मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

तुरट

वि. एक विशिष्ट अप्रिय रुचियुक्त; तुरटीप्रमाणें चव असणारा; तुरटी, हरीतकी, ओली सुपारी इ॰ च्या चवीसारखा. [सं. तुवर] ॰साखरू-पु. एक प्रकारचा औषधी डिंक. तुरटाई- स्त्री. तुरटपणा [तुरट]

दाते शब्दकोश

तुरट turaṭa a (तुवर S) Astringent, of a sharp acid or astringent taste.

मोल्सवर्थ शब्दकोश

तुरट a Astringent. तुरटाई f Astringency

वझे शब्दकोश

तुरट turaṭa n Amongst the कुणबी class. A term for मायफळ Gallnut.

मोल्सवर्थ शब्दकोश

न. (कु.) मायफळ.

दाते शब्दकोश

(सं) वि० तुरटीच्या रुचीसारखा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

तुरट      

न.       मायफळ. (कु.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

वि.       तुरटीसारखी चव असणारा (पदार्थ). [सं. तुवर]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

रा(रां)प

पु. १ तुरटपणा; विशिष्ट फुलांचा व वनस्पतींचा तुरट आणि आंबट रस. (क्रि॰ चढणें; येणें; बसणें). २ कोवळी सुपारी किंवा एखादा तुरट पदार्थ ज्यांत शिजविला आहे असें पाणी; फल, पुष्प इ॰ कांच्या द्रवाच्या अंगीं असलेला काळा इ॰ रंग. 'सुपारीचा रांप धोतरावर पडला तर धोतर खराब होईल.' रा(रां)पणें-अक्रि. १ हवेचर उघडें ठेविल्यामुळें किंवा लोखं- डाशीं संबंध झाल्यामुळें कालें होणें (तुरट किंवा आंबट फळ, भाजी-पाला). काळवटणें. २ छानदार छटा येणें; रंगणें. 'तया अनुरागाचेया चोळे । रापें इंद्रयांचें मैळें ।' -भाए ७९६. ३ चांगल्या रीतीनें भिजणें, मिसळला जाणें, मुरणें (मसाल्यानें खार, क्षारांनीं खत इ॰). ४ अढीच्या उष्णतेमुळें गुणविशिष्ट आणि स्वादिष्ट होणें (आंबें इ॰). ५ आंत खोल भिनणें व छटा येणें (खार, मीठ, क्षार, रंग). ६ सर्व अंग व्यापणें; सर्व शरीरावर परिणाम होणें (ताप, उपदंश इ॰ आजार, विष किंवा दुसरें रोग- कारक द्रव्य, औषध यांचा). ७ असा विकार भोगणें (अंग, शरीर यांनीं). ८ सर्वत्र पसरणें व विश्वासास पात्र होणें (आवई, बातमी). ९ पूर्ण, स्तेज, टवटवीत, जिवट दिसणें (पूर्वीं कृश व निस्तेज असलेला मनुष्य). १० व्यापणें; व्यापणें व ताब्यांत, कबज्यांत घेणें. 'फोजेनें किंवा परचक्रानें मुलूक रांपला.' 'गवतानें शेत रांपलें.' ११ (ल.) परिचित, चांगला माहितगार होणे. [राप]

दाते शब्दकोश

अडुक      

वि.       तुरट; कडू. (कों.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अडुक

वि. (कों.) तुरट: कडु.

दाते शब्दकोश

आमलक

पु. आंवळ्याचें झाड व फळ. 'तुरट वाटे आम- लक परि पुढें गोडी दिसे अधिक ।' [सं.] -की-स्त्री. १ आंवळी; आंवळ्याचें झाड. २ आंवळकाठी. [सं.] आमलक्यादि चूर्ण-न. आंवळाकांठी, चित्रकमूळ, हिरडेदळ, पिंपळी व सैंधव यांचें चूर्ण. हें सर्व ज्वरांचा नाश करतें. हें भेदक, रुचिकर, कफनाशक, अग्निदीपक व पाचक आहे. -योगर १.६६९.

दाते शब्दकोश

आमलक āmalaka m (S) A tree, Phyllanthus emblica or Emblic myrobalan. 2 n Its fruit. Ex. तुरट वाटे आ0 ॥ परि पुढें गोडी दिसे अधिक ॥

मोल्सवर्थ शब्दकोश

अंबा

पु. एक झाड व त्याचें मधुर फळ; आंबा; आम्र; याचें कोंवळें फळ अंबट व त्रिदोष, रक्तदोषकारक आहे. पिकलेलें फळ गोड, शक्तिवर्धक, जड, वर्तनाशक आहे. याचा रस सारक, स्निग्ध, बळकारक आहे, याची कोय तुरट, ओकारी व अति- सारनाशक आहे. याचा मोहोर अतिसार, प्रमेह व रक्तदोष नाशक आहे. यांचें पान कफ व पित्तनाशक आहे. आंब्याला रंगावरून, स्थळावरून, व्यक्तिवरून व रुचीवरून निरनिराळीं नांवें असतात. जसें:-शेंदरी, शिवापुरी, हपूस, शोपा इ॰. अंब्याचें झाड हिंदुस्थानांत होतें. रानांत, डोंगरांत उगवणार्‍या आंब्याला रायवळ, बागेंत लावलेल्यास इरसाल व कलम केलेल्यास कलमी अंबा म्हणतात. याच्या कापा (कापून खाण्याचा) व रसाळ (रस काढण्याचा) अशा दोन जाती आहेत. हें झाड पुष्कळ वर्षें टिकतें. कच्च्या आंब्याचें लोणचें व पाडाच्या आंब्याचा मुरंबा, गुळंबा करतात. 'पिवळा आणि सुगंध । अमृता ऐसा असे स्वाद । परी अंबा तव प्रसिद्ध । एकालाचि ।' -विउ १०.१९. [सं. आम्र; प्रा. अंब] ब्याचा-काप-तळका-पु. अंब्याचा एका, बाजूस कप, फोड. चा टाहाळा-डाहळा-ढाळा- पु. १ आंब्याची लहानशी फांदी. हा शुभ व अशुभ दोन्ही प्रसंगी असतो यावरून. २ (ल.) शुभ-अशुभ प्रसंगीं किंवा सुखदुःखाच्या प्रसंगीं दुसर्‍याच्या घरीं सारखेपणानें वागणारा माणूस; लग्न वगैरे समारंभांत दोहोंपक्षांकडील माणूस. -चा शेंकडा-६ आंब्याचा १ पाडा, ५३ पाड्यांचा (३१० आंबे) १ शेकडा. सबंध घेतला तर ३२० अंबे मिळतात. निर- निराळ्या ठिकाणीं अंब्याचा शेंकडा निराळा आहे. कांहीं ठिकाणीं २२ पाड्यांचा शेंकडा असतो. ॰उतरणें-१ आंबे झाडावरून खालीं न पाडतां काढणें. 'आज आमच्या झाडाचे आंबे उतरावयाचे आहेत.' २ फार पिंकणें. 'आंबा उतरला आहे. कशाला खातोस ?' ॰शिपणें-वरात घरीं जाण्याच्या पूर्वी गौरीहांरातील देवी घेण्याकरितां वर जातो तेथें गौरी- हाराच्या जागीं भिंतीवर अंब्याचें झाड काढलेलें असतें, तेथें आंबा शिपतांना वधू आपला डावा पाय वरच्या उजव्या मांडी- वर आणि डावा हात त्याच्या पागोट्यावर ठेवून त्याजपाशीं उभी राहून उजव्या हातानें नागवेलीच्या किंवा आंब्याच्या पानानें आंबा शिपते त्यावेळीं बायका आंबा शिंपण्याबद्दलचें गाणें म्हण- तात. 'आंबा शिंपावया गोरटी । कडे घेऊनि कृष्ण उठी । आइती केलीसे गोमटी । कुंकुमें वाटी परिपूर्ण ।' -एरुस्व १५.१४२. ॰बांधणें-झाडास फळ लागणें. -अंबेबार-बहार-फाल्गुन महि- न्यांत म्हणजे आंब्याला मोहोर येण्याच्या दिवसांत जें तिसरें फळांचें पीक येतें तें, म्हणजे तिसरा बार (मृगबार, हत्तीबार असे आणखी दोन बार आहेत). -शे २.१२. -ब्याचा मोहोर-पु. (एक पक्कान्न) दुधांत भिजलेल्या रव्याचे गवळे करून मध्यें चिमटून थोडे वळसे म्हणजे होणारें त्रिदळ. -चें पन्हें-न. अंबवणी पहा. -चें साठ-न. कल्हईच्या ताटाला तूप लावून त्यांत अंबरस ओततात व तो सुकवून त्यावर दुसर्‍या अंबरसाचा घालतात व पुन्हां सुकूं देतात. गोडीसाठीं यांत साखर घालतात. सुकल्या- वर तो पोळीप्रमाणें होतो. अशा प्रकारें जी पोळी करतात तें. -चा भात-पु. केशरी भात शिजत आला म्हणजे त्यांत हपूसचे आंबे चिरून त्याच्या फोडी घालून केलेला भात. ॰गदरलेला-गद्रा-गजरा-पु. पाडाचा अंबा. 'अतिरति एक दोरींत ओविलें फळझाडें आंबागद्रा ।' -पला ६६.

दाते शब्दकोश

अवळा

पु. १ आवळा; एक तुरट फळ. २ समईच्या उभ्या दांड्याला असणारे वाटोळे वेढे. -ळ्याची मोट स्त्री. तात्कालिक फायद्याकरितां एकत्र जमलेल्या लोकांचा समुदाय, गट. टोळी. म्ह॰ १ अवळा पिकायचा नाहीं, समुद्र सुकायचा नाहीं. = घडण्यास अशक्य अशा गोष्टीबद्दल म्हणतात. २ अवळ्याची मोट बांधणें = (आवळे) एकत्र बांधतां, जुळविंता येत नाहींत, ते निसटून जातात, यावरून) अशक्य गोष्ट करूं पाहणें. ३ अवळा देऊन कोहळा (किंवा बेल) काढणें = थोडयाचा बराच फायदा मिळविणें; आपण थोडें देऊन दुसर्‍याकडून अधिक घेणें; थोडया मोबदल्यावर पुष्कळाची आशा करणें. (चे)अवळे उघडणें मोठा राग काढणें; अपशब्दांचा भडिमार करणें; ठोकणें; बुकलणें; फाडून खाणें (अवळकाठी कर- तांना अवळे उकलतात त्याप्रमाणें). अवळ्या एवढें पूज्य न. पूर्ण अभाव; शून्य. अवळे शिजणें (कर.) पाचावर धारण बसणें; घाबरणें. [सं. आमलक; प्रा. आमल-ग-य; हिं. आमला; आंवला; बं. आम्ल; गुज. आंवळां; फा. आम्लझ; अर. अमलज्; पंजा. आवला; लॅ. फिलेन्थस् अंब्लिका.]

दाते शब्दकोश

आवळा      

पु.       फलविशेष; एक आंबट तुरट फळ. (वा.) आवळा देऊन कोहळा काढणे − क्षुद्र वस्तूच्या मोबदल्यात पुष्कळ घेणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

बकुल-कुळ, बकुळी

पुस्त्रीन. १ एक फुलझाड व त्याचें फूल; ओवळ; याचीं पानें आंब्याच्या पानासारखीं. फुलें लहान, पांढरीं, चक्राकृति व मध्यभागीं छिद्रान्वित. वास मधुर. फळें बदामाएवढीं, किंचित् गोड व तुरट. फुलांचा अत्तराकडे व सालींचा व बियांचा औषधाकडे उपयोग. लांकूड गलबताच्या उपयोगी. [सं. बकुल] बकुळीचें फूल-न. एक मुलींचा खेळ. -मराठी खेळांचें पुस्तक पृ. ३०७.

दाते शब्दकोश

गारट      

वि.       १. थोडासा गार, थंड (हवा, पाणी, वस्तू). २. केवळ गार (कमी किंवा जास्त नव्हे – खारट, आंबट, तुरट यासारखा प्रयोग). ३. फारच थंड.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गारट

वि. १ थोडासा गार, थंड (हवा, पाणी, वस्तु). २ नुसता गार (कमी किंवा जास्त नव्हे-खारट, आंबट, तुरट या सारखा प्रयोग). ३ फारच थंड. [गार]

दाते शब्दकोश

गुळवेल      

स्त्री.       एक कडू वेल; गरुडिवेल; गरूळवेल. (को.) ही वेल औषधात फार उपयुक्त व महत्त्वाची असून तुरट, कडू, उष्ण, वीर्योद्दीपक व ज्वरनाशक आहे. बहुतेक सर्व रोगांवर ही उपयोगी पडते. [सं. गुडूची]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गुळवेल

स्त्री. एक कडूवेल; (कों.) गरुडिवेल, गरूळवेल. लॅ. मेनिस्पेर्मम ग्लॅब्रुम; ही औषधांत फार उपयुक्त व महत्वाची असून तुरट, कडू, उष्ण, वीर्योद्दीपक व ज्वरनाशक आहे बहुतेक सर्व रोगांवर ही उपयोगी पडते. हिला बारीक फळांचे घोंस येतात. शेर इ॰ विषारी झाडावरील गुळवेल औषधास घेऊं नये. कडू लिंबावर वाढलेली उत्तम. [सं. गुडूची, हिं. गु(गी)लोय; बंगाली गुलंच; गु गलो; फा. गुलाई; अर. गिलोई; इ. गुलांचा]

दाते शब्दकोश

गव्हला      

पु.       एक सुगंधित द्रव्य; प्रियंगू; यांचे झाड लहान असून सुवासिक तेले, उटणे, उदबत्ती वगैरेसाठी उपयोगी असते. हा तुरट व शीतल असून वांती, दाह व पित्त यांचा नाशक आहे. [सं. गंधकला]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गव्हला

पु. एक सुगंधित द्रव्य; प्रियंगु; याचें झाड लहान असतें. याचा सुवासिक तेलें, उटणें, उदबत्ती वगैरेकडे उपयोग करतात. हा तुरट, शीतल व वांती, दाह, पित्त यांचा नाशक आहे. [सं. गंधफला; गु. घउला]

दाते शब्दकोश

केळफूल, केळफूल बोंड, केळफूल कमळ      

न.       केळीच्या कोक्यापासून निघालेले फूल. हे कडू, तुरट, अग्निदीपक, उष्ण, वीर्य व कफनाशक आहे. याची भाजी करतात.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खारटतुरट      

वि.       १. थोडेसे खारटव थोडेसे तुरट;चवदार; रुचकर; स्वादिष्ट (खाद्य.) २. (ल.) थट्टेचे, विनोदपर; चुरचुरीत (भाषण, निबंध).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

रापणें, रांपा

नपु. (राजा.) सुपारीवरचा पापुद्रा सोल ण्याचें एक हत्यार; (कु.) रांपो. सुपारी इ॰ तुरट किंवा आंबट फळें कापण्याचें हत्यार. [प्रा. रंप = छिलणें]

दाते शब्दकोश

रस

पु. १ चव; रुची; स्वाद; जिव्हेनें खारट, तुरट, गोड इ॰ जो पदार्थाचा धर्म समजतो तो. 'सुरभिदुग्धपान रस मजला समजे ।' -मोअनु २.७. २ चीक; द्रव; पान, फूल, फळ इ॰तील पातळ अंश. ३ ऊंस, आंबा यांतून निघणारा द्रवपदार्थ. ४ अर्क. ५ अन्नाचें रक्त व्हावयापूर्वींचें रूपांतर; शरीरांतील ज्या अन्नापासून रक्त व घाम बनतो ती अन्नाची अवस्था. ६ धातूचें द्रवरूप; कोणत्याहि धातूचा वितळून केलेला द्रवपदार्थ; सोनें, चांदी इ॰ची अग्निसंयोगानें झालेली द्रवरूप स्थिति. ७ (साहित्य) अंतःकर- णाच्या वृत्तीचें कांहीं कारणानें उद्दीपन होतें आणि त्या उद्दीपित झालेल्या वृत्तीच्या अनुभवानें किंवा अवलोकनानें अनुरूप विचार प्रकट करण्याची प्रेरणा होते तिला रस म्हणतात. रस नऊ आहेत- शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र व शांत. 'तैं नवरससुधाब्धीचा । थावो लाभे ।' -ज्ञा १०.७. ८ (ल.) गोडी; आवड; राम; मनोरमता; मोहकता (प्रसंग, साहित्य, भाषण, व्यापार इ॰ तील.) 'वचनांत कांहीं, रस नाहि पाही ।' -लीलावती. ९ प्रीति; प्रेम; अनुराग. १० कस; योग्यता. 'ऐसि- यांचा कोण मानितो विश्वास । निवडे तो रस घाईं डाईं' -तुगा ३३६२. ११ खाणींतील मीठ; खनिजक्षार; (गंधक, मोर्चूत इ॰). १२ पारा. १३ पुरुषाचें वीर्य किंवा रेत. १४ विष. १५ उत्तेजक द्रव्य (तेल, मसाला, साखर, मीठ इ॰) (संस्कृतमध्यें असे अनेक प्रतिशब्द या शब्दाला आहेत). १६ पाणी. 'तरी नुरोनि वेगळेंपण । रसीं भजिन्नलें लवण ।' -ज्ञा १७.१८. १७ दूध. 'कथा सुरभिंचा रस स्वहित पुष्कळ स्वादुहि ।' -कैका. १८ रसायन; औषध. 'पैं कळांतर गांठीं बांधिजे । मग पुढिलांचे काज कीजे । पूजा घेऊनि रसु दीजे । पीडितांसी' -ज्ञा १७.२८७. १९ नारळाच्या रसांत गूळ मिळवून तयार केलेलें पातळ पेय. [सं.] सामाशब्द- ॰कस-पु. १ रसज्ञता. -शर. २ रसाचा कस; रंग; बहार; गोडी. (क्रि॰ जाणें; घेणें). 'भोग आतां रसकस घे बरी ही संधी साप- डली ।' -प्रला १९९. [रस + कसणें] ॰केळी-स्त्री. (महानु.) रसकेलि; नवरसाची क्रीडा. 'जेही रसकेळि खेळति मनें । कळा- विदांची.' -भाए २७२. [सं. रस + केलि = क्रीडा] ॰गुल्ला- गोल्ला-पु. (व.) एक बंगाली गोड खाद्य पदार्थ; एक प्रकारची मिठाई. ॰द-पु. मेघ. [सं.] ॰पूजा-स्त्री. औषधाबद्दलची किंमत; वैद्याची फी. 'रसपूजा धरोनि पोटीं । वैद्य औषधांच्या सोडी गांठी ।' -एभा ११.१०४४. ॰बाळ-बाळी-बेळी-बेळ-स्त्री. केळयाची एक जात (सोनकेळयाप्रमाणें). [रस + का. बाळे = केळ; का. रसबाळे] ॰भंग-पु. १ गोडी जाणें; काव्यग्रंथ गानादिसंबंधीं वाचकश्रोत्यांचा विरस. २ बेरंग; सौंदर्यनाश. ३ उत्साह, उमेद, यांवर विरजण पडणें. [सं.] ॰भरित-वि. १ रसानें युक्त अगर भरलेलें; रसपूर्ण; (फळ इ॰). २ (ल.) चटकदार; गोड; मनोरंजक; सुंदर (भाषण, वर्णन, इ॰). [सं.] ॰भरू-वि. रसानें भरलेला (फलादि पदार्थ); रसपूर्ण; रसाळ. [रस + भरणें] ॰भावना-स्त्री. पुटें देण्याची रीत; किमयेची रीत. 'परी मात्रेचेनि मापें । दिव्यौषध जैसैं घेपे । कां कथिलाचें कीजे रूपें । रसभावनी ।' -ज्ञा १८.७७४. ॰भोजन-न. ज्या जेवणांत आंबरस हें मुख्य पक्कान्न आहे असें जेवण. ॰मय-वि. (रसपूर्ण) जलमय. 'अद्व- यानंदस्पर्शे । दिठी रसमय जाली असे । ते अश्रु नब्हती जैसें । द्रवत्वचि' -ज्ञा १८.१६०४. ॰रंग-पु. मकरसंक्रांतीचे दिवशीं कुंकु आणि गूळ हीं दोन पात्रांत भरून ब्राह्मणांस, सुवासनीस देतात तो; संक्रातीचें हळदीकुंकू. [रस आणि रंग] ॰राय-पु. (महानु) शृंगारस. 'निर्यास गेलें । रसरायाचें ।' -भाए ९९. ॰वडी-स्त्री. तोंडीलावण्याकरितां मसाल्याच्या रसानें युक्त हरभऱ्याच्या पिठाच्या वड्या करतात त्या; पाटवडी. ॰वंती-स्त्री. १ (प्र.) रसवती; वाणी; वाचा (रसाचें अधिष्ठान मानली जाणारी); वक्तृत्व. २ गोड भाषण. ३ जीभ. ४ एक वनस्पति. ॰वांगें-न. मसालेदार रसानें युक्त असें शिजवून तयार केलेलें सगळें वांगें; भरलेलें वांगें (भाजी). ॰वान्-वि. १ रसभरित-युक्त-पूर्ण. २ चवदार; स्वादिष्ट; मिष्ट. [सं.] ॰विक्रय-पु. (तेल, मीठ, लोणी, साखर, दूध, तूप, इ॰) रसाळ, पोषक पदार्थींची विक्री. शास्त्रांत हा दोष मानला आहे. [सं.] ॰वृत्ति-स्त्री. शृंगारादिक रसभाव. (क्रि॰ प्रकट करणें). 'येथ विभूती प्रतिविभूती । प्रस्तुत अर्जुना सांगिजेती । ते विद्गदा रसवृत्ती । म्हणिपैल कथा ।' -ज्ञा १०.४१. ॰सोय-स्त्री. स्वयंपाक; पक्कान्न. 'जैसी रांधवणी रससोय निकी । करूनियां मोले विकी ।' -ज्ञा २.२५४; -अमृ ५.४३. ॰स्वादन- न. स्त्रियांच्या शृंगारचेष्टांचें वैगरे वर्णन ऐकण्यामध्यें असलेली श्रद्धा, गोडी. 'हावभाव कटाक्षगुण । सुरतकाम निरूपण । तेथ ज्याचें श्रद्धा श्रवण । रसस्वाद त्या नांव' -एभा ११.७०७. ॰ज्ञा-वि. १ रस जाणणारा; रसिक; मर्मज्ञ. 'पुष्पाच्या मकरंदाचा रसज्ञ भ्रमरा- सारखा दुसरा कोणी नाहीं.' २ योग्यता जाणणारा; महत्त्व ओळ- खणारा. ३ रस, भावना, वृत्ति ओळखणारा. [सं.] ॰ज्ञता-स्त्री. रस जाणण्याचा गुण, पात्रता. ॰ज्ञतावात-ज्ञानवात-स्त्रीपु. रस जाणण्याखेरीज बाकी सर्व इंद्रियांची ज्ञानशक्ति यांचा नाश करणारा वात. रसरसणें-अक्रि. १ रसानें पूर्ण भरून असणें. २ (अग्नि) प्रज्वलित असणें; धगधगणें; प्रखरणें. ३ तापणें; जळजळीत असणें; जळजळणें (तापांत अंग, डोळे, उष्णतेनें पाणी, तवा इ॰. ४ ऐन तारुण्यांत, भर ज्वानींत असणें. ५ भर-भरांत असणें (देवी, गोवर, ज्या त्या हंगामांत उत्पन्न होणारे पदार्थ) किंवा संतापानें. 'संजयो विस्मयें मानसीं । आहा करूनी रसरसी । म्हणे कैसे पा देवेसी । द्वंद्व यया' -ज्ञा १४.४११. [रस ध्व.] रसरसीत- शीत-वि. १ रसाळ; रसपूर्ण. २ भर ज्वानीनें युक्त; तारुण्यानें मुसमुसलेली. ३ प्रखर; प्रज्वलित; तापून लाल झालेलें. ४ पिवळा शब्दामध्यें पहा. रसा-रस्सा-पु. १ पुष्पळ रस असलेली भाजी; मसाला इ॰ घालून केलेलें पातळ तोंडीलावणें (बटाटा इ॰चें). २ मांसाचें कालवण. [सं.] रसाधिपति-पु. वरुण. [सं.] रसाभास-पु. १ कृत्रिम, खोटी भावना; अनुचितपणें प्रवृत्त केलेला रस. उदा॰ पशुपक्ष्यादिकांचा शृंगार वर्णन करणें. हा शृंगार- रसाभास झाला. २ अशा तऱ्हेचें काव्य अगर नाटक. ३ स्थायी- भाव नांवाखालीं येणाऱ्या अष्टरसांपैकीं एकाचें केलेलें खोटें आवि- ष्करण; अशा रसाचें (काव्य, नाट्य रूपानें) केलेलें दिग्दर्शन. ४ कांहीं खोट्या बतावणीनें खरी भावना दडवून ठेवणें. [सं.] रसाल-ळ-वि. १ रसभरित; ज्यामध्यें रस पुष्कळ आहे असा (फलादि पदार्थ). २ रसयुक्त; मधुर; गोड. 'केळीचें दळवाडें । हळू पोकळ आवडे । परि फळोनिया गाढें । रसाळ जैसें ।' -ज्ञा १३.२१२. ३ चटकदार; मनोरंजक; आवडेलसें (भाषण). 'आतां टाकून बहुत शब्दजाळ । बोले रामकथा रसाळ ।' ३ बरका फणस यास दुसरें नांव. ४ गमतीचें; विनोदी; हास्यजनक (भाषण). ५ खमंग; चांगलें; मुरलेलें; चमचमीत (पाक, लोणचें, ओला पदार्थ) ७ रसिक; रसज्ञ. 'तूं सांग तो वर तुला रुचला रसाळे ।' -नल ९१. रसाळी-स्त्री. १ (व.) आंबरसाचें जेवण. 'अंबादासपंत खाड्याच्या येथें दरवर्षी एक रसाळी होते.' २ (कों.) उंसाच्या चरकाचें खालचें लांकूड, काठवट, रसिक-वि. १ मर्मज्ञ; गान, काव्य इ॰ रसावर विशेष प्रीति असून त्यांतील मर्म जाणतो तो; सहृदय. २ थट्टा-मस्करी, भाषण इ॰ द्वारा दुसऱ्याच्या आणि आपल्या अंतःकरणप्रवृत्तीस विनोद उत्पन्न करील असा. ३ गमत्या; विनोदी. ४ भावनाप्रधान. ५ चंवदार; स्वादिष्ट; मधुर. ६ (ल.) (काव्य) आल्हाददायक; सुखोत्पादक. [सं.] रसिकत्व-न. १ माधुर्य. २ रसिकता. -ज्ञा १८.३४७. रसिक रसीला-वि. रसाचा खरा खरा भोक्ता; इंष्कबाज. [रसिक + हिं. रसीला = रसदार] रसोत्पत्ति-स्त्री. १ रसाची उत्पत्ति, निर्मिति. २ विनोद; हास्य; करमणूक. [सं.]

दाते शब्दकोश

तोर

न. (कु. हेट. राजा.) कोंवळा कच्चा आंबा; कैरी. [सं. तुवर = तुरट; तुल॰ का. तोरे = पक्व]

दाते शब्दकोश

तोरण

स्त्री. एक कांटेरी फळझाड. हें करवंदाच्या झाडा- सारखें असून डोंगराळ प्रदेशांत होतें. यास फुलांचे तुरे व पिवळट रंगाचीं फळें येतात. -न. वरील झाडाचें फळ, हें खाण्यास चांगलें लागतें; हें तुरट, आंबट, उष्ण व गुरु असून रक्तपित्तनाशक, कफ व वात यांचा नाश करणारें व सारक आहे. गांगेरुक म्हणून तोर- णाची एक दुसरी जात आहे. -वगु ४.१५.

दाते शब्दकोश

तुरटाई

तुरटाई turaṭāī f (तुरट) Sharp acidity or astringency.

मोल्सवर्थ शब्दकोश

तुरटी

तुरटी turaṭī f (तुरट) Alum.

मोल्सवर्थ शब्दकोश

स्त्री. १ एक प्रकारचें क्षारद्रव्य; फटकडी. हिचा उपयोग रंग व औषधांमध्यें करतात. २ (कों) वाळलेल्या कोंवळ्या आब्याची करंबुटी. [तुरट]

दाते शब्दकोश

तूर्त, तूर्तचे तूर्त, तूर्तातूर्त

क्रिवि. १ लवकर; सत्वर; ताबड- तोब; सध्यां; तत्काळ. (गो.) तूर्ताक. 'तूर्त तार्किक तनें मनें । तल्लीन होती ।' -दा १४.४. १६. २ तात्पुरता; गरजेपुरता; कायमचा होईपर्यंत काम भागविण्यापुरेसा. [सं. त्वरित; हिं. तुरत] तूर्त किंमत-स्त्री. पुढें कांहीं काळ गेल्यानंतर जी रक्कम द्यावी लाग- णार तिची तूर्त किंमत म्हटली म्हणजे तितक्या काळचें व्याज कापून बाकी राहते ती. तूर्तातूर्त ताकीद-स्त्री. कोर्ट कायमचा निर्णय देईपर्यंत एखादी गोष्ट तात्पुरती करूं नये असा मनाई हुकूम; (इं.) टेंपररी इंजंक्शन.

दाते शब्दकोश

वगर

वि. (तंजा.) अपक्क; तुरट (सुपारी).

दाते शब्दकोश

केळ

स्त्री. केळीचें झाड. हें पुष्कळ दिवस टिकणारें, कंदरूप आहे. ह्याला मोठीं पानें येतात. ह्याच्या अनेक जाती आहेत. गोवें, कर्नाटक, वसई इकडे यांचें पीक फार. कच्च्या केळ्यांची, व केळफुलांची भाजी होते. सोपटांची राख कोष्टी व धनगर लोक सूत रंगविण्याकडे वापरतात. पानांचे दांडोरे वाळवून त्यापासून उत्पन्न होणारा क्षार कोंकणांत परीट लोक साबणासारखा वापरतात. -वगु २.५७. वैष्णव लोक कपाळास जी अक्षत (काळा टिकला) लाव- तात टी हळकुंड उगाळून त्यांत सोपटाची राख खलून करतात. केळीच्या मुठेळी, तांबेळी, बसराई, वेलची, सोन, राजेळी, म्हशेळी इ जाती आहेत. आगाशीकडे केळीं वाळवून तयार करतात त्यांस सुकेळीं म्हणतात. 'फेडून केळ्याची सालडी ।' -विउ ४.६२. 'घिवर जिलब्यांनीं केळ पोसल्यें ।' -प्रला २२९. २ केळीचें फळ. ३ ब्राह्मणी पागोट्यावरील कपाळपट्टीवरचा भाग, बिनी. ४ स्त्रिया लुगड्याच्या निर्‍या पोटाजवळ खोवून केळ्याच्या आकाराचा भाग करतात तो. [सं. कदली; प्रा. कयल-केल] (वाप्र.) केळें खाणें-साखरखाणें-(ल.) खोटें बोलणारा, मुर्खासारखी बडबड करणारा वगैरेना औपरोधिक शब्द. शेण, गू खाणें, झक मारणें तूं किंवा तो तर आपल्या घरचा राजा. असे याच अर्थाचे कांही वाक्प्रचार आहेत. सामाशब्द- ॰खंड-न. न भरणारें केळें; वांझ केळें. याची भाजी करतात. ॰फूल-बोंड-कमळ-न. केळीच्या कोंक्यापासून निघालेलें फूल; हें कडू, तुरट, ग्राहक, अग्निदीपक, उष्ण, वीर्य व कफनाशक आहे. याची भाजी करतात. ॰केळंबा-भा-पु. १ केळीचें पोर; पासांबा; नवीन फुटलेला कोंब; केळीचें रोप. (क्रि॰ फुटणें.) २ चवेणीचा पोगा, पोगाडा; काल. ॰वंड-वडी-केळावली- स्त्री. (कों.) केळ्यांचा घड, लोंगर; त्यांच्या देठांचा झुबका. 'बारा महिने नेहमीं केलवंडी पिकत.' -पाव्ह ११. ॰वत्तर निरी-स्त्री. परवंट्यांची सर्वांत वरची निरी. 'केळवत्तर निरी झळकैली ।' -शिशु ४३. ॰वली-स्त्री. पिकलेलीं केळीं मोदकपात्रांत साली- सकट उकडून काढून, तीं सोलून, कुसकरून त्यांत साखर, नारळाचा खव इत्यादि घालून त्या पुरणाचें मोदकासारखें पक्वान्न तुपांत तळून करतात तें. -गृशि १.४६४. ॰वा-पु. (कों.) केळंबा भा- पहा. केळीचा कांदा-पु. केळीचा गड्डा; हा वातनाशक व स्त्रियांच्या प्रदेर रोगावर औषधी आहे. -योर १.४६. केळ्याचा हलवा-पु. राजेळी केळीं मोठालीं तीन घेऊन चुरावीं व त्यांत साखर, तूप मिसळून, थोडें चुलीवर आटवून तें ताटांत ओतावें व त्याच्या वड्या पाडून त्यावर बदामबीं पसरावें. -गृशि १. ४२३.

दाते शब्दकोश

खार

पु. १ लवण, मीठ (खनिज अथवा वनस्पतिजन्य, स्वाभाविक अथवा कृत्रिम); संचळ, सैंधव, सवागी, तुरटी इ॰ क्षार. २ अघाडा, माठ, पोकळा इ॰ वनस्पती जाळल्यावर राहि- लेली राख शिजवून तें खारवणी गाळून त्याची वाफ करून काढ- लेला अशुद्ध क्षार. ३ खारटपणा. ४ लोणच्यांतील द्रवरूप पदार्थ. 'झोंबतो व्रणिं जसा बहु खार.' -कमं २.५६. ५ (ल.) खराबी; नुकसान; तोटा. -स्त्री. १ आंब्याचा मोहोर, वालाचीं फुलें इ॰ जळून जाण्यासारखें अभ्रांतून पडणारें दंव. खारी धुई. (क्रि॰ येणें; पडणें).२ हवेंतील अतिशय गारवा; धुई; बादल हवा. (क्रि॰ सुटणें; पडणें; होणें). (खार ही वामळेपासून भिन्न आहे, वामळ हिंवाळा व पावसाळा यांमध्यें मोठा पाऊस पड- ल्या नंतर पडते आणि खार फक्त हिंवाळ्यांतच पडते). ३ क्षारा- पासून येणारा ओलसरपणा, दमटपणा, लोणा (भिंतीवर, जमि- नीवर). ४ खर; पावसाच्या शेवटीं संध्याकाळीं आकाशांत दिस- दिसणारे तांबडे ढग. ५ समुद्र हटून मिळालेली जमीन; खारट; खाजण. ६ खारी दलदल, जमीन; भाताची खारी जमीन. ७ (ल.) तोटा; नुकसान. -न. १ सुकविलेले खारे मासे. २ (गो.) शेतास खत मिळण्यासाठीं समुद्राचें किंवा खाडीचें शेतांत साठविलेलें पाणी. -वि. खारट; क्षारयुक्त. [सं. क्षार; प्रा. खार] (वाप्र.) ॰खाणें-(ना.) द्वेष करणें; पाण्यांत पाहणें. खारणें- अक्रि. क्षारयुक्त होणें; क्षारानें विकृत होणें (जमीन, शेत); लोणचें इ॰ च्या अंगीं मीठ इ॰ चा क्षार मुरल्यामुळें त्यांनीं क्षाररसविशिष्ट होणें. -सक्रि. क्षारयुक्त करणें. ॰पाडणें-(कों.) समुद्राच्या भरतीखालील जमिनी शेतीच्या उपयोगी करणें. ॰लागणें- पडणें-लावून घेणें-१ नुकसान होणें; संकट येणें; चट्टा बसणें. 'आपल्या या शहाणपणामुळें आज आमच्या खिशाला चांग- लाच खार लागला.' २ काळिमा येणें; शिंतोडा उडणें. ॰लावणें- नुकसानींत आणणें. सामाशब्द- ॰कट-वि. १ खारट; क्षारयुक्त २ (ल.) खुनशी; मत्सरी; आकसखोर (माणूस). ॰जमीन-स्त्री. क्षारयुक्त जमीन; खारवट जमीन. खारगें-न. (नंदभाषा) मीठ. 'खारग्याशिवाय कोणताहि पदार्थ गोड होत नाहीं.' खारट- वि. क्षारयुक्त. 'खारट खारट मीठ, खारट घोट' = अतिशय खारट. -न. खाजण. खारट तुरट-वि. १ थोडेसें खारट व थोडेसें तुरट; चवदार; रुचकर; स्वादिष्ट (खाद्य); २ थट्टेचें, विनोदपर; चुरचुरीत (भाषण, निबंध). ३ पाणीदार, निश्चित, दमदार (कृत्य, वर्तन). खारटाई-स्त्री. खारटपणा. खारटाण- वि. खारट जमीन. खारणी-स्त्री. (क.) (सोनारी) क्षाराच्या साहायानें तयार केलेलें, चांदीत मिसळावयाचें हीण. 'चांदींत खारणी मिसळलेली नाहीं.' ॰बट-स्त्री. खारीजमीन; खाजण. -वि. खारट (जमीन, शेत). ॰वडा-पु. कुरड्या घालून राहि- लेला जो चीक त्याचे घातलेले सांडगे, वड्या. ॰वणी-न. खारट पाणी. ॰वांगी-स्त्री. खाजणांत होणारें वांग्यांचे झाड; व त्याचें फळ. खारवांगे. ॰संध-पु. (सोनारी) धातूंना द्यावयाचा डाक; क्षारमिश्रित कस्तूर. (खार + सांधा) ॰सळई, सोळी-स्त्री. खार- संध घोटण्याचा दगड; डांक देण्यासाठीं टाकणखार उगाळण्याची सहाण ॰सान-न. (गो.) खारटपणा.

दाते शब्दकोश

कडु-डू

वि. १ कडवा (गोडाचे उलट, कडूनिंबाच्या चवी- प्रमाणें). २ बेचव; पित्तविकारामुळें बदलणारी (जिभेची रुचि). ३ न. रुचणारें; अप्रिय; कठोर (वाक्य, भाषण इ॰). 'आधीं कडु मग गोड.' ४ ज्यास कीड लागत नाही, जें कीड खात नाहीं असें (विशिष्ट झाड, वनस्पति). ५ जारज संतति (गोडच्या उलट). ६ गोड नसणारें; अशुद्ध (विशिष्ट तेल). ७ कठिण, गांठ्याळ (बाभळीच्या लांकडाचा आंतील भाग; नार; वरचा भाग ठिसूळ, नरम किंवा गोड असतो). ८ निर्दय; कडक; ताठर (माणूस, स्वभाव). ९ नापीक; लागवडीला प्रतिकूल (जमीन). १० झोंबणारी; कडक; तिखट (विशिष्ट भाजी). -न. १ (ल.) अफू. २ कात (रात्रीच्या वेळेस काताचें नांव घ्यावयाचें नाहीं म्हणून त्याबद्दल म्हणतात). ३ मृताशौच; कडू विटाळ या शब्दाचा संक्षेप. -स्त्री. डोळ्याचें दुखणें (डोळ्यांत माती गेल्यानें, जाग्रण केल्यानें येणारें). (क्रि॰ येणें. उ॰ डोळ्यांला कडू येणें). -पु. १ दासीपासून झालेली संतति; अनौरस, जारज संतति; लेकवळा (याच्या उलट गोड). 'त्याच्या राज्यांत मल्हारराव नामक त्याच्या एका कडू सापत्न भावानें जें बंड माजविलें होतें...' -हिंक ८४. २ पाटाची संतति [सं. कटु; प्रा. कडु; गु. कडवु; हिं. कडुवा; सिं कडो] ॰इंद्रा- यण-न. कुंपणावरील एक वेल; ह्याचीं फळें तांबडीं, विषारी व रुचीस कडू असतात; कवंडळ; इंद्रावण; इंद्रवारुण; कडूवृदांवन. २ (ल.) तुसडा, माणूसघाण्या; एकलकोंडा माणूस. ॰करांदा- पु. एक कडवट तपकिरी रंगाचा कंद. ॰कारलें-न. १ कारलें. २ (ल.) वाईट स्वभावाचा व न सुधारणारा माणूस. 'तो एक कडूं कारलें आहे, त्याची संगत धरूं नको म्हणजे झालें.' म्ह॰ कडू कारलें, तुपांत तळलें, साखरेंत घोळलें तरी तें कडू तें कडूच.' ॰कारळी-ळें-स्त्रीन. कारळे तीळासारखें औषधी बीं; कडू जिरें; काळें जिरें. याचें झाड दोन तीन हात उंच असून ह्यास बोंडें येतात व त्यांत बीं असतें. हें कृमिनाशक आणि वातनाशक आहे. -शे ९.२३४. ॰काळ-पु. वाईट दिवस; अडचणीची स्थिति; साथ; दुष्काळ; दुर्गति. (क्रि॰ येणें; असणें; चालणें; वाहणें; जाणें; टळणें; चुकणें; चुकविणें). ॰घोसाळें-न. घोसा- ळ्याची एक जात. -शे ९.२३५. ॰जहर-वि. अतिशय कडू; विषासारखें कडू. ॰जिरें-कडू कारळी पहा. ॰झोंप-स्त्री. अपुरी झोंप; झोंपमोड; झोंपेचें खोबरें. (क्रि॰ करणें). ॰तेल-न. १ करंजेल. करंजाच्या बियांचें तेल. २ उंडिणीचें तेल (हेट.) पुन्नागफळांचें तेल. ४ (सामा.) न खाण्यापैकीं तेल (चोखटेल किंवा गोडें तेल याच्या उलट). ॰दोडका-पु. १ कडवट दोडका. २ दासीपुत्र; लेकवळा. ३ (ल.) पंक्तिबाह्य; जाति- बहिष्कृत माणूस. कडू भोपळा पहा. ॰दोडकी-स्त्री. भाद्रपद महिन्यांत फुलणारी एक वेल; दिवाळी; हिचीं पानें औषधी असून. फळास दिवाळें म्हणतात. -शे ९.२३५. ॰निंब-पु. बाळनिंब; बाळंतनिंब; हा वृक्ष फार मोठा असून सर्वत्र होतो. याचीं पानें गुडीपाडव्याला खातात. हा अनेक व्याधींवर उपयोगी आहे. याचें लांकूड इमारतीच्या उपयोगी आहे. आर्यवैद्यकांत याला रसायन म्हटलें आहे. म्ह॰ १ गूळ चारणारापेक्षां निंब चारणारा बरा होतो. २ (कर्‍हेपठारी) कडू निंबाच्या झाडा- खालून उठून आला = ज्याच्या जवळ कांहीं पैसा नाहीं असा; भणंग; (उपहासार्थी योजितात). ॰पडवळ-न. कडू असलेलें पडवळ. -शे ९.२३५. ॰पाणी-न. १ पाण्यांत कडूनिंबांचे किंवा निरगुडीचे टहाळे घालून उकळलेलें पाणी (यानें आजार्‍यास, बाळंतिणीस वगैरे स्नान घालतात). २ विटाळ संपल्यानंतर बायका ज्या पाण्यानें डोक्यावरून स्नान करतात तें पाणी. अशा स्नानालाहि म्हणतात. (क्रि॰ घेणें). ३ मृताशौच किंवा कडूविटाळ संपल्यानंतर माण- सानें स्नानार्थ घ्यावयाचें पाणी. (येथें कडू म्हणजे दुःखदायक प्रसंगाशीं आलेला संबंध). (क्रि॰ घेणें). ४ भाजीपाला शिजविलेलें पाणी. ॰पाणी काढणें-(बायकी वाप्र.) वरील विटाळ फिट- ल्याचें स्नान झाल्यानंतर तें स्नान नाहींसें करण्यासाठीं पुन्हां दुसर्‍या साध्या पाण्यानें स्नान करणें किंवा अंगावर पाणी घेणें. ॰पाला- पु. कडू पाण्यांत घालावयाचीं करंज, लिंब, निर्गुडी, जांभळी इ॰ चीं पानें. ॰भोपळा-पु. १ कडवट रुचीचा भोपळा; दुध्या भोपळ्याची एक जात (याचा उपयोग सतार, वीणा, वगैरे वाद्यांच्या कामीं व सांगड, तुंबडी इ॰ च्या कामीं करतात). २ (ल.) दासीपुत्र. ३ (ल.) पंक्तिबाह्य; हलक्या जातीचा; बहिष्कृत माणूस. ॰भोपळी-स्त्री. कडू भोपळ्याची वेल; कडू भोपळा अर्थ १ पहा. -शे ९.२३६. ॰वट-टु-वि. (काव्य) कडवट पहा. 'कैलासवन कडुवट । उमावन तुरट ।' -शिशु ६१५. 'जैसा निंब जिभे कडुवटु ।' -ज्ञा १८.१८६. 'कडुवट हरिनामे वाटती पापियाला ।' -वामन, नामसुधा १.४.३४. ॰वाघांटी- स्त्री. कडवट फळें येणारी एक वनस्पति; आषाढी द्वादशीस हिच्या फळांची भाजी करतात. ॰विख-वि. कडूजहर; विषाप्रमाणें कडू. ॰विटाळ पु. १ मृताशौच; सुतक. २ बाळंतपणाचा विटाळ; बाळंतिणीला येणारा दहा दिवसांचा विटाळ; जननाशौच. (क्रि॰ येणें; जाणें; सरणें; फिटणें;). ॰वृंदावन-न. कडू इंद्रायण पहा. 'कडू वृंदावन । साखरेचें आळें ।' -तुगा.

दाते शब्दकोश