मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

धडा

पु. १ विवक्षित मुदतींत तयार करण्यास पंतोजीने शिष्याला नेमून दिलेला, पाटी इ॰ कांवर लिहून दिलेला पाठ. २ (पुस्तक इ॰ कांतील) पाठ. 'तीसर्‍या पुस्तकांतील शेवटला धडा वजनाविषयीं आहे.' ३ (ल) (एखाद्यास)वर्तनाच्या बाबतींत घालून दिलेली नियम; शिस्त; उदाहरण; (काम इ॰ करण्याकरिता घालून दिलेली) पद्धत; सरणी. वहिवाट; रिवाज. 'कासया पडिला जी धडा । उगाचि वेडा आणि वांकडा ।'-तुगा ७१६. 'यजमान धडा । घालून देतो त्याप्रमाणें गुमास्ते वागतात' ४ हिय्या; हिंमत; धाडस; निश्चय. 'आतां मनाचा धडा करून करंजा खातों.' -कफा २.५ (एखादी वस्तु मिळाल्यानें)विवक्षित कालपर्यंत ती मिळविण्याविषयीं होणारी निश्चिंतता. 'एक पितांबर घेऊन ठेविला म्हणजे बारा वर्षांचा धडा होतो.' [सं.द्दढ ?] ॰घेणें- शिकणें; बोध घेणें.

दाते शब्दकोश

धडा dhaḍā m A lesson, an assigned portion to be read, written, learned. 2 Letters traced on the sand board, in instructing children to write or read. 3 Directions for guidance; rules or instruction laid down for conduct. Ex. यजमानानी धडा घालून दिल्हा आहे त्याप्रमाणें गुमास्ते वर्त्ततात. 4 ( H) A weight consisting of ten sher: also the quantity weighed by it. 5 A weight put into the opposite scale to counterbalance the receiving vessel. 6 A large weight made up by counterbalancing (stones &c.) against a small weight; adding them to that weight; opposing stones again to the weight now doubled; thus proceeding to increase by constant duplication: also an ascertained portion of the thing to be weighed out; used as a standard by which to weigh and ascertain the quantity remaining. 7 Confidence, assurance, settled conviction. 8 Calm reliance or satisfaction; comfortable persuasion regarding. Ex. एक पितांबर घेऊन ठेविला म्हणजे बारा वर्षांचा धडा होतो. 9 A body or band (of Pindarries or other marauders).

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. १ दहा शेरी वजन केलेल्या मालाचें परिणाम. २ तराजूच्या एका परडयांत (ज्यांत पदार्थ घ्यावयाचा तें) भांडें इ॰ ठेवून कांटा समतोल करण्याकरितां दुसर्‍या पारडयांत टाक- लेलीं वजनें इ॰ अभंड; पासंग. 'तराजुआ निवृतिचा । धडा बांधौनि तीर्थांचा । जरि कांटा कलताए दैवाचा । जेउता राजमठु ।' -ऋ ३९. 'तुळे उभवुनि धडा । कनक भरितां पारड ।' -भुवन(हरिश्चंद्रा- ख्यान नवनीत पृ. १९०.) ३ मण, दोनमण इ॰ सारखें एकदांच वजन करावयाचें असल्यास व त्या परिमाणाचीं वजनें जवळ नस- ल्यास लहान परिमाणाच्या वजनानें तितक्याच वजनाचे दगड इ॰ मोजून घेऊन त्यांनीं बांधतात ते मोठे वजन. ४ (व.) सपाटा; तडाखा. 'तुपाचा धडाच लावला.' ५ (पेंढारी इ॰ लुटारूंची) टोळी. ६ सामायिक जमीनीचा मालमत्तेचा वांटा हिस्सा, भाग. ७ (जरतार धंदा) पंचवीस ते ३० तोळे वजनाचा तांब्याचा रूळ घेऊन त्यावर जरतार गुंडाळतात व त्या तांब्याच्या रुळासह त्याचें केलेल वजन. [सं धट = ताजवा; हिं. धडा = वजन,जोख, जथा, टोळी; गु. धडो = वजन; सि. धडो ]

दाते शब्दकोश

पु. (महानु) घडा; घागर. 'तोकैसादिसताए कांतळा । जैसा अमृतरसाचा ॐतिला । कीं श्रेष्ठेने धडा घातला । रेवांतासी ।' -शिशु ९९४.

दाते शब्दकोश

धडा m A lesson; direction for guidance. A weight consisting of ten shers. A weight put into the opposite scale to counter balance the receiving vessel. Assurance, settled conviction.

वझे शब्दकोश

धडा dhaḍā . Add:--10 A share or portion of a piece of land divided amongst its joint proprietors.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. १ (तंजा.)तोफ २ तोफांचा बार.धडेबाजी- स्त्री. १ तोफेचा भडीमार. २(ल.)शिव्याचां भडिमार,वर्षाव. [धडा]

दाते शब्दकोश

पु.(भाजीपाला इ॰ कांची) पेंढी.

दाते शब्दकोश

पु० पाठ. २ रोग. वि. ३ कांहींशेर माप, देशपरत्वें व पदार्थपरत्वें हें वेगळें असतें. ४ कांटा, दांडी, तराजू. ५ निश्चय.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

पु. (राजा.) किनाऱ्यावर गलबत.पडाव, ठेवण्याची अच्छादित जागा, ठिकाण. 'गलबत भाडयानें न देतां धड्यावर ओढून ठेवले आहे.'

दाते शब्दकोश

पु. पोटांत होणारा एक रोग. -मनको

दाते शब्दकोश

धडा      

पु.       घडा, घागर : ‘कीं श्रेष्ठेने धडा घातला । रवांतासी ।’ – शिव ९९४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु.       १. दहा शेरी वजन केलेल्या मापाचे परिमाण. २. तराजूच्या एका पारड्यात (ज्यात पदार्थ घ्यावयाचा ते) भांडे इ. ठेवून काटा समतोल करण्यासाठी दुसऱ्या पारड्यात टाकलेली, वजने इ. अभंड; पासंग : ‘तराजुआ निवृत्तिचा । धडा बांधौनि तीर्थाचा ।’ – ऋ ३९. ३. मण, दोन मण इ.सारखे एकदाच वजन करायचे असल्यास व त्या परिमाणाची वजने जवळ नसल्यास लहान परिमाणाच्या वजनाने तितक्याच वजनाचे दगड इ. मोजून घेऊन त्यांनी बांधतात ते मोठे वजन. ४. सपाटा; तडाखा. (व.) ५. (पेंढारी इ. लुटारूंची) टोळी. ६. सामायिक जमिनीचा, मालमत्तेचा वाटा, हिस्सा, भाग. ७. (जरतारधंदा) २५ ते ३० तोळे वजनाच्या तांब्याच्या रुळावर गुंडाळलेल्या जरतारीसह त्याचे केलेले वजन. [सं. धट; हिं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु.       १. विशिष्ट मुदतीत तयार करण्यासाठी पंतोजीने शिष्याला, शिक्षकाने विद्यार्थ्याला नेमून दिलेला, पाटी इ.वर लिहून दिलेला पाठ. २. पुस्तक वगैरेतील पाठ. ३. (ल.) एखाद्याला वर्तनाच्या बाबतीत घालून दिलेला नियम; शिस्त; उदाहरण; काम करण्याबाबत घालून दिलेली पद्धत, सरणी, वहिवाट, रिवाज. ४. हिय्या; हिंमत; धाडस; निश्चय. ५. एखादी वस्तू मिळाल्यावर विशिष्ट काळापर्यंत येणारी निश्चिंतता. ६. बोध.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु.       भाजीपाला इ. ची पेंढी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु.       किनाऱ्यावर गलबत, पडाव ठेवण्याची आच्छादित जागा. (राजा.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु.       पोटात होणारा एक रोग. – मनको.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु.       १. तोफ. (तंजा.) २. तोफेचा बार.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धोंपार धडा

पु. (गो.) भरमसाटपणानें; कसें तरी, अव्य- वस्थितपणानें काम करण्याची पद्धत; चालढकल. 'सारखें मोज. धोपारधडा करून काय फायदा!' [ढोपर + धडा]

दाते शब्दकोश

धडा, धडी      

पु.       स्त्री.      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

पाठ

पु. १ वेदपठन; वेदादि ग्रंथांची आवृत्ति करणें. पंचमहायज्ञांपैकीं हा एक यज्ञ आहे. २ (सामा.) वाचणें; पठण करणें (स्तोत्र इ॰). ३ मुखोद्गत करण्याकरितां अभ्यासा- साठीं विद्यार्थ्यानें गुरूपासून घेतलेला भाग; धडा. 'राजकारणाचा अगोदरचा हा पाठ.' -इंप ११९. ४ पुस्तक इ॰कांतील धडा. ५ एखाद्या ग्रंथाच्या प्रतींतील वाक्य, शब्द, अक्षर क्रम इ॰ विषयक भेद, फरक. 'मूळ पुस्तकांतील पाठ निराळे असावेत.' -विवि ८.४.८९. तसेंच एका ग्रंथाच्या दोन प्रतींत एकीवर एक व दुसऱ्या प्रतींत दुसऱ्या प्रकारचा परंतु अशुद्ध नसलेला अर्थ ज्यांच्या पासून निघतो असे जे दोन प्रकारचे अक्षरक्रम ते प्रत्येकीं आणि त्यावर करावयाच = असें चिन्ह. ६ वहिवाट; पद्धत परिपाठ 'जेतुनि जो झाला तो त्यांत शिरे एकरूप हा पाठ ।' -मोस्वगारोहण २.२२. ७ -वि. मुखोद्गत; ग्रंथाच्या मद- तीवांचून त्यांतील भाग तोंडानें म्हणून दाखविण्याइतका स्मरणांत असलेला. 'सुजना सुनीति तैसा माया बहुसाल पाठवीरा ज्या ।' -मोभीष्म १०४० [सं.] (वाप्र) ॰करणें-१ घोकणें; (एखाद्या ग्रंथातील भाग, धडा, पाठ) स्मरणांत राहील अशा तऱ्हेनें पुन्हःपुन्हां म्हणणें. २ (एखादा ग्रंथ, पोथी, स्तोत्र इ॰) समग्र वाचणें; म्हणणें; पठन करणें. ॰पडणें-वहिवाट, शिरस्ता पडणें; परिपाठ, प्रघात चालू होणें. पाठांत असणें-(एखादी गोष्ट, काम इ॰) परिचयाची, सरावांतील, राबत्यांतील असणें. पुढें पाठ मागें सपाट-नेहमीं घोकंपट्टी करणाऱ्या परंतु घोकलेलें विसरणऱ्या मनुष्यास उद्देशून योजतात. ॰शक्ति-स्त्री. (एखादा ग्रंथ इ॰) पाठ, मुखोद्गत कर- ण्याची बुद्धीची शक्ति; स्मरणशक्ति; [पाठ + शक्ति] ॰शाला- ळा-स्त्री. शास्त्र इ॰कांचे पाठ सांगण्याकरितां असलेली शाळा; विद्यालय; शिकविण्याची जागा. पाठांतर-न. १ एखाद्या ग्रंथांत श्लोक, वाक्य, शब्द इत्यादि विषयक असणारा भिन्न पाठ; पाठभेद. 'येचि पदीं पाठांतर । तितिक्षा म्हणती थोर थोर ।' -एभा १७.१०४. २ मुखोद्गत असलेला श्लोकांचा, गोष्टींचा, ग्रंथा- तील भागाचा भरणा. 'अर्थेविण पाठांतर कासया करावें । व्यर्थचि मरावें घोकुनियां ।' -तुगा ४३५७. ३ (ग्रंथ इ॰) पुनः, दुस- ऱ्यांदा वाचणें, पठण करणें. 'पाठांतर व्हावें मनीं धरितां । जिव्हेसीं आली प्रसादता ।' ४ (एखादा ग्रंथ इ॰कांतील भाग) मुखोद्गत असणें. 'त्याचें पाठांतर मोठें आहे.' 'मला भागवताचें पाठांतर आहे.' ५ -वि. पाठ; मुखोद्गत. 'कीर्तनामाजीं साचार । चरित्र नसलें पाठांतर ।' [सं. पाठांतर; पाठ + अंतर] पाठाशक्ति-स्त्री. पाठशक्ति पहा. [पाठशक्ति अप.]

दाते शब्दकोश

(सं) पु० धडा. २ नियम, परिपाठ. ३ वहिवाट. ४ बच्चा. ५ पाश्वेभाग. ६ घोकणें, पढणें, पुस्तकाशिवाय ह्मणणें.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

धडी

स्त्री. १ विवक्षित वजनाचें, शेरांचें माप. हें निरनिराळ्या ठिकाणीं भिन्नभिन्न वजनाचें असतें. २ मण इ॰ प्रमाणांचा करून ठेवलेला दगड इ॰; धडा अर्थ ३ पहा. ३ (जरतारी धंदा) धडा अर्थ ७ पहा. ४ वजन करण्याचा कांटा; तराजू. ' सज्जन कसाई मांस विकितां । त्याची लाविसि धडी । ' -दत्तपदे ४७. [सं. धट = ताजवा; हिं. सिं. धडी = पांचशेरी] धडीनें पैसा मोजणें-श्रीमंतीस पार नसणें; पैशांत लोळणें; अलोट पैसा बाळगणें.

दाते शब्दकोश

धडी dhaḍī f (धड) The border of cloth. 2 ( H) A large weight made up &c. See धडा Sig. VI. धडीनें पैसा मोजणें A phrase expressive of great wealth. To roll in gold.

मोल्सवर्थ शब्दकोश

स्त्री० रास. २ कांटा. ३ तोलाचे प्रमाण, (धडा ३ पहा.)

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

स्त्री. १ तुकडा, भाग. २ (डोंगरांतील) घाट; बारी. 'आली सातपुड्याची धडी तोफगाडी दाटली घोडी । ' -ऐपो ४३३. [धडा]

दाते शब्दकोश

धडी      

स्त्री.       १. विशिष्ट वजनाचे, शेराचे माप. हे निरनिराळ्या ठिकाणी भिन्न–भिन्न वजनाचे असते. २. मण इ. प्रमाणांचा करून ठेवलेला दगड इ.; पहा : धडा ३. ३. पहा : धडा ७. ४. वजन करण्याचा काटा; तराजू; ‘सज्जन कसार्इ मांस विकितां । त्याची लाविसि धडी ।’ – दत्तपदें ४७. [सं. धट; हिं.; सिं.] (वा.) धडीने पैसा मोजणे – श्रीमंतीला पार नसणे; पैशात लोळणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अक्कल      

शहाणपणा; समज; चातुर्य; बुद्धी; तारतम्य; जाणण्याची शक्ती. [अर. अक्ल] (वा.) अक्कल गुंग होणे – बुद्धी कुंठित होणे; दिङ्मूढ होणे; एखादा कठीण प्रश्न, समस्या सोडविण्याचा मार्ग न सुचल्याने गोंधळात पडणे. अक्कल जाणे – सारासार विचारशक्ती नाहीशी होणे; शहाणपण नाहीसे होणे. अक्कल पाजळणे – (उप.) नको तिथे शहाणपणा दाखवणे : ‘ती अक्कल हितं गावात पाजळा!’ – पडघवली १२५. अक्कल विकत घेणे – पुष्कळ किंमत देऊन शहाणपण शिकणे; धडा शिकणे; फार महाग पडलेल्या अनुभवाने शहाणे होणे. अक्कल शेणात जाणे – शहाणपणा वाया जाणे; निरुपयोगी ठरणे : ‘नुसते वाचून काय करायचे? सारी अक्कल शेणात जायची’ – श्याआ १५०. अक्कल सांगणे – सल्ला देणे. अकलेचा कांदा, अकलेचा खंदक – (उप.) मूर्ख मनुष्य; अतिशहाणा; दीडशहाणा; काही न समजणारा. पहा : अकलेचा कांदा. अकलेचा गधडा – मूर्ख; ढ; मतिमंद; बावळट; ज्याला मुळीच शहाणपण नाही असा; समज कमी असलेला. अकलेचा बंद – दूरदर्शित्व; शहाणपण : ‘चातुर्य : अकलेचा बंद नाही घातला.’ – दास १९·८·१५. अकलेचे तारे तोडणे – मूर्खपणाने बडबडणे; अविचाराने बोलणे. अकलेचे सागर – (उप.) अतिशहाणे : ‘अंताजीपंत कितीकसे मर्द माणोस व अकलेचे सागर आहेत.’ – पुरंदभा १·२३२. अकलेच्या वाटेने पाहणे – तर्क करणे; विचार करणे : ‘गुडीविंड्यास पुढे फौज असता बेदडे येऊन ठरणार नाहींत, हे अकलेच्या वाटेने पाहता दिसते.’ – ऐलेसं १७०२. अक्कलकारा      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

भाग

पर्व, खांड, खंड, चॅप्टर, धडा, काण्ड, सर्ग, प्रकरण, विभाग, तुकडा, वॉर्ड, दालन, क्षेत्र, कक्षा, टप्पा, मळा.

शब्दकौमुदी

देख      

पु.       १. दर्शन. २. देखावा. (क्रि. दाखवणे). ३. धडा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धाडस

धैर्य, धिटुकलेपणा, जिवाचा धडा करून, मनाचा हिय्या करून, साहस, धिटाई, शौर्य, वीर्य, शूरपणा, बेडरपणा, वीरकृत्य, अडग वागणूक, वीरश्री दाखवली, साहसे श्रीः, धाडसाला लक्ष्मी वश, दर्यात तारूं लोटलें आहे; कुठें लागेल तिथें लागेल, छातीचा व्यापार.

शब्दकौमुदी

धान

न. १ साळ; भात. २ भाताचें रोप. ३ (रोप इ॰ कांचा) दांडा, देंठ. 'केतकीचें धान आणि उंबराची साल सम- भाग घेऊन चूर्ण करावें.' -अश्वप २.५०. ४ धणे. [सं. धान; बं. धान; गु. धान = धान्य] ॰गवत-न. ज्यास धान्य येतें असें गवत. उदा॰ गहूं, बाजरी, ज्वारी इ॰काचें गवत. 'उदाहरणार्थ रानगवतें व धानगवतें हा धडा पावसाळ्यांतच घ्यावा.' -अध्या- पन ७४. [धन + गवत] धानाष्टक-न. धणे, वाळलेला किंवा ओला पुदिना व मसाला यांचें एकत्र मिश्रण करून गूळ घालून केलेली चटणी.' -गृशि ३१८. [धान + अष्टक = आठांचा समुदाय] धानाधिस्पट होणें-क्रि. (कु.) धुळधाण होणें.

दाते शब्दकोश

धानगवत      

न.       ज्याला धान्य येते असे गवत. उदा. गहू, ज्वारी इ. चे गवत : ‘उदाहरणार्थ रानगवतें व धानगवतें हा धडा पावसाळ्यांतच घ्यावा.’ - अध्यापन ७४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धड      

वि.       १. चांगला; शाबूत; अखंड; दोषरहित; मोडतोड, फुटतूट न झालेला; कामाला उपयोगी असे. २. श्रीमंत; गबर; धनसंपन्न. ३. शुद्ध बुद्धीचा; शहाणा : ‘धडचि पिसें करावें । पिसेचि उमजवावें ।’ – दास ९·८·१५. [सं. दृढ] (वा.) धड गांडीने – सुरक्षितपणे; जिवानिशी; अब्रूदारपणाने; सहीसलामत; इजा, नुकसान न होता. धडा ना गोडाचा – १. अगदीच सामान्य प्रतीचा; भिकार; निरुपयोगी; टाकाऊ; खैराती. २. संदिग्ध; मोघम; अनिश्चित.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धडाडणें

अक्रिं. १ (तोफ, बंदूक इ॰ उडतांना) धड धड असा मोठा आवाज होणें. २ (वृक्ष इ॰ ) काडाडणें; कडाडून पडणें. ३ (अग्नि इ॰) धडधडणें; जोरानें, धडकून पेटणें. 'डोंगरे धडा डिती । तेथे अरूप पारखी रडती । आठै आंगें पोळतीं । वसुंधरेची ।' -शिशु ७४८. 'ते मुळीं पेटली श्रीकृष्णसंकल्पें । धडाडली ब्रह्म शापें । ' -एभा १.२३३. 'जैसा प्रळयकाळींचा दावाग्नी । महा वातें धडाडी । ' मुसभा १४.९१०. ४ (कों.) (जमीन इ॰ ताप- ल्यामुळें) भेगलणें; दुभंग होणें. ५ (ऊर) जोरानें उडणें; धडधडणें.

दाते शब्दकोश

धडेवांटप

न. एकत्र कुटुंबांतील सर्व हक्कदारांच्या जमी- नीची स्वतंत्रपणें प्रत्येकाची केलेली फाळणी. [धडा + वांटप]

दाते शब्दकोश

धडवई

पु. बाजारांत येणारा माल तोलण्याच्या कामावरील अधिकारी. -स्त्री. (क्व.) वरील अधिकार्‍याचें काम, हुद्दा. [धडा + वाही]

दाते शब्दकोश

एक्सरसाईझ

पु. १ धडा; पाठ; अभ्यास. २ व्यायाम; कसरत; मेहनत. ३ अभ्यासाची वही; टिपणवही; एक्सरसाईज बुक. [इं.]

दाते शब्दकोश

घोकीव      

वि.       १. पाठ केलेला; घोकलेला (धडा इ.). २. स्मरणात, ध्यानात पक्का ठेवलेला; मनात पक्का ठसलेला.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घोंटणें

उक्रि. १ (कागद इ॰) गुळगुळीत करण्याकरितां (कवडा इ॰) कठिण व गुळगुळीत पदार्थानें घांसणें. २ चुरडणें; खलांत घालून बारीक करणें; वाटणें; उगाळून बारीक करणें; गर- गठण. ३ नीट मिश्रण होण्याकरितां हलविणें; ढवळणें; मळणें; खलणें. ४ (श्लोक, धडा इ॰) पाठ करून पक्का करणें; घटवणें; (अक्षरें किंवा, वळण) घटविणें; गिरवणें; घोटविणें; वळविणें. [हिं. घोटना; सिं. घोटणु ध्व.]

दाते शब्दकोश

घोटणे      

उक्रि.       १. (कागद इ.) गुळगुळीत करण्याकरिता (कवडा इ.) कठीण व गुळगुळीत पदार्थाने घासणे. २. चुरडणे; खलात घालून बारीक करणे; वाटणे; उगाळून बारीक करणे; गरगटणे. ३. नीट मिश्रण होण्याकरिता हलवणे; ढवळणे; मळणे; खलणे. ४. (श्लोक, धडा इ.) पाठ करून पक्का करणे; घोटवणे; (अक्षरे, वळण) घटवणे, वळवणे. [सं. घृष्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जीव

अतिशय उत्सुक होणें; उत्कंठा लागणें. ॰वारा पिणें- उदास भासणें; भयाण वाटणें. ॰सुकणें-अशक्त, व्याकूळ होणें. ॰सुचिंत नसणें-काळजींत असणें. ॰सोडणें-१ मरणें. २ जीव धोक्यांत घालणें; स्वतःच्या जीवाची आहुति देणें. ३ अति- शय इच्छा दर्शविणें. ४ आजारी माणसावरून कोंबडें ओवाळून टाकणें (यानें आजार्‍याचा रोग कोंबड्यावर जाऊन तें मरतें अशी समजूत). जिवा आगळा-क्रि. एखाद्याच्या काम करण्याच्या शक्तीच्या बाहेर. जीवाचा कलिजा-वि. प्राणापेक्षांहि प्रिय. जीवा(विं)ची गोष्ट-अन्तःकरणांतील गोष्ट. 'येरू सांगे जिविंची गोष्टी । त्यांची आवडी लागली पोटीं ।' -भाराबाल २.१७. जिवाची ग्वाही-पाखी देणें-खात्रीपूर्वक सांगणें. जिवाचा घात करणें-१ आटोकाट प्रयत्न करणें; जिवापाड मेहनत करणें. २ अतिशय छळणें; गांजणें (जीव जाईपर्यंत). जिवाचा घोंट घेणें-जीवाचा घात करणें; मरेपर्यंत छळणें. जिवाचा धडा करणें-साहसाचा प्रयत्न करण्यास तयार होणें. जिवाचा लोळ करणें-१ जीव बेदम करणें; जीवाला त्रास देणें. २ (ल.) फार मेहनत घेणें. जिवाची कोयकाय करणें-(कुत्र्यासारिखे भुंकावयास लावणें म्हणजे) अतिशय छळणें. जिवाचा सोबती- वि. आयुष्याचा सोबती (नवराबायको, रोग). जिवाची राळ- वण करणें-अतिशय काम करणें (राळ्याच्या काडीसारखें होणें); त्रास घेणें. जिवाची हुल्लड करणें-मोठा नेटाचा प्रयत्न करणें. जी(जि)वा अगोचर-वि. शक्तीच्या बाहेर. जिवाचे चार- चार करणें-थेर करणें; नाचणें; चैन, विलास करणें. जिवाचें रान करणें-अतिशय कष्ट सोसणें. जिवाच्या गांठीं बांधणें- मनांत नीट ठसवून किंवा बिंबवून घेणें. 'तरी हा अर्थू जिवाचिया गांठी । कां न बांधावा ।' जिवांतजीव आहे तोंपर्यंत-मरण येईपर्यंत; जन्मभर; सदासर्वदा. 'माझ्या जिवांत जीव आहे तों- पर्यंत मी तुला सोडून चार दिवस देखील राहणार नाहीं.' जिवांत जीव घालणें-१ उत्तेजन देणें; सांत्वन करणें; धैर्य देणें. २ आपलें व दुसर्‍याचे मन एक करणें; आपले विचार दुसर्‍यास नीट समजावणें जिवांत जीव येणें-गेलेली शक्ति, धैर्य पुन्हां येणें; धीर येणें. जिवानिशीं-जिवासकट जिवानिशीं जाणें-मरणें (जुलुमानें, अकालीं). म्ह॰ शेळी जाते जिवानिशीं आणि खाणार म्हणतो वातड. जिवापरता-१ सहन करण्याच्या बाहेर (श्रम, आजार). 'याला जिवापरतें दुखणें आलें आहे निभावेल तेव्हां खरा.' २ प्राणापेक्षां प्रिय. जिवापलीकडे-जिवापेक्षां प्रिय. जिवापाड-डें-क्रिवि. जिवाचें मोल देऊन, शक्तीबाहेर. जिवा- भावाचा-पु.(सोबती, चाकर, पदार्थ, गोष्ट, काम) आपल्या स्वतःच्या संबंधी, लाडका, आवडता, मूल्यवान वगैरे. जीवा भावाला -स-क्रिवि. स्वतःसाठीं, स्वतःला विशेष जरूरीकरतां. 'हे पांचशें रुपये जीवाभावास ठेविले.' जिवाभावानें, जीवें- भावें-क्रिवि. अन्तःकरणापासून; प्रीतीनें; मनापासून; उत्साहानें; नेटानें. जीवभ्यासा-भ्यासानें-क्रिवि. आपलेपणाच्या भावानें; अगदीं मनापासून. 'जिवाभ्यासानें जेव्हां श्रम करावा तेव्हांच फलप्राप्ति.' जिवाला खाणें-तडफडणें; झुरणें; मनाला लागणें. जिवाला करवत लागणें-अतिशय चिंता लागणें. जिवाला कांहीं-तरी करून घेणें-आत्महत्या करणें; जीव देणें. -ला खाणें-मनाला लागून राहणें; झुरणें; झिजणें. जिवावर-स्वतःच्या शक्तीवर, श्रमावर, बुद्धीवर (जगणें, काम करणें). जिवावर उठणें-दुसर्‍याच्या जिवाची काळजी न करणें; त्याचा जीव घ्यावयाला तयार होणें. (दुसर्‍याच्या) जिवावर (आपलें) पोट भरण-दुसर्‍यावर अवलंबून आपला उदरनिर्वाह चाल- विणें. जिवावर उड्या मारणें-दुसर्‍याच्या पैशावर, मद- तीवर चैन बढाई मारणें जिवावर उदार-जिवाची पर्वा न करणारा. म्ह॰ जिवावर उदार तो लाखांशीं झुंजार. जिवा वरचा-जीव धोक्यांत घालणारा; जीवघेणा. जिवावरचा लाग-पाळी-गोष्ट-प्रसंग-खेळ -काम-लागलीच, तात्काळ येणारा धोका, संकट इ ॰; जीव जाण्याचें भय असणारी गोष्ट. जिवावरचा ताप-ज्वर-रोग-दुखणें-प्राणघातक ताप, आजार इ॰. जिवावरचें आधण उतरणें-कठिण प्रसंगांतून बचा- वणें, निभावणें. जिवावर द्वारका करणें-एखाद्याच्या आधारा- वर आश्रयावर चैन करणें; महत्कृत्य करणे; मोठा उपकार करणें. 'तुमच्या जिवावर एवढी द्वारका केलें घरदार दोमजली ।' -पला ८५. जिवावर येणें-बि(बे)तणें, जिवाशीं गांठ पडणें-१ जीव धोक्यांत पडणें; मोठें संकट ओढवणें. २ दुष्कर वाटणें. ३ चिडणें. जिवावर लाल-वि. दुसर्‍याच्या मदतीवर चैन करणारा. जिवाविशेष-क्रिवि. स्वतःच्या शक्तीच्या पलीकडे. जिवा- सांड-वि. जीवाला धोका येण्याइतका (आजार, त्रास). जिवाशीं-जिवीं धरणें-बांधणें-अतिशय प्रीति करणें; बहु- मोल वाटणें. 'काय इणें न धरावें अधनत्वें भूप-जन-वरा जीवीं ।' -मोवन १३.१८. जिवास जहानगिरी करणें-होणें-जीवा- वर मोठें संकट येणें, आणणें; संकटाचा प्रसंग ओढवणें. जिवास जीव देणें-प्रिय माणसासाठीं आपला जीव देणें. जिवास मुकणें-मरणें; मृत्यु पावणें. जिवींचा-प्राणप्रिय; जिवलग. जिवीं लागणें-१ आवडीचा असणें; प्रिय वाटणें. २ मर्मभेद होणें; जिवाला लागणें. जिवे धुस जाणें-धस्स होणें; जीवांत धडकी भरणें. 'तुमते एतां देखिलें । तैंची माझां जीवें धुस गेलें ।' -शिशु १२५. जिवें वाचणें-एखादें संकट टळून जिवंत राहणें; जीव जाण्याचा प्रसंग असतां जीव न जातां बचावणें. ' आजी आम्हां येथें राखियलें देवें । नाहीं तरी जिवें न वांचतों ।' म्ह॰ १ ज्याच्या त्याला जीव प्यारा. २ जीवो जीवस्य जीवनम्. सामाशब्द- ॰कण-पु. अल्प जीवदशा; जीवांश. 'जीवकणु जयाचा उपमदें ।' -ज्ञा १८.१२७२. ॰कळा-स्त्री जीवंत माणसाच्या तोंडावरचें तेज. याच्या उलट प्रेतकळा. ॰कोश-षु.(काव्य.) प्राणाचें, आत्म्याचें आवरण; शरीर. 'तैसें हिरण्यगर्भाचें अंश । प्रसिद्ध जीवकोश ।' ॰खडा-पु. (कुण. आगरी) अश्मा. -बदलापूर ४१. ॰घात-न. जीविताचा नाश; वध. ॰घातक-की-वि. १ प्राणाचा नाश करणारा. २ छळ करणारा, त्रासदायक. ॰घेऊ-घेणा- घेण्या-वि. १ जीव जाईपर्यंत त्रास देणारा; लोचट (भिकारी) २ भारी कठीण (काम). ॰जंतु-पु. १ लहान किडा, प्राणी; किडा- मुंगी इ ॰ २ -अव. सर्व प्राणीमात्र. ॰डा-पु. क्षुद्र जीवजंतु; जिवडा. 'नाहीं भात वडा तया दहिंवडा कैंचा ग तो जीवडा ।' -आसु ५. -पु. क्षुद्रजीव, प्राणी (साप, किडा-मुंगी इ॰). ॰डवाळ-स्त्री. उपाधि. 'हे अज्ञानकृत जीवडवाळ ।' -रंयोवा ८.१४३. ॰त्व-न. चैतन्य; जीवदशा. 'जीवत्वदुर्गीं आडिला ।' -ज्ञा १७. २. ॰दयासंघ-पु. प्राणिमात्रावर दया दाखविणारी, प्राणिमात्राचा जीव वांचविण्याचा प्रयत्न करणारी मंडळी; गोरक्षण वगैरे करणारी समिति. ॰दशा-स्त्री १ आयुष्य; अस्तित्व; सचेतन स्थिति. ' जीवदशा तोंपर्यंत संसार.' २ आत्म- ज्ञानावांचून जन्ममरणाच्या फेर्‍यांत असावें अशी अवस्था. ॰दान-न. १ जीविताचें देणें. देणगी; प्राण न घेणें. २ दुसर्‍याच्या प्राणांचें संरक्षण. (क्रि ॰ करणें; देणें). 'या रोगास कांहीं औषध देऊन तुम्ही मला जीवनदान द्याल तर पहा.' एखाद्या संकटांतून वांचविणें. ॰दार-वि. १ सचेतन; जिवंत. २ (ल.) धैर्यवान; पाणीदार; जोरदार; शक्तिवान. ३ रसयुक्त; रसाळ. ४ (ल.) फायदेशीर (धंदा, उद्योग). ॰धन-न. गुरेंढोरें, जंगम माल- मिळकत. ॰धर्म-पु. अविद्या कामकर्मादिक. ॰धोंडा-पु. (को.) अश्मा जीवखडा. ॰पापी-(पापी आत्मा, बिघडलेला आत्मा) स्वतःमध्यें किंवा दुसर्‍यांत दुष्ट विचार आढळल्यानंतरचा दुःखाचा उद्गार. ॰प्राण-पु. १ जीव आणि आत्मा; प्राण (जोर देण्यासाठीं वापरतात). 'मी तुजासाठीं जीवप्राण देतों.' २ आवडता माणूस; लाडका; जीव कीं प्राण अस माणूस, मित्र. ॰भय-न जीव जाण्याचें भय. ॰भाव-पु. १ जिवाचा भाव; इच्छा; मनीषा. 'मागणें तें तुज मागों । जीवभाव तुज सांगों ।' -तुगा १५७८. २ आत्मा; स्वतः (जोरदार अर्थी) ३ जीवदशा. 'हरिला कंसाचा जीवभाव देवें. ' ॰योनि-स्त्री. १ सरपटणारे प्राणी; क्षुद्र कीटक इ॰चा वर्ग. २ जरायुज प्राणि- वर्ग, योनि पहा. ॰रखी-स्त्री. (कों.) देवाचा नक्षीदार देव्हारा. ॰रस-पु. जीवन देणारा रस; (इं.) प्रोटोप्लॅझम्. ॰लग-वि. १ (जीवास आश्रयभूत, आधारभूत) आवडता; प्राणप्रिय (पति; ईश्वर). 'माझिया जिवलगाविण । न करी मी मंगल ध्यान ।' २ आप्त; मित्र. 'जीवलग जीव घेती ।' -दावि पृ. ६.७८. ॰शक्ति-स्त्री. प्राणशक्ति; (इं.) व्हायटलफोर्स. ॰शास्त्र- न. लहान जीवासंबंधीं शास्त्र; (इं.) बायॉलॉजी. जावस-वि. जीवट. जीवसृष्टि-स्त्री. सचेतन सुष्टि. ॰स्वर-पु. (संगीत) वादी पहा. ॰हत्या-स्त्री. जीवजंतु यांचा नाश, वध, खून; प्राणिहत्त्या; हिंसा. जीवश्चकंठश्च-वि. अत्यंत घरोब्याचा; अति- शय दृढ (मित्र, मैत्री). एकजाव जाणें, एकजीव येणें- मरणाच्या दारीं असणें; शेवटची घटका येणें. एकजीव होऊन जाणें-एकत्र होणें; सांघून जाणें; एकरूप, एकच होणें.

दाते शब्दकोश

काळा बाजार

नाडणुकीचा पैसा, आडवा व्यवहार, आडबाजार, लोकांच्या गरजेनुसार पैसा उकळणें, खोटा दुर्व्यवहार, बांडगुळी धदा, नियमबाह्य देवघेव, आडवळणाचा व्यापार, ब्लॅक-मार्केट, गरजवंतांचा पिळवणूक, तेढा उद्योग, अडवणूक करून फायदा काढणें, साठेबाजी करून मिळविलेला नफा, मागच्या दाराकडून खरेदी-विक्री. नियमांप्रमाणें न मिळेल ते मिळवून देण्याची जागा, लबाडीचा धंदा. लोकांच्या गरजचें भांडवल करणें, चोरवाटेचा पैसा, निकडीवर कुरघोडी, वाममार्गाचें धन, गटारमार्गानें आलेली संपत्ति.

शब्दकौमुदी

कांटाळा

पु. १ रोमांच. 'सर्वांगा कांटाळा आला ।' -ज्ञा १.१९७. 'देखोनि अरिष्टांचा मेळा । शुक्राआंगीं भय कांटाळा ।' -मुआदि ५.१२९. २ ताजवा. 'जें नित्यानंदाचेनि मानें । उपमेचा कांटाळां न दिसे सानें ।' -ज्ञा ८.२६३. 'माझिया प्रचंडपुण्याचळा । तुळण घालिजे कोण कांटाळा ।' -मुआदि १९.१७९. ३ कांटा; कंटक. ४ भय; त्रास. 'जेवीं मोति- यांची कंठमाळा । भ्रमें सर्प भासली डोळां । ते भ्रमांतीं घालिती गळां । न बाधी कांटाळा सर्पभयाचा ।' -एभा २४.६८. ५ आभंड, धडा, समतोल करण्याकरितां घातलेला पदार्थ. 'म्हणोनि शिवेंसीं कांटाळा । गुरुत्वें तूंचि आगळा ।' -ज्ञा १७.३. [सं. कंटक]

दाते शब्दकोश

कांटाळा      

पु.        १. रोमांच : ‘सर्वांगा कांटाळा आला ।’ - ज्ञा १·१९७. २. ताजवा, तराजू : ‘जें नित्यानंदाचेनि मानें । उपमेचा कांटाळां न दिसे सानें ।’ - ज्ञा ८·२६३. ३. काटा; कंटक. ४. भय; त्रास : ‘जेवीं मोतियांची कंठमाळा । भ्रमें सर्प भासली डोळां । ते भ्रमांती घालिती गळां । न बाधी कांटाळा सर्पभयाचा ।’ - एभा २४·६८. ५. आभंड, धडा, समतोल करण्याकरता घातलेला पदार्थ : ‘म्हणोनि शिवेंसी कांटाळा । गुरुत्वें तूंचि आगळा ।’ - ज्ञा १७·३. [सं. कंटक]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कडडड

उद्गा (झाड, वीज वगैरे पडतांना होणारा) धडा- डाडा आवाज; गडगडाट. -क्रिवि. धाडदिशीं; धप्पकन्; काडकन्. [ध्व.]

दाते शब्दकोश

कष्टाळू

रात्री जागून काम करी, मी इथे कशाला मग? मला काय खारांत घालायची आहे ? काम स्वतःच्या घरचे समजून केले, कामात अंगचोरपणा बिलकूल नाहीं, लादलेली कामें बिनबोभाट करणारे, फाईलीत कारकून बुडालेले, कामसू कष्टाळू आणि जबाबदार, झीज व कष्ट सोसण्याची तयारी, अंगमेहनतीने काम करण्याचा नमुनेदार धडा घालून दिला, सगळी कडे जातीने बघायचे, क्रियापंडित, 'जो स्वयं कष्टतचि गेला तोचि भला’ हा विश्वास, निढळाचा घाम काढी.

शब्दकौमुदी

लाटा-ट्या

वि. १ दडप्या; बेफिकीर. २ धाडसी; धडा- डीचा. लाठा पहा. 'तो पराक्रमी लाटा । राज्य करी अलोटा ।' -कथा १.२.६३. ३ लाटणारा; दिसेल तें बळकावणारा. [लाटणें] ॰गंगाजी-गोमाजी-कारभारी-पाटील-वि. आडदांड; बेमुर्वत्या; लुटारू; लुबाडणारा (माणूस).

दाते शब्दकोश

लेसन

न. धडा; शिकविण्याचा पाठ. 'याचें वीतभर लेसन तर त्याचें हातभर.' -ब्रावि १७१. [इं.]

दाते शब्दकोश

निदेश

पू. १ निर्देश; आज्ञा; शासन; हुकूम. छत्रपति किंवा प्रतिनिधी यांच्या आज्ञापत्रांतून 'निदेश समक्ष' असा शेरा शेवटीं मारलेला असे. २ दाखविणें; समजूत देणें. ३ धडा; शिकवण. '(मुनी) हरीपदींच लोळती । निदेश चित्त घोळती ।' -अकक २ मंधारा १९. [ससं. नि + दिश्] निदेशणें-उक्रि. (काव्य) १ आज्ञा करणें; हुकूम करणें, सांगणें. २ समजविणें; दिशा दाखविणें.

दाते शब्दकोश

निदेश      

पु.       १. निर्देश; आज्ञा; शासन; हुकूम. २. दाखवणे; समजून देणे. ३. धडा; शिकवण : ‘(मुनी) हरीपदींच लोळती । निदेश चित्त घोळती ।’ – अकक २ मंधारा १९. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निश्चय

हा विषय मनावेगळा केला, मनाशी खूणगांठ बांधली, मनोमन ठरविलें, मनांत पक्कें केलें, मनाचा निश्चय झाला, मनाचा धडा केला, कांहींएक ठरवून टाकलें, भीष्मप्रतिज्ञा केली.

शब्दकौमुदी

नखाग्री      

क्रिवि.       १. नखाच्या टोकावर. २. (ल.) लिहिताना चटकन आठवेल इतका पाठ असलेला (धडा, श्लोक इ.).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ओनामा      

१.ॐ नमः सिद्धम्‌ चा संक्षेप किंवा अपभ्रष्ट रूप (ॐ = ब्रह्म). अर्थ - सिद्धास नमस्कार, जिनास नमस्कार. श्रीगणेशाय नमः हा सनातनी वाक्‌प्रचार. त्यास प्रतिरूप असा हा जैन वाक्‌प्रचार. २. (ल.) प्रारंभ; पहिला धडा; सुरुवात; मूलतत्त्व : ‘संस्थानें वगळून बाकीच्या राहिलेल्या हिंदुस्थानाला डोमिनियन स्टेटस लागू करतो असे कोणी म्हणेल तर त्याला राज्यघटनेचा ओनामाहि कळत नाही, असे म्हणावें लागेल.’- सासं २·४५०.[सं. ॐ नमः] (वा.) ओनामा नसणे- प्राथमिक ज्ञान, कमीत कमी माहितीही नसणे : ‘ज्यास लढाई म्हणजे काय याचा ओनामसुद्धा ठाऊक नाही....’- केस्व ३३१. ओनामासीधं      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ओनामा, ओनामासीधं

१ ॐनमः सिद्धम् चा संक्षेप किंवा अपभ्रष्ट रूप (ॐ = ब्रह्म; नमःच्या योगी चतुर्थी असावी परंतु ॐ अव्यय असल्यानें चतुर्थीची जरूर नाहीं. सिद्ध शब्द मंगलवाचक आहे. ॐनमःसिद्धम् म्हणजे (शब्द) ब्रह्मास नम- स्काररूप मंगळवर्ण. पण हा वाक्प्रचार जैन आहे. अर्थ-सिद्धास नमस्कार-जिनास नमस्कार. श्रीगणेशायनमः हा सनातनी, त्यास प्रतिरूप असा जैन वाक्प्रचार. २ (ल.) प्रारंभ; पहिला धडा; सुरवात; मूलतत्त्व. 'संस्थानें वगळून बाकीच्या राहिलेल्या हिंदु- स्थानाला डोमिनियन स्टेटस लागू करतों असें कोणी म्हणेल तर त्याला राज्यघटनेचा ओनामाहि कळत नाहीं असें म्हणावें लागेल.' -सासं २.४५०. 'म्हणता कशास ओनामा । जनहो घ्या हरिच्या नामा ।' ओनाम्या-वि. १ ओनामा शिकणारा; कोणा- त्याहि विद्येला ज्यानें नवीनच सुरवात केली आहे असा. २ ओनामा शिकविणारा; पंतोजी. [ओं नमः]

दाते शब्दकोश

पाडा

पु. १ उजळणीचा पाठ; पाढा (तीन एके तीन, तीन दुणें सहा याप्रमाणें उजळणीचे पाठ). २ (क, का, कि, की इ॰सारखा) बाराखडीचा धडा. ३ (ल.) तपशीलवार कथन; लांबलचक तपशील; चऱ्हाट. [सं. पठाण, पाठ; पाटी-पाटा (अंकगणित) -राजवाडे भाअ १८३२] ॰वाचणें-पु. (गोष्टीचा, कज्ज्याचा, कामाचा) लांबलचक तपशील सांगणें.

दाते शब्दकोश

पाढा

पु. १ धडा. २ उजळणींतील दशक. ३ लांबलचक, पाल्हाळाची हकीकत. [सं. पाठ; प्रा. पाढ] ॰वाचणें-(एखादी गोष्ट) सविस्तर, साद्यंत, तपशीलवार सांगणें.

दाते शब्दकोश

पासङ्ग

(न.) [फा. पा-सङ्ग] तराजूंतला विषमपणा काढून टाकण्याकरितां एका पारड्यांत घातलेलें वज़न; धडा. “मयसभा उपमे तुळितां गगनांत स्वर्ग पागडें वरुनें. विश्वकर्म्यानें धरूनि मुष्टीं । पासङ्गा घातले तेतीस कोटी । तरी न बैसे तळवटीं । हळुवटपणें अद्यापी” (मुक्तेश्वर-सभापर्व २|७०). -च्या पासङ्गास न येणें, न पुरणें त्या मानानें अगदींच कमी योग्यतेचें असणं.

फारसी-मराठी शब्दकोश

पासंग

पुन. १ तराजूच्या तोलांतील विषमपणा (एक पारडें हलकें व एक जड असणें). २ तराजूंतील विषमपणा काढून टाकण्यकरितां, दोन्ही पारडीं सारखीं करण्याकरितां एका पारड्यांत घातलेलें वजन किंवा कांहीं वस्तु; धडा. 'विश्वकर्म्यानें धरूनि मुष्ठीं । पासंगा घातलें तेतीसकोटी । तरी न बैसे तळवटीं । हाळवटपणें अद्यापी ।' -मुसभा २.७०. ३ ज्वाळेचा झोंक, रोख. ४ (ल.) बरोबरी; योग्यता. 'हें खूळ माजविणारांची योग्यता आणि अधि- कार पाहूं गेलें तर तेही श्रीशिवाजीमहाराजांच्या अधिकारतेजापुढें खद्योतवत् देखील पासंगास लागावयाचे नाहींत?' -टि ४.३१८. [फा. पा-संग्] (वाप्र.) पासंगास देणें-दोन पारडीं, पक्ष, बाजू इ॰सारख्या प्रमाणांचीं करण्यासाठीं घातलेली (पदार्थ, मनुष्य इ॰ची) भर. पासंगास न पुरणें, न लागणें-फारच थोडें किंवा कमी योग्यतेचें असणें. 'लागेल न पासंगातें.' -संग्रामगीतें १३९. पासंगीं आणणें-मान देणें; किंमत देणें (बहुधा निषेधार्थी प्रयोग). पासंगीं न आणणें-कमी लेखणें; कुचकिंमतीचा आहे असें समजणें.

दाते शब्दकोश

शिंव

स्त्री. सीमा; हद्द; मर्यादा; कड. [सं. सीमा] ॰धडा-पु. शेजारी; सीमेवरील, हद्दीपलीकडील मनुष्य. [शिंव + धडा] ॰धडी-पु. शेजारी. शिवधडे, शीमधडे, शींवधडे- पुअव. सीमेबाहेरचे, शेजारच्या गांवचे लोक. -थोमा १७९. २१. ॰धार-स्त्री. (सांकेतिक) बारीक तुपाची धार. [शिंव + धार] ॰शेजारी-पु. सीमेपलीकडील, शेजारच्या गांवचा मनुष्य. ॰सोयरा-पु. शिंवशेजारी. शिंवाणीं उभा न करणें उभा न राहूं देणें-दाराशीं उभा न करणें, आपल्या सीमेवरहि येऊं न देणें. शिवार-शिंवार-नपु. १ गांवच्या सीमेच्या आंतील वस्तीखेरीज इतर जमीन; सर्व शेतजमीन. २ (कांहीं भागांत, विशेषतः दक्षिण कोंकणांत) झाडीझुडपें असलेली जमीन; बाग- बगिचे; राई. ३ कापून रचून ठेवलेलीं इमारतीचीं लांकडें. ४ लांकडें आणावयाकरितां जंगलांत केलेली खोप. [सं. सीमागार] ॰पंडित- पु. खेडेगांवातील माहितगार इसम; ग्रामपंडित; खेडेगांवातील लोक ज्याचा सल्लामसलत घेतात असा अर्धवट ज्ञान असणारा खेड- वळ ब्राह्मण; अडाणी, रानवट मनुष्य. ॰पाहणी-स्त्री. गांवच्या जमीनीची मोजणी, तपासणी. ॰स्वैंपाक-पु. १ शेतांतील हुरडा, ओंब्या वगैरे अन्न. २ शेतांतील पदार्थांचें तयार केलेलें अन्न, जेवण. शिंवारो-पु. (गो.) शिंवाराची देवता.

दाते शब्दकोश

संथा

(सं) स्त्री० थोडथोडा धडा, पाठ.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

श्रेष्ठ

पु. समर्थ रामदास यांचे वडील बंधु रामीरामदास गंगा- धर स्वामी. -वि. उत्कृष्ट; उत्तम; वरिष्ठ; मुख्य; ज्येष्ठ. 'कीं श्रेष्ठेनें धडा घातला । रेवांतासी ।' -शिशु ९९४. 'ज्येष्ठ श्रेष्ठ नृपा तूं नं धरावे बोल हे मनीं कांहीं ।' -मोसभा ४.६३. [सं.] ॰अर्धांग-न. पत्नी. (इं.) बेटरहाफ. -आगरकर. श्रेष्ठा- चार-वि. उत्तम; उत्कृष्ट तऱ्हेची वागणूक, रीति, पद्धति. श्रेष्ठा- यत्त कुटुंब-न. ज्येष्ठ मनुष्यास सर्वाधिकार असलेलें कुटुंब. (इं.) पॅट्रिआर्चल फॅमिली. -आगरकर. श्रैष्ठ्य-न. श्रेष्ठत्व.

दाते शब्दकोश

श्रीगणेशा

पु. (ल.) कार्यारंभ; पहिला धडा; सुरवात. [श्रीगणेशायनमः याचा संक्षेप]

दाते शब्दकोश

तात्पर्य

आशय, संदेश, सार, भावार्थ, तथ्यांश, बोध, सारांश, मथितार्थ, गोषवारा, ध्वन्यर्थ, सूचितार्थ, थोडक्यांत गोळाबेराज, काय म्हणावयाचें आहे तें, ग्रथित नीतितत्त्व, घ्यावयाचा धडा, थोडक्यांत अर्थ सांगण्याचे सूत्र, लेखांतला ध्वनि, लेखकाचा सल्ला, लेखनहेतु, त्यांतील सूत्र.

शब्दकौमुदी

ठे(ठें)च

स्त्री. १ ठोकर; दगड इ॰ कास पाय अडकणें. (क्रि॰ लागणें). २ (ल.) तोटा; नुकसान; हानि. ३ गर्दी; भीड; फार दाटी. ठेंच लागणें-अद्दल घडणें; धडा शिकणें; वाईट अनुभव मिळणें. [ध्व. हिं. ठेस] ॰भरणें-(आगरी) लग्नांत उंबर्‍यास हळदकुंकू लावणें. -बदलापूर ३५. म्ह॰ पुढच्यास ठेच मागला शाहणा = पुढल्या मनुष्यास ठेच लागली म्हणजे मागला हुषार होतो.

दाते शब्दकोश

ठेच      

स्त्री.       १. दगड इत्यादिकांस पाय अडकणे. (क्रि. लागणे.). २. (ल.) तोटा; नुकसान; हानी. ३. गर्दी, भीड; फार दाटी. [हिं. ठेंस] (वा.) ठेच भरणे - लग्नात उंबऱ्यास हळदकुंकू लावणे. (आगरी) ठेच लागणे - अद्दल घडणे; धडा शिकणे; वाईट अनुभव मिळणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

वाचक

पु. शब्द; भाषणाचा विभाग, तुकडा, अवयव; वाक्य; शब्दसमूह. -वि. १ दर्शक; दाखविणारा; अर्थाचा. उदा॰ काल-देश-स्थल-वृक्ष-अग्नि-वाचक. 'अन्य व्यावृत्ति सिद्ध । वाचक नव्हें ।' -अमृ ५.१३. २ वाचणारा. 'मुका होय वाचकाचा ।' -अमृ ६.६७. ३ महारांचा धर्मगुरु. -अस्पृ ४२. [सं. वच्] वाचणी-स्त्री. १ वांचन; लिहिलेल्या अक्षरांचें उच्चारण. २ वाचावयाचा धडा; पाठ. वाचणें-क्रि. लिहिलेलीं अक्षरें उच्चारणें; पठण करणें. (गो.) वाचप. [सं. वच् = बोलणें] वाचन-न. पठणक्रिया; वांचण्याची क्रिया; अभ्यास; पठण.

दाते शब्दकोश

वजन

न. १ पदार्थाच्या ठिकाणचा जडपणा; भार; गुरुत्व. २ याची इयत्ता समजण्यासाठीं (मासा, तोळा, धडा, मण, इ॰) जी ठराविक वस्तु वापरतात तें. ३ गुरुत्वाची इयत्ता समजण्या- साठीं करावयाचा तोल; तोलण्याचा व्यापार. ४ ओझें; भार. 'आपलें सर्व वजन दुसऱ्यांवर घालूं नये.' ५ इभ्रत; प्रतिष्ठा; मान. 'मनुष्याच्या आंगच्या सद्गुणांमुळें त्याचें लोकांत वजन वाढतें.' ६ महत्त्व; किंमत. 'हेस्टिंगचा प्रयत्न आपलें पेशव्यांशीं वजन रहावें म्हणून होता.' -विवि ८.६.११४. ७ (शाप.) भार; प्रतिबंधाचें अतिक्रमण करण्यास लाविलेली शक्ति. -यंस्थि ३. ८ वशिला; वर्चस्व; छाप. 'माझ्या कामांत त्यानें अधिकाऱ्या- जवळ आपलें वजन खर्ची धातलें.' [अर. वझ्न्] ॰कशी-पु. वजनेंमापें तपासणारा अधिकारी. -वाडमा १.१२०. [वजन + कस] ॰दार-शीर-वि. १ विशेष जड; जास्त वजन असलेला. २ (ल.) प्रतिष्ठित; तोलदार; छाप पडेल असा (माणूस). 'वजन- दार गणोजी तांडेल.' -चित्रगुप्त १२४. [फा. वझ्न् + दार; सं. शील] ॰दरी-स्त्री. १ प्रतिष्ठा; महत्त्व; सत्ता. २ परिणामकार- कता; चांगला बांधीवपणा. 'अशा योगानें वाक्य किंवा वाक्यांश याची वजनदारी राहत नाहीं.' -विवि ८.४.९२. ॰पूर-वि. शेर, तोळा इ॰ विवक्षित वजनानें पुरा; पुऱ्या वजनाचा. वजनी-वि. १ तोलण्याचा; मापण्याचा नव्हे असा (शेर, मण, खंड इ॰ प्रमाण). याच्या उलट मापी. २ वजन करून देण्याघेण्याचा (तूप, गुळ इ॰ पदार्थ). [फा. वझ्नी] ॰माप-न. वजन करून पाहण्यासाठीं असणारें प्रमाण.

दाते शब्दकोश

वस्तु-स्तू

स्त्री. १ पदार्थ; जिन्नस; चीज. वस्त पहा. २ काम; व्यवहार; गोष्ट. ३ परब्रह्म; बह्म. -ज्ञा ६.७१. 'वस्तु प्रगटची असे । पाहतां कोणासीच न दिसे ।' -दा १.५.३.४ नाटकाचें कथानक, विषय. ५ (संगीत) चीज. (सं. शब्दाचें लिंग नपुं. आहे पण मराठींत हा शब्द नेहमीं स्त्रीलिंगीच वापरतात). [सं. वस्तु] ॰कथन-न. खरी हकीकत; सत्यस्वरूप सांगणें. ॰गत्या, वस्तुतः-क्रिवि. १ वास्तविक; खरें पाहतां; परमार्थतः २ स्वभा- वतः; मूळपासून. 'इंग्रजींत घोंटाळा नाहीं असें नाहीं. सर्व भाषांत- वस्तुगत्याच असायचा.' -नि १२९. ॰चित्रलेखन-न. चित्र- कलेचा एक प्रकार. समोर ठेवलेल्या पदार्थाचें चित्रण. (इं.) मॉडेल ड्रॉईंग. ॰जात-न. पदार्थमात्र. 'मग पासींच असतां न दिसे । वस्तुजात ।' -ज्ञा २.५६. ॰तत्त्व-न. (तत्त्व.) कल्पना. -साक्रेसं २८१. ॰पाठ-पु. वस्तूची सप्रयोग माहिती देणें; अध्यापनाचा एक प्रकार. (सामा.) धडा. 'कायदा मोडायचा वस्तुपाठ हवा.' -के २६.७.३०. ॰मात्र-न. १ आराखडा; सांगाडा (संवाद, निबंध इ॰ चा). २ वस्तुजात पहा. ॰लाभ-पु. (लग्नांत)चांगली वधू मिळणें. 'बाकीच्या गोष्टींकडे पाहाण्याची जरूरी नाहीं. वस्तुलाभ पहा.' ॰वाद-पु. (तत्त्व.) वास्तववाद; (इं.) रिआ- लिझम. ॰शक्ति-स्वभाव-स्त्रीपु. पदार्थाच्या ठिकाणची नैसर्गिक शक्ति; निसर्ग-प्रकृतिप्रवृत्ति; नैसर्गिक गुणधर्म. ॰सत्ता-स्त्री. खरें, सत्य अस्तित्व; असृष्ट, स्वतंत्र वस्तु (म्हणजे ब्रह्म, परमेश्वर). याला विरोधी व्यावहारिकसत्ता व प्रातिभासिक सत्ता. ॰सिद्धि- स्त्री. (कायदा) झालें तें सशास्त्र हा न्याय. (इं.) फॅक्टम व्हॅलेट. ॰स्थिति-स्त्री. खरा प्रकार; खरी गोष्ट. ॰स्थितिकथन-न. खरी, वास्तविक गोष्ट आहे ती सांगणें. ॰स्थितिविचार-न. खऱ्या गोष्टीचा शोध, विचार ॰स्वरूपवाद-पु. वस्तुवाद पहा. वस्तूक-स्त्री. खेळणें; खाऊ (मुलास खेळण्यासाठीं दिलेला). वस्तूपपाद्य-न. सिद्धांत [वस्तु + उपपाद्य]

दाते शब्दकोश

व्याज

न. १ निमित्त; कारण. 'जें धर्मालय म्हणिजे । तेथ पांडव आणि माझे । गेले असती व्याजें । जुंझाचेनि ।' -ज्ञा १.८६. २ मिष; कपट; ढोंग. 'व्याज न जेथें नसे वक्रता, उपचारांची पीडा ।' -टिक २८. ३ रूप; वेष; बुंथीः ४ सबब; बतावणी. 'पितृवचनाचें करूनि व्याज । वना आलास तूं रघुराज ।' -रावि २२.१८. [सं.] ॰निंदा-स्त्री. एक अर्थालंकार. खोटी निंदा; बाहेरून निंदा दिसावी पण गर्भितार्थ स्तुतिपर असावा; प्रछन्न- स्तुति. या शब्दाचे इतर अर्थहि उलटसुलट आहेत. १ एकाच्या निंदेनें दुसऱ्याची निंदा करणें. उदा॰ 'मीच मूर्ख म्हणून तुला हें काम सांगितलें'. २ प्रछन्न निंदा; व्याजस्तुति. ॰स्तुति-स्त्री. एक अर्थालंकार. स्तुति करण्याच्या मिषानें निंदा किंवा निंदा करण्याच्या मिषानें स्तुति केली असतां हा अलंकार होतो. उदा॰ (कोणी मुलगा पहिल्यापेक्षां वाईट वाचूं लागल्यास) 'वाहवा ! आतां पर तूं फार चांगलें वाचूं लागलास; तसेंच' (निंदेच्या योगें स्तुति). 'आज एवढ्या पहांटेस उठून धडा पाठ करायाची ही अव- दसा तुला कोठून आठवली ?' व्याजोक्ति-स्त्री. एक अलंकार. मनांतून जें बोलावयाचें तें स्पष्ट न बोलतां निमित्तांतरानें भाषण करून त्यांत स्वभिप्रेत अर्थ आणावयाचा. २ गुप्त गोष्ट, स्वरूप प्रगट झालें असतां तें कांहीं सबबी सांगून लपवून टाकावयाचें.

दाते शब्दकोश

जीव      

पु.        १. प्राण : जीवित. २. प्राण असणारा जिवंत प्राणी. ३. लहान कीटक; प्राणी (चिलट, घुंगरडे, पिसू, किडा इ.). ४. तेज; वीर्य; जोम; धमक; पाणी; शक्ती, धैर्य; कार्यक्षमता; सत्त्व; सार (माणूस, घोडा, बैल इत्यादींचे). ५. अंतरात्मा; सचेतन आत्मा. पहा : जीवात्मा [सं.] (वा.) जीव अधांत्री उडणे - संकटात पडणे; भांबावून जाणे; घाबरून जाणे. जीव अर्धा करणे - मनुष्याला अतिशय त्रास देणे. सर्व शक्ती खर्च करणे (श्रम, व्यर्थ शिकवण इ.). जीव अर्धा होणे - भिणे; त्रासले जाणे; गर्भगळित होणे; श्रमणे; दमणे; अर्धमेले होणे. जीव अडकणे, जीव टांगणे, जीव टांगला असणे - आवडत्या वस्तूच्या प्राप्तीसाठी घाबरे होणे, काळजी लागणे. जीव आटणे - १. मरेमरेतो काम करणे. २. अतिशय थकून जाणे (मेहनत, काळजी इ.नी). जीव आंबणे - त्रासून जाणे; कंटाळणे. जीव उडणे - १. प्रेम नाहीसे होणे; विटणे. २. भीतिग्रस्त होणे. जीव कयंगटीस येणे - १. मेटाकुटीस येणे. २. मुरगळून पडणे. (कर.) जीव कालविणे - गलबलणे; अतिशय क्षोभ होणे; घाबरणे; गडबडणे. जीव की प्राण करणे - अतिशय प्रेम करणे. जीव कोड्यात पडणे - बुचकळ्यात पडणे; काही न सुचणे : ‘हे ऐकून भागाचा जीव कोड्यांत पडला.’ - ऊन १७. जीव कोरडा होणे, जीव कोरडा पडणे - घसा वाळणे; थकणे; अतिशय दमणे; (आजार, श्रम, भूक यांनी). जीव कोंडाळणे - गुदमरणे (ना.). जीव खरडून बोलणे, जीव सुकणे, जीव रडणे - आकांत करणे; ओक्साबोक्सी रडणे. जीव खाऊन - सर्व शक्ती एकवटून किंवा मनापासून; जोरजोरात : ‘ताशा वाजंत्रीवाले सकाळपासून दाराशी येऊन दोन पायांवर बसले होते आणि जीव खाऊन वाजवीत होते.’ - भुज १२२. जीव खाऊन काम करणे - मनापासून काम करणे; कसून काम करणे. जीव खाणे, जीव घेणे, जिवास खाणे - एखाद्याच्या जिवास त्रास देणे; झुरविणे. जीव खाली पडणे - उत्कट इच्छा पूर्ण होणे; साध्य गाठणे; मनाजोगे होणे. जीव गंगाजळ होणे - धन्य होणे; कृतार्थ होणे : ‘मळवट भरून त्येंच्यासंगं गेली असती. जीव गंगाजळ झाला असता माझा.’ - खळाळ ७४. जीव गोळा होणे - १. अधीर होणे. २. मरणोन्मुख होणे. अतिशय घाबरणे : ‘जों जों देखे देव काखेंत बोळा । तों तों त्याचा होतसे जीव गोळा ।’ - आसुच २६. जीव घेऊन पळणे - जीव वाचविण्यासाठी पळून जाणे. जीव जाळणे, जीव मारणे - निग्रह करणे; दमन करणे (कामेच्छा, पाप वासना, मनोविकार यांचे). जीव टाकणे - १. प्राण सोडणे. २. निराश होणे; चित स्वस्थ नसणे. ३. फार उत्कंठा लागणे; अतिशय हट्ट, छंद घेणे. ४. खूप प्रेम करणे; लुब्ध होणे : ‘त्यासाठी मी जीव टाकतो.’ - अआबांदे ११. जीव टाकून पळणे - अतिशय त्वरेने, घाईने, एकदम पळणे; भिऊन पोबारा करणे. जीव टांगणीस लागणे - १. एखाद्या वस्तूवर प्रीती बसणे. २. चिंताग्रस्त होणे. जीव टांगणे - काळजीत असणे : ‘लवकर ये रे बाबा - माझा जीव टांगलेला आहे.’ - एल्गार १२८. जीव टांगून ठेवणे - तिष्ठत ठेवणे; काळजीत ठेवणे : ‘चार वर्षं बिचारीचा जीव टांगून ठेवलात.’ - ऑक्टोपस ६१. जीव ठिकाणी नसणे - अस्वस्थ असणे; चैन न पडणे. जीव डहळणे, जीव मळकणे - (ना.) मळमळणे. जीव तुटणे - १. अतिशय थकणे. २. तळमळ लागणे. एखाद्याचा ध्यास लागणे; एखाद्याबद्दल अतिशय काळजी वाटणे. जीव तोडणे - दुःखाने सचिंत होणे. जीव तोडून करणे - अतिशय मेहनतीने करणे. (काम, धंदा). जीव थारी असणे - स्वस्थपणा असणे. जीव थारी नसणे - अस्वस्थ असणे; चैन न पडणे. जीव थोडा थोडा होणे - (ग्लानी, देणे इत्यादी कारणांनी) अतिशय चिंताग्रस्त होणे; काळजी लागणे; भीती वाटणे; फार दुःख होणे; धैर्य खचणे. जीव देणे - १. आत्महत्या करणे. २. सगळे लक्ष घालणे; लक्ष देऊन करणे; पुष्कळ प्रयत्न करणे. जीव धडधड करणे - काळजी, भीती वाटणे. जीव धरणे - नवीन शक्ती मिळविणे; रंगारूपास येणे; बरे व्हावयास लागणे. जगणे, वाढीस लागणे (झाड वगैरे). जीव धरून - १. धैर्य धरून; उत्सुकतेने; उत्साहाने (कृत्य करणे.) २. जिवंत राहून; अस्तित्व टिकवून (कसा तरी याला जोडून योजना.). जीव धागधूग करणे - घाबरणे; वरखाली होणे : ‘निकालाचा दिवस जो जो जवळ येऊ लागला तो तो माझा जीव धागधूग करू लागला.’ - पलको ४९१. जीव धुकुडपुकुड करणे - घाबरणे. (ना.) जीव नाकास येणे - नाकी नव येणे; नाकी नळ येणे; दमछाक होणे. जीव पछाडणे - मोठ्या कळकळीने, लाचारीने नम्र होणे. जीव पडणे - एखाद्या गोष्टीत मनापासून शिरणे; गोडी लागणे; तत्पर होणे. जीव पाखडणे - १. अतिशय मेहनत करणे; प्रयत्न करणे. २. जळफळणे; तडफडणे. जीव पोळणे - १. दुःख होणे. २. चट्टा बसणे; धडा मिळणे. जीव प्यारा असणे - जिवाविषयी अति प्रीती दाखविणे. जीव फुटणे - अतिशय उत्सुक होणे : ‘तुझे भेटीसाठी निशिदिवस माझा जिव फुटे ।’ - सारुह ६·१५८. जीव बसणे - (एखाद्यावर) मन बसणे; प्रेम करणे. जीव भांड्यात पडणे - जीव स्वस्थ होणे. जीव मट्ट्यास येणे - दमणे, अगदी थकून जाणे. जीव मुठीत धरणे - १. काळजीपूर्वक स्वतःचे संरक्षण करणे (धोक्यामुळे). जीव मोठा करणे - १. जोराचा प्रयत्न करणे; धैर्य धरणे. २. उदार होणे (खर्च करण्यात); मन मोठे करणे. जीव रखमेस येणे - कंटाळा येणे; त्रासणे. (कु.) जीव राखणे - जिवाचे रक्षण करणे; आळसाने काम करणे. जीव लावणे - प्रेम करणे; माया लावणे. जीव वर धरणे, जीव वरता धरणे - अतिशय उत्सुक होणे; उत्कंठा लागणे. जीव वारा पिणे - उदास भासणे; भयाण वाटणे. जीव सुकणे - अशक्त, व्याकूळ होणे. जीव सुचिंत नसणे - काळजीत असणे. जीव सोडणे - १. मरणे. २. जीव धोक्यात घालणे; स्वतःच्या जिवाची आहुती देणे. ३. अतिशय इच्छा दर्शविणे. ४. आजारी माणसावरून कोंबडे ओवाळून टाकणे (याने आजाऱ्याचा रोग कोंबड्यावर जाऊन ते मरते अशी समजूत). जिवाचं काय पांढ्‌ढ (कांळ-पांढरं) करणे - जिवाचे बरेवाईट करणे : ‘कोन्या आडशइरीवर जावं आन्‌ आपल्या जिवाचं काई काय पांढ्‌ढ करून टाकावं.’ - शिळान ७८. जिवाचा कान करणे - लक्षपूर्वक कान देऊन ऐकणे : ‘वयातीत वृद्धही त्यांचे बोलणे ऐकण्यासाठी जिवाचा कान करीत असत.’ - लोसंक्षि १२१. जिवाचा घात करणे - १. आटोकाट प्रयत्न करणे; जिवापाड मेहनत करणे. २. अतिशय छळणे; गांजणे (जीव जाईपर्यंत). जिवाचा घोट घेणे - जिवाचा घात करणे; मरेपर्यंत छळणे. जिवाचा धडा करणे - साहसाचा प्रयत्न करण्यास तयार होणे. जिवाचा निधडा करणे - जिवावर उदार होणे : ‘तेव्हा त्याणें जिवाचा निधडा करून शिपाइगिरी म्हणावी तैशी केली.’ - ऐको ४४५. जिवाचा लोळ करणे - १. फार श्रम करणे; जिवाला त्रास देणे. २. फार मेहनत घेणे. जिवाची कोयकोय करणे - (कुत्र्यासारखे भुंकावयास लावणे म्हणजे) अतिशय छळणे. जिवाची ग्वाही देणे, जिवाची पाखी देणे - खात्रीपूर्वक सांगणे. जिवाची घालमेल होणे - जीव अस्वस्थ होणे : ‘तुझ्या जिवाची आता जी घालमेल चालली होती’ - असा ८१. जिवाची बाजी - जिवाची पर्वा न करता : ‘येसाजींनी जिवाच्या बाजीनं वाटा रोखल्या.’ - श्रीयो २४७. जिवाची मुंबई करणे - चैन करणे : ‘मोटारी उडवून जिवाची तात्पुरती मुंबई करतात.’ - शेले ३८. जिवाची राळवण करणे - अतिशय काम करणे (राळ्याच्या काडीसारखे होणे); त्रास घेणे. जिवाची हुल्लड करणे - मोठा नेटाचा प्रयत्न करणे. जिवाची होड करणे - प्राण पणास लावणे; एखादे कार्य सर्व सामर्थ्यानुसार करणे : ‘जिवाची होड करून चालविलेल्या त्या स्वातंत्र्यसंगराने.’ - मसासंअभा ४४६. जिवाचे चार - चार करणे - थेर करणे; नाचणे; चैन, विलास करणे. जिवाचे रान करणे - अतिशय कष्ट सोसणे. जिवाच्या आकांताने - गर्भगळित होऊन; अतिशय घाबरून; सर्व शक्तीनिशी : ‘ते जिवाच्या आकांताने बाहेर पडले.’ - माचू ३७३. जिवाच्या गाठी बांधणे - मनात नीट ठसवून किंवा बिंबवून घेणे. जिवात जीव आहे तोपर्यंत - मरण येईपर्यंत; जन्मभर; सदासर्वदा. जिवात जीव घालणे - १. उत्तेजन देणे; सांत्वन करणे; धैर्य देणे. २. आपले व दुसऱ्याचे मन एक करणे; आपले विचार दुसऱ्यास नीट समजावणे. जिवात जीव नसणे - धीर नसणे - अस्वस्थ्य होणे : ‘घरी येईपर्यंत तिच्या जिवात जीव नव्हता.’ - रथचक्र १७३. जिवात जीव येणे - गेलेली शक्ती, धैर्य पुन्हा येणे; धीर येणे. जिवानिशी - जिवासकट. जिवानिशी जाणे - मरणे (जुलमाने, अकाली). जिवाला करवत लागणे - अतिशय चिंता लागणे. जिवाला काही तरी करून घेणे - आत्महत्या करणे; जीव देणे. जिवाला खाणे - मनाला लागून राहणे; झुरणे; झिजणे. तडफडणे. जिवाला चरका लावून जाणे - बेचैन करणे : ‘हे पद जिवाला चरका लावून जात असे.’ - मास्मृग्रं १४२. जिवावर आंगेजणी करणे - जिवावर उदार होऊन कार्यभाग अंगीकारणे : ‘लढाई होईलसी दिसती ते बहूत हे थोडे परंतु हे जिवावर आंगेजणी करितील श्री यश कोन्हास देईल पहावे.’ - ऐको ४४५. जिवावर उठणे - दुसऱ्याच्या जिवाची काळजी न करणे; त्याचा जीव घ्यायला याला तयार होणे. जिवावर उड्या मारणे - दुसऱ्याच्या पैशावर, मदतीवर चैन बढाई मारणे. जिवावरची होड - प्राणावर बेतलेले संकट; प्राणाची पैज; प्राणपणाला लावणे. जिवावर द्वारका करणे - एखाद्याच्या आधारावर, आश्रयावर चैन करणे; महत्कृत्य करणे; मोठा उपकार करणे : ‘तुमच्या जिवावर एवढी द्वारका केले घरदार दोमजली ।’ - पला ८५. (दुसऱ्याच्या) जिवावर (आपले) पोट भरणे - दुसऱ्यावर अवलंबून आपला उदरनिर्वाह चालविणे. जिवावर येणे, जिवावर बेतणे, जिवाशी गाठ पडणे - १. जीव धोक्यात पडणे; मोठे संकट ओढवणे. २. दुष्कर वाटणे. ३. चिडणे. जिवावरचे आधण उतरणे - कठीण प्रसंगांतून बचावणे, निभावणे. ९८. जिवाशी धरणे, जिवाशी बांधणे, जिवी धरणे, जिवी बांधणे - अतिशय प्रीती करणे; बहुमोल वाटणे : ‘काय इणें न धरावें अधनत्वें भूप - जन - वरा जीवीं ।’ - मोवन १३·१८ जिवाशी बेतणे - प्राण जाण्याची वेळ येणे : ‘जिवाशी बेतल्यावर तरी शुद्धींत याल असं वाटलं होतं.’ - एल्गार ११२. जिवास जहानगिरी करणे, जिवास जहानगिरी होणे - जिवावर मोठे संकट येणे, आणणे; संकटाचा प्रसंग ओढवणे. जिवास जीव देणे - प्रिय माणसासाठी आपला जीव देणे. अतिशय सख्य करणे. जिवास पाणी घालणे - जिवावर उदार होणे : ‘अवघे लोक पळाले, ऐसा प्रसंग लोकांचा या भरोसियावर रहावे तरी आपल्या जीवास पाणी घालोन रहावे लागते.’ - ऐको ४४५. जिवास मुकणे - मरणे; मृत्यू पावणे. जिवी लागणे - १. आवडीचा असणे; प्रिय वाटणे. २. मर्मभेद होणे; जिवाला लागणे. जिवे धुस जाणे - धस्स होणे; जिवात धडकी भरणे : ‘तुमते एतां देखिलें । तेंची माझां जीवे घुस गेले ।’ - शिव १२५. जीवे प्राणे उभे राहणे - जिवावर उदार होणे : ‘हें जीवें प्राणें उभे राहिलें तेव्हां त्याणीं अमल दिल्हा व तह केला.’ - ऐको ४४७. जिवे मारणे - जीव जाईपर्यंत मारणे. जिवे वाचणे - एखादे संकट टळून जिवंत राहणे; जीव जाण्याचा प्रसंग असता जीव न जाता बचावणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घोकणें

सक्रि. १ पुनःपुनः म्हणून पाठ करणें; घोष करणें; पाठ म्हणणें. 'आम्ही अहर्निशीं नाम घोकूं ।' -रामदास स्फुट अभंग ४७ (नवनीत पृ. १५४.) 'गोरक्ष घोकितां सद्वि- द्येसी ।' -नव १०.४०. २ (एखाद्या गोष्टीची) जपमाळ घेणें; घोष लावणें; वारंवार सांगणें, उच्चारणें. [सं. घुष्-घोषण; हिं. घोकना] म्ह॰ (व.) घोकंति विद्या खोदंति पाणी = घोकल्यानें विद्या व खोदल्यानें पाणी मिळतें. (पर्यायानें) कोणतीहि गोष्ट श्रमानें साध्य होते.' घोककाम्या-वि. अर्थाकडे लक्ष न देतां, संदर्भ लक्षांत न घेतां घोकंपट्टी करणारा (विद्यार्थी); दुसर्‍याच्या सांगण्याचा हेतु, मर्म लक्षांत न घेतां सांगण्याप्रमाणें अक्षरशः चालणारा. [घोकणें + काम] घोकणी-स्त्री. १ (एखादी गोष्ट लक्ष्यांत रहावी म्हणून) पुनःपुनः घोकण्याची क्रिया; आवृत्ति. (क्रि॰ करणें; घेणें). 'अजुनि तरि करि ही घोकणी ।' -राला ८८. २ त्याच त्याच गोष्टीचा पुनःपुनः उच्चार, निदिध्यास; एकच गोष्ट धरून बसणें; आपली इच्छा, हेतु पुन्हां पुन्हां सांगणें. (क्रि॰ घेणें; लावणें; करणें; लागणें; मांडणें; धरणें). 'सुख असल्यावर दिनासारिखे कां भौति फिरते । घोकण्या करिते । ' -सला २०. 'त्या मुलानें आईची घोकणी घेतली आहे.' [घोकणें] घोकंपट्टी—स्त्री. घोकण्याची क्रिया; घोकणी अर्थ १ पहा. (क्रि॰ करणें). 'दुसर्‍या इयत्तेंत फळ्यावरील शब्द मुलांनी आपल्या वहींत उतरून घेऊं नयेत, कारण या योगानें घोकंपट्टी करण्याची संवय मुलांना लागते.' -अध्यापन ७४. [घोकणें + पट्टी] घोकीव-वि. १ पाठ केलेला; घोकलेला (धडा इ॰). 'याचें घोकीव पांडित्य आहे. '२ स्मरणांत, ध्यानांत पक्का ठेवलेला; मनांत पक्का ठसलेला. घोकीव, घोक्या-वि. १ समजूत न घेतां, ध्यानांत न ठेवतां निव्वळ घोकंपट्टी करणारा; मंद (विद्यार्थी). २ पोपटपंची करणारा; घोकूनच फक्त ध्यानांत ठेवणारा; (क्व.) कोणत्या वेळीं काय बोलावयाचें हे पढवि- लेला; लांच घेऊन बनावट साक्ष देणारा (साक्षीदार इ॰). [घोकणें] घोक्या-वि. घोकणारा; घोकंपट्टीनें अभ्यास करणारा; घोककाम्या अर्थ १ पहा. [घोकणें]

दाते शब्दकोश

दाखल

पु. १ (एखाद्या गोष्टीचा विशदीकरणासाठीं घेतलेलें त्या गोष्टीसारखेंच) उदाहरण; दृष्टांत; उपमा; नमुना. 'कावळा करकरला म्हणून झाड मोडत नाहीं हा कावळ्याचा दाखला त्यानें तुला दिला.' 'तुमचे दाखल्यांनीं लोकांनीं करावें तें दुसरे अगोदर करितात आणि तुमचें कांहींच नाहीं.' -ख ५. २४७७. २ (एखाद्याचा) प्रत्यक्ष अनुभव; पडताळा; प्रतीति. 'जी सहस्त्रशीर्षयाचें दाखले । कोडीवरी होताति एकिवेळे ।' -ज्ञा ११.२६९. 'तुम्ही शकुन सांगितला त्याचा दाखल आला, तो माझ्या दाखल्यास आला.' ३ पायंडा; उदाहरण; वहिवाट. 'आम्ही चाकरी करूं तेव्हां दाखल पडत जाईल.' -ऐस्फुले ६२. 'आलेले खलिते मागील दाखल्याप्रमाणें बरोबर आहेत किंवा कसें हें खानगी कारभारी यांनीं पहात जावें.' -(बडोदें) अहेरबहुमान पोषाखाचा नियम ४. ४ (एखाद्या विधानास पुष्टी देणारा) पुरावा; आधारभूत गोष्ट, प्रमाण. 'ह्या वाटेनें वाघ गेला याचा दाखल हीं येथें पाऊलें उमटलीं आहेत.' ५ (पुराव्यादाखल हजर करतां येईल असें) प्रमाणपत्र; पावती; नोंद. 'तसेंच जीं पत्रें बंद करण्याविषयीं हुकूम होईल त्याची खबर कापडी जाम- दारखान्याकडे देऊन माहितीचे यादीवर तसा दाखला ठेवावा.' -(बडोदें) राजमहाल कामगारी कारकुनाच्या कर्तव्यासंबंधीं नियम ३. ६ (एखाद्याच्या) लायकीबद्दल पत्र. भलामणपत्रक; शिफारसपत्र. ७ हक्क; अधिकार. [दाखल] (वाप्र.) ॰घेणें-(एखाद्या गोष्टीपासून, व्यक्तीपासून) धडा घेणें; बोध घेणें. ॰पटणें-(एखादें भविष्य इ॰काचा) प्रत्यय, अनुभव, पडताळा येणें. ॰येणें-(एखादी गोष्ट) पुराव्यानें, प्रमाणानें सिद्ध होणें. दाखल्यास उतरणें- (एखाद्याच्या) अनुभवास जुळणें. सामाशब्द- ॰दुखला-पु. दाखला; दृष्टांत इ॰ [दाखला द्वि.] ॰मुकाबला-पु. पुरावा; पुष्टि देणारी, समर्थन करणारी गोष्ट. [दाखला + अर. मुकाबला] दाखलेचिठी-पत्र-स्त्रीन. १ (एखाद्याची लायकी, शील, इ॰ बद्दलचें) शिफारसपत्र; भलामणपत्रक. २ (विशेषार्थानें) महार, रामोशी इ॰ कास दिलेलें शिफारसपत्र. [दाखला + चिठ्ठी, पत्र] -लेवाईक-वि. १ उदाहरणें देऊन, दृष्टांत सांगून स्पष्ट, विशद केलेलें. २ ज्याच्या खरेपणाविषयीं कांहीं तरी प्रत्यय आला आहे असा. 'हा ब्राह्मण दाखलेवाईक प्रश्न सांगतो.' -लेशीर-वि. विश्वसनीय; सप्रमाण; व्यवस्थित. 'आमचे दौलतींत हालीमाजी होत गेल्यामुळें कागदपत्र दाखलेशीर राहिला नाहीं.' -रा १.३१२.

दाते शब्दकोश

सांग

स्त्री. धा नाम. १ सांगणें; सांगणी; निरोप. (क्रि॰ सांगणें). 'प्रियवधुसि वराला सांगता सांग झाला.' -आमा ९.२ आज्ञा; हुकूम. [सांगणें] ॰कामी-म्या-वि. १ स्वतःची बुद्धी न चालवितां नुसतें सांगितलेलें काम करणारा; वेळेप्रमाणें वागण्याची अक्कल नसणारा (निंदाव्यंजक उपयोग). २ ज्यानें नुसतें सांगि- तलेलें काम करावयाचें आहे असा; नुसता तंतोतंत हुकूम पाळला पाहिजे असा. (वाप्र.) सांगितल्या कामाचा दिल्या भाक- रोचा-केवळ सांगितलेलेंच काम करणारा व मिळेल तें खाणारा. ॰सरभरा-स्त्री. १ बोलण्यानें, (एखाद्याबद्दल) गौरवानें सांगून, शिफारस करून मदत करणें. 'त्यानें स्वतः कांहीं दिलें नाहीं पण माझी सांगसरभरा अशी केली कीं माझें लग्न झालें.' २ मदतीच्या थापा देणें; शाब्दिक मदत. 'होय, हा माझा माबाप खरा. ह्यानें असें करीन तसें करीन, हें देईन तें देईन म्हणतां माझी सांगसरभरा केली.' ॰सुगरण-सुग्रण-वि. नुसती बोलण्यांत हुषार; तोंडपाटिलकी करणारी स्त्री. 'मावशी म्हणजे सांगसुग्रण, चुलीजव- ळच्या नुसत्या गप्पा.' ॰सुगराई-सुग्राईस्त्री. बोलण्यांत शहाणा पणा. सांगणा-वि. निरोप्या; बोलावणेंकरी. -ख्रिपु २.४.१२. [सांगणें] सांगणी-क्रि. १ शिकवण; आदेश; सूचना. २ सांगणें; बोलणें; निरोप (क्रि॰ सांगणें). ३ शिकवण्याची, समजूत देण्याची पद्धत. सांगणीचा-वि. १ वधूपक्षीयांनीं वधूकरितां द्रव्य किंवा कांहीं मोबदला न घेतां तिचा केलेला (वाङ्निश्चय, विवाह). २ अशाप्रकारें विवाहित (कन्या). सांगणें-अक्रि. १ कळविणें; कथणें. २ करण्याविषयीं आज्ञापिणें; सुचविणें (काम, मामलत, अधिकार, रोजगार, चाकरी इ॰). ३ बोलावणें, निमंत्रण करणें (भोजन, समारंभ इ॰ स). ४ शिकविणें; समजावणें (अध्ययन, ग्रंथ, विद्या इ॰). ५ म्हणून दाखविणें (विद्या- र्थ्यास शिक्षकास, धडा इ॰). [प्रा. संघइ-तुल॰ सं. सांगतिक = गोष्टी सांगणारा; मनु ३.१०३.] (दुखणीं, संकटें, कुकर्मे इ॰ नीं) (अवघड, कठीण, जड) सागणें-(त्यांचा) परि- णाम कठीण होणें. सांगून येणें-विवाहासाठीं देऊं करणें (मुलगी). 'माझ्या भावास एक मुलगी सांगून आली आहे.' सांगणोवांगणी, सांगा(गी-गो)वांगी, सांगा- सांगी-स्त्री. १ प्रत्यक्ष प्रमाण नसतां एकानें दुसर्‍यास, दुसर्‍यानें तिसर्‍यास सांगण्याची परंपरा; ऐकीव गोष्ट; गप्पा. 'सांगणो- वांगणीचें काम नव्हे । आपुल्या अनुभवें जाणावें ।' -दा १०. १०.५३. २ गप्पा छाटणें; बकवा करणें. ३ एखादी गोष्ट अनेकांना सांगणें; बोभाटा करणें. [सांगणें द्वि.] म्ह॰ सांगा- सांगीं वडाला वांगी. सांगता-वि. सांगणारा. 'हरिकथेची महिमा कैसी । आदरें पुसतां सांगत्यासी ।' -एभा ३.५८७. सांगवा-पु. (माण. क.) निरोप. 'मला तुमचा सांगवा पोंचला नाहीं.' सांगी-स्त्री. सांग पहा. १ निरोप. २ उपदेश; समजावणी. 'दुष्टांच्या सांगीवरून आथेल्लोची दुर्गति झाली.' -विवि ८.४.८२. ३ आज्ञा; हुकूम. सांगिजणें-सांगणें; सांगि तलें जाणें. -विपू २.७९. 'कसें कार्या या तुम्हीं सांगिजे तें ।' -र ३८. 'मग आणिक उपचारु केला तेहीं । तो सांगिजैलु आतां ।' -शिशु ७७२.

दाते शब्दकोश

नख

पुन. १ मनुष्याच्या हातांच्या, पायांच्या बोटांच्या टोकाला असणारें शिंगाच्या जातीचें पातळ कवच. २ पशूच्या, पक्ष्याच्या पंजाला असणारें तीक्ष्ण अणकुचीदार हाड; पंजा. ३ खवल्या मांजराच्या अंगावर असलेल्या खवल्यांपैकीं प्रत्येक. ४ नखांतील विष; नखविष. (क्रि॰ बांधणें; लागणें; धावणें). ५ थेंब; अगदीं थोडें प्रमाण (तूप इ॰ चें). 'कुंकवाचें नख.' ६ (सोनारी) खरवईच्या दुसर्‍या टोकाशीं असणारी नाखाकृति लोखंडी मूठ; ही गडवे घडण्याच्या उपयोगी असते. [सं. नख; प्रा. नह; हिं. नह; सिं. नहु; पं. नहुं; पोर्तु. जि. नई] (वाप्र.) ॰दुष्टीस न पडणें-(एखाद्या कुलीन स्त्रीनें) बाहेर मुळींच न दिसणें, पडणें; पडद्याच्या आंत राहणें; अति मर्यादशीलपणानें वागणें, 'ती मराठमोळ्यांतील स्त्री आहे, तिचें नख तुझ्या दृष्टीस पडणार नाहीं.' ॰देणें-लावणें-ठार करणें. 'नीतीला नख देणारे ।' -संग्रामगीतें ९. ॰नख बोलणें-दिमाखानें, ऐटीनें, कुर्रेबाजपणानें बोलणें. ॰लावणें-(लहान अर्भक इ॰ कांच्या कोमल गळ्याला) नखांनीं दाबून जीव घेणें, ठार करणें. नख देणें पहा. 'माझे मर्यादेची रेख । पृथ्वी न विरवी उदक । उदकातें तेज देख । न लवी नख शोषाचें ।' -एभा २४.१३९. 'अरिहि न करिल असें त्वां केलें, कां नख न लाविलें जननी ।' -मोउद्योग ११.२३. ॰शिरणें-शिरकाव होणें; चंचुप्रवेश होणें. नखांबो टांवर काम करणें-नाजुकपणाचा आविर्भाव, दिमाख करून काम करणें. नखांबोटांवर खेळविणें-चाळविणें-(एखाद्यास) भूलथाप देणें; चाळविणें; झुलविणें; भुरळ पाडणें. नखांबोटांवर चालणें-ठमकत, ठमकत, मिजासीनें चालणें. नखांबोटांवर जेवणें-चाखतमाखत, चोखंदळपणानें जेवणें. नखांबोटांवर दिवस मोजणें-(एखाद्या गोष्टीची) अत्यंत आतुरतेनें वाट पहाणें, प्रतीक्षा करणें. नखांला आग लागली-अजून सारे अंग जळा- याचें आहे). संकटावर, संकटें येण्यास नुसती सुरवात झाली, अजून पुष्कळ संकटें यावयाचीं आहेत; (एखाद्याच्या) नखीं दोष नसणें, नखाला माती न लागणें-(एखादा) अत्यंत शुर्चि- र्भूत, निष्कलंक, पवित्र असणें. नखीं पातक लागूं न देणें-पापा- पासून अलिप्त राहणें; यत्किंचितहि पाप न करणें. 'नको लागों देऊं किमपि विमळे पातक नखीं ।' सारुह ७.१४६. नखें चावीत-कुरतुडीत-वाजवीत बसणें- १ निरूद्योगी, रिकाम- टेकडेपणानें असणें; उद्योगधंदा न मिळतां असणें. २ कुंठित, हिर- मुसलें होऊन बसणें. नखोनखीं सुया मारणें-शिक्षेचा एक प्रकार. 'नखोनखीं सुया मारिती । या नांव आदिभूतिक ।' -दा ३.७.७१.जेथें नख नको तेथें कुर्‍हाड लावणें- साध्याच साधनानें काम होईल अशा ठिकाणीं मोठमोठीं साधनें, शक्ति उपयोगांत आणणें. आपलींच नखें आपणांस विखें- आपल्याच दुष्कृत्यांनीं स्वतःवर आलेलीं संकटें. म्ह॰ जेथें नखानें काम होतें तेथें कुर्‍हाड कशाला. = जेथें क्षुल्लक, अल्प साधनानें, शक्तीनें काम होण्यासारखें असेल तेथें मोठें साधन शक्ति कशाला योजावी ? 'नखहि नको ज्या कार्या, त्या काढावा कशास करवाल ।' -मोभीष्म ४.४६. साधित शब्द-नखभर-वि. नखावर मावण्या- इतकें; अत्यंत थोडें. 'नखभर तूप.' नखाएवढा-वि. अगदीं लहान; किरकोळ; क्षुल्लक (जिन्नस, काम, कर्ज, अपराध, मनुष्य इ॰). 'मेला नखाएवढा जीव नाहीं.' -नामना १२. नखाची जीभ- स्त्री. नखाखालील नाजुक त्वचा; जिव्हाळी. सामाशब्द- ॰खुरपा-वि. नखानें खुरपून काढतां येण्याजोगा (कोवळ्या नारळांतील मगज इ॰). [नख + खुरपणें] ॰जीन-न. (राजा.) नखें काढण्याचें न्हाव्याचें हत्यार; नर्‍हाणी. [नख + फा] ॰मूळ, नखरडुं, नखरूं-न. नखाच्या जवळ होणारा फोड, सूज इ॰ विकार. [नख + मूळ] ॰वणी-न. ज्यांत मनुष्यानें नखें बुडविलीं आहेत असें धार्मिक कृत्यास निषिद्ध मानलेलें पाणी. [नख + पाणी] ॰विख, विष-न. १ नखांतील विष; नखांत एक प्रकारचें विष असून फार खाजविलें असतां खाजविलेल्या भागास तें बाधतें. 'खाजवूं नकोस, नखविष बाधेल.' २ नखांतील विष बाधून झालेला व्रण, जखम. (क्रि॰ बाधणें; लागणें; धावणें). 'नखविख आणी हिंगुर्डे । बाष्ट आणी वावडें ।' -दा ३.६. ४८. [नख + विख] ॰शिखपर्यंत, नखशिखांत-क्रिवि. पायांच्या नखां- पासून शेंडीच्या अग्रापर्यंत; आपादमस्तक; सर्व शरीरभर. 'दर पंधर- वड्यास जरी नखशिखांत क्षौर केलें तरी त्याबद्दल आम्ही त्यास दोष देणार नाहीं.' -आगर 'वाघास पाहतांच नखशिखपर्यंत कंप सुटला.' [नख + सं. शिखा = शेंडी + पर्यंत, अंत] ॰क्षत-न. १ नखानें (शरीर इ॰ कांवर) काढलेला ओरखडा. २ (प्रणय- लीलेंत) नखाचा ओरखडा, वण उमटणें. 'नखक्षतानें मृदु किण्वंती नवनवगुण रागिणी । धरावी हृदयीं कवटाळुनी ।' -राला ३६. दंतक्षत पहा. [नख + सं. क्षत = जखम, ओरखडा] नखाग्रीं- क्रिवि. १ नखाच्या टोंकावर. 'व्रजावन करावया बसविलें नखाग्रीं धरा' -केका ५. २ (ल.) लिहितांना चटकन् आठवेल इतका पाठ असलेला (धडा, श्लोक इ॰). जिव्हाग्रीं पहा. [नख + सं. अग्र = टोक] नखोदक-न. नखवणी पहा. [नख + उदक = पाणी]

दाते शब्दकोश

तोंड      

न.       १. ज्याने खाता व बोलता येते तो शरीराचा अवयव. २. चेहरा; हनुवटीपासून डोक्यापर्यंत मस्तकाचा दर्शनी भाग. ३. (सामा.) (एखाद्या वस्तूचा) दर्शनी, पुढचा, टोकाचा भाग; समोरील अंग. ४. (फोड, गळू इ.चा) छिद्र पडण्याजोगा, छिद्रासारखा भाग; व्रणाचे मुख. ५. (कुपी, तपेली, लोटी वगैरेंचे) पदार्थ आत घालण्याचे द्वार, मुख. ६. (एखाद्या विषयात, शास्त्रात, गावात, देशात, घरात) शिरकाव होण्याचा मार्ग; प्रवेशद्वार. ७. (ल.) गुरुकिल्ली. उदा. व्याकरण हे भाषेचे तोंड होय. ८. (वारा इ.ची) दिशा, बाजू. ९. धैर्य; दम; उमेद; एखादे कार्य करण्याविषयीची न्यायतः योग्यता. १०. एखाद्या वस्तूचा स्वीकार किंवा विनियोगाचा, उपयोगाचा आरंभ तिच्या ज्या भागाकडून करतात तो भाग. ११. (युद्ध, वादविवाद इ. गोष्टींची) प्रारंभदशा; सुरुवात. १२. (सोनारी धंदा) हातोड्याचा सगळ्यात खालच्या बाजूला अडिश्रीच्या बुडासारखा असणारा भाग. याने ठोकलेला जिन्नस सारखा करून घेतात. १३. (सोनारी धंदा) कांबीला गोल आकार देताना तिची टोके जेथे जुळतात तो भाग. १४. (बुद्धिबळ) डाव सुरू करण्याचा प्रकार; मोहरा. १५. सुरईचे पाणी ओतण्याचे व भरण्याचे तोंड. हे पक्ष्याच्या चोचीप्रमाणे लांब व विविध आकाराचे आढळते. [सं.तुंड] (वा.) तोंड आटोपणे, तोंड सांभाळणे, तोंड आवरणे – जपून बोलणे; बोलण्याला आळा घालणे; अमर्याद भाषण, अभक्ष्यभक्षण यांपासून निवृत्त होणे. तोंड आणणे – (आटापाट्यांचा खेळ) शेवटची पाटी खेळून जाऊन पुन्हा एक एक खेळत येणे; पाणी, लोण आणणे. तोंड आहे की तोबरा – खादाड किंवा बडबड्या माणसाला उद्देशून वापरण्याचा ‘किती खातोस’ ‘किती बोलतोस’ या अर्थाचा वाक्यप्रचार. तोंड आंबट करणे – (एखाद्याने) चेहऱ्यावर असमाधानाचे, निराशेचे भाव आणणे. तोंड उतरणे – (निराशा, आजार इ.ने) चेहरा म्लान होणे, सुकणे, फिका पडणे, निस्तेज होणे. तोंड उष्टे करणे – १. (अन्नाचा) एखाददुसरा घास खाणे. २. ज्या गोष्टीविषयी आपल्याला मुळीच माहीत नाही त्याविषयी बोलणे. तोंड करणे – बडबड, वटपट करणे; उद्धटपणे, निर्लज्जपणे बोलणे. तोंड काटणे – उदयाला येणे; अस्तित्वात येणे. तोंड काळे करणे – (उप.) एखादा ठपका, तोहमत अंगावर आल्यामुळे निघून, पळून जाणे; हातावर तुरी देणे; दृष्टीस न पडणे. तोंड कोरडे पडणे, तोंडचे पाणी पळणे, तोंडचे पाणी उडणे – १. भीतीमुळे चेहरा फिका पडणे; बावरणे; घाबरणे. २ भीतीने घसा सुकणे. तोंड गोड करणे – १. (एखाद्याला) लाच देणे, खूष करणे. २. मेजवानी देणे. तोंड गोरेमोरे होणे – (कोणी रागावले असता, वाईट वाटून) निराशेची, लाजलेपणाची जाणीव चेहऱ्यावर उमटणे. तोंड घालणे – (दोघे बोलत असताना तिसऱ्याने) संबंध नसताना मध्येच बोलणे. तोंड घेऊन येणे – एखाद्याने सोपवलेले काम न करता तसेच परत येणे. तोंड घेणे – बोंबलत सुटणे; ताशेरे झाडणे. तोंड चिघट करनं – वारंवार उपदेश करणे. (झाडी) तोंड चुकविणे – हातून एखादा अपराध घडला असता कोणी रागवेल म्हणून काम टाळण्यासाठी चुकारपणे दृष्टीस न पडणे. तोंड टाकणे – रागातिशयाने अपशब्दांचा वर्षाव करणे; निर्भर्त्सना करणे; खरडपट्टी काढणे; अद्वातद्वा बोलणे. तोंड ठेचणे – तोंडावर मार देऊन गप्प करणे; कह्यात घेणे; गुप्तता राखणे. तोंड तोडणे – एखादी वस्तू मिळवण्यासाठी एखाद्याच्या पाठी लागणे; तोंड वेंगाडणे. (ना.) तोंड दाबणे – लाच देऊन तोंड बंद करणे; एखाद्याला वश, गप्प करणे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार – एखाद्याला तक्रारीचा ब्रही काढू न देता प्रचंड छळ, कोंडमारा करणे. तोंड दिसणे – एखाद्याची केलेली निर्भर्त्सना दुसरी बाजू न कळता लोकांच्या नजरेला येणे व आपणच वाईट ठरणे. तोंड देणे – १. पहा : तोंड घेणे २. २. सैन्याच्या अग्रभागी राहून शत्रूवर हल्ला करणे. ३. (एखाद्याचा) प्रतिपक्षी, शत्रू होऊन राहणे; लढायला सिद्ध होणे. ४. (आट्यापाट्यांचा खेळ) शेवटची पाटी खेळून परत येणाऱ्या गड्याकडे पाटी धरणाराने तोंड फिरविणे. ५. एखाद्या गोष्टीला न भिता त्यातून धैर्याने पार पडण्याची तयारी ठेवणे. तोंड धरणे – १. अन्नसेवन करण्याची तोंडाची शक्ती आजार वगैरे कारणांमुळे नाहीशी होणे. २. एखाद्याची बोलण्याची शक्ती नाहीशी करणे. ३. एखाद्याला आपल्या तावडीत, कबजात आणणे. ४. बोलणे बंद करणे. तोंड धुणे – एखाद्या वस्तूच्या लाभासाठी वाट पाहणे. तोंड धुवून येणे – (उप.) एखाद्याची विनंती कधीही मान्य होणार नाही असे म्हणून फेटाळून लावताना योजण्याचा तिरस्कारदर्शक वाक्यप्रकार. तोंड निपटणे – (आजार, उपवास इ. कारणांनी) गाल खोल जाणे; चेहरा सुकणे. तोंड पडणे – १. सुरुवात होणे. २. (गळू वगैरेला) छिद्र पडणे, फुटणे, वाहू लागणे. तोंड पसरणे, तोंड वेंगाडणे, तोंड विचकणे – १. खिन्नपणाची, केविलवाणी मुद्रा करणे. २. हीनदीनपणाने याचना करणे. तोंड पाघळणे – गुप्त गोष्ट बाहेर फोडणे. तोंड पाडणे – (वादाला, कामाला) सुरुवात करणे. तोंड पाहणे – १. (एखाद्याच्या) आश्रयाची, मदतीची अपेक्षा करून असणे. २. (एखाद्याने) स्वतःच्या शक्तीचा, कर्तृत्वाचा अजमास करणे. ३. बोलणाऱ्याचे आपण नुसते ऐकणे, सांगेल तसे न करता स्वस्थ बसणे. तोंड पाहात बसणे – काय व कसे करावे या विंवचनेत पडणे. तोंड पिटणे – बडबड करणे : ‘तैशी न करी बडबड ।... वृथा तोंड पिटीना ।’ – एभा १०·२३१. तोंड फिरणे – १. आजाराने, पदार्थाच्या अधिक सेवनाने तोंडाची रुची नाहीशी होणे. २. तोंडातून शिव्यांचा वर्षाव होऊ लागणे. तोंड फिरविणे – १. (वितळत असलेला किंवा तापविला जात असलेला धातू इ.ने) रंगामध्ये फरक दाखवणे; रंग पालटणे. २. दुर्लक्ष, अवमान करणे. ३. गतीची दिशा बदलणे; दुसऱ्या दिशेला, माघारे वळणे. तोंड फुटणे – १. फजिती उडणे; पत नाहीशी होणे; नाचक्की होणे; अभिमानाला मोठा धक्का लागण्याजोगा अपमान, शिक्षा होणे. २. सुरुवात होणे (युद्ध, भांडण इ.ला). तोंड बंद करणे, तोंड बांधणे – १. जपून बोलणे. २. (एखाद्याला) लाच देऊन गप्प बसवणे, वश करून घेणे. तोंड बंदावर राखणे – खाण्याला किंवा बोलण्याला आळा घालणे. तोंड बाहेर काढणे – १. राजरोसपणे समाजात हिंडणे. २. फिरण्यासाठी, कामासाठी बाहेर पडणे. तोंड बिघडणे – तोंड बेचव होणे; तोंडाला अरुची उत्पन्न होणे. तोंड भर बोलणे, तोंड भरून बोलणे – भीड, संकोच, भीती न धरता मनमोकळेपणाने भरपूर, अघळपघळ बोलणे. तोंड मागणे – (आट्यापाट्यांचा खेळ) लोण घेऊन परत जाताना पाटीवरील गड्याला आपणाकडे तोंड फिरवायला सांगणे. तोंड माजणे – १. मिष्टान्न खाण्याची चटक लागल्याने साध्या पदार्थाबद्दल अरुची वाटणे. २. शिव्या देण्याची, फटकळपणे बोलण्याची खोड लागणे. तोंड मारनं – १. शब्द देणे. २. आपले म्हणणे सांगणे. तोंड मिचकणे – दात, ओठ खाणे. तोंड येणे – १. तोंडाच्या आतल्या बाजूने त्वचेला फोड येऊन ती हुळहुळी होणे व लाळ गळणे. २. लहान मूल बोलू लागणे. (कर.) तोंड रंगविणे – १. विडा खाऊन ओठ तांबडेलाल करून घेणे. २. एखाद्याने थोबाड थोबाडात मारून रंगवणे. तोंड लागणे – (लढाई, वादविवाद, अंगीकृत कार्य इ.ना) सुरुवात होणे. तोंड वर करून बोलणे – निर्लज्जपणे, आपला दर्जा, पायरी सोडून बोलणे. तोंड वाईट करणे, तोंड वाईट होणे – निराशेची मुद्रा धारण करणे. तोंड वाकडे करणे – १. वेडावून दाखवणे. २. नापसंती दर्शवणे. तोंड वाजविणे – एकसारखे बोलणे; निरर्थक बडबड, बकबक, वटवट करणे; भांडणे. तोंड वासणे – १. निराशेने, दुःखाने तोंड उघडणे व ते बराच वेळ तसेच राहणे. २. याचनेसाठी तोंड उघडणे, वेंगाडणे. तोंड वासून पडणे – शक्तीच्या क्षीणतेमुळे, उत्साह, तेज वगैरे नष्ट झाल्यामुळे, गतप्राण झाल्यामुळे आ पसरून पडणे. तोंड वासून बोलणे – अविचाराने बोलणे : ‘ऐसें स्वसख्यांपासीं कां गे वदलीस तोंड वासन ।’ – मोउद्योग १३·२०५. तोंड शिवले जाणे – एक शब्दही न बोलणे. तोंड शेणासारखे पडणे – (लाजिरवाणे कृत्य केल्याने) तोंड उतरणे, निस्तेज होणे, काळवंडणे. तोंड सांभाळणे – जपून बोलणे; जीभ आवरणे; मर्यादेत बोलणे. तोंड सुटणे, तोंड सोडणे, तोंड सुरू होणे; तोंडाचा तोफखाना सोडणे, तोंडाचा पट्टा सुटणे, तोंडाचा पट्टा सोडणे – अद्वातद्वा बोलणे; शिव्यांचा भडिमार करणे; जीभ मोकळी सोडणे. तोंड सोडणे – अधाशासारखे खाणे. तोंडचा गोड आणि हातचा जड – बोलण्यात गोड, पण प्रत्यक्ष पैशाची इ.मदत करण्यात मागे. तोंडचा घास काढणे, हिरावणे – अगदी आटोक्यात आलेली, जवळजवळ मिळालेली गोष्ट हिसकावली जाणे. तोंडचा घास देणे – एखाद्याला अतिशय प्रेमाने वागवणे; आपली गरज मागे सारून दुसऱ्याची गरज प्रथम भागवणे. तोंडनी भांडी करनं – निष्फळ बोलणे; निरर्थक बडबड करणे. तोंडाचा हुक्का होणे – तोंड सुकून जाणे. (व.) तोंडाची वाफ दवडणे – १. मूर्खाला उपदेश करणे. २. विश्वास न बसण्याजोगे, मूर्खपणाने बोलणे; वल्गना करणे; बाता मारणे. तोंडाचे बोळके होणे – म्हातारपणामुळे सर्व दात पडणे. तोंडाचे भदे करणे – शिवीगाळ करणे. तोंडाचे माडे करणे – थाप्पा मारणे. तोंडात जडणे – थोबाडीत, गालात बसणे. तोंडात तीळ न भिजणे; तीळभर न राहणे – अगदी क्षुद्र अशी गुप्त गोष्टही पोटात न ठरणे, न सांगता न राहवणे. तोंडात तोंड घालणे – १. प्रेम, मैत्री इ. भावांनी वागणे; मोठ्या प्रेमाचा आव आणणे. २. परस्परांचे चुंबन घेणे. तोंडात बोट घालणे – आश्चर्यचकित, थक्क, विस्मित होणे. तोंडात, भडकावणे, देणे – थोबाडीत, चपराक, गालात मारणे. तोंडात माती घालणे – खायला अन्न नसणे; अतिशय हाल, कष्ट सोसावे लागणे. तोंडात माती पडणे, जाणे – १. एखाद्याची उपासमार होणे. २. मरणे. तोंडात मारणे, मारून घेणे – १. पराभूत होणे; हार जाणे. २. फजिती झाल्यानंतर शहाणपणा शिकणे; नुकसान सोसून धडा शिकणे. तोंडात शेण, साखर घालणे – फजिती करणे; नावे ठेवणे : ‘सावित्रीबाईंच्या तोंडात लोक जेव्हां फारच साखर घालीत, तेव्हा तिने दोन–तीन जुनेरी एकत्र शिवून जानकीबाईंना द्यावी.’ – रंगराव. तोंडात साखर असणे – एखाद्याचे तोंड म्हणजे वाणी, बोलणे गोड असणे. (गो.) तोंडात साखर पडणे – आनंदाचा प्रसंग, दिवस येणे. तोंडातून ब्र काढणे – अधिक–उणे अक्षर काढणे, उच्चारणे. नकारात्मक उपयोग. तोंडाने पाप भरणे, तोंडे पाप घेणे – लोकांची पापे, त्यांचे दोष बोलून दाखवणे; वाईट बोलण्याची हौस यथेच्छ पुरवून घेणे; लोकांची पापे उच्चारून जिव्हा विटाळणे : ‘कैसीं वो मानुसें । सपाइनि परंवंसें । तोंडे पाप घेती कांइसें । वायां वीण ।’ – शिव २१६. तोंडापुरता मांडा – (भूक भागेल एवढीच पोळी) जेमतेम गरज भागेल एवढाच जरूर त्या वस्तूचा पुरवठा. तोंडाम्हा मुतनं – गरजेला, संकटात मदतीस न येणे. (अहि.) तोंडार पडप – १. वैधव्य प्राप्त होणे. २. लाजेने तोंड लपवण्याजोगी स्थिती येणे. तोंडार मारप – एखाद्याच्या पदरात चूक बांधणे; वरमण्यासारखे उत्तर देणे. (गो.) तोंडार ल्हायो उडप – (तोंडात लाह्या फुटणे) फार जलद, अस्खलित बोलणे. तोंडाला काळोखी आणणे, फासणे, लावणे – बेअब्रु, नापत करणे. तोंडाला टाकी दिलेली असणे – देवीच्या खोल वणांनी तोंड भरलेले असणे. तोंडाला पाणी सुटणे – एखादी वस्तू पाहून तिच्यासंबंधी मोह उत्पन्न होणे; हाव सुटणे. तोंडाला पाने पुसणे – फसवणे; चकवणे; छकवणे; भोळसावणे; भोंदणे. तोंडाला फाटा फुटणे – मूळ मुद्दा सोडून भलतेच, हवे तसे, अमर्याद बोलत सुटणे. तोंडावर तुकडा टाकणे – एखाद्याने गप्प बसावे, प्रतिकूल बोलू नये म्हणून त्याला काहीतरी देणे. तोंड तोंडावर, तोंडाला तोंड देणे – १. विरोध करणे; विरुद्ध बोलणे. २. उद्धटपणाने, अविनयाने, दांडगेपणाने प्रत्युत्तर देणे. तोंडावर, तोंडाला तोंड पडणे – दोघांची गाठ पडून बोलाचाल, वाद होणे. तोंडावर थुंकणे – एखाद्याची छीः थू, निर्भर्त्सना, धिक्कार करणे. तोंडावर नक्षत्र पडणे – (एखाद्याने) तोंडाळपणा करणे; शिवराळ असणे; नेहमी अपशब्दांनी तोंड भरलेले असणे. तोंडावर मारणे – पराभूत करणे. तोंडावर सांगणे, बोलणे – एखाद्याच्या समक्ष निर्भीडपणे खरे सांगणे. तोंडावर, तोंडावरून हात फिरवणे – गोड बोलून, फूस लावून, भूलथाप देऊन फसवणे; भोंदणे. तोंडाशी तोंड देणे – हलक्या दर्जाच्या व्यक्तीने वरिष्ठांशी आपला दर्जा विसरून, बरोबरीच्या नात्याने, अविनयाने बोलणे, वागणे. तोंडास काळोखी, काजळी लागणे, लावणे – बेअब्रू, नाचक्की, दुष्कीर्ती होणे; नावाला कलंक, बट्टा लागणे. तोंडास कुत्रे बांधलेले असणे – ताळतंत्र सोडून, अद्वातद्वा, अपशब्द बोलणे; शिव्या देणे. तोंडास खीळ घालणे – निग्रहपूर्वक, हट्टाने मौन धरणे. तोंडास तोंड न दिसणे – तोंड न ओळखता येण्याइतका अंधार असणे. तोंडास येईल ते बोलणे, तोंडाला फाटा फुटणे – वाट्टेल तसे बोलणे. तोंडास, तोंडाला, तोंडी लागणे – उलट उत्तरे देणे; हुज्जत घालणे; वादविवादाला तयार होणे. तोंडास हळद लागणे – एखाद्याला दोष देणे; नापसंती दर्शवणे. तोंडासारखे बोलणे – एखाद्याची स्तुती, खुशामत करण्यासाठी त्याच्या म्हणण्याची री ओढणे; आपल्या फायद्यासाठी दुसऱ्याचे मन न दुखावेल असे बोलणे. तोंडी आणणे, देणे – रोग्याला लाळ गळण्याचे, तोंड येण्याचे औषध देऊन तोंड आणणे. तोंडी काढणे – १. ओकारी, वांती होणे. २. (एखाद्याला त्याने) केलेले उपकार बोलून दाखवून टोमणा मारणे. तोंडी खीळ पडणे – तोंड बंद होणे; गप्प बसायला भाग पडणे. तोंडी घास येणे – एखाद्याला घासभर अन्न मिळणे; चरितार्थाचे साधन मिळणे; पोटापाण्याची व्यवस्था होणे. तोंडी तीळ न भिजणे – १. (तापाने, संतापून ओरडण्याने, रडण्याने) तोंड कोरडे पडणे. २. एखादी गुप्त गोष्ट मनात न ठेवणे, बोलून टाकणे. तोंडी देणे – एखाद्याला एखाद्या माणसाच्या, कठीण कार्याच्या झपाट्यात, तडाख्यात, तावडीत हाल, दुःख सोसायला लोटणे, पुढे करणे. तोंडी बसणे – श्लोक, शब्द इ. स्पष्ट, अचूक म्हणता येण्याइतका पाठ होणे. तोंडी येऊन बुडणे, नासणे – एखादी वस्तू, पीक, काम इ. अगदी पूर्णावस्थेला येऊन नाहीसे होणे. तोंडी येणे – १. (पारा इ. औषधाने) तोंड येणे. २. पूर्णावस्थेत, ऐन भरात येणे. तोंडी रक्त लागणे – १. वाघ इ. हिंस्त्र प्राण्यांच्या तोंडाला माणसाच्या रक्ताची चटक लागून ते माणसावर टपून बसणे. २. लाच खाण्याची चटक लागणे. तोंडी लागणे – १. खाद्याची चव प्रथमच कळून त्याची चटक, गोडी लागणे; आवड उत्पन्न होणे. २. (युद्ध, भांडण इ. मध्ये) आणीबाणीच्या ठिकाणी आघाडीला असणे. ३. पहा : तोंडाला तोंड देणे. ४. पहा : तोंडास लागणे. तोंडी लावणे – १. जेवताना भाजी, चटणी इ. चमचमीत पदार्थाने रुचिपालट करणे. २. विसारादाखल पैसे देणे. तोंडे वाकडी करणे – वेडावणे; वेडावून दाखवणे. लहान तोंडी मोठा घास घेणे – १. आपल्या आवाक्याबाहेरचे काम हाती घेणे. २. वडीलधाऱ्या माणसांसमोर न शोभेल असे, मर्यादा सोडून, बेअदबीने बोलणे; मोठ्या माणसाला शहाणपण शिकवणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तोंड

न. १ ज्यानें खातां वं बोलतां येतें तो शरीराचा अव- यव; मुख; वदन; तुंड. २ चेहरा; हनुवटीपासून डोक्यापर्यंत मस्तकाचा दर्शनी भाग. ३ (सामा.) (एखाद्या वस्तूचा) दर्शनी भाग; पुढचा-अग्रभाग; समोरील अंग. 'या ओझ्याच्या तोंडीं मात्र चांगल्या चांगल्या पेंढ्या घातल्या आहेत.' ४ (फोड, गळूं इ॰ कांचा) छिद्र पडावयाजोगा, छिद्रासारखा भाग; व्रणाचें मुख. यांतूनच पुढें पू, लस इ॰ वाहतात. ५ (कुपी, तपेली, लोटी इ॰ कांचें) पदार्थ आंत घालावयाचें भोंक; द्वार; मार्ग; मुख. ६ (एखाद्या विषयांत, शास्त्रांत, गांवांत, देशांत, घरांत) शिरकाव होण्याचा मार्ग; प्रवेशद्वार. 'ह्या घराचें तोंड उत्तरेस आहे.' ७ (ल.) गुरुकिल्ली. उदा॰ 'एखाद्या प्रांताचें, देशाचें किल्ला हें तोंड होय.' 'व्याकरण भाषेचें तोंड होय.' ८ (वारा इ॰कांची) दिशा; बाजू. ९ धैर्य; दम; उमेद; एखादें कार्य करण्याविषयींची न्यायतः योग्यता. १० एखाद्या पदार्थाचें ग्रहण किंवा त्या पदार्थाचा एखाद्या कर्याकडे विनियोग इ॰ कांचा आरंभ त्या पदार्थाच्या ज्या भागाकडून करि- तात तो भाग. 'भाकरीस जिकडून म्हटलें तिकडून तोंड आहे.' ११ (युद्ध, वादविवाद इ॰कांसारख्या गोष्टींची) प्रारंभदशा. 'वादास आतां कुठें तोंड लागलें.' १२ (सोनारी धंदा) हातोड्याच्या सगळ्यांत खालच्या बाजूस अडिश्रीच्या बुडासारखा जो भाग असतो तो. यानें ठोकलेला जिन्नस सारखा करून घेतात. १३ (सोनारी धंदा) कांबीस गोल आकार देतांनां तिचीं टोंकें जेथें जुळतात तो भाग. १४ (बुद्धिबळें) डाव सुरू करण्याचा प्रकार; मोहरा. 'वजीराच्या प्याद्याचें तोंड.' [सं. तुंड; प्रा. तोंड] (वाप्र.) ॰आटोपणें, सांभाळणें, आवरणें-जपून बोलणें; बोलण्याला आळा घालणें; अमर्याद भाषण, अभक्ष्यभक्षण यांपासून निवृत्त होणें. ॰आणणें- (आट्यापाट्यांचा खेळ) शेवटची पाटी खेळून जाऊन पुन्हां एक एक खेळत येणें; पाणी आणणें; लोण आणणें. ॰आंबट करणें- (एखाद्यानें) असंतुष्ट, निराशायुक्त मुद्रा धारण करणें. तोंड आहे कीं तोबरा-खादाड किंवा बडबड्या माणसास उद्देशून वापरावयाचा, 'किती खातोस' 'किती बोलतोस' या अर्थाचा वाक्प्रचार. ॰उतरणें-(निराशा, आजार इ॰ कांनीं) चेहरा म्लान होणें, सुकणें, फिका पडणें, निस्तेज होणें. ॰उष्टें करणें-(अन्नाचा) एखादा-दुसरा घांस, एक दोन घांस खाणें; जेवणाचें नुसतें नांव करणें. ॰करणें-बडबड, वटवट, बकबक करणें; उद्धटपणानें, निर्लज्ज- पणानें बोलणें. ॰करून बोलणें-निर्लज्जपणें, आपला (लहान) दर्जा सोडून बोलणें. ॰काळें करणें-(उप.) एखादा ठपका, तोहमत अंगावर आल्यामुळें निघून, पळून, निसटून जाणें; हातावर तुरी देणें; दृष्टीस न पडणें (केव्हां केव्हां तोंड हा शब्द वगळला तरी चालतो. जसें:-त्यांनीं काळें केलें). ॰गोड करणें-१ (एखाद्याला) लांच देणें; खूष करणें. २ मेजवानी देणें; गोड खावयास घालणें. ॰गोरेंमोरें करणें-(कोणी रागें भरल्यामुळें, मनास वाईट वाटल्यामुळें) निराशेची, लाजलेपणाची मुद्रा धारण करणें. ॰घालणें-(दोघे बोलत असतां तिसर्‍यानें) संबंध नसतां मध्येंच बोलणें. ॰घेऊन येणें-एखाद्यानें एखाद्यावर सोंपविलेलें काम न करतां त्यानें तसेंच परत येणें. 'असें सर्वांनीं न करावें. जो मामलेदार असें करून तोंड घेऊन येईल त्याचें मुखावलोकन न करितां फिरोन सेवा न सांगतां त्यास घरींच बसवावें.' -मराआ २९. ॰घेणें-१ बोंबलत सुटणें; ताशेरा झाडणें; बोंबलपट्टी करणें. २ तोंडांतून लाल गळावी म्हणून पारा इ॰ तोंड आणणारीं औषधें घेणें. तोंड देणें पहा. 'मी वैद्याकडून तोंड घेतलें आहें.' तोंडचा-वि. १ विरुद्ध, उलट दिशेचा; समोरून येणारा (वारा, ऊन, भरती इ॰). २ ज्याची कर्तबगारी केवळ तोंडांतच, बोल- ण्यांतच आहे, क्रियेंत दिसून येत नाहीं असा. 'तोंडचा शिपाई- कारकून-सुग्रण-खबरदार.' ३ तोंडानें सांगितलेला, निवेदन केलेला; तोंडीं केलेला (व्यवहार, हिशेब, पुरावा इ॰). याच्या उलट लेखी. तोंडचा, तोंडींचा घास काढणें-हिरून घेणें-१ (एखा- द्याची) अगदीं आटोक्यांत आलेली वस्तु, पदरीं पडावयास आलेला लाभ हिसकावून घेणें. २ (एखाद्याच्या) अन्नावर पाणी पाडणें; अन्नांत माती कालविणें; पोटावर पाय देणें. तोंडचा-तोंडींचा घांस देणें-(ल.) (एखाद्यास) अतिशय प्रेमानें, ममतेनें वाग- विणें; प्रसंगविशेषीं आपण उपाशी राहून दुसर्‍यास खावयास देणें. तोंडचा गोड आणि हातचा जड-बोलण्यांत गोड व अघळ- पघळ, पण प्रत्यक्ष पैशाची मदत करण्यांत पूज्य. तोंडचा चतुर- वि. बोलण्यांत पटाईत; वाक्पटु. तोंडचा जार-पु. नुकत्याच जन्मलेल्या मुलाच्या तोंडांतील फेंस; चिकटा; ओंठावरचा जार; जन्मप्रसंगींचा तोंडावरचा पातळ पापुद्रा (विशेषतः तुझ्या, त्याच्या तोंडाचा जार वाळला नाहीं. = तूं, तो अजून केवळ बालक आहेस.' अशा वाक्यांत उपयोग). तोंडचा नीट-वि. १ बोलून भला, चांगला; बोलकाचालका; सौजन्ययुक्त. २ युक्तायुक्त विचार करून बोलणारा. ३ हजरजबाबी; अस्खलित बोलणारा. तोंडचा फटकळ-वि. शिवराळ; उघडतोंड्या; अश्लील, शिवराळ भाषण करणारा. तोंडचा रागीट-वि. जहाल; तिखट; कडक भाषण करणारा. तोंडचा शिनळ-वि. १ इष्कबाज, फंदी म्हणून नांव मिळविण्याची इच्छा करणारा; स्त्रियांची खोटी खुषमस्करी करणारा; स्त्रियांच्या कृपेची खोटीच फुशारकी मारणारा. २ निरर्गल व अश्लील भाषण करणारा; शिवराळ. तोंड(डा)ची गोष्ट-स्त्री. सहजसाध्य, अतिशय सोपी गोष्ट, काम. 'वाघ मारणें तोंडची गोष्ट नव्हे.' तोंड चुकविणें-हातून एखादा अपराध घडला असतां कोणी रागें भरेल या भीतीनें, काम वगैरे टाळण्यासाठीं चुकारतट्टू- पणानें एखाद्यापासून आपलें तोंड लपविणें; दृष्टीस न पडणें; छपून असणें. ॰चे तोंडीं-क्रिवि. प्रत्यक्षाप्रत्यक्ष; तोंडानें; बोला- चालीनें. ॰चे तोंडीं व्यवहार-केवळ तोंडानें बोलून, बोलाचा- लीनें झालेला, होणारा व्यवहार, धंदा. याच्या उलट लेखी व्यव- हार. ॰चें पायचें-न. (कों.) गुरांच्या तोंडास व पायांस होणारा रोग. ॰चे हिशेब-पुअव. कागदांवर आंकडेमोड न करितांमनां- तल्यामनांत कांहीं आडाख्यांच्या; मदतीनें करावयाचे हिशेब. तोंडचें तोंडावरचें पाणी पळणें; उडणें, तोंड कोरडें पडणें-१ (भीतीमुळें) चेहरा फिका पडणें; बावरून,घाबरून जाणें. २ (भीति इ॰ कांमुळें) तोंडांतील ओलावा नाहींसा होणें. तोंड टाकणें-टाकून बोलणें-१ (क्रोधावेशानें) अप शब्दांचा वर्षाव करणें; निर्भर्त्सना करून बोलणें; खरडपट्टी काढणें; अद्वातद्वा बोलणें. 'तूं नोकर-माणसांवर उगीच तोंड टाकलेंस.' २ (घोडा इ॰ जनावरानें) चावण्यासाठीं तोंड पुढें करणें. 'ह्या घोड्याला तोंड टाकण्याची भारी खोड आहे, ती घालविली पाहिजे.' ॰ठेचणारा-फाडणारा-वि. (एखाद्या) उद्धट, बडबड्या माण- सास गप्प बसविण्याची हातोटी ज्यास साधली आहे असा; उद्दामपणानें, गर्वानें बोलणार्‍या व्यक्तीस रोखठोक उत्तर देऊन चूप बसविणारा. [तोंड + ठेचणें] ॰तोडणें-(ना.) एखादी वस्तु मिळ- विण्याकरितां एखाद्याच्या पाठीस लागणें; त्याच्यापुढें तोंड वेंगा- डणें. ॰दाबणें-लांचलुचपत देऊन (एखाद्याचें) तोंड बंद करणें; (एखाद्यास) वश करणें; गप्प करणें. ॰दाबणारा-वि. लांच देऊन (एखाद्या) प्रतिकूल व्यक्तीस वळविणारा; गप्प बसविणारा. [तोंड + दाबणें = बंद करणें] ॰दाबी-स्त्री. (एखाद्यानें) गुप्त बातमी फोडूं नये म्हणून, प्रतिकूल बोलूं नये म्हणून (त्यास) लांच देऊन त्याचें तोंड दाबण्याची, वश करण्याची क्रिया. 'तो गांवकाम- गारांची तोंडदाबी करतो.' -गुजा २१. [तोंड + दाबणें = बंद करणें] ॰दिसणें-एखाद्याची केलेली निर्त्भर्त्सना दुसरी बाजू न कळतां लोकांच्या नजरेस येणें व आपणच वाईट ठरणें (पण ज्याची निर्भर्त्सना केली असेल त्याचें वर्तन सुधारण्याची आशा नसणें ). 'मी तुला रागें भरलों म्हणजे माझें तोंड मात्र दिसेल, पण तूं आपला आहे तसाच राहणार.' ॰देणें- १ पारा वगैरे देऊन तोंडाच्या आंतील त्वचा सुजविण; तोंड आणविणें. 'वैद्य- बोवा म्हणाले कीं त्याला तोंड दिलें आहे.' २ सैन्याच्या अग्रभागीं राहून शत्रूवर हल्ला करणें. ३ (एखाद्याचा) प्रतिपक्षी होऊन राहणें; लढावयाला सिद्ध होणें. ४ (आट्यापाट्यांचा खेळ शेवटची पाटी खेळून परत येणार्‍या गड्याकडे पाटी धरणारानें तोंड फिरविणें. ५ एखाद्या गोष्टीला न भितां तींतून धैर्यानें पार पडण्याची तयारी ठेवणें. ॰धरणें-१ अन्नसेवन करण्याची तोंडाची शक्ति आजार वगैरे कारणांमुळें नाहींशी होणें. 'त्याचें तोंड धरलें आहे, त्याला चमच्याचमच्यानें दुध पाजावें लागतें.' २ (एखा- द्याची) बोलण्याची शक्ति नाहींशी करणें. ३ (एखाद्याला आपल्या) तावडींत, कबजांत आणणें. 'मी त्याचें तोंड धरलें आहे, तो आतां काय करणार !' ॰धुवून येणें-(उप.) एखाद्याची विनंति कधींहि मान्य होणार नाहीं असें म्हणून फेटाळून लावतांना योजण्याचा तिरस्कारदर्शक वाक्प्रचार. ॰निपटणें-(आजार, उपवास इ॰ कारणांमुळें एखाद्याचे) गाल खोल जाणें, चेहरा सुकणें. 'महिनाभर हें मूल तापानें आजारी होतें, त्याचें तोंड पहा कसें निपटलें आहे तें.' ॰पडणें-१ सुरवात होणें. 'लढाईस तोंड पडलें.' २ (गळूं इ॰ कांस) छिद्र पडणें; फुटणें; वाहूं लागणें. ॰पसरणें-वेंगाडणें-१ खिन्नपणाची, केविलवाणी मुद्रा धारण करणें. २ हिनदीनपणानें याचना करणें. ॰पाघळणें-१ न बोला- वयाची गोष्ट कोणाएकापाशीं बोलून टाकणें; बडबडणें. २ (ल.) गुप्त गोष्ट बाहेर फोडणें, फुटूं देणें. ॰पाडणें-एखादें कोडें सोड- विण्यास, वेढा फोडण्यास प्रारंभ करणें; भांडणास सुरवात करणें. ॰पाहणें-१ (एखाद्याच्या) आश्रयाची, मदतीची अपेक्षा करून असणें. 'आम्ही पडलों गरीब, म्हणून आम्हांला सावकाराचीं तोंडें पाहण्याची पाळी वारंवार येते.' २ (एखाद्यानें) स्वतःच्या शक्तीचा, कर्तुत्वाचा अजमास करणें. 'तूं असें करीन म्हणतोस, पण आधीं आपलें तोंड पहा !' ३ बोलणाराचें भाषण नुसतें ऐकणें, पण त्यानें सांगितलेलें करावयास किंवा केलेला बोध अनु- सरावयास प्रवृत्त न होतां स्वस्थ बसून राहणें. 'म्हणती हाणा, मारा, पाडा, घ्या, काय पाहतां तोंडा ।' -मोद्रोण ३.१२५. ॰पाहात-बसणें-काय करावें, कसें करावें या विवंचनेंत असणें. ॰पिटणें-बडबड करणें. 'पश्चिमद्वारींचें कवाड । सदा वार्‍यानें करी खडखड । तैशी न करी बडबड । वृथा तोंड पिटीना ।' -एभा १०.२३१. ॰फिरणें-१ आजारानें, पदार्थाच्या अधिक सेवनानें तोंडाची रुची नाहींशी होणें; तोंड वाईट होणें. २ तोंडांतून शिव्यांचा वर्षाव होऊं लागणें. 'तो रागावला म्हणजे कोणावर त्याचें तोंड फिरेल ह्याचा नेम नाहीं.' ॰फिरविणें-१ तोंडाची चव नाहींशी करणें. २ शिव्यांचा वर्षाव करीत सुटणें. 'तो रागावला म्हणजे तुमच्यावर देखील तोंड फिरवावयाला कचर- णार नाहीं.' ३ वितळत असलेला किंवा तापविला जात अस- लेला धातु इ॰ कानें) रंगामध्यें फरक दाखविणें, रंग पाल- टणें. 'ह्या तांब्यानें अद्याप तोंड फिरविलें नाहीं, आणखी पुष्कळ आंच दिली पाहिजे.' ४ दुसर्‍याकडे पाहणें; विशिष्ट गोष्टी- कडे लक्ष्य न देतां इतर गोष्टींकडे प्रवृत्ति दाखविणें. ५ गतीची दिशा बदलणें; दुसर्‍या दिशेला, माघारें वळणें. ॰फुटणें-१ थंडीमुळें तोंडाची बाह्य त्वचा खरखरीत होणें, भेगलणें. २ (एखाद्याची) फजिती उडणें; पत नाहींशी होणें; नाचक्की होणें; अभिमान गलित होण्याजोगा अपमान, शिक्षा इत्यादि होणें. ॰बंद करणें-१ जीभ आवरणें; जपून बोलणें. २ (एखाद्याला) लांच देऊन गप्प बसविणें, वश करून घेणें. ॰बंदावर राखणें- खाण्याला किंवा बोलण्याला आळा घालणें. 'तूं आपलें तोंड बंदावर राखिलें नाहींस तर अजीर्णानें आजारी पडशील.' ॰बांधणें-लांच देऊन (एखाद्याचे) तोंड बंद करणें; (एखाद्यानें) गुप्त गोष्ट फोडूं नये म्हणून पैसे देऊन त्यास गप्प बसविणें. ॰बाहेर काढणें-१ तोंड दाखविणें; राजरोसपणें समाजांत हिंडणें (बहुधां निषेधार्थी प्रयोग). 'तुरुंगांतून सुटून आल्यावर त्यानें आज दोन वर्षांत एकदांहि तोंड बाहेर काढलें नाहीं.' २ फिरण्यासाठीं, कामकाजासाठीं घराबाहेर पडणें. ॰बिघडणें-तोंड बेचव होणें; तोंडास अरुचि उत्पन्न होणें. विटणें. -॰भर-भरून बोलणें- भीड, संकोच, भीति न धरतां मनमोकळेपणानें भरपूर, अघळपघळ बोलणें; दुसर्‍याचें आणि आपलें समाधान व्हावयाजोगें अघळपघळ बोलणें. ॰भरून साखर घालणें-(एखाद्याचें) तोंड साखरेनें भरणें; (एखाद्याच्या) कामगिरीबद्दल, विजयाबद्दल संतोषादाखल त्याचें तोंड साखरेनें भरणें; (एखाद्याच्या) कामगिरीबद्दल गोड, भरपूर मोबदला देणें. ॰मागणें-(आट्यापाट्यांचा खेळ) लोण घेऊन परत जातांना पाटीवरील गड्यास आपणाकडे तोंड फिर- विण्यास सांगणें. तोंड मागितल्यावर पाटीवरील गडी आपलें तोंड फिरवितो त्यास 'तोंड देणें' म्हणतात. ॰माजणें-१ मिष्टान्न खावयाची चटक लागल्यानें साध्या पदार्थाबद्दल अरुचि उत्पन्न होणें. २ शिव्या देण्याची, फटकळपणानें बोलण्याची खोड लागणें. ॰मातीसारखें-शेणासारखें होणें-(आजारानें) तोंडाची चव नाहींशी होणें; तोंड विटणें, फिरणें; अन्नद्वेष होणें. ॰मिचकणें- दांत, ओंठ खाणें. ॰येणें-१ तोंडाच्या आंतल्या बाजूच्या त्वचेस फोड येऊन ती हुळहुळी होणें व लाळ गळूं लागणें. २ (कर.) लहान मूल बोलूं लागणें. 'आमच्या मुलाला तोंड आलें आहे.' = तो बोलावयास लागला आहे. ॰रंगविणें-१ विडा खाऊन ओंठ तांबडे लाल करून घेणें. २ (ल.) (एखाद्याचें थोबाड) थोबाडींत मारून लाल- भडक करून सोडणें. ॰लागणें-(लढाई, वादविवाद, अंगीकृत कार्य इ॰ कांस) सुरवात होणें. 'तेव्हां युद्धास तोंड लागलें.' -इमं २९०. ॰लावणें-१ (वादविवाद इ॰ कांस) सुरवात करणें. २ प्यावया- साठीं एखादें पेय ओंठाशीं नेणें. ३ ॰वाईट करणें-निराशेची मुद्रा धारण करणें. ॰वाईट होणें-१ तोंडावर निराशेची मुद्रा येणें. २ (ताप इ॰ कांमुळें) तोंडास अरुचि येणें. ॰वांकडें करणें-१ वेडावून दाखविणें. २ नापसंती दर्शविणें. ॰वाजविणें-एकसारखें बोलत सुटणें; निरर्थक बडबड करणें; बकबकणें; वटवट करणें; भांडण करणें. ॰वासणें-१ निराशेनें, दुःखानें तोंड उघडणें व तें बराच वेळ तसेंच ठेवणें. २ याचना करण्यासाठीं तोंड उघडणें, वेंगाडणें. ॰वासून पडणें-शक्तीच्या क्षीणतेमुळें, उत्साह, तेज, वगैरे नष्ट झाल्यामुळें, गतप्राण झाल्यामुळें आ पसरून पडणें. 'तो पडला सिंहनिहमत्तद्विपसाचि तोंड वासून ।' -मोगदा ५.२५. ॰वासून बोलणें-अविचारानें बोलणें. 'ऐसें स्वसख्यांपासीं कां गे वदलीस तोंड वासून ।' -मोउद्योग १३.२०५. ॰विचकणें-दीन मुद्रेनें आणि केविलवाण्या स्वरानें याचना करणें. ॰वेटा(डा)विणें- (काव्य) (एखाद्यास) वेडावून दाखविण्यासाठीं त्याच्यापुढें तोंड वेडेंवाकडें करणें. ॰शेणासारखें पडणें-(लाजिरवाणें कृत्य केल्यानें) तोंड उतरणें; निस्तेज होणें; काळवंडणें. ॰संभाळणें- जपून बोलणें; जीभ आवरणें; भलते सलते शब्द तोंडांतून बाहेर पडूं न देणें; अमर्याद बोलण्यास आळा घालणें. ॰सुटणें- चरांचरां, फडाफडां, अद्वातद्वा बोलूं लागणें. ॰सुरू होणें-बड- बडीला, शिव्यांना सुरवात होणें. ॰सोडणें-१ फडांफडां, अद्वातद्वा बोलूं लागणें; अमर्याद बोलणें. २ आधाशासारखें खात सुटणें; तोंड मोकळें सोडणें. ॰हातीं-हातावर धरणें-तोंडे सोडणें (दोन्ही अर्थीं) पहा. तोंडाचा खट्याळ-फटकळ-फटकाळ-फटकूळ-वाईट-शिनळ-वि. शिवराळ; तोंडाळ; अश्लील बोलणारा. तोंडाचा खबरदार-बहादर-बळकट-वि. बोलण्यांत चतुर, हुषार; बोलण्याची हातोटी ज्याला साधली आहे असा. -तोंडाचा गयाळ, तोंडगयाळ-वि. जिभेचा हलका; चुर- चोंबडा; लुतरा; बडबड्या; ज्याच्या तोंडीं तीळ भिजत नाहीं असा. तोंडाचा गोड-वि. गोड बोलणारा; गोडबोल्या. म्ह॰ तोंडचा गोड हाताचा जड = गोड व अघळपघळ भाषण करणारा पण प्रत्यक्ष कांहींहि मदत, पैसा न देणारा. तोंडाचा जड-वि. रेंगत बोलणारा; फार थोडें बोलणारा; अस्पष्ट भाषण करणारा; तोंडाचा तिखट-वि. खरमरीत, स्पष्ट, झोंबणारें, कठोर भाषण करणारा. तोंडाचा तोफखाना सुटणें-(एखाद्याची) अद्वातद्वा बोल- ण्याची क्रिया सुरू होणें; शिव्यांचा वर्षाव होऊं लागणें. तोंडाचा पट्टा सुटणें-चालणें-अद्वातद्वा बोलणें; शिव्यांचा भडिमार सुरू होणें; तोंडाचा पट्टा सोडणें-(एखाद्यानें) शिव्यांचा भडिमार सुरू करणें; जीभ मोकळी सोडणें; (एखाद्याची) खरडपट्टी आरंभिणें. तोंडाचा पालट-पु. रुचिपालट; तोंडास रुचि येईल असा अन्नांत केलेला फेरबदल; अन्नांतील, खाण्यांतील फरक, बदल. तोंडाचा बोबडा-वि. बोबडें बोलणारा; तोतरा. तोंडाचा मिठा-वि. गोडबोल्या; तोंडाचा गोड पहा. तोंडाचा हलका- वि. चुरचोंबडा; भडभड्या; विचार न करितां बोलणारा; फटकळ. तोंडाचा हुक्का होणें-(व.) तोंड सुकून जाणें. तोंडाची चुंबळ-स्त्री. दुसर्‍यास वेडावून दाखविण्याकरितां चुंबळीसारखी केलेली ओठांची रचना; वांकडें तोंड. तोंडाची वाफ दघडणें- १ मूर्खास उपदेश करतांना, निरर्थक, निरुपयोगी, निष्फळ भाषण करणें. २ ज्यावर विश्वास बसणार नाहीं असें भाषण करणें; मूर्खपणानें बोलणें; वल्गना करणें; बाता मारणें. (या वाक्प्रचारांत दवडणें बद्दल खरचणें गमविणें, फुकट जाणें, घालविणें, काढणें इ॰ क्रियापदेंहि योजतात). तोंडाचें बोळकें होणें-(म्हातारपणामुळें) तोंडां- तील सर्व दांत पडणें. तोंडाचें सुख-न. तोंडसुख पहा. (वरील सर्व वाक्प्रचारांत तोंडाचा या शब्दाऐवजीं तोंडचा हा शब्दहि वापरतात). तोंडांत खाणें, मारून घेणें-१ गालांत चपराक खाणें; मार मिळणें. २ पराभूत होणें; हार जाणें. ३ फजिती झाल्या- नंतर शहाणपणा शिकणें; नुकसान सोसून धडा शिकणें; बोध मिळविणें. तोंडांत जडणें-थोबाडींत, गालांत बसणें (चपराक, थप्पड इ॰). तोंडांत तीळभर न राहणें-अगदीं क्षुद्र अशी गुप्त गोष्टहि पोटांत न ठरणें; कोणतीहि लहानसहान गोष्ट गुप्त ठेवूं न शकणें. तोंडांत तोंड घालणें-१ (ल.) प्रेम, मैत्री इ॰कांच्या भावानें वागणें; मोठ्या प्रेमाचा, मित्रपणाचा आविर्भाव आणून वागणें. २ एकमेकांचें चुंबन घेणें. तोंडांत देणें-(एखाद्याच्या) थोबाडींत मारणें; गालांत चपराक मारणें; तोंडांत बोट घालणें-(ल.) आश्चर्यचकित, थक्क होणें; विस्मय पावणें. तोंडांत भडकावणें-तोंडांत देणें पहा. तोंडांत माती घालणें-खाण्यास अन्न नसणें; अतिशय हाल, कष्ट सोसावे लागणें. तोंडांत माती पडणें-१ (एखाद्याची) उपा समार होणें. २ मरणें. तोंडात शेण घालणें-(एखाद्याची) फजिती करणें; (एखाद्यास) नांवें ठेवणें; खरडपट्टी काढणें. तोंडांत साखर असणें-(गो.) (एखाद्याचें) तोंड, वाणी गोड असणें; गोड बोलत असणें. तोंडांत साखर घालणें-१ तोंड भरून साखर घालणें पहा. २ (उप.) तोंडांत शेण घालणें. 'सावित्री- बाईच्या तोंडांत लोक जेव्हां फारच साखर घालीत, तेव्हां तिनें दोन तीन जुनेरीं एकत्र शिवून जानकीबाईला द्यावी.' -रंगराव. तोंडांत साखर पडणें-(एखाद्याला) आनंदाचा प्रसंग, दिवस येणें. तोंडांतून ब्र काढणें-(तोंडांतून) अधिक-उणें अक्षर काढणें, उच्चारणें. 'आंतल्याआंत चूर होऊन मेलें पाहिजे, तोंडां- तून ब्र काढण्याची सोय नाहीं.' -विकारविलसित. तोंडानें पाप भरणें, तोंडें पाप घेणें-लोकांचीं पातकें उच्चारणें; लोकांचे दोष बोलून दाखविणें; वाईट बोलण्याची हौस यथेच्छ पुरवून घेणें; लोकांचीं पापें उच्चारून जिव्हा विटाळणें. 'कैसीं वो मानुसें । सपाइनि परंवंसें । तोंडे पाप घेती कांइसें । वायां वीण ।' -शिशु २१६. तोंडापुढें-क्रिवि. अगदीं जिव्हाग्रीं; मुखोद्गत. तोंडा- पुरता, तोंडावर गोड-वि. मधुर पण खोटें बोलणारा; दुतोंड्या; वरवर गोड बोलणारा व आंतून कपटी असलेला; उघडपणें प्रिय भाषण करणारा व मनांत निराळेच असणारा. ताडापुरता मांडा-पु. १ भूक भागेल एवढीच पोळी. २ (ल.) जेमतेम गरज भागेल एवढाच जरूर त्या वस्तूचा पुरवठा. तोंडार मारप- (गो.) (एखाद्याच्या) पदरांत चूक बांधणें; वरमण्यासारखें उत्तर देणें. तोंडार ल्हायो उडप-(गो.) फार जलद, अस्ख- लित बोलणें; लाह्या फुटणें. तोंडाला काळोखी आणणें- लावणें-बेअब्रू, नापत करणें. तोंडाला टांकी दिलेली असणें-देवीच्या खोल वणांनीं तोंड भरलेलें असणें; तोंडावर देवीचे वण फार असणें. तोंडाला पाणी सुटणें-(एखादी वस्तु पाहून तिच्यासंबंधीं) मोह उत्पन्न होणें; हांव सुटणें. तोंडाला पानें पुसणें-फसविणें; चकविणें; छकविणें; भोळसाविणें; भोंदणें; तोंडा- वरून हात फिरविणें. 'त्याच्यावर देखरेख करावयाला चार माणसें होतीं, पण त्यानें सर्वांच्या तोंडाला पानें पुसून आपला डाव साधला.' तोंडाला फांटा फुटणें-मूळ मुद्दा सोडून भलतेंच बोलत सुटणें; हवें तसें अमर्याद भाषण करूं लागणें. तोंडावर-क्रिवि. १ समक्ष; डोळ्यांदेखत. २ (ल.) निर्भयपणें; भीड न धरतां. 'मी त्याच्या तोंडावर त्याला लुच्चा म्हणण्यास भिणार नाहीं.' तोंडावर तुकडा टाकणें-(एखाद्यानें) गप्प बसावें, प्रतिकूल बोलूं नये म्हणून त्याला थोडेसें कांहीं देणें. तोंडावर-ला-तोंड देणें-१ (एखाद्यास) विरोध करणें; विरुद्ध बोलणें. २ (एखाद्यास) उद्धटपणानें, अविनयानें, दांडगेपणानें उत्तर देणें; उत्तरास प्रत्युत्तर देणें. तोंडा- वर तोंड पडणें-दोघांची गांठ पडून संभाषण, बोलाचाल होणें. तोंडावर थुंकणें-(एखाद्याची) निर्भर्त्सना, छीःथू करणें; धिक्कार करणें. तोंडावर देणें-तोंडांत देणें पहा. 'काय भीड याची द्या कीं तोंडावरी ।' -दावि ३०२. तोंडावर नक्षत्र पडणें-(एखाद्यानें) तोंडाळपणा करणें; शिवराळ असणें; नेहमीं अपशब्दांनीं तोंड भर- लेलें असणें. 'ह्याजकरिकां तोंडावर नक्षंत्र पडलेल्या पोरास म्या बोलविलें म्हणून हे मला शब्द लावीत नाहींत.' -बाळ २.१४२. तोंडावर पडप-(गो.) थोबाडींत (चपराक) बसणें, पडणें. तोंडावर पदर येणें-१ वैधव्य प्राप्त होणें. 'तिच्या तोंडावर पदर आला म्हणून ती बाहेर पडत नाहीं.' २ लज्जेनें तोंड लपविण्या- जोगी स्थिति होणें. तोंडावर मारणें-(एखाद्याला) पराभूत करणें. तोंडावर सांगणें-बोलणें-(एखाद्याच्या) समक्ष, निर्भीडपणें, बेडरपणें सांगणें, बोलणें. तोंडावरून-तोंडावर हात फिर- विणें-(एखाद्यास) गोड बोलून, फूसलावून, भुलथाप देऊन फस- विणें; भोंदणें; छकविणें. तोंडाशीं तोंड देणें-(हलक्या दर्जाच्या व्यक्तीनें वरिष्ठाशीं) आपला दर्जा विसरून, बरोबरीच्या नात्यानें, अविनयानें बोलणें, व्यवहार करणें. तोंडास काळोखी-स्त्री. मुखसंकोच; ओशाळगत; गोंधळून गेल्याची स्थिति; बेअब्रू; कलंक. तोंडास काळोखी, काजळी लागणें-(एखाद्याची) बेअब्रू, नाचक्की होणें; दुष्कीर्ति होणें; नांवाला कलंक लागणें. तोंडास काळोखी-काजळी लावणें-(एखाद्याचें) नांव कलंकित करणें; बेअब्रू करणें. 'सुनेनें माझ्या तोंडाला काळोखी लावली.' तोंडास कुत्रें बांधलेलें असणें-ताळतंत्र सोडून, अद्वातद्वा, अपशब्द बोलणें; शिव्या देणें. 'त्यानें तर जसें तोंडाला कुत्रेंच बांधलें आहे.' तोंडास खीळ घालणें-निग्रहपूर्वक, हट्टानें मौन धारण करणें. तोंडास तोंड-न. वादविवाद; वाग्युद्ध; हमरी- तुमरी; धसाफसी. -क्रिवि. समक्षासमक्ष; समोरासमोर; प्रत्यक्ष. तोंडास तोंड देणें-१ तोंडाशीं तोंड देणें पहा. २ मार्मिकपणें, खरमरीतपणें उत्तर देणें. तोंडास पाणी सुटणें-(एखाद्या- वस्तूबद्दल, गोष्टीबद्दल) लोभ, मोह उत्पन्न होणें; तोंडाला पाणी सुटणें पहा. 'पोर्तुगीज लोकांची बढती पाहून तिकडच्या दुसर्‍या साहसी लोकांच्या तोंडास पाणी सुटलें.' -बाजी. तोंडास तोंड न दिसणें-(पहांटेस) तोंड न ओळखतां येण्याइतका अंधेर असणें (झुंजमुंजु पहाटेविषयीं वर्णन करितांना हा वाक्प्रचार योजतात). 'अद्याप चांगलें उजाडलें नाहीं, तोंडास तोंड दिसत नाहीं.' तोंडास-तोंडीं बसणें-(श्लोक, शब्द इ॰) स्पष्ट, बिन- चूक, भरभर म्हणण्याइतका पाठ होणें. 'तो श्लोक दहा वेळां पुस्तकांत पाहून म्हण, म्हणजे तो तुझ्या तोंडीं बसेल.' तोंडास येईल तें बोलणें-विचार न करितां, भरमसाटपणानें वाटेल तें बोलणें; अद्वातद्वा, अपशब्द बोलणें. तोंडास-तोंडीं लागणें- १ (एखाद्याच्या) तोंडास तोंड देणें; उलट उत्तरें देणें. २ हुज्जत घालणें; वादविवाद करण्यास तयार होणें. (एखाद्याच्या) तोंडा- समोर-क्रिवि. १ (एखाद्याच्या) समक्ष; समोर; डोळ्यांदेखत. २ अगदीं मुखोद्गत; जिव्हाग्रीं. तोंडापुढें पहा. 'हा श्लोक माझ्या अगदीं तोंडासमोर आहे.' तोंडास हळद लागणें-(एखाद्यास) दोष देणें, नापसंती दर्शविणें अशा अर्थीं हा वाक्प्रचार योजितात. तोंडासारखा-वि. (एखाद्याची) खुशामत, स्तुति इ॰ होईल अशा प्रकारचा; एखाद्याच्या खुशामतीकरितां त्याच्या मतास जुळता. तोंडासारखें बोलणें-(एखाद्याची) स्तुति, खुशामत करण्या- करितां त्याच्याच मताची, म्हणण्याची री ओढणें; त्याचें मन न दुखवेल असें बोलणें. तोंडीं आणणें-देणें-(रोग्यास) लाळ गळण्याचें, तोंड येण्याचें औषध देऊन तोंड आणणें. तोंडीं- काढणें-१ ओकारी देणें; वांती होणें. २ (एखाद्यास त्यानें) केलेले उपकार बोलून दाखवून टोमणा मारणें. तोंडीं खीळ पडणें- तोंड बंद होणें; गप्प बसणें भाग पडणें. 'अवघ्या कोल्यांचें मर्म अंडीं । धरितां तोंडीं खीळ पडे ।' तोंडीं घास येणें-(एखा- द्यास) घांसभर अन्न मिळणें; चरितार्थाचें साधन मिळणें; पोटा पाण्याची व्यवस्था होणें. तोंडीं तीळ न भिजणें-१ (तापानें, संतापून ओरडण्यानें, रडण्यानें) तोंड शुष्क होणें, कोरडें पडणें. २ एखादी गुप्त गोष्ट मनांत न राहणें, बोलून टाकणें; तोंडीं तृण धरणें-(एखाद्यानें) शरण आलों. असें कबूल करणें; शरणागत होणें; हार जाणें (दांतीं तृण धरणें असाहि प्रयोग रूढ आहे). तोंडीं देणें-(एखाद्यास एहाद्या माणसाच्या, कठिण कार्याच्या) सपाट्यांत, तडाख्यांत, जबड्यांत, तावडींत लोटणें, देणें; हाल, दुःख सोसण्यास (एखाद्यास) पुढें करणें. तोंडीं-तोंडास पान- पानें पुसणें-(एखाद्यास) छकविणें; लुबाडणें; भोंदणें; अपेक्षित लाभ होऊं न देणें; स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेऊन दुसर्‍यास तोंड पहावयास लावणें. 'त्यानें आपल्या नळीचें वर्‍हाड केलें आणि सर्वांच्या तोंडीं पान पुसलें.' तोंडीं माती घालणें- (एखाद्यानें) अतिशय दुःखाकुल, शोकाकुल होणें. 'ऊर, माथा बडवून, तोंडीं माती घालूं लागली' -भाव ७५. तोंडीं येऊन बुडणें-नासणें-(एखादी वस्तु, पीक इ॰) अगदीं परिपक्वदशेस, परिणतावस्थेस येऊन, ऐन भरांत येऊन, नाहींशीं होणें, वाईट होणें. तोंडीं येणें-१ (पारा इ॰ औषधानें) तोंड येणें. २ ऐन भरांत, परिपक्व दशेस, पूर्णावस्थेस येणें. तोंडीं-रक्त, रगत लागणें-१ वाघ इ॰ हिंस्त्र पशूला माणसाच्या रक्ताची चटक लागून तो माणसावर टपून बसणें. २ (ल.) लांच-लुचपत खाण्याची चटक लागणें. तोंडीं लागणें-(एखाद्यास एखाद्या वस्तूची, खाद्याची चव प्रथमच कळून त्या वस्तूची त्यास) चटक लागणें; आवड उत्पन्न होणें. 'ह्याच्या तोंडीं भात लागला म्हणून यास भाकर आवडत नाहीं.' तोंडीं लागणें-१ (एखाद्याच्या) तोंडास तोंड देणें; उद्धटपणानें, आपला दर्जा विसरून उलट जबाब देणें. २ हुज्जत घालणें; वादविवादास प्रवृत्त होणें; तोंडास लागणें पहा. 'सुज्ञ आहेत ते दूषकांच्या तोंडीं लागत नसतात.' -नि. ३ (युद्ध, भांडण, इ॰कांच्या) आणीबाणीच्या ठिकाणीं, आघाडीस, अग्रभागीं असणें. तोंडीं लावणें-न. जेवतांना तोंडास रुचि आणणारा भाजी, चटणी इ॰ सारखा मधून मधून खावयाचा चमचमीत पदार्थ. तोंडीं लावणें-१ जेवतांना भाजी, चटणी इ॰ चम- चमीत पदार्थानें रुचिपालट करणें. 'आज तोंडीं लावावयाला भाजीबिजी कांहीं केली नाहीं काय ?' २ विसारादाखल पैसे देणें. तोंडें मागितलेली किंमत-स्त्री. (एखाद्या वस्तूची) दुकान- दारानें सांगितलेली व झिगझिग वगैरे न करितां गिर्‍हाइकानें दिलेली किंमत. तोंडें मानलेला-मानला-वि. (तोंडच्या) शब्दानें, वचनानें मानलेला (बाप, भाऊ, मुलगा इ॰); धर्माचा, पुण्याचा पहा. तोंडें वांकडीं करणें-वेडावून दाखविणें; वेडावणें. लहान तोंडीं मोठा घांस घेणें-१ (एखाद्यानें) आपल्या आवांक्या- बाहेरचें काम हातीं घेणें. २ (वडील, वरिष्ठ माणसांसमोर) न शोभेल असें, मर्यादा सोडून, बेअदबीनें बोलणें; वडील माणसांस शहाणपण शिकविणें. जळो तुझें तोंड-(बायकी भाषेंत) एक शिवी. स्त्रिया रागानें ही शिवी उपयोगांत आणतात. म्ह॰ १ तोंड बांधून (दाबून) बुक्कयांचा मार = एखाद्याचा विनाकारण छळ होऊन त्यास त्याविरुद्ध तक्रार करतां न येणें; एखाद्यास अन्यायानें वाग- वून त्याविरुद्ध त्यानें कागाळी केल्यास त्यास बेगुमानपणें शिक्षा करणें. 'बायकांचा जन्म म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार, म्हण- तात तें अक्षरशः खरें आहे.' -पकोघे २ (गो.) तोंडाच्या बाता घरा बाईल भीक मागता = बाहेर मोठमोठया गप्पा मारतो पण घरीं बायको भीक मागते. सामाशब्द- तोंड उष्ट-न. एखादा-दुसरा घांस खाणें; केवळ अन्न तोंडास लावणें; तोंड खरकटें करणें. [तोंड + उष्टें] ॰ओळख-स्त्री. परस्परांचा विशेष परिचय नसतां, चेहरा पाहू- नच हा अमुक आहे असें समजण्याजोगी ओळख; (एखाद्याची) चेहरेपट्टी लक्षांत राहून तीवरूनच त्याला ओळखतां येणें; नांव वगैरे कांहीं माहीत नसून (एखाद्याचा) केवळ तोंडावळाच ओळ- खीचा असणें. 'एखाद्याला वाटेल कीं बाळासाहेबांशीं त्याची तोंड- ओळखच आहे.' -इंप ३७. ॰कडी-स्त्री. १ आंतील तुळयांचीं तोंडें बाहेर भिंतींतील ज्या तुळईवर ठेवतात, ती सलग तुळई. २ कौलारू छपराचे वासे ज्या सलग तुळईवर टेकतात ती छपराच्या शेवटीं, टोंकास असलेली तुळई. ३ गुरांचें दावें जिला बांधतात ती कडी. ४ (सोनारी धंदा) दागिन्याची शेवटची कडी, नाकें; ज्यांत फांसा इ॰ अडकवितात ती (सरी इ॰ सारख्या दागिन्याची) टोंकाची, तोंडाची कडी; (जव्याच्या) मण्याच्या वगैरे तोंडाशीं ठेवलेली कडी. ५ (जमाखर्चाच्या वहींतील जमा आणि खर्च या दोहोंबाजूंचा मेळ. हा मेळ = = = अशा दुलांगीनें, (दुहेरी रेषेनें) दाखविण्याचा प्रघात आहे. 'वहीची खात्याची-तारखेची-तोंडकडी' असा शब्दप्रयोग करितात. (क्रि॰ मिळणें; जुळणें; येणें; उतरणें; चुकणें; बंद होणें). [तोंड + कडी] ॰कळा-स्त्री. चेहर्‍यावरील तजेला; कांति; तेज; टवटवी. (प्र.) मुखकळा. [तोंड + कळा = तेज] ॰काढप-(गो.) उपदंश झालेल्या रोग्यास एक प्रकारचें औषध देऊन त्याच्या तोंडांतून लाळ वाहवितात तो प्रकार. ह्या औषधानें तोंड बरेंच सुजतें. [तोंड + गो. काढप = काढणें] ॰खुरी- स्त्री. (ना.) गुरांचा एक रोग. ॰खोडी-वि. तोंडाळ; टाकून बोलणारा; तोंड टाकणारा; अशी संवय असलेला. 'परम अधम रुक्मी हा महा तोंडखोडी ।' -सारुह ३.७८. [तोंड + खोड = वाईट संवय] ॰घडण-स्त्री तोंडाची ठेवण; चेहरेपट्टी; तोंडवळां. 'या मुलाची बापासारखी तोंडघडण आहे.' [तोंड + घडण = रचना] ॰घशीं- सीं-क्रिवि. १ जमीनीवर पडून तोंड घासलें जाईल, फुटेल अशा रीतीनें. (क्रि॰ पडणें; पाडणें; देणें). 'तो तोंडघसींच पडे करतां दंतप्रहार बहु रागें ।' -मो. २. (आश्रय तुटल्यानें) गोत्यांत; पेचांत; अडचणींत; फजिती होईल अशा तर्‍हेनें; फशीं (पडणें). [तोंड + घासणें] ॰घशी देणें-दुसरा तोंडघशीं पडे असें करणें. ॰चाट्या-वि. खुशामत करणारा; थुंकी झेलणारा; तोंडासारखें बोलणारा. ॰चाळा-पु. १ तोंड वेडेंवाकडें करून वेडावण्याची क्रिया. २ वात इ॰कांच्या लहरीनें होणारी तोंडाची हालचाल, चाळा. ॰चुकाऊ-वू-व्या, तोंडचुकारू-चुकव्या-वि. (काम इ॰ कांच्या भीतीनें) दृष्टि चुकविणारा; तोंड लपविणारा; नजरेस न पडे असा. [तोंड + चुकविणें] ॰चुकावणी-स्त्री. (एखाद्यापासून) तोंड लपविण्याची, स्वतःस छपविण्याची क्रिया. ॰जबानी-स्त्री. तोंडानें सांगितलेली हकीगत, दिलेली साक्ष, पुरावा. -क्रिवि तोंडी, तोंडानें. [तोंड + फा. झबान्] ॰जाब-पु. तोंडी जबाब. ॰झाडणी-स्त्री. तिरस्कारपूर्ण उद्गारांनीं झिडकारणें; खडका- वणें; खरडपट्टी काढणें. ॰देखणा-ला-वि. आपल्या अंतःकरणांत तसा भाव नसून दुसर्‍याचें मन राखण्याकरितां त्याला रुचेल असा केलेला (व्यवहार, भाषण, गो इ॰); खुशामतीचा; तोंडासारखा; तोंडपुजपणाचा. 'प्राणनाथ, मला हीं तोंडदेखणीं बोलणीं आव- डत नाहींत.' -पारिभौ ३५. [तोंड + देखणें = पाहणें] ॰देखली गोष्ट-स्त्री.दुसर्‍याची मर्जी राखण्याकरितां केलेलें, खुशामतीचें भाषण. ॰निरोप-पु. तोंडी सांगितलेला निरोप. 'कृष्णास ते हळुच तोंडनिरोप सांगे ।' -सारुह ४.९. ॰पट्टा-पु. (बायकी). तोंडाचा तोफखाना; अपशब्दांचा भडिमार; संतापानें, जोराजोरानें बेबंदपणें बोलणें. [तोंड + पट्टा = तलवार] ॰पट्टी-स्त्री. (शिवणकाम) तोंडाला शिवलेला पट्टी. 'योग्य तेवढी तोंडपट्टी कातरावी.' -काप्र. १४. ॰पाटिलकी-स्त्री. १ आपण कांहीं न करतां बसल्या जागे- वरून लुडबुडेपणानें दुसर्‍यांना हुकुमवजा गोष्टी, कामें सांगणें (पाटलाला बसल्या जागेवरून अनेक कामें हुकुम सोडून करून घ्यावीं लागतात त्यावरून). २ (उप.) लुडबुडेपणाची वटवट, बडबड; तोंडाळपणा. 'दुसरें कांहीं न झालें तरी नुसती तोंडपाटिलकी करण्यास कांहीं हरकत नाहीं.' -आगर ३.६१. [तोंड + पाटिलकी = पाटलाचें काम] ॰पाठ-वि. पुस्तकाच्या सहाय्यावांचून केवळ तोंडांनें म्हणतां येण्यासारखा; मुखोद्गत [तोंड + पाट = पठण केलेलें] ॰पालटपुस्त्री. १ (अरुचि घालविण्याकरितां केलेला) अन्नांतील फेरबदल. २ अन्नांत फेरबदल करून अरुचि घालविण्याची क्रिया. [तोंड + पालट = बदल] ॰पिटी-स्त्री. १ (वडील, गुरु इ॰ कांची) आज्ञा न मानतां तिचें औचित्य इ॰ कासंबंधीं केलेली वाटाघाट; (वडिलांशीं, गुरूंशीं) उद्धटपणानें वाद घालणें; उलट उत्तर देणें; प्रश्न इ॰ विचारून अडवणूक करणें. 'गुरूंसी करिती तोंडपिटी ।' -विपू १.५७. २ (दगडोबास शिकविण्याकरितां, विसराळू माणसास पुन्हां पुन्हां बजाविण्याकरितां, थिल्लर जनावरास हांकलण्याकरितां करावी लागणारी) व्यर्थ बडबड, कटकट, वटवट. [तोंड + पिटणें] ॰प्रचिती-प्रचीति-स्त्री. खुशामत करण्याकरितां (एखाद्याच्या) व्यक्तिमाहात्म्यास, भाषणास, अस्तित्वास मान देणें; आदर दाख- विणें. [तोंड + प्रचीति] ॰प्रचीतक्रिवि. १ तोंडासारखें; खुशामतीचें; तोंडापुरतें (भाषण, वर्तन इ॰ करणें) २ माणूस ओळखून, पाहून; माणसामाणसांत तारतम्य ठेवून (बोलणें, चालणें, वागणें). ॰प्रचीत बोलणारा-चालणारा-वागणारा-वि. माणसामाणसांत तारतम्य ठेवून चालणारा, बोलणारा, वागणारा. ॰फटालकी -फटालीस्त्री. तोंडाची निरर्थक बडबड, वटवट, टकळी. [तोंड + ध्व. फटां ! द्वि.] ॰फटाला-ल्या-वि. मूर्खपणानें कांहीं तरी बड बडणारा; बकणारा; वटवट करणारा. [तोंड + ध्व. फटां !] ॰फट्याळ-वि. तोंडाचा फटकळ; शिवराळ; तोंडाळ; बातेफरास; अंगीं कर्तृत्व नसून लंब्या लंब्या बाता झोंकणारा. ॰फट्याळी- स्त्री. शिवराळपणा; तोंडाळपणा; वावदूकता. [तोंडफट्याळ] ॰बडबड्या-बडव्या-वि. निरर्थक वटवट, बडबड करणारा: बकबकणांरा टकळी चालविणारा. ॰बंद -बांधणी-पुस्त्री. गाडीच्या चाकाच्या तुंब्यावरील बाहेरील बाजूचें लोखंडी कडें, पट्टी. आंतील बाजूच्या कड्यास कटबंद असें म्हणतात. [तोंड + बंद = बांधणी] ॰बळ-न. वक्तृत्वशक्ति; वाक्पटुता; वाक्चातुर्य. 'आंगबळ न चांगबळ देरे देवा तोंडबळ.' ॰बळाचा-वि. ज्याला बोलण्याची हातोटी, वक्तृत्कला साधली आहें असा; तोंडबळ अस- लेला; भाषणपटु जबेफरास. ॰बाग-स्त्री. (राजा.) चेहरेपट्टी; चेहर्‍याची ठेवण, घडण; मुखवटा. ॰बांधणी-स्त्री. १ तोंडबंद पहा. २ (ढोरांचा धंदा) कातड्याच्या मोटेच्या सोंडेच्या टोंकाकरितां बाजूला शिवलेला गोट. ॰भडभड्या-वि. तोंडास येईल तें बड- बडत, बकत सुटणारा; बोलण्याची, बडबडण्याची हुक्की, इसळी ज्यास येते असा; भडभडून बोलणारा. ॰भर-वि. तोंडास येईल तेवढा; भरपूर. 'हॅमिल्टन यांनीं खर्चवाढीबद्दल तोंडभर मगणी केली होती.' -केले १.१९८. ॰मार-स्त्री. १ रोग्यावर लाद- लेला खाद्यपेयांचा निर्बंध, पथ्य. २ एखाद्यास बोलण्याकरितां तोंड उघडूं न देणें; भाषणबंदी. ३ (ल.) (एखाद्याच्या) आशा, आकांक्षा फोल ठरविणें; (एखाद्याचा केलेला) आशाभंग; मनोभंग; निराशा. (क्रि॰ करणें). ॰मारा-पु. १ शेतीच्या कामाच्या वेळीं पिकांत वगैरें काम करतांना गुरांच्या तोंडाला जाळी, मुंगसें, मुसकें बांधणें. २ (एखाद्यास केलेली) भाषणबंदी; खाद्यपेयांचा निर्बंध. ३ (प्र.) तोंडमार. तोंडमार अर्थ ३ पहा. ॰मिळवणी- स्त्री, १ जमा आणि खर्च यांचा मेळ; तोंडें मिळविण्यासाठीं मांडलेला जमाखर्च. २ ऋणको व धनको यांच्यांतील हिशेबाची बेबाकी, पूज्य. ३ मेळ. -शर. ॰मिळवणी खातें- (जमाखर्च) कच्चें खातें (याचें देणें येणें सालअखेर पुरें करून खुद्द खात्यांत जिरवितात). ॰लपव्या-वि. तोंड लपविणारा; छपून राहणारा; दडी मारून बसणारा. ॰लाग-पु. शिंगें असलेल्या जनावरांच्या तोंडास होणारा रोग; यांत लाळ गळत असते. ॰वळख-स्त्री (प्र.) तोंडओळख पहा. ॰वळण-वळा-नपु. चेहरा; चर्या; मुद्रा; चेहर्‍याची घडण, ठेवण; रूपरेखा; चेहरामोहरा; चेहरेपट्टी; मुखाकृति; मुखवटा. [तोंड + वळ = रचना] ॰वीख-न. (ल.) तोंडानें ओकलेलें, तोंडां- तून निघालेलें, विषारी, वाईट भाषण, बोलणें. [तोंड + विष] ॰शिनळ, शिंदळ-वि. अचकटविचटक, बीभत्स बोलणारा; केवळ तोंडानें शिनळकी करणारा. ॰शेवळें-न. मुंडावळ. -बदलापूर २७७. [तोंड + शेवळें = शेवाळें] ॰सर-क्रिवि. तुडुंब; तोंडापर्यंत; भरपूर. ॰सरता-वि. अस्खलित, तोंडपाठ न म्हणतां येण्या- सारखा; अडखळत अडखळत म्हणतां येण्यासारखा (श्लोक, ग्रंथ इ॰). -क्रिवि. घसरत घसरत; अडखळत; चुका करीत; कसेंबसें; आठवून आठवून. [तोंड + सरणें] ॰सुख-न. १ एखा- द्यानें केलेल्या अपकाराचें शरीरानें प्रतिकार करण्याचें सामर्थ्य नसल्यामुळें केवळ तोंडानें यथेच्छ शिव्यांचा, अपशब्दांचा भडि- मार करून त्यांत सुख मानणें. २ जिव्हा मोकाट सोडून वाटेल तसें बोलण्यांत मानलेलें सुख; यथेच्छ व अद्वातद्वा केलेलें भाषण; (एखाद्याची काढलेली) खरडपट्टी; बोडंती. (क्रि॰ घेणें). ॰सुख घेणें-(एखाद्याची) खरडपट्टी काढणें, हजेरी घेणें; (एखा- द्यावर) शिव्यांचा, अपशब्दांचा भडिमार करणें. ॰सुटका-स्त्री. १ जिभेचा (बोलण्यांतील) स्वैरपणा; सुळसुळीतपणा; वाक्चा- पल्य; जबेफराशी; (भाषण इ॰ कांतील) जनलज्जेपासूनची मोक- ळीक. २ भाषणस्वातंत्र्य; बोलण्याची मोकळीक. ३ तोंडाळपणा; शिवराळपणा. ४ (पथ्य, अरुची, तोंड येणें इ॰ कांपासून झालेली) तोंडाची सुटका, मोकळीक; तोंड बरें होणें; खाण्यापिण्याला स्वातंत्र्य. [तोंड + सुटणें] ॰हिशेबी-वि. अनेक रकमांचा मनांतल्या- मनांत चटकन्‌ हिशेब करून सांगणारा बुद्धिमान (मनुष्य); शीघ्रगणक. ॰तोंडागळा-वि. (तोंडानें) बोलण्यांत, वक्तृत्वशक्तींत अधिक. 'कीं शेषाहूनि तोंडागळें । बोलकें आथी ।' -ज्ञा ९. ३७०. [तोंड + आगळा = अधिक] ॰तोंडातोंडी-क्रिवि. १ समोरासमोर; २ बोलण्यांत; बोलाचालींत. [तोंड द्वि.] ॰तोंडाळ-वि. १ दुसर्‍या- वर तोंड टाकणारा; शिवराळ; भांडखोर. 'लटिकें आणि तोंडाळ । अतिशयेंसीं ।' -दा २.३.१०. २ बडबड्या; वाचाळ. [तोंड] म्ह॰ हाताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं = शिवराळ माणसा- पेक्षां चोर पुरवतो. ॰तोंडाळणें-उक्रि. बकबक करून गुप्त गोष्ट फोडणें; जीभ पघळणें. [तोंडाळ] ॰तोंडोंतोंड-क्रिवि. तोंडापर्यंत; कंठोकांठ; तुडुंब; तोंडसर.॰तोंडोंळा-पु. तोंडवळा; चेहरेपट्टी. [तोंड + ओळा, वळा प्रत्यय]

दाते शब्दकोश