आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
नाम
न. १ नांव; वस्तुमात्राचें नांव. २ (व्या.) पदार्थाचें नांव. सामान्य, विशेष, व भाववाचक असे नामाचे तीन प्रकार आहेत. -पु. १ उभें गंध; तें लावण्याचा ठसा; रेघ. (सामा.) गंध; कपाळावर लावण्याचें चिन्ह. २ (ल.) घोडा; कुत्रा इ॰कांच्या कपाळा- वर उभा पांढरा पट्टा असतो तो. [सं. नाम; फा.नाम्] ॰करण- न. मुलाचें नांव ठेवण्याचा विधि, संस्कार. हा १६ संस्कारापैकीं एक आहे.॰गावडावि. (कु.) अशिक्षितांचा पुढारी. ॰घोष-पु. १ (पूजा इ॰च्या वेळीं) देवाच्या नावांचा केलेला मोठा गजर; नावांचा घोष. 'मग नामघोषें पिटोनि टाळी ।' २ देवाचें नांव घेणें; भजन. ॰जा-स्त्री. मान; महत्त्व; कीर्ति. 'वडीलवडिलापासून स्वामीकार्य प्रसंगें धन्यास संतोषी करून आपली नाम-जा संपादीत आलेस. -रा ८.१३९. [फा. नाम् = नांव + जाह् = हुद्दा] ॰जात-द-स्त्री. १ नियुक्त, नियोजित अधिकारी. २ नेमणूक; जहागीर. 'कांहीं नामजादा चार पांच लक्ष रुपये मिळतील ऐसें आहे.' -पया ९४. ३ स्वारी. 'त्यांनीं शिर्क्यावरी नामजात रवाना केली.' -रा १५.६. ४ एक पदवी. 'रामाजी माहादेव नामजाद प्रांत साष्टी यास.' -वाडबाबा ३.१९. -वि. १ लौकिक- वान; प्रख्यात. 'हुजूर हशम तालुके मजकुरीं नामजाद आहेत.' -वाडसमा ४.१४३. २ नेमलेला; नियुक्त केलेला. 'ते लोक किल्ल्यावर ठेवावयाचे उपयोगी नसल्यास त्यांस दुसरे जागां नाम- जाद पाठविणें.' -वाडसमा १.२७८. [फा. नाम्झाद्] ॰जादी- स्त्री. १ शौर्याचें कृत्य; नांवलौकिक. २ स्वारी; अभिक्रम. 'मग त्यावरी नामजादी करून रताजी रुपाजी जीवें मारिलें.' -इंम ३४. -सभासद ५४. ॰जोग-वि. हुंडींत ज्या माणसाचें नांव व वर्णन लिहिलेलें असेल त्याच्यापासून ओळखपाळख न घेतां हुंडीची रक्कम त्याला देतां येईल अशा प्रकारची हुंडी. (इं.) ऑर्डर चेक. याच्या उलट शहाजोग. ॰दार-वि. १ कीर्तिमान; सुप्रसिद्ध. 'मुसा मुत्रीम नामदार ।' -ऐपो २२२. २ कायदे- कौन्सिलचा सभासद. एक बहुमानार्थी पदवी. (इं.) ऑनरेबल. 'नामदार गोखले.' ॰दारी-स्त्री १ कीर्ति; लौकिक. नाम- जाद-दी पहा. २ कौन्सिलचें सभासदत्व; सन्मानाचा हुद्दा. ॰देव-पु. १ शिंपी जातींतील एक प्रसिद्ध साधु. २ एक शिंपी जातींतील पोटजात. ॰धातु-पु. नामापासून बनलेला धातु. जसें:-शेवटणें; शेंपटणें; समरसणें. ॰धारक-वि. नेहमीं देवाचें नांव घेऊन मुक्ति इच्छिणारा साधक; भक्तिमार्गी; भजनी. 'एथिचेआ नामधारका । विज्ञापन परिवारिआ मार्गिका ।' -ॠ १०३. 'तरले तरति हा भरंवसा । नामधारकाचा ठसा ।' ॰धारक, नामधारी-वि. १ नांवाजलेला; प्रसिद्ध; स्वतःचें नांव गाजविणारा. 'आम्हांजवळ दाहा नामधारी सरदार आहेत.' २ नुस्त्या नांवाचा; स्वतः कांहीं एक कारभार इ॰ करीत नसतां ज्याच्या नांवावर कारभार इ॰ होतात तो. ३ एकच नांव असलेला; एकाच नांवाचे दोन परस्पर. ४ विद्या, गुण इ॰ कांहीं नसतां निव्वळ मोठें नांव धारण करणारा. 'हा नामधारक शास्त्री आहे.' ॰धेय-न. (काव्य) नांव; नाम. -वि. नांवाचा. ॰ना-नी-स्त्री. कीर्ति; प्रसिद्धि; ख्याति. ॰नाईक-पु. (हेट.) आरमारावरचा अधिकारी; यावरून एक आडनांव. ॰निर्देश-पु. नांवाचा उल्लेख; नांव घेऊन सुचविणें, दाखविणें. ॰निशाण-वि. प्रसिद्ध; विख्यात 'राजे बहाद्दर नामनिशाण ।' -ऐपो २७७. ॰बुरदा-वि. (कागद- पत्रांत) उपरि लिखित; उपर्युक्त; वर उल्लेख केलेला [फा.] ॰मत्र- पु. देवाच्या नांवाचा जप. -ज्ञा १७.१०४. ॰रूप-न. नांवरूप पहा. ॰रूपातीत-वि. १ नांव, रूप, वर्णन इ॰काच्या पलीकडचा (हीं नसलेला) (देव). 'जें का अक्षर अव्यक्त । असें नावरूपातीत । शब्देवीण आनंदत । निजे तेथें निज बाळा ।' २ नांव इ॰ घालवि- लेला; दुर्लौकिकाचा; अवनतावस्थेस आलेला. ३ ऐहिक कीर्ति, मान इ॰कांची पर्वा न करणारा; ऐहिक लाभांना तुच्छ मानणारा. [नाम + रूप + अतीत] ॰वर-वि. प्रसिद्ध; नांवाजलेलें. ॰वाचणी- स्त्री. नांवनिशी. 'कथितो नामवाचणी सारी ।' -अमृत ४४. [नाम + वाचणें] ॰वाच्य-पु. (व्या.) तुतीय पुरुष. ॰विधान-न. नामकरण पहा. ॰शेष-वि. १ ज्याचें नुसतें नांव उरलें आहे असा (मृत, अज्ञातावस्थेंतला माणूस). २ अतिशय निकृष्टावस्थेस पोहों- चलेलें (गांव इ॰) ॰संकीर्तन-न. देवाचें नांव घेणें; भजन करणें; नामघोष. ॰सरी-क्रिवि. नामसदृश; नांवासारखें. 'तेही नामाशी नामसरी । म्हणत असतील जरत्कारी ।' -मुआदि ४.१६. ॰स्मरण- न. मनामध्यें देवाचें नांव घेणें-आठवणें. ॰स्मरण भक्ति-स्त्री. उपासनामार्गांतील नवविधा भक्तीपैकीं तिसरी नामा, नाम्नी- (पुस्त्री) वि. नांवाचा-ची. जसेः-हरीपंत नामा एक पुरुष; गंगा नाम्नी कन्या. नामांकित-वि. प्रसिद्ध; विख्यात; लौकिक अस- लेला. नामाथ(थि)णें-अक्रि. १ (काव्य) प्रसिद्धीस येणें; नांव होणें; नांवाजला जाणें. 'आनंदाचेनि नांवें । नामाथें पैं ।' -सिसं ५.११. २ नांव देणें. नामाथिला-वि. नावांजलेला; नामांकित. 'ऐसे नामाथिले वीर ।' -उषा १५९. नामाभिधान-न. १ नांव. 'तेथील पांड्या भावीक पूर्ण । महादाजीपंत नामाभिधान ।' २ नामांकित माणूस. 'हुजुरातींतले नामाभिधानें ।' -ऐपो २६७. [सं. नाम + अभिधान] नामावलि-ळी-ळ-स्त्री. नांवांची यादी. मुख्तत्वें शिव, विष्णु इ॰कांच्या नावांच्या यादीस लावतात. 'प्रेमभरित अंतरांत वदनीं नामावळी गाती ।' -होला १७. नामो-वि. (गो.) नाम लावणारा. (सारस्वत वैष्णवांना उपहा- सानें योजतात). नाम्या-वि. नाम अर्थ ४ पहा. कपाळावर पांढरा पट्टा असणारा (कुत्रा इ॰).
(पु.) हिंदी अर्थ : संज्ञा, प्रसिद्ध. मराठी अर्थ : नाम, महशूर.
नाम nāma n (S) A name. 2 A noun. For figurative significations and idiomatic applications see नांव. 3 m The perpendicular mark made on the forehead. Hence applied to a white vertical streak upon the forehead of a horse, dog &c.
नाम n A name. A noun. The perpendicular mark made on the forehead.
(सं) न० नांव, अभिधान. २ व्याकरणसंज्ञाविशेष.
गुम नाम
(वि.) हिंदी अर्थ : जिसका नाम कोअी न जानता हो, जिसमें किसीका नाम न हो. मराठी अर्थ : नांव माहीत नसलेला, नांव प्रविष्ट नसलेला.
नाम व निशान
(पु.) हिंदी अर्थ : नाम और चिन्ह, पता. मराठी अर्थ : नांव व लक्षण, पत्ता मुद्दा.
नेक नाम
(वि.) हिंदी अर्थ : नामवर. मराठी अर्थ : ख्यात नाम.
प्रीतीचें नाम or नांव
प्रीतीचें नाम or नांव prītīcē nnāma or nāṃva n A name of fondness or endearment (as given to children).
हम नाम
(वि.) हिंदी अर्थ : सम नामका. मराठी अर्थ : अेकाच नांवाचा.
किंगण नाम संवत्सरे
(ल.) जीर्णपणाची कमाल झालेला; अत्यंत जुना; प्राचीन काळचा. किंगरी
किंगण नाम संवत्सरे
जीर्णपणाची कमाल झालेला; अत्यन्त जुना; प्राचीन काळचा.
खळखळणे पासून धातुसाधित नाम. पहा : खळखळणे
खळखळणे अक्रि.
नाम ज़द
(वि.) हिंदी अर्थ : प्रसिद्ध, प्रकट. मराठी अर्थ : महशूर.
नाम
न. १. नाव; वस्तुमात्राचे नाव. २. (व्या.) पदार्थाचे नाव. याचे सामान्य, विशेष व भाववाचक असे तीन प्रकार आहेत.
ब नाम
(क्रि. वि) हिंदी अर्थ : नामपर नामसे. मराठी अर्थ : नांवानें, नांवावर.
नाम आवर
(वि.) हिंदी अर्थ : नामवर. मराठी अर्थ : प्रसिद्ध.
संबंधित शब्द
धातु
पु. १ क्रियापदाचें मूळरूप; ज्याला प्रत्यय लावून क्रियापद बनवितां येतें तो शब्द. जसें:-कृ, वद्, करणें; बोलणें, चालणें इ॰ २ शब्दाचें मूळ; ज्याचे पुढें पृथक्करण करतां येत नाहीं असा शब्दांतील मूळ अवयव. इं. रॅडिकल, रूट. 'किताब शब्दांत क् त् ब् हा धातु.' [सं.] ॰नाम-न. क्रियावाचक नाम [धातु + नाम] ॰पाठ-पु. धातूंची यादी, कोष्टक. [धातु + पाठ] ॰रूप-न. धातू- पासून बनलेलें रूप; क्रियापदाचें रूप. जसें:-जातो, गेला, करतो, निजतो इ॰ [धातु + रूप] ॰साधित-न. धातूवरून साधलेला, बनलेला (शब्द इ॰). उदा. कृत, कृत्वा. यांत नाम, विशेषण व अव्यय असे भेद आहेत; कृदन्त पहा. [धातु + सं. साधित = बनविलेला, साधलेला]
नांव
न. १ नाम अर्थ १, २ पहा. 'नांव तुजें नावचि या संसारांभोधिला तरायासी ।' -भक्तमयूरकेका ४०. २ (ल.) कीर्ति; ख्याती; लौकिक; पत; अब्रू; चांगलें नाम. 'सकल म्हणती नांव राखिले । वडिलांचे ।' -दा ३.४.१४. ३ दुर्लौकिक; डाग; कलंक; बदनामी; दुष्कीर्ति; नापत; (क्रि॰ ठेवणें). ४ भांड्यावर नांव घाल- ण्याचें कासारी हत्यार. -बदलापूर ९६. ५ नवरा बायकोनें उखाणा घालून घ्यावयाचें परस्परांचें नांव (क्रि॰ घेणें). [सं. नाम; हिं. नाओं; जुनें हिं. नाऊं; पं. सिं. नाउं; फ्रेंजि. नव; इं. नेम] (वाप्र.) ॰करणें-कीर्ति गाजविणें. ॰काढणें-नांव गाजविणें; प्रसिद्धीस येणें. ॰काढणें-कुरापत काढणें; कळ लावणें. ॰खारणें- उक्रि. (कों.) नांव घेऊन निर्देश करणें; नांवाचा उल्लेख करणें; नांव घेणें. ॰गांव विचारणें-माहिती विचारणें; सामान्य विचारपूस करणें. ॰जळो-भाजो-नांवास हळद लागो-तळतळाट किंवा शाप देण्याचा वाक्प्रचार. ॰ठेवणें व फोडणें-(बायकी) खेळांत एखाद्या वेळीं दोन मुलींस एकदम शिवल्याचा प्रसंग येतो तेव्हां डाव कोणी घ्यावा ह्याविषयीं तंटा होतो त्यावेळीं त्या दोन्ही मुली एकमेकांच्या संमतीनें नांवें बदलून ठेवतात, मग त्यांतील एखाद्या मुलीस आपलीं नांवें सांगून तीं त्यांतील कुठलें नांव मागेल तें तिला देऊन उरलेल्या नांवाच्या मुलीनें डाव घ्यावयाचा असतो. ॰ठेवणें-१ दोष देणें; व्यंग काढणें. म्ह॰ नांव ठेवी लोकाला शेंबूड आपल्या नाकाला = दुसर्याला ज्या दोषाबद्दल नांवें ठेवावयाचीं तोच स्वतांत असणें. २ जन्मलेल्या मुलाचें नामकरण करणें; ॰डहाळ होणें-(ना.) बदनामी होणें. ॰डाहार करणें-(व.) नांव बद्दू करणें. ॰डालणें-(परदेशी तेली) प्रेताच्या सारवलेल्या जागेवर केळीचें पान ठेवून त्यावर प्रत्येक मनुष्यानें मयताचें नांव घेऊन कालवलेल्या भाताचा घांस ठेवणें. -बदलापूर २६७. ॰धुळींत, मातींत, पाण्यांत इ॰ जाणें, मिळणें, पडणें-नांवावर पाणी घालणें पहा. ॰नको-तिटकारा, चिळस, द्वेष दाखविणारा शब्द. ॰न घेणें-अलिप्त राहणें; अंगांस संसर्ग न लागू देणें; दूर राहणें; नांव न काढणें. ॰नाहीं-नसणें-(विद्या, पैसा इ॰कांचा) पूर्णपणें अभाव असणें; नांव, निशाण, खूण कांहीं नसणें. बदलणें-नामोशी पत्करणें (प्रतिज्ञेच्या वेळीं योजतात). 'अमूक झालें तर नांव बदलून टाकीन.' ॰मिळविणें-वाद- विवाद, लढाई इ॰ मध्यें कीर्ति मिळविणें. ॰सांगणें-लावणें- घालणें-देणें-किंमत, शर्ती ठरविणें. ॰सांगणी-वाङ्निश्चयः कुणब्यांतील वधुवरांचीं व त्यांच्या मात्यापित्यांचीं नांवें जातीच्या सभेमध्यें जाहीर करून लग्न ठरविण्याचा समारंभ. ॰सोडणें- टाकणें-त्याग करणें; संबंध सोडणें; इच्छा न करणें. नांवाचा- १ खरा. 'मी तें काम करीन तरच नांवाचा.' २ नामधारी; केवळ नांवापुरता. 'मी जॉन्सनचा नांवाचा मात्र गुरु होतों, खरोखर पहातां तो माझ्याहून वरचढ होता.' -नि ३ चांगलें नांव लौकिक असलेला. नांवाची बोंब पडणें-वाईट गोष्टीला कारणीभूत होणें किंवा एखाद्या तक्रारीचा विषय होऊन बसणें. नांवानें घागर फोडणें-संबंध तोडणें; मेला असें समजणें. 'तियेचेनि नांवें फोडावी घागरी । नाहीं ते संसारी बहिणी म्हणे ।' -ब ४७० नांवानें पाणी तावणें, तापविणें-एखाद्याचा द्वेष करणें, किंवा मरण चिंतणें. नांवानें पूज्य असणें-पूर्ण अभाव असणें. 'विद्येच्या नांवानें जरी आवळ्या एवढें (पूज्य) म्हणतां येणार नांहीं तरी मासला तोच ।' -मधलीस्थिति. नांवानें बोंब मारणें, शंख करणें, खडे फोडणें-एखाद्या विरुद्ध बोभाटा, ओरड करणें. नांवानें भंडार उधळणें-स्तुति करणें. नांवानें शंख-पूर्ण अभाव असणें. नांवानें हांका मारीत बसणें-दुसर्यानें नुक- सान केलें अशी विनाकारण ओरड करीत सुटणें. नांवावर-१ नांवासाठीं-करितां-मुळें-खातर. २ (जमाखर्च) खात्यावर; नांवें. नांवावर गोवर्या फोडणें-घालणें-रचणें-एखाद्याचें वाईट करणें-चिंतणें; शाप देणें (गोवर्या प्रेतास जाळण्यास लागतात). नांवावर पाणी घालणें-कीर्तीवर पाणी सोडणें; चांगलें नांव, लौकिक बुडविणें. नांवावर विकणें-स्वतःच्या नुस्त्या किंवा दुसर्या-मोठ्याच्या नांवाचा फायदा घेणें, त्यावर नांव, प्रसिद्धि मिळविणें; खपणें. नांवास चढणें-कीर्तिमान होणें; लौकिक वाढणें. नांवास देखील नाहीं-शपथेस किंवा नांव घेण्यास देखील नाहीं. याच्या अगोदर 'ज्याचें नांव' हे शब्द जोडतात म्हणजे त्याचा अर्थ अगदीं मुळींच नाहीं असा होतो. 'यंदा पाऊस ज्यानें नांव पडला नाहीं.' ज्याचें नांव तें-(नांव घेण्यास अयोग्य अथवा अमंगल म्हणून ज्याचें नांव घेतलें नाहीं तो अथवा तें) जें पाहिजे असतें अथवा ज्याची आशा केलेली असते तें कधीं न देणार्या, करणार्या मनुष्य-वस्तू इ॰ संबंधीं योजतात. सामाशब्द- ॰कर-री-वि. १ कीर्तिमान; प्रसिद्ध; नावलौकि- काचा. 'वडिल नांवकर मल्हार ऐका गर्दी झाली त्यावरती ।' -ऐपो ३५८. २ दुसर्याचें नांव धारण करणारा; एकाच नांवाचा दुसरा नामधारी. ॰कुल-वि. (ना.) सगळा; एकूण एक. ॰ग्रहण-न. नांव घेणें; उल्लेख करणें; नामनिर्देश (क्रि॰ करणें; घेणें; काढणें). ॰ग्रहण टाकणें-सोडणें-नांव टाकणें पहा. ॰ग्रहण ठाऊक नसणें-नांवा गांवाची कांहींहि माहिती नसणें. ॰धारक-वि. नामधारक अर्थ २ पहा. ॰नट-वि. क्रिवि. पूर्णपणें नष्ट झालेला; बेचिराख झालेला; थांग, पत्ता, माग, खुण, अवशेष नसलेला. 'त्याची गाय गुराख्यानें नांवनट केली.' [नांव + नष्ट] ॰नांगर-पु. पेरणीच्या वेळीं प्रथम नांगर धरण्याचा व निवाड- पत्रांत निशाण्या करतांना प्रथम नांगराची निशाणी करण्याचा पाटील अथवा देशमूख यांचा मान. ॰नांव-वि. (ना.) नावकुल पहा. सबंध सगळा. ॰निशाण-न. सर्व वृत्तांत (कुल, नांव, गांव इ॰). ॰निशाण ठाऊक असणें-कुलशील परंपरा ठाऊक असणें. ॰निशी-स्त्री. १ नांवांची यादी. २ तींत दाखल केलेलें नांव. 'माझी नांवनिशी काढ' [नांव + फा. नविशी] ॰निशीवार- क्रिवि. नांवा बरहुकूम; नांवनिशींतील नांवांच्या अनुक्रमानें. (क्रि॰ घेणें; मागणें). ॰नेम-१ (फलज्यो.) नांवावरून राशी, गण, नक्षत्र इ॰कांची माहिती काढणें. २ अशी काढलेली माहिती. ॰बुडव्या-वि. स्वतःचा लौकिक, पत, किंमत घालविणारा (मनुष्य वस्तु). ॰र(रा)स-स्त्री. १ (फलज्यो.) जन्मकालीन नक्षत्राव- रून नांव ठेवणें किंवा व्यावहारिक नांवावरून नक्षत्रनाम काढणें. 'मग बोलाविले ज्योतिषी । भूमी पाहिली चौरासी । तव दक्षा- चिया नावरासी । घातचंद्र ।' -कथा ३.१०.९९. २ अशा तर्हेनें काढलेलें नांव, कुंडली इ॰ (क्रि॰ काढणें). ३ जन्मनक्षत्रावरून पहावयाचें वधूवरांचें राशी घटित; नांवावरून लग्न जमविणें. (क्रि॰ काढणें; पाहणें; ठरविणें). ॰राशीस येणें, उतरणें, जमणें- मिळणें-नांवांवरून वधूवरांचा घटित विचार केला असतां अनुकूलता येणें, कुंडलींवरून लग्न जमणे. [नांव + राशि] ॰रूपन. १ कीर्ति; अब्रू; पत. नांव अर्थ २ पहा. 'त्यानें त्या लढाईमध्यें नांवरूप मिळविलें.' 'माझें लपो असतेपण । नांवरूपाशीं पडो खंडन ।' २ सार्थक; योग्यस्थानीं विनियोग. 'विद्वानास पुस्तक दिलें असतां त्याचें नांवरूप होतें.' ३ नांव आणि आकार; व्यक्तित्व; स्वतंत्र, वेगळें अस्तित्व. 'जैसें समुद्रास मिळतां गंगेचें आप । तात्काळ निरसे नांवरूप ।' नांवलौकिक-पु. प्रसिद्धिः मोठेपणा; कीर्ति; ख्याति. ॰वार-क्रिवि. नांवाबरहुकूम; नांवनिशीवार पहा. ॰सकी-स्त्री. (कु) लौकिक; कीर्ति; प्रसिद्धि. ॰सता-वि. (कु.) प्रसिद्ध; नांवाजलेला; कीर्तीचा (चांगल्या व वाईट अशा दोन्ही अर्थीं योजतात). नांवानिराळा-वि. अलिप्त; अलग (वाईट नांवापासून); स्वतंत्र; विरहित. 'हा सर्व करून नांवानिराळा.' नांवारूपास आणणें-येणें-प्रसिद्धीस-मान्यतेस आणणें- येणें. नांवें-(जमाखर्च) खर्चाची बाजू; नांवानें; खर्चीं; खर्चाकडे. नांवावर पहा.
(सं) न० नाम, अभिधान.
चर्म
न. १ कमावलेलें कातडें; चामडें; चाम. 'चर्म रंगू लागे रोहिदासासंगे ।' -तुगा ३६९१. २ साल; वरील आवरण; त्वचा. ३ ढाल. 'खड्गचर्म देई आणोन ।' -जै ३१.३२. 'करुनि शरनखी दृढ रथ चर्मासह खड्गही शकल भाचा ।' -मोकर्ण ३.२८. [स.] सामाशब्द- चर्मक, चर्मकार-पु. चांभार; मोची; जोडे शिवणार. 'नाम न म्हजे ज्याचें तोंड । तेचि चर्मकाचें कुंड ।' -तुगा २५०८. [स.] चर्मका-स्त्री. पखाल. 'चौमुखिया चर्मका जळपूर्णा ।' -कृमुरा २७.९८. चर्मकील- पु. चामखीळ; हा वात, पित्त, कफ या तीन कारणांपासून होतो. वात्ज, पित्तज, कफज, असे याचे प्रकार आहेत. [सं.] चर्म- कुंड, चर्मकाचें कुंड-न. कातडी भिजत घालण्याची चांभा- राची कुंडी. [चर्म + कुंड] ॰चक्षु-द्दष्टि-नस्त्री. पाहण्याचे डोळे; व्यावहारिक पदार्थोचा बोध होणारे डोळे; भौतिक डोळे; दृष्टि; पाहण्याची शक्ति. याच्या उलट ज्ञानचक्षु; दिव्यचक्षु. [सं.] ॰दंड-पु. (संकेतानें) शिश्न; लिंग. [सं.] ॰धन-न. मेंढरें, घोडे, बैल इ॰ जनावरें हेंच धन. 'चर्मधन गहाण घेऊन पैसा देऊं नये.' [सं.] ॰पत्र-न. चामड्याचा विशिष्ट संस्कार करून बनविलेला कागद. इं. पार्चमेट. ॰पादुका-स्त्री. पायांतील जोडा; वहाण. [सं.] ॰फराश-पु. कमावलेलीं कातडीं व चामडी यांचा व्यापार करणारा. ॰वाघ-न. चामड्यानें मढ- विलेलें वाद्य; पखवाज; नगार; तबला; डग्गा इ॰ [सं.] चर्मातु-न. (दे.) कातडें. -तुगा ४५४. -शर. चर्मिकी-स्त्री. चांभारीणें. 'मातंगीचें नाम तुळशी । चर्मिकीचें नाम काशी ।' -दा १४.१०.१५. [सं.] चर्मी-वि. चामड्याचा; कातड्याचा (जोडा इ॰). [सं.] ॰जोडा-पु. १ चामड्याचा जोडा. २ एक हक्क; (सरकाराला, वतनदाराला) चांभार लोकांपासून कराच्या किंवा हक्काच्या रूपानें जो जोडा मिळतो किंवा घेतला जातो तो.
अभिधान
न. १. नाव; नाम; संज्ञा; गुणनाम; वर्ग : ‘आता विषयाभिधान । भेदु आर्इकें ॥’ – ज्ञा १३·११६. २. नामनिर्देश; उल्लेख; संकेत शब्द; जातिवाचक नाम; अर्थबोध. ३. नाव सांगणे; नाव घेणे. ४. व्याख्या करणे; लक्षण करणे : ‘आता दुःखाची आंतुवट वेली । दोषकाट्यांची जरी भरली । तरी निजाभिधानीं घाली । असुरी ते ।’ – ज्ञा १६·२१३. ५. शब्द. ६. (व्या.) कर्त्याबद्दल विधान. ७. (अर्थ.) मूल्य, वजन, माप इ. मालिकेत प्रत्येक एककाला (युनिटला) दिलेला दर्जा. उदा. रुपयाच्या मालिकेत ५० पैसे, १० पैसे इ. नाणी. [सं.]
अद्वैत
वि. १ जीव व शिव (परमात्मा) एकच असें मत. 'जड- सृष्टि आभासात्मक असल्यामुळें खोटी व ब्रह्म हेंच एक सत्य व आत्मतत्त्व आहे, जीव हा परमात्म्यापासून अभिन्न असल्यामुळें तो व शिव एकच होय, 'हें शांकर (शंकराचार्याचें) मत. २ ब्रह्म. ३ (ल.) मतैक्य; ऐक्य; दाट परिचय; सलगी; एकोपा. ॰कुसरी- स्त्री. (काव्य) अद्वैत मताचें गूढ ज्ञान. 'एक नाम हरी द्वैत नाम दुरी । अद्वैत कुसरी विरळा जाणें ।।' ॰भाव, ॰ताभाव-पु. अद्वैतपण; एकी; ऐक्यमत्य. ॰मत- न. जीवात्मा व परमात्मा यांचा वस्तुत: अभेद असें मत. ॰वन- न. महाभारतांत वर्णन केलेलें एक वन; (जेथें सर्व पशु वैरभाव विसरून आनंदानें राहात.). ॰वाद- पु. अद्वैत; अद्वैत मत पहा. ॰वादी- वि. अद्वैतमतास अनुसरणारा (शंकराचार्यादि). 'रिपुशर विजयी गमती द्वेतीं अद्वैतवादि पंडितसे ।' -मोकर्ण ४७.१५. ॰सुख-न. अद्वैताच्या साक्षात्कारामुळें मिळणारें सुख- आनंद. [सं.]
अिस्मे फ़राज़ी
(पु.) हिंदी अर्थ : कल्पित नाम. मराठी अर्थ : कल्पित नाम.
आकारिक
वि. १ (तत्त्व.) आकारविषयक; आकारासंबंधी. २. आकार असलेले, साकार : ‘अकारिक नाम जीवानें ठेविलें । शिवानें तें केलें निर्विकार’ − नाम ६८९. [सं.]
अनुरंगणे
अक्रि. तन्मय होणे; रंगून जाणे : ‘(नाम) संतचरणी अनुरंगला’ – नाम ८४५.
चर्मिकी
स्त्री. चांभारीण : ‘मातंगीचें नाम तुळशी । चर्मिकेचें नाम काशी ।’ – दास १४·१०·१५. [सं.]
धनको रिणको
धनको रिणको dhanakō riṇakō n (धनको & रिणको Creditor and debtor. Fanciful formations from धन Money, and रीण Debt.) The relation or relative capacity of money-lender and money-borrower. Ex. मी तुझें ध0 लागत नाहीं; धनको नाम तुका वाणी ॥ रिणको नाम विठ्ठल धणी ॥.
करणे
सक्रि. अनेक नामांना जोडून येणारा व त्या संबंधीचा क्रिया दर्शविणारा धातू. जसे :- तो अभ्यास करतो, ती स्वयंपाक करते, तो काम करतो, गारुडी सापाचा खेळ करतो - अशा वाक्यात नाम (कर्ता) + नाम (कर्म) + करणे अशी रचना असते. नामाच्या अर्थानुसार करणे याच्या अर्थालाही विविध छटा प्राप्त होतात. उदा. मूर्तिकार मूर्ती करतो. (घडवतो, बनवतो), राजा युद्ध करतो (लढतो), तो अन्न भक्षण करतो (खातो, जेवतो). अनेक इंग्रजी नामांना किंवा धातूंना हा धातू लावून बोलण्याची पद्धत आहे. असा धातू अकर्मक असल्यास त्याला होणे या धातूची रूपे लागतात. जसे :- मालकांनी त्याला डिसमिस केलं, पंचांनी त्याला डिस्क्वालिफाय केलं, हे रिराइट करून द्या.
नाव
न. १. पहा : नाम १, २. २. (ल.) ख्याती; कीर्ती; लौकिक; पत; अब्रू; चांगले नाव. ३. दुर्लौकिक; डाग; कलंक; नापत; बदनामी; दुष्कीर्ती. ४. भांड्यावर नाव घालण्याचे कासारी हत्यार. – बदलापूर ९६. ५. नवरा–बायकोने उखाणा घालून घेण्याचे परस्परांचे नाव. (क्रि. घेणे). [सं. नाम] (वा.) नाव करणे, नाव काढणे–सबब सांगणे. नाव काढणे–कुरापत काढणे; कळ लावणे. नाव खारणे–नाव घेऊन निर्देश करणे; नाव घेणे; नावाचा उल्लेख करणे. (को.) नाव जळो, नाव भाजो; नावाला हळद लागो–तळतळाट किंवा शाप देण्याचा वाक्यप्रचार. नाव ठेवणे–दोष देणे; व्यंग काढणे.नाव ठेवणे व फोडणे– (बायकी) खेळात जेव्हा दोन मुली एकदम शिवतात तेव्हा डाव कोणी घ्यावा याबद्दल वाद होतो. त्या वेळी त्या एकमेकींच्या संमतीने नावे बदलून ठेवतात. मग इतर एखाद्या मुलीला आपली नावे सांगून ती त्यातील मागेल ते नाव देऊन उरलेल्या नावाच्या मुलीने डाव घ्यायचा असतो. नाव डहाळ, नाव डाहार होणे,नाव करणे–बदनामी होणे, करणे. (व.) नाव डालणे– (परदेशी तेली) प्रेताच्या सारवलेल्या जागेवर केळीचे पान ठेवून त्यावर प्रत्येक मनुष्याने मयताचें नाव घेऊन कालवलेल्या भाताचा घास ठेवणे. – बदलापूर २६७. नाव धुळीत, मातीत, पाण्यात इ. जाणे, मिळणे, पडणे–बदनाम होणे. नाव नको– तिटकारा, किळस, द्वेष दाखवणारा शब्द. नाव न घेणे–अलिप्त राहणे; अंगाला संसर्ग न लागू देणे; दूर राहणे. नाव नसणे, नाही– (विद्या, पैसा इ.चा) पूर्ण अभाव असणे; नाव, निशाण, खूण काही नसणे. नाव बदलणे–नामोशी पत्करणे (प्रतिज्ञेच्या वेळी योजतात.). नाव लावणे, नाव सांगणे, नाव घालणे, नाव देणे–किंमत, अटी ठरवणे. नाव सार्थ करणे–नावाला शोभेल अशी कामगिरी करणे. नाव सोडणे, नाव टाकणे–त्याग करणे; संबंध तोडणे; इच्छा न करणे. नावग्रहण ठाऊक नसणे–नावगावाची काहीही माहिती नसणे. नावाचा–१. खरा. २. केवळ नावापुरता; नामधारी. ३. चांगला लौकिक असलेला. नावाची बोंब पडणे–वाईट गोष्टीला कारणीभूत होणे; एखाद्या तक्रारीचा विषय होऊन बसणे. (एखाद्याच्या) नावाने घागर फोडणे–संबंध तोडणे; मेला असे समजणे. नावाने झेंडा लावणे–भव्यदिव्य, प्रतिष्ठा उंचावण्यासारखे कृत्य करणे. (एखाद्याच्या) नावाने धोंडे फोडणे–एखाद्याच्या नावाने धोंडे आपटून परमेश्वराला गाऱ्हाणे घालणे. (एखाद्याच्या) नावाने पाणी तावणे, तापवणे–एखाद्याचा द्वेष करणे, मरण चिंतणे. (एखाद्याच्या) नावाने पूज्य असणे–पूर्ण अभाव असणे. (एखाद्याच्या) नावाने बोंब मारणे, शंख करणे, खडे फोडणे–एखाद्याविरुद्ध बोभाटा, ओरड करणे. (एखाद्याच्या) नावाने भंडारा उधळणे–स्तुती करणे. (एखाद्याच्या) नावाने हाका मारत बसणे–दुसऱ्याने नुकसान केले अशी अकारण ओरड करत सुटणे. नावालादेखील नसणे, नाही–शपथेला, नाव घेण्यापुरतेही नाही. (एखाद्याच्या) नावावर गोवऱ्या फोडणे, घालणे, रचणे–एखाद्याचे वाईट चिंतणे, करणे; शाप देणे. नावावर पाणी घालणे–कीर्तीवर पाणी सोडणे; चांगले नाव, लौकिक बुडवणे. नावास चढणे–कीर्तिमान होणे; लौकिक वाढणे. ज्याचे नाव ते–जे हवे ते कधीही न देणाऱ्या, न करणाऱ्या मनुष्य, वस्तू इ.संबंधी योजतात.
सामान्य
न. १ सर्वसाधारणपणा; समानता; अनेक व्यक्ती किंवा जाती यांशीं संबंध. २ जातीचा, प्रकाराचा धर्म, गुण. 'आंबा, पिंपळ, ताड, माड, इत्यादि सर्व वृक्षांवर वृक्षत्व म्हणून एक सामन्य राहतें.' ३ साहित्यांतील एक अलंकार. एखादी वस्तु इतर तत्सदृश वस्तूंच्या सान्निध्यांत असल्यानें जेव्हां ओळखूं येत नाहीं तेव्हां हा अलंकार होतो. उदा॰ 'तडागांत जलक्रीडा करायास्तव सांगन । तो गेला, परि पद्मांत नोळखे अंगनानन ।'. -वि. १ सर्वसाधारण; सर्वांना लागू पडणारें; सर्वांचें. 'सकळांस जें मान्य । तेंचि होतसे सामान्य ।' -दा १५.६.६. २ साधारण प्रतीचा; मध्यम. चांगला आणि वाईट, उच्च आणि नीच यांमधला. 'जैसें सत्रीं अन्न जालें । कीं सामान्या बीक आलें ।' -ज्ञा १३.७००. [सं.] ॰नाम- न. (व्या.) वस्तु-पदार्थमात्राचें नांव. याच्या उलट विशेष- नाम. ॰पक्ष-पु. मध्यम मार्गं; मधला पक्ष, प्रकार. ॰रूप-न. (व्या.) विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्या- पूर्वीं नामाचें जें रूप बनतें तें. उदा॰ घोडा, लांकूड, आज्ञा यांना चा, नें, स, ला, पासून, पाशी, वर इ॰ लागतांना घोड्या, लाकडा, आज्ञे अशी रूपें होतात. ॰लक्षण-न. साधा- रण, जातिगत विशेष, चिन्ह. ॰लिंग-न. ज्या नामाचें (पुरुष किंवा स्त्री) लिंग निश्चित करतां येत नाहीं तेव्हां त्याचें लिंग सामन्य समजतात. उदा॰ मूल, मी, तूं, इ॰. ॰शासन-न. अविशिष्ट, सर्वत्र लागू पडणारा हुकूम, कायदा, आज्ञा. ॰सर्वनाम- न. जें सर्वनाम साधारणपणें कोणत्याहि नामाबद्दल येतें तें. उदा॰ कोणी, कांहीं, सर्व, अमुक, इ॰. ॰स्त्री-स्त्री. वेश्या. 'पात्रें भाट नागारी । सामान्य स्त्रिया काजुवारी ।' -ज्ञा १७.२९६. सामान्यतः-क्रिवि. १ साधारण प्रकारें; सामन्य रातीनें. २ सर्व जातीला धरून; व्यक्तिशः नव्हे अशा प्रकारें. ३ अविशिष्ट; सार्वत्रिकपणें. ४ व्यापक रीतीनें; बहुसंख्येला, मोठ्या भागाला धरून. ५ बहुशः; नेहमीं. ६ एकंदरीनें; एकूण. सामन्या- स्त्री. वेश्या; बटीक. 'सामान्या भली आंग । न शिवे तंव ।' -ज्ञा १८.२५०.
सवेच
सवेच savēca a (S Poetry.) That wastes or wears; that is liable to exhaustion or consumption. Ex. रूप सवेच नाम निर्वेच ॥ रूप क्षणिक नाम साच ॥.
सवेंच
वि. खर्च होणारें; झिजणारें; नाशवंत. 'रूप सवेंच नाम निर्वेच । रूप क्षणिक नाम साच ।' -रावि १६.९९. [स + वेंच = खर्च]
वाड
वाड vāḍa a (Poetry.) Large, great, huge, immense, monstrous. Ex. हळूहळू ह्याचें पुण्य झालें वाड ॥ वारलें हें झाड त्रिमिराचें ॥; also गगनाहुनि वाड नाम आहे ॥. 2 Vast, exceeding, extended, infinite &c.; as applied to ब्रह्म or ईश्वर. (Wrongly explained in ज्ञानेश्वरकोश by the word ठेंगणा.) Ex. जे आका- शाहुनि वाड अव्यक्ताहि पैलीकडे ॥; also (in रामवि- जय) त्या रामाचें नाम गोड ॥ ज्याची कथा त्याहुनि वाड ॥ जें लीला ऐकता पुरे कोड ॥. 3 Mighty, marvelous, wonderful, transcendent, preternatural in power or in excellence generally. Applied with all the licentiousness of poetry. Ex. विप्रशाप परम वाड ॥ मृगराज केला सरड ॥.
सांग
स्त्री. धा नाम. १ सांगणें; सांगणी; निरोप. (क्रि॰ सांगणें). 'प्रियवधुसि वराला सांगता सांग झाला.' -आमा ९.२ आज्ञा; हुकूम. [सांगणें] ॰कामी-म्या-वि. १ स्वतःची बुद्धी न चालवितां नुसतें सांगितलेलें काम करणारा; वेळेप्रमाणें वागण्याची अक्कल नसणारा (निंदाव्यंजक उपयोग). २ ज्यानें नुसतें सांगि- तलेलें काम करावयाचें आहे असा; नुसता तंतोतंत हुकूम पाळला पाहिजे असा. (वाप्र.) सांगितल्या कामाचा दिल्या भाक- रोचा-केवळ सांगितलेलेंच काम करणारा व मिळेल तें खाणारा. ॰सरभरा-स्त्री. १ बोलण्यानें, (एखाद्याबद्दल) गौरवानें सांगून, शिफारस करून मदत करणें. 'त्यानें स्वतः कांहीं दिलें नाहीं पण माझी सांगसरभरा अशी केली कीं माझें लग्न झालें.' २ मदतीच्या थापा देणें; शाब्दिक मदत. 'होय, हा माझा माबाप खरा. ह्यानें असें करीन तसें करीन, हें देईन तें देईन म्हणतां माझी सांगसरभरा केली.' ॰सुगरण-सुग्रण-वि. नुसती बोलण्यांत हुषार; तोंडपाटिलकी करणारी स्त्री. 'मावशी म्हणजे सांगसुग्रण, चुलीजव- ळच्या नुसत्या गप्पा.' ॰सुगराई-सुग्राईस्त्री. बोलण्यांत शहाणा पणा. सांगणा-वि. निरोप्या; बोलावणेंकरी. -ख्रिपु २.४.१२. [सांगणें] सांगणी-क्रि. १ शिकवण; आदेश; सूचना. २ सांगणें; बोलणें; निरोप (क्रि॰ सांगणें). ३ शिकवण्याची, समजूत देण्याची पद्धत. सांगणीचा-वि. १ वधूपक्षीयांनीं वधूकरितां द्रव्य किंवा कांहीं मोबदला न घेतां तिचा केलेला (वाङ्निश्चय, विवाह). २ अशाप्रकारें विवाहित (कन्या). सांगणें-अक्रि. १ कळविणें; कथणें. २ करण्याविषयीं आज्ञापिणें; सुचविणें (काम, मामलत, अधिकार, रोजगार, चाकरी इ॰). ३ बोलावणें, निमंत्रण करणें (भोजन, समारंभ इ॰ स). ४ शिकविणें; समजावणें (अध्ययन, ग्रंथ, विद्या इ॰). ५ म्हणून दाखविणें (विद्या- र्थ्यास शिक्षकास, धडा इ॰). [प्रा. संघइ-तुल॰ सं. सांगतिक = गोष्टी सांगणारा; मनु ३.१०३.] (दुखणीं, संकटें, कुकर्मे इ॰ नीं) (अवघड, कठीण, जड) सागणें-(त्यांचा) परि- णाम कठीण होणें. सांगून येणें-विवाहासाठीं देऊं करणें (मुलगी). 'माझ्या भावास एक मुलगी सांगून आली आहे.' सांगणोवांगणी, सांगा(गी-गो)वांगी, सांगा- सांगी-स्त्री. १ प्रत्यक्ष प्रमाण नसतां एकानें दुसर्यास, दुसर्यानें तिसर्यास सांगण्याची परंपरा; ऐकीव गोष्ट; गप्पा. 'सांगणो- वांगणीचें काम नव्हे । आपुल्या अनुभवें जाणावें ।' -दा १०. १०.५३. २ गप्पा छाटणें; बकवा करणें. ३ एखादी गोष्ट अनेकांना सांगणें; बोभाटा करणें. [सांगणें द्वि.] म्ह॰ सांगा- सांगीं वडाला वांगी. सांगता-वि. सांगणारा. 'हरिकथेची महिमा कैसी । आदरें पुसतां सांगत्यासी ।' -एभा ३.५८७. सांगवा-पु. (माण. क.) निरोप. 'मला तुमचा सांगवा पोंचला नाहीं.' सांगी-स्त्री. सांग पहा. १ निरोप. २ उपदेश; समजावणी. 'दुष्टांच्या सांगीवरून आथेल्लोची दुर्गति झाली.' -विवि ८.४.८२. ३ आज्ञा; हुकूम. सांगिजणें-सांगणें; सांगि तलें जाणें. -विपू २.७९. 'कसें कार्या या तुम्हीं सांगिजे तें ।' -र ३८. 'मग आणिक उपचारु केला तेहीं । तो सांगिजैलु आतां ।' -शिशु ७७२.
दश
वि. दहा संख्या. (समासांत) दक्ष-रात्र, दशावतार, दश-दिशा. [सं. ग्री. डेकॅ; लॅ. देसेम्; गॉ. तैहुन्; आर्मो. डेक; हिब्रू. देअघ्; लिथु. देझिंथिस्; स्ला. देस्यति; फ्रें. जिप्सी देश; आर्मेनियम लसे] दशक-पु. १ दहांचा समुदाय. २ (गणित.) घेत- लेले-धरलेले दहा. ३ दर शेकडां दहा. दशक चढविणें-वर्चस्व स्थापणें, बसविणें. दश-कंठ-कंधर-ग्रीव-मुख्य-पु. रावण. [सं.] ॰कामजव्यसन-न. काम (इच्छा) यापासून उत्पन्न होणारे दहा दुर्गुण:- शिकार करणें, जुवा खेळणें, दिवसां निजणें, शिव्या देणें; रांडबाजी, दारू पिणें, नाचणें, गाणें, खेळणें, ढोंगी- पणा इ॰. ॰ग्रंथ-पुअव. वेद व त्यांची उपांगे; संहिता, ब्राह्मण, आरण्यक, आणि शिक्षा, कल्प, व्याकरण, निघंटु, निरुत्क, छंद, ज्योतिष. [सं. दश + ग्रंथ] ॰ग्रंथी-वि. वरील दशग्रंथ पढलेला. ॰दानें-नअव. दहा दानें; गो, भूमि, तिल, सुवर्ण, घृत, वस्त्र, धान्य, गूळ, लवण (मीठ), रुपें. ॰दिशास्त्रीअव. या पुढील प्रमाणें आहेत:- पूर्व; पश्चिम,दक्षिण, उत्तर या मुख्य दिशा, व आग्नेयी, नैऋत्य, वायव्य, ईशान्य या चार उपदिशा, आणि ऊर्ध्व व अधोदिशा. -क्रिवि. सर्व दिशांना-बाजूंना; सर्वत्र; चहूंकडे (क्रि॰ पळणें; फेकणें). ॰देह-पुअव. (वेदांत) दहादेह. 'चारी पिंडीं च्यारी ब्रह्मांडी । ऐसी अष्ट देहाची प्रौढी । प्रकृतिपुरुषांची वाढी । दशदेह बोलिजे ।' -दा ८.७.४१. ॰नाडी-स्त्रीअव. (योग.) दहा नाड्या; इडा, पिंगला, सुषुम्ना, गांधारी, जीवनी, दशतुंडी, दीक्षा, बाणदशा, शंखिनी, आणि सौक्षिणी या दहा. -कथा ७. ३.८६ । ८७. ॰नाद-पुअव. चीणी, चिंचिणी, घंटा, शंख, तंत्री, ताल, वेणु, मृदंग, भेरी व मेघ (याचा नाद, रव). 'तया कमळाचया सुगंधें । जीवभ्रमर झुंकारे दशनादें ।' -स्वादि ९.५.३६. ॰नाम संन्यासी-पु. अव. गिरी, पुरी, भारती, आनंद, चैतन्य, पर्वत, सागर इ॰ संन्याशाचे दहा पंथ. ॰पाद-पु. कुरली, झिंग्या खेंकडा इ॰ दहा पायांचे कीटक, प्राणी. (इं.) डेकॅपोडा. ॰पिंड-पु. अव. मृत मनुष्यास पहिल्या दिवसापासून दहा दिवसपर्यंत देररोज एक किंवा दहाव्या दिवशीं एकदम द्यावयाचे भाताचे दहा पिंड. ॰भुजी-स्त्री. दहा हातांची दुर्गादेवी. ॰मुखपु. रावण. ॰मूळ- न. दहा वनस्पतींच्या मुळांपासून केलेलें औषध हीं मुळें:- बेल; टाकळा, टेटू, शिवण, पाडळ, साळवण, गोखरू, पिठवण, डोरली व रिंगणी अशीं आहेत. ॰रथ ललिता-रथ थळीस्त्री. आश्विन कृष्ण चतुर्थीच्या रात्रीं करावयाचें एक व्रत, तत्संबंधीं गणपतीपूजन. ॰रात्र-न. दहा दिवस, रात्री; दशाह. ॰वंत-पु. (शीखधर्म) स्वतःच्या उत्पन्नाचा धर्मासाठीं एकदशांश भाग द्यावयाचा. ॰विध- वि. दहा प्रकारचें. ॰हरा-हार-पु. दशाहरा पहा. दशम- वि. दहावा. दशमग्रह-पु. (विनोदानें) जांवई. दशम- द्वार-पु. (योग.) १ पोत; एखादी जखम वाहण्याकरितां उघडी रहावी म्हणून तींत जी वात घालतात ती. २ ब्रह्मरंघ्र (शरीरास नऊ द्वारें आहेत तीं सोडून टाळूवरील). ३ (सांकेतिक) गुद. दशम- भ्रांती-स्त्री. मोजतांना एखादा मनुष्य आपणा स्वतःस विसरतो त्यावेळीं म्हणतात. गोष्टींत दहाजणांची मोजणी करतांना मोजणारा स्वतःस विसरला त्यावरून). दशमानपद्धति-स्त्री. मेट्रिक सिस्टीम या इंग्रजी शब्दास प्रतिशब्द. या पद्धतींत मीटर हें परि- णाम धरलें जातें व इतर परिमाणें दसपटीनें अगर दहाव्या हिश्शानें चढत उतरत जातात. १ मीटर = १.१ यार्ड-वार. ॰मांश-पु. १ दहावा भाग; दशांश. २ (ल.) टाइथ या बायबलांतील इंग्रजी शब्दास प्रतिशब्द. 'त्यानें अब्राहमापासून दशमांश घेतला.' -इब्री ७.६. दशमीस्त्री. १ चैत्रादि महिन्यांच्या दोन्ही पक्षां- तील दहावी तिथि. २ दशमी दशा; मानवी जीवनयात्रेचा शेवटचा अथवा दहावा भाग. दशांक-पु. दहाचा आंकडा. दशांकचिन्ह- न. नागाच्या फणीवरील दहाच्या आंकड्या सारखें चिन्ह. दशांग- न. चंदनादि दहा सुगंधीद्रव्यांचा धूप. दशांगुळें-नअव. १ दहा बोटें. 'तो परमात्मा दशांगुळें उरला ।' २ आठव्या महिन्यांत गर्भास दहा बोटें उत्पन्न होतात म्हणून गर्भवती स्त्रीचा त्यावेळीं करावयाचा एक संस्कार. ३ दोन हातांच्या दहा बोटांत घाला- वयाचा एक दागिना. 'पोल्हारें विरुद्या दशांगुळिं वळीं गर्जोनियां पोंचटें ।' -अकक २ अनंत-सीतास्वयंवर ३९. दशांतला- वि. ज्यांचे सुतक दहा दिवस धरावें लागतें अशा नात्यांतला.
आई
एक भावदर्शक प्रत्यय. हा विशेषणास लावला असतां भाववाचक नाम होतें. उ॰ भला-भलाई कुचर = कुचराई; नरमाई, बारकाई, गनिमाई. [फा.]
आई
प्रत्यय. एक भावदर्शक प्रत्यय. हा विशेषणास लावला असता भाववाचक नाम तयार होते,उदा. भले–भलाई, कुचर–कुचराई, नरम–नरमाई, नवल–नवलाई, गोल–गोलाई, महाग–महागाई, स्वस्त–स्वस्ताई, निळा–निळाई. [फा.] आईआंग
आबान
(पु.) हिंदी अर्थ : महीने का नाम. मराठी अर्थ : महिन्याचें नांव.
अभिधान
न. १ नांव; नाम. 'आतां विषयाभिधान- । भेदु आइकें ।।' -ज्ञा १३.११६. २ नामनिर्देश; उल्लेख; अर्थबोध. 'घट हा शब्द कंबुग्रीवादिमान् जो व्यक्तिविशेष त्यांचे अभिधान करतो.' ३ नांव सांगणें; नांव घेणें. ४ व्याख्या करणें; लक्षण करणें. 'आतां दुःखाची आंतुवट वेली । दोषकाट्यांची जरी भरली । तरी निजाभिधानीं घाली । असुरी ते ।' -ज्ञा १६.२१३. ५ शब्द. ६ शब्दसंग्रह; शब्दकोश. उ॰ हेमचंद्राचा अभिधानचिंतामणि हा समानार्थक कोश; हलायुधाचा अभिधानरत्नमाला हा कोश. ७ (व्या.) कर्त्याबद्दल विधान. [सं. अभि + धा = ठेवणें]. ॰कोश- पु. अनेक कोशांचें ज्ञान; चौसष्ट कलांपैकीं एक कला. [सं.]
(सं) न० नाम, नांव.
अडनांव
न. १ उपनांव; घराण्याचें-वंशाचे नांव; कुलनाम; आडनांव पहा. २ अयथार्थ नांव. 'जीभ जै आरोगूं जाये । मग रसना हें होये । आडनांव कीं ।।' -अमृत ६.६२; 'तैसें स्त्रीसंगें जें सुख । तें अडनांवामात्र देख ।।' -मुरंशु ३६५; [सं अर्धनाम? का. अड्ड + नाव; तु॰ का. अड्डहेसरु. अट्ट = मोठें, (श्रेष्ठ) + नाम. इं. सर (श्रेष्ठ) + नेम (नांव). हिं. अडक]
अद्वैतकुसरी
अद्वैतकुसरी advaitakusarī f (Poetry.) The profound mystery or wisdom of अद्वैत (identity of God and all things). Ex. एक नाम हरी द्वैतनाम दूरी ॥ अ0 विरिळा जाणें ॥
अधोरंध्र
न. अपानद्वार; गुदद्वार. ' अधोरंध्नाचेनि वाहे । अपानु हें नाम लाहे ।' -ज्ञा १८.३३८. [सं.]
अधोरंध्र.
अपानद्वार; गुदद्वार : ‘अधोरंध्राचेनि वाहे । अपानु हे नाम लाहे ।’ – ज्ञा १८·३३८. [सं.] अधोरेखा
अधर्म
पु. १ शास्त्रविरुद्ध आचरण, वर्तन; धर्मबाह्य आच- रण. २ पाप; गुन्हा; वाईट कर्म. [सं.]. ॰चारी-वि. अधर्मानें वागणारा; धर्मबाह्य वर्तन करणारा. ॰युद्ध-न. बेकायदेशीर-अनीतीचें युद्ध; कपटयुद्ध. ॰रत-वि. अधर्माचरण करण्यांत आनंद मानणारा. 'अवघे देखिले अधर्मरत । वरिवरि आचार दाखवित । जैशी शांति मैदाची ।।' ॰विपाक-पु. अधर्माचा अखेरचा (वाईट) परि- णाम; अनीतीचें फल.
अध्यक्षी
पु. सर्वांकडे पहाणारा; सर्वत्र ज्याची दृष्टि आहे असा; सर्वश्रेष्ठ. 'सर्वांसाक्षी । अध्यक्षी हें नाम त्या ।।' -निगा ४१३. [सं. अध्यक्ष]
अध्यक्षी
पु. सर्वांकडे पाहणारा; ज्याची दृष्टी सर्वत्र आहे असा; सर्वश्रेष्ठ : ‘सर्वांसाक्षी । अध्यक्षी हें नाम त्या ॥’–निगा ४१३. [सं.]
आगळे
क्रिवि. अमर्याद : ‘नाही भीडभाड, बोलसी आगळे’ − नाम १७१८.
अहीर
पु. १. गवळी; गवळ्याची जात : ‘शिरे विषयवासना जशि शुका अहीरास भी ।’ –केका १४. २. आभिर– गवळी जात. ही खानदेशात व मराठवाड्यात आढळते. यातील निरनिराळे धंदे करणाऱ्या लोकांच्या जातींना पूर्वी हे नाम लावलेले आढळते. जसे– अहीर सोनार, अहीर हलवाई. [सं. अहीर]
अहिराणी
स्त्री. एक खानदेशांतील भाषा. ही मराठीची पोट भाषा म्हणून मानण्यांत येते. हिच्यावर गुजराथीचा बराच परि- णाम झालेला दिसतो. [सं. आभीर-अहीर, एक राष्ट्र]
आहणा, आहाणा
पु. १ आणा. उक्ति; म्हण; वचन; न्याय; दृष्टांत. 'एक अनी चुकी तो बारा बरसका हयात, ऐसा आहणा प्रसिद्ध आहे. -भाब ११८. २ लग्नांत वधूवरांनीं परस्प- रांचीं नांवें घेणें किंवा लग्नांत बायका व शिमग्यांत पुरुष विनोदी किंवा अश्लील पद्यमय वाक्यें बोलतात तो; उखाणा. 'तो आहनी रुचिर गोवुनि नाम खासें । बोले मधूर वचना रद-कांति भासे ।' -विवि ५९.३४. ३ कोडें; उखाणा; अहाणा पहा. [वै. अहनस्या; सं. आख्यान; प्रा. आहाण; किंवा सं. आहन; प्रा. आहण]
आहणा, आहाणा, आहाना
पु. १. उखाणा; उक्ती; म्हण; वचन; न्याय; दृष्टांत : ‘एक अनी चुकी तो बारा बरसका हयात, ऐसा आहणा प्रसिद्ध आहे.’ − भाब ११८. २. लग्नात वधूवरांनी परस्परांची नावे घेणे किंवा लग्नात बायका व शिमग्यात पुरुष विनोदी किंवा अश्लील पद्यमय वाक्ये बोलतात तो उखाणा : ‘तो आहनी रुचिर गोवुनि नाम खासें । बोले मधूर वचना रद−कांति भासे ।’ − विवि ५९·३४. ३. कोडे; उखाणा. [सं. आख्यान्]
अिस्म
(पु.) हिंदी अर्थ : संज्ञा. मराठी अर्थ : नाम.
अिस्म बा मुसम्मा
हिंदी अर्थ : यथा नाम तथा गुण मराठी अर्थ : नांवाप्रमाणें कृति.
अजित
वि. जिंकला न गेलेला; सदैव विजयी; ज्याचा कोणी कधी पराभव केला नाही असा (ईश्वर) : ‘अजित नाम वदो भलत्या मिसे । सकल पातक भस्म करीतसे ।’ – वामन. [सं.] (वा.) अजित जाणे – एखाद्याला हार जाणे; एखाद्याचे वर्चस्व मान्य करणे. अजित होणे – मेटाकुटीस येणे; रडकुंडीस येणे; नुकसान होणे.
अजित
वि. ज्याचा कोणी कधीं पराभव केला नाहीं असा (ईश्वर). 'अजित नाम वदों भलत्या मिषें । सकल पातक भस्म करी- तसे ।' -वामन. [सं.]. ॰जाणें-एकाद्याला हार जाणें; एकाद्याचें वर्चस्व कबूल करणें; -चुकीचा प्रयोग,जित ऐवजीं अजित. 'मी कशाला कोणाला अजित जाऊं;' 'मी काय तुला अजित जाणार कीं काय?' ॰होणें-(ना.) मेटाकुटीस येणें; रडकुंडीस येणें; नुकसान येणें; ॰पत्र-न. १ पूर्वीं पंडित वादविवाद करीत इतर पंडितांस वादांत जिंकण्याकरितां फिरत असत त्यावेळीं विशिष्ट व्यक्ति अजिंक्य ठरली असें लिहून दिलेलें पत्र; त्यावरून पुढें उलट अर्थ झाला; जितपत्र; वादांत किंवा खेळांत पराभूत झाल्यानें तशी कबुली देणें. २ खट- ल्यांत हरलेल्या पक्षानें ज्यावर आपला पराभव लिहून दिला तें पत्र. 'त्या गांवच्या ब्राह्मणांनीं त्या विद्वानास अ॰ दिलें;' 'रामभट काशीस जाऊन अ॰ घेऊन आला.' (याप्रमाणें हा शब्द द्वर्थीं वापरतात).
आजूर
(पु.) हिंदी अर्थ : अेक महीनेका नाम. मराठी अर्थ : महिन्याचें नांव.
आकळणे
उक्रि. १. समजणे; बोध होणे; लक्षात येणे; आटोक्यात, आवाक्यात येणे : ‘किती समुदाय आकळेना ।’ − दास १९·१०·११. २. ओढून घेणे; वश करणे; स्वाधीन ठेवणे : ‘तुझे कुशल नाम बा हळुहळू मना आकली ।’ − केका ७४. ३. जवळ घेणे; ओढणे; कुरवाळणे; (ल.) चुंबणे. ४. (ल.) आवरणे; किंचित मर्यादित करणे (धंदा, प्रकरण वगैरे). ५. ओढणे; निग्रह करणे; ताब्यात ठेवणे; बांधणे : ‘परि त्या गर्वे आकळिलीं’ − रासपं २५९८. ६. सापडणे : ‘अहं सोहं ब्रह्म आकळले’ − तुगा ४०३६. झाकोळणे; व्यापला जाणे : ‘तैसा तो धनुर्धरु महामोहें । आकळिला ।’ − ज्ञा १·१९०. ७. जाणणे; बांधणे; समाविष्ट करणे. [सं. आकलन]
आकळणें
उक्रि. १ ओढणें; निग्रह करणें; ताब्यांत ठेवणें; बांधणें. ‘परी त्या गर्वें आकळिलीं’ –रासपं २.५९८. ‘अंगुष्ठमात्र प्राण पुरुष । आकळोनि काढिला ।’ –भुवन ६.६३. २ समजणें; बोध होणें; लक्षांत येणें; आटोक्यांत, आवांक्यांत येणें. ‘किती समुदाय आकळेना ।’ –दा १९.१०.११. ‘बळें आकळेना मिळेना मिळेना ।’ -राम १४२.-एभा २०.६९. ‘परि योग्य वीर समर-क्रीडोत्सुक- चित्त काय आकळतें ।’ –मोभीष्म १२.६५. ३ (ल.) आवरणें; किंचित मर्यादित करणें (धंदा, प्रकरण वगैरे). ४ सांपडणें. ‘अहं सोहं ब्रह्म आकळलें ।’ –तुगा ४०३६. ५ व्यापला जाणें. ‘तैसा तो धनुर्धर महामोहें । आकळिला ।’ -ज्ञा १.१९०. ६ ओढून घेणें; वश करणें. स्वाधीन ठेवणें. –एभा २९.४७. ‘तुझें कुशल नाम बा हळुहळू मना आकळी ।’ –केका ७४. ७ जवळ घेणें; ओढणें; कुरवाळणें. (ल.) चुंबिणें. ‘थानें चोळूनिशानें वदनकमळहि आकळीलें पतीनें ।’ –विठ्ठलकृत रंसमंजरी १०. [सं. आकलन]
अमासा
वि. क्रिवि. (को.) अल्प; लहान; अमळ-सा पहा. 'तो अंतरात्मा आहे कैसा । प्रस्तुत वोळखाना अमासा ।' -दा १०. १०.३६. -सें-क्रिवि. (व. अमाशानें.) थोड्या वेळानें; अंमळ- शानें. 'किंबहुना ज्याचें नाम ऐसें । त्याचें स्वरूप असेल कैसें । तें पाहों आद्यंत अमासें । निजनाम सोई ।' -स्वादि १.५.४१. [वैसं. अम्नस्; सं. अभ् = थोडें]
अमासे
क्रिवि. थोड्या वेळाने; अंमळशाने : ‘किंबहुना ज्याचे नाम ऐसें । त्याचे स्वरूप असेल कैसें । ते पाहो आद्यंत अमासें । निजमान सोई ।’– स्वादि १·५·४१; अमाशाने (व.) [सं.]
आमंत्रिक
पु. मांत्रिक; मंत्र म्हणणारा : ‘बोलवा वहिले आमंत्रिक’ − नाम ८२.
आनत्व
न. भिनत्व : ‘आनत्व जाला आपणचि’ − नाम ४६०.
अणु
पु. १ पदार्थाचा स्वतंत्र रीतीनें अस्तित्व असणारा अतिसूक्ष्म भाग; रजःकण (सूर्यकिरणांत जें धुळीचे कण दृग्गोचर होतात त्यांच्या षष्ठांशानें लहान असणारा); (इं.) मोलेक्यूल. 'जें पाहतां त्रिभुवन ।अणुही नोहे ।।' -ज्ञा १६.३३१. २ कालाचा एक भाग-मुहुर्ताचा (४८ मिनिटांचा ) ५४६७५००० वा हिस्सा. ३ (संगीत) पावमात्रा काल. -वि. अति लहान; अल्प; सूक्ष्म. 'तुम्हासमचि हें गुणें अणु उभे नसें नाम हा ।' -केका ७५. [सं.]
अनुवादणें
क्रि. १ पुन्हां पुन्हां सांगणें, म्हणणें; पाठ करणें; पोपटपंची करणें. 'त्याचें नाम व्यर्थ वारकर । जैसें कीर अनुवादति ।' २ बोलणें; सांगणें. 'तें दु:ख मनां वाचेसीं । अनुवादवे ना ।' -शिशु १०२; 'तो स्वयें सर्वेश्वरू । प्रत्यक्ष अनुवादला ।।' -ज्ञा १.७२; 'ऐशी शूर्पणखा अनुवादली' - रावि १४.१३७. ३ स्पष्ट करणें; ' ऐसें बहुधा निरोपिलें । ग्रंथगर्भी जें बोलिलें । तें अवघेंचि अनु- वादले । न वचे किं कदां ।' -दा १.१.१३. [सं.]
अनुवादणें anuvādaṇēṃ v c (Poetry.) To perform or do अनु- वाद. 2 To repeat idly as a parrot. Ex. त्याचें नाम व्यर्थ करकर ॥ जैसे कीर अनुवादति ॥
अंगभोग
पु. शारीरिक उपचार, नितणे. २. उपभोग; भोजन : ‘मनाचा प्रसाद तुजलागी केला । अंगभोग अपुला घेउनि राहे’ – नाम १४८२.
अंगभूत
वि. १. अंगचाच असलेला; एखाद्या वस्तूचा भाग, अंश असलेला; समाविष्ट; तदंतर्गत; संबंधी; आश्रयी; अवलंबून असलेला; दुय्यम : ‘मंदी व बेकारी तिच्या अंगभूत राहिली नाहीत.’ –मार्क्स ३३·२. निकटवर्ती : ‘काय तुमचा नामा अंगभूत’ –नाम ९३५. [सं.]
अंगसंगति
स्त्री. सहवास : ‘तुझिया संतांची अंगसंगति । ते शिणलिया विश्रांति संसारिया ।’ – नाम १४५५.
आंकण, आंकणा, आंकणे
पु. न. १. पायात घालायचा तोडा; (पूर्वी शत्रूला जिंकल्यानंतर त्याचे नाव एका तोड्यावर खोदून तो पायात घालायची चाल होती त्यावरून) पराक्रमसूचक पादभूषण : ‘तो रणीं जितिला करूनिं नेम । तेणें संतोषोनि परम । आपलें नाम आंकणा घालीं ।’ एभा १९·१४३. २. (सामा.) ब्रीद; बिरुद; ब्रीदावळी; अलंकार; भूषणें : ‘हें आंकणें अनंता तुजचि साजे ।’ − भाए ६५०; ‘आंगाचेनि गोरेपणें हे पण्हरेयांवरी पढवी आंकणें’− शिव ८०७. भा.ए. [सं. अंकन]
आंकण-णा-णें
पुन. १ पायांत घालावयाचा तोडा(पूर्वी शत्रूला जिंकल्यानंतर त्याचें नाव एका तोड्यावर खोदून तो पायांत घालण्याची चाल होती त्यावरून); पराक्रमसूचक पादभूषण. 'तो रणीं जिंतिला करूनि नेम । तेणें संतोषोनी परम । आपलें नाम आंकणा घाली । ' -एभा १९.१४३. [सं. अंकन] २ (सामा.) ब्रीद; बिरुद; ब्रीदावळी; अलंकार; भूषण. 'आंगाचेनि गोरेपणें । हे पण्हरेयांवरी पढवी आंकणें ।' -शिशु ८०७. 'हें आंकणें अनंता तुजचि साजे ।'-भाए ६५०.
अंतर्भूत
वि. समाविष्ट; अंतर्गत; अंतस्थित : ‘नाम धरियेले कंठी । असें अंतर्भूत पोटी ।’ [सं.]
अंतर्भूत
वि. समाविष्ट; अंतर्गत; अंतस्थित. 'नाम धरि- येलें कंठीं । असें अंतर्भूत पोटीं ।।' [सं.]
अंतर्भूत antarbhūta a S Comprised or comprehended under; included, involved, inseated. Ex. नाम धरियेलें कंठीं ॥ असें अं0 पोटीं ॥
अपादान
न. १. दूरीकरण; वियोग. २. पंचमी विभक्तीचा अर्थ. ३. पंचमी विभक्तीतील नाम. पंचमी विभक्तीचे रूप. [सं.]
अपादान
न. १ पंचमी विभक्तीचा अर्थ. २ दूरीकरण; वियोग ३ पंचमी विभक्तींतील नाम. [सं. अप + आ + दा]
अपेय
वि. पिण्यास अयोग्य, निषिद्ध मानलेले (दारू इ.) : ‘कां बधिराचे नीट कान । अपेया नाम पान ।’ – १८·५८०. [सं.]
अपेय
वि. पिण्यास अयोग्य; शास्त्रानें पिण्याला निषिद्ध मान- लेलें. (दारू इ॰) 'कां बधिराचे नीट कान । अपेया नाम पान ।' -ज्ञा १८.५८०. [सं.]. ॰पान-दारू वगैरे निषिद्ध पेयाचें सेवन करणें.
अपत्य
न.१ मूल; संतान (पुत्र किंवा कन्या); संतति. 'जैसा स्वभावो मायबापांचा ।अपत्य बोले जरी बोबडी वाचा । तरी अधि- कचि तयाचा । संतोष आथी ।।' -ज्ञा १.६४. २ वडील माणसास (विशेषतः मातापितरांस) लिहितांना स्वतःस वापरावयाचा शब्द. 'अपत्यें (बालकें) वामनाचा शिरसाष्टांग नमस्कार.' ॰वाचक- वि. (व्या.) मातापित्याच्या किंवा एकाद्या पूर्वजाच्या नांवावरून पड- लेलें; वांशिक (वंश) नाम. उ॰ कौशिक, भार्गव, कौंतेय, पार्थ, राघव, इ॰. ॰विक्रय-पु. मुलाची विक्री (एक महापातक). [सं. अ + पत्]
आपवर्ग
पु. आप्तवर्ग; नातेवाईक : ‘आपवर्गि सांडिलों, गोत्रजां तुटलो’ − नाम १५७१.
आरजा
स्त्री. ज्येष्ठ : ‘रुक्माई म्हणे परियेसी वो आरजे’ − नाम ९४६. [सं. आर्या.]
अरंग
वि. निर्गुणत्वाने : ‘म्हणे तेथें चौक्या ज्या रंगल्या । अरंग मिरवल्या संतसंगे ।’ – नाम २०३३.
अशौच
न. १. सुतक; अपवित्र स्थिती; मरणाशौच. २. मलिनपणा : ‘अशौच तो बाधी आणिकां अक्षरां । नाम निदसुरा घेतां तरे ॥’ – तुगा २५१३. [सं.]
अशौच
न. (प्र.) आशौच. १ सुतक; अपवित्रस्थिति. आशौच पहा. २ मलिनपणा; अपवित्रस्थिति. 'अशौच तो बाधी आणिकां अक्षरां । नाम निदसुरा घेतां तरे ।।' -तुगा २५१३. -वि. अप- वित्र; पतित. 'जालों मी अति अशौच ।' -विपू १.९०; -एभा १६.३०४. [सं. आशौच]
आत्मसोय
स्त्री. आत्मज्ञानाचा मार्ग : ‘पाहे पां केवळ आत्मसोये’ − नाम १८१२.
आटोप
पु. १. सामर्थ्य; आवेश; उत्साह; ‘सूर्य उदयपर्यंत कोपें । प्राची जिंतिली आटोपें ।’ − मुआदि २१·१२. २. पसारा; व्याप: ‘व्यापेंविण आटोप केला ।’ − दास १९·८·१५. ३. संघटना; सुयंत्रणा; व्यवस्था: ‘गेले बहुत आटोपाचे । कार्यकर्ते ।’ − दास ३·९·५१. ४. बंदोबस्त; नियंत्रण; निर्बंधन; संरक्षण. ५. अभिमान; गर्व; ताठा; डौल: ‘आपलेनीचि आटोपें । धनित्वाचेनि दर्पें ।’ − ज्ञा १७·२५. ६. जोर; अतिक्रम; क्षोभ : ‘ज्वराचेनि आटोपे । रोगी भलतैसें जल्पे ।’ − ज्ञा १६·३६४. ७. आवर; उरक; आवरशक्ती : ‘एवढा कारभार झेंपावयास त्याचे अंगीं आटोप नाहीं.’ ८. स्वाधीनता; ताबा : ‘प्रकृतीचेनि आटोपें । वर्ततु असे ॥’ − ज्ञा ३·१८४. ९. संधान; १०. पकड. ११. पहा : अटप ‘विश्व त्वां आटोपें वश केले’ − नाम १३८८. [सं.]
अवतरणिका
स्री. १ अवतरण; भाष्य; टीका. २ प्रस्ता- वना; सूचना. ३ अनुक्रमणिका; विषयसूचि; सारांश. 'ऐसें नाम- धारक विनवीत । सिद्धाचे चरणीं लागत । म्हणे श्रीगुरुचरितामृत । अवतरणिका मज सांगा ।।' -गुच. ५३.१३. [सं.]
बाबुल
(पु.) हिंदी अर्थ : बैबिलोन नगरका नाम. मराठी अर्थ : शहराचें नांव.
बाहणें
बाहणें bāhaṇēṃ v c (In poetry and amongst the vulgar.) To call. Ex. वनीं नाम घेवुनि बाहे ॥.
बाळसंतोष
पु. भिकार्यांचा एक वर्ग किंवा त्यांतील एक व्यक्ति. हे भिकारी बाळसंतोष हा शब्द मोठ्यानें म्हणून जुने कपडे मागतात. यांच्या अंगावर नाना रंगाची वस्त्रें असतात. 'बाबा बाळसंतोष, बाबा बाळसंतोष, नाम घेतां हरती दोष ।' -दावि ५०१. [सं. बाळ + संतोष] (वाप्र.) उघडाबोडा बाळ- संतोष-वि. १ निर्धन. २ ज्यास कोणी मागेंपुढें नाहीं असा.
बडंबा
पु. व्यर्थ गलबला; कोलाहल; बडबड. 'मग नाम- रूपाचा बडंबा । करिती वायां ।' -ज्ञा १५.२७६. [प्रा.]
बिचकणी, बिचकावणी
स्त्री. दचकणी; संभ्रांत स्थिति; भिणें; बिचकणें (धातुसाधित. नाम).
बीजांकित
बीजांकित bījāṅkita a (S) Marked, circumscribed, or defined by the mystical letter called बीज. Ex. राम- नाम बी0.
भौम
पु. एक पापग्रह; पृथ्वीचा पुत्र; मंगळ. 'नातरी भौमा नाम मंगळु । रोहिणीतें म्हणती जळु ।' -ज्ञा १५.११६. [सं.] ॰वार-वासर-पु. मंगळवार.
भोज
न. १ उल्हास; आनंद. 'मग तया बोधाचेनि माजें । नाचती संवादसुखाचीं भोजें ।' -ज्ञा १०.१२०. २ कर्तबगारी; करा- मत. 'जेणें जग आपुलेनि भोजें । नाचवीत असें ।' -ज्ञा ३.२४९. ३ चित्र; मूर्ति; सोंग. 'परि पुढें वालभाचें भोज । नाचत असे ।' -ज्ञा ६.१२३. ४ प्रेम; आवड; कौतुक; आदर; संतोष; सुख. 'जयाचे वाचेपुडें भोजे । नाम नाचत असे माझें ।' -ज्ञा ९.५०६. ५ वृद्धि; वाढ. 'तैसेंचि सत्व रज । लोपोनि तमाचें भोज ।' -ज्ञा १४.२००. ६ निधान; सांठा; ठेवा. 'अथवा दाविलें भोज । आनं- दाचें ।' -कथा १.६.१९३. ७ भोजन; जेवण. 'जेयां वाइलें राणिवेचें भोज ।' -शिशु ३६०. ८ राज्य. 'व्हावें कीं सुखाचें भोज ।' -स्वादि १२.१. ९२. ९ भूषण; अलंकार. 'कवण वाईल मंत्रि- पणाचें भोज!।' -भाए १३३. १० मोठेपणा; महत्त्व; मोल. [सं. भुक्] ॰कोटदेश-पु. कच्छदेश. -अश्वप १.३४. ॰राजा- पु. १ (महानु.) कंस राजा. 'करी कवलय पीडा भोजराजा निपांतु' -गस्तो ६१. २ एक धारचा उदार राजा.
भव
पु. १ शंकर. 'भव राज्य करी । भवानीशीं ।' -एभा' २४.२४८. २ संसार. 'भव नेणों । भव नेणों । सर्व हें ब्रह्मचि जाणों ।' -हंको. ३ सुखदुःखें, उद्योग आणि घोर एतद्विशिष्ट अस्तित्व; मृत्युलोक. 'जे आवडोनि घेतलें । भवस्वर्गादिक ।' -ज्ञा १४.४२. ४ जन्म; उत्पत्ति. 'पुढें अंतरीं सोडि चिंता भवाची ।' -राम २६. ५ सत्ता; अस्तित्व. ६ पासून उत्पन्न झालेला याअर्थीं समासांत प्राचुर्यानें योजतात. उदा॰ देहभव (शरीरापासून उत्पन्न झालेलें दुःख इ॰); मनोभव (मनापासून उत्पन्न झालेला क्रोध इ॰). तसेंच संसार या अर्थीं पूर्वपदीं योजतात. उदा॰ भव- चक्र-सागर-बाधा-रोग-दुःख-जाल-पाश-भंजन; भवानल; भवा- टवि इ॰. [सं.] सामाशब्द- ॰गोवा-संसाररूपी संकट. 'करुणासागर नाम सत्य करी उगवी भवगोवा ।' -देप ३३. [सं.] ॰च्छेदक-वि. संसाराचा नाश करणारा. 'विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके ।' -तुगा १५७३. [सं.] ॰जनक-दायक-वि. (दुसर्या) जन्मास कारणीभूत (पापकृत्ये. ह्यांना जन्मान्तराची शिक्षा व शुद्धी पाहिजे असते). [सं.] ॰डोह-डोहो-पु. प्रपंचरूप गर्ता, विवर, डोह. ॰तारीया-वि. भवतारक. ॰नदी-स्त्री. १ गंगा. २ संसारनदी. [सं.] ॰पाशनिक्रंदन-वि. (काव्य) प्रपंचाच्या पाशाचा छेद करणारा (ईश्वर). [सं.] ॰भंजन-वि. संसाराचा मोह तोडणारा. [सं.] ॰भय-न. अन्य जन्माचें, संसाराचें, भय. 'ज्याचे नांवाचें संकीर्तन । करी भवभयासी निकृंतन ।' [सं.] ॰भाव-पु. संसाराचें अस्तित्व. 'तेवीं मिथ्या प्रतीति भवभावा ।' -एभा ११.७३. [सं.] ॰मोचक-मोचन-वि. संसारापासून किंवा भिन्न आणि व्यक्तिविषयक अस्तित्वापासून सोडविणारा. 'तें तपोबळ जाण परि नव्हे भव मोचन ।' [सं.] ॰मोचन-न. मुक्ति. -वि. संसारापासून सोडविणारा. [सं.] ॰रोगनिरसन वैद्य- पु. संसारावरून मन उडविणारा, परमार्थसंबंधीं वैद्य (गुरू). [सं.] ॰रोगी-वि. प्रापंचिक उद्योगरूप, सुखरूप आजार झालेला; असमाधानकारक रीतीनें त्यांत डुबलेला. 'भवरोगिया आरोग्य येणेंचि होय ।' [सं.] ॰व्यथा-स्त्री. प्रापंचिक चिंता, दुःखें, श्रम, संताप; संसारदुःख. [सं] भवांतक-वि. (सायुज्य मुक्ति होऊन) जन्मान्तराचा नाश करणारा (ईश्वर) [सं.] भवाब्धि- पु. संसारसमुद्र. [सं.] भवार्त-वि. १ प्रपंचाचा वीट आलेला; प्रापंचिक दुःखांनीं व आभासांनीं कंटाळलेला. २ भवातुर; भवा- क्रान्त; भवरोगी; भवदुःखित; भवपीडित. [सं.] भवाभव-पु. उत्पत्ति आणि नाश. [सं.]
चाळक
वि. चपळ; चंचल : ‘चाळक माझे मन, पांगुळ पै जाले’ - नाम ३५५. [सं. चल्]
चाळविता
पु. चालक : ‘मना इंद्रियाचा तूंचि चाळविता’ - नाम १७२१.
चेहरा होना
हिंदी अर्थ : फौज में नाम लिखाना मराठी अर्थ : सैन्यांत नांव दाखल करणे, लढाअीवर जाणें.
चिकीर्षा
स्त्री. करण्याची इच्छा; [सं. कृ = करणें या पासून इच्छादर्शक भाववाचक नाम]
चिटणी
स्त्री. (चिटणेंपासून नाम.) चिटणें पहा. ॰स पडणें-मूल, वांसरूं यांच्या निःशेष पिण्यानें (गाईचें) क्षीण होत जाणें. 'वांसरूं चिटून चिटून पितें म्हणून गाय चिटणीस पडली. [ध्व]
चक्रापत्ति
स्त्री. चक्रांत सांपडणें; भोंवर्यांत सांपडणें. परस्पर विरुद्ध गोष्टींच्या परिणामांमुळें एखादी अनिष्ट गोष्ट घडत असणें; परस्परांवर अवलंबून असणार्या गोष्टींचा परि- णाम अनिष्ट होणें. इ. व्हिशससर्कल यास प्रतिशब्द. -के २८.११.१९४१. [सं. चक्र + आपत्ति]
चोखाळा
पु. (चोखाळणें पासून नाम) १ पूर्णपणें साफ- सूफ, स्वच्छ करणें. २ शोधणें; धुंडाळणें, बारीक रीतीनें तपासणें; पाहाणें; निरीक्षण करणें इ॰. [चोखाळणें] ॰घेणें-कसोशीनें झाडा घेणें; शोध करणें; तपासणें.
चोखाळा
पु. (चोखाळणे पासून नाम) १. पूर्णपणे साफसूफ स्वच्छ करणे. २. शोधणे; धुंडाळणे, बारीक रीतीने तपासणे; पाहणे; निरीक्षण करणे इ. (क्रि. घेणे.)
चोपण, चोपणी, चोपणे
स्त्री. न. १. (जमीन इ.) चोपण्याची, ठोकण्याची क्रिया (चोपणेपासून नाम). २. गवंड्याचे जमीन थोपण्याचे लाकडी हत्यार. हे हात दीड हात लांब, वीतभर रुंद व चार पाच बोटे जाड असून, याला हातात धरण्यासाठी मागे एक मूठ असते. [का. चप्पटे पेट्टणि; फा. चोब्]
चोपण-णी, चोपणें
स्त्रीन. १ (जमीन इ॰) चोपण्याची, ठोकण्याची क्रिया (चोपणें पासून नाम). २ गवंड्याचें जमीन चोप- ण्याचें लांकडी हत्यार. हें हात दीड हात लांब, वीतभर रुंद व चार पांच बोटें जाड असून, याला हातांत धरण्यासाठीं मागें एक मूठ असते. ३ लहान मुलांचें रिंगणें; चोखणी. ४ तेलकट कापड चिकण मातींत भिजवून ठेवणें. [फा. चोब् = काठी ? ध्व. चोप्]
चपेटघात
पु. चपराक : ‘कवटाळूनी चहूं हातीं । विदारिलें चपटघाती’ - नाम ४७५. [सं.]
चर्मक, चर्मकार
पु. चांभार; मोची; जोडे शिवणारा; : ‘नाम न म्हणे ज्याचें तोंड तेचि चर्मकाचें कुंड’ – तुगा २५०८. [सं.]
चटी
स्त्री. आवड; चट पहा. 'वाणीसहि लाउ चटि हरि- नाम ।' -मोकृष्ण ४६.१३०.
दाखिल खारिज
(पु.) हिंदी अर्थ : सरकारी काग़ज़ात पर हक़दार का नाम बदलना. मराठी अर्थ : सरकारी कागद पत्रांवर वारसाचें नांव लिहिणें, बदलणें, नोंद काढ.
दांतिरी, दांतोरी, दांतौर, दांतौरी
स्त्री. दातांची कवळी : ‘घाओ हाणौनि उतरीं दांतिरी : अविद्येची’ - उगी १५९; ‘खटखटां वाजतीं दांतोरी’ - नाम ४९९; ‘हो काज विजूसि वाजतुसे दांतौर’ - नरुस्व ४३८; ‘वाजतां दांतौरी : काही आइकिजे ना’ - शिव ९५०. [सं. दंत]
दाटणी
स्त्री. १. दाटी; दाटण. २. विपुलता; रेलचेल, लयलूट : ‘तेथ महानंदाची दाटणी ।’ - ज्ञा १६·१२. ३. (कापड इ. च्या गाठीची, गाठोड्याची बांधण्याची) कसणी; आवळण्याची दोरी. ४. दडपण. ५. (क्व.) दाट, घट्ट होण्याची क्रिया. ६. व्यापकता : ‘देवाचिया दाटणी । देउळा जाली आटणी ।’ - अमृ ७३७. ७. कष्ट; परिश्रम : ‘न लगे आटणी, तपाची दाटणी ।’ - चोखा ४९. ८. मिळणी; भेट : ‘नव्हे दाटणी चक्रासी ।’ - नाम ३९२.
दब्ब
क्रिवि. १. (पोट भरणे या शब्दाशी जोडून) आकंठ; फार भरल्यासारखे. २. याचा विशेषण व नाम या दोन्हीसारखा उपयोग होतो. पहा : दबदबीत [ध्व.]
दिंडी
स्त्री. १. लहान तंबोरी; एक वाद्य; वीणा : ‘हातीं टाळ दिंडी मुखीं नाम गाणें ।’ – तुगा ३४७. २. मिरवणुकीतील निशाणावर हनुमान इ. चे काढलेले चित्र, आकृती किंवा ते निशाण. ३. (देव, ग्रंथ इ. ची) मिरवणूक; भजनी मेळा; छबीना. ४. मराठी काव्यातील एक वृत्त. ५. डोणी; दगडाचे बादलीच्या आकाराचे पात्र. [क. दिड्डि]
दिंडी
स्त्री. १ लहान तंबोरी; एक वाद्य; वीणा. 'हातीं टाळ दिंडी मुखीं नाम गाणें ।' -तुगा ३४७. २ मिरवणुकी- मधील निशाणावर हनुमान इ॰ कांचें काढलेलें चित्र, आकृति किंवा तें निशाण. ३ (देव, ग्रंथ इ॰ ची) मिरवणूक; भजनी मेळा; छबीना. (क्रि॰ काढणें; मिरविणें; निघणें; चालणें; फिरणें). ४ मराठी काव्यांतील एक वृत्त. [का. दिड्डि] ॰गाण-पु. १ दिंडी वाद्य वाजवून भिक्षा मागणारा. 'वासुदेव दिंडीगाण । प्रसाद मांगू आले जाण ।' -लळित. २ दिंडी या वाद्यावर म्हणावयाचें गाणें. ॰पताका-स्त्रीअव. १ वाद्य वगैरे. २ यावरून (समुच्चयार्थीं) मूर्तीची मिरवणूक. (मंडळी, पताका, दिंड्या, झांजा मिळून); पताका, मृदंग इ॰ घेऊन मूर्तीच्या अथवा देवळाच्या भोंव- तालीं प्रदक्षिणा घालणार्या लोकांची मिरवणूक. (क्रि॰ काढणें; मिरवणें; निघणें; घालणें; फिरणें). 'दिंडीपताका बहुवस । विठ्ठल नामें होतसे घोष ।' -संवि ९.१७. [दिंडी + पताका]
दमणे
सक्रि. पराभूत करणे : ‘दमीत दुष्टासी स्वामी माझा’ – नाम ११९. [सं. दम्]
दरिद्र
न. १ गरीबी; निष्कांचनता; कंगालपणा. २ अभाव; न्यूनता; वाण; कमतरता. (अन्न, वस्त्र इ॰ जरुरीच्या पदार्थांचा). -वि. गरीब; गरजू; कंगाल. 'आशा ज्यास दरिद्र तोचि समजे नैराश्य पैं बाणतां ।' (वामन स्पुटश्लोक ७४, नवनीत पृ. १४२. [सं.] ॰दशा-दारिद्रावस्था-स्त्री. गरीबीची, हलाखीची स्थिति. ॰दामोदर-पु.अत्यंत गरीब माणूस; ज्याच्या घरीं अठरा विश्वे दारिद्रय आहे असा मनुष्य; दारिद्रयांचा राजा. ॰नाम संवत्सरे-अत्यंत भिकारी अथवा त्याची स्थिति यांस लावा- वयाचा शब्द. दरिद्रित-वि. गरीबी; आलेला; दैन्यावस्था प्राप्त झालेला. दरिद्री-वि. गरीब; कंगाल; निष्कांचन. २ नीच; कद्रू; कंजूष; चिक्कू. ३ (ल.) अपुरा; न्यून; सडसडीत; रोडका; भिकारी इ॰. ॰नारायण-पु.दरिद्र्यांचा कनवाळू; (ल.) महात्मा गांधी. ॰दरिद्री हाड-न. गरीब हाड; गरीब आईबाप किंवा कुळ यांत जन्मलेला माणूस; हलक्या पैदाशीचें गुरूं.
धारज(जि)णा
वि. अनुकूल; शुभकारक; उपयोगी पडणारा. (सेवा; निगा; त्रास; खर्च इ॰ काचें) फल देणारा (देव, राजा, मनुष्य, जनावर, धंदा, शेत इ॰). 'तुम्हांला नसे नाम तें धार- जीणें ।' -कचेश्वर-सुदामचरित्र पृ. २ 'हें शेत आम्हांला धार- जिणें नाहीं असें पाहूंन सोडून दिलें.' धारजिणें पहा. म्ह॰ १ दुष्टास देव धारजिणा. २ मेसादेवी चोरास धारजिणी. ३ कसा बास गाय धारजिणी.
धातमात, धातमान
स्त्री. १. युक्तिप्रयुक्ती; तर्क; अनुमान; अनुभव : ‘प्रकृतीची धातमात न चले पैं तेथें.’ - दावि १७५. २. मंत्रतंत्र; धंतरमंतर : ‘मनीं कामना चेटकें धातमाता।’ - राम १८०. ३. कल्पित व चमत्कारिक गोष्ट : ‘प्रसंगीं बोलाव्या अनेक धातमाता।’ - दास ४·२·१०. ४. शब्द आणि स्वर यांच्या रचनेचे कौशल्य : ‘धातमात करी नटे नाना परी।’ - नाम १८३१.
धातुनाम
न. क्रियावाचक नाम.
धातुसाधित
न. धातूवरून साधलेला, बनलेला (शब्द इ.) यात नाम, विशेषण, अव्यय असे भेद आहेत. [सं.]
धडाधड-धडां
क्रिवि. १ (इमारती कोसळतांना, सोंसा- ट्याच्या वार्यानें झाडांवरून फळें इ॰ पडतांना, मुसळधार पाऊस पड- तांना, बंदुकांची फैर झडतांना, भराभर चपराका, तडाखे लगाव- तांना) सातत्यानें, एका पाठीमागून एक, लागोपाठ मोठा आवाज होईल अशा प्रकारें. ' त्याच्या तोंडावर धडाधड शंभर चपराका चढ- विल्या. ' २ सातत्यानें; लागोपाठ; एकसारखें; धडक पहा. या अर्थीं हा शब्द योजिल्यास ह्यानें अभिप्रेत असलेला ध्वनि कल्पनेनेंच ओळखावा लागतो असें पुढील उदाहरणांवरून दिसून येइल जसें:- महामारीनें धडाधड माणसें मरतात; धडाधड उड्या मारून धांवला; धडाधड चोऱ्या होऊं लागल्या; धडाधड-कर्ज काढितात-उचापत खातात-काळीज उडतें-बोलतात-पळतात-खर्च करितात इ॰. [ध्व. धड द्वि.] धडाधडणें-अक्रि. (नांव इ॰) गाजणें; (कीर्तीचा) डंका इ॰ वाजणें; दुमदुमणें. 'काय तयाची कीर्त सांगावी? साहेब नाम धडाधडी । ' -ऐपो १३४.
धडाधडणे
अक्रि. नाव गाजणे; कीर्तीचा डंका वाजणे; दुमदुमणे : ‘काय तयाची कीर्त सांगावी? साहेब नाम धडाधडी ।’ – ऐपो १३४.
ढोण
न. चमत्कार; अपरूप : ‘काय जालें ढोण, सासुबाई कळेना.’ –नाम ७९.
धत्तु(त्तू)र
पु. एक वनस्पति; धोत्रा. याचें बीं मादक व विषारी असतें. 'धतूर हा कनक नाम सदा धरीतो ।'-र २७. [सं. धतूर; हिं. धतूरा; गुज. धतरो, धंतरो]
धुसधुसणी
स्त्री. धडधडणें; ठसठसणें; ठणकणें; फुसफुसणें इ॰ [धुसधुसणें पासून नाम].
धूम
स्त्री. १. धाव; दौड; शर्यत; पळ. (क्रि. मारणे, ठोकणे) : ‘थाट चाले गाई गोपाळांची धूम । पुढें कृष्ण राम तया सोयी ।’ - तुगा ३२. २. (ल.) उत्सुकता; धाडस; धैर्य; साहस. ३. चैन; चंगळ; रेलचेल; अतिशयता. ४. हल्ला; गर्दी : ‘एकदम हत्यारें उपसून आमच्यावर धूम केली.’ - वज्राघात ९७. ५. संहार; बंडाळी; दंगा; गोंधळ; गडबड : ‘हरि करिकुळीं परबळीं करि तो अतुल प्रभाव कवि धूम।’ - मोशल्य २·५०. ६. उधळण : ‘गुलालाची धूम’ - नाम ३०·५.
एकहेळा
क्रिवि. सहज, एकदम. ‘जाइजे वैकुंठी एकहेळा’-नाम ७१७. [क. हेळु=सांगणे] एकळी
एक्का
पु. १ (व. ना.) एक दिवस अहोरात्र भजन; भजनसप्ता; खळ न पाडतां एक दिवस अहोरात्र करावयाचें नाम- स्मरण, भजन.' काल एक्क्याची समाप्ति झाली.' २ एकी; जूट; एकमत; एकविचार.' पुढें स्वराज्यामधीं असून एक्का नसून बेबंदी झाली होती.' -गापो ९४. [सं. एक; प्रा. एक्क]
एकमोहरे
क्रिवि. एकत्र; एकमार्गी. एका बाजूस वळलेले : ‘मन धांवेसैरावैरा । मन मारूनि केलें एकमोहरा ।’-नाम २०२०.
गौण
न. १ न्यून; अभाव; तुटवडा; कमीपणा. २ अपूर्णत्व; हीनता; तफावत. -वि. १ कमी प्रतीचा; हलक्या प्रतीचा; कमी महत्त्वाचा; अप्रधान. २ आनुकल्पिक; गौणभूत; बदला. ३ मुख्य नव्हें तें; दुय्यम. 'मूळबंधाचें लक्षण । वज्रासन गौण । नाम यासी ।।' -ज्ञा ६.१९९. [सं.] ॰मानणें-कमी लेखणे. 'तें तीर्थ घालतां वदनीं । ब्रह्मरस गौणमानी ।' ॰कल्प-पु. १ अमुख्य, अप्रधान हेतु किंवा उद्धेश. २ दुय्यम ध्येय; विकल्प; अनुकल्प; बदला; प्रतिनिधि. ॰पक्ष-१ कमजोर, खालच्या दर्जाचा, अमुख्य,अप्रधान पक्ष, बाजू (वाद, गोष्टी, प्रमेय यांचा). २ गौणकल्प ३ (सामा.) हलका पक्ष, बाजी. ॰मुख- न्याय-पु. तारतम्याचा नियम (मुख्यामुख्य, मौलिक व अलं कारिक, प्रधान अप्रधान यांतील) मुख्य पक्ष संभवत असतां गौण अंगिकारूं नये या अर्थी वापरतात. गौणीवृत्ति-स्त्री. शब्दाची स्वाभिधेय गुणसंबंधामुळें अर्थांतराच्या ठायीं असलेली प्रवृत्ति. [सं.]
गडगडीत
पु. कोरडा आणि खडकाळ : ‘तव गडगडीत कूप उदके वोसंडला’ - नाम ९२१.
गुज़री
(स्त्री.) हिंदी अर्थ : बाज़ारका नाम. मराठी अर्थ : बाजाराचे अेक नांव.
गुंडणे
उक्रि. १. बांधणे; गुंडाळणे; वळकटी करणे; लपेटणे : ‘तया गुंडलिया प्रकाशा । क्षेत्रज्ञु नाम ॥’ - ज्ञा १४·७९.
गुंडणें
उक्रि. १ बांधणें; गुंडाळणें; वळकटी करणें; लपेटणें. 'तया गुंडलिया प्रकाशा । क्षेत्रज्ञु नाम ।' -ज्ञा १४.७९. २ गोत्यांत सांपडणें, गंडणें पहा. [गुंड]
घोकणे, घोखणे,
सक्रि. १. पुनः पुन्हा म्हणून पाठ करणे; घोष करणे; पाठ म्हणणे : ‘आम्ही अहर्निशीं नाम घोकूं ।’ – रामदास स्फुट अभंग ४७ (नवनीत १५४). २. (एखाद्या गोष्टीची) जपमाळ घेणे; घोष लावणे; वारंवार सांगणे, उच्चारणे. [सं. घुष् – घोषण]
घोकणें
सक्रि. १ पुनःपुनः म्हणून पाठ करणें; घोष करणें; पाठ म्हणणें. 'आम्ही अहर्निशीं नाम घोकूं ।' -रामदास स्फुट अभंग ४७ (नवनीत पृ. १५४.) 'गोरक्ष घोकितां सद्वि- द्येसी ।' -नव १०.४०. २ (एखाद्या गोष्टीची) जपमाळ घेणें; घोष लावणें; वारंवार सांगणें, उच्चारणें. [सं. घुष्-घोषण; हिं. घोकना] म्ह॰ (व.) घोकंति विद्या खोदंति पाणी = घोकल्यानें विद्या व खोदल्यानें पाणी मिळतें. (पर्यायानें) कोणतीहि गोष्ट श्रमानें साध्य होते.' घोककाम्या-वि. अर्थाकडे लक्ष न देतां, संदर्भ लक्षांत न घेतां घोकंपट्टी करणारा (विद्यार्थी); दुसर्याच्या सांगण्याचा हेतु, मर्म लक्षांत न घेतां सांगण्याप्रमाणें अक्षरशः चालणारा. [घोकणें + काम] घोकणी-स्त्री. १ (एखादी गोष्ट लक्ष्यांत रहावी म्हणून) पुनःपुनः घोकण्याची क्रिया; आवृत्ति. (क्रि॰ करणें; घेणें). 'अजुनि तरि करि ही घोकणी ।' -राला ८८. २ त्याच त्याच गोष्टीचा पुनःपुनः उच्चार, निदिध्यास; एकच गोष्ट धरून बसणें; आपली इच्छा, हेतु पुन्हां पुन्हां सांगणें. (क्रि॰ घेणें; लावणें; करणें; लागणें; मांडणें; धरणें). 'सुख असल्यावर दिनासारिखे कां भौति फिरते । घोकण्या करिते । ' -सला २०. 'त्या मुलानें आईची घोकणी घेतली आहे.' [घोकणें] घोकंपट्टी—स्त्री. घोकण्याची क्रिया; घोकणी अर्थ १ पहा. (क्रि॰ करणें). 'दुसर्या इयत्तेंत फळ्यावरील शब्द मुलांनी आपल्या वहींत उतरून घेऊं नयेत, कारण या योगानें घोकंपट्टी करण्याची संवय मुलांना लागते.' -अध्यापन ७४. [घोकणें + पट्टी] घोकीव-वि. १ पाठ केलेला; घोकलेला (धडा इ॰). 'याचें घोकीव पांडित्य आहे. '२ स्मरणांत, ध्यानांत पक्का ठेवलेला; मनांत पक्का ठसलेला. घोकीव, घोक्या-वि. १ समजूत न घेतां, ध्यानांत न ठेवतां निव्वळ घोकंपट्टी करणारा; मंद (विद्यार्थी). २ पोपटपंची करणारा; घोकूनच फक्त ध्यानांत ठेवणारा; (क्व.) कोणत्या वेळीं काय बोलावयाचें हे पढवि- लेला; लांच घेऊन बनावट साक्ष देणारा (साक्षीदार इ॰). [घोकणें] घोक्या-वि. घोकणारा; घोकंपट्टीनें अभ्यास करणारा; घोककाम्या अर्थ १ पहा. [घोकणें]
घराश्रम
पु. गृहस्थाश्रम: ‘असे घराश्रमीं, भजे सर्वभूतीं ।’ –नाम ७६०.
घररहाटी
स्त्री. प्रापंचिक कामकाज: ‘मग चालवी घररहाटी ।’ –नाम २८३.
घटमठ
पु. १. घट आणि मठ. २. (ल.) सर्व सृष्ट वस्तू (ज्यात पोकळ अवकाश आहे अशा) : ‘घटमठ नाम मात्र । व्योम व्यापक सर्वत्र ।’ – ब २६२. घटाकाश आणि मठाकाश असे प्रयोग वेदान्तात आहेत.
घुसड(ट)णी
स्त्री. घुसडणें क्रि॰ पासून नाम. घुसडणें पहा. [घुसडणें]
हाशियेका गवाह
हिंदी अर्थ : वह गवाह जिसका नाम किसी दस्तावेज़के किनारे दर्ज हो मराठी अर्थ : दस्तावेजाच्या कडेला ज्याचें नांव आहे असा, शेवटचा साक्षीदार.
हेजीब
पु. १ जिल्हा अधिकाऱ्याचा मदतनीस; मदत कारकून. २ चाकर; नोकर. ३ वकील. ४ दूत. 'बोले नैषधेंद्र- वाचा । नाम हेजीब इंद्राचा ।' -नल. [अर. हाजिब्] हेजिबत, हेजिबी-स्त्री. १ वकिली; शिष्टाई. -मदरु १.२०. २ दूताचें काम, धंदा, वृत्ति.
हलगरजी-जू
वि. निष्काळजी; स्वतः वाटेल तेव्हां, वाटेल तसें काम करणारा; सुस्त; मंद (प्र.) अलगरजी. [फा. अहल्-इ-गरझ् = स्वार्थी] हलगरज-स्त्री. सुस्तपणा; निष्काळ- जीपणा. असेंहि नाम कधीं वापरतात.
हरिपाठ
हरिपाठ haripāṭha m Abhang-poetry composed by नाम- देव in praise of Vishn̤u. It is recited by certain worshipers of Vishn̤u under the form विठ्ठल.
हुलिया होना
हिंदी अर्थ : सेना में नाम लिखा जाना मराठी अर्थ : सैन्यांत नांव भर्ति करणे.
हू
(पु.) हिंदी अर्थ : अीश्वरका नाम, डर. मराठी अर्थ : अीश्वराचें नांव, भौति.
हवा बाँधना
हिंदी अर्थ : अच्छा नाम हो जाना । बाज़ार में साख होना मराठी अर्थ : नांव लौकिक मिळविणें, ( बाजारांत ) पत वाढणें.
हवामानशास्त्र
न. हवामानविषयक फेरफार व परि- णाम यांची कारणमीमांसा दाखविणारें शास्त्र. -यश जाने ३७. [फा. हवा + सं. मान + शास्त्र]
जागविणें
जागविणें jāgaviṇēṃ v c (जागणें) To awaken. 2 fig. To watch or hold vigils unto; to hold a wake: also to keep, uphold, observe, preserve, maintain. Used in construction with numerous words; as आबरू or नाम or नाव जागविणें To watch over and uphold one's character or good name; दिवस जागविणें To keep a day (i. e. to perform what is prescribed for the day); नियम or नेम जागविणें To maintain one's rule or self-appointed course; सती जागविणें To watch the embers or expiring ashes of a सती; गौर जागविणें To keep a wake to गौरी or देवी.
जातिवाचक
वि. १. (व्या) वर्ग–प्रकार–भेददर्शक (संज्ञा). २. सामान्य, वर्गवाचक (नाम).
जातक
न. १. जन्मकाळच्या ग्रहांच्या स्थितीवरून माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या शुभाशुभ गोष्टीविषयीचे वर्णन करणारा ज्योतिषशास्त्राचा एक विषय, फलज्योतिष : ‘नंदें जातक वर्तवून । बळिभद्र नाम ठेविलें ।’ – हरि ३·५३. २. कुंडली इत्यादीवरून भविष्य वर्तविणे. ३. विवाह जुळविण्यास लागणाऱ्या आठ गोष्टीपैकी एक. ४. पहा : जातकर्म [सं.]
जातक
न. १ जन्मकाळच्या ग्रहांच्या स्थितीवरून माण- साच्या आयुष्यांत घडणार्या शुभाशुभ गोष्टींविषयींचें वर्णन करणारा ज्योतिषशास्त्राचा एक विषय; ताजक. 'नंदें जातक वर्तवून । बळिभद्र नाम ठेविलें ।' -ह ३.५३. २ कुंडली इ॰ वरून भविष्य वर्तविणें; शुभाशुभफलपरिज्ञान (क्रि॰ वर्नविणें). ३ विवाह जुळविण्यास लागणार्या आठ गोष्टींपैकीं एक; विवाहघटिताच्या आठ प्रकारापैकीं योनिप्रकार. ४ जातकर्म पहा. जातकर्म-न. पुत्रावण; जातक; नूतन जन्म पावलेल्या बालकाचा पित्यानें करा- वयाचा संस्कार हा संस्कार सोळा संस्कारांपैकीं आहे. या संस्कारांत सहाणेवर मध व तूप घालून त्यांत सोनें उगाळून सोन्याचे रज त्या तूप-मधांत उतरल्यावर तें चाटण जन्मलेल्या बालकास पाजावयाचें असतें नंतर बालकाच्या उजव्या कानावर सुवर्ण ठेवून पित्यानें बाल- काच्या कानांत मंत्र जपावयाचा असतो. -एभा २२.५८४. 'जात- कर्म नामाभिधान । कटिसूत्र अन्नप्राशन ।' -भारा, बाल ७.१२.
जीवन
न. १ आयुष्य; अस्तिव; प्राणधारणा; निर्वाह. २ जगण्याचें, उदरनिर्वाहाचें साधन (नजीकचें किंवा अंतिम, भक्ष्य, अन्न, उद्योग-धंदा). ३ कोणत्याही वस्तूचा आहार, भक्ष्य; धारणा-साधन; ज्याच्यावांचून जो पदार्थ जगत नाहीं ते त्यांचें जीवन. जसें-अग्नीचें जीवन वायु, झाडाचें जीवन पाणी. 'वदन- कथामृतश्रवण । तें जीवन मज तुझें ।' -एरुस्व १.५. ४ पाणी; जल. ५ बसराई मोत्यें गोलपणांत, रंगांत, सारखेपणांत वं तेजांत सर्वो- त्कृष्ट असलीं म्हणजे त्यांस म्हणतात. अशीं मोत्यें चवांत १० ते १०० पर्यंत असलीं म्हणजे त्यास पातल जीवन म्हणतात ६ वेतन. 'कां सेवकां देसी जीवन ।' ज्ञा ९.९९. -वि. आयुष्य देणारें; जीवदायक. 'तें जीवन नाम जपत । तेथे बैसला ध्यानस्थ ।' [सं.] (वाप्र.) ॰घालणें-प्राण घालणें; आयुष्य देणें; जगविणें. 'त्यासी जीवन घालीन मी ।' सामाशब्द- ॰कलह-पु. जग- ण्यासाठीं धडपड, कष्ट. 'ह्या काळांत जीवनकलह मोठ्या निकराने चालला आहे.' -टि १.४५६. ॰कला-ळा-स्त्री. १ जीवकळा पहा. याच्या उलट प्रेतकळा; मरणकळा. 'बुद्धिवान् मनुष्यास देहही करवेल पण जीवनकळा ईश्वराचे हाती.' २ आयुष्य पुष्कळ दिवस राखण्याची युक्ति. ॰पाडें -नापाडी-पाडें- माफक-क्रिवि. यथाशक्ति; यथासाधन; शक्त्यनुसार; साम- र्थ्यानुरूप (काम सांगणें, दंड करणें. औषध देणें इ॰) ॰पाणी-न. शक्ति; जोर; आवेश; दम; योग्यता; धारणाशक्ति. जीव अर्थ ४ पहा. 'या घोड्याचें जीवनपाणी पाहून ओझे घालणें तें घाला.' ॰रसायन शास्त्र-पाश्चात्त्य वैद्यकांतील एक प्रकार. बारा क्षारांच्या औषधांचें शास्त्र. मानवी शरीरांत बारा क्षार असून त्यांत एक अगर अधिक कमी झाल्यास रोग होतो, ही उणीव कमी असलेला क्षार शरीरांत घालून भरून काढितात. ॰सूत्र-वि. जीवाधार; जीवाचा चालक. 'जेथ जगाचें जीवनसूत्र । श्री महालया असे ।' -ज्ञा १८. १८०३. ॰हेतु-पु. १ जगण्याचा हेतु, कारण. २ जीवाचें कार्य- क्षम साधन. -नोपाय-पु. १ निर्वाहसाधन, जीव राखण्याची युक्ति. 'जीवनोपावो कां जैसा । कोल्हाटियांचा ।' -ज्ञा १८.६०६. २ उदरनिर्वाह; शरीरधारणा. ३ संकटापासून वांचण्याचा उपाय.
जतन, जतना, जतनाई
स्त्री. निगा; जपणूक; तत्परता; सांभाळ; काळजीपूर्वक रक्षण; संरक्षण; संगोपन; प्रतिपाल : ‘हे आता जतन करी नाम ।’ –तुगा १६४८. [सं. यत्] (वा.) जतनेस, जतनाईसअसणे, घालणे, ठेवणे– काळजी घेण्यासाठी एखाद्याच्या स्वाधीन करणे, असणे.
जतन, जतना, जतनाई
स्त्री. निगा; जपणूक; तत्परता; काळजी पूर्वक रक्षण; संरक्षण; संगोपन.' हें आतां जतन करी नाम ।' -तुगा १६४८.' जतन करीगे याचें स्वाधिन केला न कापितां नाळ।' [सं. यत्न] जतनेसं- नाईस-ठेवणें-घालणें असणें-कोणाच्या स्वाधिन काळजीनें उपचार होण्यासाठीं संरक्षण होण्यासाठीं ठेवणें. जतनाविणें-सक्रि. काळजी घेणें; रक्षण करणें; शुश्रूषा करणें; सुरक्षित राखणें. जतने-क्रिवि. (कु.) संभाळून. जपून, सावधगिरीनें. ' बुळबुळीत झाड आहे, जतने चढ.' जतने- ऊन-क्रिवि, (कु.) काळजीपूर्वक; सावधगिरीनें; निगा राखून. [जतन]
झिंजार(ड)णें
अक्रि. १ (बंदूक उडतांना, काठी मार- तांना) प्रत्याघात होणें; झटका देणें; उसळी खाणें. २ झटका बसणें; प्रत्याघातानें (हात इ॰) व्यथित होणें. [ध्व.?] झिंजारा-डा-पु. १ (बंदूक, तोफा इ॰ उडतांना किंवा काठीनें मारतांना होणारा) प्रत्याघात, धक्का, झटका; उलट खाणें. (क्रि॰ होणें; येणें). २ वरील धक्क्यानें (हात इ॰ कांवर) होणारा परि- णाम, वेदना. (क्रि॰ बसणें).
झणी or झणें
झणी or झणें jhaṇī or jhaṇēṃ conj (Poetry.) Lest, peradventure, if perchance. Ex. झणी लागेल माझी दिठी म्हणोनि घेतली इटीमिटी. Ex. झणी दृष्टि लागो तुझ्या सगुणपणां ॥ तेणें माझ्या मनां बोध केला ॥. Ex. झणी मुक्ति मज देशी पांडुरंगा ॥ मग ह्या संतसंगा पाहुं कोठें ॥. 2 Explained often as signifying Quickly. Ex. मागें बहु जन तारिले मंडणीं ॥ पावलासीं झणी नाम घेतां ॥.
का-कांठ
पु. १ कडा; बाजू; मर्यादा; टोंक; किनारी (ताट, पागोटें, मडकें इ. च्या भोंवतालचा भाग); कोर (भांडीं वगैरेंची); कंगोरा. २ किनारा (समुद्राचा); जवळची भूमि; थड-डी (समुद्र, नदी यांची). ३ पदर; किनारी (वस्त्राची वेलबुट्टीची किंवा साधी). [सं. कंठ = गळा, काष्ठा = सीमा] ॰कोणा मोजणें-सूक्ष्मपणें परीक्षणें, बारकाईनें तपासणें. -ठावर बसणें (पखवाजाच्या कांठावर थाप मारली म्हणजे बद आवाज होतो त्यावरून) सोडणें, कमी होणें, (धंदा, गोष्ट), नासणें (काम) अकर्तृक योजतात. 'याच्या कांठावर बसली (चोपकाडी किंवा एकादें अव्याहृत् स्त्रीलिंगी नाम) -ठावर मारणें-बिघ- डणें, नासणें, मारणें. -ठावर येणें-जीवावर येणें. ॰किनारा -पु. बाजूची पट्टी-कडा-कांठ. [काठ + किनारा] ॰कोपरा-पु. बाजू, कड, कोपरा, कोन. 'सारें शेत पिकलें (गेलें) नाहीं कांठ- कोपरा पिकला (गेला). ॰दोरा-पु. कापडाच्या गांठीस-काठाला घातलेला जाड दोरा, पदराला घातलेली दोर्याची शिवण. ॰(ठा) परा-प्रा-फरा पु. १ (कों.) फुटलेल्या मातीच्या मडक्याचा वरचा भाग; अर्धा भाग; गळा; कांठ. 'काणा कुंटा व्याधिव्याप्त । चिंता कांठफरा गळां वहात । तोही शुनीमागें धांवत । कामासक्त अविचारी ।' -एभा १३.२०६. 'जें कां काठफरा उलले । देखसी ज्याचें बुड गेलें । तें न पाहिजे हालविलें । असो संचरलें निज- आळां ।' -एरुस्व १८.४५. ५ बोडकें गलबत (शीड, काठी वगैरे कांहीं नसलेलें). गलबताचा सांगाडा; खटारा. ॰फुटका-वि. ज्याचा कांठ मोडला आहे असा. ॰मोडका-मोडा-कांठफुटका पहा. ॰मोरा-१ कांठप्रा पहा. 'जेवीं नीचाचा कांठमोरा । गळां अडकल्या मांजरा । ते रिघोनि शुचीचिया घरा । नाना रसपात्रां विटाळी ।' -एभा २६.२०६. 'कांठमोरा त्याचे निडळी रुतला ।' -पंच ४.४. 'हातां न ये ज्या घरचा गोरस । तरी ताडन करी त्यांचिया मुलांस । त्यांच्या गळां कांठमोरे हृषीकेश । घालोनियां हिंडवी ।' -ह ७.१४६. २ पोळी, भाकरीचा कडेचा तुकडा. (क्रि॰ घेणें; तोडणें). कांठमोरा गळ्यांत अडकणें-येणें-एकाद्या धंद्यांतील, कामांतील लभ्यांश हातीं न लागतां व्यर्थ शीण पडणें (ज्याला मडक्यांतील वस्तु खावयास मिळाली नाहीं पण मड- क्याचा कांठ गळ्यांत अडकला त्या कुत्र्याप्रमाणें). ॰रें-न. कापडाची किनारी, धार. 'धोतराची कांठरी लोंबू लागली.' ॰वा-पु. (ना.) कांठ; किनारा; थडी. ॰सर-तुडुंब; कांठोकाठ; ओतप्रोत.
काळी
स्त्री. (विठ्ठलाची) काळी मूर्ती : ‘पैल ते पंढरी । पांढरीवरी काळी वसविली’ - नाम ४१९.
कानफाटा-ट्या-टी-डी
कानफाटा-ट्या-टी-डी kānaphāṭā-ṭyā-ṭī-ḍī m (कान & फाटणें) A descriptive term for an order, or for an individual of it, of mendicants. They wear heavy ear-ornaments, are worshipers of Gorakhnáth &c. Pr. एकदा का0 नाम पडलें म्हणजे वाईट It is as good to be hanged as to get a bad name.
कांचनीक, कांचनिक
वि. द्रव्यार्थी; द्रव्यलोभी; सकाम. (श्री नाम शब्दार्थ).
कार्तवीर्य
पु. पुराणप्रसिद्ध अहस्त्रार्जुन. याला परशुरामानें मारलें. हरवलेली वस्तु याच्या नामस्मरणानें सांपडते असा भाविक लोकांचा समज आहे व त्यासाठीं पुढील श्लोक रूढ आहे- 'कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहु सहस्रवान् । यस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते ।।' [सं.]
कार्तवीर्य
पु. पुराणप्रसिद्ध सहस्त्रार्जुन. याला परशुरामाने मारले. हरवलेली वस्तू याच्या स्मरणाने सापडते असा भाविक लोकांचा समज आहे व त्यासाठी पुढील श्लोक रूढ आहे - ‘कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहु सहस्त्रवान । यस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते ॥’ [सं.]
कायदा
पु. नियम; व्यवहार; धर्मशास्त्र; शिरस्ता; वहिवाट; प्रथा; विधिमंडळाने मान्य केलेला, सर्व नागरिकांना किंवा विशिष्ट नागरिक वर्गाला लागू पडणारा, जो मोडल्यास गुन्हा धरला जाऊन इलाज करण्यात येतो किंवा कोर्टात खटला चालून योग्य ती शिक्षा होऊ शकते असा नियम : ‘समाजनियमनाच्या अनेक साहित्यांपैकी कायदा हें एक साहित्य होय.’ - ज्ञाकोक २८२. [फा. काइदा] (वा.) कायद्याने कुरीनिसात करणे - हात वस्त्राने बांधून मग कुरनिसात किंवा वंदन करण्याची दरबारी रीत : ‘निर्मलवाल्याने हात बांधून नबाबाजवळ कायद्याने कुरनिसात करून उभा राहिला’ - नाम २, १३.
कायसया
क्रिवि. वि. कशाला, कशाचे : ‘सांगा कवण तें ब्रह्म । कायसया नाम कर्म ।’ - ज्ञा ८·२.
कच्चे मडके
न. १. न भाजलेले मडके. २. (ल.) अज्ञानी माणूस (मडके = डोके, बुद्धी) : ‘हे अजून कच्चे मडके आहे.’ – नाम ४.
किंकर
पु. १ चाकर; सेवक; दास. 'नाम साराचेंही सार । शरणागत यमकिंकर ।' -तुगा २५२२. 'वर्णिती राव किंकर' -ऐपो १४५. [सं.]
किंकर
पु. १. चाकर; सेवक; दास : ‘नाम साराचेंही सार । शरणागत यमकिंकर ।’ – तुगा २५३२. [सं.]
किरात
पु. १ अरण्यवासी एक जात; भिल्ल. ही जात शिकारी- वर निर्वाह करते. 'तो भेटला गुहक नाम किरात वाटें ।' -वामन भरतभाव ५०. २ किराइताची एक जात.
किरात
पु. १. एक अरण्यवासी जात; भिल्ल. ही जात शिकारीवर निर्वाह करते : ‘तो भेटला गुहक नाम किरात वाटे ।’ – वाभभा ५०. २. पहा : किराइत. ३. किरातवेषी शंकर.
कळंकटणें, कळकटणें
अक्रि. १ किंचित कळकणें; हिरवें होणें; गंजणें. २ घाणेरडें होणें; नासणें. 'कळकटेना हें नाम- पियुख' -दाव ७८१. [कळकट]
कोडिया
पु. कुष्ठरोगी : ‘कोडिया न दिसे चंदनबरवा’ - नाम १८४७.
कोरणी, कोरणे
स्त्री. न. १. कोरणेपासून धातुसाधित नाम. कोरण्याची क्रिया; खोदणी. २. कोरण्याचे साधन; शस्त्र (मूर्ती, कान, नालबंदी करताना घोड्याचे खूर) कोरण्याच्या कामी उपयोगी; मातीच्या चित्राच्या कामी लागणारी करणी. ही पितळी, लोखंडी किंवा लाकडाची असून गुळगुळीत, सभोवार चपटी व निमुळती गोलटे मारलेली असते. चुनाळ्याची कोरणी त्याला साखळीने अडकवलेली असते. ती काडीसारखी पण तोंडाला चापट असते. ३. दुकानाच्या फळ्या काढघाल करण्यासाठी खालच्या व वरच्या उंबरठ्याला खोबण पाडलेली असते ती सर्व रचना.
कोरणी-णें
स्त्रीन. १ कोरणें- धातुसाधित नाम. कोर- ण्याची क्रिया; खोदणी. २ कोरण्याचें हत्यार; शस्त्र (मूर्ति बन- विण्याच्या, कान कोरण्याच्या कामीं उपयोगी; नालबंदी करतांना घोड्याचे खूर कोरण्याचें; मातीच्या चित्राच्या कामीं लागणारी करणी. ही पितळी, लोखंडी किंवा लांकडाची असून गुळगुळीत, सभोंवार चपटी व निमुळती गोलटे मारलेली असते. चुनाळ्याची कोरणी त्याला सांखळीनें अडकाविलेली असते; ती काडीसारखी पण तोंडाला चापट असते. 'कान-दांत कोरणी-णें. [कोरणें]
कपट
न. १. छद्म; लबाडी; लुच्चेगिरी; ढोंग; कावा : ‘वेष धरला कपटाचा’ - नाम ५७ २. खोटेपणा; असत्यता. ३. मत्सर; हेवा; कृत्रिम भाव; द्वेषबुद्धी. ४. (कायदा) फसवणूक; भूलथाप; फसविण्याच्या इराद्याने केलेले कृत्य.
करि, करी
पु. हत्ती. 'करीतुरंगसमाजें । सेना नाम निफजे ।' -ज्ञा १३.१५२. [सं. करिन्] ॰चम-न. हत्तीचें कातडें. 'करिचर्म घेतसे प्रावर्ण । न कंटाळें दुर्गधीनें मन ।' ॰हस्त (संयुक्त हस्त)-पु. (नृत्य) उजवा हात लताख्य करून ह्या बाजूकडून त्या बाजूकडे झुलत ठेवणें, तसेंच डावा हात त्रिपताक करून डाव्या कानावर ठेवणें. [सं.] ॰हस्तक(करण)-न. (नृत्य) पाय अंचित करून डावा हात वक्षस्थलावर ठेवणें. उजव्या हाताचा तळहात तर्जनीच्या बाजूनें आरंभ करून बाहेरून आंतल्या बाजूस फिरविणें.
करि, करी
पु. हत्ती : ‘करितुरंगसमाजें । सेना नाम निफ जे ।’ − ज्ञा १३·१५२ [सं.]
करकर
स्त्री. कटकट पहा. १ कर्कश, कानास अस्वस्थता उत्पन्न करणारा, कानठळ्या बसविणारा आवाज (कावळ्याच्या ओरडण्याचा, लोखंडी वस्तूवर कानस घासतांना होणारा, दार वगै- रेंचा). 'त्याचें नाम व्यर्थ करकर । जैसें कीर अनुवादती ।' 'कावळ्यानें भयंकर करकर चालविली होती.' -झांमू १०. २ कट- कट; त्रास; आरडाओरड (भिक्षेची, रागाची, इ॰) 'सदा कर- कर संतांसवें ।' -व ५४३.५. ३ भांडणतंटा; कचकच; कुरकुर. 'तेथें ही झाले कुमार ।त्यांसी कढला मत्सर । त्या दोघांची । कर- कर । वृद्धापकाळीं सोसावी ।।' -जै ८९.४०. ४ हट्ट; तक्रार; त्रास; कुरकुर. [ध्व.]
करकरणें
करकरणें karakaraṇēṃ v c To caw out; to utter hoarsely; or (with contemptuous implication) to utter or speak. Ex. त्याचें नाम व्यर्थ करकर ॥ जैसेकीर अनुवादति.
कर्मी
वि. कर्मठ पहा. 'आणि तयाही केलियाचें । तोंडी लावी दौंडीचें । कर्मी या नाम पाठाचे । वाणें सारी ।' -ज्ञा १८.६०३. [कर्म]
करणवाच्य
न. (व्याक.) तृतीयांत नाम. [सं.]
करणवाच्य
न. (व्या.) तृतीयांत नाम. [सं.]
करताल, करताली, करतालिका
न. पु. स्त्री. १. (वाद्य) बाहेरच्या बाजूने निमगोल व आतून सपाट असे काशाचे टीचभर लांब व तीन बोटे रुंद व दोन्ही कडांना निमुळते असे दोन दोन तुकड्यांचे वाद्य. हे अंगठा व बोटे यांमध्ये धरून चिपळ्यासारखे वाजवतात. ताल धरण्यासाठी याचा उपयोग करतात. केव्हा केव्हा मृदंगाच्या साथीत वाजवतात. (सामा.) चिपळ्या; झांज : ‘नृत्यकृत्य तत्कारतान करताल झुंमकझ्या अंतरी ।’ - राला ३१. २. टाळी; दोन्ही तळहात एकमेकांवर आपटून काढलेला आवाज (क्रि. वाजविणे, देणे, पिटणे) : ‘अद्वय भजनें अखंड स्मरणें वाजवि करताळी ।’ - एकनाथ पदें (नवनीत) ४४९; ‘कथा अन्वय लापणिका । नाम घोष करतालिका ।’ - दास ४·२·१०. ३. चुटकी; चिटकी (क्रि. वाजविणे.) [सं. कर+तल, ताल] (वा.) करताल धरणे - हातांनी ताल धरणे; साथ करणे.
करताल-ली, करतालिका
नपुस्त्री. १ (वाद्य) बाहे- रच्या बाजूनें निमगोल व आंतून सपाट असें कांशाचें टीचभर लांब व तीन बोटें रुंद व दोन्ही कडांना निमुळतें असें दोन दोन तुकड्याचें वाद्य. हें आंगठा व बोटें यांमध्यें धरून चिपळ्यांसारखें वाजवितात. ताल धरण्याकडे याचा उपयोग करतात. केव्हां केव्हां मृदंगाच्या साथींत वाजवितात. (सामा.) चिपळ्या; झांज. 'नृत्यकृत्य तत्कारतान करताल झुंमकझ्या अंतरी ।' -राला ३१. २ टाळी; दोन्ही तळहात एकमेकांवर आपटून काढलेला आवाज. (क्रि॰ वाजविणें; देणें; पिटणें). 'अद्वय भजनें अखंड स्मरणें वाजवि करताळी ।' -एकनाथ पदें (नवनीत) पृ. ४४९. 'कथा अन्वय लापणिका ।नाम घोष करताळिका' -दा ४.२.१०. ३ चुटकी, चिटकी. (क्रि॰ वाजविणें) [सं. कर + तल, ताल; गु. करताल] ॰धरणें-हातांनीं ताल धरणें; सांथ करणें.
कर्तृवाच्य
पु. (व्या.) १. कर्तरिप्रयोग. २. कर्तृदर्शक नाम; कर्तरी धातूचे विशेषण वगैरे. [सं.]
कर्तृवाच्य
पु. १ कर्तरिप्रयोग. २ कर्तृदर्शक नाम; कर्तरि धातूचें विशेषण वगैरे. [सं.]
कसणी
स्त्री. (कसणें या उक्रि. चें धातुसाधित नाम) कसोटी; पारख; परीक्षा. 'रोज लष्कराची तपासणी व कसणी करीत ।' -मदमं २७२. [सं. कष् = घांसणें]
कसणी
स्त्री. (कसणे या उक्रि.चे धातुसाधित नाम) कसोटी; पारख; परीक्षा : ‘रोज लष्कराची तपासणी व कसणी करीत.’ - मदमं २७२. [सं. कष् = घासणे]
कठोरी
वि. कठोर; कडक : ‘कुटिल कुबुद्धि कुपात्र कठोरी ।’ – नाम ७४८.
कवळ
न. कमळाचे फूल : ‘हाती तुझ्या कवळ, शोभे पीतांबर’ - नाम १०७.
कवल, कवळ
पु. १. तोंडातील घास : ‘न बळ प्रेंक्षी परि यतिहस्तींचा पाहता गळे कवळ ।’ - मोकृष्णविजय ८६·१२. २. तुकडा (धातूचा वगैरे) : ‘लोहाचा कवळु लागला परिसाते’ - नाम ८६४. ३. मृदुंगाचा आवाज येण्यासाठी वापरलेला कणकेचा गोळा.
खाणी
स्त्री. खण; कप्पा : ‘पाच खाणी उथळ दिसती ।’ - नाम १३२.
खेम
न. मिठी; विळखा; खेव; आलिंगन : ‘पवनासि देतां खेम । अपान ऐसें पावला नाम ।’ - सिसं २·२०७. (क्रि. मारणे, देणे, घेणे.) [सं. क्षेम] (वा.) खेमवेंगेस येणे - एखाद्याच्या कबजात येणे.
खेम
स्त्री. १ मिठी; विळखा; खेंव; आलिंगन. 'पवनासि देतां खेम । अपान ऐसें पावला नाम ।' -सिसं २.२०७. (क्रि॰ मारणें; देणें; घेणें). २ -न. कल्याण; सुख; खुशाली; क्षेम. [सं. क्षेम] ॰वेंगेस येणें-एखाद्याच्या कबजांत येणें. खेमालिंगन- न. मित्रत्वाची मिठी. [सं. क्षेम + आलिंगन]
खळेदान
न. शेताच्या खळ्यावर दिलेले धान्याचे दान : ‘केशव खळेदान देता । नामा जालासे मागता ।’ - नाम १६·५८.
खळखळगी
स्त्री. खळखळणे पासून धातुसाधित नाम. पहा : खळखळणे
खळखळणी
स्त्री. खळखळणें पासून धातुसाधित नाम. खळखळणें पहा.
खंब
वि. ठाम; स्थिर : ‘खंब ठाकोनिया राहे पुढे उभा ।’ - नाम १९१ (वा.) खंब ठोकणे - खम ठोकणे; आव्हान देणे : ‘आरंभीच चीत झालेल्या दीनावर खंब ठोकणे यामध्ये मोठासा पुरुषार्थ आहे असे नाही.’ - जोफु ६४.
खंडा, खेंडा
पु. हलक्या किमतीचे वस्त्र किंवा शेला : ‘एकी दिव्य वस्त्रें नेसल्या परिकर । मज खंडे जर्जर मिळालेसे ।’ - नाम.
खंडणी
स्त्री. १ करभार (मांडलिकांनीं सार्वभौमाला द्यावयाचा); दुसर्यानें आपणास उपद्रव न करावा किंवा अनुकूल असावें म्हणून देण्यांत येणारें द्रव्य. २ दंड; गुन्हेगारी; बसवि- लेली वर्गणी; जबरीनें घेतलेला पैसा, वस्तु. ३ ठरविल्यानंतरचा चालू सालचा वसूल, सारा, कर. ४ खंड; फाळा; धान्य रूपानें मालकाला सारा देणें. ५ (खंडणें याचें धातुसाधित नाम) मक्ता करणें; किंमत किंवा अटी ठरविणें. ॰तश्रीफ-पु. धारा नक्की केल्यानंतर गांवकामगाराला दिलेलें इनाम; पाटलाचें वेतन. ॰दार-वि. खंडणी देणारा; खंडकरी. [खंड, खंडणें]
खंडणी
स्त्री. १. करभार (मांडलिकांनी सार्वभौमाला द्यावयाचा) ; दुसऱ्याने आपणास उपद्रव न करावा किंवा अनुकूल असावे म्हणून देण्यात येणारे द्रव्य; विजयी सैन्याने मागितलेला दंड; रक्कम. २. दंड; बसविलेली वर्गणी; जबरीने घेतलेला पैसा, वस्तू. ३. ठरविल्यानंतरचा चालू सालचा वसूल, सारा, कर. ४. खंड; फाळा; धान्यरूपाने मालकाला सारा देणे. ५. (खंडणे याचे धातुसाधित नाम) मक्ता करणे; किंमत, अटी ठरविणे.
खोड
न. १ खोगिराची चौकट, कमान. २ भोपळ्या शिवाय दांडी, सांगाडा (सतार, वीणा यांचा); तबला, मृदंग करण्यासाठीं तयार केलेला व पोखरलेला लांकडी ठोकळा, हा एक किंवा दुतोंडी असून शिसू किंवा खैराचा असतो. ३ सुगंधी द्रव्याचा खडा, लांकडाचा तुकडा (चंदनाचा, इतर सुगंधी झाडाचा). ४ शेंडा व फांद्या छाटून टाकलेलें झाड; ओंडका; खुंट; सोट; बुंधा; फांद्यांच्या खालचा भाग. 'तिन्ही लोकीं तुझें नाम वृक्ष पल्लव शाखा । वेंघलों वरि खोडा धरुनि भाव टेंका ।।' -तुगा ३५४. ५ अंगावरून वारें गेलेला माणूस. (क्रि॰ होऊन पडणें; होणें). ६ म्हातारी व न विणारी किंवा गाभण राहण्यास अयोग्य गाय, म्हैस; फळें न येणारें जुनाट झाड. ७ (सामा.) झाड. 'आमराईं- तील खोडें पांचशें आहेत.' ८ (मावळी) मृदंग. ९ लोखंडी घडका- माची चौरस पहार टेकविण्याचा लाकडी ठोकळा. १० (गो.) लांकडी पसरट पाळें; पोहे कांडण्याची उखळी. [प्रा. दे. खोड = काष्ठ, खुंट. का. कोडु = बुंधा] खोडका-पु. (व.) वाळून शुष्क झालेलें झाड; खोड. 'जळणास रुपाया एक लहान खोडका ।' -राला ११०. खोडव-न. (कर.) १ दौतीचें कलमदान किंवा ठोकळा २ उंसाचा बुडखा. ३ (व.) जुनाट झाड. ४ (व.) गोडें तेल ठेवण्याचें दगडी भांडें. खोडवन-(व.) जमिनीतील पिकाचें नुकसान भरून निघण्याकरिता, दुसर्याच्या मालकीच्या त्या जमिनींत असलेल्या झाडांच्या पिकांतून घेतलेला हिस्सा.
खोड
न. १. शेंडा व फांद्या छाटून टाकलेले झाड; ओंडका; खुंट; सोट; बुंधा; फांद्यांच्या खालचा भाग : ‘तिन्ही लोकीं तुझें नाम वृक्ष पल्लव शाखा । वेंघलों वरि खोडा धरुनि भाव टेंका ॥’ - तुगा ३५४. २. सुगंधी द्रव्याचा खडा, लाकडाचा तुकडा (चंदनाचा, इतर सुगंधी झाडाचा). ३. (सामान्यतः) झाड. ४. फळे, फुले न येणारे जुनाट झाड; (ल.) म्हातारी व न विणारी किंवा गाभण राहण्यास अयोग्य गाय, म्हैस; वृद्ध मनुष्य. ५. भोपळ्याशिवाय दांडी, सांगाडा (सतार, वीणा यांचा); तबला, मृदंग करण्यासाठी तयार केलेला व पोखरलेला लाकडी ठोकळा. हा एक किंवा दुतोंडी असून शिसू किंवा खैराचा असतो; मृदंग. (मावळी) ६. लोखंडी घडकामाची चौरस पहार टेकविण्याचा लाकडी ठोकळा. [त. क. ते. कोऽडु]
खोकरपण
न. नाशिवंतपणा; क्षणभंगुरता; क्षणिकत्व : ‘तेणें खोकरपणें घडे । क्षर हें नाम ॥’ - ज्ञा १५·५००.
खोकरपण
न. विनाश्यता; क्षणभंगुरता; क्षणिकत्व. 'तेणें खोकरपणें घडे । क्षर हें नाम ।' -ज्ञा १५.५००. [सं. क्षयकर + पण]
लडब(फ)ड
स्त्री. १ लटलट होणों; ढिलाई; शिथिल झालेली स्थिति; फडफडत इतस्ततः झोळकंबणें; लोंबणें (यंत्र, एखादी रचना, कपढे इ॰ चें). २ लवलवीतपणा; शौथिल्य; बलहानि (अंगाची). ३ व्यग्रता व क्षुब्धता (जीवाची). ४ घोंटाळा; विस्कळित स्थिति (संसाराची, जिंदगीची, हिशेबाची, मसल- तीची). ५ लुडबुड पहा. -क्रिवि. १ ढिलेपणानें; शैथिल्यानें; लटपटां; फडफडत इ॰. बडबड (-नाम) पहा. (क्रि॰ हालणें; चालणें; करणें). २ अव्यवस्थित गयाळ रीतीनें. (क्रि॰ चालणें; धावणें; बोलणें; जेवणें; नेसणें; करणें). [ध्व.] म्ह॰ द्राविडो लडबडाम्यहं = इकडून तिकडे व तिकडून इकडे विनाकारण लुडबुडणें.
मारुत
पु. १ वायु वारा; हवा. २ ज्यावेंळी प्राणवायु आंतून निघून गगनाला मिळतो त्या स्थितींतील कुंडलिनीचें नांव. 'ते वेळीं कुंडलिनी हे भाष जाये । मग मारुत ऐसें नाम होये ।' -ज्ञा ६.३०१. [सं.] मारुति-ती-पु. १ वायुपुत्र; हनुमान्. २ क्वचित् भीमालाहि म्हणतात. 'शिकवी मारुतिला भगदत्ते हृदयांत बाण शिरकावला ।' -मोभीष्म ५.४८. मारुतीचें(ची)शेंपूट- नस्त्री. (सीताशुद्धीसाठीं लंकेत गेलेल्या मारुतीच्या शेंपटाला राक्ष- सांनी चिंध्या बाधल्या पण तें इतकें लांबलें कीं संपेचना. यावरून (ल.) लांबत जाणारें काम; लांबट गोष्ट; पाल्हाळ. ॰लांबणें- अक्रि. अशा रीतीनें काम लांबविलें जाणें.
मदीना
(पु.) हिंदी अर्थ : गाँवका नाम. मराठी अर्थ : गांवाचें नांव.
नामाभिधान
(सं) न० नांव, नाम.
नामाभिधान nāmābhidhāna n (नाम S Name, अभिधान S Name. An inelegant compound.) A name. Ex. तेथील पांड्या भावीक पूर्ण ॥ महादाजीपंत ना0 ॥.
नामधेय
न. नाव; नाम.
नामी
नामी nāmī a (नाम) Celebrated for excellence; fine, good, superb, capital, surpassing. Used freely.
वि. उत्कृष्ट; चांगला; प्रसिद्ध; उमदा; सरस; छान- दार; नामांकित इ॰ (अनेक व्यापकअर्थीं योजतात). [फा. नाम्]
नामजा
स्त्री. मान; महत्त्व; कीर्ती : ‘वडीलवडीलापासून स्वामीकार्य प्रसंगें धन्यास संतोषी करून आपली नाम–जा संपादीत आलेस.’ – मइसा ८·१३९. [फा. नाम+जाह्]
नाम-जा
(स्त्री.) [फा. नाम् नांव, प्रतिष्ठा + फा. जाह्=हुद्दा] मान महत्व; ख्यात. “वडील वडीलापासून स्वामीकार्य प्रसङ्गे धण्यास सन्तोषी करून आपली नाम-जा सम्पादीत आलेस” (राजवाडे ८|१३९).
नामना
नामना nāmanā f (नाम S) Fame, renown, celebrity.
नामो
वि. (उप.) नाम लावणारा (सारस्वत वैष्णव). (गो.)
नाम्या
नाम्या nāmyā a (नाम) That has a white vertical streak upon the forehead--a horse, dog &c.
नांव or नाव
नांव or नाव nāṃva or nāva n (नाम S) A name or an appellation. 2 A noun. 3 fig. Renown, reputation, celebrity, character, credit, good name. 4 A bad name or character, a blot, brand, stigma. v ठेव. नांव जळो or भाजो, नांवास हळद लागो &c. Phrases in imprecation. नांव नको Phrase expressing utter disgust or abhorrence. नांव न घेणें g. of o. To abstain from; to refrain or hold off from wholly; to name no more. नांव नाहीं (विद्येचें, पैशाचें, साख- रेचें &c.) There is not the name or shadow of, the faintest appearance, mark, trace, sign of. नांव सोडणें or टाकणें g. of o. To drop the name of. 2 To give up or relinquish; to dissolve connection with or quench desire after. नांवाचा Nominal, having only the name of: also bearing a (great or good) name. नावानें बोंब मारणें g. of o. To cry out on; to clamor vehemently and publicly against. नांवावर On the account of; for the sake of; out of regard to. नांवावर पाणी घालणें g. of o. To marr or blast one's good name. नांवावर विकणें To be admitted or well received in the name of. नांवास चढणें To attain to eminence and celebrity. नांवास देखील नाहीं There is notenough toswear by. To the above add--ज्याचें नांव with neg. con. Of which even the name (is not), i. e. of which there is noneatall, none absolutely. Ex. यंदा पाऊस ज्याचें नांव पडला नाहीं, Also ज्याचें नांव तें (Whose name--it, i. e. it or he the unnamed, as being inauspicious or unworthy to be named.) Used of a thing or a person which never renders or performs what is required or expected. नांवगांव विचारणें g. of o. (To ask the name and the village of.) To ask the circumstances and common particulars of; to inquire about. नांव ठेवणें To brand, stigmatize, blame, find fault with. 2 also नांव सांगणें-लावणें- घालणें-देणें To fix the price or terms of. नांव ठेवील लोकाला शेंबूड आपल्या नाकाला Used of ready faultfinding with neighbors whilst there is blindness athome. नांव धुळींत -मातींत -पाण्यांत-ग्वांत &c. जाणें- मिळणें-पडणें To lose one's good name. नांवाची बोंब पडणें g. of s. To become, as the perpetrator of some evil deed, the subject of popular complaint or clamor. नांवानें पाणी तावणें g. of o. To hate and wish the death of. नांवानें पूज असणें g. of s. (To have a cipher attached.) To be utterly wanting. नांवानें शंख g. of s. (To be the subject of wail or outcry.) To be non-existent, null, wanting. नांवा- वर गोवऱ्या फोडणें-घालणें-रचणें &c. To imprecate evil or to prepare evil against. (Because गोवऱ्या are gathered for the burning of a corpse.) नांवें In the name of. This word is, amongst merchants, (as खर्च is in official accounts,) the heading of the expenditure-side of an account, understood before each item.
नांवनंग
पु. लौकिक; कीर्ति. ‘हबसियास नातिजा द्यावा यात नांवनंग सर्व गोष्टी आहेत यैसे बोलिले.’ –पेद ३.१३७. [सं. नाम. म. नांव + नग]
नायनाट
पु. सत्यानाश; सर्वनाश. [? सं. नाम + नष्ट]
नगर
न. १ मोठ्या वस्तीचें व सर्व पदार्थ जेथें मिळूं शक- तात असें ठिकाण; शहर. 'म्हणे दक्षिण देशिं महिलारोप्य नाम नगर.' -पंच १.५. २ (विशेषार्थानें) अहमदनगर, सातारा, इ॰ ३ अहमदनगर. [सं.] सामाशब्द- ॰करी-वि. शहरवासी; शहरी; नागरी. 'गांवढेकरी उंदीर आणि नगरकरी उंदीर.' -छत्रे- कृत इसापनीति. ॰तळ-न. (काव्य.) जीवर नगर वसलें आहे ती जमीन. 'नगरतळ दणाणिते । भयंकर घोष किंकाटत ।' [नगर + तळ = खालची बाजू] ॰नायक-पु. शहरांतील मुख्य सावकार, पेढीवाला; नगरशेट. [नगर + सं. नायल = पुढारी] ॰नायकी- स्त्री. नगरनायकाचा हुद्दा, काम. [नगरनायक] ॰पाल-पु. कोत- वाल; पोलीस. [नगर + सं. पाल् = रक्षण करणें] ॰पालिका-स्त्री. शहराचें आरोग्य, शिक्षण इ॰ बाबींचा कारभार करणारी स्थानिक संस्था; (इं.) म्युनिसिपल कमिटी. [नगर + सं. पाल् = रक्षण, पोषण करणें] ॰पिता-पु. नगरसंस्थेचा, म्युनिसिपल कमिटीचा सभासद; (इं.) सिटीफादर्. [नगर + सं. पिता = बाप] ॰प्रदक्षिणा-स्त्री. १ देवाच्या मूर्तीची, छबिन्याची शहराच्या भोंवतालीं काढलेली मिरवणूक. २ शहराभोंवतीं, सर्व शहर फिरणें. ३ (ल.) रिकाम- पणीं गांवभर (भिक्षा मागत, देवदर्शन करीत) हिंडण्याची क्रिया. [नगर + सं. प्रदक्षिणा] ॰भवानी-स्त्री. १ गांवभर भटक्या मार- णारी, रिकामटेकडी स्त्री. २ वेश्या. 'अपशकून करण्यासाठीं रुक्का- सानी या नगरभवानीला उभें केलें.' -महाराष्ट्र १७.४. ३०. [नगर + (उप)भवानी = देवी] ॰भवान्या-पु. आळशी, बेढंगी, बदफैली मनुष्य. 'पण तूं रे?-तूं रे नगरभवान्या नाच्ये पोर्ये घेवोनी । -केक १५५. [नगरभवानीचें पुल्लिंगी रूप] ॰भोजन- न. (व.) गांवजेवण. ॰रचना-स्त्री. शहराची सर्व सोयी व्हाव्यात अशी मांडणी; शहराची व्यवस्थित पद्धतशीर मांडणी; (इं.) टाऊनप्लॅनिंग. ॰लेखक-पु. कुळकर्णी. 'नगर लेखकांच्या दिव्य- मंदिरीं । -सप्र १.२३. ॰शेट-पु. गांवचा पुढारी; श्रेष्ठी; मोठा व्यापारी. ॰हेर-पु. (काव्य) शहरांतील गुप्त बातमी काढणारी टोळी, तींतील व्यक्ति. 'म्हणे सत्य बोलिला नगरहेर ।' [नगर + हेर = गुप्तपणें बातमी काढणारा] नगराध्यक्ष-पु. शहराच्या स्थानिक संस्थेच्या, म्युनिसिपल कमिटीचा अध्यक्ष; (इं.) प्रेसिडेंट. [नगर + अध्यक्ष = मुख्य] नगरी-स्त्री. लहान नगर; गांव. [सं.] -वि. अहमदनगरचा. 'नगरी रेशीम भरणें.' [नगर = अहमदनगर] ॰पैसा-पु. अहमदनगर येथील प्राचीन राजवटीतील पैसा. नगरीय-वि. शहरासंबंधीं; नगरासंबंधीं. [नगर]
निगम
पु. १ शेवट; निकाल; परिणाम. २ सुटका. -नाम १९०. [सं. निर् + गम्]
निरसणें
निरसणें nirasaṇēṃ v c (निरसन) To throw off; to put away; to reject, remove, cast out. Ex. जेणें नाम- संकीर्त्तन करूनिया ॥ निरसली सकळ प्रपंचमाया ॥.
ओळंगणें or ओळंघणें
ओळंगणें or ओळंघणें ōḷaṅgaṇē or ṃōḷaṅghaṇēṃ v c (आलिंगन S) To clasp eagerly (as in order to grasp or snatch from); to enfold and cling to. Ex. शतांच्या शत दासी ॥ ओळंग- ति जयेपासी ॥ इंदुवसना नाम जयेसी ॥ Sometimes applied as वळंगणें q. v.
ओंफट
पु. वैदिक विधीतील एक क्रिया, उपहासात्मक उल्लेख : ‘करीत ओंफट लक्षेवेळा’ - नाम १३२.ओंफस होणे- (श्रम) वाया जाणे; निष्फळ होणे; फिसकटणे; ‘पण पुढे सारेच ओफंस झाले’ - पलको ८४.
ओशाळ
न. आशा; अभिलाष: ‘अंतरींचे ओशाळन तुटे.’- नाम १७९७.
ओवळ
वि. भ्रष्ट : ‘सांवळ्याशा गोपी केल्या ओवळ्या’- नाम २५२.
पैजार
स्त्री. विशेषतः मुसलमानी पद्धतीचा जोडा; पायपोश पहा. 'मेरे रामको नाम जो लेवे बारोबार त्याके पाऊं मेरे तनकी पैजार ।' -तुगा ४३८. [फा.] ॰खाऊ-वि. खेटरखाऊ; हलकट; क्षुद्र; नीच; निर्लज्ज; कुप्रसिद्ध (मनुष्य). ॰पगडी- पागोटें-स्त्रीन. विशेष रीतीनें पैजाराच्या डौलानें बांधलेलें पागोटें. [फा. पैजार + हिं. पगडी]
पाक
पु. १ अग्निसंस्कारानें (अन्न इ॰) शिजवणें; स्वयं- पाक; भोजनाकरितां अन्न सिद्ध करण्याची क्रिया. 'पाक सिद्ध करितां सीताबाई ।' -दावि ४४. 'मग सावकारे करविला पाक ।' -शनि १२०. २ फळें इ॰ (आढींच घालून) पिकविण्याची क्रिया. ३ पक्वता; पिकलेली स्थिति; परिपक्वपणा; पक्केपणा. 'केली फळे तंव वाढे वाढी । फळपाकें माळी झाड तोडी ।' -एभा १.२२४. ४ पोटांत अन्नपचन होण्याची क्रिया; अन्नावर होणारा जाठररसाचा परिणाम. ५ गळूं इ॰ पिकणें, पुवळणें. ६ पक्वान्न; शिजवून तयार केलेला खाद्यपदार्थ. 'इंद्रियरुचीसारखे । करविती पाक निके ।' -ज्ञा ३.१२९. ७ (धान्याचें) पीक. 'मार्गशीर्ष मी मासां आंतू । जो धान्यपाक युक्तू आल्हादी ।' -एभा १६.२२०. ८ परि- णाम; पर्यवसान; फळ. 'जेव्हां द्राक्षीं दूध घातलें । तेव्हा वायां गेलें गमलें । परी फळपाकीं दुणावले । देखिजे जेवीं ।' -ज्ञा १५.५९१. ९ दहापांच औषधें एकत्र करून केलेला काढा. १० महाकवि इ॰ कांच्या वाणीच्या, काव्याच्या ठिकाणीं असणारा रसोत्पादक गुण- विशेष, शोभा, सौंदर्य. 'कालीदासाच्या काव्याचा पाकच निराळा.' ११ (सल्ला, योजना इ॰कांची) परिणति; सिद्धि; सफळता. १२ साखरेंत पाणी घालून उकळून केलेला रस. [सं. पच् = शिजणें; तुल. गुज. पाक = पीक] ॰कंडू-स्त्री. पोटांतील अन्नाचें पचन झाल्यावर उठणारी कंडू. [पाक + कंडू] ॰निष्पत्ति-स्त्री. १ स्वयं- पाक करणें; अन्न शिजविणें. २ स्वयंपाकांतील कौशल्य. [सं. पाक = स्वयंपाक + सं. निष्पन्नि = तयार करणें, होणें] ॰शाला-ळा- साळ-स्त्री. स्वयंपाकघर. [पाक + सं. शाला = घर, खोली]
पाखं(खां)ड
न. १ एका देवतेस पूज्यत्व देऊन इतर देवांची निंदा करावी अशीं जीं हिंदुस्थानांत अनेक मतें झालीं आहेत त्या पैकीं प्रत्येक; नास्तिकमत; वेदप्रामाण्यास झुगारून बुद्धिप्रामाण्य मानणारें मत; धर्मविरोधी मत; (ल.) वितंडवाद. 'किंबहुना उघड । आंगीं भरूनिया पाखांड । नास्तिकपणाचें हाड । रोविलें जीवीं ।' -ज्ञा १६.३१५. 'हरि तुझें नाम गाईन अखंड । याविण पाखंड नेणें कांही ।' तुगा १११०. २ (एखाद्याविरुद्ध रचलेलें) कुभांड; तोहमत; तुफान; कपटजाल. ३ (ढोंगी, दांभिक मनुष्याचें) थोतांड; ढोंग; भोंदूपणाचें कृत्य, गोष्ट. [सं.] पाखं(खां)डी- वि. १ नास्तिक; धर्मलंड; वाममार्गी; जडवादी; वेदांना न मानणारा (मनुष्य, मत, पंथ). २ (ल.) पाखंड, थोतांड रचणारा; दांभिक; भोंदू. [पाखंड]
पाळण्यांतलें नांव
पाळण्यांतलें नांव pāḷaṇyāntalē nnāṃva n (Cradle-name.) The name given to an infant from its जन्मनक्षत्र &c. See जन्म- नाम.
पारस
(पु.) हिंदी अर्थ : अेक देशका नाम. मराठी अर्थ : अेका देशाचें नांव.
पाटी
स्त्री. १ लहान मुलांची मूळाक्षरें लिहिण्याचा फळी; धूळपाटी. हिच्याबद्दल हल्लीं दगडी (स्लेट्) पाटी वपरतात. 'माहेरीं बाळपणीं मज झाली रत्नमूर्ति परि पाटी । शिकलें तीवरि बाई! साध्वीची कांतभक्ति परिपाटी ।' -मोकृष्ण ८३.१६८. २ पोथीच्या खालीं व वर (आच्छादनार्थ) ठेवतात त्या फळ्यांपैकीं प्रत्येक. ३ उंसांच्या चरकांतील लाटांच्या वर व खालीं असणाऱ्या लाकडाच्या जाड फळ्यांपैकीं प्रत्येक. या फळ्यांना खालची पाटी व वरची पाटी अशीं नांवें आहेत. ४ जिच्यावर शेवया तयार करितात ती लांकडाची फळीं ५ (आट्यापाट्यांचा खेळ) क्रीडा- क्षेत्रावर पाडलेल्या आडव्या जाड रेघांपैकीं प्रत्येक. हिची लांबी सुमारें बावीस फूट व रुंदी सुमारें एक फूट असते. ६ (राजा. खा. व.) लांकडाची जाड फळी; लहान तुळई, 'बुचकुंदांचिआं पाटियां । कल्हारांचिआ मोहटियां ।' -शिशु ७६६. 'दशरथ बुडतां तळ- वटीं । रामनाम स्मरे वाक्पुटीं । तव सांपडली फुकटी पाटी । नाम तारक ।' -कथा ६.१४.३७. ७ अरुंद जमीनीची लांब पट्टा. ८ शेताचा पाडलेला लहान तुकडा. -कृषि २१०. (राजा.) भातजमीन. ९ (कों.) घरटाच्या वरच्या तळीच्या मध्यभागीं बसविलेली लोखंडाची जाड पट्टी. हिच्या मध्यभागीं असलेल्या छिद्रांत खालील तळीचा खुंटा फिरतो. १० स्त्रियांचें एक कंठभूषण. 'कंठी मिरवे मुक्तामाळती, पेट्या पाटी नाना जाती.' -अमृत ५५. ११ रीत; पद्धत; परिपाठ. १२ (उदबत्त्यांचा कारखाना) उदबत्त्या तयार करण्याचा पाट. १३ (वाद्य) तंबोऱ्याच्या भोंपळ्यावर आच्छादना- साठीं बसविलेली लांकडाची फळी, तबकडी. १४ (खान) दाराची एक फळी. [सं. पट्ट] ॰उधळणें-शाळा सुटतेवेळीं धूळपाटीवरील धूळ किंवा विटकरांचा भुगा उधळून लावून लिहि- लेलीं अक्षरें नाहींशीं करणें. जुन्या काळीं धूळपाट्या वापरीत असत त्यावेळीं शाळेंतील दररोजचा अभ्यास संपला म्हणजे धूवपाटी- वरील धूळ उधळून टाकण्याचा परिपाठ होता. (मुलगा, मूल) पाटीवर घालणें-बसविणें-लावणें-शिक्षण देण्यास योग्य झालेल्या मुलास मूळाक्षरें शिकविण्यास आरंभ करणें; शाळेंत घालणें; ओनामा देणें. पाटी गणित-न. अंकगणित [पाटी + गणित] पाट्या बदलणें-वर्गांतील मुलांनीं पाटीवर लिहिलेला अभ्यास, परस्परांत पाट्या बदलून पाठ तपासण्याचा एक प्रकार. -अध्यापन ९९.
पल्हव
(पु.) हिंदी अर्थ : पारस देशका प्राचीन नाम, वीर, पहलवान. मराठी अर्थ : पारस देशाचें जुनें नांव. वीर, मल्ल.
पण
भाववाचक नाम बनविण्यासाठीं नामास व विशेषणास हा प्रत्यय लावतात. जसें-चांगलेपण, वाईटपण इ॰ हीं सर्व पणांत नामें नपुसकलिंगी होत. शब्दाचा अंत्य आ असेल तर त्याचा ए होतो. जसें-जाणता याचें जाणतेपण. क्वचित आचा अ होतो. जसें:-शाहाणा, म्हातारा इ॰ याचें शहाणपण; म्हातारपण इ॰ (पुष्कळदां चुकीनें संस्कृत शब्दालाहि हा मराठी प्रत्यय लावतात. उदा॰ वक्रपणा) [?सं. पद्-पन्न; हिं. पन]
परिपाक
पु. १ पूर्णावस्था; विकास (फळें, अन्न, धान्य, मूर्खपणा, दृष्टपणा इ॰ कांचा). 'क्रोधाऐसा महादोखु । जयाचा देखां परिपाकु ।' -ज्ञा १८.१०५८. २ (दुष्कृत्याचें) फळ; परि- णाम; शेवट. 'आचरे दोष न धरी धाक । परीपाक दुःखाचा ।' -तुगा ३१.४२. ३ अन्नपचन. ४ काढ्यांतील महत्त्वाची वनस्पति, द्रव्य. ५ शिजविणें. 'तुका म्हणे जैसा कुचराचा दाणा । परिपाकीं जाणा खोटा तैसा ।' -तुगा ५३८. [सं. परि + पच्]
परिपाटी-ठी
स्त्री. १ क्रम; अनुक्रम; व्यवस्था; प्रघात; प्रस्थापित रीत, मार्ग; परिनालिका. 'कार्य भोग्य हें परिपाठी ।' -विपू ३.८६. २ (अंकगणित) संख्यालेखनपद्धति. -वि. व्याव- हारिक; रूढ. 'जरत्कारी नाम परिपाटी । कन्या असेल जयाच्या पोटीं ।' -मुआदि ९.९. [सं. परिपाटी] परिपाठ-पु. १ परिपाठी; चाल; रीत; रुढी, 'आमच्या त्यांचे घरीं जाण्याचा परिपाठ नाहीं' २ प्रघात, वहिवाट 'ह्या गोष्टीचा त्या देशांत परिपाठ आहे.' ३ पद्धत; प्रकार; चाल; रूढी; टूम. (क्रि॰ घालणें). ४ प्रवृत्ति; बळ. 'मत्स्यमैथुन देखित्यासाठीं । खवळल्या कामाच्या परिपाठी ।' -एभा १७.३५१.
प्रमा
स्त्री. १ यथार्थ ज्ञान; निश्चित ज्ञान. 'जें सकळ भाग्याची सीमा । मोक्षलाभाची जें प्रमा ।' -ज्ञा १८.९०१. २ समजूत; जाणीव; बुद्धि. 'जें देहखंडा नाम आत्मा । ईश्वर पाषाण प्रतिमा । ययापराती प्रमा । ढळो नेणें ।' -ज्ञा १८.५६७. ३ प्रमाण 'अविद्या नाशी आत्मा । ऐसी नव्हे प्रमा ।' -अमृ ६.४१ [सं. प्र + मा = मोजणें]
प्रत्यय
न. १ अनुभव; खात्री; प्रतीति. 'सहपरिवारें पळती कामक्रोध । कीं प्रत्यया येतां ब्रह्मानंद ।' -पांप्र ४५.२१. २ भरं- वसा; श्रद्धा; निष्ठा; आत्मविश्वास. ३ (व्याकरण.) नाम व धातु यांस विशेष अर्थ उत्पन्न करण्यासाठीं त्यांना जोडून येणारा शब्द. [सं.] प्रत्ययास येणें-पटणें; अनुभवास येणें. 'म्हणोनि जळो हें झुंज । प्रत्यया नये मज ।' -ज्ञा १.२०८. ॰प्रतिभू-पु. खात्री- लायक जामीन; विश्वासप्रतिभू. [सं.] प्रत्ययित-वि. विश्वास टाकलेला; भरंवसा टाकलेला; विश्वस्त. [सं.] प्रत्ययी-वि. विश्व- सनीय; भरंवशाचा; खात्रीचा; पतीचा. [सं.] प्रत्ययीभूत प्रमाण- न. अनुभवास, दाखला म्हणून येणारें उदाहरण, दृष्टांत, विधान.
पर्यावसान
न. १ शेवट; अखेर; अंत. २ निकाल; परि- णाम; निष्कर्ष. [सं. परि + अवसान] पर्यवसन्न, पर्यवसित-वि. १ संपलेले; शेवटास गेलेलें; अखेरीस पोचलेलें; पूर्ण झालेलें, केलेलें. २ निकाल लागलेलें. परिणाम पावेलेलें ३ साध्य झालेलें; शवटीं स्थापन केलेलें. [सं.]
पट्टी
स्त्री. १ चिंधी; चिंधोटी; चिरोटी; अरुंद व लांब तुकडा (कापड, धातु, लांकूड यांचा). २ जमिनीचा लांब अरुंद तुकडा. ३ दोन भाग जोडणारा तुकडा; जोरपट्टी; अडु; (लोखंड इ॰चा). ४ सरकारनें गांवापासून केलेल्या जमाबंदीची, धर्मकृत्याकरितां वगैरे जमविलेल्या वर्गणीची अथवा कर, दंड किंवा खंडणी इ॰ची यादी. 'आम्ही चौघांनीं पट्टी करून गरीबाचें घर बांधून दिलें.' (सध्यां यादी हा अर्थ नाहींसा होऊन त्याऐवजीं या यादींतील कर किंवा दंड भरण्याच्या विषयाचा बोध होंऊ लागला आहे). व्यपदेशक नाम पट्टी शब्दाच्या मागें लागून असले अनेक समास होत असतात. असे कांहीं समास पुढें दिले आहेत-स्वारी पट्टी = राजा किंवा अधि- कारी यांच्या सफरीचा खर्च भागविण्याचा कर. पालखीपट्टी = गांवांत आलेल्या गोसाव्यांच्या मेळ्यास शिधापाणी इ॰ देण्याकरितां बसविलेला कर. खुशालपट्टी = पुत्रजन्म इ॰ उत्सवाचा खर्च भागविण्या- साठीं बसविलेला कर. लग्नपट्टी = एखाद्याच्या घरीं लग्नकार्य झालें असतां त्यासाठीं भरावयाचा कर. केरपट्टी = गांवातील केर काढण्यासाठीं (भंग्यांना द्यावयाच्या पगारासाठीं) बसविलेला कर; भंगीपट्टी. कोंबडीपट्टी = कोंबड्यांच्या खरेदी-विक्रीवरील कर. घर-झाड-म्हैस पट्टी = घर इ॰च्या खरेदी-विक्रीवरील कर. पासोडी पट्टी = पाटलाच्या पासोडी-मुंडासेंसाठी बसविलेली पट्टी इ॰. ५ (सामा.) कर; खंड. ६ सर्व लोकांवर बसविलेल्या कराची, वर्गणीची यादी; यादीचा कागद. 'हातीं पट्टी घेऊन शिपाई वसुलास आला आहे.' ७ घडी; दुमड; चुणी (पागोटें इ॰ची). ८ विड्याच्या पानांची गुंडाळी (त्यामध्यें चुना कात, सुपारी इ॰ घालून केलेली). ९ गावांचा विभाग, आळी; गल्ली; पेठ; एक प्रादेशिक विभाग; वार्ड. 'कोकणपट्टी.' १० (बायकी) वेणी घालतांना कपाळावर दोहों बाजूंनीं बस- विलेला केशसमुदाय; केंसांचा पुढला कपाळावरचा एका बाजूचा भाग. ११ वस्त्राचा बुट्टेदार कांठ, पदर, किनार. १२ फुलांची माळ; तुरा पहा. १३ वेदपठण करण्याकरितां किंवा सभेंत वेदमंत्र म्हण- ण्याकरितां बसलेली वैदिकांची ओळ; भोजनपंक्तींत बसलेली ब्राह्म- णांची रांग. १४ पट्टी शब्दाच्या चवथ्या अर्थीं विनोदी, लाक्ष णिक उपयोग. या शब्दाचे पुष्कळ समास होतात व त्यांचा अर्थ बहुधा आवेशानें रागें भरणें, शिव्या देणें असा होतो. असे कांहीं समास-खडसपट्टी;खरडपट्टी; भोसड-फोदल-उधळ- भादर-झवर-वसर-पट्टी इ॰. १५ (सोनारी धंदा) सुमारें ९ इंच लांब व १।। इंच जाड अशा लोखंडी तुकड्यास ४० ते ६० लहान-मोठीं भोकें पाडून धातूची तार बारीक करण्यासाठी त्यांतून ओढण्यासाठीं केलेलें साधन. १६ खरें व उंची रेशीम. १७ जखमेस लावावयाचा मलमासह कापडाचा तुकडा. १८ (व्यापारी) माल विकल्याबद्दल गिऱ्हाईकास करून दिलेल्या आंकड्यांची यादी. १९ रेघा ओढण्याचा, आंखण्याचा लांकडी तुकडा; आकृति काढण्याचें साधन. 'फूटपट्टी.' २० (बुद्धिबळाचा खेळ) मोह- ऱ्यानें (विशेषतः हत्तीनें किंवा वजिरानें) रोखलेलें पग. २१ वर्गणी; फंड; फाळा; कर. २२ शेत; शेताचा लांबट तुकडा. २३ (मल्ल- विद्या) आपला हात जोडीदाराच्या कानावरून गालाफडावर दाबून आपल्या कोपराच्या लवणींत जोडीदाराचे गाल, मान व कान धरून जोडीदारास चीत करणें. याला पट्टी देणें असेंहि म्हणतात. २४ (संगीत) बाजाच्या पेटीचा सूर, ध्वनि. 'पांचवी पट्टी धर.' [सं. पट्ट] ॰काढणें-गर्व नाहींसा करणें; खरडपट्टी काढणें. ॰चालणें- लागणें-वर्गणी गोळा करण्याचें काम सुरू होणें. (व.) मार देणें. ॰पढविणें-(वि.) मनाप्रमाणें शिकवून ठेवणें. ॰देणें-१ कामावरून दूर करणें; निरोप देणें. २ वाटेस लावणें. ॰लावणें- शेतसारा भरणें. 'गेलो होतो पट्टी लावायला ।' -एपो ४६. ॰फाडणें-तासणें-मागावयाची रक्कम प्रत्येक नांवापुढें लिहून नांवाची यादी तयार करणें. पट्टीचा, पट्टींतला-वि. विद्वानांच्या, निष्णातांच्या रांगेत बसण्यास योग्य; पंडित; निष्णात; श्रेष्ठ; अग्रगण्य (वैदिक, कारकून, वाजंत्री, लबाड वगैरे). ॰चा दबका-(तांबट-कासारी धंदा) फुलपात्राची कड, किनार पाडण्याचा, करण्याचा हातोडा. ॰पछोडी-पासोडी-स्त्री. पट्टी; कर; वर्गणी. ॰लंगोटी-स्त्री. कुणब्यावर बसविलेला सरकारी कर; जमीनीवरील कर, सारा. (क्रि॰ भरणें; देणें; करणें)
पूर्व
वि. १ पहिला; अगोदरचा; आधींचा; सुरवातीचा. २ प्राचीन; मागला; गतकालीन. ३ पुढील किंवा मागील (भाग, बाजू इ॰ ). जेथ पूर्वानुक्रमु दिसे । चोखाळत ।' -ज्ञा २.२२३. ४ ज्या दोन गोष्टींत आनुचर्यसंबंध असतो त्यांपैकीं आधींच्या वस्तूस पूर्व व नंतरच्या वस्तूस उत्तर म्हणतात. 'भुललों पूर्व विसरलों सारें । अगीं भरलें नूतन वारें ।' -विक ५. समासांत पूर्वपदीं व उत्तरपदींहि हा शब्द योजितांत. जसें:-द्दष्टपूर्व, श्रुतपूर्व, उक्तपूर्व, पूर्वदृष्ट, वयपूर्व (तरुण इ॰ ). 'वयपूर्व तूप वाढीत वांकोनी ।' -रामदासी २.१५६. सह, बरोबर इ॰ अर्थीं क प्रत्यय लावून (पूर्वक) समासांत योजितात. जसें:-आग्रहपूर्वक. 'ईश्वराचें नाम श्रीशब्दपूर्वक घ्यावें.' ॰कथा- स्त्री. १ संदर्भ लगावा म्हणून पूर्वी सांगून झालेल्या कथेचा जो भाग पुन्हां सारांशरूपानें सांगतात तो. २ मागील हकीकत, इतिहास. ॰कर्म-न. सद्य:स्थितींत सुखदुःखास, कारणीभूत असें मागें किंवा पूर्वजन्मीं केलेलें कर्म; पूर्वींचें कृत्य. म्ह॰ चुलीपाशीं हगावें आणि पूर्वकर्मास रडावें. ॰कालवाचक अव्यय-न. (व्या.) मूळ धातूस ऊन, हून प्रत्यय लागून होणारें अव्यय. उदा॰ करून, बोलून इ॰. ॰ग्रह-पु. प्रथम, पूर्वीं झालेली कल्पना, मत, समज इ॰; आरंभीं झालेला ग्रह (बरावाईट) ॰ग्रहदूषित-वि. पूर्वीच्या मताचा, ग्रहाचा परिणाम झालेला; पूर्वग्रहानें कलुषित असें (मन). (इं.) प्रेजुडिस्ड. ॰ज-पु. आपल्या अगोदरच्या पिढींतील माणूस, पुरुष; वाडवडील. 'धिगधिग तें जिणें पूर्वजांची वृत्ति असोहि हातींची गेली रे ।' -दावि ४१५. -वि. पूर्वीं, आधीं जन्मलेला (बंधु). [सं. पूर्व + ज (जन्मलेला) प्रत्यय] ॰जन्म-नपु. मागला जन्म; हल्लींच्या जन्माच्या पूर्वीचा जन्म. ॰जन्मार्जित-वि. पूर्वजन्मीं संपादन केलेलें (पाप, पुण्य इ॰ ). [सं. पूर्व + जन्म + अर्जित] ॰ठेवा-पु. चालु जन्मांत सुखदुःखास कराणीभुत असा पूर्वजन्मांतील पापपुण्याचा संचय. पूर्वकर्म पहा. ॰दत्त-वि. (पूर्वजन्मीं दिलेले). ह्या जन्मीं बरे वाईट अनुभव येण्यास कारणी- भूत असें पू्र्वजन्मीं केलेलें दानादि कर्म; आपण जसें पूर्वजन्मीं दिलें-आचरलें असतें तसें परमेश्वर या जन्मीं आपणास देतो असा समज. ॰धन-न. वडिलोपार्जित पैसा. 'माझों पूर्वधन । तुम्ही द्यावें ऋण ।' -गुच १.१२०. [पूर्व + धन] ॰धरी-वि. पूर्वापार चालत आलेला; सनातन. 'राउळीची चोरी केली थोरी । ते उपसाहावा जी मुरारी । कां सृष्टिकर्ता पूर्वधरी । भणऔनियां ।' -दाव ३८०. ॰धान्य-न. पावसाळयांत येणारें पीक; खरीपाचें पीक. अग्र- धान्य पहा. ॰पद-न. १ हरिदासानें कथेच्या सुरवातीस घेतलेलें एखादें विधान, सूत्र, नीतिवचन. याचें तो निरनिराळीं उदाहरणें देऊन विवरण करतो व शेवटीं पुन्हां सिद्धांत म्हणून त्याच पदा- वर येतो यावरून. २ समास, वाक्य, कविता इ॰ चें पहिलें पद. ३ (ल.) पूर्वस्थिति. पूर्वपदावर येणें-मध्यंतरीं केलेलें श्रम फुकट जाऊन पुनः पूर्वीच्या वाईट मार्गाकडे वळणें. ॰पक्ष-१ (तर्क, न्याय) वादविवादांत एका पक्षानें केलेली आपल्या मताची मांडणी; दुसरा, विरुद्ध पक्ष याला उत्तर देतो. पूर्वपक्षाचें खंडण किंवा मंडण करणें जरूर असतें. एक बाजूचा उपन्यास. 'पूर्वपक्ष त्यागून सिद्धांत । निरूपण करावें नेमस्त ।' -दा ४.२.१८. २ (कायदा) तक्रार; फिर्यादीचें म्हणणें; वादीचें म्हणणें. ३ सिद्धांत; प्रमेय. ४ महिन्याचा शुद्ध पंधरवडा. ५ आशंकामय स्थिति; माया. 'पूर्वपक्ष म्हणिजे माया । सिद्धांतें जाये विलया ।' -दा २०.३.२०. ६ पूर्वीची अविचल, अविकल स्थिति (मनाची); मूळ सिद्धांतमय स्थिति. 'तुकाराम रूपें येवोनि प्रत्यक्ष । म्हणे पूर्वपक्ष सांभाळीजे ।' -ब २५. ॰पाठ-पु. पूर्वापार चालत आलेली रूढी, प्रघात, रिवाज, वहिवाट. ॰पीठिका-स्त्री. १ पहिली, मागील, पूर्वीची किंवा प्राचीन पद्धत, मार्ग, चाल, रीत इ॰ 'आतां त्यानें साधूपणा धरिला परंतु त्याची पूर्वपीठिका तर बहुत विरुद्ध आहे.' २ (एखादा, वादविवाद किंवा इतर प्रसंग याच्या ) हकिकतीचा पहिला भाग; पूर्वींचा इत्थंभूत वृत्तांत; पूर्ववृत्त; आरंभींचा किंवा मूळचा भाग. ३ ग्रंथाचा प्रास्थाविक भाग; प्रस्तावना. पू(पु)र्वपुजा-पूजा-स्त्री. १ पूर्वपुण्य पहा. 'सांब कृपा परिपुर्ण पूर्व पूजा बहुत चांगली ।' -ऐपो ३२०. २ देवपूजेंत देवतेस अभिषेक करण्यापूर्वीं करावयाची पूजा. पूर्वपुण्य, पुण्याई-नस्त्री. पूर्वजन्मीं सत्कृत्यें करून मिळ- विलेलें पुण्य. ॰पुरुष-पुअव. पूर्वींचें वंशज; पूर्वज. 'मग वोवांडिती स्वर्गस्थ । पूर्वपुरुष ।' -ज्ञा १.२५३. ॰प्रवाह-पु. प्राचीन, पूर्वींचा मार्ग (शब्दाश: व ल). ॰बस्ती-स्त्री. वरचें पोट; ओटीच्या वरचें पोट; छातीचें मध्यपटल व बेंबी यांच्यामधील भाग; मणिपूर. ह्याच्या उलट उत्तरबस्ति. ॰भूमिका-स्त्री. पूर्वस्थल पहा. संन्यास. घेतलिया जाण । पूर्वभूमिका अवलोकन ।' -एभा २३.५०२. ॰मीमांसा-स्त्री. मीमांसाशास्त्राचा एक भाग. हा भाग जैमिनीनें केला असून त्यांत कर्म-मार्गाचें प्रतिपादन आहे; कर्मकांड. 'तैसी हिंसाचि करून अहिंसा । निफजविजे है ऐसा । पैं पूर्वमीमांसा । निर्णो केला । -ज्ञा १३.२२०. उत्तरमीमांसा पहा. ॰रात्र-स्त्री. रात्रीचा पहिला भाग; संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंतचा काळ. ॰रूप- न. १ पूर्वसूचना; (रोगाचें) पूर्वचिन्ह; पूर्वलक्षण. 'कामल (कावीळ) ही पांडूचें पूर्वरूप.' २ आधींचें स्वरूप, आकार; प्रथम दिसूं लागणारीं चिन्हें. ३ कानउघाडणी; आगाऊ दिलेली सूचना. ॰रूप- संधि-पु. (व्या.) ज्यांत दोन स्वरांच्या जागीं प्रथम स्वर कायम होतो असा संधि. ॰रूपज्ञान-न. १ पूर्वचिन्हावरून होणारें ज्ञान; प्रथमचीं लक्षणें; सूचना इ॰ वरून होणारें ज्ञान. २ (वैद्यक) रोगाचा साध्यासाध्य विचार; चिकित्सा. ॰रेषा-खा-स्त्री. कपाळावर लिहून ठेविलेल्या पुढील आयुष्यांतील बऱ्यावाईट भाग्याविषयींच्या गोष्टी; दैव; नशीब; भाग्य; लल्लाटरेषा . 'दास म्हणें पूर्व-रेखा । प्राप्त न टळे ब्रह्मादिकां ।' -रामदासाचें अभंग (नवनीत पृ. १४८ ). ॰वत्-क्रिवि. पूर्वींप्रमाणें; पहिल्यासारखें. ॰वय-न. मनुष्याच्या आयुष्याचा पहिला अर्धा भाग; बालपण; लहानपण. 'पूर्ववयीं चित्त निश्चिंत । तारुण्यीं तेंचि कामासक्त ।' -एभा २०.२७. ॰वयस्क-वि. आयुष्याच्या पहिल्या अर्धांत असलेला; लहान वयाचा; अल्पवयस्क; तरुण. ॰वाद-पु. (कायदा) आधींपासूनचा ताबा असल्याबद्दल तक्रार; पहिल्या भोगवटा-मालकीबद्दलची सबब पुढें करणें. ॰वादी-वि. १ (वादविवादांत) वादविवादास सुरवात करणारा; पूर्वपक्षी. २ (कायदा) तक्रार करणारा; फिर्यादी; वादी. ३ प्रथमचा ताबा, भोगवटा दाखविणारा; पूर्वी पासून चालत आलेली मालकी प्रस्थापित करणाका. ॰वृत्त- वृत्तांत-नपु. पूर्वींचा इतिहास; (एखादा मनुष्य, प्रकरण इ॰ ची) आरंभींची हकीकत; पूर्वकथा; पूर्वपीटिका. ॰वेत-वेट-ठ, पूर्वैट- वि. प्रथमच गाभण असलेली किंवा व्यालेली. [पूर्व + वेत] ॰सदर्भ- पु. (भाषण, कथानक इ॰ चा) पूर्वींचा संबंध. ॰संध्या-स्त्री. (ख्रि.) सणाच्या आदल्या दिवसाची सायंकाळ. (इं.) ईव्ह. 'ज्या कोणत्या सणाला...पूर्वसंध्या आहे, त्यासाठीं नेमलेली सारप्रार्थना पूर्वींच्या संध्याकाळच्या उपासनेंत म्हणावी.' -साप्रा ३९. ॰स्थल-स्थान-न. १ (एखादी गोष्ट, मनुष्य इ॰ ची) पहिली किंवा पूर्वींची स्थिति, ठिकाण, देश, जागा इ॰ २ ज्या ठिकाणा हून निघून देशांतर केलें तें ठिकाण. ॰स्थिति-स्त्री. पहिली किंवा पूंर्वींची अवस्था; प्रकृतिभूत स्थिति. पूर्वांग-न. १ आरंभीचा, प्रास्ताविक भाग, अंश; (एखादें पुस्क, धंदा किंवा काम यांचीं) सुरवातीचीं कामें; प्राथमिक योजना; एखाद्या धार्मिक विधींतील मुख्य कर्मापूर्वीचें कर्म. ह्याच्या उलट उत्तरांग. । २ (संगीत) रागाच्या सा, री, ग, म ह्या चार स्वरांचा समुदाय. पूर्वांग- वादीराग-पु. (संगीत) ज्या रागाचा वादी स्वर त्याच्या पूर्वोगामध्यें असतो असा राग. ह्या वर्गांत येणारे राग दिवसा बारा वाजल्यापासून रात्रीं बारा वाजेपर्यत गाइले जातात. पूर्वापर-वि. १ मागील व पुढील; पूर्वींचें व नंतरचें. 'पूर्वापरसंबंध'. तंव या पूर्वापर बोलाचा । विचारूनि कुमरु पंडूचा । कैसा प्रश्नु हन अव- सरीचा । करिता होईल ।' -ज्ञा ४.२११. २ -क्रिवि. आधीं आणि नंतर; पहिल्यापासून शेवटपर्यंत; अथपासून इतिपर्यंत. 'ग्रंथ पूर्वापर पाहिल्यावांचून लागणार नाहीं । ' 'तया माधवविप्राघरीं । शुभाचारें होती नारी वासना तिची पूर्वापरी । ईश्वरपूजा करितसे ।' -गुच ११.८. [सं.] पूर्वापरविरोध-पु. (ग्रंथादिकांत पहिला व शेवटचा भाग यांत भिन्नता) असंबद्धपणा; विसंगति. पूर्वापरवृत्त-न. समवृत्त; सममंडल; स्थलाच्या माध्यान्ह वृत्ताला लंबरूपानें छेदणारें द्दड्मंडल. -सूर्य ५. [सं.] पूर्वा(र्वां) पार-क्रिवि. १ पूर्वापर पहा. २ पूर्वींपासून; प्रथमपासून; प्राचीनकाळापासून. 'ह्या गांवची पूर्वापार वहिवाट अशीच आहे.' -वि. पूर्वापार पहा. पू्र्वाभ्यास- पु. मागील किंवा पूर्वींची संवय, चिकाटी, अभ्यास इ॰ पूर्वार्वन- न. (प्र. पूर्वार्चन) पूर्वपुण्य पहा. 'होनाजी बाळा म्हणे मुख्य जन्मांतर पूर्वार्चन नीढळीं ।' -होला ८८. [सं.] पूर्वार्ध-पु. स्थलकालादिकाचा पहिला, अलीकडचा, जवळचा अर्धा भाग. ह्याच्या उलट उत्तरार्ध. 'पंधरा अध्याय पूर्वाधे । व्याख्यान झालें सिद्ध । सूत्रप्राय उत्तरार्ध । दाखविला विशद अध्यायार्थें ।' -एभा १६.६९. [सं.] पूर्वावलोकन-न. आधीं किंवा प्रारंभी केलेली पाहणी; पूर्वीं केलेली परीक्षा, विचार इ॰ [सं.] पूर्वाह्ण-पु. सूर्य उगवल्यापासून सहा घटिकेचा तिसरा भाग; दुपारच्या अगो- दरच्या सहा घटिका. पराह्ण, पराण्ह पहा. [सं.] पूर्वेत-ट-ठ- वि. पूर्ववेत (अप.) पहा. पूर्वोत्तर-वि. १ पुढील व मागील; आधींचा व नंतरचा. 'पूर्वोत्तरसंबंध'-क्रिवि. सुरवातीस व शेवटीं; प्रथम व अखेर. २ आरंभापासून अखेरपर्यंत; संपूर्णपणें. 'कथा ऐकणें तर पूर्वोत्तर ऐकावी मग तिचा रस कळतो.' [सं.] पूर्वोत्तर मीमांसा-स्त्री. पूर्व आणि उत्तरमीमांसा; दर्शनांतील कर्मकांड व ज्ञानकांड. 'पूर्वोत्तरमीमांसा दोनी । कुंडलें जाहलीं कृष्णश्रवणीं ।' -एरुस्व १.५२. [सं.]
फारस
(पु.) हिंदी अर्थ : अिरान देशका नाम. मराठी अर्थ : देशाचें नांव.
फुल(ला)वणी
स्त्री. १ फुलविणें (पासून धातुसाधित नाम) पहा. २ प्रफुल्लितपणा. मनको. 'ग्रंथप्रकाशाची फुलावणी ।' -विपू ५.८१.
फुलणी
स्त्री. फुलणें (पासून धातुसाधित नाम) पहा.
फुसलावणी
स्त्री. लालूच; आमिष. (क्रि॰ देणें; करणें; लावणें). [फुसलाविणें धातुसाधित नाम] फुसलाव(वि)णें- उक्रि. १ (खोटी स्तुति, लालूच इ॰ नीं) वश करून घेणें; आप- लासा करणें; आपल्या बाजूला वळविणें. २ समजूत घालणें; बाबा- पुता करणें. [हिं. फुसलाना] फुसलाव्या-वि. फूस लावणारा; वंश करून घेणारा. [फुसलाविणें]
राणा
पु. १ (काव्य) राजा. 'मी असे उज्जनीचा राणा । नाम माझों विक्रम ।' -शनि ३६७. २ मुख्य; नायक. 'तंव बोले शिष्यांचा राणा ।' [सं. राजन्; प्रा. राण; हिं. राणा] राणी- स्त्री. १ राजपत्नी; राजाची स्त्री. २ (पत्त्यांचा खेळ) राणीच्या चित्राचें पान. [सं. राज्ञी; प्रा. रण्णी (?); गु. पं. सिं. बं. राणी; हिं. रानी] राणि(णी) वसा, राणवसा-पु. राणीची किंवा राजाच्या बायकांची राहण्याची, बसण्या-उटण्याची जागा; अंत: पुर; जनानखाना. 'तंव ते येउनि राणिवशासी ।' -ह ३१.१९७. [राणी + वास] राणीचा जाहीरनामा-पु. १८५७. सालच्या बंडानंतर लोक शांत व्हावे म्हणून व्हिक्टोरिया महाराणीनें काढ- लेला एक जाहीरनामा. राणी माशी-स्त्री. मधमाशी; आका- रानें मोठी असून अंडीं घालून नेहमीं पोळ्यांत राहणारी मधमाशी; (इं.) क्वीन् बी. राणीराउत, राणीराउ(व)ताणी-पुस्त्री. श्रीमंत व दरिद्री हा भेद; श्रीमंती, वैभव, निर्धास्तापणा किंवा धिटाई दाखविण्याकरितां भाषणसंप्रदायांत योजलेला शब्द. 'राणी रावताणी त्याच्या घरीं पाणीं भरती.' 'हा राणीराव- ताणी भीत नाहीं-खातरेंत आणीत नाहीं.' राणी(णि)व-स्त्री. (काव्य) १ राजाचा अधिकार; राजेपण; राजपद. 'नातरि राणीव सांडावी ।' -शिशु ४७५. २ राज्य. 'जीत असतां हे पांडव । पुत्रांसि न जिरे राणीव ।' -मुआदि ३४.१००. ३ राज्यसुख. 'मजवीण भोगा सुखें राणीव ।' -मुआदि १८.६९. ४ (महानु.) अधिकार; सामर्थ्य. 'भक्तीसी राणीव जाली ।' -भाए ४७. राणीवी-स्त्री. राज्य; समृद्धि. [प्रा.] राणेपण- न. १ मोठेपण. 'परि राणेपणें शार्ङ्गधरा । बोला हें तुम्हीं ।' -ज्ञा १०.३२३. २ (महानु.) राजेपणा. 'आतां देवो कांई विसरले राणेपणें ।' -भाए १४३. राणोराॐ-पु. राजराज; अधिराज. 'नागार्ज्जुनाचा दातारू । रोणोराॐ श्रीचक्रधरू ।' -शिशु ७. राणो-पु. (गो.) (राणे नांवाच्या लोकांनीं बंड केलें होतें यावरून) बंडखोर मनुष्य.
रडी, रंडी, रड्डी
स्त्री. १ (सामान्यतः रडी) भान जाऊन खेळांत खोटें खेळणें; खेळांत चिडणें. (क्रि॰ घेणें). २ वाटेल तेव्हां डोळ्यांतून पाणी, अश्रू आणणारी स्त्री. [रडणें] रडी खाणें-चिडणें; रडकुंडीस येणें; पराभव होणें. 'पांडुरंगे पहा खादलीसे रडी । परि नाम सेंडी धरिली आम्हीं ।' -तुगा १२१८. रडी येणें-ज्यावर डाव आला असेल त्या मुलीनें किंवा मुलानें माझेवर मुळींच डाव आला नाहीं असें किंवा अशा प्रकारचें खोटें सांगणें. रडी(रंडी)खोर-वि. चिडखोर; खेळांत खोटें बोलणारा. र-रंडीवाल-वि. रडण्याची संवय लागलेला, असलेला; चिरडीस जाणारा. रडी खाण्याचा किंवा रडीस येण्याचा ज्याचा स्वभाव आहे तो.
रमज़ान
(पु.) हिंदी अर्थ : महीने का नाम, गुनाहोंको जला देना. मराठी अर्थ : महिन्याचें नांव, पाप क्षालनार्थं केलेले अुपवास.
रोहिणी
स्त्री. १ सत्तावीस नक्षत्रांपैकीं चवथें नक्षत्र. २ नऊ वर्षांची कुमारिका. ३ वीज. ४ रोही जातीची हरिणी. ५ बल- रामाची आई. ६ मृगजळ. 'नातरी भौमा नाम मंगळु । रोहिणीतें म्हणती जळु ।' -ज्ञा ५.११६. ७ (संगीत) एकोणिसाव्या श्रुतीचें नांव. ८ शुद्धरक्त वाहून नेणारी रक्तवाहिनी. हिला चुकीनें धमनी म्हणतात. ९ रोहीण; एक वृक्षविशेष. रक्तरोहिडा; मंजिष्ठा; या झाडाच्या सालींचा रंगाला उपयोग होतो. [सं.] ॰जल, रोहिणीचें जळ-न. मृगजळ. -ज्ञा २.१२१. 'विषय असत्य रोहिणीचें जळ । वाटतें सकळ भ्रांतिरूप ।' -ब १५७. ॰पति- वर-पु. १ चंद्र. २ वसुदेव. ॰रोग-पु. चाळपुळीचा रोग. 'रामकृष्ण परमहंस यांच्या दुखण्याचें पर्यवसान रोहिणीरोगांत झालें. -विवेकानंदजीवनरहस्य.
रसायन धर्म
पु. पदार्थांच्या ठिकाणीं परस्परांवर परि- णाम करणारा रासायनिक गुण. [सं.]
सार्व
वि. अखिल; सबंध; एकंदर. [सं.] ॰काल-क्रिवि. सतत; नेहमीं; सदासर्वंकाळ. ॰कालिक-वि. सर्वकाळ लागू असणारें, शाश्वतचें. ॰जनिक-जनीन-वि. सर्व लेकांसंबंधीं (आचार, इ॰). सामान्य; सामुदायिक; लौकिक. खाजगी याच्या उलट. सार्वजनिक गणपति-चर्चा-सभा-हित इ॰' ॰भौतिक- वि. १ सर्व प्राण्यांसंबंधी; जगांतील सर्व भूतमात्रांविषयीं. २ सर्वभूतांविषयीं. ॰भौम-पु. सम्राट्; सर्व पृथ्वीचा राजा; चक्रवर्ती; बादशहा. 'जन्म गेला कोरान्न मागोन । सार्वभौम नाम तया ।' -वि. सर्व पृथ्वीसंबंधीं; जागतिक. ॰भौमपद-न. सम्राट्पद; सर्व पृथ्वीवर सत्ता, राज्य. ॰राष्ट्रीय-वि. १ सर्व राष्ट्रांसंबंधी-बाबत (नियम, कायदा इ॰). 'ऑस्टिन हा सार्व- राष्ट्रीय धर्मशास्त्राला कायदा ही संज्ञा लावीत नाहीं.' २ आंतर- राष्ट्रीय. (इं.) इंटरनॅशनल. -ज्ञानको. ॰लौकिक-वि. जगांतील सर्व राष्ट्रें, लोक यासंबंधीं; अखिल जागतिक. सार्वत्रिक-वि. १ सर्वत्र विद्यमान, प्रसिद्ध. २ सर्व जागचा; सर्वत्र संबंध असलेला. सार्वस्विक-वि. समाजसत्ताक. लोकसत्ताक राज्य चांगलें. सगळें राज्यतंत्र गुंडाळून टाकून सार्वस्विक सांप्रदाय असावा' -नि. ७१२. सार्वांग-(प्र.) सर्वांग. 'न लांवीं वो कर्पुरू । सार्वांगी येतसें ओदरूं ।' -शिशु ८३२.
सार्वभौम
सार्वभौम sārvabhauma m S An universal emperor; a lord of the whole earth. Ex. जन्म गेला कोरान्न मागोन ॥ सा0 नाम तया ॥.
शब्द
पु. १ आवाज; उच्चार; कोणत्याहि प्रकारचा ध्वनि; श्रोत्रेंद्रियाचा विषय. २ एखाद्या वस्तूचा, कल्पनेचा, दर्शक किंवा व्यंजक, जो अक्षरसमूह तो. ३ (व्या.) प्रथमादि विभक्ति ज्या- वरून होतात अशी वर्णानुपूर्वी (नाम, सर्वनाम इ॰ ). 'तळमळ हा संस्कृत शब्द चालतो तरी कसा ?'. -नारुक ३.४. ४ बोल; वाईटपणा; ठपका. (क्रि॰ लागणें; येणें; ठेवणें; लावणें; आणणें). 'तें केलें धार्तराष्ट्री विफळ सकळहि, आणिला शब्द सामीं ।' -मोकृष्ण ६८.३३. ५ आज्ञा; हुकूम. ६ प्रतिज्ञा; वचन; वाचा. 'एकवेळ गेले शब्द ।' -संग्रामगीतें १२०. ७ वेद. 'त्यासि शब्दपर निष्णातू ।' -एभा १०.३४९. ८ शास्त्र. 'शब्दाचिया आसकडी । भेद नदीची दोही थडी । आरडते विरह वेडी । बुद्धिबोध ।' -माज्ञा १६.५. [सं. शब्द = नाद करणें] (वाप्र.) ॰खाणें-लिहितांना किंवा बोलतांना शब्द गाळणें, न लिहिणें किंवा न उच्चारणें. ॰खालीं न पडणें-दुसऱ्याच्या सांगण्या- प्रमाणें करणें; शब्दाला किंमत देणें; शब्द मानणें. ॰खालीं पडूं न देणें-उत्तरास प्रत्युत्तर देणें; वादविवादांत किंवा भांड- णांत माघार न घेणें. ॰झेलणें-ज्याची सेवा, चाकरी शुश्रूषा, खुशामत वगैरे करावयाची असेल, त्याच्या तोंडून आज्ञा निघतांच तिच्याप्रमाणें करणें. 'राजकारस्थानी पुरुष आणि सेनापति यांचे शब्द त्यांच्या अमदानींत सगळे लोक झेलीत असतात' -ओक. ॰टाकणें-१ मागणी, विनंति करणें; एखादी गोष्ट सांगून बघणें. २ शिफारस करणें. ॰ठेवणें-लावणें-लागणें-दोष देणें; ठपका ठेवणें; दूषण लावणें. 'माझेनि दोषें पावलों खेद । हा तुज कासया ठेवणें शब्द ।' -मुक्तेश्वर. 'त्वत्सम साधु न लागों देती स्वयशासि शब्द ते राजे' -मोवन २.३६; -मोउद्योग ८.१९. ॰लागूं देणें-लागू-लावू देणें-दोष पत्करणें. 'सत्यप्रतिज्ञ पांडव लागूं देती न आपणा शब्द ।' -मोविराट ४.६३. सामाशब्द- ॰काठिण्य-न. (अलंकार) शब्दाचा कठोरपणा, कर्कश- पणा. [सं.] ॰कार्पण्य-न. अल्पभाषा; कमी बोलणें; मित- भाषण. 'शब्दकार्पण्य पंडितास दोष स्त्रीला महाभूषण ।' [सं.] ॰कोश-षपु. १ शब्दसंग्रह; शब्दसमुच्चय; शब्दांचा साठा- खजिना; शब्दांचा अर्थासह संग्रह. २ शब्दाचे अर्थ, व्युत्पत्ति, व्याकरण वगैरे सांगणारा ग्रंथ. [सं.] ॰कौशल्य-न. शब्दरचना- चातुर्य; भाषाचातुर्य. [सं.] ॰खंडन-न. शब्द, विधान इ॰ खोडून काढणें; शब्दावरील टिका. ॰गुण-पु. शब्दांचे गुण, लक्षण. हे एकंदर चोवीस आहेत. ते पुढील प्रमाणें:- श्लेष, प्रसाद, समता, माधुर्य, सुकुमारता, अर्थव्यक्ति, उदारत्व, कांति, उदात्तता, ओज, सुशब्दता, और्जिंत्य, विस्तर, समाधि, सौक्षम्य, गांभीर्य, प्रेम, सन्मितत्व, प्रौढी, रीति, उक्ति, गति, भावुक, संक्षेप. इ॰ ॰चातुर्य-न. शब्दरचनाकौशल्य; वाक्चातुर्य; शब्दपटुता; भाषा- शौली; भाषाप्रभुत्व. [सं.] ॰चित्र-न. १ शब्दांनीं केलेलें वर्णन, काढलेलें चित्र. २ (साहित्य) चित्रकाव्याचा एक प्रकार; शब्द- चमत्कृति. उदा॰ 'मागे जी लुगडी, सकाप बुगडी' इ॰. [सं.] ॰चोर-पु. दुसऱ्याचा लेख चोरून तो आपलाच म्हणून दडपून देणारा; दुसऱ्याचे शब्द चोरणारा; उष्टा बोल वापरणारा. ॰जाल-ळ-न. १ शब्दांचें जाळें; अनंत शब्दांचा नुसता समूह; शब्दावडंबर; शब्दभारूड. २ वायफळ भाषण; बडबड. 'म्हणती शब्दजाळ टाकून । निश्चल एकाग्र ऐसिजे मनें ।' [सं. ] ॰तः-क्रिवि. शब्दानें. 'शब्दतः अर्थतः अगाघ खोली ।' -एभा २१.३६७. [सं.] ॰ताडन-न. एखाद्यास लागेल असें भाषण; शब्दांचा मार; टोचून बोलणें. 'सूज्ञास शब्द ताडन मूर्खास प्रत्यक्ष ताडन.' [सं.] ॰तात्पर्य-न. भाषणाचा सारांश; शब्दार्थ; मतलब. [सं.] ॰दोष-पु. १ शब्दांतील व्यंग, उणेपणा; शब्दापराध; शब्दवैगुण्य. काव्यप्रकाशांत एकंदर शब्ददोष १३ सांगितले आहेत. ते पुढीलप्रमाणें: श्रुतिकटु च्युतसंस्कृति, अप्रयुक्त, असमर्थ, निहतार्थ, अनुचितार्थ, निरर्थंक, अवाचक, अश्लील (जुगुप्सा, अमंगल, व्रीडा-युक्त), संदिग्ध, अप्रतीत, ग्राम्य, नेयार्थ. 'प्रताप रुद्रांत पुढील सतरा शब्ददोष सांगितले आहेत:-अप्रयुक्त, अपुष्ट-अपुष्टार्थ, असमर्थ, निरर्थक, नेयार्थ, च्युतसंस्कार-च्युतसंस्कृति, संदिग्ध, अप्रयोजक, क्लिष्ट, गूढ-गूढार्थ, ग्राम्य, अन्यार्थ, अप्रतीतिक, अविसृष्ट विधेयांश, विरुद्धमतिकृत, अश्लील (जुगुप्सा, व्रीडा, अमंगल- युक्त), परुष-श्रुतिकटु. २ दोषारोप; बोल; ठपका; आळ. (क्रि॰ ठेवणें; घालणें; लावणें; आणणें; येणें; लागणें). ३ शब्दामुळें, नांवामुळें लागलेला बट्टा; कलंक. उदा॰ 'प्रतिव्रतेस व्यभिचारिणी म्हटली शब्ददोष तर येतो'. ॰ध्वनि-पु. आवाज; स्वर; बोलणें. 'तिचा हा शब्दध्वनि । म्यांही श्रवणीं ऐकिला ।' [सं.] ॰परीक्षा-स्त्री. (वैद्यक) शब्दाच्या स्पष्टास्पष्टतेवरून किंवा जड हलकेपणावरून व्याधिनिदान करणें. [सं.] ॰पांडित्य-न. १ वक्तृत्व; भाषापांडित्य. २ कृती न करतां उगीच कोरडें व डौलाचें वाक्पाटव करणें; वृथा बडबड; प्रौढी. [सं.] ॰पारुष्य-न. कठोर भाषण; कटु भाषण. [सं.] ॰पाल्हाळ-पु. शब्दावडंबर; शब्दभारूड. शब्दजाल पहा. (क्रि॰ लावणें; मांडणें; करणें). ॰प्रमाण-न. शब्दांनीं दिल्ला पुरावा; साक्ष (तोंडी), [सं.] ॰प्रहार-पु. वाक्ताडन; मनाला लागतील, दुःख देतील असे शब्द बोलणें; रागें भरणें. [सं.] ॰बोध-न. शब्दज्ञान. शब्दबोधें सदोदित ।' -एभा २.१६७. ॰ब्रह्म-न. वेद. 'हें शब्दब्रह्म अशेष ।' -ज्ञा १.३; एभा ११.४९८. [सं.] ॰भेद-पु. १ शाब्दिक फरक. २ प्रतिशब्द; दुसरे शब्द. [सं.] ॰भेदी-वेधी-वि. १ आवाजावरून बाण मारण्यांत पटाईत, निष्णात, तरबेज. २ वस्तूचा नुसता नाद ऐकून त्यावर बिनचूक जाणारा, वेध करणारा (अस्त्र, शक्ति, मंतरलेला बाण इ॰). ३ (ल.) थोडक्या शब्दांवरून एखाद्याचें अंतरंग, मतलब, बेत जाणणारा; चांगला तर्कबाज. ४ दशरथ, अर्जुन यांचें विशेषण, अभिधान. [सं.] ५ मंत्रानें दुस- ऱ्याचा नाश करणारा; केवळ मंत्रोच्चारामुळें शत्रूचा नाश करणारा. ॰माधुर्य-न. शब्दांतील गोडी; मधुर भाषण. [सं.] ॰योगी- वि. (व्या.) व्याकरणांत नामें आणि नामाप्रमाणें योजलेले इतर शब्द यांना जोडून येणारें (अव्यय). उदा॰ वरे, खालीं, पुढें, मागें इ॰. हीं ज्यांना जोडलीं जातात त्यांचे सामान्यरूप होतें. ॰योजनास्त्री. १ शब्दांची निवड, योग, जुळणी. २ शब्द- रचना; वाक्यरचना. [सं.] ॰योनि-स्त्री धातु; शब्दाचें मूळ. [सं.] ॰रचना-स्त्री. शब्दांची रचना, मांडणी; वाक्यरचना; शब्दयोजना. [सं.] ॰राशि-पु. वेद. -मनको. ॰लालित्य-न. शब्दसौंर्य; शब्दांची मनोवेधक योजना. लालित्य पहा. [सं.] ॰वाहक यंत्र-न. विजेच्या सहाय्यानें दूर अंतरावरून बोल ण्याचें यंत्र. (इं.) टेलिफोन. 'सौ. महाराणीसाहेबास वारा घाल- ण्यास एक स्त्री कामगार पाठविण्यास शब्दवाहकद्वारें...हुकूम द्यावा' -ऐरापुप्र ४.२२४. ॰विचार-पु. १ शब्दसाधनविचार; प्रत्यय प्रकरण. (इं.) इटिमॉलॉजी. २ (व्या.) वाक्यांतील निरनिराळ्या शब्दांचा परस्परांशीं असणाऱ्या संबंधाचा विचार. ॰विता- पु. परमात्मा. -मनको. ॰वेध-पु. १ वेदांतील गूढ स्थळें; शब्दांचें कूट; शब्दांचें जाळें; आडंबर. 'कंठीं शब्दवेधांचें साखळें.' -शिशु १११. २ आवाजास अनुसरून बाण, गोळी वगैरे मारणें. ॰वेधी-वि. शब्दभेदी पहा. ॰वैपरीत्य-न. (बोलणाराच्या हेतूशीं) विरुद्ध, विपरीत शब्दयोजना; भलतीच शब्दयोजना; चुकीची पदयोजना. 'कुंभकर्ण बोलला निद्रापद, कुंभकर्णाच्या मनांत होतें इंद्रपद, तस्मात्-शब्दवैपरीत्य झालें.' [सं.] ॰शक्ति-स्त्री. १ शब्दाचा जोर; शब्दाचा वास्तविक, अगदीं बरो- बर असा अर्थ. शब्दाचा यौगिक अर्थ. २ (साहित्य) अभिधा, वझणा, व्यंजन इ॰ शब्दार्थ बोधकवृत्ति. [सं.] ॰शक्तिगम्य-वि. शब्दशः; मूळ अर्थाप्रमाणें. ॰शासन-न, शब्दांचा अर्थ, त्यांची योजना वगैरे संबंधी; व्याकरणशास्त्र, शब्दविचार, इ॰ नियम. [सं.] ॰शास्त्र-न. १ शब्दविज्ञान; शब्दांचें संपूर्ण विवरण कर- णारें शास्त्र; व्युत्पत्तिशास्त्र. २ व्याकरणशास्त्र. [सं.] ॰शुद्धि- स्त्री. १ व्याकरणनियमाप्रमाणें निर्दोष अशी शब्दयोजना; अचूक मांडणी. २ शब्दांतील दोष काढून टाकणें; शब्दांची तपासणी; दुरस्ती. ३ परकीय शब्द न वापरणें; भाषाशुद्धि. ॰शूर-पु. केवळ बोलण्यांत शूर, पटाईत. -धनुर्भंग पृ. ७३. ॰श्री-स्त्री. शब्दांची शोभा. 'एथूनि शब्दश्री सच्छास्त्रिक ।' -ज्ञा १.३४. ॰संग्रह-पु. शब्दसमूह; शब्दसमुच्चय; शब्दकोश-ष. [सं.] ॰संचय-पु. शब्दांचा सांठा, समूह; शब्दांची समृद्धि, वैपुल्य. ॰संदर्भ-पु. वाक्य रचनेंतील शब्दांचा एकमेकांशीं असलेला संबंध-अन्वय. [सं.] ॰सादृश्य-न. (अर्थानें अगदीं निराळे असणाऱ्या) शब्दांतील साम्य, सारखेपणा [सं.] ॰साध- निका-स्त्री. १ शब्दविचार; शब्दांची बनावट; व्युप्तत्ति. २ शब्दांची फोड, उकल; व्याकरण चालविणें. [सं.] ॰साधित- न. शब्दापासून, नामापासून साधलेला शब्द. -वि. (व्या.) नामापासून बनलेलें. याच्याउलट धातुसाधित. [सं.] ॰साम्य- न. शब्दांचा सारखेपणा; सादृश्य. [सं.] ॰सूची-स्त्री. शब्दांची सूची. याच्या उलट पदसूची वगैरे. [सं.] ॰सृष्टि-स्त्री. १ शब्दांचा संग्रह; शब्दांची रचना. २ (ल.) काव्य; ग्रंथ; प्रबंध. 'आतां वंदूं कवेश्वर । शब्दसृष्टीचे ईश्वर ।' -दा १.७. [सं.] ॰स्फुरण-न. (शब्दांचें फुरफुरणें, थरथरणें) ज्यांत जोडाक्षरें व ट वर्गांतींल अक्षरें एकसारखीं पुष्कळ येतात अशा कठोर, कर्ण- कटु प्रबंधाबद्दल म्हणतात [सं.] ॰स्वारस्य-न. शब्दांतील गोडी, लज्जत; शब्दामाधुर्य. [सं.] शब्दविणें-क्रि. बोलविणें. 'मीचि शब्दातें शब्दातें शब्दबिता ।' -एभा १३.३४४. शब्दाचा मार-पु. वाक्ताडन; शब्दप्रहार; कानउघाडणी; निर्भर्त्सना. 'वेड्यास टोणप्याचा मार, शहाण्यास शब्दाचा.' शब्दांची कसरत-स्त्री शंब्दांची कसरतीप्रमाणें वळेनें केलेली अस्वाभा- विक रचना. 'भाषा आणि तपश्चर्या, वचनाचें कष्ट, शब्दांची कसरत, या गोष्टींची जरूर असते.' -नाकु ३.४. शब्दाडंबर- न. शब्दजाल; केवळ शब्दांचें वैपुल्य; अर्थहीन शब्दरचना; पोकळ वक्तृत्व. [सं. शब्द + आडंबर] शब्दातीत-वि. शब्दांच्या किंवा बोलण्याच्या शक्तीबाहेरचें; वर्णन करितां येत नाहीं असें; शब्दांनीं वर्णन करण्यास अशक्य; अनिर्वाच्य. [सं. शब्द + अतीत] शब्दानुप्रास-पु. (साहित्य) शब्दाचा अनुप्रास; एक यमक- रचना; ज्यांत त्याच त्या शब्दाची पुनःपुनः आवृ्त्ति होतें असा अलंकार. याच्या उलट वर्णानुप्रास. [शब्द अनुप्रास] शब्दानु- शासन-न. शब्दशासन; शब्दांच्या लिंग, रूपांबद्दल, अर्थाबद्दल वगैरे नियम. [सं.] शब्दानशब्द-क्रिवि. प्रत्येक शब्द. 'या एकंदर बोलण्यांतील शब्दान्शब्द शांतपणानें शिष्याच्या मुखांतून निघत होता.' -उषःकाल. [शब्द + न् = आणि + शब्द] शब्दा- मृत-न. (काव्य) शब्दमाधुर्य; वाड्माधुर्य; अमृताप्रमाणें गोड शब्द. [शब्द + अमृत] शब्दार्थ-पु. १ शब्दाचा अर्थ, आशय २ शब्दाचा मूळ, शब्दाशः अर्थ; यौगिकार्थ. [सं.] शब्दालंकार- पु. (साहित्य) शब्दाच्या रूपावरून साधलेला अलंकार; काव्यां- तील अनुप्रास; यमकादि अलंकार; याच्या उलट अर्थांलंकार. या अलंकारांचें पुढील पांच प्रकार आहेत:-वक्रोक्ति, अनुप्रास, यमक, श्लेष, पुनरुक्तवदाभास. ह्यांत पुन्हां प्रत्येकाचे जे निरनिराळे भेद आहेत ते सर्व प्रतापरुद्रग्रंथांत व काव्यप्रकाशांत सांगितले आहेत. [सं.] शब्दाशब्द-पु. १ चांगले-वाईट शब्द; अविचाराचे व उद्धटपणाचें भाषण; वेळ प्रसंग न पहातां असभ्यपणाचें बोलणें. 'चौघांमध्यें शब्दाशब्द बोलूं नये, चांगले बोलावें' २ अप्रत्यक्ष व आक्षेप न घेतां बालणें; चांगलें किंवा वाईट (यांपैकीं कोणतेंच नाहीं असें) भाषण. 'मी त्याला शब्दाशब्द कांहीं बोललों नाहीं.' [सं. शब्द + अशब्द] शब्दित-न. भाषण; आवाज; बोलण्याचा स्वर; ध्वनि. -वि. १ उच्चारलेलें; बोललेलें; वदलेलें; घोषित केलेलें. २ शब्दानें युक्त केला जो वाद्यादि तो; वाजविलेलें; निना- दित. [सं.] शाब्द, शाब्दिक-वि. शब्दासंबंधीं, वाग्युक्त; वाणीयुक्त; वाचिक. 'तरी तप जें कां सम्यक् । तेंही त्रिविध आइक । शारीर मानसिक । शाब्द गा ।' -ज्ञा १७.२००. २ स्वरासंबंधीं; आवाजासंबंधीं. ३ (व्या.) नामासंबंधीं; नामवा- चक (प्रत्यय वगैरे). ४ अनुभवाशिवाय बडबड करणारे; केवळ शब्द जाणणारे; शब्दज्ञानी. 'वृथा शाब्दिकांचें शब्दज्ञान । तेंहीं व्याख्यान दाविलें ।' -एभा ११.६४८. -पु. शब्दांचे अर्थ जाणण्यांत व रूपें समजण्यांत, करण्यांत निष्णात, हुषार; तरबेज; वैयाकरण. [सं.] शाब्दबोध-पु. शाब्दिक बोध; अक्षरशः होणारा अर्थ; यौगिक अर्थ. [सं.] शाब्दिकसृष्टि-स्त्री. अलंकारिक, कुशल शब्दरचना; काव्यप्रबंधांतील शब्दरचनाचातुर्य. [सं.] शाब्दी-स्त्री. शब्दप्रवृत्ति. 'तेवींचि हा अनादि । ऐसी आथी शाब्दी ।' -ज्ञा १५.२३०.
शक्ति
स्त्री. १ सामर्थ्य; योग्यता; लायकी. २ बळ; ताकद; प्रभाव. समासांत उपयोग. उदा॰ शरीरशक्ति; इंद्रियशक्ति; नेत्रशक्ति; कर्णशक्ति; वायुशक्ति; ज्ञानशक्ति; योगशक्ति; काल- शक्ति. 'नाम शक्तिबळें जळीं पाषाण तरले ।'. २ अर्थकक्षा; मर्यादा; सीमा; व्याप्ति (शब्द वगैरेची). ३ स्त्रीदेवता; पार्वती, लक्ष्मी, इ॰ देवी; ईश्वराची स्त्रीरूप सामर्थ्यप्रतिमा. 'तुका हरि- भक्ती करी । शक्ति पाणी वाहे घरीं ।' -तुगा ४११. 'गणेश शारदा नाना शक्ती' -दा ४.६.१०. ४ माया; परमेश्वरशक्ति. 'जे महंताची शांती ।...जे ईश्वराची शक्ति ।'. ५ प्रेरणा; (यंत्रास चलन देणारा कर्ता). ६ एक आयुधविशेष; अस्त्र. उदा॰ वासवशक्ति. 'चित्रनृपें प्रतिविंध्यप्राण हरायासि सोडिली शक्ति. ।' -मोकर्ण ९.२४. ७ कुंडलिनी. 'तैसी वेढियातें सोडिती । कवितकें आंग मोडिती । कंदावरी शक्ति । उठली दिसे ।' -ज्ञा ६.२२७. ८ स्त्रीपुरूष मिळून जें मिथुन त्यांतील जी स्त्री ती. ९ शिवलिंगाला प्रतिरूप म्हणून असलेली योनी; प्रकृति. तंत्र- मताची देवता. हिची उपासना करणारे ते शाक्त. १० अमुक शब्द उच्चारिला असतां अमुक अर्थाचाच बोध व्हावा असा शब्दाच्या ठिकाणीं असलेला संकेत. ११ भाला. [सं. शक्- सामर्थ्य असणें] ॰ग्रह-पु. १ शब्दाचें विशेषअर्थीं ग्रहण; अर्थ- ज्ञान. २ शब्द, लक्षण, इ॰ वरून होणारा बोध, मत; एखाद्याच्या संबंधानें झालेला ग्रह. 'त्याच्या वेषावरून हा साधु असा मला शक्तिग्रह झाला होता.' ३ अस्तित्वांत असलेल्या वस्तूंचें अस्ति- रूपी ज्ञान, ग्रहण, बोध; वास्तविकज्ञान; यथार्थज्ञान. [सं.] ॰ग्राहक-वि. शब्दाच्या अर्थाचा निर्णय करणारा; निर्णायक. उदा॰ व्याकरण, कोश, रूढी, पद्धति. [सं.] ॰चक्र-न. माया- रूप विश्व; मायाचक्र. 'जें शक्तिचक्राची वेगळ ।' 'शक्तिचक्र जें अशेष । तें उपसंहरे निःशेष । मूळमायेसिसें ।' [सं.] ॰त्रय-न. १ युद्धाच्या तीन शक्ति; प्रभुशक्ति, मंत्रशक्ति, उत्साहशक्ति. २ घटना, रचना, यासंबंधी तीन शक्ति; ज्ञानशक्ति, क्रियाशक्ति, द्रव्य- शक्ति. या तिन्हीस क्रमानें सत्वगुण, रजोगुण, तमोगुण यांशीं संबद्ध अशीं सात्विकशक्ति, राजशक्ति, तामसशक्ति अशीं नावें आहेत. [सं.] शक्तित:-क्रिवि. शक्तीप्रमाणें. शक्तिनसार-रूप-वि. शक्तीप्रमाणें; सामर्थ्याप्रमाणें; योग्यतेप्रमाणें. 'शक्तिनसार दे सर्वदा । तो सत्वगुण ।' -दा २.७.५५. [सं. शक्ति + अनुसार, शक्ति + अनुरूप] ॰नित्यत्व-न. (शाप.) शक्ति केव्हांहि नष्ट होत नाहीं, तितें फक्त रूपांतर होंतें हा सिद्धान्त. [इं.] कॉन्झर्व्हेशन ऑ/?/फ एनर्जी. [सं.] ॰पात-पु. १ मंत्राचा उपयोग करण्याचें गुरूनें दिलेलें सामर्थ्य; शिष्यास गुरूनें दिलेलें स्वतःच्या ठिकाणचें मंत्रबल. २ शक्तिक्षय; बलहानि; दुर्बलता; दुबळेपणा. ॰पूजा-स्त्री. शक्तीची, देवीची, दुर्गेंची पूजा (शाक्तांची). ॰मान्-मंत-वंत-वि. १ सामर्थ्यवान; कार्यक्षम; लायक; योग्य. २ बलवान; जोरदार; प्रबळ. [सं.] ॰मापक-न. (शाप.) यंत्राचें सामर्थ्य, गति वगैरे मोजण्याचे यंत्र. (इं.) डायनामोमीटर. ॰वैकल्य-न. (कोणत्याहि प्रकारचें) सामर्थ्यांतील व्यंग; बलांतील उणेपणा, कमताई; कमजोरपणा. ॰संग्राहक-न. एंजिनाची गति स्थिर रहाण्याकरितां, योजिलेलें एक महत्त्वाचें चक्र; यामुळें दट्ट्याची गति स्थिर राहून एंजिन सारख्याच वेगानें फिरतें. (इं.) फ्लाय- व्हील. [सं.] ॰सुत-पु. १ कार्तिकस्वामी. २ पराशर ऋषि ॰हीन-पु. दुर्बळ. ॰क्षीणवि. शक्तिपात झालेला; अतिशय. अशक्त शालेला; आजारी, उपाशी, वृद्ध, (मनुष्य); सामर्थ्यहीन; बळहीन; सत्ताहीन. शक्त्त्युपासना-स्त्री. शक्तिदेवतेची सेवा, पूजा; शक्तिपूजा. [सं.] शाक्त-पु. शक्तीचे उपासक; देवीचा उपासक; शक्तीदेवीचा भक्त. 'शक्तितें शाक्तहि आराधिती ।' -घनःश्याम भूपाळी. -वि. शक्तिसंबंधाची (पूजा, अर्चा, विधी इ॰). [सं.] ॰पंथ-मार्ग-पु. शक्त्युपासना; ज्यांत देवतोद्देशानें मद्य प्राशनादि करावें असें सांगितलें आहे त्या तंत्रोक्त मार्गाचें नांव. वाममार्ग पहा. [सं.]
शम
पु. १ शांतता; शांति; स्थिरता; स्तब्धता. २ (राग आणि विकार यासंबंधी) इंद्रियदमन; मनोनिग्रह (वेदांती लोकां- वर शम, दम, तप, तितिक्षा, श्रद्धा, आणि समाधान अशी एकं- दर सहा कर्तव्यें लादलीं आहेत). 'ऐसा बुद्धीचा उपरमु । तया नाम म्हणिपे शमु ।' -ज्ञा १८.८३४. शांति; अक्षुब्धता; अक्षोभ. ३ आत्यंतिक सुख; मोक्ष; निर्वाण. ४ औदासीन्य; संन्यस्तवृत्ति; निवृत्ति. ५ योगसिद्धि. 'कर्म हेंच शमाचें कारण होतें.' -गीर ६९६. [सं. शम् = मनोनिग्रह करणें] ॰दम- दमादि-न. वेदांती लोकांची शम, दम आदिकरून कर्तव्य; शम पहा. शमदमादि साधनसमुच्चय. ॰विषम-वि. (पाऊस, भाव, गोग वगैरेसंबंधी लोकरूढ) १ हलके व जाड; कमजास्त; कमी- अधिक; थोडेंफार; मागेंपुढें होणारें. २ थोड्याबहुत फरकाचें; थोडीफार चूक असलेले (हिशेब, विधान, रीत). ३ किंचित् मतभेद असलेलें; थोडेफार गैरसमज झालेलें. शमणें-अक्रि. १ शांत होणें; स्थिर, स्तब्ध, निश्चल होणें; संतुष्ट होणें; समाधान पावणें. 'अत्युग्र भीम काळचि, हें वचन यथार्थ मान रे ! शम रे !' ।' -मोभाष्म १२.२७. ३ ओसरणें; कमी होणें. ४ मरण पावणें; मंरणें. 'जो अधिप कोसलांचा भासत नव्हता रणीं शमा- वासा ।' -मोकर्ण ३.२७. ४ दमणें; थकणें. 'शमले मद्बंधु बहु...' -मोभीष्म १०.१३. [सं. शम्] शमविणें-क्रि. १ शांत करणें; स्थिर करणें; दमन करणें. २ मारणें; नाहीसें करणें. [शम प्रयोजक] शमन-न. १ शांति; शांतता; स्थस्थता; स्तब्धता. २ (वैद्यक) शांतवन; उपशमन; उपशम; तीव्रता कमी करणें; थंडावा आणणें. 'सप्तोपचार' पहा. ३ उपशमक; उपशांतक; उपशमन करणारें औषध; तीव्रता कमी करणारें, वेदना हलक्या करणारें औषध; दुःखहारक औषध. उदा॰ 'पित्याचें शमन सुंठसाखर'. ४ शांत होणें; स्तब्ध होंणे; उपशम होणें; स्थिर होंणे; निवारण. ५ यम. [सं.] शमनीय-वि. शांत होणारें; शांत करण्यासारखें. [सं.] शमित-वि. १ शमलेलें; शांत झालेलें. २ कमी झालेलें; दबलेलें. ३ उपशम पावलेलें; संतुष्ट. [सं.] शमी-वि. सौम्य; शांत; स्तब्ध, स्थिर; सौम्य स्वभावाचा. 'नमिला शमि-लास्य-प्रद शांति-जल-धि एकनाथ तो भावें ।' -मोसन्मणिमाला (नवनीत पृ. ३४७.) [सं.]
क़सम अुतारना
हिंदी अर्थ : किसी कामको नाम मात्रके लिये करना मराठी अर्थ : नांवाला करणें.
क़सम खानेको
हिंदी अर्थ : नाम मात्रको मराठी अर्थ : नांवापुरतें.
संकेत
पु. १ व्यवस्था; निश्चिति; स्थापना; नियतता. २ सहमत; योजना; करार; कबुली; वायदा; बोली; ठराव. ३ पूर्व- निश्चिति; तरतूद; योजना. ४ खूण; इशारा; चिन्ह; अर्थगर्भ हाल- चाल; सूचक अंगविक्षेप, द्दष्टिक्षेप बगैरे. 'सुमित्रा सुतालागिं संकेत केला ।' -राक १.१७.७४. ५ प्रेमीजनांचा बेत; निश्चित स्थान; योजना. ' तो करी संकेत गोपीसवें ।' -तुगा ९४. ६ शर्त; अट; ठरविलेलें कलम, गोष्ट. ७ शब्दाची विशिष्ट अर्थज्ञापक शक्ति. [सं. सम् + केत = आमंत्रण करणें] ॰कुंज-पु. प्रियजनांचें मीलन- स्थान, क्रीडास्थान. ॰शब्द-पु. (व्या.) नाम; पदार्थवाचक शब्द. ॰समीकरण-न. ज्या समीकरणांत अज्ञात अक्षराबद्दल विशिष्ट एकच किंमत घातली असतां खरें असतें असें. उदा॰ क्ष + ५ = १० म्हणजे क्ष = ५. ॰साह्यकारी-पु. दोस्त; मित्र; सोबती. ॰स्थान-न. प्रेमीजनांचें परस्पर भेटण्याचें योजलेलें स्थल. संकेतार्थ-पु. (व्या.) एका क्रियेची सिद्धि दुसर्या क्रियेवर अवलंबून आहे असा बोध करणारें क्रियापदाचें रूप. उदा॰ जर तो आला तर मी जाईन.' -मभाव्या १६१. ॰संके तित-धावि. निश्चित; योजिलेलें; ठरविलेलें; नियोजित. संकेती- वि. ठरल्याप्रमाणें वागणारा; नियमानें चालणारा.
शंकरपट
पु. (व. नाम) संक्रांत वगैरे प्रसंगीं होणारी बैल- गाड्यांची शर्यत; बैलांची शर्यत; गाडी-घोड्यांची धांवण्याची शर्यत. 'आजच्या दिवशीं आमच्या गांवीं शंकरपट असतो.' [सं. संगरपट ?]
सरता, सरिसा
वि. १ सारखा; समान; तुल्य. 'देखे संतासंती कर्मी । हें जें सरिसेपण मनोधर्मी ।' -माज्ञा २.२७२. 'नावांसरशी करणी असावी.' -शअ. १ सन्निध; जवळ; समीप. 'घरासरशीं घरें लागलेलीं आहेत.' २ (वेग, सपाटा, आवेश, झटक) यांच्यासह; बरोबर. 'हांकेसरशी घाली उडी । स्तंभामाजी कडाडी ।' 'वार्यासरसा, हातासरसा, झपाट्यासरसा, तडाक्यासरसा, उठण्यासरसा, बोलण्यासरसा.' -क्रिवि. १ बरोबर; सह; संन्निधभागीं; जवळपास. 'सख्या दोन्ही भागीं बसति सरसा सावधपणें ।' -सारुह ६.८९. 'तुका म्हणे सरशी असों येणें बोधें ।' -तुगा १९३. २ बाजूला; एकीकडे; मार्गातून दूर. (क्रि॰ काढणें; करणें; घालणें; निघणें; होणें; जाणें). ३ तात्काल; लागलीच; झपाट्यानें. 'सत्य बोले देव भक्तिभाव जैसा । अनुभव सरसा आणूनियां ।' -तुगा १८. 'मुलें मिळालीं सरसीं । क्रीडताती हरिसवें ।' -ह ७.११९. 'नाम जपे सरसे ।' -देप ६७. ४ नीट; व्यवस्थित; सर- सावून. 'पान खाऊन रंगेल अधर । पदर घे सरसा लाजून जरा ।' -पला ३६. ५ पुढें; अग्रभागीं. 'या हो या झगडा- वयास सरसे व्हा मेळवा वाहवा ।' -केक ५३. [सं. सदृश] सरसून-शअ. बरोबर; जवळून; सह; लगटून; लागून. (क्रि॰ जाणें; चालणें; बसणें).
सत्र
न. १ अनेक दिवस चालणारा यज्ञ. २ नामसंकीर्तन; भजन; नाम सप्ताह; ईश्वराचें गुणसंकीर्तन वगैरे. ३ अन्नछत्र; ब्राह्मण, वाटसरू वगैरेस अन्नदान व असें अन्नदान करण्याची जागा. 'जैसें सत्रीं अन्न झालें । कीं सामान्या वीक आलें ।' -ज्ञा. १३. ७००. ४ दानधर्म; भिक्षा वाढणें वगैरे. ५ (ल.) यज्ञ. या अर्था- वरून मारामारी, कापाकापी, कत्तल. [सं. सत्र = विस्तार करणें] ॰प-पु. यज्ञकर्ता. 'श्रीरामासि विलोकितां बहुसुखी होती मुनी- सत्रप ।' -मोकृष्ण १४.७८. ॰शालास्त्री. अन्नछत्र.
सुलेमान
(पु.) हिंदी अर्थ : राजा और पहाडका नाम. मराठी अर्थ : राजाचें व पर्वताचें नांव.
टाळी
पु १ एका तळहातावर दुसरा तळहात मारणें; तसें मारल्यानें होणारा आवाज. (क्रि॰ वाजविणें; वाजणें; पिटणें; मारणें). २ (गायन) गातांना हातानें ताल धरणें. (पिटणें). 'मुखीं नाम हातीं टाळी ।' -दा २.७.४१. ३ हात वाजविणें (फजीती, आनंद दर्शविण्यासाठीं, संकेत करतांना); (क्रि॰ पिटणें; वाजविणें) ४ हातावर हात मारणें; वचन देणें (सौदा ठरवितांना). (क्रि॰ मारणें). ५ उपेक्षा; रेंगाळणें. (क्रि॰ लावणें; देणें). ६ लय; ध्यान; समाधि. ब्रह्मटाळी पहा. (क्रि॰ लावणें). 'पंचविषय एकवटुनि । लाविली टाळी ।' -ख्रिपु २.३१.४१. ७ कानठाळी; दडा. 'वार्यानें जाऊं पाहे अवनी । टाळी कानीं बैसली ।' -एरुस्व १२.१०५. (वाप्र.) [सं. ताल] टाळीस टाळी देणें-वरि- ष्टाच्या म्हणण्यास मान तुकविणें; हांजी हांजी करणें. ॰वाजणें- लग्न लागणें. ॰देणें-१ कोणत्याहि खेळास प्रारंभ करणें. २ कोण- तीहि दुसर्यानें सांगितलेली गोष्ट पटली असें दाखविणें. म्ह॰ १ एका हातानें टाळी वाजत नाहीं. २ ज्याची पोळी त्याची वाजवावी टाळी (अन्नदात्याची स्तुती करावी लागते).
तारतम्य
न. १ (दोन वस्तू, व्यक्ति इ॰कांतील) श्रेष्ठ- कनिष्ठभाव; न्यूनाधिक्य; बरेवाईटपणा; उच्चनीचपणा. २ (दोन वस्तु व्यक्ति इ॰कांतील गुण, उत्कृष्टता, दर्जा इ॰ संबंधीं) अंतर; तफावत; विषमता; असमानता; भेद. 'पोपट बोलतो आणि मनुष्य बोलतो परंतु त्यांत तारतम्य आहे.' ३ गुणभेद जाणून उप चारादिकांत बुद्धीचें कौशल्य; विवेक; विवेचक शक्ति; सारासार विचार; धोरण. (क्रि॰ पाहणें; राखणें; ठेवणें). 'कोणास किती मात्रा द्यावी हें तारतम्य या वैद्याच्या अंगीं आहे.' ४ (एखाद्यास) सामान्य मनुष्यापेक्षां अधिक समजून, असाधारण दर्जा ओळखून केलेला आदरसत्कार, शिष्टाचार, आगतस्वागत. [सं. तर आणि तम प्रत्ययांपासून झालेलें भाववाचक नाम] ॰भाव-पु. (प्र.) तार तम्य; तारतम्य अर्थ १ व २ पहा.
टिळा
पु. १. कपाळावर लावलेला गंधाचा, कुंकवाचा वाटोळा ठिपका; पोट, हात इ.वरील गंधाचे ठिपके. २. कपाळावर गंध लावण्याचा नाम, यंत्र, छाप. [सं. तिलक] (वा.) टिळा करणे – राज्यावर बसविणे : ‘कीं तुम्हांसी टिळा करूं सुदिनीं ।’ – कक ३·१७·२०. टिळाटोपी करणे – पवित्रपणाचा बाह्य देखावा करणे; नटूनथटून सुशोभित होणे. टिळा वेशीस लावणे – गावातील सर्वांना जेवावयास बोलाविणे. टिळा लावणे – नियोजित वधूला कुंकू लावणे; विवाह निश्चित करणे.
टिळा
पु. १ टिकला अर्थ १ पहा; पोट, हात इ॰ वरील गंधाचे ठिपके. २ कपाळावर गंध लावण्याचा नाम, यंत्र, छाप. [सं. तिलक] (वाप्र.) ॰करणे-राज्यावर बसविणें. 'कीं तुम्हांसी टिळा करूं सुदिनीं ।' -कथा ३.१७.२०. ॰टोपी करणें-पवित्रपणाचा बाह्य देखावा करणें; नटून थटून सुशोभित होणें. ॰वेशीस लावणें- गांवांतील सर्व जातीस जेवावयास बोलावणें. सामाशब्द-॰विडा- पु. पाटलाचा एक हक्क. टिळेडोळे-पुअव. १ कणकेच्या किंवा मातीच्या मुखवटयावर गंध व डोळे काढणें. २ नट्टेपट्टे; थाटमाट; नखरेबाजी. टिळेपट्टे, टिळेमिळे-पुअव. सर्व प्रकारच्या नखर्यांना व्यापक शब्द. (क्रि॰ करणें; होणें). म्ह॰ टिळेपट्टे नायकाचे घरांत हाल बायकांचे. टिळेफाटे-पुअव. (उपहासानें). बायकांच्या कपाळावरील लांबट व भलें मोठें कुंकू. टिळयाचा धनी-पु. मुकदम; टिक्याचा धनी पहा.
त्रियंच
स्त्री. घारी; एक प्रकारची पुरी : ‘त्रियंच नाम घारी बरवंट । ब्रह्मपुरीसीं ।’ – ऋ ८२.
त्रियंच
स्त्री. घारी; एक प्रकारची पुरी. 'त्रियंच नाम घारी बरवंट । ब्रह्मपुरीसीं ।' -ऋ ८२.
थैक, थैथै
उद्गा. गुरें हांकण्याचा शब्द. 'गाय निघाली खाऊं साळी । थै, थै म्हणतां ओढाळी ।' -कथा २.१०.११३. [ध्व.] म्ह॰ थैक म्हणतां ब्रह्महत्त्या = क्षुल्लक गोष्टीचा भयंकर परि- णाम होणें.
ठसवणे
क्रि. प्रकट होणे : ‘निर्गुण गुणासि आले । परब्रह्म ठसवले ।’ - नाम १७१०.
उकळी
स्त्री. १. उकळण्याची क्रिया; कढ; आधण. (क्रि. फुटणे, येणे.). २. उमाळा; उत्कट इच्छा; उत्कंठा; आच : ‘ब्रह्मा उपजला नाभिकमळीं । त्याच्या मनीं सृष्टीची उकळी ।’ − यथादी १०·१५७. ३. प्रेम, दुःख, राग इ. मनोविकारांचा उद्रेक किंवा भरते येणे; उमाळा (क्रि. फुटणे, येणे.) : ‘रामकृष्णरंगीं रसना रंगली । अमृत उकळीं नाम तुझें ।’ −तुगा २५०२. ४. वाहणारे पाणी अडले असता होणारी अवस्था; लाटा; पाण्याची खळबळ : ‘वळणें वांकणे भोंवरे । उकळ्या तरंग झरे ।’ − दास ११·७·३. [सं. उत् + कल्] (वा.) उकळी फुटणे– १. आधण येणे. २. अनावर हसू येणे.
उकळी
स्त्री. १ उकळण्याची क्रिया; कढ; अधण. (क्रि॰ फुटणें; येणें). २ उमाळा; उत्कट इच्छा; उत्कंठा; आंच. 'ब्रह्मा उपजला नाभिकमळीं । त्याच्या मनीं सृष्टीची उकळी । म्हणोनि प्रथम पुत्र मानस उपजले' -यथादी १०.१५७. ३ प्रेम, दुःख, राग इत्यादि मनोविकारांचा उद्रेक किंवा भरतें येणें; उमाळा. (क्रि॰ फुटणें; येणें). 'रामकृष्णरंगीं रसना रंगली । अमृतउकळी नाम तुझें ।' -तुगा २५०२. ४ वाहणारें पाणी अडलें असतां होणारी अवस्था; लाटा; पाण्याची खळबळ. 'वळणें वांकणें भोंवरे । उकळ्या तरंग झरे ।' -दा ११.७.३. [सं. उत् + कल्; उत्कलिका]
उंचावणे
अक्रि. १. उंच होणे; वाढणे : ‘एथ उंचावे तेणें नाम । नैमित्तिक होय ॥’ − ज्ञा १८·११४. २. वक्षःस्थल उन्नत होणे. ३. उंच जाणे, उडणे; भरारी मारणे. ४. (ल.) सुस्थिती प्राप्त होणे; उत्कर्ष होणे. ५. फुगून जाणे : ‘तेवी प्रिय वस्तु पाये । आणि सुखें जो उंचावे ।’ − ज्ञा १३·८०६.
उंचावणें
अक्रि. १ उंच होणें; वाढणें. 'एथ उंचावे तेंणे नाम । नौमित्तिक होय । ' -ज्ञा १८.११४. २ वक्षस्थल उन्नत होणें. ३ उंच जाणें, उडणें; भरारी मारणें. ४ (ल.) सुस्थिति प्राप्त होणें; उत्कर्ष होणें. -सक्रि. १ चढविणें; वर उचलणें; उठविणें; उंची वाढवणें; वर करणें. 'शेष धावला तत्क्षणा । उंचावूनि फणा ।' -कृष्णाचा पाळणा १०. २ मोठेपणा आणणें. 'आम्हां मानवांतें उंचावीती मातें ।' -टिळक कविता १३५.
उंडी
स्त्री. उंडा याचें लघुत्ववाचक. उंडा पहा. १ गोळा; घांस. 'जैसी घापे लोणियाची उंडी ।' -ज्ञा ११ ४५७. २ भाताची मूद; पिंड; घास. 'ना तरी भस्माग्निच्या तोंडी । न पुरे भाताची उंडी ।' -ज्ञाप्र ७०३. ३ बळी; नैवेद्य. 'नवसियां देती उंडी । बाळकांची ।' -ज्ञा १७.९७. ४ खीर करावयासाठीं तांदूळ इत्या- दिकांच्या पिठाच्या गोळ्या करतात त्या प्रत्येक. ५ आमिष; पिठाची गोळी. 'उंडीस देखोनि मासा भुलला । गिळितां कंठी गळ टोचला ।' -भवि २.१६०. [प्रा. उंडी = पिंड; का. उंडे = गोळा; ते. उंड; ता. उरं/?/ड्र उर/?/न्ड्रै; उंडा याचें अल्पत्वदर्शक नाम] उंडी, उंड्या उकळणें-भिक्षा मागणें; आगंतुकी करणें (दुसर्यावर अव- लंबून असणार्याबद्दल वापरतात). ॰बकाल वि. (राजा.) भोजन- भाऊ. [उंडी + बकलणें = खाणें]
उपचार
पु. १ श्रम; उपाय; प्रयत्न. 'मग नानाहेतुप्रकारें । यथोचितें उपचारें ।' -ज्ञा ४.७१. २ पूजेंतील प्रकार. उ॰ षोड- शोपचार पहा. 'देवांगणमिरवणियां । आंगोपचार पुरवणियां ।' -ज्ञा १७.२०३. ३ चिकित्सापद्धतींतील प्रकार; सप्तोपचार पहा. ४ वैद्यकीय चिकित्सा; औषधीयोजना; इलाज; उपाय. 'तें उपचारा. वेया रसु पाहे । देतु वैद्यनाथू ।' -ऋ २२. ५ गौरव; आदरसत्कार; आतिथ्य; संभावना; सेवा. 'उपचार करोनि मग सजाला ।' -दावि ३९२. ६ रूढी; रिवाज; चाल. उ॰ लोकोपचार; शिष्टोपचार. 'मरों टेंकला विप्र पुत्रोपचारें । हरीचें वदे नाम लोकोपचारें ।' -नामसुधा ५९. ७ शब्दाचा वाच्यार्थापासून दूरान्वय; उपमा, रूपक इ॰ वाप- रणें; लाक्षणिक भाषण; अलंकारिक भाषण. ८ सामग्री; साधनें; साहित्य. 'कां वसंतीं बरवा आरामु । आरामींही प्रियसंगमु । संगमीं आगमु । उपचारांचा ।।' -ज्ञा १८.३४५. [सं. उप + चर्] ॰बोल-पु. अव. निरर्थक भाषण; औपचारिक, तोंड देखलें बोलणें; शिष्टाचार म्हणून वरवरचें, मनापासून नसलेलें भाषण. 'उपचारबोल हा कासया वृथा ।' -दावि २८६. ॰भरण-न. साधनसामग्री. 'हेचि यज्ञोपचार- भरण । अज्ञानघृत ।' -ज्ञा ९.२४०. ॰विरुध्द-क्रिवि. शिष्टाचारा- विरुध्द, रूढीविरुद्ध. -नीतिशास्त्र १४७. ॰होडें-वि. क्षणिक. -मनको
उपचार
पु. १. गौरव; आदरसत्कार; आतिथ्य; संभावना; सेवा : ‘उपचार करोनि मग राजाला ।’ – दावि ३९२. २. रुढी; रिवाज; चाल. उदा. लोकोपचार, शिष्टोपचार : ‘मरों टेंकला विप्र पुत्रोपचारें । हरीचें वदे नाम लोकोपचारें ।’ – नामसुधा ५९. [सं. उप + चर्]
उटाळणे
उक्रि. १. स्पष्ट उच्चारला जाणे; लिहिलेले अक्षर स्पष्ट उमगले जाणे. (व.) २. अर्थ, हेतू, भाव स्पष्ट होणे,भाव स्पष्टकरणे. ३. उठवणे; उत्पन्न करणे; उच्चारणे : ‘इला कसें नाम तुझे उटाळे ॥’ -सारुह १·२८. [सं. उत् + ताल्]
उटाळणें
उक्रि. १ (व.) स्पष्ट उच्चारला जाणें; लिहिलेलें अक्षर स्पष्ट उमगलें जाणें. 'श्वास लागल्यामुळें त्याचें बोलणें उटा- ळत नाहीं.' २ अर्थ, हेतु, भाव स्पष्ट होणें, करणें; ३ उठविणें; उत्पन्न करणें; उच्चारणें. 'इला कसें नाम तुझें उटाळे ।।' -सारुह १.२८. -दयाळ ९३. [सं.उत् + ताल्]
उत्तरपंथ
पु. १. संसारापासून विरक्त होऊन परलोकसाधनार्थ तीर्थयात्रा, अरण्यवास, तपश्चर्या इत्यादी करावे म्हणून अवलंब करायचा मार्ग : ‘श्रीपाद श्रीवल्लभ नाम ऐसें । झाले त्रिमूर्ति कैसे । पितयातें म्हणतसे । जाऊ उत्तरपंथासि ॥’ -गुच ५·५६. २. हिमालयात बद्रिकाश्रमाजवळ असलेले स्थान. हा मार्ग स्वर्गाकडे जातो व मानवाला तो दुर्लंघ्य आहे अशी समजूत आहे. (वा.) उत्तरपंथास लागणे - मरणोन्मुख होणे. [सं.]
वघळ
पु. १ ओघळ पहा. २ घळ; दरड. 'किनाऱ्यास मोठमोठ्या वघळी फार आहेत.' -धर्माजी १५०. वघळणी- ओघळणें धातुसाधित नाम. वघळणें-सक्रि. १ ओघळणें पहा. २ वगळणें; वलांडून जाणें. -अक्रि. १ ओघळणें पहा. २ खरडून जाणें; खरकणें (पाण्याच्या झोताखालील जमीन, माती). ३ अंगावर धांवून जाणें (रागानें अंध होऊन). (देशावर ओघळणेंचें रूप वोघळणें असें होतें. ओघळणें याच्या अर्थांखेरीज देशावरील इतर अर्थ वर दिले आहेत). ॰निघळ-ओघळ निघळ पहा.
विखरणी
स्त्री. इकडे तिकडे पसरणें इ॰. [विखरणें] विखरणें-उक्रि. १ अव्यवस्थित रीतीनें इकडेतिकडे पसरणें; उधळणें. 'दहींभात विखुरला चहुंकडे । अद्यापि शुभ्र दिसती सूक्ष्म खडे ।'. २ निष्काळजीपणानें टाकणें, ठेवणें; इकडे तिकडे लोळवणें (स्त्रीच्या डोक्यावरील केस). ३ चेंदामेंदा, तुकडे तुकडे करून फेंकून देणें. 'भीम गदा हाणुनि त्या सद्विरद क्षेम- धूर्तिला विखरा ।' -मोकर्ण ८.३०. ४ वृष्टि करणें; शिंपडणें. 'माते, ज्याचें नाम स्वरतांवरि अमृत नित्य विखरतें ।' -मोहनुमद्रामायण १६. -अक्रि. विस्कटणें (केंस, इ॰) [सं. वि + कृ-विकिर; ग्रा. विखर; हिं. विखरना; गुज, विखरवुं; पं. विख्खरना] विखरा-पु. १ विखरलेली स्थिति. २ अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू; पसारा. ३ उधळपट्टी; खर्च. 'ओटाभरणाचा गजर पुढें आहे । द्रव्याचा विखरा ।' -पला ९२. विखुरणी- स्त्री. विखरणी पहा. विखुरणें-क्रि. विखरणें पहा. १ पसरणें. 'विखुरले विकत्याचे कांटे ।' -ज्ञा ७.१७०; -अमृ २.७. २ तळमळणें. 'आम्हां नाहीं त्याचा घडला आठव । त्याचा बहुजीव विखुरला ।' -तुगा ६०६. ३ फुटणें. 'माझें करुणावचन । न ऐकती तुझे कान । ऐकोनि पाषाण । विखुरतसे ।' -गुच १.१३८. विखु(खू)री-स्त्री. प्रसार; पसारा. 'चांदाचिया दोंदावरी । होत चांडणियाची विखुरी ।' -अमृ १.५६. [विखुरणें ]
विख्यात
वि. प्रख्यात; सुप्रसिद्ध; नामांकित. 'हें गीता- नाम विख्यात । सर्व वाङ्मयाचें मथित ।' -ज्ञा १८.१३२३. [सं. ख्या = सांगणें] विख्याति-स्त्री. प्रसिद्धि; कीर्ति. 'तो फारच विख्यातीस चढला.' -नि ७०७. [सं.] विख्यापन-न. १ विवरण; स्पष्टीकरण. २ जाहीर करणें. [सं.]
विरक्त
वि. उदासीन; अनासक्त; निरिच्छ; भोगेच्छेपासून पराङ्मुख; वासनारहित. 'विरक्त करितो हरी स्वगुण नाम संकी- र्तनें ।' -वामन, नामसुधा १.५०. [सं. वि + रज्-रञ्ज्] विरक्ति- स्त्री. १ वैराग्य; अनासक्ति; निरिच्छता. 'तरी विरक्तिवाचूनि केहीं । ज्ञानासि तिगणेंचि नाहीं ।' -ज्ञा १५.३६. २ उदासी- नता; बेफिकीर वृत्ति.
विशेषनाम
विशेषनाम viśēṣanāma n (S) A proper name: opp. to सामान्य- नाम.
विशेष्य
न. (व्या.) १ विशेषण ज्याचा गुण दाखवितें तें; नाम; द्रव्यावाचक शब्द. २ कर्ता; उद्देश्य.
विस्मय, विस्मो
पु. आश्चर्य; चमत्कार; अचंबा; नवल. (क्रि॰ होणें; वाटणें). 'तंव तो पारधी विस्मो करी ।' -पंच २.१. -ज्ञा १.१७७. [सं. वि + स्मि] ॰जनक-वि. आश्चर्यकारक. विस्मयावह-वि. आश्चर्यकारक. विस्मापक-वि. आश्चर्य- कारक; चमत्कृतिजनक; चकित करून सोडणारें; थक्क करणारें. विस्मापन-न. आश्चर्यकारक गोष्ट; चमत्कृति. विस्मावणें- अक्रि. आश्चर्य पावणें; चकित होणें. 'विस्मावला नाम धिग म्हणत ।' -दावि २. विस्मित-धावि. आश्चर्यचकित. 'विस्मित होऊनि इंद्र ठेला ।' -तुगा ८१. -ज्ञा १.५५९.
विश्राम
पु. १ विश्रांति; आराम; विसावा. 'समाधीसी तेथें विश्राम । मनोरम हरिपदीं ।' -एरुव १.८६. २ विश्रांति- स्थान. 'ब्रह्मविद्येचा विश्रामु ।' -ज्ञा १७.३३. विश्रामणें-अक्रि. विसावा घेणें. 'त्यांच्या ठायीं तुझें मन । विश्रामत नाहीं कीं ।' -मुसभा ३.१४२. ॰धाम-न. विश्रांतिस्थान; लयस्थान. 'जें जगदादि विश्रामधाम । तयातें एक नाम ।' -ज्ञा १७.३२८. ॰शालिका-स्त्री. विश्रांतिस्थान. 'जे महदादि विश्रामशालिका हे ।' -ज्ञा १४.६७. ॰शाळा-स्त्री. धर्मशाळा. 'कीं निम्होळ संसारवाटेची विश्रामु शाळा ।' -शिशु ३३.
वोरस
पु. १ स्नेहभरानें फुटणारा पान्हा. -ज्ञा १४.६२. 'डोरली हे काय कृपेच्या वोरसें ।' -तुगा २१७९. २ प्रेम. 'जैसी भुलली वोरसें । माय बोले बाळा दोषें ।' -ज्ञा १८. १३२८. -न. पुत्र; वत्स. 'तूं माझी माउली मी तुझें वोरस ।' -नाम १५३९. ओरस पहा. [सं. उरस्-औरस; प्रा. औरस्स] वोरसणें-१ पान्हा सोडणें. 'जेवीं वोरसोनि तान्ही गाय । वत्सांपासीं धावूनि जाय ।' -भवि १७.२०३. २ प्रेम करणें. -एभा ३.८५०.
व्यावहारिकनाम
व्यावहारिकनाम vyāvahārikanāma or -नांव n The common or familiar name. Termed also चालतें or वाहतें नाम or नांव, प्रतिष्ठानाम, उपचारिक नांव, and, sometimes, पोषाखी नांव. Every person bears a name of this kind. The following are examples; viz. अण्णा or अन्या, अप्पा, अबा, आत्या, काका, तात्या, दाजी, दादा, नाना, बापा, बावा or ब्वा, बापाजी or बावाजी, बापु, भाऊ, मामा, रावजी or राव. These names, of different origin and import, are now used, almost interchangeably, as terms of respectful compellation or mention.
व्यक्ति
स्त्री. १ सत्य, प्रत्यक्ष गोष्ट; वस्तु; विशेष (मनु- ष्याचा, पदार्थाचा). २ स्पष्टपणा; उघडपणा; प्रगटता. -ज्ञा १७. ३७०; -एभा २८.८८. ३ आकार; स्थिति. -ज्ञा २.१५०. ४ स्पष्ट उच्चार. -ज्ञा १७४०४. 'हें पोर नुगतें बोलूं लागलें, अजून वर्णाची व्यक्ति होत नाहीं.' ५ असाधारण, अलौकिक पुरुष. कोणताहि मनुष्य; असामी; इसम. ६ (ल.) अट्टल लबाड, बद- माष माणूस. ७ आविष्करण; दिग्दर्शन. ८ अचा लोप झाल्याची अक्षरापुढीलऽखूण. [सं.] ॰दर्शन-न. (लेखनकला) लोखकानें जें कांहीं लिहिलें असेल त्यावरून बिवक्षित व्यक्तीचें प्रत्यक्ष दर्शन झाल्यासारखें वाटणें किंवा लेखकाच्या वर्णनानें वर्ण्य व्यक्ति वाचकांपुढें मूर्तिमंत उभी राहणें. -प्रतिभा साधन. ॰वाचक- वि. १ वैयक्तिक; व्यक्तीसंबंधीं. २ (व्या.) एखादें उदाहरण दाखविणारें, सिद्ध (नाम). याच्या उलट जातिवाचक. ॰वैचित्र्य-वैशिष्ट्य-न. एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणीं असणारा विशेष गुण. 'एखादा कलावान् व्यक्तिवैचित्र्यानें नवीन सुंधारणा-कसब दाखवूं लागला तर लोक त्याला मागें खेंचतात.' ॰स्वातंत्र्य-न. व्यक्तीला निर्वेध वागण्याची मोकळीक. 'व्यक्तिस्वांतत्र्यानें धर्मबंधनें तुटत चाललीं आहेत.' -केले १.१६७. ॰स्वातंत्र्यवादपु. (तत्त्व.) व्यक्तीला स्वातंत्र्य देण्याबद्दलचें मत. (इम.) इन्डिव्हिज्युअ/?/लिझम्. व्यक्तीकरण- न. १ स्पष्टीकरण; विवरण; फोड. करण ७ पहा. २ चित्रकलेंतील अंग; साधनक्रिया. (इं.) आर्ट आँफ एक्झेक्युशन.
व्युत्पत्ति
स्त्री. १ नैपुण्य; प्रावीण्य (विशेषतः शास्त्रांत); शास्त्रवाङ्मयाशीं परिचय, ज्ञान. 'तुझें नाम जरी ते पुसती । तरी बाहुक सांगे तयांप्रती । अश्वविद्येची व्युत्पत्ती । करी तेथें ।' -कथा १.१०.२२. २ अर्थज्ञान (शब्दाचें विशिष्ट जागीं); विशिष्ट पदार्थास अनुगुण जी अर्थकल्पना ती. 'वैदिक या शब्दीं वेदातें जो जाणणारा किंवा वेदानें सांगितलें जे कर्म अशा दोनही व्युत्पत्ती संभवतात.' ३ शब्दाची घटना, उगम; निरुक्ति ४ विद्वत्ता. -एभा २.४६३. ५ ज्ञान. -एभा २७.३४४. ६ उत्पत्ति; स्वरूप. -एभा ३.१२४. ७ हातोटी; युक्ति. 'स्वधर्म घडूं भगवद्भक्ती । ऐसी अति गुह्य आहे व्युत्पत्ति ।' -एभा १८.३६७. ८ परि- स्फुटता; व्याख्यान. 'वेदांतीं ब्रह्मस्थिती बोलिली मानी यथा- निगुती । इतर स्तोत्रीं ब्रह्म व्युत्पत्ती । तेही अति प्रीति मानी तूं ।' -एभा ८.१०१. ९ ज्ञानाचा गर्व; अभिमान. 'एथ व्युत्पत्ति आवघी विसरिजे । जैं जगा धाकुटें होइजे । -ज्ञा ९. ३७८. [सं.] व्युत्पन्न-वि. १ शास्त्र आणि वाङ्मय यांत प्रवीण; विद्वान; पंडित. 'कवी व्युत्पन्नाची योग्यता ।' -रामदास (नवनीत पृ. १६०). २ साधित; सामासिक (शब्द). ३ (पासून) निघालेला; उत्पन्न झालेला. व्युत्पन्नत्व-न. विद्वत्व. 'तया शरीर जें जालें अज्ञानाचें बीं विरुढलें । तयाचें व्युत्पन्नत्व गेलें । अज्ञानवेलीं ।' -ज्ञा १३.८४०. व्युत्पादक-वि. ज्याच्या योगानें व्युत्पत्ति समजते, दाखविली जाते असा (ग्रंथ, भाषण, इ॰); उत्पादक पहा.
येम
पु. (अप.) यम. 'जया नावडे नाम त्या येम जाची । ' -राम १०१. [सं. यम]
यहूद
(पु.) हिंदी अर्थ : देशका नाम. मराठी अर्थ : देशाचें नांव.
यूनुस
(पु.) हिंदी अर्थ : देखो 'यूनस' पैगंबरका नाम. मराठी अर्थ : पैगंबराचें नांव.
क
१ मराठी वर्णमालेंतील १७ वा वर्ण आणि पहिलें व्यंजन. अक्षरविकास-याच्या पांच अवस्था असून पहिली अशोक- कालीन तर शेवटची ११ व्या शतकांतील. पहिली अवस्था थेट क्रूसासारखी असून पुढें आडवी-उभी रेघ बांकदार होऊं लागली. २ पुष्कळ संस्कृत नामांना तीं दुसर्या शब्दांशीं संयुक्त होतांना (समासांत) हा शब्दातिशय प्रत्यय लागतो, जसें:-आत्म- आत्मक. 'हें जग पंचभूतात्मक आहे'; 'अलंकार सुवर्णात्मक आहेत. स्तुत्यात्मक; निंदात्मक (परिपूर्ण याअर्थीं); मूल-मूलक; ज्यापासून उत्पन्न होतें तो या अर्थीं. 'पुण्य मूलक सुख' (ज्या- अर्थीं) 'स्त्रीमूलक कलह' इ॰; पूर्व-पूर्वक पुरस्सर; अनुसरून; मुद्दाम उ॰ बुद्धिपूर्वक; आदरपूर्वक; शपथपूर्वक (भाषण इ॰). लहान वय, सारखेपणा, प्रेम इ॰ दर्शविण्याकरितां कधीं कधीं शब्दाच्या शेवटीं हें अक्षर जोडतात. त्यामुळें अर्थ फारसा बद- लत नाहीं. उ॰ बालक; पुत्रक; दंडक इ॰; ब्रहुव्रीहि समासापुढें प्रायः याचा प्रयोग होतो. उ॰ देवदत्त आहे नाम ज्याचें तो देवदत्त नामक. 'जीवत्पितृक पुरुष', 'देवमातृक देश'; 'आनंदविषयक वाक्य.' ३ ब्रह्मदेव; दक्षप्रजापति; कश्यप; वायु; सूर्य; यम; विष्णु; अग्नि इ॰ देवता. ४ मन; अंतःकरण; आत्मा. ५ पक्षिविशेष; पक्षी; पक्ष्यांचा राजा. ६ पाणी; पिण्याचा पातळ पदार्थ.
विशेष
पु. १ असामान्य गुण, धर्म, लक्षण, चिन्ह; वैशिष्ट्य; वैलक्षण्य; एकदेशीयता; असाधारणपणा; निराळेपणा; श्रेष्ठता. २ विशिष्ट गोष्ट, व्यक्ति; विशिष्ट गुणधर्मानें युक्त पदार्थ. ३ अपवाद. ४ (गणित) अंतर; फरक; विवक्षित प्रमाणापेक्षां अधिक. 'तया आणि खपुष्पा । विशेष काई ।' -अमृ ७.५३. -वि. असामान्य; असाधारण; सुप्रसिद्ध; एकाकी; बराच मोठा; अधिक; वरचढ. -क्रिवि. (विशेषकरून) मुद्दाम; मुद्दामहून; प्रामुख्यानें; फारकरून; बहूतकरून; आधिक्येंकरूंन. [सं. वि + शिष्] विशेषगुण-पु. पंचमहाभूतांचे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पांच गुण. विशेषण-न. (व्या.) १ गुण अथवा संख्या दाखविणारा शब्द; नामाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द. २ कर्त्याविषयीं विशिष्ट विधान करणारा शब्द; विधेय. [सं. वि + शिष्] विशेषणें-अक्रि. विशेष वर्णन करणें. 'अर्जुना तोचि योगी । विशेषिजे जो जगीं ।' -ज्ञा ३.७५. 'हें कांई विशे- षावें ।' -दाव २७८. विशेषतः-क्रिवि. मुख्यत्वेकरून; प्रायः; मुद्दाम; बळेंहून. विशेषनाम-न. (व्या.) वस्तूंचें अथवा स्थानाचें नांव; ज्या नामांनें विशेष वस्तूचा, प्राण्याचा अथवा समूहाचा बोध होतो तें नाम. विशेषलिंग-न. विशेषविभूति; महत्वाच्या, प्रमुख विभूति. 'तेंवि माझिया विशेषलिंगां । नाहीं मिती ।' -ज्ञा १०.३०१. विशेषज्ञान-न. ब्रह्मज्ञान; जीवाचें, चैतन्याचें ज्ञान. विशेषात्कार-पु. असामान्यत्व; असाधारणता; चमत्कृति; वैशिष्ट्य; निराळेपणा. -क्रिवि. (विशेषात्कारेंकरून, विशेषेंकरून) मुख्यत्वेंकरून; मुद्दामहून; विशेषत्वानें; वैशिष्ठ्यांनें; प्रायशः; बहुत- करून; फारकरून. विशेषित-वि. प्रसिद्ध; विशेषगुणधर्मानें ज्ञात; निर्दिष्ट. विशेषें-करून-क्रिवि. बहुतकरून; फारकरून; मुख्यत्वें- करून; 'हें विशेषेंहि न घडेल । याचि लागीं ।' -ज्ञा ६.४१७.
विचका
पु. १ अव्यवस्थित रीतीनें इकडे तिकडे फेंकलेला रचलेला, किंवा कालविंलेला ढीग (अन्नाचा, फुलांचा, फळांचा इ॰); चिवडाचिवड; पखरलेली, चिवडलेली रास. २ (ल.) विस- कळलेली, नासलेली, भंगलेली, बिघडलेली स्थिति (कामाची, मसलतीची). ३ बिघाड; विसकळलेली, नासलेली, उघडी पड- लेली स्थिति (अब्रूची, नांवाची इ॰). 'बंगल्यांतील ब्रह्मो धर्माचा विचका बाबू केशवचंद्रांनीं आपल्या मुलीचा बालविवाह केला म्हणून झाला.' -टिले ४.१४७. ४ घोटाळा; गोंधळ. ५ वाईट गोष्टींचें प्रदर्शन. [सं. विच्] विचकणी-स्त्री. १ उघडणें; दोहीकडे करणें; विदारणें इ॰. २ ('तोंडविचकणी' चें संक्षिप्त रूप.) तोंड वेडेवांकडें करून वेडावणें. [बिचकणें] विचकणें- उक्रि. व अक्रि. १ उघडणें; दोहीकडे करणें, होणें; मोठ्यानें किंवा विरूप व किळसवाण्या रीतीनें पसरणें; वासणें. २ (ल.) उघड करणें, पाडणें, पडणें; जाहीर करणें, होणें. (गुप्त दोष, व्यंगें) ३ (ल.) नासणें; मोडणें; भंगणें; बिघडणें (कट, मसलत, काम). ४ (शब्दशः) पाकळ्या, पानें, ओढून काढणें; फाडणें (फुलें, पुस्तकें यांच्या). ५ विचकचणें पहा. उसकटणें. [सं. विच् = वेगळे करणें. सं. विकोचन; विकचीकृ = विकचणें] विचकणें शब्दापूर्वीं नाम- जोडून अनेक वाक्प्रचार होतात जसें-तोंड विचकणें = १ वांकुल्या, वेड्यावण्या दाखविणें. २ तोंड उघडणें; बोलणें. दांत, बत्तिसी विच- कणें = (उपहासार्थीं) दांत, बत्तिशी दाखवणें, काढणें; हांसणें. केस विचकणें = केस विसकळणें. (त्याचें)विचकलें = (तो)नाश पावला, धुळीस मिळाला. विचकून पाहणें-सूक्ष्म दृष्टीनें बारकाईनें पाहणें. विचकोपा-पु. ओरबडलेली, विचकुरलेली, विदारलेली, छिन्न- भिन्न केलेली स्थिति. विचक पहा. [विचकणें] ॰होणें-विस्कटणें.
पाड
पु. १ बाजारभाव; दर; निरख. 'सहाप्रमाणें पहिला पाड होता.' -ख ९१४. २ (ल.) योग्यता; बरोबरी; साम्य, किंमत. 'त्रिभुवनसुंदर हें रूपडें । माझी कन्या त्याच्या पाडें ।' -वेसीस्व ३.६३. ३ महत्त्व. 'आमुचिया काजाचेनि पाडें । देखती आपुलें जीवित थोकडें ।' -ज्ञा १.११२. ४ प्रमाण; मान. 'वीज चमके जेणें पाडें । तैसा गरुड झेंपावें पुढें ।' -मुआदि ६.७३. ५ झाडावरील फळांची विशेषतः आंब्यांची कच्चेपणा जाऊन पक्कें पिकण्यापूर्वींची अवस्था. 'आंबया पाडू लागला जाण ।' -एभा १२.५९९. ६ पिकण्याच्या अवस्थेस आलेला झाडावरील आंबा. 'हिराबाईजवळ आंब्यांच्या पाडांनीं भरलेली टोपली आहे.' -बाळ २४३. ७ माळोचा; माची. ८ परवा; क्षिति. 'द्रेणाचा पाडु न करीं । भीष्माचें भय न धरीं ।' -ज्ञा ११.४७२. ९ अंतर; भेद. 'संसर्गें चेष्टिजे लोहें । परि लोह भ्रामक नोहे । क्षेत्र क्षेत्रज्ञां आहे । तेतुला पाडु ।' -ज्ञा १३.११२२. १० (ना.) जोड; प्रितिस्पर्धित्व. ११ संगति; मेळ; जुळणी. -ख्रिपु. १२ परि- णाम. -शर. १३ (नाशिक भागांत रूढ) रेशमी कांठांचें व सुती पोताचें वस्त्र. १४ (-वि.) योग्य; साजेसा; अनुरूप. 'राजा बोले वसिष्ठांसी । रामापाड हे गुणरासी ।' -वेसीस्व ९.१०९. [का. पाडु = समता; बरोबरी; का. पड्डि] म्ह॰ आंबे आले पाडां निंबुणी आल्या रसां. (वाप्र.) पाडास जाणें-१ फळझाडांचा पाडाचा ऋतु टळणें. २ गाय, म्हैस इ॰ जनावर फळण्याच्या समया- पलीकडे जाणें; फळण्याचें टळणें. पाडास येणें-लागणें- फळ पिकण्याच्या अवस्थेस प्राप्त होणें. 'हेंचि आंब्यांचें सदा फळलें वन । पाडा आलें प्रेमेंकरून ।' -ह १९२२४. सामाशब्द- ॰कुला-वि. (राजा.) वयानें प्रौढ असूनहि शरीरानें नाजुक व पुष्ट असलेला (पुरुष इ॰ व्यक्ति); ताजातवाना. 'तिला पंधरा मुलें झालीं तरी ती पाडकुली दिसते.' [पाड = पिकलेली स्थिति] ॰पंचाईत-स्त्री. १ (एखाद्या वस्तूची) किंमत इ॰ विषयीं बारीक चौकशी. २ (सामा.) पंचायतीनें केलेली चौकशी; विचार- पूस. [पाड = किंमत + पंचाईत = तपास, चौकशी] पाडाचा-वि. पिकून झाडावरून काढण्याच्या, गळण्याच्या स्थितींत आलेला (आंबा इ॰ फळ).
देह
पु. शरीर; काया; अंग. 'नोळखवे म्यां धरला हातीं । देहा दीप माया लाविली वाती ।' -तुगा ३६८. [सं.] (वाप्र.) ॰उगाळणें-(चाकरी इ॰ कानीं) शरीर झिजविणें. ॰कारणीं लावणें-एखाद्याच्या कार्याकरितां स्वदेह खर्च करणें. कामास लावणें. ॰टाकणें-ठेवणें-गोडणें-मरणें. ॰लोटणें-मूर्च्छा येणें. देहांत असून विदेही-जीवन्मुक्त. देहांत उजेड पडणें-अपराधाबद्दल शिक्षा भोगल्यानें पश्चात्ताप होणें. देहावर असणें-शुद्धींत असणें. देहावर-गाणें-गीत-अभंग-पद- लावणी-कवन-दोन अर्थांचें काव्य. याचा उत्तानार्थ शरीर विषयक असतो व गूढार्थ आत्मा किंवा ब्रह्म यासंबंधीं असतो. देहावर नसणें-मन ठिकाणावर नसणें. देहावर येणें-१ शुद्धीवर येणें. 'देहावरी येथे म्हणती ।' -गुच ५३.६. २ रानटी खोडया अथवा बेबंद चाली टाकून देणें. दहीं देवपण दाखविणें- आणणें-येणें-(एखाद्यानें) मनुष्यरूपी असूनहि, याच जड देहावस्थेंत आपल्यांत दैविक आत्मीय सत्याचें ज्ञान किंवा ब्रह्मज्ञान आहे अशी लोकांस प्रचीति आणून देणें. म्ह॰ देहं वा पातयेत् अर्थं वा साधयेत् = प्राण तरी द्यावा किंवा ध्येय तरी साध्य करावें. सामा- शब्द- ॰खंड-न. साडेतीन हाताचें शरीर. 'जें देहखंडा नाम आत्मा ।' -ज्ञा १८.५६७. ॰त्याग-पु. मरण. ॰त्रय-न. स्थूल, लिंग व कारण या तीन प्रकरचा देह. 'तैसें ज्ञानाग्नि जाळिले । देहत्रयीं निरसलें ।' ॰दंड-दडन-पुन. तपानें केलेलें देहाचें संयमन. २ फांशीची शिक्षा. ॰दृष्टि-स्त्री. मानवी दृष्टि. उदा॰ 'देहदृष्टीनें पाहिला असतां प्रपंच सत्य दिसतो.' ॰द्वय-न. स्थूल आणि सूक्ष्म देह. ॰धर्म-पु. शरीराचीं कृत्रिम व नैसर्गिक कामें, मलमूत्रविसर्जन इ॰ देह धमाचें करणें-शौचास जाणें. देह- धारी-वि. शरीरी; मूर्तिमान्. ॰पात-प्रयाण-पु. शरीराचें पतन; मरण; देहावसान. 'आणि नियता अंतःकरणीं । तूं जाणि जसी देहप्रयाणीं ।' -ज्ञा ८.५. ॰प्रारब्ध-न. नशीबाचा भोग; शरीरभोग. ॰बुद्धि-भाव-स्त्रीपु. १ जीवबुद्धि; देहावरील आसक्ति; अहंभाव; मीपणा, याच्या उलट आत्मबुद्धि. २ (काव्य) चित्ताची सावधानता देहाभिमान; देहतादात्म्य. ॰बुद्धि राहणें- (व.) धडगत रहाणें. ॰भान-न. चित्तशुद्धि; स्वतःची जाणीव; चित्तानुसंधान; मन ठिकाणावर असणें; शांत असणें; विवेकशक्ति असणें. (क्रि॰ असणें; येणें; विसरणें; जाणें). ॰भाव-पु. देहाभिमान. देहबुद्धि पहा. ॰यात्रा-स्त्री. १ देहाचा चरितार्थ; उपजीविका. (क्रि॰ चालणें; होणें; निभणें). २ आयुष्य; जीवन- क्रम. (क्रि॰ संपणें = मरणें). ॰वान-वि. देहधारी पहा. ॰विस- र्जन-न. देहत्याग पहा. ॰शुद्धि-स्त्री. १ प्रायश्चित्तानें शरीराची शुद्धता करणें. २ देहभान पहा. ॰संकल्प-पु. प्राण पणास लावून काम करणें; निकराचा प्रयत्न. ॰संग-पु. देहाचा अहंकार. ॰स्वभाव-पु. १ देहधर्म १ पहा. २ मनुष्याचा नैसर्गिक स्वभाव; जन्मप्रभृति वागण्याची पद्धत. देहाडा-पु. देह. 'पुरला साठीं देहाडा । ऐसें न म्हणे मूढा ।' -तुगा २६८४. देहांत-पु. मृत्यु. देहांत प्रायश्चित्त-न. मृत्युदंड. देहांतर-न. दुसरा जन्म किंवा दुसरा जन्म घेणें; परकाया प्रवेश; एका देहांतून दुसर्या देहांत प्रवेश करणें. देहातीत-वि. देहाच्या पलीकडे; अदेह झालेला. देहात्मवाद-दृष्टि-पुस्त्री. अनात्मवाद; जडवाद; देहा- लाच आत्मा मानणें. देहात्मवादा-दृष्टी-वि. जडवादी; देहा- त्यय-पु. देहत्याग. देहादिक कर्में-नअव. १ देहधर्म पहा. 'देहादिक कर्में अभिमान वाटे । तया मी कैं जोडें नारायण ।' २ दया, माया. प्रीति इ॰ मनाच्या वृत्ती. देहाभिमान, देहा- हंकार-पु. शरीराचा अभिमान. देहाभिमानी, देहाहंकारी- वि. देहाभिमान धारण करणारा. देहावसान-न. मृत्यु. देही-वि. १ देहासंबंधीं. २ देहधारी पहा. -पु. देहांत राहणारा जीवात्मा. 'हें रजोगुणाचें दारुण । देही देहियासी बंधन ।' -ज्ञा १४.१७३. देहे-दंड-बुद्धि-भान-शुद्धि-स्वभाव-देहदंड-बुद्धि इ॰ पहा. 'ज्ञात्यासी आणि जिंकिलें । देहबुद्धीनें ।' -दा १९.४.२६.
राशि-शी, राश
पुस्त्री. १ नक्षत्रचकाच्या किंवा क्रांति वृत्ताच्या कल्पित बारा भागांपैकीं कोणताहि एक भाग; रास. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धन, मकर, कुंभ व मीन असा बारा राशी आहेत; तारांचा पुंज. [सं.] राशीस बसणें, लागणें-१ अनिष्ट असणें (ग्रह). २ तीव्र वैरामुळें एखाद्याचा नाश करण्याकरितां त्याचा पाठलाग करणें. ३ एखाद्याच्या खणपटीस बसणें, हास धुवून पाठीस लागणें. ३ मन लावून, एकचित्तानें अभ्यास करणें. [राशि] सामाशब्द- ॰कूट- न. दोन माणसांच्या जन्मकालीं उच्च असलेल्या दोन राशी. किंवा लग्नाच्या वेळीं घटित पाहतांना दिसून येणारी वधूवरांच्या परस्पर राशींची अनुकूलता. [सं.] ॰घटित, राशघटित-न. जन्म पत्रिकेवरून वधूवरांची मैत्री, विरोध याविषयीं ज्ञान; वधूवरांचें घटित. [सं.] ॰चक्र-न. भचक्र; भमंडल. बारा राशी पहा. ज्यांत मुख्य ग्रहांच्या कक्षा सर्वांशीं सांपडतील, असा क्रांतिवृ- त्ताचा दोहोंकडे आठ आठ अंशापावेतों विस्तारलेला एक कटि- बंध कल्पिला आहे तो. -सूर्य १८. [सं.] राशिचक्रसंबंधीं प्रकाश-पु. कांहींसा अंधुक व त्रिकोणाकार उजेड संध्याकाळीं पश्चिम क्षितिजाकडे व सकाळीं पूर्व क्षितिजाकडे दिसतो तो-ज्योति: शास्त्राचीं मूलतत्वें. ॰नाम, राशनाम-न. जन्मराशीवरून मुलाचें ठेवलेलें नांव. [सं.] ॰भोग-पु. राशींतून ग्रहाचें गमन. [सं.]
चपेट
स्त्री. १ चापट; थापड; थप्पड; आघात; प्रहार; चपेटा; तडाखा (वाघाच्या किंवा मांजराच्या पंजाचा, हाताचा). 'मृत्युव्याघ्रें चपेटघात । मारूनि प्राण घेतला ।' -मुआदि २७. १०६. 'साहेल काय हरिची गज, गरुडाचीहि लावक चपेटा ।' -मोउद्योग १२.२४.२ दुर्दैवाचा किंवा संकटाचा तडाखा, झपाटा. ३ धंद्यांत बसलेली ठोकर किंवा आलेली तूट.(क्रि॰ मारणें; बसणें). 'यंदा गुरें मेल्यामुळें मोठी चपेट बसली.' ४ लुटारू किंवा पटकी यांचा हल्ला; धाड. ५ पिकावर हिंव, चिकटा, मोवा पडून किंवा पीक उंदरांनीं खाऊन झालेला नाश. ६ भूत, पिशाच यांचा तडाखा, झपाटा. ७ जुलमी राजाकडून, माणसाकडून झालेलें दुःख, ताप. ८ लढाईंत किंवा युद्धांत बसलेला आघात, लागलेला वार. ९ (ल.) हाताची चापट; तडाखा. -एभा ९.४४. 'धरा पंढरीची वाट । जंव नाहीं चपेट । घात पडिला काळाचा ।' -तुगा २५६४.१० वर्चस्व; सत्ता; मुठींत येणें. 'तो माझे चपेटींत येईल त्या दिवशीं मारून निसंतान करीन.' -वि. १ हाणून पाडलेला; उध्वस्त केलेला; जमीनदोस्त केलेला; उजाड पाड- लेला. २ (ल.) खाऊन फस्त केलेला; खर्चून टाकलेला; लक्क, साफ केलेला. चपेट (-नाम) पहा. [सं.] ॰साधणें-(व्यापारांत वगैरे) चांगला लाग साधणें; चांगलें बस्तान बसणें; नीट संधान लागणें.
प्रतिष्ठा
स्त्री. १ मान; कीर्ति; पत; लौकिक; प्रसिद्धी; मोठेपणा; ख्याति. 'नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं । सानीव धरूनि आंगीं ।' -ज्ञा १.४६. २ अधिकाराच्या, बहुमानाच्या जागीं एखा- द्याची स्थापना. ३ एखद्या देवतेच्या सन्मानार्थ उभारलेल्या स्मारकाची स्थापना. ४ देवादिकांच्या मूर्तींची यथाविधि स्थापना; प्राणप्रतिष्ठा. 'प्रतिमाप्रतिष्ठेसि पहाहो । प्रकटे आयुर्भावो मंत्रमात्रें ।' -एभा १.१७०. ५ नवीन बांधलेला घरांत राहण्यास जाण्या- पूर्वीं करितात तो विधि; घरभरणी. ६ भ्रष्ट झालेल्या देवादिकांच्या मूर्तीची पुन्हां स्थापना. ७ वसतिस्थान; गृह. ८ डौल; आढ्यता; अभिमान. (क्रि॰ करणें; मिरवणें; बाळगणें). ९ देवळास मिळा- लेली नेमणूक, वर्षासन इ॰ १० हुंडा देऊन मुलीचें लग्न लावणें. ११ आयुष्यांत स्थिर, कायम, स्थायिक होणें. १२ (सामा.) स्थिरता; स्थैर्य; कायमपणा; स्थापना. 'बुद्धी धैर्या होय वसौटा । तरी मनातें अनुभवाचिया वाटा । हळु हळु करी प्रतिष्ठा । आत्मभु- वनीं ।' -ज्ञा ६.३७८. १३ (निंदार्थीं) अप्रतिष्ठा; अपमान. [सं.] म्ह॰ कुचेष्टेवांचून प्रतिष्ठा वाढत नाहीं. पंधरा प्रकारच्या प्रतिष्ठा-दिमाखानें व गर्वानें फुगून जाणें; फाजील, अतोनात डौल; मिजास; आढ्यता. सामाशब्द- ॰नाम, प्रतिष्ठित नाम-न. व्यवहारांत आदरार्थीं योजावयाचें टोपण नांव. (दादा, तात्या, नाना बापू, अण्णा इ॰). व्यवहारिकानांव पहा. ॰वस्त्र-न. १ सभा, दरबार इ॰ ठिकाणीं प्रतिष्ठेनें घेऊन जावयाच्या उपयोगी पोषाख. उंची, भारी, सुंदर, छानछोकीचा पोषाख. २ उंची पोषाखांतील एक वस्त्र.
नेक, नेकी
स्त्री. १ अंतःकरणाचा खरेपणा, शुद्धपणा; प्रामाणिकपणा; सत्यता; ऋजुता. 'अल्पहेतुस्तव किंवा महद्हेतू- स्तव आपली नेक सोडूं नये.' २ नेकबाजी; सद्वर्तन; सरळ मार्ग, व्यवहार, आचरण. -वि. १ सद्गुणी; प्रामाणिक; विश्वासू; सरळ; खरा; चांगला; नीतिमान् (माणूस, काम). २ योग्य; युक्त. 'घाटा- खालीं राहणें नेक नव्हे.' -पेद ६.३६. [फा. नेक्] नेकीचा- वि. खरा; नीतिमान; सद्गुणी; चांगला; प्रामाणिक. ॰खाही- स्त्री. हितेच्छा. 'नेकखाई जाहीर करणें.' -रा १७.३१. [नेक + खाई] ॰जात-जाद-वि. १ प्रामाणिक; इमानी; सचोटीचा; नेक पहा. 'मराठे लोक कजाखी, बहुत नेकजात, एकदील.' -मराचि- थोरा ७६. २ प्रतिज्ञा पाळणारा; सत्यसंध. 'आतां नेकजात एक जयाजी शिंदे मात्र आहेत.' -भाब ७. ३ सुशील; अभिजात; साधु. 'तो केवळ नेकजाद प्राप्तपुरुष होता.' -भाब ५२. [फा. नेक्झात्] ॰दार-वि. प्रामाणिक; नेकजात. 'तो पुरुष चाकरीस नेकदार आहे.' -गोखचिशाब ३७. -क्रिवि. प्रामाणिकपणें. 'असे कामदार नेकदार वागले म्हणून राज्य चाललें.' -रा ६.५११. ॰नजर-स्त्री. (पत्रव्यवहारांत) अनुकूल, मेहरबानीची दृष्टि; कृपा- दृष्टि. 'साहेबाचे नेकनजर करून सेरी कराची बखेर सलामत असे.' -रा १५.७६. [फा. नेकनझर] ॰नाम-वि. चांगला; प्रख्यात; कीर्तिमान. 'आणि सर्वांत नेकनामही असावें.' -रा ६.३७७. [फा. नेक् + नाम्] ॰नामदार-वि. (पत्रव्यवहार) सद्गुणी; कीर्तिमान; प्रख्यात; प्रामाणिक; एक मोठी पदवी (गव्हर्नर, प्रीव्हीकौन्सिल, पार्लमेंटचे सभासद इ॰ नां असते). (इं.) राईट आनरेबल. ॰नामवरी-स्त्री. सुकीर्ति. -जोरा १२९. ॰नामी- स्त्री. लौकिक; कीर्ति. 'नेकनामी व बदनामी हे शब्द फक्त मुलांस व अल्प समजुतीच्या बायकांस फसविण्यापुरतेच आहेत.' -इलासुंदरी (मकरंदमाला २०). ॰नियत-स्त्री. सुबुद्धि; सद्बुद्धि. -वि. सद्बुद्धीचा. 'टोपीवाल्यांत इंग्रजी बादशहा बहुत नेकनियत.' -ख ७.३५६४. ॰बाजी-स्त्री. नेक, नेकी अर्थ २ पहा. ॰बोल- वि. सत्य, खरें बोलणारा. ॰राह-स्त्री. सरळ, चांगली राहणी, रीत; चांगलें वळण, चाल. 'नेकराह चाल दाखवून आमच्या राज्याचा आसरा पुरता केला.' -ऐटी ५७. ॰सल्ला-स्त्रीपु. खरा, चांगला उपदेश, सल्ला. (क्रि॰ देणें). 'मुरारराव घोरपडे यांचे विचार करितां बहुत उत्तम आहे. ते सांगतील तें नेकसल्लाच सांगतील.' -पया ८१. -दिमरा १.६७. नेकी-नेकबाजी-स्त्री. नेकमध्यें पहा. नेकीबदी-बादी-स्त्री. नकी बदी (चांगल्या वाईट गोष्टी) दैवी, नैसर्गिक, किंवा मानवी या प्रकारच्या घडणार्या चांगल्या वाईट गोष्टी, प्रसंग; बरावाईट प्रकार; अस्मानीसुलतानी; देवकी- राजकी. 'नेकीबदीचा अंदेशा दोन्हीकडून सेवकाकडे नसावा.' -पया २५६. [नेकी + बदी]
म्हैस
स्त्री. १ महिषी; रेड्याची मादी; म्हसरू; म्हस. २ एक प्रकारचा सहा पायांचा माशीपेक्षां मोठ्या आकाराचा व वरचा पृष्ठभाग कठीण असलेला किडा. ३ केळफुलावरील निबर, काळसर रंगाची पारी. पांढऱ्या रंगाच्या पारीस गाय म्हणतात. म्ह॰-मेल्या म्हशीला दहाशेर दूध किंवा बहु दूध. [सं. महिष प्रा. महिस] पाण्यांत म्हैस न बाहेर मोल-म्हैस डबक्यांत बुडून राहिली असतां तिची किंमत ठरविणें. म्हशीवर पाऊस पडणें-बेकिफायतीचे प्रयत्नाबद्दल किंवा निरर्थक झालेल्या हित- कारक गोष्टीबद्दल योजावयाचा शब्द. म्हशीचा प्राणनाथ-पु. रेडा. -वि. (ल.) सुस्त; मस्त. 'तो काय नुसता म्हशीचा प्राणनाथ आहे.' म्हशीनें पाय दिलेलें नाक-न. नकटें किंवा बसकें नाक. म्हैस आटणें-दूध द्यावयाचें बंद होणें; दूध न निघणें. 'गेल्या महिन्यापासून म्हैस आटली आहे.' म्हैस पावल्या- वि. (व.) म्हशीसारखा जड प्रकृतीचा. म्हैस पाहणें-(व.) म्हशीचें दूध काढणें. म्हैस पिळणें-धार काढणें. 'मी म्हैस पिळून येतों.' म्हैस हात पारखते-(व.) म्हैस धार काढ- णाऱ्याचा हात ओळखते. म्हशीचीं शिंगें म्हशीला जड होत नाहींत-मुलें अधिक असली तरी तीं आईंबापाला जड नसतात. म्हशा-पु. १ (व.) रेडा; हल्या; जड, दांडग्या व कुरूप रेड्याबद्दल किंवा इतर पशूबद्दल तुच्छतेनें योजावयाचा शब्द. २-वि. (ल.) रेड्यासारखा धष्ट पुष्ट मतिमंद; म्हशीसारखा जड प्रकृतीचा. ३ सुस्त; दांडगा आणि घाणेरडा अशा इसमाबद्दल योजावयाचा तुच्छतादर्शक शब्द; मूर्ख अरचट मनुष्य. 'कीं म्हशीचें गण्या नाम ।' -नव १८.१७२. [म्हैस] म्हशागुग्गुळ-गुगुळ- पु. १ एक प्रकारचा गुग्गुल. २ (म्हशा किंवा म्हैस) धिप्पाड गलेलठ्ठ व ठोंब्या इसमाबद्दल निर्भत्सनापूर्वक योजावयाचा शब्द. [म्हशा, म्हैस; मशी आणि गुग्गुल] म्हशाबोळ-पु. एक प्रका- रचा बोळ; एक औषधी वनस्पती; एका झाडाच्या चिकापासून हा होतो. याचा रंग काळा असतो. हें औषध गुरांचे पोटदुखीवर चालतें. म्हशासुर-पु. देवीनें मारलेला एक दैत्य; म्हसोबा. [सं. महिषासुर] म्हशी केळें, म्हशेळी, म्हशळें, म्हस- केळें-न. एक जातीचीं मोठीं व जाड केळीं. म्हशीचा खटारा म्हशीचें खोड-म्हशीचें डोबड-पुन. म्हशीबद्दल उपहासानें म्हणतात. म्हशीचें मेळवण-न. (विनोदानें) अव्यवस्थित जेवण; पात्रावर खाद्यपदार्थांची अव्यस्थित रेलचेल. म्हस-स्त्री. (व.) म्हैस; महिषी; म्हसरू; म्हसरूड; म्हसर ह्या शब्दाकरितां म्हैसरूं इ॰ शब्द पहा. [म्हैस] म्हसकी-म्हसक्या-वि. म्हैस राखणारा, चारणारा. म्हसडी, म्हसडें-वि. म्हशीचें कातडें; महिषचर्म. [म्हैस-म्हस-म्हसडी] म्हसर-ढोर; लांब व सापट (म्हशीच्या पाठी प्रमाणें) ह्या अर्थीं नामाशीं सामाजिक शब्दांत म्हैस किंवा म्हस शब्दाचें तुच्छतादर्शक रूप; कंटाळवाणें व न संपणारे लांबलचक. जसे-म्हसरमाळ, म्हसर मैदान, म्हसररान. कधीं कधीं म्हसरभुई व म्हसरजमीन, म्हसरशेत, म्हसरवाट, म्हस- ररस्ता, म्हसर मजल, म्हसरकोस, म्हसरल्ला इ. [एकवचन म्हसरू] म्हसरे-म्हैस टोणगे. म्हसड्या-वि. (व.) म्हशीसारखा जड प्रकृतीचा. म्हसासूर, म्हसोबा-पु. एका असुराचें किंवा दैत्याचें नांव यास देवीनें मारलें. कांहीं हलक्या जातीचे लोक ह्याची पूजा करितात; एक पिशाच्च. [महिष] म्हसोबाला नाहीं बायको व सटवाईला नाहीं दादला. म्हसोबा कोपविणें, पेचविणें- कृष्णानदी तटाकास अक्कलखोप गांवीं म्हसोबा आहे त्याला आपल्या शत्रूचा सूड घेण्याकरितां नारळ फोडणें; देव घालणें म्हैशा-पु. अंगानें मोठा व कुरूप अशा रेड्याबद्दल किंवा इतर नर जातीच्या पशूबद्दल रागानें किंवा उपहासपूर्वक योजावयाचा शब्द. -वि. ज्याचें शरीर पुष्ट असून जो आळशी आहे त्यास निंदेनें म्हणावयाचा शब्द. [म्हैस] म्हैसभादऱ्या-वि. आपल्या कामांचा निपुन नसलेल्या न्हाव्याबद्दल उपहासानें योजावयाचा शब्द; वाईटपणें खाडाखोड करून लिहिणाऱ्या लेखकाबद्दल योज- तात. म्हैसमंगळ-वि. मठ्ठ. म्हैसमाळ-पु. प्रवासामध्यें लवकर न संपणारा मोठा माळ किंवा ओसाड व नापीक जमीन. म्हसर पहा. म्हैसरट, म्हैसरूड, म्हैसर-न. म्हैस किंवा म्हैसा याज- बद्दल तुच्छतादर्शक बनलेली रूपें. म्हैसरूं-न. म्हैस शब्दाचे नर किंवा मादी वगैरे भेद लक्षात न घेतां लाडिकपणानें योजावयाचा शब्द. म्हैसवा-पु. (महानु.)एक प्रकारचा पाषाण. 'कीं आव्हाटी म्हैसवा थर । नव्हतां दुष्टी गोचरु ।' -ऋ ४८. म्हैसवल-स्त्री. एक झुडुप. म्हैसा-पु. टोणगा; रेडा (हा शब्द मराठींत विशेष रुळलेला नाहीं.) रांड-भांड म्हैसा बिघडे तो होय कैसा? (हिदी म्हण) 'नको देऊं म्हैसा ।' -प्रला. म्हैसासुर-पु. एक पिशाच्च; क्षुद्रदेवता. 'म्हैसासुर मलिकार्जुन ।' -दावि ६३. [महिषासुर] म्हैसिक-वि. म्हशीचा. म्हैसोबा-म्हसोबा. 'मुंज्या झोटिंग करणी । म्हैसोबाची'
धन
न. १ पैसा; संपत्ती; द्रव्य; वित्त; (सोनें,चांदी,गुरें ढोरें, घरदार जमीनजुमला इ॰) मालमत्ता. २ द्रव्याचें साधन; ज्यामुळें पैसा मिळतो तें.उदा॰ विद्या, शास्त्र, कला इ॰ (समासांत) कीर्ति-गृह-पुत्र-पाप-पुण्य-शौर्य-गो-पशु-कल्प-वित्त-मान- धन; तपो-यशो-धन; इ॰. ३ अत्यंत प्रियवस्तु. ४ मौल्यवान् वस्तु. ५ (गणित) बेरजेचें चिन्ह ( + ). मिळवावयाची संख्या; अधिक संख्या.'एका दिशेस कार्य करणार्या प्रेरणा धन ( + ) चिन्हानें दर्शविल्या '-यंस्थि ७. ६ विजेचा एक प्रकार.'धन- विद्युत्.' याच्या उलट ॠणविद्युत्. [सं] (वाप्र) धन लावणे- पाडणें-(उप.) उत्कर्ष पावणें; वैभवास चढणें; मानमरातब मिळणें (विपरीत लक्षणेनें योजतात). 'पंचवीस वर्षें झालीं आतां पुढें विद्या करून धन लावाल हें समजत आहे.' ॰पुरणें-कांहीं एक पदार्थ मनमुराद उपभोगिल्यानें आशा पूर्ण होणें म्ह॰ १ धन असे पातळीं तर तेज दिसे कपाळीं = पैसा जवळ असला कीं तोंडा- वर साहजिकच तेज चढतें. २ विशीं विद्या तिशीं धन = विद्या संपादन करण्याचें वय वीस वर्षें व पैसा तीस वर्षांपर्यंत मिळतो. ॰कनकसंपन्न-वि. (अप.रूपें) धनकनक, धनक कनक सोनें, पैसाअडका यांनीं समृद्ध; भरपूर श्रीमंत. [सं] ॰कुबेर-पु. अतिशय श्रीमंत मनुष्य; पैसेवाला; लक्षाधीश. [सं] धनको-धनको- नाम-पु. पैसे उसने देणारा; सावकार; कुळांना कर्जाऊ रकमा देऊन त्याकडून व्याजासह मुद्दल घेऊन व्यवहार करणारा; उत्तमर्ण. याच्या उलट रिणकोनाम.'धनकोनाम तुकावणी । रिणको नाम विठ्ठल धणी ।'धनकोरिणको-न.(धनको आणि रिणको) १ कर्ज देणारा व कर्ज घेणारा यांमधील संबंध; सावकार व कुळ यांमधील व्यवहार. २ देणेदार; अधमर्ण. 'मी तुझे धनको- रिणको लागत नाहीं.' [धन + रिण] ॰गर्वी-वि. पैशाचा, श्रीमंतीचा ताठा असणारा. ॰गाडा-गाढा-वि. श्रीमंत; धनवान; पैसेवाला. [धन + गाडा = समृद्ध] ॰चळ-पु. १ पैशाचें वेड; द्रव्यलोभ. २ पैसा गेल्यामुंळे लागणारें वेड. ॰चिन्ह-न. अधिक ( + ) चिन्ह. धन त्तर, धनंतर, धनवत्तर-वि. १ श्रीमंत; समर्थ; बलिष्ठ; थोर. 'कुबेराला कर्ज देण्याइतका धनत्तर तुझा बाप.'-एक. २ गडगंज; मुबलक; पुष्कळ; भरपूर (पीक, पाणी इ॰). 'आमच्या विहिरीला उन्हाळयांत सुद्धा धनत्तर पाणी असतें.' ३ खूप मोठा; विस्तृत; विस्तीर्ण (वाडा, पटांगण, देश इ॰).'भले भले धनंतर वाडे हवेल्या जागा।'-ऐपो ४२३. ४ हुषार; चलाख; कुशल. [सं. धनवत्तर] ॰तृष्णा-स्त्री. पैशाची हांव; लोभीवृत्ति. ॰तेरस-त्रयो दशी-स्त्री. अश्विन वद्य त्रयोदशी; या दिवसापासून दिपवाळी सुरू होते. व्यापारी या दिवशीं लक्ष्मीची पूजा करतात. अपमृत्यु टळण्या- साठीं यमास दीपदान करावयाचें असतें. बायकांचा नाहण्याचा हाच दिवस असतो. [सं. धन + त्रयोदशी; प्रा.तेरस] ॰द-पु. कुबेर; श्रीमंत; लक्ष्मीपुत्र. 'धर्मा जी धनदसभा तीही शतयोजनायता रम्या ।' -मोसभा १. ३१. -वि दाता; धन देणारा. [सं. धन + दा] ॰दर्प- पु. पैशाचा अभिमान; श्रीमंतीचा ताठा. [सं] ॰दौलत-धान्य- स्त्री.(व्या.) संपत्ति; मालमत्ता; पैसाअडका, दागदागिने, घर- दार, शेतीवाडी, गुरेंढोरें इ॰ इं. इस्टेट. 'जैसें तुकयाचे धनधान्य समस्त ।ओढोनि गेलें जेथचें तेथें ।' [धन + दौलत, धान्य] ॰पिशाची-स्त्री. १ पैशाचें रक्षण करणारी हडळ. २ (ल.)अति लोभी कद्रू स्त्री. ॰पिसा-वि.पैशाचा अति लोभी; पैशाचें वेड असलेला. ॰पुत्र-पु. गर्भश्रीमंत; मोठा धनवान.'तैसेचि धनपुत्रा आटितां दुष्टें ।'-दावि ३९. ॰मद-न. संपत्तीचा गर्व; ताठा. (क्रि॰ येणें; चढणें; होणें).'चोरा थोरासम करी उपकार । धनमद चोरि फार ।' -मानापमान. ३.१. -वि. पैशामुळें उन्मत्त झालेला; धनमस्त. ॰मस्त-मत्त-वि. संपत्तीनें ताठलेला; उन्मत्त झालेला. ॰मस्ती-स्त्री. पैशानें अंगीं येणारा उन्मत्तपणा. ॰माल-पु. धनदौलत. 'ज्यानें धनमाल सोडिला ।'-ऐपो ९७. ॰रमण पति-पु. १ कुबेर. २ श्रीमंत माणूस. [सं] ॰रेषा-रेघ-स्त्री. (हस्तसा.) मनुष्याच्या तळहातावरील एक विशिष्ट रेषा. यावरून पैसा किती व केव्हां मिळेल तें सांगतात. (क्रि॰ उपटणें; उम- टणें). 'त्याची धनरेषा उपटली म्हणून पैसा मिळूं लागला.' ॰लाग-लाभ-पु. द्रव्यलाभ; पैसा मिळणें.(क्रि॰ लागणें: मिळणें; सांपडणें). ॰लुब्ध-वि. (काव्य.) संपत्तीचा फाजील लोभी. धनपिसा. 'कीं धनलुब्धाचें तत्त्वज्ञान । परधन हरणार्थ ।' धनलोभ-पु. धनाचा, द्रव्याचा हव्यास. ॰लोभी-वि. पैशाची इच्छा करणारा; हांवरा. [सं.] ॰वंत-वान-स्त्री. ज्याच्यापाशीं पुष्कळ पैसा आहे असा. ॰व्ययपु. पैशाचा खर्च. ॰व्यवहार-पु. १ पैशासंबंधींची देवघेव, कारभार. २ पैशासंबंधीं खटला, निवाडा. ३ दिवाणी दावा, कारभार. धन- शेट-पु. (उप.) धनाढ्य व्यापारी किंवा पेढीवाला; धनत्तर. ॰संचय-पु. पैशाचा सांठा. [धन + संचय] ॰संपत्ति-स्त्री. पैसाअडका. ॰संपादन-न. पैसा कमावणें; धनार्जन. धनागमन- न. धनप्राप्ति. 'धनागमनीं अति कष्ट । धनरक्षणीं कष्ट श्रेष्ठ ।' -एभा २३.१७६. धनागमनागमन-न. धनाचें येणेंजाणें. 'अथवा धनागमनागमनीं । प्रबळ लोभ उपजे मनीं ।'-एरुस्व ९३.२९.धनाढय-वि. धनवान; श्रीमंत. [सं. धन + आढय] धनार्थी-वि. पैशाचा गरजू. [सं. धन + अर्थ] धनांध-वि. पैशानें उन्मत झालेला. [सं. धन + अंध] धनात्यय-पु. पैसा जाणें; संपत्तिनाश. [स. धन + अत्यय]धनाध्यक्ष-पु. खजिनदार; कोशा- ध्यक्ष. धनाशा-स्त्री. पैशाची आशा: संपत्तीची इच्छा; द्रव्याची हांव धनेश्वरवि. श्रीमंत; मातबर; तालेवार; संपन्न; संपत्ति- मान. [धन + ईश्वर] धनेषणा-स्त्री. द्रव्येषणा; द्रव्याचा लोभ, इच्छा. [धन + ईषणा] धनोत्पादक-वि. संपत्ति, पैसा आणणारा; मिळविणारा.'बॅरिस्टरी वगैरे धंदे उंसाच्या चरकाप्रमाणें धनो- त्पादक नव्हत.'-टि २.४२.
जाति
स्त्री. १ जात; प्रकार; वर्ग. २ वंश; कुळ; बीज. ३ वर्ण जात पहा. ४ (गणित) अंश व छेद यांचें एकीकरण. उदा॰ विशेष-शेष जाति. ५ (साहित्य) एक अलंकार. संस्कृत आणि प्राकृत या दोहोंतहि सारखेच वाचले जातील अशी अक्षरांची रचना. ६ छंदांचा एक वर्ग. हा मात्रासंख्याक असून, षण्मात्रिक तालाचा व अष्टमात्रिक तालाचा असे याचे दोन प्रकार आहेत. [सं.] ॰दंड-पु. जातीनें लादलेला कर. २ जातिबहिष्कृत माणसानें शुद्ध झाल्यावर जातीला द्यावयाचा दंड. ॰पक्ष-पु समु- दायरीत्या जात, वर्ग, वंश (संबंध जात एक धरून विचार कर- तांना). याच्या उलट व्यक्तिपक्ष = एकटा माणूस. ॰बंधु-पु. जातीं- तील माणूस; जातभाऊ; जातभाई; ज्ञातिबांधव. ॰भेद-पु. वंश- भिन्नत्वावरून, वर्णभिन्नत्वावरून अगर निरनिराळ्या उद्योगधंद्यां- वरून समाजाचे जे वेगवेगळाले गट बनले आहेत त्यांस जाती म्हणतात. जातीमधून भिन्न भिन्न प्रकार, आचार, रूढी उत्पन्न होतात. त्यामुळें जातिभेद उत्पन्न होतात; जातींमधील भिन्नत्व; असमानता. ॰भ्रंश-पु. जातिबहिष्कृत होणें; जातीस मुकणें. ॰भ्रष्ट-वि. जातिबहिष्कृत; जातिबाह्य; बाटगा. ॰मर्यादा-स्त्री. जातीचे नियम (चालचालणुकीचे); जातीनें घालून दिलेलें बंधन. ॰लक्षण-न. जातीचे विशेष किंवा सामान्य गुणधर्म; जातीची रीत, वर्तन. ॰वंत-वि. १ उच्च घराण्यांतील, कुळांतील; खान- दानीचा; घरंदाज; कुलीन; उत्कृष्ट 'किजविज करिताती जाति- वंत पाखरें ।' -सला ४१. २ जातलग पहा. ॰वाचक-वि. १ (व्या.) वर्ग-प्रकार-भेददर्शक (संज्ञा.) याच्या उलट व्यक्तिवाचक. २ सामान्य, वर्गवाचक (नाम.) ॰वैर-न जन्मतः, स्वाभाविक वैर. ॰व्यवहार-वेव्हार-पु. विशिष्ट समाजामध्यें प्रचलित असलेल्या नीतिमार्गाचें आचरण. 'कीं जातिवेव्हारा परौता ।' -ऋ १४. ॰स्मृति-स्त्री. पूर्वजन्मस्मरण 'मग जाहली जाति- स्मृती ।' -गुच ११.९२. ॰स्वभाव-पु. १ कुळाचा, जातीचा, वर्गाचा स्वभाव; जातिलक्षण २ जन्मस्वभाव; प्रकृतिस्वभाव. जातीचा-वि. १ जातीनें; जातीसंबंधानें. 'हा जातीचा ब्राह्मण खरा-आंधळा-पांगळा-रोगी.' जातिवंत; अस्सल. 'तुका म्हणे तेथें पाहिजे जातीचें । येरा गाबाळाचे काम नोहे.' -तुगा ३५८७. ३ खानदानीचा; मोठ्या कुळांतला. ॰म्ह॰ १ जातीची खावी लात परजातीचा नको भात. २ जातिकरितां खावी माती. जातीचें लेकरूं-न. (ल.) लुच्चा माणूस; लबाड माणूस. ॰पुती-पूत-स्त्री. वंश; कुळी; जातपूत पहा. म्ह॰ जाती तशी पुती, खाण तशी माती. ॰पुतीचा-वि. खानदानीचा; कुलीन. जातीय-वि. जातीसंबंधाचा; जातीचा. 'साधूस स्वजातीय व विजातीय सर्वसमान आहेत.' वृक्ष-ब्राह्मण-पाषाण जातीय इ॰
काळीज
न. १ (हिं.) मूळ यकृत; पित्ताशय. परंतु रूढ हृदय; रुधिराभिसारक इंद्रिय. 'भेदोनि काळिजाला गेला लोका- पवाद शर... ' -मोभारतीय रामायण. २ (ल.) अंतःकरण; मर्म; हृदयांतील नाजूक भाग 'कीं काळजीं घातली सुरी ।' -रावि ४. ४९. 'खोंचोनि बोले कौरवरावो । काळिजीं घालिसी कां घावो ।' -मुसभा १७.५०. [हिं. कलिजाह्] (वाप्र.) ॰उडून जाणें- कांपणें-थरथरणें-थरारणें-धडकणें-छाती थरथरणें, कांपणें, थडथड उडणें (भीति, दुःख वगैरेमुळें) ॰कठीण- वि. (संस्कृतच्या अनुकरणावरून अशुद्ध समास) कठीण काळजाचा; निष्ठुर; कृपण; धाडसी; बेडर (माणूस) ॰काढून टाकलें तरी विश्वास न येणें-अविश्वासाची परमावधि. ॰काढून देणें-आपल्यास अत्यंत प्रिय अशी वस्तु देणें; स्वतःचें अंतःकरण देणें. ॰खाणें-फोडणें-१ छळणें; गांजणें; बेजार करणें; मर्मभेदक बोलणें. २ पश्चात्तापास, शोकास कारण होणें. ॰पाठी- मागें असणें-टाकणें-बेफिकीर असणें; निर्भय असणें. ॰फाटणें-दो जागां होणें, काळजाचें पाणी होणें- भयानें, दुःखानें विव्हळ होणें. ॰फुटणें-धीर सोडणें किंवा ठाव सोडणें. काळजाला, भोंक-घर पडणें-भयानें, आश्चर्यानें, दुःखानें धाबें दणाणणें; धक्का बसणें; हृदयाला झोंबणें. -जास फेस येणें-अतिशय तडफेनें किंवा उत्कंठेनें गुंतणें; फार परि- श्रम करून थकणें. काळजीं घाव घालणें-डाग देणें; अंतःकरणास धक्का बसेलसें करणें; मर्मावर आघात करणें. काळजीं कांटा करणें-धरणें-साता काळजाच्या पलीकडे ठेवणें- अतिशय प्रिय होणें; अति मूल्यवान समजणें; कोठें ठेवूं कोठें न ठेवूं असें होणें; अतिशय काळजी घेणें. 'काळजाचे पलीकडे त्याला ठेव.' -नाम ना ११२. काळजीं, काळजाला लागणें- अंतःकरणांत शिरणें; दुःख, वेदना उत्पन्न करीत जिव्हारीं खोंचणें; बोचणें; आंत भिनणें (औषध, विष, वस्तु, अन्न, निंदा, अपशब्द काम वगैरे) या अर्थीं किंवा आस्थेने लक्षांत ठेवणें या अर्थी उपयोग. सामाशब्द काळजाचा घड-जिवाचा कलिजा, प्राण- प्रिय माणूस. ॰चा बोका-पु. काळजाचें मांस; यकृत; पित्ताशय. (खाटिक लोकांत रूढ) उफराट्या, उलट्या काळजाचा- वि. वाटेल तें साहस कर्म करण्यात तयार होणारा.
नक्षत्र
न. १ तारा; तारका. २ चंद्राच्या कक्षेंत असलेल्या सत्तावीस तारकापुंजांपैकीं प्रत्येक. ह्या सत्तावीस तारकापुंजांचीं नांवें पुढीलप्रमाणें आहेत-अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहणी, मृग, आद्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा,. हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, जेष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, (२८ वें अभिजित्) श्रवण, धनिष्ठा, शततारका., पूर्वाभाद्रपदा,उत्तरा- भाद्रपदा, व रेवती. ३ भूचक्राच्या सत्तावीस विभागांपैकीं प्रत्येक; तेरा अंश व वीस कला इतकें अंतर ओलांडण्यास चंद्रास लागणारा काळ. ४ (गो.) जन्मटिपण. [सं.] (एखाद्याच्या) तोंडावर नक्षत्र पडणें-(सारखी) बडबड, वटवट करण्याचा स्वभाव असणें. 'याच्या तोंडावर नक्षत्रच पडलें आहे जसें ! हा मेला काय पाहिजे तसलें अभद्र बडबडतो.' -अतिपीडचरित. पायावर नक्षत्र पडणें-नेहमीं भटकत राहणें; फिरणें. हातावर नक्षत्र पडणें-चोरी करण्याची संवय असणें, सामाशब्द- ॰गंडांत- न. अश्विनी, मघा व मूळ या नक्षत्रांच्या आरंभींच्या दोन घटका व रेवती, आश्लेषा व जेष्ठा या नक्षत्रांच्या शेवटच्या दोन घटका अनुक्रमानें मिळून चार घटकांचें एक अशीं तीन गंडांतें होतात त्यापैकीं प्रत्येक. हीं जन्मकालास शुभाशुभ आहेत तीं येणेंप्रमाणें:- अश्विनी, मघा व मूळ यांच्या पूर्वार्धांत जन्म झाल्यास पित्यास अनिष्ट व रेवती. आश्लेषा यांच्या उत्तरार्धात जन्म झाल्यास बालकास अनिष्ट होत. [नक्षत्र + गंडांत] ॰दर्शन-न. १ (संध्याकाळीं) नक्षत्र, तारे दिसूं लागणें. २ नक्षत्रें दिसूं लागतात ती संध्याकाळची वेळ. [नक्षत्र + दर्शन] ॰नाथपति- पु. नक्षत्रांचा स्वामी; चंद्र. [नक्षत्र + नाथ, पति] ॰नाम-न. जन्मनक्षत्रावरून ठेवलेलें नांव. [नक्षत्र + नाम] ॰मंडल-न. तार्यांनीं व्याप्त असलेलें नभोमंडल. [नक्षत्र + सं. मंडल + वर्तुळ] ॰माला-स्त्री. १ सत्तावीस मोत्यांचा हार. २ २७ नक्षत्रांची सारणी, यादी. [नक्षत्र + सं. माला = माळ] ॰माळ-ळा-स्त्रीअव. १ विवाहादि प्रसंगी एका उंच काठीला कागद, पितळपान इ॰कांच्या फुलांच्या माळा बांधून समारंभाच्या मिरवणुकींत पुढें चालवितात ती, या नेहमीं मिरवणुकीच्या दोन्ही बाजूस दोन असतात. २ देवांच्या पुढें शोभेसाठीं मांडून ठेवितात तीं चांदीपितळेचीं लहान भांडीं समुच्चयानें. 'नाना उपकर्णे नक्षत्रमाळा । नाना वस्त्र सामुग्री ।' -दा ४.५. २३. [नक्षत्र + माळ-ळा] ॰यंत्र-न. वेधयंत्र; सूर्य व इतर तारे यांची क्षितिजापासून उंची मोजण्याचें यंत्र. [नक्षत्र + यंत्र] ॰वारस-पु. आषाढ, भाद्रपद व कार्तिक या महिन्यांतील शुक्लपक्षाच्या द्वादशीं तिथींचा अनुक्रमें अनुराधा, श्रवण व रेवती या नक्षत्रांशीं योग असतो असा दिवस. हरिवारस अर्थ २ पहा. [नक्षत्र + सं. वारस = दिवस] ॰विद्या-स्त्री. ज्योतिष शास्त्र; ग्रहगणितशास्त्र. ॰सूची-वि. ज्योतिषशास्त्राचें ज्ञान नसून केवळ नक्षत्रें माहित आहेत म्हणून स्वतःस ज्योतिषी म्हणविणारा मुर्ख (मनुष्य). [नक्षत्र + सं. सूचि]. नक्षत्रांचा घड-पु. तारकांचा पुंज; नक्षत्रपुंज. 'अब्जादि तडतड गिरीवरि खदखड । नक्षत्रांचा घडघड लोले व्योमीं चांदवा ।' नक्षत्रासारखा-वि. (नक्षत्राप्रमाणें) सुंदर; रूपवान; लावण्ययुक्त. 'जन्मनक्षत्राच्या उपजत जोरवरच नक्षत्रासारखा मुली मिलविण्याचे दिवस गेले ते.' -भा ३३.
द्रव्य
न. १ धन; संपत्ति; मालमत्ता; पैसा. 'द्रव्येण सर्वे वशा:' = द्रव्यानें हवा तो मनुष्य वश होतो. २ वस्तूंतील मूलभूत घटक, तत्व, अर्थ, विषय, पदार्थ, प्रकृति. ३ सृष्टीचें मूलतत्त्व. हीं तत्त्वें नऊ मानितात. पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश, काळ, दिशा, मन व आत्मा; पंचभूतात्मक वस्तु. ४ औषध; औषधी वस्तु. ५ (व्या.) ज्यास लिंग, वचन, विभक्ति इ॰ लागतात असा शब्द. याच्या उलट अव्यय. ६ घटक; अवयव; अंगभूत पदार्थ, बाब, विषय; मुद्दा. उदा॰ औषधी-सुगंधी-होम- द्रव्य. ७ (रसा.) जागा व्यापणारा व पृथ्वीनें आकर्षिला जाणारा पदार्थ, वस्तु; जडपदार्थ. ८ (पदा) भौतिक जगांतील वस्तू ज्यापासून बनल्या आहेत ते सूक्ष्म कण प्रत्येकीं. ९ (यंत्र.) जी इंद्रियगोचर असून जीस कांहीं आकार व वजन असतें म्हणजे जीपासून कांहीं प्रतिबंध होतो ती वस्तु. -यंस्थि १.१० (सामा.) पदार्थ; वस्तु. [सं]. द्रव्याचा धूर निघणें-पुष्कळ श्रीमंत असणें; घरीं लक्ष्मी पाणी भरणें. द्रव्याचे उबेनें उडी मारणें-पैशाच्या बळावर वाईट, धाडसी काम करण्यास प्रवृत्त होणें. द्रव्याचे धुडके उडविणें-करणें-पैसा उडविणें, नासणें, उधळणें. द्रव्यावर ताव देणें-पैसा गिळंकृत करणें, दाबणें. सामाशब्द- ॰दृष्टि-वि. द्रव्यादृष्ट याचें अपभ्रष्ट रूप. द्रव्यादृष्ट पहा. ॰दृष्टि-वि. द्रव्यावर लक्ष देऊन, द्रव्य मिळेल तरच काम करणारा; स्वार्थी. [द्रव्य + दृष्टि] ॰वाचक-पु. (व्या.) नामाचा एक प्रकार; पदार्थाचें किंवा वस्तूचें नाव; पदार्थवाचक नाम. उदा॰ दहीं, दूध, तेल इ॰. ॰वाद-पु. पंच त्त्वांविषयींचें मत; सृष्टि पंचभूता- त्मक मानणें. ॰वादी-पु. वरील तत्त्वाचें प्रतिपादन करणारा. ॰वान-शाली-वि. श्रीमंत; धनवान् ॰हीन-वि. गरीब; निर्धन. द्रव्यादृष्ट-दृष्टि-नस्त्री. नशिबाची, भाग्याची अनुकूलता; द्रव्य- योग असणारें चांगलें नशीब, भाग्य. 'मोठी विद्या असली, मोठा पराक्रम असला तरी द्रव्यादृष्ट असल्यावांचून पैका कांहीं मिळायाचा नाहीं.' -वि. पैसा मिळण्याचें, संपत्तियोगाचें (नशीब, भाग्य). [द्रव्य + अदृष्ट = नशीब] द्रव्यानुकूल्य-न. संपदा; समृद्धि; स्वास्थ्य; द्रव्यसामर्थ्थ. द्रव्येपणा-स्त्री. १ द्रव्याची इच्छा; द्रव्यासाठीं धडपड. २ स्वतःच्या पैशावर, मालमत्तेवर प्रेम.
नरक
पु. यमनगरींतील विष्टा, रक्त, पू इ॰ घाण पदार्थांनीं भरलेली, पापी लोकांनां यातना भोगण्याची जागा. याचे ८४ प्रकार आहेत. पापी लोकांसाठीं मृत्यूनंतरचें स्थान, लोक. २ (ल.) विष्टा; मल; घाणीचा संचय; (सामा.) विष्टा; गू. ३ विष्णूनें मार- लेला एक राक्षस. ४ (ख्रि.) ईश्वरी सहवासाचा व तज्जन्य आध्या- त्मिक अनुग्रहाचा अभाव. 'विरह तुझारे नरक भयंकर । भासे प्रलयानल पेटे ।' -उसं २९३. ५ (ख्रि.) सैतान व दुरात्मे यांचें वसतिस्थान. तुझें संपूर्ण शरीर नरकांत टाकलें जावें यापेक्षां तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा यांत तुझें बरें आहे.' -मत्त ५.२९. [सं.] (वाप्र.) ॰अंगावर घेणें-(एखाद्याचें) वाईट, दुष्कीर्तिकारक काम अंगावर घेणें. ॰उपसणें-(एखाद्याच्या) घाणे- रड्या गोष्टी, कृत्यें बाहेर काढणें; (एखाद्या) घाणेरड्या गोष्टीची, प्रश्नाची शहानिशा, चर्चा करणें. ॰तोंडांत सांठविणें-तोंडांत नेहमीं अपशब्द, ग्राम्य शब्द भरलेले असणें; नेहमीं ग्राम्य, अश्लील, शिविगाळीचें भाषण करणें. -काची वाट दाखविणें-(एखाद्यास) दुर्मार्गप्रवृत्त करणें; वाईट उदाहरण घालून देणें. -काची सामुग्रीस्त्री. १ (नरकवासास पात्र करणार्या) दुष्कृत्यांचा समुदाय. २ (रागानें) संसार. ३ (रागानें) नकोशी, तिरस्करणीय गोष्ट, काम. -काचें खापर-टोपलें-न. विष्टेनें भरलेलें टोपलें. २ खापर. ३ (ल.) कर्ज; आंतबट्ट्याचा धंदा; तिरस्कारणीय, नकोशी गोष्ट, काम, लोकापवाद, अपकीर्ति इ॰. (क्रि॰ येणें; फुटणें; डोइ- वर येणें; फुटणें; घेणें). -कांत जीभ घालणें-१ खोटें बोलणें. २ घाणेरड्या गोष्टीचें अभिवचन देणें. -कांत धोंडा टाकून शिंतोडा घेणें-१ घाणेरडीं कृत्यें करण्यांत पुरुषार्थ, समाधान मानणें. २ वाइटाशीं संबंध ठेवून त्याचा वाईट परि- णाम भोगणें. -कांत पचणें-घाणेरड्या, किळसवाण्या जागेंत, परिस्थितींत खितपत पडणें. -कानें अंग भरणें-(ल.) कर्जाखालीं बुडणें; पराकाष्ठेचें कर्जबाजारी होणें. -कासारखा घाणेरा-वि. नरकाप्रमाणें तिरस्कारणीय, नकोसा वाटणारा (दारुड्या, तगादेदार, धरणेकरी, गळग्रह, नकोशी गोष्ट इ॰). -कासारखें घाणणें-(एखादी गोष्ट, व्यक्ति इ॰) नरका- प्रमाणें तिरस्कारणीय वाटणें. -कीं धजा-ध्वजा लावणें- ज्यामुळें नरकांत श्रेष्ठंपणा गाजेल अशीं घाणेरडीं कृत्यें करणें. लोकांच्या नरकांत बुडणें-लोकांचें पराकाष्ठेचें देणें होणें; लोकांच्या कर्जांत बुडणें. सामाशब्द- ॰कुंड-न १ पापी मनुष्य मरणोत्तर ज्यांत खितपत पडतो असें नरकाचें कुंड. अशीं ८६. कुंडें आहेत. २ (ल. तिरस्कारार्थी) स्त्रीचा गर्भाशय. 'नऊ मासपर्यंत प्राण्यास नरकुंडांत वास घडतो.' [सं. नरक + कुंड] ॰केंस- पुअव. (मुलास) उपजत असलेले, गर्भावस्थेंत आलेले, जन्मल्या- पासूनच असलेले केंस. [नरक + केंस] ॰चतुर्दशी-स्त्री. विष्णूनें नरकासुराचा वध केला तो आश्विन वद्य चतुर्दशी दिवस. या दिवशीं पहांटेस चंद्रोदयीं अभ्यंगस्नान करून यमतर्पण करावयाचें असतें. [नरक = नरकासूर + चतुर्दशी] ॰पाल-ळ-पु. यम. 'स्तुत होय स्वःपाळा केव्हां जी जी म्हणे नरकपाळा ।' -मोसभा ६.९१. [नरक + सं. पाल् = रक्षण करणें] ॰वणी-न. घाणेरडें व दुर्गंधयुक्त पाणी. [नरक + पाणी] ॰वासपु. १ नरकांत राहणें. २ (ल.) गर्भवास. ३ (एखाद्या) घाणेरड्या किंवा आपत्ति भोगाव्या लाग- णार्या जागेंत राहणें. ४ अधर्मस्थल. [नरक + वास = राहणें] नर- काड-डी, नरकड-स्त्री. घाणीची व दुर्गंधयुक्त जागा; गुखाडी. 'सोंगाच्या नरकाडीं । तुका बोडोनिया सोडी ।' -तुगा २८१९. [नरक]
भो(भों)वरा
पु. १ लहान मुलाचें, दोरी गुंडाळून गरगर फिरविण्याचें लाकडाचें एक खेळणें. २ मंडलाकार फिरणारें पाणी; आवर्त. ३ शरीरावरील केसांची मंडलाकार रचना. ४ भोंवरीचें फळ. ५ मातींत खळी करून त्यांत राहणारा एक क्षुद्र कीटक. ६ शेंडीच्या भोंवतीं शोभेसाठीं राखतात तें केशवलय; घेरा; संजाप. ७ गाय, म्हैस इ॰ च्या अंगाला स्पर्श झाला असतां त्वचेवर उत्पन्न होतें तें वर्तुळाकार स्फुरण. ८ (क्व.) गिरकी; चक्कर; फेरा; वळसा. (क्रि॰ देणें; घेणें). ९ एक वनस्पति; तेड; पांढरें निशोत्तर. १० (काव्य) चक्र; (सामा.) चक्राकार फिर- णारी कोणतीहि वस्तु. 'कुलालाचा भोवरा । जैसा भवे गरगरा ।' [सं. भ्रमर; अप. भवंर; हिं. पं. भौंरा] ॰करणें-गाय, म्हैस इ॰ स स्पर्श झाला असतां त्यानीं वर्तुळाकार स्फुरण करणें. भोवर्यांत सांपडणें-लवकर नाहींशा न होणार्या संकटांत, अड- चणींत गुंतणें. (पायाला) भोंवरा असणें-सारखें फिरत राहणें. भोंवरकडी-स्त्री. गुरांच्या दाव्याला असते तशी फिरती कडी. भोवरजाळी-स्त्री. भोवर्याची दोरी. भो(भों)वरी-स्त्री. १ एक प्रकरचा वेल. २ रानसालंमिश्री. ३ पायांत कांटा मोडल्या- मुळें तेथें जी वाटोळी गांठ उत्पन्न होते ती; चंकदळ. ४ कणे- कडाचें टोंक रुखाच्या ज्या पोकळ भागावर टेंकतें तो भाग. ५ मंडलाकार भ्रमण; गिरकी; प्रदक्षिणा; वळसा; फेरा (नाचणारा, भोंवरा इ॰ चा). (क्रि॰ घेणें; देणें). ६ घोड्यांतील व्यंग (केंसांचें वलय किंवा चकंदळ). ७ (अशिष्ट) मोहरीचें बीं. ८ झालर. 'तो विणला पाट सुतानें । मोत्यांची भोवरी ।' -वसा १५. ९ एक प्रकारचा दागिना; बुगडी. 'पै आकारा नाम भोंवरी । येर सोनें तें सोनें ।' -ज्ञा १०.९०२. १० (ना.) एक लहान पाखरूं. ११ बैलगाडीचें चाक. १२ (कों.) भोंवार पहा. १३ (गो.) टकळी; चाती.
बिंब
न. १ चंद्र, सूर्य, ग्रह इ॰ चें मंडळ. धूम्ररजांची. पिंजरीं । वाजतिया वायूतें जरी होकारी । कां सूर्यबिंबामाझारीं । आंधारें शिरे ।' -ज्ञा ९.१२५. २ सूर्यमंडल. 'जैसें बिंब तरी बचकें एवढें । परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडें ।' -ज्ञा ४.२१५. ३ आरसा, पाणी इ॰च्या पृष्ठभागावर ज्याचें प्रतिबिंब दिसतें तो पदार्थ. याच्या उलट प्रतिबिंब. ४ राज्यादि अधिकारावर असतां परा- क्रमादि गुण असोत किंवा नसोत पण ज्याच्या उपस्थितीमुळें खालच्या माणसांना शोभा येते, आवेश चढतो असा पुरुष, पदार्थ. 'सरदारलोक जाऊन लढाई देतील परंतु राजाचा पुत्र उगीच बिंब म्हणून बरोबर घ्यावा.' ५ (साहित्य) दृष्टांत, प्रमाण इ॰ नीं प्रति पादन करावयाचा विषय; प्रतिपाद्य अर्थ. ६ मूर्ति; प्रतिमा. 'तो चालतें ज्ञानाचें बिंब । तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ ।' -ज्ञा १०.७७. ७ ओंकाराची अर्धमात्रा. 'तंववरी तो समीरु । निराळीं कीजे स्थिरु । मग लग्नीं जेविं ॐकारु । बिंबीचि विलसे ।' -ज्ञा ८. ११६. ८ प्रतिबिंब; प्रतिच्छाया. ९ (पिकलेलें) तोंडलें. [सं] ॰दान- न. जन्मराशीस रवि किंवा चंद्र असतां ग्रहणाच्या वेळीं शांत्यर्थ करावयाचें सोन्यारुप्याचें बिंबदान. ॰प्रतिबिंबभाव-पु. बिंबभूत व प्रतिबिंबभूत अर्थाचा परस्पर संबंध. ॰फळ, बिंबा(बी)फळ- न. पिकलेलें तोंडलें. 'अधर दोन्ही जाले सधर । बिंबफळें रंगाकार ।' -एरुस्व ७.२८. 'भासे मनांत मजबिंबफळभ्रमानें ।' -र १५. बिंबाधर-पु. (काव्य तोंडल्याच्या फळाप्रमाणें असलेले ओंठ; तांबडे ओंठ. -वि. बिंबाप्रमाणें लाल ओंठ असणारी (स्त्री, सुंदरी). 'मधुरा, बिंबाधरा ।' -शारदा. [बिंब + अधर] बिंबोष्ठ-पु. खालचा ओंठ. 'बिंबोष्ठ तळहस्तें स्पर्शोनी । श्रीधर नाम उच्चारावें ।' -गुच ३६.१५८.
गवत
न. १ तृण; शष्प; याचे पुष्कळ प्रकार आहेत-पवनी, गोंडवळ, कुसळ, मारवेल, वरवेल, सुरी, कुंधा, काशा, काऊस, तिखाडी, करडू, शिपी इ॰ २ घांस; चारा; ज्या वनस्पतीच्या मुळ्या व पानें सर्व प्रकारचीं जनावरें खातात तें. [सं. गो + अत्त; प्रा. दे. गवत्त] (वाप्र.) गवत(ता)ळणें-अक्रि. (कों.) १ गवतानें आच्छादित होणें (नवीन केलेली पाळ, शेत, गवताची हुंडी). २ गवत किंवा रानझाडांनीं गुदमरणें, खुरटणें (पिकांची वाढ). म्ह॰ (व.) गवताची गरव्हार उताणी चाले = एखाद्या जयानें किंवा क्वचितकाळीं झालेल्या धनलाभानें गर्विष्ठ बनून छाती काढून चालणार्यास म्हणतात. सामाशब्द- ॰कटाई-स्त्री. १ गवत कापण्यास परवानगी मिळण्याची पट्टी, कर. २ सरकारी पागांकरितां गवतखरेदीचा खर्च भागविण्यासाठीं बसविलेला कर. ३ गवत कापण्याची मजुरी. ४ (सामा.) गवतकापणी. ॰काडी- स्त्री. सामान्यपणें गवत, चारा इ॰ ॰कापी-वि. (निंदार्थीं) लोणीकापी (तलवार, वस्तरा यांची धार बोथट असल्यास त्यास म्हणतात). ॰काप्या-अडाणी न्हावी, शिपाई, कामकरी व त्याचें हत्यार किंवा शस्त्र [गवत + कापणें] ॰चराई-स्त्री. कुरणांतील चरणावळ; चरण्याचें भाडें. गवतशी-स्त्री. (कों.) पेंढ्याची एक काडी. -ताचा उंट-पु. गवत्या टोळ; नाकतोडा; याचे पंख सरळ असून हा काळोख्या रात्रीं झिग झिग करीत हिंडतो. -तारू-वि. गवती छपराचें. 'एक गवतारू खोप रहायातें ।' -केक १५. -ताळ-वि. सपाटून गवत उत्पन्न होणारी (जमीन). विपुल गवत असलेली (जागा). -ती चहा-पु. पातीचा चहा. हा हिरवा व खरखरीत असून याचें सुवासिक तेल काढतात. तापांत घाम येण्यासाठीं हा देतात. याची उंची १-१।। हात. पाती कढींत घालतात. -ती जमीन-स्त्री. गायरान; गवताची जागा. -तुलें-न. (माण.) एक तृणधान्य. -त्या-वि. १ गवता- विषयीं. २ गवतकाप्या; अडाणी. -त्यागोमाजी-पु. (तिरस्का- रार्थी-एक कल्पित विशेष नाम) अलबत्यागलबत्या माणूस. कोणी तरी अप्रसिद्ध, गल्लीकुचींतील माणूस; भलतासलता, बिन ओळखीचा, क्षुद्र, गफलती; गवतकाप्या मनुष्य; गवत्या.
घट
पु. १ पाणी इ॰ ठेवण्याचें भांडें; घडा; घागर (मातीची किंवा धातूची). 'जैसी भांडघटशरावीं । तदाकारें असे पृथ्वी ।' -ज्ञा १३.८७२. २ नवरात्रांत उपास्य देवतेजवळ पाण्यानें भरून ठेवलेली मातीची घागर; घडा; कलश; नवरात्र बसणें; विशेष प्रकारची देवीची पूजा. ३ (ल.) विश्व; ईश्वरानें निर्माण केलेलें यच्चयावत् जगत्; शरीर इ॰ सृष्ट जीव, पदार्थ. 'म्हणौनि प्राणिजाताच्या घटीं । करूनि कंदावरी आगिठीं ।' -ज्ञा १५.४०७. 'तें विस्तारिलें सर्व घटीं ।' ४ वाद्यविशेष. दक्षिण हिंदुस्थानांत मातीचा माठ पालथा घालून त्याच्या पाठीवर दोन्ही हातांनीं तबल्यासारखें वाजवून गायनाची साथ करतात. ५ नवरात्रांकरितां कुंभाराकडून मातीची घागर घेण्याचा हक्क. [सं. घट] (वाप्र.) घटीं बसणें-अक्रि. १ (नवरात्र इ॰कांत) आराध्य देवता घटावर अधिष्ठित होणें; देवतेची स्थापना होणें. २ घटस्थापन करणारा यजमान अथवा उपाध्याय यानीं घट असे- पर्यंत व्रतनियमानें असणें. ३ (ल.) (आजारामुळें-आळसानें किंवा कांहीं कारणानें) घरांत बसून असणें. ४ (स्त्रीनें) विटाळशी होणें; अस्पर्शपणामुळें निरुद्योगी बसून असणें. सामाशब्द- ॰क्रिया-स्त्री. (गो.) घटस्फोट पहा. 'तदनंपर हिंदूरीतिप्रमाणें विधियुक्त घट- क्रिया करून...' -राजकार ५. (गोमंतकांतील रीतिभाती, भाषां- तर १८८०.) ॰पट, घटंपटं-स्त्री. न. न्यायशास्त्रांत नेहमीं घट (घडा) व पट (वस्त्र) यांचीं उदाहरणें देण्याची चाल आहे. त्यांत घट व पट हे शब्द पुढील अर्थीं रूढ आहेत- १ फुशारकीचें- शेखीचें-चढाईचें-पोकळ ऐटीचें-भाषण. २ असंबद्ध. टाळाटा- ळीचे बोलणें; लप्पेछप्पे; थाप. ३ निष्कारण उरस्फोड; वाचा- ळता; व्यर्थ बडबड; माथाकूट; वितंडवाद; शब्दावडंबर. उ॰ (कवी निरंकुशतेचे भोक्ते असल्यामुळें नैयायिक व वैय्याकरणी यांनीं घातलेल्या भाषेवरील व्याकरणविषयक निर्बंधाच्या खटाटो- पास घटपट असें हेटाळणीनें संबोधितात. कवींना साहजिकच व्याकरणविषयक सूक्ष्म निर्बंध म्हणजे व्यर्थ उरस्फोड, माथाकूट आहे असें वाटतें). 'नलगे व्याकरणाची न्यायाची घटपटादि खटपट ती । वैकुंठ पेठ मोठी नामावरि हीनदीन खट पटती ।' -कीर्तन १.३७ [घट + पट] घटंपटा-स्त्री. (व.) खटपट; अवडंबर; लटपट; 'त्याच्या लग्नाच्या वेळीं मोठी घटंपटा झाली.' ॰भंग-पु. घटाचा नाश; घागर फुटणें. 'घटभगीं घटाकाशें । आकाश जेवीं ।' -ज्ञा १४.५४. ॰मठ-पु. १ घट आणि मठ. २ (ल.) सर्व सृष्ट वस्तू (ज्यांत पोकळ अवकाश आहे अशा) 'घटमठ नाम मात्र । व्योम व्यापक सर्वत्र ।' -ब २६२. 'मजवरी घालती व्यर्थ आळ मी सर्वातील निर्मळ । जैसें आकाश केवळ । घटमठांशीं वेगळें ।' -ह ७.१५२. घटाकाश आणि मठा- काश असे प्रयोग वेदांतांत ऐकूं येतात. [घट = घागर + मठ = मठ-राहण्याचें ठिकाण; घर] ॰माळ-स्त्री. नवरात्रांत देवीच्या पूजेकरितां स्थापन केलेला घट व त्यावर सोडलेली फुलांची माळ; देवतांप्रीत्यर्थ वसविलेला माळेसहित घट. [घट + माला] ॰वात-स्त्री. १ नवरात्रांत घट बसविणे व अखंड दिवा लावणें. २ या हक्काचें वेतन, मान. 'होलीस पोली व घटवात वगैरे मानपान जो घ्यावयाचा तो घेतो.' -मसाप २.१७२. [घट + वात (दिव्यांतील बत्ती)] ॰वांटप-पु. न. (कों.) घर- दार, भांडीकुंडीं, जमीन जुमला इ॰ कांची (भावाभावांत- नातेवाईकांत) वांटणी; [घट + वांटणें] ॰स्थापना-स्त्री. घट बसविणें; आश्विन शुद्ध प्रतिपदेस मातीच्या स्थंडिलावर घट ठेवून त्यावर पूर्णपात्र ठेवून त्यांत कुलदेवतेची स्थापना करून तिची नऊ दिवस पूजा करतात, दररोज घटावर फुलांची नवी माळ लोंबती बांधतात, अखंड दीप जाळतात. आणि सप्तश- तीचा पाठ इ॰ कर्में करतात. त्या विधीस घटस्थापना म्हणतात; देवतेची घठावर स्थापना; देवप्रतिष्ठा. [घट + स्थापना] ॰स्फोट- पु. (घागर फोडणें) १ गुन्हेगाराचा जिवंतपणी प्रेतविधि. जो पतित प्रायश्चित्त घेऊं इच्छित नाहीं त्याला वाळीत टाकण्या- करितां -समाजाच्या दृष्टीनें तो मेलेलाच आहे असें दर्शविण्या- करितां-मातीची घागर फोडणें इ॰ अशुभ क्रिया-विधि. २ जाति बहिष्कृत करणें. ३ नवरा-बायकोची फारकत; पंचायतीच्या किंवा कोर्टाच्या मदतीनें विवाहाचें बंधन रद्द ठरवून नवरा-बाय- कोनीं स्वतंत्र होणें; काडीमोड; (इं.) डायव्होर्स. 'इंग्रज लोकांतील घटस्फोटाचे वाईट वाईट खटले कोर्टापुडें येतात....' -टि ४.९५. 'जारकर्मांत विधवा गरोदर सांपडली असतां तिला बहिष्कृत करून तिचा घटस्फोट नामक विधि करतात.' -व्यनि २ घटाकाश-न. (वेदांत) घटांतील पोकळी; अवकाश, रिती जागा. 'कोणें धरोनियां आकाश । घरीं घातलें सावकाश । तरी घटयोगें घटाकाश । मिथ्या गगनास नांव आलें ।' -एभा १३. ७३२. -दा ८.७.४९. [घट + आकाश = पोकळी]
व्यवहार
पु. १ कार्य; क्रिया; व्यापार. २ वहिवाट; पद्धत; रीत. ३ धंदा; देवघेव; व्यापार. -ज्ञा ७.२६. ४ व्यवसाय; उद्योग; काम. ५ न्यायालयाची वहिवाट; कोर्टाची रीत. ६ खटला; चौकशी. 'कोणत्याही व्यवहाराचा निर्णय करतांना सात ससभासदांचे सल्यानें निकाल करावा ।' -टि १.१६०. ७ न्याया- सयांत निर्णयासाठीं येणारी गोष्ट. ८ योग्य वर्तणूक, वर्तन. ९ भांडवल. 'कृतघ्ना उपेगु केला । कां चोरा व्यवहारु दिधला ।' -ज्ञा १३.७२८. १० संज्ञा. 'मग उत्तम ओघ सिंधु । हा नुरेचि व्यवहारभेदु ।' -ज्ञा १६.१३९. [सं.] ॰कुशल-चतुर-दक्ष-द्रष्टा-निपुण-वि. व्यवहारांत हुषार, तरबेज, तज्ज्ञ. ॰दर्शन-न. न्यायतत्त्वशास्त्राचा अभ्यास. 'राजानें व्यवहारदर्शन नित्य करीत असावें.' ॰धर्म-पु. व्यवहारशास्त्र पहा. ॰पद- न. १ खटला होण्यासारखी गोष्ट. २ खटला; कायदेशीर इलाज. ॰यात्रा-स्त्री. व्यवसाय; व्यवहारक्रम. शब्दांच्या व विचा- रांच्या भरभक्कम शिदोरीवरच सगळे लेखक, वक्ते, धर्मोप- देशक, वगैरे लोकांची व्यवहारयात्रा चालते.' -शर (प्रस्तावना). ॰विषय-पु. व्यवहारपद. ॰शास्त्र-न. सामाजिक चाली- रीती, व्यवहार यांसंबंधी नियम. याच्या उलट धर्मशास्त्र. ॰शुद्ध- वि. योग्य वर्तनाचें, व्यवहाराचें; चोख. ॰शून्य-ज्ञानशून्य- वि. व्यवहाराच्या कामीं अडाणी; रातीचा व्यवहार माहीत नस- लेला. ॰ज्ञ-वि. १ वयांत आलेला; अज्ञान नसलेला; सज्ञान (कायद्याच्या दृष्टीनें). २ व्यवहारांत कुशल; तरबेज. ॰ज्ञान- न. व्यवहारासंबंधी चांगली माहिती. व्यवहारणें-उक्रि. योग्य कामीं लावणें; उपयोजणें. 'मनप्रवर्ते इंद्रियद्वारे । बाह्यविषयीं व्यवहारे ।' -परमा ६.१२. व्यवहारि(री)क-वि. व्याव- हारिक पहा. व्यवहारी-वि. १ व्यवसायांत, धंद्यांत गुंतलेला; धंदेवाईक. २ व्यापारी. व्यवहारी अपूर्णांक-पु. (गणित) एका संख्येचे वाटेल तितके भाग पाडून त्यांपैकीं कांहीं घेणें. व्यवहारी ज्योतिषी-पु. मुंज, लग्न इ॰ चें आन्हिक चालविणारा ब्राह्मण; कांहीं ठिकाणीं याच्याकडे धर्माधिकाऱ्याचेहि हक्क अस- तात. व्यवहारी बस्तानी-स्त्री. (गणित) रुपयाचे पैसे कितीहि असले तरी १६ गंडे (खुर्द्यांतले) म्हणजे १ रुपाया असा हिशेब करणें. व्यवहार्य-वि. १ उपयोगाला, व्यवहाराला योग्य, अवश्य, शक्य (मनुष्य, वस्तु इ॰). २ अनुसरण्याला, करण्याला योग्य (धंदा, उद्योग). ३ कायदेशीर इलाज करण्याजोगा. व्यावहारिक-वि. १ व्यवहारासंबंधी (भाषा, लिपि इ॰). २ रूढ; सामान्य; नेहमीचें. ३ व्यवहारोपयोगी; व्यवहाराला योग्य, इष्ट. [सं.] ॰अपूर्णांक-पु. व्यवहारी अपूर्णांक पहा. ॰दिवस-पु (ज्यो.) मध्यम सौरदिवस. हा रात्रीं १२ पासून दुसऱ्या रात्रीं १२ पर्यंत धरतात. (इं.) सिव्हिल डे. ॰नाम- नांव-न. १ प्रचारांतील, परिचयाचें नांव; चालतें-वाहतें नांव. उदा॰ आण्णा, आबा, आत्या इ॰. २ नक्षत्र नामाखेरीज मुला- मुलाचें नांव ठेवतात तें. उदा॰ गणेश, नर्मदा इ॰ ॰नीति-स्त्री. शिष्टाचार; सामान्य, व्यवहारांतील नीति. ॰वर्षन. सरकारी वर्ष (३६५ दिवसांचें); कायद्याप्रमाणें ठरलेलें वर्ष. ॰शिक्षण- न. १ व्यवहार करण्यास उपयुक्त असें शिक्षण. याच्या उलट पुस्तकी शिक्षण. २ धंदेशिक्षण.
काय
सना. १ कशाचा? कसला? कोणता? 'आनृण्य न जोडावें तरि आम्ही अर्थ जोडिला काय' -मोभीष्म १२.६०. 'प्रसाद मग काय तो जरि निवरिना लाघवा ।' -केका ६६. २ जें; जें काय. 'तो काय देईल तें घेऊन ये.' ३ किती मोठा; केवढा; 'हा काय हो मूर्ख ।' 'दुःखामयेंचि सरलें, सुख काय सांगें ।' -वामन स्फुटश्लोक ६९, (नवनीत पृ. १४१.) ४ (गो.) मुळींच; कांहीं सुद्धां. 'पांचा नळांत जेव्हां काय दिसे- नाचि भेद लव तीस' -मोवन. ४.७१. 'लोभ केलिया कायही नुरे' -नरहरी गंगाधररत्नमाला ३४. (नवनीत पृ. ४२०). ५ तुच्छतादर्शक. 'हा काय रत्नभोक्ता मारू अनुताप पावुनी हाका ।' -मोआदि ३२.१७. 'जिउबा बोले गर्जून मोगल काय आणिला जिन्नस ।' -विवि ८.४.८०. ६ एखाद्या समुच्चयांतील निरनिराळ्या वस्तु, किंवा निरनिराळे प्रकार दाखविणारें सर्वनाम. 'सजगुरा काय, जोंधळा काय, गहूं काय, जो जिन्नस पाहिजे तो आहे.' ७ द्विरुक्ति (काय काय); संख्याविस्तार, भेद याबद्दल आश्चर्य दाखविण्या- साठीं, एखाद्या पदार्थाचा विशेषपणा किंवा भिन्नपणा दाखविण्या- साठीं. 'मी कायकाय त्याचे गुण सांगू?' 'त्यानें काय काय तुला सांगितलें किंवा कायकाय पदार्थ तुला दिले. म्ह॰ १ (गो.) कांय दीस सुनेचे कांय दीस मायेचे = कांहीं दिवस सुनेचे कांहीं सासूचे. २ काय करूं कसें करूं = कांहींच न सुचणें. ॰एक-कांहीं; किती; कोणी; कित्येक. 'काययेक उपजतां मरती' -तुगा ७२५. ॰क- कांहीं एक; कोणतें. 'दिनानाथ द्वारकाधीश साह्य जरी तरी कायक न करी' -राला ११. ॰गे बाई तरी-क्रिवि. (बायकी)एक वाक्प्रचार. (आश्चर्यदर्शक). ॰की-कोण जाणें; ठाऊक नाहीं अशा अर्थाचें उत्तर. 'माझा बैल इकडून गेला काय? उत्तर:-काय कीं.' ॰जाणें-कोण जाणतो? कोणाला ठाऊक? कोण सांगेल? (अशिष्ट लोकांत हा प्रयोग रूढ आहे.)' ॰जाळणें-(निरुप- योगी, कुचकामाच्या वस्तूस अनुलक्षून एक वाक्प्रचार) काय उपयोग? काय जाळावें (जळे) नेऊनि ' -दावि २१०. 'जैसें विगत विधवेचें स्वरूप । यौवन काय जाळावें ।' 'काय जळ्ळें दिवसभर अभद्र बोलणें?' ॰तो-(तिरस्कारदर्शक) कःपदार्थ; यःकश्चित. ॰माय-(कु.) कांहीं [काय द्वि. कांहीं बाही] ॰म्हणून-कशाकरितां ॰लें-ह्यलें-(ना.) कशाला? कशाकरितां? कां म्हणून? ॰शी-सी-सें-कितीशी? कोणती? कशाची? काय होय? कशाचें? कशाला? क्षुद्रतादर्शक; कःपदार्थ. 'दयानिधी तुम्हां- पुढें जनकथा अशा कायशा ।' -केका २६. 'इतरांची शक्ति कायशी ।' -दावि ४०५. 'ब्रह्मविद्येची गोष्टी । त्यांसी कायसी ।' -विपू १. ५७. 'तया साम्यता कायसी कोण आतां' -राम ६०. 'समर्था- घरीं कायसें उणें' -दावि २१. ॰सया-कशाला? कशाचें? 'सांगा कवण तें ब्रह्म । कायसया नाम कर्म ।' -ज्ञा ८.२. ॰सा- वि. १ (अनिश्चितार्थीं) एखादी गोष्ट निश्चित न आठवतां तिची साधारण आठवण असतां योजतात. 'त्यानें कायसा निरोप सांगितला होता पण मी विसरलों.' २ कशासारखा. ३ कशाचा. 'जनीं मूर्ख हो बोल कायसा आतां -दावि १७८. ४ कशासाठीं? कशाकरितां? काय फायद्याचा? काय उपयोग? 'तेथें कायसा या ग्रंथाचा उद्यम ।' -विपू ७.१५४. ॰साच-वि. कसाचसा; कसासाच; बरोबर वर्णन करतां येत नाहीं असा, अशासारखा; चमत्कारिक; आश्चर्य उत्पन्न करणारा. ॰साठीं-(व.) कशा- साठीं. ॰सें-न. कांहींसें. 'असेंच कायसें तुम्हीं म्हणाला होता खरें!' -अस्तंभा ६६. ॰सेसें-क्रिवि. कांहीं तरी एक. मुलांसाठीं बाईसाहेबानीहि कायसेसें केलें आहें.' -कोरकि २६. ॰सेना -नी-नें-कशानें; कोणत्या कारणानें. 'कायसेनी पाहुणेरु क्षीर- सागरा ।' -ज्ञा १०.११. 'तें तूं म्हणसी कायसेन । ऐक सांगेन उद्धवा ।' -एभा २९.८३६. ॰होय-काय पर्वा आहे? काय उपयोग आहे? 'आंधळ्याला बगीच्या काय होय.' -नि ५१०.
गुण
पु. १ मनोधर्म किंवा पदार्थाचा धर्म; त्यांतील बल; तेज; सत्त्व; अंतःस्थित धर्म; विद्या, कला, सत्य, शौर्य इ॰ धर्म. 'एवं गुण लक्षण ।' -ज्ञा १७.१३१. २ (न्यायशास्त्र) रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिमाण, पृथक्त्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, गुरुत्व, द्रवत्व, स्नेह, शब्द, बुद्धि, सुख, दुःख, इच्छा, दोष, प्रयत्न, धर्म, अधर्म, संस्कार हे २४ धर्म. ३ सृष्ट, उत्पन्न केलेल्या वस्तूंचा धर्म. हे गुण तीन आहेत; सत्व, रज, तम. हे ब्रह्मा, विष्णु, शिव यांचें अनुक्रमें लक्षण दर्शवितात. 'गुणीं देवां त्रयी लाविली' -ज्ञा १८.८१७. ४ उत्कृष्टता; योग्यता; व्यंगा- पासून अलिप्तता; निर्दोषता. ५ उपयोग; फायदा; नफा; फल; लाभ. ६ निघालेलें फल, वस्तु, परिणाम, निपज; उत्पन्न. ७ (अंकगणित) गुणून आलेलें फळ; गुणाकार. ८ दोरी; रज्जू. 'हें कर्माचे गुणीं गुंथलें ।' -ज्ञा १३.११०२. 'मुक्तमोती लग संपूर्ण । गुणेविण लेइलासे ।।' -एरुस्व १.३९. ९ प्रत्यंचा; धनु- ष्याची दोरी. 'गेला लक्ष्मण किष्किंधेते गुण जोडुनि चापातें ।' -मोरामा १.५११. १० (समासांत) -पट; प्रमाण; गुणाकार. जसें-अष्टगुण = आठपट; सप्तगुण, इ॰. 'शतकोटिगुणें तदधिक गमला शर निकर विखरितां पार्थ ।' -मोभीष्म ३.५६. ११ उतार; कमीपणा (रोगाचा). १२ (अंकगणित) गुणक. १३ (भूमिती) वर्तुळखंडाची ज्या. १४ दिव्याची वात. 'पै गुणु तेतुला खाय ।' -ज्ञा १३.७१९. १५ परीक्षा उतरण्यासाठीं ठरवि- ण्यांत आलेले संख्यांक; (इं.) मार्क. १६ (व्याक.) संधि करतांना वगैरे स्वराच्या रूपांत होणारा फेरफार. [इचा ए, उचा ओ, ऋचा अर्, लृचा अल्] १७ वधुवरांचें घटित पाहण्याचे अंक. हे ३६ असतात. १८ (ल.) रोग; व्याधि. म्ह॰ अठरा गुणांचा खंडोबा. १९ प्रभाव; परिणाम. 'संपत्ति हें एका तर्हेचें मद्य आहे, तें आपला गुण केल्याखेरीज बहुधा सोडणार नाहीं.' -नि ५३. [सं.] (वाप्र.) ॰आठविणें-(मृत, गैरहजर मनु- ष्याच्या) चांगल्या गोष्टी स्मरणें; त्यांचा उल्लेख करणें. ॰उध- ळणें-पसरणें-पाघळणें-स्वाभाविक वाईट, दुष्ट स्वभाव बाहेर पडणें; वाईट गुणांचें आविष्करण करणें. 'पत्र पुरतें झाल्या- वर सदाशिवराव म्हणाले हे आपल्या मातोश्रींनीं कसे गुण उध- ळले पहा!; -रंगराव. ॰काढणें-१ दुर्गुण काढून टाकणें. २ यथेच्छ झोडपणें. 'बोलाचालीनंतर त्यांचे गुण चांगलेच बाहेर काढले.' ॰घेणें, देणें-पिशाचादि बाधा न व्हावी म्हणून देवा- दिकांपासून कौल घेणें, देणें. ॰दाखविणें, गुणावर येणें-खरा स्वभाव दाखविणें. ॰शिकविणें-मारून शहाणा करणें; गुण काढणें ॰सोडणें-विसरणें-सन्मार्ग सोडून वाईट मार्गास लागणें. गुणाची चहा करणें-होणें-सद्गुणावर प्रीति करणें, असणें; चांगल्या गोष्टींचा सन्मान करणें. गुणाची माती करणें- सद्गुणांचा, बुद्धीचा दुरुपयोग करणें; अंगच्या चांगल्या गोष्टी, बुद्धि नासणें. गुणा येणें-सगुण होणें. 'गुणा आला विटेवरी । पीतांबर धारी सुंदर जो ।' -तुगा ७. गुणास येणें-पडणें- १ लागू होणें; फळणें; इष्ट परिणाम होणें. २ चांगल्या रीतीनें वागणें. म्ह॰ १ ढवळ्या शेजारीं बांधला पोंवळा वाण नाहीं पण गुण लागला. २ गुणाः पूजास्थानम् । = गुणामुळे माणसाला आदर प्राप्त होतो; जेथें गुण तेथें आदर. सामाशब्द-गुणक, गुणकांक-पु. (गणित) ज्या संख्येनें गुणतात ती संख्या. गुणक-वि. १ हिशेब ठेवणारा; गणना करणारा. २ मध्य गुणक; विशिष्ट शक्तीचें, गुणाचें मान दाखविणारा वर्ण, जात. [सं.] ॰कथा-स्त्री. १ ईश्वराच्या गुणांचें कीर्तन, प्रशंसन. 'गुणकथा श्रवणादि साधनें । करुनि सेवटीं आत्मनिवेदन.' २ (सामा.) गुण, ईश्वरी देणगी, स्वधर्म इ॰ विषयीं स्तुति. गुणकप्रमाण- न. (गणित) गुणाकारानें वाढणारें संख्येचें प्रमाण. १.४.८. १६. इ॰ प्रमाण; (इं.) रेशिओ. ॰कर-कारक-कारी-गुण- कारीक-वि. (अशुद्ध) १ गुणावह; गुण करणारें, देणारें. २ परिणामी; प्रभावी. गुण-कर-वि. (काव्य) गुणसंपन्न; बुद्धि, सुलक्षण, सद्गुण यांनीं युक्त (मूल). ॰गंभीर-वि. चांगल्या गुणांनीं युक्त. 'उदारधीर गुणगंभीर ।' [सं.] ॰गहिना-स्त्री. गुणवती व रूपवती स्त्री. 'जेव्हां जिवाला वाटेल तुमच्या आतां पाहिजे गुणगहिना ।' -सला ६. ॰गान-गाणें-न. गुणांचें स्तवन, गायन, प्रशंसा, प्रशस्ति; गुणकथा. [सं.] ॰ग्रहण-न. गुण ओळ- खणें; गुणाची चहा; गुणीजनांचा परामर्ष, आदर करणें-उमगणें. [सं.] ॰ग्राम-निधि-पात्र-राशि-सागर, गुणाकर गुणाची रास-खाण-वि. सर्वगुणसंपन्न; सुलक्षणी; सद्गुणी; अनेककलाकोविद. ॰ग्राहक-ग्राही-वि. गुणांचा भोक्ता, चहाता; गुणांचें चीज करणारा; गुण ग्रहण करणारा; दुसर्याचे गुण ओळखून संतोष मानणारा. [सं.] ॰घाती-वि. गुणदूषक; निंदक; हेटाळणी करणारा. [सं.] ॰ठेली-स्त्री. गुणांची थैली; गुणखनि. 'सुतारुण्यें तारुण्य गुणठेली ।' -आपू १०. [सं. गुण + स्था-थैली] ॰गुणत:-क्रिवि. गुणाप्रमाणें; गुणा- नुरोधानें. [सं.] गुणत्रय-न. सृष्ट पदार्थांचे सत्त्व, रज, तम हे तीन गुण, धर्म. [सं.] ॰त्रयविरहित-वि. वरील तीनहि गुणां- विरहित असा (ईश्वर); निर्गुण. 'गुणत्रयविरहित अगम्य तूं ।' [सं.] ॰दोष- पुअव. चांगले वाईट गुणधर्म; सुलक्षणें आणि कुल- क्षणें. 'नको माझे कांहीं । गुणदोष घालू ठायीं ।' ॰दोष- परीक्षा-स्त्री. गुणदोषांची चौकशी, छाननी, तपास. ॰धर्म-पु. गुणलक्षण, स्वभाव (बरा किंवा वाईट) गुण अर्थ १ पहा. गुणन-न. १ गुणाकार; मोजणी; गणना. गुणनिधान-निधी-न.गुणांचा साठा; गुणग्राम पहा. 'त्याची कन्या चिद्रत्न लावण्यागुणें गुण- निधान ।' -एरुस्व ३.४६. गुणनीय-वि. गणण्यास, गुण- ण्यास योग्य. ॰पंचक-न. आधिभौतिक वस्तूंचा मूळभूत पांच गुणांचा समाहार (पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश, किंवा शब्द, रूप, रस, गंध व स्पर्श). 'गुण पंचकें धरित्री आथिली ।' ॰परिणाम-पु. मूळ वस्तूचें तात्त्विक स्वरूप कायम राहून त्यास दुसरें नांव-रूप प्राप्त होणें. उदा॰ काथ्याची दोरी होणें, दुधाचें दहीं होणें -गीर २३९. ॰परिणामवाद-पु. त्रिगुणात्मक प्रकृ- तींतील गुणांच्या विकासानें किंवा परिणामानें व्यक्त सृष्टि निर्माण होते असें मत (सांख्य मत). -गीर २३८. ॰भूत-वि. १ गौण; दुय्यम प्रतीचें. २ वरून, पासून निवणारें; अनुकल्पित. ॰माया- स्त्री. त्रिगुणांनीं युक्त असलेली माया. 'मुळीं झालीं तें मूळ माया । त्रिगुण झाले ते गुणमाया ।' -दा ११.१.९. -भज ३५. ॰वचन-वाचक-न. गुण दाखविणारें वचन, शब्द, विशेषण. ॰वंत-वान-वि. गुणसंपन्न. ॰विशेषण-न. (व्या.) विशेषणाचा एक प्रकार; हा नामाचे गुण दाखवितो. ॰वेल्हाळ-ळी- विपुस्त्री. (काव्य.) गुणांनीं आकर्षिलेला-ली; मोहित; परितुष्ट. ॰वैषम्य-न. गुणत्रयांचें (सत्व-रज-तम) विषम मिश्रण. याच्या उलट गुणसाम्य. ॰सुशीळ-वि. (काव्य.) गुणी व शीलवान्; चांगल्या गुणांचा, स्वभावाचा. 'पतिसेवे सदा अनुकूल । सत्य वचनीं गुणसुशीळ ।' ॰स्तुति-स्त्री. गुणांची प्रशंसा. ॰हीन- वि. १ गुणविरहित; गुणाशिवाय. २ दुर्गुणी. ॰क्षोभ(भि)णी- माया-स्त्री. माया; त्रिगुणाची साम्यावस्था मोडणारी (माया); मूळ मायेंतील गुप्त असलेले त्रिगुण जेव्हां स्पष्ट होतात तेव्हां तिला गुणक्षोभिणी म्हणतात. 'पष्ट होती संधी चतुरी । जाणावी गुणक्षोभिणी ।' -दा ९.६.६. गुणज्ञ-वि. गुणग्राहक. जाणता (विद्यादि गुणांचा) पहा. गुणांक-पु. (गणित) गुणाकार. गुणांकभागोत्री-स्त्री. १ गुणाकार व भागाकार. २ (व्यापक) अंकगणित; गणित.;तुझा पंतोजी कांहीं गुणांकभागोत्री शिक- वतो कीं नाहीं?' गुणाकार-पु. १ गुणांक; गुणनाचें फळ; गणिताचा एक प्रकार; गुणकांकानें गुण्यांकास गुणणें. याचे कांहीं प्रकार:-कोष्टकी-धांवरा-बैठा-विविध गुणाकार इ॰ कपटसिंधु पहा. २ गुणणें; गुणांकार करणें. [सं. गुण्; म. गुणणें] गुणा कारक-कारी-वि. गुणकारक-कारी पहा. गुणागुण-पु. गुण आणि अवगुण; गुणदोष. गुणाचा-वि. भलेपणा, चांगले गुण अंगीं असणारा. गुणाची खाणी-रास-स्त्री. अनेक प्रकारचे चांगले गुण अंगीं असणारा; विविध गुणांचा गुणांचें गुणपात्र लेंकरू-न. (ल. उप.) अट्टल लुच्चा; लबाड; सोदा. 'गुणाचें गुणपात्र हातीं फुलपात्र.' गुणाढ्य-वि. १ गुणसंपन्न. २ एक प्रसिद्ध कवि. बृहत्कथेचा कर्ता. [सं.] गुणातीत-वि. गुणवि- रहित; निर्गुण. (ईश्वर) गुणानुवाद-पु. गुणांची वाखाणणी; गुणकीर्तन; प्रशंसा. गणानुवादकीर्तन-न. गुणांचें स्तवन. गुणावह-वि. गुण देणारें; गुणकारक; परिणामी; प्रभावी (औषध वगैरे). गुणांश-पु. १ गुणकारीपणा; प्रभाव; सुपरि- णाम. 'हा जें औषध सांगतो त्याचा गुणांश केवढा? ' २ परि- णाम; फळ; यश. 'त्या औषधानें अद्यापि गुणांश आला नाहीं.' गुणित-वि. (गणित) गुणलेलें. गुणें(ण्या)गोविंदें-दानें- क्रिवि. १ शांततेनें; भांडणतटां न करितां; मुकाट्यानें; आनंदानें; स्वेच्छेने. 'पक्षीही लहान । घरटीं बांधून । गुण्यागोविंदानें नांद- ताती ।।' २ मोठ्या स्नेहानें, ममतेनें. 'गुण्यागोविंदें मला दहा वेळ पलंगावर पालवा ।' -प्रला ३ चांगल्या प्रकारानें, रीतीनें. गुणोत्कर्ष-पु. गुणांचें वैपुल्य, विकास, वाढ. गुणो- त्कीर्तन-न. गुणांचें कीर्तन; गुणानुवाद; प्रशंसा. गुणोत्तर-न. (गणित) संख्यांची, दोन परिणामांची पट, हिस्सा, प्रमाण; भूमितिश्रेणींतील पदांमधील ठराविक अंतर; एका संख्येनें दुसरीस भागिलें म्हणजे दोहोंमधील गुणोत्तर निघतें. गुण्य-क्रि. १ जिला गुणावयाचें ती संख्या. २ गुणण्यास योग्य. [सं. गुण् = मोजणें] गुण्यांक-पु. गुण्य संख्या.
बनणें
अक्रि. १ केलें जाणें; घडून येणें; सिद्ध होणें; साधलें, संपादलें जाणें; अनुकूल होणें. 'गतवर्षीं घर बांधणार होतों पण साहित्य मिळालें नाहीं म्हणून बनलें नाहीं.' २ फुरसत मिळणें. ३ (भांडण वगैरे) जुंपणें; पेटणें. ४ एखाद्या स्थितींत येणें; केलें- उतरलें जाणें, होणें. 'त्याचा रंग चांगला बनला.' ५ लठ्ठ व बळ- कट होणें; द्रव्यवान्, भाग्यवान् होणें. ६ जुळणें; जमणें; पटणें. 'ह्याचें बाहेरचे माणसाशीं बनतें पण घरचे माणसाशीं बनत नाहीं.' ७ नटणें; शृंगारणें. 'असी चट्टी पट्टी करून बनून कोणीकडे गे चाललीस.' ८ खांदा बदलणें (हमाल, गडी यानीं). ९ घटनेस येणें; योग्य स्वरूपांत, स्थितींत येणें (व्यापार, चाकरी, हातीं घेतलेलें काम, चालू बाब). १० (ल.) फसणें. [सं. बन् किंवा भूत; प्रा. भन; हिं. बनाना] (वाप्र.) बनीं बनणें- १ सजणें. २ सज्ज होणें; कंबर बांधून तयार असणें (चाकरीस, कामास). बनून ठनून चालणें- उंची व घवघवीत पोषाखानें मिरविणें. बनून राहणें-वि. होऊन राहणें. 'त्यांतील प्रत्येकजण केवळ धर्ममूर्ति बनून राहिला आहे.' -नि ६२९. बनेल-वि. (ना.) स्वयंसिद्ध; उघड; स्पष्ट; कायम टिकणारा. बनेल तेथपर्यंत-क्रिवि. होईल तेथपर्यंत. बनेल तेव्हां-क्रिवि. फावेल त्या वेळीं. बनाव-पु. १ परस्परांचा चांगला समज; ऐकमत्य; मेळ; जम. संघटितपणा; अनुकूलभाव; सख्य (मनुष्य, गोष्टी, गुण यांचा). 'आणि अतःपर बासवाडेकराचा त्याचा बनाव बसत नाहीं.' -वाडबाबा १.२८. २ भव्य रचना; थाटमाटाची मांडणी; सुसंघटितपणा. ३ प्रसंग. ४ तहाचें बोलणें. [हिं.] बनावट, बनोट-स्त्री. १ मांडणी; रचना; घाट; बांधणी; धाटणी (इमारतीची, कवितांची इ॰). 'कवनीं ज्यांच्या बंद बनोटे ।' -ऐपो २२७. २ सूत; वीण; पोत (कपडाचा). ३ रचना; मांडणी; ठेवण; मांडण्याची पद्धत, व्यवस्था; करण्याचा अनुक्रम (जागा, काम, विधि, उत्सव यांचा). ४ बनावणी; सजवणूक; नटणें; भव्य पोशाखानें निघणें. वक्तृत्वाच्या डौलानें व अलंकारिक रीतीनें कथन करणें. ५ (ल.) कुभांड; थोतांड; कृत्रिम, बनाऊ गोष्ट. -वि. बनाऊ; नकली; खोटी; रचलेली; कृत्रिम. (समासांत) बनावट-अर्जी-साक्षी-साक्षीदार-मुद्दा-वही-जमा- खर्च इ॰ 'बनावट सबब सांगून माझा घात केला.' [हिं.] बना- वणी-स्त्री. बनविण्याची क्रिया; अलंकृत करणें इ॰ बनावट अर्थ ४ पहा. [बनविणें] बना(न)विणें-वणें-सक्रि. १ शोभविणें; सज- विणें; नटविणें. २ तयार करणें; नमुनेदार घडणें, वळविणें. ३ थाटानें मांडणें, निघणें. ४ प्रशस्त शब्दविस्तारानें, पुष्कळ अलं- कार व अर्थवादयुक्त असें सांगणें. 'गोष्ट जरी नीरस असली तरी बनवून सांगितली म्हणजे गोड लागत्ये.' ५ फसविणें. 'हे लोक आपल्याला बनविताहेत.' [बनाव] बनाऊ(वट)लेख, बनीव- -पुवि. १ खोटी सही किंवा मोहर करून दस्त करणें, खर्या दस्तांत लबाडीनें फेरफार करणें, किंवा वेड्या, अंमल चढलेल्या रचलेला; घडलेला. ३ (ल.) खोटी रचलेली; पदरची (गोष्ट). ४ बनावट; कृत्रिम. ५ थाटलेला; नटलेला. ६ परिष्कृत भाषापद्धतीनें व मोहक अभिनयानें अलंकृत (दंतकथा, व्याख्या, निवेदन. भाषण). [बनणें, बनविणेचें धातुसाधित नाम]
धस
पु. १ खुंटी; टोंक; अग्र; खिळा; कुसळ किंवा दुसरा एखादा पुढें आलेला, अणकुचीदार पदार्थ (ज्यामध्यें अडकून वस्त्र इ॰ फाटेल असा). 'या कुंपणाचा धस लागून धोतर फाटलें.' २ अविचारी, उद्धट, आडदांड माणूस. 'जसा न कळे उपदेश । धस ऐसें त्या नांव ।' तुगा २९१३. ३ दरड; कपारी; उभा उतार नदी तीर, डोंगराची बाजू इ॰ प्रमाणें). 'दोन्ही बाजूचा कडा उंच असून त्याचे धस अगदीं उभे तुटलेले.' -विवि ८.१.१९. ४ ज्वारीचें ताट, खुंट, अवशिष्ट मुळखंड; थोंठ; फण. 'नसे पल्लव लंबित धस उभा परि कोण छ्याया ।' -दावि १८६. ५ भीति, दुःख इ॰ हृदयाला जो धक्का बसतो तो. (क्रि॰ होणें). ६ (व.) बीळ; भोंक. 'आजवर केलें तें धसांत गेलें.' -स्त्री. जोराची मुसंडी; हल्ला; चाल (क्रि॰ मारणे). [ध्व. धस ! प्रा. धस] धशीं-धसास-धसावर-घालणें- लावणें-देणें- १ साहसी, कठोर उपाय योजून एखादें काम बिघडविणें; युक्ति न लढविणें. २ अपकार करणें; छळणें. धसास लावणें-शेवट करणें; कड पाहणें; तडीस नेणें. धस देणें-मारणें- धज देणें, मारणें पहा. धसावर धस घालणें-अपकारावर अप कार करणें; एकसारखें छळणें. धसक-धसकफसक पहा. धस- कट-न. लहान धस; कुसळ; धस अर्थ ४ पहा. 'रुतले अंगांगीं कांटे धसकट ।' -विवि ८.९.२२०. -वि. १ जाडेंभरडें; भसाड. २ (ना) अडाणी; आडदांड. धसकधट्या, धसकनंदन-पु. १ दांडगाईनें कोणतेंहि काम करणारा माणूस; आडदांड माणूस; आदळआपट करणारा माणूस. २ अकुशल कामकरी; हेंगाडा, अडाणी कारागीर. धसकट्या, धसक्या, धसकटराव-पु. १ दांडगेश्वर; आड- दांड; अडाणी (मजूर, कामकरी). २ धश्चोट पहा. धसमुसळ्या; धसफसा. [धसकट, धस] धसकणें-उक्रि. १ हिसकणें; जोरानें ओढणें; हासडणें (कांट्याकुट्यावरून वस्त्र इ॰). २ जोरानें घालणें; खुपसणें; भोंसकणें; आडदांडपणें शिरकवणें. -अक्रि. अड- कणें व फाटणें; आवाज होऊन फाटणें. २ काडदिशी मोडणें (काटकी, फांदी). ३ दगड इ॰ उलथून पडणें. [प्रा. धस; हिं. धसकना] धसकफसक-स्त्री. बेदरकार, बेफाम वर्तणूक. धसाफशी पहा. -क्रिवि. घाईघाईनें; निष्कळजीपणानें; उद्धटपणानें (बोलणें; लिहिणें; वाचणें वगैरे). [धसक द्वि.] धसकमुसळा-पु. (ना.) आडदांड (मनुष्य); धसमुसळा पहा. धसका-पु. १ आकस्मित भीति, दुःख, इ॰ नें मनाला बसलेला धक्का, चरका. २ तलवारीचा फटकारा; काठीचा तडाखा; हाताचा रट्टा; धबका. ३ हिसका, हिसडा. [धस; धसक प्रा. धसक्क] धसकावणी-स्त्री. तासणी; तोडणी; छाटणी. धसकाविणें-उक्रि. १ जोरानें, रागानें खच्ची करणें; तोडणें; ओढणें; सपासप तोडणें; छाटणें; खच्ची करणें. २ अडथळ्यांना न जुमानतां हिसडे देऊन ओढणें; फरपटणें. धस- कावून बोलणें-भीडभाड न ठेवतां स्पष्ट, निर्भीडपणानें बोलणें. [धस] धसणें-अक्रि. १ जोरानें शिरणें; घुसणें; जाणें; एकदम बसणें; भोंक पाडणें. 'शपथ पुरःसर दीप्तज्वलनज्वालांत जाहली धसती ।' -मोमंत्रयुद्ध ७४०. २ धजणें पहा. ३ धसाला लावणें. ४ अतिशय मन, लक्ष लावणें (अभ्यास, काम याकडे). -उक्रि. जोरानें (आंत, पुढें, कडे) ठोकणें; घासणें; ठासणें; शिरकवणें; सारणें. [धस; हिं. धसना; गु. धसको] धसदार, धसाव, धसावणें- धजदार, धजाव वगैरे पहा. धसधस-स्त्री. १ धडधड. (जिवाची- उराची-धसधस). २ (ल.) भीति; धास्ति. 'मला त्या वाटेनें जायाला धसधस वाटतें.' [ध्व. धस द्वि.] धसधस-सां- क्रिवि. १ उडून; जोरजोरानें (उडणें). 'काळीज धसधस करतें, उडतें' जीव धसधस करतो, ऊर उडतो.' 'गांवढेकरी उंद- राचा ऊर धाकानें धसधसां उडूं लागला.' -छत्रे (इसाबनीति). २ कडाडदिशीं मोडून, फाटून, तुटून, कोसळून, पडून, फुटून, इ॰. धसधसणें-अक्रि. धसधस होणें; धडधडणें, उडणें. (जीव, काळीज, ऊर, छाती, हृदय) [धस + धस] धसफस-फूस- स्त्री. (भांडण सुरू होण्याची आधींची) चरफड, आदळआपट; घालून पाडून बोलणीं; कुढें भाषण. [ध्व. धस द्वि.] धसमस- (कों.) धामधूम. धसमुसळा-ळ्या-वि. १ गलेलठ्ठ; ढोण्या; ठोंब्या. २ दांडगाईनें निष्काळजीपणें काम करणारा; आडदांड. धसक्या पहा. 'हा धसमुसळ्या दिसतो.' -नाम ८. [धस + मुसळ] धसरड-स्त्री.(कों.) नदीकांठची, टेकडीवरची उभी उतरण; दरड. [धस = पडण्याचा आवाज + रड प्रत्यय] धसाडा-वि. (व.) जाड; खरबरीत (सूत, गवत, कोणताहि पदार्थ). २ दांडगा; धसमुसळ्या (माणूस). -पु. १ (ल.) चापटी; धपाटां; रपाटा २ (ना.) रागानें बोलणें; धमकावणें. 'कमळी फार हट्ट करूं लागली पण मी जेव्हां एक धसाडा दिला तेव्हां बसली गप.' ३ बाटूक; खुंट; धस; चोय. ४ हिसका; धका. धसाधशा-स्त्री कापाकापी तुकडे तुकडे ( रणें); छाटाछाटा; एकदम, जोरजोरानें कापणें तोडणें. [ध्व.] धसाधस-सां-क्रिवि. १ खसाखस, सपासप फटाफट, तडातड (तोडणें, मोडणें, फाडणें; इ॰). 'परि तोडिलेचि वदनीं तृण धरितेही अगा धसाधस ते ।' -मोऐषिक १.४. २ धड- धड होऊन (जीव-काळीज करणें, उडणें). ३ ओक्साबोक्सीं (रडणें). ४ चटकन (निसरणें). [ध्व. धसधसचा अतिशय] धसा फशा-स्त्री. १ हिसकाहिसकी; निष्काळजीपणाचें काम; ओढाताण; आदळआपट. २ भांडणापूर्वींची चरफड; धसफस पहा. ३ कापा कापी; छाटाछाटी (करणें-तासणें) [ध्व. धस द्वि.] धसा फसा-क्रिवि. धसाफशा पहा. धसाल-ली-ल्या-वि. धसक धट्या पहा. धसासा-पु. धसधस; छातीचा टोका. 'पडति बहुत तेव्हां रुक्मियाचे धसासे ।' -सारुह ७.४ [धस द्वि.] धसाळ-पु. १ विसराळू. धसाळ जाणें-विसरून जाणें. 'परि बोलत बोलत प्रेमभावें । धसाळ गेलों ।' -ज्ञा ११.१६१. २ दांडगा; आडदांड; धसाल; धसकनंदन. ३ अविचारी; वेडा. 'केवी धसाळ म्हणो देवा तूंत । तरी अधिक हा बोलू ।' -ज्ञा १०.३२०. ४ मोठा; प्रचंड. 'नामें एवढें धसाळ देणें ।' -एभा ६.६. [धस + आळ प्रत्यय. (तुल॰) प्रा. दे. धसल = विस्तीर्ण] धसी- वि. उतावीळ. धशा पहा.धस्स-न. भीति, दुःख यांचा हृदयास, मनाला बसलेला धक्का; आघात, धडकी. धक्का पहा. [ध्व. धस] धस्समसूळ-वि. धसमुसळा पहा.
भाव
पु. १ भक्ति; श्रद्धा; निष्ठा; खात्रीची; भावना. 'माझें मज देती तैसें । परि आनानीं भावीं ।' -ज्ञा ९.३५३. 'असे हो जया अंतरीं भाव जैसा ।' -राम ३५. २ हेतु; अर्थ; मन; अंतःकरणप्रवृत्ति; उद्देश. 'न कळे तो तया सांगितला भाव । आपणासी ठाव नंदाघरीं ।' -तुगा १०. ३ अभिप्राय; आशय; धोरण; वळण; झोंक; गर्भितार्थ. 'रूप तसें विविध तिहीं कां केलें स्पष्ट सांग भावातें ।' -मोसभा ७.६६. ४ मनोविकार; मनोवृत्ति; भावना. जसें-शत्रु-बंधु-क्रोध-दुष्ट-भक्ति-मित्र-भाव. ५ अस्तित्व; असणें. 'एवं कोणेहि परी । अज्ञानभावाची उजरी ।' -अमृ ७.७७. 'जेथें धनाचा भाव तेथें विद्येचा अभाव असें प्रायः असतें.' ६ प्रत्यय किंवा अनुबंध यामुळें होणार्या फेरफाराशिवाय असणारा शुद्ध धात्वर्थ; धातूचा मूळ अर्थ. उदा॰ चाल इ॰ धातूपुढें णें हा प्रत्यय चाल धातूचा मूळ दाखवितो. ७ भावकुंडलींतील बारा स्थानांपैकीं प्रत्येक; स्थान. कुंडली पहा. ८ नैसर्गिक स्थिति, धर्म, स्वभाव; प्रकृति. जसें-सत्वभाव; तमोभाव; रजोभाव. 'म्हणोनि सात्विक भावांची मांदी । कृष्णाआंगी अर्जुना आधीं ।' -ज्ञा ८.५६. ९ विकार, वृत्ति, राग, क्रिया, चित्तवृत्ति, हावभाव इ॰ चा वर्ग. ह्याचे पांच प्रकार आहेत. विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव, सात्त्विकभाव, स्वार्थीभाव. पैकीं विभाग, अनुभाव व स्थायीभाव हे अनुक्रमें रसाचीं कारणें, कायें व पूर्वरूपें आहेत. १० जीवाची स्थिति, दशा, अवस्था. जसें-उत्पत्ति, स्थिति, लय इ॰ 'ऐसें म्हणे त्यजुनि भाव अहो जिवाचे ।' -वामन भरतभाव ५८. १२ (शब्दाचा) धर्म, गुण, अस्तित्व, विषय, संबंध, अधिकार, अवस्था इ॰ ची स्थिति; संस्कृतांतील ता आणि त्व व प्राकृतांतील पण, पणा, की हे प्रत्यय लागून झालेला शब्दाचा अर्थ. जसें-ब्राह्मणाधिष्ठित भाव तो ब्राह्मणपणा; उग्र-क्रूर-दृढ-सौम्य-शत्रु-बंधु-भाव. 'जयाचेनि संगे ब्रह्मभावो । भ्रांतासहि ।' -ज्ञा ६.१०२. १२ जन्म; अस्ति- त्वांत येणें; उत्पत्ति. १३ (तर्क) पदार्थ. भाव किंवा भावरूप पदार्थ सहा आहेत-द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय. सातवा पदार्थ अभाव. १४ रति; प्रेम (काव्यातील वर्णनाचा किंवा नाट्य प्रयोगाचा विषय). १५ क्षमता; शक्ति; सामर्थ्य; पराक्रम (शारीरिक किंवा मानसिक). १६ माया; मिष; कपट; आव. 'ध्यान केल्याचा भाव करितो.' -कमं १. १७ लक्षण; प्रकार. 'द्वितीयाध्यायीं ब्रह्मोत्पत्ति । चारी युगांचे भाव कथिती ।' -गुच ५३.२०. १८ इच्छा. 'हाची भाव माझिया जीवा । पुरवी देवा मनोरथ ।' -तुगा ६९९. १९ आवड. 'दुर्योधनें विषान्नें वाढविलीं भीम जेवला भावें ।' -मोआदि १९.१३. २० (नृत्य) अभिनय पहा. [सं. भू-भाव] म्ह॰ जसा भाव तसें फळ. ॰पाहणें- (ना.) परीक्षा करणें; अनुभव घेणें. 'मी सार्यांचा भाव पाहिला. या जगांत कोणी कोणाचें नाहीं.' ॰भाजणें- १ दुष्ट हेतु तडीस नेणें.' २ एकाद्यानें केलेलें दुष्ट भाकित प्रत्ययास येणें. ॰सोडणें- १ (भुतानें) पछाडलेल्या माणसास सोडणें. २ मरणें; गतप्राण होणें. ३ नाशाच्या मार्गांत असणें. भावाचा भुकेला-भक्ति, श्रद्धा यांकरितां भुकेला. 'भावाचा भुकेला श्रीपति । आणिक चित्तीं नावडे त्या ।' सामाशब्द- ॰कर्तरि-वि. जेथें क्रियेचा केवल भाव तोच कर्ता असतो आणि क्रियापद नेहमीं नपुंसकलिंगी एक- वचनीं असतें असा (प्रयोग). उदा॰ मला कळमळतें. ॰कर्तृक- वि. (व्या.) भावकर्तरी प्रयोगाचें (क्रियापद). ॰कुंडली-स्त्री. (ज्यो.) तनु, धन इ॰चीं १२ स्थानें दाखविण्यासाठीं बारा राशींचीं घरें ज्यावर दाखविलीं आहेत असें वर्तुळ. कुंडली पहा. ॰गर्भ- पु. १ ग्रंथांतील सारांश. २ अंतस्थ हेतु. ॰गर्भ-गर्भित-वि. १ ध्वनित; गर्भित अर्थाचा. २ ध्वनित अर्थ ज्यांत आहे असें; दिसतो त्यापेक्षां अधिक अर्थ असलेलें (भाषण, लेख इ॰). ॰चलित- वि. (ज्यो.) तन्वादिस्थानीं असून अंशे करून चलित झाला तो (सूर्य किंवा इतर ग्रह). ॰भक्ति-भगत-स्त्री. १ मनः- पूर्वक, श्रद्धा-प्रेमयुक्त, निष्कामपणें केलेली भक्ति; याच्या उलट भयभक्ति. २ एखाद्याविषयीं वाटणारें अत्यंत प्रेम; मनाची ओढ. ॰वाचक नाम-न. (व्या.) प्राणी किंवा पदार्थ यांच्या गुण- धर्माचा बोध करून देणारें नाम. [सं.] ॰वाचकसंख्या-स्त्री. जात नसणारी संख्या; संख्या किंवा परिमाणें यांचा हिस्सा, पट. ॰शबल-न. भावनाविकारांचा गोंधळ; कालवाकालव; अनेक रसांचें मिश्रण. -वि. गोंधळलेल्या भावनांचा. [सं.] ॰शुद्धि-स्त्री. अतःकरणशुद्धि. 'तेणें भावशुद्धीचिया वाटे । विखुरलें विकल्पाचे कांटे ।' -ज्ञा ७.१७०. ॰संकर-पु. मिश्र, संकीर्ण भावना, मनो- विकार. [सं.] ॰संधि-पु. निरनिराळ्या, परस्परविरूद्ध भावना असलेल्या मनाची धरसोडपणाची अवस्था; अंतःकरणांतील मिश्र रसप्रकार. [सं.] ज्ञ-वि. आशय, अभिप्राय जाणणारा; गुणज्ञ. 'पाहातयां भावज्ञां फावती गुण । चिंतामणीचे ।' -ज्ञा ६.२१. भावांतर-न. अर्थांतील फरक, विसंगतपणा. [सं. भाव + अंतर] भावाभाव-पु. अस्तित्वनास्तित्व; खरेंखोटें; चैतन्य आणि जड. 'भावाभावारूप स्फुरे । दृश्य जें हें ।' -ज्ञा १८.११८६. [सं. भाव + अभाव] भावाभास-पु. १ कृत्रिम प्रेम; कवि किंवा नाटककार यांनीं केलेलें प्रेमाचें खोटें वर्णन किंवा प्रदर्शन. २ चुकीचा समज, ग्रह, कल्पना. [भाव + आभास] भावार्थ-पु. १ तात्पर्यार्थ; सारांश. २ भक्तिसार. 'ग्रंथ वदावया निरूपणीं । भावार्थ- खाणी जयामाजी ।' -व्यं २. ३ श्रद्धा; विश्वास; भाव. 'जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा ।' -दा १.१.३८. ४ अंतःकर णाची निष्कपट वृत्ति; प्रामाणिकपणा. -क्रिवि. खरोखर; निःसंशय. 'तो भावार्थ गांवास गेला, मी आपल्यापाशीं का खोटें सांगेन' भावार्थी-वि. १ भाविक. २ साधा; भोळा; सरळ स्वभावाचा. भावि(वी)क-वि. १ श्रद्धावान्; निष्ठावंत. २ संतुष्ट होणारा. 'तिहीं यज्ञभाविकीं सुरीं । जे हे संपत्ति दिधली पुरी ।' -ज्ञा ३.१०४. ३ भक्तियुक्त अंतःकरणाचा. भावि(वी)कजन, भावीजन- पु. श्रद्धायुक्त, निष्ठावंत अंतःकरणाचा. मनुष्य. 'अद्यापि दीपाचे झळ्ळाळ । भावीकजन देखति ।' भावित-वि. १ कल्पिलेलें; चिंतिलेलें; कल्पित. २ ज्यावर भावना किंवा संस्कार केले आहेत असें (औषध). [सं.] भाविला-वि. संस्कार केलेला. -शर. भावी-वे प्रयोग-पु. (व्या.) जेथें कर्त्यावरून अथवा कर्मावरून क्रियापद बदलत नाहीं व सामान्यतः त्याचें रूप नपुसकलिंगी एक वचनी असतें असा प्रयोग. 'मी त्यास मारिलें.' भावुक-न. १ श्रृंगारिक बोलणें. २ कल्याण; हित; क्षेम. 'ऐसा भक्तमयूर चात- कहि जो नेणें दुजीं भावुकें ।' -मोकृष्ण ५५.५१. भावु(वू)क- वि. भक्तियुक्त; निष्ठावंत; भाविक. 'असोत तुज आमुचीं सकल भावुकायुर्बळें ।' -केका ६४. भावेभक्ति-स्त्री. भावभक्ति पहा. भावो-पु. भाव पहा. 'म्हणोनि मज आत्मयाचा भावो । जिहीं जियावया केला ठावो ।' -ज्ञा १०.१४१. भावो सरणें- वाटूं लागणें. -शर. 'तेथ आदिसा पासौनि पार्था । आइ- किजे ऐसीचि अवस्था । दुणावली हे यदुनाथा । भावों सरलें ।' -माज्ञा ६.४८७. (पाठ). भाव्य-वि. उपासना करण्यास योग्य. 'जो इया लटकिया भूतग्रामा । भाव्यु सदा ।' -ज्ञा ९.८४.
उत्तर
न. १ प्रतिवचन; जबाब. 'तो किमपि न दे उत्तर उत्तरदिशेसि सोडूनी ।' -मोविराढ ३. ५९. २ वाक्यरूप, पदरूप शब्द; भाषण. 'मी एक उत्तरही बोललों नाहीं आणि हा मला उगीच शिव्या देतो.'; 'उत्तरास प्रत्युतर करतो.'; 'उणें उत्तरानें बोलतो.' ३ (बायकी) गाणें किंवा एखादा हलका प्रबंध यांतील एके- कवार घोकाव्याजोगे लहान लहान विभाग असतात त्यांपैकीं प्रत्येक. 'साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संप्रूण.' ४ (गणित) गणितश्रेढींत ज्या अंतराने संख्या एकापुढें एक चढत किंवा उतरत जाताना तें अंतर; दोन पदांतील अंतर. ५ (कायदा) प्रतिवादीचा वादीस जबाब; समर्थन, साक्षी वगैरेंचा जबाब. ह्याचे चार प्रकार आहेत-असंदिग्ध (स्पष्ट), अनाकुल (सुसंबद्ध), अव्याख्यागम्य (सुबोध-सुलभ), न्याय्य (योगग्य); प्रतिवादीच्या उत्तराचे चार प्रकार आहेत-सत्योत्तर (कबुली जबाब), मिथ्योत्तर (नाकबुली), कारणोत्तर (कबुल करून त्यास कारण दाखविणें), प्राड्न्यायोत्तर (पूर्वीच वादीविरुध्द न्याय झाला आहे असा जबाब). ६ उलट जबाब; हाजीर जबाब. -स्त्री. ७ दक्षिणेच्या समोरची दिशा. 'पूर्वेकडे तोंड करून उभें राहिलें असतां डाव्या हाताकडची उत्तर दिशा.' -न. ८ उदाहरणाचें इष्ट फळ. -पु. ९ एक अलंकार, जेव्हां वक्ता प्रश्नोत्तरा- सह आपल्या मनांतील भाव, वृत्ति व्यक्त करतो तेव्हां हा अलंकार होतो. यांत विचारलेले प्रश्न किंवा उत्तरें अनुमानितां येतात. उ॰ 'हस्ति- दंत व्याघ्रचर्म कैसे येथ मिळे तुला । सुनेचे जोंवरी रम्य विलास दिसती मुला' ।। यावरून प्रश्न तर्कितां येतो. व 'काय कठीन? दैव- गती, सुख काय? प्रेमळा अशी पत्नी ।।' यांत प्रश्न आणि उत्तर हीं दोन्हीं आहेत. -न. १० अग्रहार इनाम जमीन; मालकीची जमीन. समा- सांत उत्तरपदीं जेसें-देवोत्तर; ब्रह्मोत्तर. 'ब्रम्होत्तरतें ब्राह्मणीं दिन्हलें.' -शके ११२८ चा पाटणशिलालेख. -पु.११ उंबरठा. 'कातार्यें कांतिला । उत्तर जडीला ।' -स्त्रीगीतमाला २०. -वि.१ पेक्षां अधिक, जास्त. याअर्थी-एकोत्तर, त्रीहोत्रा, चोहोत्रा, पंचहोत्रा, पंचोत्तरशत, क्रोशोत्तर योजन, अंगुलोत्तरहस्त. २ पुढील; नंतरचा; दुसरा; पूर्वच्या उलट; दूरचा. याअर्थी-उत्त- रार्ध, उत्तरश्लोक, उत्तररात्र. ३ श्रेष्ठ; वरचढ; अधिक चांगला, याअर्थी-रजोत्तरप्रधान; नरोत्तरनारी; गुरुत्तरशिष्य; स्वाम्युत्तर सेवक; शास्त्रोत्तर वेद, ज्ञानोत्तर भक्ती. ४ नंतरचा; याअर्थी-उत्तर काळ;उत्तर-व्यथा-यातना-व्यय-आयुष्य-वय. -शअ. नंतर; मागा- हून. उ॰ इतउत्तर; तदुत्तर. 'ज्येष्ठोत्तर लग्नें होत नाहीतं.' [सं. उत्तर] ॰अक्षांश-पु. जीं स्थळें विषुववृत्ताच्या उत्तरेस असतात त्यांचे अक्षांश ॰कथा-भाग-स्त्रीपु. एखाद्या गोष्टीचा, व्याख्यानाचा शेवटचा भाग; उपसंहार. ॰कंदब-न. (ज्यो.) क्रान्तिवृतांचे उत्तरेकडील केंद्र. ॰कर्म- कार्य-क्रिया-नस्त्री. और्ध्वदेहिक; प्रेतसंस्कार. 'माझें उत्तरकार्य मी आपल्या हातून आटोपणार.' -विवि १४.१०.२१९. ॰काल- पु. १ भविष्यकाळ. २ मृत्युकाळ; अखेरचे दिवस; वृद्धावस्था.३ नंतरचा, मागाहूनचा, पुढील काळ. ॰कुरु-पु.१ पृथ्वीच्या नवखंडां- पैकीं एक खंड; उत्तरेकडील, उत्तरध्रुवाजवळचा प्रदेश. २ उत्तरध्रुववृत्त ॰कोन-पु. उत्तरेकडील कोपरा, दिशा. ॰खंड-न. १ आर्यावर्त; उत्तर देश पहा. २ पुढील; उत्तरभाग (ग्रंथ, प्रदेश, शहर वगैरेंचा). ॰गति-स्त्री. १ सुटका; मुक्तता. २ मोक्ष ॰गोल-पु. क्रांतिवृत्ताचा उत्तरे. कडील भाग; यांत मेषापासून कन्येपर्यंच्या राशींचा अंतर्भाव होतो. ॰गोलार्ध-पु. भूमध्यवृत्तानें पृथ्वीचे दोन भाग पडतात त्यांपैकीं उत्तरेकडील भाग. ॰ज्या-स्त्री. (गणित.) त्रिज्येंतून भुजज्या वजा केली असतां येणारें अंतर; धनु व ज्या यांची मध्यरेषा. (इं.) व्हर्स्ड् साईन. ॰दशा-स्त्री. १ पुढें येणारी स्थिति; नंतरची स्थिति. २ उतार वय; वार्धक्य. ॰दिवस-पु. १ पुढील दिवस; नंतरचा दिवस. २ उद्यांचा दिवस; भविष्यकाळ. 'पूर्व दिवस गेला, उत्तर दिवस कसा येईल तसा येतो.' ॰देश-पु. आर्यावर्त; उत्तरेस हिमालया- पर्यंत व दक्षिणेस विंध्य पर्वतापर्यंत आणि पूर्व-पश्चिम दिशांस समु- द्रानीं मर्यादित असलेला प्रदेश. ॰ध्रुव-पु. १ उत्तर ध्रुवाचा तारा. २ पृथ्वीचा सर्वोत उत्तरेकडील बिंदु. ॰ध्रुववृत्त-न. उत्तरध्रुवबिंदू- पासून २३ ।। अंशवरून जें अक्षवृत्त जातें तें. ॰पंथ-पु. १ संसारा- पासून विरक्त होऊन परलोकसाधनार्थ तीर्थयात्रा, अरण्यवास, तप. श्चर्या इत्यादि करावें म्हणून अवलंबन करावयाचा मार्ग. 'श्रीपाद- श्रीवल्लभ नाम ऐंसें । झाले त्रिमूर्ति कैसे । पितयातें म्हणतेस । जाऊं उत्तरपंथासि ।।' -गुच ५.५६.२ हिमालयांत बद्रिकाश्रमाजवळ एक स्थान आहे तें. हा मार्ग स्वर्गाकडे जातो व मानवास तो दुर्लंघ्य आहे अशी समजूत आहे. यावरून ॰पंथास लागणें-मरणोन्मुख होणें. ॰पंथी सरदार-शिंदे होळकर. कारण पेशवाईंत हे उत्तरेकडे असत. -ख ३२४१. ॰पद-न. (व्या.) समासांतील दुसरें शेवटचें पद. ॰पराई, पर्हाई-स्त्री. उतार वय; वृद्धावस्था. ॰पक्ष-पु. (कायदा) प्रतिवादी; त्यांची बाजू. २ (भांडणतंट्यांत) विरुद्ध बाजू व तिचे जबाब-समर्थन, आरोपांचें निरसन, खंडन; पूर्वपक्ष यांच्या उलट. ३ (न्याय-तर्क.) उपप्रमेय; गौणप्रमेय; उपनय (प्रतिज्ञा, हेतु, उदाहरण, उपनय व निगमन या न्यायशास्त्राच्या पांच अंगापैकीं चौथें) ४ महिन्यांतील दुसरा पांढरवडा; कृष्णपक्ष; वद्यपक्ष. ५ (सामा.) प्रत्युत्तर; पूर्वपक्षखंडन; शंकांचे समाधान. ॰पालवी- स्त्री. (कों). ज्या ठिकाणाहून उत्तरेकडील भाग दूरवर दिसत आहे व दक्षिनेकडील बाजू टेंकडी झाडें वगैरेनीं संरक्षित आहे अशी जागा; उत्तराभिमुख अशी; दक्षिण पालवीच्या उलट. ॰पूजा-स्त्री. १ पूजेचा शेवटचा भाग. २ एखाद्या तात्पुरत्या स्थापन केलेल्या देव- तेचें विसर्जन करतेवेळीं कराव्यायाची पूजा; विसर्जनविधि. ॰प्रत्यु- त्तर-न. उत्तरावर पुन्हां उत्तर, जबाब, याप्रमाणें चाललेला वाद; वाद-प्रतिवाद. ॰भाग-पु. पुढील, दुसरा भाग. ॰भोजन-न. रात्रीचें जेवण. 'उत्तर भोजन अगत्य करावें.' -सप्र १५.२. ॰मात्रां-त्री-क्रिवि. प्रत्येक शब्दगणिक; प्रतिक्षणीं; प्रतिव्यवहारी. 'तुला उत्तरमात्रां शिकवलें पाहिजे.' -शाको. ॰मीमांसा-स्त्री. बादरंयणाचीं ब्राह्मसूत्रें; षड्दर्शनांतील एक दर्शन; वेदांत. ॰राग, रागिणी-पु. स्त्री. उत्तररात्रीं (रात्र संपावयाच्या वेळीं) गवयाचे मालकौंसं, वसंत, सोहनी इत्यादी राग, रागिणी. ॰रात्र- स्त्री. मध्यरात्रीनंतरच्या काल, विभाग; पहांटेचा कालभाग; मध्यरात्र व सूर्योय यांमधील वेळ. ॰लोक-पु. वरचा लोक; देव, ॠषि व साधू यांचे निवासस्थान. ॰वय-न. वृद्धावस्था; म्हातारपण; उत्तरप्राई. ॰वयस्क-वि. वृद्ध; म्हातारा; वयातीत. ॰वादी-पु. (कायदा) प्रतिवादी. ॰वेंठ-स्त्री. उतारपेठ पहा. 'कीं धर्माची उत्तरवेंठ कीं सिद्धीची ओळगवट' -ॠ ११. 'तें वसंताचें मूळ पीठ । कीं परिमलाची उत्तरवेंठ ।' -शिशु ६१६. ॰वेदी-स्त्री. यज्ञामध्यें ज्या वेदीवर मुख्य सोमादि द्रव्यांचें हवन होतें ती वेदी. ॰व्यवस्था-स्त्री.१ भविष्यकाळची तजवीज; पुढील तरतूद. २ मृत्युपत्र. ३ उत्तरक्रिया; और्ध्वदेहिक किंवा त्यासंबंधीं तजवीज. ॰संगीतपद्धति-स्त्री. हिंदुस्थानी संगीतपद्धति. ॰साक्षी-पु. प्रति- वादीपक्षातर्फे आलेला साक्षीदार. ॰हीन-वि. निरुत्तर; उत्तर देतां येत नाही असा.
चंद्र
पु. आकाशांत दिसणारा एक कलायुक्त व सूर्यप्रकाशित गोल; पृथ्वीचा उपग्रह; नवग्रहांतील दुसरा ग्रह; चंद्रमा; चांद; चांदोबा; सोम. २ मुसलमानी तारीख. 'आज चंद्र तेरावा माहे मोहरम.' ३ (ल.) कित्येक गाई, म्हशी इत्यादिकांच्या तोंडा- वर जो पांढरा ठिपका असतो तो. ४ स्त्रिया कपाळावर जी अर्ध- चंद्राकृति गोंदतात ती कोर. ५ मोराच्या पिसांतील डोळा. ६ चंद्रामृत. 'तैसें शरीर होये । जे वेळीं कुंडलिनी चंद्र पिये ।' -ज्ञा ६.२५९. ७ (तंजा.) स्त्रियांच्या नाकांतील एक अलंकार. ८ डोक्यांतील एक चंद्राकार दागिना. [सं.] (वाप्र.) (सुतानें) चंद्र ओवाळणें-द्वितीयेच्या दिवशीं दिसणार्या नूतन चंद्रावरून सूत किंवा दशी ओवाळणें. यामुळें नूतन वस्त्रे मिळतात अशी समजूत आहे. ॰पिकणें-पूर्ण चंद्रबिंबाचा प्रकाश पडणें. 'चंद्र पिकलासे अंबरीं । तें पिक घ्यावें कीं चकोरीं ।' -कथा १.८.६२. ॰मोहरणें- (माण.) चंद्र उगवणें. चंद्रानें कोंबडा करणें-चंद्राला खळें पडणें. म्ह॰ चंद्रम् दिवटे दिवम् थाळी = (व्यंगोक्तीनें) अत्यंत दरिद्रावस्था; ज्याच्या घरांत चंद्र हा दिवटीचें काम करतो व नागवेलीचें पान थाळीच्या ऐवजीं उपयोगी पडतें. सामाशब्द-॰कर-पु. १ चंद्र- किरण. 'हारपती कां चंद्रकर । फांकतां जैसे' -ज्ञा १८.४०६. २ चंद्रकळा लुगडें. 'थाट करुनि मार नेसली चंद्रकरकाळी ।' -मसाप १.१.२. ॰कला-ळा-स्त्री. १ चंद्राची कला; चंद्रबिंबाचा षोडशांश. २ एक प्रकारचें एक रंगी लुगडें (तांबडे अथवा काळें). चंद्रकला गंगा जमुना = उभार व आडवण काळें, किनार एक बाजू हिरवी, एक बाजू तांबडी असें एक स्त्रियांचें वस्त्र. ३ चंद्राचा प्रकाश, किरण. 'जैसें शारदीयेचें चंद्रकळे- । माजीं अमृत कण कोंवळे ।' -ज्ञा १.५६. ॰कांत-पु. एक काल्पनिक रत्न, मणि; चंद्राचे किरण यावर पडले असतां यास पाझर फुटतो असा समज आहे. 'अहो चंद्रकांतु द्रवतां कीर होये । परि ते हातवटी चंद्रीं कीं आहे ।' -ज्ञा ९.२९. ॰कांती-वि. चंद्रकांताचा बनविलेला (चष्मा). [सं.] ॰कोर-स्त्री. चंद्राची कोर; किनार. (कु.) १ चंद्रको- रेच्या आकाराचें एक सुवर्णाचें शिरोभूषण. या कोरेला लागूनच नाग व विष्णुमूर्ति कोरण्याची हल्लीं नवी तर्हा निघाली असून याच्या पुढच्या बाजूस घागर्या लावितात. २ (कों.) कपाळा- वरची कुंकवाची अगदीं बारीक लहान कोर. [चंद्र + कोर; तुल॰ सं. चंद्रकेयूर (-राजवाडे भाअ १८३४)] ॰ग्रहण-न. चंद्रास लाग- णारें ग्रहण. ग्रहण पहा. पृथ्वीच्या छायेंत चंद्र आला असतां त्याला ग्रहण लागतें तें. [सं.] ॰घार-घारी-स्त्री. (विनोदार्थीं) कानशिला- वर लावलेली चपराक; चापटी; मार. (क्रि॰ दाखवणें, देणें). 'मुष्टि- मोदक चंद्रघार्या दिल्या म्हणजे विद्या येते.' [चंद्र + घार (पक्षी)] ॰चकोरन्याय-पु. चंद्र अमृतबिंदु स्त्रवतो व चकोर सेवन करतो त्यावरून असणारा चंद्र व चकोर यांमधील संबंध. ॰चूड- शेखर-पु. महादेव; शंकर. याच्या जटेंत चंद्रकला असते यावरून. [सं.] ॰जोत, ज्योति-स्त्री. १ चंद्रासारखा प्रकाश देणारें दारू- काम; हवाई; याचे निरनिराळे प्रकार आहेत-सफेत, तांबडी, लाल, हिरवीगार, पिवळी, अस्मानी, किरमिजी, गुलेनारा, आबाशाई, जांभळी, नारिंगी, प्याजी. 'चंद्रज्योती चंद्रकार । तेजें अंबर प्रकाशे ।।' -ह २.१२९. २ (व.) मोंगली एरंड. याच्या बिया विषारी असतात, परंतु जाळल्या असतां चंद्राप्रमाणें प्रकाश पडतो. ३ चांदणें; चंद्रप्रकाश. ४ (उप.) कुटुंबांदिकाला लाग- लेला कलंक, डाग. ५ डोळ्यांत घालावयाचें एक औषध. [चंद्र + ज्योति] ॰ज्योत्स्ना-स्त्री. (काव्य) चंद्रप्रकाश, चांदणें. 'मुखीं चंद्रज्योत्स्ना अवयव यथापूर्व बरवे ।' ॰धणी-स्त्री. मनाची तुप्ति. 'जाऊं चोरूं लोणी । आजी घेऊं चंद्रधणी ।' -तुगा २२८. ॰नक्षत्र-न. चंद्राधिष्ठित नक्षत्र [सं.] ॰पर्व-न. चंद्रग्रहणाचा काल, अवधि. [सं.] ॰प्रभा वटी-स्त्री. रससिंदूर, सुवर्णभस्म, अभ्रकभस्म हीं सर्व समभाग, सर्वांबरोबर खैराचा कात, मोचरस घेऊन सर्वांचा एकत्र खल करून सावरीच्या मुळ्यांच्या रसानें एकत्र दोन प्रहर खलून हरभर्याएवढी गोळी करतात ती. ही अतिसारावर गुणकारी आहे. -योर १.४३४. ॰फूल- न. सोन्याचा एक दागिना. -ऐरापु विवि ४२९. ॰बल-ळ- न. १ चंद्राची अनुकूलता. माणसाच्या जन्मराशीला चंद्राचें साहाय्य. २ (ल.) मदत; साहाय्य 'नेदावें चोराशीं चंद्रबळ ।' -तुगा ३२५३. ओढून चंद्रबळ आणणें-१ एखादी गोष्ट इष्ट असतांहि वरपांगीं तिच्याविषयीं अनिच्छा दाखविणें; आढे- वेढे घेणें. 'आजीनें मला हांका मारल्या मी बराच वेळ ऊं ऊं करून ओढून चंद्रबळ आणिलें... शेवटी दुर्गीनें मला ओढून नेलें.' -पकोघे. २ अंगीं प्रतिष्ठा नसतां बळेंच धारण करणें. (एखाद्यास) चंद्रबळ देणें-एखाद्यास कांहीं कार्याविषयीं उत्ते- जन देणें. -तुगा ३२५३. ॰बाळी-स्त्री. (कु.) कानांतील एक मोत्यांचा दागिना. चंद्रपश्वा. यामध्यें चंद्रकोरेप्रमाणें हिरकणी बसवितात. ॰बिंब-न. चंद्राचें बिंब, मंडल, गोल. [सं.] ॰मजकूर-पु. (व.) (विनोदानें) रोजची चंदी. ॰मंडळ-न. १ चंद्रलोक; चंद्रभुवन; चंद्राचें राज्य. २ चंद्रबिंब. 'शुद्ध चंद्रमंडल पाहून स्नान करावे.' [सं.] ॰मणि-पु. एक काल्पनिक रत्न. चंद्रकांत पहा. चंद्रमा-पु. १ चंद्र. 'मुखचंद्री चंद्रमा ।' -एरुस्व ७.१७. २ (तंजा.) एक शिरोभूषण. [सं.] ॰मुखी-वदना- स्त्री. चंद्रासारखें जिचें तोंड आहे अशी रूपवती स्त्री; सुंदर स्त्री. [सं.] ॰मूलिका, मूळ-स्त्रीन. एक वनस्पति. [सं.] ॰मौळी- पु. शंकर. 'उठोनियां प्रातःकाळीं । वदनी वदा चंद्रमौळी ।' -भूपाळी गंगेची ६. 'नाम जपतां चंद्रमौळी । नामें तरला वाल्हा कोळी ।' -तुगा २५२२. -वि. (डोक्यावर चंद्र धारण करणारा) ज्याच्या छपरांतून चंद्रकिरणांचा प्रवेश आंत होतो असें (म्हणजे मोडकळीस आलेलें, जीर्ण झालेलें) घर इमारत; पडक्या घराला व्याजोक्तीनें म्हणतात. [स. चंद्रमौलि = शंकर] म्ह॰ केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी. ॰रेखा-स्त्री. चंद्राची कोर. 'पाडि व्याची चंद्ररेखा । निरुती दावावया शाखा ।' -ज्ञा १५.४७०. [सं.] ॰वंती-स्त्री. चांदणें. 'नदीतटीं रात्री न चंद्रवंती ।' -जगन्नाथ (शके १६६९.) राजवाडे ग्रंथमाला ॰विकासी-वि. चंद्रोदयानंतर उमलणारें (कमलादि पुष्प). शाला-स्त्री. उंच माडी; गच्ची. 'चंद्रासही स्पर्शति चंद्रशाळा ।' -सारुह ५.२०. ॰समुद्रन्याय-चंद्रोदयानें समुद्रास भरती येते या न्यायानें. 'वॉसवेल यास या महापंडिताचें (जॉन्सनचें) वक्तृत्वसेवन कर- ण्याची...अतोनात इच्छा होती व इकडे जॉन्सन यासहि कोणी भाविक श्रोता मिळाला असतां चंद्रसमुद्र न्यायानें त्याच्या वाणीस मोठें भरतें येई.' -नि ६८६. ॰सूर-पु. (योगशास्त्र) डाव्या नाकपुडीनें श्वास सोडणें. याच्या उलट सूर्यसूर. ॰सूर्य-पु. (चंद्र आणि सूर्य) इडा व पिंगला या दोन नाड्या. 'चंद्रसू्र्यां बुझा- वणी । करूनि अनुहताची सुडावणी ।' -ज्ञा १२.५४. ॰सूर्य- संपुट-न. वरील दोन नाड्यांचें संगमस्थान. 'बंधत्रयाचीं घरटीं । चंद्रसूर्य संपुटीं । सुये चित्त ।' -ज्ञा १३.५०८. ॰हार-पु. स्त्रियांच्या गळ्यांतील एक अलंकार; सोन्याच्या कड्यांची माळ.
कच्चा
वि. १ न पिकलेला; हिरवा; कोंवळा (फळ, गळूं, पान इ॰). २ साफसूफ न केलेला; ओबडधोबड (दगड, चित्र, इ॰). ३ अशिजा (भात, भाकरी, रसायन इ॰). ४ अपुरा व पक्का न केलेला; सरासरीचा; ठोकळ (जमाखर्च, काम, इ॰). ५ अपूर्ण; अपक्व; अप्रौढ (कट, मसलत इ॰). ६ अपुरें समजलेलें किंवा मिळविलेलें (शास्त्र, कला). ७ अपुर्या ज्ञानाचा; अर्धवट शिक्ष- णाचा (माणूस). 'तो अभ्यासांत कच्चा आहे.' ८ बिन वाकब- गार; अडाणी; संस्कारहीन; यथातथा ज्ञान असलेला. ९ कोता; अप्रौढ; संकुचित (विचार, बुद्धि). १० गौण; लहान; कमी (वजन, माप; इ॰). ११ न टिकणारा; लवकर नाहींसा होणारा (रंग इ॰). १२ सविस्तर; सर्व पोटभेद ज्यामध्यें घेतले आहेत असा (हिशेब). १३ बळकट नाहीं असा (बांधकाम इ॰). 'मातींत घर बांधूं नये, मातीचें काम अगदीं कच्चें असतें.' १४ इयत्तेहून, वाजवी- पेक्षां कमी. 'आम्हीं एका तासांत एक कच्चा कोस चालतों.' १५ कढवून फार घट्ट न केलेला (साखरेचा पाक इ॰). १६ (गणित) त्रैराशिकांतील दुसरें व तिसरें या दोन पदांचा गुणाकार करून येणार्या रकमेस कच्चे म्हणतात. नंतर त्यांस प्रथमपदानें भागून आलेल्या भागाकारास पक्के किंवा पक्का म्हणतात (ज्याच्या- मध्यें भारी परिमाणाच्या किंमतीवरून हलक्या परिमाणाची किंमत काढावयाची असते अशा हिशेबांत उपयोग), उ॰ १० शेरांस पांच रुपये, तर १।। पावशेरास किती. येथें ५ व १।। ह्यांचा गुणाकार जो ७ ।। कच्चे. १७ कामामध्यें तोटानफा होईल तो मूळ धन्याचा अशा बोलीनें केलेली (नोकरी, मामलत, इ॰); पगारी (मक्ता न देतां नोकराकडून प्रत्यक्षपणें सारा वगैरे वसूल करण्याच्या पद्धतीला हा शब्द लावितात). कच्चा हा शब्द अपुरा, ओबड- धोबड, अप्रौढ, उणा ह्या अर्थानें शब्दशः व लाक्षणिकरीत्या अनेक प्रकारें योजतात. उ॰ कच्चा मजकूर-लिहिणें-वर्तमान-बातमी-हकिगत-कैफियत-वरवरचें, पक्कें नव्हे तें, कसें तरी तयार केलेलें; अंदाजी. कच्चा ताळा-ताळेबंद-कीर्द-जमाबंदी-बाब-हिशेब-बेरीज' इ॰, = अपुरा; बंद न केलेला, अपूर्ण. [ध्व. कच; हिं. कच्चा; तु॰ सं. कथ्थ = खोटें] ॰अमदानी- स्त्री. एकंदर जमा (खर्च वजा न करितां). ॰अंमल-पु. १ पगार घेऊन केलेली सरकारी (जिल्ह्याची, तालुक्याची) नोकरी, काम; याच्या उलट मक्त्याचा अंमल. कच्चा मोकद्दमा पहा. २ कच्चा अर्थ १७ पहा. ॰असामी-पु. हंगामी, उपरी शेतकरी-मालक; ज्याचा कबजा कायमचा नाहीं असा इसम. ॰आकार-पु. ठोकळ हिशेब, अंदाज; साधारण आढावा. ॰कागद-पु. खळ न लावलेला कागद. ॰करवड-पु. माशाचा एक प्रकार, याचा रस्सा करतात. -गृशि २.४७. ॰खर्च-पु. १ कच्चा हिशेब, टांचण. २ तात्पुरता, कायम नव्हे असा खर्च. 'कच्चे खर्चाचे तमाशे असतील त्यांच्या नाइकानें वेळीं आपले लोकास १० दिवस रजा द्यावी.' -(बडोदें,) कलावंत खातें २०. ३ जुजबी; ठोकळ खर्चाखेरीज खर्च; जो प्रसंगीं होईल तो सामान्य खर्च. ॰खर्डा-पु. १ अंदाज- पत्रक; बजेट (हिशेबाचें); पक्का करण्यापूर्वीचा पहिला खर्डा. २ कुळकर्ण्यानें शेतकर्यांकडून आलेल्या रक्कमांचा ठेवलेला हिशेब. ॰खाना-पु. पोळ्या, डाळभात, खिचडी इ॰ जिन्नस. -मसाप १.१०. ॰डांक, डाग-पु. शिसें, जस्त किंवा कथील यानीं दिलेला डांक (चांदीचा नव्हे); तात्पुरता जोड; कस्तर करणें. ॰ताप, ज्वर- पु. साधा ताप; विकोपाला न गेलेला ताप. ॰तोळा-पु. (क.) ९२ गुंजांचा तोळा (पक्का तोळा ९६ गुंजांचा असतो). ॰दोरा- धागा-पु. पटकन् तुटणारा दोरा; पीळ न घातलेला दोरा. ॰पक्का-वि. अंदाजी, ठोकळ आणि त्यावरून केलेला पक्का हे दोन्ही ज्यांत आहेत असा (जमाखर्च, वही, खतावणी इ॰). ॰पाडा- ढा-पु. ठोकळ, तोंडीं, त्रोटक, ठाकठीक न केलेली, कच्ची हकिगत, वर्तमान, साधन (क्रि॰ वाचणें). ॰बटवडा-पु. इसमवार पगारवाटणी (सरकारी नोकर किंवा मजूर यांना); डोईपगार. ॰भरणा-पु. रयतेनें भरलेला सारा, वसूल (ऐन किंवा नक्त). ॰मामला, मामलत-पु. कच्चा अंमल पहा. ॰माल-पु. ओबडधोबड; न कमावलेला; मूळच्या स्वरुपांतील; ज्याचा जिन्नस बनविला नाहीं अशी वस्तु (कापूस, कातडें, बी, वनस्पती इ॰). 'विलायती कारखान्यांत हिंदुस्थानांतून जो कच्चा माल जातो तो बंद झाला.' -के ३१.५.३०. ॰मोकद्दमा-पु. कामामध्यें नफातोटा होईल तो धन्याच्या वाट्याला अशा बोलीनें केलेलें काम, गुमास्तेगिरी; कच्चा अंमल. मक्त्याच्या उलट. ॰रंग-पु. १ धुतला असतां जाणारा, न टिकाऊ रंग; रंग पक्का करण्यासाठीं उकळावा लागतो, तो उकळला नसला म्हणजे त्यास कच्चा रंग म्हणतात. २ तिफाशी सोंगट्यांत काळा अथवा हिरवा रंग. ॰वसूल-पु. रयतेकडून आलेला सारा, खंड (ज्याची वर्गवारी काढली नाहीं असा). ॰शेर-पु. प्रमाणभूत (पक्क्या) शेरापेक्षां कमी असणारा शेर. (क.) १५ रुपये भारांचा शेर. (उलट पक्का ८० भारांचा). ॰कच्ची-स्त्री. (तिफाशी सोंगट्यांत) १ मेलेली पण पुन्हां नुकतीच जिवंत केलेली, नुकतीच बसविलेली सोंगटी; पट फिरून न आलेली सोंगटी. २ हिरवी किंवा काळी सोंगटी. तिफाशीं सोंगट्यांत तांबडा व पिंवळा यांस पक्का व हिरवा व काळा यांस कच्चा रंग अशा संज्ञा आहेत. ३ (ल.) फजिती; मानहानि; अपकीर्ति. ॰असामी-स्त्री. दिवाळें वाजलेला किंवा अपुरीं साधनें असलेला, नालायक सावकार, कंत्राटदार, कूळ, अर्जदार, खंडकरी इ॰. ॰कमाविशी-कमावीस-स्त्री. तैनात घेऊन केलेलें सारावसुलीचें काम; नफातोटा धन्याचा अशा बोलीनें मामलत वगैरे करावयाचा प्रकार; कच्चा अंमल (ह्याच्या उलट मक्त्याची कमाविशी). ॰कुंदी-स्त्री. कपडा भट्टींत न घालतां नुसता धुवून केलेली थंडी इस्त्री. २ धुतलेल्या कपड्यास खळ न लावतां केलेली इस्त्री. [कच्ची + कुंदी = खळ लावणें, इस्त्री करणें] ॰कैद- स्त्री. चौकशीपूर्वीची किंवा अपराध शाबीत होण्यापूर्वीची कैद. २ नजरकैद; साधी कैद. ॰कोंबी करणें-(क.) एखाद्याचें भजन करणें. ॰खोर-पु. सदोदित ज्याची फजिती किंवा पच्ची होते असा माणूस; फजीतखोर. ॰जमाबंदी-स्त्री. एकूण आलेली गांवची जमा (खर्च वेगळा काढून तो वजा न घालतां). ॰जप्ती-स्त्री. (कायदा) दाव्याचा निकाल लागण्यापूर्वी केलेली जप्ती; अवलजप्ती पहा. ॰बाजू-स्त्री. (सोंगट्यांचा खेळ) तिफाशी डावांत काळ्या व हिरव्या सोंगट्या. ॰बुटी-ट्टी-स्त्री. सोनेरी किंवा रुपेरी रंगानें कापडावर काढितात ती बूट, फुलें, खडी. -वि. अशा कापडाचें (पागोटें; अंगा- रखा इ॰); खडीदार. ॰माती-स्त्री. कोरडी, चिक्कणपणा नसणारी माती. ॰मामलत-कच्चा अंमल पहा. ॰मिती-स्त्री. मारवाडी, सावकार हे कर्जाऊ दिलेल्या रकमेची तारीख आदल्या दिव- शींची घालतात ती. याच्या उलट पक्की मिती (कुळाकडून आलेल्या रकमेची तारीख मात्र दुसर्या दिवशींची घालतात). ॰मुदत-स्त्री. (सावकारी) हुंडी हातांत पडल्यानंतर अमुक दिवसांतच ती वटविली पाहिजे अशा प्रकारची दिलेली मुदत; ह्याच्या उलट बंदीमुदत ( = हुंडींत दिलेल्या तारखेनंतरची जास्त मुदत). २ हुंडीची ठराविक मुदत भरण्यापूर्वीचा काल; अद्याप संपावयाचा मुदतीचा काल. ॰लढाई-स्त्री. पुरा निकाल न होतां झालेलें युद्ध; दोन्ही पक्षांनीं मध्येंच सोडून दिलेली लढाई; अनिर्णीत लढाई. ॰वहिवाट-स्त्री. कची वहिवाट पहा. ॰शाई-स्त्री. लाख न मिसळलेली, पाण्यानें निघून जाण्यासारखी शाई. ॰सुपारी-स्त्री. न शिजविलेली सुपारी; पोफळ; रोठा. ॰हुंडी-स्त्री. अद्याप न पटलेली किंवा न स्वीकार- लेली हुंडी. ॰कच्चें-वि. न पिकलेलें, व इतर अर्थी कच्चा पहा. ॰अंडें-न. नवीन घातलेलें अंडें; ताजें अंडें. ॰अक्षर-न. खराब व बिन कित्त्याचें अक्षर; वळण नसलेलें अक्षर. ॰इरसाल-न. जिल्ह्यांतून सरकारी खजिन्यांत पाठविलेला शेतसार्याचा भरणा. ॰कातडें-न. न कमावलेलें किंवा रंगविलेलें कातडें. ॰खोर-कच्ची- खोर पहा. ॰खातें-न. (हिशेब) ज्या खात्याचें येणें-देणें पुढील सालास उतरावें लागत नाहीं असें खातें; तात्पुरतें खातें. ॰गिरी- स्त्री. कच्चेपणा; अपूर्णता; अपक्वता. 'तुम्ही आधीं कच्चेगिरी केली म्हणून फसला.' ॰चीट-छीट-न. जें धुतलें असतां त्यावरील रंग नाहींसा होतो असें चीट. ॰दूध-१ न तापविलेलें, निरसें दूध. २ नवीन व्यालेल्या जनावराचें पहिल्या बारा दिवसांतील दूध; कोवळें दूध. ॰नाणें-न. चलनी नाण्यांत आलेला सरकारी वसूल (यांत निरनिराळीं नाणीं सरभेसळ आलीं असतात). ॰पान-न. पान- वेलीचें, विड्याचे हिरवें पान (याच्या उलट पक्कें, पिकलेलें पान). ॰पोतें-न. सरकारी चावडींत भरलेला शेतसारा; सरकारी खजि- न्यांत ज्या स्थितींत येतो त्या स्थितींतील वसुली पैसा. ॰बच्चें- न. (अव. कच्चींबच्चीं) मूलबाळ; पोरबाळ; लहान मूल. 'येक म्हणे गा पळोन जावें । तरि कच्चे बच्चे काय करावे ।' -दावि २३२. 'तो चार कच्च्याबच्च्यांचा धनी आहे.' [हिं. कचबच] ॰बारा-पु. (तिफाशी सोंगट्यांत) फांशांवरील एक दान; (एकावर पांच, एकावर सहा व एकावर एक अशा) बारा ठिपक्यांचे दान. ॰मडकें-१ न भाजलेलें मडकें. २ (ल.) अज्ञानी माणूस (मडकें = डोकें, बुद्धि). हें अजून कच्चें मडकें आहे.' -नाम ४. ॰रंग-पु. (तिफाशी सोंगट्यांत) हिरवा व काळा रंग. कच्ची बाजू पहा. ॰रेशीम-न. पाण्यांत न उकळलेलें रेशीम. ॰लोणी-न. कोर्या दुधापासून घुसळून काढलेलें लोणी ([दह्याचें नव्हे]) ॰वजन-न. (क.) (सोन्याचें) ९२ गुंजांचा तोळा. कच्चा तोळा पहा.
ति
वि. (प्र.) तीन; संख्यावाचक उपसर्ग, प्रत्यय; जसें- तिमजला, तिकोनी = तीन मजल्यांचा, तीन कोपर्यांचा. [सं. त्रिः; प्रा. ति] सामाशब्द-तिकटणें-न. १ शेतामध्यें तीन बांध (वरोळ्या) एका ठिकाणीं असतात तें ठिकाण. २ तीन रस्ते एकत्र मिळ- तात तें ठिकाण. ३ तीन काठ्या वगैरे एकत्र बांधून केलेली रचना; तिकटी. [त्रिकूट] तिकटी-स्त्री. १ तीन काठ्या जुळवून केलेली एक त्रिकोणाकृति रचना. २ त्रिकोण. [सं. त्रिकाष्ठ; प्रा. तिकठ्ठ. त्रिकूट] तिकटें-न. १ लांकडी त्रिकोण (स्मशानांत अग्नि नेण्यासाठीं, विहिरीतून पदार्थ काढण्यासाठीं इ॰ केलेला तीन कामट्या, लांकडे यांचा). २ त्रिदळ; त्रिखंड पान (पळस, बेल, निगुडी इ॰चें). ३ तीन पानांची पत्रावळ. ४ (पंढरपूरकडे) तिफण; तीन नळकांड्यांची पाभर. ५ लांकडाची तिवई. (गो.) तीन काठ्यांची घडवंची. [सं. त्रिकाष्ठ; प्रा. तिकट्ठ. तुल. त्रिकूट] तिकडी-वि. तीन कड्यांची. 'जैं कहीं अवचटें । हे तिकडी सांखळ तुटे ।' -ज्ञा १६. ४३८. [ति = तीन + कडी] तिकळा-ळी-ळें-वि. तिखुळा पहा. तिकांडी-स्त्री. एक गवत. 'तिकांडी घोडेकुसळी ।' -गीता २. ५२८६. [ति = तीन + कांडें = पेर] तिकांडें-ढ्या-न. मृगशीर्ष नक्षत्रपुंजांतील तीन तारे; शिवाचा बाण. लुब्धक पहा. [सं. त्रिकांड] तिकुटी-स्त्री. त्रयी; तिघांची जोडी; त्रिकूट. 'गुणीं देवां त्रयी लाविली । गुणीं लोकीं तिकुटी पाडिली ।' -माज्ञा १८.८१७. [सं. त्रिकूट] तिकोनी-वि. तीन कोपर्यांचा-कोरांचा-कोनांचा. [सं. त्रिकोण] तिक्कई-स्त्री. तिर्खई; एकदम तीन तीन खडे घेऊन सागरगोटे; खडे इ॰ खेळण्याचा मुलींचा खेळ. याप्रमाणें दुर्खई; पांचखई इ॰ संज्ञा. [सं. त्रिक; म. तिक + ई प्रत्यय] तिक्कल- स्त्री. गंजिफांच्या खेळांत अनुक्रमानें लागलेलीं एकाकडे आलेलीं तीन पानें. तिक्का-पु. तीन चिन्हें असलेलें गंजिफांचें पान; तिव्वा. तिखणी-स्त्री. (घराचे) तीन खण, भाग. -वि. तीन खण अस- लेलें; तीन खणी (घर इ॰). [ति = तीन + खण] तिखळा-ळी- ळें-तिखुळा-ळी-ळें पहा. तिखुळा-ळी-ळें-वि. तीन मुलगे अथवा मुलींच्या पाठीवर झालेला (मुलगा, मुलगी किंवा सामा- न्यतः मूल). तिगस्त-न. १ गेल्या वर्षाच्या मागचें वर्ष. 'तिगस्त बाकी-वहिवाट इ॰.' २ गंजिफांच्या खेळांतील एक संज्ञा, डावां- तील एक विशिष्ट काल; गंजिफांच्या खेळांत तिन्ही खेळणारांचा एक तरी हात होणें. [तीन + फा. गस्त = गत] तिगस्तां-क्रिवि. गेल्याच्या मागील सालीं. [तिगस्त] तिगुण-वि. १ त्रिगुण. २ तिप्पट. [सं. त्रिगुण अप.] तिगुणी-वि. तिहेरी; त्रिगुणात्मक. 'जो अविद्येचिया चिंधिया । गुंडूनि जीव बाहुलिया । खेळवीतसे तिगुणिया । अहंकाररज्जु ।' -ज्ञा १८.९१५. तिघई-वि. तीन गस्ते असलेलें, एकापुढें एक तीन वठारें असलेलें (घर). तिघड- पु. (राजा) तीन आंबे, नारळ इ॰चा घड. तिघड-वि. (कों.) दर तीन लोटे बांधून झाले म्हणजे एक खापेकडाची जुळी वग- ळावी अशा रीतीनें लोटे बांधलेली (रहाटाची माळ). -क्रिवि. माळ तिघड होईल अशा रीतीनें (बांधणें). तिघडी-स्त्री. १ तिहेरी घडी (कापड, कागद इ॰ची). २ तिहेरी घडी घातलेली, तिपदरी वस्तु. -वि. तीन घड्या घातलेली. [ति = तीन + घडी] तिघस्त-न. तिगस्त अर्थ २ पहा. तिजवर-पु. १ तिसर्यांदा लग्न करीत असलेला माणूस. २ तीन लग्नें केलेला मनुष्य. [तिजा + वर] तिधारा-री-वि. १ तीन धारा-कडा असलेला. 'तिधारां अंदु फीटलियां । चरणींचिआ ।' -शिशु ७१६. २ तीन कांठ किंवा काड्या असलेलें (धोतर इ॰). [ति + धारा] तिधारी- निवडुंग-पुन. एक जातीचा निवडुंग. याच्या पेरास तीन कांट्यांच्या रांगा असतात; याच्या उलट फड्यानिवडुंग. तिधारें- न. नकसगाराचें एक हत्यार. तिपट-वि. (सामा.) तिप्पट पहा. तिपटी-स्त्री. तिप्पट संख्या अथवा परिमाण. तिपडें-न. (नाट्य) बकर्याचे केंस वळून गंगावनाच्या आकाराची स्त्री नटाकरितां तयार केलेली तीनपदरी वेणी. -पौराणिक नाटकाचा काळ. तिपदरी- वि. तीन घड्यांचें किंवा तीन पदर असलेलें (कापड; दोर इ॰). तिपाई-(व.) तीन पायांची घडवंची; तिवई. (बिडाचा कार- खाना) डेरा तयार करण्यासाठीं मातींत रोंवण्याचे लांकडी धीरे व गोलाकार लोखंडी गज. तिपाठी-वि. तीन वेळां वाचून, ऐकून पाठ म्हणणारा. तिपांडी-स्त्री. (कों.) तीन पांड भातजमीनीची प्रत्येक वीस पांडांच्या बिघ्यामागें रयतेस दिलेली जमीनीची सूट. तिपानी-स्त्री. एक लहान वेल. श्वास, व्रण, विष यांची नाशक. -वगु ४.१. -वि. तीन पानें असलेलें; त्रिदल (झाड, अंकुर). [सं. त्रिपर्णी] तिपायी-स्त्री. तिवई. -वि. तीन पाय असलेलें (जनावर; वस्तु). [तीन + पाय] तिपिकी-वि. एका वर्षांत तीन पिकें देणारी (जमीन). तिपुडी-वि. १ तीन कप्पे, खण असणारी (पेटी). २ तीन पूड असलेला मृदुंग. [सं. तिपुटी] तिपेडणें- सक्रि. तीन पेड देणें; वळणें. तिपेडी-ढी-वि. तीन पेडांनीं केलेली (दोरी, वेणी इ॰). तिपेरीस्त्री. नाचणीची एक हळवी जात. हिच्या काडास तीन पेरें आलीं म्हणजे कणीस येतें. -वि. तीन सांधे, पेरीं असलेलें (बोट इ॰). तिप्पट-स्त्री. तीन पट संख्या; तिप्पटपणा. -वि. १ तीनदां जमेस धरलेली (संख्या) त्रिगुणित. २ तीन घड्यांचे; तिपदरी (कापड इ॰) तिफण-णी-न.स्त्री. तीन नळ्या, फण असलेली पाभर, पेरण्याचें यंत्र. [ति + फण] तिफण- स्त्री. (व.) चार एकर (जमीन). तिफसली-वि. तीन पिकें ज्या जमिनींत निघतात ती जमीन. तिफांटा-पु. जेथें रस्ता, नदी. किंवा झाडाच्या खोडाच्या तीन बाजू फुटतात ती जागा. तिफांशी- सी-वि. १ तीन फाशांनी खेळावयाचा (सोंगट्यांचा एक खेळ). २ तीन फाशांनीं युक्त (दोरी इ॰). [ति + फास] तिबक-स्त्री. खेळांत विटी उडली असतां खालीं पडण्यापूर्वी दांडूनें तीनदां मारणें. 'हबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडूं । खेळू विटी दांडू ।' -भज ११३. [ति + ध्व. बक्?] तिबंदी-स्त्री. दोन वरखां (पानां) चा एक बंद याप्रमाणें तीन बंदांची केलेली कागदाची घडी. तिब्राद- वि. (पोर्तु.) तिप्पट. [पोर्तु. त्रेस्दो ब्रादो] तिमजला-ली- वि. १ तीन मजल्यांची (इमारत). २ तीन, तिहेरी काठांचा (शेला, धोतर इ॰). ३ तीन तळ (डेक) असलेलें (जहाज). तिय्यम-वि. तिसर्या दर्जाचें. 'दुय्यम, तिय्यम अधिकारी.' -सूर्यग्र ३४. तिय्या-पुस्त्री. (पत्त्यांचा खेळ). तिर्री; तीन ठिपक्यांचे पान. [ति = तीन] तिरकानी-रेघ-ओळ-स्त्री. कागदाच्या पडलेल्या चार मोडींपैकीं तीन मोडींमध्यें काढलेली रेघ. [सं. त्रि-तिर् + कान, रेघ] तिवई-स्त्री. १ तीन पायांची घडवंची; तिपाई. २ (कों.) तिवटें; भाताचीं रोपें उपटतांना शेतांत बसण्याठीं घेतात ती पायांची तीन घडवंची. तिपाई पहा. [सं. त्रिपदी; प्रा. तिवई] तिवटणां-(महानु) तीन वाटा मिळ- तात ती जागा; चौक; नाका; तिवठा. 'कलियुगाचा तिवटणां.' -भाए १०९. [सं. त्रि + वर्त्मन्; प्रा. तिवट्ट] तिवटी-स्त्री. (गो. कों.) अवयवाची वक्रता. 'पाय तिवटीं पडला.' [सं. त्रिवर्कि; प्रा. तिवट्टी] तिवटें-तिवई अर्थ २ पहा. तिवठा-पु. १ तीन रस्ते मिळतात ती जागा. २ तिवडा अर्थ १,२ पहा. [सं. त्रि + वर्त्मन्; प्रा. तिंवट्ट] तिव(वं)डा-पु. १ मळणी कर- ण्याकरितां खळ्याच्या मध्यभागीं पुरलेला खांब. 'हनुमंत तिवडा मध्यें बळें । पुच्छ पाथी फिरवितसे ।' -रावि २०.१९५. ३ शेतांत धान्य वारवण्यासाठीं उपयोगांत आणावयाची एक तीन पायांची घडवंची. ३ एक ताल अथवा गति. [सं. त्रि + पद] तिवण-१ त्रिदळ. २ तिहेरी घडी, पदर (कापडं, कागद इ॰ ची). तिव- णता-वि. (राजा.) तिघडी; तिहेरी; तिपदरी (कागद; कापड वगैरे). तिवणा-वि. तीन पानांचा; त्रिदळ. 'त्रिविध अहं- कारु जो एकु । तो तिवणा अधोमुखु । डिरु फुटे ।' -ज्ञा १५.९५. -एभा ११.१८८. [सं. त्रिपर्ण; प्रा. तिवण्ण] तिवधां-पु. अनेक गांवांच्या सीमा ज्या ठिकाणीं मिळतात ती जागा. [सं. त्रि + बंध किंवा वृंद; प्रा. तिबंद] तिवनी-स्त्री. (व.) (पळसाचें) त्रिदळ; तिवण. तिवनें-न. तिघांचा समुदाय. तिवनें-वि. तीन पानांचें. तिवण-णा पहा. [सं. त्रिपर्ण; प्रा. तिवण्ण] तिवल-पु. (तीन वेळ) दीड आणा. [तीन + वेळ = अर्धा आणा] तिवळी- स्त्री. (गो.) पोटावर पडणारी तीन वळ्यांची आठी. त्रिवळी पहा. [सं. त्रि + वली] तिंवा-पु. (गो.) दगडाचा अगर मातीचा केलेला चुलीचा पाय. २ तिव्हा; तिवई; तिनपायी; तिवारी (ज्यावर उभें राहून उपणतात ती). तिवडा अर्थ २ पहा. [सं. त्रि + पदा; प्रा. तिवय] तिवाट-ठा-पु. तीन रस्ते एकत्र मिळण्याची जागा. तिवठा पहा. फाटाफूट; ऐक्यभंग. 'केला तुवां देखत भर्तृघात । क्षणें तिवाटा रचिल्या तिघांत ।' -वामन, भरतभाव ७. [त्रि + वर्त्मन्; प्रा. तिवट्ट म. तिवाट] तिवारा-पु. (माळवी) तीन दारें असलेला दिवाणखाना. [सं. त्रि + द्वारिका; प्रा. ति + वारिआ; हिं. तिबारा] तिवारी-स्त्री. (व.) तिवडा अर्थ २ पहा. तिन- पायी (जीवर उभें राहून उपणतात ती) तिवा पहा. तिवाशी- वि. तीन वाशांचें केलेलें (घर, खोपट इ॰ उपहासार्थी). [तीन + वांसा] तिवाळ-स्त्री. एकसंध विणलेले तीन पंचे; तीन पंच्यांचें कापड; चवाळें पहा. तिवाळी-स्त्री. एक कापडाची जात. -मुंव्या १२३. [ति + आळें] तिवेती-वेत-वि. तीनदां व्यायलेली (गाय इ॰) [ति + वेत] तिवेळा-ळां-ळीं-क्रिवि. तिन्हीवेळां; सकाळीं, दुपारी, संध्याकाळीं; त्रिकाळ. तिव्वा-वा-पु. (गंजिफा, पत्त्यांचा खेळ) तिर्री; तीन ठिपके असलेलें पान. तिव्हडा, तिव्हा-पु. तिवडा अर्थ २ पहा. तिव्हाळ-पु. (महानु.) तीन रस्ते एकत्र होतात ती जागा; तिवाठा. 'तेथचि तिव्हाळां प्रकास- दर्शन ।' -ॠ ११८. तिशिंगी-वि. तीन शिंगांचा (पशु). [तीन + शिंग] तिशेंड्या-पु. (डोक्यावरच्या तीन शेंड्यांवरून) मारवाडी (निंदाव्यंजक शब्द). [ति + शेंडी] तिसडी-स्त्री. १ तीन वेळां अथवा तिसर्यांदा तांदूळ कांडणें. तिसडीनें सडणें. २ (ल.) बारीक चौकशी; छडा [तीन + सडणें] तिंसड-डा- डी-वि. तीन वेळ सडलेले (तांदूळ). [ति = तीन = सडणें] तिसढ-स्त्री. तिसर्यानदां करणें (काम इ॰) तिसड-वि. तीन थानांचें (जनावर). [तीन + सड] तिसाला-लां-विक्रिवि. लागो- पाठ तीन वर्षांसंबंधीं; तीन वर्षांकरितां; त्रैवार्षिक (हिशेब, बाकी इ॰). [हिं.] तिस(सा)रणी-स्त्री. तिसारणें पासून धातुसा- धित नाम. -क्रिवि. तिसर्यांदा. तिस(सा)रणें-सक्रि. तिस- र्यांदा करणें. -अक्रि. (कोंबडा) तिसर्यांदा आरवणें. [तिसरा] तिसुती-स्त्री. १ तिहेरी, तीन पदरी-फेरी दोरा; दोरी (जानवे इ॰ चा). 'तिसुतीला पीळ भरून झाला आहे, आतां नऊसुती करा- वयाची आहे.' २ तीन कुटुंबांचा आपापसांतील लग्नसंबंध. तिर- कूट अर्थ ३ पहा. -वि. तीन सुतांची, धाग्यांची, पदरांची (दोरी). [तीन + सुती] तिस्ती-स्त्री. (प्र.) तिसुती. (कों.) (जानव्याचें) पातीवर मोजलेलें सूत गुंडाळून ठेवतात ती गुंडाळी. [सं. त्रि + सूत्र, त्रिसुती] तिहोत्रा-पु. दरमहा दरशेंकडा तीन असा व्याजाचा दर. [तीन + उत्तर]
काळा
पु. १ (सांकेतिक) बिब्बा; भिलावा. २ (काव्य) श्रीकृष्ण; विठोबा. 'अपयशाचें खापर......त्या काळ्याच्या ढाळक्यावर फुटलें' -नामना १३. ३ काळसर्प. 'जागविला पुच्छीं त्वां देवुनि पद बहु सपूर्वफट काळा ।' -मोउद्योग १२. २१. --वि. १ कृष्णवर्ण; श्याम; काजळाच्या रंगासारखा; तशा रंगानें युक्त असलेला. २ कपटी. 'कृष्ण बाहेर काळा तसाच आंतहि काळा आहे.' -परिभौ २५. [सं. काल; फ्रें. जि. काळो, काळार्दी = जिप्सी माणूस; पो. जि. काळी; फा. कारा; सिं काला; का. करि] काळपूर्वपद असलेले रंग, वर्ण या अर्थांचें सामासिकशब्द- काळजिभ्या-वि. १ शिवराळ तोंडाचा; अनिष्ट बोलणारा; निमदळ; शिव्याशाप देणारा; अचकट विचकट बोलणारा. २ ज्याचें वाईट भाषण खरें होतें असा. ॰टिक्या- वि. १ काळे ठिपके असलेला (घोडा इ॰) घोड्याच्या ७२ अशुभ चिन्हांपैकी हें एक आहे. -मसाप २.५६. ॰तोंड्या- वि. १ दुर्दैवी; अपशकुनी; दुष्ट. २ लज्जित झालेला; गांगरलेला; खजिल. 'स्नेह कैसा सांडिला ध्रुवा आजी । काळतोंडा जाहलों जगामाजीं ।' -चिंतामणिकवी ध्रुवाख्यान. ३ (व.) ओठावर काळे केंस असलेलें(जनावर). ॰ळंदरा-ळुंद्रा-(शिवी) काळ्या उंदरासारखा काळा कुळकुळीत. ॰दांत्या वि. १ काळे दांत अस- लेला (कर्मविपाकावरून असला माणूस पूर्वजन्मीं मांग होता अशी समजूत आहे.) २ (ल.) अशुभकारक; अनिष्टदर्शक; अपशकुनी (माणूस). ३ (ल.) शिव्याशाप देणारा; शिवराळ; निंदक. ॰ळंबन-ळमन-स्त्रीन. अंधारलेली, सर्द हवा; पाऊस, थंडी यांनीं युक्त वांबाळी हवा. [कादंबिनी] ॰बुंडी-बोंडी जोंधळा- पु. जोंधळ्याची एक जात; याचें बोंड काळें असतें. ॰मांजर- पुन. कांडेचोर; ऊद. ॰मुखी-वि. १ काळ्या तोंडाचा; तोंडावर काळे केंस असलेला (घोडा), हा अशुभकारक समजतात. २ सामा- न्यतः काळ्या तोंडाचा. ३ (काव्य) दुष्ट; भयंकर; राक्षसी. 'नागविले प्रतापी थोर थोर । दशवक्त्र काळमुख ।' ॰मुखी गुंज- स्त्री. काळा ठिपका असलेली गुंज. ॰मुख्या-वि. दुर्दैवी; अभागी; अधम; नीच. ॰लोह-न. पोलाद; कालायस. 'काळलोहें डंव- चिलें । वज्रवाटीं बांधिलें ।' -शिशु ५०९. ॰वख-खा-खें-पुन. १ काळोख; अंधार (कांहीं ठिकाणीं चुकीनें काळवसें असा शब्द वापरलेला आहे). 'महामोहाचा काळवखा ।' -भाए १०२. 'कां काळ राहे काळवखा । तो आपणा ना आणिकां ।' -अमृ ४.३६. 'निद्रेचे शोधिले । काळवखें ।' -ज्ञा १२.४९. 'अविद्येचे काळवसे । समूळ गेले तेधवां ।' -भवि ९.१९६. २ काळेपणा; डाग. ॰वट-वि. १ काळसर. २ काळा; काळी (जमीन). [काळा + वत्] ॰वटणें-वंडणें-अक्रि. १ काळें पडणें; मलिन होणें; (ऊन वगैरे लागल्यामुळें शरीर इ॰) अपराध, भय यानीं चेहरा काळा ठिक्कर पडणें; काळानिळा पडणें; हिरवा निळा होणें. २ शेत पीक यांचा फिकटपणा जाऊन टवटवीत होणें; निसवण्याच्या स्थितीस येणें. ३ (काव्य) काळा पडणें. 'ग्रहणीं काळवंडे वासरमणि ।' 'चंद्रबिंब विटाळलें । गुरुद्रोहें काळ- वंडलें ।' -कथा १.२.१५०. ॰वटी-वण-स्त्री. काळिमा; डाग; कलंक; दोष. ॰वंडी-स्त्री. (कों.) कळवटणें, काळवंडणें पहा. ॰वत्री-वथरी-स्त्री. सह्याद्रींतील दख्खनमधील अग्निगर्भ काळा खडक; हा ज्वालामुखीच्या रसाच्या थरांतील उष्णता विसर्जन पावून झाला आहे. -सृष्टि ३८. ॰वदन-वि. काळमुखी (घोडा) पहा. -अश्वप ९४. ॰विद्रें-काळुंद्रा पहा. काळवें-(राजा. कुण.) संध्याकाळची काळोखी. ॰सर-वि. कळवट; किंचित् काळ्या रंगाचा. ॰सरणें-अक्रि. काळवटणें; काळवंडणें पहा. ॰सावळा-वि. काळासावळा; साधारण काळा. (रंग). काळा-नें आरंभ होणारे शब्द (वाप्र.) काळ्याचे पांढरे होणें-एखाद्याचे काळे केस पांढरे होणें; म्हातारपण येणें. पांढर्याचे काळे होणें-म्हातारपणांत तरुणपणाचे चाळे करणें; सचोटी सोडून देणें. काळ्या डोईचें मनुष्य-न. (जेव्हां इतर जिवांपेक्षां (प्राण्यांपेक्षां) माणसाची अद्भुत शक्ति वर्णाव- याची असते अशावेळीं हा शब्द माणसास लावतात). काळ्या दगडावरची रेघ-(वाप्र.) टिकाऊ; अक्षय्य; अबाधित अशी गोष्ट; उक्ति; न बदलणारी गोष्ट. 'ही आपली माझी काळ्या दगडावरची रेघ.' -तोबं १७९. सामाशब्द- ॰अबलख-वि. पांढर्या अंगावर काळे ठिपके असणारा (घोडा). ॰अभ्रक- पु. काळ्या रंगाचा अभ्रक. ॰आजार-पु. हा भयंकर रोग आसाम व मद्रास इलाख्याच्या एक भागांत होतो. यानें यकृत व प्लीहा फार वाढतात आणि रोज ताप येतो. ॰उन्हाळा-पु. १ अत्यंत कडकडीत उन्हाळा; यामुळें सर्व सृष्ट पदार्थ रखरखीत भासतात. २ कठिण, आणीबाणीची, टंचाईची वेळ; आयुष्याच्या भर- भराटीच्या साधनांचा अभाव. 'तूं काळ्या उन्हाळ्यांत मजजवळ पैका मागतोस काय?' ३ चैत्र व वैशाख हे दोन महिने. ॰उंबर- पु. उंबरे झाडाची एक जात. ॰कभिन्न-कभीन-वि. अत्यंत काळा; लोखंडासारखा काळा. [सं. काल + का. कब्बिण्ण = लोखंड] ॰किट्ट-कीट-कुट्ट-कुळकुळीत-मिचकूट- वि. अतिशय काळा. (किट्ठ, कुट्ठ वगैरे शब्द जोर दाखवितात). लोखंडासारखा किंवा शाईसारखा काळा. काळा जहर पहा. 'हा अमावास्येचा । काळाकुट्ट अंधार' -चंद्रग्र २. ॰कटवा-पु. काळा तीळ. ॰करजत-करंद-वि. काळाकभिन्न. ॰करंद- फत्तर-पु. काळा दगड. 'कृष्णवेणीचें पाणी काळाकरंद फत्तरांतून उसळ्या मारीत' -खेया २९. ॰कुडा-पु. कुड्याच्या झाडांतील एक जात. दुसरा तांबडा कुडा. [सं. कुटज; बं. कुटराज; हिं. कुडा, कौरेया; गु.कडी] ॰कुमाईत-वि. काळ्या रंगांत तेल्या रंगाची झांक असलेला (घोडा.) ॰क्रूम-पु. (चांभारी) विशिष्ट पद्धतीनें कमावलेलें काळें कातडें. ॰खापर-वि. खापरासारखा काळा. ॰गरु-पु. काळ्या रंगाचा अगरु, धूप. 'तत्काळ काळागरु धूप दावी ।' -सारुह ८.७९. ॰गवर-पु. एक शक्तिवर्धक वनस्पति. ॰गहिरा-वि. काळा कुट्ट. ॰गुगळी-पु. गुगळासारखा काळा मासा. ॰गुरा-पु. एक लहान झाड. ॰गोरा वि. १ काळा व गोरा. २ खराखोटा; शुद्धाशुद्ध. ॰चांफा-पु. चाफ्यांतील एक भेद. ॰चित्रक-पु. चित्रक (एक औषधी) झाडाची एक जात. काळचो-पु. (गो.) नीच मनुष्य. -ळांजनी-वि. एकरंगी असून डाव्या खाकेच्या जवळ किंवा छातीवर काळा ठिपका असलेला (घोडा) यामुळें धन्याला मृत्यु येतो अशी समजूत आहे. अश्वप ९६. ॰जहर-ठिक्कर-ढोण-वि. काळाकभिन्न. ॰डगलेवाला- पु. पोलीसचा शिपाई. ॰तित्तर-तीतर पु. रंगीबेरंगी तितर पक्षी. ॰तीळ-पु. कारळा तीळ पहा. ॰दगड-पु. काळवत्री- वथरी पहा. ॰दाणा-पु. एक वेल; हिचें कांडें व शाखा यांवर बारीक कुसें असून पानें कपाशीसारखीं असतात. फुलें फिकट, निळ्या रंगाची घंटेच्या आकाराचीं, व मोठीं असतात. फळ नरम असून आंत तीन पुडें व त्यांत काळें बीं असतें. याचा औषधाकडे उपयोग करतात. -वगु ७.१. [सं. कृष्णबीज, नीलपुष्पी] ॰धोतरा-पु. काळसर-जांभळट धोतर्याचें झाड. ॰निळा-वि. काळासांवळा (रंग, चेहरा). ॰फत्तर पु. १ काळवथरी दगड. २ (ल.) अत्यंत मूर्ख; अडाणी माणूस. ॰बगळा-पु. काळ्या पाठीचा बगळा. ॰बाळा-बाहाळा-वि. फिकट काळे किंवा काळे व पांढरे पट्टे अंगावर असलेला (पशु.) ॰बेंदरा-बेंद्रा- वि. काळा व हेंगाडा; विद्रूप. 'मी चांगट फांकडी रूपानें तूं काळा बेंदरा' -पला ५. [काल + हेंदर]? ॰बेरा-वि. काळाबेंदरा (अंगाचा वर्ण, स्वरूप, कपडालत्ता वगैरे). ॰बोळ-पु. बाळंत- बोळ; एका झाडाचा वाळलेला चीक. हा मुलांच्या पोटदुखीवर उपयोगी आहे. ॰भिल्ल-भील-मांग-वीख-वि. काळाकभिन्न. ॰भोपळा पु. भोपळ्याची एक जात; तांबडा भोपळा; गंगाफळ. ॰माजा-पु. मायफळ; माजूफळ. ॰मासी-पु. पित्तपापडा. ॰मुरूम-पु. काळ्या रंगाचा मुरूम. ॰शेंगळ पु. काळ्या रंगाचा एक मासा. ॰सावळा-वि. केवळ काळाहि नाहीं व केवळ गोराहि नाहीं असा (रंग, रंगाचा); साधारण काळा. [सं. काल + श्यामल] ॰सावा-पु. साव्याची काळी जात. ॰सुरमा-पु. डोळ्यांत घालावयाचें एक अंजन; (ब्लॅक सल्फेट ऑफ अँटिमनी). काळें उडीद-पुअव. माष; एक द्विदल धान्य. ॰केस-पुअव. (ल.) तारुण्य व त्यांतील खुमखुमीचा काळ; याच्या उलट पांढरे-करडे केश. ॰तीळ पुअव. काळ्या रंगाचे तीळ, श्राद्धपक्ष, श्रावणी वगैरे कार्यांत उपयोगी पडणारे तीळ. काळेला-रा- वि. काळसर वर्णाचा. काळ्या पाठीचें खोबरें-न. ज्या खोब- र्याची पाठ काळी असतें तें, ही खोबर्याची एक जात आहे. काळीनें आरंभ होणारे शब्द. काळी-वि. १ रंगानें काळी (स्त्री, मादी वगैरे). स्त्री. -स्त्री. म्हैस (कारण ती रंगानें काळी असते) ज्याचे घरीं काळी त्याची सदा दिवाळी ।' म्ह॰ (व.) काळीकाळीउंदर तिचा सैपाक सुंदर-काळ्या स्त्रीस चढविण्या- साठीं म्हणतात. सामाशब्द- ॰काठी-स्त्री. एक औषधी झुडूप. ॰कांब-१ काळ्याकुट्ट ढगांची रांग. (क्रि॰ येणें; जमणें; उठणें; विरणें; फाकणें). २ (ल.) काळ्या रंगाच्या कुण- ब्यांची (जेवण वगैरेस बसलेली) पंगत. ॰खजुरी-खजूर-खारीक-स्त्री.एक औषधोपयोगी रानखारीक. ही कडू, अग्नि- दीपक व ज्वरनाशक आहे. ॰गुळी-स्त्री. काळा रंग तयार कर- ण्याच्या कामीं उपयोगांत येणारी नीळ. ॰घेटूळ-टोळी-स्त्री. घेडूळचीच एक काळी जात. ॰चंद्रकळा-स्त्री. काळें लुगडें; याचें उभार व आडवण सर्व काळें व किनार कोणत्याहि तर्हेची असतें. ॰जिरी-स्त्री. कडू कारळी. ॰तुळस-स्त्री. काळ्या पानांची व मंजिर्यांची तुळस; कृष्णतुळस. ॰तेरी-स्त्री. काळ्या रंगाचें अळूं; हें मुळव्याध नाशक, अग्निदीपक, व शौचास साफ करणारें आहे. -योर १.४७. ॰धार-वि. दृश्य क्षितिज; समुद्रांत पहात असतां ज्यापुढें दृष्टी पोंहचत नाहीं तो मर्यादाप्रदेश. -शास्त्रीको. 'त्याची हद्द काळेधारेशीं लागलेली आहे.' -बाळ २.११८. ॰पानवेल-स्त्री. काळ्या रंगाच्या विड्यांच्या पानांची वेल; हिचें पान स्वादिष्ट परंतु तिखट असतें. ॰प्रजा-स्त्री. १ सामान्यपणें मजूरवर्ग. २ बडोदें संस्थानांतील भिल्लासारखी एक जात; (गु.) काली परज. ॰भिंत-स्त्री. उत्तरदिशेस जेथपर्यंत मनुष्याचें गमन होतें तेथील सीमाप्रांत. -शास्त्री. ॰भोपळी-स्त्री. काळ्या भोपळ्याचा वेल. ॰माशी वि. १ मोठी, काळ्या रंगाची, व्रण, क्षत, मेलेलें जना- वर यांवर बसणारी माशी. २ एका जातीचें गवत. ॰मिरची-स्त्री. १ (हिं.) काळ्या मिरच्या येणारी मिरचीची एक विशिष्ट जात. २ काळीं मिरें. ॰मुष्ठी-स्त्री. जारणमारणांतील मूठ (मार- ण्याची). 'काळामुष्ठीची बाधा होतां ।' -नव ६.१५२. ॰मुसळी- स्त्री. एक औषधी वनस्पति व मुळी; मुसळीची काळी जात. ॰रात्र-शिळी रात्र -स्त्री. १ भयंकर रात्र; भयाण रात्र. 'ही काळीरात्र चालली आहे मी खोटें बोललों तर पाहून घेईल.' [काळ + रात्र] २ हा शब्द क्रियाविशेषणासारखा सप्तम्यंत करूनहि योज- तात. जसें:-काळ्याशिळ्या रात्रीं. जास्त माहितीसाठीं बंद खालील भरल्या बंदाखालीं बसणें पहा.३ अमावस्या, मध्यरात्र, अशुभ भाषण, भूतपिशाच्चाचें आगमन (असत्य भाषण व शपथ यांखे रीज) वगैरेसंबंधानेंहि सामान्य रात्रीस हा शब्द लावितात; अरिष्टसूचक रात्र. ॰वसू-स्त्री. एक औषधी वनस्पति; हिचा दुसरा प्रकार पांढरी वसू. ॰वेल-स्त्री. गुरांच्या रोगावर उपयोगी पडणारी एक वेल. ॰साळ-स्त्री. काळ्या रंगाची साळ किंवा भात. काळेंनें आरंभ होणारे शब्द - काळें-न. १ डाग; कलंक; काळिमा; अपकीर्ति. [काळा] (वाप्र.) काळें करणें-तोंड काळें करणें; तोंड लपवून जाणें; दृष्टिआड होणें, फरारी होणें (दोष, अपराध वगैरेमुळें). 'जा कर काळें ।' -कमं २. ॰तोंड घेऊन जाणें-पळून जाणें; पोबारा करणें. 'काळें तोंड घेऊनि । गेला नेणो कोणीकडे ।' सामाशब्द- ॰अळू-न. काळी तेरी पहा. ॰अक्षर-न. कागदावर लिहिलेलें मनोगत, अक्षरें, लेख, पत्र इ॰; यच्चयावत् अक्षरमात्र-शास्त्रीको. 'हा पंडित काळ्या अक्षरांचा अर्थ करील.' ॰कमळ-न. हें हिमालय पर्वतावर बर्फांत उत्पन्न होतें. याला एक हजार पाकळ्या असून त्यांचा घेर एक हातभर असतो -तीप्र ४१. ॰कृत्य-न. कृष्ण कारस्थान; अन्याय. ॰खापर-न. अतिशय काळा माणूस. अपकीर्ति, बद- नाम झालेला, पराभव झालेला, आजारानें कृश, अशक्त झालेला माणूस. ॰गवत-न. एक प्रकारचें गवत. ॰जिरूं-जिरें-न. १ कडू कारळें. २ शहाजिरें [हिं. काली जिरी, सं. कालाजीरक] ॰ढवळें-न. १ संशय; शंका; अनिष्ट कल्पना; अंदेशा. २ काळें बेरें पहा. ॰तेरें-न. काळी तेरी, काळें अळूं पहा. ॰तोंड-पु. स्वतः पासून पुढील पांचवा वंशज (आपल्या पणतूचा मुलगा). -वि. लाजिरवाणीं कृत्यें केल्यानें कलंकित झालेलें तोंड. 'तुझें काळें तोंड दृष्टीआड कर.' ॰थर-वि. काळ्या रंगाचा थर; कार दगड किंवा काळवथरी धोंडा ॰द्राक्ष-न. एक प्रकारच्या काळा मनुका. ॰पाणी-न. १ महासागर. २ अकालीं किंवा अतिशय पडलेल्या पावसाच्या पाण्याचा दोष घालविण्यासाठीं बागेस दिलेलें विहिरीचें पाणी. ३ (ल.) हद्दपारीची शिक्षा व ती भोगाव- यांचें ठिकाण (ही शिक्षा झालेल्या इसमास हिंदुस्तानाबाहेर अंद- मानांत ठेवतात). 'अखेरीस जाल काळ्या पाण्यावर चांगले' -भा १०४. ॰पान-न. काळ्या पानवेलीचें विड्याचें पान. ॰बुबुळ-न. डोळ्याचा काळा भाग (बाहुली व कनीनिका). ॰बेरें-भेरें-ळें-न. १ अनिष्ट संशय; वाईट आकांक्षा; अनिष्ट कल्पना; कुशंका; कपट. (क्रि॰ येणें.) 'हें काळेंबेरें तुझ्या मनांत कोठून आलें?' -गीर ६१२. २ लुच्चेगिरी; डावपेंच; कारस्थान; गिळंकृत करणें; दडपादडपी. ॰भिवरी-स्त्री. काळवथरी पहा. ॰मांजर-नपु. कांडेचोर; ऊद. ॰मिरें-न. काळ्या रंगाचें मिरें. 'मिरूं पहा. ॰मीठ-न. १ पादेलोण. २ खार्या माती- पासून उत्पन्न केलेलें मीठ. -रें-न. कडू कारळें.
घोडा
पु. १ खूर असलेला एक चतुष्पाद प्राणिविशेष. ह्याचा उपयोग ओझे वाहण्याच्या, गाडी ओढण्याच्या व बसण्याच्या कामीं करतात. ह्याच्या जाती अनेक आहेत. अरबी घोडे जग- प्रसिद्ध आहेत. लहान घोड्यास तट्टू व घोड्याच्या पोरास शिंगरूं म्हणतात. घोड्याच्या आकृतीवरून, गतीवरून, उपयोगा- वरून व लक्षणेनें हा शब्द अनेक वस्तूंस लावतात. २ बुद्धिबळाच्या खेळांतील एक मोहरा. हा सर्व बाजूंनीं दोन सरळ व एक आडवें (अडीच) घर जातो. या मोहर्याचा विशेष हा आहे कीं हा इतर मोहर्यांच्या डोक्यावरून उडून जातो, तशी गति इतर मोहर्यांना नसते. ३ बंदुकींतील हातोडीच्या आकराचा अव- यवविशेष. हा दाबला असतां ठिणगी उत्पन्न होते व बंदूकीचा बार उडतो; चाप. ४ (मुलांचे खेळ) दोन पायांत काठी घालून (तिला घोडा मानून) मुलें धांवतात तो काठीचा घोडा. ५ (उप.) मूर्ख व ठोंब्या असा वयस्क मुलगा; वयानें मोठा पण पोरकट मनुष्य. ६ वस्त्रें, कपडे ठेवण्यासाठीं खुंट्या ठोकलेला खांब; स्नान करणार्या माणसाचे कपडे ठेवण्याकरितां जमिनींत रोंवलेली काठी, खांब; (इं.) स्टँड. ७ (ल.) शरीर वाहून नेतात म्हणून पायांस लक्षणेनें (दहाबोटी) घोडा असें संबोधितात; तंगड्या. 'आमचा दोन पायांचा घोडा आम्हाला हवें तेथें वाहून नेईल.' ८ पाळणा टांगण्यासाठीं एका आडव्या लांकडाला चार पाय लावून करतात ती रचना; घोडी. ९ पालखीचा दांडा ज्याला बसविलेला असतो तें दुबेळकें बेचक; पालखीं तबे- ल्यांत वगैरे ठेवतांना ज्यावर ठेवतात तीं दुबळकें असलेलीं लाकडें प्रत्येकीं. १० गाड्याच्या बैठकीच्या चौकटीचीं दोन बाजूंचीं लांब लांकडें प्रत्येकी; गाडीच्या दांडयास आधार द्याव- याचें दुबेळकें. ११ मूल रांगावयास लागलें असतां दोन हात व दोन गुडघे जमीनीला टेकून करतें ती घोड्यासारखी आकृति. (क्रि॰ करणें). १२ मृदंग; पखवाज ठेवण्याची घडवंची; घोडी; (दिवे इ॰ लावण्याची) दोन बाजूस पायर्या असलेली घडवंची; (पिंपे, पेट्या ठेवण्याची) लांकडी घडवंची. १३ नारळ सोलण्याचा, शेंड्यास सुरी बसविलेला खांब; नारळ सोलण्याचा एक प्रकारचा सांचा. १४ समुद्राच्या भरतीच्या पाण्याचा चढ, फुगोटी, फुगारा; लाटेचा उंच भाग; नद्यांच्या मुखांतून वर गेलेलें समुद्राच्या भरतीचें पाणी. -सृष्टि ५७. १५ ओबडधोबड असा आंकडा, फांसा, पकड. १६ (ल.) घोडेस्वार. 'तीन हजार घोडा पेशव्यांचे तैनातींत ठेवावा.' -विवि ८.७.१२९. १७ दाराच्या दुहेरी चौकटीच्या वरच्या बाजूचे, परस्पराला जोडणारे दोन लाकडी तुकडे (त्यांच्याच जोडीच्या खालच्या बाजूच्या तुकड्यांस छिली म्हणतात). १८ (खाटीक इ॰ कांचें) साकटणें, सकोटन; खाटकाचा ठोकळा. १९ (मुद्रण) केसी व ग्याली ठेवण्यासाठीं केलेली घडवंचीवजा चौकट. २० फळा, चित्रफलक इ॰ उभा ठेवण्याची लाकडी उभी चौकट. २१ (कों.) रहाटगाडग्याचें कोळबें ज्यावर ठेवतात ती लांकडी चौकट. २२ (पोहोण्याचा) चार भोपळ्यांचा तराफा. २३ (गो.) (विटी दांडूचा खेळ) विटी मारण्याचा एक प्रकार. (क्रि॰ मारणें). [सं. घोटक; प्रा. घोड; गु.घोडो; सिं. घोडो; स्पॅनिश जि. गोरो; अर. घोरा] घोडी-स्त्री. १ घोडा या जातीच्या प्राण्याची मादी. २ सतार, तंबोरा इ॰ तंतुवाद्यांच्या भोपळ्याच्या मध्यावर हस्ती- दंती अगर लांकडाची पाटाच्या आकृतीची एक इंची किंवा दीड- इंची पट्टीची बैठक; तिच्यावरून तारा पुढें खुंटीस गुंडाळलेल्या असतात. ३ मुलांना शिक्षा देण्याकरितां जिला हातानें धरून शिक्षा दिलेला लोंबकळत असतो अशी आढ्यापासून लोंबणारी दोरी, फांसा; मुलांस टांगण्यासाठीं उंच बांधलेली दोरी. अशी शिक्षा पुर्वीं शाळांतून फार देत. (क्रि॰ घेणें; देणें). 'एखाद्या मुलांशी माझं वांकडं आलं कीं, रचलंच त्याच्यावर किटाळ आणि दिलीच त्याला पंतोजीकडून घोडी.' -चंद्रग्र ८०. ४ उभें राहून पखवाज वाजविण्याकरितां पखवाज ठेवावयाची घडवंची. 'इत- क्यांत देवळाच्या एका कोंपर्यांत मृदंग ठेवावयाची उंच घोडी सुनंदाला दिसली.' -सुदे २५. ५ गवत इ॰ वाहण्याकरितां खटार्यावर उभारलेला सांगाडा, चौकट. ६ फळा जमीनीपासून उच ठेवण्याकरितां व त्याला उतार देण्याकरितां केलेली लांकडी चौकट, सांगाडा. ७ वयस्क असून पोरकटपणा करणारी, खिदड- णारी मुलगी; खिदडी; धांगडधिंगी; भोपळदेवता; घोडकुदळ. ८ (सुतारी) तासावयाचें लांकूड हलूं नये म्हणून त्याला आधार- भूत असें दुसरें लांकूड, चौकट इ॰ सोईनें बसवितात तें. ९ (विणकामांत) सूत उकलण्यासाठीं केलेलें लांकडी चौकटीसारखें साधन. १० (सोनारी) पायांत घालावयाच्या सांखळ्यांच्या कड्या वांकविण्यासाठीं असलेला बोटाइतका जाड असा निमु- ळता मोळा. ११ (हेट. नाविक) पोरकें (लहान) शीड उभें करण्यासाठीं असलेलें कमानीसारखें लांकूड. १२ बंधार्याच्या मुखाशीं (पाणी सोडण्याच्या ठिकाणीं) पडद्यासारखी बांधलेली भिंत. हिच्यावरून पाणी जात असतें. १३ (हेट.) गलबताच्या कडेस शौच्यास बसण्याकरितां टांगलेली लांकडी चौकट. १४ सांकटणें; सकोटण. घोडा अर्थ १७ पहा. १५ तीन पायांचें दिवा ठेवण्याचें बुरडी तिकाटणें, तिवई. १६ पाटास जे दोन आडात मारितात ते प्रत्येकी. १७ हत्तीवरील चौकट; हौदा. 'साहेब नौबतीकरितां हत्तींवर लाकडी घोडी घालून...' -ऐरा ९.५०६. १८ उभें खुंटाळें. (इं.) स्टँड. 'तिकोनी खुंट्यांची घोडी आणि रुमाल ठेवावे ' -स्वारीनियम ७०. १९ सामान ठेवण्याचा घोडा. घोडें-न १ सामा (लिंगभेद न धरतां) घोडा या जातीं- तील जनावर. ' कृष्णाकांठचीं घोडीं सडपातळ पण चपळ अस- तात.' २ खटार्याच्या साटीच्या चौकटीचीं दोन बाजूंचीं उभीं लाकडें; घोडा अर्थ ९ पहा. घोडकें अर्थ १ पहा. ३ चार भोंपाळे लावलेला पाण्यावर तरंगणारा तराफा. घोडा अर्थ २१ पहा. ४ (व.) गाडीचे दांडे-जूं ज्यावर ठेवतात तें दुबेळकें. घोडा अर्थ ९ पहा. [सं. घोडा] (वाप्र.) घोडा आडवा घालणें- (एखाद्या कार्यात) अडथळा, विघ्न आणणें. 'आणि म्हणूनच तुम्ही घोडा आडवा घातलांत वाटतं ?' -चंद्रग्र ६८. ॰उभा करणें-बांधणें-(घोडा) थोडा वेळ थांबवणें; जरासें थांबणें; घाई न करणें (घाईंत व धांदलींत असणार्या मनुष्यास उद्देशून ह्या वाक्प्रचाराचा उपयोग करतात.) ॰काढणें-१ (बांधून ठेव- लेला घोडा बाहेर नेणें) घोडा हांकारणें, पिटाळणें २ (ल.) (एखाद्यानें) पळ काढणें; पोबारा करणें; निसटणें. ॰चाल- विणें-(कर.) (ल.) डोकें खाजवणें; युक्ति लढविणें. ॰टाकणें- घोडा फेंकणें; उडवणें; अंगावर घालणें. 'आरेरे टाकौनि घोडा । भणती यांचिआं जटैं उपडा । ' -शिशु १४१. ॰मैदान जवळ असणें-(घोडा धांवण्यांत कसा काय आहे याची परीक्षा त्यास मैदानांत पळवून करतां येते यावरून) ज्याची परीक्षा करा- वयाची तो पदार्थ, मनुष्य व परीक्षेस लागणारी सामग्री हीं दोन्ही जवळ असणें असा अर्थ होतो; एखाद्या गोष्टीची निरर्थक चर्चा न करतां तिला कसोटीला लावणें, कसोटीचा वेळ किंवा सामुग्री जवळ असणें; हा सूर्य हा जयद्रथ. 'कोरडी बढाई कशाला पाहिजे ? घोडामैदान जवळच आहे.' ॰हांकणें-पळून जाणें; निघून जाणें; पोबारा करणें; घोडा काढणें पहा. 'पंतोजीबुवास पाहून त्या पोरानें घोडा हांकला. 'घोडी काढणें-भरविणें- सक्रि. (माण.) घोडीस घोडा दाखविणें, देणें; घोडी फळविणें. घोडी घेणें-(एखाद्याशीं) घांसणें; कटकट करणें; मत्सरबुद्धीनें दोष काढणें. घोडें उभें करणें-अडथळा आणणें. 'बाळासाहेब नातूसारख्यांनीं विशेष प्रसंगीं एखादें घोडें उभें केलें तरी त्याकडे दुर्लक्ष्य करून ज्यानें त्यानें आपला पंथ सुधारावा.' -आगर ३.१४४. (एखाद्याचें) घोडें थकणें-एखाद्यानें (प्रवास, धंदा, व्यापार, अभ्यास इ॰ कांत) थकून जाणें; हतबल होणें; पुढें रेटण्याची शक्ति न उरणें. (एखाद्यानें आपलें) घोडें पुढें दामटणें-ढकलणें-हांकणें-घालणें-१ इतरांच्या पूर्वीं आपला कार्यभाग साधून घेण्याचा घाईने प्रयत्न करणें. 'या शर्यतींत जो तो आपलें घोडें पुढें दामटायला पहात आहे. -नि. 'ब्रिटिश वसाहतीनीं आपल्या हक्कांचें घोडें पुढें दामटलें.' -सासं २.४४६. २ लुब्रेपणानें दुसर्यांच्या संभाषणांत तोंड घालून त्यांच्यावर आपले विचार लादणें. (एखाद्याचें) घोडें मारणें-एखाद्याचें नुकसान करून त्याला राग आणणें (पूर्वीं प्रवासाचें मुख्य साधन घोडें असे. प्रवासाचें घोडें ठार केल्यास त्याचा प्रवास थांबत असे व त्यामुळें त्याचें फार नुकसान होई यावरून) एखाद्याचें फार नुकसान करणें. 'मी काय तुझें घोडें मारलें आहे ?' (आपलें) घोडें पुढें ढकलणें-आपलें काम प्रथम करूं लागणें; आपल्या कामाला महत्व देणें. गांडी- खालचें घोडें-संसारादि निर्वाहक मालमत्ता, वाडी इ॰ आधारभूत मुख्य साधन. म्ह॰ आपले गांडीखालचें घोडें गेलें, मग त्यावर महार बसो कीं चांभार बसो. घोडीं आडवीं घालणें-१ शत्रूवर तुटून पडून त्याच्या चालीला, पळाला अड- थळा करणें. २ (ल.) (एखाद्यास त्याच्या कामांत) संकट, अडथळा, व्यत्यय आणणें. 'जर त्यांणीं आपल्यावर चालून घेतलें तर आम्ही आडवीं घोडीं घालतों. ' -ख ४२९७. घोडीं घालणें-घोड्यांच्या अनीना उचलणें-घोडदळांतील सर्व स्वारांनीं इर्षेनें शत्रूवर एकदम तुटून पडणें. -होकै ३. घोड्याच्या, हत्तीच्या पायांनीं येणें व मुंगीच्या पायांनीं जाणें-(आजार, संकट, अडचण इ॰ च्या संबंधांत हा वाक्प्र- चार योजतात) जलदीनें येणें व धिमेधिमे जाणें; आजार इ॰ जलदीनें येतात पण अतिशय हळू हळू नाहींसे होतात यावरून वरील वाक्प्रचार रूढ आहे. (एखाद्याच्या) घोड्यानें पेण (पेंड)खाणें-या वाक्प्रचारांत पेण = प्रवासांतील टप्पा, मुक्का- माची जागा या ऐवजीं चुकीनें पेंड हा शब्द उपयोगांत आणतात. लांबच्या प्रवासांत निरनिराळ्या टप्प्यांच्या ठिकाणीं घोडीं उभीं राहत. त्यामुळें टप्प्याचें ठिकाण आलें कीं घोडें तेथें अडे, पुढें जात नसे. यावरून वरील वाक्प्रचार एखादें कार्य करतांना कोणी अडून बसल्यास त्यास. 'तुझें घोडें कुठें पेण खातें' असें विचारतांना उपयोगांत आणतात. घोड्यापुढें धावणें-जिकीरीचें, दगदगीचें; कष्टाचें काम करणें. (एखा- द्याच्या) घोड्यापुढें धावणें-एखाद्याची कष्टाची सेवा, चाकरी करणें; (उप.) एखाद्याची ओंगळ खुशामत करणें; एखाद्याची थुंकी झेलणें. घोड्यावर घोडा घालणें-(लिलांव इ॰ कांत) चढाओढ करणें; एखाद्यानें केलेल्या किंमतीपेक्षां अधिक किंमत पुकारणें; उडीवर उडी घालणें. घोड्यावर बसणें-दारू पिऊन झिंगणें;ताठ्यांत असणें. घोड्यावर बसून येणें-घाईनें येणें; आपलें काम तांतडीनें करण्यास दुसर्यास घाई करणें. सर घोड्या पाणी खोल किंवा पाणी पी-(घोड्या मागें हट, पाणी खोल आहे. तेथूनच पाणी पी) गोष्ट मोठी कठिण आहे, मागें परततां येणें शक्य आहे तोंच परतावें याअर्थी. म्ह॰ १ घोडा आपल्या गुणानें दाणा खातो = चांगला घोडा खूप काम करून आपल्याला खाद्यहि जास्त मिळवतो. त्याला जास्त देण्यास मालक असंतुष्ट नसतो. यावरून चांगला चकर आपल्या गुणानें व मेहनतीनें मालकाकडून पगार वाढवून घेतो. २ घोडा स्वार (मांड) ओळखतो = बसणारा कच्चा कीं पक्का आहे हें घोडा ओळखूं शकतो. (यावरून), आपला मालक कडक कीं नरम आहे हें हाताखालचीं माणसें ओळखूं शकतात. ३ (व.) जाय रे घोड्या खाय रे हरळी = घोड्याला हरळी खावयास मोकाट सोडल्यास (घोड्याला) तें चांगलेंच होईल, पथ्यावरच पडेल. म्ह॰-१ घोडा मरे भारें शिंगरूं मरे येरझारें = घोडी ओझें किंवा माणूम वाहून नेत असतां तिचें शिंगरूंहि तिच्याबरोबर जात असतें. घोडीच्या प्रत्येक हेलपाट्याबरोबर शिंगरूंहि हेलपाटा खातें. यावरून प्रत्यक्ष काम करणारास श्रम होतातच पण त्याच्या सहवासांत असणारांना सुध्दां जवळ जवळ तितकेच श्रम होतात. २ वरातीमागून घोडें = लग्नाच्या वरातीच्या मिरवणुकींत सर्वांच्या पुढें श्रृंगारलेलें कोतवाली घोडें चालवण्याची चाल आहे. यावरून वरात निघून गेल्यावर मागाहून श्रृंगारलेलें घोडें नेणें व्यर्थ होय किंवा औचित्यास धरून होत नाहीं. त्याप्रमाणें एखादी गोष्ट होऊन गेल्यावर मागाहून तत्संबंधीचीं साधनें जुळविणें व्यर्थ होय. २ माझें घोडें आणि जाऊं दे पुढें = इतरांचें कांहींहि होवो, माझें काम आधीं झालें पाहिजे. स्वार्थी माणसाची निंदा कर- तांना या म्हणीचा उपयोग करतात. समासांत घोडा शब्द पूर्व- पदीं आल्यास त्याचीं घोड किंवा कधीं कधीं घोडे अथवा घोड व घोडे, अशीं दोन्ही रूपें होतात. उ॰-घोडचूक; घोडेखोत; घोड (डे) चिलट इ॰. सामाशब्द-घोडकट, घोडकें-न. (घोड्याला तिरस्काराने लावावयाचा शब्द) रोडकें, अशक्त व थिल्लर घोडें; भटाचा तट्टू. घोडकुदळ-पु. १ (उप.) मुंजीचें वय झालेलें असून मुंज न झालेला मुलगा; घोडमुंज्या. २ -स्त्री. (उप.) उपवर असून लग्न न झालेली दांडगट नाचरी मुलगी; घोडी; घोडगी; भोपळ- देवता; घोडनवरी; घोडी पहा. घोडकूल-न. १ (गो.) लहान घोडें; तट्टू. २ (खा.) ओट्याच्या खांबावर तिरपा टेंकू (कर्ण) देऊन त्यावर कोरलेली घोड्याची आकृति. घोडकें-का-नपु. १ ज्याच्या भरीला करळ्या व तरसे घालून गाड्याची तक्तपोशी, बैठक तयार करतात अशीं चौकटींतील दोन बाजूचीं दोन उभीं लांब लांकडें. २ तेल्याच्या घाण्याच्या कातरीला खिळलेलें व जुंवाचा दोर बांधावयाचें लांकूड. घोडके-ढोरांचा गुरु. -गांगा २६. घोडकेळ-न. (क्क.) एक हलक्या जातीचें भसाडें केळें. [घोडा + केळें] घोडक्या-का-पु.-१ घोड्याचा खिजमतगार; मोतद्दार. 'घोड्यास शिपाई काय करिल घोडका ।' -ऐपो ३७२. २ चाबुकस्वार; अश्वशिक्षक; घोडा अर्थ ९ मधील शेवटचा अर्थ पहा. घोडकोस-पु. (गो.) तीन मैलांचा कोस. घोडगा-गी- पुस्त्री. (उप.) वयानें प्रौढ पण पोरकटपणा, नाचरेपणा अंगीं असलेला मुलगा, मुलगी; घोडा अर्थ ५ पहा. घोडी अर्थ ७ पहा. घोड(डे)गांठ-स्त्री. (बुद्धिबळांचा खेळ). एकमेकांच्या जोरांत असलेली घोड्यांची दुक्कल. घोडचवड-स्त्री. घोडदौड; घोडा चौफेर उडविणें; चवडचाल. 'घोडचवडीखालीं नाना पुण्याला आला.' -ऐपो १६२. [घोडा + चवड = विशिष्ट चाल] घोडचाल-स्त्री. घोड्याची चाल. (ल.) जलद चाल. [घोडा + चाल] घोड(डे)चिलट-न. मोठें चिलट; डांस; मच्छर. घोड- चूक-स्त्री. मोठी व अक्षम्य चूक. घोडचोट्या-वि. १ (मनुष्य). (अश्लील) घोड्याच्या चोटासारखा मोठा चोट ज्याचा आहे असा २ (निंदार्थीं) मुंज न झालेला, वाढलेला मुलगा; घोडकुदळ; घोड- मुंज्या. घोडजांवई-पु. (उप.) मोठ्या वयाचा नवरामुलगा; घोडनवरा. घोडजाळी-स्त्री.(भोंवर्यांचा खेळ) विरूद्ध पक्षाच्या भोंवर्याला खोंचा देऊन आपला भोंवरा दूर जाऊन फिरत राहील अशा रीतीनें भोंवरा फेकण्याचा प्रकार. [घोडा + जाळी = दोरी] घोडतोंड्या-वि. घोड्याच्या तोंडासारखा लांबट चेहरा अस- लेला; कुरूप; लांबट, ओबडधोबड तोंडवळ्याचा. [घोड + तोंड = चेहरा] घोडदळ-न. १ घोडेस्वारांचें सैन्य; फौज. २ सैन्यां- तील घोडेस्वारांचें पथक, तुकडी. [घोडा + दळ = सैन्य] घोड- दौड-स्त्री. घोड्यासारखें पळणें; घोड्याची दौड; जलद जाणें. [घोडा + दौड = पळणें] घोडनट-न. ज्याचें एक तोंड आढ्यावर व एक लगीवर येऊन दरम्यान तिरपें राहतें असें लांकूड ठोकतात तें. घोडनवरा-पु. (उप.) प्रौढवयाचा नवरामुलगा; घोडजांवई. घोड(डे)नवरी-स्त्री. (उप.) मोठ्या वयाची नवरी मुलगी, वधू; योग्य व सामान्य वयोमर्यादेबाहेर अविवाहित राहिलेली मुलगी. 'हे मोठमोठ्या घोडनवर्या घरांत बाळगल्याचे परि- णाम बरं !' -झांमू. घोड(डे)पाळणा-पु. घोड्याला (लांकडी चौकटीला) टांगलेला पाळणा; हलग्याना न टांगतां जमीनीवर घोड्यास अडकविलेला पाळण्याचा एक प्रकार. घोडा ८ अर्थ पहा. घोड पिंपळी-स्त्री. पिंपळीची मोठी जात; हिच्या उलट लवंगी पिंपळी. घोडपुत्र-पु. घोड्याला (विशेषतः बुद्धि- बळांतील घोड्याला) प्रेमानें किंवा प्रतिष्ठेनें संबोधण्याचा शब्द. [घोडा + पुत्र = मुलगा] घोडपेटें-न. १ दोन भोपळे पुढें व दोन मागें बांधून केलेला तराफा; घोडा अर्थ २१ पहा. २ भोंपळ्यावर दोन्ही बाजूस पाय टाकून घोड्यासारखें बसून पाण्यावर तरणें, तरंगणें. घोडबच्य-न. दुबळा घोडा पुष्ट होण्यास एक औषध. 'घोडबच्य पावशेर, राई पावशेर भाजलेलीं काळीं मिरें पावशेर ... मिश्रणापैकीं आतपाव दररोज देत जावें.' -अश्वप १.१७५. घोडबांव-स्त्री. (कु.) घोड्यांना पाणी पितां येईल अशा तर्हेनें बांधलेली विहीर. [घोड + बांव = विहीर] घोडबाही- स्त्री. १ दाराच्या दुहेरी चौकटीच्या आंतल्या चौकटींतील दोन्ही बाजूचे खांब. २ खटार्याच्या बैठकीच्या चौकटीच्या दोन बाजूंच्या लांब लांकडांपैकीं प्रत्येक; घोडकें, घोडें पहा; [घोडा + बाही = बाजू] घोडबाळ-वि. (उप.) पोरचाळे करणारा प्रौढ पुरुष, स्त्री; पोरकट माणूस. [घोडा + बाळ] घोडब्रह्म- चारी-पु. (उप.) लग्नाचें वय कधींच झालें असूनहि अविवाहित राहिलेला मुलगा; घोडनवरा. [घोडा + ब्रह्मचारी] घोडमल्ली- स्त्री. (बुद्धिबळांचा खेळ) घोड्यानें मात करण्याचा प्रकार. प्रतिपक्षाचें घोडें व राजा आणि आपलें घोडें, राजा व एकच प्यादें राखून प्यादेमात करणें; घोडमात. घोड(डे)मात -स्त्री. (बुद्धिबळांचा खेळ) घोड्यानें राजाला दिलेली मात; घोडमल्ली पहा. [घोडा + फा. मात् = कोंडणें] घोडमाशी-स्त्री. १ मोठ्या आकाराची हिरवी, काळसर माशी. २ (सामा.) मोठी माशी. घोडमासा-पु. एक प्रकारचा मासा; सागराश्व. ह्याचें तोंड कांहींसें घोड्यासारखें दिसतें. यास लांब शेपूट असतें. हा नेहमी उभा पोहतो. घोडमुख-ख्या-पु. १ घोड्याचें तोंड असलेला किन्नर नांवाच्या देवयोनींतील पुरुष. याचें वर्णन पुराणांतरीं सांपडतें. २ (ल.) अगदीं कुरूप, घोडतोंड्या माणूस. 'एक मीर- वलें भुरळें पींगळें । घोडमुखें ।' -दाव २८५. घोडमुंगळा-पु. मोठा व काळा मुंगळा. घोडमुंगी-स्त्री. मोठी, काळ्या जातीची मुंगी. घोड(डे)मुंज्या-पु. उप. १ मुंज होण्याचें वय झालें असून मुंज न झालेला मुलगा. २ लग्न न झालेला प्रौढ मुंज्या. [घोडा + मुंज्या] घोडला-पु. मूल रांगत असतांना त्याची होणारी घोड्यासारखी आकृति. घोडा अर्थ १० पहा. घोडली-स्त्री. (कों. हेट.) (नाविक) शौचास बसण्याकरितां वर्यास एक चौकट चार दोर्यांनी अडकवितात ती. [घोडा] घोडवळ-स्त्री. १ बांधलेल्या घोड्यांची ओळ, रांग. २ घोड्यांचा तबेला; घोडशाळा; घोडसाळ; यावरून (सामा.) तबेला; 'रोडोला हत्ती घोडवळींतून जाणार नाहीं.' ३ लांबचलांब, ठेंगणें व बेढब घर; मागरघर; दांडसाळ; केवळ तबेल्यासारखें असलेलें घर; कोठडी. ४ (उप.) घोडनवरी. ५ न. झोडपलेल्या, झोडपून दाणे न काढलेल्या धान्याच्या पेंढ्यांची रास, गंजी. [घोडा + ओळ] घोड(डे)वाट-स्त्री. घोड्यांकरितां केलेली, फक्त घोड्याला जातां येईल अशी वाट, रस्ता (विशेषतः डोंगर इ॰ याच्यावरून); उलट गाडीवाट. [घोडा + वाट] घोडविवाह- पु. विषमविवाह. 'आपली नात शोभेल अशा दहा वर्षांच्या पोरीशीं लग्न लावण्यास तयार असतात व असा घोडविवाह करूनहि फिरून समाजांत हिंडण्यास ... त्यांस दिक्वत वाटत नाहीं' -टि ४.९६. [घोडा + विवाह] घोडवेल-स्त्री. (सांकेतिक) घोड्याची लीद; (औषधांत घोड्याच्या लिदीचा उपयोग करा- वयास असल्यास तिचा निर्देश ह्या शब्दानें करतात). घोड- शह-पु. (बुद्धिबळांचा खेळ) घोड्यानें दिलेला शह. [घोडा + शह] घोडशाळा, घोडसाळ-स्त्री. १ घोड्यांचा तबेला; घोडवळ अर्थ २ पहा. [घोडा + शाळा = घर] घोडशिष्य- पु. (निंदार्थीं) विद्यार्जन करूं पाहणारा मोठ्या वयाचा विद्यार्थीं, मोठेपणीं शिकावयास लागणारा मनुष्य. घोडशीर- स्त्री. १ पायाच्या टांचेच्या वरच्या बाजूस असलेली शीर, नाडी; दवणशीत्त; धोंडशीर पहा. २ (क्व.) पायाचा किंवा हाताचा स्नायु. घोडसटवी-स्त्री. १ उग्र स्वरूप धारण केलेली देवी. (क्रि॰ लागणें). २ घोडी व्याल्यापासून सहाव्या दिवशीं करा- वयाची सटवीची पूजा. (एखादीला) ॰लागणें-१ घोडसट- वीप्रमाणें उग्र व विकाळ दिसणें. २ घोटसटवीची बाधा होणें. घोडेखाद-स्त्री. १ घोड्यांचें चरणें; हरळी खाणें. 'या घोडे खादीमुळें माळावर एक काडी राहिली नाहीं.' २ फक्त घोड्यांना चरतां, खातां येईल इतक्या वाढीचें गवत. 'ह्या माळावर मोठें गवत नाहीं, घोडेखाद कोठें कोठें आहे.' [घोडा + खाद = खाणें] घोडेखोत-पु. घोडे भाड्यानें देण्याचा धंदा करणारा; भाड्याच्या घोड्यांचा नाईक. [घोडा + खोत = मक्तेदार] घोडेघाटी-स्त्री. एक प्रकारचें रेशमी कापड. घोडेघास-न. १ विलायती गवत; लसून- घास. २ घोडकुसळी पहा. [घोडा + घास = गवत] घोडेपाऊल- न. एक वनस्पतिविशेष. [घोडा + पाऊल] घोडेराऊत, घोडे- स्वार-पु. घोड्यावरील शिपाई. घोड्याएवढी चूक-स्त्री. फार मोठीचूक; ढोबळ चूक; घोडचूक पहा. घोड्या गोंवर-पु. एक प्रकारचा गोंवराचा आजार; याच्या पुटकुळ्या मोठ्या असतात. [घोडा = मोठा + गोवर] घोड्याचा-पु. (निंदार्थीं) घोड्यावर बसलेला मनुष्य; घोडेस्वार. 'ते पहा घोड्याचे चालले. मागून स्वारी येतीसें वाटतें.' घोड्याचा दाणा-पु. १ (उप.) हरभरा. २ (ल.) बुंदीच्या लाडवास तिरस्कारानें म्हणतात. घोड्याचा पूत-लेंक-पु. (उप.) मूर्ख; गाढव; गद्धा. घोड्याची चाकरी-स्त्री. घोड्यांना दररोज चोळणें, खरारा करणें इ॰ काम. घोड्याची जीभ-स्त्री. (राजा.) एक वनस्पति- विशेष. घोड्याची मुंज, घोड्याचें बारसें-स्त्रीन. एखादा कोठें जावयास निघाला असतां एखाद्या अधिक प्रसंगी व फाजिल चौकशी करणार्या माणसानें त्यास कां, कुठें जातां असें विचारलें असतां म्हणतात. घोड्यांचें नाटक-न. (ना.) सर्कस. घोड्याचें मूत-न. १ कुतर्याचें मूत; अळंबें; भुईछत्री. २ कुजलेल्या लांकडांतून फुटलेलें अळंबें. घोड्याच्या पाठीवर- क्रिवि. भरधाव; झरकन; त्वरेनें. (क्रि॰ जाणें; करणें). घोड्याच्या पाठीवरचा कोस-पु. कंटाळवाणा व लांब- णीचा कोस; घोड्यावरून गेल्यासच कोसाएवढें व कंटाळवाणें न वाटणारें अंतर.