मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

निगरगट, निगरगटा, निगरगट्ट      

वि.       १. निर्ढावलेला; कितीही बोलले तरी ज्याच्या मनावर काही परिणाम होत नाही असा; निलाजरा; कोडगा; निर्लज्ज; बेशरम. २. कठोर मनाचा; निर्दय. [सं. निगृ; क. निगरिसु]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

डांबरट, डांबऱ्या      

वि.       १. डांबरासारखा; डांबर लावलेला. २. निगरगट्ट; निर्लज्ज; कोडगा; निलाजरा; दांडगा; डांबीस; लबाड; बेरड. : ‘जमातच डांबरट आहे.’ –फकिरा ८६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

डांबरट, डांबर्‍या

वि. निगरगट्ट. [इं. डॅम्ड रॉट]

दाते शब्दकोश

घाय

पु. १ जखम. 'डोळां हरळ न विरे । घायीं कोत न जिरे ।' -ज्ञा १३.५३८. -एरुस्व १२.२२. २ शस्त्राचा वार, घाव, आघात. ' दुःखशोकांच्या घाई । मारिलियाची सेचि नाहीं । ' -ज्ञा ७.१०७. -र ५८. [सं. घात = प्रहार; प्रा घाय; का. हिं. गु. घाय] (वाप्र.) घायावर घाय घालणें-पहिल्या जखमे वरच दुसरा घाव घालणें; जखमेवर मीठ टाकणें; दुःखावर डागण्या देणें; मेलेल्यास मारणें. घायास येणें-अक्रि. संक टाच्या, नुकसानीच्या, दुःखाच्या परिस्थितींत पडणें, सांपडणें. सामाशब्द-॰कटर-कटार-खेंटर-वि. (राजा.) कोडगा; निगरगट्ट; लातबुक्या; लातखाऊ; निसूक; कितीहि मारलें किंवा रागावून बोललें तरी न सुधारणारा. [घाय + कट्टर?] ॰कुठार- खोर-वि थोडीशी इजा झाली असतां मोठ्यानें ओरडून फार इजा झाली आहे असें भासविणारा; कांद्यायखोर; कांघावखोर. [घाय + कुठार] ॰तेल-न. बिबा, राळ, आंबेहळद, गंधक, मोर चूत, रुईचें पान इ॰ तेलांत मिसळून खरुज इ॰ कांस लावण्या- करितां केलेलें मलम; यास भडकतेल असेंहि म्हणतात. घायभर- पु. चांगला प्रहार; सपाटून लागलेला वार. ॰वट-१ न. जखम; व्रण; घाव; -वि. घायाळ; जखमी झालेला. 'अडखळूनि आदळे पोट । म्हणे मी घायवट पडलों कीं । ' -एभा २२.६२५. 'अल्प घायवट उरलें ।' -कृमुरा २३.६३. [घाय + वट प्रत्यय] ॰वटणें- अक्रि. १ घाव लागून जखम होऊन जर्जर होणें; घायाळ होणें. २ (ल.) मनाला अतिशय अस्वस्थता वाटणें; कसेसेंच वाटणें; आजारी असणें, होणें. ॰वटा-पु. १ घाव; तडखा; प्रहार; २ जखम; व्रण. ३ अतिशय शीण. ॰वारा-वारें-पु. न. १ व्याकुळ झाल्यामुळें उत्पन्न होणारी भीति. 'वीरीं घेतलें घाय- वारें । म्हणती पळा रे पळा रे ।' -एरुस्व १२.१९. -भाए १५६. -कथा ६.१६.५५. [घाय + वारा]

दाते शब्दकोश

घायकटर, घायखेटर      

वि.       कोडगा; निगरगट्ट; लाथाबुक्याखाऊ; निसूक; कितीही मारले, रागावले तरी न सुधारणारा. (राजा.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घट्ट      

वि.       १. बळकट; मजबूत; भक्कम; घटमूठ (शरीर, मनुष्य, कापड इ.). २. घन; दाट; पाण्याचा अंश कमी असलेले (दही, दूध, पातळ पदार्थ). ३. पक्के आवळलेले; गच्च बसलेले; सैल नसलेले (झाकण, चौकट, पट्टी.). ४. दुःखाला न भिणारे; कठोर; हळुवार नसलेले (मन इ.) : ‘मन अंमळ घट्ट केलें पाहिजे.’ – रप्र १०६. ५. निलाजरा; निर्लज्ज; बेशरम; कोडगा; निगरगट्ट : ‘घट्ट मोठी हो जोगडी जाती ।’ – दावि ३४७. ६. अचाट; न डळमळणारे : ‘पहा धैर्य हें केवढें घट्ट ।’− दावि ३९. [क. ग (घ) ट्टी] (वा.) घट्ट करणे – पाठ करणे; घोकून मनात पक्के करणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घट्ट

वि. १ बळकट; मजबूत; भक्कम; घटमूठ (शरीर, मनुष्य, कापड इ॰). २ घन; दाट; पाण्याचा अंश कमी अस- लेलें (दहीं, दूध, पातळ पदार्थ). 'वरण घट्ट असावें.' 'आजचें दहीं चांगलें घट्ट आहे.' ३ पक्कें आवळलेलें; गच्च बसलेलें; सैल नसलेलें (झांकण, चौकट, पट्टी). 'पागोटें घट्ट बांध.' ४ दुःखाला न भिणारें; कठोर; हळुवार नसलेलें (मन इ॰). 'मन अमंळ घट्ट केलें पाहिजें.' रप्र १०६. ५ अचाट; न डळमळ- णारें. 'पहा धैर्य हें केवढें घट्ट ।' -दावि. ३९. ६ निलाजरा; निर्लज्ज; बेशरम; कोडगा; निगरगट्ट. 'घट्ट मोठी हो जोगडी जाती ।' -दावि. ३४७. [सं. घृष्ट; प्रा. घट्ठ किंवा सं. घट्, घट्ट; तुल॰ का. घट्टिसु = बळ येणें?] ॰करणें-सक्रि. पाठ करणें; घोकून घोकून मनांत पक्कें करणें. ॰द्रव्य-न. घन पदार्थ [घट्ट + द्रव्य = पदार्थ]

दाते शब्दकोश

झाड

पु. १ झोंट पहा. २ दांडगा; पुंड. -भवि ५३. १२२. ३ (विशेषतः) निगरगट्ट कूळ. 'नाहीं गळां पडलों झोंड ।' -तुगा १२५४. झोंडगी-स्त्री. निलाजरी; दांडगी स्त्री. 'झोंड झोंडगीचे पोटी । फळें विजाती करंटी ।' -तुगा २९७४. झोडणें पहा.

दाते शब्दकोश

झोंड      

पु.       १. पहा : झोंट. २. दांडगा; पुंड. ३. (विशेषतः) निगरगट्ट कूळ : ‘नाहीं गळां पडलों झोंड ।’ – तुगा १२५४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

काळखंडा      

पु.       १. खूप काळ जगलेला दुर्जन माणूस; ज्याने काळाचेही खंडन केले असा माणूस. २. कोडगा; निगरगट्ट.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कमरबस्तो      

वि.       निगरगट्ट; निर्लज्ज (मनुष्य). (गो.) [फा. कमर्बस्ता = तयार, सिद्ध]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कमरबस्तो

वि. (गो.) निगरगट्ट; निर्लज्ज (मनुष्य). [फा. कमर्बस्ता = तयार, सिद्ध]

दाते शब्दकोश

कोडगा

पु. लाथा, बुक्क्या इ॰ चा मार; हग्या मार. (क्रि॰ देणें). -वि. १ मार खाल्लेला; मारलेला; लतखोर. २ निर्लज्ज; निसवळलेला; कोटगा; निगरगट्ट. [का. कोट्टि = बेशरम; तुल॰ कोडण = माकड] ॰म्हलतकोडग्याची बलाय दूर, खाता पायपोस जाजा नूर. -गेखाऊ-वी. जो नेहमीं हग्यामार खातो पण दुर्गुण सोडीत नाहीं असा. -गेला-वी. कांहींसा कोडगा; हट्टी.

दाते शब्दकोश

कोडगेपणा

निलाजरेपणा, निर्लज्जपणा, गेंड्याची कातडी, लतकोडगा, कश्शाची म्हणून लाज नाहीं ! लाज कोळून प्यालेले, निगरगट्ट, निबरट, चामट, कसली क्षिती नाहीं, इरसाल, हुज्जतखोर, इब्लिस, दिवसाढवळ्या न कचरतां उघड्या माथ्याने कुकर्म करणारे, ना लाज ना मर्यादा ! कमरेचे काढून डोक्याला गुंडाळतील ! न लाजतां न मुरकतां, लाजभीड सोडून, बेदरकारपणे.

शब्दकौमुदी

खोसडखाऊ      

वि.       कोडगा; खेटरखाऊ; बेअब्रूचा; निगरगट्ट; अत्यंत मूर्ख.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

लत

स्त्री. (प्र.) लत्ता; लाथ. 'ज्ञानरहित सदा लत खाती ।' -दावि ७६१. [सं. लत्ता] ॰कुटा-ठा-कुटार-कोडगा-गाढव-खोर-खोरा-वि. निर्लज्ज; निगर्गट्ट; वाईट चालीस चिकटणारा; लाथाबुक्क्या-निंदा-शिव्या यांना न जुमानणारा. [लात + कुटणें, कोडगा] ॰खोरा-पु. १ बाहेरच्या चौकटीच्या उंबऱ्याप्रमाणें आंतल्या चौकटीचा खालचा आडवा तुकडा. २ (व. घाटी) जिन्याच्या पायरीस लावलेलें लाकूड. लताडणी- णें-(प्र.) लथाडणी-णें पहा.

दाते शब्दकोश

लत-कोडगा

(पु.) लाथा खाऊन निगर्गट्ट व निर्लज्ज झालेला.

फारसी-मराठी शब्दकोश

मडें-ढें

न. प्रेत; मुडदा; शव. 'देह पडतां म्हणती मडें ।' -दा १३.६.२३. [सं. मृत; प्रा. मड; का. मडि = मरणें] ॰पाताळावप-(गो.) ठार मारणें. मड्याच्या ताळ्याचें- ताळूवरचे लोणी खाणारा-पु. (ल.) अतिशय नीच व लोभी- मनुष्य. मड्यावर पाय देऊन जाणें-करणें-मरणोन्मुख मनुष्याकडेहि दुर्लक्ष्य करून (कांहीं जरुरीच्या कामानिमित्त) दुसरीकडे निघून जाणें. मेलें मडें आगीला भीत नाहीं- कोडग्या व निगरगट्ट माणसाबद्दल योजितात. म्ह॰ १ केश उप- टल्यानें काय मडें हलकें होतें? २ (गो.) मडें गेलें मसणा, त्याची ना वासना. ३ (व.) मड्यास शृंगार नाहीं रयतेला उपकार नाहीं. ॰कळा-स्त्री. १ मरणसमयीं तोंडावर येणारा फिकटपणा, पांडुरता. २ (ल.) केलेल्या गुन्ह्याच्या भीतीमुळें चेहऱ्यावर दिसणारा निस्तेजपणा. ॰पंचक-न. वैशाख महिन्यांतील धनिष्ठा नक्षत्रापासून पांच नक्षत्रांचा काल (धनिष्ठापंचक). या अवधींत मृत्यू फार होतात. ॰पेंड-न. मढ्याची जकात. -अस्पृ. ३८.

दाते शब्दकोश

मख्ख

वि० अभेद्य, निगरगट्ट.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

निचाड, निचाडा      

वि.       १. दांडगा; उद्धट; बेमुर्वत; अविनय. २. निरिच्छि; निष्काम. ३. निर्लज्ज; निगरगट्ट. ४. आवड, रुची, चव नसलेला. ‘गुळासारखा गूळ दगड । परी तो कठिण निचाड ।’ – दास ८·५·४७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निकरट

वि. १ निगरगट्ट. २ कठोर; निष्ठुर. 'निकरट परक्या- वाणी मला कां दूर अगदींच टाकीलें । घरीं दारीं कधीं दृष्टी पडेना कुठें रमता येकले ।' -होला ११५. [सं. निकृष्ट]

दाते शब्दकोश

निकरट, निकृट      

वि.       पहा : निगरगट्ट : ‘निकरट परक्यावाणी मला कां दूर अगदींच टाकीलें ।’ – होला ११५. [सं. निकृष्ट]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निरड(ढ)णें, निरढलणें

उक्रि. १ पक्कें करणें; पकविणें; राबविणें (नवीन, कोरे मडकें इ॰). २ (ल.) निरढावण्यास लावणें; निगरगट्ट करणें.

दाते शब्दकोश

निरडणे, निरढणे , निरढलणे      

उक्रि.       १. पक्के करणे; पकवणे; राबवणे (नवीन, कोरे मडके इ.). २. (ल.) निरढावण्यास लावणे; निगरगट्ट करणे. [सं. नि + रध्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निरढ(ढा)वणें

अक्रि. सरावणें; निगरगट्ट होणें; कोडगा बनणें.

दाते शब्दकोश

निर्लज्ज

बेशरम, निलाजरा, सर्व टीका पचविणारा, कोडगा, निगरगट्ट, कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळणारा, लाज कोळून प्यालेला, निर्लज्ज : सर्वदा सुखी, लाज कशाशीं खातात हें माहीत नाहीं, ना लाज ना खंत, लाजलज्जेच्या नांवाने इल्ला, सभ्यता नसलेला, जीवनाच्या कोणत्या तत्त्वज्ञानाचा अर्क ही मंडळी प्यायली आहेत ? निर्ढावलेला, भीति लाज- लज्जा ह्या भावना माणसांना असतात; तुला कोठल्या ? स्वर्गातल्या देवांना तरी भिऊन वागा.

शब्दकौमुदी

नफ्फट      

वि.       निगरगट्ट : ‘पण मी नफ्फटपणं बसून रहाते!’ – हेतो प्रबो ३३.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पटकोडगा

वि. पक्का निलाजरा; निगरगट्ट. [पट्ट + कोडगा]

दाते शब्दकोश

काळ

पु. १ वेळ; प्रसंग; समय. २ दुष्काळ; कठिण प्रसंग. ३ दैव; नशीब; परिस्थिति. 'हल्लीं आमचा काळ फिरला आहे ' -विवि १०.५-७.१२६. 'मला नाहीं काळ अनकूळ!' -मृ ७. ४ (व्या.) क्रियापदाच्या रूपविशेषावरून ती क्रिया अमक्या वेळीं घडली असा जो बोध होतो तो. [सं. काल] (वाप्र.) ॰अनुकूल होणें-नशीब फळफळणें. ॰कंठणें-व्यर्थ काळ दव डणें; वेळ घालविणें; दिवस काढणें. ॰विन्मुख होणें-फिरणें, काळानें घेरणें-वेढा घालणें-नशीब किंवा दैव वांकडें होणें; वाईट दिवस येणें. काळाची गांड मारणें-कसा तरी घालविणें. -ळानें ओढणें-बोलावणें-नशिबानें संकटांत किंवा मृत्युमुखीं पडणें -नें घेरणें-मृत्यु येणें. 'चिमणा बापूस लौकरच काळानें घेरलें.' -विवि ८.७.१२८. -नें मागें पाहणें-नशीब किंवा परिस्थिति प्रतिकूल होणें. -नें हातीं धरणें-नशीब किंवा परिस्थिति अनुकूल होणें. 'त्याला काळानें हातीं धरलें आहे.' -ळावर दृष्टि ठेवणें-देणें-नशिबावर किंवा पुढें येणार्‍या परिस्थितीवर, भविष्यावर अवलंबून राहाणें; परिस्थिति पाहून वागणें. 'तिची काळावर दृष्टि आहे.' चालता काळ-भरभरा- टीचे दिवस, आयुष्य; हातीं घेतलेल्या कामांत ज्यावेळीं सारखें यश येत असतें असे दिवस. याच्याउलट पडता काळ. 'बा तुझा चालता काळ; खायला मिळती सकळ ।' -अमृत ११८. काळो- काळ भविष्यति (सं. काले काले भविष्यति)-केव्हां तरी होणें याअर्थीं. म्ह॰ (व.) काळा अंतीं बरबट्या दुष्का- ळांत बरबट खाणेंहि मनुष्य खातो त्याप्रमाणें अडचणींत सांप- डल्यावर मनुष्य हलकें काम करण्यास तयार होतो. सामाशब्द- ॰काळ-क्रिवि. प्राचीन काळा पासून; पौराणिक काळापासून. ॰खंडा-पु. १ बहुत दिवस वांचलेला दुर्जन माणूस; ज्यानें काळा- चेंहि खंडन केलें असा. २ कोडगा; निगरगट्ट. ॰गत-स्त्री. १ काळ- गति. [कालगति] २ ठराविक काळाच्या पुढें गेलेला वेळ; वेळेचा अपव्यय (या अर्थीं दिवसगत हाहि शब्द अधिक रूढ आहे). ॰दुपार्‍या-वि. (निंदाव्यंजक) माध्यान्ह उलटल्यावर जेवणारा. ॰धात-स्त्री. जगाच्या बरेवाईटपणास कारणीभूत असलेली कालाची शक्ति; काळवेळ. 'यंदा काळधातच अशी आहे म्हणून शेती पिकली नाहीं.' ॰प्रसंग-पु. वेळप्रसंग; संधिसमय, यांना व्यापक संज्ञा. जो काळप्रसंग पाहतो तो शहाणा.' ॰वशें-क्रिवि. कालांतरानें; कालानुसार; योग्य काल आल्यावर. ॰वार-पु. अशुभ दिन; (जोशी किंवा शूद्र लोकांत) घातवार. ॰वेला-ळा- स्त्री. १ शिवालिखीत ग्रंथांमधील अशुभ वेळ. वेळ पहा. २ वेळ- प्रसंग; काळप्रसंग पहा. ३ मृत्यूची वेळ. 'या परि ते काळवेळा । रायें राखिली तये वेळां ।' -कथा १.२.१२१. ॰वेळ-स्त्री. १ वाईट किंवा संकटाचे दिवस; कालकल्ला पहा. 'काळवेळ सांगून येत नाहीं.' २ वेळप्रसंग; हंगाम; योग्य वेळ, संधि. 'जें कांहीं करणें तें काळवेळ पाहून करावें.' ३ सामान्यतः वाईट किंवा अशुभ वेळ. ॰शुद्धि-स्त्री. शुभ वेळ; पवित्र वेळ. 'काळशुद्धि त्रिकाळीं । जीवदशा धूप जाळी ।' -ज्ञा १३.३८८. काळाचा काकडा-पु. दणकट, बळकट म्हातारा; निरोगी, खडस, टणक म्हातारा; भयंकर धोक्यांतून निभावलेला माणूस. काळांतरीं-क्रिवि. (नास्त्यर्थीं) भविष्यकाळींहि नाहीं; केव्हांहि नाहीं. 'ही गोष्ट काळां- तरींहिं व्हावयाची नाहीं.' २ थोडे दिवस गेल्यावर; कांहीं कालानें; 'हें कांहीं काळांतरानें होईलसें वाटतें.' -ळांतून ओढलेला-वि. दुष्काळांतून जेमतेम वांचलेला; अतिशय लुडका; जरत्कारू. काळींकाळीं-क्रिवि. योग्य वेळीं; जेव्हां जेव्हां पाहिजे असेल त्या त्या वेळीं; 'पर्जन्य तोहि उपका रार्थ । काळीं काळीं वृष्टि करित ।' -निमा १.९८. [सं. काले काले] काळें करून-क्रिवी. थोड्या वेळांत; काहीं काळानें; योग्य वेळीं; थोड्या वेळानें. 'काळे करूनि सुख जोंवरि होय लेखीं ।' -र २७. काळेंचि-क्रिवि. तत्काळ. 'जें विटोनि विकारी होत । तें अपुनीत काळेंचि' -एभा २१.११७. काळो काळ-क्रिवि. १ बहुत प्राचीन काळापासून; अनादि काळापासून. २ पुन्हां पुन्हां (नकारार्थीं). 'माझी विनंति आपण ऐकावी, मी काळोकाळ मागायचा नाहीं.

दाते शब्दकोश