आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
दीपस्तंभ
दीपस्तंभ m Light-house.
दीपस्तंभ
पु. पहा : दिवादांडी
संबंधित शब्द
चिराग
पु. दिवा; दिव्यांची रांग ठेवण्याची चौकट. [फा. चिराग् = दिवा] ॰दान-न. १ दीपस्तंभ; दीपमाला. २ शोभे करितां ओळीनें लावलेल्या दिव्यांचा समुदाय. [फा. चिराग् + दान]
चिरागदान, चिराखदान
न. १. दीपस्तंभ; दीपमाला : ‘झुंबराची चिरागदाने पेटविण्यात आली.’ − बहुरूपी १३. २. शोभेकरिता ओळीने लावलेल्या दिव्यांचा समुदाय. [फा.]
दिवादांडी
स्त्री. समुद्रात धोक्याची सूचना दाखविणारा दिवा असलेले उंच घर; दीपगृह; दीपस्तंभ.
दिवादांडी
-स्त्री. समुद्रांत धोक्याची सूचना दाखविणारा दिवा असलेलें उंच घर; दीपगृह; दीपस्तंभ; (इं.) लाईटहाऊस. [दिवा + दांडी]
मनोरा
पु. १ आंतून पोकळ असा उंच स्तंभ (दगड, चुना इ॰चा). २ विहीर इ॰च्या बाजूस बांधलेला दगडी खांब; बुरूज. ३ दीपस्तंभ; दीपमाळ. मिनार पहा. [अर. मनारा]
फरेल, फोलेर
पु. (गो.) दीपस्तंभ; दीपगृह. [पोर्तु. फारोल]
त्रिपुर
पु. १ या नांवाचा एक दैत्य/?/ यास शंकरानें मारलें. २ त्रिपुरासुराचीं तीन नगरें. -शर. 'त्रिगुण त्रिपुरीं वेढिला ।' -ज्ञा १७.२. ३ कार्तिकी पौर्णिमेस देवापुढें दीपमाळेवर अथवा इतरत्र कापूर इ॰ वांचा लावतात तो मोठा दिवा. ४ शिवरात्रीस स्त्रिया शंकरापुढें लावितात त्या वाती, दिवे. ५ देवळासमोर उभा- रलेला दीपस्तंभ, दीपमाळ. [सं.] रारि-पु. त्रिपुराचा नाश करणारा; शंकर. 'नेणों कैं श्रीत्रिपुरारीं । सांगितलें जें ।' -ज्ञा १८.१७५१. [सं. त्रिपुर + अरि = शत्रु] त्रिपुरी पुनव- पौर्णिमा-स्त्री. कार्तिक शुद्ध पौर्णिमा. या दिवशीं देवळांत त्रिपुर लावतात. त्रिपुरोत्सव-न. कार्तिकी पौर्णिमेस देवालयांत त्रिपुर लावून करतात तो दीपोत्सव. [त्रिपुर + उत्सव]
त्रिपुर
पु. १. कार्तिकी पौर्णिमेला देवापुढे दीपमाळेवर किंवा इतरत्र कापूर वगैरेचा लावतात तो मोठा दिवा. २. शिवरात्रीला स्त्रिया शंकरापुढे लावतात त्या वाती, दिवे. ३. देवळासमोर उभारलेला दीपस्तंभ. [सं.]