आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
दु
अशी आडवी रेघ. (क्रि॰ मारणें; ओढणें; करणें). दुलंगी पेंच-पु. कुस्तींतील एक पेंच. दुलडी-स्त्री. स्त्रियांच्या गळ्यांत घालण्याचा दोन सरांचा एक दागिना. 'ताईत सांखळी गळाची दुलडी । बाजुबंद जोडी हातसर ।' तुगा २९५९. 'पेट्यांचें येकदाणें, तदुपरि दुलडी कंठदेशीं तयेच्या ।' -सारुह ६.२३. [दु + लड = सर] दुलंड- वि. दोन्ही पक्षांशीं विश्वासघात, बेइमानी करणारा. दुलंडी- दी-पु. (कों.) एका गांवांत राहून दुसर्या गांवीं शेती करणारा मनुष्य. दुलांकूडपण-न. एकमेकांवर घासलीं जाणारीं दोन लांकडें तीं समुच्चयानें. 'दुलांकुडपण सांडिलें । आणि आगीपणें मांडिलें । तैंचि आगी जालें । इंधन कीं ।' -अमृ ७.३२. दुलाचा, दुला(ली)च्या, दुलंच्या-स्त्रीअव. दुगाण्या; जनावराच्या मागच्या लाथा; दुमच्या. (क्रि॰ झाडणें). दुलावा-वि-व्या-वि. इकडची गोष्ट तिकडे व तिकडची इकडे सांगून कज्जा लावण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा; कळलाव्या; आगलाव्या. [दु + लावणें] दुल्लड-स्त्री. स्त्रियांचें एक दोन पदरी कंठभूषण. '३३ दुल्लडी मोत्यांची.' -वाडसभा १.५७. दुलडी पहा. दुल्लडी-वि. दोन पदरी; दोन सर असलेलें. दुवक्त-वक्तां-वख्तां-क्रिवि. १ सकाळीं व संध्याकाळीं अशा वेळीं. २ (सामा.) दोनदां; दोन वेळां. 'नित्य घरीं दुवख्ता पाणी भरावें, मग जे होणार तें होतच आहे.' -रा ८.२०१. 'संमेलन सकाळ व दुपार असें दुवक्त भरलें होतें.' -केसरी १४.६.३०. पृ. ३. [सं. दु; फा. दू-वक्त्] दुवारणें- उक्रि. दुसारणें पहा. दुवारा-वि. दोनदां सडलेला, कांडून स्वच्छ केलेला (तांदूळ). [दु + वार = वेळ] दुवारेंन. (राजा.) एक- वार कांडलेल्या साळी पाखडल्यानंतर तांदूळ अधिक स्वच्छ व्हावे म्हणून त्यांना पुन्हां कांडतात ती क्रिया. [दुवार] दुवाळ-स्त्री. (विणकाम) एकसंध विणलेले दोन पंचे; दोन पंचांचें कापड; वातिळ, चवाळें पहा. दुवाळणें-अक्रि. (कु.) एकदां सांगितलेली हकीगत पुन्हां सांगताना किंचित् फेरबदल करून सांगणें. [दु + वेळ] दुवेत-न. १ (गाय, म्हैस इ॰ जनावरांची) दुसरी प्रसूति. २ (गाय, म्हैस इ॰ जनावरांस) दुसर्या प्रसूतीच्या वेळीं झालेलें वासरूं; पारडूं. ३ (ल.) (संतापानें म्हणतात) खोडसाळ व द्वाड मूल. [दु + वेत = विणें; प्रसूति] दुवेत-वेती-वि. दोनदां व्यालेली (गाय, म्हैस इ॰). [दु + वेत] दुवेळां-वेळीं-क्रिवि. दोन वेळां; सकाळीं व संध्याकाळीं; दुवख्तां. [दु + वेळ] दुवोत्रा, दुहोत्रा-वि. दुहो- तरा पहा. दुव्वा-पु. गंजिफांतील, पत्त्यांतील दोन ठिपक्यांचें पान. दुशाख-स्त्री. हंड्यांतील दिवे, मेणबत्त्या लावतां येण्यासाठीं एका टोंकास दोन-तीन वांकडी लोखंडी शिंगें लावलेली काठी. प्रसंगविशेषीं मशालीसारखाहि हिचा उपयोग होतो. [दु + शाखा = फांदी, फांटा] दुशाल-दुशालास्त्रीपु. दुहेरी शाल, शालजोडी. 'शालू रंगलाल वर पिवळी दुशाल.' -पला ४.४२. ' मृदुशय्येवर जी पहुडावी ओढुनि तलम दुशाला ।' -विक ५२. [गु. दुशाल] दुशिडी(महागिरी)-पु. दुकाठी, दोन डोलकाठ्यांचें, शिडीचें गल- बत. दुशि(शी)कडे-क्रिवि. १ दोन्ही बाजूंस, अंगांस. २ दोन्ही दिशांनां. दुशिंगी-वि. (गो.) दोन शिंगें असलेलें (जनावर इ॰). [दु + शिंग] दुशोला-पु. जोड शामदान. 'मोमबत्तीचे दुशोला, येकशोला याप्रमाणें जिन्नस ...' -रा ७.१५६. [दु + अर. शुअला = ज्योत] दुसड-स्त्री. (राजा.) तांदूळ स्वच्छ व्हावे म्हणून ते दुसर्यांदा कांडण्याची, सडण्याची क्रिया. [दु + सडणें = कांडणें] दुसड-डा-डी-वि. १ दोनदा कांडून स्वच्छ, निर्मळ केलेले (तांदूळ). २ (वर्षांतून) जिच्यांतून दोन वेळां पीक काढलें जातें अशी (जमीन); वर्षाचें पहिलें पीक काढल्या- नंतर त्याच जिराईत जमिनींत त्याच वर्षीं काढलेलें (दुसरें पीक इ॰ दुसोटा पहा). दुसडी-वि. दोनच आचळ जिला आहेत अशी (बकरी इ॰). [दु + सड = स्तन, आचळ] दुसढ-स्त्री. (प्रां.) (सामा.) (एखादें काम इ॰ काची) पुन्हां केलेली आवृत्ति; दुसारणी. [दु + सडणें] दुसरणी-क्रिवि. पुनः; दुसर्यांदा; दुसर्यानें. दुसरणी, दुसरणें-दुसारणी, दुसारणें पहा. दुसरद-स्त्री. दोन सरहद्दी. दुसरा-पु. दोन सरांचा, दुपदरी हार. 'हा निळ्यांचा दुसरा । या बुद्धी हातु घातला विखारा । कां रत्नें म्हणोनि गारा । वेंची जेंवि ।' -ज्ञा ९.१४८. [दु + सर] दुसा-वि.) खालच्या दाढा आणि दोन दांत आलेला (बैल). दुसांजां-क्रिवि. (राजा.) जेवणाच्या दोन्ही वेळीं; सकाळीं व संध्याकाळीं; दुवेळां. [दु + सांज] दुसाड-डा-डी-वि. दोनदां कांडून स्वच्छ केलेला (तांदूळ); दुसड पहा. दुसार-अ. सोंगट्यांच्या खेळांतील एक पारिभाषिक शब्द. (क्रि॰ उठणें; निजणें; जाणें). दुसारणी- स्त्री. (कों.) एकवार नांगरलेली जमीन दुसर्यांदा नांगरण्याची क्रिया; दुसरण्याची क्रिया. [दुसारणें] दुसारणी-क्रिवि. पुन्हां; दुसर्यांदा; दुसरणी (-क्रिवि.) पहा. दुसारणें-अक्रि. (कों.) कोंबड्यानें पहांटेस दुसर्यांदा आरवणें. दुसारणें-उक्रि. (एखादी गोष्ट) दुसर्यांदा क्रियेचा विषय करणें; तीच गोष्ट पुनः करणें. जसें:- शेत पुन्हा नांगरणें, पुस्तक पुन्हा वाचणें इ॰दुसाला- ली-वि. दोन वर्षांचा; चालू व गतसालाचा. 'दुसाला-वसूल-हिशेब-उत्पन्न इ॰' (हें विशेषण लिंगवचनांनीं अविकृत राहतें) 'परगणे पाटोदें येथील हिशेब सन संमान दुसाला दप्तरीं विल्हे लावला नव्हता-' -वाडबाबा २.८५. 'या गांवाची वहिवाट दुसाला आम्ही केली.' [दु + साल = वर्ष] दुसोटा-पु. (देशांत रूढ) नुकतेंच काढून घेतलेल्या पिकाच्या जमीनींतून लागलीच पुनः घेतलेलें पीक. दुसड पहा. 'दुसोट्याचा-हरभरा-गहूं-जमीन-शेत- वावर. -ट्याची-दुसवट्याची पेरणी-स्त्री. दुसोट्याची पिकाची पेरणी. 'दुसवट्याच्या पेरणी करतां जमिनी वजविल्या पाहिजेत.' -शे ३.५. ट्याचें पीक-न. मागलें पीक. दुहस(ज)बी, दुहजी-वि. १ दोन कान, दोन डोळे इ॰ सर्व मुखावयव दिसायाजोगें व भिंत इ॰ काकडे पृष्ठदेश (मागील बाजू) असलेलें भिंत इ॰ कावर काढलेलें (चित्र); दुचश्मी अर्थ १ पहा. याच्या उलट एकचष्मी, एक डोळी इ॰ २ जें दोन्हीकडे लागू पडतें असें (वाक्य, शब्द इ॰). ३ जें एका रूपांत थोडासा फेरबदल करून दुसर्या रूपांत सहज दाखवितां येईल असें (चित्र, आकृति आंकडा, इ॰) जसें:-थोडासा फेरबदल केल्यास तीन या आंकड्याचा चार हा आंकडा व नऊ या आंकड्याचा सहाचा आंकडा बनतो त्याप्रमाणें. ४ दोन कामीं योजतां येणारा; दोन कामीं उपयोगी पडणारा (चाकर, घोडा, जनावर, जिन्नस इ॰). [दु + अर. हस्ब्] ॰मत-न. वैकल्पिक मत. दुहाता बगली- वि. (मल्लखांब.) मल्लखांबाच्या बगली उडीचा एक प्रकार. मल्लखांबाच्या बाजूचा हात बगलीप्रमाणें बांधून, दुसरा हात बगलीप्रमाणें न लावतां मल्लखांबाच्या पुढच्या अंगास लावावा. नंतर बगलीप्रमाणें अंग उडवून मल्लखांबास पाय लावून साध्या बगलीप्रमाणें पकड बांधावी व हात सोडून उठावें. नंतर पुनः त्याचप्रमाणें दोन हाताची बगल करीत जावें म्हणजे ही उडी होते. -व्यायाम-मे १९२३. [दु + हात + बगली] दुहार-स्त्री. (प्रां.) १ दुसारणी; दुसारण्याची क्रिया. २ दोन ठिकाणीं असलेला, चालविलेला (रोजगार, व्यवहार, शेती इ॰). [दसार] दुहारणी-स्त्री. आवृत्ति; पुनः तेंच काम करणें; दुसारणी. दुहा- रणें-(विप्र.) दुसारणें पहा. दुहांशी-वि. दोन्ही बाजूंना, कडांना नक्षीदार किनार, हांशे लावलेली (शाल इ॰); याच्या उलट चौहाशी. (दु + हाशिया = काठ, किनार] दुहाळ-स्त्री. (कों.) एकसंधि विणलेली दोन पंचांची जोडी, दुवाळ पहा. दुहिरी, दुहेरा-री-वि. १ दुपदरी (वस्त्र इ॰). २ दुप्पट; द्विगुणित (काम, श्रम इ॰). ३ दोहोंनीं बनलेलें. दुहेरी इष्ट- राशि-राशिक-पुन. (गणित.) ज्यांत अज्ञात, अव्यक्त संख्या दोन किंवा दोनदां घ्याव्या लागतात तें इष्टराशिक. [दुहेरी + इष्ट + राशि] दुहिरी उच्चालकपु. कात्री, आडकित्ता, चिमटा, सांडस इ॰ सारखी जोडतरफ (इं.) डबल् लिव्हर्. -यंस्थि ६६. दुहिरी चौकट-स्त्री. बाह्यांनीं दोन चौकटी जोडून केलेली चौकट; जोड चौकट. दुहिरी डागिना-पु. दोन अवयव असलेला डागिना. दुहिरी पा(फा)सोळीचा-वि. शरीरानें जाडाजुडा असलेला; लठ्ठ; गुबगुबीत; मजबूत बांध्याचा; दुहेरी हाडाचा, अंगकाठीचा (मनुष्य). दुहिरी पाहरा-पु. दोन शिपाई मिळून असलेला, दोन शिपायांचा पाहरा, चौकी; जोड पाहरा. दुहिरी वहिवाट- वही-स्त्री. (जमाखर्चात) दुहेरी जमाखर्च. दुहिरी सरकत- स्त्री. (गणित) दुहिरी सरकत वांटणी. दुहिरी हाडाचा-वि. जोड फांसळीचा; चांगल्या अंगाबांध्याचा, हाडपेराचा. दुही- स्त्री. द्वैत; यादवी; दुई; बेकी; द्वंद्व; भांडण. दुहेरा-वि. दुहिरी. दुहेरी-वि. १ दुपदरी. २ दोन प्रकारचा. ॰तारे-पुअव. एकाच केंद्राभोंवतीं किंवा एकमेकाभोंवतीं फिरणारे दोन तारे; (इ.) बाय- नरी स्टार्स्. ॰तारायंत्र-न. तारेच्या दोन्ही टोंकांला एकाच वेळीं संदेश देणारें तारायंत्र. ॰पाट-पु. (पत्त्यांच्या खेळांत खेळ) इस्पिक राणी-चौकट गुलाम किंवा किलवर राणी-बदाम गुलाम या प्रकारचे दोन जाड (दोन बिझिकें). ॰वक्रीभवन-न. प्रकाशकिरणाची भिन्न पदार्थांतून जातांना दोन वेळां होणारी मार्गच्युति. (इं.) डबल रिफ्रॅक्शन. ॰शह-पु. (बुद्धिबळांचा खेळ) बुद्धिबळांच्या खेळांत एखाद्या मोहर्याच्या पगांत असलेलें आपलेंच दुसरें मोहरें खेळून दोन्ही मोहर्यांचा प्रतिपक्षीय राजा- वर एकदम केलेला मारा. दुहोतरा, दुहोत्रा-पु. दरमहा दरशेंकडा दोन टक्के व्याजाचा दर.
अ. अभाव, निकृष्टपणा, दुष्टपणा इ॰ कांचें वाचक दुर् उप सर्गाबद्दल समासांत योजावयाचे मराठी रूप. जसें:-दुकाळ = दुष्काळ; वाईट काळ; दुबळा = बलहीन; दुर्बळ. [सं. दुर्; दु; दुस्; प्रा. दु] दुआळणें-उक्रि. (महानु.) दुखविणें; पिटणें; पीडा देणें. 'तंवं हडपिनी वारिकी दुआळिलीं ।' -शिशु ५५८. [दुआळी] दुआळी-स्त्री. पीडा; क्लेश; दुर्बुद्धि; पीडा करण्याची बुद्धि. -मनको. [दु = वाईट + आळी हेतु, इच्छा ?] दुएत-स्त्री. दुवेत; गर्भपात होणें; दुपावणें; नासवणें; (प्र.) दुवेत पहा. दुकळ-पु. १ दुकाळ; दुष्काळ; महागाई; महर्गता. २ (सामा.) (एखाद्या पदार्थाची) अतिशय दुर्लभता व्हावयाजोगें स्वल्पत्व; उणीव; कमीपणा; अभाव. 'कोंकणांत लांकडास दुकळ नाहीं. 'दुकाळ पहा. [सं. दुस् + काळ; प्रा. दुकाळ] म्ह॰ दुकळांत तेरावा महिना. दुकळणें, दुकळावणें-अक्रि. (क्व.) (निंदार्थीं) (दुष्काळ इ॰ कांमुळें मनुष्य इ॰ कानीं) अन्नाविषयीं हापापणें; लोलुप होणें; बुभुक्षित होणें (अधाशाप्रमाणें खाणारास किंवा घरीं यथेच्छ खावयास असूनही घरोघर जेवणास जाणारास उद्देशून निंदार्थीं प्रयोगांत उपयोग). 'नाहीं दुकळलों अन्ना । परि या मान जना- र्दना ।' -तुगा १०४८. 'असले वाईट आंबे खावयास मी केवळ दुकळावलों नाहीं.' [दुकळ] -ळाचा पाया-पु. १ दुष्काळाचें पूर्वचिन्ह. २ (व्यापक) नाशाचें, दारिद्र्याचें पूर्वललक्षण. दुकळा- वि. (गो.) दुष्काळांतला; दरिद्रीपणानें वागणारा. [दुकळ] दुकाळ-पु. १ महागाई; दुष्काळ. २ (सामा.) (एखाद्या वस्तूची, पदार्थाची) दुर्लभता; अभाव; टंचाई; उणीव. दुकळ दोन्ही अर्थी पहा. [सं. दुष्काल; प्रा. दुकाल] म्ह॰ १ दुकाळीं माळी सुकाळीं साळी = सुकाळाच्या वेळीं साळ्याच्या धंद्याचें महत्त्व वाढतें तर दुकाळांत माळ्याला महत्त्व येतें. २ (कर.) दुकाळांत खाल्लें आणि भांडण्यांत काढलें. दुःकाळ-पु. (महानु.) दुकाळ. 'दारूणसंसारुदुःकाळीं । जेणें परमानंदाची रांकधनी केली ।' -शिशु ५. दुकाळणें-अक्रि. महाग, दुर्लभ, दुर्मिळ होणें. [दुकाळ] दुकाळ्या-वि. दुष्काळग्रस्त; दुकाळानें पीडित झालेला. त्यांस असें जहालें कीं, दुकाळियास मिष्टन्न मिळतें तसें जहालें.' -भाब १८. [दुकाळ]
दु du The form assumed in comp. by दोन Two; also by दुर्. Some such compounds are inserted; but the learner must be prepared to hear in speech hundreds which are omitted.
दु उप.
एक उपसर्गः वाईट. २ दोन.
दु:ख
दु:ख n Pain, sorrow, affliction, unhappiness. A difficulty, disease, trouble. दु:ख मानणें To be pained or grieved about; to be sorry for. दु:ख वेशीस बांधणें To tell a grievance or pain to the whole world. दु:खाचा वाटा उचलणें-घेणें To take part in the pain or trouble of. दु;खावर डाग देणें or फासण्या घालणें or टाकणें To triumph over an unfortunate person; to apply salt to a sure.
डु
डु mf डूब m Copiousness, profusion, exceeding abundance.
डुई स्त्री.
डऊ
डऊ ḍū m A hollowed cocoanut used as a cup or vessel. See डव.
पु. नारळ कोरून आंतील खोबरें काढून टाकून केलेलें पत्र. डव, डहू पहा.
दु:खित
दु:खित p Pained, afflicted, grieved.
दु:साध्य
दु:साध्य a Difficult of performance. Difficult of cure.
दु:सह
दु:सह a Difficult of endurance, intolerable.
दु:शील
दु:शील a Of an evil disposition, illnatured.
दु:शकुन
दु:शकुन m An ill omen.
दु:संग
दु:संग m Evil association or connection; bad company.
दु:स्वभाव
दु:स्वभाव m An evil disposition.
दु:स्वम
दु:स्वम n m An inauspicious or ill-indicating dream. A misgiving.
इंग्रजी दु:ख
न. पोटशूळ; आंत्रपुच्छदाह. (इं.) अपें- डिसायटिस. या रोगाचा शोध अलीकडे लागला, म्हणजे इंग्रजी वैद्यकाचा प्रचार झाल्यानंतर लागला, म्हणून त्यास इंग्रजी दु:ख म्हणतात व त्यावर शस्त्रक्रिया हा एकच उपाय योजतात.
भड(डु)वा
पु. १ कलावंतीण नाचतांना किंवा गातांना मृदंग वाजवून साथ करणारा तिचा नोकर, साजिंदा. २ (ल.) कुटण्या. ३ स्त्री भाड्यानें देणारा. ४ (ग्राम्य.) एक शिवि; अप- शब्द. [सं. भर्याट, भट् (भाटूक = भाड्यानें देणें); हिं. भडुआ; बं भेडुया]
दु
अ. अभाव; निकृष्टपणा; दुष्टपणा इ. चे वाचक. दुर् या उपसर्गाबद्दल समासात योजण्याचे मराठी रूप. [सं. दुर्]
उप. दोन या शब्दाबद्दल समासात पूर्वपदी योजावयाचे रूप. उदा. दुकलमी, दुखंड, दुभाषी, दुतर्फा इ. [सं. द्वि]
डऊ
पु. नारळाच्या करवंटीचे केलेले पात्र. पहा : डव, डहू
दुडदुड, दुडदुडा, दु़डुदुडु
क्रिवि. जवळजवळ आणि अतिजलद पावले टाकीत (चालणे, धावणे); दुडक्या चालीने; पहा : तुरुतुरु [ध्व.; सं. द्रुत]
हुद(दु)क(ग)णें
सक्रि. १ हालविणें; चालविणें; झड- पणें (पंखा, कापड, इ॰). २ जोरानें हांकणें. -अक्रि. १ दुडक्या चालीवर चालणें (घोडा). २ हबके खाणें; बसणें (घोडेस्वारानें). [ध्व.] हुदक(ग)णी-हुदकणें-स्त्री. १ हालचाल; हबका; हुडकी. २ कुरकुर; किरकिर; निकड; टुमणें. (मुलांची).
खांडू(डु)क
न. १ गळूं; गलंड; गांठ. 'खांडुक जाल्यां किडे पडती ।' -दा १.१०.५२. २ फुटलेलें गळूं; वाहणारें क्षत. ३ हाडावरील उटंगळ; उठाणूं. ४ खवडा; डोईंतील फोड. [सं. खंड किंवा कंडू?] खांडु(ड)केला-वि. खांडकांनी ग्रस्त, व्याप्त.
लडदू(दु)-धू
वि. १ धटिंगण; धट्टाकट्टा; भक्कम. २ गब- दूल. ३ निरुद्योगी; रिकामा. म्ह॰ (क.) येबी लडदू जाबी लडदू = रिकाम्या माणसाची येजा; येणें जाणें.
मांदू(दु)स सी-सें
स्त्री. १ तिजोरी; संदूक; मोठी पेटी. 'पूर्वी भार्गवदत्त जें बहुबरें भारी घरीं मांदुसें ।' -आसी ५. २ (काव्य) सामान्यताः पेटी. 'ज्ञानरत्नाची मांदुस ।' -विपू १.६४. ३ -पु. पिंजरा. ४ (चांभारी) मांदे व एरंड्या ठेवण्याचा लाकडी ठोकळा. [सं. मंजूषा]
मुडद(दु)शी
स्त्री. (गो.) एक लहान जातीचा मासा.
नांद(दु)रुकी-खी, नांदरूक-ख
स्त्री. एक मोठें वाढणारें झाड. पानें पिंपरीच्या पानासारखीं; याची छाया फार दाट असते. [सं. नंदिवृक्ष]
सौंद(दु)री
स्त्री. (व.) मीठ. 'अगोदर सौंदरी वाढा.' [सिंधु]
संबंधित शब्द
संसार
पु. १. जग; विश्व; सृष्टि; इहलोक; संसृति; मानवी जीवित, अस्तित्व; जगाची स्थिति. 'संसार म्हणजे डोळ्यापुढें दिसणारें सर्व जग किंवा दृश्य सृष्टि असा अर्थ आहे.' -गीर ८०१. 'शिवशिव कदनाची विवसी संसारीं । कवणु नेघे ।' -भाए २२९. २ प्रपंच; व्यवहार; कुटुंबपोषणादि कार्यं; गृहकृत्य; घरकाम. ३ विस्तार; पसारा. 'नवल ऐके धनुर्धरा । कैसा वासनेचा संसारा । देहा होऊं नेदी उजगरा । परी सुखदु:खें भोगी ।' -ज्ञा ५.५४. [सं. सम् + सृ] संसार उभारणें-गृहस्थाश्रम चालविणें; गृह- व्यवस्था पाहणें. 'मुक्ताबाईनें एखाद्याचा संसार नसता का उभा- रला.' -नामना २१. संसार करणें-१ गृहकृत्य करणें; घरां- तील सर्व कामधाम, व्यवहार पाहणें. २ (बे.) ताडाचें पान कापून ताडी मोघ्यांत पाडणें. संसार मांडणें-संसारास सुरवात करणें. संसारास-संसारावर पाणी घालणें-संसाराचा नाश करणें. 'म्हणती आतां संसारा घालूं पाणी । परी अन्न देऊं चक्रपाणी ।' -ह १६.११६. संसार वृथा करणें, जाणें-संसाराचा नाश करणें. 'तुकयाची ज्येष्ठ कांता । मेली अन्न करितां । येणें लज्जा वाटे चित्ता । संसार वृथा गेला कीं ।' संसार हांकणें-संसार चाल- विणें; प्रपंच योग्य रीतीनें करणें. संसाराची मात्रा करणें- सामाशब्द- ॰ओझें-न. प्रपंचाचा भार, जबाबदारी; संसाराची काळजी. 'म्हणे संसारओझें माझें शिरीं । कैसी परी होईल ।' ॰कष्ट-पुअव. प्रपंचातील दु:खें, त्रास, मेहनत, जबाबदारी. ॰चक्र-न. प्रपंचाचा गाडा; संसारयात्रा; नेहमीं संसारांत येणारे निरनिराळे प्रसंग, अनुभव वगैरे. ॰ताप -दु:ख -यातना- पुन. प्रपंचांतील दु:खें, त्रास, कष्ट, श्रम. 'आधींच संसार तापें संतप्त । तो हा सत्समागमें निवत ।'. ॰धंदा-पु. प्रपंचांतील कामें, व्यवहार; उद्योग. 'जेणें उकले आपसा संसारधंदा.' ॰भान-न. प्रपंचांतील लक्ष्य; ऐहिक गोष्टींबद्दल वाटणारा आपलेपणा, प्रेम, आदर. ॰भार-पु. संसाराचें ओझें. ॰भ्रम-पु. संसारांतील माया. पाश; प्रापंचिक गुंतागुंत; ऐहिक गोष्टींसंबंधीं वाटणारें प्रेम व त्यांत गुरफटून राहण्याची बुद्धि. ॰माया-स्त्री. प्रापंचिक गोष्टींसंबंधीं वाटणारा भ्रम; ऐहिक गोष्टींत असणारी क्षणभंगुरता, क्षणिकत्व, परंतु त्यांचेबद्दल सत्त्याचा होणारा भास. 'संसारमाया सांडोनि । दशरथ पावला स्वर्गभुवनीं ।' -रावि ११.१४५. ॰मार्ग-पु. जग; विश्व; सृष्टि; ऐहिक व्यापार, व्यवहार. याच्या उलट पर- मार्थमार्ग. ॰यात्रा-स्त्री. प्रपंचाचा रोजचा क्रम; ऐहिक दिनचर्या; संसारांतील अनेक वरेवाईट प्रसंग; आयुष्यक्रम. ॰रहाटी-स्त्री. जगाचा क्रम; विश्वांत चाललेल्या अनेक घडामोडी; जीवितचक्र. ॰सागर-पु. प्रपंचाचा, सृष्टीचा अफाट विस्तार. ॰सात-स्त्री. संसाररूपी बाजार; प्रपंचाचा बाजार. 'तेवि संसारसातेसी येऊन । जो न करील ईश्वरभजन ।' -महि कथा १६.५. ॰साक्षी-वि. ॰सुख-नन. प्रपंचातील आनंद, सुखोपभोग; ऐहिक सुखोपभोग. संसाराचा गाडा-पु. संसारचक्र; प्रपंच, व्यवहार; जगांतील दिनक्रम. संसाराचें जोखड-न. प्रपंचाची जबाबदारी; संसाराचें ओझें. संसारिक-वि. १ संसारांत दक्ष; आपले रोजचे व्यवहार योग्य तऱ्हेनें करणारा; व्यवहारज्ञ; प्रापंचिक. २ संसारा- संबंधीं; संसारांतील. 'जंव तुझें रूप नोहे दिठे । तंव जगासि संसा- रिक गोमटें ।' -ज्ञा ११.३२१. 'संसारिक हे तुटेना । -दा २. ५.३५. ३ संसारात, प्रपंचांत गढलेला; आपल्या आयुष्यांतील गोष्टींचाच केवळ विचार करणारा; संसारी. 'मागें बोलिला संसा- रिक । त्यागेंविण नव्हे कीं साधक ।' -दा ५.१०.१. संसा- रिया-पु. संसारी; प्रापंचिक. 'आत्मा गुणसंगें । संसारिया ।' -ज्ञा १४.३३. संसारी-वि. १ प्रापंचिक; संसारांत गढलेला; गृहस्थाश्रमी; स्त्रीपुत्र वगैरे असलेला. २ ऐहिक; जगासंबंधी.
दुःख
शरीर-पीडा, व्यथा, शोक, मनस्ताप, अंतःकरणव्यथा, सुखाचा अंत, आंतरिक दुःख, मनाचा ताप, सुखाचें बाष्पीभवन, व्यस्तप्रमाणांत आनंद, दारुण यमयातना, आंतल्या आंत तडफडाट, अश्रूत भिजलेला ऐष-आराम, चीर गेलेले सुख, सुखास खग्रास ग्रहण, मरणप्राय - अपरंपार-डोंगराएवढे-असह्य -तीव्र दुःख, दुःखाचा कडेलोट, दुमजली खेद, अधिक क्षेत्रफळाची पीडा, सुखसंवेदनांची टिकटिक बंद पडली, ही अधिक अश्वशक्तीची खेदभावना, दुःख हाच जीवनाचा गुरुत्वमध्य ठरे, जगून जे प्राप्त केलें त्याचे मोजपात्र दु:खच होतें, ताठा फार वाढूं नये म्हणून दुःख ही संरक्षक झडप सतत काम करीत असते, स्वभावजन्य दुःखाला उपाय नाहीं.
दुःखांत कोण कुणाला पुसतो ? अंधारांत सावलीसुद्धां नाहींशी होते, दुःख चक्रवाढ व्याजानें वाढत जाते, विभागलें कीं दुःखाची आंच कमी होते, जगतांत सर्व सुखी असा कोण आहे ? दु:ख नेहमीं पर्वताएवढें असतें हाच संसाराचा नियम, जग हें काडेचिराइताचा एक भला मोठा काढा आहे, हे दिवस फरसे सुखाचे गेले नाहीत.
दुमाला
दुमाला m The hinder or back part. Fig. Supporting, seconding, backing. दु?B धरणें, धरुन असणें &c. To resort to or cling to for protection or support. दु?B सोडणें To let go one's hold of or upon. दुमाल्यावर असणें To be at the back of. दुमाल्यावर पाटविणें To send in pursuit of.
वि. १ दोन मालक असणारा गांव, वतन. २ जमीन- महसुलासंबंधी सरकारच्या हक्कापुरता कोणा मनुष्यास सर्वांशीं अगर अंशतः दिलेला हक्क. 'पुणें तालुक्यांत दुमालेगांव पंचवीस आणि खालसा पौंणशे.' ३ सरकारखालसातीकडे नसून लोकांकडे पर- भारें माफीनें चालणारा गांव, जमीन इ॰. याचे इनाम, सरंजाम, इसाफत, अग्रहार, पासोडी, हाडवळा, खैरात, बालपरवर्षी, नान- परवर्षी, सरदेशमुखी, चौथाई, जाहागिर, मोकसा, साहोत्रा, वेचणी, गिराणी, पसाइत, चाकराइत, वजीफा, गिरास, सौदिया, वांटा इ॰ बावीस प्रकार आहेत. -इनाम २५. ४ स्वाधीन; हस्तगत. 'मौजे मजकूर हा गांव यांचे दुमाला करून... ...' -वाडसमा २९५. ५ पूर्वींच्या मालकाचा निर्वंश झाल्यावर सर- कारजमा होणारें (इनाम) [दु = दोन + माल = मत्ता; फा. दुबाल्] दुमाला, दुबाला, दुमाळा-ळे-क्रिवि. ताब्यांत. 'पैकीं नीम चावर आपले दुमाला केले आहे.' -शिवचरित्र साहित्य २.१६३. 'कुलबाब, कुलकानू दुबाला असे' -शिवचरित्र साहित्य २.१६३. दुमाल अम्मल-पु. दोन सरकारांचा अम्मल; सरकारी व जहा- गिरी असे दोन अम्मल; दोन मालकांचा ताबा. [दुमाला + अम्मल] दुमाल झाडा-पु. १ दुमाले गांवांची यादी. २ दुमाल जमिनींच्या मालकीसंबंधीं सरकारी चौकशी. दुमाल- दार-पु. दुमाले गांवाच्या (दोन) मालकांपैकीं प्रत्येक; इनाम- दार. 'माजगांव तर्फ सातारा हा गांव दुमालदारखेरीजकरून बाकी सुभाकडील अम्मल बेगमीबद्दल पेस्तर सालापासून लावून दिला.' -वाडसमा १.३६. दुमाल पत्र-न. नवीन अम्मलदार आला असतां इनामदारास जुन्या अंमलदारापासून आपल्या इनामांचें इनाम पत्र लिहून दाखल्यादाखल आणावें लागत असे तें. -भाअ १८३२. दुमाले(ल)गांव-पुन. १ दोन मालकांच्या अमला- खालचा गांव. २ पुढें सरकारजमा होणारा गांव; (सामा.) खालसा गांव. [दुमाला + गांव] दुमाले(ल)पत्र-न. हुंडी बरो- बर खुलाशाबाबत दिलेलें पत्र; जोडलेलें पत्र. [दुमाला + पत्र]
हेंगड-डा, हेंगडतिफड, हेंगाड-डा
वि. १ ओबड- धोबड; चमत्कारिक; वेडेविद्रें; कर्णकटु (भाषण, कामधंदा, बोली). २ राकट; कठोर; विद्रुप; विशोभितच रानटी; राक्षसी (रीत, वहि वाट, वर्तणूक, स्वरूप, अंग). ३ मूर्ख; रानवट; अडाणी (माणूस) ४ हट्टी; दुराग्रही. [का. हेंगसू = स्त्री] म्ह॰ हेंगाडा कुणबी दुणा राबे धन्याला खर्च फार लागे. हेंगडतट्टू-पु. हेंगाड-डा माणूस हेंगड(डु)मेंगड(डु), हेंगडा मेंगडा-स्त्रीन. १ किरकोळ; क्षुल्लक माल, वस्तु. २ बडबडच गप्पा. -वि. १ हलका; क्षुद्र; घाणेरडा; मळकटच क्षुल्लक. (वस्तु, प्राणी, दागिना). २ अडाणी; रानटी; खेडवळ; राकट; ओबडधोवड. ३ विसंगत; असंबद्ध (भाषण). -क्रिवि विसंगतपणें.
पिड(ढ)णें
उक्रि. १ दु:ख देणें; पीडा करणें; त्रास देणें. २ दु:खी असणें; त्रासांत असणें. [सं. पीडनम्]
सक्त, सख्त, सकत
वि. कठिण; मजबूत; कणखर; कठोर; कडक; जुलमी कष्टप्रद; दु:खकारक. 'पोलाद इतकें सक्त करतां येतें कीं...' -पदाव १२१ 'ऐशा तीन सबबेनें बायका आपला दील सक्त करून जातात' -ऐटि २३३. [अर. सख्त्] ॰गो- वि. बोलण्यांत निष्ठुर. ॰गोई-स्त्री. निष्ठुरपणा. ॰पाठ्याळ- वि. १ कणखर; मजबूत; सशक्त (पशु). २ (ल.) सोशीक; कष्टाळू; काबाडकष्ट करणारा. 'तुझ्या घरांत बायको सक्तपाठ्याळ आहे म्हणून तुला वेळेवर भाकर मिळते.' ॰भीड-स्त्री. विशेष आग्रहाची विनंति; निकडीची मध्यस्थी. (क्रि॰ घालणें). 'तुम्ही सक्त भीड घातली म्हणून माझें काम झालें.' ॰मजुरी-स्त्री. १ कष्टाचें काम; मेहनतीचें काम; तुरुंगांत कैद्याकडून करून घ्यावयाचें श्रमाचें काम. २ कैद; असें काम करावयाची शिक्षा. ॰रबद दली-स्त्री. निकडीची, आग्रहाची, जरूरीची विनंति, मध्यस्थी. सक्ती-स्त्री. १ जबरी; जुलूम; कष्ट; दु:ख. २ कडकपणा; कठो- रता; निष्ठुरता.
सल
नपु. १. शल्य; शस्त्रादिकाचें टोंक; कांटा; मांसांत रुतलेला अणकुचीदार पदार्थ; कूस. 'सल सिलका आणि सराटें ।' -दा ३.७.४. २ पोटांत न वाढतां राहिलेला गर्भ; गर्भाशयांत राहिलेला मृत गर्भ. 'सल आडवें गर्भपात ।' -दा ३.६.४७. ३ (ल.) मनांत खुपत असलेलें अपमान वगैरेचें दु:ख; दु:खकारक स्मृति; त्रासदायक गोष्ट; पीडाकारक निमित्त. 'सलें गेलीं चित्तीं भय दशमुखाच्याहि धसलें ।' -मोरामायणें १.४१०. ४ वठलेलें झाड, शाखा. 'विसर विजती सलें । सलतीं तियें ।' -ज्ञा १६.१४६. ५ बीं पेरलें असतां उगवलेला कोंवळा अंकुर हा विषारी असतो व जनावरानें खाल्ला असतां त्यास रोग होतो. किरळ पहा. 'सल खाऊन गुरें मेली.' ६ साल; त्वचा. 'कलि- युगांत कोरडीं । चहुंयुगांचीं सलें सांडी ।' ज्ञा १५.१२९. ७ -स्त्री. (कों.) उसण; सलक. [सं. शल्य; प्रा. साल] सल चढणें-विषाद वाटणें. सलीं लागणें-पोटांत सल वाढल्या- मुळें झिजून आजारी पडणें. सलणें-अक्रि. १ बोचणें; टोंचणें; खुपणें. 'आंगीं देहाची लुती जिती । जेणें आली तें चित्तीं । सलेना जया ।' -ज्ञा १३.७३१. २ (ल.) न खपणें; सहन न होणें; डोळ्यांत खुपणें; मनाला टोंचून, लागून राहणें; रुखरुख लागणें (केलेल्या चुकीची, दोषाची). 'आचरणें खोटीं । अपराधाची केलीं सलताही पोटीं ।' -तुगा १८८५.
संकष्ट
न. (अप.) संकट पहा. अडचण; विघ्न. 'त्राहे त्राहे चक्रपाणी । संकष्ट हरी समर्था ।' मुविराट ३.२६. -वि. १ बिकट; श्रमाचें; अडचणीचें; पीडादायक; दु:खदायक (काम). २ कष्टाळू; सोशिक; श्रमी (मनुष्य). ३ त्रासलेला; अडचणींत असलेला; दु:खी. ॰चतुर्थी-संकष्टी चौथ, संकष्टी- स्त्री. प्रत्येक महिन्यांतील बद्य चतुर्थी. या दिवशीं विनायकाचें व्रत करावयाचें असतें. शुद्ध चतुर्थीस विनायकी चतुर्थी म्हणतात.
सर्व
वि. १. सगळा; सगळे भाग मिळून; सारी रास, संख्या, प्रमाण. २ प्रत्येकजण मिळून; सगळा गट; जमाव; समूह. ३ सगळा काल, अवधि, विस्तार वगैरे. ४ पूर्ण; संपूर्ण; अवघा; पुरता; परिपूर्ण; सबंध; न वगळतां पूर्णांश. [सं. सर्; प्रा. सब्ब; सिं. सभु; पं. सभ; हि. सब. सं. षर्द् = जाणे] ॰कर्ता-वि. सगळें करणारा; उत्पत्तिकर्ता; सगळें बनविणारा; अवघ्याची रचना करणारा. ॰काल-क्रिवि. १ सगळा वेळभर; सर्व अवधि संपेपर्यंत; सर्व वेळीं; विवक्षित सगळा कालभर. २ सतत; नेहमीं; सर्वदा; सदोदित. ॰कालीन-वि. शाश्वत; सर्वकाल टिकणारें. ॰खपी-वि. १ ज्याच्या ठिकाणीं कोणत्याहि वस्तूचा उपयोगी अथवा निरुपयोगी, अवश्य अथवा अनवश्यक अशा सर्व वस्तूंचा खप होतो असा. २ ज्याला कोणतीहि, कसलीहि वस्तु चालते असा. ३ सर्वांकरितां खपणारा, काम करणारा; कोणा- साठींहि परिश्रम करण्यास तयार असा. ॰गत-वि. सर्वव्यापक; सर्वव्यापी; सर्व ठिकाणीं ज्याचें अस्तित्व, वास्तव्य आहे असा. 'चैतन्य आहे सर्वगत । तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ।' -ज्ञा २. १२६. ॰गामी-वि. सर्वव्यापक; सर्वत्र ज्याचें गमन आहे असा; सगळीकडे जाणारा. ॰गुणसंपन्न-वि. सगळ्या गुणांनीं युक्त; सर्व तऱ्हेनें पूर्ण; सर्व चांगल्या गुणांचें अधिष्ठान. ॰जनीन-वि. सार्वजनिक; सर्व लोकांसंबंधी. ॰जाण-वि. सर्वज्ञ; सगळें ज्ञान असणारा; सर्व जाणणारा. 'काय पूजातें मी नेणें । जाणावें जी सर्व जाणें ।' -तुगा ११५८. ॰जित् वि. १ सर्व जिंकणारा; सर्वांचें दमन करणारा; सर्वांस ताब्यांत ठेवाणारा. २ सर्वांहून श्रेष्ठ; वरिष्ठ. ॰त:-क्रिवि. १ सर्व दिशांनीं; सगळीकडे; सर्व बाजूंनीं; दशदिशां. २ सर्वत्र; पूर्णपणें; विश्वभर. ॰तंत्रस्वतंत्र-वि. अनिर्बंध; स्वैर. 'अशा अघांत्री व सर्व- तंत्रस्वतंत्र लोकांनीं हिंदु महासभेच्या निर्णयाकडे पाहून नाकें मुरडावीं यांत आश्चर्य नाहीं.' -सांस २.१६४. ॰तीर्थ-पु. समुद्र; सागर. 'गंगा न सांडितां जैसा । सर्वतार्थ सहवासा । वरपडा जाला ।' -ज्ञा १८.९०९. ॰तोभद्र-पुन. १ देवता स्थापनेसाठीं एक विशिष्ट मंडल काढतात तें. २ चारी दिशांस द्वारें असलेला प्रासाद, राजवाडा, मंदिर. 'रेखिलीं परिकरें । सपुरें सर्वतो- भद्रें ।'-ऋ ७३. ३ सैन्यरचनेचा एक प्रकार; एक विशिष्ट व्यूह. ४ अनेक प्रश्नांस एकच उत्तर योग्य असतें असें कोंडें, कूट. ५ एक प्रकारचें चित्रकाव्य; कोणत्याहि दिशेनें वाचलें तरी एकच प्रकारचा श्लोक व अर्थ येईल अशी रचना. ॰तोमुखपु. एक सोम- याग, यज्ञ. -वि. सर्व बाजूंनीं तोंड असलेला; कोणत्याहि वाजूनें पाहिलें तरी समोर तोंड येईल असा (देवता, पाणी, आकाश, गोल). ॰त्र-क्रिवि. सर्व ठिकाणीं, स्थळीं, जागीं; सगळीकडे; सर्व दिशांस. 'ईश्वर सर्वत्र आहे.' -वि प्रत्येक; सगळे; सर्व. 'सर्वत्रांस दक्षिणा दिली.' ॰था-क्रिवि. सर्व बाजूंनीं; सर्व मार्गांनीं, दिशांनीं; सर्व उपायांनीं; पूर्णपणें; मुळींच; नि:शेष; निश्चित; खचित; केव्हांहि. 'मज आपणपें सर्वथा नाहीं । मन बुद्धिठायीं । स्थिर नोहे ।' -ज्ञा १.१९५. 'मना सर्वथा पापबुद्धि नको रे ।' -राम ॰थैव-क्रिवि. केव्हांहि; सर्व प्रकारें, दिशांनीं, बाजूंनीं. ॰दर्शी-द्रष्टा-वि. सर्वसाक्षी; सर्व पाहणारा; ज्यास सगळें दिसतें असा. ॰दा-क्रिवि. नेहमीं; सतत; सर्वकाळीं. ॰दु:खक्षय-पु. सर्व दु:खांपासून मुत्त्कता; मोक्ष. ॰धन-न. (गणित) श्रेढींतील सर्व पदांची बेरीज. -छअं १७३. ॰नाम-न. (व्या.) स्वत: विशिष्टार्थद्योतक नसतां पूर्वापरसंबंधानें कोणत्याहि नामाबद्दल योजतां येतो असा शव्द. ॰नियंता-वि. सर्वांवर ताबा चालविणारा; सर्वांचें नियमन करणारा. ॰न्यास-पु. सर्वसंगपरित्याग; सर्वधन, कुटुंब, आप्तेष्ट, संसार वगैरे सर्व गोष्टी सोडून देणें; सर्व ऐहिक गोष्टी टाकून देणें, त्यांपासून अलिप्तता, मुक्तता. ॰पाक-पु. खीर; क्षीर. ॰पित्री अमावास्या-स्त्री. भाद्रपद महिन्यांतील अमावास्या (या दिवशीं सर्व पितरांचें श्राद्ध करितात यावरून). ॰प्रायश्चित-न. सर्व पातकांबद्दल एकाच वेळीं घ्यावयाचें प्रायश्चित्त; सर्व पापांचें परिमार्जन, क्षालन; सर्व दोषां- पासून मुत्त्कता. 'सर्वप्रायश्चित्त घेण्याचा त्यांनीं जो निश्चय केला ...' -आगर ३.१३५. ॰प्रिय-वि. सर्वांचा आवडता; लोकप्रिय; विश्वमित्र. ॰ब्रह्मी-वि. सर्व विश्व ब्रह्मरूप आहे जसें केवळ तोंडानें बोलून एकंकार करणारा आचारभ्रष्ट. 'लेकुरें सर्व ब्रह्मी झालीं.' -सप्र १९.४०. ॰भक्ष-भक्षक-भोत्त्का- वि. वाटेल तें खाणारा; खाण्याच्या कामीं कोणताहि निर्बंध न पाळणारा; स्वच्छ अस्वच्छ, भक्ष्य, अभक्ष्य न पहातां अघोरी- पणें खाणारा. अग्नि, शेळी, कावळा वगैरेसहि हा शव्द लावतात. ॰भांवें-क्रिवि. काया-वाचा-मनें करून; सर्व भावयुक्त. 'तैसा स्त्रीदेहीं जो जीवें । पडोनिया सर्वभावें ।' -ज्ञा १३.७९०. 'जगीं वंद्य तें सर्वभावें करावें' -राम ॰भूतभूतांतर-वि. सर्व वस्तूंच्या ठिकाणीं वास करणारा; सर्वव्यापी; विश्वव्यापीं; विश्वव्यापक (ईश्वर). ॰मय-वि. सर्वव्यापी; सर्वगत (ईश्वर). ॰मान्य-वि. सर्वांस संमत, पसंत, कबूल. ॰मान्य-मान्य इनाम-न. सर्व कर माफ असलेलें इनाम; सर्वांना कबूल असें इनाम; गांवसंवंधीं इनाम; याबद्दल सनद नसते. ॰राष्ट्रीय कायदा-पु. राष्ट्रांराष्ट्रांतील व्यवहार नियंत्रण करणारा नियम. ॰रूप-रूपी-वि. सर्वव्यापी; सर्वांचें स्वरूप आहे असा; विश्वरूपी (ईश्वर) 'अनादि अविकृतु । सर्वरूप ।' -ज्ञा २.१५०. ॰लिंगी- पु. कोणताहि विशिष्ट पंथ न अनुसरणारा बैरागी. ॰वल्लभा-स्त्री. वेश्या; वारांगना. ॰विध-क्रिवि. सर्वप्रकारें. ॰वेत्ता-वेदी-वि. सर्वज्ञ; सर्वसाक्षी; त्रिकालज्ञ. ॰वेषी-वि. बहुरूपी; अनेक प्रका- रचे वेष धारण करणारा. ॰व्यापक-व्यापी-वि. सर्वत्र असणारा; विश्वव्यापी; सर्वत्र भासणारा. ॰व्रणपु. गळूं; करट. ॰श:-क्रिवि. सर्व दिशांनीं, बाजूंनीं, मार्गांनीं, रीतीनीं; पूर्णपणें; निखालस; दरोबस्त; नि:शेष. ॰शाक-ख-स्त्री. १ अनेक प्रकारच्या भाज्या एकत्र करून केलेली भाजी. २ आलें. ॰शास्ता-वि. सर्वांवर सत्ता, अधिकार गाजविणारा. ॰शोधी-वि. सर्वोचें निरी क्षण करणारा; सर्व वस्तूंची परीक्षा घेणारा; जिज्ञासु; चिकित्सक; परीक्षक; शोधक. ॰संगपरित्याग-पु. सर्वसंन्यास; सर्व ऐहिक वस्तूंचा त्याग; पूर्ण वैराग्य, विरक्ति. ॰संग्रह-पु. सर्व वस्तूंचा साठा, संचय; संकीर्ण, मिश्र संचय. ॰सपाट-क्रिवि. अभेद; सर्वत्र सम स्थिति; मोकळें. 'आत्मा नसतां सर्व सपाट चहूंकडे ।' -दा १६.८.१०. ॰संमत-वि. सर्व मान्य; सर्वांस पसंत, कबूल असलेलें. ॰समर्थ-वि. सर्वशक्तिमान; सर्वसत्ताधारी; सर्वा- धिकारी. ॰सह-वि. सर्व सहन करणारा; सर्व गोष्टींचा भार वाहणारा. ॰सहवर्तमान-वि. सर्वांसह; सर्वांस बरोबर घेतलेला; सर्वांनी युक्त. ॰साधन-न. सर्व गोष्टींची सिद्धता; सर्व गोष्टी घडवून आणणें; सर्व कार्यें साधणें, करणें, बनाव बनविणें. ॰साधन- साधनी-वि. सर्व गोष्टी साधणारा, सिद्ध करणारा, घडवून आणणारा. ॰साधारण-सामान्य-वि. सर्वांस लागू होणारा; सर्वांस सम असा; सर्वांचा समावेश करणारा. 'मला नाहीं तुमचे सर्वसामान्य सिद्धांत समजत.' -सुदे ३७. ॰साक्षी- वि. सर्व पाहणारा; सर्व भूतांच्या ठायीं असणारा; ज्यास सर्व दिसतें असा (ईश्वर). 'नसेन दिसलों कसा नयन सर्वसाक्षी रवि ।' -केका ४. ॰सिद्ध-वि. सर्व परिपूर्ण; (सर्व गुणादि- कांनीं युक्त; सर्व लक्षणांनीं युक्त; संपूर्ण; सर्वांग परिपूर्ण (ईश्वर). ॰सिद्धि-स्त्री. सर्व इच्छांची पूर्ति; सर्वकाम पूर्ति. ॰सिद्धार्थ- वि. सर्व इच्छापूर्ति झालेला; सर्व हेतु साध्य झालेला. ॰सुखा- नंद-वि. सर्व सुख व आनंद प्राप्त झालेला; सुखांचा आनंद ज्याच्या ठिकाणीं आहे असा (ईश्वर). ॰सोंवळा-वि. १ नेहमींचा शुद्ध, सोंवळा, पवित्र. जन्मसोंवळा (एखादा मनुष्य स्नान न करतांच सोंवळें नेसला असतां त्यास उपरोधिकपणें म्हणतात). २ नेहमींच पवित्र, शुद्ध, सोंवळें असलेलें (रेशमी वस्त्र, धाबळी वगैरे) (हीं कधीं न धुतलीं तरी सोंवळीं मानण्यांत येतात यावरून). ॰स्पर्शी-वि व्यापक; सर्वांचा समावेशक. 'एकंदर ठराव सर्वस्पर्शी समाधानका- रक केला.' -केले १.३०९. ॰स्व-न. १ सर्व धन; सर्वसंपत्ति; सर्व मालमत्ता, चीजवस्त वगैरे; स्वत:च्या मालकीचें सर्व. 'सर्वस्व हारवावें की जिकावें न भीरु तूं पण हो.' -मोसभा ६.९५. २ तन, मन, धन; 'तैसें सर्वस्वें कर्म अनुष्ठी । परि फळ न सुखे दिठी ।' -ज्ञा १८.५९० मी सर्वस्वयां तैसें । सुभटांसी ।' -ज्ञा १.१११. ३ तत्त्वांश; सार; ॰स्वदंड-पु. सर्व संपत्ति जप्त करणें; सर्व मालमत्ता खालसा करणें; सर्व हिरावून घेणें. ॰स्वहर-हर्ता-हारक-हारी-पु. सर्व धन हरण करणारा, घेणारा, लुबाडणारा. ॰स्वहरण-हार-नपु. सर्व संपत्तीची लूट; सर्व धन हिरावून घेणें; सर्व नाश. ॰स्वामी-पु. १ सर्व बिश्वाचा प्रभू; सर्व सत्ताधारी, जगत्पति; सार्वभौम. २ सर्वस्वाचा मालक, धनि; सर्व वस्तूंचा धनि. ॰स्वीं-स्वें-क्रिवि. १ तनमनधनेंकरून; सर्व वस्तुमात्रासह. २ पूर्णपणें; पुरतेपणीं; एकंदर; अगदीं; सर्व प्रकारें; निखालस. उदा॰ सर्वस्वीं सोदा, लुच्चा, लबाड, हरामी वगैरे. ॰हर- हर्ता-हारक-हारी-वि. सर्व हरण करणारा; लुबाडणारा. ॰हरण-न. संपूर्ण नागवणूक; नाडणूक. ॰ज्ञ-वि. सर्व जाणणारा; त्रिकालज्ञ; पूर्ण ज्ञानी;सर्वसाक्षी; सर्व वेत्ता. 'तुम्हां सर्वज्ञांच्या समाजीं । देयावें अवधान हे माझी । विनवणी सल- गीची ।'-ज्ञा ९.२ सर्वंकष-वि. सर्वांस कसोटीस लावणारा. सर्वाग-न. १ सर्व शरीर; देह; शरीराचे सर्व अवयव. २ सांग- वेद; षडंगसहित वेद. सर्वांगरोग-वात-पु. पक्षघाताप्रमाणें सर्व शरीरास वातविकार होतो तो. -योर १.७५५. सर्वांगा- सन-न. साफ उताणें निजून हात जमीनीवर टेकणें व त्यांवर जोर घेऊन खांद्यापर्यंतचा भाग व पाय वर उचलून ताठ करून स्थिर होणें. -संयो ३५०. सर्वांगीण-वि. सर्व शरीर व्यापणारा; सर्व अंगांसंबंधीं. सर्वांगें-क्रिवि. एकचित्तानें; एकाग्रतेनें. 'जो सर्वांगें श्रोता ।' -दा ७.१.२८. सर्वांची मेहुणी-स्त्री. १ मुरळी; भावीण. २ वेडसर स्त्री. सर्वांतर- वि. सर्वांच्या अंतकरणांत राहणारा. 'मज सर्वांतरानें कल्पिती । अरि मित्र गा ।' -ज्ञा ९.१६६. सर्वांतोडीं-क्रिवि. सर्वां- मुखीं; प्रत्येकाच्या मुखांत; ज्याच्या त्याच्या तोंडांतून. सर्वा- त्मना-क्रिवि. १ मनोभावें करून; अंत:करणपूर्वक; तनमन- धनें करून. 'धन कामासि निजमुख । सर्वात्मना नाहीं देख ।' -एभा २३.४३५. २ पूर्णपणें; सर्वस्वी; निखालस. 'हा सर्वात्मना लबाड आहे.' ३ मुळींच; अगदीं; केव्हांहि; कोण- त्याहि तऱ्हेनें; साफ (नाहीं-निषेधार्थक शब्दाबरोवर उपयोग). 'मजपासून ही गोष्ट सर्वात्मना घडावयाची नाहीं.' -रा ३. ३०१. सर्वात्मा-पु. सर्व प्राणिमात्राच्या ठिकाणीं असलेला जीवात्मा, चैतन्य, (ईश्वर). सर्वाथाई-क्रिवि. सर्वथा (अप- भ्रंश). 'अशा पुण्यरूपें नृप न सोडी भोग सर्वाथाई ।' -ऐपो ४०९. सर्वाधिकार-पु. पूर्ण सत्ता; सर्वांवर सत्ता, ताबा, वर्चस्व. सर्वाधिकारी-पु. प्रमुख; मुख्य; सर्वासत्ताधीश; (म्हैसूरच्या राजाचा हैदरपूर्वी मुख्य प्रधान). सर्वांधीत- वि. सर्व अध्ययन झालेला; सर्व विषय शिकलेला; निष्णात. -शिदि ११८. सर्वानुभूति-स्त्री. सर्व जगाचा, अनेक प्रका- रचा, अनेक गोष्टींचा अनुभव. सर्वान्नभक्षक-भक्षी-भोजी- वि. १ वाटेल तें खाणारा; सर्व प्रकारचें अन्न ज्यास चालतें असा. २ अधाशी; अधोरी. सर्वाबद्ध-वि. सर्व तऱ्हेनें स्वतंत्र; मोकाट; स्वैर; पूर्ण स्वतंत्र; असंबद्ध; नियमांनीं बद्ध नव्हे असे; विसंगत; (मनुष्य, चाल, वागणूक, कार्य, काव्य, भाषण वगैरे). सर्वांर्थीं-वि. सर्व वस्तूंची इच्छा करणारा; लोभी; महत्त्वाकांक्षी वगैरे. सर्वार्थी, सर्वार्थें-क्रिवि. सर्व प्रकारामें; सर्वस्वी; हरतऱ्हेनें; प्रत्येक दृष्टीनें 'वैश्य व्यव- सायांत जाण । दिसतो निपुण सर्वार्थीं ।' सर्वाभ्य-वि. क्रिवि. सर्व प्रकारें; सर्व तऱ्हेचा; सर्व कामांतील. 'सर्वाभ्य कारभारी.' -चित्र २. सर्वारिष्ट-न. सर्व जगावरील सामान्य संकट; सर्वसामान्य पीडा; अनेक लोकांस बाधक किंवा अनेक प्रका- रचें संकट, पीडा, बाधा. सर्वांशिक, सर्वांशी-वि. सर्व भागांशीं संबंध असलेलें; एकदेशीयाच्या उलट. सर्वांशीं- क्रिवि. पूर्णपणें; सर्व प्रकारें; सर्व तऱ्हेनें. सर्वाशीं संपूर्ण, सर्वावयवीं संपूर्ण-वि. सर्व विभागांनीं, अवयवांनीं युक्त; परिपूर्ण; सबंध. सर्वाशुद्ध-वि. अनेक अशुद्धें असलेला; सर्वं प्रकारें दोषयुक्त; चुक्यांनीं भरलेला (ग्रंथ वगैरे). सर्वीय- वि. सर्वांचा; सर्वाशीं संबंध असलेला; सगळ्यांचा; विश्वाचा; जागतिक. सर्वें-नअव. सगळीं. 'दु:ख भोगिलें आपुलें जीवें । तेथें कैचिं होतीं सर्वें ।' -दा ३.१०.४४. सर्वेश, सर्वे- श्वर-पु. १ परमेश्वर; जगदीश. 'तया स्वधर्मी सर्वेश्वरीं । न भजेल जो ।' -ज्ञा ३.१०४. २ सम्राट; सार्वभौम; सर्वाधीश. सर्वेश्वर(री)वाद-पु. विश्वांत सर्वत्र परमेश्वर भरलेला आहे असें मत. (इं.) पॅन थीइझम्. सर्वै-क्रिवि. सर्वहि; पूर्णपणें; सर्वस्वीं. 'अकस्मात तै राज्य सर्वै बुडालें ।' -राम. सर्वो- त्कर्ष-वि. अत्यंत महत्त्वाचें; सर्वोत्तम. 'सांप्रत हे येश आगाध भ्रीनें आपले पदरीं सर्वोत्कर्ष घातलें.' -पेद ३.१८१. सर्वोत्कृष्टवि. १ अत्युत्तम; सर्वोत्तम; सर्वश्रेष्ठ (ईश्वर). २ सत्य; न्याय्य; रास्त. सर्वोपकार-पु. सर्वांचें कल्याण; सर्वावर केलेले उपकार; जमदुपकार सर्वोपकरी-वि. जगास कल्याणकारक: सर्वांस उपकारक लाभदायक. सर्वोपयोगी- वि. सर्व कार्यांस उपयुक्त; कोणत्याहि कामास उपयोगी. सर्वोपरी-क्रिवि. सर्व प्रकारानीं; सर्व रातीनीं; सर्व पद्धतीनीं; सर्व तऱ्हानीं. [सर्व + परी] 'समर्थ जाणोनि सर्वोपरी ।' -मुआदि ३३. २ सर्वोपरी-वि सर्वश्रेष्ठ; वरिष्ठ; उत्कृष्ट; उत्तम. 'शिखराथिलियां सर्वोपरी । मेरु तो मी ।' ज्ञा १०. २२७. -क्रिवि. श्रेष्ठपणें; वरिष्ठपणें; उत्तम रीतीनें. [सर्व + उपरि] सर्वौषधि-स्त्री. शतावरी; एक वनस्पति. सर्ब्यांस- ला-सनाम द्वि. (अशिष्ट) सर्वांचा. 'तो सर्व्यांला मुजरे करतो ।' -ऐपो ४३१.
अदब
पु. १ चिंता; श्रम; दु:ख; त्रास. (क्रि॰ पडणें, पावणें, सोसणें). २ निकड, जरुरी (कामाची, बाबीची). (क्रि॰ पडणें). [दबणें]
अदबणें
अक्रि. १ खालावणें; अशक्त-अधू होणें; खितपत पडणें (आजारानें). २ टेकीला येणें- गांजणें, बेजार होणें (दु:खानें- त्रासानें, पीडेमुळें). ३ रंजीस येणें; मेटाकुटीस येणें; थकून भागून जाणें (श्रम-मेहनत-कष्ट-काळज्या यांनीं). ४ परिश्रम करणें; काबाडकष्ट करणें; अति खटपट करणें; दगदग सोसणें. ' मी लग्ना- विषयीं अदबलों तेव्हां तें झालें.' [दबणें]
अदभागी
वि. हतभागी; फुटक्या कपाळाचा-नशीबाचा; दु:खी व दरिद्रि; उपभोग नशीबांत नसणारा. [सं. हतभागिन्]
अदगळणें
अक्रि. (व.) झुरणें; दु:खित होणें; व्यथित होणें; वेदनांनीं विव्हळ होणें. 'खांडकानें रात्रंदिवस तो अदगळतो.' [सं. अर्ध + गल्?]
अदु:खनवमी
स्त्री. भाद्रपद शुद्ध नवमी (भावी वर्षातील सर्व दु:खें टळावीं म्हणून या दिवशीं स्त्रिया देवीची पूजा करितात). [सं.]
अधोगत
पु. (नृत्य) एक अभिनय: डोकें अगदीं खालीं करून पाहणें, लाज दाखविणें, नमस्कार करणें, दु:खानें तोंड खालीं घालणें, ह्या गोष्टी दाखविण्याकरितां हा अभिनय करतात. -स्त्री. अधोगति पहा. -वि. १ खालीं आलेला, उतरलेला, गेलेला, राहिलेला. २ हीन स्थितीस, निकृष्ट अवस्थेस गेलेला; पतित. -क्रिवि. १ खालीं;खालच्या बाजूस. २ (ल.) व्यर्थ. 'माझें सांगणें अधोगत गेलें.' [सं. अध: + गत]
अधोवदन
वि.अधोमुख; खालीं मान घातलेला; खिन्न; दु:खी; अवमानित. [सं.]
आळपणें
अक्रि. किरकिर करणें; रडत राहणें; दु:खाने ओरडत राहणें.
अनघटित
वि. १ अद्भुत; अघटित; न घडणारें. २ अवघड; कठिण, 'तरी हें असे अनघटित । वायां दु:ख दुणावत ।' कथा १. ४.१७९. [सं. अ + घटित]
अनर्थ
पु. १ अतिशय अनिष्ट गोष्ट; मोठें अरिष्ट. 'आमचें कुटुंब समप्र । कुंभकर्णें ग्रासिलें ठार । थोर अनर्थ मांडिला ।।' २ अव्य- वस्था; थैमान; दंगा किंवा त्यापासून उद्भवणारें दु:ख, संकट, विघ्न. 'हें असो जें सागरु । अनर्थांचा ।।' -ज्ञा ८.१४९. [सं. अ + अर्थ] ३ निरतिशयता; अमर्यादता; अपरंपारता; असामान्यता; अति- शयता. या शब्दाचा उपयोग फार स्वैरपणें केला जातो. उ॰ (अ) 'एक जाउनी सांगती सिते । अनर्थ मांडिला तुझिया सुतें ।' -अनंत लवकु. (आ) 'देऊळ बांधावयाचा यानें अनर्थ मांडिला.' = देऊळ बांधण्याच्या प्रयत्नाची पराकाष्ठा केली. (इ) 'यंदा सस्ताईचा अनर्थ झाला. १५ पायल्या तांदूळ रुपयास मिळतात.' (ई)' त्यानें एका दिवसांत ५०० श्र्लोक लिहून अनर्थ केला.' वरील अर्थी विशेषण व क्रियाविशेषणाप्रमाणें उपयोग. 'हा अनर्थ बोलतो.' 'त्याची अनर्थ बुद्धि.' ४ अर्थहीनता; अर्थशून्यता; निरर्थकता; (ल.) मुर्खपणा.' श्लोकांचा अर्थ सोडून अनर्थ केला. ' ५ पोकळपणा; नि:सत्त्वता; नि:प्तारता. 'जडा अनर्थीत समान साचा । जो अर्थ तो मी प्रियमाणसाचा ।।' ६ शत्रुत्व; वैर. 'मज सांगा वृत्तांत । कीं कृष्णजरासंधा अनर्थ । वाढला कां ।।' -कथा २.२.११. [सं. अ + अर्थ]
अनुवादणें
क्रि. १ पुन्हां पुन्हां सांगणें, म्हणणें; पाठ करणें; पोपटपंची करणें. 'त्याचें नाम व्यर्थ वारकर । जैसें कीर अनुवादति ।' २ बोलणें; सांगणें. 'तें दु:ख मनां वाचेसीं । अनुवादवे ना ।' -शिशु १०२; 'तो स्वयें सर्वेश्वरू । प्रत्यक्ष अनुवादला ।।' -ज्ञा १.७२; 'ऐशी शूर्पणखा अनुवादली' - रावि १४.१३७. ३ स्पष्ट करणें; ' ऐसें बहुधा निरोपिलें । ग्रंथगर्भी जें बोलिलें । तें अवघेंचि अनु- वादले । न वचे किं कदां ।' -दा १.१.१३. [सं.]
अंतरमाळ-ळा
स्त्री. आंतडें. (भीति, तहान, काळजी यांपासून होणारें दु:ख सांगण्यासाठीं योजतात).(क्रि॰ सोकणें; शोषणें; वाळणें; सुकणें). 'चतुर्थ नरसिंह विशाळ । ...निवटुनि असुरांसि समूळ । काढी अंतरमाळ ।' -पाळणे २२. 'तें वर्तमान ऐकून माझ्या अंतरमाळा सोकल्या.' ॰गळ्यांत घालणें-१ ठार करणें; नाश करणें. २ त्रास देणें. ॰गळ्यांत येणें-त्रास होणें; नाश होणें.
अंतर्याम
न. १ आत्मा; जीव. २ (ल.) मन; अंतःकरण; चित्त. ३ अंतरंग; आंतील गोष्ट. [सं.] (वाप्र.) ॰कळवळणें- आंतड्याला पीळ पडणें; तळमळ होणें. -मीं ताप बसणें-हाडीं ज्वर चिकटणें. -मीं रडणें-मनांतल्या मनांत दु:ख करणें; झुरणें. -मीं वास करणें-हृदयांत खोल जाऊन बसणें; अंतः करणावर ठसून राहणें. -मास डाग बसणें-लागणें-हृदयास धक्का बसणें (दुःखामुळें). -मीचें दुःख अंतर्यामास ठाऊक- मनाची पीडा मनासच माहीत (ती इतरांना कळणें अशक्य या अर्थीं). -मीची खूण अंतर्यामास ठाऊक-मनांतले बेत किंवा खलबतें, अनुभव ज्याचीं त्याला माहीत; अपकार किंवा उपकार केलेले मनाचे मनास माहीत. -मीची खूण आईला ठाऊक-१ आपल्या मनांतल्या गोष्टी आईलाच माहीत असतात. -मोल. २ मुलाचा जनक कोण हें आईसच माहीत असतें. (अंत- र्याम याऐवजी अंत्राम असेंहि अशुद्ध रूप योजितात)
अरिष्टें(तीन)
न. (महानु.) १ दु:ख, २ दैन्य, व ३ पाप. [सं. ]
अर्तिहरी
वि. (महानु.) दु:ख हरण करणारा. [सं. आर्ति = हरि ]
असडा
पु. १ एकदम-चटकन दिलेला जोराचा हिसका, हिसडा (अवयव-गात्राला); असा हिसका बसल्यामुळें होणारें दु:ख. (क्रि॰ देणें, बसणें). एकदम हिसकणें, फटकावणें, उडविणें (चाबूक, दोरी वगैरे); एकदम धरणें, पकडणें. २ पिळवटणारा कंप; तिडीक; वेणा; आंचका (बुडणारा, फांशी जाणारा, गुदमरणारा किंवा मरावयास टेकलेला जसें करतो तसा ). (क्रि॰ देणें, येणें;) ३ धक्का; धडकी; तडाखा (व्यापारांत, पिकासंबंधानें) सोसावें लागणारें नुकसान-तोटा; (क्रि०बसणें.) [असडणें]
असत्
वि. १ खरें नव्हें तें खोटें; असत्य; मिथ्या; अवा- स्तव; विनाशी; ज्याला अस्त्वि नाहीं तें; काल्पनिक; अस्सल नव्हे तें. 'तैसी सत् ना असत् होये ।' -ज्ञा १५.८१. 'तरी सच्छब्दें येणें । आटूनि असताचें नाणें । दाविजे अव्यंगवाणें । -ज्ञा १७. ३८०. [सं.] २ वाईट; दृष्ट; असाधु; खट्याळ. ३अन्याय्य; अयोग्य; सामाशब्द-असन्मित्र = खोटा मित्र, प्रसंगीं उपयोगी न पडणारा मित्र. असद्विद्या = कुविद्या; पिशाचविद्या; दु:शास्त्र. अस- न्मार्ग = कुमार्ग, अनिष्ट-वाईट मार्ग; असद्व्यापार-व्यवहार = वाईट- मुर्खपणाची कर्में-प्रघात. असद्भाव = दृष्टस्वभाव. असत्कर्म; अस- त्पथ; असत्पुत्र; असत्संसर्ग; असद्विचार; अस्दाचार; असद्वृत्ति इ॰ [सं.]
असत्काळ
स्त्री. (कों.) अनिष्ट-दृष्ट-अन्यायाचा काळ; ज्यांत दुर्गुणी पुरुषांची प्रतिष्ठा व सद्गुणी पुरुषांना दैन्य असतें अशा तर्हेचा विपरीत काळ-दशा. भ्रष्टाचार, मचमच, दैन्यावस्था, यांचें प्राबल्य माजल्यामुळें दु:ख करतांना हा शब्द योजितात. [सं. असत् + काल]
अवगळा
पु. (महानु.) १ शेताच्या कोपऱ्यावर थोडी खोलगट पडीत जमीन, येथें शेतीचें सामान ठेवतात. २ (ल.) मायेच्या स्वरूपांत असें स्थान आहे कीं, त्या ठिकाणीं सुख- दु:खरहित जीवांस ठेवतात. ‘देवता अवगळा ठेवी:’
अवंति, अवंतिका
स्री. उज्जनी; सात अतिपवित्र, संस्मर- णीय नगरांपैकीं एक. 'अयोध्या म(दु)थुरा माया काशी कांची अवंतिका।' इ॰ ०देश पु. माळवा. -पया २११. [सं.]
बस
पु. १ दृढता; निश्चितपणा; कायमपणा. २ स्थिस्र्था वरतेची स्थिति; जम; वजन; छाप; पगडा. (व.) बसोटी. (क्रि॰ बसणें). 'ज्या व्यवहारांत ज्याचा बस बसला तो त्यास सुकर.' [बसणें] बसक-स्त्री. १ आसन; आस्तरण; बैठक; बिछाईत (जाजम, खुर्ची इ॰). २ बैठक; खुर्ची; तळखडा; (सामा.) आधार. ३ बसकी; तळ; बूड; पाय; बुंधा; अडणी. 'या दऊ- तिची बसक लहान म्हणून आपटते.' ४ बसकी; बाजारांत घातलेल्या दुकानावरील कर, पट्टी. ५ बसकीची जमीन; सपाट, सखल जमीन; दरी; बदखल. ६ जमीनीचा खोलगट भाग; लवण. ७ जमीनीवर ठाम बसून राहणें (थकव्यामुळें, हट्टानें-मनुष्यानें, पशूनें). (क्रि॰ घेणें; मारणें). बसक-वि. सखल; खोलगट (जमीन). बसकट-स्त्री. दमल्यामुळें, हट्टानें, (तगादेवाल्यानें ऋणकोला) रोखण्याकरितां जमीनीवर थबकल घालून बसणें; हातपाय मोकळें सोडून बसण्याची क्रिया; बैठक. (क्रि॰ घेणें; मारणें). 'ही म्हैस उभी आहे तों दूध काढा. एकदां बसकट मारली म्हणजें उठणार नाहीं.' -वि. १ सखल; थपकट; चपटें; सपाटसर; याच्या उलट उभट, उभार. २ बसकें; फेंदरें; नकटें (नाक). बसकट नाक्या-वि. फेंदरा; नकटा. बसकण-न. १ आस्तरण; बैठक. बसक (-स्त्री) पहा. २ बसकट, थबकल (-स्त्री) पहा. ॰कण-घेणें-मारणें-सिद्धीच्या निराशेनें हातीं घेतलेलें काम सोडून देणें. ॰क(का)र-कूर, बस्क- (स्कार)र-स्त्रीन. हांतरी; चटई; जाजम; घडवंची; मुलांनीं शाळेंत बसावयास आणलेलें गोणपाट इ॰ आसनाप्रमाणें पसरलेली, ठेव- लेली कोणतीहि वस्तू. (हेट.) बस्टुक. [सं. विष्टर] ॰कल-स्त्रीन. बसण्यास फुरसत; वेळ; सवड; संधि (बहुधा नकारार्थीं प्रयोग). 'तो सारा दिवस फिरतो त्यास क्षणभर बसकल सांपडत नाहीं.' -वि. १ कमी उंचीचें; आखूड व पसरट; नीच व सपाट. २ बसकें; फेंदरें; नकटें (नाक). ३ खोलगट; खालपट (जमीन). ॰का-स्त्री. १ (राजा.) बैठक; आसन; खुर्ची. २ तळ; पाया (वस्तूचा). -वि. १ बेताच्या उताराचा; आडव्या घाटाचा; याच्या उलट पाणढाळ; खर. २ सपाट; थबकट. ॰की-स्त्री. १ विटीदांडूच्या खेळांतील एक शब्द. २ बसका अर्थ १ व २ पहा. ३ चुंबळ. -वि चुंबळीसारखें बसकट (पागोटें). 'तिवट बस्की साधें.' -समारो १.२०१. ॰कीचा-वि. १ तळ, पाया, बैठक, असलेला. २ बसण्यालायक (घोडा, बैल, गाढव). ॰कूर-स्त्रीन. बसकर पहा. बसकेचा-वि. तळ, पाया, बैठक, आधार असलेला. ॰कोळी-स्त्री. बसकट मातीची घागर. 'यथाविधीनें त्या येरी । बसकोळ्या घागरी ।' -तुगा २८०. बसण-स्त्री. (कर.) बसण्यास घेतलेली लाकडी वस्तु बसणी-स्त्री. १ बसणें; बैठक; मांडी ठोकून बसणें. 'एका बसणीस म्यां शंभर बंद लिहिलें.' २ बूड; आसन. ३ (कों.) लहान पाट. ॰फुगडी-स्त्री. बसून घालाव- याच्या फुगडीचा खेळ. 'बस फुगडी बसुंगा । चतुर भुंगा लालुंगा । एक पाय खोलीतो । सीताराम बोलीतो ।' -मसाप २.२३४.
चीकि, रुचिक
पु. रुईचा चीक. 'रुचिक बिबवे घालिती । नाना दु:खें दडपे देती ।' -दा ३.७.३५. [रुई + चीक]
चकचकणें
अक्रि. १ चकचक, चुकचुक आवाज काढणें; चुकचुकणें (पाल, साप इ॰ नीं). २ (ल.) खेद करणें; दु:ख करणें; चक असा ध्वनि काढणें (हळहळण्याच्या वेळीं तोंडांतून चक असा ध्वनि निघतो त्यावरून). 'येक झडा घालूं जाती । लंडी चकचकून पळती ।' -दावि ४०३. [ध्व. चक]
डाऊ
डाऊ ḍāū m The piece of betelnut which, at a wedding, is concealed by the bride or bridegroom, to be sought out by the bridegroom or bride. 2 A red ochre with which monkeys are said to besmear their faces.
डौ
डौ ḍau m unc A hollowed cocoanut used as a cup or vessel. See डव.
डई
पहा : ढई डऊ
दोन
वि. २ ही संख्या. विभक्तिप्रत्यय लागण्यापूर्वीं याचें दोहो असें रूप होतें. जसें- दोहोंस; दोहोंनीं. [सं. द्वि; प्रा. दुवे; बं. फ्रेंजि. दुइ; ग्री. दुओ; लॅ. दुओ; गॉ. त्वोस्; अँसॅ. त्वि; स्ला. दुव; लिथु. दु; हिव्रयू द, दो, दि] ॰जिवांचा निवाडा होणें- सुखरूप बाळंत होणें; हातींपायीं सुटणें. ॰डोळे शेजारी भेट नाहीं संसारी-जवळ जवळ राहात असून ज्यांच्या गांठी क्वचित् पडतात अशीं माणसें. ॰डोळ्यांची भीड-समोर असतांनाच फक्त प्रेम; वरपांगी प्रेम. ॰दिवस-थोडे दिवस; कांहीं काळ. म्ह॰ १ दोन दिवस सासूचे दोन दिवस सुनेचे = प्रत्येकाला चांगले दिवस येतात. ॰दिवसाचा-थोडे दिवस टिकणारा; हंगामी; अशाश्वत (सोबती, संपत्ति, अधिकार इ॰). ॰बोटें स्वग उरणें-अतिशय गर्व वाहणें. ॰हाताचे चार हात होणें-लग्र होणें. ॰तोंड्या- बारी-बोल्या-मार्या-दुतोंड्या इ॰ पहा. ॰प्रहर-पु. मध्यान्ह; दुपार पहा. ॰प्रहरची काळजी-पोटापाण्याची चिंता. दोनी- न्ही-वि. दोन हि. 'दोनी वरुषें बुडी मारिली ।' -दा ३.४.१६. [सं. द्वीनि] म्ह॰ दोन्ही दरडीवर (कांठावर) हात ठेवणें, टेकणें = दुटप्पीपणा. दोन्हीसांज-क्रिवि. (सकाळीं व संध्याकाळीं) जेव- णाच्या दोन्ही वेळेस, वेळेकरितां.
दर्द मन्द
(वि.) हिंदी अर्थ : दु:खी, पीडित, कोमल हृदय, सहानुभूति रखनेवाला. मराठी अर्थ : दुसऱ्याच्या दुःखाबद्दल सहानुभूति बाळगणारा, दुःखित.
दुअंगी
वि. दुहेरी; दोन्ही बाजूंनीं; दोन प्रकारांनी उप- युक्त; परस्पर विरुद्ध गुण असलेलें. ‘आजपर्यंत संगीतांत किंवा गद्यांत दत्तोपंतांच्या तोडीचें दुअंगी असें सव्यसाची पात्र झालेंच नाहीं व पुढें तरी होईल किंवा नाहीं याची वानवाच आहे.’ –गणपतराव जोशी पृ. १५३. [दु + अंग]
दुभाषी-सी
वि. दुतर्फा. द्व्यर्थी (बोलणें); एकदां एक एकदां एक असें (बोलणें); मेळ नसलेलें. ‘कारभार तो दुभासी आहे. अंतःकर्णापासून नाहीं.’ –पेद १२.९०. [दु + भाषा]
दुभणें
अक्रि. १ (म्हैस इ॰ कानीं) धार काढतांना दूध देणें; पान्हवणें. 'वोरसोनि लोभें । विष काय अमृतें दुभ ।' -अमृ ७.९९. 'वांझा गाई दुभती । देवा ऐसी तुझी ख्याती ।' -तुगा ६२९. २ (ल.) (ताड, माड इ॰ वृक्षापासून) रसस्त्राव होणें. ३ (ल.) (जखम, फोड इ॰) पुवळणें; वाहूं लागणें. ४ (एखादा व्यवहार, व्यापार क्रिया इ॰) आपापलें फळ देऊं लागून चालूं असणें. -उक्रि. (कों.) दूध, धार काढणें; (विरू.) दुहणें. [सं. दुह्] म्ह॰ व्याही पाहुणा आला तरी रेडा दु निकडीची, अडचणीची वेळ असली तरी अशक्य गोष्ट शक्य होत नाहीं.
दुड
स्त्री. (कु.) मातीची घागर. दुडी पहा. [दु + घट]
दुदांडी
दुदांडी dudāṇḍī a (दु Two, दांडी Bar.) Marked with two bars--a piece of copper money. 2 That has two handles.
दुदेह
वि. दोन गावांतील : ‘इनाम जमीन चावर दीड दर सवाद दुदेह पा। मजकूर.’ – मइसा २०·१११. [फा. दु + देहे]
दुदेह
वि. दोन गांवांतील. ‘इनाम जमीन चावर दीड दर सवाद दुदेह पा मजकूर.’ –रा २०. १११. [फा. दु + देहे]
दुडी
स्त्री. घागर; कळशी. 'दुडीवरी दुडी । चाले मोकळी गुजरी ।' -तुगा ११४७. 'घृतामधाच्या दुडी ।' -कृमुरा ७५.२९. दुड पहा. [दु + घट]
दुडकारी
क्रिवि. फाशाच्या खेळातील एक संज्ञा; दुढ्ढीने जाण्याजोग्या पगी; दुढ्ढारी. [सं. दु]
दुडकारीं
क्रिवि. फांशांच्या खेळांतील अक संज्ञा; दुढ्ढीनें जावयाजोग्या पगीं; दुढ्ढारीं. [सं. दु = दोन; फा. दुडु]
दुडता-ती
वि. दुहेरी केलेलें; दुपदरी घडी घाटलेलें (वस्त्र इ॰). [दु = दोन]
दुढ्ढी
स्त्री. १ दुफांशी सोंगट्यांच्या खेळांत पडणारें दोहोंचें दान. २ (ल.) दोन रुपये, पैसे इ॰ परिमाणाची दक्षिणा. 'त्यानें दुढ्ढी दुढ्ढी दक्षिणा दिली.' [सं. दु + वृत्ति, वर्त्ति; का. दुड्डि = दोन]
दुगन
दुगन dugana f (दु Twice, गान Singing) The rapid chanting of the ध्रुपद so as to chant it twice within the ordinary time or measure.
दुग्रह
पु. वाईट मत. ‘संतांविषयीं नवशिक्षितांत अनेक दुग्रह झाले आहेत.’ –मवाइ २. [सं. दुर् –दु + ग्रह]
दुघड
वि. १ (व.) हट्टी. २ मूर्ख; दुष्ट. 'दुघड नार नव र्याला शिकावी म्हणे वेगळे निघा ।' -पला ८५. 'रांड बेढंगी दुघडी ।' -पला ८३. दु( = दोन)च्या पोटांत दुघड पहा. [सं. दुर्घट; प्रा. दुग्घड]
दुहांशी
दुहांशी duhāṃśī a (दु Two, A Border.) Having a border only on two sides (opp. to चौहांशी)--a shawl.
दुहरावणें
सक्रि. पुन्हा सांगणें; पुनरुक्ति करणें; दुस- र्यानें सांगणें. ‘तेव्हां बहुतेक ममतेनें पूर्वीं वचनें दिधलीं आहेत तीं दुहराहून बोलोन त्यांणीं उत्तर दिलें कीं.’ –रा १२.१८. [दु + हार]
दुःखविह्वल
दुःखार्त, ब्रह्मांड आठवलें, दुःखानें फाटून गेला, अंतःकरण शतशः विदीर्ण झालें, दुःखांत घोळत-पिचत-शिजत- बुडत राही, दुःखानें जेरीस-टेंकीस आला, अंतःकरणाचे तुकडे झाले, हृदयांत आगीचा डोंब उसळला, हृदयाला शतशः इंगळ्या डसल्या, हा विचार काळजांत चिरत जाई, शोकाचा उमाळा येई, त्या घावानें सुजलेले मन सुन्न हाऊन जाई, दु खाग्नींत भाजून निघाला, मन हळहळलें, जीव होरपळून निघाला, अंत:करणांत दुःखाचे कढ येत, दुःखाचे असह्य चटके हृदय विदीर्ण करीत, या दुःखाचा उद्रेक स्वस्थ बसू देईना, या दुःखाच्या धक्क्याने हतबुद्ध झाला. अंतःकरण विषादानें भरून गेलें, मनावर दुःखाचे करकोचे पडले, पोटांत तोडत होतें, असह्य मनस्तापाचे बळी, अंतःकरण अगदीं चुरडून टाकल्यासारखें व्यथित झालें, पोटांत कालवून येई, जीव व्याकुळ झाला, पाहून आंतड्याला पीळ पडे व भडभडून येईं, जड मनाने परतला, माथ्यावर वज्राघात झाल्यासारखें वाटलें, विषण्ण-दुःखी व सचिंत बसे, डोक्यांत कोणी घण घालीत आहे असें वाटतें, या वाक्यानें जुन्या दुःखावरची खपली काढली गेली होती, या उद्गारानें त्या दुःखावरच बोट ठेवलें होते. हृदयांत कांहीं तरी कांचल्यासारखें होऊन हळूहळू तुटत आहें असा तिला भास होत होता, ते शब्द अंतःकरण जाळीत राहिले, ही अवज्ञा सुईसारखी बोंचली, क्विनाईन घेतल्यासारखा कडवट चेहरा केला, मनावर दुःखाची सततची सावली पडली.
दुई
दुई duī f (दु Two) Disagreement, difference, variance.
दुजा
वि. १ क्रमानें दुसरा. 'एक्या पदें भूमि भरूनि थोडी । पायें दुज्या अंडकटाह फोडी ।' -वामन, वामनचरित्र १.३१. २ आणखी; आणीक दुसरा; अन्य; इतर. 'मरे येक त्याचा दुजा शोक वाहे ।' -राम १६. 'येक्या ग्रंथें निश्चय केला । तो दुजयानें उडविला ।' -दा ७.९.४. ३ भिन्न; वेगळा; निराळा; परका. 'मला तुम्ही दुजा मानूं नका.' 'त्याजि असु तो गमला दुजा न देहें ।' -मोरा पुष्पिताग्रा श्रीरामायण कल्पलता १५.१.३६६. [दु = दोन + जा प्रत्यय ?] ॰भाव-पु. १ मनाचा दुटप्पीपणा; आंत एक बाहेर एक अशी वृत्ति. २ मीतूंपणा; भेदबुद्धि; हा माझा, हा परका असें लेखण्याचा स्वभाव, वृत्ति; परकेपणाची भावना; आपपरभाव. ३ मतभिन्नता; मतभेद; कल्पनेंत, समजुतींत फरक, अंतर. [दुजा + भाव]
दुजाणणें
अक्रि. मानणें; मान देणें; जुमानणें. ‘परंतु अंतर्यामी यासहि दुजाणत नाहींत.’ –रा १.५. [दु + जाणणें]
दुजोर or रा
दुजोर or रा dujōra or rā m (दु Two, जोर Power.) A term at chess. Double support to a piece.
डऊक, डऊत, डऊर
डऊक, डऊत, डऊर ḍūka, ḍūta, ḍūra &c. For these and other words beginning with डऊ see under डौ.
डऊक, डऊत, डऊर इ॰
हे (डऊ या अक्षरांनीं आरंभ होणारे) शब्द डौ मध्यें पहा.
दुकान
दुकान n f A shop. Any place duly set out with the apparatus of working. दु?B घालणें-माडणें To set up shop. To begin the trade of a courtesan, or to take to whoring.
दुकानदारी
दुकानदारी f The art or business of shopkeeping. दु?फैलविणें (To extend one's business.) To spread out one's wiles.
दुकांड
दुकांड dukāṇḍa f (दु & कांडी) A rather long log of fire-wood.
दुकांटी
दुकांटी dukāṇṭī a (दु & कांटा A fork or spike.) Double--a padlock.
दुकाठी
दुकाठी dukāṭhī a (दु & काठी Stick.) Two-masted--a vessel.
दुखांदा
दुखांदा dukhāndā m R (दु Two, खांदा Branch.) The space formed by a bifurcation of the trunk of a tree.
दुळ(ळा)गेस
पु. (गो.) पाणी घालून काढलेला नार- ळाचा रस. [दु = दोन + वेळ + रस]
दुला, दुल्ला
पु. (जुगारी खेळ) दुसरा; दुसर्यानें खेळणारा. याच्या उलट मिरी = प्रथम खेळणारा. [दु = दोन]
दुल्लड
स्त्री. दु मध्यें दुलड पहा.
दुम, दुय(व)म
वि. दुय्यम पहा.दुमजला-ली-वि. दोन मजल्यांचें (घर); दोन मजले डेक असलेलें (जहाज, आग- बोट इ॰); दुहेरी; दोन कांठ, संजाफ असलेलें (वस्त्र इ॰). [दु + मजला]
दुमात्राकानाकौ
दुमात्राकानाकौ dumātrākānākau n f (दु, मात्रा, काना, and the letter कौ. The words uttered by children in spelling or in showing the composition of the letter कौ) A cant term for a burden carried over both shoulders; or over one, hanging down behind and before: also for the person so loaded.
दुमची
दुमची f A crupper. दुमची उचलणें To hoist out, oust, turn out ignominiously. दु?B पुरविणें To hang at one's tail; to stick obstinately. दुमच्या झाडणें To kick up; to lash out — horse or an ass.
दुमड
स्त्री. १ दुहेरी घडी; सुरकुती; चुणी; दूण. (क्रि॰ घालणें.) २ (दुमडण्यानें वस्त्र इ॰ कास पडणारा) सळ; मोड; दुण. [दु + मोड]दुमडणें-उक्रि. दुमटणें.
दुमटणी
स्त्री. दुमडण्याची, घडी घालण्याची क्रिया. [दु + मोडणें] दुमटणें, दुमडणें, दुमतणें, दुमतविणें-उक्रि. दुहेरी घडी करणें; दुणणें.
दुपानी
दुपानी dupānī a (दु Two, पान Leaf.) Shotten or sprung--seed sown.
दुपक
वि. १ अंशतः दोन दिवस (तिथी इ॰) आल्या- मुळें त्या तिथीचें धर्मकृत्य आज करावें कीं उद्यां करावें इ॰ वादाला पात्र झालेली (तिथि). २ ज्याविषयीं दोन मतें, मतभेद आहे असा (मुद्दा, तिथि, आचारसरणी इ॰). [दु + पक्ष = बाजू]
दुपक dupaka a (दु Two, पक्ष A side.) That falls partly on one day, partly on another--a तिथि &c. 2 That (precept, dogma &c.) on which there are two opinions or two parties.
दुपोडी पोळी
दुपोडी पोळी dupōḍī pōḷī f (दु, पूड, पोळी) A पोळी or stuffed cake doubled up.
दुसड
दुसड dusaḍa f R (दु & सडणें) The second husking (by pounding) of rice.
दुसग, दुसगाई
स्त्री. (राजा.) मत्सर; द्वेष; विरोध; भांडण; घासाघीस; कचाकची; वितुष्ट. 'घरांत बायकांच्या दुसगी- मुळें संसार नसला.' [दु = दोन + संग] म्ह॰ दुसगीचा पाहुणा उपाशी मेला = ज्या घरांत नवराबायकोंत वितुष्ट आहे त्या घरांतील पाहुण्याची स्थिति फार चमत्कारिक व संकोचाची होते. कारण नवर्याचा पाहुणा बायकोला खपत नाहीं, व बायकोचा पाहुणा नवर्याला खपत नाहीं.
दुशोला
पु. जोड शामदान : ‘मोमबत्तीचे दुशोला, येकशोला याप्रमाणें जिन्नस...’ – मइसा ७·१५६. [दु + अर. शुअला]
दुष्प्राप्य
मिळण्याला कठीण, अवघड, कठीण, टप्प्यापलीकडलें, कोठे ते कोठे आम्हीं ! आवांक्याबाहेरचें, भरगीरथ प्रयत्नांनीं मिळालें तर मिळेल, देवांनाही दुर्लभ, दुर्मिळ, हाती येणें कठीण, प्राप्त होण्याची वानवा, लाभ होणें कठीण, एवढे नशीब शिकंदर नाहीं, तेथें पोहोंचणें कठीण, चटकन् खिशांत पडणार नाहीं, तीं द्राक्षें आंबट आहेत, झोळी पसरून काम होणार नाहीं, परिश्रम-साध्य, दु:साध्य, जवळजवळ असाध्य, आवांक्या-टप्प्या बाहेरचें, टिटवीला समुद्र, त्यापुढें उद्बाहुरिव वामनः
दुसरा
वि. १. क्रमाने पहिल्याच्या पुढचा. २. निराळा; भिन्न; अन्य; वेगळा. ३. आणखी; शिवाय; इतर. [सं. द्वि + सर, दु + सर] (वा.) दुसऱ्याचे घर दाखविणे –आपल्यावरची पीडा दुसरीकडे पाठविणे. दुसऱ्याचे घर निघणे – (एखाद्या स्त्रीने) लग्नाचा नवरा सोडून दुसऱ्या पुरुषाच्या घरी त्याची बायको म्हणून राहणे : ‘कोळ्यांच्या बायका जातींतल्या जातींत व्यभिचार करतात व दुसऱ्यांचे घरही निघतात.’ – गुजा ५९. दुसऱ्याचे पागोटे गुंडाळणे – (एखाद्याला) फसवणे; चकविणे. दुसऱ्याच्या तोंडाने जेवणे, दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे –स्वतंत्र विचार करण्याची अक्कल नसल्यामुळे दुसरा सांगेल त्याप्रमाणे वागणे, बोलणे, करणे.
दुटें
न. दुमडलेला कागद; दोन घड्यांचा, पानांचा कागद. [दु = दोन]
दुतोंडें
दुतोंडें dutōṇḍēṃ n (दु Two, तोंड Mouth) A species of serpent, amphisbæna. 2 A worm with two heads or mouths.
दुटप्पी or प्या
दुटप्पी or प्या duṭappī or pyā a sometimes दुटपी a (दु Two, टप्पा Drift.) Of double bearing, two sided, ambiguous--speech or action: also that uses such speech or performs such action--a person. 2 Having two members (a fly or वरलें टप and a shell or खाललें टप)--a tent. दु0 सांगणें To recount briefly; to tell in two shakes.
दुतर्फा
दुतर्फा dutarphā a ind दुतर्फी a (दु two, तरफ Part, side.) Having two rulers--a country: constituted of two distinct heads--a government: applicable, pertaining, or relating alike to both sides, parties &c. Ex. हा दु0 बोलणें बोलतो; दु0 कज्जा-मोकद्दमा-साक्षी- पुरावा &c.
दुथडी
दुथडी duthaḍī ad (दु Two, थड for तड Bank.) On both banks or sides.
दुठरुं
न. (कों.) गळूं इ॰ पुरतें पिकल्यावांचून फुटल्यामुळें पुन्हां भरून येतें तें. [दु + ठावर = गळूं]
दूड
स्त्री. १ दुपदरी गळसर, माळ; स्त्रियांचें एक कंठभूषण. 'सोनें दूड करण्यास दर तोळा रुपये १५। प्रमाणें.' -वाडसमा १.७२. [सं. दु सिं. दुरी] २ दोन घागरींची जोडी. (कावडीवांचून पाणी वाहतांना प्रयोग). 'एके घागरीनें पाणी केवढा वेळ आणावें दुसरी घागर दे म्हणजे दूडची दूड आणतों.' दुड, दुडी पहा.
दूड
स्त्री. १. दुपदरी गळसर, माळ; स्त्रियांचे एक कंठभूषण : ‘सोने’ दूड करण्यास दर तोळा रुपये १५ । प्रमाणें.’ – वाडसमा १·७२. २. दोन घागरींची जोडी. [सं. दु; सिं. दुरी]
दूक
स्त्रीन. (कडब्याच्या पेंढया, विटा इ॰ कांची) जोडी. [दु = दोन]
दुवा
पु. १. साखळीतील प्रत्येक कडी. २. पत्त्यातील, फाशातील दोन ठिपक्यांचे चिन्ह. [सं. दु; फा. दुओ]
दुवा
पु. १ ज्या अनेक कड्या एकमेकांत अडकवून सांखळी करितात त्यांपैकीं प्रत्येक कडी. २ पत्त्यांतील, फांशांतील दोन ठिपक्यांचें चिन्ह. दुवाई-स्त्री. भेद [सं. दु. फा. सिं. दुओ]
दुवाड
वि. द्वैत; द्वैतरूप. -मनको. [दु = दोन + वाड = वाट]
दुवाळी
स्त्री. १ एखादी गोष्ट दुसर्यांदा सांगतांना तींत फेरफार केला आहे असा होणारा समज. २ द्वैत. [दु = हीन + आळी = ओळ]
स्त्री. क्लेश; कष्ट; पीडा. 'तरी दुवाळी कोणा न व्हावी । कवणाची भंवई नुचलावी ।' -ज्ञा १३.२६६. [दु, दूर = वाईट + आळी = आगळीक, पीडा.]
दुवक्तां or दुवख्तां
दुवक्तां or दुवख्तां duvaktā or nduvakhtāṃ ad (दु Two, A Time.) At both times; in the morning and in the evening. 2 Twice.
दुवळ
वि. (कों.) दोन पेड एकत्र करून वळलेली; दुपेडी (दोर, दोरी). [दु + वळ]
दुवल
पु. रुपयाचा सोळावा भाग; एक आणा. [दु + वेळ] दुवली-स्त्री. आणेली. [दुवल]
दुवल duvala m (दु & वेळ) Two half án̤ás or one sixteenth part of a rupee.
धडप(फ)डणें, धडबडणें
आक्रि. १ (संताप इ॰कांमुळे) हातपाय आदळणें, आपटणें; चरफडणें. २ (शारीरिक दु:ख इ॰ कांनीं) तडफडणें; तळमळणें; बेचैनपणें वळवळणें; लोळणें. ३ परा- कांठीं) खटपट, प्रयत्न, खटाटोप करणें. ४ अव्यवस्थित रीतीनें काष्ठेची खटपट, प्रयत्न, खटाटोप करणें. ४ अव्यवस्थित रीतीनें पडणें.-शर. [सं. अध उत्पतनं-धडपडणं- धाड- पडणें धड- पडणें. -भाअ १८३५: म. धडपड] धडपडून उठणें-खड- बडून, एकदम उठणें, उठून उभें राहणें.
धडप(फ)डया
स्त्रीअव. (शारीरिक दु:ख, संताप इ॰ कानीं) हातपाय आपटणें; तडफडणें; चडफडणें. (क्रि॰ देणें; खाणें). [धडपड]
धक्का
पु. १ हिसका; हिसडा; आंचका. २ (एका पदा- र्थानें दुसर्यावर केलेला) आघात; तडाखा; प्रहार. ३ भयंकर दु:ख इ॰कानीं हृदयाला भरणारी धडकी; ऊर धडाडणें. 'मातेला धक्का बसला । लागे ती नित्य झुराया ।' -विक्र १८. ४ संकट; धोका; भय. 'आधीं गाजवावे तडाखे । तरि मग भूमंडळ धाके । ऐसें न होतां धक्के । राज्यास होती ।' -राजे संभाजीचरित्र ९. ५ रस्त्याच्या कडे- लोटाच्या बाजूनें बांधलेली कठड्याची भिंत, वरवंडी. 'धक्क्याच्या भिंती सुक्या दगडाच्या बांधतात.' -मॅरट ४४. इतर अर्थी धका पहा. [धका. ध्व.] ॰बुक्की-स्त्री. धकाबुकी पहा. [धक्का + बुक्का]
गुण
गुण guṇa m (S) A quality, attribute, affection, or property, whether of matter or mind; a power, faculty, excellence, virtue; a property inherent or an affection supervenient in the most comprehensive sense. In न्यायशास्त्र twenty-four such properties or affections are enumerated; viz. रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, गुरुत्व, द्रवत्व, स्नेह, शब्द, बुद्धि, सुख, दु:ख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, धर्म, अधर्म, संस्कार. 2 A property of created things. They are comprised in three--सत्व, रज, & तम, or principles of truth (reality, actuality, or existence); passion (foulness); and darkness (ignorance); characteristic also, respectively, of ब्रह्मा, विष्णु, & शिव. 3 Excellence, merit, virtue, freedom from fault or blemish. 4 Benefit, advantage, good, gain. 5 Product, effect, matter produced or resulting. 6 The product in multiplication. 7 A rope, cord, or string gen. 8 A bowstring. 9 In comp. Multiplied by, fold; expressing the ratio; as अष्ट- गुण, सप्तगुण, eightfold, sevenfold. 10 Remission or abatement (of a disease). 11 In arithmetic. Multiplier. 12 In geometry. The chord of an arc. गुण अठविणें g. of o. To commemorate the virtues, merits, talents (of a deceased or absent person). गुण उधळणें-पसरणें-पागळणें g. of s. To have one's native vileness breaking forth; to manifest one's evil qualities; to show the cloven hoof. गुण करणें To make promise of future ability or cleverness--a child. गुण काढणें g. of o. To take the vice out of; to thrash soundly. गुण दाखविणें or गुणांवर येणें To drop the mask; to show the cloven hoof; to exhibit the real disposition. गुण शिकविणें To teach, i. e. to render intelligent by a sound beating. गुण सोडणें or विसरणें To leave the path of virtue and take to evil courses. गुणाची चहा करणें To love merit. गुणा- ची चहा होणें in. con. To have a love for excellencies or good qualities. गुणांची माती करणें To misapply and spoil virtues or talents. गुणास येणें or पडणें To succeed; to be effectual; to turn out well. चांगले गुण करणें To behave well.
हाहा
उद्गा. दु. खोद्गार; अरेरे!, हाय, हाय!. 'हाहा! हाहा! ऐसें म्हणताचि हतशेष बळ पळालें हो!' -मोभीष्म ११.११६. [ध्व.] ॰कार-हाहाःकार, हाहाक्कार-पु. १ मोठा शोक; विलाप. 'चोहोंकडे पाण्याचा हाहाकार पडला.' २ एखाद्या पदा- र्थाचा अभाव, हाकाटी पडणें.
हसरत
(स्त्री.) हिंदी अर्थ : कामना, दुःख. मराठी अर्थ : अिच्छा, दु:ख.
कणकण, कणकणी
स्त्री. १. हुडहुडी; शिरशिरी; अंग मोडून येणे; ज्वर भरण्याच्या वेळी थंडीचे शहारे येणे. (क्रि. येणे, भरणे.) २. ताप निघाल्यावर अंगात राहणारी कडकी; मुरलेला ज्वर. (क्रि. राहणे, येणे, होणे.) ३. दु:ख. (गो.) [ध्व. सं. कवण = शब्द करणे]
खोड
न. १. शेंडा व फांद्या छाटून टाकलेले झाड; ओंडका; खुंट; सोट; बुंधा; फांद्यांच्या खालचा भाग : ‘तिन्ही लोकीं तुझें नाम वृक्ष पल्लव शाखा । वेंघलों वरि खोडा धरुनि भाव टेंका ॥’ - तुगा ३५४. २. सुगंधी द्रव्याचा खडा, लाकडाचा तुकडा (चंदनाचा, इतर सुगंधी झाडाचा). ३. (सामान्यतः) झाड. ४. फळे, फुले न येणारे जुनाट झाड; (ल.) म्हातारी व न विणारी किंवा गाभण राहण्यास अयोग्य गाय, म्हैस; वृद्ध मनुष्य. ५. भोपळ्याशिवाय दांडी, सांगाडा (सतार, वीणा यांचा); तबला, मृदंग करण्यासाठी तयार केलेला व पोखरलेला लाकडी ठोकळा. हा एक किंवा दुतोंडी असून शिसू किंवा खैराचा असतो; मृदंग. (मावळी) ६. लोखंडी घडकामाची चौरस पहार टेकविण्याचा लाकडी ठोकळा. [त. क. ते. कोऽडु]
लचक
स्त्री. १ कचक, उसण; मुरगाळणें. (क्रि॰ भरणें; निघणें; बसणें). २ उसण भरल्यानें होणारें दु:ख; चमक. (क्रि॰ मारणें). ३ चट; चटक; आवड; छंद. (क्रि॰ लागणें). [ध्व. लच्. हिं. लचकना] लचकणी-स्त्री. १ लचक भरलेली असणें. २ उडी मारणें; दचकणें इ॰ लचकणें-अक्रि. १ कचक, लचक भरणे; शिरेवर शीर चढून वेदना होणें; चमक मारणें;मुरगाळणें. २ उडी मारणें; दचकणें; खालीं, बाहेर, दूर, अकस्मात् सरकणें; घसरणें. 'तेवीं लचकलिया दिठी ।' -ज्ञा १४.८४. ३ मुरडणें; मुरकणें. 'या शिकून शिकून कशा उगाच लचकति ललना ।' म्ह॰ १ लोभ लचकला पान्हा सुटला (वात्सल्य उद्भवुन पान्हा आला). २ लोभ लचकला, डोळा पिचकला. लचका-पु. १ चट; चटक. (क्रि॰ लागणें). २ अकस्मात् भरलेली लचक. (क्रि॰ बसणें).
लक्क-क्ख-ख्ख
न. १ वीज इ॰ कांचें तेज स्फुरण होणें किंवा तसा भास होणें; लकलक करणें; चक्क; चमक. 'अकस्मात् वीज चमकतांच माझ्या डोळ्यापुढें लक्क झालें.' २ आकस्मिक भीति; आकस्मिक दु:खाचा धसका; धक्का. -वि. १ स्पष्ट; ठस- ठसीत. २ चकचकीत; झगझगीत इ॰ लकलकीत पहा. ३ उघडा बंब; अगदी नागवा. ४ कफल्लक; निर्धूत; उघडा (नग्न गोसावी). ५ छानदार; सुरेख. [ध्व.] (वाप्र.) लक्क भावडी कड्डा उजो-(गो.) नसता खर्च करून ऐट मारणें.
लळी(ळि)त
न. १ नवरात्र इ॰ उत्सवाच्या शेवटच्या दिवशीं रात्रीं उत्सवदेवता सिंहासनारूढ झाली असें कल्पून वासु- देव, दंडीगाण इ॰ ईश्वरभक्तांचीं सोंगें आणून त्या सोंगांनी स्वसं- प्रदायानुरूप देवतेस प्रसाद मागून सभासदांस वाटण्याचा विशिष्ट समारंभ. २ (यावरून) उत्सवप्रसंगीं सोंगें आणून नाटकाच्या प्रवेशाप्रभाणें खेळ करणें. ३ अशा प्रसंगाकरितां रचलेलीं व म्हटलेलीं गाणीं, अभंग, पदें इ॰ कवनांचा ग्रंथ. ४ (ल) दुष्पारिणाम; दु:खांत; फजीती (राज्य, संसार, व्यवहार इ॰ ची) -तुगा ४८४. -शर. ४ शेवटचें मंगल म्हणून मानलेल्या एका माळकेचा शेव- टचा अभंग. मंगल पहा. [सं. ललित] (वाप्र) लळा(ळि)- तावर येणें-वाद इ॰ प्रसंगीं चिरडीस येऊन निकरावर येणें; अतिप्रसंग होऊन रागावणें. लळित्या-वि. लळीत करण्यांत निपुण (हरदास इ॰).
मुक़द्दम
(दु.) हिंदी अर्थ : पुराने जमाने के. मराठी अर्थ : प्राचीन.
मुतअस्सिफ
(वि.) हिंदी अर्थ : पछतावा, दुःख. मराठी अर्थ : पश्चात्ताप, दु:ख.
ना शाद
(वि.) मराठी अर्थ : अप्रसन्न, दु:खी.
निसरसांड
निसरसांड nisarasāṇḍa f (निसरणें To slip, सांडणें To spill, drop, lose.) Suffering to slip from the memory; dropping all care or thought about or consciousness of. v कर g. of o. Ex. अहंते (सारखें) इतकें दु:ख नाहीं निसर सांडीं इतकें सुख नाहीं No pain like that of Consciousness of individuality; no rest like that of Utter obliviousness.
पाकळी
वि. पाकळ्या असलेलें (फूल इ॰). या शब्दा पूर्वीं एक, दु, ति, इ॰ सारखे अनेक शब्द जोडून समास बनतात. जसें:-एकपाकळी = पाकळ्यांचें एकच वर्तुल असलेलें (फूल); दुपा- कळी = पाकळ्यांचीं दोन वर्तुलें, रांगा असलेलें; तिपाकळी, चौपा- कळी. बहुपाकळी, अनेकपाकळी इ॰ [पाकळी]
पच
पच a In comp. That cooks or ripens Ex. सुंख पच दु:खं पच That cooks with ease, with difficulty &c.
पिडा
स्त्री. १ पीडा; त्रास, दु:ख; आजार. २ ज्यापासून आरणास त्रास होता तो इसम. ३ बाळंतपणापूर्वीची वेण; इजा. ॰जावप-(गो.) वेणा येणें. [सं. पीड् = त्रास देणें]
पीडणें
उक्रि. १ त्रासणें; त्रासविणें; दु:ख देणें. २ दाबणें. 'सव्य तें तळीं ठेविजे । तेणें सिवणीमध्यु पीडिजे ।' -ज्ञा ६.१९४. [सं. पीडन]
पिळवटणें
सक्रि. १ पीळ घालणें; पिळणें; पिरगाळणें. २ (ल.) व्यथित होणें; दु:खानें करपणें. 'पिळवटलेल्या हृदयाच्या ।' -संग्रामगीतें ६८. [पिळणें]
राग
पु. १ क्रोध; संताप; कोप. २ संस्कृतांत हा शब्द क्रोध किंवा दु:ख, आनंद, क्रोध, इच्छा, हेवा इ॰ मनोविकार सामा- न्यत: दर्शावितो. [सं.] म्ह॰ राग खाई आपणांस संतोष खाई दुसर्यास. (एखाद्याचा) राग करणें-ज्यावर आपला राग आहे तो दृष्टीस पडला किंवा त्याची गोष्ट निघाली कीं रागाविणें; त्याचा कंटाळा करणें. (एखाद्याला) ॰आणणें-एखाद्यास कोपयुक्त करणें; खिजविणें. ॰आणणें-धरणें-करणें-येणें- एखाद्याविषयीं पोटांत राग धरणें. ॰गिळणें-अतिशय राग आला असतां तो प्रयत्नानें आवरून धरणें. ॰नाकावर असणें-लवकर रागास चढणें; लवकर चिडणें. ॰मानणें-एखाद्यांबद्दल अढी बाळ- गणें; नासपंती दर्शविणें; नाखूष होणें. ॰येणें, रागें भरणें- रागावणें. रागाच्या हातीं जाणें-कोपवश होणें. रागाच्या हातीं देणें-रागाच्या हवालीं करणें; रागाच्या लहरींत सोडून देणें (काम, स्वामित्व, उद्देश) रागानें लाल होणें-रागानें संता- पणें; अतिशय रागावणें. रागानें हिरवापिवळा होणें-क्रोधा- मुळें अंगाची कांति बदलणें; भयंकर रागावणें. रागास येणें- भरणें-पेटणें-वढणें-खवळून रागाविणें; चेतणें; तापणें. रागें भरून घेणें-स्वत:वर दुसर्याचा राग ओढवून घेणें. (एखा- द्याला) रागें भरणें-एखाद्यावर आपला राग काढणें. रागणें- सक्रि. रागावणें. रागावणें-अक्ति. कोपयुक्त, रुष्ट होणें. [राग] रागिष्ट, रागीट-वि. कोपिष्ट, संतापी, तामसी. [राग] म्ह॰ रागिटाची चाकरी तरवारीची धार. रागी-वि. १ राग, मनोविकार असणारा (तीव्र, आवेशी, आस्थेवाईक, अनुरत, शीघ्रमनोविकारी, सहृदय, रसिक इ॰). २ विषयी; आसक्त. ३ शोक असलेला. 'तेथ रागी प्रतिमल्लाचा ।' -ज्ञा १८.४९०. [सं. राग] रागीसांड-डी-स्त्री. विषयत्याग. रागीसांडी-वि. विषयासक्त. रागेजणें, रागेणें-अक्रि. (काव्य राजा) १ रागावणें. 'रागे- जणें सुदुर्मिळ तेंहि जिचें ज्वालसें गगनिं जावें ।' -मोसभा ४.७५. २ रंगयुक्त होणे. रंगणें. 'रागेजली अरुण-कांति विराजवी ते ।' -नल १८. [राग] रागेला-वि. रागावलेला. 'रागेला परी सेवक चित्ता । धुसधुसी मिरवतसे ।' -नव १४.१८२. [राग]
रांकधनी
स्त्री. पूर्णिमेची समाधानी; पूर्णिमेच्या परमानंद- कारक प्रकाशाची विपुलता, रेलरेल. 'दारूण संसारु दु:काळीं । जेणें परमानंदाची रांकधनी केली ।' -शिशु ५. [राका + धणी ?]
रे(रें)व
स्त्री. १ बारीक वाळू; रेती. २ धान्यांत वगैरे असणारी बारीक रेती; साखर; दळलेलें पीठ इ॰ कांतील कचकच. ३ -न. आकाशांत लांबलचक पांढर्या ढगांचे पट्टे कधीं कधीं पसर- लेले दिसतात ते समुच्चयाने किंवा तशा पट्ट्यांनीं व्याप्त असें आकाश. (क्रि॰ निघणें; चढणें; वाढणें; पसरणें; विरणें; निखारणें; विरळणें). ४ गाळ. 'मग दु:खाचेनि बरबटें बोंबलें । पाठीं मरणा- चिये रेवे रेवले ।' -ज्ञा ७.८८. रे(रें)वट, रे(रें)वठील-वि. वाळूची; रेताड; वाळू असलेली; पुष्कळ खडे आहेत अशी (जमीन). रे(रें)वठा-पु. वाळूचा किंवा रेतीचा ढीग; रास. रेंवडा-पु. (कों.) १ वाळू; रेती. २ रेताड जागा; खडे असलेली जागा.
रेरे, रेरेरेरे
उद्गा. (आश्चर्य व दु:ख यांचा निदर्शक उद्गार) अहाहा; अरेरे; हाय हाय.
रोग
पु. १ मोठें दुखणें; आजार; प्रकृतींतील बिघाड; शरीरप्रकृतींत उत्पत्र होणारी विकृति. २ शरीर प्रकृतींत बिघाड उत्पत्र करणारें कारण. 'त्याचें पोट दाबून पाहिलें, चांगला आंब्या- एवढा रोग हाताला लागला.' ३ (फळांफुलांतील) नासका अगर किडका भाग; रोगोत्पादक किंवा प्रकृतींत बिघाड करणारा भाग. 'अगस्त्याचे फुलांतील मधली काडी तो रोग आहे. तो काढून टाक.' ४ विकृतिकारक पदार्थ;रोगकारक वस्तु, अत्र इ॰ 'हे धडधडीत किडके तांदूळ दिसतात आणि पैसा खर्चून हा रोग कशाला आणिलास?' ५ दुसऱ्याचें चांगलें पाहुन होणारें दु:ख किंवा त्रास; ज्यामुळें अंत:करणास व्यथा होते असा रोग (चिंता, मत्सर इ॰). ६ तिरस्करणीय, घाणेरडा, रोगट, कुसकट पशु किंवा मनुष्य. [सं. रुज् = रोग होणें] ॰ग्राम-पु. रोगांचें वसतिस्थान; शरीर. ॰निदान-न. रोगाची परीक्षा; कोणता रोग झाला आहे हें ठरविणें. ॰भावना-स्त्री. रोगांचीं लक्षणें; उदा॰ क्षयरोग- भावना; पित्तज्वरभावना; पांडुरोगभावना. २ लक्षणें दिसूं लागलीं आहेत असा रोग. ३ रोगपरीक्षा; रोग ठरविणें. ४ पिशाचबाधा. ॰मल्ल-पु. सदां रोगी; रोग व दुखणीं यांनीं जर्जर झालेला मनुष्य; रोगिष्ट माणूस. ॰मसाला-वि. (ना.) रोगानीं जर्जर झालेला; रोगेल; मरतुकडा (तिरस्कारार्थी उपयोग). ॰राई-स्त्री. १ लहानमोठे रोग; दुखणींपाखणीं. २ वाईट गुण; उपद्रवकारक धर्म; विकृति उत्पन्न करणारे एखाद्या वस्तूचे गुण. 'ताकाला ठिकरी दिली म्हणजे त्याची रोगराई चट जाते.' [रोग + राई. सं. राजि = ओळ] ॰लक्षण-न. १ एखाद्या दुखण्याचीं लक्षणें; रोगाची भावना. २ रोगाचीं पूर्वसूचक लक्षणें; होणाऱ्या रोगाचें सूचक चिन्ह. रोगवणी-न. १ रोगाचीं बीजें बरोबर वाहून नेऊन कोठा स्वच्छ करणारें रोग्याच्या पोटांतून बाहेर पडणारें पाणी, मल, ओकारी इ॰ २ भाजीपाल्यांतील शिजवून किंवा आंबवून काढलेला अहितकर रस, पाणी. ३ रोग आणणारा पाऊस. उदा॰ आश्लेषा नक्षत्राचा पाऊस; पिकावर रोग आणणारा पाऊस. [रोग + पाणी] ॰वारें-न. रोगराई; क्षुल्लुक दुखणें. 'समर्था कदा रोगवारें नको रे । -वेसीस्व (प्रस्तावना १२). ॰वेळ-ळा-स्त्री. तीस घटकांपैकीं विशिष्ट ३।।। घटका. वेळ शब्द पहा. रोगट-वि. १ रोगानें किंवा दुखण्यानें पछाडलेला; आजारी. २ खुरटलेला; मुरडलेला; रोग झालेला (भाजीपाला, फळें इ॰) रोगटणें-अक्रि. १ रोग होणें; विकृति जडणें; आजारी पडणें. २ (झाड, वेल, फळ, फूल इ॰) खुरटणें; मुरडणें; कीड लागणें. [रोगट] रोगणें-अक्रि. (कों.) रोगानें झिजणें; क्षीण होणें; रोड होणें. रोगपणें-अक्रि. रोगानें पीडणें; रोग होणें. 'नव्हे पचपचीत तनु रोगपली ।' -प्रला २१९. रोंगा-वि. (राजा.) १ रोडका; कृश अंगाचा; रोगट; आजारी दिसणारा. २ सुकट व आंबट चेहऱ्याचा; रुसलेल्या चेहऱ्याचा. रोगड्या-ळ्या-वि. आजारी; रोगानें झिजलेला; अशक्त; नाजूक प्रकृतीचा; रोड. रोंगाळणें-अक्रि. १ रोगट असणें, होणें; अजा- रानें अशक्त होणें. २ रेंगाळणें; झिजणें. [रोंगा] रोगिष्ट-ष्ठ- वि. रोगी; आजारी; कांहीं तरी रोग जडलेला; सतत आजारी; रोगट शरीराचा. [सं. रोगिष्ट] रोगी, रोगिया-वि. (काव्य) १ ज्याला पंडू, क्षय, दम, कुष्ट, मेह इ॰ चिरस्थायी रोग जडला आहे असा; रोगिष्ट; प्रकृतिस्वास्थ्य बिघडलेला; आजारी; दुखणा- ईत. 'का जिव्हालंपट रोगिया। अन्नें दूषी धनंजया ।' -ज्ञा १८. १३६. २ अहितावह; अपथ्यकर; रोगकारक. रोगीण-स्त्री. देवीची भक्तीण. या नेहमीं आजारी असतात. भावीण पहा. रोगेणें, रोंघणे-अक्रि. (राजा. कों.) रोगणें पहा. रोगेल, रोगेला, रोगलेला, रोग्या-वि. रोगट; नाजूक प्रकृतीचा; रोगिष्ट; सदा रोगी; रोगाड्या. रोगी-वि. (कु.) आळशी.
रोती सुरत
स्त्री. रडकी मुद्रा; रडवा, दु:खी चेहरा, तोंड (कधीं हसतमुख नसणाऱ्याबद्दल योजतात). [हिं.]
रुग्ण-न्न
वि. रोगी; रोगग्रस्त; आजारी. [सं. रुग्र; रुज् = दु:ख होणें] ॰दुत-वि. किडक्या दातांचा; किडके दांत असलेला. ॰परिचर्या-स्त्री. रोग्याची शुश्रूषा; रोग्याची चाकरी. ॰परिचर्यापथक-न. रोग्यांची शुश्रूषा करण्याकरितां उभारलेलें पथक; (इं.) अँब्युलन्म कोर. 'काँग्रेसचीं रुग्णपरिचर्यापथकें मोटारींतून हिंडू लागलीं.' -के १४.६.३०. रुग्णालय-न. आजार्यांना ज्या ठिकाणीं ठेवून आषाधोपचार केले जातात असें घर; (इं.) हॉस्पिटल. [सं. रुग्ण + आलय]
रुजा
स्त्री. १ रोग; पीडा; दु:ख. २ ज्या ठिकाणीं रोम- रंध्राचीं तोडें बंद झाल्यामुळें गळलेले केंस परत येत नाहींत ती जागा. -योर २.४२७. [सं. रुज्]
रुणा
पु. (कों.) १ झुरणी; सतत होणारें दु:ख; हृद्रोग. २ उतरती कळा. [ध्व. अथवा सं. रणरण]
सकणव
वि. सदय; दयार्द्र अंत:करण असलेला. 'हा भावो सकणवे । धरूनि श्रीहरी ।' ज्ञा १७.१२३७. [स + कणव] सकणवपणपु. सदयता; दयाळूपणा. 'तैसें दु:खिताचें शिणणें । हिरता सकणवपणें ।' -ज्ञा १६.१५५.
सखेद
क्रिवि. दु:खानें; खेदमुक्ततेनें; खेदानें. 'मग सखेद असे बोलतु ।' -ज्ञा १.१९२. [सं. स + खेद]
सन्यपात
पु. (प्र.) सन्निपात पहा. 'सन्यपाताचेनि दु:खें ।' -दा ५.६.६४.
संगत-ति
स्त्री. १ सहवास; सोबत; साहचर्य; स्नेह. 'उत्तम संगतीचें फळ सुख । अद्धम संगतीचें फळ दु:ख ।' -दा १७.७.१७. २ संयोग; मिलाफ; जोड; जमाव; मेळ; लाग; ३ ऐक्य; संबंध; जुळणी. ४ पूर्वापरसंबंध; अनुरोध. 'होईल श्लोकसंगति भंगु । म्हणऊनियां ।' -ज्ञा ५.६६. [सं. सं + गम् = जाणें]
संवेदक
वि. ज्ञान देणारें; कळविणारें; बोध करणारे. [सं. सम् + विद्] संवेदना-स्त्री. ज्ञान; जाणीव; बोध. संवेद्य-वि. स्वत:स कळणारें; स्वत:स जाणतां येणारें (पण दुसर्यास सांगतां न येण्यासारखें, आत्मानुभव, दु:ख, कळ, शूळ इ॰)
शोक
ती शोकसागरांत गर्क झाली, शोकविव्हल, मनांतल्या विस्कटलेल्या विचारांना विंचरीत बसे, आपल्याच दु:खी अंतःकरणाचे पडसाद बाहेर जगांत दिसत, तब्येत लागत नसे, मनाची ही निरगांठ उकलेना, मनच मेलें, जाणीव बधिरली, दुःख उगाळीत बसे, त्याचा चेहरा खाडकन् उतरला, दुःखमिश्रित गांभीर्यांचे जड पटल, जागच्या जागीं खिळल्यासारखा उभा राहिला, अति झालें हंसू आलें, सुतकी चेह-याने, विषण्णता मन झाकळून टाकी, मनांतील आनंदाचें खोबरें झालें, रंजीस आले, बरींच वर्षे तिचें बोलणे-हंसणें इतिहासजमा झालें होतें, अलीकडे दुःख हा मनाचा स्थायीभाव होऊन बसला आहे.
सोख्ता
(वि.) हिंदी अर्थ : जला हुआ, दुःखी. मराठी अर्थ : दग्ध, अत्यंत दु:खी.
टोचणें or टोंचणें
टोचणें or टोंचणें ṭōcaṇē or ṇṭōñcaṇēṃ v c To prick, pierce, puncture. Pr. सोनारानें कान टोचल्याचें दु:ख वाटत नाहीं. 2 fig. To prick, probe, cut; to touch a sore point. 3 To scratch or pick idly (a fruit, a sore &c.) 4 To freshen the memory (of a patron &c.); to jog.
त्रिशुद्धि
त्रिशुद्धि triśuddhi f (S) A note upon a paper indicating that it has been searched or examined three times. 2 Thrice-purified state. Ex. मी ऋणत्रयापासून त्रि0 ॥ मुक्त झालों भगवंता ॥. 3 Thrice-purified or perfected state (i. e. thrice-cleared-discharged-absolvedaccepted state) from having sworn or averred a matter thrice (ex. पिता निंदी त्रि0 ॥ पिशाच होय दु- रात्मा ॥); from ablution thrice; from heating, scouring, washing, clarifying, or other mode of depuration thrice. 4 Purified state of a विटाळशी (menstruous woman) through her having been dashed or sprinkled with water in three places. 5 Threefold purification, viz. कायिक, वाचिक, मानसिक Corporeal, oral, mental.
तुलवा
(दु.) हिंदी व मराठी अर्थ : (तालिब अिल्म का बहु०) विद्यार्थी.
विनोद (चांगला)
वाचीत असतां तोंडाची सुरकुती मोडेल असे लिखाण, खमंग चुरचुरीत खुसखुशीत विनोद, विनोदाची रम्य आतष- बाजी, लेखाला नरम विनोदाची झालर लावली आहे, दिलखेचक रोचक थट्टा, विनोदाची पखरण, कडू चेह-यांना विनोदाची बाळगोळी दिली आहे, हास्य-रसाची मेजवानी, मूर्तिमंत गंभीरतेला हंसविणारा विनोद, कोटीबाजपणा व विनोद याचा चमचमीत मसाला दाटून भरला आहे, मधाळ रसाळ व खट्याळ लेख, येथून तेथून श्लेषयुक्त व मार्मिक विनोदयुक्त, हास्यकारक घटनांनी ओथंबलेली कथा, विनोदाची झेप व पल्ला मोठा, यांची थट्टा हें दु:ख झाकणारें वस्त्र आहे, जीवनांतील झोंबणारी विसंगति उघड करतात.
वोळंब
पु. सोंग. 'सुखें वोळंब दावी गोहा । माझें दु:ख नेणो पाहा ।' -तुगा २९५७.
कूप
पु. १ खणलेला खड्डा. २ (सामा.) बिन पायर्यांची विहीर; आड. (समासांत) अंधकूप; जलकूप; धान्यकूप; शौचकूप. 'वापी कूप आराम । आग्रहारें हन महाग्राम ।' -ज्ञा १८.९९. 'छाये माकड विटे । धावे कुपीं काय भेटे ।' -तुगा १७७९. [सं.] ॰कच्छप-मंडूक-पु. १ (श्ब्दशः) विहिरींतील कांसव किंवा बेडूक. यावरून. २ (ल.) घरकोंबडा; आपलें घर हेंच जग समजणारा; बाह्य जगाविषयीं अज्ञानी; अंकुचित दृष्टीचा माणूस [सं.] ॰मंडूक-न्याय-पु. विहिरींतीलच संकुचित भाग, जागा; तिच्या बाहेर काय आहे याची त्याला मुळींच कल्पना नसते. त्याप्रमाणेंच जो मनुष्य आपला गांव किंवा देश सोडून कधीं बाहेर गेला नाहीं त्याला आपलाच गांव किंवा देश चांगला असें वाटतें व इतर गांव किंवा देश यांना तो तुच्छ लेखतो. 'असें प्रति- पादन करणें म्हणजे हिंदुधर्माच्या व्यापक स्वरूपबद्दल कुपमंडूक न्यायनें आपलें अज्ञान प्रदर्शित करणें होय.' -टि ४.३८८. ॰यंत्रघटिकान्याय-पु. रहाटगाडग्याच्या पोहर्यांची सदो- दित पालटणारी स्थिति; रहाटगाडगें फिरूं लागलें म्हणजे रिकामे पोहरे खालून पाण्यानें भरून येतात, त्यातील पाणी ओतलें जातें व ते रिकामें होऊन पुन्हां खालीं जातात आणि पुन्हां भरून वर येतात अशीच माणसांची स्थिति (सुखांतून दु;खांत व दुःखांत व दुःखांतून सुखांत) पालटली जाते. चक्रनेमिक्रम; उत्कर्षामागून अपकर्षाचा क्रम. [सं.]
दूर
क्रिवि. पुष्कळ अंतरावर; लांब. वि. १- (काल, अंतर, संबंध, नातें इ॰ कांच्या बाबतींत) लांबचा; निकटचा, जवळचा नव्हे असा. २ असंभवनीय; दुरापास्त दुर्घट. ३ बडतर्फ; नोकरीवरून काढलेला. [सं. दूर; फा. दूर; फ्रें जि. दूर] ॰करणें-१ (एखा द्यास) बडतर्फ करणें; नोकरीवरून काढून टाकणें. २ (अडचण, संकट इ॰) नष्ट करणें. ३ (अधिकार, सत्ता वगैरे) काढून घेणें; जप्त करणें. 'यांची पेशवाई दूर करून...' -सभासद ८. ४ लांब लोटून देणें, परकेपणा दाखविणें, बाळगणें. 'दूर न करती यास्तव कल्याणा ।' -दावि २८४. ॰धरणें-पाहणें- (एखाद्यास) ममत्व सोडून परका लेखणें; (एखाद्याकडे) परके- पणानें पाहणें. दूरच्यादूर-क्रिवि. फार लांबवर; दूर अंतरावर; दूरवर. 'कीर्ति प्रगटली दूरच्यादूर. ।' दूरत:-क्रिवि. दूरून; लांबून. म्ह॰ दूरून डोंगर साजरे. -डोंगर दुरून हिरवेगार व रम- णीय दिसतात पण जवळ गेलें असतां रुक्ष व भयाण दिसतात. यावरून, पुष्कळ गोष्टी दुरून चांगल्या दिसतात व त्यांच्यासंबंधीं आदर वाटतो. पण प्रत्यक्ष जवळ जाऊन त्या बारकाईनें पाहिल्या तर त्यांच्यांत पुष्कळ दोष आढळतात, व त्यांचा कंटाळा येतो. क्वचित् या म्हणीला 'जवळ जातां कांटेकुटे' असा उत्तरार्ध जोड- ण्यांत येतो. (सामाशब्द.) ॰दर्शन-न. १ दूरदृष्टि; दीर्घदृष्टि; दूरवर विचार करणें. २ दूरदर्शीपणा; दूरदर्शित्व. [दूर + सं. दर्शन = पहाणें] ॰दर्शी-दृष्टि-द्रष्टा-वि. १ दूरवर, खोल विचार करणारा पहाणारा. २ भविष्यदर्शी; भविष्यचिंतक. ३ दीर्घदृष्टीचा. [दूर + सं. दृश् = पहाणें] ॰दस्त दुदेस्त-वि. दूरचा; लांबचा. लाहोर प्रांत दूर्दस्त आहे.' -इम २६७. [फा. दूदस्त] ॰दृष्टि-स्त्री. १ खोलवर, दूरवर विचार करण्याची शक्ति; कुशाग्रबुद्धि, २ दीर्घदृष्टि; भविष्यकाळावर नजर ठेवून काळजीपूर्वक विचार करणें. [दूर + दृष्टि] ॰द्रष्ट-न. दुर्दैव; नशीब. 'न लागतां माझा शोध कपी सारे म्हणती ते हारे दूरद्रष्टा ।' -मोरा १.३३२. [दु + अदृष्ट] ॰वर- क्रिवि. लांबवर; खोलपणानें; दूरदृष्टिनें (क्रि॰ पाहणें, विचार करणें, नजर देणें). 'महादेवा देई दूरवरी दृष्टि । नको करूं कष्टी मुनीश्वरा ।' -मध्व. ५८३. ॰विचार-पु. दूरदृष्टि; दूरदर्शित्व. ॰विचारी- वि. दीर्घदर्शी; दूरवर विचार करणारा. [दूरविचार] दूरशी-सी- वि. रजस्वला; विटाळशी; अस्पर्श. 'दुष्ट म्हणे स्वसभेला तुजला नेतोंचि दूरसी अस कीं ।' -मोसभा ५.६. स्त्री दूरशी झाल्यावर पांचवे दिवसापासून..' -ग्टहवैद्य १५. दूरश्रवणयंत्र-न. दूरच्या माणसाशीं बोलण्याचें यांत्रिक साधन (इं.) टेलिफोन. [दूर + सं. श्रवण = ऐकणें + यंत्र] दूरस्थ-वि. दूर असलेला; लांबचा; दूरदेशीं असलेला. [दूर + सं. स्था = असणें, उभें राहणें] दूरीकरण- न. दूर करण्याची क्रिया; दूर करणें; वियोग. [सं.]
रात
स्त्री. १ रात्र. 'सुग्रीव म्हणें यत्नें लंकेचें भस्म जा करा रातीं ।' -मोरामायणें युद्ध ५५७. २ रातकिडा. [सं. रात्रि; प्रा. राती; हिं. पं. गुज. बं. उरिया रात; सिं राति; पोर्तुजि. अराची] म्ह॰ (गो.) रातचे बोल दिसाक पोल = रात्रीचे बोल दिवसाच्या वेळीं फोल होतात. रातच्यारात-क्रिवि. रात्रभर. सामाशब्द- रातकिडा-पु. रात्रीं किर्र आवाज काढणारा एक किडा. रात- बिरात-स्त्री. संकटाचा, धोक्याचा, अनुपपतीचा काल; वेळप्रसंग. 'रातबिरात आहे, चार जिन्नस घरांत बाळगून ठेवावें.' -क्रिवि. संकटकालीं; रात्रींबेरात्रीं. 'धान्य घेऊन ठेवावें, रातबिरात उष- योगी पडेल.' [हिं. रात + बिरात] रातवडा-पु. (गो.) एका रात्रीचें काम. रातवणी-न. (बायकी) रात्रीं हातपाय, घुण्या- करितां, शौचाकरितां किंवा पिण्याकरितां ठेवलेलें पाणी. [रात्र + वणी = पाणी] रातवा-पु. १ रात्रीचा सर्व काल; रात्रपणा. (क्रि॰ पडणें; होणें). २ रात्रीचा पाऊस. 'रातवा पडूं लागला; रातव्याच्या पावसानें किंवा रातव्यानें बाजरी नासेल. ३ बुजूं नये म्हणून घोड्याला रात्रीं बाहेर काढणें. (क्रि॰ देणें) [रात] रातवा घेउन निघणें-रात्र असतांना निघणें. (पावसानें) रातवा धरला-पावसानें रात्रीं पडण्याला सुरुवात केली. रातसार- क्रिवि. रात्रभर. रातांधळा-वि. ज्याला रात्रीं मुळींच दिसत नाहीं असा; रातांधळें प्राप्त झालेला. रातांधळें-न. एक नेत्र- रोग ह्यामुळें सुनुष्यादिकांस रात्रीं दिसत नाहीं. रातोरातीं- क्रिवि. रात्री; मध्यरात्रीच्या वेळीं. [वात] रातावणें-अक्रि. (काव्य) रात्र पडणें, होणें. 'रातावलें आतां जाऊं दे बाई घरा ।' [रात] रातिवळा-पु. (कों.) रात्रीं गुरांच्या पुढें टाकलेली वैरण किंवा ओलें गवत. रातिवा-पु. रात्रपणा; रात्र 'जे कांडाचेनि आंधारें । करिति रातिवा ।' -शिशु ९४४. राती-स्त्री. १ (काव्य) रजनी; रात्र. 'आनंदकंदा प्रभात झाली उठ सरली राती ।' -भूपाळी घनश्यामाची २०. २ अंधार. [सं. रात्री] रातीच्या रातीं-क्रिवि. (कुण.) रात्रीच्या मुदतींत; रात्रीच्या रात्रीं. राती(त्रि)दिवो-क्रिवि. रात्रंदिवस. 'तंव राहटवी रातिदिवो ।' -माझा १८.५०४. [प्रा.] रातोरात- क्रिवि. १ रात्रीच्या रात्रीं; दिवसाची इ॰ वाट न पाहतां रात्रीच्या वेळीं. २ सर्व रात्र; रात्रभर. 'हें पत्र म्यां रातोरात जागून लिहिलें' ३ रात्रीच्या वेळीं, रात्र असतांना. 'एव्हां निघालास तर रातोरात पोंचशील.' रातोरातीं-क्रिवि. रात्रीं; मध्यरात्रींच्या वेळीं. [रात] रात्र-स्त्री. १ रजनी; रात्रि; सूर्योस्तापासून सूर्योदयापर्यंतचा काळ; पृथ्वी दैनंदिन गतीनें आपल्या आसाभोंवतीं फिरतांना तिचा सूर्यानें अप्रकाशित असलेला अर्धा भाग. २ रातकिडा; झिल्ली. [सं. रात्रि] (वाप्र.) ॰ओरडणें-झिल्लीच्या शब्दानें नादणें. ॰वेर्याची जाणें-अतिशय दु:खांत व हालांत रात्र जाणें. मरती रात्र झाली-शपथेचा एक प्रकार. बंदाखालीं बसणें पहा. सामा- शब्द- ॰किडा-पु. रातकिडा; झिल्ली. रात्रंदिवस, रात्रंदिस- क्रिवि. रात्रीं व दिवसां; अहर्निश; अहोरात्र; सर्वदा. रात्रांध- वि. रात्रीं ज्यास दिसत नाहीं असा; रातांधळें झालेला. [सं.] रात्रि-स्त्री. रात्र; रजनी. [सं.] रात्रिं(त्रि)चर-पु. १ निशा- चर; राक्षस. २ चोर. [सं.] रात्रिंदिव-क्रिवि. (काव्य) रात्रीं व दिवसां; सर्वकाळ. 'जे रात्रिंदिव तूझें हित साधाया धरूनि धनु जपती ।' -मोकर्ण ३.३७. [सं.] रात्रिविर्तां-क्रिवि. रात्रीं; भर मध्यरात्रीं. [रात्रि + विर्तां] रात्रौ-क्रिवि. रात्रीस; रात्रीच्या ठायीं. [सं.] रात्रौणें-अक्रि. रात्र करणें. 'ऐसेआंहीं यावें रात्रौनि सायासीं ।' -शिशु १८३.
अठरा
वि. १ एक संख्याविशेष; १८. २ (सांकेतिक) पुराणें (मुख्य पुराणांची संख्या १८ आहे). 'कृष्ण वर्णुनियां श्रेष्ठ । चौघे गर्जताती भाट । अठरा मागध उद्भट । वंशावळी वर्णिती ।।' -एरुस्व ६.७६. तो हा पंढरीचा राणा । पुसा सहा चौं अठरां जणां ।।' -तुगा २५३९. [सं. अष्टादशन्; प्रा. अट्ठदह, अट्ठारस-ह; हिं. अठारह; पं. अठारां; बं. आठार; उ. अठर; गु. अढार; सिं. अडहं]. ॰अखाडे- अखाडा पहा. ॰उपधान्यें- न. अव. सजगुरा, भादली, वरी, नाचणी, बरग, कांग, खपले गहूं, मका, करडई, राजगिरा, मटकी, पावटा, मूग, वाल, कारळा, देवभात, सातू, अंबाडी. (दुसरी गणना) सजगुरा, नाचणी, वरी, मका, मटकी, राजगिरा, शिरस, पांढर- फळी, जिरें, मेथी, वेणुबीज, देवभात, कमलबीज, पाकड, अंबाडी; भेंडीबीज, गोवारी, कुड्याचें बीज, यांमध्ये कोठें कोठें खसखस व पांढरा राळा घालून ही संख्या विसावर नेण्यांत येते. ॰उपपुराणें- उपपुराणें पहा. ॰उपजा(या)ती-स्त्री. अव. अठरापगड जातीं- प्रमाणें ज्या अठरा उपजाती आहेत त्या अशा: भिल्ल, कोळी, मांग, अंत्यज, चांडाळ, पुल्कस, जिनगर, सलतानगर, चर्मक, डोहर (ढोर), भाट, बुरुड, रजक, दांगट, मोचेकरी, खाटिक, लोणारी व कैकाडी. -स्वादि ६.५.३७-३८. ॰कचेरी-स्त्री. (म्है.) राज्य- कारभारांतील सर्व वरिष्ठ खातीं असणारी मोठी कचेरी; सेक्रेटॅरिएट. ॰कारखाने- पु.अव. १ राज्यकारभारांतील खातीं: (अ)उष्टर, खबुतर, जनान, जवाहीर, जामदार, जिकीर, तालीम, तोफ, थट्टी, दफ्तर, दारू, दिवान, नगार, पील, फरास, बंदी, मोदी व शिकार हे अठरा कारखाने (आ) तोप, पील, उष्टर, फरास, शिकार, रथ, जामदार, जवाहीर, जिराईत, नगार, दारू, वैद्य, लकड, इमारती, मुदबख, कुणबिणी, खाजगत, थट्टी. (इ) खजिना, दफ्तर,जामदार, पील, जिराईत, अंबर, फरास, मुदबख, नगार, सरबत, आबदार, शिकार, तालीम, दारू, उष्टर, बकरे, तोप, सराफ. या तीन व आणखीहि कित्येक निरनिराळ्या याद्या सांपडतात. हे सर्व कारखाने सरकारी असून त्यांवर स्वतंत्र अधिकारी असत. सर्वांवर खानगी कारभारी मुख्य असे. 'त्याच्या अठरा कारखान्यांच्या गेल्या कळा । ' -एपो १४२. २ (ल.) मोठ्या संसाराच्या किंवा व्यवहाराच्या शाखा- खातीं. [अठरा + फा. कार्खाना]. ॰खूम- न. लोकांच्या अठरा जाती. सर्व प्रकारचे लोक; अठरापगड जात. 'या गांवांत एक मुकादम नाहीं, अठरा खुमाचे अठरा वेगळाले आहेत;' शिवाय-भाअ १८३४.४७. [अर॰ कौम; फा. खूम = जात,] ॰गुणांचा खंडोबा- पु. (ल.) १ सर्व (दूर्) गुणांनीं भरलेला; लुच्चा किंवा लबाड इसम; अट्टल सोदा. सोळा गुणांच्यावर कडी -जसा नाशिककर हा काशीकरापेक्षां शंभर पटीनें वरचढ तसा हा. २ अक्षयी रोगी; दुखणेकरी; अनेक रोगांनीं- दु:खांनीं व्याप्त. ॰जाती- स्त्री. अव. कुंभार, तेली, कासार, तांबोळी, न्हावी, परीट, कलाल, कोष्टी, झारा (झारेकरी), महार (चांभार), जैन, जती, दुंडे, गुजर, मारवाडी, सोनार, सुतार, हलालखोर (कसाब). -कोको. अठरापगड जाती पहा. ॰टोप(पी)कर- हिंदुस्तानांत आलेले युरोपियन आपल्या निरनिराळ्या देशरिवाजांप्रमाणे टोप्या वापरीत; तेव्हां त्यांना टोपकर असें नांव पडलें. १८ प्रकारचे (युरो- पियन) टोपकर: १ फिरंगी (पोर्तुगीज); २ वलंदेज (हालंड-डच); ३ निविशयान (नार्वेजियन); ४ यप्रेदोर?; ५ ग्रेंग (ग्रीक); ६ रखतार?; ७ लतियान (लाटिन); ८ यहुदिन (ज्यू); ९ इंगरे (इंग्रज); १० फरासीस (फ्रेंच); ११ कसनत्यान (शेटलंडियन केल्टिक?); १२ विनेज (व्हेनेशियन); १३ दिनमार्क (डेन्मार्क; १४ उरुस (आयरिश किंवा रशियन); १५ रुमियान (रुमानियन किंवा रोमन); १६ तलियान (इटालियन); १७ सुवेस (स्विस); १८ प्रेमरयान (पोमेरॅनियन). -भाइ १८३५. दुसरी एक यादी- फिरंगी, इंग्लिश, फ्रान्सीस, सिंध, पावलिस्त, क्रिस्त, ब्रम्हेय, डौन, द्रुप, क्राज, सुस्त, नाग, जर्मिनी, कालील, बांक, चीन, युवरेर, दौंडी. -कोको. यांत नुसते युरोपियन येत नसून हिंदुस्तानाबाहेरील चिनी वगैरेहि लोक येतात 'वडिलांची अठराटोपीकरावर सलाबत आहे.' -विवी. ८.३.५५. ॰तत्वें- न. अव. महान् (बुद्धि), अहं- कार, मन, दहा इंद्रियें आणि पंचतन्मात्रें -गीर १८५. ॰धान्यें- न. मुख्य धान्यें-गहूं, साळ, तूर, जव, जोंधळा, वाटाणा, लाख, चणा, जवस, मसूर, मूग, राळा, तीळ, हरिक, कुळीथ, सावा, उडीद, चवळी. ॰धान्यांचे कडबोळें- न. (भाजणी-अठरा धान्यें भाजून केलेल्या पिठाचा एक खाद्य पदार्थ ). (ल.) १ निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टीचें मिश्रण. २ अनौरस अपत्य; जारज. ३ भिन्न जातींचा संकर; संकरजात; संकर जातींतील व्यक्ति ॰पगडजात-स्त्री. १ तांबट, पाथरवट, लोहार, सुतार, सोनार, कासार, कुंभार, देवलक (गुरव), धनगर, गौळी, लाडवाणी, जैन, कोष्टी, साळी, चितारी, माली, तेली, रंगारी. -स्वादि ६.५.३५-३६. जशी युरोपियानांत टोप्यांची -अठरा टोप- कर-तशी हिंदु लोकांची पगड्या बांधण्याची तऱ्हा जातीजातींत वेगळी आहे; तेव्हा जितक्या जाती तितके पगड्यांचे प्रकार; या- वरून सर्व जाती किंवा जातींचे लोक; एकूणएक लोक. २ अव्य- वस्थित, मिश्र जनसमूह; नाना धर्मांचा जमाव. 'या यात्रेंत अठरापगड जात मिळाली आहे, तेथें सोंवळें काय पुसतां?' [अठरा + पगडी किंवा पगडा = फाशावरील संख्यावाचक चिन्ह] ॰पद्में वानर- पु. अव. तरुणांचा जमाव, टोळी, सैन्य; वानरसेना. (रामाला मदत करणारीं १८ पद्मे वानरें होतीं). ॰पर्वें- न. अव. महाभारताचीं मुख्य प्रकरणें:-आदि, सभा, वन विराट, उद्योग, भीष्म, द्रोण, कर्ण, शल्य, सौप्तिक, स्त्री, शांति, अनुशासन, अश्वमेघ, आश्रमवासी, मौसल, महाप्रस्थानक व स्वर्गारोहण. ॰पर्वें भारत- न. (ल.) मोठी कंटाळवाणी गोष्ट; लांबलचक, जींत अनेक भारुडें व दुःखप्रसंग भरले आहेत असें कथन; चऱ्हाट. ॰पुराणें-पुराणें पहा. ॰बाबू-लबाड किंवा लुच्च्या लोकांची टोळी; आळशी लोकांचा कंपू; अव्यवस्थित लोकांचे मंडळ; बारभाई. (हल्लीं) कारकून वर्ग. बाबू पहा. [बं. हिं. बाबू = राजेश्री; समान्य; आंइं. इंग्रजी लिहिणारा हिंदु कारकून ] ॰भार वनस्पति-स्त्री. पृथ्वीवरील सर्व वृक्ष-वन- स्पति यांचा समुदाय, 'अठराभार वनस्पतींची लेखणी ।' -व्यं ३१. ॰वर्ण-पु. अठरा (पगड) जाती. यांची एक यादी अशी; ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, कुंभार, गवळी, तेली, पांचाल, (सोनार, सुतार, लोहार, तांबट, पाथरवट, हे पांच मिळून) , कोष्टी, रंगारी, शिंपी, न्हावी, पारधी, महार, धनगर, परीट, मांग व चांभार. ॰विसवे (विश्वे)-वि. अतिशय; बहुतेक परिपूर्ण; जास्त प्रमाणाचें. विश्वा, विसवा पहा. [अठरा विसांश; वीस विसावांचा एक रुक्का, अठरा विसवे म्हणजे दोन विसवा कमी इतकें; बहुतेक पूर्ण] ॰दारिद्र्य (दरिद्र)-न. अतिशय गरिबी. 'त्याच्या घरीं अठरा विश्वे दारिद्र आहे.' 'अठराविश्वे दरिद्र पाणी वाहतें.' ॰विश्वे-पापपुण्य- चौकशी-मुर्ख-धर्म-रोग इ॰ वाक्प्रचार.
राजा
पु १ नृप; नृपति; भूपाल; नरेंद्र; छत्रपति; लहान राज्यें व थोडक्या प्रजा असलेलें संस्थानिक व सरदार यांसहि हा शब्द लागतो. २ (मंडळीचा, टोळीचा) नायक; मुख्य. ३ सजातीय पदार्थसमुच्चयांत श्रेष्ठ मानलेला तो. ४ अन्न, वस्त्र इ॰ पदार्थ यथास्थित असल्यामुळें ते मिळविण्याचे कष्ट किंवा काळजी ज्यास करावी लागत नाहीं असा मनुष्य. ५ गंजिफांच्या बांजूतील मुख्य. पत्त्यांतील एक चित्राचें पान. ६ बुद्धिबळाच्या खेळांत डावांतील मुख्य मोहरा. ७ वर्षांचा शास्ता म्हणून मानलेला ग्रह; वर्षेशग्रह. ८ (ल.) वेडा; मूर्ख; स्वेच्छ वर्तन करणारा मनुष्य. ९ कसरीच्या राणीस म्हणतात. (समासांत) राजपत्नी; राजपुत्र; राजकन्या; राजगुरु; राजपुरोहित; राजोपाध्याय; राजसभा इ॰ ह्याचे मराठी शब्दाशींहि समास झाले आहेत. जसें- राजपसंत; राजदरबार इ॰. राजपद उत्तरपदीं येणारे नायक या अर्थाचे कांहीं सामासिक शब्द- मृगराज = मृगश्रेष्ठ; तीर्थराज = तीर्थांपैकीं मुख्य, सागर किंवा प्रयाग; तसेंच गजराज; सर्पराज; अश्वराज; द्विजराज; देवराज; कविराज; वैद्यराज; पंडितराज; स्वामिराज; गणराज; भूतराज; यक्षराज; वनराज (आपटा किंवा शमी), वृक्षराज, राज- पद पूर्वंपदीं असलेले कांहीं सामासिकशब्द-राजक्रांति; राजशोभा; राजकृपा; राजचित्त; राजमित्र; राजप्रिय; राजाश्रय; राजाश्रित; राजबुद्बि; राजसखा; राजरंग; राजमहाल; राजवटी इ॰. [सं. राज् = प्रकाशेणें] (वाप्र.) राजापासून रंकापर्यंत-श्रीमंतापासून तों गरीबापर्यंत; सर्व दर्जाच्या लोकांत. 'ब्राह्मणाला राजापासून रंकापर्यंत मान मिळत असे.' राजा याचें राज असें रूप होऊन झालेले कांहीं सामाशब्द- ॰अंबीर-पु. १ (शृंगारिक काव्य) गंभीर स्वभावाचा, सभ्य नायक. -वि. बादशाही; भव्य; नामी; उत्कृष्ट (मनुष्य, देश, पोषाख, बोलण्याची ढब, कोणतीहि गोष्ट). [सं. राजा + अर. अमीर] ॰आवळी-स्त्री. आवळीचा एक प्रकार. या झाडास फळें लहान येतात. हीसच हरपररेवडी, रानआवळी असेंहि म्हणतात. ॰कडी-स्त्री. विशिष्ट प्रकारची कानांतील कडी; एक कर्णभूषण. ॰कवि-पु. दरबारी कवि. [सं.] ॰काज-कारभार- नपु. राज्यकारभार; राज्यासंबंधीं सर्व प्रकारचें काम. ॰कारण- १ राज्यासंबंधीं मसलत; खोल व गूढ मसलत, कल्पना. 'राज- कारण बहुत करावें ।' -दा ११.५.१९. २ गुप्त निमित्त, गूढ (एखाद्या गोष्टीचें). 'भिंतीस किती सारवलें, लिंपिलें तरी चीर पडते याचें राजकरण कांहीं समजत नाहीं.' ३ शासनसंस्थे- संबंधीं गोष्टी; राजनीती; (इं.) पॉलिटिक्स. 'बिझांटबाई तरुण मुलांनीं राजकरणांत पडूं नये असें सांगतात.' -केले १.१९. ॰कारणी-वि. खोल मसलत कारणारा; मुत्सद्दी. ॰कारभार- पु. राज्यव्यवस्था. ॰कारस्थान-न. राजकीय मसलत, कल्पना, बेत, चतुराई; राज्याची मसलत. ॰कार्य-न. १ राजकीय कर्तव्यें, काम; राज्याचीं कामें. २ राजाचें काम. ३ राजाचें शासन, कायदा, कृत्य. [सं.] ॰किंकर-पु. राजाचा चाकर; सरकारी नोकर, शिपाई, जासूद इ॰ [सं.] ॰किशोर-पु. राजाचा मुलगा. [सं.] राजकी-पु. राजाचा नोकर. 'राजकी म्हणती आमुचें घर ।' -दा १.१०.४६. -वि. राजापासून उत्पन्न होणारी; राजाच्या संबंधाची (सत्ता, जुलूम, कृत्यें). याच्या उलट देवकी. 'दुसर्या राज्यांत गेल्यानें राजकी उपद्रव टाळायास येईल पण देवकी उपद्रवापुढें उपाय चालत नाहीं.' [राजीक] राजकीय- वि. राजासंबंधीं; राजाचा; राजविषयक (व्यवहार, कारभार, मनुष्य इ॰) [सं.] ॰कीय कैदी-पु. राजद्रोहामुळें तुरुंगांत कद केलेला राजकरणी पुरुष; सरकारविरुद्ध अराजकता माजविणारा म्हणून कैद केलेला मनुष्य. ॰कीय बंदी-पु, सरकारी कैदेंत अडकलेला कैदी; राजद्रोही बंदिवान. ॰कीय व्यवहार-पु. १ राज्याचें काम. २ राजनीति. [सं.] ॰कीय सभा-स्त्री. राजका- रणासंबंधीं सभा; (इं.) पोलिटिकल मिटिंग. 'क्वचित एखादा सरकारी नोकर आपल्या मुलांना राजकीय सभांना जाण्यास प्रति- बंध करतो.' -केले १.२३३.[सं.] ॰कुमर-कुंवर-री- कुमारी-स्त्री. राजाची कन्या. [प्रा.] ॰कुमार-कुंवर-पु. १ राजाचा मुलगा; राजपुत्र. २ पुनर्वसु नक्षत्र. [सं.] ॰कुल-न. राजघराणें; राजवंश. [सं.] ॰केळ-ळी-ळें-स्त्रीन. केळीची एक जात व तिचें फळ. ॰क्रांत-क्रांती-स्त्रीन. १ राज्याची उलथापालथ; राज्यव्यवस्थेंत मोठी उलाढाल, खळबळ, बदल. २ युद्ध, शत्रूचें आक्रमण इत्यादीमुळें माजलेली गडबड, गोंधळ, वगैरे नासधूस. ३ राजाचा जुलूम, अन्याय. [सं.] ॰गादी-स्त्री. राजाची गादी; सिंहासन. ॰गुह्य-न. राजाचें किंवा राज्यासंबंधीं गुपित, गुढ; गुप्त गोष्ट. ॰गोंड-स्त्री. (शहराचा, गांवचा) मोठा रस्ता. ॰गोंड-पु. गोंडांतील एक श्रेष्ठ जात. ॰गोंडा-पु. पाल- खीच्या दांडीला मध्यभागीं लोंबता बांधलेला, हातांत धरावयाचा गोंडा. ॰घोस-स्त्री एक वेल. हिच्या पानांच्या काढ्याचा देवी इ॰ आजारांत उपयोग करितात. ॰घोळ-स्त्री. घोळ नामक भाजीची एक जात. ॰चिन्ह-न. १ राजेपणाचें चिन्ह; राजाचें छत्र, चामर इ॰ वैभव. २ (सामुद्रिक) नशीबीं सिंहासनावर बसण्याचा योग आहे असें दाखविणारी खूण, लक्षणविशेष किंवा विशेष गोष्ट. (आजानुबाहुत्व इ॰) ३ राजाची मोहोर, शिक्का, किंवा सही (नाणें, पत्र इ॰ कांवरील). ४ (राजाच्या सह्या अस्पष्ट, वाचण्यास कठिण असतात यावरून ल.) फरपट्यांचें, बिरखुडी, वाईट लपेटीचें, दुर्बोध अक्षर. [सं.] ॰टिटवी-स्त्री. पिवळसर रंगाची टिटवी. ॰तिलक-पु. १ राजांमध्यें श्रेष्ठ; सार्वभौम राजा. २ राजाटिळा. ३ राज्याभिषेक. [सं. राजा + तिलक] ॰तुरा-पु. एक फुलझाड व त्याचें फूल. ॰तेज-न. राजाचें तेज, वैभव, ऐश्वर्य. [सं.] ॰तख्त-न. १ राजाचें सिंहासन. २ राजधानी. 'किल्ला रायगड राजतख्त.' -चित्रगुप्त १६७. ॰त्व-न. राजेपणा; राजाधिकार; राजपद. [सं.] ॰दंड-पु. १ राजानें केलेली शिक्षा. २ राजानें बलविलेला दंड. ३ जातिबहिष्कृत केलेल्या मनुष्यास जातींत परत घेतांना त्यानें राजास द्यावयाचा दंड. ४ राजाच्या हातांतील अधिकारदर्शक काठी. ॰दंत-पु. चौकडीचे दांत; पदार्थ तोडावयाचे दांत; पुढील दांत. [सं.] ॰दरबार-१ राजाची कचेरी; न्यायसभा. २ प्रजेचीं गार्हाणीं ऐकण्याकरितां बसावयाची राजाची जागा. ॰दरबारी-वि. राज्यासंबंधी. ॰दर्शन-न. राजाचें दर्शन; राजाची भेट. 'राजदर्शन म्हणजे मोटा लाभ.' [सं.] ॰दुहिता-स्त्री. राजाची मुलगी. 'वर शिशुपाळ ऐकतां । दचकली ते राजदुहिता ।' -एरुस्व २.४१. [सं.] ॰दूत-पु. राजाची नोकर हुजर्या, सेवक; जासूद. [सं.] ॰द्रोह-पु. १ सरकाराबद्दल अप्रीति; राजाविरुद्ध कट, बंड; फितुरी. २ राज्य व राजसत्ता याविरुद्ध गुन्हा. ३ (कायदा) बादशाहाविरुद्ध किंवा ब्रिटिश अमलाविरुद्ध द्वेष, तिरस्कार किंवा बेदिली बोललेल्या किंवा लिहिलेल्या शब्दांनीं किंवा खुणानीं किंवा इतर रीतीनीं उत्पन्न करणें; (इं.) सिडिशन्. ॰द्वार-न. १ न्यायाच्या कचेरीचा राजवाडा; राजदरबार. २ राजवाड्याचा दरवाजा. [सं.] ॰धन- न. राजाचा महसूल, उत्पन्न. [सं.] ॰धर्म-पु. १ राज्यकारभार चालविण्याकरितां मार्गदर्शक असा शास्त्रांत सांगितलेला कायदा, अनुशासन. २ राजास योग्य किंवा शोभणारा गुण, राजगुण. कार्योपदेशकैशल्य, प्रागलभ्य इ॰). 'जे राजधर्म सुरतरू सख मखसे सुखद उत्सवद नाकीं ।' -मोसभा १.१५. ३ राजाचें कर्तव्य विशेष काम. [सं.] ॰धातु-पु. कित्येक कवींनीं लोखंडास हें नांव दिलें आहे । ॰धानी-नगरी-स्त्री. राजाचें राहण्याचें मुख्य शहर. [सं.] ॰धान्य-न. एक धान्य; सांवा. [सं.] ॰धारी- पु. एक प्रकारचा तमाशा. -कलावंतखातें (बडोडें) १३८. ॰निष्ठ- स्त्री. राजाविषयीं, सरकाराविषयीं आदर दाखविणारा. ॰निष्ठा- स्त्री. राजासंबंधीं, सरकारसंबंधीं आदर, पूज्यबुद्धि. 'राज्यपद्धतीं- तील दोष अधिकार्यांच्या नजरेस आणणें हीच खरी राजनिष्ठा.' -टिसू २१५. [सं.] ॰नीति-स्त्री. १ राजव्यवहारशास्त्र. आन्वी- क्षिकी किंवा तर्कविद्या, त्रयी किंवा धर्म विद्या, वार्ता किंवा अर्थ- विद्या व दंडनीति असे चार राजनीतीचे भेद आहेत. २ नीति; नीतिशास्त्र. [सं.] ॰नील-नीळ-न. नीलमणी. [सं.] पंचक- न. ज्यांत राजपासून जुलूम किंवा नासधूस होते असा ज्योति- षीय गणितानें येणाके काल. अग्निपंचक, चौरपचक, मृत्युपंचक, हानिपंचक इ॰ पहा. [सं.] ॰पट्ट-पु. राजाचा शित्ताज; राजाचें ललाटपट्ट. [सं.] ॰पत्नी-स्त्री. राजाची स्त्री; /?/. [सं.] ॰पत्र-न. राजाचें पत्र; देणगीपत्र; सनद. 'ब्राह्मण स्थापिले वृत्ति- क्षेत्रीं । ते ते अक्षयीं राजपत्रीं ।' -मुसभा ६.५६. [सं.] ॰पद- न. राजाचा अधिकार, दर्जा; राजत्व. ॰पद्धति-त-स्त्री. राजास योग्य अशी रीति, चाल, वहिवाट. [सं.] ॰पसंत-द-वि. राजे व अमीर उमराव यांस असणारा; सर्वोत्कृष्ट; उंची; खासा; नामी. [सं. राजा + फा. पसन्द] ॰पिंडा-पु. देखणा व छबी- दार मनुष्य; राजबिंडा. [सं. राजा + पिंड] ॰पीठ-न. १ राजाचें आसन; राजाचें सिंहासन. २ राजाधानीचें शहर. [सं.] ॰पीढी- पु. (महानु.) राजपुरुष. 'रवमदें पातले राजपीढी ।' -गस्तो ४६. [राजा + पिढी] ॰पुत्र-पु. १ राजाचा मुलगा. २ क्षत्रिय. [सं.] ॰पुरी-स्त्री. बादशाही शहर; राजधानी. [सं.] ॰पुरुष-पु. १ सरकारी अधिकारी, नोकर. २ राजाच्या चाकरींतील कोणीहि लहान- मोठा मनुष्य. [सं.] ॰बंदी-पु. राजकैदी; राजकीय गुन्हेगार, बंदिवान. ॰बनसी-वि. राजवंशाचा. हा हिंदुस्थानी शब्द मराठी लावण्यांतून नेहमीं येतो. [राजवंशी; हिं. राजबनसी] ॰बाबती- स्त्री. राजास द्यावयाचा वसुलाचा चौथा भाग. चौथ पहा. ॰बिडा- वि. अतिशय सुंदर व नाजुक पुरुषास म्हणतात; राजसारखा अथवा अत्यंत देखणा; सुंदर आणि तेजस्वी (मनुष्य). [राजा + पिंड] ॰बिदी-स्त्री. राजमार्ग. 'इंद्रियग्रामींचा राजबिंदी ।' -ज्ञा ७.१०६. ॰बीज-वि. १ राजाच्या बीजाचा, वंशाचा. २ (ल.) सुस्वभावी व सुंदर मुलास म्हणतात. ॰बीध-स्त्री. (शहराचा) मुख्य; मोठा रस्ता; राजबिदी. ॰बेत-(को.) राजदंड. [राज वेत्र] ॰भाग-पु. राजाचा भाग; सरकारस द्यावयाचा कोणत्याहि उत्पन्नाचा भाग. [सं.] ॰भार्या-भाजा-स्त्री. राजाची पत्नी; पट्टाभिषिक राणी. 'येरु बोले पाहीन पिता माझा । नको जाऊं मारील राजभाजा ।' -ध्रुवाख्यान ४ (नवनीत पृ. ४११). [सं.] ॰भोग-पु. सरकारचा हक्क. [सं.] ॰भ्रष्ट-वि. राज्यावरून निघा- लेला. ॰मंडल-ळ-न. १ राजांचा समुदाय. २ राजकीय मंडल; राजभृत्य; राजपुरुष; बादशाहा भोंवतालचे अमीरउमराव इ॰ [सं.] ॰मंत्र-पु. राजाचा बेत, उद्देश. [सं.] ॰मद-पु. राज्याचा गर्व, दर्प. [सं.] ॰मंदिर-न. १ सौध; राजवाडा. २ (लावणी, शृंगारविषयक काव्य इ॰ कांत) विलासंमदिर; रंगमहाल; अंत: पुर इ॰ [सं.] ॰महाल-पु. राजवाडा. ॰मान्य-वि. १ राजानें मान देण्यास योग्य; पूज्य; श्रेष्ठ; वरिष्ठ; २ ज्याला पत्र पाठवा- वयाचें असतें किंवा ज्याचा उल्लेख करावयाचा असतो त्याला सन्मानार्थ कागदोपत्रीं हें विशेषण लावतात. ३ सर्वांस पसंत पडेल असें. 'हा एक राजमान्य उपाय आहे ।' [सं.] ॰मार्ग- पु. १ राजाचा हमरस्ता; सार्वजनिक रस्ता. २ (ल.) सर्व लोकांनीं मान्य व पसंत केलेली चाल, वहिवाट, रहाटी. [सं.] ॰माष-पु. एक कडधान्य. [सं.] ॰मुद्रा-स्त्री. १ राजाची मोहार; चिता शिक्का; ठसा. २ राजाच्या छापाचें नाणें. [सं.] ॰मोहरा-मोहोरा-वि. १ शहाणा; शूर किंवा विद्वान् (मनुष्य); विद्या, शौर्य इ॰ गुणांनीं प्रसिद्ध असलेला, तेजस्वी (पुरुष). 'या राज्यांत नानाफडनवीस एक राजमोहरा होता.' २ देखणा व छबीदार (मनुष्य); राजबिंडा. ॰यश-न. राजाचें, राज्याचें यश; कीर्ति. 'राजयश वर्णितां वर्णितां भाट शिणले ।' [सं.] ॰यक्ष्मा- पु. क्षयरोगाचा एक भेद; कफक्षय. [सं.] ॰योग-पु. १ हठयो- गाहून भिन्न असा योगाचा साधा व सोपा प्रकार; प्राणनिरोध इ॰ न करितां अंत:करण एकाग्र करून भगवत्स्वरूपीं लावण्याचा उपाय. 'राजयोगतुरंगीं । आरूढला ।' -ज्ञा १८.१०४७. २ राज्य मिळ- वून देणारा पत्रिकेंतला ग्रहयोग. ३ श्रेष्ठ, सर्वोत्कृष्ठ योग; प्रापं- चिक वैभव व संपत्ति हीं उपभोगीत असतांहि त्यांहून आत्म्याची भिन्नता ओळखून आत्मचिंतनाचा अभ्यास चालू ठेवणें. [सं.] ॰योगी-पु. राजयोग करणारा मनुष्य; हठयोगीच्या उलट. [सं.] ॰रा-स्त्री. (नेहमीं अनेकवचनी उपयोग) कुलाचारच्या प्रसंगीं तबकांत ठेविलेल्या देवीच्या सात मूर्ती. [सं. राजश्वेरी = एक देवी] ॰राज-पु. राजाधिराज; राजांचा राजा; बादशाहा. [सं.] ॰राजेश्वर-पु. सम्राट; बादशाहा; सार्वभोमराजा. [सं.] ॰राणी- स्त्री. राजाची मुख्य पत्नी; पट्टराणी. [सं.] ॰रीति-स्त्री. १ राजांस योग्य अशा रीति, पद्धति, सरणी, मार्ग. २ सर्वमान्य पद्धति. [सं.] ॰रु(रो)शी-स्त्री. सार्वजनिक आणि स्वतंत्र परवानगी; उघड व पूर्ण स्वतंत्रता; मुभा. 'पोरांस सुटीच्या दिवसीं खेळायास राजरूशी असती.' [सं. राजा + फा. रूशन] ॰रू(रो)स- श-ष-क्रिवि. उघडपणें; प्रसिद्धपणें; स्वतंत्रपणें; अनियंत्रितपणें; बेधडक. 'तो राजरोस इराणीच्या दुकानांत जाऊन चहा पितो' २ दिवसाढवळ्या. [सं. राजा + फा. रूशन, रोशन्; रोश-इ-रौशन] राजर्षि-पु. तपश्चर्येनें ज्यानें ऋषि ही उच्च पदवी मिळविली आहे असा क्षत्रिय; तपस्वी क्षत्रिय; राजांमधील ऋषि. 'राजर्षि महर्षि सकळ येथें न्यूनाचि भूमिपाळ सभा ।' -मोसभा १.१०. [सं. राजा + ऋषि] ॰लव्हा-न. १ पक्षिविशेष. याचे मोठा व लहान असे दोन भेद आहेत. ॰लक्षण-न. १ राजत्वाचें सूचक एखादें स्वाभाविक चिन्ह. २ (छत्र, चामर इ॰) राजाचिन्हांपैकीं कोणतेंहि चिन्ह. [सं.] ॰लेख-पु. राजाचें पत्र; सनद. [सं.] ॰वट-वटा-टी-पुस्त्री. १ एखाद्या राजाचा, राज्याचा, अंम- लाचा, कारकीर्दीचा काल; कारकीर्द. 'विक्रमाचे राजवट्यांत सर्व लोक सुखी होते.' २ अंमलाचा, वजनाचा काल; (सामा.) चलतीचा काल. ३ सामान्य चाल, रीत, संप्रदाय, वहिवाट. 'आमचा सकाळीं जेवण्याचा राजवटा नाहीं.' -क्रिवि. राज्यांत; अमलांत; कारकीर्दीत. 'वडिलांचे राजवटा ही गोष्ट घडली नाहीं.' [राज्य + वर्ति] ॰वंटा-पु. हमरस्ता; राजमार्ग. [राजा + वाट] राजवर्खी बांगडी-स्त्री. एक प्रकारची बांगडी. ॰वंश-पु. राजाचें कुल. [सं.] ॰वंश्य-वि. राजाच्या कुळांतील, वंशांतील. [सं.] ॰वनसी-वि. राजघराण्यांतील. [सं. राजवंशी] ॰वळ, राजावळी-स्त्री. राजाचीं अक्षरें (सही); राजाचा शिक्का; राजमुद्रा. 'तर्ही राजावळीचीं अक्षरें ।' -ज्ञा १७.३२२. ॰वांटा-पु. १ मुख्य वांटा, मोठा हिस्सा. 'तो सुखदु:खाचा राजवांटा ।' -ज्ञा ८.१८४. २ राजाचा भाग. ॰वाडा-पु. राजाचा वाडा; राजमंदिर; प्रासाद. ॰विद्या-स्त्री. सर्व विद्यांमध्यें श्रेष्ठ विद्या. 'या दोन्ही कारणांमुळें राजविद्या शब्दानें भक्तिमार्गच या ठिकाणीं विवक्षित आहे असें सिद्ध होतों.' -गीर ४१५. [सं.] ॰विलास-पु. राजाचीं सुखें व करमणुकी; उच्च प्रकारचीं सुखें व क्रीडा. [सं.] ॰विलासी-वि. राजासारखीं सुखें भोगणारा; राजविलास करणारा; राजविलासांचा शोकी. [सं.] ॰वेत्र-न. राजदंड. [सं.] ॰वैद्य-पु. १ वैद्यशास्त्रपारंगत असा उत्तम वैद्य. २ राजाचा वैद्य. [सं.] ॰व्रत बांगडी-स्त्री. बांगडीची एक जात. ॰शक-पु. ज्येष्ठ शुद्ध १३, आनंदनाम संवत्सर, शके १५९६. या वर्षी शिवाजी महाराजांनीं आपल्या राज्योराहणानिमित्त सुरू केलेला शक. कोल्हापूर व इतर कांहीं संस्थानांत हा चालतो. [सं.] ॰शय्या-स्त्री. सिंहासन; राजाची शेज. [सं.] ॰शासन-न. १ राजाची आज्ञा. २ राजा अपराध्यांना जें शासन करतो तें. [सं.] ॰शोभा-स्त्री. राजाची शोभा; राजाचें तेज, कांति इ॰. [सं.] ॰श्रियाविराजित-वि. १ राजाच्या तेजानें व शोभेनें विभूषित; लक्ष्मीनें राजासारखा सुशोभित असा. २ बरोबरीच्या गृहस्थास पत्र लिहावयाचें असतां त्याच्या सन्मानार्थ हा शब्द त्याच्या नांवापूर्वीं विशेषणाप्रमाणें योजतात; पत्राचा मायना. [सं.] ॰श्री-पु. १ राजाची पदवी; राजाचें वैभव; राजासंबंधीं बोलतांना सन्मानार्थ योजावयाचा शब्द. 'एव्हां राजश्रीची स्वारी कचेरीस आहे.' २ सामान्य माणसास पत्र लिहितांना त्याच्या नांवांपूर्वीं हा शब्द आदरार्थं योजतात. ३ (विनोदार्थी) विचित्र, तर्हेवाईक माणूस. ४ (सामा.) गृहस्थ. 'आतां हे राजश्री माज्या भीमास पाणि लावून ।' -मोस्त्री २.२९. ॰सत्ता-स्त्री. १ राजाची सत्ता, कायदे- शीर अधिकार. २ राजाची थोरवी, कदर, भारदस्ती. [सं.] ॰सदन-न. राजवाडा. [सं.] ॰सभा-स्त्री. राजाची सभा, कचेरी; राजाचा दिवाणखाना; दरबार. [सं.] ॰स्थान-न. राजाची राहण्याची जागा. ॰सूय-पुन. सार्वभौम राजानें करावयाचा यज्ञ (हा यज्ञ सार्वभौमत्वाच्या द्योतनार्थ राज्याभिषेक समयीं मांडलिक राजांसह करावयाचा असतो). अथवा राजा (सोम- लता) याचें सवन, (कंडन) ज्यांत करताता तो यज्ञ. 'देवर्षि म्हणें नृप तो सम्राट् प्रभु राजसूयमखकर्ता ।' -मोसभा १.४६. [सं.] ॰हत्या-स्त्री. राजाची हत्त्या; खून. [सं.] ॰हत्यारा-वि. राज- हत्त्या-करणारा. ॰हंबीर-पु. राजअंबीर पहा. ॰हंस-पु. १ चोंच आणि पाय तांबडे व वर्ण पांढरा असा पक्षी. दूध व पाणी एकत्र केलीं असतां त्यांतून दूध तेवढें वेगळें करण्याची शक्ति याला आहे असें मानितात. 'राजहंसाचा कळप पोहताहे ।' -र ९. २ (लावण्या, शृंगारिक काव्य) प्रियकर; नायक. ३ एक झाड. हीं झाडें लहान भुइसरपट असतात; पानें बारीक व जोडलेलीं; यास तांबूस रगाचीं बारीक फुलें व बारीक शेंगा येतात. [सं.] राजांगण-गणें-न. १ राजाच्या, श्रीमंत लोकांच्या वाड्यापुढें रिकामी राखलेली मोकळी जागा. २ राजवाड्याच्या समोरचा चौक. ३ चौसोपी घरास मध्यें असलेलें चतुष्कोणी अंगण. 'पैस नाहीं राजांगणीं ।' -दावि ५०४. [सं.] राजागर-न. १ राजाचा बाग. 'सुटली तरी राजागरीं मरें ।' -एभा ११.५५८. २ रायभोग तांदुळाचें शेत. 'तेणें पिंकती केवळ राजागर ।' -एभा २७.२०२. ॰धिकार- पु. राजाचा अधिकार. [सं.] राजाधिपति, राजाधीश-पु. राजाधिराज. [सं.] राजाधिराज-पु. राजांचा राजा; सार्वभौम; अनेक मांडलिकांवरचा मुख्य राजा. [सं.] राजानुकंपा-स्त्री. राजाची कृपा, दया. [सं.] राजानुग्रह-पु. राजाची प्रसन्नता. [सं.] ॰पुरी-वि. राजापूर गांवासंबधीं (गूळ, हळद, भाषा इ॰). राजाप्रधान सोडणें-(बायकी) चातुर्मासांत भात व वरण हे मुख्य पदार्थ वर्ज्य करणें. राजाभिषेक-पु. राज्यारोहणप्रसंगीं महानद्या, समुद्र इ॰ कांचें पाणी आणून त्यानें अमात्य, पुरोहि- तादिकांनीं मिळून राजावर विधिपूर्वक अभिषेक करावयाचा, राजाला, गादीवर बसविण्याचा समारंभ. [सं.] राजाम्लक-की-पुस्त्री. रायआवळा-ळी पहा. [सं.] राजावर्त, लाजवर्द-पु. हलका, कमी प्रतीचा हिरा (इं.) लपिसलॅझूली. याचा मुख्य रंग निळा; कधीं तांबूस पिवळाहि सांपडतो. [सं.] राजावली-स्त्री. राजांची परंपरा; राजाचें घराणें; राजवंश. [सं.] राजावळ-स्त्री. १ तांदुळाची एक जात. २ तांबड्या रंगाच्या लुगड्याचा एक प्रकार. ३ वर्षाचा अधिपति; मंत्री इ॰ ग्रह दाखविणारा पचांगाच्या आरंभीचा भाग; संवत्सर फल. राजावळी-वि. राजानें काढ- लेली (ओळ). 'तर्ही राजावळीचीं अक्षरें ।' -ज्ञा १७.३२२. राजासन-न. राजाचें सिंहासन; तख्त. [सं.] राजाळूं-न. पांढर्या अळवाची जात. ह्याच्या पानाचा देठ लांब व जाड आणि कांदा मोठा असतो. राजाळें-न. केळ्याची एक जात. राजाज्ञा- पु. राजाच्या प्रधानांपैकीं (अष्टप्रधानांपैकीं नव्हे) एक. -स्त्री. १ राजाची आज्ञा, शासन. २ निखालस व खसखशीत हुकूम; आदेश; आज्ञा. राजिक-वि. राजकीय. 'राजिक देविक उद्वेग चिन्ता ।' -दा ११.३.५. राजी-स्त्री. गंजिफांतील शब्द; राजेरी देणी. [राजा] राजीक-न. १ राजाचा जुलूम; अन्याय; राजापासून उत्पत्र होणारीं सतटें व दु:खें; याच्या उलट दैविक. २ सैन्याच्या स्वार्यांमुळें होणारी नासधूस; धूळधाण. ३ राजाचें काम; लढाई व तिच्यामुळें होणारी अव्यवस्था. ४ क्रांति; बंड. [राजा] राजी बेराजी, राजीक बेराजिक-स्त्रीन. निर्नायकी; बेबंदशाही; एक राजा गादीवरून दूर झाल्यापासून दुसरा येईपर्यंतचा मधील काळ. [राजीक] राजेंद्र-पु. १ राजांचा राजा; बलाढ्य राजा. २ राजअंबीर. [सं.] राजेरजवाडे-पुअव. राजे; संस्थानिक; सरदार इ॰. राजेश्री-वि. १ राजश्री याचें अशुद्ध रूप. २ (ल.) मूर्ख माणुस. 'हे राजेश्री दुसर्याला तोंडघशी पाडण्याऐवजीं आप- णच पडेल.' -के २४.६.३०. राजेश्वरी-स्त्री. शिवाची अथवा ईश्वराची पत्नी; देवी. [सं.] राजेळ-ळी, राजकेळ-स्त्री. न. केळीची एक जात व फळ. हे केळें ६ ते १२ इंच लांब व तिधारी असतें. ह्याचीं सुकेळीं करतात. राजैश्वर्य-न. राजाचें ऐश्वर्य, वैभव, थाटमाट. [राजा + ऐश्वर्य] राजोट-टी, राजोटा-स्त्रीपु. राजवट; राजवटा पहा. राजोट्या-पु. १ कुटुंबांतील कर्ता पुरुष; घरांतील मुख्य कारभारी. २ (ना.) लुडबुड करणारा, चोंबडा मनुष्य. राजोपचार-पु. १ राजत्वास योग्य असे आदर, उपचार; राजास उचित असे उपचार (छत्र धरणें, चवरी-मोरचेल वारणें इ॰). २ सात्विक, सौम्य औषधयोजना, शस्त्रक्रिया इ॰ नाजूक प्रकृतीच्या माणसास सोसण्याजोगा ओषधादि उपचार. [सं. राजा + उपचार] राज्य-न. १ प्रजेपासून कर घेऊन तिचें पालन करणें असा राजाचा अधिकार किंवा काम. २ राजाचा अंमल; हुकमत. ३ राजाच्या सत्तेखालवा प्रदेश. ४ राष्ट्र; कायद्यानें राहण्यासाठीं संघटित झालेलें व एका विशिष्ट देशांत राहणारें लोक (ही व्याख्या वुड्रो विल्सन यांची आहे); किंवा एका ठराविक प्रदेशांत दंडशक्तीच्या सहा- य्यानें न्याय व शांतता प्रस्थापित करण्यासाठीं स्थापित केलेला मनुष्यांचा समाज. ५ कोणत्याहि व्यवहारांत दुसर्यास न जुमा- नतां स्वतंत्रपणें वागण्याजोगें एखाद्याचें आधिपत्य असतें तें. त्याचें घरांत सारें बायकांचें राज्य झालें आहें.' ६ खेळांतील डाव, हार. [सं. राजन्] ॰क्रांत-क्रांति-स्त्री. राज्याधिकार्यांत आणि राज्यपद्धतींत जबरदस्तीनें घडवून आणलेली उलथापालथ. [सं.] ॰घटना-स्त्री. राज्यव्यवस्थेसंबंधीं मूलभूत कायदे वगैरे. ॰घटना मोडणें-राज्यघटनेच्या कायद्यांत ज्या पद्धतीनें राज्य- कारभार चालवा असें नमूद केलें आहे त्याप्रमाणें कारभार चाले- नासा होणें. -के ५.१.३७. ॰घटना राबविणें-मंत्रिमंडळास जे अधिकार दिले आहेत त्यांचा उपयोग लोकहितवर्धनार्थ कराव- याचाच. पण प्रत्यक्ष कायद्याच्या कलमांतील शब्दानें जो अधिकार दिला नसेल तोहि प्रत्यक्ष व्यवहाराला आवश्यक म्हणून पर्यायानें दिला गेला आहे असें म्हणून त्यांचाहि पायंडा पाडणें.' -के ५.१.३७. ॰पद्धति-स्त्री. राज्यकारभाराचा प्रकार. हिचे राज- सत्ताक, प्रजासत्ताक व राजप्रजासत्ताक असे तीन प्रकार आहेत. [सं.] ॰भार-पु. राज्याचा कारभार करण्याची जबाबदारी, भार, ओझों. [सं.] ॰रीति-स्त्री. शासनपद्धति. 'ज्या राष्ट्राची राज्यरीति उत्कृष्ट आहे त्यास धनसमृद्धि अपायकारक होत नाहीं.' -नि ५३. ॰लोट-स्त्री. राज्यक्रांति; राज्य बुडणें. 'झालिया राज्य- लोट ।' -एभा ३०.३५९. ॰व्यवहार-पु. राज्याचें काम. [सं.] राज्यांग-न. राज्याचीं मुख्य अंगें. हीं स्वामी, अमात्य, सुहृत्, कोश, दुर्ग, राष्ट्र, व बल अशीं सात आहेत. यांतच कोणी पौर- श्रेणी व पुरोहित यांचा समावेश करतात. [सं.] राज्याभिलाष-पु. राज्याचा अभिलाष; दुसरे देश जिंकण्याची किंवा त्यावंर राज्य कर- ण्याची महत्त्वाकांक्षा. [सं.] राज्याभिलाषी-वि. राज्याचा अभि- लाष करणारा. [सं.] राज्याभिषिक्त-वि. सिंहासनावर बसविलेला; ज्यास राज्याभिषेक झाला आहे असा; राजश्रीनें युक्त केलेला. [सं.] राज्याभिषेक-पु. राजाला गादीवर बसविण्याच्या वेळीं विधिपूर्वक करावयाचा अभिषेक; राज्याधिकाराचीं वस्त्रें देणें. [सं.] राज्यासन-न. सिंहासन; राजासन पहा. [सं.] राज्योपचार- पु. सरकारी अधिकार्याचें कृत्य. [सं.]