मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

नरक

पु. यमनगरींतील विष्टा, रक्त, पू इ॰ घाण पदार्थांनीं भरलेली, पापी लोकांनां यातना भोगण्याची जागा. याचे ८४ प्रकार आहेत. पापी लोकांसाठीं मृत्यूनंतरचें स्थान, लोक. २ (ल.) विष्टा; मल; घाणीचा संचय; (सामा.) विष्टा; गू. ३ विष्णूनें मार- लेला एक राक्षस. ४ (ख्रि.) ईश्वरी सहवासाचा व तज्जन्य आध्या- त्मिक अनुग्रहाचा अभाव. 'विरह तुझारे नरक भयंकर । भासे प्रलयानल पेटे ।' -उसं २९३. ५ (ख्रि.) सैतान व दुरात्मे यांचें वसतिस्थान. तुझें संपूर्ण शरीर नरकांत टाकलें जावें यापेक्षां तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा यांत तुझें बरें आहे.' -मत्त ५.२९. [सं.] (वाप्र.) ॰अंगावर घेणें-(एखाद्याचें) वाईट, दुष्कीर्तिकारक काम अंगावर घेणें. ॰उपसणें-(एखाद्याच्या) घाणे- रड्या गोष्टी, कृत्यें बाहेर काढणें; (एखाद्या) घाणेरड्या गोष्टीची, प्रश्नाची शहानिशा, चर्चा करणें. ॰तोंडांत सांठविणें-तोंडांत नेहमीं अपशब्द, ग्राम्य शब्द भरलेले असणें; नेहमीं ग्राम्य, अश्लील, शिविगाळीचें भाषण करणें. -काची वाट दाखविणें-(एखाद्यास) दुर्मार्गप्रवृत्त करणें; वाईट उदाहरण घालून देणें. -काची सामुग्रीस्त्री. १ (नरकवासास पात्र करणार्‍या) दुष्कृत्यांचा समुदाय. २ (रागानें) संसार. ३ (रागानें) नकोशी, तिरस्करणीय गोष्ट, काम. -काचें खापर-टोपलें-न. विष्टेनें भरलेलें टोपलें. २ खापर. ३ (ल.) कर्ज; आंतबट्ट्याचा धंदा; तिरस्कारणीय, नकोशी गोष्ट, काम, लोकापवाद, अपकीर्ति इ॰. (क्रि॰ येणें; फुटणें; डोइ- वर येणें; फुटणें; घेणें). -कांत जीभ घालणें-१ खोटें बोलणें. २ घाणेरड्या गोष्टीचें अभिवचन देणें. -कांत धोंडा टाकून शिंतोडा घेणें-१ घाणेरडीं कृत्यें करण्यांत पुरुषार्थ, समाधान मानणें. २ वाइटाशीं संबंध ठेवून त्याचा वाईट परि- णाम भोगणें. -कांत पचणें-घाणेरड्या, किळसवाण्या जागेंत, परिस्थितींत खितपत पडणें. -कानें अंग भरणें-(ल.) कर्जाखालीं बुडणें; पराकाष्ठेचें कर्जबाजारी होणें. -कासारखा घाणेरा-वि. नरकाप्रमाणें तिरस्कारणीय, नकोसा वाटणारा (दारुड्या, तगादेदार, धरणेकरी, गळग्रह, नकोशी गोष्ट इ॰). -कासारखें घाणणें-(एखादी गोष्ट, व्यक्ति इ॰) नरका- प्रमाणें तिरस्कारणीय वाटणें. -कीं धजा-ध्वजा लावणें- ज्यामुळें नरकांत श्रेष्ठंपणा गाजेल अशीं घाणेरडीं कृत्यें करणें. लोकांच्या नरकांत बुडणें-लोकांचें पराकाष्ठेचें देणें होणें; लोकांच्या कर्जांत बुडणें. सामाशब्द- ॰कुंड-न १ पापी मनुष्य मरणोत्तर ज्यांत खितपत पडतो असें नरकाचें कुंड. अशीं ८६. कुंडें आहेत. २ (ल. तिरस्कारार्थी) स्त्रीचा गर्भाशय. 'नऊ मासपर्यंत प्राण्यास नरकुंडांत वास घडतो.' [सं. नरक + कुंड] ॰केंस- पुअव. (मुलास) उपजत असलेले, गर्भावस्थेंत आलेले, जन्मल्या- पासूनच असलेले केंस. [नरक + केंस] ॰चतुर्दशी-स्त्री. विष्णूनें नरकासुराचा वध केला तो आश्विन वद्य चतुर्दशी दिवस. या दिवशीं पहांटेस चंद्रोदयीं अभ्यंगस्नान करून यमतर्पण करावयाचें असतें. [नरक = नरकासूर + चतुर्दशी] ॰पाल-ळ-पु. यम. 'स्तुत होय स्वःपाळा केव्हां जी जी म्हणे नरकपाळा ।' -मोसभा ६.९१. [नरक + सं. पाल् = रक्षण करणें] ॰वणी-न. घाणेरडें व दुर्गंधयुक्त पाणी. [नरक + पाणी] ॰वासपु. १ नरकांत राहणें. २ (ल.) गर्भवास. ३ (एखाद्या) घाणेरड्या किंवा आपत्ति भोगाव्या लाग- णार्‍या जागेंत राहणें. ४ अधर्मस्थल. [नरक + वास = राहणें] नर- काड-डी, नरकड-स्त्री. घाणीची व दुर्गंधयुक्त जागा; गुखाडी. 'सोंगाच्या नरकाडीं । तुका बोडोनिया सोडी ।' -तुगा २८१९. [नरक]

दाते शब्दकोश

नरक m Hell. A mass or heap of ordure and filth. नरक अंगावर घेणें To take up any bad business of another. नरक उपसणें To stir any disgusting question or foul affair. नरक तोंडांत सांठविणें To be very scurrilous or obscene. नरकाची वाट दाखविणें To exhibit (the road to hell) a bad example. नरकांत धोंडा टाकून शिंतोडा घेणें-उडविणें. To delight one's self in dirty doings. नरकांत जीभ घालणें To tell lies: also to promise something disgusting in the performance. नरकांत पचणें To lie soaking or lingering in any bad place, case or condition. नरकानें अंग भरणें To be deeply in debt. नरकीं ध्वजा लावणें To achieve exploits leading to eminence in hell. लोकांच्या नरकांत बुडणें To be extensively involved in debt.

वझे शब्दकोश

नरक naraka m (S) Hell; a hell or a division of the infernal regions; of which there are eighty-four. 2 fig. A mass or heap of ordure and filth. न0 अंगावर घेणें To take up any bad business of another. न0 उपसणें To stir any disgusting question or foul affair. न0 तोंडांत सांठविणें To be very scurrilous or obscene. नरकाची वाट दाखविणें To exhibit (the road to hell) a bad example. नरकांत धोंडा टाकून शिंतोडा घेणें-उडविणें To delight one's self in dirty doings. नरकांत जीभ घालणें To tell lies: also to promise something disgusting in the performance. नरकांत पचणें To lie soaking or lingering in any bad place, case, or condition. नरकानें अंग भरणें To be deeply in debt. नरकासारखा घाणेरा or घाणणें Used of a spirit-drinker or other stinkard, of a dun, taskmaster, disagreeable business &c. नरकीं धजा लावणें To achieve exploits leading to eminence in hell. लोकाच्या नरकांत बुडणें To be extensively involved in debt.

मोल्सवर्थ शब्दकोश

(सं) पु० मैल, विष्ठा. २ नीच लोकविशेष.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

नरक      

पु.       १. यमनगरीतील विष्ठा, रक्त, पू इ. घाण वस्तूंनी भरलेली, पापी लोकांना मृत्यूनंतर यातना भोगण्याची जागा. याचे ८४ प्रकार आहेत. २. (ल.) विष्ठा; मल; घाणीचा संचय; (सामा.) गू. ३. विष्णूने मारलेला एक राक्षस. ४. (ख्रि.) ईश्वरी सहवासाचा व तज्जन्य आध्यात्मिक अनुग्रहाचा अभाव. ५. (ख्रि.) सैतान व दुरात्मे यांचे वसतिस्थान [सं.] (वा.) नरक अंगावर घेणे–वाईट, दुष्कीर्तिकारक काम अंगावर घेणे. नरक उपसणे–एखाद्याच्या घाणेरड्या गोष्टी, कृत्ये बाहेर काढणे; त्यांची शहानिशा, चर्चा करणे. नरक तोंडात साठवणे–तोंडात नेहमी अपशब्द, ग्राम्य शब्द भरलेले असणे; नेहमी अश्लील, शिविगाळीचे भाषण करणे. नरकाची वाट दाखविणे–एखाद्याला वाईट कामाकडे प्रवृत्त करणे; वाईट उदाहरण घालून देणे. नरकाची सामुग्री –१. नरकवासाला पात्र करणाऱ्या दुष्कृत्यांचा समुदाय. २. (रागाने) संसार. ३. (रागाने) नकोशी, तिरस्करणीय गोष्ट, काम. नरकाचे खापर, टोपले–कर्ज; आतबट्ट्याचा धंदा; लोकापवाद; अपकीर्ती इ. (क्रि. येणे, फुटणे, घेणे, डोईवर येणे.). नरकात जीभघालणे–१. खोटे बोलणे. २. घाणेरड्या गोष्टीचे अभिवचन देणे. नरकात धोंडा टाकून शिंतोडे घेणे–१. घाणेरडी कृत्ये करण्यात पुरुषार्थ, समाधान मानणे. २. वाईटाशी संबंध ठेवून त्याचा वाईट परिणाम भोगणे. नरकात पचणे, नरकात पिचणे–घाणेरड्या, किळसवाण्या जागेत, परिस्थितीत खितपत पडणे. नरकाने अंग भरणे– (ल.) कर्जाखाली बुडणे; पराकाष्ठेचे कर्जबाजारी होणे. नरकी धजा लावणे, नरकी ध्वजा लावणे–ज्यामुळे नरकात श्रेष्ठपणा गाजेल अशी घाणेरडी कृत्ये करणे. लोकांच्या नरकात बुडणे–लोकांचे पराकाष्ठेचे देणे होणे; लोकांच्या कर्जात बुडणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

दोज़ख

(पु.) हिंदी अर्थ : नरक. मराठी अर्थ : नर्क.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

जहन्नम

पु. नरक; अग्निस्थान [अर. फा. जहन्नम = नरक]

दाते शब्दकोश

कुंभ

पु. १ घागरा; घडा. 'दैवें अमृतकुंभ जोडला ।' -ज्ञा २.२५२. २ कुंभराशि (अकरावी राशि). ३ हत्तीचें गंडस्थळ. 'भवेभकुंभभंजना ।' -ज्ञा १०.५. ४ कुंभिपाक नांवाचा नरक. 'काळदंड कुंभयातना थोरा ।' -तुगा ७०२. ५ धान्य मोजण्याचें एक माप; वीस द्रोण म्हणजे एक कुंभ (मनु ८.३२०. वरील टीप) ६ (गो.) वीस खंडींचे माप. [सं.] (वाप्र.) ॰फळ गळ्यास लागणें-(कु.) संकटांत सांपडणें. समशब्द- ॰कामला स्त्री. काविळीची शेवटची अवस्था. [सं.]॰कार- पु. कुंभार. [सं.] ॰पाक-पु. एक नरक. कुंभ अर्थ ४ पहा. 'कुंभपाक लागे तयासि भोगणें ।' -तुगा २८. ॰पुट-न. एका मातीच्या घागरीस चाळीस भोकें पाडून ती अर्धी कोळश्यानें भरावी व वर औषध ठेवावें, तोंडावर एक परळ झांकून मतकापड करून तोंड लिंपावे व सावलींत वाळवावें, मग घागर चुलीवर ठेवून परळांत निखारे घालून खालीं जाळ लावावा. तीन दिवसांनी औषध काढून घ्यावें. -योर १.२१०. ॰मेळा-पु. कुंभ राशीस गुरू येतो तेव्हां हरिद्वारास भरणारी जत्रा. ही वर्षभर असते. -तीप्र ३१. ॰विवाह- पु. मुलीच्या जन्मकाळीं तिला वैधव्य प्राप्त होण्यासारखे अनिष्ट ग्रह असतील तर अरिष्टनिरसनार्थ, खर्‍या लग्नापूर्वीं तिचा घटाशीं विवाह करतात तो. ॰संभव-पु. अगस्ति ऋषि. [सं.] ॰स्थळ-न. हत्तीचें गंडस्थळ. 'गज हाणीत मुसळें । विदारित कुंभ- स्थळें । -एरुस्व १०.५५.

दाते शब्दकोश

नारक, नारकी

नारक, नारकी nāraka, nārakī , or नारकीय a S Relating to नरक the infernal regions.

मोल्सवर्थ शब्दकोश

रवरव

पु. १ किड्यांनीं भरलेला नरक; एकवीस महा नर- कांतील एक नरक. 'रवरव कुंभपाक भोगिनी यातना । नये नारायणा करुणा त्यांची ।' -तुगा २४११. २ बुजबुजाट (माशा, उवा, डांस इ॰चा). -क्रिवि. वळवळ करणाऱ्या किड्यांनीं बुजबुजल्या प्रमाणें; बुजबुजाट होऊन. (क्रि॰ किडे पडणें). [सं. रौरव] ॰नरकवास-पु. १ रवरव नरकांत वास. २ (ल)अतिशय वाईट, दुःखकारक स्थळ; प्रसंग.

दाते शब्दकोश

आदट      

वि.       स्वैर; दडपले न जाणारे : ‘तेवि इंद्रियें खाति अदटें : आत्मा नरक भोगीं’ − उगी ५१०.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अध:पतन

न. १ खालीं पडणें; अध:पात. २ पुण्यक्षयामुळें नरकांत पडणें; स्वर्गीतून मृत्युभूमीवर किंवा नरकांत पडणें. ३ नरक- पुरी. 'वेदशास्त्रें पुराणें तया बोलती अध:पतन । जया नाहीं परि- ज्ञान गुरुपरंरेची ।।' [सं.]

दाते शब्दकोश

अधःपात

(सं) पु० नरक, खालीं पडणें.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

अधोगति

स्त्री. १ उच्च प्रदेशाकडून नीच प्रदेशाकडे जी गति ती; वरून खालीं जाण्याची क्रिया; अवपतन; अवतरण. २ नरक; नरकगति. ३ अध:पात; निकृष्ट जन्म; हीन स्थिति; अवनति; दीन अवस्था. 'पुढीले अधोगतीची लाज नेणवे ।' -ज्ञा ७.१०४. -वि. खालीं उतरणारा; खालीं जाणारा; नीच स्थितीप्रत जाणारा; खालवणारा; खालावत चाललेला. -क्रिवि. खालीं; खालच्या दिशेस; हीनावस्थेस; अवनतीप्रत. 'तैसे मस्तकीं केश कुरळ । कृष्णमुखेंशीं विन्मुख सबळ । अधोगती धांविन्नले ।' -एरुस्व १.६३. [सं.]

दाते शब्दकोश

अधोगति, अधोगती      

स्त्री.       १. उंच प्रदेशाकडून खोल प्रदेशाकडे जी गती ती; वरून खाली जाण्याची क्रिया; अवपतन; अवतरण. २. नरक; नरकगती. ३. अधःपात; निकृष्ट जन्म; हीन स्थिती; अवनती; दीन अवस्था : ‘पुढीले अधोगतीची लाज नेणवे ।’ – ज्ञा ७·१०४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अघोर

वि. १ अचाट; फार भयंकर; भीतिप्रद; अमंगळ; (वस्तु, क्रिया, स्थान). २ अक्राळविक्राळ; अकटोविकट. ३ निष्का- ळजी; बिनघोर; निर्भय; स्वस्थ; बेफिकीर. ४ सौम्य; घोर नाहीं असा. 'अघोरचुक्षुः अपतिघ्न्येधि ।' -ॠग् १०.८५.४४ -अंतरपाट काढल्यानंतर 'ही वधू सौम्य दृष्टीची असावी ' असें म्हणतात. -पु. १ संकट; घोर. 'माझी हरिली त्वां जरा । आणि देहींच्या अघोरा दवडिलें ।।' -कथा २.५.१७७. २ शंकर. यावरून अघोरपंथ निघाला. 'या ते रुद्र शिवा तनूरघोरा पापकाशिनी ।' -तैसं॰ रुद्र. ३ एक नरक. 'जो द्विजदेवांची वृत्ति हरी...ते तिघे अघोरीं पचिजेति ।' -एभा २७.३९३. ॰अरण्य-न. भयंकर अरण्य. ॰कर्म-न. भयं- कर, धाडसी किंवा अमंगळ काम. ॰जप-पु. पिशाच मंत्राचा जप. ॰दंड-पु. जबरदस्त दंड. ॰निद्रा-स्त्री. गाढ झोंप. ॰पंथ-पु. गोसाव्यांचा एक पंथ; हे लोक हातांत नरकपाल घेणारे व नरमांस भक्षण, मलभक्षण व इतर अघोर (अमंगळ) कृत्यें करणारे असतात. ॰पंथी-वि. वरील पंथाचे अनुयायी. [सं. अघोर + पथिन्]. ॰मत-मार्ग-अघोरपंथ पहा. -॰मार्गी-अघोरपंथी पहा. ॰योग- गी-पु. अघोरपंथ व त्याच्या अनुयायांचा समाज. 'शाक्त आगम आघोरयोगी । कैसे ते ऐकावे ।। -दा ४.१.१३. [सं.]

दाते शब्दकोश

अक्षोभनरक      

पु.       या नावाचा एक नरक : ‘अक्षोभनर्की उदंड जीव । या नाव आदिदैविक ।’ – दास ३·८·१९. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अक्षोभनरक

पु. या नावांचा एक अत्यंत खोल नरक. [सं.]

दाते शब्दकोश

अंधकूप      

पु.       १. गवतात किंवा झाडाझुडपांमध्ये दिसेनाशी झालेली विहीर; अंधारी विहीर : ‘मग अंधकूप आश्रावा ।’ − ज्ञा १·२३९. २. एक नरक [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अंधकूप

पु. १ गवत किंवा झाडझुडूप यांमुळें जिचें तोंड दिसत नाहीं अशी विहीर; अंधारी विहीर. 'मग अंधकूप आश्रावा ।' -ज्ञा १.२३९. -एभा ७.४५२. २ एक नरक. [सं.]

दाते शब्दकोश

अंधतामिस्त्र

न. एक नरक. [सं.]

दाते शब्दकोश

अंधतामिस्त्र      

न.       एक नरक. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अंधतम      

पु.       १. जास्त दाट अंधार; आंधळे करण्याइतका काळोख. २. (ल.) आध्यात्मिक अज्ञान; अध्यात्मज्ञानाचा अभाव. ३. एक नरक : ‘तेणे अकर्म कर्मवशें अंधतमीं तो प्रवेशे ।’ − एभा १०·५९०.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अंधतम

पु. १ जास्त अंधार; आंधळें करण्याइतका काळोख. २ (ल.) आध्यत्मिक अज्ञानांधकार; अध्यात्मज्ञानाचा अभाव. ३ एक नरक. 'तेणें अकर्म कर्मवशें अंधतमीं तो प्रवेशे ।' -एभा १०.५९०. -वि. अत्यंत अंधळा. [सं.]

दाते शब्दकोश

असिपत्रवन      

न.       ज्यांना तलवारीसारखी धारदार पाने आहेत अशा झाडांचे वन. पापी लोकांना तीक्ष्ण तलवारीसारख्या पानांनी या (नरक लोकांतील) अरण्यात मोठे क्लेश देण्यात येतात. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अतल, अतळ      

न.       विवर; नरक; सप्तपातालांपैकी पहिले : ‘आताळो गेलों; पाताळो गेलों । तिथून आणली... ।’ – लोक. वि. ज्याचा तळ लागत नाही असा; अगाध; अतिखोल. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

बुधाष्टमी

बुधाष्टमी budhāṣṭamī f S A common term for the eighth day's of the moon's increase falling on wednesday. 2 An observance amongst women. If, whilst sitting at their meal, they hear, from a proceeding कथा, mention made of नरक, they quit their meal, wash their mouth, and return to listen to the कथा.

मोल्सवर्थ शब्दकोश

भीष्म

पु. १ शौर्य, शहाणपणा, ब्रह्मचर्य व सत्यप्रतिज्ञा यांविषयीं एक पुराणप्रसिद्ध क्षत्रिय भारती योद्धा. २ (ल.) शूर, बुद्धिमान, इंद्रियनिग्रही, सत्यप्रतिज्ञा असा मनुष्य. ३ (संकेत) ढेंकूण. (कारण भीष्माच्या नेत्रांनीं जसा हिरा मग्न होई त्याप्रमाणें या प्राण्याच्या रक्तानें हिरा भंगतो असें म्हणतात). [सं.] सामाशब्द- ॰तर्पण-न. दिपवाळीमध्यें नरक चतुर्दशीस भीष्माप्रीत्यर्थ करावयाचें तर्पण. [सं.] ॰प्रतिज्ञा-स्त्री. १ भीष्मानें आमरण पाळलेली अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा. यावरून २ (ल.) खात्रीचें वचन; कधीं न मोडणारा निश्चय. ३ घोर, अचाट प्रतिज्ञा. भीष्माष्टमी-स्त्री. माघ शुद्ध अष्टमी; भीष्माच्या पुण्यतिथीचा दिवस. [सं. भीष्म + अष्टमी]

दाते शब्दकोश

च(चं)चणे, चंचकरणें, चंचरणें

अक्रि. १ (सांकेतिक) मरणें. 'चचसा नाहीं म्हणती म्हातारा ।' -अमृ ७२. २ कामा- वरून, नोकरीवरून दूर होणें; बडतर्फ होणें. चसणें पहा. चंची पडणें-मरणें. -ख्रिपु [तुल॰ प्रा. चंच = एक नरक]

दाते शब्दकोश

चतुर्विध

पु. (महानु.) १ स्वर्ग. २ नरक. ३ कर्म- भूमि. ४ मोक्ष. 'चतुर्विधाचा दरकुटा । बंदी घातले त्रिविष्टपा ।'

दाते शब्दकोश

दिवाळी

दिवाळी divāḷī f (दीपावलि S A row of lamps.) A festival with nocturnal illuminations, feastings, gambling &c., held during the concluding day of आश्विन, the day of new moon, and the two first days of कार्त्तिक (or from नरकचतुर्दशी to यमद्वितीया inclusive); in honor of विष्णु, who, at this season, destroyed the demon नरक: also in propitiation of लक्ष्मी. 2 A festival with illuminations held on the 1st of मार्गशीर्ष; called also थोरली or गुरांची or देवाची दि0. 3 fig. Luxurious reveling or merrymaking. Pr. असेल त्या दिवसीं दि0 नसेल त्या दिव- सीं शिमगा. 4 fig. Overflowing abundance (of good things at a feast). Ex. आज त्याचे घरीं लाड- वाची दि0 झाली. 5 A cucurbitaceous plant which flowers about the month भादवा or आश्विन. Its leaves are medicinal. Called also कडू दोडकी.

मोल्सवर्थ शब्दकोश

दोजक      

पु.       नरक : ‘चांडाळाशी खावया दोजकामधी । मेवा लाविला असे ।’ – योसं १८·२९९. [फा.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दुर्धर      

पु.       एक नरक. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दुर्गती      

स्त्री.       १. दुर्दशा; वाईट स्थिती; संकटाची, लाजिरवाणी स्थिती; अडचण; लचांड. २. नरक; नरकात पडणे. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

हफ़्त दोजख

(पु.) हिंदी अर्थ : सातों दोजख. मराठी अर्थ : साती नर्क.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

जहन्नम      

पु.       नरक : ‘दुनिया गेली जहन्नमेमे !’ – पुत्र ६०. [फा.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जहन्नुम

(पु.) हिंदी अर्थ : दोज़ख. मराठी अर्थ : नर्क.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

झोपड-पट्टी भाग :

स्लम्स्, गल्ल्याकुच्च्यांचें साम्राज्य, शहराची काळी बाजू ; गुंडांचें माहेरघर, भूलोकींचा नरक, जीवनाचा हीनतर स्तर येथें दिसेल, खोपटांतले संसार, दरिद्री चेंदलेल्या गलिच्छ वस्त्या, माणसे म्हणजे किड्यांचे पुंजकेच.

शब्दकौमुदी

कडूपानी      

पु.       नरक चतुर्दशी. (झाडी)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुंभीपाक

पु. एक नरक. कुंभपाक पहा. 'त्यासी कैचा परलोक । अंती होय कुंभीपाक ।' -गुच १६.१३६.

दाते शब्दकोश

कुंभीपाक      

पु.       पुराणात वर्णन केलेल्या अठ्ठावीस नरकांपैकी एक नरक. पहा : कुंभपाक : ‘त्यासी कैचा परलोक । अंती होय कुंभीपाक ।’ - गुच १६·१२६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुंभपाक      

पु.       एक नरक. पहा : कुंभ ३ : ‘कुंभपाक लागे तयासि भोगणे ।’ - तुगा २८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

मैल

पु. घाण; खळखळ; मल. 'जळती चित्त मैल सर्वथा ।' -विपू १.६९. [सं. मल; सं. मल् = धारण करणें] ॰खोर-वि. मळकट रंगाचा; घाण दडवणारा; मळखाऊ (रंग). मैला-पु. नरक; घाण. [सं. मल् = धारण करणें] मैलो-पु. (कु.) मळ. [म. मैला]

दाते शब्दकोश

नारकीय

नारक, नारकी or नारकीय a Relating to नरक the infernal regions.

वझे शब्दकोश

निरय      

पु.       एक नरक. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नरकचतुर्दशी

नरकचतुर्दशी narakacaturdaśī f (S) The 14th of आश्विनवद्य, the day on which विष्णु killed the demon नरक.

मोल्सवर्थ शब्दकोश

नरकचतुर्दशी f The 14th of आश्र्विनवद्य, the day on which विष्णु killed the demon नरक.

वझे शब्दकोश

नरकड

नरकड narakaḍa f (नरक) A place of ordure and filth.

मोल्सवर्थ शब्दकोश

नरकवणी

नरकवणी narakavaṇī n (नरक & पाणी) Filthy and stinking water.

मोल्सवर्थ शब्दकोश

पैगंबरवासी

परलोकवासी; मृत. हा शब्द महंमदा- नुयायी मृत झाला असतां उपयोगांत आणतात. पंरतु तो चुकीचा आहे. हा वैकुंठवासी, कैलासवासी या शब्दांशी सादृश्य भावनेनें बनविण्यांत आलेला आहे. परंतु वैकुंठ व कैलास हे जसे लोक म्हणजे प्रदेश आहेत तशी कल्पना पैगंबर या शब्दानें व्यक्त होत नाहीं; कारण पैगंबर म्हणजे प्रेषित. तेव्हां पैगंबर लोकावासी असें वाटल्यास म्हणावें. तसेंच ख्रिस्ती व महंमदी लोकांच्या कल्पनेप्रमाणें सर्व मृत व्यक्ति निर्णय- दिनाच्या दिवशीं पुन्हां जिंवत होणार आहेत व त्यांचा न्याय झाल्यानंतर त्यांस स्वर्ग किंवा नरक प्राप्त होणार आहे. तेव्हां न्यायदिनाच्या पूर्वी त्यांचा लोक निश्चित होत नाहीं.

दाते शब्दकोश

पाप

न. १ अपराध; कुकर्म; दुष्टपणा; दोष; पातक; नीति- बाह्य वर्तन 'पापापासून ईश्वरक्षोभ, ईश्वरक्षोभापासून नरक- प्राप्ति, नरकप्राप्तीपासून स्वहितनाश.' याच्या उलट पुण्य. २ वाईट हेतु; कुकल्पना; कुढा भाव; दुष्ट वासना. 'मनांत कांहीं पाप आलेसें वाटतें.' ३ -पुस्त्रीन. (ल.) दुष्ट, त्रासदायक, पापी मनुष्य. 'संसप्तक थोडेसे असति न धरतील तेहि पाप तग ।' -मोकर्ण ४२.७१. ४ व्याधि; पीडा; अडचण; संकट; लचांड. [सं.] (वाप्र.) ॰उभें राहणें-पाप भोगणें; पाप उघडकीस येणें; मार्गांत आडवें येणें. ॰खाणे-पश्चात्तापानें मन खाणें; मनास हुरहुर लागणें. ॰बोंब मारून-देऊन उठणें, ज्याचें पाप त्याचे पुढें येऊन नाचणें-स्पष्टपणें पाप उघडकीस येणें. पापाचा वांटा उचलणें-पापकृत्याचे परिणाम भोगण्यास सिद्ध असणें किंवा नाइलाजानें तयार होणें (मागील जन्मांतील पापाचीं फळें भोगावी लागतात अशी समजूत आहे त्यावरून). पापानें पाय धुणें- सर्वदा पापचरण करणें. पापानें पाय धुतलेला-वि. अतिशय पापी; दुष्ट; महान्पातकी (मनुष्य) तो पाप देणार नाहीं तर पुण्य कोठून देईल-तो फारच कृपण आहे. वाईट वस्तु देखील दुसर्‍याला त्याच्यानें देववत नाहीं, मग चांगली देववत नाहीं, यांत काय नवल ? सामाशब्द- ॰कर्मी-वि. दुष्कर्मी; वाईट कृत्यें करणारा; दुष्ट; पापी. कष्ट-पुअव. अतिशय श्रम, कष्ट; अत्यंत दुःख; काबाडकष्ट (रागानें, त्रासानें वैतागून बोलतांना योज- तात). 'म्यां पापकष्टानें स्वयंपाक केला तो कुत्र्यानें विट ळला.' ॰कळी-स्त्री. कलियुग. ऐसी आली पापकळी । आश्चिर्य मानिलें सकळीं ।' -दा ३.५.२२. [पाप + कलि] ॰खाण-स्त्री. अत्यंत, भयंकर, पापी मनुष्य; महान् पातकी; पापाचें आगार. ॰ग्रह-पु. मंगळ, शनि, राहु, केतु हे अशुभ मानलेले ग्रह; आकाशांतील ग्रहांची अपशकुनकारक, दुश्चिन्हकारक युति, योग. ॰दृष्टि-स्त्री. पापी नजर; काम, मत्सर इ॰नीं युक्त अशी दृष्टि, पाहण्याचा प्रकार. -वि. कामुक; पापी; कलुषित, दुष्ट, दोषी नजरेचा. ॰द्वेष्टा- वि. पापाचा तिरस्कार करणारा. ॰धुणी-स्त्री. पाप धुतलें जाणें; पापापासून मुक्तता. 'जें श्रवण करतां पापधुणी । होय एकदां सर्वांची ।' -ह ४.४४. [पाप + धुणें] ॰निरास-पु. पाप धुवून टाकणें, दूर करणें. ॰पिंड-पु. (स्त्री रजस्वला असतांना गर्भ राहतो. यावेळीं मातेचें अशुद्ध रक्त वाहत असतें, त्यावरून या काळांतील) गर्भ पिंड; गर्भ. ॰पुत्र-पु. कुपुत्र. 'बाप तयाला ताप वृद्धपणिं पापपुत्र हा करी ।' -ऐपो ३६८. ॰बुद्धि-मति-वि. कुबुद्धि; दुष्ट, वाईट मनाचा; पापी वृत्तीचा. ॰भी(भे)रु-वि. पापाला भिणारा, भिऊन वागणारा. ॰मूर्ति-राशि-रूप-स्वरूप-वि. घोर, महान् पातकी; मूर्तिमंत पातकी. ॰योनि-नी-स्त्री. १ पापजाति. 'तिथे पापयोनींही किरीटी । जन्मले जे ।' -ज्ञा ९.४४३. २ गुन्हेगार जाती. 'पापयोनि शब्दानें अलीकडे सरकारदरबारांत ज्यांना गुन्हे- गार जाती असें म्हणतात तशा प्रकारचा अर्थ विवक्षित असून....' -गीर ७४८. -वि. पापी; पातकी (माणूस). ॰वासना-स्त्री. अपवित्र, पापी इच्छा; दुष्ट वासना. ॰वेळ-स्त्री. रात्रीं अकरा वाजल्या पासून तों पहाटे तीन वाजेपर्यंतचा काळ. धार्मिक व पवित्र कार्याला ही वेळ अयोग्य समजतात. ॰संग्रह-पु. पापांचा सांठा, संचय. ॰संताप-पु. पापामुळें होणारें दुःख; मनस्ताप; कांचणी. पापाचा बाप-पु. जन्मदाता बाप (कारण तो मुला- मुलीचा उत्पत्तिकारण असल्यामुळें त्यांच्या पापांची त्याच्यावर जबाबदारी येते). याच्या उलट पुण्याचा, धर्माचा बाप पापाचे पर्वत-पुअव मोठीं आणि पुष्कळ पापें. 'अपार जीव मारले । पापांचे पर्वत सांचले ।' -रावि १.११०. पापात्मा-पु. अत्यंत पापी; दुष्ट मनुष्य; पापमूर्ति, पापाचा केवळ अर्क. पापापूर्व- न. अनीतीच्या कृत्यांपासून उत्पन्न होणारें वाईट फळ, परिणाम इ॰. अपूर्व पहा. पापिष्ट, पापी-वि. अतिशय पापचरणी; दुष्ट; अनीतीनें वागणारा; पातकी; पापयुक्त. पाप्याचा पितर-न. (ल.) अतिशय रोड, दुर्बल व क्षीण, मनुष्य (पापी माणसानें दिलेले पिंड त्याचें पितर खात नाहींत त्यामुळें ते रोड बनतात त्यावरून).

दाते शब्दकोश

पर्गेटरी

स्त्री. नरक; यमलोक. -ति २८८. [इं.]

दाते शब्दकोश

परिणाम

पु. १ शेवट; निकाल; अखेरी; सार; फळ; निष्पत्ति. 'पापचा परिणाम नर्क.' २ (व्यापक. सामा.) सुख- कारक शेवट (धंदा, काम वगैरेचा); सिद्धि. ३ अडचणींतून निभा- वून गेलेली गोष्ट; यशस्वी निकाल; धडगत (नकारार्थी प्रयोग). (क्रि॰ लागणें). 'पांचशे रुपये दिल्यावाचून माझा परिणाम लागणार नाहीं.' ४ आकार, स्थिति यांचे रूपांतर; बदल; अवस्थांतर स्थित्यंतर. 'पाण्याचा धूमरूप परिणाम होऊन त्याचा पुन्हा पर्जन्यरूप परिणाम होतो. ५ अंतिम अवस्था; अखेर; चरमा- वस्था. ६ (ल.) ब्रह्म. 'जो निजानंदें धाला । परिणामु आयुष्या आला । पूर्णते जाहला । वल्लभु जो ।' -ज्ञा १२.१७१. [सं.] परिण(णा)मणें-१ परिणामाला पावणें. 'ऐसे स्वानुभवविश्रामें । वैराग्यमूळ जें परिणमे । तें सात्त्विक येणें नामें । बोलिजे सुख ।' -ज्ञा १८.७९३. २ पालटणें; बदलणें. 'चुकलें मत्प्राप्तीचें वर्म । तो धर्म अधर्म परिणमे ।' -एभा १४.२९९. ३ परिपक्व होणें. ४ विस्तारणें. 'सोनें परिणामलें सांखळें । कीं साडे पन्हरें जालें कडि- वळें ।' -ऋ ९३. ॰कार्य-न. पूर्व कारणाचा लोप होऊन जें त्यास रूपांतर प्राप्त होतें त्याचें नांव. जसें-दूध मूळ कारण लोपून त्याचें झालेलें दहीं हे रूपांतर. -हंको. ॰दाह-पु. १ मरण्याच्या वेळीं शरीराची होणारी आग, जाळ, भडका, दाह. २ अन्नपचन होत आल्यावर पोटांत उठणारी आग (रिकाम्या पोटांत ही उठते). ॰शुद्ध-वि. ज्याचा शेवट गोड होतो तें; सुपरिणामी; सुखपर्यवसयी. ॰शूल-पु. १ चांगलें अन्नपचन झालें नसतां पोटांत उठणारी कळ. २ अन्नपचन पुरें झालें असतां पोटांत होणारी आग. परिणामदाह अर्थ २ पहा. ३ मरणाच्या वेळच्या वेदना; शेवटची धडपड. ४ कोणताहि असाध्य रोग.

दाते शब्दकोश

परिणाम pariṇāma m (S) End, result, conclusion, consequence, fruit, product. Ex. पापाचा प0 नरक. 2 Used laxly, but very commonly, in the sense of Happy completion or accomplishment (as of a business, work, project); also of a successful issue out of (a difficulty). Gen. neg. con., and v लाग. Ex. हें केलेंच पाहिजे केल्यावांचून प0 नाहीं; पांचशें रुपये दिल्यावांचून माझा प0 लागणार नाहीं. 3 Change of form or state. Ex. उदकाचा धूमरूप प0 होऊन त्याचा पुनः पर्जन्यरूप प0 होतो.

मोल्सवर्थ शब्दकोश

रौरव

रौरव raurava m S A particular नरक, a division of Hell. See under the popular रवरव.

मोल्सवर्थ शब्दकोश

रौरव m A particular नरक. A division of Hell.

वझे शब्दकोश

तमकूप      

पु.       एक नरक.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तप्त

वि. (अक्षरशः ल.) तापलेला; संतप्त झालेला; चेत- विलेला; प्रक्षुब्ध. [सं.] ॰कांचन-न. तापविलेलें, शुद्ध केलेलें सोनें. 'तप्तकांचन जैसें सुढाळ ।तैसें निर्मळ निजांग तुझें ।' [तप्त + कांचन = सोनें] ॰दिव्य-न. दिव्य करण्याचा एक प्रकार; यांत हें दिव्य करणारा, 'ईश्वरा, मी जें सांगतों तें खरें असल्यास माझा हात भाजूं देऊं नकोस' असें बोलून आपल्या हातानें ताप- लेल्या तेलाच्या कढईंत टाकलेला पदार्थ (रवा) काढतो. दिव्य पहा. ॰दिव्यकरणें-वर वर्णन केल्याप्रमाणें भयंकर दिव्य कर- ण्यास तयार होणें; भयंकर शपथ घेणें. [तप्त + दिव्य] ॰मुद्रा- स्त्री. मध्व संप्रदायी वैष्णव दीक्षा घेतांना तांब्या-पितळेच्या मुद्रा तापवून आपल्या अंगावर जीं चिन्हें उमटवितात त्यांपैकीं प्रत्येक; ज्या मुद्रेनें हीं चिन्हें उमटवितात ती. [तप्त + मुद्रा = चिन्ह, छाप] ॰लोह-न. १ तापलेलें लोखंड. २ (तापलेल्या लोखंडाचा) एक प्रकारचा नरक. 'तप्तलोह भेटी । तुका म्हणे कल्पकोटी ।' -तुगा ३१४१. [तप्त + लोह = लोखंड] ॰शूल-ळ-पु. तापविलेला सूळ. 'तप्तशूळावरी घालिती । पायीं चंडशिळा बांधिती ।' [सप्त + शूल]

दाते शब्दकोश

तप्तलोह      

न.       १. तापलेले लोखंड. २. (तापलेल्या लोखंडाचा) एक प्रकारचा नरक : ‘तप्तलोह भेटी । तुका म्हणे कल्पकोटी ।’ – तुगा ३१४१.[सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तम

पुन. १ (शब्दशः व ल.) अंधार; काळोख; अंधकार. 'पडिलेआ भवतमीं निबिडें । जिया प्रति-भवीं उजियेडे ।' -ॠ २. -ज्ञा १६.३६९. '... जैसा रवि नासी तमा ।' -तुगा ४८०. २ सत्त्वरजादि गुणांपैकीं तिसरा (ज्यापासून काम-क्रोधादि विकार उत्पन्न होतात तो) तमोगुण. 'तैसा बहुवसें तमें । जो सदाचि होय निमे । तेथ श्रद्धा परिणमे । तेंचि होऊनि ।' -ज्ञा १७.६९. ३ (तमापासून उत्पन्न होणारें) अज्ञान; वेडेंपण; मूर्खपणा; मोह; अविचार. 'हें असो किती बोलावें । तरी ऐसें जें देखावें । तें ज्ञान नोहे जाणावें । डोळस तम ।' -ज्ञा १८.५८१. 'तत्कृतबोधाहुनि मज गमलें तम अहित जरि तथापि हित ।' -मोसभा ३.३६. ४ उन्माद; क्रोधाचा आवेश; गर्वाचा ताठा. (क्रि॰ गाणें; करणें; मांडणें). ५ मूर्च्छा; बेशुद्धि. 'वासुनि दांत मुखांत दहांत पडे, मति गाढ तमीं पचली ।' -वामन-सीतास्वयंवर ११. [सं. तमस्] ॰कूप-पु. १ (काव्य.) गाढ अंधारानें युक्त असा खळगा; खांच. 'कीं तमकूपीं पडला गभस्ती ।' २ एक नरक. [तम + सं. कूप = आड] तमारि-री-पु. सूर्य. 'रात्रीची चौपाहरी । वेंचलिया अवधारीं । डोळ्यां तमारी । मिळे जैसा ।' -ज्ञा १८.९६७. [तम + अरि = शत्रु] तमारिसुत-पु. सूर्याचा पुत्र. १ शनि. २ यम. ३ वरुण. 'चालिला तेव्हां तमारिसुत ।'

दाते शब्दकोश

अग्नि

पु. १ विस्तव; आग; अनल. २ पंचमहाभूतांतील एक देवता. ३ जठराग्नि; (ल.) भूक. ४ आग्नेयी दिशा व तिचा अधि- पति. ५ यज्ञीय देवता; गार्हपत्य, आहवनीय व दक्षिणाग्नि असे तीन त्रैताग्नि व सभ्य आणि आवसथ्य मिळून पंचाग्नि. ६ तीन संख्येचा वाचक. ७ चित्रकादि जठाराग्नि प्रदीप्त करणाऱ्या वनस्पती. [सं.]. ॰घेणें-दारूगोळ्याचा मार सहन करणें. ॰देणें-प्रेत जाळणें; उत्तरक्रिया करणें. ॰चा पाऊस पडणें-अग्निवर्षाव होणें; एकदम अनेक संकटें-जुलूम कोसळणें, गुदरणें. ॰आराधना- शत्रूंचीं गांवखेडीं, शेतें-भातें जाळणें. -ख २०९९. ॰कण-पु. विस्तवाची ठिणगी; स्फुल्लिंग; फुणगी. ॰कमळ-न.योगशास्त्रांतील एक संज्ञा. भुवयांच्यामध्यें अग्निनामक कमळ आहे तें विद्युद्वर्ण असून त्याला दोन पाकळ्या आहेत. तेथ 'हं' 'क्षं' हीं बीजचिन्हें आहेत. -बिउ १.५३. ॰कार्य-न. उपनयनानंतर बटूनें ब्रह्मचारी धर्माप्रमाणें करावयाचा होम; अग्नि-उपासना. ॰काष्ठ-न. निखारा; पेटलेलें लांकूड; विस्तव. ॰काष्ठ भक्षणें- १ अग्निप्रवेश करणें; अग्नींत उडी टाकून मरणें. 'अर्जुन म्हणे हेचि शपत । जरी मोडोनि पडेल सेत । तरी मी अग्निकाष्टें भक्षीन सत्य ।' -ह ३२.१६९. २ सती जाणें. 'आपला पति मृत झाल्याची खबर कानीं पडतांच तिनें अग्निकाष्ठें भक्षण करण्याचा निश्चय केला'. ॰काष्ठ अॅसिड- (पायरोलिग्निअस अॅसिड) हें लांकडांतून कच्च्या स्वरूपांत निघतें. -सेंपू २.४२. ॰कुंड-न. होमाच्या वेळीं अग्नि ठेवण्या- करितां केलेला खड्डा, पात्र; वेदी. ॰कुमार-पु. अजीर्ण, कॉलरा, वातजन्य रोग यांवरील पारा, गंधक, बचनाग टांकणखार वगैरेचें केलेलें औषध, रसायन. -योर १.५०२. ॰क्रीडा-स्त्री. दारुकाम; आतषबाजी; दारूगोळ्याचा भडिमार; फटाके, दारू उडविणें. ॰खांब-पु. तप्तलोहस्तंभ; शिक्षेचा एक प्राचीन प्रकार; नरक- यातनांपैकीं एक; यम लोकींची एक शिक्षा. 'तप्तभूमीवरी चाल- विती । अग्निखांबासहि कवळविती ।।'. ॰चक्र-न. १ षट्चक्रांपैकीं एक; अग्निकमळ पहा. -एभा १२.३३५. २ शकुन, फलज्योतिष यांतील एक संज्ञा; शांतिकर्मासाठीं अग्नि कोठें आहे हें पहावयाचें चक्र. शुक्ल प्रतिपदेपासून चालू तिथीपर्यंत मोजून त्या संख्येंत एक मिळवावा व रविवारापासून चालू वारापर्यंतची संख्या मिळवावी व त्या संख्येस ४ नी भागावें. बाकी शून्य किंवा तीन उरल्यास अग्नि पृथ्वीवर असून शुभ होय; २ उरल्यास अग्नि पाताळीं व १ उरल्यास अग्नि स्वर्गलोकीं होय; हे दोन्ही अग्नि शांतिकर्मास अशुभ होत -धसिं २८४. [सं.]. ॰ज खडक-पृथ्वीच्या पोटां- तील अग्नीनें आंतील पदार्थांचा रस होऊन त्यापासून बनणारा खडक; लाव्हा. -भू ७८. ॰ज्वाला-स्त्री. अग्निशिखा; ज्योत; जाळ. ॰तीर्थ-न. तीर्थ पहा. ॰दिव्य-न. दिव्य पहा. ॰नाश- पु. श्रोत स्मार्त अग्नि विझून जाणें; अग्निहोत्रांतील अग्नि नष्ट होणें; (याबद्दल प्रायश्चित घ्यावें लागतें). ॰नौका-स्त्री. आग- बोट; वाफर; स्टीमर. ॰पंचक-न. फलज्योतिषांतील एक योग; हा घातक असून त्यांत अग्नीपासून भय असतें. यासारखेंच चौरपं॰ ,मृत्युपं॰ ,राजपं॰ वगैरे योग आहेत. शुक्ल प्रतिपदेपासून चालू तिथीपर्यंत मोजून त्यामध्यें चालू लग्न मिळवून त्या संख्येस नवानीं भागून बाकी दोन राहिल्यास तें अग्निपंचक होय. हें सर्व गृहकर्मास वर्ज्य मानितात. -मुमा. [सं.]. ॰परीक्षा-स्त्री. अग्नि- दिव्य पहा. ॰पात्र-न. (शिंपी.) इस्त्री यंत्र; कपडा कडकडीत करण्याचें यंत्र; इस्तरी पहा. ॰पुट-न. रसायन, औषधें, मात्रा वगैरे करण्यास त्यांना अग्नीची आंच देऊन जो संस्कार करितात तें. ॰प्रद-वि.पाचक; अग्निवर्धक; अग्निदीपक. ॰प्रवेश-पु. १ स्वतःस जाळून घेणें. २ सती जाणें; अग्निकाष्ठ भक्षणें पहा. 'पुत्रवंत्या स्त्रिया विशेष । तिहिं न करावा अग्निप्रवेश ।।' ॰बाण-पु, दारूनें वर उडवावयाचा बाण; दारूचा बाण; अग्न्यस्त्र. ॰मणी-पु. एक काल्पनिक रत्न; सूर्यमणि; रविकांत. सूर्यकांत मणी पहा. ॰माद्य- न. अपचनाचा रोग; जठराग्नि प्रदीप्त नसणें; भूक न लागणें. ॰मापक-पु. न. अत्युष्णतामान मोजण्याचें यंत्र; पायरॉमीटर. ॰मुख-न. १ हिंग एक भाग, वेखंड २ भाग, पिंपळी ३ भाग, सुंठ ४ भाग, ओवा ५ भाग, हिरडेदळ ६ भाग, चित्रकमूळ ७ भाग व कोष्ठ ८ भाग यांचे चूर्ण. हें अग्निमांद्यावर देतात. -योर १. ४९३. २ देव. ३ ब्राह्मण. ॰यत्र-न. १ बंदूक; तोफ. 'यांच्या अग्नियंत्रशौंडत्वाची तारीफ व्हायला वेळेनुसार चुकायची नाहीं.' -नि ८०८. २ दारूकाम; आतषबाजी. 'भरूनी रजतमाचें औषध । करूनी अग्नियंत्र सन्नद्ध । कृष्णापुढें अतिविनोद । एक प्रबुद्ध दाविती ।।' -एरुस्व १५.११७. ॰रथ-पु. आगगाडी. ॰रोहिणी- स्त्री. काळपुळी पहा. ॰वर्ण-वि. अग्नीसाररखा तांबडा लाल (रंग); रक्तकांति. ॰वर्धक-वि. पाचक. ॰वर्धन-न. पचन; जठराग्नीचें उद्दीपन. ॰विच्छेद-पु. अग्निनाश; पत्नी मृत झाली असतां अथवा इतर कारणांनीं अग्निहोत्र बंद पडणें. (याबद्दल प्रायश्चित्त सांगितलें आहे). ॰वृद्धि-स्त्री. अग्निवर्धन; पचनशक्तीची वाढ; जठराग्नि प्रदीप्त होणें; आहाराचें प्रमाण वाढविणें. ॰शस्त्र-न. बंदूक, तोफ वगैंरे दारूनें उडणारें हत्यार. ॰शाला-स्त्री. अग्न्यागार; अग्निगृह; अग्नि ठेवण्याची जागा; यज्ञशाळा; होमशाळा. ॰शिखा-स्त्री. अग्नीची ज्वाळा; अग्निज्वाळा. ॰ष्टुत्-पु. (ख्रि) 'एंबर डेज' या इंग्रजी शब्दाचा पर्याय; राखेचे दिवस; ज्यांची दीक्षा होणार आहे त्यांच्यासाठीं प्रार्थना करण्याचे दिवस. 'उपोषणमंडळाशिवाय या चर्चच्या प्रार्थनासंग्रहांत अग्निष्टुत्, अनुनय व कित्येक विशिष्ट दिव- सांच्या पूर्वीं करावयाचीं प्रदोषोपोषणें...सांगितलीं आहेत'. -ना वा. टिळक. उ. मं. ३. [सं. अग्नि + स्तु.]. ॰ष्टोम-पु. सप्तसोमसंस्थां (यज्ञा) पैकीं एक; सोमयाग; यज्ञ. ॰ष्वात्त-पु. अव. पितृदेवता, ज्यांस मंत्राग्नि मिळालेला आहे असे; ज्यांनी जिवंतपणीं अग्निहोत्र पाळलें नाहीं असे; मरीचीपुत्रांपैकीं पितर; जिवंतपणीं श्रौताग्नि ज्यांनीं ठेवला नाहीं (अग्निष्टोमादि याग केले नाहींत) असे पितर (सायण). ॰सेवा-स्त्री. अग्नीची उपासना, पूजा. ॰स्थान-न. अग्निकमळ-चक्र पहा. 'आकळलेनी योगें । मध्यमा मध्यमार्गें । अग्निस्थानौनि निगे । ब्रह्मरंध्रा ।।' -ज्ञा ८.९४. ॰होत्र-न. १ श्रौता- ग्नीची उपासना; सकाळसायंकाळ अग्नीला होम देऊन अग्नि सतत राखण्याचें व्रत. २ (थट्टेनें) धूम्रपान; विडी ओढणें. ॰होत्री-पु. अग्निहोत्र पाळणारा; (थट्टा) तंबाकू ओढण्याचें व्यसन असणारा. ॰स्नान-न. (व.) एक तांब्याभर पाण्यांत स्नान करणें.

दाते शब्दकोश

भोग

पु. १ उपभोग; सुखदुःखाचा अनुभव. (क्रि॰ येणें; करणें). यां सकळांतें वधावें । मग जे भोग भोगावे ।' -ज्ञा १.२११. २ उपभोगिलेलें सुख किंवा दुःख; विषय. ३ उपयोग; वापर; ताबा असणें. (क्रि॰ करणें; घेणें). 'तुम्ही या शाल- जोडीचा आजपर्यंत भोग घेतलात.' ४ उपभोगण्याचा, अनुभविण्याचा कोणताहि विषय. 'झालों कर्मधर्मविरहित । मना आवडे तो भोग भोगीत ।' ५ दैवगतीनें भोगावें लागणारें सुखदुःख. (क्रि॰ येणें; उठणें; उभा राहणें; उचलणें). 'भोग असेल तितका भोगून सारला पाहिजे.' ६ (काळ, प्रदेश इ॰चें) आक्रमण; ओलांडा. 'सूर्य प्रायः तीस दिवसांत एक राशीचा भोग करतो.' ७ आक्र- मण केलेली स्थिति. यावरून ८ आकांशातील रेखांश. ९ तार्‍याचें शरवृत्त आणि उत्तरायणपातांतील शरवृत्त ह्या पातळ्यांमध्यें जो कोन होतो त्याला त्या तार्‍याचा भोग म्हणतात. -सूर्य १८. १० कष्ट; त्रास. 'जरी मित्र आहे हरी तूमचा हो । तरी भोग कां न सुटे आमुचा हो ।' -कचेसुच ३. ११ सुखदुःखादि अनुभवाचें फळ; प्रारब्ध; दैव; नशीब. 'भजन घाली भोगावरी । अकर्तव्य मनीं धरीं ।' -तुगा २९०४. १२ नैवेद्य. 'तो भोग पारतंत्र्याचा ।' -संग्रामगीतें १२. १३ मैथुनसुख. १४ शिजत असतांना भाड्याच्या वर आलेला भात. १५ नागाची फणा. [सं.] म्ह॰ भोग फिटे आणि वैद्य भेटे. (वाप्र.) ॰येणें-दैवगतीनें सुखदुःखादि नशिबी येणें. 'आलिया भोगासी असावें सादर ।' ॰चढविणें- लावणें-देवास नैवेद्य दाखविणें. भोगास येणें-(कोणतीहि गोष्ट) अनुभवण्याचा प्रसंग नशीबीं येणें. सामाशब्द- ॰चतुष्टय-न. चार प्रकारचे भोग; स्थूलभोग, प्रविविक्त भोग, आनंदभोग आणि निरानंद- भोग यांचा समुच्चय. ॰पति-पु. (कायदा) एखादा पदार्थ ज्याच्या ताब्यांत आहे असा मनुष्य; वस्तूचा मालक. [सं.] ॰भरणि-णी-स्त्री. भोग भोगणें; दुःख सोसणें. 'अकळ प्रारब्ध भोगभरणि ।' -ज्ञानप्रदीप २४७. ॰भूमि-स्त्री. स्वर्ग; इंद्रलोक. [सं.] ॰भोगवटा-पु पदार्थाचा उपभोग; ताबा; वापर इ॰. 'माझा बाप ह्या वतनाचा भोगभोगवटा घेऊन देशांतरीं गेला.' ॰मूर्ति-स्त्री. १ उत्सवांत मिरवायची मूर्ति; दिखाऊ शरीर. 'हे ही पांडुहि विदुरहि या यांच्या भोगमूर्ति, हे शिव रे!' -मोउद्योग ११.६१. २ (ल.) कांही एक न करतां लोकांच्या श्रमाचें फळ उपभोगणारा इसम; मालक; धनी. ३ एखाद्या संस्थेंत प्रत्यक्ष काम करणारा मालक. [सं.] ॰लाभ-पु. एखाद्यानें आपल्याकडे ठेव म्हणून ठेवलेल्या वस्तूपासून झालेला फायदा. [सं.] ॰वटा-पु. उपभोग; वापर; वहिवाट; कबजा; ताबा. ॰वटदारपु. (गो.) जमिनीचा उपभोग घेणारा; धनी; वहिवाटदार. ॰विडा-पु. नऊ पानें, नऊ सुपार्‍या इ॰ घालून नऊ विडे करून ब्राह्मणांस किंवा सुवासिनीस मकरसंक्रांतीच्या दिवशीं स्त्रिया देतात त्यापैकीं प्रत्येक. ॰विलास- पु. सुखोपभोग; चैनबाजी. [सं.] ॰क्षम-न. शरीर. 'आणि तयाचि स्थिति तमीं । जे वाढोनि निमती भोगक्षमीं ।' -ज्ञा १४.२७४. -वि. भोगांना योग्य; भोगण्यास योग्य. 'निगे सांडूनि कोपट । भोगक्षम हें ।' -ज्ञा १४.२१८. [सं.] ॰क्षीण-वि. ज्यांचे प्रारब्ध संपलें आहे असें. 'पाठीं भोगक्षीण आपैसें । देह गेलिया ते न दिसे ।' -ज्ञा १५.३७५.' भोगायतन-न. अंतःपुर. 'देवाचिया भोगा यतनीं । खेळतां आशंकेना मनीं ।' -ज्ञा ११.५५२. [सं. भोग + आयतन] भोगावळ-न. (गो.) पिशाच्यांना दाखवावयाचा वार्षिक नैवेद्य, देणें. [भोग + आवली] भोगी-पु. साप. 'भोगी तुम्ही उपजलां जरि नागलोकीं ।' -र ४१ -वि. १ भोक्ता; हौशी; विलासी; रंगेल. २ भोगणारा; सुखदुःखादि अनुभविणारा, सहन करणारा. भोगी-स्त्री. १ मकरसंक्रांतीच्या पूर्वींचा दिवस. २ नरक- चतुर्दशीच्या पूर्वींचा दिवस. भोगीचा विडा-पु. (बायकी) भोगविडा पहा. भोगीभूषण-पु. शंकर; शिव. -हंको. भोगी (गि)या-वि. भोग घेणारा. 'स्वामी तुकयाचा भोगिया चतुर ।' -तुगा १३४. ॰राव, भोगीं(गें)द्र-पु. शेष. 'टाकोनि कपट कुटिल भाव । स्वामीसी हांसे भोगिराव ।' -ह ३.१८. भोगोत्र, भोगोत्तर-न. व्यक्तिशः उपभोगासाठीं विशेषतः ब्राह्मणास दिलेलें इनाम (जमीन इ॰). [सं. भोग + उत्तर] भोग्य- न. उपभोग; वहिवाट; वापर; ताबा; कबजा (क्रि॰ करणें). -वि. १ भोगण्यास किंवा सोसण्यास योग्य, जरूर, शक्य; अनु- भवनीय. २ उपयोगी; उपभोगण्यासारखें; वापरण्याजोगें. 'कांहीं भोग्य वस्तू गहाण ठेवशील तर व्याज हलकें पडेल.' ३ ग्रहादि- कांनीं आक्रमावयाचा राहिलेला (मार्ग). [सं] भोग्या-पु. १ आंधळी कोशिंबीर; इरगीमिरगी इ॰ खेळांमध्यें सर्वांनीं येऊन ज्यास शिवावयाचें असतें असा मनुष्य, दगड, खांब इ॰. लपंडाव, डोळेझांकणी इ॰ खेळांत दुसर्‍याचे डोळे झांकणारा. २ वेश्येचा उप- भोग घेणारा. 'जसा भोग्या मिळेल तशी रात्र कंठावी.' [भोग] ॰शिवणें-एखाद्याकडून कांहीं प्राप्त करून घ्यावयाचें असतां तें प्राप्त होत नाहीं असें समजलें असतांहि त्यास वारंवार भेटणें, प्रयत्न करणें. ॰भोंवर-पु. निर्लज्जपणें वेश्येच्या नादीं लागलेला पुरुष. म्ह॰ भोग्या भोंवर, लाट्या ओंबर. भोगणें-सक्रि. १ उपभोगणें (सुखदुःख); सोसणें; अनुभविणें; सहन करणें. २ उपयोग करणें; ताबा असणें; वापरणें. ३ उपभोगलें जाणें; मिळलें जाणें. 'त्या कुळाकडून पंचवीस रुपये व्याज आम्हास भोगलें.' -अक्रि. (ना.) संपणें; पूर्ण होणें. 'आज ३० तारीख आहे. आज तुझा महिना भोगला.'

दाते शब्दकोश

दुर्

अ. दुष्टपणा; वाईटपणा, कठिणपणा, दुःख इ॰कांच्या वाचक शब्दापूर्वीं योजावयाचा उपसर्ग. जसें:-दुराचार = वाईट वर्त- णूक; दुर्लभ = मिळण्यास कठिण; दुस्सह = सहन करण्यास कठिण इ॰. याचीं संधिनियमानुरूप दुर्, दुस्, दुष्, दुश् इ॰ रूपें होतात. जसें:- दुर्लभ दुष्कर, दुश्चल, दुस्सह, दुस्साध्य, दुराचार, दुरंत इ. हा उपसर्ग जोडून अनेक सामासिक शब्द बनतात. त्यांपैकीं कांहीं येथें दिले आहेत. दुरंत-वि. १ अपार; अनंत; अमर्याद; अंत लागण्यास कठिण असा (मोह, माया इ॰). २ अतिशय कठिण; तीव्र (दुःख इ॰). [दुर् + अंत = शेवट] दुरतिक्रम-वि. ओलांडून जाण्यास कठिण; दुस्तर; दुर्लंघ्य. २ असाध्य. [दुर् + अतिक्रम = ओलांडणें] दुरत्यय-यी-वि. १ नाश करून टाकण्यास कठिण. २ प्रतिबंध करण्यास, टाळण्यास कठिण; अपरिहार्य. ३ असाध्य (दुःख, आजार, रोग इ॰). अप्रतीकार्य (अडचण, संकट). ४ मन वळ- विण्यास कठिण असा (मनुष्य); दुराराध्य. [दुर् + अत्यय = पार पडणें, जाणें इ॰] दुरदृष्ट-न. दुर्दैव; वाईट अदृष्ट. 'कीं आड आलें दुरदृष्ट माझें ।' -सारुह १.१०. [दुर् + अदृष्ट] दुरधिगम्य- वि. १ समजण्यास कठिण; दुर्बोध; दुर्ज्ञेय. २ दुष्प्राप्य; मिळण्यास कठिण; दुर्गम. [दुर् + सं. अधि + गम् = मिळविणें] दुरभिमान-पु. पोकळ, वृथा, अवास्तव अभिमान; फाजील गर्व. [दुर् + अभिमान] दुरवबोध-वि. दुर्बोध; गूढ. [दुर् + सं. अव + बुध् = जाणणें] दुरा- कांक्षा-स्त्री. दुष्प्राप्य वस्तूचा अभिलाष. [दुर् + आकांक्षा = इच्छा, अभिलाष] दुराग्रह-पु. हट्ट, लोकविरोध, शास्त्रविरोध, संकटें इ॰ कांना न जुमानतां एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरविण्याचा हट्ट; अनिष्ट आग्रह. 'न सुखद दुराग्रह सखा हा सर्वाऽनर्थ गेह ठक राया ।' -मोकर्ण ४६.५०. [दुर् = वाईट + आग्रह = हट्ट] दुराग्रही-वि. दुरा- ग्रह धरण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा; हेकेखोर; हटवादी; हट्टी. [दुराग्रह] दुराचरण, दुराचार-नपु. निंद्य, वाईट, वागणूक; दुर्वर्तन; दुष्ट आचरण. [दुर् = दुष्ट + सं. आचरण = वर्तन] दुराचरणी, दुराचारी-वि. निंद्य, वाईट, दुष्ट वर्तनाचा; बदफैली. [दुराचार] दुरात्मत्व-न. १ दुष्ट अंतःकरण; मनाचा दुष्टपणा. २ दुष्ट कृत्य. 'किमपि दुरात्मत्व घडलें ।' [दुर् = दुष्ट + आत्मा = मन] दुरात्मा- वि. दुष्ट मनाचा (मनुष्य); खट; शठ. [दुर् + आत्मा] दुरा- धर्ष-वि. जिंकण्यास, वर्चस्वाखालीं आणण्यास कठिण. [दुर् + सं. आ + धृष् = जिंकणें] दुराप-वि. मिळविण्यास कठिण; दुर्लभ; अप्राप्य. 'राया, भीष्माला जें सुख, इतरां तें दुराप, गा, स्वापें ।' -मोभीष्म ६.२९. दुराप(पा)स्त-वि. घडून येण्यास कठिण; दुर्घट; असंभाव्य. 'वाळूचें तेल काढणें ही गोष्ट दुरापस्त आहे.' [दुर् + सं. अप + अस् = ] दुराराध्य-वि. संतुष्ट, प्रसन्न करण्यास कठिण, अशक्य; मन वळविण्यास कठिण. 'मोक्षु दुराराध्यु कीर होय । परि तोही आराधी तुझे पाय ।' -ज्ञा ११.९९. [दुर् + सं. आराध्य] दुराशा-स्त्री. निरर्थक, फोल, अवास्तव आशा, दुष्प्राप्य गोष्टीची आशा दुष्ट वासना. 'आम्हास अन्न खावयास मिळेना आणि पालखींत बसण्याची दुराशा धरावी हें चांगलें नव्हे.' 'दुराशागुणें जो नव्हे दैन्यवाणी ।' -राम १६८. [दर् + आशा] दुरासद-वि. कष्टानें प्राप्त होणारें; जिंकण्यास, मिळण्यास कठिण. [दुर् + सं. आ + सद = मिळ विणें] दुरित-न. पाप; पातक; संचितकर्म. 'पुन्हां न मन हे मळो दुरित आत्मबोधें जळो ।' -केका ११९. [दुर् + सं. इ = जाणें] दुरुक्त-न. वाईट, दुष्टपणाचें, अश्लील भाषण; शिवी; अपशब्द; दुर्भाषण; अश्लील बोलणें. [दुर् + उक्ति = बोलणें] दुरुत्तर-न. अप मानकारक, उर्मटपणाचें उत्तर; दुरुक्ति. [दर् + उत्तर] दुरुद्धर-वि. खंडण करण्यास, खोडून काढण्यास कठिण असा (पूर्वपक्ष, आक्षेप, आरोप). 'या सिद्धांतावर दोष दिला हा सर्वांस दुरुद्धर आहे.' [दुर् + सं. उद् + धृ = काढून टाकणें; वर, बाहेर काढणें] दुरूह-वि. दुर्बोध; गूढ; अतर्क्य. 'ईश्वरानें सृष्टि कशी उत्पन्न केली हें सर्वांस दुरूह आहे.' [दुर् + सं. ऊह् = अनुमानणें] दुर्गत-वि. गरीब; दिन; दरिद्री; लाचार. 'झांकी शरपटलानीं आढ्य जसा दुर्गतांसि वस्त्रांनीं ।' -मोभीष्म ९.६५. [दुर् + सं. गत = गेलेला] दुर्गति-स्त्री. १ दुर्दशा; वाईट स्थिति; संकटाची, लाजिरवाणी स्थिति; अडचण; लचांड. २ नरक; नरकांत पडणें. [दुर् + गति = स्थिति] दुर्गंध- गंधी-पुस्त्री. घाण; वाईट वास. -वि. घाण वास येणारें [दुर् = वाईट + सं. गंध = वास] ॰नाशक-वि. (रसा.) दुर्गंधाचा नाश करणारें; (इं.) डिओडरंट्. [दुर्गध + सं. नाशक = नाश करणारा] दुर्गंधिल-वि. (रासा.) आर्सेनिक व मेथिल यांच्या संयोगापासून बनलेला विषारी, दुर्गंधी (पदार्थ) (इं.) कॅको- डिल्. दुर्गम-वि. जाण्यास कठिण (स्थळ, प्रदेश इ॰). [दुर् + सं + गम् = जाणें] दुर्गुण-पु. वाईट गुण; दोष; अवगुण; दुर्मार्गाकडील कल. (क्रि॰ आचरणें). [दुर् + गुण] दुर्गुणी-वि. वाईट गुणांचा; अवगुणी; दुराचरी; दुर्वर्तनी. [दुर्गुण] दुर्घट-वि. धड- वून आणण्यास, घडून येण्यास, सिद्धीस नेण्यास कठिण. [दुर् + सं. घट् = घडणें, घडवून आणणें] दुर्घटना-स्त्री. अशुभ, अनिष्ट गोष्ट घडणें; आकस्मिक आलेलें संकट, वाईट परिस्थिति. [दुर् + सं. घटना = स्थिति] दुर्घाण-स्त्री. दुस्सह घाण; ओरढाण; उग्रष्टाण. [दुर् + घाण] दुर्जन-पु. वाईट, दुष्ट मनुष्य. [दुर् + जन = मनुष्य, लोक] दुर्जय-वि. १ जिंकण्यास कठिण. २ दुस्साध्य; दुस्तर. [दुर + सं. जि = जिंकणें] दुर्जर-वि. पचविण्यास, विरघळ- ण्यास कठिण. [दुर् + सं. जृ = जिरणें] दुर्दम-वि. दमन करण्यास, वर्चस्वाखालीं आणण्यास कठिण. 'तिला इंग्लंडांतील प्रबल व दुर्दम प्रजाजनांच्या अडथळ्याशिवाय दुसरें कोणतेंच नियमन नसे.' -पार्ल ६. [दुर् + दम्] दुर्दर्श-वि. दिसण्यास, पाहण्यास कठिण; अतिशय अस्पष्ट. [दुर् + सं. दृश् = पाहणें] दुर्दशा-स्त्री. अवनतीची, अडचणीची, संकटाची, वाईट, दुःखद स्थिति; दुर्गति; दुःस्थिति. 'भिजल्यामुळें शालजोडीची दुर्दशा जाली.' [दुर् + दशा = स्थिति दुर्दिन-न. १ वाईट दिवस. २ अकालीं अभ्रें आलेला दिवस. ३ वृष्टि. -शर. [दुर् + सं. दिन = दिवस] दुर्दैव-न. कमनशीब; दुर्भाग्य. 'कीं माझें दुर्दैव प्रभुच्या मार्गांत आडवें पडलें ।' -मोसंशयरत्नमाला (नवनीत पृ. ३४९). -वि. कम- नशिबी; अभागी. [दुर् + दैव = नशीब] दुर्दैवी-वि. अभागी; कम- नशिबी. [दुर्दैव] दुर्धर-पु. एक नरकविशेष. [सं.] दुर्धर- वि. १ धारण, ग्रहण करण्यास कठिण. २ दुस्साध्य; दुष्प्राप्य. ३ (काव्य) (व्यापक) बिकट; खडतर; असह्य; उग्र; कठिण. 'तप करीत दुर्धर । अंगीं चालला घर्मपूर ।' ४ भयंकर; घोर; भयानक. 'महादुर्धर कानन ।' [दुर् + सं. धृ = धरणें, धारण करणें] दुर्धर्ष- वि. दुराधर्ष; दमन करण्यास, वर्चस्वाखालीं आणण्यास कठिण; दुर्दम्य; अनिवार्य. [दुर् + धृष् = जिंकणें, वठणीवर आणणें] दुर्नाम- न. अपकीर्ति; दुष्कीर्ति; बदनामी. [दुर् + सं. नामन् = नांव] दुर्नि- मित्त-न. अन्याय्य, निराधार कारण, सबब, निमित्त. [दुर् + निमित्त = कारण] दुर्निर्वह-वि. १ दुःसह; असह्य; सहन करण्यास कठिण; निभावून जाण्यास, पार पडण्यास कठिण (अडचण, संकट). २ दुस्साध्य; दुष्कर; [दुर् + सं. निर् + वह्] दुर्निवार, दुर्निवा- रण-वि. १ निवारण, प्रतिबंध करण्यास कठिण; अपरिहार्य; अनि- वार्य. २ कबजांत आणण्यास कठिण; दुर्दम्य. [दुर् + नि + वृ] दुर्बल-ळ-वि. १ दुबला; अशक्त; असमर्थ. २ गरीब; दीन; दरिद्री. 'ऐसें असतां एके दिवशीं । दुर्बळ द्विज आला परियेसीं ।' -गुच ३८.७. [दुर् + बल = शक्ति] दुर्बळी-वि. (काव्य.) दुर्बळ पहा. दुर्बुद्ध-वि. १ दुष्ट बुद्धीचा; खुनशी वृत्तीचा. २ मूर्ख; मूढ; मंदमति; ठोंब्या. [दुर् + बुद्धि] दुर्बुद्धि-स्त्री. १ दुष्ट मनोवृत्ति; खुनशी स्वभाव; मनाचा दुष्टपणा. 'दुर्बुद्धि ते मना । कदा नुपजो नारायणा ।' -तुगा ७९८. २ मूर्खपणा; अनिष्ट परिणामकारक बुद्धि. -वि. दुष्ट मनाचा; दुर्बुद्ध पहा. [दुर् + बुद्धि] दुर्बोध-वि. समजण्यास कठिण (ग्रंथ, भाषण इ॰) [दुर् + बोध् = समजणें, ज्ञान] दुर्भग-वि. कमनशिबी; दुर्दैवी; भाग्यहीन. [दुर् + सं. भग = भाग्य] दुर्भर-वि. भरून पूर्ण करण्यास कठिण; तृप्त करण्यास कठिण (पोट, इच्छा, आकांक्षा). 'इंद्रियें वज्रघातें तपे उष्ण वरी ज्वाळ । सोसिलें काय करूं दुर्भर हे चांडाळ ।' -तुगा ३५४. -न. (ल.) पोट. 'तरा दुस्तरा त्या परासागरातें । सरा वीसरा त्या भरा दुर्भरातें ।' -राम ८०. [दुर् + सं. भृ = भरणें] दुर्भ्यक्ष्य-वि. खाण्यास कठिण, अयोग्य; अभ्यक्ष्य. [दुर् + सं. भक्ष्य = खाद्य] दुभोग्य-न. कमनशीब; दुर्दैव. -वि. दुर्दैवी; अभागी. [दुर् + सं. भाग्य = दैव] दुर्भावपु. १ दुष्ट भावना; कुभाव; द्वेषबुद्धि. २ (एखाद्याविषयींचा) संशय; वाईट ग्रह; (विरू.) दुष्टभाव. [दुर् + भाव = भावना, इच्छा] दुर्भाषण-न. वाईट, अपशब्दयुक्त, शिवीगाळीचें बोलणें; दुर्वचन पहा. [दुर् + भाषण = बोलणें] दुर्भिक्ष-न. १ दुष्काळ; महागाई. २ (दुष्काळ इ॰ कांत होणारी अन्नसामुग्री इ॰ कांची) टंचाई; कमीपणा; उणीव. [सं.] ॰रक्षित-वि. दासांतील एक प्रकार; आपलें दास्य करावें एतदर्थ दुष्काळांतून वांचविलेला (दास, गुलाम इ॰). -मिताक्षरा-व्यवहारमयूख दाय २८९. [दुर्भिक्ष + सं. रक्षित = रक्षण केलेला] दुर्भेद-वि. बुद्धीचा प्रवेश होण्यास कठिण; दुर्बोध. 'तैसें दुर्भेद जे अभिप्राय । कां गुरुगम्य हन ठाय ।' -ज्ञा ६.४५९. [दुर् + सं. भिद् = तोडणें] दुर्भेद्य-वि. फोडण्यास, तुकडे करण्यास कठिण (हिरा; तट). [दुर् + सं. भेद्य = फोडण्यासारखा] दुर्मति-स्त्री. १ दुर्बुद्धि; खाष्टपणा; कुटिलपणा. २ मूर्खपणा; खूळ; वेडेपणा. -पु. एका संवत्सराचें नांव. -वि. १ दुष्ट बुद्धीचा; खाष्ट स्वभावाचा. २ मूर्ख; खुळा; वेडा. [दुर् + मति = बुद्धि, मन] दुर्मद-पु. दुराग्रहीपणा; हेकेखोरी; गर्विष्ठपणाचा हटवादीपणा. 'किती सेवाल धन दुर्मदा' -अमृतपदें ५८. -वि. मदांध; मदोन्मत्त; गर्विष्ठ. 'सावियाचि उतत होते दायाद । आणि बळिये जगीं दुर्मद ।' -ज्ञा ११.४८०. [दुर् + मद = गर्व] दुर्मनस्क, दुर्मना-वि. खिन्न; उदास मनाचा; विमनस्क; दुःखित. [दुर् + सं. मनस् = मन] दुर्मरण-न (वाघानें खाऊन, पाण्यांत बुडून, सर्प डसून इ॰ प्रकारांनीं आलेला) अपमृत्यु; अपघातानें आलेलें मरण; अमोक्षदायक मरण. [दुर् + मरण] दुर्मि(र्मी)ल-ळ- वि. मिळण्यास कठिण; दुर्लभ. [दुर् + सं. मिल् = मिळणें] दुर्मुख- पु. एका संवत्सराचें नांव. -वि. १ घुम्या; कुरठा; तुसडा; आंबट तोंडाचा. २ तोंडाळ; शिवराळ जिभेचा. 'दुर्मुखी स्त्रीचा त्याग करून । संन्यास ग्रहण करावा ।' [दुर् + मुख] दुर्मुखणें- अक्रि. तोंड आंबट होणें; फुरंगुटणें; गाल फुगविणें; (एखाद्या कार्याविषयीं) उत्साहशून्यतेची चर्या धारण करणें. 'खायास म्हटलें म्हणजे हांसत येतात आणि उद्योगाचें नांव घेतलें म्हणजें लागलेच दुर्मुखतात.' [दुर्मुख] दुर्मुखला-वि. आंबट चेहर्‍याचा; घुम्या; कुरठा; तुसडा. [दुर्मुख] दुर्मेधा-वि. १ मंदबुद्धीचा. २ दुष्ट स्वभावाचा; दुर्मति. [दुर् + सं. मेधा = बुद्धि] दुर्योग-पु. सत्ता- वीस योगांतील अशुभ, अनिष्ट योगांपैकीं प्रत्येक. [दुर् + योग] दुर्लंघ्य-वि. १ ओलांडता येण्यास कठिण; दुस्तर (नदी इ॰). २ मोडता न येण्यासारखी, अनुल्लंघनीय (आज्ञा, हुकूम, शपथ इ॰) ३ निभावून जाण्यास कठिण (संकट, अडचण इ॰). ४ घालविण्यास, दवडण्यास, क्रमण्यास, नेण्यास कठिण (काळ, वेळ इ॰). [दुर् + सं. लंघ्य = ओलांडावयाजोगें] दुर्लभ-वि. मिळण्यास कठिण; अलभ्य; दुर्मिळ; दुष्यप्राप्य; विरळा. 'अलीकडे आपलें दर्शन दुर्लभ जालें. दुर्ललित-न. चेष्टा; खोडी. 'आमच्या विविध दुर्ललिताबद्दल गुरुजींनीं कसें शासन केलें...' -आश्रमहारिणी ७. [दुर् + सं. ललित = वर्तन, चेष्टा] दुर्लक्ष-न. लक्ष नसणें; हयगय; निष्काळजी- पणा; गफलत; अनवधान. -वि. १ लक्ष न देणारा; अनवधानी; गाफील; बेसावध, 'तुम्ही गोष्ट सांगीतली पण मीं दुर्लक्ष होतों म्हणून ऐकिली नाहीं.' २ दिसण्यास, समजण्यास कठिण; 'ईश्वराचें निर्गुण स्वरूप दुर्लक्ष आहे.' [दुर् + सं. लक्ष्य] दुर्लक्षण- न. १ (मनुष्य, जनावर इ॰ कांचें) अशुभसूचक लक्षण, चिन्ह; दुश्चिन्ह; दोष; वाईट संवय; खोड; दुर्गुण. 'हा घोडा लात मारतो एवढें यामध्यें दुर्लक्षण आहे.' [दुर् + लक्षण = चिन्ह] दुर्लक्षण-णी- वि. १ दुर्लक्षणानें, वैगुण्यानें युक्त (मनुष्य, घोडा इ॰). (विरू.) दुर्लक्षणी. २ दुर्गुणी; दुराचारी; दुर्वर्तनी. दुर्लक्ष्य-वि. १ बुद्धीनें, दृष्टीनें अज्ञेय; अगम्य. २ दुर्लक्ष इतर अर्थीं पहा. [दुर् + सं. लक्ष्य] दुर्लौकिक-पु. अपकीर्ती; दुष्कीर्ति; बेअब्रू; बदनामी; कुप्रसिद्धि. [दुर् + लौकिक = कीर्ति] दुर्वच, दुर्वचन, दुर्वाक्यन. १ वाईट बोलणें; दुर्भाषण; अशिष्टपणाचें, अश्लील, शिवीगाळीचें भाषण. २ अशुभ, अनिष्टसूचक भाषण. [सं. दुर् + वचस्, वचन, वाक्य = बोलणें] दुर्वह-वि. १ वाहण्यास, नेण्यास कठिण. २ सोसण्यास, सहन करण्यास कठिण. [दुर् + सं. वह् = वाहणें, नेणें] दुर्वाड- वि. अतिशय मोठें; कठिण. -शर. प्रतिकूल. [दुर् + वह्] दुर्वात- उलट दिशेचा वारा. 'तुज महामृत्युचिया सागरीं । आतां हे त्रैलोक्यजीविताची तरी । शोकदुर्वातलहरी । आंदोळत असे ।' -ज्ञा ११.३४८. [दुर् + सं. वात = वारा] दुर्वाद-पु. वाईट शब्द; दुर्वच; वाईट बोलणें; भाषण. 'हां गा राजसूययागाचिया सभासदीं । देखतां त्रिभुवनाची मांदी । कैसा शतधा दुर्वादी । निस्तेजिलासी ।' -ज्ञा ११.१०१. [दुर् + वाद = बोलणें] दुर्वारवि. दुर्निवार; अनिवार्य; टाळण्यास, प्रतिकार करण्यास कठिण; अपरिहार्य. २ आवरतां येण्यास कठिण; अनिवार; अनावर. [दुर् + वारणें] दुर्वास-पु. १ (व.) सासुरवास; कष्ट; त्रास; जाच. [दुर् + वास = राहणें] दुर्वासना-स्त्री. वाईट इच्छा; कुवासना; दुष्प्रवृत्ति. [दुर् + वासना] दुर्विदग्ध-वि. विद्येंत न मुरलेला तथापि विद्येचा गर्व वाहणारा; अर्ध्या हळकुंडानें; पिवळा झालेला. [दुर् + सं. विदग्ध = विद्वान्] दुर्विपाक-पु. वाईट परिणाम. [दुर् + सं. विपाक = परिणाम] दुर्विभावनीय-वि. समजण्यास, कल्पना करण्यास कठिण. [दुर् + सं. विभावनीय = कल्पना करतां येण्यासारखें] दुर्वृत्ति-स्त्री. दुराचारी; दुर्व्यसनी; दुर्वर्तनी. [दुर् + सं. वृत्त = वागणूक] दुर्वत्ति-स्त्री. दुराचरण; भ्रष्टाचार; बदफैली. [दुर् + सं. वृत्ति = वर्तन] दुर्व्यसन-न. दुराचरणाची संवय; द्यूत, मद्यपान, वेश्यागमन इ॰कांसारखें वाईट व्यसन. 'दुर्व्यसन दुस्तरचि बहु सूज्ञासहि फार कंप देतें हो' -वत्सलाहरण. [दुर् + व्यसन] दुर्व्यसन-नी-वि. वाईट व्यसन, संवय लागलेला; दुराचारी; बदफैली. (प्र.) दुर्व्यसनी. दुर्व्रात्य-वि. अतिशय दुष्ट; व्रात्य; खोडकर; खट्याळ; (मुलगा अथवा त्यांचें आचरण). [दुर् + व्रात्य = खोडकर, द्वाड] दुर्हृद, दुर्हृदय-वि. वाईट, दुष्ट मनाचा. [दुर् + सं. हृदु, हृदय = मन] दुर्ज्ञेय-वि. समजण्यास कठिण; गूढ; गहन. 'ही पद्धत कशी सुरू झाली असावी हें समजणें दुर्ज्ञेय आहे.' -इंमू ७६. [दुर् + सं. ज्ञेय = समजण्याजोगें] दुःशक- वि. करण्यास कठिण; अशक्यप्राय. [दुस् + सं. शक् = शकणें] दुःशकुन-पु. अपशकुन; अनिष्टसूचक चिन्ह. [दुस् + शकुन] दुश्शील, दुःशील-वि. वाईट शीलाचा; दुराचरणी. [दुस् + शील] दुश्चरित्र-न. पापाचरण; दुष्कृत्य. [दुस् + चरित्र] दुश्चल-वि. (अक्षरशः व ल.) पुढें जाण्यास, सरसावण्यास, चालण्यास कठिण. [दुस् + सं. चल् = चालणें] दुश्चि(श्ची)त-वि. १ (काव्य) अयोग्य, चुकीचा, अपराधी (माणूस, कृत्य). 'अंगुष्ठ धरुनि मस्तकपर्यंत । अखंड दुश्चित आचरलों ।' २ खिन्न; उदास; दुःखी. 'राजा प्रजा पिडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ।' -तुगा २९८४. [सं. दुश्चित अप.] दुश्चित्त-वि. १ खिन्न; दुर्मनस्क; दुःखित; उदास; उद्विग्न. 'अबदुल्याची खबर ऐकतां मनांत झाले दुश्चित ।' -ऐपो १३२. २ क्षुब्ध. 'परी कुंडलिनी नावेक दुश्चित्त होती । ते तयातें म्हणे परौती ।' -ज्ञा ६.२३८ [दुस् + चित्त = मन] दुश्चिंत- वि. (काव्य) खिन्न; दुःखी; उदास; दुश्चित्त अर्थ २ पहा. 'डोळे लावुनियां न होतों दुश्चिंत । तुझी परचीत भाव होती ।' [दुश्चित अप.] दुश्चिन्ह-न. अशुभ, वाईट लक्षण; अपशकुन. 'दुश्चिन्हें उद्भवलीं क्षितीं । दिवसा दिवाभीतें बोभाति ।' [दुस् + चिन्ह] दुश्शाप-पु. वाईट, उग्र, खडतर शाप. [दुस् + शाप] दुश्शासन-पुविना. दुर्योधनाचा भाऊ. -वि. व्यवस्था राख- ण्यास, अधिकार चालविण्यास कठिण. [दुस् + शासन = अधिकार चालविणें] दुष्कर-वि. १ करण्यास कठिण; बिकट; अवघड. 'म्हणोनि अभ्यासासि कांहीं । सर्वथा दुष्कर नाहीं ।' -ज्ञा १२.११३. २ दुष्परिणामकारक. -मोल. [दुस् + सं. कृ = करणें] दुष्कर्म-न. वाईट, पापी, दुष्टपणाचें कृत्य; कर्म. [दुस् + कर्म] दुष्कर्मा, दुष्कर्मी-पु. दुष्ट कृत्य करणारा; पापी; दुरात्मा. [दुस् + कर्मन्] दुष्काल-ळ-पु. अतिवृष्टि किंवा अनावृष्टि होऊन पिकें बुडून अन्नाची वाण पडते तो काळ; दुकाळ; महागाई. 'जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला । कां भणगा दुष्काळु पाहला ।' -ज्ञा ११.४२८. [दुस् + काल] म्ह॰ दुष्काळांत तेरावा महिना = दुष्का- ळांत वर्षाचे बारा महिने काढतां काढतांच मुष्कील पडते. अशा वेळीं अधिक मास (तेरावा महिना) आला म्हणजे संकटातं भर पडते असा अर्थ. दुष्कीर्ति-स्त्री. अपकीर्ती; बदनामी; बेअब्रू. [दुस् = कीर्ति] दुष्कृत-ति-नस्त्री. १ पापकर्म; वाईट कृत्य. 'आणि आचरण पाहातां सुभटा । तो दुष्कृताचा कीर सेल वांटा ।' -ज्ञा ९.४१६. २ कृतींतील. वागणुकींतील दुष्टपणा. [दुस् + कृत- ति] दुष्प्रतिग्रह-पु. जो प्रतिग्रह (दानाचा स्वीकार) केला असतां, स्वीकारणारा अधोगतीस जातो तो; निंद्य प्रतिग्रह; अशुभप्रसंगीं केलेलें दान स्वीकारणें; वाईट कृत्याबाबत स्वीकारलेलें दान इ॰. उदा॰ वैतरणी, शय्या, लोखंड, तेल, म्हैस हे दुष्प्रतिग्रह होत. [दुस् + सं. प्रतिग्रह = दान स्वीकारणें] दुष्प्राप-प्य-वि. दुर्लभ; मिळण्यास कठिण; विरळा; दुर्मिळ. [दुस् + सं. प्र + आप् = मिळ- विणें] दुस्तर-वि. तरून जाण्यास, पार पडण्यास कठिण. 'समुद्रापेक्षां हा संसार मला दुस्तर वाटतो.' -न. (ल.) संकट. 'थोर वोढवलें दुस्तर । तुटलें सासुरें माहेर ।' -एरुस्व ८.५५. [दुस + सं तृ = तरणें] दुस्पर्श-वि. स्पर्श करण्यास कठिण, अयोग्य. [दुस् + सं. स्पृश् = स्पर्श करणें] दुस्संग-पु. दुष्टांची संगत; कुसंगति. [दुस् + संग] दुस्सह-वि. सहन करण्यास कठिण; असह्य. [दुस् + सं. सह् = सहन करणें] दुस्सही-वि. (प्र.) दुस्सह स्सह अप.] दुस्साध्य-वि. १ सिद्धीस नेण्यास, साधावयास कठिण. 'थोर वय झाल्यावर विद्या दुःसाध्य होते.' २ बरा करण्यास कठिण (रोग, रोगी). आटोक्यांत आणण्यास कठिण (शत्रु, अनिष्ट गोष्ट, संकट इ॰). [दुस् + सं. साध्य = साधण्यास सोपें] दुस्स्वप्न-न. १ अशुभसूचक स्वप्न. २ (मनांतील) कुतर्क, आशंका, विकल्प. [दुस् + स्वप्न] दुस्स्वभाव-पु. वाईट, दुष्ट स्वभाव. -वि. वाईट, दुष्ट स्वभावाचा. [दुस् + स्वभाव]

दाते शब्दकोश

पर

न. १ ब्रह्म; परमेश्वर. 'पर सुखाची उर्मी ।' -ऋ १. २ वस्तु (ब्रह्म). 'आतां अर्जुना आणिक कांहीं एक । सांगेन मी आइक । जे विचारें पर लोक । वोळखिती ।' -ज्ञा २.१२५. ३ -पु. शत्रु; अरि. 'कुरु कटकाला बहु भय देती गर्जुनि सिंहसे पर ते ।' -मोभीष्म ५.६२. [सं.] -वि. १ आत्मीय नव्हे असा; परका; परकीय; विदेशी. (समासांत) परचक्र-देश-मुलुख इ॰ २ दुसरा; इतर; भिन्न; निराळा; वेगळा. 'आप आणि पर नाहीं दोन्ही ।' -तुगा २११७. 'कपटादरें वळो पर, परि परमेश्वर कसा वळेल हरी ।' -मोउद्योग ७.१०. ३ संबंध असलेला; अनुसरणारा; (एखाद्यास) वाहिलेला; आधिन; जोडलेला. 'ज्ञानपर शास्त्र तुम्ही कर्मपर लावूं म्हणतां तर लागणार नाहीं.' 'लोकनिंदापर भाषण करूं नयें.' ४ अद्भुत; असाधारण; अपूर्व. ५ श्रेष्ठ; उच्च; थोर. 'जो पतीहून पर ।' -रास १.२६७. ६ नंतरचा. -क्रिवि. पलीकडे. 'ईश्वर स्वरूप मायेचे पर आहे.' ज्याच्या पूर्वपदीं हा शब्द येतो असे अनेक तद्धित व सामासिक शब्द आहेत. त्यांतील कांहीं पुढें दिले आहेत. परका-खा-वि. १ दुसरा; बाहेरचा; परकीय; अनो- ळखी (माणूस). २ नवीन; निराळी; वेगळी (वस्तु) [सं. परकीय] परकाई-खाई-स्त्री. १ परकेपणा (माणसाचा). २ नवलाई; नावीन्य (वस्तूचें). [परका] ॰कामिनी-स्त्री. दुसऱ्याची बायको; परदारा; परस्त्री. 'मन हें ओढाळ गुरूं परधन परकामिनीकडे धावें ।' -मोरोपंत (कीर्तन १.२४.) ॰काय(या)प्रवेश-पु. मंत्रादि सिद्धीनें आपला देह सोडून एखाद्या प्रेतांत किंवा दुसऱ्याच्या देहांत शिरणें; ती विद्या. परकी, परकीय-वि. १ परका पहा. अनोळखी; नवीन (माणूस). २ दुसऱ्यासंबंधीं; दुसऱ्याचा. परकीया-स्त्री. दुसऱ्याची बायको (प्रेमविषयक तीन वस्तूंपैकीं एक). ॰कोट-पु. एक तटाच्या बाहेरचा दुसरा तट; पडकोट. ॰क्रांति-स्त्री. (ज्यो.) क्रांतिवृत्ताचा वांकडेपणा. ॰गति-स्त्री. स्वर्ग. 'परगति पावों पाहसि, पर पदरीं फार पाहिजे शुचिता ।' -मोआदि २४.५६. ॰गमन-न. स्वस्त्री किंवा पति सोडून दुसऱ्याशीं व्यभिचार करणें; व्यभिचार. ॰गृह-घर-न. १ दुसऱ्याचें घर. २ दुस- ऱ्याच्या घराचा आश्रय घेणें. 'तो फार गर्भश्रीमंत आहे, त्याला परगृह माहीत नाहीं.' ३ व्यभिचार; परगमन पहा. ॰घर निवारण-न. इतःपर दुसऱ्याच्या मदतीची आवश्यकता न पडेल अशी स्थिति (देणगी). ॰गोत्री-वि. निराळ्या गोत्राचा. 'श्राद्धास परगोत्री ब्राह्मण बोलवावे.' ॰चक्र-१ स्वारी करणारें सैन्य. २ शत्रूची स्वारी, हल्ला, चढाई. 'परचक्र कोठें हरिदासांच्या वासे । न देखिजे तद्देशे राहातिया ।' -तुगा ६४६. ३ परकीय अंमल, ताबा. ॰छंद-वि. दुसऱ्याच्या स्वाधीन, ताब्यांत अस- लेला; दुसऱ्याच्या तंत्रानें मर्जीनें चालणारा; पराधीन. ॰तंत्र- वि. १ दुसऱ्याच्या स्वाधीन, ताब्यांत असलेला; दुसऱ्याच्या तंत्रानें चालणारा. २ (ल.) शरीर. 'हा लोकु कर्में बांधिला । जो पर तंत्रा भूतला । तो नित्ययज्ञातें चुकला । म्हणोनियां ।' -ज्ञा ३.८४. ॰तत्त्व-न. परब्रह्म. 'तैसी प्रकृति हे आड होती । ते देवेंचि सारोनि परौती । मग परत्व मझिये मती । शेजार केलें ।' -ज्ञा ११.७६. ॰तीर-न. (नदी इ॰च्या) पलीकडचा, दुसरा कांठ, तीर. ॰त्र-न. १ परलोक; याच्या उलट अरत्र. 'म्हणोनि देवो गोसावी । तो धर्माधर्मु भोगवी । आणि परत्राच्या गांवी । करी ते भोगी ।' -ज्ञा १६; ३०६; -दा २.४.१९. २ (महानु.) परमे- श्वर पद; परमार्थ. 'कव्हणी परत्र पाहौनि न बोले । निःप्रपंचु ।' -ऋ ४४. -क्रिवि. नाहींतर; अन्यथा; अन्यत्र. ॰त्रगति-स्त्री. दुसरी स्थिति; परलोक; स्वर्ग. (क्रि॰ साधणें; होणें; मिळणें). ॰त्र साधन-न. परलोक किंवा स्वर्ग मिळविणें. ॰त्व-न. १ दूरपणा; पलीकडे असणें. २ परकेपणा; दुजा भाव. ३ दुसरेपणा. 'म्हणोनि परत्वें ब्रह्म असें । तें आत्मत्वें परियवसे । सच्छब्द या रिणादोषें । ठेविला देवें ।' -ज्ञा १७.३७७. ॰थडी-परतीर पहा. 'त्यासि भवार्णवपरथडी । तत्काळ रोकडी मी पाववीं ।' -एभा १७.४४०. 'क्रमावी पावोनि परथडी ।' -सिसं ८.२७२. ॰थळ्या-वि. परस्थ. 'पंच ब्राह्मण वगैरेस विडे देऊन नंतर परथळ्या कोणीं असल्यास त्यास विडा देतात.' -बदलापूर ३७. [पर + स्थल] ॰दरबार-न. पेशव्यांच्या बरोबरीच्या राजांस किंवा त्यांच्या वकीलांस वगैरे पेशव्यांकडून दिलेल्या नेमणुका, जवाहीर, कापड वगैरे नोंदण्याचें हिशेबाचें सदर. ॰दार-पु. दुसऱ्याची बायको. [सं. परदारा] ॰दार-न. परद्वार; व्यभिचार परद्वार पहा. ॰दारगामी-वि. परदारा भोगणारा; व्यभिचारी. ॰दारा-स्त्री. दुसऱ्याची बायको; परदार. 'परदारादिक पडे । परी विरुद्ध ऐसें नावडे । मग शेळियेचेनि तोंडें । सैंघ चारी ।' -ज्ञा १४.२२९. 'परदारा परधन । आम्हां विषसमान ।' ॰दुःखेन दुःखित-वि. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखित होणारा. 'परदुःखेन दुःखिता विरला.' ॰देश-पु. १ स्वदेशाहून भिन्न देश; परकीय देश. २ दुसऱ्या देशांत केलेला प्रवास. ॰देशी-पु. १ परका; दुसऱ्या देशांतील माणूस; स्वदेश सोडून परदेशांत आलेला मनुष्य इ॰ २ उत्तरहिंदुस्थानी माणूस; पुरभय्या. -वि. परका. दुसऱ्या देशांतील (माल) ॰द्वार-न. १ परदारागमन पहा. स्वस्त्रीखेरीज अन्य स्त्रीशीं (वेश्या सोडून) गमन करणें; व्यभि- चार. 'वालभे परद्वार केलें । कोढी कोणी होय ।' -ज्ञा १६.३०५. २ पतीखेरीज अन्य पुरुषाशीं कुलीन स्त्रीनें केलेलें गमन; जारकर्म. (क्रि॰ करणें) 'घरस्वामि सोडुनी नारि ज्या परद्वार करिती ।' -होला १६६. ॰द्वारी-वि. व्यभिचारी; जारकर्म कराणारी (स्त्री, पुरुष). 'मैद भोंदु परद्वारी । भुरटेकरी चेटकी ।' -दा २.३.३१. ॰धन-न. १ दुसऱ्याचा पैसा. 'परदारा परधन । आम्हां विषस- मान ।' २ (ल.) मुलगी. कारण लग्न झाल्यावर ती परक्याची होते. ॰धारजिणा-वि. (निंदार्थी) दुसऱ्याच्या उपयोगीं पडणारा; दुसऱ्याला फायदेशीर, उपकारक (स्त्री, मुलगा, नोकर). ॰नार-नारी-स्त्री. दुसऱ्याची बायको. 'परधन परनारी । आम्हां विषाचिया परी ।' 'परनार विषाची धार घात करि जीवा ।' ॰न्यास-वि. वाटेल त्यास शिव्या इ॰ देण्यास लावणारा. (एक वातविकार). ॰पाकरुचि-वि. नेहमीं दुसऱ्याच्या घरीं जेवणारा; परान्नभोजी. [पर + पाक + रुचि] ॰पांडित्य-न. (निंदार्थी) (स्वतः त्याप्रमाणें न वागतां) दुसऱ्याला उपदेश करणें. ॰पार-पु. १ पलीकडचा कांठ-किनारा; परतीर. 'तेथ भक्त संत सज्ञान नर । स्वयें पावविशी परपार ।' -एभा २०.५. २ (भवाच्या पलीकडचा तीर) मोक्ष. 'जेणें पाविजे परपार । तिये नावं यात्रा पवित्र ।' -एभा २१.५८. ॰पीडा-स्त्री. १ दुसऱ्याला त्रास, दुःख देणें. 'परपीडेसारखें पाप नाहीं.' (क्रि॰ करणें; देणें). २ दुसऱ्याचें दुःख. ॰पुरुष-पु. १ परका माणूस. २ (बायकी) नवरी, भाऊ, इ॰ जवळचे आप्त सोडून इतर माणूस. ३ ईश्वर; परमेश्वर. ॰पूर्व स्त्री-स्त्री. स्वैरिणी. व्यभिचारिणी स्त्री. ॰पेठ-स्त्री. १ दुसरें गांव. २ हुंडीची तिसरी प्रत; एक हुंडी गहाळ झाली असतां दुसरी देतात तिला पेठ म्हणतात व तीहि गहाळ झाली तर जी तिसरी देतात ती. ॰बुद्धि-स्त्री. दुसऱ्याची बुद्धि, अक्कल. -वि. दुसऱ्याच्या बुद्धीनें, तंत्रानें चालणारा. ॰भाग्योपजीवी-वि. दुसऱ्याच्या नशीबावर जगणारा; आश्रित; पोष्य; पराधीन. ॰मार-पु. दुसऱ्याच्या नाश. 'प्रतिष्ठीन परमारु । यागवरी ।' -ज्ञा १६.३६०. ॰मार्ग-पु. १ परमेश्वराचा मार्ग; परमार्थ. 'जेथ कैवल्य वस्तु सांटवे । परमार्गु वाहाति सदैवें । जेआंलागिं ।' -ऋ १००. २ महानुभाव धर्म. 'तो नमस्करूं परमार्गु । दातारांचा ।' -ऋ ६. ॰मुलूख-पु. परदेश. ॰रत-वि. व्यभिचारी (स्त्री, पुरुष). ॰राज्य-न. १ दुसऱ्यांचें, परक्या लोकांचें राज्य; परकीय सरकार. २ परकीय लोकांचा अंमल, ताबा. याच्या उलट स्वराज्य. ॰रूपसंधि-पु. (व्या.) दोन्ही स्वरांच्या जागीं पुढला स्वर मात्र होतो असा संधि. ॰लक्ष्मी नारायण-वि. उसन्या, दान मिळालेल्या संपत्तीवर डौल मिरवणारा. ॰लोक-पु. १ मृत्यू- नंतर प्राप्त होणारा लोक, ठिकाण (स्वर्ग, नरक, इ॰); मृत्यूनंतरची स्थिति. २ (व्यापक) अक्षय सुखकल्याणाच्या जागा प्रत्येकीं (कैलास, वैकुंठ. इ॰) ॰लोकवासी होणें-मरणें; मृत्यु पावणें. ॰वधू-स्त्री. दुसऱ्याची भार्या; परदारा. ॰वश-वि. दुसऱ्याच्या ताब्यांत असणारा; पराधीन; परतंत्र. ॰वशता-स्त्री. पारतंत्र्य; पराधीनता. 'फारचि बरी निरयगति, परवशता शतगुणें करी जाच ।' -मोविराट १.५६. ॰वस्तु-स्त्री. १ उत्कृष्ट वस्तु; श्रेष्ठ वस्तु. 'विद्येसारखी परवस्तु नाहीं.' -न. परब्रह्म. [सं.] ॰शय्या- स्त्री. व्यभिचार; परपुरुषाशीं त्याच्याच घरीं संग करणें. ॰शास्त्र- न. (महानु.) श्रेष्ठ शास्त्र; ब्रह्मविद्या; अध्यात्म. 'आक्षेप परिहारीं निर्धारू । करितां परशास्त्र विचारू ।' -ऋ २३. ॰स्त-स्थ-वि. १ परक्या गावांत किंवा देशांत रहाणारा; परगांवचा. २ (ल.) तटस्थ; तिऱ्हाईत; निःपक्षपाती. ॰स्त्री-स्त्री. आपल्या स्त्रियेवांचून इतर स्त्री; दुसऱ्याची बायको. 'नका लाऊं जिवलगा प्रीत तुम्ही परस्त्रीचे ठाई ।' -होला १०८. ॰स्थळ-न. दुसरी जागा, स्थळ. (ज्याच्या विरुद्ध निकाल झाला तो दुसरी कडील निका- लाची खटपट करतांना वापरतो). ॰स्व-न. दुसऱ्याची मालमत्ता, धन. ''नातरी परस्वापहारें । जें सुख अवतरे ।' -ज्ञा १८.८०७. ॰स्वाधीन-वि. परतंत्र; परवश. म्ह॰ परस्वाधीन जिणें व पुस्तकी विद्या उपयोगी नाहीं. ॰हस्तगत-वि. दुसऱ्याच्या हातांत गेलेलें.

दाते शब्दकोश

लोक

पु. १ जन; मनुष्य; मानवजात; जनता; समाज. 'तूं मात्र शहाणा, लोक काय वेडे आहेत?' (सामा.) लोक- मर्यादा-रीति-लज्जा इ॰ (बहुधां अनेकवचनी प्रयोग). २ वर्ग; विशिष्ट समाज, संघ; जाता; (या अर्थीं पूर्वशब्दाशीं समास होऊन उपयोग.) उदा॰ ब्राह्मणलोक, शू्द्रलोक, गवईलोक, शिपाईलोक, देवलोक, पिशाचलोक इ॰ ३ राष्ट्र; देश; राज्य; प्रांत. 'प्रौढ होतां संपूर्ण लोक आले खरेच उदयाला ।' -ऐपो ३०४. -एभा १०. ६०४. ४ राजे, सरदार इ॰ कांजवळ किल्ला, शहर इ॰कांचें रक्षण करण्याकरतां ठेवलेलीं माणसें; सैन्य; संत्री; शिपाईनोकर. ५ भुवन; जग; मानवजात; समूह. 'देहक्रिया आवघी । न करविता होय बरवी । जैसा न चलतेनि रवी । लोकु चाले ।' -ज्ञा ८.१८७. ६ परका माणूस; तिऱ्हाईत इसम; अनोळखी मनुष्य. 'आज आपल्याकडे लोक आले आहेत.' ७ मनुष्य; इसम; माणूस. 'जो दाखवील मजला कृष्णार्जुन तो न लोक सामान्य ।' -मोकर्ण २६. १८. ८ जगाचे, विश्वाचे भाग. प्रामुख्यानें तीन लोक आहेत. स्वर्गलोक, मर्त्य किंवा मृत्युलोक, आणि पाताळलोक. पुढील सप्त- लोकहि मानण्यांत येतात. भूलोक, भुवर्लोक, स्वर्लोक, महर्लोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक. ह्यांशिवाय प्रत्येक देवतेचा एकेक लोक कल्पिलेला आहे. उदा॰ इंद्रलोक, चंद्रलोक, ब्रह्मलोक, विष्णु- लोक इ॰ 'जैं लोकांचीये व्यवस्था न पडे । जैं या त्रिभुवनाचें कांहीं न मांडे ।' -ज्ञा १०.९५. ९ सद्गति; स्वर्गलोक; मरणोत्तर चांगली अवस्था. 'मनुवंशीं जन्मुनियां जालों अनपत्य मीं न लोक मला ।' -मोमंत्ररामायण बालकांड २०. १० प्रदेश; ठिकाण. 'अवधड स्थळीं कठीण लोक । तेथें राहणें नेमक ।' -दा १५.२. २४. [सं.] म्ह॰ १ लोकां सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण = लोकांना उपदेश करावयाचा व स्वतः मात्र त्याप्रमाणें वागा- वयांचे नाहीं. २ लोक आणि ओक. = लोकमत हें अतिशय वाईट, तिरस्करणीय, ओकारीप्रमाणें त्याज्य असें जाहे, या अर्थी उपयोग. लोकांचीं घरें (किंवा दारें) पुजणें-सारखें लोकांच्या घरीं जाणें; या घरांतून त्या घरांत असें नेहमीं लोकाकडे जाणें. सामाशब्द- ॰कथा-स्त्री. १ दंतकथा; लोकांत प्रचलित अस- लेली परंतु ऐतिहासिक आधार नसलेली गोष्ट; कल्पित गोष्ट; परंपरागत गोष्ट. २ एक प्रकारचें वाङ्मय. प्राचीन काळापासून लोकांच्या तोंडीं असलेल्या गोष्टी, कहाण्या; लौकिक सारस्वत. (इं) फोकलोअर. ॰गंगा-स्त्री. समाज; लोकसमुदाय. 'जात- गंगेला व लोकगंगेला भ्यालें पाहिजे.' -भाऊ १९. ॰गान-न. ज्ञानपदगीत; खेडवळ लोकांचें गाणें. ॰ग्रह-पु. लोकमत; लोकांची एखाद्या गोष्टीविषयींची समजूत, कल्पना. ॰चर्चा-स्त्री. जनते- मधील चर्चा; गप्पा; लोकांत चर्चिली किंवा बोलली जाणारी गोष्ट. ॰जवाई-पु. (ना.) जांवई. -शर. ॰तंत्र-न. लोकमत; जनतेचा कल; प्रजेचें म्हणणें, प्रवृत्ति. 'सरकारनें लोकतंत्रानेंच राज्यकार- भार हांकावा.' -केसरी २.१२.३०. -वि. लोकनुवर्ती; लोकांना जबाबदार. 'सरकार हें अधिक लोकतंत्र झालें पाहिजें.' -केले १.६४. ॰त्रय-न. तीन लोक; स्वर्ग, मृत्यु व पाताळ. ॰धार- जिणा-वि. १ लोकमताला मानून वागणारा (परंतु स्वतःच्या किंवा धन्याच्या हिताबद्दल निष्काळजी); स्वतःच्यापेक्षां, स्वकी- यांच्यापेक्षां लोकांच्या हिताला जपणारा. २ लोकांची काळजी करणारा; लोकाभिमुख. ॰नाथ-पु. १ एक औषधी रसायन. २ राजा; देव. 'लोकनाथ, जगन्नाथा. प्राणनाथा पुरातना ।' -मारुतिस्तोत्र. ॰नायक-पु. लोकांचा पुढारी. 'लोकनायकाचें कर्तव्य फारच खडतर आहे.' -टि १.४६७. ॰नियुक्त-वि. लोकांनीं नेमलेला, निवडलेला. ॰नीति-स्त्री. लोकरीत; वागण्याची सामान्य पद्धत; समाजास मान्य गोष्ट; प्रघात; चालरीत. ॰नुत-वि. लोकांकडून प्रशंसा केला गेलेला; लोकांनीं स्तविलेला. ॰परी-स्त्री. लोकरीत. 'लोकपरीनें वर्तती जनीं ।' -दावि २६६. ॰पक्ष-पु. लोकांची बाजू; प्रजापक्ष. याच्याविरुद्ध राजपक्ष, सर- कारपक्ष. 'फेरोजशहांनीं आणीबाणीच्या प्रसंगीं लोकपक्ष संभा- ळला.' -टि १.४२२. ॰पाल-ळ-पु. १ राजा; प्रजेचा पालन कर्ता; नृप. 'म्हणवितां स्वतां लोकपाळा !' -विक ४०. २ इंद्र, यम इत्यादि लोकाचा स्वामी; अष्टदिक्पाल पहा. 'इहीं लोकपाळ केले । लोकपाळीं विविध, लोक स्त्रजिले ।' -ज्ञा १०.१०२; -एभा १०.६०३. ॰प्रवाद-पु. बातमी; लोक- वार्ता; वदंता; किंवदंती; जनप्रवाद (सामान्यत: वाईट अर्थानें). 'लोकप्रवाद कायकाय कंड्या पिकवील तें सांगतां येत नाहीं.' -नि ४३४. ॰प्रवाह-पु. सर्वसाधारण चालरीत, वागणूक; लोक- रीत. ॰प्रशस्त-वि. लोकसंमत; लोकमान्य; रुढीला धरुन. अस- लेला. ॰प्रसिद्ध-वि. १ सर्वप्रसिद्ध; लोकांमध्यें अतिशय माहित असलेला; लोकांमध्यें प्रचलित. २ सर्वसाधारण; सामान्य. ॰प्राणेश-पु. (लोकांच्या प्राणांचा भालक, धनि.) वायु; हवा. ॰बंधु-पु. १ लोकांचा भाऊ; लोकहितकर्ता. 'लोकबंधू जो होय रवी ऐसा ।' -नल. २ सूर्य. ॰बाह्य-वि. १ (लोकांच्या सामान्य वागणुकीहून किंवा समजुतीहून निराळा) विचित्र; विलक्षण; चम- त्कारिक. २ लोकांना प्रिय नसणारें; लोकविरुद्ध. ॰बोली-स्त्री. लोकांचें बोलणें; लौकिक बोली. 'गुणा निर्गुणा आणिलें लोक- बोलीं ।' -दावि २६६. ॰भय-भीति-नस्त्री. जनतेची भीति; लोकप्रवादाची भीति; जनलज्जा. ॰भांड-वि. भांडखोर; बडबड्या. -तुगा. ॰भाषा-स्त्री. १ सामान्य जनतेची भाषा, बोली. २ बोलण्यांतील भाषा; वाक्प्रचार. ३ अडाणी भाषाप्रयोग; असं- स्कृत बोली. ॰मत-न. सामान्य जनसमूहाचा अभिप्राय; लोकांचें म्हणणें; त्यांचे विचार. 'ज्या वसाहतींत लोकमतदर्शक कायदे- मंडळें आहेत त्यांस या कायद्यानें आपल्या शासनपद्धर्तीत फेर- फार करवून घेण्याचे अधिकार देतांना हा निर्बंध घालून ठेवला.' -वस्व १३६. ॰मतानुवर्ती-वि. लोकांच्या मताप्रमाणें असलेला; लोकतंत्राप्रमाणें चालणारा. [लोक + मत + अनुवर्ती] ॰मर्यादा-स्त्री. १ जनरूढी; पडलेली वहिवाट; प्रचार. २ जन- लज्जा. ३ जनाचा मान; लोकांविषयीं आदरभाव. (क्रि॰ राखणें; ठेवणें; पाळणें; धरणें; बावगणें). ॰माता-स्त्री. लक्ष्मी; लोकजननी. 'न सेविती हे जरी लोकमाता ।' -सारुह २. १८. ॰मांदी-स्त्री. लोकांचा समूह; गर्दी. 'त्वरें चालती धांवती लोक मांद्या । पुरी वोस ते रात्र जेथें अयोध्या ।' -मुरामायणें अयोध्या ४३. ॰मान्य-वि. १ लोकांना मान्य; प्रिय. २ लोकांचा पुढारी नेता. 'लोकमान्य हा शब्द उच्चारतांच मनांतून ही पदवी तुम्ही मान्यच करतां.' -केले १.२७६. बाळ गंगाधर टिळक यांना लाव- ण्यांत आलेली, येणारी पदवी. 'गोखल्यांची इंग्लंडांतील काम- गिरी' -(विश्ववृत्त एप्रिल १९०६) या लेखांत प्रथम वि. का. राज- वाडे यांनीं वापरली. ॰रंजन-न. १ लोकांची करमणूक. २ लोकांना संतोष, सुख होईल असें आचरण; लोकांना खूष ठेवणें. ॰रमण- वि. लोकांनां संतुष्ट करणारा. 'पूर्णब्रह्म स्वयें श्रीकृष्ण । बळी बळिराम लोकरमण ।' -एभा १.२.३. ॰राजक-राज्य- न. लोकमतानुवर्ती शासनसंस्था. (इं.) डेमॉक्रसी. 'लोकराजकाचे दोष त्यांना स्पष्ट दिसत होते.' -महाजनि (मनोरंजन-आगरकर अंक). ॰रीति-रीत-स्त्री. लोकांची वागण्याची पद्धत; जन- रीतिरिवाज; सामान्य वागणूक. ॰लचांड-न. लोकांच्या नाखु- षीनें होणारा त्रास; येणारी अपत्ति, लोकांच्या अवकृपेचें संकट. म्ह॰ सगळें लचांड पुरवेल पण लोकलचांड पुरवणार नाहीं. ॰लज्जा-लाजस्त्री. लोकमर्यादा पहा. १ लोकमताला मानणें; लोकांना जुमानणें. २ जनलज्जा; लोकभय; लोकांची वाटणारी शरम. ॰लोकपाळ-पुअव. १ देशाचे किंवा समाजाचे पुढारी लोक; प्रतिष्ठितवर्ग (व्यापकार्थी). २ राजा व त्याचे अधिकारी (लवाजम्यासह). ३ फौज; शिपाई. ॰वाद-वार्ता-स्त्री. पु. जनवार्ता; वदंता; कंडी; लोकप्रवाद पहा. 'लोकवार्तेला गति मिळाली कीं ती किती फोफावेल याचा नियम नाहीं.' -इंप ३७. ॰विद्या-स्त्री. समाजशास्त्र. -मसाप २.२१९. ॰व्यवहार- पु. लोकप्रवाह; सामान्य रीत; जनरीत; सर्वसाधारण वागणूक. ॰शाही-स्त्री. लोकांच्या सत्तेखालीं त्यांच्या संमतीनें चालणारी व त्यांच्याच हिताची अशी राज्यपद्धति. ॰शिरस्ता-पु. सामान्य परिपाठ; सामान्य रीत; लोकांची वागण्याची पद्धत; राहटी; रूढी. ॰संख्या-स्त्री. एका विशिष्ट स्थानी. राहणाऱ्या एकंदर सर्व लोकांची गणती. ॰संग्रह-पु. समाजव्यवस्थेचें रक्षण; लोकसंस्थेचें संरक्षण; अनेक अनुयायी मिळविणें; लोककल्याण; लोकदीक्षा; स्वतःला निराळ्या रीतीनें वागण्यास प्रत्यवाय नसतांहि लोकांनीं आचारभ्रष्ट होऊं नये म्हणून स्वतःच्या इच्छेविरुद्ध कांहीं आचा- रांचा स्वीकार करून लोकांची जूट राखणें. 'ज्ञानी पुरुषांनीं यथाधिकार धर्मसंस्थापनेसारखीं लोकसंग्रहाचीं कामें करावीं.' -टिसू ५. 'तया लोकसंग्रहालागीं । वर्ततां कर्मसंगीं । तो कर्मबंधु आंगीं । वाजेलनी ।' -ज्ञा ३.१७५. ॰सत्ताक-सत्तात्मक- वि. लोकांची सत्ता असलेलें; लोकमतानुवर्ती; राजा नसून लोकां- कडून राज्यकारभार चालणारी (शासनपद्धति). 'लोकसत्तात्मक राज्यपद्धतींत लोकच राजे असतात.' -गांगा २६. ॰संपादणी- स्त्री. लोकांचीं मनें अनुकूल करुन घेणें; लोकांची खुशामत; लोकांच्या मर्जीकरितां केलेली बतावणी. 'जैसि बहुरुपियांची रावो राणी । स्त्रीपुरुषभावो नाहीं मनीं । परी लोकसंपादणी । तैशीच करिती ।' -ज्ञा ३.१७६. ॰समजूत-स्त्री १ सर्वसाधारण लोकांचें मत; सामान्य समजूत. २ (एखाद्या मनुष्याविषयीचें किंवा पदार्था विषयींचें) लोकांचें यथायोग्य ज्ञान; समाधान; योग्य जाणीव. ३ केवळ लोकांचें समाधान (आपलें किंवा आपल्या बाजूचें समा- धान न मानतां फक्त लोकसमाधान) पहाणें ॰साहित्य-न. लोकांच्या जिव्हाग्रीं परंपरेनें वावरत असलेलें कथात्मक वा गीता- त्मक वाङ्मय. हें लिखित असेलच असें नाहीं. याचीं उदाहरणें- कहाण्या, सावित्रीचें गाणें; कावळाचिमणीच्या गोष्टी; ठकसेनाच्या गोष्टी. इ॰ ॰सिद्ध-वि. लोकांत रुढ असलेलें; लोकांत चालू अस- लेलें; प्रचलित; वहिवाटींत असलेलें. ॰स्थिति-स्त्री. एकंदर जन- तेची सामान्य स्थिति; लोकांची परिस्थिति. 'गाड्या घोड्यांतून हिंडणाऱ्या गृहस्थापेक्षां गरिबांनाच लोकस्थिति अधिक चांगली समजते.' -टि २.८०. ॰स्फीति-स्त्री. लोकप्रसिद्धि. 'स्वामींची नजर खाद्यसमृद्धीवर, त्यांच्या पुरस्कर्त्यांची लोकस्फीतीवर व इतरेजनांची केवळ मौजेवर.' -नि ६१९. ॰हितैषी-वि. जन- तेचें हित इच्छिणारा; लोकांचें कल्याण पाहणारा. [लोक + हितैषी; हित + इष् = इच्छिणें] लोकाग्रणी-पु. लोकश्रेष्ठ; लोकांचा पुढारी; नेता. [लोक + अग्रणी] लोकाग्रह-पु. लोकांची उत्कट इच्छा; जनतेचा आग्रह. लोकाचळ-पु. स्वर्गादि लोकरुपी पर्वत; जगरुप पर्वत. 'एऱ्हवीं जगदाकाराचें सिरें । जें चिरस्थानीयांचे धुरे । ब्रह्म- भुवन गा चवरें । लोकाचळाचें ।' -ज्ञा ८.१५४. [लोक + अचल] लोकाचार-पु. रूढी; लोकांची रीत; प्रघात; वहिवाट; लोकरीत. 'अंतरनिष्ठ तितुके तरले । अंतरभ्रष्ट तितुके बुडाले । बाह्याकारें भरंगळले । लोकाचारें ।' -दा १८.१.२४. लोकांतर-न. परलोक; (स्वर्ग, नरक इ॰) मृत्युलोकाहून निराळा दुसरा लोक. [लोक + अंतर] लोकांतीं-क्रिवि. लोकांमध्यें; जाहीर रीतीनें; उघडउघड. 'एकांतीं लोकांतीं करूं गदारोळ । लेश तोही मळ नाहीं येथें ।' -तुगा १९९१. लोकातीत-वि. अलौ- किक; लोकांवेगळें; या लोकीं न सांपडणारें. [लोक + अतीत] लोकानुकूल्य-न. लोकांची अनुकूलता; जनमान्यता; लोककृपा; लोकप्रसिद्धि. [लोक + आनुकूल्य] लोकापवाद-पु. लोकांनीं केलेली निंदा; जनापवाद; लोकप्रवाद. [लोक + अपवाद] लोकालोक-पु. सप्तद्वीपात्मक पृथ्वीला तटबंदीसारखा असलेला पर्वत; सप्तद्वीपा पृथिवी व सप्तसमुद्र यांना वेढणारा व सूर्य- मंडळापर्यंतचा अवकाश व्यापून टाकणारा असा एक महान् विस्तृत पर्वत. लोकालोकीं-क्रिवि. १ तिऱ्हाइतांकडून तिऱ्हाइतांमार्फत. २ विशेष पुरावा नाहीं अशा प्रकारें लोकांच्या तोंडून ऐकिलेलें. 'ही खबर मी लोकालोकीं ऐकिलेली आहें.' लोकी(कि)क- पु. १ लौकिक; कीर्ति; यश. 'बहु लोकिक सांडूं नये ।' -दा १४.१.६८. २ प्रसिद्धि; चांगल्या किंवा वाईट रीतीनें लोकांस माहीत असणें. -वि. या लोकांतील; 'प्रपंच संपादणें लोकिक ।' -दा २.७.९. [सं. लौकिक] लोकिकीं-क्रिवि. (काव्य) लोकांत; लोकसमुदायांत. 'पुत्रसंतान नस्तां दुःखी । वांज नांव पडिलें लोकिकीं ।' -दा ३.३.३२. लोकेषणा, लोकेशना- स्त्री. १ लोकांनीं आपणास बरें म्हणावें अशी इच्छा; कीर्तींची इच्छा. 'वैराग्यें तनु शुष्क करावें सोडुनि लोकेशना ।' -देप ६७. २ स्वर्गादि लोकांच्या प्राप्तीची इच्छा. ३ लोकांमध्यें चांगली किंवा वाईट प्रसिद्धि; लोकमान्यता किंवा दुर्लौकिक. 'मुलखांत लोकेशना होती.' -पेद २१ ११२. [सं. लोकेषणा] लोकोक्ति-स्त्री. १ म्हण. २ ज्यांचा रूढ अर्थच घ्यावयाचा, शब्दश: अर्थ घ्यावयाचा नाहीं असे शब्द समुच्चयानें; वाक्प्रचार. उदा॰ डोळ्यांत तेल घालून राहणें; डोक्यांत राख घालणें इ॰. ३ (साहित्य) ज्या वाक्याला वाक्प्रचारानें चारुता आली आहे असें वाक्य. 'हरिच्या पुन्हां पुन्हां कां काड्या नाकांत घालिशी शशका ।' [लोक + उक्ति] लोकोत्तर-वि. अलौकिक; असामान्य; असा- धारण. [लोक + उत्तर] लोकोद्धार-पु. मानव जातीचा उद्धार; कल्याण; मोक्ष; जननमरणापासून मानवाची सोडवणूक; लोकांची उन्नति, प्रगति. [लोक + उद्धार] लोकोपकार-पु. केवळ लौकि- काच्या संरक्षणार्थ करण्याचा शिष्टाचार; जी करण्याला शास्त्राज्ञा किंवा आपली इच्छा नसून केवळ लोकमर्जीकरतां आपण करतों ती गोष्ट, कृति. [लोक + उपचार]

दाते शब्दकोश