आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
तमतम
स्त्री. (व.) कुरकुर; पिरपिर. 'सासुचा सासुर- वास । करते तमतम । घालूं तोंडाला कुलूप । करूं बाई किती सम ।' -वलो ९३. [ध्व.]
टमटम
स्त्री. घोड्याची एक प्रकारची गाडी. [ध्व.] ॰नगरी-स्त्री. १ प्रसिद्धि; डांगोरा; गाजावाजा. २ जेथें पुष्कळ गप्पीदास व चहाडखोर लोक राहतात तें गांव; गप्पांचे आगर. ॰राज्य-न. १ बेशिस्त, अव्यवस्थित कुटुंब, जमात, समाज. २ गोंधळ; अव्यवस्था. म्ह॰ बजबजपुरी आणि टमटम राज्य.
स्त्री. एक घोडागाडी.
तमतम
स्त्री. कुरकुर; पिरपिर : ‘सासुचा सासुरवास । करते तमतम ।’ – वलो ९३. (व.) [ध्व.]
टमकी, टमटम
पहा : टिमकी, टिमटिम टमकी
टमकी, टमटम
टिमकी, टिमटिम पहा.
टमटम
स्त्री. १. आवाज; गलबला २. वाद्यांचा ध्वनी. ३. बोभाटा.
क्रिवि. चटकन.
स्त्री. १. एक प्रकारची घोडागाडी. २. सहा आसनी रिक्षा.
संबंधित शब्द
बलबल or बलबलपुरी
बलबल or बलबलपुरी balabala or balabalapurī f (बकबल Imit. पुरी A town.) A term for a place or a scene of uproar and tumult; a bear-garden, a Babel. 2 Disorder, confusion, tumultuousness; disregard of rule and discipline, or of grade and class, or of the distinctions of caste or of clean and unclean &c. v मांड, कर. Pr. बलबलपुरी आणि टमटम राज्य.
बलबल, बलबलपुरी
स्त्री. १ दंगलीचें, धुमाकुळीचें ठिकाण; बाजार. २ अव्यवस्था; अंधेरनगरी; गोंधळ; अंदाधुंदी; नियम इ॰कांकडे दुर्लक्ष; वेशिस्ती. (क्रि॰ मांडणें; होणें; करणें). 'राजेलोक ऐषआरामी झाले म्हणजे...सगळी बलबलपुरी होऊन जाते.' -बाजी. [बलबल + पुरी = शहर] म्ह॰ बलबलपुरी आणि टमटम राज्य.
टिमटिमा
क्रिवि. टमटम; ढमढमा; टिमकीच्या आवाजा- सारखा आवाज होऊन. [ध्व.]
टिमटिमा
क्रिवि. टमटम; ढमढमा; टिमकीच्या आवाजासारखा आवाज होऊन. [ध्व.]
टमकी
टमकी ṭamakī & टमटम Usually टिमकी & टिमटिम.
बाजार
पु. १ मंडई; दाट; पण्यवीथिका; दुकानें मांडून क्रयविक्रय जेथे चालतो तो; पेठ; गंज (बाजार, हाट व गंज यांच्या अर्थांत थोडा भेद आहे. बाजार म्हणजे रोज किंवा आठवडयानें किंवा नियमित वारीं भरणारा. हाट म्हणजे फक्त नियमित वेळींच भरणारा बाजार व गंज म्हणजे बाजारपेठ. २ खरेदीविक्री, क्रय- विक्रयाकरितां जमलेला समुदाय. ३ (ल.) प्रसिद्धि; बोभाटा; बभ्रा; गवगवा. ४ (ल.) गोंधळ; पसारा; अव्यवस्था; अव्यवस्थित कुटुंब किंवा घर. ५ (ल. कु.) मासळी. [फा. बाझार] म्ह॰ बाजारांत तुरी भट भटणीला मारी. (वाप्र.) ॰करणें-पाहिजे असलेली वस्तु बाजा- रांत जाऊन विकत आणणें, घेणें. ॰मांडणें-अनेक पदार्थ इतस्ततः अव्यवस्थितपणें पसरणें. ॰भरविणें-अनेक माणसें-ज्यांचा कांहीं उपयोग नाहीं परंतु घोंटाळा मात्र होतो अशीं-एके ठिकाणीं गोळा करणें. ॰भरणें-(ल.) कलकलाट करणें; गोंधळ माजविणें; पसारा पसरणें. गेला बाजार तरी-किमानपक्षीं; निदान; कमीतकमी; बाजार होऊन गेल्यावर विकला तरी. 'गेला बाजार तरी त्या पागोटयाचें पांच रुपयें मिळतील.' बाजारच्या भाकरी भाजणें-नसत्या उठाठेवी करणें; लुडबुड करणें; विनाकारण मध्येंच तोंड घालणें. (वेड्यांचा) बाजार पिकणें-बलबलपुरी होणें; सर्वच मूर्ख माणसें जमणें; टमटम राज्य होणें. बाजारांत पांच पायलीनें (विकणें मिळणें)-अत्यंत स्वस्त दरानें; माती- मोलीनें (नकारार्थीं योजना) उभ्या बाजारांत-भर बाजारांत; सर्वांसमक्ष (जाहीर करणें, सांगणें). सामाशब्द- ॰अफवा- अवाई-गप्प-बातमी-स्त्री. निराधार बातमी; कंडी; निराधार वार्ता; चिलमी गप्प. [फा. बाजार + अर्थ. अफवा, अवाई, गप्प] ॰करी-वि बाजारांत विकणारा किंवा विकत घेणारा (मनुष्य); दुकानदार किंवा गिर्हाईक. [बाजार + करणें] ॰खोर-वि. (नाग.) जगाला तमाशा दाखविणारा; खाजगी गोष्टी चवाठ्यावर आणणारा. [फा.] ॰चलन-चलनी-वि. बाजारांत चालू असलेलें, चालणारें (नाणें). ॰निरख-पु. १ बाजारभाव; बाजारांतील दर, -वि. अठ्ठ्ल; बिलंदर. 'बाजारनिरखा सोदा.' -क्रिवि. प्रसिद्धपणें; सर्व लोकांत; गाजावाजा करून; बेइज्ज्त करून. (नेहमीं वाईट अर्थानें उपयोग). (क्रि॰ करणें). 'त्याची बाजारनिरख फजिती झाली.' ॰पट्टा-पु. (गुळाची अडत) कसर; दरशेंकडा साधारणतः १२ आणेप्रमाणें कापलेली रक्कम. ॰फसकी-गी-स्त्री. बाजारांत विक्री- साठीं येणार्या मालावरील सरकारी पट्टी (पसाभर धान्य घेणें). ॰बट्टा-पु. प्रमाण मानलेल्या नाण्याशीं बाजारांतील इतर नाण्यांचे दर, प्रमाण. ॰बसका-पु. बाजारांतील दुकानांवरील कर. -वाडमा ९.७०. ॰बसवी-बसणी-बुणगी-बुंदगी, बाजाराचीखाट, बाजारीण-वि. वेश्या; कसबीण. [फा. बाझार + सं. उपवेशनी] ॰बसव्या-वि. (ल.) निर्लज्ज; अडाणी व दांडगा; शिवराळ व भांडखोर; असभ्य. ॰बुणगें-न. १ फौजेबरोबर असणारी अवांतर माणसें; फौजेबरोबर असणारे दुकानदार इ॰ गैरलढाऊ लोक; कर खान. २ कामाशिवाय जमलेला मनुष्यसमुदाय. ३ (ल.) फट- कुर्यांचा अगर चिंधोट्यांचा गठ्ठा; कतवार; निपटारा; सामुग्री. [फा. बाजार बुन्गाह्] ॰बैठक-स्त्री. बाजारांतील किंवा यात्रेंतील दुकाना- वरील कर. ॰भरणा-भरती-पुस्त्री. १ बाजारांत फक्त ठेवण्याच्या किंमतीची परंतु मोलहीन, कुचकामाची वस्तु; खोगीरभरती. २ (ल.) नीच व निरुपयोगी मनुष्य. ॰भाव-पु. बाजारांत चालू असलेला दर; बाजारनिरख. ॰महशूर-वि. बाजारांत लहानापासून थोरापर्यत सर्वांना माहित असलेला; गाजावाजा झालेला; प्रसिद्ध. ॰वाडा-पु. १ बाजार भरण्याची जागा; मंडई. २ (ल.) अव्य- वस्थित कुटुंब किंवा घर. ॰शिरस्ता-पु. बाजारांतील सामान्य वहिवाट, चाल, (रिवाज दर इ॰ चा). [बझार + फा. सर्रिश्ताह्] ॰हाट-स्त्री. बाजारपेठ; बाजारखरेदी. बाजारी-वि. १ बाजारा- संबंधीं; बाजारचा; पेटेंतील. २ ऐकीव. 'कागदो पत्रींचें वर्तमान नव्हे बाजारी आहे.' -ख. ८.३९७६. ३ (ल.) नीच; हलकट; असंभावित; लुच्चा. ४ सामान्य; साधारण; भिकार; वाईट (वस्तु).