नऊ मराठी शब्दकोशांमधील २,६२,७३६ शब्दांचा एकत्रित संग्रह
शब्दार्थ
नाविक
नाविक nāvika m S The helmsman of a vessel, whether the steersman or the pilot.
नाविक a Relating to a boat or vessel.
नाविक m The helmsman of a vessel.
नाविक nāvika a S Relating to a boat or vessel.
(सं) पु० नावाडी, नाखवा.
कबिशी, कबेशी (नाविक)
स्त्री. दोन्ही टोके अणकुचीदार असलेला लोखंडी खिळा; सुरखा (दोन फळ्या जोडण्याच्या कामी उपयोगी).
नाविक
पहा : नावाडी नाविकदल
संबंधित शब्द
बोंब-म
१ (नाविक) नाळेवरचें शीड. २ नाळेवरील लहान शीड लावण्यासाठीं असलेलें लांकूड; नाळेवरील डोलकाठी. ॰पाटली-स्त्री. (नाविक) दाट्यावर लांकडी बोंब अडकविण्या- साठीं एक आडें ठोकतात तें. याच्या मध्यावर खालच्या अंगास खांचा ठेवितात, कारण बोंब व आढें यांस बांधणारी दोरी या खांचेंतून भरून घेतात. ॰बाटली-हांजा-स्त्रीपु. नाळीवरचें शीड वर करण्याची दोरी.
ताज
पुस्त्री. १ (नाविक कों.) उथळ पाण्यांतून होडी ढकलण्याचा लांब वेळू, बांबू; चिव्याची काठी; हा साधारणपणें दहा हात लांब असतो. याच्यावर खाडीची खोली मापली जाते. उदा॰ दोन ताज खोल = वीस हात खोल. 'स्त्रीनें ताज मारीत ती होडी थोडक्यांत पडावाला भिडविली.' -कोरकि ३९५. (सामा.) लांब बांबू; याचा फुलें, फळें काढण्याच्या कामीं आंकडीसारखाहि उपयोग होतो. २ मोड्या जातीचा बांबू; याला माणगा असेंहि म्हण तात. [गो. ताज] ॰करी-पु. (कों. नाविक) ताज टेंकून गलबत चालविणारा. [ताज]
वासरूं
न. १ (नाविक) शिडाच्या दोरखंडाच्या टोंकास बांधलेला एक लांकडी दांडा. २ (नाविक) दमान बांधलेली दोरी. 'वासरूं जोरानें खेचल्याबरोबर केळीचे बंद (शिडाला बांध- लेले) तटातट तुटतात. शीड मोकळें होतें.'
बोंड
पु. १ कापूस, अफू इ॰ झाडाचें फळ; बीजकोश; अशा आकाराच्या निरनिराळ्या वस्तू. २ बिब्बा, काजू इ॰ च्या मागील फळ, अवयव. ३ वरील आकाराचें हरभरा इ॰ च्या पिठाचें तळून खाण्यासाठीं केलेलें खाद्य; भजें. ४ पळीचें टवळें; ठाणवईचें चाडें. ५ केळफूल. ६ मक्याचें कणीस. ७ शिस्नाची किंवा स्तनाची बोंडी, अग्र; टोंक. ८ (को.) लहान नारळ. ९ सुरुंगाच्या पहारीस भोक घेण्यासाठीं जें पोलाद भरतात तें. १० (नाविक कों.) जहाजाच्या शिडाचें आखूड व जाडें टोंक. याच्या उलट पात; परभाणाचा खालचा भाग. ११ कर्णफुलाप्रमाणें कानांत घालण्याचा बायकांचा दागिना. [का. बोंडु] बोंडें वेंचणें-(ल.) (अप- राधाची जाणीव असल्यानें) तोतरें बोलणें; बोलतांना अडखळणें. बोंडगहूं-पु. खपल्या गहूं. ॰ग-गी-स्त्री. केतकीचें झाड. ॰चोळी- स्त्री. एक वनस्पति. ॰निवडुंग-पुन. फड्यानिवडुंग; बोंडें येणारा निवडुंग. ॰फळ-पु. १ डावांत मारलेली किंवा मेलेली सोंगटी. २ (निंदेनें) नारळ; ज्या ठिकाणीं कांहीं तरी मूल्यवान वस्तु द्यावयाची त्या ऐवजीं दिलेला नारळ. 'तुझ्या हातास काय बोंडफळ लागा- वयाचें आहे ! ॰बाहुलें-न. (लाडिकपणें) लहान मूल. ॰बाळी- स्त्री. कानांत घालण्याचा स्त्रियांचा दागिना. ॰यारी, बोंड्यारी- स्त्री. (नाविक) शिडाच्या कोपर्यांना ते ताणण्याकरितां बांधलेली दोरी; परभाणाचें बोंड घोंसाखालीं दबण्यासाठीं बोंडास अडकवि- लेली यारी. ॰लें-न. लहान मुलास दूध पाजण्याचें गोकर्णासारखें पात्र. ॰वेल-स्त्री. (वांई) हरळीसारखें तांबडें गवत. ॰शी-स्त्री. बोंडी; टोंक. बोंडा, बोंडारा-पु. (कों.) कोंवळा नारळ; लहान नारळ. (कु.) कोंवळा गळलेला, खराब झालेला नारळ. बोंडू- न. (को.) काजूवें रसभरित फळ, हें बीच्या मागें असतें. बोंडें- खाऊ-वि. नामर्द; फटलंडी; भागूबाई; भित्रा.
नाव
स्त्री. होडी; नौका; तर. -ज्ञा ५.१३. 'सिंधूंत पर- हिताधिक धरुनि मनीं काय काम नाव रिघे ।' -मोभिष्म ६.१४. [सं. नौ; प्रा. णावा] (वाप्र.) एका नावेंत असणें-बसणें- एकाच परिस्थितींत, अडचणींत असणें. (इंग्रजी वाक्प्रचाराचें मराठी भाषांतर). 'हिंदु आणि मुसलमान आपण सगळे सध्यां एका नावेंत आहों; आपले हितसंबंध एक आहेत. मग आपण सख्या भावाप्रमाणें प्रेमानें व एक दिलानें कां वागूं नये.' गाड्या- वर नाव, नावेवर गाडा-नाव तयार केल्यानंतर ती नदी- पर्यंत नेण्यासाठीं गाड्यावर घालावी लागते, त्याचप्रमाणें नदीला पूर आला असतां पैल तीराला नेण्यासाठीं गाडा नावेवर घालावा लागतो. म्हणजे परस्परांना कालपरत्वें परस्परांची मदत लागते. किंवा एकदां एक वरचढ, एक खालीं असा सृष्टिक्रम चाललेला असतो. सर्व दिवस सारखे नसतात असा अर्थ. सामाशब्द- ॰करी- पु. नावेकरी; नावाडी. 'नावकरी अवघे द्रव्यवाना नेती ।' -राम- दासी २.११०. नावाडी-ड्या, नाविक, नावेकरी-पु. नाव- करी; नाव चालविणारा. नाविक-वि. नावेसंबंधीं. नाविकशिल्प- न. जहाज बांधण्याची कला. नावेंतील ओटी-(कर्हाड बायकी) गरोदर स्त्रीस नावेजवळ नेऊन तिच्याकडून अगोदर नावेची खणा- नारळानें ओटी भरून मग तिला नावेंत बसवून भरतात ती ओटी (गर्भावर संस्कार होण्याच्या दृष्टीनें हें करतात). नाव्य-वि. १ गलबत, नाव जाण्यास योग्य. २ नावेसंबंधीं; नाविक. नाव्य- नदी-स्त्री. नावेनें जाण्यासारखी नदी.
दांडा
पु. १. (वेळू इ. चा) जाड व आखूड तुकडा; काठी. २. (पळी, ओगराळे, वेळणी इ. ची) हातात धरण्याची मूठ; (कुऱ्हाड, कुदळ, वाकस इ. हत्याराच्या नेढ्यात घालतात तो) लाकडाचा गोल दंड, काठी. ३. पाट इ. ची पाणी जमिनीत न जिरता वहावे म्हणून जमिनीपासून उंच बांधलेली सारणी, प्रणाली; मोटेचे पाणी बागेत निरनिराळ्या ठिकाणी नेणारा पाट. (व.) ४. पाठीचा कणा. ५. (समुद्र, खाडी इ. त तारू, गलबत यांना अडथळा होण्याजोगा) रेती, खडक इ. चा दंडाकार उंचवटा; दांडी. ६. (डोंगर, टेकडी इ. चा) कणा; दंड; उंचवट्याची चिंचोळी व अरुंद रांग. ७. नाकाचा कपाळापासून शेंड्यापर्यंतचा उंच भाग. ८. नदीचा धक्का. ९. (समुद्रात गेलेला) जमिनीचा लांब व चिंचोळा पट्टा. १०. केळीचा घड. ११. (नथ इ. दागिन्याचा) आकडा. १२. केळीच्या पानाच्या मध्यातून जाणारा देठाचा लांब भाग. १३. (जमीन, इमारत इ. चा) सुळका, शेंडा. १४. माघी पौर्णिमेला होळीच्या ठिकाणी रोवलेला एरंडाचा सोट. १५. (घराचा) वासा; कडी; बहाल; तुळवट. १६. यंत्र फिरवण्यासाठी मूठ बसविलेली काठी.- शर. २१२. १७. कुळागराचा तुकडा. (गो.) १८. शूद्र स्त्रिया नाकात घालतात तो लोंबता दागिना. (गो.) १९. चार हातांचे लांबीचे एक परिमाण. (गो.) २०. भेंडाचा केलेला एक त्रिकोणाकृती अलंकारविशेष. हा अलंकार स्त्रिया मंगलप्रसंगी वापरतात. (तंजा.) २१. (विणकाम) तातू जोडण्यासाठी जी सांध असते तिच्यात घालण्याचा वेळूचा एक तुकडा. २२. (नाविक) गलबताला बाहेरच्या बाजूला काठाखाली वीतभर अंतरावर नाळवऱ्यापर्यंत दोन्ही बाजूंना ठोकलेली लाकडाची गोल अथवा चौकोनी पट्टी. (नाविक) (को.) २३. (अशिष्ट) लिंग; शिश्न (विशेषतः घोड्याचे लांब असणारे); दांडी. २४. स्त्रियांच्या डोक्यात आंबाड्यावर घालण्याची फुलाची जाळी. २५. पुष्पहार : ‘पार्यातकाचे दांडे’ - श्रीकृच १८·६१. [सं. दंड] (वा.) (घराचे) दांडेवासे मोजणे - कृतघ्न होणे; उपकार विसरून उपकारकर्त्याच्याच नाशाला प्रवृत्त होणे, त्याचा नाश चिंतणे.
आडावणी
स्त्री. (नाविक) अडवणी पहा. अडवण पहा.
आडे
न. १. आढे (घराचे). २. उंबरा; उंबरठा; मर्यादा : ‘ग्रामद्वारींचें आडें । नोलांडी कोण ।’ − ज्ञा १३·७००. ३. दोन माणसांनी कापण्याची करवत; आढ्या करवत. ४. (नाविक) नावेचा कणा; एक जाडे लाकूड; हे नावेस बोडतांच्या दुरमीणावर बसवितात. याने आतल्या बाजूस व काठीस आधार मिळतो. ५. ज्याला बैल जोडतात तो उसाच्या चरकाचा आडवा दांडा. ६. घरावरील छप्पर; माळ्यावरचा भाग. (बे.) ७. तागडी; ताजव्याची दांडी. [सं. अट्ट]
आडें
न. १ (कों.) आढें (घराचें). अढें पहा. २ उंबरा; उंबरठा. 'ग्रामद्वारींचें आडें । नोलांडी कोण ।' -ज्ञा १३.६९९. ३ दोन माणसांनीं कापण्याची करवत; आढ्या करवत. ४ (नाविक) नावेचा कणा; एक जाडें लांकूड; हें नावेस बोडतांच्या दूरमीणावर बसवितात. यानें आंतल्या बाजूस मजबुती व काठीस टेकावा मिळतो. ५ उंसाच्या चरकाचा आडवा दांडा (ज्यास बैल जोडतात तो). ६ (कर्ना.) घरावरील छप्पर; माळ्यावरचा भाग. [सं. अट्ट = माडी. का. अड्ड] ७ तागडी; ताजव्याची दांडी. -शर [का. अड-ड्ड] ॰करी-वि. तागडी वाला.
आडी
स्त्री. पहा : अडी १. रहाट गाडग्याच्या चाकाला परिघाच्या बाजूने अक्षाशी समांतर अशी रव्यावर मारलेली लाकडे. एका रहाटास अशा बारा आड्या असतात (कों.) २. धार काढताना गार्इने लाथ मारू नये म्हणून तिच्या सभोवार बांधावयाच्या काठ्या. ३. (मल्लशास्त्र) कुस्तीत प्रतिपक्षास पायात घालावयाची आढी. ४. (सामान्यतः) आढी (आंब्याची, गवताची, कपाळ, पाय इ. ची). ५. जनावराचा पाय मोडल्यास दोन्ही बाजूंना बांधतात ती लाकडे. (कों.गो.) ६. घराच्या भोवतालचे दगडी कुंपण; गडगा. (गो.) ७. नदी उतरून जाण्याचा लाकडी पूल. (बे.) ८. आडकाठी; अडथळा; प्रतिबंध : ‘मार्गी कांहीं पडली आडी । दूत तांतडी पाठविले ।’ − एरुस्व १४·६७ (बे.) ९. शंका. १०. (कातकरी धंदा) भांडी घडविण्याच्या उपयोगी असलेले दगडी, चपटे, आरपार भोक असलेले उखळ. ११. (नाविक) गलबताच्या झाडाच्या वरील लाकडी तक्त; उतारूंना बसण्यासाठी केलेली जागा; होडीवरील बसण्याकरिता असलेली फळी. १२. काना. (गो.) १३. अडसर. (गो.)
अडवणी
स्त्री. (नाविक) १. (अव.) गलबताच्या दोन फळ्यांना जोडणारे सरळ वळ किंवा आडव्या रांगा. २. (एकव.) समुद्राच्या पाण्याच्या झडीकरिता गलबताच्या दोन्ही बाजूंस बांधलेली लाकडी साटी.
अडवणी
स्त्री. (नाविक) १ अव. गलबताच्या दोन फळ्यांनां जोडणारे सरळ वळ किंवा आडव्या रांगा. २ एकव. समुद्राच्या पाण्याच्या झडीकरितां गलबताच्या दोहों बाजूंस बांधलेली लांकडी साटी. [का. अड्ड + सं. वर्ती]
अलात
न. (नाविक) १ वल्ह्याचें पातें किंवा फळी. २ तारवें पाण्यांतून जमीनीवर ओढण्याची जाड व बळकट दोरी. [सं. अरित्र = वल्हें; प्रा. अलित्त; अर. अलात् = हत्यार, साधन, नावेचा दोर]
अलात, अलाथ
न. (नाविक.) १. वल्ह्याचे पाते किंवा फळी. २. तारवे पाण्यातून जमिनीवर ओढण्याची जाड व बळकट दोरी : ‘गलबताची मरामत करून सा गलबते अलाथ अवदाण अवजारसह वर्तमान तयार केली असत’ – पेद ३३·१०.
अलात अवदात
न. (नाविक.) गलबताचें सामान- सुमान. [अर. अलत् = हत्यार द्वि. ]
अलात अवदात
न. (नाविक) गलबताचे सामानसुमान. [फा. आलात = हत्यारे द्वि.]
अमीरुल बहर
(पु.) हिंदी अर्थ : जलसेनाका सेनापति. मराठी अर्थ : नाविक, सेनानायक.
आम्ल-इ-नवारा
पु. नाविक अधिकारी वर्ग आणि त्याचा खर्च, तनखा इ.
आरमार
न. १ लढाऊ जाहजांचा तांडा; जहाजावरील योद्धे, अधिकारी वं जहाजावरील युद्धसामग्री या सर्वांस आरमार म्हण- तात. [पोर्तु. स्पे आर्माडा; लॅ. आर्मेर] २ लढाऊ जहाजें. ३ नाविक दल. ॰कर-वि. (हेट) आरमाराचीं गलबतें संग्रही असणारा. हें आडनांव देखील आहे.
आरमारी
वि. आरामारासंबंधी; नाविक दलासंबंधी.
आरमारी
वि. आरमारासंबंधीं; नाविक दलासंबंधीं.
आर्या करणे, आर्या होणे, आर्ये करणे, आर्ये होणे
क्रि. १. खाली करणे, खाली ठेवणे, पाहणे : ‘आगबोटीचो जिनो आर्या कर.’ २. (नाविक) शीड उतरणे; शीड खाली करणे, पाडणे. ३. मरणे (कु.) : ‘बातमी ऐकल्याबरोबर त्याने आर्या केलान्’ ४. नाश करणे : ‘भटाच्या गवताची आर्या रे । माझ्या बैलानं केल्यान् रे.’ [का. आरु=विझणे, नष्ट होणे]
आर्या (र्ये) करणें-होणें
क्रि. १ खालीं करणें; खालीं ठेवणें, पाडणें. 'आगबोटीचो जिनो आर्या कर.' २ (नाविक) शीड उतरणें; शीड खालीं करणें, पाडणें. ३ (कु.) मरणें. 'बातमी ऐकल्या- बरोबर त्यानें आर्यां केलान्' ४ नाश करणें. 'भटाच्या गवताची आर्यां रे । माझ्या बैलानं केल्यान् रे. [का. आरु = विझणें, नष्ट होणें]
अस्तमन, अस्तमान
न. १. (नाविक) गलबताच्या तळास मध्यभागी चारसहा बाकांवर एक–दोन हात रुंदीचे व वीत दोन वीत जाडीचे लाकूड बसवितात. त्याला वरच्या अंगास काठी उभी केलेली असते. यात डोलकाठीचा बुंधा बसवितात ही अस्तमने दोन–तीन असतात. २. अस्तमन असलेला तळमजला (गलबताचा). (हेट.) [सं. आ + स्तंभन]
अस्तमन-मान
न. १ (नाविक). गलबताच्या तळास मध्य- भागीं चार-सहा बाकांवर एक-दोन हात रुंदीचें व वीत दोन वीत जाडीचें लांकूड बसवितात. त्याला वरच्या अंगास काठी उभी केलेली असते. यांत डोलकाठीचा बुंधा बसवितात. हीं अस्तमनें दोन-तीन असतात. २ (हेट.) अस्तमन असलेला तळमजला (गलबताचा). [सं. आ + स्तंभन]
आटोळा
पु. (नाविक) वल्हें अडकविण्यासाठीं नावेवर असलेला खुंटा. हा पेरजेस पडलेल्या भोंकांत बसविलेला असतो. [अट; का. अड्ड]
आटोळा
पु. (नाविक) वल्हे अडकविण्यासाठी नावेवर असलेला खुंटा. हा पेरजेस पाडलेल्या भोकात बसवलेला असतो. २. ओटा. [का. अड्ड]
आवाडी
स्त्री. (कों.) (नाविक) सुकाणू फिरविण्यासाठीं लावलेला दांडा, काठी. [सं. आवृत् = फिरणें; प्रा. अवट्ट = फिरणें]
आवाडी
स्त्री. (नाविक) सुकाणू फिरवण्यासाठी लावलेला दांडा, काठी. (कों.) [सं. आवृत्त = फिरणे]
अवदार
न. (नाविक) शीड; अवजार पहा.
अवदार
न. (नाविक.) शीड. पहा : अवजार
बांठ
स्त्री. (नाविक) रांजण; मोठें मडकें. [का. ओट्टे]
बार्*क
स्त्री, (कों. नाविक) फत्तेमारी.
बारदानी
स्त्री. (नाविक) पावसाळी वारा.
बाव(व्हा)टा
पु. १ निशाण; ध्वज; झेंडा. २ बाहुटा; हाताचा वरील भाग. [सं. बाहु; हिं.] ॰हकारणें (नाविक) आपलें निशाण दाखविणें.
बावकांड
न. (नाविक) होडी समतोल राहण्यासाठीं जी उलांडी बांधलेली असते, ती ज्या दोन किंचित् बांकदार वांशांनीं बांधतात त्यांतील प्रत्येक.
बावलें
न. (नाविक) डोलकाठी सरूं नये म्हणून तीस दोन बाजूंनीं लाविलेलीं लांकडें.
बायकांडें
न. (नाविक) उलांडीच्या दोनहि बाजूंस बांधा- वयाचे दांडे. [बाही + कांड]
बिछा(छो)ना
पु. निजावयासाठीं पसरलेली गादी, रुजमा इ॰ अंथरूण; शेज; शय्या [सं. वि + स्तृ; हिं. बिछोना] बिछाने मजला-पु. (नाविक) खलाशांच्या उपयोगाकरितां झुलते बिछाने टांगण्याचा मजला; हा तोफामजल्याखालीं असतो (इं.) बर्थडेक. बिछोन्यासच जिरणें-(व.) रोगी अतिशय अशक्त होऊन त्यास उठण्याबसण्याची शक्ति नसणें; अंथरुणाला खिळणें.
बिवाडा
पु. (कों.) (नाविक) गलबताच्या कांठास आंतील जास्त जाडीचा व कमी रुंदीचा दुरमीण ठोकतात तो.
बोडद
न. १ (नाविक) जहाजाची किंवा बोटीची बाजू; अर्धें अंग. उदा॰ उजवें बोडद; डावें बोडद. २ (ल.) कज्जा-तट यांतील प्रत्येक पक्ष. [इं. बोर्ड]
बोम
पु. १ तोंड शिवलेल्या पोत्यांतील धान्याचा नमुना पाहाण्याकरतां आंत खुपसतां येण्यासारखें टोंकदार व खोबण असलेलें एक लोखंडी हत्यार. बंब्या पहा. २ (कों. नाविक) बोंब पहा.
बोरद
न. (नाविक) बोडद पहा.
बोयरा
पु. समुद्रांत खडकाची, धोक्याची जागा दाखवि- ण्यासाठीं ठेवलेली तरंगणारी वस्तु. [इं. बॉय] बोयराप-न. (नाविक) गलबताच्या नांगराबरोबर निशाणीकरितां पाण्यांत सोडण्याचें लांकूड.
बताण
न. (नाविक) पट्टणास फळ्या बसवितेवेळीं त्यामध्यें राहिलेला पोकळ भाग-पोकळी वांकें घालतांना लांकडांनीं भरून काढणें.
बुडाव
(नाविक कों.) दुरमणीस व वांकझाडीस ठोकलेले आंखूड खिळे. [बूड]
बुलेती
स्त्री. (कों. नाविक) वल्हें अडकविण्यासाठी नावेवरील खुंटी.
बुलीर
(कों. नाविक) परभाण पुढें-मागें ओढण्यासाठीं त्याच्या बुंध्यास बांधलेली दोरी.
बुरकत
न. (कों.)(नाविक)चौकोनी परंतु लांबट शीड. शिडाप्रमाणें ही उभी न करतां आडवी हांकारतात.
भाल
स्त्री. (कों. नाविक) डोलकाठीजवळच्या दोन आड्यांतील भाग.
भंडारी
पु. १ शूद्रांतील एक वर्ग व त्यांतील व्यक्ति. हे ताड- माडापासून दारू काढतात. २ (नाविक.) जहाजावरील जेवण तयार करणारा इसम; खलाशी. भंडारडा-ड्या-पु. (तुच्छतेनें) भंडारी. भंडारथल, भंडारव(वा)डा-नपु. भंडारी लोकांची राहण्याची जागा, मोहल्ला. 'माड व भडारथल देखील.' -वाड- बाबा १.३. भंडारमाड-पु. फळें येऊं न दारू, माडी काढण्यासाठीं राखून ठेविलेला माड. याच्या उलट नारळमाड (फळासाठीं ठेव- लेलें नारळाचें झाड). [भंडारी + माड]
भोंशा
स्त्री. (हेट. नाविक) नांगर बांधलेली दुसरी लहान दोरी.
भोय
पु. (कों. नाविक) अस्तमनाच्या पुढील भागावर गलबताच्या कांठापेक्षां एकदोन हात उंच, गोल किंवा चौरस असें लाकूड अस्तमनास दुसरी खाच पाडून उभें करतात तें. हे भोय तीन असतात. एक कलमीजवळ, दुसरा काठीजवळ व पुढील दाट्या- मागें तिसरा.
भुरडा
पु. (कों. नाविक) नाळीच्या वर बसविलेलें लाकडी टोपण; यास दोन भोकें असतात. त्यांतील एक कप्पीवरून नांगराचा दोर ओढला जातो.
डाह्य
वि. (कु. नाविक) पुष्कळ पाणी असलेला समुद्राचा भाग.
डाह्य
वि. (नाविक) पुष्कळ पाणी असलेला समुद्राचा भाग. (कु.)
डाखीण
स्त्री. (नाविक) दक्षिणेकडील वारा. [सं. दक्षिण; प्रा. दख्खिण]
दांडयारी
स्त्री. (नाविक) काठीला ज्या मुख्य याऱ्या सजवतात त्यांच्याशिवाय आणखीही बारीक दोरीच्या उपयाऱ्या असतात, त्यांपैकी प्रत्येक. (को.)
दाटा
पु. १ (सामा.) दट्टया; पाचर; चोंदी; बूच. (क्रि॰ भरणें; घालणें; बसविणें). २ (पाटणीच्या खालील) कड्यांमध्यें बसविलेला आडवा दट्टया, लांकडी पट्टी. 'बरोदाची लांबी दहा फुटापेक्षां अधिक असल्यास त्यामध्यें सहा फूट लांबीवर दाटे बस- वावे ।' -मॅरेट ६०. ३ (ल.) धमकी; दटावणी; दपटशा; दाट. ४ वल्हें अडकविण्याचा खुंटा. ५ (नाविक कों.) (गलब- ताच्या) नाळींत अगदीं पुढील भागास कांठाच्या किंचित् खालीं आढीं घालून त्यावर फळ्या ठोकून केलेली तक्तपोशी, पाटणी; गलबताचा माळा. नाळीकडे हरएक कामास जाण्यासाठीं याचा उपयोग होतो. शिवाय याच्याखालीं स्वयंपाकहि करितात. [दाट]
दाटा
पु. १. (सामा.) दट्ट्या; पाचर; चोंदी; बूच. (क्रि. भरणे, घालणे, बसवणे.). २. (पाटणीच्या खालील) कड्यांमध्ये बसवलेला आडवा दट्ट्या, लाकडी पट्टी : ‘बरोदाची लांबी दहा फुटांपेक्षा अधिक असल्यास त्यामध्यें सहा फूट लांबीवर दाटे बसवावे ।’ - मॅरेट ६०. ३. (ल.) धमकी;दटावणी; दपटशा; दाट. ४. वल्हे अडकविण्याचा खुंटा. ५. (नाविक) (गलबताच्या) नाळीत अगदी पुढील भागाला काठाच्या किंचित खाली आढी घालून त्यावर फळ्या ठोकून केलेली तक्तपोशी, पाटणी; गलबताचा माळा. (को.)
दिङ्निर्णय यंत्र
न. ज्याच्याद्वारें दिशा ओळखतां येतात असें यंत्र; नाविक कंपास. (इं.) मॅरिनर्स काँपस. [सं.]
दिङ्निर्णययंत्र
न. दिशा ओळखण्याचे यंत्र; नाविक कंपास; होकायंत्र. [सं.]
दमान, दमाण, दमन, दमण
न. १. (नाविक) शिडाची दोरी; शीड; शिडाचा मागचा (काठीजवळचा) भाग. २. वाऱ्यासमोरची बाजू. [सं. दाम; फा. दामन]
दमान-ण
न. १ (नाविक) शिडाची दोरी; शीड; शिडाचा मागचा (काठीवळ येणारा) भाग. २ वार्यासमोरची बाजू. [सं. दाम = दोर; फा. दामन्]
डोली
स्त्री. १. अशक्त, आजारी माणसांना, बायकामुलांना नेण्याकरिता उपयोगात आणावयाचे वाहन; पाळणा; डोंगर, घाट चढण्या–उतरण्यासाठी अशा डोल्यांचा वापर होतो : ‘डोलीमाजी घातली तेधवां । कृष्ण दर्शनें तारावया I’ –जैअ ६·५९. २. मेणा; पालखी; सुखासन. ३. (नाविक) घामत बाहेर टाकण्यासाठी पेटीसारखी केलेली व्यवस्था. [हिं., सं. दोलय, दोली]
डोली
स्त्री. १ अशक्त, आजारी माणसास, बायकामुलांस नेण्याकरितां उपयोगांत आणावयाचें वाहन; पाळणा; डोंगर, घाट चढण्याउतरण्यासाठीं पूर्वीं अशा डोल्या असत. 'डोलीमाजी घातली तेधवां । कृष्ण दर्शनें तारावया ।' - जै ६.५९. २ मेणा; पालखी; सुखासन. ३ (हेट. नाविक) घामत बाहेर टाकण्यासाठीं पेटीसारखी केलेली जागा. [सं. दोली]
डोलकर, डोळकर
पु. १. डोली, पालखी वाहणारा; भोई. २. शिडाची काठी सांभाळणारा; नाविक. ३. कोळी; मासेमारी करणारा.
दर्या, दर्याव, दरिया
पु. १ समुद्र; मोठी नदी; सरोवर; पाण्याचा मोठा साठा, विस्तार. कचभुजचे गुराबेची लढाई साल- मजकुरी दर्यांत होऊन' -वादसभा १.११. २ (कु.) मोठी खाडी. [फा. दर्या] दर्याई-वि. समुद्रावरील; आरमारी. 'दर्याई व खुशकी फौजा.' [फा.] दर्याक मारप-सक्रि. (गो.) समु- द्राला बळी देणें. दर्याखोबरें-न. खोबर्यांतील एक जात; झेरी- गोठला. -मुंव्या १४९. ॰गर्क-वि. समुद्रानें बुडविलेली (गांव, जमीन). दर्यांत-दर्यामें खसखस-पु. अतिशय मोठया वस्तूंशीं अगदीं क्षुल्लक वस्तूची तुलना. दर्यांदर-वि. (गो.) चांचा; लुटारू. ॰महाल-पु. नदी, सरोवर इ॰ कांच्या कांठीं बांध- लेला वाडा. ॰वर्दी-पु. खलाशी; नाविक; खारवा; नावाडी. [फा. दर्या-नवर्द + ई] ॰विस-वि. समुद्रकांठचा. 'दर्याविस तालुके मजकूरचे...' -समारो २.२.
दर्यावर्दी
पु. खलाशी; नाविक; खारवा; नावाडी. [फा. दर्या –नवर्द+ई]
दुडवाक
न. (नाविक) दुंडे, आखूड वाक. याचे एक टोक कमानीचे असते व दुसरे सरळ असते. तळाच्या वर वाकांच्यामध्ये टोक येईल अशा प्रमाणात दुडलेल्या भागात ही घालावी लागतात. (को.)
दुडवांक
न. (नाविक कों.) दुंडें, आखूड वांक, याचें अक टोंक कमानीचें असतें व दुसरें सरळ असतें. तळाच्यावर वांकांच्यामध्यें टोंक येईल आशा प्रमाणांत दुडलेल्या भागांत हीं घालावीं लागतात. [दुडणें + वांक]
दुरबिनीत
न. (हेट. कों. नाविक) गलबताच्या झाडीच्या आंतून लांबच्या लांब मारलेल्या फळ्यांपैकीं प्रत्येक. दुरमीण पहा.
दुरबिनीत, दुरमीण
न. (नाविक) गलबताच्या झाडीच्या नाळ ते वऱ्यापर्यंत ठोकलेल्या फळ्यांपैकी प्रत्येक; गलबताला आतील अंगाला मजबुती येण्यासाठी वागे, दुवाके, झाड्या यांवरून काही अंतर सोडून ठोकतात त्या जाड्या फळ्या. (हेट., को.)
दुरमीण
स्त्री. (नाविक. कोंकणी) गलबतास आंतील अंगास मजबुती येण्यासाठीं वांके, दुवांके, झाड्या यावरून कांहीं अंतर सोडून जाड्या फळ्या ठोकतात त्या. या फळ्या नाळ ते वर्या- पर्यंत ठोकतात.
धोया
पु. (हेट. नाविक.) खुंटीच्या आकारासारखें लांकूड.
धोया
पु. (नाविक) खुंटीच्या आकारासारखे लाकूड. (हेट.)
गाबडी, गाभडी, गाबडे, गाभडे
स्त्री. न. १. भोक, खड्डा, चीर बुजविण्या-आच्छादण्यासाठी लावलेला तुकडा, पुस्ती, जोड, ठिगळ. २. (नाविक) झिरपे; भोक; छिद्र. [क. गब्बरिसु]
गाबडी-डें
स्त्रीन. भोंक, खड्डा, चीर बुजविण्या-आच्छा- दण्यासाठीं लाविलेला तुकडा, पुस्ती, जोड ठिगळ, दुसर्या तुकड्यांत बसविलेला तुकडा. २ (नाविक) झिरपें; भोंक; छिद्र. 'खांदेरीच्या जवळ आमच्या गलबतांना गाबडया पडून आंत पानी येवुं लागलें. ' [का. गब्बरिसु = खणणें, फाडणें?]
गाडतक हानाव
पु. (कों.) (नाविक) पहिल्यानें कांहींसा तिरपा, नंतर सरळ व पुन्हां तिरपा असा सांधा जोडणें. हा हानाव फार मजबूत असतो. [गाडणें + हानाव]
गाडतक हानाव
(नाविक) पहिल्याने काहीसा तिरपा नंतर सरळ व पुन्हा तिरपा असा सांधा जोडणे. हा हानाव फार मजबूत असतो. (को.) गाडद
गापटी
स्त्री. (नाविक) पसरलेला कातळ; खडक.
गापटी
स्त्री. (नाविक) पसरलेला कातळ; खडक.
गावी
स्त्री. (नाविक) परभाणाच्या वर डोलकाठीच्या कळशीजवळचें (बहुधा मोठ्या गलबतास लावण्याचें) शीड.
गावी
स्त्री. (नाविक) परभाणाच्या वर डोलकाठीच्या कळशीजवळचे (बहुधा मोठ्या गलबताला लावण्याचे) शीड : ‘गावी परबान जाया झालें.’ –थोमारो ९·२३६.
गावरान
न. १. गाव त्याच्या आसपासचा प्रदेश, जमीन. २. गावची व आसपासची लोकसंख्या. ३. (नाविक) नैर्ऋत्येकडील वारा; गावाकडे येणारा वारा. (कु.)
गावरान
न. (कु.) (नाविक) नैऋत्येकडील वारा. गांवांकडे येणारा वारा.
गच्ची
स्त्री. (नाविक) डोलकाठीला आडवी टांगलेली काठी सुरक्षित ठेवण्यासाठी वापरलेले बंद आणि दाताळी.
गच्ची
स्त्री. (नाविक.) डोलकाठीस आडवी टांगलेली काठी सुरक्षित ठेवण्यासाठीं वापरलेले बंद आणि दातांळीं.
गदाम
न. (नाविक) गलबते चोपडण्यास लावतेवेळी ती तराजूसारखी राहण्यासाठी दोन्ही बोडतांना, पाण्यात लाकडे उभी करून त्यांना बांधतात त्या आडव्या दांड्या. (हेट)
गदाम
न. (हट.) (नाविक) गलबतें चोपडण्यास लवते- वेळीं तीं तराजू सारखीं राहण्यासाठीं दोन्ही बोडतांस, पाण्यांत लांकडें उभीं करून त्यांना आडव्या दांडया बांधतात त्या. गल- बतांच्या बोडतांच्या दुरमिणास दोरी बांधून गदामांवर गलबतांचा तोल घेतात. गदम.
गरबखिळी
स्त्री. (नाविक) जांगींत उभें केलेलें नाडवळ अढळ होण्यासाठीं जांगींतून व नाडवळाच्या नेढ्यांतून पार नेलेला लोखंडी खिळा. [गर्भ + खिळी]
गरबखिळी
स्त्री. (नाविक) जांगीत उभे केलेले नाडवळ अढळ होण्यासाठी जांगीतून व नाडवळाच्या नेढ्यातून पार नेलेला लोखंडी खिळा.
घामत
स्त्री. (नाविक) होडीत, गलबतात पाझरून आलेले समुद्राचे पाणी; घमत. (को. कु. हेट) : ‘गलबतास गोळे तीन लागू होऊन फुटले. आंत पाणी भरले. पुढे चालावयाचे राहिले. घामतात लोक बसले.’ – पेद ३३·२३७.
घामत
स्त्री. (कों. कु. हेट.) (नाविक) होडींत, गलब तांत पाझरून आलेलें समुद्राचें पाणी; घमत.
घांतड
स्त्री. (हेट; नाविक) घामत (गलबतांतील, होडीं- तील) पाणी काढण्याची जागा. गमतड पहा. [घामत]
घाट
पु. (नाविक) गलबताच्या बाजूच्या फळ्या जोडणारा खिळा. मालवण-गोमांतकाकडे कबिला किंवा खिळे याऐवजी सुंभाचे दोर लावून फळ्या जोडतात. (को.)
घाट
पु. (कों. नाविक) झाडी व गलबताच्या बाजूच्या फळ्या जोडणारा खिळा. मालवण, गोमांतकाकडे कबिला किंवा खिळे या ऐवजीं सुंभाचे दोर लावून कळ्या जोडतात.
घातड
स्त्री. (नाविक) घामत (गलबतातील, होडीतील) पाणी काढण्याची जागा. (हेट) पहा : गमतड
घण
(कों. नाविक.) एक प्रकारचें जाळें.
घो(घों)स
पु. १ (नाविक कों. हेट.) शिडाचा पुढील (नाळीकडील) भाग; परबाणाचें नाळीजवळचें टोंक; हें दुसर्या टोंकापेक्षां जाड असतें. शीड दोन्ही टोंकांनीं परबाणाला बांधलेलें असतें. हें केव्हांहि डोलकाठीच्या मागें जात नाहीं; वार्याच्या दिशेप्रमाणें शीड बांधण्याचा एक प्रकार व दमाण हा दुसरा प्रकार आहे. 'घोस घ्या; घोस !' -शेक्सपियर नाट्यमाला, तुफान पृ. ३. २ शीड बांधण्याची दोरी. ३ वार्याची दिशा. ४ गल- बतानें प्रवास करणें; विवक्षित स्थळीं गलबतानें केलेली फेरी; समुद्रा वरील सफर. 'मुंबईच्या घोंसास दहा रुपये पडतात.' [सं. घोष]
घोडली
स्त्री. (नाविक) शौचाला बसण्याकरिता वऱ्याला चार दोऱ्यांनी अडकविण्यात येणारी चौकट. (को. हेट.)
घोस
पु. १. (नाविक) शिडाच्या पुढील (नाळीकडील) भाग; परबाणाचे नाळीजवळचे टोक. हे दुसऱ्या टोकापेक्षा जाड असते. शीड दोन्ही टोकांनी परबाणाला बांधलेले असते. हे केव्हाही डोलकाठीच्या मागे जात नाही. वाऱ्याच्या दिशांप्रमाणे शीड बांधण्याचा एक प्रकार व दमाण हा दुसरा प्रकार आहे. (को.) २. शीड बांधण्याची दोरी. ३. वाऱ्याची दिशा. ४. गलबताने प्रवास करणे; विवक्षित स्थळी गलबताने केलेली फेरी; समुद्रावरील सफर.
घुगरा
पु. (राजा.) (नाविक.) चार मोठे जाडे दोर घेऊन त्यांचा एक मोठा नाडा (गलबताच्या उपयोगाचा) कर- ण्याची क्रिया. यासाठीं एक लांकडी चौकट वगैरेचें यंत्र असतें.
घुगरा
पु. (नाविक) चार मोठे जाडे दोर घेऊन त्यांचा एक मोठा नाडा (गलबताच्या उपयोगाचा) करण्याची क्रिया. यासाठी एक लाकडी चौकटीचे यंत्र असते. (राजा.)
हानाव
पु. (नाविक.) तिरपा सांधा.
हानजा
पु. (नाविक.) यारी.
हांडी
स्त्री. (नाविक) १ गलबताचा पाण्यावरील सुकाणूकडचा कांहींसा भाग. २ (गो.) कमर; कडा. म्ह॰ (गो.) हांडीर असा चेडो, भोवतो सगलो वाडो = कमरेवर मूल पण सगळा गांव धुंडाळते. तुल॰ खाकेंत कळसा, गांवाला वळसा.
हांजा
पु. (नाविक) लांकडी बोंबास शीड अडकविण्या- साठीं त्याचे शेंड्यावरील भोंकांत भरून घेतलेली दोरी.
हेडा
पु. (नाविक) मासे मारण्याचें एक आयुध.
हेडणें
क्रि. (नाविक) तुफान होणें. हेटणें पहा.
हेलमी
पु. (नाविक) तुफान; तुफानी वारा व पाऊस.
हेळंबी
स्त्री. (नाविक) भयंकर वादळ. हेलमी पहा.
हेरें-ऱ्यें
न. (नाविक) गलबताचें शीड बदलणें. (क्रि॰ घेणें). ॰बोऱ्यें-न. वाऱ्याच्याविरुद्ध दिशेनें गलबत हांकारणें. 'कोणीकडला तरी वाव असावा म्हणजे हेऱ्येबोऱ्ये करून गलबत नेतां येईल.'
हेट
स्त्री. (नाविक) दक्षिणदिशा; ठम (हेटकरी). -वि. खालचा दक्षिणेकडील; तळकोंकणचा. -क्रिवि. १ खालीं; खालच्या प्रांतात, प्रदेशीं, भागीं. २ किनाऱ्याच्या दक्षिणेस; दक्षिण दिशेकडे; विशेषतः कोंकणांतील सावित्री नदीच्या दक्षिणेकडे. 'यंदा हेटप्रांत चांगला पिकला.' [सं. अधस्थ; देप्रा. हेठ्ठ; गु. हेठ] ॰करी-पु १ दक्षिणेकडील (हेटप्रांतांतील) रहिवासी. २ तिकडील बरकंदाज शिपायी. ॰चा वारा-पु. दक्षिणेकडील वारा. ॰बाहेरचा वारा-पु नैऋत्येकडील वारा. हेटणें-अक्रि. (कु.) तुफानी वारा सुटणें.
होदार
न. (नाविक) दोरी ताणून बांधण्याची क्रिया.
इंद्रुसयारी
स्त्री. (नाविक) गलबतावरील डोलकाठी व शीड उभारण्याची दोरी, यारी.
इंद्रुसयारी
स्त्री. (नाविक.) गलबतावरील डोलकाठी व शीड उभारण्याची दोरी; यारी.
जहाज़ी
(वि.) हिंदी अर्थ : नाविक. मराठी अर्थ : नावाडी.
जिभांगे
न. (नाविक) वाऱ्याला रोखून धरणारा व जहाजाला गती देणारा शिडाला बांधावयाचा कापड वगैरेचा तुकडा.
जिभांगें
न. (नाविक) वार्याला रोखून धरणारा व जहा- जाला गति देणारा शिडाला बांधावयाचा कापड वगैरेचा तुकडा. [जीभ + अंग]
जिवा
पु. (नाविक) दोरीचे दोन पेड वळून झाल्यानंतर त्यात मिसळावयाचा तिसरा पेड; शिडाच्या दोन पाखा ज्या जोडसुंभाच्या दोरीने जोडलेल्या असतात तो गोट.
जिवा
पु. (नाविक) दोरीचे दोन पेड वळून झाल्या- नंतर त्यांत मिसळावयाचा तिसरा पेड; शिडाच्या दोन पाखरा ज्या जोडसुंभाच्या दोरीनें जोडलेल्या असतात तो गोट. [जीव]
जक
१ खिपत; पराभव; धक्का; थप्पड; तंबी. 'एवढी जक खर्ड्यावर हजरतीस बसली.' -रा ५.१६. २ (नाविक) एखाद्या लाकडास फूट गेल्यास मजबुतीसाठीं दोरीनें चार-सहा फेरे घेतात ते [अर. दक्क = पीठ करणें]
जक
पु. (नाविक) एखाद्या लाकडास फूट गेल्यास मजबुतीसाठी दिलेले दोरीचे चार–सहा फेरे.
जनात
स्त्री. (नाविक) जास्त मजबुतीसाठी काठाच्या खाली लावलेली जाडी फळी. ही जनात सर्वच गलबतांस असत नाही. जनातीची फळी घडण्याच्या फळीपेक्षा जाड असते.
जनात
स्त्री. (नाविक) जास्त मजबुतीसाठीं कांठाच्या खालीं जाडी फळी घडतात ती. ही जनात सर्वच गलबतांस असत नाहीं. जनातीची फळी घडण्याच्या फळीपेक्षां जाड असते.
जोर
पुन. १ जोम; शक्ति; ताकद; बळकटी. २ स्थैर्य; दार्ढ्य; गंभीरपणा; दमदारपणा; सहनशक्ति (सजीव प्राणी, वस्तु यांची). ३ वेग; शक्ति; आघात; झपाटा; गतीचा वेग (वारा, बंदुकीची गोळी यांचा). ४ जुलुम; जबरदस्ती; अन्याय. ५ दाब; ताण; नेट; वजनाचा भार. 'सगळे भोई सारखे असले तर बरे, नाहीं तर ठेंगणा असतो त्याचे खांद्यावर भारी जोर येतो.' ६ जोष; पूर्ण वेग; भर (रोग, पाऊस, थंडी यांचा). ७ तालमींतील एक व्यायामविशेष; दंड. (क्रि॰ काढणें). ८ (नाविक) पूर; समु- द्राची भरती (विशेषतः पोर्णिमा-अमावास्येच्या दिवशींची); भांग; उधाण. ९ (यंत्रशास्त्र) प्रेरकशक्ति. १० महत्त्व; भर. या गोष्टीवर गव्हर्नरसांहेबांनीं बराच जोर दिला होता.' -केले १.१९९. [फा. झोर्; अर. जौर्] (वाप्र.) ॰करणें-लावणें-जोरास येणें = जबरदस्तीनें वागणें; अडथळा करणें; शक्तीची, बलात्काराची गरज उत्पन्न करणें; तडीस नेण्यास, उरकण्यास कठिण करणें, जाणें 'आज पावेतों रुपये देतों देतों म्हणत होता पण अतां जोरास आला त्यापेक्षां उपास घातले पाहिजेत.' ॰देणें-१ पुष्टी; मदत, आधार देणें. २ महत्त्व देणें; विशेष उल्लेख, निर्देश करणें. म्ह॰ जोर थोडा, आणि घुस्सा बडा. -भाब २४. सामाशब्द- जोराचा-वि. नेटाचा; अति मोठा. ॰कस-दार-वान-वि. १ दंड काढणारा. २ पहिलवान; ताकदवान; बळकट; सशक्त. ॰गत-स्त्री. (राजा.) उधाण; उसाण; भांग; समुद्राची भरती (अमावास्या व पौर्णिमेची). 'पुनवेच्या व जोरगतीच्या दिवशीं भरतीच्या वेळीं मानसेचीं दारें बंद केल्यावरसुद्धां काय बिशाद होती.' -सह्याद्री ९४. ॰जबरी-स्त्री. जुलुम; जबरदस्ती. ॰तलप-ब-स्त्री. १ (कायदा) हजर राहण्यासाठीं जोराचें बोलावणें. २ अन्यायपूर्वक हरण; बलत्कारानें हरण; बलात्कार. 'जोरतलबेनें ऐवज शिंदे यांनीं आणिला म्हणून वार्ता आहे.' -ख ९.४९८४. 'माझें मनांत आलें तर येईन, तुमचे जोरतलपेस भिणार नाहीं.' ॰तलपी-बी-स्त्री. जुलूम; जबरदस्ती. -वि. १ जुलमाचें; जबरीचें; जोराचें; बलात्का- राची (हजेरी. पैसा उकळणें यासंबंधीं मागणी). 'त्यापेक्षां अंमल जोरतलबीचा सुरू करावा.' -मराचिथोशा ७७. २ मग्रूर; अरेराव. 'कोठें जोरतलबा महाल असतील, हरामखोरांस तंबी पोहोंचावून पैसा वसूल करून देणें.' -मदबा १.११८. -पेद ६.१४८. [फा] ॰तलबीटीप-सर-स्त्री. पत्त्यांच्या खेळांतील एक संज्ञा. ॰बळ- न. शारीरिक बल; पाशवी शक्ति; आडदांडपणा; दांडगाईचा जोर, बळ; शुद्ध दांडगाई; जुलूम. [फा. झोर् + सं. बल] ॰पट्टी-स्त्री दोन थरास जोडणारी पट्टी 'जरूर पडल्यास वरवंड्या जोर- पट्टीनें जोडाव्या.' -मरॅट १३. ॰बेजोर-बेजौर-क्रिवि. जोरा- वारीनें; जबरदस्तीनें. 'इंग्रज घाट चढोन येऊन जोरबेजोर होसकट्टयाचें ठाणें घेतलें.' -ख ९.४४५४. 'प्रधानाच्या फौजेनें बदामीचा किल्ला जोरबेजोर फत्ते केला.' -ख ८.४०९०.
जोर
पु. (नाविक) पूर; समुद्राची भरती (विशेषतः पौर्णिमा - अमावस्येच्या दिवशीची); उधाण.
जूग
न. (कु. नाविक) दोर्या (टांकणी, अलाज, खुराप) तयार करण्याकरितां केलेलें एक साधन. [सं. युग]
जूग
न. (नाविक) दोऱ्या (टाकणी, अलाज, खुराप) तयार करण्याकरिता केलेले एक साधन. (कु.) [सं.युग]
झा(झी)ट
स्त्री. १ (म्हतारपण इ॰ मुळें चालतांना जाणारी) झोकांडी; झोक; झोल. २ घेरी; मूर्च्छा; अंधेरी; भोंवळ. (क्रि॰ येणें). -न. १ काटक्या, ढलप्या, फांद्या, उपटलेलीं वाळकीं रोपें यांचा भारा. हीं जमीन भाजण्यास उपयोगी असतात. २ (नाविक. हेट.) दोरीला अडवून ठेवण्याचें लांकुड. ३ (अशिष्ट) झेंगट; लचांड; अडथळा; पेंच; संकट; त्रास; दशा. पुढील शब्द पहा.
झाडी
स्त्री. (हेट. नाविक.) गलबताच्या वांकांच्यामध्यें उभें घातलेलें लांकूड; (गलबताच्या) वांकाची वाढी व भाग व गलबताची एकएक बाजू यांस जोडणारा तिरपा वासा. [झाड]
झेलती
स्त्री. (नाविक) बोडतांस दमण भरण्याकरितां अस- लेली दोरी. [झेल]
झेलती
स्त्री. (नाविक) बोडतास दम भरण्याकरिता असलेली दोरी.
झिगी
स्त्री. (नाविक) पट्टणास खालच्या अंगास आधार म्हणून जोडतात ती लाकडे. (को.)
झीगी
स्त्री. (नाविक. कों.) पट्टणास खालच्या अंगास आधार म्हणून जोडतात तीं लांकडें.
झीट
न. १. काटक्या, ढलप्या, फांद्या, उपटलेली वाळकी रोपे यांचा भारा. ही जमीन भाजण्यास उपयोगी असतात. २. (नाविक) दोरीला अडकवून ठेवण्याचे लाकूड. (हेट.) ३. (अशिष्ट) झेंगट, लचांड, अडथळा; पेच; संकट; त्रास; दशा. [सं. क्षीण]
कागडे
(हेट. नाविक) नैर्ऋ/?/त्य दिशेचा अधिपति. निर्*ऋति ही मृत्युदेवता आहे व कागडा (कावळा) मृत्यु सूचक पक्षी आहे. तेव्हां कागडा व नैर्*/?/ऋत्य यांचा असा संबंध असावा.
कांडी
स्त्री. १. वेखंड, सुंठ, आले, हळद इत्यादींची मुळे व तुकडा; मोड; अंकुर; ऊस वगैरेची पेरे. २. त्या आकाराचा धातूचा तुकडा. ३. (वस्त्रोद्योग) वस्त्र विणण्यासाठी ज्या काठीला सूत गुंडाळलेले असते ती काठी. ४. (वस्त्रोद्योग) धोट्याच्या आतील दोऱ्याचे गुंडाळे, बाबीण; धोट्यामध्ये बसेल अशा लाकडी अगर बोरूच्या तुकड्यावर भरलेल्या सुताची गुंडाळी. ५. लसणीचा गड्डा. ६. चंदनाचे खोड.(गो.) ७. (नाविक) दोन्ही रोजांना सांधणारे व दोन्ही रोजांसहित भागाचे लाकूड. हा गलबताचा पाया होय. या लाकडाच्या वरच्या अंगाला दोन्ही बाजूंनी खाचा पाडून त्यात फळ्या बसवतात. (को.) ८. (छापखाना) फर्मा ठोकताना पान (पेज) व सामान (फर्निचर) हे चौकटीला आवळून बसण्याकरता ठोकायचा लाकडाचा तुकडा. ९. ओळ; चरण : ‘ब्राह्मणु एकु कांडि म्हणतु होता ।’–गोप्र ४५. [सं. कांड] (वा.) कांडी चिरगाळणे, कांडी फिरवणे– गारुड्याने आपल्या हातातील लाकडाची लहान काठी आपल्या हाताभोवती अथवा अंगाभोवती फिरवणे. (यक्षिणीची) कांडी फिरवणे – चमत्कार घडवून आणणे, अवचित एखादी गोष्ट घडवून पूर्वी घडलेल्या कृत्याच्या उलट होणे.
कांडी
स्त्री. १ वेखंड, सुंठ, आलें, हळद इ, चीं मुळें व तुकडा; मोड; अंकूर; ऊंस वगैरेंचीं पेरें. २ त्या आकाराचा धातूचा लांबट तुकडा. ३ वस्त्र विणण्यासाठीं ज्या काडीला सूत गुंडाळलेलें असतें ती काडी. ४ (विणकाम) धोट्याच्या आंतील दोर्याचें गुंडाळें, बाबीण; धोठ्यामध्यें बसेल अशा लांकडी अगर बोरूच्या तुक- ड्यावर भरलेल्या सुताची गुंडाळी. ५ लसणीचा गड्डा. ६ (गो.) चंदनाचें खोड. 'गंधा कांडी बरी वासाची आसा.' ७ (कों. नाविक) दोन्ही रोजांस सांधणारे व दोन्ही रोजांसहित भागाचें लांकूड, हा गलबताचा पाया होय. या लांकडास वरच्या अंगास दोन्ही बाजूंस खांचा पाडून त्यांत फळ्या बसवितात. ८ (छाप- खाना) फर्मा ठोकतांना पान (पेज) व सामान (फर्निचर) हें चौकटीला आंवळून बसण्याकरितां ठोकावयाचा लांकडाचा तुकडा. [सं. कांड] -चें लांकूड-धोट्यांतील सूत ज्या बोरूच्या कांडीवर गुंडाळतात ती, गन्या. ॰पिरगाळणें-फिरविणें-गारुडी आपल्या हातांतील लांकडाची लहान काठी आपल्या डाव्या हाताभोंवतीं अथवा अंगाभोंवतीं फिरवितो ती. (यक्षिणीची) कांडी फिरविणें-चमत्कार घडवून आणणें, अवचित एकादी गोष्ट घडवून पूर्वीं घडलेल्या कृत्याच्या उलट घडून येणें.
कांस
स्त्री. (नाविक) काठीचा बुंधा खालीं दबण्यासाठीं दुरमीणास व काठीस अडकवावी लागणारी दोरी (वाकाच्या दुरमीणास एक शेंवट-टोंक अडकवून दुसरें शेंवट काठीच्या बुंधास फेरा देऊन दुरमीणास दुसर्या बोडतास अडकवून ठेवतात. [सं. कृष् = ओढणें]
कांस
स्त्री. (नाविक) काठीचा बुंधा खाली दबण्यासाठी दुरमीणास व काठीस अडकवावी लागणारी दोरी. (वाकाच्या दुरमीणास एक टोक अडकवून दुसरे टोक काठीच्या बुंध्याला फेरा देऊन दुसऱ्या दुरमीणास दुसऱ्या बोडताला अडकवून ठेवतात.) [सं. कृष्=ओढणे]
कारी
स्त्री. (नाविक) राळ (गलबत, नाव इ॰ च्या खालीं लावतात); तेलांत चेंदरुस कढवून तयार करतात. ही फळ्या कायम घडतेवेळीं वाद्रीस लावून नंतर कापसाची घडी ठेवून घडतात.
कारी
स्त्री. (नाविक) राळ (गलबत, नाव इ. च्या खाली लावतात); तेलात चेंदरुस कढवून तयार करतात.
कौलावण
स्त्री. १. सरकारी कौल; परवाना मिळविण्यासाठी द्यायची पट्टी, किंमत, फी. २. (नाविक) गलबताचा नोर; गलबतातून जाण्यायेण्यासाठी पडणारे मूल्य.
कौलावण
स्त्री. १ सरकारी कौल, परवाना मिळविण्यास द्यावयाची पट्टी, किंमत, फी. २ (नाविक) गलबताचा नोर; गल- बतांतून जाण्यायेण्यास पडणारें मूल्य. [कौल]
काव(वा)र
न. १ (कों) पाचर, खुंटी (भिंतीतील); खुंटा (जात्याचा) ढिला झाल्यास त्यांत बसविण्याची पाचर किंवा लाकडी चीप. २ (व.) कावल; अतिशय झिजलेलें भांडें. २ (योगशास्त्र) गुदस्थानीं टांच जोडणें, गुद व शिश्न यांच्या मधील शिवण. 'अपान रंघ्रद्वया-। -माझारीं धनंजया । पार्ष्णी पिडूनियां । कांवरु मूळ ।' -ज्ञा १८.१०३६. ४ (नाविक) फळीच्या वाद्रींत दुसरी फळी गच्च बसती करणारी लांकडी पाचर ही कावर खालच्या व वरच्या दोन्ही फळ्यांस चार अंगुळें अंतरावर दोन दोन भोंकें पाडून त्यांत मस्तूर भरून नंतर ठोकतात. हिचें पुढचें टोंक निमुळतें व रुंदट असून वरचा माथा गोल व सपाट असतो. ॰मूळ-न. गुद व शिश्न यांमधील शिवणीचें मूळ.
कावर, कावार
न. १. पाचर, खुंटी (भिंतीतील); खुंटा (जात्याचा) ढिला झाल्यास त्यात बसविण्याची पाचर किंवा लाकडी चीप. (को.) २. कावल; अतिशय झिजलेले भांडे. (व.) ३. (योगशास्त्र) गुदस्थानी टाच जोडणे, गुद व शिश्न यांच्यामधील शिवण : ‘अपान रंध्रद्वया- । माझारीं धनंजया । पार्ष्णी पिडूनियां । कांवरु मूळ ॥’ - ज्ञा १८. १०३६. ४. (नाविक) फळीच्या वाद्रीत दुसरी फळी गच्च बसती करणारी लाकडी पाचर. ही कावर खालच्या व वरच्या दोन्ही फळ्यांना चार अंगुळे अंतरावर दोन दोन भोके पाडून त्यात मस्तूर भरून नंतर ठोकतात. हिचे पुढचे टोक निमुळते व रुंदट असून वरचा माथा गोल व सपाट असतो.
कबेशी
पु. (कों.) (नाविक) नावेच्या फळीच्या घड- कामास मजबुती येण्यासाठीं ठोकावयाचे खिळें, हे आंतून ठोक तात. हे खिळ्यांपेक्षा लहान असतात. हे फळ्यांस सांधकामास ठोकतात.
कबिला
पु. (कों.) (नाविक) वांक व पठाण यांस जोडण्याकरितां केलेला लोखंडी जाड गजासारखा खिळा, हे खिळे बाहेरून ठोकतात.
कबिला
पु. (नाविक) बाक व पठाण यांना जोडण्याकरिता केलेला लोखंडी जाड गजासारखा खिळा. हे खिळे बाहेरून ठोकतात.
कचोरा
पु. (नाविक) नावेचा कणा.
कचोरा
पु. (नाविक) नावेचा कणा-नाको.
कडतेल
न. (नाविक) तेलात थोडीशी राळ कढवून तयार केलेले तेल. हे गलबताचा जो भाग पाण्याच्या वर असतो त्याला लावतात. (को.)
कडतेल
(को.) (नाविक) तेलांत थोडीशी राळ कढवून तयार केलेलें तेल. हें गलबतांस पाण्याच्या वरील भागाला लाव- तात. [कढणें + तेल]
केलडे
न. (नाविक) कप्पीसारखे पण साधारण लांबट चाक.
केलडें
न. (नाविक) कप्पीसारखें पण साधारण लांबट चाक.
किबीन
स्त्री. (नाविक) गलबताचा सुकाणूकडील (मागील) भाग; हा कांहींसा कमानीसारखा गोल असून बाकीचा भिंती- सारखा उभा असतो.[इं. केबिन]
किबीन
स्त्री. (नाविक) गलबताचा सुकाणूकडील (मागील) भाग. हा काहीसा कमानीसारखा गोल असून बाकीचा भिंतीसारखा उभा असतो. [इं. केबिन]
कलबी, कलंबी, ककंबी
स्त्री. (नाविक) अगदी पाठीमागचे शीड.
कलबी-लंबी-ळंबी
स्त्री. (नाविक) अगदीं पाठीमा- गचें शीड. [अर. कल्ब् = मध्य ?]
कपा
पु. १ कप्पा; मणी; मणका. (इं.) पुली. २ (कों. हेटकरी) (नाविक) मोठी कप्पी, पुली; यास पांच-सहा गाळे असतात. कपी पहा.
कपा
पु. १. कप्पा; मणी; मणका; पुली (इ.). २. (नाविक) मोठी कप्पी, पुली. याला पाचसहा गाळे असतात. (को.) पहा : कपी
करडा
पु. १ (सोनारी धंदा) ठसे उठविण्याचें किंवा खांचा (रुपयाच्या कडेला असलेले चरे, रेघा) पाडण्याचें एक पट्टीसारखें हत्यार. २ सोन्याच्या तारेवर रेघा, चरे वगैरेसारखी उठवि- ण्याची नक्षी; तरवारीच्या मुठीवर व पट्ट्यावर किंवा बुगड्यांवर अशा प्रकारची नक्षी असते. अवटीवर तार दाबून ही नक्षी वठवि- तात. कोंदणकामासाठीं करड्याच्या नकशी खांच्यांत तार किंवा पट्टी वेटतात. -डाची आवटी-स्त्री. (सोनारी) करडा तयार कराव- याचा ठसा, यास खाचा किंवा भोंकें असतात. ॰पट्टी-स्त्री. (गो.) (सोनारी धंदा) सोनें, चांदी वगैरे धातूंच्या लडीचे तुकडे पाडण्याचें हत्यार; (नाविक) गलबताच्या बाजूच्या भोवतीं असणारा फळ्यांचा किंवा कलकाच्या कांबींचा (पावसाच्या झडीच्या निवारणार्थ) लाविलेला पडदा.
करडापट्टी
स्त्री. १. (सोनारी धंदा) सोने, चांदी वगैरे धातूच्या लडीचे तुकडे पाडण्याचे हत्यार. (गो.) २. (नाविक) गलबताच्या बाजूच्या भोवती असणारा फळ्यांचा किंवा कळकाच्या कांबीचा (पावसाच्या झडीच्या निवारणार्थ) लावलेला पडदा.
कर्ण
पु. (नाविक)नावेचे सुकाणू : ‘त्या नावाड्यांनी बाजीला शेकून जहाजाच्या कर्ण्यावर निजविले.’ − स्वप ३३०. [सं.]
कर्णरेषा
पहा : कर्ण (नाविक.) कर्णरोग
कुड
पु. १. काटक्याकुटक्या व माती यांनी घातलेली भिंत (बांबू, कारवी, इत्यादीची) : ‘ठाव नाहीं बुड । घरे बसविसी कुड ।’ - तुगा १३९३. २. (नाविक) गलबतावरील मालाच्या रक्षणाकरिता व सावलीसाठी डोलकाठीच्या मागे असलेली झावळ्यांची झोपडी. [सं. कुड्य = भिंत]
कुड
पु. १ काटक्याकुटक्या व माती यांनी घातलेली भिंत (बांबू, कारवी इ॰ची). 'ठाव नाहीं बुड । घरें वसविसी कुड ।' -तुगा १३९३. म्ह॰-कुडास कान ठेवी ध्यान = जपून हुशारीनें कोणतीहि गोष्ट करणें. २ (नाविक) गलबतावरील मालाच्या रक्षणाकरितां व सावलीसाठीं डोलकाठीच्या मागें असलेली सांवळ्यांची झोपडी. [सं. कुड्य = भिंत]
कुरवा
स्त्री. (नाविक) गलबताच्या पुढील खांद्यास आंतील बाजूस घालावीं लागणारीं /?/ अशा आकाराची लांकडें.
कुरवा
स्त्री. अव. (नाविक) गलबताच्या पुढील खांद्याला आतील बाजूस घालावी लागणारी (V) अशा आकाराची लाकडे.
कुवेकाठी
स्त्री. (नाविक) डोलकाठी.
खाली
वि. १ रिकामा; रिता. 'गडकरी याणीं राज- मंदिर म्हणून खालीं न ठेवावें.' -मराआ ३२. 'ब्राह्मणांचीं घरें खालीं करवितात.' -रा ७.१०६. २ वृथा; वाया. 'एक गोळा खाली न जाय असा मारितो' -ख ६.२५१५. ३ रिकामा; न गुंतलेला; न अडकविलेला; बिन उद्योगाचा. 'खाली घरीं बसून बंदोबस्त होणें ती गोष्ट निराळीच आहे.' -ख ६.२०४६. ४ मोकळें 'सावनूर खाली पडतें.' -ख ८००. [प्रा. खल्ल = रिक्त; अर. खाली; हिं. सिं. खाली] (वाप्र.) ॰करणें-रिकामें करणें. ॰मैदांन होणें-अरक्षित मोकळा प्रांत होणें. -पया २१२. सामाशब्द- ॰खटला-पु. बाजारबुणगें; समानसुमान इ॰ बाडबिछाईत, वस्त्र- पात्र, चीजवस्त (सैन्याचें). ॰चिठी-स्त्री. (नाविक) गलबतांत सामान भरण्याचा किंवा रिकामें करण्याचा परवाना. ॰पण-न. (व.) रिकामपण; फुरसत. ॰पिली-वि. निष्कारण; निराधार; व्यर्थ; रिकामा; पोकळ; उगीचच्या उगीच. ॰बार-पु. वाय- बार. (क्रि॰ मारणें; टाकणें). ॰मैदान-ज्यांत खडें लष्कर नाहीं असा प्रांत; रिकामें ठिकाण; मोकळी जागा. 'खाली मैदान पाहून हैदराचा उपद्रव होईल.' -ख ८००.
खालीचिठी
स्त्री. (नाविक) गलबतात सामान भरण्याचा किंवा रिकामे करण्याचा परवाना.
खांदा
पु. खांद. १ बाहुटा (बाहुमूलापासून ग्रीवासूला- पर्यंत). २ जूं ठेवण्याची जनावराच्या शरीरावरील जागा. ३ फांद्या फुटतात तो झाडाच्या खोडाचा भाग. ४ खांद्याचें काम; धाव (खांदकरी लोकांत रूढ). ५ ओझें वाहून नेण्याची पाठीच्या वरची अगर खांद्याची जागा. ६ परिचय; संवयीनें आलेली गोष्ट; झालेला अभ्यास; राबता; सराव. (क्रि॰ पडणें).७ (कु.) लांब फांदी (झाडाची). ८ (नाविक) गलबताचा विस्तार कर- ण्यासाठीं रोजाच्या पुढील टोंकास लांकडें जोडतात तीं प्रत्येकी. पट्टण व खांदे यांच्यावर फळ्या जोडतात [सं. स्कन्ध; प्रा. खन्ध; हिं. खांदा; गु. खांदो; हिं कंधा-कांधा; पं. कन्धा; बं. कांध] (वाप्र.) ॰टाकणें- (बे.) जुंवास जनावर जुंपल्यानंतर जूं न ओढतां जनावरानें खालीं बसणें. खांदाडणें-सक्रि. १ खांद्यांवर ओझें घेणें. २ (ल.) एखादें काम अगर जबाबदारी अंगावर घेणें; भांडणतंटा उकरून काढणें, पत्करणें. खांदाडी घालून नेणें- खांद्यावर वाहून नेणें. खांदाडीभर-खांद्यावर मावेल एवढें ओझें. खांदाडीस बसणें-१ दुसर्याच्या खांद्यावर बसणें. २ (कों.) झाडाच्या फांदीवर जाऊन बसणें. खांदाडीस मेखा देणें- चंबूगवाळें आटोपणें. ॰मेखा देऊन काम करणें-आंगमोडून, झटून काम करणें. खांदा देणें-प्रेताला खांद्यावरून वाहून नेणें. ॰येणें-अतिश्रमानें बैलाची मान सुजणें. खांद्याखालीं पदर- उंडगी, निर्लज्ज, विनयाचा अभाव असलेली स्त्री (पदर पहा). खांद्यावर (मेखा, गाठोडें) देणें- नोकरींतून-कामावरून बडतर्फ करणें; चंबूगवाळ्यानिशीं घालविणें. (डोकीवरचें) खांद्यावर येणें-दुस्सह ओझें (कर्ज इ॰ चें) दिल्याघेतल्यामुळें हलकें होणें. खांद्यास लागणें-तिरडीला खांदा देणें. सामाशब्द- ॰खांद- पुस्त्री. (खांद्याशीं खांदा) स्पर्धा; बरोबरी; तोलासतोल; तोडीस- तोड. खांदाड-न. १ मोठी फांदी. २ मोठा खांदा. खांदाडा- पु. (राजा.) मोठी फांदी (झाडाची). खांदाडी-स्त्री. १ अर्धें पुढें व अर्धें मागें असें खांद्यावर वाहून नेण्याचें पडशी सारखें ओझें खांद्यावर घ्यावयाच्या सोईचें बांधलेलें ओझें. २ ओझें घेतांना खांद्यालाच म्हणतात. 'हजारों जुनें पंडित आपापले ग्रंथ खांदाडीस मारून दूरदूर देशीं पळाले.' -नि १०३३. खांद्याचा बैल-पु. ओझें वाहणारा बैल.
खांदा
पु. १. बाहुटा (बाहुमूलापासून ग्रीवामूलापर्यंत.). २. जू ठेवण्याची जनावराच्या मानेवरील जागा. ३. फांद्या फुटतात तो झाडाच्या खोडाचा भाग. ४. खांद्याचे काम; घाव (खांदकरी लोकांत रूढ). ५. ओझे वाहून नेण्याची पाठीच्या वरची अगर खांद्याची जागा. ६. परिचय; सवयीने आलेली गोष्ट; झालेला अभ्यास; राबता; सराव. (क्रि. पडणे.) ७. लांब फांदी (झाडाची). (कु.) ८. (नाविक) गलबताचा विस्तार करण्यासाठी रोजाच्या पुढील टोकाला जोडतात ती लाकडे. पट्टण व खांदे यांच्यावर फळ्या जोडतात. [सं. स्कंध] (वा.) खांदा टाकणे - जुवाला जनावर जुंपल्यानंतर जू न ओढता जनावराने खाली बसणे. (बे.) खांदा देणे - प्रेताला खांद्यावरून वाहून नेणे. खांदा पडणे - रुळणे; सवय होणे. खांदामेखा देऊन काम करणे - अंग मोडून झटून काम करणे. खांदा येणे - अति श्रमाने बैलाची मान सुजणे. खांद्याखाली पदर टाकणे - स्त्रीने निर्लज्जपणाने वागणे. खांद्याला खांदा भिडविणे - एकजूट करणे. खांद्यावर घेणे - मस्तकी धारण करणे. खांद्यावर मेखा देणे, खांद्यावर गाठोडे देणे - नोकरीवरून, कामावरून बडतर्फ करणे; चंबूगबाळ्यानिशी घालविणे. डोक्यावरचे खांद्यावर येणे - दुस्सह ओझे (कर्ज इत्यादीचे) दिल्याघेतल्यामुळे हलके होणे. खांद्यास लागणे - तिरडीला खांदा देणे.
खेडणी
स्त्री. (नाविक) गलबताच्या गतीला वारा अनुकूल नसून तिरकस असेल तेव्हा तिरकस गतीने गलबत नेण्यासाठी ते लांबवर नेऊन व माथण मारून (शीड फिरवून) इष्ट स्थळी जाण्याची योजना.
खेडणी
स्त्री. (नाविक) गलबताच्या गतीला वारा अनुकूल नसून तिर्कस असेल तेव्हां तो साधून तिर्कस गतीनें गलबत नेण्यासाठीं तें लांबवर नेऊन व माथण मारून (शिड फिरवून) तो वारा साधून इष्ट स्थलीं जाण्याची योजना.
खलाली
स्त्री. (कु. नाविक) १ समुद्रांतील उथळ पाण्याच्या तळाशीं असलेला खडकाळ भाग. २ खडकावर समुद्राचें पाणी आपटल्यामुळें होणारा आवाज; पाण्याची ओढ. [ध्व.]
खलाली
स्त्री. (नाविक) १. समुद्रातील उथळ पाण्याच्या तळाशी असलेला खडकाळ भाग. २. खडकावर समुद्राचे पाणी आपटल्यामुळे होणारा आवाज; पाण्याची ओढ. (कु.)
खमयसी
स्त्री. (नाविक) पावडा किंवा रोयली टांगण्याची दोरी. (हेट.)
खमयसी
स्त्री. (हेट. नाविक) पावडा किंवा रोयाली टांगून ठेवण्याची दोरी.
खण
पु. १. खणाळ्यातील एका चोळीपुरता तुकडा. हा दीड हात लांबीचा असतो. २. खोलीचा, जागेचा एक भाग; दोन खांबांमधील अथवा दोन तुळ्यांमधील अंतर. ३. चष्मा; पडवी; सोपा. ४. होडीतील दोन आडव्या बसण्याच्या फळ्यांमधील जागा. ५. पेटीतील, कपाटातील, टेबलातील एक भाग, कप्पा. ६. इमारतीचा, घराचा मजला. पहा : खणोखाण. ७. (नाविक) माल ठेवण्याची जागा. ८. कोठार; तळघर : ‘मस्त हुडे दुर्गाचे खण ।’ - ऐपो ९. ९. (छापखाना) खिळे ठेवण्याच्या चौकटीतील कप्पा. १०. ‘माडीवर माडी बांधिल्यां त्या त्या माडीच्या भोईस खण मणावें.’ - (तंजा.) [सं. खंड, क. अंकण]
खोची
स्त्री. १. (सपाट पृष्ठभागावरील लहानशी) खोच; खांड (फळी, शेत इ. मधील). २. (ल.) लहानशी खाडी; खाडीचा फाटा; खाडीच्या वर असलेली खिंड; खिंडार; खळी. ३. समुद्राचे किंवा नदीचे पाणी खेळवण्याकरिता खोदलेली जमीन, चर. (कु.) ४. (नाविक) जहाज लावण्याची सोइस्कर जागा. (कु.) : ‘लहान होडकी सातआठ होतीं ते खोचीतच पश्चिमेच्या आहेत.’ पेद १६·५०.
खोंची
स्त्री. १ (सपाट पृष्ठभागावरील लहानशी) खोंच; खांड (फळी, शेत इ॰ मधील). २ (ल.) लहानशी खाडी; खाडीचा फांटा; खाडीच्या वर असलेली खिंड; खिंडार; खळी. ३ (कु.) समुद्राचें किंवा नदीचें पाणी खेळविण्याकरितां खोद- लेली जमीन, चर. ४ (कु. नाविक) जहाज लावण्याची सोइस्कर जागा. ॰चें कलम-न. खुंटीचें कलम; कलमी झाडाची खांदी चांगली जोरदार पाहून सुमारें वीत-दीड वीत तोडून आणावी व सुमारें तीन बोटांएवढें जाड साधें झाड पाहून त्याच्या खालच्या बाजूस म्हणजे जेथें साल जाड असेल तेथें जनावराच्या शिगानें अगर कठिणशा लांकडाच्या खुंटीनें भोंक पाडून तें भोंक जितकें खोल पाडलें असेल तितकिच कलमी झाडाची खांदी चहूंकडून तासून त्यांस बसवून देऊन सोपटानें घट्ट बांधावी. [खोंचणें]
खपाटा
पु. (नाविक) किनार्यापर्यंत आगबोटींतील माणसें किंवा माल घेऊन जाणारा-येणारा पडाव, होडी. ही होडी त्या त्या आगबोटकंपनीची असते.
खपाटा
पु. (नाविक) किनाऱ्यापर्यंत आगबोटीतील माणसे किंवा माल घेऊन जाणारा - येणारा पडाव, होडी. ही होडी त्या त्या आगबोट कंपनीची असते.
खर
स्त्री. (नाविक) माल भिजू नये म्हणून बाकावर पसरलेली लाकडे.
खर
स्त्री. १ कचरा; घाण; अनेक प्रकारचा मळ. २ श्वेत प्रदरांतील पांढरा सांका; लघवींतून पडणारे वीर्याचे कण. ३ आकाशांतील पांढरे, कापसासारखे ढग; पातळ पसरलेलें अभ्र. ४ आकाशांतील संध्याकाळचा रंग, आरक्त रंग. ५ जमीन भाजण्या- करितां टाकलेल्या टहाळांवरील जुनें गवत, पानें, काटक्या; शेण- कूट इ॰ चा कचरा; राब. ६ मुरूम किंवा बारीक खडी. ७ विहिरींतून खणून काढलेली माती; गाळ इ॰. ८ रस करतांना राखेंत अथवा मातींत पडलेले सोन्या-रुप्याचे कण. ९ नदीच्या तळची वाळू; पाण्यांतील गाळ, घाण; (गो.) पाण्याचा तळ. १० (नाविक) माल भिजूं नये म्हणून बांकांवर पसरलेलीं लांकडें. ११ (सोनारी) कोळशाची बारीक पूड; ही पाण्यांत घोटून तिचा थर मुशीच्या आंतून देतात. १२ (कु.) दंव. [सं.]
खराबा
पु. १. नापीक, टाकाऊ जमिनीचा, शेताचा तुकडा; रेताड, ओसाड जमीन. २. (नाविक) पाण्याच्या तळाशी असलेला खडकांचा थर; समुद्रातील खडक. हा गलबतांना नडतो. ३. नुकसान; तोटा : ‘फार दिवस लष्करास ताकीद केल्यानें खराबा होईल.’ - मइसा ६. ५९१. ४. बागायतीच्या जागेतच खातेदाराला घर बांधण्यासाठी दिलेली जागा. (कुलाबा) [फा. खराब]
खराबा
पु. १ नापीक, टाकाऊ जमीनीचा, शेताचा तुकडा; रेताड, ओसाड जमीन. २ (नाविक) उथळ पाण्याच्या तळाशी असलेला खडक; समुद्रांतील खडक. हा गलबतांना नडतो. ३ नुक- सान; तोटा. ‘फार दिवस लश्करास ताकीद केल्यानें खराबा होईल.’ –रा ६.५९१. ‘मोंगलाचा खराबा करावयाचा तितका त्यांनीं केला.’ –सूर्यग्र १४६. ४ (कुलाबा) अलिबाग तालु- क्यांत अष्टागर प्रांतांत गांवठाणास स्वतंत्र जागा राखून ठेवण्यांत आलेली नसते. बागायतीच्या जागेंतच थोडी राहण्यापुरती जागा बांधून खातेदार राहातो. या घराखालील जागेला खराबा म्हण- तात. व ती जमीन महसुलांतून १९२८ पर्यंत वगळली गेली होती –के ४.१२.२८. [अर. खराब् फा. खराबा]
खरमाल
स्त्री. (हेट. नाविक) शिडाची दोरी टांगून ठेव- ण्याची जागा.
खरमाल
स्त्री. (नाविक) शिडाची दोरी टांगून ठेवण्याची जागा. (हेट.)
खुटवा
पु. (नाविक) आपल्या सागरी हद्दीत येणाऱ्या किंवा बंदरात नांगर टाकणाऱ्या जहाजावरील कर : ‘खुटवा व जकात बाछाई अमलात चेऊलाकडे जमा होत होता.’ - आंपव्य ४.
खुटवा
पु. (नाविक) बंदरांत वरवा करण्यास आलेल्या गलबतावरील किंवा आपल्या हद्दींतील समुद्रांत नांगर टाकणार्या गलबतांवरील जकात; सरकारी कर (हा दहा टनांवरील जहाजांवर असतो). [खुटणें = थांबणें]
लाइस
स्त्री. (नाविक कु.) कापडी बोंब लांकडी बोंबा- वर ठेवल्यानंतर त्यास गुंडाळणारी दोरी. ॰करणें-क्रि. उलटें वल्हवून होडीच्या गतीस अवरोध करणें.
लास
पु. (नाविक) वल्ह्याचें टोंक जमीन इ॰वर टेंकून होडी मागें ढकलणें. (क्रि॰ धरणें; करणें)
लबराण
न. (नाविक) डोलकाठीचा तोल जाऊ नये म्हणुन जीं दोरखंडें बांधलेलीं असतात तीं प्रत्येक. यांचा उपयोग क्रेन प्रमाणें होतो. यांनीं आंतील वस्तु बाहेर व बाहेरील आंत घेतां येते.
लतारणी
स्त्री. (नाविक. कों.) बोंब हाकारण्यासाठीं डोलकाठीच्या धाकट्या गाल्यांतून भरून घेतलेली दोरी. ही दोरी मागच्या हरसास अडकवितात व पुढच्या टोंकास लोखंडी कड्यास वेढा देऊन तें टोंक दोरींत मिळवितात व त्या कड्यांत बोंबाचा हूक अडकवून लतारणी खेंचून बांधतात.
माचण
स्त्री. (नाविक) गतबताची गति बदलतांना शीड पालटण्याची क्रिया. [दे.] ॰घेणें-नागमोडीच्या मार्गानें जहाज हांकारून वाऱ्याच्या विरुद्ध दिशेंनें मार्गक्रमण करणें.
मालमी
स्त्री. (नाविक) मराठ्यांच्या आरमारावरील दिशा दाखविणारें होकायंत्र. मालीम-पु. १ गलबतावरील मुख्य अधि- कारी; नाखवा; सुकाणू धरणारा. कप्तान. [अर. मुअल्लिम्]
माळवान्
स्त्री. (हेट. नाविक) पश्चिम दिशा; बाहेरची बाजू. [माळवत]
मातण-न
स्त्री. सामान्यतः माचण पहा. ॰करणें- (हेट, नाविक) शीड फिरविणें. ॰घेणें-माचण घेणें पहा.
मल्लाह
(वि.) हिंदी अर्थ : नाविक. मराठी अर्थ : नावाडी.
मल्लाही
(स्त्री.) हिंदी अर्थ : नाविक का कार्य या पद. मराठी अर्थ : नावाडीपण, त्याचें पद व कार्य.
मंजी
स्त्री. (कों. नाविक) (प्र.) मंची; गलबताचा एक प्रकार.
मस्तूर
स्त्री. (कों. नाविक.) तागाची दोरी. हिचें एक टोंक (पाचर) बारीक व दुसरें जाड असतें. [मस्तूल = डोलकाठी]
मतेरी-ली-
स्त्री. (नाविक) बोमाचें शीड बांधण्याचा दोर. हा मोठ्या डोलकाठीस बांधतात आणि तिसरें शीड उभारल्यावर नाळीस बांधतात.
मतलई, मत्लई
स्त्री. (नाविक) जमिनीवरून समुद्राकडे वाहणारा वारा; पूर्व किंवा ईशान्य दिशेकडून वाहणारा वारा. [अर. मत्लअ = उगवत]
मुडत
न. (नाविक) पाण्याची खोली मोजण्याचा किंवा पाण्याच्या तळाशीं गाळ, रेती अथवा खडक आहे हें पहाण्याचा शिशाचा किंवा लोखंडी लांबट गोळा; बुडीत.
मुंडशेबाजू
स्त्री. (कु. नाविक) उलांडीच्या विरुद्ध अस- लेली होडीची बाजू.
नाखवा, नाखु(खो)दा
पु. १ जहाजावरचा मुख्य अधि- कारी; कप्तान; तांडेल; मुख्य नावाडी. २ (कों. नाविक) कोळी, दालदी वगैरे जातीला गलबतावरील मुख्य. [फा. नाखुदा]
नाखवा, नाखुदा, नाखोदा
पु. १. (नाविक) जहाजावरचा मुख्य अधिकारी; कप्तान; तांडेल; मुख्य नावाडी. २. कोळी, दालदी इ. जातीचा गलबतावरील मुख्य. (को.) [फा. नाखुदा]
नौ, नौका
स्त्री. होडी; नाव. 'रजश्वळा जेवि नौका न साहे ।' -दावि १२७. [सं.] नौकादंड-पु. वल्हें. नौकानयन- न. समुद्र, नदी यांतून जहाज, नाव इ॰ साधनानें जाणें; नौकेंतून प्रवास. नौकानयनशास्त्र-न. नाविक विद्या.
नावाडी
पु० नाव चालविणारा, नाविक.
नावाडी
पु. होडी चालवणारा; अंबेकरी; खेवट; नाविक.
नया
स्त्री. (हेट. नाविक) काठीच्या व कलमीच्या दोर्या लावण्यासाठीं असलेली गलबताच्या बाहेरील दांडी.
नया
स्त्री. (नाविक.) काठीच्या व कलमीच्या दोऱ्या लावण्यासाठी असलेली गलबताच्या बाहेरील दांडी. (हेट.)
ओढणे
सक्रि. (नाविक) गलबत पावसाळ्याच्या दिवसाच्या प्रारंभीकिनाऱ्यावर ओढून आणून ठेवणे.
ओढणें
सक्रि. (राजा. नाविक) गलबत पावसाळ्याच्या दिवसाच्या प्रारंभीं किनार्यावर ओढून आणून ठेवणें.
पागी
वि. (कु. नाविक) नावेच्या नाळीवर बसणारा.
पाकार
पु. (नाविक गो.) कापडाचा तागा उभा फाडून त्याचे दोन भाग करितात त्यापैकीं प्रत्येक; शिडाचा उभा तुकडा. [सं. पक्ष?]
पार
स्त्री. (नाविक कों.) अस्तमनास काठी उभा करण्यासाठीं खोदलेली खांच.
पु. १ तीन तासांचा काल; प्रहर. 'काळोखी रात्र, पार- । रात्रीचा अम्मल झाला ।' -ऐपो ५२. २ (नाविक) पहारा. [सं. प्रहर. (अप.)]
पासीट
न. (हेट. नाविक.) छप्पर.
पात
स्त्री. (कों. नाविक) १ परभाणाचा वरचा भाग. हा भाग पेटीच्यावर निमुळता असतो. २ वल्ह्यास पुढच्या टोकांस बांध- लेली फळी; वल्ह्याचें पान, चपटा भाग. [सं. पत्र]
पावडा
पु. १ (नाविक) जहाजाच्या नांगराचा फाळ, कांटा, आंकडा. २ (सामा.) मोठा नांगर (पदाकृती). [पाव = पाय]
पेराज
स्त्री. (कों.) (नाविक) होडीच्या काठांवर आडवी, जाड ठोकलेली फळी. ही सर्व गलबतांस नसते. [पेरें ?]
पेटी
स्त्री. १ संदूक; वस्तु बंदोबस्तानें ठेवण्याचें लांकडाचें आच्छादनसहित साधन; लहान पेटारा. २ पुरुषाच्या मणगटा- वर; दंडावर बांधावयाचें एक भूषण. ३ बायकांचा गळ्यांतील एक जडावाचा, लहान लहान पेट्या असलेला दागिना; चिंचपेटी. ४ फटाक्यांच्या सराचें बंद पुडकें. ५ दगडी जोत्याचा मधला थर, बेंदरी व पाटथर यांमधील लहान थर. ६ बालातंगी; तंगी धोड्याच्या पोटाखालून ध्यावयाचा खोगीर आवळण्याचा पट्टा. ७ कमरेपासून खांद्यापर्यंतचें चिलखत; जाकीट. ८ गाडीच्या दांड्या ज्यांत बसवितात तो व गाडीच्या कण्यावर असलेला पेटीच्या आका- राचा लांकडी भाग. ९ नदींतून तरण्याचा तराफा; सांगड. 'पेटी आणायासी गेले तेव्हां ।' -रामदासी २.२८. १० (कों. नाविक) परमाणाचे तुकडे मध्यभागीं ज्या ठिकाणीं कांड बांधतात, त्या ठिकाणीं विशिष्ट पद्धतीनें सांधतात तें सांधकाम. ११ (विणकाम) सुताचे थोक एकत्र बांधलेलें बंडल; पुडकें; जितक्या नंबरचें सुत असेल तितके थोक त्या नंबरच्या सुताच्या पेटींत असतात. १२ (ल) खजीना. 'सबळ जनक माझा राम लावण्यपेटी ।' -स्तोत्र- माला-रामदास, करुणाष्टक १. १३ बाजाची पेटी; (इं.) हार्मो- नियम. १४ (ल.) समूह; समुदाय. 'तयातें इंद्रियबैलांची पेटी । न म्हणे अवसीं पाहाटीं ।' -ज्ञा १३.२९.[सं. पेटक; हिं. पेटी] ॰वाला-पु. हार्मोनियमची पेटी वाजविणारा. पेटी(टीं)ची, साखर-स्त्री. एक प्रकारची मऊ, पिठीसाखर, ही चीनमधून पेटीं- तून येते पेटु(टू)ळ-न. लहान पेटी. [पेटी]
पगार
पु. (नाविक) एक प्रकारची होडी. ही साध्या होडीपेक्षां चांगली असून हिला उलांडीची जरूर नसते. ही कमी हलते.
पिरगा
पु. (कों. नाविक) बुरीच्या जाळयाचा दगडी नांगर.
पोरकें-क्या
न. (नाविक) सुकाणूंजवळची तिसरी, कलमी- च्या मागची व तिच्या पेक्षां लहान काठी किंवा शीड.
पोयस
स्त्री. (हेटकरी, नाविक) वायव्यदिशा. पोयशी (सी)वारापू. (कों.) उत्तर व पश्चिम यांमधून वाहणारा वारा. हा चैत्र महिन्यांत सुरू होतो.
परबा(भा)ण-न
न. (नाविक) शिडाला जोडलेली काठी. 'गावी परबान जायां जालें.' -वाडमा १.२३६. [हिं. परबान]
पट्टण
न. (नाविक) दोन्ही रोजांस सांधणारें व दोन्ही रोजासहित भागाचें लांकूड. हा गलबताचा पाया होय. या लांक- डास वरच्या अंगास दोन्ही बाजूस खांचा पाडून त्यांत फळ्या बसवितात. [पट्ट = फळी]
फांट
पु. (नाविक) वल्ह्यानें नावेचें तोंड फिरविणें, मागें चालविणें. (क्रि॰ धरणें; करणें).
फोर
पु. (नाविक) रोजच्या खालच्या अंगास रोजाच्या आकाराचें जें दुसरें लांकूड जोडतात तें.
फुगाव
पु. (नाविक.) गलबतांतील स्वयंपाक कर- ण्याची जागा. -किर्लो. आक्टो १९३८.२७४.
फुरार
(कों. नाविक) दोरी झिंजूं, कांचुं नये म्हणून काचण्या- जोग्या एखाद्या जागीं बारीक दोरीनें विशिष्ट तर्हेनें गुंडाळतात तें.
रांधण-न
न. १ शिजविणें; रांधणें; पाकक्रिया. २ रांध- ण्याचें भांडें, मडकें. 'रांधण नाहीं आमुचे धरीं' -भवि ९. १७०. ३ स्वयंपाक. ४ (गो.) चूल. [सं. रध्-रंधन] रांदा- यणी-स्त्री. स्वयंपाकीण बाई. [सं. रंधन] रांधचेकुड-स्त्री. (कु.) स्वयंपाकघर. रांधणी-स्त्री. (व.) स्वयंपाकघर. रांधणें- सक्रि. शिजविणें; उकडणें. [सं. रंधन] म्ह॰ सारी रात्र जागली आणि शेंगावांगीं रांधलीं. रांतें घर-न. १ स्वयंपाक घर; रांधतें- घर. २ माजघर. रांधतेंघर-स्त्रीन. (ना.) स्वयंपाकघर; पाक- शाला. रांधनीपल्ल-न. (गो.) चुलखंड. रांध(दा)प-न. १ शिजविणें; उकडणें. २ रांधलेले पदार्थ; स्वैंपाक. [रांधणें] रांधपखण-न. (हेट.) स्वैंपाकघर. रांधपी-पु. १ सैंपाकी; आचारी. २ (हेट. नाविक) जहाजावर जेवण तयार करणारा इसम. [रांधस] रांधपीण-स्त्री. (गो.) स्वयंपाकीण. [रांधण] रांधय-न. (गो.) एक आमटीचा प्रकार. रांधवणा-पु. सैंपाकी; आचारी. 'बल्लव रायाचा रांधवणा ।' -मुविराट २.४४ रांध- वणी-स्त्री. स्वयंपाक करणारी सुगरंण स्त्री. 'जैसी रांघवणी रस- सोय निकी ।' -ज्ञा २.२५४. -वि. स्वयंपाक करण्याची(चूल). 'रांधवणी चुलीपुढें ।' -ज्ञा १३.५६२. रांधवणी-न. स्वयं- पाकाचीं खरकटीं भांडीं व हात धुतलेलें पाणी. [रांधणें + पाणी] रांधापघर-न. (रत्नागिरी) स्वयांपाकघर. रांधिये उणें-वि. पुरतेपणीं किंवा मुळींच न शिजविलेलें. रानपीण-स्त्री. (कु.) स्वयंपाकीण. [रांधण]
राट्या
पु. (हेट. नाविक) शिडाची दोरी टांगून ठेव- ण्याची जागा.
रोज
न. (नाविक) गलबताच्या बांधकामास लागणारें प्रारंभींचें मुख्य लाकूड. हीं रोजें दरेक गलबतास दोन असतात, एक मागें व दुसरें पुढ. पुढील रोज हें मुख्य होय.
रोयली
स्त्री. (कु. हेट. नाविक.) एक प्रकारचा लहान (गलबतचा) नांगर, याला वर उलट वळलेले पांच पाय (आंकडे) असतात; लोयली.
साडी
स्त्री. (नाविक) काठी पारांत बसविण्यासाठीं अस्त- मानावरून माल आड्याच्या खालच्या अंगास भिडविलेलें लाकूंड.
सामुद्र
वि. समुद्रासंबंधी; उदधि, सागर याविषयींचें [सं.] ॰क-वि. १ दर्यावर्दी; गलबतावरचा नाविक. २ समुद्रतीरस्थ. ॰धुनि-स्त्री. (भौगोलिक अर्वाचिन संज्ञा,) दोन समुद्रांस जोड- णारी पाण्याची अरुंद पट्टी, प्रवाह. (इं.) स्ट्रेट. [सं. सामुद्र + धुनि = नदी] सामुद्रांड-समुद्रकांठचा एक माशासारखा प्राणी. (इं.) सी-अर्चिन. -प्राणिमो ८.१३६. [सामुद्र + अंड] सामु- द्रिक-न. मीठ. 'कीं समुद्रीं पडलें सामुद्रिक । तें स्वयेंचि अवघा सागर एक ।' -पांप्र २७.४४७.
सातमी
स्त्री. (नाविक, हेट.) गलबत हांकारणें; गलबत हाकारण्याचा परवाना. सतमी पहा.
सातर(रा)स, सातरवारा
पु. (नाविक, कों.) ईशान्येकडील वारा; सप्तर्षिभागाकडून येणारा वारा. [सं. सप्तषिं]
सौदा
पु. (नाविक) होडीचा खालचा भाग.
सबाय
स्त्री. (नाविक) शिडाची काठी सरूं नये म्हणून बांधलेली दोरी.
शिकी
स्त्री. (नाविक) १ गलबताचें शीड गुंडाळून काठीस बांधावयाचे उपयोगी असा शिडास संबद्ध केलेला दोरीचा तुकडा. २ शिडाची गुंडाळी, घडी.
सलीपा
पु. (नाविक. होटकरी). गलबतांतील पाणी (घमत) बाहेर उपसून टाकण्यासाठीं केलेली पेटीसारखी जागा.
सोरा
पु. १ (नाविक) टोपणानें फळीस पाडलेलीं भोकें बुजविण्याकरितां तयार केलेला लाकडी गज; सुरसा. २ गुर्हाळां- तील धुराडें; राख पाडण्यासाठीं ठेविलेलें भोंक.
सुरल
न. (नाविक) पाण्यांतील खेकड्यानें गलबताच्या तळास पाडलेलें बारीक भोंक.
सूरमदी
पु. (नाविक) आग्नेयीकडील वारा.
स्वार
न. (नाविक) सुकती अगर भरती पूर्ण झाली म्हणजे कांहीं वेळ पाणी स्थिर राहणें अशी अवस्था.
ताज
पु. स्त्री. १. (नाविक) उथळ पाण्यातून होडी ढकलण्याचा लांब वेळू, बांबू; चिव्याची काठी. हा साधारणपणे दहा हात लांब असून याच्यावर खाडीची खोली मोजली जाते : ‘स्त्रीने ताज मारीत ती होडी थोडक्यात पडावाला भिडविली.’ – कोरकि ३९५. (सामा.) लांब बांबू. याचा फुले, फळे काढण्यासाठी आकडीसारखा उपयोग होतो. २. मोठ्या जातीचा बांबू; माणगा. (को.) [गो.]
ताल
पु. (कों. नाविक) गलबताच्या नाळीच्या खांद्यास व वर्याच्या खांद्यास खालून बारीक लांकडें ठोकितात त्यांपैकीं प्रत्येक. [सं. तल]
ताल
पु. (नाविक) गलबताच्या नाळीच्या व वऱ्याच्या खांद्याला खालून ठोकलेल्या बारीक लाकडांपैकी प्रत्येक. (को.) [सं. तल]
टास
न. (कु. नाविक) लहान ओहोळांतून खारें पाणी वाहणें.
टास
न. (नाविक) लहान ओहळातून खारे पाणी वाहणे. (कु.)
तावज
स्त्री. (गो.) होडी ढकलण्याचा लहान बांबू. ताज (कों. नाविक) १ पहा.
तेलशिपा
पु. (नाविक) मोठमोठ्या माशांपासून काढलेले एक साधारण तेल. नावेच्या बाहेरच्या अंगाला लावायला याचा उपयोग करतात.
टेमली
स्त्री. (नाविक) एक लोखंडी पत्र्याचे कडे. यास दोरी घट्ट बसण्यासाठी बाहेरील अंगास खाच असते.
टेमली
स्त्री. (नाविक) एक लोखंडी पत्र्याचें कडें यास दोरी घट्ट बसण्यासाठीं बाहेरील अंगास खाच असते.
टेंबली
स्त्री. (हेटकरी नाविक) लोखंडी गोल चकती, चाक. टेमलीपहा.
टेंबली
स्त्री. (नाविक) लोखंडी गोल चकती, चाक. (हेट.) पहा : टेमली
तीर
पु. १ बाण; शर. 'मागें धांवे वायस हंस पुढें सोडिला जसा तीर ।' -मोकर्ण २८.४६. २ भेग; चीर; भगदाड (जमीनीस पडणारें). ३ खांब इ॰कांस तिरकस दिलेला धीरा. ४ टेंकू; धीरा. ५ तरफ; उटाळी; पदार्थ उचलण्यासाठीं त्यास लांकूड इ॰चा देतात तो नेटावा. ६ (नाविक) डोलकाठीच्या किंवा इतर आधारासाठीं जोड देणारें लांकूड; टेकावा. ७ घराच्या पाख्यास आढ्यापासून लगीपर्यंत असलेलें जाड लांकूड, वांसा. [फा.] सामाशब्द- ॰कमठा-कमान-पुस्त्री. धनुष्य आणि बाण. [तीर + सं. कमठ; हिं. कमठा = धनुष्य] ॰गर-पु. बाण करणारा (कारागीर). [तीर + कार] तीरंदाज-पु. धनुर्धारी; तिरंदाज पहा. ॰मार-पु. १ बाणांचा वर्षाव, मारा; तिरंदाजी. २ बाणांनीं ठार मारणें. 'तीर- मार सुळीं देती ।' -दा ३.७. ७१.
तीर
पु. १. बाण. २. भेग; चीर; जमिनीला पडणारे भगदाड. ३. खांब वगैरेंना दिलेला तिरकस धीर, टेक. ४. तरफ; उटाळी; जड वस्तू उचलण्यासाठी त्याला लाकूड वगैरेचा दिला जाणारा नेटावा, टेकू. ५. (नाविक) डोलकाठीच्या किंवा इतर आधारासाठी जोड देणारे लाकूड; टेकावा. ६. घराच्या पाख्याला आढ्यापासून लगीपर्यंत असलेले जाड लाकूड, वासा. ७. मोटेच्या खालचा व वरचा वडप या परस्परांना समांतर असणाऱ्या जाड लाकडांना जोडणारे, उभे असणारे जाड लाकडांचे भाग. दोन तीर व दोन वडप मिळून पूर्ण चौकट बनते. (खा.) ८. चामड्याचा भाता ज्या चौकटीत असतो त्या चौकटीच्या दोन उभ्या दांड्या. ९. चामड्याच्या भात्याचे तीन कप्पे असतात. हे तयार करण्यासाठी दोन्ही बाजूंनी लाकडाच्या ज्या पट्ट्या लावून त्यांना चामडे ठोकतात त्या पट्ट्या . [फा. तीर]
टपार
स्त्री. (नाविक) गलबतास पावसाची किंवा समुद्राच्या पाण्याची झड लागू नये म्हणून दोन्ही बाजूंना बांधावयाची लाकडी साटी. (हेट.)
टपार
स्त्री. (हेट. नाविक) गलबतास पावसाची किंवा समुद्राच्या पाण्याची झड लागूं नये म्हणून दोहों बाजूस बांधाव- याची लांकडी साटी. [टप]
तर
स्त्री. १ (हेट. कु) होडी; मचवा. तरी पहा. २ (मचवा इ॰ कानें उतरून जातां येईल अशी) खाडी. ३ (नाविक कु.) खाडींतील होडया लावण्याची किनारार्यावरील सोईस्कर जागा, ठिकाण. ४ पलीकडील बाजू, तीर. 'अर बांधें तर बांधें ।' -वैद्यक ७६. [सं. तॄ = तरणें] (वाप्र.) तरीपार करणें-सक्रि. खाडीवरून, समुद्रांतून होडी इ॰ नीं पलीकडे नेणें, पोहोंचविणें.
तर, तरी
स्त्री. १. होडी; मचवा. (हेट., कु.) २. (मचवा इ.काने उतरून जाता येईल अशी) खाडी. ३. (नाविक) खाडीतील होड्या लावण्याची किनाऱ्यावरील सोईस्कर जागा, ठिकाण. ४. पलीकडील बाजू, तीर : ‘अर बाधें तर बांधें ।’ – वैद्यक ७६. [सं. तॄ=तरणे]
उडली, उंडी, उलडी
स्त्री. (नाविक) होडी उलटूं नये म्हणून तोल सांभाळण्यासाठीं तिच्या बाहेरील बाजूस दोन वांकडीं लाकडें जोडून त्यांच्या शेवटाला जोडलेलें एक आडवें लांकूड. हें नेहमीं पाण्यांत असतें. [उलटणें]
उडली, उंडी, उलडी, उलांडी
स्त्री. (नाविक) होडी उलटू नये म्हणून तोल सांभाळण्यासाठी तिच्या बाहेरील बाजूला दोन वाकडी लाकडे जोडून त्यांच्या शेवटाला जोडलेले एक आडवे लाकूड. हे नेहमी पाण्यात असते.
उदर
स्त्री. (नाविक.) उत्तर दिशा; धुरू दिशा. [सं. उत्तर]
उदर
(नाविक) उत्तर दिशा; धुरु-दिशा. [सं. उत्तर]
उगवान
स्त्री. (नाविक.) पूर्वदिशा; उगवत.
उगवान
स्त्री. [हेटकरी] पूर्वदिशा (नाविक). उगवत.
उलंडा
वि. (नाविक) कलथा; कलंडा; एकदम उलथणारा (इं.) क्रँक.
उलंडा
वि. (नाविक) कलंथा; (चाक फिरविण्यासाठी) मुठीचा दांडा. [सं. उत्+लुंठ्.]
उलंडी
स्त्री. (नाविक) होडी स्थिर राहावी म्हणून तिला दोन आडवीं व एक उभें (पाण्यांतलें) अशीं लांकडें लावतात तीं; होडीच्या एका अंगास ती उलटूं नये म्हणून बावखंडाच्या टोंकास जें पाण्यांत एक लांकूड बांधतात तें. (इं.) आऊटरिगर. उडली पहा. [उलंडणें]
उलंडी
स्त्री. (नाविक) होडी स्थिर राहावी, उलटू नये म्हणून तिच्या एका अंगाला जो लाकडाचा सांगाडा बांधून पाण्यात टाकलेला असतो तो.
उपर
पु. १. वजन, छाप, श्रेष्ठत्व ठेवणे; वर्चस्व; वरचढपणा : ‘जयाचेनि सावायें । जीव ब्रह्मउपर लाहे॥’ – अमृ २·१६. २. (नाविक) उत्तर दिशा.
उपर
पु. १ वजन, छाप, श्रेष्ठत्व ठेवणें; वर्चस्व; वरचढपणा. 'जयाचेनि सावायें । जीव ब्रह्मउपर लाहे ।।' -अमृ २.१६. 'हा जिकडे जातो तिकडे आपला उपर लोकांवर ठेवितो. २ (नाविक) उत्तर दिशा [सं. उपरि; झेंद उपैरि, उपर; ग्री. हुपर; लॅ. सुपर; जुनें जर्मन ओबर; इं. ओव्हर; हिं. गु. उपर] -क्रिवि. १ नंतर; मागाहून; तदुत्तर; उपरांत. 'त्यजिल गुरुभजन कसें हें आयकि- ल्याहि उपर माणूस ।' -मोवन १०.६७. २ कांठापर्यंत. ३ उत्तर दिशेस. -शअ. १ वर; ऊर्ध्व; उंच. म्ह॰ तेरा उपर मेरा. २ आणखी; पलीकडे; अधिक; पेक्षां. 'उपरमला भीष्म, विदुर कृष्णहि कथितां अशाहि उपर मला ।।' -मोउद्योग ९.६७. 'ह्याउपर तुला कांहीं मिळणार नाहीं.' ३ नंतर. उ॰ याउपर; त्याउपर वगैरे. 'सरैल उपरा प्रतिरात्रि दिनु । सकलै दिशां उजुवाडु होउनु ।' -ख्रि २.४४. १९४. उपरांत असणें (सोंगटी)-तिफाशी सोंगट्यांच्या खेळांत सोंगटी लागण्यापुरेसें दान पडून वर उरणार्या दानामध्यें मारतां येण्यासारखी दुसर्या बाजूची सोंगटी बसलेली असणें. हीं दानें सर्व दसप्यादापासून पुढें येतात.
उपरबाहेरचा वारा
(नाविक) वायव्य दिशेकडून येणारा वारा. उपरम
उपरबाहेरचा वारा
पु. (नाविक) वायव्यदिशेकडून येणारा वारा.
उपरचा वारा
(नाविक)उत्तरेकडून येणारा वारा. [उपर = उत्तर] उपरछक्का
उपरचा वारा
पु. (नाविक) उत्तरेकडून येणारा वारा. [उपर = उत्तर]
उसेती
स्त्री. (नाविक.) भरतीची वेळ.
उसेती
स्त्री. (नाविक) भरतीची वेळ. [उस + येणें]
उतराण
स्त्री. (नाविक) उत्तरेकडून वाहणारा वारा. पहा:उतरण[सं. उत्तरायण.]
उतराण
स्त्री. (नाविक.) उत्तरेकडून वाहणारा वारा. उत- रण पहा. [सं. उत्तरायण]
वाळियेणें
सक्रि. (नाविक) वाऱ्याच्या दिशेनें चालविणें; वाऱ्यांत ठेवणें (गलबत). [वळणें]
वारदानी
पु. (नाविक) पावसाळ्यांतील दक्षिणवारा.
वात
स्त्री. १ बत्ती; दिव्यांतील कापसाची, सुताची पेळू; देवापुढें लावावयाच्या निरनिराळ्या फेऱ्यांच्या वळ्या. उदा॰ बोटवात-१ सूत; बेलवात-३ सुतें; विष्णुवात-५ सुतें; माणिकवात- १ सुत; रुद्रवात-११ सुतें; पुरुषोत्तमवात-१५ सुतें; गणेशवात-२१ सुतें; गोकुळवात-८ सुतें; रामवात-१२ सुतें; शिवरात्रवात-१००० सुतें. इतर वाती-फुलवात, काडवात, पंचरत्नवात, अनंतवात, अधिक वात. 'घरोघरी दीप अखंड त्यांच्या सरसावुनि वाती ।' -घनः- शामाची भूपाळी. २ कोवळें बारीक पडवळ, शेंग, काकडी वगैरे. ३ (ल.) (नाविक) गुंडाळलेलें शीड. ४ दिव्याचें नाक, निमूळता भाग; समईंतील वाती ठेवण्याची जागा. ५ तेलवात या शब्दाचें संक्षिप्त रूप; नंदादीपासाठीं लावून दिलेला जमीन. ६ (ल.) दिवा. 'रश्मि वातीविण न देखती ।' -ज्ञा ९.३०१. [सं. वर्त्ति] ॰दोरा-पु. गाभण प्राण्याच्या योनींतून स्त्रवणारा चिकट द्रव. ॰पोत-पु. (दिव्याची वात व देवीचा पोत) (ल.) सरळ सडसडीत, किरकोळ, बारीक लव लांब वस्तु. 'अवयव आकृति खिली वातपोतसारखी । निवडणार निवडील असे जो रत्नाचा पारखी ।' -पला ४.३४. वातरें, वातेरें, वात्येरें-न. १ समईं- तील वाती लावण्याची खोबण. 'दोन वातेऱ्यांत दोन जुळ्या वाती जळत होत्या.' -कोरकि ५४. २ वाती करावयाच्या उपयोगी फडकें. ३ (ल.) फाटकें वस्त्र; लकतऱ्या; चिंध्या. [वात]
वावडा
पु. (नाविक) लोखंडी मोठा नांगर.
वहाणी
स्त्री. (नाविक. कु.) संकटाच्या वेळीं माल समु- द्रांत फेंकणें. [सं. वहन]
वरी
स्त्री. (नाविक) ठांकणीला बांधलेली एक दोरी.
वरवा
पु. (नाविक) नांगर टाकणें; ओरवा पहा. (क्रि॰ करणें). 'हिंदुस्थानला जाणाऱ्या एका गलबतानें वरवा केला.' -पाव्ह ८५.
यारी
स्त्री. (नाविक) ओझें उचलण्याचें यंत्र. यांत मुख्यतः कप्या असतात. (इं.) क्रेन.
आडी
अढी पहा. -स्त्री. १ (कों.) रहाट-गाडग्याच्या चाकाला परिघाच्या बाजूनें अक्षाशीं समांतर अशीं रव्यावर मार- लेलीं लांकडें, एका राहाटास अशा बारा आड्या असतात. [का. अड्ड] २ धार काढतांना गाईनें लाथ मारूं नये म्हणून तिच्या सभोंवार बांधावयाच्या काठ्या. ३ (मल्लशास्त्र) कुस्तींत प्रतिप- क्ष्यास पायांत घालावयाची आढी. ४ (सामा.) आढी (आंब्याची, गवताची, कपाळ, पाय इ. ची). अढी पहा. ५ (कों. गो.) जना- वरचा पाय मोडला असतां तो नीट करण्यास दोन बाजूंस लांकडें बांधतात ती. ६ (गो.) घराच्या भोंवतालचें दगडी कुंपण, गडगा. ७ (कर्ना.) नदी उतरून जाण्याचा लांकडी पूल. ८ आडकाठी; अडथळा; प्रतिबंध. 'जन्मसहस्त्रांचिया आडी ।' -ज्ञा ६.४६५. 'मार्गीं कांही पडली आडी । दूत तांतडी पाठविले ।' -एरुस्व १४.६७. ९ शंका. १० (कासारी धंदा) भांडी घडविण्याच्या उपयोगी असलेलें दगडी, चपटें आरपार भोंक असलेलें उखळ. ११ (नाविक) गलबताच्या झाडीच्या वरील लांकडी तक्त; उतारूंना बसावयासाठीं केलेली जागा; होडीवरील बसण्याकरितां असलेली फळी. १२ (गो.) काना. १३ (गो.) अडसर.
पट्टा, पटा
पु. १ एक जातीची लांब, दुधारी, खोब- ळ्याच्या मुठीची, ५० अंगुळें लांबीची तरवार. हिला कोंपरापावेतों हाताचें संरक्षण करणारी मूठ असते. 'इट्यापट्याचे झोंक कानडे लोक ...।' -एपो ३४२. २ शिकाऊ तरवार. 'दांडपट्टा.' ३ पट्टी; रांग; ओळ; रेघ; रेष. ४ जमीनीची लांब पट्टी. ५ पट्टी; चिंचोळा व लांबट तुकडा (फित, कापड, रांगोळी, कांठ, इ॰चा); नाडी; दाल; नवार; सखलादीचा तुकडा. 'शिपायाचा पट्टा.' ६ सोनें-चांदीचा किंवा साधा कमरेस घालावयाचा दागिना. तरवारीचा गळ्यांत अडकविण्याचा चामडी बंद. ७ कौल; कबुलायतपत्र; लेखीपत्र (शेताचें वगैरे खंडपत्र); गांवच्या जमा- बंदीचें ताळेबंदपत्रक; कराराचा कागद. 'भाडें पट्टा.' ८ डोईवर वस्तऱ्यानें काढलेला पाट. ९ शरीर, वस्त्र इ॰वर कांही एक रंगाचें इ॰ चिन्ह. १० दोराची विशिष्ट गुंफण करून केलेलें आउतास बैल जोडण्याचें साधन. शिकारी. -मसाप १.२.७. ११ (पगडबंद) (पगडी घामानें खराब होऊं नये म्हणून लाविलेली) पगडीच्या आंतील मेणकापडाची पट्टी. १२ (चांभारी) गिरणींतील चाकावरची चामडी रुंद पट्टी. १३ (हेट. नाविक) भोयांनां व काठीला बांधलेली दोरी. १४ अधिकार; अधिकारपत्र. 'तेवां मी तयां । जैसे असती तैसियां । कळिकाळ नोकोनियां ।घेतला पटा ।' -ज्ञा १२.८४. [सं. पट्ट; हिं. पट्टा] ॰ओढणें-घालणें-पाडणें-१ हजामत करतांना डोईवरून कसा तरी वस्तरा खरडणें; ओबडधोबडपणें किंवा धसकफसक कामाला प्रारंभ करणें. ३ (निंदार्थी) काम अर्धवट करून खोळंबत ठेवणें. ॰परजणें-१ पट्टा फिरविणें; खेळणें. २ (ल.) सभापांडित्यांत किंवा कडक भाषणांत एकसारखें व अकुंठितपणें बोलणें. ॰मारणें-देणें- बलात्कारानें लुबाडणें; हात मारणें. (तोडचा) ॰सोडणें-एक- सारखी बडबड करणें. ॰पट्ट्याचा हात फिरवणें-१ पट्टा पेलणें; चालविणें. २ (ल.) भुलथापा देणें; खोटा आविर्भाव आणणें; अवडंबर माजविणें. पट्टाईत-वि. १ पट्टा (हत्यार) चालविण्यांत तरबेज किंवा त्याचा व्यायाम घेणारा. २ (ल.) निष्णात; निपुण; कुशल; वस्ताद (माणूस). ३ अंगावर पट्टे असलेला; ढाण्या (वाघ, इ॰). ॰ईत वाघ-पु. अंगावर पट्टे असलेला, चांगल्या जातीचा वाघ. ॰ईत-शराईत-वि. निष्णात; कुशल (चांगल्या व वाईट दोन्ही अर्थीं). धूळ-स्त्री. १ धूळधाण; पूर्ण नाश; मोड; दुर्दशा (सैन्याची). २ संपूर्ण मोडतोड, पडझड (इमारत, यंत्र, वस्तु यांची). ३ पुरा दुर्लौकिक; उपहास; अप्रतिष्ठा (मनुष्याची). ४ नाश; बिघाड (मसलत, मंत्र यांचा). ५ वाताहत; सत्यानाश (जिंदगी, काम यांचा) [पट्टा + धूळ] पट्टी-स्त्री. १ अंगावर भस्माचे पट्टे ओढण्याची क्रिया; भस्मविलेपन यावरून. २ टिळा- टोपी; चट्टीपट्टी. ३ (ल.) आडवे उभे पट्टे, उरफाटे सुरफाटे पट्टे; उभ्या आडव्या पट्ट्यांनीं युक्त अशी स्थिति (सत्रंजी इ॰ची). [पट्टा द्वि.] ॰पट्टीचा-वि. पट्टा, रेघा, ओळी ज्यावर काढ- लेल्या आहेत असा; पट्टाईत. पट्टाधिकार-पु. १ दिवाणगिरी; प्रधानकी. २ पट्ट्याचा (करारपत्राचा) अधिकार; पटाधिकार. [सं.] पट्टाधिकारी-पु. १ दिवाण; मुख्य प्रधान. २ महंत, मठ वगैरेच्या गादीवरील व्यक्ति. [सं.] पट्टाभिषिक्त-वि. ज्यास राज्याभिषेक झाला आहे असा (राजा, राणी). [सं.] पट्टाभिषेक-पु. (राजा किंवा राणी यांस) सिंहासनावर बस- वून करावयाचा यथाशास्त्र राज्याभिषेक [सं.]
पड
अ. हाताखाली, दुय्यम, दुसऱ्या प्रतीचा, मुख्य वस्तूच्या ऐवजीं घ्यावयाची या अर्थाचा एक प्रत्यय. जसें:- पड-चाकर-शिष्य-लंका-जीभ-कोट-साक्ष इ॰. 'तूं लंका पाहि- लीस तर काय झालें मी पडलंका पाहिली.' [प्रति = दुसरा किंवा सं. पर = पलीकडचा] ॰केश-स-पुअव. डोळ्याच्या पापणीच्या खालीं आंतील बाजूला उगवणारे केंस; डोळ्याचा एक रोग. ॰कोट-पु. किल्ल्याच्या बाहेरचा तट. ॰गादी-स्त्री. गालिचा; लहान गादी. ॰गहाण, गाहाण-न. गहाण ठेवणारानें किंवा सावकारानें आपल्याकडे गहाण ठेवलेले दुसऱ्याकडे गहाण टाकलेले जिन्नस. ॰गहाणदार-पु. पडगहाण ठेवून घेणारा. ॰छाया-स्त्री. १ प्रतिबिंब. २ छाया; साउली. [सं. प्रतिच्छाया] ॰जावई-पु. (व.) जावयाचा भाऊ. ॰जीभ-स्त्री. जिभेच्या मागें असणारी दुसरी लहान जीभ; जिभेच्या मुळाशीं लोंबणारी मांसाची लोळी. [सं. पतज्जिव्हा] ॰थळ-न. (राजा.) पिशाच्चाच्या उपद्रवाचा एका देवानें काहीं निर्णय सांगितला असतां इतर गांवचे देवाला विचारून जो त्याचा पडताळा पहातात तें; किंवा त्या देवानें सांगितल्याप्रमाणें पुजाऱ्याकडून करून घेतलेला लेख; पडताळा. [प्रति + स्थळ] ॰दोरा-पु. गळ्यांतील माळ, हार इ॰कास जोड- लेला व गळ्याभोंवती बांधावयाचा जोड दोरा. ॰नांव-न. टोपण, व्यावहारिक नांव. ॰नाळ-(कों.) (नाविक) मागच्या खांद्यास बाहेरच्या बाजूस जोडलेलीं लांकडें. ॰पापणी-स्त्री. पडकेश पहा. ॰बंद-पु. (गंजिफांचा खेळ) बंदाच्या (राजा, वजीर यांच्या खालील पानाच्या) खालेचें पान. ॰भिंत-स्त्री. मुख्य भिंतीच्या बोहेरची दुसरी भिंत. ॰भोज-भोजन-न. १ वरपक्षाकडून लग्नाचे दुसरे दिवशीं वधूपक्षास दिलेली मेजवानी. २ परत जेवण. [पड = प्रति किंवा परत + भोजन] ॰लंका-स्त्री. एक रावणाची लंका व दुसरी तिच्याहि पलीकडे दूर असलेली लंका. ॰विद्यार्थी- पु. विद्यार्थ्याच्या हाताखालचा दुसरा विद्यार्थी. 'शिवाय त्या शाळेंत पडविद्यर्थी असत ते निराळेच.' -चं १६. ॰शब्द- साद-पु. प्रतिध्वनि; प्रतिशब्द; पडिसाद. 'कां पडसादाचा अवचितां । गजर उठे ।' -दा ६.८.१९. 'शब्द पडसाद ऊठला । म्हणे कोणरे बोलिला ।' -रामदासी स्फुट अभंग २७ नवनीत पृ. १५०) [सं. प्रतिशब्द] ॰शाळा-ळ-शाला-स्त्री. १ घरापासून थोड्याशा अंतरावर बांधलेलें छोटेखानी घर; ओंवरी. २ उतारूंसाठीं देवालयालगत बांधलेली धर्मशाळा. 'मठ मंडपा धर्मशाळा । देवद्वारीं पडशाळा ।' -दा ४.५.२३. ॰सरी-स्त्री. १ उतार असलेल्या जमीनीवरील पाणी वाहून जाण्यासाठीं काढून दिलेला नाला, पाट, जलमार्ग. २ बागाईत जमीन. [पर + सरी] ॰साई-स्त्री. १ छाया; काळोख; झावळेपण. 'आंधार कोंडोनि घरीं । घरा पडसाई न करी ।' -अमृ ७.२१. (जुनी प्रत) २ सावली; पडछाया. 'दीपामागें पडसाई । तैश्या डोळ्यामागें भोंवई ।' -भाराबाल ६.५०. [पड + छाया] ॰सावली-स्त्री. पडछाया; प्रतिबिंब. ॰साळ-स्त्री. १पडशाळा पहा. २ (कु.) पडवी; ओटी. 'तेव्हां ती लवकर घरांतून बाहेर जाऊन पडसाळेंत एक वर्षाच्या वयाची हंसी होती तिला तिनें त्या घरांत आणिलें ।' -मराठी सहावें पुस्तक. पृ. १८. (१८७५) ॰साक्ष-स्त्री. १ पुराव्याला बळकटी देणारा दुसरा पुरावा. २ पडसाक्षी पहा. ॰साक्षी-पु. १ पुराव्याला बळकटी किंवा पुष्टि देणारा साक्षी- दार. २ साक्षादाराचा साक्षी; दुसऱ्याच्या विश्वासूपणाबद्दल शपथपूर्वक खात्री देणारा. ॰सूत्र-दोरा-नपु. मंगळसूत्र, गळसरी इ॰ ओंवून गांठ दिल्यावर जीं त्या दोऱ्याचीं टोकें राहिलीं असतात तीं. ॰स्थळ-न. पडथळ पहा. ॰हात-पु. (गो.) प्रतिहस्त.
घोडी
स्त्री. १. सतार, तंबोरा इ. तंतुवाद्यांच्या भोपळ्यावर एकदीड इंच उंचीची हस्तिदंती अगर लाकडी पट्टीची बैठक. हिच्यावरून तारा पुढे खुंटीला गुंडाळलेल्या असतात. २. पूर्वी शाळेत मुलांना देण्यात येणारी एक शिक्षा. वर उंच आढ्याला बांधलेल्या दोरीवर मुलाला लोंबकळत ठेवण्यात येई. अशा प्रकारच्या शिक्षा देण्याच्या प्रकाराला घोडी देणे असे म्हणत असत : ‘एखाद्या मुलाशी माझं वाकडं झालं की, रचलंच त्याच्यावर किटाळ आणि दिलीच त्याला पंतोजीकडून घोडी.’ – चंद्रग्र ८० (क्रि. घेणे, देणे). ३. उभे राहून पखवाज वाजविता यावा म्हणून तयार केलेली घडवंची : ‘इतक्यात देवळाच्या एका कोपऱ्यात मृदंग ठेवावयाची उंच घोडी सुनंदाला दिसली.’ – सुदे २५. ४. गवत इ. वाहण्याकरिता खटाऱ्यावर उभारलेला सांगाडा, चौकट. ५ जमिनीपासून फळा उंच ठेवण्याकरिता व त्याला उतार देण्याकरिता केलेली लाकडी चौकट, सांगाडा. ६. (सुतारी) जे लाकूड तासायचे असते ते हलू नये म्हणून त्याला आधार देणारे दुसरे लाकूड, चौकट इ. हे लाकूड एका विशिष्ट तऱ्हेने सोयीस्कररीत्या बसवतात. ७. (विणकामात) सूत उकलण्यासाठी केलेले लाकडी चौकटीसारखे साधन. ८. (सोनारी) पायात घालण्याच्या साखळ्यांच्या कड्या वाकविण्यासाठी असलेला बोटाइतका निमुळता खिळा, मोळा. (हेट. नाविक) ९. छोटे शीड उभे करण्यासाठी असलेले कमानीसारखे लाकूड. १०. बंधाऱ्याच्या मुखाशी (पाणी सोडण्याच्या ठिकाणी) पडद्यासारखी बांधलेली भिंत. या भिंतीवरून पाणी जात असते. ११. गलबताच्या कडेला शौचाला बसण्याकरिता टांगलेली लाकडी चौकट (हेट.). १२. साकटणे; सकोटण. १३. दाराच्या दुहेरी चौकटीच्या वरच्या बाजूचे, परस्परांना जोडणारे दोन लाकडी तुकडे. १४. तीन पायांचे दिवा ठेवण्याचे बुरडी तिकाटणे, तिवई. १५. पाटाला खाली मारतात ते (दोन) आडात. १६. हत्तीवरील हौदा, चौकट : ‘साहेब नौबतीकरिता हत्तींवर लाकडी घोडी घालून…’ – ऐरा ९·५०६. १७. उभे खुंटाळे; स्टँड : ‘तिकोनी खुंट्यांची घोडी आणि रुमाल ठेवावे.’ – स्वारीनियम ७०. १८. सामान ठेवण्याचा घोडा. १९. गोट्यांच्या खेळात हरणाराला खेळाच्या शेवटी मिळणारी शिक्षा. [क. कानगुडी = हातपाय बांधणे]
लाट
स्त्री. १ पाण्याचा तरंग; लहरी; 'लाटा आपटतां उठे ध्वनि शिरे तो ज्याचिया कंदरीं ।' २ बगाडाचें वरचें आडवें लांकूड. याला आंकडा लावलेला असतो. ३ चुना, पोहे इ॰ कुट- ण्याचें, कांडण्याचें साधन. ४ तेलाची घाणी, उंसाचा चरक इ॰ यंत्रांत जें उभें वाटोळें लाकूड फिरत असतें तें; रूळ. 'लाट फिर- विता आली उरावरी ।' -रामदासी २.१०६. ५ उंसाच्या चरकाचें तुळवट, जें बैल किंवा माणूस वर्तुळाकार फिरवितो, तें. ६ देवाच्या मूर्तीपुढें जें सोंवळ्याची मर्यादा राहावी, दाटी होऊं नये इ॰ कारणासाठीं आडवें लांकूड असतें तें. -एभा २८.३६९. (पाठभेद) ७ घराच्या बांधकामांत कड्यांखालीं असतें ती तुळई. ८ जमीन सपाट करावयासाठीं दगड, लोखंड इ॰ चा दंडगोल फिरवितात तो. ९ लांकडाचा मोठा ठोकळा. १० (हिं.) स्तंभ; खांब विशे- षतः उत्तरहिंदुस्थानांत अशोकादि प्राचीन राजांचे लेख ज्यांवर लिहिले असतात असे दगडी, लोखंडी खांब प्रत्येकी. ११ (जरतारधंदा) कलाबतूच्या साच्यांत ३०-४० तराक लावलेलें लांकडी साधन. १२ रहाट व चाक यांना जोडणारें आडवें लांकूड. -मसाप २.३.७६. १३ (कों.) देवळाच्या पटांगणांत एका खांबावर एक आडवी बहाळ बसवितात ती. हिच्या टोंकां- वर माणसें बसून फिरतात. ही खांद्यावरूनहि मिरवीत नेतात. [सं. यष्टि; प्रा. लठ्ठी; हिं. लाठी] ॰उठणें-१ वाद, चळवळ, टुम इ॰ निघणें, प्रचार असणें. २ (नाविक) दर्यांत खळ- बळ चालणें.
दांडा
पु. १ (वेळू इ॰ काचा) जाड व आंखूड तुकडा, काठी. २ (पळी, ओगराळें, वेळणी इ॰ कांची हातीं धरण्याची) मूठ; (कुदळ, कुर्हाड, वाकस इ॰ हत्यार धरून काम करावयाचें म्हणून त्याच्या नेढ्यांत घालतात तो) लाकडांचा गोल दंड, काठी. ३ पाट इ॰ काचें पाणी जमिनींत न जिरतां वहावें म्हणून जमी- निपासून उंच बांधलेली सारणी, प्रणाली; (व.) मोटेचें पाणी बागेंत निरनिराळ्या ठिकाणीं नेणारा पाट. ४ (मनुष्य इ॰ काच्या) पाठीचा कणा. ५ (समुद्र, खाडी इ॰ कांत तारूं, गलबत यास अडथळा होण्याजोगा) रेती, खडक इ॰ कांचा दंडाकार उंचवटा; दांडी. ६ (डोंगर, टेकडी इ॰ चा) कणा; दंड; उंचवट्याची चिंचोळी व अरुंद रांग. ७ नाकाचा कपाळापासून शेंड्यापर्यंतचा उंच भाग. ८ (नदीचा) धक्का. ९ (समुद्रांत गेलेला) जमिनीचा लांब व चिंचोळा पट्टा. १० केळीचा घड. ११ केळीच्या पानाच्या मध्यांतून जाणारा देंठाचा लांब भाग. १२ (नथ इ॰ दागिन्यांचा) आंकडा. १३ (जमीन, इमारत इ॰ कांचा) सुळका, शेंडा. १४ माघी पौर्णिमेस होळीच्या स्थानीं उभा रोंवतात तो एरंडाचा सोट. १५ (घराचा) वांसा; कडी; बहाल; तुळवंट. १६ यंत्र फिरविण्यासाठीं मूठ बसविलेली काठी. -शर. १७ (गो.) कुळागराचा तुकडा. १८ (गो.) शूद्र स्त्रिया नाकांत लोंबता घालतात तो एक दागिना. १९ (गो.) चार हाताचें लांबीचें एक परिमाण. २० (तंजा.) भेंडाचा केलेला एक त्रिकोणाकृति अलंकारविशेष. हा अलंकार स्त्रिया लग्न इ॰ मंगल- प्रसंगीं वापरतात. २१ (विणकाम) तातू जोडण्यासाठीं जी सांध असते तींत घालण्याचा वेळूचा एक तुकडा. २२ (नाविक. कों.) गलबतास बाहेरच्या अंगास कंठाखालीं वीतभर अंतरावर नाळवर्या- पर्यंत दोन्ही बाजूस ठोकतात ती लांकडाची गोल अथवा चौकोनी पट्टी. २३ (अशिष्ट) लिंग; शिश्न (विशेषतः घोड्याचें, लांब अस- असणारें). दांडी पहा. [सं. दंड; हिं. डांड, डांडा; गु. डांडो] (वाप्र.) (घराचे) दांडेवासे मोजणें-(एखाद्यानें) कृतघ्न होणें; उपकारकर्त्याचे उपकार विसरुन त्याच्या नाशास प्रवृत्त होणें, नाश चिंतणें. म्ह॰ दांड्यानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं = खरी, जिवलग मैत्री लोकांनीं कितीहि कलागती लाविल्या तरी नाहींशी होत नाहीं. सामाशब्द- ॰ईत-वि. दांडगा; उर्मट; धसकट; आडदांड. [दांडा] ॰पेंडा, पेंडोळा-पु. दाट परिचय, ओळख. दांडपेंडोळा पहा. ॰मेंडा-पु. शींव; हद्द; सीमा. दांडमेंड पहा. दांडेकरी-पु. (राजा. कु.) (सांकेतिक) (महा- राच्या हातांत नेहमीं काठी असते म्हणून) महार; ब्राह्मण सोंवळ्यांत असतांना महार शब्द न उच्चारतां दांडेकरी म्हणतात. दांडेपंडित-पु. शास्त्राचें अध्ययन न करतांहि उत्कृष्ट वादविवाद करणारा व प्रसंगविशेषीं दंदादंडी, काठ्यानीं मारामारी करण्यास तयार असलेला बळकट व हुषार मनुष्य. [दांडा + पंडित] दांडे- पाट-पु. (धरण्याकरितां) दांडा, मूठ असलेला पाट, तिवई इ॰ [दांडा + पाट] दांडेपान्हवण-ळ-न. १ गाय, म्हैस इ॰ कांस काठीनें बडवून पान्हवण्यास, दूध द्यावयास लावणें. २ (ल.) (एखाद्यास) मारून, बडवून त्याचें मन वळविणें; आपलें म्हणणें कबूल करण्यास भाग पडणें. ३ (सामा.) झोडंपट्टी; मार. [दांडा + पान्हवणें] दांडेपाळ-स्त्री. पाणी वाहून नेण्याकरितां, तसेंच शेतांत खेळविण्या- करितां उंच बांधलेला जो दांडा, त्याची पाळ, कड. [दांडा + पाळ] दांडेपाळ-पाळें-स्त्रीन. मूठ बसविलेलें लांकडी पाळें. [दांडा + पाळें] दांडेपूर्णिमा, दांडेपुनव-स्त्री. माघ शुद्ध पौर्णिमा. ह्या दिवशीं होळीचा दांडा रोंवतात म्हुणून हें नांव. [दांडा + पूर्णिमा, पुनव] दांडेबोर-स्त्री. बोरीची एक जात. -न. या जातीच्या बोरीचें फळ. दांडेभुसा-दांडेविंडा पहा. दांडेमार-पु. दांड्यानें, काठीनें झोडपणें; बडविणें; चोपणें; भरणें; (क्रि॰ करणें). [दांडा + मार] दांडेमोडाक-न. (कु.) माशाची एक जात. दांडेविंड- न. (को.) नदींत मासे पकडावयाचें एक प्रकारचें जाळें; याची दोन्हीं टोकें दोन दांड्यांस बांधलेलीं असतात. (हा शब्द विशेषतः रत्नागिरीकडे रूढ आहे. हर्णैच्या बाजूस याच अर्थी दांडेभुसा हा शब्द वापरतात). दांडेसाळ-स्त्री. अलंग; चाळीसारखें लांबचलांब घर; चाळ; पागा; बराक. [दांडा + शाला = घर] दांडे- स्वार-पु. आजारांतून नुकताच उठून काठीच्या साहायानें हिंडूंफिरूं लागलेला मनुष्य; हिंडता फिरता रोगी. [दांडा = काठी + स्वार]
लाकूड, लांकूड
न. १ काष्ठ. २ लांकडाचा तुकडा; दांडका. 'ते यत्नांतर मातले पशुवशा येती अहो! लांकुडें ।' -मोकृष्ण ६८.३२. ३ (ल.) ताठ, टणक, न लवणारें शरीर, गात्र, शेंग इ॰ कोणताहि पदार्थ. 'म्हशीला शेतकऱ्यानें खाऊं घातलें नाहीं म्हणून ती लाकूड झाली.' [सं. लगुड; प्रा. लक्कुड; हिं. लकडी] (लाकूड शब्दाचा समासांत पूर्वपदीं लाकड असा उच्चार होतो). (वाप्र.) लाकडास माकड लावणें-विजोड अशा वधूवरांचें लग्न लावणें; एखाद्या लग्नास हपापलेल्या माणसास कसली तरी बायको मिळवून देणें. (जिभेचें) लाकूड होणें-जिभेला कोरड पडणें; जीभ वाळणें. ॰पडणें-काष्ठपण येणें; लाकडासारखें जड होणें. 'सर्वेद्रियां लांकुड पडे । स्मृति भ्रमामाजीं बुडे । मन होय वेडें । कोंडे प्राण ।' -ज्ञा ८.२२७. ॰वळणें-होणें-काठी किंवा काष्ठाप्रमाणें निर्जीव-निःसत्व होणें लाकडाचा तट-पु. लांकडी कोट, भिंत; लढाईंत तोफेचे गोळे अंगावर येऊं नयेत म्हणून संरक्षणासाठीं असा तट उभारतात. लांकडाचा क्षार- पु. एक क्षार. एखाद्या लांकडाचा काढलेला क्षार. कोरड्या क्षारास प्रतिसार्य क्षार व काढ्याप्रमाणें पातळ असणाऱ्या द्रवरूप क्षारास 'तैजस क्षार' म्हणतात. -योर १.२५९. लाकडाचें नखतेल- न. लाकडापासून काढलेलें तेल; (इं.) नाफ्तेल. वुड नाफ्था. -सेंपू १.१५३. लाकडाचे दोर-पुअव. लाकडामध्यें असलेल्या बारीक बारीक रेषा. लाकडी-स्त्री. (खा.) काठी; दंड. 'आन एकेकापे एकेक लाकडी दीन आख्यों.' -भिल्ली २. लांकडी, लाकडी-वि. लाकडासंबंधाचें; लाकडाचें केलेलें. [गु.] ॰खेळ-पु. लाकडी बाहुल्या इ॰ खेळणीं; लाकडाच्या केलेल्या, भातुकली वगैरे खेळाच्या जिनसा (पूर्वी सासऱ्याकडून नव्या सुनेस श्रावणपाटीवर देत). ॰घोडी-स्त्री. पखवाज ठेवण्याकरितां उपयोगांत आणतात ती लाकडी घडवंची. घोडी पहा. ॰बोंब-पु. (कों. नाविक) नाळीच्या बाहेर शीड लावण्यासाठीं बुंधा दाट्यावरील बोंब पाट- लीस अडकवून नाळीच्या भुरड्यास बांधलेलें सरळ लांकूड. हा डोलकाठीप्रमाणें उभा न करतां पालथा ठेवितात. हा कलमीहून बराच लहान असतो. याच्या बुंध्यास भोंक पाडून त्यांत एक लाकडी खिळी (लहानसा लाकडी खुंटा) घालून त्या खिळीस फेरे घेऊन बांधतात. ॰लास-पु (चांभारी) बुटांत घाला- वयाचा लाकडी ठोकळा; कलबूत. लाकूड फांटे-पुअव. १ घर वगैरे बांधण्यासाठीं उपयोगी लाकडें, गवत विटा इ॰ साहित्य. २ संसाराच्या उपयोगी काटक्या; शेणी, गवत इ॰ जवळ; सर्पण. ॰भारा-पु. लाकडाचें ओझें-भारा (डोक्यावर वाहण्याचा किंवा जनावरावर लादण्याचा). ॰मदारी-पु. अतिशय रोडका, कृश मनुष्य. मदारी पहा.
दांड
पु. १ वेळूची लांब काठी; दांडा. २ पट्टा खेळण्याचा सराव करण्याची काठी. ३ शेताची मर्यादा दाखविणारा उंच बांध. ४ टेंकडीचा, डोंगराचा कणा, दंड, रांग. ५ उंचवट्यावरून सखल प्रदेशाकडे पाटानें पाणी नेण्याची सारणी, प्रणाली, दंड. ६ (व.) (धोतर, लुगडें इ॰ कांचे दोन तुकडे जोडणारी) एक प्रकारची जाड व लांब शिवण. (क्रि॰ करणें). ७ (शेतांमधून, शेताच्या बाजूनें) रह- दारीकरितां सोडलेला जमिनीचा लांब पट्टा. ८ जमिनीचा, मार्गाचा लांबलचक, रखरखीत व ओसाड पट्टा. ९ (फार वेळ एकाच स्थितींत बसण्यानें अंगाला येणारा) ताठरपणा; ताठकळा. (क्रि॰ भरणें). 'बसून बसून पाठीला दांड भरला.' १० (प्रां.) मळ्यां- तील) वाफा, ताटवा. ११ (-पुन. प्रां.) (शिक्षा म्हणून केलेला दंड; (विरू.) दंड. (क्रि॰ मारणें). १२ चोवीस हात लांबीचा बांध; चोवीस हात लांबीचें परिमाण. -कृषि २१३. १३ चित्त्याच्या गळपट्यापासून कंबरपट्ट्यापावेतों पाठीच्या कण्या- वरून बाधण्याची वेणी घातलेली सुताची दोरी. -चिमा १३. १४ (गो.) (आट्यापाट्या) सर्व पाट्यांना मधोमध विभाग- णारी रेषा; दंड; सूर. १५ (ना.) पाळण्याचा साखळदंड. १६ एकेक मोतीं. -शर [सं. दंड] (वाप्र.) ॰काढणें-(मनुष्य, जनावर इ॰ कांस) खूप राबवून घेणें; तांगडणें; ताण देणें; पादाडणें. सामाशब्द- ॰पट्टा-टापु. १ एका हातांत काठी व दुसर्या हातांत पट्टा घेऊन खेळावयाचा एक मर्दुमकीचा खेळ. (क्रि॰ खेळणें; करणें). २ सदर खेळ खेळण्याचें हत्यार. [दांड + पट्टा] ॰पाळें-न. लांकडाची मूठ बसविलेलें लांकडी पाळें. ॰पेंडोळा-ळें-पुन. १ (प्रदेश, जमीन इ॰ कांची) सीमा; मर्यादा; शींव; हद्द; परस्परसंबंधाची जागा; निकटपणा; संबंध. २ (ल.) विवाह अथवा इतर संबंधांतील (दोन्ही पक्षांची) अनुरूपता; योग्यतेचा सारखेपणा; सारखी लायकी. (क्रि॰ मिळणें; पुरणें; लागणें). [दांड + पेंडोळा = हद्द, बांध] ॰मेंड-पुस्त्री. सीमा; हद्द; शींव; मर्यादा. 'त्या गांवची दांडमेंड मारुतीच्या देवळापर्यंत आहे.' [दांड + मेंड = मर्यादा, सीमा] ॰यारी-स्त्री. (नाविक कों.) काठीस ज्या मुख्य यार्या शृंगारवितात त्यांच्या शिवाय आणखीहि बारीक दोरीच्या उपयार्या असतात त्यापैकीं प्रत्येक. [दांड + यारी]
सांध
स्त्री. १ जोड; सांधा; सांध्याचा बिंदु, रेषा. २ भेग; फट; चीर; तडा; खांच; खिंड. ३ पेरें; ग्रंथि; खीळ; सांधा. ४ (विणकाम) हातमागांतील ताण्याचा तिडा, वेढा, कातरा (क्रि॰ पडणें). [सं. संधि] सांधीस बसणें, सांधींत पडणें-१ एकांतांत राहणें, पडणें (पतिमरणानंतर बारामास विधवा इ॰). २ (सामा.) मागें पडणें; लोकांच्या स्मरणांतून जाणें. सामाशब्द- ॰क-वि. सांधकाम करणारा (शिवण इ॰ तील). 'सांधकाला कर्तन व सौचन या दोन्ही विषयांत गति पाहिजे.' -(काकडे) शिवणकाम. ॰काम-न. सांधण्याचें, जुळविण्याचें, योग्य रीतीनें एकत्र करण्याचें काम. [सांधणें + काम] ॰कोंद-स्त्री. कानाकोंपरा; खांचखळगा; बीळ; फट; (सामा.) सर्व आडबाजूच्या बारीक- सारीक जागा. 'दिवा घेऊन म्यां सांधकोंद पाहिली.' (अव. उपयोग). ॰मोड-स्त्री. (बांधकाम करतांना) एका थरांतील दगड, किंवा विटा यांचे सांधे वरच्या थरांतील दगडविटांच्या सांध्याशीं सरळ रेषेंत न येतील असें करणें (क्रि॰ करणें). 'सांधमोड ३ इंचापेक्षां कमी नसावी.' -मॅरट १५. ॰रुख-पु. एक झाड. अस्थिभंगावर औषधी. याचें लाकूड चिरलें तरी पुन्हा सांधलें जातें. अव्वल प्रकारच्या झाडाला 'लवंगी सांधरुख' म्हणतात. ॰वण- स्त्री. पायतणाची दुरुस्ती. -बदलापूर १८७. सांधणी-स्त्री. १ (विणकाम) परभणीमुळें साफ झालेलीं सुतें एकत्र वळणें, जोडणें. २ मागावरील सुतांशीं नवीं सुतें जोडणें. ३ या कामीं वापरावयाचें हत्यार, साधन. सांधणी-णूक-स्त्री. १ जोडणी; जुळणी; एकीकरण (शिवणें, झाळणें, चिकटविणें इ॰ नें). २ समेट; एकी. सांधणें-उक्रि. जोडणें; एकत्रित करणें; संयुक्त करणें (शिवणें, झाळणें, चिकटविणें, गांठणें इ॰ क्रियेनें) -अक्रि. एक होणें; जडणें; जुगणें. सांधन-न. जोडणी; सांधणूक. सांधप-न. (राजा.) सांधण्याचा व्यापार. सांधणें पहा. सांधा-पु. १ ग्रंथि; पेरें; संधि; सांध. २ जोड; संधिरेषा-बिंदु; दरज. ३ जोडलेला तुकडा; जो जोडला असतां वस्तु लांब होते किंवा वाढली जाते तो तुकडा. 'दोरीस दाहा हात सांधा लाविला तेव्हां पाणी काढावयाचे उपयोगी झाली.' ४ मिलाफ; एकी. 'आणि शुक्रशोणिताचा सांधा । मिळतां पांचांचा बांधा ।' -ज्ञा १३ १०६. ५ (नाविक) खाडींतील होड्या लावण्याची सोईची जागा. ६ (ढोरधंदा) दोन तुकडे एकत्र जोडणें; लाग. (क्रि॰ शिवणें). [सं. संधि] ॰बसणें- जम बसणें; जुटणें; जमणें; बेतशीर, सोईचें होणें. सांधासांध- स्त्री. १ अनेक वस्तू एकत्र येणें, जुळणें; अनेक लोकांनीं एकत्र करणें, जोडणें. २ (ल.) समेट; तडजोड. ३ दुरुस्ती; सुरळीत चालणें. सांधित॰ वि. सांधलेलें; जोडलेलें; जुळलेलें (शिवण्यानें, झाळल्यानें इ॰). सांधी-स्त्री. १ जोड; सांधा. २ चिरण; फट; भेट. सांध पहा. सांधीकोंदी-स्त्रीअव. जोड, सांधे, चिरा, फटी इ॰ संबंधीं व्यापकार्थीं शब्द; कानेकोपरे. सांधी कोंदीचा-वि. १ घरांत कोठें तरी आडबाजूस, कोपर्यांत बसणारा; बिळांत राहणारा. २ क्षुद्र; महत्त्व नसलेला; अज्ञांत;गल्ली- कुचींतील. सांधीकोनी-नीं-क्रिवि. कोनाकोपर्यांत; आडसंधींत; आडबाजूस. 'जो तो दडे सांधीकोनी ।' -र वि १९.१७०. सांधीचा, सांधीतला-वि. १ कोंपर्यांतला; आडबाजूचा. २ अज्ञात; क्षुद्र; हलका. ३ कोंपर्यांत, आडबाजूस, गुप्त जागीं अस- ण्यास योग्य, लायक. सांधीचा पदार्थ पहा. सांधीचा पदार्थ, सांधींतली वस्तु-स्त्री. १ टाकाऊ, निरुपयोगी वस्तु. २ (ल.) विधवा. ३ गुप्त किंवा खाजगी ठिकाणींच फक्त उपयोगी पडणारी वस्तु. ४ वेगळी काढून ठेवलेली, मोठ्या, नैमित्तिक प्रसंगीं वापरण्यांत येणारी वस्तु (अलंकार, पागोटें, शेला इ॰). सांधीं- तला व्यवहार-पु. कोंपर्यांत, आडबाजूस, गुप्त, स्थळीं चाल- णार व्यवहार; गुप्त, खाजगी व्यवहार. सांधींतली गोष्ट-स्त्री. अज्ञात, खाजगी, गुप्त व्यवहार, गोष्ट. म्ह॰ सांधींतली गोष्ट उजेडांत आणूं नये. सांधींतली सावकारी. सांधीं तला व्यापार-स्त्री. पु. अप्रसिद्ध, लहानसा व्यापार, सावकारी; गल्लीकुचींतील धंदा. सांधीतलें मडकें-न. (निंदाव्यंजक) विधवा. सांधीभानेचा-वि. सांधीकोंदीचा. [सांध + भानवस] सांधीव-वि. १ सांधलेलें; जोडलेले (विभाग, तुकडे). २ तुकडे जोडून केलेली; विभागांची बनलेली (वस्तु, गोष्ट). सांधोरी- स्त्री. १ मोठा किंवा अव्यस्थित सांधा, चीर. २ गल्ली; बोळ. सांधोरी कोनदोरी-कोन्दोरी-सांधीकोंदी पहा. सांधो- सांधीं-क्रिवि. कोनाकोपर्यांतून. सांदोसांदीं पहा.
काठी
स्त्री. १ लहान झाडाचा सोट; खोड. २ दांडकें; छडी; (सामान्यतः) वेळू, बांबू इत्यादिकांचा पांच चार हात लांबीचा सोटा, दांडका, लाठी (टोकाला गोळे नसलेली), ३ निशाण; दिंडी; 'खंडेरावाची काठी' -ऐरापु १.३०५. महा- देवास काठी नेतात' -मसाप २.२.२६. 'नाना काठ्या शासनें वेत्रधार ।' -सप्र २१.३४. ४ जहाजाची डोलकाठी; ज्यावर शीड बांधतात तो सोट. 'सोडिले मचवे लोक चढती काठी वर ।' -विवि ८.३.५४. ५ काठीचा फटकारा. (क्रि॰ मारणें) ' आम्हां लागलिसे पाठी । बालत्व तारुण्य काठी ।' -तुगा १३४७. 'माझी साहों शके काठी । ऐसा बळिया सृष्टी असेना ।' -एभा ४.१२०. ६ जमीन मापनाचें एक माप, साधन. ही पांच हात पांच मुठी लांबीची असते. एकविसांश पांड, किंवा एकचारशें अंश बिघा. ७ वरील काठीनें मोजलेलें क्षेत्रफळ. ८ शरीर, शरी- राची काठी; अंगकाठी; चण; बांधा; ठेवण. 'सूर्याचेनी दीपें । वसीस्टाची काठी तपें ।' -उषा ८७०. 'ते काठीनें मध्यम उंचीचे होते. -कोरकि २१. ९ जननेंद्रिय (पुरुषाचें). १० उंसाची एक जात. ११ (नंदभाषा) वीस ही संख्या. 'केवला काटी पवित्रु त्यासी । सांगोनियां दिधलें ।' -भवि ४२.४५. १२ (ल.) अडकाठी. १३ महाराच्या हातांतील सरकारी काठी. 'महारांच्या कामाची पाळी आळी व संपली म्हणजे काठी आली व काठी पडली असें म्हणतात.' -गांगा ४९. १४ (कु.) लांकडें (जळाऊ), सरपण. 'आज काठ्या नाय हाडलय' १५ (छा.) जुळविलेले खिळे (टाईप) छापण्यासाठीं लोखंडी चौकटींत (चेसमध्यें) आंवळण्यासाठीं सभोंवार टाकावयाची एका बाजूस सरळ व एका बाजूस निमुळती होत गेलेली विवक्षित मापाची लांकडी पट्टी (इं. साईडस्टिक). [सं. काष्ठ; तुल. सीगन कास्टे; पो.जि. काटे; कष्टी; फ्रें. जि.कष्ठ] ॰टाकणें-सरकारी चाकरीच्या महा- रानें आपली पाळी दुसर्यास देणें. ॰नें हाकणें-१ भेदाभेद न करतां सर्वांनां एका ओळींत गोवणें. सब घोडे बारा टक्के अशा न्यायानें वागविणें. -नें पाणी शिंपणें -स्वतः श्रम न करतां दुसर्याकडून काम करवून घेणें. ॰नें पाणी शिवणें-कुचराईनें निष्काळजीपणानें काम करणें. -नें पाणी हाटलें तरी दोन ठिकाणीं होत नाहीं -पक्की जिवलग मैत्री, दाट मैत्री, पक्का स्नेह. - ला सोनें बांधून चालावें -चांगल्या बंदोबस्ताच्या राज्याचें निदर्शक. -वर कांबळा घेणें-घालणें-भांडण- तंट्यासाठीं तयार होणें, राहणें, सज्ज असणें, कंबर कसणें; सिद्ध होणें. ॰वाजणें-(नाविक) डोलकाठी भंगणें. ॰शिखरास लागणें-१ (जत्रेमध्यें निरनिराळे मानकरी लोक आपल्या निशाणाची काठी देवळाच्या शिखरास लावतात त्यावरून) आपल्या जन्माचें सार्थक करणें; ध्येय साध्य करणें; उद्दिष्ट साधणें; इष्टार्थ साधणें. 'माझ्या काठ्या लागल्या शिखराला' -मसाप १.१.६. २ आयुष्याच्या अखेरीस येणें; आयुष्यांतील इतिकर्त- व्यता संपणें. -सारखें पडणें-साष्टांग नमस्कार घालणें; 'लिंग का प्रतिमा दिठीं । देखतखेंवों अंगेष्टी । लोटिजे कां काठी । पडली जैसी ।' -ज्ञा १७.२०४. काठ्या लावणें-(ना.) चिड विणें, नाहक त्रास देणें. ॰कर-रु-कार-हातांत सोन्याचांदीची काठी घेतलेला राजाचा, देवाचा द्वारपाळ; चोपदार. 'नंदिकेश्वर महानीळ । काठीकर दोघे प्रबळ ।' -गुच २९.११९. 'तंव तो बळीदैत्याचे द्वारीं । काठीकर झालासे हरी ।' -कथा २.३.३१. 'ऐसें काठीकरू बोलिला ।' -उषा ८९. 'मग राजा काठिकाराते म्हणे ।' -पंच ॰कांबळा-पु. श्रीकृष्णाची गोकुळांतील वेषाची नक्कल करण्यासाठीं गुराख्यांचीं पोरें हातांत काठी व पाठीवर- खांद्यावर कांबळा घेतात त्यास समुच्चयानें म्हणतात. ॰वाला-पु. सरकारी पाळीचा महार.
घोडा
पु. १ खूर असलेला एक चतुष्पाद प्राणिविशेष. ह्याचा उपयोग ओझे वाहण्याच्या, गाडी ओढण्याच्या व बसण्याच्या कामीं करतात. ह्याच्या जाती अनेक आहेत. अरबी घोडे जग- प्रसिद्ध आहेत. लहान घोड्यास तट्टू व घोड्याच्या पोरास शिंगरूं म्हणतात. घोड्याच्या आकृतीवरून, गतीवरून, उपयोगा- वरून व लक्षणेनें हा शब्द अनेक वस्तूंस लावतात. २ बुद्धिबळाच्या खेळांतील एक मोहरा. हा सर्व बाजूंनीं दोन सरळ व एक आडवें (अडीच) घर जातो. या मोहर्याचा विशेष हा आहे कीं हा इतर मोहर्यांच्या डोक्यावरून उडून जातो, तशी गति इतर मोहर्यांना नसते. ३ बंदुकींतील हातोडीच्या आकराचा अव- यवविशेष. हा दाबला असतां ठिणगी उत्पन्न होते व बंदूकीचा बार उडतो; चाप. ४ (मुलांचे खेळ) दोन पायांत काठी घालून (तिला घोडा मानून) मुलें धांवतात तो काठीचा घोडा. ५ (उप.) मूर्ख व ठोंब्या असा वयस्क मुलगा; वयानें मोठा पण पोरकट मनुष्य. ६ वस्त्रें, कपडे ठेवण्यासाठीं खुंट्या ठोकलेला खांब; स्नान करणार्या माणसाचे कपडे ठेवण्याकरितां जमिनींत रोंवलेली काठी, खांब; (इं.) स्टँड. ७ (ल.) शरीर वाहून नेतात म्हणून पायांस लक्षणेनें (दहाबोटी) घोडा असें संबोधितात; तंगड्या. 'आमचा दोन पायांचा घोडा आम्हाला हवें तेथें वाहून नेईल.' ८ पाळणा टांगण्यासाठीं एका आडव्या लांकडाला चार पाय लावून करतात ती रचना; घोडी. ९ पालखीचा दांडा ज्याला बसविलेला असतो तें दुबेळकें बेचक; पालखीं तबे- ल्यांत वगैरे ठेवतांना ज्यावर ठेवतात तीं दुबळकें असलेलीं लाकडें प्रत्येकीं. १० गाड्याच्या बैठकीच्या चौकटीचीं दोन बाजूंचीं लांब लांकडें प्रत्येकी; गाडीच्या दांडयास आधार द्याव- याचें दुबेळकें. ११ मूल रांगावयास लागलें असतां दोन हात व दोन गुडघे जमीनीला टेकून करतें ती घोड्यासारखी आकृति. (क्रि॰ करणें). १२ मृदंग; पखवाज ठेवण्याची घडवंची; घोडी; (दिवे इ॰ लावण्याची) दोन बाजूस पायर्या असलेली घडवंची; (पिंपे, पेट्या ठेवण्याची) लांकडी घडवंची. १३ नारळ सोलण्याचा, शेंड्यास सुरी बसविलेला खांब; नारळ सोलण्याचा एक प्रकारचा सांचा. १४ समुद्राच्या भरतीच्या पाण्याचा चढ, फुगोटी, फुगारा; लाटेचा उंच भाग; नद्यांच्या मुखांतून वर गेलेलें समुद्राच्या भरतीचें पाणी. -सृष्टि ५७. १५ ओबडधोबड असा आंकडा, फांसा, पकड. १६ (ल.) घोडेस्वार. 'तीन हजार घोडा पेशव्यांचे तैनातींत ठेवावा.' -विवि ८.७.१२९. १७ दाराच्या दुहेरी चौकटीच्या वरच्या बाजूचे, परस्पराला जोडणारे दोन लाकडी तुकडे (त्यांच्याच जोडीच्या खालच्या बाजूच्या तुकड्यांस छिली म्हणतात). १८ (खाटीक इ॰ कांचें) साकटणें, सकोटन; खाटकाचा ठोकळा. १९ (मुद्रण) केसी व ग्याली ठेवण्यासाठीं केलेली घडवंचीवजा चौकट. २० फळा, चित्रफलक इ॰ उभा ठेवण्याची लाकडी उभी चौकट. २१ (कों.) रहाटगाडग्याचें कोळबें ज्यावर ठेवतात ती लांकडी चौकट. २२ (पोहोण्याचा) चार भोपळ्यांचा तराफा. २३ (गो.) (विटी दांडूचा खेळ) विटी मारण्याचा एक प्रकार. (क्रि॰ मारणें). [सं. घोटक; प्रा. घोड; गु.घोडो; सिं. घोडो; स्पॅनिश जि. गोरो; अर. घोरा] घोडी-स्त्री. १ घोडा या जातीच्या प्राण्याची मादी. २ सतार, तंबोरा इ॰ तंतुवाद्यांच्या भोपळ्याच्या मध्यावर हस्ती- दंती अगर लांकडाची पाटाच्या आकृतीची एक इंची किंवा दीड- इंची पट्टीची बैठक; तिच्यावरून तारा पुढें खुंटीस गुंडाळलेल्या असतात. ३ मुलांना शिक्षा देण्याकरितां जिला हातानें धरून शिक्षा दिलेला लोंबकळत असतो अशी आढ्यापासून लोंबणारी दोरी, फांसा; मुलांस टांगण्यासाठीं उंच बांधलेली दोरी. अशी शिक्षा पुर्वीं शाळांतून फार देत. (क्रि॰ घेणें; देणें). 'एखाद्या मुलांशी माझं वांकडं आलं कीं, रचलंच त्याच्यावर किटाळ आणि दिलीच त्याला पंतोजीकडून घोडी.' -चंद्रग्र ८०. ४ उभें राहून पखवाज वाजविण्याकरितां पखवाज ठेवावयाची घडवंची. 'इत- क्यांत देवळाच्या एका कोंपर्यांत मृदंग ठेवावयाची उंच घोडी सुनंदाला दिसली.' -सुदे २५. ५ गवत इ॰ वाहण्याकरितां खटार्यावर उभारलेला सांगाडा, चौकट. ६ फळा जमीनीपासून उच ठेवण्याकरितां व त्याला उतार देण्याकरितां केलेली लांकडी चौकट, सांगाडा. ७ वयस्क असून पोरकटपणा करणारी, खिदड- णारी मुलगी; खिदडी; धांगडधिंगी; भोपळदेवता; घोडकुदळ. ८ (सुतारी) तासावयाचें लांकूड हलूं नये म्हणून त्याला आधार- भूत असें दुसरें लांकूड, चौकट इ॰ सोईनें बसवितात तें. ९ (विणकामांत) सूत उकलण्यासाठीं केलेलें लांकडी चौकटीसारखें साधन. १० (सोनारी) पायांत घालावयाच्या सांखळ्यांच्या कड्या वांकविण्यासाठीं असलेला बोटाइतका जाड असा निमु- ळता मोळा. ११ (हेट. नाविक) पोरकें (लहान) शीड उभें करण्यासाठीं असलेलें कमानीसारखें लांकूड. १२ बंधार्याच्या मुखाशीं (पाणी सोडण्याच्या ठिकाणीं) पडद्यासारखी बांधलेली भिंत. हिच्यावरून पाणी जात असतें. १३ (हेट.) गलबताच्या कडेस शौच्यास बसण्याकरितां टांगलेली लांकडी चौकट. १४ सांकटणें; सकोटण. घोडा अर्थ १७ पहा. १५ तीन पायांचें दिवा ठेवण्याचें बुरडी तिकाटणें, तिवई. १६ पाटास जे दोन आडात मारितात ते प्रत्येकी. १७ हत्तीवरील चौकट; हौदा. 'साहेब नौबतीकरितां हत्तींवर लाकडी घोडी घालून...' -ऐरा ९.५०६. १८ उभें खुंटाळें. (इं.) स्टँड. 'तिकोनी खुंट्यांची घोडी आणि रुमाल ठेवावे ' -स्वारीनियम ७०. १९ सामान ठेवण्याचा घोडा. घोडें-न १ सामा (लिंगभेद न धरतां) घोडा या जातीं- तील जनावर. ' कृष्णाकांठचीं घोडीं सडपातळ पण चपळ अस- तात.' २ खटार्याच्या साटीच्या चौकटीचीं दोन बाजूंचीं उभीं लाकडें; घोडा अर्थ ९ पहा. घोडकें अर्थ १ पहा. ३ चार भोंपाळे लावलेला पाण्यावर तरंगणारा तराफा. घोडा अर्थ २१ पहा. ४ (व.) गाडीचे दांडे-जूं ज्यावर ठेवतात तें दुबेळकें. घोडा अर्थ ९ पहा. [सं. घोडा] (वाप्र.) घोडा आडवा घालणें- (एखाद्या कार्यात) अडथळा, विघ्न आणणें. 'आणि म्हणूनच तुम्ही घोडा आडवा घातलांत वाटतं ?' -चंद्रग्र ६८. ॰उभा करणें-बांधणें-(घोडा) थोडा वेळ थांबवणें; जरासें थांबणें; घाई न करणें (घाईंत व धांदलींत असणार्या मनुष्यास उद्देशून ह्या वाक्प्रचाराचा उपयोग करतात.) ॰काढणें-१ (बांधून ठेव- लेला घोडा बाहेर नेणें) घोडा हांकारणें, पिटाळणें २ (ल.) (एखाद्यानें) पळ काढणें; पोबारा करणें; निसटणें. ॰चाल- विणें-(कर.) (ल.) डोकें खाजवणें; युक्ति लढविणें. ॰टाकणें- घोडा फेंकणें; उडवणें; अंगावर घालणें. 'आरेरे टाकौनि घोडा । भणती यांचिआं जटैं उपडा । ' -शिशु १४१. ॰मैदान जवळ असणें-(घोडा धांवण्यांत कसा काय आहे याची परीक्षा त्यास मैदानांत पळवून करतां येते यावरून) ज्याची परीक्षा करा- वयाची तो पदार्थ, मनुष्य व परीक्षेस लागणारी सामग्री हीं दोन्ही जवळ असणें असा अर्थ होतो; एखाद्या गोष्टीची निरर्थक चर्चा न करतां तिला कसोटीला लावणें, कसोटीचा वेळ किंवा सामुग्री जवळ असणें; हा सूर्य हा जयद्रथ. 'कोरडी बढाई कशाला पाहिजे ? घोडामैदान जवळच आहे.' ॰हांकणें-पळून जाणें; निघून जाणें; पोबारा करणें; घोडा काढणें पहा. 'पंतोजीबुवास पाहून त्या पोरानें घोडा हांकला. 'घोडी काढणें-भरविणें- सक्रि. (माण.) घोडीस घोडा दाखविणें, देणें; घोडी फळविणें. घोडी घेणें-(एखाद्याशीं) घांसणें; कटकट करणें; मत्सरबुद्धीनें दोष काढणें. घोडें उभें करणें-अडथळा आणणें. 'बाळासाहेब नातूसारख्यांनीं विशेष प्रसंगीं एखादें घोडें उभें केलें तरी त्याकडे दुर्लक्ष्य करून ज्यानें त्यानें आपला पंथ सुधारावा.' -आगर ३.१४४. (एखाद्याचें) घोडें थकणें-एखाद्यानें (प्रवास, धंदा, व्यापार, अभ्यास इ॰ कांत) थकून जाणें; हतबल होणें; पुढें रेटण्याची शक्ति न उरणें. (एखाद्यानें आपलें) घोडें पुढें दामटणें-ढकलणें-हांकणें-घालणें-१ इतरांच्या पूर्वीं आपला कार्यभाग साधून घेण्याचा घाईने प्रयत्न करणें. 'या शर्यतींत जो तो आपलें घोडें पुढें दामटायला पहात आहे. -नि. 'ब्रिटिश वसाहतीनीं आपल्या हक्कांचें घोडें पुढें दामटलें.' -सासं २.४४६. २ लुब्रेपणानें दुसर्यांच्या संभाषणांत तोंड घालून त्यांच्यावर आपले विचार लादणें. (एखाद्याचें) घोडें मारणें-एखाद्याचें नुकसान करून त्याला राग आणणें (पूर्वीं प्रवासाचें मुख्य साधन घोडें असे. प्रवासाचें घोडें ठार केल्यास त्याचा प्रवास थांबत असे व त्यामुळें त्याचें फार नुकसान होई यावरून) एखाद्याचें फार नुकसान करणें. 'मी काय तुझें घोडें मारलें आहे ?' (आपलें) घोडें पुढें ढकलणें-आपलें काम प्रथम करूं लागणें; आपल्या कामाला महत्व देणें. गांडी- खालचें घोडें-संसारादि निर्वाहक मालमत्ता, वाडी इ॰ आधारभूत मुख्य साधन. म्ह॰ आपले गांडीखालचें घोडें गेलें, मग त्यावर महार बसो कीं चांभार बसो. घोडीं आडवीं घालणें-१ शत्रूवर तुटून पडून त्याच्या चालीला, पळाला अड- थळा करणें. २ (ल.) (एखाद्यास त्याच्या कामांत) संकट, अडथळा, व्यत्यय आणणें. 'जर त्यांणीं आपल्यावर चालून घेतलें तर आम्ही आडवीं घोडीं घालतों. ' -ख ४२९७. घोडीं घालणें-घोड्यांच्या अनीना उचलणें-घोडदळांतील सर्व स्वारांनीं इर्षेनें शत्रूवर एकदम तुटून पडणें. -होकै ३. घोड्याच्या, हत्तीच्या पायांनीं येणें व मुंगीच्या पायांनीं जाणें-(आजार, संकट, अडचण इ॰ च्या संबंधांत हा वाक्प्र- चार योजतात) जलदीनें येणें व धिमेधिमे जाणें; आजार इ॰ जलदीनें येतात पण अतिशय हळू हळू नाहींसे होतात यावरून वरील वाक्प्रचार रूढ आहे. (एखाद्याच्या) घोड्यानें पेण (पेंड)खाणें-या वाक्प्रचारांत पेण = प्रवासांतील टप्पा, मुक्का- माची जागा या ऐवजीं चुकीनें पेंड हा शब्द उपयोगांत आणतात. लांबच्या प्रवासांत निरनिराळ्या टप्प्यांच्या ठिकाणीं घोडीं उभीं राहत. त्यामुळें टप्प्याचें ठिकाण आलें कीं घोडें तेथें अडे, पुढें जात नसे. यावरून वरील वाक्प्रचार एखादें कार्य करतांना कोणी अडून बसल्यास त्यास. 'तुझें घोडें कुठें पेण खातें' असें विचारतांना उपयोगांत आणतात. घोड्यापुढें धावणें-जिकीरीचें, दगदगीचें; कष्टाचें काम करणें. (एखा- द्याच्या) घोड्यापुढें धावणें-एखाद्याची कष्टाची सेवा, चाकरी करणें; (उप.) एखाद्याची ओंगळ खुशामत करणें; एखाद्याची थुंकी झेलणें. घोड्यावर घोडा घालणें-(लिलांव इ॰ कांत) चढाओढ करणें; एखाद्यानें केलेल्या किंमतीपेक्षां अधिक किंमत पुकारणें; उडीवर उडी घालणें. घोड्यावर बसणें-दारू पिऊन झिंगणें;ताठ्यांत असणें. घोड्यावर बसून येणें-घाईनें येणें; आपलें काम तांतडीनें करण्यास दुसर्यास घाई करणें. सर घोड्या पाणी खोल किंवा पाणी पी-(घोड्या मागें हट, पाणी खोल आहे. तेथूनच पाणी पी) गोष्ट मोठी कठिण आहे, मागें परततां येणें शक्य आहे तोंच परतावें याअर्थी. म्ह॰ १ घोडा आपल्या गुणानें दाणा खातो = चांगला घोडा खूप काम करून आपल्याला खाद्यहि जास्त मिळवतो. त्याला जास्त देण्यास मालक असंतुष्ट नसतो. यावरून चांगला चकर आपल्या गुणानें व मेहनतीनें मालकाकडून पगार वाढवून घेतो. २ घोडा स्वार (मांड) ओळखतो = बसणारा कच्चा कीं पक्का आहे हें घोडा ओळखूं शकतो. (यावरून), आपला मालक कडक कीं नरम आहे हें हाताखालचीं माणसें ओळखूं शकतात. ३ (व.) जाय रे घोड्या खाय रे हरळी = घोड्याला हरळी खावयास मोकाट सोडल्यास (घोड्याला) तें चांगलेंच होईल, पथ्यावरच पडेल. म्ह॰-१ घोडा मरे भारें शिंगरूं मरे येरझारें = घोडी ओझें किंवा माणूम वाहून नेत असतां तिचें शिंगरूंहि तिच्याबरोबर जात असतें. घोडीच्या प्रत्येक हेलपाट्याबरोबर शिंगरूंहि हेलपाटा खातें. यावरून प्रत्यक्ष काम करणारास श्रम होतातच पण त्याच्या सहवासांत असणारांना सुध्दां जवळ जवळ तितकेच श्रम होतात. २ वरातीमागून घोडें = लग्नाच्या वरातीच्या मिरवणुकींत सर्वांच्या पुढें श्रृंगारलेलें कोतवाली घोडें चालवण्याची चाल आहे. यावरून वरात निघून गेल्यावर मागाहून श्रृंगारलेलें घोडें नेणें व्यर्थ होय किंवा औचित्यास धरून होत नाहीं. त्याप्रमाणें एखादी गोष्ट होऊन गेल्यावर मागाहून तत्संबंधीचीं साधनें जुळविणें व्यर्थ होय. २ माझें घोडें आणि जाऊं दे पुढें = इतरांचें कांहींहि होवो, माझें काम आधीं झालें पाहिजे. स्वार्थी माणसाची निंदा कर- तांना या म्हणीचा उपयोग करतात. समासांत घोडा शब्द पूर्व- पदीं आल्यास त्याचीं घोड किंवा कधीं कधीं घोडे अथवा घोड व घोडे, अशीं दोन्ही रूपें होतात. उ॰-घोडचूक; घोडेखोत; घोड (डे) चिलट इ॰. सामाशब्द-घोडकट, घोडकें-न. (घोड्याला तिरस्काराने लावावयाचा शब्द) रोडकें, अशक्त व थिल्लर घोडें; भटाचा तट्टू. घोडकुदळ-पु. १ (उप.) मुंजीचें वय झालेलें असून मुंज न झालेला मुलगा; घोडमुंज्या. २ -स्त्री. (उप.) उपवर असून लग्न न झालेली दांडगट नाचरी मुलगी; घोडी; घोडगी; भोपळ- देवता; घोडनवरी; घोडी पहा. घोडकूल-न. १ (गो.) लहान घोडें; तट्टू. २ (खा.) ओट्याच्या खांबावर तिरपा टेंकू (कर्ण) देऊन त्यावर कोरलेली घोड्याची आकृति. घोडकें-का-नपु. १ ज्याच्या भरीला करळ्या व तरसे घालून गाड्याची तक्तपोशी, बैठक तयार करतात अशीं चौकटींतील दोन बाजूचीं दोन उभीं लांब लांकडें. २ तेल्याच्या घाण्याच्या कातरीला खिळलेलें व जुंवाचा दोर बांधावयाचें लांकूड. घोडके-ढोरांचा गुरु. -गांगा २६. घोडकेळ-न. (क्क.) एक हलक्या जातीचें भसाडें केळें. [घोडा + केळें] घोडक्या-का-पु.-१ घोड्याचा खिजमतगार; मोतद्दार. 'घोड्यास शिपाई काय करिल घोडका ।' -ऐपो ३७२. २ चाबुकस्वार; अश्वशिक्षक; घोडा अर्थ ९ मधील शेवटचा अर्थ पहा. घोडकोस-पु. (गो.) तीन मैलांचा कोस. घोडगा-गी- पुस्त्री. (उप.) वयानें प्रौढ पण पोरकटपणा, नाचरेपणा अंगीं असलेला मुलगा, मुलगी; घोडा अर्थ ५ पहा. घोडी अर्थ ७ पहा. घोड(डे)गांठ-स्त्री. (बुद्धिबळांचा खेळ). एकमेकांच्या जोरांत असलेली घोड्यांची दुक्कल. घोडचवड-स्त्री. घोडदौड; घोडा चौफेर उडविणें; चवडचाल. 'घोडचवडीखालीं नाना पुण्याला आला.' -ऐपो १६२. [घोडा + चवड = विशिष्ट चाल] घोडचाल-स्त्री. घोड्याची चाल. (ल.) जलद चाल. [घोडा + चाल] घोड(डे)चिलट-न. मोठें चिलट; डांस; मच्छर. घोड- चूक-स्त्री. मोठी व अक्षम्य चूक. घोडचोट्या-वि. १ (मनुष्य). (अश्लील) घोड्याच्या चोटासारखा मोठा चोट ज्याचा आहे असा २ (निंदार्थीं) मुंज न झालेला, वाढलेला मुलगा; घोडकुदळ; घोड- मुंज्या. घोडजांवई-पु. (उप.) मोठ्या वयाचा नवरामुलगा; घोडनवरा. घोडजाळी-स्त्री.(भोंवर्यांचा खेळ) विरूद्ध पक्षाच्या भोंवर्याला खोंचा देऊन आपला भोंवरा दूर जाऊन फिरत राहील अशा रीतीनें भोंवरा फेकण्याचा प्रकार. [घोडा + जाळी = दोरी] घोडतोंड्या-वि. घोड्याच्या तोंडासारखा लांबट चेहरा अस- लेला; कुरूप; लांबट, ओबडधोबड तोंडवळ्याचा. [घोड + तोंड = चेहरा] घोडदळ-न. १ घोडेस्वारांचें सैन्य; फौज. २ सैन्यां- तील घोडेस्वारांचें पथक, तुकडी. [घोडा + दळ = सैन्य] घोड- दौड-स्त्री. घोड्यासारखें पळणें; घोड्याची दौड; जलद जाणें. [घोडा + दौड = पळणें] घोडनट-न. ज्याचें एक तोंड आढ्यावर व एक लगीवर येऊन दरम्यान तिरपें राहतें असें लांकूड ठोकतात तें. घोडनवरा-पु. (उप.) प्रौढवयाचा नवरामुलगा; घोडजांवई. घोड(डे)नवरी-स्त्री. (उप.) मोठ्या वयाची नवरी मुलगी, वधू; योग्य व सामान्य वयोमर्यादेबाहेर अविवाहित राहिलेली मुलगी. 'हे मोठमोठ्या घोडनवर्या घरांत बाळगल्याचे परि- णाम बरं !' -झांमू. घोड(डे)पाळणा-पु. घोड्याला (लांकडी चौकटीला) टांगलेला पाळणा; हलग्याना न टांगतां जमीनीवर घोड्यास अडकविलेला पाळण्याचा एक प्रकार. घोडा ८ अर्थ पहा. घोड पिंपळी-स्त्री. पिंपळीची मोठी जात; हिच्या उलट लवंगी पिंपळी. घोडपुत्र-पु. घोड्याला (विशेषतः बुद्धि- बळांतील घोड्याला) प्रेमानें किंवा प्रतिष्ठेनें संबोधण्याचा शब्द. [घोडा + पुत्र = मुलगा] घोडपेटें-न. १ दोन भोपळे पुढें व दोन मागें बांधून केलेला तराफा; घोडा अर्थ २१ पहा. २ भोंपळ्यावर दोन्ही बाजूस पाय टाकून घोड्यासारखें बसून पाण्यावर तरणें, तरंगणें. घोडबच्य-न. दुबळा घोडा पुष्ट होण्यास एक औषध. 'घोडबच्य पावशेर, राई पावशेर भाजलेलीं काळीं मिरें पावशेर ... मिश्रणापैकीं आतपाव दररोज देत जावें.' -अश्वप १.१७५. घोडबांव-स्त्री. (कु.) घोड्यांना पाणी पितां येईल अशा तर्हेनें बांधलेली विहीर. [घोड + बांव = विहीर] घोडबाही- स्त्री. १ दाराच्या दुहेरी चौकटीच्या आंतल्या चौकटींतील दोन्ही बाजूचे खांब. २ खटार्याच्या बैठकीच्या चौकटीच्या दोन बाजूंच्या लांब लांकडांपैकीं प्रत्येक; घोडकें, घोडें पहा; [घोडा + बाही = बाजू] घोडबाळ-वि. (उप.) पोरचाळे करणारा प्रौढ पुरुष, स्त्री; पोरकट माणूस. [घोडा + बाळ] घोडब्रह्म- चारी-पु. (उप.) लग्नाचें वय कधींच झालें असूनहि अविवाहित राहिलेला मुलगा; घोडनवरा. [घोडा + ब्रह्मचारी] घोडमल्ली- स्त्री. (बुद्धिबळांचा खेळ) घोड्यानें मात करण्याचा प्रकार. प्रतिपक्षाचें घोडें व राजा आणि आपलें घोडें, राजा व एकच प्यादें राखून प्यादेमात करणें; घोडमात. घोड(डे)मात -स्त्री. (बुद्धिबळांचा खेळ) घोड्यानें राजाला दिलेली मात; घोडमल्ली पहा. [घोडा + फा. मात् = कोंडणें] घोडमाशी-स्त्री. १ मोठ्या आकाराची हिरवी, काळसर माशी. २ (सामा.) मोठी माशी. घोडमासा-पु. एक प्रकारचा मासा; सागराश्व. ह्याचें तोंड कांहींसें घोड्यासारखें दिसतें. यास लांब शेपूट असतें. हा नेहमी उभा पोहतो. घोडमुख-ख्या-पु. १ घोड्याचें तोंड असलेला किन्नर नांवाच्या देवयोनींतील पुरुष. याचें वर्णन पुराणांतरीं सांपडतें. २ (ल.) अगदीं कुरूप, घोडतोंड्या माणूस. 'एक मीर- वलें भुरळें पींगळें । घोडमुखें ।' -दाव २८५. घोडमुंगळा-पु. मोठा व काळा मुंगळा. घोडमुंगी-स्त्री. मोठी, काळ्या जातीची मुंगी. घोड(डे)मुंज्या-पु. उप. १ मुंज होण्याचें वय झालें असून मुंज न झालेला मुलगा. २ लग्न न झालेला प्रौढ मुंज्या. [घोडा + मुंज्या] घोडला-पु. मूल रांगत असतांना त्याची होणारी घोड्यासारखी आकृति. घोडा अर्थ १० पहा. घोडली-स्त्री. (कों. हेट.) (नाविक) शौचास बसण्याकरितां वर्यास एक चौकट चार दोर्यांनी अडकवितात ती. [घोडा] घोडवळ-स्त्री. १ बांधलेल्या घोड्यांची ओळ, रांग. २ घोड्यांचा तबेला; घोडशाळा; घोडसाळ; यावरून (सामा.) तबेला; 'रोडोला हत्ती घोडवळींतून जाणार नाहीं.' ३ लांबचलांब, ठेंगणें व बेढब घर; मागरघर; दांडसाळ; केवळ तबेल्यासारखें असलेलें घर; कोठडी. ४ (उप.) घोडनवरी. ५ न. झोडपलेल्या, झोडपून दाणे न काढलेल्या धान्याच्या पेंढ्यांची रास, गंजी. [घोडा + ओळ] घोड(डे)वाट-स्त्री. घोड्यांकरितां केलेली, फक्त घोड्याला जातां येईल अशी वाट, रस्ता (विशेषतः डोंगर इ॰ याच्यावरून); उलट गाडीवाट. [घोडा + वाट] घोडविवाह- पु. विषमविवाह. 'आपली नात शोभेल अशा दहा वर्षांच्या पोरीशीं लग्न लावण्यास तयार असतात व असा घोडविवाह करूनहि फिरून समाजांत हिंडण्यास ... त्यांस दिक्वत वाटत नाहीं' -टि ४.९६. [घोडा + विवाह] घोडवेल-स्त्री. (सांकेतिक) घोड्याची लीद; (औषधांत घोड्याच्या लिदीचा उपयोग करा- वयास असल्यास तिचा निर्देश ह्या शब्दानें करतात). घोड- शह-पु. (बुद्धिबळांचा खेळ) घोड्यानें दिलेला शह. [घोडा + शह] घोडशाळा, घोडसाळ-स्त्री. १ घोड्यांचा तबेला; घोडवळ अर्थ २ पहा. [घोडा + शाळा = घर] घोडशिष्य- पु. (निंदार्थीं) विद्यार्जन करूं पाहणारा मोठ्या वयाचा विद्यार्थीं, मोठेपणीं शिकावयास लागणारा मनुष्य. घोडशीर- स्त्री. १ पायाच्या टांचेच्या वरच्या बाजूस असलेली शीर, नाडी; दवणशीत्त; धोंडशीर पहा. २ (क्व.) पायाचा किंवा हाताचा स्नायु. घोडसटवी-स्त्री. १ उग्र स्वरूप धारण केलेली देवी. (क्रि॰ लागणें). २ घोडी व्याल्यापासून सहाव्या दिवशीं करा- वयाची सटवीची पूजा. (एखादीला) ॰लागणें-१ घोडसट- वीप्रमाणें उग्र व विकाळ दिसणें. २ घोटसटवीची बाधा होणें. घोडेखाद-स्त्री. १ घोड्यांचें चरणें; हरळी खाणें. 'या घोडे खादीमुळें माळावर एक काडी राहिली नाहीं.' २ फक्त घोड्यांना चरतां, खातां येईल इतक्या वाढीचें गवत. 'ह्या माळावर मोठें गवत नाहीं, घोडेखाद कोठें कोठें आहे.' [घोडा + खाद = खाणें] घोडेखोत-पु. घोडे भाड्यानें देण्याचा धंदा करणारा; भाड्याच्या घोड्यांचा नाईक. [घोडा + खोत = मक्तेदार] घोडेघाटी-स्त्री. एक प्रकारचें रेशमी कापड. घोडेघास-न. १ विलायती गवत; लसून- घास. २ घोडकुसळी पहा. [घोडा + घास = गवत] घोडेपाऊल- न. एक वनस्पतिविशेष. [घोडा + पाऊल] घोडेराऊत, घोडे- स्वार-पु. घोड्यावरील शिपाई. घोड्याएवढी चूक-स्त्री. फार मोठीचूक; ढोबळ चूक; घोडचूक पहा. घोड्या गोंवर-पु. एक प्रकारचा गोंवराचा आजार; याच्या पुटकुळ्या मोठ्या असतात. [घोडा = मोठा + गोवर] घोड्याचा-पु. (निंदार्थीं) घोड्यावर बसलेला मनुष्य; घोडेस्वार. 'ते पहा घोड्याचे चालले. मागून स्वारी येतीसें वाटतें.' घोड्याचा दाणा-पु. १ (उप.) हरभरा. २ (ल.) बुंदीच्या लाडवास तिरस्कारानें म्हणतात. घोड्याचा पूत-लेंक-पु. (उप.) मूर्ख; गाढव; गद्धा. घोड्याची चाकरी-स्त्री. घोड्यांना दररोज चोळणें, खरारा करणें इ॰ काम. घोड्याची जीभ-स्त्री. (राजा.) एक वनस्पति- विशेष. घोड्याची मुंज, घोड्याचें बारसें-स्त्रीन. एखादा कोठें जावयास निघाला असतां एखाद्या अधिक प्रसंगी व फाजिल चौकशी करणार्या माणसानें त्यास कां, कुठें जातां असें विचारलें असतां म्हणतात. घोड्यांचें नाटक-न. (ना.) सर्कस. घोड्याचें मूत-न. १ कुतर्याचें मूत; अळंबें; भुईछत्री. २ कुजलेल्या लांकडांतून फुटलेलें अळंबें. घोड्याच्या पाठीवर- क्रिवि. भरधाव; झरकन; त्वरेनें. (क्रि॰ जाणें; करणें). घोड्याच्या पाठीवरचा कोस-पु. कंटाळवाणा व लांब- णीचा कोस; घोड्यावरून गेल्यासच कोसाएवढें व कंटाळवाणें न वाटणारें अंतर.
मूठ
स्त्री. १ मुष्टि या शब्दाचे सर्व अर्थ पहा. २ मुष्टि- प्रयोग; मंत्रप्रयोग; मंत्रानें भारून मुठींत घेतलेले उडीद इ॰. हे दुस- ऱ्याच्या नाशाकरितां फेकावयाचे असतात. (क्रि॰ मारणें; टाकणें). ३ मुठींत राहतील इतक्या भाताच्या रोपांची जुडी; भाताची लावणी करण्यापूर्वीं रोपें उपटून त्यांची जुडी करतात ती. ४ मुठीनें पेर- लेलें भात. (क्रि॰ पेरणें; टाकणें). ५ हत्ती, घोडा वगैरे जना- वरांच्या रोजच्या अन्नांतून त्यांच्या रखवालदारास द्यावयाचा मुठीच्या परिमाणाचा (पगाराहून अधिक) भाग. ६ घोड्याच्या पायाच्या खुराला लागून असलेला सांधा (ह्या सांध्याशीं घोड्याचा पाय लहान घेराचा असल्यामुळें येथें बांधलेली दोरी खालीवर होत नाहीं). ७ एक मुलींचा खेळ. -मखेपु ३३६.८ गर्भ (हातानें चांचपून पाहील्यास गर्भाचा आकार मुठीसारखा लागतो असें म्हण- तात यावरून). 'ही मूठ मुलाची किंवा मुलीची आहे.' ९ (कों.) शेतांतील पीक कापण्याच्या वेळीं करावयाचें कुणबी लोकांचें देव- कृत्य. [सं. मुष्टि; प्रा. मुठ्ठि; पं. मुठ्ठ; सिं. मुठि; उरि. मूठि; बं. मूठ; हि. गु. मूठ, मुठ्ठि] म्ह॰ झांकली मूठ सवा लाखाची उघ- डली मूठ फुकाची = आपण बोललों नाहीं तोंपर्यंत आपलें अज्ञान झांकून राहील, बोलल्यास तें लोकांना दिसून येईल. (वाप्र.) ॰आळवणें-दुसऱ्यास देण्याचें थांबणें; चिक्कूपणा करणें, करूं लागणें ॰दाबणें-चेपणें-गार करणें-भरणें-लांच देणें; लांचाची रक्कम मुठींत किंवा हातांत देणें. 'त्यानें पन्नास रुपयांनीं फौजदा- राची मूठ दाबली तेव्हां तो सुटला.' ॰भर मास चढणें- वाढणें-लठ्ठ होणें; गर्विष्ठ होणें; फायदा झाल्यानें अत्यानंद होणें. ॰मारणें-मंत्रसामर्थ्यानें दुसऱ्याचा नाश करणें; प्राण घेणें. मुठींत असणें-(एखाद्याला) पूर्णपणें किंवा सर्वथैव ताब्यांत, कह्यांत, अधिकारांत असणें. 'श्रोत्यांच्या साऱ्या मनोवृत्ति या वक्त्याच्या जशा काय मुठींत होत्या.' -नि. मुठी-मुठेळ्या-मुठ्या मारणें-मुष्टिमैथुन करणें. मुठ्या मारीत बसणें-(व.) माशा मारीत बसणें; निरुद्योगी राहणें; आळसानें वेळ घालविणें. एका मुठीचीं माणसें-एकाच कायद्याखालीं किंवा हुकमतीखालीं येणारी माणसें. एका मुठीनें-एकदम; एकाच हप्त्यानें, एकाच वेळीं. (रुपये देणें, घेणें, फडशा पाडणें). झांवल्या मुठीनें-गुप्त- पणें; खरी गोष्ट बाहेर पडूं न देतां; कोणाजवळ काय आहे किंवा कोण कसा आहे तें बाहेर फुटूं देतां. सामाशब्द- ॰पसा-पु. पसामूठ पहा. ॰मर्दाई-स्त्री. १ अन्यायानें व दांडगाईनें किंवा पाशवी सामर्थ्यानें दुसऱ्याचा पैसा इ॰ लुबाडणें. २ दांडगाई; जुलुमजबरदस्ती. ३ चोर, भामटे इ॰नीं एका जुटीनें हल्ला करून लुबाडणें. ॰माती-स्त्री. (प्रेत इ॰) पुरणें; पुरण्याचा अंत्य संस्कार. (क्रि॰ देणें). मुठवा-पु. (नाविक) भुरड्याच्या थोडें मागें दोन बोडतास दोन लांकडी जाडे खुंट ठोकतात त्यापैकीं प्रत्येक. याचा उपयोग टांकणीचें शेवट अडकविण्यासाठीं घोंस नाळीस चेपणीच्या वेळीं अगर पागर बांधण्यासाठीं होतो. मुठळी-स्त्री. १ मूठ. २ मुठींत धरून हलविणें. मुठा-पु. १ पाणी भरण्याचें पखालीचें तोंड. २ (राजा.) चुलीतींल विस्तव विझून जाऊं नये म्हणून तींत पुरून ठेविलेला शेणाचा गोळा. (क्रि॰ घालणें; पुरणें). ३ वातविकारानें किंवा भयानें पोटांत उठणारा गोळा. ४ रेशीम, सूत इ॰चा गुंडा, लड. मुठाण-न. एकजूट; संघ; टोळी; चांडाळ- चौकडी. मुठाळणें-सक्रि. हातीं धरणें; मुठींत धरणें. 'झाला सकोप, परजाळा मुठाळुनि भुजालागि थापटिच करें ।' -आमा ४५. मुठियो-पु. १ (गो.) तांदुळाच्या पिटाचें गूळमिश्रित पिंडाकृति एक पक्वान्न. २ (गो.) सोनाराचें एक हत्यार मुठी- स्त्री. (राजा.) खोबऱ्याची गोणी; खोबरें भरलेलें पोतें. मुठीचा खेळ-पु. मंत्रानें भारलेलें धान्य मुठींत घेऊन तें एखाद्या पदार्था- वर टाकून केलेला जादूचा खेळ. मांगगारूड पहा. मुठ्ठा-वि. १ रेशीम, कलाबतू इ॰ पुष्कळ प्रकारचे धागे एकत्र बांधून केलेला बिंडा. मुठ्या-पु. १ एका जातीचा खेंकडा. २ नांगराच्या रुम- ण्यांत बसविलेली, हातांत धरावयाची खुंटी; मूठ. [म. मूठ; का. हिडी; गुज. हडेली] मुठ्याल-न. (हेट.) मुठेल पहा. मुठ्यो- पु. (कु.) १ काथ्या ठोकण्याचें लांकूड. २ (कु.) लाह्या, उमलें इ॰ भाजतांना तें ढवळण्याकरितां काठीच्या टोकाला फडकीं गुंडा- ळून केलेलें चेंडूच्या आकारचें साधन; घाटणा. मुडका-पु. (व.) पेंढी; गठ्ठा. मुडगा-पु. १ मूठभर धान्य. २ केरसुणीची मूठ.
सप्त
वि. सात ही संख्या. [सं.] ॰ऋषि-पुअव. १ प्रत्येक मन्वंतरांतील सात ब्रह्मर्षि. यांच्या नांवांबद्दल एकवाक्यता नाहीं. सध्याच्या मन्वतरांतील सप्तर्षि-कश्यप, अत्रि, भरद्वाज, विश्वा- मित्र, गौतम, जमदग्नि व वसिष्ठ. अन्यत्र मरीचि, अत्रि, अंगि- रस, पुलस्ति-स्त्य, पुलह, ऋतु व वसिष्ठ अशीं नांवें आढळतात. सप्तर्षि अथवा ऋक्ष नक्षत्रांतील हे सात तारे आहेत. 'कश्य- पादि प्रासिद्ध । सप्तऋषी ।' -ज्ञा १०.९२. २ (सांकेतिक) सातारा शहर. 'पानगांवचा राजा सप्तऋषीस येत आहे' -रा ८.१८३. 'सप्तऋषि गिरिवरी माझी प्रतिष्ठा' -सप्र ५.१३. ॰क-न १ सातांचा समुदाय २ वि. सातवा ॰कंचुक-वि. (पंचमहा- भूतें अहेकार व महत्तत्त्व हीं) सात आवरणें, वेष्टणें असलेला. 'त्यामध्यें सप्तकंचुक पिंड ।' -दा १६.७.१५. 'सप्तकंचुक ब्रह्मांड ।' -दा १५.८.२९. ॰कर-पु. अग्नि. ॰करनेत्र-पु. शिव; अग्निनेत्र. ॰करणें-नअब. (ज्यो.) बव, बालव, कौलव, तैतिल, गर, वणिज व विष्टि. हीं सात करणें. ॰कुलाचल-पुअव. सात मोठे पर्वत. महेन्द्र, मलय, सह्य, शुक्तिमान्, गंधमादन, विंध्य, पारियात्र ॰कोण-पु सात कोण असणारी सरळ रेषांनीं मर्यादित आकृति. ॰क्या-वि. सात, सात दिवसांची अगर वर्षांची मर्यादा धरून तप करणारा. 'नव नाडी, बावन आड, तेथें एक सप्तक्या ब्राह्मण तप करीत आहे' -काहणी. विष्णूची. ॰खणी- पु. स्त्री. सात खणांचा महाल. 'तया मागें सप्तखणी । शोभे कनक बालार्कवर्णी ।' -कथा १.६.१५६. ॰गणी-गाणी-स्त्री. दुंडा- पैसा; ढबू पैसा. ॰गोदावरी तीर-न. गोदावरी ज्या प्रदेशांत सप्तधा होऊन समुद्रास मिळते तो प्रदेश. ॰ग्रही-स्त्री. सात ग्रहांची एका राशींत युति. ॰चिरंजीव-पुअव. अश्वत्थामा, बलि व्यास, हनुमान, बिभीषण, कृप व परशुराम हे सात पुरुष मरणा- तीत आहेत अशी समजूत आहे. ॰चैतन्य-न. मुख्य, शाश्वत अथवा ब्रह्मचैतन्य व इतर सहा मायिक चैतन्यें तीं -ईश, जीव, प्रमाण प्रमातृ, प्रमेय, फल. ॰जिह्व-पु अग्नि. ॰ति-वि. ७० ही संख्या. ॰दंती-वि. सात दांत असलेला (घोडा) (कुलक्षणी). ॰दश-वि. १७ ही संख्या. ॰द्वीप-पुअव. पृथ्वीचे सात मोठाले विभाग. जंबु, कुश, प्लक्ष, शाल्मली, क्रौंच, शाक व पुष्कर. 'नव खंडें सप्तद्वीपें । छपन्न देशींच्या रायांचीं स्वरूपें ।' -ह २८.६४. ॰द्वीपवती-द्वीपा-स्त्री. पृथ्वी. 'आले सप्त ही सागर । सहित सप्तद्वीपवती ।' -भूपळी विष्णूची. ॰धा-क्रिवि. सात प्रकारचा, सात ठिकाणीं, सात प्रकारांनीं. ॰धातु-पुअव. शरीरांतील सात रस, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा व शुक्र. अन्यत्र-वसा, रुधिर, मांस, भेद, मज्जा, अस्थि व स्नायु. अन्यत्र-अस्थि, नाडी, मज्जा, मांस, त्वचा, रक्त व नख आणि केश मिळून. 'मग सप्त धातूंच्या सागरीं । तहानेला घोंट भरी ।' -ज्ञा ६.२३५. या सप्तधातूंचे मल अथवा उपधातु. रस-कफ;रक्त-पित; मांस-नाक, कान, डोळे यांचा स्त्राव; मेद-घाम; अस्थि-केश व नखें; मज्जा- स्निग्धता; शुक्र-ओज. २ सोनें, रुपें, तांबें, कथिल, नाग, तीक्ष व कासें. अन्यत्र-सोनें, रुपें, ताबें, शिसें, जस्त, पितळ, लोखंड. ॰धान्यें-नअव. सातू, गहूं, साळ, तीळ, राळे, सावे, हरभरे ॰नद-पुअव. शोण, सिंधु, हिरण्यवाह, कोक, घर्घर, लोहित व शतद्रु. यांपैकीं दोहोंबद्दल ब्रह्मपुत्र व शिवनद धरतात. ॰पदार्थ- पुअव. न्यायशास्त्रांतील सात पदार्थ-द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय व अभाव. ॰पदी-पदीक्रमण-स्त्रीन. विवाह- विधीमध्यें लाजाहोमानंतर वधूवरांनीं समागमें सात पावलें जाण्याचा विधि. 'विवाह होम झाला संपूर्ण । सप्तपदी पाणीग्रहण ।' -एरुस्व १६.२६. ॰पर्ण-पु. एक वृक्ष. -न एक खाद्य-द्राक्षें, डाळिंब, खजूर यांचा रस व साखर, मध व तूप व इतर मसाला घालून केलेलें. -वि. सात पानांचें (झाड). ॰पर्वत-पुअव सप्त कुलाचल, पहा. ॰पाताल-न. अव. अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल, व पाताल. 'अतळ वितळ, सुतळ महातल आणि तळातळ । रसातळ आणि पाताळ । सातवें तें ।' -कथा ६.४.७९. ॰सप्तपाताळी घालणें-पडणें-जाणें- पुन्हां केव्हांही डोकें वर काढतां येऊं नये अशी अवस्था होणें. ॰पुर्या-स्त्रीअव. अयोध्या, मथुरा, माया (हरिद्वार), काशी, कांची, अवंतिका (उज्जयिनी), व द्वारावती -एभा १८. १५०. 'सप्तपुर्या तीर्थें अगाघें । जेथें वसती ब्रह्मवृंदें ।' -ह. ३३.१०१. ॰पुंजा-स्त्रीअव. विवाहविधीमध्यें सप्तपदीसाठीं घात- लेल्या तांदुळाच्या सात राशी. 'सप्तपुंजा भोंवती बाळें ।' -वसा ५१. ॰प्रकृति-धाप्रकृति-विधा प्रकृति-स्त्रीअव. प्रकृति पहा. १ सात स्वभावधर्म. २ राज्याचे मुख्य सात आधार-राजा, मंत्रि, नगर, भूमि, कोश, सेना, मित्र. ॰भूमिका-स्त्रीअव. १ ज्ञानी जीवाच्या सात भूमिका-शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा, सत्त्वापति, असंसक्ति, पदार्थाभाविनी व सूर्यावगाहिनी. २ भक्ति, ज्ञान, वैराग्य व सलोकता, समीपता, सरुपता व सायुज्यता. 'सप्त- भूमिका परब्रह्मीं' -सप्र ७.४२. ॰भूषणें-नअव. पुरुषाचीं सात भूषणें. 'पुरुषांलागीं सप्त भूषणें । तिन्हीं वस्त्रें कनकवर्णें । द्वाद- शांगीं अलंकार लेणें । स्त्रियांस देणें तैसेंचि ।' -ह ३४.६२. ॰म- वि. सातवा. ॰मातृका-स्त्रीअव. ब्रह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी व चांमुडा. ॰मी-वि. १ पंधरा तिथीं- पैकीं सातवी तिथि. २ सातवी विभक्ति. ॰मृत्तिका-स्त्रीअव. गज, अश्व, रथ, चतुष्पथ, गोष्ठ, वल्मीक व हाट अथवा संगम या सात ठिकाणची विधीकरितां लागणारी माती. ॰रंग-पुअव. तांबडा, नारिंगी, पिंवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा हे सूर्यकिरणाच्या पृथक्करणानें किंवा इन्द्रधनुष्यांत दिसणारे रंग. ॰रात्र-न. सात रात्रींचा काल. ॰राशिक-न. त्रैराशिकाप्रमाणें सात राशीचें गणित. सप्तर्षि-पुअव. सप्तऋषि पहा. ॰वारा-पु (नाविक) सप्तऋषींकडून वाहणारा वारा. ॰लोक-पुअव. भूलोक (पृथ्वी); भुवर्लोक (पृथ्वी व सूर्य यांमधील), स्वर्लोक (सूर्य व ध्रुव यांमधील इंद्रादि देवतांचा), महर्लोक (सूर्य व नक्षत्रांचा), तपोलोक (तपस्वी लोकांचा), जनलोक(ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांचा) व सत्यलोक (ब्रह्मदेवाचा). ॰विध लक्षण-व्यसनें-नअव जारण, मारण, विध्वंसन, स्तंभन, मोहन, वशीकरण व उच्चाटण 'जारण मारण विध्वंसन । स्तंभन मोहन, वशीकरण । उच्चाटण हें सप्तलक्षण ।' -विपू १.५३. 'सप्तवेसनीं जयाचें मन । तो एक मूर्ख ।' -दा २.१.१६ ॰शती-स्त्री. १ मार्कंडेय पुरा- णांतील सातशें श्लोकांची देवीची स्तुति; चंडीपाठ. २ सातशें श्लोकांचा ग्रंथ; भगवद्निता. 'कीं गीता हे सप्तशती । मंत्रप्रति- पाद्य भगवती ।' -ज्ञा १८.१६६६. ३ हालाची गाथासप्तशती. ॰शैल, सप्ताद्रि-पुअव. सप्तकुलाचल पहा. ॰समुद्र-सागर- पुअव. क्षार, इक्षुरस, सुरा, घृत, क्षीर, दधि व शुद्धोदक समुद्र. 'इयेवरी सप्तसागर । मध्यें मेरू महा थोर ।' -दा ४.१०.१४. ॰सूर-पुअव. षड्ज, ऋषभ, गांधार, मध्यम, पंचम, धैवत व निषाद हे संगीतांतील सात सूर. ॰स्कंध-पुअव. वायुमंडलाचे सात भाग. आवह अथवा अवाह (भूमिपासून मेघमंडलापर्यंत), प्रबह अथवा प्रवाह (मेघमंडलापासून सूर्यमंडलापर्यंत), उद्वह (तिसर्या मंडलांतील), सह (चंद्रमंडलापासून नक्षत्रमंडला- पर्यंत), विवह अथवा वैवह (नक्षत्रमंडलापर्यंत), षठापरा (शनिमंडलापासून सप्तर्षिपर्यंत), परिवाह (सप्तर्षिपासून ध्रुवार्पंयत). ॰स्वर-पुअव. सप्तसूर पहा. ॰स्वर्ग-पुअव सप्त- लोक पहा. ॰हरीतकी-स्त्री अव. हरड्याच्या सात जाती. विजया, रोहिणी, पूतना, अमृता, चेतकी, अभया व जीवंती; अन्यत्र-अभया, चेतकी, पथ्या, पूतना, हरीतकी, जया व हैमा- वती. ॰क्षार-पुअव. (सात औषधी क्षार)तिल, अपामार्ग, करंज, पलाश, अर्क, यव, चिंचा. यांबद्दल पाठमेदहि आढळतात, अष्टक्षार पहा. ॰सप्ताद्रि-पुअव. सप्तकुलाचल पहा. सप्ता- वस्था-स्त्रीअव. अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्षज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकभंग व निरंकुशा तृप्ति. सप्ताश्व-पु. ज्याचे रथास सात घोडे आहेत असा; सूर्य. सप्तास्त्र-पु. सप्तकोन -वि. सप्तकोनी. सप्ताह-पु. १ सात दिवसांचा काल; आठवडा. २ सप्ताह पारायण-न. सात दिवसांत एखाद्या ग्रंथाचें वाचन. सप्तोपचार-पुअव. वैद्यक शास्त्रांतील सात निरनिराळे उप- चाराचे प्रकार. पाचन, रेचन, क्केदन (स्वेदन), शमन, मोहन, स्तभ्भन, वर्द्धन.