मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

नियम

पु. १ कायदा; आज्ञा; आदेश; निर्बंध; ठराव; कलम. 'वसंतामध्यें कोकिलांनीं शब्द करावा असा नियम आहे' २ ठराविक चालरीत; वहिवाट. 'आम्ही एकवेळ जेवण्याचा नियम केला आहे.' ३ रूढी; आचारपरंपरा; पद्धत. ४ उपवास, जागर, यात्रा इ॰ स्वेच्छेनें करावयाच्या धार्मिक गोष्टी, तसेंच आवश्यक असें धार्मिक कर्म, विधि इ॰ ५ ठरलेली गोष्ट; संकेत; ठराव. ६ (योगशास्त्र) अष्टांगांपैकीं दुसरें अंग (मनोजय). ७ निग्रह; निरोध. 'एवंमनपवन नियमें । होती दाही इंद्रियें अक्षमें ।' -ज्ञा १६.१८५. [सं.] नियमणें-सक्रि. नियम, निग्रह करणें. 'स्त्रीविषयीं नियमिजे । नांवें नांवें ।' -ज्ञा १७.२१०. नियमन- न. निग्रह; दाब; शासन; आळा; बांधा. 'मनाचें नियमन केलें असतां ईश्वरप्राप्ति लवकर होते.' २ अंमल; अधिकार. ॰निष्ठ-वि. कडकडीतपणें, नियमितपणें धार्मिक विधि पाळणारा, करणारा; नेमनिष्ट. ॰निष्ठा-स्त्री. आवश्यक करावयाच्या नित्यकर्मांचें (स्नान-संध्यादींचें) निष्ठापूर्वक पालन; त्या कर्मांविषयीं आदर. ॰पत्र-न. आज्ञापत्रक; नियमांचा कागद. पत्र पहा. ॰विधि-पु. नियमासंबंधीं स्थलकाल इत्यादि निदर्शक गोष्टी; नियमाचें दिग्दर्शन. प्राप्त जें कांहीं कर्म त्याचा अमुक कालीं करावें असा अदृष्टार्थ नियम करणें. 'आपत्काळीं पुत्रदान करावें असा नियमविधि जो केला त्याचें दृष्टफल तर संभवत नाहीं.' -मिताक्षरा. ॰शील-वि. १ नियम निष्ठ पहा. २ केलेल्या नियमाप्रमाणें नेहमीं वागणारा. ॰संयम- पु. १ ज्ञानेंद्रियें व कर्मेंद्रियें यांना ताब्यांत ठेवणें. २ अशी निग्रह- शक्ति प्राप्त होण्यासाठीं करावयाचे कांहीं विधी, आचरण. (क्रि॰ धरणें). 'यंदा चातुर्मास्यांत कांहीं नियमसंयम धरले.' निय- माचा-वि. १ नियमित; व्यवस्थित; पद्धतवार. २ विचारी; स्थिर; अचंचल. ३ सदाचरणाच्या नियमांनीं वागणारा. 'मोठा गेला नियमाचा !' -क्रिवि. नेमानें; न चुकतां; हटकून; नियमित पणें. 'मी जेवायास बसतों तेव्हां वारा येऊन नियमाचा दिवा जातो.' नियमित-वि. १ नेमलेला; नक्की केलेला; ठराविक; ठाम. २ दाबांत ठेवलेला; निग्रहीत; शासित. ३ नेमून दिलेला; निर्दिष्ट; नियम. नियमी, नियमिष्ठ-वि. १ नियमनिष्ठ पहा. २ नियमाचा पहा. नियम्य-वि. १ निग्रह करण्यास, दाबांत ठेव- ण्यास, नियमन करण्यास योग्य, आवश्यक. २ ठाम, निश्चित करा- वयाचा; नेमावयाचा; नियमित करणारा योग्य. नियामक-वि. १ ताब्यांत ठेवणारा; शासन करणारा; निग्रह करणारा. 'गांवींचे देवळेश्वर नियामकचि होती साचार ।' -ज्ञा १८.५७०. २ निय- मित, ठाम, निश्चित करणारा; नेमणारा; नियंता; नेमणूक करणारा. ३ गति वगैरेचें नियंत्रण करणारे यंत्र (गव्हर्नर). नियामक मंडळ-न. शासन करणारी संस्था. (इं.) गव्हर्निंग बॉडी.

दाते शब्दकोश

नियम m A rule, law. A regular practice Any religious observance voluntarily practised or obligatory.

वझे शब्दकोश

नियम niyama m (S) A rule, law, ordinance, appointment, regulation, statute. 2 A regular practice or custom. 3 Established order or method. 4 Any religious observance voluntarily practised; as fasting, watching, pilgrimage &c., any act of supererogatory piety: also any obligatory religious observance. 5 An engagement; an appointment; a matter fixed or settled.

मोल्सवर्थ शब्दकोश

(सं) पु० कायदा, वहिवाट, ठराव.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

वाङ् नियम

वाङ् नियम vāṅ niyama m S (वाक् & नियम) वाङ् निश्चय m S (वाक् & निश्चय) A rule imposed or formed of keeping silence for a given period. 2 वाङ् नियम is further A law or rule of speech.

मोल्सवर्थ शब्दकोश

अग्रता नियम      

पु.       प्राधान्य देण्याचे नियम.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दामदुपटीचा नियम      

धनकोने ऋणकोपासून कोणत्याही एका वेळी मुद्दलापेक्षा अधिक व्याज न घेण्याबद्दलचा हिंदू धर्मशास्त्राचा नियम. दामदुप्पट, दामदुसा      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ईश्वरी नियम, ईश्वरीनेम, ईश्वरी नेमानेम      

पु.       दैवी घटना; ब्रह्मलिखित; सृष्टिनियम.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नित्य नियम, नेम      

१. नियमाने नित्य करण्याचा परिपाठ. २. शास्त्रात अमुक कर्म नित्य करावे असे सांगितले नाही परंतु नित्य केले तर विशेष पुण्यकारक म्हणून सांगितले आहे अशी कर्मे. नित्य नैमित्तिक      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नियम      

पु.       १. कायदा; आज्ञा; आदेश; निर्बंध; ठराव; कलम. २. ठरावीक चालरीत; वहिवाट. ३. रूढी; आचारपरंपरा; पद्धत. ४. उपवास, जागर, यात्रा इ. स्वेच्छेने करण्याच्या धार्मिक गोष्टी; आवश्यक धार्मिक कार्य, विधी. ५. ठरलेली गोष्ट, संकेत; ठराव. ६. (योगशास्त्र) अष्टांगांपैकी दुसरे अंग; इंद्रियनिग्रहासाठी करण्याचे आचरण. ७. इंद्रियांवरील ताबा; निग्रह; निरोध : ‘एवं मनपवन नियमें । होती दाही इंद्रिये अक्षमें ।’ – ज्ञा १६·१८५. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धडा

पु. १ विवक्षित मुदतींत तयार करण्यास पंतोजीने शिष्याला नेमून दिलेला, पाटी इ॰ कांवर लिहून दिलेला पाठ. २ (पुस्तक इ॰ कांतील) पाठ. 'तीसर्‍या पुस्तकांतील शेवटला धडा वजनाविषयीं आहे.' ३ (ल) (एखाद्यास)वर्तनाच्या बाबतींत घालून दिलेली नियम; शिस्त; उदाहरण; (काम इ॰ करण्याकरिता घालून दिलेली) पद्धत; सरणी. वहिवाट; रिवाज. 'कासया पडिला जी धडा । उगाचि वेडा आणि वांकडा ।'-तुगा ७१६. 'यजमान धडा । घालून देतो त्याप्रमाणें गुमास्ते वागतात' ४ हिय्या; हिंमत; धाडस; निश्चय. 'आतां मनाचा धडा करून करंजा खातों.' -कफा २.५ (एखादी वस्तु मिळाल्यानें)विवक्षित कालपर्यंत ती मिळविण्याविषयीं होणारी निश्चिंतता. 'एक पितांबर घेऊन ठेविला म्हणजे बारा वर्षांचा धडा होतो.' [सं.द्दढ ?] ॰घेणें- शिकणें; बोध घेणें.

दाते शब्दकोश

धडा      

पु.       १. विशिष्ट मुदतीत तयार करण्यासाठी पंतोजीने शिष्याला, शिक्षकाने विद्यार्थ्याला नेमून दिलेला, पाटी इ.वर लिहून दिलेला पाठ. २. पुस्तक वगैरेतील पाठ. ३. (ल.) एखाद्याला वर्तनाच्या बाबतीत घालून दिलेला नियम; शिस्त; उदाहरण; काम करण्याबाबत घालून दिलेली पद्धत, सरणी, वहिवाट, रिवाज. ४. हिय्या; हिंमत; धाडस; निश्चय. ५. एखादी वस्तू मिळाल्यावर विशिष्ट काळापर्यंत येणारी निश्चिंतता. ६. बोध.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

अधिस्थापन नियम      

पु.       (भूशा.) गाळांचे खडक एकावर एक आडवे समांतर रचले जातात. त्यावरून त्यांचा सापेक्ष काल ठरवण्याचा नियम [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

विधि-धी

पु. १ नियम; शास्त्राची आज्ञा; वेदविहित क्रिया, कर्म वगैरे. 'विधीतें पाळित । निषधातें गाळित ।' -ज्ञा १२.७७. २ पद्धति; कर्म करण्याची रीत; धार्मिक कृत्याचा प्रयोग. उदा॰ उद्यापनविधि; उपासनाविधि; दामविधि; स्नानविधि; होम- विधि; व्रतविधि; पूजाविधि. 'क्रियाविशेषें बहुतें । न लोपिती विधीतें । निपुण होऊन धर्मातें । अनुष्ठिती ।' -ज्ञा २.२४९. ३ सामान्यतः नियम; आज्ञा; विधान; अनुशासन; आदेश; कल्प. 'विधि हाचि मान्य आहे ।' -मोआदि ४.१४. ४ दैव; प्रारब्ध; नशीब. 'स्थिर न राहे माझी बुद्धि । तरी हा आपुलाचि विधि । सुजाण राया ।' -कथा ६.१९.१५९. ५ ब्रह्मदेव; सृष्टिकर्ता. 'तें निर्मितो विधि विभूषण भूमिकेचें ।' -वामन स्फुटश्लोक (नवनीत पृ १४१). 'अतर्क्य महिमा तुझा गुणहि फार बाहे विधी ।' -केका १४०. ६ शास्त्रवचन; धर्मग्रंथातील वाक्य, आधार; प्रमाण. ७ तऱ्हा; प्रकार; रीत. 'गऱ्हवारे हा विधी । पोट वाढविलें चिंधी ।' -तुगा ६२५. 'लिहिल्या विधे येईन मी त्वरें ।' -होला ३४. ८ योजना; क्रिया. 'कवण कार्याचिये विधि । तुम्ही आलेती कृपानिधि ।' -एरुस्व ३.४३. [सं. विध् = विधान करणें] ॰अंड- न. ब्रह्मांड; विश्व; भूगोल. 'तडतडि विधिअंड त्रास दे...' -वामन- सीता स्वयंवर. [विधि + अंड] ॰किकर-पु. कर्मांचा दास. 'मग विधिकिंकर तो नव्हे ।' -यथादी ३.२२९९. ॰दृष्ट-वि. वेदविहित; शास्त्रोक्त; साधार; सप्रमाण. ॰निषेध-पु. अमुक बरें, अमुक वाईट, अमुक करावें, अमुक करूं नये यासंबंधी नियम; बंधन; नियम; कर्तव्याकर्तव्य. 'एथ सारासार विचारावें कवणे काय आचारावें । आणि विधिनिषेध आघवे । पारुषता ।' -ज्ञा १.२४६. [विधि + निषेध] ॰निषेधातीत-वि. १ ब्रह्मज्ञान प्राप्त होऊन मुक्त स्थितीस गेल्यामुळें ज्यास सामान्य धर्मनियम बंध- नकारक नसतात असा; सर्व नियमांच्या पलीकडे गेलेला. २ (उप.) स्वैर, अनिर्बंध वागणारा. [विधि + निषेध + अतीत] ॰पूर्वक-वि. नियमानुसार; यथासांग; योग्य प्रकारें. [विधि + पूर्वक] ॰भंजक- वि. (व्या.) नियम मोडणारा; सामान्य नियमांत न येणारा; अपवादभूत. [विधि + भंजक] ॰भंजन-न. नियम मोडणें; अप- वाद होणें. ॰मंडळ-न. कायदे, नियम करणारी संस्था, सभा. (इं.)लेजिस्लेटिव्ह कौन्सिल. ॰मंत्र-पु. विधियुक्त मंत्रसंस्कार; निय- मानुसार सर्व धर्मकृत्य. 'मग जाहला विधिमंत्र । चारी दिवसा ।' -कथा १.७.०७. ॰मुख-न. सच्चिदानंद स्वरूपाचे वर्णन. -हंको. ॰युक्त-वि. विधिपूर्वक; शास्त्रोक्त; वेदविहित; शास्त्राज्ञेप्रमाणें. ॰लिखित-लिपी-स्त्री. लल्लाटरेषा; ब्रह्मलिखित. 'आपले सुख खास गमावशील ही विधिलिपी समज.' -कल्याणी, नवयुग. ॰वत्-क्रिवि. विधिप्रमाणें; शास्त्रोक्त; यथायोग्य; वेदविहित पद्धतीप्रमाणें. ॰वाक्य-न. शास्त्रवचन; वेदवचन; वेदवाक्य. ॰वाचक धातुसाधित-न. कर्तव्यबोधक धातुसाधित; नियम घालून देणारें धातुसाधित. उदा॰ करावें; धरावें इ॰. ॰विधान- न. शास्त्राज्ञा किंवा नियम यांस अनुसरून सांगणें, बोलणें, योजणें ठरविणें, वर्तन करणें. [विधि + विधान] ॰विवर्जित-वि. शास्त्र- मर्यादेचें बंधन नसलेला; नियमांपलीकडील 'मज विधिविवर्जिता व्यवहारु । आचारादिक ।' -ज्ञा ९. १५७. ॰विवाह-पु. यथा- विधि लग्न. 'निर्धारेसीं तुझी जाया । मी जाहलेंसे यदुराया । विधिविवाह तुंवा कीजै ।' -एरुस्व ४.१४. ॰विशेषण-न. (व्या) क्रियापदाबरोबर योजलेला गुणवाचक शब्द; विशेषणाचा एक प्रकार. ॰वृत्ति-स्त्री. (निषेधवृत्तीच्या उलट) प्रत्यक्ष कृति, क्रिया करावयासाठीं आज्ञा करण्याची पद्धति, रोख, तऱ्हा, स्थिति, निय- मन. -वि. (निषेधक नव्हे तें) प्रत्यक्ष नियम, कृति, कार्य सांग- णारें; अनुज्ञापक. ॰संकुचित-संकोचित-वि. नियमबाह्य; अप- वादभूत; नियमांत न येणारें ॰संकोच-पु. अपवाद. विद्युक्त- वि. वेदविहित; शास्त्रांत सांगितलेलें; धर्मग्रंथांत सांगितलेलें. 'किती आच्मनें शौच्य विद्यूक्त चाले ।' -दावि १७९.४. -अप विध्योक्त. 'श्रीराम समर्थ विध्योक्त अर्चनें ।' -सप्र ११.१३५. [विधि + उक्त]

दाते शब्दकोश

नेम

पु. १ नियम पहा. -अमृ ५.५०. 'नेमाचा झाला कळस ।' २ उद्दिष्ट; हेतु; लक्ष्य; साधन. (क्रि॰ बांधणें; धरणें; लावणें). ३ माप. (क्रि॰ घेणें; देणें). [सं. नियम] लावणें- नियम करणें; मार्ग, रीत लावणें. 'ह्यास्तव अवतरला तुकाराम । साधकास नेम लावावया ।' ॰सारणें-नेमधर्म, नित्याचार उर- कणें. 'पार्थें स्नान करून सकळ । नेम आपुला सारिला ।' -ह ३२.१७४. ॰धर्म-पु. शास्त्रनें सांगितलेले धार्मिक आचार- विचार, नियम. ॰निष्ठ-ष्ठा-शील, नेमाचा-नियमनिष्ठ-ष्ठा पहा. 'नेमनिष्ठ वैष्णव ते विष्णुपूजा समर्पिती ।' -होला. ॰पण-न. नियम; व्रत. 'नेमपण टाळतां अवतारकृत्य संपलें ऐसें जाणिजे ।' -दावि ३५. नेमक-वि. १ नेमानें वागणारा. 'नेमक निग्रह तापस ।' -दा १.८.९. २ मोजकें, परिमित. (भाषण, बोलणें). 'नेमक बोलतां अंतरें । निववी सकळांचीं ।' -दा १९.१०.६. ॰पण-न. नियमित आचरण, वर्तन, शिस्त. 'कांहीं नेमकपण आपुलें । बहुत जनासीं कळों आलें ।' -दा १९.३. २३. नेमका, नेमकाच-क्रिवि. १ पाहिजे असलेला; नेम धरल्या- प्रमाणें बरोबर. (ल.) संकल्प, बेत केल्याप्रमाणें; अपेक्षित तोच २ वेळेवर; प्रसंगोपात्त. नेमळ-ळ्या-वि. १ अगदीं नियमा- प्रमाणें वागणारा; वक्तशीर; शिस्तीचा; ठाकठिक्या. २ नेमधर्म पाळणारा; अगदीं कट्टर धार्मिक. 'ऐशा रीती भक्त नेमळ । हरुषें वोसंडत तये वेळें ।' नेमाड्या-वि. दगड इ॰ कांचा अचूक नेम मारणारा. नेमानेम-पु. १ योजना आणि निश्चय (ईश्वरी, दैवी). योगायोग; अदृष्ट. २ वहिवाट; चाल; सामान्य नियम; नेहमींचा परिपाठ. नेमावणी-स्त्री. १ नोंदणी. 'तुळाजी आंग्रे यांचे कार- कीर्दीस नेमावणी करावयाची ताकीद जाहली...' -थोमारो २.१४२. २ शेत लावणें. -भाद्विसंवृ ६८. नेमिष्ठ, नियमिष्ठ, नेमी, नियमी-वि. नेमळ पहा.

दाते शब्दकोश

नेम m See नियम.

वझे शब्दकोश

नेम nēma m From नियम which see throughout. Ex. नेमाचा जाला कळस ॥ कासया व्यर्थ उफणूं भूस ॥ लेखणी न धरी ॥. 2 Aim. v बांध, धर, लाव. 3 Measure. v घे दे. नेम लावणें To lay down or establish a law or rule (or laws and rules); to appoint an order or a course of procedure. Ex. ह्यास्तव अवतरला तुका- राम ॥ साधकास नेम लावावया ॥.

मोल्सवर्थ शब्दकोश

(सं) पु० नियम. २ खूण, शिस्त. ३ व्रत.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

नीति

स्त्री. १ व्यवहारशास्त्र; नय, आचार-व्यवहाराचे नियम; शिष्टाचार. २ युक्तता; योग्यता; न्याय्यता; न्याय. ३ सदाचाराचे नियम; सृष्टि-नियम-व्यवस्था. ४ राजनीति-धर्म- शास्त्र. ५ नियम; कायदा; मर्यादा; निश्चितपणा; ठराविक परिणाम. 'किंवा मेघधारा वर्षिति ।नाहीं नीति त्यातें ।' (समासांत) धर्म- प्रपंच-लोक-व्यवहार-शास्त्र-नीति; तसेंच:-अंगद-नारद-बृह- स्पति-विदुर-शुक्र-नीति. ( = अंगद, नारद इ॰ व्यक्तीनीं सांगित- लेले शास्त्रीय व व्यावहारिक नियम) [सं.] ॰भेद-पु. (सांप्र- दायिक अर्थ) प्रमाण-परिमेयादि शास्त्र; तत्वभेद. कोणी अर्थ- शास्त्र तर कोणी वैशेषिक दर्शन असा याचा अर्थ घेतात. 'तरी तर्कु तोचि फरशु । नीतिभेदु अंकुश ।' -ज्ञा १.११. ॰मान- वान-वंत-वि. न्यायनीतीनें वागणारा; सदाचारी; सत्प्रवृत्त. ॰शास्त्र-न. नीतीचें प्रतिपादन करणारें शास्त्र. (इं.) एथिक्स. ॰शिक्षण-न. नीतीचें, सदाचाराचें शिक्षण (शाळांतून दिलें जाणारें). -अध्यापन १०६.

दाते शब्दकोश

कानू

स्त्री. १ (कायदा) अट; नियम; ठराव. म्ह॰ कान द्यावा पण कानू देऊं नये (ही म्हण खंडकर्‍यांत प्रचलित आहे) = कांहीं झालें तरी नवीन कराचें ओझें येऊन पडूं नये म्हणून यत्म करावा. 'त्यांनीं अशी कानू कधीं आपणावर चढवून घेतली नाहीं ते आतां कसें कबूल करितील.' -ख २.६१३. २ हक्क; रीत; वहिवाट. 'कान देऊं पण कानू सोडणार नाहीं.' ३ बाजारांत विक्रीला आलेल्या जीन्नसावरील द्यावयाचा कर, पट्टी. 'हल्ली सालोसाल नजरेची कानू गांवगन्नास बसविली ते दूर करावी.' -ऐटि २.४१. ४ नियम; कायदा. 'पूर्वापार यास माफ असतां हालीं कानू करावयास कायी गरज.' -रा २०.३६०. [अर. कानून्; तुल॰ इं. कॅनन] ॰कनात-स्त्री. चाल; रीत; कायदा; हक्क. ॰काननात-कर, पट्टी वगैरे. 'वेठी, जेठा व बाजे कानू-कान- नातीचा उपसर्ग न देणें.' -रा २०.३६०. [कानू + काननात (कानुन्चें अव.)] ॰कायदा-पु. (राजशासन) कायदेकानू, नियम, ठराव वगैरेनां समुच्चयानें योजितात. [कानू + कायदा] ॰जापतापु. सरकारी कायदेकानूंचें पुस्तक, कोड. कानूंचें पुस्तक. ॰बाब-स्त्री. एक कर. पूर्वीं मराठी मुलुखांत जमीनदार हा कर बसवीत असत.

दाते शब्दकोश

(आ) पु० कायदा, नियम, शास्त्र.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

नीति, नीती      

स्त्री.       १. व्यवहारशास्त्र; नय; आचारनियम; शिष्टाचार. २. योग्यता; न्याय. ३. सदाचाराचे नियम; सृष्टिनियमव्यवस्था. ४. राजनीतिधर्मशास्त्र. ५. नियम; कायदा; मर्यादा; निश्चितपणा; ठरावीक परिमाण. (समासात) धर्म - प्रपंच - लोक - व्यवहार - शास्त्र - नीती; तसेच अंगद - नारद - बृहस्पति - विदुर - शुक्र - नीती. ( = अंगद इ. व्यक्तींनी सांगितलेले शास्त्रीय व व्यावहारिक नियम.) [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

सध्दर्म

पु. १ चांगला गुणधर्म; सुलक्षण २ चांगला धर्म; चांगला नियम, वृत्ति, विधि. ३ सदाचार; चांगली वागणूक; सदाचरण; न्याय्य वर्तन [सं.] सद्धर्म बाळगणें-संभाळणें- राखणें--धार्मिक विधि, नियम, व्रत वगैरे आचरणें. सद्धर्म सोडणें-टाकणें-धार्मिक विधि, रूढी, व्रतें, नियम यांचा त्याग करणें. सद्धर्मानें वागणें-चालणें-राहणें-असणें- न्याय, योग्य, रास्त वर्तन करणें; सदाचारी होणें सध्दर्माला जागणें-योग्य, प्रामाणिक, नैतिक आचरण ठेवणें.सद्धर्मास येणें-नैतिक, धार्मिक, प्रामाणिक वर्तनाच्या कसोटीस उतरणें; योग्य, रास्त दिसणें, वाटणें. सध्दर्मावर टाकणें-घालणें- लोटणें-सोडणें-एखाद्याच्या सदसद्विवेकबुद्धीवर अवलंबून ठेवणें; सदसद्विवेकबुद्धीचा आश्रय घेणें; सद्बुद्धीवर सोंपविणें. सद्धर्मी-वि. सद्गुणी; न्यायी; नीतिमान; योग्य वर्तनाचा.

दाते शब्दकोश

शेरा

पु. १ नियम; कायदा; पद्धति; घालून दिलेली रीत; रूढी; प्रचार; परंपरा; धारा. २ (कोर्टदरबारीं) पत्र, अर्ज वगैरेच्या खालीं लिहिलेलें उत्तर किंवा हुकूम. 'आपण म्हणता तसें आम्हांस करतां येत नाहीं असा शेरा मिळाला.' -टिले ४.४.९१. निकालाचा लेख याअर्थी शेरेअर्जी; शेरेयाद; शेरेहुकूम; शेरेपत्रक हे शब्द रूढ आहेत. येथें अर्ज, याद, पत्रक व त्यांवरील लिहिलेले हुकूम असा अर्थ होतो. ३ नकल करून घेतल्यावर मूळ कागदावर तशा अर्थाचा लिहिलेला लेख. ४ तपासनीसानें कागदावर आपलें मत व्यक्त करणारा लिहिलेला लेख. ५ कोणत्याहि कामासंबंधीं नियम, पद्धती वगैरे घालून देणारा लेख; दिग्दर्शक यादी; नियमावली. ६ टीका. ७ शिफा- रस. 'शेरे झटती लोकलोकांचे ।' -ऐपो २३८. [अर. शरआ = नियम]

दाते शब्दकोश

पु. पीरावर बांधलेल्या पुंज; चादर. [अर शरआ = नियम]

दाते शब्दकोश

यम

पु. १ नियमन; ताब्यांत ठेवणें; इंद्रियदमन; राग, विकार, इंद्रियें यांचें दमन; आत्मसंयमन. २ अष्टांग योगांतील पहिलें अंग. तीं आठ अंगें येणेंप्रमाणें:-यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधि. यम या अंगांतील पांच प्रकार, भाग यांबद्दल सामान्यतः योजतात. ते पांच प्रकार याप्रमाणें-अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह. [सं. दे. प्रा. जम; सं. यम् = ताब्यांत ठेवणें] ॰नियम-पुअव. १ आत्मसंयमनासाठीं करावयाचीं कृत्यें; नियोजित व ऐच्छिक व्रतें; अष्टांग योगांतील पहिलीं दोन अंगें. नियमाचे पांच अवयव याप्रमाणेः-शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान. 'यम नियय दोघे द्वारपाळ । अखंडित सावध अविकळ । अंतर्बाह्य वृत्ति करूनि निश्चळ । दोघे दोहीं बाहीं । उभें ।' -स्वादि १०.२.२८. २ आत्मसंयमनाचे नियम; यमाचे नियम. ॰नियमसाधनी-वि. इंद्रियें, राग, विकार इ॰ ताब्यांत ठेवणारा; आत्मसंयमी व व्रत- वैकल्यें यथायोग्य करणारा; योगी. यमणें-सक्रि. (काव्य) नियमन करणें. 'यमु म्हणे काय यमावें । दमु म्हणें कवणातें दमावें । ' -ज्ञा ९.१९९. यमन-न. दमन; ताब्यांत ठेवणें; निग्रह; संयमन. [सं.] यमी-वि. १ यमनियमन किंवा यम साधणारा; संयमी; इंद्रियनिग्रही; योगी. २ ताब्यांत ठेवणारा; नियमन करणारा; आंवरून धरणारा.

दाते शब्दकोश

यम yama m S Restraining, confining, controlling. (As distinguished from नियम Any religious and voluntary observance.) Restraint or government of the senses, affections, and passions. 2 The eight great observances or courses incumbent upon one who would work out his salvation (i. e. emancipation from personality and absorption into Brahma) are यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधि. 3 A common term for five great acts or excellencies; viz. Refraining from violence, patience, sincerity, obedience to a Guru, observance of all purificatory ceremonies.

मोल्सवर्थ शब्दकोश

धारा

पु. १ (भाडें, विक्री. चाकरी, धंदा इ॰ व्यवहारा- विषयींचा) संप्रदाय, शिरस्ता, वहिवाट, नियम. 'शिवाजी महा- राज यांचे वेळचे धारे यांनीं राज्य चालवावें.' -मराचिथोशा ३२. 'दहा कोसांस एक रुपया द्यावा असा आमच्या गांवांत भाड्याचा धारा पडला आहे.' २ (शेत जमीन, बागाईत इ॰ कांवरील) सरकारी कर, वसूल, सारा. [सं. धृ; म. धारा; प्रा. धार. हिं धारा; गु. धारो] सामाशब्द- ॰करी-पु. धारेकरी पहा. [धारा + कर] ॰पेंडोळा-पु. १ (व्यवहारांतील, बोली करण्याचा, मोल ठर- विण्याचा) नेहमींचा, साधारणपणें पडलेला शिरस्ता, वहिवाट, नियम. २ पूर्वापार, परंपरागत पद्धत, वहिवाट. 'शेतीचा धारापेंडोळा त्या कुणब्यानें मिळविला.' ३ (ल.) कुटुंबाचा वंश- परंपरागत लौकिक, सोयरीकसंबंध, लागाबांधा इ॰. (क्रि॰ मिळणें, पटणें, लागणें, मिळवणें, दाखविणें, लावणें). 'तुमचा आमचा धारापेंडोळा मिळाला म्हणजे मुलगी देईन.' [धारा = सरकारी सार्‍याची रकम + पेंडोळा = शेतीची मर्यादा, बांध] ॰सभा-स्त्री. (गुं.) कायदेमंडळ; कायदेकौन्सिल. 'या गार्‍हाण्यांची दाद लाव- ण्याच्या त्या कालच्या मार्गाचेच हल्लींच्या काळीं न्यायखातें, धारा सभा असें भाग पडलें आहेत.' -पार्ल १५. [धारा = नियम + सभा; गु. धारासभा] ॰धारेएहसान-न. सरकारनें कृपेनें कमी केलेला सारा. [धारा + अर = इहसान् = कृपा, उपकार] धारेएहसानी-वि. जीवरील सारा कमी केलेला आहे अशी (जमीन इ॰). [धारे एहसान] धारेकरी-पु. ज्याला सरकारसारा भरावा लागतो असें कूळ; धार्‍यानें जमीन घेणारा; इजारदार. यास खरेदी, विक्री, गहाण इ॰ कांचे सर्व हक्क असतात. खोती गांवांत खोतातर्फें धारे करी धारा भरतो. धारेकरी खोतास नफा देत नाहीं. धारे पेंडोळेंन. धारापेंडोळा पहा. धारेबंदी-स्त्री. सरकारी शेतसारा ठरविणें.-वि बांधलेल्या, ठरींव धार्‍याचें शेत, कुळ. [धारा + बंदी] धारेमाप-न. ऐनजिनसी सारा घेण्याचें सरकारी माप. [धारा + माप]धारेशुद्धि-वि. धार्‍याला, वहिवाटीला धरून असलेलें; कायदेशीर; रीतसर असलेला. [धारा + शुद्ध = बरोबर]

दाते शब्दकोश

योग

पु. १ जुळणी; जोड; मिलाफ; संग; संयोग; संलग्नता; लग्न. 'योग पुढें भृगुसवें तिचा घडतां ' -मोआदि ३.६. २ परस्पर संबध; ऋणानुबंध; संगत. 'तिला नहाण यावें आणि तिचा दादला मरावा असा योग होता ' (समासांत) कालयोग; दैवयोग; प्रारब्धयोग इ॰ ३ आध्यात्मिक अथवा भाविक भक्ति अगर ध्यान, चिंतन करून होणारें ब्रह्मैक्य; ध्यानपूजा, मानसपूजा, समाधि व त्यासंबंधीं नियम व आसनें; प्राणायागादिक साधनांनीं चित्त- वृत्तीचा किंवा इंद्रियांचा निरोध करणें. ४ मार्ग; साधन; आत्म- साधन या अर्थीं भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग इ॰ ' संक्षेपानें नुसता योग अगर कर्मनिष्ठा असें म्हणतात. ५ खगोलाचे २७ भाग; ज्यावरून चंद्र सूर्याचें अक्षांक्ष रेखांश मोजतात ते; ते योग असे- विष्कंन; प्रीति, आयुष्मान्, सौभाग्य, शोभन, अतिगंड, सुकर्मा, धृति, शूल, गंड, वृद्धि, ध्रुव, व्याघात, हर्षण, वज्र, सिद्धि, व्यतीपात, वरीयान्, परीघ, शिव, सिद्धि, साध्य, शुभ, शुक्क, ब्रह्मा, ऐंद्र व वैधृति असे २७ योग आहेत. ज्योतिषी २८ योग मानतात. ६ संबंध; जवळ येणें. 'ग्रहांचे कालांश (वस्तुतः भोग) सूर्याच्या इतकें झाले म्हणजे त्याचा सूर्याशीं योग झाला किंवा युति झाली असें म्हणतात. ' -सूर्य २३. ७ उपाय- योजना; वस्तूचा उपयोग, विनियोग; कार्यार्थ साधना, प्रयत्न. ८ इष्टता; योग्यता; समत्व. ९ (गणित) रक्कम; रास; बेरीज. १०. साधन; युक्ति. 'एकच योग (साधन अगर युक्ति) आहे. ' -गीर ५६. ११ मिठी. १२ कवळा. १३ कार्यकुशलता. १४ संधि. 'योग बरवा हा पुन्हां घडेना ।' -दावि २४२. १५ (वैद्यक) इलाज; उपाय; औषध. 'आमवायूवर एरंडेलाचा योग प्रशस्त आहे.' १६ मोठा लाभ. 'मग योग योग ऐसा सहसा उठला वळी महा शब्द । ' -मोकर्ण ७.३५. १७ जारणमारण; जादूटोणा. १८ ईश्वरी संकल्प. १९ समाधिशास्त्र. २० तत्वज्ञान. २१ व्युत्पत्ति; व्युत्पत्तिमूलक अर्थ. २२ सूत्र; नियम; कायदा. २३ (ज्यो.) विशिष्ट तिथि, वार, नक्षत्र यांचें सहचर्य येणें. उदा॰ रविवारीं हस्त आलें असतां त्यास अमृतसिद्धि योग म्हणतात. [सं. युज् = जोडणें] सामाशब्द- ॰च्युत-पु. योगभ्रष्ट. -ज्ञा ६.४४८. ॰धर्म-पु. कर्तव्य; सद्गुण, अथवा योग्याचें विशेष कर्म; त्यापैकीं दहा विशेष आहेत-अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्या, अपरिग्रह (हे पांच यम व) शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर- प्रणिधान (हें पांच नियम होत). दुसरी गणना अशी आहे- अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, शांति, अपैशुन, दया, अलोभ, मार्दव, लज्जा. कांहीं दम, क्षम, अचापल्य, तेज, तितिक्षा, हे यांतच गणतात. ॰निद्रा-स्त्री. विश्वप्रलयानंतरची व विश्वोत्त्पत्तीपूर्वीची ब्रह्मदेवाची झोंप; ईस्वराची निद्रावस्था; योगमाया; सहजस्वरूप- स्थिति. -ज्ञा ५.७८. ॰निष्ठा-स्त्री. योगपरायणता. -ज्ञा २.३१५. ॰पट-पु. १ श्रेष्ठ भोग. २ संन्याशदीक्षेचा एक प्रकार. संन्याशानें धारण करावयाचीं विशिष्ट वस्त्रें. ३ (ल.) संन्यास घेतल्यावर त्यासंबंधीं पाळावयाचे नियम वगैरे. 'ते योगपटाची मवणी । जीवीं अनियम चिंतवणी । ' -ज्ञा १६.३३२. ॰भूमिका-स्त्री. योग्याचीं विशिष्ट अवस्था, स्थिति. 'द्रष्टादृश्यांचिया ग्रासीं । मध्यें उल्लेख विकासी । योगभूमिका ऐसी । अंगीं वाजे । ' -अमृ ७.१८५. ॰भ्रष्ट-वि. योगसाधनांत कांहीं प्रत्यवाय घडल्यामुळें पुनर्जन्म पाव- लेला. ॰माया-स्त्री. ईश्वराची जी मायारूप शक्ति ती; भ्रम; माया; माया व ब्रह्म पहा. ॰मुद्रा-स्त्री. खेचरी, भूचरी, चाचरी, अगो- चरी, आलेख इ॰ पांच योगमुद्रा; यांचीं स्थानें अनुक्रमें नादबिंदु, नासिका, नेत्र, कर्ण व आकाश हीं होत. 'खेचरी भूचरी चाचरी । अगोचरी आलेख यापरी । माजी समरसली खेचरी । नादबिंदूसी । ' -कथा ७.४.७३. ॰राज गुग्गुल-ळ-पु. एक प्रकारचें रसायन; मात्रा. ॰रूढ-वि. व्युत्पतीनें ज्यांचा प्राप्त अर्थ व रूढ अर्थ हे जुळतात असा (शब्द). जसे- अंगरखा; जलधर; पंकज; भूधर. कांहीं शब्द यौगिक, कांहीं रूढ आणि कांहीं योगरूढ असतात. ॰शास्त्र-न. चित्ताची एकाग्रता करण्याच्या साधनासंबंधींचें शास्त्र; ज्यामध्यें प्राणायामादिद्वारां अंतःकरणाच्या एकाग्रतेचा उपाय सांगितला आहे असें सहा शास्त्रांतील एक शास्त्र. ॰सार-पु. विचार. ॰क्षेम-पुन. निर्वाह; चरितार्थ; उदरपोषण. 'यांचे योग- क्षेमाबद्दल मौजे वडू तर्फ पाबल पैकीं इनाम.' -शाछ १.३६. योगक्षेम चालविणें-एखाद्या मनुष्यास पाहिजे असेल तें मिळ- वून देणें; संसाराची एकंदर व्यवस्था पाहणें; उदरनिर्वाहाची तज- वीज करणें. 'जे मला अनन्यभावें शरण येतात त्यांचा योगक्षेम मी चालवितों. ' योगानंद-पु. योगाभ्यासानें होणारा आनंद; पांच आनंदापैकीं शेवटचा. योगाभ्यास-पु. हटयोगादिकांचा अभ्यास, शिक्षण; योगशास्त्राचा अभ्यास; चित्तवृत्तींचा निरोध करून ध्यानादिकांचा केलेला अभ्यास. योगायोग-पु. १ दैव- गति; अनपेक्षित अशी घडलेली कांहीं गोष्ट; बनाव. २ अनुकूल काळ आणि प्रतिकूळ काळ. 'योगायोग पाहून वागावें. ' योगा- रूढ-वि. योगी; योगनिष्णात. 'तोच पुरुष योगारूढ म्हणजे पूर्ण योगी झाला.' -गीता ६९४. ॰योगासन-न. योगाभ्यास करणाऱ्या योग्याची विशेष प्रकारच्या पद्धतीनें वसण्याची रीत. योगिनी-स्त्री. १ दुर्गादेवीची परिचारिका. या ६४ आहेत. २ योगाभ्यासाची स्त्री; जोगीण. [सं.] योगी-पु. १ योगसाधन करणारा; योगमार्गास लागलेला मनुष्य. -ज्ञा ६.३९. २ योगसाध- नांचा उपयोग जादुगिरीच्या रूपानें करून लोकांस चमत्कार दाख विणारा मनुष्य. ' भारतीय वाङ्मयांत योगी याचा अर्थ बडा जादू- गार असा होतो. ' -ज्ञाको (य) ६५. ३ (सामा.) संन्याशी अथवा भक्त. योगेश्वर-पु. १ श्रेष्ठ योगी; सर्वांत श्रेष्ठ प्राणी; नांवाजलेला योगी; भक्त; संन्यासी; साधु. २ कृष्ण.

दाते शब्दकोश

वाक्य

न. १ एक संपूर्ण विधान करणारा शब्दसमूह; पूर्ण अर्थ होईल इतका शब्दसंघ; लहान परिच्छेद; सिद्धान्त. २ उक्ति; वचन; नियम; सूत्र; विधान. 'सत्यव्रतरतमति पतिस तिचें वाक्य करावें लागें ।' -मोरामायणें १.४९९. [सं. वच् = बोलणें] ॰खंडन-न. १ सिद्धान्ताची असिद्धता प्रस्थापन करणें, खोडून काढणें; चुकीचें ठरविणें. २ वाक्यांतील दोषदर्शन; वाक्य चुकीचें ठरविणें. ३ वाक्याचे अवयव पाडणें; विभाग करणें; तुकडे पाडणें. ॰दीप-पु. स्पष्ट, सुबोध वाक्यें. ॰दोष-पु. वाक्यांतील न्यूनता, चूक, अशुद्धता इ॰. साहित्यशास्त्रकार हे दोष अनेक मानतात. उदा॰ प्रतापरुद्र ग्रंथांत पुढील वाक्यदोष दाखविले आहेत:-शब्द- हीन अथवा शब्दशास्त्रहीन; क्रमभ्रष्ट; विसंधि; पुनरुक्ति; व्याकीर्ण; वाक्यसंकीर्ण; भिन्नलिंग; भिन्नवचन; न्यूनोपम व अधिकोपम; भग्न- बंद; विसर्गलुप्त; अस्थानसमास; वाच्यवर्जित; समाप्तपुनरात्त; संबंधवर्जित; पतत्पकर्ष; अधिकपद; अष्टार्धार्धवाह; प्रक्रमभंग; अपूर्ण; वाक्यगर्भित; यतिभ्रष्ट; अशरीर; अरीतिक इ॰ काव्यप्रकाशांत हे दोष पुढील सांगितले आहेत:-प्रतिकूलवर्ण; उपहतविसर्ग; लुप्त- विसर्ग; विसंधि; हतवृत्त; न्यूनपद; अधिकपद; कथितपद; पत- त्प्रकर्ष; समाप्तपुनरात्त; अर्धांतरैकवाचकपद; अभवन्मतयोग; अन- भिहितवाच्य; अस्थानपद; अस्थानसमास; संकीर्ण; गर्भित; प्रसिद्धि- हत; भग्नप्रक्रम; अक्रम; अमतपदार्थ. याप्रमाणेंच शब्ददोष. शब्दालंकार, वाच्यालंकार पहा. ॰पद्धति-स्त्री. वाक्यरचनेसंबंधीं नियम, वाक्यरचनेची रीति. ॰पूजा-स्त्री. शब्दरूपी पूजा. 'स्वामी निवृत्तिरांजा तो अवधारू वाक्यपूजा ज्ञानदेवो म्हणे ।' -ज्ञा १५.५९८. ॰पृथक्करण-न. वाक्यांतील उद्देश-विधेयादि निर- निराळे भाग सांगून त्यांचा परस्परसंबंध दाखविणें. ॰प्रयोग-पु. वाक्याची, शब्दांची किंवा भाषणाची योजना, रचना. ॰रचना- स्त्री. वाक्यांतील शब्दांतील मांडणी, ठेवण. ॰विन्यास-पु. वाक्यां- तील शब्दांची जुळणी, मांडणी, परस्परसंबंध; त्यासंबंधीं नियम वगैरे. ॰विशारद-वि. वक्ता; पंडित; भाषणांत कुशल, चतुर. ॰शः-क्रिवि. प्रत्येक वाक्य घेऊन; प्रत्येक वाक्यास अनुसरून. वाक्यार्थ-पु. १ विधान; सिद्धान्त; वाक्याचें उद्दिष्ट; भाव. २ कथा. 'समर्थसेवकें वाक्यार्थं लिहिले ।' -सप्र ३.२. वाक्या- लंकार-पु. वाक्यांतील निरर्थक शब्द; केवळ शोभेकरितां वापर- लेले शब्द; वाक्यांतील मोकळी जागा भरण्यासाठीं किंवा खंड पडूं नये म्हणून वापरलेला शब्द. उदा॰ जेहेते.

दाते शब्दकोश

शास्त्र

न. १ (दैवी) धर्म, विधि, नियम, विद्या यासंबंधीं वचन, आज्ञा. हें ईश्वरी किंवा अपौरुषेय मानण्यांत येतें. बहुधा सामासांत उपयोग. समाशब्द-शास्त्रमर्यादा, शास्त्ररीती, शास्त्रमार्ग, शास्त्रप्रतिपादित, शास्त्राभ्यास, शास्त्रज्ञ, शास्त्रज्ञान, शास्त्रतत्त्व. २ (समास नसतांना) धर्म, वाङ्मय, विज्ञान, कला इ॰ संबंधीं नियम. हा अर्थ अभिप्रेत असतां बहुधा मर्यादा घालणाऱ्या दुसऱ्या शब्दांस जोडून येतात. उदा॰ वेदांतशास्त्र, शिल्पशास्त्र, काम- शास्त्र, न्यायशास्त्र, व्याकरणशास्त्र, ३ (सामा.) प्रबंध; ग्रंथ. ४ नियमवद्ध, सिद्धांतमय रचना असलेला विषय. [सं.] (वाप्र.) शास्त्रास, शास्त्राचा, शास्त्रापुरता, शास्त्रार्थास असणें- नसणें:-केवळ नांवाला असणें-नसणें. 'हा आपला उगीच शास्त्रास चाकू आहे. ह्यानें बोट देखील कापणार नाहीं.' 'आज घरांत शास्त्राला साखर नाहीं, मग शेरभर देऊं कुठली?' 'शास्त्रास स्नान झालें खरें, मलशुद्धी ती निराळी' शास्रांत-वि. शास्त्रांप्रमाणें; शास्त्र धरून, अनुसरून. [सं.] ॰दर्शि-वेत्ता- विद ॰प्राविण-ज्ञ-अभिज्ञ-संपन्न-वि. शास्त्रांत निपुण, कुशल; चांगला शास्त्री. [सं.] ॰निंदा-स्त्री. शास्त्राची धिक्कारणी, अवमानणी, शास्त्राचा अपमान. [सं.] ॰पाखंड-न. शास्त्राचा भलता अर्थ; अशास्त्रीय विधान. 'पोट भरावया भांड । सैरा वाजविती तोंड । तैसे विषयालागीं वितंड । शास्त्रपाखंड बोलती ।' -एभा ९.३५५. ॰पारंगत-सकलशास्त्रपारंगत- वि. सर्व शास्त्रविशारद; सर्व शास्त्रांत निपुण. [सं.] ॰बाहे-वि. शास्त्रबाह्य; निषिद्ध. 'आशंकेचा उपक्रम । दिवसा नाहीं लाजा- होम । शास्त्रबाहे विषम । कां पा कवि बोलिला ।' -सीख १०. १०८. [सं. शास्त्रबाह्य] ॰मर्यादा-स्त्री. शास्त्रानें घालून दिलेली, आंखून दिलेली, मर्यादा, सीमा. (क्रि॰ राखणें पाळणें, धरणें, पाळणें) [सं.] वत्-वि. शास्त्राप्रमाणें; शास्त्रानुसार; सशास्त्र [सं.] ॰व्युत्पत्ति-स्त्री. न्यायादि शास्त्रांत गति; शास्त्र ग्रंथां- तील निपुणता. 'पुराण सांगण्यास केवळ शास्त्रव्युत्ति नको, काव्यव्युत्पत्ति असली म्हणजे झालें. [सं.] ॰संख्यांक-वि. सहा. षट्शास्त्रें यावरून सांकेतिक. 'खदिर वृक्षांचे शास्त्रसंख्याक पळसाचें ॠषि संख्याक । ऐसियापरी सम्यक । यज्ञक्रिया अव लंबिली ।' जैअ ९२.४९. शास्त्रार्थ-पु. शास्त्रांतील किंवा विधिनिषेधरूप वचन, अभिप्राय, शास्त्राची सांगणी. शास्त्रांतलें वचन; शास्त्राज्ञा. विशिष्ट बाबतींत शास्त्रानें घालून दिलेला नियम, वा दाखविलेला मार्ग. शास्त्रार्थ करणें-१ (एखादी गोष्ट) किंचित् नांवाला करणें; केली न केली याप्रमाणें वागणें. शास्त्रा- र्थास असणें-शास्त्रास असणें पहा. शास्त्री-पु. १ शास्त्रांचा अभ्यास केलेला गृहस्थ; शास्त्रवेत्ता; पंडित २ ज्या शास्त्राचें अघ्ययन ज्यानें केलें आहे तो तच्छास्त्री. उदा॰ न्यायशास्त्री, धर्मशास्त्री. ३ कोणत्याहि एखाद्या शास्त्रविद्येंत निपुण असलेल्या ब्राह्मणाच्या नांवापुढील बहुमानार्थी पदवी. उदा॰ बाळशास्त्री, गंगाधरशास्त्री, वासुदेवशास्त्री. ॰बाणा-पु. विशिष्ट धंदा किंवा वायसंग म्हणून केल्या जाणाऱ्या पुढील सहा शास्त्रीय विद्यांना योजला जाणारा शब्द, आलंकारिक, ज्योतिषी, धर्मशास्त्री, नैय्या- यिक, वैद्यकी, वैय्याकरणी-बाणा. शास्त्रीय-वि. १ शास्त्रासंबंधीं (विषय, परिभाषा, व्यवहार, ज्ञान, इ॰). २ यथाशास्त्र; शास्त्रोक्त; [सं.]

दाते शब्दकोश

(सं) न० नियम, स्मृति, कायदा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

बंद

पु. १ बांधण्याचें साधन; दोरी; फीत; नाडी. २ बंध; बंधन; मर्यादा; शिस्त. ३ (ल.) बेडी; श्रृंखला; आळा; कोंडी. ४ अटक; कैद. 'बळें तोडिला, बंद त्या त्रीदशांचा ।' ५ अंगरखा, बंडी इ॰ स बांधण्यासाठीं लावलेला कसा. ६ नियम; कायदा; अट; शासन. '...लिहिण्यास कांहीं नियम व बंद असतील असें सांप्रतचे दफ्तराचे स्थितीवरून वाटत नाहीं.' -इनाम ४८. ७ संधि; बोटांचा सांधा; पेरें. ८ देशी कागदाच्या तावाची घडी; दोन वरखी कागदाचा ताव; कागद दुमडल्यावर त्याचे प्रत्येकी होणारे दोन भाग, घड्या. त्यावरून दुबंदी, तिबंदी, चौबंदी इ॰ 'बंद कागदाचा कोरा असे ।' -चांगदेवचरित्र ३.२०. ९ (गंजि- फांचा खेळ) हातांतील एका रंगांतील अगदीं खालचा हुकूम; राजा, वजीर यांच्या शिवाय वरच्या दरजाचें पान. १० (ल.) जमाव; रांग; टोळी. 'बंद कापिला गोसाव्याचा ।' -ऐपो ३९२. ११ (इमारत) भिंतीच्या रुंदीचा एक दगड किंवा वीट. (इं.) हेडर. -मॅरट ४६. १२ (बैलगाडी) सुंभाची दोरी. १३ (हिं.) भरती. -शर. [सं. बन्ध; फा. बन्द] -वि. १ रोधलेला; अड- विलेला; मना केलेला (रस्ता, वाट). २ थांबलेलें (काम). ३ लावून घेतलेलें (दार इ॰). (वाप्र.) ॰बंदा खालीं बसणें, सहस्त्र बंदाखालीं बसणें-बंधांनीं, कर्तव्यतेनें (विशे- षतः शपथेच्या, वचनाच्या) बांधलें जाणें. ॰भरल्या बंदांत- बंदाखालीं-बसणें-जाणूनबुजून, नांदत्या घरांत, भरल्या घरांत बसून, वचन पुरें न केल्यास, खोटें बोलल्यास अनिष्टाचा प्रसंग येणार असें माहीत असूनहि शपथ घेणें, वचन देणें, खातरीनें सांगणें या अर्थी (स्वतःचें म्हणणें खरें आहे हें शपथप्रमाण करून दाखविणार्‍या मराठी वाप्र. पैकीं हा एक आहे. याच्या सार- खेच पुढील वाप्र. आहेत-ही काळीरात्र झाली (चालली) आहे; हा रामपहारा आहे; भरल्या तिन्हीसांजा; मरती रात्र झाली; सूर्य तपतो आहे; मी अन्नावर बसलों आहे; रक्ताची आण; खोटें बोलेल तर जीभ झडेल; तुमचे पाय समक्ष इ॰). ॰भरल्या बंदांत-बंदा खालीं-क्रिवि. भरल्या, वसत्या घरांत, घराखालीं (रडणें, भांडणें इ॰ चा निषेध कर्तव्य असतां प्रयोग). सामाशब्द- ॰खण- खाना-पु. बंदीखाना; कैदखाना; तुरुंग. ॰ख(खु)लास-सी- पु. बंधन, कैद यांतून मुक्तता. -वि. कैदेंतून सोडलेला; बन्धमुक्त. 'अगोदर...गुलामाची बंदखलासी करून.' -दिमरा १.३०७. [अर. खलास् = सुटका] ॰छोड-पु. बनछोड पहा. ॰लेख-पु. नियम, कायदे यांचा ठरावबंद, तक्ता. ॰शाळ-ळा-स्त्री. तुरंग; बंदीखाना. 'वसुदेवदेवकीची बंद फोडिली शाळ ।' -तुगा ४८२.

दाते शब्दकोश

(फा) वि० चालत नाहींसें. २ पु० कसा, बांधण्याची दोरी. ३ नियम, कागद, ताव.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

धर्म

पु. १ धार्मिक विधियुक्त क्रिया, कर्में; परमेश्वरासंबं- धीचें कर्तव्य; ईश्वरोपासना; परमेश्वरप्राप्तीचीं साधनें; परमेश्वरप्रा- प्तीचा मार्ग, पंथ. 'करितो धारण यास्तव धर्म म्हणावें प्रजांसि जो धरितो ।' -मोकर्ण ४१.८१. २ मनुष्यप्राण्यास सदाचरणास लावणारें व परमेश्वरचिंतनाचा मार्ग दाखवून देणारे ख्रिश्चन, यहुदी, हिंदु, इस्लामी वगैरे पंथ. 'मुख्यमुख्य नितितत्त्वांबद्दल सर्व धर्मांची एकवाक्यता आहे. '३ शास्त्रांनीं घालून दिलेले आचार, नियम; पवित्र विधी, कर्तव्यें. पंचपुरुषार्थांपैकीं एक. ४ दान; परोपकारबुद्धीनें जें कोणास कांहीं देणें, किंवा जें कांहीं दिलें जातें तें; दानधर्माचीं कृत्यें; परोपकारबुद्धि. 'अंधळयापांगळ्यांस धर्म करावा. ' 'महाराष्ट्रीयांपेक्षां गुजराथ्यांत धर्म अधिक.' ५ सद्गुण; शास्त्रोक्त वागल्यानें अंगीं येणारा नौतिक. धार्मिक गुण. 'कर्तव्यकर्म, नीति, नीतिधर्म किंवा सदाचरण यांसच धर्म असें म्हणतात. '-गीर ६५. ६ स्वाभाविक गुण; गुणधर्म; नैसर्गिक प्रवृत्ति. 'गाईनें दूध देणें हा गाईचा धर्म आहे.' 'पृथ्वीस वास येणें पृथ्वीचा धर्म. ' ७ कर्तव्यकर्म; रूढी; परंपरेनें, शास्त्रानें घालून दिलेला नियम उदा॰ दान करणें हा गुहस्थ धर्म, न्यायदान हा राजाचा धर्म, सदाचार हा ब्राह्मणधर्म, धैर्य हा क्षत्रिय धर्म. याच अर्थानें पुढील समास येतात. पुत्रधर्म-बंधुधर्म-मित्रधर्म-शेजार- धर्म इ॰ ८ कायदा. ९ यम. 'धर्म म्हणे साध्वि बहु श्रमलीस स्वाश्रमासि जा मागें ।' -मोविराट १३.६५. १० पांडवांतील पहिला. 'कीं धर्में श्वानू सरता । केला सर्वथा स्वर्गलोकीं ।' -एभा १.१०९. ११ धर्माचरणाचें पुण्य. 'ये धर्मचि, पुत्र स्त्री कोष रथ तुरग करी न सांगतें ।' -मोभीष्म ११.२६. १२ (शाप.) गुण- धर्म' स्वाभाविक लक्षण ' दोन किंवा अधिक पदार्थांचें एकमेकां- वर कार्य घडून त्यांपासून जेव्हां असा नवा पदार्थ उप्तन्न होतो कीं त्याचे धर्म मूळ पदार्थांच्या धर्मांपासून अगदीं भिन्न असतात, तेव्हां त्या कार्यास रसायनकार्य असें म्हणतात.' -रसापू १. (वाप्र.) धर्म करतां कर्म उभें राहणें-पाठीस लागणें-दुसर्‍यावर उपकार करावयला जावें तों आपल्यावरच कांहींतरी संकट ओढवणें. धर्मखुंटीस बांधणें- (जनावराला) उपाशीं जखडून टाकणें; ठाणावर बांधून ठेवणें. [धर्मखुंटी]धर्म जागो-उद्गा. (विशिष्ट गोष्टीचा संबंध पुन्हां न घडावा अशाविषयीं) पुण्य उभें राहो. धर्म पंगु-(कलियुगांत धर्म एक पायावर उभा आहे. त्याचें तीन पाय मागील तीन युगांत गेले. यावरून ल.)धर्म अतिशय दुबळा, अनाथ आहे या अर्थी. धर्माआड कुत्रें होणें- दानधर्माच्या आड येणार्‍याला म्हणतात. धर्माचा- १ धर्मासंबंधीं (पैसा, अन्न इ॰). २ मानलेला; उसना; खरा औरस नव्हे असा (पुत्र, पिता. बहीण इ॰). ३ फुकट; मोफत.'धर्माची राहण्याला जागा दिली आहे.' -पारिभौ २७. धर्माची वाट बिघडणें-मोडणें-एखाद्या दानधर्माचा ओघ थांबणें, थांबविणें. धर्माचे पारीं बसणें-१ दुसर्‍याचे पैसे खर्चीत रिकामटेकडें बसणें; धर्मावर काळ कंठणें. २ सद्गुणांचें चांगलें फल मिळणें; सदाचारामुळें चांगलें दिवस येणें. ३ सदोदित दानधर्म करणें. धर्मकृत्ये आचरणें.धर्मावर लोटणें- टाकणें-सोडणें-एखाद्याच्या न्यायबुद्धिवर सोंपविणें.धर्मा- वर सोमवार सोडणें-स्वतः झीज न सोसतां परभारें होईल तें पाहणें. -संम्ह. धर्मास-क्रिवि. (कंटाळल्यावरचा उद्गार) कृपा- करून; मेहेरबानीनें; माझे आई ! याअर्थीं. 'माझे रुपये तूं देऊं नको पण तूं एथून धर्मास जा ! ' 'मी काम करतों, तूं धर्मास नीज.' धर्मास भिऊन चालणें-वागणें-वर्तणें-करणें-धर्माप्रमाणें वागणें. धर्मास येणें-उचित दिसणें; पसंतीस येणें; मान्य होणें. 'मी तुला सांगायचें तें सांगितलें आतां तुझे धर्मास येईल तें कर.' म्ह॰ १ धर्मावर सोमवार = (दानधर्म करणें). कांहीं तरी सबबीबर, लांबणीवर टाकणें. -मोल. २ धर्माचे गायी आणि दांत कांगे नाहीं. ३ आज मरा आणि उद्यां धर्म करा. ४ धर्मादारीं आणि मारामारी. ५ धर्मस्य तत्वं निहितं गुहायाम् = धर्माचें रहस्य गुहेमध्यें ठेवलेलें असतें. (गुढ किंवा अज्ञेय असतें). धर्माचें खरें तत्त्व गहन, अगम्य आहे. ६ धर्मस्य त्वरिता गतिः = धर्मास विलंब लावूं नये या अर्थीं. सामाशब्द- ॰आई-माता-स्त्री. (ख्रि.) कांहीं चर्चेसमध्यें लहान मुलांचा बाप्तिस्मा होतो तेव्हां त्यांस ख्रिस्तीधर्मास अनुसरून वळण व शिक्षण देण्यांत यावें म्हणून त्यांच्या मातेहून भिन्न अशी जी स्त्री आपणावर जबाबदारी घेते ती. (इं.) गॉडमदर. 'प्रत्येक मुलीला एक धर्मबाप व दोन आया पाहिजेत.' -साप्रा ९०. ॰कर्ता-पु. १ धर्म करणारा; परोपकारी माणूस. २ न्यायाधीश; जज्ज. ३ (दक्षिण हिंदुस्थान) देवळाचा व्यवस्थापक, कारभारी. ॰कर्म-न. १ वर्तन; आचार; एखाद्याचीं कृत्यें. कर्मधर्म पहा. 'ज्याचें त्यास धर्मकर्म कामास येईल.' २ शास्त्रविहित कर्में, आचरण; धार्मिक कृत्यें. [सं. धर्म + कर्म] ॰कर्मसंयोग-पु. प्रारब्धयोग; कर्म- धर्मसंयोग पहा. ॰कार्य-कृत्य-न. धार्मिक कृत्य; परोपकाराचें कार्य; (विहीर, धर्मशाळा इ॰ बांधणें, रस्त्यावर झाडें लावणें; देवळें बांधणें; अन्नसत्रें स्थापणें इ॰). २ धार्मिक विधि, व्रत; धर्मसंस्कार. [सं.] ॰कीर्तन-धर्माचें व्याख्यान-प्रवचन-पुराण. 'किंबहुना तुमचें केलें । धर्मकीर्तन हें सिद्धि गेलें ।' -ज्ञा १८. १७९२. [सं.] ॰कुढाव-पु. (महानु.) धर्मरक्षक. 'कीं धर्म- कुढावेनि शाङ्र्गपाणी । महापातकांवरी सांघीतली सांघनी ।' -शिशु ३५. [धर्म + कुढावा = रक्षण] ॰खातें-न. १ धर्मासाठीं जो खर्च करितात त्याचा हिशेब ठेवणारें खातें; धार्मिक खातें. २ धर्मार्थ संस्था; लोकोपयोगी, परोपकारी संस्था. [सं. धर्म + खातें] ॰खूळ-वेड-न. धर्मासंबंधीं फाजील आसक्ति; अडाणी धर्म- भोळेपणा; धर्माबद्दलची अंधश्रद्धा. [म. धर्म + खूळ] ॰गाय- स्त्री. १ धर्मार्थ सोडलेली गाय. धर्मधेनु पहा. २ चांगली, गरीब गाय. 'कढोळाचें संगती पाहे । क्षणभरी गेलिया धर्मगाये ।' -एभा २६.४२. ॰ग्रंथप्रचारक-पु. (ख्रि.) ख्रिस्ती धर्म शास्त्र व तत्संबंधीं इतर पुस्तकें विकणारा, फेरीवाला; (इं.) कल्पो- र्चर. 'सदानंदराव काळोखे यांनीं एक तप धर्मग्रंथप्रचारकाचें काम मोठ्या प्रामाणिकपणें केलें.' [सं. धर्म + ग्रंथ + प्रचारक] धर्मतः- क्रिवि. धर्माच्या, न्यायाच्या दृष्टीनें; न्यायतः; सत्यतः; खरें पाहतां. ॰दान-न. दानधर्म; धर्मादाय. 'एक करिती धर्मदान । तृणास- मान लेखती धन ।' [सं.] ॰दारीं कुत्रें-न. परोपकाराच्या कृत्यास आड येणारा (नोकर, अधिकारी); कोठावळा. ॰दिवा दिवी-पुस्त्री. धर्मार्थ लावलेला दिवा. 'जे मुमुक्षु मार्गीची बोळावी । जे मोहरात्रीची धर्मदिवी ।' -ज्ञा १६.६५. ॰द्वार-न. कौल मागणें; ईश्वराला शरण येणें. [सं.] ॰धेनु-स्त्री. १ धर्मार्थ सोड- लेली गाय. 'ऐसेनि गा आटोपे । थोरिये आणतीं पापें । धर्मधेनु खुरपें । सुटलें जैसें ।' -ज्ञा १६.३२९. २ हरळी; दुर्वा. -मनको [सं.] ॰ध्वज-पु. १ धर्माची पताका; धर्मचिन्ह; धर्माचा डौल, प्रतिष्ठा; (क्रि॰ लावणें; उभारणें; उभविणें; उडणें). २ (ल) धर्माचा फाजील पुरस्कर्ता. [सं. धर्म + ध्वज] ॰ध्वजी-वि. धर्म- निष्ठेचा आव आणणारा ढोंगी-भोंदू माणूस. ॰नाव-स्त्री. येणार्‍या- जाणारानीं तरून जावें म्हणून नावाड्यास वेतन देऊन नदीवर जी धर्मार्थ नाव ठेवलेली असते ती; धर्मतर; मोफत नाव. [धर्म + नांव] ॰निष्पत्ति-स्त्री. कर्तव्य करणें; धर्माची संपादणूक. [सं.] ॰नौका-पु. धर्मनाव पहा. ॰न्याय-पु. वास्तविक न्याय; निःप- क्षपात, धर्माप्रमाणें दिलेला निकाल. 'तुम्ही उभयतांचें वृत्त श्रवण करून धर्म न्याय असेल तो सांगा.' [धर्म + न्याय] ॰पत्नी- स्त्री. १ विवाहित स्त्री. -ज्ञा १८.९४२. २ सशास्त्र (अग्निहोत्रादि) कर्माकरितां योग्य अशी प्रथम विवाहाची (दोन तीन पत्न्या असल्यास) ब्राह्मण स्त्री. [सं.] ॰पंथ-पु. १ धर्माचा, परो- पकाराचा, सदाचरणाचा मार्ग. 'सदां चालिजे धर्मपंथ सर्व कुमति टाकोनि ।' 'धर्मपंथ जेणें मोडिले । त्यास अवश्य दंडावें ।' २ धार्मिक संग, समाज. 'ख्रिस्तीधर्मपंथ.' [सं.] ॰परायण- वि. क्रिवि. १ परोपकारार्थ; धार्मिककृत्य म्हणून; धर्मासाठीं. २ धर्मार्थ; मोफत; (देणें, काम करणें). ३ पक्षपात न करतां; धर्मावर लक्ष ठेवून (करणें; सांगणें; बोलणें इ॰). 'धर्मपरायण बोलणारे पंच असल्यास धर्मन्याय होईल.' ॰परिवर्तन-न. (ख्रि.) धर्ममतें बदलणें; धर्मांतर. (इं.) कॉन्व्हर्शन. 'नारायण वामन टिळक यांचें १८९५ सालीं धर्मपरिवर्तन झालें.' [सं. धर्म + परिवर्तन] ॰पक्षी-पु. धर्मोपदेशक; पाद्री; पुरोहित. 'तो जातीचा धर्मपक्षी होता.' -इंग्लंडची बखर भाग १.२७२. [धर्म + पक्षी = पुरस्कर्ता] ॰पिंड-पु. १ पुत्र नसणार्‍यांना द्यावयाचा पिंड. २ दुर्गतीला गेलेल्या पितरांना द्यावयाचा पिंड. [धर्म + पिंड] ॰पिता-पु. धर्मबाप पहा. ॰पुत्र-पु. १ मानलेला मुलगा. २ उत्तरक्रियेच्या वेळीं पुत्र नसलेल्यांचा श्राद्धविधि करणारा तज्जा- तीय माणूस; धार्मिक कृत्यांत पुत्राप्रमाणें आचरणारा माणूस. 'धर्मपुत्र होऊनि नृपनायक ।' -दावि ४९१. ३ दत्तक मुलगा, इस्टेटीला वारस ठरविलेला. ॰पुरी-स्त्री. १ तपस्वी, विद्वान वगैरे ब्राह्मण ज्या क्षेत्रांत राहतात तें क्षेत्र; धार्मिक स्थल. २ ज्याच्या घरीं पाहुण्यांचा नेहमीं आदर सत्कार केला जातो तें घर; पाहुण्यांची वर्दळ, रहदारी असणारें घर. [सं.] ॰पेटी-स्त्री. धर्मादाय पेटी; धर्मार्थ पैसे टाकण्यासाठीं ठेवलेली पेटी. (देऊळ; सामाधि; धर्मार्थ संस्था वगैरे ठिकाणीं). [सं. धर्म + पेटी] ॰पाई- ॰पोवई-स्त्री. १ प्रवाशांसाठीं, गरिबांसाठीं अन्न पाणी वगैरे फुकट मिळण्याची केलेली व्यवस्था; धर्मार्थ अन्नोदक दान. २ अशी व्यवस्था जेथें केलेली असते तें ठिकाण; अन्नछत्र; धर्मशाळा. ॰प्रतिष्ठा-स्त्री. १ धर्माचा गौरव; सन्मान; डौल. २ धर्माची स्थापना. 'धर्मप्रतिष्ठा तो सिध्दु । अभयहस्तु ।' -ज्ञा १.१३. [सं.] ॰प्रधान-वि. १ धर्मरूप पुरुषार्थाविषयीं तत्पर; धार्मिक वृत्तीचा. २ धर्म ज्यांत प्रमुख आहे असा (विषय, हेतु इ॰). ॰बंधु-पु. मानलेला भाऊ; भावाच्या जागीं असणारा माणूस; स्वतःच्या धर्माचा अनुयायी; स्वधर्मीय. [सं.] ॰बाप-पु. (ख्रि) कांहीं चर्चेसमध्य लहान मुलांचा बाप्तिस्मा होतो तेव्हां त्यांस खिस्तीधर्मास अनु- सरून वळण व शिक्षण देण्यांत यावें म्हणून जबाबदारी घेणारा पित्याहून निराळा पुरुष. (इं.) गॉडफादर. 'ज्या प्रत्येक मुलाचा बाप्तिस्मा करावयाचा आहे त्याला दोन धर्मबाप व एक धर्मआई पाहिजे.' -साप्रा ९०. [धर्म + बाप] ॰बुद्धि-स्त्री. धर्म करण्याची मनाची प्रवृत्ति; धर्माचरणाविषयीं आस्था. 'या चोराला तुम्ही गरीब मानून घरीं जेवायला घालितां ही धर्मबुद्धि कामाची नव्हे.' [धर्म + बुद्धि] ॰भोळा-वि. १ धर्मावर अंधश्रद्धा असणारा, परम धार्मिक. २ (अनादरार्थी) धर्मवेडा; कट्टर सनातनी. (इं.) सुपरस्टिशस. 'बॅरिस्टर, या धर्मभोळ्या खुळचट लोकांत तुम्ही आपल्या वाईफला एक मिनिटहि ठेवणं म्हणजे तिच्या सगळ्या लाइफचं मातेरं करण्यासारखं आहे.' -सु ८. ॰भ्राता-पु. धर्म- बंधु पहा. ॰मर्यादा-स्त्री. धर्मानें घालून दिलेली मर्यादा, बंधन, शिस्त; धार्मिक नियंत्रण. [सं.] ॰मार्ग-पु. धर्माचा, सदा- चरणाचा, परोपकाराचा मार्ग. [सं.] ॰मार्तंड-पु. १ धर्माचा श्रेष्ठ अनुयायी; पुरस्कर्ता; धर्मभास्कर; एक पदवी. २ (उप.) धार्मिकपणाचें अवडंबर, ढोंग माजविणारा. 'भीतोस तूं कशाला, मोडाया हें सुधारकी बंड । आहोंत सिद्ध आम्हीं पुण्यपुरींतील धर्ममार्तंड ।' -मोगरे. ॰युद्ध-न. युद्धशास्त्राच्या नियमाप्रमाणें चाललेली लढाई; सारखें संख्याबल; सारख्या शस्त्राअस्त्रांनीं सज्ज अशा दोन पक्षांमधील न्यायीपणाचें युद्ध; न्याय्ययुद्ध; निष्कपट युद्ध. 'तों अशरीरिणी वदली उत्तर । धर्मयुद्ध नव्हे हें ।' -पाप्र ४५.३९. [सं] ॰राज-पु. १ यमधर्म. २ जेष्ठ पांडव, युधिष्ठिर युधिष्ठिर हा फार सच्छील असल्यामुळें त्याला धर्माचा अवतार सम जत. ३ (ल.) धर्मनिष्ठ, सात्त्विक मनुष्य ४ धर्माप्रमाणें भोळा- भाबडा माणूस. [सं.] ॰राजाची बीज-स्त्री. कार्तिकशुद्ध द्वितीया; भाऊबीज; यमद्वितीया. [सं. धर्मराज + म. बीज] ॰राज्य-न. ज्या राज्यांत सत्य, न्याय आणि निःपक्षपात आहे असें राज्य; सुराज्य; सुखी राज्य [धर्म + राज्य] ॰लग्न-न. धर्मविवाह पहा. ॰लड- वि. (अश्लील) नास्तिक; धर्मकृत्यें न करणारा; धर्माला झुगारून देणारा. याच्या उलट धर्ममार्तंड. 'सदर ग्रंथांत महाराष्ट्र धर्मलंड अतएव त्याज्य असें एका गंधर्वानें म्हटलें आहे.' -टि ४. [सं. धर्म + लंड = लिंग] ॰लोप-पु. धर्माची ग्लानी; अधर्माचा प्रसार. [सं.] ॰वणी-पु. (कुंभारी) तिलांजळीच्या वेळचा कुंभारी मंत्र. -बदलापूर ७२. [धर्म + पाणी] ॰वाट-स्त्री. १ शरण आलेल्या शत्रूवर दया दाखवून त्यास करून दिलेली वाट. 'तुज युद्धीं कैंचें बळ । धर्मवाट दिधली पळ ।' -एरुस्व ११.३७. २ खुला, मोकळा, बिन धोक, अनिर्बंध रस्ता, मार्ग. [सं. धर्म + वाट] ॰वान्-वि. धार्मिक; परोपकारी; सदाचरणी; सात्त्विक. [सं.] ॰वासना-स्त्री. दानधर्म, धार्मिक कृत्यें करण्याची इच्छा; धर्मबुद्धि. [सं. धर्म + म वासना] ॰निधान-न. धर्माचा खजीना, ठेवा, सांठा. 'रचिलीं धर्मनिधानें । श्रीनिवृत्तीदेवें ।' -ज्ञा ११.९. [सं.] ॰विधि-पु. धार्मिककृत्य, संस्कार. [सं.] ॰विपाक-पु. धार्मिक कृत्यांचा परिणाम, फल. सत्कृत्यांचें फल. विपाक पहा. [सं.] ॰विवाह-पु. गरिबाचें स्वतःच्या पैशानें करून दिलेलें लग्न; धर्मादाय लग्न. [सं.] ॰वीर- पु. १ स्वधर्मार्थ प्राणार्पण करणारा; धर्मासाठीं लढणारा. 'स्वधर्म- रक्षणाकरितां मृत्यूच्या दाढेंत उडी टाकणार्‍या धर्मवीराची ती समाधि होती.' -स्वप १०. २ धर्माचें संरक्षण, संवंधन करणारा; धर्माचा वाली; ही एक पदवीहि आहे. 'धर्मवीर चंद्रोजीराव आंग्रे.' ३ (ख्रि) रक्तसाक्षी. (इं.) मार्टिर. [सं.] ॰शाला-ळा, धर्म- साळ-स्त्री. वाटसरू लोकांना उतरण्याकरितां बांधलेलें घर; धर्मार्थ जागा; पांथस्थांच्या विश्रांतीची जागा. 'मढ मंडप चौबारी । देखे धर्मसाळां ।' -ऋ २०. [धर्म + शाला] ॰शाळेचें उखळ-न. (धर्म- शाळेंतील उखळाचा कोणीहि उपयोग करतात ल.) वेश्या; पण्यां- गना. म्ह॰ धर्मशाळेचे उखळीं येत्याजात्यानें कांडावें. ॰शास्त्र- न. १ वर्णाश्रम धर्माचें प्रतिपादक जें मन्वादिप्रणीत शास्त्र तें आचार व्यवहारादिकांसंबंधीं नियम सांगणारें शास्त्र, ग्रंथ. २ समाजाच्या शिस्तीसाठीं, धार्मिक आचरणाकरितां, सामाजिक संबंधाकरितां (लग्न वगैरे संस्थांबद्दल) विद्वानांनीं घालून दिलेले नियम किंवा लिहिलेले ग्रंथ. धर्माविषयीचें विवेचन केलेला ग्रंथ. ३ ख्रिस्तीधर्माचें शास्त्र. (इं.) थिऑलॉजी. याचें सृष्टिसिद्ध (नॅचरल), ईश्वरप्रणीत (रिव्हील्ड), सिद्धांतरूप (डागमॅटिक), पौरुषेय (स्पेक्युलेटिव्ह), व सूत्रबद्ध (सिस्टिमॅटिक) असे प्रकार आहेत. ४ (सामा.) कायदेकानू. [सं.] ॰शास्त्री-वि. धर्मशास्त्र जाणणारा. [सं.] ॰शिला-स्त्री. सती जाणारी स्त्री पतीच्या चितेवर चढतांना ज्या दगडावर प्रथम उभी राहते तो दगड. या ठिकाणीं उभी असतां ती सौभाग्यवायनें वाटतें. ही शिला स्वर्गलोकची पायरी समजतात. 'धर्म शिलेवर उभी असतांना थोरल्या माधवराव पेशव्यांची स्त्री रमाबाई हिनें नारायणराव पेशव्यांचा हात राघोबांच्या हातीं दिल्याचें प्रसिद्ध आहे.' -ज्ञाको (ध) ४४. 'धर्मशिळेवर पाय ठेविता दाहा शरीरा का करितो ।' -सला ८३. ॰शिक्षण-न. धर्माचें शिक्षण; धार्मिक शिक्षण. 'ज्या धर्म शिक्षणानें पुरुषाचा स्वभाव अभिमानी, श्रद्धाळु, कर्तव्यदक्ष व सत्यनिष्ठ बनेल तें धर्मशिक्षण -टिसू ११६. ॰शील-ळ-वि. शास्त्राप्रमाणें वागणारा; धार्मिक सदाचरणी; सद्गुणी. [सं.] ॰श्रद्धा-स्त्री. धर्माविषयीं निष्ठा; धर्मावर विश्वास. 'राष्ट्रोत्कष स धर्मश्रद्धा पुढार्‍यांच्याहि अंगीं पाहिजें.' -टिसू ११७. ॰संतति-संतान-स्त्रीन. १ कन्यारूप अपत्य (कारण कन्या कुटुंबाबाहेर जाते). २ दत्तक मुलगा. [सं.] ॰सभा- स्त्री. १ न्याय कचेरी; न्यायमंदिर; कोर्ट. २ धार्मिक गोष्टींचा निकाल करणारी मंडळी; पंचायत. [सं.] ॰समीक्षक, ॰जिज्ञासु-पु. (ख्रि.) धर्मसंबंधानें विचार करणारा; शोध कर णारा; पृच्छक. (इं.) एन्क्वायरर. 'धर्म समीक्षकांच्या शिक्षकांना उपयोगी पडतील अशा पुस्तकांची बरीच जरूरी आहे.' -ज्ञानो ७.५. १९१४. [सं.] ॰संमूढ-वि. कर्तव्य कोणतें हें ज्यास निश्चित कळत नाहीं असा. -गीर २५. ॰संस्कार-पु. धार्मिक संस्कार; धर्मविधी. ॰संस्थान-न. १ पुण्य क्षेत्र; धर्माचें, सदाचरणाचें स्थान. २ पूजा, अर्चा वगैरे करण्यासाठीं ब्राह्मणास दिलेलें गांव; अग्रहार. ३ (व्यापक) धर्मार्थ, परोपकारी संस्था, सभा. ॰संस्था- पन, ॰स्थापन-न. १ नवीन धर्मपंथाची उभारणी. 'धर्म स्थापनेचे नर । हे ईश्वराचे अवतार । जाले आहेत पुढें होणार ।' -दा १८.६. २०. २ धर्माची स्थापना; धर्मजागृति. [सं.] ॰सिद्धांत- स्वीकार-पु. (ख्रि.) उपासनेच्या वेळीं आपल्या धर्मश्रद्धेचे आविष्करण करण्याकरितां विवक्षित सिद्धांतसंग्रह म्हणून दाखविणें. (इं.) कन्फेशन् ऑफ फेथ. [सं.] ॰सिंधु-पु. धर्मशास्त्रावरचा एक संस्कृत ग्रंथ. यांत अनेक धर्मकृत्यांचें विवेचन केलेलें असून शुभाशुभ कृत्यांचा निर्णय सांगितला आहे. पंढरपूरचे काशिनाथ अनंतोंपाध्याय यांनीं इ. स. १७९१ त हा रचिला. ॰सूत्रें-नअव. ज्ञान व कर्म- मार्ग यांची संगति लावून व्यावहारिक आचरणाची सांगोपांग चर्चा करणारा प्राचीन ग्रंथ. सूत्रें पहा. [सं.] ॰सेतु-पु. धर्म- मर्यादा. [सं.] ॰ज्ञ-वि. १ धर्मशास्त्र, विधिनियम उत्तम प्रकारें जाणणारा. २ कर्तव्यपर माणूस; कर्तव्य जागरूक. धर्माआड कुत्रें-न. सत्कृत्याच्या, परोपकाराच्या आड येणारा दुष्ट माणूस. धर्मदारीं कुत्रें पहा. धर्माचरण-न. धार्मिक आचार; सदा- चरण. [सं. धर्म + आचरण] धर्माचा कांटा-पु. सोनें वगैरे मौल्यवान जिन्नसाचें खरें वजन लोकांस करून देण्यासाठीं विशिष्ट स्थलीं ठेवलेला कांटा; धर्मकांटा. वजन करवून घेणार्‍यांकडून मिळालेला पैसा धर्मादाय करतात. धर्माचा पाहरा-पु. सकाळचा प्रहर (सूर्योदयापूर्वीं दीड तास व नंतर दीड तास). धर्माची गाय-पु. (धर्मार्थ मिळालेली गाय). १ फुकट मिळालेला जिन्नस. म्ह॰ धर्माचे गायी आणि दांत कां गे नाहीं = फुकटचा जिन्नस किंवा काम क्कचितच चांगलें असतें. २ कन्या; मुलगी (कारण ही दुसर्‍यास द्यावयाची असते). -वि. गरीब निरुपद्रवी मनुष्य. धर्मात्मा-पु. (धर्माचा आत्मा, मूर्तिमत धर्म). १ धर्म- शील, धार्मिक प्रवृत्तीचा माणूस. २ धर्म करण्याकडे ज्याची प्रवृत्ति आहे असा. ज्यानें अनेक धर्मकृत्यें केलीं आहेत असा. [सं.] धर्मादाय-व-पु. १ धर्मार्थ जें दान तें; देणगी; भिक्षा. २ सर- कारांतून धर्मकृत्यांसाठीं प्रतिवर्षीं काढून ठेवलेली रक्कम; या कामीं ठराविक धान्य देण्यासाठीं दर गांवाला काढलेल्या हुकूम. -वि. मोफत; फुकट; धर्मार्थ. -क्रिवि. धर्म म्हणून; दान देण्याकरितां; धर्मार्थ. ॰टाकणें-सोडणें-देणें-धर्मार्थ देणें; दानधर्मासाठीं आपला हक्क सोडणें. धर्मादाय पट्टा-स्त्री. देऊळ, उत्सव इ॰ चा खर्च चालविण्यासाठीं किंवा एखाद्याच्या मदतीसाठीं, लोकांवर बसवितात ती वर्गणी. धर्माधर्मीं-धर्मींनें-क्रिवि. धार्मिक व उदार लोकांच्या मदतीनें अनेकांनीं धर्मार्थ हात लाविल्यानें; फुकट; स्वतः पैसा खर्च करण्यास न लागतां. 'लेखक ठेवून लिहिलें तर पुस्तक होईल नाहींतर धर्माधर्मीं ग्रंथ तडीस जाणार नाहीं.' [सं. धर्म द्वि.] धर्माधर्मीवर काम चाल- विणें-पैसा खर्च न करतां फुकट काम करून घेणें. धर्मा- धर्मीचा-वि. धार्मिक लोकांकडून मिळविलेला; धर्मार्थ (फुकट) मिळविलेला; अनेकांनीं हातबोट लावल्यामुळें संपादित (पदार्थ, व्यवहार). धर्माधिकरण-पु. १ धर्माचारांचें नियंत्रण. २ शास्त्रविधींची पाळणूक होते कीं नाहीं हें पाहाण्यासाठीं, नीति- नियमांवर लक्ष ठेवण्यासाठीं खातें, सभा. ३ धर्मशास्त्रांची अंमल- बजावणी. ४ सरकारी न्यायसभा; न्यायमंदिर. धर्माधिकार-पु. १ धर्मकृत्यांवर देखरेख करण्याचा अधिकार. धार्मिक गोष्टींवर नियंत्रण. २ न्यायाधीश. धर्माधिकरण पहा. [धर्म + अधिकार] धर्माधिकारी-पु. १ धर्मासंबंधीं गोष्टी पहाणारा वरिष्ठ अधि- कारी. धर्माधिकरणाचा अधिकारी. २ न्यायाधीश. धर्माध्यक्ष-पु. सरन्याधीश; धर्मगुरु; राजा. [धर्म + अध्यक्ष] धर्मानुयायी, धर्मानुवर्ती, धर्मानुसारी-वि. १ धर्माप्रमाणें चालणारा, वागणारा; सद्गुणी; सदाचरणी. २ एखाद्या धर्मपंथांतील माणूस. धर्मानुष्ठान-न. १ धर्माप्रमाणें वर्तन; पवित्र, सदाचारी जीवन. २ धार्मिक संस्कार, विधि. ३ धार्मिक कृत्य; सत्कृत्य. धर्मार्थ-क्रिवि. १ परोपकार बुद्धीनें; दान म्हणून देणगी म्हणून. २ मोफत; फुकट. धर्मार्थ जमीन-स्त्री. धार्मिक गोष्टींसाठीं दिलेली जमीन (देवस्थानास किंवा धर्मादायास दिलेली); इनाम जमीन. धर्मालय-न. १ धर्मस्थान; धर्मक्षेत्र; ज्या ठिकाणीं धार्मिक कृत्यें चालतात तें स्थळ. 'जें धर्मालय म्हणिजे । तेथ पांडव आणि माझें ।' -ज्ञा १.८३.२ धर्मशाळा. धर्मावतार-पु. अतिशय सत्वशील व पवित्र माणूस; प्रत्यक्ष धर्म. [धर्म + अवतार] धर्मासन-न. न्यायासन; न्यायाधीश बसण्याची जागा; न्याय- देवतेची जागा. धर्मित्व-वि. गुणित्व. 'जे धर्मधर्मित्व कहीं ज्ञानाज्ञाना असे ।' -अमृ ७.२८३. धर्मिष्ट-वि. धार्मिक; सत्त्वशील; सदाचरणी. धर्मी-वि. १ धर्मानें वागणारा; सदाचरण ठेवणारा; न्यायी; सद्वर्तनी. २ ते ते गुणधर्म अंगीं असणारा. (विषय, पदार्थ). ३ धर्मीदाता; उदार; धर्म करणारा. धर्मीदाता- पु. धर्मकरण्यांत उदार, मोठा दाता (भिक्षेकर्‍यांचा शब्द). धर्मोडा-पु. स्त्रियांचें एक व्रत; चैत्र महिन्यांत ब्राह्मणाच्या घरीं धर्मार्थ रोज नियमानें एक घागरभर पाणी देणें. [धर्म + घडा] धर्मोपदेश-पु. धर्माची शिकवण; धर्मांसंबंधी प्रवचन, उपदेश, धर्मोपदेशक-पु. गुरु; धर्माचा उपदेश करणारा. धर्मोपा- ध्याय-पु. धर्माधिकारी. धर्म-वि. १ धर्मयुक्त; धर्मानें संपादन केलेलें; धर्मानें मिळविलेलें; धर्मदृष्टया योग्य. 'उचित देवोद्देशें । द्रव्यें धर्म्यें आणि बहुवसें ।' -ज्ञा १७.३६०. २ (महानु.) वंद्य. 'जें पांता जालीं धर्म्यें । वित्त रागांसि ।' -ऋ २०. धर्म्यविवाह- पु. धर्मशास्त्रोक्त विवाह; सर्व धार्मिक संस्कारांनिशीं झालेला विवाह.

दाते शब्दकोश

बे

शअ. वांचून; विरहित; अभाव दाखविणारा उपसर्ग. याचा फारशी किंवा हिंदी शब्दांशीं समास होतो व हा शब्द नेहमीं पूर्वपद असतो. [फा. बी; तुल॰ सं. विना; हिं. बिन] ज्यांच्या पूर्वपदीं बे शब्द येतो असे अनेक सामासिक शब्द आहेत. त्यांतील कांहीं पुढें दिले आहेत. सामाशब्द- ॰अकली-वि. मूर्ख; बेवकूब. [फा. बी + अक्ल्] ॰अदब-बी-स्त्री. अपमान; असभ्यता; अमर्यादा; अनादर. [फा. बी + अदबी] ॰अदाई-स्त्री. स्वामिद्रोह; विरोध. अबरु-अब्रू-स्त्री. दुर्लौकिक; अपकीर्ति; फजिती. [फा. बी + आब्रू] अबस-क्रिवि. वृथा; व्यर्थ; निष्फळ. ॰आब-पु. अपमान; बेअब्रू. -वि. अपमान झालेला. [फा. बी + आब्] ॰आराम- वि. अस्वस्थ; आजारी. [फा. बी + आराम्] ॰आरामी-स्त्री. अस्वास्थ्य. [फा.] ॰इज्जत-ती-स्त्री. अप्रतिष्ठा. ॰इज्जती-वि. गैरअबरूदार; हलकट. [फा.] ॰इतबार-पु. गैरविश्वास; गैरभरंवसा. [फा.] ॰इतल्ला-क्रिवि. गैरमाहीत; बे-दखल; बडतर्फ. 'त्याचे कार्कून बे-इतल्ला केले.' -रा १०.११०. [फा.] ॰इनसाफ- इनसाफी-पुस्त्री. अन्याय; न्यायाचा अभाव. -वि. अन्यायाचा; अन्यायी. [फा.] ॰इमान-इमानी, बेमान-वि. कृतघ्न; अप्रामाणिक; बेभरंवशाचा. [फा. बी + ईमान् = अधर्मी] ॰इमानी- इमानकी-स्त्री. खोटेपणा; अप्रामाणिकता; कृतघ्नता; विश्वास- घातकीपणा. ॰इलाज-वि. निरुपाय; नाइलाज. [फा.] ॰उजूर- क्रिवि. १ कांहीं न सांगतां; बिनतक्रार. 'या दिवसांत पोटास न मिळे तेव्हां लोक चाकरी बे-उजूर कैसी करितील? '-रा १०.५७. २ विलंबरहित; बेधडक. [फा.] ॰कदर-क्रिवि. निर्धास्तपणें. ॰कम-ब-कास्त-क्रिवि. कांहीं कमी न करतां; साद्यन्त; जसेंच्यातसें. [फा. बी + कम् + उ + कास्त्] ॰करारी- स्त्री. अनिश्चिती; तहमोड. 'त्याजकडून बेकरारीच्या चाली सुरू होतात.'-रा ७.१९ ॰कस-वि. नि:सत्त्व; कमजोर; बेचव; शुष्क. ॰कानू-स्त्री. अन्याय; जुलूम. ॰कानून-कानू-वि. बेकायदेशीर; कायद्याचा भंग करून केलेलें. [फा.] ॰कायदा-पु. कायदेभंग; कायद्यासंबंधाचा अभाव. ॰कायदा-कायदेशीर- वि. नियमबाह्य; गैरकायदेशीर; जुलमी; नियमाचें उल्लंघन करणारा; नियमाला सोडून असलेला [फा. बी + काइदा] ॰कार-वि. १ निरुद्योगी; बे-रोजगारी; रिकामा. २ (व.) निरर्थक; व्यर्थ; उगाच. ३ (ल.) हैराण; निरुपयोगी. 'तिन्ही मोर्चे मिळोन निमे माणूस दुखणियानीं बेकार आहे.' -पेद ३.१८ [फा.] ॰कार- चावडी-स्त्री. (को.) रिकामपणाच्या, निरर्थक गप्पागोष्टी. ॰कारी- स्त्री. रिकामपणा; निरुद्योगीता; बेरोजगारपणा. [फा. बीकारी] ॰किलाफ-पु. मैत्री; सख्य; संशयनिवारण. [अर. खिलाफ् = वैर] ॰कुबी-स्त्री. मूर्खपणा; गाढवपणा; मौखर्य. [फा. बेवकुफी] ॰कुसूर-क्रिवि. न. चुकतां; बिलाकसूर; पूर्णपणें. [फा. बी + कुसूर्] ॰कूब-वि. मूर्ख; वेडगळ; वेडझंवा [फा. बेवकुफ] ॰कैद-स्त्री. शिस्तीचा अभावं; स्वैर वर्तन; अव्यवस्थितपणा; कायदा, नियम किंवा शिस्त यांचे उल्लंघन. -वि. बेशिस्त; स्वैर; अनियंत्रित. -क्रिवि. स्वैरपणानें; कोणत्याहि तर्‍हेचा कायदा किंवा नियम न मानतां. [फा. बी + कैदी] ॰कैदी-वि. स्वैर; कायदा, नियम, नियंत्रिण इ॰ न पाळणारा; बेशिस्त. ॰कौली-वि. बिगर कौलाचा; अभयपत्रविरहित. ॰खत्रे-क्रिवि. निःशंकपणें. 'बेखत्रे हुजूर यावें.' -जोरा १०५. ॰खबर-क्रिवि. असावध; गाफीलपणें. [फा. बी + खबर्] ॰खबर्दार-वि. गैरसावध. [फा.] ॰खर्च-खर्ची-वि. १ खर्च केल्याशिवाय झालेलें, केलेलें; फुकटंफाकट. २ खचीं जवळ नाहीं असा; निर्धन; कृपण. [फा. बी + खर्च्] ॰खातरी-स्त्री. अविचार. 'चार कोटींची मालियत जवळ असतां कंजूषपणानें सर्दारास बेखात- रीनें निरोप दिल्हा.' -जोरा १०९. गर्द-वि. वृक्षरहित; झाडी नसलेलें. 'मुलूख अगदीं वीसपंचवीस कोसपर्यंत बे-गर्द, वेचिराख जाहला.' -पाब १४ [फा. बगिर्द] ॰गार-गारी-बिगार, बिगारी पहा. ॰गुन्हा-पु. गुन्ह्यापासून मुक्तता, सुटका.-वि. गुन्हा नसलेला; अपराधांतून मुक्त झालेला. -क्रिवि. गुन्हा नसतांना. 'बक्षीस बेगुन्हा कैद केलें. ' -जोरा १०५ [फा.] ॰गुमान-नी-वि. बेपर्वा; गर्विष्ठ; उन्मत्त; निःशंक; मुर्वत नसणारा. [फा. बेगुमान्] ॰चतुर-वि. मूर्ख. ॰चरक-क्रिवि. निर्भयपणें; धडाक्यानें; निर्भीडपणें; बेधडक. ॰चव-वि. रुचिहीन; कवकवीत; नीरस; निचव. ॰चाड-वि. चाड नसलेला; लज्जाहीन; उद्धट. ॰चिराख- ग-वि. दीपहीन; ओसाड; उध्वस्त; वस्तीरहित; उजाड. [फा. बी + चीराघ् = दिवा] ॰चूक-वि. बिनचूक; बरोबर; चुका केल्या- शिवाय. [फा. बी + हिं. चूक] ॰चैन-वि. अस्वस्थ; कांहींहि सुचत नाहीं असा [फा. बी + हिं चैन] ॰चोबा-पु. खांबाशिवाय असलेला लहान तंबू. [फा. बीचोबा] ॰छूटपणा-पु. आळा, बंध नसणें; स्वैराचार; स्वच्छंदीपाणा. ॰जबाब-क्रिवि. उद्धट- पणानें; बेपर्वाईनें (बोलणें, उत्तर देणें). [फा. बी + जवाब्] ॰जबाबदार-वि. स्वतःवरची जोखीम न ओळखणारा; जोखीम न ओळखून स्वैर वागणारा. बेजबाबदार राज्यपद्धति-स्त्री. लोकमतास जबाबदार नसलेली राज्यपद्धति. ॰जबाबी-वि. १ उद्धट; उर्मट; बेमुर्वतखोर. २ तासाचे ठोके न देणारें (घड्याळ). [फा. बी + जवाब् = निरुत्तर] ॰जबर-क्रिवि. निर्भयपणें; निःशंक- पणें; बेधडक; जोरानें; उठाव करून; धाक न बाळगतां. 'आमच्या भले लोकांनीं बेजबर घोडीं घालून कित्तूरकरास मोडून वोढ्यापर्यंत नेऊन घातला. ' -ख ५.२३८८ [फा.] ॰जात-वि. (अशिष्ट) हलक्या किंवा निराळ्या जातीचा. ॰जान-वि. निर्जीव; ठार. [फा.] ॰जाब-वि. बेगुमान; बेमुलाजा; बेजबाबदार. [फा.] ॰जाबता-पु. अन्याय; ठरावाविरुद्ध गोष्ट; अविचारी भाषा. 'आम्ही टोंचून घेणार नाहीं, असेना असे मरून जाऊं असे बेजाबता बोलत होते.' -टिकळचरित्र, खंड १. ॰ज्यहा-जा- जहा-वि. फाजील; अनाठायीं; अनुचित; अयोग्य; अमर्याद; अकालीन; रुष्ट; उधळपट्टीचा. [फा.बी + जा] बेजार-वि. १ हैराण; त्रस्त; दमलेले; थकलेला (श्रम, दुःख, कटकट यांमुळें). २ दुखाण्यानें हैराण झालेला; दुखणाईत. [फा. बिझार्] बेजारी- स्त्री. त्रास; हैराणी; थकवा. ॰डर-न. ड्रेडनॉट नांवाचें जंगी लढाऊ जहाज. -वि. न भिणारी; न डरणारा. बेडर पहा. [हिं. डर] ॰डौल-वि. कुरूप; बेढब; घाट किंवा आकार चांगला नसलेला. ॰ढंग-पु. दुराचरण; स्वैराचार; बेताल वागणूक; सोदेगिरी. [हिं.] ॰ढंग-गी-वि. दुराचरणी; व्यसनी; स्वैराचारी. [हिं.] ॰ढब- वि. बेडौल; कुरूप; विक्षिप्त; ढबळशाई; चांगला घाट, आकार नसलेला; ओबडधोबड. [हिं.] ॰तकबी-वि. असमर्थ; ना-तवान. [फा. बेतक्विया] ॰तकसी(शी)र, बेतक्शी(तकसी)र- स्त्री. अपराधापासून, गुन्ह्यापासून, भुक्तता. -वि. निरपराधी; नाहक; निर्दोषी. [फा. बी + तक्सीर] ॰तमा-स्त्री. १ निर्लोभि वृत्ति. २ बेफिकीरपणा; बेपरवा; उदासीनपणा. -वि. १ निर्लोभी; निरिच्छ. २ बेपरवा; बेगुमान; गर्विष्ठ; निष्काळजी; बेसावध; काळजी, कळकळ न बाळगणारा. -क्रिवि. बेगुमानपणें. 'खांद्यावर टाकून पदर बोले बेतमा । लग्नाच्या नवऱ्याशीं बोले बेतमा ।' -पला. [फा] ॰तमीज-वि. (ना.) उद्धट; असभ्य. [फा. बे + तमीज] ॰तर्तुद-स्त्री. तजविजीचा अभाव; अव्यवस्था. ॰तर्‍हा-स्त्री. असाधारणपणा; वैलक्षण्य; चमत्कारिकपणा. -वि. विलक्षण; चमत्कारिक; असाधारण; भारी; अतिशय. 'याउपर उपेक्षा करून कालहरण केलियास नाबाबाचे दौलतीस बे-तर्‍हा धक्का बसेल.' -रा. ५.१६६. [फा. बी + तरह्] ॰ताब-वि. असमर्थ; क्षीण; हतधैर्य. ' मातुश्री अहल्याबाई यांस शैत्यउपद्रव होऊन पांचसात दिवस बे-ताब होती.' -मदाबा १.२१८ [फा. बी + ताब्] ॰ताल- ळ-वि. १ गायनांत तालाला सोडून असलेलें (गाणें-बजावणें). २ ताल सोडून गाणारा, वाजविणारा. ३ (ल.) अमर्याद; अनियं- त्रित; स्वैर; उधळ्या. [हिं.] ॰तालूक-वि. गैरसंबंधीं; संबंध नसलेला; भलता. [फा. बे + तअल्लुक = संबंध] ॰दखल-वि. १ अधिकारच्युत; बेईतल्ला. २ गैरमाहीत. [फा. बी + दख्ल्] ॰दम-वि. दम कोंडला जाईपर्यंत; निपचीत पडेपावेतों दिलेला (मार); थकलेला; दमलेला; निपचीत. [फा.] ॰दरद-दी-दर्द- दर्दी-वि. १ बेफिकीर; बेगुमान; मागेंपुढें न पाहणारा; भय न बाळगितां स्वच्छंदपणें वागणारा. २ बारीकसारीक विचार न पाहणारा. ३ निर्घृण; क्रूर; दया नसलेला. [फा.] ॰दस्तूर-पु. अन्याय; नियमाविरहित गोष्ट; गैरशिरस्ता. ॰दस्रतूई-स्त्री. (गो.) उधळेपणा. [फा.] ॰दाणा-दाना-पु. १ आंत बी नाहीं असें द्राक्ष. हें लहान, गोड, गोल, बिनबियांचें असतें. २ सुकविलेलें द्राक्ष; किसमिस. [फा.] ॰दाणा डाळिंब-न. दाण्यांत बीं नसलेलें डाळिंब. ॰दाद-स्त्री. बेबंदशाही; अन्याय; जुलूम. [फा.] ॰दार-क्रिवि. जागृत; तयार. 'नबाब बेदार जाले.' -रा ७.८३ [फा.] ॰दावा-पु. सोडचिठ्ठी; नामागणी; हक्क सोडणें. ॰दावा पत्र-फारखती-नस्त्री. हक्क सोडल्याबद्दल, नसल्याबद्दल लिहून दिलेला कागद; सोडचिठ्ठी. ॰दिक(क्क)त-क्रिवि. बेलाशक; बिनहरकत; बिनतक्रार; बेउजूर; निःशंकपणें. [फा.] ॰दिल- दील-वि. उदासीन; असंतुष्ट; दुःखी कष्टी. [फा.] ॰दील होणें-बिथरणें. ॰दिली-स्त्री. १ असंतुष्टता; औदासीन्य; निरु त्साह. २ रुष्टता; मनाचा बेबनाव. ॰दुवा-स्त्री. अवकृपा; शाप. [अर.] ॰धडक-क्रिवि. बिनघोक; निर्धास्तपणें; निर्भय; बेलाशक. [हिं.] ॰धरी-वि. धरबंद नसलेला; नियंत्रण नसलेला; मोकाट; स्वैर. [बे + धर] ॰नवा-वि. अधीर; असहाय; निर्धन; भुकेला. 'पादशहा बेनवा होऊन खानास लिहीत. ' -मराचिथोर ५३. [फा.] ॰नहाक-नाहक-क्रिवि. विनाकारण; उगीचच्याउगीच; कारण नसतांना; हक्कनहक्क, हक्कनाहक्क पहा. ॰निगा-स्त्री. दुर्लक्ष; अपरक्षण. [फा.] ॰निसबत-क्रिवि. बेलाशक; काहींहि विचार न करतां; मनांत कोणातीहि शंका न बाळगतां; बेपर्वाइनें; एकदम. [फा.] ॰निहायत-न्याहत-क्रिवि. निःसीम; अपार; परकाष्ठेचा. [फा.] ॰पडदा-वि. १ पडदा नसलेला; उघडपणें; कोणत्याहि तऱ्हेची गुप्तता न राखतां. २ (ल.) मानखंडित. क्वचित् नामाप्रमाणें उपयोग करितात. -पु. १ उघड गोष्ट; २ (ल.) मानखं डना. [फा.] ॰परवा-पर्वा-वि. निष्काळजी; निर्भय; बेगुमान. [फा.] ॰परवाई-पर्वाई-स्त्री. निष्काळजीपणा; बेगुमानी; स्वैरावृत्ति. [फा. बी + पर्वाई; तुला॰ सं द्विप्रव्राजिनी] ॰पाया- वि. गैरकायदा; नियमाविरुद्ध. ॰फंदी-वि. १ व्यसनी; दुराचारी; स्वैर. बेशुद्ध. २ खट्याळ; उच्छृंखल; खोडकर (मूल). ॰फाम-वि. १ बेसावध; बेशुद्ध. २ निश्चिन्त; गाफिल; अनावर; मस्त; तुफान; बेभान. 'शत्रू माघार गेला म्हणून बेफाम नाहीं, सावधच आहों.' -ख ७.३३१०. [फा. बी + फह्म्] ॰फामी-स्त्री. गैर- सावधपणा; गाफिली; निश्चिन्ती; खातर्जमा; दुर्लक्ष. ' या विश्वा- सावर बेफामी जाली याजमुळें दगाबाजीनें निघोन गेला. ' -दिमरा १.२५२. ॰फायदा-वि. गैरफायदेशीर; तोट्याचें; अव्यवस्थित. ॰फिकि(की)र-स्त्री. निष्काळजीपणा. -वि. १ निष्काळजी; बेपर्वा; अविचारी. २ निश्चिंत; निर्धास्त; संतुष्ट. [फा. बी + फिक] ॰फिकिरी-स्त्री. निष्काळजीपणा; गाफिली; निःशकपणा. ॰बंद- पु. अराजकता; शिस्तीचा अभाव; गोंधळ. 'हुजरातीमध्यें बेबंद सर्वथा हिऊं देऊं नये.' -मराआ १४ -वि. अव्यवस्थित; मुक्त; व्यवस्था, बंदोबस्त, कायदा, शिस्त इ॰ नसलेला; बेशिस्त; अराजक. [फा.] ॰बंदशाई-ही, बेबंदाई-बंदी-स्त्री. १ अव्यवस्था; गोंधळ; मोंगलाई; अनायकी; अंदाधुंडी; अराजकता. २ जुलूम. ' सांगुं किती दुनियेवर बेबंदी । ही मस्लत खंदी । ' -राला १०६. ॰बदल-वि. १ बदललेला. २ बंडखोर. 'गुलाम कादर- खान पादशहासी बेबदल होऊन... ' -दिमरा १.२००. [फा.] ॰बनाव-पु. भांडण; तेढ; तंटा; बिघाड. ॰बर्कत-स्त्री. अवनति; हलाखी; तोटा. [फा.] ॰बहा-वि. अमोल; किंमत करतां येणार नाहीं असें. [फा.] ॰बाक-वि. निर्भीड; बेडर. [फा.] ॰बाक-ग, बेबाकी-स्त्री. अशेष फडशा; कर्जाची पूर्ण फेड. -वि. निःशेष; संपूर्ण; कांहींहि शिल्लक, बाकी न ठेवतां फेडलेलें (कर्ज). [फा.] ॰बारत-स्त्री. बेइतबार; अविश्वास. ॰बुनियाद-बुन्याद-स्त्री. अन्याय; राखरांगोळी; नाश. 'आम्ही मदारुल महाम व फारांसीस तिघे मिळून इंग्रेजांची बेबुनियाद करूं.' -रा १०.१९९ [फा. बुनियाद् = पाया] ॰बुदी-बुद-स्त्री. १ नाश; खराबी; अभाव. २ नाबूद. [फा.] ॰भरंवसा-भरोसा-पु. अविश्वास; संशयितपणा; खात्री नसणें. [हिं.] ॰भरोशी-वि. खात्री किंवा भरंवसा अगर विश्वास ठेवतां येणार नाहीं असा; फसव्या. ॰मजगी-स्त्री. वितुष्ट; अरुचि; बेबनाव. 'पादशहांची व गुलामकादार यांची बेमजगी होऊन... 'दिमरा १.१९९. [फा.] ॰मनसबा-मन्सबा- पु. अविचार; खराब मसलत. [फा.] ॰मब्लग-मुब्लक- मोब्लक-वि. असंख्य; अपरिमित. [अर. मब्लघ्] ॰मारामत- स्त्री. नादुरुस्ती. 'आरमाराची बेमरामत जाली.' -वाडसमा २.१९५ -वि. नादुरुस्त; दुरुस्तीची जरूर असलेलें; दुरुस्तीवांचून असलेलें; अव्यवस्थित. [फा.]॰ मर्जी-स्त्री. इतराजी; अवकृपा; मर्जीविरुद्ध वर्तन. [फा.] ॰मलामत-वि. कीर्तिवान्. [अर. मलामत = दूषण] ॰मस्लत-स्त्री. अविचार. ' स्त्रीनायक, बालनायक आणि बेमस्लत, तीन गोष्टी येके ठिकाणीं; चौथा अहंकार; तेव्हां ईश्वर त्या सर्दारीची अब्रू ठेवील तर ठेवो. ' -खपल २.७० [फा.] ॰मान-मानी-मानकी-गी-बेइमान इ॰ पहा. ॰मानगिरी - स्त्री. बेइमानी; हरामखोर. ॰मार-वि. १ किंवा हल्ला करतां न येण्यासारखा (किल्ला). २ अतिशय; कमालीचा; जोरदार; विपुल; भरपूर, बेसुमार इ॰. उदा॰ बेमार-पाऊस-वारा-ऊन्ह-धूळ- लढाई-पीक-धान्य-आंबे इ॰ (पडतो-सुटला-पडतें-उडते-चालती-झालें-पिकले इ॰ क्रियापदांस जोडून उपयोग). ३ आजारी; दुखणाईत. ४ थकलेला; दमलेला; बिमार. ५ (व.) वस्ती नसलेलें; उपयोगांत नसलेलें (घर, वस्तु). [फा.] ॰मारी-स्त्री. १ आजार; आजारीपण; दुखणें. २ शिणभाग; थकवा; अशक्तता. ॰मालूम- वि. माहीत न होण्याजोगें; दिसणार नाहीं, ओळखतां येणार नाहीं, शोधतां येनार नाहीं असें; जाणण्यास कठिण; हुबेहुब. 'नवीन माहितीचा जुन्या पद्धतीशीं बेमालूम सांधा जोडणें कठिण आहे.' -टि ४.२७१ [हिं.] ॰मुनासीब-मुनास्रब-वि. अयोग्य; गैरवाजवी; बुद्धीला न पटणारे; अयुक्त. [हिं.] ॰मुन्सफी-स्त्री. अन्याय. 'हिंदू मुसल्मान, ईश्वराचे घरचे दोन्ही धर्म चालत असतां मुसल्मानानें हिंदूचे जाग्यास उपद्रव करावा हे बे-मुन्सफी.' -पया १० [फा.] ॰मुरवत-मुर्वत-क्रिवि. असभ्यपणें शिष्टाचाराला सोडून; भीड, पर्वा इ॰ न बाळगतां. [फा.] ॰मुरवत-ती, ॰मुर्वत-ती-वि. कठोर; निर्दय; निर्भीड; निर्भय; बेमुलाजा. [फा.मुरुवत् = माणुसकी] ॰मुलाजा-मुलाहिजा- क्रिवि. कांहीं न पाहतां; दयामाया सोडून; निष्ठूरपणें; बेमुर्वतपणें. [अर.मुलाहझा = पर्वा, विचार] ॰मोताद-वि. बेसुमार; असंख्य; अपरिमित. [अर. मुअत्द्द = संख्या, परिमित] मोयीं(ई)न- मोइनी-मोहीन-वि. १ अनियमित; ठरावबाह्य. २ अपरिमित; असंख्य. [फा. बी + मुअय्यन्] ॰मोहर-स्त्री. बिन शिक्क्याचें; शिक्का नसलेलें; गैरमोहरबन्दी.'कित्येक दफ्तरें सर्वमोहर व कितेक बे-मोहरेची.'-रा, खलप २.९. [फा.] ॰मोहीम-- वि.मोहीम न करणारा; उपजीविकेकरतां किंवा धंद्या-उद्योगा- करितां खटपट न करणारा; घरबशा; बाहेर न जाणारा. [फा.] रंग-पु. विरस; खराबी; मौजेचा (मान, कींती, सौदर्य इ॰चा) भंग; अपमान; फजीति. -वि. ज्याचा रंग बिघडला आहे असा. [हिं.] ॰राजी-वि. असंतुष्ट. [फा.] ॰रुख्सत-क्रिवि. पर्वा- नगीवांचून. [अर. रुख्सत् = परवानगी] ॰रू(रों)ख-पु. १ दुसरी- कडे तोंड फिरविणें; दिशा बदलणें. २ प्रेमाचा अभाव. -वि. अप्रसन्न; उदासीन; रुष्ट; विन्मुख. [फा. रुख् = दिशा] ॰रोजगार-री- वि. निरुद्योगी; बेकार; रिकामा. [फा.] ॰लगाम-मी-वि. १ लगाम नसलेला. २ लगामाला दाद न देणारा. ३ (ल.) अनियंत्रित; स्वैर; मोकाट; बेताल. ४ आडवळणी; जाण्यायेण्यास सोयीचें नसलेलें; एकीकडे असलेलें; गैरसोयीचें (शेत, घर). -क्रिवि. एकीकडे; एका बाजूला; आडरस्त्यावर. [फा. बी + लिगाम्] ॰लगामीं पडणें- १ भलत्या मार्गाला लागणें; बहकणें; स्वैर बनणें. २ हयगय होणें; आबाळ होणें. ॰लाग-पु. निरुपायाची किंवा नाइलाजाची स्थिति. 'माझा बेलाग झाला.' -वि. १ जो घेण्याला किंवा ज्यावर मारा करण्याला कठीण आहे असा; दुःस्साध्यं; अवघड; बळकट (किल्ला). २ दुःस्साध्य; दुराराध्य; अप्राप्य; आचरण्यास कठीण असा (विषय). ३ सुधारण्याला कठीण; निरु- पायाचा; दुःसाध्य (रोग, विषय). -क्रिवि. १ मदतीवांचून; उपायावाचून; निरुपायानें; नालाजानें. २ निराधार; आधारावांचून. ३ तडकाफडकीं; ताबडतोब; एका क्षणांत. [फा. बी + म. लागणें] ॰वकर-वक्र-वि. फजीत; मानखंडित; अपमानित. [फा. बीवकर्] ॰वकरी-स्त्री. मानखंडना; अप्रतिष्टा; निर्भर्त्सना. [फा.] ॰वकूब (फ)बेकूब-वि. मूर्ख; खुळसट; अजाण; अडाणी अज्ञान. [फा. बेवकूफ] ॰वकूबी-फी-स्त्री. मूर्खपणा; मूढता. ॰वजे-स्त्री.(व.) गैरसोय; गैरव्यवस्था; गैररीत; विलक्षण प्रकार. [बिवजेह] ॰वतन- क्रिवि. हद्दपार; जलावतन. [अर. वतन् = जन्मभूमि] ॰वसवसा- वस्वसा-वस्वास-क्रिवि. निर्भयपणें; निश्चिन्त; शांतपणें; बे- दिक्कत; निर्भीडपणें. [अर. वस्वास, वस्वसा = भीति, काळजी] ॰वारशी-वारशीक-वारीस-वि. ज्यावर कोणाचा हक्क, वारसा नाहीं असा; निवारशी; योग्य हक्कदार, मालक किंवा वारसा नसलेला. [अर. वारिस् = वडीलोपारर्जित संपत्तीचा हक्कदार] ॰वारसा-पु. वारसाहक्क नसणें; वारस नसणें. ॰वारा-पु. कर्ज- फेड; कामकाज उरकून टाकणें; उलगडा; सांठा, पैसाइ॰ चा निकाल लावणें. [हिं.] ॰शक-वि. १ निर्धास्त; निःशंक; धीट. २ निर्लज्ज. -क्रिवि. १ निःशंकपणें; बेलाशक; निःसंशय २ निर्लज्जपणें. [फा. बी + शक्क्] ॰शरम-श्रम-वि. निर्लज्ज; पाजी; निलाजरा [फा. बे + शर्म्] ॰शरमी-श्रमी-स्त्री. निर्लज्जपणा; पाजीपणा. ॰शर्त- स्त्री. बिनशर्तपणा. -क्रिवि. बिनशर्त; अट न ठेवतां; आढेवेढे न घेतां. [अर. शर्त् = अट, नियम] ॰शिरस्ता-पु. गैरवहिवाट; गैररीत; वहिवाटीच्या विरुद्ध. [फा. सर्रिश्ता = वहिवाट, नियम] ॰शिस्त-स्त्री अव्यवस्था -वि. गैरशिस्त; अव्यवस्थित; अनि- यमित (मनुष्य, वर्तन, भाषण). [फा.] ॰शुद्ध-वि. गैरसावध; (मूर्च्छा इ॰ कांनीं) शद्धिवर, भानावर नसलेला; धुंद; अचेतन; जड. [फा. बी + सं. शुद्धि] ॰शुभह-क्रिवि. निःसंशय. 'बेशुभह शिकस्त खाऊन फरारी होतील.' -पया ४८२.[फा] ॰शौर- वि. बेअकली; मुर्ख; बेवकूब. [अर शुऊर् = अक्कल] ॰सतर- वि. अप्रतिष्ठित; मानखंडीत. [अर. सित्र = पडदा] ॰सनद- सनदी-वि. बेकायदेशीर; सनदेविरहीत. 'श्रीमंत दादासाहेब येऊन त्या उभयतांसी सलूक करणार नाहींत व बेसनद पैसाही मागणार नाहींत.' -रा ६.३८२. ॰समज-पु. (ना.) गैरसमज. -वि. अडाणी. [हिं.] ॰सरंजाम-वि. सामुग्रीविहीन; शिबंदी शिवाय. [फा.] ॰सरम-स्त्रम-(अशिष्ट) बेशरम पहा. ॰सावध- वि. १ लक्ष नसलेला; तयार नसलेला; निष्काळजी; गैरसावध. २ बेशुद्ध; शुद्धीवर नसलेला. [हिं.] ॰सुमार-वि. अमर्याद; अति- शय; अपरिमित; मर्यादेच्या, अंदाजाच्या बाहेर. [फा. बीशुमार्] ॰सुमारी-स्त्री. अपरिमित. ॰सूर-वि. बदसूर; सुरांत नस- लेला (आवाज-गाण्याचा, वाजविण्याचा). [हिं.] ॰हंगाम-पु. १ अवेळ; भलता काळ-वेळ. २ (ल.) दंगा. 'हे बेहंगाम कर- णार.'-ख १२०५. [फा.] ॰हतनमाल-हतन्माल-हन- तमाल-पु. बेवारशी म्हणून सरकारांत जमा झालेला माल, संपत्ति. [फा. बी + तन् + माल्] ॰हतन-मावशी--स्त्री. बेहतनमाल व बटछपाई या संबंधींच्या कामाचें खातें. ॰हतर-हत्तर-हेत्तर- वि. अधिक चांगले; श्रेयस्कर.[फा. बिह्त्तर; तुल॰ इं. बेटर] ॰हतरी-हेत्तरी-स्त्री. बरेपणा; सुधारपणा. ॰हद-द्द-स्त्री-स्त्री. परा- काष्ठा; अमर्यादपणा; अतिशयितता; बेसुमारपणा. -वि अतिशय; पराकाष्टेचा; बेसुमार; अमर्याद; निःस्सीम. [फा. बी + हद्द] ॰हया, हय्या-वि. उद्धट; निर्लज्ज; बेशरम; निलाजरा. [फा.] ॰हाल- पु. दुर्दशा. -वि.दुर्दशाग्रस्त; दुःखार्त. 'चिमट्यानें मांस तोडून बेहाल करून मारिला.'-जोरा ८५. [फा. बी + हाल्] ॰हिक्मत- स्त्री. मुर्खपणा. [हिं.] ॰हिम्मत-ती-स्त्री. भ्याडपणा. [हिं.] वि. हतधैर्य; भ्याड; भित्रा. ॰हिसा(शे)ब-वि. १ अयोग्य; गैरविचाराचें; अनुचित. २ अगणित; हिशोबाबाहेरील; हिशोब करतां येणार नाहीं असें. [फा.] ॰हुकूमी-स्त्री. अवज्ञा; बंडखोरी. ॰हुजूर-क्रिवि. १ एखाद्याच्या गैरहजेरीत. २ (चुकीनें) एखा- द्याच्या समक्ष. [फा.] ॰हुर्म(रम)त-ती-स्त्री. अप्रतिष्ठा; मान- खंडना; अपमान; अकीर्ति. -वि. मानखंडीत; पत घालवून बसलेला; मान नाहींसा झालेला. [फा.] ॰हुशार-वि. गाफील; गैरसावच. ॰हुशारी-स्त्री. बेसावधपणा; गाफिलगिरी. [फा.] ॰होश-ष- वि. बेशुद्ध; धुंद; तर्र; गाफील; मुर्ख; विचारशक्ति नाहींशी झालेला. [फा. बीहोश्] ॰होशी-स्त्री. बेशुद्धी.

दाते शब्दकोश

आचरण

न. १ वर्तणूक; वागणूक; विधि; एखादें कृत्य करणें-पार पाडणें. २ व्रत; नियम; चाल; आचार; रीत; रिवाज. ॰करणें- बरहुकूम चालणें; नियम पाळणें; आचरणें; अभ्यासणें. [सं. आ + चर्]

दाते शब्दकोश

आचरण      

न.       १. वर्तणूक; वागणूक; विधी; एखादे कृत्य करणे−पार पाडणे. २. व्रत; नियम; चाल; आचार; रीत; रिवाज. (वा.) आचरण करणे − बरहुकूम चालणे; नियम पाळणे; आचरणे; अभ्यासणे. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अधिकार

पु. १ सत्तेंचें स्थान; जबाबदरीची जागा. २ धनीपणा; वर्चस्व; प्रभुत्व; हक्क. ३ कार्यक्षेत्र; मर्यादा; प्रांत. ४ योग्यता. 'अधिकार तैसा करूं उपदेश ।' 'जैसा पाहोनि अधि- कार । तैसें बोलावें उत्तर ।' -तुगा ८१७. ५ (व्या.) सर्व साधा- रण नियम, विधान, दिग्दर्शक वाक्य; कांहीं विशिष्ट गोष्टींना लागू होणारा सामान्य नियम अथवा मथळा; अशा नियमाचा उपयोग. ६ विषय; प्रकरण; ज्याविषयीं विचार केला आहे तें. 'ब्रह्माज्ञान उद्देशून वेदांत प्रवृत्त झाला तस्मात् त्यामध्यें ब्रह्मज्ञानाचाच अधि- कार.' ७ राज्य; अधिसत्ता; अमलदारी. [सं. अधि + कृ]. ॰च्युत- भ्रष्ट-वि. (प्रधान, सुभेदार इ॰ मनाच्या) अधिकारापासून भ्रष्ट; अधि- कारावरून-नोकरीवरून काढलेला; कमी केलेला. ॰च्युति-भ्रंश- पुस्त्री. सत्तानाश; पदच्युति; अपकर्ष; ऱ्हास. ॰त्याग-विसर्जन, अधिकारोत्सर्ग- पु. सत्ता किंवा स्थान सोडणें; अधिकार टाकणें. ॰बाजी-स्त्री. अधिकाराची हौस. 'पटेल कमिटीच्या रिपोर्टच अधिक विश्वसनीय ठरत असतां, तो रिपोर्ट सरकारजमा करण्यांत यावा आणि ज्या अधिकाऱ्यांनीं निष्कारण गोळीबार करून शेंपन्नास इसम नाहक ठार केले ते अधिकारी सरकारच्या दृष्टीनें सच्चे ठरून आपली अधिकारबाजी गाजवीत राहावे, यापेक्षां न्यायदेवतेचा उपमर्द तो कोणता?' -के १६-९-३०. ॰विभागणी-(इं. डिसेंट्रलायझे- शन) एकाकडेसच सर्व अधिकार न ठेवतां कांहीं वांटून देणें; मध्य- वर्ती सरकार व वसाहती किंवा प्रांतिक सरकार यांच्यामधील अधि- काराची वांटणी. 'जेथें अशी अधिकार विभागणी असेल तेथें स्वराज्य नांदत नसून गुलामगिरीच वावरत आहे असें खुशाल म्हणावें.' -के २-१२-३०. ॰शिष्टाई-एकाद्या अधिकाराच्या स्थानीं असल्यामुळें वागणुकींत दाखवावयाची अदब, गौरव वगैरे. ॰स्थ-वि. स्थानापत्र; सत्ताधिष्टित. [सं.]

दाते शब्दकोश

अधिकार      

पु.       १. सत्तेचे स्थान; जबाबदारीची जागा. २. धनीपणा; वर्चस्व; प्रभुत्व; हक्क. ३. कार्यक्षेत्र; मर्यादा; प्रांत. ४. योग्यता : ‘जैसा पाहोनि अधिकार । तैसे बोलावें उत्तर ।’ – तुगा ८१७. ५. (व्या.) सर्वसाधारण नियम; विधान; दिग्दर्शक वाक्य; काही विशिष्ट गोष्टींना लागू होणारा सामान्य नियम अथवा मथळा; अशा नियमाचा उपयोग. ६. विषय; प्रकरण; ज्याविषयी विचार केला आहे ते. ७. राज्य; अधिसत्ता; अंमलदारी. ८. विवेचनाचे किंवा निरूपणाचे क्षेत्र किंवा विषय. ९. देखरेख. १०. ग्रंथाचा पोटविभाग; प्रकरण. [सं. अधि+कृ]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आळा

१ बंधन; बांधण्याची, आवळण्याची, बांधणारी वस्तु. नियंत्रण करणारी गोष्ट; दोर; बंद. जसें-केळीच्या पानांस बांधण्याचा सोपटाचा बंद; गवताचा भारा बांधण्याची गवताची दोरी. 'हेंडग्याच्या आळां अवघीं चिपाडें । काय तेथें गोडें निवडावीं' -तुगा २८०२. २ (ल.) नियंत्रण; बंधन; संयमन; दाब; मर्यादा; आडकाठी; धरबंध. (क्रि॰ घालणें; तुटणें). 'एकीचा धंदा दुसरी जात करणार नाहीं असा आळा पडला' -गागा २६. ३ (व.) एकी; जूट. 'कुणब्यांचा आळा'. [सं. आलान (धातु ली) = सांखळी, बंधन, किंवा म. अळणें] ॰घालणें-मर्यादा, नियम, बंधन घालणें; आटोक्यांत ठेवणें; व्यवस्था लावणें. 'घालील महाराष्ट्राला निरभिलाष आळा कोण-यापुढें ।' -विक ९. ॰पिळणें-गाडीची आखरी आणि साटा यांना बांधणार्‍या आळ्याला आळेदांडीनें पीळ घालणें. आळ्यांत असणें-वागणें-राहणें-चालणें-धाकांत, कह्यांत, ताब्यांत असणें. 'ती भाषा व्यकरणाच्या आळ्यांत राहण्यास विशेष योग्य असते.' मराठी व्याकरणावरील निबंध (कृष्णशास्त्री चिपळूणकरकृत) १०. आळ्यांत आणणें-ताब्यांत, कह्यांत ठेवणें. नियमन करणें; नियम व्यवस्था लावणें. 'जॉन्सन यांने कोशरचना करून तीस (इंग्रजी भाषेस) आळ्यांत आणण्याचा प्रचंड उद्योग आरंभून तो एकट्यानें शेवटास नेला.' -नि ५५६.

दाते शब्दकोश

बेह(हे)डा, बेहाडा

पु. एखाद्या खात्यांतील नोकरचाकर, त्यांचा पगार, हुद्दा इ॰ बद्दलचे तपशीलवार पत्रक; अंदाजपत्रक; नेमणूक; सरकारी नियम इ॰ सरकारी अधिकार्‍यासाठीं बांधून दिलेले, सरकारी कामकाजाच्या वहिवाटीचे नियम. 'सालमजकुरीं गडबडीमुळें बेहेड्याचे नेमणुकेपेक्षां जास्ती लोक ठेवणें.' -वाड- समा ४.२. [हिं.] बेहडापार-क्रिवि. पत्करलेले कार्य कसेंहि करून शेवटास नेऊन. (क्रि॰ करणें; होणें)

दाते शब्दकोश

चळ

पु. १ घसरणें; चंचलपणा; चांचल्य; अस्थिरता. 'जागेला तर चळ पडतोच परंतु द्रव्याला पडतो.' २ अंतर; फरक; च्यवन; च्युति; निःसरण (वचन, कायदा, नियम, आचार इ॰ पासून). 'वचनासि चळ नव्हे माझ्या ।' 'मंत्र, देवता साध्य करण्याविषयीं जे नियम सांगितले आहेत त्यांत यत्किंचित चळ झाला तर अनर्थ होतो.' ३ खूळ; चित्तभ्रंश; बुद्धिभ्रंश; भ्रम. उ॰ काम-द्रव्य-मद्य-शास्त्र-स्त्री-चळ. (क्रि॰ लागणें). 'तरलों म्हणुनि धरिला ताठा । त्यासी चळ झाला फाटा ।' -तुगा २८७७ ४ हाव; उत्कटेच्छा; अधीरपणा; उतावीळपणा; वेड; खाज. (क्रि॰ घेणें; भरणें; येणें; लागणें). -पुस्त्री. १ एकसारखा नाद; छंद; हट्ट; खंत (मुलें घेतात ती). (क्रि॰ घेणें). -स्त्री. मूल रडत असतां तें रडें न आटोपण्याजोगी अवस्था त्यास प्राप्त होते ती. [सं. चल] ॰भरणें-वेड लागणें. 'द्रव्याच्या शोकेंकरून किती- काला भरला चळ ।' -ऐपो ३८८.

दाते शब्दकोश

चळ caḷa m (चलन S) Slipperiness or slippiness. v पड. Ex. जागेला तर चळ पडतोच परंतु द्रव्याला पडतो. 2 Deviation or departure (from one's word, or from some law, rule, or prescribed course). Ex. परि वचनासि चळ नव्हे माझ्या ॥. Also मंत्रदेवता साध्य करण्याविषयीं जे नियम सांगितले आहेत त्यांत यत्किंचित् चळ झाला तर अनर्थ होतो. 3 Idiocy or fatuity. v लाग. In this sense some compounds are in use; काम-द्रव्य-धन-मद्य-शास्त्र-स्त्री-चळ. Mem. In the above three senses the च is both tsh and ts. 4 m f An obstinate whining or pining after (as of children). v घे. 5 f The state of inability to cease from crying to which children by obstinate crying reduce themselves. 6 m Wild or eager desire after; vehement craving or itching; mad impatience. v घे, भर, ये, लाग.

मोल्सवर्थ शब्दकोश

दस्तूर

पु. १ पूर्वापार वहिवाट; चाल; प्रघात. २ जकात; कर. ३ नियम; कायदा. ४ हस्ताक्षर; लेख; लेखक किंवा त्याची निशाणी. ५ कारकुनाची सही. ६ नमुना (सरकारी काग- दाचा). ७ परवानगी. [फा.] ॰अम्मल-पु. १ सरकारी कायदा. २ कायदेशीर शिरस्ता; वागण्याचा नियम. म्ह॰ दस्तूर अम्मल कीं अम्मल दस्तूर = कायद्याप्रमाणें अंमल कीं स्वतःच्या लहरीप्रमाणें कायदा. ॰खुद-वि. स्वतःच्या हातानें लिहिलेलें (पत्र, कागद इ॰). याच्या उलट कारकुनानें लिहिलेलें. [अर.]

दाते शब्दकोश

धर्मशास्त्र      

न.       १. वर्णाश्रमधर्माचे प्रतिपादन करणारे मनुप्रणीत शास्त्र; आचार, व्यवहारादिसंबंधी नियम सांगणारे शास्त्र. २. समाजाच्या शिस्तीसाठी, धार्मिक आचरणासाठी, सामाजिक संबंधासाठी (लग्न इ. संस्थांबद्दल) विद्वानांनी घालून दिलेले नियम किंवा लिहिलेले ग्रंथ. ३. ख्रिस्ती धर्माचे शास्त्र; (इं.) थिऑलॉजी. ४. (सामा.) कायदेकानू. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ग्रह

पु. (ताल.) ताल देण्याचा प्रारंभ. याचे प्रकार चार- सम, अतीत, अनागत व विषम. [सं.] ॰मोक्षविचक्षण-वि. (संगीत) ग्रह व न्यास यांचे नियम जाणणारा. ॰मोक्षविच- क्षणत्व-न. (संगीत) ग्रह व न्यास यांचे नियम जाणणें.

दाते शब्दकोश

गुरुशिक्षा      

स्त्री.       १. अभ्यासाविषयी गुरूने लावून दिलेले नियम; गुरूची शिकवण. २. नियम वगैरे मोडल्याबद्दल गुरूने दिलेले शासन. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जलस्थितिशास्त्र, जलस्थैतिकी      

न.       पाण्यामध्ये पदार्थ स्थिर राहण्यासंबंधीचे नियम व गुणधर्म सांगणारे शास्त्र; पाण्याच्या दाबासंबंधीचे व शक्तीसंबंधीचे शास्त्र. ‘जलस्थैतिकीमधील पहिला नियम आर्किमिडीजला सापडला होता.’ – कहीग ३६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कानू      

स्त्री.       १. (कायदा) अट; नियम; ठराव. : ‘त्यांनी अशी कानू कधी आपणावर चढवून घेतली नाही ते आतां कसे कबूल करितील.’ - ऐलेसं २·६१३. २. हक्क; रीत; वहिवाट. ३. बाजारात विक्रीला आलेल्या जिनसांवरील द्यायचा कर, पट्टी : ‘हल्ली सालोसाल नजरेची कानू गावगन्नास बसविली ते दूर करावी.’ - ऐटि २·४१. ४. नियम; कायदा : ‘पूर्वापार यास माफ असतां हाली कानू करावयास कायी गरज.’ - मइसा २०·३६०. [फा. कानून]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कायदा      

पु.       नियम; व्यवहार; धर्मशास्त्र; शिरस्ता; वहिवाट; प्रथा; विधिमंडळाने मान्य केलेला, सर्व नागरिकांना किंवा विशिष्ट नागरिक वर्गाला लागू पडणारा, जो मोडल्यास गुन्हा धरला जाऊन इलाज करण्यात येतो किंवा कोर्टात खटला चालून योग्य ती शिक्षा होऊ शकते असा नियम : ‘समाजनियमनाच्या अनेक साहित्यांपैकी कायदा हें एक साहित्य होय.’ - ज्ञाकोक २८२. [फा. काइदा] (वा.) कायद्याने कुरीनिसात करणे - हात वस्त्राने बांधून मग कुरनिसात किंवा वंदन करण्याची दरबारी रीत : ‘निर्मलवाल्याने हात बांधून नबाबाजवळ कायद्याने कुरनिसात करून उभा राहिला’ - नाम २, १३.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कायदा (वाईट)

जाचक निर्बंध, राक्षसी, हम करे सो कायदा, आडमुठे नियम, नियम-पोटनियमांचे कांटेरी कुंपण, भलते कायदे, भलत्या पळवाटा, मृत कायदा, अनेक खिंडारे व पायवाटा असलेले, कायदा म्हणजे गाढव, कायद्याचें जातें भरडून काढतें, अशा कायद्यांनीं न्यायाचे हात बांधले जातात, न्यायानें असें होईल पण कायदा वेगळा आहे. हे नियम जरा आंवळ बसत आहेत-समाज त्यामुळें अडसतो, नियमांची चिरेबंदी भिंत आडवी येते, कायद्याची करडी नजर स्वातंत्र्य हिरावते, असल्या कायद्यांचे हात लांबलचक नी बळकट असतात, कायद्याच्या जबड्यांत कोण नी केव्हां पडेल सांगतां येत नाहीं !

शब्दकौमुदी

नेम      

पु.       पहा : नियम २ - ४. २. उद्दिष्ट; हेतू; लक्ष्य; साधन. (क्रि. बांधणे, धरणे, लावणे). ३. माप. (क्रि. घेणे, देणे.). [सं.नियम] (वा.) नेम लावणे - नियम करणे; मार्ग, रीत लावणे. नेम सारणे - नेमधर्म, नित्याचार उरकणे : ‘पार्थें स्नान करून सकळ । नेम आपुला सारिला.।’ - ह ३२·१७४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नेमणे      

सक्रि.       १. लावणे; ठेवणे; निश्चित करणे; (नियम, रूढी) स्थापणे. २. नियोजित करणे; नेमणूक, नियुक्ती करणे. ३. नेम धरणे; (बाण इ.नी) लक्ष्य वेधणे. ४. नियम करणे; ताब्यात ठेवणे : ‘इंद्रियांचें सुख नेमुनि । देवचारातें जितला ।’ - ख्रिपु १·१·६४. ५. नियमन, नियंत्रण, शासन करणे : ‘पुढती न करी उत्थान । ऐसा विंध्याद्री नेमून ।’ - भारा आरण्य ५·८३. [सं.नियम; क. नेमिसु]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नेमणें

सक्रि. १ लावणें; ठरविणें; निश्चित करणें; स्थापणें (नियम, रूढी). 'तुका म्हणे त्यासी ठाउकें उचित । होईल संकेत नेमियेला ।' -तुगा १०८१. २ नियोजित करणें; योजना करणें (जागेवर, अधिकारावर); नेमणूक करणें. 'नेमियले मज शत्रु- जयाला । परि तें गेलें सर्व लयाला ।' -सौभद्र अंक. १. ३ नेम धरणें; लक्ष्य वेधणें (बाण इ॰ नीं). ४ नियम करणें; ताब्यांत ठेवणें. 'नमो संतां भक्तां भक्तिणी । जेहीं भवसागरु उतरुनि । इंद्रियांचें सुख नेमुनि । देवचारतें जितला ।' -ख्रिपु १.१.६४. [सं. नि + यम्] नेमणूक-स्त्री. १ वेतन; पगार; वेतनाची व्यवस्था. 'आम्हाला चारशें रुपये नेमणूक झाली आहे.' २ सेवेबद्दल किंवा कांहीं काम- गिरीबद्दल सालीना जें नक्त वगैरे पावतें ती देणगी. ह्याबद्दल कोणास चाकरी करावी लागते, कोणास लागत नाहीं. -इनाम ३१. या नेमणुकीचे पुढील कांहीं प्रकार आहेत-वर्षासन, बिदागी, अम्मल, इनामी जमीन मोबदला, नुकसानभरपाई, ग्रास, पालखी, पगडी इ॰ ३ योजना; नियोजन; नेमणें (जागेवर, हुद्यावर). ॰बेहडा- पु. हुजुराकडून मामलेदाराकडे पाठवावयाचे कागद. -इनाम ४९. अजमास पहा.

दाते शब्दकोश

पाळणूक

स्त्री. १ एखाद्या मंत्राचें साधन करीत असतां किंवा तो प्राप्त झाला असतां सामर्थ्ययुक्त राहावा म्हणून जे आचार नियम पाळावयाचे असतात ते. २ एखादें औषध घेत असतां पथ्यादि नियम पाळावयाचे असतात ते. [सं. पालन]

दाते शब्दकोश

परिकर्म

न. १ प्रारंभीचें, आनुषंगिक काम. २ (अंकगणित) एक प्राथमिक मूलभूत नियम. हे आठ आहेत. [सं.] परिकर्माष्ठक- न. (अंकगणित) प्राथमिक, मूलभूत आठ नियम:-बेरीज, वजा- बाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घन आणि घनमूळ.

दाते शब्दकोश

प्रयोग

पु. १ (मंत्र, अस्त्र, औषध इ॰ची) योजना; लावणें; योजणें; एखाद्याकडे-वर-विरुद्ध लावणें, उपयोग करणें. 'विश्वा- मित्रानें त्या अस्त्रांचा प्रयोग वसिष्ठावर केला.' २ रचना; मांडणी (शब्द, वाक्यांतील अवयव इ॰ची). ३ मंत्र; तोडगा; मंत्राचा प्रयोग; चेटूक. 'त्यापासीं प्रयोग आहें.' ४ मंत्र; तोडगा इ॰ची योजना. उपयोग करणें. 'त्यानें मजवर प्रयोग केला.' ५ (व्याकरण) वाक्यामध्यें कर्तृप्रधान, कर्मप्रधान, भावप्रधान या भेदांमुळें क्रियांपदांत कर्ता, कर्म व भाव यांच्या अनुरोधानें विकार होऊन वाक्यरचनेचा जो प्रकार होतो तो. प्रयोग चार आहेत- कर्तरि, कर्मणि, भावे आणि भावकर्तरि. ६ विस्तारपूर्वक स्पष्टी करणानंतर केलेलें विधान; अनुमानावरून काढलेला नियम; सूत्र. ७ (आज्ञा, नियम इ॰ची) प्रत्यक्ष क्रिया; कांहीं गोष्ट सिद्ध करण्याकरितां जो संस्कार करावा लागतो तो. किमयाची क्रिया जसी सांगितली तसा आम्ही प्रयोग करून पाहिला परंतु साधत नाहीं.' ८ परिणाम; शेवट; पर्यवसान. ९ रीत; पद्धत; सरणी. १० अनुष्ठान. ११ (शब्दाचा) उपयोग; वापर. 'तूं करणें याचा बहुतु । प्रयोगु तेथ ।' -ज्ञा १७.३०५. १२ नाटक रंगभूमीवर करून दाखविणें. 'त्यांनीं कालिदासकृत विक्रमोर्वशीय नाटकाचा प्रयोग करून दाखविला.' -विवि ८.९.१०४. १३ कर्म; कृत्य. 'विवेकयोगें सकळ प्रयोग । करीत जावे ।' -दा १७.७.१९. १४ (काव्य) यत्न; श्रम; कष्ट. [सं.] म्ह॰ प्रयोगशरणाः वैय्या- करणाः. ॰पाठी-वि. विवाहादि कर्मांचे प्रयोग मात्र ज्यास पाठ येतात परंतु ते ज्या आधारावर किंवा कारणास्तव केलेले आहेत हें समजत नाहींत असा. ॰शाळा-स्त्री. रससंस्कारगृह; रसायनकर्मगृह. ॰सिद्धशास्त्र-न. प्रयोगात्मक शास्त्र; प्रयोगज्ञान; परीक्षात्मक शास्त्र. ॰सिद्धसारणी-स्त्री. सरलसारणीसूत्र. (इं.) एंपिरिकल फॉर्म्युला. प्रयोगी-वि. जादुटोणा, जारणमारणादि कर्म करणारा. 'नित्य मायबाप जाती तृणा लागीं । पाळितां प्रायोगी जाण तोषे ।' -ब १४.११.

दाते शब्दकोश

सूत्र

न. १ सूत; धागा, तंतु; दोरा. २ कळसूत्री बाहुलीची दोरी, तार, (यावरून) एकाद्या यंत्रांतील किंवा भानगडीच्या धंद्या-उद्योगांतील मख्खी. चावी, किल्ली, युक्ति, संधान, फिरकी; तसेंच त्या रचनेची युक्ति, पूर्वीं करून ठेवलेली योजना; यंत्राच्या कृतीची पद्धत, रीत उ॰ मनसूत्र म्हणजे मनाचा कल, इच्छा, आवड. ३ नियम, कायदा, तत्त्व; सूचना, शिकवण यांची ठरीव पद्धत, ठाराविक रीत. ४ व्याकरण, तर्क इ॰ शास्त्रां- तील नियम, शास्त्राप्रवर्तक आचार्यांनीं त्या त्या शास्त्रावर लिहि- लेले मूलग्रंथ; त्यांतील सुटीं वाक्यें. ५ (कायदा) हुकुमनामा; निर्णायक मत. ६ जानवें. ७ ओळंबा. ८ वात (कापसादिकांची) ९ (ल.) सरळ ओळ; रांग. 'तैसें दिसें सैन्यसूत्र ।' -एरुस्व ६.५५. १० (ल.) मैत्री; संधान. [सं.] ॰जमणें-गट्टी जमणें. सामाशब्द- ॰क-वि. १ बिनचूक; सरळ; सुतामध्यें; निश्चित; बरोबर. २ सरळ; एका रेषेंत, लंबरेषेंत, समपातळींत असलेली (रस्ता, भिंत, काठी, खांब). ३ बरोबर; नियमित; (त्यावरून) नीटनेटका, छानदार. ॰काठी-स्त्री. मागच्या हात्यास लाविलेली किंवा जोडलेली काठी. ॰जंत-पु. एक प्रकारचा बारीक जंताचा किडा. ॰धार-पु. नाटकाध्यक्ष; नाटकासंबंधी माहिती करून देणारें मुख्य पात्र. २ कळसूत्री बाहुल्यांच्या खेळांत, ज्याच्या हातांत बाहु- ल्यांच्या दोर्‍या असतात तो माणूस. ३ मंडळ, समाज, संघ इ॰ चा मुख्य चालक. ॰धारी-पु. सूत्रधार अर्थ २, ३ पहा. ॰प्राय-क्रिवि. थोडक्यांत; संक्षेपानें. सूत्रात्मा-पु. हिरण्यगर्भ. [सं.] सूत्रा-त्री-वि. सूत्रक पहा. शहाणा; तरबेज; चतुर; चलाख, निष्णात; धूर्त; तीक्ष्ण बुद्धीचा. 'व्यासु सहजें सूत्री बळी ।' -ज्ञा १८.३५. [सं.]

दाते शब्दकोश

तिथि

स्त्री. तीथ; दिवस; महिन्याचा तिसावा भाग (दिवस). सूर्य-चंद्र यांच्यामध्यें १२ अंश अंतर पडण्यास लागणारा काळ. [सं.] तिथिगंडांत-पु. प्रतिपदा, पंचमी, षष्ठी, दशमी, एकादशी आणि पौर्णिमा किंवा अमावास्या या तिथींचा संधि असेल त्यावेळीं जोडतिथीच्या शेवटची एक व आरंभींची एक अशा दोन घटिकांच्या कालास तिथिगंडांत म्हणतात. -धर्मसिंधु ३. [तिथि + गंड + अंत] तिथिपर्व, तिथिपर्वणी-नस्त्री. चांगला किंवा शुभ दिवस (क्रि॰ करणें; मानणें; पाळणें; धरणें; पाहणें). तिथिपालन- न. १ अशुभ तिथीस अमुक करूं नये असा जो धर्मशास्त्रांत सर्व तिथींविषयीं नियम सांगितला आहे त्याचें प्रतिपालन. हे नियम सर्व दिवस न पाळतां विशिष्ट तिथीचे-ती तिथि असेपर्यंतच- पाळणें. २ अमुक तिथीस अमुक करूं नये, अमुक पदार्थ खाऊं नये इत्यादि नियमन. हें विशेषतः चातुर्मासांत स्त्रिया पाळतात. [सं.] तिथिमिती(थी)स-क्रिवि. (कों.) विशिष्ट तिथीला- दिवशीं. 'देवालयांत नित्य पुराण होत नाहीं तिथिमितीस होतें.' तिथिमास-पु. (विवाह किंवा इतर धर्मिक कृत्यास) शुभ दिवस अगर महिना पाहण्यासंबंधांत म्हणतात. (क्रि॰ पाहणें; नेमणें; ठरविणें; धरणें). तिथिवासर-पु. हरिवासर पहा. [सं.] तिथिवृद्धि-स्त्री. तिथीचा प्रारंभ सूर्योदयापूर्वीं किंवा सूर्योदया- बरोबर होऊन अंत दुसर्‍या दिवशींच्या सूर्योदयानंतर होतो असा दिवस. एकच तिथि दोन दिवस असणें. [सं.] तिथिक्षय-पु. (प्र.) एक तिथि गळणें. क्षयतिथि पहा. [सं.]

दाते शब्दकोश

वाग्नियम

वाग्नियम vāgniyama m (Also वाङ् नियम) A law or rule of speech. 2 See वाङ् नियम.

मोल्सवर्थ शब्दकोश

विधान

न. १ स्थापना; आधान; स्वाधीन करणें; ठेवणें; कर्तव्य. 'तेथें राजा कौंडण्यपती । विधान स्थिति करितसे ।' -एरुस्व ५.१४. 'पलंगी पुतळ्याचें करा ग विधान ।' -प्रला १३९. २ सांगणें; कथन; अस्तिनास्ति पक्षीं म्हणणें मांडणें. 'धर्म- शिक्षणाची आवश्यकता नाहीं असें बेधडक विधान करणें या सारखें धाडस नाहीं.' -केले १.१४९. ३ आदेशणें; नियम घालणें, स्थापित करणें. ४ आज्ञा; नियम; अनुशासन. 'मनुष्यावाचूनि विधाना । विषय नाहीं ।' -ज्ञा १५.१७८. ५ (कार्यास, कृत्यास, कामास) लावणें; नेमणूक; योजना. 'जे ते वैदिक विधानीं । योग्य म्हणौनि ।' -ज्ञा १८.८१९. ६ विधि; पद्धति; क्रिया. उदा॰ पूजाविधान; होम विधान; व्रत विधान. 'यज्ञीचें विधान सरे ।' -ज्ञा ४.१५०. 'प्रायश्चित्ताची विधानें । सांगेन ऐका स्थिर मनें ।' -गुच २८.८०. ७ (व्या.) उपसर्ग, प्रत्यय लावणें. [सं. धा = ठेवणें]

दाते शब्दकोश

व्यभिचार

पु. १ सामान्य नियमाचा भंग; अनियम; अपवाद. 'जितके बुद्धिमान् तितके आळशी असें म्हणतां येत नाहीं, कांकीं क्वचित् व्यभिचार दिसतो. कितीएक बुद्धिमान असून उद्योगीहि आढळतात.' २ मार्गच्युति; व्यवहारातिक्रम; दुराचार. ३ परस्त्रीगमन; परपुरुषगमन. 'जै यमनियम ठाकती । तेथ इंद्रिये सैरा राहचटती । म्हणऊनि व्यभिचार घडती । कुळ- स्त्रीयांसीं ।' -ज्ञा १.२४९. ४ एकनिष्ठेचा अभाव; कृतघ्नपणा. 'जेथिचिया कृपा लाभिजे वरु । तेथेंचि मनें व्यभिचारु ।' -ज्ञा २.३८. ५ वेगळेपणा; फरक. 'जे प्रकृतीचेनि आधारें । गुणाचेनि व्यभिचारें ।' -ज्ञा ४.७८. [सं.] व्यभिचरणें-अक्रि. १ एक- निष्ठ, अनुकूल नसणें. 'तरी उचित काय आम्हां । जें व्यभिचरेना धर्मा ।' -ज्ञा २.६३. २ सोडून जाणें; बदलणें. -ज्ञा १७.६०. ३ भलतीकडे जाणें; योग्य मार्गापासून च्युत होणें. व्यभि- चरित-वि. अपवाद करून मोडलेला; ज्यापासून च्युति झाली आहे असा (नियम). व्यभिचारी-वि. १ अपवाद, भंग झालेला (नियम, शिरस्ता). २ व्यभिचार, परस्त्री (पुरुष) गमन करणारा-री, केलेला-ली. -एभा १ १९१. ३ दुराचारी; व्यसनी; स्वैरवर्तनी. व्यभिचारी भाव-पु. (साहित्य) रसाच्या उत्पत्तीस साहाय्यकारी असे ३२ भाव; संचारीभाव. निर्वैद, ग्लानि, शंका, असूया, मद, श्रम, आलस्य, दैन्य, चिंता, मोह, स्मृति, धृति, क्रीडा, चपलता, हर्ष, आवेग, जडता, गर्व, विषाद, औत्सुक्य, निद्रा, अपस्मार, सुप्ति, विबोध, अमर्ष, अवहिथ्था, उग्रता, मति, अपलंभ, व्याधि, उन्माद, मरण. त्रास आणि वितर्क मिळून ३४ होतात

दाते शब्दकोश

आळा      

पु.       १. बंधन; बांधण्याची, आवळण्याची वस्तू. नियंत्रण करणारी गोष्ट; दोर; बंद. जसे :− केळीच्या पानांस बांधण्याचा सोपटाचा बंद, गवताचा भारा बांधण्याची दोरी : ‘हेंगड्याच्या आळां अवघीं चिपाडें । काय तेथें गोडें निवडावीं ।’ − तुगा २८०२. २. (ल.) नियंत्रण; बंधन; संयमन; दाब; मर्यादा; आडकाठी; घरबंध. (क्रि. घालणे, तुटणे) : ‘एकीचा धंदा दुसरी जात करणार नाहीं असा आळा पडला.’ − गांगा २६. ३. एकी; जूट : ‘कुणब्यांचा आळा.’ (व.) [सं. आलान = साखळी, बंधन] (वा.) आळा घालणे − आवर आलणे; मर्यादा, नियम, बंधन घालणे; आटोक्यात ठेवणे; व्यवस्था लावणे : ‘घालील महाराष्ट्राला निरभिलाष आळा कोण यापुढें ।’ − विक ९. आळा पिळणे − गाडीची आखरी आणि साटा यांना बांधणाऱ्या आळ्याला आळेदांडीने पीळ घालणे. आळ्यात असणे, आळ्यात वागणे, आळ्यात राहणे, आळ्यात चालणे − धाकात, कह्यात, ताब्यात असणे : ‘ती भाषा व्याकरणाच्या आळ्यांत राहण्यास विशेष योग्य असते.’ − मराठी व्याकरणावरील निबंध (चिपळूणकरकृत) १०. आळ्यात आणणे − ताब्यात, कह्यात ठेवणे; नियमन करणे; नियम व्यवस्था लावणे : ‘जॉन्सन याने कोशरचना करून तीस (इंग्रजी भाषेस) आळ्यांत आणण्याचा प्रचंड उद्योग आरंभून तो एकट्यानें शेवटास नेला.’ − निमा ५५६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नित्य

वि. १ सतत टिकणारें; शाश्वत; नेहमींचा. २ निय- मित, एकसारखा घडणारा. -क्रिवि. सतत; नेहमीं; सदां; प्रति- दिवशीं. म्ह॰ नित्य मरे त्यास कोण रडे. (समास) नित्य-चर्चा-जप-नैवेद्य-पूजा इ. [सं.] नित्याखालीं पडणें-येणें-नेह- मींच्या संवयींत, अभ्यासांत, परिपाठांत-पडणें, येणें. ॰कर्म- कृत्य-न. संध्यावंदनादि ब्राह्मणाचीं रोजचीं कामें; रोजचा ठराविक कामधंदा. जागृति-स्त्री. नेहमींचा जागरूकपणा (योग्यांचा). नित्यता-स्त्री. निरंतरपणा; कायमपणा. 'नित्यता ऐसेचि असोनि । ना तरी निश्चित क्षया जाउनी ।' -ज्ञा २.१०४. नित्यदान-न. रोज द्यावयाचें दान; अशा तर्‍हेनें दिलेली देणगी. ॰नवा- वि. १ रोजचा नवा; कोराकरकरीत; रोजच्यारोज कांहीं सांगि- तलें असतां तें विसरणारा; ताजा; सदां नवा. ॰नियम-नेम- पु. १ शास्त्रामध्यें अमुक कर्म नित्यच करावें असें सांगितलें नाहीं परंतु तें नित्य केलें असतां पुण्य विशेष सांगितलें अशीं जीं गीतापाठादिक नित्य करतात तीं कर्में. २ नित्य करण्याचा आचरण्याचा नियम, परिपाठ. उदा॰ याचा शिव्या देण्याविषयीं नित्यनियम आहे. ॰नूतन-वि. नित्यनवा पहा. ॰नैमित्तिक- वि. नेहमीं आवश्यक म्हणून करावयाचें किंवा प्रसंग विशे- षानें उपस्थित झालेलें (धार्मिक कृत्य, एखादें काम इ॰). ॰पाठ-पु. १ रोजचा पाठ, पठन. २ रोजचा नियम, वहिवाट. ॰पाठांतला-वि. रोजच्या संवयीचा, परिचयाचा; शिरस्त्याचा. ॰प्रलयपु. १ प्रत्येक वस्तूचा क्षणोक्षणीं होणारा नाश. २ शरी- रांत जशी निद्रा आल्यानें जीवास नित्य प्रलय होतो त्याचप्रमाणें चार युगांची एक चौकडी अथवा पर्याय हजार वेळां गेल्यानें सकल व्यापार ब्रह्मांडीचे बंद पडतात त्याचें नांव. ॰ब्राह्मण- भट-पु. रोज जेवावयास बोलाविलें ब्राह्मण. ॰मजूर-वि. रोजच्या मजूरीवर काम करणारा; हातावर निर्वाह करणारा. ॰मुक्त-वि. सर्व व्यापापासून मुक्त (ईश्वर); जीवन्मुक्त (माणूस). 'दोहिवेगळे नित्यमुक्त । योगेश्वर जाणावे ।' -दा ७.६. ४६. ॰रोज-क्रिवि. दररोज; रोजच्यारोज. ॰विधि-पु. नित्यकर्म. नित्यशः-क्रिवि. नेहमीं; सदैव; सदोदित; सतत; वरचेवर. ॰शंको-वि. सदां शंका घेणारा; संशयी. ॰श्राद्ध-न. पितरांप्रीत्यर्थ रोज कारावयाचें श्राद्ध. ॰श्री-मंगल-न. नेहमींची भरभराट; उत्कर्ष (मोठ्या लोकांसंबंधी योजतात).॰सिद्ध-वि. १ सदोदित; कायम टिकणारा. २ नेहमीं तयार. नित्याक-क्रिवि. (गो.) दररोज; नेहमीं. नित्याचरण, नित्याचार-नपु. नेहमींचें आचरण, वाग- णूक. नित्यविधि पहा. नित्यांत, नित्यानित्य, नित्यानें-क्रिवि. एकसारखें; सतत; प्रतीदिवशीं. नित्यांतला-वि. दररोजचा; नेह- मींचा; अनुभवांतील; परिपाठांतील. नित्यानंद-वि. (काव्य) सदां आनंदी; सुखी. 'परब्रह्म तंव नित्यानंद । म्हणोनि नाहीं दुःख संबंध ।' नित्यानित्यवि. १ नेहमींचा व प्रासंगिक. २ शाश्वत व अशाश्वत; कायमचा व कांहीं काळ टिकणारा. [नित्य + अनित्य] ॰वस्तुविवेक-पु. १ साधन चतुष्ट्यांतील पहिलें साधन. २ कोणती वस्तु शाश्वत व कोणती अशाश्वत या विषयींचा विचार. नित्यावळ-स्त्री. १ रोज जेवणार्‍या ब्राह्मणांची पंगत. 'तुम्ही नित्यावळीस या.' २ दररोज जेवणास येण्याचें एकदांच दिलेलें आमंत्रण. (क्रि॰ करणें; घालणें). 'सेवक बोलती कर जोडून । नित्यावळीचा ब्राह्मण ।' -रावि २७.२९. नित्यें-क्रिवि. नित्य अर्थ ३ पहा.

दाते शब्दकोश

दाखल

पु. १ (एखाद्या गोष्टीचा विशदीकरणासाठीं घेतलेलें त्या गोष्टीसारखेंच) उदाहरण; दृष्टांत; उपमा; नमुना. 'कावळा करकरला म्हणून झाड मोडत नाहीं हा कावळ्याचा दाखला त्यानें तुला दिला.' 'तुमचे दाखल्यांनीं लोकांनीं करावें तें दुसरे अगोदर करितात आणि तुमचें कांहींच नाहीं.' -ख ५. २४७७. २ (एखाद्याचा) प्रत्यक्ष अनुभव; पडताळा; प्रतीति. 'जी सहस्त्रशीर्षयाचें दाखले । कोडीवरी होताति एकिवेळे ।' -ज्ञा ११.२६९. 'तुम्ही शकुन सांगितला त्याचा दाखल आला, तो माझ्या दाखल्यास आला.' ३ पायंडा; उदाहरण; वहिवाट. 'आम्ही चाकरी करूं तेव्हां दाखल पडत जाईल.' -ऐस्फुले ६२. 'आलेले खलिते मागील दाखल्याप्रमाणें बरोबर आहेत किंवा कसें हें खानगी कारभारी यांनीं पहात जावें.' -(बडोदें) अहेरबहुमान पोषाखाचा नियम ४. ४ (एखाद्या विधानास पुष्टी देणारा) पुरावा; आधारभूत गोष्ट, प्रमाण. 'ह्या वाटेनें वाघ गेला याचा दाखल हीं येथें पाऊलें उमटलीं आहेत.' ५ (पुराव्यादाखल हजर करतां येईल असें) प्रमाणपत्र; पावती; नोंद. 'तसेंच जीं पत्रें बंद करण्याविषयीं हुकूम होईल त्याची खबर कापडी जाम- दारखान्याकडे देऊन माहितीचे यादीवर तसा दाखला ठेवावा.' -(बडोदें) राजमहाल कामगारी कारकुनाच्या कर्तव्यासंबंधीं नियम ३. ६ (एखाद्याच्या) लायकीबद्दल पत्र. भलामणपत्रक; शिफारसपत्र. ७ हक्क; अधिकार. [दाखल] (वाप्र.) ॰घेणें-(एखाद्या गोष्टीपासून, व्यक्तीपासून) धडा घेणें; बोध घेणें. ॰पटणें-(एखादें भविष्य इ॰काचा) प्रत्यय, अनुभव, पडताळा येणें. ॰येणें-(एखादी गोष्ट) पुराव्यानें, प्रमाणानें सिद्ध होणें. दाखल्यास उतरणें- (एखाद्याच्या) अनुभवास जुळणें. सामाशब्द- ॰दुखला-पु. दाखला; दृष्टांत इ॰ [दाखला द्वि.] ॰मुकाबला-पु. पुरावा; पुष्टि देणारी, समर्थन करणारी गोष्ट. [दाखला + अर. मुकाबला] दाखलेचिठी-पत्र-स्त्रीन. १ (एखाद्याची लायकी, शील, इ॰ बद्दलचें) शिफारसपत्र; भलामणपत्रक. २ (विशेषार्थानें) महार, रामोशी इ॰ कास दिलेलें शिफारसपत्र. [दाखला + चिठ्ठी, पत्र] -लेवाईक-वि. १ उदाहरणें देऊन, दृष्टांत सांगून स्पष्ट, विशद केलेलें. २ ज्याच्या खरेपणाविषयीं कांहीं तरी प्रत्यय आला आहे असा. 'हा ब्राह्मण दाखलेवाईक प्रश्न सांगतो.' -लेशीर-वि. विश्वसनीय; सप्रमाण; व्यवस्थित. 'आमचे दौलतींत हालीमाजी होत गेल्यामुळें कागदपत्र दाखलेशीर राहिला नाहीं.' -रा १.३१२.

दाते शब्दकोश

मंत्र

पु. १ गूढशक्तियुक्त वाक्य किंवा अक्षरें. (क्रि॰ घालणे; मारणें; टाकणें; फुंकणें) मंत्राचा उपयोग मारण, मोहन, वशीकरण, स्तंभन, उच्चाटन, आकर्षण ह्याकरितां करतात. 'जे शस्त्रविद्यापारंगत । मंत्रावतार मूर्त ।' -ज्ञा १.१०९. २ देवता- स्तुतिपर पवित्र वचन. उदा॰ 'ओं विष्णवे नमः' ३ वेदभाग- विशेष; वेसंहिता. ४ मसलत; गुप्त सल्ला, उपदेश; विचार. (क्रि॰ सांगणें; देणें). 'धर्म म्हणे सिद्धि भजे यन्मंत्रा जेवि वासावा रंभा ।' -मोसभा १.५३. ५ युक्ति; क्लृप्ति. 'रसु होआवा अति- मात्रु । हा घेतासि कविमंत्रु ।' -ज्ञा १३.६३५. ६ गुप्त गोष्ट; गुह्य. 'झांकुनि मंत्र पृथेनें अति दुःसह दुःख मज दिल्हे बा हें ।' -मोशांति १.८. [सं.] ॰बोधास-गुणास-प्रत्ययास-प्रती तीस-कळूं-येणें-मंत्र परिणामकारक होणें, अनुभवास येणें. मंत्रणें-क्रि. (विरू.) मंतरणें पहा. ॰अक्षता मंत्राक्षत- ता-स्त्री. अव. १ मंत्राने संस्कारलेले तांदूळ. २ (ल.) आशीर्वाद. 'त्यास व्यासवाल्मिकादि देति मंत्र अक्षता ।' -मध्व १९. ३ (वि ल.) शिव्यांचा भडिमार. (क्रि॰ देणें; मारणें) ॰कोटाल- न. चेटुकविद्या 'सभामोहन भुररीं चेटकें । साबर मंत्रकौटालें अनेकें । -दा ५.२.२. ॰चळ-पु. १ मंत्रप्रयोगांत चूक होऊन लागणारें वेड. 'मंत्रचळ नाना खेद । नामानिष्ठें नासती ।' -दा४.३.१२. २ (ल.) वेड लागल्यासारखी, बावचळल्यासारखी होणारी स्थिति. (क्रि॰ लागणें) ॰चळ्या-वि. १ मंत्रप्रयोगांत चूक झाल्या- मुळें ज्यास वेड लागलें आहे असा. २ लहरी; बेफाम. ३ भ्रमिष्ट; बावचळलेला; तीच तीच गोष्ट पुन्हां पुन्हां करणारा ॰जागर- पु. अनेक ब्राह्मणांनी एकमेकासमोर बसून एका पक्षानें एक वाक्य म्हटल्यावर त्या पुढील वाक्य दुसऱ्या पक्षानें म्हणावें असें वेद- मंत्र म्हणणें; वेदघोष करणें. ॰तंत्र-पु. अव. १ जादू-टोणे; तोडगे; जपजाप्य; छाछूं इ॰. २ युक्त्या प्रयुक्त्या; डावपेच. (क्रि॰ लटपटणें; डगमगणें; डळमळणें; कोसळणें; ढासळणें; हरणें). ॰पुष्प-पु. देवाची संध्याकाळची आरती वगैरे झाल्यावर विशिष्ट वेदमंत्र मोठमोठ्यानें म्हणून देवास फुलें वगैरे वाहणें. ॰पुष्पां- जलि-स्त्री. १ पूजेनंतर ओंजळींत फुलें घेऊन समंत्रक देवास वाहणें; मंत्रपुष्प. २ (ल.) शिव्यांचा वर्षाव, लाखोली, भडिमार. (क्रि॰ करणें; वाहणें; अर्पिणें). ॰प्रयोग-पु. १ मंत्राचा प्रत्यक्ष अनुभव पाहणें. २ जादूटोणा करणें; मंत्र घालणें. ॰मुख-पु. आपल्या उपयोगापुरतेच ज्यास मंत्र येतात असा ब्राह्मण. ॰वादी-वि. मंत्र व त्यांचा उपयोग जाणणारा; मंत्री; मांत्रिक. ॰विद्या-स्त्री. १ वेदविद्या. 'मंत्रविद्येसि माहेर । ब्राह्मण जे ।' -ज्ञा९.४७५. २ जादूटोणा करण्याची कला. ॰शक्ति-स्त्री. १ युद्धाच्या तीन शक्तींपैकी दुसरी. बाकीच्या दोन-प्रभुशक्ति व उत्साहशक्ति. २ मंत्राचें सामर्थ्य, प्रभाव. ॰शास्त्र-न. विवक्षित देवतेपुढें कोणते मंत्र म्हणावयाचे हें शिकविणारें शास्त्र; मंत्र विद्या. ॰षडक्षरी-स्त्री. 'रामकृष्णहरी' हीं अक्षरें. 'होऊनी सावध उघडीले नेत्र । आठवला मंत्र षडक्षरी ।' -ब७७. ॰साधन-न. मंत्रशास्त्रांत सांगितलेले विधि व नियम पाळून मंत्राचा उपयोग करण्याची शक्ति मिळविणें. ॰सिद्धि-स्त्री. मानवी सामर्थ्याच्या आटोक्याबाहेर असलेल्या आठ शक्तिंपैकीं एक. ॰स्नान-न. प्रत्यक्ष स्नान न करतां कांहीं मंत्र म्हणून जो स्नानाचा गौण प्रकार म्हणून जो विधि करतात तो. ॰ज्ञ-वि. मंत्र जाणणारा; मांत्रिक. 'देखा मंत्रज्ञु बरळु जाय ।' -ज्ञा १.१९०. मंत्राग्नि-पु. उत्तरक्रियेचे मंत्र म्हणून प्रेताचें केलेलें दहन; सशास्त्र दहन. याच्या उलट भडाग्नि. [मंत्र + अग्नि] ॰मंत्रित-वि. मंतर- लेलें. मंत्री-पु. १ प्रधान; अमात्य; राजाचा सल्लागार. २ (सामा.) सल्ला देणारा; उपदेश करणारा. ३ राजाच्या अष्टप्रधा- नांपैकीं एक; न्यायाधीश. ४ मंत्र जाणणारा त्याचा उपयोग करणारा; मांत्रिक. मंत्रोपचार-पु. मंत्रप्रयोगाचे विशिष्ट विधि, नियम. [मंत्र + उपचार] मंत्रोपदेश-पु.१ मंत्र देणें (गुरूनें शिष्यास). 'मातेच्या दर्जाला जेव्हां चढावें तेव्हां मंत्रोपदेश देणाऱ्या गुरूची पायरी बायकांना प्राप्त होते.' -मेनका६८. २ सल्लामसलत; उपदेश. [मंत्र + उपदेश] मंत्रोपासना-स्त्री. मंत्र साध्य करून घेण्याचे नियम पाळणें. (क्रि॰ देणें). [मंत्र + उपासना]

दाते शब्दकोश

सिद्ध

पु. १ ईश्वरप्रेरित ग्रंथकार, लेखक. उदा॰ व्यास. २ भूत-भविष्य-वर्तमानाचें ज्ञान असलेला; द्रष्टा; साधु. ३ आणि मादि सिद्धी प्राप्त झालेली; योगी. ४ मुक्त पुरुष. -दा ५.१०. १०. ५ एक उपदेवांचा वर्ग व त्यांतील व्यक्ति. 'येर सुरसिद्ध किन्नर ।' -ज्ञा ११.५०.६. ६ (ज्यो.) एकविसावा योग. [सं.] -वि. १ संपविलेलें; पुरें केलेलें. २ स्थापित केलेलें; सत्य म्हणून दाखवून दिलेलें; पुराव्यानें खरें केलेलें; प्रस्थापित. ३ निकाल केलेलें; तोडलेलें (भांडण, खटला) ४ बनविलेला; तयार केलेला; रचलेला (नियम, घटना, कायदा). ५ पकविलेलें; शिजविलेलें. (अन्न). 'जैसी सिद्धसाध्य भोजनीं । तृप्ती एकी ।' -ज्ञा ३. ३८. ६ घेण्याजोगें; तयार केलेलें (घोटून, द्रव्यें मिसळून- औषध). ७ तयार ठेवलेला, असलेला (कामास योजावयाचा माणूस, जनावर इ॰); मुद्दाम खोळंबला, वाट पहात अस- लेला; राखून ठेवलेला; सज्ज; तयार. ८ कुशल; निष्णात. ९ शाबूत; धडधाकट 'जंव हें सकळ सिद्ध आहे । हात चाला- वया पाय ।' -तुगा ७२९. १० प्रत्यक्ष; मूर्तिमंत 'जरी प्रकटे सिद्ध सरस्वती । तरी मुका आथी भारती ।' -ज्ञा १.७८.११ अकृत्रिम; सहज असणारा. 'नित्यसिद्ध परमशुद्ध माझें स्वरुप शुद्ध जाणती ।' -एभा ११.११२७. १२ पूर्णावस्था प्राप्त झालेले. 'वांचोनि कर्मारंभ उचित । न करितांचि कां सिद्धवत । -ज्ञा ३.४५. १३ (व्या.) गुणधर्मयुक्त; मूर्त. याच्या उलट साधित = अमूर्त. १४ (भाषा.) मूळ; अव्युत्पन्न (शब्द). याच्या उलट साधित शब्द. (समासांत) (सिद्ध शब्द उत्तरपदीं असतांना) -अनुभव-उपाधि-औषधी-क्रिया-न्याय-लोक- व्याकरण-स्वभाव-सिद्ध. ऊन प्रत्ययांत धातुसाधितांपुढे नेहेमीं हा शब्द येतो. उदा॰ करून-भोगून-शिकून सिद्ध. (वाप्र.) सर्वसिद्ध आणि चुलीस पोतेरें-तयारी होण्याच्या फार आधीं तयारी झाल्याचें सांगणाराबद्दल वापरतात. ॰तत्त्व-न. ब्रह्म. ॰ता-स्त्री. तयारी; सर्व सिद्ध असणें. ॰पादुका-स्त्रीअव. ज्या पायांत घातल्यानें वाटेल तिकडे जाण्याची शक्ति प्राप्त होते अशा पादुका. 'करवीर क्षेत्रीं दत्तात्रयें सिद्धपादुका ।' -सप्र ३.२०. ॰पुरुष-पु. १ अणिमादि सिद्धी प्राप्त झालेला; योगी; मांत्रिक. २ ब्रह्मस्वरूपीं विलीन झालेला. ॰प्रज्ञा-स्त्री. पूर्वजन्मांतली या जन्मीं मिळणारी बुद्धि. 'तिये सिद्धप्रज्ञेचेनि लाभे । मनाचि सारस्वतातें दुभे ।' -ज्ञा ६.४५४. ॰मौळी-वि. श्रेष्ठ सिद्ध पुरूष. 'जयजयाजी सिद्धमौळी ।' -गुच २०.२. [सिद्धी + मौली] ॰योग-पु. बाळहिरडे आणि जिरें यांचें चूर्ण. हें अतिसारांत तांदुळाच्या धुवणांतून घेतात. -योर १.४१५. ॰रस-पु. १ अमृत. 'कुंकमाचें भरींव । सिद्धरसाचें वोतींव ।' -ज्ञा ६.२५५. २ पारा. ॰लाडू-पु. संकष्टी चतुर्थींस कणकेच्या उकडीचे केलेले लाडू; मुटकुळीं. -ह ८.१६. ॰वट-पु. कामना पूर्ण करणारा वड. 'त्या सिद्धवटा सावित्री संपूर्ण । सीता देखून नवस करी ।' ॰वत्-क्रिवि. सिद्ध झाल्याप्रमाणें; गृहीत धरून. 'एका विष- याचा वाद पडल्यास इतर विषय सिद्धवत् घ्यावे लागतात.' -वि. (शाप.) गृहीत; खरें मानून चाललेलें. 'सिद्धवत् पदें.' (इं.) पॉस्चुलेट्स. [सं.] ॰साधक-पु. अव. एकाच कपटकारस्थानां- तील मंडळी. आपलें ऐक्य बाहेर समजूं न देतां, संगनमतानें दुसर्‍याला फसविण्यासाठी एकमेकांचा पुरस्कार करणारे (एकानें सिद्ध पुरुष बनावयाचें व दुसर्‍यानें त्याचें स्तोम माजवावयाचें) [सिद्ध + साधक] ॰साधन-न. १ सिद्धीचे अद्भुत चमत्कार दाखविणें; जादू; किमया. २ सिद्ध असलेली वस्तु पुन्हां सिद्ध करण्यास लागणें. तर्कशास्त्रांत हा एक दोष मानला जातो. 'तूं चोर आहेस असें चोरालाच म्हटलें असतां सिद्धसाधन दोष होतो.' ॰स्थाली-स्त्री. पाहिजे तें अन्न पाहिजे तेंव्हा विपुल निघावें अशी (कोणी सिद्ध पुरूषानें दिलेली) थाळी, पात्र. सिद्धणें- क्रि. १ सिद्ध करणें. 'तुलदाइयां बैलां सिद्धंवै ।' -पाटणशिलालेख शके ११२८. २ सिद्धीस जाणें 'मोक्षमूल कृपाजीवन । जेणें सिद्धे ।' -ज्ञाप्र ६१. सिद्धाई-स्त्री. १ चमत्कार; सिद्धसाधन. २ दैवी शक्ति प्राप्त होणें. सिद्धि पहा. सिद्धानुवाद-पु. सिद्ध गोष्टीचें वर्णन 'तरी सिद्धानुवाद लाहों । आवडी करुं ।' -अमृ १०.१२. [सिद्ध + अनुवाद] सिद्धान्न-न शिजणें, इ॰ संस्का- रानें सिद्ध झालेलें अन्न; तयार, खाण्यालायक अन्न [सिद्ध + अन्न] सिद्धार्थ-वि. १ ज्याचा उद्देश, मनोरथ सिद्धीस गेला आहे असा. २ गौतमबुद्ध [सिद्ध + अर्थ] सिद्धार्थी-पु. त्रेपन्नावा संवत्सर. सिद्धावस्था-स्त्री. जीवन्मुक्तावस्था; ब्राह्मी- स्थिति. -गीर ३६७. [सिद्ध + अवस्था] सिध्दाश्रम-पु. १ सिद्धावस्थेस पोंचलेल्या मुनीचा आश्चम. 'जावें सिद्धाश्रमातें ।' -रावि ७.१०. २ हिमालयांतील नरनारायणाश्रम. 'सिद्धाश्र- मासि पावे विश्व जया सिद्ध सादना गाते ।' -मो उद्योग ८.२७. [सिद्ध + आश्रम] सिद्धासन-न योगासनाचा एक प्रकार. कामवासना नाहींशी करण्याला याचा उपयोग होतो. -संयोग ३२३. [सिद्ध + आसन] सिद्धि-स्त्री. १ दैवी शक्ति; अणिमा इ॰ अष्टमहासिद्धी. 'देखें विषय हे तैसे । पावती सिद्धि चेनि मिषें ।' -ज्ञा २.३१३. २ आश्चयकारक, अपूर्व सामर्थ्य, कौशल्य ३ तपश्चर्येचें किंवा देवता भक्तीचें फल. ४ परिपूर्णता; समाप्ति; संपादन; उद्दिष्ट साध्य होणें. 'तें मनोरथ संगें नव्हे । एर्‍हवीं सिद्धि गेलेंचि आहे ।' -ज्ञा १३.१३३. ५ पुराव्यानें स्थापना, संस्थिति; प्रस्थापित होणें (मुद्दा, बाजू, आरोप इ॰). शाबिती. 'अंतःकरणही अनादि । प्रवाहरूपें त्याची सिद्धी ।' -एभा १३.२४५. ६ निर्णय; निकाल; तडजोड (भांडण, खटलें इ॰ ची). ७ घटना; बनावणी; मांडणी (कायदा, नियम, इ॰ ची). ८ सिद्धता; तयारी; (अन्न, औषध इ॰ ची) ९ सज्ज असणें (बदली किंवा इतर काम करण्यास माणूस, जनावर इ॰). १० कौशल्य; नैपुण्य; वाकबकारी (योगसामर्थ्य, किमया इ॰ त). ११ मुक्ति; ब्रह्मस्थिति; निर्वाण. 'तैसें न होणें निपजे । तें नैष्कर्म्य सिद्ध जाणिजे । सर्व सिद्धींत सहजें । परम हेंचि ।' -ज्ञा १८. ९८०. १२ यश; विजय, उत्कर्ष. १३ सामग्री; साहित्य. 'घरीं त्याच्या आहे सर्व सिद्धी ।' -रामदासी २.११८.१२ [सं.] सिद्धीस-आणणें-नेणें-पुरें करणें; तडीस नेणें; यशस्वी रीतीनें पुरें होणें, तडीस जाणें. ॰स्थान-न. मूळ ठिकाण.

दाते शब्दकोश

जल

न. पाणी; उदक; तोय; अंबु; नीर [सं.] म्ह॰ जलांत राहून माशाशीं वैर. (वाप्र.) जलीं, स्थलीं, काष्ठीं, पाषाणीं- १ मूळ सर्व ठिकाणीं ज्याचें अस्तित्व अशा देवाबद्दल म्हणतात. २ (ल) ज्या त्या गोष्टींत व जेथें तेथें डोकें खुपसणारा, भेटणारा, पिच्छा पुरविणारा अशा माणसा बद्दलहि योजतात. सामाशब्द- ॰कुक्कुट-पु. पाणकोंबडा. ॰कूप-पु विहीर (पाणी असलेली). याच्या उलट शुष्क कूप. कुंड-न. (ख्रि.) ज्या कुंडांत अगर पात्रांत बाप्तिस्म्याकरितां पाणी ठेवतात तें. (इं.) फाँट. 'बाळकांस घेऊन आलेल्या लोकांनीं... प्रार्थनेंतील दुसरा पाठ झाल्यावर लाग- लेच जलकुंडाजवळ यावें.' -साप्रा ९०.१०५ ॰केलि-क्रीडा- १ विषयीपुरुष स्त्रियांसहवर्तमान जलामध्यें विलास करतात ती. २ पाण्यामधील खेळ; नावा वल्हविण्याची, पोहण्याची शर्यत. 'क्षीरधितीर विहारी जलकेलि करूं नदींत गगनीच्या ।' -हंस- काकीय आख्यान, मोकर्ण २८ २५. ३ नदी-समुद्रपर्यटन. ॰क्रिया-स्त्री. १ पितरांचें तर्पण. २ पाण्याचें कार्य; धुणें वगैरे. ॰खोकड-पु. एक मासा. -प्राणिमो ८५. ॰गतिशास्त्र- पु. (शाप.) पदार्थांच्या पाण्यांतील गतीसंबंधीं नियम दाख- विणारें शास्त्र. (इं.) हायड्रो डायनामिक्स. ॰चर न १ पाण्यांतील प्राणी. 'जैसे जळचरा जळसांडे । आणि तत्क्षणीं मरण मांडे ।' -ज्ञा ३.११७. २ (संकेतानें) समुद्रापलीकडून आलेला परकीय माणूस, द्वीपांतरचा मनुष्य. ३ युरोपियन लोक; इंग्रज लोक. 'जलचर तयार झाले.' -रा १०. १७५. 'प्रताप महिमा थोर जळामधिं परि जलचर अडविला ।' -ऐपो ३०४. ॰ज-वि. (काव्य) पाण्यापासून उत्पन्न झालेला, पाण्यांत जन्म पावलेला (मेघ, कमळ इ॰). ॰जघोष-मेघगर्जना. 'लक्ष दीपांचा प्रकाश । जलजघोष घंटावरी ।' ॰जंतु-पु जलचर; चलसंचारी प्राणी; जलामध्यें उत्पन्न होणारे जंतू (प्रत्येकी). ॰तरंग-पु. १ लाट, लहरी. २ एक वाद्य; बारा- पासून बावीसापर्यंत चिनीमातीचे लहानमोठे पेले घेऊन, वाज- विणारा ते आपल्यापुढें अर्धवर्तुलाकार मांडितो, मग त्यांतून इच्छित स्वराचा ध्वनि निघण्यासाठीं त्यांत कमीअधिक पाणी घालतो व दोन बारीक छड्या दोन हातांत घेऊन पेल्यावर मारून इच्छित रागाची गत वाजवितो, अशा रीतीनें तयार केलेलें वाद्य. ॰ताडन- न. (पाण्यास कितीहि मारलें तरी तें दुभंग होत नाहीं यावरून) (ल.) निष्फळ श्रम, प्रयत्न.' ही बाब जलताडणासारखी व्यर्थ होती.' -सासं २.९३. ॰द-धर-पु. मेघ. जलदजालपटल-न. अभ्र- पटल; आभाळ; ढगांनीं व्याप्त आकाश. जलदेवता-स्त्री. पाण्यांतील देवता; अप्सरा. ॰धर-केदार-पु (संगीत) एक राग; यांत षड्ज, तीव्र ऋषभ, कोमल मध्यम, पंचम, तीव्र धैवत, तीव्र निषाद हे स्वर लागतात. जाति षाडव-षाडव. वादी पंचम, संवादी ऋषभ. गान समय रात्रीचा पहिला प्रहर. ॰धि-निधि-पु १ (काव्य.) पाण्याचा संचय; समुद्र. 'जेणें जलनिधि आटला आचमनी ।' २ (अंकगणित) दहा शंकु किंवा एकावर चौदा पूज्यें इतकी संख्या. ॰नाडी-स्त्री. जमिनीच्या पोटांतून जाणारी पाण्याची शीर; पृथ्वीच्या पोटांतील पाण्याचा मार्ग. ॰पक्षी-पु. पाण्यांतील पक्षी. ॰पाई-स्त्री. एक औषधी वनस्पति ॰पान-न. १ जलप्राशन; पाणी पिणें. २ (काशी) फराळ. ॰पादचारी-वि. पाण्यांतून पायांनीं चालणारा एक पक्षि- वर्ग. याचे पाय लांब व उघडे असतात. -प्राणिमो ५८. ॰प्रलय-पु ज्या वेळीं सर्व पृथ्वी पाण्यांत बुडून जाते असा शेवटचा काल. ॰प्रवाह-पु. गंगाप्रवाह; (थोर पुरुषांची रक्षा, अस्थि, देवाचा निर्माल्य इ॰) पवित्र नदीमध्यें सोडावयाची क्रिया. ॰प्राय-वि. जलपूरति; पाण्याची समृद्धि असलेला (देश). [सं.] ॰बुद्बुद-पुन. १ पाण्यावरचा बुडबुडा. २ (ल.) क्षणभंगुरता, क्षणिकत्व दाखविणारी गोष्ट. पाण्यावरचा बुडबुडा पहा. ॰मंदिर- न. नदी, सरोवर यांच्या पाण्यांत बांधलेलें किंवा नदीच्या कांठीं तळघराप्रमाणें बांधलेलें घर (उन्हाळ्यासाठीं); जलांतील क्रीडा- गृह; धारागृह. ॰मय न. सर्वत्र पाण्याचा फैलाव; भोंवतालीं पाण्यावांचून कांहीं नाहीं अशी जी अवस्था ती. 'समुद्रांत भारी लांब गेलें म्हणजे सर्व जलमय दिसतें. ' -वि. १ जलपूर्ण; जलप्राय पहा. (देश, जागा, फळ). २ पाण्यानें झालेलें (बर्फ, गार). 'गार जलमय पडली यामुळें क्षणांत तिचें जल होऊन गेलें.' ३ पाण्यांत बुडलेलें (गांव, देश). ॰मनुष्य-पुन. जळमाणूस पहा. ॰मागें-१ गलबतें वगैरे जाण्याचा पाण्यामधील मार्ग; याच्या उलट खुष्कीचा मार्ग. २ समुद्रावरील करः आयातनिर्गत माला- वरील पट्टी; याच्या विरुद्ध जकात, ही जमीनीवर असते. ॰यंत्र- न. १ कारंजें. 'उठेत जेथें जलयंत्र धारा ।' -सारुह ५.१७. २ रहाट, पाणचक्की, लाट इ॰ पाण्याचीं यंत्रें. ३ पाण्याच्या जोरा- वर चालणारें यंत्र. ॰यात्रा-स्त्री जलप्रवास. (जलमार्गानें) पर- देशगमन. ॰यान-न. होडी, नाव गलबत, तरांडें इ॰ पाण्यांतील प्रवासाचें वाहन. ॰राज-पु. (शाप.) ज्यामध्यें सोनें विरघळतें असें अम्ल. (इं.) अँक्वारेजिया. ॰रुह-न पाण्यांत वाढणारें कमळ. ॰वास-पु. कांहीं काळ बेंबीपर्यंत पाण्यांत उभें राहण्याची तप- श्चर्या (साधूंची). ॰विहार-पु. जलक्रीडा पहा. ॰व्याल-पु. पाणसाप. ॰शाक-स्त्री. (ल.) मसें; पाणशेंगा. 'बंगाली बाबूस ताजी जलशाक व महाराष्ट्रीय ब्राह्मणांस लोणकढें तूप पाहिजे.' -टि १.३७४. [जल + शाक = भाजी] ॰शोधक-न. पाण्यांतील गाळ काढून शुद्ध करणारें यंत्र अथवा पात्र; (इं.) फिल्टर. ॰शोष-पु. १ तहानेनें घसा कोरडा होणें; रुक्षता; कोरड. २ दुष्काळ; अनावृष्टि; अवर्षण. ॰शोषक-वि. पाणी शोषून, ओढून घेणारें, हवेंतील आर्द्रता दाखविणारें (यंत्र). (इं.). हायग्रोस्कोपिक. ॰श्वासें- द्रियपुट-न. माशास श्वासोच्छवास करण्यास साह्य करणारी शरीरांतील एक पिशवी; गळचुंडी. ॰सत्र-न. पाणपोई; जळ- छत्र पहा. ॰समाधि-स्त्री. १ पाण्यांत बुडून मरणें; संन्याशानें पाण्यांत घेतलेली जिंवत समाधि; पाण्यांत उतरून स्वतःस बुडवून घेणें; फक्त संन्याशानेंच प्रयोग येथें जलसमाधि घ्यावी असा शास्त्रनिर्बंध आहे. ॰स्थलभ्रम-पु. १ हें पाणी कीं जमीन याबद्दलचा भ्रम पडणें. २ महापुरानें पाणी व जमीन एक होऊन जाणें; सर्व जलमय होणें. ॰स्थितीशास्त्र-न. पाण्यामध्यें पदार्थ स्थिर राहण्यासंबंधींचे नियम व गुणधर्म सांगणारें शास्त्र; (इं.) हाय- ड्रोस्टॅटिक्स. जलाचा विकार-पु. पाण्याची विकृति, अवस्थांतर; (गार, बर्फ, वाफ इ॰). जलांज(जु)ली-स्त्री. मृताच्या दहाव्या दिवशीं अश्म्यावर मृताच्या नांवानें तिळमिश्रित पाणी सोडणें; तिलां- जली देणें, सोडणें; (क्रि॰ सोडणें; देणें). 'देउनि जलांजली स्वप्रियसुत बंधूंसि म्हणुनि हा रडत ।' -मोसभा ७.७२. [जळ + अंजलि] जलाधिवासन-न. १ एखाद्या देवतेच्या मूर्तीची मंदि- रांत कायमची स्थापना करण्यापूर्वी एक रात्रभर ती मूर्ती पाण्यांत ठेवण्याचा विधि. २ (सामा.) मूर्तीची मिरवणुक काढण्याच्या पूर्वरात्रीं वरीलप्रमाणें अशीच करावयाची क्रिया. जलाबंब-वि. (ना.) पाण्यानें भरपूर, तुडुंब. [जलबंब] जलाभास-पु. मृगजल. जलाशय-पु. पाण्याचा सांठा, स्थान (समुद्र, तळीं, डबकें, तलाव इ॰). 'शैल कक्षांचीं कुहरें । जलाशय परिसरें ।' -ज्ञा १३.६१२. जलोत्सर्गक-न. पाणढोसळी. (इं.) फ्लशिंग पॉट. जलोदर-पु. पोटांत पाणी सांठल्यामुळें होणारा रोग; उदर. [सं.]

दाते शब्दकोश

सभा

स्त्री. १ ज्या ठिकाणीं विद्वान्, पंडित, गुणीजन, राजे लोक वगैरे जमतात, बसतात अशी जागा; दरबार; मंत्रगृह; 'राजसभा, ब्रह्मसभा.' 'सभे शिशुपाळ घेतला प्राणें ।' -मुसभा १२.१४४. २ समाज; मंडळी; जमाव; समुदाय; बैठक; आखाडा; मेळा. ३ सभेसंबंधी गाणें. 'तेचि सभा गातों सभेमधिं तेचि सभा गातो' -पला २०.४०. ४ शाळा; धर्मशाळा; दालन 'एका सभेंत रात्रौ निजला...।' -मोवन ४.१११. सभा- जिंकणें-वादविवादांत यश मिळवणें; फड मारून नेणें; आपलें म्हणणें खरें करणें.सभाकंप-पु. सभेमध्यें भरणारें कांपरें; लाजाळूपणा; संकोच. २ मन अपराधी असल्यामुळें वाटणारी भीति व त्यामुळें होणारा थरकांप, गोंधळ. सभांगण-न. १ सभेची जागा. २ रंगण; चौक; मोकळी जागा. 'सजूनि वर वल्लभी तव सभांगणीं नाचतो' -केका ११४. सभांगना-स्त्री. वारांगना; कलावंतीण; नायकीण. 'तक्तराव जिलेवंत नाचती सभांगना आनंदांत' -ऐपो १९९. सभागृह-न कचेरी; दिवाण- खाना; सभेची जागा; दरबारची जाग. सभाचातुर्य- कौशल्य-पाटव-न. शिष्टाचार; सभ्यता; रीतरिवाज; चार मंडळींत वागण्याची योग्य पद्धति व त्यांत दिसून येणारी चांगली बुद्धि. सभाजन-पु. १ सभेंतील सदस्य; मंडळी; समाज; लोक- समुदाय. २ सभासद; सभेंत बसणारा गृहस्थ. सभादीप-दीपक- दिवा-वि. १ श्रावणीच्या दिवशीं ब्राह्मणास अग्निसमक्ष सुवा- सिनी दान करतात तो दिवा. २ सभादीप दान करण्याचा विधि. ३ (ल.) सभाभूषण; सभेचा अलंकार. सभाधिकारी- पु. सभेचा नेता; अध्यक्ष. सभाधीट-वि. सभेमध्यें न भितां, न गोंधळतां भाषण करणारा. सभाधूर्त-वि. सभेमध्यें, दरबारांत वाद, मसलत, मध्यस्थी वगैर कामांत प्रवीण, वाक- बगार, हुशार; सभाकुशल-चतुर-पटु हे पर्याय शब्द आहेत. ॰धैर्य-न. सभेंतील धीटपणा; आत्मविश्वास; धिटाई. ॰धौर्त्य- न. सभेंतील धूर्तता, चातुर्य, कौशल्य. सभाध्यक्ष. सभा- नायक, सभापति-पु. सभेचा प्रमुख, मुख्य, नेता, पुढारी, अध्यक्ष, मुखर, उपद्रष्टा. ॰नियम-पु. सभेसंबंधीं कायदा, निर्बंध, काम चालविण्याविषयीं पद्धति. ॰नीति-स्त्री. सभेसंबंधी नियम, निर्बंध, कायदा, पद्धति. ॰पाण्डित्य-न. तादृश अंगीं विद्यादि असोनसो पण सभादिकांमध्यें भाषणादि करण्याचें सामर्थ्य. केवळ सभेमध्यें ज्ञानाचें प्रदर्शन; वरकरणी दाखविण्याची विद्वत्ता. ॰प्रवेश-पु. १ सभेच्या कामास आरंभ, सुरुवात. २ सभास- दाचा सभेमध्यें येण्याचा पहिला प्रसंग; नवीन सभासदास सभेंत दाखल करून घेणें. ॰भीत-वि. सभेमध्यें लाजणारा; संकोच वाटणारा; धीटपणा नसणारा. ॰भीति-स्त्री. समाजाची, मंड- ळीची भीति, भीड, लाज, संकोच; सभेमध्यें घाबरण्याची संवय. ॰भीरू-वि. सभेमध्यें लाजणारा; संकोची. ॰भूषण-न. सभेचा अलंकार; पंडित, विद्वान मनुष्य; सभेमध्यें शोभणारा. ॰मंडन- न. १ सभेची रोषणाई; सभास्यानाचें अंलकरण. २ सभेचा अलं कार; पंडित, विद्वान मनुष्य; सभेला शोभा आणणारा विद्वान. ॰मंडप-पु. १ सभास्थान; सभेची जागा; मंत्रगृह, दिवाणखाना. २ मंदिराच्या गाभार्‍यापुढें कीर्तन-पुराणादिकांकरितां बांधलेली आच्छादित जागा. ३ गाभार्‍यापुढील मोकळी जागा. ॰मोहन- न नजरबंदी; सभेस चकविण्याची, भुलविण्याची विद्या. 'सभा मोहन भुररी चेटकें । साबरी मंत्र कौटलें अनेकें ।' -दा ५.२. २. ॰रंजन-न. सभेची करमणूक; मंडळीचें मनोरंजन. ॰रत्न-न. सभाभूषण; सभेचा अलंकार. ॰लंकार-पु. सभारत्न. ॰व्यव- स्थापक-वि. सभेची व्यवस्था ठेवणारा; शिस्त राखणारा; सभा व्यवस्थितपणें चालविणारा. ॰व्यवस्थापन-न. सभेची व्यवस्था, व्यवस्थित मांडणी, व्यवस्थित कार्य, शिस्त, देख- रेख. ॰शूर-वि. सभेंत किंवा मंडळींत धीट; आत्मविश्वासी; सभेमध्यें पराक्रम गाजविणारा. ॰संकेत-पु. सभेचे नियम, पद्धति, रूढि. सभासद-पु. १ सदस्य; सभेचा प्रत्येक घटक; सभेमध्यें बसलेला प्रत्येक इसम. २ (ल.) लोकांच्या फिर्यादी दाखल करून घेणारा कचेरींतील कामगार. ३ सभास्थान; सभा- मंडप; सभामंडळ; बैठक. 'तूं या विश्वाची अनादि आदी । बैससीं जिये सभासदीं । तेथें सोयरिकीचिया संबंधीं । रळी बोलों ।' -ज्ञा ११.५४४. ४ पंच; न्यायदानाच्या कामीं मदत करणारा अधिकारी. 'सभासद भलेलोकीं सांगितलें कीं' -भाइ- समं २.६३. ॰स्थान-न. सभेची जागा; सभागृह, मंढप, ॰स्फूर्ति-स्त्री. सभेमध्यें प्रसंगावधान; सभेमध्यें भाषण करतांना येणारें अवसान, स्फुरण. ॰क्षोभ-पु. सभेमध्यें गांगरून जाणें; सभेमध्यें घाबरणें, घोंटाळणें. 'किंवा सभाक्षोम तयास झाला ।' -सारुह ६.९५. सभोचित-वि. सभेमध्यें करावयास, मंडळींत करण्यास योग्य; बैठकींत करण्यासारखें. सभ्य-पु. १ सभासद; प्रेक्षक. सभेंतील योग्य मनुष्य. 'तै गुणदोष सायिखेडें । सभ्युं जैसा ।' -ज्ञा १४.३४३. 'भरत कुल धर्म न बुडो सभ्याला पूस एकदां जागा ।' -मोसभा ४.१०३. 'न वदति सभ्य न पांडव ।' -मोसभा ५.५८. २ पंचाग्निपैकीं एका अग्नीचें नांव. -वि. संभा वित; प्रतिष्टित; शिष्ट; सज्जन.

दाते शब्दकोश

कलम

न. १ लेखांतील विशेष मुद्यांबद्दल किंवा गोष्टींबद्दल लिहिलेला तेवढाच भाग; स्वतंत्र सदर, बाब, मुद्दा; परिच्छेद. 'पुस्तकगृह हें एक सुधारणुकीचें मोठें कलम आहे ...' -नि १५. 'एकट्यावरूनच ... काव्यरचनेस नाक मुरडणें हें अली- कडील रसिकांचे पहिलें कलम ठरून गेलें आहे.' -नि १४१. २ एका झाडाची फांदी-डहाळी दुसर्‍या झाडाच्या फांदीवर लावून कांहीं कृतिविशेषानें त्या दोहोंचाहि एकजीव करणें; कल- माचे प्रकार:- १ जिभलीचें कलम - दोन फांद्यांचे नुसते लेखणी- सारखे तास घेऊन त्या एकमेकीस जोडणें. २ पाचरीचें कलम- एका फांदीला खांचा पाडून त्यांत दुसर्‍या फांदीचा तुकडा पाचरी- प्रमाणें मारणें, बसविणें. ३ दाबाचें कमल-फांदीला चीर घेऊन फट पाडून ती मातींत पुरतात, थोड्या दिवसांनीं तिला मुळ्या फुटल्या म्हणजे ही मुळ्यांची फांदी कापून निराळी लावतात. ४ खुंटीचें कलम-एक जाड बुंध्याचें सबंध झाड कापून टाकून त्या कापलेल्या भागांत आंतील गाभा व साल यांत फट पाडून त्यांत दुसर्‍या झाडाच्या फांदीचा जाड तुकडा खुंटीप्रमाणें बसविणें. ५ गुरीचें कलम-डोळे भरण्याचें. ६ भेटकलम-दोन झाडांच्या साली काढून आंगें एकत्र जोडून बांधून एकजीव होईल असें करणें. ३ वरील कलम करण्याची कृति. ४ चितार्‍याची कुंचली किंवा पेन्सिल. 'रजपूत कलम, कांगडी कलम, महाराष्ट्रीय कलम, मोंगली कलम इ॰' -चित्रकला संप्रदाय. 'इतकें नाजूक कलम, कोणत्या चितार्‍याजवळ असेल ?' -इंप ४४. ५ बोरूची लेखणी. 'हातीं कलम घेऊन पडला' -ऐपो ३९१. ६ कापा- काप; तोडतोड (हात, पाय वगैरेची); झाडांची खच्ची किंवा छाटाछाटी. 'हे ज्योतिषी व त्यांचे पुरस्कर्ते यांचे आमच्या कर्मठ राजाचें कारकीर्दींत खचित हात कलम केले असतें.' -विवि (क्रि॰ करणें) 'द्राक्षाच्या दुसर्‍या छाटणीच्या वेळेस फांदी जितकी जून असते तितकी ठेवून बाकीची छाटतात यास कलम म्हणतात.' -शेतकरी २.११. ७ रकाना. ८ कायद्याच्या पुस्तकांतील प्रत्येक नियम; कानू; परिच्छेद; 'पिनल कोड कलम ४३५ प्रमाणें अपक्रियेचा अपराध वामनरावाचे माथीं बसला.' -विक्षिप्त १.४३. ९ (कु.) (सोनारी धंदा) पच्ची करण्याचें एक हत्यार. १० दुकानदारांचा परस्पर उधार देवघेवीच्या हिशेबां- तील मुदत. ही १ महिना १० दिवस किंवा १।। महिना असतें. त्यानंतर उधार रकमेवर व्याज आकारतात. त्यास मुदत संपल्या- नंतर कलम पिकलें असें म्हणतात. ११ (ल.) पत्र 'चाललें कलम फौजेचें । राऊत पायदळाचे ।' -ऐपो २३०. [अर. कल्म = बोरू, लेखणी] ॰कसाई-पु. १ हिशेबनीस; हिशेब तपासनीस; पगाराचा बटवडा करणें वगैरे कामाचा कारकून; खर्चांत छाटाछाट करून लोकांचें (लेखणीनें) नुकसान करणारा इसम. २ जो आपल्या लेख- णीनें (लेखानें) लोकांना बुडवितो तो. ३ कारकुनी डावपेंचांत दुसर्‍याचा गळा गोत्यांत अडकविणारा. ॰कुचराई-स्त्री. लुच्चे- गिरीनें हिशेबांत एखादी बाब गोवणें, गाळणें; गबाळेपणानें किंवा घाईनें लेखामध्यें अक्षरें खाणें-गाळणें. [कलम + कुचराई] ॰जारी- १ पत्रें लिहून सैन्याची केलेली जमवाजमव; नांवनिशी. (क्रि॰ करणें; चालणें). 'कलम ज्यारीचे घटाव मचले ।' -ऐपो २१४. २ विज्ञप्ति; पत्रलेखन. 'ते कलमजारी करून फौज ठेवूं लागले.' -मराचिथोशा ९. [फा.] ॰तराश-स-पु. हुषार; चलाख; लेखणीबहाद्दर. [फा. तराश = चाकू] ॰दान-दानी-नस्त्री. १ लेखणी व दौत ठेवण्याचें लांकडी घर, ठोकळा, खोबळा; लांबट पेटी. [फा. कल्म दान्] २ ज्या दिवाणखान्याची मधली तख्तपोशी तबकासारखी सपाट असून दोन्ही बाजूंची (डाव्या व उजव्या हाताकडील) तख्तपोशी छपराप्रमाणें उतरती असते असा दिवाणखाना. ३ फटाक्यांची एक जात; प्रकार. 'कलम- दानी एका पेटींत ५०० पुडे असतात.' -मुंव्या ११८. ४ (इमारत) हवा आंत खेळण्यासाठीं भिंतींत केलेली खिडकीवजा योजना. ५ दरवाज्याच्या झडपेमध्यें फळीची चौकट करून आंत नक्षीदार अगर एखादी आकृति काढून पातळ फळी भरून तयार करतात तें. ॰बंद-वि. पत्रीं नमूद; लेखनिविष्ट; लिखित. 'तेच मजकूर येक जरा तफावत न करितां कलमबंद केले.' -रा १. ४४. [फा.] ॰बंद करणें-क्रि. लिहून घेणें; टिपून ठेवणें; टाक गुंतविणें. ॰बंदी-वि. १ अनेक प्रकारचीं अनेक कलमें निर्णयपूर्वक ज्यांत बांधून दिलीं आहेत तो लेख; निरनिराळीं खातीं, सदरें व बाबी निरनिराळ्या कलमाखालीं लिहिलेली याद (यांत हुकुमाची, कबुलायतीच्या किंवा कराराच्या कलमांची नोंद असते); विषयवार नोंदणी; सर्व तपशिलांच्या बाबींची एका- खालीं एक क्रमानें केलेली नोंद. २ कलमजारी पहा. ॰बहाद्दर- वि. लेखणीशूर; हुषार लेखक; तरबेज कारकून. ॰बाज-वि. १ कलम चालविणारा; फरडा. २ सर्व कलमें अथवा बाबी, नियम यांत निष्णात. 'कायद्याच्या कलमबाज शब्दार्थानें ...' -अभ्युदय ता. ३०.११.२८. ॰वार-क्रिवि. ज्यांत एकामागून एक सर्व अटी, बाबी लिहिल्या किंवा सांगितल्या आहेत अशा तर्‍हेनें; बाबीमागून बाब याप्रमाणें सूक्ष्मपणें व विशेषपणें; तपशील- वार; विषयवार. ॰सफाई-स्त्री. वळणदार लिहिणें; सुंदर अक्षर; कारकुनी हात. [फा.] ॰सूत्रा-वि. लेखनकुशल; लेखननिपुण. [अर. कलम + सं. सूत्र]

दाते शब्दकोश

ज़ाबता

(पु.) [अ. झाबिता] नियम; बन्धन; यादी. “जाते समयीं कुल लश्करचे लहान थोर लोकांचे बिशादीचे ज़ावते करावे” (सभासद २२).

फारसी-मराठी शब्दकोश

अभिजात      

वि.       १. उच्चतम प्रतीचे, श्रेष्ठ; पहिल्याप्रतीचे (साहित्य, कला). २. प्रस्थापित नियम व तत्त्वे यांचे पालन करून लिहिलेले. ३. संयम, समतोल इत्यादी सांभाळून लिहिलेले. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अभंग

वि. १ अविनाशी; अखंड; अक्षय; निश्चल; निरंतर. 'श्रीकृष्णरंगें सुरंग । अहेवपण तेणें अभंग । तेंचि कुंकुम पैं चांग । मुखचंद्री चंद्रमा ।' -ऐरुस्व ७.१७.२ (ल.) ब्रह्मस्वरूप; अवि- नाशी स्थिति. 'हे करणी केली जनार्दनें । मज अभंगीं घातलें तेणें ।' -एभा १८.३९३.३ न तुटलेलें, फुटलेलें, उल्लंघलेलें; सतत; अवि- रत. 'प्रपंचाची धाडी । अभंग हे ।' -ज्ञा १३.९९२. 'त्यालागीं जो निःसंगु । तोचि अभंगु साधक ।' -एभा २.१५६. [सं.अ + भंग] -पु. एक मात्रावृत्त. चरण चार. या वृत्ताला धरबंध फारसा नाहीं. याला मात्रा वगैरेचा नियम फारसा लागू पडत नाहीं. चरणांत तीनपासून आठपर्यंत अक्षरें. महाराष्ट्रांत या वृत्ताचा प्रसार वारकरी पंथांतील संतांनीं फार केला. उदा. सुंदर तें ध्यान उभें विटेवरि । कर कटावरि ठेवूनिया ।। तुगा १

दाते शब्दकोश

आचारशास्त्र      

न.       (समाज.) मनुष्याने समाजात वागताना कसे आचारण करावे, यासंबंधीचे नियम सांगणारे शास्त्र. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आचारविचार      

पु.       शास्त्रविहित असे कुळाचार, धर्माचार, विधी; संप्रदायशुद्ध आयुष्य घालविण्याचे मार्ग, नियम, शिस्त, मर्यादा इ. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आचरणे      

उक्रि.       १. आचरण करणे, ठेवणे, वागणे; नियम पाळणे : ‘बहिणी म्हणे ऐसे भक्त आचरित तयासी भगवंत जवळींच ।’ − ब गाथा ५४०. २. चालविणे; धार्मिक विधी करणे; उरकणे; अभ्यासणे. [सं. आ+चर्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आदेश

पु. १ उपदेश. २ आज्ञा; हुकूम; विधि; नियम. 'दास म्हणे आदेश तयाला ।' -दावि २७४. ३ अतिदेश या अर्थी चुकीनें योजिला जातो. ४ कानफाटे, नाथपंथी (गोसावी) लोक पर- स्परांस नमस्कार करतांना उपयोगांत आणितात तो शब्द. 'अलक्ष आदेस जल्पतसे ।' -नव ८.११०. ५ (व्या.) मूळ अक्षराबद्दल दुसरें योजिलें जाणारें अक्षर (प्रतिनिधि); बदली येणारा वर्ण. उ॰ इ + इ च्या स्थानीं ई आदेश होतो. ६ (शाप.) बदली वस्तु, पदार्थ; प्रतिनिधि. ७ (राजनीति) हुकूम; आज्ञा; बदली कारभार करण्याचा ठराव. (इं.) मॅन्डेट. 'वरील विचारास संलग्न असलेलें दुसरें एक तत्त्व म्हणजे आदेशाचें होय.' -वस्व ५५. ८ (भाषा.) समानार्थक अन्य शब्द; प्रतिनिधि. उ॰ दृश् (धात्वादेश) पश्य. [सं.] ॰प्रधान-वि. (भाषा.) ज्यांत शब्दांचीं रूपें बदलतात अशा सप्रत्ययी (संस्कृत, लॅटिन वगैरे भाषा). (इं.) इन्फ्ले- क्शनल. ॰प्रकरण-न भाषेंतील ध्वनींस होणार्‍या विकृतींबद्दलचें विवेचन; ध्वनिशास्त्र. (इं.) फोनेटिक्स. -ज्ञानेश्वरी व्याकरण १.

दाते शब्दकोश

आदेश      

पु.       १. आज्ञा; हुकूम; फर्मान; विधी; नियम : ‘दास म्हणे आदेश तयाला ।’ − दावि २७४. २. उपदेश. ३. अतिदेश या अर्थी चुकीने योजला जातो. ४. कानफाटे; नाथपंथी (गोसावी) लोक परस्परांस नमस्कार करताना उपयोगात आणतात तो शब्द : ‘अलक्ष आदेश जल्पतसे ।’ − नव ८·११०. ५. (भाषा) मूळ अक्षराबद्दल दुसरे योजले जाणारे अक्षर (प्रतिनिधी). ६. बदली वस्तू, पदार्थ; प्रतिनिधी. ७. (राजनीति) हुकूम; आज्ञा; फर्मान. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आडस

स्त्री. १ अडचण; अट; मर्यादा; मध्यंतरीं असलेली प्रतिबंधक गोष्ट, परिस्थिति, नियम, इ. २ (ल.) शिष्टा- चार; उपचार.‘ ज्या श्रीमंतांच्या लोकांनीं पातशहाची तगीरी बहाली केली आहे, त्यांच्या पत्रास इतकी आडस नाहीं. यांस कोण पुसतो‘ –देवी श्री अहिल्याबाईं २९४. ३ (व.) अडचण; मध्यस्त. ‘रुसले भरतारा । समजावे नानारीती । घरांत नाहीं कोणी । आडस गणपती ।।’ –वलो ९०. [आड + स]

दाते शब्दकोश

आडस      

स्त्री.       १. अडचण; अट; मर्यादा; मध्यंतरी असलेली प्रतिबंधक गोष्ट, परिस्थिती, नियम इ. ‘ग्रंथोक्ती तेथ आडसो घालितोसि कां’ − ज्ञा १३·६३४. २. (ल.) शिष्टाचार; उपचार : ‘ज्या श्रीमंतांच्या लोकांनीं पातशहाची तगीरी बहाली केली आहे, त्यांच्या पत्रास इतकी आडस नाहीं. यास कोण पुसतो?’ − देअ २९४. ३. मध्यस्थ : ‘रूसले भरतारा । समजावे नानारीती । घरांत नाहीं कोणी । आडस गणपती ॥’ − वलो ९०. (व.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अधिनियमिती      

पु.       १. कायद्यात किंवा विधिविधानात रूपांतरित झालेला मसूदा. (अधिकृतपणे जारी झालेले अधिनियम, नियम, विनियम, अध्यादेश इत्यादींचा यात समावेश होतो.). [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अध्यापन शास्त्र      

न.       शिक्षणाची तत्त्वे व नियम; कसे शिकवावे हे सांगणारे शास्त्र; शिक्षणशास्त्र. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ऐल, ऐला, ऐलाड, ऐलाडी, ऐली

वि. अलीकडचा; अलीकडला. 'उताराचिये सांगडी । ठाके ते ऐलीच थडी ।।' -ज्ञा १८.२५५. 'पाहेचि ना तो नाहीं बुडाला । कोरडा आला ऐल तीरा ।' -एभा २८.३२५. क्रिवि. १ या बाजूला; अलीकडे. 'प्रवृत्ति माघौति मोहरे । समाधि ऐलाडी उतरे ।' -ज्ञा ६.१९१. २ आधीं; अगोदर; पूर्वीं. 'तेवि तो उडुनाथ । केवल श्रीकृष्णप्रीत्यर्थ । सांडूनि काळ नियम । ऐलाडचि उदैला ।।' -रास १.१०७. [सं. आदिम; प्रा. आइल्ल] ऐलकांठ, ऐलतीर, ऐलथड-पु.न.स्त्री. अलीकडचा कांठ; जवळचा कांठ; पैलथडी याच्या उलट. 'शोभा समुद्र हेलावे पोटीं । चक्षू पोहणार उठाउठी । ऐलकांठीं चुबकले ।।' -मुसभा २.७७. 'असो आतां त्या अवसरीं । क्षीरसागरीच्या ऐलतीरी । बध्दांजलि करूनि निर्धारी । सुरवर उभे ठाकले ।।' -ह २.६०.

दाते शब्दकोश

अईन; आईन

(स्त्री.) [फा.आयीन्] चाल, रीत, नियम. “आईने अक्बरी”= अक्बराचा कायदा; अबुल्फझ्ल्नें लिहिलेल्या पुस्तकाचें नांव.

फारसी-मराठी शब्दकोश

ऐतिहासिक समाजशास्त्र      

(समाज.)सामाजिक जीवनाचा उगम,त्यातील अवस्था आणि त्यांचे नियम व कायदे यांचा अभ्यास करणारे शास्त्र. ऐतिह्य      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अलिखित

वि. लेखी नसलेला (कायदा, ठराव, नियम). (इं.) अन् रिटन. [सं.]

दाते शब्दकोश

अलिखित      

वि.       लेखी नसलेला (कायदा, ठराव, नियम). [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अलोट

अलोट alōṭa a (Poetry अ & लोटणें) That recedes not, falls not back, changes not: also that cannot be averted or turned back. Ex. जाणोनि त्याचा अलोट- नियम ॥ आज्ञा देऊन पाठवी धर्म.

मोल्सवर्थ शब्दकोश

अमल दस्तूर      

पु.       नियम; कायदा; वटहुकूम; शासन.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अनौपचारिक

वि. खासगी; खेळीमेळीचा; विशेष नियम वगैरे न पाळतां केलेलें. 'सुधाताई ढवळे स्मारक मंदि- रांत श्री. शंकरराव किर्लोस्कर यांच्या नेतृत्वाखालीं अनौपचा- रिक संमेलन भरणार आहे.' -के १७.१०.४२. [सं.अन् + उपचार]

दाते शब्दकोश

अनियत बाजार      

पु.       (कृषी.) शेतकऱ्यांच्या मालाचे वर्गीकरण, वजन व त्याला वाजवी भाव मिळण्यासंबंधी निश्चित नियम व यंत्रणा नसलेला बाजार. उदा. खेडेगावातील आठवडे बाजार.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अनंकुश      

वि.       १. स्वैरवर्तनी; अनावर. २. नियम न पाळणारा; ज्याच्यावर ताबा चालत नाही किंवा चालविता येत नाही असा; बेशिस्त; स्वच्छदी. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अनुक्रम

पु. १ परंपरा; ओळ; एकामागून एक येणें. २ पद्धति; नियम. ३ विशिष्ट पध्दतीप्रमाणें-किंवा नियमांप्रमाणें-रचना, मांडणी. 'कोशांतील शब्द वर्णानुक्रमानें लावलेले असतात.' 'देखें अनुक्रमाधारें । स्वधर्मु जो आचरे ।' -ज्ञा ३.८०. [सं. अनु + क्रम्]

दाते शब्दकोश

अनुक्रम      

पु.       १. ओळ; एकामागून एक येणे; परंपरा. २. पद्धती; नियम. ३. विशिष्ट पद्धतीप्रमाणे किंवा नियमाप्रमाणे रचना; मांडणी : ‘देखें अनुक्रमाचरें ।’ स्वधर्मु जो आधारे ।’ – ज्ञा ३·८०. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अनुशासन      

न.       १. आज्ञा. २. कायदा; नियम; ठराव. ३. शिस्त; नियमन. ४. निश्चित, मर्यादित, सुनियंत्रित करण्याचा व्यापार. ५. व्यवहारशास्त्र. ६. अनुष्ठान : ‘मग मांडिले अनुशासन । आणि रुद्राचे करी चिंतन ।’ – कथा ४·१३·२८. ७. एखाद्या विषयाचे विवेचन, विवरण, ऊहापोह, स्पष्टीकरण इ. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अनुशासन

(सं) न० कायदा, नियम.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

न.१ आज्ञा; २ कायदा; नियम; ठराव; ३ निश्र्चित, मर्यादित, सुसंत्रित करण्याचा व्यापार. ४ व्यवहारशास्त्र. ५ अनुष्ठान. 'मग मांडिलें अनुशासन । आणि रुद्राचें करी चिंतन ।' -कथा ४.१३.२८. [सं.]

दाते शब्दकोश

अनुशास्ता

पु. १ अनुशासन, नियम न करणारा; राज्य चालविणारा; बंदोबस्त राखणारा; कारभारी; शिक्षा करणारा; नियंत. २ उपदेश करणारा. [सं.]

दाते शब्दकोश

अणुव्रत      

न.       गृहस्थाश्रमी जैनाने पाळावयाची व्रते व नियम.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अन्योन्यता      

स्त्री.       १. एकमेकांशी संबंधित असणे : ‘द्विघातीक अन्योन्यतेविषयी त्याला नियम शोधावयाचा होता…’ – कग १७२. २. राष्ट्राराष्ट्रातील परस्पर देवाणघेवाण; दोन राष्ट्रांनी परस्पर संमतीने

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अंगद

न. १ बहुभूषण (दंडात किंवा मनगटांतहि घाल- तात). कडीं, वाकी, बाजूबंद इ॰. 'करकंकणें बाहुअंगदें.' -एभा १४.४८५. 'अंगदमंडित चंदनचर्चित सायुध नृपाळभुज तोडी.' -मोकर्ण ११.३. २ वालीपुत्र (रामदूत). [सं.] ॰नीति- स्त्री. (रामदूत अंगदानें रावणास संगीतलेलें नीतिशास्त्र; त्यावरून) सुनीति; सन्मार्गाचे नियम. ॰शिष्टाई-स्त्री. सीता परत करण्या- साठीं अंगदानें रावणाशीं केलेली वाटाघाट, सामाचें बोलणें, त्या- वरून (ल. उप.) दोन्हीं पक्षांचा समेट करण्यासाठीं आपण होऊन लुडबुडेपणानें केलेली मध्यस्थी; लुडबुड; चोंबडेपणा.

दाते शब्दकोश

अंगदनीति, अंगदनीती      

स्त्री.       (रामदूत अंगदाने रावणास सांगितलेले नीतिशास्त्र त्यावरून) सुनीती; सन्मार्गांचे नियम.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अंमलबजावणी      

स्त्री.       (मान्य झालेला कायदा, नियम इ.) लागू करण्याची कृती; कार्यान्वयन; अंमलात आणणे. [फा.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अपकृत्य

पु. १ (कायदा) कायद्यानें घालून दिलेला नियम मोडला म्हणून नुकसान भरपाईदाखल कोणातरी व्यक्तीला त्याकरितां कोर्टात फिर्याद आणतां येते असा विशिष्ट गुन्हा; इं. टॉर्ट. २ दुष्कृत्य; विघांतक कृत्य. 'किचनेर यांनीं लष्करी खर्च वाढविला काय आणि अर्झन साहेबांनीं तिबेट मिशनमध्यें पैसे ओतले काय, हिंदु- स्थानांतील लोकांच्या द्दष्टीनें दोन्हींहि एकसारखींच अपकृत्यें आहेत.' -टि २.५९७. [सं. अप + कृ]

दाते शब्दकोश

अपकृत्य      

न.       १. (कायदा.) कायद्याने घालून दिलेला नियम मोडला म्हणून नुकसान भरपाईदाखल कोर्टात फिर्याद आणता येते असा विशिष्ट गुन्हा. २. दुष्कृत्य; विघातक कृत्य : ‘किचनेर यांनी लष्करी खर्च वाढविला काय आणि कर्झन साहेबांनी तिबेट मिरानमध्ये पैसे ओतले काय, हिंदुस्थानातील लोकांच्या दृष्टीने दोन्हींही एकसारखीच अपकृत्यें आहेत.’– लोटिकेले २·५९७. [सं. अप +कृ]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अपसिद्धांत      

पु.       चुकीचा नियम, प्रमेय, निर्णय; तर्कशास्त्रास सोडून केलेला निकाल. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अपसम      

वि.       (ग.) ठरावीक साचा किंवा नियम नसलेला. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अपथ

पु. १ पाखंड; कुमार्ग. २ अनियमितपणा; रूढमार्गा- विरुद्ध आचरण; रीतीवेगळें-बाहेरचें वर्तन. [सं. अ + पथ]. ॰गमन- वर्तन-संचार-पु १ पाखंडमार्ग. २ नियमांविरुद्ध, अशिष्ट वर्तन; दुराचरण; वाईट वर्तन. ॰गामी-चारी-वर्ती-वि.१ पाखंडी; धर्मबाह्य आचरणाचा. २ नियम, रूढी न मानणारा; दुराचारी; कुमार्गी.

दाते शब्दकोश

अपथगामी, अपथचार, अपथवर्ती      

पु.       १. पाखंडी; धर्मबाह्य आचरणाचा. २. नियम, रूढी न मानणारा; दुराचारी; कुमार्गी. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अपवाद

(सं) पु० दोष. २ पोट नियम.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

अपवर्ग      

पु.       १. मोक्ष; चार पुरुषार्थांपैकी चवथा; मुक्ती : ‘जयाचिए गाविचा मार्गु । चुके साधनाचा वर्गु । देआवेया अपवर्गु । धावे घरोघरी ।’ – ऋ ७७. २. समाप्ती. ३. अपवाद; विशेष नियम. ४. देणगी. ५. त्याग. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आर्टिकल      

न.       १. वृत्तपत्रातील किंवा मासिकांतील लेख : ‘आर्टिकलची मर्यादाहि भरत आली. − आगर ३·१४२. २. नियम; कसर; सॉलिसिटर होण्यासाठी करावा लागणारा करार. ३. वस्तू. ४. उपपद. [इं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आर्टिकल

न. १ वृत्तपत्रांतील किंवा मासिकांतील लेख. 'आर्टिकलची मर्यादाहि भरत आली.' -आगर ३.१४२. २ नियम; करार; सॉलिसिटर व्हावया करतां करावा लागणारा करार. ३ वस्तु. ४ उपपद. [इं.]

दाते शब्दकोश

आर्टिकल्स ऑफ अ/?/सोसिएशन

न. पु. (कंपनी कायदा) 'कंपनीचे नियम, शर्ती; कलमबंदी. [इं.]

दाते शब्दकोश

आर्या      

स्त्री.       १. श्रेष्ठ आदरणीय स्त्री; साध्वी स्त्री : ‘चाले देवी (द्रौपदी) जीचा कैवारी देवदेव ती आर्या ।’ – मोस्त्री २·३. २. एक वृत्त; छंद; आर्येच्या प्रत्येक अर्धात साडेसात मात्रागण असतात. त्यात विषमस्थानी ज गण नसावा आणि षष्ठस्थानी ज गण किंवा न गण यावा हा सामान्य नियम आहे. आर्या, गीती, उपगीती, उद्‌गीती आणि आर्यागीती असे आर्यावृत्ताचे पाच भेद आहेत. यातील प्रथम आर्या हा वृत्तप्रकार संस्कृत असून मराठीत हे वृत्त क्वचित येते. आर्या नावाचे जे वृत्त मराठीत आहे ते वास्तविक गीती आहे. मोरोपंत यासच आर्यावृत्त म्हणतात : ‘शोभा आर्यावृत्तें आली भुलतील यासि कवि कोटी ।’ − मोभीष्म १२·७९. पहिल्या व तिसऱ्या पादात १२ मात्रा, दुसऱ्यात १८ आणि चौथ्यात १५ असे वास्तविक आर्यावृत्ताचे लक्षण आहे. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आर्या

स्त्री. १ श्रेष्ठ, आदरणीय स्त्री; स्वाध्वी स्त्री. (सिं.) आर्याणी = पडदानशीन स्त्री. 'चाले देवी (द्रोपदी) जीचा कैवारी देवदेव ती आर्या ।' -मोस्त्री २.३. २ एक वृत्त, छंद; आर्येच्या प्रत्येक अर्धांत साडेसात मात्रागण असावेत. त्यांत विषमस्थानीं ज गण नसावा आणि षष्ठस्थानीं ज गण किंवा न गण यावा हा सामान्य नियम आहे. आर्या, गीति, उपगीति, उद्गीति आणि आर्यागीति असे आर्यावृत्ताचे पांच भेद आहेत. यांतील प्रथम आर्या हा वृत्तप्रकार संस्कृत असून मराठींत हें वृत्त क्वचित येतें. आर्या नांवाचें जें वृत्त मराठींत आहे तें वास्तविक गीति आहे. मोरो पंत यासच आर्यावृत्त म्हणतात. 'शोभा आर्यावृत्तें आली भुलतील यासि कवि कोटी ।' -मोभीष्म १२.७९. पहिल्या व तिसर्‍या पादांत १२ मात्रा, दुसर्‍यांत १८ आणि चौथ्यांत १५ असें वास्त- विक आर्यावृत्ताचें लक्षण आहे. 'गीति' पहा. 'आर्या आर्योसि रुचे ईच्या ठायीं जशी असे गोडी । आहे इतरां छंदीं गोडी परि याप- रीस ती थोडी ।।' -मोस्फुटआर्या. आर्यागीति-स्त्री. या वृत्ताच्या पहिल्या व तिसर्‍या चरणांत १२ मात्रा असून दुसर्‍या व चौथ्या चरणांत २० मात्रा असतात. उदा॰ सत्यप्रतिज्ञ भीमस्तुतिपावे बंधु कंठलोहितपानें । मारी वसिष्ठ-सुत जो मुनि विश्वामित्र तत् कीर्ति तोहि तपानें ।।' -मोकर्ण ६.३२. [सं.]

दाते शब्दकोश

आर्यव्रत      

न.       आर्यांनी घालून दिलेले आचार, नियम; कुलीनता; सदाचरण (शरणागताची उपेक्षा न करणे, दीनांवर दया करणे इ.) : ‘आता यांही आर्यव्रत कैसें जीवितार्थ सोडावें ।’ − मोउद्योग ४•७६. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आर्यव्रत

न. आर्यांनीं घालून दिलेले आचार; नियम; कौलिन्य; सदाचरण (शरणागताची उपेक्षा न करणें, दीनांवर दया करणें इ॰). 'आतां यांही आर्यव्रत कैसें जीवितार्थ सोडावें ।' -मोउद्योग ४. ७६. [सं.]

दाते शब्दकोश

असिधारा व्रत      

न.       १. स्त्री– पुरुषांनी मीलन प्रतिबंधार्थ उभयतांच्यामध्ये नागवी तलवार ठेवून एका शय्येवर निजणे. २. (ल.) मनोविकारांचे संयमन करणे; यावरून अत्यंत कठीण, दुर्घट व्रत – नियम. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अष्टविधसमाधि

अष्टविधसमाधि aṣṭavidhasamādhi m pl S The eight modes of Yoga or Self-restraint in profound contemplation: viz. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधि.

मोल्सवर्थ शब्दकोश

अतिदेश      

पु.       १. प्रस्तुत विषयाच्या बाहेरील विषयास एखादा नियम, मुद्दा, विधान, तत्त्व लागू करणे, लागू पडेल त्या ठिकाणी लावणे. २. आज्ञा; हुकूम; आदेश.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अतिदेश

पु. १ प्रस्तुत विषयाच्या बाहेरील विषयास एकादा नियम, मुद्दा, विधान, तत्त्व लागू करणें; लागू पडेल त्या त्या ठिकाणीं लावणें. २ आज्ञा; हुकूम; आदेश. [सं. अति + दिश्]

दाते शब्दकोश

अतिपात      

पु.       १. (नियम) भंग; उल्लंघन; अतिक्रमण; शास्त्र, रीतीभाती यांना न जुमानणे. २. (भू.) ताण व दाब यामुळे फुटणे. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अतिपात

पु. (नियम) भंग; उल्लंघन; अतिक्रमण; शस्त्र, रीतीभाती यांनां न जुमानणें. [सं.]

दाते शब्दकोश

अतिशुद्धवाद      

पु.       धर्मशास्त्र आणि नीतिमत्ता याविषयीचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत असा आग्रह धरणारे मत. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अटकळ      

स्त्री.       १. अंदाज; अनुमान; तर्क; अजमास; सुमार लौकिकातील चाल; रीत (कुस्ती वगैरे खेळण्याची). २. गणित किंवा इतर शास्रातील नियम; सिद्धांत; रूढ; चाल; रीत. ३. पडताळा; ठोकताळा. ४. विचार; समजूत : ‘कारभारी यांच्या अटकळेस आले तर सलुख होईल

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अव्युत्पन्न      

वि.       १. ज्याची व्युत्पत्ती लावलेली नाही असा, मूळ न शोधलेला (शब्द, नियम); असाधित (शब्द). २. अविद्वान; अडाणी; ज्याने शास्त्रांचा नीट अभ्यास केलेला नाही असा. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अव्युत्पन्न

वि. १ ज्याची व्युत्पत्ति लावलेली नाहीं असा; मूळ न शोधलेला (शब्द, नियम); असाधित (शब्द). २ अवि- द्वान्; अडाणी. [सं.]

दाते शब्दकोश

अयीन      

पु.       कायदा; नियम.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अयीन

पु. कयदा; नियम. [अर. अयीन = कायदा]

दाते शब्दकोश

बांधी

स्त्री. १ बंधन; नियम. 'अधिकें जंवजंव ओषधीं । सेवेची मांडे बांधी ।' -माज्ञा १८.१५५. २ (व.) शेतास घातलेला बांध. [बांधणें] ॰करणें-क्रि. कांतकाम करतांना एखाद्या पदार्थावर जसें काम करावयाचें असेल तसा तो पकडणें.

दाते शब्दकोश

बांधणें

सक्रि. १ आंवळणें; एकत्र करणें; तांगडणें; अडक- वणें. २ गांठ देऊन आवळणें; गांठ मारणें. ३ नाल मारणें; पाय- बंद घालणें(घोड्याला). ५ (पागोट्यास) घड्या घालून नीट आकार देणें; गुंडाळणें. ६ (बांध इ॰ घालून पाणी) अडविणें. ७ (नियम, कायदे, रीति, वेळ इ॰) योजणें; स्थापन करणें; प्रचारांत आणणें. ८ बांधून घेणें; रोधणें; जखडून टाकणें; आखणें (कायद्यानें, निय- मानें).. 'त्याचा सारा वेळ बांधलेला असे.' -नि ९९८. ९ (घर, भिंत, जहाज इ॰) रचणें; उभारणें; बनविणें. १० (धरण, रस्ता इ॰) बांधून पक्का करणें. ११ (काव्य, व्याख्या, ग्रंथ) रचणें; रचना करणें; जुळणी करणें. १२ (तर्क, कल्पना, बुद्धि, युक्ति) योजणें; रचणें; बनविणें; एकत्र करणें. १३ बनविणें; वस्तूंना आकार देणें (जोडे, मिठाई इ॰). १४ (वैर, मत्सर, द्वेष) धरणें; बाळगणें; मनांत ठेवणें. १५ मंत्रानें ताप न येईल किंवा न दिसेल असें करणें; मंत्रानें थांबविणें; बंद करणें. [सं. बंध्; पोर्तु. बदेलार] म्ह॰ बांधली शिदोरी व सांगितलें ज्ञान पुरत नाहीं. बांधली गांठ-स्त्री. बंद केलेली पैशाची पिशवी; राखून ठेवलेले, साठविलेले पैसे; सांठा; संचय. [बांधणें + गांठ] बांधल्या कमरेचा-वि. कमरबंद; तयार; सावध.

दाते शब्दकोश

बारगळ

वि. १ उनाड; भटक्या; स्वच्छंदी; आवरण्यास कठिण; उच्छृंखल. (मनुष्य किंवा पशु) २ बेकादेशीर; बेताल- पणाचें; अनियंत्रित (भाषण, वर्तन, कृति इ॰). बारगळणें-अक्रि. १ स्वच्छंदीपणानें वागणें; ताबा झुगारून देणें. २ निकामी होणें; भ्रष्ट होणें; मध्येंच नाहींसा होणें. 'ती शास्त्रोक्त मर्यादा उल्लंघिली कीं लोण बारगळलें.' -नि ७६३. ३ खेळतांना हद्दीच्या बाहेर जाणें. [बाहेर + गळणें; बारणणें = बाहेर जाणें] बारगा-वि. १ बारगळ. २ हेकट; माथेफिरू; कायदा, नियम इ॰ न पाळणारा.

दाते शब्दकोश

बेत

पु. १ योजना; रचना; नमुना; युक्ति. २ कारण; उद्देश; हेतु मसलत. ३ पध्दत; रीति व्यवस्था; मांडणी; टापटीप. ४ रूप; आकार; रुपरेषा; वळण; आराखडा (पुढील कामाचा काढ- लेला. योजलेला). [सं. हेतु; हिं.] बेताचा, बेताबेताचा-वि. १ रीतीचा; पद्धतशीर; योग्य व ठराविक नमुन्याप्रमाणें असलेला. २ मध्यम साधारण; प्रमाणशीर; योग्य प्रमाणाचा; योग्य किंमतीचा. ३ जुळता; जुळणारा; जमणारा; माप, चालीरीती, स्वभाव इ॰शीं जुळता. ४ अल्पस्वल्प; अगदीं थोडा; ताप्तुरता; क्षणिक; अर्धवट. 'त्यांचा ईश्वरावर बेताबेताचाच विश्वास आहे.' -टि. ४.३१४. बेतावर असणें-निश्चय, ठराव, व्यवस्था, बेत, योजना, नियम यांना धरून असणें; नियमाप्रमाणें असणें. बेत- बात-पु. व्यवस्था; टापटीप. बेतवार-क्रिवि. पद्धतशीरपणें; नेम- स्तपणानें. बेताबेत-क्रिवि. माप, आकार, तर्‍हा इ॰ बाबतींत तंतोतंत जुळणारा. २ (क्व.) तंतोतंत जुळणें. बेत्या-वि. नेहमीं भल- तेच बेत, योजना करणारा, युक्त्या लढविणारा. बेतणें-सक्रि. १ माप घेणें व कापणें (अंगांस घालावयाचे कपडे). २ मुस्कटांत मारणें थोबाडीत मारणें. बेतणी-स्त्री. १ माप, आकार, रूपरेषा इ॰ ची आंखणी, मोजणी (अंगात घालावयाच्या कपड्यांची). २ कपडा मापाप्रमाणें फाडणें, कापणें. बेतनीचा-वि. जमणारा; जुळता (मापानें, बनावटीनें इ॰) (बेताचा ह्या अर्थी उपयोग). बेतीव- वि. १ बेताप्रमाणें केलेलें; योजनेनुसार असलेलें. २ मापाप्रमाणें बेतलेले, कापलेले (कपडे). बेताविणें-सक्रि. १ माप घ्यावयास लावणें. २ तोंडांत थप्पड, चपराक लगाविणें. 'तोंडावर जेव्हां दोन बेतविल्या तेव्हां कबूल झाला.'

दाते शब्दकोश

बलबल, बलबलपुरी

स्त्री. १ दंगलीचें, धुमाकुळीचें ठिकाण; बाजार. २ अव्यवस्था; अंधेरनगरी; गोंधळ; अंदाधुंदी; नियम इ॰कांकडे दुर्लक्ष; वेशिस्ती. (क्रि॰ मांडणें; होणें; करणें). 'राजेलोक ऐषआरामी झाले म्हणजे...सगळी बलबलपुरी होऊन जाते.' -बाजी. [बलबल + पुरी = शहर] म्ह॰ बलबलपुरी आणि टमटम राज्य.

दाते शब्दकोश

बंध

पु. १ नियम; कायदा; शासन; करार. २ (व्यापक) आळा निर्बंध. ३ मर्यादा; सीमा; हद्द; इयत्ता. ४ श्लोक लिहि- ण्याची एक पद्धति; विशिष्ट आकृतीच्या कोठ्यांत विशिष्ट प्रकारें याचीं अक्षरें लिहितात. पद्मबंध, वापीबंध, चक्रबंध इ॰ याचे प्रकार आहेत. ५ दोरीचा, फितीचा तुकडा; बंद; बांधण्याचें साधन. ६ बंधन; बांधणें. ७ (ल.) सांखळी; शृंखला; बेडी; अडथळा; विरोध जसें-मोहबंध, मायाबंध, भवबंध इ॰. ८ कैद. 'तोडावे बंध सबळ सोडावे भूप हात जोडावे ।' -मोसभा १.१०६. ९ रचना; बांधणी. 'मुगुटा- वरी स्तबक । ठायीं ठायीं पूजाबंध अनेक ।' -ज्ञा ११.२२०. १० (योग) विशिष्ट मुद्रा; मूलबंध; उड्डियानबंध. 'माजि घंटिका लोपे । वरी बंधु जो आरोपे । तो जालंधरु म्हणिपे । पंडुकुमारा ।' -ज्ञा ६.२०८. ११ (बुरडी) सुपाची सळई व वीण ज्या कामटीनें एकत्र विणतात ती कांब. [सं.] ॰त्रय-न. उड्डियान (नाभिस्थानीं); मूल (गुदस्थानीं) व जालंधरबंध (कंठस्थानीं). 'भेदिलें बंधत्रय । कुंडलिणीयोगें ।' -स्वादि १०.५.३८. [सं.] ॰मोचन-न. प्रति- बंधांतून मुक्तता. -वि. बंधापासून सोडविणारा. [सं.] ॰क-न. गहाण. -वि. बंधन करणारें. 'तेवीं बंधकीं कर्मी सुटिजे । नामें येणें ।' -ज्ञा १७.३६६. ३ लोभी. [सं.] ॰की-स्त्री. १ दासी. २ व्यभिचारिणी. [सं.]

दाते शब्दकोश

(सं) पु० कायदा, शास्त्र, नियम, २ बंद, बंधन.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

बंधारण

न० नियम, मर्यादा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

न. १ कायदा; शासन; कानू; विधि. २ नियम; मर्यादा; ठराव. '... दुमाले गांव किती व नक्त खर्च किती या विषी बंधारण करून...' -इनाम ५०. ३ (गु.) धारा. ४ (गु.) गोठवण. ५ (गु.) व्यसन. ६ (गु.) पाटा. [सं. बंध + धारण]

दाते शब्दकोश

बतणें

अक्रि. (कों.) (गोट्यांचा खेळ) एका गोटीपासून दुसरी गोष्टी अमुक अंतरावर रहावी हा नियम मोडून तिचें अंतर सुटणें, खेळण्याच्या उपयोगी नाहीं अशा जागीं येणें. वीत, पाऊल इ॰ चे अंतरानें गोट्यांचें बतनें होत असतें.

दाते शब्दकोश

भिन्न

न. (ग.) अपूर्णांक [सं.] ॰संकलन-व्यकलन- गुणन-भाजन-न. अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार. अपूर्णांकांशीं पूर्णांकांच्या बेरजेस इ॰ हि लावतात. ॰वर्ग-घन-पु. अपूर्णांकाचा वर्ग, घन. ॰वर्गमूळ-घनमूळ- न. अपूर्णांकांचें वर्गमूळ, घनमूळ. ॰वर्गपरिकर्म-न. अपूर्णांकांचें वर्गमूल काढणें. ॰परिकर्माष्टक-न. अपूर्णांकांच्या गणिताचें आठ मूळ नियम.

दाते शब्दकोश

भरतशास्त्र

न. १ नाट्यशास्त्र; नाटक व अभिनय यावरील भरतमुनिकृत प्रमाणभूत ग्रंथ. २ नाटक व त्याचे प्रयोग यांचे नियम. [सं.] भरतशास्त्री-वि. भरतशास्त्र जाणणारा.

दाते शब्दकोश

चक      

पु.       १. वचक; धाक; जरब; वजन; दरारा; पगडा (सत्ता, अधिकार यांचा); अप्रत्यक्ष अधिकारमान्यता. २. कायदा; नियम; कानू; शासन; ठरलेली पद्धत. ३. जुनी, नेहमीची पद्धत; रीत; वहिवाट. ४. (सरकारी नोकरांत रूढ) ताकीद; ठपका; कानउघाडणी. (क्रि. येणे, ठेवणे, चालणे.) [इं. चेक] (वा.) चक पुरवणे – चारी बाजूंकडून त्रास होणे. चक बसणे – खंबीर पायावर उभारणी होणे; मजबुती होणे; मजबुती होणे; पक्की व्यवस्था येणे; दरारा; दहशत बसणे : ‘त्या दिवसापासून दारू व मांस शहरात विकू नये असा चक बसला.’ - शिप्रब ६९.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चक

पु. १ वचक; धाक; जरब; वजन; पगडा (सत्ता, अधिकार यांचा); अप्रत्यक्ष अधिकारमान्यता. 'मामलतदार नवा होता परंतु एका अपराध्याचें शासन होतांच सर्वांवर चक बसला.' २ कायदा; नियम; कानू; शासन; ठरलेली पद्धत. 'नित्य नवें सांगूं नका एक चक बांधून द्या त्याप्रमाणें मी वर्तेन.' ३ जुनी, नेहमीची पद्धति, रीत, वहिवाट. 'त्या मंडळीचा प्रात: स्नान करण्याविषयीं बारा वर्षें एकसारखा चक चालला आहे.' ४ हक्काची रक्कम; दस्तुरी; कर; फी. 'माझा दोन रुपये चक येणें आहे.' [शक ? तुल॰ सं. चक्र]

दाते शब्दकोश

चळ      

पु.       १. चंचलपणा; अस्थिरता, २. अंतर; फरक; च्युती (वचन, कायदा, नियम, आचार इत्यादींपासून). ३. खूळ; चित्तभ्रंश; बुद्धिभ्रंश; भ्रम. उदा. काम–द्रव्य–मद्य–शास्त्र–स्त्री–चळ. (क्रि. लागणे) : ‘तरलों म्हणुनि धरिला ताठा । त्यासी चळ झाला फाटा ।’ – तुगा २८७७. ४. हाव; उत्कटेच्छा; अधीरपणा; उतावीळपणा; वेड. (क्रि. घेणे, भरणे, येणे, लागणे.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चरितार्थ

पु. १ (कामाची, धंद्याची) सिध्दि; संपादणी; हेतु साध्य होणें, सफळ होणें, शेवटास जाणें; इच्छा तृप्त होणें; तृप्ति. २ कशी तरी, बरीवाईट, सरासरी, सार्थकता, शेवट. 'पांचशें रूपयांनीं लग्नाचा चरितार्थ होईल.' ३ कसा तरी, स्वल्प सामुग्रीनें, उदरनिर्वाह. 'मणभर भातामध्यें कसा तरी चरितार्थ करतों. ४ पोट भरणें; उदरंभरण; उदरनिर्वाह. 'स्त्रियांनीं घरचीं कृर्त्यें संभा- ळावीं आणि पुरूषानीं पराक्रम करून दोघांचा चरितार्थ चालवावा.' -गुप्तमंजूष ४ -वि. सिद्धीस गेलेला; लागू पडलेला; पूर्ण केलेला; अभिप्रेत अर्थीं स्वीकार केलेला (नियम, विधी, आज्ञा). समाधान पावलेला; तृप्त झालेला (मनुष्य). [सं.चरित + अर्थ]

दाते शब्दकोश

चव

पु. मोत्यांची संख्या व वजन यावरून त्यांच्या किंमतीचें बसविलेलें प्रमाण; मोत्यांची किंमत काढण्याची रीत, नियम. चव हें मोत्याचें वजन नसून किंमतीचें परिमाण आहे.

दाते शब्दकोश

चव      

पु.       मोत्यांची संख्या व वजन यावरून त्यांच्या किमतीचे बसवलेले प्रमाण; मोत्यांची किंमत काढण्याची रीत, नियम. चव हे मोत्याची किंमत ठरवण्याचे परिमाण आहे : ‘जे मोती वजनाने अधिक चव भरेल.’ – मसासंअभा ९०.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दामणी

स्त्री. (बडोदें) स्त्रियांचा बिंदीसारखा एक दागिना. -जव्हेरखान्याच्या अंतर्व्यवस्थेचे नियम. (पारिभाषिक शब्दांच्या व्याख्या) पृ. ६. [सं. दामन; गु. दामणी; फा. दामन् = किनार]

दाते शब्दकोश

देशमर्यादा      

स्त्री.       १. देशातील आचारविचार, संप्रदाय, नियम, पद्धती. २. देशाची सीमा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दंडक

पु. १ चाल; संवय; प्रघात; पद्धति; संप्रदाय; परि- पाठ; वहिवाट; नियम. 'ऐसा ज्याचा दंडक । अखंड पाहाणें विवेक ।' -दा १९.१०.१३. २ (काव्य) एकसमवृत्त; अक्षरें २७; गण न, न, र, र, र, र, र, र, र, यति शेवटीं. ३ दळण वळण; वाग- णूक. ४ (भयाण आणि ओसाड असा) लांब रस्ता; लांबट जागा. ५ बाहु; हात. 'हा तुझा निववुं दंडक राया । जो समर्थ खळदंड कराया ।' [सं. दंड]

दाते शब्दकोश

दंडनीती, दंडशास्त्र      

स्त्री.       १. नीतिशास्त्र; नीती; संसारातील वर्तणुकीचे व व्यवहाराचे कायदे, नियम. २. (कायदा) अपराध्यांना करण्याच्या शिक्षेसंबंधीचे शास्त्र. ३. राज्य चालवण्याविषयीचे शास्त्र. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दोरी      

स्त्री.       १. बारीक दोर. २. जमीन–मोजणीचे एक परिमाण. २० परतन, ८० किंवा १२० बिघे. ३. एक लहान मासा. ४. (सोनारी – सुतारी धंदा) इंचाचा एक अष्टमांश भाग; सूत. [सं.दोरक] (वा.) दोरी सैल देणे, दोरी सैल सोडणे, दोरी ढिली करणे – बंधन, नियम इ. शिथिल करणे; स्वातंत्र्य देणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दृढ

दृढ dṛḍha a (S) Firm, solid, compact, hard, dense, lit. fig. 2 Confirmed, ratified, established. 3 Mature--a deliberation: settled or fixed--a resolution. 4 In the general sense of Firm, tenacious, fastholding, important compounds are common and others are framable at will. Ex. दृढनिश्चय or दृढ- निर्धार or दृढसंकल्प Firm of resolve or purpose; दृढ- प्रयत्न Hard or enduring in exertion or endeavor; दृढसंकेत, दृढसंधान -नियम -विश्वास -वैर -निष्ठ -व्रत -तप- सख्य -प्रेम -भक्ति -धैर्य -वचन -अनुसंधान -पातिव्रत्य-सौभाग्य. Also in the literal sense of Firm or hard; as दृढतनु, दृढदेह, दृढशरीर, दृढांग Of firm or compact body.

मोल्सवर्थ शब्दकोश

दस्तूर

(पु.) [फा. दस्तूर्] पर्वानगी; कबुली-सही; नियम; वहिवाट; पार्शी धर्मगुरू. सही दस्तूर् खुद्द=सही स्वतःच्या हातची असे.

फारसी-मराठी शब्दकोश

दस्तूर      

पु.       १. वहिवाट; पद्धत; चाल. २. जकात; कर. ३. नियम; कायदा. ४. हस्ताक्षर; लेख; लेखक किंवा त्याची निशाणी. ५. कारकुनाची सही. ६. नमुना (सरकारी कागदाचा). ७. परवानगी. [फा.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दस्तूरअम्मल      

१. सरकारी कायदा. २. कायदेशीर शिरस्ता; वागण्याचा नियम. दस्तूरखुद, दस्तूरखुद्द      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दस्तूरुल्-अमल

(पु.) [अ. दस्तूरुलू अमल] वागण्याचा नियम; शिरस्ता. (ऐस्फुले ४५).

फारसी-मराठी शब्दकोश

दुःख

शरीर-पीडा, व्यथा, शोक, मनस्ताप, अंतःकरणव्यथा, सुखाचा अंत, आंतरिक दुःख, मनाचा ताप, सुखाचें बाष्पीभवन, व्यस्तप्रमाणांत आनंद, दारुण यमयातना, आंतल्या आंत तडफडाट, अश्रूत भिजलेला ऐष-आराम, चीर गेलेले सुख, सुखास खग्रास ग्रहण, मरणप्राय - अपरंपार-डोंगराएवढे-असह्य -तीव्र दुःख, दुःखाचा कडेलोट, दुमजली खेद, अधिक क्षेत्रफळाची पीडा, सुखसंवेदनांची टिकटिक बंद पडली, ही अधिक अश्वशक्तीची खेदभावना, दुःख हाच जीवनाचा गुरुत्वमध्य ठरे, जगून जे प्राप्त केलें त्याचे मोजपात्र दु:खच होतें, ताठा फार वाढूं नये म्हणून दुःख ही संरक्षक झडप सतत काम करीत असते, स्वभावजन्य दुःखाला उपाय नाहीं.
दुःखांत कोण कुणाला पुसतो ? अंधारांत सावलीसुद्धां नाहींशी होते, दुःख चक्रवाढ व्याजानें वाढत जाते, विभागलें कीं दुःखाची आंच कमी होते, जगतांत सर्व सुखी असा कोण आहे ? दु:ख नेहमीं पर्वताएवढें असतें हाच संसाराचा नियम, जग हें काडेचिराइताचा एक भला मोठा काढा आहे, हे दिवस फरसे सुखाचे गेले नाहीत.

शब्दकौमुदी

दुरुस्त

वि. १ यथायोग्य; निर्दोष; बरोबर; नीट. २ अचूक; बरोबर. 'नेमिला जागा दुरुस्त मारणार असे.' -मराआ ३५. ३ (कायद्यांत) फेरबदल, सुधारणा केलेला (कायद्याचा नियम श॰). (क्रि॰ करणें). [फा. दुरुस्त्] दुरुस्ताई-स्त्री. दिल्सफाई. 'परस्पर दुरुस्ताई होय तर उत्तम आहे.' -जोरा ५. [दुरुस्त] दुरुस्ती-स्त्री. दोष काढून पूर्ववत करण्याची, सुधार- ण्याची क्रिया; डागडुजी; जुनें काम खराब झालें असल्यास तें सुधारण्याची क्रिया; नीट करणें. [दुरुस्त]

दाते शब्दकोश

दुरुस्त, दुरस्त      

वि.       १. यथायोग्य; निर्दोष; बरोबर; नीट. २. अचूक; बरोबर : ‘नेमिला जागा दुरुस्त मारणार असे.’ – मराआ ३५. ३. (कायद्यात) फेरबदल, सुधारणा केलेला (कायद्याचा नियम). (क्रि. करणे). [फा.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दुटे      

न.       १. गवंड्याची मापण्याची पट्टी. २. इमारत बांधण्यापूर्वी जमिनीवर काढलेला आराखडा, नकाशा, खुणा. ३. (ल.) (वागण्यासाठी घालून दिलेला) नमुना; कित्ता; नियम; साचा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दुटें

न. १ गवंड्याची मापण्याची पट्टी; इमारत बांधण्या- पूर्वीं जमिनीवर काढलेला आराखडा, नकाशा, खुणा. ३ (ल.) (वागण्याकरितां घालून दिलेला) नमुना; नियम; साचा; कित्ता. 'त्या दुट्याप्रमाणें चाल-वाग-अस-कर.'

दाते शब्दकोश

धारा      

पु.       १. (भाडे, विक्री, चाकरी, धंदा इ. व्यवहाराविषयीचा) शिरस्ता, वहिवाट, नियम : ‘शिवाजी महाराज यांचे वेळचे धारे यांनीं राज्य चालवावें.’ - मराचिशोथा ३२. २. (शेतजमीन, बागाईत इ. वरील) सरकारी कर, वसूल, सारा. [सं. धृ; हिं., गु. धार] (वा.) धाऱ्यावर येणे - शुद्धीवर येणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धारापेंडोळा, धारेपेंडोळा      

पु.       १. (व्यवहारातील, बोली करण्याचा, मोल ठरविण्याचा) नेहमीचा, साधारणपणे पडलेला शिरस्ता, नियम, वहिवाट. २. (ल.) कुटुंबाचा वंशपरंपरागत लौकिक, सोयरीक संबंध, लागाबांधा इ. (क्रि. मिळणे, पटणे, लागणे, मिळवणे, दाखविणे, लावणे.).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धजी

स्त्री. (लंगोट तयार करण्याचा) कापडाचा तिकोनी तुकडा; कापडाची घडी. 'रुमाली अगर लंगोटाची धजी बनेल तितका शरीराचा भाग झाकृं शकेल अशी आहे कीं नाहीं तें पहाणें.' -बडोदें-पहिलवान लोक व त्यांच्या कुस्त्यांचे नियम ११. [हिं. धज्जी = कापडाचा, कागदाचा तुकडा]

दाते शब्दकोश

धजी      

स्त्री.       (लंगोट तयार करण्याचा) कापडाचा तिकोनी तुकडा; कापडाची घडी : ‘रुमाली अगर लंगोटाची धजी बनेल तितका शरीराचा भाग झाकूं शकेल अशी आहे कीं नाहीं तें पहाणें.’ – बडोदे – पहिलवान लोक व त्यांच्या कुस्त्यांचे नियम ११. [हिं. धज्जी]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ढळणें

आक्रि. १ चलिता होणें; जाग्यावरून हलणें; घसरणें; स्थानभ्रष्ट, पदच्युत होणें; कलंडणें; डळमळणें; झुकणें. 'जैसी तीरी नाव न ढळे । टेकलीसांती ।' -ज्ञा ७.४. २ रेलणें; कलणें. ३ (शरीरप्रकृति) खालावणें; ढासळणें; खचणें. ४ माघार घेणें; दबणें; अपयश पदरीं येणें; कचरणें; हटणें. ५ चुकणें;' न लागणें; अंतरणें (ध्येय, नेम यापासून). ६ (ल.) वजन कमी होणें; मागें पडणें; विसरलें जाणें; रूढींत नसणें (वर्चस्व आचार, नियम). ७ उडणें; वारली जाणें (मूर्तीवर चवरी). 'कुंचे ढळती दोहीं बाहीं । जवळी राही रखुमाई ।' -तुगा २७८. ८ स्त्रवणें; गळणें (अश्रु). 'अश्रुबिन्दु ढळती नयनीं ।' -मुआदि २३.२४. ९ वाहणें; सुटणें (वारा). 'म्हणूनि संवादाचा सुवावो ढळे ।तरी हृदयाकाश सारस्वतें वोळे ।' -ज्ञा ९.२८. १० क्रम बदलणें; पुढें सरणें. 'हें कायसेनही न ढळे । अनादि ऐसें ।' -ज्ञा ११.४९७. [दे. प्रा. ढल = झुकणें; गळणें]

दाते शब्दकोश

धर-बन्द

(पु.) नियम; प्रमाण.

फारसी-मराठी शब्दकोश

धरबंद-ध, धरबंधन

पुन. १ नेम; नियम; बंधन; नियं- त्रण; कायदा; ठराविक मर्यादा, प्रमाण. 'कसें लिहावें तो मला एक धरबंध करून द्या सतरा वेळा सतरा प्रकार सांगूं नका. ' २ एक- सूत्रीपणा; सुसंबद्धता; मेळ (भाषण. वर्तन यांत). ३ भुताखेतास मंत्रतंत्रादींनीं नियंत्रित करणें. ४ बंधनाचा उपाय. ५ परिमितता; प्रमाणबद्धता. [म.धरणें + बांधणें]धरबंधावर आणणें-बस- विणें-भुताखेताला धरबंध घालणें; त्याचें नियंत्रण करणें, खुंटविणें.

दाते शब्दकोश

धरिया      

पु.       पोलादी टोक बसवलेला बांबूचा भाला. – खाजगीखातें नोकर लोकांच्या पोषाखासंबंधीं नियम ४१.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धरिया

पु. पोलादी टोंक बसविलेला बांबूचा भाला. -खानगीखातें नोकर लोकांच्या पोषाखासंबंधीं नियम ४१.

दाते शब्दकोश

धर्म      

पु.       १. धार्मिक विधियुक्त क्रिया, कर्मे; परमेश्वरासंबंधीचे कर्तव्य; र्इश्वरोपासना; परमेश्वरप्राप्तीची साधने; परमेश्वरप्राप्तीचा मार्ग, पंथ. २. मनुष्याला सदाचरणाला लावणारे व परमेश्वरचिंतनाचा मार्ग दाखवणारे हिंदू, ख्रिश्चन, यहुदी, इस्लामी वगैरे पंथ. ३. समाजव्यवस्थेसाठी शास्त्रांनी घालून दिलेले आचार, नियम, पवित्र विधी, कर्तव्ये. ४. चार पुरुषार्थांपैकी पहिला. ५. सद्गुण; शास्त्रोक्त वागल्याने अंगी येणारा नैतिक, धार्मिक गुण. ६. स्वाभाविक गुण; गुणधर्म; नैसर्गिक प्रवृत्ती. ७. कर्तव्यकर्म; रूढी. ८. कायदा. ९. धर्माचरणाचे पुण्य. [सं.] (वा.) धर्म करता कर्म उभे राहणे, धर्म करता कर्म पाठीस लागणे – परोपकार करीत असता आपणच संकटात पडणे. धर्म खुंटीस बांधणे – (जनावराला) उपाशी जखडून टाकणे; ठाणावर बांधून ठेवणे. धर्माआड कुत्रे होणे – दानधर्माच्या आड येणे. धर्माची वाट बिघडणे, . धर्माची वाट मोडणे – एखाद्या दानधर्माचा ओघ थांबणे, थांबविणे. धर्माच्या पारी बसणे – १. दुसऱ्याचे पैसे खर्च करीत रिकामटेकडे बसणे. २. सद्गुणांचे चांगले फळ मिळणे; सदाचारामुळे चांगले दिवस येणे. ३. सतत दानधर्म करणे; धर्मकृत्ये आचरणे. धर्मावर लोटणे, धर्मावर टाकणे, धर्मावर सोडणे – एखाद्याच्या न्यायबुद्धीवर सोपवणे. धर्मावर सोमवार सोडणे – स्वतः झीज न सोसता परभारे होर्इल ते पाहणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धरणे      

उक्रि.       १. पकडणे; मुठीत, हातात ठेवणे. २. निसटू नये म्हणून पायाखाली दाबून ठेवणे; जोराने पकडणे. ३. साठवणे; मनात, लक्षात ठेवणे. ४. पकडून ठेवणे; अटकेत, कह्यात, ताब्यात ठेवणे. ५. मनात आणणे; बनवणे; कल्पिणे (शास्त्रज्ञान, विद्या, कला, खुबी, युक्ती इ.). ६. एखादा क्रम, नियम, शिस्त पाळणे; विशिष्ट गोष्ट, कामे अंगीकारणे; एखादा उद्योग नियमित करणे. ७. मानणे; समजणे; पाहणे. ८. विशिष्ट कामी योजणे, लावणे, गुंतवणे. ९. मनाचा ग्रह करून घेणे व तशा ग्रहाने वागणे; गोडी, आवड लावून घेणे. १०. (जमीन, शेत) आपल्या कबजात, मालकीत, ताब्यात घेणे. ११. विचारात, लक्षात, मनावर घेणे; महत्त्व देणे. १२. अवलंबणे; स्वीकारणे; अनुसरणे; (पक्ष, बाजू, भूमिका, वृत्ती) घेणे. १३. (घार्इ, त्वरा) करणे; योजणे. १४. संपादणे; प्राप्त करून घेणे; (सामर्थ्य, बळ) मिळवणे. १५. बाळगणे; (धास्ती, भीती, अवमान) घेणे. १६. पुरस्कारणे; प्रतिपादणे (कार्य, मत इ.). १७. पकडणे; उघडकीला आणणे (चोरी, लबाडी इ.). १८. समाविष्ट करणे; हिशोबात धरणे. १९. पाळणे; आचरणे (अनुष्ठान, उपास, व्रत). २०. चालवणे; पुढाकार घेणे (गोंधळ, कथा, तमाशा इ.चा). २१. आवड असणे, घेणे; एखाद्यावर ममता करणे. [सं. धृ]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धरणें

उक्रि. १ पकडणें; मुठींत, हातांत ठेवणें. 'तो हातीं काठी धरून उभा राहिला.' २ निसटूं नये म्हणून दाबून ठेवणें; जोरानें पकडणें. 'पानें वार्‍यानें उडतील म्हणून पायाखालीं धरलीं आहेत.' ३ सांठविणें; मनांत ठेवणें; लक्षांत ठेवणें. 'हा सर्वांचा हितो- पदेश मनांत धरतो.' ४ पकडून ठेवणें; अटकेंत ठेवणें; कह्यांत, ताब्यांत ठेवणें. म्ह॰ धरीन तर डसेल सोडीन तर पळेल. ५ मनांत आणणें; बनविणें; कल्पिणें (शास्त्रज्ञान, विद्या, कला, खुबी युक्ति इ॰) 'तूं मनांत जो अंक धरशील तो मी सांगतों.' ६ एखादा क्रम, नियम, शिस्त, व्रत पाळणें; विशिष्ट गोष्ट, काम अंगिकारणें; कांहीं एक उद्योगादि नियमानें करूं लागणें 'त्यानें सांप्रत प्रातःस्नान धरलें आहे.' 'त्यानें शिव्या द्यावयाचें धरलें आहे.' ७ मानणें; समजणें; पाहाणें. ८ विशिष्ट कामीं योजणें, लावणें, गुंतविणें. 'हा बैल रहाटाखालीं धरा म्हणजे चांगला होईल.' ९ मानणें; समजणें; अमुक गोष्ट अशी आहे असा मनाचा ग्रह करून घेणें; अशा ग्रहानें वागणें. (गोडी, आवड) लावून घेणें. १० आपल्या कबजांत मालकींत, ताब्यांत घेणें. (जमीन, शेत). ११ विचारांत, लक्षांत, मनावर घेणें; महत्त्व देणें. 'हा शिव्या देतो हें तुम्हीं धरूं नका.' १२ अवलंबणें; स्वीकारणें; अनुसरणें; घेणें (पक्ष, बाजू, भूमिका, वृत्ति). १३ योजणें; करणें (घाई, त्वरा). त्वरा धरली, उशीर धरला.' १४ संपादणें; प्राप्त करून घेणें; मिळविणें (सामर्थ्य; बळ). १५ बाळगणें; घेणें (धास्ती, भीति, अवमान). १६ पुरस्कारणें; प्रतिपादणें (कार्य, मत इ॰). १७ पकडणें; उघडकीस आणणें, (चोरी, लबाडी, इ॰) १८ समाविष्ट करणें; हिशोबांत धरणें. 'त्या पन्नासामध्यें हा धरला कीं..' १९ पाळणें; आचरणें; (अनुष्ठान, उपास, व्रत). 'धरिला असेल सत्यासह म्यां जरि धर्म ।' -मो अश्व ३.७२. २० चालविणें; पुढाकार घेणें (गोंधळ, कथा, तमाशा इ॰ चा) २१ आवड असणें, घेणें; एखाद्यावर ममता करणें. 'आई मुलास, गाय-वासरास, नवरा-नवरीस धरतो-धरीत नाहीं.' [सं. धृ] धरून बसणें-हट्ट करणें; हेका न सोडणें; चिकटणें; घट्ट धरणें. (मत, मागणी, निश्चय, इ॰). धरून सोडून-क्रिवि. मधून मधून; धरसोडपणें; अनिश्चिततेनें; चंचलतेनें (वागणें, बोलणें). धरून सोडून वागणें-वेळ प्रसंग पाहून, संभाळून, धूतपणानें एखाद्याशीं वागणें. 'कपटी पुरुषाबरोबर धरून सोडून वागावें लागतें.'

दाते शब्दकोश

धट्टकंठ      

वि.       युद्धाचे नियम बाजूला ठेवणारा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ध्वजसंहिता      

स्त्री.       १. राष्ट्रध्वजारोहणासंबंधीचे नियम. २. झेंड्यांच्या साह्याने संदेश पाठविण्याची सांकेतिक भाषा; (इं.) फ्लॅग कोड.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

एकनिश्चय

(सं) पु० पक्का बेत, नियम, निश्रय, ऐकमत्य.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

गौण

न. १ न्यून; अभाव; तुटवडा; कमीपणा. २ अपूर्णत्व; हीनता; तफावत. -वि. १ कमी प्रतीचा; हलक्या प्रतीचा; कमी महत्त्वाचा; अप्रधान. २ आनुकल्पिक; गौणभूत; बदला. ३ मुख्य नव्हें तें; दुय्यम. 'मूळबंधाचें लक्षण । वज्रासन गौण । नाम यासी ।।' -ज्ञा ६.१९९. [सं.] ॰मानणें-कमी लेखणे. 'तें तीर्थ घालतां वदनीं । ब्रह्मरस गौणमानी ।' ॰कल्प-पु. १ अमुख्य, अप्रधान हेतु किंवा उद्धेश. २ दुय्यम ध्येय; विकल्प; अनुकल्प; बदला; प्रतिनिधि. ॰पक्ष-१ कमजोर, खालच्या दर्जाचा, अमुख्य,अप्रधान पक्ष, बाजू (वाद, गोष्टी, प्रमेय यांचा). २ गौणकल्प ३ (सामा.) हलका पक्ष, बाजी. ॰मुख- न्याय-पु. तारतम्याचा नियम (मुख्यामुख्य, मौलिक व अलं कारिक, प्रधान अप्रधान यांतील) मुख्य पक्ष संभवत असतां गौण अंगिकारूं नये या अर्थी वापरतात. गौणीवृत्ति-स्त्री. शब्दाची स्वाभिधेय गुणसंबंधामुळें अर्थांतराच्या ठायीं असलेली प्रवृत्ति. [सं.]

दाते शब्दकोश

गौणमुखन्याय      

पु.       तारतम्याचा नियम (मुख्यामुख्य, मौलिक व अलंकारिक, प्रधान व अप्रधान यातील) मुख्य पक्ष संभवत असताना गौण अंगीकारू नये, या अर्थी वापरतात.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गद्य      

न.       १. सामान्यतः आपण जसे बोलतो किंवा लिहितो ते भाषेचे रूप; छंदोचरण इ. चे नियम न लावता वापरली जाणारी सामान्य व्यवहारातील भाषा; (सामा.) छंदोरहित प्रबंध, लेखन, भाषा. २. साधी वाक्यरचना. ३. (ल.) अरसिक, बेचव, कंटाळवाणे विवेचन, नीरस लेखन.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गद्य

न. १ अक्षरें किंवा मात्रा अमूक असाव्या असा नियम नसलेली कविता; छंदविरहित अथवा तालसुरानुरूप रचले- ल्या पदरचनेचा स्वतंत्र भाग, किंवा वाक्यखंड; (सामा) छंदो- रहित प्रबंध, लेखन; भाषा. पद्याच्या उलट लेखन प्रकार. २ साधी वाक्यरचना; काव्यगुणरहित लिखाण. ३ (ल.) अरसिक, बेचव, कंटाळवाणें विवेचन, लेखन. ॰रूप, गद्यात्मक-वि. ज्यांत साध्या पदरचनेचा समावेश आहे तें. ॰पद्य-न. १ छंदोरहित व छंदो- बद्ध रचना. २ (ल.) छक्केपंजे, डावपेंच, कपट; कारस्थान, कावा, कुलंगडें, दगा. गदे पदे पहा. [सं. गद् = बोलणें.] ॰पद्यरूप,- द्यात्मक-ज्यांत गद्य (साधी रचना) आणि पद्य (छंदो- बद्ध किंवा कविता). याचा समावेश आहे तें. चंपूकाव्य. ॰म्ह गद्य उद्योगाचा सांठा, पद्य दैवाचा झपाटा.

दाते शब्दकोश

गीत

न. १ (संगीत) मनोरंजक स्वरसमुदाय. 'गीत भाटींव तो श्रवणीं ।कर्णजपु ।' -ज्ञा १७.२९७. गीताचे प्रकार दोन-गांधर्व व गान. २ गाणें; पद. 'सुखगीत नृत्य तेथें मजलाही तोचि एक थारा हो ।' -मोसभा १.३३. ३ गाणें म्हणणें; पद गाणें. (क्रि॰ गाणें; म्हणणें) ४ दळतांना किंवा लग्नांत म्हणतात त्या ओंव्या. ५ पदाचा छंद, वृत्त; छंदोबद्ध गाण्यांतील एक भेद. -वि. गायिलेलें; म्हटलेलें. (नावें) ॰गाणें-कोणी बरें केलें असतां त्याच्या अपरोक्ष त्याची स्तुति करणें. ॰गाणें-१ दुसर्‍याजवळ; आपली सर्व हकीकत सांगणें; रडगाणें लावणें. २ तेंच तेंच सांगणें एकच धरून बसणें. [सं. गै = गाणें] ॰म्ह जात्यावर बसलें म्हणजे गीत आठवतें. सामाशब्द- ॰मान-न. गाण्याच्या (संगीतांतील) मात्रा, अंतरा, नियम वगैरे. गीतोपयोगी नाद-पु. (संगीत) ज्या नादांत अखंडता, स्पष्टता, व माधुर्य हे गुण असून ज्यांत कांहीं प्रमाण असतें तो नाद.

दाते शब्दकोश

गंगावन

न. तार्तरी किंवा नेपाळ देशांतील वनगायीच्या शेंपटीचे काळे केंस; स्त्रियांचे केंस थोडे असल्यास वेणी घालतांना हे त्यांत मिसळतात; कृत्रिम केश (अलिकडे अंबाड्याची चाल पडल्यामुळें गंगावन मागें पडलें). ॰वनी सडका- स्त्रीअव. (बडोदें) हत्तीच्या कानांपासून पायापर्यंत लोंबणार्‍या लांब माळा. -खानगीखातें, सामानासंबंधी लागतीचे नियम ५५.

दाते शब्दकोश

ग्रामधर्म      

पु.       गावचे धार्मिक विधी, नियम, चालीरीती इ. परंपरेने चालत आलेला गावचा धर्म.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ग्रहमोक्षविचक्षण      

वि.       (संगीत) ग्रह व न्यास यांचे नियम जाणणारा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गृहीत      

न.       (शिक्षण.) सर्वसामान्यतः स्वीकृत करण्यात आलेला व तर्काला पायाभूत असणारा सिद्धांत अथवा नियम; स्वतः सिद्धतत्त्व.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घेटा      

पु.       बोकड; एडका; मेंढा : ‘शिकारी संबंधात प्राथमिक व्यवस्था करण्यासाठी पाठवलेल्या अमलदारांस पाडे, घेटे मिळवून देण्यासाठी…’ – सिंहाचे व वाघाचे शिकारीसंबंधी नियम. (बडोदे) [हिं. घे]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घेटा

पु. बोकड; एडका; मेंढा. 'शिकारी संबंधांत प्राथमिक व्यवस्था करण्यासाठीं पाठवलेल्या अंमलदारांस पाडे, घेटे मिळवून देण्यासाठीं...' -सिंहाचे व वाघाचे शिकारीसंबंधीं नियम (बडोदें) ४. घेटी-स्त्री. बकरी; कोंकरूं. [हिं. घेटा = डुक्कर; गु. घेटी, घेटु = बकरी]

दाते शब्दकोश

घनाक्षरी

स्त्री. मराठींतील एक ओंवीसारखा सोळा चर- णांचा छंद, वृत्त; याचे चार पाद असतात. प्रत्येक पादाच्या पोटीं चार चरण असतात. पहिल्या तीन चरणांत प्रत्येकी आठ अक्षरें व बारा मात्रा असतात; चौथ्या चरणांत सात अक्षरें व अकरा मात्रा असाव्यात. प्रत्येक पादांत तीन तीन चरणांचीं यमकें व प्रत्येक पादाच्या चौथ्या चौथ्या चरणांचीं यमकें असावीं हा सामान्य नियम. उद॰ 'अहो कैकयी हें काय । केलें तुवा हाय हाय । न म्हणवे तुज माय ।। जन्मोजन्मीं वैरिणी ।' [सं. घन + अक्षर]

दाते शब्दकोश

घोटणें

न. घोटण्याचें उपकरण; घोटणी; घोटा.-खानगी- खातें-लागतीचे नियम (बडोदें) ३८. [घोटणे]

दाते शब्दकोश

हवि

न. होमांत टाकावयाचें (तूप, भात इ॰) द्रव्य, पदार्थ; बली. [सं. हविस्] हवित्रि-स्त्री. होमकुंड. हविष्य-न. १ हवन करावयास योग्य वस्तु; हवि. २ व्रतादि दिवशीं भक्षणीय असा शुद्ध पदार्थ (गोधूम, गोदुग्ध इ॰). ३ (ल.) वरील पदार्थ खाण्याचें व्रत, नियम, बंधन. ४ (उप.) नेहमीची लोकाचारा- विरुद्ध किंवा स्वैर वागणूक, वहिवाट, नेम, प्रघात, व्यसन. 'या गांवांत सर्व त्याचें हविष्य आहे.' हविष्यान्न-पु. हवि; हविष्य अर्थ १ पहा. २ तांदूळ, गहू इ॰ धान्य व तूप, दूध इ॰ हबनीय पदार्थ. ३ हे पदार्थ खाऊन रहावयाचें एक व्रत. [सं. हविष्य + अन्न]

दाते शब्दकोश

हविष्य

हविष्य haviṣya n (S) An article in general fit to be offered by fire. 2 Hence An article (as wheat, cow's milk &c.) particularly pure, and suitable to be eaten upon holy days or sacred occasions. 3 (By meton. or elliptically, नियम, व्रत, or some such word being understood.) Restriction of one's self, by vow or rule, to pure and holy articles of food. 4 Applied freely to any observance, practice, custom, or course, whether religious, or licentious and wicked, or indifferent. Ex. ह्या गांवांत सर्व लोकांस रांडबाजी हें तर ह0 आहे; घोड्यावर बसणें हें त्याचें ह0 आहे.

मोल्सवर्थ शब्दकोश

ईश्वरसूत्र

(सं) पु० ईश्वराचा नियम, ईश्वरी संकेत.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

इतराजी

स्त्री. अप्रसन्नता; गैरमर्जी; अवकृपा; नाराजी. 'एकी- कडे सत्ताधीशांची इतरजी व यामुळें सुखाची हानि.' -सृष्टपदार्थ नियम १४४. [अर. इअतिराझी = राग; अवकृपा]

दाते शब्दकोश

जाबता

पु. १ कायदा; नियम. २ अधिकारपत्र; मुखत्यार- पत्र; अधिकार; मान्यता; मंजुरी. ३ परवाना; पास. ४ पाहारा; राखण; सोबत. ५ मोजलेल्या जमिनीचा तुकडा. ६ कैद. ७ सरं- जाम किंवा इनाम यांच्या अधिकाराची कमलबंदी याद. ८ व्यापा- र्‍याला पाठविलेली मालाची याद; फर्द; फेरिस्त. 'जातेसमयीं कुललष्करचे लहान थोर लोकांचे बिशादीचे जाबते करावे.' -सभासद २२. [अर. झाबिता]

दाते शब्दकोश

जाबता      

पु.        १. कायदा; नियम. २. अधिकारपत्र; मुखत्यारपत्र; अधिकार; मान्यता; मंजुरी. ३. परवाना; पास. [अर.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जागविणें

जागविणें v t A waken. Fig. Watch; keep, uphold, preserve, maintain. अब्रू or नांव जागविणें To watch over and uphold one's character or good name. दिवस जागविणें To keep a day (i. e. to perform what is prescribed for the day). नियम or नेम जागविणें To maintain one's rule or self-appointed course. गौर जागविणें To keep a wake to गौरी or देवी.

वझे शब्दकोश

जागविणें jāgaviṇēṃ v c (जागणें) To awaken. 2 fig. To watch or hold vigils unto; to hold a wake: also to keep, uphold, observe, preserve, maintain. Used in construction with numerous words; as आबरू or नाम or नाव जागविणें To watch over and uphold one's character or good name; दिवस जागविणें To keep a day (i. e. to perform what is prescribed for the day); नियम or नेम जागविणें To maintain one's rule or self-appointed course; सती जागविणें To watch the embers or expiring ashes of a सती; गौर जागविणें To keep a wake to गौरी or देवी.

मोल्सवर्थ शब्दकोश

जाति

स्त्री. १ (संगीत) रागाचा आरोह व अवरोह ह्या मधील स्वरसंख्येवरून रागाचे जे प्रकार होतात ते प्रत्येकीं. त्यांची संख्या ९ आहे. त्यांचीं नांवें-संपूर्ण-संपूर्ण, संपूर्ण-षाडव, संपूर्ण-औडुव, षाडव-संपूर्ण, षाडव-षाडव, षाडव-औडुव, औडुव-संपूर्ण, औडुव-षाडव, औडुव-औडुव २ (संगीत) न्यास, अंश, ग्रह, इत्यादि स्वर, तसेंच ताल, कला, मार्ग हे ठराविक असून अमुक एक रस उत्पन्न व्हावा अशी योजना ज्या एखाद्या नियम- बद्ध स्वररचनेंत असते ती. हिचे प्रकार दोन-शुद्ध जाति व विकृत जाति. ३ (संगीत) मात्रानियमावरून तालांचे झालेले प्रकार प्रत्येकीं. ह्या जाती पांच आहेत:-चतुरस्त्र, त्र्यस्त्र, खंड, मिश्र व संकीर्ण. [सं. जाति]

दाते शब्दकोश

स्त्री. १ जात; प्रकार; वर्ग. २ वंश; कुळ; बीज. ३ वर्ण जात पहा. ४ (गणित) अंश व छेद यांचें एकीकरण. उदा॰ विशेष-शेष जाति. ५ (साहित्य) एक अलंकार. संस्कृत आणि प्राकृत या दोहोंतहि सारखेच वाचले जातील अशी अक्षरांची रचना. ६ छंदांचा एक वर्ग. हा मात्रासंख्याक असून, षण्मात्रिक तालाचा व अष्टमात्रिक तालाचा असे याचे दोन प्रकार आहेत. [सं.] ॰दंड-पु. जातीनें लादलेला कर. २ जातिबहिष्कृत माणसानें शुद्ध झाल्यावर जातीला द्यावयाचा दंड. ॰पक्ष-पु समु- दायरीत्या जात, वर्ग, वंश (संबंध जात एक धरून विचार कर- तांना). याच्या उलट व्यक्तिपक्ष = एकटा माणूस. ॰बंधु-पु. जातीं- तील माणूस; जातभाऊ; जातभाई; ज्ञातिबांधव. ॰भेद-पु. वंश- भिन्नत्वावरून, वर्णभिन्नत्वावरून अगर निरनिराळ्या उद्योगधंद्यां- वरून समाजाचे जे वेगवेगळाले गट बनले आहेत त्यांस जाती म्हणतात. जातीमधून भिन्न भिन्न प्रकार, आचार, रूढी उत्पन्न होतात. त्यामुळें जातिभेद उत्पन्न होतात; जातींमधील भिन्नत्व; असमानता. ॰भ्रंश-पु. जातिबहिष्कृत होणें; जातीस मुकणें. ॰भ्रष्ट-वि. जातिबहिष्कृत; जातिबाह्य; बाटगा. ॰मर्यादा-स्त्री. जातीचे नियम (चालचालणुकीचे); जातीनें घालून दिलेलें बंधन. ॰लक्षण-न. जातीचे विशेष किंवा सामान्य गुणधर्म; जातीची रीत, वर्तन. ॰वंत-वि. १ उच्च घराण्यांतील, कुळांतील; खान- दानीचा; घरंदाज; कुलीन; उत्कृष्ट 'किजविज करिताती जाति- वंत पाखरें ।' -सला ४१. २ जातलग पहा. ॰वाचक-वि. १ (व्या.) वर्ग-प्रकार-भेददर्शक (संज्ञा.) याच्या उलट व्यक्तिवाचक. २ सामान्य, वर्गवाचक (नाम.) ॰वैर-न जन्मतः, स्वाभाविक वैर. ॰व्यवहार-वेव्हार-पु. विशिष्ट समाजामध्यें प्रचलित असलेल्या नीतिमार्गाचें आचरण. 'कीं जातिवेव्हारा परौता ।' -ऋ १४. ॰स्मृति-स्त्री. पूर्वजन्मस्मरण 'मग जाहली जाति- स्मृती ।' -गुच ११.९२. ॰स्वभाव-पु. १ कुळाचा, जातीचा, वर्गाचा स्वभाव; जातिलक्षण २ जन्मस्वभाव; प्रकृतिस्वभाव. जातीचा-वि. १ जातीनें; जातीसंबंधानें. 'हा जातीचा ब्राह्मण खरा-आंधळा-पांगळा-रोगी.' जातिवंत; अस्सल. 'तुका म्हणे तेथें पाहिजे जातीचें । येरा गाबाळाचे काम नोहे.' -तुगा ३५८७. ३ खानदानीचा; मोठ्या कुळांतला. ॰म्ह॰ १ जातीची खावी लात परजातीचा नको भात. २ जातिकरितां खावी माती. जातीचें लेकरूं-न. (ल.) लुच्चा माणूस; लबाड माणूस. ॰पुती-पूत-स्त्री. वंश; कुळी; जातपूत पहा. म्ह॰ जाती तशी पुती, खाण तशी माती. ॰पुतीचा-वि. खानदानीचा; कुलीन. जातीय-वि. जातीसंबंधाचा; जातीचा. 'साधूस स्वजातीय व विजातीय सर्वसमान आहेत.' वृक्ष-ब्राह्मण-पाषाण जातीय इ॰

दाते शब्दकोश

जातिमर्यादा      

स्त्री.       जातीचे नियम (चालचलणुकीचे); जातीने घालून दिलेले बंधन.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जातिव्यवस्था      

स्त्री.       (समाज.) समाजात निर्माण झालेल्या जातीनुसार केलेली समाजाची व्यवस्था यामध्ये रोटीबेटी व्यवहार उच्चनीचता, स्पृशास्पृशता यासंबंधीचे नियम येतात.      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जीभ      

स्त्री.        १. चव घेणे, अन्न घोळवणे चाटणे व गिळणे या कार्याना मदत करणारा तोंडातील स्नायू: रसनेंद्रिय. २. (ल.) जिभेच्या आकाराची वस्तू, भाग. [सं. जिव्हा] (वा.) जीभ आवरणे - बोलण्यावर नियंत्रण ठेवणे : ‘चंपे, जीभ आवर.’ - गुशि १८१. जीभ काढणे - पदार्थ खाण्यासाठी आशाळभूतपणा करणे. जीभ चावणे, जीभ चावलीशी करून बोलणे - १. चूक लक्षात येणे. २. भिऊन, संकोचामुळे दबत दबत बोलणे. जीभ चुरुचुरु चालणे - अयोग्य, अप्रासंगिक, वेडेवाकडे बोलणे. जीभ जड असणे, जीभ जड होणे - १. लवकर पाठ करता न येणे. मंदबुद्धी होणे २. (अस्पष्टोच्चारामुळे) बोलता न येणे; चांगले शुद्ध बोलता न येणे. जीभ झडणे - (खोटे वगैरे बोलण्याने) वाचा नाहीशी होणे. जीभ नरकात घालणे - पोकळ वचनांनी रिकाम्या बढायांनी वगैरे जीभ विटाळणे; खोटे बोलणे. जीभ पाघळणे - गुप्त वार्ता फोडणे; न बोलावयाची गोष्ट, गुप्त गोष्ट बोलणे. जीभ बधिर होणे - जीभ जड होणे. जीभ मोकळी सोडणे - हवे तसे बोलणे, खाणे; बंधन, नियम न पाळणे. जीभ मोडणे - बोबडी वळणे; मुके बनणे; शब्द न फुटणे. जीभ लवलव करणे - चुरुचुरु बोलणे. जीभ लाल-चावणे - खाण्याला उत्सुक असणे; तोंडाला पाणी सुटणे. जीभ लांब करून बोलणे - वरिष्ठांशी अघळपघळ बोलणे; उर्मटपणाने बोलणे. जीभ वळवळणे - (लहान मुलाने) १. बोलण्याचा प्रयत्न करणे; बोलावयास लागणे. २. शिव्या देणे; अद्वातद्वा बोलणे जीभ विटाळणे - अपशब्द बोलणे; वेडेवाकडे बोलणे. जीभ शिंदळ, जीभ निसरडी - वाह्यात, ताब्यात नसलेली जीभ. जीभ सैल सुटणे - बडबड सुरू होणे : ‘समुदाय मिळाल्यावर जीभ सैल सुटे.’ - कलंदर २३७. जीभ सोकणे, जीभ सोकावणे - १. चटक लागणे. २. चव येणे (अन्नाची - सरावाने). जीभ हाती धरणे - मन मानेल तसे बोलणे, खाणे. जिभा अवघडणे - बोलायला सुचेनासे होणे : ‘त्यांच्या पैशाला अशा चारीकडनं वाटा हैत. मग कशाचं गटळ करतोय? यावर दोघांचं बोलणं कुचमलं, जिभा अवघडल्या.’ -वळीव ३६. जिभेचा पट्टा - अद्वातद्वा बोलणे; वाचाळता. जिभेचा पालट - खाण्यात बदल; रोजच्या खाण्याच्या पदार्थांऐवजी इतर पदार्थ खाणे. जिभेचा लोळ, जिभेचा लोळा -अतिशय कढत पदार्थ खाल्ल्याने जीभ भाजून जाणे. जिभेचे फुटाणे फुटणे - फाडफाड बोलणे. जिभेच्या टोकावर असणे - बोलून टाकण्याच्या तयारीत असणे; तोंडपाठ असणे : ‘आपल्या अगदी जिभेच्या टोकावर ते नांव आहेसे तुम्हांला वाटत राहतें नि असे असूनहि तुम्हांला तें आठवत नाहीं.’ - हखेमओ ६१. (एकाच) जिभेने साखर किंवा गू खाणे - एकाच वेळी बरेवाईट म्हणणे; दोन्ही प्रकारे बोलणे. जिभेला काटा लावणे - एखादी गोष्ट गुप्त ठेवणे. जिभेला चिमटा घेणे - तोंड ताब्यात ठेवणे. जिभेला टाचा देऊन (काही एक) ठेवणे, जिभेस टाचा देऊन (काही एक) ठेवणे - आपण न खाता दुसऱ्यासाठी गोड पदार्थ राखून ठेवणे. जिभेला डाग देणे - जीभ ताब्यात ठेवणे; जिभेला नियंत्रण घालणे. जिभेला लगाम घालणे - बोलण्यावर नियंत्रण ठेवणे : ‘थोडा जिभेला लगाम घाल.’ - राऊ १६०. जिभेवर असणे - १. तोंडपाठ असणे. २. अगदी ताज्या आठवणीत असणे. ३. बोलून टाकण्याच्या तयारीत असणे. जिभेस आडवा वेढा नसणे - वाह्यात बडबड करणे; निरर्थक प्रलाप काढणे. जिभेस हाड नसणे - जीभ ताब्यात नसणे (खोटे बोलणे, शिवीगाळ करणे यात); खोटे, अपशब्द बोलण्याचे भय नसणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जलगतिशास्त्र      

पु.       (शाप.) पदार्थांच्या पाण्यातील गतीसंबंधी नियम दाखविणारे शास्त्र.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जमातपरिषद      

स्त्री.       (समाज.) वन्य जमातींच्या समस्यांची सोडवणूक करणारी, नियम करणारी सभा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

झांजर

पु (हत्ती, बैल, घोडा इ॰ कांच्या पायांत घाला- वयाचा) वाळ्यासारखा झणझण वाजणारा दागिना. -खानगी खातें, लागतीचे नियम (बडोदें) पृ. ५२ व ५५. [झांज]

दाते शब्दकोश

झब्बूशाही      

स्त्री.       पुंडशाही; जोरा; जुलूम : ‘या बोलण्याने लांडग्याची झब्बूशाही उघडी पडून नवा नियम साफ निकालात निघाला.’ - इसाप ३७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कादव मासा

पु. हा मासा मरळमाशाप्रमाणें दिसतो. दोहोंत मुख्य भेद तोंडाच्या आकृतींत असतो. कादव्याचें तोंड त्याच्या आकृतीच्या मानानें मोठें व रुंदट असतें. मरळाचें तोंड लांबट असतें. -मरळ माशांच्या पैदासी संबंधीं नियम ४ (बडोदें).

दाते शब्दकोश

कैद

स्त्री. १ बंदी; नियंत्रण; बंधन; तुरुंगवास २ शिस्त; कदर; अंमल; ताबा. -पया ११८. 'त्याची कैद कठीण.' ३ मर्यादा; नियंत्रण (सरकारचें, धार्मिक, सामाजिक चालींरीतीचें). ४ (कों.) निर्भत्सणें; धमकावणें; एकसारखे दोष पहाणें. -वि. बंदिस्त; कैदेंत पडलेला (चोर). [अर. कैद्] ॰कानू-स्त्री. १ सरकारी कायदे, हुकूम यांना संज्ञा. २ बंदोबस्त; अंमल. 'दिल्ली म्हणजे बादशाही तख्ताची जागा, तेथील अमर्यादा करून फौज दरवर्षीं पाठवून कैदकानू तुम्ही आपली बसविली.' -पाब १५०. [अर. कैद् + कानू] ॰खाना-पु. बंदिशाळा; तुरुंग; कारागृह. [अर. कैद + खाना] ॰खोर-वि. (कों.) तिरसट; टोंचून बोलणारा; कांचांत ठेवणारा. [अर. कैद + फा. खोर] ॰दगा-पु. फसवणूक; फसवेगिरी. 'मग यास का कैददगा म्हणावा तरीं इंग्रज हठऊन तंग करून बडोद्यास घालविले.' -रा १९.८४. [अर. कैद + दगा] ॰वार-क्रिवि. शिस्तवार; हुकुमांत; नम्रपणें; नियम पाळून शिस्तीनें. -सभासद ९. -वि. शिस्तबंद; नियमित; व्यवस्थित. 'ब्राह्मणीराज्य कैदवार एकापेक्षां एक मसलती ।' -ऐपो २३१.

दाते शब्दकोश

कैदखोर      

वि.       तिरसट; टोचून बोलणारा; काचात ठेवणारा; कमालीचा शिस्तप्रिय; नियम वगैरे कडकपणाने लागू करणारा. (को.) [फा.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कैदवार      

क्रिवि.       शिस्तवार; हुकमानुसार; नम्रपणे; नियम पाळून शिस्तीने.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

काकरी

स्त्री. (गु.) बारीक खडी; दगडाच्या बारीक चिपा, ' रेती अथवा काकरी टाकून जागा साफ करावी. ' -स्वारी नियम (बडोदें) ११५. [कंकर]

दाते शब्दकोश

काकरी      

स्त्री.       बारीक खडी; दगडाच्या बारीक चिपा :‘रेती अथवा काकरी टाकून जागा साफ करावी.’ - स्वारी नियम (बडोदे.) ११५. [गु.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कानूकायदा      

पु.       (शाव्य.) कायदेकानू, नियम, ठराव वगैरेंना समुच्चयाने योजतात.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कार्यान्वयन      

न.       कार्यक्रम, नियम यांची अंमलबजावणी; आखलेला कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्याचे काम.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कार्यकारणन्याय       

पु.       हेतू व परिणाम यांच्या संबंधाचा नियम. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कार्यवाही      

स्त्री.       कार्याला प्रत्यक्ष चालना देणे; कार्य चालू करणे; अंमलबजावणी : ‘केंद्र सरकारची रचना, त्याने हाती घेतलेले अधिकार व त्यांची योग्य कार्यवाही...’ - सैस्वा ९५. (वा.) कार्यवाहीत आणणे - (ठराव, नियम इत्यादीप्रमाणे) प्रत्यक्ष वागणे; अंमलबजावणी करणे. कार्यवाहीत येणे - ठरल्याप्रमाणे एखादे काम केले जाणे : ‘पाणीपुरवठ्याची योजना कार्यवाहीत आली होती.’ - मसं ३०७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

काटेकोर      

वि.       १. कडक; तडीस नेण्यात, अमलात आणण्यात शिस्तवार; निष्ठुर. २. रेखलेला; नेमका; बरोबर; बिनचूक; रीतसर; रतिभरही चूक नाही असा; मेहनतीने केलेला. ३. बारीक, सूक्ष्म, नाजूक, जेथे तिळाएवढीही चूक खपायची नाही असे (काम) : ‘उमेदवारांच्या निवडीबाबत आजच्या इतके काटेकोर नियम बनवले नव्हते.’ - माजी ४४१.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कायदा

(आ) पु० कानू, दस्तूर, नियम, शास्त्र.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

पु. १ नियम; व्यवहार; धर्मशास्त्र; शिरस्ता; वहि- वाट; न्यायानें वर्तावें, अन्यायानें वागल्यास अमुक शिक्षा होईल असें सांगणारा तो कायदा. 'समाजनियमनाच्या अनेक साहि- त्यापैकीं कायदा हें एक साहित्य होय.' -ज्ञाको क ३८२ [अर. काइदा] कायदे-कौन्सिल-न. कायदा ज्या प्रतिनिधी (लोक- नियुक्त, सरकारनियुक्त) मंडळांत मान्य केला जातो तें. हिंदुस्था- नांत ज्या प्रांतांत गव्हर्नर असतो त्या प्रांतांत कायदे-कौन्सिल असतें. ॰पंडित-वि. कायद्यांत निष्णात. ॰बाज-वि. कायद्यांत तरबेज; कायदेपंडित, भंग-पु. जुलमी कायदे मोडण्याची क्रिया. ॰मंडळ-न. कायदेकौन्सिल. ॰शीर-क्रिवि. काय- द्याप्रमाणें; नियमाप्रमाणें; नियमांबरहुकूम; कायद्याबरहुकूम; ठरावाप्रमाणें; सशास्त्र; न्याय्य (वागणारा). ॰शीर चळवळ- स्त्री. न्याय्य, कायदा न मोडतां प्रजेनें केलेली राजकीय चळ- वळ (इं.) काँस्टिट्यूशनल अ/?/जिटेशन. 'हक्क देणारे व घेणारे यांच्या शक्तींत जमीनअस्मानाचें अंतर असलें तरी (प्रजेनें) सामोपचार अर्थांत कायदेशीर चळवळ करणें. जरूर आहे.' -टिसू ५६. -द्याची अट-स्त्री. कायद्याचा निर्बंध. -चा बळी-पु. जुलमी कायदे मोडल्यामुळें शिक्षा पावलेला माणूस.

दाते शब्दकोश

कायदा

(पु.) [अ. काइदा] नियम; शिरस्ता; वहिवाट.

फारसी-मराठी शब्दकोश

कायदे-भंग

नियम झुगारले, बेकायदा वर्तन केलें, कायदेकानू पायदळीं तुडविले, मर्यादा उल्लंघिल्या, कायदा जुमानला नाहीं, कायद्याला धाब्यावर बसविलें, कायदा हातांत घेतला, कायद्यांतल्या पळवाटा हेरल्या, फरस हाच येथला अलिखित कायदा, कायदा राहिला कोर्टांत, येथे कायदा काय रडेल ? जंगलतोडीप्रमाणे येथे कायदेतोडही चालते ! कोर्ट म्हणून एक ठिकाण असतें याची कोणाला याद असेल तर ! कायद्याच्या डगला-पट्टे वाल्याला कशी झुकांडी द्यावी हें येथें सर्व पक्कें जाणतात, इकडे सर्वच अफाटपणा, नियमबाह्य आचार, दंडुक्यानें प्रश्न सोडविणे हा इथला अलिखित कायदा.

शब्दकौमुदी

कायदेकानु      

पु. अव.       कायदे, नियम इ. बंधनकारक गोष्टी : ‘वसुलीची सूट, तहकुबी, तगाई, अतिक्रमण वगैरेसंबंधाने सरकारने कायदेकानू केले आहेत.’ - गांगा ५८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कडक      

वि.       (मारताना कड असा होणारा आवाज, यावरून). १. टणक (लाकूड, माती); कमी चिकण. २. महाग (भाव, दर) : ‘विलायती हुंडीचा भाव घसरल्यामुळे सरकार कृत्रिम उपायांनीं नाणेंबाजार कडक राखून ठेवतें.’ – के १०·६·३०. ३. शिस्तीचा, तापट : ‘आपले वडील मोठे कडक आहेत.’ – विवि १०·५. ४. मोडता न येण्यासारखा, पाळलाच पाहिजे असा (नियम, शिस्त इ.). ५. (ल.) कठोर, उग्र, रागीट : ‘त्यांची मुद्रा बरीच कडक दिसत आहे.’– विवि ८·१·५. ६. जलाल; प्रखर (भाषण, लेख, ऊन इ.) : ‘उष्णकटिबंधात एखादे वेळेस उन्हाळा कडक होऊन सर्व पदार्थांचा सत्यानाश होऊन जातो.’ – पाव्ह ५५. ७. तेजस्वी, पाणीदार : ‘कृष्ण पुरःसर पांडव आले हांकीत ह्या कडक डोहा ।’– मोगदा १·१९. ८. वाळलेले, आर्द्रता नाहीशी झालेले (धान्य, भाकरी). ९. सणसणीत, जोराचा. १०. टणक पण ठिसूळ (लोखंड, सोने किंवा शिसे यांच्याशी तुलना करताना). ११. जहाल; झोंबणारे, उष्ण (तिखट); सहन न होणारे.१२. कच्चेपणामुळे दडस (फळ, भाजी). १३. दणकट, निकोप (माणूस, जनावर). १४. (ल.) कडू, तीव्र (औषध, तपकीर, विडी). १५. तीक्ष्ण, बोचणारे (थंडी). १६. कर्कश, कानठळ्या बसणारा (आवाज, संभाषण). १७. खळ घालून इस्त्री केलेला : ‘कुणी लोकल मुलगा कडक पॅन्टीत आला.’ – कोसला ४०. (वा.) कडक विझणे – मोठा आवाज शांत होणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कॅनन

पु. १ ख्रिस्ती धर्मसभेचा ठराव. २ पवित्र शास्त्रां- तर्गत प्रमाणभूत पुस्तकें. ३ इंग्लंदीय चर्चच्या आचार्यास दिलेली एक पदवी. ४ बिशपाच्या उपासनामंदिरांत राहून रोजची उपा- सना चालविणारा आणि गायकवर्गास शिकविणारा आचार्य. 'कॅनन सेल यांनीं कुरणाचें इंग्रजींत भाषांतर केलें.' [इं. ग्री. कॅनोन = नियम, (मूळ कॅन्ना, कॅने = छडी)]

दाते शब्दकोश

कलम      

न.       १. लेखातील विशेष मुद्द्यांबद्दल किंवा गोष्टींबद्दल लिहिलेला तेवढाच भाग; स्वतंत्र सदर, भाग, मुद्दा; परिच्छेद : ‘पुस्तकगृह हें एक सुधारणुकीचे मोठे कलम आहे…’ - निमा १५. २. रकाना. ३. कायद्याच्या पुस्तकातील प्रत्येक नियम, कानू, परिच्छेद : ‘पिनल कोड कलम ४३५ प्रमाणे अपक्रियेचा अपराध वामनरावांचे माथी बसतो.’ - विक्षिप्त १४३. ४. दुकानदारांच्या परस्पर उधार देवघेवीच्या हिशेबातील मुदत. ही १ महिना १० दिवस किंवा १॥ महिना असते. त्यानंतर उधार रकमेवर व्याज आकारतात. त्याला मुदत संपल्यानंतर कलम पिकले असे म्हणतात. ५. तुकडी; पथक : ‘चाललें कलम फौजेंचें । राऊत पायदळाचे ।’ - ऐपो २३०. ६. (ल.) पत्र. (वा.) कलम धरणे- सैन्यभरती सुरू करणे : ‘…भाद्रपदमासीं कलम धरावे २० हजार मोगल चाकर ठेवावे.’ - पेद १०·३१.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कलमबाज      

वि.       १. कलम चालविणारा; फर्डा. २. सर्व कलमे अथवा बाबी, नियम यांत निष्णात : ‘कायद्याच्या कलमबाज शब्दार्थाने….’– अभ्युदय ३०-११-२८. [फा.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कराधानाचे सिद्धांत      

(अर्थ.) करांची आकारणी करण्यासंबंधीची, कर बसवण्यासंबंधीची सर्वसाधारण तत्त्वे, नियम.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

करार

पु. (ख्रि.) देवाची मनुष्यजातीसंबंधीं केलेली योजना (हिब्रू भाषेंत करार या शब्दाचा अर्थवाचक जो शब्द आहे त्याचा अर्थ कापणे अथवा बंधन असा आहे). 'मी मेघांत धनुष्य ठेविलें आहे तें तुमच्या माझ्या मधल्या कराराचें चिन्ह समजावें.' -उत्प ९.१३. ख्रिस्ती करार दोन आहेत: १ जुना करार-पु. (ख्रि.) ओल्ड टेस्टामेंट या इंग्रजी शब्दाचा पर्याय; परमेश्वरानें इस्त्रायल लोकांशीं मोशे याच्यातर्फें जो करार केला होता तो. त्यांत नेमशास्त्रासंबंधीं बाह्यविधि व नियम लाविले होते. 'कारण जुना करार वाचितात तेव्हां तेंच आच्छादन तसेंच न काढिलेलें राहतें.' -करिथ ३.१४ -इब्री ८.७.१३. २ ख्रिस्ती पवित्रशास्त्र या ग्रंथाचा पूर्वार्ध. नवा करार-पु. १ (ख्रि.) न्यू टेस्टामेंट या इंग्रजी शब्दाचा पर्याय; भविष्यवादामध्ये ईश्वर व मानवजाति यांमधील ज्या नैतिक संबंधाविषयीं भविष्य वर्तविलें आहे तो संबंध. 'मी इस्त्राएलाच्या घराण्याशीं ... नवा करार, करीन.' -इब्री ८.८. २ येशु ख्रिस्तानें मनुष्यांशीं केलेला करार, त्यानें क्रुसावर आपलें रक्त सांडून त्यावर आपला छाप मारिला. त्यायोगें ख्रिस्तावर भाव ठेवणारास तारण प्राप्त होतें. ३ पवित्र- शास्त्र या ग्रंथाचा उत्तरार्ध.

दाते शब्दकोश

करार      

पु.       (ख्रि.) देवाची मनुष्यजातीसंबंधी केलेली योजना (हिब्रू भाषेत करार या शब्दाचा अर्थवाचक जो शब्द आहे त्याचा अर्थ कापणे अथवा बंधन असा आहे) : ‘मी मेघांत धनुष्य ठेविले आहे ते तुमच्या माझ्यामधल्या कराराचे चिन्ह समजावे.’ - उत्प ९·१३. ख्रिस्ती करार दोन आहेत. १. जुना करार (इस्त्राईल). ओल्ड टेस्टामेंट या इंग्रजी शब्दाचा पर्याय; परमेश्वराने इस्रायल लोकांशी मोशे याच्यातर्फे जो करार केला होता तो. त्यात नेमशास्त्रासंबंधी बाह्यविधी व नियम लावले होते : ‘कारण जुना करार वाचितात तेव्हा तेच आच्छादन तसेच न काढिलेले राहते.’ - करिंथ ३·१४. २. ख्रिस्ती पवित्रशास्त्र या ग्रंथाचा पूर्वार्ध. नवा करार - (क्रि.) १. न्यू टेस्टामेंट या इंग्रजी शब्दाचा पर्याय; भविष्यवादामध्ये ईश्वर व मानवजाती यांमधील ज्या नैतिकसंबंधाविषयी भविष्य वर्तविले आहे तो संबंध : ‘मी इस्त्राएलाच्या घराण्याशी.... नवा करार करीन.’ - इब्री ८·८. २. येशू ख्रिस्ताने मनुष्याशी केलेला करार. त्याने क्रुसावर आपले रक्त सांडून त्यावर आपला छाप मारला. त्या योगे ख्रिस्तावर भाव ठेवणाऱ्याला आधार मिळतो. ३. पवित्रशास्त्र या ग्रंथाचा उत्तरार्ध.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

क्रियांगराग      

पु.       (संगीत) शास्त्रातील नियम कायम ठेवून विचित्रतेसाठी विवादी स्वरांचा उपयोग ज्या रागात केला जातो असा राग. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

क्रियांगरात

पु. (संगीत) शास्त्रांतील नियम कायम ठेवून विचित्रतेसाठीं विवादी स्वरांचा उपयोग ज्या रागांत केला जातो असा राग. [सं.]

दाते शब्दकोश

क्रियाशील      

वि.       १. धार्मिक नियम पाळणारा; तत्त्वाला धरून वागणारा. २. प्रत्यक्ष कार्य करणारा कोणत्याही संस्थेचा सदस्य; उद्योगी. जसे :- क्रियाशील कार्यकर्ता. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

क्रियावान, क्रियावंत      

वि.       शास्त्राप्रमाणे विहित आचरण करणारा; नित्य - नैमित्तिक नियम पाळणारा : ‘जो वेदार्थ करणार पंडित । त्याहून अनुष्ठानी क्रियावंत । शतगुणें आगळा ।’ - ह ३४·१००. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

क्रम

पु. १. वर्ग; अनुक्रम. २ व्यवस्था; मांडणी; पद्धत; कांहीं नियमानुसार चालणें; मोड. ३ प्रगति; पुढें जाणें, चालणें; क्रमण. ४ विधि; नियम. ५ (संगीत) स्वरांचा आरोह. ६ परं- परा; सरणी; संप्रदाय. [सं.] सामाशब्द- ॰त्रैराशिक-पुन. सरळ- त्रैराशिक. [सं. क्रम् = जाणें] ॰पाठी-वि. वेदसंहितेंतील दोनदोन पदांचा अनुक्रम धरून एक वाक्य तयार करून पठन करणें व पठण करतांना मागील पद पुढील पदास जोडणें, याप्रमाणें अध्ययन करणारा. उ॰ 'अग्निमीळें । ईळे पुरोहितम् । पुरोहितंयज्ञस्य ।' इ॰ ह्याप्रमाणें जटापाठी; घनपाठी; शाखापाठी असे अध्ययन करणारांचे दुसरे वर्ग आहेत. [सं.] ॰प्राप्त-क्रमागत पहा. ॰योगी-क्रमाक्रमानें ब्रह्मप्राप्ति करून घेणारा योगी. 'हे मज मिळतिये वेळे । तयां क्रमयोगियां फळें ।' -ज्ञा १८.११३४. ॰मार्ग-रुळलेला, नेहमीचा मार्ग; धोपटमार्ग; सनदशीर मार्ग. 'क्रांतिमार्ग क्रममार्गापेक्षां नेहमींच वाईट असतो असें नाहीं, पण बहुदा तो वाईट असतो.' -सुदे १११. ॰मुक्ति-स्त्री. देवयान. मार्गानें मिळणारा मोक्ष. 'म्हणून या मार्गास क्रममुक्ति ... नांव आहे.' -गीर २९५. ॰शः-क्रिवि. ठराविक पद्धतीनें, क्रमानें; व्यवस्थितपणें. [सं.] ॰संख्यावाचक विशेषण-न. अनु क्रमानें संख्या दर्शविणारें विशेषण. जसें- पांचवा, सहावा, इ॰. क्रमागत-यात-वि. क्रमानें प्राप्त झालेला, असलेला; वंशक्रमानें; वारसानें मिळालेला (वांटा, जिंदगी) [सं.] क्रमाने, क्रमा- क्रमानें-क्रिवि. १ एकसारखें; नियमितपणें; सुव्यवस्थितपणें; व्यवस्थित प्रगतीनें. २ एकामागून एक अशा प्रमाणें; ओळीनें; नंबरवार. क्रमिक—वि. १ इयत्तावार नेमलेलें; अभ्यासासाठीं लावलेलें (पुस्तक इ॰). 'शिकविल्या गेलेल्या क्रमिक पुस्तकांची यादी मिळत नाहीं' -केले १.१४३. २ क्रमागत पहा.

दाते शब्दकोश

क्रम      

पु.       १. वर्ग; अनुक्रम. २. व्यवस्था; मांडणी; पद्धत; काही नियमानुसार चालणे; मोड. ३. प्रगती; पुढे जाणे; क्रमण. ४. धार्मिक विधी; नियम. ५. (संगीत) स्वरांचा आरोह. ६. परंपरा; सरणी; संप्रदाय. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कर्महीन      

वि.       धार्मिक विधी, नियम न पाळणारा; धार्मिक नियमाबद्दल काळजी न करणारा. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कर्मविधी      

पु.       (अनेकवचनीही प्रयोग होतो) धर्मासंबंधी कृत्ये वगैरेचे नियम, पद्धती, रीती, मार्ग; कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या धर्मकृत्याचे सूत्र किंवा विधान. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कृतसंकल्प

(सं) पु० शाश्वतीचा नियम.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

कसूरी

कसूर पहा. खानो नियम (बडोदें) १.

दाते शब्दकोश

कुल्बाब-कुल्कानू

=सर्व प्रकारच्या पट्या व नियम. हा शब्दचय सनदांत येतो.

फारसी-मराठी शब्दकोश

कुरी

स्त्री. १ उपद्रवकारक, त्रास देणारें भूत, रोग इ॰ चा उपद्रव न व्हावा म्हणून अमुक एका वेळीं अमुक एक उपाय करावा असे जे नियम ठरविलेले असतात ते; तो उपाय कर- ण्याची वेळ; त्यावेळीं द्यावयाचा बळी; त्या वेळची क्रिया. 'भुताला कुरीवर बसविलें.' 'भुताची कुरी चुकली म्हणून उप- द्रव होतो.' २ (सामान्यतः) ठराविक वेळ. 'कुरीवर दाणा दिल्हा असतां घोडा चांगला रहातो.' ३ एक झाड. ४ पाभर; धान्य पेरण्याचें यंत्र (चाडें व नळ्याविरहित); कुरगी. ५ अर्धा बिघा (जमीन मोजण्याचें माप). ६ दलदलींत राहणारा एक पक्षी. [का.कुरी = मेंढी] कुरीचें भात-न. (क.) कुरीनें पेरून आलेलें भात.

दाते शब्दकोश

कुरी      

स्त्री.       १. भूत, रोग इ. चा उपद्रव न व्हावा म्हणून अमुक एका वेळी अमुक एक उपाय करावा असे जे नियम ठरविलेले असतात ते; तो उपाय करण्याची वेळ; त्या वेळी द्यायचा बळी; त्या वेळची क्रिया : ‘म्हसोबाची कुरी वेळच्या वेळेवर न पोहोचली....’ - नाता १३४. २. (सामान्यतः) ठरावीक वेळ. कुरीवर बसवणे- जाग्यावर आणणे. (वा.) [क. कुरी = मेंढी]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कूस      

स्त्री.       १. शरीराची एक बाजू; बरगडीची, काखेखालची बाजू. २. जठर, गर्भाशय : ‘तो तू देवकीकूंसीचा सेजारीं ।’ - शिव ११२. ३. (ल.) जागा; अवकाश (खोटे बोलण्यास, फसवण्यास, लबाडीस, गैरमिळकतीस). (सामा.) जागा किंवा अवकाश असा अर्थ. ४. भरलेली जागा; साधलेली संधी (खोटे हिशेब करून खऱ्या खर्चापेक्षा जास्त रक्कम खर्ची टाकून, माल जमा करून, दुसऱ्याची व्यवस्था करताना काही रक्कम गिळंकृत करून इ.); घेतलेले माप किंवा केलेले हिशेब यात फारशी लबाडी अंगी न लागता थोडासा कमी - अधिकपणा करणे; थोडी कसर; वर्तावळा. ५. गुरे इ. प्रसवल्यानंतर त्यांच्या योनिद्वारे निघणारा कुजका अंश. [सं. कुक्षि.] (वा.) कूस उजवणे - मूल होणे. कूस घालणे - खेळातील नियम मोडल्याबद्दल खेळगड्‌याला बाहेर टाकणे. (कु.) कूस ठेवणे - सवलत देणे : ‘पण टिळकांपुरती त्यांनी सार्वजनिक सभेची कूस ठेवण्याची तयारी दाखवली.’ - आभासा २५७. कूस फावणे - संधी मिळणे.; सबब सापडणे : ‘ तिच्या योगाने मुसलमानांना आपल्या मागण्या वाढविण्याला कूस फावली.” - आभासे ३८१. कूस फुटप - पहा : कूस उजवणे (गो.) कूस भरणे - : एखाद्या पदार्थाने पोट भरणे. २. गर्भ राहणे. कुशीस होणे - एका अंगावर निजणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कवायत

स्त्री.१ युद्धविषयक सामुदायिक हालचाल; सैन्यची कसरत; कारवाई; कवाईत पहा. ' लढाईचे समयी कवा- यतीनें चालावें' -रा १०.६५. २ नियम; पद्धति; युक्ति; शिस्त. 'सखारामपंतानी कवायत धरली आहे जे. ' -ख ५.२६२५. [अर. कवाइद = कइदाचें अव]

दाते शब्दकोश

कवायत; कवाईत

(स्त्री.) [अ. कवाइद् अनेक व. काइदाचें] युद्ध विषयक समुदायिक हालचाल; ड्रील; परेड; नियम; पद्धती; युक्ति; कारवाई. “लढाईचे समयीं कवातीनें चालावें” (राजवाडे १०।६५). “सखारामपन्तांनीं कवाईत धरिली आहे जे” (खरे ५।२६२५).

फारसी-मराठी शब्दकोश

खेळ      

पु.       १. अन्य कोणत्याही बाह्य हेतूची किंवा भविष्यकालीन सुखाची अपेक्षा नसलेली, आत्मतृप्तीसाठी करण्यात आलेली सुखद कृती. अशा कृतीलाच ‘क्रीडा’ असेही म्हणतात. २. ज्यास नियम इ. आहेत असा खेळण्याचा प्रकार. उदा. हुतुतू, टेनिस इ.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खण      

पु.       एखादा खाद्यपदार्थ न खाण्याचा नियम (पोळीचा, खिरीचा, भाताचा खण); एखाद्या देवतेप्रीत्यर्थ धरलेला निर्बंध. [सं. खंड]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खण

पु. एखाद्या खाद्यपदार्थ न खाण्याचा नियम (पोळीचा, खिरीचा, भाताचा खण); एखाद्या देवतेप्रीत्यर्थ धरलेला निर्बंध. (क्रि॰ धरणें). [सं. खंड]

दाते शब्दकोश

खंडाराणी

स्त्री. (बडोदें) राजाच्या गैरहजेरींत त्याच्या खंडाशी (कट्यार, तरवार) जिचें लग्न लागतें अशी राणी.-अहेर बहुमान पोशाखाचा नियम ४१. [खंडा + राणी]

दाते शब्दकोश

लखापडी

स्त्री. (गुज.) पत्रव्यवहार. लिखापढा पहा. 'निरर्थक लखापडी कमी करण्याबद्दल नियम.' -(बडोदें) खानगी खातें अपवाद ३०. [लिहिणें + पढणें; हिं. लिखापढ]

दाते शब्दकोश

लोण

न. आट्यांपाट्यांच्या खेळांत सगळ्या पाट्यांतून निघून जाऊन पलीकडची थोडीशी माती परत आणणें; किंवा अशी परत आणलेली माती. (क्रि॰ आणणें; येणें; देणें). अशी माती आणली म्हणजे डाव जिंकसा असें समजण्यांत येतें. [सं. लवण] ॰बारगळणें-एखादा नियम उल्लंघिल्या कारणानें निरु- पयोगी होणें किंवा फुकट जाणें. 'असा आजपर्यंत कोणी राज्य- कर्त्यानें किंवा शास्त्र कारानें कायदा किंवा कानू केलेला आठबत' नाहीं कीं अमुक एक विषयास अमुक अमुकच पृष्ठे लागावीं. ती शास्त्रोक्त मर्यादा उल्लंघिली कीं लोण बारगळलें.' -चिपळूनकर. मागून आलेलें लोण पुढें पोंचविणें-(आट्यापाट्यांच्या खेळांत एखादी गडी सगळ्या पाट्यांतून पार जाऊन परत येण्यास निघाला म्हणजे तो लोण घेऊन येऊं लागला असें म्हणतात. हें लोण तो वाटेंतील गड्यांस शिवून देतो. यावरून) मागून आलेली चाल पुढें चालविणें. 'जे आपले आचार विचारांच्या कसोटीला लावीत नाहींत ते गाढ विश्वास शृंखलांनीं निगडीत झाल्यामुळे मागून आलेलें लोण डोळे मिटून पोंचविणें एवढेंच आपलें कर्तव्य समजतात.' -आगरकर. लोणपाट्या (स्त्रीअव.); लोणप- (पा)ट-न. १ आट्यापाट्या; मृदंगपाट्या. २ (फक्त शेवटचा शब्द) खेळांतील सरशी; जय.

दाते शब्दकोश

मामूल

(आ) पु० दस्तूर, नियम, वहिवाट.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

मौल

न. कपट, इंद्रजाल. मौलाचा बाजार-मौला- बाजार व मिनाबाजार भरविण्याची पूर्वी चाल होती. या बाजारांत मालाची विक्री करण्यास बहुधा वेश्या किंवा स्त्रिया असत. त्या मालाची मागतील तितकीच किंमत द्यावी लागे. आणि एकदा रक्कम किंवा माल मागितल्यावर तो घ्यावाच लागे असा नियम असे. हा बाजार रात्रीस भरे ह्याचाच दुसरा प्रकार खोट्या रकमा (वस्तु) किंवा रकमेचें रूपांतर करून बहुत किंमतीची रक्कम थोड्या किंमतीस द्यावयाची. यासच मौलाचा बाजार म्हणतात. 'तेव्हां छद्मी जयपूरवाल्यांनीं शहरांत मौलाचाचा बाजार भरविला । ' -मल्हारराव चरित्र ६८.

दाते शब्दकोश

मौन

न. गप्प किंवा स्तब्ध बसणें; न बोलणें; गुपचुप बसणें; मुकेपणा; निश्शब्दता; विवक्षित कालपर्यंत भाषण न करितां राहण्याचा जो व्यापार तो. 'नकळे हृदयीचें महिमान । जेथें उपनिषदा पडलें मौन । तेथेंही संचरले सज्जन । देहाभिमान सांडोनी । ' -एरुस्व १.३७. २ अबोलपणा; स्तब्धता; अनालापिता; अनाकापवृत्ति. -वि. मुका; न बोलणारा; स्तब्ध किंवा गपचूप बसणारा. [सं.] ॰मुद्रा-स्त्री. शांतपणाची, न बोलण्याची किंवा अबोलपणाची मुद्रा; अबोलपणानें राहण्याची प्रवृत्ति दर्शविणारी चेहऱ्याची ठेवण. [सं.] ॰व्रत-न. कांहीं मुदतीपर्यंत न बोलण्याचा नियम, नेम; कांहीं कालपर्यंत मौन वृत्तीनें राहण्याचें धरलेलें व्रत. (क्रि॰ धरणें.) [सं.] मौनावणें-क्रि. स्तब्ध राहणें; अबोलपणानें असणें; एखाद्यानें स्वतःची शांतवृत्ति राखणें; चुप बसणें, होणें. 'प्रेमें विकासलीं कमळें शुद्ध । गुंजावरती कृष्ण षट्पद । ऐकोनि गंधर्व जाहले स्तब्ध । सामवेद मौनावलें । ' -एरुस्व ३.६. 'स्वंयें शेष मौनावला स्थीर पाहे । ' -राम १५८. मौनी- वि. १ स्तब्ध; मौनव्रत घेतलेला; निश्शब्द; अबोल; अल्पभाषी; अनालापी; भाषणविरक्त. २ जगापासून पराड्मुख होऊन ज्यानें आपलें सर्व विकार (कामक्रोध इ॰) जिंकले आहेत असा; वन- वासी; अरण्यवासी; वानप्रस्थ; ऋषि (धार्मिक). मौन्य-न. १ स्तब्धता; मौन; शांतता. २ मुकेपणा; अबोलपणा; अनालापिता; अनालापवृत्ति. [सं. मौन] मौन्य(न) पणें-क्रिवि. स्तब्ध; मुकाट्यानें. 'बस तुं मौनपणें अथवा उगा । ' -वामनचरित्र १४ (नवनीत प्र. ११०)

दाते शब्दकोश

महिना

पु. १ साधारणपणें तीस दिवसांचा काल; मास. २ मासिक वेतन; ह्या अवधीचा पगार. 'माझे सरकारांतून सहा महिने यावयाचे आहेत.' [सं. मास; फा. माहीना;] महि- न्याच्या कांठीं-क्रिवि. महिना भरल्यावर; महिनाभर काम केल्यावर. 'महिन्याचे काठीं शंभर रुपये मिळतात.' महिनखत- न. (ना.) दरमहिन्याला ठराविक रकम फेडण्याच्या करारानें केलेलें खत. महिनदारीण-स्त्री. (ना. व.) मोलकरीण. महिने- करू, महिने(न)दार-पु. १ दर महिन्याला अमुक पगार अशा ठरावानें कामाला लाविलेला नोकर. २ आळीपाळीनें एक एक महिना काम करावें अशा वांटणीप्रमाणें त्या त्या महिन्याची ज्याची पाळी असेल तो इसम. महिनेभरु-पु. कामाकडे लक्ष न देता माझा महिना भरतो केव्हां व मला पगार मिळतो केव्हां अशा बुद्धीनें काम करणारा नोकर; भाडोत्र/?/; नोकर. महिन(न) माल, महिने(न)महाल-वि. मासिक; महिन्याच्या बोलीनें लाविलेला, ठरविलेला (चाकर, चाकरी, पगार, रोजमुरा, खर्च, जमावसूल, हिशेब). महिने(न)माह-क्रिवि. महिन्यास; प्रत्येक महिन्याला; दरमहा. 'महिनेमहा खर्चाचा ताळा.' -स्वारी- नियम ४०. महिनेवाला-पु. (कु.) देवळाच्या उत्पन्नातून ज्याला दर महिन्यास ठराविक धर्मादाय मिळतो तो मनुष्य.

दाते शब्दकोश

मिश्र, मिश्रित

वि. मिसळलेला; एकत्र झालेला; मिळवि- लेला. [सं. मिश्र = मिसळणें] ॰अपूर्णांक-पु. अव. अपूर्णांकांचा एक प्रकार; अधिक चिन्हानें जोडलेले अपूर्णांक. ॰गणित-न. सुवर्णगणित. याचे दोन भेद आदेत मध्यमिश्रगणित व व्युत्कम- मिश्र गणित. ॰गति-स्त्री. (ज्योतिष) दोन किंवा अधिक प्रेरणांच्या योगानें उत्पन्न होणारी गति. ॰जाति-स्त्री. (ताल) पहिला विभाग नियमानें सात मात्रांचा असणारा, दक्षिणेकडील एक ताल-प्रकार. ॰धातु-पु. दोन किंवा अधिक धातूंचे मिश्रण करून नवीन बनविलेला धातु उदा॰ पितळ. ॰व्यवहार-पु. मिश्र गणिताचे नियम. ॰मिश्रण-न. मिसळ, भेसळ; मिश्र झालेला पदार्थ. २ बेरीज. ३ (रसा.) संयोगी नसतां मिसळून झालेला पदार्थ. मिश्रणीय-वि. मिश्रण करण्यास योग्य; मिसळण्यासारखें.

दाते शब्दकोश

मनोनिग्रह

(सं) पु० निश्चय, नियम, आत्मसंयमन.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

मोई(इ)न

स्त्री. वर्षाची नेमणूक; ठराव; नियम; पगार; तैनात; कायम नेमणूक. 'इतकियावर मोईन प्रमाणें चौकीपहारा न राखेच तर परिच्छिन्न दूर करावा.' -मराआ १४. [अर. मुअय्यन्] ॰जाबता-पु. १ नेमणूक होतांना किंवा पगार निश्चित करतांना लिहून घेतलेला लेख; पगारपत्रक; नोकर लोकांचें पत्रक. २ कराराचें पत्रक; वांटणीपत्रक. ॰दार-पु. संस्थानांतून नेमणूक किंवा वेतन घेणारा इसम. मोईन पहा. ॰माप-न. १ ठराविक किंवा निश्चित मोजमाप. २ -क्रिवि. खचित; करारानें; कायमपणें; ठराविकपणें; खरोखर.

दाते शब्दकोश

मोईन

(स्त्री.) [अ. मुअय्यन्] नेमणूक; ठराव; नियम; पगार; तैनात. “इतकियावर मोईनप्रमाणें चौकी-पहारा न राखेच तर परिच्छिन्न दूर करावा” (मराआ १४). “यांस साडी-चोळीची मोईन सालीना होन प ॥ १०० एकसेरास केले असेत” (राजवाडे १७|४२).

फारसी-मराठी शब्दकोश

मर्यादा

स्त्री. १ सीमा; शेवट; इयत्ता; कड; हद्द (स्थल, काल, क्रिया इ॰ची). २ (ल.) संप्रदाय-शास्त्रसिद्ध रूढी, बंधन, दाब; नियम; अट. 'जो विप्र आजिपासुनि मद्यप्राशन करील तो पापी । ब्रह्मध्नासम निश्चित असि मर्यादा स्वयें कवि स्थापी ।' -मोआदि ९.५३. ३ शिष्टाचार; वर्तनाचा योग्यपणा; व्यवस्थित सभ्य वागणूक; विनीतता. 'आजकालच्या मुलींना मर्यादाच कमी- मुळींच नाहीं म्हटलें तरीं चालेल.' [सं.] ॰मोडणें-मर्यादा, सीमा ओलांडणें; नियमबाह्य, क्रम सोडून वर्तन करणें. ॰राखणें- आदरानें, शिष्टाचाराप्रमाणें वागणें. मर्याद-शअ. पावेतो; पर्यंत; अखेर. जसें-आकंठमर्याद भोजन केलें; श्रावण-काल-नदी-मर्याद. ॰दृष्टि-स्त्री. नजरकैद; साधी अटक. 'रायें पाचारुनि तंत । मर्याददृष्टित ठेविलें ।' -ज्ञानप्रदीप १०१७. ॰वेल, मर्यादावेल- स्त्री. समुद्रकांठची एक वेल. 'जैसी मर्यादावेल उल्लंघून । प्रवेश नकरी समुद्रजीवन ।' -भवि ॰शीर-ल-ळ-वि. सभ्यपणानें वागणारा; शिष्टाचार न उल्लंघिणारा; विनीत; अदबशीर.

दाते शब्दकोश

(सं) स्त्री० सीमा, नियम.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

मुक्री

स्त्री. (गो.) काजूच्या खेळांतील एक विशिष्ट संज्ञा. मुकर, कायम केलेला नियम, अट.

दाते शब्दकोश

मुक्तछंद

न. वृतादि नियम नसलेली काव्यरचना पद्घति. केवळ तालबद्धता व भावनाविष्कार यांवर गेयत्व अवलंबून असलेली काव्यपद्धती. [स.]

दाते शब्दकोश

नेह(हे)मी

क्रिवि. १ सतत; नित्यशः अविरत; नियमित- पणें; सदोदित; नेमानें. 'तो नेहमीं पढायला जातो.' २ सदा- सर्वदा; सर्वथा; कायम; पूर्णपणें; अगदीं. 'हा घोडा तुला नेहमीं दिला.' [सं. नियम?] ॰खर्च-पु. वार्षिक नेमणूक; जमा- बंदींतून काढलेला ठराविक खर्च किंवा नियमित वजावट.

दाते शब्दकोश

नेहमी or नेहेमी

नेहमी or नेहेमी nēhamī or nēhēmī ad (नियम) Constantly, continually, regularly, habitually. 2 Laxly. For ever, utterly, altogether, quite. Ex. हा घोडा तुला ने0 दिल्हा.

मोल्सवर्थ शब्दकोश

नेमानेम      

पु.       १. योजना आणि निश्चय (ईश्वरी, दैवी); अदृष्ट; योगयोग. २. वहिवाट; चाल; सामान्य नियम; परिपाठ.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नेमी

वि. नेमलेला; ठराविक; निश्चित.-क्रिवि. नियमित- पणें; नियमानें; नेहमीं; वारंवार. ॰खर्च-पु. ठराविक खर्च. [सं. नियम]

दाते शब्दकोश

नेमी nēmī ad (नियम S through नेम) Constantly, habitually, regularly, by rule or course.

मोल्सवर्थ शब्दकोश

नेमी      

वि.       नेमलेला; ठरावीक; निश्चित. [सं. नियम]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नेमोत्तर

न. निश्चित बातमी, हकीकत, भाषण. नेमोत्तर पत्र-न. निरोप पोंचल्याबद्दलचें पत्र. -भाअ १८३२. [नियम + उत्तर]

दाते शब्दकोश

नेमोत्तर nēmōttara n (नियम & उत्तर) A decided answer; positive information or statement; definite or determinate speech.

मोल्सवर्थ शब्दकोश

न. निश्चय; नियत गोष्ट; ईश्वरी सूत्र.'ईश्वरी नेमोत्तर उर्फ त्याचें कर्तव्य त्यास कळत नाहीं.' -मातीर्थ ४.३०४. [सं. नियम + उत्तर]

दाते शब्दकोश

नेमपण      

न.       नियम; व्रत : ‘नेमपण टाळतां अवतारकृत्य संपलें ऐसेंजाणिजे।’ - दावि ३५.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नेमस्त      

वि.       १. साधारण; सामान्य; मध्यम प्रतीचा. २. नियमित; नेमाने वागणारा.३.मवाळ; (इं.) लिबरल. ४. बेताचा; बरोबर. ५. निश्चित; स्पष्ट : ‘पूर्वी गोड अंतीं शोक । नेमस्त आहे ।’ - दास ३·१०·६५. ६. नेमका : ‘नेमस्त कळेना वचन । नेमस्त न ये राजकारण ।’ - दास १५·३·१४. [क.नेमिस्तनु; सं. नियम] (वा.) नेमस्त करणे - नियुक्त करणे; योजणे. (लग्नपत्रिकेत वापरतात.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नेमस्त

वि. १ मध्यम; साधारण; सामान्य; मध्यमप्रतीचा. 'तो पंडित नेमस्त आहे.' नेहमीपेक्षां कमी नव्हे असा, किंवा जास्तहि नव्हे असा. २ नियमित; नेमानें वागणारा. ३ मवाळ; आतांच प्रागतिक. (इं.) लिबरक (पक्ष). याच्या उलट जहाल. ४ बेताचा; बरोबर. 'हा मनुष्य उंच नव्हे, ठेंगणा नव्हे, नेमस्त आहे. ५ निश्चित; स्पष्ट. 'विषयजनित जें जें सुख । तेथेंच होतें परमदुःख । पूर्वी गोड अंतीं शोक । नेमस्त आहे । ' -दा ३.१०. ६५. ६ नेमका. -मुवन २.८१. 'नेमस्त कळेना वचन । नेमस्त नये राजकरण । ' -दा १५.३.१४. [सं. नियम] ॰करणें- नियुक्त करणें; योजेणें. 'अमुक अमुक यांची कन्या वधू नेमस्त केली आहे.' (कुंकुमपत्रिकेंत वापरतात).' अमक्याचा पुत्र वर नेमस्त केला आहे.' ॰पक्ष-पु. राजकारणांतील नेमस्त विचा- राचा (प्रागतिक, मवाळ) पक्ष. (इं.) मॉडरेट, लिबरल पार्टी. -टि २.१९४. 'कारण त्यांना (टिळकांना) नेमस्त पक्षाशीं भांडणें जरी आवश्यक वाटत असलें... ' -सुदे ६२.

दाते शब्दकोश

नेत

पु. (व.) नेम; नियम.

दाते शब्दकोश

नेत      

स्त्री.       १. नियत; बुद्धी : ‘ज्याची जशी नेत तसी त्यास बरकत.’ - इमं १०७. २. निष्ठा : ‘दौलतराव बाबा यांची नेत धन्याजवळ तसीच असेल.’ - ऐलेसं १२·६८१७. ३. नियम; नेम. (व.) [अर.नीयत्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निग्रह

(सं) पु० निश्चय, नियम.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

पु. १ संयमन; प्रतिरोध; दमन; अटकाव; दडपण; दाब. 'निग्रह केल्यानें थकलेल्या कुळांपासून पैसा उगवणार नाहीं म्हणून सोईसोईनें घ्या.' २ निश्चय; दृढता; आग्रह; पक्केपणा (मत किंवा हेतूचा). ३ ताब्यांत घेणें; पकडणें; धरणें; बंदींत टाकणें. 'राजानें दुष्टाचा निग्रह आणि साधूंचें रक्षण करावें.' ४ नियम. [सं.] ॰णें-सक्रि. (काव्य) दाबांत ठेवणें; संयमन करणें; दडपणें. निग्र- हानुग्रह-पु. एखाद्याला दंड करणें किंवा त्याच्यावर कृपा करणें. निग्रहानुग्रहसमर्थ-वि. एखाद्यावर कृपा किंवा अवकृपा करण्यास समर्थ तो (देव, राजा, भूपाल वगैरे). निग्रहित-वि. दाबांत ठेव लेला; ताब्यांत घेतलेला; निग्रह केलेला. निग्रही-वि. निश्चयी; दृढ; आग्रही; करारी; हट्टी. (चांगल्या व वाईट अर्थानें).

दाते शब्दकोश

निग्रह      

पु.       १. संयमन; प्रतिरोध; दमन; अटकाव; दडपण; दाब. २. निश्चय; दृढता; आग्रह; पक्केपणा. ३. ताब्यात घेणे; पकडणे; धरणे; बंदीत टाकणे. ४. नियम. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निःसंग      

वि.       १. एकटा; सोबती, नसलेला; सर्वसंगपरित्याग केलेला (योगी, परब्रह्म). २. (ल.) सर्व बंधनांपासून, पाश, नियम इ.पासून मुक्त; लोकरीत सोडलेला; (विशेषतः) निर्लज्ज; बदफैली; स्वैर. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नीम

नीम nīma m R (नियम S) An established offering to a ghost, goblin, sprite. v दे, मांड.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. (राजा.) भूत, पिशाच्च, प्रेत इ॰ कांस द्यावयाचा नियमित बलि. (क्रि॰ देणें, सांडणें). 'यंदा त्या पिशाचाचा नीम द्यावयाचा राहिला म्हणून तुम्हास उपद्रव होतो.' [सं. नियम]

दाते शब्दकोश

निर्बंध

पु. १ निश्चय; निर्धार पहा. २ मर्यादा; नियम; कायदा; हुकूम; शासन; आज्ञा; कानू. ३ ताबा; दाब; आळा. [सं. निर् + बंध] निर्बंधक-वि. प्रतिबंधक.

दाते शब्दकोश

निर्बंध      

पु.       १. निश्चय; पहा: निर्धार.२. मर्यादा; बंदी; नियम; कायदा; हुकूम; शासन; आज्ञा; कानू. ३. ताबा; दाब; आळा. ४. आग्रह. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निर्धार

(सं) पु० निश्चय, नियम.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

पु. १ निश्चय; खातरी; विश्वास. 'कृपाळु म्हणोनी बोलती पुराणें । निर्धार वचनें यांचीं मज ।' -तुगा ११२४. २ संकल्प; ठाम उद्देश; निश्चय. 'आक्षेप परिहारीं निर्धारू । करितां परशास्त्र विचारू ।' -ऋ २३. ३ निकाल; निर्णय; निश्चय (एखाद्या गोष्टीचा, विषयाचा); निःसंदेहपणा. ४ नियम; नेम. ५ आधार; आश्रय. 'सकळ सिद्धीचा निर्धार । ते हे कवी ।' -दा १.७.१८. [सं.] निर्धारण-न. १ निश्चय करणें; ठरविणें; खातरी करून घेणें. २ संदेहाभाव. निर्धारणीय-वि. निश्चय कर- ण्यास, ठरविण्यास योग्य; निश्चित करण्यासारखी. निर्धारणें- उक्रि. (काव्य) १ निश्चय, निश्चित करणें; ठरविणें. 'देखा काव्य- नाटका । जें निर्धारितां सकौतुका ।' -ज्ञा १.७. २ निःसंदिग्धपणें जाणणें. 'मग आपसयाचि उमजला । दिशा निर्धारूं लागला ।' निर्धारित-वि. निश्चित, कायम केलेलें; ठरविलेलें; खात्रीलायक. निर्धार्य-वि. निश्चय करण्यास योग्य; ठरविण्याजोगें.

दाते शब्दकोश

निर्धार      

पु.       १. निश्चय; खात्री; विश्वास. २. संकल्प; ठाम उद्देश. ३. निकाल; निर्णय; निःसंदिग्धता. ४. नियम; नेम. ५. आधार; आश्रय. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निश्चय

(सं) पु० नियम, बेत, नेम, भरंवसा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

निसर्ग

पु. १ सृष्टी. २ स्वभाव; प्रकृति. ३ स्वाभाविक, नैसर्गिक अवस्था; सहजस्थिति. [सं.] ॰चित्रलेखन-न. पानें, कळ्या, फुलें, झाड, वेल, कीटक वगैरे सृष्ट पदार्थांचीं, देखाव्यांचीं, प्राण्यांचीं चित्रें काढणें; (इं.) लँडस्केप पेंटिंग. ॰नियम-पु. सृष्टि- नियम; सृष्टीचे कायदे, सिद्धांत. ॰वाद-पु. (तत्त्वज्ञान) बुद्धि प्रामाण्यापेक्षां मानवी नैसर्गिक बुद्धीनेंच ईश्वरज्ञान व नीतिज्ञान होईल असें प्रतिपादन करणारें मत. -ज्ञाको (न) ३१०. 'प्रचलित निसर्गवाद जडैक्यवादी नाहीं.'

दाते शब्दकोश

निस्संग

वि. एकटा; सोबती, संबंध नसलेला; सर्वसंग परि- त्याग केलेला (योगी, परब्रह्म). 'संन्याशानें निःसंग असावें.' २ (ल.) सर्व बंधनांपासून, पाश, नियम इ॰ पासून मुक्त; लोकरीति सोडलेला (वाईट व चांगल्या अर्थीं). ३ (विशेषतः) निर्ल्लज; बदफैली; स्वैर. [सं.]

दाते शब्दकोश

निसुरणे      

अक्रि.       स्वैर वागणे; स्वच्छंद होणे; धाक, नियम इ. न जुमानणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निसुरणें

अक्रि. स्वैर वागणें; स्वछंद, बेकैद होणें; धाक, बंधन, नियम इ॰ न जुमानणें. [निसूर]

दाते शब्दकोश

नियमाचा

नियमाचा niyamācā a (नियम S) Regular, orderly, methodical: also sober, steady, staid. 2 as ad decl Regularly, invariably, as a thing of course. Ex. मी जेवायास बसतों तेव्हां वारा येऊन नि0 दिवा जातो.

मोल्सवर्थ शब्दकोश

नियमणे      

सक्रि.       नियम, निग्रह करणे : ‘स्त्रीविषयीं नियमिजे । नांवें नांवें ।’ – ज्ञा १७·२१०. [सं. नि+यम्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नियमविधी      

पु.       नियमासंबंधी स्थलकाल इ. निदर्शक गोष्टी; नियमांचे दिग्दर्शन; प्राप्त कर्म अमुक वेळी करावे असा अदृष्टार्थ नियम : ‘आपत्काळीं पुत्रदान करावें असा नियमविधि जो केला त्याचें दृष्टफल तर संभवत नाहीं.’ – मिताक्षरा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नियंता      

वि.       नियमन करणारा; शास्ता; अंमल, अधिकार, हुकमत चालवणारा; समाजाला नियम, शिस्त लावणारा (ईश्वर, यमधर्म). [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नियंता

(सं) वि० नियम करणारा, त्राता. २ शास्त्र. ३ वाण, तोटा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

नियंतृत्व

न. १ नियम; निग्रह; ताबा; दाब; शासन. २ नियमन अथवा शासन करण्याची शक्ति, पात्रता. [सं.]

दाते शब्दकोश

नियत, नियेत

स्त्री. नेत पहा. १ दानत; नीति; शील. 'पठाणास नेक, नियत, धर्मयुद्ध यांची माहिती नसतें.' -सूर्योदय ९५. २ बुद्धि; हेतु. 'जशी नियत तशी त्यास बर्कत.' -वाडसनदा १५०. 'शहाजीची नियत सांप्रतकाळीं ठीक नाहीं.' -दिमरा २.५. ३ -स्त्रीपु. वृत्ति; नेमणूक; नियम. 'भंडारा व नंदादीप चालवावा ऐसा नियेत करून ...' -रा १५.१९५. 'समाधिस्थळीं पूजा पुनस्कार चालिला पाहिजे म्हणून ... त्रिवर्गांनीं आपलाले वेळेस नियत करून दिल्ही. -वाडसनदा १६८. [अर. नीयत]

दाते शब्दकोश

नियती      

स्त्री.       १. नियम; निग्रह. २. अदृष्ट; दैव. ३. मृत्यू. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नियति

स्त्री. १ नियम; नियंत्रण. २ अदृष्ट दैव. ३ मृत्यु [सं.]

दाते शब्दकोश

नोकरीयात      

वि.       (सरकारी) नोकरी करणारा : ‘ज्या नोकरीयात पहिलवानास आखाड्यांत राहण्याची इच्छा असेल…’ - (बडोदें) पहिलवान व कुस्ती नियम ८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

न्याय      

पु.       १. योग्यपणा; रास्तपणा; युक्तता; खरेपणा; तथ्य; यथार्थता. २. खरा निर्णय, निकाल; इन्साफ. ३. नीती. ४. (तर्क.) वादविवाद किंवा मत, बाजू मांडण्याची रीती, प्रकार. पाच प्रकार - प्रतिज्ञा, हेतू, उदाहरण, उपनय, निगमन.५ (तर्क.) संस्कृत वाङ्‌मयातील षड्‌दर्शनांपैकी सहावे. यात अनुमानासंबंधी विवेचन आहे. कर्ता गौतम. ६. वचन; शासन; नियम; पद्धत; सामान्य तत्त्व; मूलभूत सूत्र; दाखला; म्हण; उखाणा; दृष्टान्ताला उपयोगी पडणारी सर्वलोकप्रसिद्ध गोष्ट. उदा. देहलीदीपन्याय, अंधपंगुन्याय इ. [सं.] न्याय सांगणे - फिर्याद, तक्रार करून इन्साफ मागणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

न्याय

पु. १ योग्यपणा; रास्तपणा; युक्तता; खरेपणा; तथ्य; यथार्थता. २ खरा निर्णय, निकाल; इन्साफ. ३ नीति. 'न्यायानें जो वर्ततो त्यास भय नाहीं.' ४ (तर्कशास्त्र) वाद- विवाद किंवा म्हणणें मांडण्याची रीति किंवा प्रकार. हे पांच आहेतः- प्रतिज्ञा, हेतु किंवा अपदेश, उदाहरण किंवा निदर्शन, उप- नय व निगमन. ५ (तर्कशास्त्र) संस्कृत वाङ्मयांत जी षङ्दर्शनें, आहेत त्यांतील सहावें. यामध्यें अनुमान कसें काढावें यासंबंधी मुख्यतः विवेचन आहे. याचा कर्ता गौतम होय. ६ वचन; शासन; नियम; पद्धत; सामान्य तत्त्व; मुलभूत सूत्र; दाखला; म्हण; उखाणा; दृष्टां- तास उपयोगी पडणारी सर्वजनप्रसिद्ध गोष्ट. उदा॰ देहलीदीप- न्याय; काकाक्षिगोलकन्याय; अंधपरंपरान्याय. इ॰ मराठींत म्हणींनीं जें काम होतें तें संस्कृतांत न्यायांनीं होतें. [सं.] ॰सांगणें- फिर्याद, तक्रार करून इन्साफ मागणें. 'म्हणे तुकयानें साधियेला दावा । न्याय सांगावा कवणासीं ।' ॰इन्साफ-पु. न्यायनिवाडा. न्यायतः-क्रिवि. योग्य प्रकारें; न्यायाला अनुसरून; खरोखर रीतीनें. ॰निष्ठ-वि. न्यायी; इन्साफी; निःपक्षपाती. ॰निष्ठुर-वि. न्यायाच्या कामीं भाडभीड न बाळगणारा; निर्भीड. ॰नीति-स्त्री. न्याय; खरेपणा इ॰. ॰मन्सुबी-मन्सोबा-स्त्रीपु. १ न्याया- धिशापुढें चालू असलेला खटला. २ खटल्याची चवकशी. (क्रि॰ करणें; पाहणें). [न्याय + अर. मन्सूबा] ॰संगत-वि. न्यायास धरून असलेला. ॰सभा-मंदिर-स्त्रीन. न्याय करण्याची जागा, कचेरी; कोर्ट. न्यायाधिशी-स्त्री. १ न्यायाधिशाचें काम, अधि- कार. २ (बडोदें) न्यायाधिशाची कचेरी; कोर्ट. न्यायाधीश-पु. १ न्याय करणारा, देणारा. २ (कायदा) दिवाणी किंवा फौजदारी इन्साफांत कायदेशीर रीतीनें काम चालवून निकाल देण्याचा अधि- कार असलेला इसम. (इं.) जज्ज. न्यायासन-न. न्यायाधिशाची बसण्याची जागा. न्यायी, न्यायीक-वि. १ खरा न्याय करणारा, देणारा. २ नेकीचा; प्रामाणिक; खरेपणा असणारा. न्यायें- क्रिवि. (न्यायानें) प्रमाणें; सारखें. 'स्वर्ग नर्कही आतां । येणें न्यायें ।' -दा ९.३.३. 'खगन्यायें उड्डाण केलें । तें देखिलें सकळिकीं ।'-जै ४४.२७. न्याय्य-वि. न्यायाला अनुसरून; योग्य; रास्त; बरोबर; उचित.

दाते शब्दकोश

न्यायिके      

न. अव.       समान वागणुकीच्या तत्त्वपालनासाठी पाळण्याचे नियम व रीती; समतेची तत्त्वे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ओवसा      

पु.       देवतेच्या प्रसादार्थ किंवा केवळ पुण्यार्जनार्थ किंवा काहीविशिष्ट कामनेच्या साफल्यार्थ केलेले व्रत किंवा नियम.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पाडा

पु. १ गाईच्या वांसरांतील नर; गोऱ्हा. 'किरीटी कामधेनूचा पाडा । वरी कल्पतरूचा आहे मांदोडा ।' -ज्ञा ८.८. २ खोंड; पोळ. 'कांहीं केला ताडामोडा । विकिला घरींचा पाडा- रेडा ।' -दा ३.४.१३. ३ (बडोदें) रेडा. -लागतीचे नियम ५८. 'आमच्या सरकारची परवानगी घेतल्याशिवाय पाडे बांधण्यास व शिकारीस परवानगी नाहीं.' -विक्षिप्त ३.१७४. [गु. पाडो = रेडा] ॰पेटविणें-खोंडाला नांगर ओढण्यास शिकविणें. 'कीं न पेटवितांचि पाडा ।' -सिसं ८.१९१.

दाते शब्दकोश

पाडगें

न. १ पासोडी इ॰कांचें एक पट्टें; पाटगें; तागा. २ (बडोदें-मराठवाडा, खालच्या जातींत रूढ.) पैठणी; रेशीम साडी. 'शालू अगर पाडगें.' -अहेर-बहुमान पोशाखाचा नियम ७. ३ कापडाच्या ताग्याच्या गाठींपैकी प्रत्येक; [पाटगें]

दाते शब्दकोश

पाळणें

सक्रि. १ मनुष्य, जनावर, पक्षी इ॰ ना खाऊंपिऊं घालून त्यांचें संरक्षण व संगोपन करणें; बाळगणें; वाढविणें; रक्षण करणें. 'म्हणौनि गा सुमती । जे कुमनोरथां पाळिती ।' -ज्ञा १६. ३७२. २ (ल.) (कांहीं व्रत, नियम, आचार इ॰) आचारणें, अनुसरणें; प्रतिज्ञेप्रमाणें वागणें. ३ आज्ञा इ॰ मानणें. ४ (धर्म, कायदा इ॰चें) रक्षण करणें; राखणें. -अक्रि. (अन्न, पाणी, औषध इ॰) मानवणें; हितकर होणें. 'हें जड पाणी तुम्हास पाळणार नाहीं.' [सं. पाल् = रक्षण करणें; पालन]

दाते शब्दकोश

पाळण-लन

न. १ रक्षण; सांभाळ; पालनपोषण. २ शपथ, वचन, आश्वासन इ॰ प्रमाणें वागणें; पाळणें; उल्लंघन न करणें. ३ (व्रत, नियम इ॰) पाळणें; आचरणें; अनुसरणें. [सं. पालन] ॰पोषण-न. संगोपन; संवर्धन; रक्षण, पोषण इ॰; वाढ- विणें. ॰वाला-पु. (काव्य) जो एखाद्याचें पालन, पोषण, रक्षण, संगोपन इ॰ करतो तो; पालनकर्ता. 'धर्माचा पालनवाला । तो शिवाजी राजा झाला ।' -गोविंदकवि [हिं.]

दाते शब्दकोश

पाठ

(सं) पु० धडा. २ नियम, परिपाठ. ३ वहिवाट. ४ बच्चा. ५ पाश्वेभाग. ६ घोकणें, पढणें, पुस्तकाशिवाय ह्मणणें.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

पद्य

पु. १ काव्य; श्लोक; पद; (ज्याला पाद किंवा चरण आहे अशी) छंदोबद्ध रचना; अक्षरें, मात्रा इ॰कांचा ज्यांत नियम असतो अशी कविता. 'आतां कृपाभांडवल सोडीं । भरीं मति माझी पोतडी । करीं ज्ञानपद्यजोडी । थोरा मातें ।' -ज्ञा १४.१७. २ छंद; वृत्त. [सं.]

दाते शब्दकोश

पण

पु. १ वचन; नियम; प्रतिज्ञा. 'जनकाचा पण पुरवी त्र्यंबक कोदंडदंड मोडूनी ।' -मोहनमद्रामायण ९. २ पैज; होड. (क्रि॰ करणें; घालणें) ३ (द्यूतांत, पत्त्यांच्या खेळांत) लावलेली रक्कम, पैजेचा जिन्नस. [सं.] ॰भोगणें-निश्चिति, खात्री असणें; पैज किंवा होड लावण्यास तयार असणें. ॰जित-वि. प्रतिज्ञापूर्वक वादांत पराजित झालेला; पणांत जिंकला गेलेला.

दाते शब्दकोश

परामर्श

पु. १ विचारपूस; समाचार (गरीब लोकांच्या सुखदुःखाचा, आप्तेष्टांच्या प्रकृतीचा, पाहुण्यांच्या मेजवानीचा वगैरे). (क्रि॰ घेणें; करणें). २ (ल.) मदत करणें; विपत्ति दूर करणें (स्वकीय, गोरगरीब यांची). ३ (तर्कशास्त्र) नियम लागू करण्याच्या उदाहरणाची जाणीव; अनुभवानें तत्त्वाची, सत्याची झालेली जाणीव; एखादी विवक्षित कृति किंवा परिणाम पाहिल्या- मुळें त्यापासून काढलेला सर्वसाधारण निष्कर्ष. ४ जाणवणें; पटणें; कळवळा. [सं.] परामर्ष, परामृष-श-परामर्श अर्थ १ पहा. नानापरीनें परामृष । करितां न मानी उबमलेश ।' -दावि २७१. परामर्शी-र्षी-वि. परामर्श घेणारा.

दाते शब्दकोश

परिमाण

न. १ माप; मान; परिमिति; संख्या. २ ज्यामुळें वस्तु इ॰ चा आकारमान, प्रमाण इ॰ निश्चित केलें जातें अशी रीत, नियम. ३ लांबी वजन, आकार, काळ इ॰ चें मोजमाप, त्याचें साधन. उदा॰ घड्याळ, घटकापात्र. ४ मोजणी; मापन; मिति. ५ मापाचे किंवा मोजण्याचे तीन प्रकार-अणु (परमाणु). महत् आणि परम महत् परिमाण. (पहिलें सूक्ष्म, दुसरें प्रत्यक्ष अणुपासून पृथ्वी-समुद्रापर्यंत व तिसरें आकाश, काळ, वायु दिशा, आत्मा यांच्यासंबंधीं). ६ भूमितिविषयक मापन, मोजमाप.

दाते शब्दकोश

परिमिति-मीत

स्त्री. १ परिमाण पहा. मोजून निश्चित केलेली संख्या. २ मोजणी; गणना. ३ मर्यादा; नक्की प्रमाण. ४ (गणित) आकृतीची मर्यादा दाखविणाऱ्या सर्व रेषांची बेरीज; आकृतीची परिमिति. -महमा २०. [सं.] परिमित-वि. १ मोजलेला; मापलेला; निश्चित केलेला (काहीं नियम, प्रमाण यांनीं). २ साधारण; मध्यम; बेताचा; योग्य प्रमाणात असलेला मोजका; जितक्यास तितका. मित पहा. परिमेय-वि. मोजण्यासारखें, लायक, योग्य.

दाते शब्दकोश

परिपाठ

(सं) पु० नियम, शिरस्ता, मामूल.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

पट

पुस्त्री. १ बुद्धिबळें किंवा सोंगट्या खेळण्याचें, घरें पाडून तयार केलेलें एक वस्त्र. २ (बडोदें) नांवांचें पत्रक, यादी. रिकार्ड; फेरिस्तपत्रक; विशेष गोष्टींच्या नोंदणीचें लिखाण; नियम किंवा चालीरीती दर्शविणारी यादी किंवा लेख, तक्ता, कोठा. 'नोकर लोकांचे पगार खाजगीच्या पगारपटांतून मिळत असतात.' -चिमा २. ३ (ज्यो.) संक्रातिपट (सूर्य कोणत्या राशीला केव्हां जाणार इ॰ ज्यांत लिहिलें असतें तो ), ग्रहणपट (ग्रहणांविषयीं माहिती असलेला); लग्नपट; मुहूर्तपट इ॰; अनेक कागद एकाखालीं एक चिकटवून ज्यावर नाना प्रकारचीं चित्रें काढलेलीं असतात अशी गुंडाळी. ४ कापड; वस्त्र. 'त्यांत मरेनचि शिरतां काट्यावरि घालितां चिरे पट कीं ।' -मोरविराट ३.४१. ५ जमीनीची अतिशय मोठी वरंघळ; उतरण. ६ पडदा. 'ऐसें वदोनि राघव तीव्र शरांचा क्षणें करूनि पट ।' -मोमंत्ररामायण युद्ध ६८८. ७ (व.) बैल- गाड्यांची शर्यत; शंकरपट. (क्रि॰ खेदणें). ८ पाट; फळी. ९ राजाची गादी; सिंहासन. 'जो दमनशीळ जगजेठी . अकरांचीही नळी निमटी । तो निजसुखाचें साम्राज्यपटीं । बैसे उठाउठीं तत्काळ ।' -एभा १४.१०४. १० गांवचें जमावबंदी किंवा शेत- सारा-यांचें पत्रक. ११ स्थान; ठिकाण. 'लाऊनि बैसवी पटीं । मोक्षश्रियेच्या ।' -ज्ञा ९.४६. -न. दोन, तीन फळ्यांच्या, घडी घालतां येण्यासारख्या झडपाच्या फळ्यांपैंकीं एक फळी, भाग. [सं. पट्ट] ॰कर-न. पटकूर; फटकूर. ॰का-पु. १ वीतभर रुंदीचें व ५।४ हात लांबीचें कमरेस बांधावयाचें कापड. कांचा, कमरपट्टा. २ डोईस बांधावयाचा ८ ते १५ हात लांबाचा फेटा. ॰कुडॉ- पु. (गो.) पापुद्रा. ॰कूर-कुरें-कूळ-न. (निंदार्थी) एकेरी पन्ह्याची घोंगडी किंवा वस्त्र. 'टाकलें पटकूर निजलें बटकूर.' फटकूर पहा. [सं. पट्टकुल] ॰खळणें-सक्रि. (महानु;) आच्छा- दणें; पांघरूण घालणें. धवळे, उत्तरार्ध ६. ॰चीर-न. वस्त्र; पताका; ध्वज. 'टके पटचिरें । तळपती रुचिरें ।' -आसु १३. ॰ल-ळ-न. १ आच्छादन; पडदा; आवरण; आवरणत्वचा. 'प्रथमचि पार्थशरांच्या पटळें तम दाट दाटलें होतें ।' -मोकर्ण १९.३३. २ नेत्रावरील त्वचा. ३ डोळ्यावर रोगानें आलेला दृष्टि- बंधक पडदा, सारा इ॰. ४ (ल.) बुद्धीवर असलेलें आवरण, आच्छादन. जसें-'मोह-माया-अज्ञान-द्वैत-पटल.' 'झाला व्याकुळ दुर्मति आपुलियाचि भ्रमाचिया पटलें ।' -मोसभा ३.३. ५ (सं. समुदाय, राशी, ढीग यावरून) ढग, समूह; राशी; लोट (धूळ, धूर यांचा). ६ फळी. ७ पापुद्रा. पटांतर-वि. परोक्ष; प्रत्यक्ष नव्हे असें. 'आइकिजती पटांतरीं ।' -ज्ञा १६.४२८. पटा- धिकार-पु. पटाचा अधिकार; मूळाच्या कामावरील. देणगीवरील अधिकार, अधिकारपत्र; हक्क किंवा अधिकार धारण करणें किंवा असणें. [पट + अधिकार] पटाधिकारी-वि. हा अधिकार धारण करणारा किंवा असणारा.

दाते शब्दकोश

पथ्य

न. १ दुखणेकऱ्यास हितकारक असें नियमित खाद्य; युक्तीहार; रोग्याचें खाणें. २ रोग्यानें काय खावें, काय वर्जावें यासंबंधीं नियम, शास्त्र. ३ दुखणेकरी, बाळंतीण इ॰ चें अन्न, जेवण. 'तुमचें पथ्य झालें म्हणजे ही मात्रा घ्या.' -वि. १ हित- कारक; फायदेशीर. 'राया! भलतेंचि वदसि, पथ्य हित स्वगुरुवच न आइकसी ।' -मोभीष्म ४.७. 'अंधार हा चोरास पथ्य.' २ पथ्यकारक; पथ्याचें (अन्न, आहार इ॰). [सं.] ॰अपथ्य, पथ्यापथ्य-वि. हितकारक व अहितकारक. 'पथ्याअपथ्य न म्हणतां परि सोसावें मदुक्त हें तथ्य ।' -मोकर्ण २१.३९. ॰कर- कारक-वि. १ योग्य; युक्त; मानणारें; फायदेशीर; हितकारक. २ पथ्याचें ; रोग्याला युक्त (अन्न, आहार इ॰); पथ्य पहा. (गो.) पथीक. ॰करी-वि. पथ्य करणारा, पाळणारा; पथ्यावर असणारा. ॰पाणी-न. आजारी माणसाच्या शुश्रुषेची, पथ्याची व्यवस्था. पथ्याचा-वि. १ हितकारक; मानवणारा. २ रोग्याच्या पथ्यासंबंधींचा, जेवणाचा. पथ्यावर पडणें-हितावह, फायदे- शीर, उपयुक्त होणें; अनायासें अनुकुल, सोयीचें होणें. 'एकंदरींत पाहतां आमच्या नव्या लोकांची चाल ही दिसते कीं, पथ्यावर पडण्यापुरती मात्र ते सुधारणा उचलतात.' -नि.

दाते शब्दकोश

रेघ

स्त्री. १ रेषा; ओळ. २ कांहीं आकृतीची मर्यादा. ३ चेहरा; हजामत; दाढी करून कपाळावरील केंस न्हाव्याकडून काढून महिरपीच्या आकाराची आकृति हौशी लोक कपाळावर करवितात ती. (क्रि॰ धरणें). सरकारी किंवा इतर कामाच्या कागदावर निर- निराळ्या लांबीच्या व प्रकारच्या व निरनिराळे अर्थ असलेल्या रेघा मारतात. त्यांचीं नांवें:-किंदरी, किताबती, खडे, दुरकानी, तिरकानी, देफाते, बितैन, बीत, मसुदर किंवा मशोदर, महदर, शरायती, गरफ, हिकायती. इ॰ (क्रि॰ ओढणें, काढणें; फाडणें). [सं. रेषा] ॰ओढून देणें किंवा काढून देणें-एखाद्याच्या वर्तनाला शिस्त लावून देणें; त्याला वर्तनाचे नियम घालून देणें. ॰धरणें-दाढी करून कपाळावरील केंस काढून महिरपी- प्रमाणें आकार करणें. ॰मारणें-हद्द ठरविणें; ओळ काढणें. रेघे- रूपास आणणें-येणें-चढणें-उत्कर्षाच्या स्थितीस पोंचविणें, पोंचणें; वैभवशाली करणें, होणें; नांवारूपाला आणणें, येणें; ऊर्जिता- वस्थेला आणणें, येणें. काढल्या रेघेनें-रेघे-चालणें वागणें- करणें-ठरवून दिल्याप्रमाणें; सांगतिल्याप्रमाणें; नेमल्याप्रमाणें वागणें; आंखून दिलेल्या मार्गानें चालणें. रेघनरेघ-क्रिवि. पूर्ण; खडान्खडा; बारीकसारीकसुद्धां. रेघरूप-न. १ पदार्थाची घटना किंवा आकारमान. २ पदार्थाचें स्वरूप. ३ उत्कर्षाची स्थिति; भरमराट; पूर्णपणा. रेघेरूपास आणणें पहा. रेघटी, रेघोटी- स्त्री. (वांकडीतिकडी) रेघ; रेषा; ओळ. रेघाटणें, रेघाळणें- सक्रि. रेखाटणें पहा.

दाते शब्दकोश

रोळ

पु. क्रम; नियम; वहिवाट; प्रघात; परिपाठ. 'हा अना- दिसिद्ध रोळू ।' -विपू ३.५७. [तुल॰ इं. रूल]

दाते शब्दकोश

रसम, रस्म

स्त्री. चाल; रीत. 'आलम दुनियास हेच रहा व रस्म' -पया ४६७. [फा. रस्म = नियम; चाल] ॰रव-स्त्री. चालरीत. 'आं साहेबही त्यांचें रस्मरव यांस खूव वाकीफ.' -पया ४७६. ॰रिसायत-स्त्री. वहिवाटीचें अवलंबन. 'वस्त्रें वगैरे रसम रिसायत केली.' -जोरा ५६. रस्मीयात-स्त्री. बहिवाट. 'वस्त्रें शादीचे रस्मीयातीचीं ।' -रा ७. -खलप १.२. [अर. रस्मीयात्]

दाते शब्दकोश

रस्ता

पु. १ मार्ग; बाट. २ चाल; वहिवाट; नियम. [फा. रस्ता; तुल॰ सं. रथ्या;प्रा. रच्छा] (वाप्र. आणि सामाशब्द- वाट शब्दांत) रस्तेबंदी-स्त्री. १ सडक तयार करण्याचें काम. २ रस्ता बांधणी; रस्ता-दुरुस्ती.[फा.] रस्तोरस्तीं-क्रिवि. प्रत्येक रस्त्यावर; सर्व रस्त्यांतून.

दाते शब्दकोश

(पु.) [फा. रस्ता] मार्ग; नियम; सडक.

फारसी-मराठी शब्दकोश

रूळ

पु. १ वाटोळी आंखणी. २ आगगाडीचा लोहमार्ग. ३ छापतांना टाइपास शाई लावण्याचें साधन. ४ रस्त्यावरील खडी दाबण्याचा वाटोळा दगड अगर लोखंडी यंत्र. [इं. रूलर; रोल (एखादा प्रश्न भलत्या) रुळांवर नेणें-गैरमुद्याचें, अप्रस्तुत बोलणें. 'प्रश्न भलत्या रुळांवर नेऊ नकोस. -सुदे २३३. रूळणें- क्रि. रुळणें. पहा. रूळी-स्त्री. अव. नियम; कायदे. 'सरकार रूळी करणार आहे.' -टि १.३२५. [इं. रूल]

दाते शब्दकोश

ऋत      

न.       १. (तत्त्व.) ऋग्वेदातून आलेला शब्द; वैश्विक किंवा विश्वव्यापी संरचनेचा नियम; संपूर्ण विश्वाच्या मुळाशी असलेला चित्‌त्त्वाचा अधिकार. २. सत्य; खरेपणा. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

साधारण

वि. १ सामान्य; सर्वांस लागू पडेल असें; अविशिष्ट. २ समाईक; सार्वत्रिक. 'द्यूतीं साधारण धन पण करुनि नव्हेचि एक हारविता ।' -मोसभा ५.५२. ३ उत्कृष्ट नव्हे व टाकाऊहि नव्हे असें मध्यम प्रतीचें. न- १ सर्व- सामान्य नियम, रीत. २ एका वर्गांतील सर्व वस्तूंना, व्यक्तीनां लागू पडणारा, त्यांच्या ठिकाणचा गुणधर्म. -पु. १ चवे- चाळीसावा संवत्सर. २ सामान्य लोक. -एभा २३.३१६. [सं.] ॰अवयव-पु. (गणित) दोन किंवा अधिक संख्यांत जो एकच अवयव असतो तो. ॰कार्य-न. व्यक्तीचें विशेषें करून नव्हे असें कार्य. ॰गति-स्त्री. साधी, नेहमीची, विशेष नसणारी गति. (इं.) सिंपल मोशन. ॰देश-पु. ज्यांत झाडी व डोंगर मध्यम प्रमाणांत असून पाऊसहि मध्यम प्रमाणांतच पडतो तो देश. ॰धर्म-पु. सर्वसामान्य, सर्वांना लागू पडणारा धर्म. ॰पक्ष-पु. उत्तम व निकृष्ट या दोन पक्षांमधील पक्ष; मध्यम पक्ष. ॰फुलबाजी-स्त्री. इंग्रजी फुलबाजीचा एक प्रकार. -अग्नि २०. ॰भाजक-पु. (गणित) दोन संख्यांस ज्या सामान्य अवयवाने निःशेष भाग जातो तो. ॰सभा- स्त्री. संस्थेच्या घटनानियाप्रमाणें सर्व सभासदांची वर्षांतून एकदां किंवा अनेकदां ठराविक वेळीं भरावयाची सभा. (इं.) जनरल मीटिंग. ॰स्त्री-स्त्री. वेश्या; हलकी स्त्री; अकुलीन, भाडोत्री स्त्री. साधारण्य-न. साधारणपणा; सामान्यत्व; याच्या उलट वैशिष्ट्य, विशेषता.

दाते शब्दकोश

सारासारबुद्धि

विवेक, तारतम्य, सर्व नियमांचे सार असा नियम म्हणजे सारासारबुद्धि, बरेंवाईट ओळखणे, सदसद्विवकबुद्धि, भल्यावाईटाची जाणीव, व्यवहारबुद्धि, चार लोक काय करतात व काय करणें पचतें तें ओळखणें.

शब्दकौमुदी

सार्व

वि. अखिल; सबंध; एकंदर. [सं.] ॰काल-क्रिवि. सतत; नेहमीं; सदासर्वंकाळ. ॰कालिक-वि. सर्वकाळ लागू असणारें, शाश्वतचें. ॰जनिक-जनीन-वि. सर्व लेकांसंबंधीं (आचार, इ॰). सामान्य; सामुदायिक; लौकिक. खाजगी याच्या उलट. सार्वजनिक गणपति-चर्चा-सभा-हित इ॰' ॰भौतिक- वि. १ सर्व प्राण्यांसंबंधी; जगांतील सर्व भूतमात्रांविषयीं. २ सर्वभूतांविषयीं. ॰भौम-पु. सम्राट्; सर्व पृथ्वीचा राजा; चक्रवर्ती; बादशहा. 'जन्म गेला कोरान्न मागोन । सार्वभौम नाम तया ।' -वि. सर्व पृथ्वीसंबंधीं; जागतिक. ॰भौमपद-न. सम्राट्पद; सर्व पृथ्वीवर सत्ता, राज्य. ॰राष्ट्रीय-वि. १ सर्व राष्ट्रांसंबंधी-बाबत (नियम, कायदा इ॰). 'ऑस्टिन हा सार्व- राष्ट्रीय धर्मशास्त्राला कायदा ही संज्ञा लावीत नाहीं.' २ आंतर- राष्ट्रीय. (इं.) इंटरनॅशनल. -ज्ञानको. ॰लौकिक-वि. जगांतील सर्व राष्ट्रें, लोक यासंबंधीं; अखिल जागतिक. सार्वत्रिक-वि. १ सर्वत्र विद्यमान, प्रसिद्ध. २ सर्व जागचा; सर्वत्र संबंध असलेला. सार्वस्विक-वि. समाजसत्ताक. लोकसत्ताक राज्य चांगलें. सगळें राज्यतंत्र गुंडाळून टाकून सार्वस्विक सांप्रदाय असावा' -नि. ७१२. सार्वांग-(प्र.) सर्वांग. 'न लांवीं वो कर्पुरू । सार्वांगी येतसें ओदरूं ।' -शिशु ८३२.

दाते शब्दकोश

शाश्वती

(सं) स्त्री० निश्चय, नियम.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

शेजार

पु. १ पडोसीपणा; निकटवतिंत्व; लगतचें घर, जागा, आवार; सामीप्य. २ शेजारीच पडोसी; लगतच्या घरांत राहणारा. [शेज] ॰धर्म-पु. शेजाऱ्यासंबंधीं वागणूकीची रीत, पद्धति, नियम. ॰पाजार-पु. शेजार; जवळ वास्तव्य; सामीप्य. [शेजार द्वि] शेजारी-पु. शेजारीं राहणारा; लगतच्या घरांतील मनुष्य; पडोसी. शेजारीण-स्त्री. शेजाऱ्याची बायको; शेजारीं राहणारी स्त्री. वाप्र. घेग शेजारणी वीख-स्वतःच्या प्रतिज्ञेप्रमाणें बोलण्याप्रमाणें वागणूक न घडलेल्या शेजारणीस टोंचून बोलण्याचा वाप्र. शेजारीपाजारी-पु. १ सामान्यतः शेजारी; शेजा- रच्या घरांत राहणारा. २ जवळपासचा मनुष्य; आजूबाजूच्या लोकांस वापरावयाचा सामान्य शब्द. शेजारीं-क्रिवि. संनिध; जवळ; बाजूला; लगत; समीप. 'बा तूं बसत होतास मम शेजारीं । मर्यादा रक्षीत होतास अंतरीं ।' -नव २२.१६४. शेजारून-अ. जवळून. शेजिया-वि. जवळचा. 'कीं हा एथ असतुचि गेला । शेजिया गांवा ।' -ज्ञा ९.५२३. शेजी-स्त्री. शेजारीण. म्ह॰ १ शेजीवी सरेना आणि घडीभर पडेना. २ शेजीनें दिलें बोट त्यानें काय भरेल पोट. ३ शेजीचं उसनं सवेंच देणं. शेजीं-जे-क्रिवि. जवळ; समीप. 'तंव ते छाया सुशी- तळ । शेजी सरोवर निर्मळ ।' -कथा २.४.१००. शेजुटणें- न. (कों.) विवाहप्रसंगीं वरवधूंची शेज भरणें, त्यांनीं सुपारी लपविणें, विडी तोडणें वगैरे विधींस म्हणतात. शेझार-री- शेजार-री पहा.

दाते शब्दकोश

सिध्दांत

पु. १ प्रमाणानुरोधानें ठरलेला निर्णय; विचार- संशोधनादिकांचें फल. २ प्रतिपादित तत्त्व; प्रस्थापित सत्य. ३ तत्त्वाचें कथन; परमतत्त्व. 'जे वदे शास्त्राचें सार । सिद्धांत धादांत विचार ।' -दा ५.६.२७. ४ निश्चय; निर्णय. 'अखेरीस त्याच्या मनांत सिद्धांत होऊन तो म्हणाला...' -मराठी ६ वें पु. (१८७५) १८६. ५ नियम; प्रमेय; सारणी. (इं.) थिअरम्. ६ ज्योतिष- ग्रंथ. उदा॰ सूर्यसिद्धांत. ७ (ल.) पक्की, वज्रलेप, गोष्ट. [सं.] ॰मार्ग-पु. गुरुभक्तिमार्ग. -दा ४.१.९. सिध्दांतित-वि. सिद्धांत म्हणून निश्चित केलेला, प्रस्थापित. सिध्दांती-वि. १ सिद्धांत ग्रंथ पढलेला. २ प्रयोग करून पाहणारा; सिद्धांत ठरविणारा. ३ कोणतेंहि सत्य, तत्त्व वगैरे प्रस्थापित करणारा.

दाते शब्दकोश

शिल्प

न. कोणतेंहि कलाकौशल्याचें, कुसरीचें, यांत्रिक वगैरे काम; हुन्नर; कला; हस्तकौशल्य. [सं.] ॰कर्म-न. यांत्रिक अथवा हस्तकौशल्याचें काम; कारागिरी. ॰कला-स्त्री कलाकौशल्यासंबंधीं शास्त्र, ज्ञान; यांत सामान्यतः वास्तु- शिल्प, मूर्तिशिल्प हीं मोडतात-ज्ञाको श ६७. ॰कार, शिल्पी- पु. कारागीर; यंत्रशास्त्रज्ञ; कलाभिज्ञ; यंत्रकलाविशारद. ॰विद्या-स्त्री. हस्तकौशल्य, गृहरचना, चित्रकला, मूर्तिकर्म इत्यादींचें ज्ञान. ॰शाला-स्त्री. कलाकौशल्याचे पदार्थ निर्माण करणारा कारखाना. ॰शास्त्र-न. यंत्र, मूर्ति, चित्र वगैरेसंबंधीं नियम दर्शविणारा यंथ, निबंध. शिल्पिक, शिल्पी-पु. कारागीर.

दाते शब्दकोश

शिलवृत्ति, उंछवृत्ति

स्त्री. शिलोंछवृत्ति. शेतांतील पीक काढून नेल्यावर जे कणसांचे तुकडे अथवा दाणे गळून पडलेले असतात ते वेंचून त्यावर उदरनिर्वाह करण्याचें व्रत; यास शिलवृत्ति म्हणतात व धान्याच्या मळणीच्या वेळीं खळ्या- वर जाऊन राहिलेलें किंवा दिलेलें धान्य घेणें यास उंछवृत्ति म्हणतात. हा एक व्रत, नियम, तपाचा प्रकार आहे. 'शिल- वृत्ति आणि उंछवृत्ति । जावोनि त्यांच्या गृहाप्रती । जितुकें द्रव्य ते मागती । तितुकें चतुर्गुणी तूं त्या देईं ।।' -भारा अयो ८.३८.

दाते शब्दकोश

शिरस्ता

पु. चाल; रीत; पद्धत; नियम; दंडक; बहिवाट. (समासांत) शाईशिरस्ता; सरकारशिरस्ता; जनशिरस्ता इ॰ [फा. सरिश्ता] शिर(रि)स्तेदार-पु. १ जिल्ह्याचा एक अधि- कारी; मुलकी आधिकारी २ न्यायकचेरी. मामलत. कचेरी इ॰तील मुख्य कारकून. शिरस्तेवाईक-विक्रिवि. रूढ; शिरस्त्याचें; ठराविक पद्धतीप्रमाणें; नेहमींप्रमाणें.

दाते शब्दकोश

शिरस्ता

(पु.) [फा. सर्रिश्ता] वहिवाट; नियम; दण्डक.

फारसी-मराठी शब्दकोश

स्मृति(त)

स्त्री. १ आठवण. २ 'स्मरण' पहा. ३ हिंदु- धर्मशास्त्रासंबंधीं मनु आदिकरून ऋषींनीं घालून दिलेले नियम मागून आठवून लिहिलेले ग्रंथ प्रत्येकीं व त्यांतील वचन; कायदे ग्रंथ [सं. स्मृ = स्मरणें] ॰चिन्ह-न. आयुष्यांत घडलेल्या गोष्टींची अवशेषरूप खूण; शरीरादिकांवर टिकून राहिलेली एखादी खूण. ॰विरोध-पु. धर्मशास्त्रास येणारा बाध; धर्मशास्त्राविरुद्ध गोष्ट. बेकायदेशीरपणा. ॰शास्त्रन. स्मृति अर्थ ३ पहा. स्मार्त-वि. १ स्मृतींना अनुसरणारें (व्र इ॰). २ स्मृतीनें मान्य केलेलें. ३ आठवणविषयक; स्मरण करण्याचें. स्मार्तकाल-पु. स्मृतीनें ठरविलेली, कायद्यानें ठरविलेली (१०० वर्षांची) मुदत. स्मार्त- कालातांत-वि. कायद्याच्या मुदतीच्या बाहेर गेलेलें.

दाते शब्दकोश

संकेत

(सं) पु० बेत, विचार, नियम, खूण.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

संकल्प

(सं) पु० नियम, निश्चय.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

संयम-न

पुन. १ निर्बंध; बंधन; मर्यादा. २ निग्रह; दमन; आवार; आळा; दाब. 'तेथ संयमाग्नीचीं कुंडें ।' -ज्ञा ८.५०. ३ व्रत; नियम. ४ (योग.) ध्यान, धारणा व समाधि वेळ होणारा निग्रह. [सं. सम् + यम्] संयमनी-स्त्री. यम- पुरी; यमनगरी. संयमित-धावि. निग्रहीत; बंदिस्त; मर्यादित; नियमित. सयमी-पु. निग्रही; आपले विकार ताब्यांत ठेवले आहेत असा पुरुष; तपस्वी; योगी; जितेंद्रिय.

दाते शब्दकोश

श्रेय

न. १ शुभ; हित; लाभ; कल्याण; ऐश्वर्य; चांगुलपणा- 'तरी ज्यानें मी श्रेय म्हणजे कल्याण पावेन तेवढें एकच निश्चित करून मला सांगा. ' -गीर ६४३. २ पुण्य; सुकृत; फल. [सं. श्रेयस्] श्रेयस्कर-वि. १ हितकर; लाभदायक; कल्याणकारक. २ पुण्यकारक. श्रेयस्संपादन-न. १ कल्याणप्राप्ति, उपकार- अपकारादि कृत्यांचें फलग्रहण. २ पुण्याप्राप्ति. दाक्षिणादि दानानें परकृत कृत्याचें फलग्रहण. श्रेयस्संपाद्य-न. श्रेयःसंपादन याचा अपभ्रंश. श्रेयान्-वि. श्रेष्ठ; उत्तम; वरिष्ठ; मुख्य. 'गोठ- गस्ते यांच्यापैकीं श्रेयान् अंमलदाराचे हस्ते होत जावा' -अहेर बहुमान नियम पृ. १९. श्रेयोर्थी-वि. १ शुभेच्छा प्रदर्शित करणारा; कल्याण इच्छिणारा; चांगली इच्छा असणारा; बरें व्हावें असें इच्छिणारा; अभ्युदयेच्छु; शुभेच्छु. २ पुण्याची इच्छा करणारा; शुभफलाकांक्षी; कर्मफळाची प्राप्ति इच्छिणारा. श्रेयोवाद- पु. आशीर्वाद; आशीर्वचन; शुभकारक भाषण. श्रेयोवान्-वि. ऐश्वर्ययुक्त; शुभ; उत्कर्षकारक; समृद्धियुक्त.

दाते शब्दकोश

शर्त

(स्त्री.) [अ. शर्त्] अट; नियम; पैज; कर्तव्यता; कसोशी; पराकाष्ठा. “आईसाहेबांस शपथ दिली ती शर्त करणें ती केली” (मराचिथोशा २६). “किल्याने लोक मुरारबाजी पडला म्हणोन गणना नं करितां शर्तीनें माण्डूं लागले” (सभासद ३४). “गोविन्द महादेव याणें ब्राह्मण होऊन शिपाईपणाची शर्ती केली” (वाड-सनदा २०१). “श्रीमन्तांचे बुद्धीची शर्त आहे” (खरे ९|४८४४).

फारसी-मराठी शब्दकोश

शर्त-र्त्त-र्थ

स्त्री. १ अट; करार; नियम. २ कसोशी; पराकाष्टा; कमाल; कळस; सीमा. 'आईसाहेबास शपथ दिली ती शर्त करणें ती केली.' -मराचिथोशा २६. 'किल्याचे लोक मुरारबाजी पडला म्हणोन गणना न करितां शर्तीनें भांडूं लागले.' -सभासद ३४. ३ एखाद्या गोष्टीचा बेसुमारपणा; आधिक्य, अति- शयता (आश्चर्य, कौतुक वाटण्याजोगी). ४ पराकाष्टेची समृद्धि; बाहुल्य. उदा॰ 'गलबतांची शर्त.' 'अंब्यांची शर्त.' 'लाड- वांची शर्त.' 'पुष्पांची शर्त.' इ॰. ५ पाणी; तेज, पराक्रम. -तुगा. 'एका टांकासरशी त्याचा फाडकन् फडशा पाडण्याची शर्थ झाली.' -नि १२. ६ शिरस्ता वहिवाट. 'माफी भरल्या- वर सलूकशर्त कमधारा याचा आकार होईल.' [अर. शर्त्] ॰होणें-बेसुमार होणें. 'तुझ्या खाण्याची शर्थ झाली'. शर्त- नामा-पु. तह; कारारनामा. [फा.] शर्त-बेशर्त-स्त्री. पराकाष्ठा, अतिशय मेहनत. (क्रि॰ करणें). 'फिरून चालून येण्याची उमेद धरावी तो सदाशिवपंतांची कुतर-तोड करून सर्व शत्रूस आपल्या लष्करांत शर्तबेशर्त करून दामटून घातले.' -पाव २५. शर्तमर्दी- स्त्री. अचाट पराक्रम; महनीय कृत्य; प्रयत्न; साहस इत्यादिबद्दल कौतुकानें योजावयाचा शब्द. 'सेवा शर्त-मर्दीनें केली ।' -ख ४.१८०८.

दाते शब्दकोश

श्रुति

स्त्री. १ ऐकणें; श्रवण; ऐकण्याची क्रिया. २ श्रवणें- द्रिय; कान. 'शकुने पुरुषोक्तीनें भ्याल्या श्रुति कांपतील न सुयाते ।' -मोसभा ४.६०. ३ वेद. 'जे श्रुतित्रयातें जाणोनि । शतवरी यज्ञ करूनि ।' -ज्ञा ९.३१०. 'मळे कलियुगीं श्रुती ।' -केका ९६. ४ वार्ता; बातमी; आवई. ५ (संगीत) स्वर; अखंड, स्पष्ट व मधुर या गुणांनीं युक्त गायनोपयोगी नाद. या श्रुती २२ आहेत त्याः-तीव्रा, कुमुद्वती, मंदा, छंदोवती, दया- वती, रंजनी, रक्तिका, रौद्री, क्रोधा, वज्रिका, प्रसारिणी, प्रीति, मार्जनी, क्षिती, रक्ता, संदीपनी, आलापिनी, मदंती, रोहिणी, रम्या, उग्रा, क्षोभिणी. ६ काटकोन त्रिकोणाचा कर्ण. ७ (अर्थ दोनवरून ल.) आधार; शासन; नियम. 'परंतु या गोष्टीस कांहीं श्रुति आहे ?' ८ वीणा. 'गर्जती गंभीर । टाळ श्रुति मृदंग ।' -तुगा २६५८. [सं. श्रु = ऐकणें] ॰कटु-वि. कर्णकटु; कानाला न सोसणारें; कर्कश; बेसूर. ॰पथ-पु. श्रवणमार्ग; कर्णरंध्र; कान. ॰मत-वि. १ वेदमान्य. २ कर्णमधुर. 'श्रुतिमत यन्निष्ठ जेधिं सुरचरग । ' -मोआदि १. २.

दाते शब्दकोश

तेहेवार

पु. (बडोदें) सण; सुटीचा दिवस. 'तेहेवार उत्सव व वार्षिक सनाबद्दल..' -कारकुनांच्या कर्तव्यासंबंधीं नियम ५. [हिं.]

दाते शब्दकोश

तेहेवार      

पु.       सण; सुटीचा दिवस : ‘तेहेवार उत्सव व वार्षिक सनाबद्दल...’ – कारकुनांच्या कर्तव्यासंबंधी नियम (बडोदे) ५. [हिं. त्यौहार]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तह

पु. १ दोन युध्यमान पक्षांतील शत्रुत्व नाहींसें होऊन झालेला सलोखा; समेट; सख्य; ऐक्य. २ संमति; अनुमति; मान्यता; पसंति. ३ सरकारी जुजबी कायदा; नियम. ४ वहिवाट; ठराव. 'देशमुखापासून दिवाणांत वसूल घ्यावया तह आहे.' -इमं १५५. [फा. अर. तहीया = व्यवस्था; सामुग्री ?] सामाशब्द- ॰नामा-पु. तहाविषयींचें करारपत्र; दोन पक्षांतील तहाच्या ठरा- वाच्या अटींचा लेख. ॰बाजारी-स्त्री. एक कर; बाजारांतील दुका- नच्या जागेचें भाडें. 'तफरीफ व तहबाजारी व सायेर रहदारी व भेट.' -वाडबाबा १.३५. तह ब मोजीब-क्रिवि. तहाप्रमाणें. 'हिसेदारांचा हिसा तह ब मोजीब देत जावा.' -वाडसमा १. १५६.

दाते शब्दकोश

तह      

पु.       १. दोन युध्यमान पक्षांतील शत्रुत्व नाहीसे होऊन झालेला सलोखा; समेट; सख्य; ऐक्य. २. संमती; अनुमती; मान्यता; पसंती. ३. सरकारी जुजबी कायदा; नियम. ४. वहिवाट; ठराव : ‘देशमुखापासून दिवाणांत वसूल घ्यावया तह आहे.’ – इमं १५५. [फा. अर. तहीया]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

टीप

स्त्री. १ कार बसविण्याकरितां घेतलेलीं जनावरें, झाडें इ॰ ची गणती, मोजणी. २ शिवण्याची एक तर्‍हा. (क्रि॰ भरणें). ३ सोडतींतील तिकिट. ४ गंजिफांच्या खेळांतील एक संज्ञा, तलफ इ॰ डाव दुसर्‍याकडून आला असतां एका पानाच्याऐवजीं दोन पानांनीं घेण्याचा प्रकार. ५ (सोनार) दागिन्यांच्या किंमतीचें, आकाराचें टिपण. ६ आंकडेवार नोंद; याद; यादी; बिल; हिशोब; फेरीस्त; टिपण; स्मरणपत्र; पैशाची हुंडी; वर्गणीची यादी. ७ पुस्तकांतील मुख्य भागाचें, पृष्ठाच्या खालीं केलेलें विशेष स्पष्टी- करण. ८ (कों.) गाडीचें छ्प्पर किंवा गाडीमध्यें जीवर बसतात ती गाडीची साटी. -न. ९ नेम; नियम. १० अश्रूंचा थेंब. १२ पीप; (ओतकाम) आमली पदार्थ तयार करण्याचें लांकडी पिंप. (वाप्र.) ॰जमणें, बसणें-बरहुकूम असणें, जुळणें; विरोध न येणें. ॰घालणें-विशिष्ट तर्‍हेची शिवण घालणें. (चांभार) जोडयाचा ढोपराजवळील भाग दोर्‍यानें शिवणें. ॰मारणें-(शिंपी) शिवण घालणें. टिपेस उतरणें-टिपणाबरोबर जमणें, असणें. सामा- शब्द-॰कर-नीस-पु-(कर बसविण्या साठीं) गांवांतील घरें, झाडें इ॰ ची मोजदाद करणारा अधिकारी. ॰गारी-स्त्री. (शिवणें) शिवण्याची एक तर्‍हा (क्रि॰ करणें). ॰दार-वि. व्यवस्थितपणें वागणूक करणारा. ॰दोरा-पु. दुहेरी टांका. याच्या उलट धांवता दोरा. टिपनीस-पु. सैन्याची मोजदाद ठेवणारा आणि जकातीचा अधिकारीहि असे. [टिपणें]

दाते शब्दकोश

टीप      

न.       नेम; नियम.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तळ

पु. १ (एखाद्या पदार्थाचा) खालचा भाग, बूड. २ जमीन; जमीनीचा पृष्ठभाग. 'दोन्हीं दळभारां देषतां । तो प्रद्मने (प्रद्युम्नें) आणीला तळा ।' -उषा १४१५. ३ (झाड, छपर इ॰ कांच्या) खालील जागा, जमीन. 'लपे आत्मभ्रांतिछाया । आप- णयां तळीं ।' -ज्ञा १६.१०. ४ सैन्य; स्वारी इ॰ कांची मुक्कामाची जागा छावणीची गोठ; शिबिर; कँप. (क्रि॰ घालणें, देणें; मांडणें; धरणें; पडणें; येणें; सोडणें). 'महाराणीसाहेबांचा तळ बडोदें मुक्कामीं ज्या राजवाड्यांत मुक्काम असेल तेथील पाहरे'-बडोदें, राज- महाल, कामगारी-कारकून नियम ७. ५ पृष्ठभाग; सपाट भाग. जसें- हाताचा पायाचा, तळ. 'ऐसे चारी हे सरळ । करचरणतळ ।' -ज्ञा १४.१०३. 'पृथ्वीतळ उलथों पहात ।' -ज्ञा १.१५६. ६ व्यापारी, प्रवासी, लमाण, गाड्या, घोडीं इ॰ कांच्या मुक्कामाची जागा, अड्डा. ७ एखाद्या ठिकाणीं कांहीं काळ झालेलें सैन्याचें वास्तव्य; मुक्काम; छावणी; कँप. ८ एखाद्या पदार्थाच्या राशीनें व्यापलेली जागा; पदार्थ ज्या ठिकाणीं असेल ती जागा. (पदार्थ हलवितांना, तेथून दुसरीकडे नेतांना सापेक्षतेनें या शब्दाचा उपयोग करतात). 'आंबे सगळेच नेऊं नकोस, कांहीं तळावर ठेव., ९ विस्तृत व सपाट भूभाग; मैदान; सपाट प्रदेश. 'या तळाची प्रदक्षिणा चार कोसांची आहे.' बूट, जोडा इ॰ कांचा खालचा (ज्यावर पाय टेकतात तो) भाग; तळवा; जोड्याच्या तळव्यांतील चामड्याचा तुकडा. ११ (-न.) कुंभाराच्या चाकाच्या मध्याची फळी. १२ नाश; रसातळ. 'मानी मेलाचि जरी दुर्जय तरि निजशतात्मजरिपु तळा ।' -मोस्त्री २. २२. १३ (वणजारी) तांडा. [सं. तल; फ्रें. जि. तलै = खालीं, आंत] (वाप्र.) ॰करणें-मुक्काम करून राहणें; डेरा देणें; बिर्‍हाड लावणें. ॰घालून बसणें-१ (एखाद्या ठिकाणीं) कायम वस्तीच्या इरा- द्यानें राहणें, उतरणें; आसन, ठाण मांडणें. २ दुसर्‍याचा पैसा गिळं- कृत करून, लुबाडून बेदरकारपणें स्वस्थ आणि निर्धास्त राहणें. तळ मारणें. तळची-तळपायाची आग मस्तकास जाणें- (कर्त्याची षष्ठी) रागानें नखशिखांत संतप्त होणें; अतिशय राग येणें. तळचें मडकें हाणणें-फोडणें-(मडक्याच्या उतरंडीं- तील सर्वांत खालचें मडकें फोडणें) (ल.) मुळावरच घाव घालणें; समूळ नाश करणें. ॰झाडणें-(ल.) (सर्व सामग्री, बेगमी इ॰) खाऊन फस्त करणें. ॰थांबणें-(एखाद्याचें) आसन स्थिरावणें; जन्माची सोय लागणें; थार्‍यास, ठिकाणीं लागणें (कर्त्याची षष्ठी). ॰न थांबणें-(कर्त्याची षष्ठी) एखाद्याच्या पायाला भोवरा पडणें; बूड स्थिर नसणें; भटकभोंवरी करणें. ॰मारणें-तळ घालून बसणें; अर्थ २ पहा. ॰लागणें-पडणें-(कर्माची षष्ठी). (सामग्री, बेगमी इ॰) जवळ जवळ फस्त होणें, संपण्याच्या बेतांत येणें. तळावर बसणें-राहणें-१ विपन्नावस्थेस येणें; अवदशेस येणें; अकिंचन होणें. २ (ल.) घरीं बसणें; समाई- कीच्या वांटणींतील भागास मुकणें (चोर, लुटारू त्यांच्यापैकीं घरीं बसणार्‍यास लुटीचा कांहींही भाग दत नसत त्यावरून.) ३ धंद्याच्या ठिकाणीं, नेहमीच्या जागीं असणें. (एखाद्यास) तळावर बसविणें-एखाद्यास समाईक वांटणींतील भाग देणें; त्याच्या कपाळीं वाटाण्याच्या अक्षता लावणें. सामाशब्द- ॰काठी- स्त्री. शिडाचें कापड तळाशीं लांब ताणण्याकरितां वापरलेली काठी. ॰कोंकणन- सह्याद्री आणि समुद्र यांमधील देश; कोंकण- पट्टीचा दक्षिण भाग; गोवें मुलुख व त्याजवळचा प्रदेश. ॰खंड-न. (कों.) १ जात्याची खालची तळी; (सामा.) जात्याच्या दोन तळ्यांपैकीं कोणतीहि एक याअर्थी खालचें वरचें तळखंड असाहि शब्द प्रयोग करतात. २ खालचा भाग; तळ; उदा॰ भिंतीचें तळ- खंड. ३ फणसाच्या चारखंडास आंतून चारीसारखा अंश (पाती) असतो व वर कांटे असतात त्यांच्यामध्य जो दळदार भाग असतो तो. ॰खडा-पु. खांब ज्यावर बसवितात तो दगड; उथळ्याचा दगड. ॰खप-पु. (माल, व्यापारी जिन्नस इ॰ कांचा) स्थानिक, तळावर होणारा, गावांतल्या गांवांत होणारा खप. 'या मालाचा तळखप कमी.' -मुंव्या ४९. ॰घर-न. १ घराच्या तळमज- ल्याच्या खालीं (जमीनीच्या पोटांत) मनुष्य इ॰ कांस राह- ण्यासारखें केलेलें स्थळ; खोली; दालन; भुईघर. २ (कु.) माडी असलेल्या घराचा तळमजला. -शास्त्रीको. ॰घाट-पु. १ पर्वताचा पायथा. पर्वताच्या पायथ्यालगतचा प्रदेश; घाटबुडी पहा. सह्याद्री- खालचा प्रदेश. [तळ + घाट] ॰चेपणी-स्त्री. १ धान्याचा कणगा इ॰ कांचें तळ धान्य इ॰ कानीं भरून, चेपून सारखें करण्याचा व्यापार. २ एखादें मोठें भांडें, कणगा इ॰ कांचें बूड व्यापेल इतकें पदार्थ धान्य इ॰ कांचें परिमाण. 'घागरभर रसानें या काहिलीची तळचेपणी मात्र होईल.' [तळ + चेपणी] ॰जमीनस्त्री. भात- जमीन. -शे ३.४. [तळ + जमीन] ॰झाडा-पु. १ (घर, खोली इ॰) पूर्णपणें रिकामें करणें. २ खालपासून वरपर्यंत, कोना- कोपर्‍यांतून केलेली, घेतलेली (घर इ॰ कांची) झडती; झाडा; तपासणी. ३ (खाद्य पदार्थ, धान्याची बेगमी इ॰). खाऊन फस्त; चट्ट, निःशेष करणें; (सामा.) (एखाद्या पदार्थाचा, बेगमीचा खाऊन केलेला) चट्टामट्टा; निःशेषता; फन्ना; फडशा. ४ (स्वयं- पाक, यज्ञ, इमारत इ॰ करितां) जमीन झाडून, सारवून, साफसूफ करण्याची क्रिया. ५ (सैन्य इ॰ काचा) मुक्काम उठल्यानंतर ज्या ठिकाणीं तळ असेल तेथें कांहीं जिन्नस वगैरे राहिला आहे कीं काय हें पाहण्याकरितां केलेला शोध; तपासणी; तळशोधणी. ॰तूट-स्त्री. व्यापारी जिन्नसांची स्थानिक तूट; तुटवडा. 'तोच माल खरेदी करून पाठवा असें लिहिल्यास त्या निशाणीचा माल बाजारांत तळतूट असल्यास कमी किंमतीचा माल असला तरी ज्यास्त किंमत देऊन घ्यावा लागतो. -मुंव्या ५३. ॰पाय-पु. पावलाचा खालचा भाग; पायाचा तळवा. ॰पायाची आग मस्तकास जाणें- तळची आग मस्तकास जाणें पहा. ॰पूस-स्त्री. १ खाद्यपदार्थ खाऊन सप्पा, फस्त, निःशेष करणें; (सामा.) (खाद्यपदार्थांचा खाऊन पाडलेला) फडशा; फन्ना; चट्टामट्टा. तळझाडा अर्थ ३ पहा. २ नायनाट. [तळ + पुसणें] ॰बूड-१ वृक्ष इ॰ कांचा बुंधा; तळ; खालचा भाग. 'तंव तंव होती थोराडें । अकर्माचीं तळबुडें । आणि जन्मशाखा पुढेंपुढें । घेती धांव ।' -ज्ञा १५.१६८. २ खळ्यां- तील, धान्याच्या पेंवांतील (धान्य इ॰ नें युक्त) गाळसाळ; गदळ; झाडणी. हा महारांचा हक्क असतो. ॰वट-पुन. १ माळ जमीनीचा प्रदेश; मैदान. २ डोंगराच्या पायथ्यालगतचा सपाट भूप्रदेश. ३ खालचा भाग; अधोभाग. 'ना तरी कढेयातळवटीं । जैसा आपुलाचि बोलु किरीट । पडिसादु होऊनि उठी । निमित्त- योगें ।' -ज्ञा ४.७५. (इमारत इ॰ कांचा) पायाचा भाग; पाया. 'पाया शोधूनि धरातळीं । तळवट बांधिला रत्नप्रवाळीं ।' -मुसभा २.२३. ॰वटीं-शअ. खालीं; खालच्या भागांत. 'आकाशचि वर्षे नीर । तें तळवटीं बांधे नाडर ।' -ज्ञा १८.३२२. 'कुंकुमातळवटीं टिक लागे ।' ॰वणी-न. (क्व.) जमीनीवरील (नदी, नाले, ओढे, तळीं इ॰ काचें) पाणी. 'वळवणी आलें तळवणी घेऊन गेलें.' [तळ + पाणी] ॰वाट-स्त्री. भुयाराची वाट; चोरवाट. ॰शोधणी- स्त्री. सैन्य इ॰ कांचा तळ उठल्यानंतर त्या ठिकाणीं कांहीं राहिलें कीं काय तें पुरतेपणीं पाहण्याची क्रिया; तळझाडा अर्थ ५ पहा. [तळ + शोधणें] ॰सरा-सरी-स्त्री खांबाचा तळखडा; उथळा. ॰सांड-क्रिवि. जमीनीपासून निराळें; तळापासून उचललेल्या स्थितींत (ओझें इ॰ असणें); जमीनसांड; भुईसांड. [तळ + सांडणें] तळहात, तळात-थ, तळाटा-ठा-पु. हाताचा तळवा. [तळ + हात] ॰हातचा, हातावरचा फोड-पु.(ल.) अत्यंत प्रिय व नाजूक वस्तु; अत्यंत प्रिय व जिव्हाळ्याची व्यक्ति (तळहातावर झालेल्या फोडास किंचित्हि धक्का लागूं नये म्हणून आपण फार जपतों या- वरून). तळहाताच्या फोडासारखें वागविणें-बाळगणें- मानणें-(एखाद्या वस्तूची, व्यक्तीची) अतिशय काळजी घेणें; जिवापाड जपणें. तळहाताचा मळ-पु. (ल.) अल्प श्रमानें होणारें कोणतेंहि काम; सहज लीलेनें करतां येण्याजोगी गोष्ट. 'चित्रें काढणें हें त्याला तळहाताच्या मळाप्रमाणें आहे.' या अर्थीं हाताचा मळ असाहि शब्दप्रयोग रूढ आहे.' तळहाताला केंस येणें-अशक्य गोष्ट शक्य कोटींत येणें (तळहाताला कधींच केंस येत नसतात त्यावरून हा अर्थ). तळहाताला केंस न येणें-अस- मर्थ नसणें; अंगांत धमक असणें. तळहातावर शीर घेणें- जिवाची तमा न बाळगणें; (एखाद्या कार्यासाठीं) मरणहि पत्करण्यास तयार होणें. तळाची आरी-स्त्री. (चांभारधंदा) जोड्याचा तळ शिवण्याची आरी. तळातळन. सप्त पातालापैकीं चौथें पाताल. तलातल पहा. 'इणें जे नर बुडविले । ते नेले तळातळा ।' -जै ६४.१९. [सं. तलातल]

दाते शब्दकोश

तमाशगी(गा)र, तमासगीर

वि. १ तमाशा पाहणारा; मजा. गंमत पाहाण्यास नेहमीं उत्सुक असलेला. 'कठडयाचे बाहेर तमासगीर लोकांस व्यवस्थेशीर उभें राहूं द्यावें. -(बडोदें) पहिल- वान लोक व कुस्त्यासंबंधीं नियम २४. २ (ल.) प्रेक्षक; तिर्‍हा ईत (गंमत पाहणारा)माणूस; बघ्या. ३ तमाशा करून उपजीविका करणारा तमाशेवाला (गारुडी, जादूगार, डोंबारी, विदूषक, बहुरूपी इ॰). [अर. तमाशा + गीर प्रत्यय]

दाते शब्दकोश

तमाशगीर, तमासगीर, तमाशगार, तमाशगीर      

वि.       १. तमाशा पाहणारा; मजा, गंमत पाहण्यास नेहमी उत्सुक असलेला : ‘कठड्याचे बाहेर तमासगीर लोकांस व्यवस्थेशीर उभे राहूं द्यावें.’ –पहिलवान लोक व कुस्त्यांसंबंधी नियम २४. (बडोदे) २. (ल.) प्रेक्षक; तिऱ्हाईत (गंमत पाहणारा) माणूस; बघ्या. ३. तमाशा करून उपजीविका करणारा तमाशेवाला (गारुडी, जादूगार, डोंबारी, विदूषक, बहुरूपी इ.). [फा. तमाशागीर]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तंत्रविद्या, तंत्रशास्त्र, तंत्रज्ञान      

स्त्री.न.       १. यांत्रिक कामातील प्रक्रिया, त्यातील निरनिराळ्या वारंवार घडणाऱ्या क्रिया यांचे पद्धतशीर ज्ञान. २. वैज्ञानिक नियम व तत्त्वे यांचा वापर करण्याचे ज्ञान; उपयोजित विज्ञान.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ठराव      

पु.       १. निकाल; निश्चय; निर्णय; पक्का निर्धार. २. स्थैर्य; टिकाव. ३. राहणे; मुक्काम करणे; थबकणे. ४. (कायदा) दाव्यातील मुख्य मागणीखेरीज इतर दाद मिळण्यासाठी केलेल्या अर्जाबद्दलचा निकाल. ५. सभेत मूळ किंवा उपसूचित स्वरूपात मान्य झालेला प्रस्ताव, सूचना. ६. (कायदा) नियम; सिद्धांत. [सं. स्थिर]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ठराव

पु० नियम, निश्चय. २ कायदा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

पु. १ निकाल; निश्चय; निर्णय; पक्का निर्धार; करार २ स्थिरस्थावर वसति, राहणी; स्थैर्य; टिकाव. ३ (कायदा) दाव्यांतील मुख्य मागणीखेरीज इतर दाद मिळण्यासाठीं केलेल्या अर्जाबद्दलचा निकाल; इं. ऑर्डर. -सिव्हिल प्रो. कोड. ४ सभेंत मूळ किंवा उपसूचित स्वरुपांत मान्य झालेली सूचना. ५ (कायदा) नियम; रूळ; सिद्धांत. [सं. स्थिर्; म. ठरणें; हिं.]

दाते शब्दकोश

ठरणें

अ० नियम होणें, होणें, निश्चय होणें. २ टिकणें, रहाणें, स्थिरावणें.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

उदाहरण      

न. १. दाखला; दृष्टांत; नियम, विधान इ. स्पष्ट करणारी किंवा पटवणारी गोष्ट : ‘अक्षरें तिसऱ्या पादीं । उदाहरण शेवटीं ।’ – वृत्तदर्पण ११. २. नमुना; कित्ता. ३. (ग.) गणितातील नियमाप्रमाणे सोडवण्याचा प्रश्न; (सामा.) प्रश्न. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उदक

न. पाणी; जळ; नीर; अंबु; गोव्याकडे पाणी या अर्थीं हाच शब्द रूढ आहे. 'बरें उदक आण.' 'करूं जातां उदक- पान । घोटासवें आठवे कृष्ण ।' -एरुस्व ५.६२. सामाशब्द-गंगोदक; तीर्थोदक; पर्जन्योदक; संचितोदक इ॰ [सं. उद् = वार येणें; ओलें करणें; तुल. ग्री. ऊदोर्; लॅ. उन्द; गॉ. वतो; लिथु. वन्दु. ॰येणें ( डोळ्यांत, नेत्रांत, नयनांत )-दुःख होणें; वाईट वाटून रडणें; अश्रु येणें. 'दर्भनिर्मित तया शयनातें । देखतां उदक ए नयनातें ।' ॰सोडणें-देणें-१ मालकी सोडणें; त्याग करणें; सोडून देणें; टाकून देणें. 'गोप्रदानांबद्दल सोळा रुपयांच्या रकमेचें उदक सोडलें जाईल.' -गोप्रदानाचे नियम (बडोदें) २. २ कोणत्याहि गोष्टीचा संकल्प केल्याचें द्योतक म्हणून मंत्रपूर्वक पाणी सोचणें; संकल्प करणें. ३ संकल्पाचें उदक सोडून जेवण्यास आरंभ करणें, ॰हातावर घालणें-एखाद्यास दान करणें; अपर्ण करणें; दुसर्‍यास देऊन टाकणें. उदकापपाण्यानें करून टाकणें-एखादें कार्य, समारंभ, उत्तरक्रिया अतिशय थोडया खर्चांत व गाजावाजा न करतां फक्त विधीस बाध येऊं न देतां उरकून टाकणें. ॰घेऊन वचप-(गो.) निघून जाणें. [वचणें = जाणें] ॰क्रिया-स्त्री. उत्तरक्रिया; तिलांजलि; तर्पण. ॰घात पु. बंधारे घालून पाणी अडवणें व अशा रीतीनें जोर उत्पन्न करून योग्य वेळीं योग्य प्रमाणांत वाटेल तेथें पाणी सोडणें यासंबंधीचें; ज्ञान, विद्या; ६४ कलांतील एक कला. ॰दान-न. १ उत्तरक्रिया; तिलांजलि; तर्पण; उदकक्रिया. २ पाण्याची सोय करणें (विहीर, तळें इ॰ बांधून). ॰मेह पु. एक रोग; यांत पाण्या- सारखी पुष्कळ लघवी हेते. ॰वाद्य न. १ जलतरंग; जलतरंगा- करितां वापरावयाची भांडीं. २ जलतरंग तयार करणें किंवा तें वाज- विण्याची कला. ॰शांत-शांति स्त्री. घरांत कोणी आजारी अस- ल्यास अथवा कांहीं अरिष्ट घडल्यास त्याच्या शांत्यर्थ चार ब्राह्मण बोलावून त्यांकरवीं कांहीं विशिष्ट (बौधायनसूत्रांत सांगितल्याप्रमाणें) सूक्तें पठण करावयाचा व जलसिंचन करावयाचा विधि.

दाते शब्दकोश

उदक      

न.       पाणी; जळ; नीर; अंबू : ‘करूं जातां उदकपान । घोटासवें आठवे कृष्ण ।’ -एरुस्व ५·६२. [सं. उद्=वर येणे, ओले करणे] (वा.) उदक येणे - (डोळ्यात, नेत्रांत, नयनांत) दुःख होणे; वाईट वाटून रडणे; अश्रू येणे. उदक सोडणे, उदक घेणे- १. मालकी सोडणे; त्याग करणे; सोडून देणे; टाकून देणे : ‘गोप्रदानांबद्दल सोळा रुपयांच्या रकमेचे उदक सोडले जाईल.’ -गोप्रदानाचे नियम (बडोदे) २. कोणत्याही गोष्टीचा संकल्प केल्याचे द्योतक म्हणून मंत्रपूर्वक पाणी सोडणे; संकल्प करणे. ३. संकल्पाचे उदक सोडून जेवण्यास आरंभ करणे. उदक हातावर घालणे- एखाद्याला दान करणे; अर्पण करणे; दुसऱ्याला देऊन टाकणे. उदकापाण्याने करून टाकणे- एखादे कार्य, समारंभ, उत्तरक्रिया अतिशय थोड्या खर्चात व गाजावाजा न करता फक्त विधीस बाध येऊ न देता उरकून टाकणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उधड, उधडा      

वि. उक्ता; बिनहिशोबी; अंदाजाने : ‘जमादारास लागवड खर्चाबद्दल दरमहा १ रुपयाप्रमाणे उधड देण्यांत यावा.’ – (बडोदे) पहिलवान कुस्ती नियम ८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उधड-डा

वि. उक्ता; बिन हिशोबी; अंदाजानें. 'जमादा- रास लागवड खर्चाबद्दल दरमहा १ रुपयाप्रमाणें उधड देण्यांत यावा.' (बडोदें) पहिलवान कुस्ती नियम ८.

दाते शब्दकोश

उघारणी,उघ्राणी      

पहा : उगराणी : ‘जीं पत्रें येत नसतील त्याजविषयीं उघ्राणी करावी.’− राजमहाल कारकून नियम ३. उघाळणे      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उघारणी, उघ्राणी

(कों.) (बडोदें) उगराणी पहा. 'जीं पत्रें येत नसतील त्याजविषयीं उघ्राणी करावी.' -राजमहाल कारकून नियम ३.

दाते शब्दकोश

उघराणी

(बडोदें) उगराणी पहा. 'उघराण्या वगैरे करून रक्कम वसूल करविण्याची योग्य ती तजवीज करतील.' -स्वारी नियम ३८. [सं. उद् + ग्रहण; गु. उघराणी]

दाते शब्दकोश

उघराणी      

पहा : उगराणी : ‘उघराण्या वगैरे करून रक्कम वसूल करविण्याची योग्य ती तजवीज करतील.’−स्वारी नियम ३८. उघल      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उल्लंघित

वि. १ ओलांडिलेलें; पलीकडे गेलेलें; अतिक्रांत. २ मर्यादा सोडलेला; आज्ञाभंग केलेला; नियम मोडलेला.

दाते शब्दकोश

उल्लंघन      

न.       १. ओलांडणे; पलीकडे जाणे. २. आज्ञा किंवा नियम मोडणे; मर्यादातिक्रम. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उमेदवारी लेख      

उमेदवारीसंबंधी अटी, नियम इत्यादी ज्यात नमूद केले आहेत असा लेख. उमेदी      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उपाड

न. १ (बडोदें) उचल; उचापत; उधार. 'वर्षप्रति- पदेनिमित्त व्यापारीवार होणार्‍या उपाडाचीं रीतसर बिलें तयार होऊन...' -ऐरापु २.४७. २ खप; विक्री; उठाव (मालाचा). 'कमी उपाड झाल्यास त्याजबद्दल सरकारांतून नुकसान मिळणार नाहीं अशी शर्त ठेवावी.' -स्वारी नियम (बडोदें) ९६. [सं. उत् + पत्; गु. उपाडवु = उचलणें]

दाते शब्दकोश

उपविधि, उपविधी      

पु. (कायदा) १. पोटकायदा; मुख्य कायद्याला जोडून असणारे नियम. २. स्थानिक प्राधिकरणाने केलेली नियमावली. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उपयोजन      

न. नियम, कायदे यांची अंमलबजावणी, व्यवहारात उपयोग.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उतरत्या प्रत्ययाचा सिद्धान्त      

पु.       विशिष्ट मर्यादेनंतर दिलेल्या प्रत्येक मात्रेपासून क्रमाने कमी होणाऱ्या परिणामांचा नियम.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उत्सर्ग

पु. १ बाहेर टाकणें; टाकून देणें; त्याग; दान; अर्पण. सामाशब्द-मलोत्सर्ग; मुत्रात्सर्ग; मूत्रोत्सग; वृषोत्सर्ग वगैरे. 'संक्रमण उत्सर्ग । विण्मूत्राचा ।' -ज्ञा १३.११९. २ नियम; विधि; रीत. उ॰ उत्सर्ग. शास्त्र; 'मनुष्यानें सत्य बोलावें या उत्सर्गाचा कोणेकाचा प्राणरक्षणार्थ अस्त्यहि बोलावें या विशेष वचनानें बाध होतो.' ३ धर्म करणें विहीर, धर्मशाळा इ॰ देवास अपर्ण करणें. [सं. उत् + सृज् = टाकणें]

दाते शब्दकोश

उत्सर्ग      

पु.       १. बाहेर टाकणे; टाकून देणे; त्याग; दान; अर्पण. सामा. शब्द -मलात्सर्ग, मूत्रोत्सर्ग, वृषोत्सर्ग वगैरे : ‘संक्रमण उत्सर्ग । विण्मूत्राचा ॥’ -ज्ञा १३·११९. २. नियम; विधी; रीत. उदा. उत्सर्गशास्त्र. ३. धर्म करणे; विहीर, धर्मशाळा इ. देवाला अर्पण करणे. [सं. उत् + सृज्=टाकणे]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

वाचनिक

वि. १ उच्चारित; जाहीर; साक्षात्; प्रति- पादित; निर्दिष्ट; स्पष्ट केलेला; घोषित (विधिनिषेध, नियम वगैरे) अनुमानित याच्या उलट. २ मूळ ग्रंथांतील; उल्लिखित; मूळ ग्रंथांतील वचनांत असलेला.

दाते शब्दकोश

वैकल्पिक

वि. १ ज्याविषयीं मतभेद आहे असा (मुद्दा, सिद्धांत). २ ज्याविषयीं विकल्प सांगितला आहे असा (नियम, विधि); ऐच्छिक. ३ अनिश्चित; संशयित. [सं.]

दाते शब्दकोश

वाळ

स्त्री. १ प्रचारांतून जाण्याची क्रिया; चलनांतून जाणें (नाणें). (क्रि॰ पाडणें; पडणें). २ जातिबहिष्कार; जातिबाह्यता; समाजभ्रष्टता; जातिभ्रष्टता. (क्रि॰ काढणें; निघणें; पाडणें; घालणें; पडणें). ३ नाश; कुजकेपणा; जीर्णता; सुकेपणा. (क्रि॰ पडणें; होणें; असणें). ४ लोप; प्रचारांतून जाणें; रद्द होणें. -वि. १ प्रचारबाह्य; नाचलाऊ; अव्यवहारित; बंद पडलेलें (नाणें वगैरे). २ जातिबाह्य. ३ (ल.) बेकार; प्रचारांतून गेलेली (चाल, रीत, प्रघात, नियम). [वाळणें = टाकणें] वाळीस-वाळींत-घालणें- टाकणें-जातिबाह्य करणें; जातिभ्रष्ट करणें. वाळींत-वाळीस- पडणें-जातिबाह्य, भ्रष्ट होणें.

दाते शब्दकोश

वाण

न. वायन; व्रताच्या सांगतेकरितां ब्राह्मणास सूप, खण, तांदूळ वगैरे साहित्य देतात तें. 'कां वाण धाडिजे घरा । वोवसि- याचें ।' -ज्ञा १७.२८६. [सं. उपायन] सुन्या घरीं वाण देणें-निरुपयोगी स्थानीं सामर्थ्यं वेचणें; बेफायदा सर्कृत्य करणें; विनासाक्ष मोठें कृत्य करणें, दिमाख दाखविणें. वाणक- न. वायन. वाण पहा. 'सर्वस्व समर्पाया धर्मासि ब्राह्मणासि वाण- कसें ।' -मोविराट ६.७७. वाणवसा-वंसा-पु. व्रत; नियम; उपासना. 'अनन्य भावें शरण तुला स्वधर्म अमचा वाणवसा ।' -प्रला ११४. [वाण + वोवसा]

दाते शब्दकोश

वधारा

स्त्री. (बडोदे) वाढ. 'केलेल्या प्रमाणांत परि- स्थित्यनुरूप वधारा करण्याची आवश्यकता वाटल्यास...' -बडोदें, सत्कार नियम ८. [सं. वृध-वर्धय; प्रा. वद्धार; गु. वधारो] वधारणें-क्रि. वाढणें; मोठा होणें.

दाते शब्दकोश

विच्छिन्न

वि. १ तुटलेलें; विभागित; भाग अलग झालेलें. २ छिन्नभिन्न; पूर्ण मोडलेलें; चुराडा झालेलें; नष्ट. ३ (ल.) मोडलेला; उल्लंघन केलेला; अतिक्रमण केलेला (नियम, विधि, वगैरे). 'ज्या मनुष्यांचे कुलधर्म विच्छिन्न झाले त्यांना हें जनार्दना ! नरकवास निश्चयेकरून घडतो.' -गीर ६१०. ४ बंद पडलेला; स्थगित; लुप्त; खंडित; बाधित; प्रतिबंध, हरकत आलेला (वंशपरंपरेचें वतन, हक्क, व्यवहार, धंदा, स्थिति वगैरे ). 'तुका म्हणे होय दरिद्र विच्छिन्न ।' -तुगा १९७. [सं. वि + च्छिद्] ॰किरण-पु. पृथक्कृतकिरण. (इं.) स्पेक्ट्रम. ॰किरणदर्शक- पु. प्रकाशपृथक्करणयंत्र. (इं.) स्पेक्ट्रॉस्कोप. ॰किरण-पु. पृथक् झालेल्या प्रकाशाचा पट्टा. (इं.) स्पेक्ट्रम.

दाते शब्दकोश

विद्यार्थी (वाह्यात)

मास्तरांना किंवा प्राध्यापकांना भीक घालीत नाहींत, नतद्रष्ट मुलें, छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम् हाच नियम यांना लागू, नाठाळपणाने शिक्षेची धार बोथट बनवून टाकली, वाह्यात कार्टीं, टारगट पोरें, यापेक्षां ढोरें बरीं.

शब्दकौमुदी

विध

पु. विधी; नियम; रीति. 'नेणें पाळुं विध करुणा भाकी ।' -तुगा १५६६. [सं. विधि]

दाते शब्दकोश

विगमन

न. (तर्क) ज्यांत एक किंवा अनेक विशेष गोष्टींच्या निरीक्षणानें सामान्य नियम स्थापित करण्यांत येतात तें अनुमान; (इं.) इंडक्शन्. -न्यायप १.१२१. [सं.]

दाते शब्दकोश

विकृत

न. १ वीट; किळस; चिणका. २ विकृति पहा. -वि. १ रूपांतर, बदल झालेला; बदललेला. २ तिटकारा, वीट आलेला. ३ मन उडालेला; विन्मुख झालेला; तोंड फिरविलेला. ४ दुर्दुर्श; विक्राळ. ५ बिघडलेला. [सं. वि + कृ = करणें] सामाशब्द- ॰जाति-स्त्री. (संगीत) ज्या स्वरावरून एखाद्या जातीस तिचें नांव दिलेलें असतें व जिच्यांत तोच न्यास स्वर असून बाकीच्या स्वरांबद्दल नियम नसतो ती जाति. यांची संख्या अकरा आहे. षड्जकैशिकी, षड्जोदीच्यवा, षड्जमध्यगा, गांधारोदीच्यवा रक्तगांधारी, कैशिकी, मध्यमोदीच्यवा, कर्मारवी, गांधारपंचमी, आंघ्री, नंदयति. [सं.] ॰स्वर-पु. (संगीत) शुद्ध स्वरापेक्षां ध्वनीनें कमी किंवा अधिक असा स्वर, विकृतस्वर हल्लीच्या पद्ध- तामध्यें पांच मानितात. रागवर्गीकरणास पांचापेक्षां जास्त विकृत- स्वर मानणें सोयीचें नाहीं, हें मत पंधराव्या शतकापासून आज- पर्यंतच्या ग्रंथकारांस मान्य झालें आहे. कलावंत शास्त्रज्ञ नसल्यानें त्यांच्यांत त्याबद्दल एकमत नाहीं. पांच विकृत स्वरांत ऋषभ, गांधार, धैवत, निषाद हे चार कोमल आहेत व मध्यम तीव्र आहे. ३६ इंच लांबीच्या तारेचा ध्वनि व २४० आंदोलनसंख्या षड्जस्वरास गृहीत धरण्यास, पांच विकृत स्वरांचीं आंदोलन- संख्या व तारेची लांबी खालीं लिहिल्याप्रमाणें आहे.

दाते शब्दकोश

विनीत

वि. १ नम्र; लीन; निगर्वीं. २ नियम, शिस्त वगैरे पाळणारा, मानणारा; ताब्यांत, आटोक्यांत राहणारा. ३ मनो- विकार ताब्यांत ठेवलेला; निग्रही. ४ शिकविलेला; सरावाचा; शिस्त लावलेला (पशु वगैरे). [सं. वि + नी]

दाते शब्दकोश

विवाद

पु. १ चर्चा; खल; खंडनमंडन. २ वाद; पूर्वपक्ष उत्तरपक्ष; उत्तर-प्रत्युत्तर. ३ कज्जा; खटला; फिर्याद; कायदेशीर भांडण. ४ भांडण; अपील; फेरतपासणी. 'अंमलदारांच्या फैस- ल्यावर विवाद जिकडे चालूं शकेल...' -खानगीखातें नियम १३१. [सं. वि + वद् = बोलणें] ॰ग्रस्त-वादग्रस्त पहा. विवादणें- अक्रि. (काव्य) वाद करणें; भांडणें; तंडणें. विवादी-वि. १ भांडखोर; तकरारी; वाद करणारा; फिर्यादी. २ अपीलंट; फेरतपा- सणी मागणारा. -खासगी खातें १३३. ॰स्वर-पु. रागांतील नियमित स्वराहून निराळा जो अखादा स्वर गायक कुशलतेनें रागरक्ति वाढविण्याकरितां रागास लावतात तो.

दाते शब्दकोश

वक्तव्य

न. १ वचन; उक्ति. २ नियम; अनुशासन. ३ (सामा.) भाषण; बोलणें. -वि. बोलावयास, म्हणावयास योग्य, क्रमप्राप्त, आवश्यक असलेलें. [सं.]

दाते शब्दकोश

व्रत

न. १ स्वतःला लावून घेतलेला एखादा धार्मिक नियम, मेम; देहदंडाचा एक मार्ग. -ह ८.१०. (क्रि॰ घेणें.) २ असा नेम पाळण्याची केलेली प्रतिज्ञा, पण. ३ ब्रीद; प्रतिज्ञा; बाणा. 'नतावनधृतव्रत ज्वलन तूंचि बा धावनीं ।' -केका ६. [सं.] (वाप्र.) तीळ खाऊन व्रत मोडणें-अगदीं क्षुल्लक कारणासाठीं, फायद्यासाठीं बाणा, नेम सोडणें. सामाशब्द- ॰बंध-पु. मुंज; यज्ञोपवीत धारण करणें हें एक प्रकारचें व्रतच आहे. [सं.] ॰भिक्षा- स्त्री. व्रतबंधाच्या आनुषंगिक कर्मांपैकीं एक; भिक्षा मागणें. [सं.] ॰वैकल्य-न. १ व्रताची अपूर्णता; त्यांतील न्यूनता, कमीपणा. २ लहानसहान व्रतें, नेम इ॰ व्रत अर्थ १ पहा. ॰संग्रह-पु. व्रत घेणें; व्रतस्थ असणें. व्रतस्थ, व्रती-वि. १ व्रत पाळीत असलेला; व्रताप्रमाणें कांहीं नेम करणारा. २ स्त्रीसंग न करणारा; ब्रह्मचर्य पाळणारा. 'अमृतराव सात वर्षांचा असतांना त्याची आई स्वर्ग- वासी झाली; तेव्हांपासून बापूसाहेब व्रतस्थ होतें.' -मौनयौवना.

दाते शब्दकोश

वसा

पु० नियम, व्रत. २ शरिरांतील एक धातु.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

वतीं, वतींने

क्रिवि. तर्फें; बाजूनें; बद्दल. 'ने ना. दिवाण साहेब यांही श्रीमंतांवती स्वीकार करावा.' -अहेर बहुमान पोषक नियम ६. वतीचा-वि. बाजूचा; पक्षाचा. आमच्यावतीं व तुमच्यावतीं हे शब्द व्यापारी, पेढीवाले यांच्या हिशेबांतून सावकार-कूळ यातर्फें अशा अर्थानें येतात.

दाते शब्दकोश

व्यतिरिक्त

वि. १ निराळा; भिन्न. २ विरहित; विहीन; विना. 'ज्ञानव्यतिरिक्त देह काष्टोपम जाणावा.' -शअ. खेरीज; वांचून; शिवाय. 'मी तुला घेतल्या व्यतिरिक्त जाणार नाहीं.' [सं.] व्यतिरेक-पु. १ असंबद्धता; वेगळी, भन्न स्थिति. 'ईश्वरीं अज्ञानाचा सर्वथा व्यतिरेक आहे.' २ अभाव. ३ अव्याप्ति. ४ अभावाचा नियम; परस्पराभाव. 'जेथें ईश्वरभक्ति नाहीं तेथें भूतदया नाहीं व्यतिरेक आहे.' ५ अपवाद. ६ एक अर्थालंकार; जेथें उपमान आणि उपमेय यांतून एकाचें अधिकत्व किंवा न्यूनत्व वर्णिलें असतें तो अलंकार. 'त्वदुदारता जसी तसि न सुरांच्या बहुमता अगा साधो ।' -मोभीष्म १४७. [सं.] ॰मुखें-क्रिवि. व्यतिरेकाच्या म्हणजे अभावाच्या पद्धतीनें (प्रतिपादन). याच्या उलट अन्वयमुखें. ॰व्याप्ति-स्त्री. अभावापासून निघालेला व्यापक सिद्धांत. व्यतिरेक्युदाहरण-न. विरुद्ध उदाहरण.

दाते शब्दकोश

योगधर्म

योगधर्म yōgadharma m (S) A duty, virtue, or peculiar business of a योगी. Ten are particularized; viz. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. These five are named यम. Then शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर- प्रणिधान. These five are named नियम. Another enumeration gives अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, शांति, अपैशुन, दया, अलोभ, मार्दव, लज्जा. Another includes दम, क्षम, अचापल्य, तेज, तितिक्षा &c. These discrepancies matter little. All the duties and virtues, understood with some qualification, would adorn, not the योगी, but the Christian or the man; and we may term them, as some Panḍits do term them, मनुष्यधर्म.

मोल्सवर्थ शब्दकोश

प्रमाण

न. १ पुरावा; दाखला; आधार; साक्ष; वादग्रस्त विषयाचा निर्णय करणारा लेख भाग साक्ष इ॰. 'आणि उदो अस्ताचेनि प्रमाणें । जैसें न चलतां सूर्याचें चालणें ।' -ज्ञा ४.९९. प्रमाणाचे आठ प्रकार आहेत:-१ प्रत्यक्ष, २ अनुमान, ३ उपमान, ४ शब्द, ५ अर्थापत्ति, ६ अनुपलब्धि, ७ संभव, ८ ऐतिह्य (किंवा ५ भोग, ६ लेख, ७ साक्ष्य, ८ दिव्य). २ यथार्थ ज्ञानाचें साधन; निश्चिय; प्रमा उत्पन्न होण्यास कारणीभूत जें आप्तवाक्य, अनुमान इ॰. 'अर्थापत्ति उपमान । इतिहास परिशेषादि प्रमाण । तयासी हि स्वतंत्र कवण । प्रमाण तो बोलेल ।' -विवेकसिंधु ३ आधार; प्रत्यंतर; पुरावा; निश्चितपणा; खात्री. 'तो आज येईल उद्यां येईल हें सांगवत नाहीं. त्याचें येण्याचें प्रमाण नाहीं.' ४ कसोटी; कठिण प्रसंग; तप्त दिव्य. ५ सीमा; मर्यादा, इयत्ता; निश्चितपणा; तंतोतत बरोबर संख्या इ॰ 'शब्द किती आहेत ह्याचें प्रमाण कोण्हास लागलें नाहीं.' ६ परिमाण; आकार; विस्तार; (औषधाचा) टक; मात्रा. ७ माप (वजन, लांबीरुंदी, वेळ इ॰ चें). ८ एखाद्या वस्तूचा निश्चितपणा, विभाग इ॰ ठरविण्याचा नियम. ९ (गणित) त्रेराशिकांतील पहिला संख्या; दोन समान गुणोत्तरांची मांडणी. १० सर्वमान्य, ग्राह्य, आज्ञा, उपदेश, सल्लामसलत घ्यावयास योग्य असा शब्द, माणूस, वचन, ग्रंथ इ॰ 'धर्म म्हणे गा भीमा! तुज जरि आम्ही प्रमाण तरि सोडी ।' -मोवन ९.६४. ११ शपथ; वचन. 'वैश्य म्हणे तियेसी । प्रमाण द्यावें आम्हांसी ।' -गुच ३३.७१. १२ ज्ञान; यथार्थ ज्ञान. 'तैसें प्रमाता प्रमेय । प्रमाण जें त्रय । तें अज्ञानाचें कार्य । अज्ञान नव्हे ।' -अमृ ७.४६. १३ (चुकीनें) फर्मान हुकूम. 'बाच्छाय पाठविलें प्रमाण । वजीर बोलावा तमाम ।' -ऐपो १०.१४ अंतःकरण. -हंको. -वि. खरें; योग्य; बरोबर; सत्य; न्याय. 'हें माझें भाषण प्रमाण आहे.' -क्रिवि. मान्य; कबूल. 'सेवकासी आज्ञा स्वामीची प्रमाण.' [सं.] म्ह॰ नैको ऋषिर्यस्यवचः प्रमाणम् । सामाशब्द- ॰गणित-न. त्रैराशिक. ॰चैतन्य-न. सप्त चैतन्यांतील आभासचैतन्याचें अंतःकरणचैतन्य नामक तिसरें अंग. ॰दिवा-पु. प्रमाणरूपी दिवा; लामणदिवा. 'प्रमाणदिवेयांचेनि बंबाळें । पांतां तरळैले वेदांचे डोळे ।' -शिशु ९. ॰पत्र-न. अधिकारपत्र; मुख्याच्या सहीचें पत्रक. 'ज्यांच्या- जवळ प्रमाणपत्रें असतील त्यांनाच वर्गणी द्यावी.' -के १२.७. ३०. ॰फल-न. त्रैराशिकांतील चौथी संख्या; उत्तर. ॰भूत- वि. १ प्रमाण म्हणून घेतां येईल असें; इयत्ता ठरविणारें. २ (यावरून) खरें; सत्याला धरून असलेलें. भूत पहा. ॰मद्यार्क-पु. (प्रमाणाइतकी) पुरी तेजदारू; पुरी कडक दारू. (इं.) प्रुफ स्पिरीट. ॰सूत्र-न. लग्नाचे वेळीं वधू व वर यांची उंची ज्यानें मोजतात तें सूत. प्रमाणांक-पु. त्रैराशिकांतील पहिली राशि. बाकीच्या दोन राशींस मध्यांक आणि इच्छांक अशीं नावें आहेत. प्रमाण + अंक] प्रमाणालंकार-पु. प्रमाण अर्थ १ पहा. [प्रमाण + अलंकार] प्रमाणीभूत-वि. प्रमाणभूत पहा.

दाते शब्दकोश

चौथ

स्त्री. १ चतुर्थी तिथि. २ (कों.) लोणी वगैरे तोलण्याचें अठ्ठेचाळीस दुदांडी शिवराई पैसेभार वजन. ३ चतुर्थांश. ४ चौथाई; मुसलमानांच्या अमलाखालील प्रांतांतून सरकारी वसुलाच्या एकचतुर्थांश खंडणी मराठे वसूल करीत असत ती. ही खंडणी वसूल केल्यावर मराठे तिची पुढील प्रमाणें वांटणी करीत-चौथाईचा चतुर्थांश राजा स्वतःकरितां ठेवीत असे आणि ह्या हिश्शास राजबाबती असें म्हणत. बाकी राहिलेल्या रकमेपैकीं म्हणजे मोकाशापैकीं सर्व चौथाईच्या साहोत्र्या इतकी (शे. ६ इतकी) रक्कम पंतसचिवास देत असत. बाकी राहिलेला (चौथा- ईचा एकुणसत्तर शंभरांश) हिस्सा ज्याला ऐनमोकासा म्हणत त्याची विशिष्ट अटीवर सरदार-जहागीरदारांत वांटणी होत असे. यांनीं मराठ्यांस लढाईच्या वेळीं सैन्य पुरवावयाचें असे. कांहीं प्रांतांत सगळ्या चौथाईवर शेंकडा तीन इतकी रक्कम वजा घालीत असत. तिला नाडगौडा असें म्हणत. मराठ्यांच्या अमलाखालीं ते प्रांत आल्यावरहि वरीलप्रमाणें चौथाई वसूल करून वर सांगितल्या प्रमाणें तिची वांटणी होत असे. ५ मुसलमानांच्या अमदानींत दाव्यांत, लवादांत यशस्वी झालेल्या व्यक्तीनें प्रतिपक्षाकडून चौथ व्यावी असा नियम असे. दाव्यांतील ऐवजांतील (रकमेंतील) रुप- यास चार आण्याइतकी साधारणतः ही रक्कम असे. ६ कामा- वर भाडोत्री लाविलेल्या नोकरांच्या पगाराच्या रकमेचा चतुर्थांश मुख्य अंमलदारास मिळत असे त्यासही चौथ म्हणत. ७ शिवाय कोर्टांतील बेलीफास प्रोसेस बद्दल दिलेल्या मजुरीचा चतुर्थांश नाझ- रास मिळत असे त्यासहि चौथ म्हणत. -वि. चतकोर (भाकरी). [सं. चतुर्थ; प्रा. चउत्थ] (वाप्र.) चौथीचा चंद्र(चांद)पहाणें- कांहीं तरी आळ, किटाळ येणें; चतुर्थीचा चंद्र पहिला असतां चोरीचा आळ येतो असा समज आहे. 'चौथीचा चांद पाहिलांत याचा हा परिणाम बरें का ?' -नामना ८६. ॰कर कोर-पुस्त्री. (प्र.) चतकोर पहा. ॰भरणी-स्त्री. १ भाद्रपद वद्यांत ज्या दिवशीं भरणी नक्षत्रीं चंद्र असतो असा (तृतीयेचा, चतुर्थीचा, पंचमीचा) दिवस. २ मागील बारामहिन्यांत मेलेल्या माणसांचें या दिवशीं केलेलें श्राद्ध; भरणी श्राद्ध. [चौथ = चतुर्थी + भरणी नक्षत्र]

दाते शब्दकोश

व्यवहार

पु. १ कार्य; क्रिया; व्यापार. २ वहिवाट; पद्धत; रीत. ३ धंदा; देवघेव; व्यापार. -ज्ञा ७.२६. ४ व्यवसाय; उद्योग; काम. ५ न्यायालयाची वहिवाट; कोर्टाची रीत. ६ खटला; चौकशी. 'कोणत्याही व्यवहाराचा निर्णय करतांना सात ससभासदांचे सल्यानें निकाल करावा ।' -टि १.१६०. ७ न्याया- सयांत निर्णयासाठीं येणारी गोष्ट. ८ योग्य वर्तणूक, वर्तन. ९ भांडवल. 'कृतघ्ना उपेगु केला । कां चोरा व्यवहारु दिधला ।' -ज्ञा १३.७२८. १० संज्ञा. 'मग उत्तम ओघ सिंधु । हा नुरेचि व्यवहारभेदु ।' -ज्ञा १६.१३९. [सं.] ॰कुशल-चतुर-दक्ष-द्रष्टा-निपुण-वि. व्यवहारांत हुषार, तरबेज, तज्ज्ञ. ॰दर्शन-न. न्यायतत्त्वशास्त्राचा अभ्यास. 'राजानें व्यवहारदर्शन नित्य करीत असावें.' ॰धर्म-पु. व्यवहारशास्त्र पहा. ॰पद- न. १ खटला होण्यासारखी गोष्ट. २ खटला; कायदेशीर इलाज. ॰यात्रा-स्त्री. व्यवसाय; व्यवहारक्रम. शब्दांच्या व विचा- रांच्या भरभक्कम शिदोरीवरच सगळे लेखक, वक्ते, धर्मोप- देशक, वगैरे लोकांची व्यवहारयात्रा चालते.' -शर (प्रस्तावना). ॰विषय-पु. व्यवहारपद. ॰शास्त्र-न. सामाजिक चाली- रीती, व्यवहार यांसंबंधी नियम. याच्या उलट धर्मशास्त्र. ॰शुद्ध- वि. योग्य वर्तनाचें, व्यवहाराचें; चोख. ॰शून्य-ज्ञानशून्य- वि. व्यवहाराच्या कामीं अडाणी; रातीचा व्यवहार माहीत नस- लेला. ॰ज्ञ-वि. १ वयांत आलेला; अज्ञान नसलेला; सज्ञान (कायद्याच्या दृष्टीनें). २ व्यवहारांत कुशल; तरबेज. ॰ज्ञान- न. व्यवहारासंबंधी चांगली माहिती. व्यवहारणें-उक्रि. योग्य कामीं लावणें; उपयोजणें. 'मनप्रवर्ते इंद्रियद्वारे । बाह्यविषयीं व्यवहारे ।' -परमा ६.१२. व्यवहारि(री)क-वि. व्याव- हारिक पहा. व्यवहारी-वि. १ व्यवसायांत, धंद्यांत गुंतलेला; धंदेवाईक. २ व्यापारी. व्यवहारी अपूर्णांक-पु. (गणित) एका संख्येचे वाटेल तितके भाग पाडून त्यांपैकीं कांहीं घेणें. व्यवहारी ज्योतिषी-पु. मुंज, लग्न इ॰ चें आन्हिक चालविणारा ब्राह्मण; कांहीं ठिकाणीं याच्याकडे धर्माधिकाऱ्याचेहि हक्क अस- तात. व्यवहारी बस्तानी-स्त्री. (गणित) रुपयाचे पैसे कितीहि असले तरी १६ गंडे (खुर्द्यांतले) म्हणजे १ रुपाया असा हिशेब करणें. व्यवहार्य-वि. १ उपयोगाला, व्यवहाराला योग्य, अवश्य, शक्य (मनुष्य, वस्तु इ॰). २ अनुसरण्याला, करण्याला योग्य (धंदा, उद्योग). ३ कायदेशीर इलाज करण्याजोगा. व्यावहारिक-वि. १ व्यवहारासंबंधी (भाषा, लिपि इ॰). २ रूढ; सामान्य; नेहमीचें. ३ व्यवहारोपयोगी; व्यवहाराला योग्य, इष्ट. [सं.] ॰अपूर्णांक-पु. व्यवहारी अपूर्णांक पहा. ॰दिवस-पु (ज्यो.) मध्यम सौरदिवस. हा रात्रीं १२ पासून दुसऱ्या रात्रीं १२ पर्यंत धरतात. (इं.) सिव्हिल डे. ॰नाम- नांव-न. १ प्रचारांतील, परिचयाचें नांव; चालतें-वाहतें नांव. उदा॰ आण्णा, आबा, आत्या इ॰. २ नक्षत्र नामाखेरीज मुला- मुलाचें नांव ठेवतात तें. उदा॰ गणेश, नर्मदा इ॰ ॰नीति-स्त्री. शिष्टाचार; सामान्य, व्यवहारांतील नीति. ॰वर्षन. सरकारी वर्ष (३६५ दिवसांचें); कायद्याप्रमाणें ठरलेलें वर्ष. ॰शिक्षण- न. १ व्यवहार करण्यास उपयुक्त असें शिक्षण. याच्या उलट पुस्तकी शिक्षण. २ धंदेशिक्षण.

दाते शब्दकोश

आचार

पु. १ श्रुति-स्मृतींना अनुसरून वर्तन-वागणूक; विहित आचरण; शास्त्रशुद्ध वर्तन. म्ह॰ दोन प्रहर आचार, नंतर अनाचार = बारा वाजेपर्यंत धर्माचरण करून नंतर विषयासक्त होणें किंवा दोन प्रहरपर्यंत धर्म कर्म केलें तर तो आचार व त्यानंतरचा अनाचार समजला जातो. २ (सामा.) वर्तन; वागणूक; राहाणी. सामाश्ब्द-शिष्टाचार; दुराचार; लोकाचार; कुलाचार; सदाचार; आचार-प्राप्त-युक्त-शील-प्रिय-वेत्ता; आचारानुमत-नुरूप इ. [सं. आ + चर्] ॰पद्धति- स्त्री. वागण्याची चालरीत; नेहमींचें आच- रण; वर्तनक्रम; राहाणी. ॰पूत-वान-शुद्ध-संपन्न- वि. १ कुळ- धर्म व कुलाचार व इतर रीतीभाती वक्तशीर व शुद्ध रीतीनें आचरणारा; सद्वर्तनी. २ योग्य; रीतीप्रमाणें. 'केवळ सलगीच्या मनुष्या- बरोबर जरी देवघेव करणें झालें तरी खतपत्र करून करावें, कांकीं कोणताहि व्यवहार आचारशुद्ध असावा.' ॰प्रसिद्ध- वि. लोक- रुढींतील; शिष्टाचाराचा; शिरस्तेवाईक. [सं.] ॰भ्रष्ट-वर्जित- हीन- वि. विहित धर्मकृत्यें न करणारा, न आचरणारा; अनर्गल; बेशिस्त; धर्मलंड; अनाचारी. ॰भ्रष्टी- वि. आचारभ्रष्ट (अशुद्ध. रूप). म्ह॰ आचारभ्रष्टी सदा कष्टी. ॰वाणें- (गो.) अमंगळ; अभद्र. [सं. आचार + विहीन] ॰विचार- पु. शास्त्रविहित असे कुळाचार, धर्माचार, विधि. संप्रदायशुद्ध आयुष्य घालविण्याचे मार्ग, नियम, शिस्त, मर्यादा इ॰; शास्त्रोक्त आचार विचार. 'शहरांत राहिलें असतां तादृश आचारविचार रहात नाहींत.' ॰शील- वि. आचारसंपन्न; सदाचारी. ॰शोधक- वि. सदाचार व अनाचार यांचें परीक्षण करणारा, विवरण करणारा.

दाते शब्दकोश

जीभ

स्त्री. तोंडांतील एक अवयव; रसनेंद्रिय. २ (ल.) नंदीबैलाच्या पाठीवर जिभेच्या आकाराचें चिकटविलीलें कातडें वाढतें तें. ३ जिभेच्या आकाराची वस्तु, भाग. नखाची-डोळ्याची -सापाची जीभ पहा. ४ फोगी; एक प्रकारचें शीड. ५ (व.) रणगाडा किंवा पाळणा याची खालची बाजू. ६ (नाशिक) जिभे- सारखा लांबट पसरलेला फाटा. 'नदीची जीभ लांबवर पसरली आहे.' [सं. जिह्वा; प्रा. जीभ्भा फ्रें; जि. चीव, जीवा] (वाप्र.) ॰काढणें-पदार्थ खाण्यासाठीं आशाळभूतपणा करणें. ॰चावणें- चावलीशी करून बोलणें-भिऊन, संकोच धरून, दबत दबत बोलणें. ॰चुरचुर बोलणें-अयोग्य, अप्रासंगिक, वेडेवाकडें बोलणें. ॰जड असणें-लवकर पाठ करावयाला असमर्थ असणें. जीभ जड होणें पहा. ॰जड होणें-१ (अस्पष्टोच्चारानें) बोलतां न येणें चांगलें शुद्ध बोलतां न येणें. 'लहान मुलांनीं सुपारी खाल्यानें जीभ जड होते.' २ मंदबुद्धि होणें. ॰झडणें- (खोटें वगैरे बोलण्यानें) जीभ कुजून पडणें; वाचा नाहींशी होणें. ॰नरकांत घालणें-पोकळ वचनांनीं, रिकाम्या बढाईनीं वगैरे जीभ बाटविणें; खोटें बोलणें. ॰पाघळणें-गुप्त वार्ता फोडणें; न बोलण्याची गोष्ट, गुप्त गोष्ट बोलणें. ॰बधिर होणें-जीभ जड होणें. ॰मोकळी सोडणें-हवें तसें बोलणें, खाणें; बंधन, नियम न पाळणें. ॰मोडणें-बोबडी वळणें; मुकें बनणें; शब्द न फुटणें. ॰लवलव करणें-चुरचुर चालणें; बोलणें. ॰लांब करून बोलणें- वरिष्ठांशीं अघळपघळ बोलणें; उर्मटपणानें बोलणें. ॰लालचावणें- खाण्यास उत्सुक असणें; पाणी सुटणें. ॰वळवळणें-(लहान मुलानें) बोलण्याचा प्रयत्न करणें; बोलावयास लागणें. २ शिव्या देणें; अद्वातद्वा बोलणें. ॰विटाळणें-जीभ नरकांत घालणें पहा. ॰शिंदळ-निसरडी-स्त्री. वाह्यात, बिन ताब्यांतील जीभ. -वि. फटकळ; शिवीगाळ करणारी. ॰सोकणें-१ चटक लागणें. २ चव येणें (अन्नाची-सरावानें). ॰सोकावणें-तोंड चटावणें. जीभ सोकणें पहा. ॰हातीं धरणें-मन मानेल तसें बोलणें, खाणें. -भेचा पहा-अद्वातद्वा बोलणें, वाचाळता. -भेचा पालट- खाण्यांत बदल; रोजचा खाण्याचा पदार्थ न खातां दुसरा खाणें. -भेचा लोळ-ळा-अतिशय कढत पदार्थ खाल्ल्यानें जीभ भाजून जाणें. जिभेचे फुटाणे फुटणें-फाडफाड बोलणें. (एकाच) जिभेनें साखर किंवा गू खाणें-एकाच वेळी सम्मति आणि असम्मति देणें. बरेवाईट म्हणणें; दोन्हीं प्रकारें बोलणें. -भेला काटा लावणें-एखादी गोष्ट गुप्त ठेवणें. -भेला चिमटा घेणें- बोलणें किंवा खाणें यापासून तोंड आवरणें. -भेला डाग देणें- जीभ ताब्यांत ठेवणें; जीभेला नियंत्रण घालणें. जीभेवर असणें- १ तोंडपाठ असणें. २ अगदीं ताज्या आठवणींत असणें. ३ बोलून टाकण्याच्या तयारींत असणें. -भेस-ला-आडवा-वेढा नसणें-वाह्यात बडबड करणें; निरर्थक प्रलाप काढणें. -भेस- ला आवरून धरणें-निर्बंध घालणें; जीभ आटोक्यांत ठेवणें. भेस-ला-टाचा-देऊन (कांहींएक)ठेवणें-आपण न खातां दुसर्‍यासाठीं गोड पदार्थ राखून ठेवणें. -भेस हाड नसणें- जीभ ताब्यांत नसणें (खोटे बोलणें, शिवीगाळ करणें यांत); खोटें अपशब्द बोलण्याचें भय नसणें. ॰म्ह उचलली जीभ आणि लाविली टाळ्याला = विचार न करतां बोलणें.

दाते शब्दकोश

कूस

स्त्री. १ शरीराची एक बाजू; बरगडीची, कांखेखालची बाजू. २ जठर, गर्भाशय. 'तो तूं देवकीकूंसीचा शेजारीं ।' -शिशु ११२. [स. कुक्षि; प्रा. कुच्छि, कोक्खि; हिं. कोख; गु. कुख; पं. कुक्ख; सिं. कुखि. कुसवा पहा.] ३ (ल.) जागा; अवकाश (खोटें बोलण्यास, फसवण्यास, लबाडीस; गैरमिळकतीस). 'मोजणी झाल्यामुळें शेतांत बेकायदा कूस राहिली नाहीं.' 'चिल्लर खर्च कच्चा लिहिल्यामुळें चिल्लरांत कूस राहिली नाहीं.' 'ह्या भांड्याला कूस आहे.' (सामा.) जागा किंवा अवकाश असा अर्थ. 'पोटभर खाल्लें, पाणी प्यायला कूस राहिली हानीं.' ४ भरलेली जागा; साध- लेली संधि (खोटे हिशेब करून, खर्‍या खर्चापेक्षां जास्त रक्कम खर्ची टाकून, माल जमा करून, दुसर्‍याची व्यवस्था करतांना कांहीं रक्कम गिळंकृत करून इ॰); घेतलेलें माप किंवा केलेला हिशेबयांत फारशी लबाडी अंगीं न लागतां थोडासा कमी-अधिकपणा करणें; थोडी कसर; वर्तवळा. ५ गुरें इ॰ प्रसवल्यानंतर योनिद्वारें निघणारा कुजका अंश. (वाप्र.) ॰भरणें-एखाद्या पदर्थानें पोट भरणें. 'गाईच्या दोन्ही कुशी भरल्या.' ॰घालणें-(कु.) खेळांतील नियम मोडल्याबद्दल खेळगड्यास बाहेर टाकणें. कुशीस होणें- एका अंगावर निजणें. म्ह॰ मांजर करी एकादशी उंदीर मारून भरी कूशी = उपास करणें आणि ओ येईपर्यंत खाणें. समशब्द-॰गोम- भोंवरा-स्त्री. घोड्याच्या कुशीवर असलेली गोम, भोंवरा. हा अशुभ मानितात. ॰निकुरणीचा-निखवणा-धुणीचा- धुवणा-धुणापु. स्त्रीच्या अनेक मुलांपैकीं शेवटचा मुलगा. कुसधुणा पहा. [कुस + निकुरणें = धुणें] ॰फुटप-(गो.) संतति होण्यास सुरवात होणें.

दाते शब्दकोश

नोकर, नौकर

पु. सेवक; चाकर; दास. 'नौकरचे अर्थ नईकर. त्यासी आपण नित्य नई करीत जावी.' -रा ६.६३०. 'इंग्रजी राज्य म्हणजे काय? नोकरांच्या तांड्याचें राज्य.' -टिसू १३२. [फा. नौकर्] ॰इनाम-न. १ सरकारी नोकरासाठीं दिलेला सरंजाम, इनाम, जहागीर. २ देवालय, समाधि यांची पूजा- अर्चा, दिवाबत्ती, झाडसारवण इ॰ चालण्यासाठीं दिलेलें धर्मादाय, देवस्थान इनाम. -गांगा ३९. ॰खाना-पु. नोकरखातें; नोक- रांचा कारखाना, संघ, समूह. 'हुकमी नोकर मिळावे म्हणून ज्या शाळा अथवा नोकरखाने काढले आहेत...' -टि ३.१८३. ॰शाही-स्त्री. १ नोकरांनीं चालविलेली राज्यव्यवस्था; नोकर अधिकार्‍यांचा अंमल, प्राबल्य. २ प्रबल नोकरअधिकारी वर्ग; अरेराव नोकरवर्ग. ३ जुलुमी नोकरसत्ता; जुलुमी जबरदस्तीचा कारभार. (इं.) ब्युराकसी. (हा शब्द लो. टिळकांनीं १९१७ सालीं रूढ केला). ही नोकरशाहीं सत्ता । जनतेची हरिते मत्ता ।' -सन्मित्र समाज मेळा पृ. ५ (१९२९). नोकरीयात-वि. (सरकारी) नोकरी करणारा. 'ज्या नोकरीयात पहिलवानास आखाड्यांत रहाण्याची इच्छा असेल...' -(बडोदें) पहिलवान व कुस्ती नियम ८.

दाते शब्दकोश

कार्य

न. १ काम; उद्योग; कृति; क्रिया. 'तया नांव धनंजया । कार्य पैं गा ।' -ज्ञा १३.९६९. २ परिणाम; क्रिया; योग. 'जे कार्य ना कारण ।' -ज्ञा १५.७८. 'चुन्यावर आसिडाचें कार्य झाल्यास कार्बानिक आसिड वायु बाहेर पडतो.' -पदाव ११. 'तो कार्यावर दृष्टि देतो.' ३ समारंभ; उत्सव. उ॰ लग्नकार्य. ४ (व्या.) विभक्तीचीं रूपें; विकार. ५ फिर्याद; खटला; मुकद्दमा. ६ (वेदांत) अकरा इंद्रियें व पांच विषय. (आनंदगिरीचें मत). ७ (वेदांत) शरीर (पंच ज्ञानेंद्रियें, त्यांचे पांच विषय, मन, बुद्धि व अहंकार). (शांकरभाष्य भगवद्गीता १३.२०.) -वि. करण्यास योग्य. (वाप्र.) ॰उठणें-काम पार पडणें. 'असें झालें असतां... किती कार्यें उठणारीं आहेत पहा!' -नि ४४०. ॰उरकणें-१ काम पार पाडणें. २ (ल.) रतिसंभोग करणें. कार्यावर दृष्टि देणें-आपल्या ध्येयाचा ध्यास घेणें; आपला उद्देश सिद्ध करण्याकडे लक्ष देणें; काम साधणें. -स लावणें-योग्य कामीं उपयोग करणें. 'त्यानें आपला पैका कार्यास लावला.' सामाशब्द:- ॰कर्ता-वि. १ लोकांचीं कामें करण्यांत तत्पर. २ स्वतःच्या हिमतीवर काम तडीस नेणारा. ॰कारणन्याय-पु. हेतु व परिणाम यांच्या संबंधाचा नियम. [सं.] ॰कारणभाव-पु. फल व तदुत्पादक क्रिया यांचा संबंध. 'ज्या दोन गोष्टींचें आनुचर्य दुसर्‍या कोणत्याहि गोष्टीवर अवलंबून नसतें त्या दोहोंत कार्यकारणभाव असतो.' -न्याप ३४. 'घटाचा आणि मृत्तिकेचा कार्यकारणभाव आहे.' ॰कारी-वि. कार्य करणारा; ब्यापर करणारा; तटस्थ नव्हे तो. ॰कुशल-वि. धंद्या मध्यें चतुर, कल्पक. ॰क्रम-पत्रिका-स्त्रीपु. सभेंत व्हावयाचें काम व त्याचा अनुक्रम दाखविणारा कागद. -सभा ७१. (इं.) अजेंडा. ॰त:-क्रिवि. कांहीं कारणासाठीं, उद्देशामुळें. ॰तत्पर-वि. कार्यांत निमग्न. ॰दर्शक दिशा-स्त्री. (यंत्रशास्त्र) प्रेरणा ज्या दिशेंत कार्य करते ती दिशा. -यंस्थि ४. ॰दर्शक बिंदु-पु. (यंत्र- शास्त्र) प्रेरणेचें कार्य ज्या बिंदुस्थळीं होतें तो बिंदु. -यंस्थि ४. ॰प्रयोजन-न. विवाह, मुंज वगैरे समारंभ किंवा सण यांना व्यापक संज्ञा. ॰भाग-पु. १ काम किंवा पत्करलेलें अंगावर घेत लेलें कार्य; करावयाचें काम; साधावयाचा उद्देश. (क्रि॰ करणें; उरकणें; उचलणें; लोटणें.) २ कामाचा अंश, भाग. ॰भार-पु. १ अंगावर घेतलेलें कामाचें ओझें; जबाबदारी; जोखीम. २ काम; व्यवस्था; कारभार. [सं.] ॰लोभी-वि. कार्यसाधु; काम साधून घेणारा. 'न घालिन भिडेस मी जरिही कार्यलोभी तिला ।' -केका १०. ॰वादी-वादु-साधु-वि. कोणीकडून तरी आपलें कार्य साधण्यासाठीं गोड बोलणारा. ॰वाह-ही-पु. व्यवस्था- पक; जबाबदारीनें कार्य करणारा; संस्थेचा चिटणीस वगैरे. ॰व्यग्र-व्याकुळ-व्यावृत्त-वि. हातांत घेतलेल्या कामानें बेजार झालेला; अडचणींत आलेला; वेढलेला. ॰शरीर-न. कारणशरी- राच्या अनुषंगानें योजावयाचा शब्द; स्थूल शरीर. ॰संपादन- साधन-न. कामाचा उरक; काम तडीस नेणें; काम साधणें, सफल करणें. ॰सिद्धि-स्त्री. शेवटास नेलेलें काम; फलसिद्धि; कामाची पूर्णता. ॰क्षम-वि. काम करण्यांत हुषार; निपुण; प्रवीण; कामाला प्रसंगीं उपयोगी पडणारा; काम करण्यास समर्थ, योग्य. [सं. कार्य + क्षम = समर्थ]

दाते शब्दकोश

मागें-घें

क्रिवि. १ गतकालीं; पूर्वी; अगोदर. २ पाटी- कडे; पार्श्वभागीं.' तो माझ्या मागें उभा होता.' ३ नंतर; पश्चात्. 'माझ्या मागें मुलांचें कसें होईल याची मला काळजी वाटतें.' ४ (ल.) वर अवलंबून. 'माझ्या मागें हजार कामें आहेंत.' [सं. मार्ग् = शोधणें] म्ह॰ १ पुढें पाठ मागें सपाट. २ मागें एक पुढें एक-पुढें एक बोलणें आणि मागें विरुद्ध बोलणें, करणें, बोलणें व कृति यांत फरक असणें. 'मागें येक पुढें येक । ऐसा कदापि नाहीं दंडक ।' -दा १९.४.१८. ॰घेणें-फिरणें-सरणें- होणें-हटणें-उलट खाणें; परावृत्त होणें; सोडून देणें. 'मी हें काम पथकरलें तें पथकरलें, आतां मी मागें घ्यावयाचा नाहीं.' ॰टाकणें-१ (पैसा इ॰) शिल्लक ठेवणें. २ भीतिग्रस्तास पाठीशीं घालणें. 'मला द्यावें जीवदान टाकावें मागें ।' -ऐपो १५९. ॰पडणें-१ खर्च न होतां शिलकेस राहणें; गांठी पडणें (द्रव्य). 'काटकसरीनें खर्च करा म्हणजे चार पैसे मागे पडतील.' २ साफ बरा होणें; निखालस जाणें (दुखणें, त्रास). 'माझी पोट- दुखी अगदी मागें पडली.' ३ आठवणींतून आणें. 'आमच्या बरोबर फिरावयास या, म्हणजे तुमच्या आईच्या मरणाचें दुःख मागें पडेल.' ४ रद्द होणें; मोडणें. 'हा नियम आतां मागें पडला.' ५ प्रगति कमी होणें. 'रामा महिनाभर आजारी होता म्हणून मागें पडला.' ६ फिक्के पडणें; महत्त्व कमी होणें. 'मिरजकर- बुवांच्या कथा पुण्यास सुरू होतांच इतर सर्व हरिदास मागें पडलें.' ॰पाडणें-(मिळकत, वेतन इ॰कांतून) शिलकेस टाकणें; संग्रही टाकणें. ॰राहणें-पिछाडीला असणें; लोकांपुढें, प्रसिद्धीस न येणें. ॰लागणें-(एखाद्याचा) पिच्छा पुरविणें. तगादा लावणें. ॰पाय- वि. पिशाच्चयोनी. 'तुका म्हणें मागें पाय । तया जाय स्थळांशीं । -तुगा ६५८. मागें पुढें-क्रिवि. १ आजूबाजूस. 'मागेंपुढें पाहून चाल, दांडग्यासारखा चालूं नको. २ दोन्ही दिशांकडे, गोष्टींकडे; दोन्हीपक्षी. (शब्दशः व ल). 'मागेंपुढें पाहून काय करणें ते कर.' ३ लवकर किंवा उशिरां; आगेंमागें; केव्हांना केव्हां. 'तुम्ही असें करतां परंतु मागेंपुढें जाचील.' ४ अस्ताव्यस्तपणें; व्युत्कमानें (पड- लेल्या वस्तू; बोललेल्या, केलेल्या गोष्टी). 'हा ग्रंथ मागेंपुढें झाला आहे, नोट कर.' ५ काकूं, टंगळमंगळ करून. 'हा मागेंपुढें करूं लागला.' ६ केव्हां तरी; कधी तरी; आणखी एखाद्या वेळेस; पुढच्या किंवा मागच्या बाजूस. ॰करणें-माघार घेऊं लागणें; कांकू करणें. ॰कोणी नसणें-वडील माणूस किंवा संतति नसणे; आईबाप, बायकापोरें याशिवाय असणें. ॰न पाहणें-मुळींच न कचरणें. 'मला चोर भेटले तेव्हां मी मागेंपुढें न पाहतां त्यांच्या अंगावर तुटून पडलो.' ॰पाहून वागणें-दूरवरचा विचार करून, शहाणपणानें चालणें. मागमोरा(मोहरा)-वि. पाठमोरा. [दे.] मागोमाग-क्रिवि. लागलीच; पाठोपाठ. [मागें द्वि.] मागोती, मागौता, मागौतिआं, माघौति-क्रिवि. १ पुन्हां. 'तो दैववशें मागौता । जळेंचि लाहें ।' -ऋ ६२. 'मागौतिआं निग लिआ । पवनवेगें ।' -शिशु ९०८. 'माघौति न यों सर्वथा ।' -भाए ३२३. २ माघारी; परत. 'स्वंयवरा आली उर्वशी । ते मागैति पाठवीलि साधुसीं ।' -शिशु २०२ [मागें]

दाते शब्दकोश

पेटी

स्त्री. १ संदूक; वस्तु बंदोबस्तानें ठेवण्याचें लांकडाचें आच्छादनसहित साधन; लहान पेटारा. २ पुरुषाच्या मणगटा- वर; दंडावर बांधावयाचें एक भूषण. ३ बायकांचा गळ्यांतील एक जडावाचा, लहान लहान पेट्या असलेला दागिना; चिंचपेटी. ४ फटाक्यांच्या सराचें बंद पुडकें. ५ दगडी जोत्याचा मधला थर, बेंदरी व पाटथर यांमधील लहान थर. ६ बालातंगी; तंगी धोड्याच्या पोटाखालून ध्यावयाचा खोगीर आवळण्याचा पट्टा. ७ कमरेपासून खांद्यापर्यंतचें चिलखत; जाकीट. ८ गाडीच्या दांड्या ज्यांत बसवितात तो व गाडीच्या कण्यावर असलेला पेटीच्या आका- राचा लांकडी भाग. ९ नदींतून तरण्याचा तराफा; सांगड. 'पेटी आणायासी गेले तेव्हां ।' -रामदासी २.२८. १० (कों. नाविक) परमाणाचे तुकडे मध्यभागीं ज्या ठिकाणीं कांड बांधतात, त्या ठिकाणीं विशिष्ट पद्धतीनें सांधतात तें सांधकाम. ११ (विणकाम) सुताचे थोक एकत्र बांधलेलें बंडल; पुडकें; जितक्या नंबरचें सुत असेल तितके थोक त्या नंबरच्या सुताच्या पेटींत असतात. १२ (ल) खजीना. 'सबळ जनक माझा राम लावण्यपेटी ।' -स्तोत्र- माला-रामदास, करुणाष्टक १. १३ बाजाची पेटी; (इं.) हार्मो- नियम. १४ (ल.) समूह; समुदाय. 'तयातें इंद्रियबैलांची पेटी । न म्हणे अवसीं पाहाटीं ।' -ज्ञा १३.२९.[सं. पेटक; हिं. पेटी] ॰वाला-पु. हार्मोनियमची पेटी वाजविणारा. पेटी(टीं)ची, साखर-स्त्री. एक प्रकारची मऊ, पिठीसाखर, ही चीनमधून पेटीं- तून येते पेटु(टू)ळ-न. लहान पेटी. [पेटी]

दाते शब्दकोश

यथा

अ. १ जसा-शी-सें; ज्या प्रमाणें. 'यथा राजा तथा प्रजा.' २ या शब्दाचा पुष्कळ संस्कृत शब्दांशीं समास होतो. तेथें याचा अर्थ त्या त्या प्रमाणें, त्याचें उल्लंघन न करितां असा प्रायः होतो व तो शब्द क्रियाविशेषण होतो. अशा तऱ्हेचे कांहीं सामासिक शब्द पुढीलप्रमाणें. [सं.] ॰कथंचित्-अ. १ कसा तरी; कांहीं झालें तरी; चांगल्यावाईट किंवा योग्य अयोग्य मार्गानें. 'त्यानें दिवसभर खपून लिहिलें तर यथाकथंचित् दोनशें ग्रंथ लिहील. ' २ यथाकदांचित्; यदाकदाचित्, कदाचित् कदाचित्; जर शक्य झालेंच तर; शेंकडा एक शक्यतेनें; जगदीं पराकाष्ठेनें. 'एवढा उद्योग उभा राहणें दुर्घटच, पण यथाकथंचित् तो राहिलाच तरी त्यास सहाय्य मिळण्यासारखें नाहीं. ' -नि १११. ॰कथा-क्रिवि. १ योग्य रीतीनें; जसें पाहिजे त्याप्र- माणें; म्हटल्या-सांगितल्या बरहुकूम. २ (विरू.) फार झालें तर; कदाचित्; चुकून. ॰काम-क्रिवि. इच्छेप्रमाणें; मनाजोगें. ॰कामी-कामिनी-पुस्त्री. वि. आपल्या इच्छेनुरूप वागणारा-री; स्वेच्छाचारी; आपल्या मनाप्रमाणें करणारा-री. ॰काल-लीं- ळीं-क्रिवि. योग्यवेळीं; नियमित कालीं; हंगाम साधून. 'पेरणी यथाकालीं झाली म्हणजे पीक चांगलें येतें. '॰क्रम-क्रमें- क्रमानें-क्रिवि. १ क्रमानुसार; क्रमवार; क्रमानुरूप; अनुक्र- मानें; ठरलेला क्रम न सोडतां; ओळीनें. २ शिस्तींत; नियमानें, नियम किवा रीत यांना न सोडतां. ॰गम-क्रिवि. शास्त्रानुसार; यथाशास्त्र; शास्त्रोक्त; शास्त्रांत सांगितल्याप्रमाणें. 'ऐसें कर्म- भेदें मुदलें । फळसुखही त्रिधा जालें । तें हें यथागमें केलें । गोचर तुज ।' -ज्ञा १८.८१०. [यथा + आगम] ॰जात-वि. १ जन्म ल्याप्रमाणें; जसा जन्मला तसा. २ मूर्ख; खुळा; वेडपट इ॰ सूचित अर्थी. ३ स्वभावतः; निसर्गसिद्ध; स्वाभाविक. ॰तथा-अ. कसा तरी; कष्टानें; जेमतेम. 'संसार यथातथा चालला. '॰तथ्य- क्रिवि. जसें असेल तसें; खरें; खरेपणानें. ॰तृप्त-तृप्ति-क्रिवि. भरपूर; मनसोक्त; पाहिजे तितकें. ॰यथाशक्ति-क्त्या, यथानुशक्ति-क्त्या-क्रिवि. शक्तीप्रमाणें; सामर्थ्यानुरूप; एखा- द्याच्या कर्तृत्वाप्रमाणें. [यथा + अनु + शक्ति] ॰निगुती-क्रिवि. यथार्थत्वानें; यथार्थपणें; योग्य रीतीप्रमाणें; यथायोग्य; स्पष्ट. 'ऐक बापा परीक्षिती । तूं तंव सुखाची सुखमूर्ती । भीमकी पाणिग्रहणस्थिती । यथानिगुती सांगेन । ' -एरुस्व १.९. यथानु- क्रम-में, यथानुक्रमानें-क्रिवि. यथाक्रम पहा. ॰न्याय-क्रिवि. न्यायास नीतीस धरून; न्याय्य रीतीनें; योग्यपणें. ॰पद्धति- त-क्रिवि. रीतसर; पद्धतीप्रमाणें; वहिवाटीला अनुसरून. [सं.] ॰पूर्व-क्रिवि. पूर्वींप्रमाणें; पहिल्यासारखें, पूर्ववत्. 'कुपथ्य होतांच दुखणें पुन्हां यथापूर्व झालें. '[सं.] ॰प्रति-त-क्रिवि. मूळ प्रतोप्रमाणें. [सं.] ॰बुध्दि-मति-क्रिवि. आपल्या बुद्धी- प्रमाणें; आपल्या बुद्धीच्या कुवताप्रमाणें; आपल्या ज्ञानाप्रमाणें. यथाभिमत-क्रिवि. इच्छेप्रमाणें; कल्पनेप्रमाणें आपल्या योजनेस अनुसरून. [यथा + अभिमत] ॰मार्ग-क्रिवि. योग्य मार्गानें; नीतिनियमांस धरून; खऱ्या मार्गानें; योग्य प्रकारें. ॰यथा- क्रिवि. १ जसजसा; जसा जसा. तथातथा शब्दाबरोबर प्रयोग. 'यथायथा चंद्रादिक ग्रह येतात तथातथा जप करावा. ' २ कसेंतरी; सरासरी; जितक्यांस तितकें; बेताबाताचें; अल्प. ' त्याचें गणित- ज्ञान म्हणजे यथायथाच आहे.' ॰युक्त, योग्य-क्रिवि. जसें असावें तसें; योग्य तऱ्हेनें; बरोबर रीतीनें; रास्त. ॰रीति-रीत- क्रिवि. रीतीप्रमाणें; रूढीनुसार; प्रचाराप्रमाणें; वहिवाटीस अनु- सरून. [सं. यथा + रीति] ॰रुचि-क्रिवि. आवडीप्रमाणें; इच्छे- प्रमाणें; मनाप्रमाणें. 'दिधलें भोजन यथारुचि । ' -एरुस्व ३.२५. यथार्थ-क्रिवि. १ बरोबर; खरें; जसें घडलें त्याप्रमाणें; वास्त- विक योग्य रीतीनें. 'किंबहुना प्रियपणें । कोणतेंही झकवूं नयें । यथार्थ तरी खुपणें । नाहीं कवणा । ' -ज्ञा १६.१२०. २ अन्वर्थ; नावांप्रमाणें; शब्दाप्रमाणें. उदा॰ भूपाल, जलधि, आतपत्र. हे शब्द यथार्थ होत, कारण प्रत्येक शब्दावरून आपणास त्या शब्दवाचक वस्तूचें वर्णन किंवा माहिती कळते. [यथा + अर्थ] यथार्थबुध्दि-स्त्री. निःपक्षपाती बुद्धि; मनाची समता. -नि ५८३. यथार्ह-क्रिवि. योग्यतेप्रमाणें; शोभेसें. [यथा + अर्ह] ॰लाभ-क्रिवि. मिळकतीप्रमाणें; फायद्याप्रमाणें; उत्पन्नाप्रमाणें. यथावकाश, यथावकाशें-क्रिवि. सवडीप्रमाणें; फुरसतीनें. [यथा + अवकाश] यथावत-क्रिवि. यथायोग्य; जसें आहे तसें 'तसें समस्तही श्रुतिजात । ठाके लाजलें ऐसें निवांत । तें मीचि करी यथावत । प्रकटोनिया । ' -ज्ञा १५.४३५. [सं. यथावत्] यथा- वसर-क्रिवि. प्रसंगानुसार; वेळ सांपडेल त्याप्रमाणें. [यथा + अवसर] ॰विधि-क्रिवि. नियमानुसार; शास्त्रांतील विधींत सांगि- तल्याप्रमाणें; विधीचें उल्लंघन न करितां. ॰विभव-क्रिवि. ऐपती- प्रमाणें; सामर्थ्यानुरूप; मिळकतीला धरून. ॰विभागें-क्रिवि. विभागाप्रमाणें; वांटणीप्रमाणें; हिश्शाप्रमाणें. ॰वृत्त-क्रिवि. घड- ल्याप्रमाणें; जसें झालें तसें; खरेपणानें. ॰शक्ति-क्रिवि. आपल्या शक्तीप्रमाणें; ऐपतीनुसार; कर्तृत्वानुसार. यथांशतः-क्रिवि. वांटणी- प्रमाणें; योग्य प्रमाणानें; निरनिराळ्या हिश्शांप्रमानें; हिशोबानें. [यथा + अंशतः] ॰शास्त्र-क्रिवि. शास्त्रांत सांगितल्याप्रमाणें; शास्त्रमर्यादा न उल्लंघिता. ॰श्रुत-क्रिवि. १ ऐकल्याप्रमाणें; ऐक- लेल्या गोष्टीबरहुकूम. २ जसें शिकला त्याप्रमाणें; आपली बुद्धि न चालवितां फक्त गुरूनें पढविल्याप्रमाणें. ३ काव्याचा अर्थ लाव- तांना फक्त पदांचा अर्थ दिसतो त्याप्रमाणें; यौगिक अर्थानें; व्यंगार्थ लक्षांत न घेतां.' -मभाको ॰संख्य-क्रिवि. संख्येप्रमाणें; यथानु- क्रम; क्रमानें. [यथा + संख्या] ॰संप्रदाय-क्रिवि. संप्रदाया- नुरूप; सामान्य रीतीप्रमाणें; पद्धतीप्रमाणें. ॰संभव-क्रिवि. १ शक्यतेप्रमाणें; अंदाजाप्रमाणें. २ ऐपताप्रमाणें; साधनानुकूलतेप्रमाणें. ॰सांग-क्रिवि. पूर्णपणें; कांहीं न्यून न ठेवतां; कोणतेहि गोष्ट कमी न करतां; अंगोपांगासहित शास्त्रांत सांगितल्याप्रमाणें. 'येथा- सांग रे कर्म तेंही घडेना । घडे धर्म तों पुण्य गाठीं पडेना ।' -राम १००. [यथा + स + अंग] ॰सामर्थ्य-क्रिवि. शक्तीप्रमाणें; यथा शक्ति; कर्तबगारीला साजेसें; ऐपतीप्रमाणें. ॰सुख-क्रिवि. समा धानानें; शांततेनें. ॰सूत्र-क्रिवि. सूत्राप्रमाणें; तंतोतंत त्याप्रमाणें; अगदीं बरोबर तसें. ॰स्थानीं-क्रिवि. योग्य स्थळीं; योग्य ठिकाणीं; उचित जागेवर. [यथा + स्थान] ॰स्थित-क्रिवि. १ कालानुरूप; परिस्थितीप्रमाणें. २ भरपूर; यथेच्छ; रगड; पुरेपूर; पूर्णपणें; जितकें पाहिजें असेल तितकें. 'आज भोजन यथास्थित मिळालें. '३ जसें होतें तसें; यथायोग्य. 'पोथी नीट यथास्थित बांधून ठेव; नाहींतर भिजेल.' ४ पूर्वकुशलावस्था न पालटतां; पूर्वाप्रमाणें. 'आजपर्यंत इकडील वर्तमान यथास्थित जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें.' ॰ज्ञान-ज्ञानें-क्रिवि. यथामति; ज्ञानाप्रमाणें; एखाद्याच्या समजुतीप्रमाणें. [सं. यथा + ज्ञान] यथेच्छ, यथेच्छा, यथेष्ट-क्रिवि. १ भरपूर विपुल; इच्छेला येईन तसें, तितकें; इच्छेप्रमाणें. 'यथेष्ट पुरतें जरी प्रथम दाम कां साधिती । ' -केका ८७. २ स्वैर; मन मानेल तसें; अनिर्बंधपणें; अनिर्बंध. [यथा + इच्छा; यथा + इष्ट] यथेष्टाचार-पु. मनसोक्त वर्तन; स्वैराचार; अनिर्बंधता; बेछुट वागणूक. [यथा + इष्ट + आचार] यथेष्टाचारी-वि. स्वैराचारी; मन मानेल तिकडे भटकणारा; वाटेल तसें वागणारा. यथेप्सित-क्रिवि. १ इच्छेप्रमाणें; इच्छिल्या- प्रमाणें. २ स्वैरपणें; स्वतंत्रपणें; आपल्या कल्पनेप्रमाणें; वाटेल तसें. [यथा + ईप्सित] यथोक्त, यथोदित-क्रिवि. म्हटल्याप्रमाणें; बोलल्याप्रमाणें; वर्णन केल्याप्रमाणें; दाखवून दिल्याप्रमाणें; आज्ञा केल्यप्रमाणें. [यथा + उक्त, उदित] यथोचित-क्रिवि. योग्य दिसेल तसें; लायकीप्रमाणें; अनुरूप. [यथा + उचित] यथोप- पन्न-क्रिवि. शक्तीप्रमाणें; ऐपतीप्रमाणें; प्राप्प्तीप्रमाणें. 'यथोपपन्न खर्च-दान-भोग-वर्तन-वैभव-खाणें-पिणें' इ॰ [यथा + उपपन्न]

दाते शब्दकोश

गुरु

पु. १ मंत्रोपदेशक. २ धार्मिक उपाध्याय. धार्मिक संस्कार इ॰ करणारा. ३ उपनयन संस्कारामध्यें गायत्र्युपदेश करणारा. ४ शास्त्रें इ॰ शिकविणारा; विद्यादाता. 'सकोप दिसती गुरु क्षणभरीच जे तापले ।' -केका ८८. (यावरून) ५ (ल. निंदार्थीं) फूस, भर, प्रोत्साहन देणारा वाईट मसलत देणारा माणूस. ६ पिता; बाप; पूज्य, वडील माणूस. 'गाति जनमे- जया तव गुरुच्या आश्चर्य मरण जननाचें ।' -मोअश्व ४.८०. ७ या नांवाचा ग्रह. ८ बृहस्पति; देवांचा गुरु. 'वृत्रारिप्रति वदला गुरु ज्या या भद्रधामनीतीतें । -मोसभा ६.७०. (सामा.) शिक्षक; मास्तर; आचार्य. ९ -संबोधन. अहो । लब्धप्रतिष्ठित; बोवाजी! म्ह॰ गुरूची विद्या गुरूस फळली-भोंवली = लोकांस फसविण्याची युक्ति ज्याला शिकविली त्यानेंच याला (शिक- विणाराला) फसविलें. सामाशब्द-॰किल्ली-स्त्री. १ न समज- णारें, खोल, गूढ लिखाण, प्रबंध, मंत्र (गुरूनें सांगितल्याखेरीज न समजणारें). २ (सामा.) गूढ; कठिण गोष्ट, शंका. ३ खुबी; मख्खी; मर्म (कुलंगड्याचें); गूढ उकलण्याची युक्ति. 'प्रकरण जरा जड आहे, पण तुझ्यापासून तिला नरम करण्याची गुरु- किल्ली आतां शिकलोंच आहे.' -त्राटिका [गुरु + किल्ली = फक्त गुरूलाच चालवितां येणारी किल्ली] ॰कुल-न गुरूचें कुटुंब. २ गुरूनें विद्यार्थ्यांना पुत्रवत् मानून, त्यांचे खाणें, पिणें, विद्याभ्यास इ॰ सर्व सोय लावणारी पाठशाळा; प्राचीन आश्रम- पद्धति.[सं.] ॰कृपा-स्त्री, गुरूची मर्जी, आशीर्वाद. 'गुरुकृपा संपादन केली असतां विद्या लवकर येते.' ॰क्रम-पु. गुरुपरंपरा- गत, अधिकृत शिक्षण. [सं.] ॰गम्य-वि. ज्याच्या समजुतीस गुरु लागतो असें; गुरुकिल्ली लागणारें; दुर्बोध; गहन (श्लोक, वचन ग्रंथभाग). गम्य पहा. 'कां गुरुगम्य हन ठाय ।' -ज्ञा ६. ४५९. [सं.] ॰जन-पु. पूज्य, माननीय व्यक्ति; वडील माणसें. 'कशि गुरुजनीं सतीची शिवला ज्या कुमुदिनीस अस- दर्क ।' -मोसंशयरत्नमाला १३. (नवनीत पृ. ३५०). वडील- धारीं माणसें; मनाची मंडळी. ॰जनसभा-स्त्री. १ (ख्रि.) युनायटेड चर्च ऑफ नॉर्दर्न इंडियाच्या एका विशिष्ट क्षेत्रांतील चर्चेसच्या आचार्य व प्रातिनिधीक वडिलांची सभा. २ इंग्लंडचे चर्चच्या एखाद्या पांढरीच्या आचार्याची व मंडळीच्या अनेक कामांत त्याची मदत करणारांची प्रातिनिधिक सभा. हे सहाय्यक वडीलच असावेत असें नाहीं. गुरुजी-पु. गुरु; शिक्षक; आचार्य; पुरोहित. गुरुतल्पग-तल्पी-पु. १ गुरुपत्नीशीं गमन करणारा २ (ल.) मातेसमान स्त्रीपाशीं गमन करणारा; माहापापी; नीच. [सं. गुरु + तल्प + ग] ॰दक्षिणा-स्त्री. विद्या संपल्यानंतर शिष्यानें गुरूस द्यावयाची देणगी, संभावना; शिकण्याची फी. [सं.] ॰द्रव्य-न. आपल्या गुरूची मालमत्ता. (समासांत) गुरुद्रव्यहरण- साधन-अपहार-अभिलाष. [सं.] ॰द्रोह-पु. गुरूचा द्वेष; गुरूचा गुन्हा करणें; गुरूचा विश्वासघात. [सं.] ॰द्रोही-वि. गुरूचा द्वेष करणारा; गुरूशीं वैर करणारा. 'मित्रद्रोही गुरुद्रोही । विश्व- द्रोही देवद्रोही ।' [सं.] ॰द्वार-न. शीखांच्या गुरूंनीं स्थापन केलेलें देऊळ. (सामा.) शिखांचें देऊळ. ॰परंपरा-स्त्री. आपला गुरु, गुरूचा गुरु, त्याचा गुरु असा गुरूचा वंश. ॰पीठ- न. गुरूचें राहण्याचें ठिकाण; गुरूची गादी. [सं.] ॰पुत्र-पु. १ गुरूचा मुलगा. २ साधुसंतांमध्यें वाढलेला व त्यांच्याप्रमाणें वागणारा; सत्पुरुषानें उपदेश केलेला; साधु; शिष्य. [सं.] ॰पुरुष-पु. नवरा; पति. 'व्रतोपवास करावा । गुरुपुरुष निरो- पानें ।' -गुच ३५.८७. [सं.] ॰पूजा-स्त्री. १ कार्यारंभीं राशीस प्रतिकूल असल्यास करावयाची बृहस्पतीची पूजा. २ स्वगुरूची पूजा. ॰पौर्णिमा-स्त्री. आषाढी पौर्णिमा, यादिवशीं आपला मंत्रोपदेशक गुरु, संन्यासी इ॰ ची पूजा करतात. [सं.] ॰प्रचीति-स्त्री. १ गुरूची पारख, गुणदोष परीक्षा. २ गुरूचा अनुभव (बरा-वाईट) येणें. [सं. प्रतीति] ॰प्रसाद-पु. १ गुरूची कृपा. २ गुरूच्या आशिर्वादाचें फल (विद्या, कौशल्य, भरभराट इ॰). ३ (ल.) भांग; अफू; तंबाखु. [सं.] ॰बंधु-पु. १ एकाच गुरूचें दोन किंवा अनेक शिष्य, ते परस्पर. २ सहा- ध्यायी. ३ स्वतःच्या गुरूचा पुत्र. [सं.] ॰मंडली-गुरु करणें. (महारांच्या जातींत)-बदलापूर १७५. ॰मंत्र-पु. १ गुरूनें सांगि- तलेला धार्मिक उपदेश; गुरूनें उपदेशिलेला मंत्र. २ (ल.) बरी- वाईट सल्ला, मसलत; गुप्त शिकवण (बहुतेक वाईट अर्थानें.) (क्रि॰ देणें; शिकविणें; सांगणें; म्हणणें). [सं.] ॰मार्ग-पु. गुरूनें उप- देशिलेल्या मंत्रासंबंधीं जपादि विधि. [सं.] ॰मुख न. अध्यय- नाच्या प्रसंगीं गुरूच्या मुखांतून वाक्य निघणें; प्रत्यक्ष गुरूचा उपदेश, शिकवण. 'ही माझी विद्या ऐकीव आहे, हिला गुरुमुख नाहीं.' [सं.] ॰शाप-पु. गुरूनें रागानें काढलेलें वचन; गुरुनें दिलेला शाप. [सं.] ॰शिक्षा-स्त्री. १ अभ्यासाविषयीं गुरूनें लावून दिलेले नियम; गुरूची शिकवण. २ नियम वगैरे मोडल्याबद्दल गुरूनें दिलेला मार. [सं.] ॰संप्रदाय-पु. १ गुरुमार्ग पहा. २ विशिष्ट गुरूचे अनुयायी लोकांचा आचार, परं- परा वगैरे. ॰संप्रदायी-वि. १ गुरुमार्गी. २ विशिष्ट गुरूचे अनुयायी (लोक, जमाव, संघ). ॰स्मरण करणें-कार्यास प्रारंभ करणें. गुरूपदेश, गुरोपदेश-पु. गुरूनें दिलेला मंत्र.

दाते शब्दकोश

अमल

पु. १ अधिकार; स्वामित्व; सत्ता; राज्य; ताबा; हुकूम. २ बजावणी; निवाडा लागू करणें; कृतींत आणणें. 'पुढे अमलांत येईल ते मागाहून विनंती लिहूं ' -दिमरा १.३७. ३ कैफ; निशा; औषधाचा पगडा. 'दारूच्या अमलांत झमाझम उडूं लागल्या तल- वारा' -ऐपो ३२४. ४ पदार्थांतील कैफ आणणारा गुण. ५ दारू, गांजा वगैरे कैफी पदार्थ. 'रुक्यादोरुक्याचा अमल सेउनि' -दावि ४५२. ६ सुभा, मामला इ॰ जागा; हुद्दा; अधिकार. ७ (अमीन अप.) जमीनीचा सारा वसूल करणारा सरकारी अधिकारी, कले- क्टर; ह्यावरून सध्यां खेड्यांतील सारावसुलींतील एक हक्क. ८ वेळ; काळ. 'साखरा वांटून दीड प्रहरचे अमलांत तोफांचे बार पांच कर- विले.' -ख ११.५६९६. 'साठीच्या अमलांत.' [अर. अमल्] ॰करणें-मादक पदार्थ खाऊन कैफांत गुंग होणें; दारू वगैरे घेणें. -च्या जोरानें-अधिकारामुळें प्राप्त झालेल्या सत्तेनें. -त आणणें- १ (निवाडा, ठराव, हुकूम वगैरे) लागू करणें. २ (गांव किंवा देश वगैरे) आपल्या सत्तेखालीं आणणें; ताब्यांत घेणें. ॰गाजविणें- अधिकार चालविणें. ॰कलम-न क्रियालेख. 'बोलण्यांत गोष्टी आल्या असतील, परंतु दस्तैवज अथवा वचन, शपथ, क्रिया, अमलकलम असें कांहीं नाहीं.' -रा ५.१५. ॰गव्हाण-न. ताबेगहाण (नजर गहाणाच्या उलट) ॰दस्तूर पु. नियम; कायदा; वट्टहुकूम; शासन. ॰दार-पु. अधिकारी; अखत्यार असलेला सरकारी नोकर; सुभेदार; मामलेदार वगैरे. [अर. अमल + फार. दार]. ॰दारी-स्त्री. अंमलदाराचें काम -हुद्दा. ॰बजावणी-स्त्री. कार्य घडवून आणणें; अधिकार वर्तविणें; अमलांत आणणें; (हुकुमा) प्रमाणें वर्तन करणें; अनुरूप वागणें. '(रामकालीन) राजा हा फक्त अंमलबजावणी करणारा अधिकारी असून तो प्रजेच्या नियंत्रणाखालीं असे.' -मसाप २.११२. ॰मस्त-वि. सत्ता असल्यामुळें मगरूर बनलेला. ॰मस्ती- स्त्री. सत्तेचा गर्व; ताठा.

दाते शब्दकोश

शोध

पु. १ धुंडाळणें; हुडकणें; पहाणें. २ चौकशी; तपास; विचारपूस. ३ परिक्षा; निरीक्षण; बारकाईनें पहाणें. ४ चौकशी; तपास वगैरेचा निकाल, फळ, परिणाम; निरीक्षणापासून बनलेला निश्चय. ५ चुकीची दुरुस्ती; गाळलेला मजकूर घालून केलेली शुद्धि; गळलेला अगर चुकीचा शब्द सुधारून समासांत लिहि- ण्याची क्रिया. 'कोठें कांहीं कोठें कांहीं । शोध ठायीं स्थळासीं ।' -तुगा २६२०. ६ शुद्ध करणें; स्वच्छ करणें; दुरुस्त करणें वगैरे. शोधन पहा. [सं. शुध् = शोधण, शुद्ध करणें] शोध ठेवणें-लक्ष्य ठेवणें, चौकशी करणें, तपास करणें; विचारपूस करणें; नजर ठेवणें. शोधक-वि. १ चौकस; शोधणारा; हुडकणारा; धुंडाळणारा. २ तपास, चौकशी करणारा; नजर ठेवणारा. ३ शुद्ध करणारा; दुरुस्त करणारा. 'जे यावाचूनि सोधक आन नसे ।' -ज्ञा १८. १३८. ४ (गणित) बाद करावयाचा, ऋण (अंक). शोधणूक- स्त्री. शोध; तपास; परिक्षा. शोधणें-उक्रि. १ धुंडाळणें; हुड- कणें; शोध करणें. 'मग तळवे तळहाती शोधी ।' -ज्ञा ६.२३२. २ चौकशी, तपास करणें; निरीक्षण करणें; परिक्षा करणें. 'जाणोनि शोधावीं चित्रें' -दा । ११.१०.२२. ३ शुद्ध करणें; निर्मल करणें. 'तुझ्या बहुत शोथिले अघनिधि...।' -केका ३. ४ दुरुस्त करणें; चुका काढून टाकणें; निर्दोष करणें. शोधन-न. १ शद्धि; स्वच्छ, शुद्ध, पवित्र, निर्मल करणें. २ (गणित) वजा- बाकी. ३ ऋणादानच कर्जफेड. ४ जखम धुण्याची क्रिया. शोध- नीय-वि. शुद्ध करावयाचा; पवित्र करावयाजोगा. शोधपत्र- पत्रक-न. शुद्धिपत्र; ग्रंथांतील शुद्धाशुद्ध दाखविणारें पृष्ठ. शोधा- मणी-स्त्री. (बडोदें) १ कागदपत्र वगैरे शोधण्याची क्रिया. २ पूर्वींचे कागदपत्र शोधण्याकरितां द्यावा लागणारा पैसा, शुल्क; फी. 'नकला मागण्याचे अर्जाबरोबर येणारी शोधामणी...' -कला- वंतखातें नियम. शोधारणें-सक्रि. शुद्ध करणें 'पाठीं सात्विकें धीरेंतेणें । शोधारलीं तिथें करणें ।' -ज्ञा १८.१०१८. शोधित- शोधीव-वि. शुद्ध, स्वच्छ केलेलें. 'आतां जे कां अमायिक । शोधितसत्त्वाचे सात्त्विक ।' -एभा ३.३३०.

दाते शब्दकोश

शिष्ट

वि. (शब्दशः) शिस्तीचा; व्यवस्थित; नियमित; ऋजुमार्गी; नियमाप्रमाणें चालणारा; शिक्षित. (रूढ) विद्वान्; सभ्य; संभावित. २ उत्कृष्ट; वरिष्ठ; श्रेष्ठ; आदरणीय; पूज्य. ३ उर्वरित; राहिलेला; वाकीचा; शेष. उदा॰ यज्ञशिष्ट; हुतशिष्ट. 'हें शिष्ट मद्धन म्हणे धर्मात्मा भावितें चुकेल कसें ।' -मोसभा ४.५२. [सं. शिष्] म्ह॰ शिष्टागमने अनध्यायः संभावित, पूज्य लोक आले असतां आपला व्यवसाय बंद, बाजूला ठेवावा. ॰मंडळ-न. प्रेषित किंवा प्रतिनिधीमंडळ. विनंति करण्याकरिता, भेट घेण्याकरितां, शिष्टाई करण्याकरितां पाठविलेली मंडळी. (इं.) डेप्यूटेशन. ॰संप्रदाय-पु. संभाविता, श्रेष्ठ, पूज्य लोकांची रीत, मार्ग, पद्धति, वागणूक, चाल. ॰सभा-स्त्री. श्रेष्ठ, बड्या, सन्मान्य लोकांची सभा, मंडळ, समाज. ॰संभा- वना-स्त्री. १ शिष्ट लोकाचें आदरपूर्वक स्वागत, वागवणूक; सत्कार (विवाह, यज्ञादि प्रसंगीं आहेर, देणगी, दान वगैरे देणें). २ अहेर; देणगी. (अशा प्रसंगीं दिलेली). शिष्टाइकी-शिष्टाई- शिष्टायकी-स्त्री. १ श्रेष्ठपणा; मोठेपणा; मान; पूज्यता; आदरणीयता. २ नियमितपणा; व्बवस्थितपणा; शिस्त; चोख- पणा. ३ संभावितपणाची मध्यस्थी; विवाहादि व्यवहारांत जुळवून आणण्याकरितां केलेली मध्यस्थी, सांगितलेल्या सम- जुतीच्या गोष्टी वगैरे; दोन पक्षांत ऐक्य घडवून आणण्याकरितां केलेली मध्यस्थी, बोधपर कथन वगैरे. शिष्टागम, शिष्टाचार- पु. १ परंपरागत आलेली सभ्यपणाची, संभावीत रीत, पद्धति, चाल. 'शिष्टागम विधानें । विविध याग वितानें ।' -ज्ञा १५. १८९. २ विवाहादि प्रसंगीं यजमानास केलेला अहेर, देणगी वगैरे. ३ शास्त्रांत प्रत्यक्ष न सांगितलेले परंतु रूड आचार; नियम, रीत, पद्धति. शिष्टाचार करणें-लोकव्यवहारास अनुसरून, वाईट दिसूं नये म्हणून केवळ एखादी गोष्ट वरवर करणें. शिष्टा- वणें-अक्रि. श्रेष्ठत्वास चढणें; मान्यता पावणें; योग्यता नसतां स्वतःस मोठें समजणें; उगाच मोठेपणा अंगीं आणणें.

दाते शब्दकोश

दाम

पु. १ पैसा; रोकड. २ किंमत; मूल्य; मोल. 'दाम रोख काम चोख.' ३ एक जुनें तांब्याचें नाणें. हें नाणें मूळचें तांब्याचें होतें परंतु पुढें ते चलनांत राहिलें नसून केवळ हिशे- बाच्या सोयीसाठीं याचा जमाखर्च इ॰ कांत उपयोग होऊं लागला. अकबराच्या कारकीर्दींत दाम तांब्याचा असून त्याचें वजन १ तोळा ८ मासे ७ रति होतें व चाळीस दामांचा रुपया मानला जात असे. औरंगजेबाच्या वेळीं ४६ १/३ दामांचा रुपया मानीत. त्यानंतरच्या काळीं एका रुपयाची किंमत ८० व ९० दाम यांच्या दरम्यान मधून मधून बदलणारी अशी होती. उत्तर हिंदुस्थानांत साधारणपणें एका पैशाचे पंचवीस दाम मानितात. कोठें कोठें तीस दामांचा आणा मानितात तर कांहीं ठिकाणीं साठ दामांचा आणा हें प्रमाण आहे. -कर्णेश्वर शिलालेख (शके ११०२) यांत हा शब्द आहे. 'राजा करी तैसे दाम । चाम तेही चालती ।' -तुगा ३६६०. [सं. द्रम्म; प्रा. दम्म = सोन्याचें नाणें ग्री. ड्राक्म्न] म्ह॰ १ दाम करी काम बिबी करी सलाम् = सर्व गोष्टी पैशानें साध्य होतात, किंबहुना स्त्रीसुद्धा पैशाने वश करतां येते. सामाशब्द- ॰चुंबक-जोड-जोड्या-वि. कृपणपणा करुन पैशाशीं पैसा जोडणारा; कवडीचुंबक. ॰चोरी-स्त्री. (क्व.) पैशाची चोरी याच्या उलट चामचोरी = गुरेंढोरें चोरणें. ॰जड-वि. फार किंमतीचें; महाग. ॰दुक(का)ळ-पु. पैशाचा, रोकडीचा तुटवडा. ॰दुप(प्प)ट- दुसा-स्त्री. व्याजासहित झालेली मूळ मुद्दलाच्या दुप्पट रकम. [दाम + दुप्पट = द्विगुणित] ॰दुपटीचा नियम-पु. धनकोनें ॠणको- पासून कोणत्याहि एका वेळीं मुद्दलापेक्षां अधिक व्याज न घेण्या- बद्दलचा हिंदु धर्मशास्त्राचा नियम. दामाजीपंत-पु. १ (सांके- तिक) (पैसा हीच एक व्यक्ति समजणें) पैसा; रोकड. -ख ३२.४७. २ पंधराव्या शतकांतील एक साधुवृत्तीचा कमाविसदार. दामोदर-न. १ ऐश्वर्यसंपन्न महाल, दालन. 'तंव देखिलें महा- द्वार । जेथ एकवीस खनांचें दामोदर ।' -शिशु ३३७. २ हवेली; इमारत; मंदिर. 'सोळा सहस्त्र अंतःपुरें । गगनचुंबित दामोदरें ।' -महिकथा १.९७. -वि. श्रीमंत; धनाढ्य; द्रव्यसंपन्न; गर्भश्रीमंत [दाम = पैसा + सं. उदर = पोट] दामोदरपंत-पु (संकेतिक) पैसा. दामाजीपंत पहा. 'दामोदरपंतांचें ठिकाणच नाहीं.' -ख ३२५५. [दाम + उदर + पंत]

दाते शब्दकोश

क्रिया

स्त्री. १ कर्म; काम; कृत्य; करणी; कृति. 'असेल माझी क्रिया बरी ।' -वेसीस्व ३.६४. २ और्ध्वदेहिक कर्म; प्रेतसंस्कारविधि; उत्तरकार्य; क्रियाकर्मांतर. (क्रि॰ करणें). 'करुनि क्रिया पित्याची गेला तो श्रितभवाब्धिसेंतुकडे ।' -मोवन १०.८३. ३ धार्मिक विधि. ४ कोणत्याही धंद्याचे, कामाचे विशेष मुद्दे, गोष्टी; इतिकर्तव्यता. ५ (शपथ, दिव्य, साक्षी, कागद- पत्र इत्यादिकांवरून) खरे ठरविणें, सिबद्ध करणें; शपथ; दिव्य; साक्ष; प्रमाण; पुरावा. 'क्रिया करी तुम्हाला ।' ऐपो १४.६ (वैद्यकी) औषधोपचार. ७ (व्या.) क्रियापद; धातूंचे अर्थ स्पष्ट करणारा व्यापार. ८ (संगीत) ताल धरण्याचा प्रकार; ह्यांत दोन प्रकार आहेत-सशब्द व निःशब्द. ९ (सामा.) परिणाम. 'रासायनिक क्रिया.' [सं. कृ = करणें] (वाप्र.) ॰जागणें-धरणें-एखाद्याचे उपकार जाणणें, आठवणें. ॰टाकणें-सोडणें-सांडणें-विस- रणें-एखाद्याचा उपकार विसरणें; कृतघ्न कोणें. सामाशब्द- ॰कर्मांतर-न. क्रिया अर्थ २ पहा. [सं.] ॰कलाप-क्रिया अर्थ ४ पहा. ॰कौशल्य-न. क्रिया करण्याची हातोटी; कामांतील कुश- लता; वाकबगारी. ॰द्वेषी-वि. (कायदा) खटल्यांत ज्याची साक्ष अपायकारक होते असा (साक्षीदारांच्या पांच प्रकारांपैकींएक). ॰नष्ट-वि. १ कृतघ्न. २ स्वतःचें वचन न पाळणारा; खोटा. 'नव्हे क्रियानष्ट तुम्हां ऐसा ।' -तुगा १९११. ॰परता-स्त्री. (संगीत) अभ्यासतत्परता. [सं.] ॰बाल-वि. १ (कायदा) अज्ञान; अप्रौढ (माणूस); देणें. घेणें इ॰ व्यवहार करण्यास ज्यास कायद्यानें प्रौढत्व प्राप्त झालें नाहीं असा; (इं.) मायनर.२ असमर्थ; नाला- यक (माणूस-देवघेवींत). ॰भ्रष्ट-वि. १ वचनभ्रष्ट; वचन, शपथ न पाळणारा. २ कृतघ्न; उपकार न जाणणारा. ३ नित्यनैमित्तिक कर्में न करणारा, धर्मभ्रष्ट. ॰रूप-न. क्रियापदाचें वचन, पुरुष, काल इ॰ भेदांनें बदलणारें रूप. ॰वाचक-पु (व्या.) क्रिया- बोधक; क्रियेसंबंधी. [सं.] ॰वाद-क्रिया, विकार इ॰ गोष्टी आत्म्यावर आपली छाप बसवितात असें प्रतिपादणारें एक मत; वैशैषिक जैन, तत्वज्ञान यांतून हा वाद सांपडतो. यांच्या उलट. अक्रियावाद; हा वेदांत, सांख्य, योग, बौद्धमत यांतून दिसतो. ॰वान-वंत-वि. शास्त्राप्रमाणें विहित आचरण करणारा; नित्य- नैमित्तिक नियम पाळणारा. 'वेदज्ञाहून शतगुणें बहुत । जो वेदार्थ करणारा पंडित । त्याहून अनुष्ठानी क्रियावंत । शतगुणें आगळा ।' -इ ३४.१००. ॰श्रय-पु. (व्या.) कर्ता (क्रियापदाचा); क्रियेचें प्रधान कारक. ॰सादृश्य-न. (शाप.) क्रियांतील सारखे- पणा; समता. (इं.) अ/?/नॉलॉजी.

दाते शब्दकोश

ब्रह्म

न. १ सत्तत्त्व; जगत्कारण; सच्चिदानंदरूप वस्तु. बाह्यसृष्टीच्या बुडाशीं असणारें नित्य द्रव्य. -गीर २२१. २ चार वेद. ३ (समासांत) ब्राह्मण. ४ (ल.) जातिभेद किंवा सोंवळेओवळें मोडल्यानें होणारा घोंटाळा; भ्रष्टाकार. ५ नवल; गूढ; अद्भुत अथवा दुर्ज्ञेय गोष्ट. 'याचेच गाण्यांत तुम्हास काय ब्रह्म वाटलें आहे न कळे.' ६ ब्रह्मदेश. ७ (ल.) विष्णु; कृष्ण. 'ब्रह्मासहि गहिंवरवी महिवरवीरेंद्र पांडुची भार्या ।' -मोउद्योग ७.४४. ८ ईश्वर; पर- मात्मा. [सं. बृह् = वाढणें] (वाप्र) ॰मिळणें-सांपडणें-हातीं लागणें-प्राप्त होणें-क्रि. (ल.) पराकाष्ठेची आश्चर्यकारक, उत्कृष्ट गोष्ट सांपडणें, मिळणें, सामाशब्द- ॰कटाह-पु. जगत्; ब्रह्मांडरूप कढई 'तेथ ब्रह्मकटाह शतकुट । हो पाहत असे ।' -ज्ञा १.१४७. [सं.] ॰कन्या-स्त्री. १ सरस्वती. २ अहिल्या. [सं.] ॰कप(पा)ट- न. १ त्रासदायक, संतापजनक काम; पेंच. २ पिच्छा न सोडणारें दुर्दैव. 'माझे पाठीसीं ब्रह्मकपाट लागलें.' ॰कर्म-न. ब्राह्मणाचीं धार्मिक कर्तव्यें. [सं.] ॰काष्ठ-न. मांदार. 'गंडक्यादि शिळा- मूर्ती । कां कां दारु ब्रह्मकाष्ठव्यक्ती ।' -एभा २७.९९ . ॰गांठ- स्त्री. १ जानव्यास दिलेली गांठ; पवित्र ग्रंथि. २ नेमानेम. ३ (ल.) घोंटाळा. ४ न मोडणारा संबंध. [सं.] ॰गिरि-पु. ज्यापासून गोदावरीचा उगम झाला तो नीलकूट पर्वत. [सं.] ॰गिऱ्हा-ऱ्हो- पु. ब्रह्मराक्षस. 'वेताळ खंडाळ लागल । ब्रह्मगिऱ्हो संचरला ।' -दा ३.२.२८. ॰गोल-ळ-गोल(ळ)क-पु. सृष्टि; जगत्: ब्रह्मांड. [सं.] ॰ग्रह-हो-पु. १ (प्र.) ब्रह्मगिरा-ऱ्हा; ब्रह्मराक्षस. २ (ल.) वर्णसंकर; अत्यंत घोटाळा. [सं.] ॰घातक-की- वि. १ ब्रह्महत्या करणारा. २ (ल.) ब्रह्मद्वेषी. [सं.] ॰घोंटाळा- पु. आचारविचारांची अव्यवस्था; फार गोंधळ. ॰घोष-पु. १ वेदघोष; मोठ्यानें वेद म्हणणें. २ ब्रह्म मताचा (जगदीश्वरवादाचा) घोष. उपदेश. [सं.] ॰घोळ-पु, १ जातिभेद, शुद्धशुद्धता इ॰च्या उपेक्षेनें झालेला घोंटाळा; अव्यवस्था. 'त्या प्रयोजनांत सोंवळ्या- ओंवळ्याचा विचार राहिला नाहीं. सर्व ब्रह्मघोळ झाला.' २ गोंधळ; अव्यवस्था (पुष्कळ माणसें एकदम बोलण्यापासून उत्पन्न झालेली); पराकाष्ठेचा गोंधळ. ॰घ्न-वि. ब्रह्मघातक. [सं.] ॰चर्य- न. १ चार आश्रमांपैकीं पहिला, मुंजीपासून लग्नापर्यंतचा-ब्राह्मणाचा आश्रम २ स्त्रीसंग न करण्याचें व्रत (आजन्म किंवा व्रतांगत्वेंकरून); एकपत्नीव्रत. [सं.] ॰चर्यस्खलन-न. स्त्रीसंगपरित्यागव्रताचा भंग (मुख्यत्वें ब्राह्मणाचा). ॰चारी-पु. १ मुंजीपासून लग्नाच्या कालापर्यंत सांगितलेले नियम पाळणारा ब्राह्मण; मुंज झालेला मुलगा; बटु. २ स्त्रीसंगपरित्यागाचें व्रत आजन्म किंवा कांहीं काल- पर्यंत करणारा ब्राह्मण. 'सोळा सहस्त्र गोपी भोगून ब्रह्मचारी.' ३ (उप.) पूर्ण रतिलंपट; व्यभिचारी असूनहि अव्यभिचाराचा व पावित्र्याचा डौल करणारा. [सं.] ॰चोटली-स्त्री. फारच लहान अशी पेटी, दागिना, ताट, भांडें इ॰. ॰जन-पु. ब्राह्मण. 'तेधवा रचिले ब्रह्मजन । तयां वेद दिधलें शासन ।' -ज्ञा १७.३३९. ॰जीवी पु. वेद शिकवून, आर्त्विज्य इ॰ करून उपजीविका करणारा ब्राह्मण. [सं.] ॰झांट-न. (अश्लील) शष्प या अर्थीं क्वचित् प्रयोग. -क्रिवि. काहीं देखील; थोडेसेंहि. (क्रि॰ देणें; मिळणें; प्राप्त होणें इ॰). ॰टाळी-स्त्री. १ योगाचा एक प्रकार; टाळींत (डोक्याच्या वरच्या भागांत) आत्मा नेणें. २ (ल.) रेंगाळणी; दीर्घसूत्रीपणा. (क्रि॰ देणें; लावणें; मांडणें). ॰तत्त्व-न. आत्म- तत्त्व; तात्त्विक सत्य; पदार्थमात्राच्या सत्तेला आधारभूत असें ब्रह्म. [सं.] ॰ताल-पु. एक ताल. यांत २८ मात्रा व १४ विभाग असतात. ॰तेज-न. १ सामान्य माणसाहून निराळें असें ब्राह्म- णाच्या अंगचें तेज; तेजस्विता. २ ब्राह्मणाच्या अंगचें विद्यादि सामर्थ्य. [सं.] ॰दंड-पु. प्रायश्चित्त, श्राद्ध, तीर्थविधि इ॰ कांच्या अधिकारार्थ ब्राह्मणास द्यावयाचें द्रव्य. [सं.] ॰दंड-डी-पुस्त्री. एक औषधी; काटेचुबक; उंटकटारी; अधःपुष्पी. ही पारदबंध करते. ॰दत्त-वि. ब्रह्मदेवानें दिलेलें. [सं.] ॰दिन-पु. १ ब्रह्मदेवाचा दिवस. २ वर्षप्रतिपदेच्या दिवशीं केलेलें गत व भावी मन्वादिकांचें श्रवण, अवलोकन; वर्षफळवाचन. [सं.] ॰देव-पु. १ ब्रह्मा; त्रिमूर्तीपैकीं रजोगुणात्मक पहिला; सृष्टिकर्ता. २ गांवाच्या सोनार, सुतार, जिनगर इ॰ कांनीं बसविलेला व ब्राह्मण पुजारी असलेला ग्रामदेव; ब्राह्मणदेव. [सं.] ॰देव होणें-क्रि. (ल.) (कर.) विवाहित होणें. ॰द्रोह द्वेष-पु. ब्राह्मणांचा द्वेष. [सं.] ॰द्रोही- द्वेषी-वि. ब्राह्मणांचा द्वेष करणारा. [सं.] ॰नंदन-पुअव. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र (नारद-वसिष्ठादिक). [सं.] ॰नंदिनी-स्त्री. ब्रह्मदेवाची कन्या; सरस्वती; अहल्या. तरी अहल्या ब्रह्मकन्यापूर्ण । गौत- माची निजपत्नी ।' -रावि ७.१२९ [सं.] ॰निर्वाण-न. ब्रह्मांड लय होऊन त्याशीं एकरूप होणें; मोक्ष. [सं.] ॰निष्ठ-वि. ब्रह्म- चिंतनांत निमग्न झालेला. [सं.] ॰पद-पदवी-नस्त्री. ब्रह्मनिष्ठ- तेचा अधिकार; पद; पदवी; अतिशय उच्च पद किंवा स्थान. (क्रि॰ पावणें; मिळणें; प्राप्त होणें). [सं.] ॰पाश-पु. ब्रह्मदेवाचा पाश; एक पुरातन शस्त्र. [सं.] ॰पिशाच-पुरुष-नपु. ब्रह्म- राक्षस. [सं.] ॰पिसा-वि. ब्रह्मराक्षसानें झडपलेला. ॰पिसें-न. ब्रह्मराक्षसानें झडपल्यामुळें उत्पन्न झालेलें वेड. ॰पीडा-स्त्री. (ल.) अतिशय पीडा देणारा, त्रासदायक, द्वाड मनुष्य; अतिशय दुःख किंवा त्रास. ॰पुरी-स्त्री. बहुतेक ब्राह्मणांची वस्ती असलेला गांव; विद्वान् व तपोनिष्ठ ब्राह्मणांनीं वसलेली जागा, गल्ली, पेठ. [सं.] ॰प्रलय-पु. १ ब्रह्म्याच्या प्रत्येक शंभर वर्षांच्या अंतीं होणारा सर्व विश्वाचा विनाश. यांत ब्रह्मा सुद्धां नाश पावतो. २ (ल.) मोठा अनर्थ; संकट. [सं.] ॰प्राप्ति-स्त्री. ब्रह्माची प्राप्ति; ब्रह्मांत जीवा- त्म्याचा लय; जीवास होणारा स्वस्वरूपसाक्षात्काररूप लाभ. [सं.] ॰बंधु-पु. भ्रष्ट व बहिष्कृत ब्राह्मण. [सं.] ॰बळ-न. ब्राह्मणाचें तेज. 'क्षात्रबळाहुनि शक्रा । परम गुरु ब्रह्मबळ पहा नीट ।' -मोअश्व १.९१. ॰बिंदु-पु. (ल.) वेदपठन करतांना उडालेली ब्राह्मणांची थुंकी. [सं.] ॰बीज-न. ब्राह्मणवीर्यापासून उत्पन्न झांलेला कोणीही माणूस. [सं.] ॰भाव-पु. ब्रह्मस्थिति. 'परि अनुभविलिया ब्रह्मभावा । गंवसणी होऊनि ।' -ज्ञा ८.२१०. [सं.] ॰भावना-स्त्री. सर्व चराचर ब्रह्म आहे असा ग्रह; अद्वैत- मताचा स्वीकार. [सं.] ॰भुवन-न. ब्रह्मदेवाचा सत्यलोक. ॰भूत-वि. अद्वैतानुभवसंपन्न 'एवं ब्रह्मभूत ही होऊनी ।' -यथादि ५.१८. ॰यज्ञ-पु. १ बेदाध्ययन. २ ऋषियज्ञ पहा. [सं.] ॰योनि-स्त्री. काशींतील एका खडकांतील लांब व अरुंद असें भोंक. या मधून प्रत्येक यात्रेकरून जावें लागतें. जातांना जर तो मध्येचं अडकला तर तो पापी असें समजतात. तेथेंच रुद्रयोनि नावाचें एक दुसरें भोक आहे. [सं.] ॰रंध्र-न. ज्यांतून मृत्यूनंतर आत्मा निघून जातो असें टाळूवरील गुप्त छिद्र; योगसामर्थ्यानें जेथून प्राण नेतां येतो मस्तकांतील गुप्त छिद्र; दहावें इंद्रिय. 'आक- ळलेनि योगें । मध्यमामध्यमार्गें । अग्निस्थानौनि निगे । ब्रह्मरंध्रा ।' -ज्ञा ८.९४. [सं.] ॰रस-पु. १ दैविक ज्ञानाचा आस्वाद; वेदा- भ्यासानें होणारा आनंद. २ ब्रह्मानंद. [सं.] ॰रात्रि-स्त्री. ब्रह्मदेवाची रात्र. ही देवांच्या सहस्त्र युगांबरोबर असते. [सं.] ॰राक्षस-पु. १ विद्वान् पण अभिमानी ब्राह्मणाचें मरणोत्तर झालेलें पिशाच्च. २ सामान्यतः ब्राह्मणाचें पिशाच्च. [सं.] ॰रेखा-षा-लिखित- लेख-स्त्रीनपु. १ ब्रह्मदेवानें प्रत्येक [प्राण्याच्या कपाळावर लिहिलेलें त्याचें नशीब; दैव; कधींहि न टळणारी गोष्ट. २ (ल.) खातरीचें व निश्चयाचें भाषण, वचन इ॰ 'माझें बोलणें हें ब्रह्मरेषा आहे. कधींहि खोटें होणार नाहीं.' [सं.] ॰र्षि-पु. १ ब्राह्मण जातीचा ऋषि पुरातनकालीं हा शब्द त्यांच्या विख्यात पावित्र्यामुळें ब्राह्मणांस लावीत असत. २ ब्राह्मण असून ऋषि; ब्राह्मणांतील सत्पुरुष. [सं.] ॰लोक-पु. ब्रह्म्याचा लोक; सत्यलोक. [सं.] ॰वर्च्चस-वर्चस्व- न. १ वेदांच्या अभ्यासापासून व व्रतपालनापासून उत्पन्न होणारा पवित्रपणा; तेज. 'ब्रह्मचर्यव्रत धरणें । ब्रह्मवर्चस्व चढे तेणें ।' -एभा १७.३३४. २ ब्राह्मणाची श्रेष्ठता, वैलक्ष्यण्य. [सं.] ॰विद्- वि. ब्रह्मज्ञानी; ब्रह्मवेत्ता (पुरुष). ॰विद्या-स्त्री. आत्मज्ञान. [सं.] ॰वीणा-पु. १ विशिष्ट प्रकारची वीणा; नारदाची महती वीणा. २ मस्तक. [सं.] ॰वृत्ति-स्त्री. १ ब्रह्माकार वृत्ति. २ ब्राह्मणाची उपजीविका. [सं.] ॰वृंद-पु. १ ब्राह्मणांची सभा, समुदाय. २ (ल.) धर्मशीलतेनें, विद्वत्तेनें श्रेष्ठ असलेला ब्राह्मण. [सं.] ॰वेत्ता- वित्-वि. ब्रह्मज्ञानी. [सं.] ॰शाप-पु. ब्राह्मणाचा शाप. [सं.] ॰शाला-ळा-स्त्री. वेदशाळा. 'केली जैसी वदनीं । ब्रह्मशाळा ।' -ज्ञा १७.२२२. [सं.] ॰संतर्पण-न. ब्राह्मणभोजन. ॰सदन- न. ब्रह्मलोक. ॰संपदा-स्त्री. दैवी संपत्ति. ॰सभा-स्त्री. ब्रह्मदेवाची सभा. [सं.] ॰संबंध-समंध-द-पु. ब्रह्मराक्षस. ॰संविति- स्त्री. ब्रह्मज्ञान. [सं.] ॰साम्राज्य-न. विस्तृत, बलाढ्य अधि- राज्य, अंमल; साम्राटाची सत्ता. ॰सायुज्य-न. ब्रह्माशीं एकरू- पता. [सं.] ॰साक्षात्कार-पु. ब्रह्माची प्राप्ति; ब्रह्मदर्शन; निर्गुण साक्षात्कार. [सं.] ॰सुख-न. ब्रह्माचें सुख; ब्रह्मरस. [सं.] ॰सुत-पु. नारदऋषि. ॰सूत्र-न. १ ब्रह्मदेवानें नेमलेली व्यवस्था, मार्ग; ईश्वरी नेमानेम. २ जानवें; यज्ञोपवीत. 'ब्रह्मसूत्रेवीण ब्राह्मण । संन्यासी नव्हे दंडेवीण ।' -भारा, बाल १०.६२. ३ लग्नाबद्दलचा ईश्वरी नेमानेम; ब्रह्म्यानें ठेवलेलें दैव. 'ब्रह्मसूत्र असेल तर त्या मुलीशीं ह्याचें लग्न होईल.' ४ (लग्न ठरवितांना) नवरानवरीची उंची मोजण्याचें सूत्र; प्रमाणसूत्र. ५ व्यासकृत वेदान्तसूत्रें. 'तो न पढो कां ब्रह्मसूत्र ।' -ज्ञा १७.८५. [सं.] ॰सूत्राची गांठ- स्त्री. दैवानें बांधलेली गांठ; लग्नाविषयीं ब्रह्म्यानें ठरविलेला पूर्व- संकेत. ॰सृष्टि-स्त्री. ब्रह्मदेवानें निर्मिलेलें जगत्, याच्या उलट विश्वमित्र सृष्टि. [सं.] ॰स्थान-न. १ ब्रह्मदेवाच्या उत्पत्तीची जागा. २ बेंबी. ३ सहस्त्रदळकमळ; ब्रह्मरंध्रचक्र. 'तया अनाह- ताचेनि मेघें । मग आकाश दुमदुमों लागे । तंव ब्रह्मस्थानींचें बेगें । फिटले सहजे ।' -ज्ञा ६.२७९. [सं.] ॰स्व-न. १ ब्राह्मणाची मालमत्ता. २ ब्राह्मणाचें घेतलेलें कर्ज. ३ (सामा.) कर्ज. 'त्याचे काल- क्षेप चालत नाहीं, कमी जाहल्यामुळें ब्रह्मस्वही वहुत जाहले.' -समारो १.३३. [सं.] ॰हृदय-न. एक नक्षत्रपुंज. [सं.] ॰हत्या-स्त्री. १ ब्राह्मणाचा वध; व त्यामुळें लागलेलें पातक. २ (ल. एकसारखें पाठीस लागलेलें दुर्दैव. [सं.] म्ह॰ हैक-फट् म्हणतां ब्रह्महत्या = क्षुल्लक कारणानें, प्रसंगानें मोठाले अनर्थ उद्भ- वणें. ॰हत्यारा-वि. ज्यानें ब्राह्मण मारला आहे तो. [सं.] ॰ज्ञान-न. १ जगाचें कारण व आधार असलेल्या ब्रह्माचें ज्ञान. २ दैविक, अध्यात्मिक, विशुद्ध ज्ञान. ३ (ल.) फुकट शहाणपणाच्या गोष्टी. [सं.] म्ह॰ लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण. ब्रम्हज्ञानी-ज्ञ-वि. १ ब्रह्म जाणणारा. २ लोकांस ब्रह्मज्ञान सांगणारा. [सं.] ब्रह्माकार-पु. जग आणि सर्व वस्तू ब्रह्मरूप आहेत असें मानणें. 'ब्रह्माकार-बुद्धि -द्दष्टि-मन-वृत्ति.' [सं.] ब्रह्माची गांठ-स्त्री. लग्नाविषयीं ब्रह्मदेवानें ठरविलेली योजना, नेमानेम. ब्रह्मांड-न. १ जग; चवदा लोक; विश्व. चतुर्दशभुवनें व सत्यलोक पहा. २ डोक्यावरील टाळू; ब्रह्मरंध्र. 'ब्रह्मांडीं बैसली गोळी ।' ऐपो ८६. ३ -वि. प्रचंड; विस्तृत; अमर्याद. (समासांत) ब्रह्मांड-नदी-पर्वत-पाषाण-वृक्ष-साप-हत्ती-काम-कारखाना- कारभार-पसारा-कर्ज-खर्च-संसार. [सं.] ब्रह्मांडांत न माणें- मावणें-क्रि. अतिशय असंख्य, मोठा, अफाट इ॰ असणें. ब्रह्मांडकटाह-पु. विश्व; ब्रह्मांड अंडकटाह पहा. [सं.] ब्रह्मांड गोलक-गोल-पु विश्व, ब्रह्मगोल. [सं.] ब्रह्मांड मंडप-पु. ब्रह्मांडाचा मंडल, गोल; विश्व, ब्रह्मांडमंडपा माझारीं । जिची प्रतिमा नाहीं दुसरी ।' ब्रह्मांडज्ञान-न. जगानें ज्ञान (मुख्यत्वें मानवी शरीराच्या अभ्यासापासून व ज्ञानापासून मिळालेलें); पिंडज्ञान. [सं.] ब्रह्मानंद-पु. १ ब्रह्माचें सुख. २ ब्रह्माच्या ठिकाणीं लय झाला असतां होणारा आनंद. ३ (ल.) अत्यानंद, परमानंद. 'त्याचे ग्रंथ पाहतां विशेष । ब्रह्मानंद उचंबळे ।' [सं.] ब्रह्मानंदी टाळी लागणें-क्रि. सच्चिदानंदरूपांत तल्लीन होणें. ब्रह्मासन- न. १ ब्रह्मचिंतन करण्यास योग्य असें शरीराचें आसन, ठेवणें, बसण्याची पद्धति. २ अष्टाधिकारांपैकीं एक; वर्तकीपणाचा हक्क. [सं.] ब्रह्मास्त्र-न. १ ब्रह्मदेवाचें शस्त्र; त्याच्या मंत्रानें अभि- मंत्रित केलेली काडी, बाण अथवा कोणातीहि वस्तु. 'नरकें ब्रह्मास्त्र सोडिलें जाण । तेंही गिळिलें अवलीळा ।' २ ब्राह्मणाचा शाप. [सं.] ब्रह्माहमस्मिबोध-पु. मी ब्रह्म आहें असा बोध. 'जें ब्रह्माहमस्मिबोधें सणाणें ।' -ज्ञा १५.२५९. [सं.] ब्रह्माक्षर- न. त्रयमूर्ति ईश्वराचें पवित्र आणि गूढ नांव. ओम् पहा. [सं.] ब्रह्मिष्ट-वि. ब्रह्मचिंतनांत निमग्न झालेला. [सं.] ब्रह्मीभूत-वि. स्वतःब्रह्म झालेला; ब्रह्माशीं एकरूप झालेला, मृत संन्यासी. [सं.] ब्रह्मोपदेश-पु. ब्रह्माचा निर्गुण ध्यानात्मक पूजेचा उपदेश. [सं.]

दाते शब्दकोश

वाक्-ग्

स्त्री. वाणी; भाषण; आवाज; वाचा; बोलण्याची शक्ति किंवा इंद्रिय. [सं. वाक्] सामाशब्द-॰चतुष्टय-न. वाणीचे चार प्रकार -परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी. ॰चातुर्यं-न. बोलण्यांतील कौशल्य; वक्तृत्व. ॰चापल्य-न. १ बोलण्यांतील अस्खलितपणा, चतुरता. २ बडबड; वटवट; भरमसाटपणें बोलणें; अतिशय बोलणें. ॰पटु-वि. बोलण्यांत कुशल, तरबेज; पंडित; वक्ता. ॰पंडित-पु. (उप) ताडकन् उत्तर देणारा मनुष्य; वाचा- कुशल; तडकाफडकी उत्तर देणारा. ॰पथ-पु. संभाषण; भाष- णाचा ओघ. 'नुसतीच शांतिकथा । आणिजेल कीर वाक्यपथा ।' -ज्ञा १३.११५५. ॰पाटव-न. बोलण्यांतील चातुर्य, कौशल्य; वक्तृत्व. ॰पांडित्य-न. बोलण्यांतील तत्परता; सद्यः-प्रत्युत्तर देण्याची कला. ॰पारुष्य-न. कठोर भाषण; खरडपट्टी; शिवी- गाळी; दुर्भाषण. ॰प्रचार-पु. भाषेंतील संप्रदाय; म्हणी; विशिष्ट शब्दसमूहास वारंवार उपयोजिल्यामुळें विशिष्ट अर्थ येण्याचा प्रकार; रूढी. ॰प्रतिबंध-पु. १ भाषणबंदी; बोलण्याचें थांबविणें; गप्प करणें, बसविणें; तोंड बंद करणें; कुंठित करणें. २ स्तब्धता; शांतता; निःशब्दता. ॰सरणी-स्त्री. बोलण्यांतील अस्खलितपणा; वाक्प्रवाह; शैली. ॰सिद्धि-स्त्री. शब्दांतील अमोघता; बोललेला शब्द खरा होण्याची शक्ति. ॰सुक्रुत-न. वचन. 'म्हणूनु वाक्सु- क्रुत दिधलें.' -मंगळवेढें लेख, ग्रंथमाला. ॰सृष्टि-स्त्री. बोलण्यां- तील चातुर्य, विविधता, कौशल्य. 'हे वाक्सृष्टि एके वेळे । देखतु माझे बुद्धीचे डोळे ।' -ज्ञा १४.२०. ॰स्तम्भ-पु. बोलण्यांत अडखळणें; थांबणें; वाग्रोध; गहिंवरामुळें वगैरे बोलतांना कुंठित होणें. वाग्जल्प-ना-पुस्त्री. वल्गना; बडबड; वटवट; लबलब; टकळी. ॰जाल-न. शब्दपांडित्य; बडबड; वटवट; पोकळ भाषण. 'वाग्निश्चयाचें वाग्जालिक । शब्द शास्त्रें सोडिलीं ।' -एरुस्व २.३७; -ज्ञा १३.२०. ॰दंड-पु. १ धमकी; खरडपट्टी शब्दताडन. २ वाचेचा संयम; भाषणावर नियंत्रण. ॰दत्त-वि. १ वाङ्निश्चय झालेला; शब्दांनीं दिलेला; विवाहवचन दिलेला. २ तोंडी वचन दिलेला; शब्दांनीं संमत केलेला; वचनांकित. ॰दान-न. १ वाङ्निश्चय; विवाहाचा करार; वरवधूयोजना. २ तोंडी करार; वचन. ॰दुष्ट-वि. १ अभद्र बोलणारा; अपशब्द बोलणारा. २ चुकीचें बोलणारा; चुकीची भाषा वापरणारा. ॰देवता-स्त्री. वाणीची देवता; सरस्वती. ॰दोष-पु. १ वाणीची अशुद्धता; चुकीचे उच्चार. २ अपशब्द; निंदा; अश्लीलता. ३ जिव्हाभ्रंश; चुकून शब्द बाहेर पडणें; वाक्स्खलन. ॰धज-ध्वज- पु. १ वाणीरूप पताका. २ प्रसिद्धी; दवंडी. 'स्वधर्मु वाग्ध्वजीं । बांधी नेणे ।' -ज्ञा १३.२०७. ॰नियम-ङ्नियम-पु. १ भाषेसंबंधीं, बोलण्यासंबंधीं नियम, विधि. २ भाषणबंदी; बोल- ण्यावरील नियंत्रण. ३ मौन; मूकत्व. 'वाङ्नियम सदैव विहित कां गमला । ' -मोसभा ३.७. ॰निरोध-ङ्निरोध-पु. १ बोलणें कुंठित करणें; गप्प करणें. २ वाचेवरील संयम; निःशब्दता; शांतता. ॰निश्चय-ङ्निश्चय-पु. लग्नाचा करार; वरवधूयोजना; वरवधू निश्चित करण्याचा विधि. ॰बाण-पु. कठोर शब्द; टोंच- णारें, बोंचणारे शब्द; कटु वाचा. 'लागति वाग्बाण काळजाला कीं ।' -मोभीष्म १०.८. ॰ब्रह्म-न. वेद. 'एकीं वाग्ब्रह्म अभ्यासें थोकडें केलें ।' -ज्ञा १२.११२. ॰भव-वि. वाचिक; वाचेपासून होणारें. 'वाचे वसे तें वाग्भव । तप जाणावें ।' -ज्ञा १७.२२३. ॰मय-ङ्मय-न. साहित्य; भाषेंतील ग्रंथसंपत्ति; गद्यपद्यादि ग्रंथसमूह. -वि. १ शब्दांस अनुसरून; मूळ वचनाप्रमाणें; वाणि- रूप. 'विवरण जाला वाङ्मय । संपूर्ण पर्याय नवमिचा ।' -ज्ञान- प्रपीप ७७९. २ वाचिक; शब्दमय. 'एवं शारीर जें तप । तयाचें दाविलें स्वरूप । आतां आईक निष्पाप । वाङ्मय तें ।' -ज्ञा १७.२१५. ॰मयी-स्त्री. वाणी; वकृत्त्व. 'जी एकमात्र भूषण पुरुषाप्रति तीहि वाङ्मयी देवी ।' -गोविंदाग्रज. ॰मात्रा-स्त्री. सेकंद; क्षण. ॰माधुर्य-न. वाणीची मोहकता, मधुरता, गोडी; रसाळपणा. वाग्मी-वि. १ बोलण्यांत पटाईत; चतुर; वक्ता. २ बोलघेवडा; बोलका; वटवट करणारा; वावदूक. ॰मुख-न. आरं- भीचे शब्द; सुरुवातीचें वाक्य. ॰युद्ध-न. वादविवाद; आवेश- युक्त व जोराची चर्चा; तोंडातोंडी. ॰रोध-पु. १ बोलण्याची मनाई; तोंड बंद पाडणें; गप्प करणें. २ स्तब्धता; मूकता. ॰वज्र- न. शब्दशस्त्र; वाचारूप हत्यार; शाप. ॰वल्लरा-वल्ली-विला- सिनी-स्त्री. सरस्वती; वाणीची देवता. ॰वाद-पु. वादविवाद; वितंडवाद. 'पाखंडाचे दरकुटे । मोडी वाग्वाद अव्हांटे ।' -ज्ञा १२.१४. ॰विलास-पु. १ शब्दकौतुक; शाब्दिक करमणूक; वाणीची क्रीडा; वाणीची प्रभाव. 'जैसें सरस्वतीपुढें मूढें बहुत । वाग्विलास दाविती ।' २ भाषाविनोद; शाब्दिक करमणूक. ॰वीर- शूर-वि. बोलण्यांत धीट, शूर, पटाईत. ॰वृद्धि-स्त्री. व्याख्यान- विस्तार; स्पष्टीकरण. 'आतां गीतार्थाची मुक्तमुदी । लावी माझिये वाग्वृद्धी ।' -ज्ञा १८.२७. ॰व्यय-पु. व्यर्थ बडबड; निरर्थंक भाषण, बोलणें; शब्दांची व्यर्थ काथ्याकूट. ॰व्यापार-पु. बोला- चाली; गप्पासप्पा; भाषण; परस्पर बोलणें, चालणें. 'तेध कें नाग्व्यापारा । अवकाशु असे ।' -ज्ञा १८.१.३०. ॰शून्य- सून्य-वि. वाचाहीन; मुका; बोलतां येत नाहीं असा. 'मज वाक्सुन्यास वजवावें ।' -दा १.२.२.

दाते शब्दकोश

मोडणें

सक्रि. १ तोडून खाली टाकणें, पाडणें; नाश करणें; बिघाड करणें, (इमारत इ॰); विस्कळित करणें; भग्न करणें; नाहींसें करणें (मोडणें आणि तोडणें ह्या दोन्हीहि क्रियापदांचा हा सर्वसामान्य अर्थ आहे. तरी पण दोहोंच्या अर्थांत बराच भेद आहे. (तोडणें पहा.) तोडणें याचा अर्थ कांहीं तरी मोठें, अचा- नक. भयंकर कृत्य करून तीक्ष्णधारी जोरकस हत्याराचा उपयोग करून किंवा जोरानें किंवा एकदम हिसकून एखाद्या वस्तूचा नाश करणें. आणि मोडणें म्हणजे पदार्थाच्या आकारांत, स्थितींत बदल करणें. उदा॰ रान तोडणें आणि रान मोडणें हे दोन वाक्प्रचार घेतले तर पहिल्यांतील तोडणें याचा अर्थ रानांतील झाडें तोडून, छाटून, खांडून नाहींशी करणें व मोडणें याचा अर्थ रानांतील झाडाझुडूप काढून साफसफाई करणें असा अर्थ ध्वनित होतो.) जसें:-देशपद्धति मोडणें. 'त्याचें लग्न त्यानें मोडलें.' २ तुकडे करणें; भाग किंवा अवयव वेगवेगळे करणे (यंत्राचे इ॰). ३ वांक- वून तुकडा करणें (कांठी, वेत, लांकूड इ॰चे) खुडणें. (धान्याचीं कणसें, भुट्टे इ॰). 'जादुगारानें काठी मोडलेली आम्ही पाहिली.' ४ तोडणें; नाहींसा करणें (मैत्री, संगत, दुकानदारी, व्यवहार इ॰). ५ विस्कळित होणें; विस्कट होणें; पांगापांग होणें (बाजार, मंडळी, सभा, कौन्सिल इ॰ची). 'म्हैस उधळल्यामुळें सभा मोडली.' ६ खुरादा किंवा नाणें करून आणणें (मोहरा, रुपया यांचें) 'एक रुपया मोडून नाणें, खुर्दा घेतला.' पैसे करणें; (दागि- न्याचे, धातूच्या भांड्याचें). विक्री करून पैसे घेणें (जनावरांचे, वस्तूचे). ७ भंग करणें; अडथळा करणें; बिघाड करणें (झोपेचा, शांततेचा, चालू कामाचा, उद्योगाचा इ॰). ८ बिघडविणें; नाखूश करणें; अवमानणें (मन, मर्जी, इच्छा, हेतु). 'पितृसत्यपालना प्रभु कैकेयीचें न चित्त मोडून ।' -मोरामायणें १.४८४. ९ बिघाड करणें; रचना, जुळणी नाहींशी करणें; विस्कटणें (पागोटें, निऱ्या इ॰). १० नाहींशी करणें; ओसाड पाडणें; (वस्ती, गांव, वसाहत). ११ खंडण करणें; पाडाव करणें (पक्ष, मत, वाद, इ॰चा). १२ खर्च करणें; नाश करणें; गमावणें; घालविणें; बुडविणें (वेळ, काळ, दिवस). १३ जोर हटविणें, नाहींसा करणें; शमविणें; दाबून टाकणें; घालविणें. (तहान, भूक, काळजी, संशय, भय). १४ जिरवणें; कमी करणें; घालविणें (खोड, व्यसन, गर्व, इ॰). १५ स्थिरस्थावर करणें; सांत्वन करणें; नाहींसें करणें (भांडण, झगडा, दंगा). १६ भंग करणें; अतिक्रमण करणें; उल्लंघन करणें (कायदा, हुकूम, आज्ञा, वचन, करार इ॰). १७ रद्द करणें; बंद करणें; काढून टाकणें (कायदा; नियम, विधी, संस्कार, समारंभ). १८ दिवाळें काढणें; नाश करणें; मोडतोड करणें. १९ पुसून टाकणें; नाहींशी करणें; खरडून टाकणें; मागमूस दिसूं न देणें. 'गाडीची वाट फेसाटीन मोडावी.' मोडणें हें तोडणें या क्रियापदाहून भिन्न आहेच परंतु याच अर्था- सारखें भासणारें फोडणें या क्रियापदाहूनहि भिन्न आहे. फोडणें पहा. मोडून टाकणें-काढणें-१ म्हणणें किंवा बोलणें खुंटविणें; गोंधळविणें; कुंठित करणें; निरुत्तर करणें. २ पराजित करणें; फजित करणें. 'त्याचा हा परिपाक आजि दिसतां या पंडिता मोडिलें ।' -सारुह ६.६४.

दाते शब्दकोश

ग्राम

पु. १ गांव; खेडें. २ (संगीत) सप्तस्वरांतील मुख्य तीन अवधी. याचे प्रकार तीन-षड्जग्राम, मध्यमग्राम व गांधारग्राम. सात स्वरांचा समूह. (इं.) गॅमट. ३ गांवांतील प्रमुख किंवा माननीय माणूस. ४ अरेराव, कचाट्या, जरब बस- विणारा, काचाटींत धरणारा माणूस. 'तो कसला ग्राम त्याज बराबर भांडून तुझा परिणाम लागणार नाहीं.' ५ जमाव; समु- दाय. 'मुतेहिना ऐसा वागे । ग्राम कर्मेंद्रियांचा ।' -यथादि ३. ९२. (समासांत) इंद्रिय-गुण-पुण्य-भूत-स्वर-ग्राम. 'इंद्रिय- ग्रामावरी येणें नाहीं ।' -ज्ञा ५.१०५. [सं.] सामाशब्द- ॰कंटक-कुठार-पु. चहाड्या, निंदा, त्रास, तंटे इ॰ लावणारा; गांवगुंड; गांवची पीडा, ब्याद; दुष्ट, वाईट माणूस. ग्रामकी-स्त्री. गांवजोशी किंवा पाटील इ॰ चें काम; गांवकी. ॰कूळ- केसरी-सिंह-पु. १ (ल.) गांवांतील कुत्रे. 'इया ग्रामसिं- हाचिया ठायीं.' -ज्ञा १३.६८०. २ (ल.) भेदरट माणूस. ॰खर्च-पु. १ गांवचा खर्च. २ फुकट किंवा विनाकारण खर्च; ज्याचा मोबदला नाहीं असा खर्च. ॰जोशी-ज्योतिषी-पु. गांवचा जोशी, हा पंचांग सांगणें, पत्रिका पहाणें, मुहूर्त काढणें इ॰ कामें करतो. 'आधीं होता ग्रामजोशी । राज्यपद आलें त्यासी । त्याचें हिंडणें राहीना । मूळ स्वभाव जाईना ।।' -तुगा. ग्रामज्य-न. ग्राम्य; मैथुन; सुरत क्रीडा. 'ग्रामज्य आठवे चित्तीं ।' -दा २.५. २८. ग्रामणी-पु. १ (काव्य, विद्वानांचें संभाषण) पाटील; गांवचा मुख्य. २ (लौकिक) गांवगुंड, चावट, वाईट, कुटाळ्या, पीडादायक माणूस; ब्याद. 'रामनामें विव- र्जित । ग्रामणीं बोलिजे तें ग्राम्य गीत ।' -एभा ८.१६९. ३ गांवचा महार. -स्त्री. कुटाळकी; गांवकी. ग्रामिणी पहा. 'आनित्य ग्रामणी मस्ती सदा ।' -दा २.३.६. -वि. मुख्य; श्रेष्ठ; प्रमुख. ग्रामणीक-न. हरामखोरपणा; ग्रामणी, ग्रामिणी पहा. 'तरी जी पाहतां हेंहि ग्रामणीक । दिसोनि येतसे कीं निष्टंक ।' -सादि १२.२.१०८. ग्रामण्य-न. १ मुख्यतः जातीसंबंधींचा किंवा इतर गांवकीचा तंटा, खटला. २ बहिष्कार. ३ जातीच्या खट- ल्यासंबंधीं चौकशीसाठीं भरणारी ग्रामसभा; जातगंगा. ॰त्रय- न. (संगीत) ग्राम अर्थ २ पहा. ॰थिल्लर-न. गांवांतील लहा- लसें तळें, डबकें. कीं गतधवेचें यौवन । कीं ग्रामथिल्लराचें जीवन ।' ॰दुर्गा-स्त्री. गांवची कुलदेवी, भवानी; ग्रामाधिका- रिणी देवता. ॰देऊळ-न. गांवांतील सार्वजनिक देऊळ. ॰देव- देवता-दैवत-पुस्त्रीन. १ ग्रामधिकारी-रिणी; गांवचा कुल- देव-देवी. २ या देवतेच्या खर्चास इनाम दिलेली जमीन, उत्पन्न; ग्रामदेवीची जमीन. ॰धर्म-पु. गांवचे धार्मिक विधी, नियम, चालीरिती इ॰ परंपरेनें चालत आलेला गांवचा धर्म. ॰नेत्र-न. (ल.) महार; गांवचा जागल्या. ॰पंचायत-सभा-संस्था-स्त्री. गांवची सर्व व्यवस्था पाहणारी संस्था. खेड्यांतील म्युनिसिपालटी; ग्रामस्वराज्य. ॰पशु-पु. माणसाळलेलें जनावर. ॰बिंदुटी-स्त्री. खेड्यांतील गल्ली, बिदी. 'तव ते गोधनें ग्रामबिंदुटी । अपार मौळी असती चव्हाटी ।' -नव १३.११५. ॰याजक-पु. गांवचा उपा- ध्याय; ग्रामोपाध्याय. ॰लेखक-पु. कुळकर्णी. 'ग्रामलेखक ते स्थळीं ।' -निमा (आत्मचरित्र १.१०१.) ॰सूकर-पु. गांवडुक्कर. ॰स्त-स्थ-वि. गांवांत राहणारा; गांवचा रहिवासी; गांवकरी. 'ऐसें बोलून ग्रामस्तानें.' -नव १०.१६३. 'आतांच भोगूं तरी हे पहाट । ग्रामस्थ येतांचि भरेल हाट ।' ग्रामाचार-पु. ग्रामधर्म पहा. ग्रामांतर न. १ दुसरें गांव. २ आपलें गांव सोडून परगांवीं जाणें. ग्रामाधिकार-कारी-पु. गांवासंबंधीं अधिकार; तो गाजविणारा माणूस; अधिकारी; गांवकामगार. ग्रामाधिपति-पु. पाटील 'ग्रामाधिपतिरूपें श्रीरघुवीरें जाण ।' -सप्र २.३४. ग्रामिणी- स्त्री. हरामखोरी; चहाडी इ॰ ग्रामणीक पहा. ग्रामोपाध्याय- पु. गांवचा उपाध्याय; ग्रामजोशी; ग्रामयाजक पहा. ग्राम्य- वि. १ खेड्यांत झालेला, जन्मलेला; गांवांत उत्पन्न झालेलें किंवा गांवासंबंधीं. २ गांवठी; गांवराणी; गांवढळ; खेडवळ. ३ माण- साळलेला (पशु) याच्या उलट रानटी. ४ लागवडीनें उत्पन्न केलेलें (शेतीचें उत्पन्न); याच्या उलट आपोआप झालेलें. ५ प्राकृत व इतर देशी (भाषा); याच्या उलट संस्कृत. ६ प्रापंचिक; संसारी; याच्या उलट वन्य = जंगलात राहणारा. ७ अश्लील; अशिष्ट; असभ्य. ८ अतिशय विषयासक्त. ग्राम्यगीत-न. १ अश्लील पद, लावणी. २ खेडवळ गाणें, पवाडा इ॰ ग्राम्यधर्म- संभोग; ग्रामज्य पहा. ग्रामस्त्री-स्त्री. वेश्या; रांड. 'ग्राम्य- स्त्रियांचे संगतीं जाणें ।' -एभा ८.१३९. ग्राम्यालाप-पु. १ खेडवळ गप्पागोष्टी. २ लावणी; शृंगारपर कविता. [सं.]

दाते शब्दकोश

दोर

पु. १ काथ्या, वाक, अंबाडी, ताग इत्यादि झाडांच्या सालीचे लांब तंतू. २ (राजा.) केळ, अंबाडी, भेंडी इ॰ कांच्या सालीची किंवा तंतूची वळलेली दोरी. ३ (ल.) नसलेलें दहीं, गूळ इ॰ मधील तार, तार येण्याची अवस्था; चिकटण. [सं. दोरक; प्रा. दे. दोर; हिं. दोर; फ्रेंजि. दोरी] दगडाचे दोर काढणारा-वि. युक्तिवान्; उद्योगी. दोरक-पु. १ शिवण्याचा दोरा. २ दोर अर्थ १ पहा. दोरखंड; दोरी. [सं.] ॰कस-पु. १ गाडी, मोट इ॰ नां बांधावयाचा दोर; नाडा; चर्‍हाट. २ बारीक दोरी. -न. एकत्र बांधलेल्या पुष्कळशा दोर्‍या. ॰खंड-न. १ जाड दोर; सोल. २ दोराचा तुकडा. ३ कालाचा(केळीच्या गाभ्याचा) तंतु. ॰खंडें-नअव. गलबताचे दोर; जाड दोर.॰गुंडापु. सालींचें किंवा दोरोचें भेंडोळें (शाकारण्याच्या कामीं उपयोगी). दोरडेंन. (कों.) १ जाड किंवा मोठा दोर; दोरखंड. २ (निंदार्थीं) दोराचा तुकडा (वाईट, निरुपयोगी दोरासंबंधीं योजतात). दोरणी-स्त्री. दोरी. दोरत्व-न. दोरपणा; दोर असण्याची स्थिति. 'दोरत्व दृष्टि अचळ झालें ।' -सिसं ९.९७. दोरवा-पु. १ अंगांत उभ्या जाड रेघा असलेला कपडा; कापडाचा एक प्रकार. २ (कों.) तडा; चीर; भेग; दगड इ॰ कामध्यें असणारा दोरा. ॰दोरा-पु. १ सूत (शिवण्याचें); वळीव, पिळदार सूत. २ तडा, भेग. दोरवा अर्थ २ पहा. ३ (ल.) लहान झरा; झिरण. 'या विहिरीस तळ्याचे दोरे आहेत.' ४ (ल.) जोड; संबंध; आप्तपणा; धागा- दोरा. 'हे जर आमचे जातीचे असतील तर यांचा आमचा कांहीं तरी दोरा असेल.' 'त्या दरबारांत आमचा कांहीं दोरा होता म्हणून जातांच पाय शिरकला.' ५ (ल.) गुप्त कारस्थान. 'हळूच लावले सारे दोरे ।' -ऐपो २५१. ६ नारूचा किडा; तंतु. ७ वृषणापासून शिश्नापर्यंतचें सूत्र. ८ (पदार्थ इ॰ च्या) शरीरास लागलेल्या किडीचा मार्ग; किडीच्या संचाराची रेषा. ९ गोगलगाई- सारख्या चिकट द्रव टाकणार्‍या प्राण्याची उमटलेली रेषा. १० एक प्रकारची बांगडी, दागिना. 'वेगळें निघतां घडीन दोरेचुडा ।' -तुगा २९५९. ११ (ना.) पोटांतील आंतडी [दोर] ॰वंजणें-(चांभारी धंदा) दोरा, घांसणें. [वंजणें = चोपडणें] दोरावणें-अक्रि. १ दोरा रेषा, शिरा, तड असणें (लांकूड, धोंडा, माती इ॰ मध्यें). २ दोराळ, चिकाळ होणें; तंतु सुटणें (नासलेला पदार्थ, तिंबलेली कणीक इ॰ मध्यें). दोराळ-वि. (राजा.) दोरमय; तंतुमय. (गरा, दहीं इ॰). दोरी-स्त्री. १ बारीक दोरा. २ जमीन मोजणीचें एक परि- माण. २० परतन, ८० किंवा १२० बिघे. ३ एक लहान मासा. ४ (सोनारी-सुतारी धंदा) चाचा एक अष्टमांश भाग; सूत. [दोर] ॰सैल देणें-सोडणें-ढिली करणें-लगाम, ताबा, नियम इ॰ ढिला करणें; स्वतंत्रता देणें. ॰सूत-क्रिवि. सरळ; ओळंब्यांत; सरळ रेषेंत. (क्रि॰ जाणें; असणें). 'हा मार्ग येथून दोरीसूत पुण्यास जातो.'

दाते शब्दकोश

देश

पु. १ प्रांत; प्रदेश; भाषाभेदानें भिन्न झालेला प्रांत. 'देशा- सारखा वेष.' २ जागा; स्थान. 'वृक्षाचे मूळदेशीं सेचन केलें म्हणजे अग्रदेशींहि टवटवी येते.' ३ योग्य स्थान; सभोवतीची परिस्थिति, भूमि. 'देश काल पाहून काम करावें.' ४ सह्याद्री, बालाघाट, कर्नाटक व गोदावरी नदी यांमधील देश. ५ (ज्योतिष) औरस चौरस १०० योजनें यांनीं व्याप्त असा भूभाग. ६ परिसीमायुक्त भूमिभाग. जसें:- देश (महाराष्ट्र, कर्नाटक देश इ॰); प्रांत (पुणें, वाई प्रांत इ॰). या- खेरीज सुभा, परगणा, तालुका, जिल्हा, महाल, कसबा, पेटा, पुठा, मौजा, संमत, तरफ, टप्पा, मजरा, मुजरी इ॰ आणखीहि भूमिभाग आहेत. यांची माहिती त्या त्या शब्दाखालीं पाहणें. [सं. दिश् = दाखविणें. तुल॰ झें. दिश्; ग्री. देइक्नुमि; लॅ. दिकेरे; गॉं. तैहन; प्रा. ज. झीग्ऑन; लिथु. झेन्क्लास = खूण; आर्मे. लेशी; लेशवाव (गांव)] (वाप्र.) ॰घेणें, आपला देश घेणें-आपल्या स्वतःच्या कामांत लक्ष घालणें. देशाचा पाटा वरवंटा होणें- बेचिराख, ओसाड करणें. देशीं जाणें-स्वदेशास जाणें. (सामा- शब्द) ॰कार-पु. एक राग. या रागांत षड्ज, तीव्र ऋषभ, तीव्र गांधार, पंचम, तीव्र धैवत हे स्वर लागतात. जाति औडुव-औडुव. वादी धैवत. संवादी गांधार. गानसमय दिवसाचा पहिला प्रहर. -वि. (गो.) देशावरचा. ॰कारण-न. देशभक्ति; राजकारण. ॰कालवस्तुपरिच्छेदरहित-वि. काळ, स्थळ इ॰ वस्तूनें अनिश्चयात्मक अथवा अनिर्ववनीय म्हणजे सर्वव्यापी, शाश्वत, अशरीर असें ब्रह्म, आत्मा, ईश्वर इ॰ ॰कुळकरण-न. देशकुळ- कर्ण्याचें काम. ॰कुळकरणी-पु. देशपांड्या; महालांतील प्रत्येक गांवच्या कुळकर्ण्यावरील मुख्य वतनदार कुलकर्णी. याचें काम कुळ- कर्ण्याचा व खोतांचा हिशेब तपासण्याचें असतें. ॰चौगुला-पु. देशमुखाच्या हाताखालील अधिकारी. ॰ठक-वि. अट्टल सोदा; महाठक. ॰त्याग-पु. १ देशांतर. २ हद्दपारी. ॰द्रोह-पु. स्वदेशाचा विश्वासघात. ॰द्रोही-वि. देशद्रोह करणारा. ॰धडी-धडीस- क्रिवि. देशोदेशीं भीक मागत फिरण्याची स्थिति. 'नाना हव्या- सांची जोडी । तृष्णा करी देशधडी ।' -तुगा ३५५. ॰धर्म-पु. १ देशाचा धर्म. २ स्थानिक आचारविचार, चालरीत. ॰पांड्या- डे-पु. देशकुळकर्णी पहा. ॰परिच्छेद रहित-वि. (ब्रह्माचें विशेषण) देश, काळ इ॰ मर्यादेच्या बाहेरचा. ॰भक्त-वि. देशाची सेवा करणारा. ॰भाषा-स्त्री. देशाची भाषा. बोलण्याची, लोकभाषा. ॰भाषाज्ञान-न. अनेक भाषांचें ज्ञान. ॰भ्रमण- न. निरनिराळ्या देशांत फिरणें; मुशाफरी; पर्यटण; प्रवास. ॰मर्यादा-स्त्री. १ देशांतील आचारविचार; संप्रदाय; नियम; पद्धति. २ देशाची सीमा. ॰मूख-पु. १ परगण्याचा वतनदार अधिकारी. हा परगण्यांतील सर्व पाटलांवरील मुख्य असतो. २ (विनोदानें) सोनाराचें कांकता नामक हत्यार. ३ (ल.) हुलगा. (कारण यास देशांत फार चाहतात). ४ वतल (ओतल) मधून पाणी काढण्याचें मडकें. ५ (विनोदानें) पिकदाणीसारखा उपयोग करण्याचें मडकें. ६ (व.) लग्नांत आणलेलें मडकें. ॰मुखी-स्त्री. १ देशमुखाचें काम किंवा अधिकार. २ महालांतील नक्त जमा- बंदीवर शेंकडा सात आणि धान्यावर शेंकडा तीन असा कर. ॰मुखीण-स्त्री. १ देशमुखाची बायको. २ (व.) वाकळ; गोधडी. ॰लेखक-पु. देशकुळकरणी पहा. ॰वटा-पु. हद्दपारी; देशत्याग. 'मोक्ष तो पाहातसे वास । रिद्धिसिद्धि देशवटा त्रास ।' -तुगा ७२७. ॰वर-वर(ऊर)करी-देशावर-वरकरी पहा. ॰वही-स्त्री. लोकांच्या नांवांची यादी, चोपडी. 'काळाची देश- वही । वाचितां माझे नांव नाहीं.' -भाए १५१. ॰वळू-वि. देशी; खेडवळ. ॰व्यवहार-पु. देशधर्म पहा. ॰साया, शाया-वि. माळवी; सोरठी. 'आणिके देशशाया सांगडी । कोसी कनकवर्णी ।' -दाव २८१. ॰सेविका-वि. १ देशाची सेवा करणारी (स्त्री.). २ स्वयंसेविका. ॰स्थ-वि. १ ब्राह्मणांतील एक पोटजात. २ देशांत राहणारा. ॰स्थी-वि. देशस्थासंबंधीं (व्यवहार इ॰). देशाउर- देशावर पहा. 'तो देशाउरें निघाला ।' -पंच १.३९. देशाचार-पु. देशधर्म पहा; शास्त्रप्रमाण नसतांहि एखादे देशामध्यें शिष्टपरंपरेने चालत असलेला आचार. देशाटन-न. देशभ्रमण पहा. 'केल्यानें देशाटन पंडितमैत्री सभेंत संचार' देशांतर-न. १ परदेश; दुसरा देश; (धर्मसंबंधीं बाबींत) साठ योजनें दूर असणारा अथवा नदी-पर्वतानें तुटक झालेला असा देश. हा परका समजला जातो. २ याम्योत्तरवृत्तापासून पूर्वेकडील अथवा पश्चिमेकडील अंतर. देशांतरीं जाणें, देशांतर करणें-प्रवास करणें देशाधडी- धडीस-देशधडी पहा. देशाभिमान-पु. देशाचा अभिमान; स्वराष्ट्राविषयीं तळमळ, प्रेम, जिव्हाळा. 'खरा देशाभिमान म्हणजे आपल्या देशांतील लोकांचीं निकृष्टावस्थेचीं कारणें शोधून तन्निवार- णार्थ उद्योग करणें. -टिसू १०७. देशावर-पु. १ देशोदेशीं भीक मागत फिरणें.' २ -न. अशा रीतीनें मिळविलेली भिक्षा. ३ पर- देश; परदेशी व्यापाराचा, पेठेचा गांव. ४ परदेशी, आयात माल. ५ परदेशाच्या व्यापारी, किंमतीसंबंधीं बातम्या. देशावरास-देशा- वरीं जाणें-१ देशपर्यटन करणें. २ देशोदेशीं भिक्षा मागत फिरणें. देशावरकरी-कर-पु. देशोदेशीं भिक्षाटण करणारा माणूस. देशाळू-वि. (व.) देशावरचा; मोठया शहरांतील. देशिक-पु. १ प्रवासी; मुशाफर; परदेशांत फिरणारा. २ आत्मज्ञानोपदेशक सद्गुरु. ३ समूह; थवा. 'ऐसां कव्हणी नाहीं अभिचरिकू । जो होमीं कोंकिळांचां देशिकू ।' -शिशु ८४३. देशी-वि. १ घाटावरील देशासंबंधीं. २ (समासांत) त्या त्या देशासंबंधीं. जसें:- पुणेदेशी; एतद्देशी इ॰ २ मराठी भाषा; देशांतील भाषा. 'देशियेचेनि नागर पणें ।' -ज्ञा १०.४२. ११.३ देशीकार-वि. मराठी भाषेच्या आकाराचें; मराठी भाषेमध्यें रचलेलें बनविलेलें. 'केलें ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणें । -ज्ञा १०.१८०५. [देशी + आकार] देशी- ताल-ताल पहा. देशीय-वि. देशी अर्थ १२ पहा. देशी- संगीत-न. निरनिराळ्या देशांतील लोकांच्या अभिरुचीप्रमाणें प्रचलित असलेलें संगीत. गान पहा. देशोधडी-धडीस-देस- धडी, धडीस-क्रिवि. देशधडी पहा.

दाते शब्दकोश

वर्ण

पु. १ रंग; छटा. ज्ञा ६.९७. -एभा १.१२४.२ समाजांतील वर्ग; जात (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र) -ज्ञा ४.९०. 'समाजाचे वेगळाले संघ तयार झाले तेच वर्ण.' -गांगा २१. ३ (सामा.) संघ; समूह; पंथ; पक्ष. ४ कंठांतून निघणारा स्वर; ध्वनि. याचे चार प्रकार-स्थायी, आरोही, अवरोही व संचारी. ५ (व्या.) भाषेंतीलस्वर-व्यंजनांच्या मालिकेंतील प्रत्येक अक्षर. 'म्हणोनि वर्णत्रयात्मक । जें हें परब्रह्मनाम एक ।' -ज्ञा १७.३५३. ६ कसोटीवरील उठविलेल्या सोन्याचा रंग. यावरून सोन्याची प्रत कळते. ७ (अंकगणित) गुणक; पट दाख- विण्यासाठीं अक्षर किंवा यापूर्वीं घातलेला अंक किंवा अक्षर. (इं.) कोइफिशंट. [सं.] ॰क्रम-पु. अक्षरांचा क्रम; अकार- विल्ह्याचा क्रम. ॰चतुष्ट्य-न. चातुर्वर्ण्य; ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य शूद्र या चार जाती. चतुष्ट्य पहा. ॰चिकित्सा-जलचि- कित्सा-स्त्री. निरनिराळ्या रंगांच्या बाटल्यांत ठेवलेल्या पाण्या- वर सूर्यकिरणांचें कार्य झाल्यावर तें पाणी औषधासारखें वाप- रण्याची पद्धत. (इं.) क्रोमोपथी. ॰जन्य अपेरण-न. (शाप.) रंगापायन; रंगापेरण. (इं.) क्रोमॅटिक अँबरेशन. ॰धर्म-पु. १ ज्या त्या जातीला योग्य असा आचार, व्यवहार. २ मनुष्याचें एक घटक या नात्यानें समाजांतील स्थान आणि तदनुसार त्याचीं कर्तव्यें, हक्क व जबाबदारी यांचा विचार ज्यांत येतो. -काणे धर्मशास्त्रविचार. ॰माला-स्त्री. मुळाक्षरें; अक्षरमाला; मातृका. ॰लेखनशास्त्र-न. ठराविक वर्णांना किंवा ध्वनींना ठराविक संज्ञा किंवा चिन्हें असावीं व ठराविक संज्ञांचे किंवा अक्षरांचे ध्वनि ठराविकच असावे हें मत प्रतिपादन करणारें शास्त्र. (इं.) फोने- टिक्स. ॰विचार-पु. (व्या.) वर्णाचा विचार ज्यांत केला जातो तो व्याकरणाचा भाग. ॰विपर्यय-विपर्यास-व्यत्यय- व्यत्यास-पु. (भाषा.) शब्दांतील वर्णांची अदलाबदल स्थानांतर. उदा॰ डोचकें-डोकचें; महाशूर-महाशूर, बाराणसी-बनारस इ॰ ॰विपर्यास-पु. १ रंगाची विरुद्धता; विरोध. २ रंग उडत जाणें, वाईट होणें. ॰व्यवस्था-स्त्री. चातुर्वर्ण्य. ॰शः-क्रिवि. १ जात- वार; वर्गवार; वर्णाप्रमाणें. २ अक्षरशः; अक्षरानुक्रमानें. ॰संकर- पु. १ मिश्रजात, वंश. हा प्रथम चार वर्णांच्या व्यभिचारापासून उत्पन्न होऊन, नंतर व्यभिचारसंततीच्या परस्पर संबंधापासूनहि बनत जातो. २ एकंकार; भ्रष्टाकार; वर्णैक्य; सबंगोलंकार. 'वर्ण- संकर करूं नये ।' -दा १४.१.७६. ॰संधि-पु. शब्दांच्या अंतीं किंवा एकापुढें एक येणाऱ्या दोन अक्षरांचा संयोग. ॰हीन-वि. जातिहीन; जातीमध्यें समावेश नसलेला. वर्णांचें स्थान-न. मुखाच्या ज्या स्थानापासून वर्णाचें उच्चारण होतें ते स्थान. वर्णांधता-स्त्री. दृष्टीच्या व्यंगामुळें रंग न ओळखणें. [वर्ण + अंधता] वर्णानुप्रास-पु. (काव्य) तेंच तेंच व्यंजन पुन्हां पुन्हां येणें; अनुप्रास पहा. वर्णांवर्ण-पु. जात असणें व नसणें; भेदा- भेद विरहित जात. यातायाती पहा. [वर्ण + अवर्ण] वर्णा- श्रम-पु. अव. चार वर्ण व चार आश्रम (ब्रह्मचर्य, गार्हस्थ्य, वानप्रस्थ व संन्यास). 'मग वर्णाश्रमासि उचित ।' -ज्ञा ४.९०. [वर्ण + आश्रम] ॰धर्म-पु. वर्णाश्रमाचे नियम पाळण्याविषयीं आज्ञा करणारा धर्म. वर्णीक-वि. अयोग्य, भलत्याच रंगाची झांक असलेलें (रत्न). वर्णोच्चार-पु. वर्णांचा उच्चार. [वर्ण + उच्चार]

दाते शब्दकोश

शब्द

पु. १ आवाज; उच्चार; कोणत्याहि प्रकारचा ध्वनि; श्रोत्रेंद्रियाचा विषय. २ एखाद्या वस्तूचा, कल्पनेचा, दर्शक किंवा व्यंजक, जो अक्षरसमूह तो. ३ (व्या.) प्रथमादि विभक्ति ज्या- वरून होतात अशी वर्णानुपूर्वी (नाम, सर्वनाम इ॰ ). 'तळमळ हा संस्कृत शब्द चालतो तरी कसा ?'. -नारुक ३.४. ४ बोल; वाईटपणा; ठपका. (क्रि॰ लागणें; येणें; ठेवणें; लावणें; आणणें). 'तें केलें धार्तराष्ट्री विफळ सकळहि, आणिला शब्द सामीं ।' -मोकृष्ण ६८.३३. ५ आज्ञा; हुकूम. ६ प्रतिज्ञा; वचन; वाचा. 'एकवेळ गेले शब्द ।' -संग्रामगीतें १२०. ७ वेद. 'त्यासि शब्दपर निष्णातू ।' -एभा १०.३४९. ८ शास्त्र. 'शब्दाचिया आसकडी । भेद नदीची दोही थडी । आरडते विरह वेडी । बुद्धिबोध ।' -माज्ञा १६.५. [सं. शब्द = नाद करणें] (वाप्र.) ॰खाणें-लिहितांना किंवा बोलतांना शब्द गाळणें, न लिहिणें किंवा न उच्चारणें. ॰खालीं न पडणें-दुसऱ्याच्या सांगण्या- प्रमाणें करणें; शब्दाला किंमत देणें; शब्द मानणें. ॰खालीं पडूं न देणें-उत्तरास प्रत्युत्तर देणें; वादविवादांत किंवा भांड- णांत माघार न घेणें. ॰झेलणें-ज्याची सेवा, चाकरी शुश्रूषा, खुशामत वगैरे करावयाची असेल, त्याच्या तोंडून आज्ञा निघतांच तिच्याप्रमाणें करणें. 'राजकारस्थानी पुरुष आणि सेनापति यांचे शब्द त्यांच्या अमदानींत सगळे लोक झेलीत असतात' -ओक. ॰टाकणें-१ मागणी, विनंति करणें; एखादी गोष्ट सांगून बघणें. २ शिफारस करणें. ॰ठेवणें-लावणें-लागणें-दोष देणें; ठपका ठेवणें; दूषण लावणें. 'माझेनि दोषें पावलों खेद । हा तुज कासया ठेवणें शब्द ।' -मुक्तेश्वर. 'त्वत्सम साधु न लागों देती स्वयशासि शब्द ते राजे' -मोवन २.३६; -मोउद्योग ८.१९. ॰लागूं देणें-लागू-लावू देणें-दोष पत्करणें. 'सत्यप्रतिज्ञ पांडव लागूं देती न आपणा शब्द ।' -मोविराट ४.६३. सामाशब्द- ॰काठिण्य-न. (अलंकार) शब्दाचा कठोरपणा, कर्कश- पणा. [सं.] ॰कार्पण्य-न. अल्पभाषा; कमी बोलणें; मित- भाषण. 'शब्दकार्पण्य पंडितास दोष स्त्रीला महाभूषण ।' [सं.] ॰कोश-षपु. १ शब्दसंग्रह; शब्दसमुच्चय; शब्दांचा साठा- खजिना; शब्दांचा अर्थासह संग्रह. २ शब्दाचे अर्थ, व्युत्पत्ति, व्याकरण वगैरे सांगणारा ग्रंथ. [सं.] ॰कौशल्य-न. शब्दरचना- चातुर्य; भाषाचातुर्य. [सं.] ॰खंडन-न. शब्द, विधान इ॰ खोडून काढणें; शब्दावरील टिका. ॰गुण-पु. शब्दांचे गुण, लक्षण. हे एकंदर चोवीस आहेत. ते पुढील प्रमाणें:- श्लेष, प्रसाद, समता, माधुर्य, सुकुमारता, अर्थव्यक्ति, उदारत्व, कांति, उदात्तता, ओज, सुशब्दता, और्जिंत्य, विस्तर, समाधि, सौक्षम्य, गांभीर्य, प्रेम, सन्मितत्व, प्रौढी, रीति, उक्ति, गति, भावुक, संक्षेप. इ॰ ॰चातुर्य-न. शब्दरचनाकौशल्य; वाक्चातुर्य; शब्दपटुता; भाषा- शौली; भाषाप्रभुत्व. [सं.] ॰चित्र-न. १ शब्दांनीं केलेलें वर्णन, काढलेलें चित्र. २ (साहित्य) चित्रकाव्याचा एक प्रकार; शब्द- चमत्कृति. उदा॰ 'मागे जी लुगडी, सकाप बुगडी' इ॰. [सं.] ॰चोर-पु. दुसऱ्याचा लेख चोरून तो आपलाच म्हणून दडपून देणारा; दुसऱ्याचे शब्द चोरणारा; उष्टा बोल वापरणारा. ॰जाल-ळ-न. १ शब्दांचें जाळें; अनंत शब्दांचा नुसता समूह; शब्दावडंबर; शब्दभारूड. २ वायफळ भाषण; बडबड. 'म्हणती शब्दजाळ टाकून । निश्चल एकाग्र ऐसिजे मनें ।' [सं. ] ॰तः-क्रिवि. शब्दानें. 'शब्दतः अर्थतः अगाघ खोली ।' -एभा २१.३६७. [सं.] ॰ताडन-न. एखाद्यास लागेल असें भाषण; शब्दांचा मार; टोचून बोलणें. 'सूज्ञास शब्द ताडन मूर्खास प्रत्यक्ष ताडन.' [सं.] ॰तात्पर्य-न. भाषणाचा सारांश; शब्दार्थ; मतलब. [सं.] ॰दोष-पु. १ शब्दांतील व्यंग, उणेपणा; शब्दापराध; शब्दवैगुण्य. काव्यप्रकाशांत एकंदर शब्ददोष १३ सांगितले आहेत. ते पुढीलप्रमाणें: श्रुतिकटु च्युतसंस्कृति, अप्रयुक्त, असमर्थ, निहतार्थ, अनुचितार्थ, निरर्थंक, अवाचक, अश्लील (जुगुप्सा, अमंगल, व्रीडा-युक्त), संदिग्ध, अप्रतीत, ग्राम्य, नेयार्थ. 'प्रताप रुद्रांत पुढील सतरा शब्ददोष सांगितले आहेत:-अप्रयुक्त, अपुष्ट-अपुष्टार्थ, असमर्थ, निरर्थक, नेयार्थ, च्युतसंस्कार-च्युतसंस्कृति, संदिग्ध, अप्रयोजक, क्लिष्ट, गूढ-गूढार्थ, ग्राम्य, अन्यार्थ, अप्रतीतिक, अविसृष्ट विधेयांश, विरुद्धमतिकृत, अश्लील (जुगुप्सा, व्रीडा, अमंगल- युक्त), परुष-श्रुतिकटु. २ दोषारोप; बोल; ठपका; आळ. (क्रि॰ ठेवणें; घालणें; लावणें; आणणें; येणें; लागणें). ३ शब्दामुळें, नांवामुळें लागलेला बट्टा; कलंक. उदा॰ 'प्रतिव्रतेस व्यभिचारिणी म्हटली शब्ददोष तर येतो'. ॰ध्वनि-पु. आवाज; स्वर; बोलणें. 'तिचा हा शब्दध्वनि । म्यांही श्रवणीं ऐकिला ।' [सं.] ॰परीक्षा-स्त्री. (वैद्यक) शब्दाच्या स्पष्टास्पष्टतेवरून किंवा जड हलकेपणावरून व्याधिनिदान करणें. [सं.] ॰पांडित्य-न. १ वक्तृत्व; भाषापांडित्य. २ कृती न करतां उगीच कोरडें व डौलाचें वाक्पाटव करणें; वृथा बडबड; प्रौढी. [सं.] ॰पारुष्य-न. कठोर भाषण; कटु भाषण. [सं.] ॰पाल्हाळ-पु. शब्दावडंबर; शब्दभारूड. शब्दजाल पहा. (क्रि॰ लावणें; मांडणें; करणें). ॰प्रमाण-न. शब्दांनीं दिल्ला पुरावा; साक्ष (तोंडी), [सं.] ॰प्रहार-पु. वाक्ताडन; मनाला लागतील, दुःख देतील असे शब्द बोलणें; रागें भरणें. [सं.] ॰बोध-न. शब्दज्ञान. शब्दबोधें सदोदित ।' -एभा २.१६७. ॰ब्रह्म-न. वेद. 'हें शब्दब्रह्म अशेष ।' -ज्ञा १.३; एभा ११.४९८. [सं.] ॰भेद-पु. १ शाब्दिक फरक. २ प्रतिशब्द; दुसरे शब्द. [सं.] ॰भेदी-वेधी-वि. १ आवाजावरून बाण मारण्यांत पटाईत, निष्णात, तरबेज. २ वस्तूचा नुसता नाद ऐकून त्यावर बिनचूक जाणारा, वेध करणारा (अस्त्र, शक्ति, मंतरलेला बाण इ॰). ३ (ल.) थोडक्या शब्दांवरून एखाद्याचें अंतरंग, मतलब, बेत जाणणारा; चांगला तर्कबाज. ४ दशरथ, अर्जुन यांचें विशेषण, अभिधान. [सं.] ५ मंत्रानें दुस- ऱ्याचा नाश करणारा; केवळ मंत्रोच्चारामुळें शत्रूचा नाश करणारा. ॰माधुर्य-न. शब्दांतील गोडी; मधुर भाषण. [सं.] ॰योगी- वि. (व्या.) व्याकरणांत नामें आणि नामाप्रमाणें योजलेले इतर शब्द यांना जोडून येणारें (अव्यय). उदा॰ वरे, खालीं, पुढें, मागें इ॰. हीं ज्यांना जोडलीं जातात त्यांचे सामान्यरूप होतें. ॰योजनास्त्री. १ शब्दांची निवड, योग, जुळणी. २ शब्द- रचना; वाक्यरचना. [सं.] ॰योनि-स्त्री धातु; शब्दाचें मूळ. [सं.] ॰रचना-स्त्री. शब्दांची रचना, मांडणी; वाक्यरचना; शब्दयोजना. [सं.] ॰राशि-पु. वेद. -मनको. ॰लालित्य-न. शब्दसौंर्य; शब्दांची मनोवेधक योजना. लालित्य पहा. [सं.] ॰वाहक यंत्र-न. विजेच्या सहाय्यानें दूर अंतरावरून बोल ण्याचें यंत्र. (इं.) टेलिफोन. 'सौ. महाराणीसाहेबास वारा घाल- ण्यास एक स्त्री कामगार पाठविण्यास शब्दवाहकद्वारें...हुकूम द्यावा' -ऐरापुप्र ४.२२४. ॰विचार-पु. १ शब्दसाधनविचार; प्रत्यय प्रकरण. (इं.) इटिमॉलॉजी. २ (व्या.) वाक्यांतील निरनिराळ्या शब्दांचा परस्परांशीं असणाऱ्या संबंधाचा विचार. ॰विता- पु. परमात्मा. -मनको. ॰वेध-पु. १ वेदांतील गूढ स्थळें; शब्दांचें कूट; शब्दांचें जाळें; आडंबर. 'कंठीं शब्दवेधांचें साखळें.' -शिशु १११. २ आवाजास अनुसरून बाण, गोळी वगैरे मारणें. ॰वेधी-वि. शब्दभेदी पहा. ॰वैपरीत्य-न. (बोलणाराच्या हेतूशीं) विरुद्ध, विपरीत शब्दयोजना; भलतीच शब्दयोजना; चुकीची पदयोजना. 'कुंभकर्ण बोलला निद्रापद, कुंभकर्णाच्या मनांत होतें इंद्रपद, तस्मात्-शब्दवैपरीत्य झालें.' [सं.] ॰शक्ति-स्त्री. १ शब्दाचा जोर; शब्दाचा वास्तविक, अगदीं बरो- बर असा अर्थ. शब्दाचा यौगिक अर्थ. २ (साहित्य) अभिधा, वझणा, व्यंजन इ॰ शब्दार्थ बोधकवृत्ति. [सं.] ॰शक्तिगम्य-वि. शब्दशः; मूळ अर्थाप्रमाणें. ॰शासन-न, शब्दांचा अर्थ, त्यांची योजना वगैरे संबंधी; व्याकरणशास्त्र, शब्दविचार, इ॰ नियम. [सं.] ॰शास्त्र-न. १ शब्दविज्ञान; शब्दांचें संपूर्ण विवरण कर- णारें शास्त्र; व्युत्पत्तिशास्त्र. २ व्याकरणशास्त्र. [सं.] ॰शुद्धि- स्त्री. १ व्याकरणनियमाप्रमाणें निर्दोष अशी शब्दयोजना; अचूक मांडणी. २ शब्दांतील दोष काढून टाकणें; शब्दांची तपासणी; दुरस्ती. ३ परकीय शब्द न वापरणें; भाषाशुद्धि. ॰शूर-पु. केवळ बोलण्यांत शूर, पटाईत. -धनुर्भंग पृ. ७३. ॰श्री-स्त्री. शब्दांची शोभा. 'एथूनि शब्दश्री सच्छास्त्रिक ।' -ज्ञा १.३४. ॰संग्रह-पु. शब्दसमूह; शब्दसमुच्चय; शब्दकोश-ष. [सं.] ॰संचय-पु. शब्दांचा सांठा, समूह; शब्दांची समृद्धि, वैपुल्य. ॰संदर्भ-पु. वाक्य रचनेंतील शब्दांचा एकमेकांशीं असलेला संबंध-अन्वय. [सं.] ॰सादृश्य-न. (अर्थानें अगदीं निराळे असणाऱ्या) शब्दांतील साम्य, सारखेपणा [सं.] ॰साध- निका-स्त्री. १ शब्दविचार; शब्दांची बनावट; व्युप्तत्ति. २ शब्दांची फोड, उकल; व्याकरण चालविणें. [सं.] ॰साधित- न. शब्दापासून, नामापासून साधलेला शब्द. -वि. (व्या.) नामापासून बनलेलें. याच्याउलट धातुसाधित. [सं.] ॰साम्य- न. शब्दांचा सारखेपणा; सादृश्य. [सं.] ॰सूची-स्त्री. शब्दांची सूची. याच्या उलट पदसूची वगैरे. [सं.] ॰सृष्टि-स्त्री. १ शब्दांचा संग्रह; शब्दांची रचना. २ (ल.) काव्य; ग्रंथ; प्रबंध. 'आतां वंदूं कवेश्वर । शब्दसृष्टीचे ईश्वर ।' -दा १.७. [सं.] ॰स्फुरण-न. (शब्दांचें फुरफुरणें, थरथरणें) ज्यांत जोडाक्षरें व ट वर्गांतींल अक्षरें एकसारखीं पुष्कळ येतात अशा कठोर, कर्ण- कटु प्रबंधाबद्दल म्हणतात [सं.] ॰स्वारस्य-न. शब्दांतील गोडी, लज्जत; शब्दामाधुर्य. [सं.] शब्दविणें-क्रि. बोलविणें. 'मीचि शब्दातें शब्दातें शब्दबिता ।' -एभा १३.३४४. शब्दाचा मार-पु. वाक्ताडन; शब्दप्रहार; कानउघाडणी; निर्भर्त्सना. 'वेड्यास टोणप्याचा मार, शहाण्यास शब्दाचा.' शब्दांची कसरत-स्त्री शंब्दांची कसरतीप्रमाणें वळेनें केलेली अस्वाभा- विक रचना. 'भाषा आणि तपश्चर्या, वचनाचें कष्ट, शब्दांची कसरत, या गोष्टींची जरूर असते.' -नाकु ३.४. शब्दाडंबर- न. शब्दजाल; केवळ शब्दांचें वैपुल्य; अर्थहीन शब्दरचना; पोकळ वक्तृत्व. [सं. शब्द + आडंबर] शब्दातीत-वि. शब्दांच्या किंवा बोलण्याच्या शक्तीबाहेरचें; वर्णन करितां येत नाहीं असें; शब्दांनीं वर्णन करण्यास अशक्य; अनिर्वाच्य. [सं. शब्द + अतीत] शब्दानुप्रास-पु. (साहित्य) शब्दाचा अनुप्रास; एक यमक- रचना; ज्यांत त्याच त्या शब्दाची पुनःपुनः आवृ्त्ति होतें असा अलंकार. याच्या उलट वर्णानुप्रास. [शब्द अनुप्रास] शब्दानु- शासन-न. शब्दशासन; शब्दांच्या लिंग, रूपांबद्दल, अर्थाबद्दल वगैरे नियम. [सं.] शब्दानशब्द-क्रिवि. प्रत्येक शब्द. 'या एकंदर बोलण्यांतील शब्दान्शब्द शांतपणानें शिष्याच्या मुखांतून निघत होता.' -उषःकाल. [शब्द + न् = आणि + शब्द] शब्दा- मृत-न. (काव्य) शब्दमाधुर्य; वाड्माधुर्य; अमृताप्रमाणें गोड शब्द. [शब्द + अमृत] शब्दार्थ-पु. १ शब्दाचा अर्थ, आशय २ शब्दाचा मूळ, शब्दाशः अर्थ; यौगिकार्थ. [सं.] शब्दालंकार- पु. (साहित्य) शब्दाच्या रूपावरून साधलेला अलंकार; काव्यां- तील अनुप्रास; यमकादि अलंकार; याच्या उलट अर्थांलंकार. या अलंकारांचें पुढील पांच प्रकार आहेत:-वक्रोक्ति, अनुप्रास, यमक, श्लेष, पुनरुक्तवदाभास. ह्यांत पुन्हां प्रत्येकाचे जे निरनिराळे भेद आहेत ते सर्व प्रतापरुद्रग्रंथांत व काव्यप्रकाशांत सांगितले आहेत. [सं.] शब्दाशब्द-पु. १ चांगले-वाईट शब्द; अविचाराचे व उद्धटपणाचें भाषण; वेळ प्रसंग न पहातां असभ्यपणाचें बोलणें. 'चौघांमध्यें शब्दाशब्द बोलूं नये, चांगले बोलावें' २ अप्रत्यक्ष व आक्षेप न घेतां बालणें; चांगलें किंवा वाईट (यांपैकीं कोणतेंच नाहीं असें) भाषण. 'मी त्याला शब्दाशब्द कांहीं बोललों नाहीं.' [सं. शब्द + अशब्द] शब्दित-न. भाषण; आवाज; बोलण्याचा स्वर; ध्वनि. -वि. १ उच्चारलेलें; बोललेलें; वदलेलें; घोषित केलेलें. २ शब्दानें युक्त केला जो वाद्यादि तो; वाजविलेलें; निना- दित. [सं.] शाब्द, शाब्दिक-वि. शब्दासंबंधीं, वाग्युक्त; वाणीयुक्त; वाचिक. 'तरी तप जें कां सम्यक् । तेंही त्रिविध आइक । शारीर मानसिक । शाब्द गा ।' -ज्ञा १७.२००. २ स्वरासंबंधीं; आवाजासंबंधीं. ३ (व्या.) नामासंबंधीं; नामवा- चक (प्रत्यय वगैरे). ४ अनुभवाशिवाय बडबड करणारे; केवळ शब्द जाणणारे; शब्दज्ञानी. 'वृथा शाब्दिकांचें शब्दज्ञान । तेंहीं व्याख्यान दाविलें ।' -एभा ११.६४८. -पु. शब्दांचे अर्थ जाणण्यांत व रूपें समजण्यांत, करण्यांत निष्णात, हुषार; तरबेज; वैयाकरण. [सं.] शाब्दबोध-पु. शाब्दिक बोध; अक्षरशः होणारा अर्थ; यौगिक अर्थ. [सं.] शाब्दिकसृष्टि-स्त्री. अलंकारिक, कुशल शब्दरचना; काव्यप्रबंधांतील शब्दरचनाचातुर्य. [सं.] शाब्दी-स्त्री. शब्दप्रवृत्ति. 'तेवींचि हा अनादि । ऐसी आथी शाब्दी ।' -ज्ञा १५.२३०.

दाते शब्दकोश

भार

पु. १ गुरुत्व; जडपणा. ज्या योगानें पदार्थ निराधार असतां खालीं येतो तो पदार्थाचा धर्मविशेष. २ वजन तोलून काढलेलें परिमाण. ३ कोणतीहि वजनदार वस्तु; वस्तु; दाब; दडपण. 'कागद वार्‍यानें उडतात त्यावर कांहीं भार ठेव.' ४ (ल.) (काम, उपकार, मेहेरबानी इ॰ चें) वजन; ओझें. 'तो भारु फेडावेआ जगन्नाथा । अवतरलासी तूं ।' -शिशु १४७. ५ (ल.) ओझ्याप्रमाणें मानलेलें काम; दयेचें कृत्य; उपकार. ६ (ल.) महत्त्व; गौरव; धन्यता; वजन ७ शैत्यादि विकरामुळें डोक्यास भासणारा जडपणा. 'आज माझे मस्तकास भार पडला आहे.' ८ एक रुपयाच्या वजनाइतकें वजन; एक तोळा वजन. 'ही वाटी पंचवीस भार आहे.' ९ (समासांत पदलोप होऊन) विशिष्ट वजन. 'पैसाभार लोणी, ढबूभार साखर, वीस रुपये भार गूळ.' १० ओझें; वजन उदा॰ काष्ठ-तृण-पर्ण-भार. 'सोनसाखळीचा झाला भार ।' -मसाप २.१. ११ (सैन्याचें एक अंग म्हणून) संख्या- बल. जसें-अश्वभार, कुंजलभार, दळभार, रथभार इ॰. १२ (काव्य) कळप; तांडा; समूह. 'वाटेसि गडगडतां व्याघ्र । थोकती जैसे अजाचे भार।' १३ समूह; समुदाय; मेळा; गर्दी. उदा॰ गोभार, द्विजभार, भृत्यभार इ॰. 'आशीर्वचनीं जयजयकार । करूनि बैसला ऋषींचा भार ।' -मुआदि १६.११०. १४ सेना; समूह. 'दळ- व्याचा भार कुरडूंच्या मैदानीं गेला ।' -एपो ६८. १५ भर; बहर.'मग हें रसभावफुलीं फुलैल । नानार्थ फळभारें फळा येईल ।' -ज्ञा ११.२०. 'नम्र होती फळभारें तरुवर सारे' -शाकुंतल. १६ ओझें; काळजी; जबाबदारी; आधार. 'सखे, मी सर्व भार परमेश्वरावर ठेविलेला आहे.' -रत्न २.१. १७ व्यूह; बेत. 'ते पाहोन राजभुवरानें लष्कर पायदळ फौज करून भार रचिले.' -इमं ९. १८ आठ हजार तोळे वजन. (चार तोळे = १ पल; १०० पला = १ तुला; २० तुला = १ भार. 'रत्नें प्रस्थ भार एक एक कनक । ऐसी दक्षिणा आरंभीं ।' -जै १.९१ -वि. जड. 'मत्प्रश्न भार कां गमला?' -मोअश्व २.३०. [सं. भार; फा. बार] ॰कस-नपु. १ गाड्यावर किंवा उंट, हत्ती इ॰च्या पाठीवर सामान कसून बांधण्याचा सोल, दोर. २ वादळांत तंबू डळमळूं नये ,म्हणून त्याच्यावरून टाकून जमिनीस खिळविलेली दोरी. [तुल॰ फा. बारकश्] ॰ग्रस्त-पीडित, भाराकुल, भाराक्रांत, भारान्वित, भारार्त-वि. (शब्दशः व ल.) ओझ्यानें पीडि- लेला, त्रासलेला. ॰दडीचावि. वजनदार; भारदस्त. ॰दर्शक- वि. वजन दाखविणारें (परिमाण). उदा॰ मण, पौंड, तोळा, मासा इ॰. ॰दस्त-दस्ती-दास्त-दार-वि. १ वजनदार; मह- त्त्वाचा. २ बहुमोलाचा; मूल्यवान्. [भार + फा.दस्त इ॰] ॰दस्ती- दारी-स्त्री. १ वजन; महत्व. २ हुकमत चालविण्याचें सामर्थ्य, अधिकार, सत्ता. भारंदाज-वि. वजनदार; फायदेशीर; भरभरा- टीचा (माणूस, धंदा). [फा. बार + अंदाज] भारंदाजीस्त्री. सार; महत्त्व; भरीवपणा; फायदेशीरपणा (मनुष्य, काम इ॰चा). ॰दार-वि. निष्णात; प्रवीण; वाकबगार; महत्त्वाचें काम कराव- याला जबाबदारी घेण्याला लायक, समर्थ. [हिं.] ॰दारी-वि. ओझें वाहणारा; ओझ्याचा. 'जरूरियात प्रसंगीं भागीदारी गाडे लागल्यास...' -राजमहाल कामगारी कारकुनांच्या कर्तव्या- संबंधीं नियम पृ. ६. ॰धडी-स्त्री. १ जड वस्तु; भारी सामान. 'भारधडी झाडून गेली परंतु वस्तीस मनुष्यें होतीं.' -भाब ३०. २ गैरलढाऊ लोक. 'मल्हारराव यांचीं मुलेमाणसें भारधडी इंदुरास राहिली.' -भाब ९६. ॰ब(बा)रदारी-क्रिवि. लवा- जम्यासह. 'औरंगाबादेहून देखील भारबारदारी दिल्लीस जात आहेत.' -शाछ १.२७. [भार + बरदार = वाहक] भारंभार-वि. सारख्या वजनाचें; भारोभार. 'हे रुपये द्यावे आणि भारंभार चांदी घ्यावी.' [भार + आणि + भार] ॰भूत-वि. १ जड; भार झालेला. 'भारभूत होय जीणें...।' -विक ८२. २ (ल.) निरुपयोगी; निरर्थक. ॰मान-न. १ गुरुत्व; जडपणा. याच्या उलट आकारमान. २ हवेचा दाब मोजण्याचें यंत्र; भारमापक यंत्र. (इं.) बॅरोमीटर. ॰वाहक-वि. १ ओझें वाहणारा (मनुष्य, गाडी, जनावर इ॰) 'कीं आले खर, भारवाहक असे पोटीं मनुष्याकृती ।' -विक १२. २ (संसार, कामधंदा इ॰चा) भार, जबाबदारी सहन करणारा. ३ अंगीं असलेल्या विद्यादि गुणांचा-द्रव्य मिळविणें इ॰ कामीं उपयोग न करणारा (माणूस); ओझ्याचा बैल. ॰शांखळ-ळा- स्त्री. (महानु.) शृंखला. 'तो जुझारां गडे । पाईं भारशांखळ काढे ।' -भाए ३५९. [भार + शृंखला] भारोभार-क्रिवि. सारख्या वजनाचें; भारंभार. [भार द्वि.] भारकी-कें-स्त्रीन (काटक्या, गवत, पानें इ॰चा) लहान भारा, ओझें. [भारा अल्प.]

दाते शब्दकोश

महत्

वि. १ मोठा; बडा; विस्तृत. २ (ल.) थोर; वरच्या दर्जाचा; उत्कृष्ट; कोणत्याहि गुणांत श्रेष्ठ. जसें-महाबुद्धिमान्, महालबाड; महासोदा. महत् हा शब्द कर्मधारय आणि बहुव्रीहि समासांत महा असा होतो आणि तत्पुरुष समासांत तसाच राहतो. जसें-महादेव, महाबाहु व महत्पूजा; महत्सेवा. ३ अतिशय; फार; अत्यंत. जसें-महाप्रचंड; महातीक्ष्ण इ॰ [सं.] महतामहत्-वि. (व.) मोठ्यांतला मोठा; सर्वांत मोठा. महत्तत्व-न. सत्व, रज, तम या तीन गुणांची साम्यावस्था; मूळमाया; गुणसाम्य. 'सत्त्वगुणापासून महत्तत्व उत्पन्न झालें.' -टिले ४.३६१. महत्तमसाधारण भाजकपु. दिलेल्या सर्व संख्यांना पूर्ण भाग जाईल अशी सर्वांत मोठी संख्या. महदंतर-न. फार मोठें अंतर, तफावत; वेगळेपणा. महदहंबुद्धि-स्त्री. महत्तत्त्व; अहंकार- बुद्धि. 'एवं महदहंबुद्धि । मनें महाभूत समृद्धि ।' -माज्ञा १५.१०५. महदादिदेहांत-क्रिवि. महत्तत्त्वापासून स्थूलदेहापर्यंत. 'महदादि देहांतें । इयें आशेषेंही भूतें ।' -ज्ञा ९.६७. महद्ब्रह्म-न. मूळ ब्रह्म. 'तया महद्ब्रह्मातें व्याली । दैविकी इच्छा ।' -ज्ञा ११.५११. महद्भूत-वि. विलक्षण; असामान्य; चमत्कारिक. महद्वर्त्त-न. गोलाचें वर्तुळ; खगोलीय वृत्त. महती-स्त्री. मोठेपणा; महत्त्व. 'त्याचेनि माझी त्रैलोकीं ख्याती । मज महती त्याचेनी ।' -एभा १४.२६९. महतीवीणा-स्त्री. नारदाच्या वीणेचें नांव. महत्त्व-न. मोठेपणा; योग्यता; लौकिक; प्रतिष्ठा; किंमत. महती पहा. 'रायाजी पाटिल महत्त्व रक्षी ।' ऐपो ३२. उतरणें- योग्यता; प्रतिष्ठा; कमी होणें. ॰वाढविणेंफुशारकी, बढाई मारणें. ॰दर्शक-वि. पदार्थाचें माप, लांबी, रुंदी इ॰ दाखवि- णारें (परिमाण). ॰मापन-न. गणितशास्त्राचा एक विभाग; आकारमान मोजण्याची विद्या; मापनशास्त्र. महत्त्वकांक्षा- -स्त्री. मोठेपणाची इच्छा, हांव; जिगीषा. 'कर्तबगार लोकांच्या वेडाला महत्त्वाकांक्षा म्हणतात.' -विधिलिखित २१. महा-वि. १ महत् पहा. २ थोर; बडा. 'हे एक महा आहेत.' 'तो काय एक महा आहे.' ॰अर्बुद-न. एक हजार दशकोटि ही संख्या. ॰ऊर-पु. (अप.) महापूर; अतिशय मोठा पूर. ॰एकादशी- स्त्री. आषाढशुद्ध व कार्तिक शुद्ध एकादशी. ॰कंद-पु. १ मोठ्या जातीचा कंद. २ लसूण. ॰कल्प-पु. ब्रह्मदेवाच्या शंभर वर्षांचा काल; ब्रह्मदेवाचें आयुष्य; महाप्रलय; कल्प पहा. ॰काल-ळ- पु. १ प्रलय काळचा शंकराचा अवतार. 'महाकाळ उभा चिरीन बाणीं ।' २ बारा ज्योतिर्लिंगांपैकीं एक (उज्जनी येथील). ॰काली-स्त्री. १ पार्वती. २ प्रचंड तोफ; महाकाळी. -शर. ॰काव्य-न. वीररसप्रधान, मोठें, अभिजात, रामायण-महा- भारताप्रमाणें काव्य; (इं.) एपिक. 'आर्ष महाकाव्यांत कोण- कोणते गुण असावे याबद्दल पुढें विवेचन येईलच.' ॰काश-न. अवकाश; अफाट पोकळी. याच्या उलट घटाकाश, मठाकाश. [महा + आकाश] ॰कुल-कुलीन-वि. थोर, उच्च कुलांतील; कुलीन. ॰खळें-न. मोठें अंगण. ॰गाणी-नी-वि. गानकुशल. 'उत्तर देशींच्या महागणी । गुर्जरिणी अतिगौरा ।' -मुरुंशु १२२. ॰गिरी-पु. मोठा पर्वत; हिमालय. 'किं मक्षिकाचेनि थडकें । महागिरी पडों शकें ।' -एकनाथ-आनंदलहरी ४२. -स्त्री. १ तीनशें खंडीपर्यंत वजन नेणारें जहाज, गलबत; मालाचें तारूं; 'सबब त्यांजकडे दोन महागिऱ्या भरून गवत व एक महागिरी- भर लांकडे देविलीं असें,' -समारो ३.१६. २ मोठें तारूं; शिबाड; बतेला. ॰ग्रह-ग्राह-पु. मोठी सुसर; मोठा मगर. 'गज करवडी महाग्राह ।' -एरुस्व १०.८० -एभा २०.३५०. ॰जन- पु. १ काही गुण, विद्या इ॰ मुळें थोर, श्रेष्ठ माणूस. 'परंतु हृदयीं महाजन भयास मी मानितों ।' -भक्तमयूरकेका ७५. ३ व्यापारी; उदमी; सावकार. ३ गाव, कसबा इ॰ तील व्यापाराला नियम, शिस्त घालून देणारा, त्यावर देखरेख करणारा व कर वसूल करणारा सरकारी अधिकारी. ह्या अर्थीं महाजनी असाहि शब्द आहे. ४ पंच ॰जनकी-स्त्री. महाजनांचे काम, अधिकार. ॰डोळा-पु. एक मासा. -प्रणिमो ८१. ॰तल-न. सप्तपातालांपैकीं एक; नाग व असुर यांचें स्थान. ॰ताप-पु. (तंजा.) शोभेच्या दारूचा एक प्रकार; चंद्रज्योति. महताब पहा. ॰तेज-न. १ ब्रह्म २ सूर्य. 'हें अपार कैसेनि कवळावें । महातेज कवणें धवळावें.' -ज्ञा १.७४ महात्मा-पु. १ महानुभव पंथांतील व्यक्ति. ३ मोटा धैर्यवान, पराक्रमी मनुष्य. 'तैसें महात्मा वृक्षमुळीं । असावें खांड देउळीं ।' -भाए ४९३. गौतमबुद्ध, गांधी यांस संबोधितात. -वि. १ थोर मनाचा; उदार; महानुभाव. 'परते धर्म महात्मा, स्तविला बहु नारदादि साधूंनीं ।' -मोभीष्म १.९९. [महा + आत्मा] ॰दंदी- वि. महामत्सरी; कट्टर द्वेष्टा. 'छंदी फंदि महादंदि । रावण पडिला तुझ्या बंदि ।' -ज्ञानप्रदीप २६६. [सं. महाद्वंद्वी] ॰दशा-स्त्री. (ज्योतिष) कुंडलीतींल मुख्य ग्रहाची बाधा अंतर्दशा पहा. ॰दान- न. (मोठें दान) हत्ती इ॰ षोडशदानांपैकीं एक; षोडशमहादानें पहा. ॰देव-पु. १ शंकर; शिव. 'महादेव म्हणावया कारण । ब्रह्मयासि. जाण या हेतू ।' -एभा १३.२७९. २ (विणकाम) हातमागाच्या फणीचा मरचा अवयव, दांडा फळी. हा आणि तळाचा दांडा किंवा पार्वती मिळून फणीची चौकट होते या फणीच्या चौकटीस महादेवपार्वती किंवा हात्यादांडी असेंहि म्हणतात. ॰देवाचें देणें- न. कंटाळवाणें व दीर्घकाल टिकणारें काम. ॰देवापुढचा-वि. (शब्दशः) नंदी; (ल.) मूर्ख; निर्बुद्ध. ॰देवी-स्त्री. १ पार्वती; दुर्गा. २ एक प्रकारची वनस्पति. हिचें बीं महादेवाच्या पिंडीच्या आकाराप्रमाणें असतें. ॰देवी सहादेवी-स्त्री. (माण.) चैत्री पौर्णिमेस तिन्हीसांजचे वेळीं एखाद्या भिंतीवर जीं महादेवी सहादेवी म्हणून दोन गंधाचीं बाहुलीं काढून त्यांची पूजा कर- तात तीं. -मसाप ४.४.२५९. ॰दैव-(माण.) सर्व जातींचे लोक. ॰द्वार-न. (मंदिराचा किंवा राजवाड्याचा) बाहेरचा किंवा मुख्य दरवाजा. 'भक्त गर्जती महाद्वारीं । त्यांसी द्यावे दर्शन ।' -भूपाळी विठ्ठलाची पृ २२. ॰द्वीप-न. (मोठें बेट) खंड. 'तयाफळाचे हें महाद्वीप । पातली प्रभु ।' -ज्ञा १६.३२. ॰नदी-स्त्री. मोठी नदी; उगमापासून शंभर योजनांवर वाहात जाणारी नदी. ॰न मी-स्त्री. १ आश्विन शुद्ध नवमी; नवरात्राचा शेवटचा दिवस. २ रामनवमी. -शास्त्रीको ॰नवरात्र-न. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंतचा काल. ॰नस- पु. स्वयंपाकघर. ॰नक्षत्र-न. सूर्यनक्षत्र ॰नाड-पु. महाजना- सारखा एक वतनदार. 'महाजन व महानाड पेठ मजकूर याचें नांवें सनद कीं,' -थोमारो १.५४. [महा + नाड-डु] ॰निंब-पु. एक प्रकारचें झाड. ॰निद्रा-स्त्री. मरण; मृत्यु. 'तिसरें प्रमाण महा- निद्रा म्हणजे मृत्यु हें होय?' -टि ४.४८१. महानुभाव-पु. श्रीचक्रधरानें स्थापिलेला एक द्वैतवादी पंथ. या पंथात श्रीकृष्ण- भक्ति प्रमुख आहे. [महा + अनुभाव] -वि. १ ज्यानें कामक्रोधादि विकार जिंकले आहेत असा; महात्मा. २ उदार, थोर पुरुष. एवं पिंडारकीं ऋषि सर्व । शापानुग्रही महानुभाव ।' -एभा १.३३६. ३ प्रशस्त अनुभवाचा; ब्रह्मानुभवी. 'ऐसे जे महानुभाव । जे दैविये प्रकृतीचें दैव ।' -ज्ञा ९ १९४. ४ विद्या, बुद्धि, पराक्रम इ॰ गुणांनीं श्रेष्ठ मनुष्य; महाप्रतापी. ॰नेटका-वि. परिपूर्ण; पूर्णपणे; व्यवस्थित. 'यज्ञ मुनिचा राखे महानेटका ।' -मोरामायणें त्रिःसप्तमंत्रमय रामा- यण ३. ॰नैवेद्य-पुन. पंचपक्वान्नमय अन्नाचें ताट वाढून देवाला दाखवितात तो नैवेद्य (साखर, दूध इ॰चा छोटा नैवेद्य होतो). ॰न्यास-पु. पूजा करतांना शरीराच्या विवक्षित भागांना स्पर्श करून करावयास न्यास. याचाच दुसरा प्रकार लघुन्यास. ॰पड-पु. (महानु.) महापट; ध्वज. 'आहो जी देवा । पैलु देखिला महा- पडांचा मेळावा ।' -शिशु १०३३. [महापट] ॰प(पं)थ-पु. १ मृत्यु; मरण; मृत्यूची वाट. 'न देशील सत्यवंत । तरी करीन हाचि महापंथ ।' -वसा ६.८. २ निर्याणाचा मार्ग. 'लागले महापंथी तत्काळाची ।' -एभा ३१.२९८. ॰पद-न. ब्रह्मपद. 'कीं श्रुति हे महापदीं । पैठी जाहली ।' -ज्ञा १३.३७१. ॰पद्म-पु. १ एकं, दहं, शतं ह्या श्रेणींतील तेराव्या स्थानची संख्या (एकावर बारा शून्यें इतका आकडा) २ कुबेराच्या नवनिधींपैकीं एक निधि. नवविधी पहा. ॰पातक-न. ब्रह्महत्या, दारू पिणें, सुवर्णाची चोरी, गुरूच्या पत्नीबरोबर किंवा स्वतःच्या मातेबरोबर संभोग आणि यापैकीं एखादें पातक करणाराशीं मैत्री, अशा पांच मोठ्या पातकांपैकीं प्रत्येक. ॰पातकी-वि. १ ज्याच्या हातून महापातक घडलें आहे असा. २ अत्यंत पापी; दुराचारी. म्ह॰ अवसानघातकी महापातकी. ॰पाप-पी-महापातक-की पहा. ॰पीठ-न. विष्णूच्या चक्रानें झालेले शक्ती-पार्वतीच्या शरीराचे तुकडे ज्या ठिकाणीं पडले असें मानतात त्या अत्यंत पवित्र स्थानापैकीं प्रत्येक. अशीं स्थानें साडेतीन आहेत. तुळजापूर, मातापूर आणि कोल्हापूर, हीं तीन व अर्धे सप्तशृंग. औट पीठ पहा. ॰पुरुष-पु. १ ईश्वर. २ साधु- पुरुष; सत्पुरुष; ब्रह्मनिष्ठ मनुष्य. 'महापुरुषाचें चित्त । जालिया वस्तुगत ।' -ज्ञा १३. ७८९. ३ मेलेल्या ब्राह्मणाचें पिशाच्च. ॰पू(पु)जा-स्त्री. व्रतसमाप्ति इत्यादि विवक्षित प्रसंगास अनुसरून करतात ती मोठी पूजा. ॰पूर-पु. नदीस येणारा मोठा पूर, लोंढा. 'महापूरें झाडें जाती । तेथे लव्हाळे राहती ।' -तुगा १०४३. ॰प्रयास-पु. मोठे परिश्रम, कष्ट, प्रयत्न, खटाटोप. ॰प्रलयपु. १ प्रत्येक ४३२००००००० वर्षांनीं होणारा सर्व जगाचा नाश. २ ब्रह्मदेवाच्या शंभर वर्षांनीं होणारा सर्व (देव, ब्राह्मण, साधू, ब्रह्मा यासह) विश्वाचा नाश. 'जो ब्रह्याच्या स्थूळ देहाचें मरण । तो महाप्रलय जाण ।' महाकल्प पहा. ॰प्रयासपुअव. फार मोठे कष्ट, श्रम, प्रयत्न. ॰प्रसादपु. १ धार्मिक किंवा देवाच्या उत्सवा- नंतर वाटतात तो फुलें, मिठाई, जेवण इ॰ रूप प्रसाद. २ देव, गुरु इ॰पासून मिळालेली प्रसादाची वस्तु (कृपा, अनुग्रह म्हणून). ३ (शब्दशः व ल.) मोठी कृपा, अनुग्रह 'महाप्रसादाचेनि हरिखें । सप्रेम सुखें डुल्लती ।' ॰प्रस्थानन. (मोठा प्रवास) १ यथार्थ ब्रह्मज्ञानानंतर येणारा मृत्यु. २ (ल) मरण; मृत्यु ॰प्राणपु. १ मोठ्या जोरानें व प्रयासानें केलेला उच्चार: हकारयुक्त उच्चार २ जोरानें आणि प्रयासानें उच्चारण्याचा वर्ण. जसें-ख, घ, छ, झ, ठ, ढ, थ, ध, फ, भ, आणि ह अल्पप्राण आणि बाह्य प्रयत्न पहा. ॰फणी-पु. मोठा साप. ॰फल-ळ-न. मोठे, उत्कृष्ट फळ; नारळ. फणस इ॰ ॰बलि-ळी-पु. पिशाच्चादिकांस संतुष्ट कर- ण्यासाठीं मांस, अन्न इ॰ चा बलि, अर्पण करावयाचा पदार्थ ॰बळी-वि. अत्यंत प्रबळ, सामर्थ्यवान्. 'महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें ।' -मारुतिस्तोत्र. ॰बळी बुटी-स्त्री. रुंदट पानाचें आलें. ॰भाग-वि. १ अतिशय भाग्यवान् 'नित्य निष्काम अतिप्रीतीं । मज भजती महाभाग ।' -एभा २४ ३३५. २ सद्गुणी; सद्वर्तनी. ॰भारत-न. व्यासप्रणीत कौरव-पांडवाच्या युद्धाचें भारतीयांचे पवित्र असें एक महाकाव्य; महापुराण ॰भूत-न. पृथ्वी, आप तेज, वायु आणि आकाश ह्या पंचमहाभूतांपैकीं प्रत्येक. 'तरी होसी गा तूं परब्रह्म । जें या महाभूता विसंवतें धाम ।' -ज्ञा १०. १४९. ॰भेड-वि. अत्यंत भितराः भेकड. 'मग विरा- टाचेनि महाभडें उत्तरें ।' -ज्ञा ११ ४६९. ॰मणि-पु. मौल्यवान् रत्न; हिरा, माणिक इ॰ 'कांचोटी आणि महामणी । मेरू मषक सम नव्हे ।' -ह १ ८४. ॰मति-मना-वि. थोर अंतःकरणाचा; उदार मनाचा; महात्मा. ॰मंत्र-पु. निरनिराळ्या देवतांचा मुख्य मंत्र. जसें-गायत्री हा ब्राह्मणाचा महामंत्र. 'महामंत्र आत्मप्रा- प्तीची खाणी ।' ॰मंत्री-पु. मुख्यप्रधान; मुख्य मंत्री सल्लागार. ॰महोपाध्याय-पु. मोठ्या शास्त्राला देतात ती एक सन्मानाची सरकारी पदवी. ॰म/?/त्र-पु. हत्ती हांकणारा; महात. 'मुरडावया मत्त हस्ती । महामात्र दोन्हीं हस्तीं । अंकुश हाणी तैसा श्रीपती । मर्मोद्धाटनें करितसे ।' -यथादी २.१६. ॰माया-स्त्री. १ पार्वती; दुर्गा. २ जगदुत्पादक शक्ति; सर्व संसाराला, प्रपंचाला कारणीभूत अशी देवता; आदिमाया; मूलप्रकृति ३ जहांबाज कजाग बायको. ॰मार-पु. मोठा मार, फटका. 'शुक्रबाणाचा महामारु ।' -मुवन ३.३८. ॰मारी-स्त्री. १ महामृत्यु. 'तेथ अचेतना झुंजारीं । न मरत्या महामारीं ।' -एभा २८.२५०. २ (ल.) प्राणसंकट. 'तिचेनि योगें महामारी पातली हे जाणिजे ।' -मुवन ७.१८७. ३ पटकी या सांथीचा रोग. ४ या रोगाची अधिष्ठात्री, दुर्गादेवी. ५ जिवापाड श्रम; शिकस्तीचा प्रयत्न. ६ हाणाहाणी; मारामारी; मोठें युद्ध. 'दोघे झुंजतां महा- मारी' -मुवन ३.३६. 'तैसी मांडिली महामारी ।' -कथा २.२.६०. ॰मृत्यू-पु. मरण; मृत्यू (अपमृत्युविषयीं बोलतांना उपयोग) जसें- 'अपमृत्यूचा महामृत्यु झाला.' ॰मृत्युंजय- (वैद्यक) एक औषध. ॰यंत्र-न. तोफ. ॰यज्ञ-याग-पु. मोठा यज्ञ; पंच महायज्ञांपैकीं प्रत्येक; पंचमहायज्ञ पहा. 'तरी महायाग- प्रमुखें । कर्मे निफज नाही अचुकें ।' -ज्ञा १८. १६६. ॰यात्रा- स्त्री. १ काशीयात्रा. २ (ल.) मरण; मृत्यु. 'आधीं पेशवाई सकट सगळ्यांना महायात्रेला धाडीन.' -अस्तंभा १६२. महा- प्रस्थान पहा. ॰रथ-रथी-पु. १ शस्त्रास्त्रांत प्रवीण असून दहा हजार धनुर्धारी योद्ध्यांबरोबर एकटाच लढणारा योद्धा. 'महारथी श्रेष्ठ । द्रुपद वीरु ।' -ज्ञा १.९८. २ (ल.) अत्यंत शूर, कर्तब- गार पुरुष किंवा मोठा वक्ता. ॰रस-न. १ ब्रह्म. २ पक्वान. -मनको. ॰राज-पु. १ सार्वभौम राजा; सम्राट. २ (आदरार्थी) श्रेष्ठ माणूस. ३ जैन, गुजराथी वैष्णव लोकांचा गुरु. ॰रात्रि- स्त्री. महाशिवरात्र माघ वद्य चतुर्दशी. ॰राष्ट्र-नपु. मराठे लोकाचा देश; उत्तरेस नर्मदानदी, दक्षिणेस कर्नाटक, पूर्वेस तैलंगण आणि पश्चिमेस समुद्र यांनीं मर्यादित असलेला प्रदेश; मुंबई इलाख्यां- तील एक विभीग. ॰राष्ट्र-राष्ट्रीय-वि. महाराष्ट्रदेशासंबंधाचे (लोक, भाषा, रिवाज इ॰). ॰राष्ट्र-भाषा-स्त्री. मराठी भाषा; संस्कृत-प्राकृत भाषेपासून झालेली एक देशी भाषा. ॰राष्ट्री- एक जुनी प्राकृत भाषा. ॰रुख-पु. एक प्रकारचे झाड; महावृक्ष. 'कर्वत लागला महारुखा । म्हणे पुढती न दिसे निका ।' -मुआदि ३३.२९. ॰रुद्र-पु. १ रुद्राभिषेकाचा एक प्रकार; अकरा लघुरुद्र; लघुरुद्राच्या उलट शब्द महारुद्र. २ मारुती. 'महारुद्र आज्ञेप्रमाणें निघाला ।' -राक १.१. ॰रुद्रो-पु. (गु.) बाजरीची मोठी जात हिचें काड फार उंच होतें -कृषि २७७. ॰रोग-पु. १ अत्यंत दुःखदायक असा रोग. याचे आठ प्रकार आहेत-वात- व्याधि, अश्मरी, कृछ्र, मेह, उदर, भगंदर. अर्श आणि संग्रहणी. कांहींच्या मतें हे नऊ आहेत; त्यांत राजयक्ष्मा हा एक जास्त असून कृछ्राऐवजीं कुष्ठ व संग्रहणीच्या ऐवजीं ग्रहणी अशीं नांवें आहेत. २ रक्तपिती; गलित कुष्ठ. महार्घ-वि. १ महाग; दुष्प्राप्य. 'महार्घ येथें परमार्थ जाला ।' -सारुह १.२१. २ मौल्यवान् [सं. महा + अर्घ] महार्णव-पु. मोठा समुद्र; महासागर. 'वनीं रणीं शत्रु-जलाग्निसंकटी । महार्णवीं पर्वत-वास दुर्घटीं ।' -वामन स्फुट श्लोक ३५. (नवनीत पृ. १३७.) -न. १ (ल.) मोंठें, दीर्घकाल चाललेलें भांडण; युद्ध; लढाई. 'दोघां मांडलें महार्णव । दाविती बळ प्रौढीगौरव ।' -निगा २४. २ प्रसिद्धि; डांगोरा; जघन्यत्व. ३ लहान काम, प्रकरण, गोष्ट इ॰ ला मोठें रूप देऊन सांगणें; राईचा पर्वत करणें. 'एवढ्याशा गोष्टीचें त्वां लागलेंच महार्णव केलेंस.' [सं. महा + अर्णव] ॰लय-पु. १ आश्रयस्थान; आश्रम; धर्मशाळा. २ देऊळ. ३ परमात्मा. ४ भाद्रपद वद्यपक्षां- तील पितरांप्रीत्यर्थ केलेलें श्राद्ध; पक्ष; मृतपितृकानें भाद्रपद शुद्ध पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत दररोज करावयाचें श्राद्ध. हें रोज करणें अशक्य असल्यास १५ दिवसांतून एका उक्त दिवशीं करावें. [महा + आलय] ॰लक्ष्मी-स्त्री. १ विष्णुपत्नी २ अश्विन शुद्ध अष्टमीस पूजावयाची एक देवता, त्या देवतेचे व्रत. ३ भग- वती; कोल्हापूरची देवी. ४ (ना.) ज्येष्ठागौरी; भाद्रपद शुद्ध नव- मीस पूजा करावयाच्या देवता. ॰लिंग-न. बारा ज्योतिर्लिंगांपैकीं प्रत्येक. ॰वटी, माहावटी-स्त्री. राजमार्ग. 'हे कपटाची कस(व)टी । अनृत्याची माहावटी ।' -भाए ७५५. ॰वस्त्र-न. उंची, सुंदर वस्त्र; प्रतिष्ठित वस्त्र; शालजोडी इ॰ ॰वाक्य-न. वेदांतील जीवब्रह्माचें ऐक्य दाखविणारें तत्त्वमसि आदि वाक्य हीं चार वेदांची चार आहेत. 'तो महावाक्याचेनि नांवें । गुरुकृपे- चेनि थांवें ।' -ज्ञा १८.४०४. २ गायत्री मंत्र. ॰वात-पु. (तासीं ८० मैल वेगाचा) सोसाट्याचा वारा; झंझावत; तुफान. 'महावात सूटला म्हणुनि का कंप येत भूघरा ।' -सौभद्र. ॰विषुव-न. मेष संपात; हरिपद. ॰वृत्त-न. ज्या वृत्ताची पातळी गोलाच्या मध्य बिंदूतून जाते तें वृत्त; मोठें वर्तुळ. ॰वोजा-वि. मोठ्या थाटांची; तेजस्वी. 'संतोषोनी महाराजा । सभा रचित महवोजा ।' -गुच ३४. ९७. [महा + ओजस्] ॰व्याधि-पु. महारोग; रक्तपिती. ॰शब्द- पु. बोंब; शंखध्वनि. ॰शय-पु. १ थोर पुरुष; महात्मा, २ मोठ्या माणसांस महाराज रावसाहेब याप्रमाणे संबोधावयाचा शब्द. [सं. महा + आशय; बं. मॉशे; फ्रें मुस्ये (माँसिय)] ॰शिवरात्र-त्रि-स्त्री. माघ वद्य चतुर्दशी. ॰शून्य-न. जें कांहींच नाहीं असें जें शून्यास अधिष्ठानरूप ब्रह्म तें; परब्रह्म. 'आतां महा- शून्याचिया डोहीं । जेथ गगनासीचि ठावो नाहीं ।' -ज्ञा ६. ३१५. ॰महाष्टमी-स्त्री. अश्विन शुद्ध अष्टमी. ॰सरणी-स्त्री. स्वर्गमार्ग. ' होउनि सुयोधनाचा शोकार्त वरो पिता महास- रणी ।' -मोभीष्म ११.१५. ॰सागर-पु. पृथीवरील पाण्याचा सागराहून मोठा सांठा; मोठासमुद्र. उदा॰ हिंदी महासागर. ॰सिद्धांत-पु. एकमेवाद्वितीयं ब्रह्म हा मुख्य सिद्धांत. 'आणि महासिद्धांतापासीं । श्रुति हारपती शब्देंसीं ।' -ज्ञा १५.४३४. ॰सिद्धि-स्त्री. अष्टमहासिद्धी पहा. 'जेथ महासिद्धींचीं भांडारें । अमृताचीं कोठारें ।' -ज्ञा ६.३२१. ॰सुख-न. ब्रह्मसुख; ब्रह्म साक्षात्कार. 'जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ।' -ज्ञा १.१४. ॰स्म(श्म)शान-न. काशीक्षेत्र. 'सदाशिव बैसता निजासनीं । महाश्मशानीं निजवस्ती ।' -एभा २.३१. ॰क्षेत्र-न. काशी- क्षेत्र. -रा ३.४७६. ॰महेंद्र-पु. १ हिंदुस्थानांतील पर्वताच्या सात रांगांपैकीं एक. २ इंद्राचें नांव. 'हें महेंद्रपदही पाविजेल । परि मोह हा न फिटेल ।' -ज्ञा २.६५. [महा + इंद्र] महेश, महेश्वर-पु. शिव; शंकर. [महा + ईश्वर] महेश्वरी पातळ-न. महेश्वर नांवाच्या गांवी (इंदूर संस्थान) तयार झालेलें वस्त्र, पातळ. 'आधींच कंबर बारिक त्यावर महेश्वरी पातळ कसलें ।' -होला ८९. महोत्सव, महोत्साह-पु. मोठा उत्सव; आनंद- दायक प्रसंग. [महा + उत्सव] महोदधि-पु. १ महासागर; मोठा समुद्र. ' महोदधीं कां भिनले । स्त्रोत जैसे ।' -ज्ञा १५.३१७. २ हिंदीमहासागर [महा + उदधि] महोदय-पु. माघ किंवा पौष महिन्यांत सोमवारी सूर्योदयीं अमावस्यारंभ श्रवण नक्ष- त्राचा मध्य आणि व्यतिपाताचा शेवट यांचा योग; एक मोठें पर्व. [महा + उदय] महौजा-वि. तेजस्वी; ज्याचें तेज मोठें आहे असा; सामर्थ्यवान् 'पुरुष श्याम महौजा ओढित होता बळेंचि मजला जो ।' -मोवन १३.८८. [महा + ओज] महान्-वि. १ मोठा; विस्तृत; थोर. २ उशीरा पिकणारें (धान्य, पीक); गरवें ३ दोन किंवा अनेक वर्षें टिकणारें (झाड, मिरची, कापूस, पांढरी तूर इ॰).

दाते शब्दकोश

वृत्त

न. १ भकित. 'घघरोरीं बोलवी वृत्तें ।' -विपू ७.४७. २ आचरण; वर्तन; पद्धत; वहिवाट; शिरस्ता. 'शील त्याचें अत्युच्चरम्य वृत्त । -टिक ६९. ३ उद्योग, धंदा; निर्वाहाचें साधन म्हणून व्यवसाय; वृत्ति पहा. ४ बातमी; वार्ता; हकीकत; माहिती. सांग तें वृत्त तुझ्या जननीला ।' -आकृचरित्र १८. ५ छंद; कवितेच्या प्रत्येक चरणांत किती अक्षरें असावींत याचें मापन. ६ वर्तुल; मंडळ; गोलाला कोठेंहि सरळ पातळीनें कापिलें असतां होणारा वर्तुळाकार. ७ गोल पदार्थ; गोळा. -वि. वर्तुलाकार; वाटोळें; मंडलाकार. [सं.] ॰खंड-न. (गणित) वर्तुळाचा अर्धा भाग; वृत्तांश; (इं.) सेक्टर. ॰चिति-वर्तुळस्तंभ; नळ, पंचपात्र यासारखा आकार. (इं.) सिलिंडर. ॰पत्र-न. १ वर्तमानपत्र; जाहीर बातमी, खबर किंवा तत्संबंधी कांही मतप्रदर्शन, टीका, जाहिराती इ॰ ज्यांत असतात तें पत्र. ॰पाली-स्त्री. परीघ (वर्तु- ळाचा). [सं.] ॰मध्य-पु. वर्तुळाचा मध्यबिंदु; केंद्र. [सं.] वृत्तांश-पु. (भूमिति) वृत्तखंड पहा. [सं.] वृत्तांत-पु. वृत्त; बातमी; वार्ता; माहिती; हकीकत. [सं.] वृत्ति-स्त्री. १ आचरण; वृत्त; शिरस्ता; वहिवाट. २ रीत; ओळ; पद्धत; वर्तनक्रम; निर्वाहक्रम. 'हरिनीं श्ववृत्ति वरिली ।' -मोविराट १.१००. ३ धंदा; पेशा; निर्वाहाचा उद्योग; चरितार्थाचें साधन. -ज्ञा १८.८२०. 'सांचविले वृत्ति करुनि पक्कापक्की उंदुंवरीं बदरी ।' -मोकृष्ण ८७.६६. 'सुज्ञ प्रभु तूं यांतें दंडाया, वृत्ति द्यावया स्वामी ।' -मोसभा ३.७४. 'गुरुचे शेती न चढे वारी । प्राणत्यजीन निर्धारी । गुरुचें वृत्तिनिमित्त ।' -गुच १६.५४. ४ आवृत्ति; नेहमीं उपयोग, वापर (विशिष्ट अर्थानें एखादा शब्द किंवा वाक्प्रचार याचा). ५ मनाची स्थिति, भावना (राग, करुणा, भीति, काळजी इ॰ ची); मनोव्यापार. 'रडत रडत मूर्छेमाजि वृत्ती बुडाल्या ।' -वामन, भामाविलास (नवनीत पृ. ९९). -ज्ञा ९.२५२. -एभा ७.२८४. (समासांत) उदास-औदार्य- खिन्न-तामस-प्रसन्न-म्लान-शांत-शोक-संतोष-सौम्य-हर्ष-हास्य-वृत्ति. ६ (साहित्य) काव्य-नाट्यप्रबंध रचनेचे चार प्रकार-कौशिकी, भारती, सात्वकी व आरमटी प्रत्येकीं. ७ टीका; विवरण; स्पष्टीकरण. टीका पहा. ८ वर्तुळ किंवा वर्तुळाचा परीघ; वृत्त पहा. ९ स्फूर्ति; स्फुरण. मनको. १० वाचकता, व्यंजकता, लक्षणा इ॰ अर्थबोधाचे प्रकार प्रत्येकीं. ११ शेत; इनाम जमीन; वतन; सालीना मिळणारी रक्कम. वृत्ति राजाला काढून घेतां येत नाहीं किंवा बक्षिसहि देतां येत नाहीं. -भाद्विसंवृ. 'अनादि जे प्रकृती । सांख्य जियेतें गाती । क्षेत्र हे वृत्ती । तियेची जाणा ।' -ज्ञा १३.३५. 'नव्हे मठपति । नाहीं चाहुरांची वृत्ति ।' -तुगा १८१६. 'होता वृत्ति राखीत ।' -गुच १९.४. १२ स्वभाव; धर्म. [सं.] ॰क-पु. वतनदार. 'अगा मानस हें एक । माझ्या स्वरूपीं वृत्तिक ।' -ज्ञा १२.९७. ॰च्छेद-च्छेचन-पु. न. वंशपरंपरागत असलेल्या निर्वाहसाधनाचा नाश; वतनजप्ती; वंशपरंपरागत हक्क काढून घेणें. [सं.] ॰पत्र-न. ज्यावर किंवा ज्यामुळें वृत्ति नेमून दिली जातें तें पत्र; आज्ञा-वतनपत्र. ॰पंथ-पु. वृत्तीचा, व्यापा- राचा मार्ग. 'ते भेदली वृत्तिपंथे । वायुशक्ति गा एथें । कर्मकारण चौथें । ऐसें जाण ।' -ज्ञा १८.३४३. ॰शास्त्र-न. व्यापार, धंदा इ॰ चा विचार-चर्चा करणारें शास्त्र; अर्थशास्त्र. (इं.) एकॉनॉ- मिक्स. -मसाप २.३.१०३. ॰शून्य-वृत्तिरहित. 'शून्य सांडोनि निरवकाश । तेंचि कृष्णहृदय सावकाश । संती केला रहिवास । वृत्तिशून्य होउनी ।' -एरुस्व १.३८. ॰स्थिति-स्त्री. समस्थिति; दोन्हीं बाजूस वजन व तोल सारखें राहतील अशी स्थिति. (इं.) ईक्विलिब्रियम. 'पक्ष्यांची आकृतीहि त्यांच्या वृत्तिस्थितीस फार सुंदर रीतीनें जमतें.' -मराठी ६ वें पुस्तक (१८७५). ५. ॰मंत-मान-वंत-वि. १ उपजींविकासाधन जी जोशीपणा इ॰ नियम वृत्ति ती ज्यास आहे तो; वतनदार. २ स्थिर; स्थायिक. वृत्तीचा विचका-पु. १ एखाद्याच्या निर्वाहाच्या साधनाचा नाश, वृत्ति बुडणें. २ वृत्ति गेलेली स्थिति. वृत्यंश-पु. संपत्ति, हक्क किंवा निर्वाह साधन यांतील भागी. [सं.] वृत्यंशी, वृत्यांशी-वि. वृत्तींतील वांटेकरी, भगीदार. [सं. वृत्त्यंशी]

दाते शब्दकोश

भू

स्त्री. पृथ्वी; जलस्थलमय गोल. 'हांसोनि म्हणे नारद भूवरि तों हेचि दिव्यरुचि राजा ।' -मोसभा १.२२. [सं.] सामाशब्द- ॰कंपपु. धरणीकंप. [सं.] ॰कमळ-न. महाबळेश्वर येथें होणारें एक जातीचें फूल. ॰खंड-न. भूलोकाचा भाग, तुकडा. [सं.] ॰खळें-न. पृथ्वीरूप अंगण, खळें. 'राशी झाल्या भूखळीं ।' -मुआदि ४९.११४. ॰गर्भ-न. १ भुयार. 'कित्येक काळाचे उपवासी । इच्छित होते पंगतीसी । ते पावले मनोरथासी । भूगर्भीचें आले ।' -वेसीस्व १२.५८. २ पृथ्वीचा आंतील भाग, पोट. ॰गर्भवास-पु. गुहा इ॰ स्थलीं राहणें. [सं.] ॰गर्भशास्त्र-न. पृथ्वीच्या पोटांत असणार्‍या पदार्थांसंबंधीं शास्त्र; भूस्तरशास्त्र. (इं.) जिऑलजी. [सं.] ॰गर्भक्षितिज-न. मूळ, वास्तविक क्षितिज; खगोलक्षितिज. [सं.] ॰गोल-ळ-पु. १ जलस्थलमय गोल. २ पृथ्वीरूप गोल; पृथ्वी. ३ पृथ्वीवरील देशांची माहिती; भूवर्णन. [सं.] ॰गोलशास्त्र-न. पृथ्वीसंबंधीं माहिती देणारें शास्त्र. यांत भूस्तरशास्त्र, वातावरण शास्त्र, निरनिराळ्या देशांची भूस्तरदृष्ट्या सांस्कृतिक व राजकीय विविध माहिती व व्यापारी माल, साधनें, इ॰ माहितीचा समावेश होतो. [सं.] ॰चंपक-पु. भुईचाफ्याचें झाड व त्याचें फूल. [सं.] ॰चर-वि. जमिनीवर फिरणारा, राहणारा; स्थलचर. (जलचर, जलस्थलचर, खेचर, यांच्या उलट). [सं.] ॰चरी-स्त्री. योगाच्या चार मुद्रांपैकीं एक. [सं.] ॰चरी- नयन-पुअव. अधोदृष्टि. 'मूर्ति करावी अति दीन । खेचरी भूचरी जिचे नयन ।' -एभा ११.१२८४. ॰चरी मुद्रा-स्त्री. नासिकाग्रा- वरून भूमीकडे नजर लावणें अशी एक योगांतील मुद्रा. 'कीं भूचरीमुद्रा योगेश्वर ।' -ह ६.८९. [सं.] ॰चुंबकत्व-न. पृथ्वीचा आकर्षण करण्याचा धर्म. (इं.) टेरिस्ट्रिअल् मॅग्नेटिझम्. [सं.] ॰ज्या-स्त्री. भूमध्यापासून भूपृष्टाचें जें अंतर तें. [सं.] ॰तल- ळ-न. १ पृथ्वीचा पृष्ठभाग. २ (सामा.) भूलोक; पृथ्वी. [सं.] ॰तलविद्या-स्त्री. भूपृष्ठासंबंधीं शास्त्र; (इं.) फिजिकल् जॉग्रफी. [सं.] ॰तैल-न. पृथ्वीतून पाझरणारें तेल; शिलातैल. (इं.) पेट्रोलियम्. ॰दिन-नपु. सावनदिन पहा. [सं.] ॰देव-पु. पृथ्वी- वरील देव; ब्राह्मण. 'मिळविली कीर्ति आजवरी । ती बुडेल कीं भूदेवा ।' -विक १६. [सं.] ॰देवी-स्त्री. गांव, शेत, जागा यांची रक्षक देवता. [सं.] ॰धर-पु. १ पर्वत; डोंगर. २ भूगोल मस्तकीं धारण करणारा शेष नामक सर्प. ३ राजा. [सं.] ॰प-पु. १ राजा. २ भूपकल्याण राग. 'दीप भूपकल्याण तूं गातां प्रकाश सार्‍या स्थळीं पडती ।' -प्रला २३७. ॰पकल्याण-पु. एक राग. ॰पति-पाल(ळ)-पु. राजा. [सं.] म्ह॰ भूपतिर्वा यतिर्वा = मी राजा तरी होईन नाहीं तर यति तरी होईन. ॰परिघ- पु. भूपृष्ठावरून जाणारें मोठें वर्तुळ. [सं.] ॰परिमाण-न. भूमान पहा. [सं.] ॰पृष्ठ-न. १ पृथ्वीचा पृष्ठभाग. २ सपाट जमीन; समथळ. (इं.) ग्राउंडलेव्हल. [सं.] ॰पृष्ठवर्णन-न. (भूशास्त्र) पृथ्वीवर असणार्‍या दोन मुख्य गोष्टी पाणी व जमीन, त्यांवरील सर्व बाजूनें असणारें वातावरण, याविषयीं शास्त्रीय माहिती व वर्णन; तसेंच त्यांमध्यें दृग्गोचर होणारे निरनिराळे चमत्कार याविषयीं विवेचन ज्यांत केलें असतें तें वर्णन, शास्त्र. [सं.] ॰पृष्ठक्षितिज-न. दृश्य असें क्षितिज. [सं.] ॰भा-स्त्री. (ज्यो.) १ पृथ्वीची छाया. २ शंकुच्छाया. [सं.] ॰भाग-पु. भूगोलाचा एक भाग. [सं.] ॰भा बिंब-न. पृथ्वीच्या छायेचें बिंब. [सं.] ॰भार- पु. भूमीस झालेला (पातकी जनांचा) भार. 'भूभार हराया सार, घेउनि अवतार, अत्रिच्या पोटीं ।' -दत्ताची आरती. [सं.] ॰भुज- पु. राजा. [सं. भू + भुज्] ॰भुजेंद्र-पु. सार्वभौम राजा; राजाधिराज. [सं. भूभुज + इंद्र] ॰भृदरि-पु. इंद्र. [सं. भूभृत् + अरि] ॰भ्रम- पु. पृथ्वीचें भ्रमण, गति (ग्रहांप्रमाणें). [सं.] ॰मकपु. (ना) ग्रामाधिकारी; हा गावांच्या सीमेच्या देवतेची पूजा करतो व सर- कारी कामगार गावीं आले असतां त्यांची व्यवस्था ठेवतो. ॰मंडल-ळ-न. जलस्थलमय पृथ्वीरूप गोल. [सं.] ॰मान- परिमाण-न. पृथ्वीचें मान, माप. [सं.] ॰मिति-स्त्री. (गणित) जमिनीची मापणी; रेखागणित; भूमितींत शास्त्रीय पद्धतीनें चौरस, काटकोन, त्रिकोण वगैरे आकृति काढण्याचे नियम व सिद्धांत यांचें विवेचन केलेलें असतें. [सं.] ॰मितिप्रमाण-मितिश्रेधी- मितिप्रमाणश्रेधी-मितिश्रेढी-स्त्री. (गणित) जींत कांहीं एका विवक्षित पटीनें संख्या वाढतात किंवा कमी होतात ती पंक्ति; रेखागणितश्रेढी. गुणोत्तरानें सारख्या संख्या वाढणें तें. जसें- २, ४, ८, १६ इ॰ [सं.] ॰रमलविद्या-स्त्री. जमिनीवर रेघा किंवा आकृति काढून शकुन पाहण्याची विद्या. ॰रुह-पु. (काव्य) वृक्ष; वनस्पति. 'ठाण न चळे रणींहून । कुठारघायें भूरुह जैसा ।' [सं.] ॰लोक-पु. इहलोक; पृथ्वी. सप्तलोक पहा. [सं.] ॰वैकुंठ-पु. पृथ्वीवरील वैकुंठ; विठ्ठलाचें (कृष्णाचें, विष्णूचें) नित्य वसतिस्थान असलेलें पंढरपूर इ॰ क्षेत्र. 'सकळ तीर्थांचें माहेर । भूवैकुंठ निर्वि- कार ।' -तुगा २५९१. [सं.] ॰व्यास-पु. भूमध्यांतून जाऊन भूपृष्ठास दोहों बाजूस मिळणारी रेषा. ॰शलाका-शिर-स्त्रीन. जमिनीच समुद्रांत गेलेलें टोंक; जमिनीचा चिंचोळा भाग. [सं.] ॰सुर-पु. भूदेव; ब्राह्मण. 'मानुनि वेषें स्नातक भूसुर पूजावया उठे भावें ।' -मोसभा १.९२. [सं.] ॰स्तरशास्त्र-न. यांत पृथ्वी- वरील जमीन, पाणी, खडक यांमध्यें होणार्‍या घडामोडी व संशोधन, पृथ्वीच्या उदरांत असलेल्या स्थितीबद्दल व द्रव्याबद्दल माहिती, वनस्पति, प्राणी यांचा इतिहास इ॰ गोष्टींचें विवेचन केलेलें असतें, भूगर्भशास्त्र. (इं.) जिऑलजी.

दाते शब्दकोश

राग

पु. (संगीत) पांच स्वरांपेक्षां कमी नाहीं असा वादी- संवादी स्वर व आरोह-अवरोह यानीं शोभा आल्यानें जो जन- मनरंजनास योग्य होतो असा स्वरसमुदाय. षड्जादि स्वरांची परस्पर जुळणी केल्यानें गायनास योग्य होणारे त्यांचा रचना- विशेष. हल्ली प्रचारांत सुमारें दीडशें राग मानितात त्यांचीं नांवें:- अडाणा, अभिरी, अल्लैया, अहीरभैरव, आसावरी, कानडा, काफी, कामोद, कालिंगडा, कुकुभबिलावल, केदार, कौशी, खट, खमाज, खंबायती, गारा, गुजरी तोडी, गुणकली, गौडमल्लार, गौडसारंग, १ गौरी, २ गौरी, चंद्रकांत, चांदणीकेदार, छायानट, जयजयवंती, जयंत, जयत्कल्याण, जलधरकेदार, जेताश्री, जैमिनीकानडा, जोगिया, जौनपुरी, झिंझूटी, झीलक, टंकी, तिलककामोद, तिलंग, तोडी, त्रिवणी, दरबारीकानडा, दीपक, दुर्गा (१), दुर्गा (२), देव- गांधार, देवगिरीबिलावल, देवसाख, देशकार, देस, देसगौड, देसी, धनाश्री, धानी, नट, नटबिलावल, नटमल्लार, नायकी कानडा, नारायणी, नीलांबरी, पंचडा, पटदीप, पटदीपिका, पटमंजरी (१), पटमंडरी (२), परज, पहाडी, पीलू, पूरिया; पूर्या धनाश्री, पूर्वी, प्रतापवराळी, प्रभात, बंगालभैरव, बडहंस, बरवा, बहादुरी- तोडी, बहार, बागेसरी, बिंद्रावनी सारंग, बिभास (१), बिभास (२), बिलाचल, बिलाखानी तोडी, बिहाग, बिहागरा, भंखार, भटि- यार, भीमपलासी, भूपाळी, भैख, भैखी, मधुमादसारंग, मलुहा- केदार, मांड, मारचा, मालकौंस, मालवी, मालश्री, मालीगौरा, मियांमल्लार, मियांसारंग, मुलतानी, मिरामल्लार, मेघमल्लार, मेघरंजनी, मोटकी, यमनकल्याण, यमनीबिलावल, रागेश्वरी, रामकली, रामदासीमल्लार, रेवा, लंकादहनसारंग, लच्छासाग, ललित, ललित पंचम, लाचारीतोडी, वराटी, वसंत, वसंतमुखारी, शंकरा, शहाणा, शिवभैरव, शुक्लबिलावल, शुद्ध कल्याण, शुद्ध मल्लार, शुद्ध सामंत, शुद्ध सारंग, श्याम, श्री, श्रीरंजनी, सर्पर्दा बिलावल, साजागिरी, सामंत सारंग, सावनी कल्याण, सावेरी, सिंधभैरवी, सिंधुग; सुघ- राई, सुहा, सूरदासीमल्लार, सोरट, सोहनी, सौराष्ट्रभैरव, हमीर, हंसकंकणी, हंसध्वनि, हिजेज, हिंदोल, हुसेनी कानडा, हेम. 'श्री, रागोऽथ वसंतश्वभैरव: पंचमस्तथा । मेघरागो बृहनाटो षडेते पुरुषा: स्मृता: ।' या संगीतरत्नाकर ग्रंथांतील श्लोकाप्रमाणें श्री, वसंत भैरव, पंचम, मेघ किंवा मेघमल्हार, बृहनाट किंवा नटनारायण असे सहा पुरुष राग आहेत (मोल्स्वर्थ कोशांत वरील श्लोक संगीतरत्ना- करांत असल्याबद्दल उल्लेख आहे परंतु उपलब्ध संगीतरत्नाकर ग्रंथांत हा श्लोक आढळत नाहीं). काव्यांत व पुराणांत यांवर चेतनधर्माचा आरोप केला असून प्रत्येकाला रागिणीनामक सहा (कांहींच्या मतें पांच) स्त्रीरूपें मानिलीं आहेत. सामाशब्द- ॰माला-ळा, मालि(ळि)का-स्त्री. १ गीताचा एक प्रकार; स्वरांची किंवा अनेक रामभेदांची मालिका; निरनिराळया रागांत म्हणतां येण्या- सारखें गीत. २ किल्ली दिली असतां अनेक रागांचे सूर ज्यामधून निघतात असें यंत्र; पियानोफोर्ट नामक वाद्यासहि म्हणतात. [सं. राग + माला] ॰मालेचीं चित्रें-नअव. राग गाइले जात असतां त्यांचा प्रभाव काय दिसतो हें ज्या चित्रांवरून दिसतें तीं चित्रें उदा॰ मेघमल्हार हा राग घेतला तर मोर हर्षभरित होऊन आपला रमणीय पिसारा उभारतो. इ॰ -पेशवेकालीन महाराष्ट्र १६१. ॰रंग-पु. १ गाणें व खेळणें; खेळ, मौज व ख्यालीखुशाली. २ लक्षणें व चिन्हें; साधारण स्वरूप, सुमार (कामांचा, गोष्टीचा). ३ संभव; पूर्वसूचना; बरेंवाईट स्वरूप. 'पावसाचा रागरंग पहा, तसे निघा.' [राग + रंग] ॰वाचक तान-स्त्री. (संगीत) ज्या रागामध्यें तान ध्यावयाची असेल त्या रागाच्या जीवभूत स्वरांची तान. ॰संकर-पु. गातांना एका रागांत दुसर्‍या रागांतील स्वर मिश्रित करून गाणें. [सं.] ॰ज्ञान-न. रागांचें, स्वरांचें किंवा गीताचें ज्ञान. [सं.] रागांग राग-पु. (राग) शुद्ध शास्त्रीय राग. ह्याच्या लक्षणांत सांगितल्याप्रमाणेंच हा गाइला पाहिजे असा कडक नियम आहे. [सं.] रागालप्ति-स्त्री. (प्रबंध) वर्ण, अलं- कार, गमक, स्थाय, ह्यांच्या साहाय्यानें रागाचें पूर्ण स्वरूप दृष्टीस पाडणें व त्यांत रागाचे आविर्भाव व तिरोभाव दाखविणें. [सं.] रागालाप-पु. (प्रबंध) ग्रह, अंश, न्यास, मन्द्र, तार, अप- न्यास, अल्पत्व, बहुत्व, षाडवत्व, औडुवत्व, ह्या रागाच्या विशे- षांचें प्रकाशन ज्यांत होतें अशी स्वररचना. [सं.] रागिणी-स्त्री. १ मिश्र किंवा पोट राग; मंजुल स्वर असलेला गायनांतील राग. प्रत्येक रागास रांगिणी सहा अथवा पांच मानिलेल्या आहेत. पुरा- णांत रागिणी ही रागाची स्त्री असें मानिलें आहे. राग पहा. कांहीं ग्रंथकार रागांचें वर्गीकरण पुरुषराग, भार्याराग, पुत्रराग, स्नुषाराग असें करितात त्यावेळीं कांहीं रागांस भार्याराग म्हणतात. तेव्हां त्यांस रागिणी म्हणून संबोधितात. वस्तुत: राग, रागिणी ह्यांमधील भेद कोणत्याहि ग्रंथक्रारानें स्पष्ट सांगितला नाहीं. २ विलासिनी, अनुरक्त स्त्री. [सं. राग] रागेश्वरी-स्त्री. एक राग. यांत षड्ज, तीव्र ऋषभ, तीव्र गांधार, कोमल मध्यम, तीव्र धैवत, कोमल निषाद हे स्वर लागतात. आरोहांत ऋषभ व पंचम वर्ज्य. अवरोहांत पंचम वर्ज्य. जाति औडुव-षाडव. मध्यम, संवादी षड्ज. गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर.

दाते शब्दकोश

जाग

पु. (कों.) १ (कुण.) मृताच्या दहाव्या किंवा बाराव्या रात्रीं केलेलें जाग्रण. अंगात येऊन आपल्या मरणाचें कारण सांगावें, पुरलेल्या पैशाची जागा दाखवावी किंवा आपल्या गुप्त गोष्टी सांगाव्या म्हणून त्याच्या कुटुंबातील माणसें जाग्रण करितात; यावेळीं चार देवझाडें मिळवून वाद्यादि पूर्वक समारंभ करतात. -स्त्री. १ जागृतावस्था; जागरण. (क्रि॰ होणें येणे). २ (राजा.) हालचाल; गडबड, गजबज. (घर, खेडेगांव यांतील) ३ गर्दी; गोंगाट (दाट वस्तींतील, जत्रेंतील). ४ कोण- त्याहि प्राण्याची एखाद्या जागेंतील सतत वस्ति; पाहरा; वचक बसण्याजोगें अस्तित्व. 'त्या रानांत वाघाची जाग होती म्हणून गुरें जात नसत.' 'घरांत मांजराची जाग असली म्हणजे उंदरांचा उपद्रव होत नाहीं.' ५ वस्ती.' यवतेश्वराच्या डोंगरावर मनुष्याची जाग असल्यामुळें तो डोंगर न चढतां..' -स्वप ३६४. ६ (गो.) चाहूल. [सं. जागृ] सामाशब्द- ॰माग-स्त्री. जाग अर्थ ४ पहा. जागणा-वि. जागा; जागृत. जागता-वि. १ जागरूक; सावध; दक्ष २ शक्ति, गुण आणि सामर्थ्य यांनीं युक्त; तात्काल फलदायी; उपासकाला पावणारी (देवाची मूर्ति, मंत्र-तंत्र, औषध).'या गांवचा देव असा जागता आहे कीं, तत्काल धावण्यास पोंचतो.' मंत्र जागता असला तर तत्काल विष उतरेल.' ३ तजेलदार; तेजस्वी; टवटवी असणारा; ज्याची सुधारणा आणि रक्षण काळजीपूर्वक होतें असा; संस्कृतिसंपन्न; सुस्थितीनें युक्त (धर्म, विधि, चाल) ४ तरतरीत. जोमदार (मन, बुद्धि इ॰). ५ ताजेंतवानें; न गंजलेलें; मलिन नसलेलें (मिळविलेलें ज्ञान) ६ लोकांच्या डोळ्यांपुढें असणारा व ज्याची लोकांना नेहमीं आठवण होते असा; अविस्मृत (मेलागेला माणूस, गोष्ट, प्रसंग). जागती जोत-स्त्री. जागता अर्थ २ पहा. कडक; सामर्थ्यानें युक्त अशी देवी, देव, मंत्र, औषध; सद्यः परिणामी, तात्काल फलदायी गोष्ट; खडखडीत दैवत; रामबाण औषध, (पुष्कळ देवस्थानांतून कांहीं विशिष्ट प्रसंगीं मूर्तीच्या अंगांतून ज्योत बाहेर पडते व म्हणून देवत्व नष्ट झालें नसून अद्याप आहे असें मानतात). 'जागती जोती काढिली हनुमान रूपें ।' -सप्र ३४२ [जागती + चाहूल लागतांच जाग येते अशी झोंप. २ डुलक्या घेणें; पेंगणें. ॰भाषा- स्त्री प्रचलित भाषा; जिवंत भाषा. 'संस्कृत जागती भाषा नाहीं. जागणें-अक्रि. १ जागृत राहणें; सावध राहणें; लक्ष ठेवणें. २ निजून उठणें; जागें होणें, असणें; झोंप न घेणें, टाकून देणें. 'सूर्य देखोनि उदयाचळीं । जागिन्नले समस्त ।' -मुआदि २९.१३०. ३ पाहरा करणें; सावधगिरी ठेवणें ४ लक्ष देणें; दख्खल ठेवणें; काळजी घेणें (धंदा, नोकरी, इनाम, शपथ, वचन यांची) 'त्यानें वचन दिलें होतें पण त्यास तो जागला नाहीं' ५ ताजें असणें; म्हटल्यावेळीं तयार असणें; आठवणें; कायम राहणें स्मरणें (अभ्यासिलेलें शास्र इ॰). 'व्यासंगानें श्रुत जागे । -लेलेशास्त्री म्ह॰ १ सारी रात्र जागली आणि शेगावांगीं रांधलीं = व्यर्थ श्रम आणि प्रयत्न २ जागेल त्याची वांठ आणि निजेल त्याला टोणगा. [सं जाग्रु-जागरण] जागर-रण-पुन. १ जागेपणा जागृता- वस्था. 'पोरांचे गडबडीमुळें रात्रीस चारी प्रहर जागर पडला.' २ निद्रा संयमन; देखरेख पाहरा. ३ पोवती (नारळी, श्रावणशुद्ध) पौर्णिमा. ४ देवतेच्या उद्देशानें विवक्षित कालपर्यंत जागण्याचा प्रकार. 'नवरात्रामध्यें देवाजवळ कथा करून मध्यरात्रपर्यंत प्रतिदिनीं जागर करितों.' ५ (गो.) पुरातन कालचें नाटक. ६ पुनरावृत्ति; उजळणी करणें; नवें, ताजें करणें (वेदघोषानें मंत्र). 'मंत्रजागर' [सं. जागृ] ॰घालणें-(माण.) खंडोबाच्या नांवानें वाघ्यामुरळ्या आणून त्यांची पूजा करून त्याना जेवा- वयाला घालून नाचविणें. जागरा-वि. १ भारी जागणारा. २ जागा राहणारा; दक्ष; सावध. जागरूक-वि. १ जागता पहा. २ स्पष्ट; उघड; टिकाऊ. तोंडावर फेंकता येण्याजोगा (पुरावा). ३ जागरणशील. जागरें-न. जागृति; जागेपण. 'नीद मारूनि जागरें । नांदिजे जेंवि ।' -अमृ ४.१. जागल-स्त्री. १ पहारा; राखण; सावधानता. २ पहारेकर्‍याचा पगार. ३ जागरण; जागृ- तावस्था. 'मला रात्रीं जागल घडली.' जागलकी-स्त्री. जाग- ल्याबद्दलची मजुरी; राखणावळ. 'गांवांत घोडें, गाडी मुक्का- माला रात्रीं राहिली तर महार जागले अर्धा आणा जागलकी घेतात.' -गंगा ९७. जागल्या-ळ्या-पु. पहारेकरी; रखवाल- दार; प्रवाश्यांच्या सामानावर पाहरा करणारा खेड्यांतील महार; रामोशी. जागव(वि)णें-उक्रि. १ जागें, जागृत करणें, ठेवणें; जागें राहून काळ काढणें. २ पहारा करणें; नजर ठेवणें, ३ (सामा.) राखणें; पाळणें; ठेवणें, वाक्यरचनेंत याचा पुष्कळ शब्दांशी जोडून उपयोग करितात. जसें-अब्रू-नाम-नांव जागविणें = अब्रू, नांव सांभाळणें; शील राखणें. दिवस जागविणें = दिवस राखणें; त्या दिवशीं जें कर्तव्य, जे विधी करावयाचे असतील ते करणें. नियम- नेम-जागविणें = स्वतः नेम, चाल राखणें; चालविणें. सती जागविणें = सतीची चिता प्रज्वलित ठेवणें, विझूं न देणें. गौर जागविणें = गौरीला, देवीला जागविणें; रात्रभर गौरीप्रीत्यर्थ जागरण करणें. जागसूद-वि. १ ज्याची झोंप चटकन उघडते असा; चटकन् जागा होणारा. २ जागता; सावध. 'तूं जागसूद ऐस मी निजतों.' ३ सावध; गाढ नसलेली (झोंप).

दाते शब्दकोश

सर्व

वि. १. सगळा; सगळे भाग मिळून; सारी रास, संख्या, प्रमाण. २ प्रत्येकजण मिळून; सगळा गट; जमाव; समूह. ३ सगळा काल, अवधि, विस्तार वगैरे. ४ पूर्ण; संपूर्ण; अवघा; पुरता; परिपूर्ण; सबंध; न वगळतां पूर्णांश. [सं. सर्; प्रा. सब्ब; सिं. सभु; पं. सभ; हि. सब. सं. षर्द् = जाणे] ॰कर्ता-वि. सगळें करणारा; उत्पत्तिकर्ता; सगळें बनविणारा; अवघ्याची रचना करणारा. ॰काल-क्रिवि. १ सगळा वेळभर; सर्व अवधि संपेपर्यंत; सर्व वेळीं; विवक्षित सगळा कालभर. २ सतत; नेहमीं; सर्वदा; सदोदित. ॰कालीन-वि. शाश्वत; सर्वकाल टिकणारें. ॰खपी-वि. १ ज्याच्या ठिकाणीं कोणत्याहि वस्तूचा उपयोगी अथवा निरुपयोगी, अवश्य अथवा अनवश्यक अशा सर्व वस्तूंचा खप होतो असा. २ ज्याला कोणतीहि, कसलीहि वस्तु चालते असा. ३ सर्वांकरितां खपणारा, काम करणारा; कोणा- साठींहि परिश्रम करण्यास तयार असा. ॰गत-वि. सर्वव्यापक; सर्वव्यापी; सर्व ठिकाणीं ज्याचें अस्तित्व, वास्तव्य आहे असा. 'चैतन्य आहे सर्वगत । तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ।' -ज्ञा २. १२६. ॰गामी-वि. सर्वव्यापक; सर्वत्र ज्याचें गमन आहे असा; सगळीकडे जाणारा. ॰गुणसंपन्न-वि. सगळ्या गुणांनीं युक्त; सर्व तऱ्हेनें पूर्ण; सर्व चांगल्या गुणांचें अधिष्ठान. ॰जनीन-वि. सार्वजनिक; सर्व लोकांसंबंधी. ॰जाण-वि. सर्वज्ञ; सगळें ज्ञान असणारा; सर्व जाणणारा. 'काय पूजातें मी नेणें । जाणावें जी सर्व जाणें ।' -तुगा ११५८. ॰जित् वि. १ सर्व जिंकणारा; सर्वांचें दमन करणारा; सर्वांस ताब्यांत ठेवाणारा. २ सर्वांहून श्रेष्ठ; वरिष्ठ. ॰त:-क्रिवि. १ सर्व दिशांनीं; सगळीकडे; सर्व बाजूंनीं; दशदिशां. २ सर्वत्र; पूर्णपणें; विश्वभर. ॰तंत्रस्वतंत्र-वि. अनिर्बंध; स्वैर. 'अशा अघांत्री व सर्व- तंत्रस्वतंत्र लोकांनीं हिंदु महासभेच्या निर्णयाकडे पाहून नाकें मुरडावीं यांत आश्चर्य नाहीं.' -सांस २.१६४. ॰तीर्थ-पु. समुद्र; सागर. 'गंगा न सांडितां जैसा । सर्वतार्थ सहवासा । वरपडा जाला ।' -ज्ञा १८.९०९. ॰तोभद्र-पुन. १ देवता स्थापनेसाठीं एक विशिष्ट मंडल काढतात तें. २ चारी दिशांस द्वारें असलेला प्रासाद, राजवाडा, मंदिर. 'रेखिलीं परिकरें । सपुरें सर्वतो- भद्रें ।'-ऋ ७३. ३ सैन्यरचनेचा एक प्रकार; एक विशिष्ट व्यूह. ४ अनेक प्रश्नांस एकच उत्तर योग्य असतें असें कोंडें, कूट. ५ एक प्रकारचें चित्रकाव्य; कोणत्याहि दिशेनें वाचलें तरी एकच प्रकारचा श्लोक व अर्थ येईल अशी रचना. ॰तोमुखपु. एक सोम- याग, यज्ञ. -वि. सर्व बाजूंनीं तोंड असलेला; कोणत्याहि वाजूनें पाहिलें तरी समोर तोंड येईल असा (देवता, पाणी, आकाश, गोल). ॰त्र-क्रिवि. सर्व ठिकाणीं, स्थळीं, जागीं; सगळीकडे; सर्व दिशांस. 'ईश्वर सर्वत्र आहे.' -वि प्रत्येक; सगळे; सर्व. 'सर्वत्रांस दक्षिणा दिली.' ॰था-क्रिवि. सर्व बाजूंनीं; सर्व मार्गांनीं, दिशांनीं; सर्व उपायांनीं; पूर्णपणें; मुळींच; नि:शेष; निश्चित; खचित; केव्हांहि. 'मज आपणपें सर्वथा नाहीं । मन बुद्धिठायीं । स्थिर नोहे ।' -ज्ञा १.१९५. 'मना सर्वथा पापबुद्धि नको रे ।' -राम ॰थैव-क्रिवि. केव्हांहि; सर्व प्रकारें, दिशांनीं, बाजूंनीं. ॰दर्शी-द्रष्टा-वि. सर्वसाक्षी; सर्व पाहणारा; ज्यास सगळें दिसतें असा. ॰दा-क्रिवि. नेहमीं; सतत; सर्वकाळीं. ॰दु:खक्षय-पु. सर्व दु:खांपासून मुत्त्कता; मोक्ष. ॰धन-न. (गणित) श्रेढींतील सर्व पदांची बेरीज. -छअं १७३. ॰नाम-न. (व्या.) स्वत: विशिष्टार्थद्योतक नसतां पूर्वापरसंबंधानें कोणत्याहि नामाबद्दल योजतां येतो असा शव्द. ॰नियंता-वि. सर्वांवर ताबा चालविणारा; सर्वांचें नियमन करणारा. ॰न्यास-पु. सर्वसंगपरित्याग; सर्वधन, कुटुंब, आप्तेष्ट, संसार वगैरे सर्व गोष्टी सोडून देणें; सर्व ऐहिक गोष्टी टाकून देणें, त्यांपासून अलिप्तता, मुक्तता. ॰पाक-पु. खीर; क्षीर. ॰पित्री अमावास्या-स्त्री. भाद्रपद महिन्यांतील अमावास्या (या दिवशीं सर्व पितरांचें श्राद्ध करितात यावरून). ॰प्रायश्चित-न. सर्व पातकांबद्दल एकाच वेळीं घ्यावयाचें प्रायश्चित्त; सर्व पापांचें परिमार्जन, क्षालन; सर्व दोषां- पासून मुत्त्कता. 'सर्वप्रायश्चित्त घेण्याचा त्यांनीं जो निश्चय केला ...' -आगर ३.१३५. ॰प्रिय-वि. सर्वांचा आवडता; लोकप्रिय; विश्वमित्र. ॰ब्रह्मी-वि. सर्व विश्व ब्रह्मरूप आहे जसें केवळ तोंडानें बोलून एकंकार करणारा आचारभ्रष्ट. 'लेकुरें सर्व ब्रह्मी झालीं.' -सप्र १९.४०. ॰भक्ष-भक्षक-भोत्त्का- वि. वाटेल तें खाणारा; खाण्याच्या कामीं कोणताहि निर्बंध न पाळणारा; स्वच्छ अस्वच्छ, भक्ष्य, अभक्ष्य न पहातां अघोरी- पणें खाणारा. अग्नि, शेळी, कावळा वगैरेसहि हा शव्द लावतात. ॰भांवें-क्रिवि. काया-वाचा-मनें करून; सर्व भावयुक्त. 'तैसा स्त्रीदेहीं जो जीवें । पडोनिया सर्वभावें ।' -ज्ञा १३.७९०. 'जगीं वंद्य तें सर्वभावें करावें' -राम ॰भूतभूतांतर-वि. सर्व वस्तूंच्या ठिकाणीं वास करणारा; सर्वव्यापी; विश्वव्यापीं; विश्वव्यापक (ईश्वर). ॰मय-वि. सर्वव्यापी; सर्वगत (ईश्वर). ॰मान्य-वि. सर्वांस संमत, पसंत, कबूल. ॰मान्य-मान्य इनाम-न. सर्व कर माफ असलेलें इनाम; सर्वांना कबूल असें इनाम; गांवसंवंधीं इनाम; याबद्दल सनद नसते. ॰राष्ट्रीय कायदा-पु. राष्ट्रांराष्ट्रांतील व्यवहार नियंत्रण करणारा नियम. ॰रूप-रूपी-वि. सर्वव्यापी; सर्वांचें स्वरूप आहे असा; विश्वरूपी (ईश्वर) 'अनादि अविकृतु । सर्वरूप ।' -ज्ञा २.१५०. ॰लिंगी- पु. कोणताहि विशिष्ट पंथ न अनुसरणारा बैरागी. ॰वल्लभा-स्त्री. वेश्या; वारांगना. ॰विध-क्रिवि. सर्वप्रकारें. ॰वेत्ता-वेदी-वि. सर्वज्ञ; सर्वसाक्षी; त्रिकालज्ञ. ॰वेषी-वि. बहुरूपी; अनेक प्रका- रचे वेष धारण करणारा. ॰व्यापक-व्यापी-वि. सर्वत्र असणारा; विश्वव्यापी; सर्वत्र भासणारा. ॰व्रणपु. गळूं; करट. ॰श:-क्रिवि. सर्व दिशांनीं, बाजूंनीं, मार्गांनीं, रीतीनीं; पूर्णपणें; निखालस; दरोबस्त; नि:शेष. ॰शाक-ख-स्त्री. १ अनेक प्रकारच्या भाज्या एकत्र करून केलेली भाजी. २ आलें. ॰शास्ता-वि. सर्वांवर सत्ता, अधिकार गाजविणारा. ॰शोधी-वि. सर्वोचें निरी क्षण करणारा; सर्व वस्तूंची परीक्षा घेणारा; जिज्ञासु; चिकित्सक; परीक्षक; शोधक. ॰संगपरित्याग-पु. सर्वसंन्यास; सर्व ऐहिक वस्तूंचा त्याग; पूर्ण वैराग्य, विरक्ति. ॰संग्रह-पु. सर्व वस्तूंचा साठा, संचय; संकीर्ण, मिश्र संचय. ॰सपाट-क्रिवि. अभेद; सर्वत्र सम स्थिति; मोकळें. 'आत्मा नसतां सर्व सपाट चहूंकडे ।' -दा १६.८.१०. ॰संमत-वि. सर्व मान्य; सर्वांस पसंत, कबूल असलेलें. ॰समर्थ-वि. सर्वशक्तिमान; सर्वसत्ताधारी; सर्वा- धिकारी. ॰सह-वि. सर्व सहन करणारा; सर्व गोष्टींचा भार वाहणारा. ॰सहवर्तमान-वि. सर्वांसह; सर्वांस बरोबर घेतलेला; सर्वांनी युक्त. ॰साधन-न. सर्व गोष्टींची सिद्धता; सर्व गोष्टी घडवून आणणें; सर्व कार्यें साधणें, करणें, बनाव बनविणें. ॰साधन- साधनी-वि. सर्व गोष्टी साधणारा, सिद्ध करणारा, घडवून आणणारा. ॰साधारण-सामान्य-वि. सर्वांस लागू होणारा; सर्वांस सम असा; सर्वांचा समावेश करणारा. 'मला नाहीं तुमचे सर्वसामान्य सिद्धांत समजत.' -सुदे ३७. ॰साक्षी- वि. सर्व पाहणारा; सर्व भूतांच्या ठायीं असणारा; ज्यास सर्व दिसतें असा (ईश्वर). 'नसेन दिसलों कसा नयन सर्वसाक्षी रवि ।' -केका ४. ॰सिद्ध-वि. सर्व परिपूर्ण; (सर्व गुणादि- कांनीं युक्त; सर्व लक्षणांनीं युक्त; संपूर्ण; सर्वांग परिपूर्ण (ईश्वर). ॰सिद्धि-स्त्री. सर्व इच्छांची पूर्ति; सर्वकाम पूर्ति. ॰सिद्धार्थ- वि. सर्व इच्छापूर्ति झालेला; सर्व हेतु साध्य झालेला. ॰सुखा- नंद-वि. सर्व सुख व आनंद प्राप्त झालेला; सुखांचा आनंद ज्याच्या ठिकाणीं आहे असा (ईश्वर). ॰सोंवळा-वि. १ नेहमींचा शुद्ध, सोंवळा, पवित्र. जन्मसोंवळा (एखादा मनुष्य स्नान न करतांच सोंवळें नेसला असतां त्यास उपरोधिकपणें म्हणतात). २ नेहमींच पवित्र, शुद्ध, सोंवळें असलेलें (रेशमी वस्त्र, धाबळी वगैरे) (हीं कधीं न धुतलीं तरी सोंवळीं मानण्यांत येतात यावरून). ॰स्पर्शी-वि व्यापक; सर्वांचा समावेशक. 'एकंदर ठराव सर्वस्पर्शी समाधानका- रक केला.' -केले १.३०९. ॰स्व-न. १ सर्व धन; सर्वसंपत्ति; सर्व मालमत्ता, चीजवस्त वगैरे; स्वत:च्या मालकीचें सर्व. 'सर्वस्व हारवावें की जिकावें न भीरु तूं पण हो.' -मोसभा ६.९५. २ तन, मन, धन; 'तैसें सर्वस्वें कर्म अनुष्ठी । परि फळ न सुखे दिठी ।' -ज्ञा १८.५९० मी सर्वस्वयां तैसें । सुभटांसी ।' -ज्ञा १.१११. ३ तत्त्वांश; सार; ॰स्वदंड-पु. सर्व संपत्ति जप्त करणें; सर्व मालमत्ता खालसा करणें; सर्व हिरावून घेणें. ॰स्वहर-हर्ता-हारक-हारी-पु. सर्व धन हरण करणारा, घेणारा, लुबाडणारा. ॰स्वहरण-हार-नपु. सर्व संपत्तीची लूट; सर्व धन हिरावून घेणें; सर्व नाश. ॰स्वामी-पु. १ सर्व बिश्वाचा प्रभू; सर्व सत्ताधारी, जगत्पति; सार्वभौम. २ सर्वस्वाचा मालक, धनि; सर्व वस्तूंचा धनि. ॰स्वीं-स्वें-क्रिवि. १ तनमनधनेंकरून; सर्व वस्तुमात्रासह. २ पूर्णपणें; पुरतेपणीं; एकंदर; अगदीं; सर्व प्रकारें; निखालस. उदा॰ सर्वस्वीं सोदा, लुच्चा, लबाड, हरामी वगैरे. ॰हर- हर्ता-हारक-हारी-वि. सर्व हरण करणारा; लुबाडणारा. ॰हरण-न. संपूर्ण नागवणूक; नाडणूक. ॰ज्ञ-वि. सर्व जाणणारा; त्रिकालज्ञ; पूर्ण ज्ञानी;सर्वसाक्षी; सर्व वेत्ता. 'तुम्हां सर्वज्ञांच्या समाजीं । देयावें अवधान हे माझी । विनवणी सल- गीची ।'-ज्ञा ९.२ सर्वंकष-वि. सर्वांस कसोटीस लावणारा. सर्वाग-न. १ सर्व शरीर; देह; शरीराचे सर्व अवयव. २ सांग- वेद; षडंगसहित वेद. सर्वांगरोग-वात-पु. पक्षघाताप्रमाणें सर्व शरीरास वातविकार होतो तो. -योर १.७५५. सर्वांगा- सन-न. साफ उताणें निजून हात जमीनीवर टेकणें व त्यांवर जोर घेऊन खांद्यापर्यंतचा भाग व पाय वर उचलून ताठ करून स्थिर होणें. -संयो ३५०. सर्वांगीण-वि. सर्व शरीर व्यापणारा; सर्व अंगांसंबंधीं. सर्वांगें-क्रिवि. एकचित्तानें; एकाग्रतेनें. 'जो सर्वांगें श्रोता ।' -दा ७.१.२८. सर्वांची मेहुणी-स्त्री. १ मुरळी; भावीण. २ वेडसर स्त्री. सर्वांतर- वि. सर्वांच्या अंतकरणांत राहणारा. 'मज सर्वांतरानें कल्पिती । अरि मित्र गा ।' -ज्ञा ९.१६६. सर्वांतोडीं-क्रिवि. सर्वां- मुखीं; प्रत्येकाच्या मुखांत; ज्याच्या त्याच्या तोंडांतून. सर्वा- त्मना-क्रिवि. १ मनोभावें करून; अंत:करणपूर्वक; तनमन- धनें करून. 'धन कामासि निजमुख । सर्वात्मना नाहीं देख ।' -एभा २३.४३५. २ पूर्णपणें; सर्वस्वी; निखालस. 'हा सर्वात्मना लबाड आहे.' ३ मुळींच; अगदीं; केव्हांहि; कोण- त्याहि तऱ्हेनें; साफ (नाहीं-निषेधार्थक शब्दाबरोवर उपयोग). 'मजपासून ही गोष्ट सर्वात्मना घडावयाची नाहीं.' -रा ३. ३०१. सर्वात्मा-पु. सर्व प्राणिमात्राच्या ठिकाणीं असलेला जीवात्मा, चैतन्य, (ईश्वर). सर्वाथाई-क्रिवि. सर्वथा (अप- भ्रंश). 'अशा पुण्यरूपें नृप न सोडी भोग सर्वाथाई ।' -ऐपो ४०९. सर्वाधिकार-पु. पूर्ण सत्ता; सर्वांवर सत्ता, ताबा, वर्चस्व. सर्वाधिकारी-पु. प्रमुख; मुख्य; सर्वासत्ताधीश; (म्हैसूरच्या राजाचा हैदरपूर्वी मुख्य प्रधान). सर्वांधीत- वि. सर्व अध्ययन झालेला; सर्व विषय शिकलेला; निष्णात. -शिदि ११८. सर्वानुभूति-स्त्री. सर्व जगाचा, अनेक प्रका- रचा, अनेक गोष्टींचा अनुभव. सर्वान्नभक्षक-भक्षी-भोजी- वि. १ वाटेल तें खाणारा; सर्व प्रकारचें अन्न ज्यास चालतें असा. २ अधाशी; अधोरी. सर्वाबद्ध-वि. सर्व तऱ्हेनें स्वतंत्र; मोकाट; स्वैर; पूर्ण स्वतंत्र; असंबद्ध; नियमांनीं बद्ध नव्हे असे; विसंगत; (मनुष्य, चाल, वागणूक, कार्य, काव्य, भाषण वगैरे). सर्वांर्थीं-वि. सर्व वस्तूंची इच्छा करणारा; लोभी; महत्त्वाकांक्षी वगैरे. सर्वार्थी, सर्वार्थें-क्रिवि. सर्व प्रकारामें; सर्वस्वी; हरतऱ्हेनें; प्रत्येक दृष्टीनें 'वैश्य व्यव- सायांत जाण । दिसतो निपुण सर्वार्थीं ।' सर्वाभ्य-वि. क्रिवि. सर्व प्रकारें; सर्व तऱ्हेचा; सर्व कामांतील. 'सर्वाभ्य कारभारी.' -चित्र २. सर्वारिष्ट-न. सर्व जगावरील सामान्य संकट; सर्वसामान्य पीडा; अनेक लोकांस बाधक किंवा अनेक प्रका- रचें संकट, पीडा, बाधा. सर्वांशिक, सर्वांशी-वि. सर्व भागांशीं संबंध असलेलें; एकदेशीयाच्या उलट. सर्वांशीं- क्रिवि. पूर्णपणें; सर्व प्रकारें; सर्व तऱ्हेनें. सर्वाशीं संपूर्ण, सर्वावयवीं संपूर्ण-वि. सर्व विभागांनीं, अवयवांनीं युक्त; परिपूर्ण; सबंध. सर्वाशुद्ध-वि. अनेक अशुद्धें असलेला; सर्वं प्रकारें दोषयुक्त; चुक्यांनीं भरलेला (ग्रंथ वगैरे). सर्वीय- वि. सर्वांचा; सर्वाशीं संबंध असलेला; सगळ्यांचा; विश्वाचा; जागतिक. सर्वें-नअव. सगळीं. 'दु:ख भोगिलें आपुलें जीवें । तेथें कैचिं होतीं सर्वें ।' -दा ३.१०.४४. सर्वेश, सर्वे- श्वर-पु. १ परमेश्वर; जगदीश. 'तया स्वधर्मी सर्वेश्वरीं । न भजेल जो ।' -ज्ञा ३.१०४. २ सम्राट; सार्वभौम; सर्वाधीश. सर्वेश्वर(री)वाद-पु. विश्वांत सर्वत्र परमेश्वर भरलेला आहे असें मत. (इं.) पॅन थीइझम्. सर्वै-क्रिवि. सर्वहि; पूर्णपणें; सर्वस्वीं. 'अकस्मात तै राज्य सर्वै बुडालें ।' -राम. सर्वो- त्कर्ष-वि. अत्यंत महत्त्वाचें; सर्वोत्तम. 'सांप्रत हे येश आगाध भ्रीनें आपले पदरीं सर्वोत्कर्ष घातलें.' -पेद ३.१८१. सर्वोत्कृष्टवि. १ अत्युत्तम; सर्वोत्तम; सर्वश्रेष्ठ (ईश्वर). २ सत्य; न्याय्य; रास्त. सर्वोपकार-पु. सर्वांचें कल्याण; सर्वावर केलेले उपकार; जमदुपकार सर्वोपकरी-वि. जगास कल्याणकारक: सर्वांस उपकारक लाभदायक. सर्वोपयोगी- वि. सर्व कार्यांस उपयुक्त; कोणत्याहि कामास उपयोगी. सर्वोपरी-क्रिवि. सर्व प्रकारानीं; सर्व रातीनीं; सर्व पद्धतीनीं; सर्व तऱ्हानीं. [सर्व + परी] 'समर्थ जाणोनि सर्वोपरी ।' -मुआदि ३३. २ सर्वोपरी-वि सर्वश्रेष्ठ; वरिष्ठ; उत्कृष्ट; उत्तम. 'शिखराथिलियां सर्वोपरी । मेरु तो मी ।' ज्ञा १०. २२७. -क्रिवि. श्रेष्ठपणें; वरिष्ठपणें; उत्तम रीतीनें. [सर्व + उपरि] सर्वौषधि-स्त्री. शतावरी; एक वनस्पति. सर्ब्यांस- ला-सनाम द्वि. (अशिष्ट) सर्वांचा. 'तो सर्व्यांला मुजरे करतो ।' -ऐपो ४३१.

दाते शब्दकोश

कर्म

न. १ एखादें काम, कृत्य. 'हें कर्म झालें समरांत जेव्हां । होतास कोठें रणभीरु तेव्हां ।' -वेणीसंहार ३. २. स्नान- संध्या, यज्ञयागादि धार्मिक विधि; याचे नित्य, नैमित्तिक व काम्य असे तीन भेद आहेत. ३ सांप्रतच्या आयुष्यांतील कृति, चाल, आचार, वर्तणूक; यावरून दैव किंवा नशीब अशा अर्थानें योजतात-येथें दैव म्हणजे पूर्वजन्मार्जित पापपुण्याचा भोगवटा होय; पूर्वजन्मकृत आचरण; संचित. 'अरे अरेकर्मा । बारा वर्षें झालीं याच धर्मा ।।' 'या व्यापारांत मीं साफ बुडालों, माझें कर्म ! दुसरें काय ?' 'कर्मबलिवंत', 'कर्मबलवत्तर' 'घोर-कठिण कर्म' या संज्ञा कर्माचें (दैवाचें) वर्चस्व, काठिण्य, निष्ठुरता दाखवितात. ४ विशिष्ट काम; नैतिक कर्तव्य; जाति, धंदा वगैरेंनीं मान- लेलें आवश्यक कृत्य. ५ (व्या.) कर्त्यानें अमुक क्रिया केली हें दाखविणारा शब्द; कर्तृविषयक व्यापाराचें कारक; कर्माची विभक्ति प्रायः द्वितीया असते. 'रामा गाय बांधतो' यांत गाय हें कर्म. ६ उद्योग; कामधंदा; नेमलेलें, विशिष्ट प्रकराचें काम. ७ सुरतक्रिडा; मैथुन; रतिसुख; संभोग. 'त्यानें तिच्याशीं कर्म केलें.' ८ सामान्य क्रिया; ऐहिक व्यापार; मायिक क्रिया. 'माया हा सामान्य शब्द असून तिच्याच देखाव्याला नामरूपें व व्यापाराला कर्म हीं विशिष्टार्थक नामें आहेत.' -गीर २६०. [सं.] (वाप्र.) कर्म दोन पावलें पुढें-नशीब नेहमीं आपल्यापुढें धांवत असतें. ॰आड ठाकणें-कर्म आडवें येणें; आपत्ति ओढवणें. 'अन्न घेवोनि जों निघाली । तों कर्म आड ठाकलें ।' -ह १६.१३०. कर्मानें ओढणें-ओढवणें-दैवाचा पाश येऊन पडणें; दैवाधीन होणें. -नें जागें होणें-दैव अनुकूल होणें. -नें धांव घेणें-दैव पुढें येणें; दैवाकडून प्रतिबंध, अडथळा होणें. -नें पाठ पुरविणें- उभें राहणें-दैवानें मोडता, अडथळा घालणें; कर्म ओढवणें. -नें मागें घेणें-सरणें-दैवानें साहाय्यने करणें; केल्या कर्माचें फळ-न. केलेल्या कृत्याचा परिणाम. 'केल्या कर्माचें फळ बापा । ऐश्वर्य तुज देतील ।' -अमृत, नव ४४३. (सामाशब्द) ॰कचाट- न. प्रारब्धामुळें मागें लागलेलें दुर्दैव, संकट, विपन्नावस्था; कर्म- कटकट; पूर्व जन्मीचें पाप, भोग. 'प्राणी कष्टकष्टोंचि मेले । कर्मकचाटें ।' -दा १८.८.२०. [सं. कर्म + म. कचाट] ॰कटकट- खटखट-स्त्री. १ प्रारब्धयोगानें वांट्यास आलेलें किंवा गळ्यांत पडलेलें व कंटाळा येण्याजोगें कोणतेंहि काम; वरचेवर त्रास देणारें, डोकें उठविणारें, अडथळा आणणारें काम किंवा व्यक्ति; कोणतीहि नशीबीं आलेली पीडा, त्रास, छळ, जाच वगैरे. २ (ल.) जिकिरीचें, नावडतें काम; व्याद. 'मी म्हातारा झालों, माझ्यामागें ही शिकविण्याची कर्म कटकट कशाला ?' 'आतां त्यांची कर्मकटकट आपणांस कशाला हवी' -नि ६७. ३ (ल.) भांडण; तंटा; कटकट. 'तुम्हां दोघांत नेहमीं इतकी कर्मकटकट चालत असते.' -भा ३७. ॰कट्टो-वि. (गो.) हतभागी; कर्मकरंटा. ॰कथन-नी-न. १ कर्मकथा; कर्माची कहाणी. २ (ल.) दुर्दैवी प्रसंगकथन; दुःखदकथा; कर्मकथा पहा. 'ऐसी आमुची कर्मकथनी । तें अनायासें आलें सर्व घडोनी ।' -मक २६. १८५. [सं.] ॰कथा-स्त्री. १ प्रारब्धामुळें भोगलेल्या दुःख, त्रास, दगदग, वगैरेची दुसर्‍याजवळ सांगितलेली गोष्ट, वृत्तांत, कहाणी. २ आत्मश्लाघेचें किंवा रिकामटेकडें भाषण; बाता. ३ एखाद्या प्रसंगाची किंवा कृत्याची खरी व इत्थंभूत हकीकत. ४ कंटाळवाणें, निरर्थक भाषण, बडबड. [सं.] ॰कपाट-न. कर्म- कचाट पहा. [सं.] ॰कहाणी-स्त्री. कर्मकथा पहा. ॰कांड- न. त्रिकांड वेदांतील यज्ञासंबंधींचा कर्ममार्गदर्शक व आचारनिद- र्शक भाग; -मंत्र व ब्राह्मणें मिळून जो वेदभाग त्यास कर्मकांड व उपनिषदांस ज्ञानकांड म्हणतात. 'कर्म कांड तरी जाणें । मुखोद्गत पुराणें ।' -ज्ञा १३.८२८. २ धर्मकर्में, आचारविचार, संस्कार वगैरेना व्यापक अर्थानें हा शब्द लावितात. (सामा.) आन्हिक; नित्यनैमित्तिक आचार. 'कृष्णगीत रुचतां श्रवणातें । कर्मकांड रुचि न दे कवणातें ।।' 'आतां आपलें कर्मकांड अगदीं एकाबाजूस ठेवावें.' -चंद्रगुप्त ३५. ३ कंटाळवाणी, निरर्थक बडबड; कर्मकथा. (क्रि॰ गाणें; सांगणें; बोलणें). ॰कार-वि. १ (गो.) कर्मनिष्ठ. २ शिल्पी; लोहार. [सं.] ॰काल-ळ-पु. धर्मकार्यें करण्यास उचित असलेला काळ, वेळ, समय. [सं.] ॰केरसुणी-स्त्री. कर्मरूपी केर सरसकट झाडणारी, कर्मापासून सोडविणारी केरसुणी. 'तेव्हां तेचि श्रद्धा होये । कर्मकेरसुणी ।' -ज्ञा १७.६४. ॰गति- स्त्री. दैव; प्रारब्ध; नशीब. दैवगति पहा. [सं.] ॰चंडाळ- चांडाळ-पु. (कृत्यानें) निवळ चांडाळ. १ अतिक्रूर, पाषाणहृदयी माणूस. २ स्वैर वर्तनी; धर्मलंड; दुरात्मा. [सं.] ॰चोदना- स्त्री. कर्म करण्याची प्रेरणा. 'कर्मचोदना व कर्मसंग्रह हे शब्द पारिभाषिक आहेत.' -गीर ८३५. [सं.] ॰ज-वि. कर्मापासून उत्पन्न झालेलें. 'सकळ यज्ञ कर्मज' -ज्ञा ८.४६. [सं.] ॰जड-पु. कर्मठ लोक. 'तिन्हीं लोकांचा शास्ता । ईश्वर तो मी नियंता । येणें कर्मजडांची वार्ता । अनीश्वरता छेदिली ।' -एभा १०.६२१. ॰जात-न. सर्व प्रकारचें कर्म; सर्व तर्‍हेचे व्यापार. 'मग सस्य फळपाकांत । तैसें निमालिया कर्मजात । आत्मज्ञान गिंवसित । अपैसें ये ।' -ज्ञा १८.१२९. [सं.] ॰जीव-वि. (गो.) बारीक, लहान प्राणी. ॰दक्ष-वि. धर्माचार व विधि यांत निपुण; कर्मठ; कर्मशील; कर्मनिष्ठ, कर्मिष्ठ यांसारखा उपयोग. 'कर्मदक्षा कर्ममोचका । जयराम कोदंड भंजना ।' [सं.] ॰धर्म-न. (क्क.) पु. (यासमासांतील धर्म शब्द जरी पुल्लिंगी असला तरी बहुतेक सर्व समास नपुंसकलिंगीच आहेत; कारण यांतील प्रधानार्थ कर्म शब्दापासूनच निघालेला असून धर्म शब्द केवळ जोडशब्द आहे) वर्तन; वर्तनक्रम; कृत्य; आचरण. 'जसें ज्याचें कर्मधर्म तशी त्यास फलप्राप्ति,' 'कर्माधर्मानें कोण्ही संपत्ति भोगतो आणि गादीवर बसतो, कोण्ही फांशी जातो.'; 'कोण्हाच्या कर्मधर्मांत कोण्हाचा वांटा नाहीं.' = प्रत्येकाला स्वतःच्या कृत्याबद्दल झाडा दिला पाहिजे. ॰धर्मगुण-पु. कर्म- धर्माचा प्रभाव, शक्ति. कर्मधर्मसंयोग पहा. [सं.] ॰धर्मविर- हित-वि. धर्माज्ञा, धार्मिक व्रतें व कृत्यें ज्यानें सोडलीं आहेत किंवा जो त्यापासून मुक्त झाला आहे असा; ऋषि किंवा साधुजन यांना चांगल्या अर्थीं व उच्छृंखल व धर्मलंड यांना वाईट अर्थीं लावतात. 'आम्हीं कर्मातीत झालों म्हणती' या शब्दाचा अर्थ दोन्हीं प्रकारचा म्हणजे चांगला व वाईटहि आहे. 'झालों कर्म- धर्मविरहित । मना आवडे तो भोग भोगित ।' [सं.] ॰धर्म- संयोग-धर्मयोग-पु. १ स्वतःचें दैव आणि सत्कर्म यांचा संयोग; भाग्य व सदाचार यांचें ऐक्य (पूर्वजन्मार्जित आणि इहजन्मार्जित सत्कृत्यांचें फळ मिळून) २ अकल्पित मेळ; यदृच्छा; प्रारब्धयोग. ॰धर्मसंयोगानें-क्रिवि. अचानक; चम- त्कारिक किंवा अकल्पित मेळ मिळून येऊन; प्रसंगोपात्त; प्रारब्ध- योगानें. 'कर्मधर्मसंयोगानें मी अगदीं सहज बाहेर गेलों तों माझी नजर तिच्याकडे गेली.' -मायेचा बाजार. 'कर्मधर्मसंयोगानें तुमची गांठ पडली आहे तर गोड बोलून काळ लोटावा.' ॰धारय समास-पु. (व्या.) वक्त्याच्या मनांत उभय शब्दांचा भाव ज्यांत समान असतो किंवा उभय शब्दांचा परस्पर उप- मानोपमेयभावसंबंध ज्यांत असतो तो; विशेष्य-विशेषणांचें सान्निध्य असून त्यांचा जो समास घडतो तो; उदा॰ 'भक्तिमार्ग = भक्ति तोच मार्ग, किंवा भक्तिरूप जो मार्ग तो; भवसागर; संसारा- टवि; काळपुरुष.' -मराठीभाषेचेंव्या. २७५. तत्पुरुषसमासाचा एक भेद. [सं.] ॰निष्ठ-वि. कर्मठ पहा. 'जया लाभाचिया आशा । करूनि धैर्यबाहूंचा भरंवसा । घालीत षट्कर्मांचा धारसा । कर्मनिष्ठ ।' -ज्ञा ६.४७४. [सं.] ॰निष्ठा-स्त्री. १ कर्मावर निष्ठा. २ कर्म- योग. 'वैदिक धर्मांत...दोन मार्ग...आहेत, पैकीं एका मार्गास...ज्ञाननिष्ठा व... दुसर्‍यास कर्मयोग किंवा संक्षेपानें नुसता योग अगर कर्मनिष्ठा असें म्हणतात. -गीर ३०१. [सं.] ॰न्यास-पु. १ कर्म किंवा कृत्यें त्याग (पुढील जन्मीं हित व्हावें किंवा फळ मिळावें म्हणून). २ फलन्यास; कर्मा- पासून मिळणार्‍या फलाविषयींच्या इच्छेचा किंवा आशेचा त्याग; निष्कामकर्म. [सं.] ॰फल-न. प्रारब्धापासून मिळणारें फळ; पूर्वजन्मीं केलेल्या पापपुण्याचें चांगलें अगर वाईट असें या जन्मीं भोगावें लागणारें फळ. 'सांडूनि दुधाचि टकळी । गोंवारी गांवधेनु वेंटाळी । किंबहुना कर्मफळीं । तैसें कीजे ।' -ज्ञा १८.१७४. [सं.] ॰फुटका-वि. भाग्यहीन; दुर्दैवी; कमनशिबाचा; अभागी. [कर्म + फुटणें] ॰फुटणें-सक्रि. दुर्दैव ओढवणें; गोत्यांत येणें; नुकसान होणें. ॰बंध-पु. फलाशेनें केलेल्या कर्मामुळें प्राप्त झालेलें बंधन; प्रारब्धप्राप्त स्थिति; मायिक पसारा; ऐहिक मायापाश; प्रपंच; संसार. 'जो पहुडला स्वानंदसागरीं । कर्मबंधीं न पडे तो ।' [सं.] ॰बंधु-पु. व्ययसायबंधु; समव्यवसायी; एकाच प्रकारचें काम करणारा. [सं.] ॰भुवन-न. कर्मरूप घर. 'तेथ न्यावो आणि अन्यावो । हा द्विविधु साधूनि आवो । उभवितां न लवी खेंवो । कर्मभुवनें ।' -ज्ञा १८.४५५. [सं.] ॰भूमि, भूमिका -स्त्री. १ इहलोक; मृत्युलोक; यज्ञादि धार्मिक कृत्यें जेथें करतां येतात ती जागा; कर्म करावयाचें क्षेत्र; रंगभूमि (मर्त्यांची). 'जेथें मनाचा प्रवेशु नाहीं । त्यांची पायवाट ते ठायीं । ऐसें स्वइच्छा विचारितां महीं । आले ते पाही कर्मभूमीसी' -एभा २.१८४. 'परम प्रतापी दशरथपिता । कर्मभूमीस येईल मागुता ।' -रावि १६.८६. [सं.] २ प्राधान्यानें भारतवर्ष. -हंको. ॰भोग-पु. भवितव्य- तेच्या नियामानुरूप मिळणारीं सुखदुःखें सोसणें; दैवाची भरपाई; पूर्वसंचितानुरूप या जन्मीं प्राप्त होणारी स्थिति. 'माझा कर्मभोग चुकत नाहीं.' [सं.] ॰भ्रष्ट-वि. धर्मशास्त्रविहित नित्यनैमित्तिक कर्मांचें आचरण न करणारा; धर्माज्ञा व धर्मकर्म परिपालनाविषयीं उदासीन; कर्तव्यच्युत; कर्तव्यपराङ्मुख. [सं.] ॰मार्ग-पु. १ स्नानसंध्या इ॰ कर्में करण्याची रीत; यज्ञयागादि कर्मरूप ईश्वर- प्राप्तीचा किंवा मोक्षाचा साधनीभूत मार्ग; सत्कृत्यें केल्यानें व धर्माचरणानें मोक्षाला जाण्याचा मार्ग. २ धर्मकृत्यें करण्याचा खरा मार्ग. ३ श्रौत म्हणजे यज्ञयागादि कार्मांचा मार्ग. 'भारतीय तत्त्वज्ञानांत मोक्षाचे कर्ममार्ग, ज्ञानमार्ग व भक्तिमार्ग असे तीन मार्ग सांगितले आहेत.' -ज्ञाको क १३२. [सं.] ॰मार्गी-वि. कर्ममार्गानें जाणारा; जो निष्ठापूर्वक धर्माचरण करून परमेश्वर- प्राप्तिविषयीं झटतो तो. [सं.] ॰मुक्ति-स्त्री. स्नानसंध्यादि नित्य नैमित्तिक कर्में करण्याची आवश्यकता ज्या स्थितींत उरत नाहीं अशी अवस्था; नैष्कर्म्यसिद्धि [सं.] ॰मोचक-वि. कर्ममार्गा- पासून मुक्त करणारें; ऐहिक सुखदुःखापासून सोडविणारें. 'कर्म- दक्षा कर्ममोचका । जयराम कोदंडभंजना ।' [सं.] ॰मोचन- न. कर्ममार्गापासून मुक्तता. ॰योग-पु. १ प्रारब्ध; दैव; यदृच्छा; योगायोग. २ दैवगतीनें घडणारी गोष्ट. -शर. ३ व्यापार; चळवळ किंवा कार्य करण्याचें तत्त्व. -ज्ञाको क १३५. ४ ज्ञान हेंच जरी मोक्षसाधन असलें तरी कर्मशून्य राहणें कधींच शक्य नसल्यामुळें त्यांचें बंधकत्व नाहींसें होण्यास कर्में कधींहि न सोडतां शेवट- पर्यंत तींच निष्कामबुद्धीनें करीत राहण्याचा जो योग तो. -टिसू ४७-४८; याला इंग्रजींत एनर्जीझम असा प्रतिशब्द गीतारह- स्यांत सुचविला आहे. -गीर ३०१ वरील टीप. या योगाचें जें शास्त्र त्यास कर्मयोग म्हणतात व तें आचरणारा तो कर्मयोगी). 'बलवंत (टिळक) कर्मयोगी' -सन्मित्रसमाज मेळा पद्यावली १९२९, पद १. [सं.] ॰लंड-वि. धर्मशास्त्रविहित नित्यनैमित्तिक विधींचें पालन न करणारा; धर्मभ्रष्ट; धर्मविधि व धर्माज्ञेचा धिक्कार करणारा, उपहास करणारा [सं.] ॰लोप-पु. नित्य धार्मिक क्रमां- तील एखादें कर्म सोडणें, न करणें; दीर्घकालपर्यंत नित्य अगर नैमित्तिक कर्मविधि न करणें. [सं.] ॰वाचकधातुसाधित- न. मूळ धातुस 'ला' किंवा 'लेला' हे प्रत्यय लाविले असतां होणारें धातुसाधित. उ॰ केलेला, दिलेला. परंतु यांत 'पढ' धातूचा गण वर्ज्य करून हे प्रत्यय लावितेंसमयीं सकर्मक धातूस 'ई' आगम होतो. उदा॰ ठेविला, अर्पिला, आकर्षिलेला. -मराठी- भाषेचें व्याकरण १७३. [सं.] ॰वाद-पु. १ धर्मविहित कर्मां. नींच मोक्षप्राप्ति होते असें मत. २ मनुष्यास विशिष्ट जन्मांत जें सुखदुःख मिळतें तें त्याच्या पूर्व जन्मांतील कृत्यांचें फल होय असा युक्तिवाद; कर्माचें फळ भोगणें ही कल्पना. -ज्ञाको क १३६. [सं.] ॰वादी-पु. कर्मवादावरच भिस्त ठेवून त्याचें समर्थन करणारा माणूस [सं.] ॰वासना-स्त्री. दैनिक धर्मकृत्यांबद्दलची इच्छा, आवड. [सं.] ॰विधि-पु. (अनेकवचनींहि प्रयोग होतो) धर्मसंबंधीं कृत्यें वगैरेचे नियम, पध्दति, रीति, मार्ग; कोणत्याहि विशिष्ट प्रकारच्या धर्मकृत्याचें सूत्र किंवा विधान. [सं.] ॰विपाक-पु. १ पूर्व जन्मीं केलेल्या पुण्य, पाप वगैरे कृत्यांचें फल पुढील जन्मीं हटकून यावयाचें हा सिद्धांत. २ कर्माची फलनिष्पत्ति; परिणाम. [सं.] ॰वीर-पु. कार्यकर्ता; पराक्रमी मनुष्य. 'कर्मवीर निघुनी गेलो' -संग्राम ४९. [सं.] ॰वेग- कर्माचा वेग-पु. दैवाचा किंवा प्रारब्धाचा जोर, झपाटा, सामर्थ्य, धक्का; पूर्वसंचिताचा प्रभाव. 'कलालाचा भोवरा । जैसा भवे गरगरा । कर्मवेगाचा उभारा । जोंवरी ।' 'जेथें कर्माचा वेग सरे । तेथें धांव पुरे ।' [सं.] २ (अनेक वार केलेल्या) कृत्यांचा जोर, सामर्थ्य, प्रचोदन; संवयीचा जोर; स्वाभाविक प्रेरणा; 'कर्मवेग भलत्याकडे ओढून नेईल.' ॰शील-वि. कर्मा- सक्त; धर्मानें वागणारा; शास्त्रानें संगितलेलीं सर्व धर्मकर्में जो मनापासून काळजीपूर्वक करतो तो. [सं.] ॰संगी-वि. कामांत, धर्मानुष्ठानांत, व्रतनियमनांत सतत गढलेला; याच्या विरुद्ध ज्ञानाभ्यासी [सं.] ॰संग्रह-पु. निरनिराळे व्यवसाय, व्यापार; आपण ज्या क्रिया करतों त्या; मानसिक क्रियेच्या तोडाची बाह्य, प्रत्यक्ष क्रिया. 'कर्मसंग्रह या शब्दानें त्याच मानसिक क्रियेच्या तोडीच्या बाह्य क्रिया दाखविल्या जातात.' -गीर ८३६. [सं.] ॰संचय-पु. कर्मसंग्रह; मनुष्याचे अनेकविध व्यापार, क्रिया; चलनवलनादि कृत्य 'तैसेंचि कर्ता करण कार्य । हा कर्मसंचयो ।' -ज्ञा १८.५१२. [सं.] ॰संन्यास-पु. १ कर्मांचा त्याग; नित्य नैमित्तिकादि कर्में करण्याचें सोडून देणें. २ शारीरिक सोडून इतर सर्व कर्मांचा त्याग (शांकरमत). 'शंकराचार्यांच्या ग्रंथांत कर्मसंन्यासच प्रतिपाद्य आहे.' -टिसू ५ [सं.] ॰सूत्र-न. नित्य धर्मकर्माची व त्यासंबंधीं नियमांची मालिका; कर्तव्यकर्म- परंपरा. 'भवपाश तोडिते शस्त्र । ज्ञान ईश्वराचें विचित्र । परि जिवाचें कैसें कर्मसूत्र । जे अनावडी तेथें विषयीं ।' ॰हीन- वि. धार्मिक नियम, विधि न पाळणारा; धार्मिक नियमाबद्दल काळजी न करणारा. [सं.] म्ह॰ कर्मणो गहना गति: = नशि- बाची गति जाणणें शक्य नाहीं (एखादी वाईट गोष्ट अकल्पित घडली म्हणजे दैववादी मनुष्य ही म्हण म्हणतो.)

दाते शब्दकोश

अर्ध

न. १ एका पदार्थाचे जे दोन सम विभाग ते प्रत्येकीं; निम्मा तुकडा, अर्धा भाग. २ (समांसात) अर्धा; निम्मा. उ॰ अर्धकोस, अर्धघटिका इ. [सं.] ०कच्चा वि. १ अर्धामुर्धा पिकलेला, तयार झालेला किंवा शिजलेला (फल, धान्य, विद्या, अन्न); अर्धामुर्धा; अपूर्ण; अपुरा. २ पुरें शेवटास न जातां अर्धवट राहिलेलें (काम). ०कंदरा पु. लगामाचा प्रकार. -अश्वप १८५. [सं. अर्ध + कंधरा ०काची वि. अर्धीकच्ची. 'एक अर्धकाचीं तुरटें ।' -एरुस्व १४. १०६. ०कोर स्री. अर्धा चतकोर; (गो.) नितकोर (भाकर). ०घबाड पु.न. एक शुभ मुहूर्त, परंतु घबाडापेक्षां कमी महत्वाचा. घबाड पहा. ०चंद्र पु. १ वद्य किंवा शुध्द अष्टमीचा चंद्र; अर्धा चंद्र. २ अर्ध चंद्राच्या आकारासारखी वस्तु. ३ (गचांडी देतांना हाताचा आकार अर्धचंद्रासारखा होतो म्हणून;) हकालपट्टी. 'या अष्ट मीच्या चंद्राच्या मुहूर्तावर मलाहि अर्धचंद्र मिळाला.' -मूकनायक. 'आणिक म्हणे भृत्यजना । यासी अर्धचंद्राची द्यावी दक्षिणा । देशाबाहेरी या ब्राम्हणा । घाला वहिले ।।' -कथा ५.११.७१. (हा प्रयोग मूळ संस्कृतांतच आहे.) (क्रि॰ देणें, मारणे, मिळणें, इ०). ४ (नृत्य) हाताचीं चार बोटें एकमेकांस लागून ताठ ठेवणें व आंगठा दूर पसरून ठेवणें. ५ अर्धचंद्राकृति (फाळाचा) बाण. ०चंद्री, तंद्री स्री. अर्धवट झोंप, मूर्च्छा. 'बाण भेदिला जिव्हारीं । निदूरथ पडिला धरणीवरी । डोळां लागली अर्धचंद्री । जेवीं खेचरी योगिया ।' -एरुस्व ९.३२. ०चरतीय, जरतीय-वि. अर्धे किंवा अर्धवट काम; अनिश्चित स्वरूपाचें काम; मोघम किंवा अनिश्चित भाषण. 'येतो म्हण किंवा नाहीं म्हण- उगीच अर्धचरतीय सांगूं नको.' [सं. अर्ध + जरा-जरित किंवा जर्ज- रित; अर्ध + चरित]. ०जेवा वि. अर्धवट जेवलेला; अर्ध्या जेवणांतून उठलेला; अर्धपोटी. [अर्ध + जिम्]. ०देशी कापड न. विदेशी सुताचें, हिंदुस्थानांत विणलेले कापड. ०धणी वि. अर्धतृप्त; अर्ध- पोटीं. 'भलतें करीं परी अर्धधणीं । नुठीं कदा ।' -ज्ञा १६.३०. ०नार स्री. स्रीजातींतील षंढ; षंढा; अर्धवट स्री; स्रीधर्मांपैकीं कांहीं बाबतींत उणीव असलेली स्री. [सं. अर्ध + नारी]. ०नारीनटे- श्वर पु. १ अर्धें आपलें (पुरुषांचे) व अर्धें पार्वतीचें (स्रीचें) असें शंकराचें रूप; अर्धनारीश्वर; शिवशक्ति. मोहिनीराज हें विष्णूचें रूप (यांत अर्धा विष्णु व अर्धी अमृतकलश घेतलेली मोहिनी असें अर्धनारीश्वर स्वरूप असतें. नेवासें येथें असा देव आहे). २ अर्धा पुरुष व अर्धी स्री एकत्र. 'अर्धनारीनटेश्वरी । जो पुरुष तोचि नारी ।' -ज्ञा ९.२७०; -एभा ११.३६९. ३ प्रकृतिपुरुष; शिव- शक्ति. 'प्रकृतिपुरुष शिवशक्ति । अर्धनारीनटेश्वर म्हणती ।' -दा २०.३.१०. ०नारीश्वर अर्धनारीनटेश्वर पहा. ०निकुट्टक (अंगहार) -पु. (नृत्य) उजवा पाय नूपुर करून मग तीचारी सोडून भराभर आक्षिप्तचारी त्याच पायानें करणें. नंतर दोन्ही हात फेंकून त्रिक वळविणें व शेवटीं निकुट्टक व कटिचिन्ह हीं करणें. ०निकुट्टित (करण)-न. (नृत्य) खांदा आकुंचित करून त्यावर त्या बाजूचा हात ठेवून बोटें हळु हळु ठोकणें व दुसरा हात आपल्या तोंडासमोर बोटें करुनं ठेवणे. उजवा पाय कुट्टित करणें व डावा पाय स्तब्ध ठेवणें. ०पड-डा वि. अर्धवट पडलेलें-केलेलें-बजा-वलेलें-म्हटलेले; अपुरें साधलेलें, बजावलेले; वरकरणीपणानें केलेलें. (सामा.) अपुरें; वरवर; सरासरी. [अर्ध + पडणें]. ०पद्मासन न. डाव्या पायाची मांडी मोडून बसणें व उजवा पाय मोडून डाव्या पायावर ठेवणें. ०पक्षकीटक पु. (प्राणी.) एक कीटक- वर्ग. यांतील किड्यांचे पुढील अर्धे पंख शृंगी द्रव्यानें कठिण झालेले असतात म्हणून यास हें नांव आहे. -प्राणिमो १०३. ०पिका वि. अर्धवट पिकलेला (फळ वगैरे). [अर्ध + पिकणें]. ०पुडी-वि. अर्धवट; अल्पायुषी (अर्धें झोपेंत जातें म्हणून). 'थोडें जिणें अर्धपुडी काया । गर्व करिती रडाया ।' -दा १८.५.३५. [सं. अर्ध + पुट ?]. ०पोटीं-क्रिवि. अर्धेंच पोट भरलें असतां; पूर्ण न जेवतां; भूक पुरी न भागतां. (क्रि॰ जेवणें, जाणें, असणें, उठणें, राहणें). ०फोड अर्धवट फोडलेलीं लांकडें; ठोकळे. (बुरूड) बांबू उभा चिरून केलेले दोन भाग. ०बाट-गा वि. १ अर्धवट संस्कार झालेला (वाटण्याचा-कुटण्याचा-शिजण्याचा इ०); अर्धवट बन- विलेला; अर्धबोबडा. २ अर्धवट भ्रष्ट झालेला, बाटलेला; जातींतून अर्धवट बाहेर पडलेला; वाळींत टाकलेला. ३ ज्याचा बाप एका जातीचा व आई दुसर्‍या जातीची आहे असा. ४ अर्धवट किंवा वरवर ज्याला माहिती-परिचय आहे असा. ५ (ल.) अर्धवट शिकलेला (विद्यार्थी, कारागीर, पंडित इ०). कडेचा पोहणारा; अतज्ज्ञ. -क्रिवि. अर्धेंमुर्धें करून; अपुरेपणानें; उणेंपणानें. [अर्ध + भ्रष्ट = बाट]. ०बाटे पाऊण मराठे न. १ संकर; पंचमिसळ; खिचडी; धेडगुजरी (भाषा, काम, पदार्थ); बारभाई; बजबजपुरी. २ (ल.) उचछृंखलपणाची वागणूक-आचार. ०बिंब न. १ अर्ध वर्तुळ आणि त्यावरील टिंब. २ (ल.) ओंकाराची-प्रणवाची अर्ध मात्रा. 'जंव मात्रात्रय मावळे । अर्धबिंबीं । '-ज्ञा ८.११५. ०बुकट-बुकुट वि. (राजापुरी) अर्धवट पहा. [अर्ध + बुकटी]. ०बोबडा वि. १ अर्धवट कुटलेलें-चेललेलें-वाटलेलें (मिरे वगैरे). २ शिजतांना अर्धवट राहिलेला-(भात-डाळ इ॰ पदार्थ); मऊ न झालेला, बोटचेपा. ३ (ल.) कसें तरी ओबडधोबडपणें केलेलें काम; बिगारी-वेठ काम. ०भरपोशाख पु. भर पोशाखांतील फक्त्त कांहीं विशिष्ट वस्तुयुक्त मामुली पोशाख. -बडोदें खानगी खातें नियम नोकर पोशाख पा. ३. ०मत्तल्लि(करण) न. (नृत्य) पाय अडखळल्यासारखें करून मागें टाकणें, डावा हात रेचित करणें व उजवा हात कमरेवर ठेवणें. ०मत्स्येंद्रासन न. योगासनांतील एक प्रकार. -संपूर्ण योगाशास्र पा. ३२५. ०मागधी स्री. एक प्राकृत भाषा. जैन धार्मिक ग्रंथ या भाषेंत लिहिले आहेत. हिलाच भारतीय वैय्याकरण आर्षभाषा म्हणत. शौरसेनी व मागधी भाषा प्रदेशांच्यामध्यें अर्धमागधीभाषाप्रदेश होता (म्हणजे हल्लींचा प्रदेश अयोध्या). त्याच्या दक्षिणेकडील मराठी भाषा कांहीं अंशीं या भाषेवरून बनली आहे. प्रचारकाल ख्रि. पू. ४ थ्या शतकाचा शेवट -ज्ञाको अ ४७५. ०मांडणी स्री. अर्धी मांडणी पहा. ०मात्रा स्री. १ ओंकारांतील अर्धीं मात्रा. 'अर्धमात्रापर तें न सांपडे ।' -परमा २.१३. २ एका वेळीं घ्यावयाच्या औषधाच्या प्रमा- णाच्या अर्ध्या इतकें. 'अर्धमात्रा रस देऊनिया जीव । रोग दूरी सर्व करिताती ।' -ब २२२.१; ३ (ल.) औषध; रसायनगुटिका. 'पंचगव्य तेंचि जाण अर्धमात्रा । -ब १०४.५. ४ किंचित्; थोडें. 'हे कृष्णकथा अलौकिक । महादोषासी दाहक । भवरोगासी छेदक । अर्धमात्रा सेविलिया ।' -एरुस्व १८.७५. ५ व्यंजन; अर्धस्वर. ६ संगीतांत स्वर घेतांना घेतलेली विश्रांति; एका मात्रेचा अर्धा काल. ०मुकुल(दृष्टी) स्री. (नृत्य) अर्धवट डोळा उघडणें; पापण्यांचे केंस एकमेकांस लागतील इतके जवळ आणणें. आल्हादकारक सुगंध, सुखस्पर्श ह्या गोष्टी हा अभिनय दर्शवितो. [सं. मुकुल = किंचित् उमललेली कळी]. ०मेला वि. १ अर्धवट मेलेला; थोडासा जिवंत राहिलेला. २ जर्जर; मृतप्राय; व्याकुळ. 'ती भुकेने अर्धमेली झाली आहे.' -पाव्ह २३. ०रथी वि. (रथांत बसून) एका रथ्यासह- वर्तमानहि युद्ध करतां येत नाहीं. तो; रथीहून अल्पवळी. (ल.) कच्चा योद्धा. 'अतिरथ नव्हे रथ नव्हे हा (कर्ण) केवळ अर्धरथचि अविदग्ध ।' -मोउद्योग १२.५८. [सं.]. ०रात्र स्री. मध्यरात्र. ०रेचित(करण) न. (नृत्य) उजवा हात तोंडासमोर नेऊन डोक्या- वर उचलून धरणें व उजव्या पायाकडील भाग किंचित वांकवून तो सूची करून जमिनीवर हळु हळु आपटणें. [सं.] ०रेचित(संयुक्त हस्त)-पु. (नृत्य) डावा हात चतुर व उजवा हात रेचित करणें. [सं.] ०लंड-मर्धलंड-पु. अधलंड, अधलंडमधलंड पहा. ०वट क्रिवि. १ अर्धेंपणानें; अपुरेपणानें; उणीव असलेल्या रीतीनें; वरवर; वरकरणीः मोघमपणें. 'काम पुरतें करावें, अर्ध- वट ठेवूं नये.' [सं. अर्ध + वत्] २ अर्ध्यांत; मध्यभागी; दोन्ही टोंकाच्या मध्यें.-वि. १ अधलामधला; अपुरा; २ (ल.) वेडा; अप्रबुद्ध; कमी समजूत असलेला. 'हा पुरता वेडा नव्हे पुरता शाहणा नव्हे, अर्धवट आहे.' ३ अर्धें वय झालेला; तरणा नव्हे. 'आम्ही म्हैस घेतली ती तरणी नाहीं, अर्धवट आहे.' ०वर्तुल-ळ-न. (गणित.) अर्धें वर्तुळ; वर्तुळाचा निम्मा भाग; व्यास आणि त्यानें कापलेला परिघाचा भाग यांच्यामध्यें जो वर्तु- लाचा भाग सांपडतो तो. -महमा ६. (इं.) सेमि-सर्कल. -विराम- पु. १ अर्धीं विश्रांति; पूर्ण विरामापेक्षां कमी थांबण्याची जागा. २ ती दर्शविण्याचें चिन्ह. ०वेडा वि. वेसडर; मुर्ख; अर्धवट. ०शिजा वि. अर्धवट शिजलेला; पुरता न शिजलेला (भात वगैरे) ०शिशी स्री. अर्धें कपाळ दुखण्याचा रोग; यानें अर्ध्या मस्तकाकडील मानेचा भाग, भुंवई, आंख, कान, डोळा व अर्धें कपाळ-या ठिकाणीं तर- वारीच्या आघातासारखें दुःख होतें. यावर गोकर्णाचें मूळ व फळ पाण्यांत वांटून त्याचें नस्य करावें अथवा मूळ कानांत बांधावें. [सं. अर्ध + शीर्ष] ०सम(वृत्त)-न. ज्यांत दोन दोन उ॰ पहिला आणि तिसरा व दुसरा आणि चौथा हे चरण सारखे असतात तें वृत्त. उ० पुष्पिताग्रा; हरिणीप्लुता; वियोगिनी, अपरवक्त्रा. [सं.] ०सूची (करण)-न. (नृत्य) उजवा पाय सूची करून उजवा हात उपपद्म करणें व डोक्याच्या वरच्या बाजूस नेऊन ठेवणें. ०स्थित(स्वर)-पु. (संगीत) द्व्यर्ध आणि द्विगुण या स्वरांमधील म्हणजे पांचवा, सहावा व सातवा हे स्वर. ०स्वस्तिक(करण)-(नृत्य) पु. पाय स्वस्तिक ठेवून उजवा हात कमरेवर व डावा हात वक्षःस्थलावर ठेवणें. ०स्वर-पु. य्, व्, र्, ल्, हीं व्यंजनें स्वरांबद्दल योजितात म्हणून त्यांस अर्धस्वर किंवा अंतःस्थ वर्ण म्हणतात. ०हार-पु. बारा किंवा चौसष्ट सरांचा हार; एक दागिना.

दाते शब्दकोश

दंड

पु. १ काठी; सोटा; छडी; सोडगा; दंडा. २ मार; शिक्षा (शारीरिक). ३ शिक्षा म्हणून घेतलेला पैसा; याचे राजदंड, ब्रह्मदंड जातिदंड असे तीन प्रकार आहेत. सरकारी न्यायपद्धतीनें गुन्हा शाबीत झाला म्हणजे शिक्षेदाखल सर कारांत भरावयास पैसा. ४ खांद्यापासून कोंपरापर्यंतचा हात. ५ केलेल्या, पाडलेल्या भागांच्या खुणांकरितां शेतांत किंवा बागांत घातलेला मातीचा उंचवटा; बांध; गडगा; पाणी जाण्यासाठीं दोहों बाजूंस उंचवटा करून पाडलेली सरी, पाट; (बे.) नदीकिनारा; कांठ; (वस्त्राचे) दोन तुकडे जोडण्याकरितां घात- लेली शिवण. (क्रि॰ घालणें). [प्रा. दंडी = जुन्या वस्त्राचा सांधा] ६ लांबी मोजण्याचें परिमाण, चार हातांची काठी. २००० दंड म्हणजे एक कोस. ७ वेळेचें परिमाण, चोवीस मिनिटें. ८ पैलवानांच्या व्यायामाचा एक प्रकार; जोर. 'आनंत्या नित्यनेम उठतो दंड सवाशें काढितो ।' -ऐपो ६७. (यावरून) एखादें कठिण काम अथवा प्रचंड उद्योग. (क्रि॰ काढणें; पेलणें). ९ क्रमानें उतार असलेली किंवा निमुळती पण लांबट टेंकडी, सोंड (पर्वताची). १० डोंग- राच्या माथ्यापासून पायथ्यापर्यंत असलेला उतार, ओघळ, अरुंद वाट; दंडवाट. ११ पर्वताच्या रांगेची एक लहान शाखा; डोंग- राच्या माथ्यापासून तों पायथ्यापर्यंत वांकडीतिकडी गेलेली खड- कांची ओळ. १२ (कवाईत वगैरे प्रसंगीं केलेला) सैन्याच्या रचनेचा एक प्रकार; रांग; फरा; व्यूह. 'तया दंडीं क्षोभलें । लोकत्रय ।' -ज्ञा १.१६५. १३ ताठ उभें राहण्याची अवस्था. १४ जिंकणें, ताब्यांत, कह्यांत आणणें. १५ अपराधाबद्दल शिक्षा म्हणून घेतलेलें द्रव्य, पैसा; जातींत परत घेण्यासाठीं दिलेलें प्रायश्चित्त. १६ रताळीं, ऊस इ॰ लाव- ण्याकरितां मातीचा केलेला लांबट उंचवटा, वरंबा. १७ तडाका. 'निंदा निस्तेज दंडी । कामलोभावर पडी ।' -ज्ञा १३.४९४. १८ हिंसा. 'ऐसा मनें देहें वाचा । सर्व संन्यासु दंडाचा ।' -ज्ञा १३.३१०. १९ पाठीचा कणा. 'माजी उभारलेनि दंडे । शिरकमल होय गाढें ।' -ज्ञा ६.२०२. [सं.] (वाप्र.) आवळणें, बांधणें, दंडाला काढण्या लावणें-चतुर्भुज करणें; कैद करणें. ॰थोपटणें-१ कुस्ती खेळण्यापूर्वीं दंड ठोकणें; कुस्तीस सिद्ध होणें. २ (ल.) साहसानें अथवा कोणासहि न जुमानतां एखादें कार्य करण्यास उभें राहणें. ॰थोपटून उभें राहणें-(ल.) वाग्युद्धास तयार होणें. ॰दरदरून फुगणें-आपल्याशीं कुस्तीला योग्य असा गडी पाहिला म्हणजे पहिलवानाचे दंड स्फुरण पावून फुगणें. ॰फुर- फुरणें-मारामारीची, कुस्तीची वगैरे उत्कट इच्छा होऊन दंड स्फुरण पावणें. भरणें-तालीम वगैरेमुळें दंड बळकट व जाड होणें. ॰भरणें-शिक्षेदाखल पैसा देणें. दंडास दंड लावून- घांसून-क्रिवि. बरोबरीच्या नात्यानें; सारख्या सन्मानानें. दंडाला माती लावणें-कुस्तीला तयार होणें (कुस्तीपूर्वी दंडास माती लावतात). दंडपासून साधित शब्द- दंडादंडी-स्त्री. मारामारी; काठ्यांची झोडपाझोडपी; कुस्ती; झोंबी. [दंड] दंडायमान-वि. १ (अखंडित काठीप्रमाणें) निर्मर्याद; अपार (वेळ, काळ). २ मध्यें पडलेला; आडवा पडलेला, पसरलेला. [सं.] दंडारणा-पु. सोटा; सोडगा; बडगा. -वि. जाड; स्थूल; घन (वस्तु); बळकट; मजबूत; जाड (मनुष्य, पशु). दंडारा-ळा-वि. (शिवण) ज्यास दंड घातला आहे असें; मध्यें शिवण असणारें (वस्त्र, कपडा). [दंड] दंडावणें-अक्रि. थंडीनें अथवा अवघड श्रमानें ताठणें (शरीर, अवयव). [दंड] दंडासन-न. आळसानें (जमीनीवर) पाय ताणून पसरणें, निजणें; सरळ हात- पाय पसरून आळसानें पडणें. (क्रि॰ घालणें). [सं. दंड + आसन] दंडार्ह-वि. दंड्य; दंड करण्यास योग्य. [सं.] दंडित-वि. १ शिक्षा केलेला. दंड केलेला. २ (ल.) निग्रह केलेला; वश केलेला; मारलेला; ताब्यांत आणलेला. [सं.] दंडिता-वि. १ शिक्षा करणारा; मारणारा; शिक्षा करितो तो. [सं.] दंडिया-पु. १ बारा ते पंधरा हात लांबीचें धोतर, लुगडें. २ बाजाराचा बंदो- बस्त करणारा छोटा अधिकारी; पोलीस मुकादम. [हिं.] दंडी- पु. १ दंड धारण करणारा; संन्याशी. २ द्वारपाल. ३ -स्त्री. अर्ध्या दंडापर्यंत बाह्या असणारी चोळी. [सं.] -वि. १ दंड धारण करणारा. २ दंड म्हणजे उभी जाड शिवण असलेला (कपडा). दंडी-स्त्री. मेण्यासारखें, चार माणसांनीं उचलावयाचें टोपलीचें वाहन. डोंगर चढतांना हींत मनुष्य बसतो व हमाल ही खांद्यावर वाहतात. [हि.] दंडुका-पुस्त्री. (काव्य) हाताचा पुढचा भाग. -मोको. दंडुका, दंडुकणें, दं(दां)डूक, दंडोका-पुन. सोटा; बडगा; दांडकें; काठी; लांकडाचा लहानसा जाड तुकडा; शिपायाच्या हातांतील सोटा. [सं. दंड] दंडुकेशाही-स्त्री. मारहाण किंवा जुलूम करून अंमलगाज विण्याची पध्दति; पाशवी बल; दांडगाई. 'पोलिसांची दंडुकेशाही अलीकडे फारच बोकाळली आहे.' -केसरी १६-४-३०. दंडुक्या- वि. काठीनें मार देण्यास संवकलेला; दांडगा; जबरदस्त. दंडेरा- वि. दंडारा पहा. दंडेल-ली-वि. दांडगा; अरेराव; अडदांड; झोंड; मुख्यत्वें, जो कर्ज परत फेडण्यास नाकबूल असतो तो; दंडुक्या (मनुष्य). दंडेली-स्त्री. अरेरावीची वर्तणूक; दंडेलपणा; दांडगाई; जबरदस्ती; अन्याय; सामर्थ्याचा दुरुपयोग (मुख्यत्वें देणें न देण्यासंबंधीं). दंड्य-वि. १ शिक्षा करण्यास योग्य. २ दंड करण्यास योग्य. [सं.] दंड्याप्रमाणें-क्रिवि. शिरस्त्याप्रमाणें. सामाशब्द- ॰थडक-स्त्री. खांद्याच्या बाहेरच्या भागानें केलेला आघात. [सं. दंड + थडक] ॰दास-पु. दंडाबद्दल गुलाम होऊन राहिलेला मनुष्य. [सं.] ॰धारी-पु. यम. 'नुपेक्षी कदां कोपल्या दंडधारी ।' -राम २७. -वि. १ हातांत काठी असलेला. २ (ल.) संन्यासी. ॰नायक-पु. कोतवाल; पोलिसांचा अधिकारी. 'सवे सारीतु पातीनिलें । दंडनायका पाशीं ।' -शिशु ५०४. ॰नीति- स्त्री. १ नीतिशस्त्र; नीति; संसारांतील वर्तुणुकीचे आणि व्यवहाराचे कायदे, नियम. यालाच दंडनीति, अर्थशास्त्र, व्यवहारशास्त्र, दृष्टार्थ- शास्त्र, हे जवळजवळ पर्यायशब्द आहेत. २ (कायदा) शिक्षा करून दाबांत ठेवण्याचें शास्त्र. हें राजनीतीच्या चार भागांपैकी चवथें होय. ३ अर्थशास्त्र, आन्वीक्षिकी पहा. [सं.] ॰पत्र-न. न्यायांत खोटा ठरला म्हणजे त्यापासून दंड घेण्याचें पत्र. [सं.] ॰पक्ष (करण)-न. (नृत्य) पाय ऊर्ध्वजानु करणें व त्यावर उजवा हात लताख्य करीत राहणें. [सं.] ॰संयुतहस्त-पु. (नृत्य) हात हंसपक्ष करून बाहू पसरून एका हातानें दुसर्‍या हातास एकदां कनिष्ठिकेपासून आरंभ करून आंतील बाजूनें बाहेरच्या बाजूस विळखा घालणें; नंतर कनिष्ठिकेपासूनच पण बाहेरील बाजूनें प्रारंभ करून आंतील बाजूस विळखा घालणें. [सं.] ॰पाणी-पु. शिव; यम. -वि. ज्याच्या हातांत दंड आहे असा; धट्टाकट्टा व दांडगा; गलेलठ्ठ व झोंड; आडदांड. [सं.] ॰पाद-(आकाशी, चारी)- वि. (नृत्य) नूपुरपाय पुढें पसरून क्षिप्त करणें म्हणजे कुंचित पाय उचलून दुसर्‍या पायाच्या बाहेरील बाजूस पोटर्‍यांचें स्वस्तिक होईल अशा प्रकारें टांचेच्या भारावर टेकणें व मग तें स्वस्तिकां- तील पाऊल उचलून पसरणें व खालीं टाकतांना अंचित करून दुसर्‍या पायांत अडकविणें. [सं.] ॰पारुष्य-न. १ कडक, कठोर शिक्षा. २ काठीनें हल्ला करणें; छड्या मारणें; ठोंसे देणें; मारणें (हात, पाय, शास्त्र इ॰ कांनीं). ३ (कायदा) हल्ला; भय प्रदर्शक रीतीनें हात किंवा काठी उगारणें, मारणें. [सं.] ॰पूपिकान्याय-पु. (उंदरानें काठी नेली त्या अर्थीं तिला बांधलेली पोळी खाल्ली हें उघडच होय यावरून) कार्यकारण, अंगउपांग, प्रधानअप्रधान यांचा न्याय; ओघाओघानेंच प्राप्त झालेली गोष्ट. उदा॰ राजाचा जय झाल्यानंतर त्याच्या सेनेचा जय अर्थांतच दंडपूपिकान्यायानें होतो. [सं. दंड = काठी + पूपिका = पोळी + न्याय] ॰प्रणाम-पु. साष्टांग नमस्कार;;लोटांगण. 'दंड प्रणाम करोनिया ।' -गुच ९.९. ॰प्राय-वि. दंडासारखा; साष्टांग (नमस्कार). 'करी दंडप्राय नमन ।' -गुच ४१.१४. ॰फुगडी- स्त्री. (मुलींचा खेळ) परस्परांच्या दंडांना (किंवा खांद्यांना) धरून उभ्यानें फुगडी खेळण्याचा एक प्रकार. [दंड + फुगडी] फुगई- फु(पु)रोई-स्त्री. १ दंडासाठीं केलेली जप्ती; दंड. २ (अधि- कार्‍यानें) बेकायदेशीर बसविलेला दंड; बेकायदेशीर दंड बसविणें. (क्रि॰ घेणें; देणें; भरणें). ॰वळी, कोपरवळी-स्त्री. (व.) (दंडावरची) वांक; स्त्रियांचा एक अलंकार. [दंड + वेली] ॰वाट-स्त्री. १ (उजाड, भयाण असा) लांबच लांब रस्ता; जवळपास गांव, वस्ती नाहीं असा रस्ता. २ टेकड्यांच्या कडेनें गेलेली अरुंद पायवाट. ३ एकमेकास मिळणारे रस्ते. ॰वान्- वि. काठी, दंड, वेत्र इ॰ हातांत घेणार. [सं.] ॰विकल्प- पु. शिक्षेची अदलाबदल; शिक्षा कमी द्यावी कीं अधिक द्यावी याविषयीं विचारणा. [सं.] ॰सरी-स्त्री. (बागेमध्यें) पाणी जाण्याकरितां खणलेला लहानसा पाट, चर, खाचण; तसर्‍यांच्या बाजूचा पाट. [दंड + सरी] ॰स्नान-न. घाई घाईनें केलेलें अर्धवट स्नान; नद्यादिकांच्या ठिकाणीं अंग न चोळतां केकळ दंड मात्र भिजतील अशा प्रकारचें केलेलें स्नान; काकस्नान; पाण्यांत एक बुचकळी मारून केलेलें स्नान. [सं.]

दाते शब्दकोश

वाट

स्त्री. १ रस्ता; मार्ग. 'कीं भीष्में धरिली ती वरिलीच तुझ्याहि वाट लेकांहीं ।' -मोभीष्म १.२८. २ (ल.) वर्तनक्रम; पद्धती; परिपाठ; तऱ्हा; प्रकार; रीत. 'पहिली जी नीट वाट वाहो ती ।' -मोआश्रम १.९. ३ (ल.) उपाय. 'मग पोट भराया काढिली वाट ।' -दावि ८१. ४ (ल.) परिणाम; गति; निकाल. 'माझ्या फिर्यादीची वाट काय झाली कोण जाणें.' ५ बेंबीच्या खालीं पोटांत वाटीच्या आकाराचा जो उंचवटा येतो तो (ही सरली म्हणजे पोट दुखूं लागतें). [सं. वाट, पथिवस्तु निवाटःस्यात् । -त्रिकडांशेष. वर्त्मन्; प्रा. वठ्ठ; हिं. वाट] (वाप्र.) ॰करणें-क्रि. १ मार्ग करून देणें. २ (ल.) वर्तनक्रम ठरविणें; मार्गं दाखवून देणें; व्यवस्था, मांडणी वगैरे करणें. ३ नाहींसा करणें; दूर करणें. 'तेव्हेळीं शिशुपाळाचें राऊत । पारकेयांवरी वाट करितु ।' -शिशु ९६४. ॰घडणें-परिणाम होणें; गति होणें; मार्ग निघणें. 'अद्वैतशास्त्र नावडे यासी । पुढें वाट घडेल कैसी ।' ॰चुकणें-आकस्मिक भेटणें; अनेक दिवसांनीं घरीं आलेल्यास म्हणतात. 'आज फारा दिवसांनीं वाट चुकला.' -मोर १३. ॰धरणें-१ मार्ग अडविणें, रोखून धरणें. 'एवढ्या रानामध्यें जाण । वाट धरून बैससी कोण ।' -रावि. २ मार्गप्रतीक्षा करणें; वाट पहाणें. ॰पाडणें-वाटेंत चोरी करणें; लुटणें; दरोडा घालणें. 'किरातसंगे वाट पाडित ।' -रावि. १.१०५. ॰पाहणें-मार्गप्रतिक्षा करणें; खोळंबून राहणें; वाटेकडे डोळे लावून बसणें. ॰मारणें- मार्गांत गांठून लुटणें; वाटेंत दरोडा घालणें. ॰लागणें-निकाल लागणें; उरकणें; संपणें; खलास होणें; विल्हेस लागणें; दूर होणें; नष्ट होणें. ॰लावणें-१ निकालांत काढणें; विल्हेवाट करणें. २ खाऊन टाकणें; संपविणे. ३ मोडून तोडून टाकणें; नाश करणें; ४ मार्गांतून दूर करणें; हांकलून देणें. ॰वावारणें-१ निरर्थक खेप घालणें; व्यर्थ हेलपाटा घालणें. ॰वाहणें-रहदारी असणें; चालू असणें; वाटसरू, प्रवासी वगैरेनीं गजबजलेला असणें; वापर असणें. 'तुका म्हणे वाहे वाट । वैकुंठींची घडघडाट ।' ॰वाहती करणें- वाट मोकळी करणें; घालवून देणें; वाटेस लांवणें. 'मग जाणतया जें विरू । तयाची वाट वाहती करू ।' -ज्ञा १६.५७. ॰सरणें- आंत्रमार्ग निरुद्ध होणें. 'या धक्क्यानें क्षुधामांद्य होणार बहुधा वाट सतली असेल.' -मौनयौवना. ॰सुधारणें-पळणें; चालतें होणें; पाय काढणें. 'आपली वाट सुधार कसा.' -तोबं १७. ॰होणें-परिणाम, गति होणें; निकाल लागणें. चार वाटा- करणें-उधळणें; दूर दूर करणें; विखुरणें; पळविणें; घालविणें. चारहि वाटा मोकळ्या, बारा वाटा मोकळ्या-पूर्ण स्वातंत्र्य; सर्व जग फिरावयास मोकळें असणें; स्वैरस्थिति; अनि- र्बंध गति. तिवाटांची माती येत नाहीं समजत नाहीं- पूर्ण अज्ञान; कांहीं न समजणें. देखली वाट पाहणें-करणें- गेल्या मार्गानें परत येणें. मधल्या वाटेस-दोहोंच्या मध्यें; दोहों मार्गांपैकीं केणताहि न पतकरतां, कोणाचाहि फायदा न घेतां (क्रि॰ येणें; जाणें; नेणें; आणणें). वांकडी वाट करणें-आड- वळणास जाणें; मुद्दाम मार्ग सोडून जाणें; वळसा घेणें. वाटा घेणें-क्रि. लुटणें; लुबाडणें. 'तुजकारणें चोर घेती वाटा । तूं झुंजविली वीरा सुभटा ।' -कालिका १४.६६. वाटा लावणें- वाटेस लावणें पहा. 'लाटून वाटा लोविलें । विचारें अविचारासी ।' -दा ५.९.४८. 'बळें लावितो लोभ दाटूनि वाटा ।' -दावि ३६४. वाटेग लावणें-(गो.) रस्ता धरणें. 'हांगा बसूं नाका वाटेग लागा.' वाटेचा पाय-वाटेचें पाऊल आड वाटेस पडणें- कुमार्गास लागणें; चुकी होणें. वाटे जाणें-खोडी करणें; कुचेष्टा करणें. वाटे-वाटेस लावणें-१ मार्गास लावणें; रास्त मार्ग, दाखविणें. २ निरोप देणें; पाठवणी करणें; रवानगी करणें. ३ हांकून देणें; घालविणें. वाटेवर आणणें-ताळ्यावर आणणें; सुधारणें; योग्य मार्गावर आणणें. 'गंगे जा वायेवरि आण, अभय द्यावया न हा भागे ।' -मोउद्योग १३.५६. वाटेवर पडणें-सहज प्राप्य असणें; सुलभ असणें; सुसाध्य असणें. 'माझी मुलगी वाटेवर पडली आहे ' -भाव १२. वाटेवर येणें-शुद्धीवर येणें; योग्य मार्गास लागणें; ताळ्यावर येणें; व्यवस्थित वागूं, बोलूं, करूं लागणें; वर्तनक्रम सुधारणें. वाटेस जाणें-खोडी करणें; कुरा- पत काढणें; त्रास देणें. वाटेस लागणें-१ चालू होणें; योग्य मार्गानें जाणें. २ नाहींसें होणें; संपणें. वाटेस लावणें-१ योग्य मार्गास लावणें. 'सर्वत्र धर्म रक्षक राजे आहेत लाविती वाटे ।' -मोकर्ण २९.४६. २ निरोप देणें; पाठवणी करणें; हांकून लावणें. सामाशब्द- ॰करी-काढू-काढ्या-पु. वाटाड्या; रस्ता दाख- विणारा; मार्गदर्शक. ॰खर्च-खचीं-पुस्त्री. प्रवासांत खर्चावया- करितां लागणारा पैसा; प्रवासखर्च. 'जरी हा वाटखर्चीस पीठ देतां ।' -कचेसुच ५. ॰घेणा-पु. वाटमाऱ्या; लुटारू. 'वाटघेणा वाल्हा कोळी । अजामेळा पडतां जळीं ।' -निगा १२७. ॰चा चोर-पोर-पु. कोणीहि अनोळखी मनुष्य; उडाणटप्पु; भटक्या. ॰चा वाटसरू-पु. अनोळखी प्रवासी; कोणताहि संबंध नस- लेला मनुष्य; कोणीहि प्रवासी; पांथस्थ; वाटेनें जाणारा-येणारा. ॰चाल-स्त्री. प्रवास. ॰चालन-न. (कातकरी) लग्नाच्या दुसऱ्या दिवशीं वधूस वरगृहीं नेतात त्यावेळीं वाटेंत देण्यांत येणारी दारू. -बदलापूर ११९. ॰तीट-स्त्री. आक्रमावयाच्या मार्गांतील अड- चणी, संकटें वगैरेस उद्देशून म्हणतात; रस्ते व त्यांतील संभाव्य विघ्नें इ॰ 'वाटेतिटेनें संभाळून जा.' ॰पाडी-स्त्री. दरोडा. -गुजा. [वाट द्वि] पाडिया-पाडो-डू-ड्या-पु. वाटमाऱ्या; लुटारू; चोर; दरवडेखोर. 'म्हणे आजि वाटपाडिया । कैशी दया उपजली ।' -दे कृष्णजन्म १९. 'वाटपाड्यासी कैसी भाया ।' -ह २.१९१. ॰भेट-स्त्री. रस्त्यांत पडलेली गांठ; आकस्मिक भेट. ॰माणूस-पु. सामान्य मनुष्य; कोणत्याहि दर्जाची व्यक्ति; रस्त्यावरील मनुष्य. -नवाकाळ १६.८.२७. ॰मार-स्त्री. १ रस्तालूट; रस्त्यावरील हल्ला. २ रस्त्यावर मित्रत्वानें थांबविणें, अडविणें. ३ (बुद्धिबळ) प्यादें दोन घरें जात असतां मध्येंच एक घर आल्यासारखें धरून मारणें. ॰मारू-माऱ्या-पु. ठग; लुटारू; रस्तेलूट करणारा. ॰मार्ग-पु. रस्ता; मार्ग; रीत; पद्धति; सामान्य नियम; साधारण व्यवहार, क्रम इत्यादि वाचक सामान्य शब्द- प्रयोग. वाट पहा. ॰मार्ग करणें-घालणें-दाखविणें- पाडणें-शिकवणें-सांगणें-सामान्यतः दिशा दाखविणें, सांगणें; उपदेश करणें; सल्ला देणें. ॰मार्गीं-पु. प्रवासी; पांथस्थ. ॰वाटमार्गीं लागणें-१ योग्य दिशेनें जाणें; मार्गावर येणें. २ मृत्यूपंथास लागणें. ॰वाटमार्गी लावणें-१ योग्य दिशा दाख- विणें; मार्ग दाखविणें. २ निरोप देणें; पाठवणी करणें; वाटेस लावणें. ॰वणी-न. १ वाटेंतील पाणी; गटारांतील, रस्त्यांत वाहणारें पाणी. 'नाहीं आड ना विहीरवणी । घाला वाटेचें वाटवणी । विनोद मेहुणीं मांडीला ।' -एरुस्व १२.१४८. २ (सांकेतिक- स्त्रियांमध्यें रूढ) मूत्र. ॰वधा-पु. वाटमाऱ्या. 'किंबहुना ते चुकले । वाटवधेया ।' -ज्ञा ७.१७४.१३.५४७. ॰वधें-न. वाट- मार; वाटमाऱ्या धंदा; वाटेंतील अडथळा, विघ्न. 'तया इंद्रादि पदें । करिताति वाटवधें ।' -ज्ञा १२.६१. ॰शेक-क्रिवि. रस्त्याचे बाजूनें; दुतर्फा; वाटेनें. ॰सखा-पु. प्रवासांतील सोबती. ॰सर- सरू-सारू-सुरू-पु. प्रवासी; पांथस्त; मुशाफरी; रस्त्यानें जाणारा. वाटाडी-ड्या-पु. रस्ता दाखविणारा; मार्गगर्शक. वाटेकरू-पु. वाटाड्या. 'किंभक्तीचा वाटेकरू । ज्ञानाचा निडारू ।' -भाए २५२. वाटेचा चोर-वाटेचा वाटसरू-पु. कोणीहि जाणारायेणारा सामान्य मनुष्य. 'वाटेच्या वाटसरूला देखील हें समजेल.' -अस्तंभा ३. वाटेचें सोवळें-न. (बायकी) सोंवळें वस्त्र नेसून मार्गक्रमण केल्यास त्या सोंवळ्यास दोष लागतो या- वरून त्या वस्त्रास म्हणतात. वाटेंतील कांटा-पु. अडथळा; विघ्न. 'फडणविसांनीं आपल्या वाटेंतील वगंभटाचा कांटा नाहींसा केला.' -अस्तंभा ६८.

दाते शब्दकोश

लोक

पु. १ जन; मनुष्य; मानवजात; जनता; समाज. 'तूं मात्र शहाणा, लोक काय वेडे आहेत?' (सामा.) लोक- मर्यादा-रीति-लज्जा इ॰ (बहुधां अनेकवचनी प्रयोग). २ वर्ग; विशिष्ट समाज, संघ; जाता; (या अर्थीं पूर्वशब्दाशीं समास होऊन उपयोग.) उदा॰ ब्राह्मणलोक, शू्द्रलोक, गवईलोक, शिपाईलोक, देवलोक, पिशाचलोक इ॰ ३ राष्ट्र; देश; राज्य; प्रांत. 'प्रौढ होतां संपूर्ण लोक आले खरेच उदयाला ।' -ऐपो ३०४. -एभा १०. ६०४. ४ राजे, सरदार इ॰ कांजवळ किल्ला, शहर इ॰कांचें रक्षण करण्याकरतां ठेवलेलीं माणसें; सैन्य; संत्री; शिपाईनोकर. ५ भुवन; जग; मानवजात; समूह. 'देहक्रिया आवघी । न करविता होय बरवी । जैसा न चलतेनि रवी । लोकु चाले ।' -ज्ञा ८.१८७. ६ परका माणूस; तिऱ्हाईत इसम; अनोळखी मनुष्य. 'आज आपल्याकडे लोक आले आहेत.' ७ मनुष्य; इसम; माणूस. 'जो दाखवील मजला कृष्णार्जुन तो न लोक सामान्य ।' -मोकर्ण २६. १८. ८ जगाचे, विश्वाचे भाग. प्रामुख्यानें तीन लोक आहेत. स्वर्गलोक, मर्त्य किंवा मृत्युलोक, आणि पाताळलोक. पुढील सप्त- लोकहि मानण्यांत येतात. भूलोक, भुवर्लोक, स्वर्लोक, महर्लोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक. ह्यांशिवाय प्रत्येक देवतेचा एकेक लोक कल्पिलेला आहे. उदा॰ इंद्रलोक, चंद्रलोक, ब्रह्मलोक, विष्णु- लोक इ॰ 'जैं लोकांचीये व्यवस्था न पडे । जैं या त्रिभुवनाचें कांहीं न मांडे ।' -ज्ञा १०.९५. ९ सद्गति; स्वर्गलोक; मरणोत्तर चांगली अवस्था. 'मनुवंशीं जन्मुनियां जालों अनपत्य मीं न लोक मला ।' -मोमंत्ररामायण बालकांड २०. १० प्रदेश; ठिकाण. 'अवधड स्थळीं कठीण लोक । तेथें राहणें नेमक ।' -दा १५.२. २४. [सं.] म्ह॰ १ लोकां सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण = लोकांना उपदेश करावयाचा व स्वतः मात्र त्याप्रमाणें वागा- वयांचे नाहीं. २ लोक आणि ओक. = लोकमत हें अतिशय वाईट, तिरस्करणीय, ओकारीप्रमाणें त्याज्य असें जाहे, या अर्थी उपयोग. लोकांचीं घरें (किंवा दारें) पुजणें-सारखें लोकांच्या घरीं जाणें; या घरांतून त्या घरांत असें नेहमीं लोकाकडे जाणें. सामाशब्द- ॰कथा-स्त्री. १ दंतकथा; लोकांत प्रचलित अस- लेली परंतु ऐतिहासिक आधार नसलेली गोष्ट; कल्पित गोष्ट; परंपरागत गोष्ट. २ एक प्रकारचें वाङ्मय. प्राचीन काळापासून लोकांच्या तोंडीं असलेल्या गोष्टी, कहाण्या; लौकिक सारस्वत. (इं) फोकलोअर. ॰गंगा-स्त्री. समाज; लोकसमुदाय. 'जात- गंगेला व लोकगंगेला भ्यालें पाहिजे.' -भाऊ १९. ॰गान-न. ज्ञानपदगीत; खेडवळ लोकांचें गाणें. ॰ग्रह-पु. लोकमत; लोकांची एखाद्या गोष्टीविषयींची समजूत, कल्पना. ॰चर्चा-स्त्री. जनते- मधील चर्चा; गप्पा; लोकांत चर्चिली किंवा बोलली जाणारी गोष्ट. ॰जवाई-पु. (ना.) जांवई. -शर. ॰तंत्र-न. लोकमत; जनतेचा कल; प्रजेचें म्हणणें, प्रवृत्ति. 'सरकारनें लोकतंत्रानेंच राज्यकार- भार हांकावा.' -केसरी २.१२.३०. -वि. लोकनुवर्ती; लोकांना जबाबदार. 'सरकार हें अधिक लोकतंत्र झालें पाहिजें.' -केले १.६४. ॰त्रय-न. तीन लोक; स्वर्ग, मृत्यु व पाताळ. ॰धार- जिणा-वि. १ लोकमताला मानून वागणारा (परंतु स्वतःच्या किंवा धन्याच्या हिताबद्दल निष्काळजी); स्वतःच्यापेक्षां, स्वकी- यांच्यापेक्षां लोकांच्या हिताला जपणारा. २ लोकांची काळजी करणारा; लोकाभिमुख. ॰नाथ-पु. १ एक औषधी रसायन. २ राजा; देव. 'लोकनाथ, जगन्नाथा. प्राणनाथा पुरातना ।' -मारुतिस्तोत्र. ॰नायक-पु. लोकांचा पुढारी. 'लोकनायकाचें कर्तव्य फारच खडतर आहे.' -टि १.४६७. ॰नियुक्त-वि. लोकांनीं नेमलेला, निवडलेला. ॰नीति-स्त्री. लोकरीत; वागण्याची सामान्य पद्धत; समाजास मान्य गोष्ट; प्रघात; चालरीत. ॰नुत-वि. लोकांकडून प्रशंसा केला गेलेला; लोकांनीं स्तविलेला. ॰परी-स्त्री. लोकरीत. 'लोकपरीनें वर्तती जनीं ।' -दावि २६६. ॰पक्ष-पु. लोकांची बाजू; प्रजापक्ष. याच्याविरुद्ध राजपक्ष, सर- कारपक्ष. 'फेरोजशहांनीं आणीबाणीच्या प्रसंगीं लोकपक्ष संभा- ळला.' -टि १.४२२. ॰पाल-ळ-पु. १ राजा; प्रजेचा पालन कर्ता; नृप. 'म्हणवितां स्वतां लोकपाळा !' -विक ४०. २ इंद्र, यम इत्यादि लोकाचा स्वामी; अष्टदिक्पाल पहा. 'इहीं लोकपाळ केले । लोकपाळीं विविध, लोक स्त्रजिले ।' -ज्ञा १०.१०२; -एभा १०.६०३. ॰प्रवाद-पु. बातमी; लोक- वार्ता; वदंता; किंवदंती; जनप्रवाद (सामान्यत: वाईट अर्थानें). 'लोकप्रवाद कायकाय कंड्या पिकवील तें सांगतां येत नाहीं.' -नि ४३४. ॰प्रवाह-पु. सर्वसाधारण चालरीत, वागणूक; लोक- रीत. ॰प्रशस्त-वि. लोकसंमत; लोकमान्य; रुढीला धरुन. अस- लेला. ॰प्रसिद्ध-वि. १ सर्वप्रसिद्ध; लोकांमध्यें अतिशय माहित असलेला; लोकांमध्यें प्रचलित. २ सर्वसाधारण; सामान्य. ॰प्राणेश-पु. (लोकांच्या प्राणांचा भालक, धनि.) वायु; हवा. ॰बंधु-पु. १ लोकांचा भाऊ; लोकहितकर्ता. 'लोकबंधू जो होय रवी ऐसा ।' -नल. २ सूर्य. ॰बाह्य-वि. १ (लोकांच्या सामान्य वागणुकीहून किंवा समजुतीहून निराळा) विचित्र; विलक्षण; चम- त्कारिक. २ लोकांना प्रिय नसणारें; लोकविरुद्ध. ॰बोली-स्त्री. लोकांचें बोलणें; लौकिक बोली. 'गुणा निर्गुणा आणिलें लोक- बोलीं ।' -दावि २६६. ॰भय-भीति-नस्त्री. जनतेची भीति; लोकप्रवादाची भीति; जनलज्जा. ॰भांड-वि. भांडखोर; बडबड्या. -तुगा. ॰भाषा-स्त्री. १ सामान्य जनतेची भाषा, बोली. २ बोलण्यांतील भाषा; वाक्प्रचार. ३ अडाणी भाषाप्रयोग; असं- स्कृत बोली. ॰मत-न. सामान्य जनसमूहाचा अभिप्राय; लोकांचें म्हणणें; त्यांचे विचार. 'ज्या वसाहतींत लोकमतदर्शक कायदे- मंडळें आहेत त्यांस या कायद्यानें आपल्या शासनपद्धर्तीत फेर- फार करवून घेण्याचे अधिकार देतांना हा निर्बंध घालून ठेवला.' -वस्व १३६. ॰मतानुवर्ती-वि. लोकांच्या मताप्रमाणें असलेला; लोकतंत्राप्रमाणें चालणारा. [लोक + मत + अनुवर्ती] ॰मर्यादा-स्त्री. १ जनरूढी; पडलेली वहिवाट; प्रचार. २ जन- लज्जा. ३ जनाचा मान; लोकांविषयीं आदरभाव. (क्रि॰ राखणें; ठेवणें; पाळणें; धरणें; बावगणें). ॰माता-स्त्री. लक्ष्मी; लोकजननी. 'न सेविती हे जरी लोकमाता ।' -सारुह २. १८. ॰मांदी-स्त्री. लोकांचा समूह; गर्दी. 'त्वरें चालती धांवती लोक मांद्या । पुरी वोस ते रात्र जेथें अयोध्या ।' -मुरामायणें अयोध्या ४३. ॰मान्य-वि. १ लोकांना मान्य; प्रिय. २ लोकांचा पुढारी नेता. 'लोकमान्य हा शब्द उच्चारतांच मनांतून ही पदवी तुम्ही मान्यच करतां.' -केले १.२७६. बाळ गंगाधर टिळक यांना लाव- ण्यांत आलेली, येणारी पदवी. 'गोखल्यांची इंग्लंडांतील काम- गिरी' -(विश्ववृत्त एप्रिल १९०६) या लेखांत प्रथम वि. का. राज- वाडे यांनीं वापरली. ॰रंजन-न. १ लोकांची करमणूक. २ लोकांना संतोष, सुख होईल असें आचरण; लोकांना खूष ठेवणें. ॰रमण- वि. लोकांनां संतुष्ट करणारा. 'पूर्णब्रह्म स्वयें श्रीकृष्ण । बळी बळिराम लोकरमण ।' -एभा १.२.३. ॰राजक-राज्य- न. लोकमतानुवर्ती शासनसंस्था. (इं.) डेमॉक्रसी. 'लोकराजकाचे दोष त्यांना स्पष्ट दिसत होते.' -महाजनि (मनोरंजन-आगरकर अंक). ॰रीति-रीत-स्त्री. लोकांची वागण्याची पद्धत; जन- रीतिरिवाज; सामान्य वागणूक. ॰लचांड-न. लोकांच्या नाखु- षीनें होणारा त्रास; येणारी अपत्ति, लोकांच्या अवकृपेचें संकट. म्ह॰ सगळें लचांड पुरवेल पण लोकलचांड पुरवणार नाहीं. ॰लज्जा-लाजस्त्री. लोकमर्यादा पहा. १ लोकमताला मानणें; लोकांना जुमानणें. २ जनलज्जा; लोकभय; लोकांची वाटणारी शरम. ॰लोकपाळ-पुअव. १ देशाचे किंवा समाजाचे पुढारी लोक; प्रतिष्ठितवर्ग (व्यापकार्थी). २ राजा व त्याचे अधिकारी (लवाजम्यासह). ३ फौज; शिपाई. ॰वाद-वार्ता-स्त्री. पु. जनवार्ता; वदंता; कंडी; लोकप्रवाद पहा. 'लोकवार्तेला गति मिळाली कीं ती किती फोफावेल याचा नियम नाहीं.' -इंप ३७. ॰विद्या-स्त्री. समाजशास्त्र. -मसाप २.२१९. ॰व्यवहार- पु. लोकप्रवाह; सामान्य रीत; जनरीत; सर्वसाधारण वागणूक. ॰शाही-स्त्री. लोकांच्या सत्तेखालीं त्यांच्या संमतीनें चालणारी व त्यांच्याच हिताची अशी राज्यपद्धति. ॰शिरस्ता-पु. सामान्य परिपाठ; सामान्य रीत; लोकांची वागण्याची पद्धत; राहटी; रूढी. ॰संख्या-स्त्री. एका विशिष्ट स्थानी. राहणाऱ्या एकंदर सर्व लोकांची गणती. ॰संग्रह-पु. समाजव्यवस्थेचें रक्षण; लोकसंस्थेचें संरक्षण; अनेक अनुयायी मिळविणें; लोककल्याण; लोकदीक्षा; स्वतःला निराळ्या रीतीनें वागण्यास प्रत्यवाय नसतांहि लोकांनीं आचारभ्रष्ट होऊं नये म्हणून स्वतःच्या इच्छेविरुद्ध कांहीं आचा- रांचा स्वीकार करून लोकांची जूट राखणें. 'ज्ञानी पुरुषांनीं यथाधिकार धर्मसंस्थापनेसारखीं लोकसंग्रहाचीं कामें करावीं.' -टिसू ५. 'तया लोकसंग्रहालागीं । वर्ततां कर्मसंगीं । तो कर्मबंधु आंगीं । वाजेलनी ।' -ज्ञा ३.१७५. ॰सत्ताक-सत्तात्मक- वि. लोकांची सत्ता असलेलें; लोकमतानुवर्ती; राजा नसून लोकां- कडून राज्यकारभार चालणारी (शासनपद्धति). 'लोकसत्तात्मक राज्यपद्धतींत लोकच राजे असतात.' -गांगा २६. ॰संपादणी- स्त्री. लोकांचीं मनें अनुकूल करुन घेणें; लोकांची खुशामत; लोकांच्या मर्जीकरितां केलेली बतावणी. 'जैसि बहुरुपियांची रावो राणी । स्त्रीपुरुषभावो नाहीं मनीं । परी लोकसंपादणी । तैशीच करिती ।' -ज्ञा ३.१७६. ॰समजूत-स्त्री १ सर्वसाधारण लोकांचें मत; सामान्य समजूत. २ (एखाद्या मनुष्याविषयीचें किंवा पदार्था विषयींचें) लोकांचें यथायोग्य ज्ञान; समाधान; योग्य जाणीव. ३ केवळ लोकांचें समाधान (आपलें किंवा आपल्या बाजूचें समा- धान न मानतां फक्त लोकसमाधान) पहाणें ॰साहित्य-न. लोकांच्या जिव्हाग्रीं परंपरेनें वावरत असलेलें कथात्मक वा गीता- त्मक वाङ्मय. हें लिखित असेलच असें नाहीं. याचीं उदाहरणें- कहाण्या, सावित्रीचें गाणें; कावळाचिमणीच्या गोष्टी; ठकसेनाच्या गोष्टी. इ॰ ॰सिद्ध-वि. लोकांत रुढ असलेलें; लोकांत चालू अस- लेलें; प्रचलित; वहिवाटींत असलेलें. ॰स्थिति-स्त्री. एकंदर जन- तेची सामान्य स्थिति; लोकांची परिस्थिति. 'गाड्या घोड्यांतून हिंडणाऱ्या गृहस्थापेक्षां गरिबांनाच लोकस्थिति अधिक चांगली समजते.' -टि २.८०. ॰स्फीति-स्त्री. लोकप्रसिद्धि. 'स्वामींची नजर खाद्यसमृद्धीवर, त्यांच्या पुरस्कर्त्यांची लोकस्फीतीवर व इतरेजनांची केवळ मौजेवर.' -नि ६१९. ॰हितैषी-वि. जन- तेचें हित इच्छिणारा; लोकांचें कल्याण पाहणारा. [लोक + हितैषी; हित + इष् = इच्छिणें] लोकाग्रणी-पु. लोकश्रेष्ठ; लोकांचा पुढारी; नेता. [लोक + अग्रणी] लोकाग्रह-पु. लोकांची उत्कट इच्छा; जनतेचा आग्रह. लोकाचळ-पु. स्वर्गादि लोकरुपी पर्वत; जगरुप पर्वत. 'एऱ्हवीं जगदाकाराचें सिरें । जें चिरस्थानीयांचे धुरे । ब्रह्म- भुवन गा चवरें । लोकाचळाचें ।' -ज्ञा ८.१५४. [लोक + अचल] लोकाचार-पु. रूढी; लोकांची रीत; प्रघात; वहिवाट; लोकरीत. 'अंतरनिष्ठ तितुके तरले । अंतरभ्रष्ट तितुके बुडाले । बाह्याकारें भरंगळले । लोकाचारें ।' -दा १८.१.२४. लोकांतर-न. परलोक; (स्वर्ग, नरक इ॰) मृत्युलोकाहून निराळा दुसरा लोक. [लोक + अंतर] लोकांतीं-क्रिवि. लोकांमध्यें; जाहीर रीतीनें; उघडउघड. 'एकांतीं लोकांतीं करूं गदारोळ । लेश तोही मळ नाहीं येथें ।' -तुगा १९९१. लोकातीत-वि. अलौ- किक; लोकांवेगळें; या लोकीं न सांपडणारें. [लोक + अतीत] लोकानुकूल्य-न. लोकांची अनुकूलता; जनमान्यता; लोककृपा; लोकप्रसिद्धि. [लोक + आनुकूल्य] लोकापवाद-पु. लोकांनीं केलेली निंदा; जनापवाद; लोकप्रवाद. [लोक + अपवाद] लोकालोक-पु. सप्तद्वीपात्मक पृथ्वीला तटबंदीसारखा असलेला पर्वत; सप्तद्वीपा पृथिवी व सप्तसमुद्र यांना वेढणारा व सूर्य- मंडळापर्यंतचा अवकाश व्यापून टाकणारा असा एक महान् विस्तृत पर्वत. लोकालोकीं-क्रिवि. १ तिऱ्हाइतांकडून तिऱ्हाइतांमार्फत. २ विशेष पुरावा नाहीं अशा प्रकारें लोकांच्या तोंडून ऐकिलेलें. 'ही खबर मी लोकालोकीं ऐकिलेली आहें.' लोकी(कि)क- पु. १ लौकिक; कीर्ति; यश. 'बहु लोकिक सांडूं नये ।' -दा १४.१.६८. २ प्रसिद्धि; चांगल्या किंवा वाईट रीतीनें लोकांस माहीत असणें. -वि. या लोकांतील; 'प्रपंच संपादणें लोकिक ।' -दा २.७.९. [सं. लौकिक] लोकिकीं-क्रिवि. (काव्य) लोकांत; लोकसमुदायांत. 'पुत्रसंतान नस्तां दुःखी । वांज नांव पडिलें लोकिकीं ।' -दा ३.३.३२. लोकेषणा, लोकेशना- स्त्री. १ लोकांनीं आपणास बरें म्हणावें अशी इच्छा; कीर्तींची इच्छा. 'वैराग्यें तनु शुष्क करावें सोडुनि लोकेशना ।' -देप ६७. २ स्वर्गादि लोकांच्या प्राप्तीची इच्छा. ३ लोकांमध्यें चांगली किंवा वाईट प्रसिद्धि; लोकमान्यता किंवा दुर्लौकिक. 'मुलखांत लोकेशना होती.' -पेद २१ ११२. [सं. लोकेषणा] लोकोक्ति-स्त्री. १ म्हण. २ ज्यांचा रूढ अर्थच घ्यावयाचा, शब्दश: अर्थ घ्यावयाचा नाहीं असे शब्द समुच्चयानें; वाक्प्रचार. उदा॰ डोळ्यांत तेल घालून राहणें; डोक्यांत राख घालणें इ॰. ३ (साहित्य) ज्या वाक्याला वाक्प्रचारानें चारुता आली आहे असें वाक्य. 'हरिच्या पुन्हां पुन्हां कां काड्या नाकांत घालिशी शशका ।' [लोक + उक्ति] लोकोत्तर-वि. अलौकिक; असामान्य; असा- धारण. [लोक + उत्तर] लोकोद्धार-पु. मानव जातीचा उद्धार; कल्याण; मोक्ष; जननमरणापासून मानवाची सोडवणूक; लोकांची उन्नति, प्रगति. [लोक + उद्धार] लोकोपकार-पु. केवळ लौकि- काच्या संरक्षणार्थ करण्याचा शिष्टाचार; जी करण्याला शास्त्राज्ञा किंवा आपली इच्छा नसून केवळ लोकमर्जीकरतां आपण करतों ती गोष्ट, कृति. [लोक + उपचार]

दाते शब्दकोश

गो

स्त्री. १ गाय. २ बैल (पशु). समासांत-गाईपासून झालेलें; गाईसंबधीं (दुध, चामडें, मांस इ॰). 'अगा गोक्षीर जरी जाहलें । तरी पथ्यासि नाहीं म्हणितलें ।' -ज्ञा २.१८४. [सं.] सामाशब्द- ॰कर्ण- ॰क्रण-न. १ मुलाला दूध पाजावयाचें (गाईच्या कानाच्या आकाराचें) बोंडलें. २ एक वेल व तिचें फूल. ३ बारा ज्योतिर्लिंगांपैकीं एक. हें कुमठें (कानडा जिल्हा) तालुक्यांत आहे. ४ (तजा.) दांड्याचें सारपात्र; कावळा. याचा आकार गोकर्णासारखा असतो. -पु. गाईचा कान. गोकर्णांत येणें- संपुष्टांत, गाकुळांत येणें; संपणें; दरिद्री होणें. गोकर्णिका- कर्णी-स्त्री. एक प्रकारचा लगाम. गोकर्णी-स्त्री. एक वेल, हिचीं फुलें (पांढरीं, निळीं) गाईच्या कानासारखीं असतात. [सं.] गोकु(कू)ल ळ-न. १ श्रीकृष्णाच्या लहानपणच्या वसतीचें गांव. २ गोकुळाष्टमीस नंद, यशोदा, गोप-गोपी, गाईवासरें इ॰ ची पूजा करण्यासाठीं केलेलीं मातीचीं चित्रें. ३ (ल.) स्वैरसं- भोग; व्यभिचार. (क्रि॰ माजविणें). [सं. गा + कुल] गोकु ळांत येणें-१ संकोचित होणें; संपुष्टांत येणें; संपणें. २ आटा- क्यांत येणें (व्यवहार). [विश्वव्यापी कृष्णपरमात्मा ज्याप्रमाणें गोकुळाच्या मर्यादेंत आला त्याप्रमाणें] गोकुळाष्टमी-स्त्री. श्रावण वद्य अष्टमी; या दिवशीं भगवान् श्रीकृष्णाचा जन्म झाला. [सं.] गोकुळासारखें घर-न. मुलाबाळांनीं सुखसंपत्तीनें भरलेलें घर. गोकोश-पु. जमीन मोजण्याचें एक माप: गायीच्या हंबरण्याचा टप्पा; गोरुत; दोन कोसांचें अंतर. गोखडी-स्त्री. गाई उभ्या राहण्याची जागा; गोठण. 'गिलच्यानीं गोखडींत दहा-पांच बैरागी सत्पुरुष होते तेहि बसले ठिकाणीं लबे कले.' -भाब २८ गोखमा-पु. १ गुराखी. २ (ल.) गांवढळ खेड- वळ; शेत्या; नांगर्‍या. गोखरें, गोखोण-रेब/?/-न. (कों) गुरांनीं खाऊन शिल्लक राहिलेलें गुरांच्या पायाखालचें. निरुपयोगी गवत. 'केळीला गोखरेडाचें खत चांगलें [गौ + खूर] गोखाना- पु. १ सरकारी किंवा एखाद्या मोठ्या माणसाचा गायवाडा; गुरांचें खातें. २ गायठाण; गोठा. [सं. गो + फा. खाना] गोग्र- हण-न. गाईचें हरण, चोरी. 'उत्तरगोग्रहण.' 'तृवां गोग्रह- णाचेनि अवसरें । घातलें मोहनास्त्र एकसरें ।' -ज्ञा ११.४६९. [सं.] गोग्रास-पु. १ जेवण्यास बसण्यापूर्वीं गायीसाठीं राखन ठेवलेला अन्नाचा नैवेद्य. २ गाईसाठीं भिक्षा. [सं.] गोचर-न. गुरचरण; गुरचराई. [सं.] गोचर्म-न. १ गाईच कातडें. २ (ल.) जमीन मोजण्याचें एक माप. गाईच्या चामड्याइतकी जमीन; (गाईच्या कातड्याची वादी काढून तिनें वेष्टिलेली जमीन एका माणसानें राजापासून मागून घेतल्याची एक जुनी गोष्ट आहे तिच्यावरून) तीनशें फुट लांब व दहा फूट रुंद या मानाचें क्षेत्र (यांतील धान्य एका माणसास एक वर्ष पुरतें असा हिशोब आहे). [सं.] गोजरूं गोजी-नस्त्री. (प्रेंमानें किंवा तिरस्कार करतेवेळीं योजना) कालवड; वासरी. गोजिव्हा-स्त्री. एक वनस्पति; गोजबान पाथरी; दवली. [सं.] गोठ(ठा)ण-स्त्रीन,. दुपारीं सावलीसाठीं पाण्याजवळ झाडाखालची बसण्याची गुरांची आखर. जागा; गोठा. 'पशु पीडती पर्जन्यें । गळती गाईंची गोठणें ।' -मुसभा ३.७९. [सं. गोष्ठ, गोस्थान म्ह॰ गोठणीच्या गाई माभळभट दान घेई. = हलवायाच्या घरांवर तुळशीपत्र. गोठण घालून बसणें-सभेत अस्ताव्यस्त बसणें. गोठा-ठो-पु. गुरें बांधण्याची जागा; जना- वरे रहाण्याची जागा. [सं. गोष्ठ; प्रा. गोट्ट] गोठापाणी-न. सकाळीं गोठा झाडणें. गुरांच शेण, मूत काढणें इ॰ गोठ्यांतील व्यवस्थेचें काम गोठाव(वि)णें-सक्रि. गोठणांत गुरें जमविणें; गोठ्यांत गुरें घालणें. गोठी-स्त्री. (कों.) वासरांचा लहान गोठा. गोठ्यौचें-क्रि. (गो.) पशूंचें बसणें. [गोठा] गोथवड-स्त्री. (कों.) गुरांची दावण, ठाण; लांब पडळ; कोटंबा. [सं. गोष्ठ- वत्] गोदंती हरताळ-स्त्री. पिवळा हरताळ. गोदण-स्त्री. (बे.) गुरापुढें वैरण टाकण्याची जागा. [गवादणी] गोदन- न. (माण.) लहान गोठा. गोंदरड-स्त्री. (राजा.) गोठ्यांतील केरकचरा, घाण. गोदान, गोप्रदान-न. ब्राह्मणास गाईचें दिलेलें दान. 'प्राचीन काळीं गाय दान मिळणें सोपें होतें, पावली मिळणें कठीण, पण हल्लीं चार आण्यांत गोप्रदान.' -गांगा १४४. गोदान-न. सोळा संस्कारांपैकीं व समावर्तनाच्या वेळीं करावयाचा एक संस्कार. [सं.] गोधन-न. गुरढोरे किंवा त्यांच्या रूपानें संपत्ति. 'धन्य तीं गोधनें कांबळी काष्ठीका ।' -तुगा २०८. गोधूल मुहूर्त, गोंधळिक, गोंधुळूक-पुन. १ सायंकाळचा (गुर रानांतून परत घरी येत असतां त्यांच्या) चालण्यानें उडालेली धूळ दिसते तेव्हांचा) काळ. २ सुर्यास्ता- पूर्वींची व नंतरचीं ३० पळें यामधील काळ; हा लग्नास शुभ मान- तात. गोरज मुहूर्त. गोधूल लग्न-न. १ गोरज लग्न. गोधूल पहा. २ सूर्यास्तसमयीं उदय पावणारी राशी, लग्न. गोधूलिक-वि. गोधूलसंबंधीं (कार्य. लग्न-मुहूर्त). गोधूळ-ळी-स्त्री. गोधूल पहा. गोप-पु. गुराखी, गवळी जात. व तींतील एक व्यक्ति. 'पूजिति सांग नगा ती रीति । सुखाचीच गोप सांगन गाती ।' -मोकृष्ण २४.७. गोपचार-पु. गायरान; गोचरण. गोपद-न. १ गाईचें पाऊल. २ गाईच्या पावलाचा मार्ग, खूण. ३ आंत पाणी भरलेली गोपदाची खूण, डबकें. गोपद्म-न. चातुर्मास्यांत रांगो- ळीनें गाईचीं पावलें नववधू काढतात व पूजा करतात तें. गोपद- चिन्ह. [सं.] गोपवाडा-पु. गवळीवाडा. ' जो नांदवी उत्कट गोपवाडे ।' -सारुह १.७८. गोपाल-ळ-पु. १ गुराखी; गुरें पाळणारा. २ राजा. ३ भगवान श्रीकृष्ण. ४ एक जात व तींतील व्यक्ति; डोंबारी; हे मनगटानें दगड फोडतात, मोठालीं वजनें उचलतात व कसरतीचे खेळ खेळतात, हें गांवकर्‍यांचीं गुरें राखो- ळीला घेतात. -गांगां १२२. गोपाष्टमी-स्त्री. कार्तिक शुद्ध अष्टमी या दिवशीं त्यांची व गाईची पूजा करतात. गोपाळकाला-पु. गोकुळअष्टमीच्या उत्सवाच्या व श्रीकृष्णाच्या इतर उत्सवाच्या शेवटीं करावयाचे खेळ, द्यावयाचा प्रसाद,जेवण इ॰; गोकुळा- ष्टमीच्या पारणेच्या दिवशीं दहीहंडी फोडून तींतील प्रसाद वाट- तात तो. गोपाळखेळ-पु. गोपाळ लोकांची कसरत, खेळ; डोंबार्‍यांचा खेळ. गोपाळीं-क्रिवि. गोरजीं; गोधूललग्नीं. गोपिका, गोपी-स्त्री. गोपालस्त्री; गवळण. 'तुझे कथिति गोपिका विविध तीस बोभाट ते ।' -केका ८६. [सं.] गोप्र- दान-१ गोदान पहा. २ (थट्टेने) शिव्या. 'त्यानें त्यास गोप्र- दानें केलीं.' गोप्रसव-पु. कुनक्षत्रीं जन्मलेलें मूल गाईच्या तोंडापुढें धरतात व असें केल्यानें तें गाईचें मूल होऊन अशुभा- पासून मुक्त होतें, अशा मुलाला म्हणतात. गोप्रसवशांति-स्त्री. कुयोगीं जन्मलेलें मूल गाईच्या मुखांतून जन्मलें अशी भावना धरून कुयोगदोषनाशार्थ करावयाची शांति. गोब्राह्मण-पु. १ गाय आणि ब्राह्मण. २ (ल.) अगदीं साधाभोळा, गरीब ब्राह्मण. गोमय-नपु. गाईचें शेण. 'शुद्ध करूनिया गोमय गोळा । मृति- काकण विरहित ।' [सं.] गोमाशी-स्त्री. घोडे, गाई इ॰ च्या अंगावरील एक मोठी माशी; माशीची एक जात. गोमांस-न. गाईचें मांस; शपथेसारखा किंवा निषेध दाखवीतांना याचा उपयोग करतांत. कारण हिंदूंना गोमांस अगदीं निषिद्ध आहे. 'ही तुमची ठेव मला गोमांसाप्रमाणें आहे.' गोमुख-न. १ तीर्थ इ॰ पवित्र पाणी खालीं पडण्यासाठीं बांधलेलें किंवा बनविलेलें दगडी किंवा धातूचें गाईचें तोंड. २ एका प्रक्रारचें गाईच्या तोंडासारखें वाद्य.'तों वाद्यें शंखभेर्यादी पणवानक गोमुखें ।' -वामन गीतासमश्लोकी १.१३. गोमुखव्याघ्र-पु. १ दिसण्यांत गाई- सारखा सौम्य पण अतिशय क्रूर असा वाघ. २ गाईचें कातडे पांघ- रलेला लांडगा. ३ (ल.) वरून गरीब पण आंतून लुच्चा माणूस. [सं.] गोमुखी-स्त्री. गाईच्या तोंडासारखी काटकोनी जपमा- ळेची पिशवी; हिच्या आंत हात घालून जपाची माळ ओढतात. 'काय मौन धरुनिया गोमुखिला जाळिसी ।' -राला ८७. -पु. (कों.) एक प्रकारच्या नवसांत नियम केल्यामुळें हात न लावतां तोंडानें अन्न उचलून जेवणारा माणूस [सं.] गोमूत्र-न. गाईचें मूत; हे पवित्र मानतात व अपवित्र वस्तूंवर शिंपडून त्या पवित्र करतात. गोमूत्रिका, गोमूत्रिकन्यायगुणाकार-पु. (ज्यो.) गुणाकराचा एक प्रकार. गोमुत्रिकाबंध-पु. काव्याचा एक प्रकार याच्या द्वितीय चरणांत पहिल्या चरणांतील बहुतेक अक्षरें येतात. गोमूत्रवायु-पु. एक नवयुक्त वायु. (इं) आमोनिया. गोमेघ- पु. ज्यामध्यें गाय मारतात तो यज्ञ. [सं.] गोरखी-पु. गुराखी; गुरें (गाई) पाळणारा. 'कवळाचिया सुखें । परब्रह्म झालें गोरखें ।' -तुगा १८१. गोरज पु. गाईची धूळ. गोधूल पहा. 'गोरजें डवरला, मुखचंद्र ।' -ह १८.६३. गोरजमुहूर्त-गोधूलमुहूर्त पहा. गोरस-पु. गाईचें दूध, दहीं, तूप इ॰ गाईपासून होणारे पदार्थ. [सं.] गोरक्ष-रक्षक-पु. १ गुराखी. २ गुरांची रक्षक देवता. ३ नाथपंथांतील गोरखनाथ नांवाची एक प्रसिद्ध व्यक्ति गोरख-गोरखनाथ पहा. गोरक्षण-न. कसायापासून गाय वांच- विणें; गोपालन. गोरा-र्‍हा-पु. गाईचा पाडा, खोंड; धांडा. गोरुव-न गोवत्स. गोरूं, गोरवा, गोरें-न. (राजा. गो.) ढोर, गुरूं, 'गोरु खडबडी बाहिरी ।' -भाए ३९४. गोरो- चन-ना-नस्त्री. गोवर्धन; हें गोमूत्रापासून किंवा कुपित्थाच्या रूपानें गाईच्या ओकण्यापासून, किंवा गाईच्या डोक्यांत उत्पन्न होतें याचा रंग पिवळा. हें रंग, चित्रें औषधें यांत उपयोगी आहे. 'गोरोचनापरिस गौर असें गणावें ।' -र. ६. (लोक समजूत अशी कीं वाजीकरण किंवा स्त्रियांस मोहविण्यांत गोरो- चनाचा उपयोगी होतो). [सं.] गोवंड-डी, गोवडी-पुनस्त्री. जंगल किंवा डोंगरावरील जनावरांची चरण्यास जाण्याची पाऊ- लवाट; गायवाट.[सं. गोवर्तनी] गोवंडास लागणें-येणें- सरळ रस्त्यास लागणें; चालीस लागणें (माणूस, काम). गोवत्स- पुन. गाईचें वांसरूं. गोवत्स द्वादशी-स्त्री. आश्विन वद्य द्वादशी; या दिवशीं गाईची पूजा करितात. गोवपा-स्त्री. गाईच्या आंत- ड्यावरील आवरण; सामान्यतः गाय, बैल यांच्या चरबीस व हाडांतील मगजासहि म्हणतात. [सं.] गोंवर-पु. १ शेणी; न थापलेलें वाळलेलें शेण, वाळलेल्या शेणाचा चुरा. २ गाईनें खाल्यानंतर उरलेला चारा, गळाठा. ३ (कों.) राब. ४ (हेठ.) उकि- रडा. [सं. प्रा. गोवर] गोवरर्कोडा-पु. गोठ्यांतील केरकचरा; शेणमूत. गोवरी-स्त्री. १ वाळलेल्या शेणाची थापडी; शेणी; गोवर अर्थ १ पहा. २ (कु.) शेणखत. ३ राब भाजण्यासाठीं वाळविलेला शेणगोळा. गोवरीची आग-स्त्री. गोवरी जाळली असतां वर राख दिसते परंतु आंत विस्तव असतो यावरून गुप्त परंतु भंयकर वैर. गोवर्‍या मसणांत जाणें-वृद्धपण येणें. मरण जवळ येणें; वय होणें. गोवर्धन-पु. १ मथुरेजवळील टेकडी; इंद्रानें पाडलेल्या पावसापासून गोकुळाचें रक्षण करण्यासाठीं श्रीकृष्णनें याला करंगळीवर धारण केलें व याच्या खालीं गोकु- ळांतील सर्व माणसें आणि पशू सुरक्षित राहिलें. २ कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या (बलिप्रतिपदेच्या) दिवशीं भात, शेण, भाजी- पाला इ॰ चा वल्लभसंप्रदायी लोक गोवर्धनासारखा पर्वत करून त्याची पूजा करतात तो. -न. १ गोरोचन. २ महाराष्ट्रांतील एक प्राचीन राष्ट्र हल्लींच्या नाशिक जवळच्या भागांत हें असावें. ॰ब्राह्मण-पु. एक महाराष्ट्रीय ब्राह्मण जात. गाईच्या तोंडें गोवर्धन निवडणें-पंचाईत इ॰ प्रकरणीं ज्याचा विषय त्याच्याच तोंडानें निवाडा करणें. गोवळ, गोवळगोठा-पु. (कों.) गोशाला; गायवाडा; गोठा. गोवळ, गोवळा, गोवाळ- ळी-पु. १ गुराखी; गवळी. ' उगला राहे न करी चाळा । तुज किती सांगों रे गोवळा । -तुगा १२९. २ (राजा.) वयानें मोठा पण पोरकट माणूस; दुधखुळा (निंदार्थीं). [सं. गोपाल; प्रा. गोवाल] गोवारी-पु. गुराखी; गवळी. 'तव गाई आलिया रात्रीं । कच नाहीं आला गोवारी ।' -कथा १.५.८२. गोवाल- पुअव. गंगावन; गाईच्या शेंपटीचे केंस.[सं.] गोवेल-पुस्त्री. एक वेल; ही गुरांना विषकारक असते म्हणतात; भारे बांधण्याच्या कामीं हिचा उपयोग होतो. गोवैद्य-पु. गाईचा वैद्य; गुरांचा वैद्य; पशुवैद्य. गोशत-न. १ शंभर गाई. २ शंभर गाई दान देण्याचें कर्म. [सं.] गोशाला-ळा-स्त्री. गोखाना; गोठा पहा. गोष्ठ-पुन. गोठा. गोष्पद-न. १ गाईचें पाऊल, पावलाचें चिन्ह. २ गोवंडी. ३ गोपदाइतकें माप; गाईच्या खुराखालीं समावेश होईल इतकी जमीन. ४ चिखलांत उमटलेलें वं पाण्यानें भरलेलें गाईचें पाऊल. 'गज गोष्पदीं बुडाला हा दैवा सिंधु शोषिला मशकें ।' -मोद्रोण १.२३. 'गोष्पद मानुनि दिनांत शतदां यमुना वोलांडिली । ' -राला ८१. गोष्पदोपम-वि. गोष्पदाप्रमाणें (४) ओलांडून तरून जाण्यास सुलभ; सहजसुलभ; क्षुद्र; सुगम. 'ईश्वरभजन केलें असतां भव गोष्पदोपम होतो.' गोस्फुरण- न. गाईचें अंग थरारणें, गाईनें भोंवरा करणें. [सं.] गोहण- स्त्री. गव्हाण पहा. गाताडी. गोहन-न. (व.) गाईंच्या कळप. [गोधन] गोहण्या-पु. (व.) गुराखी. गोहत्त्या -हनन- स्त्रीन. १ गाईचा वध. २ गोवधाचें पातक. गोहरा-गोहोरा- पु. गोर्‍हा पहा. म्ह॰-'गोहर्‍याच्यानें शेत पोराच्यानें संसार होता तर मग काय?' गोहोत-न. (राजा.) १ दाणा, कोंडा, पेंड इ॰ गुरासाठीं शिजविलेलें आंबोण, मिश्रण. २ (ल.) घोंटाळा; खिचडी; गोंधळ. गोक्षुर-पु. १ गोखरू; सराटा. २ गाईचा खूर. ३ गाईची पाऊलवाट; गोवंडी. [सं.]

दाते शब्दकोश

लागणें

अक्रि. (ह्या क्रियापदाचा संलग्न, संयुक्त किंवा संबद्ध होणें, जुळणें, चिकटणें, जडणें असा मूळचा एकच अर्थ आहे. परंतु अनेक नामांशीं आणि शब्दांशीं उपयोग केल्यामुळें यांस अनेक भिन्न अर्थांच्या छटा आल्या आहेत. त्यांपैकीं सर्वसामान्य व कांहीं विशेष खालीं दिल्या आहेत) १ स्पर्श करणें; शिवणें. 'तूं त्याला लागूं नको. विटाळ होईल.' 'परि सावध व्हा लागो शुचि व्हाया हृदयलोह या परिसा ।' -मोभीष्म ६.११. २ लावणें; आंत घालणें; खुपसणें (रोप, झाड इ॰); लागवड, पेरणी करणें (जमीनीची). 'वाफा, अळें, सरी लागली.' ३ मूळ धरणें; रुजणें; चांगलें जीव धरणें; एक जीव होणें (लावलेलीं रोपें, कलमें) ४ मार बसणें; आघात होणें (शस्त्र इ॰चा). ५ (ल.) मनाला बोंचणें; परिणामकारक होणें; अंतःकरणाला भिडणें (रागें भरणें, शब्दांचा मार). -दा १०.८.२७. ६ बंद होणें; मिटणें; गच्च बसणें. (दरवाजा, खिडक्या, झांकण, पापण्या, डोळे). ७ योग्य प्रकारें जुळणें; जोडलें जाणें (शब्दशः व ल.) (तुकडे, विभाग, कविता, शब्द). ८ बरोबर होणें; लागीं बसणें; नीट सामावणें. ९ प्रचारांत असणें; रूढ असणें (तऱ्हा, पद्धति, रीत). १० चिकटणें; जडणें; आंगवळणीं पडणें (दुर्गुण, खोड, रोग). ११ येणें; उत्पन्न होण; आसक्ति होणें (भूक, तहान, खोकला, कंप इ॰). १२ निघणें व चालू होण; प्रारंभ होऊन सुरू असणें (स्थल आणि काल यांतील पदार्थ आणि प्रसंग, विशिष्ट परिमाण किंवा प्रकार). 'एथून मावळ संपलें आणि देश लागला.' 'या अध्यायापासून ग्रंथ कठीण लागला.' 'तेव्हांपासून ह्याचा त्याचा कलह लागला.' 'हें काय सोपें लागलें आहे? १३ बरेंवाईट कळणें; विशिष्ट प्रकाराचे किंवा जातीचें म्हणून समजणें, वाटणें. 'आंबे खाऊन पहा, गोड लागले तर घ्या.' 'त्याला बरी गोष्ट जरी सांगितली तरी वाईट लागते.' १४ प्राप्त होणें; मिळणें (नोकरी चाकरी, नेमणूक). 'इतकी खटपट करून अखेर त्याला नोकरी लागली.' १५ नातें किंवा संबंध असणें; नात्याच्या संबंधानें असणें. 'तुझा तो काय मेहुणा लागतो.' १६ आढळणें; भेटणें; रस्त्यांत मार्गांत येणें; पुढें येणें. 'वाटेनें चार नद्या लागतात, 'तुम्ही वाचीत जा आणि पुढें येणें. 'वाटेनें चार नद्या लागतात, 'तुम्ही वाचीत जा आणि पुढें वृत्तश्लोक लागेल तेथें ठेवा.' १७ फळ धरणें; बहर येणें; वृक्ष फलोत्पा- दनाच्या स्थितीस येणें. 'ह्या प्रांताचे माड लागूं लागले म्हणजे असे लागतात कीं एका एका माडास हजार हजार नारळ लागतात.' १८ करपणें; बिघडणें; बुडाशीं जळणें. 'भात बुडाशीं लागला.' १९ कामांतून जाणें; खराब, घाण होणें; डागळणें; कुजण्यास, सडण्यास आरंभ होणें; बुरशीनें व्याप्त होणें. 'लांकूड लागलें.' २० चिकटणें; चिकटून राहाणें. 'उदंड उपाधी तरी थोडी, लागोंच नेदी.' -दा ९.१०.५. २१ बसणें जडणें; बिलगणें (मन). 'चित्त तें लागलें तुझें पायीं ।' -दावि ५६. २२ चावणें; दंश करणें; झोंबणें (साप, विंचू, चिकट पदार्थ). २३ हल्ला, आघात होणें. 'त्याला विंचू लागला' 'मला ठेंच लागली-दगड लागला.' २४ पडणें; धाड येणें (मेकाड, मोवा इ॰ची); व्यापणें; ग्रासणें; (मेकाड इ॰नीं झाड). २५ परिणाम करणें; अनिष्ट व उपद्रव होईल असें करणें; (मादक पदार्थ, वाईट हवा, पाणी, उपवास, शिव्याशाप इ॰नीं). २६ जनावर, माणूस इ॰ची पाठ, पाय इ॰ गात्रांस (खोगीर, जोडा, लगाम इ॰च्या घर्षणानें) इजा होणें; घसटणें; खरचटणें; चोळवटणें; सोलवटणें. 'जोडा लागला.' २७ नेहेमींच्या एखाद्या आजारानें पछाडलें जाणें (जनावर). २८ पूर्णपणें व योग्य रीतीनें मिसळलें जाणें (साखर, तिखट, मीठ वगैरे अन्नांत एखादा पदार्थ). २९ घालविण्याची जरूरी पडणें; खर्चिला जाणें; व्यय होणें (पैसा, पदार्थ, वेळ). 'याच्या लग्नास पांचशें रुपये लागले.' ३० पाहिजे असणें; गरज असणें; सुस्थितीस पूर्णतेस जरूर असणें; (सामा. एखादी गोष्ट) (गरज, नड, उपयोगाचा प्रसंग) उत्पन्न होणें. 'क्षत्रियासि लागल्या अनुपत्ती । पूर्वोक्त करावी वणिग् वृत्ति ।' -एभा १७.४६२. ३१ योग्य स्वरांत बसणें; स्वरानुकूल असणें (गळा, आवाज, वाद्य, सूर). ३२ पेटणें; दीप्तियुक्त होणें (दिवा, विस्तव); चेतणें (आग). ३३ प्रत्यक्ष आरंभ होणें; मुख्य विधि, संस्कार याला सुरवात व्हावयाची वेळ येणें (लग्न, मुंज इ॰ विधीची). ३४ (बोलतांना) अडखळणें (माणूस, जीभ, शब्द). ३५ चालू होणें; क्रिया सुरू होणें; गति मिळणें, (एंजिन, यंत्र इ॰). ३६ चालणें; समर्थ, कार्यक्षम असणें (आपल्या विशिष्ट कार्यांत); उपयोगास येणें. 'जंग चढला आहे म्हणून चाकू लागत नाहीं.' ३७ तीक्ष्ण होणें; धारेनें युक्त होणें. 'दोन चाकू लागले आहेत, बाकींचे लागावयाचे आहेत.' ३८ निश्चित किंवा ठरलेलें असणें; न सुटण्यासारखें जोडलेले किंवा पाठीमागें लागलेलें असणें. 'उपजत्या प्राण्यास मरण हें लागलेंच आहे.' 'संसाराचें कृत्य हें रोज लागलेंच आहे' ३९ सुरू होणें; सतत चालू असणें; एकसारखा असणें; एकसारखा राहणें, घडणें (पाऊस, थंडी, उष्णता). 'कालपासून पाऊस सारखा लागला आहे.' ४० मग्न, गुंतलेला असणें. ४१ मनांत योजिलेला किंवा स्वाभाविक परिणाम होणें; यश येणें; उपयोग होणें. ४२ जुगणें; मैथुन चालणें, करणें (पशु, पक्षी यांमध्यें नरानें मादीशीं) (निंदार्थी माणसालाहि लावतात). ४३ योग्य स्थितीला येणें; फलदायी होणें (गाय, म्हैस इ॰ दूध देऊं लागणें, झाड फळाला येणें). ४४ संबद्ध, मालकीचा असणें; कार्यक्षेत्रांतील, कक्षेंतील, अधिकारांतील असणें. ४५ विवक्षित स्थितींत असणें; विवक्षित गुण, जात, धर्म असणें; विशिष्ट परिस्थिती असणें. 'मी कां श्रीमंत लागलों आहें? सर्वांस शाल- जोड्या द्या म्हणतां तो.' 'हा काय मुसलमान लागला!' ४६ लावणें; अंगीं लागू करणें (गुन्ह्याचें कृत्य); करावयासाठीं, पार पाडण्यासाठीं एखाद्या व्यक्तीवर लादलेलें असणें; सोपविलेलें असणें (कर्तव्य, काम इ॰). 'हें काम मजकडे लागलें.' ४७ सक्तीचें, आवश्यक, जरूर असणें; करणें-भोगण भाग पडणें. 'ह्याचे हातून न झालें तर तुम्हास जावें लागले.' 'हा पळून गेला तर रुपये तुम्हाला द्यावयास लागतील.' ४८ अडकणें; गुंतणें. 'कोठें तुझा जाउनि हेतु लागे ।' -सारुह २.९४. ४९ झपाटणें; पछाडणें; अंगात येणें; बाधा होणें. 'चिंतूला चिंचेवरची हडळ लागली.' ५० (शौच, मूत्रविसर्जन इ॰) क्रियेची इच्छा होणें. 'शौचास-मुतावयास लागली.' ५१ (क्रियापद ऊं, आवयास इ॰ प्रत्यय लागून त्यांचे पुढे 'लागणें' हें क्रियापदातील आलें असतां) क्रिया सुरू करणें; आरंभणें; घडणें; लागूं होणें. 'तो तें करूं किंवा करावयास लागला'; 'तो मारूं लागला-देऊं घेऊं-खाऊं-बोलूं बसा- वयास करावयास लागला.' ५२ क्रियापदांतील 'वें' ह्या प्रत्य- यापुढें 'लागणें' क्रियापद आलें तर आवश्यक होणें, अनिवार्य होणें असे अर्थ होतात. 'त्याला जावें लागलें.' ५३ बरोबर, बाजूला असणें; मदत करणें. 'हा धोंडा मला उचलूं लाग'; 'हें काम मला करूं लाग' ५४ नांगर टाकण्याच्या स्थितीत येणें; कडेला येणें; स्थिरावणें; गति खुंटणें (जहाज, होडी). ५५ (ल.) अगतिक होणें; हालचाल बंद पडणें. [सं. लग् लग्न; प्रा. लग्ग; हिं. गु. लांगना] म्ह० लागें बोट वाढे पोट = नुसतें निमित्त होऊन एखादें वाईट काम होऊन जाणें. (एखाद्यास-ला) लागला जाणें- १ ऋणी होणें, असणें; मिंधा असणें. 'त्वां मला दोन पैसे दिलेस म्हणून मी कां तुला लागला गेलों?' 'मी काय तुझे चार चवल लागतों?' २ जास्त परिचयाचा, आसक्त असणें. लागून असणें- १ (स्नेह, लोभ, इ॰ मुळें) अगदीं चिकटला असणें; तंत्रानें किंवा मर्जीप्रमाणें वागणें. २ एखाद्या स्त्रीनें एखाद्याशीं व्यभि- चारसक्त असणें. ३ मग्न, गुंतलेलें असणें. लागून जाणें-नवरा सोडून दुसऱ्यापाशीं राहणें (एखाद्या स्त्रीनें). कानास-कानीं-लागणें- गुप्त गोष्टी बोलणें; कुजबुजणें 'किती लागती परस्पर कानीं । मधुर भाषणी ।' -रत्न १०. पाणी लागणें-१ एखाद्या ठिकाणच्या हवेचा, चालीरीतींचा मनावर, वागणुकीवर परिणाम होणें. 'विदेशी लागलें पाणी ।' -दा ३.६.२५. २ एखाद्या ठिकाणची हवा बाधणें. ३ (पुसणें) एखाद्याकडे येणें असलेली रक्कम बुडणें; नाहीसें होणें. पायीं लागणें-नम्र होणें; नमस्कार, वंदन करणें. 'समर्थपायीं राजराजेंद्र लागती ।' -सप्र ३.६६. लागत-न. (गु.) भाडें; खर्च. 'अगाऊ लागत भरून पावती मिळविली पाहिजे.' -(बडोदे) खानगी खातें, लागतीचें नियम ४. लागत- खेवों-क्रिवि. लागतांच. लागतगुण-पु. संगतीचा परिणाम- गुण; संबंध जडल्यानें येणारा गुण. 'कोणाचा कोणास लागतगुण असतोच.' लागता गुण-पु. (बायकी) माणूस, संपत्ति, उत्कर्ष, वस्तु जोडण्याचा गुण; संपादन करण्याचा, मिळविण्याचा गुण. लागता जुगता-वि. मार्गावर आणलेला; योग्य क्रमांत, रागेंत लावलेला; पायावर उभा केलेला. [लागणें + जुगणें] लागता वळगता-वि. (गु.) संबंधी; संबद्ध. 'जबाबदार इसमानें आपले ताब्यांतील व लागते वळगते नोकर लोकांस वरचेवर माहिती देत जावी.' -(बडोदें) आगी पासून बचाव ४. लागतें-न. संबंध. 'न बुझावितां मतें । न फिटे आक्षेपाचें लागतें ।' -ज्ञा १३.३२७. लागन-क्रि. (खा.) मनाला वाटणें. लागरा-वि. १ मादक; अंमली; खाल्ली असतां लागणारी (सुपारी, औषध, इ॰). २ खराब झालेला; किडीनें खाल्लेला; किडका (धान्य, फळ, लांकूड इ॰). लागीर-स्त्री. न. १ पिशाच; भूत. २ पिशाच-भूत-समंध- बाधा; पछाडणी. (क्रि० लागणें; काढणें; निघणें). -वि १ किडकें; सडकें. २ किडण्यासारखें किडण्याजोगें (लांकूड, धान्य). ३ नास-नुकसान-दुखापत पोंचेल असा. ४ लागलेला. ५ बाधा झालेला; पछाडलेला. ६ चिकटलेला; चिकट. ७ मादक; माजगा; अंमली. ८ वाईट परिणाम करणारा; अहितकारी. ९ दुसऱ्याचें प्रेम, लोभ, दया, जडवून-लावून घेणारा; लाडिक. लागीर होणें- बाधा होणें; लागणें (भूत, पिशाच्च).

दाते शब्दकोश

अष्ट

वि. आठ संख्या; सामाश्ब्द-अष्टगुण, अष्टादश, अष्ट- विंशति व पुढील शब्द. [सं. अष्टन्] ॰क न. १ आठ पदार्थांचा समुदाय. २ पाणिनीच्या व्याकरणाचे (सूत्रपाठाचे) आठ विभाग आहेत त्यांतील प्रत्येक. ३ ऋग्वेदसंहितेचे पठणाच्या सोयीकरतां आठ भाग केले आहेत, त्यांतील प्रत्येक. ४ आठ श्लोकांचा समूह; एक काव्यरचनापध्दति. उ॰ मंगलष्टकें, करुणाष्टकें. [सं.] -वि. आठ किंवा आठवा. ॰कपाळ्या-वि. १ अष्टांगें-दोन हात, दोन पाय, दोन गुडघे, वक्षःस्थळ आणि कपाळ इतक्यांचा उपयोग करूनहि ज्यास कांहीं मिळत नाहीं तो. २ (ल.) पूर्णपणें दुर्दैंवी; आपद्ग्रस्त; भद्र्या; कपाळकरंटा. ॰कर्णिका-स्त्री. कमळाच्या पाकळ्या. 'माझें हृदय दिव्य कमळ । जें तेजोमय परम निर्मळ । अष्टकर्णिका अतिकोमळ । मध्यें घननीळ विराजे ।' -ह ३५.१. ॰कुलाचल-पु. मेरूच्या चारी दिशांत जे भारतादि वर्ष आहेत त्या प्रत्येकाची मर्यादा करणारे (नील, निषध, विंध्याचल, माल्यवान्, मलय, गंध- मादन, हेमकूट, हिमालय इ॰) आठ पर्वत. अष्टकोन-नी- ण-णी-वि. आठ कोन-बाजू-असलेली, (वस्तु, आकृति). ॰गंध-न. आठ सुगंधी द्रव्यें (चंदन, अगरु, देवदार, कोष्टको- लिंजन, कुसुम, शैलज, जटांमासी, सुरगोरोचन) एकत्र करून केलेलें गंध; (सामा.) उटणें. ॰गुण-वि. आठपट. -पु. आठ गुण. ब्राह्मणाचे आठ गुण-दया, क्षांति, अनसूया, शौच, अना- यास, मंगल, अकार्पण्य, अस्पृहा. बुध्दीचे आठ गुण- शुश्रूषा श्रवण, ग्रहण, धारण, चिंतन, ऊहापोह, अर्थविज्ञान, तत्त्वज्ञान. ॰गोल-गोली-वि. कांठापदरांवर वेलबुट्टी काढलेला (चौपदरी शेला). 'कोणासी पागोटें परकाळा । कोणी मागती अष्टगोली शेला -भक्तावि. ३०.४१. [सं. अष्ट + गो]. ॰गोळी-क्रिवि. सर्वतर्‍हेनें; एकंदर. ॰घाण-स्त्री. अतिशय दुर्गंधी-घाण. [अष्ट + घ्राण]. ॰ताल- झंपाताल पहा. ॰दल-ळ-वि. आठ पाकळ्यांचें; आठ पानांचें; अष्टकोनी; अष्टभुज. -न. १ कमळाच्या आकाराची काढलेली आठ पाकळ्यांची किंवा भागांची आकृति. 'गर्भे रचिली उदंडें । अष्टदळें । -ऋ ७३. २ एक प्रकारची रांगोळी. ३ (ना.) ताम्हण; संध्या- पात्रा; 'एक अष्टदळ आणवा.' ॰दानें-न. अव. आमान्न, उद- कुंभ, भूमि, गोदान, शय्या, वस्त्र, छत्र, आसन हीं आठ वस्तूंचीं दानें और्ध्वदेहिकांत द्यावयाचीं असतात. ॰दिक्पाल-पु. अंत- रिक्षाच्या आठ दिशा पालन करणार्‍या देवता. जसें-पूर्वेंचा इंद्र, आग्नेयीचा अग्नि, दक्षिणेचा यम, नैऋत्येचा नैऋत, पश्चिमेचा वरुण, वायव्येचा मारुत, उत्तरेचा कुबेर (सोम), ईशान्येचा ईश; अष्ट- दिग्पाल. 'इयेवरी सप्तसागर । मध्यें मेरु महाथोर । अष्टदिग्पाळ तो परिवार । अंतरें वेष्टित राहिले ।।' -दा ४.१०.१. ॰दिग्गज- -पु. ऐरावत, पुंडरीक वामन, कुमुद, अंजन, पुष्पदंत, सार्वभौम, सुम- तीक असे अष्ट दिशांस पृथ्वीचे आधारभूत आठ हत्ती आहेत. [सं.] ॰दिशा-स्त्री. आठ दिशा; दिक्चक्राचे आठ भाग-पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋ/?/त्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य. ॰देह- पु. देहाचे आठ प्रकार-पहिले चार पिंडीं व पुढील चार ब्रम्हांडीं. 'स्थूल, सूक्ष्म, कारण । महाकारण, विराट, हिरण्य । अव्याकृत, मूलप्रकृति जाण । ऐसे अष्ट देह ।' -दा ८.७.४०. ॰धा-वि आठ प्रकारचे; 'भूतें गुण मेळविजे । त्यासी अष्टधा बोलिजे ।' [सं.] ॰धामूर्ति- स्त्री. आठ प्रकारच्या मूर्ती. 'शैली दारुमयी लौही लेप्या लेख्याच सैकती । मनोमयी मणीमयी प्रतिभा अष्टधा स्मृता ।।' -एभा २७.९८-१०३; 'शैली, दारुमयी, लेप्या, लेख्या, सैकती अथवा सूर्यमंडळीं, जळीं, स्थळीं, अष्टमूर्तिस्वरूप श्रीहरीसी पूजावें ।' -अमृतध्रृव ६. अष्टमूर्ति पहा. ॰(देह)प्रकृति-स्त्री. पृथ्वी, पाणी, अग्नि, वायु, आकाश मन, बुद्धि आणि अहंकार मिळून आठ प्रकारे विभागलेली.... प्रकृति.' - गीर ७१५. ॰(विध)प्रकृति-असाहि वाक्प्रचार आहे. सत्व, रज, तम, व मूळ पांच तत्त्वें मिळून आठ प्रकारची प्रकृति. 'पंच भूतें आणि त्रिगुण । ऐसी अष्टधा प्रकृति जाण ।' -दा ६.२.१४. ॰धातू-पु. सोनें, रुपें, तांबें, कथील, शिसें, पितळ, लोखंड, तिखें (पोलाद). कोणी पोलादाच्या ऐवजी पारा धर- तात. 'अष्टधातु सायासें । जेवि विधिजेति स्पर्शें ।' -ऋ २०. ॰धार-वि. आठ धारा असलेलें. 'तंव तेणें साधकें एक अष्टधार आड धरिलें ।' -कृमुरा २२.९६. ॰नायका-नाईका-स्त्री. १ अव. श्रीकृष्णाच्या आठ आवडत्या पत्न्या-रुक्मिणी, सत्यभामा, जांबवंती, कालिंदी (सूर्यकन्या), मित्रवृंदा (अवंतिराजसुता), याज्ञजिती (यज्ञजितकन्या), भद्रा (कैकेयनृपकन्या), लक्ष्मणा (महेंद्रनाथकन्या). २ इंद्राच्या आठ नायका-उर्वशी, मेनका, रंभा, पूर्वचिती, स्वयंप्रभा, भिन्नकेशी, जनवल्लभा, घृताची (तिलोत्तमा). 'अष्टनायिका येऊनि । सर्वा घरीं नृत्य करिती ।' -ह २६.२२८. ३ (साहित्य) वासकसज्जा, विरहोत्कंठिता, स्वाधीनभर्तृका, कल- हातांरिता, खंडिता, विप्रलब्धा, प्रोषितभर्तृका, अभिसारिका. ॰नाग- पु. आठ जातीचे सर्प-अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक, शंख, कुलिक, पद्म, महापद्म. ॰पत्री-वि. १ कोणत्याही विशिष्ट आका- राच्या (क्राऊन, डेमी) छापावयाच्या कागदाचीं आठ पृष्ठें होतील अशा तर्‍हेनें घडी पडणारें छापलेलें (पुस्तक) (इं.) ऑक्टेव्हो. 'पांच पांचशें पानांचे अष्टपत्री सांचाचें एक एक पुस्तक.' ॰पद- पु. १ कोळी वर्गांतील प्राणी-गोचीड, सूतकिडे, विंचू, कातीण वगैरे. (इं.) अर्कनिडा. २ आठ पायांचा काल्पनिक प्राणी. ॰पदरी-वि. आठ पदरांचा (शेला), आठसरांची (माळ), आठ पेडांची, धाग्यांची (दोरी) [सं. अष्ट + पल्लव] ॰पदी स्त्री. १ आठ पदांचा समुदाय. २ आठ चरणांचें एक कवन; कविताप्रकार. ॰पाकूळ न. (लुप्त). आठ पाकळ्यांचें फूल. ॰पाद-अष्टपद पहा. ॰पुत्ना-वि. आठ पुत्र आहेत जिला अशी (स्त्री). सौभाग्यवती स्त्रीला असा आशीर्वाद देतात. ॰पुत्री-स्त्री. विवाहामध्यें वधूला, काठाला हळद लावून नेसावयास दिलेलें शुभ्र वस्त्र. तिला पुष्कळ अपत्यें व्हावींत या इच्छेचें द्योतक. 'फेडिलें मायेचें वधूवस्त्र । अष्टपुत्र्या पीतांबर । नेसली कृष्णमय स्वतंत्र । तेणें सुंदर शोभली ।' -एरुस्व १६.१५. ॰म्ह-अष्टपुत्री मेहुणीकुत्री. ॰पैलू वि. १ ज्याला आठ पैलू (बाजू) आहेत असा (हिरा, रत्न). २ (ल.) हुषार; कलाभिज्ञ; व्यवहारचतुर (इसम). ॰पैलू माळ- (गोफ) स्त्री.घोड्याच्या गळ्यांतील दागिना; आठ पैलू असलेल्या मण्यांची माळ किंवा आठ पदर असलेली माळ. ॰प्रकृति, ॰विधप्रकृति अष्टधाप्रकृति पहा. ॰प्रधान- पु. राज्यकारभारांतील आठ प्रधान-प्रधान, अमात्य, सचीव, मंत्री, डबीर, न्यायाधीश, न्यायशास्त्री, सेनापति. अष्टप्रधानांची पद्धत शिवाजीनें सुरू केली. कांहीं जण वैद्य, उपाध्याय, सचीव, मंत्री, प्रतिनिधी, राजाज्ञा, प्रधान, अमात्य हे आठ मंत्री समजतात 'प्रधान अमात्य सचीव मंत्री । डबीर न्यायाधिश न्यायशास्त्री ।। सेनापती त्यांत असे सुजाणा । अष्टप्रधानीं नृप मुख्य जाणा ।।' हा श्लोक रूढ आहे. ॰फली-ळी,॰फळ-फल- स्त्रीन. अटोफळी पहा. ॰भार पु. ८००० तोळ्यांचा एक भार. असे आठ भार. 'नित्य प्रसवे अष्टभार सुवर्ण । सूर्यासम प्रभा परिपूर्ण ।' -ह २५. १५. ॰भाव पु. अव. (साहित्य.) शरीराचे सत्त्वगुणाचे आठ भाव, प्रकार-स्तंभ, स्वेद, रोमांच, स्वरभंग किंवा वैस्वर्य, कंप किंवा वेपथु, वैवर्ण्य, अश्रुपात, प्रलय. पर्याय-कंप, रोमांच, स्फुरण, प्रेमाश्रु, स्वेद, हास्य, लास्य, गायन. -हंको. 'आठवीया दिवशीं नाश अष्टभावा । अद्वयानुभवासुखें राहे ।।' -ब ११०. 'अष्ट- भावें होऊनि सद्गद । आनंदमय जाहला ।' ॰भैरव पु. भैरव ही शिवगणांतील स्वतंत्र देवता असून तिचीं पुढील आठ स्वरूपें आहेत-असितांग, संहार, रुरु, काल, क्रोध, ताम्रचूड, चंद्रचूड, महा. यांतील कांहीं नांवांऐवजीं कपाल, रुद्र, भीषण, उन्मत्त, कुपति इत्यादि नांवें योजिलेलीं आढळतात. ॰भोग पु. आठ प्रकारचे भोगः- अन्न, उदक, तांबूल, पुष्प, चंदन, वसन, शय्या, अलंकार. ॰म वि. आठवा.-स्त्री. अष्टमा. ॰मंगल वि. (विरू) अष्टमंगळ. १ ज्याचें तोंड, शेपूट, आयाळ, छाती व चार खूर शुभ्र आहेत असा; कित्येकांच्या मतें ज्याचे पाय, शेपूट, छाती व वृषण शुभ्र आहेत व जो कटीप्रदेशीं भोवर्‍यांनीं युक्त (नावांकित) असून ज्याच्या कपाळावर कमलाकृति केसांचें वेटोळें असतें असा (घोडा). २ (सामा.) आठ शुभलक्षणांनीं युक्त असा (घोडा). -न. पुढील आठ मंगल वस्तूंचा समुदाय-ब्राम्हण, अग्नि, गाय, सुवर्ण, घृत, सूर्य, व राजा. कांहींच्या मतें सिंह, वृषभ, गज, पूर्णोदककुंभ, व्यजन, निशाण, वाद्यें व दीप (राज्याभिषेकाच्या समयीं या अष्ट मंगलकारक वस्तू लागतात). ॰मंगलघृत न. वेखंड, कोष्ट, ब्राह्मी, मोहऱ्या, उपळसरी, सेंधेलोण, पिंपळी व तूप या औषधांच्या मिश्रणानें विधियुक्त बनविलेलें तूप. हें बुद्धिवर्धक आहे. -योर २.६७०. ॰महारोग पु. आठ मोठे रोग-वातव्याधि, अश्मरी, कृछ्र (किंवा कुष्ठ), मेह, उदर, भगंदर, अर्श (मूळव्याध), संग्रहणी. महारोग पहा. ॰महासिद्धी- १ अणिमा = शरीर अत्यंत सूक्ष्म होणें; २ महिमा = शरीर मोठें होणें; ३ लघिमा = शरीर वजनांत हलकें होणें; ४ प्राप्ति = सर्व प्राण्यांच्या इंद्रियांशीं त्या त्या इंद्रि- यांच्या अधिष्टात्री देवतांच्या रूपानें संबंध घडणें; ५ प्राकाश्य = ऐकून ठाऊक असलेल्या व स्वर्गादि पारलौकिक स्थानीं, व दिसण्याजोगे इहलोकच्या स्थानीं भोग व दर्शनाचें सामर्थ्य येणें; ६ ईशिता = शक्तीची, मायेची व तिच्या अंशाची ईशाच्या ठिकाणीं व इत- रांच्या ठिकाणीं असणारी प्रेरणा; ७ वशिता = विषय भोगीत असूनहि त्यांच्या ठिकाणीं आसक्त न होणें; ८ प्राकाम्य = ज्या ज्या सुखाची इच्छा करावी तें तें सुख अमर्याद प्राप्त होणें. -एभा १५.४२. ते ४७. ॰मर्यादागिरी- पु. आठ मोठे पर्वत-हिमालय, हेमकूट, निषध, गंधमादन, नील, श्वेत, शृंगवान व माल्यवान. हे जंबुद्रीपांत असून ते त्यांतील नऊ वर्षी (भागां)च्या मर्यादा आहेत. ॰मांगल्य- न. त्रैवर्णिकांचा एक संस्कार. अठांगुळें पहा. ॰मातृका स्त्री. आठ ईश्वरी शक्ती-ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इद्रांणी, कौबेरी, चामुंडा. सामान्यतः कौबेरी सोडून या सात असतात. विवाहादि मंगलप्रसंगीं यांची पूजा करतात. 'वेगे आल्या अष्ट मातृका । एकी चढिन्नली वृश्चिका । वाराही ते सूकरमुखा । वर्‍हाड देखा निघालें ।।' -एरुस्व १४.५८. ॰मांश पु. १ आठवा अंश; भाग. २ (वैद्यक) ज्वर नाहींसा होण्यासाठीं आठभाग पाण्याचे सात भाग आटवून एक अंश उरवितात तो काढा. ॰मी- स्त्री. चांद्रमासांतील प्रतिपदेपासून आठवी तिथी; या महिन्यांतून दोन येतात-शुद्ध व वद्य. ॰मूर्ति स्त्री. पृथ्वी, जल, तेज, वायु, आकाश, सूर्य, चंद्र व ऋत्विज् या परमेश्वराच्या आठ मूर्ती; शंकर; महादेव; अष्टधामूर्ति पहा. ॰योगिनी स्त्री. अव. आठ योगिनी; पार्वतीच्या सख्या; या शुभाशुभ फल देणाऱ्या आहेत-मंगला, पिंगला, धन्या, भ्रामरी, भद्रिका, उल्का, सिध्दा, संकटा. दुसरा पाठ-मार्जनी, कर्पुरा तिलका, मलयगंधिनी, कौमुदिका, भेरुंडा, माताली, नायकी, जया (शुभाचारा). यांत कधीं कधीं सुलक्षणा, सुनंदा हींहि नांवें आढळतात. ॰वक्र अष्टावक्र पहा. ॰वर्ग पु. १ आठ औष- धींचा समुदाय-ऋषभ, जीवक; मेद, महामेद, ऋध्दि, वृध्दि, काकोली, क्षीरकाकोली. २ मौंजीबंधनांत मातृभोजनांत भोजनाच्या वेळीं आठ मुंज्या मुलांना भोजनास बोलावितात तें कर्म ॰वर्ग्य- र्ग्या- पु. अष्टवर्गास जेवणारा बटु; उपनयनाच्या दिवशीं मातृ- भोजनाच्या वेळीं आठ बटू भोजनास बोलावितात ते प्रत्येक. ॰वर्षा- वि. आठ वर्षें वयाची (कुमारिका); (त्यावरून लग्नाला योग्य झालेली) उपवर. ॰वसु- पु. अव. प्रतीमन्वंतरांतील आठ वसू. चालू मन्वंतरांतील धर्मऋषि व दक्षकन्या वसु यांचे पुत्र-धर, ध्रुव, सोम, आप, अनिल, अनल, प्रत्यूष, प्रभास. भागवतांत द्रोण, प्राण, ध्रुव, अर्क, अग्नि, दोष, वसु, विभावसु अशीं नांवें आढळतात. 'इंद्र चंद्र वरुण कुबेर । अष्टवसु गंधर्वकिन्नर ।' -ह २५.१४१ ॰वायन- न. आठ वस्तूंचें दान; हळकुंड, सुपारी, दक्षिणा, खण, सूप, कंठण, धान्य, कांचमणी, या आठ पदार्थांचें वायन (वाण) सौभाग्यसंपादनार्थ लग्नांत आठ ब्राह्मणांपैकीं प्रत्येकाला वधूकडून दिलें जातें. ॰विध समाधि- स्त्री. समाधियोगाचे आठ प्रकार-यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधि. ॰विधा शृंगारनायका- (साहित्य) अष्टनायका पहा. ॰विना- यक- पु. अव. गणतीचीं आठ स्थानें-१ मोरेश्वर गणनाथ, (जेजुरी नजीक मोरगांव जिल्हा पुणें). २ बल्लाळेश्वर (मूळ मुरुड हल्लीं पाली, खोपवली नजीक-जिल्हा कुलाबा). ३ विनायक (कर्जत नजीक मढ-जिल्हा कुलाबा). ४ चिंतामणी (लोणी नजीक थेऊर- जिल्हा पुणें). ५ गिरिजात्मक (जुन्नर नजीक लेण्याद्रि-जिल्हा पुणें). ६ विघ्नेश्वर (जुन्नरनजीक ओझर-जिल्हा पुणें). ७ गणपति (नगर सडकेवर रांजणगांव-जिल्हा पुणें). ८ गजमुख (दौंड नजीक सिध्द- टेक-जिल्हानगर). ॰विवाह- पु. विवाहाचे आठ प्रकार-१ ब्रह्म = सालंकृतकन्यादान; २ गंधर्व = उभयतांच्या अनुमतीनें; ३ राक्षस = जब- रीनें कन्या हरण करून; ४ दैव = यज्ञप्रसंगीं ॠत्विजास कन्यादान करून; ५ आर्ष = गाय, बैल घेऊन कन्यार्पण; ६ प्राजापत्य = धर्माचरणार्थ कन्यापर्ण; ७ असुर = शुक्ल घेऊन; ८ पैशाच = कन्या चोरून आणून पत्नी करणें. सविस्तर माहिती धर्मसिंधु परिच्छेद ३ पूर्वार्ध पहा. ॰सात्विक भाव- अष्टभाव पहा. ॰सावध- वि. पुष्कळ गोष्टींकडे एकदम लक्ष पुरविणारा-देणारा; अष्टवधानी. ॰सिद्धि- अष्टमहा सिद्धि पहा. 'अष्ट सिद्धि चामरें घेऊनी । वरी वारिती अनुदिनीं ।' -ह १.१५. ॰सृष्टी- स्त्री. काल्पनिक, शाब्दिक, प्रत्येक्षा, चित्र- लेपा, स्वप्नी (स्वप्नसृष्टि), गंधर्वा, ज्वरिका (ज्वरसृष्टी), दृष्टी- बंधना. दा- ६.६.५१. [सं.]. ॰क्षार- पु. पळस, निवडुंग, सज्जी, आघाडा, रुई, तीळ, जव व टांकणखार.

दाते शब्दकोश