मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

निर्भर्त्सना      

स्त्री.       निंदा; उपहास; पाणउतारा. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निर्भर्त्सना

(सं) स्त्री० उपहास, धिक्कार.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

संबंधित शब्द

झ(झं)वणें

उक्रि. (अश्लील) संभोगणें; मैथुन करणें; स्त्रीशीं रत होणें. [सं. धवनं-झवणँ-झवणें; सं. धव = नवरा, त्याचें मुख्य कर्म धवनं अथवा (-वि.) धुवनं( = रतं) याचा अपभ्रंश झवणें. -राजवाडे भाअ १८३३. तुल॰ सं. झ्यु-झव = जाणें, हलणें] झवकीर-वि. (अश्लील). कामुक; विषयांध; स्त्रीलंपट. हें एक आडनांवहि आहे. [झवणें] झवतरोड-वि. (अश्लील.) रोडका; किरकोळ बांध्याचा; अशक्त; दुबळा; मरतुकडा; हें एक आड- नांवहि आहे. [झवणें + रोड] झंवर-वाडपटी-स्त्री. (अशिष्ट). एखाद्याची भरमसाट शिव्या देऊन केलेली निर्भर्त्सना; खरडपट्टी; घाणेरड्या शिव्या देणें. (क्रि॰ काढणें). [झवणें] झवाडणें-सक्रि. (अशिष्ट) शिव्या देऊन खरडपट्टी काढणें; निर्भर्त्सना करणें; अभद्र बोलणें. [झवणें] झवाड्या-वि. (अश्लील) व्यभिचारी; अति- शय कामुक; विषयासक्त. [झंवणें]

दाते शब्दकोश

खरड

स्त्री. १ घाई-घाईनें लिहिलेला, कागद अथवा लेख, आकृती, खर्डा, आराखडा. २ रेघोट्या; चिरखुडया. ३ खरडपट्टी; पाणउतारा; निर्भर्त्सना. (क्रि॰ काढणें; निघणें). ४ धातु शुद्ध करतांना तिचे भोंवतीं जमणारी राख व माती (ही धातूपासून खरडून काढलेली असते म्हणून हा शब्द); खरडून काढलेला भाग. ५ (गो.) टक्कल.६ (गो.) केसांत सांचणारा मळ. [सं. क्षर्; प्रा. खरड = लेपणें; ध्व. खर?]सामाशब्द- ॰घाशा-वि. (उपहासार्थी) सरासरी लेखन जाणणारा, परंतु त्यांतील मर्म न जाणणारा (कारकून). २ अकुशल; बिनकसबी (लेखक, न्हावी, सुतार). [खरडणें + घासणें] ॰निशी-स्त्री. १ गिचमिड; वेडेंवांकडें लिखाण, लेखन.२ खर्डेघाशी. ॰नीस-निशा-वि. वाईट लेखक. (खरड + नवीस). ॰पट्टी-स्त्री. १ खरड पहा. कडाक्याची निर्भर्त्सना; दटावणी; जोराची चापणी; बोडती; भोसडपट्टी; दोष किंवा अपराध दाखवून रागानें झाडलेला ताशेरा. (क्रि॰ काढणें; निघणें). २ तोटा, नुकसान सोसावयास लावणें. (क्रि॰ काढणें; निघणें).

दाते शब्दकोश

तोंड      

न.       १. ज्याने खाता व बोलता येते तो शरीराचा अवयव. २. चेहरा; हनुवटीपासून डोक्यापर्यंत मस्तकाचा दर्शनी भाग. ३. (सामा.) (एखाद्या वस्तूचा) दर्शनी, पुढचा, टोकाचा भाग; समोरील अंग. ४. (फोड, गळू इ.चा) छिद्र पडण्याजोगा, छिद्रासारखा भाग; व्रणाचे मुख. ५. (कुपी, तपेली, लोटी वगैरेंचे) पदार्थ आत घालण्याचे द्वार, मुख. ६. (एखाद्या विषयात, शास्त्रात, गावात, देशात, घरात) शिरकाव होण्याचा मार्ग; प्रवेशद्वार. ७. (ल.) गुरुकिल्ली. उदा. व्याकरण हे भाषेचे तोंड होय. ८. (वारा इ.ची) दिशा, बाजू. ९. धैर्य; दम; उमेद; एखादे कार्य करण्याविषयीची न्यायतः योग्यता. १०. एखाद्या वस्तूचा स्वीकार किंवा विनियोगाचा, उपयोगाचा आरंभ तिच्या ज्या भागाकडून करतात तो भाग. ११. (युद्ध, वादविवाद इ. गोष्टींची) प्रारंभदशा; सुरुवात. १२. (सोनारी धंदा) हातोड्याचा सगळ्यात खालच्या बाजूला अडिश्रीच्या बुडासारखा असणारा भाग. याने ठोकलेला जिन्नस सारखा करून घेतात. १३. (सोनारी धंदा) कांबीला गोल आकार देताना तिची टोके जेथे जुळतात तो भाग. १४. (बुद्धिबळ) डाव सुरू करण्याचा प्रकार; मोहरा. १५. सुरईचे पाणी ओतण्याचे व भरण्याचे तोंड. हे पक्ष्याच्या चोचीप्रमाणे लांब व विविध आकाराचे आढळते. [सं.तुंड] (वा.) तोंड आटोपणे, तोंड सांभाळणे, तोंड आवरणे – जपून बोलणे; बोलण्याला आळा घालणे; अमर्याद भाषण, अभक्ष्यभक्षण यांपासून निवृत्त होणे. तोंड आणणे – (आटापाट्यांचा खेळ) शेवटची पाटी खेळून जाऊन पुन्हा एक एक खेळत येणे; पाणी, लोण आणणे. तोंड आहे की तोबरा – खादाड किंवा बडबड्या माणसाला उद्देशून वापरण्याचा ‘किती खातोस’ ‘किती बोलतोस’ या अर्थाचा वाक्यप्रचार. तोंड आंबट करणे – (एखाद्याने) चेहऱ्यावर असमाधानाचे, निराशेचे भाव आणणे. तोंड उतरणे – (निराशा, आजार इ.ने) चेहरा म्लान होणे, सुकणे, फिका पडणे, निस्तेज होणे. तोंड उष्टे करणे – १. (अन्नाचा) एखाददुसरा घास खाणे. २. ज्या गोष्टीविषयी आपल्याला मुळीच माहीत नाही त्याविषयी बोलणे. तोंड करणे – बडबड, वटपट करणे; उद्धटपणे, निर्लज्जपणे बोलणे. तोंड काटणे – उदयाला येणे; अस्तित्वात येणे. तोंड काळे करणे – (उप.) एखादा ठपका, तोहमत अंगावर आल्यामुळे निघून, पळून जाणे; हातावर तुरी देणे; दृष्टीस न पडणे. तोंड कोरडे पडणे, तोंडचे पाणी पळणे, तोंडचे पाणी उडणे – १. भीतीमुळे चेहरा फिका पडणे; बावरणे; घाबरणे. २ भीतीने घसा सुकणे. तोंड गोड करणे – १. (एखाद्याला) लाच देणे, खूष करणे. २. मेजवानी देणे. तोंड गोरेमोरे होणे – (कोणी रागावले असता, वाईट वाटून) निराशेची, लाजलेपणाची जाणीव चेहऱ्यावर उमटणे. तोंड घालणे – (दोघे बोलत असताना तिसऱ्याने) संबंध नसताना मध्येच बोलणे. तोंड घेऊन येणे – एखाद्याने सोपवलेले काम न करता तसेच परत येणे. तोंड घेणे – बोंबलत सुटणे; ताशेरे झाडणे. तोंड चिघट करनं – वारंवार उपदेश करणे. (झाडी) तोंड चुकविणे – हातून एखादा अपराध घडला असता कोणी रागवेल म्हणून काम टाळण्यासाठी चुकारपणे दृष्टीस न पडणे. तोंड टाकणे – रागातिशयाने अपशब्दांचा वर्षाव करणे; निर्भर्त्सना करणे; खरडपट्टी काढणे; अद्वातद्वा बोलणे. तोंड ठेचणे – तोंडावर मार देऊन गप्प करणे; कह्यात घेणे; गुप्तता राखणे. तोंड तोडणे – एखादी वस्तू मिळवण्यासाठी एखाद्याच्या पाठी लागणे; तोंड वेंगाडणे. (ना.) तोंड दाबणे – लाच देऊन तोंड बंद करणे; एखाद्याला वश, गप्प करणे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार – एखाद्याला तक्रारीचा ब्रही काढू न देता प्रचंड छळ, कोंडमारा करणे. तोंड दिसणे – एखाद्याची केलेली निर्भर्त्सना दुसरी बाजू न कळता लोकांच्या नजरेला येणे व आपणच वाईट ठरणे. तोंड देणे – १. पहा : तोंड घेणे २. २. सैन्याच्या अग्रभागी राहून शत्रूवर हल्ला करणे. ३. (एखाद्याचा) प्रतिपक्षी, शत्रू होऊन राहणे; लढायला सिद्ध होणे. ४. (आट्यापाट्यांचा खेळ) शेवटची पाटी खेळून परत येणाऱ्या गड्याकडे पाटी धरणाराने तोंड फिरविणे. ५. एखाद्या गोष्टीला न भिता त्यातून धैर्याने पार पडण्याची तयारी ठेवणे. तोंड धरणे – १. अन्नसेवन करण्याची तोंडाची शक्ती आजार वगैरे कारणांमुळे नाहीशी होणे. २. एखाद्याची बोलण्याची शक्ती नाहीशी करणे. ३. एखाद्याला आपल्या तावडीत, कबजात आणणे. ४. बोलणे बंद करणे. तोंड धुणे – एखाद्या वस्तूच्या लाभासाठी वाट पाहणे. तोंड धुवून येणे – (उप.) एखाद्याची विनंती कधीही मान्य होणार नाही असे म्हणून फेटाळून लावताना योजण्याचा तिरस्कारदर्शक वाक्यप्रकार. तोंड निपटणे – (आजार, उपवास इ. कारणांनी) गाल खोल जाणे; चेहरा सुकणे. तोंड पडणे – १. सुरुवात होणे. २. (गळू वगैरेला) छिद्र पडणे, फुटणे, वाहू लागणे. तोंड पसरणे, तोंड वेंगाडणे, तोंड विचकणे – १. खिन्नपणाची, केविलवाणी मुद्रा करणे. २. हीनदीनपणाने याचना करणे. तोंड पाघळणे – गुप्त गोष्ट बाहेर फोडणे. तोंड पाडणे – (वादाला, कामाला) सुरुवात करणे. तोंड पाहणे – १. (एखाद्याच्या) आश्रयाची, मदतीची अपेक्षा करून असणे. २. (एखाद्याने) स्वतःच्या शक्तीचा, कर्तृत्वाचा अजमास करणे. ३. बोलणाऱ्याचे आपण नुसते ऐकणे, सांगेल तसे न करता स्वस्थ बसणे. तोंड पाहात बसणे – काय व कसे करावे या विंवचनेत पडणे. तोंड पिटणे – बडबड करणे : ‘तैशी न करी बडबड ।... वृथा तोंड पिटीना ।’ – एभा १०·२३१. तोंड फिरणे – १. आजाराने, पदार्थाच्या अधिक सेवनाने तोंडाची रुची नाहीशी होणे. २. तोंडातून शिव्यांचा वर्षाव होऊ लागणे. तोंड फिरविणे – १. (वितळत असलेला किंवा तापविला जात असलेला धातू इ.ने) रंगामध्ये फरक दाखवणे; रंग पालटणे. २. दुर्लक्ष, अवमान करणे. ३. गतीची दिशा बदलणे; दुसऱ्या दिशेला, माघारे वळणे. तोंड फुटणे – १. फजिती उडणे; पत नाहीशी होणे; नाचक्की होणे; अभिमानाला मोठा धक्का लागण्याजोगा अपमान, शिक्षा होणे. २. सुरुवात होणे (युद्ध, भांडण इ.ला). तोंड बंद करणे, तोंड बांधणे – १. जपून बोलणे. २. (एखाद्याला) लाच देऊन गप्प बसवणे, वश करून घेणे. तोंड बंदावर राखणे – खाण्याला किंवा बोलण्याला आळा घालणे. तोंड बाहेर काढणे – १. राजरोसपणे समाजात हिंडणे. २. फिरण्यासाठी, कामासाठी बाहेर पडणे. तोंड बिघडणे – तोंड बेचव होणे; तोंडाला अरुची उत्पन्न होणे. तोंड भर बोलणे, तोंड भरून बोलणे – भीड, संकोच, भीती न धरता मनमोकळेपणाने भरपूर, अघळपघळ बोलणे. तोंड मागणे – (आट्यापाट्यांचा खेळ) लोण घेऊन परत जाताना पाटीवरील गड्याला आपणाकडे तोंड फिरवायला सांगणे. तोंड माजणे – १. मिष्टान्न खाण्याची चटक लागल्याने साध्या पदार्थाबद्दल अरुची वाटणे. २. शिव्या देण्याची, फटकळपणे बोलण्याची खोड लागणे. तोंड मारनं – १. शब्द देणे. २. आपले म्हणणे सांगणे. तोंड मिचकणे – दात, ओठ खाणे. तोंड येणे – १. तोंडाच्या आतल्या बाजूने त्वचेला फोड येऊन ती हुळहुळी होणे व लाळ गळणे. २. लहान मूल बोलू लागणे. (कर.) तोंड रंगविणे – १. विडा खाऊन ओठ तांबडेलाल करून घेणे. २. एखाद्याने थोबाड थोबाडात मारून रंगवणे. तोंड लागणे – (लढाई, वादविवाद, अंगीकृत कार्य इ.ना) सुरुवात होणे. तोंड वर करून बोलणे – निर्लज्जपणे, आपला दर्जा, पायरी सोडून बोलणे. तोंड वाईट करणे, तोंड वाईट होणे – निराशेची मुद्रा धारण करणे. तोंड वाकडे करणे – १. वेडावून दाखवणे. २. नापसंती दर्शवणे. तोंड वाजविणे – एकसारखे बोलणे; निरर्थक बडबड, बकबक, वटवट करणे; भांडणे. तोंड वासणे – १. निराशेने, दुःखाने तोंड उघडणे व ते बराच वेळ तसेच राहणे. २. याचनेसाठी तोंड उघडणे, वेंगाडणे. तोंड वासून पडणे – शक्तीच्या क्षीणतेमुळे, उत्साह, तेज वगैरे नष्ट झाल्यामुळे, गतप्राण झाल्यामुळे आ पसरून पडणे. तोंड वासून बोलणे – अविचाराने बोलणे : ‘ऐसें स्वसख्यांपासीं कां गे वदलीस तोंड वासन ।’ – मोउद्योग १३·२०५. तोंड शिवले जाणे – एक शब्दही न बोलणे. तोंड शेणासारखे पडणे – (लाजिरवाणे कृत्य केल्याने) तोंड उतरणे, निस्तेज होणे, काळवंडणे. तोंड सांभाळणे – जपून बोलणे; जीभ आवरणे; मर्यादेत बोलणे. तोंड सुटणे, तोंड सोडणे, तोंड सुरू होणे; तोंडाचा तोफखाना सोडणे, तोंडाचा पट्टा सुटणे, तोंडाचा पट्टा सोडणे – अद्वातद्वा बोलणे; शिव्यांचा भडिमार करणे; जीभ मोकळी सोडणे. तोंड सोडणे – अधाशासारखे खाणे. तोंडचा गोड आणि हातचा जड – बोलण्यात गोड, पण प्रत्यक्ष पैशाची इ.मदत करण्यात मागे. तोंडचा घास काढणे, हिरावणे – अगदी आटोक्यात आलेली, जवळजवळ मिळालेली गोष्ट हिसकावली जाणे. तोंडचा घास देणे – एखाद्याला अतिशय प्रेमाने वागवणे; आपली गरज मागे सारून दुसऱ्याची गरज प्रथम भागवणे. तोंडनी भांडी करनं – निष्फळ बोलणे; निरर्थक बडबड करणे. तोंडाचा हुक्का होणे – तोंड सुकून जाणे. (व.) तोंडाची वाफ दवडणे – १. मूर्खाला उपदेश करणे. २. विश्वास न बसण्याजोगे, मूर्खपणाने बोलणे; वल्गना करणे; बाता मारणे. तोंडाचे बोळके होणे – म्हातारपणामुळे सर्व दात पडणे. तोंडाचे भदे करणे – शिवीगाळ करणे. तोंडाचे माडे करणे – थाप्पा मारणे. तोंडात जडणे – थोबाडीत, गालात बसणे. तोंडात तीळ न भिजणे; तीळभर न राहणे – अगदी क्षुद्र अशी गुप्त गोष्टही पोटात न ठरणे, न सांगता न राहवणे. तोंडात तोंड घालणे – १. प्रेम, मैत्री इ. भावांनी वागणे; मोठ्या प्रेमाचा आव आणणे. २. परस्परांचे चुंबन घेणे. तोंडात बोट घालणे – आश्चर्यचकित, थक्क, विस्मित होणे. तोंडात, भडकावणे, देणे – थोबाडीत, चपराक, गालात मारणे. तोंडात माती घालणे – खायला अन्न नसणे; अतिशय हाल, कष्ट सोसावे लागणे. तोंडात माती पडणे, जाणे – १. एखाद्याची उपासमार होणे. २. मरणे. तोंडात मारणे, मारून घेणे – १. पराभूत होणे; हार जाणे. २. फजिती झाल्यानंतर शहाणपणा शिकणे; नुकसान सोसून धडा शिकणे. तोंडात शेण, साखर घालणे – फजिती करणे; नावे ठेवणे : ‘सावित्रीबाईंच्या तोंडात लोक जेव्हां फारच साखर घालीत, तेव्हा तिने दोन–तीन जुनेरी एकत्र शिवून जानकीबाईंना द्यावी.’ – रंगराव. तोंडात साखर असणे – एखाद्याचे तोंड म्हणजे वाणी, बोलणे गोड असणे. (गो.) तोंडात साखर पडणे – आनंदाचा प्रसंग, दिवस येणे. तोंडातून ब्र काढणे – अधिक–उणे अक्षर काढणे, उच्चारणे. नकारात्मक उपयोग. तोंडाने पाप भरणे, तोंडे पाप घेणे – लोकांची पापे, त्यांचे दोष बोलून दाखवणे; वाईट बोलण्याची हौस यथेच्छ पुरवून घेणे; लोकांची पापे उच्चारून जिव्हा विटाळणे : ‘कैसीं वो मानुसें । सपाइनि परंवंसें । तोंडे पाप घेती कांइसें । वायां वीण ।’ – शिव २१६. तोंडापुरता मांडा – (भूक भागेल एवढीच पोळी) जेमतेम गरज भागेल एवढाच जरूर त्या वस्तूचा पुरवठा. तोंडाम्हा मुतनं – गरजेला, संकटात मदतीस न येणे. (अहि.) तोंडार पडप – १. वैधव्य प्राप्त होणे. २. लाजेने तोंड लपवण्याजोगी स्थिती येणे. तोंडार मारप – एखाद्याच्या पदरात चूक बांधणे; वरमण्यासारखे उत्तर देणे. (गो.) तोंडार ल्हायो उडप – (तोंडात लाह्या फुटणे) फार जलद, अस्खलित बोलणे. तोंडाला काळोखी आणणे, फासणे, लावणे – बेअब्रु, नापत करणे. तोंडाला टाकी दिलेली असणे – देवीच्या खोल वणांनी तोंड भरलेले असणे. तोंडाला पाणी सुटणे – एखादी वस्तू पाहून तिच्यासंबंधी मोह उत्पन्न होणे; हाव सुटणे. तोंडाला पाने पुसणे – फसवणे; चकवणे; छकवणे; भोळसावणे; भोंदणे. तोंडाला फाटा फुटणे – मूळ मुद्दा सोडून भलतेच, हवे तसे, अमर्याद बोलत सुटणे. तोंडावर तुकडा टाकणे – एखाद्याने गप्प बसावे, प्रतिकूल बोलू नये म्हणून त्याला काहीतरी देणे. तोंड तोंडावर, तोंडाला तोंड देणे – १. विरोध करणे; विरुद्ध बोलणे. २. उद्धटपणाने, अविनयाने, दांडगेपणाने प्रत्युत्तर देणे. तोंडावर, तोंडाला तोंड पडणे – दोघांची गाठ पडून बोलाचाल, वाद होणे. तोंडावर थुंकणे – एखाद्याची छीः थू, निर्भर्त्सना, धिक्कार करणे. तोंडावर नक्षत्र पडणे – (एखाद्याने) तोंडाळपणा करणे; शिवराळ असणे; नेहमी अपशब्दांनी तोंड भरलेले असणे. तोंडावर मारणे – पराभूत करणे. तोंडावर सांगणे, बोलणे – एखाद्याच्या समक्ष निर्भीडपणे खरे सांगणे. तोंडावर, तोंडावरून हात फिरवणे – गोड बोलून, फूस लावून, भूलथाप देऊन फसवणे; भोंदणे. तोंडाशी तोंड देणे – हलक्या दर्जाच्या व्यक्तीने वरिष्ठांशी आपला दर्जा विसरून, बरोबरीच्या नात्याने, अविनयाने बोलणे, वागणे. तोंडास काळोखी, काजळी लागणे, लावणे – बेअब्रू, नाचक्की, दुष्कीर्ती होणे; नावाला कलंक, बट्टा लागणे. तोंडास कुत्रे बांधलेले असणे – ताळतंत्र सोडून, अद्वातद्वा, अपशब्द बोलणे; शिव्या देणे. तोंडास खीळ घालणे – निग्रहपूर्वक, हट्टाने मौन धरणे. तोंडास तोंड न दिसणे – तोंड न ओळखता येण्याइतका अंधार असणे. तोंडास येईल ते बोलणे, तोंडाला फाटा फुटणे – वाट्टेल तसे बोलणे. तोंडास, तोंडाला, तोंडी लागणे – उलट उत्तरे देणे; हुज्जत घालणे; वादविवादाला तयार होणे. तोंडास हळद लागणे – एखाद्याला दोष देणे; नापसंती दर्शवणे. तोंडासारखे बोलणे – एखाद्याची स्तुती, खुशामत करण्यासाठी त्याच्या म्हणण्याची री ओढणे; आपल्या फायद्यासाठी दुसऱ्याचे मन न दुखावेल असे बोलणे. तोंडी आणणे, देणे – रोग्याला लाळ गळण्याचे, तोंड येण्याचे औषध देऊन तोंड आणणे. तोंडी काढणे – १. ओकारी, वांती होणे. २. (एखाद्याला त्याने) केलेले उपकार बोलून दाखवून टोमणा मारणे. तोंडी खीळ पडणे – तोंड बंद होणे; गप्प बसायला भाग पडणे. तोंडी घास येणे – एखाद्याला घासभर अन्न मिळणे; चरितार्थाचे साधन मिळणे; पोटापाण्याची व्यवस्था होणे. तोंडी तीळ न भिजणे – १. (तापाने, संतापून ओरडण्याने, रडण्याने) तोंड कोरडे पडणे. २. एखादी गुप्त गोष्ट मनात न ठेवणे, बोलून टाकणे. तोंडी देणे – एखाद्याला एखाद्या माणसाच्या, कठीण कार्याच्या झपाट्यात, तडाख्यात, तावडीत हाल, दुःख सोसायला लोटणे, पुढे करणे. तोंडी बसणे – श्लोक, शब्द इ. स्पष्ट, अचूक म्हणता येण्याइतका पाठ होणे. तोंडी येऊन बुडणे, नासणे – एखादी वस्तू, पीक, काम इ. अगदी पूर्णावस्थेला येऊन नाहीसे होणे. तोंडी येणे – १. (पारा इ. औषधाने) तोंड येणे. २. पूर्णावस्थेत, ऐन भरात येणे. तोंडी रक्त लागणे – १. वाघ इ. हिंस्त्र प्राण्यांच्या तोंडाला माणसाच्या रक्ताची चटक लागून ते माणसावर टपून बसणे. २. लाच खाण्याची चटक लागणे. तोंडी लागणे – १. खाद्याची चव प्रथमच कळून त्याची चटक, गोडी लागणे; आवड उत्पन्न होणे. २. (युद्ध, भांडण इ. मध्ये) आणीबाणीच्या ठिकाणी आघाडीला असणे. ३. पहा : तोंडाला तोंड देणे. ४. पहा : तोंडास लागणे. तोंडी लावणे – १. जेवताना भाजी, चटणी इ. चमचमीत पदार्थाने रुचिपालट करणे. २. विसारादाखल पैसे देणे. तोंडे वाकडी करणे – वेडावणे; वेडावून दाखवणे. लहान तोंडी मोठा घास घेणे – १. आपल्या आवाक्याबाहेरचे काम हाती घेणे. २. वडीलधाऱ्या माणसांसमोर न शोभेल असे, मर्यादा सोडून, बेअदबीने बोलणे; मोठ्या माणसाला शहाणपण शिकवणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अब्बस

स्त्री. निर्भर्त्सना; फजीती; अपमान. (क्रि॰ करणें). 'अब्बस केली.' = फजीती केली. [अबे किंवा अब् + बस = आतांपुरे]

दाते शब्दकोश

अब्बस      

स्त्री.       निर्भर्त्सना; फजिती; अपमान. (क्रि. करणे).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आब्बस      

निर्भर्त्सना; फजिती; अपमान. आब्रह्म      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चरबट      

वि.       १. ओबडधोबड; खरखरीत; चरचरीत : ‘फरशांचा पृष्ठभाग साधारण चरबट माठीव असावा.’ – तप ५५. २. जिभेला चरचरीत कठीण लागणारा (खाद्यपदार्थ). ३. तीव्र; तीक्ष्ण (धार, अपशब्द, निंदा, निर्भर्त्सना). ४. (ल.) हिकमती; शहाणा; कल्पक; वाचाळ; धूर्त : ‘नेणती वऱ्हाडिणी चरबटा ।’ – एरुस्व १४·५९. ५. (ल.) बेचव, चव न समजणारी (जीभ). [सं. चर्ब, चर्बट]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घसरपट्टी

स्त्री. १ (ग्राम्य) खरडपट्टी; बेमुर्वतपणें केलेली निर्भर्त्सना; खरड; बोडंती. (क्रि॰ काढणें; निघणें); २ जड्याचें, जडावाचें काम करावयाचें एक हत्यार. -शर.

दाते शब्दकोश

घसरपट्टी      

स्त्री.       खरडपट्टी; बेमुर्वतपणे केलेली निर्भर्त्सना; खरड; बोडंती. (क्रि. काढणे, निघणे.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जमालगोटा      

पु.       १. जयपाळचे बी. याने शौचास साफ होते : ‘जयपाळ या वासनाला ‘जमालगोटा’ असेही म्हणतात.’ − वसू ८१६. २. (ल.) कडक शब्दांत हजेरी घेणे; निर्भर्त्सना करणे. (क्रि. देणे.) (व.) [फा.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जुगुप्सा      

स्त्री.        निंदा; वीट; निर्भर्त्सना; दोष देणे, लावणे. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जुगुप्सा

स्त्री. निंदा; निर्भर्त्सना; दोष देणें, लावणें. [सं.] जुगुप्सित-वि. निंदलेलें; दोष दिलेलें; तिरस्कृत. [सं.] ॰दृष्टि- स्त्री. (नृत्य) डोळ्याचा मध्यभाग व पापण्या आकुंचित करणें. हा भाव जुगुप्साद्योतक आहे.

दाते शब्दकोश

झाडणें

उक्रि. १ (केरसुणी इ॰ नीं) केरकचरा काढून साफ करणें; जागा निर्मळ करणें. २ हसडणें; झटकणें; झटक्यानें हलविणें (ओलें वस्त्र, शेंडी इ॰); (हात, पाय, डोकें इ. कांस) झटका देणें. 'झाडितां आपला हात । तंव आंगासि असे जडित ।' -परमा १०.१९. ३ लोटून देणें. 'त्यांतें उडोनि झाडी झाले ते चूर्ण जेविं नगपातें ।' -मोवन १२.२९. ४ काढून टाकणें; नाहींसें करणें. 'लोक पारखुन सोडावे । राजकारणें अभिमान झाडावे ।' -दा ११. ५ (विस्तव इ॰ कांस) पंख्यानें वारा घालणें; झड- पणें. ६ खरडपट्टी काढणें; खडसावणें; निर्भर्त्सना करणें. 'बाळूला आणि नंद्याला लक्ष्मीकाकूंनीं चांगलेंच झाडलें.' -सुदे ५२. ७ (मागणाराचा, भिकार्‍याचा) निषेध करणें; मनाई करणें; साफ नाकारणें; बंदी करणें. 'अंतींच स्मरावें श्रीरामराम । ऐसा कितेका जडला भ्रम । असो गृहस्थानें भजनप्रेम पाहोनि मस्तक झाडिला ।'-दावि २०२. ८ (सरकार, सावकार इ॰ कांची) बाकी काढून टाकणें; देणें बेबाक करणें. 'धन्याची बाकी हळु हळु झाडा ।' -भज १३४. ९ (अंगातील भूत, पिशाच इ॰) काढणें; हाकलून लावणें. १० (बंदूक इ॰) उडविणें; गोळी मारणें. -अक्रि. (बंदूक इ॰ कांनीं उडतांना हात इ॰ अवयवास) हिसडा, झटका देणें. [सं. झाटन; प्रा. झाडण; हिं. झाडना; जुका. झडिसु = टाकणें, फेंकणें; झाडणें = केरसुणी; फेकणें] ॰झट- कणें-उक्रि. केरसुणी इ॰ कानीं झाडून, फटके देऊन, धूळ उडवून साफ करणें, निर्मल करणें. झाडझपट-झटक-स्त्री. १ (व्यापक) धूळ, केर इ॰ काढण्याचा, झाडण्याचा, झटकण्याचा व्यापार; झाड- झूड; सडासंमर्जन. २ (ल.) (व्यापक.) चोरीच्या म्हणून समजल्या जाणार्‍या लुबाडणें लुटणें इ॰ सर्व क्रिया. 'त्यानें आजपावेतों झाडझपट करून पोट भरलें.' ३ लुटालूट; धूळधाण; दाणादाण. 'पेंढार्‍यांनीं त्या गांवांत जाऊन झाडझपट केली.' [झाडणें + झपाटणें] झाडझुड-स्त्री. झाडझपट अर्थ १ पहा. 'माझी झाड- झूड होईतों तूं पाणी घेऊन ये.' [झाडणें द्वि.] झाडपट्टी- स्त्री. १ जमीनीचा सारा किंवा घरपट्टी याबद्दलची बाकी चुकती करण्याची अखेरची मागणी. २ (उप.) खरडपट्टी; खडसावणी; बोडंती. (क्रि॰ करणें). [झाडणें + पट्टी = कर] झाडपाखड-स्त्री. १ (धान्य इ॰) सुपानें पाखडण्याची, झटकण्याची, साफ कर- ण्याची क्रिया. २ (ल.) कवडीकवडीचा हिशोब देणें-घेणें. [झाडणें + पाखडणें] झाडपि(पी)ड-स्त्री. झाडझूड; झाडलोट. 'झाडपीडी करूनि मानऊं संताला ।' -दावि ३५३. [झाडणें द्वि.] झाड- पिड्या-वि. देऊळ, मंदिर इ॰ कांची झाडझूड, साफसूफ करणारा. [झाडपिड] झाडपोतें-न. कर्जफेडीचा शेवटचा हप्ता. [झाडणें + पोतें] झाडफूक स्त्री. (ना.) अंगारा; धुपारा; मांत्रिकाकडून करवयाचा मंत्रोपचार. (क्रि॰ करणें). [झाडणें + फुंकणें] झाड- फेड-स्त्री. (राजा.) झाडझूड; झाडलोट. [झाडणें + फेडणें] झाड- बाकी-स्त्री. १ (कर्ज, अन्नसामुग्री इ॰ कांची) पूर्ण निःशेषता; बेबाक; निरानिपटा. २ कर्जफेडीचा शेवटचा हप्ता. (क्रि॰ करून टाकणें; करणें). [झाडणें + बाकी] झाडलोट-स्त्री. केर काढणें, सारवणें इ॰; झाडझूड. [झाडणें + लोटणें] झाडलोट्या-वि. झाड- लोट करणारा. -मसाप २.४.३९७. [झाडलोट] झाडवण-स्त्रीन. झाडण्याची क्रिया. -पु. (काव्य.) १ झाडणारा. 'चोखामेळा म्हणे मी तुमचा । झाडवण साचा म्हणवितों ।' २ केरसुणी; झाडू. [झाडणें; प्रा. झाडवण] झाडसारव, झाडवणसारवण, झाडसारवण-स्त्री. (समुच्चयानें); (घर इ॰) झाडणें व शेणानें सारवणें इ॰ क्रिया; साफसुफी. 'झाडसारवण...वगैरे...करतांना त्यांचीं अंगें उकिरड्यासारखीं होत असतील यांत काय नवल !' -नाकु ३.९. [झाडणें + सारवणें] झाडून-क्रिवि. एकंदर सर्व; यच्चयावत्; एकूणएक; एकहि न वगळतां. 'यदुसचिव पौरमुख्य द्रुत आणविले सभेंत झाडूनी ।' -मोमौसल २.२९. -पया ७९. [झाडणें]

दाते शब्दकोश

झाडणी      

स्त्री.       १. झाडण; केरसुणी : ‘चित्तीं म्हणे नृप अहा चवरी ती झाडणीचं कीं केली ।’ – मोआदि १२·७८. २. झाडणे; झाडून, झटकून टाकणे. ३. अंगातील भूत, पिशाच्च इ. मंत्रतंत्रांनी काढणे; पिशाच्च, विष, डोळ्यातील फूल इ. काढण्याकरता मांत्रिक करतात तो टाहाळ टाकण्याचा विधी; हकालपट्टी : ‘अहंमहिषासुर लागला जनीं । त्यासि करावया झाडणी । कृष्ण गुणी चालिला ।’ – एभा ७·२०८. ४. (ल.) रागे भरणे; कानउघाडणी; खरडपट्टी; खडसावणी; निर्भर्त्सना. ५. गर्भपात : ‘मला दिवस गेलेत; झाडणी करायची का?’ – राकाघाका १. [सं. झाटन; त. शोदनि]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

झाडणी

स्त्री. १ (खा. कों.) झाडण; केरसुणी. 'चित्तीं म्हणे नृप अहा चवरी ती झाडणीच कीं केली ।' -मोआदि १२.७८. २ झाडणें; झाडून, झटकून टाकणें. ३ अंगांतील भूत, पिशाच्च इ॰ मंत्रतंत्रांनीं काढणें; पिशाच, विष, डोळ्यांतील फूल इ॰ काढण्या- करितां मांत्रिक करतात तो टाहाळ टाकण्याचा विधि; हकालपट्टी. 'अहंमहिषासुर लागला जनीं । त्यासि करावया झाडणी । कृष्ण गुणी चालिला ।' -एभा ७.२०८. ४ (ल.) रागें भरणें; कानउघा- डणी; खरडपट्टी; खडसावणी; निर्भर्त्सना. [सं. झाटन; प्रा. झाडण]

दाते शब्दकोश

झवाडणे      

सक्रि.       (अशिष्ट) शिव्या देऊन खरडपट्टी काढणे; निर्भर्त्सना करणे; अभद्र बोलणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

झवरपट्टी, झवाडपट्टी      

स्त्री.       (अशिष्ट) एखाद्याची भरमसाठ शिव्या देऊन केलेली निर्भर्त्सना; खरडपट्टी; घाणेरड्या शिव्या देणे. (क्रि. काढणे.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कठिनोत्तर      

न.       दुर्भाषण; शिवीगाळ; निर्भर्त्सना. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कठिण-ठीण-न

वि. १ अवघड; अशक्यप्राय; दुष्कर. २ संकटपूर्ण; आपद्ग्रस्त; कष्टप्रद (गोष्ट, बनाव, प्रसंग). 'कठिण समय येतां कोण कामासि येतो.' -र १०. ३ घट्ट; बळकट; टणक; नरम नव्हे असें; जें तोडण्यास बळ लागतें असें. 'लोखंड कठिण असतें.' ४ करण्यास वाईट 'ही गोष्ट (चोरी) कठिण आहे !' ५ दुःखप्रद; सोसण्यास अवघड; जिवावरचें; मरणप्राय (आजार, रोग, स्थिती). ६ क्रूर; कठोर; दयाशून्य (माणूस, कृत्य). ७ मनास लागेल असें; कडक; कठोर (शब्द, भाषण). 'आपले झांकी अवगुण । पुढिलास बोले कठिण ।' -दा ५.३.९२. 'वचन जयाचें कठिण । तो येक पढतमूर्ख ।।' -दा २.१०.११. ८ समजण्यास अवघड (ग्रंथ, अभ्यास, व्यवहार). [सं. कठिन; गु. सिं. कठण; पं. कटण-न] ॰वाटणें-अवघड वाटणें; दुःख होणें. -नोत्तर-न. (काव्य) दुर्भाषण; शिवीगाळ; निर्भर्त्सना. 'म्हणोनि भांडे दिवस रात्र । कठिनोत्तर बोलत ।' [कठिण + उत्तर] ॰मर्जी-स्त्री. गैरमर्जी; इतराजी. ॰वर्ण-पु. ट वर्ग आणि जोडाक्षरें.

दाते शब्दकोश

खिसखिस, खिसखीस      

स्त्री.       जिकीर; कटकट; चिरडखोरपणाचा आक्षेप; निंदा; निर्भर्त्सना; खरडपट्टी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खरड      

स्त्री.       १. घाईघाईने लिहिलेला कागद अथवा लेख, आकृती, खर्डा, आराखडा. २. रेघोट्या; चिरखुड्या. ३. खरडपट्टी; पाणउतारा; निर्भर्त्सना. (क्रि. काढणे, निघणे.) ४. धातू शुद्ध करताना तिच्याभोवती जमणारी राख व माती (ही धातूपासून खरडून काढलेली असते म्हणून हा शब्द); खरडून काढलेला भाग. ५. टक्कल. (गो.) ६. केसात साचणारा मळ. (गो.) [सं. क्षर]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खरडी      

स्त्री.       १. जोराची खरडपट्टी; निर्भर्त्सना. (क्रि. काढणे, निघणे.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खरडपट्टी      

स्त्री.       १. पहा : खरड. कठोर निर्भर्त्सना; दटावणी; जोराची चापणी; बोडंती; भोसडपट्टी; दोष किंवा अपराध दाखवून रागाने झाडलेला ताशेरा. (क्रि. काढणे, निघणे.) २. तोटा, नुकसान सोसावयास लावणे. (क्रि. काढणे, निघणे.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खरवड

स्त्री. १ पदार्थ शिजत अगर आटत असतां तळाला कठिण झालेला आणि भांड्यांस चिकटून राहिलेला खरडा, जळ- कट भाग; (भाताचा, तुपाचा, दुधाचा); खरपुडी. ‘भ्रतारासी करी झगडा । तया घाली खरवडी कोंडा ।’ –कथा ५.२४९. २ अशा रीतीनें चिकटून राहिलेला आणि खरडून निघण्याजोगा भात. म्ह॰ कामाला भरावें खरवडीला जपावें = १ कामाला चुकार पण खाण्याला अखेरपर्यंत. किंवा २ खूप काम करून शक्य तों काट- कसर करावी (उद्योगीपणा आणि काटकसर असावी). २ (ल.) खरडपट्टी; निर्भर्त्सना; ताशेरा; बोडंती. (क्रि॰. काढणें). ‘ह्याची म्यां भली खरवड काढली.’ ३ (ल.) संप- त्तीचा शेष; किडुकमिडूक; गडगंज जाऊन उरलेला अवशेष. ४ निकृष्टता दाखविण्यासाठीं उपहासानें योजतात. उदा॰ ‘मोठा बेटा शहाण्याची खरवड-गाणाराची खरवड.’ ५ (निंदाव्यंजक). अर्क; गाळ; अतिशय खोडसाळ, त्रासदायक माणूस. ‘तो सर्व गांवाची खरवड आहे.’ ६ (कु.) नारळाची खव, खरड. [सं. खरवृत्त; म. खरडणें; किंवा प्रा. खरड = लेपणें, लपेटणें] घराची खरवड-खराब, पडकें; मोडकें गैरसोयीचें घर. (अशा मोडक्या घरास तुच्छतेनें म्हणतात). ‘मेलं घर आहे कां घराची खरवड !’ –फाटक नाट्यछटा ३.

दाते शब्दकोश

खरवड, खरवडी      

स्त्री.       १. पदार्थ शिजत अगर आटत असता तळाला कठीण झालेला आणि भांड्यांना चिकटून राहिलेला खरडा, जळकट भाग (भाताचा, तुपाचा, दुधाचा); खरपुडी : ‘भ्रतारासी करी झगडा । तया घाली खरवडी कोंडा ।’ - कथा ५. २४९. २. अशा रीतीने चिकटून राहिलेला आणि खरडून निघण्याजोगा भात. ३. (ल.) खरडपट्टी; निर्भर्त्सना; ताशेरा; बोडंती. (क्रि. काढणे.) ४. (ल.) संपत्तीचा शेष; किडुकमिडूक; गडगंज जाऊन उरलेला अवशेष. ५. निकृष्टता दाखवण्यासाठी उपहासाने योजतात. ६. (निंदाव्यंजक) अर्क; गाळ; अतिशय खोडसाळ, त्रासदायक माणूस. ७. नारळाची खव, खरड. (कु.) [सं. खरवृत्त]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

मुरदाडणें

सक्रि. मुरदाडाप्रमाणें वागविणें; उपहास करणें; निर्भर्त्सना करणें; कमी लेखणें; हंसून तिरस्कार करणें. [मुरदाड]

दाते शब्दकोश

निभर्षिणे      

क्रि.       टाकून बोलणे. [सं. निर्भर्त्सना]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निखारा

पु. जिवंत-जळणारा पेटलेला कोळसा; विस्तव; इंगळ; अंगार. म्ह॰ आपल्या पोळीवर निखारे कोण न ओढी? ॰देणें-उपाशी राहणें; भूक मारणें; पोटांतील भुकेची आग न शमविणें; भुकेस न गणतां न खातां राहणें, 'आज तिसरा प्रहरपर्यंत निखारा दिला नंतर जेवलों.' ॰घरावर ठेवणें-१ एखाद्याचीं दुष्कर्में बाहेर काढून निर्भर्त्सना करणें. २ एखाद्याचें भयंकर नुक- सान करणें. निखाऱ्याचें करणें-जेवणें; खाणें; पोटांतील आगी- कडे लक्ष देणें.

दाते शब्दकोश

निखारा      

पु.       जिवंत, जळणारा, पेटलेला कोळसा; विस्तव; इंगळ; अंगार. (वा.) निखारा घरावर ठेवणे– १. एखाद्याची दुष्कर्मे बाहेर काढून निर्भर्त्सना करणे. २. एखाद्याचे भयंकर नुकसान करणे. निखारा देणे –उपाशी राहणे; भूक मारणे; भूक न शमणे. निखाऱ्याचे करणे–जेवणे; खाणे; पोटातील आगीकडे लक्ष देणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निंदा      

स्त्री.       दोषवर्णन; कुटाळी; निर्भर्त्सना; अवगुण सांगणे; शिव्या देणे; दोषारोप करणे; चहाडी. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निंदक, निंदखोर

वि. निंदा करणारा; दोषारोप करणारा; दुसर्‍याचे अवगुण सांगणारा; चहाडखोर. निंदणें-सक्रि. निंदा करणें; चहाडी करणें; दोष वर्णन करणें. निंदन-न. निंदा पहा. निंदनीय-वि. निंदा करण्यास योग्य; निंद्य; निंदेस पात्र. निंदा-स्त्री. दोषवर्णन; कुटाळी; निभर्त्सना; अवगुण सांगणें; शिव्या देणें; दोषारोप करणें; चहाडी. [सं.] ॰परस्तुति- फलकस्तुति वाक्य-उपरोधिक भाषण; व्याजोक्ति; स्तुतीचा खोटा बहाणा करून केलेली निंदा. निंदाखोर-खाऊ-वि. निंदक पहा. निंदित-वि. १ निंदा, निर्भर्त्सना केलेला; दोष दिलेला. २ शास्त्रांनीं निषिद्ध मानिलेला; असमंत. निदेजणें-सक्रि. निंदा करणें. -शर (चांगदेव, पासष्टी ६५.) निंद्य-वि. निंदेस पात्र; निंदनीय; दुषणीय; दोषयुक्त.

दाते शब्दकोश

निर्भर्त्सन

निर्भर्त्सन n निर्भर्त्सना f Abusing, cursing.

वझे शब्दकोश

निर्भर्त्सन nirbhartsana n S निर्भर्त्सना f (S) Treating with contumely and indignity; reviling, abusing, cursing.

मोल्सवर्थ शब्दकोश

निर्भर्त्सणें

निर्भर्त्सणें nirbhartsaṇēṃ v c (Poetry. निर्भर्त्सना) To revile, reproach, abuse.

मोल्सवर्थ शब्दकोश

उक्रि. १ निंदा करणें; दोष लावणें. २ तिरस्कार, उपहास, अवहेलना करणें. [सं. निर्भर्त्सना] निर्भर्त्सन-ना-न. स्त्री. निंदा; उपहास; पाणउतारा; गालिप्रदान. निर्भर्त्सित-वि. फजीत केलेला; उपहासित; निंदित; तिरस्कृत.

दाते शब्दकोश

शपणें

क्रि. शाप देणे; शापणें. [सं. शप्] शपित, शप्त-वि. १ शापित; शापलेलें. २ निर्भर्त्सना केलेलें; निंदित. [सं.] शपत, शंपत, शफत-स्त्रीपु. शपथ पहा. शपूथ शप्पथ-(गो.) शपथ. 'शप्पथ खरें सांगेन.'

दाते शब्दकोश

टा(टां)प

स्त्री. १ घोड्याच्या पुढील पायाचा होणारा टट्टट् असा आघात; घोड्यानें मागील पायानें मारलेली लाथ; त्याचा तळ पाय. (क्रि॰ मारणें). २ बोटांच्या पेर्‍यांनीं डोक्यावर मारलेली टिचकी. (क्रि॰ मारणें). ३ मर्मभेदक टीका; टोमणा; निर्भर्त्सना. (क्रि॰ मारणें). ४ छाट; तासणी. (क्रि॰ मारणें). ५ आई जवळ नसतांना लहान मुलांने घेतलेली खंत, ध्यास, तळमळ. (क्रि॰ करणें; घेणें). ६ भाजीचें लहान झाड; तशा झाडाचा खुंटलेला अग्रभाग. ७ -पु लेखांत खुणेसाठीं केलेलें रेषादिरूप चिन्ह. ८ (बे.) (वहाण, जोडा यांचें) टांचेचें कापून तयार केलेलें कातडें. टापे(फे)खालीं असणें- चालणें-राहणें-वागणें-एखाद्याच्या हुकुमांत, ताब्यांत असणें.

दाते शब्दकोश

टाप, टांप      

स्त्री.       १. घोड्याच्या पुढील पायाचा होणारा टट्‌टट्‌ असा आघात; घोड्याने मागील पायाने मारलेली लाथ; त्याचा तळपाय. (क्रि. मारणे). २. बोटांच्या पेरांनी डोक्यावर मारलेली टिचकी. ३. (ल.) मर्मभेदक टीका; टोमणा; निर्भर्त्सना. (क्रि. मारणे). ४. (वहाण, जोडा यांचे) टाचेचे कापून तयार केलेले कातडे. (बे.) [सं. स्तप्, स्तभ्, स्थापय] (वा.) टाप करणे, टांप करणे – घोड्याने पुढील पायाने बडवणे. टाप खाजने, टांप खाजने – बडबड सुरू असणे. (व.) टापेखाली असणे, चालणे, राहणे, वागणे – एखाद्याच्या हुकुमात, ताब्यात असणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तासणे      

उक्रि.       १. (लाकूड इ.) वाकसाने तासून नीटनेटके करणे; रंधणे. २. जखमी करणे : ‘शरनिकरें पार्षतासि तो तासी ।’ – मो ३६·३३. ३. खरडून हजामत करणे; भादरणे. ४. (पत्र, हिशेब, यादी, अर्ज इ.) खरडून टाकणे; भरकटणे; फटकारणे; झपाटणे. ५. (एखाद्याची रागाने) निर्भर्त्सना करणे; खरडपट्टी काढणे; हजेरी घेणे; कानउघाडणी करणे. ६. (अंकगणित) भाजकाने भागून उरेल तो भाज्यांक राखणे. ७. (ल.) अपरोक्ष निंदा, कुचेष्टा करणे. ८. हातावर तुरी देणे. [सं. तक्ष्] (वा.) तासून निजणे, तासून बसणे–निश्चिंतपणे, आरामशीर, निर्वेधपणे स्वस्थ निजणे, बसणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तासणी

स्त्री. १ तासण्याची क्रिया. (लांकूड इ॰) रंधणे; तासणें; छिलणें इ॰. २ लांकूड तासण्याचें सुताराचें हत्यार; वाकस. ३ (ल.) बोडंती; डोकें भादरणें; खरडून खरडून हजामत करणें. ४ (ल.) खरडपट्टी, निर्भर्त्सना; पाणउतारा. [तासणें]

दाते शब्दकोश

तडकाविणें

सक्रि. १ कचकावून लगावणें; तडाका, रपाटा देणें; सडकावणें. 'मी त्याला चांगलाच तडकावला.' २ कडकडणें; कडकडून बोलणें. ३ निर्भर्त्सना करणें; खडसावणें; धमकावणें. [तडक]

दाते शब्दकोश

तडकावणे, तडकाविणे      

सक्रि.       १. कचकावून लगावणे; तडका, रपाटा देणे; सडकावणे. २. कडकडणे; कडकडून बोलणे. ३. निर्भर्त्सना करणे; खडसावणे; धमकावणे. [सं.तड्‌+कर्व]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तिटकण-न, तिटकारा

नपु. १ तुच्छता; अनादर; द्वेष- भाव; तिरस्कार. २ वीट; कंटाळा; नावड. [तिट !.; तिट + कन-कार; तुल॰ का.तिट्टू = निर्भर्त्सना]

दाते शब्दकोश

टर      

स्त्री.       फजिती; मानहानी; निर्भर्त्सना; उपहास; चेष्टा; टवाळी; हेटाळणी. (क्रि. उडविणे, करणे, उडणे, होणे.). [सं. तृह]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

टर

स्त्री. १ फजीती; निंदा; मानहानि; निर्भर्त्सना; उप- हास. २ निंदास्पद स्थिति; टेर. (क्रि॰ उडविणें; करणें; उडणें; होणें). ३ (हिं.) आग्रह; हट्ट. -मनको.

दाते शब्दकोश

तर्जन

न. १ निर्भर्त्सना; निंदा; हेटाळणी; दूषण टपका. २ दहशत; धाक. 'तीचें चिन्ह असें कीं तर्जन आणि ताडनादि जानवितें ।' -अकक २ गंगाधरकृत, रसकल्लोल ६३. [सं.]

दाते शब्दकोश

टवाळ, टवाळ्या, टवाळखोर, टवाळीखोर      

वि.       १. नेहमी निंदा करणारा; दोष काढणारा; निर्भर्त्सना, उपहास, कुचेष्टा करणारा; चटोर; टिंगलखोर; वाह्यात; वात्रट. २. उनाड; खोडकर; व्रात्य; चाळे किंवा खोड्या करणारा; दुर्गुणांनी परिपूर्ण (मूल). ३. चहाडखोर. ४. लटके; मिथ्या; निरर्थक : ‘तरी सांडी म्हणे आघवें । टवाळ हें ॥’ – ज्ञा १३·८१०. [क. टमाळ=कपटी; सं. ट्वल]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

टवाळ-ळ्या, टवाळ(ळी)खोर

वि. १ आळशी; उनाड; खोडकर; चाळे किंवा खोडया करणारा; दुर्गुणांनीं किंवा लुच्चेगि- र्‍यांनीं परिपूर्ण (मूल). २ नेहमीं निंदा करणारा; दोष काढणारा; निर्भर्त्सना, उपहास, चेष्टा करणारा; चटोर. ३ लटकें; मिथ्या; निरर्थक. 'तरी सांडी म्हणे आवघें । टवाळ हें ।' -ज्ञा १३.८१०.

दाते शब्दकोश

ठोठाविणें

सक्रि. भांड्याचा नाद पहाण्यासाठीं त्याच्यावर टिचक्या मारणें; दारावर थाप मारणें; (सोनारी) हातोडीनें ठोकणें; (कुंभारी) मडक्यावर थापटणें; (पत्यांचा खेळ) मोठें पान टाकून मारून घेणें किंवा झोडपून हात घेणें; दुसर्‍या बाजूचा पत्ता ठोकणें. २ (ल.) टोमणे मारणें; निर्भर्त्सना करणें; व्याजोक्तीनें बोलणें (वाईट किंवा कृष्ण कृत्यांबद्दल); जोरानें सांगणें. ३ ठो ! ठो ! आवाज करणें; खडबडविणें [ठो! ठो!]

दाते शब्दकोश

ठोठावणे, ठोठाविणे      

सक्रि.       १. दारावर थाप मारणे; भांड्याचा नाद पाहण्यासाठी त्याच्यावर टिचक्या मारणे; (सोनारी) हातोडीने ठोकणे; (कुंभारी) मडक्यावर थापटणे; (पत्त्यांचा खेळ) मोठे पान टाकून मारून घेणे किंवा झोडपून हात घेणे; दुसऱ्या बाजूचा पत्ता ठोकणे. २. (ल.) टोमणे मारणे; निर्भर्त्सना करणे; व्याजोक्तीने बोलणे (वाईट कृत्यांबद्दल); जोराने सांगणे. ३. ठो, ठो आवाज करणे; खडबडविणे. [सं. स्त्यायनम्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

थुथु

स्त्री. छीः थूः; उपहास; निर्भर्त्सना. (क्रि॰ करणें; मांडणें; लावणें; होणें; लागणें). [ध्व.]

दाते शब्दकोश

उभस्वना      

स्त्री.       निर्भर्त्सना; चारचौघांत फटफजिती; उपहास. (को.) [सं. उद्+भर्त्सन]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उभस्वना

स्त्री. (कों.) निर्भर्त्सना; चारचौघांत फटफजिती; उपहास. [सं. उद् + भर्त्सन]

दाते शब्दकोश

उखडंपट्टी      

स्त्री.       १. उचलबांगडी; हकालपट्टी. २. ताशेरा; भोसडपट्टी; हजेरी; रागावून बोलणे; निर्भर्त्सना. (व.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उखंडपट्टी

स्त्री. (व.) १ उचलबांगडी; हकालपट्टी. २ ताशेरा; भोसडपट्टी; हजेरी; रागावून बोलणें; निर्भर्त्सना. [उखडणें]

दाते शब्दकोश

उपहास

पु. १ थट्टा; चेष्टा; फजिती; छीः थूः; निंदा; अप- मान; निर्भर्त्सना. 'उरोधु वादुबाळु । प्रणितापाढाळु । उपहासु चाळु । वर्मस्पर्शु ।' ज्ञा १३.२७०. २ उपहास होतो अशी स्थिति; उप- हासक्षम अवस्था, योग्यता. [सं. उप + हस्]

दाते शब्दकोश

उपहास      

पु.       १. थट्टा; चेष्टा; फजिती; हसे; थू; निंदा; अपमान; निर्भर्त्सना : ‘विरोधु वादुबळु । प्राणितापढाळु । उपहासु चाळु । वर्मस्पर्शु ॥’ –ज्ञा १३·२७१. २. उपहास होतो अशी स्थिती; उपहासक्षम अवस्था, योग्यता. [सं. उप+हस्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

वैताग

पु. संताप, तिरस्कार यापासून वाटणारी विरक्ति; उद्वेग; वीट; त्यागबुद्धि (जग, जगांतील गोष्टी याविषयीं). (क्रि॰ घेणें; येणें). [सं. वै + त्याग] वैतागणें-अक्रि १ तिटकारा वाटणें; त्रासून जाणें. २ रागानें निर्भर्त्सना करून संबंध सोड- ण्याच्या गोष्टी बोलणें. वैतागून जाणें असा प्रयोग येतो.

दाते शब्दकोश

विभर्त्सना

स्त्री. निर्भर्त्सना पहा.

दाते शब्दकोश

तोंड

न. १ ज्यानें खातां वं बोलतां येतें तो शरीराचा अव- यव; मुख; वदन; तुंड. २ चेहरा; हनुवटीपासून डोक्यापर्यंत मस्तकाचा दर्शनी भाग. ३ (सामा.) (एखाद्या वस्तूचा) दर्शनी भाग; पुढचा-अग्रभाग; समोरील अंग. 'या ओझ्याच्या तोंडीं मात्र चांगल्या चांगल्या पेंढ्या घातल्या आहेत.' ४ (फोड, गळूं इ॰ कांचा) छिद्र पडावयाजोगा, छिद्रासारखा भाग; व्रणाचें मुख. यांतूनच पुढें पू, लस इ॰ वाहतात. ५ (कुपी, तपेली, लोटी इ॰ कांचें) पदार्थ आंत घालावयाचें भोंक; द्वार; मार्ग; मुख. ६ (एखाद्या विषयांत, शास्त्रांत, गांवांत, देशांत, घरांत) शिरकाव होण्याचा मार्ग; प्रवेशद्वार. 'ह्या घराचें तोंड उत्तरेस आहे.' ७ (ल.) गुरुकिल्ली. उदा॰ 'एखाद्या प्रांताचें, देशाचें किल्ला हें तोंड होय.' 'व्याकरण भाषेचें तोंड होय.' ८ (वारा इ॰कांची) दिशा; बाजू. ९ धैर्य; दम; उमेद; एखादें कार्य करण्याविषयींची न्यायतः योग्यता. १० एखाद्या पदार्थाचें ग्रहण किंवा त्या पदार्थाचा एखाद्या कर्याकडे विनियोग इ॰ कांचा आरंभ त्या पदार्थाच्या ज्या भागाकडून करि- तात तो भाग. 'भाकरीस जिकडून म्हटलें तिकडून तोंड आहे.' ११ (युद्ध, वादविवाद इ॰कांसारख्या गोष्टींची) प्रारंभदशा. 'वादास आतां कुठें तोंड लागलें.' १२ (सोनारी धंदा) हातोड्याच्या सगळ्यांत खालच्या बाजूस अडिश्रीच्या बुडासारखा जो भाग असतो तो. यानें ठोकलेला जिन्नस सारखा करून घेतात. १३ (सोनारी धंदा) कांबीस गोल आकार देतांनां तिचीं टोंकें जेथें जुळतात तो भाग. १४ (बुद्धिबळें) डाव सुरू करण्याचा प्रकार; मोहरा. 'वजीराच्या प्याद्याचें तोंड.' [सं. तुंड; प्रा. तोंड] (वाप्र.) ॰आटोपणें, सांभाळणें, आवरणें-जपून बोलणें; बोलण्याला आळा घालणें; अमर्याद भाषण, अभक्ष्यभक्षण यांपासून निवृत्त होणें. ॰आणणें- (आट्यापाट्यांचा खेळ) शेवटची पाटी खेळून जाऊन पुन्हां एक एक खेळत येणें; पाणी आणणें; लोण आणणें. ॰आंबट करणें- (एखाद्यानें) असंतुष्ट, निराशायुक्त मुद्रा धारण करणें. तोंड आहे कीं तोबरा-खादाड किंवा बडबड्या माणसास उद्देशून वापरावयाचा, 'किती खातोस' 'किती बोलतोस' या अर्थाचा वाक्प्रचार. ॰उतरणें-(निराशा, आजार इ॰ कांनीं) चेहरा म्लान होणें, सुकणें, फिका पडणें, निस्तेज होणें. ॰उष्टें करणें-(अन्नाचा) एखादा-दुसरा घांस, एक दोन घांस खाणें; जेवणाचें नुसतें नांव करणें. ॰करणें-बडबड, वटवट, बकबक करणें; उद्धटपणानें, निर्लज्ज- पणानें बोलणें. ॰करून बोलणें-निर्लज्जपणें, आपला (लहान) दर्जा सोडून बोलणें. ॰काळें करणें-(उप.) एखादा ठपका, तोहमत अंगावर आल्यामुळें निघून, पळून, निसटून जाणें; हातावर तुरी देणें; दृष्टीस न पडणें (केव्हां केव्हां तोंड हा शब्द वगळला तरी चालतो. जसें:-त्यांनीं काळें केलें). ॰गोड करणें-१ (एखाद्याला) लांच देणें; खूष करणें. २ मेजवानी देणें; गोड खावयास घालणें. ॰गोरेंमोरें करणें-(कोणी रागें भरल्यामुळें, मनास वाईट वाटल्यामुळें) निराशेची, लाजलेपणाची मुद्रा धारण करणें. ॰घालणें-(दोघे बोलत असतां तिसर्‍यानें) संबंध नसतां मध्येंच बोलणें. ॰घेऊन येणें-एखाद्यानें एखाद्यावर सोंपविलेलें काम न करतां त्यानें तसेंच परत येणें. 'असें सर्वांनीं न करावें. जो मामलेदार असें करून तोंड घेऊन येईल त्याचें मुखावलोकन न करितां फिरोन सेवा न सांगतां त्यास घरींच बसवावें.' -मराआ २९. ॰घेणें-१ बोंबलत सुटणें; ताशेरा झाडणें; बोंबलपट्टी करणें. २ तोंडांतून लाल गळावी म्हणून पारा इ॰ तोंड आणणारीं औषधें घेणें. तोंड देणें पहा. 'मी वैद्याकडून तोंड घेतलें आहें.' तोंडचा-वि. १ विरुद्ध, उलट दिशेचा; समोरून येणारा (वारा, ऊन, भरती इ॰). २ ज्याची कर्तबगारी केवळ तोंडांतच, बोल- ण्यांतच आहे, क्रियेंत दिसून येत नाहीं असा. 'तोंडचा शिपाई- कारकून-सुग्रण-खबरदार.' ३ तोंडानें सांगितलेला, निवेदन केलेला; तोंडीं केलेला (व्यवहार, हिशेब, पुरावा इ॰). याच्या उलट लेखी. तोंडचा, तोंडींचा घास काढणें-हिरून घेणें-१ (एखा- द्याची) अगदीं आटोक्यांत आलेली वस्तु, पदरीं पडावयास आलेला लाभ हिसकावून घेणें. २ (एखाद्याच्या) अन्नावर पाणी पाडणें; अन्नांत माती कालविणें; पोटावर पाय देणें. तोंडचा-तोंडींचा घांस देणें-(ल.) (एखाद्यास) अतिशय प्रेमानें, ममतेनें वाग- विणें; प्रसंगविशेषीं आपण उपाशी राहून दुसर्‍यास खावयास देणें. तोंडचा गोड आणि हातचा जड-बोलण्यांत गोड व अघळ- पघळ, पण प्रत्यक्ष पैशाची मदत करण्यांत पूज्य. तोंडचा चतुर- वि. बोलण्यांत पटाईत; वाक्पटु. तोंडचा जार-पु. नुकत्याच जन्मलेल्या मुलाच्या तोंडांतील फेंस; चिकटा; ओंठावरचा जार; जन्मप्रसंगींचा तोंडावरचा पातळ पापुद्रा (विशेषतः तुझ्या, त्याच्या तोंडाचा जार वाळला नाहीं. = तूं, तो अजून केवळ बालक आहेस.' अशा वाक्यांत उपयोग). तोंडचा नीट-वि. १ बोलून भला, चांगला; बोलकाचालका; सौजन्ययुक्त. २ युक्तायुक्त विचार करून बोलणारा. ३ हजरजबाबी; अस्खलित बोलणारा. तोंडचा फटकळ-वि. शिवराळ; उघडतोंड्या; अश्लील, शिवराळ भाषण करणारा. तोंडचा रागीट-वि. जहाल; तिखट; कडक भाषण करणारा. तोंडचा शिनळ-वि. १ इष्कबाज, फंदी म्हणून नांव मिळविण्याची इच्छा करणारा; स्त्रियांची खोटी खुषमस्करी करणारा; स्त्रियांच्या कृपेची खोटीच फुशारकी मारणारा. २ निरर्गल व अश्लील भाषण करणारा; शिवराळ. तोंड(डा)ची गोष्ट-स्त्री. सहजसाध्य, अतिशय सोपी गोष्ट, काम. 'वाघ मारणें तोंडची गोष्ट नव्हे.' तोंड चुकविणें-हातून एखादा अपराध घडला असतां कोणी रागें भरेल या भीतीनें, काम वगैरे टाळण्यासाठीं चुकारतट्टू- पणानें एखाद्यापासून आपलें तोंड लपविणें; दृष्टीस न पडणें; छपून असणें. ॰चे तोंडीं-क्रिवि. प्रत्यक्षाप्रत्यक्ष; तोंडानें; बोला- चालीनें. ॰चे तोंडीं व्यवहार-केवळ तोंडानें बोलून, बोलाचा- लीनें झालेला, होणारा व्यवहार, धंदा. याच्या उलट लेखी व्यव- हार. ॰चें पायचें-न. (कों.) गुरांच्या तोंडास व पायांस होणारा रोग. ॰चे हिशेब-पुअव. कागदांवर आंकडेमोड न करितांमनां- तल्यामनांत कांहीं आडाख्यांच्या; मदतीनें करावयाचे हिशेब. तोंडचें तोंडावरचें पाणी पळणें; उडणें, तोंड कोरडें पडणें-१ (भीतीमुळें) चेहरा फिका पडणें; बावरून,घाबरून जाणें. २ (भीति इ॰ कांमुळें) तोंडांतील ओलावा नाहींसा होणें. तोंड टाकणें-टाकून बोलणें-१ (क्रोधावेशानें) अप शब्दांचा वर्षाव करणें; निर्भर्त्सना करून बोलणें; खरडपट्टी काढणें; अद्वातद्वा बोलणें. 'तूं नोकर-माणसांवर उगीच तोंड टाकलेंस.' २ (घोडा इ॰ जनावरानें) चावण्यासाठीं तोंड पुढें करणें. 'ह्या घोड्याला तोंड टाकण्याची भारी खोड आहे, ती घालविली पाहिजे.' ॰ठेचणारा-फाडणारा-वि. (एखाद्या) उद्धट, बडबड्या माण- सास गप्प बसविण्याची हातोटी ज्यास साधली आहे असा; उद्दामपणानें, गर्वानें बोलणार्‍या व्यक्तीस रोखठोक उत्तर देऊन चूप बसविणारा. [तोंड + ठेचणें] ॰तोडणें-(ना.) एखादी वस्तु मिळ- विण्याकरितां एखाद्याच्या पाठीस लागणें; त्याच्यापुढें तोंड वेंगा- डणें. ॰दाबणें-लांचलुचपत देऊन (एखाद्याचें) तोंड बंद करणें; (एखाद्यास) वश करणें; गप्प करणें. ॰दाबणारा-वि. लांच देऊन (एखाद्या) प्रतिकूल व्यक्तीस वळविणारा; गप्प बसविणारा. [तोंड + दाबणें = बंद करणें] ॰दाबी-स्त्री. (एखाद्यानें) गुप्त बातमी फोडूं नये म्हणून, प्रतिकूल बोलूं नये म्हणून (त्यास) लांच देऊन त्याचें तोंड दाबण्याची, वश करण्याची क्रिया. 'तो गांवकाम- गारांची तोंडदाबी करतो.' -गुजा २१. [तोंड + दाबणें = बंद करणें] ॰दिसणें-एखाद्याची केलेली निर्त्भर्त्सना दुसरी बाजू न कळतां लोकांच्या नजरेस येणें व आपणच वाईट ठरणें (पण ज्याची निर्भर्त्सना केली असेल त्याचें वर्तन सुधारण्याची आशा नसणें ). 'मी तुला रागें भरलों म्हणजे माझें तोंड मात्र दिसेल, पण तूं आपला आहे तसाच राहणार.' ॰देणें- १ पारा वगैरे देऊन तोंडाच्या आंतील त्वचा सुजविण; तोंड आणविणें. 'वैद्य- बोवा म्हणाले कीं त्याला तोंड दिलें आहे.' २ सैन्याच्या अग्रभागीं राहून शत्रूवर हल्ला करणें. ३ (एखाद्याचा) प्रतिपक्षी होऊन राहणें; लढावयाला सिद्ध होणें. ४ (आट्यापाट्यांचा खेळ शेवटची पाटी खेळून परत येणार्‍या गड्याकडे पाटी धरणारानें तोंड फिरविणें. ५ एखाद्या गोष्टीला न भितां तींतून धैर्यानें पार पडण्याची तयारी ठेवणें. ॰धरणें-१ अन्नसेवन करण्याची तोंडाची शक्ति आजार वगैरे कारणांमुळें नाहींशी होणें. 'त्याचें तोंड धरलें आहे, त्याला चमच्याचमच्यानें दुध पाजावें लागतें.' २ (एखा- द्याची) बोलण्याची शक्ति नाहींशी करणें. ३ (एखाद्याला आपल्या) तावडींत, कबजांत आणणें. 'मी त्याचें तोंड धरलें आहे, तो आतां काय करणार !' ॰धुवून येणें-(उप.) एखाद्याची विनंति कधींहि मान्य होणार नाहीं असें म्हणून फेटाळून लावतांना योजण्याचा तिरस्कारदर्शक वाक्प्रचार. ॰निपटणें-(आजार, उपवास इ॰ कारणांमुळें एखाद्याचे) गाल खोल जाणें, चेहरा सुकणें. 'महिनाभर हें मूल तापानें आजारी होतें, त्याचें तोंड पहा कसें निपटलें आहे तें.' ॰पडणें-१ सुरवात होणें. 'लढाईस तोंड पडलें.' २ (गळूं इ॰ कांस) छिद्र पडणें; फुटणें; वाहूं लागणें. ॰पसरणें-वेंगाडणें-१ खिन्नपणाची, केविलवाणी मुद्रा धारण करणें. २ हिनदीनपणानें याचना करणें. ॰पाघळणें-१ न बोला- वयाची गोष्ट कोणाएकापाशीं बोलून टाकणें; बडबडणें. २ (ल.) गुप्त गोष्ट बाहेर फोडणें, फुटूं देणें. ॰पाडणें-एखादें कोडें सोड- विण्यास, वेढा फोडण्यास प्रारंभ करणें; भांडणास सुरवात करणें. ॰पाहणें-१ (एखाद्याच्या) आश्रयाची, मदतीची अपेक्षा करून असणें. 'आम्ही पडलों गरीब, म्हणून आम्हांला सावकाराचीं तोंडें पाहण्याची पाळी वारंवार येते.' २ (एखाद्यानें) स्वतःच्या शक्तीचा, कर्तुत्वाचा अजमास करणें. 'तूं असें करीन म्हणतोस, पण आधीं आपलें तोंड पहा !' ३ बोलणाराचें भाषण नुसतें ऐकणें, पण त्यानें सांगितलेलें करावयास किंवा केलेला बोध अनु- सरावयास प्रवृत्त न होतां स्वस्थ बसून राहणें. 'म्हणती हाणा, मारा, पाडा, घ्या, काय पाहतां तोंडा ।' -मोद्रोण ३.१२५. ॰पाहात-बसणें-काय करावें, कसें करावें या विवंचनेंत असणें. ॰पिटणें-बडबड करणें. 'पश्चिमद्वारींचें कवाड । सदा वार्‍यानें करी खडखड । तैशी न करी बडबड । वृथा तोंड पिटीना ।' -एभा १०.२३१. ॰फिरणें-१ आजारानें, पदार्थाच्या अधिक सेवनानें तोंडाची रुची नाहींशी होणें; तोंड वाईट होणें. २ तोंडांतून शिव्यांचा वर्षाव होऊं लागणें. 'तो रागावला म्हणजे कोणावर त्याचें तोंड फिरेल ह्याचा नेम नाहीं.' ॰फिरविणें-१ तोंडाची चव नाहींशी करणें. २ शिव्यांचा वर्षाव करीत सुटणें. 'तो रागावला म्हणजे तुमच्यावर देखील तोंड फिरवावयाला कचर- णार नाहीं.' ३ वितळत असलेला किंवा तापविला जात अस- लेला धातु इ॰ कानें) रंगामध्यें फरक दाखविणें, रंग पाल- टणें. 'ह्या तांब्यानें अद्याप तोंड फिरविलें नाहीं, आणखी पुष्कळ आंच दिली पाहिजे.' ४ दुसर्‍याकडे पाहणें; विशिष्ट गोष्टी- कडे लक्ष्य न देतां इतर गोष्टींकडे प्रवृत्ति दाखविणें. ५ गतीची दिशा बदलणें; दुसर्‍या दिशेला, माघारें वळणें. ॰फुटणें-१ थंडीमुळें तोंडाची बाह्य त्वचा खरखरीत होणें, भेगलणें. २ (एखाद्याची) फजिती उडणें; पत नाहींशी होणें; नाचक्की होणें; अभिमान गलित होण्याजोगा अपमान, शिक्षा इत्यादि होणें. ॰बंद करणें-१ जीभ आवरणें; जपून बोलणें. २ (एखाद्याला) लांच देऊन गप्प बसविणें, वश करून घेणें. ॰बंदावर राखणें- खाण्याला किंवा बोलण्याला आळा घालणें. 'तूं आपलें तोंड बंदावर राखिलें नाहींस तर अजीर्णानें आजारी पडशील.' ॰बांधणें-लांच देऊन (एखाद्याचे) तोंड बंद करणें; (एखाद्यानें) गुप्त गोष्ट फोडूं नये म्हणून पैसे देऊन त्यास गप्प बसविणें. ॰बाहेर काढणें-१ तोंड दाखविणें; राजरोसपणें समाजांत हिंडणें (बहुधां निषेधार्थी प्रयोग). 'तुरुंगांतून सुटून आल्यावर त्यानें आज दोन वर्षांत एकदांहि तोंड बाहेर काढलें नाहीं.' २ फिरण्यासाठीं, कामकाजासाठीं घराबाहेर पडणें. ॰बिघडणें-तोंड बेचव होणें; तोंडास अरुचि उत्पन्न होणें. विटणें. -॰भर-भरून बोलणें- भीड, संकोच, भीति न धरतां मनमोकळेपणानें भरपूर, अघळपघळ बोलणें; दुसर्‍याचें आणि आपलें समाधान व्हावयाजोगें अघळपघळ बोलणें. ॰भरून साखर घालणें-(एखाद्याचें) तोंड साखरेनें भरणें; (एखाद्याच्या) कामगिरीबद्दल, विजयाबद्दल संतोषादाखल त्याचें तोंड साखरेनें भरणें; (एखाद्याच्या) कामगिरीबद्दल गोड, भरपूर मोबदला देणें. ॰मागणें-(आट्यापाट्यांचा खेळ) लोण घेऊन परत जातांना पाटीवरील गड्यास आपणाकडे तोंड फिर- विण्यास सांगणें. तोंड मागितल्यावर पाटीवरील गडी आपलें तोंड फिरवितो त्यास 'तोंड देणें' म्हणतात. ॰माजणें-१ मिष्टान्न खावयाची चटक लागल्यानें साध्या पदार्थाबद्दल अरुचि उत्पन्न होणें. २ शिव्या देण्याची, फटकळपणानें बोलण्याची खोड लागणें. ॰मातीसारखें-शेणासारखें होणें-(आजारानें) तोंडाची चव नाहींशी होणें; तोंड विटणें, फिरणें; अन्नद्वेष होणें. ॰मिचकणें- दांत, ओंठ खाणें. ॰येणें-१ तोंडाच्या आंतल्या बाजूच्या त्वचेस फोड येऊन ती हुळहुळी होणें व लाळ गळूं लागणें. २ (कर.) लहान मूल बोलूं लागणें. 'आमच्या मुलाला तोंड आलें आहे.' = तो बोलावयास लागला आहे. ॰रंगविणें-१ विडा खाऊन ओंठ तांबडे लाल करून घेणें. २ (ल.) (एखाद्याचें थोबाड) थोबाडींत मारून लाल- भडक करून सोडणें. ॰लागणें-(लढाई, वादविवाद, अंगीकृत कार्य इ॰ कांस) सुरवात होणें. 'तेव्हां युद्धास तोंड लागलें.' -इमं २९०. ॰लावणें-१ (वादविवाद इ॰ कांस) सुरवात करणें. २ प्यावया- साठीं एखादें पेय ओंठाशीं नेणें. ३ ॰वाईट करणें-निराशेची मुद्रा धारण करणें. ॰वाईट होणें-१ तोंडावर निराशेची मुद्रा येणें. २ (ताप इ॰ कांमुळें) तोंडास अरुचि येणें. ॰वांकडें करणें-१ वेडावून दाखविणें. २ नापसंती दर्शविणें. ॰वाजविणें-एकसारखें बोलत सुटणें; निरर्थक बडबड करणें; बकबकणें; वटवट करणें; भांडण करणें. ॰वासणें-१ निराशेनें, दुःखानें तोंड उघडणें व तें बराच वेळ तसेंच ठेवणें. २ याचना करण्यासाठीं तोंड उघडणें, वेंगाडणें. ॰वासून पडणें-शक्तीच्या क्षीणतेमुळें, उत्साह, तेज, वगैरे नष्ट झाल्यामुळें, गतप्राण झाल्यामुळें आ पसरून पडणें. 'तो पडला सिंहनिहमत्तद्विपसाचि तोंड वासून ।' -मोगदा ५.२५. ॰वासून बोलणें-अविचारानें बोलणें. 'ऐसें स्वसख्यांपासीं कां गे वदलीस तोंड वासून ।' -मोउद्योग १३.२०५. ॰विचकणें-दीन मुद्रेनें आणि केविलवाण्या स्वरानें याचना करणें. ॰वेटा(डा)विणें- (काव्य) (एखाद्यास) वेडावून दाखविण्यासाठीं त्याच्यापुढें तोंड वेडेंवाकडें करणें. ॰शेणासारखें पडणें-(लाजिरवाणें कृत्य केल्यानें) तोंड उतरणें; निस्तेज होणें; काळवंडणें. ॰संभाळणें- जपून बोलणें; जीभ आवरणें; भलते सलते शब्द तोंडांतून बाहेर पडूं न देणें; अमर्याद बोलण्यास आळा घालणें. ॰सुटणें- चरांचरां, फडाफडां, अद्वातद्वा बोलूं लागणें. ॰सुरू होणें-बड- बडीला, शिव्यांना सुरवात होणें. ॰सोडणें-१ फडांफडां, अद्वातद्वा बोलूं लागणें; अमर्याद बोलणें. २ आधाशासारखें खात सुटणें; तोंड मोकळें सोडणें. ॰हातीं-हातावर धरणें-तोंडे सोडणें (दोन्ही अर्थीं) पहा. तोंडाचा खट्याळ-फटकळ-फटकाळ-फटकूळ-वाईट-शिनळ-वि. शिवराळ; तोंडाळ; अश्लील बोलणारा. तोंडाचा खबरदार-बहादर-बळकट-वि. बोलण्यांत चतुर, हुषार; बोलण्याची हातोटी ज्याला साधली आहे असा. -तोंडाचा गयाळ, तोंडगयाळ-वि. जिभेचा हलका; चुर- चोंबडा; लुतरा; बडबड्या; ज्याच्या तोंडीं तीळ भिजत नाहीं असा. तोंडाचा गोड-वि. गोड बोलणारा; गोडबोल्या. म्ह॰ तोंडचा गोड हाताचा जड = गोड व अघळपघळ भाषण करणारा पण प्रत्यक्ष कांहींहि मदत, पैसा न देणारा. तोंडाचा जड-वि. रेंगत बोलणारा; फार थोडें बोलणारा; अस्पष्ट भाषण करणारा; तोंडाचा तिखट-वि. खरमरीत, स्पष्ट, झोंबणारें, कठोर भाषण करणारा. तोंडाचा तोफखाना सुटणें-(एखाद्याची) अद्वातद्वा बोल- ण्याची क्रिया सुरू होणें; शिव्यांचा वर्षाव होऊं लागणें. तोंडाचा पट्टा सुटणें-चालणें-अद्वातद्वा बोलणें; शिव्यांचा भडिमार सुरू होणें; तोंडाचा पट्टा सोडणें-(एखाद्यानें) शिव्यांचा भडिमार सुरू करणें; जीभ मोकळी सोडणें; (एखाद्याची) खरडपट्टी आरंभिणें. तोंडाचा पालट-पु. रुचिपालट; तोंडास रुचि येईल असा अन्नांत केलेला फेरबदल; अन्नांतील, खाण्यांतील फरक, बदल. तोंडाचा बोबडा-वि. बोबडें बोलणारा; तोतरा. तोंडाचा मिठा-वि. गोडबोल्या; तोंडाचा गोड पहा. तोंडाचा हलका- वि. चुरचोंबडा; भडभड्या; विचार न करितां बोलणारा; फटकळ. तोंडाचा हुक्का होणें-(व.) तोंड सुकून जाणें. तोंडाची चुंबळ-स्त्री. दुसर्‍यास वेडावून दाखविण्याकरितां चुंबळीसारखी केलेली ओठांची रचना; वांकडें तोंड. तोंडाची वाफ दघडणें- १ मूर्खास उपदेश करतांना, निरर्थक, निरुपयोगी, निष्फळ भाषण करणें. २ ज्यावर विश्वास बसणार नाहीं असें भाषण करणें; मूर्खपणानें बोलणें; वल्गना करणें; बाता मारणें. (या वाक्प्रचारांत दवडणें बद्दल खरचणें गमविणें, फुकट जाणें, घालविणें, काढणें इ॰ क्रियापदेंहि योजतात). तोंडाचें बोळकें होणें-(म्हातारपणामुळें) तोंडां- तील सर्व दांत पडणें. तोंडाचें सुख-न. तोंडसुख पहा. (वरील सर्व वाक्प्रचारांत तोंडाचा या शब्दाऐवजीं तोंडचा हा शब्दहि वापरतात). तोंडांत खाणें, मारून घेणें-१ गालांत चपराक खाणें; मार मिळणें. २ पराभूत होणें; हार जाणें. ३ फजिती झाल्या- नंतर शहाणपणा शिकणें; नुकसान सोसून धडा शिकणें; बोध मिळविणें. तोंडांत जडणें-थोबाडींत, गालांत बसणें (चपराक, थप्पड इ॰). तोंडांत तीळभर न राहणें-अगदीं क्षुद्र अशी गुप्त गोष्टहि पोटांत न ठरणें; कोणतीहि लहानसहान गोष्ट गुप्त ठेवूं न शकणें. तोंडांत तोंड घालणें-१ (ल.) प्रेम, मैत्री इ॰कांच्या भावानें वागणें; मोठ्या प्रेमाचा, मित्रपणाचा आविर्भाव आणून वागणें. २ एकमेकांचें चुंबन घेणें. तोंडांत देणें-(एखाद्याच्या) थोबाडींत मारणें; गालांत चपराक मारणें; तोंडांत बोट घालणें-(ल.) आश्चर्यचकित, थक्क होणें; विस्मय पावणें. तोंडांत भडकावणें-तोंडांत देणें पहा. तोंडांत माती घालणें-खाण्यास अन्न नसणें; अतिशय हाल, कष्ट सोसावे लागणें. तोंडांत माती पडणें-१ (एखाद्याची) उपा समार होणें. २ मरणें. तोंडात शेण घालणें-(एखाद्याची) फजिती करणें; (एखाद्यास) नांवें ठेवणें; खरडपट्टी काढणें. तोंडांत साखर असणें-(गो.) (एखाद्याचें) तोंड, वाणी गोड असणें; गोड बोलत असणें. तोंडांत साखर घालणें-१ तोंड भरून साखर घालणें पहा. २ (उप.) तोंडांत शेण घालणें. 'सावित्री- बाईच्या तोंडांत लोक जेव्हां फारच साखर घालीत, तेव्हां तिनें दोन तीन जुनेरीं एकत्र शिवून जानकीबाईला द्यावी.' -रंगराव. तोंडांत साखर पडणें-(एखाद्याला) आनंदाचा प्रसंग, दिवस येणें. तोंडांतून ब्र काढणें-(तोंडांतून) अधिक-उणें अक्षर काढणें, उच्चारणें. 'आंतल्याआंत चूर होऊन मेलें पाहिजे, तोंडां- तून ब्र काढण्याची सोय नाहीं.' -विकारविलसित. तोंडानें पाप भरणें, तोंडें पाप घेणें-लोकांचीं पातकें उच्चारणें; लोकांचे दोष बोलून दाखविणें; वाईट बोलण्याची हौस यथेच्छ पुरवून घेणें; लोकांचीं पापें उच्चारून जिव्हा विटाळणें. 'कैसीं वो मानुसें । सपाइनि परंवंसें । तोंडे पाप घेती कांइसें । वायां वीण ।' -शिशु २१६. तोंडापुढें-क्रिवि. अगदीं जिव्हाग्रीं; मुखोद्गत. तोंडा- पुरता, तोंडावर गोड-वि. मधुर पण खोटें बोलणारा; दुतोंड्या; वरवर गोड बोलणारा व आंतून कपटी असलेला; उघडपणें प्रिय भाषण करणारा व मनांत निराळेच असणारा. ताडापुरता मांडा-पु. १ भूक भागेल एवढीच पोळी. २ (ल.) जेमतेम गरज भागेल एवढाच जरूर त्या वस्तूचा पुरवठा. तोंडार मारप- (गो.) (एखाद्याच्या) पदरांत चूक बांधणें; वरमण्यासारखें उत्तर देणें. तोंडार ल्हायो उडप-(गो.) फार जलद, अस्ख- लित बोलणें; लाह्या फुटणें. तोंडाला काळोखी आणणें- लावणें-बेअब्रू, नापत करणें. तोंडाला टांकी दिलेली असणें-देवीच्या खोल वणांनीं तोंड भरलेलें असणें; तोंडावर देवीचे वण फार असणें. तोंडाला पाणी सुटणें-(एखादी वस्तु पाहून तिच्यासंबंधीं) मोह उत्पन्न होणें; हांव सुटणें. तोंडाला पानें पुसणें-फसविणें; चकविणें; छकविणें; भोळसाविणें; भोंदणें; तोंडा- वरून हात फिरविणें. 'त्याच्यावर देखरेख करावयाला चार माणसें होतीं, पण त्यानें सर्वांच्या तोंडाला पानें पुसून आपला डाव साधला.' तोंडाला फांटा फुटणें-मूळ मुद्दा सोडून भलतेंच बोलत सुटणें; हवें तसें अमर्याद भाषण करूं लागणें. तोंडावर-क्रिवि. १ समक्ष; डोळ्यांदेखत. २ (ल.) निर्भयपणें; भीड न धरतां. 'मी त्याच्या तोंडावर त्याला लुच्चा म्हणण्यास भिणार नाहीं.' तोंडावर तुकडा टाकणें-(एखाद्यानें) गप्प बसावें, प्रतिकूल बोलूं नये म्हणून त्याला थोडेसें कांहीं देणें. तोंडावर-ला-तोंड देणें-१ (एखाद्यास) विरोध करणें; विरुद्ध बोलणें. २ (एखाद्यास) उद्धटपणानें, अविनयानें, दांडगेपणानें उत्तर देणें; उत्तरास प्रत्युत्तर देणें. तोंडा- वर तोंड पडणें-दोघांची गांठ पडून संभाषण, बोलाचाल होणें. तोंडावर थुंकणें-(एखाद्याची) निर्भर्त्सना, छीःथू करणें; धिक्कार करणें. तोंडावर देणें-तोंडांत देणें पहा. 'काय भीड याची द्या कीं तोंडावरी ।' -दावि ३०२. तोंडावर नक्षत्र पडणें-(एखाद्यानें) तोंडाळपणा करणें; शिवराळ असणें; नेहमीं अपशब्दांनीं तोंड भर- लेलें असणें. 'ह्याजकरिकां तोंडावर नक्षंत्र पडलेल्या पोरास म्या बोलविलें म्हणून हे मला शब्द लावीत नाहींत.' -बाळ २.१४२. तोंडावर पडप-(गो.) थोबाडींत (चपराक) बसणें, पडणें. तोंडावर पदर येणें-१ वैधव्य प्राप्त होणें. 'तिच्या तोंडावर पदर आला म्हणून ती बाहेर पडत नाहीं.' २ लज्जेनें तोंड लपविण्या- जोगी स्थिति होणें. तोंडावर मारणें-(एखाद्याला) पराभूत करणें. तोंडावर सांगणें-बोलणें-(एखाद्याच्या) समक्ष, निर्भीडपणें, बेडरपणें सांगणें, बोलणें. तोंडावरून-तोंडावर हात फिर- विणें-(एखाद्यास) गोड बोलून, फूसलावून, भुलथाप देऊन फस- विणें; भोंदणें; छकविणें. तोंडाशीं तोंड देणें-(हलक्या दर्जाच्या व्यक्तीनें वरिष्ठाशीं) आपला दर्जा विसरून, बरोबरीच्या नात्यानें, अविनयानें बोलणें, व्यवहार करणें. तोंडास काळोखी-स्त्री. मुखसंकोच; ओशाळगत; गोंधळून गेल्याची स्थिति; बेअब्रू; कलंक. तोंडास काळोखी, काजळी लागणें-(एखाद्याची) बेअब्रू, नाचक्की होणें; दुष्कीर्ति होणें; नांवाला कलंक लागणें. तोंडास काळोखी-काजळी लावणें-(एखाद्याचें) नांव कलंकित करणें; बेअब्रू करणें. 'सुनेनें माझ्या तोंडाला काळोखी लावली.' तोंडास कुत्रें बांधलेलें असणें-ताळतंत्र सोडून, अद्वातद्वा, अपशब्द बोलणें; शिव्या देणें. 'त्यानें तर जसें तोंडाला कुत्रेंच बांधलें आहे.' तोंडास खीळ घालणें-निग्रहपूर्वक, हट्टानें मौन धारण करणें. तोंडास तोंड-न. वादविवाद; वाग्युद्ध; हमरी- तुमरी; धसाफसी. -क्रिवि. समक्षासमक्ष; समोरासमोर; प्रत्यक्ष. तोंडास तोंड देणें-१ तोंडाशीं तोंड देणें पहा. २ मार्मिकपणें, खरमरीतपणें उत्तर देणें. तोंडास पाणी सुटणें-(एखाद्या- वस्तूबद्दल, गोष्टीबद्दल) लोभ, मोह उत्पन्न होणें; तोंडाला पाणी सुटणें पहा. 'पोर्तुगीज लोकांची बढती पाहून तिकडच्या दुसर्‍या साहसी लोकांच्या तोंडास पाणी सुटलें.' -बाजी. तोंडास तोंड न दिसणें-(पहांटेस) तोंड न ओळखतां येण्याइतका अंधेर असणें (झुंजमुंजु पहाटेविषयीं वर्णन करितांना हा वाक्प्रचार योजतात). 'अद्याप चांगलें उजाडलें नाहीं, तोंडास तोंड दिसत नाहीं.' तोंडास-तोंडीं बसणें-(श्लोक, शब्द इ॰) स्पष्ट, बिन- चूक, भरभर म्हणण्याइतका पाठ होणें. 'तो श्लोक दहा वेळां पुस्तकांत पाहून म्हण, म्हणजे तो तुझ्या तोंडीं बसेल.' तोंडास येईल तें बोलणें-विचार न करितां, भरमसाटपणानें वाटेल तें बोलणें; अद्वातद्वा, अपशब्द बोलणें. तोंडास-तोंडीं लागणें- १ (एखाद्याच्या) तोंडास तोंड देणें; उलट उत्तरें देणें. २ हुज्जत घालणें; वादविवाद करण्यास तयार होणें. (एखाद्याच्या) तोंडा- समोर-क्रिवि. १ (एखाद्याच्या) समक्ष; समोर; डोळ्यांदेखत. २ अगदीं मुखोद्गत; जिव्हाग्रीं. तोंडापुढें पहा. 'हा श्लोक माझ्या अगदीं तोंडासमोर आहे.' तोंडास हळद लागणें-(एखाद्यास) दोष देणें, नापसंती दर्शविणें अशा अर्थीं हा वाक्प्रचार योजितात. तोंडासारखा-वि. (एखाद्याची) खुशामत, स्तुति इ॰ होईल अशा प्रकारचा; एखाद्याच्या खुशामतीकरितां त्याच्या मतास जुळता. तोंडासारखें बोलणें-(एखाद्याची) स्तुति, खुशामत करण्या- करितां त्याच्याच मताची, म्हणण्याची री ओढणें; त्याचें मन न दुखवेल असें बोलणें. तोंडीं आणणें-देणें-(रोग्यास) लाळ गळण्याचें, तोंड येण्याचें औषध देऊन तोंड आणणें. तोंडीं- काढणें-१ ओकारी देणें; वांती होणें. २ (एखाद्यास त्यानें) केलेले उपकार बोलून दाखवून टोमणा मारणें. तोंडीं खीळ पडणें- तोंड बंद होणें; गप्प बसणें भाग पडणें. 'अवघ्या कोल्यांचें मर्म अंडीं । धरितां तोंडीं खीळ पडे ।' तोंडीं घास येणें-(एखा- द्यास) घांसभर अन्न मिळणें; चरितार्थाचें साधन मिळणें; पोटा पाण्याची व्यवस्था होणें. तोंडीं तीळ न भिजणें-१ (तापानें, संतापून ओरडण्यानें, रडण्यानें) तोंड शुष्क होणें, कोरडें पडणें. २ एखादी गुप्त गोष्ट मनांत न राहणें, बोलून टाकणें; तोंडीं तृण धरणें-(एखाद्यानें) शरण आलों. असें कबूल करणें; शरणागत होणें; हार जाणें (दांतीं तृण धरणें असाहि प्रयोग रूढ आहे). तोंडीं देणें-(एखाद्यास एहाद्या माणसाच्या, कठिण कार्याच्या) सपाट्यांत, तडाख्यांत, जबड्यांत, तावडींत लोटणें, देणें; हाल, दुःख सोसण्यास (एखाद्यास) पुढें करणें. तोंडीं-तोंडास पान- पानें पुसणें-(एखाद्यास) छकविणें; लुबाडणें; भोंदणें; अपेक्षित लाभ होऊं न देणें; स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेऊन दुसर्‍यास तोंड पहावयास लावणें. 'त्यानें आपल्या नळीचें वर्‍हाड केलें आणि सर्वांच्या तोंडीं पान पुसलें.' तोंडीं माती घालणें- (एखाद्यानें) अतिशय दुःखाकुल, शोकाकुल होणें. 'ऊर, माथा बडवून, तोंडीं माती घालूं लागली' -भाव ७५. तोंडीं येऊन बुडणें-नासणें-(एखादी वस्तु, पीक इ॰) अगदीं परिपक्वदशेस, परिणतावस्थेस येऊन, ऐन भरांत येऊन, नाहींशीं होणें, वाईट होणें. तोंडीं येणें-१ (पारा इ॰ औषधानें) तोंड येणें. २ ऐन भरांत, परिपक्व दशेस, पूर्णावस्थेस येणें. तोंडीं-रक्त, रगत लागणें-१ वाघ इ॰ हिंस्त्र पशूला माणसाच्या रक्ताची चटक लागून तो माणसावर टपून बसणें. २ (ल.) लांच-लुचपत खाण्याची चटक लागणें. तोंडीं लागणें-(एखाद्यास एखाद्या वस्तूची, खाद्याची चव प्रथमच कळून त्या वस्तूची त्यास) चटक लागणें; आवड उत्पन्न होणें. 'ह्याच्या तोंडीं भात लागला म्हणून यास भाकर आवडत नाहीं.' तोंडीं लागणें-१ (एखाद्याच्या) तोंडास तोंड देणें; उद्धटपणानें, आपला दर्जा विसरून उलट जबाब देणें. २ हुज्जत घालणें; वादविवादास प्रवृत्त होणें; तोंडास लागणें पहा. 'सुज्ञ आहेत ते दूषकांच्या तोंडीं लागत नसतात.' -नि. ३ (युद्ध, भांडण, इ॰कांच्या) आणीबाणीच्या ठिकाणीं, आघाडीस, अग्रभागीं असणें. तोंडीं लावणें-न. जेवतांना तोंडास रुचि आणणारा भाजी, चटणी इ॰ सारखा मधून मधून खावयाचा चमचमीत पदार्थ. तोंडीं लावणें-१ जेवतांना भाजी, चटणी इ॰ चम- चमीत पदार्थानें रुचिपालट करणें. 'आज तोंडीं लावावयाला भाजीबिजी कांहीं केली नाहीं काय ?' २ विसारादाखल पैसे देणें. तोंडें मागितलेली किंमत-स्त्री. (एखाद्या वस्तूची) दुकान- दारानें सांगितलेली व झिगझिग वगैरे न करितां गिर्‍हाइकानें दिलेली किंमत. तोंडें मानलेला-मानला-वि. (तोंडच्या) शब्दानें, वचनानें मानलेला (बाप, भाऊ, मुलगा इ॰); धर्माचा, पुण्याचा पहा. तोंडें वांकडीं करणें-वेडावून दाखविणें; वेडावणें. लहान तोंडीं मोठा घांस घेणें-१ (एखाद्यानें) आपल्या आवांक्या- बाहेरचें काम हातीं घेणें. २ (वडील, वरिष्ठ माणसांसमोर) न शोभेल असें, मर्यादा सोडून, बेअदबीनें बोलणें; वडील माणसांस शहाणपण शिकविणें. जळो तुझें तोंड-(बायकी भाषेंत) एक शिवी. स्त्रिया रागानें ही शिवी उपयोगांत आणतात. म्ह॰ १ तोंड बांधून (दाबून) बुक्कयांचा मार = एखाद्याचा विनाकारण छळ होऊन त्यास त्याविरुद्ध तक्रार करतां न येणें; एखाद्यास अन्यायानें वाग- वून त्याविरुद्ध त्यानें कागाळी केल्यास त्यास बेगुमानपणें शिक्षा करणें. 'बायकांचा जन्म म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार, म्हण- तात तें अक्षरशः खरें आहे.' -पकोघे २ (गो.) तोंडाच्या बाता घरा बाईल भीक मागता = बाहेर मोठमोठया गप्पा मारतो पण घरीं बायको भीक मागते. सामाशब्द- तोंड उष्ट-न. एखादा-दुसरा घांस खाणें; केवळ अन्न तोंडास लावणें; तोंड खरकटें करणें. [तोंड + उष्टें] ॰ओळख-स्त्री. परस्परांचा विशेष परिचय नसतां, चेहरा पाहू- नच हा अमुक आहे असें समजण्याजोगी ओळख; (एखाद्याची) चेहरेपट्टी लक्षांत राहून तीवरूनच त्याला ओळखतां येणें; नांव वगैरे कांहीं माहीत नसून (एखाद्याचा) केवळ तोंडावळाच ओळ- खीचा असणें. 'एखाद्याला वाटेल कीं बाळासाहेबांशीं त्याची तोंड- ओळखच आहे.' -इंप ३७. ॰कडी-स्त्री. १ आंतील तुळयांचीं तोंडें बाहेर भिंतींतील ज्या तुळईवर ठेवतात, ती सलग तुळई. २ कौलारू छपराचे वासे ज्या सलग तुळईवर टेकतात ती छपराच्या शेवटीं, टोंकास असलेली तुळई. ३ गुरांचें दावें जिला बांधतात ती कडी. ४ (सोनारी धंदा) दागिन्याची शेवटची कडी, नाकें; ज्यांत फांसा इ॰ अडकवितात ती (सरी इ॰ सारख्या दागिन्याची) टोंकाची, तोंडाची कडी; (जव्याच्या) मण्याच्या वगैरे तोंडाशीं ठेवलेली कडी. ५ (जमाखर्चाच्या वहींतील जमा आणि खर्च या दोहोंबाजूंचा मेळ. हा मेळ = = = अशा दुलांगीनें, (दुहेरी रेषेनें) दाखविण्याचा प्रघात आहे. 'वहीची खात्याची-तारखेची-तोंडकडी' असा शब्दप्रयोग करितात. (क्रि॰ मिळणें; जुळणें; येणें; उतरणें; चुकणें; बंद होणें). [तोंड + कडी] ॰कळा-स्त्री. चेहर्‍यावरील तजेला; कांति; तेज; टवटवी. (प्र.) मुखकळा. [तोंड + कळा = तेज] ॰काढप-(गो.) उपदंश झालेल्या रोग्यास एक प्रकारचें औषध देऊन त्याच्या तोंडांतून लाळ वाहवितात तो प्रकार. ह्या औषधानें तोंड बरेंच सुजतें. [तोंड + गो. काढप = काढणें] ॰खुरी- स्त्री. (ना.) गुरांचा एक रोग. ॰खोडी-वि. तोंडाळ; टाकून बोलणारा; तोंड टाकणारा; अशी संवय असलेला. 'परम अधम रुक्मी हा महा तोंडखोडी ।' -सारुह ३.७८. [तोंड + खोड = वाईट संवय] ॰घडण-स्त्री तोंडाची ठेवण; चेहरेपट्टी; तोंडवळां. 'या मुलाची बापासारखी तोंडघडण आहे.' [तोंड + घडण = रचना] ॰घशीं- सीं-क्रिवि. १ जमीनीवर पडून तोंड घासलें जाईल, फुटेल अशा रीतीनें. (क्रि॰ पडणें; पाडणें; देणें). 'तो तोंडघसींच पडे करतां दंतप्रहार बहु रागें ।' -मो. २. (आश्रय तुटल्यानें) गोत्यांत; पेचांत; अडचणींत; फजिती होईल अशा तर्‍हेनें; फशीं (पडणें). [तोंड + घासणें] ॰घशी देणें-दुसरा तोंडघशीं पडे असें करणें. ॰चाट्या-वि. खुशामत करणारा; थुंकी झेलणारा; तोंडासारखें बोलणारा. ॰चाळा-पु. १ तोंड वेडेंवाकडें करून वेडावण्याची क्रिया. २ वात इ॰कांच्या लहरीनें होणारी तोंडाची हालचाल, चाळा. ॰चुकाऊ-वू-व्या, तोंडचुकारू-चुकव्या-वि. (काम इ॰ कांच्या भीतीनें) दृष्टि चुकविणारा; तोंड लपविणारा; नजरेस न पडे असा. [तोंड + चुकविणें] ॰चुकावणी-स्त्री. (एखाद्यापासून) तोंड लपविण्याची, स्वतःस छपविण्याची क्रिया. ॰जबानी-स्त्री. तोंडानें सांगितलेली हकीगत, दिलेली साक्ष, पुरावा. -क्रिवि तोंडी, तोंडानें. [तोंड + फा. झबान्] ॰जाब-पु. तोंडी जबाब. ॰झाडणी-स्त्री. तिरस्कारपूर्ण उद्गारांनीं झिडकारणें; खडका- वणें; खरडपट्टी काढणें. ॰देखणा-ला-वि. आपल्या अंतःकरणांत तसा भाव नसून दुसर्‍याचें मन राखण्याकरितां त्याला रुचेल असा केलेला (व्यवहार, भाषण, गो इ॰); खुशामतीचा; तोंडासारखा; तोंडपुजपणाचा. 'प्राणनाथ, मला हीं तोंडदेखणीं बोलणीं आव- डत नाहींत.' -पारिभौ ३५. [तोंड + देखणें = पाहणें] ॰देखली गोष्ट-स्त्री.दुसर्‍याची मर्जी राखण्याकरितां केलेलें, खुशामतीचें भाषण. ॰निरोप-पु. तोंडी सांगितलेला निरोप. 'कृष्णास ते हळुच तोंडनिरोप सांगे ।' -सारुह ४.९. ॰पट्टा-पु. (बायकी). तोंडाचा तोफखाना; अपशब्दांचा भडिमार; संतापानें, जोराजोरानें बेबंदपणें बोलणें. [तोंड + पट्टा = तलवार] ॰पट्टी-स्त्री. (शिवणकाम) तोंडाला शिवलेला पट्टी. 'योग्य तेवढी तोंडपट्टी कातरावी.' -काप्र. १४. ॰पाटिलकी-स्त्री. १ आपण कांहीं न करतां बसल्या जागे- वरून लुडबुडेपणानें दुसर्‍यांना हुकुमवजा गोष्टी, कामें सांगणें (पाटलाला बसल्या जागेवरून अनेक कामें हुकुम सोडून करून घ्यावीं लागतात त्यावरून). २ (उप.) लुडबुडेपणाची वटवट, बडबड; तोंडाळपणा. 'दुसरें कांहीं न झालें तरी नुसती तोंडपाटिलकी करण्यास कांहीं हरकत नाहीं.' -आगर ३.६१. [तोंड + पाटिलकी = पाटलाचें काम] ॰पाठ-वि. पुस्तकाच्या सहाय्यावांचून केवळ तोंडांनें म्हणतां येण्यासारखा; मुखोद्गत [तोंड + पाट = पठण केलेलें] ॰पालटपुस्त्री. १ (अरुचि घालविण्याकरितां केलेला) अन्नांतील फेरबदल. २ अन्नांत फेरबदल करून अरुचि घालविण्याची क्रिया. [तोंड + पालट = बदल] ॰पिटी-स्त्री. १ (वडील, गुरु इ॰ कांची) आज्ञा न मानतां तिचें औचित्य इ॰ कासंबंधीं केलेली वाटाघाट; (वडिलांशीं, गुरूंशीं) उद्धटपणानें वाद घालणें; उलट उत्तर देणें; प्रश्न इ॰ विचारून अडवणूक करणें. 'गुरूंसी करिती तोंडपिटी ।' -विपू १.५७. २ (दगडोबास शिकविण्याकरितां, विसराळू माणसास पुन्हां पुन्हां बजाविण्याकरितां, थिल्लर जनावरास हांकलण्याकरितां करावी लागणारी) व्यर्थ बडबड, कटकट, वटवट. [तोंड + पिटणें] ॰प्रचिती-प्रचीति-स्त्री. खुशामत करण्याकरितां (एखाद्याच्या) व्यक्तिमाहात्म्यास, भाषणास, अस्तित्वास मान देणें; आदर दाख- विणें. [तोंड + प्रचीति] ॰प्रचीतक्रिवि. १ तोंडासारखें; खुशामतीचें; तोंडापुरतें (भाषण, वर्तन इ॰ करणें) २ माणूस ओळखून, पाहून; माणसामाणसांत तारतम्य ठेवून (बोलणें, चालणें, वागणें). ॰प्रचीत बोलणारा-चालणारा-वागणारा-वि. माणसामाणसांत तारतम्य ठेवून चालणारा, बोलणारा, वागणारा. ॰फटालकी -फटालीस्त्री. तोंडाची निरर्थक बडबड, वटवट, टकळी. [तोंड + ध्व. फटां ! द्वि.] ॰फटाला-ल्या-वि. मूर्खपणानें कांहीं तरी बड बडणारा; बकणारा; वटवट करणारा. [तोंड + ध्व. फटां !] ॰फट्याळ-वि. तोंडाचा फटकळ; शिवराळ; तोंडाळ; बातेफरास; अंगीं कर्तृत्व नसून लंब्या लंब्या बाता झोंकणारा. ॰फट्याळी- स्त्री. शिवराळपणा; तोंडाळपणा; वावदूकता. [तोंडफट्याळ] ॰बडबड्या-बडव्या-वि. निरर्थक वटवट, बडबड करणारा: बकबकणांरा टकळी चालविणारा. ॰बंद -बांधणी-पुस्त्री. गाडीच्या चाकाच्या तुंब्यावरील बाहेरील बाजूचें लोखंडी कडें, पट्टी. आंतील बाजूच्या कड्यास कटबंद असें म्हणतात. [तोंड + बंद = बांधणी] ॰बळ-न. वक्तृत्वशक्ति; वाक्पटुता; वाक्चातुर्य. 'आंगबळ न चांगबळ देरे देवा तोंडबळ.' ॰बळाचा-वि. ज्याला बोलण्याची हातोटी, वक्तृत्कला साधली आहें असा; तोंडबळ अस- लेला; भाषणपटु जबेफरास. ॰बाग-स्त्री. (राजा.) चेहरेपट्टी; चेहर्‍याची ठेवण, घडण; मुखवटा. ॰बांधणी-स्त्री. १ तोंडबंद पहा. २ (ढोरांचा धंदा) कातड्याच्या मोटेच्या सोंडेच्या टोंकाकरितां बाजूला शिवलेला गोट. ॰भडभड्या-वि. तोंडास येईल तें बड- बडत, बकत सुटणारा; बोलण्याची, बडबडण्याची हुक्की, इसळी ज्यास येते असा; भडभडून बोलणारा. ॰भर-वि. तोंडास येईल तेवढा; भरपूर. 'हॅमिल्टन यांनीं खर्चवाढीबद्दल तोंडभर मगणी केली होती.' -केले १.१९८. ॰मार-स्त्री. १ रोग्यावर लाद- लेला खाद्यपेयांचा निर्बंध, पथ्य. २ एखाद्यास बोलण्याकरितां तोंड उघडूं न देणें; भाषणबंदी. ३ (ल.) (एखाद्याच्या) आशा, आकांक्षा फोल ठरविणें; (एखाद्याचा केलेला) आशाभंग; मनोभंग; निराशा. (क्रि॰ करणें). ॰मारा-पु. १ शेतीच्या कामाच्या वेळीं पिकांत वगैरें काम करतांना गुरांच्या तोंडाला जाळी, मुंगसें, मुसकें बांधणें. २ (एखाद्यास केलेली) भाषणबंदी; खाद्यपेयांचा निर्बंध. ३ (प्र.) तोंडमार. तोंडमार अर्थ ३ पहा. ॰मिळवणी- स्त्री, १ जमा आणि खर्च यांचा मेळ; तोंडें मिळविण्यासाठीं मांडलेला जमाखर्च. २ ऋणको व धनको यांच्यांतील हिशेबाची बेबाकी, पूज्य. ३ मेळ. -शर. ॰मिळवणी खातें- (जमाखर्च) कच्चें खातें (याचें देणें येणें सालअखेर पुरें करून खुद्द खात्यांत जिरवितात). ॰लपव्या-वि. तोंड लपविणारा; छपून राहणारा; दडी मारून बसणारा. ॰लाग-पु. शिंगें असलेल्या जनावरांच्या तोंडास होणारा रोग; यांत लाळ गळत असते. ॰वळख-स्त्री (प्र.) तोंडओळख पहा. ॰वळण-वळा-नपु. चेहरा; चर्या; मुद्रा; चेहर्‍याची घडण, ठेवण; रूपरेखा; चेहरामोहरा; चेहरेपट्टी; मुखाकृति; मुखवटा. [तोंड + वळ = रचना] ॰वीख-न. (ल.) तोंडानें ओकलेलें, तोंडां- तून निघालेलें, विषारी, वाईट भाषण, बोलणें. [तोंड + विष] ॰शिनळ, शिंदळ-वि. अचकटविचटक, बीभत्स बोलणारा; केवळ तोंडानें शिनळकी करणारा. ॰शेवळें-न. मुंडावळ. -बदलापूर २७७. [तोंड + शेवळें = शेवाळें] ॰सर-क्रिवि. तुडुंब; तोंडापर्यंत; भरपूर. ॰सरता-वि. अस्खलित, तोंडपाठ न म्हणतां येण्या- सारखा; अडखळत अडखळत म्हणतां येण्यासारखा (श्लोक, ग्रंथ इ॰). -क्रिवि. घसरत घसरत; अडखळत; चुका करीत; कसेंबसें; आठवून आठवून. [तोंड + सरणें] ॰सुख-न. १ एखा- द्यानें केलेल्या अपकाराचें शरीरानें प्रतिकार करण्याचें सामर्थ्य नसल्यामुळें केवळ तोंडानें यथेच्छ शिव्यांचा, अपशब्दांचा भडि- मार करून त्यांत सुख मानणें. २ जिव्हा मोकाट सोडून वाटेल तसें बोलण्यांत मानलेलें सुख; यथेच्छ व अद्वातद्वा केलेलें भाषण; (एखाद्याची काढलेली) खरडपट्टी; बोडंती. (क्रि॰ घेणें). ॰सुख घेणें-(एखाद्याची) खरडपट्टी काढणें, हजेरी घेणें; (एखा- द्यावर) शिव्यांचा, अपशब्दांचा भडिमार करणें. ॰सुटका-स्त्री. १ जिभेचा (बोलण्यांतील) स्वैरपणा; सुळसुळीतपणा; वाक्चा- पल्य; जबेफराशी; (भाषण इ॰ कांतील) जनलज्जेपासूनची मोक- ळीक. २ भाषणस्वातंत्र्य; बोलण्याची मोकळीक. ३ तोंडाळपणा; शिवराळपणा. ४ (पथ्य, अरुची, तोंड येणें इ॰ कांपासून झालेली) तोंडाची सुटका, मोकळीक; तोंड बरें होणें; खाण्यापिण्याला स्वातंत्र्य. [तोंड + सुटणें] ॰हिशेबी-वि. अनेक रकमांचा मनांतल्या- मनांत चटकन्‌ हिशेब करून सांगणारा बुद्धिमान (मनुष्य); शीघ्रगणक. ॰तोंडागळा-वि. (तोंडानें) बोलण्यांत, वक्तृत्वशक्तींत अधिक. 'कीं शेषाहूनि तोंडागळें । बोलकें आथी ।' -ज्ञा ९. ३७०. [तोंड + आगळा = अधिक] ॰तोंडातोंडी-क्रिवि. १ समोरासमोर; २ बोलण्यांत; बोलाचालींत. [तोंड द्वि.] ॰तोंडाळ-वि. १ दुसर्‍या- वर तोंड टाकणारा; शिवराळ; भांडखोर. 'लटिकें आणि तोंडाळ । अतिशयेंसीं ।' -दा २.३.१०. २ बडबड्या; वाचाळ. [तोंड] म्ह॰ हाताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं = शिवराळ माणसा- पेक्षां चोर पुरवतो. ॰तोंडाळणें-उक्रि. बकबक करून गुप्त गोष्ट फोडणें; जीभ पघळणें. [तोंडाळ] ॰तोंडोंतोंड-क्रिवि. तोंडापर्यंत; कंठोकांठ; तुडुंब; तोंडसर.॰तोंडोंळा-पु. तोंडवळा; चेहरेपट्टी. [तोंड + ओळा, वळा प्रत्यय]

दाते शब्दकोश

आडवा      

वि.       १. उभा नव्हे तो; समांतर पातळी वरचा. २. जाड; रुंद. ३. तिरपा; वाकडा. ४. विरुद्ध; प्रतिकूल; उलटा. ५. प्रतिबंध करणारा. (वा.) आडवा करणे − आड आणणे; आडवा करणे, सपाट करणे. आडवे घेणे − १. दोषैक दृष्टीने पाहणे; वाकडे घेणे; शंका घेणे. २. खरडपट्टी काढणे; (विप्र.) आडवातिडवा घेणे. ३. मुलाला पाजणे. आडवे जाणे − १. रस्ता ओलांडून जाणे. २. सामोरे जाणे. ३. हरकत करणे; अडथळा आणणे; अपशकुन करणे. मांजर आडवे जाणे − एखाद्या कामाला जाताना मांजर आडवे आले तर काम होत नाही अशी समजूत आहे. आडवे झेलणे, आडवे झोकणे, आडवे टाकणे, आडवे देणे − धोंडा, गोळा, वीट, घागर इत्यादी वस्तू एका रांगेने उभ्या राहिलेल्या लोकांच्या हातातून एकाकडून दुसऱ्याकडे अशा देणे, नेणे. आडवे टाकणे − ओलांडणे. आडवे ठाकणे − मध्ये येणे; अडथळा करणे. आडवे नेसणे − (बायकी) लहान वस्त्र, तात्पुरते (स्नान किंवा वस्त्रांतर करताना) गुंडाळणे, वेढून घेणे, उभे घेणे, लावणे. आडवे पडणे − १. भांडणतंटा तोडण्यास मध्ये पडणे; तडजोड करू पाहणे. २. लोटांगण घालणे; दयेची याचना करणे; एखादे कार्य थांबविण्याविषयी विनंती करणे. ३. विघ्न, विरोध करणे. आडवे बोलणे − १. मुद्दा सोडून बोलणे. २. वाकडे बोलणे; लावून बोलणे; विरुद्ध बोलणे; ‘म्हणोनि घडले बोलणे आडवें ॥’ − दावि १३५. आडवे येणे − १. गाठणे; भेटणे; मार्गात येणे : ‘लोक म्हणती आडवे आले । खांडून काढा ॥’ − दास ३·१·४०. २. विरुद्ध जाणे; नाउमेद करणे; प्रतिबंध करणे : ‘हा आडवा येर्इल कोण पाहों । − सारु ८·२९. ३. (विप्र. आडवे येणे) प्रसूतिसमयी मूल सरळ न येता प्रसूतिद्वाराशी आडवे होणे; अडून राहणे. ४. सामोरे जाणे; स्वागत करणे. आडवे लावणे − १. परत पाठविणे. २. वस्त्रांतर करताना किंवा स्नान करताना आखूड वस्त्र नेसणे; वस्त्र अपुरे व सैल नेसणे; उभआडवे नेसणे. ३. वाकडा अर्थ घेणे; बोल लावणे; निर्भर्त्सना करणे; अडथळे उपस्थित करणे. ४. कुत्सित दृष्टीने पाहणे. आडवे लावून देणे − पहा : आडवे नेसणे. आडवे होणे − १. (जमिनीवर) अंग टाकून लोळणे−निजणे; कलंडणे; वामकुक्षी करणे. २. (ल.) खाली पडणे. ३. लठ्ठ होणे. ४. आड येणे; मध्ये येणे. आडव्या अंगाचा − १. लठ्ठ; फोपशा. २. उंचीपेक्षा जास्त रुंद; आडवा वाढलेला. आडव्या काठीचा − पहा : आडव्या अंगाचा. आडव्या जिभेचा − १. वाकडेतिकडे बोलणारा; दुर्भाषण करणारा; भांडखोर. २. रानवट किंवा गावंढळ भाषण करणारा. ३. भरमसाटपणे बोलणारा; असंबद्ध बोलणारा. आडव्या बांध्याचा पहा : आडव्या अंगाचा. आडव्या हाडाचा पहा : आडव्या अंगाचा. आडव्या हाताने घेणे − खरडपट्टी काढणे. कठोर शब्दांत हजेरी घेणे. (ना.) आडव्या हाताने देणे, आडव्या हाती देणे − लाच देणे. आडव्यात शिरणे − १. वाम मार्गाचा अवलंब करणे; सरळ रस्ता सोडून जाणे. २. वाकडे बोलणे; विषयांतर करणे. आडव्या सुडक्याची बायको, आडव्या सुडक्याची रांड − अत्यंत दीन, दुर्बल (विधवेबद्दल किंवा एखाद्या बार्इबद्दल बोलताना ग्राम्य शिवी): ‘तू लहान झालास तरी पुरुष आणि मी मोठी झाले तरी आडव्या सुडक्याची बायको, माझे हातून काय दरबारात बोलवेल?’

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अडवा-वें

वि. १ उभा नव्हे तो; तिर्यग्; क्षितिजसमांतर पातळींतील. २ रुंद (उभा = लांब यांच्या उलट). 'तो अंगानें अडवा आहे.' ३ तिरपा; वांकडा; आड. ५ विरुद्ध; प्रतिकूल; उलटा; नुसकानकारक असा. 'त्याचें दैव अडवें आलें.' ४ प्रतिबंध करणारा. -क्रिवि. बाजूनें; बाजूवर; सामोरा. ॰करणें-आड आणणें; करणें. ॰ठाकणें-मध्यें येणें; अडथळा करणें. ॰येणें-गांठणें; भेटणें; मार्गांत येणें. २ विरुद्ध जाणें; नाउमेद करणें; प्रतिबंध करणें. 'हा आडवा येईल कोण पाहो ।' -सारु ८.२९. ३ (विप्र.अडवें येणें) गर्भांतील मुलानें सरळ न येतां प्रसुतिद्वाराशी वांकडे होणें; अडून रहाणें. म्ह॰ (ल.) 'आडवें आलें असतां कापून काढावें ' = मार्गांत कोणी जबर- दस्त अडथळा आणला तर त्याचा प्रथम नाश केलाच पाहिजे. 'लोक म्हणती आडवें आलें । खांडून काढा ।।' -दा ३.१.४०. ४ सामोरें जाणें; स्वागत करणें. ॰घेणें-१ दोषैकद्दष्टीनें पाहणें; वांकडे घेणें; शंका घेणें. २ खरडपट्टी काढणें (विप्र.) आडवातिडवा घेणें. ३ मुलाला पाजणें. ॰जाणें-१ रस्ता ओलांडून जाणें. २ सामोरें जाणें. ३ हरकत करणें. ॰टाकणें-ओलांडणें. 'त्याचें घर आडवें टाकून जा.' ॰झेलणें-झोकणें-टाकणें-देणें-धोंडा, गोळा,विट, घागर इ॰ वस्तू एका रांगेनें उभे राहिलेल्या लोकांच्या हातांतून एकाकडून दुसऱ्याकडे अशा देणें, नेणें.(आडवें) नेसणें- लाऊन घेणें(बायकी) लहान वस्त्र, तात्पुरतें (स्थान किंवा वस्त्रांतर करतांना) गुंडाळणें, वेढून घेणें; उभें घेणें. ॰पडणें-१ भांडणतंटा तोडण्यास मध्यें पडणें; तडजोड करूं पहाणें. २ लोटांगण घालणें; दयेची यातना करणें; उद्दिष्ट कार्य थांबविण्याविषयीं विनंति करणें. ३ विघ्न-विरोध करणें. ॰बोलणें-१ मुद्दा सोडून बोलणें. २ वांकडे बोलणें; लावून बोलणें; विरुद्ध बोलणें. 'म्हणोनि घडलें बोलणें आडवें ।।' -दावि १३५. ॰लावणें-१ परत पाठविणें. २ वस्त्रां- तर करतांना किंवा स्नान करतांना आंखुड वस्त्र नेसणें; वस्त्र अपुरें व सैल नेसणें; उभें-आडवें नेसणें. ३ वांकडा अर्थ घेणें; बोल लावणें; निर्भर्त्सना करणें; अडथळे उपस्थित करणें. ॰होणें-१ (जमिनीवर) आंग टाकून लोळणें-निजणें; कलंडणें. २ (ल.) खालीं पडणें; ३ लठ्ठ होणें. ४ आड येणें; मध्यें येणें. अडव्या अंगाचा-काठीचा- बांध्याचा-हाडाचा-१ लठ्ठ. २ उंचीपेक्षां जास्त रुंद; आडवा वाढलेला. अडव्या जिभेचा-वांकडेतिकडें बोलणारा; दुर्भाषण करणारा; भांडखोर. अडव्या सुडक्याची बायको-रांड- अत्यंत दीन, दुर्बल (विधवेबद्दल किंवा एकाद्या बाईबद्दल बोल- तांना ग्राम्य शिवी). 'तूं लहान झालास तरी पुरुष आणि मी मोठी झाल्यें तरी अ॰ बायको, माझे हातून काय दरबारांत बोलवेल?' अडव्या हातानें देणें (हातीं देणें)-लांच देणें. अडव्या हातानें घेणें-(ना.) खरडपट्टी काढणें. अडव्यांत शिरणें- १ वाम मार्गाचा अवलंब करणें; सरळ रस्ता सोडून जाणें. २ वांकडें बोलणें; विषयांतर करणें.

दाते शब्दकोश

भिरकं(कां)डा

पु. १ गिरकांडा; फेक (दगड, वारा, पाणी यांची); चक्कर; गिरकी; भोवंडा (मुलानीं अंगाभोवतीं घेत- लेला). (क्रि॰ देणें; खाणें). २ तिरमिरी; भिरभिरी (राग इ॰ विकारांनीं आलेली). (क्रि॰ येणें). ३ निष्फळ येरझारा; फेरा; गरका. (क्रि॰ मारणें; देणें; पाडणें; घेणें; खाणें; पडणें). ४ लहा- नशी फेरी; थोडें फिरून येणें. 'तूं एथेंच बैस मी भिरकंडा मारून येतों.' ५ (ल.) घोंटाळा; अडचण; फेरा. ६ झोंक; झोंकांडी. (क्रि॰ जाणें). ७ चिंधडी; धांधोटी. ८ (विरू. भिरकांडा) फरकंड; फरपट (फरफटविलेलें कांटेरी झुडुप, मृत पशु, जड लांकूड, साप यांची) (ओरबडल्यामुळें उठलेला) अंगावरील ओरखडा; बिरखडा; भरकटा. [ध्व. भिर!] भिरकंड्यात पडणें-घोंटाळणें; गोंध- ळणें. भिंरकंड्या उडविणें-(ल.) गोंधळवणें; कुंटित करणें; निरुत्तर करणें; कोटिक्रमानें निंदेनें जेर करणें. भिरकं(कां)डी- स्त्री. १ भेलकंडा; भेलकंडी; झोक; झोकांडी. (क्रि॰ जाणें). २ निष्कारण, निष्फळ, इकडेतिकडे हिंडणें. (क्रि॰ मारणें; खाणें). ३ भ्रमण (भोवरा, धंद्यांतील कोल्हांट्या यांचें). (क्रि॰ घेणें; मारणें). ४ रागाचा झटका; भिरभिरी; तिरमिरी. भिरकणें-सक्रि. प्रायः भिरकावणें. भिरका-पु. भिरकंडा (दगड इ॰चा); भिरका व भराका पहा. या शब्दाशीं भिरका शब्द समानार्थक आहे; तथापि याचा प्रचार कमी आहे. भिरकांडणें-सक्रि. १ भोंवडणें; भिर- कावणें; गोफणीनें फेकणें (दगड इ॰). २ (ल.) जोरानें हांकणें (गाडी इ॰). भिरकांडा-डी-भिरकंडा व भिरकंडी पहा. भिर- कांडें-न. १ तिरमिरी; भिरभिरी; रागाच्या झटक्यानें आलेली चक्कर; डोळे फिरणें. २ गोंधळ; कामाचा गरगरा, घायकूत. ३ तगाददारांची निकड आणि कटकट. भिरकावि(व)णें-सक्रि. १ गोफणीनें भोवंडणें आणि झोकणें. २ झुगारणें; फेकणें; झोकणें; भिरकांडणें. 'मग प्रेत त्याचें भोवंडून । रागें दिधलें भिरकावून ।' ३ तिरस्कारानें, बेपर्वाईनें देणें; एखाद्याकडे झोकणें, फेकणें, टाकणें. भिरकुटी-स्त्री. भरकटा; लिहिण्यांतील लपेटी. (क्रि॰ काढणें; ओढणें). भिरकें-न. १ एक किंवा दोन माणसें बसण्या- जोगी बैलांची, घोड्यांची गाडी. हिला साटी नसते; आंसावर दोन-एक फळ्या टाकतात व घोड्यावर बसतात त्याप्रमाणें बस- तात. २ झीट; चक्कर; तिरमिरी; भिरभिरी. ३ भूतबाधा. भिर- गोरें-न. १ भिरभिरें. २ गिरकी खाणें. ३ (ल.) गांजणूक; ओढा- ताण (तगाददार, मूल॰ कडून); (क्रि॰ लावणें, मांडणें, देणें, आणणें). तोडतोडून खाल्ल्याची, घोटाळ्यांत पडल्याची स्थिति. (क्रि॰ होणें). भिर(रं)ड-स्त्री. तिरमिरी; रागाचा आवेश. (क्रि॰ येणें). भिरडी-स्त्री. १ तिरिमिरी. २ खरडपट्टी; निर्भर्त्सना. (क्रि॰ काढणें, उंडविणें, करणें).

दाते शब्दकोश

रगडणें

क्ति. १ (कांहीं पदार्थ) चेपणें; दडपणें. 'कुरुबल- नलिनवनांते भीमगज निकार आठवी रगडी ।' -मोभीष्म ६. ४७. २ लाटणें; मटकावणें; बळकावणें. 'भलत्याचें पागोटें रगडलें नी चालला.' ३ चेपणें; दाबणें; जोरानें चोळणें; मालिश करणें. 'निजउनि निज शयनावरि, शयनावरि बंधुच्या पदा रगडी ।' -मोकृष्ण ८१.२७. ४ खाणें. 'त्यानें पंचवीस लाडू रगडले.' ५ निष्काळजीपणानें करणें. 'त्यानें भलताच प्रयोग रगडला.' ६ घासणें; पीठ करणें; चिरडणें. ७ दटावणें. 'सांगेल कोण दुसरा भीष्महि सांगेल ज्या न रगडूनी ।' -मोउद्योग १.११. ८ नाश करणें; मारुन टाकणें. 'त्या कुरुसेनेसि वासवी रगडी ।' -मोविरा ४.७१. रगडणी-स्त्री. मागावर विणून झालेलें कापड गुंडाळण्याचा रुळ फिरविणारें लाकूड. [रगडणें] रगडपट्टी- स्त्री. दडपशाहीचें कसें तरी उरकलेलें, धसमुसळेपणाचें काम; धडपड; रगडमल्लाचें कर्म. 'नीट विचार करुन अर्थ लिहीत जा. उगीच रगडपट्टी करुं नका.' [रगडणें + पट्टी] रगडमल्ल-वि. १ ज्याचे अंगीं काम करणयाची युक्ति नाहीं व काम कोणत्या रीतीनें केलें असतां नीटनेटकें होईल इ० विचार न करितां केवळ अंगबळानें काम करण्याचा ज्याचा स्वभाव तो; दांडगा; रानवट; ओबडधोबड. २ ज्याचे अंगीं नाजुकपणा, सुरेखपणा नाहीं आणि सामान्य रीतीपेक्षां आकारानें जो मोठा आहे असा (दागिना, पदार्थ, पात्र, वस्त्र इ०). [रगडणें + मल्ल] रगडमल्ली-स्त्री. १ ओबडधोबड, बिगारी, आडदांडपणानें केलेलें काम; रगडमल्लपणा. २ धुडगूस; धांगडधिंगा, बेफामपणा. रगडा-पु. (कों.) १ संकुचित स्थलामध्यें अनेक मनुष्यें जमलीं असतां होणीरी दाटी; चेंगराचेंगरी; गर्दी; दाटी. 'पांचशें दळव्याचा ज्याचा एकच रगड झाला।' -ऐपो ६१. २ रस काढावयाचा चरक. ३ कुचं- बणा; अव्यवस्थित कारभार. ४ नाश. 'वागुळाचा रगडा निज- शस्त्रें कीजे।' -एभा ३.३५. ५ ढीग; मोठें ओझें; अतिशय- पणा; भार; घाई वगैरे. आज कामाचा रगड. आहे. ६ (गो.) उखळांतील उभा वरवंटा; वाटव्याचा दगड. रगडी. रगडा- झगडा-पु. रगडा पहा. [रगडा + झगडा] रगडून-क्रिवि. १ खूप जोरानें; पुष्कळपर्णी; मनमुराद. 'तो रगडून जेवला. २ आवे- शानें; घट्ट. 'त्याला चांगलें रगडून धर नाहीं तर तो षठ्टून जाईल.' रगडून-बांधणें-जोरानें बांधणें; ओढून बांधणें. रगडून धरणें-घट्ट, दाबून धरणें. रगडून मारणें-सपाटून, खूप मारणें. रगडून जेवणें-पोटभरुन खाणें; ओकार येई- पर्यंत खाणें. रगडून सांगणें-बोलणें-मनमुराद बोलणें, शिव्या देणें; निर्भर्त्सना करणें; रागें भरणें. रगडया-वि. आडदांड; दडप्या; गर्दीतून, अडचर्णीतून वाट काढणारा; कशाहि स्थितीस न डरतां मनांत असेल तें करणारा. २ विचित्र; चमत्कारिक; बेफिकीर; ओबडधोबड काम करणारा. [रगडणें]

दाते शब्दकोश

शब्द

पु. १ आवाज; उच्चार; कोणत्याहि प्रकारचा ध्वनि; श्रोत्रेंद्रियाचा विषय. २ एखाद्या वस्तूचा, कल्पनेचा, दर्शक किंवा व्यंजक, जो अक्षरसमूह तो. ३ (व्या.) प्रथमादि विभक्ति ज्या- वरून होतात अशी वर्णानुपूर्वी (नाम, सर्वनाम इ॰ ). 'तळमळ हा संस्कृत शब्द चालतो तरी कसा ?'. -नारुक ३.४. ४ बोल; वाईटपणा; ठपका. (क्रि॰ लागणें; येणें; ठेवणें; लावणें; आणणें). 'तें केलें धार्तराष्ट्री विफळ सकळहि, आणिला शब्द सामीं ।' -मोकृष्ण ६८.३३. ५ आज्ञा; हुकूम. ६ प्रतिज्ञा; वचन; वाचा. 'एकवेळ गेले शब्द ।' -संग्रामगीतें १२०. ७ वेद. 'त्यासि शब्दपर निष्णातू ।' -एभा १०.३४९. ८ शास्त्र. 'शब्दाचिया आसकडी । भेद नदीची दोही थडी । आरडते विरह वेडी । बुद्धिबोध ।' -माज्ञा १६.५. [सं. शब्द = नाद करणें] (वाप्र.) ॰खाणें-लिहितांना किंवा बोलतांना शब्द गाळणें, न लिहिणें किंवा न उच्चारणें. ॰खालीं न पडणें-दुसऱ्याच्या सांगण्या- प्रमाणें करणें; शब्दाला किंमत देणें; शब्द मानणें. ॰खालीं पडूं न देणें-उत्तरास प्रत्युत्तर देणें; वादविवादांत किंवा भांड- णांत माघार न घेणें. ॰झेलणें-ज्याची सेवा, चाकरी शुश्रूषा, खुशामत वगैरे करावयाची असेल, त्याच्या तोंडून आज्ञा निघतांच तिच्याप्रमाणें करणें. 'राजकारस्थानी पुरुष आणि सेनापति यांचे शब्द त्यांच्या अमदानींत सगळे लोक झेलीत असतात' -ओक. ॰टाकणें-१ मागणी, विनंति करणें; एखादी गोष्ट सांगून बघणें. २ शिफारस करणें. ॰ठेवणें-लावणें-लागणें-दोष देणें; ठपका ठेवणें; दूषण लावणें. 'माझेनि दोषें पावलों खेद । हा तुज कासया ठेवणें शब्द ।' -मुक्तेश्वर. 'त्वत्सम साधु न लागों देती स्वयशासि शब्द ते राजे' -मोवन २.३६; -मोउद्योग ८.१९. ॰लागूं देणें-लागू-लावू देणें-दोष पत्करणें. 'सत्यप्रतिज्ञ पांडव लागूं देती न आपणा शब्द ।' -मोविराट ४.६३. सामाशब्द- ॰काठिण्य-न. (अलंकार) शब्दाचा कठोरपणा, कर्कश- पणा. [सं.] ॰कार्पण्य-न. अल्पभाषा; कमी बोलणें; मित- भाषण. 'शब्दकार्पण्य पंडितास दोष स्त्रीला महाभूषण ।' [सं.] ॰कोश-षपु. १ शब्दसंग्रह; शब्दसमुच्चय; शब्दांचा साठा- खजिना; शब्दांचा अर्थासह संग्रह. २ शब्दाचे अर्थ, व्युत्पत्ति, व्याकरण वगैरे सांगणारा ग्रंथ. [सं.] ॰कौशल्य-न. शब्दरचना- चातुर्य; भाषाचातुर्य. [सं.] ॰खंडन-न. शब्द, विधान इ॰ खोडून काढणें; शब्दावरील टिका. ॰गुण-पु. शब्दांचे गुण, लक्षण. हे एकंदर चोवीस आहेत. ते पुढील प्रमाणें:- श्लेष, प्रसाद, समता, माधुर्य, सुकुमारता, अर्थव्यक्ति, उदारत्व, कांति, उदात्तता, ओज, सुशब्दता, और्जिंत्य, विस्तर, समाधि, सौक्षम्य, गांभीर्य, प्रेम, सन्मितत्व, प्रौढी, रीति, उक्ति, गति, भावुक, संक्षेप. इ॰ ॰चातुर्य-न. शब्दरचनाकौशल्य; वाक्चातुर्य; शब्दपटुता; भाषा- शौली; भाषाप्रभुत्व. [सं.] ॰चित्र-न. १ शब्दांनीं केलेलें वर्णन, काढलेलें चित्र. २ (साहित्य) चित्रकाव्याचा एक प्रकार; शब्द- चमत्कृति. उदा॰ 'मागे जी लुगडी, सकाप बुगडी' इ॰. [सं.] ॰चोर-पु. दुसऱ्याचा लेख चोरून तो आपलाच म्हणून दडपून देणारा; दुसऱ्याचे शब्द चोरणारा; उष्टा बोल वापरणारा. ॰जाल-ळ-न. १ शब्दांचें जाळें; अनंत शब्दांचा नुसता समूह; शब्दावडंबर; शब्दभारूड. २ वायफळ भाषण; बडबड. 'म्हणती शब्दजाळ टाकून । निश्चल एकाग्र ऐसिजे मनें ।' [सं. ] ॰तः-क्रिवि. शब्दानें. 'शब्दतः अर्थतः अगाघ खोली ।' -एभा २१.३६७. [सं.] ॰ताडन-न. एखाद्यास लागेल असें भाषण; शब्दांचा मार; टोचून बोलणें. 'सूज्ञास शब्द ताडन मूर्खास प्रत्यक्ष ताडन.' [सं.] ॰तात्पर्य-न. भाषणाचा सारांश; शब्दार्थ; मतलब. [सं.] ॰दोष-पु. १ शब्दांतील व्यंग, उणेपणा; शब्दापराध; शब्दवैगुण्य. काव्यप्रकाशांत एकंदर शब्ददोष १३ सांगितले आहेत. ते पुढीलप्रमाणें: श्रुतिकटु च्युतसंस्कृति, अप्रयुक्त, असमर्थ, निहतार्थ, अनुचितार्थ, निरर्थंक, अवाचक, अश्लील (जुगुप्सा, अमंगल, व्रीडा-युक्त), संदिग्ध, अप्रतीत, ग्राम्य, नेयार्थ. 'प्रताप रुद्रांत पुढील सतरा शब्ददोष सांगितले आहेत:-अप्रयुक्त, अपुष्ट-अपुष्टार्थ, असमर्थ, निरर्थक, नेयार्थ, च्युतसंस्कार-च्युतसंस्कृति, संदिग्ध, अप्रयोजक, क्लिष्ट, गूढ-गूढार्थ, ग्राम्य, अन्यार्थ, अप्रतीतिक, अविसृष्ट विधेयांश, विरुद्धमतिकृत, अश्लील (जुगुप्सा, व्रीडा, अमंगल- युक्त), परुष-श्रुतिकटु. २ दोषारोप; बोल; ठपका; आळ. (क्रि॰ ठेवणें; घालणें; लावणें; आणणें; येणें; लागणें). ३ शब्दामुळें, नांवामुळें लागलेला बट्टा; कलंक. उदा॰ 'प्रतिव्रतेस व्यभिचारिणी म्हटली शब्ददोष तर येतो'. ॰ध्वनि-पु. आवाज; स्वर; बोलणें. 'तिचा हा शब्दध्वनि । म्यांही श्रवणीं ऐकिला ।' [सं.] ॰परीक्षा-स्त्री. (वैद्यक) शब्दाच्या स्पष्टास्पष्टतेवरून किंवा जड हलकेपणावरून व्याधिनिदान करणें. [सं.] ॰पांडित्य-न. १ वक्तृत्व; भाषापांडित्य. २ कृती न करतां उगीच कोरडें व डौलाचें वाक्पाटव करणें; वृथा बडबड; प्रौढी. [सं.] ॰पारुष्य-न. कठोर भाषण; कटु भाषण. [सं.] ॰पाल्हाळ-पु. शब्दावडंबर; शब्दभारूड. शब्दजाल पहा. (क्रि॰ लावणें; मांडणें; करणें). ॰प्रमाण-न. शब्दांनीं दिल्ला पुरावा; साक्ष (तोंडी), [सं.] ॰प्रहार-पु. वाक्ताडन; मनाला लागतील, दुःख देतील असे शब्द बोलणें; रागें भरणें. [सं.] ॰बोध-न. शब्दज्ञान. शब्दबोधें सदोदित ।' -एभा २.१६७. ॰ब्रह्म-न. वेद. 'हें शब्दब्रह्म अशेष ।' -ज्ञा १.३; एभा ११.४९८. [सं.] ॰भेद-पु. १ शाब्दिक फरक. २ प्रतिशब्द; दुसरे शब्द. [सं.] ॰भेदी-वेधी-वि. १ आवाजावरून बाण मारण्यांत पटाईत, निष्णात, तरबेज. २ वस्तूचा नुसता नाद ऐकून त्यावर बिनचूक जाणारा, वेध करणारा (अस्त्र, शक्ति, मंतरलेला बाण इ॰). ३ (ल.) थोडक्या शब्दांवरून एखाद्याचें अंतरंग, मतलब, बेत जाणणारा; चांगला तर्कबाज. ४ दशरथ, अर्जुन यांचें विशेषण, अभिधान. [सं.] ५ मंत्रानें दुस- ऱ्याचा नाश करणारा; केवळ मंत्रोच्चारामुळें शत्रूचा नाश करणारा. ॰माधुर्य-न. शब्दांतील गोडी; मधुर भाषण. [सं.] ॰योगी- वि. (व्या.) व्याकरणांत नामें आणि नामाप्रमाणें योजलेले इतर शब्द यांना जोडून येणारें (अव्यय). उदा॰ वरे, खालीं, पुढें, मागें इ॰. हीं ज्यांना जोडलीं जातात त्यांचे सामान्यरूप होतें. ॰योजनास्त्री. १ शब्दांची निवड, योग, जुळणी. २ शब्द- रचना; वाक्यरचना. [सं.] ॰योनि-स्त्री धातु; शब्दाचें मूळ. [सं.] ॰रचना-स्त्री. शब्दांची रचना, मांडणी; वाक्यरचना; शब्दयोजना. [सं.] ॰राशि-पु. वेद. -मनको. ॰लालित्य-न. शब्दसौंर्य; शब्दांची मनोवेधक योजना. लालित्य पहा. [सं.] ॰वाहक यंत्र-न. विजेच्या सहाय्यानें दूर अंतरावरून बोल ण्याचें यंत्र. (इं.) टेलिफोन. 'सौ. महाराणीसाहेबास वारा घाल- ण्यास एक स्त्री कामगार पाठविण्यास शब्दवाहकद्वारें...हुकूम द्यावा' -ऐरापुप्र ४.२२४. ॰विचार-पु. १ शब्दसाधनविचार; प्रत्यय प्रकरण. (इं.) इटिमॉलॉजी. २ (व्या.) वाक्यांतील निरनिराळ्या शब्दांचा परस्परांशीं असणाऱ्या संबंधाचा विचार. ॰विता- पु. परमात्मा. -मनको. ॰वेध-पु. १ वेदांतील गूढ स्थळें; शब्दांचें कूट; शब्दांचें जाळें; आडंबर. 'कंठीं शब्दवेधांचें साखळें.' -शिशु १११. २ आवाजास अनुसरून बाण, गोळी वगैरे मारणें. ॰वेधी-वि. शब्दभेदी पहा. ॰वैपरीत्य-न. (बोलणाराच्या हेतूशीं) विरुद्ध, विपरीत शब्दयोजना; भलतीच शब्दयोजना; चुकीची पदयोजना. 'कुंभकर्ण बोलला निद्रापद, कुंभकर्णाच्या मनांत होतें इंद्रपद, तस्मात्-शब्दवैपरीत्य झालें.' [सं.] ॰शक्ति-स्त्री. १ शब्दाचा जोर; शब्दाचा वास्तविक, अगदीं बरो- बर असा अर्थ. शब्दाचा यौगिक अर्थ. २ (साहित्य) अभिधा, वझणा, व्यंजन इ॰ शब्दार्थ बोधकवृत्ति. [सं.] ॰शक्तिगम्य-वि. शब्दशः; मूळ अर्थाप्रमाणें. ॰शासन-न, शब्दांचा अर्थ, त्यांची योजना वगैरे संबंधी; व्याकरणशास्त्र, शब्दविचार, इ॰ नियम. [सं.] ॰शास्त्र-न. १ शब्दविज्ञान; शब्दांचें संपूर्ण विवरण कर- णारें शास्त्र; व्युत्पत्तिशास्त्र. २ व्याकरणशास्त्र. [सं.] ॰शुद्धि- स्त्री. १ व्याकरणनियमाप्रमाणें निर्दोष अशी शब्दयोजना; अचूक मांडणी. २ शब्दांतील दोष काढून टाकणें; शब्दांची तपासणी; दुरस्ती. ३ परकीय शब्द न वापरणें; भाषाशुद्धि. ॰शूर-पु. केवळ बोलण्यांत शूर, पटाईत. -धनुर्भंग पृ. ७३. ॰श्री-स्त्री. शब्दांची शोभा. 'एथूनि शब्दश्री सच्छास्त्रिक ।' -ज्ञा १.३४. ॰संग्रह-पु. शब्दसमूह; शब्दसमुच्चय; शब्दकोश-ष. [सं.] ॰संचय-पु. शब्दांचा सांठा, समूह; शब्दांची समृद्धि, वैपुल्य. ॰संदर्भ-पु. वाक्य रचनेंतील शब्दांचा एकमेकांशीं असलेला संबंध-अन्वय. [सं.] ॰सादृश्य-न. (अर्थानें अगदीं निराळे असणाऱ्या) शब्दांतील साम्य, सारखेपणा [सं.] ॰साध- निका-स्त्री. १ शब्दविचार; शब्दांची बनावट; व्युप्तत्ति. २ शब्दांची फोड, उकल; व्याकरण चालविणें. [सं.] ॰साधित- न. शब्दापासून, नामापासून साधलेला शब्द. -वि. (व्या.) नामापासून बनलेलें. याच्याउलट धातुसाधित. [सं.] ॰साम्य- न. शब्दांचा सारखेपणा; सादृश्य. [सं.] ॰सूची-स्त्री. शब्दांची सूची. याच्या उलट पदसूची वगैरे. [सं.] ॰सृष्टि-स्त्री. १ शब्दांचा संग्रह; शब्दांची रचना. २ (ल.) काव्य; ग्रंथ; प्रबंध. 'आतां वंदूं कवेश्वर । शब्दसृष्टीचे ईश्वर ।' -दा १.७. [सं.] ॰स्फुरण-न. (शब्दांचें फुरफुरणें, थरथरणें) ज्यांत जोडाक्षरें व ट वर्गांतींल अक्षरें एकसारखीं पुष्कळ येतात अशा कठोर, कर्ण- कटु प्रबंधाबद्दल म्हणतात [सं.] ॰स्वारस्य-न. शब्दांतील गोडी, लज्जत; शब्दामाधुर्य. [सं.] शब्दविणें-क्रि. बोलविणें. 'मीचि शब्दातें शब्दातें शब्दबिता ।' -एभा १३.३४४. शब्दाचा मार-पु. वाक्ताडन; शब्दप्रहार; कानउघाडणी; निर्भर्त्सना. 'वेड्यास टोणप्याचा मार, शहाण्यास शब्दाचा.' शब्दांची कसरत-स्त्री शंब्दांची कसरतीप्रमाणें वळेनें केलेली अस्वाभा- विक रचना. 'भाषा आणि तपश्चर्या, वचनाचें कष्ट, शब्दांची कसरत, या गोष्टींची जरूर असते.' -नाकु ३.४. शब्दाडंबर- न. शब्दजाल; केवळ शब्दांचें वैपुल्य; अर्थहीन शब्दरचना; पोकळ वक्तृत्व. [सं. शब्द + आडंबर] शब्दातीत-वि. शब्दांच्या किंवा बोलण्याच्या शक्तीबाहेरचें; वर्णन करितां येत नाहीं असें; शब्दांनीं वर्णन करण्यास अशक्य; अनिर्वाच्य. [सं. शब्द + अतीत] शब्दानुप्रास-पु. (साहित्य) शब्दाचा अनुप्रास; एक यमक- रचना; ज्यांत त्याच त्या शब्दाची पुनःपुनः आवृ्त्ति होतें असा अलंकार. याच्या उलट वर्णानुप्रास. [शब्द अनुप्रास] शब्दानु- शासन-न. शब्दशासन; शब्दांच्या लिंग, रूपांबद्दल, अर्थाबद्दल वगैरे नियम. [सं.] शब्दानशब्द-क्रिवि. प्रत्येक शब्द. 'या एकंदर बोलण्यांतील शब्दान्शब्द शांतपणानें शिष्याच्या मुखांतून निघत होता.' -उषःकाल. [शब्द + न् = आणि + शब्द] शब्दा- मृत-न. (काव्य) शब्दमाधुर्य; वाड्माधुर्य; अमृताप्रमाणें गोड शब्द. [शब्द + अमृत] शब्दार्थ-पु. १ शब्दाचा अर्थ, आशय २ शब्दाचा मूळ, शब्दाशः अर्थ; यौगिकार्थ. [सं.] शब्दालंकार- पु. (साहित्य) शब्दाच्या रूपावरून साधलेला अलंकार; काव्यां- तील अनुप्रास; यमकादि अलंकार; याच्या उलट अर्थांलंकार. या अलंकारांचें पुढील पांच प्रकार आहेत:-वक्रोक्ति, अनुप्रास, यमक, श्लेष, पुनरुक्तवदाभास. ह्यांत पुन्हां प्रत्येकाचे जे निरनिराळे भेद आहेत ते सर्व प्रतापरुद्रग्रंथांत व काव्यप्रकाशांत सांगितले आहेत. [सं.] शब्दाशब्द-पु. १ चांगले-वाईट शब्द; अविचाराचे व उद्धटपणाचें भाषण; वेळ प्रसंग न पहातां असभ्यपणाचें बोलणें. 'चौघांमध्यें शब्दाशब्द बोलूं नये, चांगले बोलावें' २ अप्रत्यक्ष व आक्षेप न घेतां बालणें; चांगलें किंवा वाईट (यांपैकीं कोणतेंच नाहीं असें) भाषण. 'मी त्याला शब्दाशब्द कांहीं बोललों नाहीं.' [सं. शब्द + अशब्द] शब्दित-न. भाषण; आवाज; बोलण्याचा स्वर; ध्वनि. -वि. १ उच्चारलेलें; बोललेलें; वदलेलें; घोषित केलेलें. २ शब्दानें युक्त केला जो वाद्यादि तो; वाजविलेलें; निना- दित. [सं.] शाब्द, शाब्दिक-वि. शब्दासंबंधीं, वाग्युक्त; वाणीयुक्त; वाचिक. 'तरी तप जें कां सम्यक् । तेंही त्रिविध आइक । शारीर मानसिक । शाब्द गा ।' -ज्ञा १७.२००. २ स्वरासंबंधीं; आवाजासंबंधीं. ३ (व्या.) नामासंबंधीं; नामवा- चक (प्रत्यय वगैरे). ४ अनुभवाशिवाय बडबड करणारे; केवळ शब्द जाणणारे; शब्दज्ञानी. 'वृथा शाब्दिकांचें शब्दज्ञान । तेंहीं व्याख्यान दाविलें ।' -एभा ११.६४८. -पु. शब्दांचे अर्थ जाणण्यांत व रूपें समजण्यांत, करण्यांत निष्णात, हुषार; तरबेज; वैयाकरण. [सं.] शाब्दबोध-पु. शाब्दिक बोध; अक्षरशः होणारा अर्थ; यौगिक अर्थ. [सं.] शाब्दिकसृष्टि-स्त्री. अलंकारिक, कुशल शब्दरचना; काव्यप्रबंधांतील शब्दरचनाचातुर्य. [सं.] शाब्दी-स्त्री. शब्दप्रवृत्ति. 'तेवींचि हा अनादि । ऐसी आथी शाब्दी ।' -ज्ञा १५.२३०.

दाते शब्दकोश

बे

शअ. वांचून; विरहित; अभाव दाखविणारा उपसर्ग. याचा फारशी किंवा हिंदी शब्दांशीं समास होतो व हा शब्द नेहमीं पूर्वपद असतो. [फा. बी; तुल॰ सं. विना; हिं. बिन] ज्यांच्या पूर्वपदीं बे शब्द येतो असे अनेक सामासिक शब्द आहेत. त्यांतील कांहीं पुढें दिले आहेत. सामाशब्द- ॰अकली-वि. मूर्ख; बेवकूब. [फा. बी + अक्ल्] ॰अदब-बी-स्त्री. अपमान; असभ्यता; अमर्यादा; अनादर. [फा. बी + अदबी] ॰अदाई-स्त्री. स्वामिद्रोह; विरोध. अबरु-अब्रू-स्त्री. दुर्लौकिक; अपकीर्ति; फजिती. [फा. बी + आब्रू] अबस-क्रिवि. वृथा; व्यर्थ; निष्फळ. ॰आब-पु. अपमान; बेअब्रू. -वि. अपमान झालेला. [फा. बी + आब्] ॰आराम- वि. अस्वस्थ; आजारी. [फा. बी + आराम्] ॰आरामी-स्त्री. अस्वास्थ्य. [फा.] ॰इज्जत-ती-स्त्री. अप्रतिष्ठा. ॰इज्जती-वि. गैरअबरूदार; हलकट. [फा.] ॰इतबार-पु. गैरविश्वास; गैरभरंवसा. [फा.] ॰इतल्ला-क्रिवि. गैरमाहीत; बे-दखल; बडतर्फ. 'त्याचे कार्कून बे-इतल्ला केले.' -रा १०.११०. [फा.] ॰इनसाफ- इनसाफी-पुस्त्री. अन्याय; न्यायाचा अभाव. -वि. अन्यायाचा; अन्यायी. [फा.] ॰इमान-इमानी, बेमान-वि. कृतघ्न; अप्रामाणिक; बेभरंवशाचा. [फा. बी + ईमान् = अधर्मी] ॰इमानी- इमानकी-स्त्री. खोटेपणा; अप्रामाणिकता; कृतघ्नता; विश्वास- घातकीपणा. ॰इलाज-वि. निरुपाय; नाइलाज. [फा.] ॰उजूर- क्रिवि. १ कांहीं न सांगतां; बिनतक्रार. 'या दिवसांत पोटास न मिळे तेव्हां लोक चाकरी बे-उजूर कैसी करितील? '-रा १०.५७. २ विलंबरहित; बेधडक. [फा.] ॰कदर-क्रिवि. निर्धास्तपणें. ॰कम-ब-कास्त-क्रिवि. कांहीं कमी न करतां; साद्यन्त; जसेंच्यातसें. [फा. बी + कम् + उ + कास्त्] ॰करारी- स्त्री. अनिश्चिती; तहमोड. 'त्याजकडून बेकरारीच्या चाली सुरू होतात.'-रा ७.१९ ॰कस-वि. नि:सत्त्व; कमजोर; बेचव; शुष्क. ॰कानू-स्त्री. अन्याय; जुलूम. ॰कानून-कानू-वि. बेकायदेशीर; कायद्याचा भंग करून केलेलें. [फा.] ॰कायदा-पु. कायदेभंग; कायद्यासंबंधाचा अभाव. ॰कायदा-कायदेशीर- वि. नियमबाह्य; गैरकायदेशीर; जुलमी; नियमाचें उल्लंघन करणारा; नियमाला सोडून असलेला [फा. बी + काइदा] ॰कार-वि. १ निरुद्योगी; बे-रोजगारी; रिकामा. २ (व.) निरर्थक; व्यर्थ; उगाच. ३ (ल.) हैराण; निरुपयोगी. 'तिन्ही मोर्चे मिळोन निमे माणूस दुखणियानीं बेकार आहे.' -पेद ३.१८ [फा.] ॰कार- चावडी-स्त्री. (को.) रिकामपणाच्या, निरर्थक गप्पागोष्टी. ॰कारी- स्त्री. रिकामपणा; निरुद्योगीता; बेरोजगारपणा. [फा. बीकारी] ॰किलाफ-पु. मैत्री; सख्य; संशयनिवारण. [अर. खिलाफ् = वैर] ॰कुबी-स्त्री. मूर्खपणा; गाढवपणा; मौखर्य. [फा. बेवकुफी] ॰कुसूर-क्रिवि. न. चुकतां; बिलाकसूर; पूर्णपणें. [फा. बी + कुसूर्] ॰कूब-वि. मूर्ख; वेडगळ; वेडझंवा [फा. बेवकुफ] ॰कैद-स्त्री. शिस्तीचा अभावं; स्वैर वर्तन; अव्यवस्थितपणा; कायदा, नियम किंवा शिस्त यांचे उल्लंघन. -वि. बेशिस्त; स्वैर; अनियंत्रित. -क्रिवि. स्वैरपणानें; कोणत्याहि तर्‍हेचा कायदा किंवा नियम न मानतां. [फा. बी + कैदी] ॰कैदी-वि. स्वैर; कायदा, नियम, नियंत्रिण इ॰ न पाळणारा; बेशिस्त. ॰कौली-वि. बिगर कौलाचा; अभयपत्रविरहित. ॰खत्रे-क्रिवि. निःशंकपणें. 'बेखत्रे हुजूर यावें.' -जोरा १०५. ॰खबर-क्रिवि. असावध; गाफीलपणें. [फा. बी + खबर्] ॰खबर्दार-वि. गैरसावध. [फा.] ॰खर्च-खर्ची-वि. १ खर्च केल्याशिवाय झालेलें, केलेलें; फुकटंफाकट. २ खचीं जवळ नाहीं असा; निर्धन; कृपण. [फा. बी + खर्च्] ॰खातरी-स्त्री. अविचार. 'चार कोटींची मालियत जवळ असतां कंजूषपणानें सर्दारास बेखात- रीनें निरोप दिल्हा.' -जोरा १०९. गर्द-वि. वृक्षरहित; झाडी नसलेलें. 'मुलूख अगदीं वीसपंचवीस कोसपर्यंत बे-गर्द, वेचिराख जाहला.' -पाब १४ [फा. बगिर्द] ॰गार-गारी-बिगार, बिगारी पहा. ॰गुन्हा-पु. गुन्ह्यापासून मुक्तता, सुटका.-वि. गुन्हा नसलेला; अपराधांतून मुक्त झालेला. -क्रिवि. गुन्हा नसतांना. 'बक्षीस बेगुन्हा कैद केलें. ' -जोरा १०५ [फा.] ॰गुमान-नी-वि. बेपर्वा; गर्विष्ठ; उन्मत्त; निःशंक; मुर्वत नसणारा. [फा. बेगुमान्] ॰चतुर-वि. मूर्ख. ॰चरक-क्रिवि. निर्भयपणें; धडाक्यानें; निर्भीडपणें; बेधडक. ॰चव-वि. रुचिहीन; कवकवीत; नीरस; निचव. ॰चाड-वि. चाड नसलेला; लज्जाहीन; उद्धट. ॰चिराख- ग-वि. दीपहीन; ओसाड; उध्वस्त; वस्तीरहित; उजाड. [फा. बी + चीराघ् = दिवा] ॰चूक-वि. बिनचूक; बरोबर; चुका केल्या- शिवाय. [फा. बी + हिं. चूक] ॰चैन-वि. अस्वस्थ; कांहींहि सुचत नाहीं असा [फा. बी + हिं चैन] ॰चोबा-पु. खांबाशिवाय असलेला लहान तंबू. [फा. बीचोबा] ॰छूटपणा-पु. आळा, बंध नसणें; स्वैराचार; स्वच्छंदीपाणा. ॰जबाब-क्रिवि. उद्धट- पणानें; बेपर्वाईनें (बोलणें, उत्तर देणें). [फा. बी + जवाब्] ॰जबाबदार-वि. स्वतःवरची जोखीम न ओळखणारा; जोखीम न ओळखून स्वैर वागणारा. बेजबाबदार राज्यपद्धति-स्त्री. लोकमतास जबाबदार नसलेली राज्यपद्धति. ॰जबाबी-वि. १ उद्धट; उर्मट; बेमुर्वतखोर. २ तासाचे ठोके न देणारें (घड्याळ). [फा. बी + जवाब् = निरुत्तर] ॰जबर-क्रिवि. निर्भयपणें; निःशंक- पणें; बेधडक; जोरानें; उठाव करून; धाक न बाळगतां. 'आमच्या भले लोकांनीं बेजबर घोडीं घालून कित्तूरकरास मोडून वोढ्यापर्यंत नेऊन घातला. ' -ख ५.२३८८ [फा.] ॰जात-वि. (अशिष्ट) हलक्या किंवा निराळ्या जातीचा. ॰जान-वि. निर्जीव; ठार. [फा.] ॰जाब-वि. बेगुमान; बेमुलाजा; बेजबाबदार. [फा.] ॰जाबता-पु. अन्याय; ठरावाविरुद्ध गोष्ट; अविचारी भाषा. 'आम्ही टोंचून घेणार नाहीं, असेना असे मरून जाऊं असे बेजाबता बोलत होते.' -टिकळचरित्र, खंड १. ॰ज्यहा-जा- जहा-वि. फाजील; अनाठायीं; अनुचित; अयोग्य; अमर्याद; अकालीन; रुष्ट; उधळपट्टीचा. [फा.बी + जा] बेजार-वि. १ हैराण; त्रस्त; दमलेले; थकलेला (श्रम, दुःख, कटकट यांमुळें). २ दुखाण्यानें हैराण झालेला; दुखणाईत. [फा. बिझार्] बेजारी- स्त्री. त्रास; हैराणी; थकवा. ॰डर-न. ड्रेडनॉट नांवाचें जंगी लढाऊ जहाज. -वि. न भिणारी; न डरणारा. बेडर पहा. [हिं. डर] ॰डौल-वि. कुरूप; बेढब; घाट किंवा आकार चांगला नसलेला. ॰ढंग-पु. दुराचरण; स्वैराचार; बेताल वागणूक; सोदेगिरी. [हिं.] ॰ढंग-गी-वि. दुराचरणी; व्यसनी; स्वैराचारी. [हिं.] ॰ढब- वि. बेडौल; कुरूप; विक्षिप्त; ढबळशाई; चांगला घाट, आकार नसलेला; ओबडधोबड. [हिं.] ॰तकबी-वि. असमर्थ; ना-तवान. [फा. बेतक्विया] ॰तकसी(शी)र, बेतक्शी(तकसी)र- स्त्री. अपराधापासून, गुन्ह्यापासून, भुक्तता. -वि. निरपराधी; नाहक; निर्दोषी. [फा. बी + तक्सीर] ॰तमा-स्त्री. १ निर्लोभि वृत्ति. २ बेफिकीरपणा; बेपरवा; उदासीनपणा. -वि. १ निर्लोभी; निरिच्छ. २ बेपरवा; बेगुमान; गर्विष्ठ; निष्काळजी; बेसावध; काळजी, कळकळ न बाळगणारा. -क्रिवि. बेगुमानपणें. 'खांद्यावर टाकून पदर बोले बेतमा । लग्नाच्या नवऱ्याशीं बोले बेतमा ।' -पला. [फा] ॰तमीज-वि. (ना.) उद्धट; असभ्य. [फा. बे + तमीज] ॰तर्तुद-स्त्री. तजविजीचा अभाव; अव्यवस्था. ॰तर्‍हा-स्त्री. असाधारणपणा; वैलक्षण्य; चमत्कारिकपणा. -वि. विलक्षण; चमत्कारिक; असाधारण; भारी; अतिशय. 'याउपर उपेक्षा करून कालहरण केलियास नाबाबाचे दौलतीस बे-तर्‍हा धक्का बसेल.' -रा. ५.१६६. [फा. बी + तरह्] ॰ताब-वि. असमर्थ; क्षीण; हतधैर्य. ' मातुश्री अहल्याबाई यांस शैत्यउपद्रव होऊन पांचसात दिवस बे-ताब होती.' -मदाबा १.२१८ [फा. बी + ताब्] ॰ताल- ळ-वि. १ गायनांत तालाला सोडून असलेलें (गाणें-बजावणें). २ ताल सोडून गाणारा, वाजविणारा. ३ (ल.) अमर्याद; अनियं- त्रित; स्वैर; उधळ्या. [हिं.] ॰तालूक-वि. गैरसंबंधीं; संबंध नसलेला; भलता. [फा. बे + तअल्लुक = संबंध] ॰दखल-वि. १ अधिकारच्युत; बेईतल्ला. २ गैरमाहीत. [फा. बी + दख्ल्] ॰दम-वि. दम कोंडला जाईपर्यंत; निपचीत पडेपावेतों दिलेला (मार); थकलेला; दमलेला; निपचीत. [फा.] ॰दरद-दी-दर्द- दर्दी-वि. १ बेफिकीर; बेगुमान; मागेंपुढें न पाहणारा; भय न बाळगितां स्वच्छंदपणें वागणारा. २ बारीकसारीक विचार न पाहणारा. ३ निर्घृण; क्रूर; दया नसलेला. [फा.] ॰दस्तूर-पु. अन्याय; नियमाविरहित गोष्ट; गैरशिरस्ता. ॰दस्रतूई-स्त्री. (गो.) उधळेपणा. [फा.] ॰दाणा-दाना-पु. १ आंत बी नाहीं असें द्राक्ष. हें लहान, गोड, गोल, बिनबियांचें असतें. २ सुकविलेलें द्राक्ष; किसमिस. [फा.] ॰दाणा डाळिंब-न. दाण्यांत बीं नसलेलें डाळिंब. ॰दाद-स्त्री. बेबंदशाही; अन्याय; जुलूम. [फा.] ॰दार-क्रिवि. जागृत; तयार. 'नबाब बेदार जाले.' -रा ७.८३ [फा.] ॰दावा-पु. सोडचिठ्ठी; नामागणी; हक्क सोडणें. ॰दावा पत्र-फारखती-नस्त्री. हक्क सोडल्याबद्दल, नसल्याबद्दल लिहून दिलेला कागद; सोडचिठ्ठी. ॰दिक(क्क)त-क्रिवि. बेलाशक; बिनहरकत; बिनतक्रार; बेउजूर; निःशंकपणें. [फा.] ॰दिल- दील-वि. उदासीन; असंतुष्ट; दुःखी कष्टी. [फा.] ॰दील होणें-बिथरणें. ॰दिली-स्त्री. १ असंतुष्टता; औदासीन्य; निरु त्साह. २ रुष्टता; मनाचा बेबनाव. ॰दुवा-स्त्री. अवकृपा; शाप. [अर.] ॰धडक-क्रिवि. बिनघोक; निर्धास्तपणें; निर्भय; बेलाशक. [हिं.] ॰धरी-वि. धरबंद नसलेला; नियंत्रण नसलेला; मोकाट; स्वैर. [बे + धर] ॰नवा-वि. अधीर; असहाय; निर्धन; भुकेला. 'पादशहा बेनवा होऊन खानास लिहीत. ' -मराचिथोर ५३. [फा.] ॰नहाक-नाहक-क्रिवि. विनाकारण; उगीचच्याउगीच; कारण नसतांना; हक्कनहक्क, हक्कनाहक्क पहा. ॰निगा-स्त्री. दुर्लक्ष; अपरक्षण. [फा.] ॰निसबत-क्रिवि. बेलाशक; काहींहि विचार न करतां; मनांत कोणातीहि शंका न बाळगतां; बेपर्वाइनें; एकदम. [फा.] ॰निहायत-न्याहत-क्रिवि. निःसीम; अपार; परकाष्ठेचा. [फा.] ॰पडदा-वि. १ पडदा नसलेला; उघडपणें; कोणत्याहि तऱ्हेची गुप्तता न राखतां. २ (ल.) मानखंडित. क्वचित् नामाप्रमाणें उपयोग करितात. -पु. १ उघड गोष्ट; २ (ल.) मानखं डना. [फा.] ॰परवा-पर्वा-वि. निष्काळजी; निर्भय; बेगुमान. [फा.] ॰परवाई-पर्वाई-स्त्री. निष्काळजीपणा; बेगुमानी; स्वैरावृत्ति. [फा. बी + पर्वाई; तुला॰ सं द्विप्रव्राजिनी] ॰पाया- वि. गैरकायदा; नियमाविरुद्ध. ॰फंदी-वि. १ व्यसनी; दुराचारी; स्वैर. बेशुद्ध. २ खट्याळ; उच्छृंखल; खोडकर (मूल). ॰फाम-वि. १ बेसावध; बेशुद्ध. २ निश्चिन्त; गाफिल; अनावर; मस्त; तुफान; बेभान. 'शत्रू माघार गेला म्हणून बेफाम नाहीं, सावधच आहों.' -ख ७.३३१०. [फा. बी + फह्म्] ॰फामी-स्त्री. गैर- सावधपणा; गाफिली; निश्चिन्ती; खातर्जमा; दुर्लक्ष. ' या विश्वा- सावर बेफामी जाली याजमुळें दगाबाजीनें निघोन गेला. ' -दिमरा १.२५२. ॰फायदा-वि. गैरफायदेशीर; तोट्याचें; अव्यवस्थित. ॰फिकि(की)र-स्त्री. निष्काळजीपणा. -वि. १ निष्काळजी; बेपर्वा; अविचारी. २ निश्चिंत; निर्धास्त; संतुष्ट. [फा. बी + फिक] ॰फिकिरी-स्त्री. निष्काळजीपणा; गाफिली; निःशकपणा. ॰बंद- पु. अराजकता; शिस्तीचा अभाव; गोंधळ. 'हुजरातीमध्यें बेबंद सर्वथा हिऊं देऊं नये.' -मराआ १४ -वि. अव्यवस्थित; मुक्त; व्यवस्था, बंदोबस्त, कायदा, शिस्त इ॰ नसलेला; बेशिस्त; अराजक. [फा.] ॰बंदशाई-ही, बेबंदाई-बंदी-स्त्री. १ अव्यवस्था; गोंधळ; मोंगलाई; अनायकी; अंदाधुंडी; अराजकता. २ जुलूम. ' सांगुं किती दुनियेवर बेबंदी । ही मस्लत खंदी । ' -राला १०६. ॰बदल-वि. १ बदललेला. २ बंडखोर. 'गुलाम कादर- खान पादशहासी बेबदल होऊन... ' -दिमरा १.२००. [फा.] ॰बनाव-पु. भांडण; तेढ; तंटा; बिघाड. ॰बर्कत-स्त्री. अवनति; हलाखी; तोटा. [फा.] ॰बहा-वि. अमोल; किंमत करतां येणार नाहीं असें. [फा.] ॰बाक-वि. निर्भीड; बेडर. [फा.] ॰बाक-ग, बेबाकी-स्त्री. अशेष फडशा; कर्जाची पूर्ण फेड. -वि. निःशेष; संपूर्ण; कांहींहि शिल्लक, बाकी न ठेवतां फेडलेलें (कर्ज). [फा.] ॰बारत-स्त्री. बेइतबार; अविश्वास. ॰बुनियाद-बुन्याद-स्त्री. अन्याय; राखरांगोळी; नाश. 'आम्ही मदारुल महाम व फारांसीस तिघे मिळून इंग्रेजांची बेबुनियाद करूं.' -रा १०.१९९ [फा. बुनियाद् = पाया] ॰बुदी-बुद-स्त्री. १ नाश; खराबी; अभाव. २ नाबूद. [फा.] ॰भरंवसा-भरोसा-पु. अविश्वास; संशयितपणा; खात्री नसणें. [हिं.] ॰भरोशी-वि. खात्री किंवा भरंवसा अगर विश्वास ठेवतां येणार नाहीं असा; फसव्या. ॰मजगी-स्त्री. वितुष्ट; अरुचि; बेबनाव. 'पादशहांची व गुलामकादार यांची बेमजगी होऊन... 'दिमरा १.१९९. [फा.] ॰मनसबा-मन्सबा- पु. अविचार; खराब मसलत. [फा.] ॰मब्लग-मुब्लक- मोब्लक-वि. असंख्य; अपरिमित. [अर. मब्लघ्] ॰मारामत- स्त्री. नादुरुस्ती. 'आरमाराची बेमरामत जाली.' -वाडसमा २.१९५ -वि. नादुरुस्त; दुरुस्तीची जरूर असलेलें; दुरुस्तीवांचून असलेलें; अव्यवस्थित. [फा.]॰ मर्जी-स्त्री. इतराजी; अवकृपा; मर्जीविरुद्ध वर्तन. [फा.] ॰मलामत-वि. कीर्तिवान्. [अर. मलामत = दूषण] ॰मस्लत-स्त्री. अविचार. ' स्त्रीनायक, बालनायक आणि बेमस्लत, तीन गोष्टी येके ठिकाणीं; चौथा अहंकार; तेव्हां ईश्वर त्या सर्दारीची अब्रू ठेवील तर ठेवो. ' -खपल २.७० [फा.] ॰मान-मानी-मानकी-गी-बेइमान इ॰ पहा. ॰मानगिरी - स्त्री. बेइमानी; हरामखोर. ॰मार-वि. १ किंवा हल्ला करतां न येण्यासारखा (किल्ला). २ अतिशय; कमालीचा; जोरदार; विपुल; भरपूर, बेसुमार इ॰. उदा॰ बेमार-पाऊस-वारा-ऊन्ह-धूळ- लढाई-पीक-धान्य-आंबे इ॰ (पडतो-सुटला-पडतें-उडते-चालती-झालें-पिकले इ॰ क्रियापदांस जोडून उपयोग). ३ आजारी; दुखणाईत. ४ थकलेला; दमलेला; बिमार. ५ (व.) वस्ती नसलेलें; उपयोगांत नसलेलें (घर, वस्तु). [फा.] ॰मारी-स्त्री. १ आजार; आजारीपण; दुखणें. २ शिणभाग; थकवा; अशक्तता. ॰मालूम- वि. माहीत न होण्याजोगें; दिसणार नाहीं, ओळखतां येणार नाहीं, शोधतां येनार नाहीं असें; जाणण्यास कठिण; हुबेहुब. 'नवीन माहितीचा जुन्या पद्धतीशीं बेमालूम सांधा जोडणें कठिण आहे.' -टि ४.२७१ [हिं.] ॰मुनासीब-मुनास्रब-वि. अयोग्य; गैरवाजवी; बुद्धीला न पटणारे; अयुक्त. [हिं.] ॰मुन्सफी-स्त्री. अन्याय. 'हिंदू मुसल्मान, ईश्वराचे घरचे दोन्ही धर्म चालत असतां मुसल्मानानें हिंदूचे जाग्यास उपद्रव करावा हे बे-मुन्सफी.' -पया १० [फा.] ॰मुरवत-मुर्वत-क्रिवि. असभ्यपणें शिष्टाचाराला सोडून; भीड, पर्वा इ॰ न बाळगतां. [फा.] ॰मुरवत-ती, ॰मुर्वत-ती-वि. कठोर; निर्दय; निर्भीड; निर्भय; बेमुलाजा. [फा.मुरुवत् = माणुसकी] ॰मुलाजा-मुलाहिजा- क्रिवि. कांहीं न पाहतां; दयामाया सोडून; निष्ठूरपणें; बेमुर्वतपणें. [अर.मुलाहझा = पर्वा, विचार] ॰मोताद-वि. बेसुमार; असंख्य; अपरिमित. [अर. मुअत्द्द = संख्या, परिमित] मोयीं(ई)न- मोइनी-मोहीन-वि. १ अनियमित; ठरावबाह्य. २ अपरिमित; असंख्य. [फा. बी + मुअय्यन्] ॰मोहर-स्त्री. बिन शिक्क्याचें; शिक्का नसलेलें; गैरमोहरबन्दी.'कित्येक दफ्तरें सर्वमोहर व कितेक बे-मोहरेची.'-रा, खलप २.९. [फा.] ॰मोहीम-- वि.मोहीम न करणारा; उपजीविकेकरतां किंवा धंद्या-उद्योगा- करितां खटपट न करणारा; घरबशा; बाहेर न जाणारा. [फा.] रंग-पु. विरस; खराबी; मौजेचा (मान, कींती, सौदर्य इ॰चा) भंग; अपमान; फजीति. -वि. ज्याचा रंग बिघडला आहे असा. [हिं.] ॰राजी-वि. असंतुष्ट. [फा.] ॰रुख्सत-क्रिवि. पर्वा- नगीवांचून. [अर. रुख्सत् = परवानगी] ॰रू(रों)ख-पु. १ दुसरी- कडे तोंड फिरविणें; दिशा बदलणें. २ प्रेमाचा अभाव. -वि. अप्रसन्न; उदासीन; रुष्ट; विन्मुख. [फा. रुख् = दिशा] ॰रोजगार-री- वि. निरुद्योगी; बेकार; रिकामा. [फा.] ॰लगाम-मी-वि. १ लगाम नसलेला. २ लगामाला दाद न देणारा. ३ (ल.) अनियंत्रित; स्वैर; मोकाट; बेताल. ४ आडवळणी; जाण्यायेण्यास सोयीचें नसलेलें; एकीकडे असलेलें; गैरसोयीचें (शेत, घर). -क्रिवि. एकीकडे; एका बाजूला; आडरस्त्यावर. [फा. बी + लिगाम्] ॰लगामीं पडणें- १ भलत्या मार्गाला लागणें; बहकणें; स्वैर बनणें. २ हयगय होणें; आबाळ होणें. ॰लाग-पु. निरुपायाची किंवा नाइलाजाची स्थिति. 'माझा बेलाग झाला.' -वि. १ जो घेण्याला किंवा ज्यावर मारा करण्याला कठीण आहे असा; दुःस्साध्यं; अवघड; बळकट (किल्ला). २ दुःस्साध्य; दुराराध्य; अप्राप्य; आचरण्यास कठीण असा (विषय). ३ सुधारण्याला कठीण; निरु- पायाचा; दुःसाध्य (रोग, विषय). -क्रिवि. १ मदतीवांचून; उपायावाचून; निरुपायानें; नालाजानें. २ निराधार; आधारावांचून. ३ तडकाफडकीं; ताबडतोब; एका क्षणांत. [फा. बी + म. लागणें] ॰वकर-वक्र-वि. फजीत; मानखंडित; अपमानित. [फा. बीवकर्] ॰वकरी-स्त्री. मानखंडना; अप्रतिष्टा; निर्भर्त्सना. [फा.] ॰वकूब (फ)बेकूब-वि. मूर्ख; खुळसट; अजाण; अडाणी अज्ञान. [फा. बेवकूफ] ॰वकूबी-फी-स्त्री. मूर्खपणा; मूढता. ॰वजे-स्त्री.(व.) गैरसोय; गैरव्यवस्था; गैररीत; विलक्षण प्रकार. [बिवजेह] ॰वतन- क्रिवि. हद्दपार; जलावतन. [अर. वतन् = जन्मभूमि] ॰वसवसा- वस्वसा-वस्वास-क्रिवि. निर्भयपणें; निश्चिन्त; शांतपणें; बे- दिक्कत; निर्भीडपणें. [अर. वस्वास, वस्वसा = भीति, काळजी] ॰वारशी-वारशीक-वारीस-वि. ज्यावर कोणाचा हक्क, वारसा नाहीं असा; निवारशी; योग्य हक्कदार, मालक किंवा वारसा नसलेला. [अर. वारिस् = वडीलोपारर्जित संपत्तीचा हक्कदार] ॰वारसा-पु. वारसाहक्क नसणें; वारस नसणें. ॰वारा-पु. कर्ज- फेड; कामकाज उरकून टाकणें; उलगडा; सांठा, पैसाइ॰ चा निकाल लावणें. [हिं.] ॰शक-वि. १ निर्धास्त; निःशंक; धीट. २ निर्लज्ज. -क्रिवि. १ निःशंकपणें; बेलाशक; निःसंशय २ निर्लज्जपणें. [फा. बी + शक्क्] ॰शरम-श्रम-वि. निर्लज्ज; पाजी; निलाजरा [फा. बे + शर्म्] ॰शरमी-श्रमी-स्त्री. निर्लज्जपणा; पाजीपणा. ॰शर्त- स्त्री. बिनशर्तपणा. -क्रिवि. बिनशर्त; अट न ठेवतां; आढेवेढे न घेतां. [अर. शर्त् = अट, नियम] ॰शिरस्ता-पु. गैरवहिवाट; गैररीत; वहिवाटीच्या विरुद्ध. [फा. सर्रिश्ता = वहिवाट, नियम] ॰शिस्त-स्त्री अव्यवस्था -वि. गैरशिस्त; अव्यवस्थित; अनि- यमित (मनुष्य, वर्तन, भाषण). [फा.] ॰शुद्ध-वि. गैरसावध; (मूर्च्छा इ॰ कांनीं) शद्धिवर, भानावर नसलेला; धुंद; अचेतन; जड. [फा. बी + सं. शुद्धि] ॰शुभह-क्रिवि. निःसंशय. 'बेशुभह शिकस्त खाऊन फरारी होतील.' -पया ४८२.[फा] ॰शौर- वि. बेअकली; मुर्ख; बेवकूब. [अर शुऊर् = अक्कल] ॰सतर- वि. अप्रतिष्ठित; मानखंडीत. [अर. सित्र = पडदा] ॰सनद- सनदी-वि. बेकायदेशीर; सनदेविरहीत. 'श्रीमंत दादासाहेब येऊन त्या उभयतांसी सलूक करणार नाहींत व बेसनद पैसाही मागणार नाहींत.' -रा ६.३८२. ॰समज-पु. (ना.) गैरसमज. -वि. अडाणी. [हिं.] ॰सरंजाम-वि. सामुग्रीविहीन; शिबंदी शिवाय. [फा.] ॰सरम-स्त्रम-(अशिष्ट) बेशरम पहा. ॰सावध- वि. १ लक्ष नसलेला; तयार नसलेला; निष्काळजी; गैरसावध. २ बेशुद्ध; शुद्धीवर नसलेला. [हिं.] ॰सुमार-वि. अमर्याद; अति- शय; अपरिमित; मर्यादेच्या, अंदाजाच्या बाहेर. [फा. बीशुमार्] ॰सुमारी-स्त्री. अपरिमित. ॰सूर-वि. बदसूर; सुरांत नस- लेला (आवाज-गाण्याचा, वाजविण्याचा). [हिं.] ॰हंगाम-पु. १ अवेळ; भलता काळ-वेळ. २ (ल.) दंगा. 'हे बेहंगाम कर- णार.'-ख १२०५. [फा.] ॰हतनमाल-हतन्माल-हन- तमाल-पु. बेवारशी म्हणून सरकारांत जमा झालेला माल, संपत्ति. [फा. बी + तन् + माल्] ॰हतन-मावशी--स्त्री. बेहतनमाल व बटछपाई या संबंधींच्या कामाचें खातें. ॰हतर-हत्तर-हेत्तर- वि. अधिक चांगले; श्रेयस्कर.[फा. बिह्त्तर; तुल॰ इं. बेटर] ॰हतरी-हेत्तरी-स्त्री. बरेपणा; सुधारपणा. ॰हद-द्द-स्त्री-स्त्री. परा- काष्ठा; अमर्यादपणा; अतिशयितता; बेसुमारपणा. -वि अतिशय; पराकाष्टेचा; बेसुमार; अमर्याद; निःस्सीम. [फा. बी + हद्द] ॰हया, हय्या-वि. उद्धट; निर्लज्ज; बेशरम; निलाजरा. [फा.] ॰हाल- पु. दुर्दशा. -वि.दुर्दशाग्रस्त; दुःखार्त. 'चिमट्यानें मांस तोडून बेहाल करून मारिला.'-जोरा ८५. [फा. बी + हाल्] ॰हिक्मत- स्त्री. मुर्खपणा. [हिं.] ॰हिम्मत-ती-स्त्री. भ्याडपणा. [हिं.] वि. हतधैर्य; भ्याड; भित्रा. ॰हिसा(शे)ब-वि. १ अयोग्य; गैरविचाराचें; अनुचित. २ अगणित; हिशोबाबाहेरील; हिशोब करतां येणार नाहीं असें. [फा.] ॰हुकूमी-स्त्री. अवज्ञा; बंडखोरी. ॰हुजूर-क्रिवि. १ एखाद्याच्या गैरहजेरीत. २ (चुकीनें) एखा- द्याच्या समक्ष. [फा.] ॰हुर्म(रम)त-ती-स्त्री. अप्रतिष्ठा; मान- खंडना; अपमान; अकीर्ति. -वि. मानखंडीत; पत घालवून बसलेला; मान नाहींसा झालेला. [फा.] ॰हुशार-वि. गाफील; गैरसावच. ॰हुशारी-स्त्री. बेसावधपणा; गाफिलगिरी. [फा.] ॰होश-ष- वि. बेशुद्ध; धुंद; तर्र; गाफील; मुर्ख; विचारशक्ति नाहींशी झालेला. [फा. बीहोश्] ॰होशी-स्त्री. बेशुद्धी.

दाते शब्दकोश

पाय

पु. १ (शब्दशः व लक्षणेनें) पाऊल; पद; चरण. ईश्वर, गुरु, पति, धनी इ॰स उद्देशून विनयानें म्हणतात. 'मला तरी हे पाय सोडून राहिल्यानें चैन का पडणार आहे ?' -कोरकि २०. २ तंगडी. ३ कंबरेपासून तों खालीं बोटापर्यंतचा सर्व भाग; चालण्यास साधनभूत अवयव. ४ (ल.) पायाच्या आकाराची, उपयोगाची कोणतीहि वस्तु. (पलंग, चौरंग, खुर्ची, टेबल, पोळपाट इ॰चा) खूर. ५ डोंगराचा पायथा, खालचा, सपाटीचा भाग. ६ अक्षराचा किंवा पत्राचा खालचा भाग. ७ झाडाचें मूळ. ८ चवथा भाग; चतुर्थांश; चरण; पाद. ९ शिडीची पायरी; पावका; पायंडा. १० (ल.) कारण; लक्षण; चिन्ह; रंग. 'मुलाचे पाय पाळण्यांत दिसतात.' [सं. पाद; प्रा. पाअ; सिं. पाओ, पाय; फा. पाए; हिं. पाव] (वाप्र.) ॰उचलणें-भरभर चालणें; न रेंगाळणें. ॰उतारा-र्‍यां आणणें-येणें-नम्र करणें, होणें; तोरा, अभिमान कमी करणें, होणें. ॰काढणें-१ निघून जाणें; निसटणें; नाहींसें होणें. 'वैराग्यलहरीचा फायदा घेऊन पन्हाळ- गडावरून रातोरात पाय काढला.' -भक्तमयूरकेकावली पृ. ३. २ (व्यवहारांतून) अंग काढून घेणें. ॰कांपणें-घाबरणें; भिणें; भीति वाटणें; भयभीत होणें. ॰खोडणें-खुडणें-खुडकणें- निजतांना पाय अंगाशीं घेणें. ॰खोडणें-मरणसमयीं पाय झाडणें, पाखडणें. ॰घेणें-प्रवृत्ति होणें; इच्छा होणें. 'त्या कामाला माझा पाय घेत नाहीं.' ॰तोडणें-(ल.) एखाद्याच्या कामांत विघ्न आणणें. ॰दाखविणें-दर्शन देणें; भेट देणें. 'तो मज दावील काय पाय सखा ।' -मोविराट ६.११८. ॰देणें- १ पायाचा भार घालून अंग चेपणें. २ तुडविणें; उपद्रव देण्या- साठीं, कुरापत काढण्यासाठीं एखाद्याला पायानें ताडन करणें. ३ पाय लावणें; पायाचा स्पर्श करणें. ॰धरणें-१ पायां पडणें; शरण जाणें; विनंति करणें; आश्रयाखालीं जाणें. २ अर्धांगवायु इ॰ रोगांनीं पाय दुखणें. ॰धुवून-फुंकून टाकणें-ठेवणें- (ल.) मोठ्या खबरदारीनें, काळजीनें वागणें; मागें-पुढें पाहून चालणें, वागणें. ॰धुणें-१ संध्यावंदनादि कर्मापूर्वीं किंवा बाहेरून आल्याबरोबर पादप्रक्षालन करणें. २ कोणाची पूजा वगैरे कर- तांना, आदरसत्कारार्थ त्याचे पादप्रक्षालन करणें. ३ (बायकी) (ल.) लघवी करणें; मूत्रोत्सर्गाला जाणें; (मूत्रोत्सर्जनानंतर हात- पाय धुण्याची चाल बायकांत रूढ आहे त्यावरून). ॰न ठरणें- सारखें हिंडणें; भटकत रहाणें; विश्रांति न मिळणें; पायाला विसावा नसणें. ॰निघणें-मुक्त होणें; मोकळें होणें; बाहेर जाणें. पडणें. 'ह्या गांवांतून एकदां माझा पाय निघो म्हणजे झालें.' -विवि ८.११.२०९. ॰पसरणें-१ अधिकार प्रस्थापित करणें; पूर्णपणें उपभोग घेणें; अल्प प्रवेश झाला असतां हळूहळू पूर्ण प्रवेश करून घेणें. २ मरणें (मरतांना पाय लांब होतात यावरून). 'शेवटीं म्हातार्‍या आईपुढें त्यानें पाय पसरले.' म्ह॰ १ भटास दिली ओसरी, भट हातपाय पसरी. २ अंथरूण पाहून पाय पसरावेत. ॰पसरून निजणें-निश्चिंत, आळशी राहणें; निरुद्योगी असणें. ॰पोटीं जाणें-भयभीत होणें; अतिशय भीति वाटणें. निजलेला मनुष्य भीतीनें हातपाय आंखडून घेतो यावरून. 'जंव भेणें पाय पोटीं गेले नाहीं ।' -दावि १६०. ॰फांलटणें-पाय झिजवणें; पायपिटी करणें; तंगड्या तोडणें; एखादें काम करण्यासाठीं कोठें तरी फार दूरवर किंवा एकसारखें पायानें चालत जाणें. 'कांहीं लाभ नसतां उगींच पाय फांसटीत चार कोस जातो कोण ?' ॰फुटणें- १ विस्तार पावणें; वाढणें. 'पहिल्यानें तुझें एक काम होतें, नंतर दुसरें आलें, आतां तिसरें. आणखी त्याला किती पाय फुटणार आहेत कोणास ठाऊक ?' २ हळूच नाहींसा होणें; चोरीला जाणें (वस्तु). ३ थंडीच्या योगानें किंवा जळवातानें पाय भेगलणें, चिरटणें. ॰फोडणें-भलतीकडे नेणें; विषयांतर करणें; मुद्याला सोडून अघळ- पघळ बोलणें; फाटे फोडणें. ॰भुईशीं(ला)लागणें-१ (एखाद्या कामास) कायमपणा येणें; निश्चितपणा येणें. २ जिवावरच्या संकटांतून वांचणें. ॰मोकळा करणें-होणें १ अडचणींतून बाहेर पडणें, काढणें. २ फेरफटका करणें; पायांचा आंखडलेपणा नाहींसा करणें, होणें. ॰मोडणें-१ पायांत शक्ति नसणें. २ निराशेमुळें गलितधैर्य होणें; निराश होणें. 'माझा भाऊ गेल्यापासून माझे पाय मोडले.' ३ एखाद्याच्या कामांत हरकत आणणें; धीर खचविणें; मोडता घालणें; काम करूं न देणें. ४ (नगरी) एखाद्या मुलाच्या पाठीवर त्याच्या मातेस कांहीं दिवस जाणें; गरोदर राहणें. 'नरहरीचे पाय मोडले कां ?' (त्याच्या पाठीवर कांहीं दिवस गेले आहेत काय ?) ॰येणें-चालतां येणें; (लहान मूल) चालूं लागणें. ॰रोवणें- स्थिर, कायम होणें. ॰लागणें-पाय भुईशीं लागणें पहा. (वर) ॰येणें-प्रतिबंध, अडचण होणें, येणें. पोटावर पाय येणें = उदर- निर्वाहाचें साधन नाहीसें होणें. ॰वरपणें-ओरपणें-(कर.) चिंचपाण्यांच पाय बुडवून ते तापलेल्या तव्यावरून ओढणें व पुन्हां चिंचपाण्यांत बुडविणें, याचप्रमाणें पांच दहा मिनिटें सारखें करीत रहाणें (डोळ्यांची जळजळ यासारखा विकार नाहींसा होण्यावर हा उपाय आहे). [ओरपणें पहा] ॰वळणें-१ दुसरी- कडे प्रवृत्ति होणें; मुरडणें; वळले जाणें (प्रेम इ॰). २ वातविकारानें पायांत वेदना उत्पन्न होणें; पाय तिडकूं लागणें; गोळे येणें. ॰वाहणें-एखाद्या स्थलीं जाण्याचा मनाचा कल, प्रवृत्ति होणें. ॰शिंपणें-(मुलाला पायावर घेऊन दूध पाजण्यापूर्वीं स्वतः) पाय धुणें. 'ते माय आगोदर पाय शिंपी ।' -सारुह १.५३. ॰शिवणें-पायांस स्पर्श करणें; पायाची शपथ वाहणें. पायां- खालीं तुडविणें-१ दुःख देणें; क्लेश देणें छळ करणें. २ कस्पटाप्रमाणें मानणें; मानहानि करणें. पायाचा गू पायीं पुसणें-(ल.) कोणत्याहि घाणेरड्या गोष्टीची घाण जास्त वाढूं न देतां तिचा ताबडतोब बंदोबस्त करणें. पायांचा जाळ-पायांची आग-पायांचें पित्त मस्तकास जाणें-अतिशय रागावणें; क्रोधाविष्ट होणें; संतापणें. पायांची बळ भागविणें-व्यर्थ खेपा घालणें, फिरणें; निरर्थक कार्यास प्रवृत्त होणें. पायांजवळ येणें-(आदरार्थीं) एखाद्याकडे जाणें, येणें, भेटणें. पायानें जेवणें-खाणें-अत्यंत मूर्ख, वेडा असणें, होणें. पायानें लोटणें-तिरस्कार करणें; अवहेलना करणें. 'म्हणतो युधिष्ठिर नको पायें लोटूं मला अवनतातें ।' -मोउद्योग ८.१८. पायां पडणें-पायांवर डोकें ठेवणें; नमस्कार करणें; विनविणें; याचना करणें. 'उत्तर म्हणे नको गे ! पायां पडतों बृहन्नडे ! सोड !' -मोविराट ३.७४. पायांपाशीं पाहणें-जवळ असेल त्याचाच विचार करणें; अदूरदृष्टि असणें; आपल्याच परिस्थितीचा, आपल्या- पुरताच विचार करणें. पायांपाशीं येणें-पायाजवळ येणें पहा. पायांला-त, पायांअढी पडणें-(म्हातारपणामुळें) चालतांना एका पायाला दुसरा पाय घासणें. पायांला खुंट्या येणें- एकाच जागीं फार वेळ बसल्यानें पाय ताठणें. पायां लागणें- पायां पडणें. 'मीं पायां लागे कां । कांइसेयां लागीं ।'- शिशु २२४. पायांवर कुत्रीं-मांजरें घालणें-(ल.) अतिशय प्रार्थना व विनवण्या करून एखाद्यास कांहीं काम करावयास उठ- विणें. पायांवर घेणें-मूल जन्मल्यावर त्यास स्वच्छ करण्यासाठीं न्हाऊं घालणें व जरूर तें सुईणीचें काम करणें. पायांवर नक्षत्र पडणें-सदोदित फिरत असणें; एकसारखे भटकणें; पायाला विसांवा नसणें. 'काय रे, घटकाभर कांहीं तुझा पाय एका जागीं ठरेना, पायावर नक्षत्र पडलें आहे काय ?' पायांवर पाय टाकून निजणें-चैनींत व ऐटींत निजणें. पायांवर पाय ठेवणें-देणें- एखाद्याच्या पाठोपाठ जाणें; एखाद्याचें अनुकरण करणें. पायांवर भोंवरा असणें-पडणें-एकसारखें भटकत असणें; भटक्या मारणें. पायावर नक्षत्र पडणें पहा. पायावर हात मारणें- पायाची शपथ घेणें. -नामना ११०. पायाशीं पाय बांधून बसणें-एखाद्याचा एकसारखा पिच्छा पुरवून कांहीं मागणें. पायांस कुत्रें बांधणें-(ल.) शिव्या देत सुटणें; भरमसाट शिव्या देणें; फार शिवराळ असणें. पायांस पाय बांधणें-एखाद्याच्या संगतींत एकसारखें रहाणें. पायांस भिंगरी-भोंवरा असणें- पायांवर भोंवरा असणें पहा. पायांस-पायीं लागणें-नमस्कार करणें; पायां पडणें. 'तूं येकली त्वरित जाउनि लाग पायीं ।' -सारुह ८.११२. पायांस वहाण बांधणें-बांधलेली असणें-एकसारखें भटकत राहणें; पायपीट करणें. पायीं-क्रिवि. १ पायानें; पायाच्या ठिकाणीं. 'भूपें हळूच धरिला कलहंस पायीं' -र १०. [पाय] २ मुळें; साठीं; करितां. 'काय जालें देणें निघालें दिवाळें । कीं बांधलासि बळें ऋणेंपायीं ।' -तुगा ८४५. (कुण.) 'कशापायीं' = कशाकरतां; कां. पाईं. [सं. प्रीतये; प्रीत्यर्थ] पायीं बांधणें-(हत्ती इ॰च्या पायाशीं बांधणें या शिक्षेवरून) हानि, पराभव करण्यास तयार असणें. आपले पाय माझ्या घरीं लागावे-(आदरार्थीं ल.) आपण माझ्या घरीं येऊन मला धन्य करावें. आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी- (नम्रपणाचें आमंत्रण) माझ्या घरीं आपण यावें. आपल्या पायांवर धोंडा पाडून-ओढून घेणें-आपलें नुकसान आप- णच करून घेणें; आपल्या हातांनीं स्वतःवर संकट आणणें; विकत श्राद्ध घेणें. एका पायावर तयार-सिद्ध असणें-अत्यंत उत्सुक असणें. 'बाजीराव शिपाई आहेत तसा माही आहें. त्यांच्याप्रमाणेंच हा प्रतिनिधि योग्य प्रसंगीं पाहिजे त्या मोहिमेवर जाण्यास एका पायावर सिद्ध आहे.' -बाजीराव. घोड्याच्या- हत्तीच्या पायीं येणें आणि मुंगीच्या पायीं जाणें- (आजारीपण, संकट, बिकट परिस्थिति इ॰) ही येतांना जलदीनें येतात पण जावयास दीर्घकाळ लागतो. याच्या उलट श्रीमंतीबद्दल म्हणतात. चहूं-दोहें पायांनीं उतरणें-(शिंगरू, वांसरूं, पाडा इ॰नीं) चार किंवा दोन पांढर्‍या पायांसह जन्मणें. जळता पाय जाळणें-एखाद्या कामांत, व्यवहारांत, व्यापारांत नुकसान होत असतांहि तो तसाच चालू ठेवणें. त्या पायींच-क्रिवि. ताबड- तोब; त्याच पावलीं. भरल्या पायांचा-(रस्त्यांत चालून आल्या मुळें) ज्याचे पाय (बाहेरून आल्यामुळें धुळीनें वगैरे) घाणेरडे झाले आहेत असा. 'तूं भरल्या पायांचा घरांत येऊं नकोस.' भरल्या पायांनीं, पायीं भरलें-क्रिवि. बाहेरून चालून आल्यावर पाय न धुतां; घाणेरड्या पायानीं. (बाहेरच्या दोषासह; स्पृष्टा- स्पृष्टादि दोष किंवा भूतपिशाच्चादि बाधा घेऊन). 'मुलाच्या जेवणाच्या वेळेस कोणी पायीं भरलें आलें भरलें आलें म्हणून आज हें मूल जेवीत नाहीं.' 'ज्या घरीं बाळंतीण आहे त्यांत एकाएकीं पायीं भरलें जाऊं नये.' मागला पाय पुढें न घालूं देणें-(ल.) केलेली मागणी पुरविल्याशिवाय पुढें पाऊल टाकूं न देणें; मुळींच हालूं न देणें. मागला पाय पुढें न ठेवणें-मागितलेली वस्तु दिल्याशिवाय एखाद्यास सोडावयाचें नाहीं, तेथून जाऊं द्यावयाचें नाहीं असा निश्चय करणें. मागील पाय पुढें नाहीं पुढील पाय मागें नाहीं-हट्टीपणा; करारीपणा; ठाम निश्चय; जागच्या- जागीं करारीपणानें ठाव धरून बसणें याअर्थीं उपयोग. मागल्या पायीं येणें-एखादें काम करून ताबडतोब परत येणें; त्याच पावलीं परत येणें. म्ह॰ १ पाय धू म्हणे तोडे केवढ्याचे ? २ पाय लहान मोठा, न्याय खरा खोटा. ३ पायांखालीं मुंगी मर- णार नाहीं (निरुपद्रवी माणसाबद्दल योजतात). ४ (व.) पायावर पाय हवालदाराची माय = आळशी स्त्रीबद्दल योजतात. ५ पायींची वहाण पायींच छान-बरी (हलक्या मनुष्यास फाजील महत्त्व देऊं नये या अर्थीं). 'मज पामरा हें काय थोरपण । पायींची वहाण पायीं बरी ।' -तुगा ५३५. ६ हत्तीच्या पायांत सग- ळ्यांचे पाय येतात. सामाशब्द- ॰आंग-न. (व.) गर्भाशय. ॰उतार-रा-पु. नदींतून पायीं चालत जाण्यासारखी वाट. 'एर्‍हवी तरी अवधारा । जो दाविला तुम्हीं अनुसारा । तो पव्ह- ण्याहूनि पायउतारा । सोहपा जैसा ।' -ज्ञा ५.१६५. -वि. १ पायांनीं ओलांडून जांता येण्याजोगा. २ पायीं चालणारा; पायदळ. 'आम्ही गाडदी लोक केवळ आम्ही पायउतारे.' -भाब १००. [पाय + उतार] ॰उतारां-रा-क्रिवि. पायीं; पायानें. (क्रि॰ येणें; जाणें; चालणें). 'पायउतारा येइन मागें पळभर ना सोडी ।' -सला २०. पायउतारा होणें-येणें-(ल.) शिव्यागाळी, भांडण करण्यास तयार होणें. ॰कडी-स्त्री. पायांतील बेडी. 'तुम्ही हातकड्या, पायकड्या घातल्या.' -तोबं. १२६. [पाय + कडी] ॰क(ख)स्त-स्त्री. पायपीट; एकसारखें भटकणें; वणवण; [पाय + कष्ट, खस्त] ॰कस्ता-पु. एका गांवीं राहून दुसर्‍या गांवचे शेत करणारें कूळ; ओवंडेकरी. 'दर गांवास छपरबंद व पायकस्ता देखील करार असे.' -वाडबाबा १.२२९. [फा. पाएकाश्त] ॰कस्ता, पायींकस्ता-क्रिवि. पायीं जाऊन; पायांनीं कष्ट करून; ओवं- ड्यानें. 'आसपास गांव लगते असतील त्यांनीं पायीं कस्ता शेतें करून लागवड करावी ...' -वाडबाबा २.८३. ॰काळा-पु. (कों.) (सामान्यतः) कुणबी; नांगर्‍या; शेतावरचा मजूर. [पाय + काळा] ॰खाना-पु. शौचकूप; संडास; शेतखाना. [फा. पाए- खाना] ॰खिळॉ-पु. (गो.) पायखाना पहा. ॰खुंट-खुंटी- पुस्त्री. जनावर पळून जाऊं नये म्हणून त्याच्या गळ्यास व पायास मिळून बांधलेली दोरी, किंवा ओंडा; लोढणें. [पाय + खुंट, खुंटी] ॰खोळ-पु. लाथ. 'कां वैद्यातें करी सळा । रसु सांडी पायखोळां । तो रोगिया जेवीं विव्हळा- । सवता होय ।' -ज्ञा १७.१०१. २ शेतखाना ? [गो. पायखिळॉ] ॰खोळा-ळां-क्रिवि. पायतळीं; पायदळी. 'चंदन चढे देवनिढळा । येक काष्ठ पडे पायखोळा ।' -मुरंशु ३७९. ॰खोळणी-वि. शेतखान्याची ? 'जैसी पाय- खोळणी मोहरी । भरणाश्रय आमध्यनीरीं । तैसा द्रव योनिद्वारीं । म्हणोनि सदा अशौच ।' -मुरंशु ३५४. [गो. पायखिळॉ = शेतखाना] ॰गत-न.स्त्री. १ बिछान्याची पायाकडची बाजू; पायतें. 'सर- कारनें खडकवासल्याचें धरण बांधून आमच्या पायगतची नदी उशागती जेव्हा नेऊन ठेवली...' -टि २.१७४. २ (डोंगर, टेंकडी, शेत इ॰चा) पायथा; पायतरा. ३ पलंग, खाट यांचें पायांच्या बाजूकडील गात. [पाय + सं. गात्र] ॰गत घेणें-बाज इ॰च्या पायगतच्या दोर्‍या ओढून बाज ताठ करणें, ताणणें. ॰गम-पु. (व.) पाया; पूर्वतयारी; पेगम पहा. 'आधीं पासून पायगम बांधला म्हणजे वेळेवर अशी धांदल होत नाहीं.' ॰गुण-पु. (पायाचा गुण) एखाद्याचें येणें किंवा हजर असणें व त्यानंतर लगेच कांहीं बर्‍यावाईट गोष्टी घडणें यांच्यामध्यें जोडण्यांत येणारा काल्पनिक कार्यकारणसंबंध; बरेंवाईट फळ; शुभाशुभ शकुन. हातगुण शब्द याच अर्थाचा पण थोडा निराळा आहे. एखाद्या माणसाचें काम, कृत्य यांशीं हातगुणाचा संबंध जोडतात. 'धनाजीला नौकरीला ठेवल्यापासून हंबीरराव पुनः पूर्वींच्या वैभवाला चढले, आणि धनाजीचा हा पायगुण समजून त्याला प्यार करूं लागले.' -बाजीराव १२७. ॰गुंता-पु. अडचण; आड- काठी; अडथळा; पायबंद. पायगोवा पहा. 'दिल्लीस गेले आणि तिकडेच राहिले तर मग यत्न नाहीं. यास्तव समागमें पायगुंता विश्वासराव यास द्यावें' -भाव १०७. 'हीं मायेचीं माणसं स्वारींत जवळ असलीं कीं पायगुंता होतो.' -स्वप ४८. [पाय + गुंतणें] ॰गोवा-पु. १ पायगुंता; एखाद्या जुंबाडांत पाय अडकल्यामुळें होणारी अडचण; पायामुळें झालेली अडवणूक. २ (ल.) अडचण; अडथळा; नड; हरकत; आडकाठी; अटकाव. 'निरोपण सुपथीं आडथळा । पायगोवा वाटे सकळा ।' -मुसभा. २.९५. 'देवधर्म तीर्थ करावयास चिरंजीवाचा पायगोवा होईल यैसे आहे' -पेद ९.११. ३ शत्रूच्या सैन्याला पिछाडीकडून अडविणें. [पाय + गोवणें] ॰घड्या-स्त्रीअव लग्नांत वरमाय व मानकरिणी यांना त्यांच्या जानवास घर पासून वधूमंडपीं आणतांना त्यांच्या रस्त्यवर आंथराव- याच्या पासोड्या (मोठ्या सत्काराचें चिन्ह). पायघड्या घाल- ण्याचें काम परिटाकडे असतें. 'वाजंत्री पायघड्याशिरीगिरी विहिणी चालती ।' -वसा ५३ [पाय + घडी] ॰घोळ-वि. पायापर्यंत पोंचसें (वस्त्र.). 'कौसुंभरंगी पातळ । नेसली असे पायघोळ ।' -कथा १.११.११२. -क्रिवि. दोन्ही पाय झाकले जातील असें (नेसणें) पायांवर घोळे असें. [पाय + घोळणें] ॰चंपा-स्त्री. पाय चेपणें; सेवेचा एक प्रकार. 'हातदाबणी, पाय पी, विनवणी, चोळणी इत्यादि प्रकार करण्याचे अपूर्व प्रसंग जुन्या लोकांच्या परिचयाचे नव्हते असे ते सांगतात.' -खेया २८. [पाय + चंपी = चेपणीं] ॰चळ-पुस्त्री. अशुभ, अपशकुनी पाऊल. पायगुण; कोणत्याहि कार्याचा बिघाड, विकृति, संकटाची वाढ इ॰ होण्याचें कारण रस्त्यावरून जाणारा एखादा अपशकुनी माणूस किंवा भूत असें समजतात; पायरवा. [पाय + चळ] ॰चाल- स्त्री. पायानें चालणें, चालत जाणें; चरणाचाल. 'कीं येथ हे हळुच चालत पायचाली ।' -सारुह ८.१४४. [पाय + चाल] ॰चाळ- पु. १ विनाकारण केलेली पायांची हालचाल. २ (विणकाम) पायांच्या हालचालीमुळें हातमागास दिलेली चालना किंवा अशा रीतीनें चालणारा माग ३ अपशकुनी पायगुण; पायचळ. [पाय + चाळा] ॰चोरी-वि. धार काढतांना मागील पाय वर उचल- णारी (गाय, म्हैस इ॰). [पाय + चोरी] ॰ज(जा)मा-पु. विजार; तुमान; चोळणा; सुर्वार. [फा. पाएजमा] ॰जिभी- जिब-जीब-स्त्रीन. बारिक घागर्‍या असलेला पायांत घालण्याचा एक दागिना; तोरडी; पैंजण. वर्‍हाडांत अद्याप पायजिबा घालतात. 'सोन्याचें पायजिब तळीं ।' -राला ५६. [फा. पाएझेब्] ॰टा-पु. १ पायरी (शिडी, जिना इ॰ची). २ विहिरींत उतर- ण्यासाठीं केलेले कोनाडे किंवा बांधीव विहीरींत बांधकामाच्या बाहेर येतील असे पुढें बसविलेले जे दगड ते प्रत्येक; नारळाच्या झाडास वर चढतांना पाय ठेवण्यासाठीं पाडलेली खांच. ३ पाय- वाट; पाऊलवाट. ४ (ल.) वहिवाट; पायंडा; शिरस्ता; प्रघात. (क्रि॰ पडणें; लागणें; बसणें). ५ चाकाच्या परिघाचा प्रत्येक तुकडा, अवयव; पाटा. ६ (मोटेच्या विहिरीच्या) थारोळ्याच्या दोन्ही बाजूचे दगड, प्रत्येकी. [पाय + ठाय] ॰टांगी-स्त्री. (ना.) खालीं पाय सोडून बसतां येईल अशी योजना असणारी बैलगाडी. रेडू. [पाय + टांगणें] ॰ठ(ठा)ण-ठणी-नस्त्री. पायरी; पायटा पहा. 'हीं चार पांच चढुनी हळु पायठाणें ।' -केक २५. [सं. पदस्थान; म. पाय + ठाणें] ॰ठा-पु. १ चाकाच्या परिघाचा अव- याव; पाटा. २ (राजा.) सपाट जमीन भाजून तेथें नाचणी इ॰ पेरण्यासाठीं तयार केलेलें शेत. ३ ज्यांत मोटेचे सुळे, बगाडाचे खांब बसवितात ते विहिरींचे, भोंके पाडलेले दोन दगड. [सं. पदस्थ; पाय + ठेवणें] ॰त(ता)ण-न-न. (अशिष्ट.) १ जोडा; जुता; कुणबाऊ जोडा; पादत्राण. (सामा.) पायांत घालण्याचें साधन 'विठ्ठल चिंतण दिवसारात्रीं ध्यान । होईन पायतन त्याचे पायीं ।' -तुगा ११२७. 'स्त्रीपट चोरूनि पळे तेव्हां कैंचीं नळास पायतणें ।' -मोवन ४.१५५. २ (कों.) वाहाणा; चेपल्या. [सं. पादत्राण; प्रा. पायत्ताण] ॰बसविणें-(चांभारी धंदा) जोडा व्यवस्थित करणें. पायतर-पायतें पहा. ॰तरे-न. पायरी. 'एथ अग्नी हें पहिलें पायतरें । ज्योतिर्मय हें दुसरें ।' -ज्ञा ८.२२३. [पाय + थारणें] ॰तांदूळ-पुअव. (पायाखालचें तांदूळ) साधे, स्वच्छ तांदूळ निरनिराळ्या दोन पाटींत, शिपतरांत (ब्राह्मणेतरांत) किंवा पत्रावळींवर (ब्राह्मणांत) ठेवतात व त्यांवर नियोजित वधूस व वरास लग्नासाठीं उभे करितात. या तांदुळांवर उपाध्यायाचा हक्क असतो. पण ते बहुधां तो महारास देत. वधूवराच्या मस्तकावर तांदूळ, गहूं किंवा जोंधळे जे टाकतात, ते जे नंतर एकत्र करितात त्यांसहि पायतांदूळ असें म्हणतात. ह्या तांदुळांवर वेसकर-महाराचा हक्क असतो. [पाय + तांदूळ] ॰तर(रा)-ता-थर(रा)-था- पायतें-थें-पुन. १ बिछान्याची पायगताची बाजू. २ (टेंकडी, शेत, बगीचा इ॰ची) पायगत; पायतळची बाजू. [सं. पाय + थारणें; पादांत; म. पायतें] ॰थण-न-न. (विरू.) पायतण पहा. ॰थरी-स्त्री. (खा.) दुकानाच्यापुढें लांकडी किंवा दगडी तीन चार पायर्‍या असतात त्यांपैकीं प्रत्येक पायरी; पायटा. ॰दळ-न. पायानें चालणारी फौज; पाइकांचें सैन्य; पदाति. [पाय + दळ (सं. दल-सैन्य)] ॰दळ-ळीं-क्रिवि. जाण्यायेण्याच्या वाटेवर; पायानें तुडविलें जाईल असें (पडणें). 'फुलें कुसकरिलीं कुणिग मेल्यानें पायदळी तुडविलीं.' -उषःकाल १२८. ॰दळणीं-क्रिवि. पायाखालीं; पायदळीं. (कि॰ पडणें). [सं. पाददलन] ॰दान- न. (व.) तांग्याच्या, बैलगाडीच्या मागच्या बाजूस पाय ठेवण्या साठीं केलेली जागा. [सं. पाद + दा = देणें, दान] ॰दामा-पु. १ पक्षी पकडण्याचें जाळें. २ फूस लाविणारा पक्षी; ससाणा. -मराचिथोशा ३३. [फा. पाय्दाम्; सं. पाद + दाम = दावें] ॰द्दाज-न. पाय पुसणें; पायपुसें; हें बहुतेक काथ्याचें केलेलें असतें. [पाय] ॰धरणी-स्त्री. १ पायां पडणें; अत्यंत नम्रतेची, काकुळतीची विनवणी; पराकाष्ठेचें आर्जव. 'कशीहि पायधरणी मनधरणी करा- वयास तयार झालो.' -भक्तमयूरकेका प्रस्तावना १६. [पाय + धरणी] ॰धूळ-स्त्री. १ पायाची, पायास लागलेली, धूळ. 'नाचत बोले ब्रीदावळी । घेऊन लावी पायधुळी ।' -दा २.७.४१. २ स्वतःबद्दल दुसर्‍याशीं तुलना करतांना, बोलतांना (गुरु, इ॰कांजवळ) नम्रता- दर्शक योजावयाचा शब्द. [पाय + धूळ] (एखाद्यावर) ॰धूळ झाडणें-(एखाद्याच्या घरीं) आगमन करणें; भेट देणें; समाचार घेणें (गौरवार्थीं प्रयोग). 'मज गरिबावर पायधूळ झाडीत जा.' 'जगीं जरी ठायीं ठायीं पायधूळ झाडुन येई ।' -टिक ५. ॰पायखळी-स्त्री. पाय धुणें. 'तयापरी जो अशेषा । विश्वा- चिया अभिलाषा । पायपाखाळणिया देखा । घरटा जाला ।' -ज्ञा १८.६५१. [सं. पादप्रक्षालन; प्रा. पायपक्खालण; म. पाय + पाखाळणी] ॰पाटी-पांटी-स्त्री. लग्नाच्या वेळीं पायतांदुळांनीं भरलेली पांटी, शिपतर इ॰. [पाय + पांटी] ॰पा(पां)टीचे तांदूळ-पुअव. पायतांदूळ पहा. ॰पिटी-पीट-स्त्री. विनाकारण चालण्याचे श्रम; वणवण; इकडे तिकडे धांवाधांव. 'बहु केली वणवण । पायपिटी झाला सिण ।' -तुगा २००. [पाय + पिटणें] ॰पुसणें, ॰पुसें-न. पायपुसण्यासाठीं दाराशीं ठेविलेली काथ्याची जाड गादी; पायद्दाज; पायपुसण्याचें साधन. (महानु.) पायें पुसणें. 'तया वैराग्याचें बैसणें । शांभव सुखाचें पायेंपुसणें ।' -भाए ८११. [पाय + पुसणें] ॰पेटी-स्त्री. हार्मोनियमचा एक प्रकार. हींत पायानें भाता चालविण्याची योजना केली असल्यानें दोन्ही हातांनीं पेटी वाजवितां येते. याच्या उलट हातपेटी. [पाय + पेटी] ॰पैस-(व.) पाय टाकण्यास जागा. [पाय + पैस = प्रशस्त] ॰पोश-स-पु. (ल.) जोडा; वहाण; चप्पल; पादत्राण. 'सालाबादप्रमाणें ऐन जिन्नस पायपोसाचे जोडच यापासून घेत जाणें.' -दा २०१२. [फा. पाय्पोश्; सं. पाद + स्पृश्] ॰पोस- जळाला, गेला-तुटला-कांहीं पर्वा नाहीं, हरकत नाहीं, शष्प गेलें याअर्थीं वाक्प्रचार. 'एका महारुद्राची सामग्री राधाबाई काय लागेल ती पुण्याहून माळशिरसास पाठवील न पाठवील तरी आमचा पायपोस गेला ! तीन महारुद्र करून आम्हींच श्रेय घेऊं.' -ब्रप २७३. ॰पोस मारणें-मानहानि करणें; निर्भर्त्सना करणें. ॰पोस दातीं धरणें-अत्यंत लीन होऊन क्षमा मागणें; याचना करणें; आश्रय घेणें. ॰पोसासारिखें तोंड करणें-फजिती झाल्यामुळें तोंड वाईट करणें; दुर्मुखलेलें असणें. कोणाचा पाय- पोस कोणाच्या पायांत नसणें-गोंधळ उडणें (पुष्कळ मंडळी जमली असली आणि व्यवस्था नसली म्हणजे ज्याचा जोडा त्याला सांपडणें मुष्किल होतें त्याजवरून). ॰पोसखाऊ-वि. खेटरखाऊ; हलकट; अत्यंत क्षुद्र; निर्लज्ज (मनुष्य). [पाय + पोस + खाणें] ॰पोसगिरी-स्त्री. जोड्यांनीं मारणें; दोन पक्षांतील व्यक्तींनीं केलेली जोड्यांची मारामारी; जोडाजोडी. (क्रि॰ करणें; मांडणें; चालणें). [फा.] ॰पोसपोहरा-पु. जोड्याच्या आका- राचा विहिरींतून पाणी काढण्याचा पोहरा. [पायपोस + पोहरा] ॰पोसापायपोशी-स्त्री. परस्परांतील जोड्यांची मारामारी; जोडाजोडी; पायपोसगिरी. ॰पोशी-स्त्री. दर चांभारापासून दर- साल एक जोडी नजराणा घेण्याचा पाटील-कुलकर्णीं इ॰चा हक्क. ॰पोशी-वि. पायपोसाच्या डौलाचें, घाटाचें बांधलेलें पागोटें. ॰पोळी-पुस्त्री. १ (तापलेली जमीन, खडक, वाळू इ॰वरून चालल्यामुळें) पाय भाजणें. २ (ल.) मध्याह्नीची वेळ. ३ जमी- नीची तप्तावस्था; जमीन अतिशय तापलेली असणें. 'एव्हां पाय- पोळ झाली आहे संध्याकाळीं कां जाना ?' [पाय + पोळणें] ॰फळें-न. (राजा.) ओकतीच्याजवळ पाय देण्यासाठीं बस- विलेली फळी. [पाय + फळी] ॰फोडणी-स्त्री. १ घरीं रोग्यास पहाण्याकरितां आल्याबद्दल वैद्यास द्यावयाचें वेतन; वैद्याच्या भेटीचें शुल्क. २ पायपोळ. [पाय + फोडणें] ॰फौज-स्त्री. (गो.) पाय- दळ. [पाय + फौज] ॰बंद-पु. १ घोड्याचे मागचे पाय बांध- ण्याची दोरी. 'एक उपलाणी बैसले । पायबंद सोडूं विसरले ।' -जै ७६.६०. २ अडथळा; बंदी. 'इंग्रज व मोंगल यांस तिकडे पायबंद जरूर पोंचला पाहिजे.' -वाडसमा १.१६. ३ (फौजेच्या पिछाडी वर) हल्ला करून व्यत्यय आणणें. 'रायगडास वेढा पडला, आपण पायबंद लावावा म्हणजे ओढ पडेल. रायगडचा वेढा उठेल.' -मराचिथोशा ३४. ४ संसाराचा पाश. [फा. पाएबंद्] ॰बंद लावणें-लागणें-घालणें-देणें-पडणें-आळा घालणें, बसणें; व्यत्यय आणणें, येणें; अडथळा, बंदी असणें, करणें. 'भलत्या आशा व आकांक्षा यांना इतिहासदिशास्त्रांकडून पायबंद पडेल.' -विचावि ५२. 'निजामाला पायबंद लागणें शक्यच नाहीं.' -भाऊ (१.१) २. ॰भार-पु. पायदळ. याच्या उलट अश्वभार, कुंजरभार, रथभार इ॰ 'अश्वरथ कुंजरा । गणित नाहीं पाय- भारां ।' -कथा १.२.५९. [पाय + भार] ॰मर्दी-स्त्री. भरभर ये जा करणें; चालणें; धांवाधांवी, धांवपळ करणें; एखाद्या कामा- वर फार खपणें. 'पायमर्दी केली तेव्हां काम झालें .' (क्रि॰ घेणें; करणें). [फा. पाएमर्दी = धैर्य; निश्चय] ॰मल्ली-म(मा)ली- मेली-स्त्री. १ सैन्य, गुरें इ॰नीं केलेली देश, शेत इ॰ची नासाडी; पायांखालीं तुडविणें; नासधूस; तुडवातुडव. 'आपले सरकारची फौज मलक महमदखान वगैरे गेले आहेत त्यांनीं पायमाली केली आहे.' -दिमरा १.१५०. २ शत्रूनें आपला मुलुख लुटला असतां, तहांत त्याच्या कडून त्या लुटीबद्दल घेण्यांत येणारा दंड किंवा खंडणी. (सामा.) मोबदला; भरपाई. 'सर्व आमचे कर्ज सरकारांतून कारभारी देतील तेव्हां काय पायमल्ली दहापांच लक्ष रुपये (वजा) घालणें ती घालावी.' -ख ९.४८५४. 'शेतकर्‍यांस नुकसानीदाखल पायमली देण्यांत येत असते.' -हिंलइ १७४. ३ (ल.) दुर्दशा; अपमान; हेटाळणी; अवहेलना. (क्रि॰ करणें; होणें). 'आमच्या भाषेची अशी पायमल्ली व्हावी हा मोठा चमत्कार नव्हे काय ?' -नि ११३ ४ नाश; नुकसान. 'महादजी गदाधर यांनीं दरबारची जुनी राहटी राखिली नाहीं, याजमुळें पायमाली आहे.' -रा ८.२०१. [फा. पाएमाली; सं. पाद + मर्दन; म. पाय + मळणें] ॰मळणी-स्त्री. सारखी चाल, घसट, वहिवाट; एकसारखें चालणें वहिवाट ठेवणें. 'जो रस्ता सध्यां बिकट व अडचणीचा वाटतो तोच पुढें पाय- मळणीनें बराच सुधारेल.' -नि. ४२९. [पाय + मळणें] ॰मांडे- पु. (काव्य.) पायघड्या पहा. 'विषयसुख मागें सांडे । तेचि पायातळीं पायमांडे ।' -एभा ८.६. -वेसीस्व १०.१९. ॰मार्ग- पु. १ पायवाट; पाऊलवाट. २ जमीनीवरचा रस्ता; भूमिमार्ग; खुष्कीचा मार्ग. ह्याच्याउलट जलमार्ग. ॰माल, पामाल-वि. पायमल्ली केलेला, तुडविला गेलेला; उध्वस्त; नष्ट. [फा. पाएमाल्] ॰मोजा-पु. पायांत घालावयाचा विणून तयार केलेला पिशवी- सारखा कपडा. हा पाऊस, थंडी, वारा यांपासून पायाचा बचाव करण्यासाठीं वापरतात. [पाय + मोजा] ॰मोड-स्त्री. १ प्रवासाला निघालेल्या किंवा चालत असलेल्या मनुष्यास जाऊं न देणें. २ अशी केलेली थांबवणूक; थांबवून ठेविलेली स्थिति. [पाय + मोडणें] ॰मोडें-न. १ (कों.) उत्साहभंग, अडथळा करणारी गोष्ट; (हातीं घेतलेल्या किंवा घ्यावयाच्या कामांत) एखाद्याचा उत्सा- हाचा, आशांचा बींमोड; तीव्र निराशा. २ आयुष्यांतील अडचणी अडथळें, संकटें इ॰ वाढत्या व्यवहाराची गति कुंठित होण्यास निमित्त. 'हें पोर अमळ चालूं लागलें म्हणजे खोकला, पडसें अशीं अनेक पायमोडीं येतात.' [पाय + मोडणें] ॰मोडें घेणें- (हातीं घेतलेल्या कार्यापासून) भीतीनें पारवृत्त होणें. ॰रव-पु. वरदळ; वहिवाट; दळणवळण; पायंडा. पैरव पहा. 'आणीकही एक पहावें । जें साधकीं वसतें होआवें । आणि जनाचेनि पायरवें मैळेचिना ।' -ज्ञा ६. १७२. -स्त्री. १ पायतळ; पायदळ; पाय ठेवण्याची जागा. 'रावण जंव भद्रीं चढे । तवं मुगुट पायरवीं पडे ।' -भारा बाल ७.५. २ (राजा.) चाहूल; सांचल. ३ पाय- वाट; रस्ता. ४ प्रवेश. 'प्रथम चाकरीस येतों म्हणून नम्रतेनें पायरव करून घेतली' -ऐटि १.२९. ५ दृष्ट; नजर; बाहेरवसा; भूतबाधा; पायरवा; पायचळ पहा. 'करंज्यांस पायरव लागून लागलीच सरबत झालें.' -कफा ४. ६ पायगुण. 'घरांत आल्या- बरोबर लागलेंच करंजांचें सरबत झालें. काय हा पायरव !' -कफा ४. ७ पैरव पहा. [सं. पाद + रव; पाय + रव; हिं. पैरव] ॰रवा- पु. १ पायरव; शिरस्ता; पायंडा. 'त्या माणसाचा येथें येण्याचा पायरव आहे.' २ पायचळ; दृष्ट लागणें. 'विहिरीवर तुझी मूल तिनीसांजची गेली होती तेथें तिला बाहेरचा पायरवा झाला.' -वेड्यांचा बाजार. ॰रस्ता-पु. १ पायवाट. २ जमीनीवरचा रस्ता, पायमार्ग. [पाय + रस्ता] ॰रहाट-पु. (अल्पार्थी) रहाटी-स्त्री. पायानें पाणी लाटण्याचा रहाट; रहाटगाडगें. [पाय + रहाट] ॰रावणी-स्त्री. पायधरणी; विनवणी, रावण्या पहा. 'देवकी बैसविली सुखासनीं । लागल्या वाजंत्राच्या ध्वनी । विंजणें वारिती दोघीजणी । पायरावणीं पदोपदीं ।' -एरुस्व १६.३२. [पाय + रावण्या] ॰लाग-पु. १ गुरांच्या पायांस होणारा एक रोग. हा गुरांच्या तोंडावर व पायांवर परिणाम करितो. २ स्त्रियांना होणारी पिशाचबाधा. (एखाद्या स्त्रीकडून भूत पायीं तुडविलें गेल्यास तें तिला पछाडतें अशी कल्पना आहे). [पाय + लागणें] ॰वट-स्त्री. १ रहदारीचा रस्ता आहे असें दाखविणार्‍या पावलांच्या खुणा; पावलांच्या खुणा. २ पायगुण. 'नेणों कोणाचा पायवट जाहला । एक म्हणती समय पुरला । एक म्हणती होता भला । वेनराव ।' -कथा ६.५.९१. [पाय + वठणें] ॰वट-(प्र.) पायवाट पहा. ॰वट-टा-पु. (महानु.) पाय; पायाच्या शिरा; (टीप-ओहटळ पांचाहि मुख्य शिरांचा सांगातु ऋ ८८). 'समसा गुल्फाचा उंचवटा । श्रीप्रभुचिया पायवटा ।' -ऋ ८८. ॰वणी-न. चरणों- दक; चरणतीर्थ; ज्या पाण्यांत एखाद्या ब्राह्मणानें किंवा पवित्र विभूतीनें पावलें बुडविलीं आहेत किंवा धुतलीं आहेत असें पाणी. 'करितां तापसांची कडसणी । कवणु जवळां ठेविजैल शूलपाणी । तोहि अभिमानु सांडूनि पायवणी । माथां वाहे ।' -ज्ञा ९.३७२. 'कोणी राम देखिला माजा । त्याचें पायवणी मज पाजा ।' [पाय + वणी- पाणी] ॰वाट-स्त्री. १ पाऊलवाट; पायरस्ता. 'तिकडे जय; तुज देतिल मेरूचे पायवाट आजि कडे ।' -मोभीष्म ११.४५. २ जमीनीवरचा, खुष्कीचा मार्ग; भूमिमार्ग. याच्या उलट जलमार्ग. 'समुद्रावरी सैन्य ये पायवाटें ।' -लोपमुद्रा वामन-नवनीत १०८. [पाय + वाट] ३ (गो.) पालखी देवालयांत शिरण्यापूर्वीं धोब्या- कडून घालण्यांत येणारा धुतलेला पायपोस. ॰वाट करणें-उत- रून, ओलांडून जाणें. 'पायवाट केले भवाब्धी ।' -दावि ३३०. 'भवसिंधु पायवाट कराल.' -नाना १३५. ॰शिरकाव-पु. १ प्रवेश मिळवणें. २ मिळालेला प्रवेश. [पाय + शिरकाव] ॰शूर-वि. चालण्याच्या, वाटेच्या कामीं अतिशय वाकबगार; निष्णात. 'कोळी लोक कंटक व पायशूर असल्यानें त्यांना जंगलांतील वाट ना वाट माहीत असते.' -गुजा ६०. ॰सगर-पु. (खा. व.) पायवाट; पाऊलवाट; पायरस्ता. [पाय + संगर = लहान वाट] ॰सर-पु. पायरी; पाय ठेवण्याची (जिना इ॰ची) जागा, फळी. [पाय + सर = फळी] ॰सूट-वि. चपळ; चलाख; भरभर चालणारा [पाय + सुटणें] ॰सोर-पु. (गो.) पायगुण. ॰स्वार-वि. (उप.) पायीं चालणारा; पादचारी; पाईक. [पाय + स्वारी] पायाखायला-वि. (कों.) (पायांखालील) सापांची भीति, उपद्रव असलेलें (अरण्य, रस्ता). पायाखायलें-न. १ (कों.) फुरसें; साप. २ सर्पदंश. पायाखालची वाट-स्त्री. नेहमीं ज्या वाटेनें जाणें येणें आहे अशी वाट; अंगवळणी पडलेली वाट. पायाचा-वि. पायदळ (शापाई). 'पायांचे भिडतां । तोडिति जानिवसे जे ।' -शिशु १०४५. पायाचाजड-वि. १ हळुहळु चालणारा; मंदगतीनें चालणारा. २ चांगलें चालतां न येणारा. पायाचा डोळा-पु. घोटा. पायाचा नक्की कस-पु. (मल्लविद्या) एक डाव. आपला पाय जोडीदाराच्या बगलेंतून जोडीदाराच्या मानेवर घालून मान फिरवून मानेवर घातलेल्या पायाच्या पंजानें मानेस दाब देऊन मारणें, किंवा चीत करणें. [पाय + कसणें] पायाचा नरम-वि. (बायकांप्रमाणें मऊ पाय असलेला) षंढ; नपुंसक. पायांचा पारवा-पु. (पारव्याप्रमाणें गति असलेला) जलद, भरभर किंवा पुष्कळ चालणारा मनुष्य पायाचा फटकळ-वि. लाथा मार- णारें, लाथाड (जनावर) पायाचा हुलकस-पु. (मल्लविद्या) जोडादारानें खालीं येऊन आपला एक पाय धरला असतां आपला दुसरा पाय जोडीदाराच्या बगलेंतून घालून आपल्या पायाच्या पंजानें त्याच्या कोपराजवळ तट देऊन आपला दुसरा हात त्याच्या बगलेंतून देऊन जोडीदाराचा हात आपल्या पायाच्याअटीनें धरून तो पाय लांब करून हातानें काढिलेला कस जास्त जोरानें मुरगळून चीत करणें. पायाची करंगळी-स्त्री. पायाच्या बोटां- पैकीं सर्वात लहान असलेले शेवटचें बोट. पायांची माणसें- नअव. पायदळ. 'पायाच्या माणसांची सलाबत फौजेवर.' -ख ३५९४. पायाची मोळी-स्त्री. (मल्लविद्या) एक डाव. (मागें पाय बांधून गड्यास मारणें याला मोळी म्हणतात). जोडीदाराचा एक पाय उचलून आपल्या माडीच्या लवणीत दाबून ठेवावा. दुसर्‍या हातानें जोडीदाराचा दुसरा पाय धरून जोडीदाराच्या दोन्ही पायांस तिढा घालून मुरगळून मारणें. पायांचे खुबे- पुअव. पाठीच्या कण्याच्या खालच्या बाजूकडील वेडावाकडा, बळकट आणि घट्ट असा हाडाचा सांगाडा. -मराठी ६ वें पुस्तक (१८७५) २५३. पायाचें भदें-न. अनवाणी चालून पायांस खडे वगैरे बोचून पाय खरखरीत होणें; पायाची खराबी; पाय खडबडीत होणें. 'चालतांना पायांचें भदें होऊं नये म्हणून पाव लांकरिता कातड्याचें वेष्टण तयार करण्याचें काम....' -उषा- ग्रंथमालिका (हा येथें कोण उभा). पायांच्या पोळ्या-स्त्रीअव. तापलेल्या जमीनीवरून चालल्यामुळें पोळलेले पाय; पायपोळ. (क्रि॰ होणें, करून घेणें). पायांतर-न. पायरी. [पाय + अंतर] पायापुरती वहाण कापणारा-वि. कंजुष; कृपण; कवडीचुंबक; अतिशय जपून खर्च करणारा. पायां पैस-स्त्री. पायापुरती मोकळी जागा. (अगदीं गर्दी, दाटी संबंधीं वापरतांना प्रयोग). [पाय + पैस (अघळपघळ, मोकळी)] पायींचा पारवा-पु. पायांचा पारवा पहा.

दाते शब्दकोश