मराठी बृहद्कोश

तेरा मराठी शब्दकोशांमधील ३,००,८७५ शब्दांचा एकत्रित संग्रह

शब्दार्थ

दर्शक

दर्शक darśaka a (S) That exhibits, shows, points out. 2 In algebra &c. Index or exponent. 3 That sees or beholds. 4 One conversant with any science or art; a savant or connoisseur.

मोल्सवर्थ शब्दकोश

दर्शक a That exhibits, shows or points out. That sees. (In Algebra) Index or exponent.

वझे शब्दकोश

वि. १ दाखविणारा; सांगणारा. २ (बीजगणित) घात- प्रकाशक. ३ पाहणारा; प्रेक्षक; परीक्षक. ४ शास्त्र, कला इ॰ चा ज्ञाता; तज्ज्ञ; मर्मज्ञ. [सं.] ॰सर्वनाम-न. नामाच्या मागें येणारा नामाचा निदर्शक शब्द; हा; तो. जसें:- 'हा घोडा चांगला आहे.' 'तो मनुष्य चालतो आहे.'

दाते शब्दकोश

दर्शक      

वि.       १. दाखविणारा; सांगणारा. २. (बीजगणित) घातप्रकाशक. ३. पाहणारा; प्रेक्षक; परीक्षक. ४. शास्त्र; कला इ. जाणणारा; तज्ज्ञ; मर्मज्ञ. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दर्शक सर्वनाम      

नामाच्या मागे येणारा नामाचा निदर्शक शब्द, हा; तो. उदा. ‘हा घोडा चांगला आहे.’ दर्शन      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दर्शक सर्वनाम

(सं) न० व्याकरणसंज्ञाविशेष.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

संबंधित शब्द

पासून

शअ. १ (परिगणना करतांना) विशिष्ट काल धरून; नंतर 'त्या दिवसापासून मी घरीं आहे.' २ (गति किंवा अंतर सांगतांना) विशिष्ट स्थळ धरून. 'पुण्यापासून मुंबई एकशें एकोणीस मैल आहे.' ३ उत्पत्तिदर्शक. 'ह्या झाडापासून फळ होतें.' ४ (गमन दर्शक अव्यय) कडून. 'मी त्यापासून आलों.' ५ वियोग दर्शक अव्यय. 'त्यानें ह्यापासून रुपये नेले.' ६ साधन-कर्तृत्व दर्शक; कडून: 'हें भांडें मजपासून फुटलें' (म्हणजे माझ्या हातून फुटलें). ७ (गमन मार्गदर्शक अव्यय) बाजूनें; जवळून. 'तो आमचे गांवापासून गेला.' ८ सान्निध्य, संबंध इ॰ दर्शविणारें अव्यय. ९ (तरतमभावदर्शक अव्यय) पेक्षां. 'वज्रा पासुनी कठीणे ।' -उषा ७०३. 'दुजा ऐसा कोण बळी आहे आतां । हरि या अनंता पासूनियां ।' -तुगा ३०७. [सं. पार्श्व; प्रा. पास + हून, ऊन प्रत्यय]

दाते शब्दकोश

हां

उद्गा. १ मान्यता, कबुली, रुकार इ॰ दर्शक अव्यय; होय. 'जाशील का म्हणून विचारलें तेव्हां हां म्हणालास आतां कां नाहीं म्हणतोस.' २ अकल्पित आनंद, थोडें आश्चर्य, समाधान इ॰ दाखविण्याचें अव्यय. 'हां ! आतां श्लोक लागला.' 'हां गा सुर्य काय शिळा ।' -ज्ञा १०.२०२. ३ दुःखोद्गार, वेदना- दर्शक उद्गार. हाय ! (क्रि॰ म्हणणें). ४ इषारा देणें, सावध करणें, जागें करणें, धमकीं देणें इ॰ अर्थीं उद्गार. 'हां ! खबर- दार पुढें बोललास तर.' 'तंव सात्यकी बोलिला । हां गा अ/?/ शिशुपाळा ।' -शिशु ८६४. [ध्व.]

दाते शब्दकोश

शक्त

स्त्री. सामर्थ्थ; बल; पराक्रम; जोर; ताकद; (प्र.) शक्ति पहा. -वि. १ समर्थ; कार्यक्षम; योग्य; लायक; तरबेज. 'हरी भक्त तो शक्त कामास मारी ।' -राम ८७. २ पराक्रमी; प्रबल; शक्तिमान. 'शक्त नामचि तुझें रघु-राया ।' -(वामन, नामसुधा नवनीत पृ ९१). ३ (व्या.) सूचक; दर्शक; विशेष अर्थ- दर्शक; (शब्द, वाक्यप्रचार); संज्ञीक. [शक्-योग्य, समर्थ होणें]

दाते शब्दकोश

spectro-scope, direct vision

सरल दर्शक वर्ण (पट) दर्शक

वास्तव शास्त्रीय परिभाषा (पुणें विद्यापीठ मराठी परिभाषा समिती, १९६१)

सरल दर्शक स्थिर अपगमन

वास्तव शास्त्रीय परिभाषा (पुणें विद्यापीठ मराठी परिभाषा समिती, १९६१)

कार्य

न. १ काम; उद्योग; कृति; क्रिया. 'तया नांव धनंजया । कार्य पैं गा ।' -ज्ञा १३.९६९. २ परिणाम; क्रिया; योग. 'जे कार्य ना कारण ।' -ज्ञा १५.७८. 'चुन्यावर आसिडाचें कार्य झाल्यास कार्बानिक आसिड वायु बाहेर पडतो.' -पदाव ११. 'तो कार्यावर दृष्टि देतो.' ३ समारंभ; उत्सव. उ॰ लग्नकार्य. ४ (व्या.) विभक्तीचीं रूपें; विकार. ५ फिर्याद; खटला; मुकद्दमा. ६ (वेदांत) अकरा इंद्रियें व पांच विषय. (आनंदगिरीचें मत). ७ (वेदांत) शरीर (पंच ज्ञानेंद्रियें, त्यांचे पांच विषय, मन, बुद्धि व अहंकार). (शांकरभाष्य भगवद्गीता १३.२०.) -वि. करण्यास योग्य. (वाप्र.) ॰उठणें-काम पार पडणें. 'असें झालें असतां... किती कार्यें उठणारीं आहेत पहा!' -नि ४४०. ॰उरकणें-१ काम पार पाडणें. २ (ल.) रतिसंभोग करणें. कार्यावर दृष्टि देणें-आपल्या ध्येयाचा ध्यास घेणें; आपला उद्देश सिद्ध करण्याकडे लक्ष देणें; काम साधणें. -स लावणें-योग्य कामीं उपयोग करणें. 'त्यानें आपला पैका कार्यास लावला.' सामाशब्द:- ॰कर्ता-वि. १ लोकांचीं कामें करण्यांत तत्पर. २ स्वतःच्या हिमतीवर काम तडीस नेणारा. ॰कारणन्याय-पु. हेतु व परिणाम यांच्या संबंधाचा नियम. [सं.] ॰कारणभाव-पु. फल व तदुत्पादक क्रिया यांचा संबंध. 'ज्या दोन गोष्टींचें आनुचर्य दुसर्‍या कोणत्याहि गोष्टीवर अवलंबून नसतें त्या दोहोंत कार्यकारणभाव असतो.' -न्याप ३४. 'घटाचा आणि मृत्तिकेचा कार्यकारणभाव आहे.' ॰कारी-वि. कार्य करणारा; ब्यापर करणारा; तटस्थ नव्हे तो. ॰कुशल-वि. धंद्या मध्यें चतुर, कल्पक. ॰क्रम-पत्रिका-स्त्रीपु. सभेंत व्हावयाचें काम व त्याचा अनुक्रम दाखविणारा कागद. -सभा ७१. (इं.) अजेंडा. ॰त:-क्रिवि. कांहीं कारणासाठीं, उद्देशामुळें. ॰तत्पर-वि. कार्यांत निमग्न. ॰दर्शक दिशा-स्त्री. (यंत्रशास्त्र) प्रेरणा ज्या दिशेंत कार्य करते ती दिशा. -यंस्थि ४. ॰दर्शक बिंदु-पु. (यंत्र- शास्त्र) प्रेरणेचें कार्य ज्या बिंदुस्थळीं होतें तो बिंदु. -यंस्थि ४. ॰प्रयोजन-न. विवाह, मुंज वगैरे समारंभ किंवा सण यांना व्यापक संज्ञा. ॰भाग-पु. १ काम किंवा पत्करलेलें अंगावर घेत लेलें कार्य; करावयाचें काम; साधावयाचा उद्देश. (क्रि॰ करणें; उरकणें; उचलणें; लोटणें.) २ कामाचा अंश, भाग. ॰भार-पु. १ अंगावर घेतलेलें कामाचें ओझें; जबाबदारी; जोखीम. २ काम; व्यवस्था; कारभार. [सं.] ॰लोभी-वि. कार्यसाधु; काम साधून घेणारा. 'न घालिन भिडेस मी जरिही कार्यलोभी तिला ।' -केका १०. ॰वादी-वादु-साधु-वि. कोणीकडून तरी आपलें कार्य साधण्यासाठीं गोड बोलणारा. ॰वाह-ही-पु. व्यवस्था- पक; जबाबदारीनें कार्य करणारा; संस्थेचा चिटणीस वगैरे. ॰व्यग्र-व्याकुळ-व्यावृत्त-वि. हातांत घेतलेल्या कामानें बेजार झालेला; अडचणींत आलेला; वेढलेला. ॰शरीर-न. कारणशरी- राच्या अनुषंगानें योजावयाचा शब्द; स्थूल शरीर. ॰संपादन- साधन-न. कामाचा उरक; काम तडीस नेणें; काम साधणें, सफल करणें. ॰सिद्धि-स्त्री. शेवटास नेलेलें काम; फलसिद्धि; कामाची पूर्णता. ॰क्षम-वि. काम करण्यांत हुषार; निपुण; प्रवीण; कामाला प्रसंगीं उपयोगी पडणारा; काम करण्यास समर्थ, योग्य. [सं. कार्य + क्षम = समर्थ]

दाते शब्दकोश

ऊं

उद्गा. १ (प्रश्नार्थी) काय ? असें कसें? २ (असंमति- दर्शक) अं: ? ३ (अवमानार्थी) थूः हट् ! वा ! शूः ! 'ऊं: ? तो काय मूर्ख आहे.' -मृ २०. ४ असें? अँ ! असावधपणामुळें गोष्ट घडल्यानंतर ती स्पष्ट ध्यानांत आली असतां निघणारा उद्गार. [हिं. पं. गु. जू; जि. जुव]

दाते शब्दकोश

अधिक चिन्ह      

न.       १. (ग.) बेरजेची क्रिया दर्शविणारे ‘+’ हे चिन्ह. २. आरोग्यसेवा दर्शक चिन्ह. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अधिकारवस्त्र      

न.       विशिष्ट अधिकाऱ्याने कार्यालयात घालायची अधिकार दर्शक विशिष्ट वस्त्रे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अःअः

उद्गा. हाः ! हाः ! आनंद, खेद या विकाराचा दर्शक ध्वनि. 'अः अः तव भजना विसरलों ।' -दावि ७६.

दाते शब्दकोश

आकाशमापक      

पु.       (शाप.) वातावरणातील शीतोष्णता मापणारे यंत्र; किरणविसर्जन दर्शक यंत्र.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आळ

न. किंमत, वजन, माप दर्शक चिन्ह. अळें पहा. [का. आळि = वर्तुळ]

दाते शब्दकोश

आमेन

उद्गा. (ख्रि.) तथास्तु; आमीन पहा. 'पाद्रीसाहेब जें जें सांगतील त्यास आमेन् या एक्या पदानेंचा उत्तर करावयाचें हीच कां धर्मनिष्ठा.' -नि ८७६. 'तेव्हां सर्व लोकांनी आमेन म्हणावें.' -अनु २७.१५. -वि. १ स्थिर. -प्रका ३.१४. २ सत्य; बायबलमध्यें ख्रिस्ताच्या प्रवचनांत या शब्दांचें भाषांतर सत्य, सत्य (व्हेरिली, व्हेरिली) असें केलें आहे. -पु. १ येशू ख्रिस्ताचें एक नाव. २ संमति, समाप्ति दर्शक शब्द. -गण ५.२२. -नेह ५.१३. -स्तोसं १०६. ४८. [हिब्रू. ग्री. लॅ. इं. आमेन; अर. अमीन]

दाते शब्दकोश

आणि      

उअ.       आणखी; व; शिवाय; आणिक. १. दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्ये अर्थाच्या दृष्टीने जोडणारे अव्यय. २. असंभवता दर्शक उपयोग करताना कर्त्यानंतर वापरतात. उदा. टिळक आणि सरकारची माफी मागणार? शक्यच नाही ! ३. भरभर बोलताना आणि चे ‘अन्’ किंवा ‘न’ असे रूप होते.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अनुयोज्य पटल      

न.       (भौ.) दर्शक भिंगाचे छिद्र लहानमोठे करण्यासाठी असलेला पातळ, अपारदर्शक, पट्टीचा पडदा. हा एका गोल कड्याने फिरवता येतो. त्यामुळे मध्यवर्ती छिद्राचा व्यास लहानमोठा करता येतो. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अफसोस

पु. १ शोक; दुःख. 'नबाबांनीं ऐकोन बहुत अफ्सोस केला.' -रा ७.१४२.२ (ल.) पश्चाताप. ३ उद्गा. दुःख- दर्शक उद्गार; अरेरे,! हायहाय! 'अफ्सोस! प्रत्यक्ष आमच्या शत्रूकडे!' -स्वप २२५. [फा. अफ्सोस् = शोक. तुल॰ सं. अप + शुच् (शोक करणें)]

दाते शब्दकोश

अश्व

पु. घोडा. एक चतुष्पाद प्राणी; हा मनुष्यास बसाव- याचे व गाडी वगैरे ओढण्याचे उपयोगास येतो. [सं. अश्व (अश् = व्यापणें; अ = नाहीं + श्वन् = कुत्रा?). झेंद अश्प; फा. अस्प; ग्री. इप्पॉस; लॅ. इक्कस; लिथुआनि. अस्झ्व; ओल्ड आयरिश इश]. ॰क्रांत(स्थान)-न. (नृत्य) एक पाय समस्थित ठेवणें, दुसरा पाय अग्रतलसंचर करून पाय अंगठ्यावर टेंकून दुसर्‍या पायाजवळ ठेवणें. अडखळणें, वस्त्र उचलणें, झाडाच्या फांद्या ओढणें वगैरे दर्शक हें स्थान आहे. ॰खाद्य-न. हरभरा; घोडखाद्य; अश्व्जीवन ॰गति-स्त्री. स्त्री. घोड्याची चाल-गति. ॰गंधा-ह्या झाडाच्या काद्यांस आस्कंद म्हणतात. ही फार पौष्टिक औषधि आहे. यास आस्कंद, अजगंध, ढोरगुंज अशीं निरनिराळीं नांवें आहेत. हें झाड खानदेश, नाशीक, वर्‍हाड आणि घाटावर आढळतें. उंची दोन फूट. झाड ४।५ वर्षें जगतें. पानें कोरांटीसारखीं असतात. हरभर्‍याएवढीं लाल फळें येतात. पाक धातुपौष्टिक आहे. इतर अनेक रोगांवर याचा पाक गुळवेलीचें सत्व व मध यांबरोबर देतात. ॰गुण-पु. १ घोड्याचा गुण-धर्म. २ घोडयाचा विशेष-सुलक्षण-उत्कृष्ट गुण. ॰गुटिका- घुट-टि-का-स्त्री. एक विवक्षित वाजीकरण(औषध, मंत्रसिध्दि, ताईत या द्वारें). ॰चिकित्सा-स्त्री. घोडयाचे औषधी उपचार. ॰चिकित्सक-पु. शालिहोत्रज्ञ; अश्ववैद्य; घोडयाचा वैद्य. ॰दोष- अशुभ चिन्हें पहा. घोडयाचे दुर्गुण. ॰धाटी-स्त्री. एक वृत्त. याला मंदारमाला असेंही म्हणतात. उ॰ ‘वाचाळ मी नीट पाचारितों धीट याचा नयो वीट साचा हरी ।’ –वृत्तदर्पण ३२. या दोहोंत फरक म्हणजे अश्वघाटींत बाराव्या अक्षरावर पदसमाप्ति, तर मंदार मालेंत अकराव्या अक्षरावर असते. मंदारमाला पहा. ॰धाटीयमक-न. हें मागें व पुढें निराळें व्यंजन असल्यामुळें घोडयाप्रमाणें उडया मारीत चाललें आहे असा भास होतो. उ॰ ‘गाजत वाजत साजत आज तया जतन करुनि आणहो’ –मोविराट ६.७५. ॰परीक्षक-पु. घोड्याच्या शास्त्रांत प्रवीण. ॰परीक्षा-स्त्री. १ घोड्यासंबंधानें ज्ञान, परीक्षा. २ घोड्याच्या मासाचें ज्ञान; अश्वमांसज्ञान. ॰भार-पु. १ अश्वसेना; घोडदळ; घोडेस्वारांचे सैन्य. २ घोड्यांचा जमाव, समूह. [सं.] ॰मूत्राम्ल-न. (इं.) हिप्यूरिक अॅसिड. हें अम्ल वनस्पत्याहारी जनावरांच्या मूत्रांत सांपडतें. ॰मेध-पु. सार्वभौम राजानें कराव- याचा यज्ञ. हा यज्ञ केल्यानें पृथ्वीचें सार्वभौमत्व मिळतें व असे शंभर यज्ञ केल्यानें इंद्रपद मिळतें, अशी समजूत आहे. [सं.] ॰राती-स्त्री. एक वनस्पति. हरितालिका पूजेंतील पत्रीपैकीं एक. ॰वाहक-पु. सारथी; घोडे हांकणारा; चाबूकस्वार. ‘जेथ अश्व- वाहकु आपण’ –ज्ञा १.१४०. [सं.] ॰वैद्य-पु. घोड्यांचा वैद्य; शालिहोत्रज्ञ; घोडाडाक्टर. ॰शक्ति-स्त्री. घोड्याचें बल, सामर्थ्य. (इं.) हॉर्सपावर. ॰शाणी-साहणी-पु. चाबूकस्वार; घोड्यांची परीक्षा करणारा; अश्ववैद्य, परीक्षक. ‘बोलावोनिया अश्व शाणी । म्हणती घोडे निवडी गा ये क्षणीं ।’-कथा ४.९.१५. ‘जैसा वारु उपलाणी । वश्य करी अश्वसाहणी’ –एभा २०.२१६. [सं. अश्व + म. शहाणा] ॰शाला-स्त्री. १ घोड्यांची पागा; तबेला. २ घोड्यावर बसविण्यास जेथें शिकवितात तें गृह. शिक्षक- सारथी-पु. घोड्यांना शिकविणारा; चाबूकस्वार; घोडे हांकणारा. ॰शिक्षा-स्त्री. घोड्यांना शिकविणें, शिक्षा लावणें, (गति, चाल वगैरे ). ॰सारथ्य-न. रथ किंवा त्याला जुंपलेले घोडे चालविणें- हांकणें; रथांची व्यवस्था. [सं.] ॰हृदय-न. १ घोड्यासंबंधीं रहस्य किंवा गुप्त गोष्टींचें ज्ञान; अश्वशास्त्रं; अश्वविद्या; घोडयावर बसण्याची विद्या. २ घोड्यांच्या प्रकृतीचें निदान किंवा त्यासंबं- धाचें शास्त्र; शालिहोत्र. [सं.]

दाते शब्दकोश

अश्वक्रांत स्थान      

न.       (नृत्य.) एक पाय समस्थित ठेवणे, दुसरा पाय अग्रतलसंचर करून पाय अंगठ्यावर टेकून दुसऱ्या पायांजवळ ठेवणे. अडखळणे, वस्त्र उचलणे, झाडाच्या फांद्या ओढणे वगैरे दर्शक हे स्थान आहे. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

बा

पु. १ (काव्य व कुण.) बाप; जनक; वडील. 'वधिले सारोह अयुत हयगजहि तुझ्या महाकथें बा नें ।' -मोभीष्म ११.५६. २ संबोधन (लहान मुलें किंवा तरुणाबद्दल प्रेमानें योज- तांना); बाबा ! बाळा ! अहो ! 'बा ! तुझा चालता काळ खायाला मिळती सकळ ।' 'आज्या बा न म्हणावें गहिंवर येतो तयाहि माज्या बा ।' -मोआदि ३४.७२. ३ बहुमानार्थीं मनुष्य, देव इ॰ च्या नांवापुढें योजावयाचा प्रत्यय उदा॰ गणोबा; गोंदबा; विनोबा इ॰. ४ थट्टेनें परंतु आदरार्थीं नामांस जोडावयाचा प्रत्यय. उदा॰ वाघोबा; नागोबा; वेडोबा. [सं. पाद-पाअ-बाअ-बा पाद = श्रेष्ठत्व दर्शक पदवी. उदा॰ गोविंदपाद. -भाअ १८३५ ] म्ह॰ बाचा बा गेला नी बोंबलतां ओंठ गेला. बा झवणें-अक्रि. (अश्लील) मध्यें पडून बिघडविणें; भलतीच गोष्ट करणें; घाण करणें. मागून पुढून बा च नवरा- १ मुलाचें लग्न करण्याची वेळ आली असतां आपलेंच लग्न लावणार्‍या विधुर बापाबद्दल योजतात. यावरून २ (ल.) आपमतलबी मनुष्य.

दाते शब्दकोश

बाप

पु. १ पिता; जनक. २ (बापासारखा ) चुलता (धृतराष्ट्र भीष्मास म्हणतो) कीं माझा वधिला शिखंडिनें बाप ।' -मोकर्ण १.१२. ३ (काव्य.) संस्कृतांतील तात शब्दाप्रमाणें अनुकंपार्हत्वदर्शक संबोधन (लहानाला किंवा सत्कारार्थीं योजतात). 'जरी स्वधर्मैकनिरत । वर्ताल बापा ।'-ज्ञा ३.१०२ -वि. फार; पुष्कळ; मोठा.'बापु उपेगी वस्तु शब्दु ।' -अमृ ६.१. -उद्गा. आश्चर्य किंवा दुःख याचें दर्शक. 'बाप ! अज्ञानाची भुलि कैसी ।' -भाए ३.१५. [सं. पिता, वप्तृ; प्रा. बप्प, बप्पो; का. बाप्प; पोर्तु. जि.पतर्रो, पात (पितृशीं जास्त जुळणारा); आर्मेजि. बाप] म्ह॰ बापास बाप म्हणत नाहीं तो चुलत्यास काका कोठून म्हणणारा?' बापसि बाप न म्हणें ऐशासी काय होय आजोबा ।' -मो. (वाप्र.) बाप(ब)शेटीची पेंड-स्त्री. हवी त्यानें हवी तितकी न्यावी अशी वस्तु; फुकट मिळालेली व वाटेल तशी खर्चिली जाणारी वस्तु, संपत्ति; विपुल व सुसाध्य वस्तु. (बापशेट नांवाच्या श्रीमान् व उदार गृहस्थाच्या नांवावरून हा शब्द रूढ झाला असेल). ॰होऊं लागणें, म्हणविणें, बाप होऊन (करणें, बोलणें)-बापाची किंवा मोठेपणाची जागा घेणें; वर मोठेपणा मिरवणें. (एखाद्याचा) बाप होणें-बाप लागून राहणें-एखाद्यापेक्षां वरचढ असणें; त्रास देणारा असणें.बापाचा माल-एक शिवी; कोणीं उधळेपणानें दुसर्‍याचा माल खर्चू लाग- ल्यास त्यास म्हणतात. बापावरून पवनें-बापाच्या नांवानें, बापावरून शिव्या देणें. बापास बाप न म्हणणें-वाजवी गोष्टींत कोणाचीहि मुर्वत न धरणें. बापास बाप न म्हणणाराभीड मुर्वत न धरणारा; खडबडीत स्वभावाचा. ॰आजांचा धर्म-पु. पूर्वजांचा धर्म; पिढीजात आलेला धर्म. बापई-पु. (माण.) बाप्या; वयांत आलेला पुरुष. ॰घर-न. माहेर.' मग आप-घर त्यागूनि बापघरीं केलिया वस्ति ।' -सप्र ११.४९. ॰जन्मांत- जन्मीं-क्रिवि. सर्व आयुष्यांत; जन्मापासून आजपर्यंत 'मी बाप- जन्मीं कोणाचें उणें उत्तर बोलून घेतलें नाहीं. ' [बाप + जन्म] ॰जादे-दादेपुअव. वाडवडील; पूर्वज. 'दिल्ली याचे बापजाद्याची -गोखंचिशाब १२. [फा. बाब् = पिता + अर. जद्द = आजोबा] ॰पण-न. सामर्थ्य; पितेपण. 'तरि बापपण आपुलें कां दाख- विजेना ।' -ऋ ३४. ॰पोरका-वि. बाप मेल्यामुळें पोरका बनलेला. ॰भाऊ-पु. भाईबंद; भाऊबंद; नातेवाईक; दायाद (वतनांतील वांटेदार). ॰भावकी-स्त्री. १ भाऊबंदकी; नातें. २ दाट परिचय; परमस्नेह. ॰भ्रम-पु. मोठा भ्रम. 'बापभ्रमाचें विंदान । केवढे सायास पक्षियांचे ।' -जै ७७.५४. [बाप = मोठा + भ्रम] ॰माय-स्त्री. (काव्य.) बाप आणि आई (हा शब्द विशेष रूढ नाहीं. रूढ शब्द मायबाप, आईबाप, मातापिता हे आहेत). 'जैसी अबला सासुरां राहे । चित्तीं आठवे बापमाये ।' बापया-य-पु. बाप्या; पुरुष. बापयोद्धा-पु. मोठा योद्धा. 'बापयोद्धा तो निःशंक ।' -जै ७५.१२६. [बाप = मोठा + योद्धा] ॰रोटी, बापु(पो)ती-स्त्री. (हिं.) (शब्दशःअर्थ-बापाची भाकरी, अन्न). वडिलोपार्जित चालत आलेली वतनवाडी, माल- मत्ता. बापा-पु. १ (खा.) बाप. २ बापाचें संबोधन; (आद- रार्थीं हाक मारतांना) अहो ! अरे ! 'अर्थाचा दास पुरुष अर्थ नव्हे पुरुषदास बापा हें ।' -मोभीष्म १.९०. ३ (कों.) एक पिशाचदेव; बापदेव. बापाजी-पु. (संबोधन) मोठ्या माण- साला हाक मारतांना म्हणतात. 'बापाजी ! आम्ही हीं चित्रें तुमचा अनुग्रह चितारी ।' -मोउद्योग ११.५२. बापाला-पु. (गो.) मावशीचा नवरा. बापाशीक झंवरी-वि. (हेट.) एक शिवी. बापाशीं संभोग करणारी. बापिक-पु. कुलपरंपरागत धर्म; हव्यकव्य; कुलधर्म. -वि. कुळांतील; कुलपरंपरागत. 'एथ स्वामीचें काज । ना बापिकें व्याज ।' -ज्ञा १२.६७. बापु-वि. मोठा. -उद्गा. बापरे; अरे बापरे ! 'बापु ! कळा वानु कैसी ।' -ऋ ६. बापु(पू)रज(झ)दा-वि. वंशपरंपरा. 'बापूरजदा घेत जाऊन...' -वाडथोमारो २.१०६. बापु(पो)लभाऊ-भाव-पु. (गो.) चुलत भाऊ. बापु(पो)लयों-पु. (गो.) चुलता. बापुला, बापु(पू)य-स-पु. (गो. कु. कों.) बाप. बापू-पु. आदरार्थीं पुरुषास म्हणतात. बापोलभैण-स्त्री. (गो.) चुलत बहिण. बाप्या, बाप्यो-पु. बाप होण्याच्या वयाचा, वयांत आलेला पुरुष; प्रौढ. (-अव. बापे-प्ये). बाप्यामाणूस-पु. पुरुष. याच्या उलट बाई- माणूस.

दाते शब्दकोश

बेलटें-टी

न. (कों.) नारळ, डोकें यांना तुच्छता-तिर- स्कार दर्शक शब्द; करटी; नरोटी [बेलफळ]

दाते शब्दकोश

बीं

(वि.) हिंदी अर्थ : देखनेवाला, दर्शक. मराठी अर्थ : पाहणारा.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

बिरद

न. (विरू.) बिरीद; बिरुद पहा. बिरदाईत-वि. विशिष्ट विद्या, गुण इ॰ मध्यें वाकबगार (पंडित, पुराणीक, गवई, इ॰); कांहीं श्रेष्ठ गुणाबद्दल चिन्ह धारण करतो तो. [सं. विरुद] बिरदावळी-स्त्री. गुण, पराक्रम, श्रेष्ठता इ॰ दर्शक चिन्हांची माळ; बिरुदावली पहा.

दाते शब्दकोश

ब्रीद-दु

न. १ व्रत; प्रतिज्ञा; शील; बाणा. बिरद, बिरीद पहा. (क्रि॰ पाळणें; सत्य करणें). 'देविका-ताट-काढा हें ब्रीदु माझें । तिहीं लोकीं ।' -शिशु ७६.२ बाण्याचें दर्शक चिन्ह (पदक, कडें, बिल्ला इ॰). 'पदीं राघवाचे सदां ब्रीद गाजे.' -राम २९. [सं. विरुद] ब्रिदाईत-वि. ब्रीद पाळणारा. ब्रीदावळी-स्त्री. गुणानुवाद प्रतिज्ञेची ओळ. बिरुदावलि पहा.

दाते शब्दकोश

छि, छिछि

उद्गा. तिरस्कार, तुच्छता, नापसं दर्शक अव्यय. छिथू-स्त्री. फजिती; हुरेवडी; हुर्यो; हुश्हुश्.(क्रि॰ करणें).

दाते शब्दकोश

छत्

उद्गा. १ हट; फट; छिः ! फूः ! तिरस्कार, नापसंति- दर्शक उद्गार. २ नकार, निषेधदर्शक उद्गार.

दाते शब्दकोश

ढाण

अ. वि. आंबटपणा दाखविणार्‍या शब्दास हें आधिक्य- दर्शक उपपद जोडतात. अति आंबट (फळ, ताक इ॰) [डाहण]

दाते शब्दकोश

धमधमीत

क्रिवि. धमक; पिवळा; रंगाचा अतिशय दर्शक शब्द. कधीं गोरा, पांढरा या शब्दांमागेंहि लावतात. 'धमधमीत पिवळा.'

दाते शब्दकोश

धोप

अ. पांढरा शब्दास जोडून येणारा अतिशयत्व दर्शक प्रत्यय, जसें:- पांढरा धोप.

दाते शब्दकोश

ढपला-ली

पुस्त्री. धलपा; तुकडा; ढेपसा; ढलपा (दगड, गिलावा, गुळाची ढेप इ॰चा). ढपली हें ढपला याचें अल्पत्व दर्शक रूप आहे.

दाते शब्दकोश

ढुस्स

अ. काळा या विशेषणाला जोडण्यांत येणारें आधिक्य- दर्शक उपपद किंवा प्रत्यय. उदा॰ काळा ढुस्स. ( = काजळाप्रमाणें काळा). 'काळीं ढुस्स चरांजन-नग-शिखरेशीं विवूनि आसविलें ।' -मोवन १०.४१.

दाते शब्दकोश

धुश्श

वि. काळा या वर्णाचा अतिशय दर्शक प्रत्यय; अत्यंत (काळा). जसें-काळा धुश्श. ढुस्स पहा. [सं. धूसर ?]

दाते शब्दकोश

धवधवीत

क्रिवि. पिंवळा, गोरा व पांढरा या वर्णाचा अतिशय दर्शक शब्द. 'धवधवीत पिंवळा-गोरा-पांढरा.'

दाते शब्दकोश

घन

पु. (भूमिती) सहा (सम) चौरसांनी मर्यादित अशी घनाकृति. -वि. लांबी, रुंदी व जाडी यांनीं मर्यादित अशी (पोकळ, आकृति, पदर्थ इ॰). [सं.] ॰चित्रदर्शक यंत्र- न. एखाद्या पदार्थाच्या, स्थलाच्या, इमारतीच्या छायाचित्रा. वरून त्या पदार्थाचें. स्थलाचें, इमारतीचें हुबेहुब भरींव चित्र दाखविणांरें यंत्र; भरीवदर्शक; यास दोन सूक्ष्मदर्शक भिंगे असून धरण्याकरितां एक मूठ असतें. भिंगासमोर चित्र ठेवण्याकरितां चौकट असतें. (इं.) स्टिरिऑस्कोप. [सं. घन = भरीव + चित्र + दर्शक = दाखवणारें + यंत्र] ॰फल-ळ-न. (गणित, भूमिति) (पदार्थाच्या, पोकळीच्या) लांबी, रुंदी व उंची यांचा गुणा कार करून आलेलें फल; उ॰ भुज ४, कोटि ५, उंची ३ यांचें घनफळ ६०. कोणत्याहि पदार्थानें व्यापलेला अवकाश, पोकळी; एखद्या घनपरिमाणानें मोजिला असतां जी त्या घनपरिमांणांची संख्या उत्पन्न होते तिला त्या पदार्थाचें घनफळ म्हणतात.' -महमा ९२ [घन + फल = उत्तर, गुणाकार] ॰फूट- पु. 'पदा- र्थाचें अवकाशाचें आकारमान, घनफळ, फुटांनी मोजण्याचें इंग्रजी पद्धतीचें परिणाम. उ॰ दोन फुट लांब, दीड फुट उंच व एक फुट रुंद अशा पदार्थाचें घनफळ तीन घनफूट भरेल. [सं. घन + इं. फुट] घनाकृति-स्त्री. एक किंवा अनेक पातळ्यांनीं सर्वांगाकडून मर्यादित अशी आकृति, अवकाश. -महमा ५. घन. (इं.) सॉलिडफिगर्. [घन = लांबी,रुंदी व उंची असलेली + आकृति] घनांग-न. भूमितीविषयक एक परिणाम. [घन + अंग]

दाते शब्दकोश

घटस्फोट      

पु.       १. (मृत्यू, फारकत इ. दर्शक) घडा फोडणे : ‘जेवीं नष्टलिया, पुत्रासी । पिता घटस्फोटें त्यागी त्यासी ।’ – एभा २३.४८८. २. नवराबायकोची फारकत; कायदेशीर विवाहविच्छेद; नवराबायकोंनी विवाहाचे बंधन रद्द ठरवून स्वतंत्र होणे; सोडचिठ्ठी; काडीमोड : ‘इंग्रज लोकातील घटस्फोटाचे वाईट वाईट खटले कोर्टापुढें येतात …..’− लोटिकेले ४¿९५. (क्रि. घेणे.) ३. (ल.) पतिताचा जिवंतपणी प्रेतविधी; जो पतित प्रायश्चित घेऊ इच्छित नाही त्याला वाळीत टाकण्याकरिता – समाजाच्या दृष्टीने तो मेलेलाच आहे दर्शविण्यासाठी – मातीची घागर फोडणे इ. अशुभ क्रिया, विधी. ४. जातिबहिष्कृत करणे : ‘जारकर्मांत’ विधवा गरोदर सांपडली असतां तिला बहिष्कृत करून तिचा घटस्फोट नामक विधी करतात.’ – व्यनि २.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

हं

उद्गा. लक्ष वेधणें-देणें, सूचना, संमति, पंसति दाखविणें इ॰ चा दर्शक शब्द; हां. [ध्व.]

दाते शब्दकोश

हरा

पु. १ हारा; बांबूच्या कामट्यांची मोठी टोपली; पाटी (भाजी, फळें इ॰ ठेवण्याची). २ (ल.) हाराभर जिन्नस (वाळकें, फळें इ॰). म्ह॰ १ वाळकाचा हरा आणि ताकाचा डेरा (फार दिवस टिकत नाहीं). २ हरा वारा देव्हारा (दोन दिवसांचा) = क्षणभंगुरता, नश्वरता दर्शक.

दाते शब्दकोश

जे      

उअ.       १. की; (हा शब्द पुढील विधानाचा दर्शक आहे) कारण की : ‘जे सानुकूळ श्रीगुरू ।’ - ज्ञा १·७५. २. ज्यामुळे : ‘कैसें वो तुमचें करण । जे पुढिलां एओ पाहे मरण ।’ - शिव ८०. [सं.यत्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जे

उअ. २ कीं; (हा शब्द पुढील विधानाचा दर्शक आहे.) कारण कीं. 'जे सानुकूळ श्रीगुरु ।' -ज्ञा १.७५. 'त्या पत्रांत मजकूर असा जे.' २ ज्यामुळें. 'कैसें वो तुमचें करण । जे पुढिलां एओ पाहे मरण ।' -शिशु ८२०. [सं. यत्; प्रा. ज]

दाते शब्दकोश

जेका      

उअ.       की (पुढील वाक्याचा दर्शक). पहा : का

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जेका

उअ. (काव्य.) कीं; (पुढील वाक्याचा दर्शक) का पहा. 'जेका लंका वसली नवती पै ।' [जे + का-एकाच अर्थी]

दाते शब्दकोश

जेरजबर      

स्त्री.       उर्दू लिपीतील अकार व इकार दर्शक चिन्हे; (ल.) शब्दन्‌शब्द : ‘सुसंस्कृत आदब व पराक्रमी आत्मविश्वास यांचा प्रसन्न गंध तर या फारसी पत्राच्या जेरजबरमधून दरवळतो.’ - शसौ २२.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कैलास

पु. कुबेर, शंकर यांच्या निवासस्थानाचा पर्वत. हा हिमालयांत आहे. महादेवाचा लोक (विष्णुचा ज्याप्रमाणें वैकुंठ तसा). [सं.] म्ह॰ कैलास कंटाळे तों गाणें. कान फाटेस्तुर लेणें (कर्कश, बेताल, बेसूर गाणें आणि भपकेदार बहुमोल पोषाख अलंकार घालणें यावरून वेडगळ व अवाढव्य, काम, भपका; टोले- जंग देखावा.) ॰येणें, मिळणें, उतरणें, प्राप्त होणें-कांहीं तरीं मोठा लाभ होणें. कैलासाला डोकें लागणें—अस्मान ठेंगणें होणें; गर्वानें अतिशय फुगून जाणें, कैलासवासी-वि. (मृत्यु पावलेल्या माणसाबद्दल त्याचें दर्शक म्हणून कागदोपत्रीं- विशेषत: मृत मनुष्य शिवभक्त असल्यास-उल्लेख करतानां योज- तात). परलोकवासी; मृत.

दाते शब्दकोश

कलगी

स्त्री. १ पागोट्यावर खोंवावयाचें एक रत्नखचित शिरोभूषण; शोभादायक पिसें किंवा तुरा. २ घोड्याच्या डोक्यावर बांधावयाचा पिसांचा तुरा; तसेंच म्होरकीस ज्या दोन्ही बांजूस झुरमुळ्या लावतात त्यांसहि म्हणतात. ३ शृंगा- रिक लावणीचा एक प्रकार; यांत प्रकृति ही पुरुषापेक्षां श्रेष्ठ मानतात व ती पुरुषाचें आर्जव करिते असें वर्णन असतें; या संप्रदायाचें दर्शक चिन्ह जें डफावर लावतात तें. 'सनगभाऊ व त्याचे अनुयायी आपणास कलगीवाले असें म्हणवून घेतात व हें चिन्ह ते धरण करितात.' ४ पुष्पगुच्छ. 'श्रीमंतांस प्रथम कलगी समर्पण करून त्यावरच अत्तर, गुलाब देतात.' -ऐरा प्रपु ९.४२३. ५ कोंबड्याच्या डोकीवरील तुरा. ६ एका फूलझाड व त्याचें फूल. [तु. कलगी] ॰तुरा-पु. कलगी हा एक पक्ष व तुरा हा त्याचा प्रतिपक्ष यांमधील चढाओढ; लावणीचा एक प्रकार; ही लावणी प्रश्नोत्तररूपी असते. कलगीवाल्यांना नागेश व तुरेवाल्यांना हरिदास असेंहि म्हणतात. -ज्ञाको. क १४६. ॰वाला-वि. (हिं.) पुरुषापेक्षां प्रकृति श्रेष्ठ मानून कलगी जातीच्या लावण्या म्हणणारा.

दाते शब्दकोश

कर्ता

पु. १ करणारा; उरकणारा; कारण होणारा; बन- विणारा; रचणारा; जुळवणारा. 'नवल कर्तंयाची करणी । पुढें सेवक वेत्रपाणी । धांवा म्हणतां सभाजनीं । चपळ चरणीं धांवतो ।।' -ह ३४.१२८. 'कर्ता न दिसे नयनीं ।' -दावि ३८५. २ (व्या.) प्रथमा विभक्ति किंवा क्रियापदाचें उद्देश्य; एक कारक; उद्देश्य. ३ कर्तबगार माणूस; कर्तृत्त्ववान्. 'समशेर बहाद्दर रणीं थकले कर्त्याची गत आहे न्यारी.' -ऐपो १३५. ४व्यवस्थापक; श्रम करून मिळविणारा मनुष्य; कारभार, प्रपंच, घर इ॰ संभाळणारा; मिळविता माणूस. ५ (कायदा) हिंदू एकत्र कुटुंबाची व्यवस्था पाहणारा पुढारी इसम. [सं. कर्तृ] ॰हर्ता, ॰हर्तापालिता-वि. (करणारा व नाश करणारा; जड विणारा व भंगणारा; जोडणारा तोडणारा). परमेश्वराचें गुण- दर्शक नांव. 'कर्ता हर्तापालिता । मज परता नसेचि ।।' [सं.]

दाते शब्दकोश

करूब      

पु.       (ख्रि.) हे एक प्रकारचे देवदूत असून ते देवाच्या समक्षतेचे दर्शक होते असे जुन्या करारावरून दिसते : ‘एदेन भागाच्या पूर्वभागी करूब व गरगर फिरणारी ज्वालारूप तरवार ठेवली.’ − उत्प २·२४. [हिब्रु. क्रुव. (अव.)]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

करूब

पु. (ख्रि.) हे एक प्रकारचे देवदूत असुन ते देवाच्या समक्षतेचे दर्शक होते असे जुन्या करारावरून दिसतें. 'एदेन आमच्या पूर्वभागीं करून व गरगर फिरणारी ज्वाळारूप तरवार ठेवली.' -उत्प ३.२४. [हिब्रू. क्रुब. (अव.) क्रुबीम; फ्रे. चिरुबिन; इं. चीरब]

दाते शब्दकोश

कट      

अरेरे! कष्ट, यातना दर्शक उद्‌गार : ‘कट रे मूर्खीं केवडें । जोडिले निरय ।’– राज्ञा १६·४१८. [सं. कष्ट] कट      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुज

न. १ क्षितिज. -पु. २ मंगळ (ग्रह). [सं.] ॰पंचमी-स्त्री. शुद्ध पक्षांत मंगळवारीं आलेली पंचमी. ही अशुभ मानतात. [सं. कुज + पंचमी] ॰स्तंभ-पु. १ (अप. कुच स्तंभ) मंगळाची आपल्या कक्षेंतील एखाद्या नक्षत्रांत स्थिरता. २ ज्योतिषविषयांतील एक उपयुक्त योग (लौकिक दर्शक). [सं.]

दाते शब्दकोश

कूळघडणी      

स्त्री.       प्रत्येक कुळाची जमीन, साधनसामग्री, लाग - लागवड व सारा इ. चे दर्शक, कुळकर्ण्याने तयार केलेले सरकारी पत्रक, तक्ता.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

लसलस

स्त्री. १ अतिशय वळवळ; चळवळ. २ उत्कंठा. लसलस-लसां-क्रिवि. १ अतिशय तप्त व क्षुब्ध द्रवपदार्थांच्या, क्षतांत किंवा नासलेल्या फळांत बुजबुजणाऱ्या किड्यांच्या व्यापाराचें दर्शक किंवा शब्दाचें अनुकरण होऊन. २ टवटवीतपणें; टक- मकीतपणें. लसाकफसाक-क्रिवि. (कु.) अघळफघळ. लस- फशीत पहा.

दाते शब्दकोश

लट-कण-कन-कर-दिनीं-दिशीं

क्रिवि. १ अकस्मात् किंवा वेगानें उठणाऱ्या, उडणाऱ्या, उसळणाऱ्या मनुष्याच्या किंवा वस्तूच्या क्रियेचें दर्शक अथवा त्यावेळीं होणाऱ्या शब्दाचें अनुकरण होऊन. [ध्व.]

दाते शब्दकोश

लटलट-लटां

क्रिवि. कांपण्याच्या, जलद हालण्याच्या रीतीचें दर्शक किंवा शब्दाचें अनुकरण होऊन. [ध्व.] लटलट करणें-१ जलद हालणें; कांपणें. २ लटपटणें; डगडगणे. लट- लटणें-अक्रि. १ झोके खाणें; डोलणें; वाऱ्यात स्वच्छंदानें, डुलणें, खेळणें; झोळकंबणें. २ कापंण; थडथडणें; अत्यंत चंचल स्थितींत असणें. ३ डगमगणें; डगडगणें; ढिलेपणामुळें इतस्ततः हालणें. ४ (ल.) लडबडणें; लुडबुडणें; लुबरेपणानें, दुसऱ्यास त्रास होईल अशा रीतीनें पुढें पुढें करणें. ५ पाणीदार व चकचकीत दिसणें (मुख्यत्वें मोतीं). ६ टवटवीत, टुकटुकीत, सुप्रसन्न दिसणें (चेहरा, वर्ण). [लटपट]

दाते शब्दकोश

लुटलुट-टु, लुटुलुटु

क्रिवि. चटपट; चुटुचुटु; झपझप जवळ जवळ परंतु हलके टाकलेल्या पावलांच्या आवाजाचा दर्शक शब्द. [ध्व.]

दाते शब्दकोश

नाज़िरीन

(पु.) हिंदी अर्थ : दर्शक गण, पाठक गण,. मराठी अर्थ : प्रेक्षक गण.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

नाज़रीन

(पु.) हिंदी व मराठी अर्थ : दर्शक गण.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

ओहो, ओहोहो

उद्गा. आश्चर्य, कौतुक, आनंद, आठ- वण यांचा दर्शक उद्गार! वाहवा! ओलो! [ध्व.]

दाते शब्दकोश

पांवरी

स्त्री. लहान पावां; मुरली; बांसरी. [पावां + री लघु त्व दर्शक प्रत्यय]

दाते शब्दकोश

पारदर्शक

वि. प्रकाशास पलीकडे जाऊं देणारा. ज्या- मधून दुसरा पदार्थ दिसतो असा. उदा. कांच, पातळ कागद, पातळ वस्त्र. (इं.) ट्रॅन्सपरंट. [पार = पलीकडे + दर्शक]

दाते शब्दकोश

पाषाण

पु. दगड; खडक; धोंडा. 'तो पाषाणामाजि परिसु । रसांमाजी सिद्धरसु ।' -ज्ञा १०.७६. 'तृणवत तनु सोनें ज्या पाषाण । पाईका त्या भिन्न नाहीं स्वामी ।' -तुगा ३७७. [सं.] म्ह॰ १ पाषाणाला घाम येईल पण ह्याला येणार नाहीं. २ लोकां सांगे ब्रह्मज्ञान । आपण कोरडा पाषाण ।' ॰गर्दभ-पु. हनुवटीखालीं सूज येऊन शक्तिपात करणारा एक रोग. ॰चुंबक- पु. एक खनिज पदार्थ. (इं.) लोडस्टोन. या खनिजपदार्थापासून लोखंड काढतां येतें. हा पाषाण लोखंडाप्रमाणेंच काळा, अपार- दर्शक व कठीण असून त्याच्या अंगीं धातूप्रमाणेंच चकाकी आहे. त्याच्या अंगीं चुंबकत्वहि असतें. -ज्ञाको (प) ११२. ॰भेद-पु. १ कांहीं दगडावर उगवणारी क्षारयुक्त उगवण. २ एक औषधी; पाथरफोड. [सं. पाषाण + भेद. हिं. पाखानभेद; बं. पाथरकुचा; गु. पाखाणभेद] ॰माळा-स्त्री. दगडाच्या मण्यांची माळ. 'पाषाणमाळा कवडे- माळा ।' -दा १३.१०.१. ॰युग-न. जगाच्या संस्कृतीचा एक काळ; या काळांत भांडीं, हत्यारें इ॰ दगडाचीं करीत. (इं.) स्टोन एज. ॰शास्त्र-न. खडक कसे बनतात यासंबंधीचें शास्त्र; प्रस्तर- विज्ञान. (इं.) पेट्रॉलॉजी. ॰हिय्या-पु. दगडासारखा कठोर निश्चय; मन निष्ठुर करणें. 'रमाबाई पाषाणहिय्या केला ।' -ऐपो १४८. ॰हृदय-वि. दगडाप्रमाणें कठीण; कठोर मनाचा; निर्दय; दुष्ट. [सं.] पाषाणी-वि. दगडासंबंधीं; पाषाणाचा (पदार्थ). [पाषाण] ॰बरप-न. (गो.) शिलालेख. [गो. बरप = लेख] पाषाणीभूत-वि. पाषाणभूत; प्रस्तरीभूत; अश्मीभूत. दगडा- प्रमाणें कठीण झालेलें; दगडी थरांत रूपांतर, दगडरूप झालेलें. -पदाव २३.

दाते शब्दकोश

पेश रौ

(पु.) हिंदी अर्थ : सबके आगे चलनेवाला. मराठी अर्थ : मार्ग दर्शक, पुढारी.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

प्रभु

पु. १ धनी; स्वामी; मालक. 'कोणी येके ग्रामी अथवा देसीं । राहाणें आहे आपणासी । न भेटतां तेथिल्या प्रभुसी । सौख्य कैंचें ।' -दा ६.१.२. २ राजा. ३ देव; ईश्वर. 'प्रभु त्यातें मर्मीं शरहाणी ।' -मो रामायणें. -वि. समर्थ; कर्ता. [सं.] ॰त्व- न. (राज्यकर्ता, अधिकारी, अमलदार इ॰ची) जागा; पदवी; स्थान इ॰. [सं प्रभु + त्व = भाववाचक नामाचा प्रत्यय] ॰भोजनन. (ख्रि.) हा एक संस्कार किंवा साक्रमेंत आहे. ह्यांत ख्रिस्तानें नेमून दिल्याप्रमाणें भाकर व द्राक्षारस देतात व घेतात. हा संस्कार ख्रिस्ताच्या मृत्यूचा दर्शक आहे आणि योग्य प्रकारें तें भोजन करणारे, दैहिक व इंद्रियगोचर रीतीनें नव्हे तर विश्वासानें त्याच्या शरीराचे व रक्ताचे व त्यापासून होणार्‍या सर्व लाभाचे वाटेकरी होतात आणि त्यायोगें त्यांचें आत्मिक पोषण होतें व त्यांच्या ठायीं ईश्वरी अनुग्रहाची वृद्धी होते असें प्रॉटेस्टंट ख्रिस्ती लोकांचें मत आहे. ॰शक्ति-स्त्री. युद्धाच्या तीन शक्तीपैकीं एक. राजाचें सामर्थ्य; द्रव्यबल व सेनाबल अशा ह्याच्या दोन शाखा आहेत. मंत्रशक्ति, उत्साहशक्ति पहा. ॰संमित-वि. (धन्याप्रमाणें) अधि- कारयुक्त; जोरदार; खणखणीत; बादशाही; अंमलदारीचा (शब्द, वाक्य, भाषण, आज्ञा). [सं.]

दाते शब्दकोश

फें

अ. १ तुच्छता; तिरस्कार दर्शक अव्यय. 'तुला फें तुझ्या बापाला फें.' २ दमणूक; हताशपणा किंवा शरण आल्याची कबूली दर्शविण्यासाठीं काढलेला उद्गार. फेंफें पहा. [ध्व.]

दाते शब्दकोश

फलाणा

सना. अमुक; अमका; कोणी; कांहीं (तुच्छता- दर्शक शब्द). 'स्वामी तो परमहंस ! सुखदुःखातीत स्वामी असतां क्षणाक्षणां फलाण्यानें फलाणें जाहलें, हत्तीमुळें फलाणें गेलें याप्रकारें लिहून पाठवितात याचा विचार काय?' -ब्रच ३२. [फा. फलान्; अर. फुलान्] ॰बिस्ताणा-वि. अमुकतमुक; कोणीएक; कोणीतरी.

दाते शब्दकोश

pointer

दर्शक कांटा

वास्तव शास्त्रीय परिभाषा (पुणें विद्यापीठ मराठी परिभाषा समिती, १९६१)

रेफ

पुस्त्री. रफार; र हें अक्षर. अर्ध र दर्शक चिन्ह; अक्ष- राच्या डोक्यावरचें र चें अर्धवर्तुळाकृति चिन्ह. उदा॰ अर्क या शब्दांतील क या अक्षरावरील चिन्ह. [सं. रिफ् = कर्कश नाद करणें]

दाते शब्दकोश

रहबर

(वि.) हिंदी अर्थ : मार्ग. मराठी अर्थ : दर्शक.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

रहनुमा

(वि.) हिंदी अर्थ : मार्ग. मराठी अर्थ : दर्शक.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

रिद्धि

स्त्री. १ संपत्ति; समृद्धि; ऐश्वर्य. २ स्वाभाविक सिद्धि; पूर्वतप:साध्य सिद्धि. [सं. ऋद्धि] ॰सिद्धि-स्त्री. रिद्धि आणि सिद्धि नांवाच्या गणपतीच्या दोन दासी (संपत्ति व परिपूर्णता यांच्या दर्शक). 'रिद्धिसिद्धि दारीं सदा वोळंगति । सकळ संपत्ति सर्वांघरीं ।' (एखाद्याच्याघरीं) ॰पाणी भरणें-( एखा- द्याची) संपत्ति आणि यश भरपूर असणें. रिद्धि आणि सिद्धि या दासी प्रमाणें कामें करतात अशा तर्‍हेचा नशीबवान् असणें.

दाते शब्दकोश

रुपटका रुपटकी, रुपडी

पुस्त्री. रुपयाबद्दल तुच्छता- दर्शक शब्द.

दाते शब्दकोश

रूं

पु. एक प्रत्यय. हा लघुता दर्शक प्रत्यय पाणिनीय स्टरच् प्रत्ययापासून निघाला आहे. उदा॰ वाघरूं = व्याघ्रतर; म्हसरूं = महस + तर; वांसरू = वत्सतर-वच्छअर-वासरूं. इ॰.-भाअ १८३४.

दाते शब्दकोश

साडेचौर्‍यात्तर

वि. हा आंकडा गुजराती व रजपूत लोक अशुभ मानतात. याचा चितोडच्या जोहाराशी संबंध आहे असें मानतात. अकबरानें चितोडगड घेतला त्यावेळीं जयाचें माप वेगळ्या तऱ्हेनें केलें. रजपूत वीरांच्या पराक्रम- दर्शक फितीच्या तुकड्यांचें वजन केलें तें ७४।। मण भरलें. या प्रसंगाचे स्मरण म्हणून तो आंकडा अत्यंत अशुभ मान- तात असें स्पष्टीकरण आनंद १९२६ एप्रिल अंकांत पृष्ठ १४२ वर दिलें आहे तें पटत नाहीं. कारण त्यावेळीं फितीची पद्धति नव्हती. ती इंग्रजी आहे. कदाचित् ७४।। लपेटीनें लिहिल्यास श्रीकार होतो त्याप्रमाणें श्रीकार असावा. ७४।। हा आंकडा अरबी किंवा फारसी पत्रांच्या माथ्यावर आपल्या पत्रांतील श्रीकाराप्रमाणें हुकार म्हणून घालतात. हुकार पहा. हुं म्हणजे परमेश्वर-हा शब्द अरबी भाषेंत हे (दुचष्मी) व वाव या अक्षरांनी लिहितात व त्यांचा आकार ७४ या आंकड्यासारखा दिसतो व पुढें दोन रेघा दिल्या म्हणजे ७४।। हा आंकडा होतो.

दाते शब्दकोश

शब्द

पु. १ आवाज; उच्चार; कोणत्याहि प्रकारचा ध्वनि; श्रोत्रेंद्रियाचा विषय. २ एखाद्या वस्तूचा, कल्पनेचा, दर्शक किंवा व्यंजक, जो अक्षरसमूह तो. ३ (व्या.) प्रथमादि विभक्ति ज्या- वरून होतात अशी वर्णानुपूर्वी (नाम, सर्वनाम इ॰ ). 'तळमळ हा संस्कृत शब्द चालतो तरी कसा ?'. -नारुक ३.४. ४ बोल; वाईटपणा; ठपका. (क्रि॰ लागणें; येणें; ठेवणें; लावणें; आणणें). 'तें केलें धार्तराष्ट्री विफळ सकळहि, आणिला शब्द सामीं ।' -मोकृष्ण ६८.३३. ५ आज्ञा; हुकूम. ६ प्रतिज्ञा; वचन; वाचा. 'एकवेळ गेले शब्द ।' -संग्रामगीतें १२०. ७ वेद. 'त्यासि शब्दपर निष्णातू ।' -एभा १०.३४९. ८ शास्त्र. 'शब्दाचिया आसकडी । भेद नदीची दोही थडी । आरडते विरह वेडी । बुद्धिबोध ।' -माज्ञा १६.५. [सं. शब्द = नाद करणें] (वाप्र.) ॰खाणें-लिहितांना किंवा बोलतांना शब्द गाळणें, न लिहिणें किंवा न उच्चारणें. ॰खालीं न पडणें-दुसऱ्याच्या सांगण्या- प्रमाणें करणें; शब्दाला किंमत देणें; शब्द मानणें. ॰खालीं पडूं न देणें-उत्तरास प्रत्युत्तर देणें; वादविवादांत किंवा भांड- णांत माघार न घेणें. ॰झेलणें-ज्याची सेवा, चाकरी शुश्रूषा, खुशामत वगैरे करावयाची असेल, त्याच्या तोंडून आज्ञा निघतांच तिच्याप्रमाणें करणें. 'राजकारस्थानी पुरुष आणि सेनापति यांचे शब्द त्यांच्या अमदानींत सगळे लोक झेलीत असतात' -ओक. ॰टाकणें-१ मागणी, विनंति करणें; एखादी गोष्ट सांगून बघणें. २ शिफारस करणें. ॰ठेवणें-लावणें-लागणें-दोष देणें; ठपका ठेवणें; दूषण लावणें. 'माझेनि दोषें पावलों खेद । हा तुज कासया ठेवणें शब्द ।' -मुक्तेश्वर. 'त्वत्सम साधु न लागों देती स्वयशासि शब्द ते राजे' -मोवन २.३६; -मोउद्योग ८.१९. ॰लागूं देणें-लागू-लावू देणें-दोष पत्करणें. 'सत्यप्रतिज्ञ पांडव लागूं देती न आपणा शब्द ।' -मोविराट ४.६३. सामाशब्द- ॰काठिण्य-न. (अलंकार) शब्दाचा कठोरपणा, कर्कश- पणा. [सं.] ॰कार्पण्य-न. अल्पभाषा; कमी बोलणें; मित- भाषण. 'शब्दकार्पण्य पंडितास दोष स्त्रीला महाभूषण ।' [सं.] ॰कोश-षपु. १ शब्दसंग्रह; शब्दसमुच्चय; शब्दांचा साठा- खजिना; शब्दांचा अर्थासह संग्रह. २ शब्दाचे अर्थ, व्युत्पत्ति, व्याकरण वगैरे सांगणारा ग्रंथ. [सं.] ॰कौशल्य-न. शब्दरचना- चातुर्य; भाषाचातुर्य. [सं.] ॰खंडन-न. शब्द, विधान इ॰ खोडून काढणें; शब्दावरील टिका. ॰गुण-पु. शब्दांचे गुण, लक्षण. हे एकंदर चोवीस आहेत. ते पुढील प्रमाणें:- श्लेष, प्रसाद, समता, माधुर्य, सुकुमारता, अर्थव्यक्ति, उदारत्व, कांति, उदात्तता, ओज, सुशब्दता, और्जिंत्य, विस्तर, समाधि, सौक्षम्य, गांभीर्य, प्रेम, सन्मितत्व, प्रौढी, रीति, उक्ति, गति, भावुक, संक्षेप. इ॰ ॰चातुर्य-न. शब्दरचनाकौशल्य; वाक्चातुर्य; शब्दपटुता; भाषा- शौली; भाषाप्रभुत्व. [सं.] ॰चित्र-न. १ शब्दांनीं केलेलें वर्णन, काढलेलें चित्र. २ (साहित्य) चित्रकाव्याचा एक प्रकार; शब्द- चमत्कृति. उदा॰ 'मागे जी लुगडी, सकाप बुगडी' इ॰. [सं.] ॰चोर-पु. दुसऱ्याचा लेख चोरून तो आपलाच म्हणून दडपून देणारा; दुसऱ्याचे शब्द चोरणारा; उष्टा बोल वापरणारा. ॰जाल-ळ-न. १ शब्दांचें जाळें; अनंत शब्दांचा नुसता समूह; शब्दावडंबर; शब्दभारूड. २ वायफळ भाषण; बडबड. 'म्हणती शब्दजाळ टाकून । निश्चल एकाग्र ऐसिजे मनें ।' [सं. ] ॰तः-क्रिवि. शब्दानें. 'शब्दतः अर्थतः अगाघ खोली ।' -एभा २१.३६७. [सं.] ॰ताडन-न. एखाद्यास लागेल असें भाषण; शब्दांचा मार; टोचून बोलणें. 'सूज्ञास शब्द ताडन मूर्खास प्रत्यक्ष ताडन.' [सं.] ॰तात्पर्य-न. भाषणाचा सारांश; शब्दार्थ; मतलब. [सं.] ॰दोष-पु. १ शब्दांतील व्यंग, उणेपणा; शब्दापराध; शब्दवैगुण्य. काव्यप्रकाशांत एकंदर शब्ददोष १३ सांगितले आहेत. ते पुढीलप्रमाणें: श्रुतिकटु च्युतसंस्कृति, अप्रयुक्त, असमर्थ, निहतार्थ, अनुचितार्थ, निरर्थंक, अवाचक, अश्लील (जुगुप्सा, अमंगल, व्रीडा-युक्त), संदिग्ध, अप्रतीत, ग्राम्य, नेयार्थ. 'प्रताप रुद्रांत पुढील सतरा शब्ददोष सांगितले आहेत:-अप्रयुक्त, अपुष्ट-अपुष्टार्थ, असमर्थ, निरर्थक, नेयार्थ, च्युतसंस्कार-च्युतसंस्कृति, संदिग्ध, अप्रयोजक, क्लिष्ट, गूढ-गूढार्थ, ग्राम्य, अन्यार्थ, अप्रतीतिक, अविसृष्ट विधेयांश, विरुद्धमतिकृत, अश्लील (जुगुप्सा, व्रीडा, अमंगल- युक्त), परुष-श्रुतिकटु. २ दोषारोप; बोल; ठपका; आळ. (क्रि॰ ठेवणें; घालणें; लावणें; आणणें; येणें; लागणें). ३ शब्दामुळें, नांवामुळें लागलेला बट्टा; कलंक. उदा॰ 'प्रतिव्रतेस व्यभिचारिणी म्हटली शब्ददोष तर येतो'. ॰ध्वनि-पु. आवाज; स्वर; बोलणें. 'तिचा हा शब्दध्वनि । म्यांही श्रवणीं ऐकिला ।' [सं.] ॰परीक्षा-स्त्री. (वैद्यक) शब्दाच्या स्पष्टास्पष्टतेवरून किंवा जड हलकेपणावरून व्याधिनिदान करणें. [सं.] ॰पांडित्य-न. १ वक्तृत्व; भाषापांडित्य. २ कृती न करतां उगीच कोरडें व डौलाचें वाक्पाटव करणें; वृथा बडबड; प्रौढी. [सं.] ॰पारुष्य-न. कठोर भाषण; कटु भाषण. [सं.] ॰पाल्हाळ-पु. शब्दावडंबर; शब्दभारूड. शब्दजाल पहा. (क्रि॰ लावणें; मांडणें; करणें). ॰प्रमाण-न. शब्दांनीं दिल्ला पुरावा; साक्ष (तोंडी), [सं.] ॰प्रहार-पु. वाक्ताडन; मनाला लागतील, दुःख देतील असे शब्द बोलणें; रागें भरणें. [सं.] ॰बोध-न. शब्दज्ञान. शब्दबोधें सदोदित ।' -एभा २.१६७. ॰ब्रह्म-न. वेद. 'हें शब्दब्रह्म अशेष ।' -ज्ञा १.३; एभा ११.४९८. [सं.] ॰भेद-पु. १ शाब्दिक फरक. २ प्रतिशब्द; दुसरे शब्द. [सं.] ॰भेदी-वेधी-वि. १ आवाजावरून बाण मारण्यांत पटाईत, निष्णात, तरबेज. २ वस्तूचा नुसता नाद ऐकून त्यावर बिनचूक जाणारा, वेध करणारा (अस्त्र, शक्ति, मंतरलेला बाण इ॰). ३ (ल.) थोडक्या शब्दांवरून एखाद्याचें अंतरंग, मतलब, बेत जाणणारा; चांगला तर्कबाज. ४ दशरथ, अर्जुन यांचें विशेषण, अभिधान. [सं.] ५ मंत्रानें दुस- ऱ्याचा नाश करणारा; केवळ मंत्रोच्चारामुळें शत्रूचा नाश करणारा. ॰माधुर्य-न. शब्दांतील गोडी; मधुर भाषण. [सं.] ॰योगी- वि. (व्या.) व्याकरणांत नामें आणि नामाप्रमाणें योजलेले इतर शब्द यांना जोडून येणारें (अव्यय). उदा॰ वरे, खालीं, पुढें, मागें इ॰. हीं ज्यांना जोडलीं जातात त्यांचे सामान्यरूप होतें. ॰योजनास्त्री. १ शब्दांची निवड, योग, जुळणी. २ शब्द- रचना; वाक्यरचना. [सं.] ॰योनि-स्त्री धातु; शब्दाचें मूळ. [सं.] ॰रचना-स्त्री. शब्दांची रचना, मांडणी; वाक्यरचना; शब्दयोजना. [सं.] ॰राशि-पु. वेद. -मनको. ॰लालित्य-न. शब्दसौंर्य; शब्दांची मनोवेधक योजना. लालित्य पहा. [सं.] ॰वाहक यंत्र-न. विजेच्या सहाय्यानें दूर अंतरावरून बोल ण्याचें यंत्र. (इं.) टेलिफोन. 'सौ. महाराणीसाहेबास वारा घाल- ण्यास एक स्त्री कामगार पाठविण्यास शब्दवाहकद्वारें...हुकूम द्यावा' -ऐरापुप्र ४.२२४. ॰विचार-पु. १ शब्दसाधनविचार; प्रत्यय प्रकरण. (इं.) इटिमॉलॉजी. २ (व्या.) वाक्यांतील निरनिराळ्या शब्दांचा परस्परांशीं असणाऱ्या संबंधाचा विचार. ॰विता- पु. परमात्मा. -मनको. ॰वेध-पु. १ वेदांतील गूढ स्थळें; शब्दांचें कूट; शब्दांचें जाळें; आडंबर. 'कंठीं शब्दवेधांचें साखळें.' -शिशु १११. २ आवाजास अनुसरून बाण, गोळी वगैरे मारणें. ॰वेधी-वि. शब्दभेदी पहा. ॰वैपरीत्य-न. (बोलणाराच्या हेतूशीं) विरुद्ध, विपरीत शब्दयोजना; भलतीच शब्दयोजना; चुकीची पदयोजना. 'कुंभकर्ण बोलला निद्रापद, कुंभकर्णाच्या मनांत होतें इंद्रपद, तस्मात्-शब्दवैपरीत्य झालें.' [सं.] ॰शक्ति-स्त्री. १ शब्दाचा जोर; शब्दाचा वास्तविक, अगदीं बरो- बर असा अर्थ. शब्दाचा यौगिक अर्थ. २ (साहित्य) अभिधा, वझणा, व्यंजन इ॰ शब्दार्थ बोधकवृत्ति. [सं.] ॰शक्तिगम्य-वि. शब्दशः; मूळ अर्थाप्रमाणें. ॰शासन-न, शब्दांचा अर्थ, त्यांची योजना वगैरे संबंधी; व्याकरणशास्त्र, शब्दविचार, इ॰ नियम. [सं.] ॰शास्त्र-न. १ शब्दविज्ञान; शब्दांचें संपूर्ण विवरण कर- णारें शास्त्र; व्युत्पत्तिशास्त्र. २ व्याकरणशास्त्र. [सं.] ॰शुद्धि- स्त्री. १ व्याकरणनियमाप्रमाणें निर्दोष अशी शब्दयोजना; अचूक मांडणी. २ शब्दांतील दोष काढून टाकणें; शब्दांची तपासणी; दुरस्ती. ३ परकीय शब्द न वापरणें; भाषाशुद्धि. ॰शूर-पु. केवळ बोलण्यांत शूर, पटाईत. -धनुर्भंग पृ. ७३. ॰श्री-स्त्री. शब्दांची शोभा. 'एथूनि शब्दश्री सच्छास्त्रिक ।' -ज्ञा १.३४. ॰संग्रह-पु. शब्दसमूह; शब्दसमुच्चय; शब्दकोश-ष. [सं.] ॰संचय-पु. शब्दांचा सांठा, समूह; शब्दांची समृद्धि, वैपुल्य. ॰संदर्भ-पु. वाक्य रचनेंतील शब्दांचा एकमेकांशीं असलेला संबंध-अन्वय. [सं.] ॰सादृश्य-न. (अर्थानें अगदीं निराळे असणाऱ्या) शब्दांतील साम्य, सारखेपणा [सं.] ॰साध- निका-स्त्री. १ शब्दविचार; शब्दांची बनावट; व्युप्तत्ति. २ शब्दांची फोड, उकल; व्याकरण चालविणें. [सं.] ॰साधित- न. शब्दापासून, नामापासून साधलेला शब्द. -वि. (व्या.) नामापासून बनलेलें. याच्याउलट धातुसाधित. [सं.] ॰साम्य- न. शब्दांचा सारखेपणा; सादृश्य. [सं.] ॰सूची-स्त्री. शब्दांची सूची. याच्या उलट पदसूची वगैरे. [सं.] ॰सृष्टि-स्त्री. १ शब्दांचा संग्रह; शब्दांची रचना. २ (ल.) काव्य; ग्रंथ; प्रबंध. 'आतां वंदूं कवेश्वर । शब्दसृष्टीचे ईश्वर ।' -दा १.७. [सं.] ॰स्फुरण-न. (शब्दांचें फुरफुरणें, थरथरणें) ज्यांत जोडाक्षरें व ट वर्गांतींल अक्षरें एकसारखीं पुष्कळ येतात अशा कठोर, कर्ण- कटु प्रबंधाबद्दल म्हणतात [सं.] ॰स्वारस्य-न. शब्दांतील गोडी, लज्जत; शब्दामाधुर्य. [सं.] शब्दविणें-क्रि. बोलविणें. 'मीचि शब्दातें शब्दातें शब्दबिता ।' -एभा १३.३४४. शब्दाचा मार-पु. वाक्ताडन; शब्दप्रहार; कानउघाडणी; निर्भर्त्सना. 'वेड्यास टोणप्याचा मार, शहाण्यास शब्दाचा.' शब्दांची कसरत-स्त्री शंब्दांची कसरतीप्रमाणें वळेनें केलेली अस्वाभा- विक रचना. 'भाषा आणि तपश्चर्या, वचनाचें कष्ट, शब्दांची कसरत, या गोष्टींची जरूर असते.' -नाकु ३.४. शब्दाडंबर- न. शब्दजाल; केवळ शब्दांचें वैपुल्य; अर्थहीन शब्दरचना; पोकळ वक्तृत्व. [सं. शब्द + आडंबर] शब्दातीत-वि. शब्दांच्या किंवा बोलण्याच्या शक्तीबाहेरचें; वर्णन करितां येत नाहीं असें; शब्दांनीं वर्णन करण्यास अशक्य; अनिर्वाच्य. [सं. शब्द + अतीत] शब्दानुप्रास-पु. (साहित्य) शब्दाचा अनुप्रास; एक यमक- रचना; ज्यांत त्याच त्या शब्दाची पुनःपुनः आवृ्त्ति होतें असा अलंकार. याच्या उलट वर्णानुप्रास. [शब्द अनुप्रास] शब्दानु- शासन-न. शब्दशासन; शब्दांच्या लिंग, रूपांबद्दल, अर्थाबद्दल वगैरे नियम. [सं.] शब्दानशब्द-क्रिवि. प्रत्येक शब्द. 'या एकंदर बोलण्यांतील शब्दान्शब्द शांतपणानें शिष्याच्या मुखांतून निघत होता.' -उषःकाल. [शब्द + न् = आणि + शब्द] शब्दा- मृत-न. (काव्य) शब्दमाधुर्य; वाड्माधुर्य; अमृताप्रमाणें गोड शब्द. [शब्द + अमृत] शब्दार्थ-पु. १ शब्दाचा अर्थ, आशय २ शब्दाचा मूळ, शब्दाशः अर्थ; यौगिकार्थ. [सं.] शब्दालंकार- पु. (साहित्य) शब्दाच्या रूपावरून साधलेला अलंकार; काव्यां- तील अनुप्रास; यमकादि अलंकार; याच्या उलट अर्थांलंकार. या अलंकारांचें पुढील पांच प्रकार आहेत:-वक्रोक्ति, अनुप्रास, यमक, श्लेष, पुनरुक्तवदाभास. ह्यांत पुन्हां प्रत्येकाचे जे निरनिराळे भेद आहेत ते सर्व प्रतापरुद्रग्रंथांत व काव्यप्रकाशांत सांगितले आहेत. [सं.] शब्दाशब्द-पु. १ चांगले-वाईट शब्द; अविचाराचे व उद्धटपणाचें भाषण; वेळ प्रसंग न पहातां असभ्यपणाचें बोलणें. 'चौघांमध्यें शब्दाशब्द बोलूं नये, चांगले बोलावें' २ अप्रत्यक्ष व आक्षेप न घेतां बालणें; चांगलें किंवा वाईट (यांपैकीं कोणतेंच नाहीं असें) भाषण. 'मी त्याला शब्दाशब्द कांहीं बोललों नाहीं.' [सं. शब्द + अशब्द] शब्दित-न. भाषण; आवाज; बोलण्याचा स्वर; ध्वनि. -वि. १ उच्चारलेलें; बोललेलें; वदलेलें; घोषित केलेलें. २ शब्दानें युक्त केला जो वाद्यादि तो; वाजविलेलें; निना- दित. [सं.] शाब्द, शाब्दिक-वि. शब्दासंबंधीं, वाग्युक्त; वाणीयुक्त; वाचिक. 'तरी तप जें कां सम्यक् । तेंही त्रिविध आइक । शारीर मानसिक । शाब्द गा ।' -ज्ञा १७.२००. २ स्वरासंबंधीं; आवाजासंबंधीं. ३ (व्या.) नामासंबंधीं; नामवा- चक (प्रत्यय वगैरे). ४ अनुभवाशिवाय बडबड करणारे; केवळ शब्द जाणणारे; शब्दज्ञानी. 'वृथा शाब्दिकांचें शब्दज्ञान । तेंहीं व्याख्यान दाविलें ।' -एभा ११.६४८. -पु. शब्दांचे अर्थ जाणण्यांत व रूपें समजण्यांत, करण्यांत निष्णात, हुषार; तरबेज; वैयाकरण. [सं.] शाब्दबोध-पु. शाब्दिक बोध; अक्षरशः होणारा अर्थ; यौगिक अर्थ. [सं.] शाब्दिकसृष्टि-स्त्री. अलंकारिक, कुशल शब्दरचना; काव्यप्रबंधांतील शब्दरचनाचातुर्य. [सं.] शाब्दी-स्त्री. शब्दप्रवृत्ति. 'तेवींचि हा अनादि । ऐसी आथी शाब्दी ।' -ज्ञा १५.२३०.

दाते शब्दकोश

सुकाळ

पु. १ चांगला पाऊस पडून भरपूर धान्य आलेले दिवस. दुष्काळाच्या उलट काळ. २ समृद्धि; विपुलता; सुबत्ता. [सं. सु + काल] ॰पुरा-पु. अत्यंत विपुलता (धान्य, पाऊस, नफा इ॰ ची). [सुकाळ + पुरा] ॰सौदा-पु. अत्यंत स्वस्त मालाची देव- घेव (विशषतः नुकसानीचा दर्शक म्हणून योजतात). म्ह॰ सुकाळसौदा आणि हगवणीस काळ. सुकाळ्या-वि. १ अत्यंत विषयासक्त; कामोत्सुक (पुरुष, स्त्री). २ सुखार्थ वारंवार दुसर्‍या पुरुषापासून मैथुन करून घेत असावें अशा स्वभावाचा (पुरुष, स्त्री, नपुंसक).

दाते शब्दकोश

सूक्ष्म

न. ब्रह्म (सर्व विश्वाला व्यापून राहिलेलें पण सूक्ष्माहून सूक्ष्म). -पु. १ अणू. २ साहित्यांतील एक अलंकार. वाच्यालंकार पहा. वि. १ बारीक; लहान; थोडें; अणुप्रमाण. २ नाजूक; साधारण; किंचित्. ३ सुरेख; विरळ. ४ विरविरीत; ठिसूळ. ५ दिसण्यांत छानदार; सुरेख. [सं.] ॰दर्शक यंत्र- न. सूक्ष्म व अति सूक्ष्म पदार्थ पाहण्याचें यंत्र. ॰दर्शी-दृष्टि- द्रष्टा-वि. तीव्र नजरेचा;बारकाईनें पाहणारा; मर्मज्ञ. ॰देह- शरीर-पु.न. लिंगदेह पहा; वासनात्मक शरीर. ॰बुद्धि-वि. अतिशय बुद्धिमान; मर्मज्ञ; मार्मिक. ॰मान-न. १ अगदीं बरोबर व सूक्ष्म माप; बिनचूक मोजमाप. २ सविस्तर व तंतोतंत अंदाज. ३ (विपल, पल, विकला, कला इ॰ निमेषापासून संवत्सरापर्यंत) काल-विभागाचें मोजमाप; याचे उलट स्थूलमान. ॰वाद-पु. परमाणुवाद (एका परमाणूपासून आत्मा झाला हा). याचे उलट स्थूलवाद. ॰वादी-पु. सूक्ष्म वादाचें समर्थन करणारा. ॰संचयन गणित-न. अति सूक्ष्म संख्यांची किंवा परिमा- णांची बेरीज करणारें गणितशास्त्र. इंटीग्रल कॅल्क्युलस या इंग्रजी शब्दास प्रतिशब्द.

दाते शब्दकोश

शून्य

न. १ अभाव; साहित्य; नास्तित्व; रिक्तता; पोकळी. २ संख्येचा अभाव दाखविणारें चिन्ह; पूज्य. ३ अनुस्वार, विसर्ग दर्शक चिन्ह. ४ आकाश; अवकाश; पोकळी. ५ (वेदांत) निराकार ब्रह्म. 'आपुलिया साटोवाटीं । शून्य घेती उठाउठी ।' -ज्ञा १२. ५८. -वि. अभावात्मक; रिक्त; रिकामें; खाली; विरहित. (समा- सांत) द्रव्य-ज्ञान-युक्ति-अर्थ-जल-शक्ति-वृक्ष-पुष्प-पर्ण-शून्य. २ नग्न; उघड; निर्वस्त्र; पात्रादि विरहित; वस्तुविरहित; पोकळ; उघडेबोडकें. ३ उजाड; निर्जन; सुनें; बेचिराख. (समासांत) शून्य- मंदिर-गृह-प्रांत-स्थल. 'धावोनि ये उटज केवळ शून्य पाहे ।' मोरामायण १.४२५. ४ बधिर; चेतनारहित; संज्ञाविरहित. 'तो आपल्या शोकावेगानें इतका शून्यचित्त झाला होता...'-मोयचा- बाजार. (वाप्र.) शून्यस्थानीं पडणें-निष्फळ, निरर्थक होणें; वाऱ्यावर जाणें. 'परि जेवणार ते रोगिष्ट. तरि ते सुगरिणीचे कष्ट । शून्यस्थानीं पडियेलें ।' [सं. शुन् = जाणें] सामाशब्द ॰ख्याति- स्त्री. ख्याति पहा. ॰दृष्टि-स्त्री. १ निर्विकार, चेतनारहित दृष्टि. 'तिच्याकडे तो शून्यदृष्टीनें पहात बसला.' -मायेचा बाजार. २ (नृत्य) एक अभिनय. डोळ्यांतील बुबुळें स्तब्ध व एका रेषेत ठेवणें, पापण्या निश्चळ दाखविणें. हा चिन्तादर्शक आहे. ॰देह-वि. बधिर, चेतनारहित अंग झालेला. विशिष्ट रोगानें पीडिलेला. ॰परि- कर्माष्टक-न. (गणित) शून्यासंबंधीं बेरीज, वजाबाकी, गुणा- कारादि आठ क्रिया. परिकर्माष्टक पहा. ॰मंदिर-न. मूर्ति विरहित देऊळ; मशीद 'श्री शाळिग्रामशिळा यवनाचे शून्य मंदिरीं पडली ।' -स्फुटआर्या. ॰मस्तक-की-वि. ज्याचे तीन किंवा चार पाय पांढरे असून डोक्यावर (किंवा कानाजवळ) भोंवरा वगैरे कोण- तेंहि चिन्हे नसतें असा (घोडा). -अश्वप १.९७. ॰लब्धी-स्त्री. १ भाज्यापेक्षां भाजक मोठा असल्यास भागाकार शून्य येतो ती. २ (अर्वाचीन) अत्यंत सूक्ष्म संख्यांचें गणित. 'शून्यलब्धी पर्यंत माराकूट करून मजल मारा.' -नि १०३०. ॰लिंग-न. निराकार परमात्म्याचें, ब्रह्माचें, चिन्ह खूण. 'जे शून्यलिंगाची पिंडी । जे परमात्मयाची करंडी ।' -ज्ञा ६.२७३. ॰वाद- पु. जग हें केवळ अभावात्मक आहे, म्हणजे कांहीं नाहीं म्हणजेच ब्रह्म असें मत. ॰वादी-पु. शून्य वादाचा पुरस्कर्ता. ॰वेला-वेळ-स्त्री. (ज्योति) मध्यान्ह, मध्यरात्र, व संध्या- काळ या वेळांस संज्ञा. कारण यावेळीं केलेलीं कृत्यें निष्फळ होतात. ॰शेज-सेज-स्त्री. माया. ॰सिद्धान्त-पु. पदार्थ- मात्र नाशिवंत म्हणून नाहींतच व ब्रह्महि असतें तर प्रत्ययास येतें, ज्या अर्थीं प्रत्ययास येत नाहीं व जें नाहीं तेंच ब्रह्म हा सिद्धान्त. शून्यवाद पहा. ॰हृदय-वि. १ संज्ञा, जाणीव नाहींशी झालेला २ निष्ठुर; क्रूर; (मृदु) भावना नाहींशा झालेला; अन्तःकरण नसलेला. ३ मन, इच्छा, वासना नष्ट झालेला; वासनांच्या पलीकडे गेलेला; अतींद्रिय. शून्याकार- वि. १ अभावरूप; ओसाड; निर्जन; उध्वस्त; शून्यरूप. २ स्थलकालादि मर्यादा नसलेलाच निराकार; सर्वव्यापी, (प्रस- रणशीलतेनें); सर्वनाशी (आवरणशीलतेनें) (ब्रह्म). शून्या- कृति-वि. अक्रिय; नाकर्ता. 'लॉर्ड लान्सडौनसारखे शून्याकृति व्हाइसरॉय आले कीं... निरर्गल यजमान आमचे डोक्यावर बस- तात.' -टिले १.१.२८६. शून्यतुल्य-वि. निरुपयोगी; निर्माल्य- वत्' शून्यालय-न. मशीद-(कर्वेयांचे) आत्मवृत्त १४.

दाते शब्दकोश

spectro-scope

वर्ण (पट) दर्शक

वास्तव शास्त्रीय परिभाषा (पुणें विद्यापीठ मराठी परिभाषा समिती, १९६१)

वर्ण (पट) दर्शक

वास्तव शास्त्रीय परिभाषा (पुणें विद्यापीठ मराठी परिभाषा समिती, १९६१)

spectro-scope, constant deviation

स्थिर अपगमन वर्ण (पट) दर्शक

वास्तव शास्त्रीय परिभाषा (पुणें विद्यापीठ मराठी परिभाषा समिती, १९६१)

spectro-scope, grating

जालक वर्ण (पट) दर्शक

वास्तव शास्त्रीय परिभाषा (पुणें विद्यापीठ मराठी परिभाषा समिती, १९६१)

spectro-scope, prism

चितिकीय वर्ण (पट) दर्शक

वास्तव शास्त्रीय परिभाषा (पुणें विद्यापीठ मराठी परिभाषा समिती, १९६१)

stroboscope

स्तंभन (अवस्था) दर्शक

वास्तव शास्त्रीय परिभाषा (पुणें विद्यापीठ मराठी परिभाषा समिती, १९६१)

स्तंभन (अवस्था) दर्शक

वास्तव शास्त्रीय परिभाषा (पुणें विद्यापीठ मराठी परिभाषा समिती, १९६१)

तरडा

वि. १ शुष्क; रसहीन; जून (भाजी, मिरची, तोंडलें, भाजीपाला इ॰). २ पुष्कळदा हा शब्द वय, शुष्कपणा, जूनपणा, चिवटपणा इ॰ दर्शक विशेषणास पुढें अथवा मागें जोडून आधिक्य दाखविण्यांत येतें. उदा॰ जून जून तरडा = अतिशय जून; रसशून्य.

दाते शब्दकोश

तरडा, तराडा      

वि.       १. शुष्क; रसहीन; जून (भाजी इ.). २. पुष्कळदा हा शब्द वय, शुष्कपणा, जूनपणा, चिवटपणा इ. दर्शक विशेषणाला पुढे अथवा मागे जोडून आधिक्य दाखविण्यात येते.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

त्व

भाववाचक नामें साधण्याकरितां संस्कृत नामें व विशेषणें यांना लावावयाचा प्रत्यय. त्व प्रत्यय लागून झालेलीं भाववाचक नामें नपुंसकलिंगी असतात. 'ता' प्रत्यय लावून भाववाचक नामें साधण्याचाहि एक प्रकार आहे. परंतु हीं दोन्ही प्रकारचीं नामें पुष्कळ अंशीं पर्यायवाचक असलीं तरी त्यांत कांहीं अपवाद आहेत व भाववाचक नामें साधतांना कांहीं ठिकाणीं 'ता' तर कोठें 'त्व' हाच प्रत्यय विशेषेंकरून लावतात. भाववाचक नामाचा 'ता' प्रत्यय विशेषतः विशेषणांसच लावतात आणि 'त्व' हा प्रत्यय जरी विशेषणांसहि लावितात तथापि मुख्त्यवेंकरून नामांस लावण्याचा प्रघात आहे. दुसरें असें कीं 'ता' प्रत्यय लागून झालेलीं नामें गुणवाचक असतात जसें:-योग्यता, आर्द्रता, उष्णता इ॰ तर 'त्व' लागून, हुद्दा, कार्य, स्थिति, आयुष्यांतील निरनिराळें वयोमान इ॰चीं दर्शक भाववाचक नामें बनतात. उदा॰ राजत्व, प्रधानत्व, पंडितत्व, मित्रत्व, पितृत्व, बालत्व, वृद्धत्व, तरुणत्व इ॰. तिसरें असें, कीं 'ता' व 'त्व' हे दोन्ही जरी गुणधर्मदर्शक भाववाचक नामांचे प्रत्यय आहेत, तरी 'त्व' लागून झालेल्या नामांसच विशेष प्राधान्य आहे हें पुढील उदा हरणांवरून दिसून येईल. जसें:-लघुता, गुरुता, द्रवता, महत्ता, अज्ञानता, दातृता इ॰ रुपांपेक्षां लघुत्व, गृरुत्व, दातृत्व, महत्त्व, अज्ञानत्व, इ॰ रुपेंच अधिक रूढ व सरस आहेत. चौथें असें कीं, 'ता' हा अधिक रूढ प्रत्यय आहे तर 'त्व' हा अधिक भारदस्त प्रत्यय वाटतो. जसें:-दुष्टता, आम्लता, मिष्टता, तीक्ष्णता कटुता, क्षारता हीं रूपें दुष्टत्व, आम्लत्व, मिष्टत्व इ॰ रुपांपेक्षां अधिक रूढ आहेत परंतु दुष्टत्व, आम्लत्व हीं रूपें अधिक भारदस्त वाटतात.

दाते शब्दकोश

थोबाड, थोबाडी, थोबकाड      

न. स्त्री.       पहा : थोतरी (कुरूपपणा, स्थूलपणा, घाणेरडेपणा इ. दर्शक निंदाव्यंजक शब्द.) [सं. स्थपुट] (वा.) थोबाड फोडणे, थोबाडी फोडणे, थोबकाड फोडणे, थोबाड रंगवणे, थोबाडी रंगवणे, थोबकाड रंगवणे – तोंडात मारणे; चांगली अद्दल घडवणे. थोबाडात माती घालणे – शरम आणणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

थोबाड-डी थोबकाड

नस्त्री. गालफड; थोतरी पहा. (कुरूपपणा, स्थूलपणा, घाणेरडेपणा इ॰ दर्शक निंदाव्यंजक शब्द व चपराकांची भीति दाखविण्याकरितां योजण्याचा शब्द. [सं. स्थपुट] (वाप्र.) ॰णें-सक्रि. १ तोडांत चपराक, चापटी मारणें. २ (ल.) बिघडणें; विसकटणें; पराजित करणें. [थोबाड; सं. स्तुब्धानम् -शर] ॰फोडणें-१ तोंडांत मारणें. २ चांगली अद्दल घडविणें. ॰रंगविणें-तोंडांत मारणें. थोबाडांत माती घालणें- शरमविणें.

दाते शब्दकोश

उपायोज      

पु.       (यंत्र.) मूळ यंत्राला जोडता येणारे भाग. उदा. यंत्रे, हत्यारे, मापक, दर्शक इ.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

वाची

वि. वाचक; दर्शक; दाखविणारें. उदा॰ गुण-काल- देश-धर्म-वाची.

दाते शब्दकोश

वाचक

पु. शब्द; भाषणाचा विभाग, तुकडा, अवयव; वाक्य; शब्दसमूह. -वि. १ दर्शक; दाखविणारा; अर्थाचा. उदा॰ काल-देश-स्थल-वृक्ष-अग्नि-वाचक. 'अन्य व्यावृत्ति सिद्ध । वाचक नव्हें ।' -अमृ ५.१३. २ वाचणारा. 'मुका होय वाचकाचा ।' -अमृ ६.६७. ३ महारांचा धर्मगुरु. -अस्पृ ४२. [सं. वच्] वाचणी-स्त्री. १ वांचन; लिहिलेल्या अक्षरांचें उच्चारण. २ वाचावयाचा धडा; पाठ. वाचणें-क्रि. लिहिलेलीं अक्षरें उच्चारणें; पठण करणें. (गो.) वाचप. [सं. वच् = बोलणें] वाचन-न. पठणक्रिया; वांचण्याची क्रिया; अभ्यास; पठण.

दाते शब्दकोश

वैजयंती

स्त्री. १ काळी तुळस. २ एक फुलझाड. ३ विष्णूच्या गळ्यांतील माळ. हींत पृथ्वी-आप-तेज-वायु-आकाश या पांच तत्त्वांचीं दर्शक नीळ, मोतीं, माणिक, पुष्पराज व हिरा अशीं पांच रत्नें असतात. -ज्ञा ११.६०३. 'परम विसळ जेथें वैज- यंती विराजे ।' -सारुह ८.११९. [सं.] ॰माला-ळ-स्त्री. वैजयंती अर्थ ३ पहा. 'वरी डोले वैजयंतीमाळ ।'

दाते शब्दकोश

वास

पु. १ गंध; परिमळ; पुष्पादिकाचा बरावाईट गंध; दर्प. २ (ल.) झांक; छटा; स्वाद; अंश; सुगावा; खूण; अस्तित्वाचा दर्शक अंश वगैरे. 'तिला क्रोधाचा वास काय आला.' -नारुकु ३.८४. ३ अवशिष्ट अंश; अल्पांश; लेश; किंचितहि भाग. 'विहिरींत पाण्याचा वास नाहीं.' ४ हिंग. (रात्रीचे वेळीं सांकेतिक नांव). [सं. वास् = गंध सुटणें] वास काढणें-घेणें-पाहणें-शोधणें-लावणें-माग काढणें; सुगावा, पत्ता लावणें. वास निघणें-लागणें-पत्ता लागणें; सांपडणें. वास मारणें-दुर्गंध येणें; घाण येणें. वास सुटणें-चांगला वास येणें; सुगंध येणें; दरवळणें; घमघमाट सुटणें. वासाचा-वि. झांक, छटा, रूप. गुण वगैरे असलेला. वासाचें पोतें-न. १ (पदार्थाचा अभाव असून केवळ वास राहिला आहे अशी वस्तु यावरून ल.) श्रीमंती जाऊन गरीब झालेला मनुष्य; गरीब मनुष्य. २ (वास असलेली वस्तु यावरून ल.) श्रीमंत, गबर मनुष्य. वासकट, वासट-वि. १ दुर्गंधयुक्त; घाणेरा; वाईट वास येणारा. २ वाशेरा-ळा पहा. वासन-न. सुवासिक करण्याची क्रिया; गंधयुक्त करण्याची क्रिया; सुगंधित करणें. [सं. वास्] वास- वारा-पु. अत्यंत अल्प अंश; केवळ वास. (निषेधात्मक उपयोग) [वास + वारा] वासळणें-अक्रि. (फळें वगैरे पक्वदशेस आल्यामुळें) गंध पसरणें; दरवळूं लागणें; (पर्याय) वासाडणें. [वास] वासाळ-वि. वाशेरा-ळा पहा. वासित-वि. सुगंधित; सुगंधयुक्त; वास लावलेलें. [वास]

दाते शब्दकोश

विभ्रम

पु. १ चूक; दोष; स्खलन. २ भ्रम; भ्रांति; गोंधळ. 'संभोह विभ्रम भासे । गिळित धैर्याचीं आविसें ।' -ज्ञा ७.७७. ३ स्त्रियांचा प्रेममूलक हावभाव, चाळा, चेष्टा, विलास. भाव पहा. [सं. वि + भ्रम] विभ्रांत-पु. गोंधळ, गडबड, दर्शक अभिनय. -वि. गोंधळलेला; घोंटाळलेला; चुकलेला; गडबडलेला. [सं.]

दाते शब्दकोश

विकसणें

अक्रि. उमलणें; खुलणें; फुलणें. [सं. विकसन] विकसन-न. उमलण्याचा व्यापार. [सं.] विक- सित-वि. उमललेलें; प्रफुल्लित. 'विकसित लोचनपंकज ज्याचे जननी म्हणे हें चिपडें ।' -मध्व. [सं.] ॰दृष्टि-स्त्री. (नृत्य) वरच्या पापण्या वर व खालच्या खालीं ठेवणें व बाहुल्या स्थिर ठेवणें. गर्व, राग, क्रूरपणा इ॰चा दर्शक हा अभिनय आहे. [सं.]

दाते शब्दकोश

नेत्र

पुन. डोळा; नयन. 'जें उपजवी सुखदुःख । नेन्नव्दारें । ' -ज्ञा २.११६. [सं.] ॰मोडणें-नेत्रकटाक्ष फेंकणें; डोळे मारणें. 'खेळतां नाटकें दशावतारी । तेथें येती सुंदरनारी । नेत्र मोडिती कळाकुसरी । परी ते अवघे धटिंगण । ' -दा ६.८.११. ॰कटाक्ष- पु. दृष्टिविक्षेप; वांकड्या, काण्या डोळ्यानें पाहणें. ॰कोरान्न-न. निव्वळ दृष्टिसुख; ज्यांत प्रत्यक्ष वस्तूची प्राप्ति न होतां नुसत्या डोळ्यानें पाहून समाधान मानावें लागतें तो प्रकार. [नेत्र + कोरा + अन्न] ॰पल्लवी-स्त्री. १ एक खुणेची भाषा; डोळ्यांच्या हालचाली- वर, खुणांवर बसविलेली भाषा; नेत्रसंकेत. 'सांग, तुला समजणार्‍या नेत्रपल्लवीनें आतांच माझें मनोगत तुला सांगून ठेवूं का?' -भा १०७. २ डोळे मिचकावणें; डोळ्यांनीं खुणा करणें. ॰पातें-न. डोळ्याचें पातें. 'लवो विसरली नेत्रपातीं । कृष्णमूर्ति पाहतां । ' -एरुस्व ६.२०. ॰पालवी-नेत्रपलवी पहा. 'नेत्रपालवी नाद- कळा । करपालवी भेदकळा । ' -दा ५.५.२७. ॰युगुल-न. दोन्ही डोळे; नेत्रद्वय. ॰रस-पु. नेत्रगोलपटलांच्या आंतील पार- दर्शक पदार्थ. -मराठी ६ वें पुस्तक, पृ. १०३ (१८७५) ॰रोग-विकार-पु. १ डोळ्याचा रोग. २ दृष्टीमुळें, पाहण्या- मुळें जडलेला विकार. 'प्रीति हा एक नेत्ररोग आहे. ' -भा ४१. ॰वटी-स्त्री. बुबुळ; त्यांतील बाहुली. ॰विकारमाया-स्त्री. (काव्या) नेत्रकटाक्षानें दृग्गोचर होणारी माया; कृपादुष्टीनें पहाणें. 'त्या दाविती नेत्रविकारमाया ।' ॰व्रण-पु. डोळ्यांतील किंवा त्याच्या आजूबाजूचा फोड इ॰ ॰संकेत-पु. डोळ्यानें खुणावणें; नेत्रपल्लवी. 'दोघांचे आपसांत नेत्रसंकेत झाले.' -मोर २३. ॰स्पर्श-पु. आचमन, प्राणायाम इ॰ करावयाचें नसेल तेथें हाताच्या बोटांनीं डोळ्यास पाणी लावणें; कोणत्याहि धार्मिक कृत्याच्या आरंभीचा विधि; डोळ्यांना पाणी लावणें. नेत्रांजन-न. काजळ; डोळ्यांत घालावयाचें अंजन; सुरमा. नेत्रांतर-न. डोळा चुक- विणें. 'अतर्क्य नेत्रांतरें नेणें । कां धातूवादें सर्वस्व घेणें ।' -एभा २३.२०७. नेत्रांतील दर्पण, नेत्रदर्पण-दृङ्मज्जा-मंडळ. (इं.) रेटिना. -मराठी ६ वें, पुस्तक, पृ. १०३. (१८७५) नेत्रार्श-पु. डोळ्याचा एक रोग; नेत्रव्रण. पुरुळ उठणें. नेत्रो- न्मीलन-न. १ दक्षिणाचारांतील एक विधि; चक्षुरुन्मीलन पहा. २ (सामा.) डोळे उघडणें.

दाते शब्दकोश

लग्न

न. १ सोयरीक; शरीरसंबंध; विवाह. (क्रि॰ करणें. होणें). ३ मूहूर्तावर केलेला विवाहसमारंभ. (क्रि॰ लावणें; लागणें). ४ ऐक्य; साहचर्य. 'मग लग्नीं जेविं ॐकारु । बिंबींचि विलेसे ।' -ज्ञा ८.११६. ५ योग; मुहूर्त; समय. -ज्ञा १६.३०३. 'हनुमान् प्रभुला भेटे ज्या लग्नीं फार चारुतें ।' -मोरामायणें पृ. ६. ६ क्रांतिवृत्तांतील प्रत्येक राशीबरोबर एकमागून एक वर येणारा विषुववृत्ताचा विभाग; विवक्षित कालीं उदयाचलाशीं संलग्न असणारा राशि. ७ राशिचा उदयकाल; राशींत सूर्याचा गमनकाल (अहोरात्रांत एकंदर बारा राशींचीं बारा लग्नें होतात). उदा॰ मेष वृषभ लग्न, उदय-अस्त लग्न. -वि. १ संयुक्त; संबंद्ध; चिकट- लेलें. २ (ल.) निरत; आसक्त; तल्लीन. [सं.] (वाप्र.) ॰नाहणें-विवाहविधींत सांगितलेलीं नहाणीं व दुसरे संस्कार करून घेणें. सामाशब्द- ॰क-पु. हामीदार; जामीन. ॰कळा- स्त्री. लग्नसमारंभामध्यें नवरीच्या चेहऱ्यावर दिसणारें किंवा दिस- तेसें वाटणारें तेज, टवटवी. ॰कार्य-न. मंगल कार्य (लग्न, मुंज गर्भाधान इ.) [सं.] ॰कुंडली-स्त्री. जन्मकालीं पूर्वेकडे उदय पावलेल्या राशीचा दर्शक अंक पहिल्या घरांत मांडून तेथून डावी- कडे क्रमानें प्रत्येक घरांत तकदनुरोधानें राशि व त्या राशींचे ग्रह लिहून तयार केलेलें बारा घरांचें कोष्टक. [सं.] ॰गंडांत-पु. कर्क-सिंह, वृश्चिक-धनु व मीन-मेष या लग्नांच्या संधीची एक घटका (जसे, कर्काची शेवटची अर्धी व सिंहाची पहिली अर्धीं मिळून एक). [सं.] ॰गीत-न. विवाहगीत; मंगलाष्टक. [सं.] ॰गोष्ट- ष्टी-न. एव. अव. १ एखाद्याचा विवाह किंवा दुसरा एखादा इष्ट हेतु सिद्धीस जाण्याकरितां त्या मनुष्याची केलेली शिफारस, प्रशंसा. जसें.-'नोकरी नसली म्हणून काय झालें, तो मुलीवर पांचशेर सोनें घालील अशी आमची खात्रीच आहे' 'हा चांगला पतीचा माणूस आहे, याला हजार रुपये कर्जाऊ दिले तरी चिंता नाहीं इ॰ २ अनुरागाचीं पोकळ किंवा निरर्थक बोलणीं; मदतीचीं आश्वासनें. ॰घटि(ट)का-स्त्री. १ लग्न किंवा मुंज लावण्याकरितां ज्योति: शास्त्रांत शुभ म्हणून सांगतलेला मुहूर्त, वेळ. २ मुहूर्त साधण्या- करितां पाण्यांत टाकलेलें वेळ मापण्याचें अर्धगोलाकृति भांडें; घटि- पात्र. ३ असा निश्चित केलेला आणि साधलेला काल, मुहूर्त. ४ (ल.) अणीबाणीची वेळ, प्रसंग; कांहीं करून अडचण पार पाड- लीच पाहिजे अशी बेळ. 'ब्राह्मण तर जेवावयास बसले, घरांत तूप नाहीं अशी लग्नघटिका खोळंबली आहे म्हणून तुमच्याकडे धांवत तूप मागावयास आलों.' [सं. लग्नघटिका] ॰घर-न. १ ज्यामध्यें लग्नसमारंभ चालला आहे तें घर; जानोशाचें घर. २ (ल.) लग्नां- तल्याप्रमाणें माणसांनीं गजबजलेलें, फार गडबड चालली आहे असें घर. ३ लग्नासारखा भरमसाट खर्च चालला आहे, आनंदी- आनंद आहे असें घर. ॰चिटी-ठी-ठ्ठी-स्त्री. १ लग्नाचा परवाना (सरकारकडून शुद्रादिकांस मिळत असलेला). २ लग्नमुहूर्त ज्यांत आहे असा जोशानें केलेला कागद. ३ लग्न-मुंजीची आमंत्रण- पत्रिका; कुंकोत्री. ॰चु(चू)डा-पु. लग्नांत नवरीस व तिच्या बाजूच्या वऱ्हाडणींस बांगड्या इ॰ भरण्याचा विधि. हा घाण्याच्या पूर्वी होतो. ॰टका-क्का-पु. लग्न लागल्याबद्दल घेण्यांत येणारा सरकारी कर (हा शुद्राकडून घेण्यांत येई). ॰टीप-स्त्री. लग्नाच्या मूहूर्ताची यादी. ॰तीथ-स्त्री. ज्या तिथीस लग्नाचा मुहूर्त येतो ती तिथि. [सं. लग्नतिथि] ॰थर-पुन. लग्नासाठीं घेतलेलें कापड- चोपड. थर पहा. [दे.] ॰नक्षत्र-न. लग्नास शुभ असलेलें नक्षत्र. [सं.] ॰पत्रिका-स्त्री. वधूवरांच्या पत्रिकांवरून लग्नाचा शुभ मुहूर्त नक्की करून उभय कुलांचा उल्लेखासह तो ज्यावर लिहूल ठेवतात तो कागद. लग्नापूर्वी याची पूजा करतात. [सं.] ॰प्याला-पु. (तेली) नवऱ्यामुलानें लग्नासाठीं मुलीकडे जाण्याचा समारंभ; वरघोडा. -बदलापूर २६९. ॰भुज-पु. (ज्यो.) मेषादिक लग्नाचा भुज; चारकांड. ॰मंडप-पु. लग्नसमारंभा- करितां उभारलेला मांडव. [सं.] ॰मास-पु. लग्न करण्यास शुभ म्हणून सांगतलेला महिना; लग्नाचा मोसम. [सं.] ॰मुहूर्त-न. १ लग्नास शुभ अशी वेळ, मुहूर्त. याचे दिवा, गोधूल किंवा गोरज आणि रात्रौ असे तीन प्रकार आहेत. २ (लग्न आणि मुहूर्त = मोहतर, कमी दर्जाचें लग्न). लग्नकार्य पहा. [सं.] ॰वेळा- स्त्री. लग्नघटिका; लग्न लावण्याची वेळ. 'त्रिवेणीसंगमीं तिसी साधियेली लग्न वेळा ।' -मध्व ३९१. ॰शिष्टाई-स्त्री. लग्नाची मध्यस्थी; लग्नासंबंधीं बोलणें; लग्न जुळविणें. ॰शुद्धि-स्त्री. चिंतिल्या कार्याच्या आरंभाकरितां राशींची निर्दोषता, शुभता. [सं.] ॰सराई-स्त्री. लग्नाचा हंगाम, मोसम (मार्गशीर्षापासून ज्येष्ठ महिन्यापर्यंत). ॰साडा-न. १ लग्नांत वधूपक्षाकडून वराच्या आईस देण्यांत येणारें लुगडें. २ (कांहीं प्रांतांत) वराकडून वधूस देण्यांत येणारें उंची वस्त्र (पैठणी). ॰सोह(हा)ळा-पु. लग्न- समारंभांतील मेजवान्या, उत्सव इ॰; विवाहोत्सव. 'लग्नसोहळा ते वेळीं । चार दिवस जाहला ।' लग्नाऊ-वि. लग्नाच्या प्रसंगास उपयोगी, योग्य (अहेरी वस्त्र इ॰). लग्नाचा-वि. लग्नाच्या संबंधाचा (नवरा, बायको). ॰लग्नाक्षता-स्त्रीअव. लग्नांत वरानें व वधूनें परस्परांवर टाकलेले तांदूळ (सामा.) लग्नविधि. लग्नीक-वि. (गो.) बांधलेला. लग्नक पहा. 'कुटुंबाचा मालक आपल्या वहिवाटाचा हिशेष देण्यास लग्नीक आहे.' -गोमांतक रीतीभाति ११. [सं. लग्नक]

दाते शब्दकोश

घटना-न

स्त्रीन. १ घडणें; बनविणें; घडण; रचना; विधि- घटना. 'हें सर्व जगत् ईश्वराची घटना आहे.' २हस्तकौशल्य; कलाकुसरीचें काम. ३प्रसंग; बनाव; घडणें; उपस्थिति. 'काननामाजीं पडलें घटन । डोंगरारण्यीं कैचें जीवन ।' -दावि २८०. ४ घटणूक; (लग्न इ॰ काच्या संबंधांत) रदबदली, मध्यस्थी; घडवून. आणण्याची खटपट. बेत; सल्लामसलत. 'येईल शीघ्र घटना करुनी तियेची ।' -र ३०. 'उभय पक्षांसी ऐक्य घटना साधिजेल.' 'तुम्ही घटना कराल तर त्याचें लग्न होईल.' ५ कार्याची योजना. 'कोणत्याही एका घटनेचा बिघाड झाला असतां तिच्या जागीं दुसरी घटना करावयाची झाली तर ...' -केले १.४१. ६ राज्याच्या -सभेच्या-संस्थेच्या अंतर्व्यव- स्थेची-कारभाराची नियमावली; कायदेकानू. 'हिंदी स्त्रियांच्या युनिव्हर्सिटीच्या घटनेबद्दलचा हा लेख येथें संपवितों.' -केले १ ४९. ७ बनावणी; निर्मिति; बनण्याची क्रिया, पद्धत. ८ (शाप.) संयोगीकरण; समाहार. (इं.) काँपोझिशन. [सं. घट्-घटना] सामा- शब्द- घटनात्मक-वि. १विधायक; रचनात्मक. २ बनावट, निर्मिति, घटना याबद्दलचा; घटनेसंबंधीं. [घटना + आत्मक] ॰दर्शकसारणी, घटकसारणी-स्त्री. (रसा.) रासायनिक संयुक्त पदार्थ कोणत्या मूलद्रव्यांचा बनलेला आहे, ते मूल पदार्थ कसे निराळे करतां येतात इ॰ माहिती दर्शविणारी सारणी, आरा- खडा. (इं.) स्ट्रक्चरल फार्म्युला. [घटना + दर्शक + सारणी = आराखडा] ॰मंडळ-न. (एखाद्या संस्थेची, सभेची, राज्य- मंडळाची) घटना तयार करण्याकरितां नेमलेलें मंडळ. [घटना + मंडळ] ॰सादृश्य-न. समधर्मता; तुल्यजातीयता; सममूलता; घटनेंतील सारखेपणा. (इं.) होमोलोजी. [घटना + सादृश्य]

दाते शब्दकोश

भार

पु. १ गुरुत्व; जडपणा. ज्या योगानें पदार्थ निराधार असतां खालीं येतो तो पदार्थाचा धर्मविशेष. २ वजन तोलून काढलेलें परिमाण. ३ कोणतीहि वजनदार वस्तु; वस्तु; दाब; दडपण. 'कागद वार्‍यानें उडतात त्यावर कांहीं भार ठेव.' ४ (ल.) (काम, उपकार, मेहेरबानी इ॰ चें) वजन; ओझें. 'तो भारु फेडावेआ जगन्नाथा । अवतरलासी तूं ।' -शिशु १४७. ५ (ल.) ओझ्याप्रमाणें मानलेलें काम; दयेचें कृत्य; उपकार. ६ (ल.) महत्त्व; गौरव; धन्यता; वजन ७ शैत्यादि विकरामुळें डोक्यास भासणारा जडपणा. 'आज माझे मस्तकास भार पडला आहे.' ८ एक रुपयाच्या वजनाइतकें वजन; एक तोळा वजन. 'ही वाटी पंचवीस भार आहे.' ९ (समासांत पदलोप होऊन) विशिष्ट वजन. 'पैसाभार लोणी, ढबूभार साखर, वीस रुपये भार गूळ.' १० ओझें; वजन उदा॰ काष्ठ-तृण-पर्ण-भार. 'सोनसाखळीचा झाला भार ।' -मसाप २.१. ११ (सैन्याचें एक अंग म्हणून) संख्या- बल. जसें-अश्वभार, कुंजलभार, दळभार, रथभार इ॰. १२ (काव्य) कळप; तांडा; समूह. 'वाटेसि गडगडतां व्याघ्र । थोकती जैसे अजाचे भार।' १३ समूह; समुदाय; मेळा; गर्दी. उदा॰ गोभार, द्विजभार, भृत्यभार इ॰. 'आशीर्वचनीं जयजयकार । करूनि बैसला ऋषींचा भार ।' -मुआदि १६.११०. १४ सेना; समूह. 'दळ- व्याचा भार कुरडूंच्या मैदानीं गेला ।' -एपो ६८. १५ भर; बहर.'मग हें रसभावफुलीं फुलैल । नानार्थ फळभारें फळा येईल ।' -ज्ञा ११.२०. 'नम्र होती फळभारें तरुवर सारे' -शाकुंतल. १६ ओझें; काळजी; जबाबदारी; आधार. 'सखे, मी सर्व भार परमेश्वरावर ठेविलेला आहे.' -रत्न २.१. १७ व्यूह; बेत. 'ते पाहोन राजभुवरानें लष्कर पायदळ फौज करून भार रचिले.' -इमं ९. १८ आठ हजार तोळे वजन. (चार तोळे = १ पल; १०० पला = १ तुला; २० तुला = १ भार. 'रत्नें प्रस्थ भार एक एक कनक । ऐसी दक्षिणा आरंभीं ।' -जै १.९१ -वि. जड. 'मत्प्रश्न भार कां गमला?' -मोअश्व २.३०. [सं. भार; फा. बार] ॰कस-नपु. १ गाड्यावर किंवा उंट, हत्ती इ॰च्या पाठीवर सामान कसून बांधण्याचा सोल, दोर. २ वादळांत तंबू डळमळूं नये ,म्हणून त्याच्यावरून टाकून जमिनीस खिळविलेली दोरी. [तुल॰ फा. बारकश्] ॰ग्रस्त-पीडित, भाराकुल, भाराक्रांत, भारान्वित, भारार्त-वि. (शब्दशः व ल.) ओझ्यानें पीडि- लेला, त्रासलेला. ॰दडीचावि. वजनदार; भारदस्त. ॰दर्शक- वि. वजन दाखविणारें (परिमाण). उदा॰ मण, पौंड, तोळा, मासा इ॰. ॰दस्त-दस्ती-दास्त-दार-वि. १ वजनदार; मह- त्त्वाचा. २ बहुमोलाचा; मूल्यवान्. [भार + फा.दस्त इ॰] ॰दस्ती- दारी-स्त्री. १ वजन; महत्व. २ हुकमत चालविण्याचें सामर्थ्य, अधिकार, सत्ता. भारंदाज-वि. वजनदार; फायदेशीर; भरभरा- टीचा (माणूस, धंदा). [फा. बार + अंदाज] भारंदाजीस्त्री. सार; महत्त्व; भरीवपणा; फायदेशीरपणा (मनुष्य, काम इ॰चा). ॰दार-वि. निष्णात; प्रवीण; वाकबगार; महत्त्वाचें काम कराव- याला जबाबदारी घेण्याला लायक, समर्थ. [हिं.] ॰दारी-वि. ओझें वाहणारा; ओझ्याचा. 'जरूरियात प्रसंगीं भागीदारी गाडे लागल्यास...' -राजमहाल कामगारी कारकुनांच्या कर्तव्या- संबंधीं नियम पृ. ६. ॰धडी-स्त्री. १ जड वस्तु; भारी सामान. 'भारधडी झाडून गेली परंतु वस्तीस मनुष्यें होतीं.' -भाब ३०. २ गैरलढाऊ लोक. 'मल्हारराव यांचीं मुलेमाणसें भारधडी इंदुरास राहिली.' -भाब ९६. ॰ब(बा)रदारी-क्रिवि. लवा- जम्यासह. 'औरंगाबादेहून देखील भारबारदारी दिल्लीस जात आहेत.' -शाछ १.२७. [भार + बरदार = वाहक] भारंभार-वि. सारख्या वजनाचें; भारोभार. 'हे रुपये द्यावे आणि भारंभार चांदी घ्यावी.' [भार + आणि + भार] ॰भूत-वि. १ जड; भार झालेला. 'भारभूत होय जीणें...।' -विक ८२. २ (ल.) निरुपयोगी; निरर्थक. ॰मान-न. १ गुरुत्व; जडपणा. याच्या उलट आकारमान. २ हवेचा दाब मोजण्याचें यंत्र; भारमापक यंत्र. (इं.) बॅरोमीटर. ॰वाहक-वि. १ ओझें वाहणारा (मनुष्य, गाडी, जनावर इ॰) 'कीं आले खर, भारवाहक असे पोटीं मनुष्याकृती ।' -विक १२. २ (संसार, कामधंदा इ॰चा) भार, जबाबदारी सहन करणारा. ३ अंगीं असलेल्या विद्यादि गुणांचा-द्रव्य मिळविणें इ॰ कामीं उपयोग न करणारा (माणूस); ओझ्याचा बैल. ॰शांखळ-ळा- स्त्री. (महानु.) शृंखला. 'तो जुझारां गडे । पाईं भारशांखळ काढे ।' -भाए ३५९. [भार + शृंखला] भारोभार-क्रिवि. सारख्या वजनाचें; भारंभार. [भार द्वि.] भारकी-कें-स्त्रीन (काटक्या, गवत, पानें इ॰चा) लहान भारा, ओझें. [भारा अल्प.]

दाते शब्दकोश

वारा

पु. १ वात; चलित वायु; हवा; न दिसणारें परंतु स्पर्शास समजणारें पंचमहाभूतांतील एक तत्त्व. -ज्ञा १५.३७६. २ (ल.) वीरश्री; स्फुरण. 'शिंद्यांना भरला वारा ।' -संग्रामगीतें ७३. ३ संचार; अंगांत येणें. 'कंपु नोहे आंगी वारा । जगदंबेचा ।' -ऋ ६५. [सं. वा = वाहणें] (वाप्र.) ॰घालणें-पंखा, चवरी वगैरे साधनानीं हवेस चलन देऊन वारा लागेल असें करणें. ॰घेणें- खाणें-पिणें-१ (वासरें वगैरे) मोकाट सैरावैरा पळूं लागणें; उड्या मारूं लागणें. २ (ल.) निर्बंध झुगारून देऊन स्वैर वर्तन करणें; मोकाट सुटणें; अद्वातद्वा वागणें. 'स्वरूप तुमचें पाहून पापिणी जीव आमचा प्याला वारा ।' -होला १०२. 'तेणें करून रांगडे बहुत वारा प्याले ।' -पेद २१.१७७. ॰न घेणें किंवा न पडूं देणें-अगदीं अलिप्त, दूर राहणें; किंचितहि संबंध न येऊं देणें; संसर्ग टाळणें. ॰पडणें-वारा वहावयाचा बंद होणें. ॰पिणें-१ वारा घेणें पहा. २ दुःखी, उदासीन, उत्साहहीन, खिन्न, उद्विग्न होणें. ॰फिरणें-मत बदलणें; स्थिति पालटणें. ॰मोकळा करणें- सोडणें-अपानवायु सोडणें; पादणें. ॰मोकळा होणें, सरणें- अपानवायु सुटणें; पश्चिमद्वारें वायु बाहेर पडणें; पादणें. 'वारा सरतां मोठी फजीति ।' -दा १८.१०.२०. ॰वाजणें-वारा वाहणें; जोराचा गार वारा सुटणें. 'वारा वाजतां करपती ओलीं पिकें ।' -दा ९.८.२९. ॰वाजेल-वाहील तशी पाठ करावी- ओढवावी, द्यावी, वारा पाहून पाठ द्यावी, वारावाहेल तसें करावें-पाठीवर घ्यावा-१ वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर जावें, वारा बाहील त्या दिशेनें जावें, वाऱ्याच्या अनुरोधानें जहाज हांकरावें. २ (ल.) वेळ पडेल तसें, प्रसंग ओळखून वागावें. ॰होणें-वाकाहक होणें. 'हळहळ बहु झाली होय संसार वारा ।' -सारुह ३.७३. वाजता वारा लागूं न देणें-किंचितहि त्रास न सोसणें; स्वतःस अणुमात्र तोशीस लागूं न देणें; अजीबात त्रास टाळणें. वाऱ्याचा उपद्रव-पु. १ हवेंतील फरकामुळें होणारी पीडा, बाधा. २ पटकीची साथ. वाऱ्याचा बुंद-पु. हवेचा अल्पांश; किंचित्हि वायुचें वाहणें; बारीकशी झुळूक (बहुधा नास्तिपक्षी ). वाऱ्याची मोट-स्त्री. (ज्याप्रमाणें वारा एका गाठोड्यांत बांधणें अशक्य त्याप्रमाणें) परस्परांपासून दूर व भिन्न अशा अनेक वस्तु अथवा व्यक्ति एकत्र आणण्याची व ठेवण्याची क्रिया; अनिर्बंध वस्तूंचें एकत्रीकरण. (हें अशक्यप्राय असतें) ॰बांधणें-क्रि. अशक्य गोष्ट करूं जाणें. वाऱ्याचें घोडें-न. (वाऱ्यानें चालणारें) जहाज; गलबत; नौका. वाऱ्याबरोबर- शीं भांडणें-अतिशय भांडखोरपणा करणें; लसते कलह उकरून काढणें. वाऱ्याला लाथा मारणें-निष्फळ काम करणें. वाऱ्या वर टाकणें-अजिबाद सोडून देणें; टाकून देणें; पूर्णपणें त्याग करणें; हयगय, दुर्लक्ष करणें. वाऱ्यावर भारे बांधणें-मनोराज्य करणें. वाऱ्यावर वरात भुसावर चिठी-भूसपर ठेंगा- बेजबेबदारीचें, निष्काळजीचें काम (वरात म्हणजे पैसा देण्या- विषयीं चिठ्ठी. ती वाऱ्यावर देणें म्हणजे कांहीं तरी करणें); ताळ- मेळ नसलेली गोष्ट करणें. वाऱ्यावर सरणें-१ कुठें तरी भट- कणें; वहावत जाणें; कांहीं तरी भरमसाट बोलत सुटणें. २ अवखळ होणें; आडदांडपणा करणें; स्वैर वागणें. वाऱ्यावशीं-वाऱ्या- सोई-वाऱ्याबाग-क्रिवि. वाऱ्याच्या गतीच्या अनुरोधानें; प्रवाहाबरोबर; प्रवाहाच्या दिशेनें. वाऱ्यास उभा न करणें-राहूं न देणें-न राहणें-स्वतःपासून दूर ठेवणें; संबंध न ठेवणें; संसर्ग टाळणें. वाऱ्यास देणें-उपणणें; वारवणें; वारसंडणें. सामाशब्द- वारापाणी-न. १ वारा व पाणी यांच्या सुलभतेमुळें क्षुल्लकत्व दर्शक दुर्लक्षित, उपेक्षित स्थिति; अवहेलना; उपेक्षा; हेटाळणी; किर- स्कार; हेळसांड. 'मी बोलतों याचें उगीच वारापाणी करून टाकूं नको.''झालें वारापाणी वज्र तव भयेंचि देव कां पावे ।' -मोअश्व १.१०६. २ -नस्त्री. निरवानिरव; वारासार; फेड; भागवा- भागवी (कर्ज-वाम वगैरेची). ३ निरास; निवारण; अनिष्ट निर- सन. ४ हवापाणी; मोकळी स्वच्छ हवा; एखाद्या ठिकाणचें हवा- मान; आबहवा. 'चार दिवस वारापाणी खा मग बरा होशील.' [वारा + पाणी] वारें-न. १ वारा; विशेषतः वाहणारा, हलणारा वारा. २ साथ; प्रसार; प्रादुर्भाव (रोग वगैरेचा). उदा॰ पटकीचें वारें; खोकल्याचें वारें. (क्रि॰ चालणें; वाहणें; वाजणें; सुटणें). 'वारीं रोग्याची वाजतीं ।' -दावि ३७७. ३ संचार; अंगांत येणें; पिशाच्चबाधा. (क्रि॰ येणें; भरणें.) 'अंगीं घेऊनियां वारें दया देती । तयां भकतांहातीं चाट आहे. ।' -तुगा २८४२. 'वारें निराळें बोलें । देहामध्यें भरोनि डोले ।' -दा ९.८.२२. ४ झांक; छटा; चर्या; सूरत; गुणसमुच्चय. (विशिष्ट गोष्टीकडे कल, आवड, विशिष्ट बौद्धिक सामर्थ्य, कौशल्यदर्शक). 'कारकुनीचें वारें.' ५ लहर; लाट; ऊर्मि; प्रवृत्ति; कल. उदा॰ प्रीतीचें-ममतेचें-रागाचें- शोकाचें-आनंदाचें-वारें. ६ जोम; उत्साह; सामर्थ्य; आनुवंशीक ओज, तेज, रग वगैरे. उदा॰ तारुण्याचें-बळाचें-शक्तीचें- वारें. 'हिंदुलोकांत स्वातंत्र्याचें वारें कसें तें माहित नाहीं.' -नि. 'अंगीं भरलें नूतन वारें ।' -विक ३. ७ सामान्यतः एखादी चम- त्कारिक कल्पना, वेड, खूळ वगैरे. 'सुधारणेचें वारें महाराजांच्या डोक्यांत शिरलें' -टिले ४.३३६. ८ स्पर्श; वास. 'एका राज्य- व्यवस्थापकानें राज्यास संपत्तीचें वारें लागूं नयें म्हणून कडक कायदे केले.' -नि ५४. ९ अंश; भाग. 'त्यातलें बिलकुल वारें ऐन साठीच्या अंमलातहि प्रस्तुत ग्रंथकाराचे ठिकाणीं आढळत नाहीं.' -नि. १० आविर्भाव; देखावा; आव; अवसान. 'चोरा- पुढें त्यानें पहिलवानगिरीचें वारें अंगीं आणण्याचा प्रयत्न केला.' ११ अर्धांगवायु; पक्षपात. 'वारीं अंगावरून जातीं ।' -दा ९.८. २९. ॰फिरणें-बदल होणें; पालटणें; वर्तणूक निराळीं होणें. 'गोविंदरावास नोकरी लागल्यापासून सखूबाईचें वारें फिरलें.' ॰लागणें-संसर्ग होणें; संगति लागणें; संबंध येणें. 'संपत्तीचें वारें आजपर्यंत कसें तें मुळींच लागलें नाहीं असे देश पृथ्वीवर पुष्कळ आहेत.' वारें सुटणें-परिस्थिति, वातावरण उत्पन्न होणें. 'कायदे- भंगाचें हिंदुस्थानांत वारें सुटलें.' -के १२.७.३०. ॰सूत्र-न. (गो.) पिशाच्चाचा फेरा. वारेघशीं-क्रिवि. उघड्यावर; वाऱ्या- वर; हवेवर. 'रसाची घागर तुळशीपाशीं उतरलीं व वारेघशीं ठेविली.' -खरादे ६९. वारेमाप-क्रिवि. १ प्रमाणाबाहेर; भलती- कडेच; बेअंदाज; बेछूट. २ बेताल; असंबद्ध; विसंगत; अद्वातद्वा (बोलणें, भाषण). वारेलग-क्रिवि. वाऱ्याच्या प्रवाहांत, झोतांत. 'कां वारेलगें पांखिरूं । गगनीं भरे ।' -ज्ञा १३.३१४. वारे- हळक-वि. वारा लागून वाळलेलें; वाऱ्यावर टाकून वाळलेलें.

दाते शब्दकोश

राखण

स्त्रीन. (कों.) १ राखणें; ठेवणें; रक्षण करणें. २ रक्षक म्हणुन ठेवलेला मनुष्य; रखावाली. 'राखण वायसें राह- वेना ।' -एभा १३.४७४. ३ रक्षकाचें, रखवालदाराचें वेतन. ४ पिशाचादि उपद्रवापासून आपलें रक्षण व्हावें म्हणुन ग्रामदेवतेस प्रतिमासीं किंवा प्रतिवर्षी अर्पण केलेला नारळ; बळी. ५ भुतें, उंदीर, टोळ इ॰ कांच्या उपद्रवापासून मनुष्यें, प्राणी, शेतें इ॰ कांना मंत्र, तंत्र, मानता इ॰ उपायांनीं मुक्त करून सुरक्षित ठेवण्याची क्रिया; भूतादिकांचा बंदोबस्त करणें. (क्रि॰ लावणें; करणें; लागणें). ६ (क्व.) पूर्ण अभाव होऊं नये म्हणून घरांत राखून ठेवलेलें अल्प- स्वल्प धान्यादि खाद्य पदार्थाचें परिमाण; घर म्हणून ठेवलेला पदार्थ. 'सगळे दाणे खर्चूं नका, घरांत राखण म्हणून दोन पायली तरी राखून ठेवा.' ७ (माळवाप्रांत) अतिशय कुरूपतेमुळें व अक्राळविक्राळपणामुळें घराचें व त्यांतील स्त्रियांचें चेटकापासून रक्षण करण्यास समर्थ म्हणून मानलेली स्त्री. -न. ब्राह्मणांत प्रसूती- नंतर तिसर्‍या दिवशीं, सुईण बाळंतिणीच्या खोलींतील एक कोनाडा सारवून, रांगोळी काढून, त्यांत वर गंधाचीं बोटें ओढलेलें व आंत पैसा, सुपारी टाकलेलें जें मडकें ठेवते तें; किंवा बाळं- तिणीच्या दहा दिवसांत तिच्या जेवणाच्या वेळीं तिच्या खोलींत, निखारा व त्यावर थोडा भात टाकून ठेवलेलें मडकें. याच मड- क्यांत प्रत्येक जेवणाच्या वेळीं असा निखारा व भात टाकतात. [सं. रक्षण] (वाप्र.) ॰लागणें-उपद्रव न होईल असा बंदो- बस्त करणें. 'या खिस्तीचे एकदां रुपये भरले म्हणजे चार महि- न्यांची राखण लागली.' सामाशब्द- ॰करी-दार, राखणा, राखणाई(इ)त, राखणार-पु. १ रखावालदार; पहारेकरी. २ गुराखी. 'जरी राखणाइत सहपरीवारी ।' -विउ ९.७६. 'माली- काच मी तो राखणार ।' -दावि ४५९. म्ह॰ राखण्यानें गुरें टाकलीं म्हणून धनी टाकील काय ? राखणावळ-स्त्री. १ गुरा- ख्याची मजुरी, वेतन. २ राखणें; रक्षण करणें; काळजी घेणें. [राखणें] राखणी-स्त्री. राखणे; संभाळणें; ठेवणें; बाळगणें इ॰ [राखणें] राखणें-सक्ति. १ रक्षणें; रक्षण करणें; रखवाली करणें; खबरदारी घेणें; अपकारापासून वांचविण्याकरितां आपल्या ताब्यांत घेणें. 'काढूनि राखे प्राणु ।' -ज्ञा १६.१४३. २ ठेवणें; उरविणें; पुढच्या काळाकरितां किंवा कांहों उद्देशानें ठेवून देणें. 'त्या रानां- तील गवत यंदा राखलें आहे.' ३ खर्चल्याशिवाय ठेवणें (सामर्थ्य, जोर). 'जोर-हात राखला.' 'टोला-घाव-मार-राखला.' ४ चोरून ठेवणें; पोटांत किंवा मनांत ठेवणें. 'तुझ्या मनांत असेल तें सारें बोल. कांहीं राखूं नको.' ५ एखाद्या पदार्थावर ओघानें एखादी क्रिया करणें प्राप्त झालें असतां ती न करितां, तो पदार्थ तसाच ठेवणें; आहे त्या स्थितींत राहूं देणें. 'कोनाडयाची जागा तेवढी राख आणि अवघी भिंत सारीव.' ६ करणें; ठेवणें; एखादा पदार्थ स्थित्यंतर न पावूं देतां ठेवणें; बनविणें व कायम करणें. 'ही भिंत फार रुंद राखली म्हणून जागा अडली.' 'हा अंगरखा त्वां आंखूड राखलास म्हणून शोभत नाहीं.' ७ स्त्रीनें पुरुषास किंवा पुरु- षानें स्त्रीस उपभोगार्थ बाळगणें; ठेवणें. ८ ठेंवणें; धरणें; पाळणें; हेळसांड, अवज्ञा न करणें; एका बाजूस पडूं न देणें. ९ व्यवस्थित, योग्य स्थितींत ठेवणें. १० पालन करणें; न ढळणें (वचन; आज्ञा; प्रतिज्ञा). [सं. रक्षण; रक्ष्; प्रा. रक्ख; पं. रक्खण; सिं. रखणु; हिं. रखना, राखना; गुज. राखवुं; बं. राखिवा; फ्रेजि. रख; पोर्तुजि. अरखना = रक्षक] म्ह॰ राखील त्याचें घर, खणेल त्याचें शेत. राख- णेकरी-पु. राखणदार; राखणकरी पहा. राखण्या-पु. (राजा.) गुरें राखणारा; गुराखी. राखले-स्त्री. हुंडी विकत घेणाराची स्थिति, पेशा, अधिकार, पत दर्शक योजाक्याचा शब्द. 'त्या हूंडीमध्यें माझी राखले घातली होती.' [राखणें (गुजराथींतून आलेला शब्द)] राखवळ-स्त्री. (प्र.) राखणावळ; राखण्या- बद्दल मजूरी, वेतन.

दाते शब्दकोश

पाणी

न. १ उदक; जीवन; जल; सलिल. 'पाणियां छाय दुनावली । परिमळाचि ।' -शिशु ६२८. 'चोखे पाणिया न्हाली ।' -वसा २५. २ पाऊस; पर्जन्य. ३ हत्यारें भट्टींत तापवून नंतर तीं पाण्यांत बुडवून त्यांच्या आंगीं आणिलेली दृढता. (क्रि॰ देणें; चढविणें; उतरणें). ४ (ल. एखाद्याच्या अंगांतील) धमक; अवसान; वीर्य; शक्ति; तेज. 'आलें न रजपुतांचें परि यवनां सर्व हरवितां पाणी ।' -विक ६८. ५ (मोत्यें, रत्न, हिरा इ॰कांचें) तेज; कांति; झकाकी. 'नाना मुक्ताफळांचें पाणी ।' -दा १६.४.१६. ६ चेहऱ्यावरील टवटवी; कांति; तजेला. ७ धातूंचें भांडें इ॰कांस सोनें, चांदी इ॰कांचा देतात तो मुलामा; झिलई. ८ शस्त्र इ॰ घासून त्याच्या धारेस आणलेली तीक्ष्णता; कडकपणा.(क्रि॰ देणें; पाजणें). 'नाना शस्त्रांमधें पाणी ।' -दा १६.४.१६. ९ अब्रू; लौकिक, कीर्त्ति. (क्रि॰ जाणें; उतरणें; चढणें). १० (राग, गाणें इ॰कांची) नीरसता; रुक्षपणा; रसहीनता. ११ (डोळ्यांतील) चमक; तेज. १२ अश्रू. 'दुर्गा देवीच्या डोळ्यांतून पाणी येऊं लागलें.' -विवि ८.३.४९. पाणी याचें समासांत पूर्वपदीं 'पाण' असें रूप होऊन अनेक सामासिक शब्द होतात. उदा॰ पाणकोंबडा, पाणघोडा, पाणलोट इ॰ सामासिक शब्द पहा. [सं. पानीय; प्रा. पाणिअ; गुज. पाणी; हिं. पानी; फ्रें. जिप्सि. पनी; पोर्तु जिप्सी. पानी] (वाप्र.) ॰उतरणें-१ पराभूत, पराजित होणें. 'पाणिपतच्या लढाईनंतर मराठ्यांचें पाणी उतरल्या- नंतर निजमास संधी सांपडली.' -विवि ८.६.१०९. २ अब्रू जाणें; अपकीर्ति होणें. 'ज्या स्नेहानें पाणी उतरतें, तो स्नेह रुपयें पाण्यांत टाकून राखावा, त्यापेक्षां रुपये राखावे हें फार चांगलें आहे.' -बाळ २.३. ३ (डोळे इ॰कांतील) तेज, चमक, कमी होणें. 'तिच्या सतेज डोळ्यांचें पाणी उतरूं लागलें.' -पाव्ह ५४. ॰ओळखणें- जोखणें-(एखाद्याच्या अंगांतील) गुण, धमक, धैर्य, विद्वत्ता इ॰ कल्पनेनें ताडणें. (अंगाचें, रक्ताचें) ॰करणें-अतिशय खपणें; कष्ट करणें; फार मेहनतीनें (एखादें काम, कर्तव्य इ॰) करणें. म्ह॰ रक्ताचें पाणी हाडाचा मणी. ॰काढून टाकणें-सक्रि. (रसा.) (एखाद्या पदार्थांतील) द्रव, द्रवांश नाहींसा करणें, घालविणें. (इं.) डीहायड्रेट्. ॰कोंडणें-(सैन्य इ॰कांचें) पाणी बंद करणें; त्यास पिण्यास पाणी मिळूं न देणें. 'कडबा दाणा बंद कोंडिलें पाणी कहर वर्षला ।' -ऐपो २३६. ॰घालणें-१ (बायकी) (विटाळशी इ॰ स्त्रीस जेवतांना) पाणी वाढणें, देणें. २ (बायकी) (विटाळशीस, बाळंतिणीस स्नान घालून शुद्ध करून घेणें. ३ नाश करणें; खराबी- करणें; गमावून बसणें. 'ह्यानें आपल्या हातानें आपल्या रोजगारावर पाणी घातलें,' ४ (ल.) (एखाद्या गोष्टीच्या) अभिवृद्ध्यर्थ प्रयत्न करणें, जोपासनेबद्दल उपाय करणें. ५ (एखाद्या वस्तूवर) पाणी सोडणें; त्याग करणें. ६ (कों.) सर्पाचें विष उतरविण्यासाठीं सर्प चावलेल्या मनुष्यास मंत्रित पाणी पिण्यास देणें व अंगावर घालणें ७ वृक्ष इ॰कांच्या वाढीला जरूर तें पाणी त्यांच्या मुळांशीं ओतणें. ॰चढणें-महत्त्व प्राप्त होणें; वीरश्री, त्वेष संचरणें. 'थोरासंगें दुर्बळास पाणी चढे ।' -पला ४.१९. ॰छाटणें-कापणें-१ (पोहणारानें, बोटीनें आपल्या अंगच्या जोरानें) पाणी दुभंगलें पुढें सरणें. २ (पोहणाराच्या, नावेच्या) गतीमुळें पाणी दुभंगलें जाणें. ॰जाळणें-(ल.) करडा अंमल चालविणें; क्रूरपणाचीं कृत्यें करणें. ॰जोखणें-ओळखणें-(एखाद्याची) कर्तृत्वशक्ति, धमक, विद्वत्ता, पराक्रम इ॰ अजमावणें. ॰तावणें-(एखाद्याच्या नांवानें, नांवा- वर, नावांविषयी इ॰ शब्दांसह प्रयोग असल्यास-एखाद्याचें) मरण, अनिष्ट इच्छिणें. (शवदहनासाठीं नेतांना तें उचलण्यापूर्वी, पाणी तापवून त्यास स्नान घलितात त्यावरून हा अर्थ). ॰तुटणें-(पोहणाराच्या, नावेच्या गतीनें) पाणी दुभंगलें जाणें. 'पेनोवेणां दळ बहुतें मीनलें । वाटे पाणी तुटलें ।' -शिशु ५७८. ॰तुंबविणें-(धरण इ॰ बांधून) पाणी कोंडून धरणें. ॰तोडणें- पाणी छाटणें अर्थ १ पहा. ॰दाखविणें-(कर.) (शेतकऱ्यांत रूढ) (गुरांस) पाणी पाजून आणणें; पाण्यावर नेणें ॰देखील न घोटणें-(एखाद्याचे) प्राण कंठीं येणें; मरणासन्न होणें; पाणी घशाखालीं उतरण्याइतकाहि अवकाश, धीर नसणें. ॰देणें-१ पोलादाच्या अंगी नरमपणा, कडकपणा, चिवटपणा इ॰ निरनिराळे गुण आणण्यकरितां तें भिन्न भिन्न ठराविक प्रमाणांत तापवून पाण्यांत बुडविणें. या क्रियेचे कडक पाणी, नरम पाणी, जांभळें पाणी, पिवळें पाणी इ॰ निरनिराळे भेद आहेत. -ज्ञाको प ७४. 'पाणी देण्याच्या कृतीनें लोखंडांत फेरफार होतात.' पदाव १.१५५. २ शस्त्र इ॰कांस धार लावणें. ३ (मृताचा) श्राद्धविधि करून (त्याला) तिलांजलि देणें; (सामा.) तर्पण करणें. ॰देणें-सोडणें-१ (एखादी वस्तु इ॰) गमावून बसणें. २ सोडून देणें; आशा सोडणें; (वस्तू इ॰कांचा) उत्सर्ग करणें (एखाद्या वस्तूचें दान देतांना तीवर थोडेसें पाणी-आपला हक्क नाहींसा करण्याचें द्योतक म्हणून-सोडण्याचा प्रघात आहे त्यावरून हा अर्थ). (कर्माला 'वर' अथवा 'ला' हे प्रत्यय लावून प्रयोग). 'मागें एक पुढें एक । दोनी मिळुनि विठ्ठल देख । ऐसी होतांचि मिळणी दिलें संसारासि पाणी ।' -एकनाथ ॰पडणें-फुकट जाणें; निरुपयोगी होणें; खराब होणें; दर्जा, गुण, महत्त्व, उपयुक्तता इ॰ बाबतींत मागें पडणें; नाश पावणें. कर्म- स्थानीं असलेल्या शब्दास 'वर' हें शब्दयोगी अव्यय जोडून प्रयोग जसें:-रोजगारावर-पोटावर-संसारावर-कामावर-स्नेहावर-पाणी पडलें. 'त्या कार्यावर तर सर्वस्वीं पाणीच पडलें असतें .' -इंप ८. ॰पाजणें-१ (मृतास) तिलांजली देणें; प्रेतदहन होत असतांना प्रेताच्या कपाळमोक्षानंतर चितेभोवतीं सच्छिद्र मडक्यानें पाण्याची धार धरणें; श्राद्ध इ॰ करून तर्पण करणें. २ (ल.) (एखाद्यास) मरेमरेतों खूप मारणें, बडवणें. (१ ल्या अर्थावरून रूढ). ३ पराजित करणें; जिंकणें; चीत करणें. ॰पाणी करणें-१ तहानेनें 'पाणी द्या' 'पाणी द्या' असें म्हणत सुटणें; एकसारखें पाणी मागत राहणें. २ (एखादें जनावर मनुष्य इ॰कांस फार) राबवून, पादाडून बेदम करणें. ३ (अन्न, वस्त्र, पदार्थ इ॰कांची) पूर्णपणें नासाडी करणें. ॰पाणी होणें-१ पुनःपुन्हां पाणी पिण्याची प्रवृत्ति (मिष्ठान्न खाण्यानें, उन्हाच्या त्रासानें) होणें. २ (एखाद्या वस्तूचा) नाश, खराबी होणें. 'हे कठोर मांस झडून जाईल तर किंवा याचें पाणी पाणी होईल तर किती बहार होईल.' -विकार- विलसित ॰पिऊन भांडणें-वाद करणें-(ल.) नेटानें व जोराजोरानें, आवेशानें भांडणें. ॰फिरणें-(बडोदें) व्यर्थ, फुकट जाणें; पाणी पडणें पहा. 'सेनापतीच्या चातुर्यावर व सैनिकांच्या शौर्यावर पाणी फिरतें.' सेवामाहात्म्य १०. ॰भरणे-वाहणें- घालणें-(एखाद्याच्या घरीं विद्वत्ता, संपत्ति, विशिष्ट व्यक्ति इ॰कानीं) बटकीप्रमाणें राबणें; दास्य पत्करून राहणें; वश असणें (एखाद्याच्या घरीं या शब्दासह प्रयोग). 'रूपाचेनि आहे । ऐरावतु पाणि वाहे ।' -शिशु ५०८. 'उद्योगाच्या घरीं ऋद्धिसिद्धि पाणी भरी ।' ॰मरणें-१ (एखाद्याचें) धैर्य गळणें; गर्भगळित होणें; धाबें दणाणणें. २ एखाद्या गोष्टींत किंवा हिशेब, भाषण इ॰कांत) खोटेपणा, पोकळपणा, लबाडी इ॰ असणें. ॰मागूं न देणें-एकदम, तडाक्यासरशीं ठार करणें (मरतांना पाण्याकरितां मनुष्य तडफडतो, पाणी मागत असतो त्यावरून हा वाक्प्रचार). 'तुला मी बडविलें तर पाणी मांगू देणार नाहीं.' ॰मारणें- पाणी कापणें-छाटणें पहा. ॰मुरणें-१ (एखाद्याचें भाषण, वर्तन इ॰कांत कांहीं तरी संशयास्पद असा) कमीपणा, वैगुण्य, दोष, मर्मस्थान असणें. २ भिंत वगैरेंत पाणी जिरणें. ॰लागणें-१ वाईट पाणी पिण्यांत आल्यानें आजारी होणें; पाणी बाधणें. 'कैक जणाला पाणी लागलें मासोळी मागें खारी ।' -ऐपो ३५४. २ ज्याची संगति धरली असेल त्याचे किंवा जेथें कांहीं काळ रहिवास आला असेल त्या ठिकाणचे गुणदोष, ढंग अंगीं जडणें. (आंत) ॰शिरणें-(धंदा, रोजगार, काम इ॰कास) अवदशा; उतरती कळा येणें; नासाडी होणें; फसगत होणें; आंत बट्यांत येणें. ॰शोषून घेणें-(रसा.) (एखाद्या पदार्थांतील) द्रव रस शोषून घेणें; (इं.) डेलिक्विस्. ॰सारणें-(व.) आंघोळीसाठीं पाणी उपसणें. ॰सोडणें-१ (ब्राह्मणास दिलेल्या दानावर पाणी सोडलें म्हणजे दानाची सांगता होऊन त्यावरचें आपलें स्वामित्व नाहींसें होऊन ब्राह्मणाकडे जातें या धार्मिक कल्पनेवरून पुढील अर्थ) (एखादी वस्तु) स्वेच्छेनें कायमची देऊन टाकणें; (एखाद्या वस्तूचा) त्याग करणें. 'हे स्त्री नव्हे प्रतिष्ठा तुमची जरि ईस सोडितां पाणी ।' -मोविराट १.१०३. २ (ल.) (एखाद्या वस्तूची) आशा सोडणें, ती गेली असें समजून स्वस्थ बसणें. ३ (एखादी वस्तु, भावना इ॰) नाइलाजास्तव सोडण्यास, तिच्याकडे दुर्लक्ष कर- ण्यास, विसरून जाण्यास, नाश करावयास तयार व्हावें लागणें. 'परि त्याहीं आम्ही त्या प्रेमासि रणांत सोडिलें पाणी ।' -मोद्राण १७.९०. ॰होणें-(एखाद्या वस्तूची) खराबी, नाश होणें; नाहींसें होणें. 'त्या दुःखाचें तुमच्या दर्शनानें पाणीच होऊन गेलें.' -रत्न ५.२. पाण्याआधीं वळण बांधणें-नदी, ओढा इ॰कास पूर येण्यापूर्वींच पुराच्या पाण्याचा निकाल लाव- ण्याची व्यवस्था करणें. २ (ल.) भावी संकटाची उपाययोजना आधींच करून ठेवणें. 'पाण्याआधीं वळण बांधितां उत्तम. नाहीं तर शेणामेणाचे लोखंडाचे जालियावर पुढें भारी पडेल.' -भाव ८३. पाण्याचा कांटा मोडणें-अग्निसंयोगानें पाणी कोमट होणें, करणें (अतिशय थंड पाणी अंगावर घेतल्यास अंगावर कांटा उभा राहतो, किंवा तें अंगाला कांट्याप्रमाणें बोचतें ह्यावरून वरील अर्थ). पाण्यची गार गोठणें-पाणी गोठून बर्फ होणें. पाण्यांत घाम येणें-(एखाद्यानें) अतोनात संतापणें; रागानें अंगाचा भडका होणें. पाण्यांत घालणें-बुडविणें; नाश करणें; खराब करणें. 'संसार घातला पाण्यांत । स्वतें समस्त बुडविलें ।' पाण्यांत जाणें-व्यर्थ होणें; फुकट जाणें. 'नानाची मुत्सद्देगिरी सारी पाण्यांत जात असली तर ...' -नि. पाण्यांत दिसणें-(ल. एखादी व्यक्ति एखाद्याच्या) द्वेषास पात्र होणें, असणें.पाण्यांत पडल्यासारखें होणें-फजीत होणें; लाजिरवाणें होणें. 'मग देवाला लाज वाटली. पाण्यांत पडल्यासारखें झालें.' -नामना ६९. पाण्यांत पाहणें-(एखाद्याचा एखाद्यानें) अतिशय द्वेष करणें (एखाद्याचा कट्टा शत्रु किंवा त्याला ज्याचा अतिशय दरारा आहे अशी व्यक्ति भीतीमुळें त्यास सर्वत्र जळीं, स्थळीं, काष्ठीं, पाषाणीं दिसूं लागते त्यावरून). पाण्यानें वाती पाजळणें-(महानु.) अशक्य गोष्ट शक्य करूं पाहणें. 'अवो दुजी कनुधार लागती । तरि पाणिअ/?/ वाति पाजळती ।' -शिशु ६७५. पाण्यापेक्षां, पाण्याहून पातळ करणें-(एखाद्याची) फजिती, पाणउतारा, तेजोभंग करणें; फार लाजविणें. 'नामचि करि पाण्याहुनि पातळ यश भास्करादि तेजांचे ।' -मोवन १२.५०. पाण्यावर घालणें- नेणें-(कर.) (गुरांना) पाणी पाजण्यासाठीं विहीर, नदी इ॰कांवर नेणें. पाण्यावर लोणी काढणें-(कर. ल.) अतिशय कंजूषपणा करणें. गळ्याशीं पाणी लागणें-१ पाणी गळ्यापर्यंत येणें. २ (कर्ज इ॰ गोष्टींची) पराकाष्ठा होणें. दुसऱ्याच्या ओंजळीनें पाणी पिणें-१ दुसरा पाजील तेवढेंच पाणी पिऊन स्वस्थ बसणें. २ (ल.) दुसरा सांगेल तसें मुकाट्यानें वागणें. उन्हा पाण्यानें घर जाळणें-जळणें-(ल.) खोट्या आरोपानें, निंदेनें रसातळास नेणें, जाणें; (एखाद्याचा) नाश करणें, करूं पाहणें, होणें (अकरण- रूपांत योजितात व हें घडणें अशक्य असें दर्शवितात). खोल पाण्यांत शिरणें-१ आपल्या आवांक्याबाहेरचें काम शिरावर घेणें. २ (एखाद्या गोष्टीची) फाजील चिकित्सा करणें. ३ (एखादें गूढ, गुपित) उकलण्याचा प्रयत्न करणें. पाणी केस तोडतें- पाण्याच्या अतिशय जोराच्या प्रवाहाचें वर्णन करतांना योजितात. पाणी खाल्लेला-वि. पाण्यांत ठेवल्यामुळें आंत पाणी मुरलेला. पाण्यांतील पावप्यादे-जलसंचारांत प्रवीण; आरमारांतील प्रबळ लोक. 'इंग्रज लोंक पाण्यांतील पावप्यादे.' -इतिहाससंग्रह-ऐति- हासिकचरित्र ११५. पाण्यापाण्यानें-क्रिवि. नदीच्या कांठा- कांठानें. पाण्यापेक्षां शीतळ-वि. अत्यंत सोशीक; सौम्य; शांत; गंभीर स्वभावाचा. पाण्यावर-क्रिवि. नदीच्या कांठीं. 'कऱ्हेच्या पाण्यावर.' -ख ३१९३. पाण्यावरचा बुडबुडा, पाण्या वरची रेघ-पुस्त्री. (ल.) क्षणभंगुर, अशाश्वत वस्तु. क्षणभंगुरता- दर्शक इतराहि वाक्प्रचार आहेत ते पुढें दिले आहेत:-जलबुद्बुद; धुळीवरचें सारवण; दुपारची सावली; विजेचें चमकणें; विजेसारखा; वीजच; अभ्रच्छाया; आभाळाची सावली; कमलिनीवरचा बिंदु; काजव्याचा उजेड; खुंटावरचा कावळा; तेरड्याचा रंग (तीन दिवस); शिराळशेटाचें राज्य; आवाहन व विसर्जन बरोबर; औट घटिकेचें राज्य; घडीचें, घटिकेचें घड्याळें; उपळवणी; तृणाचा शेक; पुष्करपत्रतोयतरल; पळतें पीक इ॰. 'चिताडसी कां? चित्र जिवाचें पाण्यावरच्या रेघांनीं ।' -वाग्वैजयंती-गोविंदाग्रज. पाण्यास आश्रय-आसरा-पु. अतिशय तहानेल्यानें उपाशे पोटीं पाणी पिणें आरोग्यदृष्ट्या अनिष्ट असतें, म्हणून आधीं अन्नाचे एक दोन घांस खाऊन नंतर पाणी पितात. अन्नाच्या ह्या दोन-तीन घांसांस, अल्पांशास उद्देशून हा वाक्प्रचार योजतात.म्ह॰ १ पाण्यांत राहून माशांशीं वैर करूं नये = आपल्या कार्यक्षेत्रांतील मंड- ळीशीं वैर करूं नये. त्यांच्याशीं मिळूनमिसळून वागण्यांतच फायदा असतो. २ (हिं.) पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाया वैसा = जशी वेळ येईल तसें वागणें. ३ पाण्यापासून जवळ सोयऱ्यापासून दूर = मनुष्यानें पाण्याच्या जवळ राहणें सोईचें असतें, तसेंच सोयऱ्या- पासून दूर रहावें म्हणजे प्रेमांत बिघाड करणाऱ्या गोष्टी टाळतां येतात. ४ पाण्यांत म्हैस बाहेर मोल = अनिश्चित, आगामी गोष्टी- विषयीं, निरर्थक चर्चेस, चिकित्सेस उद्देशून ही म्हण योजितात. सामाशब्द- पाणआघाडा-पु. आघाड्याची एक जात. हा आघाडा सूज, कफ, खोकला, वायु, शोष यांचा नाश करतो. -वगु १.९. [पाणी + आघाडा] ॰उतार-पु. १ नदींतून चालून जातां येण्याजोगा, कमी पाणी असलेला मार्ग. २ (नदी इ॰काचें) ओसरणें; कमी होणें. 'गंगेसि भंग बहु पाणउतार होतो ।' -र २. [पाणी + उतार] ॰उतारा-पु. १ मानखंडना; तेजोभंग; अपमान; क्षुद्रपणानें लेखून (एखाद्याची) केलेली विडंबना; अवहेलना. २ (क्व) पाणउतार पहा. [पाणी + उतरणें] ॰कणीस-न. ओहळांत, ढोंपरभर पाण्यांत कसईच्या झाडाप्रमाणें होणारें पुरुषभर उंचीचें एक झाड. याचीं पानें बाजरीच्या पानांसारखीं असून याचें कणीस बाजरीच्या कणसासारखेंच असतें. हें कणीस वाळवून त्यावरील कापूस चकमक पेटविण्यास घेतात. हें तेलांत बुडवून पेटविलें असतां काकड्याप्रमाणें जळतें. -वगु ४.६२. रामबाण. ॰कसर-स्त्री. पाटस्थळाच्या पाण्याकरील कर, पट्टी. 'गांवची पाणकसर गेल्यावर्षापासून दीडपट वाढविण्यांत आली.' -के १९.७.३०. [पाणि + कसर] ॰काठी- स्त्री. १ (गो.) विहीरींतून पाणी बाहेर काढण्याचें एक साधन. ओकती पहा. २ (ल. गो.) उठाबशी. [पाणी + काठी] ॰काडो- पु. (कु.) शेतांस पाणी काढून पैरीप्रमाणें आळीपाळीनें वाटून देणारा; पाणकाढा. हा शेतकऱ्यांनीं आपसांत पाण्याविषयी तंटा होऊं नये म्हणून निवडलेला असतो. [पाणी + काढणें] ॰कापड- न. जखमेवर, शरीराच्या कापलेल्या भागावर बांधतात ती ओल्या वस्त्राची चिंधी. [पाणी + कापड] ॰कांदा-कंद-पु. नदींत होणारा एक विशिष्ट कंद. यास नागदवणीच्या फुलासारखीं फुलें येतात. -वगु ४.६३. [पाणी + कांदा] ॰कावळें-न. (विशेषतः गुरांची) गर्भोदकाची पिशवी. पाणकी-स्त्री. पाणी भरण्याची मजुरी कर- णारी स्त्री. 'कुणि विधवा ठेविता घरामधें पाणकी ।' -ऐपो ३६९. पाणकुकडें-कोंबडें-न. घशांत किंवा जिभेच्या खालच्या बाजूस होणारा एक विकार. ॰कुक्कुट-पु. (महानु.) पाणकोंबडा. 'चंद्र चकोरा चोखटीं । वोळे अमृतधारी आतुटी । ते गोडपणें पाण- कुक्कुटी । लाहिजे कैसा ।' -ऋ ५२. [पाणी + सं. कुक्कुट = कोंबडा] ॰कोंबडा-डें-पुन. १ जलचर पक्षी. 'पाणकोंबडे कोंबडे । वडवाघुळा घुबडे ।' -दावि २४४. २ चंद्राभोवतालीं पडणारें खळें. [पाणी + कोंबड] ॰केश-पुअव. शेवाळ. ॰कोंबडी-स्त्री. एक जलचर कोंबडी. ॰कोळी-पु. मासे खाणारा एक पक्षी. -प्राणिमो ५७. ॰क्या-पु. १ लोकांच्या घरीं पाणी भरून त्यावर उपजीविका करणारा मनुष्य. 'एखादा पाणक्या नवरा मिळता तरी पतकरता.' -मोर ३४. २ (ल.) निरक्षर व धटिंगण मनुष्य. [सं. पानीयक-पाणकअ-पाणका-पाणक्या. -राजवाडे (ग्रंथ- माला).] ॰खार-पु. (कों.) उकडआंबे इ॰ खारविण्यासाठीं पाण्यांत मीठ घालून केलेला खार. [पाणी + खार] ॰गहूं-पु. मोटेच्या, पाटाच्या पाण्यानें होणारा गहूं. [पाणी + गहूं] ॰घर- न. १ पाणी तापवून स्नान करण्याकरितां असलेली खोली; न्हाणी- घर. २ विहीर इ॰ खणतांना जेथें पाणी लागतें तो जमिनींतील खोल थर. [पाणी + घर] ॰घोडा-पु. आफ्रिका खंडांत मोठ्या नद्यांत, सरोवरांत आढळणारा एक अजस्त्र पण निरुपद्रवी प्राणी. याचा रवंथ करणाऱ्या प्राण्यांत समवेश होतो. याचा रंग काळसर तपकिरी असतो. याच्या कातड्याच्या ढाली करतात. -ज्ञाकोप ६७. (इं) हिपॉपोटेमस् [पाणी + घोडा] ॰घोणस-पु. पाण्यांत असणारी सापाची एक निरुपद्रवी जात. [पाणी + घोणस] ॰चक्की- स्त्री. पाण्याच्या जोरानें, साहाय्यानें चालणारी चक्की. [पाणी + चक्की] ॰चट-वि. १ ज्यास गोडी कमी आहे असा (द्रव पदार्थ); बेचव. २ (ल.) शुष्क; बाष्कळ; नीरस; अर्थशून्य (बोलणें, लेखन, गाणें, बोलणारा, लिहिणारा, गाणारा इ॰). 'शेवटीं आपल्या निस्सीम भक्तांकडूनहि वरच्या सारख्या पाणचट प्रशंसे- पेक्षां अधिक कांहीं सर्टिफिकीट मिळूं नये ...' -टि १.१.२६४. [पाणी + छटा] ॰चूल-स्त्री. पाणघरांतील, स्नानाचें पाणी इ॰ तापविण्याची चूल. 'तेथें पाणचुलींत विस्तव घालून त्यावर पाणी तापत ठेविलें.' -कोरकि ५१२. [पाणी + चूल] ॰चोरा-रा-पु. गारोड्याजवळील पाणी भरण्याचें सच्छिद्र पात्र. 'पाणचोऱ्याचें दार । वरील दाटलें तें थोर ।' -तुगा २५८३. [पाणी + चोर] ॰जंजाळ-न. (कों.) पर्जन्य, पाण्याचा पूर इ॰कानीं जिकडे तिकडे होते ती जलमय स्थिति. 'बहू पाणजंजाळ देखोनि डोळां ।' -राक १.३२. [पाणी + जंजाळ] ॰जांवई-पु. (थट्टेनें) जांवयाचा भाऊ; पडजांवई. [पाणी + जांवई] ॰झुकाव-पु. पाणी बाजूनें टिपकवून लावण्यासाठीं दरवाज्यावर केलेलें झुकाऊ कारनिस, गलथा; पाणकारनिस. -राको ५९२. [पाणी + झुकविणें] ॰झेली- स्त्री. (चेंडू, विटीदांडू इ॰ खेळांत) झाडावरून खालीं पडतांना किंवा पाण्यांतून चेंडू, कोललेली विटी इ॰ जमिनीवर पडण्यापूर्वीं झेलणें. याच्या उलट आणझेली. [पाणी + झेलणें] ॰टका- टक्का-पु. पाटस्थळ जमिनीवरील एक लहानसा कर. [पाणी + टक्का] ॰टिटवी-स्त्री. तांबडा कल्ला असलेली टिटवीची एक जात. पाणड्या, पाणाडी-ड्या-वि. जमीनींत कुठें किती खोल खणलें असतां पाणी लागेल हें काहीं आडाख्यांच्या सहाय्यानें जाणणारा. [पाणी] पाणढाळ-पु. पाणी वाहून जाण्याजोगा जमीन, छपराचें पाखें इ॰कांस दिलेला, असलेला उंचसा उतार; सखलपणा. -वि. पाणी वाहून जाण्यायोग्या उतारानें युक्त, उंच उतारीची (जमीन इ॰). [पाणी + ढाळ = उतार] ॰ताव-पु. सोनें, चांदी इ॰ तापवून पाण्यांत बुडवून त्याचा कस पाहण्याची पद्धत; याच्या उलट सुकताव = सोनें इ॰ तापवून नुसतेंच थंड करणें. [पाणी + ताव] ॰तीर-पु. (युद्धशास्त्र) स्फोटक व ज्वालाग्राही पदार्थांनीं भरलेलें चिरूटासारखें निमुळत्या आकाराचें एक युद्धोपयोगी साधन. याचा व्यास दीड-दोन फूट असून लांबी सहा यार्ड असते. याच्या आघातानें मोठमोठीं जहाजें समुद्राच्या तळाशीं जातात. (इं.) टॉर्पेडो. -ज्ञाको (प) ६७. 'गेल्या महायुद्धांत योजलेल्या अनेक शस्त्रास्त्रांत पाणतीराचा पहिला नंबर लागेल.' -ज्ञाको. प ६७. [पाणी + तीर = बाण] ॰तुटी-वि. जींतील रसांश, द्रवांश कमी झाला आहे अशी, कांहींशी पिकलेली (पालेभाजी). [पाणी + तुटणें] ॰थरा-पु. घराच्या जोत्याच्या सर्वांत वरच्या थरांतील दगड, चिरा; पाटथर पहा. ॰थरी-स्त्री. १ आंत्रपेशी; प्लीहा. २ प्लीहेचा एक विकार; पोटांतील चीप. ३ प्लीहा, आंत्रपेशी वाढणें. [पाणी + थर] ॰थळ-स्त्रीन. १ पाऊस गेल्यानंतरहि जेथील ओल जात नाहीं व उन्हाळ्यांतहि खणलें असतां पाणी लागतें अशी जमीन. 'आणि पाणथळ असे तेथें भात लावी.' -पाव्ह ११. २ पाटाच्या पाण्यानें भिजणारी जमीन. [पाणी + थळ] ॰दळ-न. (क्व.) पाणथळ अर्थ १ पहा. [पाणी + दळ] ॰दिवड-स्त्रीन.. (कों.) पाण्यांतील सापाची निर्विष जात. [पाणी + दिवड] ॰दोरी-स्त्री. विहीरींतून पाणी काढण्याच्या उपयोगाची दोरी; बारीक दोर. [पाणी + दोरी] ॰नेचा-पु. पाण्यांत. दलदलींत उगव णारी एक वनस्पति; (इं.) हायड्रोटेरिडि. -ज्ञाको. अ २२१. [पाणी + नेचा] ॰पट्टी-स्त्री. पाणकापड पहा. ॰पिकलें, पाण- पीक-न. (कों.) ज्या पिकास सबंध पावसाळ्यांतील पावसाची जरूरी असतें तें पीक; पहिलें पीक; खरीप. याच्या उलट रब्बीचें पीक. [पाणी + पिकणें, पीक] ॰पिता-वि. १ फार पाणी खाल्लेलें; फाजील पावसानें नासलेलें (पिकाचें कणीस इ॰). २ (ल.) पचपचीत; पाणचट; पचकळ; मुळमुळीत (भाषण, कारभार, मस- लत, व्यवहार, गोष्ट, काम इ॰). ३ (झटकन् पाणी पिण्यासारखें) तलख; चलाखीचें; तडफेचें (कृत्य, कृति इ॰). ४ रोखठोक, चोख; स्पष्ट (जबाब, जाब, उत्तर इ॰). [पाणी + पिणें] ॰पिशी-स्त्री. फाजील पावसामुळें न भरलेलें, पोचट राहिलेलें धान्याचें कणीस. ॰पिसा-वि. पर्ज्यनातिरेकामुळें पोंचट, दाणें झडून गेलेलें, दाण्यांनीं न भरलेलें (कणीस इ॰). ॰पिसें-न. वेड; वेडगळपणा; भ्रमिष्टपणा. -शर. -मनको. -वि. वेडगळ; खुळचट. -मनको. [पाणी + पिसें] ॰पेटी-स्त्री. (स्थापत्यशास्त्र) पाण्यांत काम करतेवेळीं पाणी आंत येऊं नये म्हणून कामाभोंवतीं बसविलेली उभ्या फळ्यांची मुंढे मारून केलेली पेटी. (इं.) कॉफरडॅम्. -राको ३६/?/ [पाणी + पेटी] ॰पोई-स्त्री. १ वाटसरूंना, आल्यागेल्यांना पाणी पाजण्या- साठीं केलेली सोय; पन्हेरी. 'येइ भाई येथ पाही । घातलीसे पाणपोई ।' -यशोधन. २ अशा ठिकाणीं आल्यागेल्यांस पाणी देण्याची क्रिया. [पाणी + पोई] ॰फोल-न. (राजा.) भाताच्या फुलांवर पाऊस अतिशय पडल्यामुळें त्यामध्यें होणारें फोल, पोचटपणा; असलें न भरलेलें पोचट कणीस. [पाणी = पाऊस + फोल = पोचटपणा] ॰बुड-स्त्री. पाटाच्या पाण्यानें भिजणाऱ्या जमीनी- वरील कर. [पाणी + बुडणें] ॰बुड-पु. (कों.) पाणकोंबड्यासारखा एक पक्षी. [पाणी + बुड] ॰बुडा-ड्या, पाणिबुड्या- पाणबुड्यी-पु. १ मासे धरणारा कोळी. 'तरी माशालागीं भुलला । ब्राह्मण पाणबुडां रिघाला ।' -ज्ञा १६.४५१. २ पाण्याच्या तळाशीं असलेल्या वस्तू वर काढण्याकरितां पाण्यांत बुडी मारून बराच वेळ पाण्यांत राहण्याचा सराव ज्यास आहे तो; समुद्रांत बुडी मारून मोत्यें वर काढणारा. 'ते वाक्समुद्रिचे पाणबुडे । कीं सारासारसीमेचे गुंडे ।' -ऋ २४. ३ एक प्रकारचा पक्षी. [पाणी + बुडणें] ॰बुडी-स्त्री. १ पाण्यांत मारलेली बुडी; सुरकांडी. (क्रि॰ मारणें). २ पाण्याच्या पृष्ठभागाखालून संचार करणारी युद्धोप- योगी नौका. (इं.) सब्मरीन्. 'तें आरमार पाणबुड्यांच्या आघातामुळें इतउत्तर आपली पूर्वकामगिरी देण्यास कितपत समर्थ राहील....' -टि ३.३.३४८. [पाणी + बुडी] ॰बुडीत-वि. पुरानें, पावसानें जलमय झालेली (जमीन, पीक). [पाणी + बुडणें] ॰बोदाड-वि. (ना.) पाणथळ; दलदलीची (जमीन). [पाणी + बुडणें] ॰भर-भरजमीन-स्त्री. १ नवीनच खोदलेल्या विहि- रीच्या पाण्यानें, ओढ्याच्या, पाटाच्या पाण्यानें भिजणारी शेत जमीन. २ पुराच्या पाण्यानें भिजणारी जमीन. ३ असल्या जमीनीवरील सरकारी सारा. [पाणी + भरणें + जमीन] ॰भर जिराईत-स्त्री. पाटाच्या पाण्यानें भिजणारी परंतु कोरड म्हणून गणली गेलेली जमीन. [पाणभर + जिराईत] ॰भरणीचा- भरीत-भरिताचा-वि. १ पाटाचें पाणी मिळणारें (शेत, मळा इ॰). याच्या उलट कोरडवाय-वाही. २ पाटाच्या, विहिरीच्या पाण्यानें तयार झालेलें, काढलेलें (पीक इ॰). ॰भरा-वि. १ विहिरीच्या, पाटाच्या पाण्याची जरूरी असलेला (गहूं, जोंधळा इ॰). २ सदर पाण्यानें भिजणारी (जमीन). [पाणी + भरणें] ॰भऱ्या-भर्या-पु. पाणक्या; पाणी भरण्याचा धंदा करणारा. [पाणी + भरणें] ॰भाकरी-स्त्री. नदीच्या, तलावाच्या पाण्याच्या पृष्ठभागावर खापऱ्या फेकण्याचा मुलांचा खेळ; भाकरीचा खेळ. 'तें गलबत वाऱ्याच्या सोसाट्यांत सांपडून मुलांच्या पाणभाकरीच्या खेळांतल्या खापरीप्रमाणें भलतीकडे गेलें.' -कोरकि ७७. [पाणी + भाकरी] ॰मांजर-न. मांजरासारखा एक जलचर प्राणी. [पाणी + मांजर] ॰मोट, पाणमोटली-की-मोटळी, पाण्याची मोट-स्त्री. प्रसूतीसमयीं गर्भ बाहेर पडण्यापूर्वी गर्भोदकानें भर- लेली गर्भाशयांतून बाहेर पडणारी पिशवी. (क्रि॰ येणें; पडणें; फुटणें; निघणें) [पाणी + मोट, मोटली = चामड्याची मोठी पिशवी] ॰रस-पु. पूर्वीं रस काढून घेतलेल्या आंब्यांवर पाणी ओतून ते हालवून, चेंदून पुन्हां त्यांपासून काढलेला पाणचट रस. [पाणी + रस] ॰रहाट-पु. पाण्याच्या साहाय्यानें चालणारा रहाट; पाणचक्की. [पाणी + रहाट] पाणरॉ, पाणसर्प-पु. (गो.) पाण्यांत असणारी सापाची एक जात. [पाण + सर्प] पाणलव्हा-पाणलांव-पु. (कों.) पक्षिविशेष; यास निबुड असेंहि म्हणतात. [पाणी + लाव, लांव्हा = पक्षिविशेष] ॰लोट-पु. १ पाणी; वाहून जाईल असा उतार; पाणढाळ २ टेकडीची, डोंगराची उतरती बाजू; उतरण. ३ पाण्याचा जोराचा प्रवाह; लोंढा; झोत; धोत. ४ डोंगरमाथा; जेथें पाणी पडलें असतां तेथें न थांबतां दोहोंबाजूंस वाहून जातें अशी डोंगर माथ्याची धार. उदा॰ सह्याद्रीचा पाणलोट. [पाणी + लोट] ॰वटा-ठा, पाणवथ-वथा-पु. नदी इ॰कांवर गांवचे लोक जेथें पिण्यासाठीं पाणी भरणें, वस्त्रें धुणें इ॰ क्रिया करतात तें ठिकाण. 'दिवसा पाणवठा म्हणुनियां रात्र आम्ही ही धरली ।' -रासक्रिडा १२. 'पौलपट्टणीं येऊनि शुद्ध । पाणवथीं बैसला ।' -नव १८.४३. [पाणि + वर्त्तिकः-वटा] म्ह॰ बारा कोसांवरचा पाऊस, शिंवेचा राऊत, पाणवठ्याची घागर बरोबर गांवांत येतात. ॰वड-स्त्री. पाण्याचे रांजण, घागरी, डेरे इ॰ भरून ठेवण्यासाठीं (घरांत) केलेला ओटा, ओटली. [पाणी + ठाव] पाणवडा- वाडा-पु. पाणवठा पहा. 'क्लेशगांविंचा उकरडां । भवपुरिचां पानवाडां ।' -राज्ञा १६.४०५. [पाणि + वर्त्तिकः] पाणवसा-पु. (कों.) गाई, म्हशी इ॰ गुरांच्या जीवनास हेतुभूत असणारें (गांवचें) पाणी, गवत इ॰ समुच्चयानें; पाणसा. [पाणी + वास] ॰वळ-न. (कों.) पावसाळ्यानंतर कांहीं काळपर्यंत जींत ओलावा टिकून राहतो अशी जमीन; पाणथळ अर्थ १ पहा. २ -वि. बेचव; पाणचट. पाणचट अर्थ १ पहा. [पाणी + ओल] ॰वाट-स्त्री. १ पाणी वाहून जाण्यासारखा उतार; सखल पृष्ठभाग; ओहळ; पाणलोट. 'पाणी पाणवाटें जैसें । आपणचि धांवे ।' -दा ७.९.११. २ पाण्याची वाट. [पाणी + वाट] ॰वारू-पु. (प्राचीन पौराणिक कथांत रूढ) होडी; नाव. [पाणी + वारू = घोडा] ॰शाई- स्त्री. तारस्वार काढण्याकरितां मृदंग इ॰कास लोहकीट इ॰काच्या लुकणाचा, शाईचा देतात तो पातळ थर; याच्या उलट भरशाई. [पाणी + शाई] ॰शेंग-स्त्री. (ल.) मासळी. [पाणी + शेंग] ॰शोष-पु. पाणपोस पहा. [पाणी + सं. शोष = सुकणें] ॰सरकी- स्त्री. पाणसर्‍याचें काम, हुद्दा. पाणसरा पहा. [पाणसरा] ॰सरडें- न. पाण्यांत असणारी एक निर्विष सापाची जात. [पाण + सरडा] ॰सरडें-न. रहाटाची माळ सरूं नये म्हणून बसवितात तें प्रति- बंधक लांकूड. [पाणी + सरा = आडवीतुक्ई] ॰सरा-पु. डोंगराच्या घाटांतील वंशपरंपरागतचा जकातदार. याला वतन व ठराविक हक्क असत. घाटदुरुस्तीचें काम याच्याकडे असे. [पाणी + सरणें ?] ॰सळ-साळ-स्त्री. १ (गवंड्याचा धंदा) बांधकाम इ॰ सम- पातळींत आहे कीं नाहीं हें पाहण्याचें गवंड्याचें साधन; साधणी. (इं.) लेव्हल् बॉटल. २ समपातळी. 'भिंतीचें बांधकाम थराचें असेल तर भिंतीच्या प्रत्येक १८ इंच उंचीस माथा पाणसळींत आणावा व त्यावर पातळ चुन्याचा रद्दा करून घालावा.' -मॅरट १४. ३ पाणी वाहून जाईल असा उतार. [पाणी + सळ] पाणसा-पु. गुराढोरांच्या जीवनोपयोगी असें (एखाद्या ठिका- णचें) गवत व पाणी; पाणवस. 'ह्या गांवचा पाणसा गुरांस मानवत नाहीं.' ॰साप-पु. पाण्यांत असणारी सर्पाची जात. [पाणी + साप] ॰सापूड-स्त्री. घर इ॰कांच्या छपराच्या खालच्या बाजूस वाशांच्या टोंकांजवळ कामट्यांच्या, रिफांच्या, ओंबणाच्या शेवटीं बांधतात ती जाड कामटी; सापूड. [पाणी + सापूड] ॰सासरा-पु. (विनो- दानें) जांवयाच्या भावानें आपल्या भावाच्या सासर्‍यास विनोदानें, थट्टेनें उल्लेखण्याची संज्ञा. जांवयाच्या भावास पाणजांवई असें थट्टेनें म्हणतात त्याप्रमाणेंच हाहि शब्द आहे. ॰सासू-स्त्री. पाण- जांवयानें स्वतःच्या भावाच्या सासूस थट्टेनें उल्लेखण्याची संज्ञा. [पाणी + सासू] ॰साळ-वि. (क्व.) समपातळींत असलेली (जमीन इ॰) [पाणसळ] ॰साळ करणें-जमीन इ॰ समपातळींत आहे कीं नाहीं तें पाहणें. ॰साळ-स्त्री. प्रवासी, वाटसरू इ॰कांना पाणी पुरविण्याच्या सोयीकरतां रस्त्याच्या बाजूस बांधलेली छपरी इ॰; पाणपोई. [पाणी + सं. शाला = घर] ॰साळ, पाण- सळी भात-स्त्रीन. पाटच्या, विहीरीच्या पाण्यावर केलेलें (मळा इ॰तील) भाताचें पीक. [पाणी + साळ] ॰सुरुंग-पु. समुद्रांतील आगबोटी इ॰कांचा नाश करण्याकरितां समुद्राच्या पृष्ठभागाखालीं योजून ठेवण्याचें सुरुंगासारखें आधुनिक युद्धो- पयोगी साधन. 'बंदरांत घातलेल्या पाणसुरुंगांनीं व पाण- बुड्यांनीं हें समुद्रावरील वर्चस्व पोखरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.' -टि ३.३.३५०. [पाणी + सुरुंग] ॰सोस, पाणशोष, पाणसोक-पु. १ ताप इ॰कांत पुनः पुनः लागणारी अतिशय तहान; घशास पडणारी कोरड. २ प्रकृतीला होणारा एक (पुनः पुनः तहान लागण्याचा) विकार. [पाणी + शोष = कोरडें पडणें, होणें] ॰सोळा-पु. दिवडाच्या जातीचा, बांड्या रंगाचा, पाण्यांत राहणारा एक निर्विष साप. -बदलापूर ३४७. पाणि- ढाळ-पु. १ ओहोटी. 'अनुरागाचा निरु ताउनी । पाणिढाळु ।' -ज्ञा ७.९९. २ पाण्याचा ओघ खालीं सोडून देणें. 'पाणिढाळु गिरीशें । गंगेचा केला ।' -ज्ञा १८.१६८८. [पाणी + ढाळणें] पाणीपद-न. (महानु.) तेजाचें स्थान; गांभीर्य; ढाळ. 'परि जाणतां उपहासावें । बोलांचें पाणिपद निहाळावें ।' -शिशु ३६५. [पाणी = तेज + पद = स्थान] पाणिपात्र-न. पाणी प्यावयाचें भांडें. 'एकें हरितलें पाणिपात्र । एकें नेलें पीठ पवित्र ।' -एभा २३.५२०. [पाणि + पात्र = भांडें] पाणिय(ये)डा-पु. (महानु.) पाणवठा. 'आत्मगंगेचां पाणियेडां । थोकला अज्ञान-सीहांचा दडा ।' -भाए १०६. [पाणी + वटा, ठाव] पाणियाडा-डें-ढें- पुन. १ पाण्याचा सांठा; तळें. 'सतरावियेचें पाणियाडें । बळिया- विलें ।' -ज्ञा ९.२१४. 'शुक्रें धरिलें पाणियाडें । अवर्षण पडे बहुकाळ ।' -भाराबाल १.७८. २ जलपात्र. -माज्ञा-कठिणशब्दांचा कोश. [पाणीवडा] पाणिलग-वि. पाण्याच्या सान्निध्यानें राहणारा. 'पाणिलगें हंसें । दोनी चारी सारसें ।' -ज्ञा ६.१७७. [पाणि + लग] पाणिवथा-पु. पाणवठा पहा. पाणिवैद्य-पु. (कों.) विषार इ॰ उपद्रवावर पाणी अभिमंत्रून देणारा वैद्य. [पाणि + वैद्य] पाणीकांजी-न. (व्यापक.) पाणी काढणें व भरणें इ॰ गृहसंबंधीं कामांविषयीं व्यापक अर्थीं योजावयाचा शब्द. [पाणी + कांजी] पाणीचोर-पु. पाणचोर पहा. 'जैसें पाणी चोराच्या द्वारीं । वरील रंध्र दाटिजे जरी ।' -विपू २.६६. [पाणी + चोर] पाणीटाळ-पु. ओहोटी. -हंको, -शर, -मनको. पाणिढाळ अर्थ १ पहा. [पाणी + ढाळ] पाणी तावणें-न. (ना.) आंघोळीचें पाणी तापविण्याचें भांडें किंवा जागा. [पाणी + तावणें] पाणी- दाम-पु. पाणीपट्टी. [पाणी + दाम = किंमत] पाणीदार-वि. १ ज्याच्या अंगीं चांगलें पाणी, तेज आहे असा (हिरा, रत्न, मोत्यें इ॰). २ तीक्ष्ण; चांगल्या धारेचें (शस्त्र इ॰). ३ तेजस्वी; स्वाभिमानी; रग, धमक इ॰कानीं युक्त (मनुष्य, पशु इ॰). [पाणी + फा. दार = युक्त] पाणीपट्टी-स्त्री. म्युनिसिपालिटी इ॰ स्थानिक संस्था नगरवासीयांकडून पाणीपुरवठ्याबाबत घेतात तो कर. 'म्युनिसिपालिटीनें पाणीपट्टी वाढविली.' -के १७.६.३०. [पाणी + पट्टी = कर] पाणीपण-न. पाण्याचा भाव. 'कां गंगा- यमुनाउदक । वोघबळें वेगळिक । दावि होऊनि एक । पाणीपणें ।' -ज्ञा १८.५२. [पाणी + पण = भाववाचक नामाचा प्रत्यय] पाणीपाऊस-पु. १ नद्या, तळीं, विहीरी इ॰कांना पाण्याचा पुरवठा करून देणारा पाऊस. 'पीकपाऊस आहे, पाणीपाऊस अझून नाहीं.' २ पाऊस, पीक इ॰; पाऊसपाणी. [पाणी + पाऊस] पाणीपिसा-वि. स्नान करणें, कपडे धुणें इ॰ पाण्याच्या व्यापारांचें ज्यास वेड आहे असा. पाणीपिसें पहा. 'एक राखे एक शंखे । एक ते अत्यंत बोलके । पाणीपिशीं झाली उदकें । कुश- मृत्तिकें विगुंतलीं ।' -एभा १४.२०९. [पाणी + पिसा = वेडा] पाणीभरा-वि. पाणभरा पहा. पाणीवळ-पु. पाण्यांतला मळ. 'तेणें बहुतीं जन्मीं मागिलीं । विक्षेपांचीं पाणिवळें झाडिलीं ।' -ज्ञा ६.४७१. पाणीशेणी-न. झाड-सारवण, पाणी भरणें इ॰ गृहसंबंधीं स्त्रीनें करावयाचीं कृत्यें समुच्चयानें. [पाणी + शेण] पाणेरा-रें-पुन. पाणी भरलेलीं भांडीं ठेवण्याकरितां केलेली चिरेबंदी ओटली. [पाणी] पाणोटा-ठा, पाणोथा-पु. १ पाणवठा पहा. २ (बे.) नदीचा उतार. [पाणी]

दाते शब्दकोश

पाय

पु. १ (शब्दशः व लक्षणेनें) पाऊल; पद; चरण. ईश्वर, गुरु, पति, धनी इ॰स उद्देशून विनयानें म्हणतात. 'मला तरी हे पाय सोडून राहिल्यानें चैन का पडणार आहे ?' -कोरकि २०. २ तंगडी. ३ कंबरेपासून तों खालीं बोटापर्यंतचा सर्व भाग; चालण्यास साधनभूत अवयव. ४ (ल.) पायाच्या आकाराची, उपयोगाची कोणतीहि वस्तु. (पलंग, चौरंग, खुर्ची, टेबल, पोळपाट इ॰चा) खूर. ५ डोंगराचा पायथा, खालचा, सपाटीचा भाग. ६ अक्षराचा किंवा पत्राचा खालचा भाग. ७ झाडाचें मूळ. ८ चवथा भाग; चतुर्थांश; चरण; पाद. ९ शिडीची पायरी; पावका; पायंडा. १० (ल.) कारण; लक्षण; चिन्ह; रंग. 'मुलाचे पाय पाळण्यांत दिसतात.' [सं. पाद; प्रा. पाअ; सिं. पाओ, पाय; फा. पाए; हिं. पाव] (वाप्र.) ॰उचलणें-भरभर चालणें; न रेंगाळणें. ॰उतारा-र्‍यां आणणें-येणें-नम्र करणें, होणें; तोरा, अभिमान कमी करणें, होणें. ॰काढणें-१ निघून जाणें; निसटणें; नाहींसें होणें. 'वैराग्यलहरीचा फायदा घेऊन पन्हाळ- गडावरून रातोरात पाय काढला.' -भक्तमयूरकेकावली पृ. ३. २ (व्यवहारांतून) अंग काढून घेणें. ॰कांपणें-घाबरणें; भिणें; भीति वाटणें; भयभीत होणें. ॰खोडणें-खुडणें-खुडकणें- निजतांना पाय अंगाशीं घेणें. ॰खोडणें-मरणसमयीं पाय झाडणें, पाखडणें. ॰घेणें-प्रवृत्ति होणें; इच्छा होणें. 'त्या कामाला माझा पाय घेत नाहीं.' ॰तोडणें-(ल.) एखाद्याच्या कामांत विघ्न आणणें. ॰दाखविणें-दर्शन देणें; भेट देणें. 'तो मज दावील काय पाय सखा ।' -मोविराट ६.११८. ॰देणें- १ पायाचा भार घालून अंग चेपणें. २ तुडविणें; उपद्रव देण्या- साठीं, कुरापत काढण्यासाठीं एखाद्याला पायानें ताडन करणें. ३ पाय लावणें; पायाचा स्पर्श करणें. ॰धरणें-१ पायां पडणें; शरण जाणें; विनंति करणें; आश्रयाखालीं जाणें. २ अर्धांगवायु इ॰ रोगांनीं पाय दुखणें. ॰धुवून-फुंकून टाकणें-ठेवणें- (ल.) मोठ्या खबरदारीनें, काळजीनें वागणें; मागें-पुढें पाहून चालणें, वागणें. ॰धुणें-१ संध्यावंदनादि कर्मापूर्वीं किंवा बाहेरून आल्याबरोबर पादप्रक्षालन करणें. २ कोणाची पूजा वगैरे कर- तांना, आदरसत्कारार्थ त्याचे पादप्रक्षालन करणें. ३ (बायकी) (ल.) लघवी करणें; मूत्रोत्सर्गाला जाणें; (मूत्रोत्सर्जनानंतर हात- पाय धुण्याची चाल बायकांत रूढ आहे त्यावरून). ॰न ठरणें- सारखें हिंडणें; भटकत रहाणें; विश्रांति न मिळणें; पायाला विसावा नसणें. ॰निघणें-मुक्त होणें; मोकळें होणें; बाहेर जाणें. पडणें. 'ह्या गांवांतून एकदां माझा पाय निघो म्हणजे झालें.' -विवि ८.११.२०९. ॰पसरणें-१ अधिकार प्रस्थापित करणें; पूर्णपणें उपभोग घेणें; अल्प प्रवेश झाला असतां हळूहळू पूर्ण प्रवेश करून घेणें. २ मरणें (मरतांना पाय लांब होतात यावरून). 'शेवटीं म्हातार्‍या आईपुढें त्यानें पाय पसरले.' म्ह॰ १ भटास दिली ओसरी, भट हातपाय पसरी. २ अंथरूण पाहून पाय पसरावेत. ॰पसरून निजणें-निश्चिंत, आळशी राहणें; निरुद्योगी असणें. ॰पोटीं जाणें-भयभीत होणें; अतिशय भीति वाटणें. निजलेला मनुष्य भीतीनें हातपाय आंखडून घेतो यावरून. 'जंव भेणें पाय पोटीं गेले नाहीं ।' -दावि १६०. ॰फांलटणें-पाय झिजवणें; पायपिटी करणें; तंगड्या तोडणें; एखादें काम करण्यासाठीं कोठें तरी फार दूरवर किंवा एकसारखें पायानें चालत जाणें. 'कांहीं लाभ नसतां उगींच पाय फांसटीत चार कोस जातो कोण ?' ॰फुटणें- १ विस्तार पावणें; वाढणें. 'पहिल्यानें तुझें एक काम होतें, नंतर दुसरें आलें, आतां तिसरें. आणखी त्याला किती पाय फुटणार आहेत कोणास ठाऊक ?' २ हळूच नाहींसा होणें; चोरीला जाणें (वस्तु). ३ थंडीच्या योगानें किंवा जळवातानें पाय भेगलणें, चिरटणें. ॰फोडणें-भलतीकडे नेणें; विषयांतर करणें; मुद्याला सोडून अघळ- पघळ बोलणें; फाटे फोडणें. ॰भुईशीं(ला)लागणें-१ (एखाद्या कामास) कायमपणा येणें; निश्चितपणा येणें. २ जिवावरच्या संकटांतून वांचणें. ॰मोकळा करणें-होणें १ अडचणींतून बाहेर पडणें, काढणें. २ फेरफटका करणें; पायांचा आंखडलेपणा नाहींसा करणें, होणें. ॰मोडणें-१ पायांत शक्ति नसणें. २ निराशेमुळें गलितधैर्य होणें; निराश होणें. 'माझा भाऊ गेल्यापासून माझे पाय मोडले.' ३ एखाद्याच्या कामांत हरकत आणणें; धीर खचविणें; मोडता घालणें; काम करूं न देणें. ४ (नगरी) एखाद्या मुलाच्या पाठीवर त्याच्या मातेस कांहीं दिवस जाणें; गरोदर राहणें. 'नरहरीचे पाय मोडले कां ?' (त्याच्या पाठीवर कांहीं दिवस गेले आहेत काय ?) ॰येणें-चालतां येणें; (लहान मूल) चालूं लागणें. ॰रोवणें- स्थिर, कायम होणें. ॰लागणें-पाय भुईशीं लागणें पहा. (वर) ॰येणें-प्रतिबंध, अडचण होणें, येणें. पोटावर पाय येणें = उदर- निर्वाहाचें साधन नाहीसें होणें. ॰वरपणें-ओरपणें-(कर.) चिंचपाण्यांच पाय बुडवून ते तापलेल्या तव्यावरून ओढणें व पुन्हां चिंचपाण्यांत बुडविणें, याचप्रमाणें पांच दहा मिनिटें सारखें करीत रहाणें (डोळ्यांची जळजळ यासारखा विकार नाहींसा होण्यावर हा उपाय आहे). [ओरपणें पहा] ॰वळणें-१ दुसरी- कडे प्रवृत्ति होणें; मुरडणें; वळले जाणें (प्रेम इ॰). २ वातविकारानें पायांत वेदना उत्पन्न होणें; पाय तिडकूं लागणें; गोळे येणें. ॰वाहणें-एखाद्या स्थलीं जाण्याचा मनाचा कल, प्रवृत्ति होणें. ॰शिंपणें-(मुलाला पायावर घेऊन दूध पाजण्यापूर्वीं स्वतः) पाय धुणें. 'ते माय आगोदर पाय शिंपी ।' -सारुह १.५३. ॰शिवणें-पायांस स्पर्श करणें; पायाची शपथ वाहणें. पायां- खालीं तुडविणें-१ दुःख देणें; क्लेश देणें छळ करणें. २ कस्पटाप्रमाणें मानणें; मानहानि करणें. पायाचा गू पायीं पुसणें-(ल.) कोणत्याहि घाणेरड्या गोष्टीची घाण जास्त वाढूं न देतां तिचा ताबडतोब बंदोबस्त करणें. पायांचा जाळ-पायांची आग-पायांचें पित्त मस्तकास जाणें-अतिशय रागावणें; क्रोधाविष्ट होणें; संतापणें. पायांची बळ भागविणें-व्यर्थ खेपा घालणें, फिरणें; निरर्थक कार्यास प्रवृत्त होणें. पायांजवळ येणें-(आदरार्थीं) एखाद्याकडे जाणें, येणें, भेटणें. पायानें जेवणें-खाणें-अत्यंत मूर्ख, वेडा असणें, होणें. पायानें लोटणें-तिरस्कार करणें; अवहेलना करणें. 'म्हणतो युधिष्ठिर नको पायें लोटूं मला अवनतातें ।' -मोउद्योग ८.१८. पायां पडणें-पायांवर डोकें ठेवणें; नमस्कार करणें; विनविणें; याचना करणें. 'उत्तर म्हणे नको गे ! पायां पडतों बृहन्नडे ! सोड !' -मोविराट ३.७४. पायांपाशीं पाहणें-जवळ असेल त्याचाच विचार करणें; अदूरदृष्टि असणें; आपल्याच परिस्थितीचा, आपल्या- पुरताच विचार करणें. पायांपाशीं येणें-पायाजवळ येणें पहा. पायांला-त, पायांअढी पडणें-(म्हातारपणामुळें) चालतांना एका पायाला दुसरा पाय घासणें. पायांला खुंट्या येणें- एकाच जागीं फार वेळ बसल्यानें पाय ताठणें. पायां लागणें- पायां पडणें. 'मीं पायां लागे कां । कांइसेयां लागीं ।'- शिशु २२४. पायांवर कुत्रीं-मांजरें घालणें-(ल.) अतिशय प्रार्थना व विनवण्या करून एखाद्यास कांहीं काम करावयास उठ- विणें. पायांवर घेणें-मूल जन्मल्यावर त्यास स्वच्छ करण्यासाठीं न्हाऊं घालणें व जरूर तें सुईणीचें काम करणें. पायांवर नक्षत्र पडणें-सदोदित फिरत असणें; एकसारखे भटकणें; पायाला विसांवा नसणें. 'काय रे, घटकाभर कांहीं तुझा पाय एका जागीं ठरेना, पायावर नक्षत्र पडलें आहे काय ?' पायांवर पाय टाकून निजणें-चैनींत व ऐटींत निजणें. पायांवर पाय ठेवणें-देणें- एखाद्याच्या पाठोपाठ जाणें; एखाद्याचें अनुकरण करणें. पायांवर भोंवरा असणें-पडणें-एकसारखें भटकत असणें; भटक्या मारणें. पायावर नक्षत्र पडणें पहा. पायावर हात मारणें- पायाची शपथ घेणें. -नामना ११०. पायाशीं पाय बांधून बसणें-एखाद्याचा एकसारखा पिच्छा पुरवून कांहीं मागणें. पायांस कुत्रें बांधणें-(ल.) शिव्या देत सुटणें; भरमसाट शिव्या देणें; फार शिवराळ असणें. पायांस पाय बांधणें-एखाद्याच्या संगतींत एकसारखें रहाणें. पायांस भिंगरी-भोंवरा असणें- पायांवर भोंवरा असणें पहा. पायांस-पायीं लागणें-नमस्कार करणें; पायां पडणें. 'तूं येकली त्वरित जाउनि लाग पायीं ।' -सारुह ८.११२. पायांस वहाण बांधणें-बांधलेली असणें-एकसारखें भटकत राहणें; पायपीट करणें. पायीं-क्रिवि. १ पायानें; पायाच्या ठिकाणीं. 'भूपें हळूच धरिला कलहंस पायीं' -र १०. [पाय] २ मुळें; साठीं; करितां. 'काय जालें देणें निघालें दिवाळें । कीं बांधलासि बळें ऋणेंपायीं ।' -तुगा ८४५. (कुण.) 'कशापायीं' = कशाकरतां; कां. पाईं. [सं. प्रीतये; प्रीत्यर्थ] पायीं बांधणें-(हत्ती इ॰च्या पायाशीं बांधणें या शिक्षेवरून) हानि, पराभव करण्यास तयार असणें. आपले पाय माझ्या घरीं लागावे-(आदरार्थीं ल.) आपण माझ्या घरीं येऊन मला धन्य करावें. आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी- (नम्रपणाचें आमंत्रण) माझ्या घरीं आपण यावें. आपल्या पायांवर धोंडा पाडून-ओढून घेणें-आपलें नुकसान आप- णच करून घेणें; आपल्या हातांनीं स्वतःवर संकट आणणें; विकत श्राद्ध घेणें. एका पायावर तयार-सिद्ध असणें-अत्यंत उत्सुक असणें. 'बाजीराव शिपाई आहेत तसा माही आहें. त्यांच्याप्रमाणेंच हा प्रतिनिधि योग्य प्रसंगीं पाहिजे त्या मोहिमेवर जाण्यास एका पायावर सिद्ध आहे.' -बाजीराव. घोड्याच्या- हत्तीच्या पायीं येणें आणि मुंगीच्या पायीं जाणें- (आजारीपण, संकट, बिकट परिस्थिति इ॰) ही येतांना जलदीनें येतात पण जावयास दीर्घकाळ लागतो. याच्या उलट श्रीमंतीबद्दल म्हणतात. चहूं-दोहें पायांनीं उतरणें-(शिंगरू, वांसरूं, पाडा इ॰नीं) चार किंवा दोन पांढर्‍या पायांसह जन्मणें. जळता पाय जाळणें-एखाद्या कामांत, व्यवहारांत, व्यापारांत नुकसान होत असतांहि तो तसाच चालू ठेवणें. त्या पायींच-क्रिवि. ताबड- तोब; त्याच पावलीं. भरल्या पायांचा-(रस्त्यांत चालून आल्या मुळें) ज्याचे पाय (बाहेरून आल्यामुळें धुळीनें वगैरे) घाणेरडे झाले आहेत असा. 'तूं भरल्या पायांचा घरांत येऊं नकोस.' भरल्या पायांनीं, पायीं भरलें-क्रिवि. बाहेरून चालून आल्यावर पाय न धुतां; घाणेरड्या पायानीं. (बाहेरच्या दोषासह; स्पृष्टा- स्पृष्टादि दोष किंवा भूतपिशाच्चादि बाधा घेऊन). 'मुलाच्या जेवणाच्या वेळेस कोणी पायीं भरलें आलें भरलें आलें म्हणून आज हें मूल जेवीत नाहीं.' 'ज्या घरीं बाळंतीण आहे त्यांत एकाएकीं पायीं भरलें जाऊं नये.' मागला पाय पुढें न घालूं देणें-(ल.) केलेली मागणी पुरविल्याशिवाय पुढें पाऊल टाकूं न देणें; मुळींच हालूं न देणें. मागला पाय पुढें न ठेवणें-मागितलेली वस्तु दिल्याशिवाय एखाद्यास सोडावयाचें नाहीं, तेथून जाऊं द्यावयाचें नाहीं असा निश्चय करणें. मागील पाय पुढें नाहीं पुढील पाय मागें नाहीं-हट्टीपणा; करारीपणा; ठाम निश्चय; जागच्या- जागीं करारीपणानें ठाव धरून बसणें याअर्थीं उपयोग. मागल्या पायीं येणें-एखादें काम करून ताबडतोब परत येणें; त्याच पावलीं परत येणें. म्ह॰ १ पाय धू म्हणे तोडे केवढ्याचे ? २ पाय लहान मोठा, न्याय खरा खोटा. ३ पायांखालीं मुंगी मर- णार नाहीं (निरुपद्रवी माणसाबद्दल योजतात). ४ (व.) पायावर पाय हवालदाराची माय = आळशी स्त्रीबद्दल योजतात. ५ पायींची वहाण पायींच छान-बरी (हलक्या मनुष्यास फाजील महत्त्व देऊं नये या अर्थीं). 'मज पामरा हें काय थोरपण । पायींची वहाण पायीं बरी ।' -तुगा ५३५. ६ हत्तीच्या पायांत सग- ळ्यांचे पाय येतात. सामाशब्द- ॰आंग-न. (व.) गर्भाशय. ॰उतार-रा-पु. नदींतून पायीं चालत जाण्यासारखी वाट. 'एर्‍हवी तरी अवधारा । जो दाविला तुम्हीं अनुसारा । तो पव्ह- ण्याहूनि पायउतारा । सोहपा जैसा ।' -ज्ञा ५.१६५. -वि. १ पायांनीं ओलांडून जांता येण्याजोगा. २ पायीं चालणारा; पायदळ. 'आम्ही गाडदी लोक केवळ आम्ही पायउतारे.' -भाब १००. [पाय + उतार] ॰उतारां-रा-क्रिवि. पायीं; पायानें. (क्रि॰ येणें; जाणें; चालणें). 'पायउतारा येइन मागें पळभर ना सोडी ।' -सला २०. पायउतारा होणें-येणें-(ल.) शिव्यागाळी, भांडण करण्यास तयार होणें. ॰कडी-स्त्री. पायांतील बेडी. 'तुम्ही हातकड्या, पायकड्या घातल्या.' -तोबं. १२६. [पाय + कडी] ॰क(ख)स्त-स्त्री. पायपीट; एकसारखें भटकणें; वणवण; [पाय + कष्ट, खस्त] ॰कस्ता-पु. एका गांवीं राहून दुसर्‍या गांवचे शेत करणारें कूळ; ओवंडेकरी. 'दर गांवास छपरबंद व पायकस्ता देखील करार असे.' -वाडबाबा १.२२९. [फा. पाएकाश्त] ॰कस्ता, पायींकस्ता-क्रिवि. पायीं जाऊन; पायांनीं कष्ट करून; ओवं- ड्यानें. 'आसपास गांव लगते असतील त्यांनीं पायीं कस्ता शेतें करून लागवड करावी ...' -वाडबाबा २.८३. ॰काळा-पु. (कों.) (सामान्यतः) कुणबी; नांगर्‍या; शेतावरचा मजूर. [पाय + काळा] ॰खाना-पु. शौचकूप; संडास; शेतखाना. [फा. पाए- खाना] ॰खिळॉ-पु. (गो.) पायखाना पहा. ॰खुंट-खुंटी- पुस्त्री. जनावर पळून जाऊं नये म्हणून त्याच्या गळ्यास व पायास मिळून बांधलेली दोरी, किंवा ओंडा; लोढणें. [पाय + खुंट, खुंटी] ॰खोळ-पु. लाथ. 'कां वैद्यातें करी सळा । रसु सांडी पायखोळां । तो रोगिया जेवीं विव्हळा- । सवता होय ।' -ज्ञा १७.१०१. २ शेतखाना ? [गो. पायखिळॉ] ॰खोळा-ळां-क्रिवि. पायतळीं; पायदळी. 'चंदन चढे देवनिढळा । येक काष्ठ पडे पायखोळा ।' -मुरंशु ३७९. ॰खोळणी-वि. शेतखान्याची ? 'जैसी पाय- खोळणी मोहरी । भरणाश्रय आमध्यनीरीं । तैसा द्रव योनिद्वारीं । म्हणोनि सदा अशौच ।' -मुरंशु ३५४. [गो. पायखिळॉ = शेतखाना] ॰गत-न.स्त्री. १ बिछान्याची पायाकडची बाजू; पायतें. 'सर- कारनें खडकवासल्याचें धरण बांधून आमच्या पायगतची नदी उशागती जेव्हा नेऊन ठेवली...' -टि २.१७४. २ (डोंगर, टेंकडी, शेत इ॰चा) पायथा; पायतरा. ३ पलंग, खाट यांचें पायांच्या बाजूकडील गात. [पाय + सं. गात्र] ॰गत घेणें-बाज इ॰च्या पायगतच्या दोर्‍या ओढून बाज ताठ करणें, ताणणें. ॰गम-पु. (व.) पाया; पूर्वतयारी; पेगम पहा. 'आधीं पासून पायगम बांधला म्हणजे वेळेवर अशी धांदल होत नाहीं.' ॰गुण-पु. (पायाचा गुण) एखाद्याचें येणें किंवा हजर असणें व त्यानंतर लगेच कांहीं बर्‍यावाईट गोष्टी घडणें यांच्यामध्यें जोडण्यांत येणारा काल्पनिक कार्यकारणसंबंध; बरेंवाईट फळ; शुभाशुभ शकुन. हातगुण शब्द याच अर्थाचा पण थोडा निराळा आहे. एखाद्या माणसाचें काम, कृत्य यांशीं हातगुणाचा संबंध जोडतात. 'धनाजीला नौकरीला ठेवल्यापासून हंबीरराव पुनः पूर्वींच्या वैभवाला चढले, आणि धनाजीचा हा पायगुण समजून त्याला प्यार करूं लागले.' -बाजीराव १२७. ॰गुंता-पु. अडचण; आड- काठी; अडथळा; पायबंद. पायगोवा पहा. 'दिल्लीस गेले आणि तिकडेच राहिले तर मग यत्न नाहीं. यास्तव समागमें पायगुंता विश्वासराव यास द्यावें' -भाव १०७. 'हीं मायेचीं माणसं स्वारींत जवळ असलीं कीं पायगुंता होतो.' -स्वप ४८. [पाय + गुंतणें] ॰गोवा-पु. १ पायगुंता; एखाद्या जुंबाडांत पाय अडकल्यामुळें होणारी अडचण; पायामुळें झालेली अडवणूक. २ (ल.) अडचण; अडथळा; नड; हरकत; आडकाठी; अटकाव. 'निरोपण सुपथीं आडथळा । पायगोवा वाटे सकळा ।' -मुसभा. २.९५. 'देवधर्म तीर्थ करावयास चिरंजीवाचा पायगोवा होईल यैसे आहे' -पेद ९.११. ३ शत्रूच्या सैन्याला पिछाडीकडून अडविणें. [पाय + गोवणें] ॰घड्या-स्त्रीअव लग्नांत वरमाय व मानकरिणी यांना त्यांच्या जानवास घर पासून वधूमंडपीं आणतांना त्यांच्या रस्त्यवर आंथराव- याच्या पासोड्या (मोठ्या सत्काराचें चिन्ह). पायघड्या घाल- ण्याचें काम परिटाकडे असतें. 'वाजंत्री पायघड्याशिरीगिरी विहिणी चालती ।' -वसा ५३ [पाय + घडी] ॰घोळ-वि. पायापर्यंत पोंचसें (वस्त्र.). 'कौसुंभरंगी पातळ । नेसली असे पायघोळ ।' -कथा १.११.११२. -क्रिवि. दोन्ही पाय झाकले जातील असें (नेसणें) पायांवर घोळे असें. [पाय + घोळणें] ॰चंपा-स्त्री. पाय चेपणें; सेवेचा एक प्रकार. 'हातदाबणी, पाय पी, विनवणी, चोळणी इत्यादि प्रकार करण्याचे अपूर्व प्रसंग जुन्या लोकांच्या परिचयाचे नव्हते असे ते सांगतात.' -खेया २८. [पाय + चंपी = चेपणीं] ॰चळ-पुस्त्री. अशुभ, अपशकुनी पाऊल. पायगुण; कोणत्याहि कार्याचा बिघाड, विकृति, संकटाची वाढ इ॰ होण्याचें कारण रस्त्यावरून जाणारा एखादा अपशकुनी माणूस किंवा भूत असें समजतात; पायरवा. [पाय + चळ] ॰चाल- स्त्री. पायानें चालणें, चालत जाणें; चरणाचाल. 'कीं येथ हे हळुच चालत पायचाली ।' -सारुह ८.१४४. [पाय + चाल] ॰चाळ- पु. १ विनाकारण केलेली पायांची हालचाल. २ (विणकाम) पायांच्या हालचालीमुळें हातमागास दिलेली चालना किंवा अशा रीतीनें चालणारा माग ३ अपशकुनी पायगुण; पायचळ. [पाय + चाळा] ॰चोरी-वि. धार काढतांना मागील पाय वर उचल- णारी (गाय, म्हैस इ॰). [पाय + चोरी] ॰ज(जा)मा-पु. विजार; तुमान; चोळणा; सुर्वार. [फा. पाएजमा] ॰जिभी- जिब-जीब-स्त्रीन. बारिक घागर्‍या असलेला पायांत घालण्याचा एक दागिना; तोरडी; पैंजण. वर्‍हाडांत अद्याप पायजिबा घालतात. 'सोन्याचें पायजिब तळीं ।' -राला ५६. [फा. पाएझेब्] ॰टा-पु. १ पायरी (शिडी, जिना इ॰ची). २ विहिरींत उतर- ण्यासाठीं केलेले कोनाडे किंवा बांधीव विहीरींत बांधकामाच्या बाहेर येतील असे पुढें बसविलेले जे दगड ते प्रत्येक; नारळाच्या झाडास वर चढतांना पाय ठेवण्यासाठीं पाडलेली खांच. ३ पाय- वाट; पाऊलवाट. ४ (ल.) वहिवाट; पायंडा; शिरस्ता; प्रघात. (क्रि॰ पडणें; लागणें; बसणें). ५ चाकाच्या परिघाचा प्रत्येक तुकडा, अवयव; पाटा. ६ (मोटेच्या विहिरीच्या) थारोळ्याच्या दोन्ही बाजूचे दगड, प्रत्येकी. [पाय + ठाय] ॰टांगी-स्त्री. (ना.) खालीं पाय सोडून बसतां येईल अशी योजना असणारी बैलगाडी. रेडू. [पाय + टांगणें] ॰ठ(ठा)ण-ठणी-नस्त्री. पायरी; पायटा पहा. 'हीं चार पांच चढुनी हळु पायठाणें ।' -केक २५. [सं. पदस्थान; म. पाय + ठाणें] ॰ठा-पु. १ चाकाच्या परिघाचा अव- याव; पाटा. २ (राजा.) सपाट जमीन भाजून तेथें नाचणी इ॰ पेरण्यासाठीं तयार केलेलें शेत. ३ ज्यांत मोटेचे सुळे, बगाडाचे खांब बसवितात ते विहिरींचे, भोंके पाडलेले दोन दगड. [सं. पदस्थ; पाय + ठेवणें] ॰त(ता)ण-न-न. (अशिष्ट.) १ जोडा; जुता; कुणबाऊ जोडा; पादत्राण. (सामा.) पायांत घालण्याचें साधन 'विठ्ठल चिंतण दिवसारात्रीं ध्यान । होईन पायतन त्याचे पायीं ।' -तुगा ११२७. 'स्त्रीपट चोरूनि पळे तेव्हां कैंचीं नळास पायतणें ।' -मोवन ४.१५५. २ (कों.) वाहाणा; चेपल्या. [सं. पादत्राण; प्रा. पायत्ताण] ॰बसविणें-(चांभारी धंदा) जोडा व्यवस्थित करणें. पायतर-पायतें पहा. ॰तरे-न. पायरी. 'एथ अग्नी हें पहिलें पायतरें । ज्योतिर्मय हें दुसरें ।' -ज्ञा ८.२२३. [पाय + थारणें] ॰तांदूळ-पुअव. (पायाखालचें तांदूळ) साधे, स्वच्छ तांदूळ निरनिराळ्या दोन पाटींत, शिपतरांत (ब्राह्मणेतरांत) किंवा पत्रावळींवर (ब्राह्मणांत) ठेवतात व त्यांवर नियोजित वधूस व वरास लग्नासाठीं उभे करितात. या तांदुळांवर उपाध्यायाचा हक्क असतो. पण ते बहुधां तो महारास देत. वधूवराच्या मस्तकावर तांदूळ, गहूं किंवा जोंधळे जे टाकतात, ते जे नंतर एकत्र करितात त्यांसहि पायतांदूळ असें म्हणतात. ह्या तांदुळांवर वेसकर-महाराचा हक्क असतो. [पाय + तांदूळ] ॰तर(रा)-ता-थर(रा)-था- पायतें-थें-पुन. १ बिछान्याची पायगताची बाजू. २ (टेंकडी, शेत, बगीचा इ॰ची) पायगत; पायतळची बाजू. [सं. पाय + थारणें; पादांत; म. पायतें] ॰थण-न-न. (विरू.) पायतण पहा. ॰थरी-स्त्री. (खा.) दुकानाच्यापुढें लांकडी किंवा दगडी तीन चार पायर्‍या असतात त्यांपैकीं प्रत्येक पायरी; पायटा. ॰दळ-न. पायानें चालणारी फौज; पाइकांचें सैन्य; पदाति. [पाय + दळ (सं. दल-सैन्य)] ॰दळ-ळीं-क्रिवि. जाण्यायेण्याच्या वाटेवर; पायानें तुडविलें जाईल असें (पडणें). 'फुलें कुसकरिलीं कुणिग मेल्यानें पायदळी तुडविलीं.' -उषःकाल १२८. ॰दळणीं-क्रिवि. पायाखालीं; पायदळीं. (कि॰ पडणें). [सं. पाददलन] ॰दान- न. (व.) तांग्याच्या, बैलगाडीच्या मागच्या बाजूस पाय ठेवण्या साठीं केलेली जागा. [सं. पाद + दा = देणें, दान] ॰दामा-पु. १ पक्षी पकडण्याचें जाळें. २ फूस लाविणारा पक्षी; ससाणा. -मराचिथोशा ३३. [फा. पाय्दाम्; सं. पाद + दाम = दावें] ॰द्दाज-न. पाय पुसणें; पायपुसें; हें बहुतेक काथ्याचें केलेलें असतें. [पाय] ॰धरणी-स्त्री. १ पायां पडणें; अत्यंत नम्रतेची, काकुळतीची विनवणी; पराकाष्ठेचें आर्जव. 'कशीहि पायधरणी मनधरणी करा- वयास तयार झालो.' -भक्तमयूरकेका प्रस्तावना १६. [पाय + धरणी] ॰धूळ-स्त्री. १ पायाची, पायास लागलेली, धूळ. 'नाचत बोले ब्रीदावळी । घेऊन लावी पायधुळी ।' -दा २.७.४१. २ स्वतःबद्दल दुसर्‍याशीं तुलना करतांना, बोलतांना (गुरु, इ॰कांजवळ) नम्रता- दर्शक योजावयाचा शब्द. [पाय + धूळ] (एखाद्यावर) ॰धूळ झाडणें-(एखाद्याच्या घरीं) आगमन करणें; भेट देणें; समाचार घेणें (गौरवार्थीं प्रयोग). 'मज गरिबावर पायधूळ झाडीत जा.' 'जगीं जरी ठायीं ठायीं पायधूळ झाडुन येई ।' -टिक ५. ॰पायखळी-स्त्री. पाय धुणें. 'तयापरी जो अशेषा । विश्वा- चिया अभिलाषा । पायपाखाळणिया देखा । घरटा जाला ।' -ज्ञा १८.६५१. [सं. पादप्रक्षालन; प्रा. पायपक्खालण; म. पाय + पाखाळणी] ॰पाटी-पांटी-स्त्री. लग्नाच्या वेळीं पायतांदुळांनीं भरलेली पांटी, शिपतर इ॰. [पाय + पांटी] ॰पा(पां)टीचे तांदूळ-पुअव. पायतांदूळ पहा. ॰पिटी-पीट-स्त्री. विनाकारण चालण्याचे श्रम; वणवण; इकडे तिकडे धांवाधांव. 'बहु केली वणवण । पायपिटी झाला सिण ।' -तुगा २००. [पाय + पिटणें] ॰पुसणें, ॰पुसें-न. पायपुसण्यासाठीं दाराशीं ठेविलेली काथ्याची जाड गादी; पायद्दाज; पायपुसण्याचें साधन. (महानु.) पायें पुसणें. 'तया वैराग्याचें बैसणें । शांभव सुखाचें पायेंपुसणें ।' -भाए ८११. [पाय + पुसणें] ॰पेटी-स्त्री. हार्मोनियमचा एक प्रकार. हींत पायानें भाता चालविण्याची योजना केली असल्यानें दोन्ही हातांनीं पेटी वाजवितां येते. याच्या उलट हातपेटी. [पाय + पेटी] ॰पैस-(व.) पाय टाकण्यास जागा. [पाय + पैस = प्रशस्त] ॰पोश-स-पु. (ल.) जोडा; वहाण; चप्पल; पादत्राण. 'सालाबादप्रमाणें ऐन जिन्नस पायपोसाचे जोडच यापासून घेत जाणें.' -दा २०१२. [फा. पाय्पोश्; सं. पाद + स्पृश्] ॰पोस- जळाला, गेला-तुटला-कांहीं पर्वा नाहीं, हरकत नाहीं, शष्प गेलें याअर्थीं वाक्प्रचार. 'एका महारुद्राची सामग्री राधाबाई काय लागेल ती पुण्याहून माळशिरसास पाठवील न पाठवील तरी आमचा पायपोस गेला ! तीन महारुद्र करून आम्हींच श्रेय घेऊं.' -ब्रप २७३. ॰पोस मारणें-मानहानि करणें; निर्भर्त्सना करणें. ॰पोस दातीं धरणें-अत्यंत लीन होऊन क्षमा मागणें; याचना करणें; आश्रय घेणें. ॰पोसासारिखें तोंड करणें-फजिती झाल्यामुळें तोंड वाईट करणें; दुर्मुखलेलें असणें. कोणाचा पाय- पोस कोणाच्या पायांत नसणें-गोंधळ उडणें (पुष्कळ मंडळी जमली असली आणि व्यवस्था नसली म्हणजे ज्याचा जोडा त्याला सांपडणें मुष्किल होतें त्याजवरून). ॰पोसखाऊ-वि. खेटरखाऊ; हलकट; अत्यंत क्षुद्र; निर्लज्ज (मनुष्य). [पाय + पोस + खाणें] ॰पोसगिरी-स्त्री. जोड्यांनीं मारणें; दोन पक्षांतील व्यक्तींनीं केलेली जोड्यांची मारामारी; जोडाजोडी. (क्रि॰ करणें; मांडणें; चालणें). [फा.] ॰पोसपोहरा-पु. जोड्याच्या आका- राचा विहिरींतून पाणी काढण्याचा पोहरा. [पायपोस + पोहरा] ॰पोसापायपोशी-स्त्री. परस्परांतील जोड्यांची मारामारी; जोडाजोडी; पायपोसगिरी. ॰पोशी-स्त्री. दर चांभारापासून दर- साल एक जोडी नजराणा घेण्याचा पाटील-कुलकर्णीं इ॰चा हक्क. ॰पोशी-वि. पायपोसाच्या डौलाचें, घाटाचें बांधलेलें पागोटें. ॰पोळी-पुस्त्री. १ (तापलेली जमीन, खडक, वाळू इ॰वरून चालल्यामुळें) पाय भाजणें. २ (ल.) मध्याह्नीची वेळ. ३ जमी- नीची तप्तावस्था; जमीन अतिशय तापलेली असणें. 'एव्हां पाय- पोळ झाली आहे संध्याकाळीं कां जाना ?' [पाय + पोळणें] ॰फळें-न. (राजा.) ओकतीच्याजवळ पाय देण्यासाठीं बस- विलेली फळी. [पाय + फळी] ॰फोडणी-स्त्री. १ घरीं रोग्यास पहाण्याकरितां आल्याबद्दल वैद्यास द्यावयाचें वेतन; वैद्याच्या भेटीचें शुल्क. २ पायपोळ. [पाय + फोडणें] ॰फौज-स्त्री. (गो.) पाय- दळ. [पाय + फौज] ॰बंद-पु. १ घोड्याचे मागचे पाय बांध- ण्याची दोरी. 'एक उपलाणी बैसले । पायबंद सोडूं विसरले ।' -जै ७६.६०. २ अडथळा; बंदी. 'इंग्रज व मोंगल यांस तिकडे पायबंद जरूर पोंचला पाहिजे.' -वाडसमा १.१६. ३ (फौजेच्या पिछाडी वर) हल्ला करून व्यत्यय आणणें. 'रायगडास वेढा पडला, आपण पायबंद लावावा म्हणजे ओढ पडेल. रायगडचा वेढा उठेल.' -मराचिथोशा ३४. ४ संसाराचा पाश. [फा. पाएबंद्] ॰बंद लावणें-लागणें-घालणें-देणें-पडणें-आळा घालणें, बसणें; व्यत्यय आणणें, येणें; अडथळा, बंदी असणें, करणें. 'भलत्या आशा व आकांक्षा यांना इतिहासदिशास्त्रांकडून पायबंद पडेल.' -विचावि ५२. 'निजामाला पायबंद लागणें शक्यच नाहीं.' -भाऊ (१.१) २. ॰भार-पु. पायदळ. याच्या उलट अश्वभार, कुंजरभार, रथभार इ॰ 'अश्वरथ कुंजरा । गणित नाहीं पाय- भारां ।' -कथा १.२.५९. [पाय + भार] ॰मर्दी-स्त्री. भरभर ये जा करणें; चालणें; धांवाधांवी, धांवपळ करणें; एखाद्या कामा- वर फार खपणें. 'पायमर्दी केली तेव्हां काम झालें .' (क्रि॰ घेणें; करणें). [फा. पाएमर्दी = धैर्य; निश्चय] ॰मल्ली-म(मा)ली- मेली-स्त्री. १ सैन्य, गुरें इ॰नीं केलेली देश, शेत इ॰ची नासाडी; पायांखालीं तुडविणें; नासधूस; तुडवातुडव. 'आपले सरकारची फौज मलक महमदखान वगैरे गेले आहेत त्यांनीं पायमाली केली आहे.' -दिमरा १.१५०. २ शत्रूनें आपला मुलुख लुटला असतां, तहांत त्याच्या कडून त्या लुटीबद्दल घेण्यांत येणारा दंड किंवा खंडणी. (सामा.) मोबदला; भरपाई. 'सर्व आमचे कर्ज सरकारांतून कारभारी देतील तेव्हां काय पायमल्ली दहापांच लक्ष रुपये (वजा) घालणें ती घालावी.' -ख ९.४८५४. 'शेतकर्‍यांस नुकसानीदाखल पायमली देण्यांत येत असते.' -हिंलइ १७४. ३ (ल.) दुर्दशा; अपमान; हेटाळणी; अवहेलना. (क्रि॰ करणें; होणें). 'आमच्या भाषेची अशी पायमल्ली व्हावी हा मोठा चमत्कार नव्हे काय ?' -नि ११३ ४ नाश; नुकसान. 'महादजी गदाधर यांनीं दरबारची जुनी राहटी राखिली नाहीं, याजमुळें पायमाली आहे.' -रा ८.२०१. [फा. पाएमाली; सं. पाद + मर्दन; म. पाय + मळणें] ॰मळणी-स्त्री. सारखी चाल, घसट, वहिवाट; एकसारखें चालणें वहिवाट ठेवणें. 'जो रस्ता सध्यां बिकट व अडचणीचा वाटतो तोच पुढें पाय- मळणीनें बराच सुधारेल.' -नि. ४२९. [पाय + मळणें] ॰मांडे- पु. (काव्य.) पायघड्या पहा. 'विषयसुख मागें सांडे । तेचि पायातळीं पायमांडे ।' -एभा ८.६. -वेसीस्व १०.१९. ॰मार्ग- पु. १ पायवाट; पाऊलवाट. २ जमीनीवरचा रस्ता; भूमिमार्ग; खुष्कीचा मार्ग. ह्याच्याउलट जलमार्ग. ॰माल, पामाल-वि. पायमल्ली केलेला, तुडविला गेलेला; उध्वस्त; नष्ट. [फा. पाएमाल्] ॰मोजा-पु. पायांत घालावयाचा विणून तयार केलेला पिशवी- सारखा कपडा. हा पाऊस, थंडी, वारा यांपासून पायाचा बचाव करण्यासाठीं वापरतात. [पाय + मोजा] ॰मोड-स्त्री. १ प्रवासाला निघालेल्या किंवा चालत असलेल्या मनुष्यास जाऊं न देणें. २ अशी केलेली थांबवणूक; थांबवून ठेविलेली स्थिति. [पाय + मोडणें] ॰मोडें-न. १ (कों.) उत्साहभंग, अडथळा करणारी गोष्ट; (हातीं घेतलेल्या किंवा घ्यावयाच्या कामांत) एखाद्याचा उत्सा- हाचा, आशांचा बींमोड; तीव्र निराशा. २ आयुष्यांतील अडचणी अडथळें, संकटें इ॰ वाढत्या व्यवहाराची गति कुंठित होण्यास निमित्त. 'हें पोर अमळ चालूं लागलें म्हणजे खोकला, पडसें अशीं अनेक पायमोडीं येतात.' [पाय + मोडणें] ॰मोडें घेणें- (हातीं घेतलेल्या कार्यापासून) भीतीनें पारवृत्त होणें. ॰रव-पु. वरदळ; वहिवाट; दळणवळण; पायंडा. पैरव पहा. 'आणीकही एक पहावें । जें साधकीं वसतें होआवें । आणि जनाचेनि पायरवें मैळेचिना ।' -ज्ञा ६. १७२. -स्त्री. १ पायतळ; पायदळ; पाय ठेवण्याची जागा. 'रावण जंव भद्रीं चढे । तवं मुगुट पायरवीं पडे ।' -भारा बाल ७.५. २ (राजा.) चाहूल; सांचल. ३ पाय- वाट; रस्ता. ४ प्रवेश. 'प्रथम चाकरीस येतों म्हणून नम्रतेनें पायरव करून घेतली' -ऐटि १.२९. ५ दृष्ट; नजर; बाहेरवसा; भूतबाधा; पायरवा; पायचळ पहा. 'करंज्यांस पायरव लागून लागलीच सरबत झालें.' -कफा ४. ६ पायगुण. 'घरांत आल्या- बरोबर लागलेंच करंजांचें सरबत झालें. काय हा पायरव !' -कफा ४. ७ पैरव पहा. [सं. पाद + रव; पाय + रव; हिं. पैरव] ॰रवा- पु. १ पायरव; शिरस्ता; पायंडा. 'त्या माणसाचा येथें येण्याचा पायरव आहे.' २ पायचळ; दृष्ट लागणें. 'विहिरीवर तुझी मूल तिनीसांजची गेली होती तेथें तिला बाहेरचा पायरवा झाला.' -वेड्यांचा बाजार. ॰रस्ता-पु. १ पायवाट. २ जमीनीवरचा रस्ता, पायमार्ग. [पाय + रस्ता] ॰रहाट-पु. (अल्पार्थी) रहाटी-स्त्री. पायानें पाणी लाटण्याचा रहाट; रहाटगाडगें. [पाय + रहाट] ॰रावणी-स्त्री. पायधरणी; विनवणी, रावण्या पहा. 'देवकी बैसविली सुखासनीं । लागल्या वाजंत्राच्या ध्वनी । विंजणें वारिती दोघीजणी । पायरावणीं पदोपदीं ।' -एरुस्व १६.३२. [पाय + रावण्या] ॰लाग-पु. १ गुरांच्या पायांस होणारा एक रोग. हा गुरांच्या तोंडावर व पायांवर परिणाम करितो. २ स्त्रियांना होणारी पिशाचबाधा. (एखाद्या स्त्रीकडून भूत पायीं तुडविलें गेल्यास तें तिला पछाडतें अशी कल्पना आहे). [पाय + लागणें] ॰वट-स्त्री. १ रहदारीचा रस्ता आहे असें दाखविणार्‍या पावलांच्या खुणा; पावलांच्या खुणा. २ पायगुण. 'नेणों कोणाचा पायवट जाहला । एक म्हणती समय पुरला । एक म्हणती होता भला । वेनराव ।' -कथा ६.५.९१. [पाय + वठणें] ॰वट-(प्र.) पायवाट पहा. ॰वट-टा-पु. (महानु.) पाय; पायाच्या शिरा; (टीप-ओहटळ पांचाहि मुख्य शिरांचा सांगातु ऋ ८८). 'समसा गुल्फाचा उंचवटा । श्रीप्रभुचिया पायवटा ।' -ऋ ८८. ॰वणी-न. चरणों- दक; चरणतीर्थ; ज्या पाण्यांत एखाद्या ब्राह्मणानें किंवा पवित्र विभूतीनें पावलें बुडविलीं आहेत किंवा धुतलीं आहेत असें पाणी. 'करितां तापसांची कडसणी । कवणु जवळां ठेविजैल शूलपाणी । तोहि अभिमानु सांडूनि पायवणी । माथां वाहे ।' -ज्ञा ९.३७२. 'कोणी राम देखिला माजा । त्याचें पायवणी मज पाजा ।' [पाय + वणी- पाणी] ॰वाट-स्त्री. १ पाऊलवाट; पायरस्ता. 'तिकडे जय; तुज देतिल मेरूचे पायवाट आजि कडे ।' -मोभीष्म ११.४५. २ जमीनीवरचा, खुष्कीचा मार्ग; भूमिमार्ग. याच्या उलट जलमार्ग. 'समुद्रावरी सैन्य ये पायवाटें ।' -लोपमुद्रा वामन-नवनीत १०८. [पाय + वाट] ३ (गो.) पालखी देवालयांत शिरण्यापूर्वीं धोब्या- कडून घालण्यांत येणारा धुतलेला पायपोस. ॰वाट करणें-उत- रून, ओलांडून जाणें. 'पायवाट केले भवाब्धी ।' -दावि ३३०. 'भवसिंधु पायवाट कराल.' -नाना १३५. ॰शिरकाव-पु. १ प्रवेश मिळवणें. २ मिळालेला प्रवेश. [पाय + शिरकाव] ॰शूर-वि. चालण्याच्या, वाटेच्या कामीं अतिशय वाकबगार; निष्णात. 'कोळी लोक कंटक व पायशूर असल्यानें त्यांना जंगलांतील वाट ना वाट माहीत असते.' -गुजा ६०. ॰सगर-पु. (खा. व.) पायवाट; पाऊलवाट; पायरस्ता. [पाय + संगर = लहान वाट] ॰सर-पु. पायरी; पाय ठेवण्याची (जिना इ॰ची) जागा, फळी. [पाय + सर = फळी] ॰सूट-वि. चपळ; चलाख; भरभर चालणारा [पाय + सुटणें] ॰सोर-पु. (गो.) पायगुण. ॰स्वार-वि. (उप.) पायीं चालणारा; पादचारी; पाईक. [पाय + स्वारी] पायाखायला-वि. (कों.) (पायांखालील) सापांची भीति, उपद्रव असलेलें (अरण्य, रस्ता). पायाखायलें-न. १ (कों.) फुरसें; साप. २ सर्पदंश. पायाखालची वाट-स्त्री. नेहमीं ज्या वाटेनें जाणें येणें आहे अशी वाट; अंगवळणी पडलेली वाट. पायाचा-वि. पायदळ (शापाई). 'पायांचे भिडतां । तोडिति जानिवसे जे ।' -शिशु १०४५. पायाचाजड-वि. १ हळुहळु चालणारा; मंदगतीनें चालणारा. २ चांगलें चालतां न येणारा. पायाचा डोळा-पु. घोटा. पायाचा नक्की कस-पु. (मल्लविद्या) एक डाव. आपला पाय जोडीदाराच्या बगलेंतून जोडीदाराच्या मानेवर घालून मान फिरवून मानेवर घातलेल्या पायाच्या पंजानें मानेस दाब देऊन मारणें, किंवा चीत करणें. [पाय + कसणें] पायाचा नरम-वि. (बायकांप्रमाणें मऊ पाय असलेला) षंढ; नपुंसक. पायांचा पारवा-पु. (पारव्याप्रमाणें गति असलेला) जलद, भरभर किंवा पुष्कळ चालणारा मनुष्य पायाचा फटकळ-वि. लाथा मार- णारें, लाथाड (जनावर) पायाचा हुलकस-पु. (मल्लविद्या) जोडादारानें खालीं येऊन आपला एक पाय धरला असतां आपला दुसरा पाय जोडीदाराच्या बगलेंतून घालून आपल्या पायाच्या पंजानें त्याच्या कोपराजवळ तट देऊन आपला दुसरा हात त्याच्या बगलेंतून देऊन जोडीदाराचा हात आपल्या पायाच्याअटीनें धरून तो पाय लांब करून हातानें काढिलेला कस जास्त जोरानें मुरगळून चीत करणें. पायाची करंगळी-स्त्री. पायाच्या बोटां- पैकीं सर्वात लहान असलेले शेवटचें बोट. पायांची माणसें- नअव. पायदळ. 'पायाच्या माणसांची सलाबत फौजेवर.' -ख ३५९४. पायाची मोळी-स्त्री. (मल्लविद्या) एक डाव. (मागें पाय बांधून गड्यास मारणें याला मोळी म्हणतात). जोडीदाराचा एक पाय उचलून आपल्या माडीच्या लवणीत दाबून ठेवावा. दुसर्‍या हातानें जोडीदाराचा दुसरा पाय धरून जोडीदाराच्या दोन्ही पायांस तिढा घालून मुरगळून मारणें. पायांचे खुबे- पुअव. पाठीच्या कण्याच्या खालच्या बाजूकडील वेडावाकडा, बळकट आणि घट्ट असा हाडाचा सांगाडा. -मराठी ६ वें पुस्तक (१८७५) २५३. पायाचें भदें-न. अनवाणी चालून पायांस खडे वगैरे बोचून पाय खरखरीत होणें; पायाची खराबी; पाय खडबडीत होणें. 'चालतांना पायांचें भदें होऊं नये म्हणून पाव लांकरिता कातड्याचें वेष्टण तयार करण्याचें काम....' -उषा- ग्रंथमालिका (हा येथें कोण उभा). पायांच्या पोळ्या-स्त्रीअव. तापलेल्या जमीनीवरून चालल्यामुळें पोळलेले पाय; पायपोळ. (क्रि॰ होणें, करून घेणें). पायांतर-न. पायरी. [पाय + अंतर] पायापुरती वहाण कापणारा-वि. कंजुष; कृपण; कवडीचुंबक; अतिशय जपून खर्च करणारा. पायां पैस-स्त्री. पायापुरती मोकळी जागा. (अगदीं गर्दी, दाटी संबंधीं वापरतांना प्रयोग). [पाय + पैस (अघळपघळ, मोकळी)] पायींचा पारवा-पु. पायांचा पारवा पहा.

दाते शब्दकोश