मराठी बृहद्कोश

पाच मराठी शब्दकोशांतील २,०४,१४० शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

नमन

नमन namana n (S) Bending, bowing, incurvating. 2 fig. Rendering obeisance or reverence unto. 3 The lines in praise of the Deity at the commencement of a Purán̤ or other work. न0 करणें-लावणें To begin or enter upon (a work gen.) And न0 होणें-लागणें in. con. To be begun.

मोल्सवर्थ शब्दकोश

नमन n Bending, bowing, incurvating. Rendering obeisance. The lines in praise of the Deity at the commencement of a Puran or other work.

वझे शब्दकोश

न. १ वंदन; नमस्कार. २ लवणें; वांकणें; नम्र होणें. ३ कीर्तन, पुराण इ॰कांच्या आरंभीं ईश्वरस्तुतीपर श्लोक इ॰ म्हणण्याची क्रिया; तमाशा, लावण्या इ॰च्या आरंभीं करण्यांत येणारें वंदन. ४ (ल.) आरंभ; सुरवात; प्रस्तावना. [सं.] ॰करणें- लावणें-(सामा.) (एखाद्या कामाचा) आरंभ करणें. ॰होणें, लावणें-(एखादें कार्य) आरंभिलें जाणें. नमनांत धडाभर तेल जाळणें-(एखाद्या कार्याच्या) आरंभालाच जास्त वेळ, पैसा खर्च करणें.

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

एकदंत

पु. गणपति; गजानन; विनायक. ‘नमन श्री एक- दंता । एकपणें तूंचि आतां ।’ –एभा १.२. ‘प्रथम नमन तुज एक- दंता । रंगीं रसाळ वोढवीं कथा ।’ –तुगा ४१९३. [सं. एक + दन्त]

दाते शब्दकोश

अभिवादन

न. १ नामगोत्रोच्चारपूर्वक वडील-गुरू यांना नमस्कार. २ (सामा.) नमस्कार; प्रणिपात; नमन. [सं.]

दाते शब्दकोश

अभिवंदन

न. नमस्कार; सर्वांशेंकरून नमन; नामगोत्रो- च्चारपूर्वक वडील, गुरू यांना नमस्कार करणें. [सं. अभि + वन्द्]

दाते शब्दकोश

बिस्मिल्ला

पु. १ मुसलमानांत मुलाच्या अगर मुलीच्या पांचव्या वर्षीं घोड्यावरून मिरवणूक काढून मशीदींत नेऊन बिस्मिल्लादि कुराणाचे कल्मे पढवितात तो उपनयनसदृश विधि. 'याचे कन्येची बिस्मिल्लाची शादीसाठीं रविवारीं रात्रीं मेहदी निघाली.' -रा ५.५७. २ मंत्र म्हणून विधिपूर्वक हत्या करणें. 'मुर्गीस बिस्मिल्ला तो कशास?' -हौकै ११. ३ कार्यारंभीं परमे- श्वराला नमन; श्रीगणेशायनमः [अर. बिस्मिल्ला = परमेश्वर. बिस्मिल्ला- हिर्रह्मानिर्रहीम् = दयाळू व कनवाळू अल्लाच्या नांवानें]

दाते शब्दकोश

भेटविणें

भेटविणें bhēṭaviṇēṃ v c (भेटणें) To bring together to an interview, meeting, or close embrace. Ex. तप्त लो- हाचा स्तंभ दारुण ॥ त्यास भेटविति नेऊन ॥ देवद्विजां जो न करी नमन ॥ त्यातें भोगणें हेचि गति ॥.

मोल्सवर्थ शब्दकोश

हरिः ओम्

उद्ना. (कोणत्याहि विधीच्या, उपासनेच्या किंवा पोथीच्या आरंभीं हें नमन असतें याकरून) आरंभ; सुरुवात. 'आफ्रिकेंतील किंवा मध्य पूर्वेंतील नव्या मोठ्या युद्धाचें 'हरिःओम्' म्हणण्याचा मान जर्मन गटच घेईल असें वाटूं लागलें आहे.' -के १८.११.१९४१. 'पुनश्च हरिः ओम्.'

दाते शब्दकोश

जय

पु. १ यश; सिद्धिः विजय; फत्ते; जयोत्सव. २ देवाला नमन करतांना त्याच्या नांवाच्या पूर्वी लावितात. ३ अर्जुन ४ भारत; कुरुपांडवकथा. 'तैसाचि लोमहर्षणनंदन उग्रंश्र- वाहि जयवक्त ।' -मोआदि १.६. [सं.] (वाप्र.) ॰करणें- जिंकणें; यशस्वी होणें. जयास जाणें-भरभराटीस येणें (यत्न, उपाय, आयुष्य). सामाशब्द- ॰गोपाळ-पु. गुजराथी लोकांतील नमस्काराचा पर्याय शब्द. ॰घंटा-स्त्री. जय झाल्या- वर वाजविण्याची घंटा. ॰घोष-पु. चांगली गोष्ट किंवा जय झाला असतां तो सर्वोंस कळावा म्हणून वाद्य वगैरेचा केलेला हर्षध्वनि. ॰जय, जयजयकार-पु. १ स्तुतिकीर्तन जयघोष. -अव. लाड करणें; थोपटणें; कुरवाळणें. -उद्गा. भले शाबास ! भले पठ्ठे ! इ. उद्गार. जयगीत; जयाचें गाणें. 'जय जय स्वसंवेद्या ।' -ज्ञा १.१. ॰जया-उद्गा. जयनाद. ॰जयवंती-स्त्री. (राग) गायनशास्त्रां- तील एक राग. ह्या रागांत षड्ज, तीव्र ऋषभ, कोमल गांधार, तीव्र गांधार, कोमल मध्यम, पंचम, तीव्र धैवत, कोमल निषाद, तीव्र निषाद हे स्वर लागतात. जाति संपूर्ण-संपूर्ण वादी ऋषभ. संवादी पंचम. गानसमय रात्रीच्या दुसर्‍या प्रहराचा शेवट. आरो- हांत तीव्र गांधार व तीव्र गांधार व अवरोहांत कोमल गांधार, कोमल- निषाद घेतात. ॰ढाक-पु. जय झाला असतां वाजवावयाचा नगारा ढोलगें. ॰तिरम-वि. भरभराटलेलें (राज्य). ॰तीर- पु. (कु.) दसर्‍याची वेंगुर्ल्याकडील जत्रा. [सं. जैत्र] ॰दुंदुभि- पु. जय झाला असतां वाजविलेल्या नगार्‍याचा आवाज व तो नगारा. ॰ध्वनि-पु. १ जयघोष. २ (ल.) कोणताहि मंगल- सूचक शब्द. ॰पताका-स्त्री. जयाचें निशाण. ॰पत्र-न. ज्याचा पराभव झाला त्यानें लिहून दिलेलें जयाचें पत्र; लेखी कबुली, कागद (कुस्ती, पंडितांतील वाद, फिर्यादअर्याद यांतील). ॰प्रातिष्टा-स्त्री. जयामुळें मिळालेला मान, वैभव. ॰प्रतिष्टित- वि. जयानें प्रसिद्ध झालेला; जेता म्हणून नांव मिळविलेला. ॰प्रस्थान-न. लढाईवर जाणें; स्वारीः कूच; मोहीम (मोठ्या प्रौढीनें). ॰फळ-न. १ (काव्य) जय. २ (चुकीनें) जायफळ. ॰मंगळ-वि. कैर्‍या डोळ्याचा (घोडा.) डोकें, कपाळ, मान, छाती, ओंठ, बेंबी या प्रत्येकावर एकएक केंसाचा भोंवरा आणि पोटावर दोन व कुशीवर (पुट्ट्यावर) एकएक भोंवरा असलेला (घोडा). हें याचें शुभलक्षण होय. -अश्वप १.९२. ॰वाद्य-न. जय झाला असतां वाजवावयाचें वाद्य. 'जय वाद्य नित्य वाजती ।' -ऐपो ३१८. ॰वान-वंत-वि. यशस्वी; जयी. ॰विजय-पु. विष्णूचे दोन द्वारपाळ. ॰शब्द-पु. १ जयाचा ध्वनि, शब्द; दोन सैन्यें भिडलीं असतां म्हणावयाचा वीरशब्द. २ राजा लढाईला निघाला असतां त्यास ब्राह्मणांनीं दिलेला आशीर्वाद. ॰श्री-स्त्री. जयानें मिळालेलें तेज; टवटवीः शोभा. ॰श्रीराम-सीताराम-उद्गा. बैरागी लोकांतील एकमेकांना नमस्कार करतांना उच्चारावयाचा शब्द. ॰स्तंभ-पु. जय मिळालेल्या ठिकाणीं जयाचें स्मारक म्हणून उभारलेला खांब (दगडी, लाकडी); रणस्तंभ. ॰स्वी- वि. नेहमीं विजय पावणारा (अंतीं स्वी असणार्‍या संस्कृत शब्दांचें अनुकरण).

दाते शब्दकोश

करुणांग

वि. नम्र. 'नमन केलें साष्टांगीं । उभा राहिला करुणांगीं ।' -गुच ३५.३१. [सं. करुण + अंग]

दाते शब्दकोश

नामना

नामना nāmanā f (नाम S) Fame, renown, celebrity.

मोल्सवर्थ शब्दकोश

न्हावण

न. १ (कर.) गौरीचें नमन. २ गौरी भरून येण्याचा समारंभ (कुणब्यांतील). 'आम्ही न्हावण आणायला जाणार आहोंत.'

दाते शब्दकोश

नमो

उद्गा. नमस्कार. 'ॐ नमो जी आद्या ।' -ज्ञा १.१. ॰नमः-अ. नमस्कार असो, नमन करतों या अर्थीं संस्कृत अव्यय. [सं. नमः] ॰नमो-स्त्री. नमस्कार; वंदन; अभिवंदन (क्रि॰ करणें). [सं. नमः द्वि] ॰नमो करणें-(एखाद्याबद्दल) अतिशय आदर, भीड दाखविणें, राखणें. ॰नारायण-उद्गा. गोसावी लोकांनीं परस्परांना नमस्कार करतांना, इतरांनीं गोसाव्यांस नमस्कार करतांना उच्चा- रावयाचे शब्द; (प्र.) नमोनारायणाय. [सं. नमः = नमस्कार + सं. नारायणाय = नारायणाला] नमोस्तु-१ नमस्कार असो या अर्थीं योजावयाचे संस्कृत शब्द. 'जलमय तीर्थेंहि तशीं संतचि फलती नमोस्तु ते म्हणतां ।' -कीर्तन १.४. २ (व.) परस्परांस नमस्कार करतांना महार लोक योजितात तो शब्द. [सं. नमः + अस्तु = असो]

दाते शब्दकोश

नमस्कार, नमस्या

पुस्त्री. १ हात जोडून व डोकें लव- वून करतात तें वंदन; (सामा.) अभिवादन; नमन. (क्रि॰ करणें; घालणें). २ ब्राह्मण परस्पर सत्कारार्थ हात गोडणें इ॰ युक्त करि- तात. ती क्रिया. [सं. नमस् + कार] ॰करणें-(ल.) सोडून देणें; त्याग करणें; रजा घेणें; रामराम ठोकणें. 'म्यां आजि पासुनि शपथ करुनि नमस्कार सच्छला केला ।' -मोवन ८.३६. (एखा- द्यास) नमस्कार असो-(एखाद्या) नांवहि घेणें नको.

दाते शब्दकोश

नमस्कारणें

उकरी. नमस्कार करणें; वंदणें; नमन करणें. 'तया परमपुरुषालागीं । अष्टौ भावाच्या अष्टांगीं । नमस्कारोनि मग प्रत्यंगीं । सेवा संतोषें निवेदी ।' -मुआदि १.६. [नमस्कार] नमस्कारित, नमस्कृत-वि. नमस्कार केला गेलेला; वंदिलेला. [सं.] नमस्कार्य, नमस्य-वि. नमस्कार करण्यास योग्य; वंद- नीय; वंद्य; पूज्य. [सं.]

दाते शब्दकोश

नति

स्त्री. १ नमन; वंदन. २ नम्रता. ३ (ज्यो.) त्रिभोन लग्नाचें अंशात्मक लंबन; स्थानभेदांश. [सं.]

दाते शब्दकोश

ओणवणें, ओणावणें

अक्रि. १ पुढच्या अंगाला कम- रेशीं खालीं वांकणें. २ शरीराच्या दुर्बलतेमुळें अथवा म्हातार- पणामुळें पाठीस बांक येणें. [सं. अव किंवा उप + नमन; प्रा. ओणा- विय]

दाते शब्दकोश

प्रणति

स्त्री. १ नमस्कार; नमन; वंदन. 'तैसा तुझिया प्रणतीं । मी पूर्णु जाहलों श्रीनिवृत्ति ।' -ज्ञा १७.२०. २ (ल.) नम्रता; लीनता; नम्रपणा. [सं.]

दाते शब्दकोश

शिजदा

पु. नमन; वंदन; जमिनीवर डोकें टेंकून वंदन; [अर. सिज्दा]

दाते शब्दकोश

सन्नति

स्त्री. आदरपूर्वक नमस्कार; नमन. [सं.]

दाते शब्दकोश

संकर्षण

पु १ संध्येंतील केशवादि चोवीस नांवांपैकीं तेरावें नांव; विष्णूचें एक नांव. २ शेष; बळिराम. 'करून साष्टांग नमन । पुढें चालिला संकर्षण । देवकीच्या उदरीं येऊन गर्भ राहिला सातवा ।' -ह ३.२७. ३ (ल.) शिंद्यांचा दिवाण बाळोबा तात्या पागनीस. ४ (योग.) चार व्यूहांतील एक व्यूह. -न. १ आकर्षण; ओढ; खेंचण्याची क्रिया. २ जमीन इ॰ नांगर- ण्याची क्रिया. [सं. सम् + कृष्]

दाते शब्दकोश

वाडा

पु. १ भव्य व मोठी इमारत; प्रासाद; थोरामोठ्याचें घर; राजवाडा; सरकारवाडा. 'मग गणेशा करूंनि नमन । वाडि यांत आला जाण ।' -कथा ६.१९.१२६. २ शहरांतील पोट विभाग; आळी; वसती. उदा॰ गौळवाडा; ब्राह्मणवाडा; कुंभार वाडा; देऊळवाडा. ३ खेडेगांवचा, मौजाचा भाग; कोंड. ४ आवाड; आवार; कुंपण घातलेली जागा; बंद केलेली जागा. 'वाडांचे कूपी खातीचे जळे ।' -कृमरा ७.४६. ५ गुरें, मेंढ्या, शेळ्या बांधण्याकरितां केलेली जागा (उघडी किंवा छपर घात- लेली); बेडें. 'देती आपुलाला झाडा । गाई बैसविल्या वाडां ।' -तुगा १८६. ६ शेळ्यामेंढ्यांचा बसलेला समुदाय. 'शेतें खत- ण्यासाठीं त्यांत वाडे बसवितात.' [सं. वाट; प्रा. वाड] वाडो वाडीं-क्रिवि. (महानु.) दर वाड्यांतून. 'आर्तातें परमेश्वरु वाडोवाडीं गिवसती ।' -दृष्टांतपाठ ३७.

दाते शब्दकोश

वैष्णव

पु. विष्णुभक्त. 'शैव यासी म्हणती सदाशिव । वैष्णव भाविती रमाधव ।' -ह ३४.१७७. २ विष्णुभक्तिसंप्रदा- याचा अनुयायी. याच्या उलट शैव. -वि. विष्णूसंबंधीं; विष्णूचें. 'ऐसी गीता वैष्णव प्रासादु ।' -ज्ञा १८.४९. [सं.] ॰संप्र- दाय-पु. केवळ विष्णूची निरनिराळ्या स्वरूपांत उपासना करणारा एक धर्मपंथ. ॰स्थान-न. (नृत्य) एका पायाची मांडी किंचित् वांकडी करून पाय ताठ ठेवणें, दुसरा पाय जमिनीपासून किंचित् उचललेला व बोटें बाजूस वळलेला असा पहिल्या पाया- पासून अडीच ताल अंतरावर ठेवणें, कमरेवरील भाग सरळ ठेवणें. अशा प्रकारें उभें राहण्याची तऱ्हा. नमन, अश्वारूढ होणें, ह्या गोष्टी ह्या स्थानांत उभें राहण्यानें सूचित होतात. वैष्णवास्त्र- न. पिशाचास मारक असें अस्त्र; विष्णुसंबंधीं अस्त्र. 'कर्णकुमारें जाणोनि अतिसत्वर । वैष्णवास्त्र सोडिलें ।' -जै ५.४४५. वैष्णवी-स्त्री.एक मातृका. -वि. वैष्णवासंबंधी (आचार इ॰). 'अनुष्ठान विधिमंत्र उपासना । सांगेन ते धारणा वैष्णवीची ।' -ब २.९. वैष्णवी भात-पु. वैष्णवांच्या गंधाप्रमाणें (वरती अक्षता (कच्चा), मध्ये गोपीचंदन (मऊ) व खालीं रक्षा ।) झालेला भात.

दाते शब्दकोश

विपरिणमन

न. बदल; फरक; रूपांतर. [सं. वि + परि + नम्न]

दाते शब्दकोश

वण

पुन. देवी, गळूं, क्षत इ॰ बरें झाल्यानंतर त्या जागे- वर राहणारें चिन्ह; डाग; व्रण; घट्टा. -मोरा १.४०२. 'नामचि पुरे न घ्यावे अष्टांगीं नमन करुन आठ वण ।' -मो स्फुट आर्या (नवनीत पृ. २५५). [सं. व्रण; प्रा. वण]

दाते शब्दकोश

वरजणें

उक्रि. वर्जणें पहा. १ टाकणें; त्याग करणें, 'आपल्याला तुम्ही रूपासी समजा । कासया वरजा आरसिया ।' -तुगा ३३३३. २ प्रतिबंध करणें. 'नमन करुनिया निघतां न सके माता सुतास वरजाया ।' -मोरा १.१२.२६.

दाते शब्दकोश

वसवसा

पु. १ दरारा; भिति; धास्ती. 'म्हणजे शेट्ये महाजन वसवसा न धरितां पेठीची अबादानी करितील. -वाडबाबा २.८५. २ संशय; भीतियुक्त शंका. (क्रि॰ धरणें, पाळणें, बाळ- गणें). 'नमन पुरे संकोचासह अंजलि वसवसाहि सोडावा ।' -मोउद्योग १३.१७४. ३ कल्पना; विचार; तर्क. (क्रि॰ जाणें). [अर. वस्वास, वस्वसा] ॰खाणें-धास्ती घेणें. 'आम्हीहि वस- वसा खाऊन निघोन आलों.' -ख ३५२६. वसवास-पु. भीति; शंका. वसवसा पहा. 'या गोष्टीचा वसवास जनराल मार- निले याही चितात धरावासा नाहीं' -पेद ३.६४. वसवासी- वि. संशयी; शंकेखोर.

दाते शब्दकोश

लवण

नस्त्री. १ खोलगट, सखल स्थल (जमिनींतील इ॰); बतखल. (सामा.) खोल, आंत गेलेला भाग; खळगा. जसें- पायाची-मानेची-हाताची-लवण. २ वळण; वांकण (रस्त्याचें, नदींचें इ॰). ३ (व.) लहानसा ओढा; नाला. ४ उतार; उतरती जागा. ५ लीनता; लवणें. [लवणें] म्ह॰ लवण- तेथें जीवन. ॰भंजन-न. (उप.) १ पूज्यतेचें व नम्रतेचें मोठें आडंबर करणें; लवून नमस्कार करून पूज्यतादर्शक शब्दांनीं संबो- धणें, बोलणें. (क्रि॰ करणें). 'पंडित भेटती समत्सर । लवण भंजन अतिनम्र ।' -एभा १०.१७३. २ अत्यंत नम्रता; आदर; आर्जव. [लवणें + भजणें] लवणा-वि. (व.) ओणवा. 'लवणा पड.' लवणी-स्त्री. वांकलेल्या शरीराच्या अवयवाच्या खालील लवण; खळगी. २ बांक; वक्रता; कमान (रस्त्याची इ॰); लवणांतील आंत गेलेला भाग. [लवणें] लवणें-अक्रि. १ वांकणें. लवलेलें-वि. वाकलेलें, नमलेलें. 'भारेंलवे प्रतिपदी भू, शेष धरूं शके न लवलीला ।' -मोभीष्म ४.४०. २ वांकणें; दबणें; दबकणें. ३ तळपणें (वीज). ४ स्फुरणें (डोळा). ५ कलणें (मन, मनोवृत्ति); वाहणें (मनदेवता-पिंगळी) ह्या अर्थीं मन, मनदेवता, मनपिंगळी इ॰ शब्द कर्तृस्थानीं योजतात. ६ (व.) उडणें; उडी मारणें. 'भिंतीवरून लवला.' ७ लीन, नम्र होणें. 'गुरुचरणीं त्यजुनि खेद लवतीस ।' -मोवन ४.७१. [सं. लीन; नमन; अप. नवन; हिं. नौना, पं. नौणा] लवन-पु. पाणी वाहून जाण्याचा पाट; लवण अर्थ ३, ४ पहा.

दाते शब्दकोश

गण

पु. १ जमाव; संख्या; समुदाय; मेळा; समूह. 'या स्वधर्मपूजा पूजिंता । देवतागणां समस्तां ।' -ज्ञा ३.९६. २ पंथ; जाती; वर्ग; विभाग; वर्ण; विभाग; वर्ण. ३ (ज्यो.) फल ज्योतिषांतील एक सज्ञा. हे गण तीन असून देवगण, मनुष्यगण, राक्षसगण अशीं त्यांचीं नांवें आहेत. २७ नक्षत्रांमध्यें एक एक गण नऊ वेळां येतो व ज्योतिषांत त्यांचा अनुक्रम (अश्विनीपासून) दे म रा म दे म दे दे इ॰ आहे. हा जन्मनक्षत्रावरून धरतात व लग्न इ॰ प्रसंगीं विचारांत घेतात). ४ तीन गुल्म सैन्य (२७ रथ, २७ हत्ती, ८१ घोडे, १३५ पायदळ). ५ गणपती देवाच्या हाताखालचा क्षुद्र देवतावर्ग; प्रमथादि शिवगण; शंकराचे सेवक; यावरून. ६ मंगलप्रसंगीं जेवण्यास किंवा समारंभाला बोलावलेल्या मंडळांतील एक पुरुष (याच्या उलट सुवासिनी); गणसवाशीण पहा. ७ (गणित) संख्या; रक्कम; बेरीज; जमा. ८ पंथ; संप्रदाय (न्याय- शास्त्र, धर्म यांतील). ९ (व्या.) धातूचें रूपख्यात; धातुपाठांतील भ्यादि अदादि गण प्र. १० गणपती देवता; गजानन. ११ (शाप.) कोटी; वर्ग; प्रत; (इं.) ऑर्डर. १२ मानस; अभिप्राय; हेतु; खरा उद्देश. 'ते माझे मुलास मुलगी देतात कीं नाहीं तो गण काढून या.' १३ जमाव; समुदाय; राशी, पुंज; संघ. समासांत- अहर्गण, मासगण, वर्षगण, भगण. इ॰ = दिवस, महिनें, वर्षें, तारे यांचा समूह. १४ सेवक, भक्त यांचा समूह. १५ (काव्य) अक्ष- रांच्या गुरुलघुत्वावरून दिलेली सज्ञा; गण तीन अक्षराचा होतो. हे गण आठ असून म, य, र, स, त, ज, भ, न अशीं त्यांचीं नांव आहेत. १६ (गणित)गुण्यांक व गुणकांक एक कल्पून केलेला गुणा- कार; वर्ग. १७ तमाशांतील ईश्वरस्तुतिपर प्रारंभीचें गीत (बहुधा गणपतीचें). 'माझ नमन आधीं गणा ।' -ऐपो ७. १८ (ना.) खेळांतील डाव. १९ (साकेतिक) राघोबादादा पेशवे याचे शागीर्द. 'श्रीमंतांचें तेथें गणांचा कारखाना.' -ख १२७८. २० (ल.) देवाच्या उत्सवांतील चोपदार, चवरी वारणारा, पालखी उचलणारा इ॰ प्रत्येक माणूस, व्यक्ति. २१ (इंग्रजीं- तील कोरम या शब्दास हल्लीं योजला जाणारा प्रतिशब्द) सदस्यां- (सभासदां) पैकीं निदान अमुक भाग किंवा किसान अमुक संख्या हजर असली तरच सभेची कायदेशीर बैठक होऊं शकते अशी किमान मर्यादा. -सभा ७१. संख्यामर्यादा. [सं. गण् = मोजणें] (वाप्र.) ॰न(ने)मणें- १ गणपतीची आराधना करणें; आराधने साठीं गणपतीस्थापना करणें २ धंद्यास लागणें; एखादी गोष्ट कर- ण्याचें ठरविणें. ॰चौथपुजणें-(ना.) मारणें; चोप देणें. ॰देणें, पुजणें-(व.) १ ठोक देणें; मारणे. 'लोकांनीं त्याचा गण दिला-पुजला.' २ डाव (खेळांतील) देणें किंवा घेणें. 'माझा गण दे' सामाशब्द-गणक-पु. कुंडली मांडणारा, नांव, रास, पंचांग पाहणारा ज्योतिषी, जोशी; पंचांग करणारा ज्योतिषी; दैवज्ञ. 'ब्राह्मण बोलाविले गणक जोशी ।' -ह २३.६६. [गण] ॰गोत-न. कुटुंब; घराणें; नातलग; संबंध; सोयरेधायरे; भाऊ बंद इ॰ व्यापकअर्थीं' गण गोत मित्र तूं माझें जीवन ।' -तुगा ७६९. [गण + गोत्र] ॰दीक्षा-स्त्री. १ जमावांत (किंवा शिष्य- मंडळींत) दाखल होण्याचा संस्कार; मंत्रोपदेश. २ पुष्कळ लोकां- करितां व्रताचरण; धार्मिक विधि. ३ ज्यांत गणपती देव मुख्य आहे असा विशेष प्रकारचा संस्कार. ॰दीक्षी- १ अनेक जातींचा उपाध्याक्ष; वर्णगुरू; आचार्य; पुरोहित. २ गणेशपूजेची दीक्षा घेतलेला पुरुष. ॰द्रव्य-न. सार्वजनिक मालमत्ता; समाईक ठेव सार्वजनिक किवा सर्वसाधारण भांडवल. 'गणद्रव्यचोरी ।' करी ।' -गुच २८.५६. ॰नाथ-पु. १ शिवगणांचा स्वामी; गणपती देव. त्यावरून. २ नायक; अधिपति. ॰नायक-पु. गणपतीदेव. 'ओं नमो जि गणनायेका ।' -दा १.२.१. 'उठाउठा सकळलोक । आधीं स्मरा गणनायक ।' -गणपतीचीभूपाळी ५. ॰गण- भोंवरी-स्त्री. मुलांचा एक खेळ; अंगार्‍या भिंगार्‍या. ॰पत- चतुर्थी-स्त्री. (अशिष्टप्रयोग) गणेशचतुर्थी. ॰पति-पु. १ गणेश देव; गजाजन. २ (ल.) ढेरपोट्या माणूस. ३ (गुंर्‍हाळ) कढईंतून गूळ बाहेर ओततांना गजाननाच्या नांवानें एकीकडे थोडासा काढून ठेवलेला गूळ; यावर गुरवाचा हक्क असतो. त्यावरून. ४ गूळ खरेदी करतांना वजनाच्या पारड्यांत टाकावयाचा दगड. गण पतीचें करणें-स्त्रीनें गर्भार होणें. ॰पतीचें केलें-स्त्रीस गर्भ राहिला. ॰पतीचें झालें-(कोण्या गणपतीची करणी) कोणी स्त्री गर्भार झाली. ॰पतीचें नांव घेणें-प्रारंभ करणें. म्ह॰ उंदराला बोललेलें गणपतीस लागतें. ॰पतिपूजन-न. १ गणेश पूजा. (कांही एक कार्यारंभीं करतात ती). २ (ल.) कार्यारंभ ॰पंचायतन-न. गणपती, शिव, नारायण, रवि व देवी अशा पांच धवता यांत गणपती प्रमुख असतो. ॰पूर्ती, भरती-स्त्री किमान मर्यादेइतके सभासद जमणें, जमाव; कोरम. 'सर- कारपक्षाच्या लोकांनी संगनमत करून दडा दिली असती तर योग्य गणभरती (कोरम) नाहीं म्हणून अध्यक्षांना सभा बर खास्त करावी लागली असती.' -सासं २.९९. ॰मंडळी-स्त्री. ठराविक नेमलेली, स्थापन केलेली मंडळी; जूट; तुकडी; टोळी; गट; समूह; टोळकें इ॰ ॰मध्य-न. पत्रिका अथवा जन्मकुंड- लींतील ऐक्य आणि शत्रुत्व या डोहोंहून भिन्न (गणमैत्री किंवा गणवैर नसणें); नवरा व बायको, धनी व चाकर इ॰ कांच्या गणांचा भेद जसें:- एकाचा देवगण तर दुसर्‍याचा मनुष्यगण. गण अर्थ ३ पहा. ॰मैत्री-स्त्री. जन्मपत्रिकेंतील गणांमधली मैत्री; एक गण असणें; बहुतेक दोघांचा (नवरा, नवरी; धनी, चाकर गण एक आला म्हणजे त्यास गणमैत्री म्हणतात. 'या मुलाची) व त्या मुलीची गणमैत्री येते कां पहा?' गण अर्थ ३ पहा. ॰वेष-पु. संघातील व्यक्तींचा ठराविक पोशाख; (इं.) युनिफॉर्म. 'नुसत्या हिरव्या रंगानें ते गणवेष इतके खुलून दिसले असते.' -सांस २.२१३. ॰वैर-न. जन्म पत्रिकेंतील गणांची प्रति- कलता, वैर, शत्रुत्व, जसें:-राक्षसगण आणि मनुष्यगण. गणश:-क्रिवि. जमाती-वर्ग-टोळी-मंडळीकडून. ॰सत्ताक राज्य-न. विशिष्ट प्रजास्ताक राज्य, याचा प्रमुख अधिकारी लोकनियुक्त असतो व सर्वांच्या हिताचे प्रश्न सर्वानीं मिळूनच सोडविले जातात या पद्धतीचें मूळ फार प्राचीनकाळापासून भारतवर्षांत दृष्टीस पडतें. ॰सवाशीण-स्त्री. १ गांवाचा मेहतर, पाटील किंवा चौगुला याची बायको; मेजवानी किवा इतर समारंभांतील एक हक्कदार व्यक्ति; गांवांतील स्त्रियांच्या गांव- भोजनांत हिला पहिल्यानें आमंत्रण घ्यावें लागतें. उत्तरेकडे पाटील किंवा त्या जागेवरील अथवा तत्संसबंधींच्या माणसाला गण म्हणतात व त्याच्या बायकोस (किंवा इतर स्त्रीसहि) सवाशीण म्हणतात त्यावरून. २ समारंभांतील भोजनप्रसंगीं बोलावलेला एखादा पुरुष व स्त्री (अथवा कोणतेंहि मेहूण).

दाते शब्दकोश

वर

क्रिवि. १ पर्यंत; काल मर्यादा किंवा प्रमाण यापावेतों. उदा॰ आजवर; वर्षावर; पायलीवर; खंडीवर. २ उंच; उच्च प्रदेशीं; उपरि. याच्या उलट खालीं. ३ नंतर; मागून. 'औरंगजेब मेल्यावर कोण गादीवर आला?' ४ अधिक; जास्त. 'त्या सभेंत शंभरावर लोक नव्हते.' ५ शिवाय; आणखी. 'आम्हाकडून काम करून घेतलेंच, वर आम्हाला शिव्या पण दिल्या.' ६ मुळें; कारणानें. 'पुरुषोत्तमरावांचें घर आपणांवरच चाललें आहे.' -इप ३२. ७ अनुरोधानें लक्ष्यविषय करून. 'वाघावर एकटा कसा चालला आहे तो पहा.' 'या विषयावर चार घटका बोलत होता.' ८ परंतु 'हे सारि ते वर थोडे । आणीकही साधील गाढे ।' -ज्ञा १६.३५२. वरता, वरी पहा. [फा. वर; सं. उपरि; प्रा. उवरि तुल॰] ॰डोकें काढणें-ऊर्जितावस्थेस येणें. 'तारा- बाईनें नातवाला सातारची गादी साधून देऊन वर डोकें काढलेलें जिजाबाईला मानवलें नाहीं.' -भक्तमयूर केका ५. ॰तोंड करणें- निर्लज्ज बनणें; लाज न वाटणें. ॰पडणें-(वस्तू, गोष्टी) तत्परतेनें करूं लागणें. 'अलीकडे तो कादंबऱ्यांवर पडला आहे.' ॰पाहणें- लज्जा, शंका, भीति न वाटणें; धीटपणा असणें; उजागरीनें बघणें. 'पापाला वर पाहण्याचा धीर होत नाहीं.' -पुण्यप्रभाव १३७. सामाशब्द- ॰उपचार-पु. अव. १ वरवर सभ्यपणा; शिष्टपणा दाखविणें; खोटी नम्रता; शिष्टचार. २ रोगनिवारणासाठीं बाहेरून शरीराला केलेले उपचार. ॰कडी-वर्चस्व; वरचढपणा. 'राज्यांत मुघोजीची वरकडी झाली कीं आपला तो सूड उगवील अशी कारभाऱ्यांस भीति पडली.' -विवि ८.६.११०. ॰करणी-वि. बाह्य; औपचारिक; कृत्रिक; दिखाऊ; वरकांती; पोकळ (भाषण, कृत्य, इ॰). ॰कर्मी-वि. १ वरकणी पहा. 'याचें असलें बरकर्मी बोलणें तुम्ही जमेस धरूं नका हो !' २ बाहेरचा; आंत ज्याचा प्रवेश नाहीं असा (रोग, औषध). ३ मूळचा झरा नसलेलें (जल इ॰). ४ मूळ नसलेला; उपरी; स्थिरपणा, कायमपणा नसलेला. ५ पोकळ; दिखाऊ; खोंटें. ॰कर्मी आदर-पु. पोकळ, कृत्रिम आदर, भाव; आदरसत्काराचा खोटा देखावा. ॰कांती-कांतीचा-वि. १ दिखाऊ; सुंदर; सुरेख दिसणारा. २ वरकरणी पहा. 'नाहीं शब्द रे बोललास वर- कांतिचा ।' -प्रला १५६. ॰काम-न. प्रत्यक्ष बनावाचें काम न करतां त्याला साधनीभूत असणाऱ्या गोष्टी करणें. उदा॰ स्वयंपाकाला लागणारें साहित्य पुरविणें, धुणेंपाणी इ॰. ॰कोट- पु. थंडी, पाऊस इ॰ साठीं कोटावर घालावयाचा लांब कोट. (इं.) ओव्हरकोट. 'उलट वरकोट आणि हातमोजे हा नेहमींचाच पोषाक होऊन बसला आहे.' -सांस २.२३४. ॰खर्च-पु. १ अधिक, योजलेल्यापेक्षां जास्त खर्च. २ इतर किरकोळ खर्च. ॰खाल-क्रिवि. खालवर; उंचसखल; विषमरीतीनें. ॰घडी-स्त्री. १ वस्त्राची घडी करतांना दर्शनी चांगला भाग यावा म्हणून अमळ बारीक विणून काढलेला पट्टा; वरची चांगली बाजू. २ (शिंपी- काम) बाहेरच्या बाजूला असलेली दुमड. 'वरघडीच्या तळाची ट्रावझर करावयाची असल्यास पांच इंच कापड अधिक घ्यावें.' -काटकर्तन ८. ॰घडीचा-वि. १ बाह्य; वरचा. २ वरघडी असलेलें (वस्त्र). ३ (ल.) दिखाऊ; भपकेदार. ४ कृत्रिम; खोटें. ॰घाट-पु. १ बाहेरचा आकार, घडण; बाह्य; स्वरूप. २ घाटावरचा प्रदेश; सह्याद्रिच्या पूर्वेकडील मुलूख. ॰घाटी-वि. बरघाटासंबंधीं (माणूस, पदार्थ इ॰). ॰घाटीण-स्त्री. घाटा- वरची स्त्री. ॰घाला-पु. जोराचा हल्ला, घाला. 'षड्रिपूवरता वरघाला ।' -दावि ३७९. ॰चढ-वि. सरस; श्रेष्ठ; जास्त; वरच्या दर्जाचा. ॰चढपणा-पु. सरसपणा; श्रेष्ठपणा. ॰चष्मा- श्मा-पु. १ वरचढपणा; वर्चस्व. (क्रि॰ करणें; होणें). 'काके- शियन वर्गाचा दुसऱ्या वर्गावर नेहमी वरचष्मा असे' -मराठी ६.३०६. २ देखरेख करणारा; तपासनीस; वरचा अधिकारी. ३ वर्चस्व गाजविणारा; अधिकार चालविणारा. ॰जोर-वि. श्रेष्ठ. 'सीरजोर वरजोर जोर हा ।' -दावि ३१०. ॰डगला-पु. (वडोदें) वरकोट पहा. -खानो ३. ॰डोळ्या-ळा-वि. १ उलट्या- बाहुल्या असणारा; अदूरदृष्टि; नेत्ररोगी. 'परपुरुषातें नयनीं पाहे । उपजतां वरडोळी होये ।' -गुच ३१.८५.२ आढ्यताखोर; रागीट. ३ टक लावून वर पाहणारा; वर दृष्टि असणारा (निंदार्थीं उपयोग). ॰तडग-न. दागिन्यावरचा तगडाचा अंश. ॰दळ-न. भाजी- बरोबर चव येण्यासाठीं शिजविलेली डाळ. [वर + दाळ] ॰दळ- न. १ घरावर कौलें, गवत इ॰ घालण्यापूर्वीं वांसे, पांजरण इ॰ पसरतात तें. २ वरचें कवच, साल. 'येक वरदळ बरें असतें । कठिण अंतर्त्यागि दिसतें ।' -ज्ञानप्रदीप ८३४. ३ वरचा भाग. 'अंग साजिरें नाकहीन । वरदळ चांग चरण क्षीण.' -एभा ११.१२८५. ४ मुलामा. 'हावभावाचेनि वरदळें ।' -भाए ३४५. -वि. १ वरवरचा; बाहेरचा. 'दाऊनियां वरदळ वेष । मना अंगीं आशा- पाश ।' -निगा २८०. 'वरदळभक्तीं करोनिया नमन ।' -नव १८.१६३.२ दांभिक. 'तुका म्हणे आम्हां तुमचेचि फंद । वरदळ छंद कळों येती ।' -तुगा ५०७. ३ हलकें; नीरस; किरकोळ. [वर + दल] ॰दळ-स्त्रीन. १ उपयोगांत, वहिवाटींत असलेले जिन्नस. 'चोर आले आणि वरदळ नेली.' २ नफा; वर मिळणारा फायदा. 'लाख रुपयें मूळ पुंजी. जें वरदळ मिळेल तें खातों.' ॰दळखर्च-पु. जास्त खर्च. ॰दळ जिंदगी-दौलत-स्त्री. सामान; जंगम माल. वरदळा-ळें-क्रिवि. वरून; बाहेरून. 'सेवन हें शिरसा धरीं । अंतरीं ही वरदळा ।' -तुगा ३२२३. 'तेविं मनुष्य वेशाचें रूपडें । वरदळें दिसे चोखडें ।' -ज्ञाप्र ७५०. वरदळ सामान-१ जंगम माल. २ किरकोळ माल. सामान. ॰दक्षिणा-स्त्री. चोरी इ॰ कानें गेलेला पैसा, पदार्थ परत मिळ- विण्यासाठीं व्यर्थ खर्चलेला पैसा. ॰दूध-न. अंगावरील दुधाखेरीज इतर दूध (लहान मुलास दिलेलें). वरचें दूध पहा. ॰नट-क्रिवि. वरून; वरकांती. 'लई अंतरची खोल मोठी वरनट केवळ सात्विक दिससी ।' -होला ८९. ॰पंग-क-वि. वरवरचा; बाह्यात्कारी (देखावा). 'अथवा वरपंग सारा । पोटीं विषयाचा थारा ।' -तुगा २८३२. ॰पंकाचा-पंगीचा-वि. क्रिवि. वरकरणी; वरकांती पहा. 'कीं वरपंगी जेवि जारीण । दावी भ्रतारसेवा करून ।' ॰पंकी- पंगी-पांगी-क्रिवि. वरवर; बाह्यात्कारी; बाह्यतः 'सामाजिक व धामिंक रीति इंग्रजी शाळेंतला मनुष्य वरपांगी पाळीत असतो.' -टि ४.३७८. [वर + पंख] ॰पंगतीचा-वरपंकी पहा. वर- कांती. 'हा स्नेह नाहीं वरपंगतीचा ।' -सारुह १.३६. ॰पिका- पीक-वि. झाडावर पिकलेला (फलादि पदार्थ) याच्या उलट कोनपिका. ' वरपिका फणस असला तर मला दे. कोनपिका नको, ' [वर + पिकणें] ॰बुजारत-क्रिवि. वरबर; बाह्यतः [वर + हिं. बुझारत] ॰बट्टा-पु. नाणें मोडतांना पडणारा बट्टा. बाहेरबट्टा पहा. ॰वंचाई-स्त्री. बाह्य भपक्यावरून झालेली फसवणूक. [वर + वंचणें] ॰वंचाईचा-वि. वरकर्मी पहा. ॰वर-वरता-वरतीं- क्रिवि. वि. १ आंत प्रवेश न होतां-करतां; बाहेरूनच (खोदणें, चोळणें इ ॰). २ थोडें फार, खोल नव्हे, अंतर्यामी नव्हे अशा रीतीनें. ३ वरकांती-वरपांगी; कृत्रिम; खोटें. 'तो मला वरवर प्रेम दाख- वितो. ' म्ह॰-वरवर माया करती आणि तोंड झांकूनी खाती. ॰वर करणें-केल्यासारखें दाखविणें; करण्याचें ढोंग करणें. वरवर बोलणें- रडणें-हांसणें-रागें भरणें-कृपा करणें इ॰ प्रयोग होतात. ॰वर उपचार-पुअव. बाह्य, दिखाऊ आदरसत्कार; नुसता, पोकळ शिष्टाचार. ॰वळा-पु. वर्चस्व; बलाधिक्य. 'देखोनि वैरियांचा वरवळा । कांपिन्नली भीमकबाळा । ' -एरुस्व ८.५१. ॰वेष-पु. बाह्य वेष; बुरखा; ढोंग. ॰शेर-सर-सांड-स्त्री. भरपूरपणा; महामुरी; तुडुंब होऊन सांडणें. -वि. भरपूर; तुडुंब. ॰सार, ॰सार- पारसार-स्त्री. (व.) संसारोपयोगी सामानसुमान, चीजवस्तु. ॰सोस-पु. श्वास; ऊर्ध्व. (क्रि॰ लागणें). [वर + श्वास] वरचा- वि. बाह्य; वरच्या भागाचा. ॰चें दूध-न. लहान मुलाला आईच्या दुधाऐवजीं-शिवाय गाईम्हशीचें जें दूध घालतात तें. -टि १.२९७. वरता-तीं-तें-शअ. क्रिवि. सर्व अर्थीं वर पहा. १ वर. 'त्यानें जे समयीं वरतें बसावें ते समयीं त्याची बुद्धि मोठी उदार व्हावी. ' -सिंहासनबत्तीशी १. २ आणखी. ३ अधिक. ' त्याहूनि कोटि- योजना वरता । ' -भारा किष्किंधा ११.७९. ४ हून; पेक्षां. ' तरी स्त्री आणि स्त्रैणावरता । दुःसंग सर्वथा असेना । ' -एभा २६.३०२. ५ श्रेष्ठ; उच्चतर. ६ (किनाऱ्याच्या बाजूनें ) उत्तरेकडचा. ७ किनाऱ्यापासून आंत. वरला-वरचा पहा. वरावरी-क्रिवि. १ वरचेवर; वारंवार. -तुगा. -शर. २ झपाट्यानें; निषिमांत. वरि- री-शअ. क्रिवि. वर पहा. १ वर; उंच. 'तूं काइसयावरी आहासि ऐसें । पाहिलें मियां । ' -ज्ञा ११.२७५. २ आणखी. 'ऐसा जात्यंधु अधस्तु । वरि भवरोगी ग्रस्तु । ' -ऋ २. ३ वरवर; बाह्यतः 'सत्य धनंजय कर्मे रूपें दिसतो उगाचि वरि नरसा । ' -मोभीष्म ११.७२. ४ पर्यंत. 'तैसें आस्थेच्या महापुरीं । रिघतांति कोटि- वरि । ' -ज्ञा ७.१३. ' देव जवळ अंतरीं । भेटीं नाहीं जन्मवरी । ' -तुगा. ५ (तृतियेचा प्रत्यय) नें; मुळें. 'तो निर्मत्सरू का म्हणिजे । बोलवरी । ' -ज्ञा ४.११३. वरिवरी-क्रिवि. वरवर पहा. 'अवघे देखिले अधर्मरत । वरीवरी आचार दावित । जैसी शांति मैंदाची । ' -वरीव-वि. श्रेष्ठ; उत्कृष्ट. ' प्रेम देखतांचि दिठीं । मीं घें आपुलियें संवसाठीं । नव्हतां वरीव दे सुखकोटी । नये तरी उठाउठी सेवक होय ।' -एभा १४.१५८. वरिवा-पु. १ वरचढपणा; श्रेष्ठपणा. 'जियें आपुलियां बरवां । नंदनवनातें मागती वरिवां । ' -शिशु २४९. २ शोभा; उत्कृष्टपणा. वरिष्ट-ष्ठ-वि. विद्या, वय इ॰ कानीं श्रेष्ठ; सर्वांत मोठा; श्रेष्ठ. -ज्ञा १.३०. 'ईश्वर तो अति वरिष्ठ । येरू भूतभौतिक अति कनिष्ठ । ' -भाराबाल ११. १६५. ३ अत्यंत मोठे, जड. [सं वरिष्ठ] वरीयान्-वि. श्रेष्ठ (मनुष्य, प्रश्न इ॰;) अत्युत्तम; अत्युत्कृष्ट. -पु. (ज्यो.) १८ वा योग. वरील-वि. वरच्या भागासंबंधीं; वरचा. वरुता-तें- शअ. क्रिवि. वर, वरता-तें पहा. 'पाळा मांडिला शरीरावरुता । ' -नव. ११.१२०. वरून-शअ. १ वरच्या भागापासून. २ साहा- य्यानें; साधनानें; कारणानें. 'तुला म्यां शब्दांवरून ओळखलें. ' ३ परिणामतः; प्रसंगानें; मुळें. ' तूं सांगितल्यावरून मी गेलों. ' ४ पुढून; समोरून; जवळून. 'तो माझे गांवावरून गेला.' ५ पृष्ठ- भागास धरून. ६ नंतर; मागाहून. (कालसापेक्ष प्रयोग). 'स्नान केल्यावरून भोजनास बसलो. ' ७ वर; उपरि. 'झाडांवरून पांखरें बसलीं.' 'घोड्यांवरून सगळीं माणसें बसलीं.' (फक्त अनेक- वचनांत प्रयोग). ८ प्रमाणें. 'आपणांवरून दुसऱ्याला । राखीत जावें । ' -दा १२.१०.२४. ' आपणांवरून जग ओळखावें ' ९ वरील बाजूस; बाह्यप्रदेशीं. 'अंतर्वसन बाह्यवसन कंचुकीवरून प्राव- रण । ' -ह ३४.१६३. वरौता-ती-वि. वर; वरता पहा. -ज्ञा ४.२०९. ' वरौति ऐऔनि आनंदभरें । ' -दाव १८८. ' सुकुमार- पणें भूपति भृंग । धरोनि झेली वरौतें । ' -मुआदि १८.३४. वरौनी-वरून पहा. 'वरौनि कापूरकेळीं । भ्रमरांची झांक ऊठिली । ' -शिशु ६०५.

दाते शब्दकोश

दंड

पु. १ काठी; सोटा; छडी; सोडगा; दंडा. २ मार; शिक्षा (शारीरिक). ३ शिक्षा म्हणून घेतलेला पैसा; याचे राजदंड, ब्रह्मदंड जातिदंड असे तीन प्रकार आहेत. सरकारी न्यायपद्धतीनें गुन्हा शाबीत झाला म्हणजे शिक्षेदाखल सर कारांत भरावयास पैसा. ४ खांद्यापासून कोंपरापर्यंतचा हात. ५ केलेल्या, पाडलेल्या भागांच्या खुणांकरितां शेतांत किंवा बागांत घातलेला मातीचा उंचवटा; बांध; गडगा; पाणी जाण्यासाठीं दोहों बाजूंस उंचवटा करून पाडलेली सरी, पाट; (बे.) नदीकिनारा; कांठ; (वस्त्राचे) दोन तुकडे जोडण्याकरितां घात- लेली शिवण. (क्रि॰ घालणें). [प्रा. दंडी = जुन्या वस्त्राचा सांधा] ६ लांबी मोजण्याचें परिमाण, चार हातांची काठी. २००० दंड म्हणजे एक कोस. ७ वेळेचें परिमाण, चोवीस मिनिटें. ८ पैलवानांच्या व्यायामाचा एक प्रकार; जोर. 'आनंत्या नित्यनेम उठतो दंड सवाशें काढितो ।' -ऐपो ६७. (यावरून) एखादें कठिण काम अथवा प्रचंड उद्योग. (क्रि॰ काढणें; पेलणें). ९ क्रमानें उतार असलेली किंवा निमुळती पण लांबट टेंकडी, सोंड (पर्वताची). १० डोंग- राच्या माथ्यापासून पायथ्यापर्यंत असलेला उतार, ओघळ, अरुंद वाट; दंडवाट. ११ पर्वताच्या रांगेची एक लहान शाखा; डोंग- राच्या माथ्यापासून तों पायथ्यापर्यंत वांकडीतिकडी गेलेली खड- कांची ओळ. १२ (कवाईत वगैरे प्रसंगीं केलेला) सैन्याच्या रचनेचा एक प्रकार; रांग; फरा; व्यूह. 'तया दंडीं क्षोभलें । लोकत्रय ।' -ज्ञा १.१६५. १३ ताठ उभें राहण्याची अवस्था. १४ जिंकणें, ताब्यांत, कह्यांत आणणें. १५ अपराधाबद्दल शिक्षा म्हणून घेतलेलें द्रव्य, पैसा; जातींत परत घेण्यासाठीं दिलेलें प्रायश्चित्त. १६ रताळीं, ऊस इ॰ लाव- ण्याकरितां मातीचा केलेला लांबट उंचवटा, वरंबा. १७ तडाका. 'निंदा निस्तेज दंडी । कामलोभावर पडी ।' -ज्ञा १३.४९४. १८ हिंसा. 'ऐसा मनें देहें वाचा । सर्व संन्यासु दंडाचा ।' -ज्ञा १३.३१०. १९ पाठीचा कणा. 'माजी उभारलेनि दंडे । शिरकमल होय गाढें ।' -ज्ञा ६.२०२. [सं.] (वाप्र.) आवळणें, बांधणें, दंडाला काढण्या लावणें-चतुर्भुज करणें; कैद करणें. ॰थोपटणें-१ कुस्ती खेळण्यापूर्वीं दंड ठोकणें; कुस्तीस सिद्ध होणें. २ (ल.) साहसानें अथवा कोणासहि न जुमानतां एखादें कार्य करण्यास उभें राहणें. ॰थोपटून उभें राहणें-(ल.) वाग्युद्धास तयार होणें. ॰दरदरून फुगणें-आपल्याशीं कुस्तीला योग्य असा गडी पाहिला म्हणजे पहिलवानाचे दंड स्फुरण पावून फुगणें. ॰फुर- फुरणें-मारामारीची, कुस्तीची वगैरे उत्कट इच्छा होऊन दंड स्फुरण पावणें. भरणें-तालीम वगैरेमुळें दंड बळकट व जाड होणें. ॰भरणें-शिक्षेदाखल पैसा देणें. दंडास दंड लावून- घांसून-क्रिवि. बरोबरीच्या नात्यानें; सारख्या सन्मानानें. दंडाला माती लावणें-कुस्तीला तयार होणें (कुस्तीपूर्वी दंडास माती लावतात). दंडपासून साधित शब्द- दंडादंडी-स्त्री. मारामारी; काठ्यांची झोडपाझोडपी; कुस्ती; झोंबी. [दंड] दंडायमान-वि. १ (अखंडित काठीप्रमाणें) निर्मर्याद; अपार (वेळ, काळ). २ मध्यें पडलेला; आडवा पडलेला, पसरलेला. [सं.] दंडारणा-पु. सोटा; सोडगा; बडगा. -वि. जाड; स्थूल; घन (वस्तु); बळकट; मजबूत; जाड (मनुष्य, पशु). दंडारा-ळा-वि. (शिवण) ज्यास दंड घातला आहे असें; मध्यें शिवण असणारें (वस्त्र, कपडा). [दंड] दंडावणें-अक्रि. थंडीनें अथवा अवघड श्रमानें ताठणें (शरीर, अवयव). [दंड] दंडासन-न. आळसानें (जमीनीवर) पाय ताणून पसरणें, निजणें; सरळ हात- पाय पसरून आळसानें पडणें. (क्रि॰ घालणें). [सं. दंड + आसन] दंडार्ह-वि. दंड्य; दंड करण्यास योग्य. [सं.] दंडित-वि. १ शिक्षा केलेला. दंड केलेला. २ (ल.) निग्रह केलेला; वश केलेला; मारलेला; ताब्यांत आणलेला. [सं.] दंडिता-वि. १ शिक्षा करणारा; मारणारा; शिक्षा करितो तो. [सं.] दंडिया-पु. १ बारा ते पंधरा हात लांबीचें धोतर, लुगडें. २ बाजाराचा बंदो- बस्त करणारा छोटा अधिकारी; पोलीस मुकादम. [हिं.] दंडी- पु. १ दंड धारण करणारा; संन्याशी. २ द्वारपाल. ३ -स्त्री. अर्ध्या दंडापर्यंत बाह्या असणारी चोळी. [सं.] -वि. १ दंड धारण करणारा. २ दंड म्हणजे उभी जाड शिवण असलेला (कपडा). दंडी-स्त्री. मेण्यासारखें, चार माणसांनीं उचलावयाचें टोपलीचें वाहन. डोंगर चढतांना हींत मनुष्य बसतो व हमाल ही खांद्यावर वाहतात. [हि.] दंडुका-पुस्त्री. (काव्य) हाताचा पुढचा भाग. -मोको. दंडुका, दंडुकणें, दं(दां)डूक, दंडोका-पुन. सोटा; बडगा; दांडकें; काठी; लांकडाचा लहानसा जाड तुकडा; शिपायाच्या हातांतील सोटा. [सं. दंड] दंडुकेशाही-स्त्री. मारहाण किंवा जुलूम करून अंमलगाज विण्याची पध्दति; पाशवी बल; दांडगाई. 'पोलिसांची दंडुकेशाही अलीकडे फारच बोकाळली आहे.' -केसरी १६-४-३०. दंडुक्या- वि. काठीनें मार देण्यास संवकलेला; दांडगा; जबरदस्त. दंडेरा- वि. दंडारा पहा. दंडेल-ली-वि. दांडगा; अरेराव; अडदांड; झोंड; मुख्यत्वें, जो कर्ज परत फेडण्यास नाकबूल असतो तो; दंडुक्या (मनुष्य). दंडेली-स्त्री. अरेरावीची वर्तणूक; दंडेलपणा; दांडगाई; जबरदस्ती; अन्याय; सामर्थ्याचा दुरुपयोग (मुख्यत्वें देणें न देण्यासंबंधीं). दंड्य-वि. १ शिक्षा करण्यास योग्य. २ दंड करण्यास योग्य. [सं.] दंड्याप्रमाणें-क्रिवि. शिरस्त्याप्रमाणें. सामाशब्द- ॰थडक-स्त्री. खांद्याच्या बाहेरच्या भागानें केलेला आघात. [सं. दंड + थडक] ॰दास-पु. दंडाबद्दल गुलाम होऊन राहिलेला मनुष्य. [सं.] ॰धारी-पु. यम. 'नुपेक्षी कदां कोपल्या दंडधारी ।' -राम २७. -वि. १ हातांत काठी असलेला. २ (ल.) संन्यासी. ॰नायक-पु. कोतवाल; पोलिसांचा अधिकारी. 'सवे सारीतु पातीनिलें । दंडनायका पाशीं ।' -शिशु ५०४. ॰नीति- स्त्री. १ नीतिशस्त्र; नीति; संसारांतील वर्तुणुकीचे आणि व्यवहाराचे कायदे, नियम. यालाच दंडनीति, अर्थशास्त्र, व्यवहारशास्त्र, दृष्टार्थ- शास्त्र, हे जवळजवळ पर्यायशब्द आहेत. २ (कायदा) शिक्षा करून दाबांत ठेवण्याचें शास्त्र. हें राजनीतीच्या चार भागांपैकी चवथें होय. ३ अर्थशास्त्र, आन्वीक्षिकी पहा. [सं.] ॰पत्र-न. न्यायांत खोटा ठरला म्हणजे त्यापासून दंड घेण्याचें पत्र. [सं.] ॰पक्ष (करण)-न. (नृत्य) पाय ऊर्ध्वजानु करणें व त्यावर उजवा हात लताख्य करीत राहणें. [सं.] ॰संयुतहस्त-पु. (नृत्य) हात हंसपक्ष करून बाहू पसरून एका हातानें दुसर्‍या हातास एकदां कनिष्ठिकेपासून आरंभ करून आंतील बाजूनें बाहेरच्या बाजूस विळखा घालणें; नंतर कनिष्ठिकेपासूनच पण बाहेरील बाजूनें प्रारंभ करून आंतील बाजूस विळखा घालणें. [सं.] ॰पाणी-पु. शिव; यम. -वि. ज्याच्या हातांत दंड आहे असा; धट्टाकट्टा व दांडगा; गलेलठ्ठ व झोंड; आडदांड. [सं.] ॰पाद-(आकाशी, चारी)- वि. (नृत्य) नूपुरपाय पुढें पसरून क्षिप्त करणें म्हणजे कुंचित पाय उचलून दुसर्‍या पायाच्या बाहेरील बाजूस पोटर्‍यांचें स्वस्तिक होईल अशा प्रकारें टांचेच्या भारावर टेकणें व मग तें स्वस्तिकां- तील पाऊल उचलून पसरणें व खालीं टाकतांना अंचित करून दुसर्‍या पायांत अडकविणें. [सं.] ॰पारुष्य-न. १ कडक, कठोर शिक्षा. २ काठीनें हल्ला करणें; छड्या मारणें; ठोंसे देणें; मारणें (हात, पाय, शास्त्र इ॰ कांनीं). ३ (कायदा) हल्ला; भय प्रदर्शक रीतीनें हात किंवा काठी उगारणें, मारणें. [सं.] ॰पूपिकान्याय-पु. (उंदरानें काठी नेली त्या अर्थीं तिला बांधलेली पोळी खाल्ली हें उघडच होय यावरून) कार्यकारण, अंगउपांग, प्रधानअप्रधान यांचा न्याय; ओघाओघानेंच प्राप्त झालेली गोष्ट. उदा॰ राजाचा जय झाल्यानंतर त्याच्या सेनेचा जय अर्थांतच दंडपूपिकान्यायानें होतो. [सं. दंड = काठी + पूपिका = पोळी + न्याय] ॰प्रणाम-पु. साष्टांग नमस्कार;;लोटांगण. 'दंड प्रणाम करोनिया ।' -गुच ९.९. ॰प्राय-वि. दंडासारखा; साष्टांग (नमस्कार). 'करी दंडप्राय नमन ।' -गुच ४१.१४. ॰फुगडी- स्त्री. (मुलींचा खेळ) परस्परांच्या दंडांना (किंवा खांद्यांना) धरून उभ्यानें फुगडी खेळण्याचा एक प्रकार. [दंड + फुगडी] फुगई- फु(पु)रोई-स्त्री. १ दंडासाठीं केलेली जप्ती; दंड. २ (अधि- कार्‍यानें) बेकायदेशीर बसविलेला दंड; बेकायदेशीर दंड बसविणें. (क्रि॰ घेणें; देणें; भरणें). ॰वळी, कोपरवळी-स्त्री. (व.) (दंडावरची) वांक; स्त्रियांचा एक अलंकार. [दंड + वेली] ॰वाट-स्त्री. १ (उजाड, भयाण असा) लांबच लांब रस्ता; जवळपास गांव, वस्ती नाहीं असा रस्ता. २ टेकड्यांच्या कडेनें गेलेली अरुंद पायवाट. ३ एकमेकास मिळणारे रस्ते. ॰वान्- वि. काठी, दंड, वेत्र इ॰ हातांत घेणार. [सं.] ॰विकल्प- पु. शिक्षेची अदलाबदल; शिक्षा कमी द्यावी कीं अधिक द्यावी याविषयीं विचारणा. [सं.] ॰सरी-स्त्री. (बागेमध्यें) पाणी जाण्याकरितां खणलेला लहानसा पाट, चर, खाचण; तसर्‍यांच्या बाजूचा पाट. [दंड + सरी] ॰स्नान-न. घाई घाईनें केलेलें अर्धवट स्नान; नद्यादिकांच्या ठिकाणीं अंग न चोळतां केकळ दंड मात्र भिजतील अशा प्रकारचें केलेलें स्नान; काकस्नान; पाण्यांत एक बुचकळी मारून केलेलें स्नान. [सं.]

दाते शब्दकोश