मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

निष्काम

वि. १ निरिच्छ; फलाची इच्छा न धरितां केलेलें (कर्म, अनुष्ठान इ॰). २ विरक्त; उदासीन. [सं.] ॰कर्म-न. फलाची इच्छा न धरतां केलेलें विहित (कर्तव्य) कर्म. 'निष्काम कर्मानें राष्ट्राला तेज येतें.' -टिसू ४.

दाते शब्दकोश

निष्काम niṣkāma a (S) Free from desire, disinterested.

मोल्सवर्थ शब्दकोश

निष्काम a Free from desire, disinterested

वझे शब्दकोश

(सं) वि० फलेच्छेशिवाय केलेलें.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

निष्काम      

वि.       १. निरिच्छ. २.फळाची इच्छा न धरता केलेले (काम). ३. विरक्त; उदासीन. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

निःकाम

वि. निष्काम; निरिच्छ; निर्लोभ. 'सामर्थ्येवीण घडेना । निःकाम भजन।' -दा १०.७.१९. [सं. निष्काम] ॰बुद्धी-स्त्री. निर्लोभता; निरिच्छता. -वि. निर्लोभी; निर्हेतुक. -क्रीवि. निर्लोभतेने; निःस्वार्थ बुद्धीनें.

दाते शब्दकोश

निःकाम niḥkāma a (For निष्काम S) Devoid of desire, disinterested.

मोल्सवर्थ शब्दकोश

अहेतु, अहेतुक

वि. ज्याला हेतु-करण नाहीं असें; विना- कारण; अकारण; निष्काम. याच्या उलट सहेतुक. 'अहेतुकें चित्तें । अनुष्ठा पां ययातें ।' ज्ञा ३.९२. 'आमच्या देशांतील सुशिक्षित वर्ग स्वभाषेचा अहेतुक शत्रु बनला । -टि ४.४९९. [सं.]

दाते शब्दकोश

अहेतुक, अहेतु, अहेतू      

वि.       १. ज्याला हेतू–कारण नाही असे; विनाकारण; अकारण. २. निष्काम. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अकाम्य      

वि.       फलाची अपेक्षा न करता, निष्काम बुद्धीने केलेले; कामनारहित; निरपेक्ष; निर्हेतुक; निर्लोभी. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अनापेक्षी      

वि.       १. अपेक्षेबाहेरचा; कल्पनेबाहेरचा. २. कोणतीही अपेक्षा, इच्छा नसलेला; निरिच्छ; निष्काम : ‘सुगड संगीत गुणग्राही । अनापेक्षी लोकसंग्रही I’ – दास २·८·१९. [सं. अन+अपेक्षा]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अनापेक्षी

वि. १ अपेक्षेबाहेरचा, कल्पनेबाहेरचा. २ कोण- तीहि अपेक्षा, इच्छा नसलेला; निरिच्छ; निष्काम 'सुगड संगीत गुण- ग्राही । अनापेक्षी लोकसंग्रही ।।' -दा २.८.१९. [सं. अ + अपेक्षा]

दाते शब्दकोश

बुद्धियोगु

निष्काम कर्मयोग (ज्ञानेश्वरी अध्याय २, ओवी २३०)

ज्ञानेश्वरीमधील कठीण शब्दांचे अर्थ (राज्य मराठी विकास संस्था प्रकाशित)

भोजन

न. जेवण; खाणें. [सं.] ॰खर्च-पु. जेवणाचा खर्च. ॰दक्षिणा-स्त्री. ब्राह्मणाला जेवूं घालून नंतर दिलेली दक्षिणा. [सं.] ॰पात्र-न. १ ज्यांत जेवावयाचें तें ताट, केळीचें पान इ॰ रूप पात्र. २ तोंड. -वि. अन्न समर्पण करण्यास योग्य, लायक. 'पैसा वर्ज्य वरून सर्व जाती, जीव भोजनपात्र आहेत.' [सं] ॰प्रिय- भाऊ, भोजन्या-पु. घरांत कांही एक कामकाज न करतां केवळ जेवणारा आळशी आणि निरुपयोगी माणूस. ॰भिक्षा-स्त्री. भक्ष्य पदार्थांची भिक्षा. [सं.] ॰विधि-पु. जेवणाच्या वेळीं करावयाचा विधि, व्रत; जेवणें; जेवणाचीक्रिया. ॰वेळ-स्त्री. जेवणाचा समय. भोजनावसर-पु. जेवणाची वेळ. [सं.भोजन + अवसर] भोज- नीय-वि. १ खाण्यास योग्य, लायक; खाद्य. २ उपभोगण्यास योग्य. ३ खाऊंपिऊं घालून पोसण्यास योग्य (मातापितरें, मुलें इ॰). [सं.] भोजन्नता-स्त्री. (महानु.) जेवावयाची जागा. 'त्या भैरवां उत्तरे भोजन्नता ।' -ऋद्धि ११६. भोजिणें-सक्रि. भोजन करविणें; जेवावयास घालणें. 'जिहीं निष्काम द्विज भोजिले । ते पावले सत्य लोक ।' -एभा २४.२२५. भोजीवि. (समासांत) खाणारा; भक्षण करणारा. जसें-अन्न-मित-अल्प-पथ्य-भोजी. [सं] भोजें-न. भोजन; खाणेंपिणें. 'परिसूनि प्रेमाचें भोजें । धरी आवडी पोटीसी ।' -मुआदि २४.५८. भोज्य-न. खाण्याजोगी वस्तु; खाद्य; अन्न. 'कैं भोज्य नानापरी । कैं कोरड्या भाकरी ।' -तुगा २७१७. -वि. १ खाण्यास योग्य, लायक. २ भोजनीय अर्थ ३ पहा. [सं.]

दाते शब्दकोश

चोख

वि. १ शुद्ध; निर्मळ; निष्कलंक; चांगलें; अस्सल; स्वच्छ; निर्भेळ. 'तें निजज्ञानही चोख । जाणता मीचि ।' -ज्ञा ५.४३६. 'ग्रंथारंभ पडला चोख । मुक्त मुमुक्षु इतर लोक ।' -एभा १११०४. २ उत्तम; उत्कृष्ट; थोर; श्रेष्ठ. 'अर्जुनाच भाग्य चोख ।' -भुवन ९.७८. ३ प्रामाणिक. [सं. चोक्ष = स्वच्छ, शुद्ध, आनंद दायक; प्रा. चोक्ख; तुल॰ हिं. चोखा; गु. चोख, चोख्खुं; का. चोक्क] सामाशब्द-चोखट-वि. चांगला; उत्तम; शुद्ध; सुंदर; चखोट. 'ऐसा महिमा घनवट । गंगा तैसी चोखट ।' -ज्ञा २.२१३. 'बहुतां जन्मांचा शेवट । नरदेह सांपडे अवचट । येथें वर्तावें चोखट । नीतिन्यायें ।' -दा ११.३.१. [चोख; का. चोक्कट] म्ह॰ (व.) चोखट चिरा दातीं कुरा = जी वरून झकपक करते, परंतु जिचे दांत स्वछ नसतात, पिवळे असतात अशा स्त्रीस उद्देशून ही म्हण योजतात. चोखटा-टी-टें, चोखडा-डी-डें-वि. (काव्य.) चांगला; शुद्ध; दृढ; निष्काम; निर्मळ; चखोट. 'चंद्र चकोरा चोखटीं । वोळे अमृतधारीं आतुटी ।' -ऋ ५२ 'तैसें श्रद्धेचें दळवाडें । आंगें कीर चोखडें । परी प्राणियांच्या पडे । विभागीं जै ।' -ज्ञा १७.५५. 'ए/?/से निरवधि चोखडे । स्वामि- भक्त । -ज्ञा १.११२. [चोखट] चोखटाई-स्त्री. चांगुलपणा; शुद्धता; चोखटपणा; कुशलता; उत्कृष्टता; सच्चेपणा; प्रामाणिक- पणा. [चोखट; तुल॰ हिं. चोखाई; गु. चोख्खाई] चोखटा- ईची भाजी-स्त्री. निर्लेप भाजी; उष्टी, खरकटी न झालेली भाजी; याच्या उलट खरकटी. खरकटा पहा. चोखटीव-स्त्री. चांगुलपणा; शुद्धपणा; निर्मळता. 'चोखटिवा आपुलिया । पुढिला उगाणा घेयावया । तया दर्पणाचीचि परी धनंजया । केली आम्हां ।' -ज्ञा १५.५७९. [चोखट] चोखटेल-न. करडई, तीळ, खुरासनी इ॰ कांचें तेल; गोडेंतेल; याच्या उलट कडू तेल. [चोखट]

दाते शब्दकोश

चोखटा, चोखटी, चोखटे, चोखडा, चोखडी, चोखडे      

वि.       चांगला; शुद्ध; दृढ; निष्काम; निर्मळ; चखोट : ‘तैसें श्रद्धेचें दळवाडें। आंगें कीर चोखडें । परी प्राणियांच्या पडे । विभागी जै ।’ − ज्ञा १७·५५.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

लंपट

वि. १ (स्त्रिया, संसार, प्रापंचिक सुखें यांविषयीं) निरत, आरक्त; (विशेषत:) कामुक; स्त्रीव्यसनी. (समासांत) स्त्री- विषय-लंपट. 'निष्काम तो झाला कामासी लंपट । गोपिकांची वाट पाहात बैसें ।' -तुगा २४१. [सं.]

दाते शब्दकोश

नि भिलाष-षी

वि. निरिच्छ; निष्काम; निरपेक्ष पहा. 'अगा आत्मजेच्या विषी । जिवु जैसा निरभिलाषी ।' -ज्ञा १२.१३२. [सं. निर् + अभिलाष]

दाते शब्दकोश

निचाड, निचाडा      

वि.       १. दांडगा; उद्धट; बेमुर्वत; अविनय. २. निरिच्छि; निष्काम. ३. निर्लज्ज; निगरगट्ट. ४. आवड, रुची, चव नसलेला. ‘गुळासारखा गूळ दगड । परी तो कठिण निचाड ।’ – दास ८·५·४७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निचाड-डा

वि. १ दांडगा; उद्धट; बेमुरवत; अविनय. २ निरिच्छ; निगरजु; निष्काम. -ज्ञा २.२८१. ३ निर्लज्ज; निगर- गट्ट. ४ प्रीति, आवड, रुचि, चव या विरहित. 'गुळासारखा गूळदगड । परी तो कठिण निचाड ।' -दा ८.५. ४७. [नि + चाड] निचाडणें-बेपरवाईनें वागणें. -एभा १२.१७५.

दाते शब्दकोश

निराकांक्ष

वि. निरिच्छ; निष्काम. [सं. निर् + आकांक्षा]

दाते शब्दकोश

निरिच्छ

उदासीन, निष्काम, वैरागी, वासनाहीन, लोभापासून अलिप्त, वांछा नसलेला, फलापेक्षा न ठेवणारा, इच्छानाश झालेला, मोह नसलेला, मनाने न चिकटलेला, इच्छेची वखवख गेलेली, आशारहित वृत्तीनें राही, फलाशारहित, अभिलाषा लोपली, तृप्तीची ढेकर आधींच दिली आहे.

शब्दकौमुदी

निरपेक्ष      

वि.       १. निरिच्छ; निःस्वार्थी; निष्काम; अपेक्षा नसणारा. २. असहाय; अनाथ; अशरण. ३. सोडून; वगळून; शिवाय. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निरपेक्ष

वि. १ निरिच्छः निःस्वार्थी; निरभिलाषी; निष्काम; अपेक्षा नसलेला. 'वैराग्यनिरपेक्षाचा गळा । गिंवसीत असे ।' -ज्ञा १६.२०९. 'जैसी निरपेक्षाची सांगता स्थिति । आशाबद्ध मनीं जल्पती । कां साहदेवमतासीं हेळसती । ज्योतिषी जैसे निजद्वेषें ।' २ असहाय; अनाथ; अशरण. ३ सोडून; वगळून- शिवाय. उदा॰ व्यक्तिनिरपेक्ष. [सं. निर् + अपेक्षा] निरपेक्षता- स्त्री. १ निरिच्छपणाः निःस्वार्थता. २ पक्षपात नसणें.

दाते शब्दकोश

निरुद्योगी

रिकामटेकडा, बेकार, कामधंदा नाहीं, घरीं बसून आहे, रिकामा, बे-काम, निष्काम बसून आहे, बिगरधंदा, सध्यां हात मोकळे आहेत, कशांत हात गुंतलेला नाहीं, कांहीं हातपाय हालवीत नाहीं,कांहीं कामच नाहीं, व्यवसायहीन, व्यवसाय धंदा नाहीं, यांना सदाचीच फुरसत, खाणें पिणे झोंपणे यांत वेळ जातो, वृत्ति - हीन, चकाट्या पिटणें हाच यांचा धंदा, पायावर पाय टाकून बसतो .

शब्दकौमुदी

संभ्रम

संभ्रम sambhrama m (S) Hurry, flurry, flutter, fluster, confused and precipitate state of mind. 2 Eagerness, impetuous ardor, vehemence or forwardness of desire. Ex. कांहीं नवा पदार्थ पाहिला म्हणजे त्याचें संपा- दन करावें हा सं0 त्या मनुष्यास फार आहे. 3 S Reverencing, exalting, honoring. Ex. सदा विरक्त आणि निष्काम ॥ नावडे लौकिकसंभ्रम ॥. Hence, with the license of popular speech, An act in honoring, adorning, dressing up, delighting, gratifying &c. Ex. चक्रीदार पागोटें घालावें गंध रेखून लावावें डौलानें चालावें असे हा दिवसभर आपल्या जिवाचे स0 करीत असतो. 4 S Turning round, whirling, revolving. 5 S Error, confusion, misapprehension, bewilderment.

मोल्सवर्थ शब्दकोश

उपराउपरी

क्रिवि. तांतडीनें; लागलीच; ताबडतोब. 'सिंह- नाद केला वीरीं । उपराउपरी धांविन्नले ।' -एरुस्व ८.२०; निष्काम उपवनें चौफेरीं । तीं जाळिलीं उपराउपरीं ।।' -एभा २३.३१९. [सं. उपरि + उपरि]

दाते शब्दकोश

वेसन-नी

व्यसन-नी पहा. 'वेसन गेलें निष्काम झालें नर नव्हे नारी ।' -तुगा २९७. 'चाहाड वेसनी निग्रही ।' -दा २.३.२७.

दाते शब्दकोश

युक्ती, युक्त

स्त्री. १ शक्कल; खुबीदार कल्पना; शोधकबुद्धि. २ कसब; खुबी; कल्पना; कौशल्य (शक्तीच्या विरुद्ध). ३ (एखाद्या यंत्रांतील) कळ; मख्खी; किल्ली; मखलाशी. ४ उचित- पणा; योग्यपणा; औचित्य; विवेक; प्रमाण; नियमितपणा. 'तरि तत्सत्तेविषयीं उपमन्यो कोणती असे युक्ती । ' -मोअनु ३.३१. ५ ऐक्य; मिश्रण; मिळणी; एकत्रीकरण; एकी. ६ निष्काम कर्म करण्याची हातोडी. 'जो युक्तीपंथें पार्था । चढे मोक्षपर्वता । तो मपा सुखाचा निमथा । वहिला पावे । ' -ज्ञा ५.३२. [सं. युक्ति] (वाप्र.) युक्तीच्या पोटीं-क्रिवि. युक्तीनें; मुत्सद्देगिरीनें; कौशल्यानें. युक्तीस येणें-मनास पसंत पडणें; योग्य, युक्त वाटणें, दिसणें. ' बहु बोलणें तयांचें धर्माच्या येइनाचि युक्तीस तें । ' -मोशांति ३.८४. युक्तीयुक्तीनें करणें-घेणें-त्वरा अथवा दांडगाई न करतां सोईनें करणें. सामाशब्द- ॰कौशल्य- न. उपाययोजनेंतील कौशल्य; तोड काढण्यांतील प्रावीण्य. ॰घोष- पु. बंधरूपी मंत्रघोष. 'तेथ संयमाग्नीचीं कुंडें । इंद्रियद्रव्याचेनि पवाडें । यजिती उदंडें । युक्तीघोषें । ' -ज्ञा ८.५०. ॰त्रय-न. (योगशास्त्र) वज्रासन, जालंदर आणि उड्डियान असे तीन बंध. -ज्ञा ४.१२७. ॰प्रयुक्ति-स्त्री. नानाप्रकारच्या युक्त्या; बरेवाईट उपाय. [सं.] युक्तिप्रयुक्तीनें-क्रिवि. बऱ्यावाईट उपायांनीं; कोणत्याहि मार्गानें; कांहींहि करून; या नाहीं त्या उपायानें. ॰बाज-मान-वंत-वान-वि. युक्त्या जाणणारा; युक्त्या लढ- विणारा; हुषार; सुपीक डोक्याचा; शोधक; निरनिराळे उपाय योजणारा. ॰वता-क्रिवि. कौशल्यानें; युक्तिनें; खुबीनें; हुषारीनें; लबाडीनें. [युक्ति + वत्, वाट] ॰वाद-पु. युक्तीनें केलेला वाद (तर्कशास्त्रास अनुसरून नव्हे पण सामान्य व्यवहारास पटेल असा) ॰सार-वि. बरोबर; योग्य; रास्त; पटण्यासारखें; औचि- त्याला धरून असलेलें. युक्त्या-वि. कसबी; हुशार; युक्तिबाज; सुपीक डोक्याचा; चलाख; निरनिराळे बेत, मसलती, उपाय योजणारा. -क्रिवि. युक्तिनें; कौशल्यानें; लबाडीनें; हुशारीनें.

दाते शब्दकोश

युक्तिपंथ

निष्काम कर्म योगानुष्ठान हातवटी (ज्ञानेश्वरी अध्याय ५, ओवी ३२)

ज्ञानेश्वरीमधील कठीण शब्दांचे अर्थ (राज्य मराठी विकास संस्था प्रकाशित)

महत्

वि. १ मोठा; बडा; विस्तृत. २ (ल.) थोर; वरच्या दर्जाचा; उत्कृष्ट; कोणत्याहि गुणांत श्रेष्ठ. जसें-महाबुद्धिमान्, महालबाड; महासोदा. महत् हा शब्द कर्मधारय आणि बहुव्रीहि समासांत महा असा होतो आणि तत्पुरुष समासांत तसाच राहतो. जसें-महादेव, महाबाहु व महत्पूजा; महत्सेवा. ३ अतिशय; फार; अत्यंत. जसें-महाप्रचंड; महातीक्ष्ण इ॰ [सं.] महतामहत्-वि. (व.) मोठ्यांतला मोठा; सर्वांत मोठा. महत्तत्व-न. सत्व, रज, तम या तीन गुणांची साम्यावस्था; मूळमाया; गुणसाम्य. 'सत्त्वगुणापासून महत्तत्व उत्पन्न झालें.' -टिले ४.३६१. महत्तमसाधारण भाजकपु. दिलेल्या सर्व संख्यांना पूर्ण भाग जाईल अशी सर्वांत मोठी संख्या. महदंतर-न. फार मोठें अंतर, तफावत; वेगळेपणा. महदहंबुद्धि-स्त्री. महत्तत्त्व; अहंकार- बुद्धि. 'एवं महदहंबुद्धि । मनें महाभूत समृद्धि ।' -माज्ञा १५.१०५. महदादिदेहांत-क्रिवि. महत्तत्त्वापासून स्थूलदेहापर्यंत. 'महदादि देहांतें । इयें आशेषेंही भूतें ।' -ज्ञा ९.६७. महद्ब्रह्म-न. मूळ ब्रह्म. 'तया महद्ब्रह्मातें व्याली । दैविकी इच्छा ।' -ज्ञा ११.५११. महद्भूत-वि. विलक्षण; असामान्य; चमत्कारिक. महद्वर्त्त-न. गोलाचें वर्तुळ; खगोलीय वृत्त. महती-स्त्री. मोठेपणा; महत्त्व. 'त्याचेनि माझी त्रैलोकीं ख्याती । मज महती त्याचेनी ।' -एभा १४.२६९. महतीवीणा-स्त्री. नारदाच्या वीणेचें नांव. महत्त्व-न. मोठेपणा; योग्यता; लौकिक; प्रतिष्ठा; किंमत. महती पहा. 'रायाजी पाटिल महत्त्व रक्षी ।' ऐपो ३२. उतरणें- योग्यता; प्रतिष्ठा; कमी होणें. ॰वाढविणेंफुशारकी, बढाई मारणें. ॰दर्शक-वि. पदार्थाचें माप, लांबी, रुंदी इ॰ दाखवि- णारें (परिमाण). ॰मापन-न. गणितशास्त्राचा एक विभाग; आकारमान मोजण्याची विद्या; मापनशास्त्र. महत्त्वकांक्षा- -स्त्री. मोठेपणाची इच्छा, हांव; जिगीषा. 'कर्तबगार लोकांच्या वेडाला महत्त्वाकांक्षा म्हणतात.' -विधिलिखित २१. महा-वि. १ महत् पहा. २ थोर; बडा. 'हे एक महा आहेत.' 'तो काय एक महा आहे.' ॰अर्बुद-न. एक हजार दशकोटि ही संख्या. ॰ऊर-पु. (अप.) महापूर; अतिशय मोठा पूर. ॰एकादशी- स्त्री. आषाढशुद्ध व कार्तिक शुद्ध एकादशी. ॰कंद-पु. १ मोठ्या जातीचा कंद. २ लसूण. ॰कल्प-पु. ब्रह्मदेवाच्या शंभर वर्षांचा काल; ब्रह्मदेवाचें आयुष्य; महाप्रलय; कल्प पहा. ॰काल-ळ- पु. १ प्रलय काळचा शंकराचा अवतार. 'महाकाळ उभा चिरीन बाणीं ।' २ बारा ज्योतिर्लिंगांपैकीं एक (उज्जनी येथील). ॰काली-स्त्री. १ पार्वती. २ प्रचंड तोफ; महाकाळी. -शर. ॰काव्य-न. वीररसप्रधान, मोठें, अभिजात, रामायण-महा- भारताप्रमाणें काव्य; (इं.) एपिक. 'आर्ष महाकाव्यांत कोण- कोणते गुण असावे याबद्दल पुढें विवेचन येईलच.' ॰काश-न. अवकाश; अफाट पोकळी. याच्या उलट घटाकाश, मठाकाश. [महा + आकाश] ॰कुल-कुलीन-वि. थोर, उच्च कुलांतील; कुलीन. ॰खळें-न. मोठें अंगण. ॰गाणी-नी-वि. गानकुशल. 'उत्तर देशींच्या महागणी । गुर्जरिणी अतिगौरा ।' -मुरुंशु १२२. ॰गिरी-पु. मोठा पर्वत; हिमालय. 'किं मक्षिकाचेनि थडकें । महागिरी पडों शकें ।' -एकनाथ-आनंदलहरी ४२. -स्त्री. १ तीनशें खंडीपर्यंत वजन नेणारें जहाज, गलबत; मालाचें तारूं; 'सबब त्यांजकडे दोन महागिऱ्या भरून गवत व एक महागिरी- भर लांकडे देविलीं असें,' -समारो ३.१६. २ मोठें तारूं; शिबाड; बतेला. ॰ग्रह-ग्राह-पु. मोठी सुसर; मोठा मगर. 'गज करवडी महाग्राह ।' -एरुस्व १०.८० -एभा २०.३५०. ॰जन- पु. १ काही गुण, विद्या इ॰ मुळें थोर, श्रेष्ठ माणूस. 'परंतु हृदयीं महाजन भयास मी मानितों ।' -भक्तमयूरकेका ७५. ३ व्यापारी; उदमी; सावकार. ३ गाव, कसबा इ॰ तील व्यापाराला नियम, शिस्त घालून देणारा, त्यावर देखरेख करणारा व कर वसूल करणारा सरकारी अधिकारी. ह्या अर्थीं महाजनी असाहि शब्द आहे. ४ पंच ॰जनकी-स्त्री. महाजनांचे काम, अधिकार. ॰डोळा-पु. एक मासा. -प्रणिमो ८१. ॰तल-न. सप्तपातालांपैकीं एक; नाग व असुर यांचें स्थान. ॰ताप-पु. (तंजा.) शोभेच्या दारूचा एक प्रकार; चंद्रज्योति. महताब पहा. ॰तेज-न. १ ब्रह्म २ सूर्य. 'हें अपार कैसेनि कवळावें । महातेज कवणें धवळावें.' -ज्ञा १.७४ महात्मा-पु. १ महानुभव पंथांतील व्यक्ति. ३ मोटा धैर्यवान, पराक्रमी मनुष्य. 'तैसें महात्मा वृक्षमुळीं । असावें खांड देउळीं ।' -भाए ४९३. गौतमबुद्ध, गांधी यांस संबोधितात. -वि. १ थोर मनाचा; उदार; महानुभाव. 'परते धर्म महात्मा, स्तविला बहु नारदादि साधूंनीं ।' -मोभीष्म १.९९. [महा + आत्मा] ॰दंदी- वि. महामत्सरी; कट्टर द्वेष्टा. 'छंदी फंदि महादंदि । रावण पडिला तुझ्या बंदि ।' -ज्ञानप्रदीप २६६. [सं. महाद्वंद्वी] ॰दशा-स्त्री. (ज्योतिष) कुंडलीतींल मुख्य ग्रहाची बाधा अंतर्दशा पहा. ॰दान- न. (मोठें दान) हत्ती इ॰ षोडशदानांपैकीं एक; षोडशमहादानें पहा. ॰देव-पु. १ शंकर; शिव. 'महादेव म्हणावया कारण । ब्रह्मयासि. जाण या हेतू ।' -एभा १३.२७९. २ (विणकाम) हातमागाच्या फणीचा मरचा अवयव, दांडा फळी. हा आणि तळाचा दांडा किंवा पार्वती मिळून फणीची चौकट होते या फणीच्या चौकटीस महादेवपार्वती किंवा हात्यादांडी असेंहि म्हणतात. ॰देवाचें देणें- न. कंटाळवाणें व दीर्घकाल टिकणारें काम. ॰देवापुढचा-वि. (शब्दशः) नंदी; (ल.) मूर्ख; निर्बुद्ध. ॰देवी-स्त्री. १ पार्वती; दुर्गा. २ एक प्रकारची वनस्पति. हिचें बीं महादेवाच्या पिंडीच्या आकाराप्रमाणें असतें. ॰देवी सहादेवी-स्त्री. (माण.) चैत्री पौर्णिमेस तिन्हीसांजचे वेळीं एखाद्या भिंतीवर जीं महादेवी सहादेवी म्हणून दोन गंधाचीं बाहुलीं काढून त्यांची पूजा कर- तात तीं. -मसाप ४.४.२५९. ॰दैव-(माण.) सर्व जातींचे लोक. ॰द्वार-न. (मंदिराचा किंवा राजवाड्याचा) बाहेरचा किंवा मुख्य दरवाजा. 'भक्त गर्जती महाद्वारीं । त्यांसी द्यावे दर्शन ।' -भूपाळी विठ्ठलाची पृ २२. ॰द्वीप-न. (मोठें बेट) खंड. 'तयाफळाचे हें महाद्वीप । पातली प्रभु ।' -ज्ञा १६.३२. ॰नदी-स्त्री. मोठी नदी; उगमापासून शंभर योजनांवर वाहात जाणारी नदी. ॰न मी-स्त्री. १ आश्विन शुद्ध नवमी; नवरात्राचा शेवटचा दिवस. २ रामनवमी. -शास्त्रीको ॰नवरात्र-न. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंतचा काल. ॰नस- पु. स्वयंपाकघर. ॰नक्षत्र-न. सूर्यनक्षत्र ॰नाड-पु. महाजना- सारखा एक वतनदार. 'महाजन व महानाड पेठ मजकूर याचें नांवें सनद कीं,' -थोमारो १.५४. [महा + नाड-डु] ॰निंब-पु. एक प्रकारचें झाड. ॰निद्रा-स्त्री. मरण; मृत्यु. 'तिसरें प्रमाण महा- निद्रा म्हणजे मृत्यु हें होय?' -टि ४.४८१. महानुभाव-पु. श्रीचक्रधरानें स्थापिलेला एक द्वैतवादी पंथ. या पंथात श्रीकृष्ण- भक्ति प्रमुख आहे. [महा + अनुभाव] -वि. १ ज्यानें कामक्रोधादि विकार जिंकले आहेत असा; महात्मा. २ उदार, थोर पुरुष. एवं पिंडारकीं ऋषि सर्व । शापानुग्रही महानुभाव ।' -एभा १.३३६. ३ प्रशस्त अनुभवाचा; ब्रह्मानुभवी. 'ऐसे जे महानुभाव । जे दैविये प्रकृतीचें दैव ।' -ज्ञा ९ १९४. ४ विद्या, बुद्धि, पराक्रम इ॰ गुणांनीं श्रेष्ठ मनुष्य; महाप्रतापी. ॰नेटका-वि. परिपूर्ण; पूर्णपणे; व्यवस्थित. 'यज्ञ मुनिचा राखे महानेटका ।' -मोरामायणें त्रिःसप्तमंत्रमय रामा- यण ३. ॰नैवेद्य-पुन. पंचपक्वान्नमय अन्नाचें ताट वाढून देवाला दाखवितात तो नैवेद्य (साखर, दूध इ॰चा छोटा नैवेद्य होतो). ॰न्यास-पु. पूजा करतांना शरीराच्या विवक्षित भागांना स्पर्श करून करावयास न्यास. याचाच दुसरा प्रकार लघुन्यास. ॰पड-पु. (महानु.) महापट; ध्वज. 'आहो जी देवा । पैलु देखिला महा- पडांचा मेळावा ।' -शिशु १०३३. [महापट] ॰प(पं)थ-पु. १ मृत्यु; मरण; मृत्यूची वाट. 'न देशील सत्यवंत । तरी करीन हाचि महापंथ ।' -वसा ६.८. २ निर्याणाचा मार्ग. 'लागले महापंथी तत्काळाची ।' -एभा ३१.२९८. ॰पद-न. ब्रह्मपद. 'कीं श्रुति हे महापदीं । पैठी जाहली ।' -ज्ञा १३.३७१. ॰पद्म-पु. १ एकं, दहं, शतं ह्या श्रेणींतील तेराव्या स्थानची संख्या (एकावर बारा शून्यें इतका आकडा) २ कुबेराच्या नवनिधींपैकीं एक निधि. नवविधी पहा. ॰पातक-न. ब्रह्महत्या, दारू पिणें, सुवर्णाची चोरी, गुरूच्या पत्नीबरोबर किंवा स्वतःच्या मातेबरोबर संभोग आणि यापैकीं एखादें पातक करणाराशीं मैत्री, अशा पांच मोठ्या पातकांपैकीं प्रत्येक. ॰पातकी-वि. १ ज्याच्या हातून महापातक घडलें आहे असा. २ अत्यंत पापी; दुराचारी. म्ह॰ अवसानघातकी महापातकी. ॰पाप-पी-महापातक-की पहा. ॰पीठ-न. विष्णूच्या चक्रानें झालेले शक्ती-पार्वतीच्या शरीराचे तुकडे ज्या ठिकाणीं पडले असें मानतात त्या अत्यंत पवित्र स्थानापैकीं प्रत्येक. अशीं स्थानें साडेतीन आहेत. तुळजापूर, मातापूर आणि कोल्हापूर, हीं तीन व अर्धे सप्तशृंग. औट पीठ पहा. ॰पुरुष-पु. १ ईश्वर. २ साधु- पुरुष; सत्पुरुष; ब्रह्मनिष्ठ मनुष्य. 'महापुरुषाचें चित्त । जालिया वस्तुगत ।' -ज्ञा १३. ७८९. ३ मेलेल्या ब्राह्मणाचें पिशाच्च. ॰पू(पु)जा-स्त्री. व्रतसमाप्ति इत्यादि विवक्षित प्रसंगास अनुसरून करतात ती मोठी पूजा. ॰पूर-पु. नदीस येणारा मोठा पूर, लोंढा. 'महापूरें झाडें जाती । तेथे लव्हाळे राहती ।' -तुगा १०४३. ॰प्रयास-पु. मोठे परिश्रम, कष्ट, प्रयत्न, खटाटोप. ॰प्रलयपु. १ प्रत्येक ४३२००००००० वर्षांनीं होणारा सर्व जगाचा नाश. २ ब्रह्मदेवाच्या शंभर वर्षांनीं होणारा सर्व (देव, ब्राह्मण, साधू, ब्रह्मा यासह) विश्वाचा नाश. 'जो ब्रह्याच्या स्थूळ देहाचें मरण । तो महाप्रलय जाण ।' महाकल्प पहा. ॰प्रयासपुअव. फार मोठे कष्ट, श्रम, प्रयत्न. ॰प्रसादपु. १ धार्मिक किंवा देवाच्या उत्सवा- नंतर वाटतात तो फुलें, मिठाई, जेवण इ॰ रूप प्रसाद. २ देव, गुरु इ॰पासून मिळालेली प्रसादाची वस्तु (कृपा, अनुग्रह म्हणून). ३ (शब्दशः व ल.) मोठी कृपा, अनुग्रह 'महाप्रसादाचेनि हरिखें । सप्रेम सुखें डुल्लती ।' ॰प्रस्थानन. (मोठा प्रवास) १ यथार्थ ब्रह्मज्ञानानंतर येणारा मृत्यु. २ (ल) मरण; मृत्यु ॰प्राणपु. १ मोठ्या जोरानें व प्रयासानें केलेला उच्चार: हकारयुक्त उच्चार २ जोरानें आणि प्रयासानें उच्चारण्याचा वर्ण. जसें-ख, घ, छ, झ, ठ, ढ, थ, ध, फ, भ, आणि ह अल्पप्राण आणि बाह्य प्रयत्न पहा. ॰फणी-पु. मोठा साप. ॰फल-ळ-न. मोठे, उत्कृष्ट फळ; नारळ. फणस इ॰ ॰बलि-ळी-पु. पिशाच्चादिकांस संतुष्ट कर- ण्यासाठीं मांस, अन्न इ॰ चा बलि, अर्पण करावयाचा पदार्थ ॰बळी-वि. अत्यंत प्रबळ, सामर्थ्यवान्. 'महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें ।' -मारुतिस्तोत्र. ॰बळी बुटी-स्त्री. रुंदट पानाचें आलें. ॰भाग-वि. १ अतिशय भाग्यवान् 'नित्य निष्काम अतिप्रीतीं । मज भजती महाभाग ।' -एभा २४ ३३५. २ सद्गुणी; सद्वर्तनी. ॰भारत-न. व्यासप्रणीत कौरव-पांडवाच्या युद्धाचें भारतीयांचे पवित्र असें एक महाकाव्य; महापुराण ॰भूत-न. पृथ्वी, आप तेज, वायु आणि आकाश ह्या पंचमहाभूतांपैकीं प्रत्येक. 'तरी होसी गा तूं परब्रह्म । जें या महाभूता विसंवतें धाम ।' -ज्ञा १०. १४९. ॰भेड-वि. अत्यंत भितराः भेकड. 'मग विरा- टाचेनि महाभडें उत्तरें ।' -ज्ञा ११ ४६९. ॰मणि-पु. मौल्यवान् रत्न; हिरा, माणिक इ॰ 'कांचोटी आणि महामणी । मेरू मषक सम नव्हे ।' -ह १ ८४. ॰मति-मना-वि. थोर अंतःकरणाचा; उदार मनाचा; महात्मा. ॰मंत्र-पु. निरनिराळ्या देवतांचा मुख्य मंत्र. जसें-गायत्री हा ब्राह्मणाचा महामंत्र. 'महामंत्र आत्मप्रा- प्तीची खाणी ।' ॰मंत्री-पु. मुख्यप्रधान; मुख्य मंत्री सल्लागार. ॰महोपाध्याय-पु. मोठ्या शास्त्राला देतात ती एक सन्मानाची सरकारी पदवी. ॰म/?/त्र-पु. हत्ती हांकणारा; महात. 'मुरडावया मत्त हस्ती । महामात्र दोन्हीं हस्तीं । अंकुश हाणी तैसा श्रीपती । मर्मोद्धाटनें करितसे ।' -यथादी २.१६. ॰माया-स्त्री. १ पार्वती; दुर्गा. २ जगदुत्पादक शक्ति; सर्व संसाराला, प्रपंचाला कारणीभूत अशी देवता; आदिमाया; मूलप्रकृति ३ जहांबाज कजाग बायको. ॰मार-पु. मोठा मार, फटका. 'शुक्रबाणाचा महामारु ।' -मुवन ३.३८. ॰मारी-स्त्री. १ महामृत्यु. 'तेथ अचेतना झुंजारीं । न मरत्या महामारीं ।' -एभा २८.२५०. २ (ल.) प्राणसंकट. 'तिचेनि योगें महामारी पातली हे जाणिजे ।' -मुवन ७.१८७. ३ पटकी या सांथीचा रोग. ४ या रोगाची अधिष्ठात्री, दुर्गादेवी. ५ जिवापाड श्रम; शिकस्तीचा प्रयत्न. ६ हाणाहाणी; मारामारी; मोठें युद्ध. 'दोघे झुंजतां महा- मारी' -मुवन ३.३६. 'तैसी मांडिली महामारी ।' -कथा २.२.६०. ॰मृत्यू-पु. मरण; मृत्यू (अपमृत्युविषयीं बोलतांना उपयोग) जसें- 'अपमृत्यूचा महामृत्यु झाला.' ॰मृत्युंजय- (वैद्यक) एक औषध. ॰यंत्र-न. तोफ. ॰यज्ञ-याग-पु. मोठा यज्ञ; पंच महायज्ञांपैकीं प्रत्येक; पंचमहायज्ञ पहा. 'तरी महायाग- प्रमुखें । कर्मे निफज नाही अचुकें ।' -ज्ञा १८. १६६. ॰यात्रा- स्त्री. १ काशीयात्रा. २ (ल.) मरण; मृत्यु. 'आधीं पेशवाई सकट सगळ्यांना महायात्रेला धाडीन.' -अस्तंभा १६२. महा- प्रस्थान पहा. ॰रथ-रथी-पु. १ शस्त्रास्त्रांत प्रवीण असून दहा हजार धनुर्धारी योद्ध्यांबरोबर एकटाच लढणारा योद्धा. 'महारथी श्रेष्ठ । द्रुपद वीरु ।' -ज्ञा १.९८. २ (ल.) अत्यंत शूर, कर्तब- गार पुरुष किंवा मोठा वक्ता. ॰रस-न. १ ब्रह्म. २ पक्वान. -मनको. ॰राज-पु. १ सार्वभौम राजा; सम्राट. २ (आदरार्थी) श्रेष्ठ माणूस. ३ जैन, गुजराथी वैष्णव लोकांचा गुरु. ॰रात्रि- स्त्री. महाशिवरात्र माघ वद्य चतुर्दशी. ॰राष्ट्र-नपु. मराठे लोकाचा देश; उत्तरेस नर्मदानदी, दक्षिणेस कर्नाटक, पूर्वेस तैलंगण आणि पश्चिमेस समुद्र यांनीं मर्यादित असलेला प्रदेश; मुंबई इलाख्यां- तील एक विभीग. ॰राष्ट्र-राष्ट्रीय-वि. महाराष्ट्रदेशासंबंधाचे (लोक, भाषा, रिवाज इ॰). ॰राष्ट्र-भाषा-स्त्री. मराठी भाषा; संस्कृत-प्राकृत भाषेपासून झालेली एक देशी भाषा. ॰राष्ट्री- एक जुनी प्राकृत भाषा. ॰रुख-पु. एक प्रकारचे झाड; महावृक्ष. 'कर्वत लागला महारुखा । म्हणे पुढती न दिसे निका ।' -मुआदि ३३.२९. ॰रुद्र-पु. १ रुद्राभिषेकाचा एक प्रकार; अकरा लघुरुद्र; लघुरुद्राच्या उलट शब्द महारुद्र. २ मारुती. 'महारुद्र आज्ञेप्रमाणें निघाला ।' -राक १.१. ॰रुद्रो-पु. (गु.) बाजरीची मोठी जात हिचें काड फार उंच होतें -कृषि २७७. ॰रोग-पु. १ अत्यंत दुःखदायक असा रोग. याचे आठ प्रकार आहेत-वात- व्याधि, अश्मरी, कृछ्र, मेह, उदर, भगंदर. अर्श आणि संग्रहणी. कांहींच्या मतें हे नऊ आहेत; त्यांत राजयक्ष्मा हा एक जास्त असून कृछ्राऐवजीं कुष्ठ व संग्रहणीच्या ऐवजीं ग्रहणी अशीं नांवें आहेत. २ रक्तपिती; गलित कुष्ठ. महार्घ-वि. १ महाग; दुष्प्राप्य. 'महार्घ येथें परमार्थ जाला ।' -सारुह १.२१. २ मौल्यवान् [सं. महा + अर्घ] महार्णव-पु. मोठा समुद्र; महासागर. 'वनीं रणीं शत्रु-जलाग्निसंकटी । महार्णवीं पर्वत-वास दुर्घटीं ।' -वामन स्फुट श्लोक ३५. (नवनीत पृ. १३७.) -न. १ (ल.) मोंठें, दीर्घकाल चाललेलें भांडण; युद्ध; लढाई. 'दोघां मांडलें महार्णव । दाविती बळ प्रौढीगौरव ।' -निगा २४. २ प्रसिद्धि; डांगोरा; जघन्यत्व. ३ लहान काम, प्रकरण, गोष्ट इ॰ ला मोठें रूप देऊन सांगणें; राईचा पर्वत करणें. 'एवढ्याशा गोष्टीचें त्वां लागलेंच महार्णव केलेंस.' [सं. महा + अर्णव] ॰लय-पु. १ आश्रयस्थान; आश्रम; धर्मशाळा. २ देऊळ. ३ परमात्मा. ४ भाद्रपद वद्यपक्षां- तील पितरांप्रीत्यर्थ केलेलें श्राद्ध; पक्ष; मृतपितृकानें भाद्रपद शुद्ध पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत दररोज करावयाचें श्राद्ध. हें रोज करणें अशक्य असल्यास १५ दिवसांतून एका उक्त दिवशीं करावें. [महा + आलय] ॰लक्ष्मी-स्त्री. १ विष्णुपत्नी २ अश्विन शुद्ध अष्टमीस पूजावयाची एक देवता, त्या देवतेचे व्रत. ३ भग- वती; कोल्हापूरची देवी. ४ (ना.) ज्येष्ठागौरी; भाद्रपद शुद्ध नव- मीस पूजा करावयाच्या देवता. ॰लिंग-न. बारा ज्योतिर्लिंगांपैकीं प्रत्येक. ॰वटी, माहावटी-स्त्री. राजमार्ग. 'हे कपटाची कस(व)टी । अनृत्याची माहावटी ।' -भाए ७५५. ॰वस्त्र-न. उंची, सुंदर वस्त्र; प्रतिष्ठित वस्त्र; शालजोडी इ॰ ॰वाक्य-न. वेदांतील जीवब्रह्माचें ऐक्य दाखविणारें तत्त्वमसि आदि वाक्य हीं चार वेदांची चार आहेत. 'तो महावाक्याचेनि नांवें । गुरुकृपे- चेनि थांवें ।' -ज्ञा १८.४०४. २ गायत्री मंत्र. ॰वात-पु. (तासीं ८० मैल वेगाचा) सोसाट्याचा वारा; झंझावत; तुफान. 'महावात सूटला म्हणुनि का कंप येत भूघरा ।' -सौभद्र. ॰विषुव-न. मेष संपात; हरिपद. ॰वृत्त-न. ज्या वृत्ताची पातळी गोलाच्या मध्य बिंदूतून जाते तें वृत्त; मोठें वर्तुळ. ॰वोजा-वि. मोठ्या थाटांची; तेजस्वी. 'संतोषोनी महाराजा । सभा रचित महवोजा ।' -गुच ३४. ९७. [महा + ओजस्] ॰व्याधि-पु. महारोग; रक्तपिती. ॰शब्द- पु. बोंब; शंखध्वनि. ॰शय-पु. १ थोर पुरुष; महात्मा, २ मोठ्या माणसांस महाराज रावसाहेब याप्रमाणे संबोधावयाचा शब्द. [सं. महा + आशय; बं. मॉशे; फ्रें मुस्ये (माँसिय)] ॰शिवरात्र-त्रि-स्त्री. माघ वद्य चतुर्दशी. ॰शून्य-न. जें कांहींच नाहीं असें जें शून्यास अधिष्ठानरूप ब्रह्म तें; परब्रह्म. 'आतां महा- शून्याचिया डोहीं । जेथ गगनासीचि ठावो नाहीं ।' -ज्ञा ६. ३१५. ॰महाष्टमी-स्त्री. अश्विन शुद्ध अष्टमी. ॰सरणी-स्त्री. स्वर्गमार्ग. ' होउनि सुयोधनाचा शोकार्त वरो पिता महास- रणी ।' -मोभीष्म ११.१५. ॰सागर-पु. पृथीवरील पाण्याचा सागराहून मोठा सांठा; मोठासमुद्र. उदा॰ हिंदी महासागर. ॰सिद्धांत-पु. एकमेवाद्वितीयं ब्रह्म हा मुख्य सिद्धांत. 'आणि महासिद्धांतापासीं । श्रुति हारपती शब्देंसीं ।' -ज्ञा १५.४३४. ॰सिद्धि-स्त्री. अष्टमहासिद्धी पहा. 'जेथ महासिद्धींचीं भांडारें । अमृताचीं कोठारें ।' -ज्ञा ६.३२१. ॰सुख-न. ब्रह्मसुख; ब्रह्म साक्षात्कार. 'जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ।' -ज्ञा १.१४. ॰स्म(श्म)शान-न. काशीक्षेत्र. 'सदाशिव बैसता निजासनीं । महाश्मशानीं निजवस्ती ।' -एभा २.३१. ॰क्षेत्र-न. काशी- क्षेत्र. -रा ३.४७६. ॰महेंद्र-पु. १ हिंदुस्थानांतील पर्वताच्या सात रांगांपैकीं एक. २ इंद्राचें नांव. 'हें महेंद्रपदही पाविजेल । परि मोह हा न फिटेल ।' -ज्ञा २.६५. [महा + इंद्र] महेश, महेश्वर-पु. शिव; शंकर. [महा + ईश्वर] महेश्वरी पातळ-न. महेश्वर नांवाच्या गांवी (इंदूर संस्थान) तयार झालेलें वस्त्र, पातळ. 'आधींच कंबर बारिक त्यावर महेश्वरी पातळ कसलें ।' -होला ८९. महोत्सव, महोत्साह-पु. मोठा उत्सव; आनंद- दायक प्रसंग. [महा + उत्सव] महोदधि-पु. १ महासागर; मोठा समुद्र. ' महोदधीं कां भिनले । स्त्रोत जैसे ।' -ज्ञा १५.३१७. २ हिंदीमहासागर [महा + उदधि] महोदय-पु. माघ किंवा पौष महिन्यांत सोमवारी सूर्योदयीं अमावस्यारंभ श्रवण नक्ष- त्राचा मध्य आणि व्यतिपाताचा शेवट यांचा योग; एक मोठें पर्व. [महा + उदय] महौजा-वि. तेजस्वी; ज्याचें तेज मोठें आहे असा; सामर्थ्यवान् 'पुरुष श्याम महौजा ओढित होता बळेंचि मजला जो ।' -मोवन १३.८८. [महा + ओज] महान्-वि. १ मोठा; विस्तृत; थोर. २ उशीरा पिकणारें (धान्य, पीक); गरवें ३ दोन किंवा अनेक वर्षें टिकणारें (झाड, मिरची, कापूस, पांढरी तूर इ॰).

दाते शब्दकोश