मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

तेलंगी

तेलंगी tēlaṅgī a (तेलंग) Relating to persons from the country तेलंगण--fashions, costume, language.

मोल्सवर्थ शब्दकोश

स्त्री. (बे.) कुत्र्याची टोपी. [का. तेलगी]

दाते शब्दकोश

तेलंगी      

स्त्री.       कुत्र्याची टोपी. (बे.) [क. तेलगी]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

तेलंग

पु. तेलंगण अथवा आंध्रप्रांतांतील रहिवासी. मुख्यत्वें- करून तेथील ब्राह्मण; तेलंगी. [सं. त्रिकलिंग-तिअलिंग-तिलिंग असा अपभ्रंश होऊन पुन्हां त्रिलिंग असें अपूर्व संस्कृत रूप] तेलंगण-न. अर्वाचीन आंध्र देश; तेलगु भाषाप्रांत. तेलंगण हें नांव मुसलमानांनीं रूढ केलें; याचें मूळचें नांव त्रिलिंग (तीन ज्योति- र्लिंगें असणारा प्रदेश) असें आहे. [सं. त्रिलिंग-तैलंग] तेलंग- भट-पु. १ तेलंगणांतील ब्राह्मण; तेलंगी ब्राह्मण. २ (तेलंगी भिक्षेकरी ब्राह्मण कांहीं मिळाल्याशिवाय घरांतून जात नाहींत यावरून ल.) भोजनसमारंभांत आगंतुकी करणारा, चिकट, लोचट माणूस. तेलंगा-पु. तेलंगणांतील मनुष्य; तेलगू माणूस. [तेलंग] ॰शिसवा-पु. (राजा.) अतिशय काळ्या जातीचें शिसवी लांकूड. तेलंगी-वि. १ तेलंगणांतील लोकांसंबंधीं (चाली, रीति, पेहराव, भाषा इ॰). २ तेलंगणांतला (माणूस). ३ मांगांची एक पोटजात; ही खानदेशांत आढळते, -अस्पृ ४७-४८. ॰कानडी- एक जात, ही अहमदनगर जिल्ह्यांत आकोलें डांगणांत आहे.

दाते शब्दकोश

तेलंगभट      

पु.       १. तेलंगी ब्राह्मण. २. (तेलंगी भिक्षेकरी ब्राह्मण काही मिळाल्याशिवाय घरातून जात नाहीत. यावरून ल.) भोजनसमारंभात आगंतुकी करणारा, चिकट, लोचट माणूस.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अळंबें-भें

न. एक वनस्पती; कुत्र्याचें मूत; भुइछत्री; याचे दोन प्रकार -गोडें व विषारी; यानें अंमल चढतो, वांती होते. जाती-चुड्यें, चितळें, गवतें, कुवळें, करडी, तेलंगी, भुईफोड, मोग- राळें. हें शीत, मधुर, त्रिदोषकारक, कफप्रद आहें. [का. अळिंबें.]

दाते शब्दकोश

घाशि(शी)रामी

स्त्री. १ (घाशीराम नांवाचा पुण्यांतील एक जुलमी कोतवाल सवाई माधवरावांच्या कारकीर्दीत होऊन गेला तो तेलंगी ब्राह्मणांना लहान कोठड्यांत अन्नपाण्या- वाचून कोंडून ठेवीत असे. त्यावरून) श्वासावरोध होण्याइतकी माणसांची गर्दी; दाटी कोंडमार. २ घाशिराम कोतवाल याच्या कारकीर्दीसारखा जुलमी अंमल, कारकीर्द; झोटिंगपाच्छाई; करडा अंमल. 'चार दिवस घाशीरामी चालवून घेतलेल्या अर्वाच्य पंडित मंडळीची आमच्या देशासंबंधीं एक मोठी समजूत ही आहे कीं, आमचा देश केवळ आसन्नमरण झाला आहे.' -नि. [घाशिराम]

दाते शब्दकोश

घाशिरामीं, घाशीरामीं      

स्त्री.       १. (घाशीराम नावाचा पुण्यातील एक जुलमी कोतवाल सवाई माधवरावांच्या कारकीर्दीत होऊन गेला; तो तेलंगी ब्राह्मणांना लहान लहान कोठड्यात अन्नपाण्यावाचून कोंडून ठेवीत असे. त्यावरून) श्वासावरोध होण्याइतकी माणसांची गर्दी; दाटी; कोंडमार. २. घाशिराम कोतवाल याच्या कारकीर्दीसारखा जुलमी अंमल, कारकीर्द; झोटिंगपाच्छाई; करडा अमंल : ‘चार दिवस घाशीरामी चालवून घेतलेल्या अर्वाच्य पंडित मंडळीची…’ – नि (घाशिराम).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

रेड्डी

स्त्री. तेलंगी शेतकर्‍यांची मुख्य जात.

दाते शब्दकोश