आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
तनु, तनू
स्त्री. १. देह; शरीर. २. प्रकृती; तब्येत; देहस्वभाव. ३. शरीरप्रकृतीची काळजी; निगा; पथ्य. ४. नाजूक प्रकृती. [सं. तनु] (वा.) तनु राखणे, तनू राखणे– जीव जगण्यापुरते, थोडे देणे.
तनू
तनू tanū f (S) The body. 2 fig. The constitution or the constitutional wants or requirements; the natural or inherent exigencies and occasions. v राख, संभाळ, & तनूप्रमाणें वागणें. 3 Regard to the constitution or bodily health; observance of regimen. Ex. वैद्यानें मला तनूवर ठेविलें आणि माझा मित्र तो तनूवर आहेच. 4 A delicate constitution or state of health.
स्त्री. (व.) तकवा; ताकद; शक्ति. 'तनू आल्यावर मला कामधाम करतां येईल.' [त्राण]
स्त्री. १ देह; शरीर; तनु. २ प्रकृति; तब्यत; देह- स्वभाव. (क्रि॰ राखणें; संभाळणें; (प्रमाणें) वागणें). ३ शरीर- प्रकृतीची काळजी; निगा; पथ्यापथ्य पाळण्याची खबरदारी; पथ्य. 'वैद्यानें मला तनूवर ठेविलें. ४ नाजूक शरीरप्रकृति. [सं. तनु]
टणू
टणू m टणूं n A bumb (esp. on the forehead or head) from a blow.
टणू ṭaṇū m टणूं n A bump (esp. on the forehead or head) from a blow.
पु. गांठ; ग्रंथि; ठेंगूळ.
तनु / तनू
(सं) स्त्री० (तन १ पहा.) २ वि ० नाजूक.
तनू
स्त्री. तकवा; ताकद; शक्ती.(व.)
टणू, टण्णू
पु. न. आघाताने डोके किंवा कपाळ यास आलेले टेंगूळ : ‘कपाळास लागून टणु आलें.’ – रामक १५·११८. [सं. स्तन्; ध्व.]
संबंधित शब्द
अंग
अंग aṅga . Add:--14 In certain applications, as उघड्या अंगानें (फिरणें -बसणें -असणें), झांकल्या अंगाने, अंग उघडें पडलें or टाकलें, अंग झांकलें &c., अंग bears the implied sense of Pudenda (vel muliebria vel virilia) or Bodily parts required by pudor to be covered. In this special implication अंग is followed by one, but by one only of its synonymes, viz. काया (not by देह, शरीर, तनू &c.) See under काया the phrases काया दाखविणें & काया झांकणें.
काया
काया kāyā f (काय S) The body. 2 Freshness or healthiness of appearance (of the body or countenance). काया दाखविणें-दिसणें-पाहणें To show, be seen, see the body of. Expressions betwixt patient and physician, wife and husband, or of a widow with reference to yielding up her body in another marriage &c. काया as constructed with झांकणें, उघडी टाकणें-पडणें &c. (To cover or hide, or to expose or become exposed) implies any part of the body which decency demands to be clothed. The expressions are constant amongst females. In this use काया answers to the English "Person." अंग or rather आंग (not देह, शरीर, तनू or other synonyme for Body) undergoes the same construction and bears the same implication. काया पालटणें- फिरणें-बदलणें g. of s. To recover freshness and healthiness of look (after sickness). कायावाचामनें- करून In act, speech, and thought: or with all the limbs and members of the body, and all the faculties and affections of the mind and soul--performing virtuous or sinful actions.
कवळी
वि. कोवळी : ‘बारे तनू असतां कवळी । परी शयनाहूनि उठसी उषःकाळीं ।’ - नव २२·१६३. [सं. कोमल]
कवळी
वि. कोवळी. ' बारे तनू असतां कवळी । परी शयनाहूनि उठसी उषःकाळी ।' -नव २२. १६३. [सं. कोमल]
पुरस्सर
वि. १ मुख्य पुढारी; अग्रेसर. २ पुढें जाणारा, सरणारा. 'पुरस्सर गदासवें झगडितां तनू भागली ।' -केका ४६. ३ (समासांत) सहित; पूर्वक. 'शपथपुरस्सर-बुद्धिपुरस्सर-आदर. पुरस्सर-इच्छापुरस्सर इ॰ 'इंद्रपुरस्सर देव शरण गेले.' [सं. पुरस् + सृ]
तन
न. शरीर; देह. तनू पहा.' सहज सुंदर नीळ तन ।' -वेसीस्व ९.११. [सं. तनु; तन्] (वाप्र.) ॰देणें-न. शरीर समपर्ण करणें; छाती पुढें करून तोंड देणें; पुढें पडणें. 'इंग्रजीपाशीं तोफांचा मार फार; तेव्हां लोकांनी तन न दिलें.' -ख १०२४. ॰मन-न. शरीर व आत्मा (मन); सर्व शरीर, ॰लागणें- एखाद्या विषयाकडे अंतःकरणवृत्ति सर्वात्मना गुंतली जाणें. ॰मन- धन- न. १ शरीर, मन व संपत्ति. २ (ल.) सर्वस्व; सर्व; सर्व चीज- वस्त 'तनमनधन माझें राघवा रूप तुझें ।' -रामदास-करुणाष्टक 'तनमनधन कर देवाला अर्पण ।' [तन + मन + धन] ॰मनधन- समर्पण-न. शरीर, मन व संपत्ति अर्पण करणें; सर्वस्व वाहणें; सर्वावर पाणी सोडणें. [तन + मन + धन + समर्पण]
तन tana f n Commonly तनू. The body &c.
तन, तनका
न. पु. शरीर; देह. पहा : तनू : ‘सहज सुंदर नीळ तन ।’ – वेसीस्व ९·११.[सं. तनु; फा. तन्] (वा.) तन देणे, तनका देणे – छाती पुढे करून तोंड देणे; पुढे पडणे. तन लागणे, तनका लागणे – एखाद्या विषयाकडे मन पूर्णपणे गुंतणे. तनमनधन अर्पिणे – सर्वस्व अर्पण करणे.
तनवी
तनवी tanavī f (तनू The body.) Healthiness of look; the clearness, freshness, and lustre of health; (as recovered or returning after sickness.) v पालट, बदल g. of s.
वाणकी
वि. लहान. 'तगायास तूझी तनू वाणकी रे ।' -वामन, विराट ७.१५५. [वाण = न्यून]