मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

निरर्थक

निरर्थक nirarthaka a (S) sometimes निरर्थ a Devoid of meaning or sense--a word. 2 Wanting profit or advantage--labor. 3 Vain, empty, unavailing. 4 Uncalled for, unnecessary.

मोल्सवर्थ शब्दकोश

निरर्थक a निरर्थ a Devoid of — word. Wanting profit or — labour. Vain, empty. Uncalled for.

वझे शब्दकोश

(सं) वि० व्यर्थ, उगाच, निरुपयोगी.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

निरर्थक

व्यर्थ, फुकट, बेकार, मढ्याला शृंगार, पारशाला विडी आणि शिखाला वस्तरा देण्याप्रमाणे ,बाभळीच्या रानामध्ये आम्रफळ शोधण्याचा मामला, आंधळ्याला आरसा व षंढाला रमणी.

शब्दकौमुदी

निरर्थक      

वि.       १. अर्थशून्य (शब्द, प्रयोग इ.). २. ज्यात नफा, फायदा नाही असा (धंदा, श्रम). ३. फुकट; निष्फळ; पोकळ. ४. अनावश्यक; निरुपयोगी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निरर्थक, निरर्थ

वि. १ अर्थशून्य (शब्द, प्रयोग इ॰). २ ज्यांत नफा, फायदा नाहीं असा (धंदा, श्रम). ३ फुकट; निष्फळ; पोकळ. ४ अनावश्यक; निरुपयोगी. -क्रिवि. उपयोगा- वांचून; विनाकारण. (क्रि॰ मारणें; बोलणें). [सं. निर् + अर्थ + क]

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

वाय

क्रिवि. (वायां-वाव) व्यर्थ; निरर्थक; निष्फळ; मिथ्या.' ते वेळीं तुझा आक्षेप वाय ।' -विपू ७.७; ३.४०; -ज्ञा १५.३२७; १७.१९७. [सं. वि + अय्] ॰आभाळ-न. पोकळ अभ्र; बिन पावसाचें मळभ, ढग. ॰करणी-वि. व्यर्थ; निष्फळ; पोकळ. 'कासया होसी घामाघूम । वायकरणी बैदा हा ।' -अफला १४. ॰कळ-वि. १ शुष्क; पोकळ; निरर्थक; कुच- कामाचें (भाषण, कृत्य). २ अनिर्बंध; बेफायदा; स्वैर. ॰कांड-पु. निष्फळ बाण. 'काय पिनाकपाणीचिया भाता । वायकांडीं आंहाती ।' -ज्ञा ११.२०७. ॰धळ-वि. वायकळ पहा. ॰पट- वट-वि. व्यर्थ; मिथ्या. 'तैसा आत्मा भूंजे वायवटु । संसारू हा ।' -भाए ५९९. ॰फट-वि. १ निष्फळ; निरर्थक; बालिश; पोकळ (बोलणें, बोलणारा). २ स्वैर; स्वच्छंदी; हट्टी; तऱ्हेवाईक; लहरी; हूड; उनाड. (मूल वगैरे). ३ क्षुद्र; फुकट; क्षुल्लक; बेफायदा (काम). ॰फली-फूल-वि. फळें, फुलें न येणारें, वांझ (झाड, रोप). ॰फळ-वि. पोकळ; फोल; अर्थशून्य; रिकामें; वावगें (बोलणें). 'या वायफळ गप्पांत कांहीं अर्थ नाहीं.' -टिले ४. १९. [वायु + फल] ॰फूल-न. वांझ मोहोर; फळ न धरणारें फूल. 'अष्टलोकपालांसहित । स्वर्गसुखें वायफुलें समस्त ।' -ह २२.६. ॰बार-पु. वांझा, फुसका बार; गोळा न घालतां नुसती दारू भरून उडविलेला बंदुकीचा बार. वायबारचें काडतूस- न. बिन गोळीचें, नुसत्या दारूचें काडतूस. ॰बुंथी-स्त्री. बुरखा; भ्रामक आवरण. 'तरी नामाची वायबुंथी । सांडीचि ना ।' -अमृ २.३२. ॰बुद्धि-स्त्री. चुकीची, व्यर्थ, भ्रामक समजूत. 'मा येती न येती हे कायसी । वायबुद्धि ।' -ज्ञा १५.३२७. वायवाय- क्रिवि. व्यर्थ; निष्फळ; वायां. 'ऐकुनि मोकलुनि धाय रुदन करीत वायवाय ।' -अमृत, ध्रुवचरित्र ३. वायां, वायां-विक्रिवि. व्यर्थ; पोकळ; निष्फळ; मिथ्या; फुकट; निरर्थक. 'वेंचून वायां वय सर्व गेलें ।' -सारुह १.१८. -ज्ञा २.१४०. [सं. वि + अय्] वायाणी-णें-वि. व्यर्थ; मिथ्या; लटकें. 'तैसे सर्व कमीं असणें । तें फुडे मानूनि वायाणें ।' -ज्ञा ४.९८. वायांविण-वि. व्यर्थ; निष्फळ; निष्कारण. 'तोंडे पाप घेती कांइसें । वायांविण ।' -शिशु २१६.

दाते शब्दकोश

पोकळ

वि. १ भरीव नव्हे तो. २ (ल.) रिकामा; शून्य; फुसका; ढिला; सैल; वरकरणी; अर्थहीन; फोल (वचन); निरर्थक; व्यर्थ (भाषण); बिन फायद्याचा; फोल (धंदा, उद्योग); हलका; सोपा; क्षुद्र (नकाराच्या निषेधार्थी योजतात). 'हें काम कांहीं पोकळ नाहीं !' ३ अनिश्चित; अनिर्णीत; पुरा न केलेला (हिशोब, बाब); मोघम; पुळपुळीत (भाषण). [सं. पुष्कर; हिं. पोला; गु. पोलु] ॰खर्च-पु. हिशोबांतील खर्चाची कल्पित, बनावट, खोटी बाब. ॰जमा-स्त्री. जमेची कल्पित बाब. ॰जमाखर्च-पु. जमेचा व खर्चाचा (न मिटलेला) तसाच पडलेला हिशेब. ॰जमीन- स्त्री. भुसभुशीत जमीन. ॰धोत्र्या-भट-पु. (निंदार्थी) विद्या, धन, बुद्धि या विरहित ब्राह्मण; नुसता धोतरबडव्या मनुष्य. ॰ब्रह्म- न. (ल.) दिखाऊ, पोकळ काम, भाषण, बाब इ॰ ॰सूत्री-वि. नेभळट; गबाळ्या; अव्यवस्थित (मनुष्य). पोकळापोकळ- ळी-वि. पोकळ; (ल.) वरकरणी; निरर्थक; निष्फल; निर्जीव; निकस; रिकामा; लभ्यांश नसलेला. [पोकळ द्वि.] पोकळि(ळी) स्त-वि. १ अनिश्चित; अनिर्णीत; दिखाऊ; हिशेंबांत न धरलेला (जमाखर्च). २ मोघम; निरर्थक; संदिग्ध (भाषण). पोकळी-स्त्री. १पोकळपणा. २ पोकळ जागा; अवकाश; ढिलेपणा. पोकळीस, पोकळाखालीं जाणें-फुकट, व्यर्थ, निष्फळ होणें (एखादी गोष्ट साधण्याचे प्रयन्त). पोकळी (पोळकी)-स्त्री. कागदाची नळी (बाण, काडतुसें ठेवण्याकरितां) पोकळीक-स्त्री. पोकळ- पणा; रितेपणा; व्यर्थपणा.

दाते शब्दकोश

कोरडा

वि. १ अनार्द्र; शुष्क; जलहरित; आर्द्रताविरहित. 'ते रेड भरतही तसा रडे जोंवरी नयन होति कोरडे ।' -वामनभरत भाव १६. म्ह॰ कोरड्याबरोबर ओलेंहि जळतें = अपराध्याबरोबर निरपराधी गरीबहि चिरडला जातो. २ नुसतें; कोरड्यास बरोबर कांहीं नसलेलें; दूध, दहीं, वगैरे पातळ पदार्थांचें कालवण नस- लेलें (अन्न). ३ नक्त (जेवणाशिवाय मजूरी); उक्ते. 'मला कोरडे तीन रुपये मिळतात.' ४ (लक्षणेनें निरनिराळ्या ठिकाणीं हा शब्द योजतात. -जसे) औपचारिक; शुष्क; पोकळ; वर- कांती; निष्फळ; बिनहंशिलाचा; बिनफायद्याचा; निरर्थक; ओला (विशेषतः ओलाव्याचा) याच्या उलट. 'किं वेदांतज्ञाना- वांचून । कोरडी व्यर्थ मतिशून्य।' 'बारा वर्षें पढत होतों परंतु कोरडा.' कोरडा-आदर, मान, प्रतिष्ठा-ममता-बोलणें-व्यवहार -श्रम इ॰ पहा. ५ व्यर्थ, फुकट. 'हिंडणवारा कोरडा । तैसा जया' ज्ञा १३.६८९. 'कांहीं लाभावाचून कोरडी खटपट कोण करतो.' ६ (ल.) वांझ. म्ह॰ 'कोरड्या अंगीं तिडका, बोडक्या डोईं लिखा.' सामाशब्द- ॰अधिकार-पु. १ नुसता पोकळ, नांवाचा अधिकार. २ बिनपगारी अम्मल, हुद्दा; बिनावेतन काम. ॰अभि- मान-पु. पोकळ मिजास; रिकामा डौल; अज्ञानी अहंकार. ॰आग्रह-पु. वरवरचें आमंत्रण; इच्छा नसतांनां बाह्यात्कारें बोला- वणें. पैठणी आग्रह. ॰आदर-पु. औपचारिक सन्मान. मनांत कांहीं पूज्यभाव नसतां बाह्यात्कारें केलेला गौरव. (विवाहादि समारंभांत) शाब्दिक सन्मान. ॰खडक-पु. १ अतिशय कठिण, टणक खडक. खडक पहा. २ (ल.) अडाणी. ३ कोरडा पाषाण पहा. ॰टांक-वि. (अतिशयितता व्यक्त करण्यासाठीं) अतिशय शुष्क, कोरडी (नदी, विहीर, तलाव वगैरे). [कोरडा + टांक = बिंदु, कण] ॰डौल-पु. रिकामा दिमाख; खोटा बडिबार, मोठेपणा. ॰दरमहा-पगार-मुशारा-पु. नक्त वेतन (जेवणाशिवाय) ॰द्वेष-पु. विनाकारण मत्सर. ॰धंदा-पु. आंत बट्याचा, बिन नफ्याचा उद्योग. ॰पाषाण-पु. १ कठीण, ठणठणीत दगड. २ (ल.) उपदेशाप्रमाणें आचरण न करणारा असा माणूस; चांगल्या गोष्टीचा परिणाम न झालेला माणूस. म्ह॰ लोकां सांगे ब्रह्मज्ञान । आपण कोरडा पाषाण. ॰ब्रह्मज्ञानी-वि. भोंदू; ढोंगी. स्वतः ब्रह्मज्ञानाचा अनुभव नसलेला पण लोकांना त्याचा उपदेश करणारा मनुष्य. ॰मान-पु. पोकळ, रिकामा, काम न करतां मिळणारा, दिलेला मान; कोरडा-आदर पहा. ॰विचार-पु. १ निष्फळ, निरर्थक चौकशी शोध. २ निष्क्रिय बडबड, विचार. ॰विश्वास-पु. वरवरचा विश्वास. ॰व्यवहार- पु. १ कोरडा धंदा पहा. २ रिकामा, निष्कारण उद्योग. ॰सत्कार- पु. १ पोकळ, वरवर सन्मान. २ गैरफायद्याचा मानमरातब; निर- र्थक बडेजाव. ॰सा-वि. वाळल्याप्रमाणें; शुष्कप्राय. ॰स्नेह-पु. वरवरची प्रीति; पोकळ मैत्री. कोरडेकष्ट ॰श्रम-पु. (अव.) विनाफायदा, निरर्थक श्रम; व्यर्थ मेहनत. कोरड्या टांकाचा हिशेब-हिशोब-हिसाब-पु. ज्यांत यत्किंचितहि फेरबदल करण्यासाठीं लेखणीचा टांक शाईंत बुडविला गेला नाहीं असा स्वच्छ, शुद्ध, बिनचुक लिहिलेला जमाखर्च, तक्ता; चोख हिशेब. (क्रि॰ देणें; करणें) ॰कोरड्यास-ला, कोरडेशास-ला, कोरड्याशास-ला-क्रिवि. (कोरडा-याचें विभक्तीरूप) भाकर इत्यादि कोरडी खाववत नाहीं म्हणून त्याबरोबर धेण्या. करितां (तूप, वरण वगैरे पातळ कालवण); तोंडी लावण्यास (गो.) कोरड्याक, -न. कालवण; तोंडीलावणें. 'आज कोरड्याशास काय केलें ? -कढी केली, भाजी केली.' कोरडी-वि. शुष्क; वाळलेली; कोरडा पहा. सामाशब्द- ॰आग-स्त्री. भयंकर मोठी आग. याचे उलट, ओली आग = अतिवृष्टीनें होणारें नुकसान. म्ह॰ कोरडी आग पुरवते पण ओली आग पुरवत नाहीं. = पाठीवर मारलेलें चालतें पण उपासमार झालेली सोसवत नाहीं. ॰ओकारी-स्त्री. १ घशांत बोटें घालून मुद्दाम काढलेली ओकारी. सकाळीं तोंड धुतांना घशांत बोटें घालून काढलेले खाकारे. (क्रि॰ देणें; काढणें). २ ओकारी येतेसें वाटणें. (क्रि॰ येणें). पोटांत ढवळल्याप्रमाणें होऊन मळमळ सुटते आणि थुंकी पडते, हृदयांत पीडा होते, ओकारी येते परंतु अन्न पडत नाहीं, अशा वेळीं म्हणतात. -योर १.२७७. ॰सवाशीण-स्त्री. जेवणाखेरीज ओटी भरून कुंकू लावून जिची बोळवण करतात अशी सवाशीण. ब्राह्मणेतरांच्या घरीं अशी ब्राह्मण सवाशीण बोलावितात. ॰किटाळ-स्त्री. १ (शब्दशः) कोरडी ठिणगी. २ (ल.) तोहंमत; आळ. (क्रि॰ घालणें; उठवणें; घेणें). ॰किरकिर-स्त्री. विनाकारण कटकट, तक्रार, पिरपीर, भुणभुण; निष्कारण त्रास. ॰खाकरी-स्त्री. कोरडी ओकारी पहा. (क्रि॰ देणें, काढणें) [खाकरणें] ॰चाकरी-स्त्री. १ वेतन, मजुरी घेतल्याशिवाय चाकरी; निर्वेतन सेवा. २ रोख पैसा घेऊन जेव- णाशिवाय चाकरी; कोरडा दरमहा. ॰जांभई-जांभळी-स्त्री. श्रमामुळें आलेली (झोंपेमुळें नव्हे) जांभई. ॰दारू-स्त्री. वाय. बाराची दारू; वायबार. ॰प्रतिष्ठा-स्त्री. औपचारिक मानसन्मान. हातीं पैसा नसतां अगर अंगांत कर्तबगारी नसतां मिरवलेला डौल. कोरडा मान पहा. ॰भिक्षा-स्त्री. तांदूळ, गहूं, वगैरे धान्याची भिक्षा (शिजविलेलें अन्न, माधुकरी शिवाय). ॰ममता-माया- स्त्री. वरकांती दाखविलेलें प्रेम; लोकाचारास्तव दाखविलेला सभ्यपणा. ॰मेजवानी-स्त्री. अन्नाशिवाय मेवामिठाईंची आणि फळफळावळीची मेजवानी; उपहार. ॰मैत्री-स्त्री. वरवरचें प्रेम; अंतःकरणापासून प्रेमनाहीं अशी मैत्री. -ड्या गाथा-स्त्री. अव. बनावट बातम्या; भुमका; कंड्या. [कोरडी + गाथा] कोरडें-वि. वाळकें; निष्फळ; शुष्क. कोरडा-डी पहा. सामाशब्द- कोरडें खाणें-आवश्यक वस्तूंचा अभाव भासणें; आवश्यक म्हणून इच्छिणें त्यामुळें त्रास होणें (निषेधार्थीं रचना). 'मी काय त्यावांचून कोरडें खातों' = तें नाहीं म्हणून माझें नडतें कीं काय ? ॰अंग- न. वांझपणा; वांझ कूस. ॰काम-न. १ विटाळशेपणीं व पांचवे दिवशीं न्हाऊन शुद्ध होण्यापूर्वीं करावयाचें काम. 'चौथ्या दिवशीं बायका कोरडे काम करतात.' २ वेळ घालविण्याकरितां केलेलें सटरफटर काम. ॰तप-न. श्रद्धाहीन, भक्तिहीन तपश्चर्या, आरा- धना. 'जळो जळो त्याचा प्रताप । काय चाटावें कोरडें तप । जैसें विगतधवेचें स्वरूप । यौवन काय जाळावें ।' ॰बोलणें, भाषण-न. वरकांती, मनापासून नव्हे असें भाषण, बडबड. ॰ब्रह्मज्ञान-न. आचरण नसतां सांगितलेला वेदांत, परमार्थविद्या; बकध्यान; भोंदूपणा, ढोंग. ॰वैर-न. निराधार द्वेष, मत्सर. ॰वैराग्य-न. विषयाचा खरा तिटकारा आल्याखेरीज दाख- विली जाणारी पोकळ विरक्ति; साधूपणाचें ढोंग; निवृत्तिमार्गाची बतावणी. ॰सुख-न. उपभोगाशिवाय सुख; नांवाचा आनंद. कोरडया अंगीं तिडका-१ गर्भ नसतां बाळंतपणाच्या वेदना भासविणें. २ ढोंग; भोंदूपणा.

दाते शब्दकोश

बात

स्त्री. गप्प; निरर्थक गोष्ट; पोकळ बोलणें; थाप. [सं. वार्ता; हिं] म्ह॰ बातची बात व कुरापतची कुरापत. बाता उडविणें-झोंकणें-फेकणें-हाकणें-खोट्या बातम्या पसरविणें; कंड्या पिकविणें. बाता कुटणें-खबाळणें-छाटणें- मारणें-हाणणें-गप्पा मारणें; थापा मारणें; निरर्थक गोष्टी बोलत बसणें. ॰बात-बाता खबात्या-खबाल्या, खवाल्या, बात कुट्या, बातखोर, बाताड्या, बातेखपाल, बातेखानी- बातेफर्मास, बातोना, बात्या, बात्त्या(त्ये)रा-वि. गप्पा मारण्याची संवय असलेला; गप्पिष्ट; थापेबाज; गप्पादास; खोट्या बातम्या बनवून पसरविणारा; कंड्या उठविणारा. (गो.) बातयॉ; बातयो. ॰चित-स्त्री. संभाषण; गप्पागोष्टी. 'तुम्हासवें बातचित । कोण करील महाराजा ।' -नव १७.१४८.

दाते शब्दकोश

भाकड

वि. १ म्हातारपणामुळें दूध देत नसलेली, आट- लेली (गाय, म्हैस इ॰). 'कां चिखलीं रुतली गाये । धड भाकड न पाहे ।' -ज्ञा १६.१४२. २ (विऊन बरेच दिवस झाल्यानें) दूध देईनाशी झालेली (गाय; म्हैस इ॰). -एभा ११.५५६. ३ ज्या दिवशीं काहीं धार्मिक व्रत, विधि नाहींत असा (धोंड दिवस) ४ ज्यांत कांहीं फायदा होत नाहीं असा, निरर्थक (धंदा, जमीन, प्रयत्न इ॰). ५ निरर्थक; निःसत्व (अन्न इ॰). ॰कथा-स्त्री. १ एका कथेचें अनुसंधान चाललें असतां मध्यें निघणारी दुसरी कथा; आडकथा. २ रिकामटेकडें भाषण; बाष्कळ गप्पा; लांबलचक, नीरस, कंटाळवाणी हकीगत, गोष्ट इ॰ 'झाली ही सर्व भाकड- कथाच वाटतं! वाहवा!' -नाकु ३.८६.

दाते शब्दकोश

शब्ददोष

शब्ददोष śabdadōṣa m (S) A blemish or an imperfection in words or a word (not as inherent or essential, but as occurring); verbal fault or faultiness (in literary composition). Thirteen Verbal faults are enumerated; viz. श्रुतिकटु, च्युतसंस्कृति, अप्रयुक्त, अस- मर्थ, निहतार्थ, अनुचितार्थ, निरर्थक, अवाचक, अश्लील, (This term expresses the faults of जुगुप्सा, अमंगल, & व्रीडा,) संदिग्ध, अप्रतीत, ग्राम्य, नेयार्थ. These thirteen are taught in काव्यप्रकाश; in प्रतापरुद्र the enumeration is of seventeen; viz. अप्रयुक्त, अपुष्ट or अपुष्टार्थ, असमर्थ, निरर्थक, नेयार्थ, च्युतसंस्कार or च्युतसंस्कृति, संदिग्ध, अप्रयोजक, क्लिष्ट, गूढ or गूढार्थ, ग्राम्य, अन्यार्थ, अप्रतीतिक, अविमृष्टविधेयांश, विरुद्ध- मतिकृत, अश्लील (involving जुगुप्सा, अमंगल, & व्रीडा), परुष or श्रुतिकटु. These may be briefly rendered as:--अप्र0 Unestablished by good authority or approved use; अपु0 Foreign to the subject, irrelevant; अस0 Unsupported (in the sense intended--a sense conformable to the शक्ति or power of the word) by popular usage or acceptation; निर0 Lacking significance or import, unmeaning (e. g. च, हि, तू, खलु, ननु, or, in Prakrit, पैं, पां); ने0 Intelligible through understanding the conventional or the determined sign or token; च्युत0 Of violated grammar, ungrammatical; सं0 Ambiguous or equivocal; अप्र0 Superfluous or redundant; क्लिष्ट Hard of interpretation; गूढ Deep or occult (unnecessarily); ग्राम्य Rustic; अ0 Of which the obvious meaning is different from the meaning intended; अप्र0 Of which the verification (to be found in another Shástra) is lacking here; अवि0 Of which the predicate is made to bear upon a wrong clause or portion of the sentence; (see ex. in the English of Rom. vi. 17;) विरु0 Enforcing or causing an apprehension different from the sense sought to be conveyed; अ0 Coarse, rude, vulgar, obscene &c.; i. e. offensive to modesty or shame; reviling or abusive; nauseating, disgusting, or productive of the sense of the unpropitious, unkindly, or disagreeable; प0 Harsh, rough, grating, or thrilling to the ear. 2 Familiarly. Blame, impeachment, fault charged against, word. v ठेव, घाल, लाव, आण,, & ये, लाग. 3 The slur of a word or name; the fault or badness of a name having passed (upon a person, matter, or thing exempt from real blameworthiness). Ex. पतिव्रतेस व्यभिचारिणी म्हटली श0 तर येतो Cæsar's wife must be, not only blameless, but unblamed.

मोल्सवर्थ शब्दकोश

वाईट

वि. अनिष्ट; गुणरहित; अयोग्य; अशुभ. सामान्यतः चांगला याच्या उलट फार व्यापक अर्थानें वापरतात. [सं. वि + अय् + ट] ॰करणें-नाश, अहित करणें. वाइटावर असणें-द्वेष करणें; बरें न पाहणें. अहित चिंतणें. सामाशब्द- ॰बरा-वि. सामान्य; मध्यम; थोडा फार वाईट. ॰वांकडा-वि. अयोग्य; निरुपयोगी; निरर्थक; सर्वतः वाईट; सामान्यतः वाईटच. ॰वाणा- वि. थोडासा, साधारण वाईट. ॰विडूळ-वि. १ निरुपयोगी; कुचकामाचा; व्यर्थ. २ कुरूप; विद्रूप; वेडावांकडा. ॰साईट-वि. अपथ्यकर; निरर्थक; निरुपयोगी; सामान्यतः वाईटच.

दाते शब्दकोश

विफल-ळ

वि. निष्फळ; व्यर्थ; निरर्थक; फुकट. [सं. वि + फल] ॰ता-स्त्री. व्यर्थता; निरर्थकता. विफळणें-अक्रि. व्यर्थ करणें; निष्फळ करणें. 'परी विफळ ती आचरोनिया । नाटकी जैसे ।' -ज्ञा १६.३७३. विफळात-स्त्री. विफळता; व्यर्थता. -क्रिवि. व्यर्थ; फुकट; निरर्थक.

दाते शब्दकोश

आपला

सना. (आपण षष्ठी). १ स्वतःचा; मालकीचा; आपण या शब्दाप्रमाणें याचाहि प्रयोग तिन्ही पुरुषी, दोन्हीं वच- नांत करतात. आपण पहा. २ भ्रांतिष्ट किंवा अनिश्चयी मनुष्याच्या बोलण्यांत हा शब्द निरर्थक, वाक्यपूरणार्थक येतो. उ॰ मी आपला येथून उठलों; तो आपला त्याच्या घरीं गेला. 'काय मेलीं अली- कडचीं कार्टीं तरी !......लहान नाहीं, मोठं नाहीं, आपलं उठ घोडया पाणी पी!' -सुंदरची संक्रांत. आपला हा शब्द पुष्कळ वेळा सुशिक्षित लोकांकडूनहि आपण या अर्थीं वापरण्यांत येतो. जसें-आपल्यास किंवा आपल्याला = आपणांस. [आपण षष्ठी; सं. आत्मीय; प्रा. अपुल्ल; गु. आपणु] आपली वाढ- वून खाणें-आपमतलबीपणानें आपलेंच घोडें पुढें ढकलणें; आपल्या हिताकडेच पाहणें. -आपलीशी करणें- १ आपलें म्हणणें (पक्ष, मत) सिद्ध करणें, प्रस्थापित करणें; आपली सरशी करणें. २ वश करणें; ताब्यांत आणणें. 'प्रपंच वैरी मारावा । अथवा आपलासा ।' विपू. ७.१४४. ३ स्वतःच्या मना- प्रमाणें वागणें. आपला-आपलासा म्हणणें-समजणें-एखा- द्यास आत्मीय भावनेनें किंवा मित्रत्वाच्या भावनेनें वागविणें; मित्र समजणें. 'ज्यास मीं एकदां आपलासा म्हटलें त्याच्यासाठीं मीं हवी तितकी घस सोशीन.' तूं आपला ऐस-तूं आपलें स्वतःचें काम पहा, दुसर्‍याची उठाठेव करुं नको. म्ह॰ १ आपल्या (ला) चेप्या, दुसर्‍या(ला) फुल्या = आपल्यास घ्यावयाचें असलें म्हणजे माप दाबून भरणें व दुसर्‍यास द्यावयाचें असलें म्हणजे माप पोकळ भरणें. ही म्हण लोभी किंवा आपमतलबी माणसास लावतात. २ आपलें तें मापलें व दुसर्‍याचें तें दुपायलें. ३ आपला कान पिळून घेणें = एखादी गोष्ट करून ती बिघडली म्हणजे पुन्हां तशी न करण्याचा निश्चय करणें; अद्दल घडणें. ४ आपला हात आणि जगन्नाथ = एखादें कार्य स्वतःच्या हातांत असलें म्हणजे त्यांत स्वतःचा स्वार्थ साधणें. (जगन्नाथपुरी येथील प्रसाद एका ठिकाणीं ठेवलेला असतो व त्यांतून यात्रेकरूनें हवा तितका (पुष्कळ सुद्धां) घ्यावयाचा असतो; किंवा जगन्नाथ म्हणजे सर्व सत्ताधीश-हात.) विपुलता व हवें तेवढें घेण्याची मुभा याअर्थीं ही म्हण रूढ झाली असावी. ॰तुपला-वि. माझा तुझा; स्वतःचा व परक्याचा; आपपर. २ आपली मालकीची; आपली म्हटलेली (मिळकत, जिन्नस वगैरे). आपपर किंवा आपअपर याच्यासारखेच आपला तुपला यापासून सामासिक शब्द बनतात. ॰माणूस-मनुष्य-पुन. प्रीतीचा मनुष्य. 'आपल्या मनुष्याला कोणी कमी कां करतो?' -करंज्याचा फार्स २२. आपलाला-वि. आपआपला, ज्याचा त्याचा स्वतःचा; 'आपलाले कपडे संभाळा!' आपलूक, आपलुकी-स्त्री. (चि.) आपलेपणा; स्वकीयता. आपले आपण, आपल्याआपण-क्रिवि. आपखुषीनें; स्वयंप्रेर- णेनें; आपण होऊन. आपलें उगीच-विनाकारण; निरर्थक. आपला अर्थ २ पहा. 'आपलें उगीच कारागिराची कुशलता पाहून माझी दृष्टि तिकडे वळली.' -मृ ५८. -आपल्या अंगीं-अंगें-अंगानें- स्वतः; खुद्द. आपल्या आपण दुसर्‍याच्या मदतीवांचून; स्वतःच; आपसूक. आपल्या घरचा थोर-राजा-वि. १ हट्टी, हेके- खोर मनुष्य. २ स्वतःच्या घरीं जबरदस्तीनें वागणारा व बाहेर लोकांत थंड-नरमपणानें वागणारा; गांवचा गांड्या आणि बायकोचा देश- पांड्या. ३ दुसर्‍यावर विनाकारण वर्चस्व गाजविणारा. 'तो असेल आपल्या घरचा थोर, मला काय?' आपल्यांत-स्वगत (भाषण) जुन्या नाटकांतून स्वगत या अर्थीं आपल्यांत हा शब्द योजीत असत. 'भीमराव:-(थांबून आपल्यांत )' -रत्नकांता नाटक २४.

दाते शब्दकोश

सुकणा

पु. (कु.) एक जातीचा पक्षी. सुकणें-अक्रि. १ वाळणें; शुष्क होणें; ओलावा नाहींसा होणें. २ नदी, खाडी इ॰ मधील पाणी कमी होणें, पात्र कोरडें पडणें. ३ आजारी- पणामुळें शरीर क्षीण होणें; वाळणें. [सं. शुष् = वाळणें] म्ह॰ (गो.) सुकलेलें पान न्हयं झालेले सांग = निरुपयोगी माणसास भलतेंच काम सांगणें. सुकणावळ-स्त्री. सुकल्यामुळें झालेली द्रवपदार्थाची खराजी. सुकतळ-न. जोड्यांत पावलाचा घाम शोषून घेण्यासाठीं घातलेला चामड्याचा तुकडा; घामोळें; खोगि- राच्या खालचें घामोळें; अंगरखा इ॰ कामध्यें कांखेंत असल्या प्रका- रचें घातलेलें जोड कापड. [सुकणें + तळ] सुकताव-पु. भट्टींत सोनें तापवून हवेनें आपोआप थंड होऊं देण्याची क्रिया. याच्या उलट पाणताव (पाणी ओतून थंड करणें). [सुका + ताव] सुकती-स्त्री. नदी, समुद्र इ॰ची ओहोटी; पात्र कोरडें होणें. सुकती भरती- स्त्री. समुद्र इ॰ चें पाणी उतरणें व चढणें. सुकवडापु. उड- दाचे पिठांत मिरें, सुठें, हिंग इ॰ घालून तळलेला वडा. सुकवण- न. १ धान्य इ॰ सुकविणें; वाळवण. २ वाळविण्याची मजुरी. -स्त्री. जीर्ण स्थिति; अशक्तता. सुक(ख)वत-स्त्रीन. वाळलेलें केलीचें पान. सुकवणी-स्त्री. १ क्षयरोग; क्षीणता. २ (व.) एक प्रकरची गवती चटई. सुकविणें-सक्रि. १ वाळविणें. २ (ल.) निस्तेज करणें. -मोस्त्री ४.३९. सुकवें-न.(को.) करपलेलें पीक; वाळलेलें शेत. सुका-वि. १ सुकलेलें; वाळलेलें. २ (ल.) लाभ- रहित, उत्पन्नरहित; पोकळ; निरर्थक; अर्थहीन; कसहीन. ३ कोरडा, जेवणाशिवाय (पगार). [सं. शुष्क; तुल॰ फ्रेंजि. शुको] सुका- कूल-न. एक जातीचें फळ. मिस्त्री. सुकाट-न. (कु.) वाळवि- लेला कोलबी जातीचा एक मासा; सुंगाट. सुकाट(ठ)णक-वि. कोरंडा ठणठणीत (जमीन). सुकाड-पु. १ सुकंडा पहा. २ शेतांतील पांखरांसाठीं उभें केलेलें बुजगावणें. सुकाताव-पु. १ भुकेमुळें होणारा पोटाचा भडका; भुकेमुळें होणारी व्याकुळता. २ शुष्क पाहुणचार; निरर्थक फेरफटका; साफ नाकबुली; खरडपट्टी; धसमुसळेपणा. (क्रि॰ देणें; बसणें). ३ सुकताव पहा. सुका दुक(ष्का)ळ-पु. पावसाच्या अभावामुळें पडलेला दुष्काळ. सुका लफडा-डें-पुन. निरर्थंक व्याद, त्रास, अडचण, भांडण इ॰. सुकाळें-न. (गो.) सुकें तळें. सुकी(कें) केळ, सुकेळ- न. सोलून तूप लावून वाळविलेलें केळें. सुकी(क्)खरूज-स्त्री. कोरडी, पू नसलेली खरूज. सुकेड-स्त्री. (राजा.) वाळलेली बाजू, जागा. [सुका + कड] सुको जामोर-(गो.) फायद्या- शिवाय काम करणें. सुक्खा-वि. (राजा.) सुका पहा. सुक्यो पोळ्यो-(गो.) हवेतेल बंगले मनचे मांडे.

दाते शब्दकोश

बे

शअ. वांचून; विरहित; अभाव दाखविणारा उपसर्ग. याचा फारशी किंवा हिंदी शब्दांशीं समास होतो व हा शब्द नेहमीं पूर्वपद असतो. [फा. बी; तुल॰ सं. विना; हिं. बिन] ज्यांच्या पूर्वपदीं बे शब्द येतो असे अनेक सामासिक शब्द आहेत. त्यांतील कांहीं पुढें दिले आहेत. सामाशब्द- ॰अकली-वि. मूर्ख; बेवकूब. [फा. बी + अक्ल्] ॰अदब-बी-स्त्री. अपमान; असभ्यता; अमर्यादा; अनादर. [फा. बी + अदबी] ॰अदाई-स्त्री. स्वामिद्रोह; विरोध. अबरु-अब्रू-स्त्री. दुर्लौकिक; अपकीर्ति; फजिती. [फा. बी + आब्रू] अबस-क्रिवि. वृथा; व्यर्थ; निष्फळ. ॰आब-पु. अपमान; बेअब्रू. -वि. अपमान झालेला. [फा. बी + आब्] ॰आराम- वि. अस्वस्थ; आजारी. [फा. बी + आराम्] ॰आरामी-स्त्री. अस्वास्थ्य. [फा.] ॰इज्जत-ती-स्त्री. अप्रतिष्ठा. ॰इज्जती-वि. गैरअबरूदार; हलकट. [फा.] ॰इतबार-पु. गैरविश्वास; गैरभरंवसा. [फा.] ॰इतल्ला-क्रिवि. गैरमाहीत; बे-दखल; बडतर्फ. 'त्याचे कार्कून बे-इतल्ला केले.' -रा १०.११०. [फा.] ॰इनसाफ- इनसाफी-पुस्त्री. अन्याय; न्यायाचा अभाव. -वि. अन्यायाचा; अन्यायी. [फा.] ॰इमान-इमानी, बेमान-वि. कृतघ्न; अप्रामाणिक; बेभरंवशाचा. [फा. बी + ईमान् = अधर्मी] ॰इमानी- इमानकी-स्त्री. खोटेपणा; अप्रामाणिकता; कृतघ्नता; विश्वास- घातकीपणा. ॰इलाज-वि. निरुपाय; नाइलाज. [फा.] ॰उजूर- क्रिवि. १ कांहीं न सांगतां; बिनतक्रार. 'या दिवसांत पोटास न मिळे तेव्हां लोक चाकरी बे-उजूर कैसी करितील? '-रा १०.५७. २ विलंबरहित; बेधडक. [फा.] ॰कदर-क्रिवि. निर्धास्तपणें. ॰कम-ब-कास्त-क्रिवि. कांहीं कमी न करतां; साद्यन्त; जसेंच्यातसें. [फा. बी + कम् + उ + कास्त्] ॰करारी- स्त्री. अनिश्चिती; तहमोड. 'त्याजकडून बेकरारीच्या चाली सुरू होतात.'-रा ७.१९ ॰कस-वि. नि:सत्त्व; कमजोर; बेचव; शुष्क. ॰कानू-स्त्री. अन्याय; जुलूम. ॰कानून-कानू-वि. बेकायदेशीर; कायद्याचा भंग करून केलेलें. [फा.] ॰कायदा-पु. कायदेभंग; कायद्यासंबंधाचा अभाव. ॰कायदा-कायदेशीर- वि. नियमबाह्य; गैरकायदेशीर; जुलमी; नियमाचें उल्लंघन करणारा; नियमाला सोडून असलेला [फा. बी + काइदा] ॰कार-वि. १ निरुद्योगी; बे-रोजगारी; रिकामा. २ (व.) निरर्थक; व्यर्थ; उगाच. ३ (ल.) हैराण; निरुपयोगी. 'तिन्ही मोर्चे मिळोन निमे माणूस दुखणियानीं बेकार आहे.' -पेद ३.१८ [फा.] ॰कार- चावडी-स्त्री. (को.) रिकामपणाच्या, निरर्थक गप्पागोष्टी. ॰कारी- स्त्री. रिकामपणा; निरुद्योगीता; बेरोजगारपणा. [फा. बीकारी] ॰किलाफ-पु. मैत्री; सख्य; संशयनिवारण. [अर. खिलाफ् = वैर] ॰कुबी-स्त्री. मूर्खपणा; गाढवपणा; मौखर्य. [फा. बेवकुफी] ॰कुसूर-क्रिवि. न. चुकतां; बिलाकसूर; पूर्णपणें. [फा. बी + कुसूर्] ॰कूब-वि. मूर्ख; वेडगळ; वेडझंवा [फा. बेवकुफ] ॰कैद-स्त्री. शिस्तीचा अभावं; स्वैर वर्तन; अव्यवस्थितपणा; कायदा, नियम किंवा शिस्त यांचे उल्लंघन. -वि. बेशिस्त; स्वैर; अनियंत्रित. -क्रिवि. स्वैरपणानें; कोणत्याहि तर्‍हेचा कायदा किंवा नियम न मानतां. [फा. बी + कैदी] ॰कैदी-वि. स्वैर; कायदा, नियम, नियंत्रिण इ॰ न पाळणारा; बेशिस्त. ॰कौली-वि. बिगर कौलाचा; अभयपत्रविरहित. ॰खत्रे-क्रिवि. निःशंकपणें. 'बेखत्रे हुजूर यावें.' -जोरा १०५. ॰खबर-क्रिवि. असावध; गाफीलपणें. [फा. बी + खबर्] ॰खबर्दार-वि. गैरसावध. [फा.] ॰खर्च-खर्ची-वि. १ खर्च केल्याशिवाय झालेलें, केलेलें; फुकटंफाकट. २ खचीं जवळ नाहीं असा; निर्धन; कृपण. [फा. बी + खर्च्] ॰खातरी-स्त्री. अविचार. 'चार कोटींची मालियत जवळ असतां कंजूषपणानें सर्दारास बेखात- रीनें निरोप दिल्हा.' -जोरा १०९. गर्द-वि. वृक्षरहित; झाडी नसलेलें. 'मुलूख अगदीं वीसपंचवीस कोसपर्यंत बे-गर्द, वेचिराख जाहला.' -पाब १४ [फा. बगिर्द] ॰गार-गारी-बिगार, बिगारी पहा. ॰गुन्हा-पु. गुन्ह्यापासून मुक्तता, सुटका.-वि. गुन्हा नसलेला; अपराधांतून मुक्त झालेला. -क्रिवि. गुन्हा नसतांना. 'बक्षीस बेगुन्हा कैद केलें. ' -जोरा १०५ [फा.] ॰गुमान-नी-वि. बेपर्वा; गर्विष्ठ; उन्मत्त; निःशंक; मुर्वत नसणारा. [फा. बेगुमान्] ॰चतुर-वि. मूर्ख. ॰चरक-क्रिवि. निर्भयपणें; धडाक्यानें; निर्भीडपणें; बेधडक. ॰चव-वि. रुचिहीन; कवकवीत; नीरस; निचव. ॰चाड-वि. चाड नसलेला; लज्जाहीन; उद्धट. ॰चिराख- ग-वि. दीपहीन; ओसाड; उध्वस्त; वस्तीरहित; उजाड. [फा. बी + चीराघ् = दिवा] ॰चूक-वि. बिनचूक; बरोबर; चुका केल्या- शिवाय. [फा. बी + हिं. चूक] ॰चैन-वि. अस्वस्थ; कांहींहि सुचत नाहीं असा [फा. बी + हिं चैन] ॰चोबा-पु. खांबाशिवाय असलेला लहान तंबू. [फा. बीचोबा] ॰छूटपणा-पु. आळा, बंध नसणें; स्वैराचार; स्वच्छंदीपाणा. ॰जबाब-क्रिवि. उद्धट- पणानें; बेपर्वाईनें (बोलणें, उत्तर देणें). [फा. बी + जवाब्] ॰जबाबदार-वि. स्वतःवरची जोखीम न ओळखणारा; जोखीम न ओळखून स्वैर वागणारा. बेजबाबदार राज्यपद्धति-स्त्री. लोकमतास जबाबदार नसलेली राज्यपद्धति. ॰जबाबी-वि. १ उद्धट; उर्मट; बेमुर्वतखोर. २ तासाचे ठोके न देणारें (घड्याळ). [फा. बी + जवाब् = निरुत्तर] ॰जबर-क्रिवि. निर्भयपणें; निःशंक- पणें; बेधडक; जोरानें; उठाव करून; धाक न बाळगतां. 'आमच्या भले लोकांनीं बेजबर घोडीं घालून कित्तूरकरास मोडून वोढ्यापर्यंत नेऊन घातला. ' -ख ५.२३८८ [फा.] ॰जात-वि. (अशिष्ट) हलक्या किंवा निराळ्या जातीचा. ॰जान-वि. निर्जीव; ठार. [फा.] ॰जाब-वि. बेगुमान; बेमुलाजा; बेजबाबदार. [फा.] ॰जाबता-पु. अन्याय; ठरावाविरुद्ध गोष्ट; अविचारी भाषा. 'आम्ही टोंचून घेणार नाहीं, असेना असे मरून जाऊं असे बेजाबता बोलत होते.' -टिकळचरित्र, खंड १. ॰ज्यहा-जा- जहा-वि. फाजील; अनाठायीं; अनुचित; अयोग्य; अमर्याद; अकालीन; रुष्ट; उधळपट्टीचा. [फा.बी + जा] बेजार-वि. १ हैराण; त्रस्त; दमलेले; थकलेला (श्रम, दुःख, कटकट यांमुळें). २ दुखाण्यानें हैराण झालेला; दुखणाईत. [फा. बिझार्] बेजारी- स्त्री. त्रास; हैराणी; थकवा. ॰डर-न. ड्रेडनॉट नांवाचें जंगी लढाऊ जहाज. -वि. न भिणारी; न डरणारा. बेडर पहा. [हिं. डर] ॰डौल-वि. कुरूप; बेढब; घाट किंवा आकार चांगला नसलेला. ॰ढंग-पु. दुराचरण; स्वैराचार; बेताल वागणूक; सोदेगिरी. [हिं.] ॰ढंग-गी-वि. दुराचरणी; व्यसनी; स्वैराचारी. [हिं.] ॰ढब- वि. बेडौल; कुरूप; विक्षिप्त; ढबळशाई; चांगला घाट, आकार नसलेला; ओबडधोबड. [हिं.] ॰तकबी-वि. असमर्थ; ना-तवान. [फा. बेतक्विया] ॰तकसी(शी)र, बेतक्शी(तकसी)र- स्त्री. अपराधापासून, गुन्ह्यापासून, भुक्तता. -वि. निरपराधी; नाहक; निर्दोषी. [फा. बी + तक्सीर] ॰तमा-स्त्री. १ निर्लोभि वृत्ति. २ बेफिकीरपणा; बेपरवा; उदासीनपणा. -वि. १ निर्लोभी; निरिच्छ. २ बेपरवा; बेगुमान; गर्विष्ठ; निष्काळजी; बेसावध; काळजी, कळकळ न बाळगणारा. -क्रिवि. बेगुमानपणें. 'खांद्यावर टाकून पदर बोले बेतमा । लग्नाच्या नवऱ्याशीं बोले बेतमा ।' -पला. [फा] ॰तमीज-वि. (ना.) उद्धट; असभ्य. [फा. बे + तमीज] ॰तर्तुद-स्त्री. तजविजीचा अभाव; अव्यवस्था. ॰तर्‍हा-स्त्री. असाधारणपणा; वैलक्षण्य; चमत्कारिकपणा. -वि. विलक्षण; चमत्कारिक; असाधारण; भारी; अतिशय. 'याउपर उपेक्षा करून कालहरण केलियास नाबाबाचे दौलतीस बे-तर्‍हा धक्का बसेल.' -रा. ५.१६६. [फा. बी + तरह्] ॰ताब-वि. असमर्थ; क्षीण; हतधैर्य. ' मातुश्री अहल्याबाई यांस शैत्यउपद्रव होऊन पांचसात दिवस बे-ताब होती.' -मदाबा १.२१८ [फा. बी + ताब्] ॰ताल- ळ-वि. १ गायनांत तालाला सोडून असलेलें (गाणें-बजावणें). २ ताल सोडून गाणारा, वाजविणारा. ३ (ल.) अमर्याद; अनियं- त्रित; स्वैर; उधळ्या. [हिं.] ॰तालूक-वि. गैरसंबंधीं; संबंध नसलेला; भलता. [फा. बे + तअल्लुक = संबंध] ॰दखल-वि. १ अधिकारच्युत; बेईतल्ला. २ गैरमाहीत. [फा. बी + दख्ल्] ॰दम-वि. दम कोंडला जाईपर्यंत; निपचीत पडेपावेतों दिलेला (मार); थकलेला; दमलेला; निपचीत. [फा.] ॰दरद-दी-दर्द- दर्दी-वि. १ बेफिकीर; बेगुमान; मागेंपुढें न पाहणारा; भय न बाळगितां स्वच्छंदपणें वागणारा. २ बारीकसारीक विचार न पाहणारा. ३ निर्घृण; क्रूर; दया नसलेला. [फा.] ॰दस्तूर-पु. अन्याय; नियमाविरहित गोष्ट; गैरशिरस्ता. ॰दस्रतूई-स्त्री. (गो.) उधळेपणा. [फा.] ॰दाणा-दाना-पु. १ आंत बी नाहीं असें द्राक्ष. हें लहान, गोड, गोल, बिनबियांचें असतें. २ सुकविलेलें द्राक्ष; किसमिस. [फा.] ॰दाणा डाळिंब-न. दाण्यांत बीं नसलेलें डाळिंब. ॰दाद-स्त्री. बेबंदशाही; अन्याय; जुलूम. [फा.] ॰दार-क्रिवि. जागृत; तयार. 'नबाब बेदार जाले.' -रा ७.८३ [फा.] ॰दावा-पु. सोडचिठ्ठी; नामागणी; हक्क सोडणें. ॰दावा पत्र-फारखती-नस्त्री. हक्क सोडल्याबद्दल, नसल्याबद्दल लिहून दिलेला कागद; सोडचिठ्ठी. ॰दिक(क्क)त-क्रिवि. बेलाशक; बिनहरकत; बिनतक्रार; बेउजूर; निःशंकपणें. [फा.] ॰दिल- दील-वि. उदासीन; असंतुष्ट; दुःखी कष्टी. [फा.] ॰दील होणें-बिथरणें. ॰दिली-स्त्री. १ असंतुष्टता; औदासीन्य; निरु त्साह. २ रुष्टता; मनाचा बेबनाव. ॰दुवा-स्त्री. अवकृपा; शाप. [अर.] ॰धडक-क्रिवि. बिनघोक; निर्धास्तपणें; निर्भय; बेलाशक. [हिं.] ॰धरी-वि. धरबंद नसलेला; नियंत्रण नसलेला; मोकाट; स्वैर. [बे + धर] ॰नवा-वि. अधीर; असहाय; निर्धन; भुकेला. 'पादशहा बेनवा होऊन खानास लिहीत. ' -मराचिथोर ५३. [फा.] ॰नहाक-नाहक-क्रिवि. विनाकारण; उगीचच्याउगीच; कारण नसतांना; हक्कनहक्क, हक्कनाहक्क पहा. ॰निगा-स्त्री. दुर्लक्ष; अपरक्षण. [फा.] ॰निसबत-क्रिवि. बेलाशक; काहींहि विचार न करतां; मनांत कोणातीहि शंका न बाळगतां; बेपर्वाइनें; एकदम. [फा.] ॰निहायत-न्याहत-क्रिवि. निःसीम; अपार; परकाष्ठेचा. [फा.] ॰पडदा-वि. १ पडदा नसलेला; उघडपणें; कोणत्याहि तऱ्हेची गुप्तता न राखतां. २ (ल.) मानखंडित. क्वचित् नामाप्रमाणें उपयोग करितात. -पु. १ उघड गोष्ट; २ (ल.) मानखं डना. [फा.] ॰परवा-पर्वा-वि. निष्काळजी; निर्भय; बेगुमान. [फा.] ॰परवाई-पर्वाई-स्त्री. निष्काळजीपणा; बेगुमानी; स्वैरावृत्ति. [फा. बी + पर्वाई; तुला॰ सं द्विप्रव्राजिनी] ॰पाया- वि. गैरकायदा; नियमाविरुद्ध. ॰फंदी-वि. १ व्यसनी; दुराचारी; स्वैर. बेशुद्ध. २ खट्याळ; उच्छृंखल; खोडकर (मूल). ॰फाम-वि. १ बेसावध; बेशुद्ध. २ निश्चिन्त; गाफिल; अनावर; मस्त; तुफान; बेभान. 'शत्रू माघार गेला म्हणून बेफाम नाहीं, सावधच आहों.' -ख ७.३३१०. [फा. बी + फह्म्] ॰फामी-स्त्री. गैर- सावधपणा; गाफिली; निश्चिन्ती; खातर्जमा; दुर्लक्ष. ' या विश्वा- सावर बेफामी जाली याजमुळें दगाबाजीनें निघोन गेला. ' -दिमरा १.२५२. ॰फायदा-वि. गैरफायदेशीर; तोट्याचें; अव्यवस्थित. ॰फिकि(की)र-स्त्री. निष्काळजीपणा. -वि. १ निष्काळजी; बेपर्वा; अविचारी. २ निश्चिंत; निर्धास्त; संतुष्ट. [फा. बी + फिक] ॰फिकिरी-स्त्री. निष्काळजीपणा; गाफिली; निःशकपणा. ॰बंद- पु. अराजकता; शिस्तीचा अभाव; गोंधळ. 'हुजरातीमध्यें बेबंद सर्वथा हिऊं देऊं नये.' -मराआ १४ -वि. अव्यवस्थित; मुक्त; व्यवस्था, बंदोबस्त, कायदा, शिस्त इ॰ नसलेला; बेशिस्त; अराजक. [फा.] ॰बंदशाई-ही, बेबंदाई-बंदी-स्त्री. १ अव्यवस्था; गोंधळ; मोंगलाई; अनायकी; अंदाधुंडी; अराजकता. २ जुलूम. ' सांगुं किती दुनियेवर बेबंदी । ही मस्लत खंदी । ' -राला १०६. ॰बदल-वि. १ बदललेला. २ बंडखोर. 'गुलाम कादर- खान पादशहासी बेबदल होऊन... ' -दिमरा १.२००. [फा.] ॰बनाव-पु. भांडण; तेढ; तंटा; बिघाड. ॰बर्कत-स्त्री. अवनति; हलाखी; तोटा. [फा.] ॰बहा-वि. अमोल; किंमत करतां येणार नाहीं असें. [फा.] ॰बाक-वि. निर्भीड; बेडर. [फा.] ॰बाक-ग, बेबाकी-स्त्री. अशेष फडशा; कर्जाची पूर्ण फेड. -वि. निःशेष; संपूर्ण; कांहींहि शिल्लक, बाकी न ठेवतां फेडलेलें (कर्ज). [फा.] ॰बारत-स्त्री. बेइतबार; अविश्वास. ॰बुनियाद-बुन्याद-स्त्री. अन्याय; राखरांगोळी; नाश. 'आम्ही मदारुल महाम व फारांसीस तिघे मिळून इंग्रेजांची बेबुनियाद करूं.' -रा १०.१९९ [फा. बुनियाद् = पाया] ॰बुदी-बुद-स्त्री. १ नाश; खराबी; अभाव. २ नाबूद. [फा.] ॰भरंवसा-भरोसा-पु. अविश्वास; संशयितपणा; खात्री नसणें. [हिं.] ॰भरोशी-वि. खात्री किंवा भरंवसा अगर विश्वास ठेवतां येणार नाहीं असा; फसव्या. ॰मजगी-स्त्री. वितुष्ट; अरुचि; बेबनाव. 'पादशहांची व गुलामकादार यांची बेमजगी होऊन... 'दिमरा १.१९९. [फा.] ॰मनसबा-मन्सबा- पु. अविचार; खराब मसलत. [फा.] ॰मब्लग-मुब्लक- मोब्लक-वि. असंख्य; अपरिमित. [अर. मब्लघ्] ॰मारामत- स्त्री. नादुरुस्ती. 'आरमाराची बेमरामत जाली.' -वाडसमा २.१९५ -वि. नादुरुस्त; दुरुस्तीची जरूर असलेलें; दुरुस्तीवांचून असलेलें; अव्यवस्थित. [फा.]॰ मर्जी-स्त्री. इतराजी; अवकृपा; मर्जीविरुद्ध वर्तन. [फा.] ॰मलामत-वि. कीर्तिवान्. [अर. मलामत = दूषण] ॰मस्लत-स्त्री. अविचार. ' स्त्रीनायक, बालनायक आणि बेमस्लत, तीन गोष्टी येके ठिकाणीं; चौथा अहंकार; तेव्हां ईश्वर त्या सर्दारीची अब्रू ठेवील तर ठेवो. ' -खपल २.७० [फा.] ॰मान-मानी-मानकी-गी-बेइमान इ॰ पहा. ॰मानगिरी - स्त्री. बेइमानी; हरामखोर. ॰मार-वि. १ किंवा हल्ला करतां न येण्यासारखा (किल्ला). २ अतिशय; कमालीचा; जोरदार; विपुल; भरपूर, बेसुमार इ॰. उदा॰ बेमार-पाऊस-वारा-ऊन्ह-धूळ- लढाई-पीक-धान्य-आंबे इ॰ (पडतो-सुटला-पडतें-उडते-चालती-झालें-पिकले इ॰ क्रियापदांस जोडून उपयोग). ३ आजारी; दुखणाईत. ४ थकलेला; दमलेला; बिमार. ५ (व.) वस्ती नसलेलें; उपयोगांत नसलेलें (घर, वस्तु). [फा.] ॰मारी-स्त्री. १ आजार; आजारीपण; दुखणें. २ शिणभाग; थकवा; अशक्तता. ॰मालूम- वि. माहीत न होण्याजोगें; दिसणार नाहीं, ओळखतां येणार नाहीं, शोधतां येनार नाहीं असें; जाणण्यास कठिण; हुबेहुब. 'नवीन माहितीचा जुन्या पद्धतीशीं बेमालूम सांधा जोडणें कठिण आहे.' -टि ४.२७१ [हिं.] ॰मुनासीब-मुनास्रब-वि. अयोग्य; गैरवाजवी; बुद्धीला न पटणारे; अयुक्त. [हिं.] ॰मुन्सफी-स्त्री. अन्याय. 'हिंदू मुसल्मान, ईश्वराचे घरचे दोन्ही धर्म चालत असतां मुसल्मानानें हिंदूचे जाग्यास उपद्रव करावा हे बे-मुन्सफी.' -पया १० [फा.] ॰मुरवत-मुर्वत-क्रिवि. असभ्यपणें शिष्टाचाराला सोडून; भीड, पर्वा इ॰ न बाळगतां. [फा.] ॰मुरवत-ती, ॰मुर्वत-ती-वि. कठोर; निर्दय; निर्भीड; निर्भय; बेमुलाजा. [फा.मुरुवत् = माणुसकी] ॰मुलाजा-मुलाहिजा- क्रिवि. कांहीं न पाहतां; दयामाया सोडून; निष्ठूरपणें; बेमुर्वतपणें. [अर.मुलाहझा = पर्वा, विचार] ॰मोताद-वि. बेसुमार; असंख्य; अपरिमित. [अर. मुअत्द्द = संख्या, परिमित] मोयीं(ई)न- मोइनी-मोहीन-वि. १ अनियमित; ठरावबाह्य. २ अपरिमित; असंख्य. [फा. बी + मुअय्यन्] ॰मोहर-स्त्री. बिन शिक्क्याचें; शिक्का नसलेलें; गैरमोहरबन्दी.'कित्येक दफ्तरें सर्वमोहर व कितेक बे-मोहरेची.'-रा, खलप २.९. [फा.] ॰मोहीम-- वि.मोहीम न करणारा; उपजीविकेकरतां किंवा धंद्या-उद्योगा- करितां खटपट न करणारा; घरबशा; बाहेर न जाणारा. [फा.] रंग-पु. विरस; खराबी; मौजेचा (मान, कींती, सौदर्य इ॰चा) भंग; अपमान; फजीति. -वि. ज्याचा रंग बिघडला आहे असा. [हिं.] ॰राजी-वि. असंतुष्ट. [फा.] ॰रुख्सत-क्रिवि. पर्वा- नगीवांचून. [अर. रुख्सत् = परवानगी] ॰रू(रों)ख-पु. १ दुसरी- कडे तोंड फिरविणें; दिशा बदलणें. २ प्रेमाचा अभाव. -वि. अप्रसन्न; उदासीन; रुष्ट; विन्मुख. [फा. रुख् = दिशा] ॰रोजगार-री- वि. निरुद्योगी; बेकार; रिकामा. [फा.] ॰लगाम-मी-वि. १ लगाम नसलेला. २ लगामाला दाद न देणारा. ३ (ल.) अनियंत्रित; स्वैर; मोकाट; बेताल. ४ आडवळणी; जाण्यायेण्यास सोयीचें नसलेलें; एकीकडे असलेलें; गैरसोयीचें (शेत, घर). -क्रिवि. एकीकडे; एका बाजूला; आडरस्त्यावर. [फा. बी + लिगाम्] ॰लगामीं पडणें- १ भलत्या मार्गाला लागणें; बहकणें; स्वैर बनणें. २ हयगय होणें; आबाळ होणें. ॰लाग-पु. निरुपायाची किंवा नाइलाजाची स्थिति. 'माझा बेलाग झाला.' -वि. १ जो घेण्याला किंवा ज्यावर मारा करण्याला कठीण आहे असा; दुःस्साध्यं; अवघड; बळकट (किल्ला). २ दुःस्साध्य; दुराराध्य; अप्राप्य; आचरण्यास कठीण असा (विषय). ३ सुधारण्याला कठीण; निरु- पायाचा; दुःसाध्य (रोग, विषय). -क्रिवि. १ मदतीवांचून; उपायावाचून; निरुपायानें; नालाजानें. २ निराधार; आधारावांचून. ३ तडकाफडकीं; ताबडतोब; एका क्षणांत. [फा. बी + म. लागणें] ॰वकर-वक्र-वि. फजीत; मानखंडित; अपमानित. [फा. बीवकर्] ॰वकरी-स्त्री. मानखंडना; अप्रतिष्टा; निर्भर्त्सना. [फा.] ॰वकूब (फ)बेकूब-वि. मूर्ख; खुळसट; अजाण; अडाणी अज्ञान. [फा. बेवकूफ] ॰वकूबी-फी-स्त्री. मूर्खपणा; मूढता. ॰वजे-स्त्री.(व.) गैरसोय; गैरव्यवस्था; गैररीत; विलक्षण प्रकार. [बिवजेह] ॰वतन- क्रिवि. हद्दपार; जलावतन. [अर. वतन् = जन्मभूमि] ॰वसवसा- वस्वसा-वस्वास-क्रिवि. निर्भयपणें; निश्चिन्त; शांतपणें; बे- दिक्कत; निर्भीडपणें. [अर. वस्वास, वस्वसा = भीति, काळजी] ॰वारशी-वारशीक-वारीस-वि. ज्यावर कोणाचा हक्क, वारसा नाहीं असा; निवारशी; योग्य हक्कदार, मालक किंवा वारसा नसलेला. [अर. वारिस् = वडीलोपारर्जित संपत्तीचा हक्कदार] ॰वारसा-पु. वारसाहक्क नसणें; वारस नसणें. ॰वारा-पु. कर्ज- फेड; कामकाज उरकून टाकणें; उलगडा; सांठा, पैसाइ॰ चा निकाल लावणें. [हिं.] ॰शक-वि. १ निर्धास्त; निःशंक; धीट. २ निर्लज्ज. -क्रिवि. १ निःशंकपणें; बेलाशक; निःसंशय २ निर्लज्जपणें. [फा. बी + शक्क्] ॰शरम-श्रम-वि. निर्लज्ज; पाजी; निलाजरा [फा. बे + शर्म्] ॰शरमी-श्रमी-स्त्री. निर्लज्जपणा; पाजीपणा. ॰शर्त- स्त्री. बिनशर्तपणा. -क्रिवि. बिनशर्त; अट न ठेवतां; आढेवेढे न घेतां. [अर. शर्त् = अट, नियम] ॰शिरस्ता-पु. गैरवहिवाट; गैररीत; वहिवाटीच्या विरुद्ध. [फा. सर्रिश्ता = वहिवाट, नियम] ॰शिस्त-स्त्री अव्यवस्था -वि. गैरशिस्त; अव्यवस्थित; अनि- यमित (मनुष्य, वर्तन, भाषण). [फा.] ॰शुद्ध-वि. गैरसावध; (मूर्च्छा इ॰ कांनीं) शद्धिवर, भानावर नसलेला; धुंद; अचेतन; जड. [फा. बी + सं. शुद्धि] ॰शुभह-क्रिवि. निःसंशय. 'बेशुभह शिकस्त खाऊन फरारी होतील.' -पया ४८२.[फा] ॰शौर- वि. बेअकली; मुर्ख; बेवकूब. [अर शुऊर् = अक्कल] ॰सतर- वि. अप्रतिष्ठित; मानखंडीत. [अर. सित्र = पडदा] ॰सनद- सनदी-वि. बेकायदेशीर; सनदेविरहीत. 'श्रीमंत दादासाहेब येऊन त्या उभयतांसी सलूक करणार नाहींत व बेसनद पैसाही मागणार नाहींत.' -रा ६.३८२. ॰समज-पु. (ना.) गैरसमज. -वि. अडाणी. [हिं.] ॰सरंजाम-वि. सामुग्रीविहीन; शिबंदी शिवाय. [फा.] ॰सरम-स्त्रम-(अशिष्ट) बेशरम पहा. ॰सावध- वि. १ लक्ष नसलेला; तयार नसलेला; निष्काळजी; गैरसावध. २ बेशुद्ध; शुद्धीवर नसलेला. [हिं.] ॰सुमार-वि. अमर्याद; अति- शय; अपरिमित; मर्यादेच्या, अंदाजाच्या बाहेर. [फा. बीशुमार्] ॰सुमारी-स्त्री. अपरिमित. ॰सूर-वि. बदसूर; सुरांत नस- लेला (आवाज-गाण्याचा, वाजविण्याचा). [हिं.] ॰हंगाम-पु. १ अवेळ; भलता काळ-वेळ. २ (ल.) दंगा. 'हे बेहंगाम कर- णार.'-ख १२०५. [फा.] ॰हतनमाल-हतन्माल-हन- तमाल-पु. बेवारशी म्हणून सरकारांत जमा झालेला माल, संपत्ति. [फा. बी + तन् + माल्] ॰हतन-मावशी--स्त्री. बेहतनमाल व बटछपाई या संबंधींच्या कामाचें खातें. ॰हतर-हत्तर-हेत्तर- वि. अधिक चांगले; श्रेयस्कर.[फा. बिह्त्तर; तुल॰ इं. बेटर] ॰हतरी-हेत्तरी-स्त्री. बरेपणा; सुधारपणा. ॰हद-द्द-स्त्री-स्त्री. परा- काष्ठा; अमर्यादपणा; अतिशयितता; बेसुमारपणा. -वि अतिशय; पराकाष्टेचा; बेसुमार; अमर्याद; निःस्सीम. [फा. बी + हद्द] ॰हया, हय्या-वि. उद्धट; निर्लज्ज; बेशरम; निलाजरा. [फा.] ॰हाल- पु. दुर्दशा. -वि.दुर्दशाग्रस्त; दुःखार्त. 'चिमट्यानें मांस तोडून बेहाल करून मारिला.'-जोरा ८५. [फा. बी + हाल्] ॰हिक्मत- स्त्री. मुर्खपणा. [हिं.] ॰हिम्मत-ती-स्त्री. भ्याडपणा. [हिं.] वि. हतधैर्य; भ्याड; भित्रा. ॰हिसा(शे)ब-वि. १ अयोग्य; गैरविचाराचें; अनुचित. २ अगणित; हिशोबाबाहेरील; हिशोब करतां येणार नाहीं असें. [फा.] ॰हुकूमी-स्त्री. अवज्ञा; बंडखोरी. ॰हुजूर-क्रिवि. १ एखाद्याच्या गैरहजेरीत. २ (चुकीनें) एखा- द्याच्या समक्ष. [फा.] ॰हुर्म(रम)त-ती-स्त्री. अप्रतिष्ठा; मान- खंडना; अपमान; अकीर्ति. -वि. मानखंडीत; पत घालवून बसलेला; मान नाहींसा झालेला. [फा.] ॰हुशार-वि. गाफील; गैरसावच. ॰हुशारी-स्त्री. बेसावधपणा; गाफिलगिरी. [फा.] ॰होश-ष- वि. बेशुद्ध; धुंद; तर्र; गाफील; मुर्ख; विचारशक्ति नाहींशी झालेला. [फा. बीहोश्] ॰होशी-स्त्री. बेशुद्धी.

दाते शब्दकोश

दांत

पु. १ चावण्याच्या, फाडण्याच्या उपयोगीं तोंडांतील दृश्य अस्थिविशेषांपैकीं प्रत्येक; दंत. २ (ल.) (फणी, करवत, दंताळें इ॰ कांचा) दांता; फाळ; नांगराचें टोंक; डंगाचें टोंक. ३ हस्तिदंत. 'सहदेव नकुळ घेउनि दांतीं सिंहासनीं पृथा बसली ।' -मोशांति ५.४३ ४ द्वेषबुद्धि; मत्सर; दावा; डाव; वंश. 'त्याचा दांत आहे.' 'तो दांत राखितो.' [सं. दंत; पहा. हिं. दांत; सिं. डंदु] (वाप्र.) -उठणें-दांतांनीं धरलेल्या पदार्थावर दांताच्या खोलगट खुणा उमटणें. ॰ओठ खाणें-चावणें-रागानें दांतांवर दांत घासणें; दांतानीं ओंठ चावणें; अतिशय चिडणें; रागावणें. ॰काढणें-दाखविणें-दांत विचकून, फिदिफिदी हंसणें. ॰किची खाणें-(ना.) (राग इ॰ कानीं) कचाकच, कडकड दांत- चावणें. किरकिटीस येणें-विपन्नावस्था, अन्नान्नदशा प्राप्त- होणें; अति निकृष्ट परिस्थितीनें ग्रस्त होणें. ॰खाऊन-ओठ खाऊन-मोठ्या रागानें व अवसानानें. 'नरवर गरधरखरतर शर करकर दांत खाउनी सोडी ।' -मोशल्य २.८४. ॰खाऊन- चावून अवलक्षण करणें-(प्रतिकार करण्याचें सामर्थ्य नसतां) रागाचा दुबळा आविर्भाव आणून, शिव्याशाप देऊन स्वतःचें हंसें करून घेणें. ॰खाणें-चावणें-(रागानें चडफडून, झोंपेंत) दांतांवर दांत घासणें. 'कोपें खातात दांत बा हेर ।' -मोस्त्री ४.२६. ॰खीळ-खिळी बसणें-१ (सन्निपातादि दोषांमुळें) वरील दांत व खालचे दांत एकमेकांस घट्ट चिकटून बसणें. 'रामनाम घेतां तुझी बैसे दांतखीळ ।' -एकनाथ २ (ल.) निरुत्तर होणें; एखाद्या पुढें बोलतां न येणें. ॰खोचरणें- दांताच्या फटींत, खळग्यांत काडी, कोरणी घालून अडकलेले अन्नाचे कण इ॰ काढणें. ॰झिजणें-(ल.) निष्फळ उपदेश केल्यानें, केलेल्या विनवण्या व्यर्थ गेल्यानें, शिकविलेला विषय मूर्ख विद्यार्थ्यास ण समजल्यानें तोंडाला फुकट शीण, श्रम होणें. ॰धरणें-असणें-ठेवणें-राखणें-बाळगणें-(एखाद्याशीं) द्वेष, अदावत, मत्सर करणें; (एखाद्यावर) डाव धरणें; पूर्वींचें शल्य मनांत ठेवून (एखाद्याच्या) नाशासाठीं टपून बसणें. ॰निस- कीस येणें-त्वेष, स्फुरण, आवेश इ॰ कानीं युक्त होणें; जिवावर उदार होणें. 'मल्हारराव यांचे इरेनें दातनिसकीस येऊन मोठेमोठे खेतांत येऊन जीवाअधिक केली.' -भाब ११. [दांत + सं. निकष = घासणें] ॰पडणें-(एखाद्याची) फटफजिती, नाचक्की होणें; पराजित, फजित होणें. ॰पाजविणें-एखादी वस्तु (विशेषतः खाण्याची वस्तु) मिळण्याजोगी नसतां तिच्याबद्दल उत्कंठित, आतुर होणें. ॰पाडणें-(एखाद्याची) फजिती करणें; (एखा- द्यास) वादांत पराजित करणें; टोमणा मारणें; निरुत्तर करणें. 'इतका खोटें बोलणारा तूं असशील असें मला वाटलें नव्हतें. नाहींतर दोन चार साक्षी ठेवून तुझे चांगले दांत पाडले असते.' -त्राटिका अंक ४, प्र. ३. ॰पाडून हातावर देणें-(अशिष्ट) (एखा- द्याची) कंब्ख्ती काढणें; पारिपत्य करणें; उट्टें फेडणें (विशेषतः धमकावणी देतांना उपयोग). ॰लागप-(गो) पैसे पदरीं असणें; गबर असणें; खाऊन पिऊन सुखी असणें. ॰वठणें-लागणें- उच्च्चारलेला शाप (एखाद्यावर) फलद्रूप होणें. 'त्याच्यावर तया चेट- कीचा दांत वठला' = त्याला चेटकीच्या शापाचें वाईट फळ मिळालें, त्याला शाप भोंवला. ॰वासणें-(ल.) हातीं घेतलेलें कार्य शेवटास नेववत नाहीं म्हणून निराश होऊन स्वस्थ बसणें. ॰वासून पडणें-१ आजारानें अशक्त होऊन अंथरुणास खिळणें. २ मेहनत फुकट गेल्यानें हिरमुसलें होऊन बसणें. दांत वासणें पहा. 'वासुनि दांत मुखांत दहांत पडे मति गाढ तमीं पचली ।' -वामन-सीतास्वयंवर ११. ॰विचकणें-१ उपहास करून हंसणें. 'जो ऐसा प्रभु त्या जना न विचकूं दे दांत, बाहे रहा । वैकुठींच सदा..' -मोरोपंत. 'प्रेमदांत पावुनियां श्रम दांत क्षुद्र विचकिती कीं जे ।' -भक्तमयूरकेका ६५. २ याचना करणें; कांहीं जिन्नस मिळविण्याकरितां एखाद्यास विनविणें. ॰होंठ खाणें-चावणें-दांत ओंठ खाणें पहा. दातां ओठांवर जेवणें-चोखंदळपणानें जेवणें. दांतांखाली घालणें- धरणें-(एखाद्यावर) करडा, सक्त अंमल चालविणें; कडकपणानें वागविणें; अतिशय छळणें; गांजणें. दांतांची मिरवणूक काढणें-(कर.) (एखाद्यानें) स्वतःचें हंसें करून घेणें. दांताचें विष-न.मत्सरानें, जळफळाटानें काढलेले विषारी उद्धार; शाप; अभिशाप; शिव्याशाप. दांताचें विष बाधणें-१ (एखाद्याचे) शापोद्गार फलद्रूप होणें; दांत वठणें लागणें पहा. २ दुसर्‍यास बाधेल असा शाप देण्यास समर्थ असणें. दांतांच्या कण्या करणें-१ विनवण्या, याचना करून व्यर्थ उपदेश करून, शिकविण्याचा निरर्थक खटाटोप करून दांत झिजविणें; तोंड शिणविणें. २ अनेक- वार सांगणे, विनविणें. 'एक कांबळा पासोडी द्या म्हणून दातांच्या कण्या केल्या.' -नामना ५४. दांतांच्या-कण्या घुगर्‍या होणें-व्यर्थ याचना करून, उपदेश करून, शिकविण्याचा निरर्थक खटाटोप करून तोंड शिणणें; फार व निरर्थक बोलावें लागणें. 'हांका मारतां मारतां माझ्या दांतांच्या कण्या झाल्या.' -पकोघे. दांता- वर मरावयाला पैसा नसणें-अगदीं अकिंचन, निर्धम असणें, होणें, बनणें; जवळ एकहि पैसा नसणें नसणें. दांतावर मांस नसणें-१ (ल.) पैशाचें पाठबळ नसणें; दारिद्रानें ग्रस्त होणें. २ (दुसर्‍याशीं) भांडण्याचें, (दुसर्‍यास) इजा करण्याचें सामर्थ्य अंगी नसणें. 'उगीच भरीस भरल्याप्रमाणें लग्नांत खर्च केला. आपल्या तर दांतांवर मांस नाहीं. कुटुंब एवढें थोरलें.. असें शंकर मामंजींचें रडगाणें चालूं होतें.' -पकोघे. दांतास दांत लावून असणें-निजणें-बसणें-राहणें-तोंड मिटून, कांहीं न खातां, उपाशीं असणें, निजणें, बसणें इ॰ दांतीं घेणें, दातांवर येणें- (एखाद्या) कार्यांत अपयश येणें; (व्यापार इ॰ कांत) नुकसान, तोटा येणें. दांती तृण-तण-कड्याळ धरणें-मान तुकविणें; नम्रपणा स्वीकारणें; शरण येणें; पराजय कबूल करणें. दांतीं बळ धरणें-आतोनात मेहेनत, धडपड, नेट करणें; प्रयासानें, नेटानें काम करणें. दांतीं येणें-१ (एखाद्यावर) रागानें दांत- ओंठ खाणें; दांत ओंठ खाऊन भांडण्यास प्रवृत्त होणें. 'येकीस एकी ढकलून देती । येताति येकीवरि एक दांतीं ।' -सारुह ७.६०. २ फार अडचणींत, पेचांत, येणें, सांपडणें. (एखाद्याचे) दांत त्याच्याच घशांत घालणें-(एखाद्याची) लबाडी बाहेर काढून त्याच्या पदरांत माप घालून त्याची फजिती करणें; (एखा- द्याची) लबाडी त्याच्यावर उलटविणें. सोन्यानें दांत किसणें- (ल.) पैशाच्या राशींत लोळणें. हसतां हसतां दांत पाडणें- हंसून, गोड गोड बोलून फजिती करणें, टोमणे मारणें, निरु- त्तर करणें, कुंठित करणें. दांत कोरून कोठें पोट भरत नसतें-भलत्याच कामीं चिक्कूपणा करून चालत नाहीं. मोठया कार्यास क्षुद्र साधन पुरत नसतें; क्षुल्लक बाबींत काटकसर करून मोठा खर्च भागत नसतो. आपलेच दांत आपलेच ओंठ-१ शिक्षा करणारा आपणच आणि ज्याला शिक्षा करावयाची तोहि आपल्यांतलाच अशी स्थिति असते तेव्हां भांडणारे दोन्ही पक्ष निवाडा, शिक्षा करणाराला सारखेच जवळचे स्वकीय असल्यामुळें दोहोंपैकी कोणाचेंहि बरेंवाईट करतां येत नाहीं अशा वेळीं योज- तात. २ स्वतःच्याच दुष्कर्माचें फळ भोगतांना स्वतःलाच दोष द्यावा लागतो. खावयाचे दांत वेगळे, दाखवावयाचे दांत वेगळे- हत्तीला देखाव्याचे बाहेर आलेले मोठे सुळे आणि चावण्या- करितां तोंडांत निराळे असलेले असे दोन प्रकारचे दांत अस- तात त्यावरून वर दाखवावयाचें एक आणि मनांत भलतेंच असा- वयाचें अशा रीतीचें ढोंग. म्ह॰ दांत आहेत तर चणे नाहींत. आणि चणे आहेत तर दांत नाहींत. = पूर्ण सुदैव कधींहि लाभत नाहीं, त्यांत कांहीं तरी कमीपणा असतोच. एक गोष्ट अनुकूल आहे, पण तिचा उपयोग होण्यास जी दुसरी गोष्ट आवश्यक असते ती अनुकूल नसते अशा वेळीं योजतात. सामाशब्द- ॰इळा-पु. दांतरा, दांते पाडलेला कोयता. ॰कडी-स्त्री. (राजा.) दांतखिळी. (क्रि॰ बसणें). ॰कस-स्त्री. (तोंडातून निघालेले) शब्द; उद्गार; भाषण; विशेषतः अशुभसूचक शब्द, भाकित इ॰ बत्तिशी पहा. (क्रि॰ बांधणें; लागणें) [दांत + कस] ॰कस(सा)ई-पु. नेहमीं अशुभ भविष्यें सांगणारा व ज्याचीं तसलीं अशुभ भविष्यें खरीं ठरतात असें मानलें जातें असा मनुष्य. [दांत + कसाई = खाटिक] -कसळ-ळी-कसाळ-ळी, किसळ-ळी-स्त्री. १ एक सारखें, नेहमीं दांत खाणें, शिव्याशाप देणें, ताशेरा झाडणें इ॰ युक्त दुर्भाषण. २ अभद्रसूचक, अशुभ भाषण, अमंगल भाषण; बत्तिशी. (क्रि॰ बांधणें). -वि. १ नेहमीं दांत खाणारा; शिव्याशाप देणारा; ताशेरा झाडणारा. २ नेहमीं अनिष्ट, अभद्र, अशुभ भविष्य सांगणारा. बत्तिशी वठविणारा-रें. (व्यक्ति, भाषण). दांतकसा- ळीस येणें-दांत खाऊन असणें, येणें. 'दांत कसाळीस येऊन.. इंग्रज.. आला.' -रा १०.८१. [दात + कसला = आयास, श्रम, छळ] ॰किरकंड्या-स्त्रीअव. (व.) दांत खाणें; शिव्याशाप देणें; दांत किरकीट अर्थ १ पहा. 'दांतकिरकंड्या खाल्ल्या माझ्यावर.' ॰किरकीट-किरकिटी-स्त्री. १ दांत खाणें; शिव्याशाप देणें. (क्रि॰ देणें). २ (ल.) हट्टानें, घुमेपणानें मौन धरून स्वस्थ बसणें. (क्रि॰ देणें). ३ (बायकी भाषा.) आर्जव, विनवण्या, गयावया करून उसनें मागणें; दांतांच्या कण्या करणें (तिन्ही अर्थी अनेकवचनी प्रयोग). [दांत + किरकीट = ध्व. दांत खाण्यानें होणारा शब्द] ॰केणें-न. (एखाद्याचें) नेहमींचें, नित्याच्या जेवणाचें अन्न, भक्ष. [दांत + केणें = धान्य, भाजीपाला इ॰ व्यापारी जिन्नस] ॰कोरणें-दांतांत अडकलेला पदार्थ, अन्नाचे कण इ॰ कोरून काढण्याची चांदी, तांबें इ॰ धातूची अणकुचीदार, लहान व बारीक सळई. ॰खिळी-खीळ-स्त्री. १ सन्निपातामुळें वरचे व खालचे दांत परस्परांत घट्ट बसून तोंड उघडतां न येणें. (क्रि॰ बसणें; मिटणें; लागणें, उघडणें). २ न बोलणें; मौनव्रत. [दांत + खीळ = खिळा] ॰घशीं-क्रिवि. तोंडघशीं. 'या रांडा घरघाल्या सख्या तूं पडशी दांतघशीं ।' -सला १०. [दांत + घसणें] ॰चिना- पु. दांत घट्ट करण्याचें औषध; दंतमंजन; (विरू.) दारशिणा; (व.) दाच्छना पहा. [सं. दंत + शाण] ॰पडका-गा-पड्या-वि. १ ज्यांचे दांत पडले आहेत असा. २ दांत पडल्यामुळें विरूप दिसणारा. [दांत + पडणें] ॰वडा-पु. (गो.) लहान मुलास दांत आल्यानंतर, त्याच्यावरून ओंवाळून मुलांकडून लुटवावयाच्या वाड्यांपैकीं प्रत्येक. ॰वडे काढप-(गो.) मुलास दांत आल्यानंतर लहान लहान वडे त्याच्यावरून ओंवाळून ते मुलांकडून लुटविणें. ॰वण-न. १ एक टोंक चावून शेवटास गोंडेदार केलेली, दांत घांस- ण्याची बाभळ, निंब इ॰ झाडाची लहान काडी. २ दंतमंजन; दांत घासण्यासाठीं केलेली पूड. (व.) दातवन. ३ दांतचिना; दांतांस लावून ते काळे करण्याचें औषध. [सं दंतवर्ण; प्रा दंतवण; गुज. दांतवण] ॰वाकें-न. शेतीच्या कांहीं आउतांचे, अवजारांचे दांते आंत वांकविण्याचें एक हत्यार [दांत + वांकणें]

दाते शब्दकोश

सुटकणें

क्रि. १ चटकन् निघून जाणें; सटकणें पहा. [हिं. छुटकना] सुटका-स्त्री. १ मुक्तता; मोकळीक. २ प्रसूति; बाळंत होणें. [हिं. छुटका] सुटगांठ-स्त्री. सुरगांठ पहा. सुटणूक-स्त्री. मुक्तता. सुटणें-अक्रि. १ मोकळें होणें; स्वतंत्र होणें; बंधन- करार-दाब-त्रास-घोटाळा इ॰ तून मुक्त होणें. २ अलग होणें; विभाग पडणें; गांठ-संबंध-संगत इ॰ मधून मोकळें होणें; विलग, वियुक्त होणें. ३ भंगणें; फुटणें. ४ उद्भवणें; फुटणें; बाहेर पडणें (घाम, कंप, कंड); पाझर फुटणें; वास येणें; भीति-राग-रोग-जुलूम- अरिष्ट इ॰ चा प्रादुर्भाव होणें; वारा-पाऊस इ॰ सोसाट्यानें वहाणें; आग-वणवा पेटणें. ५ बैल-घोडा भडकणें किंवा भरधांव पळणें; दाब-बंधन नसणें; मोकट धावणें; स्वैरपणें संचरणें; एखादें काम- धंदा इ॰ करण्यास बेदरकारपणें तुटून पटणें; मनमुराद व बेमुर्वत पणें एखादें कृत्य करीत सुटणें. 'तो मारीत-शिव्या देत-बोंब- लत-पळत-सुटला.' ६ बार होणें, उडणें; स्फोट होणें (तोफ, बंदुक इ॰ चा). ७ मर्यादेबाहेर मोठें होणें; वातानें फोपसें होणें (पोट अंग). [सं. श्वठ्] सुटला-वि. (व.) फालतू (माणूस). सुटल्या सारखा-वि. आधाशी. सुटसुटीत-वि. चपळ; मोकळाचाकळा; नीटनेटका; आखुड व बांधेसूद; हलका व मज- बूत; तडफदार व चलाख (माणूस, शरीराचा बांधा); टुमदार व छोटें (घर); सोईस्कर व मर्यादित; आटोपशीर (काम, धंदा); लहान पण व्यवस्थित; बोजड नसलेलें. सुटा-वि. १ ढिला; मोकळा; अलग; न गुंतलेला. २ बंधनरहित; घट्ट न बसविलेला; लोंबता; हालत असलेला. ३ गर्दी नसलेला; विरळ; फट, अंतर पडलेला. ४ एकटा; वेगळा; निराळा. ५ न अटकलेला; कामांत नसलेला. ६ मुक्त; सुटलेला (कर्ज इ॰ मधून); हाताचा सुटा = उदार. सुटारु-स्त्री. (कु.) वाईट चालीची स्त्री. सुटावणें-अक्रि. १ सुटणें; मोकळा होणें; विस्कळित होणें; ढासळणें (गवताचा भारा, गंज इ॰). २ ओलीनें फुगोटा येणें (मोतीची भिंत इ॰ स); वाढणें; सुजणें; मोठें होणें (पोट इ॰); चैनीनें शरीर फोपसें, लठ्ठ होणें. ३ जागेवरून घसरणें (तुळई इ॰). सुटा स्वर-पु. (संगीत) ज्यावर गायक थांबून रागरक्ति वाढवितो तो स्वर. सुटिक-का-स्त्री. १ (काव्य) सुटणूक; सुटका. २ वर्षाव; वृष्टि. 'पर्जन्याची सुटिका जैसी ।' -ज्ञा ११.६८६. सुटी-ट्टी-स्त्री. मोकळीक; रजा (काम, अभ्यास इ॰ मधून); कामास टाळा; नागा दिवस. [हिं. छुटटी] सुटी करणें-(कु) नीट करणें; निवडणें (धान्य). सुटुक-न. (व.) लचांड. सुटुबुंटु-स्त्री. निरर्थक हालचाल; रिकामी चुळबुळ. (क्रि॰ लावणें; मांडणें; करणें). -क्रिवि. आळसानें; मागेंपुढें करून, निरर्थक प्रकारें. सुट्टा-क्रिवि. (व.) पहिल्यानें; प्रथम. 'पहिले सुट्टा तो माझ्या घरीं आला.' सुट्टी बाहेरील टांग-स्त्री. (मल्लविद्या) कुस्तींतील एक पेंच. सुट्यो-न. १ (कों.) देणेंघेणें पूर्ण करणें; कर्जफेड, ऋणमुक्तता. २ -उद्गा. मुलांच्या खेळांतील अटीतून मोकळीक करण्याविषयीं, आंधळ्याचे डोळे सोडण्याविषयीं एक संज्ञा.

दाते शब्दकोश

कर्म

न. १ एखादें काम, कृत्य. 'हें कर्म झालें समरांत जेव्हां । होतास कोठें रणभीरु तेव्हां ।' -वेणीसंहार ३. २. स्नान- संध्या, यज्ञयागादि धार्मिक विधि; याचे नित्य, नैमित्तिक व काम्य असे तीन भेद आहेत. ३ सांप्रतच्या आयुष्यांतील कृति, चाल, आचार, वर्तणूक; यावरून दैव किंवा नशीब अशा अर्थानें योजतात-येथें दैव म्हणजे पूर्वजन्मार्जित पापपुण्याचा भोगवटा होय; पूर्वजन्मकृत आचरण; संचित. 'अरे अरेकर्मा । बारा वर्षें झालीं याच धर्मा ।।' 'या व्यापारांत मीं साफ बुडालों, माझें कर्म ! दुसरें काय ?' 'कर्मबलिवंत', 'कर्मबलवत्तर' 'घोर-कठिण कर्म' या संज्ञा कर्माचें (दैवाचें) वर्चस्व, काठिण्य, निष्ठुरता दाखवितात. ४ विशिष्ट काम; नैतिक कर्तव्य; जाति, धंदा वगैरेंनीं मान- लेलें आवश्यक कृत्य. ५ (व्या.) कर्त्यानें अमुक क्रिया केली हें दाखविणारा शब्द; कर्तृविषयक व्यापाराचें कारक; कर्माची विभक्ति प्रायः द्वितीया असते. 'रामा गाय बांधतो' यांत गाय हें कर्म. ६ उद्योग; कामधंदा; नेमलेलें, विशिष्ट प्रकराचें काम. ७ सुरतक्रिडा; मैथुन; रतिसुख; संभोग. 'त्यानें तिच्याशीं कर्म केलें.' ८ सामान्य क्रिया; ऐहिक व्यापार; मायिक क्रिया. 'माया हा सामान्य शब्द असून तिच्याच देखाव्याला नामरूपें व व्यापाराला कर्म हीं विशिष्टार्थक नामें आहेत.' -गीर २६०. [सं.] (वाप्र.) कर्म दोन पावलें पुढें-नशीब नेहमीं आपल्यापुढें धांवत असतें. ॰आड ठाकणें-कर्म आडवें येणें; आपत्ति ओढवणें. 'अन्न घेवोनि जों निघाली । तों कर्म आड ठाकलें ।' -ह १६.१३०. कर्मानें ओढणें-ओढवणें-दैवाचा पाश येऊन पडणें; दैवाधीन होणें. -नें जागें होणें-दैव अनुकूल होणें. -नें धांव घेणें-दैव पुढें येणें; दैवाकडून प्रतिबंध, अडथळा होणें. -नें पाठ पुरविणें- उभें राहणें-दैवानें मोडता, अडथळा घालणें; कर्म ओढवणें. -नें मागें घेणें-सरणें-दैवानें साहाय्यने करणें; केल्या कर्माचें फळ-न. केलेल्या कृत्याचा परिणाम. 'केल्या कर्माचें फळ बापा । ऐश्वर्य तुज देतील ।' -अमृत, नव ४४३. (सामाशब्द) ॰कचाट- न. प्रारब्धामुळें मागें लागलेलें दुर्दैव, संकट, विपन्नावस्था; कर्म- कटकट; पूर्व जन्मीचें पाप, भोग. 'प्राणी कष्टकष्टोंचि मेले । कर्मकचाटें ।' -दा १८.८.२०. [सं. कर्म + म. कचाट] ॰कटकट- खटखट-स्त्री. १ प्रारब्धयोगानें वांट्यास आलेलें किंवा गळ्यांत पडलेलें व कंटाळा येण्याजोगें कोणतेंहि काम; वरचेवर त्रास देणारें, डोकें उठविणारें, अडथळा आणणारें काम किंवा व्यक्ति; कोणतीहि नशीबीं आलेली पीडा, त्रास, छळ, जाच वगैरे. २ (ल.) जिकिरीचें, नावडतें काम; व्याद. 'मी म्हातारा झालों, माझ्यामागें ही शिकविण्याची कर्म कटकट कशाला ?' 'आतां त्यांची कर्मकटकट आपणांस कशाला हवी' -नि ६७. ३ (ल.) भांडण; तंटा; कटकट. 'तुम्हां दोघांत नेहमीं इतकी कर्मकटकट चालत असते.' -भा ३७. ॰कट्टो-वि. (गो.) हतभागी; कर्मकरंटा. ॰कथन-नी-न. १ कर्मकथा; कर्माची कहाणी. २ (ल.) दुर्दैवी प्रसंगकथन; दुःखदकथा; कर्मकथा पहा. 'ऐसी आमुची कर्मकथनी । तें अनायासें आलें सर्व घडोनी ।' -मक २६. १८५. [सं.] ॰कथा-स्त्री. १ प्रारब्धामुळें भोगलेल्या दुःख, त्रास, दगदग, वगैरेची दुसर्‍याजवळ सांगितलेली गोष्ट, वृत्तांत, कहाणी. २ आत्मश्लाघेचें किंवा रिकामटेकडें भाषण; बाता. ३ एखाद्या प्रसंगाची किंवा कृत्याची खरी व इत्थंभूत हकीकत. ४ कंटाळवाणें, निरर्थक भाषण, बडबड. [सं.] ॰कपाट-न. कर्म- कचाट पहा. [सं.] ॰कहाणी-स्त्री. कर्मकथा पहा. ॰कांड- न. त्रिकांड वेदांतील यज्ञासंबंधींचा कर्ममार्गदर्शक व आचारनिद- र्शक भाग; -मंत्र व ब्राह्मणें मिळून जो वेदभाग त्यास कर्मकांड व उपनिषदांस ज्ञानकांड म्हणतात. 'कर्म कांड तरी जाणें । मुखोद्गत पुराणें ।' -ज्ञा १३.८२८. २ धर्मकर्में, आचारविचार, संस्कार वगैरेना व्यापक अर्थानें हा शब्द लावितात. (सामा.) आन्हिक; नित्यनैमित्तिक आचार. 'कृष्णगीत रुचतां श्रवणातें । कर्मकांड रुचि न दे कवणातें ।।' 'आतां आपलें कर्मकांड अगदीं एकाबाजूस ठेवावें.' -चंद्रगुप्त ३५. ३ कंटाळवाणी, निरर्थक बडबड; कर्मकथा. (क्रि॰ गाणें; सांगणें; बोलणें). ॰कार-वि. १ (गो.) कर्मनिष्ठ. २ शिल्पी; लोहार. [सं.] ॰काल-ळ-पु. धर्मकार्यें करण्यास उचित असलेला काळ, वेळ, समय. [सं.] ॰केरसुणी-स्त्री. कर्मरूपी केर सरसकट झाडणारी, कर्मापासून सोडविणारी केरसुणी. 'तेव्हां तेचि श्रद्धा होये । कर्मकेरसुणी ।' -ज्ञा १७.६४. ॰गति- स्त्री. दैव; प्रारब्ध; नशीब. दैवगति पहा. [सं.] ॰चंडाळ- चांडाळ-पु. (कृत्यानें) निवळ चांडाळ. १ अतिक्रूर, पाषाणहृदयी माणूस. २ स्वैर वर्तनी; धर्मलंड; दुरात्मा. [सं.] ॰चोदना- स्त्री. कर्म करण्याची प्रेरणा. 'कर्मचोदना व कर्मसंग्रह हे शब्द पारिभाषिक आहेत.' -गीर ८३५. [सं.] ॰ज-वि. कर्मापासून उत्पन्न झालेलें. 'सकळ यज्ञ कर्मज' -ज्ञा ८.४६. [सं.] ॰जड-पु. कर्मठ लोक. 'तिन्हीं लोकांचा शास्ता । ईश्वर तो मी नियंता । येणें कर्मजडांची वार्ता । अनीश्वरता छेदिली ।' -एभा १०.६२१. ॰जात-न. सर्व प्रकारचें कर्म; सर्व तर्‍हेचे व्यापार. 'मग सस्य फळपाकांत । तैसें निमालिया कर्मजात । आत्मज्ञान गिंवसित । अपैसें ये ।' -ज्ञा १८.१२९. [सं.] ॰जीव-वि. (गो.) बारीक, लहान प्राणी. ॰दक्ष-वि. धर्माचार व विधि यांत निपुण; कर्मठ; कर्मशील; कर्मनिष्ठ, कर्मिष्ठ यांसारखा उपयोग. 'कर्मदक्षा कर्ममोचका । जयराम कोदंड भंजना ।' [सं.] ॰धर्म-न. (क्क.) पु. (यासमासांतील धर्म शब्द जरी पुल्लिंगी असला तरी बहुतेक सर्व समास नपुंसकलिंगीच आहेत; कारण यांतील प्रधानार्थ कर्म शब्दापासूनच निघालेला असून धर्म शब्द केवळ जोडशब्द आहे) वर्तन; वर्तनक्रम; कृत्य; आचरण. 'जसें ज्याचें कर्मधर्म तशी त्यास फलप्राप्ति,' 'कर्माधर्मानें कोण्ही संपत्ति भोगतो आणि गादीवर बसतो, कोण्ही फांशी जातो.'; 'कोण्हाच्या कर्मधर्मांत कोण्हाचा वांटा नाहीं.' = प्रत्येकाला स्वतःच्या कृत्याबद्दल झाडा दिला पाहिजे. ॰धर्मगुण-पु. कर्म- धर्माचा प्रभाव, शक्ति. कर्मधर्मसंयोग पहा. [सं.] ॰धर्मविर- हित-वि. धर्माज्ञा, धार्मिक व्रतें व कृत्यें ज्यानें सोडलीं आहेत किंवा जो त्यापासून मुक्त झाला आहे असा; ऋषि किंवा साधुजन यांना चांगल्या अर्थीं व उच्छृंखल व धर्मलंड यांना वाईट अर्थीं लावतात. 'आम्हीं कर्मातीत झालों म्हणती' या शब्दाचा अर्थ दोन्हीं प्रकारचा म्हणजे चांगला व वाईटहि आहे. 'झालों कर्म- धर्मविरहित । मना आवडे तो भोग भोगित ।' [सं.] ॰धर्म- संयोग-धर्मयोग-पु. १ स्वतःचें दैव आणि सत्कर्म यांचा संयोग; भाग्य व सदाचार यांचें ऐक्य (पूर्वजन्मार्जित आणि इहजन्मार्जित सत्कृत्यांचें फळ मिळून) २ अकल्पित मेळ; यदृच्छा; प्रारब्धयोग. ॰धर्मसंयोगानें-क्रिवि. अचानक; चम- त्कारिक किंवा अकल्पित मेळ मिळून येऊन; प्रसंगोपात्त; प्रारब्ध- योगानें. 'कर्मधर्मसंयोगानें मी अगदीं सहज बाहेर गेलों तों माझी नजर तिच्याकडे गेली.' -मायेचा बाजार. 'कर्मधर्मसंयोगानें तुमची गांठ पडली आहे तर गोड बोलून काळ लोटावा.' ॰धारय समास-पु. (व्या.) वक्त्याच्या मनांत उभय शब्दांचा भाव ज्यांत समान असतो किंवा उभय शब्दांचा परस्पर उप- मानोपमेयभावसंबंध ज्यांत असतो तो; विशेष्य-विशेषणांचें सान्निध्य असून त्यांचा जो समास घडतो तो; उदा॰ 'भक्तिमार्ग = भक्ति तोच मार्ग, किंवा भक्तिरूप जो मार्ग तो; भवसागर; संसारा- टवि; काळपुरुष.' -मराठीभाषेचेंव्या. २७५. तत्पुरुषसमासाचा एक भेद. [सं.] ॰निष्ठ-वि. कर्मठ पहा. 'जया लाभाचिया आशा । करूनि धैर्यबाहूंचा भरंवसा । घालीत षट्कर्मांचा धारसा । कर्मनिष्ठ ।' -ज्ञा ६.४७४. [सं.] ॰निष्ठा-स्त्री. १ कर्मावर निष्ठा. २ कर्म- योग. 'वैदिक धर्मांत...दोन मार्ग...आहेत, पैकीं एका मार्गास...ज्ञाननिष्ठा व... दुसर्‍यास कर्मयोग किंवा संक्षेपानें नुसता योग अगर कर्मनिष्ठा असें म्हणतात. -गीर ३०१. [सं.] ॰न्यास-पु. १ कर्म किंवा कृत्यें त्याग (पुढील जन्मीं हित व्हावें किंवा फळ मिळावें म्हणून). २ फलन्यास; कर्मा- पासून मिळणार्‍या फलाविषयींच्या इच्छेचा किंवा आशेचा त्याग; निष्कामकर्म. [सं.] ॰फल-न. प्रारब्धापासून मिळणारें फळ; पूर्वजन्मीं केलेल्या पापपुण्याचें चांगलें अगर वाईट असें या जन्मीं भोगावें लागणारें फळ. 'सांडूनि दुधाचि टकळी । गोंवारी गांवधेनु वेंटाळी । किंबहुना कर्मफळीं । तैसें कीजे ।' -ज्ञा १८.१७४. [सं.] ॰फुटका-वि. भाग्यहीन; दुर्दैवी; कमनशिबाचा; अभागी. [कर्म + फुटणें] ॰फुटणें-सक्रि. दुर्दैव ओढवणें; गोत्यांत येणें; नुकसान होणें. ॰बंध-पु. फलाशेनें केलेल्या कर्मामुळें प्राप्त झालेलें बंधन; प्रारब्धप्राप्त स्थिति; मायिक पसारा; ऐहिक मायापाश; प्रपंच; संसार. 'जो पहुडला स्वानंदसागरीं । कर्मबंधीं न पडे तो ।' [सं.] ॰बंधु-पु. व्ययसायबंधु; समव्यवसायी; एकाच प्रकारचें काम करणारा. [सं.] ॰भुवन-न. कर्मरूप घर. 'तेथ न्यावो आणि अन्यावो । हा द्विविधु साधूनि आवो । उभवितां न लवी खेंवो । कर्मभुवनें ।' -ज्ञा १८.४५५. [सं.] ॰भूमि, भूमिका -स्त्री. १ इहलोक; मृत्युलोक; यज्ञादि धार्मिक कृत्यें जेथें करतां येतात ती जागा; कर्म करावयाचें क्षेत्र; रंगभूमि (मर्त्यांची). 'जेथें मनाचा प्रवेशु नाहीं । त्यांची पायवाट ते ठायीं । ऐसें स्वइच्छा विचारितां महीं । आले ते पाही कर्मभूमीसी' -एभा २.१८४. 'परम प्रतापी दशरथपिता । कर्मभूमीस येईल मागुता ।' -रावि १६.८६. [सं.] २ प्राधान्यानें भारतवर्ष. -हंको. ॰भोग-पु. भवितव्य- तेच्या नियामानुरूप मिळणारीं सुखदुःखें सोसणें; दैवाची भरपाई; पूर्वसंचितानुरूप या जन्मीं प्राप्त होणारी स्थिति. 'माझा कर्मभोग चुकत नाहीं.' [सं.] ॰भ्रष्ट-वि. धर्मशास्त्रविहित नित्यनैमित्तिक कर्मांचें आचरण न करणारा; धर्माज्ञा व धर्मकर्म परिपालनाविषयीं उदासीन; कर्तव्यच्युत; कर्तव्यपराङ्मुख. [सं.] ॰मार्ग-पु. १ स्नानसंध्या इ॰ कर्में करण्याची रीत; यज्ञयागादि कर्मरूप ईश्वर- प्राप्तीचा किंवा मोक्षाचा साधनीभूत मार्ग; सत्कृत्यें केल्यानें व धर्माचरणानें मोक्षाला जाण्याचा मार्ग. २ धर्मकृत्यें करण्याचा खरा मार्ग. ३ श्रौत म्हणजे यज्ञयागादि कार्मांचा मार्ग. 'भारतीय तत्त्वज्ञानांत मोक्षाचे कर्ममार्ग, ज्ञानमार्ग व भक्तिमार्ग असे तीन मार्ग सांगितले आहेत.' -ज्ञाको क १३२. [सं.] ॰मार्गी-वि. कर्ममार्गानें जाणारा; जो निष्ठापूर्वक धर्माचरण करून परमेश्वर- प्राप्तिविषयीं झटतो तो. [सं.] ॰मुक्ति-स्त्री. स्नानसंध्यादि नित्य नैमित्तिक कर्में करण्याची आवश्यकता ज्या स्थितींत उरत नाहीं अशी अवस्था; नैष्कर्म्यसिद्धि [सं.] ॰मोचक-वि. कर्ममार्गा- पासून मुक्त करणारें; ऐहिक सुखदुःखापासून सोडविणारें. 'कर्म- दक्षा कर्ममोचका । जयराम कोदंडभंजना ।' [सं.] ॰मोचन- न. कर्ममार्गापासून मुक्तता. ॰योग-पु. १ प्रारब्ध; दैव; यदृच्छा; योगायोग. २ दैवगतीनें घडणारी गोष्ट. -शर. ३ व्यापार; चळवळ किंवा कार्य करण्याचें तत्त्व. -ज्ञाको क १३५. ४ ज्ञान हेंच जरी मोक्षसाधन असलें तरी कर्मशून्य राहणें कधींच शक्य नसल्यामुळें त्यांचें बंधकत्व नाहींसें होण्यास कर्में कधींहि न सोडतां शेवट- पर्यंत तींच निष्कामबुद्धीनें करीत राहण्याचा जो योग तो. -टिसू ४७-४८; याला इंग्रजींत एनर्जीझम असा प्रतिशब्द गीतारह- स्यांत सुचविला आहे. -गीर ३०१ वरील टीप. या योगाचें जें शास्त्र त्यास कर्मयोग म्हणतात व तें आचरणारा तो कर्मयोगी). 'बलवंत (टिळक) कर्मयोगी' -सन्मित्रसमाज मेळा पद्यावली १९२९, पद १. [सं.] ॰लंड-वि. धर्मशास्त्रविहित नित्यनैमित्तिक विधींचें पालन न करणारा; धर्मभ्रष्ट; धर्मविधि व धर्माज्ञेचा धिक्कार करणारा, उपहास करणारा [सं.] ॰लोप-पु. नित्य धार्मिक क्रमां- तील एखादें कर्म सोडणें, न करणें; दीर्घकालपर्यंत नित्य अगर नैमित्तिक कर्मविधि न करणें. [सं.] ॰वाचकधातुसाधित- न. मूळ धातुस 'ला' किंवा 'लेला' हे प्रत्यय लाविले असतां होणारें धातुसाधित. उ॰ केलेला, दिलेला. परंतु यांत 'पढ' धातूचा गण वर्ज्य करून हे प्रत्यय लावितेंसमयीं सकर्मक धातूस 'ई' आगम होतो. उदा॰ ठेविला, अर्पिला, आकर्षिलेला. -मराठी- भाषेचें व्याकरण १७३. [सं.] ॰वाद-पु. १ धर्मविहित कर्मां. नींच मोक्षप्राप्ति होते असें मत. २ मनुष्यास विशिष्ट जन्मांत जें सुखदुःख मिळतें तें त्याच्या पूर्व जन्मांतील कृत्यांचें फल होय असा युक्तिवाद; कर्माचें फळ भोगणें ही कल्पना. -ज्ञाको क १३६. [सं.] ॰वादी-पु. कर्मवादावरच भिस्त ठेवून त्याचें समर्थन करणारा माणूस [सं.] ॰वासना-स्त्री. दैनिक धर्मकृत्यांबद्दलची इच्छा, आवड. [सं.] ॰विधि-पु. (अनेकवचनींहि प्रयोग होतो) धर्मसंबंधीं कृत्यें वगैरेचे नियम, पध्दति, रीति, मार्ग; कोणत्याहि विशिष्ट प्रकारच्या धर्मकृत्याचें सूत्र किंवा विधान. [सं.] ॰विपाक-पु. १ पूर्व जन्मीं केलेल्या पुण्य, पाप वगैरे कृत्यांचें फल पुढील जन्मीं हटकून यावयाचें हा सिद्धांत. २ कर्माची फलनिष्पत्ति; परिणाम. [सं.] ॰वीर-पु. कार्यकर्ता; पराक्रमी मनुष्य. 'कर्मवीर निघुनी गेलो' -संग्राम ४९. [सं.] ॰वेग- कर्माचा वेग-पु. दैवाचा किंवा प्रारब्धाचा जोर, झपाटा, सामर्थ्य, धक्का; पूर्वसंचिताचा प्रभाव. 'कलालाचा भोवरा । जैसा भवे गरगरा । कर्मवेगाचा उभारा । जोंवरी ।' 'जेथें कर्माचा वेग सरे । तेथें धांव पुरे ।' [सं.] २ (अनेक वार केलेल्या) कृत्यांचा जोर, सामर्थ्य, प्रचोदन; संवयीचा जोर; स्वाभाविक प्रेरणा; 'कर्मवेग भलत्याकडे ओढून नेईल.' ॰शील-वि. कर्मा- सक्त; धर्मानें वागणारा; शास्त्रानें संगितलेलीं सर्व धर्मकर्में जो मनापासून काळजीपूर्वक करतो तो. [सं.] ॰संगी-वि. कामांत, धर्मानुष्ठानांत, व्रतनियमनांत सतत गढलेला; याच्या विरुद्ध ज्ञानाभ्यासी [सं.] ॰संग्रह-पु. निरनिराळे व्यवसाय, व्यापार; आपण ज्या क्रिया करतों त्या; मानसिक क्रियेच्या तोडाची बाह्य, प्रत्यक्ष क्रिया. 'कर्मसंग्रह या शब्दानें त्याच मानसिक क्रियेच्या तोडीच्या बाह्य क्रिया दाखविल्या जातात.' -गीर ८३६. [सं.] ॰संचय-पु. कर्मसंग्रह; मनुष्याचे अनेकविध व्यापार, क्रिया; चलनवलनादि कृत्य 'तैसेंचि कर्ता करण कार्य । हा कर्मसंचयो ।' -ज्ञा १८.५१२. [सं.] ॰संन्यास-पु. १ कर्मांचा त्याग; नित्य नैमित्तिकादि कर्में करण्याचें सोडून देणें. २ शारीरिक सोडून इतर सर्व कर्मांचा त्याग (शांकरमत). 'शंकराचार्यांच्या ग्रंथांत कर्मसंन्यासच प्रतिपाद्य आहे.' -टिसू ५ [सं.] ॰सूत्र-न. नित्य धर्मकर्माची व त्यासंबंधीं नियमांची मालिका; कर्तव्यकर्म- परंपरा. 'भवपाश तोडिते शस्त्र । ज्ञान ईश्वराचें विचित्र । परि जिवाचें कैसें कर्मसूत्र । जे अनावडी तेथें विषयीं ।' ॰हीन- वि. धार्मिक नियम, विधि न पाळणारा; धार्मिक नियमाबद्दल काळजी न करणारा. [सं.] म्ह॰ कर्मणो गहना गति: = नशि- बाची गति जाणणें शक्य नाहीं (एखादी वाईट गोष्ट अकल्पित घडली म्हणजे दैववादी मनुष्य ही म्हण म्हणतो.)

दाते शब्दकोश

१ वर्णमालेंतील पहिला स्वर. या वर्णाचें सर्वांत जुनें स्वरूप अशोकाच्या गिरनार शिलालेखांत सांपडतें-ओझा; ज्ञाको.२ पु. ब्रह्मा; विष्णु; महेश; सूर्य; अग्नि; वायु; ब्रह्म; मोर. ३ उपसर्ग नका- रार्थीं प्रकार सातः (अ) त्यासारखें पण तें नव्हे. 'अब्राह्मण' (ब्राह्मणा- सारखा पण ब्राह्मण नव्हे); 'अचक्षुदर्शन'. (आ) अप्राशस्त्य; अयो- ग्यता; अनुचितपणा. 'अकाल' (अयोग्य काल); 'अवेळ' (अयोग्य वेळ); 'अपथ्य'. (इ) निषेध; प्रतिषेध. 'अदर्शन' (ई) अभाव. 'अज्ञान'; 'अक्रोध'. (उ) त्याहून इतर, किंवा भेद. 'अमनुष्य' (मनु- ष्येतर, जनावर वगैरे). (ऊ) अल्पत्व; कमीपणा. 'अबोल्या'.'अनु- दरा' (कृशोदरी); 'अशिजा (अर्धवट शिजलेला). (ॠ) विरोध; उलटे- पणा. 'अधर्म'; 'अनीति'. ४ निरर्थक. 'अघोर' (घोर); 'अपरोक्ष' (पाठीमागें). ५ क्रिवि. मूळ स्थितीला जाणें. 'असुजणें' (सूज उतरणें).

दाते शब्दकोश

आ      

उपसर्ग.       व्यंजनादी शब्दापूर्वी सामान्यतः पुढील अर्थाने − (अ) लघुता; अल्पता; कमीपणा. उदा. ओष्णम् = कोंबट (उष्णम् = कढत, ओष्णम् = किंचित, उष्ण = कोंबट). (आ) व्याप्ती; प्रसार; वाढ. उदा. + आभोग = समृद्धी, पूर्णता. (भोग = सुख, आभोग = अधिक भोग, भोगाची वाढ). (इ.) उपक्रमाची मर्यादी (अमुक पासून) उदा. आसमुद्रात् = समुद्रापासून, आजन्मतः = जन्मापासून. (ई) अवसान; मर्यादा; अंतीची मर्यादा. (अमुकपर्यंत, पावेतो). उदा. आजानु = गुडघ्यापर्यंत, आमरण = मृत्यूपर्यंत, आकर्ण = कानांपर्यंत. (उ) अंतर्भूत व समाविष्ट मर्यादा. उदा. आक्रमण = व्यापून टाकणे. (क्रम = जाणे, चालणे, पाऊल टाकणे). आसकलात् ब्रह्म = ब्रह्म वस्तुमात्र व्यापून आहे. (आ+सकल = सर्व). (ऊ) अतिरिक्त; अकारण, वाजवीपेक्षा अधिक; निरर्थक; द्विरुक्ती. उदा. आभास, आप्राण, आल्हाद, आघात (भास, प्राण, ल्हाद, घात याप्रमाणेच अर्थ). (ए) आ लावल्याने शब्दाचा अर्थ वाढतो, मर्यादित होतो, बदलतो किंवा फिरविला जातो. उदा. आग्रह (ग्रह = देणे, घेतल्यानंतर त्यालाच चिकटून राहणे). = हेका; आचार (चर् = घालणे) = शास्त्राप्रमाणे वागणूक ठेवणे; आगमन (गमन = जाणे) = जवळ येणे; येणे; आमोद (मोद = आनंद) = सुवास; आकृति (कृति = कृत्य) = मूर्ती; स्वरूप; आकार.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

१ वर्णमालेंतील दुसरें अक्षर. याचा अक्षरविकास साधारण अ सारखाच झाला आहे. २ संस्कृत शब्दाच्या मागें जेव्हां हें अक्षर उपसर्ग म्हणून लागतें तेव्हां त्याचे पुढील अर्थ होतात- (अ) लघुता; अल्पता; कमीपणा. उ॰ ओष्णम् = कोंबट (उष्णम् = कढत, ओष्णम् = किंचित् उष्ण-कोंबट) (आ) व्याप्ति; प्रसार; वाढ. उ॰ आभोग = समृद्धि; पूर्णता. (भोग = सुख, आभोग = अधिक भोग, भोगाची वाढ). (इ) उपक्रमाची मर्यादा (अमूकपासून). उ॰ आसमुद्रात् = समुद्रापासून, आजन्मतः = जन्मापासून. (ई)अवसानमर्यादा; शेवटची, अंताची मर्यादा (अमूकपर्यंत, पावेतों)उ॰ आफलोदय = फलप्राप्ति होईपर्यंत; आजानु = गुडघ्यापर्यंत; आकर्ण; आमरण = मृत्यूपर्यंत. (उ) अंतर्भूत व समा- विष्ट मर्यादा. उ॰ आक्रमण (क्रम् = जाणें, चालणें, पाऊल टाकणें) = व्यापून टाकणें, आसकलात् ब्रह्म = ब्रह्म वस्तुमात्र व्यापून आहे. (आ + सकळ = सर्व). (ऊ) अतिरिक्त; अकारण, वाजवीपेक्षां अधिक; निरर्थक; द्विरुक्ति. उ ॰ आभास, आघ्राण, आह्लाद, आघात, (भास, घ्राण, ह्लाद, घात, याप्रमाणेंच अर्थ ). (ए) आ लावल्यानें शब्दाचा अर्थ वाढतो, मर्यादित होतो, बदलतो किंवा फिरविला जातो उ ॰ आग्रह(ग्रह = घेणें-घेतल्यानंतर त्यालाच चिकटून राहणें) = हेका. आचार (चर् = चालणे) = शास्त्राप्रमाणें वागणूक ठेवणें. आग- मन (गमन = जाणें) = जवळ जाणें, येणें.आमोद (मोद = आनंद) = सुवास.आकृति (कृति = कृत्य ) = मूर्ति; स्वरूप; आकार.

दाते शब्दकोश

अचाव(वा)चा, अच्यावच्या

क्रिवि. १ बोलण्यास अयोग्य; निरर्थक; असंबद्ध; अद्वातद्वा; अचकटविचकट (भाषण). २ गैरशिस्त; ऐदीपणानें (काम करणें.) ३ अव्यवस्थित; कसेंतरी. 'तो अचावचा खातो.' [ध्व. सं. अवाच्य + वाच्य]

दाते शब्दकोश

अगडत(द)(ध)(ब)गड

न. १ क्षुल्लक वस्तु; अडगळ; सटर- फटर. २ अमर्याद, शुष्क, निरर्थक बडबड; वांकडेंतिकडें बोलणें- करणें-वागणें, वगैंरे. ३ शिळेंपाकें जाडेंभरडें अन्न; गरीबीचें खाणें; भिकार खाणें. -क्रिवि. कसेंतरी; वेडेंवांकडें; ओबडधोबडपणें. [विचित्र प्रयोग. सं. अ + घट्; म. घाट]. अगडीं दगडीं जीव घालणें-पाडणें-एखाद्यास अडचणींत घालणें. अगडीं दगडीं पडणें-अडचणींत सांपडणें.

दाते शब्दकोश

अगडतगड, अगडदगड, अगडधगड, अगडबगड      

न.       १. क्षुल्लक वस्तू; अडगळ; सटरफटर. २. अमर्याद, शुष्क, निरर्थक बडबड; वेडेवाकडे वागणे, बोलणे वगैरे. ३. शिळेपाके, जाडेभरडे अन्न; निःसत्त्व खाणे; गरिबीचे खाणे; भिकार खाणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अजा

स्त्री. १ शेळी; बकरी. २ माया; मोह; भास. 'अजाची ते अजामाया ।' -एभा ७.५८६. [सं.] ॰कृपाणीयन्याय-पु. शेळी जावयास व तिच्यावर तरवार पडण्यास एकच गांठ पडणें. यावरून डोक्यावर तरवार टांगली असतां अथवा अगतिक अवस्था असेल तेव्हां योजितात. 'वर्तमानपत्र-कर्त्याच्या डोक्यावर प्रेस-अॅक्टाची तरवार अजा-कृपाणीयन्यायानें टांगली आहे.' ॰ग (ल) ळ-वि. १ बावळा; कर्तृत्वहीन; मूर्ख. [सं. अजा- गल]. २ निराधार; निरर्थक. ॰गळस्तन-न. (शेळीच्या गळ्याजवळचा मांसल अवयव; याचा उपयोग नसतो म्हणून लक्षणेनें ) कर्तुत्वहीन, कुचकामाचा पुरुष, बैल, इ॰. 'धर्मार्थ- काममोक्षाणां यस्यैकोपि न विद्यते । अजागलस्तनस्यैव तस्य जन्म निरर्थकम् ।।' -सुभाषित. ॰पुत्र-पु. १ कोंकरूं. २ (ल.) गरीब माणूस. 'अजापुत्रं' बलिं दद्यात् = यज्ञांत बोकडासच बळी देतात; तद्वतच गरीब निराश्रित माणसास लोक छळतात. [सं.] ॰पालक-पु. १ धनगर. २ मल्हारराव होळकर व त्याचे वंशज यांना जुन्या कागदपत्रांतून लक्षणेनें हा शब्द लावितात. [सं.] ॰युद्ध- न. बकरीं फार वेळ भांडत नाहींत नुसता आव आणतात; त्यावरून लक्षणेनें पोकळ धमकी -भांडण. [सं.]

दाते शब्दकोश

अजागल, अजागळ      

वि.       १. बावळट; मूर्ख. २. निरर्थक; निरुपयोगी. ३. कर्तृत्वहीन. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अजागळस्तन      

पु.       (शेळीच्या गळ्याजवळचे स्तनासारखे मांसल अवयव. याचा उपयोग नसतो म्हणून लक्षणेने) निरर्थक; कर्तृत्वहीन; कुचकामाचा. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आका

१ अक्का पहा. २ (गो.) आत्या. ३ निरर्थक शब्द; आकाबाका (ओठोप्रमाणें). ‘आका म्हणतां बाका येत नाहीं = ओ म्हणतां ठो येत नाहीं; अडाणी; अक्षरशत्रु.

दाते शब्दकोश

अनर्थक

वि. १ निरर्थक; अर्थशून्य (ग्रंथ पद्य; वाक्य; इ॰). २ बिनफायदेशीर; व्यर्थ; पोकळ. ३ अनर्थकारी; उपद्रवी [सं.]

दाते शब्दकोश

अनर्थक      

वि.       १ निरर्थक; अर्थशून्य (ग्रंथ, पद्य, वाक्य इ.). २. बिनकायदेशीर; व्यर्थ; पोकळ. ३. अनर्थकारी; उपद्रवी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अनुपकारी

वि. १ उपकाराची फेड न करणारा; उपकार न जाणणारा; कृतघ्र. २ दुसऱ्यावर उपकार न करणारा. ३ (व्यापक) निरुयोगी; कुचकामाचा; निरर्थक (पदार्थ- वस्तु).[सं. अ + उप- कार]

दाते शब्दकोश

अनुपकारी      

वि.       १. उपकाराची फेड न करणारा; उपकार न जाणणारा; कृतघ्न. २. दुसऱ्यावर उपकार न करणारा. ३. (व्यापक) निरुपयोगी; कुचकामाचा; निरर्थक (वस्तू, पदार्थ).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अपार्थ      

वि.       निरुपयोगी; निरर्थक : ‘जेथ सत्य अर्थ नाहीं, तो अपार्थ म्हणिजे पाही ।’ – एभा २८·१५९. [सं. अप +अर्थ]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अपार्थ

वि. निरुपयोगी; निरर्थक. 'जेथ सात्य अर्थ नाहीं । तो अपार्थ म्हणिजे पाही ।' -एभा २८.१५९. [सं. अप + अर्थ]

दाते शब्दकोश

आपला      

सना.       १. स्वतःचा; मालकीचा. आपण या शब्दाप्रमाणे याचाही प्रयोग तिन्ही पुरुषी, दोन्ही वचनात करतात. २. कित्येकदा हा शब्द निरर्थक, वाक्यपूरणार्थक येतो. उदा. ‘मी आपला येथून उठलो.’ आपला हा शब्द पुष्कळ वेळा आपण या अर्थी वापरण्यात येतो. जसे:− आपल्यास किंवा आपल्याला = आपणांस (आपणची षष्टी) [सं. आत्मीय] (वा.) आपला म्हणणे, आपला समजणे, आपलासा म्हणणे, आपलासा समजणे – एखाद्यास आत्मीय भावनेने किंवा मित्रत्वाच्या भावनेने वागविणे; प्रिय समजणे. तू आपला ऐस – तू आपले स्वतःचे काम पहा. आपली वाढवून खाणे – आपमतलबीपणाने आपलेच घोडे पुढे ढकलणे; आपल्या हिताकडेच पाहणे. आपलीशी करणे – १. आपले म्हणणे (पक्ष, मत) सिद्ध करणे, प्रस्थापित करणे; आपली सरशी करणे. २. वश करणे; ताब्यात आणणे : ‘प्रपंच वैरी मारावा । अथवा आपलासा करावा ।’ − विसिंपू ७·१४४. ३. स्वतःच्या मनाप्रमाणे वागणे. आपलेच घोडे पुढे दामटणे – स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करणे; इतरांच्या आधी आपले काम करून घेण्याचा प्रयत्न करणे : ‘जो तो आपल्या गांवचं घोडं पुढं दामटू लागला.’ – फगो १. आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणे – स्वतःचे नुकसान होईल असे वागणे : ‘असे ठराव करून काँग्रेस आपल्याच पायावर धोंडा पाडून घेत आहे.’−

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अपव्यय

पु. उधळेपणा; अतिशय खर्च; निरर्थक खर्च; उधळपट्टी; दिवाळखोरी. -यी-वि. अतिशय खर्च करणारा; उधळ्या. [सं. अप + व्यय]

दाते शब्दकोश

अपव्यय      

पु.       १. उधळेपणा; निरर्थक खर्च; उधळपट्टी; दिवाळखोरी. २. अयोग्य कामात घालवलेला काळ, पैसा, शक्ती. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आरीबोरी      

स्त्री.       १. आरी, बोरी यासारखी विशेषतः काटेरी व फुलांस वास नसलेली झाडे : ‘चंदनाचे संगतीवरी । सुवास होती अरीबोरी । त्यातें देवद्विज वंदिती शिरीं । तेवी साधकां करी सत्संग ।’ − एभा २९·२५२. २. (सामान्यतः) बोरीचे झाड; बोरीबरोबर आरीचाही निरर्थक उल्लेख येतो : ‘आरी बोरी रुई कारली ती शीघ्र आण । जवळि राखण मांडा ।’ − वसा ७. [सं. आरि+बोरी किंवा बोरीचे द्वि.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आरीबोरी

स्त्री. १ आरी, बोरी यांसारखीं विशेषतः कांटेरी व फुलांस वास नसलेलीं झाडें. आरी अर्थ ४ पहा. 'चंदनाचे संगतीवरी । सुवास होती आरीबोरी । त्यांतें देवद्विज वंदिती शिरीं । तेवी साधकां करी सत्यंग' -एभा २९.२५२. २ (सामा.) बोरीचें झाड; बोरीबरोबर आरीचाहि निरर्थक उल्लेख येतो. 'आरी बोरी रुई कारली ती शीघ्र आण । जवळि राखण मांडा ।' -वसा ७. [सं. आरि + बोरी; किंवा बोरी द्वि.]

दाते शब्दकोश

अर्थशून्य      

वि.       काहीही अर्थ, आशय नसलेला; निरर्थक; मुद्द्याला सोडून असलेला. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अस्मान

न. आकाश; अंतराळ; स्वर्ग. ‘अस्मानीं फत्तेची ध्वजा लागली.’ –चित्रगुप्त ३३. ‘अस्मानहि बुडालें तरी (मराठे) आपल्या मर्दानगीस अंतर करणार नाहींत.’ –मरि ३.७१. ॰गिरी- पु. चांदवा; छत; चांदणी; मांडवाचें आच्छादन; मांडव; छप्पर; वळचण. ॰चपेटा- पु. १ परमेश्वरी कोप; मोठा प्रलय; संकट; दैवी आपत्ति; अरिष्ट. २ (व्योजोक्ति) आकाशांत उड्डाण करणारा घोडा ( एकाद्या रद्दी, टाकाऊ, निकामी घोडयास म्हणतात ). -ची परी- स्त्री अप्सरा; सुंदर स्त्री. ‘तबियतखानाचें सर्व लक्ष्य हातीं लागलेल्या अस्मानचच्या परीकडे होतें.; -स्वप ४२९. ॰तारा -पु १ आकाशांत चमकणारा तारा; चांदणी. २ धूमकेतु; उल्का. (क्रि॰ तुटणें ). ३ सुंदर, चपळ घोडयाबद्दल अगर खंद्या घोडेस्वाराविषयीं, तसेंच उत्तम गवई उत्तम लेखक, उत्तम बजवय्या इत्यादिकांची प्रसंशा करतेसमयीं म्हणतात. अस्मान तारा तुटणें-१ उल्का- पात होणें; तारे निखळून पडणें. २ निरर्थक बडबड करणें. अस्मान जमीनीची तफावत- स्त्री. महदंतर; फार मोठें अंतर. ‘त्या सुमारास व या लिहिण्यास पाहतां अस्मान-जमिनीची तफा- वत.’ –ख १२९५. अस्मान ठेंगणें होणें- स्वर्ग दोन बोटें उरणें; ताठयाचा-गर्वाचा कळस होणें. ‘नवऱ्याच्या पगारामुळें तर तिला अगदीं अस्मान ठेंगणें झालें होतें.’ –पकोघे [फा. आस्मान् = आकाश ]

दाते शब्दकोश

अस्मान      

न.       आकाश; अंतराळ; स्वर्ग : ‘अस्मानीं फत्तेची ध्वजा लागली.’ – चित्रगुप्त ३३. [फा. आस्मान् = आकाश] (वा.) अस्मान ठेंगणे होणे – स्वर्ग दोन बोटे उरणे; ताठ्याचा, गर्वाचा कळस होणे : ‘नवऱ्याच्या पगारामुळे तर तिला अगदी अस्मान ठेंगणें झालें होतें.’ – पकोघे. अस्मान तारा तुटणे – १. उल्कापात होणे; तारे निखळून पडणे. २. निरर्थक बडबड करणे. अस्मान दाखवणे – पराभव करणे. अस्मानास थिगळ देणे, अस्मानास ठिगळ देणे – वाटेल तेवढे मोठे संकटही थोपवून धरणे; निवारण करणे. अस्मानास लागणे – चढून जाणे; गर्विष्ठ होणे : ‘त्याचा प्रकार बुनियाद कशी आहे तें कळतच आहे आणि त्याजशीं हलके बोलल्यास ते अस्मानास लागणार.’ – ऐलेसं १०७४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अस्तित्ववाद      

पु.       मनुष्याचा व्यक्तिगत अनुभव व दायित्व यांचे महत्त्व प्रतिपादन करणारे एक आधुनिक तत्त्वज्ञान. यात अस्तित्वाच्या (सकृत्‌दर्शनी निरर्थक वाटणाऱ्या) संदर्भात माणसाच्या स्वातंत्र्याचा, निर्णयशक्तीचा व बांधिलकीचा विचार अभिप्रेत असतो. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अस्थानी

वारयोषितेच्या गळ्यांत मंगळसूत्राची निरर्थक व्यथा असावी त्याप्रमाणे, साधूंच्या मेळाव्यांत नटरंगी यावा त्याप्रमाणें, देवालयांत नटीचें चित्र टांगावे तसें.

शब्दकौमुदी

अतथ्य      

वि.       खोटे; असत्य; बनावट; दिशाभूल करणारे (भाषण इ.); आशय नसलेले; निरर्थक : ‘ही अनेकांची झालेली समजूत मुळातच अतथ्य नि निराधार आहे.’– ससावा ३. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

बाड

स्त्रीपुन. (ल.) एखादें वाईट कृत्य करण्याकरितां खोट्या आश्वासनांनीं एखाद्याला उत्तेजन देणें, चेतविणें; अशा तर्‍हेचें उत्तेजन किंवा प्रोत्साहन. (क्रि॰ देणें) -न. १ तरवार इ॰ चें म्यान. २ थाप; गप्प; निरर्थक गोष्टी; चकट्या; थापा. (-अव. बाडा). (क्रि॰ मारणें; झोंकणें; हाकणें; हाणणें; फेंकणें; सांगणें).

दाते शब्दकोश

बाजीग(गा)र

पु. गारुडी; जादूगार. -वि. उलटणारा. 'माष्टीन बाजीगार होऊन...' -ख ३५७०. [फा. बाझीगर्] बाजी(जे)गरी-गारी-गिरी-स्त्री. १ गारुडीविद्या; चेटूक; मंत्र- तंत्र; नजरबंदी; हातचलाखी; इंद्रजाल. 'माया मिथ्या बाजीगरी । दिसे साचाचिये परी ।' -दा ६.८.२४. २ पत्ते, सोंगटया खेळणें; द्यूत; जुगार. -वि. १ रिकामा; कुचकमी; निकस; वाईट (वस्तू, पदार्थ). २ (ल.) निरर्थक; पोकळ; मूर्खपणाचें (भाषण, वागणूक, उद्योग); वरकरणी; ढोंगी; बेजबाबदार (माणूस). [फा. बाझीगरी]

दाते शब्दकोश

बडबड

स्त्री. १ वटवट; बकबक; जल्पना; टकळी. २ बेशु- द्धींत बोलणें, बरळणें. [ध्व.] बडबड्या-वि. बडबड करणारा; बोलघेवडा. (गो.) बझबझॉ. बडबडणी-स्त्री. बडबड अर्थ १, २ पहा. बडबडणें- १ वटवट करणें; टकळी चालविणें; निरर्थक भाषण करणें. २ चावळणें; बरळणें. ३ (गो.) बझबझचें.

दाते शब्दकोश

बेकार

(वि.) हिंदी अर्थ : निकम्मा, व्यर्थ, निष्फल. मराठी अर्थ : रिकामा, निरुद्योगी, निरर्थक, निरुपयोगी.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

बॅष्टॉ

वि. (गो.) निरर्थक.

दाते शब्दकोश

बॅठँ

न. (गो.) न वळतां तयार केलेला भात. -वि. (गो.) निरर्थक.

दाते शब्दकोश

बियाळ

वि. बेंबिळ; वेडेवांकडे; बोबडे; निरर्थक. 'तैसे देवाचां गुणीं बिसंवतां । मी बियाळ बोलें उसणतां । भावो वोळ- खावा श्रोतां । प्रेमगर्भ ।।' -नरुस्व ३७. [धा]

दाते शब्दकोश

बक

स्त्री. (बहुधां अव. बका असा प्रयोग) वटवट; लेखप्रमाण विरहित तोंडी भाषण; बकबक, बाजारगप्प. [सं. वाक्; हिं. बक] म्ह॰ हजार बका आणि एक लिखा. बकवाद-पु. गप्पाष्टक; पोकळ निरर्थक भाषण. ॰वादी-वाद्या-वि. बकणारा; बडबड्या; बकवाद करणारा.

दाते शब्दकोश

बकबक

स्त्री. जल्पना; बडबड; वटवट; निरर्थक भाषण, गप्पा. [हिं. ध्व] बकबक-बकां-क्रिवि. १ घाईनें व उतावीळ होऊन; अधाशीपणानें; उतावीळपणानें. २ निरर्थकपणें; वचावचां (बोलणें). ॰खाणें-गपांगपां खाणें; मटकावणें. बकबकणें- अक्रि. बडबडणें; वटवट करणें. बकबक्या-वि. पुष्कळ बडबडणारा.

दाते शब्दकोश

बोज्यां बारज्यां

क्रिवि. निरर्थक; व्यर्थ. 'जागे जतन व्हावे स्वामींचे पदरीं असावे याकरितां ज्यांचें सांपडेल त्यांचे वित्त विषय घेऊन पोटास खाले व खर्चले ते बोजां बारज्यां न म्हणता सर्व माफ करावें.' -पेद १९.३२.

दाते शब्दकोश

बरळ

स्त्री. १ विसंगत भाषण (झोंप, ताप, दारूची निशा यांतील). २ निरर्थक बडबड; वटवट; जल्पना. -वि. १ असंबद्ध (भाषण); मूर्खपणाचें भाषण करणारा; भ्रमिष्ट; मूर्खपणाचें (भाषण). 'ऐसें बोलती ते बरळ ज्ञानहीन ।' २ भटकणारा; आड- मार्गाला जाणारा; छांदिष्ट. 'गुरूतें वाचा बरळ । विनवीत असे ।' -विपु २.६. ३ भ्रांत. 'जीव आधींचि समळ । वरि विषयेसंगें होति बरळ ।' -भाए ६२१. [ध्व.] ॰जाणें-अक्रि. चांचरणें; मंत्र म्हणतांना चुकणें. 'देखां मंत्रज्ञु बरळु जाय ।' -ज्ञा १.१९०. बरळणें-अक्रि. १ असंबद्ध भाषण करणें; भलतें भलतें बोलणें (झोंपेंत. तापांत, निशेंत). २ बडबडणें; चावळणें. ३ स्वच्छंद फिरणें; भटकणें; भलत्या मार्गाला जाणें. 'इंद्रियें बरळों नेदावीं ।' -ज्ञा ३.११६. बरळणीस्त्री. बडबड (झोंपेंतील).

दाते शब्दकोश

बष्टांच

क्रिवि. (गो.) व्यर्थ; विनाकारण; निरर्थक. पोर्तुं. ? इं. बेस्ट]

दाते शब्दकोश

भडभड-भडां

क्रिवि. १ मोठ्यानें ओकनें, जखमेंतून रक्त घळघळा वाहणें, भळभळ पाणी ओतणें, निरर्थक निंदा, धम- कावणी, बडबड करणें. वाटेल त्या बाजूनें लोकांनीं जलदीनें घुसणें, जलद पेटणे, मोठ्यानें धडकणें, अमर्याद खर्च करणें इ॰ क्रियांचें अनुकरण होऊन). झटकन; पटकन; फटकन. 'भडभड भलतेंच बोले ।' तुकारामाचीं पदें. (नवनीत पृ. ४४८ ). २ तोफ इ॰ कांच्या आवा- जाचें अनुकरण होऊन. (क्रि॰ वाजणें; उडणें). [ध्व.] भड- भडा-ढ्या-वि. मनास येईल तें, विचार न करतां बोलून टाकणारा. भडभडणें-अक्रि. १ भडाडणें (विस्तव). २ मोठ्यानें पेट घेणें (गृह, जळण इ॰). ३ पुष्कळ जोरानें व आवाज करून वाहणें, फळफळणें; उफाळणें. ४ दुःखानें ऊर, अंतःकरण भरून येणें. भडभडून येणें-क्रि. शोकानें कंठ दाटून येणें. भडभड (डा)वि(व)णें-सवि. जोरानें पेट घ्याववयास लावणें. भड- भडाट-पु. १ आगीचा अतिशय भडका, डोंबाळा. २ दणका; निंदा यांचा); सामान्यतः मोठा, गंभीर व एकवटलेला, गोंधळाचा आवाज, गोंधळ. ३ दंगलीची, मजलसीची मौज; आनंद करणें. भडभडीत-वि. फटफटीत; चकचकीत, स्वच्छ. (क्रि॰ उजाडणें).

दाते शब्दकोश

भणक्या

स्त्रीअव. निरर्थक हिंडणें, फिरणें; भटकी. (क्रि॰ मारणें). [भटकणें]

दाते शब्दकोश

भंड

वि. १ भांडखोर; आग्रही; हट्टी. २ थट्टेखोर. ३ लबाड. [सं.] भं(भां)डाई-स्त्री. भांडण; कज्जेदलाली. 'तुका म्हणे किती करिसी लंडाई । होईल भंडाई थोर पुढें.' 'बहिणी म्हणे आतां करीन भंडाई ।' -ब ४८८. ॰उभंड-न. निरर्थक बडबड; पोकळ वल्गना. 'ज्याचे मुखीं भंडउभंड । तो येक मूर्ख ।' -दा २.१.२७.

दाते शब्दकोश

चामडचावू      

वि.       त्याच त्याच गोष्टींची निरर्थक चर्चा करणारी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चावळी

स्त्री. निरर्थक बडबड. [चावळणें]

दाते शब्दकोश

चावळी      

स्त्री.       निरर्थक बडबड.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चघळणे      

अक्रि.       १. खाण्याचा पदार्थ तोंडातल्या तोंडात घोळवणे, फिरवणे; चर्वण करणे, रवंथ करणे. २. निरर्थक चर्चा करणे : ‘तुम्हां नोकरलोकांना पुरेसं काम दिसत नाही. म्हणून असल्या ह्या गोष्टी चघळत बसता.’ - राऊ ९९. [त. शवैत्तल्] [सं. गॄ]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चीची

स्त्री. १ छीः थूः; फजिती. 'जिकडेतिकडे होते चीची । अवलक्षणें ।' -दा १९.३.२४. २ फोल; निरर्थक; क्षणभंगुर. 'कायामाया दों दिसांची । आदिअंतीं अवघी चीची ।' -दा १५.८.३८. [ध्व]

दाते शब्दकोश

चरुचमकुरा

स्त्री. एक भाजी; अळूं. 'चवळी कवळी चरुचमकुरा ।' -अमृत ६२. [चमकुरा पहा. यास निरर्थक अनु- प्रासार्थ चरु शब्द लावून]

दाते शब्दकोश

चर्वित

वि. चावलेला; चघळलेला; रवंथ केलेला; चर्वण झालेला (पदार्थ). [सं.] ॰चर्वण-न. १ चघळलेलें पुन्हां चघळणें; चावलेलें पुन्हां चावणें. २ काथ्याकुट; निष्कळ, रिकामी पुनरुक्ति; निरर्थक पुनरुच्चारण (विनंति, हकीकत, गोष्ट वगैरेंचे). 'तुच्छें चर्वित चर्वणोपम सुखें जीं तीच तीं भोगितां । संसारीं न तिरस्कृती उपजते हे कोण निर्लज्जता ।।' -वामन स्फुट श्लोक ६७. (नवनीत पृ. १४१.) [सं. चर्वित + चर्वण]

दाते शब्दकोश

चर्वितचर्वण      

न.       १. चघळलेले पुन्हा चघळणे; चावलेले पुन्हा चावणे. २. (ल.) काथ्याकूट; निष्फळ, रसहीन चर्चा; रिकामी पुनरुक्ती; निरर्थक पुनरुच्चारण (विनंती, हकीगत, गोष्ट वगैरेचे) : ‘तुच्छें चर्वित चर्वणोपम सुखें जीं तीच तीं भोगितां । संसारीं न तिरस्कृती उपजते हे कोण निर्लज्जता ॥’ – वाश्लो ६७. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चर्वणा      

स्त्री.       १. एखाद्या गोष्टीविषयी आपले मत चढत्या स्वराने, जोराने पुनः पुन्हा उच्चारणे; पुनरुच्चारण. २. वाटाघाट करताना, हुकूम सोडताना इ. निरर्थक पुनरुच्चारण; अनेक शब्दप्रयोग करून तीच गोष्ट वारंवार सांगणे; (निंदार्थी प्रयोग) काथ्याकूट. ३. सर्व प्रकारची भाषणशैली वापरणे; युक्तिवाद लढविणे. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चर्वणा

स्त्री. (साहित्य) एक अलंकार; एखाद्या गोष्टी- विषयीं आपलें मत वाढल्या स्वरानें, जोरानें पुन्हां पुन्हां उच्चा- रणें; पुनरुच्चारण. उदा॰ ही चांगलीच, हीच चांगली, चांगलीच ही इ॰. २ (वाटाघाट करतांना, हुकूम सोडतांना इ॰) निरर्थक पुनरुच्चारण; अनेक शब्दप्रयोग करून तीच गोष्ट वारंवार सांगणें. (निंदार्थी प्रयोग) काथ्याकूट. ३ सर्व प्रकारची भाषणशैली व युक्तिवाद लढविणें [सं.]

दाते शब्दकोश

च्यायला      

उद्गा.       निरर्थक उद्गार : ‘लिहितानासुद्धा, च्यायला! आमची भाषेची कसरत.’ − लव्हाळी ११६−११७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दिमाग़ खाना / दिमाग़ चाटना

हिंदी अर्थ : व्यर्थ की बातें कहना मराठी अर्थ : निरर्थक बोलून त्रास देणें, डोकें शिणविणें.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

दुराशा      

स्त्री.       निरर्थक, फोल, अवास्तव आशा; दुष्प्राप्य गोष्टीची आशा; दुष्ट वासना : ‘दुराशागुणें जो नव्हे दैन्यवाणी ।’ – राम १६८. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

डवरणे, डवरनं      

अक्रि.       फिरणे; उंडारणे; निरर्थक फिरत राहणे. (अहि.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धापू, धापो      

क्रिवि. फुकट; व्यर्थ; निरर्थक. (वा.) धापू होणे - १.मरणे. २. हरवणे. (कु.) धापोडा      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धापू-पो

क्रि. फुकट; व्यर्थ; निरर्थक. ॰होणें-अक्रि (कु.) १ मरणें. २ हरवणें. ३ फुकट जाणें. -मसाप ४.४. २८०.

दाते शब्दकोश

एरंड

पु. एक औषधी झाड; याच्या मोगली व सुरती (तांबडा व पांढरा) अशा दोन जाती आहेत. सुरती एरंडाच्या बियांचें (एरंड्यांचें) तेल काढितात. तें उत्तम रेचक असून बहुतेक रोगांवर आरंभीं रेचक म्हणून देतात. सर्पदंशावर पानांचा चार चमचे रस, चमचाभर पाणी घालून द्यावा व दंशावर पाला वाटून लावावा. -वगु १.७६. मोगली एरंड शेताच्या कुंपणास लावतात त्याच्या बियांतहि तेल असतें पण त्याचा फारसा उपयोग करीत नाहींत. म्ह॰ १ ओसाड गांवीं एरंड बळी. २ थोर (उंच ) वाढला एरंड तर काय काय होईल इक्षुदंड. ३ एरंडाचे गुर्‍हाळ = निरर्थक, कंटाळवाणें भाषण, निष्फळ उद्योग. (ऊंस चरकांत घातला तर गोड रस तरी मिळतो पण एरंडापासून न पिण्याजोगा निरुपयोगी पदार्थ निघेल, ऊंस आणि एरंड दिस- ण्यांत सारखे म्हणून ही तुलना). ४ निरस्त पादपे देशे एरंडोऽपि द्रुमायते = (झाड नसणार्‍या प्रदेशांत एरंडच श्रेष्ठ). गांवढ्या गावांत गाढवी सवाष्ण याप्रमाणें अर्थ. [सं. एरंड; गु. एरडो; हिं. अरंड; बं भेरांडा; का. एरडु आंडलके] ॰मूळ-न. सुरती एरंडाचें मूळ, मुळी; ही औषधी असते. ॰काकडी-स्त्री. (माळवी) पोपई. नागपुराकडे एरणपपई असें पपईला नांव आहे.

दाते शब्दकोश

गाबाळ

नपु. १ गळाठा; चोथा; घाण; केरकचरा; गाळ. 'आणिक नका कांही गाबाळाचे भरी ।। पडों येते थोरी नाग- वण । ' -तुगा २७१६. २ जुनाट, फाटक्यातुटक्या, निरुपयोगी वस्तूंचा ढीग, रास (रद्दी, कसरीनें खालेल्या कागदांची, पुस्तकांची). ३ उंसाचा वाळलेला पाचोळा; चोयट्या, -पु. (को.) नारळ्याच्या शेंड्यापासून, डोक्यापासून फुटलेले तंतू, शेंडी. याचा काथ्या करतात. (कु.) गाबाळो. -वि. १ जुनाट व उरलासुरला; जीर्ण व फाटका; चिरलेला व विदारलेला इ॰ २ निरर्थक. [गबाळ] सामा- शब्द- ॰गुबाळ- वि. गाबाळ पहा. [गाबाळ द्वि.] ॰ग्रंथ- पु. १ फाटकातुटका, कसर लागलेला ग्रंथ, पुस्तक. २ अनेक पुस्तकांतून घेतलेल्या पानांचे बांधीव पुस्तक; रद्दी कागदाचा ढीग; वेंच्यांचें पुस्तक; खर्ड्याचें पुस्तक. 'ज्या लक्षावधि लोकांस बायबल हें केवळ गाबाळ ग्रंथ वाटतें...' नि ४२०. ॰मुद्रा- स्त्री. अजागळी किंवा मूर्ख चर्या, चेहरा; भोंगळ मुद्रा, सूरत; गाबाळी-ळ्या-वि अव्यवस्थित; निष्काळजी; गैदी; अजा- गळ. 'रामदास म्हणे अवघेची गाबाळी । ' -रामदास, स्फुट अभंग ५. (नवनीत पृ. १४५.)

दाते शब्दकोश

गाबाळो      

वि.       १. जुनाट व उरला सुरला; जीर्ण व फाटका; चिरलेला व विदारलेला इ. २. निरर्थक.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गचाळकी, गचाळी      

स्त्री.       १. गप्पाटप्पा; निरर्थक सांगणे किंवा बोलणे. २. गबाळपणा; वाईट, घाणेरडे चाळे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गचाळकी, गचाळी, गचाळचाळे

स्त्री पुअव. १ गप्पा- टप्पा; निरर्थक सांगणें किंवा बोलणें. २ गबाळपणा; वाईट, घाणे- रडे चाळे.

दाते शब्दकोश

गजाल      

स्त्री.       १. गोष्ट; निरर्थक गप्पा; गजलगोष्टी. (क्रि. सांगणे, करणे.) (कु.) २. आरडाओरड; कोलाहल, गडबड. (राजा. गो.) [ध्व.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गजश्रद्धा      

स्त्री.       प्रारंभी मोठा डौल किंवा गाजावाजा दाखवणारे व परिणामी अगदीच क्षुद्र ठरणारे काम किंवा त्याचा प्रकार. भपकेदार व विस्तृत पण निरर्थक काम, डोंगर पोखरून उंदीर काढणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गळगळीत      

वि.       १. पचपचीत; बेचव; पाणचट (पक्वान्न). २. पुळपुळीत; निरर्थक; अर्थबोध न होणारे. ३. (सामा.) गुळगुळीत, मऊ व तजेलदार. ४. सैल; विस्कळीत. (गो.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गळगळीत

वि. १ पचपचीत; अरुचकर; पाणचट (पक्कान्न). २ पुळपुळीत; निरर्थक; अर्थबोध न होणारें. ३ (सामा.) गुळ- गुळीत, मऊ व तजेलेदार. 'माझा गडवा गळगळीत पडला म्हणून लौकर उजळतो. ' ४ (गो.) सैल; विस्कळित.

दाते शब्दकोश

गलतान

वि. १ (व.) आजारी; 'त्याची आई गल- तान आहे.' २ नालायक; निरर्थक; अयोग्य; अशक्त; मूर्ख; गयाळ (ममुष्य). ३ लेच्यापेच्या; फुसका; कुचकामाची (वस्तु). ४ बेसूर; कर्कश; कर्णकठोर (गाणारा, गाणें, आवाज इ॰)' [अर. घलतान; तुल॰ सं. गलस्तन?]

दाते शब्दकोश

गलतान      

वि.       १. आजारी. (व.) २. नालायक; निरर्थक; अयोग्य; अशक्त; मूर्ख; गयाळ (मनुष्य). ३. लेचापेचा; फुसका; कुचकामाची (वस्तू.).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गोष्ट श्राद्ध      

न.       १. अडचणीमुळे सर्वोपचारयुक्त श्राद्ध करण्यास सवड नसेल तेव्हा अनुकल्पाने केवळ शब्दाने केलेले श्राद्ध. २. (ल.) निव्वळ गप्पाष्टक, बडबड; निरर्थक गोष्टी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गप, गप्प      

स्त्री.       १. सामान्य बोलवा; उडत बातमी; अफवा; वार्ता; आवई. २. निरर्थक बोलणे, भाषण, बकवास; रिकामी वटवट; बाता. ३. खोटी बनावट हकीगत; मिथ्या गोष्ट. [फा. गोफतन, गप्] (वा.) गप उठवणे, गप्प उठवणे - अफवा पसरविणे. गप छाटणे, गप्प छाटणे, गप तासणे, गप्प तासणे, गप झोकणे, गप्प झोकणे - एखाद्या बातमीची चर्चा चालवणे; रिकाम्या बातम्या पसरवणे : ‘आम्ही कवी कवीना रीति नव्हें छाटितोंचि लाख गपा ।’ - मोरोपंत. गप मारणे, गप्प मारणे - (बोलण्यातली) थाप मारणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गप-प्प

स्त्री. १ सामान्य; बोलवा; उडत बातमी; अफवा; वार्ता; आवई. २ निरर्थक बोलणें, भाषण, बकवा; रिकामी वटवट; बाता. ३ खोटी, बनावट हकीकत; मिथ्या गोष्ट [फा. हिं. गप्] गपछप-शप-सप-स्त्री. रिकामटेकड्या गप्पा; चकाट्या. [फा. गपशप] गपाटा-पु. गप्प; बात. 'कृष्णराव नांवाच्या मुंबईकरानें महाराजांच्या मुलाखतींत बरेच गपाटे मारले' -विक्षिप्त ३.५३. [हिं.] गपा-प्पा-गफ्फा -स्त्रीअव. बडबडी; चकाट्या. गप पहा. 'न सार्थक लटक्या सार्‍या गपा ।' -रला ८७. गप्पागोष्टी- स्त्रीअव. १ गोष्टी; कथा हकीकती; खबरबखर. २ बकवा; बाता; रिकामी वटवट. २ शिळोप्याच्या गोष्टी; रिकामपणचें बोलणें. (क्रि॰ करणें; हांकणें) गपापणें- अक्रि. वटवट, बडबड करणें. [गप] गपाप्या-वि. वटवटया; बडबडया; बरळणारा; बाताड्या गप्पाष्टक-न. गप्पा; वटवट; बडबड; रिकामपणच्या गोष्टी. 'उगीच गप्पाष्टकें ऐकून फळ काय, घटकाभर देवाचें तरी नांव घ्यावे. ' [गप्प + अष्टक = समूह] गप्पाष्टक्या, गपी-ष्मी-प्या गपोडा-डया-वि. बाता झोंकणारा; वटवट्या. गप्पिष्ट गप्पी, गप्पीस्त, गप्पीदास-नाथ-वि. बाता झोकणारा गोष्टीवेल्हाळ; थापाडया बाताड्या

दाते शब्दकोश

गुऱ्हाळ      

न.       १. ऊस गाळण्याचा चरक; ऊस गाळण्याचे यंत्र. २. चरक असलेली जागा. ३. गूळ तयार करण्याचा कारखाना (यंत्र, इमारत इत्यादी सर्व उपकरणांसह). ४. ऊस गाळण्याचा, गूळ करण्याचा धंदा, काम. ५. (ल.) लांबलचक हकीगत, भाषण; कंटाळवाणे भाषण; चऱ्हाट : ‘पण श्रीमंतांचे गुऱ्हाळ आवरेना त्याला ते काय करणार ।’ - ऐलेसं [सं. गुर + आलय] (वा.) एरंडाचे गुऱ्हाळ - कंटाळवाणे, निरर्थक बोलणे; ज्यातून काही निषन्न होत नाही असे बोलत राहणे. गुऱ्हाळलावणे - बडबडत बसणे; चऱ्हाट लावणे : ‘मी आपला काहीतरी गुऱ्हाळ लावीत असतो.’ - कलंदर ४१०.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घडा

पु. १ घागर; घट; मडकें. 'अवतरली गाडग्यां घडां । पृथ्वी अनोळख जाली मूढां ।' -ज्ञा १८.५४३. २ ताडाच्या पोंगीला (ताडी काढण्यकरितां) लावावयाचें गाडगें. ३ जम; घडी. -शर. [सं. घट; प्रा. हिं. पं. घडा; गु. सिं. घडो] (वाप्र.) घडा फोडणें-संकेत, खरें तत्व बाहेर सांगणें; ग्पुत गोष्ट प्रकट करणें. (एखाद्याचा) घडा भरणें-अपराधांची परमावधि होऊन शिक्षेस पात्र होणें.' त्याचा घडा भरला म्हणजे त्याला शासन होईलच होईल.' (आयुष्याचा) घडा भरणें- १ अंतकाळ जवळ येणें; आयुष्य संपणें. २ (ल.) अधिकाराची मुदत संपण्याच्या बेतांत येणें. (पापाचा) घडा भरणें-(पापपुण्यें सांठविण्यासाठीं घडें असतात या कल्पनेवरून) दुष्कृत्यांचा कळस होऊन त्यांचे फळ भोगण्याची वेळ येणें. (कच्या) घड्यानें पाणी भरणें-वाहणें-१ निष्फळ काबाडकष्ट करणें; निरर्थक उद्योग, मेहनत करणें. २ अतिशय हाल काढणें; कष्ट करणें. सामाशब्द-॰बाजी-स्त्री. दारू उडविण्याचा प्रकार; मडक्यांत फाटके, चिचुंद्र्या इ॰ ठांसून त्यांचा घडाका करणें; (प्र घडें- बाजी पहा.

दाते शब्दकोश

घडा      

पु.       १. घागर; घट; गाडगे; मडके : ‘अवतरली गाडम्यां घडां । पृथ्वी अनोळख जाली मूढां ।’ –ज्ञा १८¿५४३. २. ताडाच्या पोंगीला (ताडी काढण्याकरिता) लावायचे गाडगे. [सं. घट] (वा.) घडा फोडणे –संकेत, खरे तत्त्व बाहेर सांगणे; गुप्त गोष्ट प्रकट करणे. (एखाद्याचा) घडा भरणे –अपराधांची परमावधी होऊन शिक्षेला पात्र होणे. (आयुष्याचा) घडा भरणे –१. अंतकाल जवळ येणे; आयुष्य संपणे. २. (ल.) अधिकाराची मुदत संपण्याच्या बोतात येणे. (पापाचा) घडा भरणे – (पापपुण्ये साठवण्यासाठी घडे असतात या कल्पनेवरून) दुष्कृत्यांचा कळस होऊन त्यांचे फळ भोगण्याची वेळ येणे. (कच्च्या) घड्याने पाणी भरणे, (कच्च्या) घड्याने पाणी वाहणे – १. निष्फळ काबाडकष्ट करणे; निरर्थक उद्योग, मेहनत करणे. २. अतिशय हाल काढणे, कष्ट करणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घणाट्या

स्त्रीअव. १ निरर्थक, कंटाळवाणे हेलपाटे, हिसके फेर्‍या; पायपिटी. २ (सामा.) व्यर्थ शीण; फुकट प्रयत्न. (क्रि॰ खाणें; घेणें). [घण?]

दाते शब्दकोश

घणाट्या      

स्त्री.       अव. १. निरर्थक, अकारण हेलपाटे, हिसके, फेऱ्या; पायपिटी. २. (सामा.) व्यर्थ शीण; फुकट प्रयत्न. (क्रि. खाणे, घेणे.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घसघस      

स्त्री.       १. घासाघीस; जिकीर; चिणचिण; खाराखीर; (पदार्थ विकत घेताना होणारी) कोरडी तक्रार; निरर्थक ओढाताण. २. (एखाद्याला) सदोदित दोष लावणे आणि रागे भरणे, निंदा करणे. ३. कुरकुर; फुसफुस; कुरबूर; खाजगी, कुटुंबातील कटकट, चडफड, चिणचिण: ‘घसघस करितां विटे । सगट लोकु ।’ –दास १९·७·२१. ४. कडाक्याचा, धडाक्याचा वादविवाद, चर्चा; तंडणे; रिकामा वाद. (क्रि. करणे, लावणे, घालणे, मांडणे.) [सं. घर्ष्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घसघस

स्त्री १ घासाघीस; जिकीर; चिणचिण; खारा- खीर; (पदार्थ विकत घेतांना होणारी) कोरडी तक्रार; निरर्थक ओढाताण. 'तुम्हीं कांहीं विकत घेणार कीं कोरडी घसघस लाव- णार.' २ (एखाद्यास) सदोदित दोष लावणें आणि रागे भरणें, निंदा करणें. ३ कुरकूर; धुसफूस; कुरबूर; खाजगी कुटुंबां- तील कटकट, चडफड, चिणचिण. 'घसघस करितां विटे । सगट लोकु ।' -दा १९.७. २१. ४ कडाक्याचा, धडक्याचा वाद- विवाद. चर्चा; तंडणें; रिकामा वाद. (क्रि॰ करणें; लावणें; घालणें; मांडणें). ५ सैन्याचा किरकोळ हल्ला.? [सं. घर्ष् म. घासणें]

दाते शब्दकोश

होपळ, होपळसुती

वि. १ अव्यवस्थित; मंद; मूर्ख; भोंपळसुती पहा. २ पोकळ; निरर्थक.

दाते शब्दकोश

हवा से बातें करना

हिंदी अर्थ : बहुत तेज़ दौड़ना । आपही आप या व्यर्थ वडबडाना मराठी अर्थ : वान्याच्या वेगानें धांवणें, स्वःतशींच बोलत राहणें, निरर्थक बडबड करणें.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

जगडंबर      

न.       १. अवडंबर; अवाढव्य पण निरर्थक थाटमाट; धामधूम; आव (विद्या, पैसा यांचा). (क्रि. घालणे.) २. अफाट जगास आश्चर्याने म्हणतात; विश्वविस्तार; एखादी अवाढव्य, विस्तीर्ण वस्तू : ‘तो हा जगडंबरू! – ज्ञा १५·४७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जलदुर्भीति, जलदुर्भीती      

स्त्री.       (मानस.) तलाव, जळातील वाहते पाणी, पाण्याचे झरे इ. विषयीची अतार्किक, असामान्य निरर्थक व स्थायी स्वरूपाची भीती वाटणे. दुर्भीती हा मानसविकृतीचा एक प्रकार आहे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ज्ञान (कमी)

लांडी विद्वत्ता, केवळ व्यर्थ निरर्थक बडबडीस कारण, उथळ पाणी, शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी, झगमगाट पण खोली नाहीं, तुटपुंजें ज्ञान, सांठवलेलें शहाणपण, टीचभर मन व गुंजभर माहिती.

शब्दकौमुदी

काबाड      

वि.       निरर्थक (चर्चा).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

काथा-थ्या

१ नारळाच्या सोडण्याच्या आंतील तंतु- मय आवरणाचा जाड थर. हा भिजवून, कुटून त्याच्या दोर्‍या वळतात, त्यास सुंभ म्हणतात. २ याचा केलेला दोर, दोरी. ३ सुर- माडावरील तंतु. ४ आंब्याच्या कोईस, बाठीस असलेलें केशर. ॰कुटणें-(ल.) ज्यापासून कांहीं फलनिष्पत्ति नाहीं असा पोकळ वादविवाद करणें. [काथ्या + कुटणें] ॰कूट-थ्या-थे-कूट-स्त्री. रिकामी चर्चा; निरर्थक वाद. (क्रि॰ करणें). 'असल्या शास्त्रार्थांत पडून विनाकारण काथ्याकूट तरी करण्याची काय जरूर आहे.' -टि ४.११८. ॰मेथा-पु. आजीबाईच्या बटव्यांतील औषधें, वनस्पती. -थ्याचा नमदा-पु. दरवाज्यांत पाय पुसण्यासाठीं ठेवलेलें काथ्याचें जाड तरट. 'रस्त्यास लागून काथ्याचे दोन नमदे टाकण्यांत यावे.' -ऐरापुप्र (बडोदें) ३.१८३.

दाते शब्दकोश

काथ्याकुटणी, काथ्याकूट      

स्त्री       : रिकामी चर्चा; निरर्थक वाद. (क्रि. करणे) : ‘असल्या शास्त्रार्थात पडून विनाकारण काथ्याकूट तरी करण्याची काय जरूर आहे.’ - लोटिकेले ४·११८; ‘कोणी पक्ष मोडणार किंवा सोडणार नाहीत, ही गोष्ट सिद्ध मानून ही काथ्याकूटणी बंद करावी.’ - आव्हान ८५.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कडे      

शअ.       १. बाजूला; दिशेला : ‘हातीं धरूनि तियेसी । कडे काढी व्योमकेशी ।’ − गुच ३३·११०. २. पाशी; जवळ; ताब्यात; हातात; हाताखाली; दिमतीत; व्यवस्थेत. ३. आत; खाली; संबंधी; निसबत. ४. हवाली; स्वाधीन. (क्रि. करणे, देणे.) ५. पक्षाला; वाट्याला. ६. हातात; पाशी; जवळ. ७. (ल.) पलीकडे; पार : ‘स्वामी तारका गुरुनाथा । संसारसागराकडे लावी ॥’ − गुच ४५·१०६. ८. जबाबदारी; पत्कर. ९. काळ, वेळ यासंबंधी निरर्थक अव्यय; स; ला. (कुण.) [क. कडे] (वा.) कडेला नेणे − पूर्ण करणे; शेवटाला नेणे : ‘काम करून कडेला न्यायचच असं त्यांनी ठरवून टाकलं.’ − भुताचा ६२. कडे पडणे सार्थक होणे : ‘तीएचे जन्म कडे पडे ॥’ − दृपा ४९.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कडे

शअ. १ बाजूला; दिशेला. 'हातीं धरुनि तियेसी । कडे काढी व्योमकेशी ।' -गुच ३३.११०. 'यंदा तुमच्या कडे धारण कशी आहे?' २ पाशीं; जवळ; ताब्यांत; हातांत; हाताखालीं; दिमतींत; व्यवस्थेत. 'त्याजकडे शंभर शिपाई आहेत.' ३ आंत; खालीं संबंधी; निसबत. 'हा पागेकडे चाकर आहे.' ४ हवालीं; स्वाधीन (करणें, देणें). 'ज्याचें त्याकडे दे.' ५ पक्षाला; वांट्याला. 'सरदारांनी तलवार मारावी, परंतु यश धन्याकड;' कौरव-पांडवांच्या युद्धांत श्रीकृष्ण पांडवांकडे गेला.' ६ हातांत; पाशीं; जवळ. 'त्याकडे माझे रुपये आहेत.' ७ (ल.) पलीकडे; पार. 'स्वामी तारका गुरुनाथा । संसारसागराकडे लावी ।' -गुच ४५.१०६. ८ जबाबदारी; पत्कर. 'हें काम माझ्याकडे लागलें.' ९ (कुण.) काळ, वेळ यासंबंधीं निरर्थक अव्यय; स; ला. 'तूं उद्यांकडे मला भेट.' [का. कडे; म्. कड]

दाते शब्दकोश

(किसी का) सब्र पड़ना

हिंदी अर्थ : किसी के सहन किये हुअे कष्टका बुरा प्रतिफल होना मराठी अर्थ : केलेले कष्ट निरर्थक जाणें.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

कलावंत

वि. १ कांहीं तरी कला जाणारा; कलाभिज्ञ; कला पहा. परंतु विशेषतः गाणारे नाचणारे वाजविणारे आणि त्यांतही कलावंतिणींचे साजिंदे, पखवाज व सारंगी वाजविणारे, यांना लावतात. [सं. कलावत्] २ (प्रबंध) धृवपद गाणारा. ३ (गो.) नाचणारी स्त्री; गाण्याचा धंदा करणारी एक जात (नायकीण). 'मौलाबक्षांचे चिरंजीव... यांस कलावंत सुपरिंटेंडेंट असा हुद्दा देऊन...' -कलावंत खातें (बडोदें) १. ॰खातें-न. गुणीजनांचा (गाणारे, नाचणारे वाजविणारे इ॰ चें) परामर्ष घेणारें एक खातें. 'कलावंत खातें स्थापन झाल्यापासून कोणते गुणीजन नोकरीत ...ठेविले......' -कलावंत खातें (बडोदें) २. म्ह॰ (गो.) १ कलावंत नाचतां देवळांत, म्होण गावडी नाचतां घरांत (दुस- र्‍याचें निरर्थक अनुकरण करणें या अर्थी) २ कलावंताचें भाग्य आणि तिरड्याचें राज्य तीनच दीस = कलावंतिणीचें भाग्य तारुण्य असेपर्यंत व तेरड्याचें राज्य रंग विटेपर्यंत (अल्पकाळ टिकणारें वैभव) -ची प्रीत-(गो.) खोटें, लटकें, वरकांती प्रेम, प्रीति.

दाते शब्दकोश

कंगुमंगू, कंगमंग

स्त्री. १ टंगळमंगळ; टाळाटाळी; कांकू; घुटमळणें; मागें मागें घेणें. २ मोघम, दुटप्पी भाषण. ३ चोखंदळपणा (जेवणांतील); जेवतांना चार करणें. -वि. १ कांकूं करणारा; गुळगुळीत (माणूस, भाषण, वर्तन इ॰). २ ह्यर्थी; मोघम; निरर्थक (भाषण). ३ अशक्त; दुबळा; लुळा (प्राणी). [ध्व. मंग (मग) (द्वि.?]

दाते शब्दकोश

कोल्हेकुई      

स्त्री.       १. कोल्ह्यांची आरडाओरड; हुकी. २. (ल.) क्षुद्र लोकांची एखाद्याच्या विरुद्ध निरर्थक बडबड; क्षुद्र अडथळा : ‘जगाची कर्कश कोल्हेकुई कोण ऐकत बसणार?’ - प्रेमसंन्यास.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कोरडा, कोरडे, कोरडी      

वि.       १. अनार्द्र; शुष्क; जलरहित; आर्द्रताविरहित; पाण्याचा थोडासुद्धा अंश नसलेला : ‘ते रडे भरतही तसा रडे जोंवरी नयन होति कोरडे ।’ - वामन भरतभाव १६. २. नुसते; बरोबर कोरड्यास नसलेले; दूध, दही वगैरे पातळ पदार्थांचे कालवण नसलेले (अन्न). ३. नक्त (जेवणाशिवाय मजुरी); उक्ते. ४. (ल) औपचारिक, शुष्क, पोकळ, वरकांती, निष्फळ, बिनहशिलाचा, बिनफायद्याचा, निरर्थक. ५. व्यर्थ; फुकट : ‘हिंडणवारा कोरडा । तैसा जया ॥’ - ज्ञा १३·६९०. ६. (ल.) वांझ. ७. व्याकूळ. [क.] (वा.) कोरड्या अंगी तिडका - १. प्रसूतिवेदनांचे ढोंग. २. ढोंग; भोंदूपणा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कोरडे कष्ट, कोरडे श्रम      

पुअव.       विनाफायदा, निरर्थक श्रम; व्यर्थ मेहनत.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कर्मकांड      

न.       १. त्रिकांड वेदातील यज्ञासंबंधीचा कर्ममार्गदर्शक व आचारनिदर्शक भाग. मंत्र व ब्राह्मण्ये मिळून जो वेदभाग त्याला कर्मकांड म्हणतात : ‘कर्मकांड तरी जाणें । मुखोद्गत पुराणें ।’ − ज्ञा १३·८२९. २. धर्मकर्मे, आचारविचार, संस्कार वगैरेंना व्यापक अर्थाने हा शब्द लावतात. (सामा.) आन्हिक; नित्यनैमित्तिक आचार : ‘आता आपलें कर्मकांड अगदी एका बाजूस ठेवावें.’ − चंद्रगुप्त ३५. ३. कंटाळवाणी, निरर्थक बडबड, कर्मकथा. (क्रि. गाणे, सांगणे, बोलणे.) [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कर्मकथा, कर्मकहाणी      

स्त्री.       १. प्रारब्धामुळे भोगलेल्या दुःख, त्रास, दगदग वगैरेची दुसऱ्याजवळ सांगितलेली गोष्ट, वृत्तांत, कहाणी. २. आत्मश्लाघेचे किंवा रिकामटेकडे भाषण, बाता. ३. एखाद्या प्रसंगाची किंवा कृत्याची खरी व इत्थंभूत हकीगत. ४. कंटाळवाणे, निरर्थक भाषण, बडबड. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुबेदमाल      

वि.       निरर्थक; पोकळ : ‘कुबेदमाल गोष्टी बोलून आपले घरास यावे ही चाल येथील पडली आहे.’ - मशियांका ५७१.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुच      

वि.        निरर्थक; निरुपयोगी. जसे :— कुचकामाचे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कूच      

वि.       निरर्थक; निरुपयोगी. उदा. कुचकामाचे, कुचकामाचा [हिं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कूच

वि. (हिं.) निरर्थक; निरुपयोगी. उ॰ कुचकामाचें कुचकामाचा पहा.

दाते शब्दकोश

कुवाद

पु. उलटा अथवा निरर्थक वाद; घासाघीस; कांक्षा, तक्रार. (क्रि॰ धरणें; करणें; घेणें). [सं. कु + वाद]

दाते शब्दकोश

कुवाद      

पु.       उलटा अथवा निरर्थक वाद; घासाघीस; तक्रार. (क्रि. धरणे, करणे, घेणे) [सं. कु + वाद]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खाम खयाली

(स्त्री.) हिंदी अर्थ : व्यर्थके विचार. मराठी अर्थ : निरर्थक बडबड.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

खबा(ब)लणें

उक्रि. १ अधाशीपणानें खाणें; गिळणें. २ (ल.) निरर्थक खर्च करणें; उधळणें; उधळेपणानें खर्च करणें. गोष्टी-बाता खबालणें-गप्पा, बाता झोंकणें; बडबडणें. 'तो तेथें बाता खबलीत बसला आहे.' [अर. किबाल = समृद्धि; म. खबाला]

दाते शब्दकोश

खबालणे, खबलणे, खवलणे      

उक्रि.       १. अधाशीपणाने खाणे; गिळणे. २. (ल.) निरर्थक खर्च करणे; उधळणे; [अर. किबाल ⬜ समृद्धी.] (वा.) गोष्टी खबाळणे, बाता खबालणे - गप्पा, बाता झोकणे; बडबडणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खबर

स्त्री. १ बातमी; संदेश; वार्ता. २ समाचार; माहिती (परक्या गांवची). ३ गप्पासप्पा; वृथा गोष्टी; निरर्थक भाषण (अनेकवचनी प्रयोग). 'हा गांवात उगीच खबरा सांगत बसतो.' 'खबरांची झाली दाटी आणि कामाला लागली काटी.' [अर. खबर्] (वाप्र.) ॰घेणें- सूड घेणें; शिक्षा करणें. सामाशब्द- ॰गीर-(हिं.) १ बातमी देणारे हेर; चार; २ पालनकर्ता; आश्रयदाता. ॰अ(ए)ख्(क्)बार-स्त्री. बातमी- पत्र. जयपुराकडील खबरएक्बार पादशहासी आली कीं...' -दिमरा १.१८२. खबर्गिरी-स्त्री. विचारपूस. 'खबर्गिरी करावयासही याद होत नाहीं. ' -रा ३.९०. 'आपण आमची खबर्गिरी व परामर्ष पुर्वीपरीस अधिक असा केला.' -एस्फुले ४९. [फा. खबरगीरी]

दाते शब्दकोश

खबर      

स्त्री.       १. बातमी; संदेश; वार्ता. २. समाचार; माहिती (परगावची). ३. गप्पासप्पा; वृथा गोष्टी; निरर्थक भाषण. [फा.] (वा.) १. खबर उडणे - वार्ता उठणे : ‘कोंडनाकमहार तिकडे सापडला आहे की काय? इकडे मारला म्हणून खबर उडाली आहे.’ - पेद ३·१७३. २. खबर उडविणे - बातमी उठविणे : ‘लटकी खबर उडवितात, श्रीमंताशीं आपला सलुख जाहला.’ - इसंतंराघ ८०. ३. खबर करणे - वर्दी देणे : ‘तेव्हा अंताजीपंत दि ॥ पेशवे बरोबर होता. त्याने खबर केली.’ - इंसंपेद समा ६. ४. खबर घेणे - सूड घेणे; शिक्षा करणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

लिपि

स्त्री. १ लेखनपद्धति; हस्ताक्षर; अक्षरें. २ लीप; भाषेंतील निरनिराळ्या ध्वनींचें पृथ्थकरण करून त्यांपासून वर्ण- मालायुक्त अक्षरें तयार झालीं त्यास लिपि ही संज्ञा आहे. ५ भाषा; लेखन; लेख. 'इहीं बोधाचीं रोपें लुंचिलीं । सुखाची लिपी पुसिली ।' -ज्ञा ३.२५४. ३ रंग देणें, भरणें; चित्रें काढणें; आकृति; चिन्ह. ४ लेप; माखण; सारवण; लिंपण. [सं.] ॰मात्र- वि. निरर्थक; तथ्य नसलेलें (पुस्तक लिखाण). म्ह॰ लिपिमात्र पुस्तक योनिमात्र स्त्री.' ॰लेखन-न. कारकुनी; लिहिण्याचें काम.

दाते शब्दकोश

लखापडी

स्त्री. (गुज.) पत्रव्यवहार. लिखापढा पहा. 'निरर्थक लखापडी कमी करण्याबद्दल नियम.' -(बडोदें) खानगी खातें अपवाद ३०. [लिहिणें + पढणें; हिं. लिखापढ]

दाते शब्दकोश

मचमच

स्त्री. १ खातांना होणारा तोंडाचा आवाज. २ (ल.) व्यर्थ, निरर्थक केलेली बडबड. [ध्व.] म्ह॰ खाणें थोडे मचमच फार. मचमच-मचां-क्रिवि. खातांना, चुंबन घेतांना इ॰ वेळीं होणाऱ्या आवाजाप्रमाणे आवाज करून.

दाते शब्दकोश

म्हैस

स्त्री. १ महिषी; रेड्याची मादी; म्हसरू; म्हस. २ एक प्रकारचा सहा पायांचा माशीपेक्षां मोठ्या आकाराचा व वरचा पृष्ठभाग कठीण असलेला किडा. ३ केळफुलावरील निबर, काळसर रंगाची पारी. पांढऱ्या रंगाच्या पारीस गाय म्हणतात. म्ह॰-मेल्या म्हशीला दहाशेर दूध किंवा बहु दूध. [सं. महिष प्रा. महिस] पाण्यांत म्हैस न बाहेर मोल-म्हैस डबक्यांत बुडून राहिली असतां तिची किंमत ठरविणें. म्हशीवर पाऊस पडणें-बेकिफायतीचे प्रयत्नाबद्दल किंवा निरर्थक झालेल्या हित- कारक गोष्टीबद्दल योजावयाचा शब्द. म्हशीचा प्राणनाथ-पु. रेडा. -वि. (ल.) सुस्त; मस्त. 'तो काय नुसता म्हशीचा प्राणनाथ आहे.' म्हशीनें पाय दिलेलें नाक-न. नकटें किंवा बसकें नाक. म्हैस आटणें-दूध द्यावयाचें बंद होणें; दूध न निघणें. 'गेल्या महिन्यापासून म्हैस आटली आहे.' म्हैस पावल्या- वि. (व.) म्हशीसारखा जड प्रकृतीचा. म्हैस पाहणें-(व.) म्हशीचें दूध काढणें. म्हैस पिळणें-धार काढणें. 'मी म्हैस पिळून येतों.' म्हैस हात पारखते-(व.) म्हैस धार काढ- णाऱ्याचा हात ओळखते. म्हशीचीं शिंगें म्हशीला जड होत नाहींत-मुलें अधिक असली तरी तीं आईंबापाला जड नसतात. म्हशा-पु. १ (व.) रेडा; हल्या; जड, दांडग्या व कुरूप रेड्याबद्दल किंवा इतर पशूबद्दल तुच्छतेनें योजावयाचा शब्द. २-वि. (ल.) रेड्यासारखा धष्ट पुष्ट मतिमंद; म्हशीसारखा जड प्रकृतीचा. ३ सुस्त; दांडगा आणि घाणेरडा अशा इसमाबद्दल योजावयाचा तुच्छतादर्शक शब्द; मूर्ख अरचट मनुष्य. 'कीं म्हशीचें गण्या नाम ।' -नव १८.१७२. [म्हैस] म्हशागुग्गुळ-गुगुळ- पु. १ एक प्रकारचा गुग्गुल. २ (म्हशा किंवा म्हैस) धिप्पाड गलेलठ्ठ व ठोंब्या इसमाबद्दल निर्भत्सनापूर्वक योजावयाचा शब्द. [म्हशा, म्हैस; मशी आणि गुग्गुल] म्हशाबोळ-पु. एक प्रका- रचा बोळ; एक औषधी वनस्पती; एका झाडाच्या चिकापासून हा होतो. याचा रंग काळा असतो. हें औषध गुरांचे पोटदुखीवर चालतें. म्हशासुर-पु. देवीनें मारलेला एक दैत्य; म्हसोबा. [सं. महिषासुर] म्हशी केळें, म्हशेळी, म्हशळें, म्हस- केळें-न. एक जातीचीं मोठीं व जाड केळीं. म्हशीचा खटारा म्हशीचें खोड-म्हशीचें डोबड-पुन. म्हशीबद्दल उपहासानें म्हणतात. म्हशीचें मेळवण-न. (विनोदानें) अव्यवस्थित जेवण; पात्रावर खाद्यपदार्थांची अव्यस्थित रेलचेल. म्हस-स्त्री. (व.) म्हैस; महिषी; म्हसरू; म्हसरूड; म्हसर ह्या शब्दाकरितां म्हैसरूं इ॰ शब्द पहा. [म्हैस] म्हसकी-म्हसक्या-वि. म्हैस राखणारा, चारणारा. म्हसडी, म्हसडें-वि. म्हशीचें कातडें; महिषचर्म. [म्हैस-म्हस-म्हसडी] म्हसर-ढोर; लांब व सापट (म्हशीच्या पाठी प्रमाणें) ह्या अर्थीं नामाशीं सामाजिक शब्दांत म्हैस किंवा म्हस शब्दाचें तुच्छतादर्शक रूप; कंटाळवाणें व न संपणारे लांबलचक. जसे-म्हसरमाळ, म्हसर मैदान, म्हसररान. कधीं कधीं म्हसरभुई व म्हसरजमीन, म्हसरशेत, म्हसरवाट, म्हस- ररस्ता, म्हसर मजल, म्हसरकोस, म्हसरल्ला इ. [एकवचन म्हसरू] म्हसरे-म्हैस टोणगे. म्हसड्या-वि. (व.) म्हशीसारखा जड प्रकृतीचा. म्हसासूर, म्हसोबा-पु. एका असुराचें किंवा दैत्याचें नांव यास देवीनें मारलें. कांहीं हलक्या जातीचे लोक ह्याची पूजा करितात; एक पिशाच्च. [महिष] म्हसोबाला नाहीं बायको व सटवाईला नाहीं दादला. म्हसोबा कोपविणें, पेचविणें- कृष्णानदी तटाकास अक्कलखोप गांवीं म्हसोबा आहे त्याला आपल्या शत्रूचा सूड घेण्याकरितां नारळ फोडणें; देव घालणें म्हैशा-पु. अंगानें मोठा व कुरूप अशा रेड्याबद्दल किंवा इतर नर जातीच्या पशूबद्दल रागानें किंवा उपहासपूर्वक योजावयाचा शब्द. -वि. ज्याचें शरीर पुष्ट असून जो आळशी आहे त्यास निंदेनें म्हणावयाचा शब्द. [म्हैस] म्हैसभादऱ्या-वि. आपल्या कामांचा निपुन नसलेल्या न्हाव्याबद्दल उपहासानें योजावयाचा शब्द; वाईटपणें खाडाखोड करून लिहिणाऱ्या लेखकाबद्दल योज- तात. म्हैसमंगळ-वि. मठ्ठ. म्हैसमाळ-पु. प्रवासामध्यें लवकर न संपणारा मोठा माळ किंवा ओसाड व नापीक जमीन. म्हसर पहा. म्हैसरट, म्हैसरूड, म्हैसर-न. म्हैस किंवा म्हैसा याज- बद्दल तुच्छतादर्शक बनलेली रूपें. म्हैसरूं-न. म्हैस शब्दाचे नर किंवा मादी वगैरे भेद लक्षात न घेतां लाडिकपणानें योजावयाचा शब्द. म्हैसवा-पु. (महानु.)एक प्रकारचा पाषाण. 'कीं आव्हाटी म्हैसवा थर । नव्हतां दुष्टी गोचरु ।' -ऋ ४८. म्हैसवल-स्त्री. एक झुडुप. म्हैसा-पु. टोणगा; रेडा (हा शब्द मराठींत विशेष रुळलेला नाहीं.) रांड-भांड म्हैसा बिघडे तो होय कैसा? (हिदी म्हण) 'नको देऊं म्हैसा ।' -प्रला. म्हैसासुर-पु. एक पिशाच्च; क्षुद्रदेवता. 'म्हैसासुर मलिकार्जुन ।' -दावि ६३. [महिषासुर] म्हैसिक-वि. म्हशीचा. म्हैसोबा-म्हसोबा. 'मुंज्या झोटिंग करणी । म्हैसोबाची'

दाते शब्दकोश

मिरवण-वणी, मिरवणूक

स्त्री. थाटानें पुष्कळशा जमा- वानें सावकाश जाणें; छबीना; दिंडी; वरात; स्वारी. (क्रि॰ निघणें). 'झाली संभ्रमें मिरवण ।' -वेसीस्व ७.१.६. [का. मेरवणगे, मिरवणें; का. म्यरोण; द्राविडी. मेरे; अरमीर, अमीर, मिहीर] मिर- वणी-स्त्री. १ अलंकार; सुशोभित करण्याची वस्तु. 'पै जळशयना चिया अवगणिया । कां मत्स्यकूर्मं इया मिरवणिया ।' -ज्ञा ११. ८४.२ प्रसिद्ध. 'सिंधु आणि गंगेचि मिळणी । स्त्रीपुरुष नामाची मिरवणी ।' -अमृ १.५४. मिरवणें-अक्रि. १ वाद्यादिसहित शहरांतून समारंभपूर्वक सावकाश जाणें; भपका दाखवीत जाणें. २ छानछोकीनें फिरणें; डौलानें जाणें. ३ (ल.) धिंड काढली जाणें. ४ शोभणें. 'तेंचि कृष्णाचें श्रीमुख । नित्य निर्दोष मिरवत ।' -एरुस्व १.५४. ५ बोलणें. ६ क्रिडा करणें; खेळणें. ७ डौल दाख- विणें; डौलानें फिरणें. मिरवा मिरवणें-डौलानें दिमाख दाखवीत हिंडणें.मिरवणें-सक्रि. मिरवणूक काढणें; थाटानें फिरवीत नेणें. (प्रतिष्ठा-डौल-तेज-विद्या-गुण-ज्ञान-शहाणपण) मिरवणें-प्रतिष्ठा डौल इ॰ चें निरर्थक प्रदर्शन मांडणें; पोकळ देखावा दाखवणें; खोटा अविर्भाव करणें.

दाते शब्दकोश

मसण

न. प्रेतें जाळण्याची किंवा पुरण्याची जागा; स्मशान. ' अग्निचा परम सण क्षणांत भासे पुरी भयंकर मसण ।' -मो रामायणें १.३४३. [सं. स्मशान; प्रा. मसण] म्ह॰ आचरट खाणें मसणांत जाणें. ॰उठणें-ज्या ठिकाणी लढाईंत भयंकर प्राणहानि झाली असेल किंवा जेथे असंख्य लोक जाळले गेले अस- तील अशा जागेबद्दल योजतात. ॰जागविणें-स्मशानांतील पिशा- चांना उठवून त्यांनां कांहीं अद्भुत करावयास लावणें. ॰माजणें- भरमसाट, अतिशय दाट वाढणें (शेत, गवत इ॰).मसणांत गोवऱ्या-हाडें जाणें-मरणाच्या पंथाला लागलेला असणें; वयातीत असणें. मसणांत-मसणीं दिवा लावणें-कोणतेंहि उच्छृंखलपणाचें अशास्त्रीय, अयोग्य, निरर्थक कृत्य करणें. मस- णांत देखील कावळ्यांचा उपद्रव-कोणत्याहि स्थळीं-परि- स्थितींत विश्रांति न मिळणें. मसणांतून ओढून काढणें-अनेक उपाय करून मरणोन्मुख माणसाला बरें करणें. मसणांतून ओढून काढलेला-वि. कोणतेहि काम करण्यास असमर्थ, अत्यंत अशक्त; रोड; किडकिडीत (माणूस) ॰कुटी-स्त्री. (ना) स्मशानभूमि. ॰खाई-स्त्री. १ प्रेतें जाळण्याची खोलगट अशी जमीन. २ (ल.) खूप मोठें (स्मशानाप्रमाणें) भयाण, ओसाड घर. ॰खुंट-पु. आईबाप, बायकामुलें इ॰ नसून विद्या व द्रव्य बेता- चेंच असलेला अगडबंब, धष्टपुष्ट माणूस. ॰फट्टें-न. (गो.) १ स्मशानांत पिंड देण्याकरितां शिजवितांत तें अन्न. २ (ल.) रुचि नसलेलें जेवण. ॰वट-टी-टा-स्त्रीपु. स्मशानभूमि. मसणा-वि. १ ज्याचें नांव आपणास माहीत नाहीं किंवा ज्याचें नांव सांगणें अप्रिय किंवा इष्ट नाहीं अशा माणसाबद्दल योजतात. फलाणा; कोणीतरी, गोमाजी. २ रागामध्यें संबोधनार्थ योजावयाचा शब्द. 'अरे मसण्या तुला शंभर वेळ सांगितलें तरी तूं तसाच.'

दाते शब्दकोश

ना कारा

(वि.) हिंदी अर्थ : निकम्मा. मराठी अर्थ : निरर्थक.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

नि

अ. एक उपसर्ग. याचे कांहीं अर्थः १ खातरी; निखाल- सपणा. २ नकार; अभाव; राहित्य. जसें निकोप; निकामी. ३ अतिशयिता. जसें:-निमग्न; इ॰. कधीं हा उपसर्ग निरर्थक, अनवश्यक असाहि लागतो. [सं. निर्]

दाते शब्दकोश

निबरू      

वि.       निरर्थक.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निकरा      

वि.       निरर्थक; व्यर्थ.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निकरा

वि. निरर्थक; व्यर्थ.

दाते शब्दकोश

निष्फळ

निरर्थक, वांझोटें, फलविरहित, फलहीन, अर्थहीन, निष्पत्ति कांहीं नाहीं, फुकट बाळंतपण ! त्यांतून कांहीं निघालें नाहीं, नुसंतें पिष्टपेषण, वंध्यामैथुनाप्रमाणें, फुसका बार, जिरलेलें गर्भारपण, हातीं आलें धोपाटणें, त्याचें बक्षीस कांहीं नाहीं, मोबदला नाहीं, चीज नाहीं, चार बरे शब्दहि कोणी बोलेना, वायां गेले, सर्व गटाराची भर, मातींत गेलें, नसता खटाटोपो भयंकरः, नुसती तोंडाची वाफ, सगळेच मुसळ केरांत, जल ताडनवत्, पालथ्या घड्यावर पाणी, धुळींत गेलें, थोट्याच्या हातीं तलवार देण्याप्रमाणें, हंशील नाहीं, काय चाटायचें आहे त्या वैभवाला ! ना अरत्र ना परत्र ! आग लागो त्याला !

शब्दकौमुदी

निष्फळ      

वि.       १. (ल. व शब्दशः) व्यर्थ; फलहीन; विफल; निरर्थक. २. निरुपाधिक : ‘जय जय देव निष्फळ । स्फुरदमंदानंद बहळ ।’ - ज्ञा १८·४. [सं. निष्फळ]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निष्फळ-ळ

वि. १ (ल. व शब्दशः). व्यर्थ; फलहीन; विफल; निरर्थक; २ निरुपाधिक. 'जय जय देव निष्फळ । स्फुरदमंदानंद बहळ ।' -ज्ञा १८.४.

दाते शब्दकोश

नष्ट      

वि.       १. नाश पावलेला; नाहीसा, जमीनदोस्त, धुळधाण झालेला. २. दुसऱ्याचा नाश, वाईट करण्याचा स्वभाव असणारा; दुष्ट : ‘तुका म्हणे नष्टा । अबोळण्या तुझ्या चेष्टा ।’ – तुगा १४१९·३. निरर्थक; अनावश्यक. ४. वाईट. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पा(पां)टी

स्त्री. बांबू इ॰कांची केलेली मोठी टोपली; हारा. [सिं. पाटि] पाटींतलें मास-न. (तिरस्कारार्थी) क्षुद्र व अग- तिक व्यक्ति; लाचार व दीन मनुष्य. 'मी पाटींतली मास परमान सायासी लाधलें । अभर्वसी नको टाकु जसें जळवळवाचें वाहवलें ।' -होला ११४. म्ह॰ पाटीभर बोलणें गुंजभर अर्थ = अवडंबर- युक्त, निरर्थक बोलणें. [सिं. पाटि]

दाते शब्दकोश

पिष्ट

न. धान्यादिकांचें पीठ; चूर्ण. 'ब्रह्मशापाचें समुल घन । यादवीं पिष्ट करितां जाण ।' -एभा 30.215. [सं.] (वाप्र.) ॰करणें-चूर्ण करणें; ठार मारणें. 'ऐसें म्हणें रणीं तो केला कीं त्वां शरोत्करें पिष्ट ।' -मोकर्ण ४०.२१. सामाशब्द- ॰पेषण-न. पुन: पुनः तेंच तें सांगणें किंवा करणें; एखाद्या गोष्टीचा निरर्थक खल करणें; चर्वितचर्वण. [सं. पिट + पेषण = दळणें] ॰मयद्रव्य-न. पिष्टसत्व पहा. ॰मेह-पु. पीठ कालविलेल्या पाण्याप्रमाणें होणारी लघवी; प्रमेहाचा एक प्रकार. [सं. पिष्ट + मेह] ॰शर्करा-स्त्री. पिष्टसत्त्वा- पासून तयार केलेली स्फटिकसद्दश साखर. [सं. पिष्ट + शर्करा = साखर] ॰सत्त्व-न. कंद, धान्य इ॰कांत होणारा अन्नाचा पिठूळ सत्त्वांश. [सं. पिष्ट + सत्त्व]

दाते शब्दकोश

प्रास

(सं) पु० शब्दालंकारविशेष, अनुप्रास, त्याच त्याच सार्थक किंवा निरर्थक अक्षरांची आवृत्ति. २ भाला.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

प्रलाप

पु. असंबद्ध, निरर्थक बडबड (झोप, शोक, मद, इ॰ तील); व्यर्थ भाषण. 'हा प्रलाप स्त्रीजातीनें करावा.' -भाब ७४. [सं.] प्रलापणें-अक्रि. (काव्य) विसंगतपणें बोलणें, बड- बडणें; बकणें. [प्रलाप]

दाते शब्दकोश

प्रलपणें

अक्रि. निरर्थक बोलणें; बडबडणें. [सं. प्रलपन]

दाते शब्दकोश

पुसणें

उक्रि. १ (कागद, शरीर, वस्त्र इ॰ चा मळ, फडकें इ॰ नें) घासून नाहींसा करणें; साफ करणें; चोळून स्वच्छ करणें. २ नाहींसें होणें; करणें; नष्ट करणें; नाश करणें. 'तें उगाणिलें मज कर्म । तेव्हांचि पुसिलें मरणजन्म ।' -ज्ञा ९.४०४. 'शूरांचें शौर्य तें कैसें । शत्रूंचें निःशेष नांवचि पुसे । ' -एभा १७.१४५. ३ कोरडें करणें. ४ लिहिणें या क्रियापदाबरोबर निरर्थक योजितात. 'त्याला लिहितां पुसतां येत नाहीं.' म्हणजे त्याला मुळींच लिहितां येत नाहीं. तो अडाणी; अशिक्षित; निरक्षर आहे. [सं. स्पृश्; प्रोच्छन-पुंछण-पूंसणें-पुसणें-राजवाडे ग्रंथमाला]

दाते शब्दकोश

फ़ज़ूल

(वि.) हिंदी व मराठी अर्थ : निरर्थक, व्यर्थ, अतिरिक्त.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

फ़ज़ूल गो

(वि.) हिंदी अर्थ : व्यर्थकी बातें कहने वाला. मराठी अर्थ : निरर्थक बडबडणारा, व्यर्थ.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

फा(फां)का

पु. उपास; जेवणाचा खाडा; उपवासाचा दिवस. 'दिवसेंदिवस अन्न मिळेनासें जाहलें, चार चार फांके पडूं लागलें.' -पाब ३०. -वि. रिकामा; निरर्थक; फुकट; रिता; खाली ;बाद; कोरा; कोरडा. 'नित्य विकारी होती असेंच कांही घडत नाहीं एखाद दिवस फांका जातो.' [अर.फाका = दारिद्य; अभाव] ॰मारीत फिरणें-कांही लाभ इ॰ नसून व्यर्थ भटकणें. फाके- कशी-सी-स्त्री. उपासमारी. 'जोतसिंग खंदाकर यास फाकेकसी होत आहे.' -रा ५.११८. [फा. फाका + कशी] फांकेबाज- मस्त-वि. दारिद्यानें गांजलेला असून बाहेर तसें न दाखविणारा; थोर मनानें पूर्वीप्रमाणेंच वागणारा. फाके मस्त- वि. (व.) ज्याला फाके (उपवास) पडूनहि जो मस्तासारखा राहतो तो. फाकेकंगाल-मस्त-वि. (ना.) भुकेकंगाल; अठराविश्वे दरिद्री फाकेशीर-वि. उपाशी. (फा.) -ऐच १.९.

दाते शब्दकोश

फिसकटणें, फिसकणें

अक्रि. १ (मैत्री, निष्ठा इ॰ चा) त्याग करणें; प्रतिकूल, परावृत्त होणें; दूर जाणें. २ (करार, बेत, योजना इ॰) निरर्थक होणें; मोडणें; विरणें; फसणें; बिघडणें. ३ लाथां मारूं लागणें व दुध न देणें; बिथरणें (गाय). ४ बेफाम, अनावर होणें; बिथरणें (घोडा). [ध्व. फमक, फिस्]

दाते शब्दकोश

फलाणबिस्ताण

न. १ हें तें; ही ती वस्तु. २ सटरफटर; अडगळ. ३ कांहींचे कांहीं, निरर्थक, फाल्तू गोष्टी. [फा. फलान् द्विरु.]

दाते शब्दकोश

फोल

न. १ हलका, पोकळ दाणा. २ टरफल; आंतील दाणा काढून घेतल्यावर राहिलेलें दाण्याचें (भात, हरभरा इ॰) साल; कडधान्याच्या दाण्यावरील साल. ३ कोंडा; भुसा; तूप. ४ (ल.) पोकळ व अविश्वासाचें बोलणें, वचन; निरर्थक बडबड. ५ निष्कल श्रम, प्रयत्न. -वि. खोटें; व्यर्थ; कोरडें; निःत्व. 'दुःशासना न याचे ऐकावे बोल फोल हा बाळ ।' -मोसभा ५.६२. [का. पोळ्ळु] ॰कट-न. टरफल; इलकें, पोकळ, पोचट धान्य. 'जैसें सांडिजे फोलकट ।' -विउ ७.२१. -वि. व्यर्थ; पोकळ. 'बाकीच्या शास्त्रांचा फोलवट पसारा काय करावयाचा ?' -गीर ११. [फोल]

दाते शब्दकोश

फुकट

वि. १ वृथा. २ फुकटचा पहा. -क्रिवि. १ व्यर्थ; विनाकारण; निरर्थक. २ पैशाशिवाय किंवा श्रमाशिवाय (मिळा- लेला, दिलेला). ३ मोबदल्याशिवाय; मोफत (केलेलें काम इ॰). [सं. फूत्कृतम्?] म्ह॰ फुकट आणि चोखट = पदार्थ फुकट मिळावा आणि तो चांगला पण असावा (अशी इच्छा करणें). फुकटचा- वि. १ मोफत; श्रमाशिवाय, पैशाशिवाय मिळणारा. २ अनायासें, सहज घडणारें. 'हें काम फुकटचें नव्हे.' ॰खाऊ-खोर, चोंट, फुकट्या-वि. १ बिन परिश्रमानें, बिन मोबदल्यानें आयतें फळ मिळावें म्हणून पुढें आलेला; निलाजरा (इसम). २ दुसर्‍याच्या जिवा- वर मजा मारणारा. ऐतखाऊ पहा. ॰पसारा-वि. फुकट हांसण्याचा ज्याचा स्वभाव तो. ॰फजिती-स्त्री. नुकसान, श्रम, तिरस्कार, अपमान इ॰ चाच फक्त लाभ होणारा. धंदा, गोष्ट इ॰. ॰फाकट-वारीं-फुका-क्रिवि. फुकट; मोफत; मोबदल्याशिवाय. [फुकट द्वि.] ॰फाकट ब्रह्मज्ञान-न. बिन मोबदल्यानें, श्रमानें मिळणारें आध्यात्मिक ज्ञान (हें असें कधींहि मिळत नसतें निषेधार्थीं प्रयोग). 'फुकट ब्रह्मज्ञान-मिळत नाहीं-सांपडत नाहीं- साधत नाहीं. ॰बिसनी-वि. पदराला खार न लागतां चैन चालविणारा फांकडा; व्यसनी (मनुष्य); फुकटचोद. म्ह॰ फुकट बिसनी तमाखू उसनी. ॰शाई-वि. मोफत; फुकट; पैसा खर्च न होतां मिळणारें. [फुकट + शाही प्रत्यय] फुकटा, फुकट्या- वि. १ मोफत; फुकटशाई. २ (ल.) कुचकामाचें. ३ मोफत घेणारा; फुकटखोर. [फुकट] फुकटाई-स्त्री. मोफतपणा; फुकटपणा. (क्क. पंचमीविभक्तींत उपयोग). फुकटाईनें-खालीं-वारी- फुकटाईचा-क्रिविवि. फुकट; विना मोबदला मिळालेला, केलेला. फुकटाफुकट, फुकटाफुकटी, फुकटावारीं-क्रिवि. मोफत वारीं; फुकटफाकट. [फुकट द्वि.]

दाते शब्दकोश

रायगा

(वि.) हिंदी अर्थ : व्यर्थ, बेकार. मराठी अर्थ : व्यर्थ, निरर्थक.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

रिकामा-वि.

१ ज्यांत कांहीं नाहीं असा; पोकळ. 'ही घागर रिकामी आहे. २ (ल.) पोकळे; निराधार; तथ्यांश नस- लेला; कोरडा; पुराव्यानें, प्रमाणानें, उदाहरणानें ज्याची सत्यता, यथार्थता सिद्ध करतां येत नाहीं असा (वाद, विधान, हकीकत). उदा॰ रिकामा डौल; रिकानी स्तुति. ३ ज्या जागेवरील अधिकारी किंवा काम करणारा मनुष्य अद्यापि नेमण्यांत आलेला नाहीं किंवा रजेवर गेलेला आहे अशी (जागा); 'ह्या कचेरींत तीन कार- कुनांच्या जागा रिकाम्या आहेत.' ४ निरर्थक; व्यर्थ; निष्फळ; निष्प्रयोजन; खोटा (दगदग, पायपिटी, चौकशी, बोलणें). 'नको सांगु बडिवार रिकाम लक्षुनि नाना परी'-प्रभाकर-लावणी- लक्ष्मीपार्वती संवाद (नवतीत पृ. ४१५.). ५ जरूर ती सामुग्री, हत्यारें इ॰ साधन ज्याचें जवळ नाहीं असा. 'माझीं हत्यारें सारीं घरीं आहेत, मी रिकामा तुमच्या घरीं येऊन काय करणार ?' ६ ज्याला नोकरी, उद्योग-धंदा नाहीं असा; बेकार; निरुद्योगी; कामवीण; 'कधीं रिकामा असूं नको ।' -अनंतफंदी लावणी (नवनीत. पृ. ४३७.) ७ उपयोगांत नसलेली, कामांत न गुंतविलेली (वस्तु, गाडी इ॰). 'तुमचा चाकू रिकामा झाला म्हणजे मला अंमळ द्या.' ८ एकाकी; उद्दिष्ट न साधलेला; प्रयोजनशून्य; फलशून्य. 'मी तुला पुढें घालून घेऊन जाणार, रिकामा परत जाणार नाहीं.' ९ ज्यास कोणी मालक नाहीं असा (देश, मुलूख इ॰). 'आर्यांना दंडकारण्याचा प्रदेश रिकामा सांपडला.' [सं. रिक्त, रिच = रिकामें करणें] म्ह॰ रिकामा न्हावी कुडाला (भिंतीला) तुंबड्या लावी. (वाप्र.) ॰बसणें- उद्योग नसणें; बेकार असणें; निरुद्योगी राहणें; आळशीपणानें वेळ काढणें. 'सहज रिकामे बैसाल घरीं । संसार चाले कैशापरी ।' सामाशब्द- रिकम्मचावडी-टेंकडी-स्त्री. निरुद्योगी लोकांची चकाट्या पिटीत बसावयाची जागा-अड्डा; निरुद्योगी लोकांचा समूब-टोळी-कंपू. ॰चेष्टा-स्त्रीअव. निरुद्योगी माणसाचे चाळे, उपव्द्याप; रिकामपणाच्या खोड्या. ॰चोट-टवळा-टेकडा- वि. (अशिष्ट) निरुद्योगी; आळशी (मनुष्य); उपयोगी न पडतां पडून राहिलेला (वस्तु). म्ह॰ १ रिकामचोट आणि गांवास उपद्रव. २ रिकाम टवळा आणि गांवचा होवळा.' रिकामटी, रिकामणूक-स्त्री. सवड; फुरसत; रिकामा वेळ; रिकामीक. 'पुराणीं बैसतां नाहीं रिकामटी । खेळतो सोंगटी अहोरात्र '। -तुगा ४२३४. रिकामढंग, रिकामे ढंग-पुअव. रिकाम- पणचे चाळे; निष्फळ उपव्द्याप; निष्प्रयोजन काम. ॰पण- पणा-न. पु. फुरसत; सवड; कामांत न गुंतल्यामुळें मिळणारी सावकाशी; सुट्टी; रजा; विश्रांति. ॰वाणा-णी-वि. व्यर्थ; फुकट; आळसानें घालविलेलें; निष्फळ. ॰वेळ-स्त्री. पुर- सतीचा वेळ; सवड. रिकामा ताठा-पु. पोकळ गर्व; पोकळ डौल; मोठेपणाचा खोटा आव. म्ह॰ 'नाकीं नाहीं काटा रिकामा ताठा.' -रिकामीक-स्त्री. रिकामपण; फुरसत; सवड. रिकाम्या पोटी-क्रिवि. अनशेपोटी; जेवण्यापूर्वीं. रिकाम्यारानी-णी- क्रिवि. विनाकारण; फळाची आशा किंवा संभव नसतां. 'तुमचें तिकडें कांहीं का होईना ?' मला काय त्याची पंचाईंत ? रिकाम्या रानीं मी कशाला आपल्याला त्रास करून घेऊं ?' (ज्यांत जनावरें नाहींत अशा रानांत शिकारी जात नाहींत यावरून वरील प्रयोग). रिकाम्या हातानें-क्रिवि. आणावयाची वस्तु न आणतां; रिक्त हस्तानें. रिक्यामी-वि. (गो.) रिकामा. 'हांव रिक्यामी ना.'

दाते शब्दकोश

रिकामका

वि. रिकामा; निरुद्योगी; कामधंदा नसलेला. [रिकामा] ॰खटाटोप-पु. निरर्थक दगदग; फायदा न मिळतां विनाकारण करावें लागलेलें काम, श्रम.

दाते शब्दकोश

रिता

वि. १ पोकळ; मोकळा. २ रिकामा (सर्व अर्थ- विशेषत: पहिले पांच अर्थ) पहा. ३ (काव्य) वांचून; विरहित; गरज किंवा कमतरता असलेला. 'चतुर मी जालों आपुल्या भोंवता । भावेंविण रिता स्फंद अंगीं ।' -तुगा २०१९. [सं. रिक्त] ॰भरला-वि. होय नाहीं; केलें किंवा न केलें; असा तसा; बराबाईट; बरोबर किंवा चूक. 'जें काम मी सांगितलें त्याचा जाब मला रिताभरला द्यावयाचा होता.' रिताड-स्त्री. १ माल, टाकून रित्या झालेल्या गाड्या, बैल, तट्टें इ॰ २ -न. रहाटगाडग्यावरील रिकाम्या लोट्यांची मोळेची बाजू. ३ स्त्री. रिकामें असण्याची स्थिति. याच्या उलट भरताड. रिति-ती- वि. रिकामी; मोकळी; व्यर्थ; रिकामा पहा. रितें-वि. १ रिकामें; पोकळ. २ (गो.) सहज. 'हांव रितें आयल्लें' = मी सहज आलें होतें' ॰सोप-वि. निरर्थक. रीतहाती-स्त्री. (महानु.) हातांत कांकणें नसलेली; विधवा. 'आतां वेल्हाळ वेधवती । जाली रीत हाती ।' -भाए १२. [सं. रिक्त + हस्त]

दाते शब्दकोश

साक़ित

(वि.) हिंदी अर्थ : गिरा हुआ, निरर्थक. मराठी अर्थ : त्यक्त, पतित, व्यर्थ.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

शहद लगाकर चाटना

हिंदी अर्थ : किसी निरर्थक पदार्थको व्यर्थके लिये रखना (व्यंग) मराठी अर्थ : निरुपयोगी वस्तु सांभाळून ठेवणें. (अुपहासात्मक)

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

शिकविणे ( व्यर्थ )

व्यर्थ उरस्फोड, कानींकपाळी ओरडणें, उगाच माथेपची व घसेफोड, निरर्थक टाळकेफोड, बिषयाचा वासहि बिद्यार्योस लागत नाहीं, हा ग्रंथ या मुलांच्या डोक्यांत घालण्याचा मी सारखा प्रथन करतों आहें; पण पालथ्या घड्यावरील पाण्याप्रमाणें.

शब्दकौमुदी

सुणा-णी-णें

वि. व्यर्थ; शून्य; निरर्थक. [सं. शून्य]

दाते शब्दकोश

शुष्क

कोरडा, रसहीन, सुकलेला, वाळलेला, जठहीन , सुखट, व्यर्थ, निरर्थक, फुकट.

शब्दकौमुदी

शून्य

न. १ अभाव; साहित्य; नास्तित्व; रिक्तता; पोकळी. २ संख्येचा अभाव दाखविणारें चिन्ह; पूज्य. ३ अनुस्वार, विसर्ग दर्शक चिन्ह. ४ आकाश; अवकाश; पोकळी. ५ (वेदांत) निराकार ब्रह्म. 'आपुलिया साटोवाटीं । शून्य घेती उठाउठी ।' -ज्ञा १२. ५८. -वि. अभावात्मक; रिक्त; रिकामें; खाली; विरहित. (समा- सांत) द्रव्य-ज्ञान-युक्ति-अर्थ-जल-शक्ति-वृक्ष-पुष्प-पर्ण-शून्य. २ नग्न; उघड; निर्वस्त्र; पात्रादि विरहित; वस्तुविरहित; पोकळ; उघडेबोडकें. ३ उजाड; निर्जन; सुनें; बेचिराख. (समासांत) शून्य- मंदिर-गृह-प्रांत-स्थल. 'धावोनि ये उटज केवळ शून्य पाहे ।' मोरामायण १.४२५. ४ बधिर; चेतनारहित; संज्ञाविरहित. 'तो आपल्या शोकावेगानें इतका शून्यचित्त झाला होता...'-मोयचा- बाजार. (वाप्र.) शून्यस्थानीं पडणें-निष्फळ, निरर्थक होणें; वाऱ्यावर जाणें. 'परि जेवणार ते रोगिष्ट. तरि ते सुगरिणीचे कष्ट । शून्यस्थानीं पडियेलें ।' [सं. शुन् = जाणें] सामाशब्द ॰ख्याति- स्त्री. ख्याति पहा. ॰दृष्टि-स्त्री. १ निर्विकार, चेतनारहित दृष्टि. 'तिच्याकडे तो शून्यदृष्टीनें पहात बसला.' -मायेचा बाजार. २ (नृत्य) एक अभिनय. डोळ्यांतील बुबुळें स्तब्ध व एका रेषेत ठेवणें, पापण्या निश्चळ दाखविणें. हा चिन्तादर्शक आहे. ॰देह-वि. बधिर, चेतनारहित अंग झालेला. विशिष्ट रोगानें पीडिलेला. ॰परि- कर्माष्टक-न. (गणित) शून्यासंबंधीं बेरीज, वजाबाकी, गुणा- कारादि आठ क्रिया. परिकर्माष्टक पहा. ॰मंदिर-न. मूर्ति विरहित देऊळ; मशीद 'श्री शाळिग्रामशिळा यवनाचे शून्य मंदिरीं पडली ।' -स्फुटआर्या. ॰मस्तक-की-वि. ज्याचे तीन किंवा चार पाय पांढरे असून डोक्यावर (किंवा कानाजवळ) भोंवरा वगैरे कोण- तेंहि चिन्हे नसतें असा (घोडा). -अश्वप १.९७. ॰लब्धी-स्त्री. १ भाज्यापेक्षां भाजक मोठा असल्यास भागाकार शून्य येतो ती. २ (अर्वाचीन) अत्यंत सूक्ष्म संख्यांचें गणित. 'शून्यलब्धी पर्यंत माराकूट करून मजल मारा.' -नि १०३०. ॰लिंग-न. निराकार परमात्म्याचें, ब्रह्माचें, चिन्ह खूण. 'जे शून्यलिंगाची पिंडी । जे परमात्मयाची करंडी ।' -ज्ञा ६.२७३. ॰वाद- पु. जग हें केवळ अभावात्मक आहे, म्हणजे कांहीं नाहीं म्हणजेच ब्रह्म असें मत. ॰वादी-पु. शून्य वादाचा पुरस्कर्ता. ॰वेला-वेळ-स्त्री. (ज्योति) मध्यान्ह, मध्यरात्र, व संध्या- काळ या वेळांस संज्ञा. कारण यावेळीं केलेलीं कृत्यें निष्फळ होतात. ॰शेज-सेज-स्त्री. माया. ॰सिद्धान्त-पु. पदार्थ- मात्र नाशिवंत म्हणून नाहींतच व ब्रह्महि असतें तर प्रत्ययास येतें, ज्या अर्थीं प्रत्ययास येत नाहीं व जें नाहीं तेंच ब्रह्म हा सिद्धान्त. शून्यवाद पहा. ॰हृदय-वि. १ संज्ञा, जाणीव नाहींशी झालेला २ निष्ठुर; क्रूर; (मृदु) भावना नाहींशा झालेला; अन्तःकरण नसलेला. ३ मन, इच्छा, वासना नष्ट झालेला; वासनांच्या पलीकडे गेलेला; अतींद्रिय. शून्याकार- वि. १ अभावरूप; ओसाड; निर्जन; उध्वस्त; शून्यरूप. २ स्थलकालादि मर्यादा नसलेलाच निराकार; सर्वव्यापी, (प्रस- रणशीलतेनें); सर्वनाशी (आवरणशीलतेनें) (ब्रह्म). शून्या- कृति-वि. अक्रिय; नाकर्ता. 'लॉर्ड लान्सडौनसारखे शून्याकृति व्हाइसरॉय आले कीं... निरर्गल यजमान आमचे डोक्यावर बस- तात.' -टिले १.१.२८६. शून्यतुल्य-वि. निरुपयोगी; निर्माल्य- वत्' शून्यालय-न. मशीद-(कर्वेयांचे) आत्मवृत्त १४.

दाते शब्दकोश

टाळकुटेपणा      

पु.       (निंदार्थी) टाळ वाजविण्याची सवय; भजनात वेळ घालवणे : ‘...त्यांच्या नामसंकीर्तनामुळे टाळकुटेपणाची साथ फैलावून समाज रसातळाला गेला...’ – संवासाफ ४८. (ल.) वेळ घालवण्यासाठी निरर्थक चर्चा करत बसणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

टाळकुट्या, टाळघाशा      

वि.       १. (निंदार्थी) टाळ वाजविणारा; ढोंगीपणाने भजन, कीर्तन करणारा. २. (ल.) वेळ घालवण्यासाठी निरर्थक चर्चा करत बसणारा (मनुष्य). ३. (ल.) पायांत पाय अडकवून चालणारा (घोडा).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तिरस्थळी

स्त्री. १ काशी, प्रयाग, गया या तीन क्षेत्रांची यात्रा. २ (ल.) इकडून तिकडे होणारे निरर्थक हेलपाटे; त्रास- दायक व व्यर्थ प्रवास. ३ वरचेवर लागणार्‍या पदार्थाची व स्थलांची पांगापांग व गैरसोईची स्थिति; कामाची दाणदाण. ४ मनाची अस्थिरता, चंचलपणा. उदा॰ 'मी काल येऊन पोंचलों पण अजून माझी तिरस्थळी आहे. [सं. त्रि + स्थळ] (वाप्र.) ॰ची यात्रा-स्त्री. काशी,, प्रयोग व गया या क्षेत्राची यात्रा (ल.) दूरदूरच्या ब वगैसोयींच्या ठिकाणीं पांगलेलें काम.

दाते शब्दकोश

तिरस्थळी      

स्त्री.       १. काशी, प्रयाग, गया या तीन क्षेत्रांची यात्रा. २. (ल.) इकडून तिकडे होणारे निरर्थक हेलपाटे; त्रासदायक व व्यर्थ प्रवास. ३. वरचेवर लागणाऱ्या पदार्थांची व स्थळांची पांगापांग व गैरसोईची स्थिती; कामाची दाणादाण. ४. मनाची अस्थिरता; चंचलपणा. [सं. त्रिस्थली]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

टोणा-ण्या

पु. १ जाड, गलेलट्ठ ढेंकूण, ऊ, गोचीड. २ (सोंगट्या) प्रतिपक्ष्यास दान पडूं नये म्हणून हा शब्द उच्चारून मोठयानें ओरडतात. ३ जादू; मंतरतंतर; टाणाटोणा. 'तो मूढ नेणेच मुकुंद टोणा ।' -आगो २४. ४ (व.) विटेचा किंवा मातीच्या ढेकळाचा तुकडा. ५ टोला; घाव. 'प्रगतिस जर तें हाणी टोणा । ' -केक १०३. ६ (बे.) सोटा, दांडकें. ७ -वि. मूर्ख; मद्दड; निरर्थक (माणुस). [का. टोण्णि, टोण्णे = दांडकें]

दाते शब्दकोश

त्रिस्थळी

स्त्री. १ काशी, प्रयोग व गया तीन तीर्थांची यात्रा. २ (ल.) एकाच कामासाठीं अनेक ठिकाणीं जाण्याचा प्रसंग; इकडून तिकडे निरर्थक हेलपाटे घालावे लागणें. ३ (ल.) (वरचेवर लागण्यार्‍या पदार्थाची, स्थलांची एखाद्या स्थलापासून) लांब व गैरसोईची स्थिति; (काम इ॰कांची) पांगापांग; विस्कळितपणा; मनाची दगदग व अस्थिरता. (विरू.) तिरस्थळी. तिरस्थळी सर्व अर्थीं पहा. [त्रि + सं. स्थल = ठिकाण] ॰यात्रा-स्त्री. त्रिस्थळी अर्थ १ पहा.

दाते शब्दकोश

टवाळ, टवाळ्या, टवाळखोर, टवाळीखोर      

वि.       १. नेहमी निंदा करणारा; दोष काढणारा; निर्भर्त्सना, उपहास, कुचेष्टा करणारा; चटोर; टिंगलखोर; वाह्यात; वात्रट. २. उनाड; खोडकर; व्रात्य; चाळे किंवा खोड्या करणारा; दुर्गुणांनी परिपूर्ण (मूल). ३. चहाडखोर. ४. लटके; मिथ्या; निरर्थक : ‘तरी सांडी म्हणे आघवें । टवाळ हें ॥’ – ज्ञा १३·८१०. [क. टमाळ=कपटी; सं. ट्वल]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

टवाळ-ळ्या, टवाळ(ळी)खोर

वि. १ आळशी; उनाड; खोडकर; चाळे किंवा खोडया करणारा; दुर्गुणांनीं किंवा लुच्चेगि- र्‍यांनीं परिपूर्ण (मूल). २ नेहमीं निंदा करणारा; दोष काढणारा; निर्भर्त्सना, उपहास, चेष्टा करणारा; चटोर. ३ लटकें; मिथ्या; निरर्थक. 'तरी सांडी म्हणे आवघें । टवाळ हें ।' -ज्ञा १३.८१०.

दाते शब्दकोश

उगा      

क्रिवि.       १. न बोलता, हालता, काम करता; स्वस्थ; शांत; गप्प; उगीच; मुकाट्याने : ‘आतां नाइकें न पाहें । म्हणोनि मी उगा राहे ।’ −एभा ९·४५५. २. खटपट न करता; विना धंदा किंवा उद्योग. ३. अकारण; अनिमित्त; निष्कारण; जरुरी नसता : ‘उगा लोळसा घोळ मोठा करीतो.’ − राक ३६. ४. व्यर्थ; निरर्थक; बेकायदा : ‘उगा भ्रमसि वाउगा कशाला युगांत खळ हा कली.’− राला १०६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उगा

क्रिवि. १ न बोलतां-हालतां काम करतां; स्वस्थ; गप्प; उगीच; मुकाट्यानें. 'तंव रज तम उगे । कां पां राहाती ।' -ज्ञा १७.६३. 'आतां नाइकें न पाहें । म्हणोनि मी उगा राहे ।' -एभा ९.४५५. 'राहे भीष्म उगा, कीं सोडी तव सुत न दूरभिमानातें ।' -मोभीष्म १२.२८. 'नको छंद घेऊ उगा राहिं गोपाळा ।' -कृष्णाचा पाळणा १४. २ न खटपट करतां; विना धंदा किंवा उद्योग. ३ अकारण; अनिमित्त; निष्कारण; जरुरी नसतां. 'उगा लोळसा घोळ मोठा करितो.' -राक ३६.४ व्यर्थ; निरर्थक; बे फायदा. 'उगा भ्रमसि वाउगा कशाला युगांत खळ हा कली.' -राला १०६. उगी, उगला पहा. [ह. का. उगि = भिणें; का. उके = गप्प?]

दाते शब्दकोश

उगाच, उगीचचे उगीच, उगीचे उगीच      

क्रिवि.       १. निष्कारण; जरूर नसता; विनाकारण; व्यर्थ; निरर्थक : ‘सत्य धनंजय कर्में रूपें दिसतो उगाचि वरि नरसा ।’ − मोभीष्म ११·७२. २. निमूटपणे : ‘घेणार तो न समजोनि उगाच घेतो ।’ − नल ८७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उगाच, उगीचचेउगीच, उगीचेउगीच

क्रिवि. उगा पहा. १ निष्कारण; जरूर नसतां; विनाकारण; व्यर्थ; निरर्थक. 'सत्य धनंजय कर्में रुपें दिसतो उगाचि वरि नरसा ।'-मोभीष्म ११. ७२.२ निमूटपणें; बिनतक्रार. 'घेणार तो न समजोनि उगाच घेतो.' -नल ८७.

दाते शब्दकोश

उगला

क्रिवि. १ स्तब्ध; मुकाटयानें; उगीच; निमूट; गप्प; गुपचुप; निवांत; निमूटपणें; तटस्थपणानें 'आनंदें फुगला नसेचि उगला; गाधेय गर्जे सभे ।' -आसी ५५. 'क्षत्ता म्हणे करी उगला । वाग्व्यापार ये काळीं ।' मुआदि २९.१४५. 'बसले कृष्णेसमीप ते उगले । -मोऐषिक ३.१९. २ व्यर्थ; विनाकारण. निरर्थक. 'जन्मुनी उगले कां मरती? -आप ३८. 'हा ग्रंथ म्हणाल उगलीच वाणी । तरी नोहे आहे अमृतसंजीवनी ।'-नव ६.५४. [सं. उद् + गु/?/]

दाते शब्दकोश

उगला      

वि. क्रिवि.       १. स्तब्ध; मुकाट्याने; उगीच; निमूट; गप्प; गुपचूप; निवांत; निमुटपणे; तटस्थपणे : ‘आनंदें फुगला नसेचि उगला; गाधेय गर्जे सभे ।’ − आसी ५५. २. व्यर्थ; विनाकारण; निरर्थक : ‘जन्मुनी उगले कां मरती?’ − आप ३८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उप      

अ.       एक उपसर्ग. हा पुढील अर्थी योजतात. १. अनुगमन. उदा. उपदेश, उपालंभ. २. अधिकपणा. उदा. उपपरार्ध. ३. हीनपणा, गौणत्व. उदा. उपस्त्री, उपपत्नी, उपपुराण. दुय्यम; गौण. उदा.उपसचिव, उपायुक्त. ५. कमी प्रतीचा, तीव्रतेचा, गुणाचा. हा आम्लात किंवा त्या रसायनात (प्राणवायूचा) कमीपणा आहे असे दाखवतो. उदा. नत्रस अम्लापेक्षा उपनत्रस अम्ल हे कमी अम्लजन असते. ६. समीपता; सान्निध्य. उदा. उपकंठ, उपनदी, उपांत्य. ७. पहिलेपणा. उदा. उपक्रम. ८. दाक्षिण्य; आदर. उदा. उपचर्या. ९. साम्य. उदा. उपधातू, उपव्याघ्र. १०. शेवट; नाश. उदा. उपरती. ११. विकार. उदा. उपलेप. १२. स्वीकार. उदा. उपगम, उपाकर्म. १३. व्यापणे. उदा. – उपहास. १४. समूहत्व; संमेलन; संकलन. उदा. उपार्जन. १५. शक्ती. १६. अध्ययन; अध्यापन. उदा. उपाध्याय. १७. उद्योग. १८. कडे; वर; खाली. उदा. उपनयन. १९. निरर्थक, स्वार्थी म्हणूनही कधी हा उपसर्ग लागतो. अप या उपसर्गाचे काही अर्थ याचेही आहेत.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उप

अ. एक उपसर्ग-अर्थः १ अनुगमन. उ॰ उपदेश, उपा- लंभ. २ अधिकपणा. उ॰ उपपरार्ध. ३ हीनपणा; गौणत्व. उ॰ उपत्नी, उपपत्नी, उपपुराण. ४ कमी प्रतीचा, तीव्रतेचा, गुणाचा. (इं.) हायपो; हा अम्लांत किंवा त्या रसायनांत (प्राणवायूचा) कमीपणा आहे असें दाखवितो. उ॰ नत्रस अम्ल (नायट्रस अॅसिड) पेक्षां उपनत्रस अम्ल (हायपोनायट्रस अॅसिड) हें कमी अम्लजन असतें. ५ समीपता; सान्निध्य. उ॰ उपकंठ, उपनदी, उपांत्य. ६ पहिले- पणा. उ॰ उपक्रम. ७ दाक्षिण्य; आदर. उ॰ उपचर्या. ८ साम्य. उ॰ उपधातु, उपव्याघ्र. ९ शेवट; नाश. उ॰ उपरति. १० विकार उ॰ उपलेप. ११ स्वीकार. उ॰ उपागम, उपाकर्म. १२ व्यापणें. उ॰ उपहास. १३ समूहत्व; संमेलन; संकलन. उ॰ उपार्जन. १४ शक्ति. १५ अध्ययन; अध्यापन; उ॰ उपाध्याय. १६ उद्योग. १७ कडे; वर; खालीं. उ॰ उपनयन. १८ निरर्थक म्हणूनहि कधीं हा उपसर्ग लागतो. अप या उपसर्गाचे कांहीं अर्थ याचेहि आहेत.

दाते शब्दकोश

उपचार

पु. १ श्रम; उपाय; प्रयत्न. 'मग नानाहेतुप्रकारें । यथोचितें उपचारें ।' -ज्ञा ४.७१. २ पूजेंतील प्रकार. उ॰ षोड- शोपचार पहा. 'देवांगणमिरवणियां । आंगोपचार पुरवणियां ।' -ज्ञा १७.२०३. ३ चिकित्सापद्धतींतील प्रकार; सप्तोपचार पहा. ४ वैद्यकीय चिकित्सा; औषधीयोजना; इलाज; उपाय. 'तें उपचारा. वेया रसु पाहे । देतु वैद्यनाथू ।' -ऋ २२. ५ गौरव; आदरसत्कार; आतिथ्य; संभावना; सेवा. 'उपचार करोनि मग सजाला ।' -दावि ३९२. ६ रूढी; रिवाज; चाल. उ॰ लोकोपचार; शिष्टोपचार. 'मरों टेंकला विप्र पुत्रोपचारें । हरीचें वदे नाम लोकोपचारें ।' -नामसुधा ५९. ७ शब्दाचा वाच्यार्थापासून दूरान्वय; उपमा, रूपक इ॰ वाप- रणें; लाक्षणिक भाषण; अलंकारिक भाषण. ८ सामग्री; साधनें; साहित्य. 'कां वसंतीं बरवा आरामु । आरामींही प्रियसंगमु । संगमीं आगमु । उपचारांचा ।।' -ज्ञा १८.३४५. [सं. उप + चर्] ॰बोल-पु. अव. निरर्थक भाषण; औपचारिक, तोंड देखलें बोलणें; शिष्टाचार म्हणून वरवरचें, मनापासून नसलेलें भाषण. 'उपचारबोल हा कासया वृथा ।' -दावि २८६. ॰भरण-न. साधनसामग्री. 'हेचि यज्ञोपचार- भरण । अज्ञानघृत ।' -ज्ञा ९.२४०. ॰विरुध्द-क्रिवि. शिष्टाचारा- विरुध्द, रूढीविरुद्ध. -नीतिशास्त्र १४७. ॰होडें-वि. क्षणिक. -मनको

दाते शब्दकोश

उपचारबोल      

पु. निरर्थक भाषण; औपचारिक, तोंडदेखले बोलणे; शिष्टाचार म्हणून वरवरचे, मनापासून नसलेले भाषण : ‘उपचारबोल हा कायसा वृथा ।’ – दावि २८६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उपखा

पु. १ श्रम. 'तेथ चंद्रासि काय किरीटी । उपखा पडे ।।' -ज्ञा ९.११५. २ क्षय; नाश; खर्च. 'किंबहुना इया भाखा । द्वैताचा जेथ उपखा ।।' -अमृ २.५४. -वि. व्यर्थ; निरर्थक. [सं. उप + क्षि-क्षय् = र्‍हास होणें]

दाते शब्दकोश

वाचा

स्त्री. १ वाक्; वाणी; वागिंद्रिय. २ भाषण; बोलणें; शब्द; वचन; बोल. 'वदलासि न तूं कधींहि अशी वाचा ।' -मोकर्ण ५.३७. ३ आकाशवाणी; अशरीरिणी वाक्. ४ अव- सरणी. [सं. वच् = बोलणें] वाचा उकठणें-पालटणें-परतणें- फिरणें-मुरडणें-बोलणें खुंटणें; बोलणें खोटें पडणें; मागें घेण्याची पाळी येणें; गप्प बसावें लागणें. वाचा नरकांत घालविणें-खोटें बोलणें; वचन मागें घेणें. वाचा फुटणें-बोल- ण्याची शक्ति येणें. वाचा बसणें-बोलण्याची शक्ति नाहींशीं होणें; वाणी खुंटणें; बोबडी वळणें. वाचा विटाळणें-१ खोटें बोलणें; वचन न पाळणें. २ व्यर्थ भीड घालणें; निरर्थक शब्द वेंचणें, खर्च करणें. ॰ट-ल-ळ-वि. बडबड्या; बोलका; बोल- घेवडा; वटवट करणारा. 'वाचाट हा चाट वदोन राहे ।' -सारुह ८.१५. (वाप्र.) ॰दत्त-वि. १ वाग्दत्त; वाणीनें दिलेलें; वाङ्- निश्चित. २ वचनानें दिलेलें; कबूल केलेलें. ॰बरळ-वि. बड- बड्या; बरळणारा. 'गुरूतें वाचाबरळ ।' -विपू २.६. ॰रंभण- न. परिस्फुटता; स्पष्टपणें वाचेनें निदर्शन; बोलण्यांत रूढी. 'राष्ट्रीय शिक्षणाच्या कल्पनेला वाचारंभण किंवा नामधेय अजून मिळालें नव्हतें ।' -टिळकचरित्र १. ॰विदळ-वि. (बो.) वाचाट; वात्रट; अद्वातद्वा बोलणारा. वाचांश-पु. १ (चुकीनें वाच्यांश). शब्द; चकार शब्द; उच्चार (क्रि॰ काढणें; करणें). २ उल्लेख; बोलणें; चर्चा. (क्रि॰ काढणें; निघणें). ३ परिस्फोट; लावालावी. (क्रि॰ करणें). ४ वचन; करार. (क्रि॰ करणें). वाचाशक्ति- स्त्री. १ वक्तृत्त्व; व्याख्यानसामर्थ्य; बोलण्याचें चातुर्य. २ (रूढ) वाचण्यांतील कौशल्य; स्पष्टपणा; वाचनशक्ति. ३ वाचाळपणा. 'तुम्ही अमळसें तोंड आपटून धरीत जा. भारी वाचाशक्ति करूं नका.' -शास्त्रीको. ॰सिद्धि-स्त्री. बोललेलें खरें होण्याचें सामर्थ्य; अमोघवाणी. वाचाळ-वाचाट पहा. 'तुका म्हणे वाचा वाचां- ळतें ।' -तुगा ७०. वाचाळता-स्त्री. बडबड. 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ।' -राम १६५. वाचाळ पंचविशी- स्त्री. बडबड. (क्रि॰ लावणें). 'तिची वाचाळ पंचविशी आतां सारखी चालू झाली ।' -गणपतराव. ॰पंचांग-न. चऱ्हाट; बड- बड; वटवट. ॰वाणा-णी-वि. बोलका; बडबड्या. -क्रिवि. चावटपणें; वाचाटपणें. वाचाळी-स्त्री. बडबड. 'एक म्हणती साडी वाचाळी ।' -दा ८.१०.१९; -ज्ञा १८.१७०९. वाचिक- न. वृत्त; बातमी; हकीकत; वर्तमान. -वि. वाणीसंबंधीं; बोलण्यानें, शब्दानें घडलेलें. ॰कर्म-१ वाणीनें केलेलें काम. (विशेषतः पातक, खोटें, कडू बोलणें वगैरे). ॰प्रतिकार-पु. तोंडानें केलेला विरोध; शाब्दिक विरोध. 'त्यांचा वाचिक प्रतिकारहि आम्हाला करवत नाहीं ।' -केले २.५०३.

दाते शब्दकोश

वाई

क्रिवि. वाया; व्यर्थ; निरर्थक. -तुगा. [सं. व्यय]

दाते शब्दकोश

वांझ

स्त्री. १ वंध्या; निपुत्रिक स्त्री. 'शल्या तैसी नवांझ वेणेची ।' -मोकर्ण २७१४. -ज्ञा १२.१३५. २ निपुत्रिक, संतानाक्षम पुरुष. ३ निष्फल उद्योग; बेफायदा धंदा. -वि. निष्फल; निरर्थक; फोल. 'कोरडेचि बोल फोस वांझ ।' -तुगा १०८३. [सं. वंघ्या; प्रा. वंज्झा; पं. वंझा; सिं. वांझ; हिं. बांझ; गु. बांझणी; बं. बाझा; का. बांझि] ॰खडा-पु. गर्भधारणा न व्हावी म्हणून घ्यावयाचें औषध. ॰ट-टोळी-स्त्री. वंध्या; वंध्येस उपहासात्मक शब्द. (गो.) वांझडो-टो. -वि. व्यर्थ. 'तैसें दृश्य कां द्रष्टा या दोन्ही दशा वांझटा ।' -अमृ ७.२४४. ॰तिथी- तीथ-स्त्री. ज्या दिवशीं कोणतेंहि कर्म, विधि विहित नसतो असा दिवस. वांझा-वि. वांझ पहा. १ ज्या फुलापासून फल उत्पन्न होत नाहीं असें. २ गरे नसलेला (फणस); दाणे नसलेली (शेंग, कणीस वगैरे). ३ ज्यास फुलें येतात पण फळें येत नाहींत असा (वृक्ष-पोपया, बकुल वगैरे). ४ निष्फळ; बेकायदा; निर- र्थक (धंदा, श्रम, काम, हंगामा). ५ ज्या दिवशीं व्यवहार झाला नाहीं. जमाखर्च नाहीं असा (दिवस). वांझीतिथी-तीथ- वांझतिथी पहा. वांझी पुनव-पूर्णिमा-स्त्री. पौषशुद्ध पौर्णिमा. या दिवशीं अनेक मुलें असलेल्या स्त्रीस सुवासिनी म्हणून बोला- वितात. वांझें-वि. निष्फळ; व्यर्थ. -ज्ञा १८.११९. वांझेढक- ग-पुअव. बिनपाण्याचे. पाऊस न आणणारे मेघ, ढग. वांझो- वि. (गो.) वांझा. वांझोटा-टी-डा-ळा-वि. (उप.) वांझ; निपुत्रिक. 'जैसी एकचिवये वांझोटी ।' -ज्ञा ६.१२१ वांझोलें- ळ-ळें-वांझौळ-ळें-न. वांझ फूल. 'म्हणोनि वांझोळें व लगती देखा ।' -ज्ञा १०.३३३. -वि. व्यर्थ; निष्फळ. 'ये दोन्हीहि वांझौलें । दोन्ही जालीं ।' -अमृ ८.१७.

दाते शब्दकोश

वांझोटें

न. निष्फल; निरर्थक. 'यालाच वांझोटें जिणें म्हणतात.' -आई. [वांझ]

दाते शब्दकोश

वात्रट-ड

वि. वातट-ड पहा. १ चिवट; लोचट. २ (ल.) निरर्थक; पाचकळ. 'माझें बोलणें वात्रट । याचा मानूं नको वीट ।' -मध्व ६६३.

दाते शब्दकोश

वाउ(ऊ)गा

वि. व्यर्थ; निरर्थक; रिकामा; मिथ्या. 'किर्ती जल्पेसी वाउगें । ' -शिशु १०७२. -ज्ञा १५.२३८. [सं. वि + अय्]

दाते शब्दकोश

वाउर-ळ

वि. व्यर्थ; वावगें; निरर्थक. ' कियिसया ते असुर । संपत्ति पोषित वाउर । ' -ज्ञा १६.४२२. ' ऐसी तूं महा पुंश्चली । आतां काय स्फुंदसी वाउळी । ' -कथा ३.१६.५२. [वाउगा]

दाते शब्दकोश

वचवच

स्त्री. बडबड. (क्रि॰ करणें). वचवच-वचां- क्रिवि. १ विसकटून, चिवडून, विसकारुन इ॰ रीतीनें (डुकराप्रमाणें किंवा अडाणी रीतीनें अन्न खाणें). २ निरर्थक व मूर्खपणानें (बोलणें, करणें). [ध्व. वच !] वचवच्या-वि. वटवट, वचवच करणारा; बडबड्या.

दाते शब्दकोश

व्यर्थ

वि. निरर्थक; निष्फल; फुकट. 'रे धर्मा व्यर्थ तुझें झालें सद्धामिंक...।' -मोभीष्म १.२४. -क्रिवि. वृथा. [सं.]

दाते शब्दकोश

शुष्क

वि. १ कोरडें; वाळलेलें; सुकलेलें. 'शुष्क काष्टीं गुरगुरी । लाज हरि न धरितां ।' -तुगा ३७५३. २ (ल.) रोड (शरीर); कृश. [सं. शुष्] ॰अन्न-न. कोरान्न; कोरडें अन्न; शिधा; धान्य. 'तयेसि म्हणे बाहुक । आम्ही करूं स्वयंपाक । शुष्क अन्न देइंजे सम्यक । आम्हालागी ।' -कथा १. १०.१३५. ॰ऊर्ध्वपात-न. (शाप) कोरड्या पदार्थांस उष्णता देऊन केलेलें ऊर्ध्वपातन. (इं.) ड्राय डिस्टिलेशन-सेपूं २.६९. ॰काष्ठ-न. चुकीनें शुक्ल काष्ठ पहा. ॰कूप-पु. कोरडी विहीर. ॰वाद-पु. रिकामा, निष्फळ वाद, चर्चा; कोरडा वाद. 'शुष्क- वाद वृथा गोष्टी । त्यांतही वाग्वाद उठी ।' -एभा १८.२०९. ॰वैर-न. १ अकारण शत्रुत्व; अहेतुक वाकडेपणा. २ निष्फळ, बेफायदा शत्रुत्व, भांडण. ३ शत्रुत्वाचा आविर्भाव; दिखाऊ भांडण. शुष्काशुष्की-क्रिवि. रिकामपणीं; निष्फळ; बेफायदा; निरु- पयोगी (श्रम करणें, काम करणें, यातायात करणें, परिश्रम घेणें). शुष्केष्टि-स्त्री. अभ्यासाकरितां, शिकण्याकरितां, प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरितां, करावयाच्या संस्कार, विधि अथवा प्रयोगाची तालीम, मांडणी; पूर्व प्रयत्न. [सं. शुष्क + इष्टि] शुष्कोपचार-पु. अव. १ कोरडे, निष्फळ, व्यर्थ उपाय, योजना; बेफायदा तपतूद. २ (ल.) निरर्थक, पोकळ, प्रतिकार, आश्वासन, शुभेच्छाप्रदर्शन शुभचिंतन.

दाते शब्दकोश

भणभण

स्त्री. १ गुणगुण आवाज (माशांचा इ॰). २ ओसाडी; भयाणपणा (जागेचा). ३ सोसाट्याचा वारा; अशा वाऱ्याचा आवाज. -वि. ओसांड. भणभण-भणां-क्रिवि. गुण- गुण आवाजाचें, वाऱ्याच्या सणसण आवाजाचें, अनुकरण. [ध्व.] (वाप्र.) भणभण करणें-अक्रि. १ शून्य, भयाण, ओसाड दिसणें (घर, निर्जन अरण्य, गांव). २ घो घो करणें (माशा इ॰). भणभण फिरणें-स्वैरपणें इतस्ततः हिंडणें; भटकणें. भण- भणणें-अक्रि. १ गुणगुणणें; घोंगावणें (मधमाशा, माशा इ॰ कांचा थवा). २ (ल.) दाणादाण होणें; दशदिशा पळ काढणें (सैन्य इ॰ नीं). ३ झणझपणें; सणसणणें (मार, रोग इ॰ कांमुळें कान इ॰). ४ वाजणें; गरजणें (वारा, तोफ). ५ डोक्यांत, कानांत भणभण असा आवाज होणें. भणभणविणें-सक्रि. १ मोठ्यानें गुणगुणणें, घोंगावणें, सणसणणें, वाजणें, गरजणें इ॰ क्रिया करा- वयास लावणें. २ (जोराच्या ठोशानें) झणझणण्यास, भिरभिरण्यास लावणें (कान इ॰). ३ कानशिल भणभणे असा पदार्थ चाख- विणें, डोक्यास चोळणें. भणभणाट-पु. १ गुणगुणाट; कानटाळ्या बसविणारें घोंगावणें. २ शून्यताः उदासपणा; भयाणपणा; ओसाड- पणा (रिकामें घर, गांव, अफाट अरण्य यांचा) भणभ(णी)णित- वि. रिकामेपणामुळें, ओसाडपणामुळें उदास, शून्य दिसणारा (ओसाड गांव, इमला इ॰). 'आश्रमांत पाहती येऊन । दिसे शून्य भणभणित । ' -रावि १६.९. भणभण्या-वि. निरर्थक हिंडणारा; भणभण फिरणारा. भणाट(ण)णें-अक्रि. मोठ्यानें गुणगुणणें, घोंगावणें, सणसणणें, वाजणें, गरजणें इ॰. भणाटा, भणाण-णा- पु. १ भणभणाट. २ पळापळ; पांगापांगा; दाणादाण. 'इतुक्या उपरी भणाणा फौजाचा झाला । ' -ऐपो ८८. ३ (विरू. भणाटा) पराकाष्ठेची घालमेल; अव्यवस्था (कामाची, धंद्याची). ४ नाश; ओसाडी. 'सात्यकि कुरुकटकांचा, पवन घनांचा तसा, करि भणाण । ' -मोद्रोण १५.२७. भणाण-क्रिवि. भणभण शब्द करून; घो घो आवाज करून. ' भणाण-माशा उडाल्या-बसल्या- जमल्या-दाटल्या इ॰.'

दाते शब्दकोश

घागर

स्त्री. (तांबें, पितळ, माती इ॰ काचें) पाणी ठेव- ण्याचें आंवळ गळयाचें भांडें; घड्या पेक्षां मोठ्या आकाराचें पाणी ठेवण्याचें भांडें; मोठी कळशी; घट. 'अमूप अमृत फल क्षीर घागरी । दध्योदनेसीं वायन करी ।' -भारा, बाल १२.२३. 'घागरीची तहान पण घोटानेंच भागवायाला हवी.' -जन्मरहस्य २४. १ (दारूकाम) एक दारूच झाड; खापराची घागर घेऊन तिच्या बुडाला जाळीदार भोंकें पाडून त्या प्रत्येक भोंकाच्या तोंडाशीं बाण ठेवतात. तोंडावर भुईनळा ठेवून नळा दाखवितात. वर झाड उडतें व सभोंवार तारे व बाण उडतात. [सं. गर्गरी; प्रा. गग्गरी; घग्घर; सिं. घाघरि] (वाप्र) घागर उदवणें-मद्दा लक्ष्मीच्या दिवशीं रात्रीं बायका शेगडीवर ऊद घालून वर घागर धरतात ती क्रिया -बदलापूर २१५. -री फुंकणें-आश्विन शुद्ध अष्टमीच्या रात्रीं महालक्ष्मीची स्थापना करून तिची पूजा करून तिच्या पुढें स्त्रिया घागरींत तोंडाचा फुंकर घालून घुमतात ती क्रिया. पालथ्या घागरीवर पाणी-(पालथ्या घागरीवर पाणी ओतल्यास तें तिच्या आंत न जातां वाहून जातें यावरून) निरू- पयोगो, निरर्थक उपदेश. जेथें उपदेश ठसत नाहीं तेथें प्रयोग. सामाशब्द-॰गडचासुभा-पु. पाणी भाण्याची नोकरी; पाण- क्याचें काम. ॰गडची सुभेदारी-स्त्री. पाणक्याची नोकरी. घागराळें-न. प्रवासांत खोगिराला घागर अडकविण्याकरितां काठ्यांची व दोर्‍यांची केलेली विशिष्ट रचना, चौकट. [घागर + आळा] घागर्‍याआंबा-पु. आंब्याची एक मोठी जात; घागरी एवढा आंबा. [घागरी + आंबा]

दाते शब्दकोश

भाजी

स्त्री. १ मुख्य अन्न खातानां, फळें, मुळें, पाला इ॰ शिजवून, मसाला घालून तोंडीं लावण्यासाठीं तयार केलेला पदार्थ; शाक. पालेभाजी व फळभाजी असे हिचे दोन प्रकार आहेत. २ शिजवून खाण्याच्या कामीं उपयोगांत आणतात तीं फळें, मुळें, कंद, पाला इ॰ ३ निसर्गानें मेलेल्या जनावराचें मांस. -शर. ४ विटीदांडूच्या खेळांतील एक पारिभाषिक शब्द. झक्कूपाणीच्या खेळांत आपल्या उजव्या हाताच्या मुठींत दांडू धरून मुठीवर दांडूस लागून इटी ठेवणें व मग ती थोडी वर उडवून तिच्यावर दांडू मारणें. ५ (ल.) चोळामोळा. म्ह॰ (व.) भाजीसारखें परतावें आणि जगासारखें वर्तावें. (कागद, पांघरूण इ॰ ची) ॰करणें-चोळामोळा करणें; अव्यवस्थित करणें. भाजीकाची- वि. (भाजी कच्ची!) कोणताहि मनुष्य, परिस्थिति, पदार्थ इ॰ विषयीं नेहमीं नाखुषी दर्शविणार्‍या इसमाबद्दल योजितात. नाव- डतीचें मीठ अळणी याप्रमाणें. ओली भाजी आणि वाळली भाजी-स्त्री. ताजी, हिरवी भाजी आणि सुकवून ठेविलेली भाजी. ॰दस्त-पु. बाजारांत विकावयास आणलेल्या भाजीवरील कर. ॰पाला-पु. १ शिजवून खाण्यास, तोंडी लावणें करण्यास योग्य अशीं फळें, कंद, पाला, मुळें इ॰ समुच्चयानें. 'दोचौं दिवसां मिळे तरण । भाजीपाला भक्षिती ।' २ निरर्थक, तथ्य नसलेली गोष्ट. 'त्याचें बोलणें भाजीपाला.' ॰भाकर-स्त्री. साधें, गरीबीचें अन्न (एखाद्यास जेवणाचें आमंत्रण देतांना घरच्या जेवणाबद्दल विनयानें योजितात).

दाते शब्दकोश

बोलणें

क्रि. १ शब्द उच्चारून मनोगत कळविणें. २ (पोप- टानें) कानीं पडलेलें किंवा शिकविलेले शब्द उच्चारणें. ३ (वाद्यानें) ध्वनि उत्पन्न करणें. ४ म्हणणें; नावें देणें. 'पोथीला संस्कृत भाषेंत पुस्तक बोलतात.' ५ रागें भरणें; रागावणें; दोष देणें; बोल लावणें. 'मी येथून गेलो तर साहेब मला बोलतील.' ६ व्याख्यान देणें; सांगणें; म्हणणें; कथन करणें. [सं. ब्रू ?; प्रा. बोल्ल; देश्य. बोहई] म्ह॰ बोलेल तो करील काय, गर्जे/?/ल तो पडेल काय ! बोलणे फिरविणें-बोलतां बोलतां आशय किंवा अर्थ बदलणें; बोलणें सारवणें. बोलून घेणें-दुसरा मनुष्य रागावेल असें वर्तन करणें; लोकांच्या रागास पात्र होणें. 'मी अद्याप कधी कोणाचें उणें उत्तर बोलून घेतलें नाहीं.' बोलण्यावर जाणें-(एखाद्याच्या) बोलण्यावर विश्वास ठेवणें. बोलण्यावरून बोलण येणें- वाढणें-एखादी गोष्ट बोलत असतां इतर गोष्टी सुचून अधिक बोलणें. विशिष्ट गोष्टीचा संदर्भ, उल्लेख यांमुळें बोलावें लागणें; वाद- विवाद होणें. उत्तर बोलणें; उत्तर करणें-उत्तर देणें; उत्तर द्यावयास लावणें. 'क्रोधें तुकयास बोले उत्तर । कैसें बुडविलें माझें घर ।' बोलून सुघड-भल-चांगला-मधुर-बोलणें, वर्तन इ॰ मध्यें चांगला; सरळ, गोडबोल्या. भाजीपाला बोलणें- निरर्थक बडबड करणें; भाषणांत अर्थ नसणें. बोलणेंचालणें-न. संभाषण; व्यवहार; दळणवळण; लोकांशीं वागण्याची तऱ्हा. बोलून- चालून-क्रिवि. १ लोकांशीं वागण्याच्या बाबतींत; व्यवहाराला अनुसरून. २ उघडउघड; स्पष्टपणें; धडधडीत; आडपडदा न ठेवतां; उघडपणें; सांगूनसवरून. 'लागले असतां बोलून चालून दोन रुपये मागून घ्यावे परंतु चोरून एक पैसाहि घेऊं नये.' ३ मुद्दाम. ४ सर्वथैव; कांहीं झालें तरी. बोलतखेवो-अ. बोलल्याबरोबर. 'ऐसें वाक्य जी बोलतखेवो । मागुता मनुष्य जाहला देवो ।' -ज्ञा ११.६४०. बोलता-वि. बोलणारा; सांगणारा. ॰म्ह मारत्याचा हात धरवेल, बोलत्याचें तोंड धरवत नाहीं. बोलती-स्त्री. वाणी. -शर. -वि. बोलावयाची. 'आतां बोलती ते नवाई । सांगिजेल ।' -ज्ञा १६.२९२

दाते शब्दकोश

कोल्हा-ल्हें

पुन. १ कुत्र्याच्या वर्गांतील प्राणी. हा भुर्‍या वर्णाचा व मऊ केसांचा असून रात्रीचा हिंडतो. याला द्राक्षें वगैरे फळें आवडतात. कर्कश ओरडणारा, फार धूर्त पण भित्रा. जंबूक; शुगाल. 'कीं कोल्हेया चांदणीं । आवडी उपेज ।' -ज्ञा ४.२३. २ (ल.) धूर्त माणूस, चोरटा माणूस. [दे. प्रा. कोल्हूअ] म्ह॰ १ अडलें कोल्हें मंगळ गाय = संकटांत सांपडलेला दुष्ट मनुष्यहि संक- टांत घालणाराची स्तुति करतो. तुल॰ अडला नारायण गाढवाचे पाय धरी. २ एक कोल्हं सतरा ठिकाणीं व्यालं. ३ कोल्हं काक- डीला राजी = ज्या वस्तूवर आपला मुळींच हक्क नाहीं ती आप- णांस अगदीं थोडी मिळाली तरी क्षुद्र माणूस खुष होतो. अल्प- संतोषी. (वाप्र.) कोल्हाकोल्हीचें लग्न-ऊन असतांना पाऊस पडूं लागला असता म्हणतात. कोल्ह्याचेंतोंड बघणें, -नागवें कोल्हें भेटणें-शुभ शकून घडणें, अकल्पित मोठा लाभ होणें. कोल्ह्याचें शिंग-(गो.) सशाचें शिंग. (ल.) अशक्य गोष्ट साध्य होणें; वशीकरणकला अवगत असणें. (पुढील समासांतील पहिलें पद 'कोल्हें' आहे ॰कुई-स्त्री. कोल्ह्यांची आरडाओरडा; हुकी. (ल.) क्षुद्र लोकांची निरर्थक विरुद्ध बडबड; क्षुद्र अडथळा. 'बाहेरच्या जगाला विसरून... जगाची कर्कश कोल्हेकुई कोण ऐकत बसणार ? ' -प्रेमसंन्यास ॰टेंकण-णें-न. (विशेषतः चतुर्थी विभक्तींत बसणें, किंवा येणें बरोबर उपयोग). कोल्हे टेकण्यास बसणें-कोल्ह्याप्रमाणें दबकून बसणें. कोल्हें टेक- ण्यास येणें-१ वयामुळें अशक्तता प्राप्त होणें. २ मावळण्यास येणें (सूर्य, दिवस). कोल्हा मागल्या पायावर बसला असतां जमिनीपासून जितक्या उंचीवर असतो तितक्या उंचीवर सूर्य मावळतांना क्षितीजापासून असला म्हणजे म्हणतात. ॰भूंक- भोकं-स्त्री. १ कोल्ह्याची हुकी, ओरडा; कोल्हेकुई. २ मोठी पहांट; प्रभात. [कोल्हें + भुंकणें] ॰शाही(ई)-स्त्री. लुच्चेगिरी. 'असला कोल्हेशाई प्रश्न कशला ?' -टि १.२६. ॰हूक-स्त्री. १ कोल्ह्याची हुकी; कोल्हेकुई. २ (ल.) मोठमोठ्यानें ओरडून हल्ला करणें.

दाते शब्दकोश

जग

न. १ स्थावरजंगमरूप अखिल सृष्टि; विश्व; पृथ्वी; दुनिया. २ ब्रह्मांड; माणसांचें वसतिस्थान; मनुष्यजात; लोक. [सं. जगत्] (वाप्र.) जगांतून उठणें- १ लोकाचाराविरुद्ध वागणें. २ (वैधव्यामुळें, आपत्तीमुळें) सर्वस्वी बुडणें. जगाबाहेरील- निराळी चाल-लोकविलक्षण चाल. जगामुलखानें सोड- लेला-जातीवेगळा टाकलेला; सार्‍या गांवाची ओवाळणी; सार्‍या दुनियेची खरवड. म्ह॰ आपण भला तर जग भलें आपण मेला जग बुडालें. सामाशब्द-॰गोळ-पु. (काव्य) पृथ्वीरूपी गोल. 'जैसा महाप्रलयीं जगगोळ । जाहाला उदकाभ्रें ब्रह्मगोळ ।' ॰चालक-वि. (काव्य) जगाचें भरणपोषण करणारा (ईश्वर). जगच्छेट-जगत्छेट पहा. जगजाहीर-वि. सर्व लोकांना माहित असलेला; प्रसिद्ध असलेला. ॰जीवन-न. जगज्जीवत पहा. ॰जुग-न. (महानु.) मोठी आपत्ति, जगावर आकाश कोसळणें. 'औचीतें जगजुग पडिले सनकादिकावरी । ॰जूट-पु. सुव्यवस्था. ॰जेठी-पु. (काव्य) १ जगामधील मोठा (ईश्वर). २ जगांतील बलवान पुरुष, मल्ल. 'आम्ही जगजेठी असतां ।' -एरुस्व ६.३५. -ज्जनक-पु. जग उत्पन्न करणारा. जगत्कारण पहा. -ज्जीवन-न. १ जगाचें जीवन; जीव सृष्टीचें जगण्याचें साधन (पाऊसपाणी, अन्न इ॰). २ सजीव प्राण्यांचें अस्तित्व -वि जगाचें धारण-पोषण करणारा (ईश्वर). ॰झंपू-वि. (महानु) जगाला झोडणारा. 'उधटेआं देवां जगझंपु ।' -शिशु १५४. ॰झोडी-स्त्री. बटीक; दासी. 'लाज धरीं भांडे । जगझोडी रांडे ।' -तुगा. २६०. ॰डंबर-न. १ अवडंबर; अवाढव्य पण निरर्थक थाटमाट, धामधूम, आव (विद्या, पैसा यांचा). (क्रि॰ घालणें). २ अफाट जगास आश्चर्यानें म्हणतात; विश्वविस्तार; एखादी अवाढव्य, विस्तीर्ण वस्तु. 'तो हा जगडंबरु ।' -ज्ञा. १५.४७. [सं. जगत् + अंबर] -ड्वाळ-ड्व्याळ-वि. प्रचंड; अवाढव्य (इमारत, शरीर, अरण्य); प्रमाणरहित, बोजड (पदार्थ). [सं. जगत् + व्याल] ॰ढाल-ढाळ-पु. ध्वज; झेंडा. [सं. जगत् + ढाल] जगत्-न. जग अर्थ १, २, पहा. जगती-स्त्री. १ जग अर्थ १, २ पहा. 'किं पळता सरली अवघी जगती ।' २ (महानु.) मठ. 'पूर्वाभिमुखजगती असे ।' -ऋ १०६. जगती- तल-न. पृथ्वीतल; पृथ्वीचा पृष्ठभाग. जगत्कर्ता-पु. ब्रह्मदेवाचें एक नांव. जगज्जनक पाहा. -त्कारण-न. जगाला उत्पन्न करणारी शक्ति; हा शब्द निरनिराळे पंथ, ईश्वर, माया, प्रधान, पर- माणु, या निरनिराळ्या शब्दांना लावतात. जगतत्रय-न. स्वर्ग, मृत्यु, पाताळ. जगत्पति-प्रभु-पु. जगाचा धनी, नियंता, ईश्वर किंवा राजा. जगत्पालक-पाळक-वि. जगाचें पालन करणारा. जगत्प्रसिद्ध-वि. जगजाहीर पहा. जगत्प्राण-पु. हवा; वायु. जगद्वंधु-पु. विश्वबंधु; सर्व सृष्टीवर प्रेम करणारा. जगत्शेट-पु. १ फार श्रीमंत. २ (ल.) निर्धन पुरुष. जगत्शेटीचा-नातू- वि. निर्धन मनुष्य. जगत्स्त्रष्टा जगज्जनक पहा. जगत्स्वामी- पु. जगाचा धनी. जगत्क्षय-जगाचा नाश. जगदंत-पु. जगाचा नाश शेवट, अखेर. [जगत् + अंत] ॰दंबा-दंबिका-स्त्री. पार्वती; देवी; जगाची माता. 'विन्मुख जाहली जगदंबा ।' -एरुस्व ५.७३. [जगत् + अंबा] ॰दळ-दाळ-वि. १ जगाला भरडणारा. 'दापीतेआं देवांचा जगदळा ।' -शिशु १५५. २ (बायकी) जगाशीं भांडणारा. ॰दात्मा-जगदीश-दीश्वर-पु. ईश्वर; ब्रह्म. [जगत् + आत्मा, ईश, ईश्वर] ॰दाभास-पु. विश्वसादृश्य; जडरूप माया; बाह्य सृष्टि. [जगत् + आभास] ॰दुद्धार-पु. १ जगाचा उद्धार, मुक्ति. २-वि. जगाचा उद्धार करणारा. [जगत् + उद्धार] -द्गुरु-पु. १ ईश्वर. २ श्रीशंकराचार्यांची पदवी. ३ थिऑसफी पंथांतील गुरुस्थानी मानलेली श्रेष्ठ विभूति. -द्भूषण-न. जगाचा अलंकार; ईश्वर. -द्वंद्य-वि. सर्व जगास पूज्य. -द्विनाश- जगत्क्षय पहा. -द्विलक्षण-वि. १ सर्व जगाहून निराळा; विलक्षण. २ वाह्यात; चमत्कारिक; तर्‍हेवाईक. जगधाम-जग- न्निवास-वि. (काव्य.) सगळें जग व्यापून राहणारा; परमेश्वर; सर्व जग हें ज्याचें घर आहे असा. ॰नाड-स्त्री. जगदळ-दाळ पहा. ॰न्नाथ-पु. १ जगाचा स्वामी. २ पुरी येथील श्रीविष्णूची मूर्ति. ॰म्ह आपला हात अन् जगन्नाथ = स्वतःस पूर्ण स्वातंत्र्य असणें. [जगत् + नाथ] ॰न्नायक-पु. जगाचा स्वामी, पालनकर्ता; ईश्वर. [जगत् + नायक] ॰न्निंद्य-वि. सर्व जग ज्याची निंदा करतें असा. ॰न्नियंता-वि. जगाच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणारा. -न्मंगल-वि. जगाचें कल्याण करणारा. 'माळा हे कमळा विचारुनि गळा घाली जगन्मंगला ।' -न्माता-स्त्री. १ जगाची आई; जगदंबा. २ (ल.) मातृतुल्य स्त्री. -न्मित्न-पु. जगत्बंधु पहा. आवडतें मूल, सुस्वभावी माणूस. -न्मोहना-स्त्री. जगाला भुलविणारी स्त्री. ॰प्रसिद्ध-जगजाहीर पहा. ॰बोळ-पु. १ (महानु.) जगाला पारखा होणें. 'त्यागा जगबोळ जाहाला ।' -भाए ९१. २ कडू कातबोळ. 'नारदा होतुसें जगबोळाचें मानू ।' -भाए ६३. ॰भांड-वि. जगदळ पहा. ॰मित्र-मैत्र-वि. सर्व जगाशीं मैत्री करणारा. ॰लीला-स्त्री. १ जगाची रीत; सर्वसामान्य लोकांची वागणूक, पद्धति, समजूत वगैरे. 'जगलीला अशीच, बर्‍याला वाईट वाईटाला बरें म्हणावें.' २ आधिभौतिक मोह, माया; खोट्या जगाचा खर्‍या जगाप्रमाणें भास.

दाते शब्दकोश

गोष्ट

स्त्री. १ कथा; दंतकथा; आख्यान. २ (व्यापक) वाक्य; शब्द; पद; उच्चार; चकार; उल्लेख. 'तुम्हीं येथें गोष्टी बोलूं नका.' ३ कृत्य; काम; प्रकरण; बाब; व्यवहार. 'मज- पासून अशी गोष्ट घडणार नाहीं.' ४ वृत्त; वृत्तांत, घडलेला प्रसंग; घटना. ५ स्थिति; अवस्था; प्रकार. 'श्रीमंत लोक कितीही खर्च करोत त्यांची गोष्टच निराळी.' ६ (पुराव्याचा कायदा) ज्याचें ज्ञान इंद्रियांच्या योगानें होतें अशी कोणतीहि वस्तु किंवा वस्तूंची स्थिति अथवा संबंध; मनुष्याच्या मनाची कोणतीहि स्थिति. (इं.) फॅक्ट. [सं. गोष्ठी्]?(वाप्र.) एक्या गोष्टींत-एकदम; झटक्यास; सपाट्यास; चटकन. ॰काढणें- खोड काढणें. गोष्टी खापलणें-क्रि. (व.) गप्पा छाटणें. म्ह॰ (व.) गोष्टीचा खाप विसरला मायबाप. ॰फोडणें-गुप्त प्रगट करणें, जाहीर करणें. गोष्टी सांगणें-१ बोलणें; संभाषण करणें; गप्पा छाटणें; वार्ता करणें. 'ठाव्या आहेत मला, सांगा यथेष्ठ गोष्टी अन्या या ।' मोउद्योग १३.३७. २ (खा.) सबबी सांगणें; बयादी लावणें. सामाशब्द- गोष्टम-वि. (व. ना.) गप्पीदास; गोष्टीवेल्हाळ; बाताड्या. ॰मात-स्त्री. गोष्ट अर्थ १ पहा. 'एखादी गोष्टमात सांग म्हणजे वाट करमेल.' ॰श्राद्ध-न. १ अडचणीमुळें सर्वोपचारयुक्त श्राद्ध करण्यास सवड नसेल तेव्हां अनुकल्पानें केवळ शब्दांनीं केलेलें श्राद्ध. २ (ल.) निवळ गप्पा- ष्टक, बडबड; निरर्थक गोष्टी. गोष्टिप्रिय-लंपट-वेल्हाळ--वि. १ गोष्टी ऐकण्याचा किंवा सांगण्याचा शोक असलेला; कथा- प्रिय. २ गप्पागोष्टींनी परिपूर्ण. गोष्टिबा(मा)ता(था)-स्त्रीअव. गप्पाष्टकें; व्यर्थ संभाषण; निव्वळ गोष्टी व कथा. [सं.]

दाते शब्दकोश

रांड

स्त्री. १ (निंदार्थी) विधवा. २ दासी; कलावंतीण; वेश्या. ३ (तिरस्कार, राग किंवा अनाथ स्थिति दाखवावयाची असतां) स्त्रीजात; बायको. 'तुझी रांड रंडकी झाली.' -नामना १२. ४ (निरुद्योगीपणा, नवरा मेलेल्या स्त्रीच्या स्थिती- प्रमाणें) बिघडलेली, अतिशय खलावलेली स्थिति; दुर्दशा. 'यंदा शोतों चांगलीं आलीं होती पण आंत पाणी शिरून अवधी रांड झाली.' ५ (निंदेनें) भित्रा, नीच, नामर्द मनुष्य; युद्धांतून पळून जाणारा सौनिक. 'म्यां न वधावें पळतां चाला मारूनि काय रांडा या ।' -मोकर्ण ३५.६०.[सं. रंडा] म्ह॰ रांडेच्या लग्नाला छत्तीस विघ्नें. (वाप्र.) रांडेवा-वि. १ बेकायदेशीर संबंधापासून झालेला. २ (ग्राम्य.) पादपूरणार्थक किंवा उद्गारवाचक शब्द. ३ एक ग्राम्य शिवी. रांडेचा, रांडचा मारलेला-वि. स्त्रीवश; स्त्रीलंपट रांडे(डि)च्यानो-उद्गा॰ (बायकी) रखेली पासून झालेल्या मुलांना उद्देशून बोललेल्या शब्दावरून पुष्कळदा आश्वर्य व्यक्त करण्याकरितां पण क्वचित् निर्थकपणें निघणारा उद्गार. रांडवोचून पाणी पीत नाहीं-आपल्या बायकोला एखादा कठोर शब्द बोलल्यावांचून तो पाण्याचा थेंब सुद्धां पीत नाहीं (सतत शिव्या देणार्‍या नवर्‍यासंबंधीं म्हणतात). रांडेहून रांड- वि. बुळा; अतिशय बायक्या (मनुष्य). सामाशब्द- ॰अंमल-पु. १ स्त्रीराज्य. २ नेभळा, अयशस्वी कारभार. ॰काम-न. १ बायकोचें काम; गृहकृत्य. २ विधवेचें काम; बाहेरील आडकाम किंवा रानांतील गवत कापणें व सर्पण गोळा करणें इ॰ काम. ॰कार- भार-पु. १ बायकी कारभार. २ स्त्रियांचा कारभार; स्त्रियांचीं कृत्यें. ३ (निंदेनें) भिकार, मूर्खपणाचीं कृत्यें; दुबळीं कृत्यें. ॰खळी-वि. (गो.) विधवा झालेली. खांड-स्त्री. स्त्रियांस लाववयाचा रांड, बाजारबसवी, बटीक इ॰ अर्थाचा अभद्र शब्द, शिवी. 'मी त्याची कांहीं गोष्ट बोलिलें नसतां उगीच मेला मला रांडखांड म्हणतो.' [रांड द्धि.] ॰गळा-पु. १ टिपेचा सूर; तृतीय सवन. २ बायकी आवाज. [रांड] ॰गांठ-स्त्री. विशिष्ट आका- राची गांठ; ढिली गांठ. बाईलगांठ पहा. याच्या उलट पुरुषगांठ. ॰गाणें-गार्‍हाणें-न. पिरपिर; बायकी कुरकूर; बायकी विनंति; रडगाणें. (क्रि॰ गाणे; सांगणें). रांडगो-पु. (गो.) वेश्येचा मुलगा, किंवा विधवेस अनीतीच्या मार्गानें झालेला मुलगा. ॰चाल-स्त्री. भित्रेपणा; नामर्दपणा; बायकीपणा. ॰छंद-पु. रंडीबाजीचा नाद; रांडेचें व्यसन. ॰छंदी-वि. रंडीबाजीची संवय लागलेला; रांडगा. ॰तगादा-पु. (कुण.) (सार्‍याच्या किंवा कर्जाच्या) पैशाची (पिठ्या शिपायानें नव्हे) कुळाकडे सौम्य रीतीनें केलेली मागणी. ह्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यास आपणास मुखत्यारी आहे असें कुणबी मानतो. बडग्याच्या विनंतीशिवाय दुसर्‍या कोणत्याहि विनंतीस दाद न देण्याबद्दल हा वर्ग कित्येक पिढ्या प्रसिद्ध आहे. कुणबी पहा. ॰पण-न. १ (कों.) वैधव्य. २ नाश; नादानपणा. 'कां घेतां रांडपण ठरून भाऊ नाना ।' -ऐपो ११६. ॰पाटा-पु. वैधव्य. (क्रि॰ भोगणें; येणें; मिळणें; प्राप्त होणें; कपाळीं येणें). [रांड + पट्ट] ॰पिसा-वि. रांडवेडा; अतिशय रांडछंदी; रंडीबाज; बाईलवेडा; स्त्रैण. ॰पिसें-न. रांड- वेड; रांडेचा नाद. ॰पोर-न. १ (व्यापक) बायकामुलांसह एखाद्या ठिकाणचे सर्व रहिवासी; गांवांतल्या बायकोपारांसुद्धां सर्व लोक. 'आज कथेला झाडून रांडपोर आलें होतें.' २ एखा- द्याच्या पदरीं असलेलें. बायको, मुलें इ॰ कुटुंब, खटलें. ३ रंडकीचें मूल. ४ दासीपुत्र; वेश्यासुत. [रांड + पोर] रांडपोर- कीं राजपोर-रंडकीचा मुलगा किंवा राजाचा मुलगा हे दोघेहि- अनियंत्रित व अशिक्षित असतात; दोघेहि बेबंद व निर्धास्त असतात. ॰पोरें-नअव. घर, गांव, देश यांतील मुख्य कर्त्या पुरुषाहून इतर बायका, मुलें इ॰ सर्व माणसें. ॰बाज-वि. रंडीबाज; बाहेरख्याली. [हिं.] ॰बाजी-स्त्री. बाहेख्याली- पणा; रंडीबाजी. [हिं.] ॰बायल-स्त्री. (गो.) विधवा स्त्री. ॰बेटा-पु. रांडलेक. 'तुका म्हणे कोरान्न रांड । बेटा भांड मागेना कां ।' -तुगा २९८३. ॰बोडकी-स्त्री. विधवा स्त्री. 'त्या रांडबोडकीनें लन्न जुळलन् ।' -मोर ११. ॰भांड-स्त्री. (निंदार्थीं) रंडकी; बाजारबसवी; बटीक. [रांड द्वि.] ॰भांडण- न. १ बायकांचें भांडण. २ (ल.) बिन फायदेशीर, निरर्थक गोष्ट. ॰भाषण-न. बायकी, नामर्द, दीनवाणें भाषण. ॰मस्ती- स्त्री. १ पतिमरणानंतर विधवेस येणारा लठ्ठपणा व जोम. २ (ल.) नियंता न हींसा झाल्याबरोबर एखाद्या माणसास येणारी टवटवी; चपळाई, धिटाई. ॰माणूस-न. १ (दुर्बलत्व दाखवावचें असतां) स्त्री; स्त्रीजाति; स्त्रीमात्र. २ (तिरस्कारार्थीं) बुळा, निर्जीव, बायक्या मनुष्य; भित्रा मनुष्य. [रांड + माणूस] ॰मामी- स्त्री. (करुणेनें) विधवा स्त्री. ॰मांस-न. (निदार्थीं) पतीच्या मृत्यू- नंतर विधवा स्त्रियांस एकटें राहतां आल्यामुळें व मोकळेपणा मिळाल्यामुळें कधीं कधीं येणारा लठ्ठपणा. (क्रि॰. चढणें; येणें). [रांड + मांस] ॰मुंड-स्त्री. १ केशवपन केलेली, अनाथ न अनु- कंप्य अशी विधवा. २ (शिवी) रांड; बोडकी; अकेशा थेरडी; विधवा. [रांड + मुंड] ॰रळी-स्त्री. विधवा किंवा विधवेसा- रखी; (व्यापक.) विधवा. 'रांडरळी म्हणती हा मेला बरें झालें' [रांड + रळी] ॰रागोळी-स्त्री. (व्यपक.) रंडीबाजी व बदफैली. [रांडद्वि.] ॰रांडोळी-स्त्री. १ विधवा किंवा तिच्या सारखी स्त्री. रांडरळी पहा. २ शिंदळकी. ३ बायकांशीं संगत ठेवणें; रंडीबाजी. ॰रूं-न. विधवा स्त्री. ॰रोट-रोटा-पु. आपल्या मरणानंतर बायको विधवा होईल यासाठीं लग्नाच्या वेळीं नवर्‍यानें तिच्या तर्तुदीकरितां दिलेलें वेतन; बाइलवांटा; रांडरोट्याची चाल मुख्यत्वें गुजराथेंत आहे. [हिं.] ॰रोटी-स्त्री. लढाईंत पडलेल्या किंवा सरकारकामी आलेल्या माणसाच्या बायकोस निर्वाहाकरितां दिलेली जमीन इ॰. [हिं.] ॰लें(ल्यों)क-पुन. १ रंडापुत्र; विधवेचा मुलगा; एक शिवी. 'काय केलें रांडलेंका । तुला राजी नाहीं तुका ।' २ (व.) मेलें या शब्दाप्रमाणें वाक्याच्या आरंभीं किंवा मध्यें निरर्थक योजतात. 'आम्हास नाहीं रांडलेक असं येत !' ॰वडा-पु. सर्व बायकामाणसें; घरांत सत्ताधारी पुरुष नसल्यामुळें होणारें स्त्रियांचें प्राधान्य. २ बाजारबसवी, रांड, बटीक इ॰ शब्दप्रचुर शिच्या; शिवीगाळ; गालिप्रदान. (क्रि॰ गाणें; गाजविणें; ऊठविणें) 'किती रांडवडे । घालुनि व्हालरे बापुडे ।' -तुगार २ ७४६. [रांड + वाडा] ॰वळा-पु. स्त्रियांच्या कडाक्याच्या भांडणांतील शिवी; रंडकी; रांड, भटकी, बाजारबसवी इ॰ शिव्यांची माळता. (क्रि॰ गाणें; वाजवणें). [रांड + आवलि] ॰वांटा-पु. वैधव्य. ॰वांटा कपाळीं येणें-विधवा होणें. ॰वाडा-पु. कुंटणखाना; वेश्यांची आळी. ॰व्यसन-न. रांडेचा नाद, छंद. ॰व्यसनी-वि. रांडबाज. ॰सांड-स्त्री. विधवा. [रांड + सांडणें किंवा रांड द्वि.] ॰सांध-स्त्री. विधवेचा कोपरा. [रांड + संधि] ॰सांधीस बसणें-घरांत उदास होऊन बसणें (रागानें एखा- द्यास म्हणतात). रांडक-वि. (कों.) विधवा झालेली. 'सडा मफलीस व रांडक बायको व भिकारी बैरागी हे निमदस्ती.' [रांड] रांडका-पु. विधुर; ज्याची बायको मेली आहे असा पुरुष. [रांड] रांडकी-स्त्री. विधवा. (तिरस्कार दया दाखवितांना). [रांड] रांडगा-वि. (राजा. तंजा.) रंडीबाज. २ -पु. (बे.) महार जातीचा बलुतेदार. याला वतन इनाम जमीन असते. याचा हक्क कर्णाटकांतील लक्ष्मीच्या जत्रेंत रेडा मारण्याचा असतो. हल्लीं ह्या शब्दास अपभ्रष्टता येऊन तो शिवीदाखल योजिला जातो. रांडरूं-न. (तिरस्कारानें) विधवा स्त्री. [रांड] रांडव-वि. १ रंडकी झालेली; विधवा (स्त्री). २ बायकोच्या मरणानें उघडा झालेला; मृतपत्नीक; विधुर. [रांड] रांडवणें-अक्रि. विधवा होणें; रांडावणें पहा. [रांड] रांडवा-स्त्री. विधवा स्त्री. 'रांडवा केलें काजळ कुंकूं ।' -एभा ११.९६६. रांडा पोरों-नअव. १ कुटुंबांतील कनिष्ठ दर्जाचीं माणसें (बायका, मुलें व कुणबिणी). २ समाजांतील हलक्या दर्जाचे लोक. ॰रोटा-पु. विधवांनीं करा- वयाचें सामान्य आडकाम. (दळण, कांडण, मोल मजुरी इ॰). रांडाव-वि. (गो.) विधवा. रांडावणें-अक्रि. १ विधवा- पणाच्या केविलवाण्या स्थितीस प्राप्त होणें. २ (ल.) फिसकटणें; मोडावणें; नासणें; बिघडणें; भंग पावणें (व्यापार, मसलत, काम) (विशेषत: या लाक्षणिक अर्थानेंच हा शब्द योजतात). 'त्याणीं मागें संसार चांगला थाटला होता पण थोरला भाऊ मेल्यापासून रांडावला.' [रांड] रांडावा-स्त्री. (माण.) बालविधवा; बाल- रांड. रांडरांड-स्त्री. १ रंडक्यांतली रंडकी; अतिशय अनाथ व असहाय रंडकी. २ (ल.) नामर्द, बुळा, अपात्र, नालायक, मनुष्य. ३ पराकाष्ठेचा अनाथ किंवा निराधार मनुष्य. रांडुल-स्त्री. (गो.) (अनीतीच्या मार्गानें) विधवेस झालेला मुलगी. रांडूल- स्त्री. (कों.) विधवा स्त्रीला उपहासानें म्हणतात. रांडे-उद्गा. एक शिवी. 'भांडे तृष्णेसीं द्विज भारार्त, म्हणे यथेष्ट घे रांडे !' -मोअश्व ६.७५. [रांड, संबोधन] रांडचा-वि. रांडलेक. -उद्गा. आश्वर्यवाचक उद्गार. 'अग रांडेचें ! पांच वर्षांचें पोर पहा किंग कशी पोथी वाचतो.' रांडेचा आजार-पु. गर्मी. रांडेच्या- उद्गा. (प्रेमळ) एक शिवी. 'आहा रांडेच्या !...' -देप ६२. रांडोळी-स्त्री. १ (करुणेनें, तिरस्कारानें) विधवा स्त्री. २ विधवे- प्रमाणें वागवणूक. ३ कुचाळी, थट्टा. 'करितां गोपिकांसी रांडोळी ।' -एभा ६.३६५. ४ मारामारी; कत्तल. 'निकरा जाईल रांडोळी ।' -एरुस्व ६.९. ५ क्रीडा. ६ नाश. 'कीं भीष्मदेवें चरणातळीं ।' केली कामाची रांडोळी ।' -जै २४.७ [रांड] रांड्या, रांड्या राऊजी, रांड्या राघोजी-वि. १ रंडीबाज; रांडव्यसनी; रांडछंदी. २ बायक्या; बाइल्या; नामर्द. ३ बाईलवेडा. ४ रांड्याराघोबा, रांड्यारावजी, बायकांत बसून किंवा त्यांजबरो- बर फिरून गप्पा मारण्यांत आनंद मानणारा (मनुष्य); गप्पीदास; चुलमावसा. म्ह॰ रांड्या रावजी आणि बोडक्या भावजी. [रांड] रांढरुं, रांढूं-न. (तिरस्कारार्थीं) विधवा स्त्री. रांडरू पहा. [रांड]

दाते शब्दकोश

घोडा      

पु.       १. खूर असलेला एक चतुष्पाद प्राणी. याचा उपयोग ओझे वाहण्याच्या, गाडी ओढण्याच्या व बसण्याच्या कामी करतात. याच्या अनेक जाती आहेत. लहान घोड्याला तट्टू म्हणतात व घोड्याच्या पिलाला शिंगरू म्हणतात. २. (उप.) मूर्ख व ठेंब्या असा वयस्क मुलगा; वयाने मोठा पण पोरकट मनुष्य. ३. (ल.) शरीर वाहून नेतात म्हणून पायांना (दहाबोटी) घोडा असे म्हणतात. ४. (ल.) घोडेस्वार : ‘तीन हजार घोडा पेशव्यांचे तैनातींत ठेवा.’ – विवि ८·७·१२९. [सं. घोटक] (वा.) घोडा आडवा घालणे – (एखाद्या कार्यात) अडथळा, विघ्न आणणे : ‘आणि म्हणूनच तुम्ही घोडा आडवा घातलांत वाटतं?’ – चंद्रग्र ६८. घोडा उभा करणे, बांधणे – (घोडा) थोडा वेळ थांबवणे; जरासे थांबणे; घाई न करणे (घाईत व धांदलीत असणाऱ्या मनुष्याला उद्देशून या वाक्प्रचाराचा उपयोग करतात.). घोडा काढणे, फेकणे – १. बांधून ठेवलेला घोडा बाहेर काढणे, हाकारणे, जोराने पिटाळणे. २. (एखाद्याने) पळ काढणे, पोबारा करणे, निसटणे. घोडा चालविणे – डोके खाजवणे; युक्ती लढविणे. (कर.) घोडा टाकणे – घोडा फेकणे, उडवणे, अंगावर घालणे : ‘आरेरे टाकौनि घोडा । भणती यांचिआं जटैं उपडा ।’ – शिव १४१. घोडा मैदान जवळ असणे – (घोडा धावण्यात कसा काय आहे याची परीक्षा त्याला मैदानात पळवून करता येते यावरून) ज्याची परीक्षा करायची तो पदार्थ, मनुष्य व परीक्षेला लागणारी सामग्री ही दोन्ही जवळ असणे; एखाद्या गोष्टीची निरर्थक चर्चा न करता तिला कसोटीला लावणे, कसोटीची वेळ किंवा सामग्री जवळ असणे; हा सूर्य हा जयद्रथ अशी अवस्था असणे. घोडा हाकणे – पळून जाणे; निघून जाणे; पोबारा करणे. घोड्याच्या किंवा हत्तीच्या पायांनी येणे व मुंगीच्या पायांनी जाणे – (आजार, संकट, अडचण इ. च्या संबंधात हा वाक्‌प्रचार योजतात) जलदीने येणे व धीमेपणाने जाणे. एखाद्याच्या घोड्याने पेंड (पेण) खाणे – या वाक्‌प्रचारात पेण = प्रवासातील टप्पा, मुक्कामाची जागा याऐवजी चुकीने पेंड हा शब्द उपयोगात आणतात. लांबच्या प्रवासात निरनिराळ्या टप्प्यांच्या ठिकाणी घोडी उभी राहत. त्यामुळे टप्प्याचे ठिकाण आले की घोडे तेथे अडून राही, पुढे हलायचे नाही. यावरून एखादे कार्य करताना कोणी अडून बसणे. घोड्यापुढे धावणे – जिकिरीचे, दगदगीचे, कष्टाचे काम करणे. एखाद्याची कष्टाची सेवा, चाकरी करणे; (उप.) एखाद्याची ओंगळ खुशामत करणे; अतिशय उत्साह दाखविणे; एखाद्याची थुंकी झेलणे. घोड्यावर घोडा घालणे – (लिलाव इत्यादिकात) चढाओढ करणे; एखाद्याने केलेल्या किमतीपेक्षा अधिक किंमत पुकारणे; उडीवर उडी घालणे. घोड्यावर बसणे – दारू पिऊन झिंगणे; ताठ्यात असणे. घोड्यावर बसविणे – इच्छा नसताना जबाबदारी लादणे. घोड्यावर बसून येणे – घाईने येणे; आपले काम तातडीने करण्याबद्दल दुसऱ्याला घाई करणे. सर घोड्या पाणी खोल, सर घोड्या पाणी पी – (घोड्या मागे हो, पाणी खोल आहे. तेथूनच पाणी पी) अंदाज घेऊन काम करावे; कोणतीही गोष्ट जपून पुढे पाहून करावी. घोड्यास हात घालणे – लगाम खेचून घोडा थांबविणे : ‘आतां पळूं नये. व्यर्थ मरूं नये. घोड्यास हात घालावे.’ – पेदभा ४१·१८९.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

वाट

स्त्री. १ रस्ता; मार्ग. 'कीं भीष्में धरिली ती वरिलीच तुझ्याहि वाट लेकांहीं ।' -मोभीष्म १.२८. २ (ल.) वर्तनक्रम; पद्धती; परिपाठ; तऱ्हा; प्रकार; रीत. 'पहिली जी नीट वाट वाहो ती ।' -मोआश्रम १.९. ३ (ल.) उपाय. 'मग पोट भराया काढिली वाट ।' -दावि ८१. ४ (ल.) परिणाम; गति; निकाल. 'माझ्या फिर्यादीची वाट काय झाली कोण जाणें.' ५ बेंबीच्या खालीं पोटांत वाटीच्या आकाराचा जो उंचवटा येतो तो (ही सरली म्हणजे पोट दुखूं लागतें). [सं. वाट, पथिवस्तु निवाटःस्यात् । -त्रिकडांशेष. वर्त्मन्; प्रा. वठ्ठ; हिं. वाट] (वाप्र.) ॰करणें-क्रि. १ मार्ग करून देणें. २ (ल.) वर्तनक्रम ठरविणें; मार्गं दाखवून देणें; व्यवस्था, मांडणी वगैरे करणें. ३ नाहींसा करणें; दूर करणें. 'तेव्हेळीं शिशुपाळाचें राऊत । पारकेयांवरी वाट करितु ।' -शिशु ९६४. ॰घडणें-परिणाम होणें; गति होणें; मार्ग निघणें. 'अद्वैतशास्त्र नावडे यासी । पुढें वाट घडेल कैसी ।' ॰चुकणें-आकस्मिक भेटणें; अनेक दिवसांनीं घरीं आलेल्यास म्हणतात. 'आज फारा दिवसांनीं वाट चुकला.' -मोर १३. ॰धरणें-१ मार्ग अडविणें, रोखून धरणें. 'एवढ्या रानामध्यें जाण । वाट धरून बैससी कोण ।' -रावि. २ मार्गप्रतीक्षा करणें; वाट पहाणें. ॰पाडणें-वाटेंत चोरी करणें; लुटणें; दरोडा घालणें. 'किरातसंगे वाट पाडित ।' -रावि. १.१०५. ॰पाहणें-मार्गप्रतिक्षा करणें; खोळंबून राहणें; वाटेकडे डोळे लावून बसणें. ॰मारणें- मार्गांत गांठून लुटणें; वाटेंत दरोडा घालणें. ॰लागणें-निकाल लागणें; उरकणें; संपणें; खलास होणें; विल्हेस लागणें; दूर होणें; नष्ट होणें. ॰लावणें-१ निकालांत काढणें; विल्हेवाट करणें. २ खाऊन टाकणें; संपविणे. ३ मोडून तोडून टाकणें; नाश करणें; ४ मार्गांतून दूर करणें; हांकलून देणें. ॰वावारणें-१ निरर्थक खेप घालणें; व्यर्थ हेलपाटा घालणें. ॰वाहणें-रहदारी असणें; चालू असणें; वाटसरू, प्रवासी वगैरेनीं गजबजलेला असणें; वापर असणें. 'तुका म्हणे वाहे वाट । वैकुंठींची घडघडाट ।' ॰वाहती करणें- वाट मोकळी करणें; घालवून देणें; वाटेस लांवणें. 'मग जाणतया जें विरू । तयाची वाट वाहती करू ।' -ज्ञा १६.५७. ॰सरणें- आंत्रमार्ग निरुद्ध होणें. 'या धक्क्यानें क्षुधामांद्य होणार बहुधा वाट सतली असेल.' -मौनयौवना. ॰सुधारणें-पळणें; चालतें होणें; पाय काढणें. 'आपली वाट सुधार कसा.' -तोबं १७. ॰होणें-परिणाम, गति होणें; निकाल लागणें. चार वाटा- करणें-उधळणें; दूर दूर करणें; विखुरणें; पळविणें; घालविणें. चारहि वाटा मोकळ्या, बारा वाटा मोकळ्या-पूर्ण स्वातंत्र्य; सर्व जग फिरावयास मोकळें असणें; स्वैरस्थिति; अनि- र्बंध गति. तिवाटांची माती येत नाहीं समजत नाहीं- पूर्ण अज्ञान; कांहीं न समजणें. देखली वाट पाहणें-करणें- गेल्या मार्गानें परत येणें. मधल्या वाटेस-दोहोंच्या मध्यें; दोहों मार्गांपैकीं केणताहि न पतकरतां, कोणाचाहि फायदा न घेतां (क्रि॰ येणें; जाणें; नेणें; आणणें). वांकडी वाट करणें-आड- वळणास जाणें; मुद्दाम मार्ग सोडून जाणें; वळसा घेणें. वाटा घेणें-क्रि. लुटणें; लुबाडणें. 'तुजकारणें चोर घेती वाटा । तूं झुंजविली वीरा सुभटा ।' -कालिका १४.६६. वाटा लावणें- वाटेस लावणें पहा. 'लाटून वाटा लोविलें । विचारें अविचारासी ।' -दा ५.९.४८. 'बळें लावितो लोभ दाटूनि वाटा ।' -दावि ३६४. वाटेग लावणें-(गो.) रस्ता धरणें. 'हांगा बसूं नाका वाटेग लागा.' वाटेचा पाय-वाटेचें पाऊल आड वाटेस पडणें- कुमार्गास लागणें; चुकी होणें. वाटे जाणें-खोडी करणें; कुचेष्टा करणें. वाटे-वाटेस लावणें-१ मार्गास लावणें; रास्त मार्ग, दाखविणें. २ निरोप देणें; पाठवणी करणें; रवानगी करणें. ३ हांकून देणें; घालविणें. वाटेवर आणणें-ताळ्यावर आणणें; सुधारणें; योग्य मार्गावर आणणें. 'गंगे जा वायेवरि आण, अभय द्यावया न हा भागे ।' -मोउद्योग १३.५६. वाटेवर पडणें-सहज प्राप्य असणें; सुलभ असणें; सुसाध्य असणें. 'माझी मुलगी वाटेवर पडली आहे ' -भाव १२. वाटेवर येणें-शुद्धीवर येणें; योग्य मार्गास लागणें; ताळ्यावर येणें; व्यवस्थित वागूं, बोलूं, करूं लागणें; वर्तनक्रम सुधारणें. वाटेस जाणें-खोडी करणें; कुरा- पत काढणें; त्रास देणें. वाटेस लागणें-१ चालू होणें; योग्य मार्गानें जाणें. २ नाहींसें होणें; संपणें. वाटेस लावणें-१ योग्य मार्गास लावणें. 'सर्वत्र धर्म रक्षक राजे आहेत लाविती वाटे ।' -मोकर्ण २९.४६. २ निरोप देणें; पाठवणी करणें; हांकून लावणें. सामाशब्द- ॰करी-काढू-काढ्या-पु. वाटाड्या; रस्ता दाख- विणारा; मार्गदर्शक. ॰खर्च-खचीं-पुस्त्री. प्रवासांत खर्चावया- करितां लागणारा पैसा; प्रवासखर्च. 'जरी हा वाटखर्चीस पीठ देतां ।' -कचेसुच ५. ॰घेणा-पु. वाटमाऱ्या; लुटारू. 'वाटघेणा वाल्हा कोळी । अजामेळा पडतां जळीं ।' -निगा १२७. ॰चा चोर-पोर-पु. कोणीहि अनोळखी मनुष्य; उडाणटप्पु; भटक्या. ॰चा वाटसरू-पु. अनोळखी प्रवासी; कोणताहि संबंध नस- लेला मनुष्य; कोणीहि प्रवासी; पांथस्थ; वाटेनें जाणारा-येणारा. ॰चाल-स्त्री. प्रवास. ॰चालन-न. (कातकरी) लग्नाच्या दुसऱ्या दिवशीं वधूस वरगृहीं नेतात त्यावेळीं वाटेंत देण्यांत येणारी दारू. -बदलापूर ११९. ॰तीट-स्त्री. आक्रमावयाच्या मार्गांतील अड- चणी, संकटें वगैरेस उद्देशून म्हणतात; रस्ते व त्यांतील संभाव्य विघ्नें इ॰ 'वाटेतिटेनें संभाळून जा.' ॰पाडी-स्त्री. दरोडा. -गुजा. [वाट द्वि] पाडिया-पाडो-डू-ड्या-पु. वाटमाऱ्या; लुटारू; चोर; दरवडेखोर. 'म्हणे आजि वाटपाडिया । कैशी दया उपजली ।' -दे कृष्णजन्म १९. 'वाटपाड्यासी कैसी भाया ।' -ह २.१९१. ॰भेट-स्त्री. रस्त्यांत पडलेली गांठ; आकस्मिक भेट. ॰माणूस-पु. सामान्य मनुष्य; कोणत्याहि दर्जाची व्यक्ति; रस्त्यावरील मनुष्य. -नवाकाळ १६.८.२७. ॰मार-स्त्री. १ रस्तालूट; रस्त्यावरील हल्ला. २ रस्त्यावर मित्रत्वानें थांबविणें, अडविणें. ३ (बुद्धिबळ) प्यादें दोन घरें जात असतां मध्येंच एक घर आल्यासारखें धरून मारणें. ॰मारू-माऱ्या-पु. ठग; लुटारू; रस्तेलूट करणारा. ॰मार्ग-पु. रस्ता; मार्ग; रीत; पद्धति; सामान्य नियम; साधारण व्यवहार, क्रम इत्यादि वाचक सामान्य शब्द- प्रयोग. वाट पहा. ॰मार्ग करणें-घालणें-दाखविणें- पाडणें-शिकवणें-सांगणें-सामान्यतः दिशा दाखविणें, सांगणें; उपदेश करणें; सल्ला देणें. ॰मार्गीं-पु. प्रवासी; पांथस्थ. ॰वाटमार्गीं लागणें-१ योग्य दिशेनें जाणें; मार्गावर येणें. २ मृत्यूपंथास लागणें. ॰वाटमार्गी लावणें-१ योग्य दिशा दाख- विणें; मार्ग दाखविणें. २ निरोप देणें; पाठवणी करणें; वाटेस लावणें. ॰वणी-न. १ वाटेंतील पाणी; गटारांतील, रस्त्यांत वाहणारें पाणी. 'नाहीं आड ना विहीरवणी । घाला वाटेचें वाटवणी । विनोद मेहुणीं मांडीला ।' -एरुस्व १२.१४८. २ (सांकेतिक- स्त्रियांमध्यें रूढ) मूत्र. ॰वधा-पु. वाटमाऱ्या. 'किंबहुना ते चुकले । वाटवधेया ।' -ज्ञा ७.१७४.१३.५४७. ॰वधें-न. वाट- मार; वाटमाऱ्या धंदा; वाटेंतील अडथळा, विघ्न. 'तया इंद्रादि पदें । करिताति वाटवधें ।' -ज्ञा १२.६१. ॰शेक-क्रिवि. रस्त्याचे बाजूनें; दुतर्फा; वाटेनें. ॰सखा-पु. प्रवासांतील सोबती. ॰सर- सरू-सारू-सुरू-पु. प्रवासी; पांथस्त; मुशाफरी; रस्त्यानें जाणारा. वाटाडी-ड्या-पु. रस्ता दाखविणारा; मार्गगर्शक. वाटेकरू-पु. वाटाड्या. 'किंभक्तीचा वाटेकरू । ज्ञानाचा निडारू ।' -भाए २५२. वाटेचा चोर-वाटेचा वाटसरू-पु. कोणीहि जाणारायेणारा सामान्य मनुष्य. 'वाटेच्या वाटसरूला देखील हें समजेल.' -अस्तंभा ३. वाटेचें सोवळें-न. (बायकी) सोंवळें वस्त्र नेसून मार्गक्रमण केल्यास त्या सोंवळ्यास दोष लागतो या- वरून त्या वस्त्रास म्हणतात. वाटेंतील कांटा-पु. अडथळा; विघ्न. 'फडणविसांनीं आपल्या वाटेंतील वगंभटाचा कांटा नाहींसा केला.' -अस्तंभा ६८.

दाते शब्दकोश

जाणे      

अक्रि.       १. गमन करणे; चालू लागणे; प्रवास करणे; पुढे सरणे; पूर्वस्थळ सोडणे. २. पूर्वस्थळ सोडून विवक्षित स्थळ गाठणे; स्थलांतर करणे. ३. निघून जाणे; नाहीसे होणे; नाश पावणे; हरवणे; हलविलेले असणे. ४. लोटणे; क्रमणे (वेळ). ५. छिद्रादिकांत प्रवेश करणे; आत शिरणे; समाविष्ट करणे. ६. (विशेषतः भूतकालात उपयोग) वाया जाणे; नासणे; निरुपयोगी, टाकाऊ होणे; खराबणे. ७. घडून येणे; होणे (नजरचूक, गुन्हा, योग्य किंवा रूढ मार्गाचे उल्लंघन). ८. एखाद्याकडून चुकून होणे, घडून येणे (गफलतीने एखादी चुकीची गोष्ट). ९. वजा होणे; कमी होणे. १०. निर्बल होणे; शक्ती जाणे; गुण जाणे (इंद्रिये, औषधे यांचा). ११. अनुसरणे; पाठीमागून जाणे; वैधणे; अभिलषित होणे (मन, डोळे, कान, प्रीती इ.) (वर अथवा कडे शब्दाबरोबर प्रयोग). १२. दिले जाणे. (शब्द, वचन – भूतकाळी उपयोग). १३. विझणे (दिवा, प्रकाश, अग्नी). १४. ऱ्हास, नाश होणे. झिजणे (शरीर). १५. एखाद्या स्त्रीशी रत होणे; संभोग करणे. १६. एखादा पदार्थ विवक्षित कालपर्यंत टिकणे. कोणत्याही क्रियापदाच्या वर्तमानकालवाचक विशेषणाबरोबर ह्या क्रियापदाचा उपयोग केला असता त्याचा अर्थ क्रियासातत्य दर्शविण्याकडे होतो. उदा. १. जसा व्यापार वाढवाल तसा मी पैसा देत जाईन. २. सकर्मक क्रियापदाच्या पूर्णभूतकाळाबरोबर उपयोग केला असता कर्मकर्तरीचा अर्थ होतो. जसे :— तुला शिक्षा केली जाईल. ३. ऊनप्रत्ययान्त धातुसाधिताशी उपयोग केला असता याचा अर्थ क्रियापूर्णता दर्शविण्याकडे होतो. जसे :— तळ्यातील पाणी आटून गेले. ४. दुसऱ्या क्रियापदाच्या आज्ञार्थी रूपानंतर ह्या क्रियापदाच्या आज्ञार्थाचा उपयोग केला असता पहिल्या क्रियापदावर जोर दिला जाऊन, क्रियेचा जोरदारपणा सिद्ध होतो. जसे – आण जा; ठेव जा; दे जा; कर जा इ. [सं. या] (वा.) जाजा येये करणे – निरर्थक पुनः पुनः जाणे येणे; खेपा. (क्रि. घालणे)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

वाक्य

न. १ एक संपूर्ण विधान करणारा शब्दसमूह; पूर्ण अर्थ होईल इतका शब्दसंघ; लहान परिच्छेद; सिद्धान्त. २ उक्ति; वचन; नियम; सूत्र; विधान. 'सत्यव्रतरतमति पतिस तिचें वाक्य करावें लागें ।' -मोरामायणें १.४९९. [सं. वच् = बोलणें] ॰खंडन-न. १ सिद्धान्ताची असिद्धता प्रस्थापन करणें, खोडून काढणें; चुकीचें ठरविणें. २ वाक्यांतील दोषदर्शन; वाक्य चुकीचें ठरविणें. ३ वाक्याचे अवयव पाडणें; विभाग करणें; तुकडे पाडणें. ॰दीप-पु. स्पष्ट, सुबोध वाक्यें. ॰दोष-पु. वाक्यांतील न्यूनता, चूक, अशुद्धता इ॰. साहित्यशास्त्रकार हे दोष अनेक मानतात. उदा॰ प्रतापरुद्र ग्रंथांत पुढील वाक्यदोष दाखविले आहेत:-शब्द- हीन अथवा शब्दशास्त्रहीन; क्रमभ्रष्ट; विसंधि; पुनरुक्ति; व्याकीर्ण; वाक्यसंकीर्ण; भिन्नलिंग; भिन्नवचन; न्यूनोपम व अधिकोपम; भग्न- बंद; विसर्गलुप्त; अस्थानसमास; वाच्यवर्जित; समाप्तपुनरात्त; संबंधवर्जित; पतत्पकर्ष; अधिकपद; अष्टार्धार्धवाह; प्रक्रमभंग; अपूर्ण; वाक्यगर्भित; यतिभ्रष्ट; अशरीर; अरीतिक इ॰ काव्यप्रकाशांत हे दोष पुढील सांगितले आहेत:-प्रतिकूलवर्ण; उपहतविसर्ग; लुप्त- विसर्ग; विसंधि; हतवृत्त; न्यूनपद; अधिकपद; कथितपद; पत- त्प्रकर्ष; समाप्तपुनरात्त; अर्धांतरैकवाचकपद; अभवन्मतयोग; अन- भिहितवाच्य; अस्थानपद; अस्थानसमास; संकीर्ण; गर्भित; प्रसिद्धि- हत; भग्नप्रक्रम; अक्रम; अमतपदार्थ. याप्रमाणेंच शब्ददोष. शब्दालंकार, वाच्यालंकार पहा. ॰पद्धति-स्त्री. वाक्यरचनेसंबंधीं नियम, वाक्यरचनेची रीति. ॰पूजा-स्त्री. शब्दरूपी पूजा. 'स्वामी निवृत्तिरांजा तो अवधारू वाक्यपूजा ज्ञानदेवो म्हणे ।' -ज्ञा १५.५९८. ॰पृथक्करण-न. वाक्यांतील उद्देश-विधेयादि निर- निराळे भाग सांगून त्यांचा परस्परसंबंध दाखविणें. ॰प्रयोग-पु. वाक्याची, शब्दांची किंवा भाषणाची योजना, रचना. ॰रचना- स्त्री. वाक्यांतील शब्दांतील मांडणी, ठेवण. ॰विन्यास-पु. वाक्यां- तील शब्दांची जुळणी, मांडणी, परस्परसंबंध; त्यासंबंधीं नियम वगैरे. ॰विशारद-वि. वक्ता; पंडित; भाषणांत कुशल, चतुर. ॰शः-क्रिवि. प्रत्येक वाक्य घेऊन; प्रत्येक वाक्यास अनुसरून. वाक्यार्थ-पु. १ विधान; सिद्धान्त; वाक्याचें उद्दिष्ट; भाव. २ कथा. 'समर्थसेवकें वाक्यार्थं लिहिले ।' -सप्र ३.२. वाक्या- लंकार-पु. वाक्यांतील निरर्थक शब्द; केवळ शोभेकरितां वापर- लेले शब्द; वाक्यांतील मोकळी जागा भरण्यासाठीं किंवा खंड पडूं नये म्हणून वापरलेला शब्द. उदा॰ जेहेते.

दाते शब्दकोश

लग्न

न. १ सोयरीक; शरीरसंबंध; विवाह. (क्रि॰ करणें. होणें). ३ मूहूर्तावर केलेला विवाहसमारंभ. (क्रि॰ लावणें; लागणें). ४ ऐक्य; साहचर्य. 'मग लग्नीं जेविं ॐकारु । बिंबींचि विलेसे ।' -ज्ञा ८.११६. ५ योग; मुहूर्त; समय. -ज्ञा १६.३०३. 'हनुमान् प्रभुला भेटे ज्या लग्नीं फार चारुतें ।' -मोरामायणें पृ. ६. ६ क्रांतिवृत्तांतील प्रत्येक राशीबरोबर एकमागून एक वर येणारा विषुववृत्ताचा विभाग; विवक्षित कालीं उदयाचलाशीं संलग्न असणारा राशि. ७ राशिचा उदयकाल; राशींत सूर्याचा गमनकाल (अहोरात्रांत एकंदर बारा राशींचीं बारा लग्नें होतात). उदा॰ मेष वृषभ लग्न, उदय-अस्त लग्न. -वि. १ संयुक्त; संबंद्ध; चिकट- लेलें. २ (ल.) निरत; आसक्त; तल्लीन. [सं.] (वाप्र.) ॰नाहणें-विवाहविधींत सांगितलेलीं नहाणीं व दुसरे संस्कार करून घेणें. सामाशब्द- ॰क-पु. हामीदार; जामीन. ॰कळा- स्त्री. लग्नसमारंभामध्यें नवरीच्या चेहऱ्यावर दिसणारें किंवा दिस- तेसें वाटणारें तेज, टवटवी. ॰कार्य-न. मंगल कार्य (लग्न, मुंज गर्भाधान इ.) [सं.] ॰कुंडली-स्त्री. जन्मकालीं पूर्वेकडे उदय पावलेल्या राशीचा दर्शक अंक पहिल्या घरांत मांडून तेथून डावी- कडे क्रमानें प्रत्येक घरांत तकदनुरोधानें राशि व त्या राशींचे ग्रह लिहून तयार केलेलें बारा घरांचें कोष्टक. [सं.] ॰गंडांत-पु. कर्क-सिंह, वृश्चिक-धनु व मीन-मेष या लग्नांच्या संधीची एक घटका (जसे, कर्काची शेवटची अर्धी व सिंहाची पहिली अर्धीं मिळून एक). [सं.] ॰गीत-न. विवाहगीत; मंगलाष्टक. [सं.] ॰गोष्ट- ष्टी-न. एव. अव. १ एखाद्याचा विवाह किंवा दुसरा एखादा इष्ट हेतु सिद्धीस जाण्याकरितां त्या मनुष्याची केलेली शिफारस, प्रशंसा. जसें.-'नोकरी नसली म्हणून काय झालें, तो मुलीवर पांचशेर सोनें घालील अशी आमची खात्रीच आहे' 'हा चांगला पतीचा माणूस आहे, याला हजार रुपये कर्जाऊ दिले तरी चिंता नाहीं इ॰ २ अनुरागाचीं पोकळ किंवा निरर्थक बोलणीं; मदतीचीं आश्वासनें. ॰घटि(ट)का-स्त्री. १ लग्न किंवा मुंज लावण्याकरितां ज्योति: शास्त्रांत शुभ म्हणून सांगतलेला मुहूर्त, वेळ. २ मुहूर्त साधण्या- करितां पाण्यांत टाकलेलें वेळ मापण्याचें अर्धगोलाकृति भांडें; घटि- पात्र. ३ असा निश्चित केलेला आणि साधलेला काल, मुहूर्त. ४ (ल.) अणीबाणीची वेळ, प्रसंग; कांहीं करून अडचण पार पाड- लीच पाहिजे अशी बेळ. 'ब्राह्मण तर जेवावयास बसले, घरांत तूप नाहीं अशी लग्नघटिका खोळंबली आहे म्हणून तुमच्याकडे धांवत तूप मागावयास आलों.' [सं. लग्नघटिका] ॰घर-न. १ ज्यामध्यें लग्नसमारंभ चालला आहे तें घर; जानोशाचें घर. २ (ल.) लग्नां- तल्याप्रमाणें माणसांनीं गजबजलेलें, फार गडबड चालली आहे असें घर. ३ लग्नासारखा भरमसाट खर्च चालला आहे, आनंदी- आनंद आहे असें घर. ॰चिटी-ठी-ठ्ठी-स्त्री. १ लग्नाचा परवाना (सरकारकडून शुद्रादिकांस मिळत असलेला). २ लग्नमुहूर्त ज्यांत आहे असा जोशानें केलेला कागद. ३ लग्न-मुंजीची आमंत्रण- पत्रिका; कुंकोत्री. ॰चु(चू)डा-पु. लग्नांत नवरीस व तिच्या बाजूच्या वऱ्हाडणींस बांगड्या इ॰ भरण्याचा विधि. हा घाण्याच्या पूर्वी होतो. ॰टका-क्का-पु. लग्न लागल्याबद्दल घेण्यांत येणारा सरकारी कर (हा शुद्राकडून घेण्यांत येई). ॰टीप-स्त्री. लग्नाच्या मूहूर्ताची यादी. ॰तीथ-स्त्री. ज्या तिथीस लग्नाचा मुहूर्त येतो ती तिथि. [सं. लग्नतिथि] ॰थर-पुन. लग्नासाठीं घेतलेलें कापड- चोपड. थर पहा. [दे.] ॰नक्षत्र-न. लग्नास शुभ असलेलें नक्षत्र. [सं.] ॰पत्रिका-स्त्री. वधूवरांच्या पत्रिकांवरून लग्नाचा शुभ मुहूर्त नक्की करून उभय कुलांचा उल्लेखासह तो ज्यावर लिहूल ठेवतात तो कागद. लग्नापूर्वी याची पूजा करतात. [सं.] ॰प्याला-पु. (तेली) नवऱ्यामुलानें लग्नासाठीं मुलीकडे जाण्याचा समारंभ; वरघोडा. -बदलापूर २६९. ॰भुज-पु. (ज्यो.) मेषादिक लग्नाचा भुज; चारकांड. ॰मंडप-पु. लग्नसमारंभा- करितां उभारलेला मांडव. [सं.] ॰मास-पु. लग्न करण्यास शुभ म्हणून सांगतलेला महिना; लग्नाचा मोसम. [सं.] ॰मुहूर्त-न. १ लग्नास शुभ अशी वेळ, मुहूर्त. याचे दिवा, गोधूल किंवा गोरज आणि रात्रौ असे तीन प्रकार आहेत. २ (लग्न आणि मुहूर्त = मोहतर, कमी दर्जाचें लग्न). लग्नकार्य पहा. [सं.] ॰वेळा- स्त्री. लग्नघटिका; लग्न लावण्याची वेळ. 'त्रिवेणीसंगमीं तिसी साधियेली लग्न वेळा ।' -मध्व ३९१. ॰शिष्टाई-स्त्री. लग्नाची मध्यस्थी; लग्नासंबंधीं बोलणें; लग्न जुळविणें. ॰शुद्धि-स्त्री. चिंतिल्या कार्याच्या आरंभाकरितां राशींची निर्दोषता, शुभता. [सं.] ॰सराई-स्त्री. लग्नाचा हंगाम, मोसम (मार्गशीर्षापासून ज्येष्ठ महिन्यापर्यंत). ॰साडा-न. १ लग्नांत वधूपक्षाकडून वराच्या आईस देण्यांत येणारें लुगडें. २ (कांहीं प्रांतांत) वराकडून वधूस देण्यांत येणारें उंची वस्त्र (पैठणी). ॰सोह(हा)ळा-पु. लग्न- समारंभांतील मेजवान्या, उत्सव इ॰; विवाहोत्सव. 'लग्नसोहळा ते वेळीं । चार दिवस जाहला ।' लग्नाऊ-वि. लग्नाच्या प्रसंगास उपयोगी, योग्य (अहेरी वस्त्र इ॰). लग्नाचा-वि. लग्नाच्या संबंधाचा (नवरा, बायको). ॰लग्नाक्षता-स्त्रीअव. लग्नांत वरानें व वधूनें परस्परांवर टाकलेले तांदूळ (सामा.) लग्नविधि. लग्नीक-वि. (गो.) बांधलेला. लग्नक पहा. 'कुटुंबाचा मालक आपल्या वहिवाटाचा हिशेष देण्यास लग्नीक आहे.' -गोमांतक रीतीभाति ११. [सं. लग्नक]

दाते शब्दकोश

जीभ

स्त्री. तोंडांतील एक अवयव; रसनेंद्रिय. २ (ल.) नंदीबैलाच्या पाठीवर जिभेच्या आकाराचें चिकटविलीलें कातडें वाढतें तें. ३ जिभेच्या आकाराची वस्तु, भाग. नखाची-डोळ्याची -सापाची जीभ पहा. ४ फोगी; एक प्रकारचें शीड. ५ (व.) रणगाडा किंवा पाळणा याची खालची बाजू. ६ (नाशिक) जिभे- सारखा लांबट पसरलेला फाटा. 'नदीची जीभ लांबवर पसरली आहे.' [सं. जिह्वा; प्रा. जीभ्भा फ्रें; जि. चीव, जीवा] (वाप्र.) ॰काढणें-पदार्थ खाण्यासाठीं आशाळभूतपणा करणें. ॰चावणें- चावलीशी करून बोलणें-भिऊन, संकोच धरून, दबत दबत बोलणें. ॰चुरचुर बोलणें-अयोग्य, अप्रासंगिक, वेडेवाकडें बोलणें. ॰जड असणें-लवकर पाठ करावयाला असमर्थ असणें. जीभ जड होणें पहा. ॰जड होणें-१ (अस्पष्टोच्चारानें) बोलतां न येणें चांगलें शुद्ध बोलतां न येणें. 'लहान मुलांनीं सुपारी खाल्यानें जीभ जड होते.' २ मंदबुद्धि होणें. ॰झडणें- (खोटें वगैरे बोलण्यानें) जीभ कुजून पडणें; वाचा नाहींशी होणें. ॰नरकांत घालणें-पोकळ वचनांनीं, रिकाम्या बढाईनीं वगैरे जीभ बाटविणें; खोटें बोलणें. ॰पाघळणें-गुप्त वार्ता फोडणें; न बोलण्याची गोष्ट, गुप्त गोष्ट बोलणें. ॰बधिर होणें-जीभ जड होणें. ॰मोकळी सोडणें-हवें तसें बोलणें, खाणें; बंधन, नियम न पाळणें. ॰मोडणें-बोबडी वळणें; मुकें बनणें; शब्द न फुटणें. ॰लवलव करणें-चुरचुर चालणें; बोलणें. ॰लांब करून बोलणें- वरिष्ठांशीं अघळपघळ बोलणें; उर्मटपणानें बोलणें. ॰लालचावणें- खाण्यास उत्सुक असणें; पाणी सुटणें. ॰वळवळणें-(लहान मुलानें) बोलण्याचा प्रयत्न करणें; बोलावयास लागणें. २ शिव्या देणें; अद्वातद्वा बोलणें. ॰विटाळणें-जीभ नरकांत घालणें पहा. ॰शिंदळ-निसरडी-स्त्री. वाह्यात, बिन ताब्यांतील जीभ. -वि. फटकळ; शिवीगाळ करणारी. ॰सोकणें-१ चटक लागणें. २ चव येणें (अन्नाची-सरावानें). ॰सोकावणें-तोंड चटावणें. जीभ सोकणें पहा. ॰हातीं धरणें-मन मानेल तसें बोलणें, खाणें. -भेचा पहा-अद्वातद्वा बोलणें, वाचाळता. -भेचा पालट- खाण्यांत बदल; रोजचा खाण्याचा पदार्थ न खातां दुसरा खाणें. -भेचा लोळ-ळा-अतिशय कढत पदार्थ खाल्ल्यानें जीभ भाजून जाणें. जिभेचे फुटाणे फुटणें-फाडफाड बोलणें. (एकाच) जिभेनें साखर किंवा गू खाणें-एकाच वेळी सम्मति आणि असम्मति देणें. बरेवाईट म्हणणें; दोन्हीं प्रकारें बोलणें. -भेला काटा लावणें-एखादी गोष्ट गुप्त ठेवणें. -भेला चिमटा घेणें- बोलणें किंवा खाणें यापासून तोंड आवरणें. -भेला डाग देणें- जीभ ताब्यांत ठेवणें; जीभेला नियंत्रण घालणें. जीभेवर असणें- १ तोंडपाठ असणें. २ अगदीं ताज्या आठवणींत असणें. ३ बोलून टाकण्याच्या तयारींत असणें. -भेस-ला-आडवा-वेढा नसणें-वाह्यात बडबड करणें; निरर्थक प्रलाप काढणें. -भेस- ला आवरून धरणें-निर्बंध घालणें; जीभ आटोक्यांत ठेवणें. भेस-ला-टाचा-देऊन (कांहींएक)ठेवणें-आपण न खातां दुसर्‍यासाठीं गोड पदार्थ राखून ठेवणें. -भेस हाड नसणें- जीभ ताब्यांत नसणें (खोटे बोलणें, शिवीगाळ करणें यांत); खोटें अपशब्द बोलण्याचें भय नसणें. ॰म्ह उचलली जीभ आणि लाविली टाळ्याला = विचार न करतां बोलणें.

दाते शब्दकोश

तोंड      

न.       १. ज्याने खाता व बोलता येते तो शरीराचा अवयव. २. चेहरा; हनुवटीपासून डोक्यापर्यंत मस्तकाचा दर्शनी भाग. ३. (सामा.) (एखाद्या वस्तूचा) दर्शनी, पुढचा, टोकाचा भाग; समोरील अंग. ४. (फोड, गळू इ.चा) छिद्र पडण्याजोगा, छिद्रासारखा भाग; व्रणाचे मुख. ५. (कुपी, तपेली, लोटी वगैरेंचे) पदार्थ आत घालण्याचे द्वार, मुख. ६. (एखाद्या विषयात, शास्त्रात, गावात, देशात, घरात) शिरकाव होण्याचा मार्ग; प्रवेशद्वार. ७. (ल.) गुरुकिल्ली. उदा. व्याकरण हे भाषेचे तोंड होय. ८. (वारा इ.ची) दिशा, बाजू. ९. धैर्य; दम; उमेद; एखादे कार्य करण्याविषयीची न्यायतः योग्यता. १०. एखाद्या वस्तूचा स्वीकार किंवा विनियोगाचा, उपयोगाचा आरंभ तिच्या ज्या भागाकडून करतात तो भाग. ११. (युद्ध, वादविवाद इ. गोष्टींची) प्रारंभदशा; सुरुवात. १२. (सोनारी धंदा) हातोड्याचा सगळ्यात खालच्या बाजूला अडिश्रीच्या बुडासारखा असणारा भाग. याने ठोकलेला जिन्नस सारखा करून घेतात. १३. (सोनारी धंदा) कांबीला गोल आकार देताना तिची टोके जेथे जुळतात तो भाग. १४. (बुद्धिबळ) डाव सुरू करण्याचा प्रकार; मोहरा. १५. सुरईचे पाणी ओतण्याचे व भरण्याचे तोंड. हे पक्ष्याच्या चोचीप्रमाणे लांब व विविध आकाराचे आढळते. [सं.तुंड] (वा.) तोंड आटोपणे, तोंड सांभाळणे, तोंड आवरणे – जपून बोलणे; बोलण्याला आळा घालणे; अमर्याद भाषण, अभक्ष्यभक्षण यांपासून निवृत्त होणे. तोंड आणणे – (आटापाट्यांचा खेळ) शेवटची पाटी खेळून जाऊन पुन्हा एक एक खेळत येणे; पाणी, लोण आणणे. तोंड आहे की तोबरा – खादाड किंवा बडबड्या माणसाला उद्देशून वापरण्याचा ‘किती खातोस’ ‘किती बोलतोस’ या अर्थाचा वाक्यप्रचार. तोंड आंबट करणे – (एखाद्याने) चेहऱ्यावर असमाधानाचे, निराशेचे भाव आणणे. तोंड उतरणे – (निराशा, आजार इ.ने) चेहरा म्लान होणे, सुकणे, फिका पडणे, निस्तेज होणे. तोंड उष्टे करणे – १. (अन्नाचा) एखाददुसरा घास खाणे. २. ज्या गोष्टीविषयी आपल्याला मुळीच माहीत नाही त्याविषयी बोलणे. तोंड करणे – बडबड, वटपट करणे; उद्धटपणे, निर्लज्जपणे बोलणे. तोंड काटणे – उदयाला येणे; अस्तित्वात येणे. तोंड काळे करणे – (उप.) एखादा ठपका, तोहमत अंगावर आल्यामुळे निघून, पळून जाणे; हातावर तुरी देणे; दृष्टीस न पडणे. तोंड कोरडे पडणे, तोंडचे पाणी पळणे, तोंडचे पाणी उडणे – १. भीतीमुळे चेहरा फिका पडणे; बावरणे; घाबरणे. २ भीतीने घसा सुकणे. तोंड गोड करणे – १. (एखाद्याला) लाच देणे, खूष करणे. २. मेजवानी देणे. तोंड गोरेमोरे होणे – (कोणी रागावले असता, वाईट वाटून) निराशेची, लाजलेपणाची जाणीव चेहऱ्यावर उमटणे. तोंड घालणे – (दोघे बोलत असताना तिसऱ्याने) संबंध नसताना मध्येच बोलणे. तोंड घेऊन येणे – एखाद्याने सोपवलेले काम न करता तसेच परत येणे. तोंड घेणे – बोंबलत सुटणे; ताशेरे झाडणे. तोंड चिघट करनं – वारंवार उपदेश करणे. (झाडी) तोंड चुकविणे – हातून एखादा अपराध घडला असता कोणी रागवेल म्हणून काम टाळण्यासाठी चुकारपणे दृष्टीस न पडणे. तोंड टाकणे – रागातिशयाने अपशब्दांचा वर्षाव करणे; निर्भर्त्सना करणे; खरडपट्टी काढणे; अद्वातद्वा बोलणे. तोंड ठेचणे – तोंडावर मार देऊन गप्प करणे; कह्यात घेणे; गुप्तता राखणे. तोंड तोडणे – एखादी वस्तू मिळवण्यासाठी एखाद्याच्या पाठी लागणे; तोंड वेंगाडणे. (ना.) तोंड दाबणे – लाच देऊन तोंड बंद करणे; एखाद्याला वश, गप्प करणे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार – एखाद्याला तक्रारीचा ब्रही काढू न देता प्रचंड छळ, कोंडमारा करणे. तोंड दिसणे – एखाद्याची केलेली निर्भर्त्सना दुसरी बाजू न कळता लोकांच्या नजरेला येणे व आपणच वाईट ठरणे. तोंड देणे – १. पहा : तोंड घेणे २. २. सैन्याच्या अग्रभागी राहून शत्रूवर हल्ला करणे. ३. (एखाद्याचा) प्रतिपक्षी, शत्रू होऊन राहणे; लढायला सिद्ध होणे. ४. (आट्यापाट्यांचा खेळ) शेवटची पाटी खेळून परत येणाऱ्या गड्याकडे पाटी धरणाराने तोंड फिरविणे. ५. एखाद्या गोष्टीला न भिता त्यातून धैर्याने पार पडण्याची तयारी ठेवणे. तोंड धरणे – १. अन्नसेवन करण्याची तोंडाची शक्ती आजार वगैरे कारणांमुळे नाहीशी होणे. २. एखाद्याची बोलण्याची शक्ती नाहीशी करणे. ३. एखाद्याला आपल्या तावडीत, कबजात आणणे. ४. बोलणे बंद करणे. तोंड धुणे – एखाद्या वस्तूच्या लाभासाठी वाट पाहणे. तोंड धुवून येणे – (उप.) एखाद्याची विनंती कधीही मान्य होणार नाही असे म्हणून फेटाळून लावताना योजण्याचा तिरस्कारदर्शक वाक्यप्रकार. तोंड निपटणे – (आजार, उपवास इ. कारणांनी) गाल खोल जाणे; चेहरा सुकणे. तोंड पडणे – १. सुरुवात होणे. २. (गळू वगैरेला) छिद्र पडणे, फुटणे, वाहू लागणे. तोंड पसरणे, तोंड वेंगाडणे, तोंड विचकणे – १. खिन्नपणाची, केविलवाणी मुद्रा करणे. २. हीनदीनपणाने याचना करणे. तोंड पाघळणे – गुप्त गोष्ट बाहेर फोडणे. तोंड पाडणे – (वादाला, कामाला) सुरुवात करणे. तोंड पाहणे – १. (एखाद्याच्या) आश्रयाची, मदतीची अपेक्षा करून असणे. २. (एखाद्याने) स्वतःच्या शक्तीचा, कर्तृत्वाचा अजमास करणे. ३. बोलणाऱ्याचे आपण नुसते ऐकणे, सांगेल तसे न करता स्वस्थ बसणे. तोंड पाहात बसणे – काय व कसे करावे या विंवचनेत पडणे. तोंड पिटणे – बडबड करणे : ‘तैशी न करी बडबड ।... वृथा तोंड पिटीना ।’ – एभा १०·२३१. तोंड फिरणे – १. आजाराने, पदार्थाच्या अधिक सेवनाने तोंडाची रुची नाहीशी होणे. २. तोंडातून शिव्यांचा वर्षाव होऊ लागणे. तोंड फिरविणे – १. (वितळत असलेला किंवा तापविला जात असलेला धातू इ.ने) रंगामध्ये फरक दाखवणे; रंग पालटणे. २. दुर्लक्ष, अवमान करणे. ३. गतीची दिशा बदलणे; दुसऱ्या दिशेला, माघारे वळणे. तोंड फुटणे – १. फजिती उडणे; पत नाहीशी होणे; नाचक्की होणे; अभिमानाला मोठा धक्का लागण्याजोगा अपमान, शिक्षा होणे. २. सुरुवात होणे (युद्ध, भांडण इ.ला). तोंड बंद करणे, तोंड बांधणे – १. जपून बोलणे. २. (एखाद्याला) लाच देऊन गप्प बसवणे, वश करून घेणे. तोंड बंदावर राखणे – खाण्याला किंवा बोलण्याला आळा घालणे. तोंड बाहेर काढणे – १. राजरोसपणे समाजात हिंडणे. २. फिरण्यासाठी, कामासाठी बाहेर पडणे. तोंड बिघडणे – तोंड बेचव होणे; तोंडाला अरुची उत्पन्न होणे. तोंड भर बोलणे, तोंड भरून बोलणे – भीड, संकोच, भीती न धरता मनमोकळेपणाने भरपूर, अघळपघळ बोलणे. तोंड मागणे – (आट्यापाट्यांचा खेळ) लोण घेऊन परत जाताना पाटीवरील गड्याला आपणाकडे तोंड फिरवायला सांगणे. तोंड माजणे – १. मिष्टान्न खाण्याची चटक लागल्याने साध्या पदार्थाबद्दल अरुची वाटणे. २. शिव्या देण्याची, फटकळपणे बोलण्याची खोड लागणे. तोंड मारनं – १. शब्द देणे. २. आपले म्हणणे सांगणे. तोंड मिचकणे – दात, ओठ खाणे. तोंड येणे – १. तोंडाच्या आतल्या बाजूने त्वचेला फोड येऊन ती हुळहुळी होणे व लाळ गळणे. २. लहान मूल बोलू लागणे. (कर.) तोंड रंगविणे – १. विडा खाऊन ओठ तांबडेलाल करून घेणे. २. एखाद्याने थोबाड थोबाडात मारून रंगवणे. तोंड लागणे – (लढाई, वादविवाद, अंगीकृत कार्य इ.ना) सुरुवात होणे. तोंड वर करून बोलणे – निर्लज्जपणे, आपला दर्जा, पायरी सोडून बोलणे. तोंड वाईट करणे, तोंड वाईट होणे – निराशेची मुद्रा धारण करणे. तोंड वाकडे करणे – १. वेडावून दाखवणे. २. नापसंती दर्शवणे. तोंड वाजविणे – एकसारखे बोलणे; निरर्थक बडबड, बकबक, वटवट करणे; भांडणे. तोंड वासणे – १. निराशेने, दुःखाने तोंड उघडणे व ते बराच वेळ तसेच राहणे. २. याचनेसाठी तोंड उघडणे, वेंगाडणे. तोंड वासून पडणे – शक्तीच्या क्षीणतेमुळे, उत्साह, तेज वगैरे नष्ट झाल्यामुळे, गतप्राण झाल्यामुळे आ पसरून पडणे. तोंड वासून बोलणे – अविचाराने बोलणे : ‘ऐसें स्वसख्यांपासीं कां गे वदलीस तोंड वासन ।’ – मोउद्योग १३·२०५. तोंड शिवले जाणे – एक शब्दही न बोलणे. तोंड शेणासारखे पडणे – (लाजिरवाणे कृत्य केल्याने) तोंड उतरणे, निस्तेज होणे, काळवंडणे. तोंड सांभाळणे – जपून बोलणे; जीभ आवरणे; मर्यादेत बोलणे. तोंड सुटणे, तोंड सोडणे, तोंड सुरू होणे; तोंडाचा तोफखाना सोडणे, तोंडाचा पट्टा सुटणे, तोंडाचा पट्टा सोडणे – अद्वातद्वा बोलणे; शिव्यांचा भडिमार करणे; जीभ मोकळी सोडणे. तोंड सोडणे – अधाशासारखे खाणे. तोंडचा गोड आणि हातचा जड – बोलण्यात गोड, पण प्रत्यक्ष पैशाची इ.मदत करण्यात मागे. तोंडचा घास काढणे, हिरावणे – अगदी आटोक्यात आलेली, जवळजवळ मिळालेली गोष्ट हिसकावली जाणे. तोंडचा घास देणे – एखाद्याला अतिशय प्रेमाने वागवणे; आपली गरज मागे सारून दुसऱ्याची गरज प्रथम भागवणे. तोंडनी भांडी करनं – निष्फळ बोलणे; निरर्थक बडबड करणे. तोंडाचा हुक्का होणे – तोंड सुकून जाणे. (व.) तोंडाची वाफ दवडणे – १. मूर्खाला उपदेश करणे. २. विश्वास न बसण्याजोगे, मूर्खपणाने बोलणे; वल्गना करणे; बाता मारणे. तोंडाचे बोळके होणे – म्हातारपणामुळे सर्व दात पडणे. तोंडाचे भदे करणे – शिवीगाळ करणे. तोंडाचे माडे करणे – थाप्पा मारणे. तोंडात जडणे – थोबाडीत, गालात बसणे. तोंडात तीळ न भिजणे; तीळभर न राहणे – अगदी क्षुद्र अशी गुप्त गोष्टही पोटात न ठरणे, न सांगता न राहवणे. तोंडात तोंड घालणे – १. प्रेम, मैत्री इ. भावांनी वागणे; मोठ्या प्रेमाचा आव आणणे. २. परस्परांचे चुंबन घेणे. तोंडात बोट घालणे – आश्चर्यचकित, थक्क, विस्मित होणे. तोंडात, भडकावणे, देणे – थोबाडीत, चपराक, गालात मारणे. तोंडात माती घालणे – खायला अन्न नसणे; अतिशय हाल, कष्ट सोसावे लागणे. तोंडात माती पडणे, जाणे – १. एखाद्याची उपासमार होणे. २. मरणे. तोंडात मारणे, मारून घेणे – १. पराभूत होणे; हार जाणे. २. फजिती झाल्यानंतर शहाणपणा शिकणे; नुकसान सोसून धडा शिकणे. तोंडात शेण, साखर घालणे – फजिती करणे; नावे ठेवणे : ‘सावित्रीबाईंच्या तोंडात लोक जेव्हां फारच साखर घालीत, तेव्हा तिने दोन–तीन जुनेरी एकत्र शिवून जानकीबाईंना द्यावी.’ – रंगराव. तोंडात साखर असणे – एखाद्याचे तोंड म्हणजे वाणी, बोलणे गोड असणे. (गो.) तोंडात साखर पडणे – आनंदाचा प्रसंग, दिवस येणे. तोंडातून ब्र काढणे – अधिक–उणे अक्षर काढणे, उच्चारणे. नकारात्मक उपयोग. तोंडाने पाप भरणे, तोंडे पाप घेणे – लोकांची पापे, त्यांचे दोष बोलून दाखवणे; वाईट बोलण्याची हौस यथेच्छ पुरवून घेणे; लोकांची पापे उच्चारून जिव्हा विटाळणे : ‘कैसीं वो मानुसें । सपाइनि परंवंसें । तोंडे पाप घेती कांइसें । वायां वीण ।’ – शिव २१६. तोंडापुरता मांडा – (भूक भागेल एवढीच पोळी) जेमतेम गरज भागेल एवढाच जरूर त्या वस्तूचा पुरवठा. तोंडाम्हा मुतनं – गरजेला, संकटात मदतीस न येणे. (अहि.) तोंडार पडप – १. वैधव्य प्राप्त होणे. २. लाजेने तोंड लपवण्याजोगी स्थिती येणे. तोंडार मारप – एखाद्याच्या पदरात चूक बांधणे; वरमण्यासारखे उत्तर देणे. (गो.) तोंडार ल्हायो उडप – (तोंडात लाह्या फुटणे) फार जलद, अस्खलित बोलणे. तोंडाला काळोखी आणणे, फासणे, लावणे – बेअब्रु, नापत करणे. तोंडाला टाकी दिलेली असणे – देवीच्या खोल वणांनी तोंड भरलेले असणे. तोंडाला पाणी सुटणे – एखादी वस्तू पाहून तिच्यासंबंधी मोह उत्पन्न होणे; हाव सुटणे. तोंडाला पाने पुसणे – फसवणे; चकवणे; छकवणे; भोळसावणे; भोंदणे. तोंडाला फाटा फुटणे – मूळ मुद्दा सोडून भलतेच, हवे तसे, अमर्याद बोलत सुटणे. तोंडावर तुकडा टाकणे – एखाद्याने गप्प बसावे, प्रतिकूल बोलू नये म्हणून त्याला काहीतरी देणे. तोंड तोंडावर, तोंडाला तोंड देणे – १. विरोध करणे; विरुद्ध बोलणे. २. उद्धटपणाने, अविनयाने, दांडगेपणाने प्रत्युत्तर देणे. तोंडावर, तोंडाला तोंड पडणे – दोघांची गाठ पडून बोलाचाल, वाद होणे. तोंडावर थुंकणे – एखाद्याची छीः थू, निर्भर्त्सना, धिक्कार करणे. तोंडावर नक्षत्र पडणे – (एखाद्याने) तोंडाळपणा करणे; शिवराळ असणे; नेहमी अपशब्दांनी तोंड भरलेले असणे. तोंडावर मारणे – पराभूत करणे. तोंडावर सांगणे, बोलणे – एखाद्याच्या समक्ष निर्भीडपणे खरे सांगणे. तोंडावर, तोंडावरून हात फिरवणे – गोड बोलून, फूस लावून, भूलथाप देऊन फसवणे; भोंदणे. तोंडाशी तोंड देणे – हलक्या दर्जाच्या व्यक्तीने वरिष्ठांशी आपला दर्जा विसरून, बरोबरीच्या नात्याने, अविनयाने बोलणे, वागणे. तोंडास काळोखी, काजळी लागणे, लावणे – बेअब्रू, नाचक्की, दुष्कीर्ती होणे; नावाला कलंक, बट्टा लागणे. तोंडास कुत्रे बांधलेले असणे – ताळतंत्र सोडून, अद्वातद्वा, अपशब्द बोलणे; शिव्या देणे. तोंडास खीळ घालणे – निग्रहपूर्वक, हट्टाने मौन धरणे. तोंडास तोंड न दिसणे – तोंड न ओळखता येण्याइतका अंधार असणे. तोंडास येईल ते बोलणे, तोंडाला फाटा फुटणे – वाट्टेल तसे बोलणे. तोंडास, तोंडाला, तोंडी लागणे – उलट उत्तरे देणे; हुज्जत घालणे; वादविवादाला तयार होणे. तोंडास हळद लागणे – एखाद्याला दोष देणे; नापसंती दर्शवणे. तोंडासारखे बोलणे – एखाद्याची स्तुती, खुशामत करण्यासाठी त्याच्या म्हणण्याची री ओढणे; आपल्या फायद्यासाठी दुसऱ्याचे मन न दुखावेल असे बोलणे. तोंडी आणणे, देणे – रोग्याला लाळ गळण्याचे, तोंड येण्याचे औषध देऊन तोंड आणणे. तोंडी काढणे – १. ओकारी, वांती होणे. २. (एखाद्याला त्याने) केलेले उपकार बोलून दाखवून टोमणा मारणे. तोंडी खीळ पडणे – तोंड बंद होणे; गप्प बसायला भाग पडणे. तोंडी घास येणे – एखाद्याला घासभर अन्न मिळणे; चरितार्थाचे साधन मिळणे; पोटापाण्याची व्यवस्था होणे. तोंडी तीळ न भिजणे – १. (तापाने, संतापून ओरडण्याने, रडण्याने) तोंड कोरडे पडणे. २. एखादी गुप्त गोष्ट मनात न ठेवणे, बोलून टाकणे. तोंडी देणे – एखाद्याला एखाद्या माणसाच्या, कठीण कार्याच्या झपाट्यात, तडाख्यात, तावडीत हाल, दुःख सोसायला लोटणे, पुढे करणे. तोंडी बसणे – श्लोक, शब्द इ. स्पष्ट, अचूक म्हणता येण्याइतका पाठ होणे. तोंडी येऊन बुडणे, नासणे – एखादी वस्तू, पीक, काम इ. अगदी पूर्णावस्थेला येऊन नाहीसे होणे. तोंडी येणे – १. (पारा इ. औषधाने) तोंड येणे. २. पूर्णावस्थेत, ऐन भरात येणे. तोंडी रक्त लागणे – १. वाघ इ. हिंस्त्र प्राण्यांच्या तोंडाला माणसाच्या रक्ताची चटक लागून ते माणसावर टपून बसणे. २. लाच खाण्याची चटक लागणे. तोंडी लागणे – १. खाद्याची चव प्रथमच कळून त्याची चटक, गोडी लागणे; आवड उत्पन्न होणे. २. (युद्ध, भांडण इ. मध्ये) आणीबाणीच्या ठिकाणी आघाडीला असणे. ३. पहा : तोंडाला तोंड देणे. ४. पहा : तोंडास लागणे. तोंडी लावणे – १. जेवताना भाजी, चटणी इ. चमचमीत पदार्थाने रुचिपालट करणे. २. विसारादाखल पैसे देणे. तोंडे वाकडी करणे – वेडावणे; वेडावून दाखवणे. लहान तोंडी मोठा घास घेणे – १. आपल्या आवाक्याबाहेरचे काम हाती घेणे. २. वडीलधाऱ्या माणसांसमोर न शोभेल असे, मर्यादा सोडून, बेअदबीने बोलणे; मोठ्या माणसाला शहाणपण शिकवणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तोंड

न. १ ज्यानें खातां वं बोलतां येतें तो शरीराचा अव- यव; मुख; वदन; तुंड. २ चेहरा; हनुवटीपासून डोक्यापर्यंत मस्तकाचा दर्शनी भाग. ३ (सामा.) (एखाद्या वस्तूचा) दर्शनी भाग; पुढचा-अग्रभाग; समोरील अंग. 'या ओझ्याच्या तोंडीं मात्र चांगल्या चांगल्या पेंढ्या घातल्या आहेत.' ४ (फोड, गळूं इ॰ कांचा) छिद्र पडावयाजोगा, छिद्रासारखा भाग; व्रणाचें मुख. यांतूनच पुढें पू, लस इ॰ वाहतात. ५ (कुपी, तपेली, लोटी इ॰ कांचें) पदार्थ आंत घालावयाचें भोंक; द्वार; मार्ग; मुख. ६ (एखाद्या विषयांत, शास्त्रांत, गांवांत, देशांत, घरांत) शिरकाव होण्याचा मार्ग; प्रवेशद्वार. 'ह्या घराचें तोंड उत्तरेस आहे.' ७ (ल.) गुरुकिल्ली. उदा॰ 'एखाद्या प्रांताचें, देशाचें किल्ला हें तोंड होय.' 'व्याकरण भाषेचें तोंड होय.' ८ (वारा इ॰कांची) दिशा; बाजू. ९ धैर्य; दम; उमेद; एखादें कार्य करण्याविषयींची न्यायतः योग्यता. १० एखाद्या पदार्थाचें ग्रहण किंवा त्या पदार्थाचा एखाद्या कर्याकडे विनियोग इ॰ कांचा आरंभ त्या पदार्थाच्या ज्या भागाकडून करि- तात तो भाग. 'भाकरीस जिकडून म्हटलें तिकडून तोंड आहे.' ११ (युद्ध, वादविवाद इ॰कांसारख्या गोष्टींची) प्रारंभदशा. 'वादास आतां कुठें तोंड लागलें.' १२ (सोनारी धंदा) हातोड्याच्या सगळ्यांत खालच्या बाजूस अडिश्रीच्या बुडासारखा जो भाग असतो तो. यानें ठोकलेला जिन्नस सारखा करून घेतात. १३ (सोनारी धंदा) कांबीस गोल आकार देतांनां तिचीं टोंकें जेथें जुळतात तो भाग. १४ (बुद्धिबळें) डाव सुरू करण्याचा प्रकार; मोहरा. 'वजीराच्या प्याद्याचें तोंड.' [सं. तुंड; प्रा. तोंड] (वाप्र.) ॰आटोपणें, सांभाळणें, आवरणें-जपून बोलणें; बोलण्याला आळा घालणें; अमर्याद भाषण, अभक्ष्यभक्षण यांपासून निवृत्त होणें. ॰आणणें- (आट्यापाट्यांचा खेळ) शेवटची पाटी खेळून जाऊन पुन्हां एक एक खेळत येणें; पाणी आणणें; लोण आणणें. ॰आंबट करणें- (एखाद्यानें) असंतुष्ट, निराशायुक्त मुद्रा धारण करणें. तोंड आहे कीं तोबरा-खादाड किंवा बडबड्या माणसास उद्देशून वापरावयाचा, 'किती खातोस' 'किती बोलतोस' या अर्थाचा वाक्प्रचार. ॰उतरणें-(निराशा, आजार इ॰ कांनीं) चेहरा म्लान होणें, सुकणें, फिका पडणें, निस्तेज होणें. ॰उष्टें करणें-(अन्नाचा) एखादा-दुसरा घांस, एक दोन घांस खाणें; जेवणाचें नुसतें नांव करणें. ॰करणें-बडबड, वटवट, बकबक करणें; उद्धटपणानें, निर्लज्ज- पणानें बोलणें. ॰करून बोलणें-निर्लज्जपणें, आपला (लहान) दर्जा सोडून बोलणें. ॰काळें करणें-(उप.) एखादा ठपका, तोहमत अंगावर आल्यामुळें निघून, पळून, निसटून जाणें; हातावर तुरी देणें; दृष्टीस न पडणें (केव्हां केव्हां तोंड हा शब्द वगळला तरी चालतो. जसें:-त्यांनीं काळें केलें). ॰गोड करणें-१ (एखाद्याला) लांच देणें; खूष करणें. २ मेजवानी देणें; गोड खावयास घालणें. ॰गोरेंमोरें करणें-(कोणी रागें भरल्यामुळें, मनास वाईट वाटल्यामुळें) निराशेची, लाजलेपणाची मुद्रा धारण करणें. ॰घालणें-(दोघे बोलत असतां तिसर्‍यानें) संबंध नसतां मध्येंच बोलणें. ॰घेऊन येणें-एखाद्यानें एखाद्यावर सोंपविलेलें काम न करतां त्यानें तसेंच परत येणें. 'असें सर्वांनीं न करावें. जो मामलेदार असें करून तोंड घेऊन येईल त्याचें मुखावलोकन न करितां फिरोन सेवा न सांगतां त्यास घरींच बसवावें.' -मराआ २९. ॰घेणें-१ बोंबलत सुटणें; ताशेरा झाडणें; बोंबलपट्टी करणें. २ तोंडांतून लाल गळावी म्हणून पारा इ॰ तोंड आणणारीं औषधें घेणें. तोंड देणें पहा. 'मी वैद्याकडून तोंड घेतलें आहें.' तोंडचा-वि. १ विरुद्ध, उलट दिशेचा; समोरून येणारा (वारा, ऊन, भरती इ॰). २ ज्याची कर्तबगारी केवळ तोंडांतच, बोल- ण्यांतच आहे, क्रियेंत दिसून येत नाहीं असा. 'तोंडचा शिपाई- कारकून-सुग्रण-खबरदार.' ३ तोंडानें सांगितलेला, निवेदन केलेला; तोंडीं केलेला (व्यवहार, हिशेब, पुरावा इ॰). याच्या उलट लेखी. तोंडचा, तोंडींचा घास काढणें-हिरून घेणें-१ (एखा- द्याची) अगदीं आटोक्यांत आलेली वस्तु, पदरीं पडावयास आलेला लाभ हिसकावून घेणें. २ (एखाद्याच्या) अन्नावर पाणी पाडणें; अन्नांत माती कालविणें; पोटावर पाय देणें. तोंडचा-तोंडींचा घांस देणें-(ल.) (एखाद्यास) अतिशय प्रेमानें, ममतेनें वाग- विणें; प्रसंगविशेषीं आपण उपाशी राहून दुसर्‍यास खावयास देणें. तोंडचा गोड आणि हातचा जड-बोलण्यांत गोड व अघळ- पघळ, पण प्रत्यक्ष पैशाची मदत करण्यांत पूज्य. तोंडचा चतुर- वि. बोलण्यांत पटाईत; वाक्पटु. तोंडचा जार-पु. नुकत्याच जन्मलेल्या मुलाच्या तोंडांतील फेंस; चिकटा; ओंठावरचा जार; जन्मप्रसंगींचा तोंडावरचा पातळ पापुद्रा (विशेषतः तुझ्या, त्याच्या तोंडाचा जार वाळला नाहीं. = तूं, तो अजून केवळ बालक आहेस.' अशा वाक्यांत उपयोग). तोंडचा नीट-वि. १ बोलून भला, चांगला; बोलकाचालका; सौजन्ययुक्त. २ युक्तायुक्त विचार करून बोलणारा. ३ हजरजबाबी; अस्खलित बोलणारा. तोंडचा फटकळ-वि. शिवराळ; उघडतोंड्या; अश्लील, शिवराळ भाषण करणारा. तोंडचा रागीट-वि. जहाल; तिखट; कडक भाषण करणारा. तोंडचा शिनळ-वि. १ इष्कबाज, फंदी म्हणून नांव मिळविण्याची इच्छा करणारा; स्त्रियांची खोटी खुषमस्करी करणारा; स्त्रियांच्या कृपेची खोटीच फुशारकी मारणारा. २ निरर्गल व अश्लील भाषण करणारा; शिवराळ. तोंड(डा)ची गोष्ट-स्त्री. सहजसाध्य, अतिशय सोपी गोष्ट, काम. 'वाघ मारणें तोंडची गोष्ट नव्हे.' तोंड चुकविणें-हातून एखादा अपराध घडला असतां कोणी रागें भरेल या भीतीनें, काम वगैरे टाळण्यासाठीं चुकारतट्टू- पणानें एखाद्यापासून आपलें तोंड लपविणें; दृष्टीस न पडणें; छपून असणें. ॰चे तोंडीं-क्रिवि. प्रत्यक्षाप्रत्यक्ष; तोंडानें; बोला- चालीनें. ॰चे तोंडीं व्यवहार-केवळ तोंडानें बोलून, बोलाचा- लीनें झालेला, होणारा व्यवहार, धंदा. याच्या उलट लेखी व्यव- हार. ॰चें पायचें-न. (कों.) गुरांच्या तोंडास व पायांस होणारा रोग. ॰चे हिशेब-पुअव. कागदांवर आंकडेमोड न करितांमनां- तल्यामनांत कांहीं आडाख्यांच्या; मदतीनें करावयाचे हिशेब. तोंडचें तोंडावरचें पाणी पळणें; उडणें, तोंड कोरडें पडणें-१ (भीतीमुळें) चेहरा फिका पडणें; बावरून,घाबरून जाणें. २ (भीति इ॰ कांमुळें) तोंडांतील ओलावा नाहींसा होणें. तोंड टाकणें-टाकून बोलणें-१ (क्रोधावेशानें) अप शब्दांचा वर्षाव करणें; निर्भर्त्सना करून बोलणें; खरडपट्टी काढणें; अद्वातद्वा बोलणें. 'तूं नोकर-माणसांवर उगीच तोंड टाकलेंस.' २ (घोडा इ॰ जनावरानें) चावण्यासाठीं तोंड पुढें करणें. 'ह्या घोड्याला तोंड टाकण्याची भारी खोड आहे, ती घालविली पाहिजे.' ॰ठेचणारा-फाडणारा-वि. (एखाद्या) उद्धट, बडबड्या माण- सास गप्प बसविण्याची हातोटी ज्यास साधली आहे असा; उद्दामपणानें, गर्वानें बोलणार्‍या व्यक्तीस रोखठोक उत्तर देऊन चूप बसविणारा. [तोंड + ठेचणें] ॰तोडणें-(ना.) एखादी वस्तु मिळ- विण्याकरितां एखाद्याच्या पाठीस लागणें; त्याच्यापुढें तोंड वेंगा- डणें. ॰दाबणें-लांचलुचपत देऊन (एखाद्याचें) तोंड बंद करणें; (एखाद्यास) वश करणें; गप्प करणें. ॰दाबणारा-वि. लांच देऊन (एखाद्या) प्रतिकूल व्यक्तीस वळविणारा; गप्प बसविणारा. [तोंड + दाबणें = बंद करणें] ॰दाबी-स्त्री. (एखाद्यानें) गुप्त बातमी फोडूं नये म्हणून, प्रतिकूल बोलूं नये म्हणून (त्यास) लांच देऊन त्याचें तोंड दाबण्याची, वश करण्याची क्रिया. 'तो गांवकाम- गारांची तोंडदाबी करतो.' -गुजा २१. [तोंड + दाबणें = बंद करणें] ॰दिसणें-एखाद्याची केलेली निर्त्भर्त्सना दुसरी बाजू न कळतां लोकांच्या नजरेस येणें व आपणच वाईट ठरणें (पण ज्याची निर्भर्त्सना केली असेल त्याचें वर्तन सुधारण्याची आशा नसणें ). 'मी तुला रागें भरलों म्हणजे माझें तोंड मात्र दिसेल, पण तूं आपला आहे तसाच राहणार.' ॰देणें- १ पारा वगैरे देऊन तोंडाच्या आंतील त्वचा सुजविण; तोंड आणविणें. 'वैद्य- बोवा म्हणाले कीं त्याला तोंड दिलें आहे.' २ सैन्याच्या अग्रभागीं राहून शत्रूवर हल्ला करणें. ३ (एखाद्याचा) प्रतिपक्षी होऊन राहणें; लढावयाला सिद्ध होणें. ४ (आट्यापाट्यांचा खेळ शेवटची पाटी खेळून परत येणार्‍या गड्याकडे पाटी धरणारानें तोंड फिरविणें. ५ एखाद्या गोष्टीला न भितां तींतून धैर्यानें पार पडण्याची तयारी ठेवणें. ॰धरणें-१ अन्नसेवन करण्याची तोंडाची शक्ति आजार वगैरे कारणांमुळें नाहींशी होणें. 'त्याचें तोंड धरलें आहे, त्याला चमच्याचमच्यानें दुध पाजावें लागतें.' २ (एखा- द्याची) बोलण्याची शक्ति नाहींशी करणें. ३ (एखाद्याला आपल्या) तावडींत, कबजांत आणणें. 'मी त्याचें तोंड धरलें आहे, तो आतां काय करणार !' ॰धुवून येणें-(उप.) एखाद्याची विनंति कधींहि मान्य होणार नाहीं असें म्हणून फेटाळून लावतांना योजण्याचा तिरस्कारदर्शक वाक्प्रचार. ॰निपटणें-(आजार, उपवास इ॰ कारणांमुळें एखाद्याचे) गाल खोल जाणें, चेहरा सुकणें. 'महिनाभर हें मूल तापानें आजारी होतें, त्याचें तोंड पहा कसें निपटलें आहे तें.' ॰पडणें-१ सुरवात होणें. 'लढाईस तोंड पडलें.' २ (गळूं इ॰ कांस) छिद्र पडणें; फुटणें; वाहूं लागणें. ॰पसरणें-वेंगाडणें-१ खिन्नपणाची, केविलवाणी मुद्रा धारण करणें. २ हिनदीनपणानें याचना करणें. ॰पाघळणें-१ न बोला- वयाची गोष्ट कोणाएकापाशीं बोलून टाकणें; बडबडणें. २ (ल.) गुप्त गोष्ट बाहेर फोडणें, फुटूं देणें. ॰पाडणें-एखादें कोडें सोड- विण्यास, वेढा फोडण्यास प्रारंभ करणें; भांडणास सुरवात करणें. ॰पाहणें-१ (एखाद्याच्या) आश्रयाची, मदतीची अपेक्षा करून असणें. 'आम्ही पडलों गरीब, म्हणून आम्हांला सावकाराचीं तोंडें पाहण्याची पाळी वारंवार येते.' २ (एखाद्यानें) स्वतःच्या शक्तीचा, कर्तुत्वाचा अजमास करणें. 'तूं असें करीन म्हणतोस, पण आधीं आपलें तोंड पहा !' ३ बोलणाराचें भाषण नुसतें ऐकणें, पण त्यानें सांगितलेलें करावयास किंवा केलेला बोध अनु- सरावयास प्रवृत्त न होतां स्वस्थ बसून राहणें. 'म्हणती हाणा, मारा, पाडा, घ्या, काय पाहतां तोंडा ।' -मोद्रोण ३.१२५. ॰पाहात-बसणें-काय करावें, कसें करावें या विवंचनेंत असणें. ॰पिटणें-बडबड करणें. 'पश्चिमद्वारींचें कवाड । सदा वार्‍यानें करी खडखड । तैशी न करी बडबड । वृथा तोंड पिटीना ।' -एभा १०.२३१. ॰फिरणें-१ आजारानें, पदार्थाच्या अधिक सेवनानें तोंडाची रुची नाहींशी होणें; तोंड वाईट होणें. २ तोंडांतून शिव्यांचा वर्षाव होऊं लागणें. 'तो रागावला म्हणजे कोणावर त्याचें तोंड फिरेल ह्याचा नेम नाहीं.' ॰फिरविणें-१ तोंडाची चव नाहींशी करणें. २ शिव्यांचा वर्षाव करीत सुटणें. 'तो रागावला म्हणजे तुमच्यावर देखील तोंड फिरवावयाला कचर- णार नाहीं.' ३ वितळत असलेला किंवा तापविला जात अस- लेला धातु इ॰ कानें) रंगामध्यें फरक दाखविणें, रंग पाल- टणें. 'ह्या तांब्यानें अद्याप तोंड फिरविलें नाहीं, आणखी पुष्कळ आंच दिली पाहिजे.' ४ दुसर्‍याकडे पाहणें; विशिष्ट गोष्टी- कडे लक्ष्य न देतां इतर गोष्टींकडे प्रवृत्ति दाखविणें. ५ गतीची दिशा बदलणें; दुसर्‍या दिशेला, माघारें वळणें. ॰फुटणें-१ थंडीमुळें तोंडाची बाह्य त्वचा खरखरीत होणें, भेगलणें. २ (एखाद्याची) फजिती उडणें; पत नाहींशी होणें; नाचक्की होणें; अभिमान गलित होण्याजोगा अपमान, शिक्षा इत्यादि होणें. ॰बंद करणें-१ जीभ आवरणें; जपून बोलणें. २ (एखाद्याला) लांच देऊन गप्प बसविणें, वश करून घेणें. ॰बंदावर राखणें- खाण्याला किंवा बोलण्याला आळा घालणें. 'तूं आपलें तोंड बंदावर राखिलें नाहींस तर अजीर्णानें आजारी पडशील.' ॰बांधणें-लांच देऊन (एखाद्याचे) तोंड बंद करणें; (एखाद्यानें) गुप्त गोष्ट फोडूं नये म्हणून पैसे देऊन त्यास गप्प बसविणें. ॰बाहेर काढणें-१ तोंड दाखविणें; राजरोसपणें समाजांत हिंडणें (बहुधां निषेधार्थी प्रयोग). 'तुरुंगांतून सुटून आल्यावर त्यानें आज दोन वर्षांत एकदांहि तोंड बाहेर काढलें नाहीं.' २ फिरण्यासाठीं, कामकाजासाठीं घराबाहेर पडणें. ॰बिघडणें-तोंड बेचव होणें; तोंडास अरुचि उत्पन्न होणें. विटणें. -॰भर-भरून बोलणें- भीड, संकोच, भीति न धरतां मनमोकळेपणानें भरपूर, अघळपघळ बोलणें; दुसर्‍याचें आणि आपलें समाधान व्हावयाजोगें अघळपघळ बोलणें. ॰भरून साखर घालणें-(एखाद्याचें) तोंड साखरेनें भरणें; (एखाद्याच्या) कामगिरीबद्दल, विजयाबद्दल संतोषादाखल त्याचें तोंड साखरेनें भरणें; (एखाद्याच्या) कामगिरीबद्दल गोड, भरपूर मोबदला देणें. ॰मागणें-(आट्यापाट्यांचा खेळ) लोण घेऊन परत जातांना पाटीवरील गड्यास आपणाकडे तोंड फिर- विण्यास सांगणें. तोंड मागितल्यावर पाटीवरील गडी आपलें तोंड फिरवितो त्यास 'तोंड देणें' म्हणतात. ॰माजणें-१ मिष्टान्न खावयाची चटक लागल्यानें साध्या पदार्थाबद्दल अरुचि उत्पन्न होणें. २ शिव्या देण्याची, फटकळपणानें बोलण्याची खोड लागणें. ॰मातीसारखें-शेणासारखें होणें-(आजारानें) तोंडाची चव नाहींशी होणें; तोंड विटणें, फिरणें; अन्नद्वेष होणें. ॰मिचकणें- दांत, ओंठ खाणें. ॰येणें-१ तोंडाच्या आंतल्या बाजूच्या त्वचेस फोड येऊन ती हुळहुळी होणें व लाळ गळूं लागणें. २ (कर.) लहान मूल बोलूं लागणें. 'आमच्या मुलाला तोंड आलें आहे.' = तो बोलावयास लागला आहे. ॰रंगविणें-१ विडा खाऊन ओंठ तांबडे लाल करून घेणें. २ (ल.) (एखाद्याचें थोबाड) थोबाडींत मारून लाल- भडक करून सोडणें. ॰लागणें-(लढाई, वादविवाद, अंगीकृत कार्य इ॰ कांस) सुरवात होणें. 'तेव्हां युद्धास तोंड लागलें.' -इमं २९०. ॰लावणें-१ (वादविवाद इ॰ कांस) सुरवात करणें. २ प्यावया- साठीं एखादें पेय ओंठाशीं नेणें. ३ ॰वाईट करणें-निराशेची मुद्रा धारण करणें. ॰वाईट होणें-१ तोंडावर निराशेची मुद्रा येणें. २ (ताप इ॰ कांमुळें) तोंडास अरुचि येणें. ॰वांकडें करणें-१ वेडावून दाखविणें. २ नापसंती दर्शविणें. ॰वाजविणें-एकसारखें बोलत सुटणें; निरर्थक बडबड करणें; बकबकणें; वटवट करणें; भांडण करणें. ॰वासणें-१ निराशेनें, दुःखानें तोंड उघडणें व तें बराच वेळ तसेंच ठेवणें. २ याचना करण्यासाठीं तोंड उघडणें, वेंगाडणें. ॰वासून पडणें-शक्तीच्या क्षीणतेमुळें, उत्साह, तेज, वगैरे नष्ट झाल्यामुळें, गतप्राण झाल्यामुळें आ पसरून पडणें. 'तो पडला सिंहनिहमत्तद्विपसाचि तोंड वासून ।' -मोगदा ५.२५. ॰वासून बोलणें-अविचारानें बोलणें. 'ऐसें स्वसख्यांपासीं कां गे वदलीस तोंड वासून ।' -मोउद्योग १३.२०५. ॰विचकणें-दीन मुद्रेनें आणि केविलवाण्या स्वरानें याचना करणें. ॰वेटा(डा)विणें- (काव्य) (एखाद्यास) वेडावून दाखविण्यासाठीं त्याच्यापुढें तोंड वेडेंवाकडें करणें. ॰शेणासारखें पडणें-(लाजिरवाणें कृत्य केल्यानें) तोंड उतरणें; निस्तेज होणें; काळवंडणें. ॰संभाळणें- जपून बोलणें; जीभ आवरणें; भलते सलते शब्द तोंडांतून बाहेर पडूं न देणें; अमर्याद बोलण्यास आळा घालणें. ॰सुटणें- चरांचरां, फडाफडां, अद्वातद्वा बोलूं लागणें. ॰सुरू होणें-बड- बडीला, शिव्यांना सुरवात होणें. ॰सोडणें-१ फडांफडां, अद्वातद्वा बोलूं लागणें; अमर्याद बोलणें. २ आधाशासारखें खात सुटणें; तोंड मोकळें सोडणें. ॰हातीं-हातावर धरणें-तोंडे सोडणें (दोन्ही अर्थीं) पहा. तोंडाचा खट्याळ-फटकळ-फटकाळ-फटकूळ-वाईट-शिनळ-वि. शिवराळ; तोंडाळ; अश्लील बोलणारा. तोंडाचा खबरदार-बहादर-बळकट-वि. बोलण्यांत चतुर, हुषार; बोलण्याची हातोटी ज्याला साधली आहे असा. -तोंडाचा गयाळ, तोंडगयाळ-वि. जिभेचा हलका; चुर- चोंबडा; लुतरा; बडबड्या; ज्याच्या तोंडीं तीळ भिजत नाहीं असा. तोंडाचा गोड-वि. गोड बोलणारा; गोडबोल्या. म्ह॰ तोंडचा गोड हाताचा जड = गोड व अघळपघळ भाषण करणारा पण प्रत्यक्ष कांहींहि मदत, पैसा न देणारा. तोंडाचा जड-वि. रेंगत बोलणारा; फार थोडें बोलणारा; अस्पष्ट भाषण करणारा; तोंडाचा तिखट-वि. खरमरीत, स्पष्ट, झोंबणारें, कठोर भाषण करणारा. तोंडाचा तोफखाना सुटणें-(एखाद्याची) अद्वातद्वा बोल- ण्याची क्रिया सुरू होणें; शिव्यांचा वर्षाव होऊं लागणें. तोंडाचा पट्टा सुटणें-चालणें-अद्वातद्वा बोलणें; शिव्यांचा भडिमार सुरू होणें; तोंडाचा पट्टा सोडणें-(एखाद्यानें) शिव्यांचा भडिमार सुरू करणें; जीभ मोकळी सोडणें; (एखाद्याची) खरडपट्टी आरंभिणें. तोंडाचा पालट-पु. रुचिपालट; तोंडास रुचि येईल असा अन्नांत केलेला फेरबदल; अन्नांतील, खाण्यांतील फरक, बदल. तोंडाचा बोबडा-वि. बोबडें बोलणारा; तोतरा. तोंडाचा मिठा-वि. गोडबोल्या; तोंडाचा गोड पहा. तोंडाचा हलका- वि. चुरचोंबडा; भडभड्या; विचार न करितां बोलणारा; फटकळ. तोंडाचा हुक्का होणें-(व.) तोंड सुकून जाणें. तोंडाची चुंबळ-स्त्री. दुसर्‍यास वेडावून दाखविण्याकरितां चुंबळीसारखी केलेली ओठांची रचना; वांकडें तोंड. तोंडाची वाफ दघडणें- १ मूर्खास उपदेश करतांना, निरर्थक, निरुपयोगी, निष्फळ भाषण करणें. २ ज्यावर विश्वास बसणार नाहीं असें भाषण करणें; मूर्खपणानें बोलणें; वल्गना करणें; बाता मारणें. (या वाक्प्रचारांत दवडणें बद्दल खरचणें गमविणें, फुकट जाणें, घालविणें, काढणें इ॰ क्रियापदेंहि योजतात). तोंडाचें बोळकें होणें-(म्हातारपणामुळें) तोंडां- तील सर्व दांत पडणें. तोंडाचें सुख-न. तोंडसुख पहा. (वरील सर्व वाक्प्रचारांत तोंडाचा या शब्दाऐवजीं तोंडचा हा शब्दहि वापरतात). तोंडांत खाणें, मारून घेणें-१ गालांत चपराक खाणें; मार मिळणें. २ पराभूत होणें; हार जाणें. ३ फजिती झाल्या- नंतर शहाणपणा शिकणें; नुकसान सोसून धडा शिकणें; बोध मिळविणें. तोंडांत जडणें-थोबाडींत, गालांत बसणें (चपराक, थप्पड इ॰). तोंडांत तीळभर न राहणें-अगदीं क्षुद्र अशी गुप्त गोष्टहि पोटांत न ठरणें; कोणतीहि लहानसहान गोष्ट गुप्त ठेवूं न शकणें. तोंडांत तोंड घालणें-१ (ल.) प्रेम, मैत्री इ॰कांच्या भावानें वागणें; मोठ्या प्रेमाचा, मित्रपणाचा आविर्भाव आणून वागणें. २ एकमेकांचें चुंबन घेणें. तोंडांत देणें-(एखाद्याच्या) थोबाडींत मारणें; गालांत चपराक मारणें; तोंडांत बोट घालणें-(ल.) आश्चर्यचकित, थक्क होणें; विस्मय पावणें. तोंडांत भडकावणें-तोंडांत देणें पहा. तोंडांत माती घालणें-खाण्यास अन्न नसणें; अतिशय हाल, कष्ट सोसावे लागणें. तोंडांत माती पडणें-१ (एखाद्याची) उपा समार होणें. २ मरणें. तोंडात शेण घालणें-(एखाद्याची) फजिती करणें; (एखाद्यास) नांवें ठेवणें; खरडपट्टी काढणें. तोंडांत साखर असणें-(गो.) (एखाद्याचें) तोंड, वाणी गोड असणें; गोड बोलत असणें. तोंडांत साखर घालणें-१ तोंड भरून साखर घालणें पहा. २ (उप.) तोंडांत शेण घालणें. 'सावित्री- बाईच्या तोंडांत लोक जेव्हां फारच साखर घालीत, तेव्हां तिनें दोन तीन जुनेरीं एकत्र शिवून जानकीबाईला द्यावी.' -रंगराव. तोंडांत साखर पडणें-(एखाद्याला) आनंदाचा प्रसंग, दिवस येणें. तोंडांतून ब्र काढणें-(तोंडांतून) अधिक-उणें अक्षर काढणें, उच्चारणें. 'आंतल्याआंत चूर होऊन मेलें पाहिजे, तोंडां- तून ब्र काढण्याची सोय नाहीं.' -विकारविलसित. तोंडानें पाप भरणें, तोंडें पाप घेणें-लोकांचीं पातकें उच्चारणें; लोकांचे दोष बोलून दाखविणें; वाईट बोलण्याची हौस यथेच्छ पुरवून घेणें; लोकांचीं पापें उच्चारून जिव्हा विटाळणें. 'कैसीं वो मानुसें । सपाइनि परंवंसें । तोंडे पाप घेती कांइसें । वायां वीण ।' -शिशु २१६. तोंडापुढें-क्रिवि. अगदीं जिव्हाग्रीं; मुखोद्गत. तोंडा- पुरता, तोंडावर गोड-वि. मधुर पण खोटें बोलणारा; दुतोंड्या; वरवर गोड बोलणारा व आंतून कपटी असलेला; उघडपणें प्रिय भाषण करणारा व मनांत निराळेच असणारा. ताडापुरता मांडा-पु. १ भूक भागेल एवढीच पोळी. २ (ल.) जेमतेम गरज भागेल एवढाच जरूर त्या वस्तूचा पुरवठा. तोंडार मारप- (गो.) (एखाद्याच्या) पदरांत चूक बांधणें; वरमण्यासारखें उत्तर देणें. तोंडार ल्हायो उडप-(गो.) फार जलद, अस्ख- लित बोलणें; लाह्या फुटणें. तोंडाला काळोखी आणणें- लावणें-बेअब्रू, नापत करणें. तोंडाला टांकी दिलेली असणें-देवीच्या खोल वणांनीं तोंड भरलेलें असणें; तोंडावर देवीचे वण फार असणें. तोंडाला पाणी सुटणें-(एखादी वस्तु पाहून तिच्यासंबंधीं) मोह उत्पन्न होणें; हांव सुटणें. तोंडाला पानें पुसणें-फसविणें; चकविणें; छकविणें; भोळसाविणें; भोंदणें; तोंडा- वरून हात फिरविणें. 'त्याच्यावर देखरेख करावयाला चार माणसें होतीं, पण त्यानें सर्वांच्या तोंडाला पानें पुसून आपला डाव साधला.' तोंडाला फांटा फुटणें-मूळ मुद्दा सोडून भलतेंच बोलत सुटणें; हवें तसें अमर्याद भाषण करूं लागणें. तोंडावर-क्रिवि. १ समक्ष; डोळ्यांदेखत. २ (ल.) निर्भयपणें; भीड न धरतां. 'मी त्याच्या तोंडावर त्याला लुच्चा म्हणण्यास भिणार नाहीं.' तोंडावर तुकडा टाकणें-(एखाद्यानें) गप्प बसावें, प्रतिकूल बोलूं नये म्हणून त्याला थोडेसें कांहीं देणें. तोंडावर-ला-तोंड देणें-१ (एखाद्यास) विरोध करणें; विरुद्ध बोलणें. २ (एखाद्यास) उद्धटपणानें, अविनयानें, दांडगेपणानें उत्तर देणें; उत्तरास प्रत्युत्तर देणें. तोंडा- वर तोंड पडणें-दोघांची गांठ पडून संभाषण, बोलाचाल होणें. तोंडावर थुंकणें-(एखाद्याची) निर्भर्त्सना, छीःथू करणें; धिक्कार करणें. तोंडावर देणें-तोंडांत देणें पहा. 'काय भीड याची द्या कीं तोंडावरी ।' -दावि ३०२. तोंडावर नक्षत्र पडणें-(एखाद्यानें) तोंडाळपणा करणें; शिवराळ असणें; नेहमीं अपशब्दांनीं तोंड भर- लेलें असणें. 'ह्याजकरिकां तोंडावर नक्षंत्र पडलेल्या पोरास म्या बोलविलें म्हणून हे मला शब्द लावीत नाहींत.' -बाळ २.१४२. तोंडावर पडप-(गो.) थोबाडींत (चपराक) बसणें, पडणें. तोंडावर पदर येणें-१ वैधव्य प्राप्त होणें. 'तिच्या तोंडावर पदर आला म्हणून ती बाहेर पडत नाहीं.' २ लज्जेनें तोंड लपविण्या- जोगी स्थिति होणें. तोंडावर मारणें-(एखाद्याला) पराभूत करणें. तोंडावर सांगणें-बोलणें-(एखाद्याच्या) समक्ष, निर्भीडपणें, बेडरपणें सांगणें, बोलणें. तोंडावरून-तोंडावर हात फिर- विणें-(एखाद्यास) गोड बोलून, फूसलावून, भुलथाप देऊन फस- विणें; भोंदणें; छकविणें. तोंडाशीं तोंड देणें-(हलक्या दर्जाच्या व्यक्तीनें वरिष्ठाशीं) आपला दर्जा विसरून, बरोबरीच्या नात्यानें, अविनयानें बोलणें, व्यवहार करणें. तोंडास काळोखी-स्त्री. मुखसंकोच; ओशाळगत; गोंधळून गेल्याची स्थिति; बेअब्रू; कलंक. तोंडास काळोखी, काजळी लागणें-(एखाद्याची) बेअब्रू, नाचक्की होणें; दुष्कीर्ति होणें; नांवाला कलंक लागणें. तोंडास काळोखी-काजळी लावणें-(एखाद्याचें) नांव कलंकित करणें; बेअब्रू करणें. 'सुनेनें माझ्या तोंडाला काळोखी लावली.' तोंडास कुत्रें बांधलेलें असणें-ताळतंत्र सोडून, अद्वातद्वा, अपशब्द बोलणें; शिव्या देणें. 'त्यानें तर जसें तोंडाला कुत्रेंच बांधलें आहे.' तोंडास खीळ घालणें-निग्रहपूर्वक, हट्टानें मौन धारण करणें. तोंडास तोंड-न. वादविवाद; वाग्युद्ध; हमरी- तुमरी; धसाफसी. -क्रिवि. समक्षासमक्ष; समोरासमोर; प्रत्यक्ष. तोंडास तोंड देणें-१ तोंडाशीं तोंड देणें पहा. २ मार्मिकपणें, खरमरीतपणें उत्तर देणें. तोंडास पाणी सुटणें-(एखाद्या- वस्तूबद्दल, गोष्टीबद्दल) लोभ, मोह उत्पन्न होणें; तोंडाला पाणी सुटणें पहा. 'पोर्तुगीज लोकांची बढती पाहून तिकडच्या दुसर्‍या साहसी लोकांच्या तोंडास पाणी सुटलें.' -बाजी. तोंडास तोंड न दिसणें-(पहांटेस) तोंड न ओळखतां येण्याइतका अंधेर असणें (झुंजमुंजु पहाटेविषयीं वर्णन करितांना हा वाक्प्रचार योजतात). 'अद्याप चांगलें उजाडलें नाहीं, तोंडास तोंड दिसत नाहीं.' तोंडास-तोंडीं बसणें-(श्लोक, शब्द इ॰) स्पष्ट, बिन- चूक, भरभर म्हणण्याइतका पाठ होणें. 'तो श्लोक दहा वेळां पुस्तकांत पाहून म्हण, म्हणजे तो तुझ्या तोंडीं बसेल.' तोंडास येईल तें बोलणें-विचार न करितां, भरमसाटपणानें वाटेल तें बोलणें; अद्वातद्वा, अपशब्द बोलणें. तोंडास-तोंडीं लागणें- १ (एखाद्याच्या) तोंडास तोंड देणें; उलट उत्तरें देणें. २ हुज्जत घालणें; वादविवाद करण्यास तयार होणें. (एखाद्याच्या) तोंडा- समोर-क्रिवि. १ (एखाद्याच्या) समक्ष; समोर; डोळ्यांदेखत. २ अगदीं मुखोद्गत; जिव्हाग्रीं. तोंडापुढें पहा. 'हा श्लोक माझ्या अगदीं तोंडासमोर आहे.' तोंडास हळद लागणें-(एखाद्यास) दोष देणें, नापसंती दर्शविणें अशा अर्थीं हा वाक्प्रचार योजितात. तोंडासारखा-वि. (एखाद्याची) खुशामत, स्तुति इ॰ होईल अशा प्रकारचा; एखाद्याच्या खुशामतीकरितां त्याच्या मतास जुळता. तोंडासारखें बोलणें-(एखाद्याची) स्तुति, खुशामत करण्या- करितां त्याच्याच मताची, म्हणण्याची री ओढणें; त्याचें मन न दुखवेल असें बोलणें. तोंडीं आणणें-देणें-(रोग्यास) लाळ गळण्याचें, तोंड येण्याचें औषध देऊन तोंड आणणें. तोंडीं- काढणें-१ ओकारी देणें; वांती होणें. २ (एखाद्यास त्यानें) केलेले उपकार बोलून दाखवून टोमणा मारणें. तोंडीं खीळ पडणें- तोंड बंद होणें; गप्प बसणें भाग पडणें. 'अवघ्या कोल्यांचें मर्म अंडीं । धरितां तोंडीं खीळ पडे ।' तोंडीं घास येणें-(एखा- द्यास) घांसभर अन्न मिळणें; चरितार्थाचें साधन मिळणें; पोटा पाण्याची व्यवस्था होणें. तोंडीं तीळ न भिजणें-१ (तापानें, संतापून ओरडण्यानें, रडण्यानें) तोंड शुष्क होणें, कोरडें पडणें. २ एखादी गुप्त गोष्ट मनांत न राहणें, बोलून टाकणें; तोंडीं तृण धरणें-(एखाद्यानें) शरण आलों. असें कबूल करणें; शरणागत होणें; हार जाणें (दांतीं तृण धरणें असाहि प्रयोग रूढ आहे). तोंडीं देणें-(एखाद्यास एहाद्या माणसाच्या, कठिण कार्याच्या) सपाट्यांत, तडाख्यांत, जबड्यांत, तावडींत लोटणें, देणें; हाल, दुःख सोसण्यास (एखाद्यास) पुढें करणें. तोंडीं-तोंडास पान- पानें पुसणें-(एखाद्यास) छकविणें; लुबाडणें; भोंदणें; अपेक्षित लाभ होऊं न देणें; स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेऊन दुसर्‍यास तोंड पहावयास लावणें. 'त्यानें आपल्या नळीचें वर्‍हाड केलें आणि सर्वांच्या तोंडीं पान पुसलें.' तोंडीं माती घालणें- (एखाद्यानें) अतिशय दुःखाकुल, शोकाकुल होणें. 'ऊर, माथा बडवून, तोंडीं माती घालूं लागली' -भाव ७५. तोंडीं येऊन बुडणें-नासणें-(एखादी वस्तु, पीक इ॰) अगदीं परिपक्वदशेस, परिणतावस्थेस येऊन, ऐन भरांत येऊन, नाहींशीं होणें, वाईट होणें. तोंडीं येणें-१ (पारा इ॰ औषधानें) तोंड येणें. २ ऐन भरांत, परिपक्व दशेस, पूर्णावस्थेस येणें. तोंडीं-रक्त, रगत लागणें-१ वाघ इ॰ हिंस्त्र पशूला माणसाच्या रक्ताची चटक लागून तो माणसावर टपून बसणें. २ (ल.) लांच-लुचपत खाण्याची चटक लागणें. तोंडीं लागणें-(एखाद्यास एखाद्या वस्तूची, खाद्याची चव प्रथमच कळून त्या वस्तूची त्यास) चटक लागणें; आवड उत्पन्न होणें. 'ह्याच्या तोंडीं भात लागला म्हणून यास भाकर आवडत नाहीं.' तोंडीं लागणें-१ (एखाद्याच्या) तोंडास तोंड देणें; उद्धटपणानें, आपला दर्जा विसरून उलट जबाब देणें. २ हुज्जत घालणें; वादविवादास प्रवृत्त होणें; तोंडास लागणें पहा. 'सुज्ञ आहेत ते दूषकांच्या तोंडीं लागत नसतात.' -नि. ३ (युद्ध, भांडण, इ॰कांच्या) आणीबाणीच्या ठिकाणीं, आघाडीस, अग्रभागीं असणें. तोंडीं लावणें-न. जेवतांना तोंडास रुचि आणणारा भाजी, चटणी इ॰ सारखा मधून मधून खावयाचा चमचमीत पदार्थ. तोंडीं लावणें-१ जेवतांना भाजी, चटणी इ॰ चम- चमीत पदार्थानें रुचिपालट करणें. 'आज तोंडीं लावावयाला भाजीबिजी कांहीं केली नाहीं काय ?' २ विसारादाखल पैसे देणें. तोंडें मागितलेली किंमत-स्त्री. (एखाद्या वस्तूची) दुकान- दारानें सांगितलेली व झिगझिग वगैरे न करितां गिर्‍हाइकानें दिलेली किंमत. तोंडें मानलेला-मानला-वि. (तोंडच्या) शब्दानें, वचनानें मानलेला (बाप, भाऊ, मुलगा इ॰); धर्माचा, पुण्याचा पहा. तोंडें वांकडीं करणें-वेडावून दाखविणें; वेडावणें. लहान तोंडीं मोठा घांस घेणें-१ (एखाद्यानें) आपल्या आवांक्या- बाहेरचें काम हातीं घेणें. २ (वडील, वरिष्ठ माणसांसमोर) न शोभेल असें, मर्यादा सोडून, बेअदबीनें बोलणें; वडील माणसांस शहाणपण शिकविणें. जळो तुझें तोंड-(बायकी भाषेंत) एक शिवी. स्त्रिया रागानें ही शिवी उपयोगांत आणतात. म्ह॰ १ तोंड बांधून (दाबून) बुक्कयांचा मार = एखाद्याचा विनाकारण छळ होऊन त्यास त्याविरुद्ध तक्रार करतां न येणें; एखाद्यास अन्यायानें वाग- वून त्याविरुद्ध त्यानें कागाळी केल्यास त्यास बेगुमानपणें शिक्षा करणें. 'बायकांचा जन्म म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार, म्हण- तात तें अक्षरशः खरें आहे.' -पकोघे २ (गो.) तोंडाच्या बाता घरा बाईल भीक मागता = बाहेर मोठमोठया गप्पा मारतो पण घरीं बायको भीक मागते. सामाशब्द- तोंड उष्ट-न. एखादा-दुसरा घांस खाणें; केवळ अन्न तोंडास लावणें; तोंड खरकटें करणें. [तोंड + उष्टें] ॰ओळख-स्त्री. परस्परांचा विशेष परिचय नसतां, चेहरा पाहू- नच हा अमुक आहे असें समजण्याजोगी ओळख; (एखाद्याची) चेहरेपट्टी लक्षांत राहून तीवरूनच त्याला ओळखतां येणें; नांव वगैरे कांहीं माहीत नसून (एखाद्याचा) केवळ तोंडावळाच ओळ- खीचा असणें. 'एखाद्याला वाटेल कीं बाळासाहेबांशीं त्याची तोंड- ओळखच आहे.' -इंप ३७. ॰कडी-स्त्री. १ आंतील तुळयांचीं तोंडें बाहेर भिंतींतील ज्या तुळईवर ठेवतात, ती सलग तुळई. २ कौलारू छपराचे वासे ज्या सलग तुळईवर टेकतात ती छपराच्या शेवटीं, टोंकास असलेली तुळई. ३ गुरांचें दावें जिला बांधतात ती कडी. ४ (सोनारी धंदा) दागिन्याची शेवटची कडी, नाकें; ज्यांत फांसा इ॰ अडकवितात ती (सरी इ॰ सारख्या दागिन्याची) टोंकाची, तोंडाची कडी; (जव्याच्या) मण्याच्या वगैरे तोंडाशीं ठेवलेली कडी. ५ (जमाखर्चाच्या वहींतील जमा आणि खर्च या दोहोंबाजूंचा मेळ. हा मेळ = = = अशा दुलांगीनें, (दुहेरी रेषेनें) दाखविण्याचा प्रघात आहे. 'वहीची खात्याची-तारखेची-तोंडकडी' असा शब्दप्रयोग करितात. (क्रि॰ मिळणें; जुळणें; येणें; उतरणें; चुकणें; बंद होणें). [तोंड + कडी] ॰कळा-स्त्री. चेहर्‍यावरील तजेला; कांति; तेज; टवटवी. (प्र.) मुखकळा. [तोंड + कळा = तेज] ॰काढप-(गो.) उपदंश झालेल्या रोग्यास एक प्रकारचें औषध देऊन त्याच्या तोंडांतून लाळ वाहवितात तो प्रकार. ह्या औषधानें तोंड बरेंच सुजतें. [तोंड + गो. काढप = काढणें] ॰खुरी- स्त्री. (ना.) गुरांचा एक रोग. ॰खोडी-वि. तोंडाळ; टाकून बोलणारा; तोंड टाकणारा; अशी संवय असलेला. 'परम अधम रुक्मी हा महा तोंडखोडी ।' -सारुह ३.७८. [तोंड + खोड = वाईट संवय] ॰घडण-स्त्री तोंडाची ठेवण; चेहरेपट्टी; तोंडवळां. 'या मुलाची बापासारखी तोंडघडण आहे.' [तोंड + घडण = रचना] ॰घशीं- सीं-क्रिवि. १ जमीनीवर पडून तोंड घासलें जाईल, फुटेल अशा रीतीनें. (क्रि॰ पडणें; पाडणें; देणें). 'तो तोंडघसींच पडे करतां दंतप्रहार बहु रागें ।' -मो. २. (आश्रय तुटल्यानें) गोत्यांत; पेचांत; अडचणींत; फजिती होईल अशा तर्‍हेनें; फशीं (पडणें). [तोंड + घासणें] ॰घशी देणें-दुसरा तोंडघशीं पडे असें करणें. ॰चाट्या-वि. खुशामत करणारा; थुंकी झेलणारा; तोंडासारखें बोलणारा. ॰चाळा-पु. १ तोंड वेडेंवाकडें करून वेडावण्याची क्रिया. २ वात इ॰कांच्या लहरीनें होणारी तोंडाची हालचाल, चाळा. ॰चुकाऊ-वू-व्या, तोंडचुकारू-चुकव्या-वि. (काम इ॰ कांच्या भीतीनें) दृष्टि चुकविणारा; तोंड लपविणारा; नजरेस न पडे असा. [तोंड + चुकविणें] ॰चुकावणी-स्त्री. (एखाद्यापासून) तोंड लपविण्याची, स्वतःस छपविण्याची क्रिया. ॰जबानी-स्त्री. तोंडानें सांगितलेली हकीगत, दिलेली साक्ष, पुरावा. -क्रिवि तोंडी, तोंडानें. [तोंड + फा. झबान्] ॰जाब-पु. तोंडी जबाब. ॰झाडणी-स्त्री. तिरस्कारपूर्ण उद्गारांनीं झिडकारणें; खडका- वणें; खरडपट्टी काढणें. ॰देखणा-ला-वि. आपल्या अंतःकरणांत तसा भाव नसून दुसर्‍याचें मन राखण्याकरितां त्याला रुचेल असा केलेला (व्यवहार, भाषण, गो इ॰); खुशामतीचा; तोंडासारखा; तोंडपुजपणाचा. 'प्राणनाथ, मला हीं तोंडदेखणीं बोलणीं आव- डत नाहींत.' -पारिभौ ३५. [तोंड + देखणें = पाहणें] ॰देखली गोष्ट-स्त्री.दुसर्‍याची मर्जी राखण्याकरितां केलेलें, खुशामतीचें भाषण. ॰निरोप-पु. तोंडी सांगितलेला निरोप. 'कृष्णास ते हळुच तोंडनिरोप सांगे ।' -सारुह ४.९. ॰पट्टा-पु. (बायकी). तोंडाचा तोफखाना; अपशब्दांचा भडिमार; संतापानें, जोराजोरानें बेबंदपणें बोलणें. [तोंड + पट्टा = तलवार] ॰पट्टी-स्त्री. (शिवणकाम) तोंडाला शिवलेला पट्टी. 'योग्य तेवढी तोंडपट्टी कातरावी.' -काप्र. १४. ॰पाटिलकी-स्त्री. १ आपण कांहीं न करतां बसल्या जागे- वरून लुडबुडेपणानें दुसर्‍यांना हुकुमवजा गोष्टी, कामें सांगणें (पाटलाला बसल्या जागेवरून अनेक कामें हुकुम सोडून करून घ्यावीं लागतात त्यावरून). २ (उप.) लुडबुडेपणाची वटवट, बडबड; तोंडाळपणा. 'दुसरें कांहीं न झालें तरी नुसती तोंडपाटिलकी करण्यास कांहीं हरकत नाहीं.' -आगर ३.६१. [तोंड + पाटिलकी = पाटलाचें काम] ॰पाठ-वि. पुस्तकाच्या सहाय्यावांचून केवळ तोंडांनें म्हणतां येण्यासारखा; मुखोद्गत [तोंड + पाट = पठण केलेलें] ॰पालटपुस्त्री. १ (अरुचि घालविण्याकरितां केलेला) अन्नांतील फेरबदल. २ अन्नांत फेरबदल करून अरुचि घालविण्याची क्रिया. [तोंड + पालट = बदल] ॰पिटी-स्त्री. १ (वडील, गुरु इ॰ कांची) आज्ञा न मानतां तिचें औचित्य इ॰ कासंबंधीं केलेली वाटाघाट; (वडिलांशीं, गुरूंशीं) उद्धटपणानें वाद घालणें; उलट उत्तर देणें; प्रश्न इ॰ विचारून अडवणूक करणें. 'गुरूंसी करिती तोंडपिटी ।' -विपू १.५७. २ (दगडोबास शिकविण्याकरितां, विसराळू माणसास पुन्हां पुन्हां बजाविण्याकरितां, थिल्लर जनावरास हांकलण्याकरितां करावी लागणारी) व्यर्थ बडबड, कटकट, वटवट. [तोंड + पिटणें] ॰प्रचिती-प्रचीति-स्त्री. खुशामत करण्याकरितां (एखाद्याच्या) व्यक्तिमाहात्म्यास, भाषणास, अस्तित्वास मान देणें; आदर दाख- विणें. [तोंड + प्रचीति] ॰प्रचीतक्रिवि. १ तोंडासारखें; खुशामतीचें; तोंडापुरतें (भाषण, वर्तन इ॰ करणें) २ माणूस ओळखून, पाहून; माणसामाणसांत तारतम्य ठेवून (बोलणें, चालणें, वागणें). ॰प्रचीत बोलणारा-चालणारा-वागणारा-वि. माणसामाणसांत तारतम्य ठेवून चालणारा, बोलणारा, वागणारा. ॰फटालकी -फटालीस्त्री. तोंडाची निरर्थक बडबड, वटवट, टकळी. [तोंड + ध्व. फटां ! द्वि.] ॰फटाला-ल्या-वि. मूर्खपणानें कांहीं तरी बड बडणारा; बकणारा; वटवट करणारा. [तोंड + ध्व. फटां !] ॰फट्याळ-वि. तोंडाचा फटकळ; शिवराळ; तोंडाळ; बातेफरास; अंगीं कर्तृत्व नसून लंब्या लंब्या बाता झोंकणारा. ॰फट्याळी- स्त्री. शिवराळपणा; तोंडाळपणा; वावदूकता. [तोंडफट्याळ] ॰बडबड्या-बडव्या-वि. निरर्थक वटवट, बडबड करणारा: बकबकणांरा टकळी चालविणारा. ॰बंद -बांधणी-पुस्त्री. गाडीच्या चाकाच्या तुंब्यावरील बाहेरील बाजूचें लोखंडी कडें, पट्टी. आंतील बाजूच्या कड्यास कटबंद असें म्हणतात. [तोंड + बंद = बांधणी] ॰बळ-न. वक्तृत्वशक्ति; वाक्पटुता; वाक्चातुर्य. 'आंगबळ न चांगबळ देरे देवा तोंडबळ.' ॰बळाचा-वि. ज्याला बोलण्याची हातोटी, वक्तृत्कला साधली आहें असा; तोंडबळ अस- लेला; भाषणपटु जबेफरास. ॰बाग-स्त्री. (राजा.) चेहरेपट्टी; चेहर्‍याची ठेवण, घडण; मुखवटा. ॰बांधणी-स्त्री. १ तोंडबंद पहा. २ (ढोरांचा धंदा) कातड्याच्या मोटेच्या सोंडेच्या टोंकाकरितां बाजूला शिवलेला गोट. ॰भडभड्या-वि. तोंडास येईल तें बड- बडत, बकत सुटणारा; बोलण्याची, बडबडण्याची हुक्की, इसळी ज्यास येते असा; भडभडून बोलणारा. ॰भर-वि. तोंडास येईल तेवढा; भरपूर. 'हॅमिल्टन यांनीं खर्चवाढीबद्दल तोंडभर मगणी केली होती.' -केले १.१९८. ॰मार-स्त्री. १ रोग्यावर लाद- लेला खाद्यपेयांचा निर्बंध, पथ्य. २ एखाद्यास बोलण्याकरितां तोंड उघडूं न देणें; भाषणबंदी. ३ (ल.) (एखाद्याच्या) आशा, आकांक्षा फोल ठरविणें; (एखाद्याचा केलेला) आशाभंग; मनोभंग; निराशा. (क्रि॰ करणें). ॰मारा-पु. १ शेतीच्या कामाच्या वेळीं पिकांत वगैरें काम करतांना गुरांच्या तोंडाला जाळी, मुंगसें, मुसकें बांधणें. २ (एखाद्यास केलेली) भाषणबंदी; खाद्यपेयांचा निर्बंध. ३ (प्र.) तोंडमार. तोंडमार अर्थ ३ पहा. ॰मिळवणी- स्त्री, १ जमा आणि खर्च यांचा मेळ; तोंडें मिळविण्यासाठीं मांडलेला जमाखर्च. २ ऋणको व धनको यांच्यांतील हिशेबाची बेबाकी, पूज्य. ३ मेळ. -शर. ॰मिळवणी खातें- (जमाखर्च) कच्चें खातें (याचें देणें येणें सालअखेर पुरें करून खुद्द खात्यांत जिरवितात). ॰लपव्या-वि. तोंड लपविणारा; छपून राहणारा; दडी मारून बसणारा. ॰लाग-पु. शिंगें असलेल्या जनावरांच्या तोंडास होणारा रोग; यांत लाळ गळत असते. ॰वळख-स्त्री (प्र.) तोंडओळख पहा. ॰वळण-वळा-नपु. चेहरा; चर्या; मुद्रा; चेहर्‍याची घडण, ठेवण; रूपरेखा; चेहरामोहरा; चेहरेपट्टी; मुखाकृति; मुखवटा. [तोंड + वळ = रचना] ॰वीख-न. (ल.) तोंडानें ओकलेलें, तोंडां- तून निघालेलें, विषारी, वाईट भाषण, बोलणें. [तोंड + विष] ॰शिनळ, शिंदळ-वि. अचकटविचटक, बीभत्स बोलणारा; केवळ तोंडानें शिनळकी करणारा. ॰शेवळें-न. मुंडावळ. -बदलापूर २७७. [तोंड + शेवळें = शेवाळें] ॰सर-क्रिवि. तुडुंब; तोंडापर्यंत; भरपूर. ॰सरता-वि. अस्खलित, तोंडपाठ न म्हणतां येण्या- सारखा; अडखळत अडखळत म्हणतां येण्यासारखा (श्लोक, ग्रंथ इ॰). -क्रिवि. घसरत घसरत; अडखळत; चुका करीत; कसेंबसें; आठवून आठवून. [तोंड + सरणें] ॰सुख-न. १ एखा- द्यानें केलेल्या अपकाराचें शरीरानें प्रतिकार करण्याचें सामर्थ्य नसल्यामुळें केवळ तोंडानें यथेच्छ शिव्यांचा, अपशब्दांचा भडि- मार करून त्यांत सुख मानणें. २ जिव्हा मोकाट सोडून वाटेल तसें बोलण्यांत मानलेलें सुख; यथेच्छ व अद्वातद्वा केलेलें भाषण; (एखाद्याची काढलेली) खरडपट्टी; बोडंती. (क्रि॰ घेणें). ॰सुख घेणें-(एखाद्याची) खरडपट्टी काढणें, हजेरी घेणें; (एखा- द्यावर) शिव्यांचा, अपशब्दांचा भडिमार करणें. ॰सुटका-स्त्री. १ जिभेचा (बोलण्यांतील) स्वैरपणा; सुळसुळीतपणा; वाक्चा- पल्य; जबेफराशी; (भाषण इ॰ कांतील) जनलज्जेपासूनची मोक- ळीक. २ भाषणस्वातंत्र्य; बोलण्याची मोकळीक. ३ तोंडाळपणा; शिवराळपणा. ४ (पथ्य, अरुची, तोंड येणें इ॰ कांपासून झालेली) तोंडाची सुटका, मोकळीक; तोंड बरें होणें; खाण्यापिण्याला स्वातंत्र्य. [तोंड + सुटणें] ॰हिशेबी-वि. अनेक रकमांचा मनांतल्या- मनांत चटकन्‌ हिशेब करून सांगणारा बुद्धिमान (मनुष्य); शीघ्रगणक. ॰तोंडागळा-वि. (तोंडानें) बोलण्यांत, वक्तृत्वशक्तींत अधिक. 'कीं शेषाहूनि तोंडागळें । बोलकें आथी ।' -ज्ञा ९. ३७०. [तोंड + आगळा = अधिक] ॰तोंडातोंडी-क्रिवि. १ समोरासमोर; २ बोलण्यांत; बोलाचालींत. [तोंड द्वि.] ॰तोंडाळ-वि. १ दुसर्‍या- वर तोंड टाकणारा; शिवराळ; भांडखोर. 'लटिकें आणि तोंडाळ । अतिशयेंसीं ।' -दा २.३.१०. २ बडबड्या; वाचाळ. [तोंड] म्ह॰ हाताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं = शिवराळ माणसा- पेक्षां चोर पुरवतो. ॰तोंडाळणें-उक्रि. बकबक करून गुप्त गोष्ट फोडणें; जीभ पघळणें. [तोंडाळ] ॰तोंडोंतोंड-क्रिवि. तोंडापर्यंत; कंठोकांठ; तुडुंब; तोंडसर.॰तोंडोंळा-पु. तोंडवळा; चेहरेपट्टी. [तोंड + ओळा, वळा प्रत्यय]

दाते शब्दकोश

दुर्

अ. दुष्टपणा; वाईटपणा, कठिणपणा, दुःख इ॰कांच्या वाचक शब्दापूर्वीं योजावयाचा उपसर्ग. जसें:-दुराचार = वाईट वर्त- णूक; दुर्लभ = मिळण्यास कठिण; दुस्सह = सहन करण्यास कठिण इ॰. याचीं संधिनियमानुरूप दुर्, दुस्, दुष्, दुश् इ॰ रूपें होतात. जसें:- दुर्लभ दुष्कर, दुश्चल, दुस्सह, दुस्साध्य, दुराचार, दुरंत इ. हा उपसर्ग जोडून अनेक सामासिक शब्द बनतात. त्यांपैकीं कांहीं येथें दिले आहेत. दुरंत-वि. १ अपार; अनंत; अमर्याद; अंत लागण्यास कठिण असा (मोह, माया इ॰). २ अतिशय कठिण; तीव्र (दुःख इ॰). [दुर् + अंत = शेवट] दुरतिक्रम-वि. ओलांडून जाण्यास कठिण; दुस्तर; दुर्लंघ्य. २ असाध्य. [दुर् + अतिक्रम = ओलांडणें] दुरत्यय-यी-वि. १ नाश करून टाकण्यास कठिण. २ प्रतिबंध करण्यास, टाळण्यास कठिण; अपरिहार्य. ३ असाध्य (दुःख, आजार, रोग इ॰). अप्रतीकार्य (अडचण, संकट). ४ मन वळ- विण्यास कठिण असा (मनुष्य); दुराराध्य. [दुर् + अत्यय = पार पडणें, जाणें इ॰] दुरदृष्ट-न. दुर्दैव; वाईट अदृष्ट. 'कीं आड आलें दुरदृष्ट माझें ।' -सारुह १.१०. [दुर् + अदृष्ट] दुरधिगम्य- वि. १ समजण्यास कठिण; दुर्बोध; दुर्ज्ञेय. २ दुष्प्राप्य; मिळण्यास कठिण; दुर्गम. [दुर् + सं. अधि + गम् = मिळविणें] दुरभिमान-पु. पोकळ, वृथा, अवास्तव अभिमान; फाजील गर्व. [दुर् + अभिमान] दुरवबोध-वि. दुर्बोध; गूढ. [दुर् + सं. अव + बुध् = जाणणें] दुरा- कांक्षा-स्त्री. दुष्प्राप्य वस्तूचा अभिलाष. [दुर् + आकांक्षा = इच्छा, अभिलाष] दुराग्रह-पु. हट्ट, लोकविरोध, शास्त्रविरोध, संकटें इ॰ कांना न जुमानतां एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरविण्याचा हट्ट; अनिष्ट आग्रह. 'न सुखद दुराग्रह सखा हा सर्वाऽनर्थ गेह ठक राया ।' -मोकर्ण ४६.५०. [दुर् = वाईट + आग्रह = हट्ट] दुराग्रही-वि. दुरा- ग्रह धरण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा; हेकेखोर; हटवादी; हट्टी. [दुराग्रह] दुराचरण, दुराचार-नपु. निंद्य, वाईट, वागणूक; दुर्वर्तन; दुष्ट आचरण. [दुर् = दुष्ट + सं. आचरण = वर्तन] दुराचरणी, दुराचारी-वि. निंद्य, वाईट, दुष्ट वर्तनाचा; बदफैली. [दुराचार] दुरात्मत्व-न. १ दुष्ट अंतःकरण; मनाचा दुष्टपणा. २ दुष्ट कृत्य. 'किमपि दुरात्मत्व घडलें ।' [दुर् = दुष्ट + आत्मा = मन] दुरात्मा- वि. दुष्ट मनाचा (मनुष्य); खट; शठ. [दुर् + आत्मा] दुरा- धर्ष-वि. जिंकण्यास, वर्चस्वाखालीं आणण्यास कठिण. [दुर् + सं. आ + धृष् = जिंकणें] दुराप-वि. मिळविण्यास कठिण; दुर्लभ; अप्राप्य. 'राया, भीष्माला जें सुख, इतरां तें दुराप, गा, स्वापें ।' -मोभीष्म ६.२९. दुराप(पा)स्त-वि. घडून येण्यास कठिण; दुर्घट; असंभाव्य. 'वाळूचें तेल काढणें ही गोष्ट दुरापस्त आहे.' [दुर् + सं. अप + अस् = ] दुराराध्य-वि. संतुष्ट, प्रसन्न करण्यास कठिण, अशक्य; मन वळविण्यास कठिण. 'मोक्षु दुराराध्यु कीर होय । परि तोही आराधी तुझे पाय ।' -ज्ञा ११.९९. [दुर् + सं. आराध्य] दुराशा-स्त्री. निरर्थक, फोल, अवास्तव आशा, दुष्प्राप्य गोष्टीची आशा दुष्ट वासना. 'आम्हास अन्न खावयास मिळेना आणि पालखींत बसण्याची दुराशा धरावी हें चांगलें नव्हे.' 'दुराशागुणें जो नव्हे दैन्यवाणी ।' -राम १६८. [दर् + आशा] दुरासद-वि. कष्टानें प्राप्त होणारें; जिंकण्यास, मिळण्यास कठिण. [दुर् + सं. आ + सद = मिळ विणें] दुरित-न. पाप; पातक; संचितकर्म. 'पुन्हां न मन हे मळो दुरित आत्मबोधें जळो ।' -केका ११९. [दुर् + सं. इ = जाणें] दुरुक्त-न. वाईट, दुष्टपणाचें, अश्लील भाषण; शिवी; अपशब्द; दुर्भाषण; अश्लील बोलणें. [दुर् + उक्ति = बोलणें] दुरुत्तर-न. अप मानकारक, उर्मटपणाचें उत्तर; दुरुक्ति. [दर् + उत्तर] दुरुद्धर-वि. खंडण करण्यास, खोडून काढण्यास कठिण असा (पूर्वपक्ष, आक्षेप, आरोप). 'या सिद्धांतावर दोष दिला हा सर्वांस दुरुद्धर आहे.' [दुर् + सं. उद् + धृ = काढून टाकणें; वर, बाहेर काढणें] दुरूह-वि. दुर्बोध; गूढ; अतर्क्य. 'ईश्वरानें सृष्टि कशी उत्पन्न केली हें सर्वांस दुरूह आहे.' [दुर् + सं. ऊह् = अनुमानणें] दुर्गत-वि. गरीब; दिन; दरिद्री; लाचार. 'झांकी शरपटलानीं आढ्य जसा दुर्गतांसि वस्त्रांनीं ।' -मोभीष्म ९.६५. [दुर् + सं. गत = गेलेला] दुर्गति-स्त्री. १ दुर्दशा; वाईट स्थिति; संकटाची, लाजिरवाणी स्थिति; अडचण; लचांड. २ नरक; नरकांत पडणें. [दुर् + गति = स्थिति] दुर्गंध- गंधी-पुस्त्री. घाण; वाईट वास. -वि. घाण वास येणारें [दुर् = वाईट + सं. गंध = वास] ॰नाशक-वि. (रसा.) दुर्गंधाचा नाश करणारें; (इं.) डिओडरंट्. [दुर्गध + सं. नाशक = नाश करणारा] दुर्गंधिल-वि. (रासा.) आर्सेनिक व मेथिल यांच्या संयोगापासून बनलेला विषारी, दुर्गंधी (पदार्थ) (इं.) कॅको- डिल्. दुर्गम-वि. जाण्यास कठिण (स्थळ, प्रदेश इ॰). [दुर् + सं + गम् = जाणें] दुर्गुण-पु. वाईट गुण; दोष; अवगुण; दुर्मार्गाकडील कल. (क्रि॰ आचरणें). [दुर् + गुण] दुर्गुणी-वि. वाईट गुणांचा; अवगुणी; दुराचरी; दुर्वर्तनी. [दुर्गुण] दुर्घट-वि. धड- वून आणण्यास, घडून येण्यास, सिद्धीस नेण्यास कठिण. [दुर् + सं. घट् = घडणें, घडवून आणणें] दुर्घटना-स्त्री. अशुभ, अनिष्ट गोष्ट घडणें; आकस्मिक आलेलें संकट, वाईट परिस्थिति. [दुर् + सं. घटना = स्थिति] दुर्घाण-स्त्री. दुस्सह घाण; ओरढाण; उग्रष्टाण. [दुर् + घाण] दुर्जन-पु. वाईट, दुष्ट मनुष्य. [दुर् + जन = मनुष्य, लोक] दुर्जय-वि. १ जिंकण्यास कठिण. २ दुस्साध्य; दुस्तर. [दुर + सं. जि = जिंकणें] दुर्जर-वि. पचविण्यास, विरघळ- ण्यास कठिण. [दुर् + सं. जृ = जिरणें] दुर्दम-वि. दमन करण्यास, वर्चस्वाखालीं आणण्यास कठिण. 'तिला इंग्लंडांतील प्रबल व दुर्दम प्रजाजनांच्या अडथळ्याशिवाय दुसरें कोणतेंच नियमन नसे.' -पार्ल ६. [दुर् + दम्] दुर्दर्श-वि. दिसण्यास, पाहण्यास कठिण; अतिशय अस्पष्ट. [दुर् + सं. दृश् = पाहणें] दुर्दशा-स्त्री. अवनतीची, अडचणीची, संकटाची, वाईट, दुःखद स्थिति; दुर्गति; दुःस्थिति. 'भिजल्यामुळें शालजोडीची दुर्दशा जाली.' [दुर् + दशा = स्थिति दुर्दिन-न. १ वाईट दिवस. २ अकालीं अभ्रें आलेला दिवस. ३ वृष्टि. -शर. [दुर् + सं. दिन = दिवस] दुर्दैव-न. कमनशीब; दुर्भाग्य. 'कीं माझें दुर्दैव प्रभुच्या मार्गांत आडवें पडलें ।' -मोसंशयरत्नमाला (नवनीत पृ. ३४९). -वि. कम- नशिबी; अभागी. [दुर् + दैव = नशीब] दुर्दैवी-वि. अभागी; कम- नशिबी. [दुर्दैव] दुर्धर-पु. एक नरकविशेष. [सं.] दुर्धर- वि. १ धारण, ग्रहण करण्यास कठिण. २ दुस्साध्य; दुष्प्राप्य. ३ (काव्य) (व्यापक) बिकट; खडतर; असह्य; उग्र; कठिण. 'तप करीत दुर्धर । अंगीं चालला घर्मपूर ।' ४ भयंकर; घोर; भयानक. 'महादुर्धर कानन ।' [दुर् + सं. धृ = धरणें, धारण करणें] दुर्धर्ष- वि. दुराधर्ष; दमन करण्यास, वर्चस्वाखालीं आणण्यास कठिण; दुर्दम्य; अनिवार्य. [दुर् + धृष् = जिंकणें, वठणीवर आणणें] दुर्नाम- न. अपकीर्ति; दुष्कीर्ति; बदनामी. [दुर् + सं. नामन् = नांव] दुर्नि- मित्त-न. अन्याय्य, निराधार कारण, सबब, निमित्त. [दुर् + निमित्त = कारण] दुर्निर्वह-वि. १ दुःसह; असह्य; सहन करण्यास कठिण; निभावून जाण्यास, पार पडण्यास कठिण (अडचण, संकट). २ दुस्साध्य; दुष्कर; [दुर् + सं. निर् + वह्] दुर्निवार, दुर्निवा- रण-वि. १ निवारण, प्रतिबंध करण्यास कठिण; अपरिहार्य; अनि- वार्य. २ कबजांत आणण्यास कठिण; दुर्दम्य. [दुर् + नि + वृ] दुर्बल-ळ-वि. १ दुबला; अशक्त; असमर्थ. २ गरीब; दीन; दरिद्री. 'ऐसें असतां एके दिवशीं । दुर्बळ द्विज आला परियेसीं ।' -गुच ३८.७. [दुर् + बल = शक्ति] दुर्बळी-वि. (काव्य.) दुर्बळ पहा. दुर्बुद्ध-वि. १ दुष्ट बुद्धीचा; खुनशी वृत्तीचा. २ मूर्ख; मूढ; मंदमति; ठोंब्या. [दुर् + बुद्धि] दुर्बुद्धि-स्त्री. १ दुष्ट मनोवृत्ति; खुनशी स्वभाव; मनाचा दुष्टपणा. 'दुर्बुद्धि ते मना । कदा नुपजो नारायणा ।' -तुगा ७९८. २ मूर्खपणा; अनिष्ट परिणामकारक बुद्धि. -वि. दुष्ट मनाचा; दुर्बुद्ध पहा. [दुर् + बुद्धि] दुर्बोध-वि. समजण्यास कठिण (ग्रंथ, भाषण इ॰) [दुर् + बोध् = समजणें, ज्ञान] दुर्भग-वि. कमनशिबी; दुर्दैवी; भाग्यहीन. [दुर् + सं. भग = भाग्य] दुर्भर-वि. भरून पूर्ण करण्यास कठिण; तृप्त करण्यास कठिण (पोट, इच्छा, आकांक्षा). 'इंद्रियें वज्रघातें तपे उष्ण वरी ज्वाळ । सोसिलें काय करूं दुर्भर हे चांडाळ ।' -तुगा ३५४. -न. (ल.) पोट. 'तरा दुस्तरा त्या परासागरातें । सरा वीसरा त्या भरा दुर्भरातें ।' -राम ८०. [दुर् + सं. भृ = भरणें] दुर्भ्यक्ष्य-वि. खाण्यास कठिण, अयोग्य; अभ्यक्ष्य. [दुर् + सं. भक्ष्य = खाद्य] दुभोग्य-न. कमनशीब; दुर्दैव. -वि. दुर्दैवी; अभागी. [दुर् + सं. भाग्य = दैव] दुर्भावपु. १ दुष्ट भावना; कुभाव; द्वेषबुद्धि. २ (एखाद्याविषयींचा) संशय; वाईट ग्रह; (विरू.) दुष्टभाव. [दुर् + भाव = भावना, इच्छा] दुर्भाषण-न. वाईट, अपशब्दयुक्त, शिवीगाळीचें बोलणें; दुर्वचन पहा. [दुर् + भाषण = बोलणें] दुर्भिक्ष-न. १ दुष्काळ; महागाई. २ (दुष्काळ इ॰ कांत होणारी अन्नसामुग्री इ॰ कांची) टंचाई; कमीपणा; उणीव. [सं.] ॰रक्षित-वि. दासांतील एक प्रकार; आपलें दास्य करावें एतदर्थ दुष्काळांतून वांचविलेला (दास, गुलाम इ॰). -मिताक्षरा-व्यवहारमयूख दाय २८९. [दुर्भिक्ष + सं. रक्षित = रक्षण केलेला] दुर्भेद-वि. बुद्धीचा प्रवेश होण्यास कठिण; दुर्बोध. 'तैसें दुर्भेद जे अभिप्राय । कां गुरुगम्य हन ठाय ।' -ज्ञा ६.४५९. [दुर् + सं. भिद् = तोडणें] दुर्भेद्य-वि. फोडण्यास, तुकडे करण्यास कठिण (हिरा; तट). [दुर् + सं. भेद्य = फोडण्यासारखा] दुर्मति-स्त्री. १ दुर्बुद्धि; खाष्टपणा; कुटिलपणा. २ मूर्खपणा; खूळ; वेडेपणा. -पु. एका संवत्सराचें नांव. -वि. १ दुष्ट बुद्धीचा; खाष्ट स्वभावाचा. २ मूर्ख; खुळा; वेडा. [दुर् + मति = बुद्धि, मन] दुर्मद-पु. दुराग्रहीपणा; हेकेखोरी; गर्विष्ठपणाचा हटवादीपणा. 'किती सेवाल धन दुर्मदा' -अमृतपदें ५८. -वि. मदांध; मदोन्मत्त; गर्विष्ठ. 'सावियाचि उतत होते दायाद । आणि बळिये जगीं दुर्मद ।' -ज्ञा ११.४८०. [दुर् + मद = गर्व] दुर्मनस्क, दुर्मना-वि. खिन्न; उदास मनाचा; विमनस्क; दुःखित. [दुर् + सं. मनस् = मन] दुर्मरण-न (वाघानें खाऊन, पाण्यांत बुडून, सर्प डसून इ॰ प्रकारांनीं आलेला) अपमृत्यु; अपघातानें आलेलें मरण; अमोक्षदायक मरण. [दुर् + मरण] दुर्मि(र्मी)ल-ळ- वि. मिळण्यास कठिण; दुर्लभ. [दुर् + सं. मिल् = मिळणें] दुर्मुख- पु. एका संवत्सराचें नांव. -वि. १ घुम्या; कुरठा; तुसडा; आंबट तोंडाचा. २ तोंडाळ; शिवराळ जिभेचा. 'दुर्मुखी स्त्रीचा त्याग करून । संन्यास ग्रहण करावा ।' [दुर् + मुख] दुर्मुखणें- अक्रि. तोंड आंबट होणें; फुरंगुटणें; गाल फुगविणें; (एखाद्या कार्याविषयीं) उत्साहशून्यतेची चर्या धारण करणें. 'खायास म्हटलें म्हणजे हांसत येतात आणि उद्योगाचें नांव घेतलें म्हणजें लागलेच दुर्मुखतात.' [दुर्मुख] दुर्मुखला-वि. आंबट चेहर्‍याचा; घुम्या; कुरठा; तुसडा. [दुर्मुख] दुर्मेधा-वि. १ मंदबुद्धीचा. २ दुष्ट स्वभावाचा; दुर्मति. [दुर् + सं. मेधा = बुद्धि] दुर्योग-पु. सत्ता- वीस योगांतील अशुभ, अनिष्ट योगांपैकीं प्रत्येक. [दुर् + योग] दुर्लंघ्य-वि. १ ओलांडता येण्यास कठिण; दुस्तर (नदी इ॰). २ मोडता न येण्यासारखी, अनुल्लंघनीय (आज्ञा, हुकूम, शपथ इ॰) ३ निभावून जाण्यास कठिण (संकट, अडचण इ॰). ४ घालविण्यास, दवडण्यास, क्रमण्यास, नेण्यास कठिण (काळ, वेळ इ॰). [दुर् + सं. लंघ्य = ओलांडावयाजोगें] दुर्लभ-वि. मिळण्यास कठिण; अलभ्य; दुर्मिळ; दुष्यप्राप्य; विरळा. 'अलीकडे आपलें दर्शन दुर्लभ जालें. दुर्ललित-न. चेष्टा; खोडी. 'आमच्या विविध दुर्ललिताबद्दल गुरुजींनीं कसें शासन केलें...' -आश्रमहारिणी ७. [दुर् + सं. ललित = वर्तन, चेष्टा] दुर्लक्ष-न. लक्ष नसणें; हयगय; निष्काळजी- पणा; गफलत; अनवधान. -वि. १ लक्ष न देणारा; अनवधानी; गाफील; बेसावध, 'तुम्ही गोष्ट सांगीतली पण मीं दुर्लक्ष होतों म्हणून ऐकिली नाहीं.' २ दिसण्यास, समजण्यास कठिण; 'ईश्वराचें निर्गुण स्वरूप दुर्लक्ष आहे.' [दुर् + सं. लक्ष्य] दुर्लक्षण- न. १ (मनुष्य, जनावर इ॰ कांचें) अशुभसूचक लक्षण, चिन्ह; दुश्चिन्ह; दोष; वाईट संवय; खोड; दुर्गुण. 'हा घोडा लात मारतो एवढें यामध्यें दुर्लक्षण आहे.' [दुर् + लक्षण = चिन्ह] दुर्लक्षण-णी- वि. १ दुर्लक्षणानें, वैगुण्यानें युक्त (मनुष्य, घोडा इ॰). (विरू.) दुर्लक्षणी. २ दुर्गुणी; दुराचारी; दुर्वर्तनी. दुर्लक्ष्य-वि. १ बुद्धीनें, दृष्टीनें अज्ञेय; अगम्य. २ दुर्लक्ष इतर अर्थीं पहा. [दुर् + सं. लक्ष्य] दुर्लौकिक-पु. अपकीर्ती; दुष्कीर्ति; बेअब्रू; बदनामी; कुप्रसिद्धि. [दुर् + लौकिक = कीर्ति] दुर्वच, दुर्वचन, दुर्वाक्यन. १ वाईट बोलणें; दुर्भाषण; अशिष्टपणाचें, अश्लील, शिवीगाळीचें भाषण. २ अशुभ, अनिष्टसूचक भाषण. [सं. दुर् + वचस्, वचन, वाक्य = बोलणें] दुर्वह-वि. १ वाहण्यास, नेण्यास कठिण. २ सोसण्यास, सहन करण्यास कठिण. [दुर् + सं. वह् = वाहणें, नेणें] दुर्वाड- वि. अतिशय मोठें; कठिण. -शर. प्रतिकूल. [दुर् + वह्] दुर्वात- उलट दिशेचा वारा. 'तुज महामृत्युचिया सागरीं । आतां हे त्रैलोक्यजीविताची तरी । शोकदुर्वातलहरी । आंदोळत असे ।' -ज्ञा ११.३४८. [दुर् + सं. वात = वारा] दुर्वाद-पु. वाईट शब्द; दुर्वच; वाईट बोलणें; भाषण. 'हां गा राजसूययागाचिया सभासदीं । देखतां त्रिभुवनाची मांदी । कैसा शतधा दुर्वादी । निस्तेजिलासी ।' -ज्ञा ११.१०१. [दुर् + वाद = बोलणें] दुर्वारवि. दुर्निवार; अनिवार्य; टाळण्यास, प्रतिकार करण्यास कठिण; अपरिहार्य. २ आवरतां येण्यास कठिण; अनिवार; अनावर. [दुर् + वारणें] दुर्वास-पु. १ (व.) सासुरवास; कष्ट; त्रास; जाच. [दुर् + वास = राहणें] दुर्वासना-स्त्री. वाईट इच्छा; कुवासना; दुष्प्रवृत्ति. [दुर् + वासना] दुर्विदग्ध-वि. विद्येंत न मुरलेला तथापि विद्येचा गर्व वाहणारा; अर्ध्या हळकुंडानें; पिवळा झालेला. [दुर् + सं. विदग्ध = विद्वान्] दुर्विपाक-पु. वाईट परिणाम. [दुर् + सं. विपाक = परिणाम] दुर्विभावनीय-वि. समजण्यास, कल्पना करण्यास कठिण. [दुर् + सं. विभावनीय = कल्पना करतां येण्यासारखें] दुर्वृत्ति-स्त्री. दुराचारी; दुर्व्यसनी; दुर्वर्तनी. [दुर् + सं. वृत्त = वागणूक] दुर्वत्ति-स्त्री. दुराचरण; भ्रष्टाचार; बदफैली. [दुर् + सं. वृत्ति = वर्तन] दुर्व्यसन-न. दुराचरणाची संवय; द्यूत, मद्यपान, वेश्यागमन इ॰कांसारखें वाईट व्यसन. 'दुर्व्यसन दुस्तरचि बहु सूज्ञासहि फार कंप देतें हो' -वत्सलाहरण. [दुर् + व्यसन] दुर्व्यसन-नी-वि. वाईट व्यसन, संवय लागलेला; दुराचारी; बदफैली. (प्र.) दुर्व्यसनी. दुर्व्रात्य-वि. अतिशय दुष्ट; व्रात्य; खोडकर; खट्याळ; (मुलगा अथवा त्यांचें आचरण). [दुर् + व्रात्य = खोडकर, द्वाड] दुर्हृद, दुर्हृदय-वि. वाईट, दुष्ट मनाचा. [दुर् + सं. हृदु, हृदय = मन] दुर्ज्ञेय-वि. समजण्यास कठिण; गूढ; गहन. 'ही पद्धत कशी सुरू झाली असावी हें समजणें दुर्ज्ञेय आहे.' -इंमू ७६. [दुर् + सं. ज्ञेय = समजण्याजोगें] दुःशक- वि. करण्यास कठिण; अशक्यप्राय. [दुस् + सं. शक् = शकणें] दुःशकुन-पु. अपशकुन; अनिष्टसूचक चिन्ह. [दुस् + शकुन] दुश्शील, दुःशील-वि. वाईट शीलाचा; दुराचरणी. [दुस् + शील] दुश्चरित्र-न. पापाचरण; दुष्कृत्य. [दुस् + चरित्र] दुश्चल-वि. (अक्षरशः व ल.) पुढें जाण्यास, सरसावण्यास, चालण्यास कठिण. [दुस् + सं. चल् = चालणें] दुश्चि(श्ची)त-वि. १ (काव्य) अयोग्य, चुकीचा, अपराधी (माणूस, कृत्य). 'अंगुष्ठ धरुनि मस्तकपर्यंत । अखंड दुश्चित आचरलों ।' २ खिन्न; उदास; दुःखी. 'राजा प्रजा पिडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ।' -तुगा २९८४. [सं. दुश्चित अप.] दुश्चित्त-वि. १ खिन्न; दुर्मनस्क; दुःखित; उदास; उद्विग्न. 'अबदुल्याची खबर ऐकतां मनांत झाले दुश्चित ।' -ऐपो १३२. २ क्षुब्ध. 'परी कुंडलिनी नावेक दुश्चित्त होती । ते तयातें म्हणे परौती ।' -ज्ञा ६.२३८ [दुस् + चित्त = मन] दुश्चिंत- वि. (काव्य) खिन्न; दुःखी; उदास; दुश्चित्त अर्थ २ पहा. 'डोळे लावुनियां न होतों दुश्चिंत । तुझी परचीत भाव होती ।' [दुश्चित अप.] दुश्चिन्ह-न. अशुभ, वाईट लक्षण; अपशकुन. 'दुश्चिन्हें उद्भवलीं क्षितीं । दिवसा दिवाभीतें बोभाति ।' [दुस् + चिन्ह] दुश्शाप-पु. वाईट, उग्र, खडतर शाप. [दुस् + शाप] दुश्शासन-पुविना. दुर्योधनाचा भाऊ. -वि. व्यवस्था राख- ण्यास, अधिकार चालविण्यास कठिण. [दुस् + शासन = अधिकार चालविणें] दुष्कर-वि. १ करण्यास कठिण; बिकट; अवघड. 'म्हणोनि अभ्यासासि कांहीं । सर्वथा दुष्कर नाहीं ।' -ज्ञा १२.११३. २ दुष्परिणामकारक. -मोल. [दुस् + सं. कृ = करणें] दुष्कर्म-न. वाईट, पापी, दुष्टपणाचें कृत्य; कर्म. [दुस् + कर्म] दुष्कर्मा, दुष्कर्मी-पु. दुष्ट कृत्य करणारा; पापी; दुरात्मा. [दुस् + कर्मन्] दुष्काल-ळ-पु. अतिवृष्टि किंवा अनावृष्टि होऊन पिकें बुडून अन्नाची वाण पडते तो काळ; दुकाळ; महागाई. 'जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला । कां भणगा दुष्काळु पाहला ।' -ज्ञा ११.४२८. [दुस् + काल] म्ह॰ दुष्काळांत तेरावा महिना = दुष्का- ळांत वर्षाचे बारा महिने काढतां काढतांच मुष्कील पडते. अशा वेळीं अधिक मास (तेरावा महिना) आला म्हणजे संकटातं भर पडते असा अर्थ. दुष्कीर्ति-स्त्री. अपकीर्ती; बदनामी; बेअब्रू. [दुस् = कीर्ति] दुष्कृत-ति-नस्त्री. १ पापकर्म; वाईट कृत्य. 'आणि आचरण पाहातां सुभटा । तो दुष्कृताचा कीर सेल वांटा ।' -ज्ञा ९.४१६. २ कृतींतील. वागणुकींतील दुष्टपणा. [दुस् + कृत- ति] दुष्प्रतिग्रह-पु. जो प्रतिग्रह (दानाचा स्वीकार) केला असतां, स्वीकारणारा अधोगतीस जातो तो; निंद्य प्रतिग्रह; अशुभप्रसंगीं केलेलें दान स्वीकारणें; वाईट कृत्याबाबत स्वीकारलेलें दान इ॰. उदा॰ वैतरणी, शय्या, लोखंड, तेल, म्हैस हे दुष्प्रतिग्रह होत. [दुस् + सं. प्रतिग्रह = दान स्वीकारणें] दुष्प्राप-प्य-वि. दुर्लभ; मिळण्यास कठिण; विरळा; दुर्मिळ. [दुस् + सं. प्र + आप् = मिळ- विणें] दुस्तर-वि. तरून जाण्यास, पार पडण्यास कठिण. 'समुद्रापेक्षां हा संसार मला दुस्तर वाटतो.' -न. (ल.) संकट. 'थोर वोढवलें दुस्तर । तुटलें सासुरें माहेर ।' -एरुस्व ८.५५. [दुस + सं तृ = तरणें] दुस्पर्श-वि. स्पर्श करण्यास कठिण, अयोग्य. [दुस् + सं. स्पृश् = स्पर्श करणें] दुस्संग-पु. दुष्टांची संगत; कुसंगति. [दुस् + संग] दुस्सह-वि. सहन करण्यास कठिण; असह्य. [दुस् + सं. सह् = सहन करणें] दुस्सही-वि. (प्र.) दुस्सह स्सह अप.] दुस्साध्य-वि. १ सिद्धीस नेण्यास, साधावयास कठिण. 'थोर वय झाल्यावर विद्या दुःसाध्य होते.' २ बरा करण्यास कठिण (रोग, रोगी). आटोक्यांत आणण्यास कठिण (शत्रु, अनिष्ट गोष्ट, संकट इ॰). [दुस् + सं. साध्य = साधण्यास सोपें] दुस्स्वप्न-न. १ अशुभसूचक स्वप्न. २ (मनांतील) कुतर्क, आशंका, विकल्प. [दुस् + स्वप्न] दुस्स्वभाव-पु. वाईट, दुष्ट स्वभाव. -वि. वाईट, दुष्ट स्वभावाचा. [दुस् + स्वभाव]

दाते शब्दकोश

आकालिक

वि. आभाळ; आपल्या डोक्यावर दिसणारी घुम- टाकार पोकळी. हिचा रंग निळसर असतो. ‘आकाश म्हणजे अव- काश पसरला पैस’ –दा १३.७.१. २ वातावरण; अंतराळ. ३ पोकळी-एभा १९.१९३. ४ एक संख्या (शून्य). ५ पंचमहा- भूतांपैकीं शेवटचें. यांत इंधक (ईथर) भरला असून तो ध्वनिवाहक आहे. ६ (वेदांत) निर्गुण स्वरूप. ‘ऐसाही जरी धिंवसा । बांधोनियां आकाशा ।।’ –ज्ञा १२.७४. कांहीं समाशब्द-घटाकाश; मठाकाश; महदाकाश; चिदाकाश इ॰ [सं.] हा शब्द पाताळ शब्दाबरोबर येतो. असे कांहीं वाक्प्रचार. ॰पाताळ एक- गर्वानें फुगून गेलेल्या माणसाबद्दल योजतत. ॰पाताळ एक होणें- अति जोराचा पाऊस पडणें (मोठ्या पावसांत जमीन-अस्मान एक झालेलें दिसतें म्हणून.) ॰पाताळ एक करणें- हलकल्लोळ करणें; आरडा ओरडा करणें; धिंगाणा घालणें (रागानें, हट्टानें). ॰पाताळाचा भेद- दोन वस्तूं- मधील महदंतर दाखविणें. ‘आत्मा आणि बुद्धि हीं जर तूं एक सम- जत असलास, तर आकाश पाताळाचा भेदच तूं नाहींसा केलास असें म्हटलें पाहिजें.’ ला घेरा घालणें-देणें- अचाट कृत्यें करणें; मोठ- मोठे पराक्रम करणें; दिग्विजय करणें; अशक्य गोष्टीस हात घालणें; महत्त्वाकांक्षी होणें. ॰शाची चौघडी करणें- आकाशाला घेरा घालणें. ‘आकाशाची करवले चौघडी । महामेरूची बांधवेल पुडी । शून्याची मुरडवेल नरडी । परी मनाच्या ओढी अनिवार ।।’ -ची दोरी तुटणें- आकाशाची कुऱ्हाड पडणें. ‘तों एकाएकींच आका- शाची दोरी तुटते तैशी गोळी येऊन...उजवे बर्गडींत लागली.’ -भाब ८१. -शींराहणें- वरच्या मजल्यावर, आढयाखालीं राहाणें. -ला गवसणी घालणें- अशक्य गोष्ट करावयास धजणें; आका- शाला घेरा घालणें. -वी कुऱ्हाड-धाड पडणें- दैवी आपत्ति येणें; निसर्गाच्या आपत्ती येणें; अत्यंत मोठी हानि होणें. उ॰ पति मरणें; एकुलता एक पुत्र मरण पावणें. ‘चिटणीस, तुमच्यावर आज आका- शाची कुऱ्हाड कोसळली आहे.’ –स्वप ४४६. म्ह॰ आकाशाची कुऱ्हाड कोल्ह्याच्या दांतांवर. -ची साल काढणें- निष्फळ प्रयत्न करणें. ‘तेणें साली काढावी आकाशाची ।’ –अमृ ६.४७. -तून उतरणें, पडणें किंवा अस्मान फाडून येणें- अघटित घटना दाखविणें. म्ह॰ आकाशांतून पडलों आणि भुईवर सावरलों. –नि ५९८. -ला शिड्या लावणें- शक्तीबाहेर काम करणें. ॰फाटणें- सर्व बाजूंनीं एकदम संकटें येणें. ‘आकाश फाटलें त्याला लावावें ठिगळ कुठोनी ।’ –संग्रामगीतें. हेंच दुसऱ्या शब्दांत उदाहरण. -शास ठिगळ लावणें- निरर्थक प्रयत्न. ‘हरि-भय-दीर्ण नभ करिल धड लावुनि कृष्णसार थिगळाला ।’-मोभीष्म ६.४४. ॰कक्षा- स्त्री. दृश्य क्षितिज. ॰कुसुम- न. खपुष्प; असंभाव्य किंवा अवास्त- विक गोष्ट (सशाच्या शिंगाप्रमाणें). ॰गंगा-नदी- स्त्री. आकाशां. तील नदी; तारांचा एक विशिष्ट समुदाया; अति सूक्ष्म अशा ताऱ्यांचे आकाशांत दिसणारे दोन पट्टे. हे दक्षिणोत्तर गेलेला दिसतात. पहिला पट्टा अगस्ति ताऱ्याच्या पूर्वेस मघांच्या रेखांशांजवळून निघून व्याधाच्या पूर्वेकडून आर्द्रांच्या पश्चिमेस वळतो व तेथून तो ध्रुवाच्या पश्चिमेपर्यंत पसरलेला आहे. दुसरा पट्टा श्रवण नक्षत्राजवळून ध्रुवाच्या पूर्वेकडे गेलेला आहे. पहिल्यापेक्षां दुसरा पट्टा लहान आहे. दुर्बिणीनें दिसणारे यांतील तारे सुमारें दोन कोटी आहेत. ॰गमनविद्या- सिद्धी- स्त्री. यौगिक सिद्धीपैकीं एक; आकाशांत संचार करण्याची माहिती; अर्वाचीन विमानविद्या. ॰दिवा-दीप- पु. आश्विन शुद्ध पौर्णिमेपासून कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत (पितरांना प्रकाश दिसण्या- करितां) भिंगाचा किंवा कागदाचा दिवा (कंदील) करून एखाद्या उंच काठीस किंवा झाडास टांगून लावतात तो. २ खुणेसठीं एखाद्या उंच जागीं लावलेला दिवा. ॰नगर- ढगांच्या विचित्र आकृतींवरून वाट- णारें ढगांतील किंवा आकाशांतील काल्पनिक शहर; (विप्र.) गंधर्वनगर; गंधर्वसृष्टी. ॰पट- पु. ज्यामध्यें अक्षांश, रेखांश, विषुववृत्त, क्रांतिवृत्त, अयनवृत्त, नक्षत्रें, राशी, तारे, यांच्या आकृती दिलेल्या असतात असा नकाशा. यावरून सूर्य, चंद्र, ग्रह, उपग्रह, यांचे मार्ग ठरवितां येतात. [सं.] ॰पथ-मार्ग- पु. १ अंतराळ; आकाशांतून जाणारा रस्ता; यौगिक सिद्धींपैकी एक सिद्धि. ‘दे आकाश पंथें झोंकून । दशदिशा गेले पाषाण ।’ ‘आकाश मार्गी गुप्त पंथ । जाणती योगिये समर्थ ।।’ –दा. २ हवेंतील रस्ता, वाट. ॰पाणी- न. (ल.) ताडी, माडी, इ॰ मादक पेय; ताड, माड हीं झाडें फार उंच असतात व त्यापासून ताडी, माडी काढतात ती त्यांच्या शेंड्याजवळच्या भागापासून काढतात यावरून [सं.] ॰भाषण- न. १ स्वर्गीय देवतांशीं संभाषण; (नाटकांत वगैरे) आकाशाकडे पाहून, देवांना हांक मारून, त्यांचे उत्तर आपण ऐकलेसें दाखवून जें भाषण नाटकांतील व्यक्ति करिते तें. उ॰ ‘हे स्वर्गस्थ देवतांनो !’ २ (नाटकांत) रंगभूमीवर नसलेल्या दुसऱ्या एखाद्या पात्राचे शब्द आपण ऐकत आहों असें रंगभूमीवरील पात्र हावभाव करून सुचवितें व त्यास उत्तर देतें ते शब्द. [सं.] ॰मंडप- पु. आकाशाचें छत; आकाश हाच मांडव. ‘आकाश- मंडप आसडत । नक्षत्रें रिचविती अपार पै ।।’ ॰मंडल- न. खगोल. ॰मापक पु. (शाप.) वातावरणोष्णतास्थित्यंतर मापक यंत्र; किरण- विसर्जनदर्शक यंत्र. (इं.) ईथ्रिओस्कोप. ॰मुनि- पु. उंट (हा वाक्प्रचार उंटाची मान उंच असल्यामुळें पडला.) ॰मूलि- स्त्री. एक. झाडाचा वर्ग (कुंभिका, पुन्नाग, यांचें मूळ जमिनींत नसून अधां- तरीं असतें). जलसंबंधीं वनस्पति. ॰यान-वहन- न. विमान. ॰वल्ली- वेल- स्त्री. १ बांडगुळ; वृक्षरुहा; वृक्षावर वाढणारी वेल. २ शेर वगैरे झाडांवर वाढणारी व बारीक पिवळे तंतू असणारी वेली; सोनवेल; अमरवेल; अंतरवेल. याच प्रकारच्या दुसऱ्या एका वेलीस फुलें येतात. ॰वाणी- स्त्री. १ आकाशापासून निघणारा शब्द; अशरीरिणी वाणी; देववाणी. ‘तुझें हें गाणें म्हणजे आकाशवाणीच मी समजतों.’ –स्वयंवर. २ कोणाकडून एखादी गोष्ट समजली हें जेव्हां सांगावयाचें नसतें तेव्हां म्हणतात. जसें- ‘चिलिट गुणगुणलें.’ ॰वास- पु. वृक्षांदिकांवर राहणें; उंच राहणें.

दाते शब्दकोश

जाणें

अक्रि. १ गमन करणें; चालू लागणें; प्रवास करणें; पुढें सरणें; पूर्वस्थळ सोडणें. 'तो या गांवातून पळून गेला.' २ पूर्वस्थळ सोडून विवक्षित स्थळ गांठणें. 'तो उद्यां पुण्यास जाणार आहे. २ निघून जाणें; नाहींसे होणें; नाश पावणें; हरवणें; हल- विलेलें असणें. 'या कोनाड्यांतली वस्तु कधीं जात नाहीं पण आज गेली.' ३ लोटणें; क्रमणें (वेळ). 'हां हां म्हणतां वर्ष गेलें.' ४ छिद्रादिकांत प्रवेश करणें; आंत शिरणें; समाविष्ट करणें. 'या दौतीचे भोकांत लेखणी जात नाहीं.' ५ (विशेषतः भूतकालांत उपयोग) वायां जाणें; नासणें; निरुपयोगी, टाकाऊ होणें. खराबणें. अयथा- योग्य होणें. 'ही बायको चांगली पण कंबरेंत गेली.' 'हा कसला विद्वान पण अभिमानानें गेला.' ६ घडून येणें, होणें (नजरचूक, गुन्हा, योग्य किंवा रूढ मार्गाचें उल्लंघन) 'हा आंगरखा बरा उतरला पण गुंडीजवळ कांहीं गेलें' 'रोज औषध घेत असें त्यांत एक दिवस माझे हातून गेलें, रोगानें बळ केलें' ७ एखाद्यापासून चुकून होणें, घडून येणें (गफलतीनें एखादी चुकीची गोष्ट). 'ती गोष्ट मजपासून गेली खरी.' ८ वजा होणें; कमी होणें; 'दहांतून पांच गेले तेव्हां राहिले पांच.' ९ निर्बल होणें; शक्ति जाणें; गुण जाणें (इंद्रिय, औषध यांचा) १० अनुसरणें; पाठीमागून जाणें; वेधणें; अभिलषित होणें (मन, डोळे, कान, प्रीति इ॰) (वर अथवा कडे शब्दाबरोबर प्रयोग). 'चांगली बायको करूं नये तिजवर लोकांची इच्छा जाते.' ११ दिलें जाणें (शब्द, वचन-भूतकाळीं उपयोग) १२ विझणें (दिवा, प्रकाश, अग्नि). 'झणकार्‍याबरोबर दिवा गेला' १३ र्‍हास, नाश होणें; झिजणें (शरीर). १४ एखाद्या स्त्रीशीं रत होणें; संभोग करणें. १५ कांहीं पदार्थानें विवक्षित कालपर्यंत टिकणें. 'याला धोतरजोडा सहा महिनेपर्यंतसुद्धां जात नाहीं.' कोणत्याहि क्रियापदाच्या वर्तमानकालवाचक विशेषणाबरोबर ह्या क्रियापदाचा उपयोग केला असतां त्याचा अर्थ क्रियासातत्य दर्शविण्याकडे होतो. उदा॰ जसा व्यापार वाढवाल तसा मी पैसा देत जाईन. २ सकर्मक क्रियापदाच्या पूर्णभूतकाळाबरोबर उपयोग केला असतां कर्मकर्तरीचा अर्थ होतो. जसें-तुला शिक्षा केली जाईल. ३ ऊनप्रत्ययांत धातुसाधिताशीं उपयोग केला असतां याचा अर्थ क्रियापूर्णता दर्शविण्याकडे होतो. जसें-तळ्यांतील पाणी आटून गेलें. शरीर वाळून गेलें ४ दुसर्‍या क्रियापदाच्या आज्ञार्थी रूपानंतर ह्या क्रियापदाच्या आज्ञार्थाचा उपयोग केला असतां पहिल्या क्रियापदावर जोर दिला जाऊन, क्रियेचा जोरदार- पणा सिद्ध होतो. जसें-आण जा; ठेव जा; दे जा; कर जा इ॰ [सं. या; प्रा. जा; फ्रेंजि. जा; रशियन या.] (वाप्र.) जाजा येये- स्त्री. निरर्थक पुनः पुनः जाणें येणें; खेपा. 'माझ्यानें हें हजारदां जाजा येये करवत नाहीं.' [जाणें-येणें] जायाचा-जायां, जायांस-प्रसंगविशेषीं उसना घेतलेला; आपल्या हातांतून पुढें- मागें जाणारा; दुसर्‍याचा (कपडा, रत्नें वस्तु). म्ह॰ जायाचें लेणें लाजिरवाणें. गेलामेला, गेलामेला गतला-सर्वस्वी गेला; अजीबात, कायमचा नाहींसा झाला. (माझें, तुझें, त्याचें इ॰) -काय जातें-गेलें? -मला, त्याला, तुला, त्याची काय परवा, किंमत? गेला तो मेला-गेलेलें पुन्हां भरून येत नाहीं. गेलेला असणें-पाहाण्यांत, अनुभवांत, आढळण्यांत, ऐकण्यांत येणें, असणें. 'हें मला गेलेलें आहे. = हें मला ठाऊक आहे.

दाते शब्दकोश

दात      

पु.       १. चावण्याच्या, फाडण्याच्या उपयोगी तोंडातील दृश्य अस्थिविशेषांपैकी प्रत्येक; दंत. २. (ल.) (फणी, करवत, दंताळे इ. चा) दाता; फाळ; नांगराचे टोक; डंगाचे टोक. ३. हस्तिदंत. ४. द्वेषबुद्धी; मत्सर; दावा; डाव; दंश. [सं. दंत] (वा.) दात, दात ओठ खाणे, चावणे - रागाने दातावर दात घासणे, दातांनी ओठ चावणे; अतिशय चिडणे; रागावणे. दात काढणे, दात दाखवणे - दात विचकून, फिदीफिदी हसणे. दात किरकिटीस येणे - विपन्नावस्था, अन्नान्नदशा होणे; हलाकीची परिस्थिती येणे. दात कोरणे - इकडून-तिकडून खटपटीने जमवणे; अडचणीने मिळवणे. दात खाऊन, ओठ खाऊन - मोठ्या रागाने व अवसानाने. दात खाऊन अवलक्षण करणे, दात चावून अवलक्षण करणे - (प्रतिकार करण्याचे सामर्थ्य नसताना) रागाचा दुबळा आविर्भाव आणून, शिव्याशाप देऊन स्वतःचे हसे करून घेणे. दात खीळ-खिळी बसणे - निरुत्तर होणे; एखाद्यापुढे बोलता न येणे. दात झिजणे - निष्फळ उपदेश केल्याने, केलेल्या विनवण्या व्यर्थ गेल्याने, शिकवलेला विषय मूर्ख विद्यार्थ्याला न समजल्याने तोंडाला फुकट शीण, श्रम होणे. दात धरणे, दात असणे, दात ठेवणे, दात राखणे, दात बाळगणे - द्वेष, मत्सर करणे; डाव धरणे; पूर्वीचे शल्य मनात ठेवून एखाद्याच्या नाशासाठी टपून बसणे. दात पडणे - (एखाद्याची) फटफजिती, नाचक्की होणे. दात पाजवणे-एखादी वस्तू (विशेषतः खाण्याची) मिळण्याजोगी नसताना तिच्याबद्दल उत्कंठित, आतुर होणे. दात पाडणे - (एखाद्याची) फजिती करणे; वादात पराजित करणे; टोमणा मारणे; निरुत्तर करणे; विरोधकांचे सर्व मार्ग बंद करणे; अद्दल घडवणे. दात पाडून हातावर देणे - कंबख्ती काढणे; पारिपत्य करणे; उट्टे फेडणे (विशेषतः धमकावणी देताना उपयोग). दात लागप - पैसे पदरी असणे; खाऊनपिऊन सुखी असणे. (गो.) दात वठणे, दात लागणे - (उच्चारलेला शाप एखाद्यावर) फलद्रूप होणे. दात वासणे - हाती घेतलेले कार्य शेवटाला नेता येत नाही म्हणून निराश होऊन स्वस्थ बसणे. दात वासून पडणे - १. आजाराने अशक्त होऊन अंथरुणाला खिळणे. दात विचकणे - १. उपहासाने हसणे. २. याचना करणे; काही मिळवण्यासाठी एखाद्याला विनवणे. दातकिची खाणे - (रागाने) कचाकच, कडकड दात चावणे. दात निसकीस येणे - १. त्वेष, स्फुरण, आवेश इ. नी युक्त होणे. २. जिवावर उदार होणे : ‘मल्हारराव यांचे इरेनें दातनिसकीस येऊन मोठमोठे खेतांत जीवाअधिक केली.’ - भाब ११. दाताओठांवर जेवणे - चोखंदळपणाने जेवणे. दाताखाली घालणे, दाताखाली धरणे - करडा, सक्त अंमल चालवणे; कडकपणाने वागवणे; अतिशय छळणे; गांजणे. दाताची मिरवणूक काढणे - स्वतःचे हसे करून घेणे. (कर.) दाताचे विष - मत्सराने, जळफळाटाने काढलेले विषारी उद्गार; शिव्याशाप. दाताचे विष बाधणे - १. पहा : दात वठणे. २. दुसऱ्याला बाधेल असा शाप देण्यास समर्थ असणे. दाताच्या कण्या करणे, घुगऱ्या होणे - १. विनवण्या, याचना करून, व्यर्थ उपदेश किंवा शिकविण्याचा निरर्थक खटाटोप करून दात झिजवणे; तोंड शिणवणे. २. अनेकवार सांगणे, विनवणे. दातावर मारायला पैसा नसणे - अगदी अकिंचन, निर्धन असणे, बनणे, होणे; जवळ एकही पैसा नसणे. दातावर मांस नसणे - १. पैशाचे पाठबळ नसणे; दारिद्र्याने ग्रस्त होणे : ‘आपल्या तर दांतांवर मांस नाहीं. कुटुंब एवढें थोरलें...’ - पकोघे. २. कोणाशीही भांडण्याचे किंवा कोणालाही इजा करण्याचे सामर्थ्य अंगी नसणे. दातावर येणे - अंगावर येणे; व्यवहार आतबट्ट्याचा होणे. दाताला दात लावून असणे, दातास दात लावून असणे, दाताला दात लावून निजणे, दातास दात लावून निजणे, दाताला दात लावून बसणे, दातास दात लावून बसणे, दाताला दात लावून रहाणे, दातास दात लावून रहाणे - तोंड मिटून, काही न खाता, उपाशी, न बोलता बसणे, रहाणे इ. दाती घेणे, दातावर येणे - एखाद्या कार्यात अपयश येणे; व्यापार इ. मध्ये नुकसान होणे. दाती तृण, दाती तण, दाती कड्याळ धरणे - मान तुकवणे; नम्रपणा स्वीकारणे; शरण येणे; पराभव मान्य करणे. दाती बळ धरणे - अतोनात मेहनत, धडपड, नेट करणे; प्रयासाने, नेटाने काम करणे. दाती येणे - १. रागाने दात-ओठ खाणे; भांडायला प्रवृत्त होणे : ‘येकीस येकी ढकलून देती । येताति येकीवरी एक दांतीं ।’ - सारुह ७·६०. २. फार अडचणीत, पेचात येणे, सापडणे. (एखाद्याचे)दात त्याच्याच घशात घालणे - एखाद्याची लबाडी बाहेर काढून त्याची फजिती करणे; (एखाद्याची) लबाडी त्याच्यावरच उलटवणे. सोन्याने दात किसणे - पैशाच्या राशीत लोळणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जीभ      

स्त्री.        १. चव घेणे, अन्न घोळवणे चाटणे व गिळणे या कार्याना मदत करणारा तोंडातील स्नायू: रसनेंद्रिय. २. (ल.) जिभेच्या आकाराची वस्तू, भाग. [सं. जिव्हा] (वा.) जीभ आवरणे - बोलण्यावर नियंत्रण ठेवणे : ‘चंपे, जीभ आवर.’ - गुशि १८१. जीभ काढणे - पदार्थ खाण्यासाठी आशाळभूतपणा करणे. जीभ चावणे, जीभ चावलीशी करून बोलणे - १. चूक लक्षात येणे. २. भिऊन, संकोचामुळे दबत दबत बोलणे. जीभ चुरुचुरु चालणे - अयोग्य, अप्रासंगिक, वेडेवाकडे बोलणे. जीभ जड असणे, जीभ जड होणे - १. लवकर पाठ करता न येणे. मंदबुद्धी होणे २. (अस्पष्टोच्चारामुळे) बोलता न येणे; चांगले शुद्ध बोलता न येणे. जीभ झडणे - (खोटे वगैरे बोलण्याने) वाचा नाहीशी होणे. जीभ नरकात घालणे - पोकळ वचनांनी रिकाम्या बढायांनी वगैरे जीभ विटाळणे; खोटे बोलणे. जीभ पाघळणे - गुप्त वार्ता फोडणे; न बोलावयाची गोष्ट, गुप्त गोष्ट बोलणे. जीभ बधिर होणे - जीभ जड होणे. जीभ मोकळी सोडणे - हवे तसे बोलणे, खाणे; बंधन, नियम न पाळणे. जीभ मोडणे - बोबडी वळणे; मुके बनणे; शब्द न फुटणे. जीभ लवलव करणे - चुरुचुरु बोलणे. जीभ लाल-चावणे - खाण्याला उत्सुक असणे; तोंडाला पाणी सुटणे. जीभ लांब करून बोलणे - वरिष्ठांशी अघळपघळ बोलणे; उर्मटपणाने बोलणे. जीभ वळवळणे - (लहान मुलाने) १. बोलण्याचा प्रयत्न करणे; बोलावयास लागणे. २. शिव्या देणे; अद्वातद्वा बोलणे जीभ विटाळणे - अपशब्द बोलणे; वेडेवाकडे बोलणे. जीभ शिंदळ, जीभ निसरडी - वाह्यात, ताब्यात नसलेली जीभ. जीभ सैल सुटणे - बडबड सुरू होणे : ‘समुदाय मिळाल्यावर जीभ सैल सुटे.’ - कलंदर २३७. जीभ सोकणे, जीभ सोकावणे - १. चटक लागणे. २. चव येणे (अन्नाची - सरावाने). जीभ हाती धरणे - मन मानेल तसे बोलणे, खाणे. जिभा अवघडणे - बोलायला सुचेनासे होणे : ‘त्यांच्या पैशाला अशा चारीकडनं वाटा हैत. मग कशाचं गटळ करतोय? यावर दोघांचं बोलणं कुचमलं, जिभा अवघडल्या.’ -वळीव ३६. जिभेचा पट्टा - अद्वातद्वा बोलणे; वाचाळता. जिभेचा पालट - खाण्यात बदल; रोजच्या खाण्याच्या पदार्थांऐवजी इतर पदार्थ खाणे. जिभेचा लोळ, जिभेचा लोळा -अतिशय कढत पदार्थ खाल्ल्याने जीभ भाजून जाणे. जिभेचे फुटाणे फुटणे - फाडफाड बोलणे. जिभेच्या टोकावर असणे - बोलून टाकण्याच्या तयारीत असणे; तोंडपाठ असणे : ‘आपल्या अगदी जिभेच्या टोकावर ते नांव आहेसे तुम्हांला वाटत राहतें नि असे असूनहि तुम्हांला तें आठवत नाहीं.’ - हखेमओ ६१. (एकाच) जिभेने साखर किंवा गू खाणे - एकाच वेळी बरेवाईट म्हणणे; दोन्ही प्रकारे बोलणे. जिभेला काटा लावणे - एखादी गोष्ट गुप्त ठेवणे. जिभेला चिमटा घेणे - तोंड ताब्यात ठेवणे. जिभेला टाचा देऊन (काही एक) ठेवणे, जिभेस टाचा देऊन (काही एक) ठेवणे - आपण न खाता दुसऱ्यासाठी गोड पदार्थ राखून ठेवणे. जिभेला डाग देणे - जीभ ताब्यात ठेवणे; जिभेला नियंत्रण घालणे. जिभेला लगाम घालणे - बोलण्यावर नियंत्रण ठेवणे : ‘थोडा जिभेला लगाम घाल.’ - राऊ १६०. जिभेवर असणे - १. तोंडपाठ असणे. २. अगदी ताज्या आठवणीत असणे. ३. बोलून टाकण्याच्या तयारीत असणे. जिभेस आडवा वेढा नसणे - वाह्यात बडबड करणे; निरर्थक प्रलाप काढणे. जिभेस हाड नसणे - जीभ ताब्यात नसणे (खोटे बोलणे, शिवीगाळ करणे यात); खोटे, अपशब्द बोलण्याचे भय नसणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

रान

न. १ जंगल; वन; विशेषत: जंगलांतील खुजा, ठेंगण्या झाडाझुडपांचा समुदाय. २ तळवट; माळ; रुक्ष प्रदेश; नापीक व निर्जन प्रदेश. ३ मनुष्यास उपभोग्य असा भाजी-पाला इ॰ कांहून भिन्न असें तण, गवत, उपद्रवी-निरुपयोगी वनस्पती इ॰ 'भाजीचे वाफ्यांत कोठें कोठें रान रुजलें आहे तें उपटून टाक.' ४ शेतांत उगवणारें गवत; तन. ५ शेत. ६ झाडी; राई; बन; वृक्षवाटिका. 'बंदर किनार्‍यास सारें नारळींचें रान.' ७ देश; प्रदेश; भाग. 'मारवाडदेश म्हणजे उंटाचें रान.' 'त्या रानचे मनुष्यास हें रान मानत नाहीं.' ८ विदेश; परका मुलुख. 'परस्परें या रानांतील उमराव व रजवाडे यांस पत्रें देऊन तुमची कुमक करवितों.' -भाव १३. ९ (ल.) फार मोठी वाढलेली हजामत. प्रदेश ह्या सामान्य अर्थी रान शब्दा- पूर्वीं विशेषणात्मक शब्द जोडल्यानें त्याचा विशेष अर्थ होतो; उदा॰ डोंगररान; खडकरान; धोंडेरान किंवा गोटेरान; वनजररान गवतरान; माळरान इ॰ तसेंच काळें रान, पांढरें रान, चिक्कणरान काळया-पांढर्‍या-चिक्कण मातीचा प्रदेश. नवें रान = पूर्वीं जंगल किंवा माळ असून नुकतीच लागवडीस आणलेली जमीन [सं. अरण्य; प्रा. रण्ण] म्ह॰ (गो.) रान झालें लागीं घरां जाली पैस = म्हातारपण प्राप्त होणें, मरण जवळ येणें या अर्थीं. (वाप्र.) ॰उठणें-लोक खवळणें; क्रुद्ध होणें. 'म्युनिसिपल इमारतीवर संयुक्त निशाण लावण्याचा ठराव हुजूरपक्षानें फेटाळला त्यामुळें शहरांतील रान उठलें होतें.' -के २२.७.३०. ॰उठविणें- जागाविणें-पारधीकरितां धडधड आवाज करून सावजांना जागें करणें. झाडींतून पारध, सावज बाहेर हुसकणें. 'रान उठविल्या- शिवाय, जागविल्याशिवाय शिकार कशी सापडेल ?' ॰काढणें- १ जंगल-जमीन लागवडीस आणणें. २ झाडें झोडपून व ओर- डून ओडडून शिकार उठवणें. ३ रानाचा, जंगलाचा शोप लावणें. ॰खवळणें-१ एखाद्यावर खवळणें; उठणें (रान, श्वापदें). २ अतिशय क्षुब्ध होणें, (राग, भूक, लोभ, काम इ॰ कानीं). 'लवकर जेवायला वाढा, आज इकडे रान फार खवळलें आहे.' ॰घेणें-१ रानांत पळून जाणें (गुरांनीं). २ (ल.) वेढंग मार्गाचा स्वीकार करणें; बारगळणें. ३ रानांत शिरणें पहा. ॰बदलणें- सोडणें-पारखें होणें-(ल.) आपलें मन किंवा उद्देश बद- लणें; एखाद्यासंबंधीचा आपला विचार फिरविणें; आपला पूर्वींचा मुद्दा सोडून देणें. ॰भारणें-१ सर्व प्रदेशावर जादू पसरणें; मंत्र टाकणें. 'तमाम गारोडी रान भारतो तसा प्रकार त्यानें केला.' -भाव २४. २ (ल.) यथास्थित पैसे चारणें. ॰मानणें-त्या देशाची हवा इ॰ प्रकृतीस मानवणें, पसंत पडणें. 'कोंकणच्या माणसास हें रान मानवत नाहीं.' ॰हांकणें- (शिकार उठविण्याकरितां) झाडें झोडपणें व आरडाओरड करणें. रानांत, आडरानांत पडणें-एकटें सापडणें; उदास होणें. रानांत शिरणें-(ल.) (संभाषणप्रसंगीं) सरळ मार्ग सोडून अयोग्य गोष्ठी सांगत बसणें; विषयांतर करणें; बहकणें. रानीं रिघणें-अरण्य सोविणें. 'ब्रह्म- सुकाळु लाघला ते ही । जे रानीं रिगाले ।' -ऋ १६. रिकाम्या रानीं-क्रिवि. बेफायदेशीर; व्यर्थ; निरर्थक; फुकट; (बोलणें, चालणें). 'आतां एथें काम नाहीं काज नाहीं. रिकाम्यारानीं कशाला बसावें, रहावें, फिरावें इ॰.' रान या शब्दापुढें पक्षी, पशु व वनस्पति यांचीं नांवें जोडून रानटी किंवा व माणसाळलेला, न लागवड केलेला या अर्थीं बरेच समास होतात. जसें.-रानडुक्कर; रान- मांजर; रानकेळ; रानउडीद; रानतूर; रानपडवळ; रानमटकी; रान- मसूर; रानमाठ; रानमूग इ॰. तसेंच रावआंबा-केळी-कोंबडा-जेवण. या व यासारख्या दुसर्‍या अनेक सामासिक शब्दांत /?/ ह्याचा रानांत राहणारा किंवा होणारा असा अर्थ होतो; कांहीं विशिष्ट सामाशब्द- ॰आंबा-पु. वृक्षविशेष. ॰आलें-न. रानांत होणारें आलें. ॰आळू-न. तेरें अळूं. हें पर्जन्यकाळीं उगवतें; याचा रंग पाढरा, हें फार थंड आहे याची भाजी चागली होते. ॰कट- वि. खेडवळ; गांवढळ; वनांतील (मनुष्य, पशु). [रान] ॰कंद-पु. एक कंद. ॰करी-पु. रान्या; गवत, ताकूडफाटा इ॰ आणण्याकरितां रानांतच फिरणारा माणूस. ॰काढ्या-वि. शिकार कर- ण्यासाठीं रान काढण्याकरिता लावलेला (मनुष्य); पारध्याकरितां सावज कचाटयांत आणणारा. ॰कांदळ-न. एक वन्य वृक्ष. ॰कापशी-स्त्री. रानांतील कापशीचें झाड; देवकापशी, देवपळ्ही- हून भिन्न व पिळ्हेशीं जुळणारी. हिचें बीं लहान व वाटोळें असून देवकापशीचें मोठें व लांबट असतें. ॰कापूस-पु. रानकापशीचा कापूस. ॰कोवळा-पु. कावळ्याच्या जातींतील जंगली पक्षी. ॰केळ-ळी-स्त्री. केळीची जंगली जात. हिच्या पानावर जेवतात. कांदा उकडून किंवा वाळवून त्याचें पीठ करून खातात; कवदर व ही एकच. कवदर पहा. ॰कौबडा-डी-डें-पुस्त्रीन. जंगली कोंबडा. ॰खरडा-पु. जंगलखरडा पहा. ॰गट-वि. १ खेडवळ; गांवढळ. २ वन्य; लागवडीशिवाय उगवणारा. [रान] ॰गांजा-ज्या-पु. एक औषधी मूळ; सालवण. याचीं पानें बेलाप्रमाणें त्रिदळ असून यास निरनिराळया रंगाचीं फुलें येतात. याचें मूळ सर्व प्रकारचे तापा- वर गुणकारी आहे. ॰गाय-स्त्री. तार्तरी देशांतील गाय; वनगाय. ॰गोवरी-स्त्री. जंगलांत सांपडणारें इतस्तत: पडलेलें शेण, शेणी. याच्या उलट शेण थापटून लावलेली गोवरी. ॰घेवडा-पु. एक वेल. ॰घोळ-स्त्री. घोळ नामक भाजीचा एक प्रकार. हिचें पान रंगानें तांबूस चरबट असतें. ॰चा राजा-पु. भील किंवा कात- करी. ॰चिमणी-स्त्री. १ चिमणीसारखा एक लहान पक्षी. २ जांभळीं व पांढरीं फुलें येणारें एक झाड. ॰जाई-स्त्री. उंच वाढ- णारें वेलासारखें झुडुप. ॰जेवण-न. वनभोजन; रानात किंवा झाडाखालीं केलेलें जेवण. रानट, रानक(ग ट-वि. १ रानांत राहणारा; रानटी; अज्ञानी. 'होतां तापत्रयार्त त्वरित भववनीं रक्षितां रानटाचा ।' -केका १२२. २ आडगांवीं राहणारा; शहर, कचेरी, गरबार इ॰ ठिकाणीं न जाणारा; अडाणी (मनुष्य). ३ जींत भात, गहूं इ॰न येतां गवत फार उगवतें अशी जमीन. ॰टाकळी-स्त्री. टाकळीची एक जात. रानटी-ठी-वि. १ रानासंबंधीं; आपो- आप उगवणारा. २ गांवढळ; खेडवळ; रीतभात नसलेला. [रान] ॰टोणगा-पु. जंगली टोणगा; रेडा. ॰टोळ-पु. टोळाची एक जात. ॰डुक(क्क)र-पुन. भुइमूग, ऊंस, भात इ॰ पिकांचा फन्ना उडविणारें रानटी जनावर. ॰तरवड-पु. तरवडाची एक जात. ॰तीळ-पु. काळा तीळ पहा. ॰तुळस-स्त्री. एक वनस्पति; वैज- यंती, ही तुळशीसारखीच असते. पानें मात्र मोठीं असतात. हिला मंजिर्‍या येतात. बीं काळें, किंचित् तांबूस व खसखशीएवढें असून पाण्यांत घातलें असतां फुगतें. हें तुकुमराई (सबजाचें बीं) प्रमाणें असतें. यासहि तुकुमराई म्हणतात. ॰र-स्त्री. एक लहान पिवळ्या फुलांचें झुडुप. ॰तेरडा-पु. तेरड्याची एक जंगली जात. ॰दांडगा- वि. आडदांड; रानटी; धिप्पाड; राक्षसी काम करणारा. ॰दांडगे- पुअव. सर्व तर्‍हेचीं शस्त्रें घेऊन शत्रूचा किंवा लुटारू घाडीचा प्रति- कार करण्याकरितां जाणारा शेतकरी किंवा खेड्यांतील लोकांचा समुदाय. ॰निंबू-न. राननिंबोणीचें फळ. निंबोणी-निंबूण- स्त्री. एक मोठें कोटेरी झाड. ॰निवडुंग-पुन. जंगली निवडुंग. ॰पासरा-पु. दुकानदारीची झिंबड. ॰पाळ-वि. नापीक; भुकिस्त; बरड; माळवजा (भातजमीन). ॰पिंपळ-पु. पारोसा पिंपळ; एक झाड. ॰बाजरी-स्त्री. गवतासारखी वनस्पति. ॰भरी-क्रिवि. रानोमाळ. 'रानभरी झाले साधारण ।' -एभा २३.३१६. ॰भरी- भरू-वि. १ भयभीत; घाबरलेला; पलायमान; परागंदा (पशु, मनुष्य). 'महा वारण जे उन्मत्त । दैत्यें सोडिले तयावरते । तमास प्रल्हाद सिंह दिसत । मग ते होत रानभरी ।' २ (ल.) चैनीकरितां इतस्तत: भटकण्याच्या हेतूनें ज्यानें आपली बायका- पोरें सोडली आहेत असा. [रान + भरणें] ॰भरू होणें-१ रस्ता चुकणें; आडरस्त्यास जाणें. २ गोंधळणें; घाबरणें; घाबरें होणें. ॰भाजी-स्त्री. १ लागवडीशिवाय उगविणारी भाजी. २ वनांत होणारी खाद्य वनस्पति. ॰मटकी-स्त्री. रानांत होणारी मटकी, मठ. ॰मसूर-स्त्री. एक जंगली झाड; हीं झाडें महाबळेश्वराकडे पुष्कळ होतात; ह्यांचें बीं मसुरासारखें असतें. ॰माजर-पुन. जंगली मांजर; मोठा व धाकटा असे याचे दोन मेद आहेत. ॰माणुस- न. १ एक प्रकारचा वानर. २ (ल.) रानटी; खेडवळ माणूस. ॰मूग-पु. रानात होणर्‍या मुगाची जात. ॰मोगरा-पु. अरुंद पानाची जाई. ॰म्हैस-स्त्री. जंगली म्हैस. ॰रावताण-णी- नस्त्री. रावताण पहा. ॰वट-स्त्री. मोठ्या रस्त्यापासून फुटलेली रानास जावयाची वाट 'पुढच्या आंब्याजवळ वाट उजवी फुटली आहे ती रानवट आहे.' -वि. १ जंगली; लागवड न केलेली व साफ न केलेली (जमीन). २ खेडवळ; गांवढळ; रानटी (मनुष्य). ३ वन्य आपोआप उगवणारा (वृक्ष, वन- स्पती). ॰वत-न. (राजा.) वन्य वृक्षांचें पान; ज्यांचीं पानें सामान्यत: भोजनाकरितां, पुड्याकरितां उपयोगी पडत नाहींत अशा झाडाचें पान. [रान + पत्र] ॰वन-न. (व्यापक) रान; जंगली प्रदेश; रानांच फिरणें, वन्य पदार्थांवर उपजीविका करणें किंवा निर्वाहाकरितां वन्य पदार्थ शोधणें. (क्रि॰ करणें; पाहणें; फिरणें; हिंडणें). 'रानवन मला व्हाव्याचें-किंवा भी करीत असतों.' [रान + वन] रानवा-पु. लागवडीस न आणलेली पडीत जमीन; जंगल; रान. 'गांवाला रानवा असल्यावांचून तृणकाष्ठाची सोय होत नाहीं.' रानवाट-स्त्री. जंगली व रानवट प्रदेशाकडे जाणारी वाट. ॰वाळूक-न. (थट्टेनें, ल.) दगड. ॰वाळूक चारणें-(ल.) दगड मारणें. ॰शकट्ट-पु. एका जातीचें श्वापद. 'रानशकट्ट आणी रीसें ।' -दा ३.७.९. ॰शेकट-पु. रानशेवगा पहा. ॰शेण-शेणी-गवरी-स्त्री. १ रानांत पडलेलें गाई-म्हशीचें वाळलेलें शेण, याच्या उलट वळशेण. २ जेव्हां एखाद्या मनुष्याचें ज्ञान, समज, सामर्थ्य किंवा संपत्ति यासंबंधीं पूर्णपणें निषेध दाख वाववाचा असतो तेव्हां उपमानाप्रमाणें योजलेल्या (शेण, गोवर्‍या, माती, धूळ, दगड, धोंडा, राख इ॰) शब्दापैकीं हा एक शब्द आहे. उदा॰ त्याला रानशेणीचें पीठ समजतें ? = त्याला काय समजतें ? ॰शेर-पु. एक वनस्पति; हुरा. ॰शेवगा-पु. एक झाड. सामा- न्यत: रानेशर. ॰सठ(ट)वी-स्त्री. सठवीचें रूप धारण करणार्‍या देवीचें किंवा दुर्गेंचें नांव. 'उच्छिष्टचांडाळी रानसटवी जखणी ।' -ह १३.६८. ॰सावज-न. रानांतील जंगली पशु. 'कीं रानींचें रानसावज उन्मत्त ।' -नव २२.१३१. ॰सिवार-न. शिवारां- तील जंगल. 'गांवचें रानसिवार खोताची सत्ता आहे.' -मसाप २.५९. ॰सोडवण-स्त्री. रान तोडून साफ केल्याबद्दलची जकात. -अस्पृ ३८. ॰सो(व)र-सोरु-पु. रानटुक्कर. 'रानसोवर बळकट ।' -कालिका २२.१९.[रान सूकर-सूअर-वर] ॰हळद- दी-स्त्री. एक वनस्पति. ॰हुरा-पु. सामान्यत: रानशेर. राना- वळी-स्त्री. एक लहान फुलझाड. हिचा औषधांत उपयोग करतात. रानी-परज-स्त्री. सुरतपासून नवापूरपर्यंत राहणारे रानटी लोक. रानोमाळ-क्रिवि. १ रानांत आणि माळांत. २ तजावजा; अव्यवस्थित; अस्ताव्यस्त रीतीन; पांगून. 'तैसे ब्राह्मण रानो- माळ । भयें करूनि फळतात ।' ३ (ल.) पसरल्यासारखें; इकडे तिकडे अस्ताव्यस्त फेकल्यासारखें. 'वार्‍यानें पोथीचीं पत्रें रानो- माळ झाली.' [रान + माळ] रानोरान-क्रिवि. रानांतून आणि वनांतून; दरीखोर्‍यांतून; सर्व देशभर. 'माझी गाय चुकली म्हणून मी रानोरान फिरलों' [रान द्वि.] रान्या-वि. रानावनां तील; खेडवळ; गांवढळ; रानकरी; रानट. [रान]

दाते शब्दकोश

भार

पु. १ गुरुत्व; जडपणा. ज्या योगानें पदार्थ निराधार असतां खालीं येतो तो पदार्थाचा धर्मविशेष. २ वजन तोलून काढलेलें परिमाण. ३ कोणतीहि वजनदार वस्तु; वस्तु; दाब; दडपण. 'कागद वार्‍यानें उडतात त्यावर कांहीं भार ठेव.' ४ (ल.) (काम, उपकार, मेहेरबानी इ॰ चें) वजन; ओझें. 'तो भारु फेडावेआ जगन्नाथा । अवतरलासी तूं ।' -शिशु १४७. ५ (ल.) ओझ्याप्रमाणें मानलेलें काम; दयेचें कृत्य; उपकार. ६ (ल.) महत्त्व; गौरव; धन्यता; वजन ७ शैत्यादि विकरामुळें डोक्यास भासणारा जडपणा. 'आज माझे मस्तकास भार पडला आहे.' ८ एक रुपयाच्या वजनाइतकें वजन; एक तोळा वजन. 'ही वाटी पंचवीस भार आहे.' ९ (समासांत पदलोप होऊन) विशिष्ट वजन. 'पैसाभार लोणी, ढबूभार साखर, वीस रुपये भार गूळ.' १० ओझें; वजन उदा॰ काष्ठ-तृण-पर्ण-भार. 'सोनसाखळीचा झाला भार ।' -मसाप २.१. ११ (सैन्याचें एक अंग म्हणून) संख्या- बल. जसें-अश्वभार, कुंजलभार, दळभार, रथभार इ॰. १२ (काव्य) कळप; तांडा; समूह. 'वाटेसि गडगडतां व्याघ्र । थोकती जैसे अजाचे भार।' १३ समूह; समुदाय; मेळा; गर्दी. उदा॰ गोभार, द्विजभार, भृत्यभार इ॰. 'आशीर्वचनीं जयजयकार । करूनि बैसला ऋषींचा भार ।' -मुआदि १६.११०. १४ सेना; समूह. 'दळ- व्याचा भार कुरडूंच्या मैदानीं गेला ।' -एपो ६८. १५ भर; बहर.'मग हें रसभावफुलीं फुलैल । नानार्थ फळभारें फळा येईल ।' -ज्ञा ११.२०. 'नम्र होती फळभारें तरुवर सारे' -शाकुंतल. १६ ओझें; काळजी; जबाबदारी; आधार. 'सखे, मी सर्व भार परमेश्वरावर ठेविलेला आहे.' -रत्न २.१. १७ व्यूह; बेत. 'ते पाहोन राजभुवरानें लष्कर पायदळ फौज करून भार रचिले.' -इमं ९. १८ आठ हजार तोळे वजन. (चार तोळे = १ पल; १०० पला = १ तुला; २० तुला = १ भार. 'रत्नें प्रस्थ भार एक एक कनक । ऐसी दक्षिणा आरंभीं ।' -जै १.९१ -वि. जड. 'मत्प्रश्न भार कां गमला?' -मोअश्व २.३०. [सं. भार; फा. बार] ॰कस-नपु. १ गाड्यावर किंवा उंट, हत्ती इ॰च्या पाठीवर सामान कसून बांधण्याचा सोल, दोर. २ वादळांत तंबू डळमळूं नये ,म्हणून त्याच्यावरून टाकून जमिनीस खिळविलेली दोरी. [तुल॰ फा. बारकश्] ॰ग्रस्त-पीडित, भाराकुल, भाराक्रांत, भारान्वित, भारार्त-वि. (शब्दशः व ल.) ओझ्यानें पीडि- लेला, त्रासलेला. ॰दडीचावि. वजनदार; भारदस्त. ॰दर्शक- वि. वजन दाखविणारें (परिमाण). उदा॰ मण, पौंड, तोळा, मासा इ॰. ॰दस्त-दस्ती-दास्त-दार-वि. १ वजनदार; मह- त्त्वाचा. २ बहुमोलाचा; मूल्यवान्. [भार + फा.दस्त इ॰] ॰दस्ती- दारी-स्त्री. १ वजन; महत्व. २ हुकमत चालविण्याचें सामर्थ्य, अधिकार, सत्ता. भारंदाज-वि. वजनदार; फायदेशीर; भरभरा- टीचा (माणूस, धंदा). [फा. बार + अंदाज] भारंदाजीस्त्री. सार; महत्त्व; भरीवपणा; फायदेशीरपणा (मनुष्य, काम इ॰चा). ॰दार-वि. निष्णात; प्रवीण; वाकबगार; महत्त्वाचें काम कराव- याला जबाबदारी घेण्याला लायक, समर्थ. [हिं.] ॰दारी-वि. ओझें वाहणारा; ओझ्याचा. 'जरूरियात प्रसंगीं भागीदारी गाडे लागल्यास...' -राजमहाल कामगारी कारकुनांच्या कर्तव्या- संबंधीं नियम पृ. ६. ॰धडी-स्त्री. १ जड वस्तु; भारी सामान. 'भारधडी झाडून गेली परंतु वस्तीस मनुष्यें होतीं.' -भाब ३०. २ गैरलढाऊ लोक. 'मल्हारराव यांचीं मुलेमाणसें भारधडी इंदुरास राहिली.' -भाब ९६. ॰ब(बा)रदारी-क्रिवि. लवा- जम्यासह. 'औरंगाबादेहून देखील भारबारदारी दिल्लीस जात आहेत.' -शाछ १.२७. [भार + बरदार = वाहक] भारंभार-वि. सारख्या वजनाचें; भारोभार. 'हे रुपये द्यावे आणि भारंभार चांदी घ्यावी.' [भार + आणि + भार] ॰भूत-वि. १ जड; भार झालेला. 'भारभूत होय जीणें...।' -विक ८२. २ (ल.) निरुपयोगी; निरर्थक. ॰मान-न. १ गुरुत्व; जडपणा. याच्या उलट आकारमान. २ हवेचा दाब मोजण्याचें यंत्र; भारमापक यंत्र. (इं.) बॅरोमीटर. ॰वाहक-वि. १ ओझें वाहणारा (मनुष्य, गाडी, जनावर इ॰) 'कीं आले खर, भारवाहक असे पोटीं मनुष्याकृती ।' -विक १२. २ (संसार, कामधंदा इ॰चा) भार, जबाबदारी सहन करणारा. ३ अंगीं असलेल्या विद्यादि गुणांचा-द्रव्य मिळविणें इ॰ कामीं उपयोग न करणारा (माणूस); ओझ्याचा बैल. ॰शांखळ-ळा- स्त्री. (महानु.) शृंखला. 'तो जुझारां गडे । पाईं भारशांखळ काढे ।' -भाए ३५९. [भार + शृंखला] भारोभार-क्रिवि. सारख्या वजनाचें; भारंभार. [भार द्वि.] भारकी-कें-स्त्रीन (काटक्या, गवत, पानें इ॰चा) लहान भारा, ओझें. [भारा अल्प.]

दाते शब्दकोश

गज

पु. हत्ती. [सं.] सामाशब्द-॰कर्णी-वि. हत्तीप्रमाणें कान असलेला. ॰कुंभ-न. हत्तीचें गंडस्थळ. 'स्वर्गातें गजकुंभ भेदुनिन कीं सत्कीर्ति ही धाडिली ।' -वैराग्यशतक, श्लोक ४३. ॰कोंत-पु. १ हत्तीचें गंडस्थळ (?) 'सांबळी झेलितां । गजकोंतीं गुसळितां ।' -शिशु १०४५. २ हत्तीला टोंचण्याचा भाला. [गज + सं. कुंत; म. कोंत = भाला] ॰क्रीडित(करण)-न. (नृत्य) हात अंचित करून कमरेवर ठेवणें, उजवा हात लताहस्त करणें, उजवा पाय दोलित करणें. [सं.] ॰गति-स्त्री. (हत्तीची चाल) गंभीर व रुबाबदार चाल; डौलदार गति, चालणें; ठुमकत जाणें; ऐश्वर्यवान ठमका, तोरा. 'गजगती जगतीप्रति दाविते ।' -वामन, सीतास्वंयवर ५९. 'ठुमकत मुरडत चाले गजगतीं ।' -शांकुतल. -वि. रुबाबदार चालीचा; गजगतीनें विशिष्ट. [सं.] ॰गमा-गामिनी-स्त्री. गज- गतीनें, ऐटीनें चालणारी स्त्री; गजगति स्त्री. [सं.] ॰गौर-री- स्त्री. हत्तीवर ठेवून पूजिलेली पार्वतीची मूर्ति; गजारूढ गौरी. ॰गौरीव्रत-न. १ भाद्रपदांतील स्त्रियांचें एक व्रत; हस्तनक्षत्रीं सूर्यप्रवेश होण्याच्या वेळचें व्रत. यांत सोन्याच्या शंकर, पार्वती व गणपती यांच्या मूर्ती करून त्या सोन्याच्या हत्तीवर बसवून ब्राह्म- णास दान देतात. २ हत्तीवर बसविलेल्या पार्वतीचें पूजन. ॰घंटा- स्त्री. हत्तींचा कळप, समुदाय. 'जैसें न गणिजे पंचाननें । गजघंटांतें ।' -ज्ञा १.९२. [सं. घटा = कळप] ॰घंटा-घांट-स्त्री. १ हत्तीच्या गळ्यांतील घांट. २ (ल.) वाचाट; कर्कश; कजाग स्त्री; (विशेषतः) मोठ्यानें भाषण करणारी स्त्री. ३ गुप्त गोष्ट फोडणारा मनुष्य; ष्याच्या पोटांत कांहीं रहात नाहीं असा. [तुल॰ का. गज्जे = घंटा] ॰चर्म-न. १ हत्तीचें कातडें. २ घोड्याचा एक रोग, यांत अंग वारंवार झाडणें, अंगावर चट्टे पडणें व हत्तीच्या अंगाप्रमाणें अंग खरखरीत होणें हीं लक्षणें होतात. -अश्वप २.२५२. ॰छाया-छायापर्व-स्त्रीन भाद्रपदी अमावस्येला सूर्य व चंद्र हस्तनक्षत्रीं येणें, अशा योगाची पर्वणी; हस्तनक्षत्रीं सूर्य असतां मघानक्षत्रयुक्त त्रयोदशीं येणें या योगासहि गजच्छा यापर्व म्हणतात. ॰झंपा-पु. (ताल) एकताल; याच्या मात्रा पंधरा व विभाग चार असतात. ॰ढाल-ला-ळा-स्त्री. हत्तीवरील मोठा ध्वज; निशाण. 'गजढाला आंदोळती ।' -जै ६७.४८. -पु. निशाणाचा हत्ती. 'लाविला गजढाळा ।' -ऐपो १४. [ढाल = निशाण] ॰दंत-पु. १ (हत्तीचा दांत) हस्तिदंत. २ घोड्याचा हत्ती- सारखा बाहेर आलेला दांत, सुळा; असा घोडा (हा अशुभकारक मानितात). -अश्वप १.१०५. ३ (संयुक्तहस्त) (नृत्य) खांद्या- इतक्या सरळ रेषेंत दोन्ही हातांचीं कोंपरे उंच करणें व डोक्याच्या प्रत्येक बाजूस हाताचीं बोटें एकमेकांस चिकटवून उंच करून त्यांस थोडा खळगा पाडणें. गंजदर-वि. गजेंदर; गजेंद्र पहा. गजनख- न. हत्तीच्या पायाचें नख (हें औषध असतें). ॰नेत्र-त्री-वि. १ हत्तीच्या डोळ्याप्रमाणें डोळे असणारा; बारीक, मिचमिच्या डोळ्यांचा. २ अधु दृष्टिचा; उलट्या बाहुल्या असलेला. ॰पति- पु. १ हत्तींचा धनी; हत्ती बाळगणारा ऐश्वर्यवान माणूस. २ गज- दळाचा सेनापति. ३ (विनोदार्थी) धोतराऐवजीं गजा (पंचा) नेसलेला. ४. 'कां मांदुरी लोकांची घोडा । गजपतिही मानी थोडा ।' -ज्ञा १६.२२५. ५ ओरिसा येथील राजांचे बिरुद. ॰पिंपळी-स्त्री. १ एक औषधी झाड; मिरवेल. २ मिरवेलीवर आलेल्या शेंगा (औषधी). ॰भार-पु. गजदळाचा समावेश असलेलें सैन्य. २ हत्तींचा कळप, झुंड. ॰मस्तकारूढ- वि. १ हत्तीच्या गंडस्थळावर बसलेला. २ (ल.) अतिशय गर्विष्ठ; मगरूर. ॰मुख-न हत्तीचें तोंड. -पु. गणपती देवता. 'नमिला गजमुख ज्याचें सेवुनि मृदु मधुर बोल कानांहीं ।' -मोस्फुटआर्या (नवनीत पृ. २५४). ॰मृत्तिका-स्त्री. (एका विशिष्ट अनुष्ठानांत लागणारी) हत्तीच्या पायाखालची माती; मृत्तिका पहा. ॰राज- पु. मोठा हत्ती; हत्तीच्या बहुमानानें म्हणतात. 'घेतोचि घांस गज- राज कशी बढाई ।।' ॰वदन-पु. गणपती देव. ॰वेल-स्त्री. तांदुळाची एक जात. ॰श्रद्धा-स्त्री. प्रारंभीं मोठा डौल किंवा गाजावाजा दाखविणारें पण परिणामीं अगदींच क्षुद्र ठरणारें काम किंवा त्याचा प्रकार; भपकेदार व विस्तृत पण निरर्थक काम; डोंगर पोखरून उंदीर काढणें. 'हा या प्रयोजनीं हजार रुपये खर्च करील असा डौल दिसतो खरा परंतु शेवटीं गजश्रद्धा झाली नाहीं म्हणजे पुरे !' [गज + श्रद्धा] ॰सिंहासन-न. हत्तीच्या आकाराचें आसन. ॰स्कंधी बसणें-नवीन मिळालेल्या वैभवांत पहिली ओळख विसरणें; गर्वानें फुगणें; आढ्यताखोर होणें. ॰स्नान-न. (हत्तीस स्नान घातल्यावर किंवा त्यानें स्वतः सोंडेनें स्नान केल्यावर तो आपल्या अंगावर पुन्हां धूळ, चिखल उडवितो त्यावरून) निष्फळ प्रयत्न; विपरीत फळ मिळालेला प्रयत्न; बरें होण्याकरितां योजले असतां उलट रोग वाढविणारे उपाय. गंजात लक्ष्मी-स्त्री. १ दाराशीं हत्ती झुलण्याइतकी म्हणजे हत्ती पोसण्याइतकी श्रीमंती; अतोनात श्रीमंती, वैभव. २ (विनोदानें) अतिशय दारीद्र्य; धोतर विकत घेण्यास पैका नसल्यानें गजा (पंचा) विकत घेण्याची पाळी येणें. ३ (विनोदानें) अंगावरील गजकर्ण; नायटे. 'तुला गजांतलक्ष्मी प्राप्त झाली !' [गज + अंत + लक्ष्मी]

दाते शब्दकोश

शब्द

पु. १ आवाज; उच्चार; कोणत्याहि प्रकारचा ध्वनि; श्रोत्रेंद्रियाचा विषय. २ एखाद्या वस्तूचा, कल्पनेचा, दर्शक किंवा व्यंजक, जो अक्षरसमूह तो. ३ (व्या.) प्रथमादि विभक्ति ज्या- वरून होतात अशी वर्णानुपूर्वी (नाम, सर्वनाम इ॰ ). 'तळमळ हा संस्कृत शब्द चालतो तरी कसा ?'. -नारुक ३.४. ४ बोल; वाईटपणा; ठपका. (क्रि॰ लागणें; येणें; ठेवणें; लावणें; आणणें). 'तें केलें धार्तराष्ट्री विफळ सकळहि, आणिला शब्द सामीं ।' -मोकृष्ण ६८.३३. ५ आज्ञा; हुकूम. ६ प्रतिज्ञा; वचन; वाचा. 'एकवेळ गेले शब्द ।' -संग्रामगीतें १२०. ७ वेद. 'त्यासि शब्दपर निष्णातू ।' -एभा १०.३४९. ८ शास्त्र. 'शब्दाचिया आसकडी । भेद नदीची दोही थडी । आरडते विरह वेडी । बुद्धिबोध ।' -माज्ञा १६.५. [सं. शब्द = नाद करणें] (वाप्र.) ॰खाणें-लिहितांना किंवा बोलतांना शब्द गाळणें, न लिहिणें किंवा न उच्चारणें. ॰खालीं न पडणें-दुसऱ्याच्या सांगण्या- प्रमाणें करणें; शब्दाला किंमत देणें; शब्द मानणें. ॰खालीं पडूं न देणें-उत्तरास प्रत्युत्तर देणें; वादविवादांत किंवा भांड- णांत माघार न घेणें. ॰झेलणें-ज्याची सेवा, चाकरी शुश्रूषा, खुशामत वगैरे करावयाची असेल, त्याच्या तोंडून आज्ञा निघतांच तिच्याप्रमाणें करणें. 'राजकारस्थानी पुरुष आणि सेनापति यांचे शब्द त्यांच्या अमदानींत सगळे लोक झेलीत असतात' -ओक. ॰टाकणें-१ मागणी, विनंति करणें; एखादी गोष्ट सांगून बघणें. २ शिफारस करणें. ॰ठेवणें-लावणें-लागणें-दोष देणें; ठपका ठेवणें; दूषण लावणें. 'माझेनि दोषें पावलों खेद । हा तुज कासया ठेवणें शब्द ।' -मुक्तेश्वर. 'त्वत्सम साधु न लागों देती स्वयशासि शब्द ते राजे' -मोवन २.३६; -मोउद्योग ८.१९. ॰लागूं देणें-लागू-लावू देणें-दोष पत्करणें. 'सत्यप्रतिज्ञ पांडव लागूं देती न आपणा शब्द ।' -मोविराट ४.६३. सामाशब्द- ॰काठिण्य-न. (अलंकार) शब्दाचा कठोरपणा, कर्कश- पणा. [सं.] ॰कार्पण्य-न. अल्पभाषा; कमी बोलणें; मित- भाषण. 'शब्दकार्पण्य पंडितास दोष स्त्रीला महाभूषण ।' [सं.] ॰कोश-षपु. १ शब्दसंग्रह; शब्दसमुच्चय; शब्दांचा साठा- खजिना; शब्दांचा अर्थासह संग्रह. २ शब्दाचे अर्थ, व्युत्पत्ति, व्याकरण वगैरे सांगणारा ग्रंथ. [सं.] ॰कौशल्य-न. शब्दरचना- चातुर्य; भाषाचातुर्य. [सं.] ॰खंडन-न. शब्द, विधान इ॰ खोडून काढणें; शब्दावरील टिका. ॰गुण-पु. शब्दांचे गुण, लक्षण. हे एकंदर चोवीस आहेत. ते पुढील प्रमाणें:- श्लेष, प्रसाद, समता, माधुर्य, सुकुमारता, अर्थव्यक्ति, उदारत्व, कांति, उदात्तता, ओज, सुशब्दता, और्जिंत्य, विस्तर, समाधि, सौक्षम्य, गांभीर्य, प्रेम, सन्मितत्व, प्रौढी, रीति, उक्ति, गति, भावुक, संक्षेप. इ॰ ॰चातुर्य-न. शब्दरचनाकौशल्य; वाक्चातुर्य; शब्दपटुता; भाषा- शौली; भाषाप्रभुत्व. [सं.] ॰चित्र-न. १ शब्दांनीं केलेलें वर्णन, काढलेलें चित्र. २ (साहित्य) चित्रकाव्याचा एक प्रकार; शब्द- चमत्कृति. उदा॰ 'मागे जी लुगडी, सकाप बुगडी' इ॰. [सं.] ॰चोर-पु. दुसऱ्याचा लेख चोरून तो आपलाच म्हणून दडपून देणारा; दुसऱ्याचे शब्द चोरणारा; उष्टा बोल वापरणारा. ॰जाल-ळ-न. १ शब्दांचें जाळें; अनंत शब्दांचा नुसता समूह; शब्दावडंबर; शब्दभारूड. २ वायफळ भाषण; बडबड. 'म्हणती शब्दजाळ टाकून । निश्चल एकाग्र ऐसिजे मनें ।' [सं. ] ॰तः-क्रिवि. शब्दानें. 'शब्दतः अर्थतः अगाघ खोली ।' -एभा २१.३६७. [सं.] ॰ताडन-न. एखाद्यास लागेल असें भाषण; शब्दांचा मार; टोचून बोलणें. 'सूज्ञास शब्द ताडन मूर्खास प्रत्यक्ष ताडन.' [सं.] ॰तात्पर्य-न. भाषणाचा सारांश; शब्दार्थ; मतलब. [सं.] ॰दोष-पु. १ शब्दांतील व्यंग, उणेपणा; शब्दापराध; शब्दवैगुण्य. काव्यप्रकाशांत एकंदर शब्ददोष १३ सांगितले आहेत. ते पुढीलप्रमाणें: श्रुतिकटु च्युतसंस्कृति, अप्रयुक्त, असमर्थ, निहतार्थ, अनुचितार्थ, निरर्थंक, अवाचक, अश्लील (जुगुप्सा, अमंगल, व्रीडा-युक्त), संदिग्ध, अप्रतीत, ग्राम्य, नेयार्थ. 'प्रताप रुद्रांत पुढील सतरा शब्ददोष सांगितले आहेत:-अप्रयुक्त, अपुष्ट-अपुष्टार्थ, असमर्थ, निरर्थक, नेयार्थ, च्युतसंस्कार-च्युतसंस्कृति, संदिग्ध, अप्रयोजक, क्लिष्ट, गूढ-गूढार्थ, ग्राम्य, अन्यार्थ, अप्रतीतिक, अविसृष्ट विधेयांश, विरुद्धमतिकृत, अश्लील (जुगुप्सा, व्रीडा, अमंगल- युक्त), परुष-श्रुतिकटु. २ दोषारोप; बोल; ठपका; आळ. (क्रि॰ ठेवणें; घालणें; लावणें; आणणें; येणें; लागणें). ३ शब्दामुळें, नांवामुळें लागलेला बट्टा; कलंक. उदा॰ 'प्रतिव्रतेस व्यभिचारिणी म्हटली शब्ददोष तर येतो'. ॰ध्वनि-पु. आवाज; स्वर; बोलणें. 'तिचा हा शब्दध्वनि । म्यांही श्रवणीं ऐकिला ।' [सं.] ॰परीक्षा-स्त्री. (वैद्यक) शब्दाच्या स्पष्टास्पष्टतेवरून किंवा जड हलकेपणावरून व्याधिनिदान करणें. [सं.] ॰पांडित्य-न. १ वक्तृत्व; भाषापांडित्य. २ कृती न करतां उगीच कोरडें व डौलाचें वाक्पाटव करणें; वृथा बडबड; प्रौढी. [सं.] ॰पारुष्य-न. कठोर भाषण; कटु भाषण. [सं.] ॰पाल्हाळ-पु. शब्दावडंबर; शब्दभारूड. शब्दजाल पहा. (क्रि॰ लावणें; मांडणें; करणें). ॰प्रमाण-न. शब्दांनीं दिल्ला पुरावा; साक्ष (तोंडी), [सं.] ॰प्रहार-पु. वाक्ताडन; मनाला लागतील, दुःख देतील असे शब्द बोलणें; रागें भरणें. [सं.] ॰बोध-न. शब्दज्ञान. शब्दबोधें सदोदित ।' -एभा २.१६७. ॰ब्रह्म-न. वेद. 'हें शब्दब्रह्म अशेष ।' -ज्ञा १.३; एभा ११.४९८. [सं.] ॰भेद-पु. १ शाब्दिक फरक. २ प्रतिशब्द; दुसरे शब्द. [सं.] ॰भेदी-वेधी-वि. १ आवाजावरून बाण मारण्यांत पटाईत, निष्णात, तरबेज. २ वस्तूचा नुसता नाद ऐकून त्यावर बिनचूक जाणारा, वेध करणारा (अस्त्र, शक्ति, मंतरलेला बाण इ॰). ३ (ल.) थोडक्या शब्दांवरून एखाद्याचें अंतरंग, मतलब, बेत जाणणारा; चांगला तर्कबाज. ४ दशरथ, अर्जुन यांचें विशेषण, अभिधान. [सं.] ५ मंत्रानें दुस- ऱ्याचा नाश करणारा; केवळ मंत्रोच्चारामुळें शत्रूचा नाश करणारा. ॰माधुर्य-न. शब्दांतील गोडी; मधुर भाषण. [सं.] ॰योगी- वि. (व्या.) व्याकरणांत नामें आणि नामाप्रमाणें योजलेले इतर शब्द यांना जोडून येणारें (अव्यय). उदा॰ वरे, खालीं, पुढें, मागें इ॰. हीं ज्यांना जोडलीं जातात त्यांचे सामान्यरूप होतें. ॰योजनास्त्री. १ शब्दांची निवड, योग, जुळणी. २ शब्द- रचना; वाक्यरचना. [सं.] ॰योनि-स्त्री धातु; शब्दाचें मूळ. [सं.] ॰रचना-स्त्री. शब्दांची रचना, मांडणी; वाक्यरचना; शब्दयोजना. [सं.] ॰राशि-पु. वेद. -मनको. ॰लालित्य-न. शब्दसौंर्य; शब्दांची मनोवेधक योजना. लालित्य पहा. [सं.] ॰वाहक यंत्र-न. विजेच्या सहाय्यानें दूर अंतरावरून बोल ण्याचें यंत्र. (इं.) टेलिफोन. 'सौ. महाराणीसाहेबास वारा घाल- ण्यास एक स्त्री कामगार पाठविण्यास शब्दवाहकद्वारें...हुकूम द्यावा' -ऐरापुप्र ४.२२४. ॰विचार-पु. १ शब्दसाधनविचार; प्रत्यय प्रकरण. (इं.) इटिमॉलॉजी. २ (व्या.) वाक्यांतील निरनिराळ्या शब्दांचा परस्परांशीं असणाऱ्या संबंधाचा विचार. ॰विता- पु. परमात्मा. -मनको. ॰वेध-पु. १ वेदांतील गूढ स्थळें; शब्दांचें कूट; शब्दांचें जाळें; आडंबर. 'कंठीं शब्दवेधांचें साखळें.' -शिशु १११. २ आवाजास अनुसरून बाण, गोळी वगैरे मारणें. ॰वेधी-वि. शब्दभेदी पहा. ॰वैपरीत्य-न. (बोलणाराच्या हेतूशीं) विरुद्ध, विपरीत शब्दयोजना; भलतीच शब्दयोजना; चुकीची पदयोजना. 'कुंभकर्ण बोलला निद्रापद, कुंभकर्णाच्या मनांत होतें इंद्रपद, तस्मात्-शब्दवैपरीत्य झालें.' [सं.] ॰शक्ति-स्त्री. १ शब्दाचा जोर; शब्दाचा वास्तविक, अगदीं बरो- बर असा अर्थ. शब्दाचा यौगिक अर्थ. २ (साहित्य) अभिधा, वझणा, व्यंजन इ॰ शब्दार्थ बोधकवृत्ति. [सं.] ॰शक्तिगम्य-वि. शब्दशः; मूळ अर्थाप्रमाणें. ॰शासन-न, शब्दांचा अर्थ, त्यांची योजना वगैरे संबंधी; व्याकरणशास्त्र, शब्दविचार, इ॰ नियम. [सं.] ॰शास्त्र-न. १ शब्दविज्ञान; शब्दांचें संपूर्ण विवरण कर- णारें शास्त्र; व्युत्पत्तिशास्त्र. २ व्याकरणशास्त्र. [सं.] ॰शुद्धि- स्त्री. १ व्याकरणनियमाप्रमाणें निर्दोष अशी शब्दयोजना; अचूक मांडणी. २ शब्दांतील दोष काढून टाकणें; शब्दांची तपासणी; दुरस्ती. ३ परकीय शब्द न वापरणें; भाषाशुद्धि. ॰शूर-पु. केवळ बोलण्यांत शूर, पटाईत. -धनुर्भंग पृ. ७३. ॰श्री-स्त्री. शब्दांची शोभा. 'एथूनि शब्दश्री सच्छास्त्रिक ।' -ज्ञा १.३४. ॰संग्रह-पु. शब्दसमूह; शब्दसमुच्चय; शब्दकोश-ष. [सं.] ॰संचय-पु. शब्दांचा सांठा, समूह; शब्दांची समृद्धि, वैपुल्य. ॰संदर्भ-पु. वाक्य रचनेंतील शब्दांचा एकमेकांशीं असलेला संबंध-अन्वय. [सं.] ॰सादृश्य-न. (अर्थानें अगदीं निराळे असणाऱ्या) शब्दांतील साम्य, सारखेपणा [सं.] ॰साध- निका-स्त्री. १ शब्दविचार; शब्दांची बनावट; व्युप्तत्ति. २ शब्दांची फोड, उकल; व्याकरण चालविणें. [सं.] ॰साधित- न. शब्दापासून, नामापासून साधलेला शब्द. -वि. (व्या.) नामापासून बनलेलें. याच्याउलट धातुसाधित. [सं.] ॰साम्य- न. शब्दांचा सारखेपणा; सादृश्य. [सं.] ॰सूची-स्त्री. शब्दांची सूची. याच्या उलट पदसूची वगैरे. [सं.] ॰सृष्टि-स्त्री. १ शब्दांचा संग्रह; शब्दांची रचना. २ (ल.) काव्य; ग्रंथ; प्रबंध. 'आतां वंदूं कवेश्वर । शब्दसृष्टीचे ईश्वर ।' -दा १.७. [सं.] ॰स्फुरण-न. (शब्दांचें फुरफुरणें, थरथरणें) ज्यांत जोडाक्षरें व ट वर्गांतींल अक्षरें एकसारखीं पुष्कळ येतात अशा कठोर, कर्ण- कटु प्रबंधाबद्दल म्हणतात [सं.] ॰स्वारस्य-न. शब्दांतील गोडी, लज्जत; शब्दामाधुर्य. [सं.] शब्दविणें-क्रि. बोलविणें. 'मीचि शब्दातें शब्दातें शब्दबिता ।' -एभा १३.३४४. शब्दाचा मार-पु. वाक्ताडन; शब्दप्रहार; कानउघाडणी; निर्भर्त्सना. 'वेड्यास टोणप्याचा मार, शहाण्यास शब्दाचा.' शब्दांची कसरत-स्त्री शंब्दांची कसरतीप्रमाणें वळेनें केलेली अस्वाभा- विक रचना. 'भाषा आणि तपश्चर्या, वचनाचें कष्ट, शब्दांची कसरत, या गोष्टींची जरूर असते.' -नाकु ३.४. शब्दाडंबर- न. शब्दजाल; केवळ शब्दांचें वैपुल्य; अर्थहीन शब्दरचना; पोकळ वक्तृत्व. [सं. शब्द + आडंबर] शब्दातीत-वि. शब्दांच्या किंवा बोलण्याच्या शक्तीबाहेरचें; वर्णन करितां येत नाहीं असें; शब्दांनीं वर्णन करण्यास अशक्य; अनिर्वाच्य. [सं. शब्द + अतीत] शब्दानुप्रास-पु. (साहित्य) शब्दाचा अनुप्रास; एक यमक- रचना; ज्यांत त्याच त्या शब्दाची पुनःपुनः आवृ्त्ति होतें असा अलंकार. याच्या उलट वर्णानुप्रास. [शब्द अनुप्रास] शब्दानु- शासन-न. शब्दशासन; शब्दांच्या लिंग, रूपांबद्दल, अर्थाबद्दल वगैरे नियम. [सं.] शब्दानशब्द-क्रिवि. प्रत्येक शब्द. 'या एकंदर बोलण्यांतील शब्दान्शब्द शांतपणानें शिष्याच्या मुखांतून निघत होता.' -उषःकाल. [शब्द + न् = आणि + शब्द] शब्दा- मृत-न. (काव्य) शब्दमाधुर्य; वाड्माधुर्य; अमृताप्रमाणें गोड शब्द. [शब्द + अमृत] शब्दार्थ-पु. १ शब्दाचा अर्थ, आशय २ शब्दाचा मूळ, शब्दाशः अर्थ; यौगिकार्थ. [सं.] शब्दालंकार- पु. (साहित्य) शब्दाच्या रूपावरून साधलेला अलंकार; काव्यां- तील अनुप्रास; यमकादि अलंकार; याच्या उलट अर्थांलंकार. या अलंकारांचें पुढील पांच प्रकार आहेत:-वक्रोक्ति, अनुप्रास, यमक, श्लेष, पुनरुक्तवदाभास. ह्यांत पुन्हां प्रत्येकाचे जे निरनिराळे भेद आहेत ते सर्व प्रतापरुद्रग्रंथांत व काव्यप्रकाशांत सांगितले आहेत. [सं.] शब्दाशब्द-पु. १ चांगले-वाईट शब्द; अविचाराचे व उद्धटपणाचें भाषण; वेळ प्रसंग न पहातां असभ्यपणाचें बोलणें. 'चौघांमध्यें शब्दाशब्द बोलूं नये, चांगले बोलावें' २ अप्रत्यक्ष व आक्षेप न घेतां बालणें; चांगलें किंवा वाईट (यांपैकीं कोणतेंच नाहीं असें) भाषण. 'मी त्याला शब्दाशब्द कांहीं बोललों नाहीं.' [सं. शब्द + अशब्द] शब्दित-न. भाषण; आवाज; बोलण्याचा स्वर; ध्वनि. -वि. १ उच्चारलेलें; बोललेलें; वदलेलें; घोषित केलेलें. २ शब्दानें युक्त केला जो वाद्यादि तो; वाजविलेलें; निना- दित. [सं.] शाब्द, शाब्दिक-वि. शब्दासंबंधीं, वाग्युक्त; वाणीयुक्त; वाचिक. 'तरी तप जें कां सम्यक् । तेंही त्रिविध आइक । शारीर मानसिक । शाब्द गा ।' -ज्ञा १७.२००. २ स्वरासंबंधीं; आवाजासंबंधीं. ३ (व्या.) नामासंबंधीं; नामवा- चक (प्रत्यय वगैरे). ४ अनुभवाशिवाय बडबड करणारे; केवळ शब्द जाणणारे; शब्दज्ञानी. 'वृथा शाब्दिकांचें शब्दज्ञान । तेंहीं व्याख्यान दाविलें ।' -एभा ११.६४८. -पु. शब्दांचे अर्थ जाणण्यांत व रूपें समजण्यांत, करण्यांत निष्णात, हुषार; तरबेज; वैयाकरण. [सं.] शाब्दबोध-पु. शाब्दिक बोध; अक्षरशः होणारा अर्थ; यौगिक अर्थ. [सं.] शाब्दिकसृष्टि-स्त्री. अलंकारिक, कुशल शब्दरचना; काव्यप्रबंधांतील शब्दरचनाचातुर्य. [सं.] शाब्दी-स्त्री. शब्दप्रवृत्ति. 'तेवींचि हा अनादि । ऐसी आथी शाब्दी ।' -ज्ञा १५.२३०.

दाते शब्दकोश

पाय

पु. १ (शब्दशः व लक्षणेनें) पाऊल; पद; चरण. ईश्वर, गुरु, पति, धनी इ॰स उद्देशून विनयानें म्हणतात. 'मला तरी हे पाय सोडून राहिल्यानें चैन का पडणार आहे ?' -कोरकि २०. २ तंगडी. ३ कंबरेपासून तों खालीं बोटापर्यंतचा सर्व भाग; चालण्यास साधनभूत अवयव. ४ (ल.) पायाच्या आकाराची, उपयोगाची कोणतीहि वस्तु. (पलंग, चौरंग, खुर्ची, टेबल, पोळपाट इ॰चा) खूर. ५ डोंगराचा पायथा, खालचा, सपाटीचा भाग. ६ अक्षराचा किंवा पत्राचा खालचा भाग. ७ झाडाचें मूळ. ८ चवथा भाग; चतुर्थांश; चरण; पाद. ९ शिडीची पायरी; पावका; पायंडा. १० (ल.) कारण; लक्षण; चिन्ह; रंग. 'मुलाचे पाय पाळण्यांत दिसतात.' [सं. पाद; प्रा. पाअ; सिं. पाओ, पाय; फा. पाए; हिं. पाव] (वाप्र.) ॰उचलणें-भरभर चालणें; न रेंगाळणें. ॰उतारा-र्‍यां आणणें-येणें-नम्र करणें, होणें; तोरा, अभिमान कमी करणें, होणें. ॰काढणें-१ निघून जाणें; निसटणें; नाहींसें होणें. 'वैराग्यलहरीचा फायदा घेऊन पन्हाळ- गडावरून रातोरात पाय काढला.' -भक्तमयूरकेकावली पृ. ३. २ (व्यवहारांतून) अंग काढून घेणें. ॰कांपणें-घाबरणें; भिणें; भीति वाटणें; भयभीत होणें. ॰खोडणें-खुडणें-खुडकणें- निजतांना पाय अंगाशीं घेणें. ॰खोडणें-मरणसमयीं पाय झाडणें, पाखडणें. ॰घेणें-प्रवृत्ति होणें; इच्छा होणें. 'त्या कामाला माझा पाय घेत नाहीं.' ॰तोडणें-(ल.) एखाद्याच्या कामांत विघ्न आणणें. ॰दाखविणें-दर्शन देणें; भेट देणें. 'तो मज दावील काय पाय सखा ।' -मोविराट ६.११८. ॰देणें- १ पायाचा भार घालून अंग चेपणें. २ तुडविणें; उपद्रव देण्या- साठीं, कुरापत काढण्यासाठीं एखाद्याला पायानें ताडन करणें. ३ पाय लावणें; पायाचा स्पर्श करणें. ॰धरणें-१ पायां पडणें; शरण जाणें; विनंति करणें; आश्रयाखालीं जाणें. २ अर्धांगवायु इ॰ रोगांनीं पाय दुखणें. ॰धुवून-फुंकून टाकणें-ठेवणें- (ल.) मोठ्या खबरदारीनें, काळजीनें वागणें; मागें-पुढें पाहून चालणें, वागणें. ॰धुणें-१ संध्यावंदनादि कर्मापूर्वीं किंवा बाहेरून आल्याबरोबर पादप्रक्षालन करणें. २ कोणाची पूजा वगैरे कर- तांना, आदरसत्कारार्थ त्याचे पादप्रक्षालन करणें. ३ (बायकी) (ल.) लघवी करणें; मूत्रोत्सर्गाला जाणें; (मूत्रोत्सर्जनानंतर हात- पाय धुण्याची चाल बायकांत रूढ आहे त्यावरून). ॰न ठरणें- सारखें हिंडणें; भटकत रहाणें; विश्रांति न मिळणें; पायाला विसावा नसणें. ॰निघणें-मुक्त होणें; मोकळें होणें; बाहेर जाणें. पडणें. 'ह्या गांवांतून एकदां माझा पाय निघो म्हणजे झालें.' -विवि ८.११.२०९. ॰पसरणें-१ अधिकार प्रस्थापित करणें; पूर्णपणें उपभोग घेणें; अल्प प्रवेश झाला असतां हळूहळू पूर्ण प्रवेश करून घेणें. २ मरणें (मरतांना पाय लांब होतात यावरून). 'शेवटीं म्हातार्‍या आईपुढें त्यानें पाय पसरले.' म्ह॰ १ भटास दिली ओसरी, भट हातपाय पसरी. २ अंथरूण पाहून पाय पसरावेत. ॰पसरून निजणें-निश्चिंत, आळशी राहणें; निरुद्योगी असणें. ॰पोटीं जाणें-भयभीत होणें; अतिशय भीति वाटणें. निजलेला मनुष्य भीतीनें हातपाय आंखडून घेतो यावरून. 'जंव भेणें पाय पोटीं गेले नाहीं ।' -दावि १६०. ॰फांलटणें-पाय झिजवणें; पायपिटी करणें; तंगड्या तोडणें; एखादें काम करण्यासाठीं कोठें तरी फार दूरवर किंवा एकसारखें पायानें चालत जाणें. 'कांहीं लाभ नसतां उगींच पाय फांसटीत चार कोस जातो कोण ?' ॰फुटणें- १ विस्तार पावणें; वाढणें. 'पहिल्यानें तुझें एक काम होतें, नंतर दुसरें आलें, आतां तिसरें. आणखी त्याला किती पाय फुटणार आहेत कोणास ठाऊक ?' २ हळूच नाहींसा होणें; चोरीला जाणें (वस्तु). ३ थंडीच्या योगानें किंवा जळवातानें पाय भेगलणें, चिरटणें. ॰फोडणें-भलतीकडे नेणें; विषयांतर करणें; मुद्याला सोडून अघळ- पघळ बोलणें; फाटे फोडणें. ॰भुईशीं(ला)लागणें-१ (एखाद्या कामास) कायमपणा येणें; निश्चितपणा येणें. २ जिवावरच्या संकटांतून वांचणें. ॰मोकळा करणें-होणें १ अडचणींतून बाहेर पडणें, काढणें. २ फेरफटका करणें; पायांचा आंखडलेपणा नाहींसा करणें, होणें. ॰मोडणें-१ पायांत शक्ति नसणें. २ निराशेमुळें गलितधैर्य होणें; निराश होणें. 'माझा भाऊ गेल्यापासून माझे पाय मोडले.' ३ एखाद्याच्या कामांत हरकत आणणें; धीर खचविणें; मोडता घालणें; काम करूं न देणें. ४ (नगरी) एखाद्या मुलाच्या पाठीवर त्याच्या मातेस कांहीं दिवस जाणें; गरोदर राहणें. 'नरहरीचे पाय मोडले कां ?' (त्याच्या पाठीवर कांहीं दिवस गेले आहेत काय ?) ॰येणें-चालतां येणें; (लहान मूल) चालूं लागणें. ॰रोवणें- स्थिर, कायम होणें. ॰लागणें-पाय भुईशीं लागणें पहा. (वर) ॰येणें-प्रतिबंध, अडचण होणें, येणें. पोटावर पाय येणें = उदर- निर्वाहाचें साधन नाहीसें होणें. ॰वरपणें-ओरपणें-(कर.) चिंचपाण्यांच पाय बुडवून ते तापलेल्या तव्यावरून ओढणें व पुन्हां चिंचपाण्यांत बुडविणें, याचप्रमाणें पांच दहा मिनिटें सारखें करीत रहाणें (डोळ्यांची जळजळ यासारखा विकार नाहींसा होण्यावर हा उपाय आहे). [ओरपणें पहा] ॰वळणें-१ दुसरी- कडे प्रवृत्ति होणें; मुरडणें; वळले जाणें (प्रेम इ॰). २ वातविकारानें पायांत वेदना उत्पन्न होणें; पाय तिडकूं लागणें; गोळे येणें. ॰वाहणें-एखाद्या स्थलीं जाण्याचा मनाचा कल, प्रवृत्ति होणें. ॰शिंपणें-(मुलाला पायावर घेऊन दूध पाजण्यापूर्वीं स्वतः) पाय धुणें. 'ते माय आगोदर पाय शिंपी ।' -सारुह १.५३. ॰शिवणें-पायांस स्पर्श करणें; पायाची शपथ वाहणें. पायां- खालीं तुडविणें-१ दुःख देणें; क्लेश देणें छळ करणें. २ कस्पटाप्रमाणें मानणें; मानहानि करणें. पायाचा गू पायीं पुसणें-(ल.) कोणत्याहि घाणेरड्या गोष्टीची घाण जास्त वाढूं न देतां तिचा ताबडतोब बंदोबस्त करणें. पायांचा जाळ-पायांची आग-पायांचें पित्त मस्तकास जाणें-अतिशय रागावणें; क्रोधाविष्ट होणें; संतापणें. पायांची बळ भागविणें-व्यर्थ खेपा घालणें, फिरणें; निरर्थक कार्यास प्रवृत्त होणें. पायांजवळ येणें-(आदरार्थीं) एखाद्याकडे जाणें, येणें, भेटणें. पायानें जेवणें-खाणें-अत्यंत मूर्ख, वेडा असणें, होणें. पायानें लोटणें-तिरस्कार करणें; अवहेलना करणें. 'म्हणतो युधिष्ठिर नको पायें लोटूं मला अवनतातें ।' -मोउद्योग ८.१८. पायां पडणें-पायांवर डोकें ठेवणें; नमस्कार करणें; विनविणें; याचना करणें. 'उत्तर म्हणे नको गे ! पायां पडतों बृहन्नडे ! सोड !' -मोविराट ३.७४. पायांपाशीं पाहणें-जवळ असेल त्याचाच विचार करणें; अदूरदृष्टि असणें; आपल्याच परिस्थितीचा, आपल्या- पुरताच विचार करणें. पायांपाशीं येणें-पायाजवळ येणें पहा. पायांला-त, पायांअढी पडणें-(म्हातारपणामुळें) चालतांना एका पायाला दुसरा पाय घासणें. पायांला खुंट्या येणें- एकाच जागीं फार वेळ बसल्यानें पाय ताठणें. पायां लागणें- पायां पडणें. 'मीं पायां लागे कां । कांइसेयां लागीं ।'- शिशु २२४. पायांवर कुत्रीं-मांजरें घालणें-(ल.) अतिशय प्रार्थना व विनवण्या करून एखाद्यास कांहीं काम करावयास उठ- विणें. पायांवर घेणें-मूल जन्मल्यावर त्यास स्वच्छ करण्यासाठीं न्हाऊं घालणें व जरूर तें सुईणीचें काम करणें. पायांवर नक्षत्र पडणें-सदोदित फिरत असणें; एकसारखे भटकणें; पायाला विसांवा नसणें. 'काय रे, घटकाभर कांहीं तुझा पाय एका जागीं ठरेना, पायावर नक्षत्र पडलें आहे काय ?' पायांवर पाय टाकून निजणें-चैनींत व ऐटींत निजणें. पायांवर पाय ठेवणें-देणें- एखाद्याच्या पाठोपाठ जाणें; एखाद्याचें अनुकरण करणें. पायांवर भोंवरा असणें-पडणें-एकसारखें भटकत असणें; भटक्या मारणें. पायावर नक्षत्र पडणें पहा. पायावर हात मारणें- पायाची शपथ घेणें. -नामना ११०. पायाशीं पाय बांधून बसणें-एखाद्याचा एकसारखा पिच्छा पुरवून कांहीं मागणें. पायांस कुत्रें बांधणें-(ल.) शिव्या देत सुटणें; भरमसाट शिव्या देणें; फार शिवराळ असणें. पायांस पाय बांधणें-एखाद्याच्या संगतींत एकसारखें रहाणें. पायांस भिंगरी-भोंवरा असणें- पायांवर भोंवरा असणें पहा. पायांस-पायीं लागणें-नमस्कार करणें; पायां पडणें. 'तूं येकली त्वरित जाउनि लाग पायीं ।' -सारुह ८.११२. पायांस वहाण बांधणें-बांधलेली असणें-एकसारखें भटकत राहणें; पायपीट करणें. पायीं-क्रिवि. १ पायानें; पायाच्या ठिकाणीं. 'भूपें हळूच धरिला कलहंस पायीं' -र १०. [पाय] २ मुळें; साठीं; करितां. 'काय जालें देणें निघालें दिवाळें । कीं बांधलासि बळें ऋणेंपायीं ।' -तुगा ८४५. (कुण.) 'कशापायीं' = कशाकरतां; कां. पाईं. [सं. प्रीतये; प्रीत्यर्थ] पायीं बांधणें-(हत्ती इ॰च्या पायाशीं बांधणें या शिक्षेवरून) हानि, पराभव करण्यास तयार असणें. आपले पाय माझ्या घरीं लागावे-(आदरार्थीं ल.) आपण माझ्या घरीं येऊन मला धन्य करावें. आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी- (नम्रपणाचें आमंत्रण) माझ्या घरीं आपण यावें. आपल्या पायांवर धोंडा पाडून-ओढून घेणें-आपलें नुकसान आप- णच करून घेणें; आपल्या हातांनीं स्वतःवर संकट आणणें; विकत श्राद्ध घेणें. एका पायावर तयार-सिद्ध असणें-अत्यंत उत्सुक असणें. 'बाजीराव शिपाई आहेत तसा माही आहें. त्यांच्याप्रमाणेंच हा प्रतिनिधि योग्य प्रसंगीं पाहिजे त्या मोहिमेवर जाण्यास एका पायावर सिद्ध आहे.' -बाजीराव. घोड्याच्या- हत्तीच्या पायीं येणें आणि मुंगीच्या पायीं जाणें- (आजारीपण, संकट, बिकट परिस्थिति इ॰) ही येतांना जलदीनें येतात पण जावयास दीर्घकाळ लागतो. याच्या उलट श्रीमंतीबद्दल म्हणतात. चहूं-दोहें पायांनीं उतरणें-(शिंगरू, वांसरूं, पाडा इ॰नीं) चार किंवा दोन पांढर्‍या पायांसह जन्मणें. जळता पाय जाळणें-एखाद्या कामांत, व्यवहारांत, व्यापारांत नुकसान होत असतांहि तो तसाच चालू ठेवणें. त्या पायींच-क्रिवि. ताबड- तोब; त्याच पावलीं. भरल्या पायांचा-(रस्त्यांत चालून आल्या मुळें) ज्याचे पाय (बाहेरून आल्यामुळें धुळीनें वगैरे) घाणेरडे झाले आहेत असा. 'तूं भरल्या पायांचा घरांत येऊं नकोस.' भरल्या पायांनीं, पायीं भरलें-क्रिवि. बाहेरून चालून आल्यावर पाय न धुतां; घाणेरड्या पायानीं. (बाहेरच्या दोषासह; स्पृष्टा- स्पृष्टादि दोष किंवा भूतपिशाच्चादि बाधा घेऊन). 'मुलाच्या जेवणाच्या वेळेस कोणी पायीं भरलें आलें भरलें आलें म्हणून आज हें मूल जेवीत नाहीं.' 'ज्या घरीं बाळंतीण आहे त्यांत एकाएकीं पायीं भरलें जाऊं नये.' मागला पाय पुढें न घालूं देणें-(ल.) केलेली मागणी पुरविल्याशिवाय पुढें पाऊल टाकूं न देणें; मुळींच हालूं न देणें. मागला पाय पुढें न ठेवणें-मागितलेली वस्तु दिल्याशिवाय एखाद्यास सोडावयाचें नाहीं, तेथून जाऊं द्यावयाचें नाहीं असा निश्चय करणें. मागील पाय पुढें नाहीं पुढील पाय मागें नाहीं-हट्टीपणा; करारीपणा; ठाम निश्चय; जागच्या- जागीं करारीपणानें ठाव धरून बसणें याअर्थीं उपयोग. मागल्या पायीं येणें-एखादें काम करून ताबडतोब परत येणें; त्याच पावलीं परत येणें. म्ह॰ १ पाय धू म्हणे तोडे केवढ्याचे ? २ पाय लहान मोठा, न्याय खरा खोटा. ३ पायांखालीं मुंगी मर- णार नाहीं (निरुपद्रवी माणसाबद्दल योजतात). ४ (व.) पायावर पाय हवालदाराची माय = आळशी स्त्रीबद्दल योजतात. ५ पायींची वहाण पायींच छान-बरी (हलक्या मनुष्यास फाजील महत्त्व देऊं नये या अर्थीं). 'मज पामरा हें काय थोरपण । पायींची वहाण पायीं बरी ।' -तुगा ५३५. ६ हत्तीच्या पायांत सग- ळ्यांचे पाय येतात. सामाशब्द- ॰आंग-न. (व.) गर्भाशय. ॰उतार-रा-पु. नदींतून पायीं चालत जाण्यासारखी वाट. 'एर्‍हवी तरी अवधारा । जो दाविला तुम्हीं अनुसारा । तो पव्ह- ण्याहूनि पायउतारा । सोहपा जैसा ।' -ज्ञा ५.१६५. -वि. १ पायांनीं ओलांडून जांता येण्याजोगा. २ पायीं चालणारा; पायदळ. 'आम्ही गाडदी लोक केवळ आम्ही पायउतारे.' -भाब १००. [पाय + उतार] ॰उतारां-रा-क्रिवि. पायीं; पायानें. (क्रि॰ येणें; जाणें; चालणें). 'पायउतारा येइन मागें पळभर ना सोडी ।' -सला २०. पायउतारा होणें-येणें-(ल.) शिव्यागाळी, भांडण करण्यास तयार होणें. ॰कडी-स्त्री. पायांतील बेडी. 'तुम्ही हातकड्या, पायकड्या घातल्या.' -तोबं. १२६. [पाय + कडी] ॰क(ख)स्त-स्त्री. पायपीट; एकसारखें भटकणें; वणवण; [पाय + कष्ट, खस्त] ॰कस्ता-पु. एका गांवीं राहून दुसर्‍या गांवचे शेत करणारें कूळ; ओवंडेकरी. 'दर गांवास छपरबंद व पायकस्ता देखील करार असे.' -वाडबाबा १.२२९. [फा. पाएकाश्त] ॰कस्ता, पायींकस्ता-क्रिवि. पायीं जाऊन; पायांनीं कष्ट करून; ओवं- ड्यानें. 'आसपास गांव लगते असतील त्यांनीं पायीं कस्ता शेतें करून लागवड करावी ...' -वाडबाबा २.८३. ॰काळा-पु. (कों.) (सामान्यतः) कुणबी; नांगर्‍या; शेतावरचा मजूर. [पाय + काळा] ॰खाना-पु. शौचकूप; संडास; शेतखाना. [फा. पाए- खाना] ॰खिळॉ-पु. (गो.) पायखाना पहा. ॰खुंट-खुंटी- पुस्त्री. जनावर पळून जाऊं नये म्हणून त्याच्या गळ्यास व पायास मिळून बांधलेली दोरी, किंवा ओंडा; लोढणें. [पाय + खुंट, खुंटी] ॰खोळ-पु. लाथ. 'कां वैद्यातें करी सळा । रसु सांडी पायखोळां । तो रोगिया जेवीं विव्हळा- । सवता होय ।' -ज्ञा १७.१०१. २ शेतखाना ? [गो. पायखिळॉ] ॰खोळा-ळां-क्रिवि. पायतळीं; पायदळी. 'चंदन चढे देवनिढळा । येक काष्ठ पडे पायखोळा ।' -मुरंशु ३७९. ॰खोळणी-वि. शेतखान्याची ? 'जैसी पाय- खोळणी मोहरी । भरणाश्रय आमध्यनीरीं । तैसा द्रव योनिद्वारीं । म्हणोनि सदा अशौच ।' -मुरंशु ३५४. [गो. पायखिळॉ = शेतखाना] ॰गत-न.स्त्री. १ बिछान्याची पायाकडची बाजू; पायतें. 'सर- कारनें खडकवासल्याचें धरण बांधून आमच्या पायगतची नदी उशागती जेव्हा नेऊन ठेवली...' -टि २.१७४. २ (डोंगर, टेंकडी, शेत इ॰चा) पायथा; पायतरा. ३ पलंग, खाट यांचें पायांच्या बाजूकडील गात. [पाय + सं. गात्र] ॰गत घेणें-बाज इ॰च्या पायगतच्या दोर्‍या ओढून बाज ताठ करणें, ताणणें. ॰गम-पु. (व.) पाया; पूर्वतयारी; पेगम पहा. 'आधीं पासून पायगम बांधला म्हणजे वेळेवर अशी धांदल होत नाहीं.' ॰गुण-पु. (पायाचा गुण) एखाद्याचें येणें किंवा हजर असणें व त्यानंतर लगेच कांहीं बर्‍यावाईट गोष्टी घडणें यांच्यामध्यें जोडण्यांत येणारा काल्पनिक कार्यकारणसंबंध; बरेंवाईट फळ; शुभाशुभ शकुन. हातगुण शब्द याच अर्थाचा पण थोडा निराळा आहे. एखाद्या माणसाचें काम, कृत्य यांशीं हातगुणाचा संबंध जोडतात. 'धनाजीला नौकरीला ठेवल्यापासून हंबीरराव पुनः पूर्वींच्या वैभवाला चढले, आणि धनाजीचा हा पायगुण समजून त्याला प्यार करूं लागले.' -बाजीराव १२७. ॰गुंता-पु. अडचण; आड- काठी; अडथळा; पायबंद. पायगोवा पहा. 'दिल्लीस गेले आणि तिकडेच राहिले तर मग यत्न नाहीं. यास्तव समागमें पायगुंता विश्वासराव यास द्यावें' -भाव १०७. 'हीं मायेचीं माणसं स्वारींत जवळ असलीं कीं पायगुंता होतो.' -स्वप ४८. [पाय + गुंतणें] ॰गोवा-पु. १ पायगुंता; एखाद्या जुंबाडांत पाय अडकल्यामुळें होणारी अडचण; पायामुळें झालेली अडवणूक. २ (ल.) अडचण; अडथळा; नड; हरकत; आडकाठी; अटकाव. 'निरोपण सुपथीं आडथळा । पायगोवा वाटे सकळा ।' -मुसभा. २.९५. 'देवधर्म तीर्थ करावयास चिरंजीवाचा पायगोवा होईल यैसे आहे' -पेद ९.११. ३ शत्रूच्या सैन्याला पिछाडीकडून अडविणें. [पाय + गोवणें] ॰घड्या-स्त्रीअव लग्नांत वरमाय व मानकरिणी यांना त्यांच्या जानवास घर पासून वधूमंडपीं आणतांना त्यांच्या रस्त्यवर आंथराव- याच्या पासोड्या (मोठ्या सत्काराचें चिन्ह). पायघड्या घाल- ण्याचें काम परिटाकडे असतें. 'वाजंत्री पायघड्याशिरीगिरी विहिणी चालती ।' -वसा ५३ [पाय + घडी] ॰घोळ-वि. पायापर्यंत पोंचसें (वस्त्र.). 'कौसुंभरंगी पातळ । नेसली असे पायघोळ ।' -कथा १.११.११२. -क्रिवि. दोन्ही पाय झाकले जातील असें (नेसणें) पायांवर घोळे असें. [पाय + घोळणें] ॰चंपा-स्त्री. पाय चेपणें; सेवेचा एक प्रकार. 'हातदाबणी, पाय पी, विनवणी, चोळणी इत्यादि प्रकार करण्याचे अपूर्व प्रसंग जुन्या लोकांच्या परिचयाचे नव्हते असे ते सांगतात.' -खेया २८. [पाय + चंपी = चेपणीं] ॰चळ-पुस्त्री. अशुभ, अपशकुनी पाऊल. पायगुण; कोणत्याहि कार्याचा बिघाड, विकृति, संकटाची वाढ इ॰ होण्याचें कारण रस्त्यावरून जाणारा एखादा अपशकुनी माणूस किंवा भूत असें समजतात; पायरवा. [पाय + चळ] ॰चाल- स्त्री. पायानें चालणें, चालत जाणें; चरणाचाल. 'कीं येथ हे हळुच चालत पायचाली ।' -सारुह ८.१४४. [पाय + चाल] ॰चाळ- पु. १ विनाकारण केलेली पायांची हालचाल. २ (विणकाम) पायांच्या हालचालीमुळें हातमागास दिलेली चालना किंवा अशा रीतीनें चालणारा माग ३ अपशकुनी पायगुण; पायचळ. [पाय + चाळा] ॰चोरी-वि. धार काढतांना मागील पाय वर उचल- णारी (गाय, म्हैस इ॰). [पाय + चोरी] ॰ज(जा)मा-पु. विजार; तुमान; चोळणा; सुर्वार. [फा. पाएजमा] ॰जिभी- जिब-जीब-स्त्रीन. बारिक घागर्‍या असलेला पायांत घालण्याचा एक दागिना; तोरडी; पैंजण. वर्‍हाडांत अद्याप पायजिबा घालतात. 'सोन्याचें पायजिब तळीं ।' -राला ५६. [फा. पाएझेब्] ॰टा-पु. १ पायरी (शिडी, जिना इ॰ची). २ विहिरींत उतर- ण्यासाठीं केलेले कोनाडे किंवा बांधीव विहीरींत बांधकामाच्या बाहेर येतील असे पुढें बसविलेले जे दगड ते प्रत्येक; नारळाच्या झाडास वर चढतांना पाय ठेवण्यासाठीं पाडलेली खांच. ३ पाय- वाट; पाऊलवाट. ४ (ल.) वहिवाट; पायंडा; शिरस्ता; प्रघात. (क्रि॰ पडणें; लागणें; बसणें). ५ चाकाच्या परिघाचा प्रत्येक तुकडा, अवयव; पाटा. ६ (मोटेच्या विहिरीच्या) थारोळ्याच्या दोन्ही बाजूचे दगड, प्रत्येकी. [पाय + ठाय] ॰टांगी-स्त्री. (ना.) खालीं पाय सोडून बसतां येईल अशी योजना असणारी बैलगाडी. रेडू. [पाय + टांगणें] ॰ठ(ठा)ण-ठणी-नस्त्री. पायरी; पायटा पहा. 'हीं चार पांच चढुनी हळु पायठाणें ।' -केक २५. [सं. पदस्थान; म. पाय + ठाणें] ॰ठा-पु. १ चाकाच्या परिघाचा अव- याव; पाटा. २ (राजा.) सपाट जमीन भाजून तेथें नाचणी इ॰ पेरण्यासाठीं तयार केलेलें शेत. ३ ज्यांत मोटेचे सुळे, बगाडाचे खांब बसवितात ते विहिरींचे, भोंके पाडलेले दोन दगड. [सं. पदस्थ; पाय + ठेवणें] ॰त(ता)ण-न-न. (अशिष्ट.) १ जोडा; जुता; कुणबाऊ जोडा; पादत्राण. (सामा.) पायांत घालण्याचें साधन 'विठ्ठल चिंतण दिवसारात्रीं ध्यान । होईन पायतन त्याचे पायीं ।' -तुगा ११२७. 'स्त्रीपट चोरूनि पळे तेव्हां कैंचीं नळास पायतणें ।' -मोवन ४.१५५. २ (कों.) वाहाणा; चेपल्या. [सं. पादत्राण; प्रा. पायत्ताण] ॰बसविणें-(चांभारी धंदा) जोडा व्यवस्थित करणें. पायतर-पायतें पहा. ॰तरे-न. पायरी. 'एथ अग्नी हें पहिलें पायतरें । ज्योतिर्मय हें दुसरें ।' -ज्ञा ८.२२३. [पाय + थारणें] ॰तांदूळ-पुअव. (पायाखालचें तांदूळ) साधे, स्वच्छ तांदूळ निरनिराळ्या दोन पाटींत, शिपतरांत (ब्राह्मणेतरांत) किंवा पत्रावळींवर (ब्राह्मणांत) ठेवतात व त्यांवर नियोजित वधूस व वरास लग्नासाठीं उभे करितात. या तांदुळांवर उपाध्यायाचा हक्क असतो. पण ते बहुधां तो महारास देत. वधूवराच्या मस्तकावर तांदूळ, गहूं किंवा जोंधळे जे टाकतात, ते जे नंतर एकत्र करितात त्यांसहि पायतांदूळ असें म्हणतात. ह्या तांदुळांवर वेसकर-महाराचा हक्क असतो. [पाय + तांदूळ] ॰तर(रा)-ता-थर(रा)-था- पायतें-थें-पुन. १ बिछान्याची पायगताची बाजू. २ (टेंकडी, शेत, बगीचा इ॰ची) पायगत; पायतळची बाजू. [सं. पाय + थारणें; पादांत; म. पायतें] ॰थण-न-न. (विरू.) पायतण पहा. ॰थरी-स्त्री. (खा.) दुकानाच्यापुढें लांकडी किंवा दगडी तीन चार पायर्‍या असतात त्यांपैकीं प्रत्येक पायरी; पायटा. ॰दळ-न. पायानें चालणारी फौज; पाइकांचें सैन्य; पदाति. [पाय + दळ (सं. दल-सैन्य)] ॰दळ-ळीं-क्रिवि. जाण्यायेण्याच्या वाटेवर; पायानें तुडविलें जाईल असें (पडणें). 'फुलें कुसकरिलीं कुणिग मेल्यानें पायदळी तुडविलीं.' -उषःकाल १२८. ॰दळणीं-क्रिवि. पायाखालीं; पायदळीं. (कि॰ पडणें). [सं. पाददलन] ॰दान- न. (व.) तांग्याच्या, बैलगाडीच्या मागच्या बाजूस पाय ठेवण्या साठीं केलेली जागा. [सं. पाद + दा = देणें, दान] ॰दामा-पु. १ पक्षी पकडण्याचें जाळें. २ फूस लाविणारा पक्षी; ससाणा. -मराचिथोशा ३३. [फा. पाय्दाम्; सं. पाद + दाम = दावें] ॰द्दाज-न. पाय पुसणें; पायपुसें; हें बहुतेक काथ्याचें केलेलें असतें. [पाय] ॰धरणी-स्त्री. १ पायां पडणें; अत्यंत नम्रतेची, काकुळतीची विनवणी; पराकाष्ठेचें आर्जव. 'कशीहि पायधरणी मनधरणी करा- वयास तयार झालो.' -भक्तमयूरकेका प्रस्तावना १६. [पाय + धरणी] ॰धूळ-स्त्री. १ पायाची, पायास लागलेली, धूळ. 'नाचत बोले ब्रीदावळी । घेऊन लावी पायधुळी ।' -दा २.७.४१. २ स्वतःबद्दल दुसर्‍याशीं तुलना करतांना, बोलतांना (गुरु, इ॰कांजवळ) नम्रता- दर्शक योजावयाचा शब्द. [पाय + धूळ] (एखाद्यावर) ॰धूळ झाडणें-(एखाद्याच्या घरीं) आगमन करणें; भेट देणें; समाचार घेणें (गौरवार्थीं प्रयोग). 'मज गरिबावर पायधूळ झाडीत जा.' 'जगीं जरी ठायीं ठायीं पायधूळ झाडुन येई ।' -टिक ५. ॰पायखळी-स्त्री. पाय धुणें. 'तयापरी जो अशेषा । विश्वा- चिया अभिलाषा । पायपाखाळणिया देखा । घरटा जाला ।' -ज्ञा १८.६५१. [सं. पादप्रक्षालन; प्रा. पायपक्खालण; म. पाय + पाखाळणी] ॰पाटी-पांटी-स्त्री. लग्नाच्या वेळीं पायतांदुळांनीं भरलेली पांटी, शिपतर इ॰. [पाय + पांटी] ॰पा(पां)टीचे तांदूळ-पुअव. पायतांदूळ पहा. ॰पिटी-पीट-स्त्री. विनाकारण चालण्याचे श्रम; वणवण; इकडे तिकडे धांवाधांव. 'बहु केली वणवण । पायपिटी झाला सिण ।' -तुगा २००. [पाय + पिटणें] ॰पुसणें, ॰पुसें-न. पायपुसण्यासाठीं दाराशीं ठेविलेली काथ्याची जाड गादी; पायद्दाज; पायपुसण्याचें साधन. (महानु.) पायें पुसणें. 'तया वैराग्याचें बैसणें । शांभव सुखाचें पायेंपुसणें ।' -भाए ८११. [पाय + पुसणें] ॰पेटी-स्त्री. हार्मोनियमचा एक प्रकार. हींत पायानें भाता चालविण्याची योजना केली असल्यानें दोन्ही हातांनीं पेटी वाजवितां येते. याच्या उलट हातपेटी. [पाय + पेटी] ॰पैस-(व.) पाय टाकण्यास जागा. [पाय + पैस = प्रशस्त] ॰पोश-स-पु. (ल.) जोडा; वहाण; चप्पल; पादत्राण. 'सालाबादप्रमाणें ऐन जिन्नस पायपोसाचे जोडच यापासून घेत जाणें.' -दा २०१२. [फा. पाय्पोश्; सं. पाद + स्पृश्] ॰पोस- जळाला, गेला-तुटला-कांहीं पर्वा नाहीं, हरकत नाहीं, शष्प गेलें याअर्थीं वाक्प्रचार. 'एका महारुद्राची सामग्री राधाबाई काय लागेल ती पुण्याहून माळशिरसास पाठवील न पाठवील तरी आमचा पायपोस गेला ! तीन महारुद्र करून आम्हींच श्रेय घेऊं.' -ब्रप २७३. ॰पोस मारणें-मानहानि करणें; निर्भर्त्सना करणें. ॰पोस दातीं धरणें-अत्यंत लीन होऊन क्षमा मागणें; याचना करणें; आश्रय घेणें. ॰पोसासारिखें तोंड करणें-फजिती झाल्यामुळें तोंड वाईट करणें; दुर्मुखलेलें असणें. कोणाचा पाय- पोस कोणाच्या पायांत नसणें-गोंधळ उडणें (पुष्कळ मंडळी जमली असली आणि व्यवस्था नसली म्हणजे ज्याचा जोडा त्याला सांपडणें मुष्किल होतें त्याजवरून). ॰पोसखाऊ-वि. खेटरखाऊ; हलकट; अत्यंत क्षुद्र; निर्लज्ज (मनुष्य). [पाय + पोस + खाणें] ॰पोसगिरी-स्त्री. जोड्यांनीं मारणें; दोन पक्षांतील व्यक्तींनीं केलेली जोड्यांची मारामारी; जोडाजोडी. (क्रि॰ करणें; मांडणें; चालणें). [फा.] ॰पोसपोहरा-पु. जोड्याच्या आका- राचा विहिरींतून पाणी काढण्याचा पोहरा. [पायपोस + पोहरा] ॰पोसापायपोशी-स्त्री. परस्परांतील जोड्यांची मारामारी; जोडाजोडी; पायपोसगिरी. ॰पोशी-स्त्री. दर चांभारापासून दर- साल एक जोडी नजराणा घेण्याचा पाटील-कुलकर्णीं इ॰चा हक्क. ॰पोशी-वि. पायपोसाच्या डौलाचें, घाटाचें बांधलेलें पागोटें. ॰पोळी-पुस्त्री. १ (तापलेली जमीन, खडक, वाळू इ॰वरून चालल्यामुळें) पाय भाजणें. २ (ल.) मध्याह्नीची वेळ. ३ जमी- नीची तप्तावस्था; जमीन अतिशय तापलेली असणें. 'एव्हां पाय- पोळ झाली आहे संध्याकाळीं कां जाना ?' [पाय + पोळणें] ॰फळें-न. (राजा.) ओकतीच्याजवळ पाय देण्यासाठीं बस- विलेली फळी. [पाय + फळी] ॰फोडणी-स्त्री. १ घरीं रोग्यास पहाण्याकरितां आल्याबद्दल वैद्यास द्यावयाचें वेतन; वैद्याच्या भेटीचें शुल्क. २ पायपोळ. [पाय + फोडणें] ॰फौज-स्त्री. (गो.) पाय- दळ. [पाय + फौज] ॰बंद-पु. १ घोड्याचे मागचे पाय बांध- ण्याची दोरी. 'एक उपलाणी बैसले । पायबंद सोडूं विसरले ।' -जै ७६.६०. २ अडथळा; बंदी. 'इंग्रज व मोंगल यांस तिकडे पायबंद जरूर पोंचला पाहिजे.' -वाडसमा १.१६. ३ (फौजेच्या पिछाडी वर) हल्ला करून व्यत्यय आणणें. 'रायगडास वेढा पडला, आपण पायबंद लावावा म्हणजे ओढ पडेल. रायगडचा वेढा उठेल.' -मराचिथोशा ३४. ४ संसाराचा पाश. [फा. पाएबंद्] ॰बंद लावणें-लागणें-घालणें-देणें-पडणें-आळा घालणें, बसणें; व्यत्यय आणणें, येणें; अडथळा, बंदी असणें, करणें. 'भलत्या आशा व आकांक्षा यांना इतिहासदिशास्त्रांकडून पायबंद पडेल.' -विचावि ५२. 'निजामाला पायबंद लागणें शक्यच नाहीं.' -भाऊ (१.१) २. ॰भार-पु. पायदळ. याच्या उलट अश्वभार, कुंजरभार, रथभार इ॰ 'अश्वरथ कुंजरा । गणित नाहीं पाय- भारां ।' -कथा १.२.५९. [पाय + भार] ॰मर्दी-स्त्री. भरभर ये जा करणें; चालणें; धांवाधांवी, धांवपळ करणें; एखाद्या कामा- वर फार खपणें. 'पायमर्दी केली तेव्हां काम झालें .' (क्रि॰ घेणें; करणें). [फा. पाएमर्दी = धैर्य; निश्चय] ॰मल्ली-म(मा)ली- मेली-स्त्री. १ सैन्य, गुरें इ॰नीं केलेली देश, शेत इ॰ची नासाडी; पायांखालीं तुडविणें; नासधूस; तुडवातुडव. 'आपले सरकारची फौज मलक महमदखान वगैरे गेले आहेत त्यांनीं पायमाली केली आहे.' -दिमरा १.१५०. २ शत्रूनें आपला मुलुख लुटला असतां, तहांत त्याच्या कडून त्या लुटीबद्दल घेण्यांत येणारा दंड किंवा खंडणी. (सामा.) मोबदला; भरपाई. 'सर्व आमचे कर्ज सरकारांतून कारभारी देतील तेव्हां काय पायमल्ली दहापांच लक्ष रुपये (वजा) घालणें ती घालावी.' -ख ९.४८५४. 'शेतकर्‍यांस नुकसानीदाखल पायमली देण्यांत येत असते.' -हिंलइ १७४. ३ (ल.) दुर्दशा; अपमान; हेटाळणी; अवहेलना. (क्रि॰ करणें; होणें). 'आमच्या भाषेची अशी पायमल्ली व्हावी हा मोठा चमत्कार नव्हे काय ?' -नि ११३ ४ नाश; नुकसान. 'महादजी गदाधर यांनीं दरबारची जुनी राहटी राखिली नाहीं, याजमुळें पायमाली आहे.' -रा ८.२०१. [फा. पाएमाली; सं. पाद + मर्दन; म. पाय + मळणें] ॰मळणी-स्त्री. सारखी चाल, घसट, वहिवाट; एकसारखें चालणें वहिवाट ठेवणें. 'जो रस्ता सध्यां बिकट व अडचणीचा वाटतो तोच पुढें पाय- मळणीनें बराच सुधारेल.' -नि. ४२९. [पाय + मळणें] ॰मांडे- पु. (काव्य.) पायघड्या पहा. 'विषयसुख मागें सांडे । तेचि पायातळीं पायमांडे ।' -एभा ८.६. -वेसीस्व १०.१९. ॰मार्ग- पु. १ पायवाट; पाऊलवाट. २ जमीनीवरचा रस्ता; भूमिमार्ग; खुष्कीचा मार्ग. ह्याच्याउलट जलमार्ग. ॰माल, पामाल-वि. पायमल्ली केलेला, तुडविला गेलेला; उध्वस्त; नष्ट. [फा. पाएमाल्] ॰मोजा-पु. पायांत घालावयाचा विणून तयार केलेला पिशवी- सारखा कपडा. हा पाऊस, थंडी, वारा यांपासून पायाचा बचाव करण्यासाठीं वापरतात. [पाय + मोजा] ॰मोड-स्त्री. १ प्रवासाला निघालेल्या किंवा चालत असलेल्या मनुष्यास जाऊं न देणें. २ अशी केलेली थांबवणूक; थांबवून ठेविलेली स्थिति. [पाय + मोडणें] ॰मोडें-न. १ (कों.) उत्साहभंग, अडथळा करणारी गोष्ट; (हातीं घेतलेल्या किंवा घ्यावयाच्या कामांत) एखाद्याचा उत्सा- हाचा, आशांचा बींमोड; तीव्र निराशा. २ आयुष्यांतील अडचणी अडथळें, संकटें इ॰ वाढत्या व्यवहाराची गति कुंठित होण्यास निमित्त. 'हें पोर अमळ चालूं लागलें म्हणजे खोकला, पडसें अशीं अनेक पायमोडीं येतात.' [पाय + मोडणें] ॰मोडें घेणें- (हातीं घेतलेल्या कार्यापासून) भीतीनें पारवृत्त होणें. ॰रव-पु. वरदळ; वहिवाट; दळणवळण; पायंडा. पैरव पहा. 'आणीकही एक पहावें । जें साधकीं वसतें होआवें । आणि जनाचेनि पायरवें मैळेचिना ।' -ज्ञा ६. १७२. -स्त्री. १ पायतळ; पायदळ; पाय ठेवण्याची जागा. 'रावण जंव भद्रीं चढे । तवं मुगुट पायरवीं पडे ।' -भारा बाल ७.५. २ (राजा.) चाहूल; सांचल. ३ पाय- वाट; रस्ता. ४ प्रवेश. 'प्रथम चाकरीस येतों म्हणून नम्रतेनें पायरव करून घेतली' -ऐटि १.२९. ५ दृष्ट; नजर; बाहेरवसा; भूतबाधा; पायरवा; पायचळ पहा. 'करंज्यांस पायरव लागून लागलीच सरबत झालें.' -कफा ४. ६ पायगुण. 'घरांत आल्या- बरोबर लागलेंच करंजांचें सरबत झालें. काय हा पायरव !' -कफा ४. ७ पैरव पहा. [सं. पाद + रव; पाय + रव; हिं. पैरव] ॰रवा- पु. १ पायरव; शिरस्ता; पायंडा. 'त्या माणसाचा येथें येण्याचा पायरव आहे.' २ पायचळ; दृष्ट लागणें. 'विहिरीवर तुझी मूल तिनीसांजची गेली होती तेथें तिला बाहेरचा पायरवा झाला.' -वेड्यांचा बाजार. ॰रस्ता-पु. १ पायवाट. २ जमीनीवरचा रस्ता, पायमार्ग. [पाय + रस्ता] ॰रहाट-पु. (अल्पार्थी) रहाटी-स्त्री. पायानें पाणी लाटण्याचा रहाट; रहाटगाडगें. [पाय + रहाट] ॰रावणी-स्त्री. पायधरणी; विनवणी, रावण्या पहा. 'देवकी बैसविली सुखासनीं । लागल्या वाजंत्राच्या ध्वनी । विंजणें वारिती दोघीजणी । पायरावणीं पदोपदीं ।' -एरुस्व १६.३२. [पाय + रावण्या] ॰लाग-पु. १ गुरांच्या पायांस होणारा एक रोग. हा गुरांच्या तोंडावर व पायांवर परिणाम करितो. २ स्त्रियांना होणारी पिशाचबाधा. (एखाद्या स्त्रीकडून भूत पायीं तुडविलें गेल्यास तें तिला पछाडतें अशी कल्पना आहे). [पाय + लागणें] ॰वट-स्त्री. १ रहदारीचा रस्ता आहे असें दाखविणार्‍या पावलांच्या खुणा; पावलांच्या खुणा. २ पायगुण. 'नेणों कोणाचा पायवट जाहला । एक म्हणती समय पुरला । एक म्हणती होता भला । वेनराव ।' -कथा ६.५.९१. [पाय + वठणें] ॰वट-(प्र.) पायवाट पहा. ॰वट-टा-पु. (महानु.) पाय; पायाच्या शिरा; (टीप-ओहटळ पांचाहि मुख्य शिरांचा सांगातु ऋ ८८). 'समसा गुल्फाचा उंचवटा । श्रीप्रभुचिया पायवटा ।' -ऋ ८८. ॰वणी-न. चरणों- दक; चरणतीर्थ; ज्या पाण्यांत एखाद्या ब्राह्मणानें किंवा पवित्र विभूतीनें पावलें बुडविलीं आहेत किंवा धुतलीं आहेत असें पाणी. 'करितां तापसांची कडसणी । कवणु जवळां ठेविजैल शूलपाणी । तोहि अभिमानु सांडूनि पायवणी । माथां वाहे ।' -ज्ञा ९.३७२. 'कोणी राम देखिला माजा । त्याचें पायवणी मज पाजा ।' [पाय + वणी- पाणी] ॰वाट-स्त्री. १ पाऊलवाट; पायरस्ता. 'तिकडे जय; तुज देतिल मेरूचे पायवाट आजि कडे ।' -मोभीष्म ११.४५. २ जमीनीवरचा, खुष्कीचा मार्ग; भूमिमार्ग. याच्या उलट जलमार्ग. 'समुद्रावरी सैन्य ये पायवाटें ।' -लोपमुद्रा वामन-नवनीत १०८. [पाय + वाट] ३ (गो.) पालखी देवालयांत शिरण्यापूर्वीं धोब्या- कडून घालण्यांत येणारा धुतलेला पायपोस. ॰वाट करणें-उत- रून, ओलांडून जाणें. 'पायवाट केले भवाब्धी ।' -दावि ३३०. 'भवसिंधु पायवाट कराल.' -नाना १३५. ॰शिरकाव-पु. १ प्रवेश मिळवणें. २ मिळालेला प्रवेश. [पाय + शिरकाव] ॰शूर-वि. चालण्याच्या, वाटेच्या कामीं अतिशय वाकबगार; निष्णात. 'कोळी लोक कंटक व पायशूर असल्यानें त्यांना जंगलांतील वाट ना वाट माहीत असते.' -गुजा ६०. ॰सगर-पु. (खा. व.) पायवाट; पाऊलवाट; पायरस्ता. [पाय + संगर = लहान वाट] ॰सर-पु. पायरी; पाय ठेवण्याची (जिना इ॰ची) जागा, फळी. [पाय + सर = फळी] ॰सूट-वि. चपळ; चलाख; भरभर चालणारा [पाय + सुटणें] ॰सोर-पु. (गो.) पायगुण. ॰स्वार-वि. (उप.) पायीं चालणारा; पादचारी; पाईक. [पाय + स्वारी] पायाखायला-वि. (कों.) (पायांखालील) सापांची भीति, उपद्रव असलेलें (अरण्य, रस्ता). पायाखायलें-न. १ (कों.) फुरसें; साप. २ सर्पदंश. पायाखालची वाट-स्त्री. नेहमीं ज्या वाटेनें जाणें येणें आहे अशी वाट; अंगवळणी पडलेली वाट. पायाचा-वि. पायदळ (शापाई). 'पायांचे भिडतां । तोडिति जानिवसे जे ।' -शिशु १०४५. पायाचाजड-वि. १ हळुहळु चालणारा; मंदगतीनें चालणारा. २ चांगलें चालतां न येणारा. पायाचा डोळा-पु. घोटा. पायाचा नक्की कस-पु. (मल्लविद्या) एक डाव. आपला पाय जोडीदाराच्या बगलेंतून जोडीदाराच्या मानेवर घालून मान फिरवून मानेवर घातलेल्या पायाच्या पंजानें मानेस दाब देऊन मारणें, किंवा चीत करणें. [पाय + कसणें] पायाचा नरम-वि. (बायकांप्रमाणें मऊ पाय असलेला) षंढ; नपुंसक. पायांचा पारवा-पु. (पारव्याप्रमाणें गति असलेला) जलद, भरभर किंवा पुष्कळ चालणारा मनुष्य पायाचा फटकळ-वि. लाथा मार- णारें, लाथाड (जनावर) पायाचा हुलकस-पु. (मल्लविद्या) जोडादारानें खालीं येऊन आपला एक पाय धरला असतां आपला दुसरा पाय जोडीदाराच्या बगलेंतून घालून आपल्या पायाच्या पंजानें त्याच्या कोपराजवळ तट देऊन आपला दुसरा हात त्याच्या बगलेंतून देऊन जोडीदाराचा हात आपल्या पायाच्याअटीनें धरून तो पाय लांब करून हातानें काढिलेला कस जास्त जोरानें मुरगळून चीत करणें. पायाची करंगळी-स्त्री. पायाच्या बोटां- पैकीं सर्वात लहान असलेले शेवटचें बोट. पायांची माणसें- नअव. पायदळ. 'पायाच्या माणसांची सलाबत फौजेवर.' -ख ३५९४. पायाची मोळी-स्त्री. (मल्लविद्या) एक डाव. (मागें पाय बांधून गड्यास मारणें याला मोळी म्हणतात). जोडीदाराचा एक पाय उचलून आपल्या माडीच्या लवणीत दाबून ठेवावा. दुसर्‍या हातानें जोडीदाराचा दुसरा पाय धरून जोडीदाराच्या दोन्ही पायांस तिढा घालून मुरगळून मारणें. पायांचे खुबे- पुअव. पाठीच्या कण्याच्या खालच्या बाजूकडील वेडावाकडा, बळकट आणि घट्ट असा हाडाचा सांगाडा. -मराठी ६ वें पुस्तक (१८७५) २५३. पायाचें भदें-न. अनवाणी चालून पायांस खडे वगैरे बोचून पाय खरखरीत होणें; पायाची खराबी; पाय खडबडीत होणें. 'चालतांना पायांचें भदें होऊं नये म्हणून पाव लांकरिता कातड्याचें वेष्टण तयार करण्याचें काम....' -उषा- ग्रंथमालिका (हा येथें कोण उभा). पायांच्या पोळ्या-स्त्रीअव. तापलेल्या जमीनीवरून चालल्यामुळें पोळलेले पाय; पायपोळ. (क्रि॰ होणें, करून घेणें). पायांतर-न. पायरी. [पाय + अंतर] पायापुरती वहाण कापणारा-वि. कंजुष; कृपण; कवडीचुंबक; अतिशय जपून खर्च करणारा. पायां पैस-स्त्री. पायापुरती मोकळी जागा. (अगदीं गर्दी, दाटी संबंधीं वापरतांना प्रयोग). [पाय + पैस (अघळपघळ, मोकळी)] पायींचा पारवा-पु. पायांचा पारवा पहा.

दाते शब्दकोश

घोडा

पु. १ खूर असलेला एक चतुष्पाद प्राणिविशेष. ह्याचा उपयोग ओझे वाहण्याच्या, गाडी ओढण्याच्या व बसण्याच्या कामीं करतात. ह्याच्या जाती अनेक आहेत. अरबी घोडे जग- प्रसिद्ध आहेत. लहान घोड्यास तट्टू व घोड्याच्या पोरास शिंगरूं म्हणतात. घोड्याच्या आकृतीवरून, गतीवरून, उपयोगा- वरून व लक्षणेनें हा शब्द अनेक वस्तूंस लावतात. २ बुद्धिबळाच्या खेळांतील एक मोहरा. हा सर्व बाजूंनीं दोन सरळ व एक आडवें (अडीच) घर जातो. या मोहर्‍याचा विशेष हा आहे कीं हा इतर मोहर्‍यांच्या डोक्यावरून उडून जातो, तशी गति इतर मोहर्‍यांना नसते. ३ बंदुकींतील हातोडीच्या आकराचा अव- यवविशेष. हा दाबला असतां ठिणगी उत्पन्न होते व बंदूकीचा बार उडतो; चाप. ४ (मुलांचे खेळ) दोन पायांत काठी घालून (तिला घोडा मानून) मुलें धांवतात तो काठीचा घोडा. ५ (उप.) मूर्ख व ठोंब्या असा वयस्क मुलगा; वयानें मोठा पण पोरकट मनुष्य. ६ वस्त्रें, कपडे ठेवण्यासाठीं खुंट्या ठोकलेला खांब; स्नान करणार्‍या माणसाचे कपडे ठेवण्याकरितां जमिनींत रोंवलेली काठी, खांब; (इं.) स्टँड. ७ (ल.) शरीर वाहून नेतात म्हणून पायांस लक्षणेनें (दहाबोटी) घोडा असें संबोधितात; तंगड्या. 'आमचा दोन पायांचा घोडा आम्हाला हवें तेथें वाहून नेईल.' ८ पाळणा टांगण्यासाठीं एका आडव्या लांकडाला चार पाय लावून करतात ती रचना; घोडी. ९ पालखीचा दांडा ज्याला बसविलेला असतो तें दुबेळकें बेचक; पालखीं तबे- ल्यांत वगैरे ठेवतांना ज्यावर ठेवतात तीं दुबळकें असलेलीं लाकडें प्रत्येकीं. १० गाड्याच्या बैठकीच्या चौकटीचीं दोन बाजूंचीं लांब लांकडें प्रत्येकी; गाडीच्या दांडयास आधार द्याव- याचें दुबेळकें. ११ मूल रांगावयास लागलें असतां दोन हात व दोन गुडघे जमीनीला टेकून करतें ती घोड्यासारखी आकृति. (क्रि॰ करणें). १२ मृदंग; पखवाज ठेवण्याची घडवंची; घोडी; (दिवे इ॰ लावण्याची) दोन बाजूस पायर्‍या असलेली घडवंची; (पिंपे, पेट्या ठेवण्याची) लांकडी घडवंची. १३ नारळ सोलण्याचा, शेंड्यास सुरी बसविलेला खांब; नारळ सोलण्याचा एक प्रकारचा सांचा. १४ समुद्राच्या भरतीच्या पाण्याचा चढ, फुगोटी, फुगारा; लाटेचा उंच भाग; नद्यांच्या मुखांतून वर गेलेलें समुद्राच्या भरतीचें पाणी. -सृष्टि ५७. १५ ओबडधोबड असा आंकडा, फांसा, पकड. १६ (ल.) घोडेस्वार. 'तीन हजार घोडा पेशव्यांचे तैनातींत ठेवावा.' -विवि ८.७.१२९. १७ दाराच्या दुहेरी चौकटीच्या वरच्या बाजूचे, परस्पराला जोडणारे दोन लाकडी तुकडे (त्यांच्याच जोडीच्या खालच्या बाजूच्या तुकड्यांस छिली म्हणतात). १८ (खाटीक इ॰ कांचें) साकटणें, सकोटन; खाटकाचा ठोकळा. १९ (मुद्रण) केसी व ग्याली ठेवण्यासाठीं केलेली घडवंचीवजा चौकट. २० फळा, चित्रफलक इ॰ उभा ठेवण्याची लाकडी उभी चौकट. २१ (कों.) रहाटगाडग्याचें कोळबें ज्यावर ठेवतात ती लांकडी चौकट. २२ (पोहोण्याचा) चार भोपळ्यांचा तराफा. २३ (गो.) (विटी दांडूचा खेळ) विटी मारण्याचा एक प्रकार. (क्रि॰ मारणें). [सं. घोटक; प्रा. घोड; गु.घोडो; सिं. घोडो; स्पॅनिश जि. गोरो; अर. घोरा] घोडी-स्त्री. १ घोडा या जातीच्या प्राण्याची मादी. २ सतार, तंबोरा इ॰ तंतुवाद्यांच्या भोपळ्याच्या मध्यावर हस्ती- दंती अगर लांकडाची पाटाच्या आकृतीची एक इंची किंवा दीड- इंची पट्टीची बैठक; तिच्यावरून तारा पुढें खुंटीस गुंडाळलेल्या असतात. ३ मुलांना शिक्षा देण्याकरितां जिला हातानें धरून शिक्षा दिलेला लोंबकळत असतो अशी आढ्यापासून लोंबणारी दोरी, फांसा; मुलांस टांगण्यासाठीं उंच बांधलेली दोरी. अशी शिक्षा पुर्वीं शाळांतून फार देत. (क्रि॰ घेणें; देणें). 'एखाद्या मुलांशी माझं वांकडं आलं कीं, रचलंच त्याच्यावर किटाळ आणि दिलीच त्याला पंतोजीकडून घोडी.' -चंद्रग्र ८०. ४ उभें राहून पखवाज वाजविण्याकरितां पखवाज ठेवावयाची घडवंची. 'इत- क्यांत देवळाच्या एका कोंपर्‍यांत मृदंग ठेवावयाची उंच घोडी सुनंदाला दिसली.' -सुदे २५. ५ गवत इ॰ वाहण्याकरितां खटार्‍यावर उभारलेला सांगाडा, चौकट. ६ फळा जमीनीपासून उच ठेवण्याकरितां व त्याला उतार देण्याकरितां केलेली लांकडी चौकट, सांगाडा. ७ वयस्क असून पोरकटपणा करणारी, खिदड- णारी मुलगी; खिदडी; धांगडधिंगी; भोपळदेवता; घोडकुदळ. ८ (सुतारी) तासावयाचें लांकूड हलूं नये म्हणून त्याला आधार- भूत असें दुसरें लांकूड, चौकट इ॰ सोईनें बसवितात तें. ९ (विणकामांत) सूत उकलण्यासाठीं केलेलें लांकडी चौकटीसारखें साधन. १० (सोनारी) पायांत घालावयाच्या सांखळ्यांच्या कड्या वांकविण्यासाठीं असलेला बोटाइतका जाड असा निमु- ळता मोळा. ११ (हेट. नाविक) पोरकें (लहान) शीड उभें करण्यासाठीं असलेलें कमानीसारखें लांकूड. १२ बंधार्‍याच्या मुखाशीं (पाणी सोडण्याच्या ठिकाणीं) पडद्यासारखी बांधलेली भिंत. हिच्यावरून पाणी जात असतें. १३ (हेट.) गलबताच्या कडेस शौच्यास बसण्याकरितां टांगलेली लांकडी चौकट. १४ सांकटणें; सकोटण. घोडा अर्थ १७ पहा. १५ तीन पायांचें दिवा ठेवण्याचें बुरडी तिकाटणें, तिवई. १६ पाटास जे दोन आडात मारितात ते प्रत्येकी. १७ हत्तीवरील चौकट; हौदा. 'साहेब नौबतीकरितां हत्तींवर लाकडी घोडी घालून...' -ऐरा ९.५०६. १८ उभें खुंटाळें. (इं.) स्टँड. 'तिकोनी खुंट्यांची घोडी आणि रुमाल ठेवावे ' -स्वारीनियम ७०. १९ सामान ठेवण्याचा घोडा. घोडें-न १ सामा (लिंगभेद न धरतां) घोडा या जातीं- तील जनावर. ' कृष्णाकांठचीं घोडीं सडपातळ पण चपळ अस- तात.' २ खटार्‍याच्या साटीच्या चौकटीचीं दोन बाजूंचीं उभीं लाकडें; घोडा अर्थ ९ पहा. घोडकें अर्थ १ पहा. ३ चार भोंपाळे लावलेला पाण्यावर तरंगणारा तराफा. घोडा अर्थ २१ पहा. ४ (व.) गाडीचे दांडे-जूं ज्यावर ठेवतात तें दुबेळकें. घोडा अर्थ ९ पहा. [सं. घोडा] (वाप्र.) घोडा आडवा घालणें- (एखाद्या कार्यात) अडथळा, विघ्न आणणें. 'आणि म्हणूनच तुम्ही घोडा आडवा घातलांत वाटतं ?' -चंद्रग्र ६८. ॰उभा करणें-बांधणें-(घोडा) थोडा वेळ थांबवणें; जरासें थांबणें; घाई न करणें (घाईंत व धांदलींत असणार्‍या मनुष्यास उद्देशून ह्या वाक्प्रचाराचा उपयोग करतात.) ॰काढणें-१ (बांधून ठेव- लेला घोडा बाहेर नेणें) घोडा हांकारणें, पिटाळणें २ (ल.) (एखाद्यानें) पळ काढणें; पोबारा करणें; निसटणें. ॰चाल- विणें-(कर.) (ल.) डोकें खाजवणें; युक्ति लढविणें. ॰टाकणें- घोडा फेंकणें; उडवणें; अंगावर घालणें. 'आरेरे टाकौनि घोडा । भणती यांचिआं जटैं उपडा । ' -शिशु १४१. ॰मैदान जवळ असणें-(घोडा धांवण्यांत कसा काय आहे याची परीक्षा त्यास मैदानांत पळवून करतां येते यावरून) ज्याची परीक्षा करा- वयाची तो पदार्थ, मनुष्य व परीक्षेस लागणारी सामग्री हीं दोन्ही जवळ असणें असा अर्थ होतो; एखाद्या गोष्टीची निरर्थक चर्चा न करतां तिला कसोटीला लावणें, कसोटीचा वेळ किंवा सामुग्री जवळ असणें; हा सूर्य हा जयद्रथ. 'कोरडी बढाई कशाला पाहिजे ? घोडामैदान जवळच आहे.' ॰हांकणें-पळून जाणें; निघून जाणें; पोबारा करणें; घोडा काढणें पहा. 'पंतोजीबुवास पाहून त्या पोरानें घोडा हांकला. 'घोडी काढणें-भरविणें- सक्रि. (माण.) घोडीस घोडा दाखविणें, देणें; घोडी फळविणें. घोडी घेणें-(एखाद्याशीं) घांसणें; कटकट करणें; मत्सरबुद्धीनें दोष काढणें. घोडें उभें करणें-अडथळा आणणें. 'बाळासाहेब नातूसारख्यांनीं विशेष प्रसंगीं एखादें घोडें उभें केलें तरी त्याकडे दुर्लक्ष्य करून ज्यानें त्यानें आपला पंथ सुधारावा.' -आगर ३.१४४. (एखाद्याचें) घोडें थकणें-एखाद्यानें (प्रवास, धंदा, व्यापार, अभ्यास इ॰ कांत) थकून जाणें; हतबल होणें; पुढें रेटण्याची शक्ति न उरणें. (एखाद्यानें आपलें) घोडें पुढें दामटणें-ढकलणें-हांकणें-घालणें-१ इतरांच्या पूर्वीं आपला कार्यभाग साधून घेण्याचा घाईने प्रयत्न करणें. 'या शर्यतींत जो तो आपलें घोडें पुढें दामटायला पहात आहे. -नि. 'ब्रिटिश वसाहतीनीं आपल्या हक्कांचें घोडें पुढें दामटलें.' -सासं २.४४६. २ लुब्रेपणानें दुसर्‍यांच्या संभाषणांत तोंड घालून त्यांच्यावर आपले विचार लादणें. (एखाद्याचें) घोडें मारणें-एखाद्याचें नुकसान करून त्याला राग आणणें (पूर्वीं प्रवासाचें मुख्य साधन घोडें असे. प्रवासाचें घोडें ठार केल्यास त्याचा प्रवास थांबत असे व त्यामुळें त्याचें फार नुकसान होई यावरून) एखाद्याचें फार नुकसान करणें. 'मी काय तुझें घोडें मारलें आहे ?' (आपलें) घोडें पुढें ढकलणें-आपलें काम प्रथम करूं लागणें; आपल्या कामाला महत्व देणें. गांडी- खालचें घोडें-संसारादि निर्वाहक मालमत्ता, वाडी इ॰ आधारभूत मुख्य साधन. म्ह॰ आपले गांडीखालचें घोडें गेलें, मग त्यावर महार बसो कीं चांभार बसो. घोडीं आडवीं घालणें-१ शत्रूवर तुटून पडून त्याच्या चालीला, पळाला अड- थळा करणें. २ (ल.) (एखाद्यास त्याच्या कामांत) संकट, अडथळा, व्यत्यय आणणें. 'जर त्यांणीं आपल्यावर चालून घेतलें तर आम्ही आडवीं घोडीं घालतों. ' -ख ४२९७. घोडीं घालणें-घोड्यांच्या अनीना उचलणें-घोडदळांतील सर्व स्वारांनीं इर्षेनें शत्रूवर एकदम तुटून पडणें. -होकै ३. घोड्याच्या, हत्तीच्या पायांनीं येणें व मुंगीच्या पायांनीं जाणें-(आजार, संकट, अडचण इ॰ च्या संबंधांत हा वाक्प्र- चार योजतात) जलदीनें येणें व धिमेधिमे जाणें; आजार इ॰ जलदीनें येतात पण अतिशय हळू हळू नाहींसे होतात यावरून वरील वाक्प्रचार रूढ आहे. (एखाद्याच्या) घोड्यानें पेण (पेंड)खाणें-या वाक्प्रचारांत पेण = प्रवासांतील टप्पा, मुक्का- माची जागा या ऐवजीं चुकीनें पेंड हा शब्द उपयोगांत आणतात. लांबच्या प्रवासांत निरनिराळ्या टप्प्यांच्या ठिकाणीं घोडीं उभीं राहत. त्यामुळें टप्प्याचें ठिकाण आलें कीं घोडें तेथें अडे, पुढें जात नसे. यावरून वरील वाक्प्रचार एखादें कार्य करतांना कोणी अडून बसल्यास त्यास. 'तुझें घोडें कुठें पेण खातें' असें विचारतांना उपयोगांत आणतात. घोड्यापुढें धावणें-जिकीरीचें, दगदगीचें; कष्टाचें काम करणें. (एखा- द्याच्या) घोड्यापुढें धावणें-एखाद्याची कष्टाची सेवा, चाकरी करणें; (उप.) एखाद्याची ओंगळ खुशामत करणें; एखाद्याची थुंकी झेलणें. घोड्यावर घोडा घालणें-(लिलांव इ॰ कांत) चढाओढ करणें; एखाद्यानें केलेल्या किंमतीपेक्षां अधिक किंमत पुकारणें; उडीवर उडी घालणें. घोड्यावर बसणें-दारू पिऊन झिंगणें;ताठ्यांत असणें. घोड्यावर बसून येणें-घाईनें येणें; आपलें काम तांतडीनें करण्यास दुसर्‍यास घाई करणें. सर घोड्या पाणी खोल किंवा पाणी पी-(घोड्या मागें हट, पाणी खोल आहे. तेथूनच पाणी पी) गोष्ट मोठी कठिण आहे, मागें परततां येणें शक्य आहे तोंच परतावें याअर्थी. म्ह॰ १ घोडा आपल्या गुणानें दाणा खातो = चांगला घोडा खूप काम करून आपल्याला खाद्यहि जास्त मिळवतो. त्याला जास्त देण्यास मालक असंतुष्ट नसतो. यावरून चांगला चकर आपल्या गुणानें व मेहनतीनें मालकाकडून पगार वाढवून घेतो. २ घोडा स्वार (मांड) ओळखतो = बसणारा कच्चा कीं पक्का आहे हें घोडा ओळखूं शकतो. (यावरून), आपला मालक कडक कीं नरम आहे हें हाताखालचीं माणसें ओळखूं शकतात. ३ (व.) जाय रे घोड्या खाय रे हरळी = घोड्याला हरळी खावयास मोकाट सोडल्यास (घोड्याला) तें चांगलेंच होईल, पथ्यावरच पडेल. म्ह॰-१ घोडा मरे भारें शिंगरूं मरे येरझारें = घोडी ओझें किंवा माणूम वाहून नेत असतां तिचें शिंगरूंहि तिच्याबरोबर जात असतें. घोडीच्या प्रत्येक हेलपाट्याबरोबर शिंगरूंहि हेलपाटा खातें. यावरून प्रत्यक्ष काम करणारास श्रम होतातच पण त्याच्या सहवासांत असणारांना सुध्दां जवळ जवळ तितकेच श्रम होतात. २ वरातीमागून घोडें = लग्नाच्या वरातीच्या मिरवणुकींत सर्वांच्या पुढें श्रृंगारलेलें कोतवाली घोडें चालवण्याची चाल आहे. यावरून वरात निघून गेल्यावर मागाहून श्रृंगारलेलें घोडें नेणें व्यर्थ होय किंवा औचित्यास धरून होत नाहीं. त्याप्रमाणें एखादी गोष्ट होऊन गेल्यावर मागाहून तत्संबंधीचीं साधनें जुळविणें व्यर्थ होय. २ माझें घोडें आणि जाऊं दे पुढें = इतरांचें कांहींहि होवो, माझें काम आधीं झालें पाहिजे. स्वार्थी माणसाची निंदा कर- तांना या म्हणीचा उपयोग करतात. समासांत घोडा शब्द पूर्व- पदीं आल्यास त्याचीं घोड किंवा कधीं कधीं घोडे अथवा घोड व घोडे, अशीं दोन्ही रूपें होतात. उ॰-घोडचूक; घोडेखोत; घोड (डे) चिलट इ॰. सामाशब्द-घोडकट, घोडकें-न. (घोड्याला तिरस्काराने लावावयाचा शब्द) रोडकें, अशक्त व थिल्लर घोडें; भटाचा तट्टू. घोडकुदळ-पु. १ (उप.) मुंजीचें वय झालेलें असून मुंज न झालेला मुलगा; घोडमुंज्या. २ -स्त्री. (उप.) उपवर असून लग्न न झालेली दांडगट नाचरी मुलगी; घोडी; घोडगी; भोपळ- देवता; घोडनवरी; घोडी पहा. घोडकूल-न. १ (गो.) लहान घोडें; तट्टू. २ (खा.) ओट्याच्या खांबावर तिरपा टेंकू (कर्ण) देऊन त्यावर कोरलेली घोड्याची आकृति. घोडकें-का-नपु. १ ज्याच्या भरीला करळ्या व तरसे घालून गाड्याची तक्तपोशी, बैठक तयार करतात अशीं चौकटींतील दोन बाजूचीं दोन उभीं लांब लांकडें. २ तेल्याच्या घाण्याच्या कातरीला खिळलेलें व जुंवाचा दोर बांधावयाचें लांकूड. घोडके-ढोरांचा गुरु. -गांगा २६. घोडकेळ-न. (क्क.) एक हलक्या जातीचें भसाडें केळें. [घोडा + केळें] घोडक्या-का-पु.-१ घोड्याचा खिजमतगार; मोतद्दार. 'घोड्यास शिपाई काय करिल घोडका ।' -ऐपो ३७२. २ चाबुकस्वार; अश्वशिक्षक; घोडा अर्थ ९ मधील शेवटचा अर्थ पहा. घोडकोस-पु. (गो.) तीन मैलांचा कोस. घोडगा-गी- पुस्त्री. (उप.) वयानें प्रौढ पण पोरकटपणा, नाचरेपणा अंगीं असलेला मुलगा, मुलगी; घोडा अर्थ ५ पहा. घोडी अर्थ ७ पहा. घोड(डे)गांठ-स्त्री. (बुद्धिबळांचा खेळ). एकमेकांच्या जोरांत असलेली घोड्यांची दुक्कल. घोडचवड-स्त्री. घोडदौड; घोडा चौफेर उडविणें; चवडचाल. 'घोडचवडीखालीं नाना पुण्याला आला.' -ऐपो १६२. [घोडा + चवड = विशिष्ट चाल] घोडचाल-स्त्री. घोड्याची चाल. (ल.) जलद चाल. [घोडा + चाल] घोड(डे)चिलट-न. मोठें चिलट; डांस; मच्छर. घोड- चूक-स्त्री. मोठी व अक्षम्य चूक. घोडचोट्या-वि. १ (मनुष्य). (अश्लील) घोड्याच्या चोटासारखा मोठा चोट ज्याचा आहे असा २ (निंदार्थीं) मुंज न झालेला, वाढलेला मुलगा; घोडकुदळ; घोड- मुंज्या. घोडजांवई-पु. (उप.) मोठ्या वयाचा नवरामुलगा; घोडनवरा. घोडजाळी-स्त्री.(भोंवर्‍यांचा खेळ) विरूद्ध पक्षाच्या भोंवर्‍याला खोंचा देऊन आपला भोंवरा दूर जाऊन फिरत राहील अशा रीतीनें भोंवरा फेकण्याचा प्रकार. [घोडा + जाळी = दोरी] घोडतोंड्या-वि. घोड्याच्या तोंडासारखा लांबट चेहरा अस- लेला; कुरूप; लांबट, ओबडधोबड तोंडवळ्याचा. [घोड + तोंड = चेहरा] घोडदळ-न. १ घोडेस्वारांचें सैन्य; फौज. २ सैन्यां- तील घोडेस्वारांचें पथक, तुकडी. [घोडा + दळ = सैन्य] घोड- दौड-स्त्री. घोड्यासारखें पळणें; घोड्याची दौड; जलद जाणें. [घोडा + दौड = पळणें] घोडनट-न. ज्याचें एक तोंड आढ्यावर व एक लगीवर येऊन दरम्यान तिरपें राहतें असें लांकूड ठोकतात तें. घोडनवरा-पु. (उप.) प्रौढवयाचा नवरामुलगा; घोडजांवई. घोड(डे)नवरी-स्त्री. (उप.) मोठ्या वयाची नवरी मुलगी, वधू; योग्य व सामान्य वयोमर्यादेबाहेर अविवाहित राहिलेली मुलगी. 'हे मोठमोठ्या घोडनवर्‍या घरांत बाळगल्याचे परि- णाम बरं !' -झांमू. घोड(डे)पाळणा-पु. घोड्याला (लांकडी चौकटीला) टांगलेला पाळणा; हलग्याना न टांगतां जमीनीवर घोड्यास अडकविलेला पाळण्याचा एक प्रकार. घोडा ८ अर्थ पहा. घोड पिंपळी-स्त्री. पिंपळीची मोठी जात; हिच्या उलट लवंगी पिंपळी. घोडपुत्र-पु. घोड्याला (विशेषतः बुद्धि- बळांतील घोड्याला) प्रेमानें किंवा प्रतिष्ठेनें संबोधण्याचा शब्द. [घोडा + पुत्र = मुलगा] घोडपेटें-न. १ दोन भोपळे पुढें व दोन मागें बांधून केलेला तराफा; घोडा अर्थ २१ पहा. २ भोंपळ्यावर दोन्ही बाजूस पाय टाकून घोड्यासारखें बसून पाण्यावर तरणें, तरंगणें. घोडबच्य-न. दुबळा घोडा पुष्ट होण्यास एक औषध. 'घोडबच्य पावशेर, राई पावशेर भाजलेलीं काळीं मिरें पावशेर ... मिश्रणापैकीं आतपाव दररोज देत जावें.' -अश्वप १.१७५. घोडबांव-स्त्री. (कु.) घोड्यांना पाणी पितां येईल अशा तर्‍हेनें बांधलेली विहीर. [घोड + बांव = विहीर] घोडबाही- स्त्री. १ दाराच्या दुहेरी चौकटीच्या आंतल्या चौकटींतील दोन्ही बाजूचे खांब. २ खटार्‍याच्या बैठकीच्या चौकटीच्या दोन बाजूंच्या लांब लांकडांपैकीं प्रत्येक; घोडकें, घोडें पहा; [घोडा + बाही = बाजू] घोडबाळ-वि. (उप.) पोरचाळे करणारा प्रौढ पुरुष, स्त्री; पोरकट माणूस. [घोडा + बाळ] घोडब्रह्म- चारी-पु. (उप.) लग्नाचें वय कधींच झालें असूनहि अविवाहित राहिलेला मुलगा; घोडनवरा. [घोडा + ब्रह्मचारी] घोडमल्ली- स्त्री. (बुद्धिबळांचा खेळ) घोड्यानें मात करण्याचा प्रकार. प्रतिपक्षाचें घोडें व राजा आणि आपलें घोडें, राजा व एकच प्यादें राखून प्यादेमात करणें; घोडमात. घोड(डे)मात -स्त्री. (बुद्धिबळांचा खेळ) घोड्यानें राजाला दिलेली मात; घोडमल्ली पहा. [घोडा + फा. मात् = कोंडणें] घोडमाशी-स्त्री. १ मोठ्या आकाराची हिरवी, काळसर माशी. २ (सामा.) मोठी माशी. घोडमासा-पु. एक प्रकारचा मासा; सागराश्व. ह्याचें तोंड कांहींसें घोड्यासारखें दिसतें. यास लांब शेपूट असतें. हा नेहमी उभा पोहतो. घोडमुख-ख्या-पु. १ घोड्याचें तोंड असलेला किन्नर नांवाच्या देवयोनींतील पुरुष. याचें वर्णन पुराणांतरीं सांपडतें. २ (ल.) अगदीं कुरूप, घोडतोंड्या माणूस. 'एक मीर- वलें भुरळें पींगळें । घोडमुखें ।' -दाव २८५. घोडमुंगळा-पु. मोठा व काळा मुंगळा. घोडमुंगी-स्त्री. मोठी, काळ्या जातीची मुंगी. घोड(डे)मुंज्या-पु. उप. १ मुंज होण्याचें वय झालें असून मुंज न झालेला मुलगा. २ लग्न न झालेला प्रौढ मुंज्या. [घोडा + मुंज्या] घोडला-पु. मूल रांगत असतांना त्याची होणारी घोड्यासारखी आकृति. घोडा अर्थ १० पहा. घोडली-स्त्री. (कों. हेट.) (नाविक) शौचास बसण्याकरितां वर्‍यास एक चौकट चार दोर्‍यांनी अडकवितात ती. [घोडा] घोडवळ-स्त्री. १ बांधलेल्या घोड्यांची ओळ, रांग. २ घोड्यांचा तबेला; घोडशाळा; घोडसाळ; यावरून (सामा.) तबेला; 'रोडोला हत्ती घोडवळींतून जाणार नाहीं.' ३ लांबचलांब, ठेंगणें व बेढब घर; मागरघर; दांडसाळ; केवळ तबेल्यासारखें असलेलें घर; कोठडी. ४ (उप.) घोडनवरी. ५ न. झोडपलेल्या, झोडपून दाणे न काढलेल्या धान्याच्या पेंढ्यांची रास, गंजी. [घोडा + ओळ] घोड(डे)वाट-स्त्री. घोड्यांकरितां केलेली, फक्त घोड्याला जातां येईल अशी वाट, रस्ता (विशेषतः डोंगर इ॰ याच्यावरून); उलट गाडीवाट. [घोडा + वाट] घोडविवाह- पु. विषमविवाह. 'आपली नात शोभेल अशा दहा वर्षांच्या पोरीशीं लग्न लावण्यास तयार असतात व असा घोडविवाह करूनहि फिरून समाजांत हिंडण्यास ... त्यांस दिक्वत वाटत नाहीं' -टि ४.९६. [घोडा + विवाह] घोडवेल-स्त्री. (सांकेतिक) घोड्याची लीद; (औषधांत घोड्याच्या लिदीचा उपयोग करा- वयास असल्यास तिचा निर्देश ह्या शब्दानें करतात). घोड- शह-पु. (बुद्धिबळांचा खेळ) घोड्यानें दिलेला शह. [घोडा + शह] घोडशाळा, घोडसाळ-स्त्री. १ घोड्यांचा तबेला; घोडवळ अर्थ २ पहा. [घोडा + शाळा = घर] घोडशिष्य- पु. (निंदार्थीं) विद्यार्जन करूं पाहणारा मोठ्या वयाचा विद्यार्थीं, मोठेपणीं शिकावयास लागणारा मनुष्य. घोडशीर- स्त्री. १ पायाच्या टांचेच्या वरच्या बाजूस असलेली शीर, नाडी; दवणशीत्त; धोंडशीर पहा. २ (क्व.) पायाचा किंवा हाताचा स्नायु. घोडसटवी-स्त्री. १ उग्र स्वरूप धारण केलेली देवी. (क्रि॰ लागणें). २ घोडी व्याल्यापासून सहाव्या दिवशीं करा- वयाची सटवीची पूजा. (एखादीला) ॰लागणें-१ घोडसट- वीप्रमाणें उग्र व विकाळ दिसणें. २ घोटसटवीची बाधा होणें. घोडेखाद-स्त्री. १ घोड्यांचें चरणें; हरळी खाणें. 'या घोडे खादीमुळें माळावर एक काडी राहिली नाहीं.' २ फक्त घोड्यांना चरतां, खातां येईल इतक्या वाढीचें गवत. 'ह्या माळावर मोठें गवत नाहीं, घोडेखाद कोठें कोठें आहे.' [घोडा + खाद = खाणें] घोडेखोत-पु. घोडे भाड्यानें देण्याचा धंदा करणारा; भाड्याच्या घोड्यांचा नाईक. [घोडा + खोत = मक्तेदार] घोडेघाटी-स्त्री. एक प्रकारचें रेशमी कापड. घोडेघास-न. १ विलायती गवत; लसून- घास. २ घोडकुसळी पहा. [घोडा + घास = गवत] घोडेपाऊल- न. एक वनस्पतिविशेष. [घोडा + पाऊल] घोडेराऊत, घोडे- स्वार-पु. घोड्यावरील शिपाई. घोड्याएवढी चूक-स्त्री. फार मोठीचूक; ढोबळ चूक; घोडचूक पहा. घोड्या गोंवर-पु. एक प्रकारचा गोंवराचा आजार; याच्या पुटकुळ्या मोठ्या असतात. [घोडा = मोठा + गोवर] घोड्याचा-पु. (निंदार्थीं) घोड्यावर बसलेला मनुष्य; घोडेस्वार. 'ते पहा घोड्याचे चालले. मागून स्वारी येतीसें वाटतें.' घोड्याचा दाणा-पु. १ (उप.) हरभरा. २ (ल.) बुंदीच्या लाडवास तिरस्कारानें म्हणतात. घोड्याचा पूत-लेंक-पु. (उप.) मूर्ख; गाढव; गद्धा. घोड्याची चाकरी-स्त्री. घोड्यांना दररोज चोळणें, खरारा करणें इ॰ काम. घोड्याची जीभ-स्त्री. (राजा.) एक वनस्पति- विशेष. घोड्याची मुंज, घोड्याचें बारसें-स्त्रीन. एखादा कोठें जावयास निघाला असतां एखाद्या अधिक प्रसंगी व फाजिल चौकशी करणार्‍या माणसानें त्यास कां, कुठें जातां असें विचारलें असतां म्हणतात. घोड्यांचें नाटक-न. (ना.) सर्कस. घोड्याचें मूत-न. १ कुतर्‍याचें मूत; अळंबें; भुईछत्री. २ कुजलेल्या लांकडांतून फुटलेलें अळंबें. घोड्याच्या पाठीवर- क्रिवि. भरधाव; झरकन; त्वरेनें. (क्रि॰ जाणें; करणें). घोड्याच्या पाठीवरचा कोस-पु. कंटाळवाणा व लांब- णीचा कोस; घोड्यावरून गेल्यासच कोसाएवढें व कंटाळवाणें न वाटणारें अंतर.

दाते शब्दकोश

पाणी

न. १ उदक; जीवन; जल; सलिल. 'पाणियां छाय दुनावली । परिमळाचि ।' -शिशु ६२८. 'चोखे पाणिया न्हाली ।' -वसा २५. २ पाऊस; पर्जन्य. ३ हत्यारें भट्टींत तापवून नंतर तीं पाण्यांत बुडवून त्यांच्या आंगीं आणिलेली दृढता. (क्रि॰ देणें; चढविणें; उतरणें). ४ (ल. एखाद्याच्या अंगांतील) धमक; अवसान; वीर्य; शक्ति; तेज. 'आलें न रजपुतांचें परि यवनां सर्व हरवितां पाणी ।' -विक ६८. ५ (मोत्यें, रत्न, हिरा इ॰कांचें) तेज; कांति; झकाकी. 'नाना मुक्ताफळांचें पाणी ।' -दा १६.४.१६. ६ चेहऱ्यावरील टवटवी; कांति; तजेला. ७ धातूंचें भांडें इ॰कांस सोनें, चांदी इ॰कांचा देतात तो मुलामा; झिलई. ८ शस्त्र इ॰ घासून त्याच्या धारेस आणलेली तीक्ष्णता; कडकपणा.(क्रि॰ देणें; पाजणें). 'नाना शस्त्रांमधें पाणी ।' -दा १६.४.१६. ९ अब्रू; लौकिक, कीर्त्ति. (क्रि॰ जाणें; उतरणें; चढणें). १० (राग, गाणें इ॰कांची) नीरसता; रुक्षपणा; रसहीनता. ११ (डोळ्यांतील) चमक; तेज. १२ अश्रू. 'दुर्गा देवीच्या डोळ्यांतून पाणी येऊं लागलें.' -विवि ८.३.४९. पाणी याचें समासांत पूर्वपदीं 'पाण' असें रूप होऊन अनेक सामासिक शब्द होतात. उदा॰ पाणकोंबडा, पाणघोडा, पाणलोट इ॰ सामासिक शब्द पहा. [सं. पानीय; प्रा. पाणिअ; गुज. पाणी; हिं. पानी; फ्रें. जिप्सि. पनी; पोर्तु जिप्सी. पानी] (वाप्र.) ॰उतरणें-१ पराभूत, पराजित होणें. 'पाणिपतच्या लढाईनंतर मराठ्यांचें पाणी उतरल्या- नंतर निजमास संधी सांपडली.' -विवि ८.६.१०९. २ अब्रू जाणें; अपकीर्ति होणें. 'ज्या स्नेहानें पाणी उतरतें, तो स्नेह रुपयें पाण्यांत टाकून राखावा, त्यापेक्षां रुपये राखावे हें फार चांगलें आहे.' -बाळ २.३. ३ (डोळे इ॰कांतील) तेज, चमक, कमी होणें. 'तिच्या सतेज डोळ्यांचें पाणी उतरूं लागलें.' -पाव्ह ५४. ॰ओळखणें- जोखणें-(एखाद्याच्या अंगांतील) गुण, धमक, धैर्य, विद्वत्ता इ॰ कल्पनेनें ताडणें. (अंगाचें, रक्ताचें) ॰करणें-अतिशय खपणें; कष्ट करणें; फार मेहनतीनें (एखादें काम, कर्तव्य इ॰) करणें. म्ह॰ रक्ताचें पाणी हाडाचा मणी. ॰काढून टाकणें-सक्रि. (रसा.) (एखाद्या पदार्थांतील) द्रव, द्रवांश नाहींसा करणें, घालविणें. (इं.) डीहायड्रेट्. ॰कोंडणें-(सैन्य इ॰कांचें) पाणी बंद करणें; त्यास पिण्यास पाणी मिळूं न देणें. 'कडबा दाणा बंद कोंडिलें पाणी कहर वर्षला ।' -ऐपो २३६. ॰घालणें-१ (बायकी) (विटाळशी इ॰ स्त्रीस जेवतांना) पाणी वाढणें, देणें. २ (बायकी) (विटाळशीस, बाळंतिणीस स्नान घालून शुद्ध करून घेणें. ३ नाश करणें; खराबी- करणें; गमावून बसणें. 'ह्यानें आपल्या हातानें आपल्या रोजगारावर पाणी घातलें,' ४ (ल.) (एखाद्या गोष्टीच्या) अभिवृद्ध्यर्थ प्रयत्न करणें, जोपासनेबद्दल उपाय करणें. ५ (एखाद्या वस्तूवर) पाणी सोडणें; त्याग करणें. ६ (कों.) सर्पाचें विष उतरविण्यासाठीं सर्प चावलेल्या मनुष्यास मंत्रित पाणी पिण्यास देणें व अंगावर घालणें ७ वृक्ष इ॰कांच्या वाढीला जरूर तें पाणी त्यांच्या मुळांशीं ओतणें. ॰चढणें-महत्त्व प्राप्त होणें; वीरश्री, त्वेष संचरणें. 'थोरासंगें दुर्बळास पाणी चढे ।' -पला ४.१९. ॰छाटणें-कापणें-१ (पोहणारानें, बोटीनें आपल्या अंगच्या जोरानें) पाणी दुभंगलें पुढें सरणें. २ (पोहणाराच्या, नावेच्या) गतीमुळें पाणी दुभंगलें जाणें. ॰जाळणें-(ल.) करडा अंमल चालविणें; क्रूरपणाचीं कृत्यें करणें. ॰जोखणें-ओळखणें-(एखाद्याची) कर्तृत्वशक्ति, धमक, विद्वत्ता, पराक्रम इ॰ अजमावणें. ॰तावणें-(एखाद्याच्या नांवानें, नांवा- वर, नावांविषयी इ॰ शब्दांसह प्रयोग असल्यास-एखाद्याचें) मरण, अनिष्ट इच्छिणें. (शवदहनासाठीं नेतांना तें उचलण्यापूर्वी, पाणी तापवून त्यास स्नान घलितात त्यावरून हा अर्थ). ॰तुटणें-(पोहणाराच्या, नावेच्या गतीनें) पाणी दुभंगलें जाणें. 'पेनोवेणां दळ बहुतें मीनलें । वाटे पाणी तुटलें ।' -शिशु ५७८. ॰तुंबविणें-(धरण इ॰ बांधून) पाणी कोंडून धरणें. ॰तोडणें- पाणी छाटणें अर्थ १ पहा. ॰दाखविणें-(कर.) (शेतकऱ्यांत रूढ) (गुरांस) पाणी पाजून आणणें; पाण्यावर नेणें ॰देखील न घोटणें-(एखाद्याचे) प्राण कंठीं येणें; मरणासन्न होणें; पाणी घशाखालीं उतरण्याइतकाहि अवकाश, धीर नसणें. ॰देणें-१ पोलादाच्या अंगी नरमपणा, कडकपणा, चिवटपणा इ॰ निरनिराळे गुण आणण्यकरितां तें भिन्न भिन्न ठराविक प्रमाणांत तापवून पाण्यांत बुडविणें. या क्रियेचे कडक पाणी, नरम पाणी, जांभळें पाणी, पिवळें पाणी इ॰ निरनिराळे भेद आहेत. -ज्ञाको प ७४. 'पाणी देण्याच्या कृतीनें लोखंडांत फेरफार होतात.' पदाव १.१५५. २ शस्त्र इ॰कांस धार लावणें. ३ (मृताचा) श्राद्धविधि करून (त्याला) तिलांजलि देणें; (सामा.) तर्पण करणें. ॰देणें-सोडणें-१ (एखादी वस्तु इ॰) गमावून बसणें. २ सोडून देणें; आशा सोडणें; (वस्तू इ॰कांचा) उत्सर्ग करणें (एखाद्या वस्तूचें दान देतांना तीवर थोडेसें पाणी-आपला हक्क नाहींसा करण्याचें द्योतक म्हणून-सोडण्याचा प्रघात आहे त्यावरून हा अर्थ). (कर्माला 'वर' अथवा 'ला' हे प्रत्यय लावून प्रयोग). 'मागें एक पुढें एक । दोनी मिळुनि विठ्ठल देख । ऐसी होतांचि मिळणी दिलें संसारासि पाणी ।' -एकनाथ ॰पडणें-फुकट जाणें; निरुपयोगी होणें; खराब होणें; दर्जा, गुण, महत्त्व, उपयुक्तता इ॰ बाबतींत मागें पडणें; नाश पावणें. कर्म- स्थानीं असलेल्या शब्दास 'वर' हें शब्दयोगी अव्यय जोडून प्रयोग जसें:-रोजगारावर-पोटावर-संसारावर-कामावर-स्नेहावर-पाणी पडलें. 'त्या कार्यावर तर सर्वस्वीं पाणीच पडलें असतें .' -इंप ८. ॰पाजणें-१ (मृतास) तिलांजली देणें; प्रेतदहन होत असतांना प्रेताच्या कपाळमोक्षानंतर चितेभोवतीं सच्छिद्र मडक्यानें पाण्याची धार धरणें; श्राद्ध इ॰ करून तर्पण करणें. २ (ल.) (एखाद्यास) मरेमरेतों खूप मारणें, बडवणें. (१ ल्या अर्थावरून रूढ). ३ पराजित करणें; जिंकणें; चीत करणें. ॰पाणी करणें-१ तहानेनें 'पाणी द्या' 'पाणी द्या' असें म्हणत सुटणें; एकसारखें पाणी मागत राहणें. २ (एखादें जनावर मनुष्य इ॰कांस फार) राबवून, पादाडून बेदम करणें. ३ (अन्न, वस्त्र, पदार्थ इ॰कांची) पूर्णपणें नासाडी करणें. ॰पाणी होणें-१ पुनःपुन्हां पाणी पिण्याची प्रवृत्ति (मिष्ठान्न खाण्यानें, उन्हाच्या त्रासानें) होणें. २ (एखाद्या वस्तूचा) नाश, खराबी होणें. 'हे कठोर मांस झडून जाईल तर किंवा याचें पाणी पाणी होईल तर किती बहार होईल.' -विकार- विलसित ॰पिऊन भांडणें-वाद करणें-(ल.) नेटानें व जोराजोरानें, आवेशानें भांडणें. ॰फिरणें-(बडोदें) व्यर्थ, फुकट जाणें; पाणी पडणें पहा. 'सेनापतीच्या चातुर्यावर व सैनिकांच्या शौर्यावर पाणी फिरतें.' सेवामाहात्म्य १०. ॰भरणे-वाहणें- घालणें-(एखाद्याच्या घरीं विद्वत्ता, संपत्ति, विशिष्ट व्यक्ति इ॰कानीं) बटकीप्रमाणें राबणें; दास्य पत्करून राहणें; वश असणें (एखाद्याच्या घरीं या शब्दासह प्रयोग). 'रूपाचेनि आहे । ऐरावतु पाणि वाहे ।' -शिशु ५०८. 'उद्योगाच्या घरीं ऋद्धिसिद्धि पाणी भरी ।' ॰मरणें-१ (एखाद्याचें) धैर्य गळणें; गर्भगळित होणें; धाबें दणाणणें. २ एखाद्या गोष्टींत किंवा हिशेब, भाषण इ॰कांत) खोटेपणा, पोकळपणा, लबाडी इ॰ असणें. ॰मागूं न देणें-एकदम, तडाक्यासरशीं ठार करणें (मरतांना पाण्याकरितां मनुष्य तडफडतो, पाणी मागत असतो त्यावरून हा वाक्प्रचार). 'तुला मी बडविलें तर पाणी मांगू देणार नाहीं.' ॰मारणें- पाणी कापणें-छाटणें पहा. ॰मुरणें-१ (एखाद्याचें भाषण, वर्तन इ॰कांत कांहीं तरी संशयास्पद असा) कमीपणा, वैगुण्य, दोष, मर्मस्थान असणें. २ भिंत वगैरेंत पाणी जिरणें. ॰लागणें-१ वाईट पाणी पिण्यांत आल्यानें आजारी होणें; पाणी बाधणें. 'कैक जणाला पाणी लागलें मासोळी मागें खारी ।' -ऐपो ३५४. २ ज्याची संगति धरली असेल त्याचे किंवा जेथें कांहीं काळ रहिवास आला असेल त्या ठिकाणचे गुणदोष, ढंग अंगीं जडणें. (आंत) ॰शिरणें-(धंदा, रोजगार, काम इ॰कास) अवदशा; उतरती कळा येणें; नासाडी होणें; फसगत होणें; आंत बट्यांत येणें. ॰शोषून घेणें-(रसा.) (एखाद्या पदार्थांतील) द्रव रस शोषून घेणें; (इं.) डेलिक्विस्. ॰सारणें-(व.) आंघोळीसाठीं पाणी उपसणें. ॰सोडणें-१ (ब्राह्मणास दिलेल्या दानावर पाणी सोडलें म्हणजे दानाची सांगता होऊन त्यावरचें आपलें स्वामित्व नाहींसें होऊन ब्राह्मणाकडे जातें या धार्मिक कल्पनेवरून पुढील अर्थ) (एखादी वस्तु) स्वेच्छेनें कायमची देऊन टाकणें; (एखाद्या वस्तूचा) त्याग करणें. 'हे स्त्री नव्हे प्रतिष्ठा तुमची जरि ईस सोडितां पाणी ।' -मोविराट १.१०३. २ (ल.) (एखाद्या वस्तूची) आशा सोडणें, ती गेली असें समजून स्वस्थ बसणें. ३ (एखादी वस्तु, भावना इ॰) नाइलाजास्तव सोडण्यास, तिच्याकडे दुर्लक्ष कर- ण्यास, विसरून जाण्यास, नाश करावयास तयार व्हावें लागणें. 'परि त्याहीं आम्ही त्या प्रेमासि रणांत सोडिलें पाणी ।' -मोद्राण १७.९०. ॰होणें-(एखाद्या वस्तूची) खराबी, नाश होणें; नाहींसें होणें. 'त्या दुःखाचें तुमच्या दर्शनानें पाणीच होऊन गेलें.' -रत्न ५.२. पाण्याआधीं वळण बांधणें-नदी, ओढा इ॰कास पूर येण्यापूर्वींच पुराच्या पाण्याचा निकाल लाव- ण्याची व्यवस्था करणें. २ (ल.) भावी संकटाची उपाययोजना आधींच करून ठेवणें. 'पाण्याआधीं वळण बांधितां उत्तम. नाहीं तर शेणामेणाचे लोखंडाचे जालियावर पुढें भारी पडेल.' -भाव ८३. पाण्याचा कांटा मोडणें-अग्निसंयोगानें पाणी कोमट होणें, करणें (अतिशय थंड पाणी अंगावर घेतल्यास अंगावर कांटा उभा राहतो, किंवा तें अंगाला कांट्याप्रमाणें बोचतें ह्यावरून वरील अर्थ). पाण्यची गार गोठणें-पाणी गोठून बर्फ होणें. पाण्यांत घाम येणें-(एखाद्यानें) अतोनात संतापणें; रागानें अंगाचा भडका होणें. पाण्यांत घालणें-बुडविणें; नाश करणें; खराब करणें. 'संसार घातला पाण्यांत । स्वतें समस्त बुडविलें ।' पाण्यांत जाणें-व्यर्थ होणें; फुकट जाणें. 'नानाची मुत्सद्देगिरी सारी पाण्यांत जात असली तर ...' -नि. पाण्यांत दिसणें-(ल. एखादी व्यक्ति एखाद्याच्या) द्वेषास पात्र होणें, असणें.पाण्यांत पडल्यासारखें होणें-फजीत होणें; लाजिरवाणें होणें. 'मग देवाला लाज वाटली. पाण्यांत पडल्यासारखें झालें.' -नामना ६९. पाण्यांत पाहणें-(एखाद्याचा एखाद्यानें) अतिशय द्वेष करणें (एखाद्याचा कट्टा शत्रु किंवा त्याला ज्याचा अतिशय दरारा आहे अशी व्यक्ति भीतीमुळें त्यास सर्वत्र जळीं, स्थळीं, काष्ठीं, पाषाणीं दिसूं लागते त्यावरून). पाण्यानें वाती पाजळणें-(महानु.) अशक्य गोष्ट शक्य करूं पाहणें. 'अवो दुजी कनुधार लागती । तरि पाणिअ/?/ वाति पाजळती ।' -शिशु ६७५. पाण्यापेक्षां, पाण्याहून पातळ करणें-(एखाद्याची) फजिती, पाणउतारा, तेजोभंग करणें; फार लाजविणें. 'नामचि करि पाण्याहुनि पातळ यश भास्करादि तेजांचे ।' -मोवन १२.५०. पाण्यावर घालणें- नेणें-(कर.) (गुरांना) पाणी पाजण्यासाठीं विहीर, नदी इ॰कांवर नेणें. पाण्यावर लोणी काढणें-(कर. ल.) अतिशय कंजूषपणा करणें. गळ्याशीं पाणी लागणें-१ पाणी गळ्यापर्यंत येणें. २ (कर्ज इ॰ गोष्टींची) पराकाष्ठा होणें. दुसऱ्याच्या ओंजळीनें पाणी पिणें-१ दुसरा पाजील तेवढेंच पाणी पिऊन स्वस्थ बसणें. २ (ल.) दुसरा सांगेल तसें मुकाट्यानें वागणें. उन्हा पाण्यानें घर जाळणें-जळणें-(ल.) खोट्या आरोपानें, निंदेनें रसातळास नेणें, जाणें; (एखाद्याचा) नाश करणें, करूं पाहणें, होणें (अकरण- रूपांत योजितात व हें घडणें अशक्य असें दर्शवितात). खोल पाण्यांत शिरणें-१ आपल्या आवांक्याबाहेरचें काम शिरावर घेणें. २ (एखाद्या गोष्टीची) फाजील चिकित्सा करणें. ३ (एखादें गूढ, गुपित) उकलण्याचा प्रयत्न करणें. पाणी केस तोडतें- पाण्याच्या अतिशय जोराच्या प्रवाहाचें वर्णन करतांना योजितात. पाणी खाल्लेला-वि. पाण्यांत ठेवल्यामुळें आंत पाणी मुरलेला. पाण्यांतील पावप्यादे-जलसंचारांत प्रवीण; आरमारांतील प्रबळ लोक. 'इंग्रज लोंक पाण्यांतील पावप्यादे.' -इतिहाससंग्रह-ऐति- हासिकचरित्र ११५. पाण्यापाण्यानें-क्रिवि. नदीच्या कांठा- कांठानें. पाण्यापेक्षां शीतळ-वि. अत्यंत सोशीक; सौम्य; शांत; गंभीर स्वभावाचा. पाण्यावर-क्रिवि. नदीच्या कांठीं. 'कऱ्हेच्या पाण्यावर.' -ख ३१९३. पाण्यावरचा बुडबुडा, पाण्या वरची रेघ-पुस्त्री. (ल.) क्षणभंगुर, अशाश्वत वस्तु. क्षणभंगुरता- दर्शक इतराहि वाक्प्रचार आहेत ते पुढें दिले आहेत:-जलबुद्बुद; धुळीवरचें सारवण; दुपारची सावली; विजेचें चमकणें; विजेसारखा; वीजच; अभ्रच्छाया; आभाळाची सावली; कमलिनीवरचा बिंदु; काजव्याचा उजेड; खुंटावरचा कावळा; तेरड्याचा रंग (तीन दिवस); शिराळशेटाचें राज्य; आवाहन व विसर्जन बरोबर; औट घटिकेचें राज्य; घडीचें, घटिकेचें घड्याळें; उपळवणी; तृणाचा शेक; पुष्करपत्रतोयतरल; पळतें पीक इ॰. 'चिताडसी कां? चित्र जिवाचें पाण्यावरच्या रेघांनीं ।' -वाग्वैजयंती-गोविंदाग्रज. पाण्यास आश्रय-आसरा-पु. अतिशय तहानेल्यानें उपाशे पोटीं पाणी पिणें आरोग्यदृष्ट्या अनिष्ट असतें, म्हणून आधीं अन्नाचे एक दोन घांस खाऊन नंतर पाणी पितात. अन्नाच्या ह्या दोन-तीन घांसांस, अल्पांशास उद्देशून हा वाक्प्रचार योजतात.म्ह॰ १ पाण्यांत राहून माशांशीं वैर करूं नये = आपल्या कार्यक्षेत्रांतील मंड- ळीशीं वैर करूं नये. त्यांच्याशीं मिळूनमिसळून वागण्यांतच फायदा असतो. २ (हिं.) पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाया वैसा = जशी वेळ येईल तसें वागणें. ३ पाण्यापासून जवळ सोयऱ्यापासून दूर = मनुष्यानें पाण्याच्या जवळ राहणें सोईचें असतें, तसेंच सोयऱ्या- पासून दूर रहावें म्हणजे प्रेमांत बिघाड करणाऱ्या गोष्टी टाळतां येतात. ४ पाण्यांत म्हैस बाहेर मोल = अनिश्चित, आगामी गोष्टी- विषयीं, निरर्थक चर्चेस, चिकित्सेस उद्देशून ही म्हण योजितात. सामाशब्द- पाणआघाडा-पु. आघाड्याची एक जात. हा आघाडा सूज, कफ, खोकला, वायु, शोष यांचा नाश करतो. -वगु १.९. [पाणी + आघाडा] ॰उतार-पु. १ नदींतून चालून जातां येण्याजोगा, कमी पाणी असलेला मार्ग. २ (नदी इ॰काचें) ओसरणें; कमी होणें. 'गंगेसि भंग बहु पाणउतार होतो ।' -र २. [पाणी + उतार] ॰उतारा-पु. १ मानखंडना; तेजोभंग; अपमान; क्षुद्रपणानें लेखून (एखाद्याची) केलेली विडंबना; अवहेलना. २ (क्व) पाणउतार पहा. [पाणी + उतरणें] ॰कणीस-न. ओहळांत, ढोंपरभर पाण्यांत कसईच्या झाडाप्रमाणें होणारें पुरुषभर उंचीचें एक झाड. याचीं पानें बाजरीच्या पानांसारखीं असून याचें कणीस बाजरीच्या कणसासारखेंच असतें. हें कणीस वाळवून त्यावरील कापूस चकमक पेटविण्यास घेतात. हें तेलांत बुडवून पेटविलें असतां काकड्याप्रमाणें जळतें. -वगु ४.६२. रामबाण. ॰कसर-स्त्री. पाटस्थळाच्या पाण्याकरील कर, पट्टी. 'गांवची पाणकसर गेल्यावर्षापासून दीडपट वाढविण्यांत आली.' -के १९.७.३०. [पाणि + कसर] ॰काठी- स्त्री. १ (गो.) विहीरींतून पाणी बाहेर काढण्याचें एक साधन. ओकती पहा. २ (ल. गो.) उठाबशी. [पाणी + काठी] ॰काडो- पु. (कु.) शेतांस पाणी काढून पैरीप्रमाणें आळीपाळीनें वाटून देणारा; पाणकाढा. हा शेतकऱ्यांनीं आपसांत पाण्याविषयी तंटा होऊं नये म्हणून निवडलेला असतो. [पाणी + काढणें] ॰कापड- न. जखमेवर, शरीराच्या कापलेल्या भागावर बांधतात ती ओल्या वस्त्राची चिंधी. [पाणी + कापड] ॰कांदा-कंद-पु. नदींत होणारा एक विशिष्ट कंद. यास नागदवणीच्या फुलासारखीं फुलें येतात. -वगु ४.६३. [पाणी + कांदा] ॰कावळें-न. (विशेषतः गुरांची) गर्भोदकाची पिशवी. पाणकी-स्त्री. पाणी भरण्याची मजुरी कर- णारी स्त्री. 'कुणि विधवा ठेविता घरामधें पाणकी ।' -ऐपो ३६९. पाणकुकडें-कोंबडें-न. घशांत किंवा जिभेच्या खालच्या बाजूस होणारा एक विकार. ॰कुक्कुट-पु. (महानु.) पाणकोंबडा. 'चंद्र चकोरा चोखटीं । वोळे अमृतधारी आतुटी । ते गोडपणें पाण- कुक्कुटी । लाहिजे कैसा ।' -ऋ ५२. [पाणी + सं. कुक्कुट = कोंबडा] ॰कोंबडा-डें-पुन. १ जलचर पक्षी. 'पाणकोंबडे कोंबडे । वडवाघुळा घुबडे ।' -दावि २४४. २ चंद्राभोवतालीं पडणारें खळें. [पाणी + कोंबड] ॰केश-पुअव. शेवाळ. ॰कोंबडी-स्त्री. एक जलचर कोंबडी. ॰कोळी-पु. मासे खाणारा एक पक्षी. -प्राणिमो ५७. ॰क्या-पु. १ लोकांच्या घरीं पाणी भरून त्यावर उपजीविका करणारा मनुष्य. 'एखादा पाणक्या नवरा मिळता तरी पतकरता.' -मोर ३४. २ (ल.) निरक्षर व धटिंगण मनुष्य. [सं. पानीयक-पाणकअ-पाणका-पाणक्या. -राजवाडे (ग्रंथ- माला).] ॰खार-पु. (कों.) उकडआंबे इ॰ खारविण्यासाठीं पाण्यांत मीठ घालून केलेला खार. [पाणी + खार] ॰गहूं-पु. मोटेच्या, पाटाच्या पाण्यानें होणारा गहूं. [पाणी + गहूं] ॰घर- न. १ पाणी तापवून स्नान करण्याकरितां असलेली खोली; न्हाणी- घर. २ विहीर इ॰ खणतांना जेथें पाणी लागतें तो जमिनींतील खोल थर. [पाणी + घर] ॰घोडा-पु. आफ्रिका खंडांत मोठ्या नद्यांत, सरोवरांत आढळणारा एक अजस्त्र पण निरुपद्रवी प्राणी. याचा रवंथ करणाऱ्या प्राण्यांत समवेश होतो. याचा रंग काळसर तपकिरी असतो. याच्या कातड्याच्या ढाली करतात. -ज्ञाकोप ६७. (इं) हिपॉपोटेमस् [पाणी + घोडा] ॰घोणस-पु. पाण्यांत असणारी सापाची एक निरुपद्रवी जात. [पाणी + घोणस] ॰चक्की- स्त्री. पाण्याच्या जोरानें, साहाय्यानें चालणारी चक्की. [पाणी + चक्की] ॰चट-वि. १ ज्यास गोडी कमी आहे असा (द्रव पदार्थ); बेचव. २ (ल.) शुष्क; बाष्कळ; नीरस; अर्थशून्य (बोलणें, लेखन, गाणें, बोलणारा, लिहिणारा, गाणारा इ॰). 'शेवटीं आपल्या निस्सीम भक्तांकडूनहि वरच्या सारख्या पाणचट प्रशंसे- पेक्षां अधिक कांहीं सर्टिफिकीट मिळूं नये ...' -टि १.१.२६४. [पाणी + छटा] ॰चूल-स्त्री. पाणघरांतील, स्नानाचें पाणी इ॰ तापविण्याची चूल. 'तेथें पाणचुलींत विस्तव घालून त्यावर पाणी तापत ठेविलें.' -कोरकि ५१२. [पाणी + चूल] ॰चोरा-रा-पु. गारोड्याजवळील पाणी भरण्याचें सच्छिद्र पात्र. 'पाणचोऱ्याचें दार । वरील दाटलें तें थोर ।' -तुगा २५८३. [पाणी + चोर] ॰जंजाळ-न. (कों.) पर्जन्य, पाण्याचा पूर इ॰कानीं जिकडे तिकडे होते ती जलमय स्थिति. 'बहू पाणजंजाळ देखोनि डोळां ।' -राक १.३२. [पाणी + जंजाळ] ॰जांवई-पु. (थट्टेनें) जांवयाचा भाऊ; पडजांवई. [पाणी + जांवई] ॰झुकाव-पु. पाणी बाजूनें टिपकवून लावण्यासाठीं दरवाज्यावर केलेलें झुकाऊ कारनिस, गलथा; पाणकारनिस. -राको ५९२. [पाणी + झुकविणें] ॰झेली- स्त्री. (चेंडू, विटीदांडू इ॰ खेळांत) झाडावरून खालीं पडतांना किंवा पाण्यांतून चेंडू, कोललेली विटी इ॰ जमिनीवर पडण्यापूर्वीं झेलणें. याच्या उलट आणझेली. [पाणी + झेलणें] ॰टका- टक्का-पु. पाटस्थळ जमिनीवरील एक लहानसा कर. [पाणी + टक्का] ॰टिटवी-स्त्री. तांबडा कल्ला असलेली टिटवीची एक जात. पाणड्या, पाणाडी-ड्या-वि. जमीनींत कुठें किती खोल खणलें असतां पाणी लागेल हें काहीं आडाख्यांच्या सहाय्यानें जाणणारा. [पाणी] पाणढाळ-पु. पाणी वाहून जाण्याजोगा जमीन, छपराचें पाखें इ॰कांस दिलेला, असलेला उंचसा उतार; सखलपणा. -वि. पाणी वाहून जाण्यायोग्या उतारानें युक्त, उंच उतारीची (जमीन इ॰). [पाणी + ढाळ = उतार] ॰ताव-पु. सोनें, चांदी इ॰ तापवून पाण्यांत बुडवून त्याचा कस पाहण्याची पद्धत; याच्या उलट सुकताव = सोनें इ॰ तापवून नुसतेंच थंड करणें. [पाणी + ताव] ॰तीर-पु. (युद्धशास्त्र) स्फोटक व ज्वालाग्राही पदार्थांनीं भरलेलें चिरूटासारखें निमुळत्या आकाराचें एक युद्धोपयोगी साधन. याचा व्यास दीड-दोन फूट असून लांबी सहा यार्ड असते. याच्या आघातानें मोठमोठीं जहाजें समुद्राच्या तळाशीं जातात. (इं.) टॉर्पेडो. -ज्ञाको (प) ६७. 'गेल्या महायुद्धांत योजलेल्या अनेक शस्त्रास्त्रांत पाणतीराचा पहिला नंबर लागेल.' -ज्ञाको. प ६७. [पाणी + तीर = बाण] ॰तुटी-वि. जींतील रसांश, द्रवांश कमी झाला आहे अशी, कांहींशी पिकलेली (पालेभाजी). [पाणी + तुटणें] ॰थरा-पु. घराच्या जोत्याच्या सर्वांत वरच्या थरांतील दगड, चिरा; पाटथर पहा. ॰थरी-स्त्री. १ आंत्रपेशी; प्लीहा. २ प्लीहेचा एक विकार; पोटांतील चीप. ३ प्लीहा, आंत्रपेशी वाढणें. [पाणी + थर] ॰थळ-स्त्रीन. १ पाऊस गेल्यानंतरहि जेथील ओल जात नाहीं व उन्हाळ्यांतहि खणलें असतां पाणी लागतें अशी जमीन. 'आणि पाणथळ असे तेथें भात लावी.' -पाव्ह ११. २ पाटाच्या पाण्यानें भिजणारी जमीन. [पाणी + थळ] ॰दळ-न. (क्व.) पाणथळ अर्थ १ पहा. [पाणी + दळ] ॰दिवड-स्त्रीन.. (कों.) पाण्यांतील सापाची निर्विष जात. [पाणी + दिवड] ॰दोरी-स्त्री. विहीरींतून पाणी काढण्याच्या उपयोगाची दोरी; बारीक दोर. [पाणी + दोरी] ॰नेचा-पु. पाण्यांत. दलदलींत उगव णारी एक वनस्पति; (इं.) हायड्रोटेरिडि. -ज्ञाको. अ २२१. [पाणी + नेचा] ॰पट्टी-स्त्री. पाणकापड पहा. ॰पिकलें, पाण- पीक-न. (कों.) ज्या पिकास सबंध पावसाळ्यांतील पावसाची जरूरी असतें तें पीक; पहिलें पीक; खरीप. याच्या उलट रब्बीचें पीक. [पाणी + पिकणें, पीक] ॰पिता-वि. १ फार पाणी खाल्लेलें; फाजील पावसानें नासलेलें (पिकाचें कणीस इ॰). २ (ल.) पचपचीत; पाणचट; पचकळ; मुळमुळीत (भाषण, कारभार, मस- लत, व्यवहार, गोष्ट, काम इ॰). ३ (झटकन् पाणी पिण्यासारखें) तलख; चलाखीचें; तडफेचें (कृत्य, कृति इ॰). ४ रोखठोक, चोख; स्पष्ट (जबाब, जाब, उत्तर इ॰). [पाणी + पिणें] ॰पिशी-स्त्री. फाजील पावसामुळें न भरलेलें, पोचट राहिलेलें धान्याचें कणीस. ॰पिसा-वि. पर्ज्यनातिरेकामुळें पोंचट, दाणें झडून गेलेलें, दाण्यांनीं न भरलेलें (कणीस इ॰). ॰पिसें-न. वेड; वेडगळपणा; भ्रमिष्टपणा. -शर. -मनको. -वि. वेडगळ; खुळचट. -मनको. [पाणी + पिसें] ॰पेटी-स्त्री. (स्थापत्यशास्त्र) पाण्यांत काम करतेवेळीं पाणी आंत येऊं नये म्हणून कामाभोंवतीं बसविलेली उभ्या फळ्यांची मुंढे मारून केलेली पेटी. (इं.) कॉफरडॅम्. -राको ३६/?/ [पाणी + पेटी] ॰पोई-स्त्री. १ वाटसरूंना, आल्यागेल्यांना पाणी पाजण्या- साठीं केलेली सोय; पन्हेरी. 'येइ भाई येथ पाही । घातलीसे पाणपोई ।' -यशोधन. २ अशा ठिकाणीं आल्यागेल्यांस पाणी देण्याची क्रिया. [पाणी + पोई] ॰फोल-न. (राजा.) भाताच्या फुलांवर पाऊस अतिशय पडल्यामुळें त्यामध्यें होणारें फोल, पोचटपणा; असलें न भरलेलें पोचट कणीस. [पाणी = पाऊस + फोल = पोचटपणा] ॰बुड-स्त्री. पाटाच्या पाण्यानें भिजणाऱ्या जमीनी- वरील कर. [पाणी + बुडणें] ॰बुड-पु. (कों.) पाणकोंबड्यासारखा एक पक्षी. [पाणी + बुड] ॰बुडा-ड्या, पाणिबुड्या- पाणबुड्यी-पु. १ मासे धरणारा कोळी. 'तरी माशालागीं भुलला । ब्राह्मण पाणबुडां रिघाला ।' -ज्ञा १६.४५१. २ पाण्याच्या तळाशीं असलेल्या वस्तू वर काढण्याकरितां पाण्यांत बुडी मारून बराच वेळ पाण्यांत राहण्याचा सराव ज्यास आहे तो; समुद्रांत बुडी मारून मोत्यें वर काढणारा. 'ते वाक्समुद्रिचे पाणबुडे । कीं सारासारसीमेचे गुंडे ।' -ऋ २४. ३ एक प्रकारचा पक्षी. [पाणी + बुडणें] ॰बुडी-स्त्री. १ पाण्यांत मारलेली बुडी; सुरकांडी. (क्रि॰ मारणें). २ पाण्याच्या पृष्ठभागाखालून संचार करणारी युद्धोप- योगी नौका. (इं.) सब्मरीन्. 'तें आरमार पाणबुड्यांच्या आघातामुळें इतउत्तर आपली पूर्वकामगिरी देण्यास कितपत समर्थ राहील....' -टि ३.३.३४८. [पाणी + बुडी] ॰बुडीत-वि. पुरानें, पावसानें जलमय झालेली (जमीन, पीक). [पाणी + बुडणें] ॰बोदाड-वि. (ना.) पाणथळ; दलदलीची (जमीन). [पाणी + बुडणें] ॰भर-भरजमीन-स्त्री. १ नवीनच खोदलेल्या विहि- रीच्या पाण्यानें, ओढ्याच्या, पाटाच्या पाण्यानें भिजणारी शेत जमीन. २ पुराच्या पाण्यानें भिजणारी जमीन. ३ असल्या जमीनीवरील सरकारी सारा. [पाणी + भरणें + जमीन] ॰भर जिराईत-स्त्री. पाटाच्या पाण्यानें भिजणारी परंतु कोरड म्हणून गणली गेलेली जमीन. [पाणभर + जिराईत] ॰भरणीचा- भरीत-भरिताचा-वि. १ पाटाचें पाणी मिळणारें (शेत, मळा इ॰). याच्या उलट कोरडवाय-वाही. २ पाटाच्या, विहिरीच्या पाण्यानें तयार झालेलें, काढलेलें (पीक इ॰). ॰भरा-वि. १ विहिरीच्या, पाटाच्या पाण्याची जरूरी असलेला (गहूं, जोंधळा इ॰). २ सदर पाण्यानें भिजणारी (जमीन). [पाणी + भरणें] ॰भऱ्या-भर्या-पु. पाणक्या; पाणी भरण्याचा धंदा करणारा. [पाणी + भरणें] ॰भाकरी-स्त्री. नदीच्या, तलावाच्या पाण्याच्या पृष्ठभागावर खापऱ्या फेकण्याचा मुलांचा खेळ; भाकरीचा खेळ. 'तें गलबत वाऱ्याच्या सोसाट्यांत सांपडून मुलांच्या पाणभाकरीच्या खेळांतल्या खापरीप्रमाणें भलतीकडे गेलें.' -कोरकि ७७. [पाणी + भाकरी] ॰मांजर-न. मांजरासारखा एक जलचर प्राणी. [पाणी + मांजर] ॰मोट, पाणमोटली-की-मोटळी, पाण्याची मोट-स्त्री. प्रसूतीसमयीं गर्भ बाहेर पडण्यापूर्वी गर्भोदकानें भर- लेली गर्भाशयांतून बाहेर पडणारी पिशवी. (क्रि॰ येणें; पडणें; फुटणें; निघणें) [पाणी + मोट, मोटली = चामड्याची मोठी पिशवी] ॰रस-पु. पूर्वीं रस काढून घेतलेल्या आंब्यांवर पाणी ओतून ते हालवून, चेंदून पुन्हां त्यांपासून काढलेला पाणचट रस. [पाणी + रस] ॰रहाट-पु. पाण्याच्या साहाय्यानें चालणारा रहाट; पाणचक्की. [पाणी + रहाट] पाणरॉ, पाणसर्प-पु. (गो.) पाण्यांत असणारी सापाची एक जात. [पाण + सर्प] पाणलव्हा-पाणलांव-पु. (कों.) पक्षिविशेष; यास निबुड असेंहि म्हणतात. [पाणी + लाव, लांव्हा = पक्षिविशेष] ॰लोट-पु. १ पाणी; वाहून जाईल असा उतार; पाणढाळ २ टेकडीची, डोंगराची उतरती बाजू; उतरण. ३ पाण्याचा जोराचा प्रवाह; लोंढा; झोत; धोत. ४ डोंगरमाथा; जेथें पाणी पडलें असतां तेथें न थांबतां दोहोंबाजूंस वाहून जातें अशी डोंगर माथ्याची धार. उदा॰ सह्याद्रीचा पाणलोट. [पाणी + लोट] ॰वटा-ठा, पाणवथ-वथा-पु. नदी इ॰कांवर गांवचे लोक जेथें पिण्यासाठीं पाणी भरणें, वस्त्रें धुणें इ॰ क्रिया करतात तें ठिकाण. 'दिवसा पाणवठा म्हणुनियां रात्र आम्ही ही धरली ।' -रासक्रिडा १२. 'पौलपट्टणीं येऊनि शुद्ध । पाणवथीं बैसला ।' -नव १८.४३. [पाणि + वर्त्तिकः-वटा] म्ह॰ बारा कोसांवरचा पाऊस, शिंवेचा राऊत, पाणवठ्याची घागर बरोबर गांवांत येतात. ॰वड-स्त्री. पाण्याचे रांजण, घागरी, डेरे इ॰ भरून ठेवण्यासाठीं (घरांत) केलेला ओटा, ओटली. [पाणी + ठाव] पाणवडा- वाडा-पु. पाणवठा पहा. 'क्लेशगांविंचा उकरडां । भवपुरिचां पानवाडां ।' -राज्ञा १६.४०५. [पाणि + वर्त्तिकः] पाणवसा-पु. (कों.) गाई, म्हशी इ॰ गुरांच्या जीवनास हेतुभूत असणारें (गांवचें) पाणी, गवत इ॰ समुच्चयानें; पाणसा. [पाणी + वास] ॰वळ-न. (कों.) पावसाळ्यानंतर कांहीं काळपर्यंत जींत ओलावा टिकून राहतो अशी जमीन; पाणथळ अर्थ १ पहा. २ -वि. बेचव; पाणचट. पाणचट अर्थ १ पहा. [पाणी + ओल] ॰वाट-स्त्री. १ पाणी वाहून जाण्यासारखा उतार; सखल पृष्ठभाग; ओहळ; पाणलोट. 'पाणी पाणवाटें जैसें । आपणचि धांवे ।' -दा ७.९.११. २ पाण्याची वाट. [पाणी + वाट] ॰वारू-पु. (प्राचीन पौराणिक कथांत रूढ) होडी; नाव. [पाणी + वारू = घोडा] ॰शाई- स्त्री. तारस्वार काढण्याकरितां मृदंग इ॰कास लोहकीट इ॰काच्या लुकणाचा, शाईचा देतात तो पातळ थर; याच्या उलट भरशाई. [पाणी + शाई] ॰शेंग-स्त्री. (ल.) मासळी. [पाणी + शेंग] ॰शोष-पु. पाणपोस पहा. [पाणी + सं. शोष = सुकणें] ॰सरकी- स्त्री. पाणसर्‍याचें काम, हुद्दा. पाणसरा पहा. [पाणसरा] ॰सरडें- न. पाण्यांत असणारी एक निर्विष सापाची जात. [पाण + सरडा] ॰सरडें-न. रहाटाची माळ सरूं नये म्हणून बसवितात तें प्रति- बंधक लांकूड. [पाणी + सरा = आडवीतुक्ई] ॰सरा-पु. डोंगराच्या घाटांतील वंशपरंपरागतचा जकातदार. याला वतन व ठराविक हक्क असत. घाटदुरुस्तीचें काम याच्याकडे असे. [पाणी + सरणें ?] ॰सळ-साळ-स्त्री. १ (गवंड्याचा धंदा) बांधकाम इ॰ सम- पातळींत आहे कीं नाहीं हें पाहण्याचें गवंड्याचें साधन; साधणी. (इं.) लेव्हल् बॉटल. २ समपातळी. 'भिंतीचें बांधकाम थराचें असेल तर भिंतीच्या प्रत्येक १८ इंच उंचीस माथा पाणसळींत आणावा व त्यावर पातळ चुन्याचा रद्दा करून घालावा.' -मॅरट १४. ३ पाणी वाहून जाईल असा उतार. [पाणी + सळ] पाणसा-पु. गुराढोरांच्या जीवनोपयोगी असें (एखाद्या ठिका- णचें) गवत व पाणी; पाणवस. 'ह्या गांवचा पाणसा गुरांस मानवत नाहीं.' ॰साप-पु. पाण्यांत असणारी सर्पाची जात. [पाणी + साप] ॰सापूड-स्त्री. घर इ॰कांच्या छपराच्या खालच्या बाजूस वाशांच्या टोंकांजवळ कामट्यांच्या, रिफांच्या, ओंबणाच्या शेवटीं बांधतात ती जाड कामटी; सापूड. [पाणी + सापूड] ॰सासरा-पु. (विनो- दानें) जांवयाच्या भावानें आपल्या भावाच्या सासर्‍यास विनोदानें, थट्टेनें उल्लेखण्याची संज्ञा. जांवयाच्या भावास पाणजांवई असें थट्टेनें म्हणतात त्याप्रमाणेंच हाहि शब्द आहे. ॰सासू-स्त्री. पाण- जांवयानें स्वतःच्या भावाच्या सासूस थट्टेनें उल्लेखण्याची संज्ञा. [पाणी + सासू] ॰साळ-वि. (क्व.) समपातळींत असलेली (जमीन इ॰) [पाणसळ] ॰साळ करणें-जमीन इ॰ समपातळींत आहे कीं नाहीं तें पाहणें. ॰साळ-स्त्री. प्रवासी, वाटसरू इ॰कांना पाणी पुरविण्याच्या सोयीकरतां रस्त्याच्या बाजूस बांधलेली छपरी इ॰; पाणपोई. [पाणी + सं. शाला = घर] ॰साळ, पाण- सळी भात-स्त्रीन. पाटच्या, विहीरीच्या पाण्यावर केलेलें (मळा इ॰तील) भाताचें पीक. [पाणी + साळ] ॰सुरुंग-पु. समुद्रांतील आगबोटी इ॰कांचा नाश करण्याकरितां समुद्राच्या पृष्ठभागाखालीं योजून ठेवण्याचें सुरुंगासारखें आधुनिक युद्धो- पयोगी साधन. 'बंदरांत घातलेल्या पाणसुरुंगांनीं व पाण- बुड्यांनीं हें समुद्रावरील वर्चस्व पोखरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.' -टि ३.३.३५०. [पाणी + सुरुंग] ॰सोस, पाणशोष, पाणसोक-पु. १ ताप इ॰कांत पुनः पुनः लागणारी अतिशय तहान; घशास पडणारी कोरड. २ प्रकृतीला होणारा एक (पुनः पुनः तहान लागण्याचा) विकार. [पाणी + शोष = कोरडें पडणें, होणें] ॰सोळा-पु. दिवडाच्या जातीचा, बांड्या रंगाचा, पाण्यांत राहणारा एक निर्विष साप. -बदलापूर ३४७. पाणि- ढाळ-पु. १ ओहोटी. 'अनुरागाचा निरु ताउनी । पाणिढाळु ।' -ज्ञा ७.९९. २ पाण्याचा ओघ खालीं सोडून देणें. 'पाणिढाळु गिरीशें । गंगेचा केला ।' -ज्ञा १८.१६८८. [पाणी + ढाळणें] पाणीपद-न. (महानु.) तेजाचें स्थान; गांभीर्य; ढाळ. 'परि जाणतां उपहासावें । बोलांचें पाणिपद निहाळावें ।' -शिशु ३६५. [पाणी = तेज + पद = स्थान] पाणिपात्र-न. पाणी प्यावयाचें भांडें. 'एकें हरितलें पाणिपात्र । एकें नेलें पीठ पवित्र ।' -एभा २३.५२०. [पाणि + पात्र = भांडें] पाणिय(ये)डा-पु. (महानु.) पाणवठा. 'आत्मगंगेचां पाणियेडां । थोकला अज्ञान-सीहांचा दडा ।' -भाए १०६. [पाणी + वटा, ठाव] पाणियाडा-डें-ढें- पुन. १ पाण्याचा सांठा; तळें. 'सतरावियेचें पाणियाडें । बळिया- विलें ।' -ज्ञा ९.२१४. 'शुक्रें धरिलें पाणियाडें । अवर्षण पडे बहुकाळ ।' -भाराबाल १.७८. २ जलपात्र. -माज्ञा-कठिणशब्दांचा कोश. [पाणीवडा] पाणिलग-वि. पाण्याच्या सान्निध्यानें राहणारा. 'पाणिलगें हंसें । दोनी चारी सारसें ।' -ज्ञा ६.१७७. [पाणि + लग] पाणिवथा-पु. पाणवठा पहा. पाणिवैद्य-पु. (कों.) विषार इ॰ उपद्रवावर पाणी अभिमंत्रून देणारा वैद्य. [पाणि + वैद्य] पाणीकांजी-न. (व्यापक.) पाणी काढणें व भरणें इ॰ गृहसंबंधीं कामांविषयीं व्यापक अर्थीं योजावयाचा शब्द. [पाणी + कांजी] पाणीचोर-पु. पाणचोर पहा. 'जैसें पाणी चोराच्या द्वारीं । वरील रंध्र दाटिजे जरी ।' -विपू २.६६. [पाणी + चोर] पाणीटाळ-पु. ओहोटी. -हंको, -शर, -मनको. पाणिढाळ अर्थ १ पहा. [पाणी + ढाळ] पाणी तावणें-न. (ना.) आंघोळीचें पाणी तापविण्याचें भांडें किंवा जागा. [पाणी + तावणें] पाणी- दाम-पु. पाणीपट्टी. [पाणी + दाम = किंमत] पाणीदार-वि. १ ज्याच्या अंगीं चांगलें पाणी, तेज आहे असा (हिरा, रत्न, मोत्यें इ॰). २ तीक्ष्ण; चांगल्या धारेचें (शस्त्र इ॰). ३ तेजस्वी; स्वाभिमानी; रग, धमक इ॰कानीं युक्त (मनुष्य, पशु इ॰). [पाणी + फा. दार = युक्त] पाणीपट्टी-स्त्री. म्युनिसिपालिटी इ॰ स्थानिक संस्था नगरवासीयांकडून पाणीपुरवठ्याबाबत घेतात तो कर. 'म्युनिसिपालिटीनें पाणीपट्टी वाढविली.' -के १७.६.३०. [पाणी + पट्टी = कर] पाणीपण-न. पाण्याचा भाव. 'कां गंगा- यमुनाउदक । वोघबळें वेगळिक । दावि होऊनि एक । पाणीपणें ।' -ज्ञा १८.५२. [पाणी + पण = भाववाचक नामाचा प्रत्यय] पाणीपाऊस-पु. १ नद्या, तळीं, विहीरी इ॰कांना पाण्याचा पुरवठा करून देणारा पाऊस. 'पीकपाऊस आहे, पाणीपाऊस अझून नाहीं.' २ पाऊस, पीक इ॰; पाऊसपाणी. [पाणी + पाऊस] पाणीपिसा-वि. स्नान करणें, कपडे धुणें इ॰ पाण्याच्या व्यापारांचें ज्यास वेड आहे असा. पाणीपिसें पहा. 'एक राखे एक शंखे । एक ते अत्यंत बोलके । पाणीपिशीं झाली उदकें । कुश- मृत्तिकें विगुंतलीं ।' -एभा १४.२०९. [पाणी + पिसा = वेडा] पाणीभरा-वि. पाणभरा पहा. पाणीवळ-पु. पाण्यांतला मळ. 'तेणें बहुतीं जन्मीं मागिलीं । विक्षेपांचीं पाणिवळें झाडिलीं ।' -ज्ञा ६.४७१. पाणीशेणी-न. झाड-सारवण, पाणी भरणें इ॰ गृहसंबंधीं स्त्रीनें करावयाचीं कृत्यें समुच्चयानें. [पाणी + शेण] पाणेरा-रें-पुन. पाणी भरलेलीं भांडीं ठेवण्याकरितां केलेली चिरेबंदी ओटली. [पाणी] पाणोटा-ठा, पाणोथा-पु. १ पाणवठा पहा. २ (बे.) नदीचा उतार. [पाणी]

दाते शब्दकोश