मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

डोळा      

पु.       १. रंग, रूप वगैरे जाणण्याचे इंद्रिय; नेत्र; नयन; चक्षु; नेत्रेंद्रियाचे स्थान. २. दृष्टी; नजर; लक्ष; कटाक्ष. ३. (ल.) अंतर्दृष्टी; आकलनशक्ती; ज्ञानचक्षू. [सं. दोल्] (वा.) डोळा असणे –एखाद्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी टपून असणे, बसणे; अभिलाषा असणे. डोळा ओळखणे, जाणणे, समजणे, ताडणे –दुसऱ्याच्या मनाचा कल समजणे; आशय, अभिप्राय ताडणे. डोळा घालणे, मारणे –१. डोळा मिचकावून खूण करणे. २. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी एखाद्या बाईकडे पाहून डावा डोळा मिचकावणे. डोळा चुकविणे –दृष्टीस न पडणे; भेट घेण्याचे टाळणे; नजरेला नजर भिडू न देणे. डोळा ठेवणे –एखाद्या वस्तूच्या प्राप्तीची इच्छा करणे. डोळा देणे –बारीक नजर ठेवणे : ‘गृध्रासम डोळा दिधला.’ –संगी ४१. डोळा न उघडणे –१. ग्लानी येणे; आजारामुळे निपचित पडणे. २. आपली चूक लक्षात न घेता मग्रूरपणे वागणे. ३. पाऊस न थांबणे. डोळा पाहणे –डोळे वटारून पाहणे. डोळा प्राण ठेवणे –पहा : डोळ्यांत प्राण ठेवणे. डोळाभर झोप घेणे –चांगली झोप घेणे. डोळे उगारणे, डोळा गुरकावणे –डोळे वटारणे. डोळे उघडणे –आपले कर्तव्य, हिताहित वगैरेकडे लक्ष वेधणे, सावध होणे; अनुभवाने, चट्टा बसल्याने, नुकसान झाल्याने शहाणे होणे. डोळे उरफाटणे, फिरणे, चढणे –(श्रीमंतीमुळे) मदांध होणे. डोळे मोठे(केवढे) करणे –डोळे वटारणे; रागावून पाहणे : ‘मी नुसतें त्याचें नांव घेतलें मात्र, तो बाईसाहेबांनीं केवढे डोळे केले तें तूं पाहिलेंस ना?’ –फाल्गुन. डोळे खाणे –पेंगणे; डुलकी घेणे. डोळेगावची कवाडे लागणे –अंध होणे. डोळे गाळणे –आवाज न करता रडणे. डोळे चढणे – (दारू, जागरण, ऊन, राग यांमुळे) डोळे उग्र, लाल दिसणे. डोळे चढवून बोलणे –रागाने बोलणे. डोळे चोरणे –तोंड लपविणे; भेट चुकविणे; नजर टाळणे; फसविणे; डोळ्यांत धूळ टाकणे : ‘त्याशीं कसें बोलावें याची आज्ञा आली पाहिजे. डोळे चोरले असतां पत जाते.’ –मइसा ५·२१०. डोळे जळणे –द्वेषामुळे बरे न पाहवणे. डोळे जाणे –अंधत्व येणे. डोळे झाकणे, ढापणे –१. मरणे; प्राण सोडणे. २. दुर्लक्ष, हयगय करणे; कानाडोळा करणे. डोळेझाक करणे –दुर्लक्ष करणे. डोळे तरारणे –डोळ्यांत पाणी येणे : ‘डॉ. मार्टिनचे डोळे गेल्या दोन दिवसांत प्रथमच तरारले.’ –एल्गार १४३. डोळे ताटवत बसणे –वाट पाहात बसणे : ‘उगं कां बोलणं वाढवत, रातचं डोळं ताटवत बसलाय.’ –आपा ७. डोळे ताठणे –अरेराव, मगरूर बनणे, होणे. डोळे ताणून पाहणे, डोळे फाकणे –तीक्ष्ण नजरेने पाहणे. डोळे तांबडे–पिवळे करणे –रागाने लाल होणे; उग्र नजरेने, डोळे फाडून पाहणे. डोळे दाखविणे –डोळे वटारणे. डोळे निवणे, निवविणे, थंड होणे –एखादी ईप्सित, प्रिय वस्तू पाहून समाधान पावणे; कृतकृत्य होणे : ‘कृष्णा म्हणे निवविले डोळे त्वां बा यदूत्तमा माजे ।’ –मोएषि ३·३१. डोळे निवळणे–१. डोळे येऊन बरे होणे; डोळे फिरून स्वच्छ होणे. २. (वेडानंतर) पूर्ववत ताळ्यावर, शुद्धीवर येणे. डोळे पठारास, पाताळात जाणे –आजार, अशक्तता इ.मुळे डोळे खोल जाणे. डोळे पांढरे करणे –१. (डोळे पांढरे होईतोपर्यंत) अत्यंत क्रूरपणाची शिक्षा देणे. २. मृत्युपंथास लागणे. डोळे पापी असणे –डोळ्यांना नेहमी विलासी, विषयी, कामुक असे मानण्यात येते. प्रथम (तेच) पाप करतात. डोळे पाहून वागणे, चालणे –एखाद्याच्या मनाचा कल पाहून वागणे; तब्येत ओळखणे. डोळे पिंजारणे, फिंदारणे, फाडणे –(रागाने) डोळे वटारणे, क्रूर करणे. डोळे पुसणे –१. रडायला लागणे; वाईट वाटणे. २. सांत्वन करणे. डोळे पोंढळणे –डोळे खोल जाणे. डोळे फाटणे –१. आशा जास्त वाढणे; महत्त्वाकांक्षी बनणे. २. आश्चर्यचकित होणे. डोळे फाडणे –१. रागावणे; डोळे वटारून पाहणे. २. अंतकाळी डोळे निश्चल उघडे ठेवणे; डोळे थिजणे. डोळे फिरणे, फिरवणे –१. घेरी, चक्कर येणे. २. मगरूर, उन्मत्त होणे. ३. (मरणसमयी) डोळे फिरवू लागणे. ४. (करारासंबंधी) बेत फिरणे; मत बदलणे; माघार घेणे. डोळे फिरवणे – (रागाने) डोळे वटारणे; चेहरा उग्र करणे; अवकृपेने पाहणे. डोळे फुटणे –१. अंध होणे; डोळे जाणे. २. दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून मत्सरग्रस्त होणे. डोळे फोडून वाचणे–लक्षपूर्वक वाचणे. डोळे बांधणे –१. भारणे; नजरबंदी करणे (जादूटोणा इ.नी). २. डोळ्यांत माती फेकणे; फसविणे. डोळे भरणे –अश्रूंनी डोळे भरून येणे; रडू येणे. डोळेभर, डोळाभर, डोळे भरून पाहणे –तृप्त होईपर्यंत एखादी वस्तू पाहणे. डोळे मिटणे –मरणे; डोळे झाकणे. डोळे मुरडणे –१. वाकडी नजर करून, संशयितपणे पाहणे. २. काण्या डोळ्याने पाहणे; एके बाजूस पाहणे : ‘डोळे मुरडुनि सहज बघे ती ।’ –शाकुंतल (अंक २). डोळे मोडणे –१. डोळे मिचकावणे; डोळ्याने खुणा करणे. २. ऐटीने, चोखंदळपणे डोळे उचलणे, वर करणे; नखऱ्याने पाहणे. डोळे लवणे –डोळ्याच्या पापणीचे स्फुरण होणे. (शुभाशुभसूचक). डोळे लाल करणे, डोळे वटारणे –१. रागावणे. २. एखाद्यावर उलटणे. डोळे लावून बसणे –आतुरतेने वाट पाहणे. डोळे होणे –माहिती होणे, सावध होणे (कामधंदा, अभ्यास इ.संबंधी). डोळ्याला डोळा मिळविणे, भिडविणे –उद्धटपणाने टक लावून पाहणे. डोळ्याला डोळा लागणे –झोप येणे; झोपेने डोळे मिटणे. डोळ्यांआड करणे –दुर्लक्ष, कानाडोळा करणे. डोळ्यांचा अंधार करणे –उजेडात चुकणे; धडधडीत चूक करणे. डोळ्यांचे कडू मोडणे –डोळा लागणे; डुलकी येणे. डोळ्यांची खोगरे होणे, डोळ्यांच्या खाचा होणे, डोळ्याची भिंत होणे –दृष्टी जाणे; अंध होणे. डोळ्यांचे पारणे फिटणे, होणे –उत्कंठतेने अपेक्षिलेली वस्तू पाहावयास मिळून मन तृप्त होणे. डोळ्यांचे दिवे करणे –सतत नजर ठेवीत अत्यंत काळजी घेणे. डोळ्यांच्या वाती करणे –डोळे ताणणे, डोळ्यांनी जास्त काम करणे. डोळ्यांत अंजन घालणे –कान–उघाडणी करणे; वस्तुस्थितीची जाणीव करून देणे. डोळ्यांत कुरूप, कुरुंद असणे –असूया वाटणे; एखाद्याविषयी मत्सरग्रस्त असणे. डोळ्यांत खुपणे, सलणे –१. डोळ्यांस वेदना होणे. २. मत्सरग्रस्त होणे (दुसऱ्याचे गुण, धन इ. पाहून). (व.) डोळ्यांत गंगाजमना येणे, डोळे भरून येणे–रडू येणे. डोळ्यांत जहर उतरणे, डोळ्यात सलणे, खुपणे –दुसऱ्याचे वैभव इ. पाहून हेवा वाटणे. डोळ्यांत जाळ पेटणे –संतापाने डोळे लाल होणे. डोळ्यांत जीव गोळा होणे –व्याकुळ होणे. डोळ्यांत तेल घालून जपणे –अतिशय काळजी घेणे; जपणे; लक्ष देणे. डोळ्यांत तेल घालून पाहणे –फार बारकाईने पाहणे; सूक्ष्म नजरेने पाहणे; पाळत ठेवणे; बारीक चौकशी करणे. डोळ्यांत धूळ, माती घालणे, फेकणे –फसविणे; नजरबंद करणे. डोळ्यांत पाणी असणे –लाज वाटणे; विनय, मर्यादा असणे. डोळ्यांत प्राण ठेवणे –मरणापूर्वी एखाद्या गोष्टीची इच्छा ठेवणे. डोळ्यांत प्राण येणे, उरणे –१. मरणाच्या द्वारी असणे. २. इच्छित वस्तू (माणूस इ.) पाहण्या–मिळण्या–भेटण्याकरिताच केवळ प्राण गुंतलेला असणे. डोळ्यांत बोट घातले तरी न दिसणे –अतिशय निबिड काळोख असणे. डोळ्यांत भरणे –१. दृष्टीला आनंद, संतोष देणे. २. पटणे; मान्य होणे. डोळ्यांत माती पडणे –मत्सर वाटणे; द्वेष करणे. डोळ्यांत मावणे, सामावणे –डोळ्यांनी खाल्ला जाणे; रागाने पाहण्याने घाबरून जाणे. (नकारार्थी वाक्यांत उपयोग करतात.). डोळ्यात वात घालून बसणे –वाट पाहणे. डोळ्यांत सळई फिरविणे–डोळे काढणे. डोळ्यांत हराम उतरणे –एखाद्याच्या दृष्टीने वाईट असणे. डोळ्यांतील काजळ चोरणे –पाहता पाहता चोरी करणे. डोळ्यांतून उतरविणे –अपमान करणे. डोळ्यांतून गंगायमुना वाहणे –रडू येणे. डोळ्यांतून ठिणग्या गाळणे –रागाने डोळे लाल होणे. डोळ्यांतून पाणी काढणे –रडणे; अश्रू गाळणे. डोळ्यांनी दिवस उगवणे –रात्रभर झोप न येणे. डोळ्यांनी मारणे –प्रेमकटाक्षांनी प्रहार करणे; प्रेमकटाक्ष टाकणे. डोळ्यांनी रात्रदिवस काढणे –एकसारखे जागत बसून रात्र–दिवस घालविणे. डोळ्यांनी भुई दिसेनाशी होणे –उन्मत्त होणे (संपत्ती इ.ने). डोळ्यांपुढे काजवे चमकणे –भोवळ येण्याची भावना होणे; घेरी येणे; भीतीने डोळ्यांपुढे अंधारी येणे. डोळ्यांवर कातडे ओढणे –१. एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे. २. बेदरकारपणे, बेफामपणे वागणे. डोळ्यांवर धूर येणे, धुराने डोळे भरणे, डोळ्यांवर पडळ येणे, चढणे, डोळ्यावर मांद येणे, चढणे –गर्वाने अंध होणे; गर्वाने कोणास न जुमानणे. डोळ्यांवर येणे –१. डोळ्यांत सलणे. २. (कीर्ती, पैसा यांनी) पूर्णपणे फुगून जाणे; धुंद होणे. डोळ्यांस पाटा, पट्टा बांधणे –डोळे मिटणे; कानाडोळा करणे; न पाहिल्यासारखे करणे. डोळ्यांस पाणी लावणे –१. नेत्राचमन करणे; एखाद्या धार्मिक विधीच्या आरंभी स्नानाऐवजी उदकस्पर्श करणे. २. अनुकूल करून घेणे; संतोषविणे : ‘आतांशा उगेच बाबाच्या डोळ्यांस पाणी लावण्यासाठी इकडे येते.’ –रत्नकांता ३. ३. (डाव्या) डोळ्याने पाहणे –१. तिरस्काराने पाहणे : ‘डाव्या डोळ्यानें तुमच्याकडे पाह्याचेसुद्धां नाहींत.’ –झांमू ६१. २. चोरून, वाकड्या नजरेने पाहणे. (दोहो) डोळ्यांची मुर्वत राखणे –एखाद्याकडे पाहायला, नजर भिडवायला भिणे, घाबरणे, कचरणे. (दुसऱ्याच्या) डोळ्यात बोट टपकन जाणे, शिरणे –दुसऱ्याचे दोष चटकन कळणे. (रुप्याचे) डोळे होणे –डोळे पांढरे होणे; मरणोन्मुख होणे. (वाकड्या) डोळ्याने पाहणे –कानाडोळा करून पाहणे; भीतभीत पण उत्कट इच्छेने पाहणे. डोळ्यावर कोक्या वाढणे –१. डोळ्यावर पडदे येणे, न दिसणे. २. माज येणे : ’ते मिळताच दाल्याच्या डोळ्यावर कोक्याच वाढल्या.’ –चिताक १०.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु.       (कृषि.) अंकुर; मोड फुटण्याची, येण्याची जागा (बटाटा, ऊस, नारळ इ.ला). (वा.) डोळा बांधणे –एका झाडावर दुसऱ्या झाडाचे कलम करणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु.       मोटेस बांधावयाचे लाकण.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु.       (सोनारी) जिन्नसाच्या इतर अंगापेक्षा तोंडाशी किंचित वाटोळा व डगळ असणारा भाग.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु.       १. पायाच्या घोट्याचे हाड; घोटा. २. गुडघ्याच्या वाटीजवळ दोन खळगे असतात, ते प्रत्येक.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु.       दुर्बिणीचे आपल्याकडे असलेले भिंग.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु.       १. माहिती, ज्ञान देणारा (माणूस, विद्या इ.). २. बातमीचा, ज्ञानाचा उगम (शास्त्र, कागदपत्र, हेर, गावचा महार इ.).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु.       (विटीदांडू) आर डाव, वकट, लेंड इ.मधील डोळ्यावरून विटी मारण्याचा डाव. (क्रि. मारणे). (कर.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु.       १. माशाच्या पाठीवरील खवला. २. सीताफळ, रामफळ, अननस इ. फळांवरील खवला. ३. मोराच्या पिसावरील डोळ्याच्या आकाराचे वर्तुळ.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु.       १. जात्याचे तोंड. २. कुंभाराच्या चाकातील खाच.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु.       लहान भोक; छिद्र (कापड, भांडे इ.चे).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु.       सोळा शेराचे माप, परिमाण; एक तृतीयांश पायली (४८ शेर = एक पायली). १२ डोळे = एक माप व ६० मापे = एक साठ. (खा.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

डोळा

पु. १ रंग, रूप वगैरे जाणण्याचें इंद्रिय; नेत्र; दृष्टि; नयन; नेत्रेंद्रियाचें स्थान. २ दृष्टि; नजर; लक्ष; कटाक्ष. ३ लहान भोंक; छिद्र (कापड, भांडें इ॰ चें). ४ मोराच्या पिसार्‍यावरील डोळयाच्या आकाराचें वर्तुळ; नेत्रसदृशचिन्ह; चंद्र; चंद्रक. ५ अंकुर, मोड फुटण्याची, येण्याची जागा (बटाटा, ऊंस, नारळ इ॰स). ६ पायाच्या घोट्याचें हाड; घोटा. ७ गुडघ्याच्या वाटीजवळ दोन खळगे असतात ते प्रत्येक. ८ माहिती सांगणारा; ज्ञान देणारा (माणूस, विद्या इ॰); बातमीचा, ज्ञानाचा उगम (शास्त्र, कागदपत्र, हेर, गांवचा महार इ॰). 'धर्माधर्म ज्ञान समजण्याचा डोळा धर्मशास्त्र.' 'पांढरीचे डोळे महार.' ९ माशाच्या पाठीवरील खवला; सीताफळ, रामफळ, अननस इ॰ फळावरील खवला, नेत्रकार आकृति. १० (खा.) १६ शेराचें माप; परिमाण. एकतृतीयांश पायली (४८ शेरांची). १२ डोळे = एक माप व ६० मापें = एक साठ). ११ कुंभाराच्या चाकांतील एक खांच. १२ (सोनारी) जिन्नसाच्या इतर अंगापेक्षां तोंडाशीं किंचित वाटोळा व डगळ असणारा भाग. १३ दुर्बिणीचें आपल्याकडे असलेलें भिंग. १४ जात्याचें तोंड. १५ मोटेस बांधावयाचें लाकण. १६ (विटीदांडू, कर). आर डाव; वकट, लेंड इ॰ मधील डोळ्यावरून विटी मारण्याचा डाव. (क्रि॰ मारणें). [देप्रा. डोल] (वाप्र.) डोळा उघडत नाहीं-एखाद्या, गर्विष्ठ मगरूर माणसाबद्दल किंवा पाऊस एकसारखा पडत अस- ल्यास म्हणतात. डोळा ओळखणें-दुसर्‍याच्या मनाचा कल समजणें, आशय, अभिप्राय ताडणें. डोळा काणा असावा मुलूक काणा असूं नये-दृष्टीला अंधत्व असलें तरी चालेल परंतु अव्यवस्था असूं नये. डोळा घालणें-मारणें-१ डोळा मिचकावून खूण करणें. २ आपलें प्रेम व्यक्त करण्यासाठीं एखाद्या (बाई) कडे पाहून डोळे मिचकावणें. डोळा चुकविणें-दृष्टीस न पडणें; भेट घेण्याचें टाळणें; नजरेला नजर भिडूं न देणें. डोळा ठेवणें-एखाद्या वस्तूच्या प्राप्तीची इच्छा करणें. डोळा जाणणें- समजणें-ताडणें-मनांतील गोष्ट जाणणें. डोळा देणें-बारीक नजर ठेवणें. 'गृध्रासम डोळा दिधला.' -संग्रामगीतें ४१. डोळा न फुटे काडी न मोडे या रीतीनें करणें-अगदीं लक्षपूर्वक, कौशल्यानें काम करणें. डोळा पाहणें-डोळे वटारून पाहणें. डोळा प्राण ठेवणें-डोळ्यांत प्राण ठेवणें पहा. 'माझी माता शोकें करून । डोळां प्राण ठेवील कीं ।' डोळा बांधणें-दुसर्‍या झाडाच्या फांदीला सालीमध्यें खांच करून निराळ्या झाडाचा डोळा कापून बसविणें. डोळाभर झोंप-चांगली झोंप. डोळे उगा- रणें-गुरकावणें-डोळे वटारणें. डोळे उघडणें-आपलें कर्तव्य, हिताहित वगैरेकडे लक्ष वेधणें; सावध होणें. अनुभवानें; चट्टा बसल्यानें; नुकसान झाल्यानें शहाणें होणें. 'आतां तरी याचे डोळे उघडले असले म्हणजे पुष्कळच चांगलें झालें म्हणा- यचें.' -उषःकाल. डोळे उरफाटणें-फिरणें-चढणें- (श्रीमंतीमुळें) मदांध होणें. डोळे (मोठे, केवढे)करणें-डोळे वटारणें; रागावून पाहणें. 'मी नुसतें त्याचें नांव घेतलें मात्र तों बाईसाहेबांनीं केवढे डोळे केले तें तूं पाहिलेंस ना?' -फाल्गुनराव. डोळे खाणें-पेंगणें; डुलकी घेणें. डोळेगांवचीं कवाडें लागणें-(मी, तो इ॰) अंध होणें. डोळे चढणें- (दारूनें, जाग्रणानें, उन्हानें, रागानें) डोळे उग्र दिसणें. डोळे चढवून बोलणें-रागानें बोलणें. डोळे जळणें-द्वेषामुळें बरें न पाहवणें; जळफळणें. डोळे जाणें-अंधत्व येणें. डोळे झांकणें-ढापणें-१ मरणें. २ दुर्लक्ष, हयगय करणें; कानाडोळा करणें; डोळझांक करणें. ३ डोळे मिटणें; प्राण सोडणें. डोळे टळ- टळीत भरणे-अश्रूंनीं डोळे भरून येणें. डोळे तळावणें- खुडकणें-डोळे लाल होणें, उष्णतेनें बिघडणें. डोळे ताठणें- अरेराव, मगरूर बनणें, होणें. डोळे ताणून पहाणें, डोळे फांकणें-तीक्ष्ण नजरेनें पाहणें. डोळे तांबडेपिवळे करणें- रागानें लाल होणें; उग्र नजरेनें, डोळे फाडून पाहणें. डोळे निवणें, निवविणें-थंड होणें-एखादी ईप्सित, प्रिय वस्तु पाहून समा- धान पावणें; कृतकृत्य होणें. 'कृष्णा म्हणे निवविले डोळे त्वां बा यदूत्तमा माजे ।' -मोऐषिक ३.३१. डोळे निवळणें-१ डोळे येऊन बरे होणें; डोळे फिरून पूर्ववत् स्वच्छ होणें. २ (ल.) (वेडानंतर) पूर्ववत् ताळ्यावर, शुद्धीवर येणें. डोळे पठारास, पाताळांत जाणें-आजार, अशक्तता इ॰ मुळें डोळे खोल जाणें. डोळे पांढरे करणें-१ (डोळे पांढरे होईतोंपर्यंत) अत्यंत क्रूरपणाची शिक्षा देणें. २ मृत्युपंथास लागणें. डोळे पापी-डोळ्यांना नेहमीं विलासी, विषयी, कामुक असें मानण्यांत येतें; प्रथम पाप करतात ते डोळेच. डोळे पाहून वागणें-चालणें-एखाद्याच्या मनाचा कल पाहून वागणें; तब्येत ओळखणें. डोळे पिंजारणें- फिंदारणें-फाडणें-(रागानें) डोळे वटारणें; क्रूर मुद्रा करणें; डोळे पुसणें-१ रडावयास लागणें; वाईट वाटणें. २ सांत्वन करणें. डोळे पोंढळणें-डोळे खोल जाणें. डोळे फाटणें-१ आशा जास्त जास्त वाढणें; महत्त्वाकांक्षी बनणें. २ आश्चर्यचकित होणें. डोळे फाडणें-१ रागावणें; डोळे वटारून पाहणें. २ अंतकाळीं डोळे निश्चळ उघडे ठेवणें; डोळे थिजणें. डोळे फिरणें- १ घेरी, चक्कर येणें. २ (ल.) मगरूर, उन्मत्त होणें. ३ (मरण- समयीं) डोळे फिरवूं लागणें. ४ (करारासंबंधीं) बेत फिरणें; मत बदलणें; माघार घेणें. डोळे फिरविणें-(रागानें) डोळे वटारणें; चेहरा उग्र करणें; अवकृपेनें पाहणें. डोळे फुटणें-१ अंध होणें; डोळे जाणें. २ दुसर्‍याचा उत्कर्ष पाहून मत्सरग्रस्त होणें. डोळे फोडून वाचणें-लक्षपूर्वक वाचणें. डोळे बांधणें-१ भारणें; नजरबंदी करणें (जादूटोणा इ॰नीं). २ डोळ्यांत माती फेंकणें; फस- विणें. डोळेभर-डोळ्यांभर पाहणें, डोळे भरून पाहणें- तृप्ति होईपर्यंत एखादी वस्तु पाहणें. डोळे मिटणें-मरणें; डोळे झांकणें. 'आदिमाये, माझ्या डोळ्यांनीं हें पाहण्यापूर्वीं माझे डोळे कां मिटलें नाहींत.' -बाय ५.२. डोळे मुरडणें-१ वांकडी नजर करून, संशयित नजरेनें पाहणें. २ काण्या डोळ्यानें पाहणें; एके बाजूस पाहणें. 'डोळे मुरडुनि सहज बघे ती ।' -शाकुंतल अंक २. डोळे मोडणें-मारणें-१ डोळे मिचकावणें; डोळ्यानें खुणा करणें. 'डोळे मोडून वांकुल्या दावी । घुलकावित मान पै ।' २ ऐटीनें, चोखंदळपणानें डोळे उचलणें, वर करणें; नखर्‍यानें पाहाणें. डोळे येणें-अंधत्व जाऊन दृष्टि प्राप्त होणें. डोळे येणें-विणें- डोळयांस रोग येणें. डोळे लवणें-डोळयाच्या पापणीचें स्फुरण होणें (शुभाशुभसूचक). पुरुषांचा उजवा व बायकांचा डावा डोळा लवणें हें शुभसूचक लक्षण समजतात. डोळे लाल करणें-वटा रणें-१ रागावणें. २ एखाद्यावर उलटणें. डोळे होणें-माहिती होणें-सावध होणें (कामधंदा, अभ्यास इ॰ संबंधीं). डोळ्या आड-नजरे पलीकडे, पाठीमागें डोळ्यांचा अंधार करणें- उजेडांत चुकणें; धडधडीत चूक करणें. डोळ्यांचीं खोगरें- डोळ्यांच्या खांचा-डोळ्यांची भिंत होणें-कांहीं एक दिसे- नासें होणें; दृष्टि जाणें. डोळ्यांचें पारणें फिटणें-होणें-उत्कं- ठेनें अपेक्षिलेली वस्तु पहावयास मिळणें; फार दिवस इच्छिलेली गोष्ट घडून येणें. डोळ्यांच्या वाती करणें-डोळे ताणणें; डोळ्यांनीं जास्त काम करणें. डोळ्यांत कुरूप-कुरुंद असणें- असूया वाटणें; एखाद्याविषयीं मत्सरग्रस्त असणें. डोळ्यांत- खुपणें-सलणें-१ डोळ्यांस वेदना होणें. २ (ल.) मत्सरग्रस्त होणें; द्वेषबुद्धियुक्त, कलुषित मन असणें (दुसर्‍याचे गुण, धन इ॰ पाहून) डोळ्यांत गंगाजमना येणें-डोळे भरून येणें- रडूं येणें. डोळ्यांत जहर उतरणें-दुसर्‍याचें वैभव इ॰ पाहून हेवा वाटणें; डोळ्यांत सलणें, खुपणें. डोळ्यांत तेल घालून जपणें-अतिशय काळजीनें जपणें; लक्ष देणें; काळजी घेणें. डोळ्यांत तेल घालून पाहणें-सूक्ष्म नजरेनें पाहणें; पाळत ठेवणें; बारीक चौकशी करणें. डोळ्यांत धूळ, माती घालणें- फेकणें-फसविणें; नजरबंद करणें. डोळ्यांत पाणी असणें- लाज वाटणें; विनय, मर्यादा असणें. डोळ्यांत पाणी नसणें-लाज न वाटणें; आदर न वाटणें; निर्लज्ज बनणें. डोळ्यांत प्राण ठेवणें-एखादी गोष्ट पाहिल्यावर मग मरावयास तयार असणें; मरणापूर्वीं एखाद्या गोष्टीची इच्छा धरणें. डोळ्यांत प्राण येणें-उरणें-१ मरणाच्या द्वारीं असणें. २ इच्छित वस्तु (माणूस इ॰) पाहण्या-मिळण्याकरतांच केवळ फक्त प्राण गुंतलेले असणें. डोळ्यांत बोट घातलें तरी दिसत नाहीं-अतिशय, निबिड काळोख पडला असतां म्हणतात. डोळ्यांत भरणें-१ दृष्टीला आनंद, संतोष देणें. २ पटणें; मान्य होणें. डोळ्यांत माती पडणें-मत्सर वाटणें; द्वेष करणें. डोळ्यांत मावणें- समावणें-(डोळ्यांनीं खाल्ला जाणें) रागाने पाहण्यानें घाबरून जाणें. (नकारार्थीं वाक्यांत उपयोग करतात). 'तूं किती डोळे ताण- लेस तरी मी कांहीं तुझ्या डोळ्यांत मावणार नाहीं.' डोळ्यांत वात घालून बसणें-ताटकळत, वाट पहात मार्गप्रतीक्षा करणें. डोळ्यांत शरम नसणें-निर्लज्ज बनणें. डोळ्यांत हराम उतरणें-एखाद्याच्या दृष्टीनें वाईट असणें. डोळ्यांतील काजळ चोरणें-पाहतां पाहतां चोरी करणें. डोळ्यांतून उतरविणें-अपमान करणें. डोळ्यांतून पाणी काढणें-रडणें; अश्रु गाळणें. 'असें वारंवार डोळ्यांतून पाणी काढीत राहूं नये.' -रत्न ४.४. डोळ्यांनीं उजेडणें-सारी रात्र जागून काढणें. डोळ्यांनी मारणें-प्रेमकटाक्षांनीं प्रहार करणें; प्रेमकटाक्ष टाकणें. डोळ्यांनीं रात्र-दिवस काढणें-एकसारखें जागत बसून रात्र- दिवस घालविणें. डोळ्यानें भुई दिसेनाशी होणें-उन्मत्त होणें (संपत्ति इ॰नीं). डोळ्यांपुढें काजवे चमकणें-भोंवळ येण्याची भावना होणें; घेरी येणें. डोळ्याला पाणी येणें-अश्रूंनीं डोळे भरणें; वाईट वाटणें. 'आलें डोळ्याला बहु वर्षाकालीं जसें नदा पाणी ।' -मोशल्य ३०.२०. डोळ्यांवर कातडें ओढणें-१ एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणें. २ बेदरकारपणें, बेफामपणें वागणें. डोळ्या- वर धूर येणें-धुरानें डोळे भरणें-(अधिकार, संपत्ति इ॰नें) ताठणें; फुगून जाणें. डोळ्यांवर पडळ-मांद येणें-चढणें- गर्वानें अंध होणें; गर्वानें कोणास न जुमानणें. डोळ्यांवर येणें-१ डोळ्यांत सलणें. २ (कीर्ति, पैका यांनीं) पूर्णपणें फुगून जाणें; धुंद होणें. डोळ्याशीं डोळा मिळविणें-भिडविणें- (एकमेकांकडे पाहणें) नजरेशीं नजर भिडविणें; उद्धटपणानें टक लावून पाहणें. डोळ्याशीं डोळा लागणें-झोंप येणें, झोपेनें डोळे मिटणें. डोळ्यांस टिपें येणें-डोळ्यांत अश्रू येणें. डोळ्यांस पाटा(पट्टा)बांधणेंडोळें मिटणें; कानाडोळा करणें; न पाहिल्यासारखें करणें. डोळ्यांस पाणी लावणें- अनुकूल करून घेणें; संतोषविणें. 'आतांशा उगेच बाबाच्या डोळ्यांस पाणी लावण्यासाठीं इकडे येते.' -रत्न ३.३.डाव्या डोळ्यानें-१ तिरस्कारानें. 'डाव्या डोळ्यानें तुमच्याकडे पाह्याचेसुद्धां नाहींत.' -झांमू ६१. २ चोरून, वांकड्या नजरेनें. दोहों डोळ्यांची मुरवत राखणें-एखाद्याकडे पहावयास, नजर भिडवावयास भिणें, कचरणें. दुसर्‍याच्या डोळ्यांत बोट टपकन जातें-शिरतें-दुसर्‍याचे दोष चट्कन् कळतात. दोषैकदृष्टीबद्दल वापरतात. रुप्याचे डोळे होणें-डोळे पांढरे होणें; मरणोन्मुख होणें. वांकड्या डोळ्यानें पाहणें- कानाडोळा करून पाहणें. भीतभीत पण उत्कट इच्छेनें पाहणें. म्ह॰ १ दोन डोळे शेजारीं भेट नाहीं संसारी = शेजारीं राहत असूनहि क्वचितच भेटत असलेल्या मित्रांसंबंधीं योजतात. २ डोळ्यांत केर व कानांत फुंकर = रोग एक व उपाय भलताच! ३ फुटका डोळा काजळानें साजरा = व्यंग झांकण्याचा प्रयत्न. सामाशब्द- डोळुला-पु. (लडिवाळपणें) डोळा. 'वाटुली पाहतां सिणले डोळुले । दाविसी पाउले कैं वो डोळा ।' -तुगा ८२९. डोळे उजेडी-क्रिवि. १ दिवसा उजेडी; अंधार पडण्याचे पूर्वीं; उजेड आहे तों. 'डोळेउजेडीं घरीं ये. ' २ स्पष्टपणें; उघड; तोंडावर; आड पडदा न ठेवतां. 'तुझे मनांत काय तें डोळेउजेडी सांग.' [डोळा + उजेड] डोळे झांक-की-स्त्री. मुद्दाम दुर्लक्ष; कानाडोळा; हयगत; उपेक्षां. [डोळे + झांकणें] डोळे झांकणी, डोळे झांकण्याचा खेळ-स्त्रीपु. एक खेळ. डोळे झांकणें- झांपणी-ढाळणें-ढांपणें-बांधणें-नस्त्री. बैलाच्या डोळ्या- वरची झांकणी; ढापणी. डोळे फुटका-वि. दृष्टि गेलेला; आंधळा. डोळेफोड-स्त्री. १ बारीक पाहणी, चौकशी; तीक्ष्ण नजर. २ डोळे त्रासले जावयाजोगी किचकट कामामध्यें मेहनत. -वि. १ डोळ्यांस त्रास देणारें (कलाकुसरीचें, बारीक काम). २ डोळ्यास हिडिस दिसणारी; ओंगळ (वस्तु). ३ डोळ्यांत भरणारी पण निरुप- योगी सुंदर पण टाकाऊ. 'ही गाय डोळेफोड मात्र दिसत्ये पण दूध तादृश नाहीं.' [डोळा + फोडणें] डोळे भेट-स्त्री. १ शेव- टची भेट (मुलाची व मरणोन्मुख आईबापांची भेट); नुसतें एकदां शेवटचें डोळ्यांनी पाहणें. २ ओझरती, उभ्या उभ्या भेट; घाईची भेट. ३ नजरानजर; दृष्टीस पडणें. 'डोळेभेट तरी दुरून देत जा नको करूं हयगय ।' -होला १५१. डोळे मिचका-क्या-वि. डोळेपिचक्या; डोळे मिचकावणारा. डोळेमोडे-स्त्री. नेत्रसंकेत; डोळे मिचकाविणें. डोळेमोडणी-वि. डोळे मोडणारी (मूढ होऊन); डोळे फिरविणारी. 'चौघी डोळेमोडण्या ।लाजोनियां तटस्थ ।' -ह ३.५. डोळेलासु-वि. डोळ्यांत अंजन घालणारा; वठणीवर आणणारा. 'साभिमानिआ देवां डोळेलासु ।' -शिशु १५६. [डोळा + लासणें = डाग देणें] डोळ्याचा त्रास- दाब-पु. डोळ्यानें भीति घालणें; दाबणें; भेदक नजर. डोळ्याचा पडदा-पु. डोळ्यावरचें आवरण; नेत्रदोष. डोळ्याचा मद-पु. डोळ्याची लाली, लालबुंदपणा (मद्यपान, क्रोध, गर्व इ॰मुळें). डोळ्याची खूण-स्त्री. नेत्रकटाक्ष, संकेत. 'तुमच्यापैकीं कोणी तरी बाईनें डोळ्याची खूण करून त्याला तेथून बाहेर काढला असेल.' -बाय २.१. डोळ्याची जीभ-स्त्री. पापण्यांच्या आंतील बाजूस अस्तराप्रमाणें असणारी त्वचा. डोळ्यांतलें काजळ चोरणारा-नेणारा-पु. वस्ताद; अट्टल चोर. -वि. अतिशय कुशल; हुशार; धूर्त. डोळ्यादेखत-तां, डोळ्यापुढें-क्रिवि. १ डोळ्यांसमोर; प्रत्यक्ष. 'माझ्या डोळ्यांदेखत तो निसटला.' २ प्रत्यक्ष; स्वतः पाहिल्यापैकीं; स्वतःच्या आयुष्यांतील, अनुभवां- तील; जिवंतपणीं. 'म्हातारीचें डोळ्यादेखत पोराचें लग्न होतें म्हणजे बरें.' डोळ्यांभर-क्रिवि. डोळे भरून; अवलोकनानें नेत्र तृप्त करून (पाहणें); दृष्टि संतुष्ट करून. डोळ्यांमागें-पर- भारें-क्रिवि. पाठीमागें; गैर हजेरींत; अप्रत्यक्ष.

दाते शब्दकोश

डोळा ḍōḷā m An eye. 2 fig. Sight, vision, attention, regard &c. 3 A little hole;--as burnt in a cloth, burst through a vessel &c. 4 The eye of the peacock's fan. 5 The eye (of a coconnut, cashewnut, a sugarcane, potato &c.) 6 The eye of the leg, i. e. the anklebone. 7 The cavity on the side of the knee; observable on stretching the leg. 8 A source in general of knowledge or information; viz. a Shástra or scientific treatise, a scout or emissary, the Mahár of a village &c. 9 A scale of a fish; a square of a custard apple, pine apple &c. 10 (In Khándesh.) A measure of capacity, of sixteen sher or ⅓ of a पायली. (The पायली there is forty-eight sher. As three डोळे make one पाय- ली, so twelve डोळे or four पायली make one माप, and sixty मापें make एकसाठ. One fourth of a पायली or twelve sher is चौथा or चोथा) 11 The dint or little cavity in the flint of the potter's wheel. चार डोळे होणें g. of s. & o. reciprocally. To have an interview, to meet. डोळा ओळखणें g. of o. To be acquainted with the whims, ways, and will of, or with the mind of. डोळा काणा असावा मुलूक काणा असूं नये Let there be Eye-blindness, but let there not be Civil darkness and disorder. डोळा घालणें To wink; to intimate by the eye: also to cast the eye at; to glance at. डोळा चुकाविणें or मारणें g. of o. To elude the observation of. डोळा जाणणें-समजणें-ताडणें To discern the mind of. डोळा न फुटे काडी न मोडे ह्या रीतीनें करणें To execute or perform with great care and skill. डोळां प्राण ठेवणें See डोळ्यांत प्राण ठेवणें. Ex. माझी माता शोकें करून ॥ डोळां प्राण ठेवील की ॥. डोळाभर झोप A good bit of sleep; and, neg. con., not a wink of sleep. डोळे उमारणें or गुरकाविणें To browbeat; to scowl; to glare at fiercely. डोळे उघडणें To open the eyes (to one's duty or interest). डोळा उघडत नाहीं Said of a disdainful or proud man: also of rain which pours unceasingly. डोळे उरफाटणें-फिरणें-चढणें g. of s.To become blind: (as on an accession of wealth &c.) Lit. To start out or turn up or in. डोळेखाणें g. of s. To nod from drowsiness. डोळेगांवचीं कवाडें लागलीं (I, he &c.) am blind. डोळे चढणें g. of s. To look fiery--the eyes: (from intoxication, watchfulness, pride.) डोळे चढवून बोलणें To speak sharply and angrily. डोळे जळणें g. of s. To burn with envy; to be pained at the sight of. डोळे झांकणें or ढांपणें To be remiss, heedless, careless. 2 To connive at or to overlook. 3 To close the eyes in death. डोळे टळटळीत भरणें g. of s. To have one's eyes glistening with tears. डोळे ताठणें g. of s. To become haughty or disdainful. डोळे तांबारणें (To make the eyes red upon.) To glare at fiercely. डोळे निवणें or थंड होणें g. of s. To experience the gratification of seeing a much desired person or thing; to obtain the desire of one's eyes. डोळे निवळणें g. of s. To get one's eyes clean and bright again after ophthalmia &c. 2 fig. To recover clear mental vision (after any infatuation). डोळे पठारास जाणें g. of s. To have sunken eyes (eyes gone down into the back) from fasting or disease or in death. डोळे पांढरे करणें g. of o. To beat unmercifully. 2 g. of s. To be on the point of death. डोळे पाताळांत जाणें g. of s. To have one's eyes sink in. डोळे पापी The eyes spoken of as (ever) lascivious or wanton. डोळे पाहून वागणें or चालणें g. of o. To conduct one's self with obsequious conformity to the will of. डोळे पिंजारणें or फिंदारणें or फाडणें To look fiercely; to glare at angrily. डोळे पुसणें (To wipe or rub the eyes.) To cry, blubber, pipe. 2 g. of o. To comfort or console; to wipe the tears of. डोळे पोंढळणें g. of s. To get sinking or hollowness of eyes. डोळे फाटणें g. of s. To have one's expectations enlarged. डोळे फाडणें To set the eyes and glare (as in death). डोळे फिरणें g. of s. To be dizzy or to have swimming in the eyes. 2 fig. To become disdainful or supercilious. 3 To turn up the eyes (in dying). 4 To change the mind (as from an agreement); to fight shy. डोळे फिरविणें To turn up the eyes; to be dying: also to glare at angrily; or to begin to look at with estrangement or disfavor. डोळे फुटणें g. of s. To become blind or impaired in vision. 2 To be pained at the sight (of another's prosperity or success). डोळे बांधणें To fascinate the eyes (as by spells and charms). 2 To blindfold, hoodwink, befool, bamboozle. डोळेभर or भरून पाहणें To feast the eyes upon; to fill the sight with. डोळे मुरढणें To cast the eyes askance; to look aside. डोळे मोडणें To wink at or leer at; to ogle or shoot glances. Ex. डोळे मोडून वांकुल्या दावी ॥ घुलकावीत मान पैं ॥. 2 To turn up the eyes fastidiously or superciliously डोळे येणें in. con. To obtain sight--a blind person. डोळे येणें or डोळे विणें g. ofs. To get ophthalmia. डोळे लवणें g. ofs. To have a twitching in the eyes. A favorable indication. डोळे होणें in. con. To become acquainted with or aware of (any business or study, the wiles of another &c.) डोळ्यांचा अंधार करणें To err against light. डोळ्यांची खोगरें or डोळ्यांच्या खांचा or डोळ्यां- ची भिंत होणें g. of s. To become or be stone blind. डोळ्यांच्या वाती करणें To strain the eyes. डोळ्यांचें पारणें फिटणें or होणें To see at length an object or an accomplishment anxiously longed after; to have the desire of one's eyes gratified. डोळ्यांत कुरूप or कुरुंद असणें g. of s. To be envious about: also to have hatred or a grudge against. डोळ्यांत खुपणें or सलणें To pain the eyes--another's merit, wealth &c. डोळ्यांत जहर उतरणें To be pained at the sight of (another's fortune &c.) डोळ्यांत तेल घालून जपणें To watch intently; to be very vigilant. डोळ्यांत तेल घालून पाहणें To inspect narrowly; to pore over; to pry or peer into. डोळ्यांत धूळ or माती घालणें To throw dust into the eyes of; to blind. डोळ्यांत पाणी नसणें g. of s. To have no reverence for or sense of shame at: or -असणें To have shame, modesty &c. डोळ्यांत प्राण ठेवणें To be ready to die after seeing. See below. डोळ्यांत प्राण येणें or उरणें To be in the last lingerings of life; to be tarrying only to see (some greatly desired object). डोळ्यांत बोट घातलें असतां तरीं दिसत नाहीं Used in expression of the sense of gross darkness. डोळ्यांत भरणें To fill or satisfy the sight. डोळ्यांत माती पडणें g. of s. To envy. डोळ्यांत मावणें or समावणें g. of o. To be swallowed up or confounded by the scowl or fierce glare of. Gen. neg. con. Ex. तू आप- ला ऐस मी कांहीं तुझ्या डोळ्यांत मावणार नाहीं. डोळ्यांत वात घालून बसणें To sit up watching. डोळ्यांत शरम नसणें To be brazenfaced. डोळ्यांत हराम उतरणें To be evil in the eyes of. डोळ्यांनीं उजेडणें To watch throughout the night. डोळ्यांनीं मारणें To strike with amorous glances; to ogle. डोळ्यांनीं (रात्र or दिवस) काढणें or उगविणें, To spend (the night or the day) in wakefulness. डोळ्यांवर कातडें ओढणें To connive or wink at. 2 To act blindly and rashly; to resist conviction &c. डोळ्यांवर धूर येणें g.of s. or धुरानें डोळे भरणें To be blinded (by riches, honors &c.) डोळ्यांवर पडळ येणें g. of s. To become proud-blind. डोळ्यांवर येणें g. of o. To be an eyesore unto. 2 g. of s. To get blinded (as by wealth or fame). डोळ्याशीं डोळा मिळविणें To look at audaciously or pertly. डोळ्याशीं डोळा लागणें To close in sleep--eyes. डोळ्यांस टिपें येणें To have tears come into the eyes. डोळ्यांस पाटा बांधणें (To bind a slab over the eyes.) To close the eyes; to hoodwink; to blind. दोहों डोळ्यांची मुरवत राखणें To be afraid to look in the face of. रुप्याचे डोळे होणें in con. To have silvery eyes; i. e. to be blind, or to be dying. वांकड्या डोळ्यानें पाहणें To look sideways, i. e. with timorous yet earnest desire. दुसऱ्याच्या डोळ्यांत बोट टपकन शिरतें or जातें expresses great censoriousness or the easiness of c. दोन डोळे शेजारीं भेट नाहीं संसारीं Applied to a friend in the neighborhood but seldom seen. फुटका डोळा काजळानें साजरा Applied to a deformity or a defect tricked out or varnished over.

मोल्सवर्थ शब्दकोश

डोळा m An eye. Sight. A little hole. डोळा घालणें Wink; intimate by the eye. डोळा चुकविणें Elude the observation of. डोळें उघडणें Open the eyes (to one's interest). डोळे झाकणें Connive at. Close the eyes in death. डोळे ताठणें Become haughty or disdainful. डोळे निवणें Obtain the desire of one's eyes. डोळे पांढरे करणें Beat mercilessly. Be on the point of death. डोळे पुसणें Comfort or console; wipe the tears of. Cry. डोळे फाटणें Have one's expectations enlarged. डोळे फिरविणें Turn up the eyes; be dying. डोळे फुटणें Become blind. Be pained at the sight (of another's success). डोळे भरुन पाहणें To feast the eyes upon. डोळे मुरढणें Cast the eyes askance. डोळे मोंडणें Wink at; ogle. डोळे येणें Get ophthalmia, to have sore eyes. Obtain sight. डोळे लवणें Have a twitching in the eyes. डोळ्यांच्या खांचा होणें To become stone-blind. डोळ्यांच्या वाती करणें Strain the eyes. डोळ्यांच्या पारणे फिटणें To have the desire of one's eyes gratified. डोळ्यांत खुपणें-सलणें Pain the — merit, &c. डोळ्यांत तेल घालून पाहणें Inspect narrowly. डोळ्यांत धूळ फेकणें To throw dust into the eyes. डोळ्यांत पाणी नसणें To have no sense of shame at. डोळ्यांत प्राण ठेवणें Be ready to die after seeing. डोळ्यांत प्राण येणें Be in the last lingering of life. डोळ्यांत भरणें Fill or satisfy the sight. डोळ्यांत माती पडणें Envy. डोळ्यांत वात घालून बसणें Sit up watching. डोळ्यांत शरम नसणें Be brazen-faced. डोळ्यांनी उजडणें. Watch throughout the night. डोळ्यावर कातढें ओढणें Connive at. डोळ्यांवर धूर येणें. Be blinded (by riches, &c.) डोळ्यांवर पडळ येणें. To be proud-blind डोळ्यांवर येणें To be an — to. डोळ्याशीं डोळा मिळवणें. To look at audaciously. डोळ्याशीं डोळा लागणें. To close the – sleep. रुप्याचे डोळे फोडणें To be blind or to be dying. डोळ्यांपुढे काजव दिसणें To be dizzy. डोळ्यांत केर आणि कानांत फुंकर To apply a wrong remedy to a wrong disease.

वझे शब्दकोश

पु० नेत्र, नयन, लोचन. २ लक्ष, ध्यान.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

डोला      

पु.       १. मुसलमानांचा ताबूत; ताजिया. २. डोली, पालखी, मेणा यांसारखे वाहन : ‘स्वारि सख्याची येईल कधी मिरवत डौलांत । बसुनियां चौरंग डोलांत ।’ –प्रला १३४. ३. प्रेताचे वाहन; तिरडी. [हिं., सं. दोला, क. डोळ्ळारि] (वा.) डोला जाणे – (शिवी) मढे जाणे; मरणे. डोला मिरविणे –डोला हा मुसलमानांचे प्रेतवाहनाचे प्रतीक आहे, त्याची मिरवणूक; एक शिवी : ‘ठकभटानो तुमचा डोला मिरविला.’ –जोफुसग्रं २३९.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

डोला

पु. १ मुसलमानांचा ताबूत; ताजिया. २ डोली; पालखी, मेणा इ॰ वाहन. 'स्वारि सख्याची येईल कधीं मिरवत डौलांत । बसुनियां चौरंग डोलांत ।' -प्रला १३४. ३ (हिं.) प्रेताचें वाहन; तिरडी. [सं. दोला; हिं.] ॰जाणें-क्रि. (शिवी) मढें जाणें; मरणें. 'हात् तुझा डोला गेला.' (मुसलमानांचा डोला हा प्रेतवाहनाचें प्रतीक आहे त्यावरून).

दाते शब्दकोश

डोला ḍōlā m (दोला S Swing &c.) The ताबूत or bier of & carried about in procession by Muhammadans at the Muharram.

मोल्सवर्थ शब्दकोश

डोला m The ताबूत.

वझे शब्दकोश

(सं) पु० ताबूत, ताज्या.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

डोला(ल्हा)रा

पु. डोल; लहानसा झोंपाळा; देवाचा पाळणा; झुलता देव्हारा. -एभा ९.२६६. 'अंतःकरणाचे डोल्हारीं । आत्मा निजविला श्रीहरी ।' -देकृष्णजन्म ७९. [सं. दोला; हिं डोला]

दाते शब्दकोश

अंधळा डोळा

अंधळा डोळा andhaḷā ḍōḷā m (A blind eye.) A blind person, esp. a person blind of one eye.

मोल्सवर्थ शब्दकोश

दोला

दोला m A swinging seat; a pensile bed.

वझे शब्दकोश

दोला dōlā m S A swinging seat; a pensile bed; a swing; a traveling litter.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. १ झोंपाळा; झुला; झोका. २ डोली. [सं.] ॰यंत्र-न. (वैद्यक) तेल, रस काढण्याचें यंत्र.दोलयात्रा-स्त्री. देवाला दोलांत बसवून काढलेली मिरवणूक. दोलायमान-वि. १ हलणारें; डोलणारें. 'शिर:कंपामुळें कर्णभूषणें दोलायमान होतात.' २ डळमळीत; घुटमळणारें; चंचल (चित्त.)

दाते शब्दकोश

(सं) पु० झोंपाळा, झुला.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

डोळा भरणें-करणें

डोळा बांधणें पहा

दाते शब्दकोश

गांवचा डोळा

गांवचा डोळा gāṃvacā ḍōḷā m (Village-eye.) A term for the Mahár or village-watchman.

मोल्सवर्थ शब्दकोश

कावळ्याचा डोळा

कावळ्याचा डोळा kāvaḷyācā ḍōḷā m (Crow's eye.) The name of a flower. 2 A term for very watery buttermilk.

मोल्सवर्थ शब्दकोश

पांढरीचा डोळा

पांढरीचा डोळा pāṇḍharīcā ḍōḷā m (Eye of the village-community.) A term for the village-mahár.

मोल्सवर्थ शब्दकोश

दोला      

पु.       १. झोपाळा; झुला; झोका. २. डोली. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गावचा डोळा      

गावचा वेसकर, महार, जागल्या. गावचा लोक      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कावळ्याचा डोळा      

१. एका वनस्पतीचे फूल. (राजा.) २. (ल.) फार पातळ ताक. कावळ्याची छत्री      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

एकडोळा

पु. १ एक डोळा. २ (ल.) एकुलता एक मुलगा. म्ह ‘एक डोळा तो कां डोळा म्हणावा?’ = एकच मुलगा असला तर त्याला संतति म्हणतां येईल काय? –वि. एकच डोळा असलेला.

दाते शब्दकोश

एकडोळा ēkaḍōḷā m (One eye.) A term for an only son. Pr. ए0 तो का डोळा म्हणावा Having but a single son how can we say there is offspring?

मोल्सवर्थ शब्दकोश

आख

पु. १ डोळा. ‘आखीं ल्याहीली काजळ ।’ स्त्रीगीत ३०. [सं. अक्षि; अक्षन् = डोळा] २ डोळा आणि कान यांच्या- मधील मर्मस्थान; गंडस्थल. ॰मोडणें- डोकेदुखी बरी होण्यासाठीं आखावर बिब्याच्या फुल्या घालणें.

दाते शब्दकोश

घारा

वि. १ मांजराच्या डोळ्यांच्या रंगाचा (डोळा). २ घारडोळ्या (माणूस). घारडोळ्या-वि. घारा; मांज- राच्या डोळ्यांच्या रंगाचे डोळे आहेत असा; मांजरडोळ्या. [घारा + डोळा] घारेला, घारोळा-वि. गारोळा. १ किंचित, थोडासा घारा (डोळा). २ किंचित, थोडासा घारडोळ्या. [घारा + एला, ओळ प्रत्यय] घार्‍या-वि. घारोळ्या. [घारा]

दाते शब्दकोश

घूर्णित

वि. १ गरगर फिरविलेलें; भ्रमविलेलें; भ्रमण करा- वयास लावलेलें. २ (ल.) बेसावध; धुंद. 'एकें घूर्णितें सावधें ।' -ज्ञा ११.१२६. ॰करण-न (नृत्य) उजवा हात बाजूस करून वाटोळा फिरवणें, डावा हात दोलित करणें, पायाचें स्वस्तिक करून त्या स्वस्तिकांतून पाय दूर करणें हा प्रकार. [सं.] ॰नेत्र- ॰लोचन-पु. न. १ गरगर फिरणारा डोळा. २ (ल.) (मद्य, क्रोध इ॰ कानीं) धुंद, लाल झालेला, तारवटलेला डोळा. -वि. १ ज्याचे डोळे गरगर फिरताहेत असा. २ (ल.) (मद्य इ॰ कानीं) धुंद, तारवटलेले आहेत डोळे ज्याचे असा. [सं. घूर्णित + नेत्र, लोचन = डोळा]

दाते शब्दकोश

काणा

वि. १ ज्याच्या दोन डोळ्यांपैकीं एका डोळ्याची शक्ति गेली आहे असा; एका डोळ्यानें अंधळा; एकाक्ष. 'काणीला जसें सोग्याचें काजळ शोभत नाहीं.' -कमं १.३२. २ तिरव्या डोळ्याचा, चकणा; ज्याला बुबुळें तिरकस केल्याशिवाय दिसत नाहीं असा. हाच अर्थ विशेष रूढ-प्रचारांत आहे. 'कावळा हा काणा पक्षी आहे.' ३ तिरवा डोळा (एका डोळ्यानें, दोहों डोळ्यांनीं). काणा डोळा, काणे डोळे, असे प्रयोग होतात. ४ ज्या देशांत पाहिजे असलेला जिन्नस वेळेस मिळत नाहीं किंवा जेथील भाव एकदां स्वस्त तर एकदां महाग असतात असा देश, शहर, खेडें. ज्या देशांत आपण दुष्कर्मादि केल्यामुळें पुन्हां त्या देशांत जावयास आपल्यास लाज वाटते तो देश, शहर, खेडें इ. 'डोळा काणा असावा पण मुलूख काणा असूं नये.' ५ एक पेड मोठा व दुसरा बारीक अशा तर्‍हेनें विणलेला दोर. तसेंच तिडून वांकडी झालेली खाट, माचा, बाज. ६ तिरकस; तिर्यक्; तिरपा; वक्र; वांकडा. 'जाईल काणे वाटारे ।' -दावि १५८. [सं. काण एकाक्ष का. काण] म्ह॰ १ काणा कैपती अंधळा हिकमती. २ काण्या डोळ्यानें पाहणें = कटाक्ष मारणें. ३ क्वचित् काणा भवे- त्साधु = काणा किंवा एका डोळ्यानें अंधळा मनुष्य प्रायः सुस्व- भावी नसतो बहुतकरून लबाड असतो. अंधळ्यांत काणा राजा.

दाते शब्दकोश

काणा kāṇā a (S) Of which the vision is destroyed--one of the two eyes: and attrib. blind of one eye, monoculous. S adage, क्वचित् काणा भवेत् साधुः Pauci monoculi sunt honesti. Pr. अंधळ्यांत काणा राजा or अंधळ्यांमध्यें काणा श्रेष्ठ. 2 Squint-eyed. This is the general understanding of the word. Also squint--an eye. The applications are एका डोळ्यानें or दोहो डोळ्यांनी काणा or simply, काणा, or डोळा काणा or डोळे काणे. 3 Applied to a country, town, or village of uncertain supplies and alternating cheapness and dearness; also to a country or place whither one, from his crimes or follies, is ashamed to go. Pr. डोळा काणा असावा पण मुलूक काणा असूं नये: also to a cord of which one of the strings composing it is thick and another thin: also to a warped and thus crooked (bedframe, cot, cart). 4 Oblique or slanting; cross-going or devious.

मोल्सवर्थ शब्दकोश

दृष्टि

स्त्री. १ नेत्रगोलस्थित जें पहाण्याचें इंद्रिय आहे त्याची वृत्ति, कार्य तिनें झालेलें ज्ञान; पाहण्याचें सामर्थ्य; नजर. २ (ल.) (एखाद्या गोष्टीकडे द्यावयाचें) लक्ष; अनुसंधान. 'निरं- तर शास्त्राकडे दृष्टि ठेवावी तेव्हा शास्त्र येतें.' 'त्यास पागोटें द्यावयाचें खरें परंतु माझी दृष्टि चुकली.' ३ (ल.) सत्, असत् जाणण्यास कारणीभूत असलेली मनोवृत्ति; (एखाद्याकडे पहाण्याचा, एखाद्याशीं वागण्याचा) रोंख; कल; मनोवृत्ति. 'अलीकडे त्याची दृष्टि फिरली.' ४ (राजा.) पाषाणाच्या देवाच्या मूर्तीस रुपें इ॰ काचे बसवितात त्या डोळ्यापैकीं प्रत्येक. ५ दृष्ट; वाईट, बाधक नजर. दृष्ट २ पहा (क्रि॰ होणें; काढणें). 'राधा म्हणत्ये हा ! मज पुत्रवतींचीच लागली दृष्टि ।' -मोस्त्री ५.५. -वि. पाहणारा; दर्शी पहा. समासांत उपयोग जसें. गुणदृष्टि; स्थूलदृष्टि; दोपदृष्टि इ॰. [सं.] (वाप्र.) ॰ओळखणें-(एखाद्याच्या) नजरे- वरूनच, चेहर्‍यावरून त्याचें मनोगत ओळखणें. ॰काढणें- उतरणें-ओवाळून टाकणें-एखाद्यास वाईट दृष्टीची झालेली बाधा मंत्रतंत्र, तोडगा इ॰ कानें काढून टाकणें. ॰खालून जाणें- (एखादी गोष्ट. वस्तु इ॰ एखाद्याच्या) डोळ्याखालून, नजरें- तून जाणें; स्थूलपणें माहीत असणें. 'ज्यांचे दृष्टीखालून गेलें । ऐसें कांहींच नाहीं उरलें ।' -दा १.६.९. ॰घालणें-१ डोळा मोडणें, मिचकावणें, डोळ्यानें इशारा करणें. २ (एखाद्या गोष्टी- कडे) काळजीपूर्वक पहाणें, लक्ष देणें, म्न लावणें. 'स्वर्गांगनेसीं जरि साम्य आली । परंतु तेथें दृष्टी न घाली ।' -रामदासी २.४३. ॰चढणें-गावानें फुगणें; उन्मत होणें; डोळ्यांवर धूर येणें. ॰चुकणें-विसरणेः गोंधळून जाणें. घोटाळ्यात पडणें. ॰चुकविणें, चारणें-(एखाद्याच्या) डोळ्यास डोळा न देणेः नजरेस पडण्याचें टाळणें. ॰चारणें-नजर भारून टाकणें; नजरबंद करणें. 'कीं पुढिलाची दृष्टि चोरिजे । हा दृष्टिबंधु निफजे । परी नवल लाघव तुझें । जें आपणपें चोरे ।' -ज्ञा १४.५. ॰ठेवणें देणें-राखणें-(एखाद्या गोष्टीची, वस्तूची) काळजी घेणें; लक्ष देणें. 'ठेवीना गर्भींही दृष्टिस ती नीट जळहि सेवीन ।' -मोअश्व ४.८. ॰देखणें-(काव्य) पाहणें. ॰निवळणें-१ बिघडलेले, आलेले डोळे पूर्ववत् स्वच्छ होणें. २ (ल.) गर्व, ताटा, उन्माद नाहींसा होणें. ॰पडणें, होणें, लागणें-(एखा- द्याच्या) वाईट नजरेची बाधा होणें; दृष्ट होणें. ॰फांकणें-१ गोंधळून जाणें; भांबावून जाणें. २ नजर बेताल, ओढाळ होणें. ॰फाटणें-(एखाद्याच्या) आकांक्षा, महत्त्वाकांक्षा, हेतु इ॰ वाढणें, विस्तृत होणें. ॰फिरणें-१ राग येणें. 'येतां दृष्टी त्याची फिरली म्हणे ।' -रामदासी २.९८. २ ताठा चढणें; गर्व इ॰ नें दृष्टि अंध होणें; धुंदी चढणें. ॰बंद करणें-नजर भारून टाकणें; मोडून टाकणें; नजर बंद करणें; दृष्टि चोरणें. ॰भर पाहणें-पोटभर, डोळे भरून. तृप्ति होईपर्यंत, मनमुराद पाहणें. 'पाहा जा सदृढ दृष्टि भरूनि ।' -दावि ४६. ॰मरणें-तीच वस्तु अनेक वेळां पाहिल्यानें, तीच गोष्ट अनेक वेळां केल्याने, तिच्याबदृलची भीति, आश्चर्य, हिडीसपणा इ॰ वाटेनासें होणें. 'माडावर चढून चढून भंडार्‍याची दृष्टि मेलेली असते.' दृष्टीची मुखत राखणें-(एखाद्याच्या) भावनेस मान देणें; (एखाद्यास) न आवडेल अशी गोष्ट त्याच्या समक्ष न करणें. दृष्टीचें पारणें फिटणें-जें पाहण्याविषयीं उत्कठा आहे तें पाहण्यास मिळाल्यानें समाधान पावणें. दृष्टींत न आणणें-न. जुमानणें. 'ऐसे वदोनि आणित नव्हतासि च बा परासि दृष्टींत ।' -मोगहाप्रस्थानिक २.२० दृष्टींत न येणें- (एखाद्यास) तुच्छ लेखणें; कःपदार्थ मानणें. 'ज्याच्या दृष्टींत न ते सहसुत पांडवबळी न कंसारी ।' -मोकर्ण ६.६६. दृष्टीनें शिवणें-डोळ्यांनीं पाहणें. 'म्हणतो नाहीं शिवलों दृष्टि करुनिही धराधवा हविला ।' -मोआदि २.३. दृष्टीस पडणें- आढळून येणें; नजरेप येणें; अनुभवास येणें. दृष्टीस फांटा फुटणें-दृष्टि फाटणें; दृष्टीचें सामर्थ्य वाढणें. 'जैसें डोळ्यां अंजन भेट । ते वेळीं दृष्टीसी फांटा फुटे ।' -ज्ञा १.२३. चार दृष्टि होणें-भेट होणें; नजरानजर होणें. अडव्या दृष्टीनें पाहणें-वांकड्या, काण्या डोळ्यानें पाहणें. दृष्टीचा अंमल-पु. १ पाहण्यांत, नजरेंत आलेला काळाचा अवधि. 'हा दरिद्र्याचा श्रीमंत झाला हें माझ्या दृष्टीच्या अंमलांतलें.' २ नज- रेचें कार्यक्षेत्र कर्तबगारी. 'चित्र काढणें हें दृष्टीच्या अमलांत.' दृष्टीचा खेळ-पु. नजरेनें, दृष्टीनें करावयाची चमत्कृतिपूर्ण कुशलतेची गोष्ट; नजरेचा खेळ. 'पाहून लिहिणें, चित्र काढणें, इ॰ दृष्टीचे खेळ आहेत.' दृष्टीचा खोटा-पापी-वि. दुस- र्‍याचें चांगलें पाहून मनांत जळफळणारा; मत्सरबुद्धीचा. दृष्टीचा पसारा-पु. डोळ्यांनां दिसणारें विश्व. त्या दृष्टीनें-त्या धोर- णानें. बुद्धीनें. 'पुत्राकडे पुत्रदृष्टीनें पाहिलें असतां ममता वाटतें, नाहींतर सर्व एकच आहे.' म्ह॰ १ दृष्टीआड सृष्टी आणि वस्त्रा- आड जग नागवें = जें आपल्या देखत घडत नाहीं त्याला आपण जबाबदार नाहीं व त्याचा प्रतिकार करणेंहि कठिण. २ (व.) दृष्टी माया भाता भूक = दृष्टीस मूल पडलें कीं माया उत्पन्न होते व भात पहिला तर भूक लागते. दृष्टीसमोर कांहीं वाईट घडलें तर वाईट वाटतें. सामाश्ब्द- ॰अभिनय-पु. (नृत्य.) पापण्या, पाप- ण्याचे केस, बुबुळें, बाहुल्या व भिंवया यांच्या मदतीनें केलेला अभिनय. याचे प्रकार ३४ आहेत. ते:- कान्त, भयानक, हास्य, करुण, अद्भुत, वीर, बीभत्स, शांत, स्निग्ध, हृष्ट, दीन, क्रुद्ध, दृप्त, भयान्वित; जुगुप्सित, विस्मित, शून्य, लज्जित, म्लान, विषण्ण, शंकित, मुकुल, कुंचित, जिह्म अभितप्त, ललित, अर्ध- मुकुल, विभ्रांत, विप्लुत, आकेकर, विकसित, मध्यममद, अधमपद व त्रस्त. ॰कोन-पु. विचार करण्याचें, पाहण्याचें धोरण, रोंख, मनोवृत्तिः विचारसरणी. (इं.) अँग्ल ऑफ् व्हिजन्. 'आमचा दृष्टिकोन भिन्न असल्यामुळें त्यांनीं योजिलेली भाषा आम्हांला साहजिकच पटत नाहीं.' -मसाप २.२.१११. [दृष्टि + कोन] ॰गुण-पु. नजरेनें पाहिल्यामुळें पाहिलेल्या वस्तूंचें, मनुष्याचें बरें वाईट करण्याची (एखाद्यांतील) विशिष्ट शक्ति. ॰गोचर- वि. डोळ्यांनां दिसणारें; पाहतां येणारें; दृष्टीस पडणारें. [दृष्टि + सं. गोचर] ॰चरित-क्रिवि. जाणूनबुजून, बुद्धिपुरस्सर केलेलें (पाप इ॰). -ज्ञाको (क) १३८. [दृष्टि + सं. चरित = आचरलेलें] ॰चोर-पु. दुसर्‍याचा डोळा चुकवून चोरण्याचा, पळण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा मनुष्य. [दृष्टि + चोर] ॰देखत-तां-क्रिवि समक्ष; पहात असतांना; डोळ्यांदेखत. [दृष्टि] ॰पथ-पु. दृष्टीची रेषा टप्पा. [दृष्टि + सं. पथिन् = रस्ता] ॰परीक्षा-स्त्री. (वैद्यक शास्त्र) रोग्याच्या डोळ्यांवरून, दृष्टी- वरून रोगाची चिकित्सा करणें. [दृष्टि + परीक्षा] ॰पात-पु. १ (एखाद्या वस्तूवर, मनुष्यावर) नजर पडणें, वळणें; अवलोकन. २ नजर बाधणें; दृष्ट लावणें. [दृष्टि + सं. पात = पडणें] ॰पिंड- पु. डोळ्यांतील पारदर्शक भिंग; इं.) लेन्स्. 'कांहीं मुलांस जन्मतः दृष्टिपिंडास विकार होऊन, त्या पिंडाची पारदर्शकता नाहींशी होते.' -बालरोग चिकित्सा १२६. [दृष्टि + पिंड] ॰फोड-स्त्री. १ बारीक पाहणी; चौकशी. २ डोळ्यांस त्रास होईल अशा प्रका- रचें जिकीरीचें काम; डोळेफोड सर्व अर्थीं पहा. -वि. १ डोळ्यांनां त्रास, ताण देणारें (कलाकुसरीचें काम, किचकट लिखाण इ॰). २ (क्व.) डोळ्यांस हिडीस दिसणारें; ओंगळ. [दृष्टि + फोडणें] ॰बंध-बंधन-पुन. मंत्रसामर्थ्यानें डोळें भारून टाकणें; नजरबंदी 'कीं पुढिलाची दृष्टि चोरिजे । हा दृष्टिबंधु निफजे ।' -ज्ञा १४.५. [दृष्टि + सं. बंध, बंधन = बांधणें] ॰भरू-वि. देखणा; सुंदर; डोळ्यांत भरणारा. [दृष्टि + भरणें] ॰भेट-स्त्री. १ आसन्नमरण मनुष्यास त्याच्या लांबच्या पुत्रादिक आप्तांची झालेली शेवटची दृष्टादृष्ट. २ दृष्टादृष्ट; नजरानजर. [दृष्टि + भेट] ॰मंडल-न. वलय; दृङ्मंडल; खमध्यवृत्त. [दृष्टि + सं. मंडल = वर्तुळ] ॰मणी-पु. लहान मुलास दृष्ट होऊं नये म्हणून त्याच्या गळ्यांत, मनगटाला बांधावयाचा कांचेचा पांढर्‍या ठिपक्यांचा काळा मणि. ॰मर्यादा-स्त्री. मनु- ष्याच्या डोळ्यांना जेव्हढा पृथ्वीचा भाग दिसूं शकतो तेवढी जागा; दृष्टीच्या टप्प्यांतील भूभाग; क्षितिज; काळीधार; चक्र- वाल. [दृष्टि + मर्यादा = सीमा] ॰रचना-रचनेचाउभार-स्त्रीपु. (काव्य) डोळ्यांनां दिसणारा इहलोकचा, सृष्टीचा पसारा. ॰विकार-पु. १ वाईट मनुष्याची (लहान मुलास) नजर लागून झालेली बाधा. २ दृष्टीचा रोग; डोळे बिघडणें. [दृष्टि + विकार = बाधा] ॰र्‍हास्वता-स्त्री. लांबचें दिसणें; (इं.) शॉर्टसाइट्. हा विकार मुलांनां सात ते नऊ वर्षांपर्यंत होतो. एकाग्रतेनें पाह- ण्यानें अगर वाचनानें हें व्यंग चांगल्या मनुष्यांसहि नवीन होऊं लागतें. -ज्ञाको (अं) ९५. [दृष्टि + सं. र्‍हस्वता = आंखुडपणा] ॰हेळा- स्त्री. कृपाकटाक्ष. 'जयाचिये दृष्टिहेळाचि संसारू । निरसोनि जाय ।' -विपू. २.२८. दृष्ट्यगोचर-वि. अदृश्य; न दिसणारें. [दृष्टि + सं. अगोचर-इंद्रियगम्य नव्हे असें]

दाते शब्दकोश

आख      

पु.       १. डोळा : ‘आखीं ल्याहीलीं काजळ ।’ − स्त्रीगीत ३०. २. डोळा आणि कान यांच्यामधील भाग; मर्मस्थान; गंडस्थल; कानशील : ‘त्याच्या मानेवर दोन्ही आखांवर मोठे फोड दिसले.’ − सांज ३२. (वा.) आख मोडणे − डोकेदुखी बरी होण्यासाठी आखावर बिब्याच्या फुल्या घालणे [सं. अक्षि]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अंबक      

न.       डोळा : ‘त्र्यंबकाने तिसरा ‘अंबक’ म्हणजे डोळा उघडला की त्यातून या ज्वाला निघतात.’ − तीम ७९. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

डोळ

पु. टरफल असलेली डाळ; अर्धवट भरडलेली, सडलेली डाळ; भरडा; चोख डाळीमध्यें क्वचित् सालासकट राहि- लेल्या डाळिंब्या. -न. (मनांतील डोळ) संशय; वहीम; किंतु. (क्रि॰ पडणें; येणें). [डोळा. देप्रा. डोल = डोळा, जंतु, फल]

दाते शब्दकोश

डोळुला      

पु.       (लडिवाळपणे) डोळा : ‘वाटुली पाहतां सिणले डोळुले । दाविसी पाउलें कैं वो डोळा ।’ –तुगा ८२९.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दृष्टि, दृष्टी      

स्त्री.       १. नेत्रगोलात असणाऱ्या पाहण्याच्या इंद्रियाचे कार्य; तिने झालेले ज्ञान; पाहण्याचे सामर्थ्य; नजर. २. (ल.) (एखाद्या गोष्टीकडे देण्याचे) लक्ष; अनुसंधान. ३. (ल.) खरे, खोटे जाणण्यास कारणीभूत असणारी मनोवृत्ती; कल; (एखाद्याशी वागण्याचा, एखाद्याकडे पाहण्याचा) रोख. ४. पाषाणाच्या देवाच्या मूर्तीला बसवले जाणारे रुपे इ. चे डोळे. (राजा.) [सं.] (वा.) दृष्टि ओळखणे, दृष्टी ओळखणे– (एखाद्याच्या) नजरेवरूनच, चेहऱ्यावरून त्याचे मनोगत ओळखणे. दृष्टि खालून जाणे, दृष्टी खालून जाणे– (एखादी गोष्ट, वस्तू इ. एखाद्याच्या) डोळ्याखालून, नजरेतून जाणे; स्थूलपणे माहीत असणे. दृष्टि घालणे, दृष्टी घालणे–१. डोळ्याने इशारा करणे. २. (एखाद्या गोष्टीकडे) काळजीपूर्वक पाहणे, लक्ष देणे, मन लावणे : ‘स्वर्गांगनेसीं जरि साम्य आली । परंतु तेथें दृष्टी न घाली ।’ – रामदासी २·४३. दृष्टि चढणे, दृष्टी चढणे–गर्वाने फुगणे; उन्मत्त होणे. दृष्टि चुकणे, दृष्टी चुकणे–विसरणे; गोंधळून जाणे; घोटाळ्यात पडणे. दृष्टि चुकवणे, दृष्टि चोरणे, दृष्टी चुकवणे, दृष्टी चोरणे– (एखाद्याच्या) डोळ्याला डोळा न देणे; नजरेला पडण्याचे टाळणे. दृष्टि चेपणे, दृष्टी चेपणे–डोळ्याला डोळा भिडवणे : ‘गोसावीयांची दृष्टी चेपे ना’ – लीचपू १०७. दृष्टि चोरणे, दृष्टी चोरणे– नजर भारून टाकणे; नजरबंद करणे : ‘कीं पुढिलाची दृष्टि चोरिजे ।’ – ज्ञा १४·५. दृष्टि ठेवणे, दृष्टि देणे, दृष्टि राखणे, दृष्टी ठेवणे, दृष्टी देणे, दृष्टी राखणे – एखाद्या गोष्टीची, वस्तूची काळजी घेणे; लक्ष देणे : ‘ठेवीना गर्भींही दृष्टिस ती नीट जळहि सेवीना ।’ – मोअश्व ४·८. दृष्टि निवळणे, दृष्टी निवळणे– (ल.) गर्व, ताठा, उन्माद, भ्रम नाहीसा होणे. दृष्टि पडणे, दृष्टि लागणे, दृष्टि होणे, दृष्टी पडणे, दृष्टी लागणे, दृष्टी होणे– (एखाद्याच्या) वाईट नजरेची बाधा होणे. दृष्टि फाकणे, दृष्टी फाकणे–१. गोंधळून, भांबावून जाणे. २. नजर बेताल, ओढाळ होणे. दृष्टि फाटणे, दृष्टी फाटणे– (एखाद्याच्या) आकांक्षा, महत्त्वाकांक्षा, हेतू इ. वाढणे, विस्तृत होणे. दृष्टि फिरणे –, दृष्टी फिरणे१. राग येणे : ‘येतां दृष्टी त्याची फिरली म्हणे ।’ – रामदासी २·९८. २. ताठा चढणे; गर्व इ. ने बुद्धी बदलणे; धुंदी चढणे. दृष्टि बंद करणे, दृष्टी बंद करणे–नजर भारून, मोहून टाकणे; दृष्टी चोरणे. दृष्टि मरणे, दृष्टी मरणे–तीच गोष्ट अनेक वेळा पाहून, ऐकून, करून तिच्याविषयीची भीती, आश्चर्य, हिडीसपणा इ. वाटेनासे होणे. दृष्टीचा अंमल –१. पाहण्यात, नजरेत आलेला काळाचा अवधी. २. नजरेचे कार्यक्षेत्र, कर्तबगारी. दृष्टीचा खेळ –नजरेने, दृष्टीने करण्याची चमत्कृतिपूर्ण, कुशलतेची गोष्ट. दृष्टीचा खोटा, दृष्टीचा पापी –दुसऱ्याचे चांगले पाहून मनात जळफळणारा; मत्सरबुद्धीचा. दृष्टीचा पसारा – डोळ्यांना दिसणारे विश्व. दृष्टीचिये आळिवे राहणे –नजरेच्या टप्प्यात राहणे : ‘बाइसे दृष्टीचिये आळिवे राहिली’ – लीचपू १६५. दृष्टीची मुरवत राखणे – (एखाद्याच्या) भावनेला मान देणे; (एखाद्याला) न आवडेल अशी गोष्ट त्याच्यासमोर न करणे. दृष्टीचे पारणे फिटणे –जे पाहण्याविषयी उत्कंठा आहे, ते पहायला मिळाल्यामुळे समाधान पावणे. दृष्टीत न आणणे –न जुमानणे : ‘ऐसें वदोनि आणित नव्हतासि च बा परासि दृष्टींत ।’ – मोमहाप्रस्थानिक २·२०. दृष्टीत न येणे – (एखाद्याला) तुच्छ लेखणे, क : पदार्थ मानणे : ‘ज्याच्या दृष्टींत न ते सहसुत पांडवबळी न कंसारी ।’ –मोकर्ण ६·६६. दृष्टीने शिवणे –डोळ्यांनी पाहणे : ‘म्हणतो नाहीं शिवलों दृष्टी करुनिही धराधवा हविला ।’ – मोआदि २·३. दृष्टीस फाटा फुटणे –दृष्टी फाटणे; दृष्टीचे सामर्थ्य वाढणे : ‘जैसें डोळ्यां अंजन भेटे । ते वेळीं दृष्टीसी फांटा फुटे ।’ – ज्ञा १·२३. आडव्या दृष्टीने पाहणे –वाकड्या काण्या डोळ्याने पाहणे. चार दृष्टी होणे –भेट, नजरानजर होणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गरो(र्‍हो)ळा

वि. १ मांजराच्या डोळ्याच्या रंगाचा (डोळा); घारा. २ बिडालाक्ष; घार्‍या डोळ्यांचा 'गारोळे जमून टाफरें ।' -दा ३.६. ४२. [घार + डोळा?]

दाते शब्दकोश

झोला      

पु.       १. झोका (क्रि. देणे, घेणे.) : ‘तो मुकाट्या उठला, अंगाला झोले देत गावात गेला.’ – वाळवण ५. २. झोपाळा; हिंदोळा. [सं. दोला] (वा.) झोला खाणे – झोके घेणे : ‘हिंदोळ्यावर झोले खाऊ लागले.’ – अंया ३३. ३. झोक; कल; तोल : ‘डोले बोलत बोल तों न धरवे गेलांचे झोला भला ।’ – आसीस्व ४४. [सं. दोला]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कैरा

वि. १ तिरळा; चकणा (डोळा). 'तारसें धुलें काणें कैरें ।' -दा ३.६.४२. २ चकणा डोळा असलेला. [सं. केकर = तिरवा ते. कैकरमु]

दाते शब्दकोश

कैरा      

वि.       १. तिरळा; चकणा (डोळा) : ‘तारसें घुलें काणें कैरे’ - दास ३•६•४२. २. चकणा डोळा असलेला. [सं. केकर = तिरवा]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कटाक्ष      

पु.       १. डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहणे (साभिप्रायाने); अपांगदर्शन; अपांगदृष्टी; डोळा घालणे, डोळा मारणे; वाकडी दृष्टी : ‘काय चंचळु मासा । कामिनीकटाक्षु जैसा ।’ – ज्ञा १४·१७०. २. (ल.) व्यंग्यार्थाचे भाषण; छद्मीपणा; उपरोधिक भाषणाचा रोख. ३. क्रोधदृष्टी; गैरमर्जी; राग; वैर; कलह. ४. मुद्दा; रोख; कल; प्रवृत्ति, (वा.) कटाक्ष वाढणे– वैर निर्माण होणे : ‘राजेश्री मुरारराव याचे व मुसाफरखानाचे कटाक्ष वाढले.’ – पेद २८. १७९. कटाक्ष मिटणे – भांडण संपणे : ‘लक्ष्मीबाई शिंदे व अलिजाबहादर यांचे कटाक्ष मिटत नाही.’ – ऐलेसं ५७५६. कटाक्ष लागणे– भांडण लागणे : ‘जाबतेखान शुक्रतालास आहेत…. त्याचा कटाक्ष लागला आहे.’ – पेदभा २९·८९. ५. मुद्दा; जोर; रोख; कल; प्रवृत्ती : ‘गीतेचा सर्व कटाक्ष याच तत्त्वावर आहे.’ – लोटिकेले ४·५२३. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खुपरा

पु. (डोळे आले किंवा खुपरी झाली असतां त्याची) खुपणी; ठणका. (क्रि॰ येणें; जाणें; होणें; फोडणें). -वि. १ ठनकणारा; खुपणारा (खुपर्‍या झालेला डोळा इ॰). २ खुपर्‍या डोळ्याचा (माणूस). ३ स्वभावतः ठणकणारा; खुपणारा (डोळा). [खुपणें]

दाते शब्दकोश

नग्न

वि. १ वस्त्रहीन; नागवा; नंगा, 'जैसे आपण नग्न भांडकें । जगातें म्हणे ।' -ज्ञा १८.१३५. २ (ल.) दरिद्री; कफ- ल्लक; अकिंचन. [सं.] ॰चक्षु-पु. साधा, उघडा, भिंग, दुर्भिण इ॰ कांचें साहाय्य नसलेला डोळा, नजर; (इं.) नेकेड आय्. 'नग्नचक्षूनें या क्षीरपथाकडे पाहिलें असतां, चोहोंकडें धुकें पस- रलें आहे कीं काय असा भास होतो.' -आगरकर निबंधसंग्रह, आमचें काय होणारा. [नग्न + सं. चक्षुस् = डोळा] ॰दिगं(गां)बर वि. अगदीं पूर्णपणें नागवा; नगीननागवा. [नग्न + सं. दिगंबर = दिशा हेंच वस्त्र ज्याचें तो, नग्न] ॰दीक्षा-स्त्री. नागवें राहण्याचें व्रत. (क्रि॰ घेणें). कांहीं विशिष्ट वर्गांतील गोसावी ही दीक्षा घेतात. [नग्न + दीक्षा = व्रताचा स्वीकार] ॰दीक्षाधारण-न. नग्न दीक्षा स्वीकारणें, अंगीकारणें. (क्रि॰ करणें) [नग्न + दीक्षा + धारण = धारण करणें; स्वीकारणें] ॰दीक्षाधारक-दीक्षा- धारी-वि. नग्नदीक्षेचा स्वीकार केलेला; नग्नदीक्षा धारण करणारा. [नग्नदीक्षा + सं. धारक, धारी = धारण करणारा] ॰वस्त्र- न. लंगोटी; केवळ नागवें राहूं नये म्हणून लोकोपचारार्थ धारण केलेलें वस्त्र. 'काशायांबर नग्नवस्त्र । संन्याशासी हें पवित्र ।' -सप्र ३.१६.

दाते शब्दकोश

फुटका

वि. १ फुटलेला; छिन्नभिन्न. २ किरकोळ; हिशेबांत नसलेला (वेळ, खर्चाची बाब इ॰). ३ टांक आंत घुसणारा किंवा लिहिलें असता शाई पसणारा (कागद); लवकर फुटणारी, पसरणारी (शाई). ४ जाड व अस्पष्ट (लिखाण, अक्षर हा शब्द कागद, शाई, अक्षर व लेख यांना सारखाच लावतत). ५ अंध; मंददृष्टि; अंधत्व आलेला (डोळा). ६ मुळींच नाहीं किंवा कमी ऐकूं येणारा; बधिर (कान). ७ वाईट; अभागी (नशीब, दैव). [फुटणें] (जवळ) ॰मणी-कवडी-फोड-नसणें-अतिशय दरिद्री असणें. 'माझ्या बायकोच्या अंगावर फुटका मणि देखील राहिला नाहीं.' फुटका डोळा काजळानें साजरा करणें-(ल.) युक्तीनें अवगुण झांकणें. फुटकी तिनिसांज-स्त्री. सुर्यास्ताचीं वेळ; ऐन संध्याकाळ.फुटक्या तिनिसांजा-क्रिवि. ऐन संध्याकाळी. फुटकें कपाळ-नशीब-दैव-न. १दुर्भाग्य. २ वैधव्य.'फुटक्या कपाळाची-दैवाची-वि. दुर्दैवी; कपाळ- करंटी; विधवा.फुटक्या मनाचा-वि. चंचल; अनिश्चित स्वभा- वाचा; दुर्बल मनाचा.

दाते शब्दकोश

शिरचष्मा, शिर्चष्मा

पु. (डोंके व डोळा) लावण्यां- तील प्रियजनांविषयींची संज्ञा; प्रियजन; प्रियकर. [फा. सर्चश्मा. शिर + चष्मा = डोळा]

दाते शब्दकोश

तृतीय

वि. तिसरा-री-रें. [सं.] ॰नेत्र-पु. तिसरा डोळा; कपाळाच्या मध्यभागीं असणारा शंकराचा तिसरा डोळा. ॰उघ- डणें-(ल.) अतिशय संतापणें. ॰पंथ-पु. (मुरारेस्तृतीयः पंथः = मुरारीचा तिसराच मार्ग; दोहोंपैकीं त्याचें मत कोणाशींच जुळत नाहीं. मुरारिभट्ट हा जैमिनीच्या पूर्वमीमांसेवरील एक भाष्यकार असून त्याचें मत शबरस्वामी व प्रभाकर यांहून भिन्न होतें या- वरून) तिसरा मार्ग, मत, समजूत, कल्पना, अनुमान इ॰. म्ह॰ त्यानें तृतीयपंथ केला = ह्याचें तिसरेंच एक. ॰पंथी-वि. दुसर्‍याचे विचार खरे न मानतां आपले खरे समजणारा. ॰प्रकृति- लिंगी-पु. षंढ; नपुंसक. ॰सवन-न. (सोमायागामध्यें शेवटच्या दिवशीं सोमवल्ली कुटून तिचा रस काढतात. तो रस तीन वेळां काढतात व त्या प्रत्येक वेळेस अनुक्रमें प्रातःसवन, माध्यंदिनसवन व तृतीयसवन असें म्हणतात. या तृतीयसवनांत मंत्र म्हणणारांचा सूर चढा असतो यावरून) १ अतिशय उच्च स्वर, आवाज. २ तिप्पट. ॰सवनानें म्हणणें-अतिशय मोठ्यानें ओरडून अथवा कर्कश आवाजानें बोलणें. तृतीया-स्त्री. १ शुक्ल अथवा कृष्ण पक्षाची तिसरी तिथि. २ (व्याकरण) एक विभक्ति (तिसरी). [स.] तृतीयातत्पुरुष-पु. (व्याकरण) एक समास. दोन शब्दां- मधील जेथें तृतीयेचा लोप होतो असा समास. जसें:- कृपा- वलोकन = कृपेनें अथवा कृपेकरून जें अवलोकन तें. तृतीया- प्रकृति-स्त्री. तिसरी प्रकृति अथवा स्वभाव; तमोगुण. -वि. १ तिसर्‍या प्रकृतीसंबंधीं. २ (उप.) नपुंसक; षंढ.

दाते शब्दकोश

अंधळा

वि. १ ज्याला दिसत नाहीं असा (मनुष्य, डोळा); अंध पहा. २ (ल.) अज्ञानी; अजाणता; चुकणारा; विवेकशून्य; अविचारी; गोंधळ्या; अव्यवस्थित (व्यवहार), बेकायदेशीर (राज्य). [सं. अंध] ॰म्ह अंधळा सांगे गोष्टी, बहिरा गाढव पिटी; अंधळ्या मनीं आयतवार (सोमवार), बहिरा (किंवा पांगळा) म्हणतो माझी बायको गर्भार. या (परस्पर गैरसमज दाखविणार्‍या) व अशा पुष्कळ म्हणी आहेत. अंध- ळ्याच्या गाई देव राखतो = ईश्वर गरिबा-दुबळ्याची काळजी घेतो. अंधळ्यानें दळावें कुत्र्यानें पीठ खावें किंवा अंधळें दळतें कुत्रें पीठ खातें = एकानें कष्ट करावे व भलत्यानेंच त्याचा फायदा घ्यावा अशी बेबंदशाही, अंदाधुंदी. 'यास्तव आमचें सर- कारास रयतांच्या वतीनें असें निक्षून सांगणें आहे कीं आंधळें दळतें आणि कुत्रें पीठ खातें असला प्रकार यापुढें चाला- वयाचा नाहीं.' -सासं २.३१६. अंधळ्यापुढें नाच बहिर्‍या- पुढें गायन = ज्याला ज्याची किंमत नाहीं त्याला ती वस्तु देणगी देणें. (गो.) 'आंधळ्यासरी नाजून आनी भैर्‍यासरी गावन उपयोग किते?' अंधळ्या बहिर्‍याची गांठ = प्रत्येक जण दुसर्‍या- बद्दल गैरसमज करून घेतो अशा दोन माणसांची भेट. २ पर- स्परांना मदत करण्यास असमर्थ अशांची गांठ. अंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन(दैव अनुकूल झालें असतां कधीं कधीं आपल्या इच्छेपेक्षां अधिकहि देतें यावरून) = अपेक्षेपेक्षां अधिक मिळणें. अंधळ्यास अंधळा वाट दाखवितो = एक अज्ञानी दुसर्‍या अज्ञानी माणसास उपदेश करतो, मार्गदर्शक होतो (म्हणजे दोघेहि फसतात). अंधळा रोजगार आणि मिंधा संसार = अव्यय- स्थितपणामुळें दुसर्‍याचा पगडा स्वतःवर बसणें. -ळ्याचा रस्ता-वाट-मार्ग-पु. सरळ; रुंद व मोकळा रस्ता; आंधळ्याला अडचणीशिवाय जातां येईल असा हमरस्ता. ॰कारभार- पु. अंदाधुंदीनें चालविलेलें राज्य; बेबंदशाही; अव्यवस्थित काम. ॰डोळा-पु. अंधळा माणूस (विशेषतः एका डोळ्यानें). ॰तिंधळा-तिरळा-वि. (कों.) १ अंडगडी; पोटगडी; पित्त्या, २ (इटीदांडूच्या खेळांतील) दुश्या; दोन्ही बाजूंनीं खेळणारा; रहाट्या. ३ (ल.) दोहीं दगडींवर हात टेकणारा; दुरोखी. ॰नारळ-पु. कोंवळा नारळ; शहाळें; ज्यांत नुसतें पाणीच असल्यामुळें वाजत नाहीं असा. आडसर पहा. -ळ्याची काठी - १ अंधळा, अशक्त, निराश्रित यांचा पुढारी अथवा आश्रयदाता; अंधळ्याला आधारभूत गोष्ट (अंधळ्याला मुख्य आधार त्याच्या काठीचा असतो यावरून). 'या अंधावृद्धाची राहों देतास एक जरि यष्टी । भीमा, मी मानस तरि होऊं देत्यें कशास बहु कष्टी ।' -मोस्त्री ३.४६. २ म्हातार्‍या आईबापांचा एकुलता एक मुलगा. -ळ्याची माळ-माळका-स्त्री. १ अंधळ्या लोकांची माळ, रांग. २ (ल.) अज्ञानी व मूर्ख लोकांची परंपरा. -ळ्याची मिठी-स्त्री. घट्ट मिठी; चिकटणें. -ळ्यांत काणा राजा-जेथें सर्वच अडाणी असतात तेथें थोडयाशा शहाण्याचें तेज पडतें. -ळ्यासी जन सारेंचि आंधळें-जसें आपण असतों तसेंच जग आपल्याला दिसतें.

दाते शब्दकोश

नेत्र

पुन. डोळा; नयन. 'जें उपजवी सुखदुःख । नेन्नव्दारें । ' -ज्ञा २.११६. [सं.] ॰मोडणें-नेत्रकटाक्ष फेंकणें; डोळे मारणें. 'खेळतां नाटकें दशावतारी । तेथें येती सुंदरनारी । नेत्र मोडिती कळाकुसरी । परी ते अवघे धटिंगण । ' -दा ६.८.११. ॰कटाक्ष- पु. दृष्टिविक्षेप; वांकड्या, काण्या डोळ्यानें पाहणें. ॰कोरान्न-न. निव्वळ दृष्टिसुख; ज्यांत प्रत्यक्ष वस्तूची प्राप्ति न होतां नुसत्या डोळ्यानें पाहून समाधान मानावें लागतें तो प्रकार. [नेत्र + कोरा + अन्न] ॰पल्लवी-स्त्री. १ एक खुणेची भाषा; डोळ्यांच्या हालचाली- वर, खुणांवर बसविलेली भाषा; नेत्रसंकेत. 'सांग, तुला समजणार्‍या नेत्रपल्लवीनें आतांच माझें मनोगत तुला सांगून ठेवूं का?' -भा १०७. २ डोळे मिचकावणें; डोळ्यांनीं खुणा करणें. ॰पातें-न. डोळ्याचें पातें. 'लवो विसरली नेत्रपातीं । कृष्णमूर्ति पाहतां । ' -एरुस्व ६.२०. ॰पालवी-नेत्रपलवी पहा. 'नेत्रपालवी नाद- कळा । करपालवी भेदकळा । ' -दा ५.५.२७. ॰युगुल-न. दोन्ही डोळे; नेत्रद्वय. ॰रस-पु. नेत्रगोलपटलांच्या आंतील पार- दर्शक पदार्थ. -मराठी ६ वें पुस्तक, पृ. १०३ (१८७५) ॰रोग-विकार-पु. १ डोळ्याचा रोग. २ दृष्टीमुळें, पाहण्या- मुळें जडलेला विकार. 'प्रीति हा एक नेत्ररोग आहे. ' -भा ४१. ॰वटी-स्त्री. बुबुळ; त्यांतील बाहुली. ॰विकारमाया-स्त्री. (काव्या) नेत्रकटाक्षानें दृग्गोचर होणारी माया; कृपादुष्टीनें पहाणें. 'त्या दाविती नेत्रविकारमाया ।' ॰व्रण-पु. डोळ्यांतील किंवा त्याच्या आजूबाजूचा फोड इ॰ ॰संकेत-पु. डोळ्यानें खुणावणें; नेत्रपल्लवी. 'दोघांचे आपसांत नेत्रसंकेत झाले.' -मोर २३. ॰स्पर्श-पु. आचमन, प्राणायाम इ॰ करावयाचें नसेल तेथें हाताच्या बोटांनीं डोळ्यास पाणी लावणें; कोणत्याहि धार्मिक कृत्याच्या आरंभीचा विधि; डोळ्यांना पाणी लावणें. नेत्रांजन-न. काजळ; डोळ्यांत घालावयाचें अंजन; सुरमा. नेत्रांतर-न. डोळा चुक- विणें. 'अतर्क्य नेत्रांतरें नेणें । कां धातूवादें सर्वस्व घेणें ।' -एभा २३.२०७. नेत्रांतील दर्पण, नेत्रदर्पण-दृङ्मज्जा-मंडळ. (इं.) रेटिना. -मराठी ६ वें, पुस्तक, पृ. १०३. (१८७५) नेत्रार्श-पु. डोळ्याचा एक रोग; नेत्रव्रण. पुरुळ उठणें. नेत्रो- न्मीलन-न. १ दक्षिणाचारांतील एक विधि; चक्षुरुन्मीलन पहा. २ (सामा.) डोळे उघडणें.

दाते शब्दकोश

(सं) पु० डोळा, नयन.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

रुद्र

पु. १ शंकराचा एक अवतार; शंकर. २ ब्रह्मदेवाच्या कपाळापासून उत्पन्न झालेला देव; देवताविशेष. हे रुद्र अकरा आहेत. अकरा रुद्र पहा. (यावरून ल.) ३ अकरांचा समुदाय; अकरा ही संख्या. ४ रुद्रताल; शिवस्तोत्र; ह्या तालांत अकरा मात्रा व पांच विभाग असतात. ५ अकरावा रुद्र; मारुती; हनुमान. 'चूडा- मणिसह देवी प्रभु आणाया निरोप दे रुद्रा ।' -मोरामायणें १.१८७. -वि. भयंकर; रडविणारा. [सं. रुद = रडणें] ॰काठी-वि. तीन धागे काळे व एक पांढरा, नंतर एक काळा व एक पांढरा असें उभार व आडवणहि त्याच प्रकारचें, किनार कोणतीहि असें (लुगडें). ॰कोप-पु. भयंकर प्रसंग; भयंकर संकट. 'क्षुद्र इतर जे शुद्रचे तयांवरि रुद्रकोप या क्षणीं ।' -ऐपो ३७०. ॰गांठ-स्त्री. कापड विणतांना त्यांत चौकटीसारखें उठविलेलें चिन्ह. ॰गांठी-वि. रुद्र- गांठी असलेलें (लुगडें, वस्त्र इ॰) ॰ताल-पु तालाचा एक प्रकार. रुद्र अर्थ ४ पहा. 'मंगलाचरणाचा एक जिवाचा एक ताल आणि भरतवाक्याला रुद्रताल हा टेवलेलाघ.' -भा ३८. ॰पिशाच-पु.न. १ काशींत केलेल्या पापाचें क्षालन होईपर्यंत (काशींत मेल्यानंतरहि) पिशाच योनींत राहिलेला जीव. २ (ल.) शीघ्रकोपी, अविचारी, रागीट मनुष्य. ॰बलि-पु. रुद्र देव- तांना अर्पण केलेला मांसाचा बली. ॰भूमि-स्त्री. स्मशान; मसणवटी. ॰मळी-स्त्री. (व.) अंधारी; झांपड. 'असा नास चाललेला पाहिला कीं आमच्या डोळ्यांना रुद्रमळी येते.' ॰योनि- स्त्री. १ काशी येथील विश्वेश्वराच्या देवळाबाहेरील खडकांतून गेलेले भुयारासारखा प्रदक्षिणेचा मार्ग ह्या मार्गात मनुष्य मेल्यास तो रुद्रापिशाच होतो. हा मार्गं उतरता आहे व ब्रह्मयोनीचा मार्ग चढावाचा आहे. यावरून ब्रह्मयोनि आणि रुद्रयोनि हे शब्द ज्या घराचे भाग उंचसखल असतात त्याला लावतात. २ लांब व अरुंद गल्ली; बोळवंडी. ब्रह्मयोनि पहा. ॰वात-स्त्री. चार बोटें लांबीची अकरा सुतांची वात. अशा वातींचा लक्ष लावतात. ॰वि(वी)णा-पु. वीण्याचा एक प्रकार. ह्याचा आकार तंबोर्‍या- सारखा असतो. दांडीचें टोक वळवून पाठीकडे नेलेलें असतें. दांडीच्या मागें शेवटाला एक गोल भोपळा बसविलेला असतो. दांडीवर मेणांत चोविस पडदे पक्के बसविलेले असतात. ह्याला चार तारा असून त्या सा, प, सा, म, ह्या स्वरांत. व आणखी तीन तारा प, सा व तार सा मध्यें लवितात. वाजविण्याचा सर्व प्रकार बीनाप्रमाणें असतो. ॰विंशति-स्त्री. प्रलयकाळ (माधवग्रं- थांत हाच शब्द रुद्रवंश, रुद्रवंशी असा आला आहे.) 'भयानका क्षिति झाली घर-घाली रुद्रविंशति जगिं फांकली ।' -ऐपो ३६८. [साठ संवत्सरांतले शेवटचे वीस संवत्सर रुद्र देव- तेचे म्हणजे संहार देवतेचे असल्यामुळें ते अनिष्ट मानतात.] ॰संख्या-वि. अकरा. 'कृष्णावाळुवंटीं ब्रह्मचारी पूजिले । रुद्र- संख्या नाभिपर्यंत पुरिले ।' -सप्र ३.३७. ॰सावर्णि-चवदा मनु पहा. -गीर ७५२. रुद्राचल-पु. रुद्र नांवाचा पर्वत. [रुद्र + अचल] रुद्राणी-स्त्री. पार्वती. 'शिव भवानी रुद्राणी । कां पां न पावतीच कोणी ।' -एरुस्व ५.७४. रुद्रावतार-पु. १ शिवाचा अवतार; शिवाचें उग्रस्वरूप. २ (ल.) तापट किंवा रागीट मनुष्य; तामसी व्यक्ति. [रुद्र + अवतार] ॰धा ण करणें- संतापणें; अतिशय संतप्त होणों; अति क्रोध येणें. रुद्राक्ष-पु. १ एक वृक्षविशेष आणि त्याचें फळ. याचे मोठे मोठे वृक्ष होतात. पानें गंगेरीसारखीं असतात. हीं झाडें कोंकणांत थोडीं व म्हैसुर- कडे फार आहेत. या झाडाच्या फळांतील बिया तेच रुद्राक्षमणी. याची माळ करून शिवभक्त गळ्यांत धारण करितात. रुद्राक्षाला एक ते सहा मुखें असतात. याच्या आणखी जाती गौरीशंख व रुद्राक्षल अशा आहेत. २ शंकराचा डोळा; शिननेत्र. 'कल्या- णाचे बाण निर्वाण मारा । रुद्राक्षींच्या पावकातुल्य धारा ।' -मुरामायणें बालकांड ११०. [सं. रुद्र = शंकर + अक्षत् = डोळा]

दाते शब्दकोश

अैन

(स्त्री.) हिंदी अर्थ : आँख, ठीक. मराठी अर्थ : डोळा, अेकूण.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

आडई

स्त्री. (कों.) विश्रांतीसाठीं आडवें होणें. (क्रि॰ घेणें). 'अमंळ आडई घेतली तों किंचित डोळा लागला.' [का. अड्ड; म. आडवा]

दाते शब्दकोश

आडोळणे      

क्रि.       आड येणे; प्रतिबंध होणे : ‘येऱ्हवी आडोळलिया डोळा । शिवदर्शनाचा सोहळा । भोगिजे ।’ − अमृ ९·५५.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अधू

वि. १ व्यंग असलेला; उणीव असलेला; कुरूप; बेढव; लुला अवयव, गात्र, इंद्रिय; अशक्त; विकल; पंगू (इसम). वाप्र. डोळा अधू, पाय अधू, दातानें अधू, कानानें अधू. २ नीट न चाल- णारें. 'गिरण अधू आहे.' ३ कच्चा-विषय, अभ्यास वगैरे. ४ हळवा-मनाचा. [सं. अर्ध.]

दाते शब्दकोश

अधू adhū a (अधुरा) Weak, defective, deformed, distorted--a limb, member, organ, faculty: and, attrib. the person so affected. Ex. डोळ्यानें अधू, दांतानी अधू, कानानें अधू &c.: or तो डोळा अधू आहे,हा पाय अधू.

मोल्सवर्थ शब्दकोश

अध्यक्ष

पु. १ संस्था अगर मंडळ यांचा त्यांच्या नियमा- प्रमाणें निवडलेला अगर ठरविलेला मुख्य-नियंता; प्रमुख. -सभा ७१. २ स्वामी; मुख्य; नियंता; वरिंष्ठपणानें देखरेख करणारा; दिशा दाखविणारा; नियामक; नियंत्रक. उ॰ दानाध्यक्ष, धनाध्यक्ष, धर्माध्यक्ष. ' जो इंद्रियदेशींचा अध्यक्षु ।' -ज्ञा ८.३४. [सं. अधि + अक्षि = डोळा]

दाते शब्दकोश

अक्ष      

पु.       नेत्र; डोळा. [सं. अक्षि]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अक्ष

पु. नेत्र; डोळा. [सं. अक्षि]

दाते शब्दकोश

अक्षि

पु. नेत्र; डोळा. सामाशब्द-अक्षिगोचर, अक्षिमी- लन, अक्षिपात, अक्ष्युन्मीलन. [सं.अक्षि; लॅ.ओक्यूलस्; ग्री. ओकोस; झें. अशि.]

दाते शब्दकोश

(सं) पु० डोळा, नेत्र, नयन.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

अक्षि, अक्षी      

नेत्र; डोळा. [सं.] अक्षिका      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अक्षिका      

स्त्री.       १. हूक अडकविण्याचे भोक; सुईचे नेढे; वेज; नाक. २. भिंतीत किंवा दारात बसवलेला चोर डोळा. ३. भरतकाम करताना विणलेला डोळ्याचा कलात्मक आकार. ४. (यंत्र.) यंत्रावर काम करताना, एखादी वस्तू बारकाईने पाहण्याकरिता उपयोगात आणावयाचे, डोळ्याला बसवायचे उपकरण. ५. (प्राणी.) कीटकाच्या डोळ्याचा एक घटक. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अक्षिस्पंदन      

न.       डोळा लवणे. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आखाळे      

न.       आख; डोळा आणि कान यांच्यामधील मर्मस्थान : ‘कानांजवळ, आखाळ्यांना आणि पायाला घोट्याजवळ डाव दिले गेले.’ − बलुतं ६६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अन्मीख

वि. अनिमिष; पापण्या न हालवितां एकसारखा उघडा (डोळा). 'अन्मीखे पाहों ठेलें । राआ मुरारि तें ।।' -दाव ७३. [सं. अनिमिष अप.]

दाते शब्दकोश

आंधळा कारभार

आंधळा कारभार m Mismanagement of affairs. आंधळ्याबहिऱ्याची गांठ combination of inefficient persons. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन To obtain more than one desires for; to receive beyond expectation.

वझे शब्दकोश

आंक      

पहा : आंख डोळ्याजवळचा भाग; भुवई व कान यामधील जागा : ‘आंका बैसला भाला । सयाजी गायवाड पडला ।’ − ऐपो ८७. [सं. अक्षि; अक्षन् = डोळा] (वा.) आंक मोडणे − डोकेदुखी बरी होण्यासाठी आंकावर बिब्याच्या फुल्या घालणे. आंक– छाप, ठसा. ‘कर्मी या नावें पाटाचे : आंक जैसे’ −ज्ञा १८·६००.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आँख

(स्त्री.) हिंदी अर्थ : आँख. मराठी अर्थ : डोळा.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

अंख      

पु.       डोळ्याजवळचा. भाग; डोळा व कान यांच्यामधील भाग. [सं. अंक]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आंख

(सं) पु० डोळा. २ नेत्राची सीमा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

अर्धमुकुल दृष्टि, अर्धमुकुल दृष्टी      

स्त्री.       (नृत्य.) अर्धवट डोळा उघडणे; पापण्यांचे केस एकमेकांस लागतील इतक्या पापण्या मिटणे; आल्हादकारक सुगंध, सुखस्पर्श ह्या गोष्टींचा या अभिनयाने अर्धबोध होतो. [सं. मुकुल=किंचित उमलेली कळी.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अर्धशिशी      

स्त्री.       अर्धे कपाळ दुखण्याचा रोग; याने अर्ध्या मस्तकाकडील मानेचा भाग, भुवई, कान, डोळा व अर्धे कपाळ याठिकाणी तरवारीच्या आघातासारख्या वेदना होतात. [सं. अर्धशीर्ष]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

असाक्ष-क्षिक

वि. १ न पाहिलेला; न देखलेला; ज्यास साक्षी नाहीं असा. २ (ल.) अतिथीस न देतां सेवन केलेलें. 'असाक्ष भक्षिलें मिष्टान्न ।' -मक १४.८८. ॰भोजन- न. पंक्तीस कोणी नसतां केलेलें भोजन. -एभा २१.१३१. [सं. अ + स + अक्षि = डोळा]

दाते शब्दकोश

अवलोकन      

न.       १. निरीक्षण; चिंतन; विलोकन; पाहणे; एखादा विषय डोळ्याने किंवा विचारात्मक बुद्धीने जाणण्याचा व्यापार. २. तपास किंवा चौकशी करणे. ३. दृष्टी. ४. डोळा. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अयनक

न. चष्मा; उपनेत्र; चाळिशी; आरशी. 'माझ्या अयनकीला भिंग बसवावयाचें आहे.' [अर. आयनक. अयन = डोळा याचें द्विवचन. तुल॰ सं. नयन; इं. आय

दाते शब्दकोश

बारीक

वि. १ सूक्ष्म; ज्याची जाडी कमी आहे असा; पातळ; कृश (खांब, शरीरावयव सूत इ॰) २ एकंदरींत आकारानें लहान असलेला (दाणा; सुपारी, लवंग, डोळा इ॰) ३ तलम सूत असलेलें (वस्त्र इ॰) तलम, पातळ (कण, अवयव) जाड भरड नसलेलें (पीठ इ॰). ४ (ल.) गुप्त; गूढ (बातमी). ५ (ल.) 'श्रीमंत स्वामींची बहुतच मर्जी बारीक जाली आहे.' -रा १.२२८. [फा. बारीक्] म्ह॰ (व.) बारिकगळी सकनयळी = फार हळू बोलणार्‍या सुनेला सासू असें म्हणते. ॰कातणें- १ हिशेबांत किंवा वागण्यांत फार बारकाईनें पाहणें; कांटेकोरपणानें वागणें; फाजील चोखपणा करणें. २ अत्यंत कृश किंवा किडकिडीत होणें. (एखाद्यावर) बारीक कातणें-गोड गोड बोलून फस- विणें; दयालुत्वाचा व सभ्यतेचा आव आणून एखाद्याला बुडविणें, त्याचा नाश करणें. ॰पहाणें-पैसे किंवा खर्च यांकडे फार बार- काईनें पाहणें; खर्चाच्या अगदीं क्षुल्लक किंवा किरकोळ गोष्टींकडे लक्ष पुरविणें; चिक्कूपणा करणें. ॰कुटाळ-वि. सभ्यपणाचा आव आणून निंदा करणारा; धूर्तपणानें व गुप्तपणानें बालंट घेणारा; आळ घालणारा (उपरोधिक बोलण्यानें). ॰कुटाळी-स्त्री. गुप- चुपपणें घेतलेलें बालंट. ॰जोर-पु. (गो.) क्षयरोग. [बारीक + सं. ज्वर] ॰दृष्टि-नजर-स्त्री. (ल.) फाजिल हिशोबी पाहणी; चिक्कूपणा. ॰निरीक-सारीक-शिरीक-वि. किरकोळ; बारीक. [बारीक द्वि.] ॰मोठा-वि. बारीक आणि मोठा; कांहीं बारीक कांहीं मोठा. ॰रडणें-रडें-न. हळू आवाजानें रडणें; मुसमुसणें; मुळुमुळु रडणें. ॰राव-पु. काडीपहिलवान; सडपातळ कृश मनुष्य. ॰साय, साण-पु. (गो.) चौकसपणा; सूक्ष्म दृष्टि. ॰हंसणें, हंसें-न. स्मित करणें; गालांतल्या गालांत हसणें; मोठा आवाज न करतां हसणें.

दाते शब्दकोश

बिंद

पु. (अशिष्ट) १ बिंदु; थेंब. २ पुरुषाचें वीर्य किंवा त्याचा एक थेंब. ३ अश्रु. 'नेत्रावाटे वाहे बिंद । याचा डोळा लागेना ।' -एकनाथ, कृष्णपदें. [सं. बिंदु]

दाते शब्दकोश

बसर

(पु.) हिंदी अर्थ : नजर, आँख. मराठी अर्थ : दृष्टि, डोळा.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

बुलाखा

पु. (व.) रागानें नाक व डोळे वर चढवून धरून केलेली चर्या. [?बुलुक् = मोठा डोळा]

दाते शब्दकोश

बुलबुल, बुलबूलबोचा, बुल्बूल

पु. १ एक गाणारा पक्षी. २ (लहान मुलांची) बडबड; जीभ वळवळ करणें, (क्रि॰ लावणें; मांडणें; करणें)-क्रिवि. एकसारखी बडबड करून; जिभेची टकळी लावून (लहान मुलांनीं बोलणें).(क्रि॰ करणें; बोलणें). [फा.बुल्बुल्] बुलबुल चष्मी-वि. (बुलबुल पक्ष्याच्या डोळ्यासारखे) एका विशिष्ट प्रकारचे कांठ ज्याला आहेत असें(वस्त्र).'या धोतरजोड्याचे रेशमी कांठ बुलबुल चष्मी विणकरीचे आहेत.' [फा.बुल्बुल् + चष्मा = डोळा]

दाते शब्दकोश

भोंदूपण

बहिस्त्यागी अंतःसंगी, वरून गोरा पण आंत काळा, बगलेत सुरा मुखीं रामनाम, वचस्येकं मनस्येकं, शेंदूर फासलेले दगड, पायघोळ संतपणा, बोकेसंन्यासी, दिवा न भुंक्ते, पुराणांतलीं वांगीं पुराणांत, केवळ गिलीट, खोटें नाणें, मोठा बुडबुडा, बेगडी धार्मिकता, मायावी रूप, बोलण्यांत मिठ्ठास, पोटांत एक नी ओठांत एक, नुसती दाढी; आंत ऋषीच नाहीं ! दिसायला भोळा नी मुदलावर डोळा, आंत एक बाहेर एक असे, गळ्यांत माळ नी गरिबांचा काळ.

शब्दकौमुदी

चाक्षुष

न. प्रत्यक्ष ज्ञान. डोळ्यापासून होणारें ज्ञान. -पु. सहावा मनु. -वि. १ नेत्रविषयक; डोळ्यासंबधीं; दृष्टीसंबंधीं २ दृश्य; दिसणारें. [सं. चक्षुस् = डोळा]

दाते शब्दकोश

चाळणे      

सक्रि.       १. करणे : ‘ऐसा चाळीत नाना युक्ती’ - मुआदि ४२·३. २. पेलणे; झेपणे : ‘परी जेणें शस्त्रासी चाळिजे । यश गौरव त्यासीच साजे ।’ - मुसभा ७·७०. ३. फिरविणे : ‘वायसा एकें बुबुळें दोहींकडे । डोळा चाळिता अपाडें ।’ - ज्ञा १३५. ४. चाळणीत घालून गाळणे. ५. पुस्तकाची पाने, घराची कौले, विड्याची पाने इ. उलटणे; गंजिफा पिसणे. ६. धुंडाळणे; शोधणे. ७. (पुस्तक वगैरे) धावते वाचन करणे. [सं. चालन]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चाळणें

सक्रि. १ करणें. 'ऐशा चाळीत नाना युक्ती' -मुआदि ४२.३. २ पेलणें; झोपणें. 'परी जेणें शस्त्रासी चालिजे । यश गौरव त्यासीच साजे ।' -मुसभा ७.७०. 'नावके चाळवूं वीरेशा पाठी पुरवूं कामना ।' -भुवन ४.१०९. ३ फिरविणें. 'वायसा एकें बुबुळें दोहींकडे । डोळा चाळितां अपाडें ।' -ज्ञा १५.१३५. ४ चाळणींत घालून गाळणें. ५ पुस्तकांचीं पानें, घराची कौलें, विड्यांची पानें इ॰ उलटणें; गजिफा पिसणें. 'यंदा बंगल्याचीं कौलें चाळलीं नाहींत म्हणून फार गळतें. ६ धुंडाळणें; शोधणें. उदा॰ घरघर, देशदेश, गांवगांव चाळणें. 'सगळें घर चाळलें, तरी आंगठी सांपडत नाहीं.' [सं. चलन] चाळूनचाळून, चाळूनपाळून-क्रिवि. पुनःपुनः उचलून; फिरवून; उलटापालट करून; अदलाबदल करून.

दाते शब्दकोश

चौथा

चौथा cauthā m A measure in Khándesh. See चोथवा & डोळा.

मोल्सवर्थ शब्दकोश

चिमणडोळ्या

वि. चिमणीच्या डोळ्यांप्रमाणें लहान, बारीक डोळे असलेला (मनुष्य). [चिमणी + डोळा]

दाते शब्दकोश

चिपड, चिपडा      

न.       डोळ्याला येणारा चिकट पांढरा मळ, मळाचा तंतू; तुकडा : ‘डोळा निघतीं चिपडें । नाकीं दाटलीं मेकडे ।’ - दास ३·१·२१.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चिपडा

पु. डोळ्यांतील चिकट मळ, गू, पू. -वि. १ चिकटा आलेला (डोळा). 'पाहों न शकति कोण्ही जन डोळे भानुतें जसे चिपडे ।' -मोअनु १.२७. २ चिपडलेल्या डोळ्याचा; मिचमिच्या डोळ्याचा (मनुष्य). 'चिपडे अमंगळ तीं पोरें । प्रिय कृष्णासी अद्भुत रें ।' -रासक्रीडा २२. [सं. चिपिट]

दाते शब्दकोश

चिपका      

वि.       (वर्णविपर्यासाने झालेले पिचका या शब्दाचे रूप). १. अर्धवट मिटलेला; चिपड्या; मंद तेजाचा; ज्यातून पाणी गळते आहे असा (डोळा). २. पिचक्या डोळ्याचा (मनुष्य).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चिपका

वि. (वर्णविपर्यासानें झालेलें पिचका याचें रूप). १ अर्धवट मिटलेला; चिपड्या; मंद तेजाचा; ज्यांतून पाणी गळतें आहे असा (डोळा). २ पिचक्या डोळ्याचा (मनुष्य).

दाते शब्दकोश

चक्रपाळणा      

पु.       १. यात्रेच्या, जत्रेच्या प्रसंगी टांगलेले फिरते पाळणे. २. गोलाकार फिरणारा पाळणा, डोला.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चक्षु

(सं) पु० डोळा, आख, नेत्र.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

चक्षु, चक्ष

न. डोळा; नेत्र; नयन; आंख; पाहण्याच इंद्रिय 'बाह्यत्वचा श्रवण । चक्षु रसना घ्राण । हे पंचविध जाण । इंद्रियें गा ।' -ज्ञा १८.४९९. 'जगीं पाहता ज्ञानचक्षीं न रक्षे ।' -दावि ५७. [सं. चक्षुस्, चक्षस्; फा. चश्म] म्ह॰ चक्षुर्वैसत्यं = डोळ्यानें पाहिलें तें खरें.

दाते शब्दकोश

चक्षु, चक्षू, चक्ष      

पु.       डोळा; नेत्र; नयन; आख : ‘बाह्यत्वचा श्रवण । चक्षु रसना प्राण । हे पंचविध जाण । इंद्रियें गा ।’ – ज्ञा १८·४९९; ‘जगीं पाहता ज्ञानचक्षीं न रक्षे ।’ – दावि ५७. २. दृष्टी. ३. दिव्य ज्ञान [सं. चक्षुस्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चख      

न.       डोळा; चक्षू : ‘चखे आसतां आंधु जाहाला ।’ - क्रिपु ४२.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चंद्र

पु. आकाशांत दिसणारा एक कलायुक्त व सूर्यप्रकाशित गोल; पृथ्वीचा उपग्रह; नवग्रहांतील दुसरा ग्रह; चंद्रमा; चांद; चांदोबा; सोम. २ मुसलमानी तारीख. 'आज चंद्र तेरावा माहे मोहरम.' ३ (ल.) कित्येक गाई, म्हशी इत्यादिकांच्या तोंडा- वर जो पांढरा ठिपका असतो तो. ४ स्त्रिया कपाळावर जी अर्ध- चंद्राकृति गोंदतात ती कोर. ५ मोराच्या पिसांतील डोळा. ६ चंद्रामृत. 'तैसें शरीर होये । जे वेळीं कुंडलिनी चंद्र पिये ।' -ज्ञा ६.२५९. ७ (तंजा.) स्त्रियांच्या नाकांतील एक अलंकार. ८ डोक्यांतील एक चंद्राकार दागिना. [सं.] (वाप्र.) (सुतानें) चंद्र ओवाळणें-द्वितीयेच्या दिवशीं दिसणार्‍या नूतन चंद्रावरून सूत किंवा दशी ओवाळणें. यामुळें नूतन वस्त्रे मिळतात अशी समजूत आहे. ॰पिकणें-पूर्ण चंद्रबिंबाचा प्रकाश पडणें. 'चंद्र पिकलासे अंबरीं । तें पिक घ्यावें कीं चकोरीं ।' -कथा १.८.६२. ॰मोहरणें- (माण.) चंद्र उगवणें. चंद्रानें कोंबडा करणें-चंद्राला खळें पडणें. म्ह॰ चंद्रम् दिवटे दिवम् थाळी = (व्यंगोक्तीनें) अत्यंत दरिद्रावस्था; ज्याच्या घरांत चंद्र हा दिवटीचें काम करतो व नागवेलीचें पान थाळीच्या ऐवजीं उपयोगी पडतें. सामाशब्द-॰कर-पु. १ चंद्र- किरण. 'हारपती कां चंद्रकर । फांकतां जैसे' -ज्ञा १८.४०६. २ चंद्रकळा लुगडें. 'थाट करुनि मार नेसली चंद्रकरकाळी ।' -मसाप १.१.२. ॰कला-ळा-स्त्री. १ चंद्राची कला; चंद्रबिंबाचा षोडशांश. २ एक प्रकारचें एक रंगी लुगडें (तांबडे अथवा काळें). चंद्रकला गंगा जमुना = उभार व आडवण काळें, किनार एक बाजू हिरवी, एक बाजू तांबडी असें एक स्त्रियांचें वस्त्र. ३ चंद्राचा प्रकाश, किरण. 'जैसें शारदीयेचें चंद्रकळे- । माजीं अमृत कण कोंवळे ।' -ज्ञा १.५६. ॰कांत-पु. एक काल्पनिक रत्न, मणि; चंद्राचे किरण यावर पडले असतां यास पाझर फुटतो असा समज आहे. 'अहो चंद्रकांतु द्रवतां कीर होये । परि ते हातवटी चंद्रीं कीं आहे ।' -ज्ञा ९.२९. ॰कांती-वि. चंद्रकांताचा बनविलेला (चष्मा). [सं.] ॰कोर-स्त्री. चंद्राची कोर; किनार. (कु.) १ चंद्रको- रेच्या आकाराचें एक सुवर्णाचें शिरोभूषण. या कोरेला लागूनच नाग व विष्णुमूर्ति कोरण्याची हल्लीं नवी तर्‍हा निघाली असून याच्या पुढच्या बाजूस घागर्‍या लावितात. २ (कों.) कपाळा- वरची कुंकवाची अगदीं बारीक लहान कोर. [चंद्र + कोर; तुल॰ सं. चंद्रकेयूर (-राजवाडे भाअ १८३४)] ॰ग्रहण-न. चंद्रास लाग- णारें ग्रहण. ग्रहण पहा. पृथ्वीच्या छायेंत चंद्र आला असतां त्याला ग्रहण लागतें तें. [सं.] ॰घार-घारी-स्त्री. (विनोदार्थीं) कानशिला- वर लावलेली चपराक; चापटी; मार. (क्रि॰ दाखवणें, देणें). 'मुष्टि- मोदक चंद्रघार्‍या दिल्या म्हणजे विद्या येते.' [चंद्र + घार (पक्षी)] ॰चकोरन्याय-पु. चंद्र अमृतबिंदु स्त्रवतो व चकोर सेवन करतो त्यावरून असणारा चंद्र व चकोर यांमधील संबंध. ॰चूड- शेखर-पु. महादेव; शंकर. याच्या जटेंत चंद्रकला असते यावरून. [सं.] ॰जोत, ज्योति-स्त्री. १ चंद्रासारखा प्रकाश देणारें दारू- काम; हवाई; याचे निरनिराळे प्रकार आहेत-सफेत, तांबडी, लाल, हिरवीगार, पिवळी, अस्मानी, किरमिजी, गुलेनारा, आबाशाई, जांभळी, नारिंगी, प्याजी. 'चंद्रज्योती चंद्रकार । तेजें अंबर प्रकाशे ।।' -ह २.१२९. २ (व.) मोंगली एरंड. याच्या बिया विषारी असतात, परंतु जाळल्या असतां चंद्राप्रमाणें प्रकाश पडतो. ३ चांदणें; चंद्रप्रकाश. ४ (उप.) कुटुंबांदिकाला लाग- लेला कलंक, डाग. ५ डोळ्यांत घालावयाचें एक औषध. [चंद्र + ज्योति] ॰ज्योत्स्ना-स्त्री. (काव्य) चंद्रप्रकाश, चांदणें. 'मुखीं चंद्रज्योत्स्ना अवयव यथापूर्व बरवे ।' ॰धणी-स्त्री. मनाची तुप्ति. 'जाऊं चोरूं लोणी । आजी घेऊं चंद्रधणी ।' -तुगा २२८. ॰नक्षत्र-न. चंद्राधिष्ठित नक्षत्र [सं.] ॰पर्व-न. चंद्रग्रहणाचा काल, अवधि. [सं.] ॰प्रभा वटी-स्त्री. रससिंदूर, सुवर्णभस्म, अभ्रकभस्म हीं सर्व समभाग, सर्वांबरोबर खैराचा कात, मोचरस घेऊन सर्वांचा एकत्र खल करून सावरीच्या मुळ्यांच्या रसानें एकत्र दोन प्रहर खलून हरभर्‍याएवढी गोळी करतात ती. ही अतिसारावर गुणकारी आहे. -योर १.४३४. ॰फूल- न. सोन्याचा एक दागिना. -ऐरापु विवि ४२९. ॰बल-ळ- न. १ चंद्राची अनुकूलता. माणसाच्या जन्मराशीला चंद्राचें साहाय्य. २ (ल.) मदत; साहाय्य 'नेदावें चोराशीं चंद्रबळ ।' -तुगा ३२५३. ओढून चंद्रबळ आणणें-१ एखादी गोष्ट इष्ट असतांहि वरपांगीं तिच्याविषयीं अनिच्छा दाखविणें; आढे- वेढे घेणें. 'आजीनें मला हांका मारल्या मी बराच वेळ ऊं ऊं करून ओढून चंद्रबळ आणिलें... शेवटी दुर्गीनें मला ओढून नेलें.' -पकोघे. २ अंगीं प्रतिष्ठा नसतां बळेंच धारण करणें. (एखाद्यास) चंद्रबळ देणें-एखाद्यास कांहीं कार्याविषयीं उत्ते- जन देणें. -तुगा ३२५३. ॰बाळी-स्त्री. (कु.) कानांतील एक मोत्यांचा दागिना. चंद्रपश्वा. यामध्यें चंद्रकोरेप्रमाणें हिरकणी बसवितात. ॰बिंब-न. चंद्राचें बिंब, मंडल, गोल. [सं.] ॰मजकूर-पु. (व.) (विनोदानें) रोजची चंदी. ॰मंडळ-न. १ चंद्रलोक; चंद्रभुवन; चंद्राचें राज्य. २ चंद्रबिंब. 'शुद्ध चंद्रमंडल पाहून स्नान करावे.' [सं.] ॰मणि-पु. एक काल्पनिक रत्न. चंद्रकांत पहा. चंद्रमा-पु. १ चंद्र. 'मुखचंद्री चंद्रमा ।' -एरुस्व ७.१७. २ (तंजा.) एक शिरोभूषण. [सं.] ॰मुखी-वदना- स्त्री. चंद्रासारखें जिचें तोंड आहे अशी रूपवती स्त्री; सुंदर स्त्री. [सं.] ॰मूलिका, मूळ-स्त्रीन. एक वनस्पति. [सं.] ॰मौळी- पु. शंकर. 'उठोनियां प्रातःकाळीं । वदनी वदा चंद्रमौळी ।' -भूपाळी गंगेची ६. 'नाम जपतां चंद्रमौळी । नामें तरला वाल्हा कोळी ।' -तुगा २५२२. -वि. (डोक्यावर चंद्र धारण करणारा) ज्याच्या छपरांतून चंद्रकिरणांचा प्रवेश आंत होतो असें (म्हणजे मोडकळीस आलेलें, जीर्ण झालेलें) घर इमारत; पडक्या घराला व्याजोक्तीनें म्हणतात. [स. चंद्रमौलि = शंकर] म्ह॰ केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी. ॰रेखा-स्त्री. चंद्राची कोर. 'पाडि व्याची चंद्ररेखा । निरुती दावावया शाखा ।' -ज्ञा १५.४७०. [सं.] ॰वंती-स्त्री. चांदणें. 'नदीतटीं रात्री न चंद्रवंती ।' -जगन्नाथ (शके १६६९.) राजवाडे ग्रंथमाला ॰विकासी-वि. चंद्रोदयानंतर उमलणारें (कमलादि पुष्प). शाला-स्त्री. उंच माडी; गच्ची. 'चंद्रासही स्पर्शति चंद्रशाळा ।' -सारुह ५.२०. ॰समुद्रन्याय-चंद्रोदयानें समुद्रास भरती येते या न्यायानें. 'वॉसवेल यास या महापंडिताचें (जॉन्सनचें) वक्तृत्वसेवन कर- ण्याची...अतोनात इच्छा होती व इकडे जॉन्सन यासहि कोणी भाविक श्रोता मिळाला असतां चंद्रसमुद्र न्यायानें त्याच्या वाणीस मोठें भरतें येई.' -नि ६८६. ॰सूर-पु. (योगशास्त्र) डाव्या नाकपुडीनें श्वास सोडणें. याच्या उलट सूर्यसूर. ॰सूर्य-पु. (चंद्र आणि सूर्य) इडा व पिंगला या दोन नाड्या. 'चंद्रसू्र्यां बुझा- वणी । करूनि अनुहताची सुडावणी ।' -ज्ञा १२.५४. ॰सूर्य- संपुट-न. वरील दोन नाड्यांचें संगमस्थान. 'बंधत्रयाचीं घरटीं । चंद्रसूर्य संपुटीं । सुये चित्त ।' -ज्ञा १३.५०८. ॰हार-पु. स्त्रियांच्या गळ्यांतील एक अलंकार; सोन्याच्या कड्यांची माळ.

दाते शब्दकोश

चंद्र      

पु.       १. आकाशात दिसणारा, कला असलेला एक सूर्यप्रकाशित गोल; पृथ्वीचा उपग्रह; नवग्रहांतील दुसरा ग्रह; चंद्रमा; चांद; चांदोबा; सोम. २. मुसलमानी तारीख. ३. (ल.) गाई, म्हशी इत्यादिकांच्या कपाळावरील पांढरा ठिपका. ४. स्त्रियांच्या कपाळावर गोंदलेली अर्धचंद्राकृती कोर. ५. मोराच्या पिसातील डोळा. ६. चंद्रामृत : ‘तैसें शरीर होये । जै वेळीं कुंडलिनी चंद्र पिये ।’ – ज्ञा ६·२·५९. ७. स्त्रियांच्या नाकातील किंवा डोक्यातील एक चंद्राकार दागिना. –(तंजा) [सं.] (वा.) (सुताने) चंद्र ओवाळणे – द्वितीयेच्या दिवशी दिसणाऱ्या नूतन चंद्रावरून सूत किंवा दशी ओवाळणे. यामुळे नवीन वस्त्रे मिळतात अशी समजूत आहे. चंद्र पिकणे – पूर्ण चंद्रबिंबाचा प्रकाश पडणे : ‘चंद्र पिकलासे अंबरीं । तें पिक घ्यावे की चकोरीं ।’ – कक १·८·६२. (माण.) चंद्राने कोंबडा करणे – चंद्राला खळे पडणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चोपा(फा)ळा

पु. १ झोंपाळा; झोंपा; दोला; आंदोला. २ (कु.) फळ्यांची चार खुरांची, खाट, चोपाळा. [सं. चौ + फलक = फळा; हिं. चौपाला = पालखी, रथ]

दाते शब्दकोश

चोपाळा, चोफाळा      

पु.       १. झोपाळा; झोपा; दोला; आंदोला. २. फळ्यांची चार खुरांची खाट, चोपाळा. (कु.) [सं. चौ+फलक]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चोफाळा

पु० झोंपा, झोंपाळा, दोला.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

चश्म      

पु.       डोळा. [फा.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चश्म

(स्त्री.) हिंदी अर्थ : आँख. मराठी अर्थ : डोळा.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

पु. डोळा. -मुधो. [फा.]

दाते शब्दकोश

चश्मा-ष्मा, चस्मा

पु. १ आरशी; चाळशी; डोळ्याचीं भिंगें; उपनेत्र. 'अधिकाराचे चष्मे याच्या डोळ्यास लागल्या- वर त्याला पूर्वींचें जग निराळ्या रंगाचें दिसुं लागतें.' -टि ३.३३७. २ पडवी; ओटी ३ नाटकगृहांतील प्रेक्षकांसाठीं केलेली खास खोली. ४ दोन खांबांमधील किंवा तुळ्यांमधील जागा; खण. [फा. चष्म् = डोळा, चष्म-आरशी; तुल॰ सं. चक्षुमत्] ॰(अमुक)चष्म्यांतून पाहणें-अमक्या प्रकारची, विशिष्ट दृष्टी ठेवणें; अमुक दृष्टीनें पाहणें. -के १७.४.३०. ॰पोशी-स्त्री. डोळेझांक. 'गोष्टी बोलेल त्यास चष्मपोशी करून ऐकल्या पाहिजेत.' -मरिठवि २.३१४.

दाते शब्दकोश

चुकाव(वि)णें

सक्रि. १ चुकविणें; खोटें करणें. 'लोकीं केलें तें चुकावी । लोकिं भाविलें तें उलथवी ।' -दा ११.१०.११.२ टाळणें; नजर, डोळा चुकविणें. 'मातें करीं धरिल देखुनि एक लीला । चाले चुकावुनि पुढें चमकोनि घोषा । बिंबाधरा शशिमुखीं पिकमंजुघोषा । ' -आकं ३ [चुकणेंचें प्रयोजक रूप]

दाते शब्दकोश

चुकावणे, चुकाविणे      

सक्रि.       १. चुकविणे; खोटे करणे : ‘लोकीं केलें तें चुकावी । लोकिं भाविलें तें उलथवी ।’ − दास ११·१०·११. २. टाळणे; नजर, डोळा चुकविणे : ‘मातें करीं धरिल देखुनि एक लीला । चाले चुकवुनि पुढें चमकोनि घोषा । बिंबाधरा शशिमुखीं पिकमंजुघोषा ।’ − आकं ३. [चुकणे प्रयोजक]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चुकावणी      

स्त्री.       नजर चुकविणे; टाळणे; डोळा चुकविणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चुकावणी

स्त्री. नजर चुकविणें; टाळणें; डोळा चुकविणें. [चुकविणें]

दाते शब्दकोश

डहू

पु. नारळाचा डोळा हें तोंड ठेवून आंतील खोबरें पोखरून काढून केलेलें पात्र. डव पहा.

दाते शब्दकोश

दलोत्तराक्ष      

पु.       (कृषि.) पानावरील डोळा. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

डोलारा, डोल्हारा      

पु.       डोल; लहानसा झोपाळा; हिंदोळा; बंगई; देवाचा पाळणा; झुलता देव्हारा : ‘अंतःकरणाचे डोल्हारीं । आत्मा निजविला श्रीहरी ।’ –देकृज ७९. [सं. दोला]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

डोळढांपणें

डोळढांपणें ḍōḷaḍhāmpaṇēṃ n (डोळा & ढांपणें) A blind for the eyes (of cattle when moving round a mill &c.): also a horse-blind.

मोल्सवर्थ शब्दकोश

डोळेउजेडीं

डोळेउजेडीं ḍōḷēujēḍīṃ ad (डोळा & उजेड) In the dusk of the evening; whilst it is yet light; before dark. Ex. डो0 घरीं ये. 2 Plainly, plump, outright, before one's face. Ex. तुझे मनांत काय तें डो0 सांग.

मोल्सवर्थ शब्दकोश

डोलना

पु. डोला; प्रेताची तिरडी; प्रेताची पालखी. ‘शिद्दी सुरुरखान साहेब फौत जाले. त्यांचा डोलना बाहेर राज पुरीस आणिला.’ –जंजिरेकर शिद्दी हकीगत, भारतवर्ष ३.

दाते शब्दकोश

डोलना      

पु.       डोला; प्रेताची तिरडी; प्रेताची पालखी : ‘शिद्दी सुरुरखान साहेब फौत जाले. त्यांचा डोलना बाहेर राजपुरीस आणिला.’ –भावजंसि ३.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

डोळस

डोळस ḍōḷasa a (डोळा) Having eyes or sight, seeing. Ex. विठाई ॥ सावळे डोळसे ॥ रगा येई हो ॥. Also कां डोळसाचे धरूनि कर ॥ अंधळा सत्वर चालतसे ॥. 2 fig. Sharp, shrewd, quick, discerning. 3 fig. Sharp-sighted. Ex. म्हणे एक सकुमार राजसे ॥ चंपक- कळिके परम डोळसे ॥. 4 (डोळ) Jocosely. Having unhusked grains amongst it--husked and split pulse.

मोल्सवर्थ शब्दकोश

वि. १ डोळे, दृष्टि शाबूत असलेला. 'कां डोळ- साचे धरूनि कर । अंधळा सत्वर चालतसे ।' २ (ल.) चतुर; हुषार; चलाख; काकदृष्टीचा; दूरवर दृष्टि पोंचविणारा; सूक्ष्मदृष्टि; चाणाक्ष. 'ज्ञान जी तुझेनि डोळस ।' -ज्ञा १४.१०. ३ तीक्ष्ण दृष्टीचा. 'म्हणे ऐक सकुमार राजसे । चंपककळिके परम डोळसे ।' ४ सुंदर डोळ्याचा. 'रंगा येईं वो विठाई । सांवळिये डोळसे ।' -तुगा २८२. ५ स्वच्छ; प्रत्यक्ष. तें ज्ञान नोहे जाणावें । डोळस तम ।' -ज्ञा १८.५८१. ६ (थट्टेनें) डोळ असलेली (डाळ, वरण इ॰). [डोळा] डोळसता-स्त्री. डोळे असणें; दृष्टि. 'देखणे- पणेंवीण डोळसता । तोची माथां स्तबक ।' -एरुस्व १.६६. डोळस वरण-वि. डोळानें युक्त अशा डाळीचें वरण.

दाते शब्दकोश

डोळू

डोळू ḍōḷū m (डोळा Eye.) A hole (in a vessel, cloth, plank): a hole (through a hedge or fence): an eyelet or a little hole.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. १ छिद्र; भोंक (भांडें, कागद, कापड इ॰स पडलेलें). २ भगदाड; भोंक (कुंपणास पडलेलें). [डोळा] डोळूक-पु. १ डोळू पहा. २ साप; मासा इ॰चें डोकें.

दाते शब्दकोश

दृष्टिचोर      

पु.       दुसऱ्याचा डोळा चुकवून चोरण्याचा, पळण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा मनुष्य.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

डुळका

डुळका ḍuḷakā a (डोळा) Pink-eyed or purblind: also pink or small--eyes.

मोल्सवर्थ शब्दकोश

डुळूं

डुळूं ḍuḷūṃ n डुळू m (डोळा) A little hole (in a vessel, cloth &c.) Ex. कणगीला पडलें डुळूं.

मोल्सवर्थ शब्दकोश

डुळूं, डुळू

नपु. (भांडें, कापड इ॰ला पडलेलें) लहान भोंक. 'कणगीला पडलें डुळूं.' [म. डोळा; तुल॰ का. डोळ- डोळ् = भगदाड]

दाते शब्दकोश

डव      

पु.       १. लहान नारळाचा डोळा हे तोंड ठेवून खरवडून तयार केलेले पात्र; डहू. २. नारळाची पळी; डाव. नारळाच्या करवंटीला लाकडी मूठ लावून केला जाणारा डाव; लाकडी डाव. [सं. दर्वी]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ढालढकल

स्त्री. दिरंगाई; चालढकल; पुढें टाकणें; अळंटळं; एखादी गोष्ट करण्याचें दिरंगाईवर टाकणें; काणा- डोळा. ‘आमचीं कामें ढालढकलीखालीं पडल्यास कसें पुरवेल.’ -रा १४.५९; ‘परंतु याउपरी तैसीच ढालढकल करावी यैसा अर्थ नाहीं.’ –पेद ३३.२९२. [ढकलणें द्वि.]

दाते शब्दकोश

एकांगुळ      

वि.       एक डोळा गारोळा आणि एक पांढरा असणारा (घोडा); एक मंडलिया. ही एक घोड्याची खोड आहे - अश्वप १·९४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

एकांगुळ

वि. एक डोळा गारोळा आणि एक पांढरा असणारा (घोडा); एक मंडलिया. (फा.) हफीर. ही एक घोड्याची खोड आहे. –अश्वप १.९४. [एक + अंग]

दाते शब्दकोश

एकडोळा      

पु.       १. एक डोळा. २. (ल.) एकुलता एक मुलगा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

एकडोळी करोटी-करवंटी

स्त्री. एक डोळा (भोंक) असलेली, शेंडीकडील बाजूची, करवंटी, नरोटी.

दाते शब्दकोश

एकडोळसां

न. (कु.) एक जातीचा मासा. [एक + डोळा]

दाते शब्दकोश

गारसा

वि. (व.) गारोळा; घारा (डोळा इ॰). 'त्याचे डोळे गारसे आहेत.' [घार].

दाते शब्दकोश

गारसा      

वि.       गारोळा; घारा (डोळा इ.). (व.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गढूळ

वि. १ खडूळ; गदळ; रेंदाड; मातीनें युक्त; राड; अस्वच्छ. 'किंवा गढूळ झालें असतां उदक । स्थीरावल्या दावी पवित्र मुख ।' -नव २४.१४९. २ तांबडसर (डोळा). ३ (ल.) क्षुब्ध; अस्वस्थ; व्यग्र; कलुषित; विकारवश (राग, दुःख, क्लेश, मत्सर, संशय, हेवा इ॰ मनोधर्मामुळें). ४ अंदा- धुंदी; बंडाळीनें व्याप्त (राज्य, देश). ५ आचारभ्रष्ट; धर्मभ्रष्ट (जात, वर्ण, व्यक्ति). ६ खाडसाळ; गोंधळाचा (हिशोब). [प्रा. गडुल = तांदूळ वगैरे धुतलेलें पाणी? तुल॰ का. गदडु = जोराने हलविणें]

दाते शब्दकोश

गढूळ      

वि.       १. खडूळ; गदळ; रेंदाड; मातीने युक्त; राड; शबल; अस्वच्छ : ‘किंवा गढूळ झालें असतां उदक । स्थीरावल्या दावी पवित्र मुख ।’ - नव २४·१४९. २. तांबडसर (डोळा). ३. (ल.) क्षुब्ध; अस्वस्थ; व्यग्र; कलुषित; विकारवश (राग, दुःख, क्लेश, संशय, हेवा इ. मनोधर्मामुळे.). ४. दूषित; पूर्वग्रहयुक्त. ५. अशुद्ध; गोंधळाचा; लबाडीचा; खोडसाळ (हिशेब). ६. अंदाधुंदी, बंडाळीने व्याप्त (राज्य, देश.). ७. आचारभ्रष्ट, धर्मभ्रष्ट (जात, वर्ण व्यक्ती).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गलित

वि. १ पडलेला; सांडलेला; फेकलेला; गळलेला 'भक्षोनियां शुष्क गलीत पाला ।' -नरहरि, गंगारत्नमाला ५६. (नवनीत पृ. ४२२.) २ वितुळलेलें; पाघळविलेलें; पातळ (रस) केलेलें. ३ (ल.) खगलेला; सुकलेला; क्षयी; र्‍हास किंवा खराब झालेला; निःशक्त. 'गलित झाली काया । तेचि लळित पंढरि राया ।' [सं. गल् = गळणें] सामाशब्द- ॰काय-देह-शरीर- अंग- वि. रोडका; लुकडा; क्षीण; सुकट्या. ॰काया-स्त्री. अशक्त झालेलें शरीर. ॰कुष्ट-नपु वाहणारें कोड; रक्तपिती. 'शर भंगु महाऋषि । परि गलितकुष्ट भरला त्यासि ।' [सं.] ॰चक्षु-पु अश्रु (आसवें) पाझरणारा, वाहणारा डोळा. [स.] ॰दंत-चक्षु-नास-केश-नख-वि. दात पडलला; डोळे गेलेला इ॰. [सं.] ॰नास न. शेंबडें नाक. [सं.] ॰पत्र-न १ झाडाचें गळलेलें पान २ (ल.) फार वार्धक्याने किंवा रोगानें निःशक्त झालेला माणूस; शिथिलावयवी पदार्थ. ३ (ल.) पदभ्रष्ट, अधिकारच्युत, सत्ता हीन माणूस. [सं.] ॰पात्र-न. गलितपत्र अर्थ ३ पहा. ॰यवन- वि. उतारवयाचा; म्हातारा. [सं.] -तेंद्रिय-वि. इंद्रिये किंवा ज्ञानेंद्रिय नष्ट झालेला. [सं.]

दाते शब्दकोश

गलित, गलितचक्षु, गलितचक्षू      

पु.       अश्रू (आसवे) पाझरणारा, वाहणारा डोळा. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गोलाम

न पुष्प; कापुर. कुंकुम कस्तुरी चंदन पालवी । गोलामे परतौनि नवीं । हा लेपु सिर व्यथे लावितां देवी । डोळा झांपडी पडत ।’ –नरुस्त्र ५४२. [?]

दाते शब्दकोश

गटगोळा or गटंगोळा

गटगोळा or गटंगोळा gaṭagōḷā or gaṭaṅgōḷā m (गट & गोळा) Gobbling up; devouring a large quantity at a mouthful. v कर or करून टाक. Ex. ग0 वरतीं डोळा Used of a wholesale peculator or embezzler affecting simplicity and purity.

मोल्सवर्थ शब्दकोश

गुरमाळणे      

अक्रि.       पेंगुळणे; झोप येणे : ‘तोंडातला उष्ण विडा चघळता चघळता त्याचा डोळा गुरमाळला.’ - सीए १२४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घारा      

वि.       रंगविशेष; १. मांजराच्या डोळ्यांच्या रंगाचा (डोळा). २. घारडोळ्या (माणूस). [सं. गहिर]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घारडोळ्या

घारडोळ्या ghāraḍōḷyā a (घारा & डोळा) Having eyes of the color of cats' eyes.

मोल्सवर्थ शब्दकोश

घारेला, घारोळा      

वि.       १. किंचित, थोडासा घारा (डोळा). २. किंचित, थोडासा घारडोळ्या; गारोळा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घोटा

पु. पायाचा डोळा, खुबा; पायाची नळी व चवडा यांच्यामधील सांध्याचें हाड. [सं. घुट-टी घोटक -भंडारकर]

दाते शब्दकोश

घरसॉ      

वि.       घारा (डोळा). (गो.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घरसॉ

वि. (गो.) घारा (डोळा). [घार]

दाते शब्दकोश

घुमिली      

वि.       धुंद; कैफ चढलेला; तर्र झालेला (डोळा इ.) : ‘राधा हरिला पुसती । नेत्र विलासती लाल भासती । उघड दिसती दृष्ट घुमिली ।’ – होला २२.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घुमिली

वि. धुंद; माज आलेला; तर्र झालेला (डोळा इ॰). 'राधा हरिला पुसती नेत्र विलासती लाल भासती उघड दिसती दृष्ट घुमिली ।' -होला २२. [घुमणें = माजणें, कैफ येणें]

दाते शब्दकोश

घवघवी(वि)त

वि. १ पाहतांच डोळ्यांना आनंद देणारा; डोळ्यांत भरणारा; भरदार; भव्य. २ गोंडस; गुबगुबीत; धष्टपुष्ट; मोठा आणि देखणा (पुरुष, स्त्री). 'घवघवीत डोळां पहाताती ।' -रामदासी २.१२२. ३ ठळक; ठसठसीत; भरदार; डोळ्यांत भरणारा (दागिना, डोळा); हलका, खुरटा, बारीक याच्या उलट. ४ खूप दागिने घालून शोभणारी (स्त्री, मुलगी); तेजस्वी; भव्य; शोभणारा; भरदार (चेहरा, मुख). 'कांसे कशिला सोन- सळा । अपाद रुळे वनमाळा । घनसांवळा घवघवित ।।' -एभा ३.५५१. 'वदे ते अंबेसी घवघवित जीचा मुखविधू ।' -सारुह ८.८७. 'रत्नभूषणीं घवघवीत ।' -मुआदि ५.६. ५ ठळक; स्पष्ट; मोठा; चांगला ऐकूं येणारा. 'घंटाघोष घवघवीत ।' -मुवन १३.१०६. ६ चमचमीत; उंची खाद्य पदार्थांनीं भरलेलें (जेव- णाचें ताट, पान). 'वाढिलेंच असें घवघवीत ।' -रामदासी २.८१. ७ दरवळणार्‍या सुगंधानें युक्त; सुवासाच्या घमघमाटानें युक्त. [घवघव]

दाते शब्दकोश

घवघवीत      

वि.       १. पाहताच डोळ्यांना आनंद देणारा; डोळ्यांत भरणारा; भरदार; भव्य. २. गोंडस; गुबगुबीत; धष्टपुष्ट; मोठा आणि देखणा (पुरुष, स्त्री): ‘घवघवीत डोळां पहाताती ।’ –रामदासी २·१२२. ३. ठळक; ठसठशीत; भरदार; डोळ्यांत भरणारा (दागिना, डोळा). ४. खूप दागिने घालून शोभणारी (स्त्री. मुलगी); तेजस्वी; भव्य; शोभणारा; भरदार (चेहरा, मुख): ‘रत्नभूषणीं घवघवीत ।’ –मुआदि ५·६. ५. स्पष्ट; मोठा; चांगला ऐकू येणारा: ‘घंटाघोष घवघवीत ।’ –मुवन १३·१०६. ६. चमचमीत; उंची खाद्य पदार्थांनी भरलेले (जेवणाचे ताट, पान): ‘वाढिलेंच असें घवघवीत ।’ –रामदासी २·८१. ७. दरवळणाऱ्या सुगंधाने युक्त; सुवासाच्या घमघमाटाने युक्त.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

हाव

स्त्री. १ तीव्र इच्छा; ओत्सुक्य; बळकट आशा. (क्रि॰ भरणें; लागणें; धरणें). २ हिंमत; धमक; धाडस; दम. 'हजार रुपये खर्चीन अशी त्याची हांव आहे.' ३ तेज; प्रभा. -शर. ४ हव्यास; लोभ. [अर. हवा = आयुष्य, वार] ॰घालणें- (काव्य) आशा धरणें. 'मार्जारें देखिला लोणियाचा गोळा । लावूनिया डोळा हाव घाली ।' हाव करणें-मिळविण्या- साठीं धडपडणें; घाबरें होणें. ॰भरी भरणें-होणें-अतिशय उस्तुक होणें; लोभ उत्पन्न होणें. हावेस-नें-हावे भरणें- १ उत्सुकतेनें पत्करणें (असामान्य, विक्षिप्त योजना). २ मन घालून पाठपुरावा करणें; चिकाटी धरणें. ३ फार महत्त्वाकांक्षी बनणें, होणें. ४ हट्टास पेटणें. 'तों त्यावरि उठे भरले दोघेहि संगरीं हांव ।' -मोकर्ण ४५.३४. ॰भरी-वि. १ लोभयुक्त; हावरा; वासनायुक्त. २ मबत्त्वाकांक्षी; अति उत्साही; एखाद्या गोष्टीसाठीं वेडा झालेला (क्रि॰ होणें). हावर-रें-पु.स्त्री.न. अतिशय इच्छा; लोभ; हव्यास. (क्रि॰ सुटणें; भरणें). हावरा, हांवरा-वि. १ अत्यंत लोभी; कितीहि मिळालें तरी हवेंच अशा स्वभावाचा; आशाळभूत. २ उतावळा; हळवा; असहनशील (दुःख, ईप्सित वस्तु इ॰ संबंधीं). हावळा-वि. हवळा. हळवा पहा. हावा-पु. हव्यास. 'भणौनि तळौनि काढिला हावा । अमृतरूप ।' -ऋ ८१.

दाते शब्दकोश

हाव or हांव

हाव or हांव hāva or hāṃva f ए ( A Air, life &c.) Vehement or earnest desire: also earnest hope. v भर, लाग, & धर. 2 Spirit, ardor, daring, pluck, mettle, sponk. The word agrees well, although not wholly, with धमक q. v. 3 Rumor. हाव घालणें (esp. in poetry.) To cast a longing or strong desire after. Ex. मार्ज्जारें देखिला लोणियाचा गोळा ॥ लावुनिया डोळा हाव घाली ॥. हावहाव करणें To fire up eagerly to obtain or get, to catch at, to snap at. हावभरीं भरणें or होणें To be filled with eagerness or the excitement of desire. हावेस or हावेनें भरणें To take up eagerly (some scheme or plan, esp. as extravagant or eccentric); to pursue ardently and with full swing (some lofty or wild project): also to be intensely ambitious or aspiring (in the general tone of one's spirit).

मोल्सवर्थ शब्दकोश

ईक्षण      

न.       १. अवलोकन; पाहणे. २. डोळा; नयन : ‘देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ॥’− ज्ञा १·१५. [सं. ईक्ष्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ईक्षण

(सं) न० अवलोकन. २ डोळा, दृष्टि.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

न. १ अवलोकन; पाहणें. २ डोळा; नयन. 'देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ।।' -ज्ञा १.१५. [सं. ईक्ष् = पाहणें] ॰यंत्र न. एक प्रकारचा आरसा, परंतु यांत काचेच्या ऐवजीं धातूचा पत्रा असून त्यावरून किरणांचें योग्य तर्‍हेनें पृथक्करण होण्या- करितां तो घासून चांगला चकचकीत केलेला असतो. याचा उपयोग शस्त्रक्रियेच्या वेळीं आंतरिंद्रियें पाहण्यासाठीं, तसेंच परावर्तक दुर्बि- णींत करतात.

दाते शब्दकोश

जासलवट, जासवट      

न.        पळी; डाव; दर्वी : ‘तो पाळणे यावरूनि पडिला : तें जासलवट रूपलें : तो डोला फुटला :’ - लीचउ २७५.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जासवट

पु. (महानु.) पळी; डाव; दर्वी. ‘तो पाळन्यावरौनि पडीला तें जासवट रुपला तो डोळा फुटला.’ -उच २२४.

दाते शब्दकोश

जिंतु      

वि.        जिवंत : ‘तो जिंतु जाहाला ऐसा डोळा देखोनि । तुमीं साखिनादु दिधला ॥’ - क्रिपु १·८३.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

झोळा      

पु.       १. मोठी झोळी. २. डोळा : ‘तेणे झांपताति झोळे : सारथीयाचे’ – रुस्व २०७८. [सं. झौलिक]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

झोला

पु १ झोंका. (क्रि॰ देणें; घेणें.) २ फसवणूक; गप्प; कपट; लबाडी; टाळाटाळ. (क्रि॰ देणें.) ३ झोळ-ल; पदर; कांठ; सोगा. ४ घोळ सुटणें, सोडणें; झोलफुगारा (वस्त्राचा). ५ झोंपळा; हिंदोळा. ६ गोता; हिसका. 'जो देता मधुकैटभ-कनककशिपुमुख- महासुरां झोले ।' -मोस्त्री २.३०. ७ धोका; संकट; त्रास. 'येम- यातनेचा झोला कठीण आहे ।' -दा ११.३.८. ८ झोंक; कल; तोल., 'डोले बोलत बोल तों न धरवे गेलाचि झोला भला ।' -आसी ४४. [सं. दोला] ॰झोल-स्त्री. झुकांडी; टाळटाळ; टोलवाटोलवी. [झोलणें, झोलविणें द्वि.]

दाते शब्दकोश

झोळकंबा-कुंवा-खंबा-खुंबा

पु सैलपणें इकडेतिकडे; पुढेंमागें हलणें; झोल; झोका; लोंबकळी; हेलकावा. (क्रि॰ घेणें; खाणें). 'तदन्याय तरूवरतीं । देव उफराटे झोळकंबे घेती ।' -नव १२. १८५. २ झोपाळा; चोपाळा; पाळणा; झोला. [रां. दोला + खांब]

दाते शब्दकोश

झुला

पु. झोला. १ दोन काठ्यांत लोंबकळणारी पाटी. हींत बसून (जत्रेंत) झोकें घेतां येतात; पाळणा; हिंदोळा; झोंपळा; चौपाळा. २ डोंगराच्या कड्यांवर, नदीतीरांवर खांब वगैरे उभारून त्यांस दोरखंड बांधून त्या दोरावरून सरकणारी टोपली, तिच्यां- तून जाण्याची योजना. ३ वरीलप्रमाणें दोन कड्यांनां, तीरांनां दोरी बांधून त्या दोरीच्या साहाय्यानें खालीं बांधलेल्या लाकडा- वरून जाण्याकरतां केलेला रस्ता; दोरीचा पूल. उदा॰ 'लक्ष्मण झुला.' ४ झुलता बिछाना; झोपाळा; पाळणा. [सं. दोला; प्रा. झुल्ल; हिं. झूला]

दाते शब्दकोश

झुरणे      

अक्रि.       १. झिरपणे; स्त्रवणे; गळून जाणे. २. झिजून, झरून हळूहळू नाहीसे होणे (पावसाने भिंत इ.). ३. दुःखाने क्षीण होणे; खंत घेणे; झुरणीला लागणे. ४. (ल.) डोळा चुकवून पळून जाणे; निसटणे : ‘साधुसंता पाहुनि झुरा ।’ – सिसं ३·१७५. [सं.झृ]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

झुरणें

अक्रि. १ झिरपणें; स्त्राव होणें; झुरझुरणें पहा. गळून जाणें. २ झिजून, झरून हळू हळू नाहींसें होणें, झिजणें (पावसानें भिंत इ॰). ३ दुःखानें क्षीण होणें; खंत घेणें; झुरपणीस लागणें. 'पग पाहून मोर झुरे.' ४ (ल.) डोळा चुकवून पळून जाणें; निसटणें. 'साधुसंता पाहुनि झुरा ।' -सिसं ३.१७५. [सं, झृ. प्रा. झूर]

दाते शब्दकोश

कैरा or खैरा

कैरा or खैरा kairā or khairā a Of a gray pupil--an eye; and attrib. Wall-eyed;--used of horses &c. The कैरा- डोळा is among the inauspicious marks of the horse.

मोल्सवर्थ शब्दकोश

कैरा, खैरा

वि. १ कैरे डोळ्या; मांजर्‍या; घार्‍या डोळ्याचा (घोडा); कैराडोळा असणें हें अशुभचिन्ह आहे. २ ज्याचें बुबुळ घारें आहे असा (डोळा). ३ घार्‍या, करड्या रंगाचा. 'चितार भिंगारें खैरें । मोरें सेंवरें आणि कैरें ।' -ह १०.१९२. [हिं.]

दाते शब्दकोश

कैरा, खैरा      

वि.       १. कैरेडोळ्या; मांजऱ्या; घाऱ्या डोळ्याचा (घोडा). कैराडोळा असणे हे अशुभचिन्ह आहे. २. ज्याचे बुबुळ घारे आहे असा (डोळा). ३. घाऱ्या, करड्या रंगाचा : ‘चितार भिंगारे खैरें । मोरें सेवरें आणि कैरें ।’ - हरि १•१९२ [हिं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

काणा      

वि.       १. ज्याच्या दोन डोळ्यांपैकी एका डोळ्याची शक्ती गेली आहे असा; एका डोळ्याने आंधळा; एकाक्ष; डुचका : ‘काणीला जसे सोग्याचे काजळ शोभत नाही.’ - कमं ९·३२. २. तिरळ्या डोळ्याचा, चकणा; ज्याला बुबुळे तिरकस केल्याशिवाय दिसत नाही असा. हाच अर्थ विशेष रूढ आहे. ३. तिरळा (एका डोळ्याने, दोन्ही डोळ्यांनी.) काणा डोळा, काणे डोळे असे प्रयोग होतात. ४. ज्या देशात पाहिजे असलेला जिन्नस वेळेला मिळत नाही किंवा जेथील भाव एकदा स्वस्त तर एकदा महाग असतात असा देश, शहर, खेडे. ज्या देशात आपण दुष्कर्मादी कृत्ये केल्यामुळे पुन्हा त्या देशात जायला आपल्याला लाज वाटते तो देश, शहर, खेडे इ. ५. एक पेड मोठा व दुसरा बारीक अशा तऱ्हेने विणलेला दोर. तसेच तिडून वाकडी झालेली खाट, माचा, बाज. ६. तिरकस; तिर्यक्; तिरवा; वक्र; वाकडा : ‘जाईल काणे वाटारे ।’ - दावि १५८. [सं. काण = एकाक्ष) (वा.) काणाडोळा करणे - (अपराध, चूक इत्यादीकडे) दुर्लक्ष करणे. काणे होणे - दुर्लक्ष होणे. काण्याडोळ्याने पाहणे - कटाक्ष मारणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कानाडोळा      

पु.       १. (प्र.) काणाडोळा; एखाद्या अपराधाकडे दुर्लक्ष; मनात न आणणे. २. डोळ्यांनी केलेली खूण; गुप्त खूण. (क्रि. करणे.) ३. उदासीनपणा; दुर्लक्ष; आळस; ढिलाई. [सं. काण + डोळा]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कानाडोळा

कानाडोळा kānāḍōḷā m (Derived by some from कानाकडे डोळा करणें) Overlooking or passing by (of an offence): also connivance or winking at. 2 Slackness, languidness, indifference (on an occasion demanding fire and energy).

मोल्सवर्थ शब्दकोश

कांकरणें

अक्रि. (व.) मिटणें; लागणें. ' सगळ्या रात्रींत डोळा कांकरला नाहीं. '

दाते शब्दकोश

कांटेडोळे

कांटेडोळे kāṇṭēḍōḷē m pl (काटा & डोळा) Acute ophthalmia. v ये. Contrad. from शेणेडोळे Purulent ophthalmia.

मोल्सवर्थ शब्दकोश

कावळ्या आवय      

सारखी हिंडणारी व इकडची बातमी तिकडे करणारी बाई. (गो.) कावळ्याचा डोळा      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कल्हातणें

उक्रि. कलंडून पडणें-पाडणें. 'कां वाटे जातां वाघें । कल्हातांही डोळा लागे ।' -ज्ञा १४.१८८. [कलणें]

दाते शब्दकोश

कल्हणे, कल्हाणे, कल्हातणे      

अक्रि. कलणे; तोल जाणे; लवंडणे : ‘कां वाटे जातां वोघें । कल्हातांही डोळा लागे ।’ - ज्ञा १४·१८८. कल्हमा      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कलक

वि. काळा (कबूतराचा डोळा).

दाते शब्दकोश

कणी

स्त्री. डोळ्यांतील बाहुली. [सं. कनीनिका; का. कण = डोळा, कणी = दृष्टि, दर्शन]

दाते शब्दकोश

कोंजा, कोंझा, कोंझट      

१. खोल डोळ्याचा (माणूस.) २. खोल गेलेला व बारीक (डोळा). ३. (ल.) तुसडा; तिरसट. ४. संकुचित. [सं. कुचित] कोंटा :      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कोंजा, कोंझट-डा, कोंझा

वि. (कों.) १ खोलगट डोळ्याचा (माणूस). २ खोल गेलेला व बारीक (डोळा). ३ (ल.) तुसडा; तिरसट. [सं. कुंचित; प्रा. कोंचिअ]

दाते शब्दकोश

कटाक्ष

पु. १ डोळ्याच्या कोपर्‍यांतून पाहणें (साभि- प्रायानें); अपांगदर्शन-दृष्टि; डोळा घालणें, मारणें; वांकडी दृष्टि. 'काय चंचळू मासा । कामिनीकटाक्षु जैसा ।' -ज्ञा १४.१७०. २ (ल.) व्यंग्यार्थाचें भाषण; छद्मीपणा; उपरोधिक भाषणाचा रोख. ३ दांत; राग; वैर. 'जेव्हां तेव्हां त्याचा माझ्यावर कटाक्ष ! मी काय त्याचें असें घोडें मारलें आहे?' ४ क्रोधदृष्टि; गैरमर्जी. 'त्यानें माझ्याकडे कटाक्षानें पाहतांच मी भ्यालों.' ५ मुद्दा; जोर; रोख; कल; प्रवृत्ति. 'मोठमोठया रसिकांचाहि वरीलप्रमाणें कटाक्ष आढळेल.' -नि. 'गीतेचा सर्व कटाक्ष याच तत्त्वावर आहे.' -टि ४.५२३. [सं.]

दाते शब्दकोश

कुरडा

पु. १ (राजा. कु.) संकुचित डोळा. -वि. अशा डोळ्याचा (माणूस). [का. कुरुड = आंधळा; तुल॰ अर. कुर = आंधळा]

दाते शब्दकोश

कुरडा      

पु.       १. संकुचित, बारीक डोळा. (राजा. कु.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

क्वचित्

क्रिवि. १ कोठें तरी; कांही थोड्या ठिकाणीं; सर्वत्र नाहीं असें. 'सहस्त्रांवर एकटा धांवून जाणारा क्कचित आढळतो.' २ केव्हां केव्हां; कांहीं वेळां. 'एकच ग्रंथी क्वचित् असें लिहितो क्वचित् असें लिहितो तस्मात्‌ उभयपक्षीं करावें' [सं.] म्ह॰ क्वचित् काणा भवेत्साधुः = एक डोळा किंवा चकणा माणूस बहुधा लबाड असतो.

दाते शब्दकोश

कवळ

स्त्री. कावीळ; कामीण. (पित्तप्रकोपामुळें उत्पन्न होणारी). 'कवळें अध्यासिला डोळा । तों चंद्रमा देखे पिवळा' -एभा १०.६३३. [सं. कामला]

दाते शब्दकोश

कवळ      

स्त्री.       कावीळ; कामीण; (पित्तप्रकोपामुळे उत्पन्न होणारी) : ‘कवळे अध्यासिला डोळा । तों चंद्रमा देखे पिवळा ।’ - एभा. १०·६३३. [सं. कामला]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खैरा

वि. १ घनसांवळा; कपिश. २ करडा; पांढर्‍यावर तांबडे किंवा तांबड्यावर पांढरे ठिपके असणारा. 'चितार भिंगारें खैरें । ... अवघीं वासरें आपण जाहला ।' -ह १०.१९२. ३ निरनिराळ्या रंगाचा (डोळा); किंवा निरनिराळ्या रंगाचे डोळे असलेला (माणूस, पशु) कैरा पहा. ४ मिश्र रंगाचा; चित्रविचित्र; मिश्र. ॰कबूतर-न. लालभडक किंवा काळसर तांबट रंगाचें कबूतर. ॰बांडा-वि. पांढर्‍यावर काळे किंवा काळ्यावर पांढरे ठिपके असलेला.

दाते शब्दकोश

खैरा      

वि.       १. घनसावळा; कपिश. २. करडा; पांढऱ्यावर तांबडे किंवा तांबड्यावर पांढरे ठिपके असणारा : ‘चितार भींगारें खैरें । ...अवघीं वासरें आपण जाहला ।’ - ह १०·१९२. ३. निरनिराळ्या रंगाचा (डोळा); निरनिराळ्या रंगाचे डोळे असलेला (माणूस, पशू). पहा : कैरा. ४. मिश्र रंगाचा; चित्रविचित्र; मिश्र.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खडुळ

न. गढूळ पाणी. 'सरिता घेऊनि येती खडुळें ।' -ज्ञा ११.५५७. -वि. १ गढूळ; डहुळ. 'नंदनवनींचें खडुळ । मानससरोवरींचे महूंचळ । ' -शिशु ६४४. २ आरक्त; लाल (डोळा). [खडू]

दाते शब्दकोश

खिळ      

स्त्री.       (नारळाचा) डोळा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खरा

पु. १ एखाद्या अम्लांत भिजत घालून तांबडा केलेला किंवा कुंकू तयार करण्याकरितां सालपट काढलेला हळदीचा तुकडा, कुडें; गंधाचा रवा. जसें-हळकुंडाचा खरा, कुंकवाचा खरा, खडा. २ पुटकुळी; कातरा; उष्णतेमुळें तोंडांत येणारा फोड. ३ कोइती वगैरे शस्त्रांचे दांते प्रत्येकीं. ४ खडा. 'निश्चयाचा खरा । गांठीं बांध वीरा ' -ज्ञा १४.१२८. [खडा. सं. खर. ध्व. खर] (वाप्र.) ॰करून देणें-खरा व अस्सल आहे म्हणून सिद्ध करणें; चांगलेपणा पटवून देणें. म्ह॰ खर्‍याखोट्यामध्यें चार बोटें अंतर आहे. = डोळा व कान यांच्यामधील अंतर. सामाशब्द- ॰खुरा-खोरा-वि. निश्चयेंकरून जो खोटा नव्हे तो; खरोखर खरा; अगदीं वास्तविक; सत्य; न्याय; विश्वासू; खरोखर पहा. ॰खोटा-वि. खरा आणि खोटा. खरारोकडा, खर्‍या- रोकड्याचा-वि. खरा आणि खात्रीचा; सच्चा आणि अस्सल; प्रामाणिक आणि मोकळ्या मनाचा; खरा आणि वास्तविक (माणूस, वस्तु, वर्तन).

दाते शब्दकोश

खरावणें

अक्रि. आरक्त, लाल होणें (डोळे). 'त्याचा डोळा खरावला आहे.' [खर]

दाते शब्दकोश

खुपणे      

उक्रि.       १. टोचणे; बोचणे; दुःख देणे; पीडा करणे (काटा, केस, शल्य यांनी) : ‘यथार्थ तरी खुपणें । नाहीं कवणा ॥’ - ज्ञा १६·१२०. २. दुखावणे; सलणे (डोळा इ.). ३. (ल.) डोळ्यात किंवा मनात काट्याप्रमाणे, शल्याप्रमाणे बोचणे, सलणे : ‘अंतरीं मृदु लोणी तैसा । कोणाही सहसा खुपेना ॥’ - भाराबाल ११·२४६. ४. पश्चात्ताप होणे. ५. मनात डाचणे; मनाला खाणे; अस्वस्थता उत्पन्न करणे : ‘परि तुझा बोल होता खुपत । हृदयामाजीं ।’ - कथा ५·११·१६१. [सं. क्षुभ]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खुपणें

उक्रि.१ टोंचणें; बोंचणें; दुःख देणें; पीडा करणें (कांटा, केस, शल्य यांनीं). 'यथार्थ तरी खुपणें । नाहीं कवणा ।' -ज्ञा १६.१२०. २ दुखावणें; सलणें (डोळा इ॰). ३ (ल.) डोळ्यांत किंवा मनांत कांट्याप्रमाणें, शल्याप्रमाणें बोंचणें, सलणें. 'अंतरीं मृदु लोणी तैसा । कोणाही सहसा खुपेना ।।' -भाराबाल ११.२४६. ४ अनुतप्त होणें; पश्चाताप होणें. ५ मनांत डांचणें; मनाला खाणें; अस्वस्थता उत्पन्न करणें. 'परि तुझा बोल होता खुपत । हृदयामाजीं ।' कथा ५.११.१६१. [सं.क्षुभ्; प्रा.खुभ किंवा खुप्प + निमग्न होणें?]

दाते शब्दकोश

लचक

स्त्री. १ कचक, उसण; मुरगाळणें. (क्रि॰ भरणें; निघणें; बसणें). २ उसण भरल्यानें होणारें दु:ख; चमक. (क्रि॰ मारणें). ३ चट; चटक; आवड; छंद. (क्रि॰ लागणें). [ध्व. लच्. हिं. लचकना] लचकणी-स्त्री. १ लचक भरलेली असणें. २ उडी मारणें; दचकणें इ॰ लचकणें-अक्रि. १ कचक, लचक भरणे; शिरेवर शीर चढून वेदना होणें; चमक मारणें;मुरगाळणें. २ उडी मारणें; दचकणें; खालीं, बाहेर, दूर, अकस्मात् सरकणें; घसरणें. 'तेवीं लचकलिया दिठी ।' -ज्ञा १४.८४. ३ मुरडणें; मुरकणें. 'या शिकून शिकून कशा उगाच लचकति ललना ।' म्ह॰ १ लोभ लचकला पान्हा सुटला (वात्सल्य उद्भवुन पान्हा आला). २ लोभ लचकला, डोळा पिचकला. लचका-पु. १ चट; चटक. (क्रि॰ लागणें). २ अकस्मात् भरलेली लचक. (क्रि॰ बसणें).

दाते शब्दकोश

लिख्या

वि. बारीक; लहान (डोळा). [सं. लिख्या- खसखस]

दाते शब्दकोश

लोचन

(सं) न० नेत्र, डोळा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

पु. डोळा. [सं.] लोचनावर्त-पु. घोड्याच्या भुंवईखालीं असणारा भोंवरा.

दाते शब्दकोश

लवण

नस्त्री. १ खोलगट, सखल स्थल (जमिनींतील इ॰); बतखल. (सामा.) खोल, आंत गेलेला भाग; खळगा. जसें- पायाची-मानेची-हाताची-लवण. २ वळण; वांकण (रस्त्याचें, नदींचें इ॰). ३ (व.) लहानसा ओढा; नाला. ४ उतार; उतरती जागा. ५ लीनता; लवणें. [लवणें] म्ह॰ लवण- तेथें जीवन. ॰भंजन-न. (उप.) १ पूज्यतेचें व नम्रतेचें मोठें आडंबर करणें; लवून नमस्कार करून पूज्यतादर्शक शब्दांनीं संबो- धणें, बोलणें. (क्रि॰ करणें). 'पंडित भेटती समत्सर । लवण भंजन अतिनम्र ।' -एभा १०.१७३. २ अत्यंत नम्रता; आदर; आर्जव. [लवणें + भजणें] लवणा-वि. (व.) ओणवा. 'लवणा पड.' लवणी-स्त्री. वांकलेल्या शरीराच्या अवयवाच्या खालील लवण; खळगी. २ बांक; वक्रता; कमान (रस्त्याची इ॰); लवणांतील आंत गेलेला भाग. [लवणें] लवणें-अक्रि. १ वांकणें. लवलेलें-वि. वाकलेलें, नमलेलें. 'भारेंलवे प्रतिपदी भू, शेष धरूं शके न लवलीला ।' -मोभीष्म ४.४०. २ वांकणें; दबणें; दबकणें. ३ तळपणें (वीज). ४ स्फुरणें (डोळा). ५ कलणें (मन, मनोवृत्ति); वाहणें (मनदेवता-पिंगळी) ह्या अर्थीं मन, मनदेवता, मनपिंगळी इ॰ शब्द कर्तृस्थानीं योजतात. ६ (व.) उडणें; उडी मारणें. 'भिंतीवरून लवला.' ७ लीन, नम्र होणें. 'गुरुचरणीं त्यजुनि खेद लवतीस ।' -मोवन ४.७१. [सं. लीन; नमन; अप. नवन; हिं. नौना, पं. नौणा] लवन-पु. पाणी वाहून जाण्याचा पाट; लवण अर्थ ३, ४ पहा.

दाते शब्दकोश

मांजरडोळ्या

मांजरडोळ्या māñjaraḍōḷyā a (मांजर & डोळा) Cat-eyed.

मोल्सवर्थ शब्दकोश

माप

माप māpa n (मापन S) Determining by a measure (whether of weight, capacity, length, or time), measuring. v कर, चालव, घे, मांड, लाव. 2 unc Determining by numbering. Ex. आंब्याचें माप झालें म्हणजे खुरद्याचें माप घे. 3 The amount or quantity determined by measurement, the measure. Ex. दाहा खंडी माप भरलें; वीस हात कापड भरलें. 4 A measuring instrument or means, a measure (of weight, capacity, length &c.); as वजनी माप, कैली माप, धान्यमाप, कापडाचें माप &c.; any means of measuring. 5 A portion measured off. Ex. त्या खांचरांत चार मापें आहेत. 6 In Khándesh माप is a measure of twelve डोळे or four पायली. See under डोळा. आपल्या मापानें मोजणें To measure by one's own bushel (standard). तें माप कुतऱ्यानें नेलें That matter is amongst the by-gones, Fuit Ilium. माप आणि महापाप A (false) measure is an abomination. Deut. xxv. 13--15.

मोल्सवर्थ शब्दकोश

न. १ प्रमाणानें मोजून निश्चित करण्याचें साधन; (वजन, सांठा, लांबी, वेळ इ॰) मोजण्याची, गणण्याची क्रिया. (क्रि॰ करणें; चालवणें; घेणें; मांडणें; लावणें.) 'आज भाताचें माप चालले आहें.' २ गणना; गणनेनें निश्चित करणें. 'आंब्याचें माप झालें म्हणजे खुरद्याचें माप घे.' ३ (सामा) मापण्यानें निश्चित केलेलें मान, करिमाण. 'दहा खंडी माप भरलें; (सामा.) माप- ण्याचें साधन. (वजन, सांठा, लांबी इ॰चें) उदा॰ वजनी माप, कैली माप, धान्य माप, कापडाचें माप. इ॰, मापण्याचें कोणतेंहि साधन. ४ मापलेला, परिमित भाग. 'त्या खाचरांत चार मापें आहेत.' ५ (खा.) बारा डोळे किंवा चार पायली. डोळा अर्थ १० पहा. [सं. मा = मोजणें] ॰देणें-घेणें-मापून देणें, घेणें. ॰कुतऱ्यानें नेणें-एखादी गोष्ट गतगोष्टींपैकीं एक होणें; एखाद्या गोष्टीची गतगोष्टींत गणना होणें. (पदरी) ॰घालणें-एखादी गोष्ट अमान्य करणारास ती अनेक प्रमाणांनी खरी करून पटवून देणें. ॰लागणें-मापी लागणें-कमी कमी होणें. 'मापीं लागलें शरीर ।' -दा ३.९.१. (आपल्या) मापानें मोजणें-आपल्या स्वतःच्या (प्रमाण असलेल्या) मापानें मोजणें. माप आणि महापाप-खोटें माप घालणें महापाप होय. सामाशब्द- ॰पट्टी- ऐनजिनसी सारा घेतांना धान्य मापण्याबाबत शेतकऱ्यावर बस- विलेला कर. ॰वरताळा-वर्ताळा-पु. १ धान्याच्या साऱ्याच्या खंडीमागें सरकारनें हक्कानें मागितलेला वरकतावळा. २ (कों.) कुळांकडून धान्य घेतांना माप घेण्यासाठीं हक्क म्हणून ठरीव खंडा- पेक्षा एकचौसष्टांश किंवा एकअष्टमांश जास्त घेतलेला माल, रकम. मापटें-न. साठप्याचें माप; अर्धा शेर, एक अषटमांश पायली; निठवें. म्ह॰ (व.) आपलं तें मापटं दुसऱ्याचं तें दीड पायली. मापणें- सक्रि. (वजन, साठपा, लांबी, वेळ यांच्या) मापानें निश्चित करणें; मोजणें; तोल करणें; मेंज घेणें. [सं. मा; झें. मा; ग्री. मेजिओ; लॅ॰ मेतिओर] मापन-न. मापणें; मोजणें; माप घेणें. मापड्या, मापारी, मापेली-वि. १ (सरकारी कोठ्या, बाजार माल यांतील) सरकारी धान्य मापणारा. २ (सामा.) मापणारा. 'आयुष्य मोजायाला बैसला मापारी । तूं कांरे व्यापारीं संसाराच्या ।' मापारकी-स्त्री. मापाऱ्याचा धंदा. मापारी- स्त्री. धान्य इ॰ मोजण्याचें फरा नावाचें एक मांप. मापी-वि. १ साठप्याच्या मापानें निश्चित केलेला. २ मापानें मोजण्यासारखें; साठप्याचें; वजनीच्या उलट. माप दाखविणाऱ्या शब्दांच्या पूर्वी हा शब्द जोडून येतो. जसें मापी खंडी-मण-शेर. मापीव, मापित-वि. मापलेला. ह्याच्या उळट तोलीव, मोजीव.

दाते शब्दकोश

मदत (सढळ)

मदतीचा हात सदैव पुढें, इतरांसाठी इतकें करतो, हातांबर लाखाचें उदक सोडील, पदरमोड करून देईल, कर्णाचा अवतारच, भारंभार सोनें द्यायला तथार, मोकळ्या मुडीने मदत, द्रव्याच्या थैल्या मोकळ्या केल्या, सढळ हातानें- घसघशीत - वाटेल ती घस-झीज सोसून-पदरास खार लावून मदत, परोपरीचें सहाय्य, दातृत्वाचा ओघ वळविला, दे दे दिलें, कण्णाच्या दातृत्वानें दिलें, आंधळा मागतो एक डोळा तर देव देतो दोन डोळे, ददात नाहींशी केली, देणग्यांचा वर्षाव.

शब्दकौमुदी

मेघ

पु. १ घन; जलद. २ हिम. ३ दाट धुकें पडलें अस- तांना हवेपासून उत्पन्न होणारा व नंतर विस्तवावर तयार केलेला एक विशिष्ट खाण्याजोगा पदार्थ. [सं. मेघ; प्रा. मेह; गुज. हिं. मेह; सिं. मेहु] (वाप्र.) ॰ओळणें-ढग येणें; आकाश अभ्राच्छादित होणें. 'असंभाव्य मेघ ओळला । एकाएकीं चहूंकडे ।' -ह १२.४५. सामाशब्द- ॰गंभीर-वि. १ मोठा नाद करणारा; मेघगर्जनेप्रमाणें घन व पूर्ण. [सं. मेघ + गंभीर ॰गर्भ-पु. (अनेक वचनी उपयोग) गारा; करका. [सं.] ॰डंबर, मेघाडंबर- नपु. १ मेघांचें अवडंबर; आभाळ भरून येणें; ढगाचें छत. २ (ल.) पोकळ धमकावणी; व्यर्थ वल्गना; भयंकर पण निष्फळ देखावा. ॰डंबर-री-स्त्री. १ छत; मंडपी; उंच छत्री. 'भक्ति वैराग्य ज्ञान । हेंचि माहीमार्तब सूर्यपान । मेघडंबर पताका ।' -स्वादि ७.५.५२. २ घुमट; हत्तीवरील अंबारी. 'यापरी हवदे मेघडंबरी ।' -नव १३.७५. -वि. मंडपी, छत असणारा (देव्हारा, डोला इ॰). [सं.] ॰तडित्-स्त्री. (शाप.) ढगांतील वीज; (इं.) लाइट- निंग. [सं.] ॰तडिद्वाहक-पु. (पदाव) ढगांत उत्पन्न होणाऱ्या विजेपासून संरक्षण होण्याकरितां इमारतीच्या उंच भागावर धातूच्या पट्ट्या बसवून त्या जमीनींत पुरलेल्या असतात त्या प्रत्येक [सं. मेघ + तडित् + वाहक] ॰पटल-न. ढगांचें आवरण; धत; ढगांनीं आकाश आच्छादित होणें. (क्रि॰ येणें; पडणें). ॰मंडल-न. १ मेघांचा समुदाय. २ मेघांचा प्रदेश; वातावरण, आकाश. [सं. मेघ + मंडल] ॰मल्हार-पु. (संगित) एक राग. ह्या रागांत षड्ज, तीव्र ऋषभ, कोमल मध्यम, पंचम, तीव्र धैवत, कोमल निषाद, तीव्र निषाद हे स्वर लागतात. जाति षाडव-षाडव. वादी षड्ज. संवादी पंचम. गानसमय मध्यरात्र. वर्षाऋतूंत सार्वकालिक [सं.] ॰मास-न. मेघ अर्थ २ पहा. [सं.] ॰माळ-स्त्री. कागद कातरून केलेली माळ; नक्षत्रमाळ; रंगमाळ पहा. ॰माळा-स्त्री. १ ढग; मेघपंक्ति. २ मेघावर केलेला एक भविष्यसूचक ग्रंथ. ३ रहाटगाडग्यावरील गाडग्यांची माळ. ॰रजनी-पु. (संगीत) एक राग. ह्या रागांत षड्ज, कोमल ऋषभ, तीव्र गांधार, कोमल मध्यम, तीव्र निषाध हे स्वर लागतात जाति औडुव-औडुव. वादी मध्यम. संवादी षड्ज. गानसमय रात्रीचा चौथा प्रहर. क्वचित् ह्या रागांत तीव्र मध्यम घेण्यांत योते. ॰वितान-न. मेघडंबरी; मेघांचा चांदवा, विस्तार. [सं.] ॰श्याम-वि. ढगासारखा काळासावळा; घनश्याम मेघाडंबर-न. मेघडंबर पहा. मेघुडा-पु. प्रळ्यकालचा मेघ. 'मग मेघुडे विराले ।' -विउ ५.४९. मेघो(घौ)डा मेघौडें- पुन. मेघ; ढगांचा समुदाय. 'जैसे वर्षाकाळींचे मेघौडे ।' -ज्ञा ११.१९४. [प्रा.] मेघौनि-क्रिवि. मेघापासून. 'देखें मेघौनि सुटती धारा ।' -ज्ञा ६ ८७. [मेघ + हून-ऊन]

दाते शब्दकोश

मेघडंबरी

मेघडंबरी mēghaḍambarī a Having a canopy;--used of a देव्हारा, डोला &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

मिचकणें, मिचकाव(कवि)णें

सक्रि. १ (डोळे, तोंड इ॰) त्वरेनें मिटणें आणि उघडणें; (डोळ्यांची) उघडझांप करणें; एखाद्याला एखादी खूण करण्याकरतां डोळे झांकून उघडणें; नेत्रसंकेत करणें. २ अतिश्रमामुळें, दुःखामुळें डोळ्यांची एक- सारखी उघडझांप करणें. 'कासावीस गरुड होत । नेत्र मिचकावून मुख पसरित ।' -ह ३१.११७. [सं. श्मीलनम्] मिचकावणी- स्त्री. डोळे मिचकावण्याची क्रिया; निमिषोन्मेषण. मिचका- वि. मिचमिचीत डोळ्याचा (मनुष्य); एकसारखी उघडझांप होणारा (डोळा). मिचक्या-मिचमिच्या-वि, डोळे मिचका- वण्याची संवय असलेला; डोळे मिचकावणारा.

दाते शब्दकोश

मिचमिच

स्त्री. १ जलद खातांना होणारा आवाज; मिटकी; जबड्याची त्वरित उघडझाक. (क्रि॰ करणें; वाजणें). २ डोळ्यांची उघडझाप. [ध्व.] म्ह॰ खाणें थोडें आणि मिचमिच बहुत. मिचमिच-मुचां-क्रिवि. १ मिटक्या मारून; खातांना तोंडाच आवाज करून. २ उघडझांकीनें; मिचकावून. (डोळे इ॰). मिचमिचीत-वि. १ बिलबिलीत; बेचव; चांगल्या तऱ्हेनें न शिजविलेलें (अन्न). २ मिचका (डोळा); मिचक्या डोळ्याचा (माणूस).

दाते शब्दकोश

मण(न)गट

न. १ हाताचा पंजा आणि कोपर यां- मधील भाग; (सामा.) मणिबंध; पंज्याचा सांधा. २ पाऊल व पायाची नळी यांच्यामधील सांध्याचें हाड; घोटा; पायाचा डोळा; गोफा. ३ घोड्याच्या पायाचा सांधा. ४ (ल.) उपाय; मार्ग; योग्यता (शक्ति, पैसा, विद्या इ॰ची). [सं. मणि + कट] ॰म्ह ज्याच्या मणगटास जोर तो बळी. ॰घेणें-बोंबा मारणें; बोंबलणें. ॰धरणें-एखाद्या कांहीं अपराधांत पकडणें; आरोप ठेवणें. मणगटांत-मणगटास जोर असणें-द्रव्य, अधि- कार, योग्यता, शारीरिक शक्ति इ॰ बाबतींत समर्थ असणें. मणगटावर केंस येणें-हातांतील जोर नाहीसा होणें; एखादें काम करावयाला असमर्थ असणें. मणगटावर गोणी पडणें- येणें-(ल.) एखादे कष्टाचे किंवा जबाबदारीचें काम लादलें जाणें. मणगटावर तेल-तेल चुना घालणें-ओतणें-बोंबा मारणें; बोंबलत सुटणें (कांहीं एक विद्येविषयी अज्ञ). मणगटावर तेल घातलें पाहिजे-मूर्ख, अडाणी मनुष्यास उद्देशून योजि- तात. मणगटासारखें मणगट पाहून कन्या द्यावी, मणगटासारखें मणगट पहावें-शरीर, पैसा, परिस्थिति इ॰ बाबतींत कन्येशीं जुळणारा वर पहावा. मणगटाशीं मणगट घासणें-एखाद्याशीं बरोबरी, स्पर्धा करणें. मणगटी-स्त्री, लहान मुलांच्या मणगटांत घालण्याचा मण्यांचा एक अलंकार.

दाते शब्दकोश

मोहरी

स्त्री. पाणी वाहून नेण्याकरितां केलेला लहान पाट. स्नान वगैरे कामासाठीं केलेली चुनेगच्ची मोरी. तोफेचा मणी किंवा डोळा. चुन्याच्या भट्टीचें भोंक. [मोरी]

दाते शब्दकोश

मुद्रण

न. छापण्याची क्रिया. [सं.] ॰कला-स्त्री. दाबाच्या योगानें कागद किंवा मुद्रणयोग्य अशा इतर पृष्ठभागावर शाई किंवा इतर तैलरंग यांच्या साहाय्यानें अक्षरें अगर इतर आकृति वठविण्याची कला. -ज्ञाको (म) १६५. ॰स्वातंत्र्य-न. आपल्या मतानुरूप मजकूर छापून प्रसिद्ध करण्याचा व्यक्तीचा अधिकार. छाप- खान्याचा हक्क; (इं.) लिबर्टी ऑफ प्रेस. 'परिस्थिती व प्रसिद्धी यांच्या दरम्यान मुद्रणस्वातंत्र्य आहे.' -टिसू २००. मुद्रक- पु. १ छापणारा. २ छाप मारणारा. [सं.] मुद्रित-न. छापून झालेलें लिखाण; छापलेला कच्चा खर्डा; (इं.) प्रूफ. 'घाणेरडें मुद्रित शुद्ध करण्यापेक्षां फिरून सर्वच प्रत लिहून कंपोज करवि- लेली पुरवेल.' -केले १.२२६. -वि. १ ज्यावर ठसा किंवा शिक्का मारलेला आहे असा. २ खूण केलेला; चिन्हांकित. ३ मिटलेले; बंद केलेलें (फूल, डोळा इ॰).

दाते शब्दकोश

मुग्धा

कोणाकडे डोळा उचलून बघायची नाहीं, अव्याजमनोहर मुग्ध सुंदरी, आश्रम-हरिणी, कोमल- किशोरी, पानाआडची कळी, लाजाळूचे झाड.

शब्दकौमुदी

नैन

न. नयन; डोळा. 'नैनी नैन एक करी भाई नाच काणा ।' -बयाबाई रामदासी.

दाते शब्दकोश

नैन      

न.       नयन; डोळा : ‘नैनी नैन एक करी भाईंनाच काणा ।’ - बयाबाई रामदासी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नाक

न. १ घ्राणेंद्रिय; नासिका. २ (ल.) धान्य, बटाटे इ॰काला ज्या ठिकाणीं मोड येतो ती जागा; डोळा. ३ सुई, दाभण इ॰काचें भोंक; नेडें. ४ (कुटुंब, सभा इ॰कांचा) मुख्य उत्कृष्ट मनुष्य; देशांतील मुख्य शहर किंवा किल्ला. 'पुणें हें देशाचें नाक आहें. ५ नथेकरितां नाकास पाडलेलें भोंक, छिद्र. 'नाक तुटणें, बुजणें.' ६ धीटपणा; दम; खात्री. निलाजरेपणा; उजळ माथा. 'तेथें मी कोणत्या नाकानें जाऊं.' ७ अब्रू; चांगली कीर्ति, नांव. 'माझें नाक गेलें, गमावलें.' [सं. नासिका; प्रा. णक्क; फ्रेंजि. नख; पोजि. नकी] (वाप्र.) ॰ओरबडणें-नाकांतील अलंकार हिसकून घेणें. ॰कापणें-खोडकी, गर्व जिरविणें; पराभव करणें; ॰(आपलें) कापून दुसर्‍यास अपशकून, अवलक्षण करणें-दुसर्‍याचें नुकसान व्हावें म्हणून आपला स्वतःचा नाश करून घेणें. ॰कापून पाटावानें पुसणें-एखाद्याची मोठी अप्रतिष्ठा करून नंतर थोडा सन्मान करणें. ॰खाजविणें-चिड- विणें. ॰खालीं पडणें-पाडणें-होणें-गर्व नाहींसा होणें, करणें; मानहानि होणें. ॰गुंडाळणें-आपला कमीपणा, पराभव कबूल करणें; शरण जाणें; क्षमा मागणें. ॰गेलें तरी भोकें राहिलीं आहेत असें म्हणणें-पुन्हां निर्लज्जपणें बोलणें, वागणें; मागील गुन्ह्याची लाज सोडून चालणें. ॰चिरून मीठ भरणें-एखाद्यास फजीत करणें; नकशा उतरविणें. ॰घासणें-१ आर्जव, खुशामत करणें; हांजी हांजी करणें. २ क्षमा मागणें; चूक कबूल करणें. ॰चेचणें- ठेचणें-१ फजीती, पारिपत्य होणें, करणें. २ नक्षा उतरणें; खोड मोडणें. ॰जळणें, नाकांतले केस जळणें-फार दुर्गंधि येणें. ॰झाडणें-१ नाक चेचणें; तिरस्कार दाखविणें; ताठा, गर्व, उतरविणें. २ नाक शिंकरणें. ३ घोडा इ॰ जनावरानें नाकां- तून वारा काढणें. ॰तोंड मुरडणें-नापसंति दर्शविणें; नावें ठेवणें. ॰तोडून कडोस्त्रीस खोवणें-भीक मागण्याकरितां लाजलज्जा सोडून देणें; अगदीं लोंचट बनणें. ॰धरणें-वाट पहावयास लावणें; खोळंबा करणें. ॰धरल्यास किंवा दाबल्यास तोंड उघ- डणें-एखाद्यास पेंचांत धरल्याशिवाय तो आपल्या म्हणण्यास कबूल होत नाहीं या अर्थीं. (नाक व तोंड यानीं श्वासोछ्श्वास होतो. त्यापैकीं एक दाबलें तर दुसरें उघडावेंच लागतें). ॰धरून बसणें- (प्राणायामावरून) धार्मिक कृत्यांत गुंतलेला असणें, वेळ घालविणें. (ल.) कर्तव्य न करतां वेळ गमावीत बसणें. ॰पुडया पिंजा- रणें-फुलविणें-फुगविणें, फुरफुरविणें-फेंदरणें-रागानें खेंकसणें; अंगावर जाणें; नाक फुगवून राग दाखविणें. ॰फेडणें- नाक शिंकरणें. ॰मुठींत धरून जाणें-निरुपायास्तव, नाइला- जानें शरण जाणें; अभिमान सोडून जाणें. ॰मुक्यापुढें खाज- विणें-चिडविणें; क्षोभविणें. ॰मुरडणें-मोडणें-नाक वाकडें- तिकडें करून नापंसति दाखविणें. ॰मुष्ट्या हाणणें-(व.) हिण- विणें; नाराजी दर्शविणें. 'नाकमुष्ट्या हाणूं हाणूंच बेजार, स्वतः तर काम होईना.' ॰मोडणें-फजीती उडविणें; गर्व उतरविणें. ॰लावून(करणें)-क्रिवि. धिटाईनें; निलाजरेपणें. ॰वर करणें- वर करून चालणें-वर असणें-१ दिमाख, ताठा, गर्व, निर्लज्जपणा दाखविणें; वरचढ असणें. २ स्वतः दोषी असतांनाहि दिमाख दाखविणें; शरम न वाटणें. ॰वाहणें-पडसें येणें. ॰सावरणें-(बायकी) मूल जन्मल्याबरोबर त्यास न्हाऊ घाल- तांना त्याच्या नाकांत तेलाचे एकदोन थेंब सोडून त्याच तेलाच्या हातानें नाकाच्या वरच्या भागापासून शेवटपर्यंत हलकें चोळणें. नाकाची घाण मरणें-जाणें-१ संवईमुळें किंवा पडशामुळें वास न येणें; संवय होणें. २ (ल.) वाइटाचा तिरस्कार न येणें. नाकांत काड्या घालणें-चिडविणें; टोमणे मारणें; कुरापत काढणें; (एखाद्यास) चीड येईल असें कृत्य करणें. 'हरिच्या पुनःपुन्हां कां काड्या नाकांत घालिशी शशका' -मोसभा ४.८४. नाकांत काड्या जाणें-रुसणें; चिडणें; राग येणें. नाकांत दम येणें- (माळवी) नाकीं नऊ येणें. नाकांत बोलणें-नाकांतून, गेंगाण्या स्वरांत शब्द काढणें; अनुस्वारयुक्त बोलणें (कोंकणी लोकांप्रमाणें). नाकातोंडाची गुजंडी करणें-(नाक, तोंड आवळून, चंबू- सारखें करून) राग किंवा नापसंति दाखविणें. उंच्या नाकानें (करणें, बोलणें, वागणें, फिरणें)-मिजासीनें, निलाजरे- पणानें, (करणें इ॰). नाकानें कांदे-वांगीं सोलणें-१ नसता, खोटा शुचिर्भूतपणा दाखविणें; उगीच पावित्र्याच्या गोष्टी सांगणें. २ एखादे वेळीं फार चोखंदळपणा करणें पण एरवीं वाटेल तसें वागणें (ढोंगीपणा दाखवितांना वापरतात). नाकापेक्षां मोतीं जड होणें-(एखाद्याच्या अंगचा खरा गुण लोकांच्या अपेक्षेहून कमी आहे असें निदर्शनास आल्यावर योजतात) एखाद्या गौण वस्तूला अधिक महत्त्व प्राप्त होणें; कनिष्ठ दर्जाचा मनुष्य वरिष्ठा- हून वरचड होणें; (नाकास शोभा आणण्याकरितां मोतीं असतें पण तें जड झालें तर नाकास इजा होईल यावरून). तुल॰ सासूपेक्षां सून अवजड. नाकाला जीभ लावणें-तिरस्कार दाखविणें; गर्व, ताठा, दिमाख दाखविणें; नाक मुरडणें. नाकावर झिमोटा घालणें-तिरस्कार दाखविणें; नाक मुरडणें. नाकावर असणें- अगदीं तयार असणें. 'राग कसा त्याच्या अगदीं नाकावर आहे.' नाकावरची माशी तरवारीनें हाणणें-(व.) लवकर राग येणें. नाकावर निंबु घासणें-पिळणें-प्रतिपक्ष्यास न जुमानतां आपलें कार्य साधणें; प्रतिपक्ष्यास चीत करणें. नाकाला- पदर लावणें, लागणें-१ लज्जेनें, अपकीर्तीमुळें तोंड झाकणें. २ घाणीचा तिरस्कार करणें. नाकावर टिचणें-१ एखाद्याचे पैसे ताबडतोब देणें. २ काकूं न करतां, अडथळ्यास न जुमानतां एकदम देणें, करून टाकणें. नाकावर पदर येणें-१ वैधव्य येणें. २ लाजेनें लपून एकांतवासांत बसणें. नाकावर पाय देणें- विरोधाची पर्वा न करणें; प्रतिपक्ष्यावर मात करणें. नाकावर बोट ठेवणें-गुप्त ठेवण्यास किंवा गप्प बसण्यास सांगणें; (रागानें किंवा अन्य कारणानें एखाद्यास) दबकावणें. नाकावर माशी बसूं न देणें-अतिशय चिडखोर, क्रोधी असणें; अपमान किंवा तिरस्कार अगदीं सहन न होणें; थोडें देखील उणें बोलणें न सोसणें. 'जागृदवस्थेंत जसी नासाग्रीं बैसली नरा माशी ।' -मोगदा ५.२ नाकावर म्हशीनें पाय देणें-नाक नकटें, बसकें, चपटें असणें. नाकावर वाट करणें-विरोधास न जुमा- नतां काम सिद्धीस नेणें, करणें; नाकावर पाय देणें. नाकाशीं सूत धरणें-अगदीं मरणोन्मुख होणें (मरतांना श्वास आहे कीं नाहीं हें पाहण्याकरितां नाकाशीं सूत धरतात). नाकास चुना लावणें-नाकावर लिंबू पिळणें, पाय देणें पहा. 'सोसे कुलजा मृत्यु, न अयशाचा सोसवे चुना नाकीं ।' -मोद्रोण २१.५८. नाकास पदर येणें-बेअब्रू होणें; लाज वाटणें; मानखंडना होणें. नाकास मिरची झोंबणें-एखादी गोष्ट मनास लागणें; वर्मी लागणें. नाकासमोर जाणें-अगदीं सरळ मार्गानें जाणें. नाका- होंटावर जेवणें-चाखतमाखत खाणें; चोखंदळपणानें जेवणें. ॰दुराही, नाकधुर्‍या काढणें-१ अति नम्रपणानें विनविणें; शरण जाणें; क्षमा मागणें. 'सद्गति दे म्हणुनिच तो जाणा काढी मयूर नाकधुर्‍या ।' -भक्तमयूरकेकावली प्रस्तावना. २ कृताप- राधाबद्दल प्रायश्चित्त भोगणें. नाकीं नव-नळ येणें-१ अति- शय कंटाळणें; दमणें; भागणें (कामानें, श्रमानें). २ (नऊ इंद्रि- यांची शक्ति नाकांत येणें) मरणाच्या दारीं असणें. नाकीं वेसण घालणें-एखाद्यास कबाजांत, कह्यांत ठेवणें. नाकीं-नाक(का)चा बाल-अत्यंत आवडता, जिवलग, मोलवान् माणूस; गळ्यांतील ताईत; मोठ्याच्या परम प्रीतींतील दुर्जन (नाकांतील केंस काढतांना फार त्रास होतो म्हणून त्यांस फार जपतात त्यावरून). म्ह॰ (व.) १ नाक नकट तोंड वकट = कुरूप, अष्टावक्र अशा माणसास उद्देशून म्हणतात. २ नाकांत नाहीं कांटा, रिकामा ताठा-(बायकी, सोलापुरी) ३ (गो.) नाक गेल्यावर काय माझा चवरी गोंडा हाय = निलाजरा मनुष्य आपली कितीहि अब्रू गेली तरी पुन्हां नाक वर करतोच. सामा- शब्द- चिंबा-वि. बसल्या नाकाचा; नकटा. ॰तोडा-ड्या- पु. १ एक मोठ्या जातीचा टोळ. २ गवत्या टोळ (नाक तोडतो यावरून). ॰दुर-राई, ॰धुराई-धुरी-स्त्री. १ पश्चात्ताप दाखविण्यासाठीं नाक घासणें. 'माझ्या अपमानाबद्दल त्यानें किती जरी नाकधुर्‍या काढल्या तरी...बोलायची नाहीं.' -बाबं ४.३. २ (ल.) नम्रतेची विनंति (क्रि॰ काढणें). ॰पट्टी-स्त्री. (मल्लविद्या) जोडीदाराच्या कानावरून व गालावरून आपल्या हाताची पोटरी जोडीदाराच्या नाकपुडीवर दाबून वर दाब देऊन त्याला चीत करणें. ॰पुडी-स्त्री. नाकाचें एक पूड; नासारंध्र. [सं. नासापुट] म्ह॰ (व.) नाकपुडींत हरिकीर्तन = लहान जागेंत मोठें कार्य करा- वयाचें झाल्यास म्हणतात. ॰भुंकन-वि. नाकावर भोवरा अस- लेला (घोडा). नासिकावर्त पहा. -मसाप २.५७. ॰मोड-स्त्री. नकार दर्शविणें; तिरस्कारयुक्त नापसंती. ॰वणी-न. १ तपकीर; नस्य. २ नाकांत ओतावयाचा तीक्ष्ण पदार्थ. 'नाकवणी चुनवणी ।' -दा ३.७.६८. 'एका देती नाकवणी । काळकुटाचे ।' -ज्ञाप्र २९५. [नाक + वणी = पाणी] ॰शिंकणी-स्त्री. एक वनस्पति; भुताकेशी; हिच्या पानाच्या वासानें शिंका येतात. ॰शिमरो- वि. १ (गो.) नकटा. २ निलाजरा. [नाक + शिमरा = बसकें] ॰सूर- पुअव. नाकांतून बाहेर पडणारी हवा, श्वास. (क्रि॰ वाहणें; बंद होणें). ॰सुरॉ-वि. (गो.) नाकांतून येणारा (आवाज); गणगणा; गेंगाणा. नाकाचा दांडा-वासा-पु. नाकाचें लांबट हाड. नाकाचा पडदा, नाकाची पडदी, नाकाची भिंत-पुस्त्री. दोन नाकपुड्यांतील पडदा. नाकाचा शेंडा-नाकाची बोंडी- पुस्त्री. नाकाचा अग्रभाग. नाकाचो कवळो करप-(गो.) कंटा- ळणें. नाकाटणी, नाकाटी-स्त्री. रग जिरविणें; नक्षा उतरविणें; खरडपट्टी काढणें; नाक खालीं करावयास लावणें. (क्रि॰ करणें). [नाक + काटणी] नाकाटणें-नाकाटणी करणें. नाकाड-डा-नपु. (निंदार्थी) १ मोठें नाक. २ डोंगराचा पुढें आलेला नाकासारखा भाग. 'या नाकाडाचे पलीकडे आपला गांव आहे.' ३ भूशिर; जमीनीचें टोंक. ४ आंब्याच्या फळाचा मागील बाजूचा नाका- सारखा उंच भाग. नाकाड-ड्या-वि. मोठें आणि कुरूप नाक असणारा. नाकाडोळ्याचा(कानाचा)वैद्य-पु. साधारण, कामचलाऊ वैद्य. वैद्यकविद्येंत फारसा वाकबगार नसलेला वैद्य; वैदू. नाका डोळ्यानें सुरेख-वि. सुस्वरूप; देखणा; रेंखीव बांध्याचा. नाकादाई-स्त्री. (व.) खोड. खरडपट्टी. (क्रि॰ काढणें). 'खूप नाकादाई काढली आधीं, मग जेवूं घातलें.' नाका- वर रडें-न. रडण्याची तयारी, तत्परता; लवकर रडूं येणें. नाका- वर राग-पु. चिडखोरपणा; ताबडतोब रागावणें. नाकीचें मोतीं-न. नथ; बुलाख. 'नाकींचें मोतीं सुढाळ ।' -ह ५.१९७. नाकील-वि. सरळ, लांब व सुंदर नाक असणारा. नाकेला पहा. नाकु(को)स्ती, नाकु(को)ष्टें-स्त्रीन. नापंसति; नकार दाखवि- ण्याकरितां तिरस्कारानें नाक मुरडणें. (क्रि॰ मारणें; देणें; हाणणें). नाकेल-ला-वि. नाकील पहा. 'नाकेला अन् गुलजार । सांवळा नि सुंदर भासे ।' -बाल शिवाजी. नाकोटा-टें-पुन. (निंदार्थी) नाक.

दाते शब्दकोश

नाक      

न.       १. श्वास व वास घेण्याचे इंद्रिय; श्वासनलिकेची सुरुवात; घ्राणेंद्रिय; नासिका. २. (ल.) धान्य, बटाटे इ.ला ज्या ठिकाणी मोड येतो ती जागा; डोळा. ३. सुई, दाभण इ.चे भोक; नेडे. ४. (कुटुंब, सभा इ.तील) मुख्य उत्कृष्ट मनुष्य; देशातील मुख्य शहर किंवा किल्ला. ५. नथीकरता नाकाला पाडलेले भोक, छिद्र. ६. धीटपणा; दम; खात्री. ७. निलाजरेपणा. ८. अब्रू; चांगली कीर्ती, नाव; उजळ माथा. [सं. नासिका] (वा.) नाक ओरबाडणे–नाकातील अलंकार हिसकून घेणे. नाक कापणे–खोडकी, गर्व जिरविणे; पराभव करणे. (आपले) नाक कापून दुसऱ्याला अपशकुन, अवलक्षण करणे–दुसऱ्याचे नुकसान व्हावे म्हणून आपला स्वतःचा नाश करून घेणे. नाक कापून पाटावाने पुसणे–एखाद्याची मोठी अप्रतिष्ठा करून नंतर थोडा सन्मान करणे. नाक खाजवणे–चिडवणे; वेडावणे; खिजवणे. नाक खाली पडणे, नाक पाडणे, नाक होणे–गर्व नाहीसा होणे, करणे; मानहानी होणे. नाक गुंडाळणे–आपला कमीपणा, पराभव कबूल करणे; शरण जाणे; क्षमा मागणे. नाक गेले तरी भोके राहिली आहेत असे म्हणणे–मागील गुन्ह्याची लाज सोडून पुन्हा निर्लज्जपणे बोलणे, वागणे. नाक घासणे–१. आर्जव, खुशामत करणे; हांजी हांजी करणे. २. क्षमा मागणे; चूक कबूल करणे. नाक चढवून बोलणे–उद्धटपणाने बोलणे. नाक ठेचणे –फजिती करणे; नक्षा उतरणे; खोड मोडणे. नाक जळणे,नाकातले केस जळणे–फार दुर्गंधी येणे. नाक झाडणे–१. तिरस्कार दाखवणे; ताठा, गर्व उतरविणे. २. नाक शिंकरणे. ३. घोडा इ. जनावराने जोराने नाकातून वारा काढणे. नाक तोडून कडोस्त्रीला खोवणे–१. भीक मागण्यासाठी लाजलज्जा सोडणे; अगदी लोचट बनणे. २. नापसंती दाखवणे; नावे ठेवणे. नाक धरणे–वाट पाहायला लावणे; खोळंबा करणे. नाक धरल्यास, नाक दाबल्यास तोंड उघडणे–एखाद्याला पेचात धरल्याशिवाय तो आपल्या म्हणण्याला कबूल होत नाही म्हणून त्याला पेचात धरणे. नाक धरून बसणे–१. (प्राणायामावरून) धार्मिक कृत्यांत गुंतलेला असणे. २. कर्तव्य न करता वेळ दवडणे. नाक मुठीत धरून जाणे–निरुपायाने, नाइलाजाने शरण जाणे; अभिमान सोडून जाणे.नाक मुरडणे, नाक मोडणे–नाक वाकडे करून नापसंती दर्शविणे; फजिती उडवणे; गर्व उतरवणे. नाक लावून (करणे)–धिटाईने; निलाजरेपणाने (करणे). नाक वर करणे, नाक वर करून चालणे, नाक वर असणे–१. दिमाख, ताठा, गर्व, निर्लज्जपणा दाखवणे; वरचढ असणे. २. स्वतः दोषी असतानाही दिमाख दाखवणे; शरम न वाटणे. नाक वाहणे–पडसे येणे. नाक सावरणे– (बायकी) मूल जन्मल्याबरोबर त्याला न्हाऊ घालताना त्याच्या नाकात तेलाचे एकदोन थेंब सोडून त्याच तेलाच्या हाताने नाकाच्या वरच्या भागापासून शेवटपर्यंत हलके चोळणे. नाकधुऱ्याकाढणे, नाकदुऱ्या काढणे–१. अतिनम्रपणाने विनवणे; शरण जाणे; क्षमा मागणे. २. केलेल्या अपराधाबद्दल प्रायश्चित्त भोगणे. नाकपुड्या पिंजारणे, नाकपुड्या फुलविणे, नाकपुड्या फुगविणे, नागपुड्या फुरफुरविणे, नाकपुड्या फेंदरणे–रागाने खेकसणे; अंगावर जाणे; नाक फुगवून राग दाखविणे. नाकमुष्ट्या हाणणे–हिणवणे; नाराजी दाखवणे. नाकाचा कानवला करणे–नाक मुरडणे. नाकाची घाण मरणे, जाणे –१. सवयीमुळे, पडशामुळे वास न येणे; सवय होणे. २. (ल.) सवयीमुळे वाईटाचा तिरस्कार न वाटणे. नाकात काड्या घालणे–चिडवणे; टोमणे मारणे; कुरापत काढणे; चीड येईल असे वागणे. नाकात दम येणे–निरुपाय होणे; अत्यंत थकणे. नाकात बोलणे– नाकातून, गेंगाण्या स्वरात बोलणे; (कोकणी लोकांप्रमाणे) अनुस्वारयुक्त बोलणे. नाकातोंडाची गुंजडी करणे– (नाक, तोंड आवळून, चंबूसारखे करून) राग, नापसंती दाखवणे. नाकाने कांदे, वांगी सोलणे–१. नसता, खोटा शुचिर्भूतपणा दाखवणे; उगीच पावित्र्याच्या गोष्टी सांगणे. २. एखादे वेळी फार चोखंदळपणा करणे पण एरवी वाटेल तसे वागणे. नाकापेक्षा मोती जड होणे–गौण वस्तूला अधिक महत्त्व प्राप्त होणे; कनिष्ठ दर्जाचा मनुष्य वरिष्ठाहून वरचढ होणे. नाकाला चुना लावणे, नाकाला चुना लागणे– १. बदनाम करणे, होणे : ‘सोसे कुलजा मृत्यु, न अयशाचा सोसवे चुना नाकीं ।’ – मोद्रोण २१·५८. २. डिवचणे. नाकाला जीभ लावणे, झिमोटा घालणे – तिरस्कार दाखवणे; गर्व, ताठा, दिमाख दाखवणे; नाक मुरडणे. नाकाला पदर लावणे– १. लज्जेने, अपर्कीतीमुळे तोंड झाकणे. २. घाणीचा तिरस्कार करणे. नाकाला मिरच्या झोंबणे–एखादी गोष्ट मनाला, वर्मी लागणे. नाकावर असणे–अगदी तयार असणे. नाकावरची माशी तरवारीने हाणणे–लवकर राग येणे. (व.) नाकावर जीव येणे–कमालीचे कष्ट पडणे. नाकावर टिचणे–१. एखाद्याचे पैसे ताबडतोब देणे. २. काकूं न करता, अडथळ्याला न जुमानता एकदम देणे, करून टाकणे. नाकावर निंबू घासणे,नाकावर निंबूपिळणे– प्रतिपक्षाला न जुमानता आपले काम साधणे; प्रतिपक्षाला चीत करणे. नाकावर पदर येणे–१. वैधव्य येणे. २. लाजेने लपून एकांतवासात बसणे. नाकावर पाय देणे–विरोधाची पर्वा न करणे; प्रतिपक्षावर मात करणे. नाकावर बोट ठेवणे–१. गुप्त ठेवायला, गप्प बसायला सांगणे. २. (रागाने किंवा अन्य कारणाने एखाद्याला) दबकावणे. नाकावर माशी बसू न देणे–अतिशय चिडखोर असणे; अपमान किंवा तिरस्कार अगदी सहन न होणे; थोडेदेखील उणे बोलणे सहन न होणे. नाकावर वाट करणे –विरोधाला न जुमानता काम सिद्धीला नेणे. नाकाशी सूत धरणे–अगदी मरणोन्मुख होणे. (मरताना श्वास आहे की नाही ते पाहण्यासाठी नाकाशी सूत धरतात). नाकासमोर जाणे, चालणे–अगदी सरळ मार्गाने जाणे. नाकाहोटांवर जेवणे–चाखतमाखत, चोखंदळपणाने जेवणे. नाकीचा बाल, नाकाचा बाल–१. अत्यंत आवडता, जिवलग माणूस; गळ्यातला ताईत. २. मोठ्यांच्या परमप्रीतीतला दुर्जन. नाकी नऊ, नळ, नव येणे–१. अतिशय दमणे, कंटाळणे, भागणे (श्रमाने). २. (नऊ इंद्रियांची शक्ती नाकात येणे) मरणाच्या दारीअसणे. नाकी वेसण घालणे–एखाद्याला कह्यात, कबजात ठेवणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नेत्र      

पु. न.       डोळा; नयन.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नेत्रगोलक      

पु.       खोबणीत बसवलेला डोळा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नेत्रकाच      

स्त्री.       दुर्बीण; सूक्ष्मदर्शक यंत्र इ.तून पाहण्यासाठी ज्या ठिकाणी आपण डोळा लावतो ती काच.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नेत्रस्फुरण

डोळ्याची पापणी फुरफुरणें; नेत्रस्पंदन; डोळा लवणें. यावरून शुभाशुभ पहातात. [सं.]

दाते शब्दकोश

नेत्रस्फुरण      

न.       डोळ्याची पापणी फुरफुरणे; डोळा लवणे. यावरून शुभाशुभ पाहतात. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नहिना

पु. नेत्र; डोळा; नयन. -शर. [सं. नयन]

दाते शब्दकोश

निंदा

कर्णमैथुन, चहाडी, चुगली, कानमंत्र, विचिकित्सा, निखंदणें, जखमेवर टोंच, कुटाळकी, दोष हेरणें, वर्मावर बोट ठेवणें, खजाळी, न्यूनांचे प्रकटन, गुणांकडे कानाडोळा, अवगुणांकडे उघडा डोळा.

शब्दकौमुदी

नजन

पु. डोळा; नयन. -शर [सं. नयन]

दाते शब्दकोश

नवचंदरी म्हैस      

ज्या म्हशीस चार पाय, एक डोळा, एक आंचूळ व तोंड, शेपटी आणि कपाळ हीं पांढरी असतात अशी म्हैस. – नवाकाळ ७·३·१९३४. नवचांद      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नवचंदरी म्हैस

स्त्री. ज्या म्हशीस चार पाय, एक डोळा, एक आंचूळ व तोंड, शेपटी आणि कपाळ हीं पांढरीं असतात अशी म्हैस. -नवाकाळ ७.३.१९३४. [सं. नव + चंद्र]

दाते शब्दकोश

नयन

पुन. डोळा; पाहण्याचें इंद्रिय; दृष्टि. [सं.] नयनीं- नयनातें उदक येणें-डोळ्यांत अश्रू उभे राहणें; अश्रूनीं डोळे भरून येणें. 'दर्भनिर्मित नया शयनातें । देखतां उदक ये नयनातें ।' -वामन भरतभाव ५१. सामाशब्द- ॰पट्टा-पु. नेत्रकटाक्ष. 'फिरवी गर र र र र र र र नयन पट्टा दुधारी ।' -नामना ७९. ॰बेटी-स्त्री. डोळ्यांतील बाहुली. -देवनाथ. ॰सुख-न. डोळ्याचें, दृष्टीचें सुख; नयनानंद. [नयन + सुख] नयनोपांत- पु. डोळ्याच्या बाहेरच्या अंगचा कोन; नेत्रप्रांत; अपांग. [नयन + सं. उपांत]

दाते शब्दकोश

(सं) पु० आंख, डोळा, नेत्र.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

नयन      

पु. न.       डोळा; पाहण्याचे इंद्रिय. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ओढणे      

अक्रि.       १. खेचणे; सरकविणे; लोटणे; जवळ घेणे, करणे; आपल्याकडे आणणे; ताणणे :‘परि ओढुनिने त्यासीदेव ओढकसा I’-मोभीष्म४·४४. २. (शेतजमिनीतीलडिखळे फोडून साफ करण्यासाठी दाताळे किंवा गुढेवगैरे जमिनीवर) फिरवणे. ३. (रेषा, ओळी) काढणे;आखणे. ४. ओढ बसणे (फोड, उष्णता, रोग वगैरेपासून डोळा इत्यादी) ५. (दुखणे, आजार, दारिद्र्य यामुळे शरीर) क्षीण होणे; आक्रसणे : ‘अम्मीचा चेहरा खूप ओढला होता.’-वीज८. ६. (गुडगुडी, सिगारेट, विडी इत्यादीचा) धूर काढणे; अंमल करणे. ७. (स्तन) पिणे; चोखणे. ८. (तपकीर) हुंगणे; सुंगणे. ९. (भाषेची अर्थाकरिता) ओढाताण करणे, वाटेल तो अर्थ बसवणे. १०. लावणे; बंद करणे (दार, खिडकी इ.) ११. (काठी, छडी इ.) मारणे. १२. नेसणे : ‘नित्य ओढिती धौत वस्त्रें’-मुसभा २४·३७. १३. लांबणीवर पडणे : ‘इकडे पर्जन्य ओढला आहे, या उपरि पुनर्वसूचा लागेल तरी राहिले पेरे पेरतील.’-ऐलेसं ४३०९.[सं. वह-वोढ-ओढ] (वा.) ओढून आणणे- १. गर्वाने किंवा रागाने ताठून बसणे. २. कां कूं करीत मागे राहणे. ओढून काढणे- बाहेर खेचणे; मोठ्या युक्तीने बाहेर काढणे, जबरीने जवळ आणणे, घेणे. ओढून घेणे- १. (एखादे संकट अथवा अडचण) स्वतःवर बळेच आणणे. २. आपल्या बाजूचे करणे :‘हीच मुले आपल्याकडे ओढून घ्यावयाची आहेत.’-इंप ४२. ३. (गंजिफा) घेणी घेणाराने राजाबरोबर जे पान टाकले असेल त्यावरील बंद दुसऱ्याजवळ असल्यास त्याने राजाबरोबरचे पान मारून ओढूण घेणे. हा ओढून घेण्याचा हक्क घेणी घेणाऱ्याच्या उजव्या हातच्या खेळाडूलाअसतो. ओढून टाकणे-रागाने, दांडगाईने ओढून ढकलणे किंवा झुगारून देणे. (मनुष्य, वस्तूइ.). ओढून बळकट करणे- (दोरीचीसैलवमोकळी गाठ घट्ट वन सुटेल अशी आवळणे यावरून) फाजीलशहाणपणाने स्वतःला फसविणे; उद्देश बाजूला सारणे; हट्टाने किंवापड न खाल्ल्यामुळे (अटी, करार, परिस्थिती) अधिक बिकट करूनघेणे. ओढून विकणे-१. जास्त किंवा अवाच्यासवा किंमतीसविकणे. २. (ल.) स्वतःची योग्यता फार मोठी मानणे; अभिमानानेआत्मप्रतिष्ठा चढविणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पाळत-थ

स्त्री. १ (दुसऱ्याच्या हालचालीवर असलेली) बारीक नजर; गुप्त देखरेख. 'ते त्याचे पाळतीवर आहेत.' २ (चोरी वगैरे शोधून काढण्यासाठीं काढलेला) माग; सुगावा काढणें; शोध; तलास. 'गोरक्षापाशीं शीघ्र येऊन । म्हणे तूं माय माझें न देशील धन । तूं कोण कोणाचा येऊन । पाळतीनें मिरवसी ।' -मव. २३. ८१. 'गावांत दरोडा पडला असतां गांवचा रामोसी पाळत लावून देतो.' ३ (एखाद्यानें पळून जाण्याच्या किंवा चोरी करण्याच्या हेतूनें त्यावर) लक्ष ठेवणें; चोरून किंवा लपून पाहणें; डोळा ठेवणें. (क्रि॰ घेणें; लावणें; काढणें; राखणें; ठेवणें). 'त्यांनीं पाळत ठेवली आणि घर मारलें.' ३ रक्षण; जतन; पालन. -हंको -शर [पाळणें] पाळतीवर असणें-एखाद्यास कळूं न देतां त्याच्या हालचालीवर गुप्तपणें नजर ठेवणें. 'ते म्हणाले-अहमद, तूं माझ्या पाळतीवर आहेस कीं काय ?' -उषःकाल.

दाते शब्दकोश

पाव

स्त्री. १ फणस, अननस, रामफळ इ॰ फळांच्या आंत देठांचें शिरलेलें अग्र. ह्यास फळाचे गरे चिकटलेले असतात. २ आरारूट. ३ जात्याचे दोन अथवा एक डोळा आणि तोंड यां- मधील दांडा, भाग. ४ जात्याच्या वरच्या तळीच्या खालच्या बाजूस डोळ्याचें भोंक असलेली लांकडी पट्टी. ५ (गो.) जात्याची तळी. ६ (व.) मातीची परात. 'पावांत कणीक घे; पावांत भाकरी आहेत.' [सं. पाद]

दाते शब्दकोश

पायली

स्त्री. १ धान्य मोजण्याचें चार शेराचें (पक्का किंवा कच्चा) एक माप. बारा किंवा सोळा पायल्यांचा एक मण होतो. खानदेशांत अठ्ठेचाळीस शेरांची एक पायली होते. [पाय = एक चतुर्थांश; पाव] डोळा पहा. (वाप्र.) ॰भरणें-१ (स्वतःच्या गरजा, आयुष्य, भरभराटीची स्थिति इ॰चें) माप भरून घेणें; स्वार्थ साधणें; कम करून घेणें. २ एखाद्याला उतरती कळा लागणें. घडा, पायरी भरणें पहा. ॰चा पसा करणें-होणें-परद्रव्याचा गुप्तपणें अपहार करणें; कमी करून सांगणें; कमी करणें; होणें. ॰चे पंधरा-अतिविपुल; पु्ष्कळ; फार स्वस्त; ज्यास फारशी किंमत, महत्त्व नाहीं असें; क्षुद्र: 'छप्पन्न. तुझ्यासारखे पायलीचे पंधरा आहेत.' गोव्याकडे 'पायलेड पन्नास' = पायलीचे पन्नास असा प्रचार आहे. आपली पायली भरणें-स्वतःपुरतें पाहणें; स्वार्थ. आपलपोटेपणा करणें. म्ह॰ आण पायली करूं दे वायली.

दाते शब्दकोश

पायली pāyalī f A measure of four sher (पक्का or कच्चा). Pr. आण पा0 करूं दे वायली Go to, let us eat and enjoy ourselves. 2 C The socket of a millstone. 3 In Khándesh the पायली is forty-eight sher. See under डोळा. आपली पा0 भरणें To regard self; to fill one's own measure. पा0 भरणें g.of s. To have one's measure (i. e. the measure of one's iniquities, the period of one's life or of one's prosperous circumstances &c.) filled. पा0 चा पसा करणें-होणें To make--or to become--a handful out of four sher. Used where crimping, cabbaging, or illicit appropriation is charged or suspected. Also, generally, to reduce, or to be reduced, exceedingly. पा0 चे पंधरा (Fifteen to a páylí.) A term for a light, insignificant fellow.

मोल्सवर्थ शब्दकोश

पिचपिचीत

वि. बारीक; मिचका; मिचमिचा; लुकलुका (डोळा, असे डोळे असलेला मनुष्य).

दाते शब्दकोश

पिगल

वि. पिंवळा (कबूतराचा डोळा.) [सं.पिंगल]

दाते शब्दकोश

पळाला

काढता पाय घेतला, ढुंगणाला पाय लावून पळाला, यः पलायति स जीवति, यशस्वी माघार घेतली, पुढें भुंकत पण मागे सरत, सूंबाल्या केला, कसलें काय नी कसलें काय ? पळतां भुई थोडी झाली ! दाैड केली; पण उलट्या दिशेने ! पसार झाला, धूम ठोकली, बाडबिस्तरा गुंडाळून रस्ता धरला, चौखूर उधळला, डोळा चुकवून गुम झाला, काळे केलें, तुरी दिली, निसटला, पोबारा केला.

शब्दकौमुदी

पलक लगना

हिंदी अर्थ : नींद लगना, आँखे मूंदना मराठी अर्थ : झोंप लागणें, डोळा लागणें.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

प्राप्ति-प्ती

स्त्री. १ मिळकत; लाभ; फायदा; नफा. 'जे साम्यापरौति जगीं । प्राप्ति नाहीं । -ज्ञा ६.४१०. २ प्राप्तपणा; प्राप्तस्थिति; सिद्धी; सफलता. ३ येणें; उद्भवणें; प्राप्त होणें; भोगास येणें (सुख, दुःख इ॰). ४ अष्टमहासिद्धीपैकीं एक; सर्व प्राण्यांच्या इंद्रियाशीं त्या त्या इंद्रियाच्या अधिष्ठात्री देवतांच्या रूपानें संबंध घडणें. 'आणिमा महिमा लघिमास्थिती । या तिन्ही देहसिद्धींची प्राप्ती । प्राप्तिरिंद्रिय जे वंदती ।' -एभा १५.४३. ५ प्राज्ञा; सामर्थ्य; छाती; किंमत; बिशात; प्रतिष्ठा; लाग; पाड. 'मजबरोबर बोलायला त्याची काय प्राप्ति?' 'नाहींतरीं काय प्राप्ती मानवाची । कंदर्प हरावया । -जै २२.३४. [सं. प्राप्ति] ॰कर-वि. प्राप्ती करून देणारा; लाभकारक. 'तंव लवि- न्नला डावा डोळा । बाहु स्फुरती वेळोवेळां । हें तेव चिन्हें गे गोपाळा । प्राप्तीकरें पैं होती ।' -एरुस्व ५.७६. ॰पुरुष-पु. ज्याला भगवत्स्वरूपाचा साक्षात्कार झाला आहे असा साधुपुरुष. ॰वरील कर-पु. कामधंद्यांच्या वर, अगर इतर मार्गानें एखाद्या इसमास अगर संस्थेस जें वार्षिक उत्पन्न येतें त्यावर सरकारकडून विशिष्ट प्रमाणांत घेण्यांत येणारा कर. प्राप्त्यंश-पु. लभ्यांश; फायदा; मिळकत; नफा. [सं. प्राप्ति + अंश]

दाते शब्दकोश

फोडणें

फोडणें phōḍaṇēṃ v c (स्फोटन S Active of फुटणें) To break; to part by violence; to shatter, shiver, smash. 2 To break open; to burst by violence; to force a chasm, gap, hole, or opening (into a house, a wall, a box). 3 To break, cleave, rive, split, to dissever by blows. 4 To burst (a boil or tumor). 5 To punch or force out (the eyes). फोडणें is used of birds &c. and thus, apparently in the sense of plucking out, yet the sense, notwithstanding the object of the verb is डोळा, नेत्र, नयन &c., is To break, burst, or destroy (the vision). 6 To disclose or divulge (a secret). 7 To break (buttermilk) by heating it over the fire. फोडणें is To break or burst open in many applications where suddenness and smartness are implied; and is contrad. from मोडणें & तोडणें which पाणी फोडणें To let out water.

मोल्सवर्थ शब्दकोश

फुलडौल, डौल

पु. फुलांनीं सजविलेल्या डोलार्‍यावर काढलेली देवाची मिरवणूक. -के १९.९.४१. [फूल + दोला; म. डोलणें]

दाते शब्दकोश

फुरण

न. १ कंप; फुरफुरणें; लवणें. (डोळ्याची पापणी, डोळा. २ (मारणें, लढणें, भारणें इ॰ संबंधी) स्फुरण; आवेश. (क्रि॰ येणें; चढणें). 'ऐसें म्हणतां कंपिनाथा । फुरण आलें ते काळीं ।' -रावि १८.२४६. [सं. स्फुरण; प्रा. फुरण]

दाते शब्दकोश

फुरणें

अक्रि. १ फुरफुरणें; कंप होणें; लवणें (डोळा). २ (भांडण, मारणें, बोलणें इ॰ संबंधीं) स्फुरण चढणें. स्फुरण पहा. [फुरण]

दाते शब्दकोश

फुरफुरणें

अक्रि. १ (घोड्यानें, गाढवानें) खेंकाळणें; श्वास जोरानें सोडणें. २ (करवंटी इ॰ तेलकट पदार्थ जळतांना) तडतडणें; फुर्र असा आवाज होणें. ३ तोंडानें फुर्र् असा आवाज करणें. फुरकी वाजविणें. ४ स्फुरणें; (डोळा) लवणें. ५ (ल.) अत्यंत उत्सुकते- मुळें, अगर आवेशानें हात, पाय, तोंड इ॰ मारणें, धांवणें, बोलणें इ॰ साठीं स्फुरण पावणें. ६ उतावळा होणें. फुरफुरणी- स्त्री. धातूसाधितनाम.

दाते शब्दकोश

रोंबटणें, रोमटणें

सक्रि. (राजा.) खुपसणें; (डोळा, मातीचा गोळा, पोट इ॰ कांमध्यें बोट, लांकूड, कट्यार इ॰) भोंसकणें; जोरानें दाबून आंत शिरकाविणें; आंत चेपणें, दाबणें.

दाते शब्दकोश

रुसवा

लटका राग, गाल फुगवले, मर्जी खप्पा झाली, कळी खुलेना, ' आम्ही नाहीं जा॔ झाले, अदया कठोरा अशीं संबोधने मिळालीं, तळपायाची आग गालांपर्यंत गेली, फुरंगटली, फणका-याने म्हणाली, एकेक डोळा एवढाला केला, अकारण घुस्सा केला, समजूत काढतां नाकीं-नऊ आले, नाजूक फसवा रुसवा, रुसवाफुगवा, कृतक काप, खोट्टं खोट्टं रागावणें, रुसूं बाई रुसूं कोपऱ्यात बसू ; तिकडून आला नवरा फुस्कन हंसू त्यांतला प्रकार ! पारदर्शक राग, रागाचा केवळ आवि्भाव, प्रेमकलह, रागाचा कढतपणा कायम होता.

शब्दकौमुदी

रूपके ( चमकृतिजनक )

समोरच्या मोटारीनें डोळा घातला तेव्हा आमची पुढें निघाली, सूर्याची गुड् -बाय करायची वेळ होती, म्हशींना आज डिनर पार्टी होती; आंबोणांत पेंड होती, दिवसाला ज्वर चढला, आंदण आलेल्या कल्पना, गादीला लाटा पडल्या आहेत, अनुभवाच्या लिपीनेंच जीवन-ग्रंथ उलगडतो, तोंडाल। कुलूप पडलें, क्यूचें तोंड कुठें आहे ?

शब्दकौमुदी

रवका

पु. एखाद्या रवाळ पदार्थाचा जमलेला, तोडून काढ लेला लहानसा डोळा; तुकडा; (गूळ, मध, तूप इ॰चा). 'कलिंगड चांगलें असलें म्हणजे त्याचे रवके तोडून खावयास बरें.' [रवा]

दाते शब्दकोश

साजरा

साजरा sājarā a (सज्ज S) Decorated, ornamented, embellished, tricked out, set off. Pr. पुणताम्याच्या म्हशी आणि ढोणगांव सा0 (The depasturing herds of buffaloes roundabout the village ढोणगांव set off the village पुणतामें) Used where anything is adorned or beautified by ornaments or graces not its own. Pr. फुटका डोळा काजळानें सा0 करावा. 2 Graceful, handsome, comely, pretty, neat. (दिवस, सण &c.) सा0 करणें To observe or keep (a day, festival, rite) in a cold, heartless, and perfunctory manner; to observe (it) in such manner as that the observance, although it cannot be denied, shall be, evidently to all, only an outward act to save appearances.

मोल्सवर्थ शब्दकोश

सायरा

पु. पातळ थर, पापुद्रा, तरंग (पाणी, डोळा इ॰ वर येणारा). [साय]

दाते शब्दकोश

सडोळ

वि. डोळस. 'ते तेथीचें सडोळपण ।' -गीता २.६६०. [स + डोळा]

दाते शब्दकोश

शेज

स्त्रीन. १ रांग; ओळ; बाजू; क्रम. 'धर्माशीं नीतिशीं । शेज धरी ।' -ज्ञा ४.५३. २ मळवट; विवाहादि मंगल प्रसंगीं कपाळावर गंधाचा लेप करतात (अक्षता लावण्याकरितां) ती; (क्रि॰ भरणें; लावणें). ३ शय्याच अंथरूण; बिछाना; निजण्या- करितां तयार केलेली गादी वगैरे घालून मऊ जागा. 'डोळा नलगे शेजेसी । निद्रेमाजी देखे कृष्णासी ।' -एरुस्व ५.३०. ४ मोहरमांतील मखर. [सं. शय्या; प्रा. सेजा; गु. शेज; हि. पंसिं. सेज] (वाप्र.) शेज घेणें-(चांभरी) जोड्याच्या कडेचा भाग छाटणें, व्यवस्थित करणें. शेज पडणें-लागणें-रांगेस लागणें; क्रमप्राप्त होणें; सूरू होणें. शेजसे घालणें-नवरानवरीस एकत्र निजविणें. शेजेस येणें-१ लवंडणें; झोंपण्याकरितां बसणें (घोडा). २ भरून येणें; खपली धरणें; माठळणें (जखम) शेजारती-शेज आरती-स्त्री. रात्रीं निजावयास जाण्या- पूर्वीं देवाची करावयाची आरती. शेजओटी-स्त्री. ब्राह्मणांमध्यें गर्भाधानप्रसंगी रात्रौ माहेरचीं माणसें मुलीची ओटी भरतात ती. -बदलापूर २०७. शेजघर-न. शय्यागृह; निजण्याची खोली, जागा. शेजार-न. १ शय्यागार; निद्रागृह; निजण्याची खोली, जागा. 'दुधाचीं शेंजारें । क्षीराब्धी ऐसीं मनोहरें ।' -ज्ञा ९.३९०. २ बिछाना; शय्या. 'जाले आपुले शेजार । तेथें हृदयाच्या शेजारीं ।' -विपु २.९४. [सं. शय्यागार] शेजोट-पु. १४-२० माणसें बसूं शकतील असा चौरंग.

दाते शब्दकोश

सज्जन

सज्जन sajjana m (S) A good and virtuous person. Pr. स0 तोडूं नये आणि डोळा फोडू नये.

मोल्सवर्थ शब्दकोश

संभाळ

पु. रक्षण; प्रतिपाळ; पालन; संगोपन. [स. संभार] संभाळीं करणें-हवालीं करणें; स्वाधीन, सुपूर्त करणें. संभाळणें-उक्रि. १ रक्षण करणें; पाळणें; पोसणें; संगोपन करणें; आश्रय देणें; काळजी घेणें. २ धारण करणें; सोसणें; सहन करणें; वाहणें. (भार, कार्याचा बोजा, ओझें). ३-अक्रि. जपणें; काळजी येणें; सावध राहणें. 'संभाळ, अपथ्य केलेंस तर दुखणें वाढेल.' ४ जाणीव असणें; वाटणे; समजणें. 'डाग दिला तरी संभाळत नाहीं मग चिमटा कोठला संभाळावयाला.' संभाळून घेणें-वागवून घेणें; चालवून घेणें; सोसणें; खपवून घेणें; काणा डोळा करणें.

दाते शब्दकोश

संधान

न. उपाययोजना; शक्ति, युक्ति, साधनें यांची योग्य तरतूद व योजना; एखादें कार्य घडवून आणण्याच्या कामीं प्रयत्न, बुद्धि व शक्ति यांचा योग्य मिलाफ करून योजना २ योग्य रीति, मार्ग, पद्धति (एखाद्या कार्याच्या सिद्धयर्थ). ३ नेम; निशाण; लक्ष्य. 'रिपुकंठीं हा शर लागेल या न संधानें ।' -मोकर्ण ४७.७०. ४ कल, प्रवृत्ति, रोंख (मन, इच्छा, डोळा वगैरेचा). ५ मनाची धारणा; लक्ष्य; अवधान; ध्यान. 'मूळ ग्रंथाचें संधान राखून मग आपलें राखायचें' -नि १९६. ६ कावा; कपट; युक्ति. 'चोर डाक होती गिलचांची नाहीं कळले संधना' -ऐपो ११८. 'करिता जाहला घोर संधान ।' -रावि ३२.११. ७ घबाड; डबोलें; ठेवा. 'आम्हांस मार्गांत कांहीं चांगलेसें मोठें संधान साधेना.' -विवि ८.८.१५४. ८ सुमार; समय; संधि. 'दसर्‍याच्या संधानास मी तुमचे गांवीं येईन.' ९ वग; वशिला; सूत्र. [सं. सभ् + धा] संधानी-वि. हुशार; धूर्त; युक्तिबाज; कावेबाज; संधान लावणारा, बांधणारा.

दाते शब्दकोश

संधि-धी

पुस्त्री. १ जोडणी; ऐक्य; मिलाफ. २ सांधा; जोड; शिवण; सांध्यांची रेषा, बिंदू. 'अस्ति यंत्र कीडिकीडी । संधि कळासु कडकडी ।' -भाए २०४. 'बैसलो संधि भागीं तुज धरूनि चित्तीं' -तुगा ३२०. ३ चीर; भेग; फट; खांच; खंड. 'भयें दडताती संधींत' -नव २४.१३४. ४ अवघि; मधील काल; अवसर; अवकाश. ५ गांठ; पेर; कांडें; जोड ६ वर्णांचा योग; स्वर किंवा व्यंजनें यांचा जोड, मीलन; सामासिक शब्दाच्या अंत्य व प्रारंभींच्या वर्णांचें मेलन. ७ लक्ष्य; दृष्टि; डोळा; इच्छा; उद्देश. 'भिक्षुक पैक्यावर संधि ठेवून यजमानाचें आर्जव करितो.' 'करून आले दक्षिण संधी ।' -ऐपो २६७.८ युग, मन्वंतर, कल्प वगैरेपैकीं एक संपूर्ण होऊन दुसरें लागण्याच्या मध्यंतरींचा काल; संधिकाल. ९ चोरानें भिंतीस पाडलेलें भोंक, बीळ, बिवर, भुयार, खिंड, भगदाड. १० योग्य वेळ; योग्य समय; ऐन वेळ; आणिबाणीची वेळ; अनुकूल वेळ. 'यास्तव मोठ्या संधीस सूज्ञांनीं दोहोंच्या स्थितीकडे लक्ष्य द्यावें.' -नि १. ११ (ल.) समेट; तह; सलाह; ऐक्य; मिलाफ; तडजोड (मैत्री, नातें, सख्य वगैरेची). 'मज बरोबर संधि करावयास आली होती.' -कमं २ -एभा १९ १५६. [सं.सम्-धा = ठेवणें] ॰काल-पु. दोन कालांच्या मधील अवधि. 'आयुष्याच्या अशां संधिकालावर तुम्ही उभे आहांत.' -केले १.३७३. ॰ग-वि. प्रत्येक सांध्यांतून जाणारें, भिनणारें (रोग, विष, औषध वगैरे). ॰गत-वि. सांध्यांत असलेला, शिरलेला (वायु, वात, रोग वगैरे). ॰पाद-पु. ज्यांच्या पायांस सांधे असतात असे प्राणी. उदा॰ डांस, ढेंकूण, उवा, पिसवा, मुंग्या, खेकडा वगैरे. (इं) अँथ्रोपोडा. ॰प्रकाश-पु. सूर्योदयापूर्वी सूर्यास्तानंतर बराच वेळ जो प्रकाश दिसतो तो. प्रकाशराग-पु. (संगीत) संधि- प्रकाशाच्या वेळीं गाइला जाणारा राग. यांत ऋषभ कोमल व गांधार, निषाद हे स्वर तीव्र असातात. ॰फुटणी-स्त्री. १ संधि- वाताचा रोग, कळा. २ (सढळपणें) सांध्यांत झालेलें गळूं, उठाणूं. ॰बंध-वंधन-पुन. स्नायुरश्मि; सांध्यांना बांधणारे स्नायूचे दोर. (इं.) लिगॅमेंट. ॰भंग-पु. १ संधिवातामुळें सांधे धरणें, दुखणें. २ सांधा मोडणें, निखळणें. ॰वात-वायु-पु. ज्यामुळें शरीराचे सांधे धरतात, दुखतात असा रोग. (इं.) र्‍हुभॅटिझम्. ॰विग्रह-पु. तह किंवा तोड. ॰वेला-स्त्री. संधिकाल; दिवस व रात्र यांच्या मधील काल; कोणत्याहि दोन कालवधींमधील अवकाश. उदा॰ पौर्णिमा, अमावास्या; कालाचा कोणताहि अवधिदर्शक शब्द. उदा॰ सकाळ; दुपार; संध्याकाळ. ॰संकोच- पु. सांधे धरण्याचा रोग; संधिवात. ॰स्फोट-पु. १ सांध्यांस फूट, कळ लागणें. २ सांध्यांच्या ठिकाणीं फोड, सूज, आवाळू होणें.

दाते शब्दकोश

स्फुरण

न. १ फुरफुर; भरभर; कंप (डोळा, कातडी, अवयव यांचा); लखलखाट. (वीज, तरवार, इ॰ चा); चमक, लुकलुक (तारा, रत्न इ॰ ची); आवेश, राग इ॰ चा झटका; संचार; स्फूर्ति (युद्ध, वाद यांतील); थरथराट; कंप (राग, भीति इ॰ मुळें). २ एखादी गोष्ट एकदम आठवणें; स्मरण होणें; मनांत उद्भूत होणें. ३ धडपड; धक्का. [सं. स्फुर् = फुरफुरणें] स्फुरणें-क्रि. स्फुरण पहा; कंप पावणें, मनांत एकाएकीं येणें; सुचणें. २ स्फूर्त-र्ति-१ स्त्री. स्फुरण पहा. एकाएकीं प्रादुर्भाव. स्फुरणें. २ थरकाप. ३ मनांत उत्कटतेनें प्रगट होणारी शक्ति. प्रतिभा.

दाते शब्दकोश

सता

पु. सती या शब्दाचें पुल्लिंगी रूप. 'खरेंच निघल काय सता पाह्यला थेट घेतली प्रेतकळा । तेव्हां तो तिजला झोंबूं लागला नार उघडून पाहे डोळा ।' -पला ८.१७. [सं. सत्]

दाते शब्दकोश

ताबूत

(पु.) [अ. ताबूत्] मृत ठेवण्याची पेटी; मोहरमांत मिरवावयाची इमाम् हुसैनच्या थडग्याची प्रतिमा; डोला; शवाची पेटी. “शहाजाद्याचा ताबूद व त्याचीं मुलें माणसें येथें पाठऊन देणें” (दिमरा १|२५१).

फारसी-मराठी शब्दकोश

ताबूत / ताबूद

(आ) पु० डोला, ताजा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

ताबूत, ताबूद      

पु.       १. शव ठेवण्याची पेटी; शव; प्रेत : ‘शहाजाद्याचा ताबूद व त्याची मुलें माणसें येथें पाठऊन देणें.’ – दिमरा १·२५१. २. मुसलमान लोक मोहरमात मिरवतात ती हुसेनच्या थडग्याची प्रतिमा; डोला; ताजिया. ३. ताबूत नेण्याच्या परवानगीसाठी मुसलमानांवर बसवलेला मराठ्यांच्या रियासतीतील एक कर.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ताबूत-द

पु. १ शव ठेवण्याची पेटी. शव; प्रेत. 'शहाजा- द्याचा ताबूद व त्याचीं मुलें माणसें येथें पाठऊन देणें.' -दिमरा १.२५१. २ मुसलमान लोक मोहरमांत मिरवितात ती हुसे- नच्या थडग्याची प्रतिमा; डोला; ताजिया. ३ ताबूत नेण्याच्या परवानगीसाठीं मुसलमानांत बसविलेला मराठ्यांच्या रियासतींतील एक कर. [अर. ताबूत्]

दाते शब्दकोश

ताजा

(फा) वि० तवाना, श्रम हरलेला. २ पु० डोला, ताबूद, त.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

पु. १ मोहरमांत मुसलमान लोक हसनहुसेनाविषयीं गातात तें शोकगीत. २ ताबूत; डोला. [अर. तअझिया]

दाते शब्दकोश

ताजा      

पु.       १. मोहरमात मुसलमान लोक हसनहुसेनाविषयी गातात ते शोकगीत. २. ताबूत; डोला; ताजिया. [अर. तअझिया]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ताजिया

(पु.) [अ. तअझिया] इसन-हुसेनविषयीं शोकगीत; मर्शा; ताबूत; डोला.

फारसी-मराठी शब्दकोश

तांब(बा)रणें

अक्रि. १ (डोळा, आकाश, चेहरा, सायं- काळ इ॰) आरक्त, तांबडा होणें; तांबुसणें. २ (पीक इ॰) तांब या रोगानें युक्त होणें. ३ (लोखंड) गंजणें; तांबर्‍यानें युक्त होणें. -उक्रि. (डोळे) लाल करणें. [सं. ताम्र; म. तांबर]

दाते शब्दकोश

ताठ

पु. १ ताठरपणा; न वांकणें किंवा वळणें; लवचीक- पणाचा अभाव. २ (अति श्रमामुळें, बराच वेळ बसून राहिल्या- मुळें शरीर इ॰ कांस आलेला) ताठपणा; जाड्य. ३ (ताजवा इ॰ कांचें) वजनांतील विचलन; अशुद्धता; तंतोतंतपणाचा अभाव. (क्रि॰ होणें; देणें). 'ह्या ताजव्याला ताठ इतका आहें कीं एक गुंज टाकली तरी कांटा बराबर.' ४ गर्व; दिमाख; ताठा. -वि. १ (शब्दशः व ल.) न वांकणारा; न लवणारा; कडक; न नमणारा; ताठर. 'ना तो संशृतीसि ताठ । वज्रलेप ।' -ऋ ११.२ न बदलणारा; आपलें धोरण न सोडणारा; अचंचल; निश्चयी; करारी. ३ घट्ट; अंगास चांगलें बसणारें; सैल, लहान न होणारें (वस्त्र, अंगरखा). ४ ताणलेला; ताणून लांब केलेला (दोर इ॰). ५ तारवट; ताठरलेला; ओढलेला (डोळा इ॰). ६ धष्टपुष्ट; धट्टाकट्टा; मजबूत बांध्याचा. ७ पुरेपूर; भरपूर; तब्बल; पुरता. 'येथून तो गांव ताठ कोसभर आहे.' 'तो ताठ सहा फूट उंच आहे.' ८ ठसठसीत; भरदार; घसघसीत (रोप, ऊंस, धान्य इ॰). ९ अवि- नयी; गर्विष्ठ. [स. दृढ-तठ्ठ-ताठ -भाअ १८३२.; तुल॰ सं. तटस्थ.] ॰वडा-पु. १ गुर्मी; मगरूरी. २ दिमाख; ताठपणा. 'उर उघडा घडोघडीं करुन कुच, दाखवितां तुज ताठवडा ।' -प्रला १६२. [ताठ + वट-ड प्रत्यय]

दाते शब्दकोश

ताठर

वि. १ ताणलेला; न वांकणारा; ताणून लांब केलेला (दोर इ॰). २ वाळलेला; कडक; कोरडा; शुष्क; टणक (कागद, पान इ॰). ३ (सामा.) लवचीक नसलेला; न वांकणारा. ४ (झोंप इ॰ मुळें) ओढलेला; तारवटलेला; जड झालेला (डोळा इ॰). ५ दाट विणीचें; घटमूट; अटस; घट्ट (वस्त्र, कापड इ॰). ६ भरदार; घसघसीत (रोंप, पीक इ॰). ७ भक्कम; मजबूत बांध्याचें (घर इ॰). ८ (व्यापक) अगडबंब; अवाढव्य; भरभक्कम; अव- जड; बोजड (ओझें इ॰). ९ पुरेपूर; तब्बल. ताठ अर्थ ७ पहा. [ताठ]

दाते शब्दकोश

तेरसा      

वि.       तिरवा (डोळा); तिरसा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तेरसा

वि. तिरवा (डोळा); तिरवें पाहणारा; तिसरा. [सं. तिरस्]

दाते शब्दकोश

तिजा

तिजा tijā m The feasting and jollity on the third day after the discharge of the डोला or ताबूत into the water. Among Muhammadans.

मोल्सवर्थ शब्दकोश

तिरडोळी

स्त्री. १ नारळाचे डोळे. २ (निषेधार्थी) भिकारी. [त्रि + डोळा]

दाते शब्दकोश

तिरका

वि. १ तिरवा; तिरकस; वांकडा (डोळा). २ तिरवें, तिरळें पाहणारा. [सं. तिर्यक्; प्रा. तिरिक्ख]

दाते शब्दकोश

तिरकट

वि. तिरवा; काणा; चकणा (डोळा; माणूस). [सं. तिर्यक्]

दाते शब्दकोश

तिरकट, तिरवट, तिरका, तिरपा, तिरवा, तिरसा, तिरळा      

वि.       काणा, चकणा (डोळा, माणूस). [सं. तिर्यक्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तिरळा

वि. तिरवा (डोळा अथवा मनुष्य). [सं. तिरस्]

दाते शब्दकोश

तिरसा, तिरवा

वि. तिरळा; तिरपा (डोळा); तिरव्या डोळ्याचा (माणूस).

दाते शब्दकोश

तिरवा

वि. १ तिरळा (डोळा); तिरपा पाहणारा; काणा. २ वांकडा; कलता; एका बाजूस असणारा; तिरपा. [सं. तिर्यक्]

दाते शब्दकोश

तिरवट

वि. तिरपें पाहणारा; तिरळा (डोळा). [तिरवा]

दाते शब्दकोश

त्रिनयन, त्रिनेत्र, त्रिलोचन

वि. तीन डोळे असलेला; (शंकर, महादेव). [सं. त्रि + नेत्र, नयन, लोचन = डोळा]

दाते शब्दकोश

त्र्यंबक

पु. १ तीन डोळ्यांचा देव; शंकर. २ शिवधनुष्य. 'वोढूनि धनुष्याची ओढी । त्र्यंबक मोडिलें कडाडी ।' -एभा ११.७३५. [सं. त्रि = तीन + अंबक = डोळा] -केश्वर-पु. १ शंकर. २ बारा ज्योतिर्लिंगांपैकीं नाशिकाजवळचें एक सुप्रसिद्ध ज्योतिर्लिंग.

दाते शब्दकोश

उधळा      

पु. १. भुरळ; मोह : ‘हा रजोगुणाचा उधळा । पडे ज्ञानियाचां डोळा ।’ – उगी ७३८. २. मंतरलेली राख; भस्म; धुरळा. पहा : उधळण : ‘कनककमळांचां कचोळा । किजे परागाचा उधळा॥’ – शिव ७८१.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उजळणें

सक्रि. १ चकचकीत करणें; जिल्हई देणें; घांसणें; निर्मळ, स्वच्छ करणें. २ दिवे लावणें; मशाल पेटविणें; प्रकाश करणें; पेटविणें; पेट देणें. 'जैसा मालवलिया दिवा । प्रभेसि जाय पांडवा । मग उजळिजे तेथ तेधवा । तैसाचि फांके ।।' -ज्ञा १५. ३६९. ३ प्रकाशित करणें. 'दंत तेजें उजळोनी दिशा । हांसोनि म्हणे ।' -मुआदि २२.८८. ४ स्पष्ट करणें; सुलभ करणें. 'विरक्तें पर- मार्थ उजळावा.' -दा २.९.१२. ५ उजळणी, आवृत्ति करणें. 'पाठ उदंडचि असावें । सर्वकाळ उजळीत जावें ।' दा १८.३.१९. -अक्रि. १ गोरें होणें; सतेज होणें; सुंदर होणें. 'क्रमेंच तीचीं उजळेच अंगे ।' -सारूह २.५३. 'उजळेना ना काळवंडेना ।' -दा १३. २.२२. २ पाडास आलेले आंबे इ॰ सुंदर रंगयुक्त होणें, उजळ होणें. 'कापुरवेलीची चोखडी । उजळिली परीवडी ।' -ऋ ८४. ३ (उष्णादि विकारानें लाल झालेला डोळा, अंधारी रात्र) निव- ळणें. ४ प्रकाशित होणें. 'जैसें त्रैलोक्य दिसे उजळलें ।' -ज्ञा १.३९. 'उजळल्या दाही दिशा.' -तुगा ६७८ [सं. उज्ज्वलन; प्रा. उज्जळण; सिं. ओजरणु]

दाते शब्दकोश

वाढ

स्त्री. १ शरीराची उत्तरोत्तर होत जाणारी वृद्धि; आकार मोठा होणें; जाडें होणें. २ आधिक्य, प्रमाणात, मापांत, संख्येंत अधिक भरणें; वाढावा. ३ व्याज; वाढावा (उसनें धान्य वगैरे परत देतांना जें अधिक देतात तें). ४ -स्त्रीन. मोड येण्याची जागा; डोळा; अंकुर फुटण्याचें स्थान. ५ -न. (वाढें) उंसाचा अग्रभाग, शेंडा. -वि उंच; थोर; मोठा. 'कवी उपासकांची वाढ कीर्ति । विस्तारली ।' -दा १.७.१३. [सं. वृध्-वर्ध्; प्रा. वढ्ढ] वाढआविंज, वाढाविंज-स्त्री. भातलावणीची अखेर, शेवट. आविंज पहा. वाढणी-स्त्री. वाढ; मोठें होणें; उंच होणें; वाढणीस लागणें; वाढूं लागणें. [वाढ] वाढणें-अक्रि. १ मोठें होणें; आकार, उंची, संख्या वगैरे अधिक होणें. २ वय, काल इत्यादीनीं प्रगत होणें; पक्व दशेप्रत जाणें. ३ पुढें जाणें; हल्ला करणें; समोर जाणें; चालून जाणें. 'राउळांपुढें वाढत । राजवाहन पुआळित ।' -शिशु ५३०. 'पवार कांहींसे पुढें वाढून गेले.' -भाव ११५. ४ (प्रत्यक्ष उच्चारानें येणारे अशुभ टाळण्या- करितां स्त्रिया वगैरेमध्यें रूढ) कमी होणें; नाहींसें होणें; संपणें; खर्चहोणें (कुंकु, इ॰). ५ वारविलें जाणें (धान्य) ६ अंगांत येणें; संचार हेणें (देव, भूत, पिशाचादिकांचा). -आडिवऱ्याची महाकाली १०३. [सं. वृध्-वर्ध; प्रा. वड्ड; हिं. बढना; वं. बडिवा; उरि बढिवा; सिं. गु. वधणुं-वुं] वाढणें वर्तणें-अक्रि. सामा- न्यतः वाढणें व राहणें; आयुष्यक्रम चालविणें. 'तुमच्या अन्नावर वाढलें व वर्तलों तो मी तुमचाच आहें.' [वाढणें + वर्तणें] वाढता-वि. १ वाढत जाणारा; पूर्णतेस जाणारा; मोठा होणारा. २ अधिक होत जाणारा; वृद्धि पावणारा. उदा॰ वाढता धंदा- रोजगार-चाकरी-मुदत-बुद्धि-लक्ष्मी-राज्य-कळा. ३ शुभदायक, मंगलदायक म्हणून वर्ताळा दिलेला. [वाढ] वाढत्या अंगाचा- वि. १ जलद वाढणारा, मोठा होणारा; उंच होत जाणारा. २ सैल; डगळ; वाढला तरी अंगास येईल असा (कपडा वगैरे). वाढता चुडा-पु. बांगड्या भरल्यावर शुभदायक म्हणून कासार जी अधिक बांगडी भरतो ती. वाढती-स्त्री. १ मुलांच्या उचकीस शुभदायक शब्द (अमंगल टाळण्यास). २ वाढदिवस. 'कीं वाढती करिती उल्हासें । उभविती गुढिया ।' -ज्ञा ९.५१२. वाढ- दिवस-दीस-पु. जन्मदिवस; जन्मदिनीं करावयाचा विधि, समारंभ. (प्रारंभीं मुलाच्या प्रत्येक महिन्याच्या जन्मदिवशीं हा विधी करतात व एक वर्षानंतर वार्षिक करतात). वाढवण-स्त्री. १ वाढण्याची, अधिक होण्याची क्रिया. २ वृद्धि; वाढ; बढती. ३ संपणें; खलास होणें; खुंटणें (अभाव, नाश वगैरेचा प्रत्यक्ष निर्देश अशुभसूचक मानून त्याअर्थी उलट वृद्धिवाचक शब्द योज- तात). ४ केरसुणी; खराटा. [सं. वर्द्धनी] वाढवणें-विणें- उक्रि. (वाढणें प्रयोजक) १ मोठें करणें; अधिक करणें; विस्तृत करणें. २ वाढावयास लावणें; पालनपोषण करणें; संभाळणें. ३ फुटणें (बांगडी वगैरे); संपणें; खुंटणें; नाश पावणें (अशुभ निर्देश टाळण्याकरितां कुंकू, बांगड्या वगैरेसंबंधीं). ४ आसडणें; पाखडणें; वारवणें (धान्य). [सं. वर्धापनम्] वाढवा-पु. वाढ; वाढलेला भाग; जास्तीपणा. वाढविणें वर्तविणें-उक्रि. पालनपोषण करणें; लहानाचा मोठा करणें; संभाळ करणें. वाढवा- वाढव-स्त्री. १ विस्तार; आधिक्य; वृद्धि करणें (औस्तुक्य, पुरस्कार, नेट प्रगति इत्यादि ध्वनित होतात). २ (ल.) चेत- वणी; भडकविणें; वाढविणें (कलह, भांडण, तंटा, आग). वाढ- वीस-पु. वाढदिवस; जन्मदिवस; वर्षगांठ. वाढिनणें-निणें- न्नणें-क्रि. वाढणें पहा. 'यादव प्रतापतरु, वाढिनला ।' -शिशु २. 'त्यावरी वाढिन्नली तृणजाळी ।' -भुवन १५.७६. वाढी- स्त्री. १ वृद्धि; वाढ. २ उसना घेतलेला धान्यादि पदार्थ परत करा- वयाच्या वेळीं अधिक द्यावयाचा तो; व्याज. ३ पातळ पदार्थ वाढण्याचें तोटीचें भांडे; झारी. [वाढ] ॰दिढी-स्त्री. उसनें धान्यादि दीडपटीनें परत द्यावयाचा करार, रिवाज, रीत. ॰मोडी- स्त्री. चढउतार. -शर. (वाप्र.) उंसांत जाऊन वाढें आणणें- समृद्धीच्या स्थळाहून क्षुद्र वस्तु आणणें. वाढीव-स्त्री. थोरपणा; बडेजाव. 'वाढिवेच्या गोष्टी बोलती । घाय घालिती अधर्म ।' -रावि १९.११५. वाढणीस, वाढीस लागणें-१ उंच, रुंद, लठ्ठ होऊं लागणें. २ खुंटलेली वाढ पुन्हां सुरू होणें.

दाते शब्दकोश

वांकडी दृष्टि

वांकडी दृष्टि vāṅkaḍī dṛṣṭi f वांकडी नजर f sometimes वांकडा- डोळा m Eye, view, or regard of disfavor or displeasure.

मोल्सवर्थ शब्दकोश

वींदान

विंदान पहा. 'अया-घडीता तोची वींदानी ।' -उषा ७४. 'तीये वींदाने लागती डोळा' -उषा ९७.

दाते शब्दकोश

वित्त

न. १ द्रव्य; धन. 'जो बाधोनि असे डोळा । वित्ता- शेतें ।' -ज्ञा १३.६८३. २ मालमत्ता; संपत्ति; ऐवज; मालकीच्या वस्तू. [सं. विद् = मिळणें] सामाशब्द- ॰घोषणा-स्त्री. द्रव्याचा ध्यास; पैशासंबंधी चिंतन; धनलोभ. ॰प-पु. कुबेर. ॰पिसा- वि. द्रव्याचें वेड लागलेला; पैशाशिवाय कांहीं सुचत नाहीं असा. ॰पिसें-न. द्रव्याचें वेड; धनलोभ. ॰विषय-पु. धनदौलत; मालमत्ता; ऐहिक संपत्ति; ऐवज; पैसा. [सं.] ॰शाठ्य-न. कृपणता; चिक्कूपणा; कवडीचुंबकपणा; कद्रुपणा; कार्पण्य. [सं.] वित्तेश-पु. कुबेर. 'रौप्याद्री तुळिला पदें प्रबळिला वित्तेश विध्वं- सिला ।' -मुरामाण युद्ध १२५. वित्तेषणा-स्त्री. द्रव्याविषयीं इच्छा; धनलोभ. [सं.]

दाते शब्दकोश

विवर्तं

पु. १ भोंवरा. २ भास; भ्रम; भ्रांति; माया. 'माया ब्रह्मीचा विवर्त ।' -विपू ३.२४. 'बोलतां परिणाम विवर्तु ।' -भाए ५८३. 'मूळ तात्त्विक रूप सुटून दुसरें नांवरूप प्राप्त होतें तेव्हां त्यास विर्तत म्हणावें.' -गीर २३९. [सं. वि + वृ] ॰रूप-वि. भासमात्र; मायावी. 'तेथें माया मिथ्या भान । विवर्तरूप भासे ।' -दा ८.२.२. ॰वाद-पु. मायावाद. 'प्रकृति ही स्वतंत्र दुसरी वस्तु नसून एकजिन्नसी एका निर्गुण ब्रह्मावरच मनुष्याचीं इंद्रियें अज्ञानानें सगुण देखाव्याचा अध्यारोप करीत असतात या मतास विवर्तवाद म्हणतात.' -गीर २३८. विव- र्तन-न. १ भ्रमण. २ (नृत्य) डोळा एका बाजूस फेकणें, शृंगार- द्योतक अभिनय. ॰उरू-स्त्री. (नृत्य) टांच आंत घेऊन जंघा- क्षिप्त मांड्यांची होणारी स्थिति. विवर्तितकरण-न. (नृत्य) हात पुढें करणें, त्रिक विवर्तन फेकणें व डावा हात रेचित करणें. ॰पार्श्व-पु. (नृत्य) एकाच पायाच्या चवड्यावर उभें राहून कटि विवृत्त केली असतां वरचा सर्व भाग फिरविण्याची क्रिया. ॰पुट- न. (नृत्य) खालच्या व वरच्या पापण्या जवळ आणून फिरविणें.

दाते शब्दकोश

वोघ

पु. ओघ पहा. १ पाट; ओहोळ. 'जरी सरिता वोघ समस्त । परिपूर्ण होऊनि मिळत ।' -ज्ञा २.३५८. २ ओघळ; पाट. 'पात्रें भरूनि जाती वोघ ।' -वेसीस्व १२.९४. ३ क्रम; रूढी. 'वोघ मागला क्वचित जरी असतां तरी हृदयीं भेंतें ।' -होला ९६. [सं. ओघ] वोघणें-वाहणें. 'प्रारब्ध मंदराचळाची सरिता । वोघ वोघील आतांची ।' -नव २.३५. वोघें-क्रिवि. सहज; ओघानें. 'कां वाटे जातां वोघें । कल्हातांही डोळा लागे ।' -ज्ञा १४.१८८.

दाते शब्दकोश

वरडोळ्या or ळा

वरडोळ्या or ळा varaḍōḷyā or ḷā a (वर & डोळा) Of whom the eye-balls are turned up, nearsighted, a myope. 2 fig. Lofty-looking, disdainful, haughty. 3 That stares or gazes.

मोल्सवर्थ शब्दकोश

विश्व

न. जग; सृष्टि. 'तैसें व्यासमति कवळलें । मिरवे विश्व ।' -ज्ञा १.३९. -वि. सर्व; सगळें; अचाट; अगणित. [सं.] ॰कर-विश्वंकर-पु. सृष्टिकर्ता. ॰कर्मा-पु. १ ब्रह्मदेवाचा पुत्र व देवांचा शिल्पकार, सुतार, कारागीर. २ हुषार कारागीर; शिल्पी. ॰कारण-न. (काव्य) सृष्टिनिर्माणकर्ता; ब्रह्मदेव,. ॰कुटुंब- वादी-पु. सर्व जग हें एक कुटुंब असून सर्व असून सर्व लोक त्या कुटुंबातील भागीदार आहेत असें मत असणारा. 'त्याचीं मतें नास्तिक्या- कडे झुकत होतीं व तो जहाल विश्वकुटुंबवादी बनत चालला होता हें सुशीलेला ठाऊक नव्हतें.' -सुदे २०६. ॰कुटुंबी-पु. १ सर्व- सृष्टि हें ज्याचें कुटुंब आहे तो परमेश्वर. २ (ल.) उदार आश्रय- दाता; जनकल्याणकर्ता; मोठ्या कुटुंबाचा धनी. ॰कोश-पु. सर्व विषयांचें ज्ञान देणारा मोठा ग्रंथ. ॰जनीन-जनीय-वि. सर्व- जगास योग्य, सोईस्कर, हितकर, लाभदायक, संबद्ध. ॰जित्-पु. एका यज्ञाचें नांव; जग जिंकणारा. 'ज्या विश्वजित् यज्ञांत यज- मानानें आपलें सर्वस्व दान करावें असें सांगितलें आहे...' -टि ४.५१. ॰जीवन-न. (काव्य) सृष्टीचा प्राण; परमेश्वर. ॰दुनी- स्त्री. सर्वजग; सर्वसृष्टि; सर्व मानवजाति अलमदुनीया याप्रमाणें. 'देवा विश्वदुनीच्या भाग्यानें शेत पिको.' [विश्व + फा. दुनिया] ॰धाया-पु. सृष्टीचा आधार; परमेश्वर. ॰नेत्र-पु. सृष्टीचा, जगाचा डोळा; परमेश्वर. ॰पाल-विश्वंभर-पु. जगाचें पोषण- कर्ता; जगाचें पालन करणारा; परमेश्वर. ॰प्रयत्न-अचाट प्रयत्न; शक्य ते सर्व प्रयत्न. ॰प्रामाण्य-न. सर्व जगाला प्रमाण असें; सर्व जगास योग्य वाटणारें तें. 'जे विश्वप्रामाण्याची मुदी । आणि तुझ्या हातें असे सुबुद्धी ।' -ज्ञा १६.४६८. ॰बाहु-पु. ज्यांचे हात सर्वत्र आहेत असा; परमेश्वर. -ज्ञा १३.८७४. ॰बीज-न. सर्वसृष्टीचें मूळ; आद्यकरण; परमेश्वर. ॰ब्राह्मण-पु. सुवर्णकार; देवशिल्प करणारी जात. ॰भेषज-न. सार्वत्रिक औषध; सुंठ. 'मध आणि विश्वभेषज हे दारूंत मिसळून द्यावेत' -अश्वप २.१३४. ॰मंगल-न. सर्व सृष्टीचें कल्याण, सुख, सुदैव, शुभ. -वि. सर्वजगाचें कल्याण करणारा; शुभदायक. ॰मतिचालक- पु. सर्व जगाच्या मनांत प्रेरणा करणारा; सर्वाच्या बुद्धीस चालना देणारा. ॰मूर्धा-पु. ज्याचें डोकें सर्वत्र आहे असा; परमेश्वर. -ज्ञा १३.८७८. ॰मोहिनी-स्त्री. सर्व जगास भुरळ पाडणारी, भूल- विणारी, मोहून टाकणारी. -ज्ञा १.२१. ॰रचना-स्त्री. सृष्टीची व्यवस्था; घटना. -ज्ञा २.९५. ॰रूप-वि. १ सर्व सृष्टीमधील वस्तूंची रूपें धारण करणारा; सर्व सृष्टीमधील वस्तूंच्या रूपांत असणारा; ब्रह्माचें उपपद. २ व्यापक; महत्त्वाचा. 'म्हणतां जाय पाप । प्रश्न असे विश्वरूप ।' ॰विद्या- लय-न. विद्यापीठ; अनेक विद्यांचें अध्ययन-अध्यापनादि कार्य करणारी संस्था. (इं.) युनिव्हर्सिटी. ॰व्यापक-व्यापी-वि. सर्वव्यापी; सर्वत्र भरून राहिलेलें, सर्व वस्तुमात्रांशीं संबद्ध. ॰व्याप्ति-स्त्री. सर्व सृष्टीमध्यें भरून राहणें. ॰संस्था-स्त्री. (ज्यो.) सूर्य, चंद्र, ग्रह, तारें व इतर आकाशस्थ ज्योती ज्या आकाशाच्या प्रदेशांत कार्य करितात तो प्रदेश. (इं.) युनिव्हर्स. ॰साक्षी-वि. सर्व सृष्टीस पाहणारा. ॰सृट्-पु. सृष्टिकर्ता; जग निर्माण करणारा; ब्रह्मा. विश्वस्तः-क्रिवि. सर्व ठिकाणीं; सर्वत्र. विश्वतश्चुक्षु-पु. ज्याचे सर्वत्र डोळे आहेत असा, ज्याला सर्व दिसतें असा; परमेश्वर. -ज्ञा १३.८७. विश्वतोभय-पु. सर्व बाजूंनी भय उत्पन्न करणारा; परमेश्वर. -एभा २.१०१. विश्वतो- मुख-पु. सर्व बाजूंनीं ज्यास मुखें आहेत असा; परमेश्वर. -ज्ञा ११.२३३. विश्वतोमुखीं- क्रिवि. सर्वांचें तोंडीं; सर्वतोमुखीं; ज्याच्या त्याच्या तोंडीं; सर्वांच्या बोलण्यांत. विश्वाचा जिव्हाळा-पु. १ सृष्टीचाप्राण, जीव. २ (संकेतानें) शिव. विश्वात्मक-वि. सृष्टिस्वरूपी. -ज्ञा १५.५९५. विश्वात्मा-पु. सृष्टीचा प्राण; जगदात्मा; सर्वव्यापी तत्त्व; ब्रह्म. विश्वांप्रि-पु. ज्याचे सर्वत्र पाय आहेत असा. -ज्ञा १३.८७४. विश्वानुसार- वि. सृष्टीतींल पदार्थांप्रमाणें. -ज्ञा १६.१७३. विश्वाभिराम- वि. जगाचा आवडता; जगत्प्रिय; परमेश्वर. विश्वाभिमान-पु. देह हा मी व सर्व सृष्टि माझा भोग्य विषय होय असा अभिमान. विश्वेश-पु. सृष्टिचा स्वामी, मालक; परमेश्वर. -ज्ञा १५.४०. विश्वाशराव-पु. सर्व सृष्टिचा प्रभु; मालक; परमेश्वर. -ज्ञा १८. १८०१. विश्वेश्वर-पु. १ सर्व सृष्टीचा प्रभु; परमेश्वर. २ काशीक्षेत्रांतील मुख्य देवता. विश्वोदयपंथ-पु. माया. विश्वो- द्धार-पु. सर्व सृष्टीचें रक्षण, तारण, उद्धरण. २ सृष्टितारक, रक्षक परमेश्वर.

दाते शब्दकोश

मोह

पु. १ मूर्च्छा; बेशुद्धि; चित्तभ्रम; भुरळ; भारणी; मोहन; भुलावण; भूल. २ प्रेम; माया, दया, कींव, सहानुभूति इ॰ ना चेतविणाऱ्या विषयांचा क्षुब्ध लोभ; मोहन. 'द्रोणाला दुःशासन कथितां दे भीष्म हानि मोहातें ।' -मोभीष्म ११.१३२.३ सदसद्- विवेकबुद्धीचा, जाणिवेचा लोप; विस्मरण; घोटाळा; मतिभ्रम; भुलवण. 'निजदोषें व्यसनातें पावुनि मोहीं निमग्न नसती कीं ।' -मोकर्ण १.६.४. अज्ञान; मूर्खपणा; आत्मज्ञानाचा अभाव असल्या मुळें जगांतील सर्व विषय, सर्व दृश्य जगत खरें आहे असा भास होऊन त्याचा उपभोग व वैषयिक सुख घेण्याकडे प्रवृत्ति होणें. ५ आवड; शोक; प्रीती; प्रेमाचें वेड; प्रेमाचा अतिरेक. 'परिभूप- पुत्र मोहें केला पहिल्या परीस ही अंध ।' -मोरोपंत. ६ चूक. [सं. मुह्] मोहक-वि. १ भुरळ पाडणारें; भ्रम उत्पन्न करणारें; गुंतविणारें; गुंगविणारे. २ आकर्षक; रमविणारें; चित्त हरण कर- णारें. [सं.] ॰पाश-पु. मोहरूप जो पाश तो; संसाराचें जाळें; भ्रामक विषयांचें बंधन. मोहजाल पहा. ॰यंत्र-न. नळा (शोभेच्या दारूचा); फुलबाजी. 'मोहयंत्री सुमनमाला । अग्निपुष्पें भासती डोळा । फुलें म्हणती अबळा । पाहता डोळां ते राखा ।' -एरुस्व १५.११८. मोहा, मोहाचा-वि. मोहक किंवा उत्कृष्ट गुणाचा-(एका प्रका- रच्या नारळाबद्दल किंवा सुपारीबद्दल उपयोग). मोहाचा नारळ नारळी-माड-सुपारी-पुस्त्री. ज्यांची गोडी इतर नारळ, सुपा- रीपेक्षां अधिक असते तो नारळ, सुपारी इ॰. या नारळाचें खोंबरे गोड असून तें खाल्ल्यावर चोथा रहात नाहीं; सुपारीहि गोड असतें. -कृषि ७०३. मोहाथिणें-क्रि. (काव्य) मोहनी पाडणें; भुरळ किंवा भुलवन पडणें; भुलून जाणें; मोहीत होणें. 'अवश्य म्हणोनि तीर्थेंश्वरी मोहाथिली अनुवादे ।' मोहाळणें-क्रि. मोह पावणें. ॰मोहित-वि. मोह पावलेला; भुललेला; भुरळ पडलेला; मोहानें व्याप्त असा; लुब्ध. मोहरात्रि-स्त्री. श्रावण वद्य अष्टमी. (या रात्रीं कृष्णानें कंसदूतास मोह पाडला यावरून). मोह- जाल-जाळ-न. मायेच्या योगानें संसारांत उत्पन्न होणारा मोहाचा पाश; संसाराचें, जगांतील पसाऱ्याचें जाळें; कुटुंब, इष्ट- मित्र, मालमत्ता व इतर भ्रामक विषय यांची भूल, भुरळ. 'तां घेतले ये मज मोहजाळीं ।' -सारुह १.१९. मोहणें-उक्रि. भुलणें; भुलावणें; वश करून घेणें; वश होणें; मोह पडेल असें करणें; भारणें; व्यामोह उत्पन्न होणें, करणें; भुलविणें; भुलणें; चित्त भ्रमणें, भ्रम- विणें. 'मन मोहिलें नंदाच्या नंदनें ।' मोहन-वि. १ मोहविणारें; आकर्षक. २ भुलविणारें; भूल पाडणारें; भ्रामक. 'एक म्हणे कुब्जेनें लाविला चंदन । त्यांत कांहीं घातलें मोहन । तरीच भुलला जगज्जीवन । कौटिल्य पूर्ण केलें तिनें ।' -ह २१.१७७. -न. १ (वैद्यक) गुंगी आणणें; भूल देणें; बेहोष पाडणें. -ज्ञा १३.९९५. २ भुरळ मूर्च्छा; भ्रम. गुंगी, निद्रा आणणारें औषध. मोहन- भूत-न. एक प्रकारचें भूत, पिशाच. मोहनमाळ-माला-स्त्री. सोन्याच्या मण्यांची गळ्यांत घालावयाची एक विशिष्ट माळ. मोहनास्त्र-न. एखाद्या इसमावर मोहनी टाकण्याचें अस्त्र; जें शत्रूवर सोंडलें असतां त्याला मूर्च्छा येते असें एक अस्त्र. मोह (हि)नी-स्त्री. १ भूल; भुलावण; मोहन. २ मोह घालण्याचीं कृत्यें; वश करण्याचीं किंवा भूल घालण्याचीं, भुलविण्याचीं कृत्यें (क्रि॰ घालणें). एखाद्यास भुलविण्याकरितां उपयोगांत आणण्याचे मंत्र. ३ विष्णूनें अमृतमंथनाच्या वेळीं घेतलेले सुंदर स्त्रीचें रूप. [सं. मुह् = बेशुद्ध होणें] मोहिनी-स्त्री. १ मोहन; प्रलोभन; भुलवन; भुरळणें; चित्तभ्रम; बुद्धिभ्रम; मोह करणारी. २ समुद्र- मंथनप्रसंगीं भगवंतानीं जें मोहिनीचें रूप घेतलें होतें तें; भुरळ पाडणारी. 'कथा भुवन मोहिनी अशि न मोहिनी होय ती ।' -केका १०३. [सं. मुह्] मोहिरें-न. (महानु.) मोहक वस्तु; मोहविणारें 'तो दाउनि माया वेषाचें मोहिरें । जेथ चरित्रें करी' -ऋ ४२

दाते शब्दकोश

कळा

स्त्री. १ कला या शब्दाचा सर्व अर्थी योजतात. 'कीं हे नाना कळांचे जीवन ।' -दा १.७.२. 'असो सकळ कळा प्रवीण । विद्यमात्र परीपूर्ण ।' -दा. २ किरण; प्रकाश. 'जैसें शारदीयेचे चंद्रकळे- । माजीं अमृत कण कोंवळे ।' -ज्ञा १.५६. ३ तेज. 'तैसें पिंडाचेनि आकारें । तें कळाचिकां अवतरे ।' -ज्ञा ६.२५०. 'जनविजन समान कळा । तेचि आपाद वन- माळा ।' -एरुस्व १.४१. ४ चंद्राचा १६ वा अंश; त्यावरून १६ ही संख्या. 'चंद्रमा कळीं धाला । न दिसे कोणे आंगीं वोसावला ।' -ज्ञा १५.३०३. 'चंद्रासि लागति कळा उपराग येतो ।' -र २. ५ मनस्थिति. 'काय भाव एक निवडूं निराळा । जाणसी तूं कळा अंतरींची ।' -तुगा १६१३. ६ देखावा; दशा. 'दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयांचा सोहळा ।' -तुगा २८३५. ७ युक्ति. 'कळा तुजपाशीं आमुचें जिवन । उचित करून देई आम्हां ।' -तुगा ९. ८ चातुर्य; करणी. 'पाव्यामाजीं रागज्ञान । केल्या अति मधुर गायन । तो पाव्याचा नव्हे गुण । कळा जाण गात्याची ।' -एभा १०.२६७. ज्याची कळा तोच जाण ।' -ऐपो १४४. ९ ज्ञान. 'कस्तूरीचा वास घेईल काऊळा । तरिच ती कळा कळे तया ।' -ब ९८. १० हालचाल; चलनवलन. 'शरिरांतुनिया प्राण गळाल्या लोपति सर्व कळा ।' -रत्न ४.३. ११ प्रकार. 'जेवीं माउली देखोनि डोळा । बालक नाचे नाना कळा ।' -एभा ३.५९९. [सं. कला] ॰जाणें -वि. (व.) अवनति होणें; दुर्मुखलेलें दिसणें. 'त्याच्या अठरा कारखान्याच्या गेल्या कळा ।-ऐपो १४२. ॰ईत-वि. कुशल; कलावान (मनुष्य). ॰कळी-स्त्री. मर्म; कौशल्य. 'तेआं जुंझाची कळाकळी । ते देशांचि वेगळी ।' -शिशु ८७९. ॰कांती -स्त्री. (शरीराची, चेहर्‍याची, देहाची) चमक; सतेजता; तेज; टवटवी. 'परम मळीण दिसती । कळाकांती नसे कांहीं ।' ॰कुशलता- कौशल्य-स्त्रीन. कसब व चातुर्य; नैपुण्य व करामत; शहाणपणा व बुद्धि. ॰कुसरी-स्त्री. १ (कुसरी हा शब्द लुप्त झाला असून बहुधा कला शब्दाबरोबर अधिक जोर येण्याकरितां योजितात) चातुर्याची कल्पना; युक्ति; करामत; कुशलतेची रचना; शहाणपणाची योजना. २ कौशल्य; कसब; कारागिरी (गाणें, चित्रकला इ॰ तील). 'पतिच्या संगावांचूनि सर्व स्त्रीच्या वृथा कळाकुसरी ।' -मो. ३ बारीक नक्षीकाम (जीगचें काम, भरतकाम इ॰). [अनेकवचन, कळा = कुशलता + कुसरी] ॰खाऊ-घाण-वि. १ एखाद्याच्या मोठेपणास, अब्रूस काळिमा आणणारा. २ जो दुसर्‍याला मूर्ख बनवितो, घोटाळ्यांत, गोत्यांत आणतो तो. 'घरीं कळाखाऊ अबळा नसावी अशी । अवघा वेळ रागामधीं नागीण धुसधुशी ।' -पला ८०. २ (व्यापक.) शोभा येण्यासाठीं, सौंदर्यासाठीं कोणतीहि गोष्ट केली असतां तिचा ज्यावर परिणाम होत नाहीं अशी व्यक्ति (विशेषतः स्त्रिया व मुलें); घाणेरडा; कळाहीन; मळकट; घाण. 'कळाखाऊ कपडे घालून जर गेलात तर काम कसें होईल? ॰तीन -स्त्री. (व.) कळावंतीण. ॰धर -वि. कलावान; पंडित; विद्वान्. 'जितुके कळाधर पृथ्वीवरी । जे जे आले शाहू नगरीं ।' -निमा (आत्मचरित्र) १.१०६. ॰निधि -पु. १ चंद्र. २ ज्याच्यापाशीं पुष्कळ कला आहेत असा. ॰न्यास -वि. अनेक कलाकौशल्यानें बनविलेलें; नक्षीदार. 'पांचा आंगोळियां विन्यास । कळान्यास मुद्रिका ।' -एरुस्व. १५.५३. ॰पात्र -वि. कळावान; कलावंत. 'विद्यापात्रें कळापात्रें । विशेष गुणांचीं सत्पात्रें ।' -दा १.८.२३. -न. कलावंतीण. 'तों सभेसी आलीं कळापात्रें । श्रीची लीला वर्णिती विचित्रें । त्या गौरविल्या राजीव- नेत्रें । वस्त्रें भूषणें देवोनियां ।' -ह २९.१५१. ॰वंत-वि. कलावंत पहा. ॰वती-वंती-वंतीण-स्त्री. कलावंतीण, कळवंतीण पहा. 'कळावती ते करी दरिद्र । कामिका पाश घालूनि ।' -दावि ४५१. ॰विद-वि. कलावान; कुशल. 'तें कळाविदीं आइकावी । अवधान देओनी ।' -शिशु ६५१. ॰विदपण -न. कुशलता. 'एथ कळाविदपण कळा ।' -ज्ञा २.३७. ॰सूत्र-न. कळसूत्र पहा. ॰सूत्राचा खेळ -पु. कळसूत्री बाहुल्यांचा खेळ. ॰सूत्राची बाहुली -स्त्रि. विशिष्ट प्रकारच्या दोर्‍यांनीं हालाणारी बाहुली. ॰सूत्री-वि. कळसूत्री पहा

दाते शब्दकोश

साज

पु. १ लागणारें सामान; साहित्य; साधनें; सरंजाम; कार्याला लागणार्‍या सर्व गोष्टी (समुच्चयार्थीं). २ नाचणारी, गाणारणी, पोवाडेवाले, तमाशेवाले, जादूगार इ॰ मंडळींना लाग- णारीं हत्यारें पातारें, साहित्य; उपकरणीं. 'साज सारंगी देत आणून । म्हणे नवरसे कुशलत्वपण । कळा दावी कुशळ कोणती ।' -नव १९.३८. ३ गाण्यानाचण्याच्या वेळीं पायांत घुंगरांचा चाळ बांधतात तो. ४ पोषाख; जामानिमा; शृंगार (कलावंतीण, नट, शिपाई इ॰ चा). ५ सज्ज. तयार होणें; पोषाख घालणें. ६ (सामा.) नटण्यासजण्यासाठीं लागणारा पोषाख, वस्त्रें, इ॰ ७ थाटमाट; शृंगारमंडण; नटणें. 'बहु दिवसीं पति येतां करि बहु मिथिला पतिव्रता साज ।' -मोकृष्ण ८७.१५. ८ पखवाज. ९ गळ्यांतील एक दागिना. [सं. सज्ज; फा. साझ्] ॰करी- पु. वाजंत्री, गवई, तमासगीर, गोंधळीं इ॰ च्या ताफ्यांतील इसम. ॰संजोगीवि. साज, साजकरी. 'साजसंजोगी थोर प्रवीण ।' -दावि ३८१. ॰सरंजाम-पु. एखाद्या कार्याला लागणारें साहित्य, सामानसुमान. ॰सामान-न. साधनें; साहित्य. साज अर्थ १ पहा. 'साज सामान कूल लुटून नेलें.' -ऐच २४. साजणें-उक्रि. १ शोभणें; योग्य दिसणें. 'ब्रह्मगोळकांचिया माळा । साजती जियेच्या गळां ।' -शिशु ८७. २ चांगलें, योग्य समावणें. [सं. सज्ज] म्ह॰ साजेल ते बोलावें आणि पचेल तें खावें. साजरा, साजिरा-वि. १ सुशोभित; शोभिवंत; अलंकृत -एभा १८. 'तरी तो मदन तूं तेंच वरी । तेणें तूं साजिरी । जगामाजी ।' -कथा १.३.१४०. २ सुंदर; गोजिरवाणा; छान. 'कंठीं हार साजिरा ।' -भूपाळी गणपतीची म्ह॰ १ पुणतांब्याच्या म्हशी आणि टोणगांव साजरा. २ फुटका डोळा काजळानें साजरा. साज(जि)रा गोजरा-वि. देखणा; सुंदर; 'पद्मावीण तळें, निरक्षर मुखीं जो साजिरा गोजिरा ।' -वामन सफुटश्लोक (नव- नीत पृ. १३३). साज(जि)रेपण-न. सौंदर्य; शोभा. 'ऐक्याचें मुदल न ढळे । आणि साजरेपणाचा लाभ मिळे ।' -अमृ १.५९. साजविणें-क्रि. शोभविणें. 'उद्धरुनि पतित राम- प्रभु-कीर्तिहुनी स्वकीर्ति साजविली ।' -मो स्फुट आर्या (नव- नीत पृ. २५५). साजावणें-क्रि. शोभिवंत दिसणें; खुलणें. 'परि तो पूर्णमेसीच पूर्णत्वासी ये । आणि कळंके साजवला होय ।' -स्वानु ६.१.३२.

दाते शब्दकोश

मृग

पु. १ हरिण; काळवीट. २ सत्तावीस नक्षत्रांपैकीं पांचवें नक्षत्र. ३ मृग नक्षत्राचा पाऊस. ४ सामान्यपणें चतुष्पाद प्राणी; पशु; जनावर. [सं. मृग् = शोधणें] म्ह॰ मृगाचे आधीं पेरावें बोंबेचें आधीं पळावें. सामाशब्द- ॰छाल-छाला-पु. मृगा- जिन; हरिणाचें कातडें. 'शेले शाली शाला दुशाल । स्वीकारा सांडून मृगछाल ।' -नव १७.१३७. ॰जल-ळ-न. अति- उन्हानें जमीन किंवा वाळवंट सडकून तापलें म्हणजे त्या लग- तच्या हवेचे थरहि तापून हलके होतात. ते वर जाऊं लागले म्हणजे हवा पाण्याच्या लाटांप्रमाणें हलूं लागते व ते थर पाण्या- प्रमाणें भासतात अशा रीतीनें होणारा पाण्याचा भास. ॰जल- स्नान-न. अशक्य गोष्ट; खपुष्प. ॰तृषा-तृष्णिका-स्त्री. मृग जळ पिऊन शांत होणारी तृष्णा; अशक्य गोष्ट. ॰नयना- नैना-नेत्री-लोचना-स्त्री. हरिणाच्या डोळ्यांसारखें डोळे अस- लेली स्त्री; सुंदर स्त्री. ॰नाभि-मद-पु. कस्तुरी. 'मृगनामीं रेखिला टिळा ।' -तुगा ४०६९. ॰नीर-न. मृगअळ. ॰पति-राज- वर, मृगेंद्र-पु. (काव्य) पशूंचा राजा; सिंह. ॰बहार-बार- पु. आगोटीच्या सुमारास किंवा मृगनक्षत्राचे वेळीं येणारा बार; पहिला बहर; हत्तीबार, आंबेबार पहा. ॰मद-पु. मृगनाभि पहा. ॰लांच्छन, मृगांक-पु. १ मृगाच्या आकाराचा डाग(चंद्रावरील). २ (काव्य) चंद्र; मृगाची आकृति धारण करणारा. 'कृपेने अंकीं धरिला हरिण । मृगलांछन चंद्रमा ।' -मुआदि ३४.१२. ॰शा- वाक्षी-स्त्री. हरिणाच्या पिलाच्या डोळ्यांसारखे डोळे असलेली, चंचल डोळ्यांची स्त्री; सुंदर डोळ्यांची स्त्री. 'मृगशावाक्षी गुण निधान । उपमा नाहीं स्वरूपातें ।' -शिली १४.१४९. [मृग + शाव = पिलूं + अक्षन् = डोळा] ॰शि(शी)तळाई-शि(शी)तळी- स्त्री. मृगाच्या पावसानें हवेंत आलेला थंडावा. ॰शिर-शीर्ष- न. मृग नक्षत्र. ॰शीर्षक(हस्त)-पु. (नृत्य) मूठ मिटून नंतर आंगठा व करंगळी उभीं करणें. ॰साल-न. मृगनक्षत्राच्या आरंभा- पासून सुरू होणारें वर्ष. या खेरीज दुसरें पाडव्याचें साल, दिवा- ळीचें साल व सुरमन पहा. ॰सेवडी-स्त्री. कृष्णाजिन; हरिणाचें कातडें. 'वरी चोखट मृगसेवडी । माजी धूतवस्त्राची घडी ।' -ज्ञा ६.१८२. मृगांक-पु. चंद्र, मृगलांच्छान पहा. 'उदैला आनंद मृगांकु । मोहा अंधकारीं ।' -भाए २. [मृग + अंक = चिन्ह] मृगाचा किडा-पु. मृगनक्षत्रांत किंवा त्या सुमारास आढळणारा एक तांबडा किडा. मृगांबु-न. मृगजळ. 'ब्रह्मगिरीहूनिं न निघे । आणि समुद्रींही कीर न रिगे । तरी माजीं दिसे वाउगें । मृगांबु जैसें ।' -ज्ञा १५.२३८. [मृग + अम्बु = पाणी] मृगाब्धि, मृगांभ-न. मृगजळ. मृगासन-न. १ बसावयाचें हरिणाचें कातडें २ देवडीच्या दोन बाजूंस असणाऱ्या ओट्यांपैकीं प्रत्येक ओटा. ३ रांगोळीची एक आकृति. ही आठ आठ ठिपक्यांच्या आठ समांतर ओळी व बाजूनें दोनदोन ठिपके देऊन चौपट साधून काढतात. -रंगवल्लिका १.११. मृगी-स्त्री. हरिणी. मृगेंद्र, मृगेश-पु. (काव्य) सिंह. [मृग + इंद्र, ईश] मृगया-स्त्री. शिकार; पारध. [सं. मृग् = शोधणें]

दाते शब्दकोश

लहान

वि. १ लघु; सान; अल्प (वय, किंमत, सामर्थ्य इ॰नीं). २ आखूड; छोटा (आकार, प्रमाण, इ॰ नीं). ३ अल्प; थोडा. [सं. लघु, प्रा. लहु] म्ह॰ (व.) लहानशी बुटली सांज- सकाळ उठली = घरीं नवरा बायको दोघेच असल्यामुळें ज्यास फारसा खर्च नसतो अशास म्हण्तात. (वाप्र.) लहान तोंडीं मोठा घास घेंणें-आपला लहान दर्जा न ओळखतां एखादी मोठी गोष्ट करणें; आपल्याकडून होण्याजोगों नसलेलें काम करावयास सिद्ध होणें. सामाशब्द- ॰केळी-स्त्री. एक वनस्पति. देवकेळी पहा. ॰खुरी-वि. १ लहान पायाची (गाय, बैल इ॰) २ लहान बांध्याची; ठेंगणीठुसकी. 'लहानखुऱ्या ठेंगण्या देखण्या त्या कां होईना त्या राजी ।' -सला ४३. [लहान + खूर] ॰गा-वि. १ धाकटा; अधिक बुटका-आखूड-लहान- तरुण; (तारतम्यानें) कमी (उंची, लांबी, वय इ॰ कांत). २ छोटा; बुटका; आंखूड; लहान. (तारतम्याशिवाय) [लहान + गा प्रत्यय] ॰झारडी-पु. (कों.) एक मासा. ॰थोर- मोठा-वि. लहान आणि मोठा; प्रत्येक आकाराचा, वयाचा व जातीचा; एकंदर, ॰पण-पणा-नपु. १ लघुता; हलकेपणा. 'लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।' २ बाळपण. [लहान] ॰बापा-पु. (खा.) बापापेक्षां लहान असणारा चुलता. [तुल॰ कानडींत चिक्क अप्पा, दोड्ढ अप्पा (लहान बाप, मोठा बाप) असे शब्द धाकट्या व मोठ्या चुलत्याला वापरतात.] ॰लहू-लोहू-लव-वि. लहुलहान पहा. ॰वी-स्त्री. १ (वयाचा, आकाराचा) लहानपणा. २ (ल.) हलकेपणा; लघुत्व; थोरवी, मान्यता, गौरव यांचा अभाव. [लहान] ॰वीथोरवी-स्त्री. तुलना करतांना दाखविलें जाणारें दोन माणसांतील (मुख्यत्वें वयाचें) अंतर; दोन वस्तूंमधील तुलना- त्मक अंतर; असमता. 'स्त्री-पुरुषाची दोहों वर्षांची लहानवी- थोरवी असावी' ॰सर-वि. लहानसा; कांहींसा लहान. 'हें घर लहानसरच आहे पण टुमदार आहे.' [लहान] ॰सहान-वि. बारीकसारीक; लहान, हलका इ॰ (व्यापक व सामान्य अर्थीं). [लहान द्वि. किंवा लहान + साना] लहाना-वि. लघु, लहान पहा. [लहान] ल(ला)हानाव(ळ)णें-अक्रि. १ कमी, अधिक लहान, अधिक अशक्त इ॰ होत जाणें; घटणें. 'पाऊस लहाना- वला म्हणजे मग जा.' २ क्षीणक्षीण, बारीकबारीक होणें (विझणारा दिवा). ३ लहान प्रमाणांत येणें; संकुचित होणें (जवळचे भाग सुजले असतां, डोळा). [लहान] लहानाळ-वि. (राजा.) सामान्य प्रमाणापेक्षां लहान बांध्याचा (मनुष्य, पशु इ॰). [लहान] लहानाळणें-सक्रि. अधिक लहान-आखूड-अशक्त-मंद-कमती-करणें (शब्दांशः व ल.) 'आपण भ्रमें लाहाना- ळला ।' -दा ९. ३४. [लहान]

दाते शब्दकोश

कान

पु. १ श्रोत्र; कर्णेद्रिय; श्रवणेंद्रिय; शरीराच्या ज्या अवयवामुळें आपणास ऐकूं येतें तो अवयव. २ (ल.) कढई, मोदकपात्र किंवा या सारख्या भांडयाच्या कड्या; सामान्यतः कानाच्या आका- राची वस्तु. ३ दागिने घालण्यासाठीं कानाला पाडलेलें भोंक. 'माझा भिकबाळीचा कान बुजला आहे.' ४ बंदुकीचा काना किंवा रंजक; दारू पेटविण्याचें छिद्र; बत्ती लावावयाची जागा. [सं. कर्ण] (वाप्र.) ॰उघडणें-केलेल्या मूर्खपणाचीं कृत्यें समजणें (स्वतःची व दुसर्‍याचीं); डोळे उघडणें; एखादी गोष्ट स्पष्ट करून दाखविणें; समजूत पटविणें; ॰उघडून सांगणें- बजावून सांगणें; स्पष्ट सूचना देणें. ॰उपटणें, धरणें, पिळणें, पिरगळणें-शिक्षा करण्यासाठीं कान धरून पिळविटणें, ओढणें; शिस्त लावणें. 'त्याला जिंकून जिवंत पकडून त्याचे कान उपटल्या- शिवाय आम्ही राहणार नाहीं.' -बाय २.२. ॰कापणें-कापून हातावर देणें- वरचढ करणें; कडी करणें; वर ताण करणें; मात करणें; फसविणें. 'दुकानदारानें माझा चांगला कान कापला' ॰किटणें-एखादी गोष्ट पुन्हां पुन्हां ऐकविण्यामुळे वीट, कंटाळा येणें. ॰खडा-डी लावणें-सूचना देणें; मनावर ठसेल असें सांगणें. ॰खडी लावून घेणें-स्वतःला शिक्षा लावून घेऊन चुकी सुधारणें. ॰झाडणें- १ स्पष्ट नाकारणें; ऐकून न घेणें; कानावर येऊं न देणें; निषेध करणें. 'स्वर्गा जाणें हें सांडी । भवविषयीं कान झाडी ।' -ज्ञा १३.६१७. २ उपदेश झिडकारणें, न मानणें. ॰टवकारून, पसरून, ऐकणें-लक्ष देणें; पूर्ण लक्ष देऊन ऐकणें. 'भाषण करणार म्हटल्याबरोबर त्यांनीं कान टवकारून पहावें.' के ३१.५.३०. ॰टोचणें-१ कानाला भोंक पाडणें. २ (ल.) फूस देणें; चिथावणें; चढविणें. ३ कानउघाडणी करणें; झाडणें; ताशेरा झाडणें; खरडपट्टी काढणें. (सोनारानें) कान टोचणें-तिर्‍हाइतानें कानउघाडणी करणें. ॰देणें-लक्ष देणें. 'श्रीरामराजा देतेस कान ।' -दावि ७८०. ॰धरणें-शासन करणें. ॰धरून-पिळून घेणें-वादाची वस्तु बळजबरीनें कब- ज्यांत, ताब्यांत घेणें. ॰निवणें-थंड होणें-बरें वाटणें; आव- डती किंवा जिच्याबद्दल उत्कंठा लागलेली अशी गोष्ट ऐकून संतोष होणें ॰पसरून ऐकणें-पूर्ण लक्ष देऊन ऐकणें (पण कृति न करणें). ॰पाडणें-१ धैर्य सुटणें; निराश होणें. २ आपल्या तांठ्याला आळा बसलासें वाटणें; गरीब बनणें; माघार घेणें. ३ ऐकूं येत नाहीं असें सोंग करणें; काणा डोळा करणें. 'कान पाडुनि बसे धरणीसी ।' -किंगवि २.२०. 'मी ह्याविषयीं कान पाड- णार नाही.' -बाळ २.१५. ॰पिळून घेणें-स्वतःचा मूर्खपणा कळून आल्यामुळें व त्याचे दुष्परिणाम भोगल्यानंतर पुन्हां तसें न वागण्याबद्दल दृढ निश्चय करणें. ॰पूर ओस करून बसणें- बहिर्‍याचें सोंग घेणें; ऐकूं येत नाहीं असें भासविणें. ॰पूर ओस पडणें-बहिरा होणें. ॰फुंकणें-१ कानांत मंत्र सांगणें; उपदेश देणें. २ चुगली करणें; मनांत भरविणें; चाहाडी, लावालावी करणें. ॰फुटणें-बहिरा होणें (पूर्ण, अर्धवट). ॰भरणें- भारणें-चहाड्या करणें; कानांत सांगणें; चिथविणें. -॰येणें- ऐकण्याची शक्ति येणें. ॰लांबणें-१ वयानें जसेजसें मोठें होते जाईल तसतशी अक्कल कमी होत जाणें (लहान मुलाविषयीं). २ (गाढवाचे कान लांब असतात यावरून) गाढव होणें. ॰होणें- लक्ष देणे; सावध होणें; सावधपणानें वागणें. कानाआड- मागें-वरून- ऊ न जाणें-उपदेश, शिक्षा, ताकीद वगैरेचा एखाद्यावर उपयोग न होणें. -चा चावा घेणें-खोट्या नाट्या गोष्टी सांगून दुसर्‍याचें मन कलुषित करणें. -चे कानवले होणें-कान वाकडें, (कानोल्याप्रमाणें) पिळवटलेले होणें. -चे किडे झाडणें-१ परनिंदा श्रवणदोषापासून मुक्त करणें; किल्मिष घालविणें; मनांतील गैरसमज, अढी दूर करणें. २ (कानांत किड्यांचा प्रवेश झाला आहे अशा समजुतीनें) बरोबर समजूत पाडणें; हितवाद सांगणें; चांगली खरडपट्टी काढणें. -त खुंट्या मारणें-१ बहिरें होणें. २ पूर्वींचा एक शिक्षेचा प्रकार, 'कानीं खुंट्या आदळिती । अपानीं मेखा मारिती ।' -दा ३.७.७३. -त जपणें-कानांत पुटपुटणें; गुप्त रीतीनें बोलणें, सुचविणें; कानमंत्र देणें; चहाडी करणें. -त तुळशी घालणें-घालून बसणें-१ ऐकूं येत नाहीं असें भासविणें, सोंग करणें. २ माया- पाश झुगारून दिल्याचा आविर्भाव आणणें; उपरति झाल्याचें दाख- विणें; विरक्तीचें सोंग आणणें. -त तेल घालून निजणें-अति- शय दुर्लक्ष करणें; पूर्णपणें उदासीन असणें. -त भरणें-चुगल्या करणें; एखाद्याचें वाईट करण्याविषयीं भरी भरणें. -त भेंड घालणें-(व.) बहिरेपणाचें सोंग घेणें; न ऐंकणे -त वारें भरणें-उच्छृंखल होणें; एखद्या गोष्टीचा पूर्ण विचार न करतां हुरळून जाणें. 'ही गरीब गाय कानांत वारें भरल्यामुळें उधळली आणि सैरवैरा धांवून अखेर चिखलांत रुतली' -सु ६१. (या) कानानें ऐकणें-त्या कानानें-सोडणें-मनांत मुळींच न ठेवणें, राखणें. -पाठीमागें टाकणें-दुर्लक्ष करणें 'फुकटच्या उपदेशा- प्रमाणें त्यांच्या निरोप कानापाठीमागें टाकणार नसाल तर सांगतों' -सु १०५. -बाहेर-वेगळा करणें-दुर्लक्ष करणें; उदासीन राहणें. -मध्यें-त- मंत्र सांगणे, फुकणें-चिथविणें; चेताविणें. -मागें टाकणें १ उपदेश शिकवण, सूचना इ॰ कडे लक्ष न देणें. २ दुर्लक्ष करणें. 'शत्रूचा समाचार अगोदर घेतला पाहिजे. घरचीं भांडणें तूर्त कानामागें टाकलीं पाहिजेत.' -बाजीराव. -ला खडा लावणें-मूर्खपणाचें किंवा दुष्टपणाचें काम पुन्हां न करण्या- विषयीं निश्चय करणें (कानाच्या पाळीच्या मागें खडा लावून दाबण्याचा पूर्वीं शिक्षेचा एक प्रकार होता). -वर (उजव्या डाव्या) पडणें-निजणें-लेटणें एका कुशीकर (डाव्या-उजव्या) निजणें. -वर मान ठेवणें-आळशीपणानें किंवा निष्काळजीपणानें बसणें. -वर येणें-ऐकणें; श्रुत होणें; 'येणार पुढें पुष्कळ आलें आतांचि काय काना तें ।' -भोभीष्म ७.६. -वर हात ठेवणें-त बोटें घालणें,कान-झांकणें-१ एखादी गोष्ट मुळींच माहीत नाहीं अगर तींत आपला बिलकुल संबंध नाहीं असें दाखविणें; नाकारणें; नाकबूल जाणें. २ एखादी मनाविरुद्ध गोष्ट ऐकवत नाहीं म्हणून कानांत बोटें घालणें. 'तो हा वधिला केलें कर्म अमित साधु घातसें मोठें । खोटें हें म्हणतिल शिव शिव कर्णी घालतील बुध बोटें. ।' -मोस्त्री ४.३६. -वरून जाणें १ कान चाटून जाणें; २ (ल.) थोडासा तोटा होणें. ३ ऐकलेलें असणें. -शीं कान लावणें-गुप्त रीतीनें मिळून मसलत, खलबत करणें. -शीं लागणें, कानीं लागणें-कानांत सांगणे; हळूच बोलणें; गुप्त रीतीनें सुचविणें -स कोन न कळूं-न लागूं देणें-अतिशय गुप्तपणा राखणें. 'आणि झाल्यावर सुद्धां कानास कोन लागूं नये ही तर खबर- दारी घेतलीच पाहिजे.' -सु १०.८. -स दट्टे-दडे बसणें- बहिरा होणें. कानीं कपाळीं रडणें-ओरडणें-सदोदित, नेहमीं बुद्धिवाद करीत असणें; नेहमीं, पुन्हां पुन्हा सांगणें. -नीं कोचीं बसणें-लागणें-(चोरून ऐकण्यासाठीं) कानाकोपर्‍यांत, अड- चणींत बसणें, कानोसा घेणें. -नीं मनीं नसणें-एखाद्याची कल्पना नसणें; कधींच न ऐकलेलें, मनांत नसलेलें ऐकणें. -नीं सात बाळ्या असणें-(लहान मुलांच्या भाषेंत) (ऐकावयाचेंच नाहीं असा निश्चय दाखवावयाचा असतां) ह्या कानाचें ह्या कानास कळूं न देणें; अतिशय गुप्तपणा ठेवणें. म्ह॰ (व.) १ कानाची कोन झाली नाहीं = कुणालाहि कळलें नाहीं. २ कानामागून आलें महालिंग (तिखट) झालें; = मागून आलेला किंवा वयानें लहान असा माणूस जेव्हां वरचढ होतो तेव्हां योजतात. ३ मुढ्या कानाची पण अभिमानाची = अंगांत दोष असून अभिमानयुक्त. ४ (गो.) कान मान हालवप = एखादी गोष्ट करण्यासाठीं उत्सुकता दाखविणें. ५ (गो.) कान फुंक म्हळ्यार व्हान फुंकता = एक सांगि- तल्यावर दुसरेंच करणें. ६ (गो.) कानाचा पोळा आनी पोटाची चिरी वोढता तितली वाढता = संवयीनें संवय वाढते. ७ कान आणि डोळे यांच्यांत चार बोटांचें अंतर = पाहिलेलें व ऐकिलेलें यांत केव्हां केव्हां अंतर असतें, ऐकलेलें तितकें विश्वसनीय नसतें, पुढें खोटें ठरण्याचा संभव असतो. ८ कानामागून आलें शिंगट ते झालें अति तिखट-(कानाच्या नंतर शिंगें उद्भवतात म्हणून) एखादा उपटसुंभ मागून येऊन एकाएकीं मोठ्या पदाला चढला व पहिल्या लोकांना शिकवूं लागला-त्रास देऊं लागला तर त्यास म्हणतात. यावरून कानामागून येणें व तिखट होणें. सामाशब्द-॰आढा-पु. (बैल- गाडी) गाडी उतरणीवर असतां किंवा बैल बेफाम असला तर तो ताब्यांत रहावा म्हणून कासर्‍यानें बैलाच्या कानाला टाकलेला वेढा. ॰कडी-स्त्री. (लोखंडी काम) कानाच्या आकाराचा पत्रा कापून त्याला जें एक लांबट तोंड ठेवतात तें वळवून त्यांत बसविलेली कडी. अशा दोन बाजूस दोन कड्या असतात. ॰कवडा-पु. कान- खवडा पहा. ॰कळाशी-सी-स्त्री. (घोडा, बैल इ॰ च्या) कानाची व डोक्याची ठेवण, आकार. 'अस्सल जरदी घोडी भिवरथडी वर बसली चांदणी । कानकळाशीं फेरफटक्यामध्यें कोणी तरी दिली आंदणी ।' -पला ४.२१. ॰कात्रा-पु. (गो.) पाण्या- वर तरंगणारा एक लहान मासा. -मसाप ३.३.१५७ -वि. कान कापलेला; कानफाट्या. ॰कारी-स्त्री. (विणकाम) ताणा ताणून धर- णारी एक धनुकली. ॰किरळी-कीड-कुरकुटी-कुरटी-स्त्री. (कों.) कानास होणार एक रोग; कानाची कीड. ॰कुडें-न. कानां- तील कुडें; एक अलंकार. [कर्ण + कुंडल; कण्णकुड्डळ-कानकुडें.] ॰कुलाय-स्त्री. (गो.) कान झाकेपर्यंतचा डोक्यावर घालण्याचा निमुळता टोप. [सं. कर्ण + कुलाया = घर, झांकण] ॰कूण-स्त्री. १ गुणगुण; बाजारगप्प. २ कुजबूज; कुरकूर. ३ तक्रार; कां कूं; अनिश्चित वर्तन. [कान + कुणकुण] ॰कूस-अनिश्चितता; कां कूं; चालढकल; कानकूण अर्थ ३ पहा. [कान + ध्व. कुस्] ॰केस-पुअव. (नुकत्याच विधवा झालेल्या स्त्रीचें) केशवपन करणें व अलंकार काढून घेणें. (क्रि॰ करणें.) ॰कोंडा-वि. १ (आश्रयदाता, उपकारकर्ता, ज्याला आपलीं अंडींपिल्लीं, दोष माहीत आहेत अशा माणसासमोर) लज्जित; मुग्ध; खजिल; कुंठित; ओशाळा; भय- चकित झालेला; मिंधा. 'गुरुज्ञानाचें अंजन नसतां कानकोंडा प्रपंच फोल ।' -अमृत १९. 'ईश्वरी कानकोंडा जाला । कुटुंब- काबाडी ।' -दा ३.४.४७. 'मी कानकोंडा जाहलों दुर्मती ।' -भावि ५५.१०६. २ ऐकूं येत नाहीं असें ढोंग करणारा. -पु. दुर्लक्ष; ऐकूं येत नसल्याचें सोंग. 'तुजविषयीं कानकोंडा करुं काय मी आतां ।' -दावि ८२. [कान + कोंडणें] ॰कोंडा-पु. कानां- तील भुसकट, मळ. ॰कोंडीं-गाडा, कानागाडा-स्त्रीपु. बहिरे- पणाचें सोंग घेणें; दुर्लक्ष करणें; कां कूं करणें; अळंटळं करणें; ऐकण्या न ऐकण्याबद्दल अनिश्चितता. (क्रि॰ करणें). [कान + कोंडा] ॰कोंडा-डी-वाटणें-शरमिंधें होणें, वाटणें. ॰कोंडें-वि. लाजिरवाणें. कानकोंडा-डी पहा. 'ऐसी परस्त्रीची संगत । घडतां जनांत कानकोंडें । -महिकथा २८.१००. -न. १ दुर्लक्ष; 'केली नाही चिंता नामीं कानकोंडें । अंती कोण्या तोंडें जात असे ।' -रामदास (नवनीत पृ. १५२.) २ भिडस्तपणा. 'कानकोंडें साहो नये ।' -दा १४.१.६. ॰कोपरा-पु. वेडावांकडा भाग; कान किंवा कोपरा; पुडें आलेला भाग (शेत, घन पदार्थ इ॰ चा) चतुरस्त्र, वर्तुल इ॰. आकारविरहित जे क्षेत्रादिकांचे अंश असतात तो. ॰कोरणी-णें-कानांतील मळ काढण्याची, पुढें वाटी असलेली धातूची लहानशी काडी; कानमळ काढण्याचें हत्यार. ॰खडी-स्त्री. सूचना; ताकीद. 'मी त्यास कानखडी लावली.' ॰खवडा-पु. वास- रांच्या कानाला होणारा एक रोग; तो नाहींसा होण्यासाठीं वास- राच्या कानांत एक कथलाची बाळी घालतात. ॰खीळ-स्त्री. १ (बैल- गाडी) चाक पडूं नये किंवा जागेवरून मागेंपुढें सरकूं नये म्हणून आंसास घातलेली कडी, कुणी. २ (औत) जेथें दोन शिवळा जोखडास असतात त्यांतील बाहेरील शिवळ. ॰खोरणें-(ना.) कानकोरणी-णें पहा. ॰गच्ची-स्त्री. १ पट्टा अगर वस्त्र यांनीं कान झांकणें, बांधणें. (क्रि॰ करणें; बांधणें). २ खोट्या, अनिष्ट गोष्टी ऐकूं नये म्हणून कानावर हात ठेवणें; आपल्या कानीं सातबाळ्या करणें. (क्रि॰ करणें). [कान + गच्च] ॰गोष्ट- स्त्री. कानांत सांगितलेली गोष्ट; रहस्य; कर्णमैथुन. ॰घसणी- स्त्री. १ कानगोष्ट पहा. २ कुजबूज; आळ. 'जाणोनि कान घसणी हरि चालियेला' -अकक. कृष्ण कौतुक ५४. ॰घुशी-घुसणी-स्त्री. (गोट्यांचा खेळ) हाताच्या बोटांनीं आपला कान धरून त्याच हाताच्या कोपरानें गोटी उडविण्याचा प्रकार. ॰घोण-स्त्री. गोम नांवाचा सरपटणारा किडा; घोण; कर्णजूलिका; कर्णकोटी. हा कानांत शिरतो ॰चा कोन-पु. क्रिवि. कानाच्या कोपर्‍यांत; अगदीं जवळ; कोठेंहि; किंचित् (ऐकूं न येणें, परिस्फुटता न करणें). 'म्या त्याची लबाडी कानाच्याकोनाला कळूं दिली नाहीं.' 'कानाचाकोन समजला नाहीं.' ॰चिट्-पु. खेळांतील समाईक गडी; राहाट्या. ॰चिपी-स्त्री. १ कानाचा वरचा भाग पिरगळणें; कानपिचकी. (शाळेंतील पंतोजीच्या शिक्षेचा अथवा मुलांच्या खेळांतील शिक्षेचा एक प्रकार). (क्रि॰ घेणें). २ खेळांत लबाडी केल्याबद्दल शिक्षा म्हणून स्वतःचा कान पिरगळून घेणें. (क्रि॰ घालणें.) ॰चिंबळी-(कों.) कानचिपी पहा. (क्रि॰ घेणें. ॰चोर-वि. (गो.) ऐकून न ऐकलेसें करणारा. ॰टाळ- ठाळ-ळी-ळें-ठळ्या-ठाळ्या-टाळीं-ळें-(अव.) (बसणें क्रियापदास जोडून) बधिर होणें; दडे बसणें; कानाचे पडदे बंद होणें. ऐकूं न येणें (थंडी, वारा, मोठा आवाज इ. मुळें). -गलि ३.१७ २ (उघडणें क्रियापदाला जोडून) बहिरेपणा जाणें; ऐकूं येऊं लागणें. ३ समजण्याला, शिकविण्याला योग्य होणें; डोळे उघ- डणें; ताळ्यावर येणें. ४ ताळ्यावर आणणें. [कर्ण + स्थळ] ॰टोपी-पु. कान, कपाळ झांकणारी टोपी; माकडटोपी; कान- पट्टीची टोपी. ॰पट-स्त्री. (व.) कानशील; कानाजवळील गाल व कपाळ यांमधील भाग. ॰पट्टी-स्त्री. १ कानगच्ची अर्थ १ पहा. कान झांकतील अशा तर्‍हेनें डोक्याला गुंडाळणें. २ कान- पट; कान-शील. 'भाल्याची जखम कानपट्टीस लागली.' -भाब ५७. ॰पिसा-वि. (कों.) कानाचा हलका; भोळ- सर; खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवणारा. ॰पिळा-ळ्या-पु. (लग्नांत) नवर्‍यामुलीचा भाऊ. नवरीच्या हातांत लाजाहोमाच्या वेळेस लाह्या घालतो व नवरामुलगा त्याचा कान पिळतो, त्या- बद्दल त्याला नवर्‍यामुलाकडून कानपिळ्याचें अगर कानपिळणीचें पागोटें मिळतें तो मान. ॰फट-ड-स्त्रीन. कानशील; गालफड; कानाच्या पुढील गालाचा प्रदेश (विशेषतः थोबाडींत मारतांना ह्या शब्दाचा उपयोग करतात. जसें-मी तुझें कानफड सुजवीन, फोडीन; कानफडांत मारीन. [सं. कर्ण + फलक] ॰फटा-फाटा- टी-ट्या-डी-पु. नाथपंथ व त्या पंथांतील गोसावी. ह्यांचीं परं- परा आदिनाथापासून आहे. यांच्यांत प्रख्यात असे नऊ नाथ होऊन गेले. हे शैवमतानुयायी आहेत. हे कानाच्या पाळीस मोठें भोंक पाडून त्यांत काचेच्या किंवा लाकडाच्या गोल चकत्या घाल- तात. ह्यांच्या गळ्यांत शिंगी, पुंगी असते. हे किनरीबर गोपीचंद राजाचीं गाणीं म्हणतात. 'व्याघ्रांबर गजचर्मांबर परिधान शुद्ध कानफटा । ' -प्रला ५. [कान + फाट] कानफटा (इ.) नांव पडणें-क्रि. दुर्लौकिक होणें; नांव बद्दू होणें. कानफाट्यांच्या वर्त- नाबद्दल लोक सांशक असतात त्यावरून लोकांत एकदां शंका उत्पन्न झाली कीं ती जात नाहीं. उदा॰ म्ह॰ एकदां कानफाट्या नांव पडलें म्हणजे जन्मभर तें तसेंच राहतें, त्यावरून एकदां दुष्कृत्य केलें म्हणजे त्याचा कलंक जन्मभर राहतो. ॰फुटी-स्त्री. १ एक औषधी वेल. २ (हेट.) कडधान्यांतील एका गवताचें बीं. ॰फुशी- स्त्री. कानगोष्ट; कानांत पुटपुटणें; कुज बूज. ॰फोडी-स्त्री. अजगंधा वनस्पति; तिळवळ. ॰भेरा-भायरा-वि. बहिरट. ॰मंत्र- मंत्री-पुस्त्री. कानांत सांगितलेली गोष्ट; गुप्त मसलत. ॰वडा-वि. १ एका कुशीवर, बाजूवर निजलेला; आडवा झालेला. (क्रि॰ निजणें; पडणें; होणें). 'ना येणेसीं मुख वांकडें । करूनि ठाकाल कान- वडे ।' -ज्ञा १८.१६९३. 'परि ते कानवडि परांमुख निजेली होती ।' -पंच ३.१५. 'कोणी कानवडे निजती -दा १८. ९.७. २ पराङ्मुख. 'दुर दुर जासी निघुन बघुन लगबगुन होसि कां कानवडा ।' -प्रला १६२. -पु. दाराचें झांकण, वस्त्राचा आडपडदा. -शर ॰वडें-क्रिवि. कानवडा पहा. एका कुशीवर, बाजूवर. 'तिएं धारेचेनि दडवादडें । नावेकु मुखचंद्र कानवडें ।' -शिशु ७१२. 'नये अळसे मोडूं अंग । कथे कानवडे ढुंग ।' -तुगा २४१३. ॰वसा-पु. कानोसा; दूरचा शब्द कान देऊन एकाग्रतेनें ऐकण्याची कृति. (क्रि॰ घेणें; लावणें; लावणें) ॰वळ-पु. कानामागें होणारा एक रोग. ॰वळा-वि. कानवडा पहा. (क्रि॰ असणें; निजणें; पडणें). -पु. (पशूच्या) डाव्या कानाखालीं दिलेल्या डागाची रेघ. ॰वळे-पुअव. गालावर आलेले कानाच्या बाह्य अंगावरील केंस. कानवा-व्ह-ळा-पु. कानोसा. (क्रि॰ घेणें; लावणें). ॰विळें-न. (कु.) कानांतील मळ ॰वेणी, कानशीलवेणी-स्त्री. लहान मुलांच्या कानावरील केसांची घातलेली वेणी. ॰वेरी-क्रिवि. कानापर्यंत; कानाविरी. 'जे अनर्थाचे कानवेरी ।' -ज्ञा ९.१८२. ॰शिरा-स्त्रीअव. कानाजवळच्या शिरा. 'कानशिरा दुखतात, धमकतात, उठल्या.' ॰शील-सल-सूल, कानाड-न. १ कानाच्या जवळचा, गाल व कपाळ यांमधील भाग 'कानसुलां भाली । आंगें कूट जालीं ।' -शिशु ९७०. 'घोर जाहली हातफळी । हाणिताती कानसुली । एकमेकां ।' -कथा ५.१७.१४१. 'याच कानसुलीं मारीतसे हाका ।' -तुगा १८०५. २ गालफड; चेहर्‍याची एक बाजू; कानठाड; कानफट. [कर्णशिरस्] ॰सर-पु. बैलाच्या कान व शिंगाभोंवतीं बांधावयाची रंगीत सुती दोरी. ॰साक्षी-पु. ऐकींव माहिती सांगणारा साक्षीदार. काना-नें आरंभ होणारे सामा- शब्द-कानाकोचा-वि. कानाला कटु, कर्कश, वाईट लागणारें; कर्णकटू (भाषण, इ॰) 'आणि कां कानेंकोचें बोले ।' -तुगा २७३५. ॰कोचा-कोपरा-१ उंचवटे व भेगा. पृष्ठभागीं विष- मता (जागा, वस्तू इ॰ ची). २ (ल.) एकूण एक भाग. 'मी घराचा कानाकोपरा शोधला.' [कान + कोपरा, कोचा] ३ पुढें मागें झालेला, भाग; उंचसखल भाग; गट्टू व खड्डा. कानाकोपर्‍याचें भाषण- न. गुपचुपीचें भाषण; कुजबूज; गुप्तपणाचें बोलणें; खाजगी, घरगुती बोलणें. -चा आदळ-वि. ज्याच्या पोटांत कोणतीहि गोष्ट राहात नाही असा; बहकणारा; बडबड करणारा. -चा जड- वि. १ अर्धवट बहिरा; बहिरट. २ (ल.) ज्याला सांगून लवकर समजत नाहीं असा. -चा टप्पा-पु. हांकेचे अंतर. -चा तिखट-वि. तीक्ष्ण श्रवणेंद्रियाचा. -चा पडदा-पु. ध्वनीचा आघात होऊन नाद उत्पन्न होणारें कानांतील तंबूर; ध्वनिलहरी ज्यावर आदळल्यामुळें कंप उत्पन्न होऊन ऐकूं येतें तो पातळ पापुदरा. -वर लेखणी ठेवणारा, बाळगणारा-वि. हुषार; वाकबगार कारकून, लेखक यास म्हणतात. -चा हलका-खरी खोटी गोष्ट सांगितली असतां तीवर सहज विश्वास ठेवणारा; चहाडखोराचें खरें मानणारा.

दाते शब्दकोश

अर्ध

न. १ एका पदार्थाचे जे दोन सम विभाग ते प्रत्येकीं; निम्मा तुकडा, अर्धा भाग. २ (समांसात) अर्धा; निम्मा. उ॰ अर्धकोस, अर्धघटिका इ. [सं.] ०कच्चा वि. १ अर्धामुर्धा पिकलेला, तयार झालेला किंवा शिजलेला (फल, धान्य, विद्या, अन्न); अर्धामुर्धा; अपूर्ण; अपुरा. २ पुरें शेवटास न जातां अर्धवट राहिलेलें (काम). ०कंदरा पु. लगामाचा प्रकार. -अश्वप १८५. [सं. अर्ध + कंधरा ०काची वि. अर्धीकच्ची. 'एक अर्धकाचीं तुरटें ।' -एरुस्व १४. १०६. ०कोर स्री. अर्धा चतकोर; (गो.) नितकोर (भाकर). ०घबाड पु.न. एक शुभ मुहूर्त, परंतु घबाडापेक्षां कमी महत्वाचा. घबाड पहा. ०चंद्र पु. १ वद्य किंवा शुध्द अष्टमीचा चंद्र; अर्धा चंद्र. २ अर्ध चंद्राच्या आकारासारखी वस्तु. ३ (गचांडी देतांना हाताचा आकार अर्धचंद्रासारखा होतो म्हणून;) हकालपट्टी. 'या अष्ट मीच्या चंद्राच्या मुहूर्तावर मलाहि अर्धचंद्र मिळाला.' -मूकनायक. 'आणिक म्हणे भृत्यजना । यासी अर्धचंद्राची द्यावी दक्षिणा । देशाबाहेरी या ब्राम्हणा । घाला वहिले ।।' -कथा ५.११.७१. (हा प्रयोग मूळ संस्कृतांतच आहे.) (क्रि॰ देणें, मारणे, मिळणें, इ०). ४ (नृत्य) हाताचीं चार बोटें एकमेकांस लागून ताठ ठेवणें व आंगठा दूर पसरून ठेवणें. ५ अर्धचंद्राकृति (फाळाचा) बाण. ०चंद्री, तंद्री स्री. अर्धवट झोंप, मूर्च्छा. 'बाण भेदिला जिव्हारीं । निदूरथ पडिला धरणीवरी । डोळां लागली अर्धचंद्री । जेवीं खेचरी योगिया ।' -एरुस्व ९.३२. ०चरतीय, जरतीय-वि. अर्धे किंवा अर्धवट काम; अनिश्चित स्वरूपाचें काम; मोघम किंवा अनिश्चित भाषण. 'येतो म्हण किंवा नाहीं म्हण- उगीच अर्धचरतीय सांगूं नको.' [सं. अर्ध + जरा-जरित किंवा जर्ज- रित; अर्ध + चरित]. ०जेवा वि. अर्धवट जेवलेला; अर्ध्या जेवणांतून उठलेला; अर्धपोटी. [अर्ध + जिम्]. ०देशी कापड न. विदेशी सुताचें, हिंदुस्थानांत विणलेले कापड. ०धणी वि. अर्धतृप्त; अर्ध- पोटीं. 'भलतें करीं परी अर्धधणीं । नुठीं कदा ।' -ज्ञा १६.३०. ०नार स्री. स्रीजातींतील षंढ; षंढा; अर्धवट स्री; स्रीधर्मांपैकीं कांहीं बाबतींत उणीव असलेली स्री. [सं. अर्ध + नारी]. ०नारीनटे- श्वर पु. १ अर्धें आपलें (पुरुषांचे) व अर्धें पार्वतीचें (स्रीचें) असें शंकराचें रूप; अर्धनारीश्वर; शिवशक्ति. मोहिनीराज हें विष्णूचें रूप (यांत अर्धा विष्णु व अर्धी अमृतकलश घेतलेली मोहिनी असें अर्धनारीश्वर स्वरूप असतें. नेवासें येथें असा देव आहे). २ अर्धा पुरुष व अर्धी स्री एकत्र. 'अर्धनारीनटेश्वरी । जो पुरुष तोचि नारी ।' -ज्ञा ९.२७०; -एभा ११.३६९. ३ प्रकृतिपुरुष; शिव- शक्ति. 'प्रकृतिपुरुष शिवशक्ति । अर्धनारीनटेश्वर म्हणती ।' -दा २०.३.१०. ०नारीश्वर अर्धनारीनटेश्वर पहा. ०निकुट्टक (अंगहार) -पु. (नृत्य) उजवा पाय नूपुर करून मग तीचारी सोडून भराभर आक्षिप्तचारी त्याच पायानें करणें. नंतर दोन्ही हात फेंकून त्रिक वळविणें व शेवटीं निकुट्टक व कटिचिन्ह हीं करणें. ०निकुट्टित (करण)-न. (नृत्य) खांदा आकुंचित करून त्यावर त्या बाजूचा हात ठेवून बोटें हळु हळु ठोकणें व दुसरा हात आपल्या तोंडासमोर बोटें करुनं ठेवणे. उजवा पाय कुट्टित करणें व डावा पाय स्तब्ध ठेवणें. ०पड-डा वि. अर्धवट पडलेलें-केलेलें-बजा-वलेलें-म्हटलेले; अपुरें साधलेलें, बजावलेले; वरकरणीपणानें केलेलें. (सामा.) अपुरें; वरवर; सरासरी. [अर्ध + पडणें]. ०पद्मासन न. डाव्या पायाची मांडी मोडून बसणें व उजवा पाय मोडून डाव्या पायावर ठेवणें. ०पक्षकीटक पु. (प्राणी.) एक कीटक- वर्ग. यांतील किड्यांचे पुढील अर्धे पंख शृंगी द्रव्यानें कठिण झालेले असतात म्हणून यास हें नांव आहे. -प्राणिमो १०३. ०पिका वि. अर्धवट पिकलेला (फळ वगैरे). [अर्ध + पिकणें]. ०पुडी-वि. अर्धवट; अल्पायुषी (अर्धें झोपेंत जातें म्हणून). 'थोडें जिणें अर्धपुडी काया । गर्व करिती रडाया ।' -दा १८.५.३५. [सं. अर्ध + पुट ?]. ०पोटीं-क्रिवि. अर्धेंच पोट भरलें असतां; पूर्ण न जेवतां; भूक पुरी न भागतां. (क्रि॰ जेवणें, जाणें, असणें, उठणें, राहणें). ०फोड अर्धवट फोडलेलीं लांकडें; ठोकळे. (बुरूड) बांबू उभा चिरून केलेले दोन भाग. ०बाट-गा वि. १ अर्धवट संस्कार झालेला (वाटण्याचा-कुटण्याचा-शिजण्याचा इ०); अर्धवट बन- विलेला; अर्धबोबडा. २ अर्धवट भ्रष्ट झालेला, बाटलेला; जातींतून अर्धवट बाहेर पडलेला; वाळींत टाकलेला. ३ ज्याचा बाप एका जातीचा व आई दुसर्‍या जातीची आहे असा. ४ अर्धवट किंवा वरवर ज्याला माहिती-परिचय आहे असा. ५ (ल.) अर्धवट शिकलेला (विद्यार्थी, कारागीर, पंडित इ०). कडेचा पोहणारा; अतज्ज्ञ. -क्रिवि. अर्धेंमुर्धें करून; अपुरेपणानें; उणेंपणानें. [अर्ध + भ्रष्ट = बाट]. ०बाटे पाऊण मराठे न. १ संकर; पंचमिसळ; खिचडी; धेडगुजरी (भाषा, काम, पदार्थ); बारभाई; बजबजपुरी. २ (ल.) उचछृंखलपणाची वागणूक-आचार. ०बिंब न. १ अर्ध वर्तुळ आणि त्यावरील टिंब. २ (ल.) ओंकाराची-प्रणवाची अर्ध मात्रा. 'जंव मात्रात्रय मावळे । अर्धबिंबीं । '-ज्ञा ८.११५. ०बुकट-बुकुट वि. (राजापुरी) अर्धवट पहा. [अर्ध + बुकटी]. ०बोबडा वि. १ अर्धवट कुटलेलें-चेललेलें-वाटलेलें (मिरे वगैरे). २ शिजतांना अर्धवट राहिलेला-(भात-डाळ इ॰ पदार्थ); मऊ न झालेला, बोटचेपा. ३ (ल.) कसें तरी ओबडधोबडपणें केलेलें काम; बिगारी-वेठ काम. ०भरपोशाख पु. भर पोशाखांतील फक्त्त कांहीं विशिष्ट वस्तुयुक्त मामुली पोशाख. -बडोदें खानगी खातें नियम नोकर पोशाख पा. ३. ०मत्तल्लि(करण) न. (नृत्य) पाय अडखळल्यासारखें करून मागें टाकणें, डावा हात रेचित करणें व उजवा हात कमरेवर ठेवणें. ०मत्स्येंद्रासन न. योगासनांतील एक प्रकार. -संपूर्ण योगाशास्र पा. ३२५. ०मागधी स्री. एक प्राकृत भाषा. जैन धार्मिक ग्रंथ या भाषेंत लिहिले आहेत. हिलाच भारतीय वैय्याकरण आर्षभाषा म्हणत. शौरसेनी व मागधी भाषा प्रदेशांच्यामध्यें अर्धमागधीभाषाप्रदेश होता (म्हणजे हल्लींचा प्रदेश अयोध्या). त्याच्या दक्षिणेकडील मराठी भाषा कांहीं अंशीं या भाषेवरून बनली आहे. प्रचारकाल ख्रि. पू. ४ थ्या शतकाचा शेवट -ज्ञाको अ ४७५. ०मांडणी स्री. अर्धी मांडणी पहा. ०मात्रा स्री. १ ओंकारांतील अर्धीं मात्रा. 'अर्धमात्रापर तें न सांपडे ।' -परमा २.१३. २ एका वेळीं घ्यावयाच्या औषधाच्या प्रमा- णाच्या अर्ध्या इतकें. 'अर्धमात्रा रस देऊनिया जीव । रोग दूरी सर्व करिताती ।' -ब २२२.१; ३ (ल.) औषध; रसायनगुटिका. 'पंचगव्य तेंचि जाण अर्धमात्रा । -ब १०४.५. ४ किंचित्; थोडें. 'हे कृष्णकथा अलौकिक । महादोषासी दाहक । भवरोगासी छेदक । अर्धमात्रा सेविलिया ।' -एरुस्व १८.७५. ५ व्यंजन; अर्धस्वर. ६ संगीतांत स्वर घेतांना घेतलेली विश्रांति; एका मात्रेचा अर्धा काल. ०मुकुल(दृष्टी) स्री. (नृत्य) अर्धवट डोळा उघडणें; पापण्यांचे केंस एकमेकांस लागतील इतके जवळ आणणें. आल्हादकारक सुगंध, सुखस्पर्श ह्या गोष्टी हा अभिनय दर्शवितो. [सं. मुकुल = किंचित् उमललेली कळी]. ०मेला वि. १ अर्धवट मेलेला; थोडासा जिवंत राहिलेला. २ जर्जर; मृतप्राय; व्याकुळ. 'ती भुकेने अर्धमेली झाली आहे.' -पाव्ह २३. ०रथी वि. (रथांत बसून) एका रथ्यासह- वर्तमानहि युद्ध करतां येत नाहीं. तो; रथीहून अल्पवळी. (ल.) कच्चा योद्धा. 'अतिरथ नव्हे रथ नव्हे हा (कर्ण) केवळ अर्धरथचि अविदग्ध ।' -मोउद्योग १२.५८. [सं.]. ०रात्र स्री. मध्यरात्र. ०रेचित(करण) न. (नृत्य) उजवा हात तोंडासमोर नेऊन डोक्या- वर उचलून धरणें व उजव्या पायाकडील भाग किंचित वांकवून तो सूची करून जमिनीवर हळु हळु आपटणें. [सं.] ०रेचित(संयुक्त हस्त)-पु. (नृत्य) डावा हात चतुर व उजवा हात रेचित करणें. [सं.] ०लंड-मर्धलंड-पु. अधलंड, अधलंडमधलंड पहा. ०वट क्रिवि. १ अर्धेंपणानें; अपुरेपणानें; उणीव असलेल्या रीतीनें; वरवर; वरकरणीः मोघमपणें. 'काम पुरतें करावें, अर्ध- वट ठेवूं नये.' [सं. अर्ध + वत्] २ अर्ध्यांत; मध्यभागी; दोन्ही टोंकाच्या मध्यें.-वि. १ अधलामधला; अपुरा; २ (ल.) वेडा; अप्रबुद्ध; कमी समजूत असलेला. 'हा पुरता वेडा नव्हे पुरता शाहणा नव्हे, अर्धवट आहे.' ३ अर्धें वय झालेला; तरणा नव्हे. 'आम्ही म्हैस घेतली ती तरणी नाहीं, अर्धवट आहे.' ०वर्तुल-ळ-न. (गणित.) अर्धें वर्तुळ; वर्तुळाचा निम्मा भाग; व्यास आणि त्यानें कापलेला परिघाचा भाग यांच्यामध्यें जो वर्तु- लाचा भाग सांपडतो तो. -महमा ६. (इं.) सेमि-सर्कल. -विराम- पु. १ अर्धीं विश्रांति; पूर्ण विरामापेक्षां कमी थांबण्याची जागा. २ ती दर्शविण्याचें चिन्ह. ०वेडा वि. वेसडर; मुर्ख; अर्धवट. ०शिजा वि. अर्धवट शिजलेला; पुरता न शिजलेला (भात वगैरे) ०शिशी स्री. अर्धें कपाळ दुखण्याचा रोग; यानें अर्ध्या मस्तकाकडील मानेचा भाग, भुंवई, आंख, कान, डोळा व अर्धें कपाळ-या ठिकाणीं तर- वारीच्या आघातासारखें दुःख होतें. यावर गोकर्णाचें मूळ व फळ पाण्यांत वांटून त्याचें नस्य करावें अथवा मूळ कानांत बांधावें. [सं. अर्ध + शीर्ष] ०सम(वृत्त)-न. ज्यांत दोन दोन उ॰ पहिला आणि तिसरा व दुसरा आणि चौथा हे चरण सारखे असतात तें वृत्त. उ० पुष्पिताग्रा; हरिणीप्लुता; वियोगिनी, अपरवक्त्रा. [सं.] ०सूची (करण)-न. (नृत्य) उजवा पाय सूची करून उजवा हात उपपद्म करणें व डोक्याच्या वरच्या बाजूस नेऊन ठेवणें. ०स्थित(स्वर)-पु. (संगीत) द्व्यर्ध आणि द्विगुण या स्वरांमधील म्हणजे पांचवा, सहावा व सातवा हे स्वर. ०स्वस्तिक(करण)-(नृत्य) पु. पाय स्वस्तिक ठेवून उजवा हात कमरेवर व डावा हात वक्षःस्थलावर ठेवणें. ०स्वर-पु. य्, व्, र्, ल्, हीं व्यंजनें स्वरांबद्दल योजितात म्हणून त्यांस अर्धस्वर किंवा अंतःस्थ वर्ण म्हणतात. ०हार-पु. बारा किंवा चौसष्ट सरांचा हार; एक दागिना.

दाते शब्दकोश