मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

झांजड or झांजर

झांजड or झांजर jhāñjaḍa or jhāñjara n f झांजरमांजर f The first glimmering of dawn. Gen. reduplicated; as झां0 झां0 झालें उठा. 2 Applied also to the dusk of evening. Also written झांजडमांजड & झांजड & झांझडमां- झड. v पड, हो. Also adverbially, glimmeringly &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

झांजड, झांजर, झांजरमांजर, झांझडमांजड, झांझडमांझड      

न. स्त्री.       १. पहाटेच्या वेळचा मंद उजेड; झुंजुमुंजु; अंगावरील लव दिसण्याजोगी पहाट. उदा. झांजड झांजड झालें कीं लागलेंच औषध घ्या. (क्रि. पडणे, होणे.) २. सायंकाळचा संधिप्रकाश : ‘झांजर पडतां घेऊन पळे हा रांडमुंडेचा नित भारा ।’ – प्रला २४०.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

झांजर

झांजड or झांजर nf झांजरमांजर f The first glimmering of dawn. Applied also to the dusk of evening.

वझे शब्दकोश

वि. जीर्ण झालेला; झिरझिरीत, विरविरीत झालेला (कपडा इ॰). 'एका अंगावर झांजर शेला तो जातो चुरचुरा ।' -पला ८३. [सं. जर्जर; हिं. झांझर = फाटलेला]

दाते शब्दकोश

पु (हत्ती, बैल, घोडा इ॰ कांच्या पायांत घाला- वयाचा) वाळ्यासारखा झणझण वाजणारा दागिना. -खानगी खातें, लागतीचे नियम (बडोदें) पृ. ५२ व ५५. [झांज]

दाते शब्दकोश

झांजर      

वि.       जीर्ण, झिरझिरीत, विरविरीत झालेला (कपडा इ.) : ‘एका अंगावर झांजर शेला तो जातो चुरचुरा ।’ – पला ८३. [सं. जर्जर]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु.       (हत्ती, बैल, घोडा इ.च्या पायात घालायचा) वाळ्यासारखा झणझण वाजणारा दागिना.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

झा(झां)जरणें

उक्रि. १ घसवटणें; खरडणें; खर- चटणें ' चंद्रिकेच्या अंगावर झाजरल्यासारखें झालें.' -निचं १४. २ (ल.) (राजा.) फसवणें; एखाद्याला टोपी किंवा गोता घालणें. ३ वाप- रून खराब होणें; जीर्ण, जर्जर होणें; झिजणें; छिन्नभिन्न करणें; खराब होणें, करणें. 'ती जखम झाजरल्याइतकी... कठीण ठरली नाहीं.' -झांमू २.४. (ल.) पीडणें; पीडा देणें. 'झांजरलीं पंचबाणें एक- मेकावरी पडितीं हरणें ।' -भाए ४३०. [सं. जर्जर; म. झांजर] (वाप्र.) झाजर माडाचे गरे खाणें- (उप.) झाडावरून पडून अंग खरचटल्यानें, ठेचल्यानें पीडित होणें. झांजरता-वि. ओझरता पहा. झांजरसा-वि. झिजलेला; जर्जर झालेला. 'दोन्ही खांद्याला दोन्ही घट्टे बांधल्या गरशी । वांकडा हातखुळा देह झाली झांजरसी ।' -पला ८०. [झाजरणें]

दाते शब्दकोश

झांजड-र, झांजरमांजर, झांज(झ)ड मांज(झ)ड

नस्त्री. १ पहाटेच्या वेळचा झुंजरूक मुंजरूक; झुंजुमुंजु; अंगावरील लव दिसण्याजोगी पहांट. (सामान्यताः द्विरुक्तीनें) उदा॰ 'झांजड झांजड झालें कीं लागलेंच औषध घ्या.' (क्रि॰ पडणें; होणें). २ सायंकाळचा संधिप्रकाश. 'संध्याकाळीं मागत फिरतो महारा- पोरा पशीं चारा । झांजर पडतां घेऊन पळे हा रांडमुंडेचा नित भारा ।' -प्रला २४०. -क्रिवि. अंधुकअंधुक; मिणमिण. [सांज?]

दाते शब्दकोश

झिळमिटा-मिट्यार

पु. (गो.) झुंजमुंज; झांजड; झांजर- मांजर. झिळमिळणें पहा.

दाते शब्दकोश