मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

निरोध

निरोध nirōdha m (S) Restraining or confining: restraint or confinement: also obstructing or impeding gen.

मोल्सवर्थ शब्दकोश

निरोध m निरोधन n Restraining; restraint. Obstructing. Restraining, confining, checking; also obstructing or impeding.

वझे शब्दकोश

पु. १ प्रतिबंध अटकाव; कैद; अडथळा. 'बेझंट- बाईंचा निरोध करून ...स्वराज्याच्या चळवळीस धोका आण- ण्यांत शहाणपणा कोणता?' -टि ३.३४१. २ नियमन; संयमन; बंधन; प्रतिकार. [सं.] निरोधकवि. १ दाब, आटोका, ताबा, बंधन इ॰त ठेवणार; दमन करणारा. २ अटक, प्रतिकार करणारा; अडथळा आणणारा निरोधणें-सक्रि. १ निग्रह, दमन, संयमन करणें. 'परी कर्मेंद्रियप्रवृत्ती । निरोघुनि ।' -ज्ञा ३.६४. २ बंधन, ताबा इ॰मध्यें ठेवणें; अटकाव; हरकत करणें. ३ रुद्ध करणें; आडवणें; रोखणें. -एभा ६.३२२. 'वर्म जाणती त्या एकल्या एकटा । बैसतील वाटा निरोधूनि ।' -तुगा १४.निरोधन-न. १ निग्रह दमन दाब; बंधन. २ अटकाव; प्रतिकार; अडथळा. (इं.) पिकेटिंग. 'विदेशी कापड विकण्याबद्दल अहमदाबाद स्वयंसेवकांनीं निरोधन करून अन्नत्याग केला.' -के २.१२.३०.

दाते शब्दकोश

(सं) पु० अवरोध, बंद ठेवणें.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

वाङ् निरोध

वाङ् निरोध vāṅ nirōdha m S See वाग्निरोध.

मोल्सवर्थ शब्दकोश

निरोध      

पु.       १. प्रतिबंध; अटकाव; कैद; अडथळा. २. नियमन; संयमन; बंधन; प्रतिकार. ३. संततिनियमन व लैंगिक संबंधातील सुरक्षितता या कारणांसाठी पुरुषांनी शारीरिक संबंधाच्या वेळी वापरण्याचे साधन.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

योग

पु. १ जुळणी; जोड; मिलाफ; संग; संयोग; संलग्नता; लग्न. 'योग पुढें भृगुसवें तिचा घडतां ' -मोआदि ३.६. २ परस्पर संबध; ऋणानुबंध; संगत. 'तिला नहाण यावें आणि तिचा दादला मरावा असा योग होता ' (समासांत) कालयोग; दैवयोग; प्रारब्धयोग इ॰ ३ आध्यात्मिक अथवा भाविक भक्ति अगर ध्यान, चिंतन करून होणारें ब्रह्मैक्य; ध्यानपूजा, मानसपूजा, समाधि व त्यासंबंधीं नियम व आसनें; प्राणायागादिक साधनांनीं चित्त- वृत्तीचा किंवा इंद्रियांचा निरोध करणें. ४ मार्ग; साधन; आत्म- साधन या अर्थीं भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग इ॰ ' संक्षेपानें नुसता योग अगर कर्मनिष्ठा असें म्हणतात. ५ खगोलाचे २७ भाग; ज्यावरून चंद्र सूर्याचें अक्षांक्ष रेखांश मोजतात ते; ते योग असे- विष्कंन; प्रीति, आयुष्मान्, सौभाग्य, शोभन, अतिगंड, सुकर्मा, धृति, शूल, गंड, वृद्धि, ध्रुव, व्याघात, हर्षण, वज्र, सिद्धि, व्यतीपात, वरीयान्, परीघ, शिव, सिद्धि, साध्य, शुभ, शुक्क, ब्रह्मा, ऐंद्र व वैधृति असे २७ योग आहेत. ज्योतिषी २८ योग मानतात. ६ संबंध; जवळ येणें. 'ग्रहांचे कालांश (वस्तुतः भोग) सूर्याच्या इतकें झाले म्हणजे त्याचा सूर्याशीं योग झाला किंवा युति झाली असें म्हणतात. ' -सूर्य २३. ७ उपाय- योजना; वस्तूचा उपयोग, विनियोग; कार्यार्थ साधना, प्रयत्न. ८ इष्टता; योग्यता; समत्व. ९ (गणित) रक्कम; रास; बेरीज. १०. साधन; युक्ति. 'एकच योग (साधन अगर युक्ति) आहे. ' -गीर ५६. ११ मिठी. १२ कवळा. १३ कार्यकुशलता. १४ संधि. 'योग बरवा हा पुन्हां घडेना ।' -दावि २४२. १५ (वैद्यक) इलाज; उपाय; औषध. 'आमवायूवर एरंडेलाचा योग प्रशस्त आहे.' १६ मोठा लाभ. 'मग योग योग ऐसा सहसा उठला वळी महा शब्द । ' -मोकर्ण ७.३५. १७ जारणमारण; जादूटोणा. १८ ईश्वरी संकल्प. १९ समाधिशास्त्र. २० तत्वज्ञान. २१ व्युत्पत्ति; व्युत्पत्तिमूलक अर्थ. २२ सूत्र; नियम; कायदा. २३ (ज्यो.) विशिष्ट तिथि, वार, नक्षत्र यांचें सहचर्य येणें. उदा॰ रविवारीं हस्त आलें असतां त्यास अमृतसिद्धि योग म्हणतात. [सं. युज् = जोडणें] सामाशब्द- ॰च्युत-पु. योगभ्रष्ट. -ज्ञा ६.४४८. ॰धर्म-पु. कर्तव्य; सद्गुण, अथवा योग्याचें विशेष कर्म; त्यापैकीं दहा विशेष आहेत-अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्या, अपरिग्रह (हे पांच यम व) शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर- प्रणिधान (हें पांच नियम होत). दुसरी गणना अशी आहे- अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, शांति, अपैशुन, दया, अलोभ, मार्दव, लज्जा. कांहीं दम, क्षम, अचापल्य, तेज, तितिक्षा, हे यांतच गणतात. ॰निद्रा-स्त्री. विश्वप्रलयानंतरची व विश्वोत्त्पत्तीपूर्वीची ब्रह्मदेवाची झोंप; ईस्वराची निद्रावस्था; योगमाया; सहजस्वरूप- स्थिति. -ज्ञा ५.७८. ॰निष्ठा-स्त्री. योगपरायणता. -ज्ञा २.३१५. ॰पट-पु. १ श्रेष्ठ भोग. २ संन्याशदीक्षेचा एक प्रकार. संन्याशानें धारण करावयाचीं विशिष्ट वस्त्रें. ३ (ल.) संन्यास घेतल्यावर त्यासंबंधीं पाळावयाचे नियम वगैरे. 'ते योगपटाची मवणी । जीवीं अनियम चिंतवणी । ' -ज्ञा १६.३३२. ॰भूमिका-स्त्री. योग्याचीं विशिष्ट अवस्था, स्थिति. 'द्रष्टादृश्यांचिया ग्रासीं । मध्यें उल्लेख विकासी । योगभूमिका ऐसी । अंगीं वाजे । ' -अमृ ७.१८५. ॰भ्रष्ट-वि. योगसाधनांत कांहीं प्रत्यवाय घडल्यामुळें पुनर्जन्म पाव- लेला. ॰माया-स्त्री. ईश्वराची जी मायारूप शक्ति ती; भ्रम; माया; माया व ब्रह्म पहा. ॰मुद्रा-स्त्री. खेचरी, भूचरी, चाचरी, अगो- चरी, आलेख इ॰ पांच योगमुद्रा; यांचीं स्थानें अनुक्रमें नादबिंदु, नासिका, नेत्र, कर्ण व आकाश हीं होत. 'खेचरी भूचरी चाचरी । अगोचरी आलेख यापरी । माजी समरसली खेचरी । नादबिंदूसी । ' -कथा ७.४.७३. ॰राज गुग्गुल-ळ-पु. एक प्रकारचें रसायन; मात्रा. ॰रूढ-वि. व्युत्पतीनें ज्यांचा प्राप्त अर्थ व रूढ अर्थ हे जुळतात असा (शब्द). जसे- अंगरखा; जलधर; पंकज; भूधर. कांहीं शब्द यौगिक, कांहीं रूढ आणि कांहीं योगरूढ असतात. ॰शास्त्र-न. चित्ताची एकाग्रता करण्याच्या साधनासंबंधींचें शास्त्र; ज्यामध्यें प्राणायामादिद्वारां अंतःकरणाच्या एकाग्रतेचा उपाय सांगितला आहे असें सहा शास्त्रांतील एक शास्त्र. ॰सार-पु. विचार. ॰क्षेम-पुन. निर्वाह; चरितार्थ; उदरपोषण. 'यांचे योग- क्षेमाबद्दल मौजे वडू तर्फ पाबल पैकीं इनाम.' -शाछ १.३६. योगक्षेम चालविणें-एखाद्या मनुष्यास पाहिजे असेल तें मिळ- वून देणें; संसाराची एकंदर व्यवस्था पाहणें; उदरनिर्वाहाची तज- वीज करणें. 'जे मला अनन्यभावें शरण येतात त्यांचा योगक्षेम मी चालवितों. ' योगानंद-पु. योगाभ्यासानें होणारा आनंद; पांच आनंदापैकीं शेवटचा. योगाभ्यास-पु. हटयोगादिकांचा अभ्यास, शिक्षण; योगशास्त्राचा अभ्यास; चित्तवृत्तींचा निरोध करून ध्यानादिकांचा केलेला अभ्यास. योगायोग-पु. १ दैव- गति; अनपेक्षित अशी घडलेली कांहीं गोष्ट; बनाव. २ अनुकूल काळ आणि प्रतिकूळ काळ. 'योगायोग पाहून वागावें. ' योगा- रूढ-वि. योगी; योगनिष्णात. 'तोच पुरुष योगारूढ म्हणजे पूर्ण योगी झाला.' -गीता ६९४. ॰योगासन-न. योगाभ्यास करणाऱ्या योग्याची विशेष प्रकारच्या पद्धतीनें वसण्याची रीत. योगिनी-स्त्री. १ दुर्गादेवीची परिचारिका. या ६४ आहेत. २ योगाभ्यासाची स्त्री; जोगीण. [सं.] योगी-पु. १ योगसाधन करणारा; योगमार्गास लागलेला मनुष्य. -ज्ञा ६.३९. २ योगसाध- नांचा उपयोग जादुगिरीच्या रूपानें करून लोकांस चमत्कार दाख विणारा मनुष्य. ' भारतीय वाङ्मयांत योगी याचा अर्थ बडा जादू- गार असा होतो. ' -ज्ञाको (य) ६५. ३ (सामा.) संन्याशी अथवा भक्त. योगेश्वर-पु. १ श्रेष्ठ योगी; सर्वांत श्रेष्ठ प्राणी; नांवाजलेला योगी; भक्त; संन्यासी; साधु. २ कृष्ण.

दाते शब्दकोश

प्राण

पु. १ देहांतील पांच वायु; प्राण, अपान, व्यान, उदान व समान. २ शरीरांतील पांच वायूंपैकीं पहिला; हृदयांतील वायु. 'तैसी प्राणजयें कर्मेंद्रिया । खुंटे गती ।' -ज्ञा १६.१८३. ३ एक बेचव, रंगहीन व वासरहित वायु. ह्याचें अस्तित्व हवेंत, पाण्यांत कित्येक खनिज पदार्थांत व सेंद्रिय वस्तूंत असते. हा वायु सर्व प्राण्यांस व वनस्पतींस अत्यावश्यक आहे. -ज्ञाको (प) २५५. (इं.) ऑक्सिजन. ४. श्वास; फुफ्फुसांत घेतलेली किंवा सोडलेली हवा; उच्छवास. 'प्राण म्हणजे पुढें जाणारा म्हणजे उच्छवास- वायु. -गीर ६७८. ५ वायु; वारा. ६ जीव. ७ (ल.) अत्यंत प्रिय वस्तु. 'महाराजांचा प्राण तर आपण.' -रत्न २.१. अधिक लाक्षणिक अर्थांसाठीं जीव शब्द पहा. ८ (संगीत) तालास लागणारी आवश्यक आणि महत्त्वाची गोष्ट. हे प्राण दहा आहेत-काल, मार्ग, क्रिया, अंग, ग्रह, जाति, कला, लय, यति व प्रस्तार. [सं.] (वाप्र.) ॰असणें-अत्यंत प्रिय असणें. 'दुर्गादेवीची तर ती खरोखर प्राणच होती.' -बिवि ८.१.६. ॰उरणें-केवळ जगणें; कसें तरी जगणें. ॰ओकणें-१ अत्यंत दुःख करणें. २ एखाद्या गोष्टीचा अतिशय छंद असणें. ॰ओवाळून टाकणें-सर्वस्व अर्पण करणें 'चारुदत्ता, या तुझ्या गुणावरून प्राण ओवाळून टाकावे असें वाटतें.' -मृ ४७. ॰काढून ठेवणें-परोपरीनें विनविणें; हट्ट घेणें. 'करंजा घाल म्हणून प्राण काढून ठेविला पण नाहीं हो ऐकिलें.' -कफा ३. ॰खाणें-अतिशय त्रास देणें; त्रासून सोडणें. 'तू... आमचा दोघांचा प्राण खाल्लास.' -नामना १२३. ॰जाणें-मरणें. ॰ठेवणें-एखाद्या गोष्टीवर अंतःकरणपूर्वक प्रेम करणें; जीव कीं प्राण असणें. ॰डोळ्यांत उतरणें-प्राण जाण्याचा प्रसंग येऊन ठेवणें. 'तरु- णाचे प्राण शेवटीं डोळ्यांत उतरण्याचा प्रसंग येतो.' -भावबंधन पृ. २२. ॰देणें-प्राणत्याग करणें; मरणें. ॰न ठेवणें-प्राण देणें; मरणें. 'मी प्राण ठेवणार नाहीं.' ॰फुटणें-अतिशय उत्कंठा असणें; तीव्र इच्छा होणें. 'तैसें देखावें वाटे पाहावया प्राण फटे ।' दावि १५५. ॰वाहणें-एखाद्यासाठीं सर्वस्व अर्पण करणें. 'प्राण वाहिला पायावरी ।' ॰सोखणें-१ तहानेनें व्याकुळ होणें; तहा- नेनें जीव कासावीस होणें. २ एखाद्या गोष्टीचा ध्यास, रुखरुख लागणें; एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा धरणें. ॰सोडणें-प्राण देणें; मरणें. प्राणाचा वाली-जीविताचा मालक; प्राणनाथ; नवरा. प्राणापेक्षां कठीण-मरणापेक्षांहि वाईट. प्राणाशीं गांठ-प्राण धोक्यांत पडणें; प्राणसंकट. (क्रि॰ घालणें; पडणें; होणें). म्ह॰ असंगाशीं संग प्राणाशीं गांठ. प्राणाशीं जाणें- (आकस्मिक घाला आल्यामुळें) प्राणास मुकणें. प्राणें उत्तीर्ण होणें-मरणें. 'तेथ उत्तीर्ण होईल प्राणें । परी तें कमळदळ चिरूं नेणें ।' -ज्ञा १.२०२. प्राणें जाणें-प्राण देणें. 'आतां मी जाईन प्राणें । पुत्रविण व्यर्थ जिणें ।' -कथा १.४.१०१. उघड्या डोळ्यानें प्राण न जाणें-आपल्या डोळ्यांसमोर एखाद्या अन्याय होत असतां स्वस्थ न बसवणें. सामाशब्द- ॰खाऊ- वि. (प्राण खाणारा) प्राणावर बेतणारा; प्राण धोक्यांत येईल इतका कष्टप्रद किंवा त्रासदायक; जीवघेणा; प्राणघेणा. [प्राण + खाणें] ॰घात-पु. १ ठार मारणें; प्राणहत्या; हिंसा. २ (ल.) नाश; विध्वंस. ॰घातक-की-वि. जीवनाचा नाश करणारा; जिवावर बेतणारा; जीव धोक्यांत आणणारा; प्राणघेणा. ॰घेणा- वि. १ प्राण घेणारा; जीव घेणारा. २ (ल.) अतिशय लोचट; अतिशय कष्टप्रद (काम, भिकारी इ॰). 'असली प्राणघेणी लढाई कोठें बोलली आहे काय?' -नि ९१३. [प्राण + घेणें] ॰घोष-पु. (कान बंद केले असतां) कानांत होणारा मोठा आवाज. ॰जय- पु. वायूचा निरोध. 'तैसी प्राणजयें कर्मेंद्रियां । कुंठे गति ।' -माज्ञा १६.१८३. ॰जीवन-न. १ जीवनाचा आधार. २ चरितार्थाचें साधन. ३ पति; प्रियकर; जार. ॰तर्पण-न. प्राणांचें समाधान; भुकेची शांति. 'गुरुआज्ञा जें दीधलें अन्न । तेणें प्राणतर्पण करावें ।' -एभा १७.३०८. ॰त्याग-पु. १ प्राण सोडणें; मरणें. २ प्राण देणें; आपल्या प्राणाचें बलिदान करणें. ॰दान-न. एखाद्याला जिवावरच्या संकटांतून सोडविणें. ॰द्यूत-न. (ल.) भयंकर किंवा कजाखीची लढाई. ॰धर्म-पु. भूक व तहान. -हंको. ॰धारण- धारणा-नस्त्री. १ जिवंत राहणें; जगणें. 'आम्ही कंदमूल खाऊन कसें तरी प्राणधारण करितों.' २ (योग.) श्वासाचा निरोध करणें. ३ जीवन. ॰नाथ-पति-प्रिय-प्यारा-पु. पति; नवरा. 'प्राणनाथाचिया आधीं । विरहणींतें जिणेंही बाधी ।' -ज्ञा १८.९२०. २ जार. ॰नाहो-पु. नवरा; पति. 'होवोनि माझा प्राणनाहो ।' -मुआदि १७.१३६. ॰पंचक-न. प्राण, अपान, व्यान, उदान, समान यांचा समुदाय. ॰पूजा-स्त्री. (ल.) जेवण; भोजन. ॰प्रतिष्ठा-स्त्री. १ दक्षिणाचार विधीच्या प्रसंगीं मंत्रादिकांनीं धातु, काष्ठ, पाषाण इत्यादिकांच्या देवतेच्या मूर्तींत प्राणांची स्थापना करण्याचा विधि. हा चक्षुरुन्मीलन विधीबरोबर करितात. २ स्थापना. 'दक्षिणेंत शिवाजीनें मराठी राज्याची प्राणप्रतिष्ठा केली.' ॰मय-वि. पंचप्राणयुक्त; सजीव. ॰मय- कोश-पु. आत्म्याच्या पंचकोशांपैकीं दुसरा कोश. पंचकोश पहा. ॰मित्र-पु. १ नवरा; पति; जार. २ जिवलग मित्र. 'उत्तरेसि वैश्रवण । प्राणमित्र शिवाचा ।' ॰यात्रा-स्त्री. चरितार्थ; उपजीविका. ॰याम-पु. (प्र.) प्राणायाम पहा. ॰रक्षण-न. जीवितरक्षण; जगणें; प्राणधारणा. ॰लिंग-न. गळ्यांत असलेलें महादेवाचें लिंग. -ख्रिपु. ॰वायु-पु. पंचप्राणांपैकीं पहिला वायु; प्राण पहा. ॰वियोग-पु. मरणसमयीं शरीरापासून झालेला प्राणाचा वियोग ॰विसावा-पु. अत्यंत आवडता मनुष्य (पति, जार, मित्र इ॰). 'प्राणाविसाव्याची भेट इच्छितसें ।' -रत्न ४.३. २ प्राणांचें विश्रांतिस्थान. ॰संकट-पु. प्राणघातक; दारुण, संकट; बिकट परिस्थिति. जिवावरची गोष्ट. ॰सखा-पु. प्राणविसावा. ॰संदेह- पु. दारुण परिस्थिति; प्राण जाईल किंवा राहील अशा तर्‍हेची संशयास्पद स्थिति; प्राणांतिक संकट. ॰सा-वि. (प्राणाप्रमाणें) अत्यंत आवडता. [प्राण + सा = सादृश्यदर्शक प्रत्यय] ॰सांडण- स्त्री. प्राणाची ओवाळणी. 'ऐसीयावरून प्राणसांडण करूं ।' -दावि १०७. [प्राण + सांडणें] प्राणाचा गिर्‍हाईक-पु. प्राणघातक शत्रू; हाडवैरी. प्राणांत-पु. १ आयुष्याची अखेर. शेवटची अवस्था; आयुष्याचा अखेरचा काल. २ अत्यंत भयंकर संकट. 'लढाईत जाणें हा केवळ प्राणांत आहे.' ३ (समासांत) प्राणांत-जेवण-यातना-व्यथा-समय. ४ जिवावरची गोष्ट प्राणांशीं गांठ. 'थोर प्राणांत वोढवला ।' ५ आयुष्याचा किंवा प्राणाचा शेवट; मृत्यु; मरण. 'मच्छ तळमळति तुटतां जीवन । प्राणांत वोडवे त्यालागोन ।' [प्राण + अंत = शेवट] प्राणांतदंड-पु. देहात- शासन; फांशीची शिक्षा. प्राणांतबुद्धि-स्त्री. धोक्याचा किंवा घातुक सल्ला. (क्रि॰ सांगणें; सुचविणें) प्राणांति(ती)क-न. जीविताचा शेवट; मरणकाल. -वि. घातक; भयप्रद; प्राण घेणारें; अति संकटमय (अजारीपण, संकट इ॰). [प्राणांत] प्राणांतिक अवस्था-स्त्री. मरण येतें कीं काय अशी स्थिति; प्राणसंकट; जिवावरची गोष्ट. प्राणात्यय-पु. १ (प्र.) प्राणनाश. २ (विरू.) प्राणत्याग. प्राणापदी-स्त्री. (महानु.) प्राणसंकट. 'श्रीकृष्णा सांडिता प्राणापदी जाली । ते सांघों नेणिजे ।' -शिशु २३१. [प्राण + आपदा] प्राणायाम-पु. (योग) भूः, भुवः इ॰ सात व्याहृती म्हणून उजव्या नाकपुडीनें श्वास आंत घेणें, पुनः त्या सात व्याहृती म्हणून श्वास कोंडून धरणें व पुनः त्या व्याहृती म्हणून डाव्या नाकपुडीनें श्वास बाहेर सोडणें. या तीन क्रियांस कुंभक, पूरक व रेचक असें म्हणतात; श्वासाच्या गतीचा निरोध. 'येई प्राणायामाचेनि आडकंठें । वरौता गा ।' -ज्ञा ६.५५. (द्राविडी)प्राणायाम-पु. प्राणायाम करतांना उजव्या हातानें नाकपुडी धरावयाची असते. त्यासाठीं सरळ, समोरून हात न घेतां डोक्याच्या मागच्या बाजूनें हात नेऊन तो पुढें आणून नाकपुडी धरणें. यावरून (ल.) त्रासयुक्त, आडमार्गानें केलेली कोणतीहि गोष्ट. 'वेताळ पंचविशी हा ग्रंथ मूळचा संस्कृत, त्या भाषेंतून याचा तर्जुमा फारसी भाषें झाला, तींतून इंग्रजींत, इंग्रजीतून मराठींत. केवढा द्राविडी प्राणायाम!' -नि. प्राणायामी-वि. प्राणा- याम करणारा. 'एक अपानु प्राणीं अर्पिती । एक दोहोंतेही निरुं- धिती । ते प्राणायामी म्हणिपती । पंडुकुमरा ।' -ज्ञा ४.१४६. प्राणासन-न. (योग.) उजवी मांडी मोडून व डावा पाय जमिनीवर टेकवून बसणें. उजव्या पायाचीं बोटें डाव्या जांघेंत भरून दावा पाय डाव्या हाताच्या खांद्यावरून काढून तो पाय जमिनीवर टेकणें व हात जमिनीवर टेकणें. -संयोग ३३१. [प्राण + आसन] प्राणाहुति-ती-स्त्री. भोजनाच्या आरंभीं पांच प्राणांना देतात ते पांच किंवा सहा घांस. 'तत्प्राण जाण हरिले निजविक्रमानें । प्राणाहुती मागत पांच अनुक्रमानें ।' -आपू ४०. [प्राण + आहुति] प्राणेश, प्राणेश्वर-पु. १ पति; नवरा. वोखटें मरणाऐसें । तेंही आलें अग्निप्रवेशें । परी प्राणेश्वरोद्देशें ।न गणीची सती ।' -ज्ञा १६.१८७. २ जार; उपपति; प्रियकर. ३ प्रभु; स्वामी; मालक. 'आतां मज जाणें प्राणेश्वरासवें । मी माझिया भावें अनुसरलों ।' -तुगा ६८५. [प्राण + ईश, ईश्वर] प्राणेश्वरी-स्त्री. १ प्रकृति. 'जो प्रियूचि प्राणेश्वरी । उलथे आवडीचिये सरोभरीं ।' अमृ १.२. २ बायको. [प्राण + ईश्वरी] प्राणोत्क्रमण-न. प्राण निघून जाणें; मरण; मृत्यु. [प्राण + उत्क्रमण] प्राणोपासना-स्त्री. उपासनेचा एक प्रकार. 'पुरुष विद्या, पर्यकविद्या, प्राणोपासना इ॰ प्रकारची उपासना उपनिष- दांत वर्णिली आहे.' -गीर २०७. [प्राण + उपासना]

दाते शब्दकोश

असंज्ञिसमापत्ति, असंज्ञिसमापत्ती      

स्त्री.       (तत्त्व.) ब्रह्मानंदमग्नता; तन्मयावस्था; उन्मनीअवस्था; परमानंदअवस्था; चित्ताच्या सर्व वृत्तींचा निरोध केल्यावर जी अवस्था असते ती. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चेक

पु. (अधिकार्‍याचा) दपटशा; तंबी; दाब; अड- थळा; विरोध. [इं. चेक्] ॰करणें-तपासणी करणें. ॰ठेवणें- घालणें-दाब ठेवणें; शह घालणें. ॰येणें-दाब येणें; निरोध, अडथळा येणें, होणें.

दाते शब्दकोश

चेक      

पु.       (अधिकाऱ्याचा) दपटशा; तंबी; दाब; अडथळा. [इं.] (वा.) चेक करणे – तपासणी करणे. चेक ठेवणे, चेक घालणे – दाब ठेवणे; शह घालणे. चेक येणे – दाब येणे; निरोध, अडथळा येणे, होणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

हठ

पु. हट्ट, दुराग्रह. हट-ट्ट पहा. [सं.] ॰योग-पु. १ प्राणवायूचा निरोध करून त्याच्या द्वारें चित्तवृत्तीची एकाग्रता करण्याचा योगांतील एक प्रकार. २ सतत एका पायावर उभे राहणें, अधोमुख होऊन धूम्रपान करणें, हात वर करून उभें राहणें इ॰ प्रकारचें घोर तप. याच्या उलट राजयोग.

दाते शब्दकोश

कुंभक      

पु.       (प्राणायाम) पूरकाने आत घेतलेला वायू रेचक होईपर्यंत कोंडून धरणे : ‘प्राण व अपान या दोहोंचाही निरोध झाला म्हणजे तोच प्राणायाम कुंभक होय.’ - गीर ६७८. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुंभक

पु. (प्राणायाम) पुरकाने आंत घेतलेला वायु रेचक होईपर्यंत कोंडून धरणें. 'प्राण व अपना या दोहोंचाहि निरोध झाला म्हणजे तोच प्राणायाम कुंभक होय.' -गीर ६७८. [सं.]

दाते शब्दकोश

निरुंधणे      

उक्रि.       निरोध, प्रतिबंध करणे; अडवणे. [सं.नि + रुध्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निरुंधणें

उक्रि, निरोध, प्रतिबंध करणें; अडविणें. 'एक अपानु प्राणीं अर्पिती । एक दोहीं तें निरुधिती ।' -ज्ञा ४.१४६. [निरुद्ध]

दाते शब्दकोश

नियम

पु. १ कायदा; आज्ञा; आदेश; निर्बंध; ठराव; कलम. 'वसंतामध्यें कोकिलांनीं शब्द करावा असा नियम आहे' २ ठराविक चालरीत; वहिवाट. 'आम्ही एकवेळ जेवण्याचा नियम केला आहे.' ३ रूढी; आचारपरंपरा; पद्धत. ४ उपवास, जागर, यात्रा इ॰ स्वेच्छेनें करावयाच्या धार्मिक गोष्टी, तसेंच आवश्यक असें धार्मिक कर्म, विधि इ॰ ५ ठरलेली गोष्ट; संकेत; ठराव. ६ (योगशास्त्र) अष्टांगांपैकीं दुसरें अंग (मनोजय). ७ निग्रह; निरोध. 'एवंमनपवन नियमें । होती दाही इंद्रियें अक्षमें ।' -ज्ञा १६.१८५. [सं.] नियमणें-सक्रि. नियम, निग्रह करणें. 'स्त्रीविषयीं नियमिजे । नांवें नांवें ।' -ज्ञा १७.२१०. नियमन- न. निग्रह; दाब; शासन; आळा; बांधा. 'मनाचें नियमन केलें असतां ईश्वरप्राप्ति लवकर होते.' २ अंमल; अधिकार. ॰निष्ठ-वि. कडकडीतपणें, नियमितपणें धार्मिक विधि पाळणारा, करणारा; नेमनिष्ट. ॰निष्ठा-स्त्री. आवश्यक करावयाच्या नित्यकर्मांचें (स्नान-संध्यादींचें) निष्ठापूर्वक पालन; त्या कर्मांविषयीं आदर. ॰पत्र-न. आज्ञापत्रक; नियमांचा कागद. पत्र पहा. ॰विधि-पु. नियमासंबंधीं स्थलकाल इत्यादि निदर्शक गोष्टी; नियमाचें दिग्दर्शन. प्राप्त जें कांहीं कर्म त्याचा अमुक कालीं करावें असा अदृष्टार्थ नियम करणें. 'आपत्काळीं पुत्रदान करावें असा नियमविधि जो केला त्याचें दृष्टफल तर संभवत नाहीं.' -मिताक्षरा. ॰शील-वि. १ नियम निष्ठ पहा. २ केलेल्या नियमाप्रमाणें नेहमीं वागणारा. ॰संयम- पु. १ ज्ञानेंद्रियें व कर्मेंद्रियें यांना ताब्यांत ठेवणें. २ अशी निग्रह- शक्ति प्राप्त होण्यासाठीं करावयाचे कांहीं विधी, आचरण. (क्रि॰ धरणें). 'यंदा चातुर्मास्यांत कांहीं नियमसंयम धरले.' निय- माचा-वि. १ नियमित; व्यवस्थित; पद्धतवार. २ विचारी; स्थिर; अचंचल. ३ सदाचरणाच्या नियमांनीं वागणारा. 'मोठा गेला नियमाचा !' -क्रिवि. नेमानें; न चुकतां; हटकून; नियमित पणें. 'मी जेवायास बसतों तेव्हां वारा येऊन नियमाचा दिवा जातो.' नियमित-वि. १ नेमलेला; नक्की केलेला; ठराविक; ठाम. २ दाबांत ठेवलेला; निग्रहीत; शासित. ३ नेमून दिलेला; निर्दिष्ट; नियम. नियमी, नियमिष्ठ-वि. १ नियमनिष्ठ पहा. २ नियमाचा पहा. नियम्य-वि. १ निग्रह करण्यास, दाबांत ठेव- ण्यास, नियमन करण्यास योग्य, आवश्यक. २ ठाम, निश्चित करा- वयाचा; नेमावयाचा; नियमित करणारा योग्य. नियामक-वि. १ ताब्यांत ठेवणारा; शासन करणारा; निग्रह करणारा. 'गांवींचे देवळेश्वर नियामकचि होती साचार ।' -ज्ञा १८.५७०. २ निय- मित, ठाम, निश्चित करणारा; नेमणारा; नियंता; नेमणूक करणारा. ३ गति वगैरेचें नियंत्रण करणारे यंत्र (गव्हर्नर). नियामक मंडळ-न. शासन करणारी संस्था. (इं.) गव्हर्निंग बॉडी.

दाते शब्दकोश

नियम      

पु.       १. कायदा; आज्ञा; आदेश; निर्बंध; ठराव; कलम. २. ठरावीक चालरीत; वहिवाट. ३. रूढी; आचारपरंपरा; पद्धत. ४. उपवास, जागर, यात्रा इ. स्वेच्छेने करण्याच्या धार्मिक गोष्टी; आवश्यक धार्मिक कार्य, विधी. ५. ठरलेली गोष्ट, संकेत; ठराव. ६. (योगशास्त्र) अष्टांगांपैकी दुसरे अंग; इंद्रियनिग्रहासाठी करण्याचे आचरण. ७. इंद्रियांवरील ताबा; निग्रह; निरोध : ‘एवं मनपवन नियमें । होती दाही इंद्रिये अक्षमें ।’ – ज्ञा १६·१८५. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

समाधिक, समाध

स्त्री. १ चित्तैकाग्र्य; इंद्रियांचें दमन करून आत्मस्वरूपांत लीन होणें; एकतानता; तंद्री; इंद्रियवृत्ति- निरोध; योगांतील आठवें व शेवटचें अंग. 'ऐसिये सरिसिये भूमिके । समाधि राहे ।' -ज्ञा ६.६. 'समाध उभ्यानें लागली तटस्थ ।' -दावि ४५७. २ संन्याशानें स्वतःस जिवंतपणीं जलांत बुडवून घेणें, किंवा पुरून घेणें ३ मृत संन्याशास जलांत बुडविण्याचा किंवा मातींत पुरण्याचा विधि, संस्कार. ४ संन्याशास पुरलेल्या भूमीवर बांधतात तें वृंदावन, थडगें. [सं.] ॰सुख-न समाधिअव- स्थेंत होणारा आनंद समाधिस्त-स्थ-वि. १ समाधि लावलेला; ध्यानमग्न; आत्मचिंतनांत मग्न, गढलेला. 'देह केला वाव समा धिस्थ ।' -तुगा ७७३. 'वेदस्वरूपीं होय समाधिस्त ।' २ समाधि घेतलेला; मृत; पुरलेला.

दाते शब्दकोश

समाहार

पु. १ एकत्र जमाव; समूह; समुदाय; मिश्रण; जुळणी. २ अक्षरसमाहार; वर्णसमाहार; वर्णमाला; अक्षर- माला. ३ संक्षेप; सारांश. ४ (व्या.) समास; शब्दांची जोडणी. ५ शब्दांची अथवा वाक्यांची जोडणी, जुळणी; 'आणि' या उभयान्वयी अव्ययाचा अर्थ. ६ द्वंद्व समासाचा एक प्रकार. ७ सारखाच, एकाच प्रमाणांत असलेला आहार. ८ निरोध. 'किजैल इंद्रियांचा मारू । प्राणापानाचा समा- हारू ।' -भाए २३२. [सं. सम् + आ + हृ] ॰द्वंद्व-पु. द्वंद्व समासाचा एक प्रकार. या प्रकारांत समस्त पदांच्या अर्था- शिवाय आणखी तशाच प्रकारच्या पदार्थांचा अंतर्भाव होतो. उदा॰ भाजीपाला; चणेकुरमुरे. समाहारी-वि. एखाद्याच्या बरोबरीनें आहार असणारा; बरोबरीनें खाणारा.

दाते शब्दकोश

ठेप

स्त्री. १ टक्कर, भेट, अडथळा, संबंध किंवा संघ- र्षण यांच्यामुळें दोन गतिमान पदार्थांचा अटकाव; स्थिरता; विरुद्ध गतीनें येणार्‍या वस्तूंच्या गतीचा निरोध. (क्रि॰ खाणें; बसणें). २ (ल.) सीमा; मर्यादा; थांबण्याचें ठिवाण; हद्द. 'पंचा- यतीची ठेप कोठपर्यंत आली?' ३ संकेत; वचन; नेमलेली वेळ; ठरविलेला काळ; मर्यादित मुदत. (क्रि॰ करणें; ठरविणें). 'उद्यां सकाळीं भेटेन अशी त्यानें ठेप केली आहे.' कालदेशावधि निय- मपूर्वक केलेला कार्यनियम. ४ अपराधी माणसास कांहीं नियमित कालपर्यंत सरकारांतून तुरुंगांत जो प्रतिबंध करतात तो; कैद; शिक्षा. ५ (लाकूडकाम) सांध्याचा एक प्रकार. -मॅरेट २८. ६ पंचाय- तप्रकरणीं वादी प्रतिवाद्यांपासून लिहून घ्यावयाची कलमवार यादी. (वाप्र.) ठेप देणें-अडथळा आणणें; मर्यादित करणें; मुदतबंद करणें. ॰विणें-उक्रि. १ गति बंद करणें; मार्गांत अडथळा करणें; स्थिर करणें; हालचाल करणार्‍या वस्तूच्या मार्गांत अडथळा आणून अथवा विरोध करून ती थांबविणें, स्थिर करणें. २ दुसर्‍यावर टेकेल असें ठेवणें; एखाद्याला आधारभूत किंवा एखाद्याच्या आश्रयांने ठेवणें. ३ एखाद्या दिवसापर्यंत नेमणें; ठराविक काळीं योजणें. [ठेपणें] ॰लणें-अक्रि. १ आघात किंवा अडथळा यामुळें थांबणें; वाढलें जाणें. २ -उक्रि. भोंदणें; भुलथाप देणें; चाळवण्या दाखविणें; हळू हळू वश करणें; हुरळविणें; गोंजारणें; आशा लावून फसविणें. ठेपेस नेणें, लावणें-जागच्या जागी आणणें; पूर्वस्थळीं आणणें, नेमणें; ठरविणें. सामाशब्द- ॰ठाप-स्त्री. नियमितपणा; ठराविक स्थिति; टापटीप; ठामपणा; नेमकेपणा. ॰राई-स्त्री. टापटीप; व्यवस्था; व्यवस्थितपणा; योग्यायोग्यता; मर्यादा; सावधगिरी (वागणूक भाषण, कृत्य, शिक्षण इ॰ची). ठेपी(पे)चा-वि. १ मर्यादा किंवा कायदा पाळणारा; व्यवस्थित; टापटिपेचा (मनुष्य, व्यापार, धंदा). २ थेटचा अखेरपर्यंत जाणारा (प्रवासी), पुरणारें (काम).

दाते शब्दकोश

उदावर्त

पु. एक आंतड्याचा रोग; पोटांतील आंतड्यांमध्यें निरोध झाल्यामुळें होण्यार्‍या वेदना, रोग (वाईट प्रकारचें अन्न सेवन केल्यामुळें हा रोग होतो.). [सं.]

दाते शब्दकोश

लढणें

अक्रि. १ युद्ब करणें; झुंझ करणें; द्वंद करणें. २ झग- डणें; भांडणें; तंटा करणें. ३ (ल.) स्पर्धा करणें; चढाओढ करणें; टक्कर मारणें. [हिं. लडना] (वाप्र.) लढून पडणें-मोठ्या औत्सुक्यानें, उत्कंठेनें एखाद्यावर झटून पडणें; तूटून पडणें. लढत-स्त्री. युद्ध; झुंज; झगडा (क्रि॰ लागणें; चालणें; होणें). लढा अर्थ १ पहा. [लढणें] लढता-वि. १ लढाऊ; युद्धकुशल; लढवई पहा. 'शिंदे यांची फौज एवढी लढती, तिची ही गत.' -भाब ७५. २ लढवय्या; लढणारा; योद्धा. लढवय्या-पु. लढ- ण्यांत हुशार असलेला मनुष्य; योद्धा; वीर. [हिं.] लढव(वा)ई- वि. १ झुंजार; रणधीर; रणशूर. २ लढाईस योग्य (मनुष्य, घोडा, जहाज, रथ, शस्त्र). [हिं.] लढविणें-सक्रि. १ झुंजावयास लावणें. २ बरोबरी, स्पर्धा करण्यास लावणें. 'हें पागोटें त्या पागोट्याशीं लढवून पहिलें परंतु लढत नाहीं.' ३ चालविणें; करणें; योजणें;उपयोग करणें (मसलत, शक्कल, युक्ति, यत्न, तजवीज, साधनें). लढा-पु. १ भांडण; वाद; तंटा; वादाचा विषय, भूमि. (क्रि॰ लागणें; चालणें; असणें; होणें; राहणें व तोडणें; चुकविणें). २ प्रतिबंध; अडथळा; निरोध; हरकत; निग्रह करणारें, आड येणारें, गति कुंठित करणारें कारण. 'त्या कागदा- वर घोटणी नाहीं म्हणून रेघ ओडतांना मध्यें लढा लागतो.' ३ (शब्दशः व ल.) गुंता; गुताडा; गुरफटा. लढाई-स्त्री. १ भांडण, तंटा करणें. २ सामाना; रण, संग्राम. ३ युद्ध; युद्धसंसार. [हिं. लडाई] (वाप्र.) ॰जिंकणें-लढाईंत जय मिळविणें; विजयी होणें. लढाऊ-वि. लढण्यास योग्य (मनुष्य, पशु, जहाज इ॰). [हिं. लडाऊ] ॰गलबत-जहाज-न. लष्करी जहाज.

दाते शब्दकोश

दम

पु. १ श्वास. (ल.) प्राण; जीव. २ धाप; हवावी; सुसकारा; प्रमाणाधिक श्वासोच्छवास; कष्टानें श्वास टाकणें. ३ स्वतः- बद्दलची फाजील कल्पना; अहंमन्यता; अहंकार; महत्त्वाकांक्षा; गर्व; बढाईखोरपणा. ४ क्षण; पळ. ५ जोम; हिम्मत; निश्चय; विश्वास; तेज; धीर. ६ शक्ति; सत्व; चांगलपणा; सामर्थ्य; गुण (औषधांचा). ७ श्वास कोंडून धरण्याची शक्ति; अवसान. 'तुझा दम मोठा म्हणून तूं बुडून राहतोस.' ८ कायम ओलसरपणा, दमटपणा (जमी- नीचा). ९ एखाद्या वाद्यांतील हवा (वाजविण्यासाठीं कोंडलेली, भरलेली). १० वाफ देणें (मंदाग्नीवर ठेवलेल्या अन्नास). ११ धूम; पखवाज, संबळ इ॰ कांचा खर्ज सूर. १२ हिम्मत; जोम; शक्ति; धीर; दृढनिश्चय; सहनशक्ति इ॰ उठावणी करण्याची, प्रोत्साहित करण्याची, पाठपुरावा करण्याची शक्ति (संपत्ति, अधि- कार, उद्योग यांची); व्यापारधंद्यांतील भरभराट; किफायत; व्यापारांतील ऐपतगिरी; गब्बरपणा. १३ धान्याचा सकसपणा; केळीं वगैरे पदार्थांचा (पोटांत) पुष्कळ वेळपर्यंत भूक न लागतां राहण्याचा गुण; जुन्या, वापरलेल्या वस्तूंची अधिक टिकण्याची शक्ति; पुष्कळ वेळ जळत राहण्याची दारूकामाची शक्ति; न तापतां पुष्कळ वेळ बार उडण्याची (तोफ, बंदूक इ॰) शक्ति. १४ झुरका (गुडगुडी, चिलीम इ॰चा). (क्रि॰ घेणें; पिणें खेंचणें; ओढणें; लावणें). १५ जोर; शक्ति. 'पावसानें पिकास दम आला. ' १६ धमकी. [सं. दम्; फा.] (वाप्र.) ॰कोंडणें-१ श्वास कोंडणें; श्वासाचा अवरोध होणें. २ हिंमत, उत्साह खचणें. ॰खाणें-१ थांबणें; श्वास घेणें; थोडा वेळ स्वस्थ बसणें. २ वाट पाहणें; धीर धरणें. ॰घेणें-थांबणें; विश्रांति घेणें. ॰छाटणें-१ श्वासाचा निरोध करणें; श्वास कोंडून धरणें. २ धीर धरणें; सहनशीलपणा धारण करणें. ३ श्वासोच्छ्वास अनियंत्रित चालणें; गुदमरणें; घाबरे होणें. 'कफामुळें दम छाटत नाहीं.' ॰टाकणें-सोडणें-१ आशा, विश्वास. धैर्य सोडणें. २ श्वास घेणें; विश्रांति घेणें. ॰देणें-१ धैर्य देणें; प्रोत्साहित करणें; उत्तेजन देणें. २ धमकी देणें; धाकदपटशा दाखविणें. ३ जोराने खडसावणें; भोसडणें. ४ क्षणभर विसावा घेऊं देणें. ॰धरणें-१ श्वासावरोध करणें; धीर धरणें. २ थांबणें; विसावा घेणें. ३ धैर्य धरणें. ४ कांहीं वेळ वाट पाहणें. ॰पाहणें- (एखाद्याच्या) अवसानाची, शक्तीची परीक्षा घेणें, करणें. ॰भरणें-धमकावणें; खडकावणें; तंबी देणें; भेडसावणें; दहशत घालणें; ताकीद देणें. ॰मारणें-१ झुरका घेणें (गुडगुडी इ॰चा). २ आपल्या करामतीची पराकाष्टा करणें. 'पुन्हां एकदां दम मार म्हणजे ते धोंडा सरकेल.' ३ गट्ट करणें; दाबणें (पैसा, अन्न इ॰). ॰लागणें-जीव खालींवर होणें; जलद, कष्टानें श्वास घेणें; धाप लागणें. ॰सुटणें-धैर्य, विश्वास नाहींसा होणें; धीर खचणें. दमादमानें-सावकाश; शांतपणें; हळू हळू; थांबून. दमावर धरणें-घाईशिवाय किंवा न थकतां एकसारखें काम करणें. एका दमानें-क्रिवि. एका श्वासानें अथवा अव्याहत प्रयत्नानें; एका सपाट्यांत. दमास येणें-थकणें. सामाशब्द- ॰छाट-पु. श्वासोच्छ्वास निरोधाची शक्ति; पुष्कळ वेळ दम कोंडून ठेवणारा माणूस. ॰छाटगोळा-पु. कुलपी गोळा; बाँब. ॰छाट- तोफ-स्त्री. गरनाळ. ॰छाट माणूस-मनुष्य-पु. पुष्कळ वेळ अवरोध करण्याची शक्ति असलेला मनुष्य. दमट, दमकट- कल-वि. १ ओलसर; आंबटओलें; कुंद; आर्द्र (जमीन इ॰). २ हिरवी; रसभरीत (फांदी). ॰टणें-अक्रि. १ ओलसर असणें. २ ओलसर होणें. ॰दाटी-स्त्री. धाकदपटशा. ॰दार-वि. १ ओल- सर; दमट (जमीन). २ ओलट; हिरवें (लांकूड); जमीनींतील भट्टींत तयार केलेला व दमानें जळणारा (कोळसा); सकस; कस- दार (धान्य); नफा होणारें; फायदेशीर (काम, धंदा). ३ धाडसी; अंगांत तेज किंवा पाणी असणारा; नशीबवान; निश्चयी. ४ धीराचा; सहनशील; उत्साही; दीर्घोद्योगी. ५ पैसेवाला; भांडवलवाला; पैशाची ऊब असणारा (सावकार). ६ पुष्कळ व वापरूनहि दणकट, मजबूत राहणारी (वस्तु, वस्त्र). ॰दिलासा-पु. उत्साह; धीर; समाधान. ॰विकरी, दमाची विकरी-स्त्री. उधारीचा धंदा; उधारीची विक्री. ॰सर-वि. दमट पहा. ॰सर्द-वि. १ थंड. २ नामोहरम; पराजित; हतप्रभ. 'अमर्यादकांस शासनें करुन ...दमसर्द केलें.' -राज ८.१२५. ॰सूट-क्रिवि. पहांटेच्या वेळीं.

दाते शब्दकोश