मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

धगड

पु. १ जार; भडवा; यार; उपपति. 'जड प्रपंच धगडालागीं ।' -दावि ७५. 'म्हणे प्रदोष करत्ये न माती करत्ये. त्या मेल्या धगडाला मात्र घेऊन बसत्ये.' -सागोप्र २.३. २ (अशिष्ट, निंदार्थी) नवरा, पति. 'पोरी, आज मुके देतांना तोंड असें वांकडें करतेस पण उद्यां नवरा (आजोबा इथें थोड्याशा ग्राम्य भाषेंत धगड असें बोलत) मुके घेऊं लागला म्हणजे कसें करशील.' -बहकलेली तरुणी ६. ३ (एखाद्याचें) निर्दालन, परा- भव करणारा; उरावर बसणारा; पुरें पडणारा; डोक्यावरचा मनुष्य इ॰ 'हा पंडितांचा धगड आसे.' 'मंडूर हा पंडु रोगाचा धगड आहे.' [सं. धव; हिं. धगडा] म्ह॰ जेथें दगड तेथें धगड. धगडी-स्त्री. रखेल; रांड; जारिणी; नाटकशाळा. हा शब्द धगडीचा = रांडलेक, रांडेचा या ग्राम्य शिवीच्या रूपानेंच विशेष रूढ आहे.' फुगडी फू, उघडी हो । न होसी उघडी तरी मग धगडी तूं ।' -ब ५९०. 'धगडीचा बटकीचा लवंडीचा ।' -दा १७.६.२०. [धगड; तुल॰ गुज.]

दाते शब्दकोश

धगड dhagaḍa m ( or H) A gallant, sweetheart, lover, leman. Pr. जेथें दगड तेथें ध0. 2 In low or familiar language. A husband. 3 In familiar language. The all-surpassing or subduing he or it, before whom or which all must cower; the man, the match, the master. Ex. हा पंडित सर्व पंडितांचा ध0 आहे; हा तुमचे उरावरचा ध0 आला; बिबवा अमांशाचा ध0 आहे; मी तुझा ध0.

मोल्सवर्थ शब्दकोश

धगड m A gallant, paramour; a husband.

वझे शब्दकोश

पु० नवरा. २ वि० आवडता, प्रिय.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

काळजीचा धगड

काळजीचा धगड kāḷajīcā dhagaḍa m A term for a person utterly without concern or care.

मोल्सवर्थ शब्दकोश

धगड      

पु.       १. जार; भडवा; यार; उपपती : ‘जड प्रपंच धगडालागीं’ । – दावि ७५. २. नवरा; पती. ३. निर्दालन, पराभव करणारा, उरावर बसणारा, पुरे पडणारा, डोक्यावरचा मनुष्य. [सं. धव; हिं. धगडा]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु.       उतारा; रामबाण उपाय.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

काळजीचा धगड      

अत्यंत निष्काळजी; बेगुमान (माणूस). काळज्वर      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

ढगाड or ढगार

ढगाड or ढगार ḍhagāḍa or ḍhagāra n (Intens. of ढग) A large and dense cloud.

मोल्सवर्थ शब्दकोश

धगडी

धगडी dhagaḍī f (धगड) A kept mistress, or a female sweetheart. This word is better known in the genitive (धगडीचा Sprung from an inamorata--whoreson) as a term of vulgar reviling.

मोल्सवर्थ शब्दकोश

उपपति

पु. यार; जार; धगड; सग्या; राखा; पतीखेरीज दुसरा उपभोक्ता; व्यभिचारिणीशीं संबंध असलेला पुरुष. [सं. उप + पति]

दाते शब्दकोश

उपपति, उपपती      

पु. यार; जार; धगड; सग्या; राखा; पतीखेरीज दुसरा उपभोक्ता; व्यभिचारिणीशी संबंध असलेला पुरुष. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उरावरचा गोहो

उरावरचा गोहो urāvaracā gōhō or -धगड m A term for an object (a person or a thing) of which one lives under the dread or apprehension.

मोल्सवर्थ शब्दकोश

यार

पु. १ मित्र; स्नेही; दोस्त; मदतनीस. २ जार; धगड; प्रेमी. ३ हत्तीबरोबर चालणारा भालाईत. [फा. यार; सं. जार द्वितायार्थी] यारी-स्त्री. मैत्री; अत्यंत सख्यभाव; दोस्ती; निकट स्नेह. 'अधमाची यारी । रंग पतंगाचे परी । ' -तुगा ११७७. २ मदत; साह्य. (क्रि॰ देणें). [फा.] ॰देणें- संकटकाळीं मदत करणें; (जरूरीचे वेळीं) उपयोगी पडणें. ॰न देणें-(जरुरीचे वेळीं) निराश करणें; मदत न करणें; हेळ- सांड करणें. यारेदी, यारदी-पु. १ देशपांड्याचा मदतनीस वतनाची देखरेख करणारा; गुमास्ता. २ -स्त्री. त्या गुमास्त्याची वंशपरेनें चालत आलेली मालमत्ता-हुद्दा-जागा इ॰ [फा. यारी- दिह्]

दाते शब्दकोश