मराठी बृहद्कोश

नऊ मराठी शब्दकोशांमधील २,६२,७३६ शब्दांचा एकत्रित संग्रह

शब्दार्थ

नियोग

नियोग m Appointment. A command, mandate.

वझे शब्दकोश

नियोग niyōga m S Appointment or assignation; ordering or authorizing; putting or setting to. 2 A command, mandate, direction, bidding.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. १ नेमणूक अथवा योजना; आज्ञा देणें अथवा अधिकार देणें; योजणें; व्यवस्थित लावणें. २ आज्ञा; हुकूम; आदेश; शासन. ३ प्राचीनकाळीं वंश खुंटू नये म्हणून स्त्रीच्या ठिकाणीं करविलेली प्रजोत्पत्ति; निपुत्रिक विधवेला अपत्योत्पा- दनार्थ दिलेली शास्त्राज्ञा. दीर किंवा नवऱ्याचा कोणी आप्त याच्या- कडून पुत्रप्राप्ति करून घेण्याची पूर्वीं शास्त्रानें सवलत ठेवलेली असे. नियोगणें-सक्रि. काम सांगणें; आज्ञा करणें. 'मज म्या नियो- गावें स्वामिसेवकत्वें ।' -एभा ३.७५. नियोगी-वि. १ नियामक पहा. २ युक्त; योग्य अधिकारी. 'तेथ सत्त्वें आपल्या आंगीं समीननिमीन भागीं । दोघे केले नियोगी । ब्राह्मण क्षत्रिय ।' -ज्ञा १८.८२८.

दाते शब्दकोश

नियोग      

पु.       १. नेमणूक; योजना; अधिकार; व्यवस्था. २.आज्ञा; हुकूम; आदेश; शासन. ३. प्राचीन काळी वंश खुंटू नये म्हणून पती जिवंत नसल्यास अगर तो पुत्रोत्पत्तीला समर्थ नसल्यास स्त्रीला दीर किंवा त्याच गोत्रातील इतर पुरुषाकडून पुत्रप्राप्ती करून घेण्याची शास्त्राने दिलेली सवलत, आज्ञा. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

कलिवर्ज, कलिवर्ज्य      

वि.       जे करायला कलियुगात मनाई आहे असे : ‘नियोग कलिवर्ज असला तरी…’ - केतका ८७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नियुक्त

वि. १ नेमलेला; ठरलेला; योजिलेला; अधिकृत. २ ज्यास पुत्रोत्पादनाविषयीं गुरूचा नियोग झाला आहे तो. -मिता- क्षरा [सं.]

दाते शब्दकोश

नियुक्त      

वि.       १. नेमलेला; ठरवलेला; योजलेला; अधिकृत. २. ज्यास पुत्रोत्पादनाविषयीं गुरूचा नियोग (आज्ञा) झाला आहे तो. – मिताक्षरा. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)