मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

त्व

त्व tva An affix to Sanskrit adjectives and nouns to form the noun abstract. All such formations are neuter. As they demand no interpretation, and no further notice than the following exhibition of the distinction betwixt these formations and those with the affix ता, they, with the exception of certain few pertaining to Heads ii and iii., do not appear in this dictionary. These two affixes, त्व & ता, are understood by Sanskrit grammarians and scholars to be, excepting only in gender, equivalent. But they are not thus equivalent:--they demand other exceptions. In being adjuncts for the formation of the abstract noun, and in being in some few instances justly interchangeable and in some other few laxly confounded, they agree; but they differ--First, In that, whilst ता forms the abstract from adjectives, त्व, although, likewise, forming it from adjectives, forms it mainly from nouns--concrete nouns: Secondly, In that, whilst ता forms abstracts of quality, त्व forms abstracts of office or function, state or condition, and of the stages or periods of life; ता thus answering to ness, त्व to ship and hood: Thirdly, In that, whilst ता & त्व both form abstract terms expressing attributes or properties, there pertains preferableness or greater eligibility to त्व: Fourthly, In that ता, even in the cases common to ता & त्व, is the popular or familiar affix, and त्व the scholastic or ornate affix. Of the first and second particulars of difference exemplification may be adduced in योग्यता, अर्हता, आर्द्रता, उष्णता--abstracts from adjectives, answering to fitness, wetness &c.; and in राजत्व, प्रधानत्व, पंडितत्व, शिष्यत्व, दासत्व, भृत्यत्व, पितृत्व, मातृत्व, पुत्रत्व, भ्रातृत्व, भर्तृत्व, पुरुषत्व, स्त्रीत्व, बालत्व, तरुणत्व, वृद्धत्व--abstracts from concretes, answering to kingship, childhood &c. Of the third particular illustration is found in लघुता as excelled by लघुत्व, महत्ता by महत्व, गुरुता by गुरुत्व, द्रवता by द्रवत्व, अज्ञानता by अज्ञानत्व, and in दातृता &c. im- measurably by दातृत्व, वक्तृत्व, कर्त्तृत्व, नियंतृत्व, भोक्तृत्व &c. &c. Of the last particular the verification is in दुष्टता, मिष्टता, आम्लता, तीक्ष्णता, कटुता, क्षारता &c. endlessly, as compared with दुष्टत्व, मिष्टत्व &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

भाववाचक नामें साधण्याकरितां संस्कृत नामें व विशेषणें यांना लावावयाचा प्रत्यय. त्व प्रत्यय लागून झालेलीं भाववाचक नामें नपुंसकलिंगी असतात. 'ता' प्रत्यय लावून भाववाचक नामें साधण्याचाहि एक प्रकार आहे. परंतु हीं दोन्ही प्रकारचीं नामें पुष्कळ अंशीं पर्यायवाचक असलीं तरी त्यांत कांहीं अपवाद आहेत व भाववाचक नामें साधतांना कांहीं ठिकाणीं 'ता' तर कोठें 'त्व' हाच प्रत्यय विशेषेंकरून लावतात. भाववाचक नामाचा 'ता' प्रत्यय विशेषतः विशेषणांसच लावतात आणि 'त्व' हा प्रत्यय जरी विशेषणांसहि लावितात तथापि मुख्त्यवेंकरून नामांस लावण्याचा प्रघात आहे. दुसरें असें कीं 'ता' प्रत्यय लागून झालेलीं नामें गुणवाचक असतात जसें:-योग्यता, आर्द्रता, उष्णता इ॰ तर 'त्व' लागून, हुद्दा, कार्य, स्थिति, आयुष्यांतील निरनिराळें वयोमान इ॰चीं दर्शक भाववाचक नामें बनतात. उदा॰ राजत्व, प्रधानत्व, पंडितत्व, मित्रत्व, पितृत्व, बालत्व, वृद्धत्व, तरुणत्व इ॰. तिसरें असें, कीं 'ता' व 'त्व' हे दोन्ही जरी गुणधर्मदर्शक भाववाचक नामांचे प्रत्यय आहेत, तरी 'त्व' लागून झालेल्या नामांसच विशेष प्राधान्य आहे हें पुढील उदा हरणांवरून दिसून येईल. जसें:-लघुता, गुरुता, द्रवता, महत्ता, अज्ञानता, दातृता इ॰ रुपांपेक्षां लघुत्व, गृरुत्व, दातृत्व, महत्त्व, अज्ञानत्व, इ॰ रुपेंच अधिक रूढ व सरस आहेत. चौथें असें कीं, 'ता' हा अधिक रूढ प्रत्यय आहे तर 'त्व' हा अधिक भारदस्त प्रत्यय वाटतो. जसें:-दुष्टता, आम्लता, मिष्टता, तीक्ष्णता कटुता, क्षारता हीं रूपें दुष्टत्व, आम्लत्व, मिष्टत्व इ॰ रुपांपेक्षां अधिक रूढ आहेत परंतु दुष्टत्व, आम्लत्व हीं रूपें अधिक भारदस्त वाटतात.

दाते शब्दकोश

त्व       भाववाचक नामे साधण्यासाठी संस्कृत नामे व विशेषणे यांना लावण्याचा प्रत्यय. हा लागून झालेली भाववाचक नामे नपुंसकलिंगी असतात. उदा. मित्रत्व, लघुत्व इ.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

त्व An affix to Sanskrit adjectives and nouns to form the noun abstract.

वझे शब्दकोश

तव

सना. (काव्य.) तुझा. 'कैकेयनृपभ्राते दोघे त्यांतील एक तव पक्ष ।' -मोकर्ण ४.११. 'तव चरणीं ठेऊनि माथा ।' [सं. तव = युष्मत् सर्वनामाच्या षष्ठींचें एकवचन]

दाते शब्दकोश

तव tava pron S Thine. Occurring in Prákrit only with the poets. Ex. तव चरणीं ठेवूनि माथा ॥.

मोल्सवर्थ शब्दकोश

तव tava m f A thin skin or coating; a film or pellicle. 2 Dusky suffusion over the eye, nebula.

मोल्सवर्थ शब्दकोश

तव pro Thine. m f A thin skin; a film Nebula.

वझे शब्दकोश

(सं) सर्व० तुझें. २ पातळ कातडें.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

पु.स्त्री. १ पापुद्रा; पातळ पदर; थर; तवंग. २ (डोळ्यावर येणारा) सारा; भुरी. [सं. तवस्]

दाते शब्दकोश

पु. आवेश; जोर. तवक पहा. [सं. तवस् = बल]

दाते शब्दकोश

तंव or तव

तंव or तव taṃva or tava f sometimes तवा f Giddiness, vertigo. v ये.

मोल्सवर्थ शब्दकोश

तंव, तव, तवई

स्त्री. (पित्तादिकामुळें येणारी) तिरि- मिरी; घेरी; मूर्च्छा; बेशुद्धि; भोंवळ; तवा. (क्रि॰ येणें). 'धनुष्या घालितां कव । झोक गेला आली तव । रावणासी ।' -मध्व ३७. 'जनकोजी शिंदे यांस तवई येऊन घोड्याखालीं आले.' -भाब ६४. [सं. तमस् = अंधार]

दाते शब्दकोश

तव      

सना.       तुझा : ‘कैकेयनृपभ्राते दोघे त्यांतील एक तव पक्ष ।’ – मोकर्ण ४·११. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु. स्त्री.       १. पापुद्रा; पातळ पदर; थर; तवंग. २. (डोळ्यावर येणारा) सारा; भुरी. [सं. तवस्‌]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु.       ताप.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तव, तंव, तवई      

स्त्री.       (पित्तादिकामुळे येणारी) तिरमिरी; घेरी; मूर्च्छा; बेशुद्धी; भोवळ; तवा (क्रि. येणे) : ‘धनुष्या घालितां कव । झोक गेला आली तव । रावणासी ।’ – मध्व ३७; ‘जनकोजी शिंदे यांस तवई येऊन घोड्याखालीं आलें– भाब ६४. [सं. तमस्‌]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

टव      

पु.       (कासारी धंदा) पत्रा कापताना मध्यबिंदू काढण्याचे एक खिळ्यासारखे हत्यार.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

टव

पु. (कासारी धंदा) पत्रा कापतांना मध्यबिंदु काढण्याचें एक खिळ्यासारखें हत्यार. -बदलापूर ९६.

दाते शब्दकोश

त्व      

भाववाचक नामे साधण्यासाठी संस्कृत नामे व विशेषणे यांना लावण्याचा प्रत्यय. हा लागून झालेली भाववाचक नामे नपुंसकलिंगी असतात. उदा. मित्रत्व, लघुत्व इ. त्वक्पक्ष      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तव, तंव      

क्रिवि.       १. तेव्हा; तो : ‘तंव के नारदु भणे ।’ – शिव १२६. २. तोपर्यंत; जंव याचे अनुयोगी : ‘कृतांत शिवला नसे तंव दिसे बरें पावणें ।’ – केका ४७. ३. तर या अर्थी पादपूरणार्थक अव्यय : ‘देह तंव पांचांचें जालें । हें कर्माचे गुणीं गुंथलें ।’ – ज्ञा १३·११·२. [सं. तावत्‌, तदा]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तव(वं)क, तवका

पु. (काव्य) रागाचा आवेश; त्वेष; संतापाचा आवेग; राग; संताप. 'एनें बोलें सनानिली । तंवकें बैठी ठेली ।' -शिशु १८६. 'रक्षावा 'प्राग्ज्योतिष ऐसें बोलोनि वृद्ध तवकानें । ' -मोभीष्म ५.५७. 'राक्षस चढूनियां तवका । भीमहृदयीं मारी थडका ।' २ आवेश; जोर; शक्ति; सामर्थ्य. 'आला धावुनि जांबुवंत तवकें झुंजावया लागला ।' -अकक २, कृष्णकौतुक ५७. तवका पहा. [सं. तवस्-तपक; प्रा. तवक]

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

प्रभु

पु. १ धनी; स्वामी; मालक. 'कोणी येके ग्रामी अथवा देसीं । राहाणें आहे आपणासी । न भेटतां तेथिल्या प्रभुसी । सौख्य कैंचें ।' -दा ६.१.२. २ राजा. ३ देव; ईश्वर. 'प्रभु त्यातें मर्मीं शरहाणी ।' -मो रामायणें. -वि. समर्थ; कर्ता. [सं.] ॰त्व- न. (राज्यकर्ता, अधिकारी, अमलदार इ॰ची) जागा; पदवी; स्थान इ॰. [सं प्रभु + त्व = भाववाचक नामाचा प्रत्यय] ॰भोजनन. (ख्रि.) हा एक संस्कार किंवा साक्रमेंत आहे. ह्यांत ख्रिस्तानें नेमून दिल्याप्रमाणें भाकर व द्राक्षारस देतात व घेतात. हा संस्कार ख्रिस्ताच्या मृत्यूचा दर्शक आहे आणि योग्य प्रकारें तें भोजन करणारे, दैहिक व इंद्रियगोचर रीतीनें नव्हे तर विश्वासानें त्याच्या शरीराचे व रक्ताचे व त्यापासून होणार्‍या सर्व लाभाचे वाटेकरी होतात आणि त्यायोगें त्यांचें आत्मिक पोषण होतें व त्यांच्या ठायीं ईश्वरी अनुग्रहाची वृद्धी होते असें प्रॉटेस्टंट ख्रिस्ती लोकांचें मत आहे. ॰शक्ति-स्त्री. युद्धाच्या तीन शक्तीपैकीं एक. राजाचें सामर्थ्य; द्रव्यबल व सेनाबल अशा ह्याच्या दोन शाखा आहेत. मंत्रशक्ति, उत्साहशक्ति पहा. ॰संमित-वि. (धन्याप्रमाणें) अधि- कारयुक्त; जोरदार; खणखणीत; बादशाही; अंमलदारीचा (शब्द, वाक्य, भाषण, आज्ञा). [सं.]

दाते शब्दकोश

ता

संस्कृतांतील एक प्रत्यय. हा नामाला, विशेषणाला लावून भाववाचक नामें बनवितात. हा प्रत्यय लागून झालेलीं भाव- वाचक नामें स्त्रीलिंगी असतात. उदा॰ मधुरता = गोडी; मधुरपणा. याप्रमाणें मिष्ट; मनुष्य; पशु, योग्य इ॰ पासून मिष्टता; मनुष्यता; पशुता; योग्यता इ॰ भाववाचक नामें होतील. त्व हा प्रत्यय लागून होणार्‍या भाववाचक नामांतील व ता लागून होणार्‍या भाववाचक नामांतील फरक त्व मध्यें पहा.

दाते शब्दकोश

ता tā An affix to Sanskrit adjectives and nouns to form the noun abstract; as मिष्टता, योग्यता, देवता, सुवर्णता, from मिष्ट, योग्य, देव, सुवर्ण. All such nouns are feminine. As they are formed at will, and demand no explanation, they do not appear in this dictionary. See notice of the distinction betwixt ता & त्व under त्व.

मोल्सवर्थ शब्दकोश

तवा

तवा tavā f (Commonly तव) Giddiness. v ये.

मोल्सवर्थ शब्दकोश

स्त्री. मूर्च्छा; घेरी. (विरू.) तव पहा. (क्रि॰ येणें).

दाते शब्दकोश

तवा tavā m ( H) An iron or earthen plate on which cakes are baked, a griddle or girdle. 2 fig. A sheet of rock; or a clear, level, uniform track of ground. 3 The ground of a garment. 4 The ground or foil of a jewel. 5 Applied to to the draw-bridge at Dowlutabad: also to the iron plate covering the mouth of the step-ascent: also to a plate thrown here and there over an aqueduct or a drain.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. १ पोळ्या, भाकरी इ॰ भाजण्याचें लोखंडाचें, मातीचें वर्तुलाकार पसरट असें भांडें. 'भरत रडे मातेचा तो स्नेह हि तापला पर तवा या ।' -मोरा हनुमद्रामायण १.४८४. २ कांठ व पदर वर्ज्य करून शेला, शालजोडी इ॰ वस्त्राचा मधला भाग; वस्त्राचें अंग. ३ (ल.) एकसारखा सपाट व विस्तीर्ण पातळ खडक; कातळ. ४ वृक्ष, खाचखळगे, उंचवटे इ॰ नीं विरहित असा जमीनीचा प्रदेश; सपाट भूप्रदेश. ५ रत्न इ॰ कांचा कोंदणामध्यें रत्नाच्या खालीं बसविण्याचा सोनें, चांदी इ॰ धातूचा पत्रा; तकट. ६ दौल- ताबाद येथील किल्ल्यांतील काढताघालता पूल; उभ्या चढणीवर जिन्याच्या तोंडाशीं बसविलेलें तव्याच्या आकाराचें लोखंडी झांकण. शत्रूला येतां येऊं नये म्हणून याच्यावर विस्तव घालीत. ७ ओलां- डण्याकरितां नाला, गटार इ॰ कांवर घातलेला पुलासारखा लोखंडी पत्रा. [सं. तप् = तापणें; प्रा. तव; हिं. तवा; फा. ताबा] सामाशब्द- ॰तोबरा-पु. १ (तवा आणि तोबरा) (ल.) प्रवासास आव- श्यक सामुग्री, समान; प्रवासाचें साहित्य. २ निर्वाह; उपजीविका. 'इकडे उत्पन्न झाल्यास तवा-तोबरा, न जाल्यास फाका.' -होकै १०५. 'परंतु फौजेचा तवा-तोबरा चालला पाहिजे.' -ख ६. २९१३. [तवा + तोबरा]

दाते शब्दकोश

आ      

आ अक्षर उच्चारताना होणारा ध्वनी व तोंडाचा होणारा आकार (स्थिती). वासलेले, उघडलेले तोंड : ‘तव सुप्रसाद मुदिरा इच्छितसे घातकी करीत ‘आ’ हे ।’ − मोआ ४·८३. (वा.) आ करणे − तोंड जास्तीत जास्त उघडणे (घसा तपासण्यासाठी). आ पसरणे − १. तोंड उघडणे; पदार्थ खाण्यासाठी आ करणे. २. मदतीसाठी, दयेची याचना करणे. ३. भोकाड पसरणे. आ वासणे − १. चकित होऊन निर्बुद्धपणे तोंड पसरणे, आ करणे; जांभई देणे. २. खाऊन टाकण्यासाठी तोंड उघडणे. ३. अधीनता, अंकितपणा कबूल करणे. आ      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

(आ अक्षर उच्चारतांना होणार्‍या ध्वनींचा अनुवाद व तोंडाचा आकार ) तोंड वासणें. उघडणें; उघडलेलें तोंड. (क्रि॰ करणें, पसरणें, वासणें.) 'तव सुप्रसाद मुदिरा इच्छितसे चातकी करुनि ' आ ' हे ।' -मोआ ४. ८३.' हृदये वाट पहाती मेघाची जेंवि करुनि आ शेतें ।'-मोशांति ३. ६५. ॰ वासणें १ तोंड पसरणें; आ करणें; जांभई देणें. २ खाऊन टाकण्यासाठीं तोंड उघडणें. ३ मदतीसाठीं याचना करणें. जसें -चीं चीं करणें, बें बें करणें; दयेची याचना करणें; आधीनता, अंकितपणा कबूल करणें; शरण आलों म्हणून कबूल करणें. म्ह॰ नाक दाबलें म्हणजे आ वासतो. ॰वासून,पसरून बसणें- आशा धरून, उत्कंठेनें बसणें. ॰पस रणें- तोंड उघडणें; पदार्थ खाण्यासाठीं आ करणें. '...आ ज्याला । कवळार्थ पसरिला...' -मोभीष्म १.२४.

दाते शब्दकोश

अदीक      

वि.       अधिक; जास्त : ‘तव आबैस अदीक दुख उपनले’ – लीचपू ३२६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आधि

पु.स्त्री. मानसिक दुःख; भीति, शोक, चिंता इत्यादि- कांपासून होणारें दुःख; काळजी. 'ते बुडाले द्वंद्व संधी । आधि व्याधि महार्णवी ।' -एभा २.२८९; -तुगा १५७०. 'तव सेनेंतील धरिति आधि रथी ।' -मोकर्ण १४.४९. -पु. गहाण; करार; वायदा. -स्त्री. १ (व्यापक.) पाठीमागें लागणारें लचांड, पीडा, उपाधि, कुलंगडें, खेंकटें. २ (ल.) उत्कंठा. 'हा बोलु आइकत खेवीं । अर्जुना आधि न माये जीवीं ।।' -ज्ञा १७.३२६. [सं. आधि]

दाते शब्दकोश

अघाड

स्त्री. आघाडी; अग्रेसर; अग्रमान; अग्रहक्क; पुढील जागा; पुढील बाजू, स्थान; इ. ‘वडिलपन अघाड संभाजीकडे धाकुटपण माघाड संताजी बिन महादोजीकडे. ’ -रा ६. पृ. ३३. [सं.अग्र + त्व]

दाते शब्दकोश

अघड

वि. न घडविलेलें; घडींव नसलेलें; ओबडधोबड (दगड, वस्तु इ॰). [सं. अ + घट्]. ॰ता-वि. न घडणारा; अशक्य. 'तेथ परिवारु बहुये । अघडता कीं ।। -अमृ ९. ३८; 'हे असो मात आघ- डती ।' -ज्ञा १.२३५; 'म्हणाल हे उपदेशिली नीती । आम्हांस तव अघडती ।' रास १.६४०.

दाते शब्दकोश

अःअः

उद्गा. हाः ! हाः ! आनंद, खेद या विकाराचा दर्शक ध्वनि. 'अः अः तव भजना विसरलों ।' -दावि ७६.

दाते शब्दकोश

अजिंक      

पहा : अजिंक्य : ‘तू तव अजिंक गा धडफुडा’ – एरुस्व ४·३६. अजिंक्य      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अजिंक

वि. न जिंकतां येणारा; अजिंक्य; अजय्य. 'तूं तव अजिंक गा धडफुडा ।' -एरुस्व ४.३६. [सं. अ + जी = जिंकणें]

दाते शब्दकोश

अलग, अलगत

क्रिवि. १ निराळ्या प्रकारें; भिन्नपणें; फट- कून; विरळ. २ कशास न लागतां, स्पर्श न होतां; सरळ अडथळया- शिवाय; तडक (धोंडा, गोळी इ॰ कोणके मार्गानें जाणें, उडणें, पाठ म्हणणें वगैरे ). ३ पृथक्; दूर. ४ विवक्षित संस्कार-संबंध न होतां (क्रि॰ असणें, राहणें, ठेवणें). ‘माहामारीनें सर्वांचा समा- चार घेतला, एवढें मात्र घर अलग राहिलें.’ ‘जे प्राप्ती तव अलग ठेली । ’ –ज्ञा ६.४३५. ५ हलकेंच; अचळ; अल्लाद. ६ स्वतंत्रपणें; मोकळेपणें. ७ लोंबकळत; ओळबंत; अधांतरीं; एकीकडे; एकलकोंडे. ‘आमचे यजमान गेल्यापासून आम्ही येथें उगीच अलग पडलों आहों.’ [सं. अ + लग + लग्न]

दाते शब्दकोश

अमाइक      

वि.       मायेपलीकडला; खराखुरा; वास्तव : ‘अमाइक तव नव्हसी । कवणहि विषो ।’ – अमृ २·३६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अमर      

वि.       ज्याला मरण नाही असा; मृत्यूच्या आधीन नसलेले; मृत्युरहित; नाशरहित : ‘सहजे दुर्वेचा डिरु । आंगेचि तव अमरू । वरी आला पुरू । पीयुषाचा ॥’ – ज्ञा १४·२८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अनाहत      

वि.       १. न मारलेला; न हाणलेला. २. स्वयमेव; स्वभावतःच उत्पन्न झालेला. ३. कोरे; न धुतलेले (वस्त्र). ४. सततचा; अखंड. ५. योगामुळे ऐकू येणारा दशनादांचा ध्वनी : ‘तव अनाहताची बोली । चावळे ते ॥’ – ज्ञा ६·२७४. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अनंतत्व

न. १ ज्या स्थितीला अंत नाहीं अशी शाश्वत स्थिति; आनंत्य; अनंतता; अपारता; निरवधिभाव. २ संपूर्णता; अव्यंगता. ३ (गणित.) अनंत संख्या. [सं. अनंत + त्व]

दाते शब्दकोश

आंब      

पु.       आंबरस : ‘आंबु जव सांघावें तव पुरु आला’ − लिचपू ६७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अंबा

पु. एक झाड व त्याचें मधुर फळ; आंबा; आम्र; याचें कोंवळें फळ अंबट व त्रिदोष, रक्तदोषकारक आहे. पिकलेलें फळ गोड, शक्तिवर्धक, जड, वर्तनाशक आहे. याचा रस सारक, स्निग्ध, बळकारक आहे, याची कोय तुरट, ओकारी व अति- सारनाशक आहे. याचा मोहोर अतिसार, प्रमेह व रक्तदोष नाशक आहे. यांचें पान कफ व पित्तनाशक आहे. आंब्याला रंगावरून, स्थळावरून, व्यक्तिवरून व रुचीवरून निरनिराळीं नांवें असतात. जसें:-शेंदरी, शिवापुरी, हपूस, शोपा इ॰. अंब्याचें झाड हिंदुस्थानांत होतें. रानांत, डोंगरांत उगवणार्‍या आंब्याला रायवळ, बागेंत लावलेल्यास इरसाल व कलम केलेल्यास कलमी अंबा म्हणतात. याच्या कापा (कापून खाण्याचा) व रसाळ (रस काढण्याचा) अशा दोन जाती आहेत. हें झाड पुष्कळ वर्षें टिकतें. कच्च्या आंब्याचें लोणचें व पाडाच्या आंब्याचा मुरंबा, गुळंबा करतात. 'पिवळा आणि सुगंध । अमृता ऐसा असे स्वाद । परी अंबा तव प्रसिद्ध । एकालाचि ।' -विउ १०.१९. [सं. आम्र; प्रा. अंब] ब्याचा-काप-तळका-पु. अंब्याचा एका, बाजूस कप, फोड. चा टाहाळा-डाहळा-ढाळा- पु. १ आंब्याची लहानशी फांदी. हा शुभ व अशुभ दोन्ही प्रसंगी असतो यावरून. २ (ल.) शुभ-अशुभ प्रसंगीं किंवा सुखदुःखाच्या प्रसंगीं दुसर्‍याच्या घरीं सारखेपणानें वागणारा माणूस; लग्न वगैरे समारंभांत दोहोंपक्षांकडील माणूस. -चा शेंकडा-६ आंब्याचा १ पाडा, ५३ पाड्यांचा (३१० आंबे) १ शेकडा. सबंध घेतला तर ३२० अंबे मिळतात. निर- निराळ्या ठिकाणीं अंब्याचा शेंकडा निराळा आहे. कांहीं ठिकाणीं २२ पाड्यांचा शेंकडा असतो. ॰उतरणें-१ आंबे झाडावरून खालीं न पाडतां काढणें. 'आज आमच्या झाडाचे आंबे उतरावयाचे आहेत.' २ फार पिंकणें. 'आंबा उतरला आहे. कशाला खातोस ?' ॰शिपणें-वरात घरीं जाण्याच्या पूर्वी गौरीहांरातील देवी घेण्याकरितां वर जातो तेथें गौरी- हाराच्या जागीं भिंतीवर अंब्याचें झाड काढलेलें असतें, तेथें आंबा शिपतांना वधू आपला डावा पाय वरच्या उजव्या मांडी- वर आणि डावा हात त्याच्या पागोट्यावर ठेवून त्याजपाशीं उभी राहून उजव्या हातानें नागवेलीच्या किंवा आंब्याच्या पानानें आंबा शिपते त्यावेळीं बायका आंबा शिंपण्याबद्दलचें गाणें म्हण- तात. 'आंबा शिंपावया गोरटी । कडे घेऊनि कृष्ण उठी । आइती केलीसे गोमटी । कुंकुमें वाटी परिपूर्ण ।' -एरुस्व १५.१४२. ॰बांधणें-झाडास फळ लागणें. -अंबेबार-बहार-फाल्गुन महि- न्यांत म्हणजे आंब्याला मोहोर येण्याच्या दिवसांत जें तिसरें फळांचें पीक येतें तें, म्हणजे तिसरा बार (मृगबार, हत्तीबार असे आणखी दोन बार आहेत). -शे २.१२. -ब्याचा मोहोर-पु. (एक पक्कान्न) दुधांत भिजलेल्या रव्याचे गवळे करून मध्यें चिमटून थोडे वळसे म्हणजे होणारें त्रिदळ. -चें पन्हें-न. अंबवणी पहा. -चें साठ-न. कल्हईच्या ताटाला तूप लावून त्यांत अंबरस ओततात व तो सुकवून त्यावर दुसर्‍या अंबरसाचा घालतात व पुन्हां सुकूं देतात. गोडीसाठीं यांत साखर घालतात. सुकल्या- वर तो पोळीप्रमाणें होतो. अशा प्रकारें जी पोळी करतात तें. -चा भात-पु. केशरी भात शिजत आला म्हणजे त्यांत हपूसचे आंबे चिरून त्याच्या फोडी घालून केलेला भात. ॰गदरलेला-गद्रा-गजरा-पु. पाडाचा अंबा. 'अतिरति एक दोरींत ओविलें फळझाडें आंबागद्रा ।' -पला ६६.

दाते शब्दकोश

अंबुद

पु. ढग; मेघ. ' नगदंबूदगर्भ नभ ।' -ज्ञा १८.५. 'किं ऐकतां तव वचनांबुंद । ममचित्त शिखी नृत्य करी ।।' [सं.]

दाते शब्दकोश

अंबुद ambuda m S (Water giver.) A cloud. Ex. किं ऐकतां तव वचनांबुद ॥ मम चित्तशिखी नृत्य करी ॥

मोल्सवर्थ शब्दकोश

अपड

स्त्री. रुसणें; पड न घेणें; ओढून धरणें. 'तव बोलिलें दैत्यविभांडें ।आतां उसीरूं होइलु अपडें ।।' -शिशु १८५. [अ + पड]

दाते शब्दकोश

अपड      

स्त्री.       रुसणे; पड न घेणे; ओढून धरणे : ‘तव बोलिले दैत्यविभांडे । आतां उसीरू होइलु अपडें ॥’ - शिव १८५.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अप्रशिखा

स्त्री. एकाचा मित्र त्यास ठार करावयास प्रवृत्त झाला असतां आपलें मृत्युवृत्त इतरांस ज्ञात व्हावें म्हणून त्यानें अ-प्र-शि-ख या आद्याक्षरयुक्त रचलेली एक चार चरणांची कविता. अनेन तव पुत्रेण । प्रसुप्तस्य वनांतरे । शिखामादाय हस्तेन । खड्गेनोपहतः शिरः ।। (त्यावरून) सांकेतिक किंवा लाक्षणिक भाषा.

दाते शब्दकोश

अस्वत्व

न. मालकीचा, धनिपणाचा, स्वामित्वाचा अभाव. ( कायदा ) जिनगी, मालमत्ता वगैरेवरील वारसाचा, मालकीचा अभाव; बेवारस. [ सं. अ + स्व + त्व ]

दाते शब्दकोश

आत्मपोटी      

वि.       आप्पलपोट्या; स्वार्थी : ‘तव भीम म्हणे श्रीकृष्णासी । तूं बरवा आत्मपोटी कळलासी । मी अतिथी उभा असता द्वारासी । भोजन सावकाश करिसी तूं ।’ − जै १०·२.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अवकलतवकल

अवकलतवकल avakalatavakala f n Formed by redup. from तव- कल q. v.

मोल्सवर्थ शब्दकोश

आवशणे      

अक्रि.       १. आवेशयुक्त होणे; स्फुरण पावणे; उद्युक्त होणे. २. रागावणे; संतापणे; क्षुब्ध होणे : ‘तव वातात्मजा आवेशला । म्हणे धरूनी आणीन दुदुंभीला । मग तो आकाशीं उडाला । नाहीं देखिला कोणीही ।’ − जै ६७·३९. ३. प्रवेश करणे; शिरणे; व्यापणे : ‘मनीं आवेशलें अद्‌भुत.’ [सं. आ+विश्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अवस्वरी      

पु.       जासूद : ‘तव अवस्वरीए जुहारिले’– रुस्व १२७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अवतरण      

न.       १. उतरणे; खाली येणे; देवादिकांचे पृथ्वीवर मृत्युलोकी जन्मास येणे; अवतार; अवतरण्याची क्रिया, व्यापार : ‘पार्वती म्हणे माग वरदान । तव अदिती विनवी वचन । कीं त्वा करावे अवतरण । माझे ठाई ॥’ – कथा २·११·३७. २. अधःपात; अधोगती; अवपतन. ३. विवरणात्मक भाषण किंवा विधान; (श्लोक, वाक्य इ. वर) टीका; स्पष्टीकरण; भाष्य; टिप्पणी. ४. उतारा; उद्धृतवचन. ५. आवेश; वारे; संचार : ‘जेणें चैतन्यासी भरे अवतरण ।’ – विसिंपू. ५·३९. ६. मूर्ती; प्रत्यक्षपण; प्रत्यक्ष अवतार : ‘तो सहजेंचि स्नेहाचें अवतरण ।’ – ज्ञा ११·४२. ७. तीर्थस्थान. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

बाह(हा)णें

सक्रि. १ (काव्य) बोलावणें; हांक मारणें. 'धेनुवत्सें तुला बाहती माधवा ।' -भूपाळी. २ अक्रि. आरोळी मारणें, देणें; आवाज करणें; ओरडणें. 'तव कोकिळा बाहती सुंदर ।' [सं. आह्रान; वि + आ + ह्रे = हांक मारणें]

दाते शब्दकोश

बाहणें

बाहणें bāhaṇēṃ v i (Poetry.) To make a call or cry; to utter its voice. Ex. तव कोकिळा बाहति सुंदर ॥. 2 To call in general.

मोल्सवर्थ शब्दकोश

बांकुटणें

अक्रि. (राजा.) कोमेजणें; वाळणें; सुकणें; टव- टवी नाहींशी होणें. [वाळकुटणें ?]

दाते शब्दकोश

बंका

पु. पहारेकर्‍यांची अथवा चौकीदारांची रांग(किल्ल्या- भोंवतालची). 'बंकीं रिघे तव तया दिसताति बंके.' -र ३९. ॰ईत-पु. चौकीपहारा करणारा शिपाई; राजाच्या तंबूभोंवतालचा शिपाई.

दाते शब्दकोश

भीम

पु. १ पांच पांडवांपैकीं दुसरा. हा फार शक्तिमान व खादाड होता. २ (ल.) धिप्पाड शरिराचा व अधाशी मनुष्य. ३ मारुति; बलभीम. 'भयासूर तो भीम सिंधू उडाला ।' -राक १.८. -वि. भयंकर; भयानक; भयावह; भय उत्पन्न करणारा (माणूस, गोष्ट). 'तव राक्षस उठले तांतडी । भीम कोल्हाळ करिती ।' [सं.] ॰तुंबा-पु. (ना.) एक गोंडी वाद्य हें एक- तारी असून याच्या दांडीच्या मध्यावर खालच्या बाजूस लहान भोपळा बसविलेला असून दांडीच्या वरील बाजूस उंच तिकोनी ५।६ पडदे असतात. ॰पलासी-पु. (संगीत) एक राग. यांत षड्ज, तीव्र ऋषभ, कोमल गांधार, कोमल मध्यम, पंचम, तीव्र धैवत, कोमल निषाद हे स्वर लागतात. आरोहांत ऋषभ आणि धैवत वर्ज्य. जाति औडव-संपूर्ण. वादी मध्यम. संवादी षड्ज. गानसमय दिवसाचा तिसरा प्रहर. ॰पाक-पु. भीमाचा पाक म्हणजे खाण्याचे तामसी पदार्थ. याच्या उलट नळपाक (सात्त्विक पदार्थ). ॰रात्र-त्रि-स्त्री. माणसाच्या वयाच्या ७७ व्या वर्षाच्या सातव्या महिन्याची सातवी रात्र. ॰सेनपु. भीम अर्थ १ व २ पहा. ॰सेनी ऊद-पु. एक तांबडसर जातीचा ऊद. ॰सेनी एकादशी-स्त्री. ज्येष्ठ शुद्ध एकादशी. भीम दुसर्‍या कोणत्याहि एकादशी न करतां हीच करीत असे. ॰सेनी कापूर- पु. कापराची एक जात.

दाते शब्दकोश

चाळविणे      

उक्रि.       झुलविणे; व्यर्थ आशा लावणे; वेडे करणे : ‘कोणी येकें चाळविलें । कोणी येकें भ्रष्टविलें ।’ - दास ३·७·१६. २. हलविणे; चेतना देणे; प्रवृत्त करणे : ‘तव प्रवृत्तिचे काइं सांघे । चाळविलों फळश्रुतीचेनि मार्गें ।’ ऋव २८. ३. आजूबाजूस फिरविणे. ४. घसरावयास, निसटावयास, झुकावयास लावणे; मूळ जागेवरून हलविणे. ५. चेष्टा करणे; हरभऱ्याच्या झाडावर चढवणे. ६. चीड येईलसे करणे; त्रास देणे; खोडी काढणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चाळविणें

उक्रि. १ झुलविणें; आशा लावणें; वेडें करणें. 'कोणी येकें चालविणें । कोणी येकें भ्रष्टविलें ।' -दा ३.७.१६. २ हलविणें; चेतना देणें; प्रवृत्त करणें. 'तव प्रवृतिचे कांइ सांधे । चालविलों फळश्रुतीचेनि मागें ।' -ॠ २८. ३ आजु- बाजूस फिरविणें. ४ घसरावयास, निसटावयास, झुकावयास लावणें; हरभर्‍याच्या झाडावर चढविणें. ६ चीड येईलसें करणें; त्रास देणें; खोडी काढणें.

दाते शब्दकोश

चांद

पु. १ चंद्र. 'देखोनि निजप्रबोध चांद । भरतें अगाध तुज दाटें ।' -एभा २०.२. 'वदलीं हृदयांत नांदतो तव माझा अभिलाष चांद तो ।' -मोरा १.३७५. २ चंद्राच्या आकाराचा दागिना; बिल्ला; पदक. 'तीन चांदांचा जहागिरदार' ३ (बे.) चांदई. ४ एक प्रकारचें दारूकाम; यांत चंद्राच्या आकाराच्या कांबी असतात व उडतांना निरनिराळ्या रंगांचे तारे बाहेर पड- तात, [सं. चंद्र; प्रा. चन्द; हिं. गु. बं. चांद; पं. चंद; सिं. चंडु] (वाप्र.) चांदाची वृद्धि असणें-द्वितीयेच्या चंद्राप्रमाणें वाढणें. 'चांदाची वृद्धि असो नांदा सानंद सानुग स्वस्थ ।' -मोआदि ३५.७७. चांद बांधणें-भिंतीस पाऊस लागूं नये म्हणून आडोसा बांधणें.

दाते शब्दकोश

चाटा, चाटी, चाठ्या      

पु.       कापडाचा फिरता व्यापारी : ‘तव गंगातीरिचे चाटे गुजराते कापड वीकुं गेले होते : ते भेटले : ते माहादाइसांचे भाचे :’ लीचउ ६५४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चावटा      

स्त्री.       वटवट; बडबड : ‘तंव दैत्येश म्हणे वाजटा । व्यर्थ कां करिसी चावटा । तव सैन्य लाविले बारा वाटा । हें काय दृष्टीं न देखसी ।’ - जैअ ७९·६७. [सं. वाचाट]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चावटा

स्त्री. वटवट; बडबड. 'तंव दैत्येश म्हणे वाजटा । व्यर्थ कां करिसी चावटा । तव सैन्य लाविलें बारा वाटा । हें काय दृष्टीं न देखसी ।' -जै ७९.६७. [वाचाट]

दाते शब्दकोश

चइणे      

अक्रि.       जागा होणे : ‘चइला तव लटके ।’ - चसिसू ५३. [सं. चित्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चइणें

अक्रि. (महानु.) जागा होणें. 'चइला तव लटके ।' -चक्रधर सिद्धांत सूत्रें ५३. [सं. चित्; प्रा. चेअ]

दाते शब्दकोश

चक्री

पु. कुंभार. 'दे येक म्हणतां कोरी घागरी । हास्य करोनि चक्री अंतरीं । पांच रुपया द्याल जरी । घडा देईन सुंदर वदे ।' -दावि २३५. -वि. चक्र धारण करणारा (विष्णु, कुंभार). 'दिनमणि तव नोहे चंद्रसा रंग चक्री' -मुरामाअरण्य १०१.

दाते शब्दकोश

चटका      

पु.       १. दाह; भाजणारी उष्णता; तलखी; प्रखरता (सूर्य, अग्नी किंवा तापलेला पदार्थ यांपासून उत्पन्न होणारी); ताप. २. ऊन किंवा तिखट पदार्थ खाल्ल्याने घशाशी होणारी आग; अशी आग होण्याचा गुणधर्म. (क्रि. लागणे.) ३. पोळल्यामुळे किंवा तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे होणाऱ्या तात्कालिक वेदना, दुःखावेग. (क्रि. बसणे.) ४. पोळल्यामुळे पडलेला डाग, जखम; भाजल्याची खूण. ५. अंतःकरणाला होणाऱ्या वेदना; मनस्ताप; चरका; संताप; मानसिक यातना; चुटपुट; रुखरुख; एखादी वस्तू परत मिळण्याविषयी लागलेली उत्कंठा (क्रि. बसणे, लागणे.) : ‘मी सोडुनि आलों तटका । तो जिवा लागला चटका ।’ - मध्वक २२०. ६. व्यंगोक्ती; औपराधिक मर्मभेदी भाषण; प्रतिक्षेप; टोमणा, टोला; जिव्हारी लागणारी व झोंबण्यासारखी टीका. (क्रि. मारणे.) ७. काळजी. चिंता; आस्था; हुरहुर; पर्वा; दरकार : ‘मनासि चटका म्हणुनी तव पदीं लगबग येत बालिका ।’ - स्वयंवर. ८. सांडसाने दिलेला डाग; चरका. (क्रि. देणे, लावणे.) ९. मोरचूद वगैरे लावून सोने अग्नीत तापवणे. (क्रि. देणे.) १०. (जहल्लक्षणेने) वरील कृत्याला लागणारी साधनसामग्री, द्रव्यसाहित्य, साधनीभूत पदार्थांचा संच. ११. मिऱ्याचे तिखट; तिखट चटणी विशेषतः हरभऱ्याची डाळ वाटून दही व ओल्या मिरच्या घालून करतात तो. १२. (राहिलेल्या अर्थासाठी) पहा : चटक, चरका [सं.चट्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चटका

पु. १ दाह; भाजणारी उष्णता; तलखाई; प्रखरता; (सूर्य, अग्नि किंवा तापलेला पदार्थ यांपासून उत्पन्न होणारी); ताप. २ ऊन किंवा तिखट पदार्थ खाल्ल्यानें घशाशीं होणारी आग; अशी आग होण्याचा गुणधर्म. (क्रि॰ लागणें). ३ पोळल्यामुळें किंवा तिखट पदार्थ खाल्ल्यामुळें होणार्‍या तात्कालिक वेदना, दुःखावेग. (क्रि॰ बसणें). ४ पोळल्यामुळें पडलेला डाग, जखम. ५ अंतःकरणाला होणार्‍या वेदना; मनस्ताप; आधि; चरका; संताप; मानसिक यातना; चुटपूट; रुखरुख. (क्रि॰ बसणें, लागणें). 'मी सोडुनि आलों तटका । तो जिवा लागला चटका ।' -मध्व २२०. ६ व्यंगोक्ति; औपरोधिक मर्मभेदी भाषण; प्रतिक्षेप; टोमणा, टोला; जिव्हारी लागणारी व झोंबण्यासारखी टीका. (क्रि॰ मारणें) ७ काळजी; चिंता; आस्था; कळकळ; पर्वा; दरकार. 'मनासि चटका म्हणुनी तव पदीं लगबग येत बालिका ।' -स्वयंवर नाटक. ८ विरह; दुःख; हुरहुर; एखादी वस्तु परत मिळण्याविषयीं लागलेली उत्कंठा, चटक; चुटपूट; ध्यास; छंद; तहान. (क्रि॰ लागणें; लावणें; बसणें). 'च च चटका लागतां पावसी पद उंच ।' -दावि २१३. 'लोभ हरीचा लटका...लावुनि गेला चटका.' 'तो माळी दादव्या केला । तो विहिरींत पडून मेला । त्याचें कांहीं वाटत नाहीं मला । सख्याचा चटका लागुनि गेला ।' ९ सांडसानें दिलेला डाग; चरका. (क्रि॰ देणें; लावणें). 'बसतेचि चटके लावीत । शुद्धावरि मूर्खत्वें ।' १० मोरचूत वगैरे लावून सोनें अग्नींत तापविणें. (क्रि॰ देणें). ११ (जहल्लक्षणेनें) या कृत्यास लागणारी साधनसामुग्री, द्रव्य- साहित्य, साधनीभूत पदार्थांचा संच. १२ व्यापारांत ठोकर, तोटा, थप्पड, अद्दल. (क्रि॰ बसणें; लागणें). 'जामीनकी विषयीं मला असा चटका बसला आहे कीं पुन्हां जन्मांत कोणास जामीन राहूं नये.' १३ मिर्‍याचें तिखट; तिखट चटणी; विशेषतः हरभर्‍याची डाळ वाटून दहीं व ओल्या मिरच्या घालून करतात तो. १४ (को.) खमंग काकडी. १५ (राहिलेल्या अर्थांसाठीं) चटक, चरका पहा. [सं. चट् = जखम करणें; म. चाटणें, झाजरणें, घसटून जाणें] म्ह॰ (व.) चटकामटका तोंडाला फाटकें धोतर गांडीला = खायला चम मीत हवें व अंगावर फाटके कपडे चालतात अशा माणसाला म्हणतात.

दाते शब्दकोश

चुबकळणें

उक्रि. बुचकळणें; बुडविणें. 'जे आनंदसमुद्रीं कुंभ । चुबकळोनि भरिले ।' -ज्ञा ९.१९१. 'मग हात चुबक. ळुनि पहात । तव निर्मळ झरा आंतुनि येत ।' -अक्रि. १ बुडणें; गटांगळ्या खाणें. २ (ल.) मौनावणें; कुंठीत होणें. चुबुकळणें पहा. [बुचकळणें]

दाते शब्दकोश

चवी      

स्त्री.       १. चव; रुची; गोडी; जिभेने ग्रहण करणे : ‘दाविली आपुली चवि ।’ – रापं ३·७०. २. आस्वाद; बऱ्यावाईटाची परीक्षा, चाचणी. (क्रि. पाहणे.) : ‘कीं तेंचि चवी करूनि पाहिजें । तव अमृत आहे ।’ – ज्ञा ६·३.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

डिंबिया

स्त्रीअव. (कों.) गुडघे. (धरणीं) डिंबिया घालणें-दंडवत घालणें. 'तव सकलैकी कर जोडुनी । डिंबिया घातलिया धरणी ।' -ख्रिपु १.१.१७७.

दाते शब्दकोश

डिंबिया      

स्त्री. अव.       गुडघे. (को.) (वा.) (धरणी) डिंबिया घालणे –दंडवत घालणे : ‘तव सकलैकी कर जोडुनी । डिंबिया घातलिया धरणी ।’ –क्रिपु १·१·१७७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दुरावणें

अक्रि. वियोग होऊन दूर राहणें, पडणें, जाणें. 'तैसीं दोन्ही दुरावलीं । जे प्राप्ती तव अलग ठेली ।' -ज्ञा ६.४३५. [दूर]

दाते शब्दकोश

धुआटी      

स्त्री.       धूळ; धुरळा : ‘तव कर्ममार्गाचिया धुआटी आंधरिली ब्रह्मयाची दिठी.’ - उगी ६७१.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

एरीवानी      

क्रिवि.       दुसऱ्या बाजूला : ‘मग एरवानी उलथे : तव एर अंगसावध होए’- लीचउ १२१.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

एसणा, एसना      

वि.       असा; असला; इतका; अशा तऱ्हेचा; एवढा : ‘तव बलिभद्रु बोलिला। एसना तुं जुझारू भला ।’-शिव ९१९; ‘एसणी आंगीं असता प्रौढी।’ -गीता १·१४७२. [सं. अदस् एष]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गडगडीत      

पु.       कोरडा आणि खडकाळ : ‘तव गडगडीत कूप उदके वोसंडला’ - नाम ९२१.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गोवारी      

पु.       गुराखी; गवळी : ‘तव गाई आलिया रात्रीं । कच नाहीं आला गोवारी ।’ –कथा १¿५¿८२.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गोवध      

पु.       १. गाईची हत्या. २. वाचेची हत्या : ‘आखारी तव गोवधु । पुढारा अनृतवादु ।’-अमृ ७¿२७८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ग्रामबिंदुटी      

स्त्री.       खेड्यातील गल्ली, बिदी : ‘तव ते गोधनें ग्रामबिंदुटी । अपार मौळी असती चव्हाटी ।’ –नव १३¿११५.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ग्रथन, ग्रंथन      

न.       गुंफण; जुडण; बांधणी; रचना : ‘आणि माझें तव आघवें । ग्रथन येणेचि भावें ।’ –ज्ञा १३¿३२९. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गुढी      

स्त्री.       १. वर्षप्रतिपदेला उभारायचा ध्वज (आंब्याचा मोहोर, लिंबाचा टाहाळा, उंची वस्त्र, गाठी व एक भांडे यासह काठीला बांधून उभारतात तो). (त्यावरून) आनंदप्रदर्शनार्थ उभारलेली ध्वजा, पताका : ‘तव आत्मा उभिताअे गुढी । रोमांचमियें ।’ –शिव ६०. २. देवाला काही प्रश्न वगैरे विचारायचे झाल्यास गोटी, फूल, तांदूळ वगैरे चिकटवतात व प्रसाद किंवा कौल मागतात ती. [क. गुडी] (वा.) गुढी उजवी देणे – विनंती मान्य करणे; अनुकूल कौल देणे. गुढी डावी देणे – विनंती अमान्य करणे; प्रतिकूल कौल देणे. गुढी उभारणे – प्रसिद्धी पावणे; कीर्तिवंत होणे; विजय मिळवणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गुरु

पु. १ मंत्रोपदेशक. २ धार्मिक उपाध्याय. धार्मिक संस्कार इ॰ करणारा. ३ उपनयन संस्कारामध्यें गायत्र्युपदेश करणारा. ४ शास्त्रें इ॰ शिकविणारा; विद्यादाता. 'सकोप दिसती गुरु क्षणभरीच जे तापले ।' -केका ८८. (यावरून) ५ (ल. निंदार्थीं) फूस, भर, प्रोत्साहन देणारा वाईट मसलत देणारा माणूस. ६ पिता; बाप; पूज्य, वडील माणूस. 'गाति जनमे- जया तव गुरुच्या आश्चर्य मरण जननाचें ।' -मोअश्व ४.८०. ७ या नांवाचा ग्रह. ८ बृहस्पति; देवांचा गुरु. 'वृत्रारिप्रति वदला गुरु ज्या या भद्रधामनीतीतें । -मोसभा ६.७०. (सामा.) शिक्षक; मास्तर; आचार्य. ९ -संबोधन. अहो । लब्धप्रतिष्ठित; बोवाजी! म्ह॰ गुरूची विद्या गुरूस फळली-भोंवली = लोकांस फसविण्याची युक्ति ज्याला शिकविली त्यानेंच याला (शिक- विणाराला) फसविलें. सामाशब्द-॰किल्ली-स्त्री. १ न समज- णारें, खोल, गूढ लिखाण, प्रबंध, मंत्र (गुरूनें सांगितल्याखेरीज न समजणारें). २ (सामा.) गूढ; कठिण गोष्ट, शंका. ३ खुबी; मख्खी; मर्म (कुलंगड्याचें); गूढ उकलण्याची युक्ति. 'प्रकरण जरा जड आहे, पण तुझ्यापासून तिला नरम करण्याची गुरु- किल्ली आतां शिकलोंच आहे.' -त्राटिका [गुरु + किल्ली = फक्त गुरूलाच चालवितां येणारी किल्ली] ॰कुल-न गुरूचें कुटुंब. २ गुरूनें विद्यार्थ्यांना पुत्रवत् मानून, त्यांचे खाणें, पिणें, विद्याभ्यास इ॰ सर्व सोय लावणारी पाठशाळा; प्राचीन आश्रम- पद्धति.[सं.] ॰कृपा-स्त्री, गुरूची मर्जी, आशीर्वाद. 'गुरुकृपा संपादन केली असतां विद्या लवकर येते.' ॰क्रम-पु. गुरुपरंपरा- गत, अधिकृत शिक्षण. [सं.] ॰गम्य-वि. ज्याच्या समजुतीस गुरु लागतो असें; गुरुकिल्ली लागणारें; दुर्बोध; गहन (श्लोक, वचन ग्रंथभाग). गम्य पहा. 'कां गुरुगम्य हन ठाय ।' -ज्ञा ६. ४५९. [सं.] ॰जन-पु. पूज्य, माननीय व्यक्ति; वडील माणसें. 'कशि गुरुजनीं सतीची शिवला ज्या कुमुदिनीस अस- दर्क ।' -मोसंशयरत्नमाला १३. (नवनीत पृ. ३५०). वडील- धारीं माणसें; मनाची मंडळी. ॰जनसभा-स्त्री. १ (ख्रि.) युनायटेड चर्च ऑफ नॉर्दर्न इंडियाच्या एका विशिष्ट क्षेत्रांतील चर्चेसच्या आचार्य व प्रातिनिधीक वडिलांची सभा. २ इंग्लंडचे चर्चच्या एखाद्या पांढरीच्या आचार्याची व मंडळीच्या अनेक कामांत त्याची मदत करणारांची प्रातिनिधिक सभा. हे सहाय्यक वडीलच असावेत असें नाहीं. गुरुजी-पु. गुरु; शिक्षक; आचार्य; पुरोहित. गुरुतल्पग-तल्पी-पु. १ गुरुपत्नीशीं गमन करणारा २ (ल.) मातेसमान स्त्रीपाशीं गमन करणारा; माहापापी; नीच. [सं. गुरु + तल्प + ग] ॰दक्षिणा-स्त्री. विद्या संपल्यानंतर शिष्यानें गुरूस द्यावयाची देणगी, संभावना; शिकण्याची फी. [सं.] ॰द्रव्य-न. आपल्या गुरूची मालमत्ता. (समासांत) गुरुद्रव्यहरण- साधन-अपहार-अभिलाष. [सं.] ॰द्रोह-पु. गुरूचा द्वेष; गुरूचा गुन्हा करणें; गुरूचा विश्वासघात. [सं.] ॰द्रोही-वि. गुरूचा द्वेष करणारा; गुरूशीं वैर करणारा. 'मित्रद्रोही गुरुद्रोही । विश्व- द्रोही देवद्रोही ।' [सं.] ॰द्वार-न. शीखांच्या गुरूंनीं स्थापन केलेलें देऊळ. (सामा.) शिखांचें देऊळ. ॰परंपरा-स्त्री. आपला गुरु, गुरूचा गुरु, त्याचा गुरु असा गुरूचा वंश. ॰पीठ- न. गुरूचें राहण्याचें ठिकाण; गुरूची गादी. [सं.] ॰पुत्र-पु. १ गुरूचा मुलगा. २ साधुसंतांमध्यें वाढलेला व त्यांच्याप्रमाणें वागणारा; सत्पुरुषानें उपदेश केलेला; साधु; शिष्य. [सं.] ॰पुरुष-पु. नवरा; पति. 'व्रतोपवास करावा । गुरुपुरुष निरो- पानें ।' -गुच ३५.८७. [सं.] ॰पूजा-स्त्री. १ कार्यारंभीं राशीस प्रतिकूल असल्यास करावयाची बृहस्पतीची पूजा. २ स्वगुरूची पूजा. ॰पौर्णिमा-स्त्री. आषाढी पौर्णिमा, यादिवशीं आपला मंत्रोपदेशक गुरु, संन्यासी इ॰ ची पूजा करतात. [सं.] ॰प्रचीति-स्त्री. १ गुरूची पारख, गुणदोष परीक्षा. २ गुरूचा अनुभव (बरा-वाईट) येणें. [सं. प्रतीति] ॰प्रसाद-पु. १ गुरूची कृपा. २ गुरूच्या आशिर्वादाचें फल (विद्या, कौशल्य, भरभराट इ॰). ३ (ल.) भांग; अफू; तंबाखु. [सं.] ॰बंधु-पु. १ एकाच गुरूचें दोन किंवा अनेक शिष्य, ते परस्पर. २ सहा- ध्यायी. ३ स्वतःच्या गुरूचा पुत्र. [सं.] ॰मंडली-गुरु करणें. (महारांच्या जातींत)-बदलापूर १७५. ॰मंत्र-पु. १ गुरूनें सांगि- तलेला धार्मिक उपदेश; गुरूनें उपदेशिलेला मंत्र. २ (ल.) बरी- वाईट सल्ला, मसलत; गुप्त शिकवण (बहुतेक वाईट अर्थानें.) (क्रि॰ देणें; शिकविणें; सांगणें; म्हणणें). [सं.] ॰मार्ग-पु. गुरूनें उप- देशिलेल्या मंत्रासंबंधीं जपादि विधि. [सं.] ॰मुख न. अध्यय- नाच्या प्रसंगीं गुरूच्या मुखांतून वाक्य निघणें; प्रत्यक्ष गुरूचा उपदेश, शिकवण. 'ही माझी विद्या ऐकीव आहे, हिला गुरुमुख नाहीं.' [सं.] ॰शाप-पु. गुरूनें रागानें काढलेलें वचन; गुरुनें दिलेला शाप. [सं.] ॰शिक्षा-स्त्री. १ अभ्यासाविषयीं गुरूनें लावून दिलेले नियम; गुरूची शिकवण. २ नियम वगैरे मोडल्याबद्दल गुरूनें दिलेला मार. [सं.] ॰संप्रदाय-पु. १ गुरुमार्ग पहा. २ विशिष्ट गुरूचे अनुयायी लोकांचा आचार, परं- परा वगैरे. ॰संप्रदायी-वि. १ गुरुमार्गी. २ विशिष्ट गुरूचे अनुयायी (लोक, जमाव, संघ). ॰स्मरण करणें-कार्यास प्रारंभ करणें. गुरूपदेश, गुरोपदेश-पु. गुरूनें दिलेला मंत्र.

दाते शब्दकोश

गुरु, गुरू      

पु.       १. मंत्रोपदेशक. २. धार्मिक उपाध्याय; धार्मिक संस्कार इ. करणारा. ३. उपनयन संस्कारामध्ये गायत्री मंत्राचा उपदेश करणारा. ४. शास्त्रे इ. शिकविणारा; विद्यादाता : ‘सकोप दिसती गुरु क्षणभरीच जे तापले ।’ - केका ८८. ५. (ल. निंदार्थी) फूस, भर, प्रोत्साहन देणारा, वाईट मसलत देणारा माणूस. ६. पिता; बाप; पूज्य, वडील माणूस : ‘गाति जनमेजया तव गुरुच्या आश्चर्य मरण जननाचें ।’ - मोअश्व ४·८०. ७. बृहस्पती; देवांचा गुरु : ‘वृत्रारिप्रति वदला गुरु ज्या या भद्रधामनीतीतें ।’ - मोसभा ६·७०. ८. (सामा.) शिक्षक; मास्तर; आचार्य. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घाटौली

स्त्री. कळ्या; बटमोगर्‍याच्या कळ्या. ‘तव गगनीं नक्षत्रें उमटत । जै़सी आकाशीं घाटौली फुलत । नातरि मेघ वीणि साधित । मोतियांची’ –नरूस्व ४८६. [घाटवेल?]

दाते शब्दकोश

घडीत

न. १ घडण्याकरितां दिलेली धातु, धातूचा पत्रा, तुकडा, मोड इ॰. २ घडलेला जिन्नस; घडविलेला पदार्थ. ३ घडणावळ; घडण्याची मजुरी. 'हा तोळ्यास एक रुपयाचें घडीत मागतो. ४ (दागिन्याचा, भांड्याचा) घाट; घडण; ढाळ; रचना. 'चातुर्य वेंचे चतुराननाचें । घडीत आलें तव आननाचें ।' -सारुह २.३९. म्ह॰ १ घडीत बुडवून घडणावळीचा तगादा = एका नुकसानींत दुसर्‍या नुकसानीची भर २ करावयास सांगित- लेलें काम न करून, बिघडवून कामाची मजुरी मागणें. [घडणें = बनविणें]

दाते शब्दकोश

घेणे      

सक्रि.       स्थापणे; ठेवणे; आदराने स्पर्श करणे : ‘येऊनि तुजजवळीं । चरण घेतिल तव भाळीं ।’ – रत्न १७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घो(घों)टाळणें, घोटळणें

अक्रि. १ (गुंतागुंतीच्या मार्गोत, चक्रव्यूहांत) इकडे तिकडे, मागेंपुढें फिरणें, भ्रमणें. २ कोंडाळणें; वळणें; तोंड फिरविणें; दिशा बदलत फिरणें; भोंवणें; गरगर फिरणें; घुटमळणें उ॰ कोंडलेल्या जागेंतील वारा. २ (गव- ताच्या काड्या, केरकचरा इ॰ वार्‍याच्या झोतावर) इतस्ततः उडणें; गरगर फिरत राहणें. ३ (नदी इ॰) वळणावळणांनीं वहात जाणें; भोंवरे करीत वाहाणें. ४ (मन इ॰) गोंधळून जाणें, घोंटा ळ्यांत पडणें; दिङ्*मूढ होणें; बावरणें; गडबडून जाणें; गुंतणें; 'तें सणेग तितक्या रुपयांनीं देण्याविषयीं त्याचें घोंटाळत होते.' [सं. गुंठ्-घोंट-घोंटाळणें-गुंठाळणें = लपणें, आंत ओढणे; -भाअ १८३२.] -सक्रि. गोंधळून टाकणें; गुंतवणें; बुचकळ्यांत पाडणें; घुटमळावयास लावणें. 'जातो परी तव मोहनी । घोटाळीत माझे प्राणालागुनी ।' -नव २१.४९. [घोटाळणें प्रयोजक]

दाते शब्दकोश

घोट, घोटक

पु. १ घोडा, अश्व. 'निजकरें तव स्यंदन घोटकां । धरिन मी करिं शत्रु सघोट कां ।' -वामन, विराट ६. १११. 'ते कालव्याल करटिघोटक-भटभेक खावया सुटले ।' -मोभीष्म ३.५९. २ (बुद्धिबळांत) घोडा या नांवाचें मोहरें. [सं. घोटक; अर. घोरा]

दाते शब्दकोश

घोट, घोटक      

पुन.       १. घोडा, अश्व : ‘निजकरें तव स्पंदन घोटकां । धरिन मी करिं शत्रू सघोट कां ।’ – वामन विराट ६·१११. २. (बुद्धिबळात) घोडा या नावाचे मोहरे. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जाणो      

उअ.       जणू; जणू काय; जसे काही : ‘कांटाचि काढिला तो जाणों तव सूनुच्या मना मधिला ।’ – मोकर्ण ४·१५. [सं. जाने]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जाणों

उअ जणूं; जणूं काय जाणूं; जसें कांहीं. 'कांटाचि काढिला तो जाणों तव सूनुच्या मना मधिला ।' -मोकर्ण ४.१५. [सं. जाते] ॰परी-क्रिवि. पाहण्यांत; देखत; जाणण्याच्या वेळे- पासून; अनुभवाच्या, सज्ञानपणाच्या, जाणपणाच्या काळापासून. 'माझे जाणोपरी त्याचे घरीं लक्ष्मी पाणी भरीत होती' याच्या उलट जाणोपरीचे अगोदर [जाण + उपरि = पासून]

दाते शब्दकोश

जाणता

वि. १ शहाणा. 'भव बुडवी म्हणुनिच तव भजनीं सनकादि जाणता रमला ।' -मोउद्योग. ६.१. २ जाण, निपुण. ३ तरबेज; हुशार (रोग बरा करण्यांत, सूतिकाशास्त्रांत); पंचा क्षरी; मांत्रिक; वैदू; पशुवैद्य. ४ (ल.) धूर्त; लुच्चा (जसें- चोराचा माग लावणारा, पाण्याचा थांग लावणारा). ५ निवाडा करणारा; न्यायाधीश. ६ एखाद्या गोष्टीचा गौरव करणारा; गुण- ग्राहक; आश्रयदाता. 'शास्त्रविद्येचा आतां कोणी जाणता नाहीं.' ७ (श्रम, उपकार इ॰) ओळखणारा; आभारी होणारा. 'मी नित्यशः विचारपूर्वक लिहिण्याचा श्रम करितों याचा जाणता कोणी नाहीं.' ७ परीक्षा करणारा; परीक्षक; बर्‍यावाइटाची पारख करणारा. ८ वयांत आलेला; सजाण. ९ वडीलधारा (माणूस) [सं. ज्ञा] ॰वर-नवरा-पु. वयांत आलेला नवरा. जाणती- स्त्री. १ बुद्धि. 'धर्माधर्म रूपें जियें । तियें न चोजवितां जायें । जाणती जे कां ।' -ज्ञा १८.७२०. २ (कु.) वयात आलेली, ऋतुमती स्त्री. [सं. ज्ञा] ॰होणें-ऋतुस्नान होणें; न्हातीधुती होणें. ॰कळा-स्त्री. १ परिपक्व, पुर्ण ज्ञानाचें तेज. (जाणपणा आल्यावरचें); बुद्धीची चमक (क्रि॰ येणें). २ बुद्धि (जिवंत प्राण्याची) (कलांपैकीं एक). जीवनकळा, प्रेतकळा ह्यासारखीं आणखी दुसरीं रूपें होतात. ३ अप्रत्यक्ष विषय दर्शन; त्रिजगत आणि त्रिकाल यांमधील गूढ वस्तूचें ज्ञान. ४ ज्याच्यामुळें भूतबाधा जाणली जाते असा एक मंत्र. ॰वधू-नवरी-स्त्री. जाणती अर्थ २ पहा. (क्रि॰ होणें).

दाते शब्दकोश

जाणता      

वि.       १. शहाणा : ‘भव बुडवी म्हणुनिच तव भजनीं सनकादि जाणता रमला ।’ –मोउद्यो ६·१. २. निपुण; तरबेज; हुशार (रोग बरा करण्यात, सूतिकाशास्त्रात)– पंचाक्षरी; मांत्रिक; वैदू; पशुवैद्य. ३. (ल.) धूर्त; लुच्चा (जसे :— चोराचा माग लावणारा, पाण्याचा थांग लावणारा). ४. निवाडा करणारा; न्यायाधीश. ५. एखाद्या गोष्टीचा गौरव करणारा; गुणग्राहक; आश्रयदाता. ६. (श्रम, उपकार इ.) ओळखणारा; जाणणारा. ७. परीक्षा करणारा; बऱ्यावाईटाची पारख करणारा. ८. वयात आलेला; सजाण. ९. वडीलधारा (माणूस). [सं. ज्ञा]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जाणवणे      

उक्रि.       समजणे; कळणे; जाणणे; जाणीव होणे : ‘ऐसा मानी विचारी । तव जाणवते मुरारी ।’ – कक १·४·१०४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जावडे      

न.        कुंकवाच्या रेषा, बोटे. पहा : जाडवी : ‘पायीं मी तव अर्पितों अतिशयें आलक्तके जावडे’ - निमाक १·१४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जावडें

न. कुंकवाच्या रेघा, बोटें. जाडवीं पहा. 'पायीं मी तव अर्पिंतों अतिशयें आलक्तकें जावडें ।' -निमा १.१४.

दाते शब्दकोश

जंत्र      

न.       वाद्य : ‘तव जंत्रे वाजिनली अनुहाते.’ – एरुस्व ६७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

काह्यला-ले, काह्या, काह्यास

अ. (व. ना.) कशास? कशाला? 'तव भीमकीआ भणितलें । काह्यां हानतु करतळें ।' -शिशु १८०. 'येर काह्या मोलें वेंचूनि ।' -ज्ञा १८.९४७. अद्वै- ताचा समो फुटे । तरी काह्या होती भाटें । शास्त्रें तुझीं । -अमृ ९.७०. ॰चा-कशाचा. 'तया बंधु कोण काह्याचा ।' -ज्ञा ६. ९५. ॰चें क्रिवि. कशाचें? 'काह्याचें निर्वाण मांडलें ।' -स्वानु २.१.२२. [कस्य + कृते, अर्थे]

दाते शब्दकोश

कैकाडी

पु. एका जातीचें नांव. यांतील लोक बुरड्या, टोपल्या इ॰ विकून व भिक्षा मागून उदरनिर्वाह करतात. महारा- ष्ट्रांत यांच्या चार पोटजाती आहेत. -१ चोरकैकाडी, किंवा फिरस्ते; किंवा डोंटलमोर. २ गांवकैकाडी किंवा बुढी; टोपल्ये. ३ खुचडी किंवा कुंचीवाले. ४ माकडवाले किंवा लाल बाजार- वाले; कैकाडी ही गुन्हेगार जात आहे. -पु. कैकाडी माणूस. [सं. कीकट-राजवाडे] कैकाडीण-स्त्री. १ कैकाड्याची, कैकाडी जातीची बायको. 'प्रथमचि मी तव दादा कैकाडीण झालें ।' -भज ४०. २ कैदाशीण; भांडखोर स्त्री. ३ (प्रेमानें) गबाळ, केंस पिंजारलेल्या मुलीस म्हणतात.

दाते शब्दकोश

कैकाडीण      

स्त्री.       १. कैकाड्याची, कैकाडी जातीची स्त्री : ‘प्रथमचि मी तव दादा कैकाडीण झालें ।’ - भज ४०. २. कैदाशीण; भांडखोर स्त्री. ३. (प्रेमाने) गबाळ, केस पिंजारलेल्या मुलीला म्हणतात.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कामना

स्त्री. इच्छा; कल; वासना; मनोरथ. 'पै अवज्ञा आणि कामना ।' -ज्ञा १८.२०२. 'नारदा सांगती कामिनी कामना ।' -नरहरि दानव्रत १०२. 'जे मागसी पुरवितों तव कामना ही ।' -वामनचरित्र ८. [सं.] ॰पूर्ति-स्त्री. इच्छेची तृप्ति, समाधान; संतोष.

दाते शब्दकोश

कापडे      

पहा : कापडी : ‘तव परमेश्वरपूरीचीं ऋध्दपुरची कापडीयें (यात्रेकरू) : देवभट : महदाइसे आली :’ - लीच ४. ५२. कापण, कापणी      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कडकडीत

कडकडीत kaḍakaḍīta a (कडकड) Crisp; that emits a crashing or crackling sound--parched grains &c. under chewing. 2 Intensely hot--sunshine, water &c. 3 Ready, fresh, vigorous--an acquired knowledge: also prompt and smart in the use of it--a person. 4 Plain, outright, void of reserve or subtlety--speech, dealing: also a person. 5 Rigidly observant of prescribed rites; minutely exact and correct--a person, a conduct. 6 Stiff and crackling from dryness--a cloth. 7 Hard, severe, rigorous--a regimen, a course, a वैराग्य, तपश्चर्या &c. 8 Strictly or strikingly real; true out and out--a वारें or demon-afflatus. 9 (Poetry.) Rough. Ex. तव तें वल्कलें क0 कठीण ॥ नेसतां न येति सीतेलागून ॥ The common word is खरखरीत or खडबडीत.

मोल्सवर्थ शब्दकोश

कीश

न. माकड. 'कोण कीश तव नांव कथीं ।' -निमा १.४. [सं.]

दाते शब्दकोश

कीश      

न.        माकड : ‘कोण कीश तव नांव कथी ।’ – निमा १·४. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कल्पणे      

सक्रि.       मंत्र म्हणणे : ‘तव ब्राह्मणीं कल्पीले मग गोसावियांसि वाढिले.’ -गोप्र १०. [सं. क्लृप]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कल्याणी

स्त्री. १ (ज्योतिष) भद्रा नांवाचा एक योग. याचा काल अर्धीतिथि अथवा एक करणाइतका असतो व दर साडे- तीनतिथि अथवा सात करणांनंतर तो पुन्हा येतो. म्हणजे प्रत्येक सातव्या करणास भद्रा असतात. 'व्यतिपात वैधृत कल्याणी हे तव कुयोग असे' -होला ४९.७. २ एक रागिणी. -वि. कल्याण गांवचें (तांब्या वगैरे पात्र). [सं.]

दाते शब्दकोश

कल्याणी      

स्त्री.       (ज्यो.) भद्रा नावाचा एक अशुभ योग. याचा काल अर्धी तिथी अथवा एक करणाइतका असतो व दर साडेतीन तिथी अथवा सात करणानंतर तो पुन्हा येतो म्हणजे प्रत्येक सातव्या करणास भद्रा असतात : ‘व्यतिपात वैधृत कल्याणी हे तव कुयोग असे ।’ - होला ४९·७. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कंठी      

स्त्री.       १. पुरुषाच्या गळ्यातील सोन्याचा किंवा मोत्याचा तीन किंवा चार पदरी माळेसारखा एक अलंकार, माळ; विशिष्ट पद्धतीने केलेली फुलांची माळ. पहा : कंठा : ‘तैशीं घेतां कंठी मजसि, तव कंठी धरियली ।’ - विविध ८·१·२०. २. तुळशीच्या मण्यांची केलेली माळ (विशेषतः पंढरीच्या वारकऱ्यांच्या गळ्यातील.). ३. सतारीच्या किंवा वीणेचा भोपळा व दांडी यांच्या सांध्यावरील वर्तुळाकार हस्तिदंती काम. ४. अंगरख्याला गळ्याच्या ठिकाणी शिवून हारासारखी केली जाणारी नक्षी. [क. कंटि] [सं. कंठिका, कंठी]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कोणी      

प्र. सना.       १. कुणी; कोणी एक; कोणीतरी; कोणीही : ‘नये ज्वाळ वीशाळ सन्नीध कोणी ।’ - राम १२१. नकारवाचक विधानात पूर्ण अभावदर्शन. २. कोणतीही : ‘हातीचा बाण जाई तव कोणी तजवीज?’ - ऐकोपुर.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कोंभणे      

अक्रि.       अंकुर येणे; कोंब येणे; कोबेणे; उत्पन्न होणे : ‘तव दोर्दंडी कां जैसें । आकाश कोंभैलें ।’ - ज्ञा ११·२६६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कथालाप      

पु.       वर्णन; कथा सांगणे; गप्पा गोष्टी करणे : ‘व्यापारांतर टाकुनी तव कथालापासि जे आदरी.’ - र ६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुजंत्र, कुजांत्र      

न.       १. प्राणघातक यंत्र : ‘मग पांता घातैली कुजांत्रें ।’ - शिव ८०१. २. चेटूक; कौटाळ : ‘वैरियाचेया कुजंत्रा हवना तव उदेला ।’ - वैवसं २४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खाण

स्त्री. १ खोल खड्डा; खळी; बळद. २ दगड, धातू, रत्नें इ॰ काढण्याकरितां खोल खणलेली जागा. ३ घर; निवास- स्थान (मुंग्या, इतर किडे यांचें). ४ (ल.) मूळ; उगम; थळ; उत्पत्तीचें ठिकाण; जात; झरा. ५ आगर; निधि; सांठा; खनि; समृद्धिस्थान. [सं. खनि] म्ह॰ खाण तशी माती. (बीज तसा अंकूर या अर्थानें) = जशीं आईबापें तशी मुलें. 'जिचे उदरी तव उत्पत्ती । तिची निवडली ऐशी जाती । म्हणोनि खाणतैशी माती । आहाणा लोकीं प्रसिद्ध ।' -मुक्तेश्वर. सामाशब्द- ॰करी-पु. खाणींत खणणारा; खाणीवाला. 'ज्यांस अझून खाणकर्‍यांनीं हात लाविला नाहीं अशा डोंगरांच्या पोटांतून सोनें व संगमरवरी दगड निघतील.' -मराठी ६ वें पुस्तक पृ. ८२. (१८७५). ॰गत-स्त्री. खाणीपासून सरकारला मिळणारें उत्पन्न. ॰चोर-पु. खणून घर फोडणारा चोर; याच्या उलट दरोडेकरी, वाटमार्‍या. इतर अर्थांसाठीं खानचोर पहा. ॰चोरी-स्त्री. घर फोडून केलेली चोरी. खा(न)चोरी पहा. ॰वट-स्त्री. कुळी; वंश; जातगोत. खानवटा पहा.

दाते शब्दकोश

खाराणी

स्त्री. मुतेरें; मुतलेलें वस्त्र. 'कव्हणी एक निजला असे । तो आंतुरणीं मुती । मग स्वप्नाचेनि भ्रमे म्हणे मी दारां- गेला ...चइला तव लटके । खाराणी ती साचः तें धुतलियावीण न फिटे ।' -चक्रधर सिद्धांतसूत्रें ५३. [खार]

दाते शब्दकोश

खाराणी      

स्त्री.       मुतेरे; मुतलेले वस्त्र : ‘कव्हणी एक निजला असे : तो आंतुरणीं मुती : मग स्वप्नाचेनि भ्रमे म्हणे मी दारांगेला.... चइला तव लटके : खाराणी ती साच : तें धुतलियावीण न फिटे :’ - चक्रधर सिद्धांतसूत्रें ५३.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

लगाम

स्त्रीपु. १ घोड्याला ताब्यांत ठेवण्याकरितां व वळ- विण्याकरितां त्याच्या जबड्यांत अडकविलेली लोखंडी सांखळी, कडी. मुखयंत्रण. उभा लगाम, करवती लगाम, कडोळी-ळ्या लगमा किंवा कड्याळें, कड्यांचा लगाम, काट्या किंवा काटे लगाम, काटेकडी लगाम, कुऱ्हाड्या लगाम, साकळी लगाम, सुतळ्या लगाम असे लगामाचे कांहीं प्रकार आहेत. 'तव भुज या तरलश्रीवडवावदनीं लगाम हा बा! हो!' -मोकर्ण ७.१४. २ वरील सांखळी, कडी अनीनीला किंवा जेराला लावून केलेलें नियंत्रणसाधन; वादी. ३ स्वाधीनसुत्र; मार्गदर्शकत्व; व्यवस्था; दिशा दाखविणें; ताबा. 'या फौजेचा लगाम बक्षीचे स्वाधीन आहे त्यास वश करा म्हणजे झालें., ४ कुस्तीचा एक डाव. जोडी- दाराला खालतीं धरून घोड्याला लगाम देतात त्याप्रमाणें आपलीं दोन बोटें जोडीदाराच्या गालफडांत घालून त्याला चीत करणें. [फा. लिगाम्] (वाप्र.) ॰घालणें-आळा घालणें. लगामी- वि. १ स्वाधीन; अधीन. २ व्यवस्थित; शिस्तवार. याच्या उलट बेलगामी. लगामीं-क्रिवि. हुकुमाखाली; ताब्यांत; शासनाखालीं. (क्रि॰ असणें; चालणें; वागणें; लागणें; ठेवणें; चालवणें; आणणें; लावणें) 'हा जन तुमच्याचि असे इतरा कोण्हाचियाहि न लगामीं ।' -मोवन ४.६६. -भाब २४.

दाते शब्दकोश

लोल

वि. १ हलणारा; अस्थिर; चंचल; झुलणारा; कांपणारा. 'लोल पताकीं डोलत । रथ शोभत अतिशोभा ।' -एरुस्व ५.११. २ (ल.) अति उत्सुक; अधीर; उतावीळ; आतुर. 'असन्मानस तव भुजपौरुष देखावया असे लोल ।' -मोकर्ण १४.४२. ३ लंपट; अधाशी; लोलुप; आसक्त; लुब्ध; एखाद्या विषयाकडे आकृष्ट झालेला. 'त्या शोकगररसाच्या पानीं मुनि शंभुचीच मति लोला ।' -मोवन ४.१३८. ४ क्षणभंगुर; नाश पावणें; नाहींसे होणारें. ५ क्षुब्ध; अस्वस्थ. ६ लोळागोळा झोलेला; पंख उपटल्या- सारखा; असहाय. 'रयत बिचारी लोल झाली उपटली पराला ।' -ऐपो ४२१. [सं. लोल] लोलक-पु. दागिन्यांतील लोंबता मणि. हा बहुधा खालीं जाड व वर निमुळता आणि लांबट असतो. [सं.] लोलं(लि)गत-वि. आसक्त; लोभी; हावरा. 'सांडून राम आनंदघन । ज्याचे मनीं विषयचिंतन । त्यासी कैचें समा- धान । लोलंगतासी ।' -दा ३.१०.६२. लोलं(लिं)गता-स्त्री. १ आसक्ति; लोभ; एखाद्या वस्तूच्या प्राप्तीची इच्छा-हांव. 'तापसां नाहीं लोलंगता ।' -मुआदि २२.१४३. २ चंचलता. 'लोलंगता नसें ज्ञान धालेपणें ।' -रामदास, अभंग (नवनीत पृ. १६७.) लोला-वि. १ निर्जीव होऊन लोंबत राहिलेला (हात, पाय इ॰ अवयव, ताड, माड इ॰चें पान). २ लुला; अशक्त; निर्जीव; थोटा (माणूस, पशू). ३ (ल.) परतंत्र; असहाय. ४ लंगडा; लुळापांगळा; व्यंग असलेला; अर्धांग झालेला. 'हा लोला झाला, होऊन पडला.' लोला-ळा-पु. १ घंटेचा लोढणा. हा आंतील घंटेच्या बाजूवर आपटून आवाज होतो. २ घड्याळाचा लंबक. ३ घशांत पडजीभ; उपजिव्हा. ४ लचका. 'श्वानें अश्वें लोले तोडिती ।' -दा १.१०.५७. लोलावणें-अक्रि. आसक्त होणें.

दाते शब्दकोश

मामल(लीय)त, मामला

स्त्रीपु. १ सरकारी काम; सर- कारी चाकरी (विशेषतः तहशीलची व अधिकाराची). २ तालुक्याच्या वसुलाचें काम. ३ हातीं घेतलेलें काम; जोखीम; महत्त्वाचें कार्य, गोष्ट. 'सोन्धेकरांचीही मामलीयत चुकवून बिदनूरकरांकडे जावें.' -पया ६९. ४ महत्त्व; वजन; योग्यता; गणना; (बिशाद, किंमत, पाड, कथा, लेख इ॰ शब्दांप्रमाणें योजितात.) ५ जाबसाल. [अर. मुआमलत; मुआमला] मामलतदार, मामलेदार-पु. तालुक्यावर अंमल चालवून जमाबंदीचा वसूल घेणारा अधिकारी. [फा. मआमिलतदार] ॰दारी-स्त्री. मामलतदाराचे अधिकार, काम, हक्क इ॰ मामला-पु. १ मामलत. २ (ल.) काम; कृत्य. 'मामला कठिण दिसतो.' ३ बाब; बाजू. 'तव ते व्यापार बुडाले । मामले आंगी सेकले ।' -स्वादि २.२१८. म्ह॰ धकाधीचा मामला.

दाते शब्दकोश

ममत्व

ममत्व mamatva n (S मम & त्व Affix.) Mineness &c. This word is the same with ममता, but it is far less common.

मोल्सवर्थ शब्दकोश

म(मं)थणें

उक्रि. १ घुसळणें; मंथन करणें. 'ना तरी शब्द- ब्रह्माब्धि । मथिलेया व्यासबुद्धि ।' -ज्ञा १.५१. २ वादविवाद, चर्चा, वाटाघाट करणें. ३ छाननी, संशोधन, परीक्षण करणें. ४ एखाद्या गोष्टीविषयीं (मनांत) विचार, मनन, चिंतन करणें. ५ अनुकूल करून घेणें; वळविणें. ६ (काव्य) ठार मारणें. 'श्वेत- हयें अंबष्ट श्रुतायुनामा रणांगणीं मथिला ।' -मोकर्ण ३.२५. ७ पराभव करणें. 'तव बळ मथितो त्यातें मारुनि साधीं रणीं निज- स्वार्था ।' -मोकर्ण १२.३. ८ घासणें, मंथन करणें. 'जैसें काष्ठें काष्ठ मथिजे । तेथ वन्हि एक उपजे ।' -ज्ञा १.२४३. [सं. मंथन] मंथणी-नी-स्त्री. १ रवी; घुसळणी. २ मंथण्याची, घुसळण्याची क्रिया ३ सोनाराचें मणि तयार करण्याचें हत्यार. मथणी-नी-स्त्री. ताक करण्याचा डेरा; माथणी.

दाते शब्दकोश

मूल्य

न. मोल; किंमत. [सं.] ॰वान्-वंत-वि. मोठ्या किंमतीचा; महाग; किंमतवान्. [सं. मूल्यवान्] मूल्यत्व-न. (रसायन शास्त्रांतील) परमाणूंची संयोगशक्ति (इं.) व्हलन्सी. 'उज्ज हें एकमूल्यक द्रव्य असून त्याचें तें मूल्यत्व स्थिर असल्या- मुळें संयोगशक्ति मोजण्याकडे त्याचा उपयोग केला जातो.' -ज्ञाको (म) १८८. ॰त्व कल्पना-मूल द्रव्यें विशिष्ट परिमाणां- तच संयोग पावतात हा सिद्धांत. (इं.) थिअरी ऑफ व्हॅलन्सी. मूल्यानुवर्ती-वि. किंमतीवर अवलंबून असलेली; किंमतीच्या प्रमाणांत असलेली. याच्या उलट परिणामानुवर्ती.

दाते शब्दकोश

नाना

वि. १ पुष्कळ; अनेक. 'जन्म घेईन मी नाना । बहु सोसीन यातना ।' -तुगा ११४६. २ निरनिराळे; बहुविध; विविध; भिन्नभिन्न. 'नाना देव्हारा प्रसीध्धु । जे बहुत आइको मंत्रसिध्धु ।' -ॠ ६७. नानारूप-वर्ण-रस इ॰ [सं.] सामाशब्द- ॰त्व- वि. अनेकत्व. -एभा ११.४३३. ॰परीं-क्रिवि. अनेकप्रकारें. 'क्रियेवीण नानापरी बोलिजेतें ।' -राम १०४. ॰प्रकार-पुअव. विविधजाति, तर्‍हा, प्रकार. ॰प्रकार करणें-(ल.) रागाचे सर्व आविर्भाव व कृत्यें करणें; रागानें जळफळणें, आदळआपट करणें. ॰प्रकारचा-वि. सहस्त्रावधि, हजार प्रकारचा. ॰मत- न. १ लौकिक अभिप्राय. २ मतवैचित्र; मतांचे प्रकार. ॰रत्न- वसुंधरा-स्त्री. (प्र.) बहुरत्नावसुंधरा. अनेक बहुमोल रत्नांनीं भरलेली पृथ्वी. जेव्हां एखादी आश्चर्यकारक गोष्ट घडतें तेंव्हा ती पाहतांना किंवा नमूद करतांना हा शब्द योजतात. 'पिंडे पिंडे मतिर्भिन्ना । तुंडे तुंडे सरस्वति । देशेदेशे विभाषास्यात्‌ । नानारत्ना वसुंधरा ।' ॰वाडें-क्रिवि. पुष्कळ प्रसंगीं; अनेक वेळां. ॰विध- वि. अनेक प्रकारचें. -ज्ञा ७.३७.

दाते शब्दकोश

निडार

वि. निवडक. -न. १ कपाळ. २ (ल.) दृष्टि. 'तेणें तसें नगर तें धरितां निडारी ।' -र २०. ३ पक्वदशा. निडारणें-सक्रि. १ परिपक्व होणें; भरपूर पीक येणें; कोंब निघणें. 'तिफणी वेगळा दाणा निडारला निघेल ।' -स्वानुदिन १०.१०.६०. 'निडाराचेनि कोंदाटें । मोतिये नावरतीं संपुटें । मग शिवणी जैशी उमटे । शुक्ति पल्लवांची ।' -ज्ञा ६.२६६. २ थक्क होणें. ३ पाण्यानें डबडबणें. 'इतुकें बोलेना तव प्रेमाश्रु उत्तंबलोनि नयन । निढारली दृष्टि ।' -स्वादि ६.२.१८. निडारलेंपण-न. पक्वता.

दाते शब्दकोश

निडारणे, निढारणे      

सक्रि.       १. परिपक्व होणे; भरपूर पीक येणे; कोंब निघणे : ‘तिफणी वेगळा दाणा निडारला निघेल ।’ – स्वानुदिन १०·१·६०. २. थक्क होणे. ३. पाण्याने डबडबणे : ‘इतुकें बोलेना तव प्रेमाश्रु उत्तंबलोनि नयन । निढारली दृष्टि I’ – स्वादि ६·२·१८. [सं. निस् + धृ]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निवसणे      

अक्रि.       जवळ राहणे, वस्ती करणे : ‘म्हणें आम्हांपाशीं तव गुरू विलासी निवसतो ।’ - र ३५. [सं.नि + वस्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निवसणें

अक्रि. जवळ राहणें; वसती करणें. 'म्हणें आम्हां पाशीं तव गुरु विलासी निवसतो ।' -र ३५. [सं. निवास]

दाते शब्दकोश

पाळी

स्त्री. कानाच्या खालच्या टोंकाचा भाग; चापा. 'तव कर्णाची निर्भय धरुनी पाळी ।' -विक ९१. [सं. पालि]

दाते शब्दकोश

पांडुर

वि. पांढरा. 'पांडुरवर्ण झाले डोळे ।' -एरुस्व १२. २. 'वृद्ध वदे वत्सा कां पांडुर कृश जाहलासि सांग मला ।' -मोसभा ३.२७. [सं.] पांडुरत्व-ता-नस्त्री. पांढरेपणा. 'परि पांडुरत्वें कांती । राहे जैसी ।' -अमृ ३.२८. 'व्रतनियमाच्या कष्टें आली पांडुरता वदनीं ।' -शाकुंतल अंक ६. [पांडुर + त्व भाववाचक नामाचा प्रत्यय]

दाते शब्दकोश

पांवरी

स्त्री. लहान पावां; मुरली; बांसरी. [पावां + री लघु त्व दर्शक प्रत्यय]

दाते शब्दकोश

पाटी

स्त्री. १ लहान मुलांची मूळाक्षरें लिहिण्याचा फळी; धूळपाटी. हिच्याबद्दल हल्लीं दगडी (स्लेट्) पाटी वपरतात. 'माहेरीं बाळपणीं मज झाली रत्नमूर्ति परि पाटी । शिकलें तीवरि बाई! साध्वीची कांतभक्ति परिपाटी ।' -मोकृष्ण ८३.१६८. २ पोथीच्या खालीं व वर (आच्छादनार्थ) ठेवतात त्या फळ्यांपैकीं प्रत्येक. ३ उंसांच्या चरकांतील लाटांच्या वर व खालीं असणाऱ्या लाकडाच्या जाड फळ्यांपैकीं प्रत्येक. या फळ्यांना खालची पाटी व वरची पाटी अशीं नांवें आहेत. ४ जिच्यावर शेवया तयार करितात ती लांकडाची फळीं ५ (आट्यापाट्यांचा खेळ) क्रीडा- क्षेत्रावर पाडलेल्या आडव्या जाड रेघांपैकीं प्रत्येक. हिची लांबी सुमारें बावीस फूट व रुंदी सुमारें एक फूट असते. ६ (राजा. खा. व.) लांकडाची जाड फळी; लहान तुळई, 'बुचकुंदांचिआं पाटियां । कल्हारांचिआ मोहटियां ।' -शिशु ७६६. 'दशरथ बुडतां तळ- वटीं । रामनाम स्मरे वाक्पुटीं । तव सांपडली फुकटी पाटी । नाम तारक ।' -कथा ६.१४.३७. ७ अरुंद जमीनीची लांब पट्टा. ८ शेताचा पाडलेला लहान तुकडा. -कृषि २१०. (राजा.) भातजमीन. ९ (कों.) घरटाच्या वरच्या तळीच्या मध्यभागीं बसविलेली लोखंडाची जाड पट्टी. हिच्या मध्यभागीं असलेल्या छिद्रांत खालील तळीचा खुंटा फिरतो. १० स्त्रियांचें एक कंठभूषण. 'कंठी मिरवे मुक्तामाळती, पेट्या पाटी नाना जाती.' -अमृत ५५. ११ रीत; पद्धत; परिपाठ. १२ (उदबत्त्यांचा कारखाना) उदबत्त्या तयार करण्याचा पाट. १३ (वाद्य) तंबोऱ्याच्या भोंपळ्यावर आच्छादना- साठीं बसविलेली लांकडाची फळी, तबकडी. १४ (खान) दाराची एक फळी. [सं. पट्ट] ॰उधळणें-शाळा सुटतेवेळीं धूळपाटीवरील धूळ किंवा विटकरांचा भुगा उधळून लावून लिहि- लेलीं अक्षरें नाहींशीं करणें. जुन्या काळीं धूळपाट्या वापरीत असत त्यावेळीं शाळेंतील दररोजचा अभ्यास संपला म्हणजे धूवपाटी- वरील धूळ उधळून टाकण्याचा परिपाठ होता. (मुलगा, मूल) पाटीवर घालणें-बसविणें-लावणें-शिक्षण देण्यास योग्य झालेल्या मुलास मूळाक्षरें शिकविण्यास आरंभ करणें; शाळेंत घालणें; ओनामा देणें. पाटी गणित-न. अंकगणित [पाटी + गणित] पाट्या बदलणें-वर्गांतील मुलांनीं पाटीवर लिहिलेला अभ्यास, परस्परांत पाट्या बदलून पाठ तपासण्याचा एक प्रकार. -अध्यापन ९९.

दाते शब्दकोश

पेखणें

न. (महानु.) नाच; नृत्य; नाचरंग. 'पेखणें या करिती तिआं विद्याधरा नारी ।' -धवळे पूर्वार्ध ७१. 'तव पेखणें माडलें श्रीपती । सभारंगीं ।' -कथा ७.१०.१०९. [सं. प्रेंख् = हलणें = हलविणें]

दाते शब्दकोश

पेण

णें-न. १ मिरवणुकीच्या वेळीं पालखी उभी करण्याचें एक ठरविक ठिकाण; प्रवासांतील मुक्कामाची जागा. 'देवा तव कृपे वांचून । मीं न पावेचि हें पेण ।' -कथा २.१. २ मुक्काम; मजल; टप्पा; मजलीवर थांबणें. 'करा एक वेळें पेणें । मग नलगे येणें जाणें ।' [सं. आप्यायनम्]

दाते शब्दकोश

पिणें

उक्रि. १ प्राशन करणें; जल, वायु इ॰ पातळ पदार्थ मुखद्वारानें गळयाखालीं उतरविणें. २ ढोसणें; झोकणें; गटगट पिणें, घोटणें. ३ (तंबाखू, अफू इ॰च्या धुराचें) सेवन करणें; धूम्रपान करणें. ४ शोषणें; जिरविणें (कातडें, लांकूड, कापड इ॰ नीं तेल, रंग, पाणी इ॰ ). ५ बंदुकीनें ठासलेल्या दारूचा बार न होणें. ६ (ल.) दाबणें; गिळणें; सहन करणें; पोटांत घालणें (राग, अपमान, चेष्टा, खोडया इ॰ ). (ल.) प्रीतीनें ऐकणें. 'कवी तव यश:कथा नवसुधा नवद्या पिती ।' -केका ५१. [सं. पा.; सिं. पिअणी; पोर्तु. जि. पिलार]

दाते शब्दकोश

पंचत्व

न. १ मृत्यु; मरण; देहांतील पांच तत्त्वें निरनिराळीं होणें. 'किं पंचत्व पावला तोही । तुझेनि विरहें ।' -भाए १५१. २ पांचांचें अस्तित्व. [पंच + त्व]

दाते शब्दकोश

प्रथक

वि. (अप.) वेगळा; निराळा; भिन्न; (प्र.) पृथक्. 'तव प्रथकु संतभाव । ऐसें गमे ।' -ग्रंथराज ७.१०२.[सं. पृथक्]

दाते शब्दकोश

फळ

न. १ भाला, बरची इ॰ चें पातें. २ बाणाचा लोखंडी फाळ. 'अस्मद्योगास तसें तव संदर्शन जसें शरास फळें ।' -मोएनु १.११. ३ कुंभाराचें थापटणें. [सं. फल]

दाते शब्दकोश

रंगण

न. १ मंडळ; वर्तुलाकार वाट, प्रदेश; भजनासाठीं भक्तमंडळी जो फेर धरतात तें. वैष्णव नाचति रंगणि करिती तव सेवा ।' -भज ७७. २ खेळाची जागा; खेळाचें मैदान. ३ अंगण; प्राकार. 'पातली अंबिकेचें रंगण । केलें क़रचरण क्षालन ।' -एरुस्व ६ ७८. ३ भोंवरा इ. खेळाचें वर्तळ, हद्द. ४ घोडे फिर- विण्याचें मैदान ५ नाटकगृह; नर्तनगृह. 'इतक्यासहित त्वां बा यावें माझे रंगणीं नाचावें ।' ६ सभा; मंडळी (खेळासाठीं जम- लेली). [सं. रंगांगण] रंगणांत येणें-१ प्रतिपक्ष्यार्शी लढा- वयासाठीं पुढें सरसावणें; सामन्यास छातीठोकपणें येणें; धैर्यानें पुढें येणें. २ देखत, समोर आरोप करण्यास धजणें. 'पाठीमागें बडबडून फळ काय ? अवसान असलें तर असा रंगणांत ये. मग पांहीन.' .टोला-पु. रंगणांत भोंवरा फेंकणें; चिंगाटी फेकणें. ॰डाव-पु. मुलांचा एक खेळ.-मखेपु १३२. ॰पाणी-न. एक खेळ.-मखेपु ५५.

दाते शब्दकोश

सा(सां) चल-ळ, साचाल सां, (सा) चोल-ळ, साचोला

पुस्त्री. पावलांची चाहूल (माणूस, प्राणी इ॰ च्या); आवाज; हालचालींचा शब्द. 'सांचलु न मोडितु । प्राणियाचा ।' ज्ञा १३.२४५. -एभा ८.१९९. 'इतुकियांत सांचळ ऐके । द्वारि देखा ।' -कथा १.६.१८७. 'तव साचाल जाला मार्गावरी ।' -मुवन १६.१२८. 'म्हणे सखे हो एक एका । पाउलें वाजूं देऊं नका । सांचोळ ऐकोन गोपिका । जाग्या होतील निर्धारें । -ह ६.४८. [सं. संचल्]

दाते शब्दकोश

सभा

स्त्री. १ ज्या ठिकाणीं विद्वान्, पंडित, गुणीजन, राजे लोक वगैरे जमतात, बसतात अशी जागा; दरबार; मंत्रगृह; 'राजसभा, ब्रह्मसभा.' 'सभे शिशुपाळ घेतला प्राणें ।' -मुसभा १२.१४४. २ समाज; मंडळी; जमाव; समुदाय; बैठक; आखाडा; मेळा. ३ सभेसंबंधी गाणें. 'तेचि सभा गातों सभेमधिं तेचि सभा गातो' -पला २०.४०. ४ शाळा; धर्मशाळा; दालन 'एका सभेंत रात्रौ निजला...।' -मोवन ४.१११. सभा- जिंकणें-वादविवादांत यश मिळवणें; फड मारून नेणें; आपलें म्हणणें खरें करणें.सभाकंप-पु. सभेमध्यें भरणारें कांपरें; लाजाळूपणा; संकोच. २ मन अपराधी असल्यामुळें वाटणारी भीति व त्यामुळें होणारा थरकांप, गोंधळ. सभांगण-न. १ सभेची जागा. २ रंगण; चौक; मोकळी जागा. 'सजूनि वर वल्लभी तव सभांगणीं नाचतो' -केका ११४. सभांगना-स्त्री. वारांगना; कलावंतीण; नायकीण. 'तक्तराव जिलेवंत नाचती सभांगना आनंदांत' -ऐपो १९९. सभागृह-न कचेरी; दिवाण- खाना; सभेची जागा; दरबारची जाग. सभाचातुर्य- कौशल्य-पाटव-न. शिष्टाचार; सभ्यता; रीतरिवाज; चार मंडळींत वागण्याची योग्य पद्धति व त्यांत दिसून येणारी चांगली बुद्धि. सभाजन-पु. १ सभेंतील सदस्य; मंडळी; समाज; लोक- समुदाय. २ सभासद; सभेंत बसणारा गृहस्थ. सभादीप-दीपक- दिवा-वि. १ श्रावणीच्या दिवशीं ब्राह्मणास अग्निसमक्ष सुवा- सिनी दान करतात तो दिवा. २ सभादीप दान करण्याचा विधि. ३ (ल.) सभाभूषण; सभेचा अलंकार. सभाधिकारी- पु. सभेचा नेता; अध्यक्ष. सभाधीट-वि. सभेमध्यें न भितां, न गोंधळतां भाषण करणारा. सभाधूर्त-वि. सभेमध्यें, दरबारांत वाद, मसलत, मध्यस्थी वगैर कामांत प्रवीण, वाक- बगार, हुशार; सभाकुशल-चतुर-पटु हे पर्याय शब्द आहेत. ॰धैर्य-न. सभेंतील धीटपणा; आत्मविश्वास; धिटाई. ॰धौर्त्य- न. सभेंतील धूर्तता, चातुर्य, कौशल्य. सभाध्यक्ष. सभा- नायक, सभापति-पु. सभेचा प्रमुख, मुख्य, नेता, पुढारी, अध्यक्ष, मुखर, उपद्रष्टा. ॰नियम-पु. सभेसंबंधीं कायदा, निर्बंध, काम चालविण्याविषयीं पद्धति. ॰नीति-स्त्री. सभेसंबंधी नियम, निर्बंध, कायदा, पद्धति. ॰पाण्डित्य-न. तादृश अंगीं विद्यादि असोनसो पण सभादिकांमध्यें भाषणादि करण्याचें सामर्थ्य. केवळ सभेमध्यें ज्ञानाचें प्रदर्शन; वरकरणी दाखविण्याची विद्वत्ता. ॰प्रवेश-पु. १ सभेच्या कामास आरंभ, सुरुवात. २ सभास- दाचा सभेमध्यें येण्याचा पहिला प्रसंग; नवीन सभासदास सभेंत दाखल करून घेणें. ॰भीत-वि. सभेमध्यें लाजणारा; संकोच वाटणारा; धीटपणा नसणारा. ॰भीति-स्त्री. समाजाची, मंड- ळीची भीति, भीड, लाज, संकोच; सभेमध्यें घाबरण्याची संवय. ॰भीरू-वि. सभेमध्यें लाजणारा; संकोची. ॰भूषण-न. सभेचा अलंकार; पंडित, विद्वान मनुष्य; सभेमध्यें शोभणारा. ॰मंडन- न. १ सभेची रोषणाई; सभास्यानाचें अंलकरण. २ सभेचा अलं कार; पंडित, विद्वान मनुष्य; सभेला शोभा आणणारा विद्वान. ॰मंडप-पु. १ सभास्थान; सभेची जागा; मंत्रगृह, दिवाणखाना. २ मंदिराच्या गाभार्‍यापुढें कीर्तन-पुराणादिकांकरितां बांधलेली आच्छादित जागा. ३ गाभार्‍यापुढील मोकळी जागा. ॰मोहन- न नजरबंदी; सभेस चकविण्याची, भुलविण्याची विद्या. 'सभा मोहन भुररी चेटकें । साबरी मंत्र कौटलें अनेकें ।' -दा ५.२. २. ॰रंजन-न. सभेची करमणूक; मंडळीचें मनोरंजन. ॰रत्न-न. सभाभूषण; सभेचा अलंकार. ॰लंकार-पु. सभारत्न. ॰व्यव- स्थापक-वि. सभेची व्यवस्था ठेवणारा; शिस्त राखणारा; सभा व्यवस्थितपणें चालविणारा. ॰व्यवस्थापन-न. सभेची व्यवस्था, व्यवस्थित मांडणी, व्यवस्थित कार्य, शिस्त, देख- रेख. ॰शूर-वि. सभेंत किंवा मंडळींत धीट; आत्मविश्वासी; सभेमध्यें पराक्रम गाजविणारा. ॰संकेत-पु. सभेचे नियम, पद्धति, रूढि. सभासद-पु. १ सदस्य; सभेचा प्रत्येक घटक; सभेमध्यें बसलेला प्रत्येक इसम. २ (ल.) लोकांच्या फिर्यादी दाखल करून घेणारा कचेरींतील कामगार. ३ सभास्थान; सभा- मंडप; सभामंडळ; बैठक. 'तूं या विश्वाची अनादि आदी । बैससीं जिये सभासदीं । तेथें सोयरिकीचिया संबंधीं । रळी बोलों ।' -ज्ञा ११.५४४. ४ पंच; न्यायदानाच्या कामीं मदत करणारा अधिकारी. 'सभासद भलेलोकीं सांगितलें कीं' -भाइ- समं २.६३. ॰स्थान-न. सभेची जागा; सभागृह, मंढप, ॰स्फूर्ति-स्त्री. सभेमध्यें प्रसंगावधान; सभेमध्यें भाषण करतांना येणारें अवसान, स्फुरण. ॰क्षोभ-पु. सभेमध्यें गांगरून जाणें; सभेमध्यें घाबरणें, घोंटाळणें. 'किंवा सभाक्षोम तयास झाला ।' -सारुह ६.९५. सभोचित-वि. सभेमध्यें करावयास, मंडळींत करण्यास योग्य; बैठकींत करण्यासारखें. सभ्य-पु. १ सभासद; प्रेक्षक. सभेंतील योग्य मनुष्य. 'तै गुणदोष सायिखेडें । सभ्युं जैसा ।' -ज्ञा १४.३४३. 'भरत कुल धर्म न बुडो सभ्याला पूस एकदां जागा ।' -मोसभा ४.१०३. 'न वदति सभ्य न पांडव ।' -मोसभा ५.५८. २ पंचाग्निपैकीं एका अग्नीचें नांव. -वि. संभा वित; प्रतिष्टित; शिष्ट; सज्जन.

दाते शब्दकोश

शीक

स्त्री. शिक्षण; शिक्षा; रीत. 'तव दसवंती म्हणे आणा शीक लावूं ।' -तुगा १२२. 'म्हणोनि किंवा स्मर शीक लावी ।' -सारुह २.६२. [सं. शिक्ष्]

दाते शब्दकोश

सीलद्री

स्त्री. (महानु.) एक प्रकारचें भारी लुगडें; शेलारी. 'तव सीलद्रिया आणिले अनेक वस्त्रें आळंकारू ।' -धवळे पू ७६.

दाते शब्दकोश

संतति (विपुल)

रग्गड पोरें, पोरांचें लेंढार, बाळगोपाळांचे खिल्लार, खंडोगणती पिल्लें, हे आमचे ताजे चिरंजीव, घराला गोकुळाचें स्वरूप प्राप्त झालें आहे, एक अंगाशीं तर एक खांद्याशी, खायला काळ भुइला भार, एकाचे एकवीस होवोत, वेल मांडवाला जावो; तसेंच झालें, माझ्याहि पदरीं मुलेंबाळें आहेत, शेळीच्या लेंड्यांप्रमाणें पोरें होताहेत, विवाह मजेसाठीं नसून प्रजेसाठी आहे हे पक्के ओळखलेंत, रग्गड मुलें असलेल्या लेकुरवाळ्या स्त्रिया, शोभो तव कुल सत्कुमरें, अष्टपुत्रा जाहली, पोरगी पायगुणाची; घर भरल्याशिवाय सोडायची नाहीं.

शब्दकौमुदी

सपा

क्रिवि. पूर्णपणें; सपाइ पहा. 'तव कृपेची दृष्टी असतां । सपा मिरवूं सवे क्षमिता ।' -नव २३.१११.

दाते शब्दकोश

स्थितिस्थापक

स्थितिस्थापक sthitisthāpaka a S (That fixes the state.) Elastic. By attaching the affix त्व we form the useful word स्थितिस्थापकत्व Elasticity.

मोल्सवर्थ शब्दकोश

सुका ताव

सुका ताव sukā tāva m (Dry cautery or heating.) Applied figuratively to the burning of a hungry stomach; to a dry (empty or bare) treatment or reception; a dry faring or fare; also to a flat refusal; to a downright abusing or scolding; to any rough or unceremonious handling. v दे & बस. 2 Commonly सकताव.

मोल्सवर्थ शब्दकोश

सवळ

स्त्री. प्रात:काल; प्रभात; पहांट. 'तो सूर्य उदयो देखोनि सवळे । पापिया फुटती डोळे । डुडुळाचे ।' -ज्ञा १६. २३९ [सं. सु + वेला] -क्रिवि. तात्काल; ताबडतोब 'तव जाला हाहाकार । देव मिळाले सवळ' -ब ४६५.

दाते शब्दकोश

टाव

टाव ṭāva m Commonly टाहो.

मोल्सवर्थ शब्दकोश

ताव

ताव tāva f C Mild sunshine (as of rainy weather).

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. १. सोनें इ॰ धातुस अग्नींत तापवून लाल कर- ण्याची क्रिया' अग्निसंस्कार. २. सोनें, चांदी इ॰ धातु तापवून लाल करून थंड होऊं दिल्यास त्यास येणारा रंग; तेज. ३.(ल.) (एखाद्याचा) माज, ताठा जिरविणें; खरडपट्टी काढून नमविणें. (क्रि॰ देणें). ४. दुःख. ५. राग; संताप. 'दौलत खराबीस आली म्हणून तावाच्या गोष्टी बोलतो.' -ख ७.४७१. ६.(खा. व.) ताप; ज्वर. ७.आंच. [सं. ताप = उष्णता; प्रा. फा. ताव; फा. ताब् = उष्णता; फ्रे.जि. तव. थव = भजणें, तापविणें] (वाप्र.) ॰देणें- तापविणें. (एखाद्या वस्तूवर, पैशावर ) ताव देणें- मारणें-एखादी वस्तु पळविणें; लुबाडणें; लांबविणें; (कारकुनी कसबानें) गिळंकृत करणें. (एखाद्या खाद्यावर) ताव देणें- मारणें-सपाटून, आकंठ एखादें खाद्य यथेच्छ खाणें; त्या खाद्यावर हात मारणें; त्या खाद्याचा समाचार घेणें. (एखाद्याला) ताव देणें-१ एखाद्याची खरडपट्टी काढणें; हजेरी घेणें; त्यास दपटशा देणें. २ चांगलें मारणें (व्यापार इ॰ कांत) ॰देणें-मारणें-१ व्यापारधंदा इ॰ कांत नफा मिळविणें; घबाड सांपडणें. २ व्यापार इ॰ कांत ठोकर, बूड येणें. (एखाद्या कार्याचा) ॰ताव येणें-एखादें कार्य करण्याबद्दल इसळी, सुरसुरी येणें. (मिशावर) ताव देणें- 'बरें आहें, पाहून घेईन' इ॰ वाचक शब्द बोलून मिशावरून हात फिरविणें. सामाशब्द- ॰सुलाख-पु. सोनें इ॰ धातूस ताव देऊन व छिद्र पाडून पारखणें. (क्रि॰ घालणें; उतरणें; निघणे). [ताव + सुलाख] ॰तावातावानें-क्रिवि. रागारागानें; फणकार्‍यानें; संता- पाच्या भरांत. [ताव द्वि.]

दाते शब्दकोश

ताव tāva m ( P ताप S) Heating to a red heat (metals &c.) 2 The appearance induced upon metals by thus heating them. 3 fig. Taking the conceit out of; humbling by vehement vituperation. v दे. 4 A sheet of paper. 5 A pane of glass. ताव देणें (कशावर) To make away with; to purloin or pilfer: (लाडू पोळी इत्यादिकावर) To play a good stick at (cakes, puddings, sweetmeats). ताव देणें (with ला) To beat or scold vehemently. ताव देणें or मारणें (व्यापारांत &c.) To get a gain, or to get a loss; i. e. to make or to get a hit. ताव येणें in. con. To get an impulse or itching (to do).

मोल्सवर्थ शब्दकोश

तेज

न. १ प्रकाश; कांति; लकाकी; पाणी; झकझकी. २ उष्णता; कडक सूर्यकिरण. 'तोय तेज घूमु । ययां वायूसीं संगमु । -ज्ञा १८.३०८. ३ वैभव; शोभा; उत्कर्ष. ४ गुण; उपयुक्तता; सत्त्व; प्रताप (औषध इ॰ चा); जोम; उत्साह; गांभीर्य (भाषण इ॰ चें). ५ वीर्य; रेत. 'देइन तुज निजकन्या, तव तेजातें परा न सोसील ।' -मोअश्व ३.१५. ६ तिखटपणा; तीक्ष्णता; झणझणीतपणा. ७ पराक्रम; सामर्थ्य. 'भावितमःप्रशमीं न क्षमही होऊनि तेज देहिं सके ।' -मोसभा ५.१९. [सं. तेजस्] सामाशब्द- तेजगी-स्त्री. चकाकी; टवटवी; झांक; पाणीदारपणा. तेजतत्व- न. १ तेजाचें अधिष्टान; तेजस्वीपणाचें मूळ; नेत्र, सूर्य वगैरेच्या ठिकाणीं राहणारें आद्यतत्त्व. २ ज्ञान; ज्ञानेंद्रिय. 'जे तेजतत्त्वाची आदी ।' -ज्ञा १३.८८. तेजःपुंज-वि. सूर्य, रत्न, विद्वान, मानमान्यतेचा पुरुष यांना ही संज्ञा लावतात. तेजवान्,तेज- वंत, तेजोमय, तेजस्वी-वि. १ शोभायमान; कांतिमान्; उजळ; सतेज; उज्वल. २ (ल.) प्रभाववान्; प्रतापी; प्रतिष्ठित; प्रसिद्ध; सन्माननीय; बाणेदार. तेजस-वि. तेजस्वी; प्रकाशवान्. 'पैं कमलायतडोळसा । सूर्यकोटि तेजसा ।' -ज्ञा ११.६९.तेजःसंकर्ष- देश-पु. (शाप.) (सर्व प्रकाश एकत्र जमण्याचें स्थान). सूक्ष्मदर्शक भिगांतून निघणारे किरण ज्या ठिकाणीं केंद्रीभूत होतात तो बिंदु. तेजस्कर-वि. तेजस्वी; चकाकित; सतेज. तेजाकार-पु. सुर्य. 'कां उदय न कीजे तेजाकारें । तंव गगनचि होऊनि असे आंधारें ।' -ज्ञा ११.६९३. तेज्स्वी मासा-पु. चकचकीत व शोभायमान असे एकावर एक चढलेले खवले अंगावर असणारा एक जातीचा मासा. तेजाळ-वि. (काव्य.) १ उज्वल; सतेज; चकचकीत; तेजस्वी. 'तोच पारा परम चपळ । न धरवे कोणा तेजाळ ।' २ उदमा; भव्य; छानदार; शोभिवंत. तेजित-वि. १ झिलई, उजळा दिलेला. २ धार लावलेला. तेजोभंग-पु. १ अपमान; अवमान; अपमानपूर्वक अथवा तिरस्कारपूर्वक वागविणें; होणारा अपमान अथवा फजिती. २ तेजाचा, पराक्रमाचा नाश; वीर्यहानि. 'सर- कारी शाळांतून मिळत असलेलें शिक्षण भावी पिढीचा तेजोभंग व निरूत्साह करण्याकरितां मुद्दाम वेड्यावांकड्या रीतीनें दिलें जात आहे.' -टि ३.१३३. तेजोमय-वि. प्रकाशमय; तेजस्वी; पाणीदार; भव्य. तेजोवध-पु. तेजोभंग; पाणउतारा. तेजोवृध्दि- स्त्री. प्रकाश, कांति, शोभा, मोठेपणा, यश इ॰ कांची वाढ. तेजो- हानि-स्त्री. १ प्रकाशाची न्यूनता, कमतरता; पराक्रमाची वाढ खुंटणें; वीर्यनाश. २ अपमान; अवमान; प्रतिष्टा, नांवलौकिक, कीर्ति यांची हानि. तेजोर्‍हास-पु. तेजोहानि पहा. तेजोमेघ- न. आकाशामध्यें कापसाप्रमाणें विरळ, तेजोयुक्त भाग दिसतो तो; केंद्रीभूत होण्यापूर्वीं तेजाची विरलावस्था; पटल; भूर. (इं.) नेब्युला. तेजोवहमज्जातंतू-पुअव. तेजाचें ज्ञान करून देणारे किंवा तेजाचें वहन करणारे ज्ञानतंतु.

दाते शब्दकोश

तेज      

न.       १. पंचमहाभूतांपैकी तिसरे भूत; सत् आणि ज्ञानाचे प्रतीक. २. प्रकाश; कांती; लकाकी; पाणी; झकझकी. ३. उष्णता; कडक सूर्यकिरण : ‘तोय तेज धूमु । ययां वायूसीं संगमु ।’ – ज्ञा १८·३०८. ४. वैभव; शोभा; उत्कर्ष. ५. गुण; उपयुक्तता; सत्त्व; प्रताप; परिणाम (औषध इ.चा); जोम; उत्साह. ६. वीर्य; पराक्रम : ‘तव तेजातें परा न सोसील ।’ – मोअश्व ३·१५. ७. तिखटपणा; तीक्ष्णता; झणझणीतपणा. ८. पराक्रम; सामर्थ्य. [सं. तेजस्] (वा.) तेज चढणे – एखाद्याचा दरारा बसणे; वरचढपणा दिसणे. तेज होणे – तयार, सिद्ध, सज्ज होणे. वि.      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तळबूड      

स्त्री.       १. वृक्ष इ.कांचा बुंधा; तळ; खालचा भाग : ‘तव तंव होती थोराडें । अकर्माची तळबुडें ।’ – ज्ञा १५·१६८. २. खळ्यातील, धान्याच्या पेवातील (धान्य इ.ने युक्त) गाळसाळ; गदळ; झाडणी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तंवा

क्रिवि. (कों.) तेव्हां; त्यावेळीं. [तव]

दाते शब्दकोश

तत्त्व

न. १ सत्य; वास्तविक स्वरूप; वस्तुस्थिति. 'असे हा कोणाचा कवण मजला तत्त्व न कळें ।' -सारुह ७.८२. 'जाणें त्या जिष्णुलाहिं तत्त्वानें ।' -मोकर्ण २७.१८. २ (ल.) प्रत्यक्ष अस्तित्व; उलट अर्थीं माया. ३ (वेदांत). ब्रम्ह; तेंचपण; जीवपण; विश्वाला चेतना देणार्‍या परमात्मरूपाशीं एकरूप असलेलें जीवात्म्याचें स्वरूप. 'तैसें विचारितां निरसलें । तें प्रपंचु सहजें सांडवलें । मग तत्त्वता तत्त्व उरलें । ज्ञानियासी ।' -ज्ञा २.१३१. ४ पंचमहाभूतें, पंचविषय, दशेंद्रियें, मन, अहंकार, महत्तत्त्व, माया, ईश्वर यांना सामान्य संज्ञा. यांपैकीं प्रत्येकाला म्हणतात. ५ (शब्दश: व लक्षणेनें) (एखाद्या पदार्थांतील) उत्कृष्ट अंश; सत्त्व; सार; मगज. ६ सारांश; तात्पर्य; सार. ७ (रसा.) मूलद्रव्य, धातु. (इं.) एलेमेंट्. [सं. तत् = तो + त्व = भाववाचक नामाचा प्रत्यय] सामा- शब्द- ॰ग्रह-पु. १ सत्य, यथार्थ स्वरूपाचा बोध होणें. २ सार, मुख्यांश ग्रहण करणें; [तत्त्व + ग्रह = घेणें] ॰चिंता-स्त्री. ब्रह्माचिंतन; वेदांत. 'क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादें ।' -राम ५२. [तत्त्व + चिंता = विचार, मनन] ॰त:, तत्त्वता-तां-क्रिवि. खरोखर; वास्त- विक पहातां; नि:संशय; वस्तुत: 'समस्त देव माता पिता । गुरुचि असे तत्वता ।' -गुच २.२३८. [तत्त्व + तस् प्रत्यय] ॰निरसन- न. (अक्षरश: व ल.) (एखाद्या वस्तूंतील, गोष्टींतील) सार काढून घेणें; तत्त्वग्रह. [तत्व + निरसन] ॰निष्ठ-वि. १ ब्रह्मनिष्ट. 'कीं तत्त्वनिष्ठु जैसा । नागवे भ्रांतिलेशा ।' -ज्ञा ३.१२४. २ तत्त्वाला न सोडणारा; सत्यनिष्ठ. ३ विशिष्ठ तत्त्वाप्रमाणें चालणारा; ध्येय- वादी. [तत्त्व + निष्टा] ॰मीलन-न. मूलतत्त्वांचा मिलाफ, संमिश्रण. [तत्त्व + मीलन = एकत्र येणें] ॰वर्तक-वि. (एखाद्या) तत्त्वाचा पुरस्कार करणारा; तत्त्व काढणारा, सांगणारा. 'कोणतीहि सुधारणा करणें ती तत्त्ववर्तकांनीं आधीं केलीं पाहिजे.' -टि ४.१०२. [तत्व + वर्तक = निष्ठावचन] ॰वाद-पु. १ ईश्वराच्या अस्तित्वा- विषयीं वाद; ब्रह्म सत्य कीं माया सत्य वगैरे संबंधींचा वाद. २ तत्त्वाचा, तत्त्वासंबंधीं वाद. [तत्त्व + वाद] ॰वादी- वि. तत्त्ववाद करणारा. ॰ज्ञान-विद्या-नस्त्री. १ परमात्मस्वरूपाचें ज्ञान; ब्रह्मज्ञान; यथार्थज्ञान; वेदांत. एक शास्त्र. (इं.) फिलॉसॉफी. २ एखाद्या विषयाच्या सामान्य तत्त्वांचा अभ्यास. ॰ज्ञानी-ज्ञ-वि. १ ब्रह्मस्वरूपाचें ज्यास ज्ञान झालें आहे तो. २ तत्त्वज्ञान शास्त्राचा अभ्यासी; त्या शास्त्रांतील तज्ज्ञ. तत्त्वार्थ-पु. १ सारभूत अंश; सत्त्व; सार; मगज; गाभा. २ सत्य; खरेपणा; सत्य अस्तित्वानें युक्त अशी वस्तु; खरें अस्तित्व. ३ ब्रह्म; ब्रह्मरूप घन. 'आंतु बाहेरि चोखाळु । सूर्य तैसा निर्मळु । तत्त्वार्थाचा पायाळु । देखणा जो ।' ज्ञा १२.१७९. [तत्त्व + अर्थ = सार; धन]

दाते शब्दकोश

तुझा      

सना.       तू या सर्वनामाची षष्ठी विभक्ती. [सं. तव] (वा.) तुझे माझे करणे – एकेरीवर येणे; भांडणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तुला

स्त्री. १ तराजू; तागडी. 'तेव्हां आणवि तो तुला त्रिभुवनीं जीला नसे हो तुला.' -आशिबि २९. २ मेषादि बारा राशींपैकीं सातवी राशि. ३ वजन करणें अथवा वजन करून किती हें ठरविणें अथवा अमुक एक आहे हें वजन करून ठरविलेलें परिमाण. ४ बरोबरी; साम्य; समता; सारखेपणा; तुलना. 'भगवान् धर्मासि म्हणे, नाहींच तुला तव प्रतापा या ।' -मोभीष्म ११.१५२. ५ धार्मिकविधिपूर्वक आपल्या शरीराच्या भारंभार सोनें, रुपें, साखर इ॰ ब्राह्मणास देण्याचें कार्य; अशा रीतीनें ठरविलेलें भारंभार सुवर्ण वगैरे. (क्रि॰ करणें; देणें). [सं.] ॰म्ह गाजराची तुला आणि विमानाची वाट = क्षुल्लक गोष्टीबद्दल किंवा थोड्या यत्नाबद्दल मोठें बक्षीस अथवा फळाची अपेक्षा करणें. सामाशब्द- ॰कोश- परीक्षा-पुस्त्री. तुला करण्याचें दिव्य. ॰दान-न. आपल्या भारंभार सोनें, रुपें वगैरे ब्राह्मणास देणें. तुला अर्थ ५ पहा. ॰धार-पु. तराजूची दांडी; कांटा. ॰पुरुष-पु. १ माणसाच्या भारंभार सोनें इ॰ ची केलेली प्रतिमा. २ त्याच्या भारंभार सोनें इ॰. ॰मान-न. वजन करून काढलेलें प्रमाण. ॰संपात-पु. सूर्याचें तूल राशीमध्यें जाणें (ता. २२ सप्टेंबर या दिवशीं सूर्य विषुव- वृत्तावर येऊन दिवस व रात्र यांचें मान सारखें होतें तो काळ).

दाते शब्दकोश

तवंग

पु. १ पाण्यावर येणारा, पसरणारा (तेल इ॰ काचा) पातळ थर; तरंग; कोशेटा; तव. 'दानांबु तैलजतवंग सवंग झाले ।' -र ५६. २ डोळ्यांत येणारा भुरीचा पापुद्रा; सारा. 'कामभोगाचे तवंगें । डोळ्या पातया पातें न लागे ।' -मुविराट ३.१३३. तवंगट-वि. तवंगांनीं युक्त. [सं. तवस्]

दाते शब्दकोश

तवर

स्त्री. मूर्च्छा; भोंवळ; घेरी. तव पहा. (क्रि॰ येणें).

दाते शब्दकोश

तवर      

पहा : तव पु. स्त्री.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

टवसण

वि. (व.) टणक; कडक. 'म्हातारा बोलून टव- सण आहे.'

दाते शब्दकोश

तवट

न. धैर्य; धीर. 'या परी लोहदंतु पडला । स्वामी काई करीतु जाला । घाये बांधले ने तवटें । आपुला सारथी सावदु केला ।' -उषा १४१७. [तव]

दाते शब्दकोश

तवतुक

स्त्री. १ (कर.) त्वरा; लगबग; जलदी. 'तो तव- तुक करून आला.' २ -क्रिवि. (कर) लगबगीनें; जलदीनें; त्वरित. 'तवतुक निघा.' [तवताक]

दाते शब्दकोश

तवतवणे      

अक्रि.       (अनेक किचकट कामे अंगावर पडल्याने) कातवणे; चिडणे; जिकिरीस येणे; चरफडणे. [तव द्वि.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तवतवणें

अक्रि. (अनेक किचकट कामें अंगावर पडल्यानें) कातवणें; चिडणें; जिकीरीस येणें; चरफडणें; तातवणें पहा. [तव द्वि.]

दाते शब्दकोश

उडणे      

अक्रि. १. नाहीसे होणे; निघून जाणे; संपणे : ‘ते रात्री येतां सूर्यापुढें । स्वकायेंसी सगळी उडे ।’ -एभा २०·२८१. २. एकदम अदृश्य होणे; दिसेनासे होणे. ३. कोमेजणे; निस्तेज होणे; रंग विटणे; अस्पष्ट होणे; फिक्का होणे. ४. खपणे; खलास होणे; खर्च होणे (द्रव्य, जिन्नस); झपाट्यात संपणे : ‘तिच्या दोन हजार प्रती दोन दिवसांत उडाल्या.’ -दुर्दम्य १६२. (धैर्य, धीर) खुंटणे, सुटणे; (पाणी वगैरे) आटणे. ५. मन विटणे; तिटकारा येणे; प्रेम नाहीसे होणे : ‘तिचा आज जीवच उडून गेला होता.’ -अस्तंभा १८८. ६. दुभते जनावर दूध देत नाहीसे होणे; कोरडे पडणे; भाकड होणे : ‘दुभतीया दोनि गाइ : तीया दुभेति जव उडेति तव असेति’ : - गोप्र ८७.७. एखाद्याची चाकरी, रोजगार सुटणे. ८. दोष, विरोध वगैरे दूर होणे; मावळणे; आरोप नाहीसा होणे (शास्त्रादी विषयांवरील). ९. निसटून जाणे; पळून जाणे : ‘पुढें धरितां मागें पेंचला । मागे धरितां पुढे उडाला । ऐसा सांपडतचि गेला । ठाइंठाइं ॥’ -दास १७·४·३. १०. (शाप.) वाफ होऊन जाणे; बाष्पीभवन होणे. [सं. उड्डान] (वा.) उडत जाणे - (ल.) खिजगणतीत नसणे; महत्त्व न देणे; न मानणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उगा

क्रिवि. १ न बोलतां-हालतां काम करतां; स्वस्थ; गप्प; उगीच; मुकाट्यानें. 'तंव रज तम उगे । कां पां राहाती ।' -ज्ञा १७.६३. 'आतां नाइकें न पाहें । म्हणोनि मी उगा राहे ।' -एभा ९.४५५. 'राहे भीष्म उगा, कीं सोडी तव सुत न दूरभिमानातें ।' -मोभीष्म १२.२८. 'नको छंद घेऊ उगा राहिं गोपाळा ।' -कृष्णाचा पाळणा १४. २ न खटपट करतां; विना धंदा किंवा उद्योग. ३ अकारण; अनिमित्त; निष्कारण; जरुरी नसतां. 'उगा लोळसा घोळ मोठा करितो.' -राक ३६.४ व्यर्थ; निरर्थक; बे फायदा. 'उगा भ्रमसि वाउगा कशाला युगांत खळ हा कली.' -राला १०६. उगी, उगला पहा. [ह. का. उगि = भिणें; का. उके = गप्प?]

दाते शब्दकोश

उपखा      

स्त्री. १. उपेक्षा; कमीपणा; उणीव; ‘गृहीं उपखा न पडी ।’ – उगी ३५०. २. खंड; खळ : ‘तव माझिया श्रवणसुखा । मध्येंचि पडेल कीं उपखा॥’ – स्वादि १२·२·६८. [सं. उपेक्षा]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उपखा

स्त्री. १ उपेक्षा; उणीव. 'गृहीं उपखा न पडी ।' -भाए ३५०. २ खंड; खळ. 'तव माझिया श्रवणसुखा । मध्येंचि पडेल कीं उपखा ।।' -स्वादि १२.२.६८. [सं. उपेक्षा]

दाते शब्दकोश

वाह, वाहक

पु. नेणारा; वाहून नेणारा; हमाल. -वि. वाहणारा; वाहून नेणारा. (समासांत) रथ-मार-शव-वाहक. वाहक(त्व)-न. उष्णता, विद्युत् इत्यादि वाहून नेण्याचा धर्म. वाहक शक्ति-स्त्री. उष्णता, विद्युत् इत्यादि वाहून नेण्याचें सामर्थ्य, गुण.

दाते शब्दकोश

वामन

पु. १ विष्णूचा पांचवा अवतार. २ वामनद्वादशीचे दिवशीं जेवावयास बोलविलेला बटु, मुलगा. -वि. १ (ल.) खुजा; बुटका; ठेंगू (मनुष्य). २ (विष्णूनें वामन अवतारांत बलीस फस- विल्यावरून ) लबाड; ठक; फसव्या. [सं.] ॰जयंती-द्वादशी-स्त्री. भाद्रपद शुद्ध द्वादशी; वामनाचा जन्मदिवस व बलिगर्वहरण. ॰त्व- न. ठेंगणेपणा; हीनता. 'आशा उपजली वामनासी । नीच वामनत्व आलें त्यासी ।' -एभा ८.३११. ॰मूर्ति-स्त्री. ठेंगणा मनुष्य; खुजा मनुष्य. (विशेषतः एखाद्या लहान पण पराक्रमी पुरुषाबद्दल वापरतात.) -वि ठेंगणा; खुजा.

दाते शब्दकोश

वधू

स्त्री. १ नवरी; जिचें लग्न ठरलें आहे, चालले आहे अशी स्त्री. -ज्ञा १४.३. २ पत्नी. ३ उपवर कन्या; स्त्री; विवाह- योग्य वयापासून यौवनदशा येईपर्यंतची स्त्री. 'भुले सुकवि वाग्वधू तव गुणा अनर्ध्रा नगा ।' -केका ९९. ४ (सामा.) स्त्री. 'राजीवाक्ष असा विलोकुनी वधू धांवे जशी बावरी ।' -आशबरी ९. [सं.] ॰पक्ष-पु. लग्नामध्यें नवरीकडील पक्ष. ॰पक्षीय-वि. वधूपक्षासंबंधी; नवरीकडील ॰प्रवेश-पु. १ विवहानंतर नवरीनें नवऱ्याच्या घरीं समारंभानें येणें. २ या वेळचा विधि; घरभरणी. ॰माय-स्त्री. (काव्य.) नवरीची आई (लग्न समारंभात या नावानें तिला संबोधितात). [माय = माता] ॰वरें-न. अव. विवाहसमारंभांतील वधू आणि वर उभयतां मिळून; जोडपे; नवरानवरी. ॰वस्त्र-न. लग्नाच्या वेळचें वधूचें पातळ; अष्टपुत्री. वधूटी-स्त्री. आड बायको; अर्धवट प्रौढ स्त्री.

दाते शब्दकोश

वेधा

स्त्री. (महानु.) (प्र.) विद्या; ज्ञान. 'तै अब्रह्मा- पलीकडे । ज्ञानसूर्य उजियेडे । शुद्ध वेधा तव जोडे । कैवल्यविधि ।' -ज्ञाप्र ३.

दाते शब्दकोश

वहिला

वहिला vahilā a & ad (Poetry.) Separate, disjunct, distinct. Ex. झडझडोनि व0 निघ ॥ माझे भक्तिचिये वाटें लाग ॥ जवकाळ असे दुरी ठेला ॥ तव तू हरिगुण गाय व0 ॥; also पाईक तत्काळ बोलाविला ॥ म्हणे तत्काळ हात तोडून टाक व0 ॥. 2 Quickly, smartly, promptly. 3 Certainly, positively, assuredly. Ex. त्याचा दास मी जाण वहिलें ॥ करीन कंदन लंकेचें ॥; also आठ राक्षस रावणें पाठविले ॥ रामास मारून यावें वहिलें ॥. Note. The above three senses have been determined with satisfaction; but the word occurs endlessly in poetry and is explained with endless diversity. The student may allow himself in the universal indulgence.

मोल्सवर्थ शब्दकोश

च(वि)वी

स्त्री. १ (काव्य) चव; रुचि; गोडी; जिभेनें ग्रहण करणें. 'दाविली आपुली चवि ।' -रास ३.७०. २ आस्वाद; बर्‍यावाईटाची परीक्षा, चाचणी. (क्रि॰ पाहणें). 'कीं तेंचि चवी करूनि पाहिजे । तव अमृत आहे ।' -ज्ञा ६.३. [का. सवि; ते. चवी; ता. चुवै; म. चवी]

दाते शब्दकोश

विभु

पु. प्रभु; परमेश्वर. 'प्रभो, विभो अगाध किति तव- करणी ।' -वि. सर्वव्यापी; व्यापक; महान्; चिरंतन. 'उष्णता व पदार्थ या दोन्ही वस्तू नित्य व विभु पडल्यामुळें तदभाव विशिष्टकाल व स्थान मिळणें असंभवनीय आहे.' -न्याप २०६. [सं. वि + भू]

दाते शब्दकोश

विकळ

वि. विकल पहा. १ दुःखित; गालितगात्र. 'परम विकळ मी तूं या स्मृती ही उडाल्या ।' -वामन, भामाविलास (नवनीत पृ. ९९). २ विसकटलेला; अस्ताव्यस्त. 'विकळ देखोनि दळभार । मागधवीरीं केला मार ।' -एरुस्व १०.४२. ३ अधू; व्यंग. 'बाण खोंचला अति निगुती । विकळ गेला दोही हातीं ।' -एरुस्व ११.४४. ४ हीन दशा पावलेला; हतबुद्ध; अस- हाय्य. 'निज मंडपीं शिशुपाळ । करीत होता गदारोळ । भीमकी घेऊन गेला गोपाळ । ऐकोन विकळ पडियेला ।' -एरुस्व १२. १. ५ विव्हळ; दुःखी. 'लिंग देखिलें भूमीवर । मनीं विकळ जाहला ।' -गुच ६.१८३. ६ निस्तेज; निःसत्व. 'विकळ वरि शिखंडीतें गुरुसुत...।' -मोभीष्म ८.२१. ७ उलट; विपरीत. 'तंव ग्रह नव्हता सानुकूळ । म्हणोनि तव बुद्धि विकळ ।' -शनि ३७१. ८ उणाख; अपूर्ण. 'जो साम्यचि परी विकळ । तो दृष्टांत नव्हे निर्मल ।' -विपु ७.३३.९ अमेळ; संबंधशून्य; विसंगत. 'आतां जाहालिया भ्रमहत । जैसें पिशाचाचें चित्त । मग इंद्रियांचें चेष्टित । विकळु दिसे ।' -ज्ञा ५.५७. १० जड; अस्पष्ट. 'ययाती म्हणे वाचा विकळ । सांगो जातां होतसे ।' -मुआदि २०.२३७. [सं. विकल] विकळणें-अक्रि. (कों.) १ बुद्धीची ग्राहकशक्ति जाणें, नष्ट होणें (वार्धक्य, विकार इ॰मुळें). 'साधक आळसें विकळे ।' -एभा २०.२०२. २ बारगळणें; भ्रम होणें; वेड्यासारखें, मूर्खा- सारखे चाळे करणें; बडबडणें (विशेषतः म्हाताऱ्यानें, लहान मुलानें). 'तो म्हातारा अलीकडे विकळला, त्याबरोबर तुम्ही कशास बोलतां !' ३ अतिशय विकल, जेर होणें (उष्णतेंनें, श्रमानें), ४ नासणें व फुटणें (दूध, ताक, दहीं). [विकळ] ॰ता-स्त्री. १ शिथिलता; विकलता पहा. 'विकळता उपजत । गात्रांसी ।' -ज्ञा १.१९६. २ व्याकुळता; खेद; दुःख. 'ऐश्वर्यहानीची विकळता । अळुमाळ नाहीं माझिया चित्ता ।' -मुआदि २०.४४. ॰मति- स्त्री. (काव्य) १ बुद्धिभ्रंश; भ्रष्टमति. 'नळाची विकळमति होऊन । तटस्थरूप राहिला ।' -वि. ज्याच्या बुद्धीला विकळता आली आहे असा. विकळा-वि. विवर्ण; निस्तेज; फिकट (वर्ण, चेहरा). [वि + कळा]

दाते शब्दकोश

विषय

पु. १ इंद्रियें किंवा मन यांस गोचर वस्तु; ज्ञानाच्या कोणत्याहि साधनानें माहीत होणारी गोष्ट. (याअर्थीं सामासांत) विषयभोग, विषयत्याग, विषयासक्ति, विषयाभिरुचि, विषय- सेवा-सेवन-प्रीति-तिरस्कार-संबंध-कथन-निंदा-ज्ञान-सुख- दुःख. २ एखाद्या क्रियेचा कर्ता अथवा कार्य; एखादा विकार अथवा भावनेशीं संबद्ध गोष्ट; (कर्ता, करण, शक्ति अथवा कार्याचा) प्रदेश, टप्पा, आटोका, स्थान वगैरे. उदा॰ कामाचा विषय स्त्री; मोहाचा विषय पुत्र; लोभाचा विषय वित्त; रोगाचा विषय शरीर; तसेंच क्रोध, हर्ष, दंड इत्यादींचा विषय. (याअर्थीं सामासांत) विवाद-व्याख्या-गायन-लेखन-गमन-विचार-धर्म-ज्ञाति- हास्य-काम-संकल्प-विधि-निषेध-विषय. 'निजस्मृतिस जाहलीं विषयी तीं तव श्रीपदें' -केका ८. ३ कार्य; कर्तव्य; कार्यक्षेत्र; अधिकार; व्यवसाय; योग्य धंदा, काम. उदा॰ बोलणें हा वागिं- द्रियाचा विषय; मामलत करणें हा भिक्षुकाचा विषय नव्हें; रफू करणें हा दाभणाचा विषय नव्हे. ४ उद्देश; हेतु; ध्येय; मनां- तील गोष्ट. 'तुम्ही जो हा उद्योग करीत आहां याचा विषय कोण?' ५ मुद्दा; प्रकरण; बाब; संबंध. 'शब्द साधनारूप विषय ज्यांत असतो त्याला व्याकरण म्हणावें.' ६ द्रव्य; ऐवज; माल. 'त्यास साऱ्या वर्षांत शंभर रुपयांचा विषय पोंचतो.' ७ महत्व; पर्वा; दरकार. 'स्वामीचा आशीर्वाद असतां इतरांचा विषय मांनीत नाहीं.' -रा ३.३२४. ८ कामेच्छा. 'जैसे थोर विषय सुभगे अंगी । अंगसानें ।' -ज्ञा १६.२५३. 'रुचे विषय ज्या मिळे अमृत ते न मद्या पिती ।' -केका ४३. [सं.] ॰द्वार-न. इंद्रिय. 'बहु हीं दुस्तर विषयद्वारें ।' -तुगा १८७४. ॰नियामक समिति-स्त्री. सभेपुढें मांडावयाचे विषय ठरविणारी, निश्चित कर- णारी, निवडणारी मंडळी. ॰पंचक-न. पांच इंद्रियांचे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पांच विषय. 'शब्दस्परुषरूपरसगंध । ऐसें हें विषय पंचक ।' -दा १७.८.१४. ॰बद्ध-वि. इंद्रिय विषय लोलुप; कामी; भोगी; आसक्त. (याचअर्थीं सामासांत) विषय- तत्पर-लंपट-लीन-लुब्ध-वश-दास-आसक्त-आधीन-आविष्ट- अंध. ॰भोगोडा-पु. विषयाचा उपभोग. 'विषयभोगोडा करा- वया ।' -दावि ४१. ॰वासना-स्त्री. भोगेच्छा; इंद्रियसुखेच्छा; ऐहिक वस्तूंच्या उपभोगाची इच्छा. 'विषयवासना नावडो' ॰विरक्त-वि. ऐहिक भोगांस विटलेला; भोगांचा त्याग केलेला. ॰व्यापार-पु. व्यवहार; धंदा; ऐहिक व्यवसाय; सुखसाधनांचें संपादन. 'विषयव्यापारीं सदा सादर । आपपर नावडे त्या ।' ॰सुख-न. इंद्रियजन्यसुख; रतिसुख; सृष्टींतील निरनिराळ्या भोगांपासून निरनिराळ्या इंद्रियांस मिळणारा आनंद. विषया- चरण-न. इंद्रियभोग; विषयोपभोग. 'पतंगा दीपीं आलिंगन । तेथ त्यासी अचुक मरण । तेंवी विषयाचरण । आत्माघाता ।' -ज्ञा ३.२०१. विषयानंद-पु. भोगसुख; निरनिराळ्या पदार्थांच्या उपभोगापासून मिळणारें सुख. विषयोपभोग-पु. भोग्य वस्तूंचें सेवन; इंद्रियांस सुख देणाऱ्या वस्तूंचें सेवन. विषयी-वि. १ विषयासक्त; भोगसुखास लालचावलेला; कामी; गोडघाश्या. 'जरी विषयीं विषयों सांडिजेल ।' -ज्ञा ५.१२५. २ इंद्रियांस अगोचर वस्तूंचें अस्तित्व न मानणारा. ३ ज्या गोष्टीचें एखादी वस्तु कार्य अथवा कर्ता असतो ती (गोष्ट). विषयीकरण-न. इंद्रियांकडून स्वविषयाचें ग्रहण; इंद्रियाकडून त्या विषयाचें ज्ञान होणें. विषयीं- शअ. संबंधी; संबंधानें; बद्दल; धरून; अनुसरून; अनुलक्षून. पूर्वीं षष्ठ्यंत नामापुढें लावीत हल्लीं सामान्यरूप करून जोडतात. उदा॰ घराचेविषयीं, युद्धाचेविषयीं = घराविषयीं, युद्धाविषयीं. [विषय- सप्तमी] विषी, विषीं-शअ. विषयीं पहा. 'अगा आत्मजेच्या विषी । जिवु जैसा निरभिलाषी ।' -ज्ञा १२.१३२. विषो-पु. विषय पहा. 'अमाइक तंव नव्हसी । कवणा ही विषो ।' -अमृ २.३६.

दाते शब्दकोश

वोळग

स्त्री. १ सेवा; उळिग पहा. 'होईन पुरेपण । वोळ- गेचें ।' -ज्ञा १३.४२४. -एभा १४०. २ आश्रय; ओळग. 'चंद्रसतार वोळग घाली । नखप्रभेमाजी ।' -पूजावसर ११. वोळगण, वोळगी-सेवा; वोळग. 'बहिणी म्हणे पूर्ण विरक्ति आनसीं । ज्ञान हें तयासीं वोळहण ।' -ब १६०. 'जंव देह हें असेल । तव वोळगी ऐसी कीजेल ।' -ज्ञा १३.६३०. वोळं- गणा-वि. सेवक; उपासक. 'स्वधर्म पंथीं वर्तता जाण । सिद्धी होती वोळगण्या ।' -मुआदि ८.८०. वोळगणें, वोळंगणें- क्रि. १ सेवा करणें; आश्रय करून राहणें. 'अष्टसिद्धि याचे द्वारीं । वोळंगत राहतील निरंतर ।' -गुच ११.१८. -मुआदि १८.२०. २ बिलगणें; लोंबणें. 'वोळगे फळभार । लावण्येसी ।' -ज्ञा ३.१००. ३ जवळ जाणें; भेटणें. 'नगरा येका जाउनि रायाते वोळगे ।' -पंच ४. ४. वोळगविणें-(महानु.) सेवे प्रीत्यर्थ अर्पण करणें. 'वाईसी कापुरे वीडा वोळगवीला ।' -पूजावसर ३३.

दाते शब्दकोश

वरेत, वरैत

पु. (गो. ख्रि.) वरणारा; भर्ता. नवरदेव. -ज्ञा १८.१०४९. 'आघीं सभागा हेति तव वरैतु आदिकरूनि तिएसि अधीनें होति ।' -दुर्भगाप्रमेय [सं. वृ-वर]

दाते शब्दकोश

वर्ज

वि. (प्रं.) वर्ज्य. १ वगळलेला; समाविष्ट न केलेला. २ टाकून दिलेला; फेंटाळलेला. [सं.] ॰दिवस-वार-पु. १ धार्मिक आचार, संस्कार इ॰ला निषिद्ध दिवस. २ प्रयाण, नवीन कामाला सुरुवात इ॰ महत्त्वाच्या गोष्टींना अशुभ दिवस; घातवार. ॰वर्जं(र्जि)णें-उक्रि. १ वगळणें; समावेश न करणें. 'वर्जुनि वृषासि मज निज कटकींच प्रथम ने ।' -मोकर्ण ३५.९. २ एकटाच राहूं देणें; लक्ष न देणें. ३ बाहेर टाकणें; टाकून देणें. 'तेवीं मातें जाणे तो संकल्पीं । वर्जूनि घालिजे ।' -ज्ञा १०.८०. ४ त्याग करणें; सोडणें. 'प्रीति नाहीं राया वर्जिली ते कांता । परी तिची सत्ता जगावरी ।' -तुगा १६७५. ५ परिपाठ सोडणें, बंद करणें. 'येणें जाणें कांहो वर्जिलें ।' -लावणी. ६ मना करणें; प्रतिबंध करणें. 'या रात्रीच्या ठाईं । श्रीकृष्णाजवळ काज कांहीं । ऐसें बहुतांहीं । वर्जिलें त्यांतें ।' -रास १.२३२. ७ निषेध करणें; निर्भर्त्सणें. 'तव राजपत्नी येऊनि जवळी । वर्जी आपुले पतीतें ।' -गुच ७.२४. [सं. वर्जन] वर्जन-न. वर्जण्याचा व्यापार; वर्जणें (सर्व अर्थी) पहा. [सं.] वर्जनीय-वि. वर्जन करण्यास योग्य; त्याज्य. वर्जावर्जी-स्त्री. गाळागाळ. 'हा वर्जावर्जी करण्यासंबंधीं कायदा.' -इंमू २५२. [वर्ज द्वि.] वर्जित-वि. वर्जिलेला. वर्जणें पहा. वर्जिता-वि. निवारण करणारा. 'कोणी वर्जिता नाहीं सबळ ।' -कथासा २.२६. वर्ज्य-वि. वर्जावयास योग्य, अवश्य, शक्य. वर्ज्यस्वर-पु. (संगीत) 'विवादी स्वर पहा.

दाते शब्दकोश

व्याहाळ

न. अरण्य;ओसाड जागा; रान. 'न जाऊनी अरण्य-व्याहाळीं ।' -मुवन १२.३५. व्याहाळी-स्त्री. (महानु.) शिकार. 'रावो व्याहाळीए बाहिरी नीगे ।' -दृष्टांतपाठ ७७. -एभा १३.७०१. व्याहाळी जाणें-निघणें-शिकार करणें -एभा ६.३६४. 'तव राव गेला बाहेरा । व्याहाळीसि ।' -कथा १.५.१२८. व्याहाळणें-शिकार करणें. -एभा ७.२६०.

दाते शब्दकोश

ग्रंथ

पु. १ परस्पर संगतवार अर्थाच्या वाक्यांचा रचना- विशिष्ट समुदाय. पोथी, पुस्तक (गद्य किंवा पद्य यांचें). २ (ल. व शब्दशः) गुंफणी; जुळवणी; जोडणी; संपादणी. ३ पुस्तक; भाग; अध्याय; परिच्छेद इ॰ ४ बत्तीस अक्षरांचें वृत्त किंवा वृत्ताची ओळ. 'व्यासकृत महाभारत लक्षग्रंथ प्रसिद्ध हा भारी ।' -मोआदि १.९. (एका अनुष्टुभांत ३२ अक्षरें असतात व अनु- ष्टुभालाहि ग्रंथ म्हणतात त्यावरून ३२ ची संख्या). ५ (ल.) योजना; बेत; कट; मसलत. 'बाळोबा आणि भाऊ हा सगळा एक ग्रंथ आहे. -अस्तंभा ९६. ६ प्रसंग; गोष्ट हकीकत (व्यव- हार इ॰ संबंधीं). 'आमचा पूर्वापार ग्रंथ ऐकून मग न्याय करा.' ७ पराचा कावळा; एवढ्याचें एवढें करणें; विस्तार. ८ अर्थ, संगति. 'त्यांनीं राजीनामा कां दिला याचा ग्रंथ लावणें कठीण.' -के २७.५.३०. ९ अकांडतांडव; कुभांड. [सं. ग्रथ् = रचणें] (वाप्र.) ॰आटोपणें-(काम) संपणे; (कार्य) नाश होणें, (माणूस) मरणें. 'पण आमच्या दुदैवानें सर्वच ग्रंथ आटोपला ।' -भयंकरदिव्य. ग्र-ग्रंथन-न. गुंफण; जुडण; बांधणी; रचना. 'आणि माझें तव आघवें । ग्रथन येणेंचि भावें ।' -ज्ञा १३. ३२८. [सं.] ॰पंचक-न. (ख्रि.) पवित्रशास्त्रांतील पहिलीं पांच पुस्तकें. हीं मोशे यानें लिहिल्याचें मानितात. (इं.) पेंट्या- ट्यूक. 'ग्रंथपंचकामध्यें इस्त्राएल लोकांचें नेमशास्त्र आहे.' ॰विस्तार-पु. ग्रंथांतील गोष्टींचा, भाषेचा विस्तार, पाल्हाळ; मोठा ग्रंथ. सामाशब्द- ॰कर्ता-कार-वि. पुस्तक तयार करणारा, रचणारा कवि; लेखक; संपादक. ग्र-ग्रंथणें-उक्रि. (काव्य.) १ अर्थानुसंधानपूर्वक अनेक वाक्यें एकत्र गुंफणें, बांधणें, जुळणें, रचणें (पद्य, कविता) ग्रंथरचना करणें; ग्रंथ संपादणें. 'जें मी संजात ग्रंथलों देख । आचार्यें कीं ।' -ज्ञा १८.१७६९. ग्रथिलें भारत ज्यानें त्यालाहि स्वमनिं सौख्य वाटेना ।' २ गुंफणें; ओंवणें (पुष्पादि). ३ एकत्रित करणें; जुळणें. [सं. ग्रथन] ग्रंथाची- ग्रंथांतर टीका-स्त्री. एका पुस्तकानें दुसर्‍या पुस्तकाचें विवरण करणें. ग्रंथावरचा मालकी हक्क-पु. (कायदा). ग्रंथलेख- काचा त्या ग्रंथाचें पुनःप्रकाशन, भाषांतर इत्यादिसंबंधी हक्क. (इं.) कॉपीराईट. ग्रंथीय-थी-वि. पुस्तकासंबंधीं; पुस्तकांतील. ग्रंथोपजीवी-वि. ग्रंथ लिहून (रचून) पोट भरणारा. 'आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें' -ज्ञा १८.१८००. [सं. ग्रंथ + उपजीविन्]

दाते शब्दकोश

पुरुष

पु. १ ज्याच्या अंगीं प्रजोत्पादक बीज आहे असा मनुष्यप्राणी; नर. २ वयांत आलेला माणूस; बाप्या. ३; फळझाडां मधील नर; ज्या झाडांत पुंकेसर असतात तें झाड. ४ (व्या.) पुरुष- वाचक लिंग; पुल्लिंग. 'वृक्ष हा पुरुष, झाड नपुंसक.' ५ (व्या.) वक्ता, श्रोता व उक्तविषय असे सृष्टव्यक्तीचे जे तीन प्रकार करतात त्यास 'पुरुष' ही संज्ञा लावतात. प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन पुरुष आहेत. ६ साडेतीन हात उंचीचें प्रमाण. ७ पिढी; पिढीची एक एक व्यक्ति; पिढींतील पूर्वज. ८ पति; नवरा. 'तुझा जन्म कवणें वंशीं । पुरुष तुझा कोण सांगे ।' -गुच ३५.२४१. ९ ज्ञाता, जाणणारा, उपभोग घेणारा माणूस. १० जगताच्या उत्पत्तीस प्रकृतिसमवेत कारणीभूत व्यक्ति. 'प्रकृति आणी पुरुष । यां दोहींस जेथें निरास ।' -दा ९.२.३९. ११ (तत्त्वज्ञान) आत्मा; क्षेत्रज्ञ. 'ज्याला क्षेत्रज्ञ किंवा आत्मा म्हटलें... यासच सांख्यशास्त्रांत ...पुरुष म्हणतात.' -गीर १५९. १२ (गो.) मूळ पुरुष.[सं.] ॰गांठ-स्त्री. चाडेगांठ; बोटांत घालावयाच्या सोन्याच्या पवि- त्रकावर असते तशी गांठ. याच्या उलट रांडगांठ किंवा बाईलगांठ. ॰त्व-न. १ पुरुषाच्या ठिकाणीं प्रजोत्पादनाविषयीं उपयुक्त जी शक्ति असते ती; वीर्य. २ (ल.) सामर्थ्य; शौर्य; पराक्रमाचा उत्साह. 'वृषकेतूचें परुषत्व पाहोन । डोलवी मान आनंदें ।।' -जै १८.७७. ३ (व्या.) पुल्लिंग. [सं. पुरुष + त्व प्रत्यय] ॰प्रयत्न-पु. मानवी प्रयत्न; मनु्ष्यानें केलेली धडपड. (इं.) ह्यूमन एफर्ट. 'कला म्हटली कीं पुरुषप्रयत्न आलाच.' -(रा. ग. हर्षे) गोविंदा- ग्रज. [सं. पुरुष + प्रयत्न] ॰वाचक(सर्वनाम)-न. (व्या.) सर्वनामाचा एक प्रकार; मी, तूं, तो इ॰ जातीचें सर्वनाम; प्रथम, द्वितीय व तृतीय असे याचे तीन प्रकार आहेत. पुरुषाकार-पु. शौर्य; पुरुषत्व. 'तुझा जाणें पुरुषाकारु ।' -उषा १४३८. [पुरुष + आकार] पुरुषांतर-न. एक पिढी. -ख्रिपु. [पुरुष + अंतर] पुरुषाद-वि. नरभक्षक; नरमांसभक्षक. 'म्हणति मारूनिया पुरु षाद । हा करील शुभ्र यशें खदिशा दाहा ।' [सं. पुरुष + अद् = खाणें] पुरुषार्थ-पु. १ पुरुषानें साधवयाच्या चार गोष्टी, कर्तव्यें; धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष; पुरुषाच्या इच्छेचा विषय; ईप्सित वस्तु. 'पुरुषार्थसिद्धि चौथी । घेऊनि आपुलिया हातीं ।' -ज्ञा १२.१९. २ धाडस; पराक्रम; शौर्य. 'लटिका पुरुषार्थ बोलों नये ।' -दा २.२.१० [सं. पुरुष + अर्थ] पुरुषार्थचतुष्ट्य- न. पुरुषानें साधावयाच्या चार गोष्टी; धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. पुरुषार्थराज-पु. मोक्ष. 'म्हणोनि करावा स्वधर्मु । जो करितां हिरोनि घे श्रमु । उचित देईल परमु । पुरुषार्थराजु ।' -ज्ञा १८.९४९. पुरुषार्थी-वि. पुरुषार्थचतुष्टयापैकीं कोणताहि एक पुरुषार्थ साधण्याविषयीं प्रयत्न करणारा मिळाले येथें सर्व नृपति । जे पुरुषार्थी थोर थोर ।' [सं. पुरुष + अर्थी] पुरुषाशन-न. नर- मांसभक्षण. -वि नरभक्षक. पुरुषाद पहा. [सं. पुरुष + अशन] पुरुषोत्तम-पु. १ उत्तम पुरुष; पुरुषश्रेष्ठ. २ परमात्मा; विष्णु. 'व्याप्यु मी व्यापकु । पुरुषोत्तमु मी ।' -ज्ञा १८.११९८. [सं. पुरुष + उत्तम] पुरुषोत्तममास-पु. अधिकमास; मलमास; धोंडा महिना. हा दर ३३ महिन्यांनीं येतो. [सं. पुरुषोत्तम + मास]

दाते शब्दकोश

रच

पु. १ ढीग; रचना; रचाई. २ रचण्याची क्रिया. ३ रचलेली वस्तु. ४ रचून केकेला ढीग किंवा केकेली रास. [सं रच् = रचना करणें] रचणावळ-स्त्री. जुळण्याची, एके जागीं ठेवण्याची मजूरी, किंमत. [रचणें + वळ] रचणी-स्त्री. १ रचण्याचा जो व्यापार ती. २ रचना. रचणी, रचणूक-स्त्री. रचना; जुळणूक; व्यवस्थित लावणी; व्यवस्था. [सं. रचना] रचणें- उक्ति. १ मांडणें; जुळणें; व्यवस्थित रूपांत ठेवणें, उरकणें; २ पदार्थ एकावर एक ठेवणें किंवा पदार्थाच्या एका थरावर दुसरा, दुसऱ्या थरावर तिसरा, अशा प्रकारें त्यांची रास करणें; जुळणें. ३ उभें करणें; उभारणें; मांडणें. 'बाहेरी पद्मासन रचुनी ।' -ज्ञा ८.९२. ४ शब्दांची, विचारांची योग्य प्रकारें मांडणी, जुळणी करून ग्रंथ, श्लोक इ॰ निर्माण करणें. ५ (कादंबरी, गोष्ट, बनावट हकीगत इ॰) आपल्या कल्पनेनें नवीन बनविणें. ६ (माप, योजना) ठरविणें; आंखणें. -अक्रि. तन्मय होणें. 'तूं संत स्तवनीं रचसी । तरी कथेची से न करिसी ।' -ज्ञा ५.१४१. [सं. रच् = रचना] रचना-स्त्री. १ मांडणी; रचण्याचा व्यापार; व्यव- स्थित ठेवणें; एकावर एक किंवा एकापुढें एक ठेवणें. 'अनेक पदांची रचना केली असतां श्लोक होतो.' २ घर, मांडव, भिंत, गवताची गंजी इ॰ ची उभारणी. ३ कल्पनेनें निर्माण केकेली कांहीं वस्तु, गोष्ट इ॰. ४ ग्रंथ, मसलत, श्लोक इ॰ची उत्तम प्रकारची जुळणी. ५ घटना; जुळणी. 'शरीराची रचना सर्व शस्त्रवैद्यांस ठाऊक असावी लागते.' ६ हार, दागिना, यंत्र इ॰ चे अवयव विशिष्ट प्रकारें जुळवून त्यांची विशिष्ट प्रकारें केलेली जुळणी. ७ मांडणें, बनविणें, उभारणें, निर्मिणें, जुळविणें, घडविणें, गुंफिणें इ॰ क्रियांनीं झालेला किंवा अस्तित्वांत आलेला पदार्थ. 'तव रचना देखे गोमटी । राजद्वारीं' -ऋ ५६. [सं. रच् = जुळणें] रचमेच-पु. (महानु.) उपद्व्याप. 'जया रचमेचची भीति । सदा जनेशीं संगती । गुरुकुळीं रती । नाहीं कदा ।' -ज्ञाप्र २३५. रचयिता-वि. रचना करणारा [सं.] रचलेपणा-पु. स्थिरपणा; सुखरूपता. 'म्हणे पावो धडफडील । तरी स्वामीची निद्रा मोडैल । रचलेपणा पडैल । झोती हन' -ज्ञा १३. २५६. रचाई-स्त्री. १ रचण्याची क्रिया, सरणी; तेणेंकरून सिद्ध झालेला पदार्थ. २ अशा सिद्धतेसाठीं द्यावे लागलेलें द्रव्य. ३ व्यवस्था; तजवीज; व्यवस्थित लावणी; जुळणी. ४ रचना; मांडणी; जुळणी; उभारणी. 'धर्ममंदिराची रचाई श्रद्धेच्या किंवा विश्वासाच्या पायावर झालेली आहे.' रचावा-पु रचना. 'तरी हे इच्छा धरी कोण । सृष्टीरचाव्याची ।' -दा ८.२.१२. रचित-वि. १ रच- लेला; जुळविलेला; मांडलेला; व्यवस्थित ठेवलेला, लावलेला. २ योजलेलें; बेत केलेलें; जुळविलेलें; बांधलेलें (पुस्तक, कविता, फुलें वगैरे); आंखणी, अंदाज केलेलें. [सं.] रचुन, रच्चुन- क्रिवि. भरपूर, पूर्ण या अर्थीं. रच्चक-स्त्री. (व.) भडिमार; एकसारखा मारा. 'पत्रांचीं रच्चक लाविली.'

दाते शब्दकोश

वळण

न. १ आकारभेदाचे प्रकार (अक्षर, चित्र, शरीर, अवयव इ॰ चे प्रत्येकी); तऱ्हा; मोड. 'गोंदूनानाच्या अक्षराचें वळण बिवलकारी दिसतें. ' २ वागण्याची रीत, पद्धति, व्यवहार. ३ कल; प्रवृत्ति; झोंक (अंतःकरण, मन इ॰ चा). ४ शिक्षण; शिस्त; व्यवस्था. 'बाळकास वळणांत ठेवावे. ' ५ देणें, घेणें, जाणें, येणें इ॰ व्यवहार व त्यामुळें येणारा संबंध; दळणवळण. 'सरकारांत वळण बांधावें, मग फिर्याद करावी. ' ६ वक्रता; सरळ- पणा नसणें; वांक, (नदी, रस्ता, काठी इ॰चा). ७ डोंगराचें वांकण ८ नद्यादिकांचें पाणी विवक्षित जागीं न्यावयासाठीं बांधतात तें धरण; बांध; माती दगड वगैरेचा वळ. 'उदधीचें वळण फुटें । ' -उषां ९९.२३. ९ वशिला; वजन. (क्रि॰ बांधणें). 'चिंतोपंतांनीं राम शेटजीकडे वळण बांधून नोकरी मिळविली.' १०. वेढा; वळसा. 'दुर्मोच्य काळपाशासम याच्या होय वळण वळयाचें । ' -मोवन ६.२०. [सं. वलन] ॰म्ह-१ वळणाचें पाणी वळणानेंच जाईल. २ पाण्याआधीं वळण बांधावें. (वाप्र.) वळण बांधणें-(ल.) मैत्री संपादन करणें; संधान बांधणें. वळणावर जाणें-अनु- सरणें; प्रमाणें चालणें, वागणें. ' हा अगदीं बापाच्या वळणावर गेला.' सामाशब्द- ॰डळण-दळण-न. दळणवळण पहा. ॰दार-वि. १ चांगला आकार, वळण असलेलें; नीटनेटकें. /?/एकसारखें, व्यवस्थित, शुद्ध (लेखन). घटींव आणि घोंटीव यांपासून हें निराळें आहे. ॰शुद्ध-सूद-वि. प्रमाणशीर; वळणदार. 'तीं कामाच्या सोईकरितां अथवा वळणसूदपणा- करितां सुधारण्यांत आलीं.' -इमूं ३५२. वळणी-स्त्री. वळणें, वळण पहा. वळणीं, वळणीस आणणें-येणें-वठणीस आणणें-येणें पहा. 'तव विक्रमाविणें पळभरिहि न येतींच खळ बळें वळणी । ' -मोनामरसायन. वळणें-उक्रि. १ दिशा बदलणें; फिरवणें. २ राखणें; सांभाळणें (गुरें, मेंढ्या इ॰). 'चला वळूं गाई । बैसो जेऊं एके ठायीं । ' -तुगा २००. ३ बनविणें; घडविणें (पिळून, इतर क्रिया करून). 'संस्कृत इक्षुदंडरस अपार । त्याची प्राकृत हे वळिली साखर । ' -ह १९.२२२. ४ अंकित करणें; वश करणें. 'मातल्या कामभद्रजाती । विवेकांकुशें वळावा । ' -मुआदि १६.११. ५ वळवून, परतवून नेणें, आणणें. 'जन कथिति धेनु कुरुनीं वळिल्या येऊनि उत्तराशेला । ' -मोविराट ६.६३. 'वळल्या हातीवरल्या ढाला । ' -ऐपो २१. ६ वळता करणें, घेणें. -अक्रि. १ घटलें जाणें; चांगलें तयार होणें (अक्षर). २ वळणदार होणें; योग्य रूप घेणें. (चित्र, प्रतिमा इ॰ नीं). ३ वांकणें; कलणें; दिशा, रूप, आकार इ॰ बदलणें. -ज्ञा ११.४८७. ' मडक्याचा कांठ ओला आहे तो वळेल.' 'आकाशीं मेघ करी गर्जना । वळला पर्जन्य सभोंवतां । ' ४ शरीरावयव वायूनें आंत ओढला जाणें, त्याला वेदना होणें; पेटका येणें; वांब येणें. ५ अनुकूल, वश होणें; कबूल होणें. 'वळला न ईश्वरासहि तो दुष्ट वळेल काय इतरांला । ' -मोउद्योग १०.७१. ६ प्रसन्न होणें. 'म्हणे सोसिका नृपा ! वळलों । ' -मोअश्व १.३५. ७ फिरणें; विशिष्ट दिशेनें जाणें. [सं. वलन] वळता देणें-परत देणें, करणें (पैसा, उसनी वस्तु). वळती-स्त्री. १ रानामध्यें गेलेली गुरें परत वळवून आणण्याचा व्यापार. २ गुरें वळून आणण्याची पाळी (गुराखी पोरें खेळत असतां ज्यावर डाव येतो त्यानें गुरें वळावीं असा संकेत). 'वांसुरें चारितां गोविंदा । वळत्या न देसी तूं कदा । ' -ह ३६.५६; -तुगा १७०. ३ एकदम, एकाएकीं आगमन, फेरी. (क्रि॰ येणें). 'दूध उघडें टांकू नको मांजराची जर कोण्हीकडून वळती आली तर खाऊन जाईल. ' ४ उलट चाल, जाण्याचा रोंख, वळण; फेरी. ' गुरें गांवाकडे येत होतीं आतां वळती रानाकडे चालली. ' ५ (जुगार) विशिष्ट दान पडलें असतां घेण्यासाठीं मांडलेलें द्रव्य. ६ छपराचा सुरुवातीचा, तळचा भाग. (क्रि॰ बांधणें). ७ हल्ला चाल. (क्रि॰ करणें). 'मौजे मजकुरावरि डफळेची फौज येऊन वळती केली ते समयीं युद्ध जाहलें.' -वाडशाछ १०७. वळतीस येणें-वळणीस, वठणीस येणें. 'त्यांनीं धनीण वहु दक्ष असें म्हणावें । घेवोनि धाक हृदयीं वळतीस यावें । ' -अर्वाचीन ३८२. वळते करणें-वजा करणें. वळवणी-स्त्री. एक हत्यार; पकड. वळविणें-उक्रि. (वळणें प्रयोजक). १ आकार देणें; घडविणें. २ फिरविणें; कलतें करणें (केंस इ॰). ३ गिरविणें; घटवणें; वळण देणें (कित्ता, खरडा, हस्तव्यवसाय इ॰ ला). ४ तयार करणें (पिळून, विणून ). वळाण-न-न. (प्र.) वळण पहा. वळित, वळीत-स्त्री. १ सुरकुती. 'लपौनि चोर खांचेचां वोहळीं । वळीत- पळिताचें ताडवन घाली । ' -भाए ५२१. २ वळती; परत फिरणें. (क्रि॰ धरणें). 'आतां मोडूनि ठेलीं दुर्गें । कां वळित धरिलें खगें । ' -ज्ञा १३.५८३. ३ वळती पहा. ४ मेलेलें माणूस भूत होऊन घरीं परत येणें. वळींव-वि. १ वळलेलें; पीळ दिलेलें; विणलेलें. २ घट्ट पिळलेलें, वळलेलें; पीळदार. ३ भक्कम; चांगलें मजबूत; घटलेलें (शरीर इ॰) वळीव गवरी-स्त्री. गोळा बनविलेलें शेण; गोल गवरी; थापा-थापटी नव्हे.

दाते शब्दकोश

भाव

भाव bhāva m (S) Assurance; faith in or towards; conviction or confidence regarding. Pr. जसा भाव तसें फळ. 2 Meaning, mind, intention: also purport, tenor, scope, strain, drift, implication. 3 Market price or rate. 4 A state or an affection of mind; a sentiment or a passion; an emotion or a feeling. Ex. शत्रुभाव, बंधुभाव, क्रोधभाव, स्नेहभाव, कुभाव, दुष्टभाव, सद्भाव, भक्तिभाव, मनोभाव, सख्यभाव, विरुद्ध- भाव, मित्रभाव, आप्तभाव, प्रीतिभाव, भिन्नभाव, ऐक्यभाव. 5 Being, existing, present or subsisting state. Ex. जेथें धनाचा भाव तेथें विद्येचा अभाव असें प्रायः असतें. 6 The simple idea involved in the root; as distinguished from the diversifications of it through affixes and adjuncts, or as expressed in one class of derivatives. Ex. चाल इत्यादि धातू- पुढें णें हा प्रत्यय भावीं होतो. 7 A common term for the twelve points of consultation of the भावकुंडली. See under कुंडली. 8 Natural state of being; innate property, disposition, nature; as सत्वभाव, तमोभाव, रजोभाव. 9 A class of affections, passions, or sentiments; also of the actions or emotions, gestures or postures, constituting corporeal expression of them. Five classes are enumerated; viz. विभाव, अनुभाव, व्यभिचारीभाव, सात्विकभाव, स्थायीभाव. Of these the constituents of the class विभाव are रसाचीं कारणें the causes; those of अनुभाव are रसाचीं कार्ये the effects; those of स्थायीभाव are रसाचीं पूर्वरूपें the states or forms. See the whole in order. 10 A state or condition of being, as birth, growth, decay &c. 11 The absolute sense or idea (of a word) as abstracted; as ब्राह्मणावरील भाव तो ब्राह्मणपणा. Also the standing, subsisting, being (of existencies or subjects, or of qualities, relations, offices, conditions); i. e. the sense involved in the Sanskrit affixes ता & त्व, the Prakrit पण, पणा, की, and the English ness, hood, ship Ex. उग्रभाव, क्रूरभाव, गुह्यभाव, दृढभाव, सौम्यभाव, कुटिलभाव, सरलभाव, चंचलभाव, चपलभाव, पुरुषभाव, स्त्रीभाव, स्वामीभाव, सेवकभाव, गुरुभाव, शिष्यभाव, परकीयभाव, शत्रुभाव, मित्रभाव, बंधुभाव Fierceness &c., manhood, wifehood, &c., mastership, servantship &c. These examples are numerous (and yet might they have been augmented a hundred fold) because none such words, excepting where there is to be noticed something peculiar or special, will be found in the columns. Bearing the exact import and power of the above affixes there are numerous established and current, and quite numberless occasional compounds of a distinguishable class. They are all sound and serviceable; but as none of them can appear in order, their significance and power and the law of their formation should be studied from the examples collected here:--कार्यकारणभाव (Effect-and-cause-ness.) The (con) subsistence or (cor) relative state; briefly, the correlation of effect and cause; अंगांगीभाव (Body-and-membership.) The reciprocal relation of the body and its members; of a whole and its parts or appendages; of a chief and his followers; of a principal and his accessaries; जन्यजनकभाव The correlation of effect and cause, product and producer, creature and creator, workmanship and workman &c.; हेतुहेतुमद्भाव The correlation of the originating principle and the product; प्रकृतिविकृतिभाव The relation (of a word, a substance &c.) in its radical or primitive form, to itself under the various mutations (of inflection, composition, combination &c.); विशेषणविशेष्यभाव The correlation of an adjective and its noun, or of a predicate and its subject; बिंबप्रतिबिंबभाव The correlation of the reflecting body with the image reflected; of a substance with its shadow; अवयवावयवीभाव, सेव्य- सेवक -उपजीव्योपजीवक -आधाराधेय -or आधेयाधि- करण -क्रियाकारक -निरूप्यनिरूपक -लक्ष्यलक्षण -स्वस्वामि -वाच्यवाचक -प्रयोज्यप्रयोजक -उपमानोपमेय -व्याप्यव्यापक -भाव. 12 Birth or production; coming into being. 13 A category in logic. The भाव or भाव- रूपपदार्थare six,--द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय: the seventh category is अभाव. See explained under पदार्थ. 14 Love (रति) as an object of poetical description or dramatic representation. Hence भावाभास q. v. 15 Capability or power (corporeal or mental). The word agrees with सामर्थ्य or पराक्रम. भाव भाजणें To carry one's (evil) purpose into effect: also, and more commonly, to come to pass--some evil foretold or forewished. (भाव means Mind, purpose, desire.) भाव सोडणें To quit the subject of possession--a devil. 2 To give up the ghost. 3 To be on the point of destruction. भावाचा भुकेला Hungry after faith; that earnestly seeks faith in his worshipers;--used of the Deity. Ex. भा0 श्रीपति ॥ अणीक चित्तीं नावडे त्या ॥. Heb. xi. 6.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. १ भक्ति; श्रद्धा; निष्ठा; खात्रीची; भावना. 'माझें मज देती तैसें । परि आनानीं भावीं ।' -ज्ञा ९.३५३. 'असे हो जया अंतरीं भाव जैसा ।' -राम ३५. २ हेतु; अर्थ; मन; अंतःकरणप्रवृत्ति; उद्देश. 'न कळे तो तया सांगितला भाव । आपणासी ठाव नंदाघरीं ।' -तुगा १०. ३ अभिप्राय; आशय; धोरण; वळण; झोंक; गर्भितार्थ. 'रूप तसें विविध तिहीं कां केलें स्पष्ट सांग भावातें ।' -मोसभा ७.६६. ४ मनोविकार; मनोवृत्ति; भावना. जसें-शत्रु-बंधु-क्रोध-दुष्ट-भक्ति-मित्र-भाव. ५ अस्तित्व; असणें. 'एवं कोणेहि परी । अज्ञानभावाची उजरी ।' -अमृ ७.७७. 'जेथें धनाचा भाव तेथें विद्येचा अभाव असें प्रायः असतें.' ६ प्रत्यय किंवा अनुबंध यामुळें होणार्‍या फेरफाराशिवाय असणारा शुद्ध धात्वर्थ; धातूचा मूळ अर्थ. उदा॰ चाल इ॰ धातूपुढें णें हा प्रत्यय चाल धातूचा मूळ दाखवितो. ७ भावकुंडलींतील बारा स्थानांपैकीं प्रत्येक; स्थान. कुंडली पहा. ८ नैसर्गिक स्थिति, धर्म, स्वभाव; प्रकृति. जसें-सत्वभाव; तमोभाव; रजोभाव. 'म्हणोनि सात्विक भावांची मांदी । कृष्णाआंगी अर्जुना आधीं ।' -ज्ञा ८.५६. ९ विकार, वृत्ति, राग, क्रिया, चित्तवृत्ति, हावभाव इ॰ चा वर्ग. ह्याचे पांच प्रकार आहेत. विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव, सात्त्विकभाव, स्वार्थीभाव. पैकीं विभाग, अनुभाव व स्थायीभाव हे अनुक्रमें रसाचीं कारणें, कायें व पूर्वरूपें आहेत. १० जीवाची स्थिति, दशा, अवस्था. जसें-उत्पत्ति, स्थिति, लय इ॰ 'ऐसें म्हणे त्यजुनि भाव अहो जिवाचे ।' -वामन भरतभाव ५८. १२ (शब्दाचा) धर्म, गुण, अस्तित्व, विषय, संबंध, अधिकार, अवस्था इ॰ ची स्थिति; संस्कृतांतील ता आणि त्व व प्राकृतांतील पण, पणा, की हे प्रत्यय लागून झालेला शब्दाचा अर्थ. जसें-ब्राह्मणाधिष्ठित भाव तो ब्राह्मणपणा; उग्र-क्रूर-दृढ-सौम्य-शत्रु-बंधु-भाव. 'जयाचेनि संगे ब्रह्मभावो । भ्रांतासहि ।' -ज्ञा ६.१०२. १२ जन्म; अस्ति- त्वांत येणें; उत्पत्ति. १३ (तर्क) पदार्थ. भाव किंवा भावरूप पदार्थ सहा आहेत-द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय. सातवा पदार्थ अभाव. १४ रति; प्रेम (काव्यातील वर्णनाचा किंवा नाट्य प्रयोगाचा विषय). १५ क्षमता; शक्ति; सामर्थ्य; पराक्रम (शारीरिक किंवा मानसिक). १६ माया; मिष; कपट; आव. 'ध्यान केल्याचा भाव करितो.' -कमं १. १७ लक्षण; प्रकार. 'द्वितीयाध्यायीं ब्रह्मोत्पत्ति । चारी युगांचे भाव कथिती ।' -गुच ५३.२०. १८ इच्छा. 'हाची भाव माझिया जीवा । पुरवी देवा मनोरथ ।' -तुगा ६९९. १९ आवड. 'दुर्योधनें विषान्नें वाढविलीं भीम जेवला भावें ।' -मोआदि १९.१३. २० (नृत्य) अभिनय पहा. [सं. भू-भाव] म्ह॰ जसा भाव तसें फळ. ॰पाहणें- (ना.) परीक्षा करणें; अनुभव घेणें. 'मी सार्‍यांचा भाव पाहिला. या जगांत कोणी कोणाचें नाहीं.' ॰भाजणें- १ दुष्ट हेतु तडीस नेणें.' २ एकाद्यानें केलेलें दुष्ट भाकित प्रत्ययास येणें. ॰सोडणें- १ (भुतानें) पछाडलेल्या माणसास सोडणें. २ मरणें; गतप्राण होणें. ३ नाशाच्या मार्गांत असणें. भावाचा भुकेला-भक्ति, श्रद्धा यांकरितां भुकेला. 'भावाचा भुकेला श्रीपति । आणिक चित्तीं नावडे त्या ।' सामाशब्द- ॰कर्तरि-वि. जेथें क्रियेचा केवल भाव तोच कर्ता असतो आणि क्रियापद नेहमीं नपुंसकलिंगी एक- वचनीं असतें असा (प्रयोग). उदा॰ मला कळमळतें. ॰कर्तृक- वि. (व्या.) भावकर्तरी प्रयोगाचें (क्रियापद). ॰कुंडली-स्त्री. (ज्यो.) तनु, धन इ॰चीं १२ स्थानें दाखविण्यासाठीं बारा राशींचीं घरें ज्यावर दाखविलीं आहेत असें वर्तुळ. कुंडली पहा. ॰गर्भ- पु. १ ग्रंथांतील सारांश. २ अंतस्थ हेतु. ॰गर्भ-गर्भित-वि. १ ध्वनित; गर्भित अर्थाचा. २ ध्वनित अर्थ ज्यांत आहे असें; दिसतो त्यापेक्षां अधिक अर्थ असलेलें (भाषण, लेख इ॰). ॰चलित- वि. (ज्यो.) तन्वादिस्थानीं असून अंशे करून चलित झाला तो (सूर्य किंवा इतर ग्रह). ॰भक्ति-भगत-स्त्री. १ मनः- पूर्वक, श्रद्धा-प्रेमयुक्त, निष्कामपणें केलेली भक्ति; याच्या उलट भयभक्ति. २ एखाद्याविषयीं वाटणारें अत्यंत प्रेम; मनाची ओढ. ॰वाचक नाम-न. (व्या.) प्राणी किंवा पदार्थ यांच्या गुण- धर्माचा बोध करून देणारें नाम. [सं.] ॰वाचकसंख्या-स्त्री. जात नसणारी संख्या; संख्या किंवा परिमाणें यांचा हिस्सा, पट. ॰शबल-न. भावनाविकारांचा गोंधळ; कालवाकालव; अनेक रसांचें मिश्रण. -वि. गोंधळलेल्या भावनांचा. [सं.] ॰शुद्धि-स्त्री. अतःकरणशुद्धि. 'तेणें भावशुद्धीचिया वाटे । विखुरलें विकल्पाचे कांटे ।' -ज्ञा ७.१७०. ॰संकर-पु. मिश्र, संकीर्ण भावना, मनो- विकार. [सं.] ॰संधि-पु. निरनिराळ्या, परस्परविरूद्ध भावना असलेल्या मनाची धरसोडपणाची अवस्था; अंतःकरणांतील मिश्र रसप्रकार. [सं.] ज्ञ-वि. आशय, अभिप्राय जाणणारा; गुणज्ञ. 'पाहातयां भावज्ञां फावती गुण । चिंतामणीचे ।' -ज्ञा ६.२१. भावांतर-न. अर्थांतील फरक, विसंगतपणा. [सं. भाव + अंतर] भावाभाव-पु. अस्तित्वनास्तित्व; खरेंखोटें; चैतन्य आणि जड. 'भावाभावारूप स्फुरे । दृश्य जें हें ।' -ज्ञा १८.११८६. [सं. भाव + अभाव] भावाभास-पु. १ कृत्रिम प्रेम; कवि किंवा नाटककार यांनीं केलेलें प्रेमाचें खोटें वर्णन किंवा प्रदर्शन. २ चुकीचा समज, ग्रह, कल्पना. [भाव + आभास] भावार्थ-पु. १ तात्पर्यार्थ; सारांश. २ भक्तिसार. 'ग्रंथ वदावया निरूपणीं । भावार्थ- खाणी जयामाजी ।' -व्यं २. ३ श्रद्धा; विश्वास; भाव. 'जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा ।' -दा १.१.३८. ४ अंतःकर णाची निष्कपट वृत्ति; प्रामाणिकपणा. -क्रिवि. खरोखर; निःसंशय. 'तो भावार्थ गांवास गेला, मी आपल्यापाशीं का खोटें सांगेन' भावार्थी-वि. १ भाविक. २ साधा; भोळा; सरळ स्वभावाचा. भावि(वी)क-वि. १ श्रद्धावान्; निष्ठावंत. २ संतुष्ट होणारा. 'तिहीं यज्ञभाविकीं सुरीं । जे हे संपत्ति दिधली पुरी ।' -ज्ञा ३.१०४. ३ भक्तियुक्त अंतःकरणाचा. भावि(वी)कजन, भावीजन- पु. श्रद्धायुक्त, निष्ठावंत अंतःकरणाचा. मनुष्य. 'अद्यापि दीपाचे झळ्ळाळ । भावीकजन देखति ।' भावित-वि. १ कल्पिलेलें; चिंतिलेलें; कल्पित. २ ज्यावर भावना किंवा संस्कार केले आहेत असें (औषध). [सं.] भाविला-वि. संस्कार केलेला. -शर. भावी-वे प्रयोग-पु. (व्या.) जेथें कर्त्यावरून अथवा कर्मावरून क्रियापद बदलत नाहीं व सामान्यतः त्याचें रूप नपुसकलिंगी एक वचनी असतें असा प्रयोग. 'मी त्यास मारिलें.' भावुक-न. १ श्रृंगारिक बोलणें. २ कल्याण; हित; क्षेम. 'ऐसा भक्तमयूर चात- कहि जो नेणें दुजीं भावुकें ।' -मोकृष्ण ५५.५१. भावु(वू)क- वि. भक्तियुक्त; निष्ठावंत; भाविक. 'असोत तुज आमुचीं सकल भावुकायुर्बळें ।' -केका ६४. भावेभक्ति-स्त्री. भावभक्ति पहा. भावो-पु. भाव पहा. 'म्हणोनि मज आत्मयाचा भावो । जिहीं जियावया केला ठावो ।' -ज्ञा १०.१४१. भावो सरणें- वाटूं लागणें. -शर. 'तेथ आदिसा पासौनि पार्था । आइ- किजे ऐसीचि अवस्था । दुणावली हे यदुनाथा । भावों सरलें ।' -माज्ञा ६.४८७. (पाठ). भाव्य-वि. उपासना करण्यास योग्य. 'जो इया लटकिया भूतग्रामा । भाव्यु सदा ।' -ज्ञा ९.८४.

दाते शब्दकोश

कथा

स्त्री. १ गोष्ट; रचलेली गोष्ट; कल्पित गोष्ट; कहाणी. 'कथा बोलूं हे मधुर सुधाधारा । ' -र १. २ हकीकत; वर्णन. 'स्मरला स्मरहर भरला कंठ न वदवेचि ते कथा राहो ।' -मोसभा १.३३. ३ टाळ, मृदंग, वीणा इ॰ साधनांनीं हरिदास देवादिकांचें गुणवर्णन करतात ती; कीर्तन; देवादिकांच्या गोष्टी सांगणें; हा एक सार्वजनिक करमणुकीचा, परमार्थ साधनाचा प्रकार आहे. 'चार्तुमासांत बहुतेक देवळांतून कथा चालतात. ' ४ केलेलें कृत्य; काम; (पराक्रमाचा) प्रंसग; पराक्रम. 'गेला माधव लोक सोडुन किती गाऊं तयाच्या कथा ।'; 'अशा त्याच्या कथा आहेत बाबा !' ५ (ल.) महत्व; वजन; पर्वा; मातब्बरी (मनुष्य, वस्तु वगैरेंची) किंमत पहा. 'तो दुसरा ब्रह्मा करील उत्पन्न । मग ऐसियाची कथा कोण ।' -नव १६.६८. 'क्षुद्र पशु पक्ष्यांची काय कथा पांचही महाभूतें ।' -विद्याप्रशंसा (चिपळूणकर). ७. ६ भाषण; म्हणणें; सांगणें. ७ हकीकत; ग्रंथार्थ; विषय. 'तूं संतस्तवनीं रतसी । कथेची से न करिसी ।' -ज्ञा ५.१४१. [सं.] ॰होणें-क्रि. केवळ कथेंत राहणें; नुसती कथा बनणें (खरें अस्तित्व नसणें);स्मृतिरूपाने अस्तित्व असणें. कथेची गति- स्त्री. कथा सुरू, चालू असणें; कथेचा ओघ, प्रवाह. 'जेव्हां कथेची गति हे वदावी । धनुष्यभंगीं रस रौद्र दावी ।' -वामन-सीता- स्वयंवर ४९. -नुसंधान-न. वृत्तवर्णनाचा संदर्भ, संबंध; गोष्टीची, हकीकतीची संगति. ॰प्रसंग-पु. १ गोष्टीचा, संभाष- णाचा ओघ. २ गोष्टींतील, वर्णनांतील प्रसंग. ॰बांधणें-क्रि. कथा रचणें, लिहिणें; पद्यमय रचनेंत चरित्र लिहिणें. 'तथापि बांधेन कथा विचित्रा ।' -सारुह १.३०. ॰भाग-पु.१ पुराण किंवा इतर ग्रंथांतील राजे वैगेरेचे पराक्रम, गोष्टी, चरित्रें इ॰ चें वर्णन ज्यांत आहे असा भाग. २ कीर्तनांतील आख्यान; कीर्त- नाचा विषय. ३ विशिष्ट प्रसंगाचें वर्णन; हकीकत. [सं.] -मृत- न. अमृताप्रमाणें गोड, चित्त रंजन करणारी गोष्ट. कथारस पहा. 'कालिंदिचें जीवन शुद्ध केलें । कथामृताला जग हें भुकेलें' -वामन-हरिविलास १.२४. [सं.] ॰रस-पु. (कथेंतील गोडी) १ प्रतिपादनाची सुंदर हातोटी; उत्तम प्रकारें अलंकारादिकांनीं कथाभाग सजविणें; कथाशृंगार. 'हरिदासानें कथारस चांगला केला.' २ साधें भगवद्गुणानुवाद, कीर्तन, कथा (अलंकार इ॰ सजावटीविरहित). 'कथारस काय निघाला होता ?' [सं.] ॰रूप ग्रंथ-पु. १ वर्णनांनीं, हकीकतींनीं भरलेला किंवा इति- हासपर ग्रंथ; ज्यांत आख्यानें, गोष्टी आहेत असा गद्य ग्रंथ; बखर. २ गद्यमय ग्रंथ; प्रबंध. ॰लाप-पु. वर्णन; कथा सांगणें. 'व्यापारांतर टाकुनी तव कथलापासि जे आदरी ।' -र ६. ॰वार्ता-स्त्री. गप्पा, गोष्टी. 'त्या दोघी महालांत बसून परस्पर कथा- वार्ता करीत होत्या. ' -राणी चंद्रवती १६४. ॰शेष-वि. कथा- रूपानें उरलेला; स्मृतिरूपानें अवशिष्ट राहिलेला; सत्कार्यादिरूप कथा मात्र ज्याची राहिली आहे असा; कथेवरूनच ज्याची माहिती मिळते असा (मृत, गत मनुष्य). 'दुराग्रही प्रवर्तोन योग्यायोग्य कार्य न विचारतां स्वांगें संपादित होत्साता स्थळोस्थळीं अपमान पावोन कथाशेष जाहला ' -मराआ ५. ॰संदर्भ (चुकीनें) संदर्प-पु. भाषणांतील पूर्वापर संबंध, वृत्तवर्णानांतील संगति. कथानुसंधान पहा. [सं.]

दाते शब्दकोश

काटा      

पु.       १. अणकुचीदार, तीक्ष्ण टोक असलेली, जी बोचली असताना रक्त काढते अशी काडी; बाभळीचा, बोरीचा दाभणासारखा टोचणारा अवयव : ‘सर्प कपाळीं कांटा नेहटे । कां सापसुरळीचे पुच्छ तुटे ।’ - भारा बाल ८·३५. २. सुई : ‘काटा आणिला । मेग सींउ बैसले ।’ - लीचउ २९. ३. (भयाने, थंडीने वगैरे) अंगावर उभे राहणारे शहारे; रोमांच. ४. (अव.) तापानंतर अंगावर येणारा खरखरीतपणा अथवा उठणाऱ्या बारीकपुटकुळ्या; पुरळ. ५. (अव.) तापाच्या पूर्वी अंगावर येणारी शिरशिरी; रोमांच; कसर. ६. विंचवाच्या नांगीचे पुढचे तीक्ष्ण टोक. ७. जो कुलुपाच्या दांडीत असतो व मागे सरतो तो कुलपादिकाचा खिळा. ८. वेळू, बांबू वगैरेंना येणारा तुरा, मोहोर, फुलोरा. ९. कंबर, मान, पाठ, यांच्या आतील बाजूला आधारभूत असलेला अस्थिविशेष. १०. गुणाकार, भागाकार यांचा ताळा पाहण्यासाठी अंक मांडण्याकरिता घातलेली चौफुली (ल.). ११. वजनाने विकलेल्या वस्तूंवर जे काही वजन कटते देतात ते. पहा : कडता. १२. काट्यासारखी शरीराला बोचणारी कोणतीही वस्तू (माशाचे हाड, चक्राचा दाता, घड्याळाचा हातकाटा, खडबडीत लगामाचे टोक, करवतीचा दाता, जेवणातील वापरायचे दाताळे - काटा, जनावरे किंवा भाजीपाला यावरील खरखरीत केस व लव इ.) : ‘काटा बराबर एकांवर एक आला.’ - रासक्रिडा ७. १३. हलवा, इतर मिठाई यावरील टोके, रवा. (क्रि. येणे, उमटणे, वठणे, उठणे.) १४. (वस्त्रोद्योग) वशारन करताना इकडून तिकडे (वशारन पुढे सरकण्यासाठी) फिरवायचे लाकूड. १५. सुताराचे एक हत्यार. (कु.) १६. (ल.) त्रास देणारा माणूस, व्याधी, शल्य, पीडा, शत्रू. १७. तराजूच्या दांडीमधील उभा खिळा : ‘जरि कांटा कलताए देवांचा । जेउता राजमठु ।’ - ऋ ३९. १८. काटा असलेला तराजू (विशेषतः सोनाराचा, सराफाचा) : ‘मेरूचिया वजनासपाहीं । कांटिया घातली जैसी राई ।’ - हरि ६०·१६१. [सं. कंटक] (वा.) काटा उपटणे - १. त्रासदायक प्राणी, शत्रू, गोष्ट नाहीशी करणे. (कर. व.) २. समूळ नाहीसा करणे, काढून टाकणे. काटा काढणे - आपल्या मार्गात असलेल्या, आपल्याला पदोपदी नडवणाऱ्या शत्रूला दूर करणे : ‘वसुदानाच्या पुत्रें जो अभिमुख काशिराजतो वधिला । कांटाचि काढिला तो जाणो तव सूनुच्या मनामधिला ।’ - मोकर्ण ४·१५. काटा मारणे - १. काट्याने सिद्ध करणे. २. अंगात (तापाची) कसर येणे. ३. काटेकोरपणे बरोबर आहे असे दाखविणे; चुकीचा तराजू वापरून वजनात खोट आणणे. काटा मोडणे - १. विंचू चावणे. (व.) २. पाणी किंचित उष्ण होणे. ३. पायात काटा घुसणे. काट्याचा नायटा होणे - काटा मोडल्यावर लगेच तो काढला नाही तर त्या ठिकाणी नायटा होतो, म्हणजे आरंभी क्षुल्लक वाटणाऱ्या वाईट गोष्टीचे पुढे मोठे हानिकारक परिणाम कधी कधी होतात. काट्याने काटा काढणे – एका दुष्टाच्या हातून परभारे दुसऱ्या दुष्टास शासन होईल असे करणे. काट्याप्रमाणे सलणे - सतत त्रासदायक होणे; दुखःकारक होणे; मत्सर, हेवा, द्वेष वाटणे. काट्यावर ओढणे, काट्यावर घालणे - वस्त्र काट्यावर ओढले असताना फाटते त्यावरून दुःखात घालणे; दुःखात लोटणे : ‘त्यांत (कौरव सैन्यात) मरेनचि शिरतां काट्यावरी घालितां चिरे पट कीं ।’ - मोविराट २. ४१. काट्यावर येणे - १. (बैलगाडी) आसाच्या दोन्ही बाजूला समतोल वजन होणे. २. (ल.) (मूल) खळीला येणे; रडायचे न थांबणे. ३. सहनशक्तीची परिसीमा होणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आत्म

वि. १ आत्म्यासंबंधींचें. २ स्वतःचें; आपलें. [सं.] ॰कार्य-न. आपलें काम; स्वतःचें काम. -क्रिवि. खासगी कामा- करितां; आपल्या कामासाठीं (व्यापारी लोकांच्या पत्रव्यवहारांत हा शब्द येतो). हें अप. रूप आहे. ॰ख्याति-ख्याति पहा. ॰गत-वि. स्वगत; आपल्याशीं (नाटकांत खाद्या पात्रानें केलेलें भाषण). ॰गति-स्त्री. १ आत्म्याची अखेरची अवस्था. २ आपली अखेर. 'प्रिये आत्मगति यांची दिसताहे ।' -सप्र १३.१४. ॰ग्रह-पु. १ आत्मज्ञान. २ स्वीकार करणें; स्वतःचें मानणें; आपला म्हणणें; कैवार घेणें. ॰घात-पु. १ आत्महत्त्या; स्वतःचा घात, नुकसान (धर्मशास्त्रविहित प्राणत्यागास हा शब्द लावीत नाहींत). 'तंव तो विशिष्ट गुरूनाथ । म्हणे सहसा न करावा आत्मघात ।' ॰घातक-की, घाती-वि. १ स्वतःचा घात करणारा. २ (ल.) स्वतःचें नुकसान करणारा; स्वतःच्या पायांवर धोंडा पाडून घेणारा. ॰घ्न-वि. १ आत्महत्त्या करणारा. २ आत्मघातकी. ॰चर्चा-वि. आत्म्यासंबंधीं वादविवाद; ब्रह्मविचार; आत्मानात्म- विचार. [सं.] ॰च्छाया-स्त्री. स्वतःची सावली. 'कां कवळि- लिया न धरे । आत्मच्छाया ।।' -ज्ञा १८.५३०. [सं.] ॰ज-पु. स्वतःपासून जन्मलेला; पुत्र; मुलगा. 'पैल इतरु हा आत्मजु । हें उरेल के ।' -ज्ञा ५.९३. ॰जा-स्त्री. स्वतःची मुलगी. 'अगा आत्मजेच्या विषी ।' -ज्ञा १२.१३२. ॰जिज्ञासु-वि. आत्मज्ञानाची इच्छा करणारा. 'ऐसे आत्मजिज्ञासु जे होते ।' -ज्ञा १६.५२. ॰तत्त्व- न. ब्रह्मज्ञान; आत्मज्ञान. 'येर आत्मतत्त्व उदासीन' -ज्ञा १८.३०६. ॰तोख, तोष-पु. आत्मानंद; स्वसंतोष. ॰त्याग-पु. स्वार्थ- त्याग. 'हा आत्मत्याग व लोकाश्रय सरकारचे गुप्त हेतु पर्यायानें सिद्धीस नेण्यास जर उपयोगी पडला...' -टि ३.१८२. ॰त्व-न. आत्मस्वरूप. 'न लगती तपें व्रतें अनुष्ठान । आत्मत्वाची खूण वेगळीच' -ब. १७९. ॰धन-न. १ स्वतःची संपत्ति. २ स्वतःचा आत्मा; स्वतः ३ (ल.) स्वतःचा पुत्र. ॰निंदा-स्त्री. स्वतःची निंदा; स्वतःस दोष देणें; स्वतःवर दोषारोप करणें (पश्चात्तापाच्या वेळीं). ॰निवेदन-न. आत्मसमर्पण; परमेश्वराच्या ठिकाणीं स्वतःस वाहून घेणें; नवविधाभक्तींतील शेवटचा-नवव्या भक्तीचा प्रकार, म्हणजे जीवशिवैक्य. 'आत्मनिवेदनाचें लक्षण । आधीं पाहावें मी कोण । मग परमात्मा निर्गुण । तो वोळखावा ।' -दा ८.८.१३. २ स्वतःची कथा, खुलासा; आत्मचरित्र. ॰निश्वास-पु. वेद (यस्य निःश्वसितं वेदाः = वेद ज्याचे (परमेश्वराचे) निःश्वास आहेत या वाक्यावरून). ॰निष्ठ-वि. १ आत्मस्वरूपीं तल्लीन असलेला; आत्मानंदीं, ब्रह्मानंदीं निमग्न असलेला. २ मनोभवाचा; कळकळीचा; उत्सुक. ॰निष्ठा-स्त्री. १ आत्म्याच्या ठिकाणीं निष्ठा. २ स्वतःवर विश्वास; आत्मविश्वास. ॰परिचय-पु. आत्म्याविषयींचें किंवा स्वतःविषयींचें ज्ञान-ओळख. ॰पोटी-वि. अप्पलपोट्या; स्वार्थी. 'तव भीम म्हणे श्रीकृष्णासी । तूं बरवा आत्मपोटी कळलासी । मी अतिथी उभा असता द्वारासी । भोजन सावकाश करिसी तूं ।' -जै १०.२. ॰प्रची(ती)ति-स्त्री. १ आत्मज्ञान; स्वप्रतीति, गुरुप्रतीति, आत्मप्रतीति या तीन प्रतीतींपैकीं एक. २ स्वतःच्या अनुभवावरून मिळविलेलें ज्ञान-बोध; आत्मानुभव. 'नाना ग्रंथांच्या समती । उपनिषदें वेदांत श्रुती । आणि मुख्य आत्मप्रचीती । शास्त्रेंसहित ।' -दा १.१.१५. ॰प्रशंसा-स्त्री. स्वतःची स्तुति; आत्मस्तुति-श्लाघा. ॰प्राप्ति-लाभ-स्त्रीपु. आत्म- ज्ञान; ब्रह्मज्ञान. 'महामंत्र आत्मप्राप्तीची खाणी ।' ॰बंधु-पु. स्वतःचा नातेवाईक; चुलत-मावस-आते-मामे भाऊ. ॰बिंब-न. १ प्रतिबिंब. 'का आत्मबिंबा घेतलें । बाळकें जळीं ।' -ज्ञा १८.१३०६. २ जीवात्मा (परमात्म्याचें प्रतिबिंब). ॰बोध-पु. आत्मज्ञान. 'मग सत्वें चोखाळें । उघडती आत्मबोधाचे डोळे ।' -ज्ञा १८.२१०. -आत्मंभरी-वि. अप्पलपोट्या. ॰यज्ञ-पु. स्वार्थत्याग; जीवि- ताचें बलिदान; स्वतः मरणाला तयार होणें. ॰राज-पु. आत्मा; स्वतः 'तेथ न सुवावा अभंगीं । आत्मराजु ।' -ज्ञा १८.२८०. ॰रूप-न. स्वस्वरूप. 'जयजय स्वसंवेद्या आत्मरूपा ।' -ज्ञा १.१. ॰लिंग-न. १ आत्मस्वरूप. 'पैं तुझी आण वाहणें । हें आत्मलिंगतें शिवणें ।' -ज्ञा १८.१३६९. २ शिवाचें मुख्य लिंग (प्रतीक). शंकरानें आपल्या भक्तासाठीं आत्मस्वरूपाचा तत्त्वांश मूर्त करून ठेवला आहे. ३ अत्यंत जिवलग मनुष्य; प्रेमाचें माणूस. 'एके दिवशीं बाजीरावसाहेब हे नानासाहेबास भोजनाचे वेळीं बोलेले कीं, रघुनाथराव यांचें पूर्वज विठ्ठल शिवदेव हे आमचे दादासाहेबांचे आत्मलिंग होते.' -तीर्थयात्राप्रबंध ८२. ॰वत्-वि. आपल्या प्रमाणें; स्वतःसारखें; भेदभाव, आपपरभाव न ठेवतां. 'आत्मवत् सर्व भूतानि ।' या वचनावरून. 'आत्मवत् देखावे अवघे जन । नसो देहभान किंचित ।' ॰वश-मनोनिग्रह; आत्म निग्रह-आत्मसंयमन. ॰विचार-पु. आत्म्यासंबंधीं चर्चा; ब्रम्ह- विचार. 'संतसंगे आत्मविचार.' ॰विद्या-स्त्री. १ ब्रह्मविद्या; अध्या- त्मविद्या; वेदांत. २ आत्मज्ञान; स्वतःसंबंधीं जाणीव. ॰विधि-पु. आत्म्याचें कर्तव्य, गुणधर्म. 'ऐका चित्त देऊन आत्मविधि ।' ॰वेत्ता-पु. ज्याला स्वस्वरूपाची पूर्ण ओळख झाली, स्वहृदयांत वास करणारा ब्रम्हांडव्यापी परमात्मा आपण आहों असा ज्याच्या बुद्धीचा निर्धार झाला तो; मी ब्रह्म आहे असें मानणारा. ॰शास्त्र-न. अध्या- त्मविद्या-शास्त्र. ॰शुद्धि-स्त्री. चित्तशुद्धि; स्वतःचे आचारविचार, वर्तन शुद्ध ठेवणें. म्ह॰ आधीं आत्मशुद्धि. मग देवशुद्धि ॰संतो- षानें क्रिवि. राजाखुशीनें; कोणाची भीड न धरतां; आपखुषीनें. 'हें खत मी आत्मसंतोषानें लिहून दिलें असें.' ॰संतोषी-वि. १ आत्मा- नंदांत सुख मानणारा. २ (ल.) आपमतलबी. ॰सत्ता-स्त्री. ब्रह्म- ज्ञान; आत्मस्वरूप. तैसें होईजे जाईजे देहें । तें आत्मसत्ते अवि- क्रिये ।' -ज्ञा १५. ३८०. ॰संयम-आत्मवश पहा. ॰साधन-न. १ आपल्या जीवाचें किंवा जन्माचें सार्थक करणें. जैसि संताचि कास मुमुक्षु नर । धरिति आत्मसाधना ।' २ स्वतःच्या उपजी- विकेची व्यवस्था-तरतूद. ३ (ल.) स्वतःचा मतलब. 'त्याचें कांहीं- तरी आत्मसाधन असेल तरच तो इतकी खटपट करितो.' ॰साक्षा- त्कार-पु. निर्गुण साक्षात्कार (सगुण साक्षात्काराच्या उलट); अंत- र्यामीं परमेश्वर- ब्रह्म याचें दर्शन होणें. ॰सुख-न.स्वतःचें (शारी- रिक किंवा मानसिक) सुख; आपल्या ठिकाणींच सुख; ब्रह्मज्ञाना- पासून होणारें सुख. ॰स्तुति स्त्री. स्वतःची प्रशंसा; आत्मप्रशंसा. 'आत्मस्तुति मनांतून । स्वप्नीं जयासि नावडे ।' ॰स्थिति-स्त्री. ब्रह्म- स्वरूपाची स्थिति; आत्म्याची स्वतंत्र अवस्था; शरीर किंवा इतर वस्तू यांहून भिन्न अशी अलिप्त स्थिति. कांहीं वाक्प्रचार-आत्मस्थिती ओळ- खावी-जाणावी-संपादावी-जोडावी-धरावी = सोडूं नये; आत्म- स्थितीवर असणें. ॰हत्त्या-स्त्री. १ (कायदा) शास्त्रविधिविरहित स्वतःस मरण येईल असें कृत्य स्वतः करून मरणास कारण होणें; हेतुपुरस्सर स्वतःचा जीव स्वतः घेणें; आत्मनाश; आत्मघात. २ आत्महत्येचें पाप, गुन्हा. ॰हत्त्यारा-वि. आत्मघात करणारा. 'जो आपला आपण घातकी । तो आत्महत्यारा पातकी ।' -दा १७.७.१०. ॰हित-न. १(ईश्वरप्राप्तीनें होणारें) जीवाचें कल्याण; देहाचें सार्थक; भग- वत्प्राप्ति. 'आहा नरदेह उत्तम पूर्ण । केवळ भगवत्प्राप्तीचें स्थान । म्यां आत्महित न करून । बुडालों किं अंधतमीं ।' २ स्वतःचा फायदा. ॰ज्ञान-न. १ ब्रह्मज्ञान; स्वस्वरूपाचें ज्ञान; अध्यात्मज्ञान. 'ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान । पाहावें आपणासि आपण ।' -दा ५.६.१. २ स्वतःच्या वर्तनाची जाणीव. म्ह॰ आधीं आत्मज्ञान, मग ब्रह्मज्ञान.

दाते शब्दकोश

ग्राम

पु. १ गांव; खेडें. २ (संगीत) सप्तस्वरांतील मुख्य तीन अवधी. याचे प्रकार तीन-षड्जग्राम, मध्यमग्राम व गांधारग्राम. सात स्वरांचा समूह. (इं.) गॅमट. ३ गांवांतील प्रमुख किंवा माननीय माणूस. ४ अरेराव, कचाट्या, जरब बस- विणारा, काचाटींत धरणारा माणूस. 'तो कसला ग्राम त्याज बराबर भांडून तुझा परिणाम लागणार नाहीं.' ५ जमाव; समु- दाय. 'मुतेहिना ऐसा वागे । ग्राम कर्मेंद्रियांचा ।' -यथादि ३. ९२. (समासांत) इंद्रिय-गुण-पुण्य-भूत-स्वर-ग्राम. 'इंद्रिय- ग्रामावरी येणें नाहीं ।' -ज्ञा ५.१०५. [सं.] सामाशब्द- ॰कंटक-कुठार-पु. चहाड्या, निंदा, त्रास, तंटे इ॰ लावणारा; गांवगुंड; गांवची पीडा, ब्याद; दुष्ट, वाईट माणूस. ग्रामकी-स्त्री. गांवजोशी किंवा पाटील इ॰ चें काम; गांवकी. ॰कूळ- केसरी-सिंह-पु. १ (ल.) गांवांतील कुत्रे. 'इया ग्रामसिं- हाचिया ठायीं.' -ज्ञा १३.६८०. २ (ल.) भेदरट माणूस. ॰खर्च-पु. १ गांवचा खर्च. २ फुकट किंवा विनाकारण खर्च; ज्याचा मोबदला नाहीं असा खर्च. ॰जोशी-ज्योतिषी-पु. गांवचा जोशी, हा पंचांग सांगणें, पत्रिका पहाणें, मुहूर्त काढणें इ॰ कामें करतो. 'आधीं होता ग्रामजोशी । राज्यपद आलें त्यासी । त्याचें हिंडणें राहीना । मूळ स्वभाव जाईना ।।' -तुगा. ग्रामज्य-न. ग्राम्य; मैथुन; सुरत क्रीडा. 'ग्रामज्य आठवे चित्तीं ।' -दा २.५. २८. ग्रामणी-पु. १ (काव्य, विद्वानांचें संभाषण) पाटील; गांवचा मुख्य. २ (लौकिक) गांवगुंड, चावट, वाईट, कुटाळ्या, पीडादायक माणूस; ब्याद. 'रामनामें विव- र्जित । ग्रामणीं बोलिजे तें ग्राम्य गीत ।' -एभा ८.१६९. ३ गांवचा महार. -स्त्री. कुटाळकी; गांवकी. ग्रामिणी पहा. 'आनित्य ग्रामणी मस्ती सदा ।' -दा २.३.६. -वि. मुख्य; श्रेष्ठ; प्रमुख. ग्रामणीक-न. हरामखोरपणा; ग्रामणी, ग्रामिणी पहा. 'तरी जी पाहतां हेंहि ग्रामणीक । दिसोनि येतसे कीं निष्टंक ।' -सादि १२.२.१०८. ग्रामण्य-न. १ मुख्यतः जातीसंबंधींचा किंवा इतर गांवकीचा तंटा, खटला. २ बहिष्कार. ३ जातीच्या खट- ल्यासंबंधीं चौकशीसाठीं भरणारी ग्रामसभा; जातगंगा. ॰त्रय- न. (संगीत) ग्राम अर्थ २ पहा. ॰थिल्लर-न. गांवांतील लहा- लसें तळें, डबकें. कीं गतधवेचें यौवन । कीं ग्रामथिल्लराचें जीवन ।' ॰दुर्गा-स्त्री. गांवची कुलदेवी, भवानी; ग्रामाधिका- रिणी देवता. ॰देऊळ-न. गांवांतील सार्वजनिक देऊळ. ॰देव- देवता-दैवत-पुस्त्रीन. १ ग्रामधिकारी-रिणी; गांवचा कुल- देव-देवी. २ या देवतेच्या खर्चास इनाम दिलेली जमीन, उत्पन्न; ग्रामदेवीची जमीन. ॰धर्म-पु. गांवचे धार्मिक विधी, नियम, चालीरिती इ॰ परंपरेनें चालत आलेला गांवचा धर्म. ॰नेत्र-न. (ल.) महार; गांवचा जागल्या. ॰पंचायत-सभा-संस्था-स्त्री. गांवची सर्व व्यवस्था पाहणारी संस्था. खेड्यांतील म्युनिसिपालटी; ग्रामस्वराज्य. ॰पशु-पु. माणसाळलेलें जनावर. ॰बिंदुटी-स्त्री. खेड्यांतील गल्ली, बिदी. 'तव ते गोधनें ग्रामबिंदुटी । अपार मौळी असती चव्हाटी ।' -नव १३.११५. ॰याजक-पु. गांवचा उपा- ध्याय; ग्रामोपाध्याय. ॰लेखक-पु. कुळकर्णी. 'ग्रामलेखक ते स्थळीं ।' -निमा (आत्मचरित्र १.१०१.) ॰सूकर-पु. गांवडुक्कर. ॰स्त-स्थ-वि. गांवांत राहणारा; गांवचा रहिवासी; गांवकरी. 'ऐसें बोलून ग्रामस्तानें.' -नव १०.१६३. 'आतांच भोगूं तरी हे पहाट । ग्रामस्थ येतांचि भरेल हाट ।' ग्रामाचार-पु. ग्रामधर्म पहा. ग्रामांतर न. १ दुसरें गांव. २ आपलें गांव सोडून परगांवीं जाणें. ग्रामाधिकार-कारी-पु. गांवासंबंधीं अधिकार; तो गाजविणारा माणूस; अधिकारी; गांवकामगार. ग्रामाधिपति-पु. पाटील 'ग्रामाधिपतिरूपें श्रीरघुवीरें जाण ।' -सप्र २.३४. ग्रामिणी- स्त्री. हरामखोरी; चहाडी इ॰ ग्रामणीक पहा. ग्रामोपाध्याय- पु. गांवचा उपाध्याय; ग्रामजोशी; ग्रामयाजक पहा. ग्राम्य- वि. १ खेड्यांत झालेला, जन्मलेला; गांवांत उत्पन्न झालेलें किंवा गांवासंबंधीं. २ गांवठी; गांवराणी; गांवढळ; खेडवळ. ३ माण- साळलेला (पशु) याच्या उलट रानटी. ४ लागवडीनें उत्पन्न केलेलें (शेतीचें उत्पन्न); याच्या उलट आपोआप झालेलें. ५ प्राकृत व इतर देशी (भाषा); याच्या उलट संस्कृत. ६ प्रापंचिक; संसारी; याच्या उलट वन्य = जंगलात राहणारा. ७ अश्लील; अशिष्ट; असभ्य. ८ अतिशय विषयासक्त. ग्राम्यगीत-न. १ अश्लील पद, लावणी. २ खेडवळ गाणें, पवाडा इ॰ ग्राम्यधर्म- संभोग; ग्रामज्य पहा. ग्रामस्त्री-स्त्री. वेश्या; रांड. 'ग्राम्य- स्त्रियांचे संगतीं जाणें ।' -एभा ८.१३९. ग्राम्यालाप-पु. १ खेडवळ गप्पागोष्टी. २ लावणी; शृंगारपर कविता. [सं.]

दाते शब्दकोश

नव

वि. नऊ. नऊ संख्या. 'हे नवरत्नमाळा गोमटी । जो घाली सद्गुरुच्या कंठीं ।' -एभा १०.२३८. [सं. नव; गुज. नव; झें. नवन्; ग्री. एन्नेअ; लॅ. नोव्हेम्; गॉ. निउन; अँसॅ. निगन्, प्राज. निउन; अज. नेउन; प्राप्र. नेविन्त्स; स्लॅ. देवन्ति; लिथु-देव्यन्ति; हिब्र्यू; नओइ; कँब्रि-नव्] ॰कुलपांचें तारूं- न. लढाऊ गलबत. 'विलायत जंजिरा नवकुलपांचें तारूं ।' -विवि ८.३. ५४. ॰तुकड्यांची चोळी-स्त्री. नऊ तुकडे जोडून केलेली चोळी; इच्या उलट अखंड चोळी, तीन तुकड्यांची चोळी. म्ह॰ नवव्या दिवशीं नवी विद्या. सामाशब्द- ॰कोट (टी)नारायण-पु. १ कोट्याधीश; अतिशय श्रीमंत मनुष्य. 'पण हे विचारांचे नवकोटनारायण आचाराच्या बाबतींत मात्र सुदाम्यापेक्षां दरिद्री आसतात.' -प्रेम २१. २ (विपरीत लक्ष- णेनें) अतिशय दरिद्री; कंगाल मनुष्य. -शास्त्रीको. [नव + कोट नारायण] ॰कोटी कात्यायनी(येणी)-चामुंडा-स्त्रीअव. नऊ कोट देवी, कात्यायनी, चामुंडा. 'नवकोटी कात्यायेणीचा विचार । पिंडीं कोठें ।' -दा ९.५. ३१. 'पहावया श्रीकृष्णाचें लग्न । सकळ दैवतें निघालीं सांवरोन । नवकोटी चामुंडा संपूर्ण । चालती वेगें तेधवां ।' -ह २४.१०५. [नव + कोटी + कात्यायनी, चामुंडा] ॰कोण-पु. (भूमिति) नऊ कोपरे असलेली व नऊ बाजूंनीं मर्या- दित आकृति. -वि. नऊ कोन असलेली. [नव + सं. कोण] ॰खंड- खंडें-नअव. १ पृथ्वीच्या नऊ खंडांचा समुदाय. इलावृत्त, भद्राश्व, हरिवर्ष, किंपुरुष, केतुमाल, रम्यक, भरत, हिरण्मय व उत्तरकुरू हीं नवखंडें होत. दुसरेहि पाठभेद आहेत. (अ) भरत, वर्त्त?, राम?, द्रामाळा (द्रमिल, द्रामिल?), केतुमाल, हिरे (हीरक?), विधि- वस?, महि आणि सुवर्ण. (आ) इंद्र, कशेरु, ताम्र, गभस्ति, नाग, वारुण, सौम्य, ब्रह्म, भरत हे नऊ भाग. -हंको. 'नवखंडें सप्तद्वीपें । छपन्नदेशींच्या रायांचीं स्वरूपें ।' -ह २८.६४. [नव + सं. खंड = तुकडा, पृथ्वीचा भाग] ॰खंड पृथ्वी-स्त्री. जींत नऊ खंडें आहेत अशी पृथ्वी. 'नवखंड पृथ्वी व दहावें खंड काशी.' 'नवखंड पृथ्वीचें दान.' ॰खणी-वि. नऊ खणांची. 'दुखणी काय नवखणी माडी नलगे धरा नखेंदु खणी ।' -मोकृष्ण ८३.१३. 'लावण्याची सकळ संपदा सहज उभी नवखणी ।' -पला ४.३४. [नव + खण] ॰गजी-पुस्त्री. १ (नऊ गजी) नऊ गज लांबीचा सोपा. राजदरबारचा भव्य दिवाणखाना; कचेरी; सदर. 'राजा नवगजींत बैसला ।' -ऐपो १७.२ तंबू; डेरा. 'बाडें सुंदर खाबगे नवगज्या सिद्धाच होत्या घरीं ।' -सारुह ३.४५. 'तमाम येऊनु नऊ गजी आसपास येऊनु उतरीले' -इमं ७. नवगोजी पहा. [नव + गज = एक परिमाण] ॰गुणपुअव. बुद्धि, सुख, दुःख, प्रयत्न, इच्छा द्वेष, संस्कार, पुण्य व पाप असे न्यायशास्त्रांत सांगितलेले नऊ गुण. 'बुद्धि सुख दुःख प्रयत्न । इच्छा द्वेष संस्कारण । पुण्य पाप नवगुण । बोलिजेती ।' -विउ ३.४. -वि. नऊपट. ॰गुण-वि. नऊ दोर्‍यांचें (यज्ञोपवीत इ॰). नऊ फेर्‍यांचें. 'नवगुण तव कंठी ब्रह्मसूत्र प्रभा जे ।' -मुरा बालकांड ११३. [नव + सं. गुण = दोरा] ॰गोजी-पु. डेरा. शामियाना. 'उतर तर्फेसी नवगोजी देऊनु उतरिले.' -इमं ७. ॰ग्रह-पुअव. १ सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहू, व केतु हे नऊ ग्रह. २ (उप. निंदार्थी) जूट; टोळकें; टोळी; कंपू. ३ -न. मंगलकार्यारंभीं करतात ती नऊ ग्रहांची पूजा; ग्रहमख. 'दोन्हीं घरीं नवग्रहें झालीं । देवदेवकें पूजिलीं । -कालिका १६.४१. [नव + ग्रह] ॰चंडी-स्त्री. १ देवीची आराधना (विशेषतः तिच्या स्तोत्राचें, सप्तशतीचें नऊ वेळां पठण करून केलेली). 'जर मला पुत्र- प्राप्ति झाली तर देवीची नवचंडी करीन.' -रत्न १.३. २ नवरात्र; नवरात्र पहा. [नव + सं. चंडी = देवी] ॰छिद्रें-नअव. नवद्वारें पहा. ॰जणी-स्त्रीअव. १ नऊ स्त्रिया. २ (ल.) नवविधाभक्ति. 'अत्यंत शहाण्या सुवासिनी । आणिक आल्या नवजणी । कृष्णाची खुतखावणी । त्या जाणोनी वर्तती ।' -एरुस्व १६.४३ ॰ज्वर- पु. दूषित तापाचा एक अतिशय तीव्र प्रकार; हा ताप नऊ दिवसांच्या मुदतीचा व प्रायः घातुक असतो. [नव + सं. ज्वर = ताप] ॰टकें- न. शेराच्या अष्टमांशाचें, (कैली) अर्ध्या पावशेराचें माप. [नऊ + टांक] ॰टांक-न. अदपावाचें वजन. नवटकें पहा. [नव + टांक; गुज. नवटांक; गो नवटांग] ॰द्वारें-नअव. दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या, तोंड, गुदद्वार व मूत्रद्वार अशीं मानवी शरीराचीं नऊ द्वारें, छिद्रें. 'नवद्वारें देहीं । तो असतुचि परि नाहीं ।' -ज्ञा ५.७५. ॰नाग-पुअव. १ पुराणांतरीं वर्णिलेले अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक व कालीय ह्या नांवांचे नऊ नाग, सर्प. २ नऊ हत्ती. [नव + सं. नाग = सर्प, हत्ती] ॰नाग- सहस्त्रबळी-वि. नऊ हजार हत्तींचें बळ असलेला. [नव + सं. नाग = हत्ती + बळी = बलवान] ॰नागसहस्त्रशक्ती-स्त्री. नऊ हजार हत्तींचें बळ. 'अंगीं जियेस नवनागषस्त्रशक्ति ।' -आपू ३९ [नव + सं. नाग = हत्ती + सं. सहस्त्र = हजार + सं. शक्ति = बळ] ॰नागोर्‍या-पु. (ना.) चेंडूलगोर्‍यांचा खेळ. ॰नाथ-पुअव. मच्छिंद्र, गोरक्ष, जालिंदर, कानीफा, चरपटी, नागेश, भरत, रेवण व गीहिनी हे नवनारायणाचे अवतार मानतात. प्रकाश, विमर्श, आनंद, ज्ञान, सत्यानंद, पूर्णानंद, स्वभावानंद, प्रतिभावानंद, व सुभगानंद असहि पाठभेद आहे. -नव १.३९. ते ४३. -ज्ञाको (न) ३७ ॰नारायण-कवि, हरि, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पला- यन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस, व करभाजन. -नव १.२९ ते ३०. ॰नारीकुंजर-पु. नऊ स्त्रियांनीं आपल्या शरीरन्स निरनिराळ्या प्रकारें पीळ व मुरड देऊन (कृष्णाच्या पुयोगसाठीं) बनवि- लेली हत्तीची आकृती. [नव + सं. नारी = स्त्री + सं. कुंजर = हत्ती] ॰निधि-धी-पुअव. कुबेराचे नऊ खजिने. त्याचीं नावें:-महा- पद्म, पद्म, शंख, मकर, कच्छप, मुकुंद, कुंद, नील, आणि खर्व. 'मोल तुमचिया या श्रीचरणरजाचे न होय निधिनवही ।' -मोमंभा १.११२. [नव + सं. निधी = खजिना, सांठा] ॰महाद्वारे-नअव. नवद्वारें पहा. ॰महारोग-पुअव. राजयक्ष्मा, कुष्ट, रक्तपिती, उन्माद, श्वास, मधुमेह, भगंदर, उदर व मुतखडा हे नऊ दुर्धर व भयंकर रोग. [नव + सं. महायोग = मोठा, भयंकर रोग] ॰रंगी-वि. नऊ रंगांनी युक्त (पदार्थ.) ॰रत्नराजमृगांक-पु. (वैद्यक) एक औषधीं रसायन. [नव + रत्न + राजन् + मृग = हरिण + अंक = चिन्ह] ॰रत्नें-नअव. हिरा, माणिक, मोतीं, गोमेद, इंद्रनील, पाच, प्रवाळ, पुष्कराज, वैडूर्य किंवा तोर्लल्ली हिं नऊ प्रकारचीं रत्नें 'नवरत्नांची आंगठी.' ॰रत्नांचा हार-पु. स्त्रियांचा गळ्यांत घालण्याचा एक बहुमोल हार. ॰रस-पुअव. (साहित्य) साहित्य- शास्त्रांत वर्णिलेले शृंगार, विर, करूण, अद्भुत, हास्य, भया- नक, बीभत्स, रौद्र आणि शांत या नांवांचें नऊ रस. जी दैविकीं उदार वाचा । जैं उद्देशु दे नाभिकाराचा । तैं नवरससुधाब्धीचा । थावो लाभे ।' -ज्ञा १०.७. ज्ञाता जो सरसावला, नवरसां-माझिरि शृंगारसा ।' -रा ५ [नव + सं. रस] ॰रसिका-वि. चलाख; त्र- तरीत; आवेशयुक्त; नऊ रसांनीं भरलेलें, पूर्ण (गान, कवन, कथा, वर्णन, ग्रंथ, श्लोक, गवई, कवि, वक्ता इ॰). [नवरस] ॰रात्र-न. १ (सामा.) नऊ अहोरात्रांचा समुदाय. २ (विशेशार्थाणें) चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचा काल (रामाचें नवरात्र); तसेंच अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचा नऊ दिवसांचा काल. (देवीचें नव- रात्र) यास प्रतिपदेपासून चंपाषष्ठीपर्यंत सहा दिवस खंडोबाचें नवरात्र असतें. ३ वरील कालांत करतात तो देवाचा, देवीचा उत्सव, पूजा. [नव + सं. रात्रि = रात्र] ॰लख-वि. (काव्य) नऊ लक्ष. 'आकाशांत नवलख तारे आहेत.' [नव + लक्ष = शंभर हजार] ॰लक्षणें-नअव. आचार, विनय, विद्या, प्रतिष्ठा, तीर्थदर्शन, निष्ठा वेदपठन, तपस्या व दान हिं ब्रह्मणाचीं नऊ लक्षणें. -शर. ॰लाखा-ख्या-वि. ज्याच्याजवळ नऊ लक्ष रुपये आहेत असा; लक्षाधीश; अतिशय श्रीमंत. 'अपुल्या पुम्ही घरचें नवलाखे मिजाजी ।' -प्रला १७५ [नव + लाख = शंभर हजार] ॰विध- वि. नऊ प्रकारचें. [वन + सं. विधा = प्रकार, भेद] ॰विधभजन- न. नवविधा भक्ति पहा. 'नवविधभजन घडो । तुझिये स्वरूपें प्रीति जडो ।' ॰विध रत्नें-नअव. नवरत्ने पाह. ॰विधा भक्ति-स्त्री. श्रवण = ईश्वराचें गुणवर्णन, चरित्रें इ॰ ऐकणें; कीर्तन = ईश्वराचें चरित्र वर्णन करणें, वाचणें; स्मरण = ईश्वराचे गुण, चरित्र इ॰ आठवणें; पादसेवन = ईश्वराचे पाय धुणें, चेपणें इ॰ सेवा; अर्चन = पूजा करणें; वंदन = नमस्कार करणें; दास्य = चाकरी करणें; सख्य = ईश्वराशीं सलगी करणें; आत्मनिवेदन = ममत्व सोडून ईश्वरास सर्वस्व, स्वतःला अर्पण करणें. या नऊ प्रकारानीं करावयाची ईश्वराची भक्ति, सेवा. 'श्रवण कीर्तन स्मरण । पाद- सेवन अर्चन वंदन । दास्य सख्य आत्मनिवेदन । हे भक्ति नव- विधा पै ।' -विपू ५.२३. -दा १.१. ३. [सं. नवविधा = नऊ प्रकारची + भक्ति = सेवा] ॰सर-वि. नऊ सरांचा (हार इ॰). नव + सर] ॰सुती-स्त्री. जानवें करण्यासाठीं नऊ पदरी वळून केलेला दोरा. [नव + सुत = दोरा] ॰नवांकित-वि. पुठ्ठ्यावर नवाच्या आंकड्यानें चिन्हित (घोडा). [नव + सं. अंकित = चिन्हानें युक्त] नवास्त्र-वि. नवकोण पहा. [नव + सं. अस्त्र = कोण, कोपरा]

दाते शब्दकोश

काटा, कांटा

पु. १ अणकुचीदार, तीक्ष्ण टोंक असलेली, जी बोचली असतां रक्त काढते अशी काडी; बाभळीचा, बोरीचा दाभणासारखा टोंचणारा अवयव. 'सर्प कपाळीं कांटा नेहटे । कां सापसुरळीचें पुच्छ तुटे ।' -भारा बाल ८.३५. २ (भयानें, थंडीनें वगैरे) अंगावर उभे राहणारे शहारे; रोमांच. ३ (अव.) तापानंतर अंगावर उभे खरखरीतपणा अथवा बारीक पुटकुळ्या अस- तात तो; पुरळ. ४ (अव.) तापाच्या पूर्वीं अंगावर येणारी शिर- शिरी; रोमांच; कसर. ५ विंचवाच्या नांगीचें पुढचें तीक्ष्ण टोंक. ६ कुलुपादिकाचा खिळा, जो कुलुपाच्या दांडींत बसतो व मागें सरतो तो. ७ वेळू, बांबू वगैरेंना येणारा तुरा; मोहोर; फुलोरा. ८ कंबर, मान, पाठ यांच्या आंतील बाजूस आधारभूत असलेला अस्थि- विशेष. ९ गुणाकार भागाकार यांचा ताळा पाहण्यासाठीं अंक मांडण्याकरितां घातलेली चौफुली (x). १० राघु, मैना इत्यादि कांच्या गळ्यांत होणारा एक रोग. ११ वजनानें विकलेल्या वस्तूं- वर जें कांहीं वजन कटतें देतात तें. कडता पहा. १२ नदी किंवा समुद्रांतील पाण्याखालीं झांकलेला खडक. १३ काट्यासारखी शरीरास बोचणारी कोणतीहि वस्तु (माशाचें हाड, चक्राचा दांता, घड्याळाचा हातकांटा, खडबडीत लगामाचें टोंक, करवतीचा दांता, जेवणांतील वापरावयाचें दांताळें-कांटा, जनावरें किंवा भाजीपाला यांवरील खरखरीत केंस. लव इ॰). 'काटा बराबर एकावर एक आला.' -रासक्रीडा ७. १४ हलवा, इतर मिठाई यांवरील टोंकें, रवा. (क्रि॰ येणें; उमटणें; वठणें उठणें). १५ (विणकाम) वशारन करतांना इकडून तिकडे (वशारन पुढें सरकण्यासाठीं) फिरवावयाचें लांकूड. १६ (व.) थेंब. 'घरांत तेलाचा एक कांटा नाहीं. ' -वशाप ५१.१२. ४७८. १७ (कु.) सुताराचें एक हत्यार. १८ (ल) त्रास देणारा माणूस, व्याधि, शल्य, पीडा, शत्रु. ' धर्माच्या हृदयांतिल काढितसे मी समूळ कांटा हो । ' १९ तराजूच्या दांडीमधील उभा खिळा. ' जरि कांटा कलताए दैवांचा । जेउता राजमठु । ' -ऋ ३९. २० काटा असलेला तराजू (विशेषतः सोनाराचा, सराफाचा). ' मेरूचिया वजनास पाहीं । कांटिया घातली जैशी राई । ' -ह ३०.१६१. [सं.कंटक, प्रा. कंटओ, अप. कंटउ; त्सीगन; फ्रे. जि. कंडो. ते काटा] ॰उपटणें-१ (क.व.) त्रासदायक प्राणी, शत्रु, गोष्ट, नाहींशी होणें. २ (व. ष.) समूळ नाहींसा करणें, काढून टाकणें. ॰काढणें -आपल्या मार्गांत असलेल्या, आपणांस पदोपदीं नडवणार्‍या शत्रूस दूर करणें. ' वसुदानाच्या पुत्रे जो अभिमुख काशिराज तो वधिला । कांटाचि काढिला तो जाणो तव सूनुच्या मनामधिला । ' -मोकर्ण ४.१५. ॰मारणें-१ काट्यानें सिद्ध करणें. २ अंगांत (तापाची) कसर येणें. ॰मोडणें-१ (व.) विंचू चावणें. २ किंचित उष्ण होणें. 'थंड पाण्याचा थोडा कांटा मोडला.' कांट्याचा नायटा होणें -कांटा मोडल्यावर लगेच तो काढला नाहीं तर त्या ठिकाणीं नायटा होतो म्हणजे आरंभीं क्षुल्लक वाटणार्‍या वाईट गोष्टीचे पुढें मोठे हानिकारक परिणाम कधीं कधीं होतात. कांटयानें कांटा काढणें-एका दुष्टाच्या हातून परभारें दुसर्‍या दुष्टाचें शासन होईल असें करणें. ' कांट्यानें काढितात कांटा कीं. ' काट्याप्रमाणें सलणें -सतत त्रासदायक होणें; दुःखकारक होणें; मत्सर, हेवा, द्वेष वाटणें. काट्यावर ओढणें-दुःखांत घालणें; वस्त्र कांट्यावर ओढलें असतां फाटतें त्यावरून. काट्यावर घालणें-दुःखांत लोटणें. ' त्यांत (कौरव सैन्यांत) मरेनचि शिरतां कांट्यावरि घालितां चिरे पट कीं । ' -मोविराट ३.४१. कांट्यावर येणें - (बैलगाडी) आंसाच्या दोन्ही बाजूंला समतोल वजन होणें. ॰धारवाडी -अगदीं बरोबर तोल दाखविणारा कांटा. ' टीका करणार्‍याच्या हातांत नेहमीं धारवाडी कांटा असला पाहिजे. ' कांटेकाळजी-अतिशय सूक्ष्म काळजी; चिंता. ' नवीन गव्हर्नर हे काट्याकाळजीनें व निःपक्षपातबुद्धीनें आपलें काम करतील. ' -टि १.४३३. ॰भर-(बायकी) थोडें. ' आज तिच्या दुखण्याला कांटाभर मागचें पाऊल आहे. ' ॰रोखण-स्त्री. (कु.) लांकडांत खांच, रेघ, पाडण्याच्या उपयोगी सुताराचें एक हत्यार; खतावणी; फावडी. ॰कणगी-(गो.) कणगर; कनक पहा.

दाते शब्दकोश

वारा

पु. १ वात; चलित वायु; हवा; न दिसणारें परंतु स्पर्शास समजणारें पंचमहाभूतांतील एक तत्त्व. -ज्ञा १५.३७६. २ (ल.) वीरश्री; स्फुरण. 'शिंद्यांना भरला वारा ।' -संग्रामगीतें ७३. ३ संचार; अंगांत येणें. 'कंपु नोहे आंगी वारा । जगदंबेचा ।' -ऋ ६५. [सं. वा = वाहणें] (वाप्र.) ॰घालणें-पंखा, चवरी वगैरे साधनानीं हवेस चलन देऊन वारा लागेल असें करणें. ॰घेणें- खाणें-पिणें-१ (वासरें वगैरे) मोकाट सैरावैरा पळूं लागणें; उड्या मारूं लागणें. २ (ल.) निर्बंध झुगारून देऊन स्वैर वर्तन करणें; मोकाट सुटणें; अद्वातद्वा वागणें. 'स्वरूप तुमचें पाहून पापिणी जीव आमचा प्याला वारा ।' -होला १०२. 'तेणें करून रांगडे बहुत वारा प्याले ।' -पेद २१.१७७. ॰न घेणें किंवा न पडूं देणें-अगदीं अलिप्त, दूर राहणें; किंचितहि संबंध न येऊं देणें; संसर्ग टाळणें. ॰पडणें-वारा वहावयाचा बंद होणें. ॰पिणें-१ वारा घेणें पहा. २ दुःखी, उदासीन, उत्साहहीन, खिन्न, उद्विग्न होणें. ॰फिरणें-मत बदलणें; स्थिति पालटणें. ॰मोकळा करणें- सोडणें-अपानवायु सोडणें; पादणें. ॰मोकळा होणें, सरणें- अपानवायु सुटणें; पश्चिमद्वारें वायु बाहेर पडणें; पादणें. 'वारा सरतां मोठी फजीति ।' -दा १८.१०.२०. ॰वाजणें-वारा वाहणें; जोराचा गार वारा सुटणें. 'वारा वाजतां करपती ओलीं पिकें ।' -दा ९.८.२९. ॰वाजेल-वाहील तशी पाठ करावी- ओढवावी, द्यावी, वारा पाहून पाठ द्यावी, वारावाहेल तसें करावें-पाठीवर घ्यावा-१ वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर जावें, वारा बाहील त्या दिशेनें जावें, वाऱ्याच्या अनुरोधानें जहाज हांकरावें. २ (ल.) वेळ पडेल तसें, प्रसंग ओळखून वागावें. ॰होणें-वाकाहक होणें. 'हळहळ बहु झाली होय संसार वारा ।' -सारुह ३.७३. वाजता वारा लागूं न देणें-किंचितहि त्रास न सोसणें; स्वतःस अणुमात्र तोशीस लागूं न देणें; अजीबात त्रास टाळणें. वाऱ्याचा उपद्रव-पु. १ हवेंतील फरकामुळें होणारी पीडा, बाधा. २ पटकीची साथ. वाऱ्याचा बुंद-पु. हवेचा अल्पांश; किंचित्हि वायुचें वाहणें; बारीकशी झुळूक (बहुधा नास्तिपक्षी ). वाऱ्याची मोट-स्त्री. (ज्याप्रमाणें वारा एका गाठोड्यांत बांधणें अशक्य त्याप्रमाणें) परस्परांपासून दूर व भिन्न अशा अनेक वस्तु अथवा व्यक्ति एकत्र आणण्याची व ठेवण्याची क्रिया; अनिर्बंध वस्तूंचें एकत्रीकरण. (हें अशक्यप्राय असतें) ॰बांधणें-क्रि. अशक्य गोष्ट करूं जाणें. वाऱ्याचें घोडें-न. (वाऱ्यानें चालणारें) जहाज; गलबत; नौका. वाऱ्याबरोबर- शीं भांडणें-अतिशय भांडखोरपणा करणें; लसते कलह उकरून काढणें. वाऱ्याला लाथा मारणें-निष्फळ काम करणें. वाऱ्या वर टाकणें-अजिबाद सोडून देणें; टाकून देणें; पूर्णपणें त्याग करणें; हयगय, दुर्लक्ष करणें. वाऱ्यावर भारे बांधणें-मनोराज्य करणें. वाऱ्यावर वरात भुसावर चिठी-भूसपर ठेंगा- बेजबेबदारीचें, निष्काळजीचें काम (वरात म्हणजे पैसा देण्या- विषयीं चिठ्ठी. ती वाऱ्यावर देणें म्हणजे कांहीं तरी करणें); ताळ- मेळ नसलेली गोष्ट करणें. वाऱ्यावर सरणें-१ कुठें तरी भट- कणें; वहावत जाणें; कांहीं तरी भरमसाट बोलत सुटणें. २ अवखळ होणें; आडदांडपणा करणें; स्वैर वागणें. वाऱ्यावशीं-वाऱ्या- सोई-वाऱ्याबाग-क्रिवि. वाऱ्याच्या गतीच्या अनुरोधानें; प्रवाहाबरोबर; प्रवाहाच्या दिशेनें. वाऱ्यास उभा न करणें-राहूं न देणें-न राहणें-स्वतःपासून दूर ठेवणें; संबंध न ठेवणें; संसर्ग टाळणें. वाऱ्यास देणें-उपणणें; वारवणें; वारसंडणें. सामाशब्द- वारापाणी-न. १ वारा व पाणी यांच्या सुलभतेमुळें क्षुल्लकत्व दर्शक दुर्लक्षित, उपेक्षित स्थिति; अवहेलना; उपेक्षा; हेटाळणी; किर- स्कार; हेळसांड. 'मी बोलतों याचें उगीच वारापाणी करून टाकूं नको.''झालें वारापाणी वज्र तव भयेंचि देव कां पावे ।' -मोअश्व १.१०६. २ -नस्त्री. निरवानिरव; वारासार; फेड; भागवा- भागवी (कर्ज-वाम वगैरेची). ३ निरास; निवारण; अनिष्ट निर- सन. ४ हवापाणी; मोकळी स्वच्छ हवा; एखाद्या ठिकाणचें हवा- मान; आबहवा. 'चार दिवस वारापाणी खा मग बरा होशील.' [वारा + पाणी] वारें-न. १ वारा; विशेषतः वाहणारा, हलणारा वारा. २ साथ; प्रसार; प्रादुर्भाव (रोग वगैरेचा). उदा॰ पटकीचें वारें; खोकल्याचें वारें. (क्रि॰ चालणें; वाहणें; वाजणें; सुटणें). 'वारीं रोग्याची वाजतीं ।' -दावि ३७७. ३ संचार; अंगांत येणें; पिशाच्चबाधा. (क्रि॰ येणें; भरणें.) 'अंगीं घेऊनियां वारें दया देती । तयां भकतांहातीं चाट आहे. ।' -तुगा २८४२. 'वारें निराळें बोलें । देहामध्यें भरोनि डोले ।' -दा ९.८.२२. ४ झांक; छटा; चर्या; सूरत; गुणसमुच्चय. (विशिष्ट गोष्टीकडे कल, आवड, विशिष्ट बौद्धिक सामर्थ्य, कौशल्यदर्शक). 'कारकुनीचें वारें.' ५ लहर; लाट; ऊर्मि; प्रवृत्ति; कल. उदा॰ प्रीतीचें-ममतेचें-रागाचें- शोकाचें-आनंदाचें-वारें. ६ जोम; उत्साह; सामर्थ्य; आनुवंशीक ओज, तेज, रग वगैरे. उदा॰ तारुण्याचें-बळाचें-शक्तीचें- वारें. 'हिंदुलोकांत स्वातंत्र्याचें वारें कसें तें माहित नाहीं.' -नि. 'अंगीं भरलें नूतन वारें ।' -विक ३. ७ सामान्यतः एखादी चम- त्कारिक कल्पना, वेड, खूळ वगैरे. 'सुधारणेचें वारें महाराजांच्या डोक्यांत शिरलें' -टिले ४.३३६. ८ स्पर्श; वास. 'एका राज्य- व्यवस्थापकानें राज्यास संपत्तीचें वारें लागूं नयें म्हणून कडक कायदे केले.' -नि ५४. ९ अंश; भाग. 'त्यातलें बिलकुल वारें ऐन साठीच्या अंमलातहि प्रस्तुत ग्रंथकाराचे ठिकाणीं आढळत नाहीं.' -नि. १० आविर्भाव; देखावा; आव; अवसान. 'चोरा- पुढें त्यानें पहिलवानगिरीचें वारें अंगीं आणण्याचा प्रयत्न केला.' ११ अर्धांगवायु; पक्षपात. 'वारीं अंगावरून जातीं ।' -दा ९.८. २९. ॰फिरणें-बदल होणें; पालटणें; वर्तणूक निराळीं होणें. 'गोविंदरावास नोकरी लागल्यापासून सखूबाईचें वारें फिरलें.' ॰लागणें-संसर्ग होणें; संगति लागणें; संबंध येणें. 'संपत्तीचें वारें आजपर्यंत कसें तें मुळींच लागलें नाहीं असे देश पृथ्वीवर पुष्कळ आहेत.' वारें सुटणें-परिस्थिति, वातावरण उत्पन्न होणें. 'कायदे- भंगाचें हिंदुस्थानांत वारें सुटलें.' -के १२.७.३०. ॰सूत्र-न. (गो.) पिशाच्चाचा फेरा. वारेघशीं-क्रिवि. उघड्यावर; वाऱ्या- वर; हवेवर. 'रसाची घागर तुळशीपाशीं उतरलीं व वारेघशीं ठेविली.' -खरादे ६९. वारेमाप-क्रिवि. १ प्रमाणाबाहेर; भलती- कडेच; बेअंदाज; बेछूट. २ बेताल; असंबद्ध; विसंगत; अद्वातद्वा (बोलणें, भाषण). वारेलग-क्रिवि. वाऱ्याच्या प्रवाहांत, झोतांत. 'कां वारेलगें पांखिरूं । गगनीं भरे ।' -ज्ञा १३.३१४. वारे- हळक-वि. वारा लागून वाळलेलें; वाऱ्यावर टाकून वाळलेलें.

दाते शब्दकोश

चित्त

न. मन; अन्तःकरण; बुद्धि; वृत्त्यात्मक अन्तःकरण पंचकांतील चवथा अवयव; मनोवृत्ति, विकार, भावना, राग इ॰ कांचें अधिष्ठान मानलेलें हृदयस्थान. 'जे वस्तूचा निश्चयें केला । पुढें तेंचि चिंतूं लागला । तें चित्त बोलिल्या बोला । येथार्थ मानावें ।' -दा १७.८.८. [सं.] (वाप्र). ॰उडून जाणें अक्रि. १ घाबरणें, उदास होणें; मन न रमणें. (कर्त्याची षष्टी असते). 'तें ऐकून महाराजांचें चित्त उडून गेलें.' -चंद्र १३४. २ एखाद्या गोष्टी- विषयीं मन विटणें; नावड उत्पन्न होणें. ॰पुरविणें-वि. लक्ष्य देणें; लक्ष्यपूर्वक ऐकणें. चित्तांत खाणें-अक्रि. मनास लागणें; वाईट वाटणें. सामाशब्द-॰क-वि. हुषार; चलाख; अल्पवयस्क असून मोठ्या विषयाकडे चित्त लावण्याचा स्वभाव ज्याचा तो. चित्तंगम-वि. हृदयंगम; मनोवेधक; हृदयस्पर्शी. 'माझीं मी निवडूनि अर्पिलिं फुलें अत्यंत चित्तंगम ।' -टिक १५२. ॰गेह-न. हृदयरूपी घर; मन हेंच घर; मन. 'विकल्प प्रवेशला ते समयीं । चित्तगेहीं कैकेयीच्या ।' -रावि ९.१६१. [सं. चित्त + गेह = घर] ॰चतुष्टय न. मन, बुद्धि, चित्त व अहंकार या चारांचा समुदाय. चित्तचतुष्टय डाहाळिक । कोंभैजेतो ।' -ज्ञा १५.९७. 'चित्त- चतुष्ठ्यय चमत्कार । मन बुद्धी चित्त अहंकार ।' एभा २२.३५०. -एभा ३.११२. [सं. चित्त = मन + चतुष्टय = चारांचा समुदाय] ॰चमत्कार-पु. आश्चर्य; अचंबा; सानंदाश्चर्य. [सं. चित्त + चमत्कार] ॰चाळक-वि. १ इच्छेचें, मनोवृत्तींचें नियमन करणारा (ईश्वर). 'चित्तचाळक विटेवरला । तो हरि माझ्या मनीं भरला ।' 'जयजय सकळ चित्तचाळका ।' २ मन रमविणारा; मनोरंजक; मन चाळविणारा, विकारयुक्त करणारा. [सं. चित्त + चालक] ॰चोर-चोरटा-वि. मन हरण करणारा; चित्ताकर्षक. [सं. चित्त + चोर] ॰ज-पु. मदन; कामदेव; मनांत जन्मणारा (मदन). [सं. चित्त = मन + ज = जन्मणारा] ॰जडसंयोग-पु. आत्मा आणि शरीर यांचा संयोग. [सं. चित्त = चैतन्य + जड = स्थूल (शरीर, देह) + सम् + योग = एकत्र येणें] ॰निग्रह-पु. मनाचें संयमन, नियमन; मन ताब्यांत ठेवणें. [सं. चित्त + निग्रह = ताब्यांत, दाबांत ठेवणें] ॰निर्वृत्ति-स्त्री. मनाची शांति; चित्ताची विश्रांति. [सं. चित्त + निर् + वृत्ति] ॰पावन-पु. चितपावन पहा. ॰पोळ्या- पु. चितपावनांना तुच्छतेनें, उपहासानें संबोधण्याचा शब्द. ॰प्रसन्न-वि. समाधानी; संतुष्ट; शांत चित्ताचा. [सं. चित्त + प्रसन्न = तुष्ट, शांत] ॰भ्रंश-पु. १ मानसिक शक्तींचा भंग; म्हतारचळ. २ देहभानाचा नाश; चित्तभ्रम; डोकें ठिकाणावर नसणें; डोकें फिरणें. [सं. चित्त + भ्रंश] ॰भ्रामक-वि. मनाला मोहून टाकणारा; चित्ताकर्षक; मन वेडें करणारा. [सं. चित्त + भ्रामक] ॰लहरी- स्त्रीअव. मनस्तरंग; मनाची हुक्की; मनोविकार; मनाचे छंद, तरंग, विलास इ॰ 'ब्रह्मानंद सागरीं । वीराल्या चित्तलहरी ।' [सं. चित्त = मन + लहरी = लाटा, तरंग] ॰विभ्रम-पु. मन बहकणें; बुद्धि- भ्रंश; मन ठिकाणावर नसणें. [सं. चित्त = मन + वि = विरुद्ध + भ्रम = फिरणें] ॰वृत्ति-स्त्री. १ लक्ष्य; मन. 'चित्तवृत्ति ठिकाणीं नाहीं फिरली, बदलली. उडून गेली.' २ मनाच्या लहरी, तरंग, परि- भ्रमण, उड्डाण. 'चित्तवृत्ती घटकेघटकेंत पालटतात.' [सं. चित्त = मन + वृत्ति = वर्तन, वागणें, असणें] ॰वेधक-वि. मन आकर्षिणारा; मन हलवून सोडणारा; अन्तःकरणास भिडणारा; हृदयंगम; [सं. चित्त + वेधक = वेधणारा] ॰वैकल्य-न. मनोभ्रम; बुद्धि- भ्रंश; मन बहकून जाणें. [सं. चित्त + वैकल्य = विकलता, भ्रम, पंगुपणा] ॰शुद्धि-स्त्री. मनाचा शुद्धपणा, पवित्रपणा; मनाचें रागद्वेषादि वाईट भावनांपासून अलिप्त राहणें. 'चित्तशुद्धि नस- लिया जाणा । एकांतीं मांडिती देवार्चना । पुढें आठवी मन- कामना । तें रानोरान हिंडवी ।' [सं. चित्त + शुद्धि] ॰संकोच- पु. १ मनोनिग्रह; मनावरील दाब. २ (विनयामुळें होणारा) मनाचा लाजाळूपणा; भीडस्तपणा; शालीनता. [सं. चित्त + संकोच = आंखूडपणा; भिडस्तपणा] ॰समाधान न. मनाचें स्वास्थ्य; चित्ताची शांति; संतुष्टता. [सं. चित्त + सम् + आ + धा अन] ॰स्थैर्य-न. मनःस्वास्थ्य; मनाची स्थिरता, शांति. [सं. चित्त + स्थैर्य = स्थिरता] ॰हीन-वि. मन ठिकाणावर नसणारा; मनावर योग्य संस्कार नसलेला; अप्रबुद्ध. 'तें आघवेंचि गेलें वाया । जे चित्तहीन ।' -ज्ञा ९.१७८. [सं. चित्त = मन + हीन = टाकलेलें, वाईट क्षुद्र] ॰चित्ताची आर्द्रता-स्त्री. मनाचा कोंवळे- पणा; चित्ताची मृदुता. चित्ताथिला-वि. सजीव; विचारी; चित्तसंपन्न. 'मा मी तव चित्ताथिला । आणि श्रीगुरु ऐसा दादुला ।' -ज्ञा १८.१७.३२. चित्तैकाग्र्‍य-न. मनाची एका- ग्रता, एकतानता. [सं. चित्त + ऐकाग्र्‍य = एकाग्रता]

दाते शब्दकोश

घेणें

सक्रि. १ स्वीकारणें; अंगीकारणें; (आपल्या) हातांत येईलसा करणें. 'त्यांत घेऊं ये तितुकें घ्यावें ।' -दा १५.९.३२. 'घेयीं तूं मधुपर्क पावन बरें सद्धेमपात्रीं असे ।' -निमा १.१३. २ धरणें; पकडणें; हिसकणें; झोंबाडणें. 'जे घेय हातीं बरवी विपंची ।' -सारुह १.२. ३ लागणें; बसणें; मिळणें (मार इ॰). 'तेथें गेलास तर मार घेशील.' ४ समजणें; मानणें. 'येथ दुजें नाहींचि घेई । सर्वत्र मी गा ।' -ज्ञा १५.४११. ५ ऐकणें. 'वाक्य घेऊनि हरुषली आई ।' -दावि १६०. 'तुवां सजणे हा समाचार घेतां' -र ११. ६ समाविष्ट, प्रविष्ट, अंतर्भूत करणें; आंत येऊं देणें. 'त्या माणसास जातींत घेतलें.' ७ कवटाळणें; कैवार घेणें; पत्करणें; स्वीकारणें; अंगीकारणें; उचलणें (पक्ष, बाजू, धर्म इ॰). 'त्यानें ख्रिस्ती धर्म घेतला.' ८ कबूल, मान्य करणें; मान्यता देणें; संमति, अनुमोदन देणें; ग्राह्य समजणें. 'त्या आशंकेचें ह्यानें समाधान केलें तें तुम्ही घेतलें काय ?' ९ योग्यता, किंमत जाणणें (गुणांची); आदरणें; चांगलें लेखणें (गुणाबरोबर उपयोग). १० मनांत आणणें, बाळगणें, ठेवणें (शंका, संशय, तिरस्कार इ॰). 'मागें हांसति गौळणी हरिपुढें ह्या घेतलीसे भ्रमें ।' -आकृष्ण ३८. ११ आविर्भाव आणणें; पांघरणें; बळेनें धारण करणें (वेड, सोंग इ॰). १२ (भय, रोग, मोह इ॰ कांच्या) ताब्यांत जाणें; (ज्वर, भय, मोह, दुखणें इ॰ कानीं). घेरलें जाणें; व्यथित होणें 'आणि तेणें आपुलेपणाचेनि मोहें । तुम्ही संत घेतले असा बहुवें ।' -ज्ञा ९.१७. 'नुघडि नेत्र घे भीतिला ।' -केका १०. १३ मुकवणें; हरण करणें; नाश करणें; बुडविणें (प्राण, शील इ॰). १४ छाटणें; तोडून टाकणें; कापणें. 'तुझें नाक-कान घेईन.' 'ह्या भोताचे शेंडे चार चार बोटें घेतले म्हणजे पडणार नाहीं.' १५ लागणें; आवश्यकता असणें; खर्ची पाडणें; खपवणें; अटवणें; खाणें (वेळ, स्थळ, शक्ति). 'हें काम दोन वर्षें घेईल.' 'हें गांठाळ लांकूड फोडण्यास फार बळ घेतें.' १६ खडकावणें; खडसणें; ठोक देणें; मारणें. 'मी त्याला भल्लें घेतलें.' १७ विशिष्ट आचरण, वर्तन, कृति करणें (उ॰ शोध, वाद, गांठ, लढाई, माप घेणें); शोध घेणें = तपास करणें; चौकशी करणें; वाद, लढाई घेणें = वाद, लढाई उपस्थित करणें; माप घेणें = मोजणें (लांबी, रुंदी इ॰ मध्यें); उडी घेणें = उडी टाकणें; गांठ घेणें = बांधणें इ॰. १८ हस्तगत करणें; मिळवणें; पैदा करणें; शोधून, मिळवून आणणें; संपादन करणें (खबर, बातमी, चाहूल, पायरव). १९ हातानें देणें; उचलून देणें; जवळ नेणें. (ह्या अर्थीं नेहमी आज्ञार्थींच प्रयोग होतो). 'ती दौत इकडे घ्या.' २० जोडणें; मिळविणें; स्वतःवर आणणें; ओढून घेणें (उपहास, निंदा, मार); विषय होणें (निंदा, मार इ॰ चा). 'अरे पोरा दाटीमध्यें तुडवून घेशील.' 'मारून, हांसून, घांसून, नागवून घेशील.' २१ पलीकडे जाणें; ओलांडणें (डोंगर, विशिष्ट स्थिति); संपविणें; शेवटास नेणें; सिद्धीस नेणें (प्रवास, मजल इ॰). 'त्यानें दहा कोसांची मजल घेतली.' २२ जोडणें; सामील करणें; वाढविणें. 'हा ओटा फार अरुंद झाला, आणखी दोन हात घे.' २३ स्वतःस जोडणें; जडवून घेणें; लावून घेणें (संवय, खोड, व्यसन). २४ आणणें; घालणें; माथीं मारणें; अंगाला चिकटविणें (आरोप, आळ, बालंट, तुफान). २५ (एखाद्या वस्तूनें दुसर्‍या वस्तूचा स्वतःवर) परिणाम होऊं देणें; विकार पावणें; परिणाम लागू करून घेणें. 'ओलें लांकूड आग घेत नाहीं.' 'तेलकट वस्त्र पाणी घेत नाहीं.' २६ जवळ येऊं देणें, पाजणें. 'ती गाय वासरूं घेत नाहीं.' २७ मारणें; बळी घेणें; नाश करणें. 'ही नदी, हें तळें, ती विहीर वर्षांत एक माणूस घेते.' 'माझा भाऊ भुतानें घेतला.' २८ जाणें; पळून जाणें; एखाद्याचा आश्रय करणें. 'काळयवन भेणें थोर । तेणें घेतलें गिरिकंदर ।' २९ स्थापणें; ठेवणें; आदरानें स्पर्श करणें 'येऊनि तुजजवळीं । चरण घेतिल तव भाळीं ।' -रत्न १७. ३० वळणें; कल होणें; एखादी गोष्ट करावयास तयार होणें (मन इ॰ नी). 'त्यामुळें ह्याचा शब्दशः अर्थ करण्यास आमचें मन घेत नाहीं.' -मसाप २.११७. ३१ (बुद्धिबळांचा खेळ) एकानें दुसर्‍याचें मोहरें मारणें (कित्येक वेळीं क्रियापदाच्या पुढें घेणें याचें रूप मन सोक्तपणें लावतात. अशा ठिकाणीं तें कारक हा क्रियेचा कर्ता आहे असें दाखवितें; तर कांहीं ठिकाणीं शब्दावर जोर देण्या- करितां त्याचा उपयोग करतात; विशेषतः कर्त्याविषयीं जोरानें बोलावयाचें असल्यास क्रियापादास जोडून घेणें याचा प्रयोग करतात. परंतु सामान्यतः अशा वाक्यरचनेनें विशेष अर्थ ध्वनित होत नाहीं व वाक्य चांगल्या रीतीनें पुरें करण्याकरतांच केवळ याचा उपयोग करतात. 'पोरानें हात पोळून घेतला.' कांहीं वेळां एखादी क्रिया आटोपून, उरकून टाकणें या अर्थीं पूर्वकालवाचक धातुसाधितास घेणें हा शब्द जोडतात. उ॰ स्नान करून घ्या; मी भात शिजवून घेतों; हें तुम्ही शिजवून घ्या. इतक्या ब्राह्मणांस गंध लावून घेतों आणि वाटी स्वाधीन करतों).' घेऊं देणें-या शब्दसंहतीचा उपयोग पूर्वकालवाचक धातु- साधितांना जोडून करतात. अशा वेळीं त्याचा अर्थ एखाद्यास एखाद्या क्रियेचा विषय, त्या क्रियेच्या आधीन होऊं देणें किंवा एखाद्यानें स्वतःकरतां एखादी गोष्ट करणें असा होतो. जसें- 'रडून-जेवून-पिऊन-बसून-उठून-धुवून-घेऊं दे.' घे म्हटल्या, घे म्हटल्यावर-क्रिवि. (जी जी गोष्ट, कृत्य करतां येईल ती ती गोष्ट, कृत्य करण्याला जे धडकावतात अशा अडदांड व तापट लोकांच्या रीतीला अनुलक्षून हा विशिष्ट प्रयोग रूढ झाला आहे) उतावीळपणानें; एकदम; विचार न करतां. 'तो घे म्हटल्या शिव्या देणार नाहीं.' घ्या-क्रि. इकडे पहा; हं पहा (लक्ष्य वेध- ण्याकरतां याचा उपयोग करतात). (घेणें ह्या क्रियापदाचे निरनिराळ्या संबंधांत अनेक प्रयोग होत असल्यानें ह्या स्थळीं सर्व देतां येणें शक्य नाहीं). उत्थापन-वर-चालीवर- जागा-शेवट-तोडीवर-त्वरेवर-घाव-परीक्षा-पाठ-रान-इ॰ अनेक शब्दांना जोडून घेणें या क्रियापदाचा प्रयोग होतो. त्याचप्रमाणें देणें; टाकणें; मारणें; घालणें व पाडणें या धातूं- प्रमाणें अनेक धातुसाधितांना जोडूनहि घेणें शब्दाचा प्रयोग करतात. उ॰ आटोपतां-कांकरतां-चालतां-काढतां-घेणें. श्वास, रजा, सूड इ॰ शब्दांना जोडूनहि घेणें या क्रियापदाचा उपयोग होतो. शिवाय उपयोग करणें; गिळणें; सहन करणेः सोसणें (रोग, व्यसन इ॰); जडवून घेणें इ॰ अनेक अर्थ होतात. म्ह॰ घेऊं जाणतो, देऊं जाणत नाहीं. [सं. ग्रह्; प्रा. गेण्ह; झें. गेरेप्; गॉ. ग्रेइप; जर्म. ग्रेफ; लिथु. ग्रेब्जु; स्ला. ग्रॅबल्जु; हिब्रू ग्रबैम; ग्री. ग्रीफॉस; लॅ. गेरो; पोलि. गार्निआक]

दाते शब्दकोश

सम

स्त्री. तालाची पहिली टाळी; तालाच्या प्रारंभींचें मुख्य ठिकाण; गायनवादनाचें महत्त्वाचें स्थान. -न. १ एक अर्था- लंकार; यामध्यें दोन समान वस्तूंची तुलना केलेली असते. २ कोण- त्याहि आकाशस्थ उभ्या वर्तुळाचा ज्या बिंदूंत क्षितिजाशीं छेद होतो तो बिंदु. ३ (भूमिति) मध्यमप्रमाण. ४ साम्य; सारखेपणा. 'ऐसें बोधा आलें जया सम । तया कर्तव्य तें नैष्कर्म्य ।' -ज्ञा ४. १२१. ५ ब्रह्म. -ज्ञा ६.४३. वि. १ सारखा; तुल्य; समान; सदृश. उदा॰ समकाल, समदेश, सम-गति-क्रांति-गुण-गोत्र-जाति-धन-विभाग-शील-बल वगैरे. 'सकळकाळीं समा । सर्व- रूपा ।' -ज्ञा ११.५३३. 'तुळे घालितां वो नये कनकरासी । सम तुकें एक पान तुळसी वो ।' -तुगा १२१. २ एका पातळींतील; सपाट; सरळ; नीट; थेट; एकरूप. ३ दोन या संख्येनें विभाग्य (संख्या) ४ निःपक्षपाती; समदृष्टि; समान अधिकारी. ५ तटस्थ; मित्रत्व अगर शत्रुत्व नसलेला. ६ शांत. 'तैसा आत्मबोधीं उत्तमु । करितां होय जो श्रमु । तोही जेथें समु । होउनि जाय ।'-ज्ञा १८. १०९४. [सं.] ॰उदर-न. (नृत्य) नृत्यप्रसंगीं श्वासोच्छ्वास अजिबात बंद ठेवणें. ॰कपोल-पु. (नृत्य) गालांची स्वाभाविक स्थिति. ॰ग्रह-पु. (ताल) गाण्यास व ताल देण्यास जेथें एकदम सुरुवात होते तें ठिकाण. ॰चिबुक-पु. (नृत्य) खालचे-वरचे दांत मागें पुढें न होतील, हनुवटी सारखी राहील असे ठेवणें. ॰दर्शन-न. (नृत्य) दोन्ही डोळ्यांचीं बुबुळें एका रेषेंत ठेवणें. ॰पाद-न. (नृत्य) पायांची स्वाभाविक ठेवण; जुळलेले पाय. ॰पुट-न. (नृत्य) पापण्यांची स्वाभाविक स्थिति. ॰मान-स्त्री. स्वाभाविक स्थितींत मान ठेवणें. ॰यति-पु (ताल) गायनाचा प्रारंभ, मध्य व अंत या तीन ठिकाणीं लयीची गति सारखी ठेवणें. ॰वक्षःस्थल-न. (नृत्य) उरोभागाची स्वाभाविक स्थिति. ॰अपूर्णाक-पु. (गणित) छेदापेक्षां अंश लहान असतो असा अपूर्णांक. ॰कर्णतुल्य चतुर्भुज-पु. ज्याचे कर्ण व बाजू सारख्या असतात असा चौकोन; समचतुष्कोण; इ. र्‍हाँबस. ॰कर्णायत- पु. दीर्घचतुरस्त्र; दीर्घ चौकोन. ॰कक्ष-वि. समान; बरोबरीचें; सारखे; जोडीचे. ॰कालीन-क-वि. एकाच काळचे; एकाच वेळचे; एककालीन. ॰केंद्र-वि. ज्यांचा मध्यबिंदु एक आहे अशीं (वर्तुळें). ॰कोण-पु. काटकोन; ९० अंशांचा कोन. ॰खात- पु. (भूमिति)चौरस घन पदार्थ. विटेसारख्या आकाराची आकृति. ॰गुणन-न. एका संख्येस त्याच संख्येनें गुणण्याचा प्रकार; संख्येचा वर्ग करणें. ॰घटक-पु (शाप.) सारख्या आकाराचे पदार्थ, (इं.) आयसोमेरॉइड. -वि. सारख्या आकाराचे, रूपाचे. (इं.) आयसोमेरिक. ॰घटकत्व-न. समरूपता. (इं.) आयसोमेरिझम. ॰घर-न. माजघर; मध्यगृह; मधलें दालन, वठार. ॰चतुरस्त्र- वि. (रूढ) समचौरस; चौकोनी; चारी कोन सारखे असलेला. -नपु, चारी कोन सारखे असलेली आकृति. [सं. सम + चतुर् + अस्त्र] ॰चित्त-वि. १ समतोल स्वभावाचा; समदृष्टि; मनाचा कल ढळूं न देणारा. २ तटस्थ; कोणत्याहि विशिष्ट बाजूस मनाचा ओढा नसलेला; उदासीन. ॰चौरस-समचतुरस्त्र पहा. ॰च्छेद-पु. (गणित) सारखा छेद; सामान्य छेद. -वि. ज्यांचे छेद सारखे आहेत असे (अपूर्णांक). ॰च्छेदरूप-न. ज्या- सर्व अपूर्णांकांस सामान्य असा एकच अंक छेदस्थानीं असतो असे अपूर्णांक. ॰तळणें-अक्रि. (सोनारी) सारखी तोलून मध्यावर खूण करणें (सोन्याची कांब वगैरे). [सम + तोलणें] ॰ता-स्त्री. १ सारखेपणा; बरोबरी. २ अभेदबुद्धि; समबुद्धि; तुल्य मानणें. 'पै भय आणि निर्भयता । अहिंसा आणि समता । तुष्टि तप पांडुसुता । दान जे गा ।' -ज्ञा १०.८५. ३ निःपक्ष- पातपणा. ४ ब्रह्मरूपता; तादात्म्य. ॰तुक-वि. समतोल; सारख्या वजनाचें; सारख्या महत्त्वाचें; सारखें. 'तुका म्हणे तुजमध्यें एक भाव । समतुके भार घेऊं पावो उंच ठाव ।' -भज ३३. ॰तुक भाव-पु. बरोबरी; समतोलपणा. घ्या संभाळून समतुकभावें । आपणहि खावें त्याच तुकें द्यावें ।' ॰तोल-वि. १ सारख्या वजनाचा; समभार. २ सारखा; सम; जोडीचा; बरोबरीचा; सारख्या गुणांचा, मोलाचा, रंगाचा, दर्जाचा. ३ शांत; सौम्य; न क्षोम पावणारा (स्वभाव, प्रकृति). समाधान (प्रकृति). ४ सारख्या शक्तीच्या (प्रेरणा). -क्रिवि. दोहींकडे सारखा भार, वजन असलेला. 'होडीमध्यें समतोल बसावें.' ॰पणा-अवस्था-स्थिति-पुस्त्री. एखाद्या पदार्थावर सर्व बाजूंनीं कार्य करणार्‍या प्रेरणा जेव्हां परस्पर समान असतात अशी स्थिति; तुल्यबलता; (इं.) इक्विलिब्रिअम. ॰त्रिभुज-पु. ज्याच्या तिन्ही बाजू सारख्या लांबीच्या आहेत असा त्रिकोण. ॰त्रैराशिक-पुन. ॰त्रैराशि-स्त्री. (गणित) ज्यामध्यें सम प्रमाणें असतात असें त्रैराशिक. याच्या उलट व्यस्त त्रैराशिक. ॰त्व- न समता पहा ॰स्थळ-न. सपाट जागा; मैदान; सपाटी. [सं. सम + तल] ॰दर्शी-वि. निःपक्षपाती; तटस्थ; कोणत्याहि एका बाजूस मनाचा कल नसलेला. ॰दुःख-समदुःखी-वि. ज्यांस एकाच प्रकारची पीडा, त्रास वगैरे आहे असा; दुःखाचा भागी- दार, वांटेकरी. ॰दृष्टि-स्त्री. समानवृत्ति; निःपक्षपातीपणा; निःस्पृहवृत्ति; उदासीन. ॰द्विभुज त्रिकोण-पु. ज्याच्या दोन बाजू सारख्या आहेत असा त्रिकोण. ॰धात-समधातु- वि. समशीतोष्ण; फार थंड नाहीं व उष्ण नाहीं अशी; निरोगी. 'तशी काया समधात सुगंधिक अमोल फुंदाची ।' -प्रला ९०. [सं. सम + धातु] ॰नख(करण)-न. (नृत्य.) पाय जोडून नखें एका रेषेंत ठेवणें. ॰नर-समशंकु पहा. ॰पाद(स्थान)- न. (नृत्य.) सर्व अंग सरळ, सारखें व सौष्ठवांत ठेवून दोन्ही पाय एक ताल अंतरावर व एकाच रेषेंत ठेवणें. ॰पाद भौमि- चारी-स्त्री. (नृत्य.) दोन्ही पावलांत अंतर न ठेवतां तीं एक- मेकांस चिकटवून जमीनीवर एकाच रेषेंत ठेवणें. ॰पादी-वि. (प्राणि) दोन्ही पाय दोहों बाजूस सारखे असणारा (प्राणि). ॰प्रमाण-वि. (गणित) सारख्या प्रमाणांत वाढणारा अथवा कमी होणारा. -छअ १८. ॰फळि-ळी-स्त्री. बरोबरी; स्पर्धा. 'तयासि मांडितां समफळी । न दिसे दुजा ।' -कथा ४.१४. ५. -वि. समबल; समतोल. 'ज्ञाप्र २७५. ॰बुद्धि- स्त्री. सारखे विचार; सारख्या भावना. -वि. १ सारख्या मताचे, कलाचे, वृत्तीचे. २ सर्वांबद्दल सारखीच वृत्ति असणारा; सम- दृष्टि; कोणासहि कमी अधिक, जवळचा दूरचा वगैरे न मानणारा. ॰भाग-पु सारखा वांटा, हिस्सा, पाती. ॰भाग-समभागी- वि. १ सारखा हिस्सा, वांटा, भाग असणारा; सारखा पातीदार. २ सारख्या प्रमाणाचे, आकाराचे, वजनाचे. ॰भाव-पु. १ सारखेपणा; समरूपता; साम्य; एकरूपता. २ बरोबरी; समता. ३ सारखा स्वभाव, वृत्ति, मनोधर्म, प्रकृति, घटना असलेला; साधर्म्य; प्रकृति-प्रवृत्तिसाम्य. -वि. १ सारखा; एकरूप; समवृत्ति; सारख्या स्वभावाचा. २ सहमत; सहकारी; सहोद्देशी. ॰भाररेषा-स्त्री. ज्या ठिकाणीं वातावरणाचा दाब सारखा असतो अशीं पृथ्वीवरील ठिकाणें दाखविणारी रेषा. ॰भुज- चौकोन-पु. ज्या चौकोनाच्या सर्व बाजू सारख्या असतात असा चौकोन. ॰भुजत्रिकोण-पु. ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू सारख्या असतात असा त्रिकोण. ॰मंडल-न. (ज्यो.) समवृत्त; खस्वस्तिक व पूर्व-पश्चिम बिंदू यांमधून जाणारें वृत्त ॰मात्र-वि. सारख्या वजनाचा, आकाराचा, मापाचा. ॰मिति-स्त्री. १ मध्यम माप; दोन मापांमधील काढलेलें मध्यम माप. २ मापाचा सारखेपणा. ॰मूल्यत्व-न. (रसा.) मूल द्रव्यांचा इतर मूलद्रव्यांशीं संयोग होण्याच्या प्रमाणांतील सारखेपणा. (इं.) ईक्वलव्हलेन्सी. ॰योग-पु. उत्तम योग; चांगला जुळून आलेला प्रसंग. 'ऐशिया समयोगाची निरुती ।' -ज्ञा ८.२२१. ॰रस-पु. ऐक्य; तादात्म्य; एकरूपता; ब्रह्मसारूप्य. 'म्हणे तुका समरशी मिळाला जर । तरी कोणासीं उत्तर बोलावें ।' 'तेथ अवभृत समरशीं । सहजें जहालें ।' -ज्ञा. ४. १३८. -वि. १ समतोल वृत्तीचा, प्रकृतीचा, स्वभावाचा; शांत; गंभीर; सुमनस्क. २ समानधर्मी; सारख्या स्वभावाचा, गुण- धर्मांचा, वृत्तीचा. ॰रसणें-अक्रि. १ ऐक्य पावणें; तादात्म्य पावणें; विलीन होणें; तल्लीन होणें. 'तदा महासुखासी सम- रसे तो ।' २ एक होणें; मिसळणें; विरून जाणें; पूर्णपणें एक- रूप होणें. 'जैसा लवणाचा पुतळा । समुद्रामाजीं समरसे ।' -ह २१.२७. 'अलंकारीं हेम समरसे ।' -यथादी २.१२५६. ॰रस्य-न. ऐक्यभाव. 'चित्तगुणी प्रवेशे । चित्तीं असती समरस्यें ।' -भाए ६८२. ॰रास-स्त्री. शेतांतील पिकांची अविभक्त रास; एकत्रित संपत्ति; एकत्र मालमत्ता, जिंदगी. ॰रूप-वि. सारख्या आकाराचे, आकृतीचे, रूपाचे. ॰रूप्य-न. आकारसादृश्य; आकृतीचा, ठेवणीचा सारखेपणा. ॰लंबचतु- र्भुज-पु. ज्याच्या दोन बाजू समांतर आहेत असा चौकोन. ॰वय-वयी-वयस्क-वि. सारख्या वयाचे, उमरीचे. ॰वर्ति- वि. समतेनें वागणारा, असणारा. ॰विषम-न. विसंगति; अप्र- योजकता. 'जो नावरे समें विषमें । चर्मचक्षूंचेनि चामें ।' -ज्ञा १८. ४०१. 'तेथ समविषम न दिसे कांहीं ।' -ज्ञा ८.१७. -वि. बरें- वाईट; अनियमित; योग्यायोग्य; सदोष. ॰वीर्य-वि. १ सारख्या गुणाचें; सारख्या तीव्रतेचें (औषध, वगैरे.) २ सारखे परा- क्रमी, प्रभावी, शूर. ॰वृत्त-न. (ज्यो.) सममंडल; खस्व- स्तिक व पूर्व-पश्चिम बिंदू यांमधून जाणारें वृत्त. (इं.) प्राइम- व्हर्टिकल. ॰शंकु-पु. (ज्योति.) समवृत्तावर सूर्य असतां पडणारी शंकुच्छाया किंवा त्याच्या अक्षांशत्रिज्या. ॰शीतोष्ण -वि. जेथें हवामानांत थंडी व उष्णता यांचें प्रमाण बहुधा सारखें असतें असा (प्रदेश). ॰शीतोष्णकटिबंध-पु. अयनवृत्त व ध्रुववृत्त यांमधील उत्तरेकडील व दक्षिणेकडील त्रेचाळीस अंशांचा पृथ्वीचा भाग. ॰शील-वि. सारख्या स्वभावाचे, प्रवृत्तीचे, वृत्तीचे; एकमेकांस अनुकूल. ॰समान-वि. १ अगदीं सारखा; तुल्य. 'तुकयाची समता जाण । शत्रुमित्र समसमान ।' २ हुबेहुब; एकरूप. ३ सपाट; सारखी; समतल. 'समसमान साधुनि भुई।' दावि २४.५०. ॰सरीवि. सारखे.'राव प्रधान समसरी । दोन पुत्र दोघांसी ।' -शनि २८६. 'प्रपंच परमार्थ समसरी । होय श्रीहरिकृपें ।' -ह २४.७६. [सम + सर] ॰सीम-वि. ज्यांची सीमा, मर्यादा सारखी आहे असे; एकाच ठिकाणीं संपणारे. [सम + सीमा] ॰सूत्र-न. (ज्यो.) समवृत्ताच्या ध्रुवबिंदूमधून जाणारें महावृत्त; क्षितिज. ॰स्थल- न. पटांगण; मैदान; सपाट जमीन; माळ. ॰स्थान-न. क्षिति- जाचा उत्तर किंवा दक्षिण ध्रुवबिंदु. ॰स्वभाव-वि. सारख्या वृत्तीचा; सारख्या प्रकृतीचा; सजातीय; सारख्या घटनेचा; समान गुणधर्मांचा.

दाते शब्दकोश

नांव

न. १ नाम अर्थ १, २ पहा. 'नांव तुजें नावचि या संसारांभोधिला तरायासी ।' -भक्तमयूरकेका ४०. २ (ल.) कीर्ति; ख्याती; लौकिक; पत; अब्रू; चांगलें नाम. 'सकल म्हणती नांव राखिले । वडिलांचे ।' -दा ३.४.१४. ३ दुर्लौकिक; डाग; कलंक; बदनामी; दुष्कीर्ति; नापत; (क्रि॰ ठेवणें). ४ भांड्यावर नांव घाल- ण्याचें कासारी हत्यार. -बदलापूर ९६. ५ नवरा बायकोनें उखाणा घालून घ्यावयाचें परस्परांचें नांव (क्रि॰ घेणें). [सं. नाम; हिं. नाओं; जुनें हिं. नाऊं; पं. सिं. नाउं; फ्रेंजि. नव; इं. नेम] (वाप्र.) ॰करणें-कीर्ति गाजविणें. ॰काढणें-नांव गाजविणें; प्रसिद्धीस येणें. ॰काढणें-कुरापत काढणें; कळ लावणें. ॰खारणें- उक्रि. (कों.) नांव घेऊन निर्देश करणें; नांवाचा उल्लेख करणें; नांव घेणें. ॰गांव विचारणें-माहिती विचारणें; सामान्य विचारपूस करणें. ॰जळो-भाजो-नांवास हळद लागो-तळतळाट किंवा शाप देण्याचा वाक्प्रचार. ॰ठेवणें व फोडणें-(बायकी) खेळांत एखाद्या वेळीं दोन मुलींस एकदम शिवल्याचा प्रसंग येतो तेव्हां डाव कोणी घ्यावा ह्याविषयीं तंटा होतो त्यावेळीं त्या दोन्ही मुली एकमेकांच्या संमतीनें नांवें बदलून ठेवतात, मग त्यांतील एखाद्या मुलीस आपलीं नांवें सांगून तीं त्यांतील कुठलें नांव मागेल तें तिला देऊन उरलेल्या नांवाच्या मुलीनें डाव घ्यावयाचा असतो. ॰ठेवणें-१ दोष देणें; व्यंग काढणें. म्ह॰ नांव ठेवी लोकाला शेंबूड आपल्या नाकाला = दुसर्‍याला ज्या दोषाबद्दल नांवें ठेवावयाचीं तोच स्वतांत असणें. २ जन्मलेल्या मुलाचें नामकरण करणें; ॰डहाळ होणें-(ना.) बदनामी होणें. ॰डाहार करणें-(व.) नांव बद्दू करणें. ॰डालणें-(परदेशी तेली) प्रेताच्या सारवलेल्या जागेवर केळीचें पान ठेवून त्यावर प्रत्येक मनुष्यानें मयताचें नांव घेऊन कालवलेल्या भाताचा घांस ठेवणें. -बदलापूर २६७. ॰धुळींत, मातींत, पाण्यांत इ॰ जाणें, मिळणें, पडणें-नांवावर पाणी घालणें पहा. ॰नको-तिटकारा, चिळस, द्वेष दाखविणारा शब्द. ॰न घेणें-अलिप्त राहणें; अंगांस संसर्ग न लागू देणें; दूर राहणें; नांव न काढणें. ॰नाहीं-नसणें-(विद्या, पैसा इ॰कांचा) पूर्णपणें अभाव असणें; नांव, निशाण, खूण कांहीं नसणें. बदलणें-नामोशी पत्करणें (प्रतिज्ञेच्या वेळीं योजतात). 'अमूक झालें तर नांव बदलून टाकीन.' ॰मिळविणें-वाद- विवाद, लढाई इ॰ मध्यें कीर्ति मिळविणें. ॰सांगणें-लावणें- घालणें-देणें-किंमत, शर्ती ठरविणें. ॰सांगणी-वाङ्निश्चयः कुणब्यांतील वधुवरांचीं व त्यांच्या मात्यापित्यांचीं नांवें जातीच्या सभेमध्यें जाहीर करून लग्न ठरविण्याचा समारंभ. ॰सोडणें- टाकणें-त्याग करणें; संबंध सोडणें; इच्छा न करणें. नांवाचा- १ खरा. 'मी तें काम करीन तरच नांवाचा.' २ नामधारी; केवळ नांवापुरता. 'मी जॉन्सनचा नांवाचा मात्र गुरु होतों, खरोखर पहातां तो माझ्याहून वरचढ होता.' -नि ३ चांगलें नांव लौकिक असलेला. नांवाची बोंब पडणें-वाईट गोष्टीला कारणीभूत होणें किंवा एखाद्या तक्रारीचा विषय होऊन बसणें. नांवानें घागर फोडणें-संबंध तोडणें; मेला असें समजणें. 'तियेचेनि नांवें फोडावी घागरी । नाहीं ते संसारी बहिणी म्हणे ।' -ब ४७० नांवानें पाणी तावणें, तापविणें-एखाद्याचा द्वेष करणें, किंवा मरण चिंतणें. नांवानें पूज्य असणें-पूर्ण अभाव असणें. 'विद्येच्या नांवानें जरी आवळ्या एवढें (पूज्य) म्हणतां येणार नांहीं तरी मासला तोच ।' -मधलीस्थिति. नांवानें बोंब मारणें, शंख करणें, खडे फोडणें-एखाद्या विरुद्ध बोभाटा, ओरड करणें. नांवानें भंडार उधळणें-स्तुति करणें. नांवानें शंख-पूर्ण अभाव असणें. नांवानें हांका मारीत बसणें-दुसर्‍यानें नुक- सान केलें अशी विनाकारण ओरड करीत सुटणें. नांवावर-१ नांवासाठीं-करितां-मुळें-खातर. २ (जमाखर्च) खात्यावर; नांवें. नांवावर गोवर्‍या फोडणें-घालणें-रचणें-एखाद्याचें वाईट करणें-चिंतणें; शाप देणें (गोवर्‍या प्रेतास जाळण्यास लागतात). नांवावर पाणी घालणें-कीर्तीवर पाणी सोडणें; चांगलें नांव, लौकिक बुडविणें. नांवावर विकणें-स्वतःच्या नुस्त्या किंवा दुसर्‍या-मोठ्याच्या नांवाचा फायदा घेणें, त्यावर नांव, प्रसिद्धि मिळविणें; खपणें. नांवास चढणें-कीर्तिमान होणें; लौकिक वाढणें. नांवास देखील नाहीं-शपथेस किंवा नांव घेण्यास देखील नाहीं. याच्या अगोदर 'ज्याचें नांव' हे शब्द जोडतात म्हणजे त्याचा अर्थ अगदीं मुळींच नाहीं असा होतो. 'यंदा पाऊस ज्यानें नांव पडला नाहीं.' ज्याचें नांव तें-(नांव घेण्यास अयोग्य अथवा अमंगल म्हणून ज्याचें नांव घेतलें नाहीं तो अथवा तें) जें पाहिजे असतें अथवा ज्याची आशा केलेली असते तें कधीं न देणार्‍या, करणार्‍या मनुष्य-वस्तू इ॰ संबंधीं योजतात. सामाशब्द- ॰कर-री-वि. १ कीर्तिमान; प्रसिद्ध; नावलौकि- काचा. 'वडिल नांवकर मल्हार ऐका गर्दी झाली त्यावरती ।' -ऐपो ३५८. २ दुसर्‍याचें नांव धारण करणारा; एकाच नांवाचा दुसरा नामधारी. ॰कुल-वि. (ना.) सगळा; एकूण एक. ॰ग्रहण-न. नांव घेणें; उल्लेख करणें; नामनिर्देश (क्रि॰ करणें; घेणें; काढणें). ॰ग्रहण टाकणें-सोडणें-नांव टाकणें पहा. ॰ग्रहण ठाऊक नसणें-नांवा गांवाची कांहींहि माहिती नसणें. ॰धारक-वि. नामधारक अर्थ २ पहा. ॰नट-वि. क्रिवि. पूर्णपणें नष्ट झालेला; बेचिराख झालेला; थांग, पत्ता, माग, खुण, अवशेष नसलेला. 'त्याची गाय गुराख्यानें नांवनट केली.' [नांव + नष्ट] ॰नांगर-पु. पेरणीच्या वेळीं प्रथम नांगर धरण्याचा व निवाड- पत्रांत निशाण्या करतांना प्रथम नांगराची निशाणी करण्याचा पाटील अथवा देशमूख यांचा मान. ॰नांव-वि. (ना.) नावकुल पहा. सबंध सगळा. ॰निशाण-न. सर्व वृत्तांत (कुल, नांव, गांव इ॰). ॰निशाण ठाऊक असणें-कुलशील परंपरा ठाऊक असणें. ॰निशी-स्त्री. १ नांवांची यादी. २ तींत दाखल केलेलें नांव. 'माझी नांवनिशी काढ' [नांव + फा. नविशी] ॰निशीवार- क्रिवि. नांवा बरहुकूम; नांवनिशींतील नांवांच्या अनुक्रमानें. (क्रि॰ घेणें; मागणें). ॰नेम-१ (फलज्यो.) नांवावरून राशी, गण, नक्षत्र इ॰कांची माहिती काढणें. २ अशी काढलेली माहिती. ॰बुडव्या-वि. स्वतःचा लौकिक, पत, किंमत घालविणारा (मनुष्य वस्तु). ॰र(रा)स-स्त्री. १ (फलज्यो.) जन्मकालीन नक्षत्राव- रून नांव ठेवणें किंवा व्यावहारिक नांवावरून नक्षत्रनाम काढणें. 'मग बोलाविले ज्योतिषी । भूमी पाहिली चौरासी । तव दक्षा- चिया नावरासी । घातचंद्र ।' -कथा ३.१०.९९. २ अशा तर्‍हेनें काढलेलें नांव, कुंडली इ॰ (क्रि॰ काढणें). ३ जन्मनक्षत्रावरून पहावयाचें वधूवरांचें राशी घटित; नांवावरून लग्न जमविणें. (क्रि॰ काढणें; पाहणें; ठरविणें). ॰राशीस येणें, उतरणें, जमणें- मिळणें-नांवांवरून वधूवरांचा घटित विचार केला असतां अनुकूलता येणें, कुंडलींवरून लग्न जमणे. [नांव + राशि] ॰रूपन. १ कीर्ति; अब्रू; पत. नांव अर्थ २ पहा. 'त्यानें त्या लढाईमध्यें नांवरूप मिळविलें.' 'माझें लपो असतेपण । नांवरूपाशीं पडो खंडन ।' २ सार्थक; योग्यस्थानीं विनियोग. 'विद्वानास पुस्तक दिलें असतां त्याचें नांवरूप होतें.' ३ नांव आणि आकार; व्यक्तित्व; स्वतंत्र, वेगळें अस्तित्व. 'जैसें समुद्रास मिळतां गंगेचें आप । तात्काळ निरसे नांवरूप ।' नांवलौकिक-पु. प्रसिद्धिः मोठेपणा; कीर्ति; ख्याति. ॰वार-क्रिवि. नांवाबरहुकूम; नांवनिशीवार पहा. ॰सकी-स्त्री. (कु) लौकिक; कीर्ति; प्रसिद्धि. ॰सता-वि. (कु.) प्रसिद्ध; नांवाजलेला; कीर्तीचा (चांगल्या व वाईट अशा दोन्ही अर्थीं योजतात). नांवानिराळा-वि. अलिप्त; अलग (वाईट नांवापासून); स्वतंत्र; विरहित. 'हा सर्व करून नांवानिराळा.' नांवारूपास आणणें-येणें-प्रसिद्धीस-मान्यतेस आणणें- येणें. नांवें-(जमाखर्च) खर्चाची बाजू; नांवानें; खर्चीं; खर्चाकडे. नांवावर पहा.

दाते शब्दकोश

गो

स्त्री. १ गाय. २ बैल (पशु). समासांत-गाईपासून झालेलें; गाईसंबधीं (दुध, चामडें, मांस इ॰). 'अगा गोक्षीर जरी जाहलें । तरी पथ्यासि नाहीं म्हणितलें ।' -ज्ञा २.१८४. [सं.] सामाशब्द- ॰कर्ण- ॰क्रण-न. १ मुलाला दूध पाजावयाचें (गाईच्या कानाच्या आकाराचें) बोंडलें. २ एक वेल व तिचें फूल. ३ बारा ज्योतिर्लिंगांपैकीं एक. हें कुमठें (कानडा जिल्हा) तालुक्यांत आहे. ४ (तजा.) दांड्याचें सारपात्र; कावळा. याचा आकार गोकर्णासारखा असतो. -पु. गाईचा कान. गोकर्णांत येणें- संपुष्टांत, गाकुळांत येणें; संपणें; दरिद्री होणें. गोकर्णिका- कर्णी-स्त्री. एक प्रकारचा लगाम. गोकर्णी-स्त्री. एक वेल, हिचीं फुलें (पांढरीं, निळीं) गाईच्या कानासारखीं असतात. [सं.] गोकु(कू)ल ळ-न. १ श्रीकृष्णाच्या लहानपणच्या वसतीचें गांव. २ गोकुळाष्टमीस नंद, यशोदा, गोप-गोपी, गाईवासरें इ॰ ची पूजा करण्यासाठीं केलेलीं मातीचीं चित्रें. ३ (ल.) स्वैरसं- भोग; व्यभिचार. (क्रि॰ माजविणें). [सं. गा + कुल] गोकु ळांत येणें-१ संकोचित होणें; संपुष्टांत येणें; संपणें. २ आटा- क्यांत येणें (व्यवहार). [विश्वव्यापी कृष्णपरमात्मा ज्याप्रमाणें गोकुळाच्या मर्यादेंत आला त्याप्रमाणें] गोकुळाष्टमी-स्त्री. श्रावण वद्य अष्टमी; या दिवशीं भगवान् श्रीकृष्णाचा जन्म झाला. [सं.] गोकुळासारखें घर-न. मुलाबाळांनीं सुखसंपत्तीनें भरलेलें घर. गोकोश-पु. जमीन मोजण्याचें एक माप: गायीच्या हंबरण्याचा टप्पा; गोरुत; दोन कोसांचें अंतर. गोखडी-स्त्री. गाई उभ्या राहण्याची जागा; गोठण. 'गिलच्यानीं गोखडींत दहा-पांच बैरागी सत्पुरुष होते तेहि बसले ठिकाणीं लबे कले.' -भाब २८ गोखमा-पु. १ गुराखी. २ (ल.) गांवढळ खेड- वळ; शेत्या; नांगर्‍या. गोखरें, गोखोण-रेब/?/-न. (कों) गुरांनीं खाऊन शिल्लक राहिलेलें गुरांच्या पायाखालचें. निरुपयोगी गवत. 'केळीला गोखरेडाचें खत चांगलें [गौ + खूर] गोखाना- पु. १ सरकारी किंवा एखाद्या मोठ्या माणसाचा गायवाडा; गुरांचें खातें. २ गायठाण; गोठा. [सं. गो + फा. खाना] गोग्र- हण-न. गाईचें हरण, चोरी. 'उत्तरगोग्रहण.' 'तृवां गोग्रह- णाचेनि अवसरें । घातलें मोहनास्त्र एकसरें ।' -ज्ञा ११.४६९. [सं.] गोग्रास-पु. १ जेवण्यास बसण्यापूर्वीं गायीसाठीं राखन ठेवलेला अन्नाचा नैवेद्य. २ गाईसाठीं भिक्षा. [सं.] गोचर-न. गुरचरण; गुरचराई. [सं.] गोचर्म-न. १ गाईच कातडें. २ (ल.) जमीन मोजण्याचें एक माप. गाईच्या चामड्याइतकी जमीन; (गाईच्या कातड्याची वादी काढून तिनें वेष्टिलेली जमीन एका माणसानें राजापासून मागून घेतल्याची एक जुनी गोष्ट आहे तिच्यावरून) तीनशें फुट लांब व दहा फूट रुंद या मानाचें क्षेत्र (यांतील धान्य एका माणसास एक वर्ष पुरतें असा हिशोब आहे). [सं.] गोजरूं गोजी-नस्त्री. (प्रेंमानें किंवा तिरस्कार करतेवेळीं योजना) कालवड; वासरी. गोजिव्हा-स्त्री. एक वनस्पति; गोजबान पाथरी; दवली. [सं.] गोठ(ठा)ण-स्त्रीन,. दुपारीं सावलीसाठीं पाण्याजवळ झाडाखालची बसण्याची गुरांची आखर. जागा; गोठा. 'पशु पीडती पर्जन्यें । गळती गाईंची गोठणें ।' -मुसभा ३.७९. [सं. गोष्ठ, गोस्थान म्ह॰ गोठणीच्या गाई माभळभट दान घेई. = हलवायाच्या घरांवर तुळशीपत्र. गोठण घालून बसणें-सभेत अस्ताव्यस्त बसणें. गोठा-ठो-पु. गुरें बांधण्याची जागा; जना- वरे रहाण्याची जागा. [सं. गोष्ठ; प्रा. गोट्ट] गोठापाणी-न. सकाळीं गोठा झाडणें. गुरांच शेण, मूत काढणें इ॰ गोठ्यांतील व्यवस्थेचें काम गोठाव(वि)णें-सक्रि. गोठणांत गुरें जमविणें; गोठ्यांत गुरें घालणें. गोठी-स्त्री. (कों.) वासरांचा लहान गोठा. गोठ्यौचें-क्रि. (गो.) पशूंचें बसणें. [गोठा] गोथवड-स्त्री. (कों.) गुरांची दावण, ठाण; लांब पडळ; कोटंबा. [सं. गोष्ठ- वत्] गोदंती हरताळ-स्त्री. पिवळा हरताळ. गोदण-स्त्री. (बे.) गुरापुढें वैरण टाकण्याची जागा. [गवादणी] गोदन- न. (माण.) लहान गोठा. गोंदरड-स्त्री. (राजा.) गोठ्यांतील केरकचरा, घाण. गोदान, गोप्रदान-न. ब्राह्मणास गाईचें दिलेलें दान. 'प्राचीन काळीं गाय दान मिळणें सोपें होतें, पावली मिळणें कठीण, पण हल्लीं चार आण्यांत गोप्रदान.' -गांगा १४४. गोदान-न. सोळा संस्कारांपैकीं व समावर्तनाच्या वेळीं करावयाचा एक संस्कार. [सं.] गोधन-न. गुरढोरे किंवा त्यांच्या रूपानें संपत्ति. 'धन्य तीं गोधनें कांबळी काष्ठीका ।' -तुगा २०८. गोधूल मुहूर्त, गोंधळिक, गोंधुळूक-पुन. १ सायंकाळचा (गुर रानांतून परत घरी येत असतां त्यांच्या) चालण्यानें उडालेली धूळ दिसते तेव्हांचा) काळ. २ सुर्यास्ता- पूर्वींची व नंतरचीं ३० पळें यामधील काळ; हा लग्नास शुभ मान- तात. गोरज मुहूर्त. गोधूल लग्न-न. १ गोरज लग्न. गोधूल पहा. २ सूर्यास्तसमयीं उदय पावणारी राशी, लग्न. गोधूलिक-वि. गोधूलसंबंधीं (कार्य. लग्न-मुहूर्त). गोधूळ-ळी-स्त्री. गोधूल पहा. गोप-पु. गुराखी, गवळी जात. व तींतील एक व्यक्ति. 'पूजिति सांग नगा ती रीति । सुखाचीच गोप सांगन गाती ।' -मोकृष्ण २४.७. गोपचार-पु. गायरान; गोचरण. गोपद-न. १ गाईचें पाऊल. २ गाईच्या पावलाचा मार्ग, खूण. ३ आंत पाणी भरलेली गोपदाची खूण, डबकें. गोपद्म-न. चातुर्मास्यांत रांगो- ळीनें गाईचीं पावलें नववधू काढतात व पूजा करतात तें. गोपद- चिन्ह. [सं.] गोपवाडा-पु. गवळीवाडा. ' जो नांदवी उत्कट गोपवाडे ।' -सारुह १.७८. गोपाल-ळ-पु. १ गुराखी; गुरें पाळणारा. २ राजा. ३ भगवान श्रीकृष्ण. ४ एक जात व तींतील व्यक्ति; डोंबारी; हे मनगटानें दगड फोडतात, मोठालीं वजनें उचलतात व कसरतीचे खेळ खेळतात, हें गांवकर्‍यांचीं गुरें राखो- ळीला घेतात. -गांगां १२२. गोपाष्टमी-स्त्री. कार्तिक शुद्ध अष्टमी या दिवशीं त्यांची व गाईची पूजा करतात. गोपाळकाला-पु. गोकुळअष्टमीच्या उत्सवाच्या व श्रीकृष्णाच्या इतर उत्सवाच्या शेवटीं करावयाचे खेळ, द्यावयाचा प्रसाद,जेवण इ॰; गोकुळा- ष्टमीच्या पारणेच्या दिवशीं दहीहंडी फोडून तींतील प्रसाद वाट- तात तो. गोपाळखेळ-पु. गोपाळ लोकांची कसरत, खेळ; डोंबार्‍यांचा खेळ. गोपाळीं-क्रिवि. गोरजीं; गोधूललग्नीं. गोपिका, गोपी-स्त्री. गोपालस्त्री; गवळण. 'तुझे कथिति गोपिका विविध तीस बोभाट ते ।' -केका ८६. [सं.] गोप्र- दान-१ गोदान पहा. २ (थट्टेने) शिव्या. 'त्यानें त्यास गोप्र- दानें केलीं.' गोप्रसव-पु. कुनक्षत्रीं जन्मलेलें मूल गाईच्या तोंडापुढें धरतात व असें केल्यानें तें गाईचें मूल होऊन अशुभा- पासून मुक्त होतें, अशा मुलाला म्हणतात. गोप्रसवशांति-स्त्री. कुयोगीं जन्मलेलें मूल गाईच्या मुखांतून जन्मलें अशी भावना धरून कुयोगदोषनाशार्थ करावयाची शांति. गोब्राह्मण-पु. १ गाय आणि ब्राह्मण. २ (ल.) अगदीं साधाभोळा, गरीब ब्राह्मण. गोमय-नपु. गाईचें शेण. 'शुद्ध करूनिया गोमय गोळा । मृति- काकण विरहित ।' [सं.] गोमाशी-स्त्री. घोडे, गाई इ॰ च्या अंगावरील एक मोठी माशी; माशीची एक जात. गोमांस-न. गाईचें मांस; शपथेसारखा किंवा निषेध दाखवीतांना याचा उपयोग करतांत. कारण हिंदूंना गोमांस अगदीं निषिद्ध आहे. 'ही तुमची ठेव मला गोमांसाप्रमाणें आहे.' गोमुख-न. १ तीर्थ इ॰ पवित्र पाणी खालीं पडण्यासाठीं बांधलेलें किंवा बनविलेलें दगडी किंवा धातूचें गाईचें तोंड. २ एका प्रक्रारचें गाईच्या तोंडासारखें वाद्य.'तों वाद्यें शंखभेर्यादी पणवानक गोमुखें ।' -वामन गीतासमश्लोकी १.१३. गोमुखव्याघ्र-पु. १ दिसण्यांत गाई- सारखा सौम्य पण अतिशय क्रूर असा वाघ. २ गाईचें कातडे पांघ- रलेला लांडगा. ३ (ल.) वरून गरीब पण आंतून लुच्चा माणूस. [सं.] गोमुखी-स्त्री. गाईच्या तोंडासारखी काटकोनी जपमा- ळेची पिशवी; हिच्या आंत हात घालून जपाची माळ ओढतात. 'काय मौन धरुनिया गोमुखिला जाळिसी ।' -राला ८७. -पु. (कों.) एक प्रकारच्या नवसांत नियम केल्यामुळें हात न लावतां तोंडानें अन्न उचलून जेवणारा माणूस [सं.] गोमूत्र-न. गाईचें मूत; हे पवित्र मानतात व अपवित्र वस्तूंवर शिंपडून त्या पवित्र करतात. गोमूत्रिका, गोमूत्रिकन्यायगुणाकार-पु. (ज्यो.) गुणाकराचा एक प्रकार. गोमुत्रिकाबंध-पु. काव्याचा एक प्रकार याच्या द्वितीय चरणांत पहिल्या चरणांतील बहुतेक अक्षरें येतात. गोमूत्रवायु-पु. एक नवयुक्त वायु. (इं) आमोनिया. गोमेघ- पु. ज्यामध्यें गाय मारतात तो यज्ञ. [सं.] गोरखी-पु. गुराखी; गुरें (गाई) पाळणारा. 'कवळाचिया सुखें । परब्रह्म झालें गोरखें ।' -तुगा १८१. गोरज पु. गाईची धूळ. गोधूल पहा. 'गोरजें डवरला, मुखचंद्र ।' -ह १८.६३. गोरजमुहूर्त-गोधूलमुहूर्त पहा. गोरस-पु. गाईचें दूध, दहीं, तूप इ॰ गाईपासून होणारे पदार्थ. [सं.] गोरक्ष-रक्षक-पु. १ गुराखी. २ गुरांची रक्षक देवता. ३ नाथपंथांतील गोरखनाथ नांवाची एक प्रसिद्ध व्यक्ति गोरख-गोरखनाथ पहा. गोरक्षण-न. कसायापासून गाय वांच- विणें; गोपालन. गोरा-र्‍हा-पु. गाईचा पाडा, खोंड; धांडा. गोरुव-न गोवत्स. गोरूं, गोरवा, गोरें-न. (राजा. गो.) ढोर, गुरूं, 'गोरु खडबडी बाहिरी ।' -भाए ३९४. गोरो- चन-ना-नस्त्री. गोवर्धन; हें गोमूत्रापासून किंवा कुपित्थाच्या रूपानें गाईच्या ओकण्यापासून, किंवा गाईच्या डोक्यांत उत्पन्न होतें याचा रंग पिवळा. हें रंग, चित्रें औषधें यांत उपयोगी आहे. 'गोरोचनापरिस गौर असें गणावें ।' -र. ६. (लोक समजूत अशी कीं वाजीकरण किंवा स्त्रियांस मोहविण्यांत गोरो- चनाचा उपयोगी होतो). [सं.] गोवंड-डी, गोवडी-पुनस्त्री. जंगल किंवा डोंगरावरील जनावरांची चरण्यास जाण्याची पाऊ- लवाट; गायवाट.[सं. गोवर्तनी] गोवंडास लागणें-येणें- सरळ रस्त्यास लागणें; चालीस लागणें (माणूस, काम). गोवत्स- पुन. गाईचें वांसरूं. गोवत्स द्वादशी-स्त्री. आश्विन वद्य द्वादशी; या दिवशीं गाईची पूजा करितात. गोवपा-स्त्री. गाईच्या आंत- ड्यावरील आवरण; सामान्यतः गाय, बैल यांच्या चरबीस व हाडांतील मगजासहि म्हणतात. [सं.] गोंवर-पु. १ शेणी; न थापलेलें वाळलेलें शेण, वाळलेल्या शेणाचा चुरा. २ गाईनें खाल्यानंतर उरलेला चारा, गळाठा. ३ (कों.) राब. ४ (हेठ.) उकि- रडा. [सं. प्रा. गोवर] गोवरर्कोडा-पु. गोठ्यांतील केरकचरा; शेणमूत. गोवरी-स्त्री. १ वाळलेल्या शेणाची थापडी; शेणी; गोवर अर्थ १ पहा. २ (कु.) शेणखत. ३ राब भाजण्यासाठीं वाळविलेला शेणगोळा. गोवरीची आग-स्त्री. गोवरी जाळली असतां वर राख दिसते परंतु आंत विस्तव असतो यावरून गुप्त परंतु भंयकर वैर. गोवर्‍या मसणांत जाणें-वृद्धपण येणें. मरण जवळ येणें; वय होणें. गोवर्धन-पु. १ मथुरेजवळील टेकडी; इंद्रानें पाडलेल्या पावसापासून गोकुळाचें रक्षण करण्यासाठीं श्रीकृष्णनें याला करंगळीवर धारण केलें व याच्या खालीं गोकु- ळांतील सर्व माणसें आणि पशू सुरक्षित राहिलें. २ कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या (बलिप्रतिपदेच्या) दिवशीं भात, शेण, भाजी- पाला इ॰ चा वल्लभसंप्रदायी लोक गोवर्धनासारखा पर्वत करून त्याची पूजा करतात तो. -न. १ गोरोचन. २ महाराष्ट्रांतील एक प्राचीन राष्ट्र हल्लींच्या नाशिक जवळच्या भागांत हें असावें. ॰ब्राह्मण-पु. एक महाराष्ट्रीय ब्राह्मण जात. गाईच्या तोंडें गोवर्धन निवडणें-पंचाईत इ॰ प्रकरणीं ज्याचा विषय त्याच्याच तोंडानें निवाडा करणें. गोवळ, गोवळगोठा-पु. (कों.) गोशाला; गायवाडा; गोठा. गोवळ, गोवळा, गोवाळ- ळी-पु. १ गुराखी; गवळी. ' उगला राहे न करी चाळा । तुज किती सांगों रे गोवळा । -तुगा १२९. २ (राजा.) वयानें मोठा पण पोरकट माणूस; दुधखुळा (निंदार्थीं). [सं. गोपाल; प्रा. गोवाल] गोवारी-पु. गुराखी; गवळी. 'तव गाई आलिया रात्रीं । कच नाहीं आला गोवारी ।' -कथा १.५.८२. गोवाल- पुअव. गंगावन; गाईच्या शेंपटीचे केंस.[सं.] गोवेल-पुस्त्री. एक वेल; ही गुरांना विषकारक असते म्हणतात; भारे बांधण्याच्या कामीं हिचा उपयोग होतो. गोवैद्य-पु. गाईचा वैद्य; गुरांचा वैद्य; पशुवैद्य. गोशत-न. १ शंभर गाई. २ शंभर गाई दान देण्याचें कर्म. [सं.] गोशाला-ळा-स्त्री. गोखाना; गोठा पहा. गोष्ठ-पुन. गोठा. गोष्पद-न. १ गाईचें पाऊल, पावलाचें चिन्ह. २ गोवंडी. ३ गोपदाइतकें माप; गाईच्या खुराखालीं समावेश होईल इतकी जमीन. ४ चिखलांत उमटलेलें वं पाण्यानें भरलेलें गाईचें पाऊल. 'गज गोष्पदीं बुडाला हा दैवा सिंधु शोषिला मशकें ।' -मोद्रोण १.२३. 'गोष्पद मानुनि दिनांत शतदां यमुना वोलांडिली । ' -राला ८१. गोष्पदोपम-वि. गोष्पदाप्रमाणें (४) ओलांडून तरून जाण्यास सुलभ; सहजसुलभ; क्षुद्र; सुगम. 'ईश्वरभजन केलें असतां भव गोष्पदोपम होतो.' गोस्फुरण- न. गाईचें अंग थरारणें, गाईनें भोंवरा करणें. [सं.] गोहण- स्त्री. गव्हाण पहा. गाताडी. गोहन-न. (व.) गाईंच्या कळप. [गोधन] गोहण्या-पु. (व.) गुराखी. गोहत्त्या -हनन- स्त्रीन. १ गाईचा वध. २ गोवधाचें पातक. गोहरा-गोहोरा- पु. गोर्‍हा पहा. म्ह॰-'गोहर्‍याच्यानें शेत पोराच्यानें संसार होता तर मग काय?' गोहोत-न. (राजा.) १ दाणा, कोंडा, पेंड इ॰ गुरासाठीं शिजविलेलें आंबोण, मिश्रण. २ (ल.) घोंटाळा; खिचडी; गोंधळ. गोक्षुर-पु. १ गोखरू; सराटा. २ गाईचा खूर. ३ गाईची पाऊलवाट; गोवंडी. [सं.]

दाते शब्दकोश