मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

संबंधित शब्द

दारिद्र्य

दैन्य, हलाखी, भुकेकंगाल स्थिति, उलटी अंबारी हातांत, जवळ छदाम नाहीं, उद्यांची वानवा, कफल्लकपणा, अठराविश्वे दारिद्र्य, विपन्न दशा, हातांवर संसार, नेहमींची परवड, आर्थिक चणचण, खालावलेलें राहणीमान, दांतांवर मारायला पैसा नाहीं ! खिशांत कवडी नाहीं, दोन घास अन्न मिळण्याची भ्रांत, नाण्यांची टंचाई, अन्नाला महाग, पोटापुरतें मिळण्याची वानवा, हातीं नरोटी, उपाशी पोटाला गोळाभर अन्न मिळेना, विष खायला जवळ पैसा नाहीं, पोटाची खळगी कशी भरावी हा प्रश्न. कनवठीला पैसा नाहीं; रुपया कुठला ? हातांत जवळजवळ भिकेची झोळी आली, हाती नारळाची करवंटी आली, खर्च आणि मिळकत यांत मेळ घालणे जड जाऊं लागलें, चौपदरी हातीं घ्यावी कीं काय असा प्रसंग आला ! अब्रू उघडी पडली, दुसऱ्याच्या दारीं जाण्याची वेळ आली, अर्थिक समस्या भेडसावूं लागली, मासिक बजेट बसवितां बसवितां अंतर्बाह्य टेकीस आला, त्याच्या घरीं सुखाची हंडी कधीं चुलीवर चढली नाहीं, दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहण्याचा प्रसंग गुदरला, घसरती परिस्थिति, धड अब्रू झाकायला वस्त्रहि मिळत नाहीं वेळेवर. सारा जन्म पळीपंचपात्र बडविण्यांत गेला, दारिद्र्य पांचवीला पुजले, आर्थिक दुःस्थितींत खितपत पडला आहे, बापडा जन्मभर सरपटत चालला, हें त्यांनीं बापजन्मीं पाहिले नसेल, यांच्या उशाला धोंडा व भुकेला कोंडा; दुसरें काय ?

शब्दकौमुदी

अक्काबार्इ      

१. लक्ष्मीची वडील बहीण. २. दुष्ट, भांडकुदळ स्त्री. ३. (ल.) दारिद्र्य; दुर्दशा; दुर्बुद्धी. (वा.) अक्काबार्इ आठवणे – दुर्बुद्धी होणे; विपरीत बुद्धी होणे. अक्काबार्इचा पाया - दुर्दैवाची, वार्इट स्थिती येण्याची पूर्वचिन्हे. अक्काबार्इचा फेरा – भरभराटीचा, वेगवान काळ जाऊन दारिद्र्य येणे; दुर्दशा; दैन्य. अक्काबार्इची दया – (ल.) दारिद्र्य; दुरवस्था. अक्काबार्इचे पोर – दुर्बुद्धी; दुर्दैव : ‘हे अक्काबार्इचे पोर (१९०१ चे शेतकी बिल) सर्व इलाखा भिकारी करील.’ – लोटिकेले. २·२·२६७. अक्काबार्इचे बाळ – (ल.) कमनशिबी माणूस; दुर्दैवी व्यक्ती. अक्रबपेनी      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

भीक

स्त्री. १ भिक्षा; दानधर्म. २ अभाव; कमताई; उणीव; वैगुण्य. 'सर्व गोष्टीची भीक आहे.' [सं. भिक्षा; प्रा. भिक्खा] म्ह॰ १ भिकेची हंडी शिंक्यास चढत नाहीं. २ भीक नको पण कुत्रा आवर. (वाप्र.) भीक असून द(दा)रिद्र(द्र्य)कां- भिक्षेकर्‍याचा धंदा पतकरल्यावर मग अडचण कां सोसावी? ॰काढणें-क्रि. अडचण सोसणें; दारिद्र्य अनुभविणें. ॰घालणें- क्रि. १ (ल.) वचकून असणें. 'तो माझ्यावर आपला अंमल चालवूं पाहतो, पण मी कोठें त्याला भीक घालायाला बसलों आहें !' ३ मोजणें; मानणें; जुमानणें. 'बायकांच्या धमका- वणीला कां तुम्ही भीक घालणार?' २ मागितलेली वस्तु देणें; एखाद्याची विनंती मान्य करणें (हा प्रयोग नेहमीं नकारार्थीं असतो). 'मीं त्याला परोपरीनें विनविलें, पण त्यानें माझ्या शब्दाला भीक घातली नाहीं.' ॰न घालणेंक्रि. अतिशय तुच्छ लेखणें. ॰लागणें-क्रि. १ फार मागणी असणें; अतिशय चणचणीचा असणें. २ भिकेस मिळणें; कमताई असणें. भिकेचा डोहळा- पु. दारिद्र्य आणणारी हलकट, नीच, भिकार खोड, कृत्य, इच्छा. (क्रि॰ लागणें, आठवणें, होणें) भिकेचे डोहाळे होणें-क्रि. दारिद्र्यादि दुर्दशा येण्यापूर्वीं तदनुरूप पूर्वींच्या संपन्न स्थितीत विरुद्ध अशा वासना होणें (ज्या प्रकारची संतति व्हावयाची असते त्या प्रकारचे डोहाळे-वासना गर्भारपणीं बायकांना होतात यावरून). भिकेवर लक्ष्य ठेवेणें-भीक मागण्याचा प्रसंग येईल अशा रीतीनें वर्तन करणें. आळशी, उधळा इ॰ बनणें. भिकेवर श्राद्धन. १ भिक्षेवर केलेलें श्राद्ध; भिकार, चुटपुटीत श्राद्ध. २ (ल) दिलेल्या, उसन्या घेतलेल्या, तुटपुंज्या सामग्रीवर भिकार- पणानें चालविलेला धंदा, काम. (क्रि॰ करणें, होणें). सामाशब्द- ॰दुःख-न. भीक मागण्याची दुःखकारक स्थिति. ॰पायली- स्त्री. गांवकर्‍यांकडून महारास दिलें जाणारें धान्य. ॰बरी-स्त्री. भिक्षा; धर्म. (क्रि॰ मागणें). [भीक द्वि.] भी(भि)क बाळी- स्त्री. पुरुषांचा उजव्या कानांत घालावयाचा मोत्याचा दागिना. पुर्वी ही भिक्षा मागून मिळविलेल्या सोन्याची अथवा त्या पैशांचें सोनें घेऊन त्याची करीत. ॰मागता-माग्या-वि. भिक्षा मागणारा; भिकारी. म्ह॰ भीक मागत्या दहा घरें. भिकणें-न. १ भिक्षा मागून मिळालेली एखादी वस्तु; भिक्षा. (क्रि॰ मागणें). २ जोशी, भक्त, उपाध्याय इ॰ कांस दिलेलें बक्षीस, इनाम. ३ धर्मादाय. ४ धर्मादाय म्हणून सरकाराकडून घेण्यांत येणारा कर. ५ बलुतेंअलुतें; बलुतेदार इ॰ स धान्य देणें. ६ जकातीच्या उत्पन्नांतील पतकीस दिलेला हक्क. ७ भिकारीपणा; दारिद्र्य. (क्रि॰ लागणें).

दाते शब्दकोश

अक्काबाई

स्त्री. लक्ष्मीची वडील बहीण; (ल.) दारिद्र्य; दुर्दशा; दुर्दैव; दुर्बुद्धि; दुष्ट, भांडकुदळ स्त्री. 'अक्काबाई दोहीं दारीं फुगडया घालिती.' [का. अक्का]. ॰चा पाया-दुर्दैवाचीं पूर्व चिन्हें. ॰चें पोर-दुर्दैव. 'हें अक्काबाईचें पोर (१९०१ चें शेतकी बिल) सर्व इलाखा भिकारी करील'.- टि २.२.२६७. ॰चा फेरा-वाईट दशा; दारिद्र्य; दुर्दैंवाचें आगमन. ॰ची दया-दारिद्र्य. ॰चें बाळ- दुर्दैवी मूल. []

दाते शब्दकोश

फकिरी

स्त्री. १ फकीराची वृत्ति, व्यवसाय. २ मोहरम- मध्यें फकीरांना द्यावयाची भिक्षा. 'गारपीरचे लष्करांतील शिपाई व गंगाधरशास्त्री यांजकडील माणसें मोहरमची फकिरी मागावयास आले; सबब मशार्निल्हेनीं लष्करवाले यांस रुपये दहा व शास्त्री यांजकडील माणसास पांच एकून पंधरा रुपये दिल्हे. -पया १२६. ३ मोहरममध्यें फकिराची दीक्षा घेतात ती; -गळ्यांत नाडा बांधणें इ॰ ४ दारिद्र्य; भिक्षावृत्ति; भीक. -वि. फकीरासंबंधीं; फकीरविषयक. [अर. फकीर्] ॰दौलत-संपत्ति-स्त्री. (भिक्षे- कर्‍याची संपत्ति); चंचल, अस्थिर संपत्ति; एके जागीं फार वेळ न राहणारी लक्ष्मी. ॰बाणा-पु. भिक्षेकर्‍याचा धंदा, वृत्ति, भिक्षा देही; दारिद्र्य. (क्रि॰ धरणें; घेणें; बाळगणें).

दाते शब्दकोश

विश्वा-स्वा

पु. विसावा अंश निश्चित प्रमाणाचा विसावा भाग; रुका किंवा रति यांचा विसावा भाग. [सं. विंशति] आठराविश्वे दारिद्र्य-पूर्ण दारिद्र्य म्हणजे वीस विश्वे पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. ॰घाट-पु. घाटां- तील विश्वा नाण्यांतील जकात. बाजारावरील कर.

दाते शब्दकोश

गरीब

वि. १ दरिद्री; बंगाल; द्रव्यहीन. २ शांत; निरुप- द्रवी; सात्त्विक; थंडा. ३ दीन; लाचार. [अर. घरीब्] म्ह॰ (व. गरीब की जोरू सबकी भाबी = गरीबाला सर्व जण त्रास देतात; गरीबाचा काळ. ॰गाय-वि. अगदीं निरुपद्रवी; दीन; लाचार (मनुष्य). ॰गुरीब गुरबा-वि. गोरगरीब; गरीब लोक (समुच्चयार्थी). 'गरीब गुरबांचीं घरें बहुतेक वाहून गेलीं.' -रा ७.७०. 'धर्म करणें तो गरीबगुरिबास करावा.' [अर. घरीब + घुरबा (अव.)] ॰नवाज, परवर-वि. दीनदयाळ; अनाथनाथ; गरीबांचा पालनकर्ता. 'गरिबानवाज माधवजीची दुरुनि द्वारावती देखियली ।' -अमृत ३०. धनी, मोठे लोक, यांना अर्जदारांकडून ही पदवी लावण्यात येई. [फा. घरीब् + नवाझ्, घरीब् + पर्वर्] ॰सार-वि. लाचार; कंगाल; बापुडा. गरिबाई- स्त्री. १ गरीबी; कंगाली; लाचारी; पराधीनता; दैन्य. २ शांत- पणा; सात्त्विकपणा; थंडार्ड (स्वभावाची) [फा. घरीबी] -बांचा काळ (आणि मोठ्यांचा-तिपाळ)-वि. दुबळ्या लोकांना त्रास देणारा व श्रीमंताच्या लाथा खाणारा. गरिबी-स्त्री. १ दारिद्र्य. २ सात्त्विकवृत्ति; नम्रता; शांत स्वभाव; गरीबपणा. [फा. घरीबी] -बी हरिपी-स्त्री. १ दारिद्र्य व श्रीमंती. २ नीचता मोठेपणा.

दाते शब्दकोश

कपाल, कपाळ      

न.       १. डोक्याची कवटी; डोक्याचे हाड; करटी. २. मडक्याचा अर्धा भाग; खापर; खापराचा तुकडा; श्रौतकर्मात पुरोडाश भाजण्यासाठीचे वापरायचे खापराचे तुकडे. हे ८, ११, १२, १३ असून त्यांचा एक गट असतो. ३. भिवया आणि डोक्याचे केस यामधील भाग; ललाट; भाल. ४. नशीब; प्रारब्ध; ब्रह्मलिखित (ब्रह्मदेव मनुष्याच्या कपाळावर त्याचे भविष्य लिहून ठेवतो या समजुतीवरून) : ‘कीं एकदांचि फुटले त्वत्पतिपंचककपाळ पापाने ।’ - मोसभा ६·४. ५. (कपाल) चपटे, पातळ हाड; खांद्याचा किंवा मांडीचा फरा. ६. भिक्षापात्र : ‘कपाळ झोळी एका स्मशानींचा वास । एक जगन्निवास विश्वंभर ।’ - तुगा २०५०. ७. (भू.) कोणत्याही याम्योत्तर वृत्ताच्या पूर्वेकडील किंवा पश्चिमेकडील अर्धे गोलार्ध. [सं.] (वा.) कपाल आपटून घेणे, कपाळ आपटून घेणे − दुःखाने, रागाने डोके आपटणे स्वतःला अपाय करून घेणे कपाल उगवणे, कपाळ उगवणे − भाग्योदय होणे, कपाल उठणे, कपाळ चढणे − डोके दुखणे; त्रास, कटकट होणे; पीडा होणे : ‘उगा करिती कोल्हाळ । माझें उठते कपाळ ।’ - रामदास. कपाल उणे असणे, कपाळ उणे असणे − दुर्दैवी, कमनशिबी असणे. कपाल काढणे, कपाळ काढणे − वैभवाला चढणे; नशीब काढणे. कपाल खुलणे, कपाळ खुलणे − दैव उदयाला येणे. [हिं.] कपाल जाणे, कपाळ जाणे − दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडणे; भाग्य नाहीसे होणे. कपाल टेकणे, कपाळ टेकणे − एखाद्यावर भरवसा ठेवून, अवलंबून असणे. कपाल ठरणे, कपाळ ठरणे − नशिबात लिहिल्यासारखी एखादी गोष्ट घडून येणे; दैवात असणे : ‘पुढें मागें... याही गोष्टीत सुधारकांचा वरचष्मा होऊन या हताश, विचारशून्य, मत्सरी ... लोकांस ... मूळूमुळू रडत बसावे लागेल हें याचे कपाळ ठरलेलेंच.’ −आगर. कपाल धुऊन घेणे, कपाळ धुऊन घेणे − एखाद्याचे भाग्य हिरावून घेणे; नशिबात असेल ते घेणे. कपाल पाहणे, कपाळ पाहणे, कपाल वाचणे, कपाळ वाचणे − नशिबी काय आहे ते पाहणे; नशीब पाहणे. कपाल निवडणे, कपाळ निवडणे − दैवात असेल ते उभे राहणे : ‘परंतु त्याचे कपाल काय निवडेल ते न कले.’ - पेद ३४·४. कपाल पिटणे, कपाळ पिटणे − दुःखातिशयामुळे डोके जमिनीवर आपटणे : ‘एक अवनीं कपाळ आपटिती ।’ - हरि १८·९६. कपाळपिटी करणे − व्यर्थ बडबड करणे कपाल फुटणे, कपाळ फुटणे − १. दुर्दैव ओढवणे; दैव प्रतिकूल होणे; सर्वस्वाचा नाश होणे; आपत्ती कोसळणे. २. वैधव्य येणे : ‘मी गरीब कितीही असलें । जरि कपाळ माझें फुटलें ।’ − (राजहंस) गोविंदाग्रज. कपाल फोडणे, कपाळ फोडणे − फार शोक, दुःख करणे : ‘कुंतल तोंडी, कपाळ फोडी, करी थोर आकांत ।’ − विक ५३. कपाल बडविणे, कपाळ बडविणे − दुःखातिशयामुळे किंवा क्रोधाच्या आवेगाने कपाळ पिटणे; कपाळावर हाताने मारून घेणे : ‘कळतां वृत्त क्रोधें घे बहु बडवूनि तो कपाळाला ।’ - मोवन ४·८३. कपाल मोक्ष करणे, कपाळ मोक्ष करणे − १. एखाद्याचा सर्वस्वी नाश करणे. २. खूप झोडपणे; ठार मारणे. पहा : कपाळमोक्ष. कपाळाची रेघ उमटणे, रेषा उपटणे, रेषा उघडणे − आकस्मिक रीतीने सुदैव प्राप्त होणे; एकदम मोठेपणा, श्रीमंती मिळणे. कपाळाचे कातडे नेणे − विपत्तीत लोटणे; भाग्यहीन करणे; नुकसान करणे. कपाळात तिडीक उठणे − १. डोके दुखणे. २ (ल.) त्रासणे; अतिशय चीड येणे; रागावणे : ‘आडमुठ्यांच्या घराचे नाव काढले कीं यशवंतरावाच्या कपाळास तिडीख उठे.’ - यशवंतराव खरे. कपाळातले तीन फातर − दुर्दैवाचे फेरे (ढोमले, थोड्यारेथोड्यारे म्हणून एक प्रकारची मासळी आहे. तिच्या डोक्यात तीन पांढरे दगड असतात यावरून) (गो.). कपाळाला अपकीर्ती येणे, कपाळाला अपयश येणे, कपाळाला दारिद्र्य येणे, कपाळाला आपत्ती येणे − अपमान, गरिबी, दुर्लौकिक इत्यादी प्राप्त होणे; नाव बद्दू होणे. कपाळाला आठ्या घालणे, कपाळाला आठ्या चढणे, कपाळाला आठ्या पडणे - त्रासणे; अति त्रास होणे; नापसंती दाखविणे; मनाविरुद्ध गोष्ट घडणे (त्रास झाला असताना कपाळाला आठ्या पडतात त्यावरून) : ‘उलट कपाळाला आठ्या घालून म्हटलें - तुला काय त्याची चौकशी?’ − उषःकाल. कपाळाला किंवा कपाळावर केस उगवणे - अशक्य गोष्ट घडणे (पुढे घडेल असे वाटणाऱ्या एखाद्या गोष्टीशी असंभाव्यता दर्शविताना हा प्रयोग योजतात. तळ हाताला केस येणे याप्रमाणे). कपाळाला येणे, कपाळी येणे − नशिबी येणे : ‘जरि आलें पतन या कपाळाला ।’ − मोआदि १०·८२. कपाळाला लावणे - कुंकू लावणे. कपाळावर, कपाळाला कपाळा किंवा कपाळी हात मारणे, लावणे − १. नशिबाला दोष देणे. २. आश्चर्य, दुःख, काळजी प्रदर्शित करणे : ‘अशींच तुम्ही दोघंही सदोदित कपाळाला हात लावून रडत बसत असतां.’ − हामुबा ८२. कपाळाशी कपाळ घासणे − १. आपल्याला लाभ होईल या आशेने एखाद्या भाग्यवानाशी सहवास करणे; संगतीत राहणे; लगट करणे. २. कच्छपी लागणे; मागे मागे असणे; गुलाम वृत्तीने अनुकरण करणे. कपाळास काठी घेणे, कपाळास काठी टेकणे − वैतागणे : ‘.... आम्ही कपाळास काठी घेऊन वरघाटें आलों.’ - ब्रच २६४; ‘कपाळास काठी टेकून वैतागोन ज्यात होतों.’ - ब्रच ३३५. कपाळी डाग लागणे − बेअब्रू होणे; फजिती होणे; कलंक लागणे. कपाळी काठी घेऊन जाणे − निघून जाणे; चालते होणे; काळे करणे. कपाळी भद्रा असणे − नेहमी दुर्दैवी असणे; प्रतिकूल ग्रह असल्यामुळे दारिद्र्य येणे. कपाळी लिहिलेले असणे − नशिबी असणे; प्राक्तनात असणे; योग येणे : ‘माझ्या कपाळीं आपली सेवा एवढीच लिहिली होती.’ - एक १२२.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अलक्ष्मी      

स्त्री.       दुर्दैव; दुर्भाग्य; दारिद्र्य; विपत्ती; अवलक्ष्मी; अक्काबाई; गैरव्यवहाराने आलेला पैसा. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अलक्ष्मी

स्त्री. दुर्दैव; दुर्भाग्य; दारिद्र्य; विपत्ति; अवलक्ष्मी; अक्काबाई. लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोन बहिणी असून त्या समु- द्रांतून निघाल्या अशी सार्वत्रिक समजूत आहे. पहिलीनें विष्णूशीं लग्न लाविलें व दुसरी नवरा पहात दारोदार भटकते. ज्येष्ठा व कनिष्ठा पहा. [सं.]

दाते शब्दकोश

अन्नान्नगत दशा, अन्नान्नगती दशा,      

स्त्री.       अन्न! अन्न! करीत दारोदार भटकत फिरण्याची अवस्था; अत्यंत विपन्नावस्था; कंगालपणा; घोर दारिद्र्य. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अन्नान्नगत-ति, अन्नान्नदशा

स्त्री. अन्न! अन्न! करीत दारोदार भटकत फिरण्याची अवस्था; अत्यंत विपन्नावस्था; कंगाल- पणा; घोर दारिद्र्य. [सं. अन्न + अन्न + गति.]

दाते शब्दकोश

अनुपपत्ति, अनुपपत्ती      

स्त्री.       १. निर्वाहाच्या साधनांचा अभाव; दारिद्र्य. २. काथ्याकूट; काही निष्पन्न न होणे. ३. अप्रगती; अयोग्यता : ‘अंगाचिया अनुपपत्ति । आटलिया उपपत्ति ।’ – अमृ ५·५५. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अनुपत, अनुपद, अनुपत्ति, अनुपत्ती      

स्त्री.       १. उत्पन्न नसणे; निर्वाहाच्या साधनाचा अभाव : ‘आपदा अनुपत्ती कदान्न । या नांव आदिभूतिक ।’ – दास २·७·८१. २. विपत्ती; दारिद्रय; कंगालपणा; ओढ; आपत्काल : ‘ब्राम्हणासि हिंसाकर्म । तो जाण पां परम अधर्म । लागल्या अनुपत्ती दुर्गम । तैं क्षात्रधर्म करावा ॥’ – एभा १७·४५५.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अपादणें

अक्रि. (कु.) कंटाळणें; त्रासणें; जीवित नकोसें होणें (दुखणें, दारिद्रय वगैरेमुळें). [सं.आपदा]

दाते शब्दकोश

आपदा

(सं) स्त्री०आपत्ति, गरीबी, दारिद्र्य.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

अपरिग्रह

पु. १ परिवारशून्य. २ उपाधिराहित्य. उपाधि जवळ न बाळगणें; कोणत्याहि वस्तूचा स्वीकार न करणें. 'साधूची अपरिग्रहता ।परीग्रहो नातळे चित्त।' -एभा ११.९०१. ३ असं- चय; दारिद्र्य; निर्धनता; अकिंचनत्व. [सं.]

दाते शब्दकोश

अपरिग्रह      

पु.       १. असंग्रह; असंचय. २. परिवारशून्यत्व. ३. उपाधिराहित्य; उपाधी जवळ न बाळगणे; कोणत्याही वस्तूचा स्वीकार न करणे : ‘साधूची अपरिग्रहता । परिग्रहो नातळे चित्ता ।’ –एभा ११·९०१ ४. दारिद्र्य; निर्धनता. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अष्टाक्षरी मंत्र      

पु.       १. आठ अक्षरे ज्यात आहेत असा मंत्र : ‘ॐ नमो नारायणाय.’ २. (ल.) ‘कसे करू काय करू’ हा आठ अक्षरांचा मंत्र; अतिशय दारिद्र्य, मोठे संकट किंवा अडचण प्राप्त झाली असता असे शब्द तोंडून निघतात. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अस्वास्थ्य

न. १ स्वास्थ्याचा अभाव; असमाधान; असं- तोष; असुख. २ शारीरिक व्याधि किंवा विकृति; प्रकृति बरी नसणें. ३निर्धनता; दारिद्रय. [सं.]

दाते शब्दकोश

अवदशा-सा

स्री. १ दुर्दैव; दुर्भाग्य; कमनशीब. 'आतु- डलों होतों मरणगांवीं । ते अवदसाचि अवधी । फेडिली आजी ।' -ज्ञा १६.३४. २ विपत्ति; विपन्नावस्था; दारिद्र्य; निष्कृष्ट स्थिति. 'श्रीमूर्ति देखौनि राउळिची । फिटली अवदशा डोळेआंची ।।' -ऋ ३६. 'तुज आली अवदशा यथार्थ ।।' ३ (ल.) कर्कशा; भांडकुदळ स्री; जगभांड (शिवी). 'तूं घराण्याचें वाटोळें करा- यला बसली आहेस. अवदसा नाहींतर !' अमात्यमाधव (न. चिं. केळकर). [सं.] ०आठवणें-वाईट, निष्कृष्ट स्थिति प्राप्त होईल असे भलतेसलते घातक विचार मनांत येणें; वाईट वर्तन करणें. 'अहह ! आठवली मजही अशी । अवदसा, वद साह्यकरी कशी ।।' -लक्ष्मण शास्री लेले. [सं.]

दाते शब्दकोश

आयुष्य      

न.       १. जीवितकाल; हयात; आयुर्दाय; जन्मल्यापासून मरेपर्यंतचा काल; स्थूल शरीरावयव (शरीर), इंद्रिये (ज्ञान ग्रहण करणे), सत्त्व (मन) व आत्मा इत्यादींच्या संयोगास आयुर्वेदाने दिलेली संज्ञा. २. वय; उमर. ३. वेळ; अवधी; फुरसत. [सं.] (वा.) आयुष्य मागणे – आयुष्य वाढविण्याबद्दल देवाजवळ प्रार्थना करणे; हित चिंतणे : ‘आयुष्य मागेन तुझ्या राज्याला ।’ − ऐपो ३२. आयुष्याचा उन्हाळा होणे – १. आयुष्यात कोणताही ओलावा न राहणे. २. माया, प्रेम, पैसा, प्रतिष्ठा या सर्वांचा नाश होणे : ‘दारिद्र्य, धिक्कार व सामाजिक बहिष्कार यांच्या योगानें त्यांच्या आयुष्याचा उन्हाळा झाला होता.’ − विचार १०४. आयुष्याची दोरी तुटणे – आयुष्य संपणे, मरणे; मृत्यू होणे. आयुष्याची दोरी बळकट असणे – गंभीर दुखण्यातून बचावणे. आयुष्याचे उणे करणे – आयुष्य फुकट दवडणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दिनवास      

पु. गरिबी; दारिद्र्य. (गो.) [सं.] दिनवृद्धी      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दिनवाशी

वि. (गो.) गरीब; दरिद्री. दिनवास-पु. (गो.) गरिबी; दारिद्र्य. [सं. दीन + वास]

दाते शब्दकोश

दिवाळे, दिवाळू      

न.       १. (जुन्या काळी दिवाळे काढावयाचे असताना ते काढणारा आपल्या दुकानाच्या उंबऱ्यात, दारात एक शेणाचा दिवा लावून ठेवीत असे त्यावरून) नादारी; भांगोरे; सावकारांना देण्यासाठी जवळ काही नसणे; देणेदार कफल्लक बनणे. (क्रि. निघणे, काढणे, वाजणे.). २. (ल.) कंगालपणा; काही नसणे; दारिद्र्य. ३. संपणे; (जिन्नस, खाद्यपदार्थ) सरणे; केलेले अन्न संपून यजमानाची होणारी फजिती. ४. निंदा; टवाळी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दिवाळें-ळूं

न. १ (जुन्याकाळीं दिवाळें काढावयाचें असतां, तें काढणारा आपल्या दुकानाच्या उंबर्‍यात-दरांत एक शेणाचा दिवा लावून ठेवीत असे त्यावरून) नादारी; भांगोरें; सावकारांना देण्यासाठीं जवळ कांहीं नसतें, देणेदार कफल्लक बनतो ती अवस्था. (क्रि॰ निघणें; वाजणें; काढणें). २ (ल.) कंगाल- पणा; कांहीं नसणें; दारिद्रय. ३ संपणे; सरणें (जिन्नस, खाद्यपदार्थ); केलेलें अन्न संपून यजमानाची जी फजीती होते ती. ४ (गो.) निंदा; टवाळी. (क्रि॰ मारप). [दिवाळी] ॰वाजणें-नादार बनणें; कर्जबाजारी होणें; नापत गजणें.

दाते शब्दकोश

डोहळा, डोहाळा, डोहला, डोहोला, डौला      

पु.       १. गर्भवती स्त्रीला एखादा पदार्थ खावासा वाटणे; तिला होणारी विशिष्ट इच्छा, मनोरथ, लालसा, लक्षणे. २. अयोग्य इच्छा; भलत्या गोष्टीवर वासना जाणे; छंद; हौस; शौक (क्रि. पुरणे, पुरविणे): ‘कैसे प्राप्तीचिये वेळे । निदैवा अंधळेपणाचे डोहळे ।’ –ज्ञा ६·७३. [सं. दोहद] (वा.) (भिकेचा) डोहळा आठविणे –ज्यामुळे दारिद्र्य येईल, भीक मागावी लागेल असे ढंग करणे; व्यसनात पैसा उधळणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दरिद्र

न. १ गरीबी; निष्कांचनता; कंगालपणा. २ अभाव; न्यूनता; वाण; कमतरता. (अन्न, वस्त्र इ॰ जरुरीच्या पदार्थांचा). -वि. गरीब; गरजू; कंगाल. 'आशा ज्यास दरिद्र तोचि समजे नैराश्य पैं बाणतां ।' (वामन स्पुटश्लोक ७४, नवनीत पृ. १४२. [सं.] ॰दशा-दारिद्रावस्था-स्त्री. गरीबीची, हलाखीची स्थिति. ॰दामोदर-पु.अत्यंत गरीब माणूस; ज्याच्या घरीं अठरा विश्वे दारिद्रय आहे असा मनुष्य; दारिद्रयांचा राजा. ॰नाम संवत्सरे-अत्यंत भिकारी अथवा त्याची स्थिति यांस लावा- वयाचा शब्द. दरिद्रित-वि. गरीबी; आलेला; दैन्यावस्था प्राप्त झालेला. दरिद्री-वि. गरीब; कंगाल; निष्कांचन. २ नीच; कद्रू; कंजूष; चिक्कू. ३ (ल.) अपुरा; न्यून; सडसडीत; रोडका; भिकारी इ॰. ॰नारायण-पु.दरिद्र्यांचा कनवाळू; (ल.) महात्मा गांधी. ॰दरिद्री हाड-न. गरीब हाड; गरीब आईबाप किंवा कुळ यांत जन्मलेला माणूस; हलक्या पैदाशीचें गुरूं.

दाते शब्दकोश

दरिद्रदामोदर      

पु.       अत्यंत गरीब माणूस; ज्याच्या घरी अठरा विश्वे दारिद्र्य आहे असा मनुष्य; दरिद्र्यांचा राजा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दुबळवाडा, दुबळवाडी      

पु. स्त्री.       दैन्य; दारिद्र्य; लाचारपणा; दुबळेपणा; अगतिकता : ‘तेथ भेदाचिया दुबळवाडी । नेणिजे तो ।’ – ज्ञा ७·१७९.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दुबळवाडा-डी

पुस्त्री. दैन्य; दारिद्र्य; लाचारपणा; दुबळे पणा; अगतिकत्व. (क्रि॰ एखाद्यावर पडणें; एखाद्याची होणें). 'तयातें साम्याचिये वाढी । ऐक्याची सांदे कुळवाडी । तेथ भेदा- चिया दुबळवाडी । नेणिजे तो ।' -ज्ञा ७.१७९. [दुबळा]

दाते शब्दकोश

धातुस्पर्श      

पु.       सोने, रुपे इ. धातूंचा स्पर्श. (अकरणरूपी प्रयोग केल्यास) (ल.) अठराविश्वे दारिद्र्य; दागदागिने मुळीच नसणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ढे(ढें)कूण

पु. १ दंशक जातींतील एक स्वेदज कीटक. याला लहानशी सोंड असून ती तो माणसाच्या अंगांत खुपसून रक्त शोषण करितो; खटमल; मत्कुण. २ (तिरस्कारार्थीं) घाण्या, कुचका, पादरा, माणूस. [देप्रा. ढेकुण] ॰म्ह ढेकणास ढेकूण काय खातो = (हिंस्त्र पशू एके ठिकाणीं शांततेनें राहूं शकतात). वाईट वाईटाला कांहीं करीत नाहीं. ॰पिसा-स्त्री. अव. (ल.) पूर्ण दारिद्र्य, दैना. [ढेंकूण + पिसवा]

दाते शब्दकोश

ढेकूणपिसा      

पु.       पूर्ण दारिद्र्य; दैना.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गजांत लक्ष्मी      

१.       दाराशी हत्ती झुलण्याइतकी म्हणजे हत्ती पोसण्याइतकी श्रीमंती, अतोनात श्रीमंती, वैभव. २. (विनोदाने) अतिशय दारिद्रय; धोतर विकत घेण्यासाठी पैसे नसल्याने गजा (पंचा) विकत घेण्याची पाळी येणे. ३. (विनोदाने) अंगावरील गजकर्ण, नायटे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गल्हाटणे      

अक्रि.       १. रोग वगैरेंनी अशक्त होणे; गळाठणे. २. सावकारीत तोटा आल्याने दारिद्रय येणे. पहा : गलवटणे, गळहाटणे

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गल्हाटणें

१ रोग वगैरेनीं अशक्त होणें. २ सावसावका- रींत तोटा, बूड आल्यानें दारिद्र्य येणें. गलफटणें, गळहाटणें पहा.

दाते शब्दकोश

ग्रहपीडा, ग्रहबाधा      

स्त्री.       १. प्रतिकूल ग्रह किंवा ग्रहयोग यापासून उत्पन्न होणारे दुःख, दारिद्र्य आजारीपण इ. २. भूतपिशाचबाधा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गरिबी      

स्त्री.       १. दारिद्रय; पैशाची कमतरता २. रंकपण; नादारी. ३. (ल.) सात्त्विक वृत्ती; नम्रता; शांत स्वभाव; गरीबपणा. [फा.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गरिबीहरिपी      

स्त्री.       १. दारिद्रय व श्रीमंती. २. नीचता व मोठेपणा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गतक

न. १ मिष; ढोंग; बहाणा; सोंग (दारिद्र्य, वेड दुखापत, वेदना यांचें); किंचित असतां फार करण (क्रि॰ घेणें. करण). २ गद्यपद्ययाचा छोटासा व रसभरित चुटका; मजेदार विनोदी कवन (भाट, बंदीजन, भिक्षेकरी यांनीं गाइलेल); न्यायप्रचुर वचन अथवा म्हण ३ (कों.) मनोरंजक, हास्यकारक गोष्ट 'त्यानें एक गतक घातलें तर सर्वांच्या हसतांना मुरकुंड्या पाडील.' ४ लांबचक भाकडकथा; कंटाळवाणी गोष्ट. (क्रि॰ लावणें; लागणें) 'त्याला कोठें जातोस इतके पुसतांच त्यानें दोन घटका मजपाशीं गतक लाविलें.' ५ दुसर्‍यानें घाबरें व्हावें किंवा चमत्कार वाटून हंसें यावें असें भाषण किंवा भाषणाची नक्कल. 'तुझे बोलण्यावर मला एकग गतक सुचलें, काय तर, आकाशाची कुर्‍हाड कोल्ह्याच्या डोक्यावर.'

दाते शब्दकोश

गतक      

न.       मिष; ढोंग; बहाणा; सोंग (दारिद्र्य, वेड, दुखापत, वेदना यांचे), किंचित असता फार करणे. (क्रि. घेणे, करणे.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

हिंकृण्वती

स्त्री. दुर्भिक्ष; दारिद्र्य. 'त्यांच्या कपाळीं आपली हंकृण्वती.' -खेड्यांतील स्वभावचित्रें ९८. [हिंकृण्वती या वैदिक मंत्रावरून अडाणीपणें बनविलेला चुकीचा अर्थ]

दाते शब्दकोश

हल(ल्ल)क, हलाक-ख

वि. १ निःशक्त झालेला; दम- लेला; क्षीण (दुखणें, श्रम इ॰ नें). दोनतीन चपेट होऊन बहुत हलाक जहालों आहों.' -चित्रगुप्त ७९. २ गरजू; निष्कां- चन; दरिद्री. [अर. हलाक्] हलाकी-खी-स्त्री. १ थकवा; शोण; अशक्तपणा; क्लाति. 'आपलें राज्य नवें त्याहीमध्यें दोनतीत चपेटे होऊन हलाखी झाली आहे.' -सभासद ४७. २ कंगालपणा; अत्यंत दारिद्र्य; दुर्दशा. 'हलाखीची स्थिति' असा रूढ प्रयोग. 'लश्करांत दाणाचारा मिळेना तेव्हां हलाकींत आले.' -मराचिथोशा ५८. [अर. हलाकी]

दाते शब्दकोश

हलाखी, हलाकी

(स्त्री.) थकवा; पडती; दारिद्र्य; दुर्दशा. “आपलें राज्य नवें; त्याहीमध्यें दोन तीन चपेटे होऊन हलाखी झाली आहे” (सभासद ४७). “लश्करांत दाणा-चारा मिळेना तेव्हां हलाकीत आले” (मराचिथोरा ५८).

फारसी-मराठी शब्दकोश

हरिद्र

न. (दादर) दारिद्र्य. [सं. हृ-हर]

दाते शब्दकोश

जेर      

वि.       १. कमी योग्यतेचा; अशक्त; लेचापेचा. २. हतवीर्य; दमलेला; भागलेला; थकलेला. ३. त्रस्त, हैराण (दारिद्र्य, आजार इत्यादींनी). (क्रि. होणे, आणणे.) [फा.] (वा.) जेर करणे - कोंडी करणे; बेजार, त्रस्त करणे, चोहो बाजूंनी जखडणे : ‘चारी बाजूंनी जेर केलंय त्याला.’ - श्रीयो १·५३. जेरीस आणणे - सततचा त्रास देऊन हतबल करणे. जेरीस येणे - मेटाकुटीला येणे; हैराण होणे : ‘दोन्ही ठिकाणी पटवर्धन जेरीस आले होते.’ - ओंकार १३६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जेर

वि. १ कमी प्रकारचा, योग्यतेचा; अशक्त; लेचापेचा. २ हतवीर्य; दमलेला; भागलेला; थकलेला; त्रस्त; हैराण (आजार, दारिद्र्य इ॰ नीं) (क्रि ॰ होणें, आणणें). 'पडश्यानें त्याला भारी जेर केलें.' ३ चीत; पराभूत; निर्बल. 'त्याशत्रूखालीं तो जेर आहे.' ४ हस्तगत. 'तें स्थळ जेर करावें.' -सभासद ५६. [फा. झेर्] जेरकडी- स्त्री. लगामाची कडी. ॰जप्त-वि. हस्तगत; स्वाधीन. 'पाण्यांत गड बसविले म्हणजे दर्या जेर्जप्त आहे.' -चित्रगुप्त ८७. ॰जबर- जबरी-वि. १ डाव्या अंगाचा जबर व उजव्या अंगाचा जेर अशा संकेतानें खेळण्याचा गंजिफांचा एक खेळ. २ दुर्बळ, सबळ 'त्यास कळों न देतां बिघाड करावा; मग जेर-जबर कोण किती तें पहावें' -गोखंचिशाब ८०. ॰जबरी-स्त्री. (चुकीनें) जोर- जबरी; जुलूम. ॰दस्त वि. १ जेर अर्थ १ पहा; दीन; गरजु; २ कमजोर; दुर्बल. 'तिकडून इराणचें शाहानें जेरदस्त केलें.' -इमं २६० याच्या उलट जबरदस्त. ३ जेरजबर-री पहा. ४ काबीज; जेरजप्त. 'ममताई देशपांडीण इणें तमाम प्रगणा जेरदस्त केला.' -भजनीभारूड, अर्जदास्त. पृ. ७. [फा.] ॰दस्ती-स्त्री. १ विपन्नावस्था; दुर्बलता. २ गांजिफांचे खेळांतील एक संज्ञा. [फा.] ॰बार-वि. त्रस्त; हैराण. 'तेथें जाऊन व्यर्थ जेरबार व्हावें, वरकड अर्थ नाहीं.' -दिमरा १.२८७. [फा. झेर्बार]

दाते शब्दकोश

झोपडपट्टी      

स्त्री.       नागरी सुखसुविधांचा अभाव असलेली, अतिगर्दी, दाटीवाटी असलेली गलिच्छ वस्ती; आरोग्यविघातक अस्वच्छ वस्त्या, दारिद्र्य आणि सामाजिक बेशिस्त यांनी युक्त असलेला बकाली नागरी किंवा उपनागरी भाग.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कनांदणे      

अक्रि.       व्याकूळ होणे; हाल होणे; मट्ट्यास येणे; पेचात सापडणे (दारिद्र्य, देणे वगैरेमुळे). (राजा.) [सं. कु + नंद]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कनांदणें

अक्रि. (राजा.) व्याकूळ होणें; हाल होणें; मट्यास येणें; पेंचांत सांपडणें (दारिद्र्य, देणें वगैरेमुळें). [सं. कु + नंद्; म. नांदणें]

दाते शब्दकोश

कंगाली

स्त्री. १ कंगालपणा; दारिद्र्य; दुर्भिक्ष; हीनता. २ गरिबि; द्रव्यहीनता. कंगाल पहा.

दाते शब्दकोश

कंगाली स्त्री.      

१. कंगालपणा; दारिद्र्य; दुर्भिक्ष; हीनता. २. गरिबी. कंगी      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कोंग

वि. १ ढोंग; सोंग (दारिद्र्य, दुःख, वेड इत्यादींचें). (क्रि॰ घेणें; करणें; लावणें). 'जो न्यायासनावर चढला कीं दुष्यंत राजाप्रमाणें त्या गांवचाच नाहीं असें बळानें कोंग मात्र करतो ...' -नि ६२५. [का.]

दाते शब्दकोश

कोंग, कोंध      

न.       १. ढोंग; सोंग (दारिद्र्य, दुःख, वेड इ. चे). (क्रि. घेणे, करणे, लावणे.) : ‘जो न्यायासनावर चढला कीं दुष्यंत राजाप्रमाणें त्या गांवचाच नाहीं असें बळानें कोंग मात्र करतो...’ - निमा ६२५. [क.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

क्रांतणे      

उक्रि.       १. पादाक्रांत करणे; चालून जाणे; आक्रमणे (देश, रस्ता इ.) २. व्याकूळ होणे (भूक, दुःख, श्रम, झोप, कर्ज, दारिद्र्य यांमुळे).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

क्रांतणें

उक्रि. १ पादाक्रांत करणें; चालून जाणें; आक्रमणें (देश. रस्ता). २ व्याकुळ होणें (भूक, तहान, दुःख, श्रम, झोप, कर्ज, दारिद्र्य यांमुळें).

दाते शब्दकोश

कर्वादणे      

अक्रि.       १. चरफडणे (रागाने). २. गांजले जाणे (कर्ज, भूक, दारिद्र्य इ. नी).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कर्वादणें

अक्रि. १चरफडणें (रागानें). २ गांजले जाणें (कर्ज; भूक, दारिद्र्य इ. नें). ३ छळणें; शापणें.

दाते शब्दकोश

कुशल

वि. १ सुखरूप; खुशाल; कल्याणकारक (रोग, दारिद्र्य वगैरे विरहित). २ बुद्धीवान; चतुर; पटु; वाकबगार. [सं. कुश = दर्भ + ला = कापणें; सं. कुश् = प्रकाशणें] ॰पट्टी-स्त्री. राजपुत्राच्या जन्मासारख्या प्रसंगी पाटील वगैरे गांवकामगारांवर जी पट्टी बसविण्यांत येते ती. [कुशल + पट्टी = कर] ॰प्रश्न-पु. वंदन; अभिवादन; दोघे ओळखीचे भेटले असतां; कसें काय? अशा अर्थानें प्रश्न विचारावयाचे वेळीं उपयोग. [सं.]. ॰बुद्धि- वि. कुशल अर्थ २ पहा. ॰क्षेम-पु. आरोग्य व सौख्य; खुशाली व सुख; आयुरारोग्य. [सं.] -लार्थ-पु. क्षेमसमाचार. हा शव्द फक्त पत्रांत येतो जसें- 'स्वकीय कुशलर्थ लिहून पाठवावा.' [कुशल + अर्थ = हकिगत]

दाते शब्दकोश

कुशल, कुशलक्षेम      

वि.       सुखरूप; खुशाल; कल्याणकारक (रोग, दारिद्र्य वगैरे विरहित). [सं. कुश् = प्रकाशणे] २. बुद्धिवान; चतुर; पटू; वाकबगार. [सं. कुशू = प्रकाशणे]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खडकपात्र

न. मुलाम्याची बांगडी. खड्गपात्र पहा. 'घरांत दारिद्र्य अठरा विश्वे हें तर बाहेर उघडेंच दिसतें. हातांत खडकपात्रें, कानांत ताडपत्रें. ।' -श्री भिल्लीणनाटक. इतर अर्थां- साठीं खड्गपात्र पहा.

दाते शब्दकोश

नादार

वि. १ देणें, कर्ज देण्यास नालायक ठरलेला (इसम). दिवाळखोर. (इं.) इन्साल्व्हंट. २ ज्याची वार्षिक मिळकत शंभर रुपये किंमतीहून कमी किंमतीची आहे असा (इसम). (इं.) पॉपर. ३ (सामा.) अकिंचन; दरिद्री. ४ मासिक फी माफ असलेला विद्यार्थी. [फा. ना + दार] नादारी-स्त्री. १ दिवाळखोरी; दारफळणी. २ कंगालपणा; दारिद्र्य. 'राजाचे हाली माजीचे विज्वरामुळें शिरस्ता मोडत आला आणि हक्क रुसूमही झाडून उगवेना, सबब नादारीस आलों आणि कर्जबाजारी जाहलों.' -रा १३.९१. ३ शाळेंतील फीची माफी.

दाते शब्दकोश

नादारी      

स्त्री.       १. दिवाळखोरी; दारफळणी. २. कंगालपणा; दारिद्र्य. ३. शाळेतील फीची माफी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नास्त

स्त्री. (गो.) दारिद्रय. उदा॰ 'नास्त पापा मूळ.' [सं.नास्ति] ॰भाकणें-१ दारिद्र्याचें ढोंग करणें. २ तोट्याचें, नुकसानीचें, अनर्थाचें भविष्य करणें; भावी अनर्थाबद्दल ओरडणें. ॰भाक्या-१ नास्त भाकणारा. २ अवसानघातकी; रड्या.

दाते शब्दकोश

नास्त      

स्त्री.       दारिद्र्य. [सं. नास्ति] (वा.) नास्त भाकणे–१. दारिद्र्याचे ढोंग करणे. २. तोट्याचे, नुकसानीचे, अनर्थाचे भविष्य करणे; भावी अनर्थाबद्दल बोलणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नेटून      

क्रिवि.       निष्ठापूर्वक : ‘माथां ठेवतां नेटून । जाते गुरूच्या कृपेनें सारं दारिद्र्य फिटून ।’ - वलो १८. (व.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ओढणे      

अक्रि.       १. खेचणे; सरकविणे; लोटणे; जवळ घेणे, करणे; आपल्याकडे आणणे; ताणणे :‘परि ओढुनिने त्यासीदेव ओढकसा I’-मोभीष्म४·४४. २. (शेतजमिनीतीलडिखळे फोडून साफ करण्यासाठी दाताळे किंवा गुढेवगैरे जमिनीवर) फिरवणे. ३. (रेषा, ओळी) काढणे;आखणे. ४. ओढ बसणे (फोड, उष्णता, रोग वगैरेपासून डोळा इत्यादी) ५. (दुखणे, आजार, दारिद्र्य यामुळे शरीर) क्षीण होणे; आक्रसणे : ‘अम्मीचा चेहरा खूप ओढला होता.’-वीज८. ६. (गुडगुडी, सिगारेट, विडी इत्यादीचा) धूर काढणे; अंमल करणे. ७. (स्तन) पिणे; चोखणे. ८. (तपकीर) हुंगणे; सुंगणे. ९. (भाषेची अर्थाकरिता) ओढाताण करणे, वाटेल तो अर्थ बसवणे. १०. लावणे; बंद करणे (दार, खिडकी इ.) ११. (काठी, छडी इ.) मारणे. १२. नेसणे : ‘नित्य ओढिती धौत वस्त्रें’-मुसभा २४·३७. १३. लांबणीवर पडणे : ‘इकडे पर्जन्य ओढला आहे, या उपरि पुनर्वसूचा लागेल तरी राहिले पेरे पेरतील.’-ऐलेसं ४३०९.[सं. वह-वोढ-ओढ] (वा.) ओढून आणणे- १. गर्वाने किंवा रागाने ताठून बसणे. २. कां कूं करीत मागे राहणे. ओढून काढणे- बाहेर खेचणे; मोठ्या युक्तीने बाहेर काढणे, जबरीने जवळ आणणे, घेणे. ओढून घेणे- १. (एखादे संकट अथवा अडचण) स्वतःवर बळेच आणणे. २. आपल्या बाजूचे करणे :‘हीच मुले आपल्याकडे ओढून घ्यावयाची आहेत.’-इंप ४२. ३. (गंजिफा) घेणी घेणाराने राजाबरोबर जे पान टाकले असेल त्यावरील बंद दुसऱ्याजवळ असल्यास त्याने राजाबरोबरचे पान मारून ओढूण घेणे. हा ओढून घेण्याचा हक्क घेणी घेणाऱ्याच्या उजव्या हातच्या खेळाडूलाअसतो. ओढून टाकणे-रागाने, दांडगाईने ओढून ढकलणे किंवा झुगारून देणे. (मनुष्य, वस्तूइ.). ओढून बळकट करणे- (दोरीचीसैलवमोकळी गाठ घट्ट वन सुटेल अशी आवळणे यावरून) फाजीलशहाणपणाने स्वतःला फसविणे; उद्देश बाजूला सारणे; हट्टाने किंवापड न खाल्ल्यामुळे (अटी, करार, परिस्थिती) अधिक बिकट करूनघेणे. ओढून विकणे-१. जास्त किंवा अवाच्यासवा किंमतीसविकणे. २. (ल.) स्वतःची योग्यता फार मोठी मानणे; अभिमानानेआत्मप्रतिष्ठा चढविणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ओढणें

उक्रि. १ खेचणें; सरकविणें; लोटणें; जवळ घेणें, करणें; आपल्याकडे आणणें; ताणणें. 'परि ओढुनि ने त्यासि देव ओढकसा ।' -मोभीष्म ४.४४. 'तूं पाणी ओढ, मी आंघूळ करतों.' २ (शेत जमिनींतील डिखळे फोडून साफ कर- ण्यासाठीं दाताळें किंवा गुठें वगैरे जमिनीवर) फिरविणें. ३ रेघा, ओळी काढणें; आंखणें. 'काय रेघा ओढल्यास ! सरळ ओढ.' ४ ओढ बसणें (फोड, उष्णता, रोग वगैरेपासून डोळे इ॰). ५ (दुखणें, आजार, दारिद्र्य यांमुळें शरीर) क्षीण होणें. ६ (गुड- गुडी, विडी इ॰ चा) धूर काढणें; अंमल करणें. ७ (थान) पिणें; चोखणें. (गाय, म्हैस इ॰ चें) दूध काढण्याकरितां आंचळ ओढणें; धार काढणें. ८ (तपकीर) हुंगणें; सुंगणें. ९ (भाषेची- अर्थाकरीतां) ओढाताण करणें; वाटेल तो अर्थ बसविणें. १० लावणें; बंद करणें (दार, खिडकी इ॰). [सं. वह्-वोढ-ओढ] (वाप्र.) ॰ओढून आणणें १ गर्वानें किंवा रागानें ताठून बसणें. २ कां कूं करीत मागें राहणें. ओढून काढणें-बाहेर खेंचणें; मोठ्या युक्तीनें बाहेर काढणें; जबरीनें जवळ आणणें, घेणें. ओढून घेणें-(एखादें संकट अथवा अडचण) स्वतःवर बळेंच आणणें. 'भरतानें रामासारखाच वनवास आपल्यावर ओढून घेतला.' २ आपल्या बाजूचें करणें. 'हींच मुलें आपल्याकडे ओढून घ्यावयाचीं आहेत.' -इंप ४२. ३ (गंजिफा) घेणी घेणारानें राजाबरोबर जें पान टाकलें असेल त्यावरील बंद दुसर्‍या- जवळ असल्यास त्यानें राजाबरोबरचें पान मारून ओढून घेणें. हा ओढून येण्याचा हक्क देणी घेणार्‍याच्या उजव्या हातच्या मनुष्यास असतो. ओढून बळकट करणें-(दोरीची सैल व मोकळी गांठ घट्ट व न सुटेल अशी आंवळणें). फाजील शहाण- पणानें स्वतःला फसविणें; उद्देश बाजूला सारणें; हट्टानें किंवा पड न खाल्ल्यामुळें (अटी, करार, परिस्थिती) अधिक बिकट करून घेणें. ओढून विकणें १ जास्त किंवा अवाच्यासवा किंमतीस विकणें. २ (ल.) स्वतःची योग्यता फार मोठी मानणें; अभि- मानानें आत्मप्रतिष्ठा चढविणें. कर्ज ओढणें-कर्जावर कर्ज काढणें. चाबूक॰-एखाद्याला चाबूक लगावणें. जमीन॰-शेत- जमीन लागवडीस आणणें. जीभ॰-कांहीं विकृतीनें जीभ कोरडी होणें. बाकी॰-१ हिशेबाची शिल्लकबाकी पुढील सालच्या कीर्दी- वर नेणें. २ देणें न देतां कांहीं काळ राखणें. वरून ओढून टाकणें-ताणणें-(जसें-शास्त्रावरून ओढणें, विद्येवरून ओढणें) थोडेंसें, वरवरचें ज्ञान असणें. श्वास॰-श्वास घेणें. ओढून टाकणें-रागानें, दांडगाईनें ओढून ढकलणें किंवा झुगारून देणें (मनुष्य, वस्तु इ॰).

दाते शब्दकोश

पांग

पु. १ उत्कट इच्छा, आशा; तृष्णा; आसक्ति. (क्रि॰ फिटणें; निवारणें; फेडणें). 'आजि असतें वेंचिजेल । परी पाहे काय कीजेल । ऐसा पांगीं वडील । व्यवसाय मांडी ।' -ज्ञा १४. १६५. 'वर्णाश्रमाचा पांग । न करी राम निःसंग ।' -विउ ११.६. 'वासना कुरण इचा नको करूं पांग ।' -ब ५९१. 'जिव्हा अमृतरसें वेष्ठे । अन्य रसाचा पांग फिटे ।' २ पराधीनता; ताबेदारी. 'येथ श्रवणाचेनि पांगें-। वीण श्रोत्या व्हावें लागे । हे मनाचेनि निजांगे । भोगिजे गा ।' -ज्ञा ६.२४. 'त्यजूनि अहंममता पांग । विचरती निःसंग हरिकीर्तनीं ।' -एभा २.५४९. ३ गरज; इच्छा; अपेक्षा; जरूरी. 'त्यासि झणी कोणाची दृष्टी लागे । यालागीं देवो त्या पुढें मागें । त्या सभोंवतां सर्वांगें । भक्तिचेनि पांगे भुलला ।' -एभा २.७१९. ४ उणीव; दारिद्र्य; पंगूपणा; हाल; अन्नवस्त्र इ॰कांची ददात (चिंता; सामान्यतः अनेककचनीं प्रयोग). 'जेथ वैराग्याचा पांगु फिटे । विवेकाचाही सोसु तुटे ।' -ज्ञा ४.१६४. 'मोठ्याच्या पदरीं पडलें म्हणजे खाण्यापिण्याचे पांग फिटतात.' 'हा मुलगा मोठा झाला म्हणजे तुझे पांग फेडील.' ५ यातायात; श्रम; कष्ट. 'न. लगे वेदशास्त्राचा पांग ।' -विउ ११.१७. ६ (सावकार, उपकारकर्ता इ॰कांविषयींचा) मिंधेपणा; ओझें; ओशाळगत; संकोच; पराधीनतेची जाणीव. 'ह्या कर्जदाराचा मला पांग वाटतो.' [सं. पंगु = लंगडा] ॰फिटणें-मनोरथ सफल होणें; उणीव, याता- यात, काळजी दूर होणें. 'समस्तां भक्तांचा नयनगत हा पांग फिटला ।' -सारुह ८.१६७. ॰फेडणें-मनोरथ सफल करणें; चिंता दूर करणें. 'जेणें फेडिला पांग ब्रह्मादिकांचा ।' -राक १.७. म्ह॰ येतील वांग तर फिटतील पांग.

दाते शब्दकोश

फकिरी

(स्त्री.) [फा. फकीरी] दारिद्र्य; भिक्षावृत्ती; भीक; फकिरासम्बन्धी. “गारपीरचे लष्करांतील शिपाई व गङ्गाधर शास्त्री याजकडील माणसें मोहरमची फकिरी मागावयास आले; सबब मशार्निल्हेनीं लष्करवाले यांस रुपये दहा व शास्त्री यांजकडील माणसास पांच एकूण पन्धरा रुपये दिल्हे” (साने-पयाव १२६).

फारसी-मराठी शब्दकोश

राव

पु. १ नृप; राजा. 'व्यास योगियांचा राव ।' -मुआदि ३९.८७. २ नांवापुढील सन्मानाची एक पदवी. जसें:- बळवंतराव, माधवराव. क्वचित नुसता राव शब्दहि येतों. 'काय राव सांगावें, तुम्ही काल नव्हतां. मोठी मौज झाली.' ३ एक मराठा जात व तिच्यापैकीं एक व्यक्ति. मराठा पहा. ४ समशेर बहादर; तिस्मारखां. ५ दक्षिण हिंदुस्थानांत देशस्थ ब्राह्मण, मराठे, जैन, आणि शेर्बेंगार राव ही पदवी लागतात. गोणी विणकरांची पेरिके नांवाची जातहि कधीं कधीं राव पदवी लाविते. ६ पेशवाईंत विशिष्ट शौर्य गाजविल्याबद्दल एखाद्या व्यक्तीस दिली जाणारी पदवी. [सं. राज, राय] म्ह॰ राव करीत नाहीं तें गांव करितो. (वाप्र.) राव खालीं आले-एखादा मोठा मनुष्य घोड्यावरून, मोठ्या पदावरून खालीं आला असतां त्यास उद्देशून निघणारा उद्गार. राव घोड्याखालीं आले-राव मेले. रावाचा रंक होणे-मोठ्या, श्रीमान, मनुष्यास दारिद्र्य, गरीबी येणें. सामाशब्द-रावकी-स्त्री. रावाची स्थिति, गुण; रावपणा. 'याला हणमंतराव म्हणून सारे हांक मारितात, याला रावकी कोणी दिली ?' रावजी-पु. पुरुषास लावावयाचा बहु मानाचा शब्द. [राव] रावरंक-पु. राजा व रंक; श्रीमंत व भिकारी. 'साधूला रावरंक सारखें.' रावो-पु. १ राजा. 'देशाधिपतीस दंडिता रावो ।' -दा ३.८.९. २ श्रेष्ठ मनुष्य. 'तो चतुरांचा रावो ।' -रास २.४७८.

दाते शब्दकोश

रंक

वि. १ गरीब, दीन (माणूस). राजा किंवा राव या शब्दाच्या जोडीनें येतो. -ज्ञा ५.११०. -एभा ५.४६८. ' रंक राजआज्ञेसि भ्यालें । तेचि पुढें राजा जालें । ' दा ९.१०.३१.. २ दीन; लाचार; क्षुद्र. ' पैं रंकु एक आडलेपणें । काकुळती अंतीं धांवा गा धांवा म्हणे । ' -ज्ञा ८.१२८. [सं.] ॰पण-न. दारिद्र्य -ज्ञा १८.३२३.

दाते शब्दकोश

साहचर्य

न. १ बरोबर असणें, जाणें; जोड; गट्टी; संबंध. 'दारिद्र्य व विद्याव्यासंग यांचें आज हजारों वर्षांपासून ब्राह्य- णांशीं साहचर्य आहे.' -टि ४.१६६. २ सहवास; मैत्री; संगत. [सं.]

दाते शब्दकोश

सासर-रें

न. सासरा-सासूचें घर; पतिगृह. 'कन्या सास- र्‍यासी जाये । मागें परतोनी पाहे ।' 'म्हणे इकडे सासरें तिकडे माहेर । दोहींकडे आप्तचि समग्र ।' -ह २४.३८. [सासरा] म्ह॰ १ वेडीला सासर काय माहेर काय !. २ सासरीं एकादशी माहेरीं शिवरात्र (दोन्हीं घरीं दारिद्र्य). ॰माहेर-१ सासरीं पाठविणें व माहेरीं आणणें; विचारपूस करणें (मुलीची). २ संक्रांतीच्या वेळीं दोन विवाहित मुली-एक माहेरवाशीण व दुसरी सासुरवाशीण म्हणून-दोनतीन दिवस राहावयास आणून त्यांना चोळीबांगडी करून किंक्रांतीनंतर त्यांची पाठवणी करणें. ३ (नवीन लग्न झालेल्या मुलींमध्यें) भांगाचा एक प्रकार. ॰वास-(प्र.) सासुरवास पहा.

दाते शब्दकोश

सदा-दां

क्रिवि. नेहमीं; सदोदित; निरंतर; सतत. 'हा सदां पाणिबुडा । युधिष्ठिरूं साबडा ।' -शिशु ८९४. 'सदा सर्वदा योग तूझा घडावा ।' -राम. सदाकष्टी, सदादुःखी, सदाभोगी, सदारड्या, सदारोगी, सदानंदी, सदाशुचि, सदासुखी असे याचे समासहि होतात. म्ह॰ १ सदा पीक सदा भीक = कुणब्याचें कितीहि पीक आलें तरी दारिद्र्य जात नाहीं. २ सदा मरे त्याला कोण रडे = दुःखाची कांहीं काळानें संवय होते या अर्थीं. सदा त्रिकाळ-नेहमीं; सतत; निरंतर; तिन्ही त्रिकाळ; सकाळ, दुपार, संध्याकाळ (विशेष जोर दाखविण्याकरितां योजतात). सदाकदा, सदानकदा, सदाकाळ-क्रिवि. नेहमीं; निरंतर; सतत; सदोदित. सदावक्र-वि. नेहमीं वांकडा, दुर्मुखलेला, रुसलेला, हट्टी; कष्टी; उदास. सदा खाटलेकरी-वि. बिछा- न्यास खिळलेला. सदागति-वि. नेहमीं भ्रमण करणारा; सारखा गतिमान असणारा (हवा, वार). सदातन-वि. चिरं- तन; शाश्वत; निरंतरचा; कायमचा. सदाफळ-वि. नेहमीं फळें देणारें. 'जोडती दाटें झाडें । सदाफळ तीं ।' -ज्ञा ६.१७३. सदासर्वदा-क्रिवि. नेहमीं; सतत. सदासिद्ध-वि. शाश्वत; चिरंतन (परमेश्वर).

दाते शब्दकोश

सोव

पु. अव. (राजा.) ढोंग; सोंग (दुखणें, दारिद्र्य इ॰ चें). (क्रि॰ लावणें; करणें; मांडणें). ॰लाव्या-वि. ढोंगी; कोंगाडी.

दाते शब्दकोश

सुदाम, सुदामदेव

पु श्रीकृष्णाचा एक मित्र. हा रोड व दरिद्री होता. -वि. (ल.) रोड, दरिद्री (मनुष्य). [सं.] ॰दरिद्र-पु. अत्यंत दारिद्र्य. ॰दरिद्री-वि. फार दरिद्री. सुदाम्याचें वस्त्र-न. अत्यंत जीर्ण व फाटकें वस्त्र. सुदाम- पुरी-स्त्री. फार दरिद्री गांव. सुदाम्याचे पोहे-पु. अव. (सुदा- म्यानें एक मूठभर पोहे श्रीकृष्णास दिले. त्याच्या मोबदल्यांत देवानें त्यास सोन्याचें नगर दिलें त्यावरून) दात्यानें आपल्या दाणगीबद्दल बोलावयाचा विनयाचा शब्द; भाजीभाकरी. सुदामे- पु.अव. पोह्यांस सांकेतिक शब्द.

दाते शब्दकोश

ठणठणाट

पु. १ घणघण असा आवाज (धातूच्या भांडया- वर हातोडीनें मारलें असतां निघणारा) नाद. २ (विहिरींतील); पाण्याचा खडखडाट; फन्ना; चट्टा (कोठडीतील वस्तूंचा). दारिद्र्य; गरिबी; पोकळपणा; कमतरता; गरज; बोंब; दुर्मिळता. [ध्व. ठण! ठण!]

दाते शब्दकोश

ठणठणाट, ठणाका      

पु.       १. घणघण असा आवाज; (धातूच्या भांड्यावर हातोडीने मारले असता निघणारा) नाद. २. (विहिरीतील) पाण्याचा खडखडाट; फन्ना; चट्टा (वस्तूंचा). ३. दारिद्र्य; गरिबी; पोकळपणा; कमतरता; अभाव; बोंब; दुर्मिळता. ४. शुष्कता.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

थोरीवडा

वि. थोरपणाचा. 'दारिद्र्य/?/ चिवडाचि सर्व, दवडा थोरीवडा पांवडा ।' -आसुदा ४९.

दाते शब्दकोश

उभवणी

स्त्री. १ उभारणी; उठावणी; रचना; स्थापना; बांधणी; उभणी पहा. 'जेवीं कां नटाची रावोरणी । दोघें खेळती लटिकेपणीं । तेवीं प्रकृतीपुरुषउभवणी । मिथ्यापणीं । जो जाणें ।।' -एभा १९.२७. २. (ल.) (दारिद्र्य, आजार; वगैरेपासून) मुक्तता; उर्जितावस्था; वर डोकें काढणें; उठणें उठवणें; पायावर उभें करणें. ३ धंदा, व्यापार वगैरेची स्थापना, उभारणी. ४ पसारा; ज्याची उभारणी केली आहे ती वस्तु, गोष्ट. 'असो हे उभवणी माया- मय । जेणें रचिली ।।' -विपू ४.७९. [उभा, उद्भवन]

दाते शब्दकोश

उभवणी      

स्त्री.       १. उभारणी; उठावणी; रचना; स्थापना; बांधणी. पहा : उभणी : ‘जेवीं का नटाची रावोराणी । दोघें खेळती लटिकेपणीं । तेवीं प्रकृतिपुरुषउगवणी । मिथ्यापणी जो जाणे ॥’ –एभा १९·२७. २. (ल.) (दारिद्र्य, आजार वगैरे पासून) मुक्तता; उर्जितावस्था; वर डोके काढणे; उठणे; उठवणे; पायावर उभे करणे. ३. धंदा, व्यापार वगैरेंची स्थापना, उभारणी. ४. पसारा; ज्याची उभारी केली आहे ती वस्तू, गोष्ट : ‘असो हे उभवणी मायामय । जेणे रचिली ॥’ –विसिंपू ४·७९.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उठावणी      

स्त्री. पहा : उठविणे. १. उत्तेजन; प्रोत्साहन; प्रेरणा; पुढाकार : ‘देवळात काकडआरती आमच्या बाबांच्याच उठावणीने होत असे.’ - माजी २१.२. जोराने पुढे सरसावणे; उचल करणे. ३. बंडखोरी; डोके वर काढणे; हल्ला करणे; स्वारी करणे : ‘इंग्रज लोक जितक्या वेळा उठावणी करतील तितक्या वेळा त्यांना चोपून काढायचे.’ -इंप १४४. ४. उद्युक्त होणे; पुढे होणे. ५. जागृती. ६. उभारणी; सजावट; रचना; बांधणी : ‘शिवापूरच्या बागायतीसाठी दुसऱ्या धरणाची उठावणी केली.’ -श्रीयो १४३. ७. तळ हलविणे; निघण्याची तयारी करणे; कूच करणे. ८. उठवणे; दारिद्र्य, संकटे यातून वर काढणे. ९. उचलणे (ओझे). [सं. उत्थापन]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जमीन      

स्त्री.       १. भूमी; धरणी; भुई; नद्या, समुद्र आणि वातावरण यांखेरीजची जागा. २. पृथ्वीचा पृष्ठभाग; अंतर; जागा. ३. शेत; लागवडीची जागा. ४. गच्ची; मजल्यावरची भुई अथवा पेंडाची तयार केलेली भुई. ५. मूळ आधार. पहा : भुई [फा.] (वा.) जमीन अस्मान एक होणे − १. सपाटून पाऊस पडणे; धुरळा, धुके यांनी दिशा धुंद होणे. २. (ल.) अतिशय गर्विष्ठ होणे. जमीन अस्मानाचे अंतर − फार मोठे अंतर, तफावत. जमीन उकरणे − आंगठ्यांनी भुई उकरणे (संकटग्रस्त, भीतिग्रस्त होऊन घोडा टापेने जमीन उकरतो तसे). जमीन ओढणे − जमीन लागवडीस आणणे. जमीन कोरणे − हळूहळू बळकावणे; खरडणे : ‘बाबूरावने पाट काढताना बेगर्स होमच्या जमिनी कोरल्या आहेत.’ − अगाआवे ४९. जमीन धरणे − १. आजारीपणामुळे अंथरुणाला खिळणे : ‘आख्खा महिना झाला, म्हातारीनं जमीन धरली होती… म्हातारी आता उठणार नव्हती.’ − नागीण ११४. २. रागाला वश होणे. जमीन माडी ठेवणे − बागाईत पिकाकरिता जमीन रिकामी ठेवून उरलेल्या जमिनीत एकच पीक काढणे. जमीन वाफेला येणे − वाफसा होणे; पेरणीसाठी योग्य होणे. जमीन सोडणे − १. जमिनीतून वर येणे, दिसणे (पीक). २. (ल.) दुखणे, दारिद्र्य इत्यादीतून वर येणे, उठणे. जमिनीवर पाय नसणे − चपळ घोडा, जलद पळणारा, गडबड्या माणूस यासंबंधी योजितात. जमिनीस पाठ (अंग) लागणे, जमिनीवर पडणे − दुखण्याने किंवा अतिशय दारिद्र्याने पिडणे. जमिनीस पाय लागणे − रोगमुक्त होणे. जमिनीस मिळणे − सर्वस्वी नाश होणे (अक्षरशः आणि लक्षणेने).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

भिकार

न. भिकार्‍यांचा थवा, समुदाय; समुच्चयानें भिकारी लोक. -वि. दरिद्री; भिकारी; कंगाल; जीवनाच्या सामान्य सुखाविरहित (देश, गांव, खेडें); भिकारी; दरिद्री. जसें- भिकारी-राज्य-जमीन-बाग-दौलत-पीक-हंगाम इ॰ [सं. भिक्ष् = मागणें] ॰काम-न. दरिद्री, भिकारी काम. ॰खाना-पु. १ भिकार्‍यांची वस्तीची जागा. २ भिकारी घर, वसतिस्थान. ३ (निंदेनें) भिकारी, दरिद्री मानलेलें घर. ॰खोड-चट-चाळा- स्त्रीपु. अशिष्ट, बिनसंभावित, भिकार्‍यासारखी खोड, चाळा, चाल, रीत, ढंग, संबंध. ॰गंड-न. भिकारी लोक. ॰चेष्टा-स्त्री. हलकट, क्षुद्र, घाणेरडे, गदळ, अयोग्य काम, कृत्य; निवळ रिकामा कार- भार; बेफायदेशीर कृत्य. ॰चोंट-वि. १ (निंदार्थीं) भिकारी; कृपण. २ दरिद्री; तुच्छ; पसंत नसलेला; (किंमत, बळकटी, पृष्ठता, इ॰- कांत) कमी दर्जाचा; अपुरता (पदार्थ). ॰छंद-पु. वाईट नाद, संवय, खोड. ॰टोकार-न. (व्यापक, सामा.) भिकारी लोक; भिकार्‍यांचा व टोळभैरवांचा समुदाय. [भिकारी द्वि.] ॰डा-पु. (तिरस्कारदर्शक) भिकारी. ॰णें-अक्रि. भिकारी, दरिद्री होणें. ॰दासावर हुंडी-स्त्री. अत्यंत गरीब माणसाकडे केलेली पैशाची मागणी, विनंति. ॰पेठ-स्त्री. मालाचा पुरवठा पूर्ण नसलेलें शहर. (समासांत) भिकार-नगरी-पुरी-वस्ती इ॰ ॰बुद्धि-स्त्री. भिकारी- बुद्धि; हलकी कल्पना, युक्ति, तोड, सल्ला, विचार. ॰भास- स्त्री. (गो.) भिकार चेष्टा. ॰भोपळा- वि. दुर्दैवी; कपाळकरंटा. ॰लक्षण-न. हलकट व भिकारी लक्षण, चिन्ह; भिकार चाळा. ॰लाड-पु. (भिकारी करण्यासारखे लाड) अतिशय कौतुक. आणि लालन (प्रायः मुलाचें); मुलास बिघडविण्यासारखे लाड. ॰वाडा-पु. १ भिकार्‍यांची राहण्याची जागा. २ भिकार्‍यांचा समुदाय ३ भिकार दिसणारें घर, इमारत. ॰विकरी-स्त्री. १ भिकार वस्तूंची विकरी. २ थोडकी विकरी; अतिशय लहान प्रमाणांतील किरकोळ विकरी. ॰सौदा-पु. भिकार माल, वस्तु; कोणताहि बेफायदेशीर व्यापार, करार; भिकार खटलें, काम. ॰हट- पु. नीच, हलकट, अयोग्य खवखव, हांव, आग्रह. -री-हाड- न. १ (ल.) भिकारी किंवा गरीब कुळी २ अत्यंत हीन असें जीवित हाडाचें दारिद्र्य हाडींमाशीं खिळलेली दारिद्रता. भिकारी- पु. १ भीक मागणारा मनुष्य. २ दरिद्री, कंगाल मनुष्य. ३ -वि. (निंदार्थी) कवडीमोल; तुच्छ; भिकारी (मनुष्य, स्थळ, वस्तु). ४ हिताची गोष्ट न ऐकणारा; लाभाविषयीं पराङ्मुख; तोटा, नाश करणार्‍या कामाविषयीं तत्पर असा (मनुष्य इ॰). म्ह॰ (व.) भिकार्‍याला ओकार्‍या = भिकार्‍याला आढ्यता फार.

दाते शब्दकोश

लोणी

न. दूध, दही घुसळलें अमतां त्यांतून जो स्निग्धांश निघतो तो. [सं. नवनीत; प्रा. नोणीअ; पं. नौणी; हिं. नौनी] ॰खाऊन ताक देणें-स्वतःचा स्वार्थ साधून मग परार्थ पाहणें; मुख्य भाग आपण घेऊन निःसत्व व किरकोळ स्वरूपाचा भाग उदार होऊन दुसऱ्यास देणें. 'हजार युरोपियन कामगार सर्व लोणी खाऊन ताक मात्र आमच्या वाट्यास देतात.' -टि २.५१२. ॰लावणें-खिशामत करणें; मनधरणी करणें; मिनत्या करणें. लोण्याची कडी करणें-लोणी वाटेल तितकें किंवा विपुलतेनें वाढणें. लोण्याची सवत न साहणें-शांत आणि लोण्या- प्रमाणें मऊ अशीहि सवत असह्य होणें; विरोध सदन न करणें. न घडणाऱ्या गोष्टीही चिकित्सा करणें. लोण्यांत दांत फुटणें- अत्यंत सौम्य स्वभावाचा मनुष्य असभ्य, रागीट आणि कठोर असा होणें. लोण्यास दांत फुटणें-आपण ज्याचें लालन, पालन, पोषण केलें त्यानें आपणाशीं कृतघ्नपणें किंवा अमर्याद- पणें वागूं लागणें. लोण्याची कणी, लोण्याचें बोट--स्त्रीन. अगदी किंचंत् लोणी; कणीएवढें लोणी; बोटाला चिकटलेलें लोणी; इवलेसें लोणी. लोण्याचें आयसिंग-न. लोण्यापासून चोटी चुरम्याची तुकडे पाडून केलेली बर्फि. -गृशि १.४४४. लोण- कढा-वि. ताजा; अगदी नवा; कोरा करकरीत; नवीन; साजूक. (अगदी ताज्या कढविलेल्या लोण्याप्रमाणें). [लोणी + कढणें] लोणकढी, लोणकढीथाप-वार्ता-बातमी-गोष्ट-खबर, लोणकढें वर्तमान-स्त्रीन. समयानुसार ठेवून दिलेली थाप; खोटी बातमी; गंमतीखातर आणि गंभीर मुद्रेनें सांगितलेली खोटी खबर. 'पण मला आपण तसबीर द्यायची कबूल केली ना? कां लोणकढी दिलीत?' फाल्गुनराव. लोणकढी दौलत- स्त्री. नवीनच मिळालेली दौलत. लोणकढें(डें)तूप-न. शुद्ध लोणी कढवून तयार केलेलें ताजें तूप; साजूप तूप. लोणकढें दारिद्र्य-न. नुकतेच आलेलें दारिद्र्य. लोणकाप्या, लोणी- काप्या-वि. बोथट; धार नसलेला (चाकू, सुरी इ॰). लोणट- वि. लोण्याच्या वासाचें चवीचें. लोणणें-सक्रि. (व.) घोटणें; आहाटणें; घाटणें; वरणाची डाळ शिजल्यानंतर ती लोण्या- सारखी मऊ करणें. लोणस-वि. (कों.) १ सत्वस; कसदार; ज्यामध्ये लोण्याचा अंश पुष्कळ आहे असें (दूध, दहीं). २ जीच्या दुधापासून पुष्कळ लोणी मिळतें अशी (गाय, म्हैस इ॰).

दाते शब्दकोश

ग्रह

पु. १ घेणें; स्वीकार; अंगीकार; धरणें. २ चंद्र किंवा सूर्य यांचें ग्रहण (राहूकेतुकडून). ३ सूर्याभोंवतीं फिरणारा गोल (पृथ्वी, बुध, शुक्र, गुरु मंगळ इ॰चा); ज्योतिःशास्त्राप्रमाणें हे (सूर्यासह) नऊ आहेत; (सामा.) केंद्रस्थ, ऊष्ण व देदीप्यमान पदार्थाभोंवतीं फिरणारा, कमी उष्णतेचा परप्रकाश गोल -सूर्य २२; (ग्रहाभोंवतीं फिरणारा तो उपग्रह) ग्रह हा तार्‍याप्रमाणें दिसतो. पृथ्वीच्या दैनंदिन गतीमुळें हा उगवतो व मावळतो आणि स्वतःच्या गतीनें तार्‍यांमधून पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो. परप्रकाश असल्यानें याचें तेज स्थिर असतें. -सृष्टि. ४ एक प्रकारचें पिशाच्च, गिरा. 'जैसा ग्रहातें पंचाक्षरी । अनुमानी कां ।' -ज्ञा २.८५ (यापासून ल.) व्याधि,उपाधि, पीडा इ॰; तापदायक माणूस; खनपटीस बसणारा, पाठीस लागणारा इ॰ बद्दल म्हणतात. ५ कल्पना; भावना; मत. ६ चिकाटी. ७ उमज; अधिगम (एखाद्याच्या अर्थाचा); बुद्धि; अर्थग्रहण; अर्थबोध; धारणा; समजूत. ८ मगर; एक मोठा मासा; ग्राह. 'गज सरो- वरीं ग्रहग्रस्त । स्त्रियांपुत्रीं सांडिला जीत ।' -एभा १२.८५. [सं.] सामाशब्द- ॰कुंडली-स्त्री. पंचांगांतील ग्रहांच्या दशा दाखवि- णारी आकृति. ॰गणित-न. ग्रहांच्या गतीविषयींचें गणित. ॰गति-स्त्री. (फल ज्योतिष किंवा ज्योतिःशास्त्र) १ ग्रहांची गति. २ दृष्टि ग्रहांचा विशिष्ट रिणाम. (मुख्यत्वें माणसाचें नशीब पाहतांना) 'गृहस्थ पडले ग्रहगतीत.' ॰चार-पु. सूर्य किंवा इतर ग्रह यांची गति, भ्रमण ॰जप-पु. ग्रह प्रसन्न होण्यासाठीं त्या त्या ग्रहाच्या विशिष्ट मंत्राचा करावयाचा जप. ॰दशा-स्त्री. मनुष्यादिकांस प्राप्त होणारी शुभाशुभ फलसूचक सूर्यादि ग्रहांची दशा, दृष्टि, अवस्था, काल. ॰दान-न. नवग्रहांना प्रसन्न करण्यासाठीं ब्राह्म- णाला द्यावयाचें दान. ॰पीठ-न. ग्रहमख करण्यासाठीं नवग्रह देवता मांडण्याचा पाट, चौरंग. ॰पीडा-बाधा-स्त्री. १ प्रति- कूल ग्रह किंवा ग्रहयोग यापासून उत्पन्न होणारें दुःख, दारिद्र्य, आजारीपण इ॰. २ भूतपिशाच्च बाधा. ॰बल-न. विवक्षित राशीस ग्रहांची अनुकूलता (विवाह, उपनयन, मंगल कृत्य कर- ण्याविषयीं). ॰मख-यज्ञ-पु. ग्रहांना अनुकूल करून घेण्या- साठीं, ग्रहांच्या प्रीत्यर्थ करावयाचा यज्ञ; ग्रहशांति; नवग्रहांना उद्देशून करावयाचा होम; हा होम विवाह, मुंज व इतर शांतीच्या प्रसंगीं करतात. ॰मंडळ-न. ग्रहगोल; सर्व ग्रहांचें चक्र. ॰मैत्री- स्त्री. वधूवरांच्या पत्रिकांचा मेळ. पत्रिका जुळणें, पटणें. राशींचें स्वामी सात असल्यानें, ज्या राशींत नवरी जन्मली आणि ज्या राशींत नवरा जन्मला, त्या दोन्हीं राशींचा स्वामी एक असणें किंवा एकमेकांस अनुकूल असणें. ॰योग-पु. शुभाशुभदायक ग्रहांचा योग, स्थिति. ॰वैर-न. १ ग्रहांचें शत्रुत्व. २ पत्रिका न जमणें. याच्या उलट ग्रहमैत्री. ॰शांति-स्त्री. ग्रहमख. ॰साधन-न. १ (कोष्टक गणित किंवा दुर्बिण इ॰ यंत्रें यांच्या साह्यानें) ग्रहदशेचा निश्चय; ग्रहाचें स्थळ व गति यांचें शोधन; ग्रहांचे वेध घेणें. २ ग्रहाची आराधना. ॰सारणी-स्त्री. अमुक ग्रह अमुक ठिकाणीं आहे याचा निश्चय करण्याचीं गणितें किंवा कोष्टकें; ग्रहसाधनाचें गणित. ग्रहानुकूल्य-न. ग्रहांची प्रसन्नता, ग्रहबल. ग्रहावेज्ञ-ग्रहपीडा. ग्रहेश-पु. सूर्य.

दाते शब्दकोश

पडणें

अक्रि. १ खालीं येणें; गळणें; पतन पावणें; एखाद्या स्थानापासून भ्रष्ट होणें; आधार तुटून खालीं येणें; खालीं-नीच स्थितीप्रत जाणें. 'किल्ल्यावरून दगड खालीं पडला.' 'वाऱ्यानें झाडें मोडून पडलीं.' २ (ल.) थांबणें; बंद होणें; पडून रहाणें; सतत चाललेला धंदा-व्यवहार कांहीं कारणामुळें बंद पडणें; थांबणें 'पैसा नाहीं म्हणून सावकारी पडली.' 'बीं मिळालें नाहीं म्हणून यंदा शेत पडेंल.' ३ घडणें; घडून येणें; होणें; असणें. 'तुम्ही धनी पडला मी चाकर पडलों.' 'तुमचें घर लांब पडलें.' 'हें शहर पडलें म्हणून लांकूडफाट्याची महागाई.' ४ प्रवृत्त होणें; करूं लागणें; सुरू करणें. 'तो आतांसा लिहिण्यावर पडला आहे.' ५ जोराचा हल्ला करणें; चालून जाणें. 'अकस्मात् गनीम पडला आणि निसंतान केलें.' ६ उद्भवणें; घडणें; होणें; जाणवूं, दिसूं लागणें (थंडी, अंधार, उजेड, उष्णता इ॰). ७ कमी होणें; थंडावणें; शांत होणें (वारा); कमी होणें; उतरणें (दर). ८ जमिनीवर अंग टाकणें; निजणें; आडवें होणें; लवंडणें; पहुडणें. ९ आळसानें निजणें; सुस्त पडणें. 'येथें काय पडलास कामावर जा.' १० रिकामा, बेकार, निर्वस्त, वस्तीशिवाय, पेरल्याशिवाय, बिन वहिवाटीचा, बिन वापरलेला किंवा उपयोगांत न आणलेला असा राहणें, असणें (मनुष्य, खेडें घर, जमीन, रस्ता, वस्तु इ॰). 'पांच शालजोड्या पडल्या आहेत. तुला पाहिजे ती घे.' ११ (लढाईंत) मरणें; धारातीर्थीं पतन पावणें. 'पडतांचि भीष्म, पडले रडले कुरुवीर भूप सुर सगळे ।' -मोभीष्म ११.११७.१२ गुंतणें; उद्योगांत शिरणें; संबंध ठेवणें 'तूं त्या कामांत पडशील तर रडशील.' १३ आवश्यकता प्राप्त होणें; भाग पडणें. 'तूं ज्वरग्रस्त झालास म्हणून मला खेपा घालावयास पडतें.' 'बायको केली तर घर बांधावयास पडलें.' १४ किंमत द्यावयास लागणें. 'शाल- जोडीला पांचशें रुपये पडतील.' १५ होणें; घडणें; घडून येणें; उपस्थित होणें. १६ ठरणें; शेवटीं दिसणें; उघडकीस येणें. १७ पराभूत होणें; मार खाणें (वाद इ॰त). १८ कोसळणें; गुदरणें; प्राप्त होणें; (त्रास, दुःख) १९ रूपांतर होणें; स्थित्यंतर होणें. 'हात पाय गार पडलें.' हा रंग काळा पडेल.' २० उद्भवणें; उत्पन्न होणें; परिणाम होणें. 'क्षतांत किडे पडले.' 'मध्यें चार रेषा काढल्या म्हणजे तीन कोष्टकें पडतात.' 'ह्या भिंगाच्या दोन आरशा पडतील.' २१ बुडणें; खचणें (दारिद्र्य, दुर्बलता, हल- केपणा, दुष्कीर्ति इ॰त). २२ दाटणें; घोगरा होणें; हलका पडणें; बसणें (आवाज). २३ (पत्त्यांचा, जुगारीचा खेळ) गमावणें; हरणें 'मी दहा रुपयें पडलों.' २४ सुरू, प्रारंभ होणें; चालणें; प्रचारांत, व्यवहारांत असणें (धंदा, उद्योग, चाल, टूम इ॰). २५ बाहेर येणें; (तोंडातून); ओकणें. 'अन्न पडलें.' २६ (गणित) त्रेराशि- कादि गणितावरून कांही एक फल फलित होणें.' 'कोशास आठ हजार हात तेव्हां अर्ध कोशास काय पडतें?' २७ सतत चालू असणारा व्यापार-फड इ॰ चालू रहाणें. 'पत्रावळीचा एकदां फड पडला म्हणजे कोणी येईल तो लावील' २८ कर्मधर्म संयो- गानें असण. 'तो पडला अधिकारी नाहीं तर पाडून घेतलें असतें.' २९ दाखल होणें; समाविष्ट होणें. 'रक्कम दरमहा कपात होऊन जो फंड जमा जाहलेला असतो त्यांत पडावयाची आहे.' -(बडोदें) कलावंतखातें ३३. ३० (कु.) मानवणें. 'माझ्या जिवाक पडता.' ३१ (अकर्तृक) परस्पर जुळणें; जमणें; जम बसणें; योग्य असणें; पटणें. 'विद्येस आणि लक्ष्मीस पडत नाहीं.' 'अंबाडीची भाजी आणि भाकरी यास चांगलें पडतें.' [सं. पत्; प्रा. पड; गु. हिं. पडवुं-ना; फ्रेंजि. पेर; आर्मे. पर] म्ह॰ पडलेलें शेण माती घेऊन उठतें = चांगल्या मनुष्यावर कांहीं टपका आला आणि त्या टपक्याचें जरी त्यानें सर्वांशीं निरसन केलें तरी त्याची थोडी तरी बदनामी होतेच. पडतझडत-क्रिवि. झडतपडत पहा. [पडणें + झडणें] म्ह॰ (व.) पडेझडे माल वाढे = एखादा मुलगा पडला म्हणजे त्याला म्हणतात. म्हणजे असें पडल्या पडल्यानेंच शक्ति येते. पडत उभें-न. १ (प्रशंसार्थी) उत्पन्न होतांच, जन्मतांच उभें राहणारें, वावरूं शकणारें गाय इ॰ कांचें वासरूं. २ (ल.) यशस्वी उपाययोजना; श्रेयस्कर वागणूक. ३ अनुकूल प्रारब्ध. [पडणें + उभें] पडत काळ-पु. उतरती कळा; ऱ्हासाचा काळ; निकृष्ट दशा. पडत पाया-पु. १ ऱ्हास; पडता काळ. २ (क्व.) खालावलेली स्थिति. पडती भावना-स्त्री. १ (पाऊस) पडूं लागणें, येऊं लागणें; (पावसास) सुरवात होणें. २ (क्व.) ऊन्ह, थंडी पडणें, सुरू होणें; पडूं लागणें. (क्रि॰ होणें). 'थंडीची, उन्हाची पडती भावना.' ३ आरंभाचें किंवा सुरवातीचें चिन्ह; सूचक लक्षण. पडत्या पुठ्याचा-वि. (माण.) उतरत्या कुल्याचा (घोडा, बैल वगैरे). पडत्या फळाची आज्ञा-स्त्री. मारुतीस सीतेनें पडलेलीं फळें खाण्यास तेवढी परवानगी दिल्याबरोबर झाडें उपटून त्यांचीं फळें पाडून त्यानें अशोकवनाचा विध्वंस केला. यावरून एकदां थोडीशी सवलत दिल्याबरोबर तिचा फायदा घेऊन अपेक्षेबाहेर काम करणें; आपल्या इच्छेप्रमाणें आयतेंच कार्य घडून येत असतां तें तात्काळ घडवून आणावें अशा विषयींची माणसाची आतुरता. पडला- झडला-वि. पडलेला व झडलेला; गळून पडलेला; सांडलेला; विसकटलेला; पसरलेला. [पडणें + झडणें] पडलें पान-न. खेड्यां- तील सर्वाधिकार (पडलेलें पानहि घेण्याचा ज्याला अधिकार आहे असा). 'जोशीपणा व कुळकर्ण हे दोनच अधिकार त्याच्याकडे आहेत असें नाहीं तर पडलें पान त्याचें आहे.' पडल्या पानावर हक्क असणें-गांवासंबंधीं सर्वाधिकार, हक्क स्वतःकडे असणें. पडीचा आंबा-पु. (पिकलेला किंवा कच्चा) झाडावरून पड- लेला आंबा. याच्या उलट उतरलेला, काढलेला. पडी पडणें- १ (पडलेल्यांत पडणें) नाहींसा होणें; विसरला जाणें; उपयोगांतून जाणें; नष्ट होणें; बाजूला पडणें. २ अडथळ्यानीं अडविला जाणें. पडल्यापडल्या-क्रिवि. १ पडतां पडतां; पडत, लोळत असतां; लोळतां लोळतां. २ आळसानें; धिमेपणानें. [पडणें] गोष्टी सांगणें-विचार न करतां कांहीं तरी गोष्टी सांगणें. जिंकणें- करणें-सहज लीलेनें जिंकणें, करणें.

दाते शब्दकोश

शुभ

न. १ सुदैव; कल्याण; अभ्युदय; ऐश्वर्यच सुखकारक स्थिति. २ (ज्यो.) अनुकूलता; कृपादृष्टि; कल्याणकारकता (तिथि, युति वगैरेची). ३ हितकारकता; लाभदायकता (एखाद्या वचनाची अथवा दिग्दर्शक गोष्टीची). -पु. (ज्यो.) सत्तावीस योगांपैकीं तेविसावा योग. -वि. १ मंगलदायक; लाभदायक; सुखकारक; चांगलें; सुदैवी; सुपरिणामी (कृत्य, विधि, शकून, चिन्ह, योग). २ मंगल; उत्सवरूपी; समा- रंभाचे (विधि, प्रसंग, संस्कार वगैरे). याच्या उलट अमंगल; अशुभ; श्राद्ध, पुण्यतिथि, वगैरेसंबंधीं. ३ सामान्यतः चांगलें; बरें; हवेसें. 'अशुभस्य कालहरणं शुभस्य शीघ्रम् ।' [सं. शुभ् = शोभणें, प्रकाशणें] म्ह॰ शुभ बोल रे नाऱ्या, मांडवास आग लागली. ॰कर, शुभंकर-वि. शुभदायक; मंगल- कारक; हितकर; सुखकर. ॰कर्म-कार्य-न. मंगल समारंभ; उत्सव; कल्याणकारक संस्कार, विधि वगैरे (उदा॰ लग्न, चौल, मुंज वगैरे). ॰कृत्य-न. १ (शब्दशः) चांगलें कार्य; मंगल- कार्य. २ (सांकेतिक) मैथून. ॰गा-स्त्री एक प्रकारची लगाम. -अश्वप १.१८५. ॰ग्रह-पु. कल्याणकारक, सुखकारक ग्रह; बुध, शुक्र व गुरु. ॰चिंतक-वि. चांगली इच्छा करणाराच चांगलें चिंतणारा; बरें होईल अशी इच्छा करणारा. ॰चिंतन-न. चांगलें होवो अशी इच्छा; कल्याण इच्छिणें. ॰चिन्ह- लक्षण-न. मंगलप्रद, कल्याणकारक खूण, शकून, दिग्दर्शक गोष्ट. घोड्याचीं कांहीं शुभ चिन्हें-खुंटेगाड, देवमण, पंच- कल्याण, रणशूर, श्यामकर्ण, गोम (सुलटी, शिरोमुखी), बाशिंग, गंगापाठ, कैरे डोळे, जयमंगळ, कंठाभरण, कुशावर्त, सप्तदंती, बाहालकांचन, बदकमुख, पर्वती, चिंतामणी, मेखला- मुख, अष्टमंगळ, हयकंठी, अधोमुखी गोम इत्यादि. शिलावर्त, पोटावर्त इ॰ हीं अर्धवट अथवा मध्यम गुणकारी व इतर अशुभ चिन्हें असतात तीं अशुभ चिन्हें या शब्दांत दिलीं आहेत. ॰वर्तमान-न. १ चांगली बातमी; सुवार्ता; मंगलवार्ता; संदेश. २ (ख्रि.) मँथ्यु, मार्क, ल्यूक व जॉन यांनीं लिहिलेले नव्या काराराचे भाग. ॰वार्ता-स्त्री. मंगलदायक, कल्याणकारक, सुख- कारक बातमी, वर्चमान, हकीकत. ॰वेळ-ळा-स्त्री. मंगल- दायक वेळ; दिवसांतील कांहीं विशिष्ट अनुकूल काल. वेळ पहा. शुभा-स्त्री. १ पार्वतीचें नांव. २ गोंवर या रोगास म्हणतात. ३ (सांकेतिक, अशुभ सूचना टाळण्याकरितां) गोंवऱ्या, शेणी यांस म्हणतात. 'बळें शुभा धबाबिती. कित्येक ढेंकळें भिती ।' -बसवकृत महाबळभट चरित्र १६. 'शुभा वेंचोनि देशील मातें । तरी पानगे करून भक्षूं येथें ।' -भवि ५३. ७९. 'शुभानांवें विकती शेणी ।' -निगा २८१. 'येका शुभा येकवटती ।' -दा ६.९.७. शुभांगी-स्त्री. सुंदर स्त्री; रूपवती स्त्री. शुभाचार- पु. शुद्ध, पवित्र आचरण, वागणूक. 'शुभाचारें होती नारी ।' -गुच ११.८. शुभानना-स्त्री. सुंदरी; रूपवती, देखणी स्त्री. शुभावेळ-स्त्री. शुभवेळ पहा. शुभाशुभ-वि. (शुभ + अशुभ) बरेंवाईट; मंगल व अमंगल; ऐश्वर्य अथवा दारिद्र्य; पाप- पुण्यात्मक, 'तैसीं शुभाशुभ कर्में । जियें निफाजती प्रकृति धर्में ।' -ज्ञा ३.१७८. शुभासन-न. मंगलकारक आसन, बैठक, जागा; सुंदर बैठक; शकुनाची जागा. 'शुभासनी रुक्मिणी बैसलीसे ।' -सारुह ८६२. शुभेच्छा-स्त्री. ज्ञानी जीवाच्या सप्तभूमिकांतील पहिली भूमिका, ही मुळें अनुताप होऊन साधनचतुष्यसंपन्नता येऊन गुरूपदेशपात्रता येते; चांगली मंगलदायक इच्छा.

दाते शब्दकोश

हात

पु. १ हस्त; बाहु; खांद्यापासून बोटांपर्यंत शरीराचा भाग. कोपरापासून बोटांपर्यंतचा भाग. २ कोपरापासून मधल्याबोटाच्या टोकापर्यंतचें माप. 'हा पंचा साडेचार हात भरला.' ३ उजवी किंवा डावी बाजू, तरफ. 'आमचें घर वाड्याचे उजव्या हातास आहे.' ४ ताबा; आटोका; अधिकार; खातें. 'तुझें काम करणें माझ्या हातीं नाहीं.' (कारक विभक्तींत प्रयोग). ५ स्वतः व्यक्तिगत मनुष्य. 'अपराधावांचून शिवी देणें हें माझ्या हातानें घडणार नाहीं.' ६ स्वामित्व; कबजा; मालकी; ताबा. 'साप्रंत माझ्या हातीं पैसा नाहीं.' ७ हातानें वाजविण्याच्या वाद्यावर मारलेली हाताची थाप. ८ डाव; खेळ (काठी, लाठी, पट्टा इ॰ शस्त्रांचा). 'पट्ट्याचे दोन हात करून दाखव.' ९ कर्तृत्वशक्ति; अंग; हस्तकौशल्य (एखाद्या विषयांतील, कलेंतील). 'त्याचा चित्र काढण्याचा हात चांगला आहे.' १० कुलुपाची किल्ली; चावी. 'कुलवाचा हात इकडे दे बघूं.' ११ सोंगट्या, पत्ते इ॰ खेळांतील डाव, खेळण्याची पाळी, खेळ; खेळणारा गडी. 'अजून आमच्यांतील एक हात खेळवयाचा आहे.' १२ हस्तक; मदतनीस; साहाय्यक; हाताखालचा मनुष्य. १३ ज्यावर दंड, जोर काढावयाचे तो लांकडी, दगडी ठोकळा; हत्ती १४ (रंग देणें, सारवणें इ॰ कामीं) वरून हात फिरविणें; हातानें दिलेला थर, लेप. १५. ठोंसा; तडाखा; हस्तक्रिया (भिन्नभिन्न प्रसंगीं त्या त्या अर्थांनीं) १६ (तेली-घाणा) कातरीस जोडलेला वांकडा लाकडी तुकडा. १७ हात टेकावयासाठी, हातानें धरावयाचा कोणताहि पदार्थाचा भाग. 'खुर्चींचे-रहाटाचे-हात. १८ हाताच्या आका- राची कोणतीहि वस्तु. १९ (सोनेरी) हातांतील दागिना सैल करण्याचें एक हत्यार. २० (नृत्य) दोन हातांनीं मिळून करा- वथाचे अभिनयाचे प्रकार. हे ४० प्रकारचे आहेत. २१ (शिंपी) कापड मोजण्याचें बारा तसूंचें एक माप; गज. २२ पान्हा (नट- बोलट फिरविण्याचा). [सं. हस्त; प्रा. हत्थ; हिं. गु. हाथ; ब. हात; आर्में. जि. हथ, अथ; पॅलेस्टाईनजि. हस्त; पोर्तुंजि. बस्त] म्ह॰ १ हात ओला तर मैत्र भला-नाहींतर पडला अबोला- जोपर्यंत माणूस दुसर्‍यास देत असतो तोंपर्यंत त्याच्याशीं सगळे मित्रत्वानें वागतात. २ हात घशांत घातला तरी कोरडाच = कितीहि मदत केली तरी बेइमान राहणारा. ३ हातपाय रोड्या, पोट लोड्या; हातपाय काड्या, पोट ढेर्‍या = पोटाचा तटतटीतपणा व अवयवांचा रोडकेपणा. ४ हात फिरे तेथें लक्ष्मी फिरें, तोंड फिरे तेथें अवदसा फिरे = उद्योगी माणसाचा हात श्रीमंती आणतो तर नुसत्या बडबड्याच्या हातून कांहींच होत नाहीं उलट दारिद्र्य येतें. ५ आपला हात जगन्नाथ (जगन्नाथपुरीस आपल्या हातानें वाटेल तेवढा प्रसाद घेतां येतो त्यावरून) वाटेल तेवढें व तसें घेणें; प्राचुर्य. ६ हातचें सोडून पळत्याचे पाठीस लागूं नये = जें खात्रीनें आपलें आहे (आपणांस मिळावयाचेंच आहे) तें सोडून जें अनिश्चित आहे तें मिळविण्याच्या नादीं लागूं नये. ७ हातच्या कांकणास आरसा कशाला ? (हातांतील कांकण डोळ्यानें दिसण्या- सारखें आहे, आरसा आणणें वेडेपणा) = जी गोष्ट उघड सिद्ध आहे ती दाखविण्यास पुराव्याची जरूरी नाहीं. ८ हातपाय र्‍हावलें काम करूं वायले = नाइलाज होणें. ९ हातपाय लुलें तोंड चुरचुरां चाले = अशक्त पण तोंडाळ, मुजोर माणूस. १० हातभर लांकूड नऊ हात ढलपी = अतिशयोक्ति करणें. ११ हातांत नाहीं अडका बाजारांत चालला धडका = जवळ कवडीं नाहीं पण डौल बादशहाचा. (वाप्र.) ॰आंखडणें-देण्यासाठीं पुढें केलेली वस्तु एकदम मागें घेणें; देण्याचें प्रमाण कमी करणें, बंद करणें. ॰आटोपणें-मारणें इ॰ हातांनीं करावयाची कोणतीहि क्रिया बंद करणें. ॰आवरणें-१ हात आटपणें. २ कोणत्याहि कृत्यापासून परावृत होणें. 'ऐकेल वचन माझें आवरिल द्वेषिकाळ हात रणीं ।' -मोकर्ण ४६.४४. ॰इचकणें-(व.) हात मोडणें. ॰उगारणें-उचलणें-(एखा- द्यास) मारावयास प्रवृत होणें. ॰उचलणें-१ स्वयंस्फूर्तीनें, आपण होऊन बक्षीस देणें. २ हातीं घेणें (काम, धंदा). ॰ओढविणें- १ घेण्यासाठीं झांप टाकणें. २ विटंबना, करण्यासाठीं तुच्छता दर्शविण्यासाठीं तोंडापुढें हात करणें. ॰ओंवाळणें-तुच्छता दर्शविणें. ॰करणें-१ लाठी मारणें; शस्त्राचा वार करणें. हात टाकणें. 'स्त्रीचे अंगावर हात करूं नये.' २ पट्टा, बोथाटी वगैरेचे डाव करणें; फिरविणें. ३ वादविवाद, युद्ध करणें. ॰कापून-देणें- गुंतणें-लेखी करारकरून स्वतःस बांधून देणें. ॰खंडा असणें- एखादें कार्य (हुन्नर) हमखास पार पाडण्याचें कौशल्य, पटाईत- पणा अंगीं असणें. ॰गहाण ठेवणें-उजवा हात देवास वाहून कोणत्याहि कामीं त्याचा उपयोग करावयाचा नाहीं असा नवस करणें. २ कोणत्याही कामास हात न लावणें. ॰घालणें-१ (एखादें काम) पत्करणें; करावयास घेणें. २ एखादी वस्तु घेणें, धरणें, शोधणें यासाठीं हात पुढें करणें. 'मग विभु वसनासी त्याचिया हात घाली ।' -आनंदतनय. ३ (एखाद्या कामांत, व्यवहांरांत) ढवळाढवळ करणें; आंत पडणें. ॰घेणें-(पत्त्यांचा खेळ) हुकूम मारून अगर भारी पान मारून दस्त करून घेणें. ॰चढणें-प्राप्त होणें. 'अनुताप चढविया हात । क्षणार्धं करी विरक्त ।' -एभा २६.२०. हाताचा आंवळा-मळ, हातचें कांकण-उघडउघड गोष्ट; सत्य. ॰चा मळ-अत्यंत सोपें कृत्य; हात धुण्यासारखें सोपें काम; अंगचा मळ. ॰चालणें-१ हातांत सत्ता, सामर्थ्य, संपत्ति असणें, मिळविणें, मिळणें. १ एखादी गोष्ट करतां येणें. 'कशिद्यावर माझा हात चालत नाहीं.' ॰चाल- विणें-हत्यार चालविणें (संरक्षणार्थ). 'न्यायाच्या अभावीं ज्याला त्याला हात चालवावेसें वाटणें रास्तच होईल.' -टि १. २२. ॰चेपणें-लांचाचे पैसे मुकाट्यानें एखाद्याचे हातांत देणें. ॰चोळणें-फार राग आला असतां तळहात एकमेकांवर घासणें; कुंठितगति होऊन स्वस्थ बसावें लागणें. 'शल्य सुयोधन वाक्यें कोपे चोळी करें करा...।' -मोकर्ण २१.१३. ॰जोडणें-१ नमस्कार, प्रार्थना, विनंति करणें. २ शरण जाणें, येणें. 'अपराध फार केले परि आतां हात जोडिले स्वामी ! ।' -मोआर्याकेका. ३ नको असलेला पदार्थ हात जोडून आर्जवानें दूर सारणें; अव्हे- रणें. 'दानश्री त्याहुनि बहु दुग्धासहि हात जोडितो मीन ।' -मोबृहद्द ८. ॰झाडणें-१ झिडकारणें; नापंसत ठरविणें. २ निराशेनें सोडून देणें. ३ एखादें काम उरकून मोकळें होणें. ॰टाकणें-१ पोहतांना पाण्यावर हात मारणें. २ (एखाद्यावर) प्रहार करणें; मारणें. 'बायकोमाणसाच्या अंगावर हात टाकणें तुम्हाला शोभत नाहीं.' ॰टेकणें-१ काम करण्यास असमर्थ असल्यानें पराभव पावल्याचें कबूल करणें. २ म्हातारपणानें अशक्त होणें. ३ दमणें; थकणें; टेकीस येणें. ॰तोडणें-स्वतःच्या लेखानें आपणांस बांधून घेणें. ॰थावरणें-हात आवरणें; आटो- पणें. '...थावरूनि हातरणीं ।' -मोस्त्री ६.५१. ॰दाखविणें- दावणें-१ हस्तसामुदिक जाणण्यासाठीं जोशापुढें तळहात करणें. २ अहितकारक परिणाम करणें. ३ स्वतःची शक्ति, सामर्थ्य दाख- विणें. 'शक्रादि देव असते तरि त्यांसहि दावितोंचि हात रणीं ।' -मोभीष्म ३.४. ४ नाडीपरीक्षा करण्यासाठीं वैद्यापुढें हात करणें. ५ हातानें एखादी वस्तु दर्शविणें. ६ बडवून काढणें; पारिपत्त्य करणें; सूड घेणें; उट्टें काढणें. म्ह॰ हात दावून अवलक्षण चिंतणें, करणें. ॰दाबणें-लांच देणें. 'त्यानें आपल्यास मदत करावी म्हणून त्याचे हात दाबावे असें एकदां मनांत येतें.' -विवि १०. ९ २१०. ॰देणें-१ मदत करणें; तारणें. 'घडतां अधःपतन मज पुण्यें देतिल न हात परिणामीं ।' -मोआदि १९.३२. २ चोरणें; उचलेगिरी करणें. ३ खाद्यापदार्थावर ताव मारणें. ४ (बायकी, छप्पापाणी) छप्पू घातलेल्या मुलीस इतर मुलीनीं (तिनें उठावें म्हणून) हस्तस्पर्श करणें. ॰धरणें-१ अडविणें; हरकत करणें; स्पर्धा करणें; बरोबरी करणें. २ लांच देणें. ॰धरून जाणें- विवाहित स्त्रीनें एखाद्या परपुरुषाबरोबर पळून जाणें; जाराबरोबर निघून जाणें. ॰धुणें-(ल.) एखाद्या कामांतून आपलें अंग काढून घेणें. ॰धुवून पाठीस लागणें-एखाद्या नाश करण्याविषयीं हट्टानें प्रवृत्त होणें; चिकाटी धरून एखाद्याचा पाठलाग करणें. ॰न बनणें-(व.) विटाळशी होणें; गुंता येणें. ॰नाचविणें-चेष्टा करण्यासाठीं दुसर्‍याचे तोंडापुढें हातवारे करणें. हात ओवाळणें पहा. ॰पडणें-१ एखादें काम अनेकांनीं लागून संपविणें; एखादा खाद्यपदार्थ अनेकांनीं एकसमयवच्छेनेंकरून फन्ना करणें. २ (ना.) जिवंतपणीं भेट नाहीं पण दहनापूर्वी तरीं प्रेताचें दर्शन होणें. ॰पसरणें-भीक मागणें. ॰पाय खोडणें-१ अवयव आंख- डणें; विव्हल होणें. २ एखाद्यास प्रतिबंध, अडचण करणें. ॰पाय गळणें-गाळणें-१ अशक्त होणें; रोडावणें. २ खचून जाणें; नाउमेद होणें; गलितधैर्य होणें. ॰पाय गुंडाळणें-१ अंत- काळच्या वेदनांनीं हातपाय आंखडणें; कियाशक्ति रहित होणें. २ हरकत, अडथळा करणें. ॰पाय चोळणें-१ सूड घेण्याची प्रतिज्ञा करणें; चरफडणें. २ रागानें तरफडणें; शिव्याशाप देणें. ॰पाय झाडणें-१ हातपाय गुंडाळणें अर्थ १ पहा. २ सुटकेसाठीं हातापायांचा उपयोग करणें. ३ धडपड करणें; चरफडणें. ॰पाय ताणणें-सुखानें, निष्काळजीपणानें हातपाय पसरून पडणें. ॰पाय धोडावप-(गो.) आटापिटा करणें. ॰पाय पसरणें- १ हातपाय गुंडाळणें अर्थ १ पहा. २ मर्यादेच्या, आटोक्याच्या बाहेर जाणें; जास्त जास्त व्याप वाढविणें; पसारा वाढविणें. म्ह॰ भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी. ३ काम होत नसल्यास सबबी सांगणें; कामांत आळस करणें (काम करीन असें वचन दिलें असतां). ४ मागणी वाढत जाणें, अधिकाधिक आक्रमण करणें. ॰पाय पाखडणें-अंतकाळच्या वेदनेनें, फार संतापानें हातपाय झाडणें. ॰पाय पांघरून-पोटाळून बसणें-आळशा- सारखें बसणें; जेठा मारून बसणें. ॰पाय फुटणें-१ उधळपट्टी सुरू होणें; संपत्तीला (जाण्यास) पंख फुटणें. 'दौलतीला अलीकडे हातपाय फुटुं लागले आहेत.' ३ लुच्चेगिर्‍या करण्यांत तरबेज होणें. २ थंडीनें हातपायास भेगा पडणें. ॰पाय फोडणें-लावणें- फुटणें-लागणें-१ मूळ गोष्टींत, अंदाजांत भर घालणें; वाढ विणें. २ नटविणें; थटविणें; अलंकृत करणें. ३ मागून वाढविणें (काम, दर, खर्च इ॰). ४ लबाड्या इ॰ नीं सजवून उजळून दाखविणें. ॰पाय मोकळे करणें-फेरफटाका करून हातपाय सैल, हलके करणें; फिरणें; सहल करणें. ॰पाय मोडणें-मोडून येणें-टाकणें-१ तापापूर्वीं अंग मोडून येणें; निरंगळी येणें. २ बलहीन, निःसत्त्व करून टाकणें; हरकत घेणें. ॰पाय सोडणें -अंतकाळच्या वेदनांनीं हातपाय ताणणें, ताठ होणें. ॰पाय हालविणें-उद्योग, परिश्रम, कष्ट इ॰ करणें; स्वस्थ न बसणें. ॰पोचणें-कृतकृत्य होणें (ढुंगणाला हात पोंचणें असा मूळ प्रयोग). ॰फाटणें-रुची वाढणें. 'जेथें जिव्हेचा हातु फाटे ।' -ज्ञा १८.२४९. ॰फिरणें-लक्ष जाणें; व्यवस्थित ठेवण्याची काळजी घेणें; साफसफाई करणें. ॰फेरविणें-१ लहान मुलास प्रेमानें कुरवाळणें. 'प्रेमें मजवरुनि हात फिरवूनी ।' -मोउद्योग १३.१८३. २ पुन्हां उजळणी, उजळा देणें. ॰बसणें-१ एक- सारखें लिहीत, वाचीत इ॰ राहणें. २ अक्षरांचें वळण बसणें; तें पक्कें होणें. ३ एखादें काम उत्तम प्रकारें करतां येणें; मनांत ठसणें; विशिष्ट क्रिया करण्याची सफाई हातास प्राप्त होणें. ॰बांधणें-१ मर्यादा घालणें; स्वैर होऊं न देणें. २ अडथळा आणणें. ॰बोट लावणें-भार लावणें-मदत करणें. ॰भिजणें-१ दक्षणा देणें; (गो.) हात भिजविणें. २ लांच देणें; हात ओले करणें. ॰मारणें-१ बळकाविणें (पैसा इ॰) देणें. २ अधाशीपणानें खाणें; ताव मारणें. ३ एखाद्या वस्तूवर विविध क्रिया करणें. ॰मिठ्ठीला येणें-(माण.) हाताहातीं होईपर्यंत भांडणें. ॰मिळविणें-१ घाव घालणें. 'तस्कारानें जलदीकरून हात मिळविला जाऊन ।' -ऐपो ३९०. २ (कुस्ती) सलामी घेणें. ॰मोडणें-१ असहाय्य, मित्रहीन होणें. २ मिळत असलेली देणगी, बक्षीस नाकारणें. ॰राखणें- कुचराई करणें. ॰राखून खर्च करणें-काटकसरीनें खर्च करणें. ॰लागा ना-(गो.) विटाळशी होणें. ॰लावणें-मदत करणें. ॰वसणें-क्रि. हस्तगत होणें. 'ते ज्ञाननिष्ठा जेथें हातवसे ।' -ज्ञा १८.१२४८; -भाए २४०. ॰वहाणें-१ हत्यार चालविणें. 'परि परमप्रिय अर्जुन त्यावरि याचा न हात वाहेल ।' -मोउद्योग १२.५४. २ प्रवृत्त होणें; कार्य करणें. ॰वळणें-१ सराव, परि- पाठ इ॰ नें हातास सफाई येणें. २ (एखाद्या गोष्टीस, कृत्यास) प्रवृत्त होणें. ॰सैल सोडणें-सढळपणें खर्च करणें. ॰सोडणें-१ पूर्वीप्रमाणें कृपा, लोभ न करणें. २ संगति. ओळख सोडणें. ॰हातांत देणें-लग्न लावणें. 'एखाद्या तरुणीचा हात माझ्या हातांत दे.' -भा ४९. ॰हालवीत येणें-काम न होतां रिकामें परत येणें. हातणें-क्रि. सारवणें. हाताखालीं घालणें-देख. रेखीखालीं, अंमलखालीं, कबज्यांत, ताब्यांत घेणें. हातां चढणें- प्राप्त होणें. 'जरी चिंतामणी हातां चढे ।' -ज्ञा ३.२३; -एभा १०.२८२. हाताचें पायावर लोटणें-आजची अडचण उद्यां- वर ढकलणें; आजचें संकट लांबणीवर टाकणें. हाताचे लाडू होणें-खरजेनें हाताच्या मुठी वळणें, त्या न उघडणें. हाताच्या धारणेनें घेणें-मारणें; बुकलणें. हातांत कंकण बांधणें- एखाद्या गोष्टीची प्रतिज्ञा करणें; चंग बांधणें (यजमानानें यज्ञ करावयाच्या पूर्वी हातांत दीक्षासूत्र बांधण्याच्या चालीवरून). हातांत हात घालणें-१ लांच देणें. २ मैत्रीच्या भावानें वागणें, प्रेम करणें. ३ विवाहसंबंध घडवून आणणें. ४ विवाहित स्त्रीनें परपुरुषाशीं संबंध ठेवणें; निघून जाणें. हातातोंडाशीं गांठ पडणें-१ घास तोंडांत पडणें; खावयास सुरुवात करणें; जेवणा- खेरीज इतरत्र लक्ष न जाणें. २ एखाद्या कार्यास घाईनें आरंभ होणें. ३ बोंब मारणें. हातातोंडास येणें-१ तारुण्यावस्था प्राप्त होणें (लग्न झालेली स्त्री, तरुण मुलगा इ॰). २ फल देण्याच्या स्थितीस येणें. हातापायांचा चौरंग होणें-पेटके वगैरेमुळें हातपाय आंखडणें. हातापायांचे डगळें होणें- पडणें-मोडणें-अशक्तपणानें अंगास कंप सुटणें; अंग शिथिल होणें. हातापायांचे ढीग पडणें-होणें-भीतीनें, आजारानें अशक्त असहाय्य होणें. हातापायांच्या फुंकण्या होणें- अशक्ताता, निर्बलता येणें. हाता(तीं) पायां(यीं) पडणें- १ गयावया करणें; प्रार्थना करणें. २ शरण जाणें; नम्र होणें; दया याचिणें. हाताबोटावर येणें, हातावर येणें-आतां होईल, घटकाभर्‍यानें होईल अशा स्थितीस येणें; हस्तगत कबज्यांत, साध्य होण्याच्या अगदी बेतांत असणें. हाताला चढणें-प्राप्त होणें. 'संसार कशाचा जरि न हाताला चढली ।' -राला ११२. हाताला येईल तें-जें कांहीं हातांत सांपडेल तें; ज्याचेवर हात पडेल तें. हाताल लागणें-गमावलेल्या, फुकट गेलेल्या, नासलेल्या, बिघडलेल्या वस्तूंतून अल्प अंश मिळणें. 'कापडांत पैसें घालूं नका, त्यांतून हाताला कांहीं सुद्धां लागणार नाहीं.' हाताला वंगण लावणें-लांच देणें. -राको १३३७. हाताला हात लावणें-१ पति पुण्याहवाचनादि धर्मसंस्कारास बसला म्हणजे पत्नीनें त्याच्या हातास नुसता हात लावणें (म्हणजे तिलाहि त्याचें फळ मिळतें). २ स्वतः कांहीं न करतां दुसर्‍यानें केलेल्या कामाच्या फळांत वांटेकरी होणें; दुस- र्‍याच्या कार्याला अनुमति देणें. हातावर असणें-पूर्णपणें साध्य असणें. हातावर घेणें-आणणें-काढणें-तारण, गहाण न ठेवतां पैसे उसनें आणणें, काढणें, घेणें. हातावर तुरी देणें-देऊन पळून जाणें-हातावर हात देऊन-मारून पळणें-पळून जाणें-फसविणें; डोळ्यादेखत फसवून पळून जाणें; देखत देखत भुल- विणें. 'सुभद्रा काबीज करण्यासाठीं श्रीकृष्ण परमात्म्याच्या मदतीनें बलिरामाच्या हातावर ज्या तुरी दिल्या... तें पाहून तरी आम्हांस कधीं विषाद झाला आहे काय ?' -आगर. हातावर दिवस काढणें-लोटणें-मोठ्या कष्टानें संसार चालविणें. हातावर धरणें-हातांवर संभाळीत राहावयास लावणें (मुलीनें). 'यानें मला सकाळपासून हातावर धरिलें.' हातावर पाणी पडणें- भोजनोत्तर आंटवणें. 'हातावर पाणी पडलें कीं चालला बाहेर.' हातावर पिळकणें-लांच देणें. हातावर पोट भरणें-संसार करणें-अंगमेहनत, भिक्षा, नौकरी करून उपजीविका करणें. हातावर मिळविणें-मिळवावें व खावें अशा स्थितींत राहणें. हातावर येणें-जवळ येऊन ठेपणें. हातावर येणें-लागणें- दूध देऊं लागणें-थानास वासरूं न लावतां किंवा पान्हवण (सरकी इ॰) पुढें न ठेवतां जनावरानें दूध देणें, पान्हवणें. हातावर शीर घेऊन असणें-कोणतेंहि धाडसाचें कृत्य कर- ण्यास सदां सिद्ध असणें. हातावर हात चोळणें-रागानें तळ- हात एकमेकांवर घासणें; चरफडणें. 'इंद्रें स्वतातघातक पाठीसीं घातला म्हणोनि करें । कर चोळी...' -मोआदि ७.४०. हाता- वर हात मारणें-१ एखादी गोष्ट, सट्टा इ॰ पटला म्हणजे दुस- र्‍याचे हातावर आपला हात मारणें. २ वचन देणें. हातास हात लावणें-(देणार्‍याच्या, घेणार्‍याचे हातास स्पर्श होणें) द्रव्यलाभ होणें. हातास-हातां-हातीं चढणें-प्राप्त होणें. 'तो किल्ला माझ्या हातीं चढला.' 'नवनींत मंथनावांचून । हातां न चढे सहसाहि ।' हातीं धरणें-१ स्वतःच्या देखरेखीखालीं घेणें; एखाद्यास आपल्या आश्रयाखालीं घेणें. २ निरंकुशपणें मोकाट सोडणें (जीभ, तोंड, पोट इ॰ इंद्रियें). हातीं धोंडे घेणें-१ विरुद्ध उठणें. २ वेड्यासारखें करणें. हातींपायीं (अन्न इ॰) डेवणें-धावणें-येणें-रेवणें-जाड्य, सुस्ती येणें; शिव्या देण्यास तयार होणें. हातींपायीं उतरणें-सुटणें-मोकळी होणें-सुखरूपपणें बाळंत होणें हातींपायीं पडणें, लागणें- अतिशय विनवण्या, काकुळत्या करणें. हातीं भोपळा घेणें- देणें-भिक्षा मागणें, मागावयास लावणें. आडव्या हातानें घेणें-१ चोरून; चोरवाटेनें घेणें. २ झिडकारणें; भोसडणें; तुच्छता दाखविणें; कचकावून खडकाविणें; मारणें. आडव्या हातानें घेणें, चारणें-बाजूनें, तोंडांत हात घालून खाऊं घालणें; औषधोपचार करणें (घोडा इ॰स). (देणें-चोरून देणें-मारणें- मागल्या बाजूनें मारणें-ठोकणें). एका हाताचीं बोटें पण सारखीं नाहींत-सारख्या परिस्थितींतील माणसें असलीं तरी त्यांच्यांत थोडाफार फरक असतो. दोहों हाताचे चार हात करणें-होणें-लग्न करणें, होणें या हाताचे त्या हातावर- क्रिवि. ताबडतोब; जेव्हांचे तेव्हांच (दुष्कृत्याची फेड लवकर व खात्रीनें मिळते या अर्थीं). या हाताचें त्या हातास कळूं न देणें-अत्यंत गुप्तपणें करणें. रिकाम्या हातानें-जरूं- रीच्या साधनां-उपकरणां-सामग्रीखेरीज; कांहीं काम न करतां. याचा हात कोण धरीसा आहे ? -याच्या वरचढ, बरो- बरीचा कोण आहे ? याचा हात धरण्याची शक्ति कोणास आहे ? हातांत काय तागडू मिळाला-(व) कोणता फायदा झाला ? हातांत नारळाची आई (नरोटी) देणें-भिक्षा मागावयास लावणें. सामाशब्द- ॰अनार-पु. शोभेच्या दारूचा एक प्रकार. ॰इंद-न. (कों.) खेंकडे पकडण्याचें जाळें. ॰उगावा-पु. १ एखाद्या किचकट, अडचणीच्या कामांतून, धंद्यांतून अंग काढून घेणें. २ सूड; पारिपत्य. (क्रि॰ करणें). ३ कर्जाची उगराणी; घातलेलें भांडवल परत मिळविणें. [हात + उगवणें] ॰उचल-स्त्री. १ पेढींतून स्वतःची रक्कम आतां थोडी मग अशा रीतीनें खर्चण्यास घेणें. २ मूळ भांडवल; मुद्दल. उचल मध्यें पहा. ॰उचला-वि. १ आप- खुषीनें, हात उचलून दिलेला (पदार्थ). २ ज्याचा स्वतः करण्याबद्दल पत्कर घेतला आहे असा (व्यवहार, उद्योग). ॰उसना-ना-वि. थोडा वेळ उसना घेतलेला; लवकर परत करण्याच्या बोलीनें आणलेला (त्यामुळें लेख इ॰ लिहून न घेत दिला-घेतलेला). ॰उसणें-नें-न. थोड्या मुदतींत परत कर- ण्याच्या बोलीनें (लेख करून न देतां) उसनी घेतलेली रक्कम. ॰कडी-स्त्री. हातांतील बेडी. 'मन सिंतरील विवेकासीं । यालागी हात कडिया दोहींसीं ।' -एभा २३.९५१. ॰कर- वत-पुस्त्री. हातानें चालविण्याची लहान करवत. ॰करवती- स्त्री. लहान हात करवत. ॰करीण-स्त्री. अचळाला हात लावतांच (वासरूं न सोडतां किंवा आंबोण न ठेवतां) पान्हा सोडून दूध देणारी गाय; म्हैस. इच्या उलट पान्हावणकरीण. ॰कापें-न. (गो.) लांडी, बिन बाह्यांची बंडी. ॰काम-न. हस्तकौशल्याचें काम (यांत्रिक कामाच्या विरुद्ध); हस्तव्यवसाय. (इं.) हँडफ्रॅक्ट. ॰कैची-कचाटी- स्त्री. आलिंगन; मिठी. ॰खंड-वि. १ मधून मधून कामांत सोडवणूक करणारा; मदतनीस (मूल, मित्र, शेजारी); अडल्या वेळीं आपल्या कामीं उपयोगी पडणारा. २ हात खंडा पहा. [हात + खंड = खळ, विसावा] ॰खंडा-वि. निष्णात, करतलामलकवत् असलेली; म्हणाल त्यावेळीं तयार (विद्या, कला). ॰खर्च-पु. किरकोळ खर्च; वरखर्च. ॰ख(खं)वणी- स्त्री. लहान खवणी. ॰खुंट-खुंटा-पु. (विणकाम) वशारन पसरलेल्या लांबीपाशीं असलेल्या समोरच्या खांबापासून मागा पाशीं बसण्याच्या जागेजवळ उजवीकडे दोरी बांधावयाची खुंटी. ॰खुरपणीचें लोणी-न. हातखुरप्या नारळाचें खोबरें. ॰खुरपा-वि. हातानेंच आंतील खोबरें खरवडून काढण्याजोगा (कोंवळा नारळ). ॰खुरपें-न. १ हातखुरपा नारळ. २ गवत काढण्याचा लहान विळा. ॰खे(खो)रणें-न. कलथा; उलथणें; झारा. (क्रि॰ लावणें-अन्नास, पैक्यास = पैका उकळण्याचा सपाटा). म्ह॰ हातखेरणें असतां हात कां जाळावा. ॰खेवणें-न. १ हातवल्हें. २ मदतनीस; हाताखालचा माणूस. ॰खेव्या-व्या-पु. हातखेवणें अर्थ २ पहा. ॰खोडा-पु. हात अडकविण्याचा सांपळा. 'चंद्रसूर्याचा हातखोडा । काळा कैसेनि घालिजे ।' -भाए ५४९. ॰गाडी-स्त्री. हातानें ढकलून चालविण्याची गाडी. ॰गुंडा-धोंडा-पु. १ हातानें फेकण्या-उचलण्या-जोगा दगड. 'कुश्चीतभावाचे हातगुंडे ।' -ज्ञाप्र २६५. २ असला दगड हातानें जेथवर फेंकला जाईल तितकें अंतर. ॰गुण-पु. (बरेंवाईट करण्याचा योग, गुण) नशीब; हातीं (काम, माणूस) धरणाराचा प्रारब्धयोग. हस्तगुण पहा. ॰घाई-स्त्री. १ हातानें वाजवावयाचें वाद्य जोराजोरानें, आवेशानें वाजविणें. २ (ल.) उतावळेपणा; जोराची हाल चाल. (क्रि॰ हातघाईवर, हातघाईस येणें-मारामारी करणें). ॰चरक-पु. १ हातानें फिरवून रस काढावयाचा चरक. २ हात घाणी. ॰चलाख-वि. चोर; उचल्या. ॰चलाकी-खी-स्त्री. हस्तचापल्य; लपवाछपवी; नजरबंदीचा कारभार (गारुडी, सराफ इ॰ चा). ॰चाळा-पु. १ हाताचा अस्थिरपणा; चुळबुळ; हातानें कांहीं तरी उगीच करीत रहावें अशी लागलेली खोड; हातचेष्टा. (क्रि॰ लागणें). २ अशा प्रकारानें होणारें नुकसान. (क्रि॰ करणें). ३ सदोदित हात गुंतलेला असणें; त्यांत निमग्न असणें (वाढता धंदा, व्यापार, खेळ इ॰ त); देवघेवीचा मोठा उद्योग. ॰चिठी-चिटी-ट्टी-स्त्री. १ अधिकार्‍यानें शिक्का- मोर्तब न करतां आपल्या हातच्या निशाणीनेंच पुरी केलेली चिठी, हुकूम. २ कोणाहातीं पाठविलेली चिठी-चपाटी. ॰चे हातीं- च्या हातीं, हातोहातीं-किवि. लेगच; ताबडतोब; आतांचे आतां; क्षणार्धांत पटकन् (करणें, घडणें). 'ही गडी हाताचे हातीं जाऊन येईल.' 'हाताचे हातीं चोरी-लबाडी-शिंदळकी' इ॰. ॰चोखणें-चुंफणें-न. तान्ह्या मुलास चोखण्यासाठीं हातांत देण्याची वस्तु. ॰जतन-स्त्री. हातानें केलेली मशागत (मालीस इ॰); रोज वक्तशीर घेतलेली काळजी. 'हा घोडा नुसत्या हातजतनानें इतका हुशार आहे.' ॰जुळणी-स्त्री. (ठाकुर) लग्न लागल्यानंतर मुलानें मुलीचे दोन हात धरणें. -बदलापूर १३८. ॰झाड-स्त्री. आपोआप उगवलेलें नसून मुद्दाम लाविलेलें झाड. ॰झाडणी-स्त्री. राग, तिरस्कार इ॰ नें हात झटकणें. ॰झालणा-पु. हातजाळें; हातविंड. ॰झोंबी-स्त्री. परस्परांचे हात धरून केलेली झटापट; हिसकाहसकी; झगडा. ॰तुक-न. १ हातानें वजन करणें. 'नव्हती हाततुके बोल ।' -तुगा ३४२३. २ अटकळ; अजमास. 'मग त्यागु कीजे हात- तुकें ।' -ज्ञा १८.१३१. ॰दाबी-स्त्री. लांच. 'मालकानें हात- दाबी केली म्हणजे माल त्यांना परत देतात.' -गुजा ६७. ॰धरणें-न. (खा.) सोधणें; स्वयंपाकघरांतील भांडीं उतरणें इ॰ चें फडकें. ॰धरणी माप-न. माप भरतांना त्याचे शेवटास डावा हात धरून, मापापेक्षां थोडें जास्त धान्य घेऊन केलेलें माप. बोटधरणी माप पहा. ॰धुणी-स्त्री. १ राजाच्या हात- धुणारास दिलेलें इनाम इ॰. २ स्वयंपाकघरांतील मोरी. ॰धोंडा- पु. १ हातानें उचलण्याजोगा धोंडा. २ धोंडा हातानें फेंकला असतां जेथवर जाईल इतकें अंतर; टप्पा. ॰नळा-पु. हातांत धरून सोडण्याचा, शोभेची दारू भरलेला नळा. ॰नळी-स्त्री. चपटें कौल. ॰निघा-गा-हातजतन पहा. हातजपणूक. ॰नेट- क्रिवि. १ (व.) हाताचा जोर, भार देऊन. २ (व.) हाता- जवळ. ॰पडत-पात-वि. हातीं असलेलें; अगदीं जवळ असणारें; लागेल त्यावेळीं ताबडतोब मिळणारें. ॰पहार-स्त्री. हातभर लांबीची पहार. ॰पा-हातोपा-पु. अंगरखा इ॰ ची बाही. ॰पाटिलकी-स्त्री. १ हातानें ठोकणें; चोपणें, बदडणें. तोंड- पाटिलकीचे उलट. २ बोलण्यापेक्षां प्रत्यक्ष कृति, काम. 'तोंड- पाटिलकी सगळ्यांस येते हातपाटिलकी कठीण.' ३ हस्तचापल्य; उचलेगिरी. ॰पाणी-न. १ लग्नांत रासन्हाणीचे वेळीं वधूच्या सासूनें तिचे हातांवर ओतावयाचें पाणी. (क्रि॰ घालणें). २ लग्नांत मांडव परतण्याचे दिवशीं सासूनें सुनेची बोहोल्यावर ओटी भरून, किंवा मांडवांत न्हातेवेळीं नवर्‍यानें केशरी रंगांत बुडवून तिचे हातांत घालवयाची अंगठी. ३ लग्नांत मुलाच्या हाताखालीं मुलीचा हात ठेवून त्यांवर समंत्रक पाणी घालणें. -बदलापूर २०५. ॰पान-पु. कोंका पडण्यापूर्वींचें केळीचें पान. ॰पान्हा- पु. हातकरीण गाय, म्हैस इ॰ नें सोडलेला पान्हा (वासरूं किंवा अंबोण दाखविल्याशिवाय). हातपान्ह्यास लगाणें, येणें, हातपान्ह्याची गाय इ॰ प्रयोग. ॰पालवी-स्त्री. हात पोंहो- चेल इतक्या उंचीवरील पाला. ॰पावा-वि. (कों.) हाताच्या आटोक्यांतील, हात पोहोंचेल इतक्या उंचीवरील (वेलीचें फूल इ॰ किंवा खोली-विहिरींतील पाणी इ॰). [हात + पावणें] ॰पिटीं-स्त्री. १ झोंबाझोंबी; गुद्दागुद्दी. २ (ल.) हातघाईची मारामारी. 'तंव राउतां जाली हातपीटी ।' -शिशु ९६८. [हात + पिटणें] ॰पेटी-स्त्री. हातानें भाता चालवून वाजवावयाची बाजाची पेटी; हार्मोनियम. २ सरकारी कामाचे कादगपत्र ठेवण्याची पेटी. -स्वभावचित्रें २४. ॰पाळी-स्त्री. चेंडूफळीचा एक प्रकारचा खेळ. -मखेपु ५६. ॰फळ-न. (बे.) मेर ओढण्याचें फळ. ॰फळी, हातोफळी-क्रिवि. हातोहातीं; लवकर. ॰बळ-न. हस्तसामर्थ्य. 'हातबळ ना पायबळ, देरे देवा तोंडबळ.' ॰बांधून डंकी-स्त्री. (कुस्ती) जोडीदारास खालीं आणल्यावर त्यानें आपला एक पाय धरला तर आपण दुसर्‍या पायानें जोडीदाराचे पाठीवरून झोंका घेऊन उडी मारून त्यास चीत करणें. ॰बेडी-स्त्री. कैद्याच्या हातांत अडकवावयाची बेडी; हातकडी. ॰बोनें-न. हातांत घेत- लेलें भक्ष्य. 'बुद्धीचेनि शाकें । हातबोनें निकें ।' -ज्ञा ६.२८२. ॰बोळावन-स्त्री. हातांनीं मार्गाला लावणें. 'जाणो नेदी योग्यता । ग्रहीं हातबोळावन करितां ।' -भाए ३४९. ॰भाता-पु. हातांत घेऊन फुंकावयाचा भाता; लहान भाता. ॰भार-पु. मदत; साहाय्य (विशषतः द्रव्याचें). (क्रि॰ लावणें). ॰भुरकणा- भुरका-वि. हातानें भुरकून खावयाजोगा (पेयपदार्थ). ॰भुर- कणें-भुरकें-वरील प्रकारचा पातळ पदार्थ. ॰भेटी-स्त्री. प्रेमानें हातांत हात घालणें. -एभा २८.५९२. ॰मांडणी-स्त्री. पैसे पावल्याची पोंच म्हणून पैसे नेणार्‍याची खतावणीवर घेतलेली सही. ॰मात-स्त्री. हात टेकणें. ॰मेटी हेटीमेटी-क्रिवि. आळसांत; निरुद्योगीपणानें; हातांवर व गुडघ्यावर टेकून रमतगमत (दिवस इ॰) घालविणें. 'दिवस गेला हातमेटीं चांदण्या खाली कापूस वेटी.' ॰रगाडा-पु. उसाचा हातचरक. ॰रवी-स्त्री. घुसळखांब, मांजरी यांचे विरहित हातानेंट फिरविण्याची लहानरवी. ॰रहाट- पु. हातानें ओढून पाणी काढण्याचा लहान रहाट. ॰रिकामी- स्त्री. विधवा स्त्री. -बजलापूर १७४. ॰रिती-वि. (महानु.) रिकामी विधवा. -स्मृतिस्थळ. ॰रुमाल-पु. १ तोंड वगैरे पुसण्याचा लहान रुमाल. २ नित्योपयोगी कागदपत्रें ठेवण्याच्या दप्तराचा रुमाल; चालता रुमाल; त्यांतील कागदपत्रांचें बंडल. ॰रोखा- पु. दस्तक; चिठी; आज्ञापत्र. 'पाराजीपंत वाघ यांस हातरोखा वरचेवर पाठवून अति आग्रहें अंतरवेदींत घालविलें.' -भाव १०२. ॰लाग-पु. हाताचा टप्पा. ॰लागास-लागीं येणें-असणें- कक्षा, आंवाका, आटोका, अवसान इ॰ त येणें, असणें. ॰लागा- लाग्या-वि. अनुकूल असणारा. 'तुमचे हातलागे लोक असतील.' -वाडबाबा १.६. ॰लावणी-स्त्री. १ वेश्येचा चिरा उतरणें; कौमार्यभंग. (क्रि॰ करणें). २ हाताची पेरणी; लागवण. -वि. हातपेरणीचें. ॰लावा-व्या-वि. हाताळ; चोरटा; चोरी करण्या- साठीं हात फुरफुरत असलेला. ॰वजन-न. १ जिन्नस हातांत घेऊन केलेलें वजन. २ अशाप्रकारें वजन काढण्याची लायकी. ॰वटी- हातोटी-स्त्री. १ हस्तकौशल्य; हस्तचातुर्य. २ (सामा.) कसब; नैपुण्य; चलाखी. 'अहो चंद्रकांतु द्रवता कीर होये । परि ते हात- वटी चंद्री कीं आहे ।' -ज्ञा ९.२९. ३ विशिष्ट पद्धत, रीत, प्रकार. [हिं.] भाषणाची-पोहण्याची-व्यापाराची इ॰ हातोटी. ॰वडा- हातोडा-पु. सोनार, कासार इ॰ चें ठोकण्याचें हत्यार. ॰वडी हातोडी-स्त्री. लहान हातोडी. ॰वणी-न. १ हात धुतलेलें पाणी. २ (कों.) हातरहाटाचें पाणी पन्हाळांतून जेथें पडतें तेथील जमीनीचा उंच केलेला भाग; हातणी. ॰वल्हें-न. हातानेंच वल्हवावयाचें लहान वल्हें. ॰वश-वि. हस्तगत. ॰वशी-स्त्री. हात उगारणें. -शर. ॰वळा, हातोळा-पु. हातवटी पहा. म्ह॰ गातां गळा; शिंपता मळा, लिहितां हातवळा. ॰वारे-पु.अव. हातानीं केलेलें हावभाव; हाताची हालचाल. ॰विंड-न. (राजा.) हाता झालणा पहा. ॰विरजण-न. अजमासानें घातलेलें विरजण ॰विरजा-विरंगुळा-वि. कामांत मदत करण्याच्या लायक, लायकीस झालेला (पुत्र, शिष्य, उमेदवार इ॰) [हात + विरजणें] ॰शिंपणें-न. सोडवणी न देतां शेलणें इ॰ साधनानें भाजी- पाल्यास उडवून द्यावयाचें पाणी; असें पाणी शिंपणें. ॰शेकणें-न. (उसाचा चरक) चुलाण्यांत जाळ घालणारास त्याच्या मेहनती बद्दल द्यावयाचा गूळ. ॰शेवई-स्त्री. हातानें वळलेली शेवई; याचे उलट पाटशेवई. ॰सर-न. बायकांचा हातांतील एक दागिना, गजरा. 'हे पाटल्या हातसरांस ल्याली ।' -सारुह ६.२६. ॰सार- वण-न. खराटा, केरसुणी न घेतां हातानें जमीन इ॰ सारवणें. ॰सुख-न. १ दुसर्‍यास, शत्रूस हातानें मारूंन त्यामुळें अनुभवि- लेलें सुख (क्रि॰ होणें). २ हातानें दिलेला मार. ॰सुटका-स्त्री. १ एखाद्या व्यवहारांतून, धंद्यांतून स्वतः अंग काढून घेणें; मोकळें होणें. २ हातविरजा पहा. ३ हाताचा सढळपणा. ॰सुटी-स्त्री. औदार्य. 'हे हातसुटीक्षीरसागरा । वांचौनि नाहीं ।' -भाए ७६९. ॰सुतकी-स्त्री. पाथरवटाचें दगड फोडण्याचें हत्यार. ॰सूत-न. चातीवर हातानीं काढलेलें सूत. ॰सोकी(के)ल-सोका-वि. हाताच्या संवयीचा; अंगाखांद्यावर घेण्यास संवकलेला. 'केल कुत्रा हातसोंका ।' 'घडो नेदि तीर्थयात्रा.' -तुगा २९५४. ॰सोडवण-नस्त्री. हातसुटका अर्थ १,२ पहा. ॰सोरा-र्‍या सुरा-र्‍या-पु. कुरड्या इ॰ करण्याचा सांचा. ॰हालवणी-स्त्री. प्रवाशांवरील एक जुना कर (त्यांच्या हात हालवण्याच्या क्रियेबद्दल हा कर असे). हातचा-वि. १ हातानें दिलेला; स्वाधीनचा; हातांतला; हातानें निर्मिलेली, मिळविलेली, दिलेली (वस्तु, काम, उत्पादन इ॰). 'शुद्राचे हातचें पाणी स्नानसंध्येस घेऊं नये.' 'रोग्यास औषध देणें मनुष्याच्या हातचें आहे-आयुष्य घालणें नाहीं.' २ (अंकगणित) पूर्णांकाची बेरीज करतांना बेरजेच्या संख्येंतला अंक ज्या स्थानाचा त्या स्थानीं मिळविण्याकरितां उरलेला अंक. (क्रि॰ येणें; रहाणें; ठेवणें). ३ लवकर हातीं येणारें; अवसानांतील. ४ ताब्यांतील; कबजांतील. म्ह॰ 'हातचें सोडून पळत्याचे पाठीस लागूं नये.' ॰चा पाडणें-१ हातां- तील सोडणें. २ एखाद्यास त्याचे ताब्यांतील वस्तू्स मुकविणें. ॰चा-धड-नीट-वि. नीटनेटकें काम करणारा (लेखक, कारागीर). ॰चा फोड-पु. फार प्रिय माणूस. तळहाताचा फोड पहा. ॰चा मळ-पु. सहज घडणारी गोष्ट. 'सरळ, सोपी आणि बालिकाबोध भाषा कशी वापरावी हें म्हणजे माझ्या हाताचा मळ आहे.' -कीच. ॰चा सुटा-वि. सढळ हाताचा. हातवा-पु. १ (बायकी) गौरीपूजनाचे सणांत हळदीकुंकवानें हात भिजवून जमिनीवर छाप मारणें. २ लग्नांत नवर्‍याच्या मिरवणुकीच्या मागें धरावयाचा कणकेचा दिवा. ३ घोड्याचा खरारा, साफ करण्याचा काथ्याचा पंजा. ४ काडवात मनको. ५ (कर्‍हाड) न्हाणवली बसवितांना, मखर बांधावयाचे ठिकाणीं, कुंकू पाण्यांत भिजवून हातानें पांच उलटे पांच सुलटे ठसें उठविणें. हातळ, हाताळ-ळु-वि. चोरण्याची संवय असलेला; चोर; भामटा. हातळणें, हाताळणें-उक्रि. १ हात लावणें; चोळ- वटणें; चिवडणें, २ हाताळ माणसानें वस्तू् चोरणें. हातळी, हाताळी, हाताळें-स्त्रीन. १ घोड्याचा काथ्या इ॰ चा खरारा. २ भात्याची बोटांत, हातांत अडकवावयाची चामड्याची वादीं. ३ (कर.) भाकरी. हाता-पु. हातांत राहील इतका जिन्नस, पसा (फळें, फुलें इ॰ पांच-सहा इ॰ संख्येचा संच एकेक वेळ हातांत घेऊन बाजूस ठेवतात). हाताखालचा-वि. १ मदतनीस; हाता- खालीं काम करणारा. २ उत्तम परिचयाचा; माहितींतील. ३ हातां- तील; कबज्यामधील; स्वाधीन. ४ दुय्यम; कमी दर्जाचा. हाता- खालीं-क्रिवि. १ सत्तेखालीं; दुय्यम प्रतींत. २ स्वाधीन. ३ जातांजातां; हातासरशीं; सहजगत्या. 'मी आपला घोडा विका वयास नेतोंच आहे, मर्जीं असली तर हाताखालीं तुमचाहि घोडा नेईन आणि विकीन.' हाताचा उदार, मोकळा, सढळ- वि. देणगी इ॰ देण्यांत सढळ. हाताचा कुशल-वि. हस्त कौशल्यांत निपुण, प्रवीण. हाताचा जड-बळकट-थंड-वि. १ चिक्कू; कृपण. म्ह॰ हाताचा जढ आणि बोलून गोड. २ मंद (लेखक). हाताचा जलद-वि. काम करण्यांत चलाख हाताचा फटकळ-वि. फटाफट मारणारा; मारकट. हाताचा बाण-पु. वर्चस्व, पगडा, वजन पाडणारें कृत्य, गोष्ट (क्रि॰ गमावणें; दवडणें; सोडणें). हाताजोगता-वि. १ हातांत बसेल; मावेल; धरतां येईल असा. २ हात पोहोचण्याजोगें. हाता- निराळा-वेगळा-वि. १ पूर्ण; पुरा; सिद्ध केलेला; पुन्हां हात लावण्याची जरूरी राहिली नाहीं असें (काम, धंदा इ॰). 'हा दुर्निवह कोश एकदां हातानिराळा झाला म्हणजे दुसरें काम घेतां येईल.' २ -क्रिवि. एकीकडे; बाजूस. 'कामापुरती भांडीं वहिवाटींत ठेवा वरकड हातानिराळीं ठेवा.' हातापद्धति-स्त्री. दलाल माल घेणार्‍याच्या हातावर रुमाल टाकून गुप्तरीतीनें मालाची किंमत माल घेणार्‍याकडून अजमावतो ती पद्धत. हाताची थट्टा-स्त्री. थट्टेंनें मारणें (थापटी इ॰); चापट देणें. (तोंडी थट्टा नव्हे्). हाता(तो)फळी-स्त्री. गुद्दागुद्दी; मारामारी; कुस्ती; हातझोंबी; धक्काबुक्की. 'मजसीं भिडे हातोफळी ।' -ह १९.१४३. -क्रिवि. पटकन्; चट्दिशी; तत्काळ; हातावर हात मारून. [हात + फळी] हातावरचा संसार-हातावरचें पोट-पुन. मजुरी, कामधंदा करून स्वतःचें कसेंतरी पोट भरणें (क्रि॰ करणें; चालविणें) थोड्या पगाराची, कष्टाची नोकरी करून उदरनिर्वाह. हातावीती- क्रिवि. हातोहात पहा. 'सर्वज्ञ हातावीती पुढें जाती ।' -पुच. हातासन-न. हातवटी. 'अन्योपदेशाचेनि हातासनें ।' -ज्ञा ६.११९. हातासरसां-क्रिवि. त्याच हातानें, प्रकारानें; तसेंच; त्याच बरोबर; चालू कामांत आहे तोंच. 'उष्टी काढतो आहेस तों हातासरशीं भांडीं घास मग हात धू.' हातिणें-अक्रि. मारणें. -मनको. हातिवा-स्त्री. काडवात. 'उजळोनि दिव्य तेजा हातिवा ।' -ज्ञा १६.२३. हातुवसीया-विय एक हात अंतरा- वरील. 'हातवसिया कळागंगा पार्वती ।' -धवळे ३१ हातोणी- स्त्री. (व.) खरकटें पाणी; हातवणी. हातोपा-हातपा पहा. हातोपात-ती-क्रिवि. एका हातांतून दुसर्‍या हातांत. वरचेवर; हातोहात. -ज्ञा १८.१५६. हातोरी-क्रि. (ना.) हातानें; साहा- य्यानें. हातोवा-पु. (महानु.) अंजली; ओंजळ. 'हातोवा केवि आटे अंभोनिधि ।' -भाए २१७. हातोसा-पु. मदत; हातभांर. (क्रि॰ देणें), हातोहात-ती-क्रिवि. १ हातचेहातीं; हातोपात. २ चटकन्; भरदिशीं. (क्रि॰ येणें = मारामारी करणें). 'हिंवांळ्याचे दिवसांत दुपार हातोहात भरतें.' हातोळा-हात- वळा पहा. हातोळी-स्त्री. (व.) लग्न. हात्या-पु. १ पाणर- हाटाचा दांडा. २ घोडा घासण्याची पिशवी; खरारा. हाताळी अर्थ १ पहा. ३ मागाच्या फणीची मूठ. ४ काहिलींतील गूळ खरवड- ण्याचें खुरपें. ५ (कर.) मोठी किल्ली.

दाते शब्दकोश

फूल

न. १ पुष्प; मोहोर. २ ठिणगी (विशे. लोखंडाची); फुलासारखा अग्नीचा आकार (शोभेचे दारूकामांतील). ३ कपडावरील बारीक लव; केंस, तंतु; ज्या कापडांना फूल आहे अशीं कापडें बहु- तेक डबल पन्ह्यांचीं असतात. ४ (अव. प्रयोग) (गाय, घोडा, इ॰ च्या अंगावरील) पांढरे ठिपके. ५ पावसाळ्यांत दगडावर, लांकडावर उगवणारी छत्रीसारख एक वनस्पति. ६ बुबुळावर दिसणारा पांढरा ठिपका; शुक्ल हा एक नेत्ररोग आहे. ७ एक विशिष्ट रानवनस्पति. ८ उदाचें धुरकट; उदाचा जमलेला धूर. ९ जस्ताची लाही. १० सुपारीची चांगली कातरण; चांगली कातरलेली सुपारी. ११ बिबा पेटवून त्याच्या तेलाचा पाडलेला थेंब. १२ ओव्यापासून बनविलेलें एक औषध. १३ अंडाशय; ज्यांत गर्भ तयार होतो तो पोटाचा भाग. (सामा.) गर्भाशय. (क्रि॰ वांकडें पडणें). १४ (कों.) घाण पाण्यांत झालेले चक्राकार किडे. १५ स्फटिक. -शर. १६ (खा.) देशी दारू. १७ घन स्वरूपांतून द्रव रूपांत न जातां वायुरूपांत गेलेला पदार्थ. १८ सोनें, रूपें इ॰ धातूचीं किंवा हस्तिदंत, कापड लाकूड, कागद इ॰ कांची शोभेकरितां केलेली पुष्पा- कृति; फुलासारखी वस्तु, दागिना. [सं.; प्रा. फुल्लें; फूल] म्ह॰ आकाशीचें फूल त्याचें कुणाएवढें खूळ. ॰चल(ळ)णें-योनि, गर्भाशय स्थानभ्रष्ट होणें. ॰झडून जाणें-१ फुलवरा गळणें. २ गालिचा इ॰ ची लव निघून जाणें. (दिव्याला.) ॰देणें-दिवा माल- विणें. (दिवा मालविण्यासाठीं त्यावर फूल टाकीत असें संस्कृत काव्यावरून दिसतें). ॰नाहीं फुलाची पाकळी देणें-आपल्या ऐपतीप्रमाणें यथाशक्ति देणें; (भरपूर योग्य रक्कम, मोबदला देण्याची ऐपत नसल्यामुळें कांहीं थोडा भाग देतांना प्रयोग). ॰बाहेर पडणें-निघणें-(गुप्त गोष्ट) बाहेर फुटणें; जाहीर होणें. ॰येणें- (वांई) उन्हानें तापून जमीन सकस होणें. ॰वाहणें-लग्नांत मुलगी वरास अर्पण करणें; कन्यादान करणें. फुलांत घालून ठेवणें-राखणें-जपणें-अत्यंत काळजीपूर्वक व दक्षतेनें ठेवणें; नेणें. फुलार्‍यास येणें-फूल येणें. फुलें चढविणें-मुंडावळ बांधणें. -बदलापूर १४७ फुलें देणें-(ल.) बाह्यात्कारें मान्यता देणें; सन्मान करणें. 'मसलत ठीक केली, आणि उगेच फुलें द्यावी म्हणोन शिंदे होळकर व सुरजमल जाट यांस विचारणा केली.' -भाब ११६. फुलें माळणें-१ (कु.) पहिल्या गरोदरपणांत स्त्रीची पांचव्या महिन्यांत ओटी भरणें. २ फुलांची माळ करणें. फुलें विकलीं(वेंचलीं) तेथें गोवर्‍या विकणें-जेथें पूर्वीं वैभवानें दिवस घालविले तेथें द्ररिद्री स्थितींत राहणें; वैभवाचा काळ जाऊन दारिद्र्य येणें. सामाशब्द- फूलक(का)री-पु. माळी. ॰कारी-स्त्री. प्रत्येक अक्षरापूर्वीं फूल शब्द जोडून बोलण्याची, लिहिण्याची सांकेतिक भाषा. -वि. ज्यावर फुलाच्या आकृती आहेत असें (कापड, कागद इ॰). ॰कोबी-स्त्री. एक प्रकारची भाजी; कोबीचा एक प्रकार. (इं.) कॉली फ्लॉवर. ॰गुडे-पु. (गो.) हळदीकुंकू, फळफळावळ देण्याचा एक सौभाग्यचिन्हाचा प्रकार; फुलविडे. ॰गोटा-पु. एक प्रकारची रवाळ पिठीसाखर. ॰चोचे- पुअव. तुंबडी लावण्याच्या जागेवर फासण्या मारतात त्या. (क्रि॰ घेणें; देणें; मारणें). ॰छडी-स्त्री. फुलांनीं गुंफिलेली छडी, काठी; फुलांचा छडीदार गुच्छ. फूलजी-पु. गर्वानें ताठलेला, अहंमन्य माणूस (फुलाप्रमाणें फुगणारा, ताठणारा व दिमाख दाखविणारा मनुष्य). फूलझगरें-न. १ गोंवर्‍यांचा विस्तव. २ जळते निखारे. ॰झडी-फूलबाजी; एक प्रकारचें शोभेचें दारूकाम. (ल.) नाजुक स्त्री. 'कंठामध्यें पिक दिसे अशिग तूं रूपसुंदर फुलझडी ।' -होला १०४. [फूल + झडणें (पडणें)] ॰झाड-१ फुलें येणारें झाड; ज्याचें फूल हेंच मुख्य आहे असें (कण्हेर, जास्वंद, मोगरा इ॰) झाड; याच्या उलट फळझाड. २ एक प्रकारचें शोभेचें दारूकाम. [फूल + झाड] ॰धर-पु. माळी. -शर ॰दान-दाणी- नस्त्री. फुलें ठेवावयाचें भांडें. (इं.) फ्लॉंवर पॉट. [फूल + फा. दान्] ॰दावरी-स्त्री. एक फूलझाड व त्याचें फूल. ॰पगडी-स्त्री. १ लहान, सुंदर व भारी किंमतीचें पागोटें. २ (ल.) हलकी, क्षुद्र वस्तु. ॰पगर-न. डोक्यांत घालण्याचा फुलाच्या आकाराचा दागिना. ॰पत्री-स्त्री. (व्यापका) देवाला वाहण्याच्या उपयोगी फुलें, पानें इ॰. ॰पांखरूं-न. चित्रविचित्र पंखाचा फुलांवर उडत असणारा बारीक प्राणी; पतंग याच्या चार अवस्था असतात:-१ अंडें, २ अळी किंवा सुरवंट, ३ कोश, ४ फुलपांखरूं. ह्याच्या पुष्कळ जाती आहेत. ॰पात्र-न. पाणी पिण्याचें भांडें; रामपात्र (हें पितळी असून याचा आकार साधारणतः फुलासारखा असतो). ॰फासणी-ण्या-फूलचोचे पहा. ॰बडवा-पु. (महानु.) फुलें पुरविणारा. 'फुलबडवा ऋतिपति ।' -शिशु ५१. [फूल + सं. बटुक; प्रा. बटुअ; म. बडवा] ॰बरडा-बर्डा-पु. झाडावरून कच्ची काढून शिजवून वाळविलेली एक प्रकारची सुपारी. बरडा पहा. ॰बाग-पुस्त्री. फुलांसाठीं केलेला बाग. [फूल + बाग] ॰बाजी-स्त्री. १ कागदाच्या नळींत शोभेची दारू भरून तयार केलेला दारूकामांतील एक प्रकार. ही पेटविली असतां फुलें गळताना दिसतात. २ (थट्टेनें) तंबाखूची विडी. ॰बाडी-स्त्री. फुलबाग 'करीं धरून सुहृज्जन फुलबाडीमधें शिरली ।' -राला ५५. [फूल + बा-वाडी. सं. पुष्पवाटिका] ॰बासन-वासन-न. उंची जिन्नस कापड मळूं नये म्हणून त्याला गुंडाळलेलें साधें कापड; बासन. ॰बाळ्या-स्त्रीअव. बाळ्यांचा प्रकार ।' -अफला ५५. ॰बिसणा- णी-नी-वि. १ अतिशय नाजुक, कोमल. २ पोशाखी; नुसता ऐट मारणारा; मिजासी; अक्कडबाज; छेलछबेला. 'त्याच्यानें श्रमाचें काम होत नाहीं तो फूलबिसनी आहे.' [फूल + हिं. बिसणी = नाजूक, छबेला] ॰माळी-पु. फुलारी; माळी. ॰मेंगा- पु. षंढ; नपुंसक; हिजडा. ॰वात-स्त्री. फुलाच्या आकाराची कापसाची वात. ही निरांजनांत लावतात. ॰विडे-पुअव. (गो.) हळदीकुंकवाचा समारंभ फुलगुडे पहा.॰सर-पु. फुलांचा हार 'फुलां फुलासरां लेख चढे । द्रुतीं दुजी अंगुळी न पडे ।' -ज्ञा १८.५७. फुलांची जाळी-स्त्री. फुलें गुंफून केलेली डोक्यावर बांधावयाची जाळी. फुलार माळी-पु. माळ्यांची पोटजात; फूलमाळी पहा. फुलारी-पु. माळी, फुलमाळी. 'तों फुलारी आला ते वेळां । तेणें हरिकंठीं घातल्या माळा ।' -ह १९.५९. -स्त्री. १ फुलकरी भाषा, फुलकारी पहा. २ (व.) फुलांची परडी. फुललें-वि. (प्रा.) फुलाचें. फुलोडी-स्त्री. फुलाप्रमाणें नाजूक स्त्री. फूलझडी पहा. 'चाले ठुमकत ती मादवान फुलोडी ।' -प्रला ९३. फुलसाखर-स्त्री. उंसाचा रस आटवून थोडा पातळ राहिला असतां मडक्यांत भरून घडवंचीवर ठेवल्यावर आंतील काकवी गळून वरील भागांत जी पांढरी साखर होते ती. -कृषि ४८२.

दाते शब्दकोश

जमीन

स्त्री. १ भूमी; धरणी; भुई; नद्या, समुद्र आणि वातावरण यांखेरीजची जागा. २ पृथ्वीचा पृष्ठभाग; अंतर; जागा. 'येथून दहा कोस जमीन चाललें म्हणजे समुद्र लागेल.' ३ शेत; लागवडीची जागा. 'राजापूर प्रांतीं सगळा कातळ आहे. जमीन थोडी.' ४ गच्ची; मजल्यावरची भुई अथवा पेंडाची तयार केलेली भुई. ५ वस्त्राच्या बाजूच्या कांठांमधील आंतील अंग; तवा. ६ चित्राची पार्श्वभूमि. ७ (ल.) मूळ आधार. भूई पहा. जमि- नीचे प्रकार:- पड जमीन = नापीक जमीन. वहित जमीन = लागव- डीची जमीन. तणेली जमीन = गवत माजलेली जमीन. करळ-चोपण- खळगट जमीन = कांहीं खोलीवर चुनखडीसारखा टणक थर अस- लेली; हींतून पाणी लवकर झिरपत नाहीं. आगरी जमीन = समुद्र किनारीं, नदीच्या किवा खाडीच्या काठीं असणारी रेताड जमीन. हींत रेतीपेक्षां मातीचा अंश अधिक असल्या- मुळें नारळीच्या बागा करतात. कागदाळी = गोवा, कारवार कडील सुपारी, वेलदोडे यांच्या लागवडीची जमीन; मध्यम काळी = देशाव- रील जमीन. हींत २ ते ४ फूट माती असून खालीं मुरूम असतो. भारी काळी जमीन = मोठया नद्यांच्या खोर्‍यांतील पंधरा-वीस फूट खोल काळी माती असलेली जमीन; कूर्याट जमीन = (कों.) डोंगराच्या उतारावर ठिकठिकाणीं बांध घालून केलेली भात जमीन. केवटा जमीन = मळईच्या वरची काळी अथवा तांबूस जमीन. खाजण- खारी जमीन = खाडी अडवून केलेली; हीस गझणी, कनटूर, सापळ, भाटी इ॰ नावें आहेत. पुळणवट = (कों.) वाळूची किंवा रेताड जमीन हींत नारळाची लागवड होते. हीस रेवे, रेवट, शीट्टा इ॰ नावें आहेत. बांधणरब्बी = (कों.) ओढ्यानाल्यांच्या काठीं बांध घालून केलेली जमीन. बावळ, खरी = (कों.) डोंगराच्या माथ्या- वरील कातळांत भोंवतालाची माती येऊन झालेली. मळखंडी = ह्या जमीनी गाळानें तयार झालेल्या असतात. त्यांचीं खांचरें बनवीत नाहींत. त्या देशांतील जिराईत जमिनीसारख्या मोकळ्या ठेवितात. अशा जमिनीवर ठाणें, कुलाबा जिल्ह्यांत पावसाळी गवत होतें. या प्रकारच्या जमिनींत मानवट म्हणून एक भेद आहे. घाटावरील करळ जमीन व कोंकणांतील मानवट जमीन यांत बरेंच साम्यआहे. मळई = नदीकांठची, गाळानें सांचलेली. वायंगण = (राजा.) पावसाळी भात काढल्यावर रब्बीच्या वेळीं डोंगरांतील पाटाच्या पाण्यावर भाताचें दुसरें पीक काढितां येणारी. वरकस = डोंगराच्या उतारा- वरील जमीन. हिचें भरोड असें दुसरें नांव आहे. हिचे प्रकार दोन:- डोंगरी व माळ पहिलीची मशागत हातांनीं खणून करतात. जंगली भागांत हिच्यांत कुमरा-डाहळी या पद्धतीनें नाचणी, वरी, सावा, खुरासणी तीळ इ॰ पिकें काढितात. दुसरींत बैलाची नांगरट करितां येते. शेळ जमीन = डोंगराच्या खोलगट भागांत असणारी व सतत पाण्याचा झिरपा असणारी. मळी जमीन = दरीच्या पाय- थ्याशीं असणारी जमीन. हीस बैलू, गादळ अशीं दुसरीं नांवें आहेत. पाणथळ जमीन = स्वभाविक खोलगटपणामुळें पावसाळ्यांत पाणी सांचणारी जमीन. हीस कारूगद्दे असें दुसरें नावं आहे. मक्कीजमीन = डोंगराच्या उतरणीवर एकाखालीं एक बांध घालून केलेली जमीन. हीस मॉलॉय, आढी, मॉरोड अशी दुसरीं नावें आहेत. [फा. झमीन्; झेन्द, झेम] (वाप्र.) ॰अस्मान एक होणें- १ सपाटून पाऊस पडणें; धुरळा. धुकें यांनीं दिशा धुंद होणें. २ (ल.) अतिशय गर्विष्ठ होणें. ॰अस्मानाचें अंतर-फार मोठें अंतर, तफावत. ॰उकरणें-अंगठ्यांनी भुई उकरणें (संकटग्रस्त, भीति- ग्रस्त होऊन थोडा टापेनें जमीन उकरतो तसें). ॰ओढणें-जमीन लागवडीस आणणें. ॰धरणें-१ आजारीपणामुळें अंथरुणाला खिळणें. २ रागाला वश होणें. ॰माडी ठेवणें-बागाईत पिकाक- रितां जमीन रिकामी ठेवून बाकीच्यांत एकच पीक काढणें. ॰वाफेला येणें-पेरण्याच्या हंगामाला येणें. ॰सोडणें-१ जमिनींतून वर येणें, दिसणें (पीक). २ (ल.) दुखणें, दारिद्र्य इ॰ तून वर येणें, उठणें. जमिनीवर पाय नसणें-चपळ घोडा, जलद पळणारा, गडबड्या माणूस यांसंबंधीं योजीतात. -स पाठ(अंग) लागणें-वर पडणें-दुखण्यानें किंवा अतिशय दारिद्र्यानें पीडणें. -स पाय लागणें-रोगमुक्त होणें.-स मिळणें-सर्वस्वी नाश होणें (अक्षरशः आणि ल). म्ह॰ जमीन बादशहाची लेक माय- बापाची सामाशब्द-॰उत्पन्न-न १ जमीनीचें उत्पन्न. २ सारा किंवा वसूल. ॰जुमला-पु. खेडेगांवांतील सगळी जमीन, घर, दार, वतन वाडी, कुरणें यांस व्यापक अर्थानें म्हणतात. [फा. झमीन + अर. जुम्ला = सर्व] ॰झाडा-पु. जमीनी, गांव, खेडें, यांची एक विस्तृत याद, यादी. ॰दार-पु. वंशपरंपरेचे सरकारी वतनदार, कामदार; जसें-देशमुख-देशपांड्या, (कोठेंकोठें) पाटील, कुलकर्णी. जमीन- दार, जमीदार-पु. १ (व.) इंग्रजीपूर्वीच्या राज्यांतील सनदी सरंजामी माणसें. २ स्वतःसाठीं मेहनताना म्हणून कांहीं टक्के (शेंकडा दहा टक्के) वसूल कापूस घेऊन बाकीचा वसूल उगवून सरकारांत पाठविणारा; वतनदार. [फा. झमीदार, झमीन्दार] ॰दार व कुळें-पुनअव. शेतीच्या उपयोगाच्या बर्‍याच जमिनी स्वतःच्या मालकीच्या असलेला सधन मनुष्य, त्या जमिनीचे वेगवेगळे गट करून ते जमिनीची लागवड करणार्‍या गरीब लोकांस ठराविक मुदतीपुरते देतो व त्यापासून जमिनीच्या भाड्याबद्दल कर (खंड) घेतो, अशी व्यवहारांत जमिनीचे मालकास जमीनदार व जमीन करणार्‍यास कळ अशी संज्ञा आहे. जमीनदारी-स्त्री. १ जमीन- दाराचा हक्क, हुद्द, धंदा; जमीनखंड इ॰ २ (ल.) लुच्चेगिरी; छक्केपंजे. ॰दारी मत-न (ल.) लबाडीचें, खोटें मत. [फा. ॰दारी जमा-स्त्री. जमीनदाराकडून येणार सरकारसारा, वसूल. ॰दोस्त-वि. १ (कुस्ती) जमीनीला खिळविलेला; लोळविलेला. २ सर्वस्वीं नाश झालेला; फन्ना झालेला. ॰धारा-स्त्री. जमी- नीचा कर; सारा. ॰नीस-नवीस-पु. १ शेत, जमीन, पिकें इत्यादींची पहाणी करून सारा ठरविणारा अधिकारी. २ (क.) दप्तरदार. [फा. जमीन + नवीश] ॰बाब-स्त्री सारा कर. ॰महसूल-पु. जमीनबाब जमीनीपासून कराच्या रूपानें होणारें सरकारी उत्पन्न. ॰माजणी-स्त्री. जमीनीचें क्षेत्र मोजून जमा- बंदी करणें. ॰शिरस्ता-पु. जमिनीची पहाणी करून प्रत लावून ठरविलला सरकारसारा. ' ॰सांड-क्रिवि. (राजा.) जमिनीपासून निराळें (उचललेलें ओझें).

दाते शब्दकोश

कपाल-ळ

न. १ डोक्याची कवटी; डोक्याचें हाड; करटी. २ मडक्याचा अर्धा भाग; खापर; खापराचा तुकडा; श्रौतकर्मांत ज्यावर पुरोडाश भाजतात असे खापराचे तुकडे. हे ८, ११, १२, १३ असून त्यांचा एक गट असतो. ३ भिवया आणि डोक्याचे केंस यामधील भाग; ललाट; भाल. ४ नशीब; प्रारब्ध; ब्रम्हलिखित (ब्रम्हदेव मनुष्याच्या कपाळावर त्याचें भविष्य लिहून ठेवितो या समजुतीवरून). 'कीं एकदांचि फुटलें त्वत्पतिपंचककपाळ पापानें.' -मोसभा ६.४. 'गडे, काय कपाळाला करूं । नाहीं घरांत एक लेंकरूं ।।' -प्रला. ५ (कपाल) चपटें, पातळ हाड; खांद्याचा किंवा मांडीचा फरा. ६ भिक्षापात्र. 'कपाळ झोळी एका स्मशानींचा वास । एक जगन्निवास विश्वंभर ।' -तुगा २०५०. ७ (भूगोलशास्त्र) कोणत्याहि याम्योत्तर वृत्ताच्या पूर्वेंकडील किंवा पश्चिमेकडील अर्धें गोलार्ध. -उद्गा. १ नाहीं, खोटें, अशक्य हा अर्थ पटविण्यासाठीं 'माझें कपाळ ! तुझें कपाळ !' इ॰ उद्गार काढतात. 'असें ऐकतां हासले द्वारपाळ । वदों लागले कृष्णाजीचें कपाळ ! ।' -कचसु ६. २ दुःखदर्शक उद्गार, हाय ! हाय ! 'काय सांगूं, कपाळ !' ॰उठणें, चढणें-डोकें दुखणें; त्रास, कटकट होणें; पीडा होणें. 'भजन करितो सर्व काळ । उठतें कपाळ आमचें ।।' 'उगा करिती कोल्हाळ । माझें उठलें कपाळ ।' -रामदास. ॰काढणें-वैभवास चढणें; नशीब काढणें. 'तो चांगला कपाळ काढील असा मला रंग दिसत आहे.' ॰खुलणें-(हिं.) दैव उदयास येणें. ॰जाणें-दुर्दैवाच्या फेर्‍यांत सांपडणें; भाग्य नाहींसें होणें. ॰टेकणें एखाद्यावर भरंवसा ठेवून, अवलंबून असणें; कपाळटेंक करणें. ॰ठरणें-नशिबांत लिहिल्या- सारखी एखादी गोष्ट घडून येणें; दैवांत असणें. 'पुढें मागें... याही गोष्टींत सुधारकांचा वरचष्मा होऊन या हताश, विचार- शून्य, मत्सरी... लोकांस... मुळूमुळू रडत बसावें लागेल हें यांचें कपाळ ठरलेलेंच.' -आगर. ॰धुवून पाहणें-नशिबीं काय आहे तें पाहणें; नशीब पाहणें; ॰पिटणें-दुःखातिशया- मुळें डोकें जमिनीवर आपटणें. 'एक अवनीं कपाळ आपटिती ।' -ह १८.९६. ॰फुटणें-१ दुर्दैव ओढवणें; दैव प्रतिकूल होणें; सर्वस्वाचा नाश होणें; आपत्ति कोसळणें. 'कपाळीं कुंकूं लागतें आहे म्हणून हसायला लागूं कीं कपाळ फुटलें म्हणून रडत बसूं.' २ वैधव्य येणें. 'मी गरीब कितिही असलें । जरि कपाळ माझें फुटलें ।' -(राजहंस) गोविंदाग्रज. ॰फोडणें-फार शोक, दुःख करणें. 'कुंतल तोडी, कपाळ फोडी, करी थोर आकांत ।' -विक ५३. ॰बडविण-दुःखातिशयामुळें किंवा क्रोधाच्या आवेगानें कपाळ पिटणें; कपाळावर हातानें मारून घेणें. 'कळतां वृत्त क्रोधें घे बहु बडवूनि तो कपाळाला.' -मोवन ४.८३. ॰मोक्ष करणें- १ एखाद्याचा सर्वस्वीं नाश करणें. २ खूप झोडपणें; ठार मारणें. कपाळमोक्ष पहा. -ळाला लावणें-कुंकूं लावणें. (गो.) कपा- ळाक लावप. -ळाची रेघ-रेषा उमटणें, उघडणें-आक- स्मिक रीतीनें सुदैव प्राप्त होणें; एकदम मोठेपणा, श्रीमंती मिळणें. -ळाचें कातडें नेणें-विपत्तींत लोटणें; भाग्यहीन करणें; नुकसान करणें. -ळांत तिडीक उठणें-१ डोकें दुखणें. २ (ल.) त्रासणें; रागावणें. 'आडमुठ्यांच्या घराचें नांव काढलें कीं यशवंतरावांच्या कपाळास तिडीख उठे.' -यशवंतराव खरे. -ळांतले तीन फातर-(गो.) दुर्दैवाचे फेरे. (ढोमले, थोड्यारें-थोड्यारे म्हणून एक प्रकारची मासळी आहे तिच्या डोक्यांत तीन पांढरे दगड असतात यावरून). -ळाला आठ्या घालणें, चढणें-त्रासणें; अति त्रास होणें; मनाविरुद्ध गोष्ट घडणें (त्रास झाला असतां कपाळास आठ्या पडतात यावरून). 'उलट कपाळाला आठ्या घालून म्हटलें-तुला काय त्याची चौकशी ?' -उषःकाल. -ळाला किंवा कपाळावर केस उगवणें-अशक्य गोष्ट घडणें. (पुढें घडेल असें वाटणार्‍या एखाद्या गोष्टीची असंभाव्यता दर्शवितांना हा प्रयोग योजितात. तळ हाताला केंस येणें याप्रमाणें). -ळावर, कपाळाला किंवा कपाळीं हात मारणें, लावणें-१नशी- बास दोष देणें. २ आश्चर्य, दुःख, काळजी प्रदर्शित करणें. 'अशींच तुम्हीं दोघंही सदोदित कपाळाला हात लावून रडत बसत असतां.' -हामुबा ८२. -ळाशीं कपाळ घासणें- १ आपल्याला लाभ होईल या आशेनें एखाद्या भाग्यवानाशीं सहवास करणें; संगतींत राहणें. २ कच्छपीं लागणें; मागें मागें असणें; गुलामवृत्तीनें अनुकरण करणें. -ळास अपकीर्ति- अपयश-दारिद्र्य-आपत्ति येणें-अपमान, गरीबी, दुर्लौ- किक इत्यादि प्राप्त होणें; नांव बद्दु होणें. -ळास, कपाळीं येणें-नशीबीं येणें. 'जरि आलें पतन या कपाळाला ।' -मोआदि १०.८२. -ळीं कांटी घेऊन जाणें-निघून जाणें; चालतें होणें; काळें करणें. -ळीं डाग लागणें-बेअब्रू होणें; फजिती होणें; कलंक लागणें. -ळीं भद्रा असणें-नेहमीं दुर्दैवी असणें; प्रतिकूल ग्रह असल्यामुळें दारिद्र्य येणें. -ळीं लिहिलेलें असणें- नशीबीं असणें; प्राक्तनांत असणें; योग येणें. 'माझ्या कपाळीं आपली सेवा एवढीच लिहिली होती.' -एक १२२. -म्ह॰ १ कपाळभर कुंकूं व हातभर बांगड्या = सुवासिनीपणाची स्थिति; सौभाग्य. २ (ल.) केवळ कुंकवाचा धनि म्हणूनच जी स्त्री. नवर्‍याला मानते अशा स्त्रीच्या बाबतींत योजतात. ॰कटकट-स्त्री. तोच तोच विषय पुन्हां पुन्हां सांगत बसणें; कर्म कटकट. 'आतां मी जातें आणि त्या पोरीजवळ कपाळकटकट करीत बसतें.' -पिंगला नाटक. ॰करटा, करंटा-वि. दुर्दैवी; अभागी; दैवहीन; जना वराच्या कपाळावर आंगठ्याखालीं झांकण्याइतपत पांढरा टिकला असल्यास तें अशुभ, कपाळकरंटें समजतात. 'काळें तोंड करी कपाळकरटे जा, खेप आणी दुजी ।' -आठल्ये. ॰कष्टी-स्त्री. १ अति त्रास; अतिशय श्रम, (मूर्ख किंवा हेकेखोर मनुष्याची समजूत घालण्यासाठीं पडणारा); डोकेफोड; उरस्फोड. २ एकाच गोष्टीचा नाद, हट्ट; एकसारखी बडबड-वटवट; खिसखिस; धरणें धरून केलेली मागणी. कपाळकूट-खटखट पहा. [कपाळ + कष्ट] -वि. थकवा आणणारें; त्रास देणारें (काम); असें काम करणारा. ॰काठी-स्त्री. (विणकाम) वही (ओवी) किंवा चाळा ज्यास पक्कें केलें आहे किंवा बांधलें आहे असें आडवें लांकूड किंवा दांडा. हें मागाच्या वर असतें. ॰कूट-स्त्रीन. १ माथेफोड; शिक- विण्याचे फुकट श्रम. कपाळकष्टी पहा. 'कपाळकुट जाहालें लोकीं बोभाट ऐकिला । सांवळें ।' -भज ८. २ वटवट; बडबड; एक- सारखी विनवणी, याचना. 'एकदां तिनें दाराची कडी लावली कीं कोणी कितीहि कपाळकूट करो, इला कडी काढील तर शपथ !' -इलासुंदरी १५. ॰क्रिया-स्त्री. यति संन्यासी वगैरे मृत झाल्या- वर समाधी देण्यापूर्वीं मस्तकावर शंख आपटून मस्तक फोड- ण्याची क्रिया; कपाळमोक्ष. ॰खटखट-स्त्री. त्रास; उद्वेग कपाळ- कूट पहा. -ळाचा डाग-पु. (कपाळावरील काळा डाग; दुर्लौ- किक; अपकीर्ति; कलंक; (क्रि॰ लागणें, चुकणें, लागू होणें). ॰टेंक-टेंकणी-ढोंकणी-स्त्री. (कपाळ टेंकणें). (ल.) एकाद्या- वर भार; भरंवसा टाकणें; अवलंबून राहाणें; स्वतःच्या आकांक्षा- इच्छापूर्ति दुसर्‍यावर सोंपविणें. ॰दुखी-स्त्री. ज्यांत सतत डोकें दुखत राहतें असा रोग; डोकेदुखी; कपाळशूळ. ॰पट्टा-पु. १ घोड्याची म्होरकी किंवा सरोसरी हिचा एक भाग; कपाळा- वरचा पट्टा. हा मुखपट्ट्याहून निराळा असतो. ॰पट्टी-स्त्री. १ कपाळ; कपाळाचा भाग; ललाटपटल. 'विधात्यानं प्राणि- मात्रांचें अदृष्ट डोळ्यांला न दिसणार्‍या कपाळपट्टीवर लिहून ठेवलं आहे.' -एक ४१. २ कुंचडें, कानटोपी इ॰ चा कपाळा- वरील भाग, पट्टी; टोपीचा कपाळावरील भाग. ३ दरवाज्याच्या चौकटीचें वरचें आडवें लांकूड; गणेशपट्टी. ४ मोटेच्या विहि- रीच्या धावेवरील खांबांवर असलेलें आडवें लांकूड. ५ कोण- त्याहि यंत्ररचनेंतील आडवें बहाल. ६ ब्रह्यलिखित; ब्रह्मदेवानें कपाळीं लिहिलेलें; नशिबी असलेलें. [कपाळ + पट्टी] ॰पांचशेरी- पांसरी-स्त्री. न टळणारी दैवगति; अटळनशीब. नशिबाचा दाखला कशानेंहि बदलत नाहीं असा. कोठेंहि गेलां तरी कपाळ- पांचशेरी बरोबर.' [कपाळ + पांचशेरी = चरितार्थ] ॰पाटी- कपाळपट्टी १ पहा. 'तीची असे सज्ज कपाळपाटी ।' -सारुह ५. ११०. ॰फुटका-वि. कपाळकरंटा; दैवहीन; कमनशिबी; अभागी. [कपाळ + फुटणें] ॰फोड-स्त्री. कपाळकूट; कपाळकष्टी पहा. (हा शब्द फार त्रासदायक कामाला लावितात). ॰फोडा स्त्री. कपाळ. फोडीचें फळ. ॰फोडी-पु. एक वनस्पति; चिरबोटी; फोपेटी. याचें फळ (कपाळफोडा) वार्‍यानें फुगवितां येतें; लहान मुळें हें फळ कपाळावर आपटून वाजवितात (कपाळावर फोडणें-म्हणून कपाळ- फोडी हें नांव). ॰फोड्या-पु. डोईफोड्या; मनाजोगें झालें नाहीं म्हणजे कपाळ फोडून घेणारा; इष्टवस्तु मिळेपर्यंत हट्ट धरून बसणारा (भिकारी); आततायी. -वि. कपाळकूट करणारा; हट्टी; दुराग्रही; अक्रस्ताळ्या; अकांडतांडव करणारा. ॰माळा-उद्गा. कल्पनातीत वाईट अवस्था पाहून आश्चर्य किंवा दुःखदर्शक उद्गार. -स्त्री. रुंडमाळा; शंकराच्या गळ्यांतील नरमुंडांची माळा. 'जटा विभूती उटि चंदनाची । कपाळमाळा प्रित गौतमीची । ... तुजवीण शंभो मज कोण तारी ।' -शिवस्तुति. ॰मोक्ष-पु. १प्रेत जळत असतां कपाळाची कवटी फुटण्याची क्रिया. २ मृत संन्याशाच्या डोक्यावर शंख आपटून मस्तक फोडण्याची क्रिया. ३डोक्यास आकस्मिक होणारा एखाद्या वस्तूचा आघात; डोकें फुटणें. -करणें-ठार मारणें. 'मनोहराला स्वर्गीं पाठवावें म्हणून त्याचा कपाळमोक्ष करण्याचा मी प्रयत्न केला.' -मतिविकार. ४ काशीक्षेत्रांतील पांच मुख्य तीर्थांपैकीं एक तीर्थ. -होणें-(ल.) मरणें; अंत होणें. 'खरी वेळ आली म्हणजे या भीमाच्याच लत्ताप्रहारानें त्या धर्म- भ्रष्टाचा कपाळमोक्ष होणार हें मला पक्कें दिसत आहे.' -कीच. ॰रेखा-रेषा-लेख-स्त्रीपु. नशीब; दैव; विधिलिखित (विधीनें कपाळावर लिहून ठेवलेलें. ॰शूल-सूळ-पु. कपाळदुखी पहा.

दाते शब्दकोश

धातु

पुस्त्री. १ पुरुषाचें रेत; वीर्य; धात. २ सोनें, रुपें, तांबें; लोखंड इ॰ जास्त विशिष्ट गुरुत्वयुक्त, अपारदर्शक व एक प्रकारच्या चकाकीनें युक्त अशा खनिज पदार्थांपैकीं प्रत्येक. ३ पैसा; द्रव्य; धन. 'कोणी धातूचा न करिती स्पर्श ।' -दावि ४०१. 'तेव्हां कळेल कीं अमके महाल अमके धातु ।' -ऐपो २५३. ४ शरीरां- तील कफ, वात, पित्त या तत्त्वांपैकीं प्रत्येक. ५ शरीरांतील रक्त, मज्जा, वसा, मांस, अस्थि मेद व रेत या सात घटकांपैकीं प्रत्येक 'धातूंचें समुद्र उलंडी । मेदाचे पर्वत फोडी । आंतली मज्जा काढी अस्थिगत जे ।' -स्वानुदिन ९.४. ७५. ६ पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश इ॰ पंचमहाभूतांपैकीं प्रत्येक. ७ पंचमहाभूतांच्या स्पर्श, रूप, रस, गंध व तेज या गुणधर्मांपैकीं प्रत्येक. ८ मनशीळ, काव, पारा, गंधक, अभ्रक इ॰ सारखा पदार्थ. ९ (महानु.) गेरू, काव. 'एकें धातुचिआं उटी घेतें ।' -दाव ७७. १० (तत्त्व.) अहंकार. 'या अहंकारासच तैजस, अभिमान, भूतादि, धातु अशीं दुसरीं नांवें आहेत.' -गीर १७२. ११ (संगीत.) चिजेचें निरनिराळे भाग. अवयव ५ अर्थीं पहा. [सं.] (वाप्र.) ॰फुटणें-१ कांहीं रोगामुळें मूत्रविसर्जनादि प्रसंगीं आपोआप गळण्याइतकें वीर्य पातळ होणें. २ वयांत येणें. सामाशब्द- ॰कर्मविद्या-स्त्री. धातूंचें शोधन करण्याची विद्या; शास्त्र; (इं.) मेटॅलर्जी. [धातु + कर्म + विद्या] ॰काम-न. धातू ओतून अगर हातोड्यानें ठोकून त्याच्या निरनिराळ्या सुंदर वस्तू बनविण्याचें कारागिरीचें काम. [धातु + काम] ॰क्रिया-स्त्री. किमया. 'हातींचा परीस टाकोनियां । साधूं जावें धातुक्रिया । सगुण मूर्ति सांडोनियां । निर्गुण वायां कां कथिसी ।' -ह २१.२२० [धातु + क्रिया] ॰जन्यपदार्थ-पु. (रसा.) धातूपासून बनलेला संमिश्र रासायनिक पदार्थ; (इं.) मेटॅलिक् कॉम्पाउंड. -सेपू २.१००. [धातु + सं. जन्य = उत्पन्नहोणारा + पदार्थ] ॰पात-पु. वीर्यस्खलन; रेत गळणें. [सं. धातु + सं. पात = पडणें] ॰पुष्ट ॰पोषण-वि. धातु पुष्ट करणारें, बलवर्धक, पौष्टिक (खाद्य, औषध). [धातु + सं पुष्ट = वाढलेलें; सं. पोषण = वाढणें, पोसणें] ॰पोषण-न. १ (शरीरांतील) सप्त धातूंचें पोषण, वर्धन; बलवर्धन. २ (ल.) खुशामत; तोंडपुजे- पणा; टाळाटाळ, बकवा, गोड गोड भाषण इ॰ करून खोटा उत्साह उत्पन्न करणें, धीर देणें. 'लोभ भय दम्भ मानार्थ । धातुपोषण बोलती बहुत ।' -मुसभा ५.१२४. 'धातुपोषणार्थ समाधान केलें.' -जोरा १७. -वि. बलवर्धक; पौष्टिक. [सं. धातु + पोषण] ॰पोपणाचें बोलणें-पोषणाच्या गोष्टी ॰ पोषण-बोलणें- गोष्ट-भाषण-थापेबाजी; खुशामत, आर्जव इ॰ युक्त बोलणें; गूळखोबरें; गुळगुळथापडी. ॰मय-वि. सोनें, चांदी, तांबें इ॰ सारख्या धातूंचें बनविलेलें. [धातु + सं. मय प्रत्यय] ॰माक्षिक- न. लोखंड व गंधक यांच्या संयोगापासून बनलेलें एक खनिज द्रव्य. [धातु + माक्षिक] ॰मेह-पु. १ मूत्रावाटे धातु, वीर्य गळण्याचा मूत्ररोग. २ वीर्यमिश्रित मूत्र. [सं. धातु = वीर्य + सं. मेह = मूत्र, मूत्ररोग] ॰योग-पु. रसायन. 'येक औषधी प्रयोग । येक देती धातुयोग ।' -दावि ६४. [धातु + सं. योग = जुळणें, जोडणें] ॰राशी-पु. अस्थि रक्त, मांस वगैरे सप्त धातूंचा समुदाय; (ल.) शरीर; देह. 'अथवा एकांतरा कृच्छ्री । चाद्रायणें मासोपवासीं । शोषोनि गा धातुराशी । करिती तपें ।' -ज्ञा १७.३६४. [सं. धातु + राशी = समुदाय] ॰रूप-वि. (रसा.) ज्यांस धातूचें स्वरूप आहे (असें मूल द्रव्य). 'सोयीकरितां एकाकी पदार्थाचे धातूरूप व अधातुरूप असे दोन वर्ग करितात.' -रसापू ६. [सं. धातु + रूप] ॰वाद, धातुर्वाद-पु. १ किमया; सुवर्णविद्या; सोनें करण्याची विद्या. 'नातरी जें धातुवादाही न जोडे । तें लोहींचि पंधरें सांपडे ।' -ज्ञा ६.३४. 'अतर्क्य नेत्रांतरें नेणें । कां धातूवादें सर्वस्व घेणें ।' -एभा २३.२०७. २ अशोधित धातु शुद्ध करणें. -ज्ञाको क १५३. ३ रसायनशास्त्र. [धातु + वाद] ॰वादी, धातुर्वादी-वि. १ किमया करणारा. 'जो सोधोनि भवपारदु । अनादि रससिदध्दु । तो लाधला शब्दवेधु । जेणें धातुर्वादिये ।' -ऋ ५. 'टिपरे धातुर्वादी खोटे ।' -दावि ४७४. २ रसायनशास्त्रज्ञ; खनिजपदार्थांचें, रसायनांचें ज्ञान असणारा. [धातुवाद] ॰विकार-क्षय-पु. धातुक्षीणतेचा, क्षय- रोगाचा एक प्रकार. [सं. धातु + सं. विकार = रोग; क्षय = क्षीण होणें] ॰विद्या-स्त्री. (रसा.) अशुद्ध धातूपासून शुद्ध धातु काढण्याची विद्या. [धातु + विद्या] ॰शलाका-स्त्री. धातूची सळई, कांब. [म. धातु + सं. शलाका = सळई] ॰साम्य-न. कफवातादि शरी- रांतील धातूंची समता, योग्य स्थिति. 'जागणें जरी जाहलें तरी व्हावे ते मितलें । इतुकेनि धातुसाम्य संचलें । असेल सुखें ।' -ज्ञा ६.३५१. [सं. धातु + सं. साम्य = सारखेपणा] ॰स्खलन- न. रेतस्खलन; वीर्यपात. [सं. धातु + सं. स्खलन = गळणें] ॰स्तंभक- वि. वीर्याचें स्तंभन करणारें (औषध इ॰). [सं. धातु + सं. स्तंभक = थांबविणारें] ॰स्पर्श-पु. तांबें, पितळ, सोनें, रुपें इ॰ धातूंचा स्पर्श. (ल) (अकरणरूपीं प्रयोग केल्यास) १ अठरा विश्वे दारिद्रय. 'याच्या घरांत धातुस्पर्श नाहीं.' २ (अकरणरूपीं प्रयोगांत) दागदागिने मुळींच नसणें. 'त्या बायकोच्या अंगास धातुस्पर्श म्हटला तर नाहींच.' [धातु + स्पर्श] ॰क्षय-पु. धातुविकार पहा.

दाते शब्दकोश

गज

पु. हत्ती. [सं.] सामाशब्द-॰कर्णी-वि. हत्तीप्रमाणें कान असलेला. ॰कुंभ-न. हत्तीचें गंडस्थळ. 'स्वर्गातें गजकुंभ भेदुनिन कीं सत्कीर्ति ही धाडिली ।' -वैराग्यशतक, श्लोक ४३. ॰कोंत-पु. १ हत्तीचें गंडस्थळ (?) 'सांबळी झेलितां । गजकोंतीं गुसळितां ।' -शिशु १०४५. २ हत्तीला टोंचण्याचा भाला. [गज + सं. कुंत; म. कोंत = भाला] ॰क्रीडित(करण)-न. (नृत्य) हात अंचित करून कमरेवर ठेवणें, उजवा हात लताहस्त करणें, उजवा पाय दोलित करणें. [सं.] ॰गति-स्त्री. (हत्तीची चाल) गंभीर व रुबाबदार चाल; डौलदार गति, चालणें; ठुमकत जाणें; ऐश्वर्यवान ठमका, तोरा. 'गजगती जगतीप्रति दाविते ।' -वामन, सीतास्वंयवर ५९. 'ठुमकत मुरडत चाले गजगतीं ।' -शांकुतल. -वि. रुबाबदार चालीचा; गजगतीनें विशिष्ट. [सं.] ॰गमा-गामिनी-स्त्री. गज- गतीनें, ऐटीनें चालणारी स्त्री; गजगति स्त्री. [सं.] ॰गौर-री- स्त्री. हत्तीवर ठेवून पूजिलेली पार्वतीची मूर्ति; गजारूढ गौरी. ॰गौरीव्रत-न. १ भाद्रपदांतील स्त्रियांचें एक व्रत; हस्तनक्षत्रीं सूर्यप्रवेश होण्याच्या वेळचें व्रत. यांत सोन्याच्या शंकर, पार्वती व गणपती यांच्या मूर्ती करून त्या सोन्याच्या हत्तीवर बसवून ब्राह्म- णास दान देतात. २ हत्तीवर बसविलेल्या पार्वतीचें पूजन. ॰घंटा- स्त्री. हत्तींचा कळप, समुदाय. 'जैसें न गणिजे पंचाननें । गजघंटांतें ।' -ज्ञा १.९२. [सं. घटा = कळप] ॰घंटा-घांट-स्त्री. १ हत्तीच्या गळ्यांतील घांट. २ (ल.) वाचाट; कर्कश; कजाग स्त्री; (विशेषतः) मोठ्यानें भाषण करणारी स्त्री. ३ गुप्त गोष्ट फोडणारा मनुष्य; ष्याच्या पोटांत कांहीं रहात नाहीं असा. [तुल॰ का. गज्जे = घंटा] ॰चर्म-न. १ हत्तीचें कातडें. २ घोड्याचा एक रोग, यांत अंग वारंवार झाडणें, अंगावर चट्टे पडणें व हत्तीच्या अंगाप्रमाणें अंग खरखरीत होणें हीं लक्षणें होतात. -अश्वप २.२५२. ॰छाया-छायापर्व-स्त्रीन भाद्रपदी अमावस्येला सूर्य व चंद्र हस्तनक्षत्रीं येणें, अशा योगाची पर्वणी; हस्तनक्षत्रीं सूर्य असतां मघानक्षत्रयुक्त त्रयोदशीं येणें या योगासहि गजच्छा यापर्व म्हणतात. ॰झंपा-पु. (ताल) एकताल; याच्या मात्रा पंधरा व विभाग चार असतात. ॰ढाल-ला-ळा-स्त्री. हत्तीवरील मोठा ध्वज; निशाण. 'गजढाला आंदोळती ।' -जै ६७.४८. -पु. निशाणाचा हत्ती. 'लाविला गजढाळा ।' -ऐपो १४. [ढाल = निशाण] ॰दंत-पु. १ (हत्तीचा दांत) हस्तिदंत. २ घोड्याचा हत्ती- सारखा बाहेर आलेला दांत, सुळा; असा घोडा (हा अशुभकारक मानितात). -अश्वप १.१०५. ३ (संयुक्तहस्त) (नृत्य) खांद्या- इतक्या सरळ रेषेंत दोन्ही हातांचीं कोंपरे उंच करणें व डोक्याच्या प्रत्येक बाजूस हाताचीं बोटें एकमेकांस चिकटवून उंच करून त्यांस थोडा खळगा पाडणें. गंजदर-वि. गजेंदर; गजेंद्र पहा. गजनख- न. हत्तीच्या पायाचें नख (हें औषध असतें). ॰नेत्र-त्री-वि. १ हत्तीच्या डोळ्याप्रमाणें डोळे असणारा; बारीक, मिचमिच्या डोळ्यांचा. २ अधु दृष्टिचा; उलट्या बाहुल्या असलेला. ॰पति- पु. १ हत्तींचा धनी; हत्ती बाळगणारा ऐश्वर्यवान माणूस. २ गज- दळाचा सेनापति. ३ (विनोदार्थी) धोतराऐवजीं गजा (पंचा) नेसलेला. ४. 'कां मांदुरी लोकांची घोडा । गजपतिही मानी थोडा ।' -ज्ञा १६.२२५. ५ ओरिसा येथील राजांचे बिरुद. ॰पिंपळी-स्त्री. १ एक औषधी झाड; मिरवेल. २ मिरवेलीवर आलेल्या शेंगा (औषधी). ॰भार-पु. गजदळाचा समावेश असलेलें सैन्य. २ हत्तींचा कळप, झुंड. ॰मस्तकारूढ- वि. १ हत्तीच्या गंडस्थळावर बसलेला. २ (ल.) अतिशय गर्विष्ठ; मगरूर. ॰मुख-न हत्तीचें तोंड. -पु. गणपती देवता. 'नमिला गजमुख ज्याचें सेवुनि मृदु मधुर बोल कानांहीं ।' -मोस्फुटआर्या (नवनीत पृ. २५४). ॰मृत्तिका-स्त्री. (एका विशिष्ट अनुष्ठानांत लागणारी) हत्तीच्या पायाखालची माती; मृत्तिका पहा. ॰राज- पु. मोठा हत्ती; हत्तीच्या बहुमानानें म्हणतात. 'घेतोचि घांस गज- राज कशी बढाई ।।' ॰वदन-पु. गणपती देव. ॰वेल-स्त्री. तांदुळाची एक जात. ॰श्रद्धा-स्त्री. प्रारंभीं मोठा डौल किंवा गाजावाजा दाखविणारें पण परिणामीं अगदींच क्षुद्र ठरणारें काम किंवा त्याचा प्रकार; भपकेदार व विस्तृत पण निरर्थक काम; डोंगर पोखरून उंदीर काढणें. 'हा या प्रयोजनीं हजार रुपये खर्च करील असा डौल दिसतो खरा परंतु शेवटीं गजश्रद्धा झाली नाहीं म्हणजे पुरे !' [गज + श्रद्धा] ॰सिंहासन-न. हत्तीच्या आकाराचें आसन. ॰स्कंधी बसणें-नवीन मिळालेल्या वैभवांत पहिली ओळख विसरणें; गर्वानें फुगणें; आढ्यताखोर होणें. ॰स्नान-न. (हत्तीस स्नान घातल्यावर किंवा त्यानें स्वतः सोंडेनें स्नान केल्यावर तो आपल्या अंगावर पुन्हां धूळ, चिखल उडवितो त्यावरून) निष्फळ प्रयत्न; विपरीत फळ मिळालेला प्रयत्न; बरें होण्याकरितां योजले असतां उलट रोग वाढविणारे उपाय. गंजात लक्ष्मी-स्त्री. १ दाराशीं हत्ती झुलण्याइतकी म्हणजे हत्ती पोसण्याइतकी श्रीमंती; अतोनात श्रीमंती, वैभव. २ (विनोदानें) अतिशय दारीद्र्य; धोतर विकत घेण्यास पैका नसल्यानें गजा (पंचा) विकत घेण्याची पाळी येणें. ३ (विनोदानें) अंगावरील गजकर्ण; नायटे. 'तुला गजांतलक्ष्मी प्राप्त झाली !' [गज + अंत + लक्ष्मी]

दाते शब्दकोश

अठरा

वि. १ एक संख्याविशेष; १८. २ (सांकेतिक) पुराणें (मुख्य पुराणांची संख्या १८ आहे). 'कृष्ण वर्णुनियां श्रेष्ठ । चौघे गर्जताती भाट । अठरा मागध उद्भट । वंशावळी वर्णिती ।।' -एरुस्व ६.७६. तो हा पंढरीचा राणा । पुसा सहा चौं अठरां जणां ।।' -तुगा २५३९. [सं. अष्टादशन्; प्रा. अट्ठदह, अट्ठारस-ह; हिं. अठारह; पं. अठारां; बं. आठार; उ. अठर; गु. अढार; सिं. अडहं]. ॰अखाडे- अखाडा पहा. ॰उपधान्यें- न. अव. सजगुरा, भादली, वरी, नाचणी, बरग, कांग, खपले गहूं, मका, करडई, राजगिरा, मटकी, पावटा, मूग, वाल, कारळा, देवभात, सातू, अंबाडी. (दुसरी गणना) सजगुरा, नाचणी, वरी, मका, मटकी, राजगिरा, शिरस, पांढर- फळी, जिरें, मेथी, वेणुबीज, देवभात, कमलबीज, पाकड, अंबाडी; भेंडीबीज, गोवारी, कुड्याचें बीज, यांमध्ये कोठें कोठें खसखस व पांढरा राळा घालून ही संख्या विसावर नेण्यांत येते. ॰उपपुराणें- उपपुराणें पहा. ॰उपजा(या)ती-स्त्री. अव. अठरापगड जातीं- प्रमाणें ज्या अठरा उपजाती आहेत त्या अशा: भिल्ल, कोळी, मांग, अंत्यज, चांडाळ, पुल्कस, जिनगर, सलतानगर, चर्मक, डोहर (ढोर), भाट, बुरुड, रजक, दांगट, मोचेकरी, खाटिक, लोणारी व कैकाडी. -स्वादि ६.५.३७-३८. ॰कचेरी-स्त्री. (म्है.) राज्य- कारभारांतील सर्व वरिष्ठ खातीं असणारी मोठी कचेरी; सेक्रेटॅरिएट. ॰कारखाने- पु.अव. १ राज्यकारभारांतील खातीं: (अ)उष्टर, खबुतर, जनान, जवाहीर, जामदार, जिकीर, तालीम, तोफ, थट्टी, दफ्तर, दारू, दिवान, नगार, पील, फरास, बंदी, मोदी व शिकार हे अठरा कारखाने (आ) तोप, पील, उष्टर, फरास, शिकार, रथ, जामदार, जवाहीर, जिराईत, नगार, दारू, वैद्य, लकड, इमारती, मुदबख, कुणबिणी, खाजगत, थट्टी. (इ) खजिना, दफ्तर,जामदार, पील, जिराईत, अंबर, फरास, मुदबख, नगार, सरबत, आबदार, शिकार, तालीम, दारू, उष्टर, बकरे, तोप, सराफ. या तीन व आणखीहि कित्येक निरनिराळ्या याद्या सांपडतात. हे सर्व कारखाने सरकारी असून त्यांवर स्वतंत्र अधिकारी असत. सर्वांवर खानगी कारभारी मुख्य असे. 'त्याच्या अठरा कारखान्यांच्या गेल्या कळा । ' -एपो १४२. २ (ल.) मोठ्या संसाराच्या किंवा व्यवहाराच्या शाखा- खातीं. [अठरा + फा. कार्खाना]. ॰खूम- न. लोकांच्या अठरा जाती. सर्व प्रकारचे लोक; अठरापगड जात. 'या गांवांत एक मुकादम नाहीं, अठरा खुमाचे अठरा वेगळाले आहेत;' शिवाय-भाअ १८३४.४७. [अर॰ कौम; फा. खूम = जात,] ॰गुणांचा खंडोबा- पु. (ल.) १ सर्व (दूर्) गुणांनीं भरलेला; लुच्चा किंवा लबाड इसम; अट्टल सोदा. सोळा गुणांच्यावर कडी -जसा नाशिककर हा काशीकरापेक्षां शंभर पटीनें वरचढ तसा हा. २ अक्षयी रोगी; दुखणेकरी; अनेक रोगांनीं- दु:खांनीं व्याप्त. ॰जाती- स्त्री. अव. कुंभार, तेली, कासार, तांबोळी, न्हावी, परीट, कलाल, कोष्टी, झारा (झारेकरी), महार (चांभार), जैन, जती, दुंडे, गुजर, मारवाडी, सोनार, सुतार, हलालखोर (कसाब). -कोको. अठरापगड जाती पहा. ॰टोप(पी)कर- हिंदुस्तानांत आलेले युरोपियन आपल्या निरनिराळ्या देशरिवाजांप्रमाणे टोप्या वापरीत; तेव्हां त्यांना टोपकर असें नांव पडलें. १८ प्रकारचे (युरो- पियन) टोपकर: १ फिरंगी (पोर्तुगीज); २ वलंदेज (हालंड-डच); ३ निविशयान (नार्वेजियन); ४ यप्रेदोर?; ५ ग्रेंग (ग्रीक); ६ रखतार?; ७ लतियान (लाटिन); ८ यहुदिन (ज्यू); ९ इंगरे (इंग्रज); १० फरासीस (फ्रेंच); ११ कसनत्यान (शेटलंडियन केल्टिक?); १२ विनेज (व्हेनेशियन); १३ दिनमार्क (डेन्मार्क; १४ उरुस (आयरिश किंवा रशियन); १५ रुमियान (रुमानियन किंवा रोमन); १६ तलियान (इटालियन); १७ सुवेस (स्विस); १८ प्रेमरयान (पोमेरॅनियन). -भाइ १८३५. दुसरी एक यादी- फिरंगी, इंग्लिश, फ्रान्सीस, सिंध, पावलिस्त, क्रिस्त, ब्रम्हेय, डौन, द्रुप, क्राज, सुस्त, नाग, जर्मिनी, कालील, बांक, चीन, युवरेर, दौंडी. -कोको. यांत नुसते युरोपियन येत नसून हिंदुस्तानाबाहेरील चिनी वगैरेहि लोक येतात 'वडिलांची अठराटोपीकरावर सलाबत आहे.' -विवी. ८.३.५५. ॰तत्वें- न. अव. महान् (बुद्धि), अहं- कार, मन, दहा इंद्रियें आणि पंचतन्मात्रें -गीर १८५. ॰धान्यें- न. मुख्य धान्यें-गहूं, साळ, तूर, जव, जोंधळा, वाटाणा, लाख, चणा, जवस, मसूर, मूग, राळा, तीळ, हरिक, कुळीथ, सावा, उडीद, चवळी. ॰धान्यांचे कडबोळें- न. (भाजणी-अठरा धान्यें भाजून केलेल्या पिठाचा एक खाद्य पदार्थ ). (ल.) १ निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टीचें मिश्रण. २ अनौरस अपत्य; जारज. ३ भिन्न जातींचा संकर; संकरजात; संकर जातींतील व्यक्ति ॰पगडजात-स्त्री. १ तांबट, पाथरवट, लोहार, सुतार, सोनार, कासार, कुंभार, देवलक (गुरव), धनगर, गौळी, लाडवाणी, जैन, कोष्टी, साळी, चितारी, माली, तेली, रंगारी. -स्वादि ६.५.३५-३६. जशी युरोपियानांत टोप्यांची -अठरा टोप- कर-तशी हिंदु लोकांची पगड्या बांधण्याची तऱ्हा जातीजातींत वेगळी आहे; तेव्हा जितक्या जाती तितके पगड्यांचे प्रकार; या- वरून सर्व जाती किंवा जातींचे लोक; एकूणएक लोक. २ अव्य- वस्थित, मिश्र जनसमूह; नाना धर्मांचा जमाव. 'या यात्रेंत अठरापगड जात मिळाली आहे, तेथें सोंवळें काय पुसतां?' [अठरा + पगडी किंवा पगडा = फाशावरील संख्यावाचक चिन्ह] ॰पद्में वानर- पु. अव. तरुणांचा जमाव, टोळी, सैन्य; वानरसेना. (रामाला मदत करणारीं १८ पद्मे वानरें होतीं). ॰पर्वें- न. अव. महाभारताचीं मुख्य प्रकरणें:-आदि, सभा, वन विराट, उद्योग, भीष्म, द्रोण, कर्ण, शल्य, सौप्तिक, स्त्री, शांति, अनुशासन, अश्वमेघ, आश्रमवासी, मौसल, महाप्रस्थानक व स्वर्गारोहण. ॰पर्वें भारत- न. (ल.) मोठी कंटाळवाणी गोष्ट; लांबलचक, जींत अनेक भारुडें व दुःखप्रसंग भरले आहेत असें कथन; चऱ्हाट. ॰पुराणें-पुराणें पहा. ॰बाबू-लबाड किंवा लुच्च्या लोकांची टोळी; आळशी लोकांचा कंपू; अव्यवस्थित लोकांचे मंडळ; बारभाई. (हल्लीं) कारकून वर्ग. बाबू पहा. [बं. हिं. बाबू = राजेश्री; समान्य; आंइं. इंग्रजी लिहिणारा हिंदु कारकून ] ॰भार वनस्पति-स्त्री. पृथ्वीवरील सर्व वृक्ष-वन- स्पति यांचा समुदाय, 'अठराभार वनस्पतींची लेखणी ।' -व्यं ३१. ॰वर्ण-पु. अठरा (पगड) जाती. यांची एक यादी अशी; ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, कुंभार, गवळी, तेली, पांचाल, (सोनार, सुतार, लोहार, तांबट, पाथरवट, हे पांच मिळून) , कोष्टी, रंगारी, शिंपी, न्हावी, पारधी, महार, धनगर, परीट, मांग व चांभार. ॰विसवे (विश्वे)-वि. अतिशय; बहुतेक परिपूर्ण; जास्त प्रमाणाचें. विश्वा, विसवा पहा. [अठरा विसांश; वीस विसावांचा एक रुक्का, अठरा विसवे म्हणजे दोन विसवा कमी इतकें; बहुतेक पूर्ण] ॰दारिद्र्य (दरिद्र)-न. अतिशय गरिबी. 'त्याच्या घरीं अठरा विश्वे दारिद्र आहे.' 'अठराविश्वे दरिद्र पाणी वाहतें.' ॰विश्वे-पापपुण्य- चौकशी-मुर्ख-धर्म-रोग इ॰ वाक्प्रचार.

दाते शब्दकोश

शब्दार्थ

दारिद्र्य

दारिद्र्य dāridrya n S Poverty.

मोल्सवर्थ शब्दकोश

दारिद्र्य n Poverty, indigence.

वझे शब्दकोश

न. गरीबी; निर्धनता; दरिद्रीपणा. 'दारिद्र्यमित्रा वससी शरीरीं ।,माझ्याच तूं मानुनि सौख्य भारी ।' -अन्योक्ति ५ वें पुस्तक. [सं.]

दाते शब्दकोश

दारिद्र्य      

न.       गरिबी; दरिद्रता; निर्धनता. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दारिद्र्य (मगरूरी )

भिकेची भाकरी आणि म्हणे शिळी कां ? होतीं गांठ झोळीची नी इच्छा मात्र पोळीची, भिका-याला ओकारी फार ! गरिबीचा कुर्रा बिलकूल सहन होत नाहीं.

शब्दकौमुदी