नऊ मराठी शब्दकोशांमधील २,६२,७३६ शब्दांचा एकत्रित संग्रह
शब्दार्थ
ढोंगी or ग्या
ढोंगी or ग्या ḍhōṅgī or gyā a ढोंगीसोंगी a (ढोंग) Sanctimonious or hypocritical; that pretends or falsely professes gen. 2 That shams or feigns (a sickness &c.)
ढोंगी
वि० लबाड, खोटा, लुच्या, फसविणारा.
ढोंगी
दांभिक, हे लोक मनाच्या चोरकप्प्याची किल्ली कधीं कोणाच्या हातीं देत नाहींत, यांच्या आचारांत व विचारांत मोठी तफावत असते; आपली हेतु गुलदस्तांत ठेवतात, यांच्या व्यवहारांत प्रकट न करण्यासारखें रहस्य असतेंच, त्यांच्या मनाचा अंत लागत नाहीं, पक्का आंतल्या गांठीचा, या झोपेचे सोंग करणाऱ्यांना कोण उठवील ? करून सवरून दाखवतील कीं आपण त्या गांवचेच जणूं नव्हेत, जाणूनबुजून दुर्लक्ष करून आव आणतील विसरल्याचा, वर नि:संग पण चार-चौघांसारखे चापून जेवतात कीं ! बोलण्याशी विसंगत आचरण, सर्व गोष्टींत यांचे मोठे हेतु व पोट-हेतु पण असतात. बोभाटा झालेल्या माणसांची नांवें ऐकतांच हे फाजील संभावित लोक तीं नांवे तोंडांत आल्यास चूळ भरल्याचा आविर्भाव आणतात.
ढोंगी, ढोंग्या, ढोंगीसोंगी
वि. १. ढोंग करणारा; दांभिक; पाखंडी; लबाड. २. (आजारपणाचे) सोंग करणारा; कांगावखोर.
संबंधित शब्द
भगल
स्त्रीन. ढोंग; लबाडी; ढोंगी वर्तन. 'जाणों रणमर- णाचें करउनि पुनरपि हरी भगल, बाहे ।' -मोआश्रम ५.३. [हिं.] (वाप्र.) ॰उडणें-क्रि. ढोंग उघडकीस येणें. ॰भावार्थी-वि. आंत कावेबाजी व बाहेरून निष्कपटीपणा, प्रामाणिकपणा दाखविणारा. भगली-ल्या-वि. १ ढोंगी; दांभिक; कपटी. 'भगली ते फुग- वीसी उरावरील गोळे ।' -मध्व ३८२. २ खुषमस्कर्या. [भगल]
अध्यात्मिक
वि. १ अध्यात्मासंबंधी; आध्यात्मिक पहा. २ (विप्र. अध्यात्मक) दांभिक; ढोंगी.
आरोपित, आरोपी
वि. १ आरोप केलेला; आरोप अस- लेला; (आरोपाच्या सर्व अर्थानें) आरोप पहा. २ खोटा; बना- वट; ढोंगी. ३ गुन्हेगार; ज्याच्यावर आरोप ठेवला गेला आहे असा. 'समोर आरोपिताकरतां जागा होती.' -राणी चंद्रावती १५३. 'प्रेसअॅक्टाप्रमाणें आरोपित लेखांचा नाट्यदृष्ट्या विचार करण्याचा अधिकारच... कोर्टाला नाहीं.' -टि ३.३५३. [आरोप]
आरोपित, आरोपी
वि. १. आरोप केलेला; आरोप असलेला. आरोपाच्या सर्व अर्थाने पहा : आरोप २. खोटा; बनावट; ढोंगी. ३. गुन्हेगार; ज्याच्यावर आरोप ठेवला गेला आहे असा : ‘प्रेसॲक्टाप्रमाणे आरोपित लेखांचा नाट्यदृष्ट्या विचार करण्याचा अधिकारच…. कोर्टाला नाहीं.’ − लोटिकेले ३·३५३. [सं.]
बाजीग(गा)र
पु. गारुडी; जादूगार. -वि. उलटणारा. 'माष्टीन बाजीगार होऊन...' -ख ३५७०. [फा. बाझीगर्] बाजी(जे)गरी-गारी-गिरी-स्त्री. १ गारुडीविद्या; चेटूक; मंत्र- तंत्र; नजरबंदी; हातचलाखी; इंद्रजाल. 'माया मिथ्या बाजीगरी । दिसे साचाचिये परी ।' -दा ६.८.२४. २ पत्ते, सोंगटया खेळणें; द्यूत; जुगार. -वि. १ रिकामा; कुचकमी; निकस; वाईट (वस्तू, पदार्थ). २ (ल.) निरर्थक; पोकळ; मूर्खपणाचें (भाषण, वागणूक, उद्योग); वरकरणी; ढोंगी; बेजबाबदार (माणूस). [फा. बाझीगरी]
बावांचे
पुअव. गैरलागू उत्तरें; बांवट्या; भावास्त्रें; गोंधळून सांगितलेल्या सबबी; ढोंगी किंवा मानभावी उत्तरें. (क्रि॰ फोडणें; लावणें; घेणें).
बे(बें)गड
स्त्री. जस्ताचा अतिशय पातळ व रंगविलेले चक- चकीत पत्रा; वर्ख. [का.बेगडे] बेगडी-वि. १ बेगड लाविलेला; बेगड लावून सुशोभित किंवा भपकेदार केलेला. २ (ल.) दिस- ण्यांत भपकेदार पण आंतून हलका; पोकळ; नकली; दिखाऊ; तक- लादी. ३ (ल.) खोटा; ढोंगी. 'बेगडाचा रंग राहे कोण काळ । -तुगा ८६२. 'आमच्या बेगडी सुधरकांच्या प्रथम व्याख्यानाचा भपका पाहून लोक दिपले होते.' -टि ४.१२२.
बोका
पु. १ मांजरांतील नर. २ (ल.) गल्लेलठ्ठ, खाऊन खाऊन माजलेला, धिप्पाड मनुष्य किंवा पशु; (कोणताहि) राक्षसी पदार्थ. म्ह॰ शिक्याचें तुटलें, बोक्याचें पटलें किंवा शिंकें तुटलें आणि बोक्याचें फावलें = शिंकें तुटलें असतां दुधदुभतें बोक्याला ज्याप्रमाणें आयतें खाण्यास मिळतें त्याप्रमाणें एखाद्याचा अक- ल्पित रीतीनें आयता फायदा होणें. बोकेजुंज-झुंज-स्त्रीन. मांजरांचें भांडण, झुंज, झोंबी. बोकेसंन्यास-पु. संन्यासाचें ढोंग; खोटा संन्यास; लोकांना फसविण्याकरतां घेतलेला खोटा संन्यास. बोकेसंन्यासी-पु. दांभिक संन्यासी; ढोंगी साधु. बोका ज्याप्रमाणें मोठा साधुत्वाचा डौल धालून मुकाट्यानें बसतो पण उंदीर नजरेस पडतांच त्याचें साधुत्व लटपटून तो त्याच्यावर झडप घालतो त्याप्रमाणें लाभाची संघि येतांच आपलें खरें स्वरूप प्रगट करणारा; संभावितपणानें आपले कटपविचार झाकणारा.
बुवाबाजी
वृक्ष तेथे छाया बुवा तेथें बाया, मेंढीचें कातडें पांघरलेला लांडगा, घोर प्रतारणा, ढोंगी सोवळेपणा, दाखवायचे दांत वेगळे खायचे वेगळे, दिसतें तसें नसतें म्हणून जग फसतें, आपण शेण खाऊन दुस-याचे तोंड हुंगणारे, बाहेर बरवा आंत हिरवा, बाहेर झकपक आंत भगभग, आपलें काम देवाचे नांव, दिसण्यांत बाळबोध कृतींत दुर्बोध, पोटांत काळेंबेरें, गायतोंडे गायधनी आणि कंपनी ! दाढीदीक्षित पुंड, मुखवट्यांचें जीवन जगण्यांत पटाईत.
भगलभावार्थी
पु० ढोंगी, दांभिक.
भोंदणें
सक्रि. भुलथापांनीं, कपटानें, गोड बोलून वश करणें भुलविणें; फसविणें; फूस लावणें. 'जाणोन अत्यनिष्ट क्षिप्र तय आंधळ्यासि भोंदाया ।' -मोसभा ६.६७. [हिं. भोंदना] भोंदू- द्या-वि. भोंदणारा; फसविणारा; दांभिक; ढोंगी.
भोंदू
वि० दांभिक, ढोंगी, लबाड.
चोदबावळा
वि. लबाडीनें, लुच्चेगिरीनें, बावळी मुद्रा धारण करणारा; फसवेगिरीनें वेड पांघरणारा; ढोंगी. [चोदणें + बावळा]
चोदबावळा
वि. लबाडीने, लुच्चेगिरीने, बावळी मुद्रा धारण करणारा; वेडाचे सोंग पांघरणारा; ढोंगी.
दांभिक
वि. ढोंगी; लुच्चा; (धार्मिकपणा, संपत्ती, विद्वत्ता इ.चे) अवडंबर, सोंग करणारा. [सं.]
दांभिक
(सं) वि० ढोंगी, दंभ माजविणारा.
न. ढोंग; दंभ; अवडंबर; सोंग. -वि. ढोंगी; लुच्चा; (धार्मिकपणा, संपत्ति, विद्वत्ता इ॰काचें) अवडंबर, सोंग करणारा. [सं.]
डेंग
वि. जड; ढ; ढोंगी. 'तुका म्हणे कुचर दाणा । तैसा म्हणा डेंग हा ।' -तुगा २९१३.
डेंग
वि. १. बुद्धीचा जड; ढ. २. ढोंगी : ‘तुका म्हणे कुचर दाणा । तैसा म्हणे डेंग हा ।’ –तुगा २९१३.
दंभ
पु. १ ढोंग; स्तोम; देखावा; सोंग. २ पोकळ, तोंडाचें ब्रह्मज्ञान. [सं.] दंभी-वि. ढोंगी; दांभिक; पोकळ डौली.
दश
वि. दहा संख्या. (समासांत) दक्ष-रात्र, दशावतार, दश-दिशा. [सं. ग्री. डेकॅ; लॅ. देसेम्; गॉ. तैहुन्; आर्मो. डेक; हिब्रू. देअघ्; लिथु. देझिंथिस्; स्ला. देस्यति; फ्रें. जिप्सी देश; आर्मेनियम लसे] दशक-पु. १ दहांचा समुदाय. २ (गणित.) घेत- लेले-धरलेले दहा. ३ दर शेकडां दहा. दशक चढविणें-वर्चस्व स्थापणें, बसविणें. दश-कंठ-कंधर-ग्रीव-मुख्य-पु. रावण. [सं.] ॰कामजव्यसन-न. काम (इच्छा) यापासून उत्पन्न होणारे दहा दुर्गुण:- शिकार करणें, जुवा खेळणें, दिवसां निजणें, शिव्या देणें; रांडबाजी, दारू पिणें, नाचणें, गाणें, खेळणें, ढोंगी- पणा इ॰. ॰ग्रंथ-पुअव. वेद व त्यांची उपांगे; संहिता, ब्राह्मण, आरण्यक, आणि शिक्षा, कल्प, व्याकरण, निघंटु, निरुत्क, छंद, ज्योतिष. [सं. दश + ग्रंथ] ॰ग्रंथी-वि. वरील दशग्रंथ पढलेला. ॰दानें-नअव. दहा दानें; गो, भूमि, तिल, सुवर्ण, घृत, वस्त्र, धान्य, गूळ, लवण (मीठ), रुपें. ॰दिशास्त्रीअव. या पुढील प्रमाणें आहेत:- पूर्व; पश्चिम,दक्षिण, उत्तर या मुख्य दिशा, व आग्नेयी, नैऋत्य, वायव्य, ईशान्य या चार उपदिशा, आणि ऊर्ध्व व अधोदिशा. -क्रिवि. सर्व दिशांना-बाजूंना; सर्वत्र; चहूंकडे (क्रि॰ पळणें; फेकणें). ॰देह-पुअव. (वेदांत) दहादेह. 'चारी पिंडीं च्यारी ब्रह्मांडी । ऐसी अष्ट देहाची प्रौढी । प्रकृतिपुरुषांची वाढी । दशदेह बोलिजे ।' -दा ८.७.४१. ॰नाडी-स्त्रीअव. (योग.) दहा नाड्या; इडा, पिंगला, सुषुम्ना, गांधारी, जीवनी, दशतुंडी, दीक्षा, बाणदशा, शंखिनी, आणि सौक्षिणी या दहा. -कथा ७. ३.८६ । ८७. ॰नाद-पुअव. चीणी, चिंचिणी, घंटा, शंख, तंत्री, ताल, वेणु, मृदंग, भेरी व मेघ (याचा नाद, रव). 'तया कमळाचया सुगंधें । जीवभ्रमर झुंकारे दशनादें ।' -स्वादि ९.५.३६. ॰नाम संन्यासी-पु. अव. गिरी, पुरी, भारती, आनंद, चैतन्य, पर्वत, सागर इ॰ संन्याशाचे दहा पंथ. ॰पाद-पु. कुरली, झिंग्या खेंकडा इ॰ दहा पायांचे कीटक, प्राणी. (इं.) डेकॅपोडा. ॰पिंड-पु. अव. मृत मनुष्यास पहिल्या दिवसापासून दहा दिवसपर्यंत देररोज एक किंवा दहाव्या दिवशीं एकदम द्यावयाचे भाताचे दहा पिंड. ॰भुजी-स्त्री. दहा हातांची दुर्गादेवी. ॰मुखपु. रावण. ॰मूळ- न. दहा वनस्पतींच्या मुळांपासून केलेलें औषध हीं मुळें:- बेल; टाकळा, टेटू, शिवण, पाडळ, साळवण, गोखरू, पिठवण, डोरली व रिंगणी अशीं आहेत. ॰रथ ललिता-रथ थळीस्त्री. आश्विन कृष्ण चतुर्थीच्या रात्रीं करावयाचें एक व्रत, तत्संबंधीं गणपतीपूजन. ॰रात्र-न. दहा दिवस, रात्री; दशाह. ॰वंत-पु. (शीखधर्म) स्वतःच्या उत्पन्नाचा धर्मासाठीं एकदशांश भाग द्यावयाचा. ॰विध- वि. दहा प्रकारचें. ॰हरा-हार-पु. दशाहरा पहा. दशम- वि. दहावा. दशमग्रह-पु. (विनोदानें) जांवई. दशम- द्वार-पु. (योग.) १ पोत; एखादी जखम वाहण्याकरितां उघडी रहावी म्हणून तींत जी वात घालतात ती. २ ब्रह्मरंघ्र (शरीरास नऊ द्वारें आहेत तीं सोडून टाळूवरील). ३ (सांकेतिक) गुद. दशम- भ्रांती-स्त्री. मोजतांना एखादा मनुष्य आपणा स्वतःस विसरतो त्यावेळीं म्हणतात. गोष्टींत दहाजणांची मोजणी करतांना मोजणारा स्वतःस विसरला त्यावरून). दशमानपद्धति-स्त्री. मेट्रिक सिस्टीम या इंग्रजी शब्दास प्रतिशब्द. या पद्धतींत मीटर हें परि- णाम धरलें जातें व इतर परिमाणें दसपटीनें अगर दहाव्या हिश्शानें चढत उतरत जातात. १ मीटर = १.१ यार्ड-वार. ॰मांश-पु. १ दहावा भाग; दशांश. २ (ल.) टाइथ या बायबलांतील इंग्रजी शब्दास प्रतिशब्द. 'त्यानें अब्राहमापासून दशमांश घेतला.' -इब्री ७.६. दशमीस्त्री. १ चैत्रादि महिन्यांच्या दोन्ही पक्षां- तील दहावी तिथि. २ दशमी दशा; मानवी जीवनयात्रेचा शेवटचा अथवा दहावा भाग. दशांक-पु. दहाचा आंकडा. दशांकचिन्ह- न. नागाच्या फणीवरील दहाच्या आंकड्या सारखें चिन्ह. दशांग- न. चंदनादि दहा सुगंधीद्रव्यांचा धूप. दशांगुळें-नअव. १ दहा बोटें. 'तो परमात्मा दशांगुळें उरला ।' २ आठव्या महिन्यांत गर्भास दहा बोटें उत्पन्न होतात म्हणून गर्भवती स्त्रीचा त्यावेळीं करावयाचा एक संस्कार. ३ दोन हातांच्या दहा बोटांत घाला- वयाचा एक दागिना. 'पोल्हारें विरुद्या दशांगुळिं वळीं गर्जोनियां पोंचटें ।' -अकक २ अनंत-सीतास्वयंवर ३९. दशांतला- वि. ज्यांचे सुतक दहा दिवस धरावें लागतें अशा नात्यांतला.
ढेंगूमेंगू, ढेंगोजी, ढेंगोजीमेंगोजी, ढेंगोमेंगो
पु. १ (निंदार्थी) बढाईखोर; लब्धप्रतिष्ठित; रिकामा डौली; ढोंगी; तोतया; लुच्चा माणूस. २ महारांचा गुरु. [ढेंग द्वि.]
ढेंगूमेंगू, ढेंगोजीमेंगोजी, ढेंगोमेंगो
पु. १. (निंदार्थी) बढाईखोर; लब्धप्रतिष्ठित; रिकामा डौल दाखवणारा ढोंगी, तोतया, लुच्चा माणूस. २. महारांचा गुरू. [ढेंगचे द्वि.]
ढंगधोत्रेकरी
पु. ढंगधत्तुरा करणारा गारुडी; ढोंगी; फसव्या (मांत्रिक, वैदू, गारुडी इ.).
ढंगधत्तुरा-धोत्र
पुन. सोंग ढोंग; चाळे; फसवणूक; गारुड. [ढंग + सं. धत्तूर] ढंगधोत्रेकरी-पु. ढंगधत्तुरा करणारा गारुडी; ढोंगी; फसव्या (मांत्रिक, वैदू, गारुडी इ॰).
ढंगमकऱ्या
वि. ढोंगी; सोंगाड्या. (व.)
ढोंग
वि. लबाड; ठक. ‘आणखीहि कितेक ढोंग आहेत त्यांचे पारपत्य करावें लागतें.’ –पेद २७.२४१. [ढोंगी]
ढोंग, ढोंगसोंग
न. १ दांभिकपणा; सोंग; पाखंड; खोटी बतावणी. २ सबब; कांगावा; मिष. ॰धत्तुरा-पु. ढोंग; ढोंगी- पणाची वर्तणूक; फसवाफसवी; चाळे; फसविण्यासाठीं (मंत्र इ॰) युक्त्त्या. [ढोंग + धत्तुरा] ढोंगी-ग्या, ढोंगीसोंगी-वि. १ ढोंग करणारा; दांभिक; पाखंडी; लबाड. २ (आजारीपणा इ॰चें) सोंग करणारा; कांगावखोर. [ढोंग]
धटिंगण
पु. पुरुष. 'खेळतां नेटकें दशावतारी । तेथें येती सुंदर नारी । नेत्र मांडिती कळाकुसरी । परंतु अवघे धटिंगण ।' -दा ६.८.११. -वि. उर्मट व दांडगा (मनुष्य). [तुल॰ गुज. धतिंग = ढोंगी]
गागाचार्य, गागादीक्षित, गागाभट्ट
पु. (मूळचा गागाभट्ट हा अति विद्वान पंडित असून त्याने शिवाजीमहाराजांना राज्याभिषेक केला होता त्यावरून). (ल.) दिखाऊ, ढोंगी विद्वान; अकटो-विकट पंडित.
गागाचार्य, गागादीक्षित, गागाभट्ट
पु. (मूळचा गागाभट्ट हा अति विद्वान पंडित असून त्यानें शिवाजीमहाराजांना राज्यभिषेक केला होता त्यावरून). (ल.) दिखाऊ, ढोंगी विद्वान; अकटो-विकट पंडित. गागाभट्टी-स्त्री. १ गागाभट्टानें लिहिलेला धर्मशास्त्रावरील ग्रंथ. २ (ल.) विद्येचें आडंबर; अकटो- विकट पांडित्य.
गारपगार, गारपगारी, गारपगाऱ्या
पु. १. मंत्रतंत्राने गारांचा पाऊस पाडणारी किंवा गारापासून संरक्षण करणारी एक जात : ‘थंडीनें मेले लोक उठविले गारपगाऱ्यांनीं भुत ।’ –ऐपो ४०१. पिकांना नुकसानी पोहचू नये म्हणून काही खेड्यातून गारपगारी ठेवलेला असे. २. (ल.) ढोंगी; लबाड; ठक; ‘हरि ऐसा गारपगारी मर्दुनया काल खगारी ।’ –प्रला १६. ३. वाममार्गी; मांत्रिक.
गारपगार-री-र्या
पु. १ मंत्रतंत्रानें गारांचा पाऊस पाडणारी किंवा गारापासून संरक्षण करणारी एक जात. 'थंडीनें मेले लोक उठविले गारपगार्यांनीं भुत ।' -ऐपो ४०१. पिकांना नुकसानी पोंहचूं नये म्हणून कांहीं खेड्यांतून गारपगारी ठेवलेला असे. वर्हाडांत अद्याप असे लोक वेतन देऊन ठेवलेले असतात. २ (ल.) ढोंगी; लबाड; ठक. 'हरि ऐसा गारपगारी मर्दुनया काल खगारी ।' -प्रला १६. ३ वाममार्गी; मांत्रिक. [गार + अपकार?]
गतकाळा, गतकाळ्या
वि. कांगावा, अकांडतांडव करणारा, थोडेसे मारले असता जीव तोडून ओरडणारा; श्रीमंत असून दारिद्रयाचा बहाणा करणारा; वेड्यांचे सोंग आणणारा; ढोंगी : ‘गावातनं मिरवनी काढतोय काय त्यो गतकाळीचा !’ - रैत ७५.
गतकाळा-ळ्या
वि. कांगावा; अकांडतांडव करणारा; थोडेंसें मारलें असतां जीव तोडून ओरडणारा, श्रीमंत असून दारिद्रयाचा बहाणा करणारा; वेड्याचें सोंग आणणारा; ढोंगी. [गतक = गत + ला]
गूळदगड, गूळधोंडा
पु. १. गुळाच्या ढेपेत सापडणारा दगड : ‘गुळासारिखा गुळदगड । परी तो कठिण निचाड ।’ - दास ८·५·४७. २. (ल.) ढोंगी, कपटी मनुष्य.
जाणणें
उक्रि. १ समजणें; कळणें; ज्ञान असणें; उमजणें; खात्रीपूर्वक माहीत असणें.'वर्णभेद मनुष्यमात्र जाणतो, पशु जाणत नाहीं.' २ (ल.) ओळखणें; दयेनें,मानानें, गौरवानें वागविणें (जुन्या ओळखीच्या दीन, गरीब माणसास). 'भल्या माणसावर उपकार केला असतां तो जाणतो. ३ जाणीव असणें; मान्य करणें; मानणें; प्रत्युपकाराची, मोबदला देण्याची बुद्धि असणें (नोकरी, श्रम, उपकार याबद्दल) ४ भोगणें; संभोग करणें. ५ गुणविशिष्ट माहीत असणें. 'हा तुम्हांस भला वाटतो पण मी याला पक्का जाणतों.' ६ प्रतिसहकार करणें; लाभानुरूप वागणें. (जनावरांनी). या गाईला खाणें घातलें ती जाणत्ये.' [सं. ज्ञान; प्रा. जाण. फ्रेंजि. जन] न जाणो-कोणास ठाऊक? कोण सांगूं शकेल? असेंहि असेल, असेलहि या अर्थी. जाणत, जाणतजाणत-क्रिवि. जाणूनबुजून; समजूनउमजून; बुद्ध्या; जाणून. जाणतमूर्ख वि. जाणत असून मूर्खपणाचें ढोंग करणारा; ढोंगी मूर्ख. [जाणणें + मूर्ख]
जाणतमूर्ख
वि. जाणत असून मूर्खपणाचे ढोंग करणारा; ढोंगी मूर्ख.
झां(झा)ट
न. १ (अश्लील) शिस्नाच्या किंवा योनीच्या वरील केंस, केंसांचा समुदाय; गृह्यस्थानचे केंस; शष्प. शेट. २ -स्त्री. खालीं लोंबलेल्या बटा. 'मोहालीं पांखरांवरी झांटा । पायीं नोपुरें क्षुद्र घंटा ।' -गीता १.४८२. [सं. जटा? देप्रा. झंटी = लहा- नसा केशकलाप; हिं. झांट] ॰मुंडावण-स्त्री. गुह्येंद्रियावरील केंस काढणें यावरून) (तिरस्कारार्थी) अतिशय क्षुद्र व सोपें काम. [झाट + मुंडावण] झांटोजी-वि. (अशिष्ट) (उप.) व्यर्थ फुशा- रकी मारणारा; ढोंगी; गर्विष्ठ माणूस); क्षुद्र; हलका (माणूस). [झाट]
झाटोजी
वि. (अशिष्ट) (उप.) व्यर्थ फुशारकी मारणारा; ढोंगी; गर्विष्ठ (माणूस); क्षुद्र; हलका (माणूस).
कोंगाडी
वि. सोंगाड्या; ढोंगी; बहुरूपी. कोंगी पहा. 'कोंडाण्यास कोंगाड्याचें सोंग घेऊन ...' -सूर्य ५६. [का.]
कोंगाडी, कोंगी, कोंगीग्या
वि. सोंगाड्या; ढोंगी; बहुरूपी; कोंग सोंग करणारा : ‘कोंडाण्यास कोंगाड्याचे सोंग घेऊन...’ - सूर्य ५६. [क.]
कोंगी-ग्या
वि. कोंग करणारा; ढोंगी; सोंग करणारा; सोंगाड्या. [का.]
कोरडा ब्रह्मज्ञानी
पु. भोंदू; ढोंगी; स्वतः ब्रह्मज्ञानाचा अनुभव नसलेला पण लोकांना त्याचा उपदेश करणारा मनुष्य.
कपटी
वि. १ ढोंगी; खोटा; लुच्चा; गळेकापू. 'कपटी पूर्ण दुरात्मा ।' २ हेकेखोर; मत्सरी; कपटानें वागणारा. [कपट]
(सं) वि० फसव्या, लबांड, ढोंगी.
कपटी, कपटीया
वि. १. ढोंगी; खोटा; लुच्चा; कारस्थानी; गळेकापू. २. हेकेखोर; मत्सरी; कपटाने वागणारा.
कृत्रिमी
वि. १. खोटा; कावेबाज; बेईमानी; ढोंगी : ‘मी काहीं लबाड कृत्रिमी नव्हे.’ - बाळ २·६८. २. बनावट; मुद्दाम केलेला; काल्पनिक; करणीचा. पहा : कृत्रिम
कृत्रिमी
वि. १ खोठा; कावेबाज; बेइमानी; ढोंगी. 'मी कांहीं लबाड कृत्रिमी नव्हे.' -बाळ २.६८. २ बनावट; मुद्दाम केलेला; काल्पनिक; करणीचा; कृत्रिम पहा.
कुभक्त
वि. ढोंगी; भोंदू. [सं. कु + भक्त] कुभक्ति-स्त्री. ढोंगीपणा; भोंदूपणा; कृत्रिम उपसकता; दांभिक भक्ति [सं. कु + भक्ति]
मैंद
पु. एका विवक्षित जातींतील व्यक्ति. हे लोक प्रवासी लोकांना वाटेंत अडवून त्यांचा खून करतात. -वि. १ बुद्धिमंद; जड; सुस्त. २ घातकी; ढोंगी; दांभिक. 'मैंद सोइरी काढिती । फांसे घालोनी प्राण घेती ।' -दा ३.२. 'मैंदाचे स्वीकारिल कवण विचक्षण अमूल्य निष्क-पट ।' -मोउद्योग ६.४९. [सं. मंद; महेंद्र] ॰कर्म-न. खून; दरवडा. 'गर्व सत्यभामेचा निर्दाळुन समुळिहुन करी एक चोर ज्यार दाहाड एक मैंदकर्म आचरी ।' -होला २७. मैंदाची नगरी-स्त्री. सोदे किंवा लबाड लोकांचा कंपू. मैंदाव- वें-न. १ मैंद नांवाच्या लेकांचा दरवडा, अत्याचार. २ मैंद- पणा; घातकीपणा. ३ भुलावणी; मोह. 'येकलें जाववेना संसार मैंदावें ।' -दावि २३५.
मिस. मिसक, मिसकट-टें
म. १ निमित्त. २ रूप; आकार. 'पै अष्टधा भिन्न ऐसें । जें दाखविलें प्रकृतिमिसें ।' -ज्ञा १५.४८४. ॰करा-खोर-वि. ढोंगी; बतावणी करणारा; तोतया. मिसकीन-ल-वि. १ गरीब; अशक्त. २ निरुपद्रवी; शांत (गाय, म्हैस). ३ (ल.) बाहेरून दिसण्यांत गरीब पण आंतून लबाड. [अर. मिस्कीन् = गरीब] ॰बगळा-मात्रागमनी- मादरचोद-मारवाडी-वि. बाहेरून सौम्य, गरीब परंतु आंतून हरामखोर; मुद्रा बावळी परंतु पक्का लबाड असा (इसम).
मिष-स
न. १ निमित्त; ढोंग; बतावणी; सोंग. २ फसवणूक; फसवेगिरी; लबाडी. [सं.] मिषांतर-न. दुसरें निमित्त; निराळी बतावणी. 'वर्षे तेथ मिषांतर । चातुक कीं ।' -ज्ञा १८.१३७७. मिषा-वि. ढोंगी; बतावणी करणारा; खोटें कारण दाखविणारा; सबबी सांगणारा.
मतलबानें बोलणें
स्वार्थ साधण्याच्या दृष्टीनें केलेलें भाषण. मतलबाचें, मतलबी भाषण; ढोंगी, कपटी भाषण.
मठ
पु. १पाठशाळा; धार्मिक शिक्षणसंस्था. २ आश्रम, गुहा. ३ यती, गोसावी, ब्रह्मचारी इ॰चें राहण्याचे स्थान. 'गंधर्व सोडोनिया मठीं । आलीस कां ।' -कथा २.१२.७१. ४ लहान देऊळ. ५ स्थान; जागा. 'ना ते साटवण मठ । ब्रह्मविद्येचे' -ऋ २७ [सं.] ॰भिक्षा-स्त्री. (भिक्षा मागण्यासाठीं बाहेर न जातां) मठांत मिळालेली भिक्षा. मठाधिकार-पु. गोसावी, बैरागी, संन्यासी इ॰ चा विवक्षित काळापर्यंत मठांत राहण्याचा हक्क. [मठ + अधिकार] मठाधिकारी, मठाधिपति, मठाधीश, मठपति-पु. मठांत राहण्याचा हक्क असलेला गोसावी, यति, बैरागी इ॰ मठारा-पु. ढोंगी साधू. 'सांडा सांडा रे मठारे । एकी गांठी सवें धुरें ।' -तुगा ३२५५. मठिका, मठी-स्त्री. १ लहान मठ. २ (विनयानें उल्लेख करतांना) लहान घर. ३ (व.) चावडी.
नाटकी
वि. १. नटाचे काम करणारा; नाचणारा; नट. २. (ल.) ज्याच्या कृतीचा थांग लागत नाही असा. ३. आतल्या गाठीचा; वर एक आत एक असा. ४. ढोंगी; दिखाऊ; खोटा; बहुरूपी. ५. नकल्या. (गो.) ६. नाटकासंबंधी– विषयी.
नकाल
वि. १. नकल्या. २. (ल.) नाटकी; ढोंगी; कपटी. [अर. नक्काल]
नकाल
वि. १ नकल्या. २ (ल.) नाटकी; ढोंगी; कपटी. [अर. नक्काल्-नकल्या]
पाखं(खां)ड
न. १ एका देवतेस पूज्यत्व देऊन इतर देवांची निंदा करावी अशीं जीं हिंदुस्थानांत अनेक मतें झालीं आहेत त्या पैकीं प्रत्येक; नास्तिकमत; वेदप्रामाण्यास झुगारून बुद्धिप्रामाण्य मानणारें मत; धर्मविरोधी मत; (ल.) वितंडवाद. 'किंबहुना उघड । आंगीं भरूनिया पाखांड । नास्तिकपणाचें हाड । रोविलें जीवीं ।' -ज्ञा १६.३१५. 'हरि तुझें नाम गाईन अखंड । याविण पाखंड नेणें कांही ।' तुगा १११०. २ (एखाद्याविरुद्ध रचलेलें) कुभांड; तोहमत; तुफान; कपटजाल. ३ (ढोंगी, दांभिक मनुष्याचें) थोतांड; ढोंग; भोंदूपणाचें कृत्य, गोष्ट. [सं.] पाखं(खां)डी- वि. १ नास्तिक; धर्मलंड; वाममार्गी; जडवादी; वेदांना न मानणारा (मनुष्य, मत, पंथ). २ (ल.) पाखंड, थोतांड रचणारा; दांभिक; भोंदू. [पाखंड]
पीलभक्त
वि. दांभिक; ढोंगी; भोंदू. पीलभक्ति-स्त्री. १ जग परमाणूपासून उत्पन्न झालें आहे असें मत. २ प्रेम व मैत्री याविषयींच्या पोकळ बाता. ३ ढोंगीपणा; दांभिकता. [सं. पिलु- भक्ति]
परूशी, परोशी
पु. १ ख्रिस्ताच्या काळीं यहुदी लोकां- मध्यें एक पंथ होता त्यांच्यापैकीं कर्मठ, गर्विष्ठ व बाह्यशुद्धीला महत्त्व देणारा मनुष्य. 'तेव्हां योहानाचे शिष्य त्याजकडे येऊन म्हणाले, आम्ही व परूशी पुष्कळ उपास करतों.' -मत्त १५. २ ढोंगी. [हिब्रू परूशीम = वेगळे केलेले]
फसवणूक
ढोंगी संपादणूक, बंडलबाजी केली, मागाहूनची सारवासारवी, काहीं थातुरमातुर करून बनविलें, केवळ पोकळ देखावा केला, प्रत्यक्ष पाऊल उलट दिशेनें ! स्वतःच्या कृष्णकृत्यांवर रंगसफेती चढाविली, डाग पुसावयासाठी हें ढोंग उभें केलें, मायावी आश्वासनें दिलीं, करून नामानिराळा, दर वेळीं नवी क्लृप्ती करून मासा गळाला लावला, व्यूह मांडला व शिताफीनें चकविलें, मोहजालाचा प्रयोग गेला, सर्वांना आपल्या अकलेचा प्रसाद देऊन गेला ! या बोटाची थुंकी त्या बोटावर केली व पळवाट काढली, गुंगारा दिला.
सदंभ
वि. दांभिक; ढोंगी; पोकळ डौल आणणारा. [सं. स + दंभ]
शिंदळ
वि. जारकर्मी; बाहेरख्याली; बदफैली; छिनाल; दुराचरणी; व्याभिचारी (स्त्री, पुरुष). [देशी प्रा. छिण्णो, छिण्णाल; हिं. छिनाल; सं. छिद्-छिन्न;क्षुण्ण?] ॰की-स्त्री. (विशे- षतः स्त्रियांना हा शब्द लावतात) जारकर्म; व्याभिचार; दुराचरण; छिनाली; बदफैली. ॰चार-चाळ-टेव-पुअव. बदफैली कर्में; छिनाल नखरे; नटणें, मुरडणें, चट्टीपट्टी करणें इ॰ शिंदळकीच्या चष्टा; दुराचार. ॰तीट-स्त्रीपु. शिंदळ माणसानें कपाळावर लाव- लेली तीट; विशिष्ट प्रकारची नखंरेबाज तीट; टिळा. ॰नखरा- पु. शिंदळचार; व्याभिचारिणीचें नटणें, मुरडणें व हावभाव, बोलणें, चालणें इ॰ ॰वडा-वाडा-पु. जारकमीं व व्यभिचारी लोकांच्या बस्तीची जागा, घर, गांव; (सामा.) व्याभिचार- बाहुल्याचें ठिकाण. ॰सोव-पुअव. (राजा.) व्याभिचारिणी- प्रमाणें ढोंगी वर्तन, लडिकपणा, चेष्टा इ॰. सोव पहा.
शिव्या
ढोंगी, धर्मच्युत, नतद्रष्ट, करंटा, खुनशी, गांवरुंड, बेरड कावळा, लांडगा, संधिसाधू , पाजी, हलकट, भोंदू , नीच, हीन, नाटकी, छाकटा, टवाळ, बजरबट्टू, वृद्ध कपि, इरसाल, इब्लिस, लोचट, शेंद-या, दगड, स्वार्थी, स्वार्थान्ध, कर्तव्य पराङ्मुख, अधम, निमकहराम, नाग, बोथट काळजाचा, उद्दाम, हेकट, अप्पलपोटा, डामरट, सडक्या मेंदूचा, बाजारू, दुर्वृत्त, सभाबाज, चांडाळ, रानटी, सोदा.
सोंग
न. १ नाचकांत घेतलेली भूमिका; वेष; पार्ट. (क्रि॰ आणणें; घेणें; येणें). २ ढोंग; मिष; बनावट वेष; नक्कल; आवि- र्भाव. ३ पोकळ देखावा, थाटमाट; निरुपयोगी व व्यर्थ अडचण करणारी गोष्ट. ४ लोकविलक्षण माणूस; चमत्कारिक वस्तु, प्राणी. [सं. स्वांग; का. सोगु] म्ह॰ १ रात्र थोडी सोंगें फार. २ सारी सोंगें येतात, पैशाचें सोंग येत नाहीं. ॰करणें-हुबेहुब नक्कल, अनुकरण करणें. ॰ढोंग-पु. १ सामन्यपणें सोंग. २ खोडसा- ळपणा. ३ बतावणी. (क्रि॰ करणें; मांडणें; लावणें; माजवणें). ॰संपादणी-स्त्री. घेतलेल्या भूमिकेची तंतोतंत बतावणी. सोंगाडी-ड्या, सोंगळ्या, सोंगी-ग्या-वि. १ सोंग घेणारा; बहुरूपी. २ ढोंगी. म्ह॰ (व.) सोंग्या ढोंग्या पांडुरंगा.
सोव
पु. अव. (राजा.) ढोंग; सोंग (दुखणें, दारिद्र्य इ॰ चें). (क्रि॰ लावणें; करणें; मांडणें). ॰लाव्या-वि. ढोंगी; कोंगाडी.
तोतया
वि० लबाड, लुच्चा, ढोंगी.
तरार
वि. ढोंगी; खिसेकापू; लुच्चा; फसवा; तोतया.
वाण
पु. १ वर्ण; रंग. 'साजत मेघा ऐसा वाण ।' -कीर्तन १.७५. म्ह॰ ढवळ्या शेजारी बांधल्या पोवळा वाण नाहीं पण गुण लागला.' २ नमुना; प्रकार; तऱ्हा. लुगड्याचें वाण. 'कर्मी या नामपाठाचे । वाणें सारी ।' -ज्ञा १८.६०३. ३ बाजू. 'तेया क्रुसाचा येके वाणी ।' -ख्रिपु २.४४.४१. [सं. वर्ण; प्रा. वण्ण] ॰चोर-वि. आपलें खरें स्वरूप लपविणारा; वेषधारी; ढोंगी. ॰ढाळ-वि. विटका; रंग, चेहरा, चर्या उतरलेला; निस्तेज; फिका (रत्न, मोती). ॰पालटण-स्त्री. १ वस्त्रपालट. 'श्रीकृष्णासी वाणपालटण । नामरूपाचें वास संपूर्ण ।' -एरुस्व १६.१५४. २ रंग, चर्या, छटा बदलणें. (चेहरा, सोनें, मोतीं, हिरे यांचा). वाण मारणें-कलाहीन होणें; निस्तेज होणें; फिकें पडणें. निःसत्त्व असणें. 'आज घोढा बाण मारल्यासारखा दिसतो.' ॰माऱ्या- वि. निस्तेज; फिका; उतरलेल्या चेहऱ्याचा; दुर्मुखलेला. वाणलग, वाणेलग-वि. अनेक रंगांचें; भिन्नवर्णी; पंचवर्णी. 'वानलगां वस्त्राचे वोसाडे ।' -ऋ १.४.२३. 'वरि शिरा जाळ उमटे । वाणेलग ।' -भाए २०२. वाणवती-स्त्री. वर्ण; छटा. 'ना तरी पण्हरेयां वाणवती ।' -शिशु २९. [वर्ण]
वेष
पु. १ पोशाख; कपडे; पेहराव. २ पोशाखाची तऱ्हा, प्रकार, रिवाज. ३ बुरखा; सोंग; मिष. ४ रूप. 'मी सूर्याचेनि वेषें । तपें तैं हें शोषे ।' -ज्ञा ९.२९६. [सं.] ॰धारी-पु. १ वेषे, सोंग, बुरखा घेणारा; सोंगाड्या. 'पुरुष-स्त्री वेषधारी.' 'येर मायीक वेषधारी । असत्छिष्य ।' २ ढोंगी. ॰भूषा-स्त्री. वस्त्रालंकार घालणें; पोशाख करणें; प्रसाधना. (इं.) टॉयलेटला नवा प्रतिशब्द.
लठ्ठ
पु. १ सोटा; सोडगा; जाड काठी. २ ओबड-धोबड जळणाचें लाकूड; ओंडकें. -वि. १ विलक्षण मोठा; भक्कम; जाड; धसाडा (मनुष्य, अवयव, दागिना, दोर, दोरी इ॰) २ स्थूल; फोपशा. [हिं.] सामाशब्द- ॰निरंजन, लठ्ठ(ठूं)भारती- पु. (मुळ गोसाव्यां संबंधी रूढ) शरीरानें धष्टपुष्ट, दांडगा मनुष्य (विशेषतः निरक्षर व आडाणी). -वि. १ धष्टपुष्ट. २ बेफिकीर. ३ दांडगा. ४ मूर्ख. लठ्ठा-पु. (व.) मोठा सोडगा. लठ्ठा, लठ्ठू, लठ्ठया-वि. अजस्त्र; अमर्याद मोठा; भक्कम; जाड; भसाडा (मनुष्य, पशु, वस्त्र, भांडें, जिन्नस). लठ्ठ पहा. लठ्ठाई-स्त्री. दांडगाई;जनावराप्रमाणें धुडगूस, लढाई; लठ्ठामिश्र, लठ्ठाश्रम, लठ्ठूबगाड्या, लठ्ठेश्वर-पु. लठ्ठनिरंजन पहा. लठ्ठामिश्रई स्त्री. १ उर्मटपणाचें वर्तन; दांडगाई. २ लठ्ठालठ्ठी. [मिश्र = मैथिली ब्राह्मणाची पदवी] लठ्ठालठ्ठी-स्त्री. सोटे, दांडकीं इ॰ कांनीं परस्परांमध्यें चालणारी मारामारी; (सामा.) भांडण; हमरी- तुमरी. 'आम्हां लोकांत एकी तर इतकी, कीं यत्किंचित् लाभ होण्याचा सुमार दिंसू लागला न लागला तों लठ्ठालठ्ठी सुरू व्हाव- याची!' -के. लठ्ठाश्रम-मी-पु ढोंगी, दांभिक, धटिंगण असा जोगी. लोठाश्रम पहा. 'लठ्ठश्रमाच्या लागून पायीं । विघ्न आणिलें राज्यांत ।' -नव १८.३५. [लठ्ठ + आश्रमी] लठ्ठेश्वर- लठ्ठनिरंजन पहा. लठ्ठ्या-पु. (बायकी) १ दांडगा, स्वैर. मोकाट माणूस. लठ्ठा पहा. २ एखाद्या स्त्रीनें ठेवलेला माणूस; जार.
वाईट
खराब, बिघडलेलें, ढूस, फडतूस, शिळेंपाकें, बद्द, हीन, नालायक, बेकार, निकामी, कुचकें नासकें, अशुद्ध, नाकामयाब, निकम्में, खिळखिळें, कामांतून गेलेलें, फुकट, चाळणी झालेलें, फालतु, भेसळीचें, डागाळलेलें, बेडौल, बेढब, कुरूप, वेडावांकडा,प्रमाणहीन, विशोभित, खरबरीत, कांहीं तरीच ! लठ्ठ, मठ्ठ व ठेंगू , नकटें- चिपें, भसभोंगळ, कलाहीन, नेभळट, सेकंड-हँड, तिय्यम दर्जाचें, कमअस्सल, साधारण प्रतीचें, बाजारी,
निकृष्ट, थर्ड-रेट्, बनावट, जुनाट, बुरसट, वापरलेलें. घाणेरडें, गलिच्छ, मळकट, कळकट, ओंगळ, उष्टें, ओशट, गढूळ, घृणास्पद, ग्राम्य, अस्पष्ट, किरटें, भरड, भडकफडक, प्रेतवत्, कर्कश, कर्णकटु, रासवट, तेंच तेंच, ठराविक, नेहमींचेंच, विटाळी, निषिद्ध, लज्जास्पद, निंद्य, संशयित चालीचें, आसुरी, हीन, हलकट, नीच, भुक्कड, दीड दमडीचे, भिक्कार, सवंग, सामान्य, सस्ते, पैशास पांसरी, कसलें काय नी फाटक्यांत पाय ! बेछूट, निरर्गल, तिखट, चढेल, कडवट, झोंबरें, बोंचरें.
दुटप्पी, दुहेरी, भाडोत्री, ढोंगी, कपटी, स्वार्थी, चोरटें, निर्लज्ज, निलाजरें, खारट-तुरट, गैरवक्तशीर, आळशी, कच्चे, अर्धवट, अपुरें, अपक्व, बिनबुडाचे, गद्यात्मक, निराशाजनक, गैरभरंवशाचा, दुबळा, पोकळ, तकलादू, विशविशीत.
कपट
न. १ छद्म; लबाडी; लुच्चेगिरी; ढोंग; कावा. २ खोटेपणा; असत्यता. ३ मत्सर; हेवा; कृत्रिम भाव; द्वेष- बुद्धि. ४ (कायदा) फसवणूक; भुलथाप; फसविण्याच्या इराद्यानें केलेलें कृत्य. ॰कुभाव-पु. मत्सर आणि दुष्टबुद्धि; वाईट वासना; द्वेष. ॰नाटक-न. कपटी व्यूह, योजना; कपटीपणाचा खेळ. 'कलह नाटक कपट नाटकापेक्षां पुष्कळ बरं !' -कृयु ११. ॰निंदा-स्त्री. व्याजनिंदा; गर्भित स्तुति; बाहेरून निंदा पण खरी स्तुति. याच्या उलट कपटस्तुति. ॰पाश-फांसा-पु. १ इच्छित दान पडावें म्हणून मंत्रादि विद्येनें बनविलेला खेळाचा फांसा; लबा- डीचे फांसे. 'तरी पांडव जिंकावया बळ । एकयुक्ति आहे सबळ । तरी कपटपाश केवळ । वश मज असती ।' -पांप्र २०.६१. २ फसविण्याकरितां केलेली घटना; कट; गुप्त मसलत. ॰बाब-स्त्री. (कायदा) मत्सरानें किंवा दुष्टपणानें उत्पन्न केलेला निराधार खटला; खोटा खटला. ॰मूर्ति-वि. अति लुच्चा, लबाड मनुष्य; कपटाचा मूर्तिमंत पुतळा. ॰युद्ध-न. १ गनिमि काव्यानें चाल- विलेली लढाई; छद्मी लढाई. २ गनीमिकावा; युद्धाचे कपटी डावपेच. ॰रूप-न. खोटें रूप; लबाडीचा वेष; छद्मवेष; ढोंगी रूप. ॰विद्या-स्त्री. लुच्चेगिरीचे डावपेंच; ठकबाजी; कावा; खोटीं कृत्यें आचरणें. ॰वेष-पु. छद्मवेष; स्वतःचें रूप पालटून घेतलेला अन्य वेष; सोंग. -वि. सोंग घेतलेला; रूप पालटलेला. ॰सिंधु-१ (गणित) गुणाकाराची एक पद्धत; गुणकाच्या पहिल्या आंकड्यानें गुण्यास गुणून आलेल्या गुणाकारांत गुणकाच्या राहि- लेल्या आंकड्यांचा गुणाकार मनांतल्या मनांतच मिळवून एकदम गुणाकार मांडणें. गुणाकार पहा. २ फार कपटी मनुष्य; अतिशय लबाड, खोटा, घातकी मनुष्य. ॰स्तुति-स्त्री. व्याजस्तुति; बाह्यतः स्तुति पण आंतून निंदा; व्याजनिंदा; याच्या उलट कपटनिंदा.
निमित्त
न. १ हेतू; उद्देश; मतलब; आशय; अनुसंधान. 'पोट भरावयाचे निमित्तानें माणसें चाकरी करितात.' २ कारण; सबब; प्रयोजन; आधार. 'असे मेघ ही या निमित्तें सखा हो ।' -वामन, वेणुसुधा २.१५. 'तो चोरीच्या निमित्तानें फाशी गेला.' ३ कारणीभूत गोष्ट. ४ खोटी; बहाणा; सोंग. 'पोटदुखीचें निमित्त करून तो घरीं राहिला.' ५ खोटा आरोप; आळ. (क्रि॰ येणें; लागणें; टळणें; लावणें; आणणें; ठेवणें; घेणें; काढणें). 'त्यानें चोरी केली नसतां चोरीचें निमित्त आलें.' ६ चिन्ह.' देखतों मी निमित्तेंही विपरीतेंचि केशवा ।' -गीता (वामन शांडिल्य) ४६. -शअ. साठीं; करितां; करणें. 'चोरी- निमित्त मारलें.' 'विद्यानिमित्त श्रम केला.' [सं.] निमि- त्ताचा-१ आरोपास अथवा दोषास कारण होणारा; ज्यामुळें आळ येईल असा (धंदा; वस्तु वगैरे-जी सकृद्दर्शनीं उत्तम दिसत पण त्यांतील व्यंगामुळें वापरणार्यावर निष्कारण दोष येतो). २ प्रसंगास उपयोगी पडणारा; बहाण्यास पुरे असलेला, नांवाला पुरेसा. जसें:-निमित्ताची देवपुजा, -स्नास-भोजन-दानधर्म. निमित्ताचा धनी-वि. वाईटपणा, दोषारोप, बोल सोसणारा ज्याच्यावर दोष ठेवला जातो असा. 'निमित्ताचा धनी केला असे प्राणी ।' -नवनीत १४५. निमित्ताचा साधु-पु. ढोंगी साधु; वरकरणी साधु.निमित्ताची बायको-नवरा-चाकर-पुत्र-घोडा-इ॰-नांवापुरेशी, गरज भागण्यास उपयोगी बायको इ॰ निमित्ताचें भांडें-पात्र, निमित्ताचें घर-निंदेचें किंवा दोषाचें निमित्त करतां येण्याजोगा (मनुष्य, वस्तु, गोष्ट इ॰. निमित्तास-क्रिवि. देखाव्याकरितां; नांवाला. 'ह्या कामांत कोणी निमित्तास पाहिजे.' निमत्तावर टेकणें-निमित्त सांपडेल केव्हां म्हणून टपून बसणें.निमित्तास टेंकणें-एखादें काम बिघडावें म्हणून निमित्त (स्वल्प कारण) शोधणें. 'त्याच्याशीं अंगदीं बोलूं नका, स्वारी काय अगदीं निमित्ताला टेंकली आहे. तुम्ही एखादा शब्द बोलल्यावर लागलीच वाजंत्री सुरू होईल. सामाशब्द- ॰कारण-न आधारभूत गोष्ट. निमित्त अर्थ ३ पहा. प्रत्यक्ष कर्ता, साधक; विशेषतः सृष्टि निर्माण करणारी देवता, ब्रह्मा; कारण पहा. 'मृत्घटास निमित्तकारण कुलाल.' ॰खोर-वि. १ खोट्या सबबी, बहाणे सांगणारा. २ दोष देण्याची संधि शोधणारा; लहानसहान अपराध शोधून काढण्यासाठीं डोळ्यांत तेल घालून बसणारा. ॰धर्म-पु. एखादा विशेष अथवा प्रासंगिक विधि, कर्म. ॰धारी-भूत-वि.टिक्याचा, टिळयाचा धनी पहा. ॰वाचक धातुसाधित-न. मूळ धातुस ऊं प्रत्यय लावून होणारा धातुसाधित शब्द. उदा॰ बोलूं घेऊं इ॰ निमित्ती-वि. केलेला; उत्पादित; कारणीभूत. (समासांत ) एतन्निमित्ती, तन्निमित्ती. निमित्य- न. (प्र.) निमित्त. 'दुसर्याची बुद्ध ऐकत निमि त्याशी ।' -ऐपो १५७.
नाटक
नपु. १ सोंग घेऊन करण्याचा खेळ; एखादी गोष्ट (ऐतिहासिक, कल्पित किंवा पौराणिक) अनेक स्त्रीपुरुष पात्रां- कडून प्रत्यक्ष घडल्याप्रमाणें करून दाखविणें; नाट्यरूपक. दशरूप लक्षणांतील दहा प्रकारांतील नाटक हा पहिला प्रकार आहे. उदा॰ शाकुंतल नाटक, वेणीसंहार नाटक. २ काव्यांतील एक प्रकार. ३ ढोंग; सोंग; बतावणी. 'पुरुषोत्तमरावांच्या पत्नीसमोर त्यांनीं चांगलेंच नाटक केलें.' ४ फजीती; तमाशा; बेअब्रूची गोष्ट. 'नाटक झालें जन्माचें मनिं कांहो येइना ।' -शारदा १.१. -वि. नाटकी; खेळ करणारा. [सं. नट् = नाचणें; अभिनय करणें] ॰गृह, नाट्यगृह-मंडप-मंदिर-शाला-नस्त्री. १ नाटकाचे प्रयोग व इतर खेळ पाहण्याकरितां प्रेक्षकांच्या सोयीची अशी बांधलेली इमारत. (इं.) थिएटर ॰शाला-ळा-स्त्री. १ रंगमहाल; खास महाल; जनानखाना; अंतःपुर. २ (समुच्चयार्थीं) उपस्त्रिया; रखेल्या. ॰शाळ-ळा, साळ-स्त्री. एखादे पोरीस विकत घेऊन, नाचणें, गाणें इ॰ शिकवून उपभोगार्थ ठेवितात ती; नर्तकी; रखेली; राख; ठेवलेली बायको. 'संभाजी राजे यांचे पुत्र शिवाजीराजे व येसू बाईसाहेब व आणखी नाटकशाळा.' -मराचिसं २६. नाटकी- वि. १ नटाचें काम करणारा; नाचणारा; नट. २ (ल.) ज्याच्या कृतीचा थांग लागत नाहीं असा. 'तैसा श्रीकृष्ण सर्वचित्तचालक । जो मनोबुद्धीचा प्रवर्तक । तेणें मांडिलें कौतुक । परम नाटकी श्रीहरी ।' -ह ४.३७. ३ आंतल्या गांठीचा; वर एक व आंत एक असा. 'हा कारभारी मोठा नाटकी आहे.' ३ ढोंगी; दिखाऊ; खोटा; बहुरूपी. ४ (गो.) नकल्या. ५ नाटकीय; नाटकासंबंधीचें; नाट्यविषयक. नाटकी-क्या-पु. छचोर माणूस.
गूळ
पु. आटवलेला उंसाचा रस; पदार्थाला गोडपणा येण्यासाठीं रस आटवून केलेला घन पदार्थ; साखरेचा कच्चा प्रकार, अवस्था; तांबडी साखर. [सं. गुड; प्रा. गुल; पाली गुळ; कों. गोड; खा. गूय] (वाप्र.) ॰करणें-उपहास, निंदा करणें. ॰देणें-हातीं देणें-१ लालूच दाखविणें; लांच देणें. २ फसविणें; भुरळ घालणें; झुलविणें; तोंडावर हात फिरविणें. ॰पुर्या वाटणें-हौस पुरविणें. गुळमटणें-१ (राजा.) अंबा; चिंच इत्यादींनी गुळमट, गोडसर होणें. २ गुळमटणें; संदिग्ध, अड- खळत बोलणें. म्ह॰ १ गाढवास गुळाची चव काय? २ जो गळानें मरतो त्याला विष कशाला? सामाशब्द- ॰आंबा, गुळंबा-ळांबा, गुळांब-पु. एक पक्वान्न. गुळाच्या पाकांत शिजविलेल्या आंब्याच्या फोडी; गुळाचा मोरंबा. ॰कैरी-स्त्री. (व.) गूळ घालून केलेलें बिन मोहरीचें आंब्याचें लोणचें. ॰खोबरें-न. (गूळ आणि खोबरें यांचा खाऊ). १ (ल.) निवळ फसवणूक; लांच; लालूच. 'गुळखोबरें विलोकुनि भलत्याहि जनासि बाळक वळावा ।' -मोउद्योग ७.९. २ पोकळ भाषण, वचन. ॰चट-चीट-मट-वि. १ थोडेंसें गोड; गोडसर. 'येक्या सगें तें कडवट । येक्या सगें तें गुळचट ।' -दा ११.७. १६. २ (तंजा.) गोड; मधुर. ॰चट, चीट-गूळसाखर वगैरे गोड पदार्थ. गुळण्णा-पु. (गो.) गुळाचा गणपति. [गूळ + अण्णा] गुळत्र- य-न. गूळ, राब, काकवी यांचा समुदाय. 'मद पारा गुळत्र ।' -दा १५.४. १५. गूळदगड-धोंडा-पु. १ गुळाच्या ढेपेंत सांप- डणारा दगढ. 'गुळासारिखा गुळदगड । परी तो कठिण निचाड ।' -दा ८.५. ४७. २ (ल.) ढोंगी, कपटी मनुष्य. ॰धवा-धा- धिवा-धुवा-देवा-धेवा-धावी-पु. केवळ तांबडा नव्हे, केवळ पांढरा नव्हे असा मिश्र रंग; गुळी रंग. -वि. अशा रंगाचा (मोती, इ॰ पदार्थ). ॰धानी-वि. लालसर; गुळधवा रंगाचा (मोती). ॰पापडी-स्त्री. १ एक पक्वान्न; गुळांत पाकविलेल्या रव्याच्या वड्या. २ (राजा.) गुळाच्या पाकांत भाजलेली कणीक वगैरे घालून केलेले लाडू. ३ (ल.) एखाद्यानें मागें अपराध करून समक्ष गोड गोड, कपटी भाषण करणें; गुळगुळ थापडी; गुळमट; गुळवणी ॰पीठ-न. एकमेकांचा दाट स्नेह; मेतकूट; एकी; सलोखा; एक विचार. ॰पोळी-स्त्री. गूळ घालून केलेली पोळी. गुळमट, गुळंबट-१ गुळचट अर्थ १ पहा. २ (गो.) आंबटसर. ॰मारी-- स्त्री. दर उसाच्या मळ्यापाठीमागें २२।। शेर गूळ घ्यावयाचा कर. ॰वणी, गुळेणी, गुळोणी-न. १ गुळ मिश्रित पाणी. २ (कु. व.) गुळाच्या पाण्याचें कालवण (पोळीशीं खाण्यासाठीं). यांत कधीं थोडें पीठहि घालतात. [गूळ + पाणी] ॰वरी, गुळोरी-स्त्री. एक खाद्य. पक्वान्न; गुरोळी पहा. 'मांडा सारखपांडा गुळवरी ।' -एभा २७.२९०.; -ह १०.३४. गुळवा-गुळावा-गुळवी- व्या-गुळ्या, गुळरांध्या-पु. गूळ तयार करणारा. [गुड- वाहक] ॰शील-शेल-शेलें-न. (व.) तांबडा भोपळा उकडून त्यांत दूध, गुळ घालून केलेली खीर. गुळाचा गणपती- गणेश-पुवि. १ आळशी; मंद; गलेलठ्ठ; अचळोजी. २ होयबा; बुळा; दुर्बळ; शेणाचा पोहो. म्ह॰ गुळाचा गणपति गुळाचाच नैवेद्य = वस्तुतः एकच असणार्या दोन व्यक्ती; ज्याचें त्यासच देणें. गुळार, गुळहार-गुर्हाळ पहा. गुळेरस-पु (हेट.) नारळाचें दूध व गूळ घालून केलेलें पिठाचे गोळे यांचें बनविलेलें एक पक्वान्न.
हरि
पु. १ विष्णु; कृष्ण. 'हरि ज्यांचा कैवारी त्या पांडु- सुतांसि वंदितों भावें.' -मोआदि १.७. (समासांत) हरि-सत्ता-कीर्तन-कथा. २ जुन्या संकृत व प्राकृत वाड्मयांत हरिशब्द पुढील अर्थानें आढळतो. उदा॰ घोडा; सिंह; माकड; बेडुक; सुर्य; इंद्र; यम, वायु, चंद्र, प्रकाशकिरण, पोपट; सर्प इ॰. ३ पृथ्वीच्या नऊ वर्षां- (भागां) पैकीं एक वर्ष (हें निषध व हेमकूट यांच्यामध्यें आहे). [सं.] ॰खग-पु. विष्णुवाहन; गरुड. 'त्याच्या विमान येईल काय न येतांचि हरिखग मनातें.' -मोवन. ॰गण-पु. वानरसेना. 'सुग्रीवें घालुनि आपुली आण । आणविले सप्तद्वीपाचे हरिगण ।'. ॰चंदन- पु. पिवळा चंदन; कुंकुमागरु. -न. केशर. ॰जन-पु. महार, मांग, भंगी इ॰ अस्पृश्य मनुष्य व जात (महात्मा गांधींनीं तयार केलेला शब्द). ॰जागर-पु. एकादशीच्या रात्रीचें जागरण. 'दशमीव्रत एकभुक्त साचार । एकादशी उपोषण हरिजागर ।' ॰दास-पु. १ हरीचा भक्त, उपासक. २ कथेकरी, हरदास पहा. ॰दिन-दिनी-पुस्त्री. एकादशी. -जैअ १७.१२४. ॰दिशा-स्त्री. पूर्वदिशा. 'हरिदिशेप्रती गमन करी । तों पुढें सह्याद्री देखिला ।' -जैअ १६. २. ॰द्वार-पु. उत्तर हिंदुस्थानांतील एक तीर्थ क्षेत्र; येथें गंगा हिमालयांतून बाहेर सपाटीवर येते. ॰नाख-ग- वि. १ एकरंगी पण पाठ पांढरी असणारा (घोडा). -मसाप २. १.२ दोन्ही कानांत आणि डोक्याच्या केसांत भोंवरा असलेला (घोडा). -अश्वप १.१०१. ॰पद-न. मेषसंपात; महाविषवु. [सं.] ॰पाठ-पु. विठ्ठलभक्तिपर नामदेवरचित अभंग. ॰भक्त-वि. १ विष्णुभक्त. (विशेषतः) हरिनाम घेत संन्यासवृत्तीनें फिरणारा भक्त. २ (ल.) पक्कां नास्तिक; दांभिक; ढोंगी. ३ (ल.) भोळसर; वेडसर. ॰भक्तपरायण-वि. भगवद्गक्त; संत; हरदास. ॰रंगण-न. देवापुढील भजन किंवा नृत्य करण्याची जागा. -एभा १७.१९०. 'गरुडपार हरिरंगणीं । टाळ मृदुंगाचा ध्वनी । ॰वर्ष-न. हरि अर्थ ३ पहा. ॰वासर-पु. १ द्वादशीचा प्रथम पाद; तिथिवासर (यांत भोजन करावयाचें नसतें). २ आषाढ, भाद्रपद, कार्तिक या महिन्यांतील शुद्ध द्वादशीचा व अनुक्रमें अनुराधा, श्रवण, रेवती या नक्षत्रांचा योग; नक्षत्रवासर. ॰विठ्ठल-उद्गा. भजनांतील नामोच्चार. -न. (ल.) सत्त्यानाश; नासधूस; सर्व समाप्ति; कार्यहानि इ॰ ॰हरीचा लाल-पु. वि. १ चैनी मनुष्य; रंगेल मनुष्य. 'डफ तुणतुणे वाजविणारें हरीचे लाल कोण असतील ?' -स्वप २९. २ कोणी तरी, कोठला तरी माणूस.
कोरडा
वि. १ अनार्द्र; शुष्क; जलहरित; आर्द्रताविरहित. 'ते रेड भरतही तसा रडे जोंवरी नयन होति कोरडे ।' -वामनभरत भाव १६. म्ह॰ कोरड्याबरोबर ओलेंहि जळतें = अपराध्याबरोबर निरपराधी गरीबहि चिरडला जातो. २ नुसतें; कोरड्यास बरोबर कांहीं नसलेलें; दूध, दहीं, वगैरे पातळ पदार्थांचें कालवण नस- लेलें (अन्न). ३ नक्त (जेवणाशिवाय मजूरी); उक्ते. 'मला कोरडे तीन रुपये मिळतात.' ४ (लक्षणेनें निरनिराळ्या ठिकाणीं हा शब्द योजतात. -जसे) औपचारिक; शुष्क; पोकळ; वर- कांती; निष्फळ; बिनहंशिलाचा; बिनफायद्याचा; निरर्थक; ओला (विशेषतः ओलाव्याचा) याच्या उलट. 'किं वेदांतज्ञाना- वांचून । कोरडी व्यर्थ मतिशून्य।' 'बारा वर्षें पढत होतों परंतु कोरडा.' कोरडा-आदर, मान, प्रतिष्ठा-ममता-बोलणें-व्यवहार -श्रम इ॰ पहा. ५ व्यर्थ, फुकट. 'हिंडणवारा कोरडा । तैसा जया' ज्ञा १३.६८९. 'कांहीं लाभावाचून कोरडी खटपट कोण करतो.' ६ (ल.) वांझ. म्ह॰ 'कोरड्या अंगीं तिडका, बोडक्या डोईं लिखा.' सामाशब्द- ॰अधिकार-पु. १ नुसता पोकळ, नांवाचा अधिकार. २ बिनपगारी अम्मल, हुद्दा; बिनावेतन काम. ॰अभि- मान-पु. पोकळ मिजास; रिकामा डौल; अज्ञानी अहंकार. ॰आग्रह-पु. वरवरचें आमंत्रण; इच्छा नसतांनां बाह्यात्कारें बोला- वणें. पैठणी आग्रह. ॰आदर-पु. औपचारिक सन्मान. मनांत कांहीं पूज्यभाव नसतां बाह्यात्कारें केलेला गौरव. (विवाहादि समारंभांत) शाब्दिक सन्मान. ॰खडक-पु. १ अतिशय कठिण, टणक खडक. खडक पहा. २ (ल.) अडाणी. ३ कोरडा पाषाण पहा. ॰टांक-वि. (अतिशयितता व्यक्त करण्यासाठीं) अतिशय शुष्क, कोरडी (नदी, विहीर, तलाव वगैरे). [कोरडा + टांक = बिंदु, कण] ॰डौल-पु. रिकामा दिमाख; खोटा बडिबार, मोठेपणा. ॰दरमहा-पगार-मुशारा-पु. नक्त वेतन (जेवणाशिवाय) ॰द्वेष-पु. विनाकारण मत्सर. ॰धंदा-पु. आंत बट्याचा, बिन नफ्याचा उद्योग. ॰पाषाण-पु. १ कठीण, ठणठणीत दगड. २ (ल.) उपदेशाप्रमाणें आचरण न करणारा असा माणूस; चांगल्या गोष्टीचा परिणाम न झालेला माणूस. म्ह॰ लोकां सांगे ब्रह्मज्ञान । आपण कोरडा पाषाण. ॰ब्रह्मज्ञानी-वि. भोंदू; ढोंगी. स्वतः ब्रह्मज्ञानाचा अनुभव नसलेला पण लोकांना त्याचा उपदेश करणारा मनुष्य. ॰मान-पु. पोकळ, रिकामा, काम न करतां मिळणारा, दिलेला मान; कोरडा-आदर पहा. ॰विचार-पु. १ निष्फळ, निरर्थक चौकशी शोध. २ निष्क्रिय बडबड, विचार. ॰विश्वास-पु. वरवरचा विश्वास. ॰व्यवहार- पु. १ कोरडा धंदा पहा. २ रिकामा, निष्कारण उद्योग. ॰सत्कार- पु. १ पोकळ, वरवर सन्मान. २ गैरफायद्याचा मानमरातब; निर- र्थक बडेजाव. ॰सा-वि. वाळल्याप्रमाणें; शुष्कप्राय. ॰स्नेह-पु. वरवरची प्रीति; पोकळ मैत्री. कोरडेकष्ट ॰श्रम-पु. (अव.) विनाफायदा, निरर्थक श्रम; व्यर्थ मेहनत. कोरड्या टांकाचा हिशेब-हिशोब-हिसाब-पु. ज्यांत यत्किंचितहि फेरबदल करण्यासाठीं लेखणीचा टांक शाईंत बुडविला गेला नाहीं असा स्वच्छ, शुद्ध, बिनचुक लिहिलेला जमाखर्च, तक्ता; चोख हिशेब. (क्रि॰ देणें; करणें) ॰कोरड्यास-ला, कोरडेशास-ला, कोरड्याशास-ला-क्रिवि. (कोरडा-याचें विभक्तीरूप) भाकर इत्यादि कोरडी खाववत नाहीं म्हणून त्याबरोबर धेण्या. करितां (तूप, वरण वगैरे पातळ कालवण); तोंडी लावण्यास (गो.) कोरड्याक, -न. कालवण; तोंडीलावणें. 'आज कोरड्याशास काय केलें ? -कढी केली, भाजी केली.' कोरडी-वि. शुष्क; वाळलेली; कोरडा पहा. सामाशब्द- ॰आग-स्त्री. भयंकर मोठी आग. याचे उलट, ओली आग = अतिवृष्टीनें होणारें नुकसान. म्ह॰ कोरडी आग पुरवते पण ओली आग पुरवत नाहीं. = पाठीवर मारलेलें चालतें पण उपासमार झालेली सोसवत नाहीं. ॰ओकारी-स्त्री. १ घशांत बोटें घालून मुद्दाम काढलेली ओकारी. सकाळीं तोंड धुतांना घशांत बोटें घालून काढलेले खाकारे. (क्रि॰ देणें; काढणें). २ ओकारी येतेसें वाटणें. (क्रि॰ येणें). पोटांत ढवळल्याप्रमाणें होऊन मळमळ सुटते आणि थुंकी पडते, हृदयांत पीडा होते, ओकारी येते परंतु अन्न पडत नाहीं, अशा वेळीं म्हणतात. -योर १.२७७. ॰सवाशीण-स्त्री. जेवणाखेरीज ओटी भरून कुंकू लावून जिची बोळवण करतात अशी सवाशीण. ब्राह्मणेतरांच्या घरीं अशी ब्राह्मण सवाशीण बोलावितात. ॰किटाळ-स्त्री. १ (शब्दशः) कोरडी ठिणगी. २ (ल.) तोहंमत; आळ. (क्रि॰ घालणें; उठवणें; घेणें). ॰किरकिर-स्त्री. विनाकारण कटकट, तक्रार, पिरपीर, भुणभुण; निष्कारण त्रास. ॰खाकरी-स्त्री. कोरडी ओकारी पहा. (क्रि॰ देणें, काढणें) [खाकरणें] ॰चाकरी-स्त्री. १ वेतन, मजुरी घेतल्याशिवाय चाकरी; निर्वेतन सेवा. २ रोख पैसा घेऊन जेव- णाशिवाय चाकरी; कोरडा दरमहा. ॰जांभई-जांभळी-स्त्री. श्रमामुळें आलेली (झोंपेमुळें नव्हे) जांभई. ॰दारू-स्त्री. वाय. बाराची दारू; वायबार. ॰प्रतिष्ठा-स्त्री. औपचारिक मानसन्मान. हातीं पैसा नसतां अगर अंगांत कर्तबगारी नसतां मिरवलेला डौल. कोरडा मान पहा. ॰भिक्षा-स्त्री. तांदूळ, गहूं, वगैरे धान्याची भिक्षा (शिजविलेलें अन्न, माधुकरी शिवाय). ॰ममता-माया- स्त्री. वरकांती दाखविलेलें प्रेम; लोकाचारास्तव दाखविलेला सभ्यपणा. ॰मेजवानी-स्त्री. अन्नाशिवाय मेवामिठाईंची आणि फळफळावळीची मेजवानी; उपहार. ॰मैत्री-स्त्री. वरवरचें प्रेम; अंतःकरणापासून प्रेमनाहीं अशी मैत्री. -ड्या गाथा-स्त्री. अव. बनावट बातम्या; भुमका; कंड्या. [कोरडी + गाथा] कोरडें-वि. वाळकें; निष्फळ; शुष्क. कोरडा-डी पहा. सामाशब्द- कोरडें खाणें-आवश्यक वस्तूंचा अभाव भासणें; आवश्यक म्हणून इच्छिणें त्यामुळें त्रास होणें (निषेधार्थीं रचना). 'मी काय त्यावांचून कोरडें खातों' = तें नाहीं म्हणून माझें नडतें कीं काय ? ॰अंग- न. वांझपणा; वांझ कूस. ॰काम-न. १ विटाळशेपणीं व पांचवे दिवशीं न्हाऊन शुद्ध होण्यापूर्वीं करावयाचें काम. 'चौथ्या दिवशीं बायका कोरडे काम करतात.' २ वेळ घालविण्याकरितां केलेलें सटरफटर काम. ॰तप-न. श्रद्धाहीन, भक्तिहीन तपश्चर्या, आरा- धना. 'जळो जळो त्याचा प्रताप । काय चाटावें कोरडें तप । जैसें विगतधवेचें स्वरूप । यौवन काय जाळावें ।' ॰बोलणें, भाषण-न. वरकांती, मनापासून नव्हे असें भाषण, बडबड. ॰ब्रह्मज्ञान-न. आचरण नसतां सांगितलेला वेदांत, परमार्थविद्या; बकध्यान; भोंदूपणा, ढोंग. ॰वैर-न. निराधार द्वेष, मत्सर. ॰वैराग्य-न. विषयाचा खरा तिटकारा आल्याखेरीज दाख- विली जाणारी पोकळ विरक्ति; साधूपणाचें ढोंग; निवृत्तिमार्गाची बतावणी. ॰सुख-न. उपभोगाशिवाय सुख; नांवाचा आनंद. कोरडया अंगीं तिडका-१ गर्भ नसतां बाळंतपणाच्या वेदना भासविणें. २ ढोंग; भोंदूपणा.
रंग
पु. १ केवळ चक्षुरिंद्रियानां जाणतां येतो असा पदार्थांच्या ठिकाणीं जो पांढरेपणा, तांबडेपणा इ॰ वर्ण तो; एखद्या वस्तूवर प्रकाश पडला असतां ती वस्तु ज्या रंगाची असेल त्या रंगाच्या किरणाशिवाय इतर किरण शोषले जाऊन त्या रंगाचे किरणच फक्त बाहेर टाकते. त्यास रंग म्हणतात. -ज्ञाको (र) २. २ रंगाची पूड; पदार्थाला तांबडा, काळा इ॰ कोणताहि वर्ण देण्याचें द्रव्य; रंगविण्याचें द्रव्य. ३ (ल.) तेज; तेजस्विता, चकाकी; भपका; गायन, कीर्तन, तमाशा, भाषण, इ॰ चा लोकांचीं अंतःकरणें रमण्याजोगा पडणारा शोभाविशेष; मजा; शोभा; आनंद. 'आजचे गाण्यास रंग चांगला आला. ' ४ देखणेपणा; उत्कृष्टता; चांगली स्थिति (मनुष्य, वृक्ष, बाग, शेत इ॰ पदार्थांची किंवा संसार, व्यवहार इ॰ ची). 'नुकता संसार रंगास आला तों बायको मेली. ' ५ देखावा; आकार; ढब; डौल; घाट; अंदाज; चिन्ह; परिस्थिति; प्रसंग; संधी. (क्रि॰ दिसणें). 'आज गरमी होती तेव्हां पाऊस पडेलसा रंग दिसतो.' 'उन्हाचा-वाऱ्याचा-आभाळाचा-दिव- साचा-काळाचा-धारणेचा-भावाचा-पिकाचा-चाकरीचा-रंग. ' 'तूं शालजोडी मागशील तर पहा, मागण्याचा रंग आहे. ' ६ सोंगट्यांचे चार भिन्न प्रकार; गंजिफांचे निरनिराळे दहा प्रकार; पत्त्यांच्या चार बाजू प्रत्येकीं. ७ गंमत; मजा; तमाशा; खेळ. 'भंगकरी रंग, अफू करी चाळा, तंबाखू बापडा भोळा. ' ८ रंगण; क्रीडास्थान (नाट्य, नृत्य इ॰ चें); हौदा; आखाडा; रंगभूमी; सभागृह; सभामंडप. 'असें बोलून इकडे तिकडे फिरते आणि रंगांतून पडद्यांत निघून जाते.' -क्रमं २; -मोआदि २६.२१. ९ नवरा; पति (समासांत स्त्रीच्या नांवापुढें योजतात). 'सीतारंग.' १० विचार; बेत. 'जाणत्याचे जाणावे प्रसंग । जाणत्याचे घ्यावे रंग ' -दा १८.२.१२. ११ तऱ्हा; ढोंग. 'बहु शिकला रंग चाळे । खरें खोटें इचे वेळे. -तुगा १३५९. १२ गाणें, बजावणें, नृत्य इत्यादि करमणुकीचा प्रकार. 'आजि कुमारिकेच्या महा- लासी । रंग होतो दिवसनिशीं । ' -शनि २४६. १३ थाटमाट. ' रंग स्वर्गीचा उतरे । ' -दावि ५०४. १४. महत्त्व ' या कारणें कांहीं रंग । राखोन जावें ' -दा १७.७.२१. १५ विवाह, शिमगा इ॰ प्रसंगीं एकमेकांच्या अंगावर केशर इ॰ चें रंगीत पाणी टाकतात तें किंवा तें टाकण्याचा समारंभ. १६ प्रेक्षकांचा किंवा श्रोत्यांचा समुदाय. १७ चुना; सफेती; उजळा. (क्रि॰ देणें). [सं. रञ्ज्-रंग देणें; फा. रङ्ग; हिं. रंग] (वाप्र.) ॰उडणें- १ मूळचा रंग जाणें, फिका होणें; तेज कमी होणें. ॰करणें- मजा मारणें; मौज करणें. ॰खेळणें-विवाहादि प्रसंगीं एकमेकांच्या अंगावर रंग उडविणें. ॰चढणें-अंमल, निशा, मद, धुंदी येणें. ॰दिसणें-एखादी गोष्ट होईलशी वाटणें, आकारास येणें; संभव असणें. 'तरी यापुढें जें एकंदर अवस्थांतर होण्याचा रंग दिसत आहे.' -नि. ॰भरणें-१ भरास येणें; जोमांत येणें; मजा येणें. 'भलत्या प्रसंगीं भलत्या तालाची चीज सुरू केलीत तर रंग भरेल कां ? ' -नाकु ३.४६. २ रंग आणणें. 'रंग भरिती अद्भूत । ' -सप्र १०.८८. ३ तडजोड करणें. -पया १४०. ॰मारणें-- बाजी मारून नेणें. 'रहस्य राखून रंग मारला । ' -ऐपो २५३. ॰राखणें, रंगाची मोट बांधणें-विजयानें, वैभवानें हुरळून न जातां सभ्य आणि सौम्य वर्तन कायम ठेवणें; आपल्या प्रति पक्ष्यांवर वादांत किंवा कांहीं कामांत आपण सरशी मिळविली असतां आपण दिलदारीनें त्याच्याशीं वागणें; त्या सरशीच्या जोरावर त्याच्याशीं कठोरपणा न करणें; त्याला न हिणविणें; अधिक पेंचांत ढकलण्याचा प्रयत्न न करणें. ' त्यानें मी चुकलों असें कबूल केलें तें बस झालें, आतां काय रंगाच्या मोटा बांधा- वयाच्या आहेत ? ' ॰शिंपणें-होळीचे अगर लग्नाचे वेळी रंगाचें पाणी उडविणें, फेकणें; रंग खेळणें. रंगाचा भंग करणें-आनं- दाचा बिरस करणें. रंगांत येणें-तल्लीन होणें; रंगून जाणें. चढणें- शोभा प्राप्त होणें; खुलून दिसणें; पूर्णतेस येणें; विकास पावणें; भरास येणें. रंगास-रंगारूपास आणणें-येणें-चढणें-१ फलद्रूप होणें-करणें; वैभवशाली, सुखावह करणें; आरंभिलेलें कार्य अनुकूल संस्कारादिकांनीं चांगल्या स्थितीला आणणें, येणें. 'माझ्या ग्रंथाचा मी नुसता कच्चा खरडा तयार केला आहे. तो रंगारूपास आणावयास वर्ष दीड वर्ष तरी लागेल. ' २ (तिरस्का- रार्थी) एखाद्या तऱ्हेस, आकृतीस, विशिष्ट अवस्थेस पोंचणें, पोचविणें. ' हा आतां राम म्हणावयाचे रंगास आला. ' सामा- शब्द- ॰आखाडा-पु. कुस्ती खेळण्याची जागा. 'धनुर्याग आरंभिला । मल्लें रंगआखाडा केला । ' -कथा ४.६.३७. ॰काम- न. १ रंग देण्याचें, रंगाचें काम. २ (रंगारी धंदा) धाग्यावर रंग चढवून तो पक्का बसविण्याची क्रिया; (इं.) डाइंग. ॰डाव- बाजी-पुस्त्री. गंजिफा, पत्ते खेळण्याचा एक प्रकार. ॰डी, रंगडी ढंगडी-धंगडी-स्त्री. १ ढंग; चाळा. २ फसगंमत; फसवेगिरी; खोडी; लबाडी; डावपेंच इ॰ (अनेक वचनी उपयोग). [रंग + ढंग] ॰ढंग-नपु. १ युक्ति; कारवाई; फंद; चाळा; लटपट; कावा. (क्रि॰ करणें; मांडणें; चालविणें). २ रागरंग; स्वरूप; एकंदर देखावा. ३ नाचरंग वगैरे; स्वच्छंदी आचरण. रंगणावळ-स्त्री. रंगविण्याबद्दलची मजुरी; रंगविण्याचा खर्च. [रंगणें] ॰दार-वि. १ मनोहर रंग असणारा (पदार्थ, फूल, वस्त्र इ॰) २ रंगेल गमत्या; विनोदी विषयी; चैनी; (माणूस) ३ रंगीत; रंगविलेले; रंगीबेरंगी. ॰देवता-स्त्री. गाणेंबजावणें, कथा पुराण, प्रवचन, व्याख्यान इ॰ कांस जिच्या प्रसादानें रंग येतो, यश मिळतें अशीं एक कल्पित देवता; खेळांत रमणीयता आणणारी देवता. २ खेळांची अधिष्टात्री देवता. [सं.] ॰द्रव्यें-नअव. (रसा.) जीं द्रव्यें सूर्यकिरणांचा कांहीं विशिष्ट भागच फक्त आरपार जाऊं देतात अथवा परावृत्त करतात व बाकीचा भाग नष्ट करून टाकतात तीं द्रव्यें. -ज्ञाको (र) ३. २ रंगविण्याच्या कामीं लागणाऱ्या वस्तू, पदार्थ. ॰नाथ- पु. कृष्ण; श्रीकृष्णाची बालमूर्ति. [सं.] ॰पंचमी-स्त्री. फाल्गुन वद्य पंचमी. या दिवशीं एकमेकांवर रंग उडवितात. ॰पट-पु. रंग- ण्याची खोली; पात्र रंगून तयार होण्याकरितां केलेली जागा; (इं.) ड्रेसरूम, ग्रीनरूम. [सं.] ॰बहार-पु. १ मौज. कमालीचा आनंद; सुख; आनंदाची लूट (क्रि॰ करणें मांडणें; होणें) ' रंगबहार एकांतीं लुटा । घर सुंदर कर पोपटा । ' -प्रला १४०. २ भव्य, आनंददायक दृष्य; थाटमाट. ३ नानाप्रकारच्या करमणुकी, खेळ, कसरती किंवा त्या जेथें चालतात तें ठिकाण. ४ मुबलकता; पीक इ॰ ची आनंदप्रद रेलचेल. 'पिकांचा-धान्याचा-आंब्यांचा-लाड- वांचा-जेवणांचा-रंगबहार. [रंग + बहार] ॰बाजी-स्त्री. पत्त्यांनीं खेळण्याचा एक प्रकार; पत्त्यांतील एक खेळ; रंगडाव. ॰भंग- पु. विरस; आनंदाचा नाश; मध्येंच एकदम येऊन खेळ थांबविणें, बंद करणें; खेळांतील आनंद, गोडी न वाटेल असें करणें. ॰भूमि-स्त्री. १ नाटकगृह; प्रयोग किंवा नाटक करून दाख- विण्याची जागा; सभागृह; सभामंडप. २ मर्दानी खेळांचें मैदान; रणांगण. [सं.] ॰मंडप-पु. कुस्त्या वगैरे खेळण्यासाठीं घातलेला मांडव. [सं.] ॰मंडपी-स्त्री. खेळाची अथवा करमणुकीची जागा. [सं.] ॰महाल-पु. विलासमंदिर; दिवाणखाना; आरसे व तजबिरी लावून सुखोपभोग घेण्यासाठीं केलेलें घरांतील दालन; श्रीमंत लोकांची आरशांनीं, रंगीबेरंगी चित्रांनीं सुशोभित केलेली विलास करण्याची खोली; (विशेषतः) निजण्याची खोली. [फा.] ॰माळ-स्त्री. लग्न वगैरे समारंभाच्या मिरवणुकीपुढची नक्षत्रमाळा; रंगीबेरंगी कागदांचीं अथवा बेगडांचीं फुलें कातरून दोऱ्यांत ओवून काठीला बांधून लग्नकार्यांत धरण्याच्या माळा. [सं. रंग + माला] ॰माळा-स्त्री. १ रांगोळीचीं चित्रें; रांगोळी. 'प्रवर्तोनि गृहकामीं रंगमाळा घालुं पाहती ।' -भूपाळी घनश्यमाची २०. २ सिंहासन अथवा मूर्तीचें देवालय याचे भोवतीं तिन्ही बाजूंनीं बसविलेल्या लाकडी अगर धातूच्या सोंगट्या अथवा निरनिराळ्या आकृतीचीं चिन्हें. ३ नक्षत्रपुंज; तारे. ४ नक्षत्रमाळा; (सामा.) रंगमाळ ॰मूर्तिं-स्त्री. ज्याच्यामुळें समारंभास विशेष शोभा येते असा मनुष्य अथवा मूर्ति; कृष्णाचें बालस्वरूपी लांकडी अथवा धातूचें छायाचित्र; श्रीकृष्णाची मूर्ति. [सं.] ॰मोड-स्त्री. रंगभंग; ऐन भरांत खेळ आला असतां विरस होणें; हिरमोड; उत्साहभंग; आनं- दाचा नाश; खेळाचा चुथडा. ॰रस-पु. आनंद; हर्ष. 'हस्ती सेवकांसुद्धां सकळही लाल रंगसी । ' -हो २०३. ॰राग-पु. राग- रंग पहा. ॰रूप-न. आकार, रंग, वर्ण, चर्या, देखावा इ॰ (फळ, व्यापार, व्यक्ति, इ॰चा); बाह्यस्वरूप. [सं.] ॰रूपास आणणें- चांगल्या स्थितीस आणणें; निरोगी करणें; ऊर्जित दशेस आणणें. ॰रूपास येणें-चढणें-चांगल्या स्थितीस किंवा पूर्णतेस येणें. पोहोचणें. ॰रेज-पु. रंगारी. [फा. रंग्रेझ] ॰रेजी-स्त्री. रंग देणें; रंगविणें; सफेती. [फा.] ॰रोगण-न. १ तेलिया रंग. २ सामान्यतः रंग देणें; साफसूफ करणें वगैरे क्रिया. [रंग-इ-रौघन्] ॰लाल-वि. चैनी (मनुष्य). [रंग] ॰लूट-स्त्री गंजिफांचे खेळां- तील एक शब्द; गंजीफांचे डावांत सर्वांचीं पानें एक रंगाचीच पडलीं असतां तो हुकूम फुकट जातो आणि पानें सर्वांनीं लुटून घ्यावीं असा एक प्रकार आहे ती. ॰लेला ऊंस-पु. गाभ्यांत लाल पड- लेला ऊंस. ॰वट-स्त्री. खेळण्याची जागा; क्रीडांगण; रंगण. 'द्राखे घोंस लांबटी । रंगवटामाजी मिरवती । ' -ख्रिपु १.८.२३. ॰वणी-न. रंगाचें पाणी. [रंग + पाणी] ॰वल्ली-स्त्री. रांगोळीचें चित्र; रांगोळी पहा. [सं.] ॰शाला, रंगांगण-स्त्रीन. नाटकगृह; खेळाचें मैदान; तालीम; नर्तनशाला; जेथें नाटकांतील पात्रें रंग- वितात ती जागा. [सं.] ॰शिला, रंगशिळ-स्त्री. १ दगडी पाटा. २ देवाच्या मूर्तीपुढील मोठी शिळा; पंढरपूरच्या विठोबाच्या पुढील मोठी शिळा (यावर भक्त नाचतात). 'नाचा रंगशिळेवरी । भेट देईगा मुरारी । रामचंद्रहो । ' -भज ८२. [सं.] ॰सभा-स्त्री. १ खेळ अथवा करमणूक यासाठीं असलेली जागा. २ खेळाडू अगर विनोदी मंडळी. (क्रि॰ जमणें; भरणें; मांडणें; चालणें; उठण; मोडणें). ॰सही-स्त्री. तिफांशी खेळांत पक्क्या रंगाच्या चारी सोंगट्या पटाच्या चारी बाजू हिंडून आपल्या पटाच्या डाव्या बाजूकडील घरांच्या ओळींत येऊन बसणें. ॰स्थल-न. रंगण; रंग- भूमि पहा. ' विचक्षणा पडद्यांतून रंगस्थलांत येते. ' -कमं २. रंगाई-स्त्री. (हिं.) रंगणावळ; रंग देण्याची मजूरी, किंमत. 'रंगाऱ्याला कपडे रंगविण्याबद्दल रंगाई द्यावी लागते. ' -विक्षिप्त १.१२. [फा. रंगाई] रंगांगण-न. कुस्त्या, खेळ इ॰ करून दाख- विण्यास योग्य स्थळ; रंगशाला पहा. रंगाचळ-न. (महानु.) रंगाचा भर; आनंद; उत्साह; भर. 'निरुपनांचा रंगाचळी । त्यागाचें आढाळ चाळी । ' -भाए २३७. [रंग + अचल] रंगाची (रंगीत) तालीम-स्त्री. रंगभूमीवर नाटक होण्यापूर्वीं खाजगी रीतीनें सालंकृत प्रयोग करून पाहणें. [इं.] रंगाथिणें-क्रि. रंगविणें; रंगविशिष्ट करणें. 'यया भूतांचेनि संगें । जीवें घेतलीं अनेक सोंगें । विपरीत वासना संगे । रंगाथिला ।' -सिसं ३५.२२२. रंगामेज-पु. १ चितारी २ ढोंगी; दांभिक इसम. [फा. रंगामेझ] रंगामेजी-स्त्री. १ आरसे, चित्रे; इ॰ नीं सुशोभित करणें; दिवाणखाना इ॰ स्थलास नानाप्रकारचे रंगांनीं, चित्रें, वेलबुट्टी काढून शोभेसाठीं चितारण्याचा केलेला संस्कार. 'भीमनाथ केदार राममंदीर रंगामेजींचें ।' -प्रला ७८. २ (ल.) दांभिकता; कृत्रिमता; कुटिलता. रंगारी-पु. कपडे रंग- विणारा; वस्त्रें रंगवून उपजीविका करणाऱ्यांची एक जात. [सं. रंज्; फा.] रंगारीहिरडा-पु. एक प्रकारचें हिरड्याचें झाड व त्याचें फळ (पिवळसर रंगाचें). यालाच जंगली किंवा चांभारी हिरडा म्हणतात. सुरवारी हिरडा हा दुसऱ्या जातीचा आहे. रंगालय-न. नाट्यशाला. [सं.] रंगालां-न. (राजा.) चामडें ताणून घोटण्याचें साधन (हें सुताराच्या पटाशीसारखें पण बोथट धारेचें असतें). [रंगाळें] रंगिन-न. चांदीवर सोन्याचा पत्रा चढवून तयार केलेलें जरतार. रंगिला-वि. रंगेल; ख्यालीखुशा- लीचा; चैनी; विषयी; खेळाडू. [हिं.] रंगी-स्त्री. (बे.) जुगार; जुवा; पत्त्यांतील खेळाचा एक प्रकार. रंगी, रंगीन, रंगील-वि. १ रंगीत; रंगविलेलें. 'तुम्ही रंगीन फेटा पाठविला तो पावला. ' -रा ३२.८९. २. रंगेल पहा. [रंग; महानु] रंगीढंगी-वि. रंगेल; चंगीभंगी; व्यसनी. 'मुलगा रंगीढंगी असूनहि केवळ पैसा पाहून पांचmohsinहजार हुंडयासह त्याच्या ताब्यांत देऊन चाकली.'-हाकांध १८२. रंगीत-वि. रंगी; रंगविलेलें; रंग असलेले; रंग लाविलेला कुसुंबा, हिंगूळ इ. रंगानीं रंगविलेला (पदार्थ, पस्त्र, काष्ठ इ.). रंगीबेरंगी-वि. अनेक रंगाचा. रंगीला-वि. रंगीन; रंगेल; गुलहौशी. रंगेरी-स्त्री. (गंजीफांचा खेळ) अखेरीस म्हणजे सर्व खेळाच्या शेवटीं खेळणाराची अखेरी दोघानीहि मापली, तिघांचेंहि पान एकाच रंगाचें निघालें तर त्यास रंगेरी म्हणतात. रंगेल-ला-ली-वि. १ आनंदी; विनोदि; खेळाडू; खेळकर; चैनी; विषयी; विलासी; ललितकलाप्रिय; गाणें, तमाशा, इ. विषयांचा उपभोग, मस्करी, या विषयावर ज्याची अधिक रुचि असा आनंदी; रसिक; इष्कबाज. रंगविणें-क्रि. १ रंग लावणें, देणें; रंगानें वस्त्रादिक विशिष्ट करणें; शोभिवंन करणें. २ (ल.) तोंडांत देणें; भडकाविणे; मारणें. 'त्याचें तोंडांत दोन रंगविल्या म्हणजे कबूल होईल.' (तोंड) रंगविणें-१ विडा खाणें. २ (ल.) थोबाडांत मारणें. [रंग; रंजू = रंग देणें]