मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

नेम

पु. १ नियम पहा. -अमृ ५.५०. 'नेमाचा झाला कळस ।' २ उद्दिष्ट; हेतु; लक्ष्य; साधन. (क्रि॰ बांधणें; धरणें; लावणें). ३ माप. (क्रि॰ घेणें; देणें). [सं. नियम] लावणें- नियम करणें; मार्ग, रीत लावणें. 'ह्यास्तव अवतरला तुकाराम । साधकास नेम लावावया ।' ॰सारणें-नेमधर्म, नित्याचार उर- कणें. 'पार्थें स्नान करून सकळ । नेम आपुला सारिला ।' -ह ३२.१७४. ॰धर्म-पु. शास्त्रनें सांगितलेले धार्मिक आचार- विचार, नियम. ॰निष्ठ-ष्ठा-शील, नेमाचा-नियमनिष्ठ-ष्ठा पहा. 'नेमनिष्ठ वैष्णव ते विष्णुपूजा समर्पिती ।' -होला. ॰पण-न. नियम; व्रत. 'नेमपण टाळतां अवतारकृत्य संपलें ऐसें जाणिजे ।' -दावि ३५. नेमक-वि. १ नेमानें वागणारा. 'नेमक निग्रह तापस ।' -दा १.८.९. २ मोजकें, परिमित. (भाषण, बोलणें). 'नेमक बोलतां अंतरें । निववी सकळांचीं ।' -दा १९.१०.६. ॰पण-न. नियमित आचरण, वर्तन, शिस्त. 'कांहीं नेमकपण आपुलें । बहुत जनासीं कळों आलें ।' -दा १९.३. २३. नेमका, नेमकाच-क्रिवि. १ पाहिजे असलेला; नेम धरल्या- प्रमाणें बरोबर. (ल.) संकल्प, बेत केल्याप्रमाणें; अपेक्षित तोच २ वेळेवर; प्रसंगोपात्त. नेमळ-ळ्या-वि. १ अगदीं नियमा- प्रमाणें वागणारा; वक्तशीर; शिस्तीचा; ठाकठिक्या. २ नेमधर्म पाळणारा; अगदीं कट्टर धार्मिक. 'ऐशा रीती भक्त नेमळ । हरुषें वोसंडत तये वेळें ।' नेमाड्या-वि. दगड इ॰ कांचा अचूक नेम मारणारा. नेमानेम-पु. १ योजना आणि निश्चय (ईश्वरी, दैवी). योगायोग; अदृष्ट. २ वहिवाट; चाल; सामान्य नियम; नेहमींचा परिपाठ. नेमावणी-स्त्री. १ नोंदणी. 'तुळाजी आंग्रे यांचे कार- कीर्दीस नेमावणी करावयाची ताकीद जाहली...' -थोमारो २.१४२. २ शेत लावणें. -भाद्विसंवृ ६८. नेमिष्ठ, नियमिष्ठ, नेमी, नियमी-वि. नेमळ पहा.

दाते शब्दकोश

नेम nēma m From नियम which see throughout. Ex. नेमाचा जाला कळस ॥ कासया व्यर्थ उफणूं भूस ॥ लेखणी न धरी ॥. 2 Aim. v बांध, धर, लाव. 3 Measure. v घे दे. नेम लावणें To lay down or establish a law or rule (or laws and rules); to appoint an order or a course of procedure. Ex. ह्यास्तव अवतरला तुका- राम ॥ साधकास नेम लावावया ॥.

मोल्सवर्थ शब्दकोश

नेम nēma m n A hole dug in order to plant (a post, tree &c.) Pr. वांकडे मेढीस वांकडेंच नेम.

मोल्सवर्थ शब्दकोश

पुन. जमीनींत खणलेला खड्डा (खांब, झाड इ॰ पुर- ण्याकरितां). म्ह॰ वांकडे मेढीस वांकडेंच नेम. नेमणें, नेम- विणें-उक्रि. जमीनींत गाडणें (खांब; झाड इ॰). 'सकाळपासून शंभर केळी नेमिल्या.' [सं. नि + यम्]

दाते शब्दकोश

नेम m n A hole dug in order to plant (a post, tree &c.) Pr. वांकडे मेढीस वांकडेंच नेम.

वझे शब्दकोश

नेम m See नियम.

वझे शब्दकोश

(सं) पु० नियम. २ खूण, शिस्त. ३ व्रत.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

नेम      

पु.       पहा : नियम २ - ४. २. उद्दिष्ट; हेतू; लक्ष्य; साधन. (क्रि. बांधणे, धरणे, लावणे). ३. माप. (क्रि. घेणे, देणे.). [सं.नियम] (वा.) नेम लावणे - नियम करणे; मार्ग, रीत लावणे. नेम सारणे - नेमधर्म, नित्याचार उरकणे : ‘पार्थें स्नान करून सकळ । नेम आपुला सारिला.।’ - ह ३२·१७४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु.न.       जमिनीत खणलेला खड्डा (खांब, झाड इ. पुरण्यासाठी).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नित्य नियम, नेम      

१. नियमाने नित्य करण्याचा परिपाठ. २. शास्त्रात अमुक कर्म नित्य करावे असे सांगितले नाही परंतु नित्य केले तर विशेष पुण्यकारक म्हणून सांगितले आहे अशी कर्मे. नित्य नैमित्तिक      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पी पाण्याचा नेम

पु. कोणीं सांगितल्याशिवाय पाणी प्याव्याचें नाहीं असें व्रत. -खेस्व ६४.

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

व्रत

न. १ स्वतःला लावून घेतलेला एखादा धार्मिक नियम, मेम; देहदंडाचा एक मार्ग. -ह ८.१०. (क्रि॰ घेणें.) २ असा नेम पाळण्याची केलेली प्रतिज्ञा, पण. ३ ब्रीद; प्रतिज्ञा; बाणा. 'नतावनधृतव्रत ज्वलन तूंचि बा धावनीं ।' -केका ६. [सं.] (वाप्र.) तीळ खाऊन व्रत मोडणें-अगदीं क्षुल्लक कारणासाठीं, फायद्यासाठीं बाणा, नेम सोडणें. सामाशब्द- ॰बंध-पु. मुंज; यज्ञोपवीत धारण करणें हें एक प्रकारचें व्रतच आहे. [सं.] ॰भिक्षा- स्त्री. व्रतबंधाच्या आनुषंगिक कर्मांपैकीं एक; भिक्षा मागणें. [सं.] ॰वैकल्य-न. १ व्रताची अपूर्णता; त्यांतील न्यूनता, कमीपणा. २ लहानसहान व्रतें, नेम इ॰ व्रत अर्थ १ पहा. ॰संग्रह-पु. व्रत घेणें; व्रतस्थ असणें. व्रतस्थ, व्रती-वि. १ व्रत पाळीत असलेला; व्रताप्रमाणें कांहीं नेम करणारा. २ स्त्रीसंग न करणारा; ब्रह्मचर्य पाळणारा. 'अमृतराव सात वर्षांचा असतांना त्याची आई स्वर्ग- वासी झाली; तेव्हांपासून बापूसाहेब व्रतस्थ होतें.' -मौनयौवना.

दाते शब्दकोश

र्रोख

पु. १ झोंक; वळण; नेम; दिशा; कल; भार; ध्येय; बांक. 'निघाला मोंगल भागानगरचा घरला रोंख ।' -ऐपो २६०. २ कटाक्ष; रागावून लावलेली टक. ३ (ल.) धोरण; उद्देश; हेतु; बेत; मन. 'वरील पक्षाचा एकंदर रोंख जुन्या मतांविरुद्ब आहे.' -नि ५६१. ४ (कुस्ती) डाव करणाण्याचा डाव चालू न देणें ही क्रिया. [फा.] रोखण, रोंखणी-स्त्री. १ रंधा; लांकूड तासून सपाट करण्याचें हत्यार. २ रंध्यानें लाकूड तासणें; रंधणें; रोंखणें. [हिं.] रोखणें-सक्रि १ दाखविणें; नेम धरणें; बंदूक, तोफ इ॰ चा विवक्षित लक्षाकडे रोंख करणें. २ सपाट करणें; समपातळींत आणणें;रोंखणीनें साफ करणें. [रोंख] रोंखणें- सक्रि. सारख्या नजरेनें लक्ष लावून पाहाणें; न्याहाळणें; निरीक्षण करणें; हेतु धरून टक लावून पहाणें. 'दृष्टीं कार्मुक रोंखिलें मग मदें तेणें हळु लेखिलें ।' -आसी ४०. रोखून पाहाणें-१ टक लावून पहाणें; एखाद्या वस्तूकडे एकसारखें पहात राहाणें; एखाद्या वस्तूवर सारखी नजर ठेवणें. २ नेम धरणें; निशाण धरणें; नेम लावणें.

दाते शब्दकोश

निशाण

न. १ ध्वज; पताका; झेंडा. २ बंदूक, बाण इ॰नीं नेम धरावयाचें लक्ष्य; चांद. ३ नेम; चिन्ह; खूण; निशाणी. 'आमचे व आपले इत्तिफाकानें इंग्रजांचें नांव व निशाण नाहीं सारखे नेस्त नाबूत होतील.' -रा १०.१८२. ४ नाण्यांवरील पोतदाराची तपासल्याची खूण. [फा. निशान्] ॰उतरणें-गोळी बरोबर लागणें; लक्ष्य भेदणें. ॰दार-बरदार-पु. निशाण धरणारा. 'हत्तीवरल्या निशाणदारास पायास गोळी लागली.' -रा ६. १२५. ॰बाजी-स्त्री. नेम मारणें; वेध. निशाणचा हत्ती- पु. १ ज्याच्यावर निशाण असतें तो हत्ती. २ पुढारी; नेता.

दाते शब्दकोश

हिंदण-न. हिंदाण-हिंद्यान

न. १ नेम मारण्यासाठीं केलेलें चिन्ह; लक्ष्य. २ आणीबाणीची वेळ. ३ नेम. (क्रि॰ धरणें; बांधणें). विंधणें पहा. [सं. विंधन]

दाते शब्दकोश

हुकणें

अक्रि. १ दगड, गोटी इ॰ बरोबर नेमानें न लागणें; नेम, मार चुकणें. २ असा नेम मारतां न येणें, मार- ण्यास. चुकणें. ३ चुकणें; भुलणें; न साधणें (वेळ, गाडी). [हिं. हुकना] हुकचूक-स्त्री. १ चूकभूल; फसगत; विसर. २ (सामान्य- पणें) चुकणें; कार्यसिद्धि न होणें. 'हुकचूक आहे, एखाद वेळ गोळी लागत नाहीं.' [हुकणें + चुकणें]

दाते शब्दकोश

किरण

न. उडी; नेम; किराण पहा. ॰साधणें-क्रि. (कों.) बरोबर, नेमकी उडी मारणें; बरोबर नेम मारणें.

दाते शब्दकोश

किरण      

न.        उडी; नेम. पहा : किराण. (वा.) किरण साधणे – बरोबर, नेमकी उडी मारणे; बरोबर नेम मारणे; हल्ला : ‘कुत्र्याने भुरींच्या (ससुरीच्या) किरणातून निसटावे ही गोष्ट’ – डोह १४४. (को.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

लक्ष्य

न. १ लक्ष ठेवण्याची किंवा नेम धरण्याची वस्तु; वेध्य; निशाण. २ अवधान; सादर चित्त. ३ ज्याच्या योगानें पदार्थ पहावयाचे असतात आणि दिशा निश्चित करावयाची असते असें लहानसें भोंक (तुरीययंत्राचें इ॰). ४ सावज. ५ (तत्त्व.) ब्रह्मात्मस्वरूप. -वि. १ अवलोकण्यास, अवधान देण्यास, निरखण्यास, जाणण्यास शक्य, उद्दिष्ट, जरूर, योग्य. २ समज लेला; सूचित किंवा उद्दिष्ट म्हणून ग्रहण केलेला; लक्षणेनें ज्ञेय. [सं.] सामाशब्द- ॰दर्शी-वि १ खोल दृष्टीचा; अचुक, योग्य दृष्टीचा. २ चांगला नेम मारणारा; निशाणबाज. ३ आसक्तचित्त [सं.] ॰भेद-पु. लक्ष्याचा भेद; वेध. ॰भेदी-वेधी-वि. लक्ष्याचा भेद, वेध करण्यांत कुशल. [सं.] लक्ष्यार्थ-पु. लक्षणेनें प्राप्त झालेला अर्थ; गर्भितार्थ; वाच्यार्थाहून भिन्न अर्थ. 'तत्पदार्थ त्वंपदार्थ दोहीचा जो लक्ष्यार्थ । त्यासि ऐक्य हा फलितार्थ महावाक्याचा ।' [सं. लक्ष्य + अर्थ] लक्ष्यांश-पु. १ लक्षावयाची, ध्यानांत घ्यावयाची, विचार करावयाची, जाणा- वयाची इ॰ गोष्ट. २ लक्षिलेली, मनांत आणलेली, ग्रहण केलेली, समजलेली गोष्ट, 'शबल जो वाच्यांश बोलिजे । शुद्ध तो लक्ष्यांश म्हणिजे ।' ३ (तत्त्व.) वाच्यांशाचा त्याग झाल्यावर शेष राहिलेला अधिष्ठान ब्रह्मात्मा. -हंको. [सं. लक्ष्य + अंश]

दाते शब्दकोश

न. उद्दिष्ट; नेम मारण्याचें ठिकाण; हल्ला करा- वयाचें स्थान; शत्रूचें मर्मस्थान. 'आस्ट्रेलियाच्या सरकारनें जपानी लक्ष्यावर चढाई करण्याच्या आज्ञा सोडल्या आहेत.' -के १३.३.१९४२. [सं.]

दाते शब्दकोश

मुजरा, मुज्रा

पु. १ वंदन; नमस्कार; रामराम; सलाम. २ धन्याची भेट झाल्याबरोर किंवा त्याजी रजा घेतांना नोकरांनीं म्हणावयाचें गीत. ३ तमाशांतील समाप्तीचें गाणें, लावणी. ४ (राजा.) नेम; नेम धरणें. (क्रि॰ धरणें). ५ मोबदला; भत्ता. ६ वजा, कमी केलेली, काढून टाकलेली रक्कम. 'कोणी वसूल वगैरे दिल्यास तो मुजरा धरला जाणार नाहीं.' [अर. मुज्रा = रूढ] म्ह॰ (गो.) मुजऱ्याक कोण ना हुलप्याक पंचवीस = हुलपा (बिदागी) घेण्याला पुष्कळ परंतु मुजरा करावयाला कोणी नाहीं.

दाते शब्दकोश

नेमोडा

पु. (कों.) नेम (खड्डा) खणण्याचें एक हत्यार. [नेम]

दाते शब्दकोश

निशाण      

न.       १. ध्वज; पताका; झेंडा. २. बंदूक, बाण इ.नी नेम धरण्याचे लक्ष्य; चांद. ३. नेम; चिन्ह; खूण; निशाणी. ४. नाण्यावरील पोतदाराची तपासल्याची खूण. [फा. निशान] (वा.) निशाण उतरणे - गोळी बरोबर लागणे; लक्ष्य भेदणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

फुसकणें

अक्रि १ (दोरी, दोरा, काठी इ॰) फसदिशीं मोडणें, तुटणें. २ बिनसणें; अपुरी राहणें; मोडणें (योजना, व्यवहार). ३ (बंदुक इ॰) न उडणें; नेम चुकणें. ४ (सामा.) हुकणें; चुकणें (नेम, वार, यत्न इ॰) [ध्व. फुसक]

दाते शब्दकोश

टिचणें

उ० वि० नेमणें, नेम धरणें, नेम साध्य होणें, नेमानें मारणें.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

शर

पु. १ बाण; तीर. २ मृग नक्षत्रांतील शिवाच्या तीन ताऱ्यांचा आकाशांतील बाण. लुब्धक पहा. -वि. (ज्यो.) पांच संख्या (मदनाचे पंच शर यावरून). [सं.] ॰कांड- स्वामी. [सं.] ॰जाल-न. (काव्य) बाणाची झोड, वर्षाव. सरबत्ती; बाणांचे जाळें. [सं.] ॰धार-पु. बाणांचा पाऊस; वर्षाव. 'मेघ वर्षतां जळ शरधारीं ।' -एभा २१.८२. ॰धि-पु. भाता; बाणांची पिशवी. [सं.] ॰पंजर-पु. १ (काव्यांत अतिशयो- क्तीनें वर्णन करतांना) एखाद्याच्या अंगांत पुष्कळ बाण शिरले म्हणजे हा शब्द योजतात; देहाला शरांचें पिंजऱ्याप्रमाणें आवरण. २ बाणांचा पिंजरा, पलंग. [सं.] ॰पंजरीं पडणें-१ (ल.) (भीष्माच्या कथेवरीन) मृत्यूच्या द्वारीं खितपत पडणें; आजा- रानें, दुखण्यानें झिजत पडणें. २ ज्यांतून बाहेर पडण्यास कोण- ताच उपाय नाशीं अशा संकटांत पडणें. ॰पात-पु. १ बाण सोडणें, फेकणें. २ बाणाचें पतन; बाण येऊन पडणें, आदळणें. ३ बाणांचा वर्षाव. [सं.] ॰पुंखा-स्त्री. बाणाची पिसें; बाणाचा पिसें लावलेला मागील भाग. [सं.] ॰फल-न. बाणाचें टोंक, अग्र; बाणाचें धातूचें पातें [सं.] ॰वर्ष-वर्षाव-वृष्टि-पुस्त्री. बाणांचा वर्षाव, भडिमार. [सं.] ॰शय्या-स्त्री. बाणांचा बिछाना. [सं.] ॰संधान-न. बाणाचा नेम; बाणानें नेम धरणें, साधणें, मारणें. [सं.]

दाते शब्दकोश

अचूक

वि. नेमकें; बिनचूक; दोषरहित; निर्दोष. 'अचुक येत्न करवेना । म्हणून केलें तें सजेना ।' -दा १२.२.६. [सं. अच्युत; प्रा. अचुक्क]. ॰संधान-न. १ न चुकणारा नेम, क्रिया, गोष्ट. 'अचुक मारुतीचें संधान । सोडिता झाला असंख्य बाण ।।' २ बरोबर घडणारा बेत; न चुकणारी सल्ला, मसलत. अचुकसंधानी.-वि. बिन- चूक कार्य करणारा.

दाते शब्दकोश

अचूकसंधान      

न.       १. न चुकणारा नेम, क्रिया, गोष्ट. २. बरोबर घडणारा बेत; न चुकणारी सल्ला मसलत.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अडील      

वि.       अडेल; हट्टी; हेकेखोर; स्वेच्छाचारी : ‘पावसाचा काय नेम सांगावा, महाअडील जात’ – पेरणी ११५.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आडखिळा      

पु.       लगोरीची रचना; ज्यावर नेम धरायचा असे स्थळ; निशाण; लक्ष्य.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आडखिळा

पु. लगोरीची रचना; ज्यावर नेम धरावयाचा असें स्थळ; निशाण; लक्ष्य. 'आपणचि आडखिळा कीजे । तो कौतुकें जैसा विंधोनि पाडिजे ।' -ज्ञा ११.४७८. [आड + सं. कीलक; प्रा. खिल्ल = खिळविणें?]

दाते शब्दकोश

अडनांव

न. १ उपनांव; घराण्याचें-वंशाचे नांव; कुलनाम; आडनांव पहा. २ अयथार्थ नांव. 'जीभ जै आरोगूं जाये । मग रसना हें होये । आडनांव कीं ।।' -अमृत ६.६२; 'तैसें स्त्रीसंगें जें सुख । तें अडनांवामात्र देख ।।' -मुरंशु ३६५; [सं अर्धनाम? का. अड्ड + नाव; तु॰ का. अड्डहेसरु. अट्ट = मोठें, (श्रेष्ठ) + नाम. इं. सर (श्रेष्ठ) + नेम (नांव). हिं. अडक]

दाते शब्दकोश

अडत करणे      

व्रत किंवा नेम करणे. अडतट्टू      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आडवार

पु. १ कोणत्याहि विशिष्ट दिवसाशिवाय किंवा नेम- लेल्या दिवसाशिवाय इतर दिवस; अधलामधल दिवस. २ भलता, अयोग्य दिवस. [आड + वार]

दाते शब्दकोश

आधरणे      

क्रि.       आदरणे; स्वाकारणे : ‘तो होवावोया भ्रतारू । अधारीला नेम आचरू ।’ − श्रीकृच ११·८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अज्जुत      

वि.       बिनचूक; अचूक : ‘अज्जूत नेम मारिन’ – मसाप ४·४·२७९. (कु.) [सं. ऋजु]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अज्जुत

वि. (कु.) बिनचूक; अचूक. –मसाप ४.४. २७९. ‘अज्जूत नेम मारिन.’[सं. ॠजु; म. उजू;अ + च्युत = न चुकलेला; न ढळलेला]

दाते शब्दकोश

अकरे      

न. अव.       १. (देवापुढे लावण्याच्या) अकरा वातींचा समूह. २. आज एक, उद्या दोन, परवा तीन अशी चढत्या क्रमाने अकरा दिवस देवापुढे पिठाचे दिवे ठेवणे व परत एकपर्यंत उतरत्या क्रमाने कमी करणे. ३. चातुर्मास्यात चार चार बोटे लांबीच्या अकरा वाती निरांजनात पेटवून ओवाळण्याचा मुलींचा एक नेम किंवा व्रत.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आंकण, आंकणा, आंकणे      

पु. न.       १. पायात घालायचा तोडा; (पूर्वी शत्रूला जिंकल्यानंतर त्याचे नाव एका तोड्यावर खोदून तो पायात घालायची चाल होती त्यावरून) पराक्रमसूचक पादभूषण : ‘तो रणीं जितिला करूनिं नेम । तेणें संतोषोनि परम । आपलें नाम आंकणा घालीं ।’ एभा १९·१४३. २. (सामा.) ब्रीद; बिरुद; ब्रीदावळी; अलंकार; भूषणें : ‘हें आंकणें अनंता तुजचि साजे ।’ − भाए ६५०; ‘आंगाचेनि गोरेपणें हे पण्हरेयांवरी पढवी आंकणें’− शिव ८०७. भा.ए. [सं. अंकन]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आंकण-णा-णें

पुन. १ पायांत घालावयाचा तोडा(पूर्वी शत्रूला जिंकल्यानंतर त्याचें नाव एका तोड्यावर खोदून तो पायांत घालण्याची चाल होती त्यावरून); पराक्रमसूचक पादभूषण. 'तो रणीं जिंतिला करूनि नेम । तेणें संतोषोनी परम । आपलें नाम आंकणा घाली । ' -एभा १९.१४३. [सं. अंकन] २ (सामा.) ब्रीद; बिरुद; ब्रीदावळी; अलंकार; भूषण. 'आंगाचेनि गोरेपणें । हे पण्हरेयांवरी पढवी आंकणें ।' -शिशु ८०७. 'हें आंकणें अनंता तुजचि साजे ।'-भाए ६५०.

दाते शब्दकोश

आस      

पु. स्त्री.       १. (भोवऱ्याचा खेळ) रंगणात नेमका भोवरा टाकणे; रंगणातील भोवऱ्यास दुसरा भोवरा मारणे; रंगणटोला. २. एक बैदूल दुसऱ्या बैदूलास नेम धरून मारणे. [सं. अस् = फेकण.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आस

पु. स्त्री. १ (भोंवर्‍याचा खेळ) रंगणांत नेमका भोंवरा टाकणें; रंगणांतील भोवर्‍यास दुसरा भोंवरा मारणें; रंगणटोला. २ (बैदुलाचा खेळ) एक बैदूल दुसर्‍या बैदुलास नेम धरून मारणें. [सं. अस् = फेंकणें]

दाते शब्दकोश

असामी

पु. स्त्री. १ इसम; व्यक्ति; माणूस, ' तुकोजी शिंदे यांनीं मौजे मुल्खेडें येथें बटकी देखील पोरें असामी तीन येकूण रुपये दीडशांस विकत घेतली. ' -वाड बाबा २.१९१. २ देणेंकरी; कर्जदार; ऋणको; प्रतिवादी. 'ती असामी भारी आहे.' ३ धारे- करी; भाडेकरी; कूळ-खंडकरी. ४ हजीरीपटावर असलेलें नांव; नोंद 'मातबर लोकांत असामी घातली.' सभासद. -पु. १ सरकारी नोकरी; चाकरी; नेमणूक; उपजीविकेंचें साधन. 'राबर्ट आर्म हा इस्ट इंडिया कंपनीच्या पदरी कारकुनाची एक लहान असामी पतकरून ...हिंदुस्थानांत आला.' -नि. ६१२. २ मोठा, मातबर माणूस; स्वारी. 'दक्षिणेंत केवळ असामी नाहीं दुसरा ।' -ऐपो २३६. [अर. इस्म = नांव अव] ॰दार- असामदार पहा. ॰वार- क्रिवि. १ नेम- णुकीप्रमाणें; हुद्याप्रमाणें. 'वरकड पांच इसम यांस असामीवार शिर- पेंच, पानदान देऊन वाटेस लाविलें.' -रा ५.१४१. २ प्रत्येकी; वेगवेगळें; मनुष्यागणीक; नांवनिशीवर. ३ कुळाप्रमाणें; रयतवार. [फा.]

दाते शब्दकोश

असि

स्त्री. तरवार; खड्ग. 'जेथ असिपत्र तरुवर ।' -ज्ञा १६.३७३. [सं.] ॰धारा- स्त्री. तरवारीची धार. ॰धारा व्रत- न. १ स्त्रीपुरुषांनीं संगमनिवारणार्थ उभयतांच्यामध्यें नागवी तरवार ठेवून एका शय्येवर निजणें. २ (ल.) मनोविकारांचें संयमन करणें; यावरून अत्यंत कठिण, दुर्घट व्रत-नियम. [सं.] ॰पत्त्र- न. तरवारीचें पान, धार. ॰पत्त्रतरु- पु. ज्याला तरवारीसारखीं पानें आहेत असें झाड. 'जेथ असिपत्रतरुवर । खदिरांगाराचे डोंगर ।' -ज्ञा १६.३७३. ॰पत्त्रमत्स्य- पु. एक जातीचा मासा.) (इं.) सॉफिश. -प्राणिमो ९०. ॰पत्त्रवन- न. तरवारीसारखीं पानें आहेत अशा झाडांचें वन. पापी लोकांना तीक्ष्ण तरवारीसारख्या पानांनीं या (नरके लोकांतील) अरण्यांत मोठे क्लेश देण्यांत येतात. ॰पत्त्रव्रत- ब्रह्मचर्य; असिधाराव्रत पहा. 'चैत्री पौर्णिमेसीं सोडावा । वर्ष- पर्यंत तो रक्षावा । स्वयें असिपत्रव्रत नेम धरावा । आणि वर्जावे भोगमात्र ।।' -जै. १.९३. [सं.]

दाते शब्दकोश

असिपत्रव्रत      

न.       ब्रह्मचर्य. पहा : असिधाराव्रत : ‘चैत्री पौर्णिमेसीं सोडावा । वर्षपर्यंत तो रक्षावा । स्वयें असिपत्रव्रत नेम धरावा । आणि वर्जावे भोगमात्र ॥’ – जै १·९३. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आव

पु. १ डौल; थाट; मोठा आविर्भाव; प्रतिष्ठा; महत्त्व. 'येथूनि रसां झाला आवो । रसाळपणाचा ।' -ज्ञा १.३३. (क्रि॰ घालणें; आणणें). 'अंगांत कर्तृत्व नसून आव घालण्याचा आमच्या लोकांना मोठा अहंपणा.' -नि ६४. २ नीटनेटकेपणा; सुंदरता; बाह्यसौंदर्य; आकारमनोरमता; सुंदर घाट; (सामा.) आकार; घाट; घडण. 'सप्तावरणेंसि प्रचंड । आवो साधूनि उदंड । निर्माण केलें ब्रह्मांड । मयूरांड आकारें ।' -एभा २४.१४२. ३ धैर्य; हिंमत; हिय्या; धमक; अवसान. (क्रि॰ धरणें; आणणें) 'त्या धर्मसैनि- कांचे झाले होतेचि सर्व आव रिते ।' -मोकर्ण १२.५. ४ दाब; आटोप; आब; दबदबा; शक्तिक्षेत्र; बल; सामर्थ्य. 'तुझिया लाठे- पणाचा आवो । तिहीं लोकीं ।' -ज्ञा २.९. 'फोडून चित्ताची धांव बसविसील आव न कळे कैसा ।' -होला १०१. ५ नेम; पवित्रा. 'दृढ साधोनियां आवो । निजबळें घालिता घावो ।' -एभा १२. ५८८. ६ घाट; घडण (भांडें वगैरेंची). ७ उद्भव; उद्गम. -शर. [सं. आ + इ = जाणें]

दाते शब्दकोश

आव      

पु.       १. डौल; थाट; मोठा आविर्भाव; प्रतिष्ठा; महत्त्व : ‘एथूनि रसां झाला आवो । रसाळपणाचा ।’ − ज्ञा १·३३ (क्रि. घालणे, आणणे). २. नीटनेटकेपणा; सुंदरता; बाह्य सौंदर्य; आकार मनोरमता; सुंदर घाट; (सामान्यतः) आकार; घाट; घडण : ‘सप्तावरणेंसि प्रचंड । आवो साधूनि उदंड । निर्माण केलें ब्रह्मांड । मयूरांड आकारें ।’ − एभा २४·१४२. ३. धैर्य; हिंमत; हिय्या; धमक; अवसान (क्रि धरणे, आणणे) : ‘त्या धर्मसैनिकांचे झाले होतेचि सर्व आव रिते ।’ − मोकर्ण १२·५. ४. दाब; आटोप; आब; दबदबा; शक्तिक्षेम; बल; सामर्थ्य : ‘तुझिया लाठेपणाचा आवो । तिहीं लोकीं ।’ − ज्ञा २·९. ५. नेम; पवित्रा : ‘दृढ साधोनियां आवो । निजबळें घालिता घावो ।’ − एभा १२·५८८. ६. घाट; घडण (भांडे वगैरेंची). ७. उद्भव; उद्गम. ८. ऐट; धीर. ९. अवडंबर. १०. उद्‌भवणे; पिकणे : ‘पेरिजे नुसदी हिंसा । तेथ आवैल काय अहिंसा ।’ − राज्ञा १३·२२३.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

बेत

पु. १ योजना; रचना; नमुना; युक्ति. २ कारण; उद्देश; हेतु मसलत. ३ पध्दत; रीति व्यवस्था; मांडणी; टापटीप. ४ रूप; आकार; रुपरेषा; वळण; आराखडा (पुढील कामाचा काढ- लेला. योजलेला). [सं. हेतु; हिं.] बेताचा, बेताबेताचा-वि. १ रीतीचा; पद्धतशीर; योग्य व ठराविक नमुन्याप्रमाणें असलेला. २ मध्यम साधारण; प्रमाणशीर; योग्य प्रमाणाचा; योग्य किंमतीचा. ३ जुळता; जुळणारा; जमणारा; माप, चालीरीती, स्वभाव इ॰शीं जुळता. ४ अल्पस्वल्प; अगदीं थोडा; ताप्तुरता; क्षणिक; अर्धवट. 'त्यांचा ईश्वरावर बेताबेताचाच विश्वास आहे.' -टि. ४.३१४. बेतावर असणें-निश्चय, ठराव, व्यवस्था, बेत, योजना, नियम यांना धरून असणें; नियमाप्रमाणें असणें. बेत- बात-पु. व्यवस्था; टापटीप. बेतवार-क्रिवि. पद्धतशीरपणें; नेम- स्तपणानें. बेताबेत-क्रिवि. माप, आकार, तर्‍हा इ॰ बाबतींत तंतोतंत जुळणारा. २ (क्व.) तंतोतंत जुळणें. बेत्या-वि. नेहमीं भल- तेच बेत, योजना करणारा, युक्त्या लढविणारा. बेतणें-सक्रि. १ माप घेणें व कापणें (अंगांस घालावयाचे कपडे). २ मुस्कटांत मारणें थोबाडीत मारणें. बेतणी-स्त्री. १ माप, आकार, रूपरेषा इ॰ ची आंखणी, मोजणी (अंगात घालावयाच्या कपड्यांची). २ कपडा मापाप्रमाणें फाडणें, कापणें. बेतनीचा-वि. जमणारा; जुळता (मापानें, बनावटीनें इ॰) (बेताचा ह्या अर्थी उपयोग). बेतीव- वि. १ बेताप्रमाणें केलेलें; योजनेनुसार असलेलें. २ मापाप्रमाणें बेतलेले, कापलेले (कपडे). बेताविणें-सक्रि. १ माप घ्यावयास लावणें. २ तोंडांत थप्पड, चपराक लगाविणें. 'तोंडावर जेव्हां दोन बेतविल्या तेव्हां कबूल झाला.'

दाते शब्दकोश

बरकंदाज, बर्कंदाज

पु. बंदूकवाला शिपाई; बंदुकीनें नेम मारणारा, गोळीबार करणारा इसम. 'चौकशीनें एक हजार पावेतों बरकंदाज निवडणूक. -समारो २.४. [फा. बर्कअंदाज] बरकं- (क)दाजी-स्त्री. तोड्याची बंदूक सोडणें; निशान मारणें; गोळ्यांचा भडिमार. [फा.]

दाते शब्दकोश

चांदमारी

स्त्री. नेम मारण्याचा अभ्यास; लक्ष्यवेध; (लक्ष्य चंद्राकृति असतें यावरून). [हिं. म. चंद्र + मारणें]

दाते शब्दकोश

चांदमारी स्त्री.      

नेम मारण्याचा अभ्यास; लक्ष्यवेध; शिकार. (लक्ष्य चंद्राकृती असते यावरून) : ‘वर्षातून ५१० गोळ्या पाच पंचवीस यार्डावरून उडवून चांदमारी केली.’ - युजि २३.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चंदन

न. एक झाड. हें २० ते ४० फूट उंच वाढतें. याचें पान कडुनिंबा सारखें असून लांकूड फार सुवासिक असतें. याच्या पेट्या, पंखे, चित्रें, अत्तरें, तेलें इ॰ बनवितात. चंदन औषधी आहे. 'मंदारामाल बकुल बिल्व कुट अशोक चंदन जाती ।' -नरहरि, गंगारत्नमाला (नवनीत पृ. ४३२.) -न. १ या झाडाचें लांकूड, गाभ्याचा तुकडा, खोड. २ (चंदनाचें) गंध; लांकूड उगाळून देवास लावण्यासाठीं करतात तें. ३ (ल.) नाश; धूळधाण; उच्छेद; निर्दाळण, सत्यनाश; नुकसान. (क्रि॰ करणें). 'पेंढा- र्‍यांनीं गांव लुटून चंदन केलें.' 'पोरानें पोळ्यांचें चंदन करून टाकलें.' [सं.] (वाप्र.) ॰उडविणें-१ नाश करणें; उध्वस्त करणें; चक्काचूर करणें. २ (व.) बरोबर नेम मारणें. ॰काढणें- सडकून ठोकणें; यथास्थित बडविणें; चोपणें. सामाशब्द- ॰काचोळी-स्त्री. काचोळीच्या आकाराचा अंगास लावलेला चंदनाचा लेप. 'चंदन काचोळ्या रेखिल्या । पाटावांच्या चोळिया ।' -कालिका पुराण १६.४७. ॰चारोळी-स्त्री. चंदन वृक्षाचें बीं-बीज. ॰बटवा-पु. एक पालेभाजी. ही औषधी असून संग्रहणी, कोड, मुळव्याध इ॰ वर गुणकारी आहे. -योर १.४१. ॰हौशी-वि. गुलजार; गुलहौशी; चैनी; ऐषआरामी; विषयी; खुशालचंद. चंदनी-वि. चंदन काष्ठाचा, काष्ठसंबंधीचा (तेल, चौरंग, देव्हारा इ॰). 'चंदनि वृक्ष तोडावया । तोडावया ।' -मसाप (कोंकणीं गाणीं) २८. ॰अत्तर-तेल-न. चंदनाचें जें अत्तर किंवा तेल काढतात तें. यास चंदनेल असेंहि म्हणतात. ॰पोपट, चंदन्या पोपट-पु. एका जातीचा पोपट; याच्या गळ्यावर व पंखांवर तांबड्या रेघा व पट्टे असतात.

दाते शब्दकोश

चंदन      

न.       १. एक झाड. हे २० ते ४० फूट उंच वाढते. याचे पान कडुनिंबासारखे असून लाकूड फार सुवासिक असते. २. या झाडाचे लाकूड, गाभ्याचा तुकडा, खोड. ३. (चंदनाचे) लाकूड उगाळून देवास लावण्यासाठी करतात ते गंध. ४. (ल.) नाश; धूळधाण; उच्छेद; निर्दाळण; सत्यानाश; नुकसान. (क्रि. करणे होणे.) [अर. सन्दल; त. चांदम्] [सं.] (वा.) चंदन उडवणे – बरोबर नेम मारणे. (व.) चंदन काढणे – सडकून ठोकणे; यथास्थित बडविणे; चोपणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चुकणे      

अक्रि.       १. चूक, प्रमाद करणे; नको ते करणे; अपराध करणे. २. मार्गापासून चळणे; बहकणे; भकणे; भलत्या रस्त्याला जाणे : ‘उंडळ उंडळ चुकों नये । हेकाडपणें ।’ − दास १४·४·१३. ३. कामात कसूर, कुचराई, कामचुकारपणा करणे. ४. (नेम, लक्ष्य इ.) न साधणे; न लागणे; अंतरणे : हुकणे : ‘वाटा लागे तरी गगना भेटे । एऱ्हवीं चुकें ।’ − ज्ञा ८·२५३. ५. व्हावयाचे टळणे; न घडणे. ६. (इष्ट, योग्य वेळात, पद्धतीत) कमी किंवा जास्त होणे. ७. संख्येमध्ये आकड्याचा फरक पडणे, लागणे; आकडा कमी येणे. ८. गफलतीने, नजरचुकीने वगळला, टाकला जाणे; गळणे. [सं. च्यव्] (वा.) चुकल्या चुकल्यासारखे होणे – आपल्या सवयीचे माणूस किंवा वस्तू जवळ नसल्यामुळे, परक्या ठिकाणी गेल्यामुळे मनास अस्वस्थ वाटणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चुकणें

अक्रि. १ चुक, प्रमाद करणें; नको तें करणें; अप- राध करणें. 'लिहिणार चुकतो पोहणार बुडतो.' २ मार्गापासून चळणें; बहकणें; भकणें; भलत्या रस्त्याला जाणें. 'उंडळ उंडळ चुकों नये । हेकाडपणें ।' -दा १४.४.१३. 'चुकला फकीर मशिदींत शोधावा' ३ कामांत कसूर, कुचराई करणें; कामचुकार- पणा करणें. 'मी चाकरीमध्यें कधीं चुकलों नाहीं. ४ (नेम, लक्ष्य इ॰) न साधणें; न लागणें; अंतरणें; हुकणें. 'वाटा लागे तरि गगना भेटे । एर्‍हवीं चुकें ।' -ज्ञा ८.२५३.५ व्हाव- याचें टाळणें; न घडणें. 'गेलें तें येत नाहीं, होणार तें चुकत नाहीं.' 'सरकारचें देणें चुकावयाचें नाहीं.' 'अपमृत्यु चुकला.' ६ (इष्ट, योग्य वेळांत, पद्धतींत) कमी किंवा जास्त होणें. 'तुम्ही वेळ चुकलांत.' 'चुकला तो मुकला.' ७ संख्येमध्यें आंकड्याचा फरक पडणें, लागणें; आंकडा कमी येणें. ८ गफल. तीनें, नजरचुकीनें वगळला, टाकला जाणें; गळणें, ९ (हिशेब) चुकता करणें; फेड करणें; (कज्जा) तुटणें; तोडणें, (खटल्याचा) निवाडा होणें, करणें. 'हिशेब, खटला, कज्जा चुकला.' १० (कांहीं एक काम, गोष्ट) केली जाणें; समाप्त होणें. 'मी तर त्यास वचन देऊन चुकलों.' [सं. स्कु = चुक + णें = चुकणें. स्कु म्हणजे उडी मारणें, गति करणें. करून चुकणें म्हणजे करून पुढें जाणें; -भाअ १८३५; सं. च्यु = मार्गभ्रष्ट होणें; च्युत; सं. चुक्क = दुःख देणें अथवा भोगणें; प्रा. चुक्कइ; का. चुक्की = डाग] (वाप्र.) चुकल्या चुकल्या सारखें होणें-आपल्या संवयीचें माणूस किंवा वस्तु जवळ नसल्यामुळें, परक्या ठिकाणीं गेल्यामुळें चित्तास अस्वस्थ वाटणें. 'घरची सर्व मंडळी परगावीं गेल्यानें मला आज चुकल्या चुकल्यासारखें झालें आहे.' सामाशब्द--चुकतचुकत- माकत-वांकत-क्रिवि. चुका करीत; घसरत; चुकतां चुकतां; वेड्यावांकड्या पद्धतीनें; अडखळत. 'चुकत वांकत आठवलें । इतुकें संकळित बोलीलें । न्यूनपूर्ण क्षमा केलें । पाहिजे श्रोतीं ।' -दा १३.५.१९. 'त्याला श्लोक पाठ येत नाहीं, चुकतमाकत म्हणेल.' [चुकणें द्वि.] चुकलामाकला-वाकला-वि. नजर- चुकीनें राहून गेलेला; योग्य वेळीं हजर न राहिलेला; वाट चुकून भलतीकडे गेलेला. [चुकला द्वि.] चुकून माकून-वाकून- क्रिवि. चुकीमुळें; नजरचुकीनें; दुर्लक्ष होऊन. [चुकून द्वि.] चुकूनसुद्धा-क्रिवि. चुकीनें देखील (नेहमी अकरणरूपी प्रयोग.) 'मी चुकूनसुद्धा त्याच्या वाटेस जात नाहीं.'

दाते शब्दकोश

दबा      

पु.       हल्ला करण्याच्या किंवा उडी टाकण्याच्या तयारीने नेम धरून बसण्याची क्रिया; दडणे; आड लपून बसणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दबा

पु. हल्ला करण्याच्या किंवा उडी टाकण्याच्या तयारीनें नेम धरून बसण्याची क्रिया. दडणें; आड लपून बसणें. [दबणें]

दाते शब्दकोश

दीक्षा      

स्त्री.       १. व्रताच्या कालावधीतील नियमाचरण. (क्रि. घेणे, देणे.) २. आचरणाची रीत; नेम; क्रम. (क्रि. धरणे). ३. (ल.) मोठे काम स्वीकारणे. (क्रि. घेणे). ४. एखाद्या पंथाचा किंवा कलेचा स्वीकार करणे, अनुयायी बनणे. (क्रि. करणे, होणे.). ५. व्रत : ‘असेचि धरली नयच्युतदमार्थ दीक्षा करीं ।’ – केका १६. ६. उपदेश; शिक्षण. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दीक्षा

स्त्री. १ एखादें व्रत वगैरे घेतलें असतां त्याच्या प्रारं- भापासून समाप्तीपर्यंत तत्संबंधीं केलेलें नियमाचरण. (क्रि॰ घेणें). २ आचरणाची रीत; नेम; क्रम. (क्रि॰ धरणें). 'अलीकडे यानें दीक्षा बरी धरली आहे.' ३ (ल.) मोठया कामांत पडणें, तें अंगावर घेणें. (क्रि॰ घेणें). ४ एखाद्या पंथाचा किंवा कलेचा स्वीकार करणें, अनुयायी बनणें. (क्रि॰ करणें; होणें). ५ व्रत. 'असेचि धरली नयच्युतदमार्थ दीक्षा करीं ।' -केका १६. ६ उपदेश; शिक्षण. 'विडी ओढण्याची आपणांस कोणी दीक्षा दिली ?' [सं.] ॰गुरु-पु. दीक्षा देणारा, शिकवण देणारा, उपदेश देणारा पुरुष. 'बरवेयां देवां दीक्षा गुरु ।' -शिशु १५२. दीक्षित-पु. १ सोमयाग करणारा; ज्यानें यज्ञ केला आहे असा पुरुष किंवा त्याचा वंशज. 'तेथ सोहंमंत्रें दीक्षितीं । इंद्रियकर्माचिया आहुती ।' -ज्ञा ४.१३७. २ (ल.) धर्मकृत्यांत गुंतलेला किंवा कला- कौशल्य, शास्त्र यांत प्रवीण असलेला. ३ (ल.) कुशल; अतिशय हुषार; मर्मज्ञ.

दाते शब्दकोश

दुबी(भ्भी)राजा

पु. (गोट्यांचा खेळ) (सांकेतिक) दुसरा नेम मारणारा.

दाते शब्दकोश

दुबीराजा, दुभ्भीराजा      

पु.       (गोट्यांचा खेळ) (सांकेतिक) दुसरा नेम मारणारा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ढळणे      

अक्रि.       १. जाग्यावरून हलणे; घसरणे; स्थानभ्रष्ट, पदच्युत होणे; कलंडणे; डळमळणे; झुकणे : ‘जैसी तीरी नाव न ढळे टेकलीसांती ।’ –ज्ञा ७·४. २. रेलणे; कलणे. ३. (शरीरप्रकृती) खालावणे; ढासळणे; खचणे. ४. माघार घेणे; दबणे; अपयश पदरी येणे; कचरणे; हटणे. ५. चुकणे; न लागणे; अंतरणे (ध्येय, नेम यांपासून). ६. (ल.) वजन कमी होणे; मागे पडणे; विसरले जाणे; रूढीत नसणे. ७. उडणे; मूर्तीवर चवरी वारली जाणे : ‘कुंचे ढळती दोही बाही जवळी राही रखुमाई ।’ –तुगा २७८. ८. स्रवणे; गळणे (अश्रू). ९. वाहणे; सुटणे (वारा) : ‘म्हणूनि संवादाचा सुवावो ढळे । तरी हृदयाकाश सारस्वतें वोळे ।’ –ज्ञा ९·२८. १०. क्रम बदलणे; पुढे सरणे : ‘हें कायसेनही न ढळे अनादि ऐसें ।’ –ज्ञा ११·४९७. [प्रा. ढल]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ढळणें

आक्रि. १ चलिता होणें; जाग्यावरून हलणें; घसरणें; स्थानभ्रष्ट, पदच्युत होणें; कलंडणें; डळमळणें; झुकणें. 'जैसी तीरी नाव न ढळे । टेकलीसांती ।' -ज्ञा ७.४. २ रेलणें; कलणें. ३ (शरीरप्रकृति) खालावणें; ढासळणें; खचणें. ४ माघार घेणें; दबणें; अपयश पदरीं येणें; कचरणें; हटणें. ५ चुकणें;' न लागणें; अंतरणें (ध्येय, नेम यापासून). ६ (ल.) वजन कमी होणें; मागें पडणें; विसरलें जाणें; रूढींत नसणें (वर्चस्व आचार, नियम). ७ उडणें; वारली जाणें (मूर्तीवर चवरी). 'कुंचे ढळती दोहीं बाहीं । जवळी राही रखुमाई ।' -तुगा २७८. ८ स्त्रवणें; गळणें (अश्रु). 'अश्रुबिन्दु ढळती नयनीं ।' -मुआदि २३.२४. ९ वाहणें; सुटणें (वारा). 'म्हणूनि संवादाचा सुवावो ढळे ।तरी हृदयाकाश सारस्वतें वोळे ।' -ज्ञा ९.२८. १० क्रम बदलणें; पुढें सरणें. 'हें कायसेनही न ढळे । अनादि ऐसें ।' -ज्ञा ११.४९७. [दे. प्रा. ढल = झुकणें; गळणें]

दाते शब्दकोश

धोरण

न. १ तोंड; दिशा; संधान; नेम; रोंख. 'मोर- च्याचें धोरण किल्ल्यावर आहे.' 'महागिरीचें धोरण कोणत्या बंदरकडे आहे ?' २ केवळ नजरेनें पाहून (एखाद्या गोष्टीच्या) स्वरुपाविषयीं केलेला अंदाज, अजमास; तर्क; अटकळ बांधण्याची बुद्धीची चतुरता; खरा तर्क; अनुमानशक्ति. 'याच्या बोलण्या- चालण्यावरून हा चोर असेल असें माझ्या धोरणांत येतें.' 'हें शेत चार खंडी पिकावें असें आम्हांस धोरण दिसतें.' ३ (बोल- तांना, एखादी गोष्ट करतांना करावयाचा) मागचा पुढचा विचार; पोंच; संधानरूप अंतःकरणवृत्ति; सारासार विचार. 'पूर्वी बोललों काय आणि आतां बोलतों काय हें धोरण त्यास राहत नाहीं.' ४ (एखाद्याच्या भाषण, वर्तन इ॰कांवरून त्याच्या) उद्देशाची, अतस्थ हेतूची तर्कानें कळून येणारी दिशा, रोंख, स्वरूप. 'हा बोलण्यांत साधुपणा दाखवितो पण याचें धोरण निराळें आहें.' ५ सावधातेची नजर, दृष्टी; लक्ष्य; काळजी. 'हे गडी काम करितांना जोगवतील तर तुमचें धोरण तिकडे असूं द्या.' ६ (मनाचा, विचाराचा) कल; झोंक; रोंख. 'त्याचें प्रपंचाकडे धोरण.' 'त्याच्या अंतःकरण्याचें धोरण कळत नाहीं.' ७ (एखा- द्याच्या अंगीं असलेली एखादें काम करण्याची) हातोटी; विशिष्ट पद्धत; सरणी; शैली. 'नाना फडनीसाचें राज्य करण्याचें धोरण दुसर्‍यास येणारा नाहीं.' 'हि कशाची पतिव्रता, पतिव्रतेचे धोर- णच निराळें.' ८ धारा; व्यवहार इ॰ कांतील संप्रदाय; वळण; वहिवाट. जसें- दरबारचें धोरण; सभेचें धोरण. ९ पुर्वापार चालत आलेली पद्धत; मोड; रीत. जसें-लिहिण्याचें-हिशेबाचें धोरण. १० -पु. मार्ग; रस्ता. 'कीं तेथ अनुभवाच्या पाउलीं । धोरणू पडिला ।' -ज्ञा ६.१५४. [सं. धूर् = अग्रभाग; किंवा सं. धारणा; किंवा सं. धुर् = जाणणें; सं. धोरण = वाहणें ?] ॰शुद्ध-वि. बिनचूक धोरणाचा; धोरणाला धरून असलेला; पद्धतशीर. [धोरण।शुद्ध = बरोबर]

दाते शब्दकोश

धोरण      

न.पु.       १. तोंड; दिशा; संधान; नेम; रोख. २. केवळ नजरेने पाहून एखाद्या गोष्टीच्या स्वरूपाविषयी केलेला अंदाज, अजमास; अटकळ बांधण्याची बुद्धीची चतुरता; खरा तर्क. ३. (बोलताना, एखादी गोष्ट करताना करण्याचा) मागचा पुढचा विचार; पोच; सारासार विचार. ४. (एखाद्याच्या बोलण्यावागण्यावरून त्याच्या) उद्देशाची, हेतूची तर्काने कळणारी दिशा, रोख, स्वरूप. ५. सावधानतेची नजर, दृष्टी; लक्ष्य; काळजी. ६. (मनाचा, विचाराचा) कल, झोक, रोख. ७. (एखादे काम करण्याची) हातोटी; विशिष्ट पद्धत; सरणी; शैली. ८. धारा; व्यवहार इ.तील संप्रदाय; वळण; वहिवाट. ९. पूर्वापार चालत आलेली पद्धत; रीत. १०. मार्ग; रस्ता : ‘कीं तेथ अनुभवाच्या पाउलीं । धोरणू पडिला।’ - ज्ञा ६·१५४. ११. सुषुम्नानाडीचा मार्ग. (क्रि. पडणे.) - हंको. [सं. धुर्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धरबंद-ध, धरबंधन

पुन. १ नेम; नियम; बंधन; नियं- त्रण; कायदा; ठराविक मर्यादा, प्रमाण. 'कसें लिहावें तो मला एक धरबंध करून द्या सतरा वेळा सतरा प्रकार सांगूं नका. ' २ एक- सूत्रीपणा; सुसंबद्धता; मेळ (भाषण. वर्तन यांत). ३ भुताखेतास मंत्रतंत्रादींनीं नियंत्रित करणें. ४ बंधनाचा उपाय. ५ परिमितता; प्रमाणबद्धता. [म.धरणें + बांधणें]धरबंधावर आणणें-बस- विणें-भुताखेताला धरबंध घालणें; त्याचें नियंत्रण करणें, खुंटविणें.

दाते शब्दकोश

धरनेम

पु. (भाषण, वर्तन, इ॰त) एकसूत्रीपणा; संब द्धता; निश्चितपणा. [धर + नेम]

दाते शब्दकोश

धरनेम dharanēma m (धर & नेम) Consistency, constancy, steadiness, fixedness (of speech, action, course).

मोल्सवर्थ शब्दकोश

गुमास्ता

पु. १ मुनीम; प्रतिनिधी; मुखत्यार; कारभारी; अडत्या; बातमीदार; मुतालीक. 'प्रधान यांचे गुमास्ते व आमात्यांचे वगैरे यांणीं काम तूर्त करावें.' -मराचिस ८. २ (कायदा) कोणत्याहि व्यवहारांत दुसर्‍या ऐवजीं प्रतिनिधी- दाखल वागण्याकरितां मोबदला देऊन नेमलेला मनुष्य, एजंट. ३ (वतन कायदा) वतनी नोकरीचें काम करण्याकरितां नेम- लेला बदली इसम. -वि. पाठविलेला. [फा. गुमाश्ता] गुमास्त (स्ते)गिरी-स्त्री. १ गुमास्त्याचें काम मुतालिकी; एजंटी. २ प्रतिनिधित्व. 'नामाजी लांडा पुणेहून गुमास्तगिरी देऊन कार्यात मावळास पाठविला.' -इंम ५६.

दाते शब्दकोश

घुसणे      

क्रि.       गवसणे, नेम धरणे : ‘ठणुनि लाथ घातली कंबर घुसून । येवूनी सांगती लेकाला गाऱ्हाणं ।’ – एहोरा (वासुदेव) २८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

हिंद्यान

न. (व. घाटी) नेम; हिंदण पहा.

दाते शब्दकोश

हरम

वि. राख; राखेच्या पोटची; अनौरस. 'सैफन- मुल्क यांची दुसरी कन्या हरम म्हणजे राखीचे पोटची ते असदअलीखानाचे पुत्रास नेम धरून' -रा ७.१४९. [अर. हरम = पवित्र, निषिद्ध -स्त्री. रखेली]

दाते शब्दकोश

हुसकणें, हुसकावणें

उक्रि. १ हांकणें; हांकलून देणें (पशु, पक्षी इ॰ स). २ चुकण; हुकणें (नेम, शिस्त, निशाण, टोला). ३ बिघडविणें; नाश करणें; फिसकटविणें. ४ एकदम हिसकावून घेणें. ५ उसकटणें. [हुस्स!]

दाते शब्दकोश

हवि

न. होमांत टाकावयाचें (तूप, भात इ॰) द्रव्य, पदार्थ; बली. [सं. हविस्] हवित्रि-स्त्री. होमकुंड. हविष्य-न. १ हवन करावयास योग्य वस्तु; हवि. २ व्रतादि दिवशीं भक्षणीय असा शुद्ध पदार्थ (गोधूम, गोदुग्ध इ॰). ३ (ल.) वरील पदार्थ खाण्याचें व्रत, नियम, बंधन. ४ (उप.) नेहमीची लोकाचारा- विरुद्ध किंवा स्वैर वागणूक, वहिवाट, नेम, प्रघात, व्यसन. 'या गांवांत सर्व त्याचें हविष्य आहे.' हविष्यान्न-पु. हवि; हविष्य अर्थ १ पहा. २ तांदूळ, गहू इ॰ धान्य व तूप, दूध इ॰ हबनीय पदार्थ. ३ हे पदार्थ खाऊन रहावयाचें एक व्रत. [सं. हविष्य + अन्न]

दाते शब्दकोश

जागविणें

जागविणें jāgaviṇēṃ v c (जागणें) To awaken. 2 fig. To watch or hold vigils unto; to hold a wake: also to keep, uphold, observe, preserve, maintain. Used in construction with numerous words; as आबरू or नाम or नाव जागविणें To watch over and uphold one's character or good name; दिवस जागविणें To keep a day (i. e. to perform what is prescribed for the day); नियम or नेम जागविणें To maintain one's rule or self-appointed course; सती जागविणें To watch the embers or expiring ashes of a सती; गौर जागविणें To keep a wake to गौरी or देवी.

मोल्सवर्थ शब्दकोश

जागविणें v t A waken. Fig. Watch; keep, uphold, preserve, maintain. अब्रू or नांव जागविणें To watch over and uphold one's character or good name. दिवस जागविणें To keep a day (i. e. to perform what is prescribed for the day). नियम or नेम जागविणें To maintain one's rule or self-appointed course. गौर जागविणें To keep a wake to गौरी or देवी.

वझे शब्दकोश

किराण

न. १ उडी; उड्डाण. किलाण पहा. (कांहींच्या मतें खालीं डोकें वर पाय करून मारलेली उडी). (क्रि॰ मारणें; टाकणें; साधणें). 'उड्डाणे किराणें घेती गगनीं ।' -मुवन १५. १५७. 'घेतलें किराण अंतराळ जातसे ।' -दावि ४९६. २ संधान; निशाण; नेम. (क्रि॰ साधणें; बांधणें; चुकणे). ३ शुभग्रह- युति; संधि; योग्य समय. [सं. किल् = खेळणें]

दाते शब्दकोश

किराण      

न.        १. उडी; उड्डाण. पहा : किलाण. (काहींच्या मते खाली डोके वर पाय करून मारलेली उडी.) (क्रि. मारणे, टाकणे, साधणे.) : ‘उड्डाणें किराणें घेती गगनीं ।’ – मुवन १५·१५७. २. संधान; निशाण; नेम. (क्रि. साधणे, बांधणे, चुकणे.) ३. शुभग्रह युती; संधी; योग्य समय. [सं. किल – खेळणे]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कमिटी, कमेटी

स्त्री. १ पोटमंडळ; कांहीं गृहस्थांची समिति; विशेष प्रश्नांचा विचार करून निर्णय करण्याकरितां नेम- लेली एखाद्या संस्थेच्या सभासदांची अगर कांहीं गृहस्थांची लहान मंडळी; चौकशीमंडळ. 'ह्या कमेटीच्या आश्रयानें मराठी भाषेंत आजवर बरेच ग्रंथ झाले.' -विवि ८.७.१२१. २ व्यवस्थापक मंडळ; नियुक्तमंडळ. 'स्त्रियांमध्यें संक्षोभन करून शेवटीं एक प्रचंड कमिटी (व्यवस्थापक मंडळी) उत्पन्न केली आहे.' -टि ४.९०. ३ पंचायत. [इं. कमिटि]

दाते शब्दकोश

कोळसुंदा

पु. बंदुकीची माशी, मोहरी. हिच्याकडे बघून गोळीचा नेम धरतात.

दाते शब्दकोश

कोळसुंदा      

पु.       बंदुकीची माशी, मोहरी. हिच्याकडे बघून गोळीचा नेम धरतात.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खोत

पु. १ गांव सार्‍यानें घेणारा अधिकारी; गांवाचा सारा भरणारा वतनदार; वसुलाचा इजारदार; जकातीचा इजारदार; (सामा.) मक्तेदार; सरकारांतून नफा-तोटा आपले अंगावर पतकरून जकात किंवा कांहीं एक जिन्नस सर्व आपण द्यावा, मग आपण विकणें तर विकावा अशा रीतीनें काम करणारा इजार- दार. २ (कांहीं ठिकाणीं) सरकारासाठीं गांवचा वसूल जमा करणारा पिढीजाद कामदार; तसेंच या कामासाठीं तात्पुरता नेम- लेला कामगार.' (याचे अधिकार, हक्क यासाठीं रत्नागिरी ग्याझे- टियर पृ. २०४ पहा). कोंकणांत जुन्या वतनी हक्कामुळें किंवा पिढीजाद मुलकी अधिकारामुळें खोत हा जमिनदार बनलेला असतो व कुळांकडून वाटेल तितका वसूल घेत राहातो.' ३ दक्षिण कोंकणांतील एक ब्राह्मण जात; जवळ जात. 'गोविंद खोत.' [खेत ?] सामाशब्द- ॰करी-पु. जमिनींचा किंवा जमिनींच्या उत्पन्नांचा मक्तेदार किंवा इजारदार, खोत. खोतकी-गी- स्त्री. खोताचें काम, हुद्दा. ॰खराबा-पु. १ ज्या गांवाची ज्यास खोती सांगितली त्या गांवच्या खराब जमीनी कांहीं एक ठराव करून (सरकारनें) खोताच्या माथीं मारणें; खराबा मक्त्यानें देणें. २ अशा खराब जमिनी. ॰धारा-पु. जमिनीबद्दल कुळां- कडून जमीनदाराला मिळावयाचा खंड. ॰पट्टी-स्त्री. खोताच्या नफ्याकरितां बसविलेला फाळा, कर. ॰बाकी-स्त्री. खोताच्या येण्याची बाकी. ॰वार-वि. खोताकडे लावून दिलेला (गांव). ॰वेठ-स्त्री. खोतानें मजुरी दिल्याशिवाय कुळांपासून घेतलेली चाकरी, वेठ किंवा जिन्नस. यांचे पुढील प्रकार आहेत:-वरंडी- गवत, पान-पेंढा, शाकाराणी माणूस, रवळी, पाटी, सूप, शिंपली, हवसा, वाढवण, हतरी, तट्ट्या, हातर, नागरजोत, भार्‍या- लांकडें, मानासंबंधीं नारळसुपारी, बाबभाडें, अर्धेली, तिर्धेली इ॰. या बाबींहून कारसाईची बाब भिन्न आहे. हे प्रकार दक्षिण कोंकणांतील आहेत. ॰सजा(ज्जा)-पु. खोतापासून सार्‍यानें, भाडेपट्ट्यानें घेतलेल्या जमिनी. याच्या उलट रकमी जमीन (सरकाराकडून ठरावीक रकमेनें घेतलेली जमीन) खोती-स्त्री. १ खोताचा व्यापार, काम,अधिकार. २ इजार्‍यानें, खंडानें, मक्त्यानें देणें घेणें; इजारा पहा. ३ उभ्या पिकाचा, जंगलांतील लांकडाचा, बागाइती उत्पन्नाचा मक्ता. ४ वाढीदिढीनें शेतकर्‍यास पेरण्यासाठीं वगैरे आगाऊ धान्य देण्याचा धंदा. ५ गांवची मुख- त्यारी. [खोत]

दाते शब्दकोश

लाग

पु. १ संधि; वेळ; संभव; शक्यता. 'पाऊस पडण्याचा लाग दिसतो.' 'आंबे पिकायचे लागास आले म्हणजे काढावे.' 'झाडी जेव्हां तोडली तेव्हां किल्ल्याजवळ जायास लाग झाला.' २ मनांतील संधान; उमेदीची दिशा; प्रयत्न; नेम; खटा- टोप; खटपट. (क्रि॰ करणें). 'चाकरीसाठीं बहुत लाग केले परंतु एकही चालला नाहीं.' 'तुझा अश्व धरूनियां याग । हंसध्वज करी सांग । परी सोडवावयाचा तुझा लाग । येथें कांहीं न चाले ।' -जै १९.३१. 'राजदूत पावले लागा ।' -मुआदि २५.६. ३ ध्येय; विषय; हेतु; उद्देश; मनुष्य ज्याचा पाठलाग करतो ती वस्तु. (क्रि॰ धरणें; बांधणें). उदा॰ 'लाग साधला' = हेतु साधला; कार्य यशस्वी झालें. याच्या उलट लाग फसला, 'एक लाग आला आहे.' = कांहीं तरी मिळण्याचा संभव आहे किंवा प्रयत्नास जागा आहे. 'तो लागावर चालला.' 'हा लाग योजून जातो' इ॰ ४ एखाद्यावर ओढवलेलें संकट; दुर्दैवाचा प्रसंग; हल्ला; घाला. 'आजपावेतों दोन तीन लाग निभावले, आतां हा लाग कठीण.' 'जीवावरचा लाग.' ५ हल्ला; झपाटा; तडाखा. 'सांडी सांडी भीमकीचा संग । अबद्ध बाधिजसी निलाग । आला कोपिष्टांचा लाग । पडेल पांग दुजयाचा ।' -एरुस्व ८.२३. ६ पीक, बहार, झाड, शेत इ॰ पासून फळें, धान्य इ॰ रूप प्राप्ति. 'इरसाल झाडास लाग कमी असतो.' ७ फळें आणि बहर येण्याची वेळ; योग्य काल; हंगाम; फलादि रूप उत्पन्न करण्याची वृक्षादींची स्थिति. 'नारळ, माड लावल्यापासून दहाव्या वर्षीं लागास येतो.' ८ दांडा; जहाज किनाऱ्यास येऊन लागतें ती जागा; जहाज होडी इ॰ चा तळ जेथें जमिनीस लागतो ती जागा. ९ चोळीला कांखेंत ठुशीखालीं द्यावयाचा जोड, तुकडा. १० पकड; कैची; तिढा; टेकण; आश्रय; आधार; जागा; पाया; धर (जड वस्तु वर ठेवण्याकरितां). 'ह्या खांबाला हा धोंडा लाग म्हणून पुरे.' ११ पदार्थाचा मादक गुण; तंबाखू इ॰ पदार्थांचा अंमली गुण. सुपारी खाल्ली असतां ती कांहींना लागते तेव्हांचा मदांश. १२ जनावराला एखाद्या ठिकाणीं होणारा रोग. 'र्तोडलाग, पायलाग.' १३ मारा; स्पर्श; पोंच; पल्ला (बंदुक, तोफ इ॰चा). 'बंदुकीचा- तोफेचा-तिराचा-गोळीचा-कमानीचा-लाग.' १४ शिकार; लूट; प्राप्ति; लग्गा. 'आम्ही तिघेजण संकेताप्रमाणें लाग लागेल तर पहावा म्हणून शहरांत जाण्यास निघालों.' -विवि ८.११.२०३. १५ पत्ता; शोध; तपास; पाठलाग. 'लाग प्रसेनतनुचा लावी हरि- चाहि मग महाभाग ।' -मोकृष्ण ८३.१११. -ऐपो १५९. १६ विशिष्ट गात्र, इंद्रिय इ॰ची विकृति. १७ स्थिति; अवस्था. 'निद्रिता- मागें बैसला वाघु । अथवा पुढें आला स्वर्ग भोगु । त्यासि नाहीं रागविरागु । तैसा लागु ज्ञात्याचा ।' -एभा ७.१२४. १८ संबंध. 'या प्रपंचाचा कठिण लागु । नाशासि मूळ स्त्रीसंगू ।' -एभा ८. ६९. १९ आवड; प्रीति. 'तैसा जाहला प्रसंगु । जे ज्ञानी आम्हासि लागु । आणि तुजही अनुरागु । आथि येथ ।' -ज्ञा १३.६४४. २० अधिकार. 'एथ इंद्रियांचा पांगु । जया फिटला आहे चांगु । तयासीचि आथि लागु । परिसावया ।' -ज्ञा ५.६६. २१ (कों.) गवताच्या उत्पन्नाकरितां राखून ठेविलेली डोंगराळ जमीन. 'लागाची कुपण धरण्याची वेळ झाली.' २२ सामर्थ्य; मगदूर. २३ सोय. 'कडावरुनि पाहिला लाग ।' -दावि २१८. २४ रीघ; वाट. २५ युक्ति. 'हा बाहेर निघोन येइल असा लागेच ना लाग तो ।' -र ५७. २६ मिलाफ. 'तुम्हा उभएता लाग लागों हे ना । सेवितां मी ।' -ऋ ८१. २७ (व.) पशुपक्ष्यादिकांचें मैथुन; कावळा, सर्प इ॰ची सुरतक्रीडा. 'कावळ्यांचा लाग पाहिला.' २८ (जरकाम) तारेची दिशा बरोबर लावणारा, रूळ. २९ (लोहार- काम) मोठा अवजड हातोडा. रेवीट (रिव्हेट) फुलवितांना एका बाजूनें ठोकतात व दुसऱ्या बाजूस याचा जोर लावतात. ३० (चांभारी) अपुऱ्या सागळीस लागलेला तुकडा. ३१ (संगीत) एका स्वरावर थांबून मग दुसऱ्या स्वरावर उडी घेणें. (-स्त्री.) उडी; उड्डाण (क्रि॰ मारणें). -क्रिवि. एकामागून एक; लागो- पाठ (लागलगट, लागट या अर्थीं). [सं. लग्-लग्न; प्रा. लग्ग] (वाप्र.) ॰करणें-हल्ला चढविणें. 'सवेंचि पिप्लिका करिती लाग । देखोनि माजला कीर्तनरंग ।' -दावि २६९. ॰चालविणें-ठर- लेल्या क्रमानें किंवा सरणीनें चालू करणें. (कांहीं काम योजना, बेत). ॰दवडणें-संधि घालविणें; लाभ दवडणें. ॰दवडणें- एखाद्या गोष्टीच्या सिद्धीसाठीं आपल्या योजना चालू करणें, मागें लावण. ॰लावणें-१ (प्राप्तीसाठीं) संधान बांधणें; कांहीं वशिला खर्च करणें; हरएक प्रकारें उपाय, युक्ति योजून काम जुळेलसें करणें. २ माग काढणें; पाठलाग करणें. 'मागोनि लाग लावित नृपबळ येउनि ।' -मोआदि १५.६३. (एखादें काम) लागाला येणें-लागीं लागणें-लागावर येणें-मिळणें, जुळणें-एखादें काम सुरळीतपणें सुरू होणें किंवा चालू लागणें, सिद्धीच्या मार्गावर असणें. पंथाला लागणें. 'माझी पंचायत लागीं लागली.' लागास येणें-रंगारूपास, फलद्रूप होण्याच्या बेतांत येणें. सामाशब्द- ॰पाठ-पु. स्त्री. १ लगबग; त्वरा; घाई. 'करा करा लागपाठ । धरा पंढरीची वाट ।' -तुगा २५६४. २ लागलेंच अनुसरण; पाठलाग; पाठपुरावा. (क्रि॰ पुरवणें; पुरणें; लागणें). ॰पाळती-स्त्री. पाठीस लागण्याची क्रिया. 'किमर्थ अर्थीं माझियें पृष्ठीं । लागपाळती केली त्वां ।' -नव १३.१३८. ॰बग-पु. संबंध. 'पाईक तो जाणे या इक्रीचा भाव । लागबग ठाव चोरवाट ।' -तुगा ३७५. ॰बंदी-वि. जीस लाग लावले आहेत अशी, चांगल्या प्रकारची (चोळी). 'नका सोडू तरी गांठ चोळी फाडाल लागबंदीची ।' -होला ९७. ॰भाग-पु. १ संबंध; लागाबांधा. 'निष्ठुरा उत्तरीं न धरावा राग । आहे लागभाग ठायींचाचि ।' -तुगा १२१७. २ पाठलाग. ॰माग-पु. लागभाग; उपाय. 'पराक्रमाचा लाग- माग । क्षात्रकर्म किं कपटांग ।' -ज्ञानप्रदीप २८१. ॰लाब्या- वि. युक्त्या, बेत वगैरे योजून काम साधणारा; संधान बांधण्यांत कुशल. ॰वण-स्त्री. पाठलाग. 'असाध्य साधूति अंजन । करी लागवण स्त्रियांसी ।' - एभा १०.५७७. ॰वेग-क्रिवि. घाई; त्वरा; लगबग. वेग-स्त्री. अतिशय त्वरा; घाई; गडबड. 'आतां लागवेग करा । ज्याचे धरा ठाके ते ।' -तुगा १९३९. पु. १ प्रतीक्षा; वाट. 'पालटाचा लागवेग । किती म्हणोनि पहावा ।' -दा ९.६.४२. २ संबंध; लागाबांधा. नरदेहाचेनि लागवेगें । एक लागे भक्तिसंगे ।' -दा १.१०.२. ॰वेग-गीं-गें-क्रिवि. त्वरित; ताबडतोब; लगबगीनें. 'शत्रु निर्दाळी लागवेगीं । यश त्रिजगती न समाये ।' -भारा १२.३२. 'महत्कृत्य सांडूनि मागें । देवास ये लागवेगें ।' -दा २.७.३४. लागाची चोळी-स्त्री. नऊ तुक- ड्यांची चोळी. याच्या उलट अखंड चोळी. लागावेगा-पु. लागवेग; लागाबांधा. 'न कळे कव्हणा लागावेगा ।' -उषा १२४. लागचा-वि. (गो.) लगतचा; जवळचा.

दाते शब्दकोश

लगाव

पु. १ नेम; रोख (एखाद्याजागीं तोफ इ॰च्या माऱ्याचा). 'नगरच्या किल्ल्यास भिंगारकडून लगाव आहे.' २ संबंध; संधान; या शब्दाचे हिंदींत यापेक्षां जास्त अर्थ होतात. [लागणें; हिं. लगाऊ]

दाते शब्दकोश

लक्ष

(सं) न० ध्यान, मन. २ नेम, शिस्त. ३ वि० लाख, संख्याविशेष.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

न. १ लक्ष्य; नेम (बंदुकीचा इ॰); वेधण्याचें उद्दिष्ट. 'पै लक्ष भेदिलियाहीवरी ।' -ज्ञा १८.४२६. २ अनुसंधान; अवधान; चित्त. 'कीं शेतीं बीं विखुरिजे । परी पिकीं लक्ष ।' -ज्ञा १६.१००. [सं. लक्ष्] लक्षक-वि. लक्षिणारा; पाहणारा. लक्षिणें (-क्रि.) पहा. लक्षणीय-वि. १ दर्शनीय. २. मननीय; विचार- णीय. [सं.] लक्षणें-सक्रि. (प्र.) लक्षिणें पहा. १ समजणें; कल्पना करणें. 'लय लक्षूनियां झालों म्हणती देव ।' -तुगा २८०८. २ काळजी करणें; लेखणें. '...त्वत्सुतासि रक्षील । मन्मातुळ जगदीश, प्रेमें मजहूनि अधिक लक्षील ।' -मोअश्व ३. ३१.३ -अक्रि. कळणें. 'तेही लक्षे तें फुडें । लक्षण सांगों ।' -ज्ञा १३.३४१.

दाते शब्दकोश

लक्षणें

(सं) स० लक्ष, नेम धरणें. २ पहाणें.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

माहा

सर्व. (व.) माझा. 'पहिला माझी ओवी । पहिला माहा नेम ।' -वलो १.

दाते शब्दकोश

मास

न. अनेक माशांचा समुदाय. -स्त्री. (राजा.) माशांचा थवा. [माशी] मासकी-स्त्री. (राजा. वा.) १ बंदु- कीच्या टोंकावर नेम मारावयासाठीं असलेलें चिन्ह, खूण. २ (बे.) माशी. मासूक-न. (राजा.) माशी; मक्षिका. मासूक- मारा-वि. (राजा.) माशी मरेल इतकें अतिशय जालिम. (तंबाकू, तपकीर, भांग इ॰); चेटक्या किंवा अत्यंत दुष्ट व मारक दृष्टीचा (मनुष्य).

दाते शब्दकोश

माशी

स्त्री. १ मक्षिका. एक घरांत आढळणारा सपक्ष जीव, कीटक. २ नेम धरण्यास उपयोगी असें बंदुकीच्या तोंडावरच माशीसारखें चिन्ह; मासकी; मखी. [सं. मक्षिका; प्रा. मख्खिआ; पं. मक्खी; सिं. मखी; हिं. गुज. माखी; हिं. मछिआ; बं. माछी; फ्रेंजि. मखी] म्ह॰ (व.) माशी पादली = माशी शिंकणें याअर्थी. (वाप्र.) माशा उडवणें-स्वस्थ बसणें. माशा खाणें-गिळणें-१ मूर्ख, गोंधळलेला, बावरा झालेला दिसणें. २ गमणें; रेंगाळणें; चाचपडणें. माशा मारणें-मारीत बसणें-निरुद्योगी बसणें. माशी लागणें-१ दागिना इ॰ च्या वरील मुलामा, पातळ पत्रा झिजून आंतील लाख दिसूं लागणें. २ एखादें काम चालू असतां तें मध्येंच थांबणें; अडणें. 'पण कुठें माशी लागली ? ' -नाकु ३.७७. ३ मळमळूं लागून वांति होणें. ॰शिंकणें-(हानि किंवा अनर्थकारक गोष्ट घडून येण्यास क्षुल्लक कारण दाखविणाऱ्या माणसाच्या उपाहासार्थ योजतात) हरकत येणें; अडथळा येणें (माशी शिंकणें ही गोष्ट अशक्य तेव्हां असेंच असंभवनीय कारण सांगून कार्य बंद ठेवणारास उद्देशून उपयोग). (नाका-तोंडावरची) माशी न हालणें-गरीब स्वभावामुळें कांही न बोलणें. माशीला माशी-(नक्कल करि- तांना मूळच्या लेखांत शाईवर माशी बसून डाग पडला असल्यास नकलेंतहि तसाच डाग दाखविणें यावरून ल.) हुबेहुब, बिनचुक पण अर्थ न समजतां नक्कल करणें. माशी हागणें-क्रि. जना- वराच्या अंगातील व्रणांवर कीड होण्याचीं चिन्हें दिसणें. गुळा- वरल्या माशा किंवा साखरेवरले मुंगळें-जोंपर्यंत गोडी (उत्कर्षाचे दिवस) आहे तोंपर्यंत मित्र म्हणविणारे लोक. माशांचा वाघ-पु. माशा पकडणारा कीटक, कोळी.

दाते शब्दकोश

मौन

न. गप्प किंवा स्तब्ध बसणें; न बोलणें; गुपचुप बसणें; मुकेपणा; निश्शब्दता; विवक्षित कालपर्यंत भाषण न करितां राहण्याचा जो व्यापार तो. 'नकळे हृदयीचें महिमान । जेथें उपनिषदा पडलें मौन । तेथेंही संचरले सज्जन । देहाभिमान सांडोनी । ' -एरुस्व १.३७. २ अबोलपणा; स्तब्धता; अनालापिता; अनाकापवृत्ति. -वि. मुका; न बोलणारा; स्तब्ध किंवा गपचूप बसणारा. [सं.] ॰मुद्रा-स्त्री. शांतपणाची, न बोलण्याची किंवा अबोलपणाची मुद्रा; अबोलपणानें राहण्याची प्रवृत्ति दर्शविणारी चेहऱ्याची ठेवण. [सं.] ॰व्रत-न. कांहीं मुदतीपर्यंत न बोलण्याचा नियम, नेम; कांहीं कालपर्यंत मौन वृत्तीनें राहण्याचें धरलेलें व्रत. (क्रि॰ धरणें.) [सं.] मौनावणें-क्रि. स्तब्ध राहणें; अबोलपणानें असणें; एखाद्यानें स्वतःची शांतवृत्ति राखणें; चुप बसणें, होणें. 'प्रेमें विकासलीं कमळें शुद्ध । गुंजावरती कृष्ण षट्पद । ऐकोनि गंधर्व जाहले स्तब्ध । सामवेद मौनावलें । ' -एरुस्व ३.६. 'स्वंयें शेष मौनावला स्थीर पाहे । ' -राम १५८. मौनी- वि. १ स्तब्ध; मौनव्रत घेतलेला; निश्शब्द; अबोल; अल्पभाषी; अनालापी; भाषणविरक्त. २ जगापासून पराड्मुख होऊन ज्यानें आपलें सर्व विकार (कामक्रोध इ॰) जिंकले आहेत असा; वन- वासी; अरण्यवासी; वानप्रस्थ; ऋषि (धार्मिक). मौन्य-न. १ स्तब्धता; मौन; शांतता. २ मुकेपणा; अबोलपणा; अनालापिता; अनालापवृत्ति. [सं. मौन] मौन्य(न) पणें-क्रिवि. स्तब्ध; मुकाट्यानें. 'बस तुं मौनपणें अथवा उगा । ' -वामनचरित्र १४ (नवनीत प्र. ११०)

दाते शब्दकोश

म्हातारपण

वार्धक्य, जरा, वृद्धापकाळ, वृद्धत्व, बुढापन, बुट्टेपण, जर्जरावस्था, थेरडेपण, दहा गेले पांच उरले, पिकलें पान केव्हां गळेल याचा नेम नाहीं, मावळतें आयुष्य, जीवनाची उतरण, जीवनाची संध्याकाळ, वय झालें, काळ्याचे पांढरे झाले, इतिश्रीची वेळ, शरिराची खोळ जीर्ण झाली, तारुण्य संपलें, काळाचीं पावलें शरिरावर उमटूं लागलीं. मृत्यूच्या सावलींतलें वय, जीवनाचें टोंक, गाडी व्ही. टी. जवळ आली, गोंव-या ओंकारेश्वरास पोंचल्या, परलोकी डोळे लागले, परतीरीं दृष्टि लागली, जीवनयात्रेचा अखेरचा टप्पा सुरू झाला, यमाच्या चिठ्ठीस तयार राहण्याचें वय झालें, आपल्या हाताने मांडलेला पसारा आपल्याच हाताने आंवरावा अशी वेळ येत चालली, या दिव्यांतलें तेल संपत आलें आहे.

शब्दकौमुदी

ज़मीन-जुम्ला

(पु.) [अ. जुम्ला=सर्व] वतन-वाडी; सर्व इष्टेट. “त्यास वडिलांनी ज़मीन-जुम्ला किती, तन्खा काय, पर्गणा कोण, तें पत्र लिहून दिल्लीस रवाना करावें” (साने-पयाव २२). “सिवेचे नेम वही दाणे ज़मीन-जुम्ले कानगोहोच्या दफ्तरीं असे” (भाइसम १८३५ वाइ ३७५).

फारसी-मराठी शब्दकोश

मखी-ख्खी

स्त्री. १ बंदुकीच्या टोंकाला नेम धरण्यास उपयोगी असतें तें चिन्ह; माशी. २ खोंच; मर्म; गर्भितार्थ; आशय (भाषण, कविता इ॰ चा.) ३ युक्ति; रीत; खुबी; मर्म (एखाद्या कृतीचें, कोड्याचें) [सं. मक्षिका. प्रा. मक्खिआ; हिं. मख्खी] ॰उतरणें-हुबेहूब, बिनचूक अनुकरण, नक्कल करणें.

दाते शब्दकोश

नांव

न. १ नाम अर्थ १, २ पहा. 'नांव तुजें नावचि या संसारांभोधिला तरायासी ।' -भक्तमयूरकेका ४०. २ (ल.) कीर्ति; ख्याती; लौकिक; पत; अब्रू; चांगलें नाम. 'सकल म्हणती नांव राखिले । वडिलांचे ।' -दा ३.४.१४. ३ दुर्लौकिक; डाग; कलंक; बदनामी; दुष्कीर्ति; नापत; (क्रि॰ ठेवणें). ४ भांड्यावर नांव घाल- ण्याचें कासारी हत्यार. -बदलापूर ९६. ५ नवरा बायकोनें उखाणा घालून घ्यावयाचें परस्परांचें नांव (क्रि॰ घेणें). [सं. नाम; हिं. नाओं; जुनें हिं. नाऊं; पं. सिं. नाउं; फ्रेंजि. नव; इं. नेम] (वाप्र.) ॰करणें-कीर्ति गाजविणें. ॰काढणें-नांव गाजविणें; प्रसिद्धीस येणें. ॰काढणें-कुरापत काढणें; कळ लावणें. ॰खारणें- उक्रि. (कों.) नांव घेऊन निर्देश करणें; नांवाचा उल्लेख करणें; नांव घेणें. ॰गांव विचारणें-माहिती विचारणें; सामान्य विचारपूस करणें. ॰जळो-भाजो-नांवास हळद लागो-तळतळाट किंवा शाप देण्याचा वाक्प्रचार. ॰ठेवणें व फोडणें-(बायकी) खेळांत एखाद्या वेळीं दोन मुलींस एकदम शिवल्याचा प्रसंग येतो तेव्हां डाव कोणी घ्यावा ह्याविषयीं तंटा होतो त्यावेळीं त्या दोन्ही मुली एकमेकांच्या संमतीनें नांवें बदलून ठेवतात, मग त्यांतील एखाद्या मुलीस आपलीं नांवें सांगून तीं त्यांतील कुठलें नांव मागेल तें तिला देऊन उरलेल्या नांवाच्या मुलीनें डाव घ्यावयाचा असतो. ॰ठेवणें-१ दोष देणें; व्यंग काढणें. म्ह॰ नांव ठेवी लोकाला शेंबूड आपल्या नाकाला = दुसर्‍याला ज्या दोषाबद्दल नांवें ठेवावयाचीं तोच स्वतांत असणें. २ जन्मलेल्या मुलाचें नामकरण करणें; ॰डहाळ होणें-(ना.) बदनामी होणें. ॰डाहार करणें-(व.) नांव बद्दू करणें. ॰डालणें-(परदेशी तेली) प्रेताच्या सारवलेल्या जागेवर केळीचें पान ठेवून त्यावर प्रत्येक मनुष्यानें मयताचें नांव घेऊन कालवलेल्या भाताचा घांस ठेवणें. -बदलापूर २६७. ॰धुळींत, मातींत, पाण्यांत इ॰ जाणें, मिळणें, पडणें-नांवावर पाणी घालणें पहा. ॰नको-तिटकारा, चिळस, द्वेष दाखविणारा शब्द. ॰न घेणें-अलिप्त राहणें; अंगांस संसर्ग न लागू देणें; दूर राहणें; नांव न काढणें. ॰नाहीं-नसणें-(विद्या, पैसा इ॰कांचा) पूर्णपणें अभाव असणें; नांव, निशाण, खूण कांहीं नसणें. बदलणें-नामोशी पत्करणें (प्रतिज्ञेच्या वेळीं योजतात). 'अमूक झालें तर नांव बदलून टाकीन.' ॰मिळविणें-वाद- विवाद, लढाई इ॰ मध्यें कीर्ति मिळविणें. ॰सांगणें-लावणें- घालणें-देणें-किंमत, शर्ती ठरविणें. ॰सांगणी-वाङ्निश्चयः कुणब्यांतील वधुवरांचीं व त्यांच्या मात्यापित्यांचीं नांवें जातीच्या सभेमध्यें जाहीर करून लग्न ठरविण्याचा समारंभ. ॰सोडणें- टाकणें-त्याग करणें; संबंध सोडणें; इच्छा न करणें. नांवाचा- १ खरा. 'मी तें काम करीन तरच नांवाचा.' २ नामधारी; केवळ नांवापुरता. 'मी जॉन्सनचा नांवाचा मात्र गुरु होतों, खरोखर पहातां तो माझ्याहून वरचढ होता.' -नि ३ चांगलें नांव लौकिक असलेला. नांवाची बोंब पडणें-वाईट गोष्टीला कारणीभूत होणें किंवा एखाद्या तक्रारीचा विषय होऊन बसणें. नांवानें घागर फोडणें-संबंध तोडणें; मेला असें समजणें. 'तियेचेनि नांवें फोडावी घागरी । नाहीं ते संसारी बहिणी म्हणे ।' -ब ४७० नांवानें पाणी तावणें, तापविणें-एखाद्याचा द्वेष करणें, किंवा मरण चिंतणें. नांवानें पूज्य असणें-पूर्ण अभाव असणें. 'विद्येच्या नांवानें जरी आवळ्या एवढें (पूज्य) म्हणतां येणार नांहीं तरी मासला तोच ।' -मधलीस्थिति. नांवानें बोंब मारणें, शंख करणें, खडे फोडणें-एखाद्या विरुद्ध बोभाटा, ओरड करणें. नांवानें भंडार उधळणें-स्तुति करणें. नांवानें शंख-पूर्ण अभाव असणें. नांवानें हांका मारीत बसणें-दुसर्‍यानें नुक- सान केलें अशी विनाकारण ओरड करीत सुटणें. नांवावर-१ नांवासाठीं-करितां-मुळें-खातर. २ (जमाखर्च) खात्यावर; नांवें. नांवावर गोवर्‍या फोडणें-घालणें-रचणें-एखाद्याचें वाईट करणें-चिंतणें; शाप देणें (गोवर्‍या प्रेतास जाळण्यास लागतात). नांवावर पाणी घालणें-कीर्तीवर पाणी सोडणें; चांगलें नांव, लौकिक बुडविणें. नांवावर विकणें-स्वतःच्या नुस्त्या किंवा दुसर्‍या-मोठ्याच्या नांवाचा फायदा घेणें, त्यावर नांव, प्रसिद्धि मिळविणें; खपणें. नांवास चढणें-कीर्तिमान होणें; लौकिक वाढणें. नांवास देखील नाहीं-शपथेस किंवा नांव घेण्यास देखील नाहीं. याच्या अगोदर 'ज्याचें नांव' हे शब्द जोडतात म्हणजे त्याचा अर्थ अगदीं मुळींच नाहीं असा होतो. 'यंदा पाऊस ज्यानें नांव पडला नाहीं.' ज्याचें नांव तें-(नांव घेण्यास अयोग्य अथवा अमंगल म्हणून ज्याचें नांव घेतलें नाहीं तो अथवा तें) जें पाहिजे असतें अथवा ज्याची आशा केलेली असते तें कधीं न देणार्‍या, करणार्‍या मनुष्य-वस्तू इ॰ संबंधीं योजतात. सामाशब्द- ॰कर-री-वि. १ कीर्तिमान; प्रसिद्ध; नावलौकि- काचा. 'वडिल नांवकर मल्हार ऐका गर्दी झाली त्यावरती ।' -ऐपो ३५८. २ दुसर्‍याचें नांव धारण करणारा; एकाच नांवाचा दुसरा नामधारी. ॰कुल-वि. (ना.) सगळा; एकूण एक. ॰ग्रहण-न. नांव घेणें; उल्लेख करणें; नामनिर्देश (क्रि॰ करणें; घेणें; काढणें). ॰ग्रहण टाकणें-सोडणें-नांव टाकणें पहा. ॰ग्रहण ठाऊक नसणें-नांवा गांवाची कांहींहि माहिती नसणें. ॰धारक-वि. नामधारक अर्थ २ पहा. ॰नट-वि. क्रिवि. पूर्णपणें नष्ट झालेला; बेचिराख झालेला; थांग, पत्ता, माग, खुण, अवशेष नसलेला. 'त्याची गाय गुराख्यानें नांवनट केली.' [नांव + नष्ट] ॰नांगर-पु. पेरणीच्या वेळीं प्रथम नांगर धरण्याचा व निवाड- पत्रांत निशाण्या करतांना प्रथम नांगराची निशाणी करण्याचा पाटील अथवा देशमूख यांचा मान. ॰नांव-वि. (ना.) नावकुल पहा. सबंध सगळा. ॰निशाण-न. सर्व वृत्तांत (कुल, नांव, गांव इ॰). ॰निशाण ठाऊक असणें-कुलशील परंपरा ठाऊक असणें. ॰निशी-स्त्री. १ नांवांची यादी. २ तींत दाखल केलेलें नांव. 'माझी नांवनिशी काढ' [नांव + फा. नविशी] ॰निशीवार- क्रिवि. नांवा बरहुकूम; नांवनिशींतील नांवांच्या अनुक्रमानें. (क्रि॰ घेणें; मागणें). ॰नेम-१ (फलज्यो.) नांवावरून राशी, गण, नक्षत्र इ॰कांची माहिती काढणें. २ अशी काढलेली माहिती. ॰बुडव्या-वि. स्वतःचा लौकिक, पत, किंमत घालविणारा (मनुष्य वस्तु). ॰र(रा)स-स्त्री. १ (फलज्यो.) जन्मकालीन नक्षत्राव- रून नांव ठेवणें किंवा व्यावहारिक नांवावरून नक्षत्रनाम काढणें. 'मग बोलाविले ज्योतिषी । भूमी पाहिली चौरासी । तव दक्षा- चिया नावरासी । घातचंद्र ।' -कथा ३.१०.९९. २ अशा तर्‍हेनें काढलेलें नांव, कुंडली इ॰ (क्रि॰ काढणें). ३ जन्मनक्षत्रावरून पहावयाचें वधूवरांचें राशी घटित; नांवावरून लग्न जमविणें. (क्रि॰ काढणें; पाहणें; ठरविणें). ॰राशीस येणें, उतरणें, जमणें- मिळणें-नांवांवरून वधूवरांचा घटित विचार केला असतां अनुकूलता येणें, कुंडलींवरून लग्न जमणे. [नांव + राशि] ॰रूपन. १ कीर्ति; अब्रू; पत. नांव अर्थ २ पहा. 'त्यानें त्या लढाईमध्यें नांवरूप मिळविलें.' 'माझें लपो असतेपण । नांवरूपाशीं पडो खंडन ।' २ सार्थक; योग्यस्थानीं विनियोग. 'विद्वानास पुस्तक दिलें असतां त्याचें नांवरूप होतें.' ३ नांव आणि आकार; व्यक्तित्व; स्वतंत्र, वेगळें अस्तित्व. 'जैसें समुद्रास मिळतां गंगेचें आप । तात्काळ निरसे नांवरूप ।' नांवलौकिक-पु. प्रसिद्धिः मोठेपणा; कीर्ति; ख्याति. ॰वार-क्रिवि. नांवाबरहुकूम; नांवनिशीवार पहा. ॰सकी-स्त्री. (कु) लौकिक; कीर्ति; प्रसिद्धि. ॰सता-वि. (कु.) प्रसिद्ध; नांवाजलेला; कीर्तीचा (चांगल्या व वाईट अशा दोन्ही अर्थीं योजतात). नांवानिराळा-वि. अलिप्त; अलग (वाईट नांवापासून); स्वतंत्र; विरहित. 'हा सर्व करून नांवानिराळा.' नांवारूपास आणणें-येणें-प्रसिद्धीस-मान्यतेस आणणें- येणें. नांवें-(जमाखर्च) खर्चाची बाजू; नांवानें; खर्चीं; खर्चाकडे. नांवावर पहा.

दाते शब्दकोश

नेमाड्या      

वि.       दगड इ.चा अचूक नेम मारणारा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नेमानेम

नेमानेम nēmānēma m (नेम by redup.) The appointment and determination (of God, destiny &c.): also usage, custom, general rule, constant practice.

मोल्सवर्थ शब्दकोश

नेमी

नेमी nēmī ad (नियम S through नेम) Constantly, habitually, regularly, by rule or course.

मोल्सवर्थ शब्दकोश

नेमका      

क्रिवि.       १ पाहिजे असलेला; नेम धरल्याप्रमाणे बरोबर. (ल.) संकल्प, बेत केल्याप्रमाणे; अपेक्षित तोच. २. वेळेवर; प्रसंगोपात्त.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नेमका or नेमकाच

नेमका or नेमकाच nēmakā or nēmakāca ad decl and vulgarly नेमक ad (नेम) Exactly as aimed; and fig., as designed or planned, or as desired or expected; opportunely, apropos, just at the nick, pat.

मोल्सवर्थ शब्दकोश

नेमळ or नेमाळ्या

नेमळ or नेमाळ्या nēmaḷa or nēmāḷyā a (नेम) Scrupulously or fastidiously punctual, exact, or strict; punctilious, finikin, nice. 2 Regular and rigid in religious ceremonies and ordinances. Ex. ऐशा रीतीं भक्त नेमळ ॥ हरुषें वोसंडत तये वेळें ॥.

मोल्सवर्थ शब्दकोश

नेमणे      

सक्रि.       १. लावणे; ठेवणे; निश्चित करणे; (नियम, रूढी) स्थापणे. २. नियोजित करणे; नेमणूक, नियुक्ती करणे. ३. नेम धरणे; (बाण इ.नी) लक्ष्य वेधणे. ४. नियम करणे; ताब्यात ठेवणे : ‘इंद्रियांचें सुख नेमुनि । देवचारातें जितला ।’ - ख्रिपु १·१·६४. ५. नियमन, नियंत्रण, शासन करणे : ‘पुढती न करी उत्थान । ऐसा विंध्याद्री नेमून ।’ - भारा आरण्य ५·८३. [सं.नियम; क. नेमिसु]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नेमणें

सक्रि. १ लावणें; ठरविणें; निश्चित करणें; स्थापणें (नियम, रूढी). 'तुका म्हणे त्यासी ठाउकें उचित । होईल संकेत नेमियेला ।' -तुगा १०८१. २ नियोजित करणें; योजना करणें (जागेवर, अधिकारावर); नेमणूक करणें. 'नेमियले मज शत्रु- जयाला । परि तें गेलें सर्व लयाला ।' -सौभद्र अंक. १. ३ नेम धरणें; लक्ष्य वेधणें (बाण इ॰ नीं). ४ नियम करणें; ताब्यांत ठेवणें. 'नमो संतां भक्तां भक्तिणी । जेहीं भवसागरु उतरुनि । इंद्रियांचें सुख नेमुनि । देवचारतें जितला ।' -ख्रिपु १.१.६४. [सं. नि + यम्] नेमणूक-स्त्री. १ वेतन; पगार; वेतनाची व्यवस्था. 'आम्हाला चारशें रुपये नेमणूक झाली आहे.' २ सेवेबद्दल किंवा कांहीं काम- गिरीबद्दल सालीना जें नक्त वगैरे पावतें ती देणगी. ह्याबद्दल कोणास चाकरी करावी लागते, कोणास लागत नाहीं. -इनाम ३१. या नेमणुकीचे पुढील कांहीं प्रकार आहेत-वर्षासन, बिदागी, अम्मल, इनामी जमीन मोबदला, नुकसानभरपाई, ग्रास, पालखी, पगडी इ॰ ३ योजना; नियोजन; नेमणें (जागेवर, हुद्यावर). ॰बेहडा- पु. हुजुराकडून मामलेदाराकडे पाठवावयाचे कागद. -इनाम ४९. अजमास पहा.

दाते शब्दकोश

नेमणें nēmaṇēṃ v c (नेम) To appoint, fix, lay down, establish as a law or rule. 2 To appoint (as to an office or a post); to nominate. 3 To aim. 4 To fix in the ground (a post &c.)

मोल्सवर्थ शब्दकोश

नेमोडा      

पु.       नेम (खड्डा) खणण्याचे एक हत्यार.(को.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नेमस्त

नेमस्त nēmasta a (नेम) Middling, ordinary, common, not exceeding nor falling short of mediocrity or customariness: also moderate, temperate &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

नेमविणें

नेमविणें nēmaviṇēṃ v c (नेम) To fix in a hole in the ground (a post, a tree &c.)

मोल्सवर्थ शब्दकोश

नेत

पु. (व.) नेम; नियम.

दाते शब्दकोश

नेत      

स्त्री.       १. नियत; बुद्धी : ‘ज्याची जशी नेत तसी त्यास बरकत.’ - इमं १०७. २. निष्ठा : ‘दौलतराव बाबा यांची नेत धन्याजवळ तसीच असेल.’ - ऐलेसं १२·६८१७. ३. नियम; नेम. (व.) [अर.नीयत्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निखानेमाचा

वि. नियमित; नेहमींचा; ठराविक; काय- मचा; खात्रीचा; पुनःपुनः येणारा (उकडा, उचपात, पाहुणा, अतीत, भिकारी, पाऊस, वारा इ॰ शब्दांबरोबर योजतात). याचा क्रियाविशेषणाप्रमाणेंहि उपयोग करतात. जसें-हा निखाने- माचा येतो, जातो, खातो. [निका, निक्खळ + नेम]

दाते शब्दकोश

निखानेमाचा nikhānēmācā a (निका or निक्खळ & नेम) Regular, constant, settled, of fixed and sure recurrence. Used with such words as उकाडा-उचापत-पाहुणा- अतीत-भिकारी-पाऊस-वारा. 2 Used as ad decl as हा नि0 येतो-जातो-खातो &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

निर्धार      

पु.       १. निश्चय; खात्री; विश्वास. २. संकल्प; ठाम उद्देश. ३. निकाल; निर्णय; निःसंदिग्धता. ४. नियम; नेम. ५. आधार; आश्रय. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निर्धार

पु. १ निश्चय; खातरी; विश्वास. 'कृपाळु म्हणोनी बोलती पुराणें । निर्धार वचनें यांचीं मज ।' -तुगा ११२४. २ संकल्प; ठाम उद्देश; निश्चय. 'आक्षेप परिहारीं निर्धारू । करितां परशास्त्र विचारू ।' -ऋ २३. ३ निकाल; निर्णय; निश्चय (एखाद्या गोष्टीचा, विषयाचा); निःसंदेहपणा. ४ नियम; नेम. ५ आधार; आश्रय. 'सकळ सिद्धीचा निर्धार । ते हे कवी ।' -दा १.७.१८. [सं.] निर्धारण-न. १ निश्चय करणें; ठरविणें; खातरी करून घेणें. २ संदेहाभाव. निर्धारणीय-वि. निश्चय कर- ण्यास, ठरविण्यास योग्य; निश्चित करण्यासारखी. निर्धारणें- उक्रि. (काव्य) १ निश्चय, निश्चित करणें; ठरविणें. 'देखा काव्य- नाटका । जें निर्धारितां सकौतुका ।' -ज्ञा १.७. २ निःसंदिग्धपणें जाणणें. 'मग आपसयाचि उमजला । दिशा निर्धारूं लागला ।' निर्धारित-वि. निश्चित, कायम केलेलें; ठरविलेलें; खात्रीलायक. निर्धार्य-वि. निश्चय करण्यास योग्य; ठरविण्याजोगें.

दाते शब्दकोश

निशाण

(न.) [फा. निशान्] चिन्ह; खूण; ज्या ठिकाणीं नेम मारावयाचा ती ज़ागा; झेण्डा. “आमचे व आपले इत्तिफाकानें (=ऐकमत्यानें) इङ्ग्रजांचें नांव व निशाण नाहीं सारखे नेस्तनाबूत होतील” (राजवाडे १०|१८२).

फारसी-मराठी शब्दकोश

निशाण / निशान

(फा) न० पताक, ध्वज, नेम.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

निशाण-बाज़

(पु.) उत्तम नेम मारणारा.

फारसी-मराठी शब्दकोश

निशाण-बाजी

(स्त्री.) नेम मारणें; वेध.

फारसी-मराठी शब्दकोश

निश्चय

(सं) पु० नियम, बेत, नेम, भरंवसा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

न्याम

न. (कु. कुण. अशिष्ट) खांब पुरण्यासाठीं खणलेला खळगा; नेम.

दाते शब्दकोश

ओवी      

स्त्री.       १. मराठीतील चार चरणांचा एक छंद.महाराष्ट्र संतकवींचा हा छंद अत्यंत आवडता आहे. यात वर्ण व मात्रा यांची संख्या अनियमित असते: ‘पहिली माझी ओवी। पहिला माझा नेम। तुळशीखाली राम।पोथी वाचे॥’- हा एक प्रकार; मुख्यतः प्रकार दोन १. साडेतीन चरणी, २. साडेचार चरणी, चरणांन्ती यमक. २. या छंदात रचलेले गीत बायका दळताना, मुलांना थोपटताना किंवा झोपाळ्यावर बसून म्हणतात : ‘ओविअें गाताति यादवांचा राणा ।’- वछा ३३. (वा.) ओव्या गाणे (ल.) भलतीच स्तुती करणे. [त. ओडवि]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ओवी, ओंवी

स्त्री. १ मराठींतील चार चरणांचा एक छंद. महाराष्ट्र संतकवींचा हा छंद अत्यंत आवडता आहे. यांत वर्ण व मात्रा यांची संख्या अनियमित असते. तथापि अष्टाक्षरी-औटचरणी व अष्टाक्षरी-त्रिचरणी असे दोन प्रकार साधारणपणें पाडतात. 'पहिली माझी ओंवी । पहिला माझा नेम । तुळशीखालीं राम । पोथी वाचे ।।' हा पहिला प्रकार. 'आकाशींच्या अंतराळीं । तार- कांना तेज चढे । तुझी माझी प्रीति जडे ।।' हा दुसरा प्रकार. 'नागार्जुनाचा दातारु । राणेराओ श्रीचक्रधरू । ओंवी प्रबंधीं कवी भास्करु । वर्णितुसें ।' -शिशु ७. २ सदर छंदांत रचलेलें गीत बायका दळतांना, मुलांना थोपटतांना किंवा झोपाळ्यावर बसून म्हण- तात. 'तथा महाराष्ट्रेषु योषिद्भिर् ओंवी गेया तु कंडने ।' -मानसोल्लस ५.२०५२. 'ओविअं/?/ गातांति यादवांचां राणा ।' -दाव ३३. 'जात्यावर बसलें म्हणजे ओवी आठवते' किंवा 'हातीं खुंटा आल्यावांचून ओवी सुचत नाहीं.' ३ विणकामांतील प्रत्येक ताणा जींतून ओवला जातो व जिच्यामुळें विणतांना तो खालींवर केला जातो ती; वही; नेहमीं ओव्या असा अनेक- वचनीं प्रयोग करतात. ओव्या गाणें-(ल.) भलतीच स्तुति करणें. [सं. वे = विणणें; दे. ओविंअमू; म. ओवणें]

दाते शब्दकोश

पैदा

वि. १ मिळविलेलें; संपादित; प्राप्त केलेलें; निर्माण केलेलें. 'काणवानी मस्ती पैदा करून.' -इऐ ५.१००.[फा.] ॰गिरी-स्त्री. उकळणूक; (बहुधा जुलमानें गोळा केलेला) वसूल; बलात्कारानें घेतलेलें धन. 'दरीं वख्त पनालेस विजापुराहून एक हवाल्दार गैरमहसूल पैदागिरी कबूल करून आला.' -इऐ ५.१००. [फा.] पैदास-स्त-स्त्री. १ नफा; फायदा; मिळकत. २ उत्पत्ति; उत्पन्न; उपज; निपज. ३ (व.) 'पैदास्ती वरील नेम णुकीमुळें साहुकारांस उपद्रव होऊन साहुकारी बुडेल.' -मराआ ३६. अमदानी. [फा. पैदाइश्]

दाते शब्दकोश

पूजार-री

पु. देवालयांत देवीची पूजा करण्यासीठीं नेम लेला माणूस; ब्राह्मणाखेरीज इतर जातीचेहि पुजारी असतात. 'मह जदी बांधोन पुजारे । ठाईं ठाईं स्थापिले ।' -नव २३.१७८. ॰रीण-स्त्री. स्त्री. पुजारी; पुजाऱ्याची स्त्री. 'पुजारिणी दासें द । ग १ दे दां १ ।' -शके ११९५ तींल पंढरपूरचा शिलालेख. [पूजा]

दाते शब्दकोश

रोख

(सं) स्त्री० द्रव्य, रोकड. २ नगदी. ३ कल, वळण. ४ नेम, शिस्त, लक्ष.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

रोखणें / रोखणें

अ० लक्ष जाणें, लक्ष देणें, नेम / शिस्त धरणें.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

सारणें

सारणें sāraṇēṃ v c (सारण S or Active of सारणें) To move on, aside or away, or back; to remove by pushing. 2 To consume, expend, exhaust; to make an end of. 3 (Esp. in poetry.) To despatch, finish, perform, complete (business or work); to drive along. Ex. सारूनिया घरधंदा ॥ सेवितें पतिपदारविंदा ॥; also स्नान करूनि सकाळिकानि ॥ नित्य नेम सारिले कोणीं ॥.

मोल्सवर्थ शब्दकोश

शेवट

पु. अखेर; परिणाम; अंत; समाप्ति; अंतिम अवस्था. १ -न. टोंक; अग्र; कड; कडेचा भाग; अंतिम भाग. २ बंदुकीचा तोडा. [सं. सीमन्-सीमा] शेवट घेणें-अखेरीस नेऊन पोंचविणें; संपविणें; समाप्त करणें; अखेर करणें. शेवटचा- वि. १ अखेरचा; अंतिम. २ सर्वांत धाकटा. शेवटचा आदित- वार-पु. कधींहि न येणारा दिवस. ॰च्याआदितवारी कधींहि नव्हे; कदापि न; केव्हाहि नाहीं. शेवटची पालखी-स्त्री. प्रेताची तिरडी. शेवटच्या बांधण्यास पाणी मोडणें-अखे- रच्या अटी सांगणें; कमाल मागणी करणें; अंतिम हेतु कळविणें. सरशेवटीं-अखेरीस; सर्व संपल्यावर; अंतिम अवस्थेमध्यें. शेवटणें-अक्रि. १ टोंक काढणें; बोथट झालेलें टोक (छिनी वगैरेचें) तीक्ष्ण करणें; धार लावणें. 'पहार शेवटायला हवी होती.' २ घोड्यास वगैरे चाबकाच्या अग्रानें किंचित मारणें. ३ (राजा.) टोंकास, शेवटास लागणें; चाटून, घांसून जाणें (गोळी, तीर, नेम वगैरे). ४ शेवट लावणें; संपविणें; पूर्ण करणें (हिशोब, व्यवहार वगैरे). ५ शेवटीं येणें. अखेरीस होणें, घडून येणें. 'परिपरिणामीं शेवटे । अवश्य मरण ।' -ज्ञा १८.२४९ शेवटता-क्रिवि. निसटता; घांसून जाणारा; चाटून जाणारा; चुटमुटका. (क्रि॰ लागणें; जाणें). शेवटला-टील-वि. अखेरचा; अंतिम; शेवटचा. शेवडा-वि. (राजा.) गांवाच्या शेवटीं राहणारा. शेवडे हें आडनांव परांजपे, आपटे, गोखले या चित्यावन व एका कऱ्हाडा घराण्याचें आहे. शेवटोर-क्रिवि. शेवटपर्यंत; अखेरपावेतों. 'सकळ राज्य तंत्रहि डबीर नारोपंताचे स्वाधीन करून शेवटोर ही चालवीत आले' -तंजावर शिलालेख ९६.२३. [शेवटवर]

दाते शब्दकोश

शिस्त

स्त्री. १ नेम; निशाण; वेध; संधान. (क्रि॰ धरण; बांधणें). 'शिस्त धरून वनिं करोल वधितां हरणें ठिकाणीं अडखळती ।' -प्रला २३६. २ कुळांकडील वसूल करावयांसाठीं जी कुंळवार यादी करितात ती; बंदोबस्त. ३ विवक्षित पद्धतीनुरूप, संप्रदायानुरूप वर्तन, व्यवहार, जाबसाल; शिरसत्ता; पद्धति; रीत. [फा. शिस्त]

दाते शब्दकोश

(फा) स्त्री० नेम, निशाण. २ रीत, चाल.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

[फा. शिस्त्] निशाण; नेम; बन्दोबस्त; रीत; शिरस्ता. “शिस्त धरुन वनिं करोल वधितां हरणें ठिकाणीं अडखळती” (प्रभाकर २३६).

फारसी-मराठी शब्दकोश

संधान

न. उपाययोजना; शक्ति, युक्ति, साधनें यांची योग्य तरतूद व योजना; एखादें कार्य घडवून आणण्याच्या कामीं प्रयत्न, बुद्धि व शक्ति यांचा योग्य मिलाफ करून योजना २ योग्य रीति, मार्ग, पद्धति (एखाद्या कार्याच्या सिद्धयर्थ). ३ नेम; निशाण; लक्ष्य. 'रिपुकंठीं हा शर लागेल या न संधानें ।' -मोकर्ण ४७.७०. ४ कल, प्रवृत्ति, रोंख (मन, इच्छा, डोळा वगैरेचा). ५ मनाची धारणा; लक्ष्य; अवधान; ध्यान. 'मूळ ग्रंथाचें संधान राखून मग आपलें राखायचें' -नि १९६. ६ कावा; कपट; युक्ति. 'चोर डाक होती गिलचांची नाहीं कळले संधना' -ऐपो ११८. 'करिता जाहला घोर संधान ।' -रावि ३२.११. ७ घबाड; डबोलें; ठेवा. 'आम्हांस मार्गांत कांहीं चांगलेसें मोठें संधान साधेना.' -विवि ८.८.१५४. ८ सुमार; समय; संधि. 'दसर्‍याच्या संधानास मी तुमचे गांवीं येईन.' ९ वग; वशिला; सूत्र. [सं. सभ् + धा] संधानी-वि. हुशार; धूर्त; युक्तिबाज; कावेबाज; संधान लावणारा, बांधणारा.

दाते शब्दकोश

शस्त

स्त्री. १ अंगुस्तान; अंगुष्टत्राण. २ नेम. [फा. शस्त्]

दाते शब्दकोश

सुमार

पु. अजमास; अंदाज; गणती; साधरण संख्या; तर्क. (क्रि॰ पहाणें; काढणें; करणें; बांधणें; येणें; दिसणें; होणें). २ बेसुमार किंवा अंदाजाबाहेरची संख्या. 'विहिरीला पाण्याचा सुमारच नाहीं.' ३ किमान मर्यादा; मध्यम प्रमाण 'हा सुमारानें बोलतो.' ४ निकटपणा; सांनिध्य 'पौर्णिमेच्या सुमारावर या.' ५ मर्यादा; काळ. 'हा घोडा बसकणेच्या सुमारास आला.' ६ भान; शुद्धि. 'एवढा वेळ भलतेंसलतें बोलत होता, आतां सुमा- रावर आला.' ७ प्रमाण; नेम; बेत. ८ रोंख. -वि. वाईट; मध्यम प्रकारचें. 'हे आंबे सुमार आहेत.' [फा. शुमार] सुमाराचा- वि. साधारण; मध्यम प्रकरचा. सुमारणें-अक्रि. १ मर्यादेंत येणें, असणें. २ अंदाजापेक्षां जास्त होणें, भरभराटणें (पीक, धंदा). ३ किंचिंत फुगवटी येणें. सुमार माफक-वट-वि. सुमाराचा. सुमारी-वि. संख्येनें मोजतां येण्यासारखें, मापीच्या उलट. गणनीय; संख्यावाचक. १ -स्त्री. सुमार पहा (अर्थ ३,४ सोडून). २ गणना; गणती. 'खानेसुमारी.' झाडसुमारी, गांव- सुमारी, शेतसुमारी. सुमारें-क्रिवि. अंदाजें.

दाते शब्दकोश

सुमार

(पु.) [फा. शुमार्] गणती; अन्दाज; तर्क; विचार; रोख; प्रमाण; अद्मास; नेम; बेत. “चित्ते सुमार दोन” (चित्रगुप्त). “श्रीमन्त माघारे एव्हांच फिरले तरी फौज़ देशास येतांच फुटेल, यास्तव बाहेर फिरतात हा एक सुमार” (खरे १।३९४). “मज़ल-दर-मज़ल नर्मदा उतरून आले पार, धरला दख्खनचा सुमार” (साने-पयाव ५२). दहाचा सुमार असेल. खाण्याचा सुमार असावा. “सुभार धरून बार त्या नेमाचा केला” (उमाजी नायकाचा पोवाडा).

फारसी-मराठी शब्दकोश

सवाणणें

उक्रि. (राजा.) चेंदणें; ठासणें; ठोकणें; खांबाचें नेम, बंदुक यांत माती, दारू वगैरे ठासणें.

दाते शब्दकोश

टचका      

पु.       १. एक लाकडी खेळणे (हे लाकडी गोट्यांच्या घडाचे असते.). २. टोच; टोचणी; टोचा : ‘टचका बसताच कोणती जाणीव तरारून वर येईल याचा नेम नसतो.’ – पवा २०४. ३. बोटाने किंवा गोटीने हळूच मारलेली टिचकी, धक्का इत्यादी; टच आवाज होईल असा प्रहार. (क्रि. मारणे). ४. (खडकाळ रस्त्यातून जाताना) गाडीला बसलेला आचका, धक्का. ५. एकदम भळभळा स्त्राव (रक्त, पू, रस, अश्रू यांचा). ६. खटका. [ध्व. टच]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

टि(टिं)चणें

उक्रि. १ टिचकी मारणें. २ गोटी, कवडी इ॰ लक्ष्यावर नेम मारणें; वेधणें. ३ -अक्रि. तडा जाणें; फुटणें; तड- कणें (बांगडी, कांचसमान इ॰). ४ (ल.) (पैसे) भरणें; देणें.

दाते शब्दकोश

तिबावचे      

सक्रि.       बंदुकीचा नेम बरोबर लागतो की नाही हे बार उडवून पाहणे. (गो.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तिबावचें

क्रि. (गो.) बंदुकीचा नेम बरोबर लागतो कीं नाहीं हें बार उडवून पाहणें.

दाते शब्दकोश

टिचणे, टिंचणे      

उक्रि.       १. टिचकी मारणे. २. गोटी, कवडी इत्यादी लक्ष्यावर नेम मारणे; वेधणे. ३. (ल.) (पैसे) भरणे; देणे. [सं. तिज्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

टीप

स्त्री. १ कार बसविण्याकरितां घेतलेलीं जनावरें, झाडें इ॰ ची गणती, मोजणी. २ शिवण्याची एक तर्‍हा. (क्रि॰ भरणें). ३ सोडतींतील तिकिट. ४ गंजिफांच्या खेळांतील एक संज्ञा, तलफ इ॰ डाव दुसर्‍याकडून आला असतां एका पानाच्याऐवजीं दोन पानांनीं घेण्याचा प्रकार. ५ (सोनार) दागिन्यांच्या किंमतीचें, आकाराचें टिपण. ६ आंकडेवार नोंद; याद; यादी; बिल; हिशोब; फेरीस्त; टिपण; स्मरणपत्र; पैशाची हुंडी; वर्गणीची यादी. ७ पुस्तकांतील मुख्य भागाचें, पृष्ठाच्या खालीं केलेलें विशेष स्पष्टी- करण. ८ (कों.) गाडीचें छ्प्पर किंवा गाडीमध्यें जीवर बसतात ती गाडीची साटी. -न. ९ नेम; नियम. १० अश्रूंचा थेंब. १२ पीप; (ओतकाम) आमली पदार्थ तयार करण्याचें लांकडी पिंप. (वाप्र.) ॰जमणें, बसणें-बरहुकूम असणें, जुळणें; विरोध न येणें. ॰घालणें-विशिष्ट तर्‍हेची शिवण घालणें. (चांभार) जोडयाचा ढोपराजवळील भाग दोर्‍यानें शिवणें. ॰मारणें-(शिंपी) शिवण घालणें. टिपेस उतरणें-टिपणाबरोबर जमणें, असणें. सामा- शब्द-॰कर-नीस-पु-(कर बसविण्या साठीं) गांवांतील घरें, झाडें इ॰ ची मोजदाद करणारा अधिकारी. ॰गारी-स्त्री. (शिवणें) शिवण्याची एक तर्‍हा (क्रि॰ करणें). ॰दार-वि. व्यवस्थितपणें वागणूक करणारा. ॰दोरा-पु. दुहेरी टांका. याच्या उलट धांवता दोरा. टिपनीस-पु. सैन्याची मोजदाद ठेवणारा आणि जकातीचा अधिकारीहि असे. [टिपणें]

दाते शब्दकोश

टीप      

न.       नेम; नियम.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

टिपणे      

सक्रि.       १. गोळी, बाण, चेंडू इ.नी लक्ष्य वेधणे; नेम धरून मारणे; (लढाईत) एकटा निवडून काढून ठार मारणे. २. (खेळ) ईर्ष्येने पळून झाड, दगड, खेळगडी इ.स शिवणे, स्पर्श करणे. ३. नोंद करणे, घेणे (टिपण, यादी करणे; टाचण करणे) : ‘स्वारांची होणारी हालचाल बाजीरावांच्या कानांनी टिपली.’ – राऊ २६८. [सं. डिप्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

टिपणें

सक्रि. १ टिपण, यादी करणें; टांचण करणें. २ शाई, तेल इ॰ शोषून घेणें, वस्त्रानें पुसून काढणें. ३ धान्याचा एक एक दाणा वेंचून घेणें. ४ गोळी, बाण, चेंडू इ॰ नीं लक्ष्यं वेधणें; नेम धरून मारणें (लढाईंत) एकटा निवडून काढून ठार मारणें. ५ चुना इ॰ नें भिंत सारवणें. ६ (खेळ) ईर्षेनें पळून झाड, दगड, खेळगडी इ॰ स शिवणें, स्पर्श करणें. ७ मोजतांना स्पर्श करणें; लिहून ठेवणें. ८ शिवणें; दोरा घालणें; टांका घालणें. टिपकागद- पु. शाई टिपून, शोषून घेण्याचा एक प्रकारचा कागद.

दाते शब्दकोश

तिथिमास

तिथिमास tithimāsa m Determining of the auspicious lunar day and month (for a marriage or other rite). v पाह, नेम, ठरव, धर.

मोल्सवर्थ शब्दकोश

तोदा      

न.       (तिरंदाजाचे) नेम मारण्याचे स्थान; लक्ष्य; संधानबिंदू; निशाण.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तोदा

न. (तिंरदाजाचें) नेम मारण्याचें स्थान; लक्ष्य; संधानबिंदु; निशाण. [फा.]

दाते शब्दकोश

टोला      

पु.       १. दांड, काठी किंवा दगडाचा प्रहार; फटका; तडाखा; रट्टा; आघात; ठोका. २. विटेचा तुकडा; रोडा. ३. (ल.) कोपरखळी; छद्मी बोलणे; खोचदार भाषण. (क्रि. बसणे, देणे, मारणे.): ‘तसं पाहिलं तर ह्या माणसाचं असं काय मोठंसं कर्तृत्व होतं? टोला बसला.’ - रथचक्र १५४. (वा.) टोला खाणे - नापास होणे; यश न मिळणे; (परीक्षेत) अनुत्तीर्ण होणे : ‘आगरकरांनी मात्र एम.ए.च्या परीक्षेत टोला खाल्ला.’ - दुर्दम्य १०६. टोला बसणे - फटका बसणे. टोला लागणे - नेम लागणे : ‘परीक्षा सुरू होणार. टोला लागला तर सिक्सर नाही तर क्लीन बोल्ड अशी तयारी आहे.’ - लव्हाळी ३२.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

टप्पा, टपा      

पु.       नेम; गोळीचा धक्का.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तरजुमान, तर्जुमान

पु. १ भाषांतर कामावर नेम- लेला सरकारी अधिकारी; भाषांतर्‍या. २ दुभाषी; दुभाष्या. [अर. तर्जुमान]

दाते शब्दकोश

तुक्का, तुका      

पु.       १. पात्याऐवजी तोंडाशी गोळा असलेला बोथट बाण. २. (ल.) गुप्त निंदा; कावेबाजीचा फटका किंवा टोमणा; व्यंग्यार्थ; व्याजोक्ती. (क्रि. टाकणे, मारणे, ठेवणे). ३. आळ; आरोप. (वा.) तुका मारणे – १. नेम मारणे. २. महत्कृत्य करणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उडीद      

पु.       नेम धरण्यासाठी बंदुकीच्या नळीवर असलेली माशी. लहान उंचवटा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उडवणें-विणें

उक्रि. १ उडणें याचें प्रायोजक; उडणें पहा. २ दूर फेंकणें; अस्ताव्यस्त करणें; विस्कळित करणें; चारी दिशांस उधळून लावणें; पळवून लावणें. 'मुकुट शिरींच उडविला ।' -मोदोहारामायण ६९. ३ उधळपट्टी करणें; बेसुमार खर्च करणें. 'आपल्या नादीं लागून हवा तेवढा पैसा उडवील असें तिला वाटलें.' -विवि १०.५-७.१२३. ४ टाळणें; अव्हेरणें; सोडणें; टाकून देणें. ५ हेटाळणें; अव्हरे करणें; झिडकारणें. ६ चोरणें; लांबविणें; नाहीसें करणें. 'हातवह्या फिर्यादीनें उडविल्या.' -विक्षिप्त ३.९५. ७. मारणें; आघात करणें; 'निर्गुणास जन्म कल्पिला । अथवा निर्गुण उडविला ।।' -दा ९.३.२६. 'शत्रूवर नेम धरून सोजीर उडवितां येतील.' -इंप १५०. चाबूक उडविले.' चाबकाचे फटके मारणें. 'भटजीचें अंगावर चाबूक उडविलें' -इंप ८६. ८ चोरून नेणें; पळवून नेणें; 'तिला उडवून नेण्याचा प्रयत्न करणें ही गोष्ट श्लाध्य आहे.' -विवि १०.५-७.१२३. ९ आटोपणें; जलद काम करणें; त्वरित संपविणें 'लॅटिन भाषांतर विद्यार्थ्योस दिलें असतां तें जॉन्सननें कसें उडवून दिलें याविषयीं मागें संगितलेंच आहे.' -नि ६५६. १० फजीत करणें. 'नका आमची जास्त उडवूं' -चंद्रग्रहण. ४०. ११ काढून, हांकून लावणें. 'आपण स्वतः टोळीचा नायक होऊन तुम्हास उडवून देणारे नाहीं.' -कोरकि २७८. [सं. उद् + डी-डायय्-उड्डायन; प्रा. उड्डवण]

दाते शब्दकोश

उजवणे      

अक्रि.       १. विहित क्रमाप्रमाणे समाप्त होणे; पार पडणे; यथासांग तडीस जाणे (नेम, विधी, धर्मकृत्य); सफल होणे; सुपरिणाम होणे : ‘मग म्हणे गा प्रज्ञाकांता । उजवली आजि वक्तृत्वता ।’− ज्ञा १४·६३. २. विवाह होणे : ‘नुजवेचि कव्हणें बोलें । आंगा आठुवर पण आलें ।’− शिव २०८. [सं. उद्यापन]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उजवणें

अक्रि. १ विहित क्रमाप्रमाणें समाप्त होणें, पार- पडणें; यथासांग तडीस जाणें (नेम, विधि, धर्मकृत्य). सफल होणें; सुपरिणामी होणें. 'मग म्हणे गा प्रज्ञाकांता । उजवली आजि वक्तृ- त्वचा ।' -ज्ञा १४.६३.२. स्वतःचा विवाह इत्यादि संस्कार होणें, 'नुजवेचि कव्हणें बोलें । आंगा आठुवर पग आलें ।' -शिशु २०८. [सं.उद्यापन; प्रा. उज्जावण = उजवणें]

दाते शब्दकोश

उकाळ

पु.१ काढा. २ नेम चुकून फुकट गेलेला तोफेचा गोळा. [उकळणें]

दाते शब्दकोश

उकाळ      

पु.       नेम चुकून फुकट गेलेला तोफेचा गोळा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ऊंट

पु. १ उंट पहा. -वि. २ (ल.) लांबटांग्या; बारिकमान्या उंच व किरकोळ (माणूस). म्ह॰ ऊंट कोण्या कानीं बसेल कोण जाणें? = दुसर्‍याच्या संकटाला कोणी हंसूं नये (केव्हा हसणार्‍यावर आपत्ति कोसळेल याचा नेम नाहीं; कदाचित् ऊट = अडथळा या- वरून). [सं. उष्ट्र]

दाते शब्दकोश

विंधान

न. संधान; नेम; योजना. (क्रि॰ करणें; बांधणें; धरणें; लावणें). [सं. वेधन]

दाते शब्दकोश

वळवणी

न. वळवाचा पाऊस. वळवा पहा. 'आला पुर वळवणी वहालें । तळचें जळ तसेंच संख्या राहिलें । ' -प्रला १७२. [वळवा + पाणी] म्ह॰-वळवणी आलें आणि तळवणी घेऊन गेलें. वळवा-स्त्री. अव. १ (वारा-पाऊस पूर्वेंकडे जाऊन पुन्हां पश्चिमे- कडे वळतो यावरून) पावसाचीं पूर्वा ते स्वातीपर्यंतचीं नक्षत्रें. २ या नक्षत्रांचा पाऊस. [वळणें] वळवाचा पाऊस-पु. १ पूर्वेकडून येणारा पाऊस. २ (ल.) कोणीकडे वळेल, काय करील याचा नेम नसलेला माणूस; लहरी माणूस. वळीव, वळीव पाऊस-पुस्त्री. वळवाचा पाऊस.

दाते शब्दकोश

व(वं)सा-वोवसा

पु. १ (बायकी) स्वतः लावून घेतलेला नेम, व्रत. (क्रि॰ घेणें; होणें). २ (क.) वाण (संक्रातीचें); सुघड. [सं. उप + आस्-उपासना] वसा(सो)ळी- स्त्री. वसा पूजणारी, व्रत पाळणारी स्त्री.

दाते शब्दकोश

वोवसा

पु. वसा; व्रत; नेम. 'माझें अधिष्ठान घरीं । आणि वोवसें आनाचें करी ।' -ज्ञा ११.८१६; -दा ७.९.२३. [सं. उप + आस्; प्रा. उवास; म/?/ वसा] वोवसणें-व्रत घेणें; ओवसणें पहा. 'गौर वोवसली'. वोवसी-वि. वसा घेतलेला; व्रतस्थ. 'कां वाण धाडिजे घरा । वोवसीयाचे ।' -ज्ञा १७.२८६; -एभा २३.३१९.

दाते शब्दकोश

वर्शिली

स्त्री. (बे.) नेम; व्रत. [वर्ष]

दाते शब्दकोश

वतन

न. १ वंशपरंपरेची चाकरी, धंदा, अधिकार, नेम- णूक, उत्पन्न; उपजीविकेचे साधन. -गंगा १६. २ मालकीची जागा; जन्मभूमि; घर. ३ इनाम; बक्षीस. 'दिधलों गुरु प्रसाद- प्रभुनें पूर्वोक्तसद्गुणा वतन ।' -मोकर्ण २०. २९. ४ वंशपरंपरा हक्क (जमीन, वृत्ति इ॰ त). [अर. वतन् = जन्मभूमि, घर. तुल॰ सं. वर्तन = उदरनिर्वाह, वेतन] ॰गाडणें-एखाद्या जागीं मालकी, सत्ता असणें (नेहमीं नास्तिपक्षीं उपयोग). 'तूं नित्य येथें येऊनि बसतोस, काय येथें तुझें वतन गाडलें आहे.' ॰गाडलें- न. (गाडलेलें वतन) जुनी किंवा फार दिवस तांब्यात असलेली मिळकत. 'माझी वंशपरंपरा ह्या जागेवर नांदून वतनगाडलें आहे तें मी सोडणार नाहीं' ॰जप्ती-स्त्री. वतनी जमीन किंवा तीवरील उत्पन्नाची जप्ती. ॰दार-पु. वतन असलेला; वतन धारण करणारा. 'वतनदारांची वतनें वतनदारांच्या दुमाला केल्या विरहित पोट- तिडीक लागोन मुलूक मामूर होत नाहीं.' -रा १६.४४ (कायदा) वंशपरंपरेनें सरकारी काम करण्याचा हक्क असणारा इसम. 'तीर्थो- पाध्याय, मंदिरवालें, दरगेवाले, फिरस्ते, हुन्नरी व मनोरंजनाचा धंदा करणारे, भिकारचोरटे वगैरे वतनदार स्वतःला म्हणवितात. ...सर्व गांवकऱ्यांना मग ते कोणत्याहि धंद्यावर पोट चालावोत वतनदार ही सामान्य संज्ञा आहे.' -गांगा १५. [फा.] ॰दार- हिजडा-पु. हिजडा पहा. ॰दारी-दारकी-स्त्री. वतनाचा हक्क, मालकी; वतन असणें. ॰दारीकरी-पु. (वतनदार) (कों.) फार जुना शेतकरी. ॰पत्र-न. वतनाची सनद, दस्तऐवज. ॰बंधु-भाऊ-पु. १ वडिलोपार्जित मिळकतींत हक्क असणारा; भागीदार. २ सह-अधिकारी (वंशपरंपरागत); देशमुखबंधु. वतन- बहिण असाहि शब्द येतो. ॰वाडी-स्त्री. वतन, वतनी शेत, वाडी इ॰ (व्यापकपणें); जमीनजुमला; इस्टेट. 'वतनवाडी पाहून मुलगी देणें तर द्यावी.' वतनी-वि. १ वडलोपार्जित किंवा विकत घेतलेली (जमीन, मालमत्ता इ॰). २ वतनासंबंधी (दस्त- ऐवज, कागदपत्र, इ॰). ३ वतन आहे किंवा जन्म झाला तें (ठिकाण). वतनी मिळकत-स्त्री. (कायदा) वंशपरंपरेने सर- कारी काम करण्याच्या मेहनतान्याबद्दल मिळकत किंवा नफ्त नेमणूक.

दाते शब्दकोश

ऐरण      

स्त्री.       सोनार, लोहार वगैरेंचे एक हत्यार; घडकाम करण्याचे साधन. यावर धातूचे जिन्नस ठोकून त्याला पाहिजे तो आकार देतात. सामान्यतः ८ ते १० शेर वजनाचा व ५ इंच लांबी व रुंदीचा, वर रुंद व चौकोनी असून खाली निमुळता असलेला लोखंडी ठोकळा एका लाकडी लांबट ठोकळ्यात बसविलेला असतो. याला वरच्या बाजूला एक इंच जाडीचा पोलादी भाग असतो : ‘जैसे ऐरणीवरी घण । तैसे हाणिती उसणपण ॥’ − कथा १. १३·९८. [सं. अरणि, अघरिणी] (वा.) ऐरण देणे − एखाद्याला ‘ऐरणी दिव्य’ करायला लावणे. तापून लाल झालेली ऐरण मोकळ्या हातांनी उचलून काही पावले चालून दाखवणे. आपण गुन्हेगार नाही असे सिद्ध करण्यासाठी किंवा आपल्या एकाद्या हक्काच्या शाबितीसाठी अशा प्रकारचे दिव्य करून दाखविण्याची जुन्या काळी वहिवाट होती : ‘खून फरादिया केलियावरी हर दो नफरीं नेम केला जे सिषेस यैरण द्यावी. जो खरा होई तेणें खावी.’ − शिचसाखं २·११४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उठविणें, उठवणें

उक्रि. उठणें प्रयोजक. १ उचलणें; वर करणें; उच्च स्थितीला नेणें; उंच करणें; उभें करणें. २ जागृत करणें; जागें करणें; उठावयास लावणें. म्ह॰ निजलेल्याला कोणी उठ- वील, जाग्याला कोण उठवील? ३ चेतना देणें; प्रवृत्त करणें; क्षोभ- विणें; उठावणी करणें. ४ दुखावयास लावणें (डोकें). ५ (कंडी) पिकवणें; जाहीर करणें (बातमी, गोष्ट). ६ उत्पन्न करणें; काढणें. 'जे उठवी शब्दांकुर । वदे वैखरी अपार ।' -दा १.३.२. 'विचार न करतां वांधा उठवून... अडथळा आणूं नये.' -स्वारीनियम (बडोदें) ४७. ७ पार पाडणें; बजावणें. 'सूचना होतील त्याप्रमाणें नोकरी उठविण्याची आहे.' -स्वारीनियम (बडोदें). २४. ८ चोरणें; लांबविणें. 'चोरट्यांनीं स्वयंपाकाचीं दोन भांडी उठ- विलीं.' -विवि ८.११.२०८. ९ रक्कम कर्ज काढणें; उचल करणें; खर्च करणें. [सं. उत्थापन; प्रा. उठ्ठवण] घरांतून उठविणें- नादीं लावून पळविणें 'ह्या स्वतंत्र बायका केव्हां कोणच्या म्हातार्‍याला घरांतून उठवतील कांहीं नेम नाहीं. -बाय २.१. जन्मांतून उठ- विणें-आयुष्याचें मातेरें करणें (जर कर्मामुळें). 'माझ्या पोरीला अशी जन्मांतनं उठवलीन्.' -निचं १२५.

दाते शब्दकोश

ताळ

पु. १ संगीत, वाद्य, नृत्य इ॰ कांच्या गतीचें निय- मित कालदर्शक प्रमाण; ताल. ताल अर्थ १ पहा. 'ताळ जातो येकेकडे ।' -दावि २७१. २ टाळी वाजविण्याची क्रिया; टाळी. ३ कांशाचें एक वाद्य; एक प्रकरचा टाळ. 'खण खण खण खण ताळ उमाळे ।' -दावि ११२. ४ हालचाल; फडफड करणें; (कान इ॰) फडफडावणें. 'पाठीं निवृत्तिकर्णताळें । आहाळी ते पूजा विधुळे ।' -ज्ञा १७.७. ५ (हिशेब, हकीगत इ॰ तील) मेळ; जुळणी; एक- वाक्यता; (बोलणें, वागणें, करणें इ॰ कांतील) सुसंबद्धपणा; विरो- धाभाव; घरबंद; मेळ (बहुधां निषेधार्थी प्रयोग). 'ऐसें कळों आलें मज नारायणा । जागृती स्वपना ताळ नाहीं ।' -तुगा ९०६. ६ (व्यापक.) (पदार्थ, वस्तू, शरीरावयव इ॰ कांचा) एकजीव; एकजिनसीपणा; मिलाफ; संयोग; एकत्र टिकाव धरून राहण्याची शक्ति. (क्रि॰ असणें; धरणें; टाकणें; सोडणें). [सं. ताल] (वाप्र.) ॰देणें-१ एखादा गात असतांना त्याचा ठेका धरणें. २ (ल.) (एखाद्याची) री ओढणें; त्याला अनुसरणें, मदत करणें. -शर. ॰सोडणें-मर्यादा; धरबंद सोडणें; बेफामपणें वागणें. सामाशब्द- ॰तंत, ॰तंत्र, (क्व.) ताळातंत्र-पुन. (भाषण, वर्तन, आचार इ॰ व्यवहारांतील) मेळ; मिळतेपणा; एकवाक्यता; सुसं- गतपणा; नेम; परस्परसंगति. [ताळ + तंत. तंत्र] ॰पत्र-न. ताल हें वाद्य; टाळ. 'ताळपत्रांचा निर्घोष । गीत गायन करिती सुरस ।' -मुरंशु ३९. ॰मेळ-पु. १ ताळतेत. २ तानमान; देश, काल इ॰काचा सुयोग, अनुसंधान. [ताळ + मेळ = मिलाफ, जुळणी] ॰विताळ- क्रिवि. सुर-बेसूर. -शर. ॰वेळ-पु. तानमान; प्रसंग; परिस्थिति; काळवेळ. ताळमेळ अर्थ २ पहा. 'ताळवेळ तानमानें । प्रबंध कवित्व जाडवचनें ।' -दा ११.६. ८. [ताळ + वेळ]

दाते शब्दकोश

प्रेम (निंदा)

अंगचोर माया, प्रेमाचे नाटक, भावनांची उधळपट्टी, वेळमारू प्रेम, प्रेमाचा पुळका, हें असलें जंगी वात्सल्य, हृदय पिघळले जीभहि, चंद्रमौळी प्रेम, ढिसूळ प्रेम, विवेकबुद्धीची कबर, सोनेरी मृगजळ, वाळूचा किल्ला, हृदयाची एक व्यथा, गुलाबी गफलत, दाहक सुख, मधाळ हलाहल, तारुण्याची गुंगी, यौवनोन्माद, भावविश्वाला हादरणारी भूचाल, विकारसर्पाचा विळखा, १०० टक्के तोट्याचा व्यापार ! विस्तवाशीं खेळ, टोपलीभर त्यागाचे गुंजभर अत्तर, कटिशूळाचें सभ्य नांव, ही इंगळाची नांगी, अविचारांचें बंड, दांड विकारानें मांडलेला उच्छाद, मनाची केंद, वासनांचा चक्रव्यूह, प्रेम म्हणजे प्लेगची गांठ.
मनाचा अति चोरटा व्यापार साक्षात् मूर्खपणाला दुसरें नांव प्रेम। इष्काचा प्याला जहरी असतो, बाह्यांगाची पूजा, मनुष्य प्रेमांत आला की बुद्धीचें दिवाळें वाजलेंच समजा, प्रेम आंधळे असरते, आसुरी विकाराचें तांडव नृत्य, गलिच्छ हेतूला स्वच्छ नांव प्रेम, चावट भानगडी, नाकासमोर चालूनहि जेथे सरळ वाट सांपडत नाहीं तो प्रेमाचा प्रदेश ! अश्रूंविना प्रेम नाहीं, प्रेमांत पेरूं तितकें पिकत नाहीं, प्रेमाच्या या उभ्या कणसांवर केव्हां कीड पडेल नेम नाहीं, जगण्यासारखें फार असून ज्यामुळें जिणें सोसत नाही तें प्रेम, भासाचें नाजूक सुख, आनंदाचें स्वप्नचित्र, केवळ कामज्वर , डोळस आंधळेपण.

शब्दकौमुदी

उडवणे, उडविणे      

उक्रि. १. उडणे याचे प्रयोजक. पहा : उडणे २. दूर फेकणे; अस्ताव्यस्त करणे;विस्कळीत करणे; चारी दिशांना उधळून लावणे; पळवून लावणे : ‘मुकूट शिरींचा उडविला ।’ -मोदोहारामायण ६९. ३. उधळपट्टी करणे; बेसुमार खर्च करणे : ‘आपल्या नादीं लागून हवा तेवढा पैसा उडवील असें तिला वाटलें.’ -विवि १०·५-७·१२३. ४. टाळणे; अव्हेरणे; सोडणे; टाकून देणे. ५. हेटाळणे; अव्हेर करणे; झिडकारणे. ६. चोरणे; लांबविणे; नाहीसे करणे : ‘हातवह्या फिर्यादीने उडविल्या.’ -विक्षिप्त ३·९५. ७. मारणे (फटके इ.); आघात करणे : ‘निर्गुणास जन्म कल्पिला । अथवा निर्गुण उडविला ॥’- दास ९·३·२६. चाबूक उडवणे; चाबकाचे फटके मारणे. ८. चोरून नेणे; पळवून नेणे : ‘तिला उडवून नेण्याचा प्रयत्न करणे ही गोष्ट श्लाघ्य आहे.’ -विवि १०·५.-७·१२३. ९. आटोपणे; जलद काम करणे; त्वरित संपवणे : ‘लॅटिन भाषांतर विद्यार्थ्यास दिले असतां ते जॉन्सनने कसें उडवून दिले याविषयीं मागे सांगितलेंच आहे.’ -निमा ६५६. १०. फजीत करणे : ‘नका आमची जास्त उडवू.’ -चंद्रग्रहण ४०. ११. पदभ्रष्ट करणे; काढून, हाकून लावणे : ‘आपण स्वतः टोळीचा नायक होऊन तुम्हांस उडवून देणार नाहीं.’ -कोरकि २७८. १२. स्फोट करणे; उडविणे (शोभेची व सुरुंगाची दारू इ.) १३. नष्ट करणे; ठार मारणे : ‘शत्रूवर नेम धरून सोजीर उडवितां येतील.’ -इंप १५०. [सं. उड्डायन] (वा.) उडवून घेणे -भिल्ल जमातीतील वाङ्‌निश्चयानंतरचा एक विधी. या विधीत नवरानवरीला एका कमरेइतक्या उंच धरलेल्या अधांतरी फळीवर बसवून गाणे गात तालावर वर उडवतात व पुन्हा फळीवर झेलतात. उडवून देणे,उडवूनलावणे १. ठार मारणे : ‘पहारेकऱ्यांना आणि शिपाईबंदीला उडवून दिले की…’ -केस्व ४८. २. दुर्लक्ष करणे; हेटाळणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

मान

पु. १ आदर; मुरवत; पूज्यबुद्धि; सत्कार; गणना. 'एथ आलेआं तुमचा मानु किती । वाढीन्निला ।' -शिशु १८१. २ तोरा; दिमाख; स्वतःचा किंवा स्वतःसंबंधी माणसें, वस्तु, देह इ॰ कांचा अभिमान; अहंता. 'जया पुरुषांचें कां मन । सांडोनि गेलें नोह मान ।' -ज्ञा १५.२८५. ३ (औषधाचा) गुण; आराम. 'वैद्याच्या औषधानें मान वाटतों कां कांही ?' ४ अधि- कार; हक्क; इलाखा; सत्ता. 'लग्नामध्यें उपाध्यायाचा वस्त्र घेण्याचा मान आहे.' ५ कामगिरी; प्रतिष्ठा; अधिकार. 'नाहीं-होय म्हणण्याचा मान सासूबाईकडे आहे.' ६ परिमिति; परिमाण; इयत्ता; माप (पदार्थाची लांबीरुंदी, महत्त्व, संख्या यांचें अथवा काल, देश, गुण याचें). 'मज अमेया मान ।' -ज्ञा ९.१५९. ७ ज्याच्या योगानें एखादें परिमाण निश्चित करितात तें; वजन, लांबी, अवकाश, वेळ इ॰ कांचें कोणतेहिं माप. 'मास म्हणून कालाचें एक मान आहे.' ८ आधार; प्रमाण; गमक. ९ प्रमाण; तुल्यता; 'अव्हेरिलें कवणें मानें ।' -ज्ञा १.९२. १० रीत; रिवाज; चाल. 'नाना क्षीरापति मान पद्धति ।' -सप्र २०.३७. ११ -न. परि- स्थिति 'पण तेच आंटनीनें आपल्या करुणरसभरित भाषणास प्रारंभ करतांच सगळें मान एकदम फिरून गेलें. -नि. १२ वयोमर्यादा; जगण्याची सीमा. 'हल्ली ५० किंवा ६० हेंच आयुष्याचें मान झालें.' -टि ४.१४०. १३ (महानु.) वृत्तांत. 'ऐसें मान आइकौनि ।' -धवळेपू २३. १४ नेम; टीप; निश्चय (काल, स्थल, कर्ता, सुमार यासंबंधीं). 'पर्जन्य केव्हां कोठें किती काय कसा पढेल ह्याचें मान कोण्हाचें हातीं लागत नाहीं.' १५ युक्तता; वाजवीपणा; औचित्य; जरूरी. 'राजा दुष्ट झाला. आतां एथें राहण्याचें मान राहिलें नाहीं.' १६ मोठेपणाची, महत्त्वाची पदवी; उंची; सुमार; मजल; पायरी. 'त्या गृहस्थाचें अलीकडें मान चढलें आहे.' १७ दर; योग्यता; उच्चता; किंमत. 'गाड्याचें, भाड्याचें, धान्याचें, गुळाचें मान चढलें-वाढलें-उतरलें-बसलें-फिरलें- उलटलें-बदललें.' [सं. मा = मापणें] म्ह॰ १ मानो हि महंता धनं । २ मानें न खाई पानें पडपडल्या खाई कांदे = कांदे खाण्यांत आनंद पावण्याइतक्या नीच स्थितीस आलेल्या गर्विष्ठ माणसासंबंधीं योज- तात. ३ मान जना, अपमान मना (सांगावा); मान सांगावा जना; अपमान सांगावा मना. (वाप्र) मानावर जाणें-क्रि. (खा.) इष्ट देवतेस नवस फेडणें. साधितशब्द- मानाचा- वि. मानाचा हक्क असणारा. जसें-मानाचा धनी-पाटील-देशमुख- देशपांड्या इ॰. मानकरी पहा. मानाचा तुकडा-पु. क्षुद्र देणगी, पदवी. 'ते देतील तेवढाच भाकरीचा किंवा मानाचा तुकडा घेऊन...' -टि २.५४. मानाचें पान-न. द्रव्यदृष्ट्या अल्प मोलाची परंतु जिच्या योगानें मान दिला जातो अशी कोणतीहि देणगी, सत्ता अथवा मालमत्तेची बाब. म्ह॰ मानाचें पान गोड. सामाशब्द- ॰करी-पु. १ (अधिकार, नातें, गुण इ॰कामुळें) दरबार, सभा, लग्न, उत्सव, ग्रामसभा इ॰ ठिकाणीं विशिष्ठ मान व नजराणा घेण्याचा हक्क असलेला मनुष्य; आदरणीय, माननीय मनुष्य. २ राजा-राणीचे आप्तेष्ट; यांस काहीं नेमणूक असतें. (गो.) मानकर. ॰कीन-धनी-पु. (व घाटी.) मानाचा मनुष्य. ॰खंडना-स्त्री. अनादर; अपमान; अवमान करणें. [सं. मान + खंडना] ॰णूक-स्त्री. १ नवस; देव, ईश्वर, पिशाच यांच्या पुढें घेतलेली शपथ. २ मानपान. [मानणें] ॰धन-न. मानरूपी धन. -वि. मान (दिमाख, ताठा) हेंच ज्याचें धन आहे असा; मानी. [मान + धन] ॰नीय-वि. पूज्य; मान्य; विश्वासार्ह; मान देण्यास, विश्वास ठेवण्यास, मान्य करण्यास योग्य. (व.) मानधरी. ॰पट्टी-स्त्री. प्रमाण मोजण्याची पट्टी; स्केलपट्टी. ॰पत्र-न. मान्यता करणारा लेख. [सं.]॰पान-पु. १ मानकऱ्याचे हक्क; लग्न, मुंज इ॰ प्रसंगी मानकऱ्यास दिलेले मान व नजराणें; आदर- सत्कार. २ गांवच्या पिढीजाद अधिकाऱ्याचे हक्क. ३ एखाद्या कामाचें संबंधीं अधिकार व हक्क. [मान + पान; मान द्वि.] ॰बरळे- वि. (महानु.) गर्वानें (वाटेल तें) बरळणारें. 'तंव रतिरसिकां भणि तलें । आंवो आंवो मानबरळें ।' -शिशु २१८. ॰भंग-पु. १ अना- दरानें, अपमानानें वागविणें. २ अपमान; परिभव; मानहानि. [सं. मान + भंग] ॰मरातब-पु. आदरसत्कार. ॰मर्यादा-स्त्री. आदर; मान्यता भीड; मुरवत. (क्रि॰ ठेवणें; राखणें). ॰मान्यता-स्त्री. १ (पदवी, विद्या इ॰ असलेल्या मनुष्याचा) वाजवी मानसन्मान, आदर उपचार करणें.' त्या दरबारांत त्याची मानमान्यता मोठी आहे.' २ सन्मान्यपणा; मान वंदन कर- ण्याची पात्रता. [मान + मान्यता] ॰म्हातारी-स्त्री. प्रौढ स्त्री; वागणुकीचें व गांभीर्याचें अनुकरण करणारी लहान मुलगी; लहानगी आजीबाई. [महान् + म्हातारी] ॰वती-स्त्री. १ स्त्री. २ (नाट्य) आपल्या प्रियकरावर रुसलेली कामिनी; मानिनी. -वि. मान- वत म्हणून एक पेठ आहे. तेथें तयार झालेलें (पागोटें इ॰). [सं.] ॰वस्त्र-न. सन्मानार्थ दिलेलें वस्त्र. 'वोपिलें पताका मानवस्त्रे ।' -दावि ४७४. ॰वाईक-वि. (व.) मान देण्यास योग्य; मानकरी. ॰हानि-स्त्री. अपमान, मानभंग. [सं. मान + हानि] मानार्ह-वि. मान देण्यास योग्य. [सं.] मानणें-सक्रि. १ आज्ञा पाळणें; पूज्य समजणें. २ विश्वास ठेवणें; भरंवसा धरणें; मान्य करणें; कबूल करणें; खरें, बरोबर आहे असें धरणें.' तूं जरी हें ऐसें मानसी । तरी खेदु कां करिसी ।' -ज्ञा २.१६२. ३ गृहीत धरणें; लेखणें; भावणें; गणणें. 'विष्णु व शिव निराळा असें मानीत नाहींत.' ४ किंमत बाळगणें; मोजणें; विचारणें; महत्त्वाचें गणणें. ' ज्याचा एकदां पराजय झाला च्यास कोण्ही मानत नाहीं.' ५ मानवणें; सुखावह होणें; आरोग्यदायक पथ्यकारक असणें (हवा, पाणी, अन्न इ॰). 'येथील पाणी मला मानतें.' ६ मर्जीस येणें; आवडणें; रूचणें. 'माझें मनास जे मानील तें करीन.' ७ वाटणें; आवडणें. 'हा मन मानेल तेंच करील.' ८ नवस करणें. [सं. मन् = विचार करणें; प्रा. मण्ण; पं. मन्नणा; सिं मनणु; गु. मानवुं; हिं. मानना] म्ह॰ मानला तर देव नाहींतर धोंडा = मूर्तीपूजक लोक दगडाच्या इ॰ मूर्तींना दोवाप्रमाणें भजतात. तदितर लोक मूर्तींना कांहींच मान देत नाहींत. यावरून मान हा दुसऱ्यानीं करावा तेव्हांच होतो. नाही तर तो होत नाहीं. मानवणें-अक्रि. १ कबूली, परवानगी, रुकार ह्याकरिता मान हालविणें; पटणें; कबूल होणें. २ संतुष्ट होणें. 'म्हणौनि मानवले सारंगपाणी.' -धवळेपू ४९. ३ अनुभवास येणें. 'ऐसें एकत्वें मानवे ।' -ज्ञा ९.२४७. ४ मान देणें. ५ सोसणें (हवा, पाणी). मानवली-स्त्री. (व.) देवीच्या नवसाची सुवासिनी. मानविणें-सक्रि. मन वळविणें (रुकार देण्यास, मान्य करण्यास, आवडण्यास). 'लग्न करण्या- विषयीं त्याचें मन मानवा.' या अर्थी ह्या क्रियापदाचा बहुधा मन शब्दाशीं प्रयोग होतो. -अक्रि. रुचणें; आवडणें; मान्य होणें. 'आजची कथा आम्हास मानविली.' [मानणें] मानवणी, मानवीण-स्त्री. १ (लग्न, श्राद्ध इ॰ प्रसंगी) मृत सुवासिनी स्त्रीची प्रतिनिधीभूत मानलेली सुवासिनी. 'मानवणीच्या सुवा- सिनी किती आहेत?' -ऐरापु ४४१. २ (व.) मृत सव- तीच्या नावानें देव्हाऱ्यांत बसविलेली प्रतिमा, टाक. ३ एक क्षुद्र देवता. 'बाळा बगुळा मानविणी ।' -दा ४.५.१६. [मानणें = गृहीत धरणें] मानाविणें-सक्रि. (काव्य) मान देणे; आदर करणें; सन्मान राखणें. 'मानावया जगा व्हावी द्रव्यमाया । नाहीं ते माझिया जिवा चाड ।' मानि(नी) जणें-१ पर्वा करणें. 'दुर्वार वाडवशिखेस न मानिजेलें ।' -र ३९. २ मानिलें जाणें. 'मानीजेसी थोर थोरी नाहीं ।' तुगा १०८. मानित-वि. मान दिलेला; आदरिलेला; आज्ञा पाळलेला; सन्मान केलेला. [सं.] ॰मानिनी-स्त्री. (नाट्य) १ आपल्या प्रियकरावर रागावलेली, मानी स्त्री. मानवती पहा. 'ते साचचि धर्माची मानिनी ।' -एभा १.२०९. २ स्त्री. [सं.] मानिया-पु. मानी पुरुष. 'कां मानिया निस्तेजा । निकृष्टास्तव ।' -ज्ञा १६.१७५. [मान] मानी-वि. १ गर्विष्ठ; ताठेबाज; चढेल. २ दुराग्रही; हट्टी. 'जो मानी म्हणतो यमपुरपथहित सामपथ नका माते ।' -मोभीष्म ७.४१. ३ तेजस्वी; उदार; थोर मनाचा. [सं.] मानीव-वि. मानलेला. मानेच्छु, मानेपाष्टी-वि. मान, आदर इ॰ इच्छिणारा; योग्य मानाविषयीं आग्रह धरणारा; मानासाठीं हपापलेला. [सं.] मान्य-वि. १ आदरार्ह; पूज्य; मानमान्यतेला, योग्यतेला योग्य. 'विद्या भोगसुकीर्तिदायक पहा ते मान्य मान्यासही ।' २ प्रशस्त; अभिमत; अनुमत; पसंत. 'शास्त्रीबुवांची ही स्पष्टोक्ति माधवरावांना मान्य झाली.' ३ तयार; कबूल; राजी. [सं.] मान्य करणें-कबूल करणें; न्याय्य, बरोबर, खरें मानणें. (प्रश्न, सूचना) मान्य होणें- प्रश्न, सूचना ह्यांस संस्थेच्या नियमांत अवश्य असलेलें बहुमत मिळणें. -सभा ७३. मान्यपूजन-न. मानास पात्र असलेल्यांचा सन्मान करणें. मान्यता-स्त्री. १ आज्ञा पाळणें. २ विश्वास ठेवणें. ३ मान; आदर; मुरवत. 'ज्यासि अग्रपूजेची मान्यता ।' -एभा १०.६१३. ४ भारदस्तपणा; पत; योग्यता (मान, आदर, समाचार याविषयींची). ५ कबुली; अनुमति; संमति. [सं.]

दाते शब्दकोश

राय

पु. राजा; नृप. राव पहा. 'ऐसें सांगोनि रायासी ।' -एरुस्व ६.४७. [सं. राजा; प्रा. राआ-या; हिं. गुज. राय] सामाशब्द- ॰आवळी-आवळा-स्त्रीपु. राय आंवळयाचें झाड व त्याचें फळ. ह्यास हरपररेवडी असेंहि म्हणतात. ॰कुरा-री- पु. स्त्री. एक कोंकणी झाड. डाक घेऊन जाणारे शिपाई रात्रीच्या वेळी ह्याच्या लांकडाचा दिवटीसारखा उपयोग करतात. ॰केळ- स्त्रीन. केळीची एक जात व तिचें फळ, हें तांबड्या जातीच्या केळ्यासारखें असतें. [दे.] ॰गिडगिडी-स्त्री. (महानु.) लहान नगारा. 'रायगिडागिडी बोबाडिआं ।' -शिशु १०५३. ॰घणस- पु. सर्पाची एक जात. -प्राणिमो ७०. ॰घोळ-स्त्री. एक प्रका- रची भाजी. ॰धडक-पु. (महानु.) घाय; धाव. 'मग रायधडक निशान लागला ।' -संत राजी. रु १३.५. ॰पण-न. राजेपणा. 'स्वप्नीचेनि जै अवतरे । रायपणें ।' -ज्ञा १५.३४०. ॰पुरी-वि. रायपूर शहरासंबंधीं (साखर, लुगडें, खण इ॰) -पु. (सांकेतिक) भामट्या. ॰बोर-स्त्री. न. एक वृक्ष व त्याचें फळ. ॰भुलावण- स्त्री. राजास भुलवणारी किंवा मोह घालणारी स्त्री; सुंदर व मोहक स्त्री. ॰भोग-पु. तांदुळाची एक जात. -वि. राजानें खाण्या- जोगा; उत्तम (पदार्थ). [सं. राज + भोग] ॰माड-पु. १ (कों.) ज्यापासून माडी काढतात तें माडाचें झाड. २ सरकारी हक्काचा माड. ॰मुनी-स्त्री. एक फुलझाड व त्याचें फूल. ॰राजेंद्र-पु. (पोवाडे काव्य) राजाच्या एखाद्या प्रधानाची पदवी. ॰विनोदी- वि. बहुरूपी व माकडचेष्टा करणारा; मस्कर्‍या; नकल्या; माधवी. 'दंडीगाणें टेहलकरी । रायविनोदी ।' -दावि ४७४. ॰शेवती- स्त्री. एक फुलझाड; शेवतीचा एक प्रका. ॰स्थळ-न. राजधानी. 'पू्र्वकालच्या राजधान्या अशाच किल्ल्यावर करीत. नाहींतर मैदानांतलें रायस्थळ शत्रु केव्हां येऊन लुटून नेईल याचा नेम नसे.' -के ९.२.३७. राया-पु. डौलानें बोलतांना फांकडे, फंदी, अफीणबाज इ॰ कांनीं स्वत:स लावलेली ऐश्वर्याची व वैभवाची पदवी. [सं. राज् = प्रकाशणें; राय] (वाप्र.) रायाप्पा नाइ- काचा फराळ करणें-थंडा फराळ करणें; फक्त पाणी पिणें.

दाते शब्दकोश

वेध

पु. १ मोती, माणिक इ॰ ना भोंक पाडण्याची क्रिया, छिद्र करण्याची क्रिया. २ छिद्र; भोंक; वेज. ३ भेद; दृष्टि, बाण, गोळी इ॰ नीं एखाद्या लक्ष्यावर केलेलां परिणाम; लक्ष्य पदार्था- वर झालेला परिणाम. ४ सूर्यग्रहणाच्या पूर्वी चार प्रहर आणि चंद्रग्रहणाच्या पूर्वी तीन प्रहर अशी धर्मशास्त्राप्रमाणें असलेली ग्रहणसंबंधीं दोषाची व्याप्ति. या कालांत भोजन इ॰ निषिद्ध आहे. ५ (ज्यो.) खस्थ पदार्थांचें क्षितिजापासून किंवा खस्वस्तिका- पासून असलेलें कोनात्मक आणि कालात्मक अंतर. ६ मुख्य तिथिनक्षत्राचा दुसर्‍या तिथिनक्षत्राच्या त्या दिवशीं सकाळीं किंवा संध्याकाळीं असणार्‍या अंशात्मक भागानें येणारा गुणदोष- प्रयोजक संबंध. 'आज मंगळवारी दशमी तीन घटिका आणि एकादशी पडली सत्तावन घटिका म्हणून ह्या एकादशीला दशमीचा वेध आहे.' ७ सप्तशलाकादि चक्राचे ठायीं एकशलाकादिगत जीं नक्षत्रादिक असतात त्यांतून एकीकडचे नक्षत्रांदिकांवर जो कोणीं ग्रह असतो त्याचा दुसरीकडचे नक्षत्रादिकांवर जो दृष्टिपात असतो तो. एका नक्षत्रानें दुसर्‍यासमोर येण्यानें होणारा परिणाम. (एक वस्तु दुसर्‍या समोर अगदीं समरेघेंत आली असली म्हणजे तें अशुभ मानतात. यामुळें घराचा दरवाजा व दिंडीदरवाजा हे समोरा समोर नसतात, किंवा एक खिडकी दुसरीच्या समोर नसते). (यावरून पुढील अर्थ). ८ अटकाव; अडचण; विरोध; उपसर्ग; पाय- बंद; अडथळा. जातो खरा पण वेध न आला म्हणजे बरा.' ९ एखाद्यावर असलेल्या कार्याच्या भारामुळें, काळजी-यातनामुळें त्याला स्वतंत्रपणें वागतां न येणें. 'प्रपंचाचा वेध ज्याच्या पाठी- मागें आहे त्याला खेळ-तमाशे कोठून सुचतील ?' १० चाल लेल्या कामांत अडथळा आल्यानें झालेला खोळंबा.' माझ्या कामांत वेध आला.' ११ काळजी; निकड; चिंता; घोर; पुढें करावयाच्या गोष्टीचें आधीं लागलेलें व्यवधान. 'ह्या कामाचा मला वेध असा लागला कीं रात्रीं मला झोंप आली नाहीं.' १२ ध्यास; छंद; नाद; आकर्षण; चटका; ओढा.' जडें पाटीं धावैती वेधें । आनंदे ढुलति चतुष्पदें ।' -ऋ ३६. -ज्ञा १३.४१०. -एरुस्व ६.५. -तुगा ११७. १३ तळें, विहीर इ॰चा खोलपणा. १४ प्रवेश; शिरकाव. 'एक एकासीं होय वेध । परि प्राप्तीविण नव्हे बोध ।' १५ नेम (बाण इ॰ चा). १६ सूक्ष्म, लक्ष- पूर्वक अवलोकन; ठाव घेणें. १७ चित्ताकर्षकपणा. 'वेधे परि- मळाचें वीक मोडे । जयाचेनि ।' -ज्ञा ६.१५.१८ चिंतन. -ज्ञा १८.९६१. [सं. विध् = छिद्र पाडणें] ॰घेणें-करणें-दुर्बीण इ॰ साधनांनीं खस्थपदार्थाची स्थिति, गति, इ॰ मापणें किंवा ठरविणें, अवलोकन करणें.

दाते शब्दकोश

जाग

पु. (कों.) १ (कुण.) मृताच्या दहाव्या किंवा बाराव्या रात्रीं केलेलें जाग्रण. अंगात येऊन आपल्या मरणाचें कारण सांगावें, पुरलेल्या पैशाची जागा दाखवावी किंवा आपल्या गुप्त गोष्टी सांगाव्या म्हणून त्याच्या कुटुंबातील माणसें जाग्रण करितात; यावेळीं चार देवझाडें मिळवून वाद्यादि पूर्वक समारंभ करतात. -स्त्री. १ जागृतावस्था; जागरण. (क्रि॰ होणें येणे). २ (राजा.) हालचाल; गडबड, गजबज. (घर, खेडेगांव यांतील) ३ गर्दी; गोंगाट (दाट वस्तींतील, जत्रेंतील). ४ कोण- त्याहि प्राण्याची एखाद्या जागेंतील सतत वस्ति; पाहरा; वचक बसण्याजोगें अस्तित्व. 'त्या रानांत वाघाची जाग होती म्हणून गुरें जात नसत.' 'घरांत मांजराची जाग असली म्हणजे उंदरांचा उपद्रव होत नाहीं.' ५ वस्ती.' यवतेश्वराच्या डोंगरावर मनुष्याची जाग असल्यामुळें तो डोंगर न चढतां..' -स्वप ३६४. ६ (गो.) चाहूल. [सं. जागृ] सामाशब्द- ॰माग-स्त्री. जाग अर्थ ४ पहा. जागणा-वि. जागा; जागृत. जागता-वि. १ जागरूक; सावध; दक्ष २ शक्ति, गुण आणि सामर्थ्य यांनीं युक्त; तात्काल फलदायी; उपासकाला पावणारी (देवाची मूर्ति, मंत्र-तंत्र, औषध).'या गांवचा देव असा जागता आहे कीं, तत्काल धावण्यास पोंचतो.' मंत्र जागता असला तर तत्काल विष उतरेल.' ३ तजेलदार; तेजस्वी; टवटवी असणारा; ज्याची सुधारणा आणि रक्षण काळजीपूर्वक होतें असा; संस्कृतिसंपन्न; सुस्थितीनें युक्त (धर्म, विधि, चाल) ४ तरतरीत. जोमदार (मन, बुद्धि इ॰). ५ ताजेंतवानें; न गंजलेलें; मलिन नसलेलें (मिळविलेलें ज्ञान) ६ लोकांच्या डोळ्यांपुढें असणारा व ज्याची लोकांना नेहमीं आठवण होते असा; अविस्मृत (मेलागेला माणूस, गोष्ट, प्रसंग). जागती जोत-स्त्री. जागता अर्थ २ पहा. कडक; सामर्थ्यानें युक्त अशी देवी, देव, मंत्र, औषध; सद्यः परिणामी, तात्काल फलदायी गोष्ट; खडखडीत दैवत; रामबाण औषध, (पुष्कळ देवस्थानांतून कांहीं विशिष्ट प्रसंगीं मूर्तीच्या अंगांतून ज्योत बाहेर पडते व म्हणून देवत्व नष्ट झालें नसून अद्याप आहे असें मानतात). 'जागती जोती काढिली हनुमान रूपें ।' -सप्र ३४२ [जागती + चाहूल लागतांच जाग येते अशी झोंप. २ डुलक्या घेणें; पेंगणें. ॰भाषा- स्त्री प्रचलित भाषा; जिवंत भाषा. 'संस्कृत जागती भाषा नाहीं. जागणें-अक्रि. १ जागृत राहणें; सावध राहणें; लक्ष ठेवणें. २ निजून उठणें; जागें होणें, असणें; झोंप न घेणें, टाकून देणें. 'सूर्य देखोनि उदयाचळीं । जागिन्नले समस्त ।' -मुआदि २९.१३०. ३ पाहरा करणें; सावधगिरी ठेवणें ४ लक्ष देणें; दख्खल ठेवणें; काळजी घेणें (धंदा, नोकरी, इनाम, शपथ, वचन यांची) 'त्यानें वचन दिलें होतें पण त्यास तो जागला नाहीं' ५ ताजें असणें; म्हटल्यावेळीं तयार असणें; आठवणें; कायम राहणें स्मरणें (अभ्यासिलेलें शास्र इ॰). 'व्यासंगानें श्रुत जागे । -लेलेशास्त्री म्ह॰ १ सारी रात्र जागली आणि शेगावांगीं रांधलीं = व्यर्थ श्रम आणि प्रयत्न २ जागेल त्याची वांठ आणि निजेल त्याला टोणगा. [सं जाग्रु-जागरण] जागर-रण-पुन. १ जागेपणा जागृता- वस्था. 'पोरांचे गडबडीमुळें रात्रीस चारी प्रहर जागर पडला.' २ निद्रा संयमन; देखरेख पाहरा. ३ पोवती (नारळी, श्रावणशुद्ध) पौर्णिमा. ४ देवतेच्या उद्देशानें विवक्षित कालपर्यंत जागण्याचा प्रकार. 'नवरात्रामध्यें देवाजवळ कथा करून मध्यरात्रपर्यंत प्रतिदिनीं जागर करितों.' ५ (गो.) पुरातन कालचें नाटक. ६ पुनरावृत्ति; उजळणी करणें; नवें, ताजें करणें (वेदघोषानें मंत्र). 'मंत्रजागर' [सं. जागृ] ॰घालणें-(माण.) खंडोबाच्या नांवानें वाघ्यामुरळ्या आणून त्यांची पूजा करून त्याना जेवा- वयाला घालून नाचविणें. जागरा-वि. १ भारी जागणारा. २ जागा राहणारा; दक्ष; सावध. जागरूक-वि. १ जागता पहा. २ स्पष्ट; उघड; टिकाऊ. तोंडावर फेंकता येण्याजोगा (पुरावा). ३ जागरणशील. जागरें-न. जागृति; जागेपण. 'नीद मारूनि जागरें । नांदिजे जेंवि ।' -अमृ ४.१. जागल-स्त्री. १ पहारा; राखण; सावधानता. २ पहारेकर्‍याचा पगार. ३ जागरण; जागृ- तावस्था. 'मला रात्रीं जागल घडली.' जागलकी-स्त्री. जाग- ल्याबद्दलची मजुरी; राखणावळ. 'गांवांत घोडें, गाडी मुक्का- माला रात्रीं राहिली तर महार जागले अर्धा आणा जागलकी घेतात.' -गंगा ९७. जागल्या-ळ्या-पु. पहारेकरी; रखवाल- दार; प्रवाश्यांच्या सामानावर पाहरा करणारा खेड्यांतील महार; रामोशी. जागव(वि)णें-उक्रि. १ जागें, जागृत करणें, ठेवणें; जागें राहून काळ काढणें. २ पहारा करणें; नजर ठेवणें, ३ (सामा.) राखणें; पाळणें; ठेवणें, वाक्यरचनेंत याचा पुष्कळ शब्दांशी जोडून उपयोग करितात. जसें-अब्रू-नाम-नांव जागविणें = अब्रू, नांव सांभाळणें; शील राखणें. दिवस जागविणें = दिवस राखणें; त्या दिवशीं जें कर्तव्य, जे विधी करावयाचे असतील ते करणें. नियम- नेम-जागविणें = स्वतः नेम, चाल राखणें; चालविणें. सती जागविणें = सतीची चिता प्रज्वलित ठेवणें, विझूं न देणें. गौर जागविणें = गौरीला, देवीला जागविणें; रात्रभर गौरीप्रीत्यर्थ जागरण करणें. जागसूद-वि. १ ज्याची झोंप चटकन उघडते असा; चटकन् जागा होणारा. २ जागता; सावध. 'तूं जागसूद ऐस मी निजतों.' ३ सावध; गाढ नसलेली (झोंप).

दाते शब्दकोश

तोंड

न. १ ज्यानें खातां वं बोलतां येतें तो शरीराचा अव- यव; मुख; वदन; तुंड. २ चेहरा; हनुवटीपासून डोक्यापर्यंत मस्तकाचा दर्शनी भाग. ३ (सामा.) (एखाद्या वस्तूचा) दर्शनी भाग; पुढचा-अग्रभाग; समोरील अंग. 'या ओझ्याच्या तोंडीं मात्र चांगल्या चांगल्या पेंढ्या घातल्या आहेत.' ४ (फोड, गळूं इ॰ कांचा) छिद्र पडावयाजोगा, छिद्रासारखा भाग; व्रणाचें मुख. यांतूनच पुढें पू, लस इ॰ वाहतात. ५ (कुपी, तपेली, लोटी इ॰ कांचें) पदार्थ आंत घालावयाचें भोंक; द्वार; मार्ग; मुख. ६ (एखाद्या विषयांत, शास्त्रांत, गांवांत, देशांत, घरांत) शिरकाव होण्याचा मार्ग; प्रवेशद्वार. 'ह्या घराचें तोंड उत्तरेस आहे.' ७ (ल.) गुरुकिल्ली. उदा॰ 'एखाद्या प्रांताचें, देशाचें किल्ला हें तोंड होय.' 'व्याकरण भाषेचें तोंड होय.' ८ (वारा इ॰कांची) दिशा; बाजू. ९ धैर्य; दम; उमेद; एखादें कार्य करण्याविषयींची न्यायतः योग्यता. १० एखाद्या पदार्थाचें ग्रहण किंवा त्या पदार्थाचा एखाद्या कर्याकडे विनियोग इ॰ कांचा आरंभ त्या पदार्थाच्या ज्या भागाकडून करि- तात तो भाग. 'भाकरीस जिकडून म्हटलें तिकडून तोंड आहे.' ११ (युद्ध, वादविवाद इ॰कांसारख्या गोष्टींची) प्रारंभदशा. 'वादास आतां कुठें तोंड लागलें.' १२ (सोनारी धंदा) हातोड्याच्या सगळ्यांत खालच्या बाजूस अडिश्रीच्या बुडासारखा जो भाग असतो तो. यानें ठोकलेला जिन्नस सारखा करून घेतात. १३ (सोनारी धंदा) कांबीस गोल आकार देतांनां तिचीं टोंकें जेथें जुळतात तो भाग. १४ (बुद्धिबळें) डाव सुरू करण्याचा प्रकार; मोहरा. 'वजीराच्या प्याद्याचें तोंड.' [सं. तुंड; प्रा. तोंड] (वाप्र.) ॰आटोपणें, सांभाळणें, आवरणें-जपून बोलणें; बोलण्याला आळा घालणें; अमर्याद भाषण, अभक्ष्यभक्षण यांपासून निवृत्त होणें. ॰आणणें- (आट्यापाट्यांचा खेळ) शेवटची पाटी खेळून जाऊन पुन्हां एक एक खेळत येणें; पाणी आणणें; लोण आणणें. ॰आंबट करणें- (एखाद्यानें) असंतुष्ट, निराशायुक्त मुद्रा धारण करणें. तोंड आहे कीं तोबरा-खादाड किंवा बडबड्या माणसास उद्देशून वापरावयाचा, 'किती खातोस' 'किती बोलतोस' या अर्थाचा वाक्प्रचार. ॰उतरणें-(निराशा, आजार इ॰ कांनीं) चेहरा म्लान होणें, सुकणें, फिका पडणें, निस्तेज होणें. ॰उष्टें करणें-(अन्नाचा) एखादा-दुसरा घांस, एक दोन घांस खाणें; जेवणाचें नुसतें नांव करणें. ॰करणें-बडबड, वटवट, बकबक करणें; उद्धटपणानें, निर्लज्ज- पणानें बोलणें. ॰करून बोलणें-निर्लज्जपणें, आपला (लहान) दर्जा सोडून बोलणें. ॰काळें करणें-(उप.) एखादा ठपका, तोहमत अंगावर आल्यामुळें निघून, पळून, निसटून जाणें; हातावर तुरी देणें; दृष्टीस न पडणें (केव्हां केव्हां तोंड हा शब्द वगळला तरी चालतो. जसें:-त्यांनीं काळें केलें). ॰गोड करणें-१ (एखाद्याला) लांच देणें; खूष करणें. २ मेजवानी देणें; गोड खावयास घालणें. ॰गोरेंमोरें करणें-(कोणी रागें भरल्यामुळें, मनास वाईट वाटल्यामुळें) निराशेची, लाजलेपणाची मुद्रा धारण करणें. ॰घालणें-(दोघे बोलत असतां तिसर्‍यानें) संबंध नसतां मध्येंच बोलणें. ॰घेऊन येणें-एखाद्यानें एखाद्यावर सोंपविलेलें काम न करतां त्यानें तसेंच परत येणें. 'असें सर्वांनीं न करावें. जो मामलेदार असें करून तोंड घेऊन येईल त्याचें मुखावलोकन न करितां फिरोन सेवा न सांगतां त्यास घरींच बसवावें.' -मराआ २९. ॰घेणें-१ बोंबलत सुटणें; ताशेरा झाडणें; बोंबलपट्टी करणें. २ तोंडांतून लाल गळावी म्हणून पारा इ॰ तोंड आणणारीं औषधें घेणें. तोंड देणें पहा. 'मी वैद्याकडून तोंड घेतलें आहें.' तोंडचा-वि. १ विरुद्ध, उलट दिशेचा; समोरून येणारा (वारा, ऊन, भरती इ॰). २ ज्याची कर्तबगारी केवळ तोंडांतच, बोल- ण्यांतच आहे, क्रियेंत दिसून येत नाहीं असा. 'तोंडचा शिपाई- कारकून-सुग्रण-खबरदार.' ३ तोंडानें सांगितलेला, निवेदन केलेला; तोंडीं केलेला (व्यवहार, हिशेब, पुरावा इ॰). याच्या उलट लेखी. तोंडचा, तोंडींचा घास काढणें-हिरून घेणें-१ (एखा- द्याची) अगदीं आटोक्यांत आलेली वस्तु, पदरीं पडावयास आलेला लाभ हिसकावून घेणें. २ (एखाद्याच्या) अन्नावर पाणी पाडणें; अन्नांत माती कालविणें; पोटावर पाय देणें. तोंडचा-तोंडींचा घांस देणें-(ल.) (एखाद्यास) अतिशय प्रेमानें, ममतेनें वाग- विणें; प्रसंगविशेषीं आपण उपाशी राहून दुसर्‍यास खावयास देणें. तोंडचा गोड आणि हातचा जड-बोलण्यांत गोड व अघळ- पघळ, पण प्रत्यक्ष पैशाची मदत करण्यांत पूज्य. तोंडचा चतुर- वि. बोलण्यांत पटाईत; वाक्पटु. तोंडचा जार-पु. नुकत्याच जन्मलेल्या मुलाच्या तोंडांतील फेंस; चिकटा; ओंठावरचा जार; जन्मप्रसंगींचा तोंडावरचा पातळ पापुद्रा (विशेषतः तुझ्या, त्याच्या तोंडाचा जार वाळला नाहीं. = तूं, तो अजून केवळ बालक आहेस.' अशा वाक्यांत उपयोग). तोंडचा नीट-वि. १ बोलून भला, चांगला; बोलकाचालका; सौजन्ययुक्त. २ युक्तायुक्त विचार करून बोलणारा. ३ हजरजबाबी; अस्खलित बोलणारा. तोंडचा फटकळ-वि. शिवराळ; उघडतोंड्या; अश्लील, शिवराळ भाषण करणारा. तोंडचा रागीट-वि. जहाल; तिखट; कडक भाषण करणारा. तोंडचा शिनळ-वि. १ इष्कबाज, फंदी म्हणून नांव मिळविण्याची इच्छा करणारा; स्त्रियांची खोटी खुषमस्करी करणारा; स्त्रियांच्या कृपेची खोटीच फुशारकी मारणारा. २ निरर्गल व अश्लील भाषण करणारा; शिवराळ. तोंड(डा)ची गोष्ट-स्त्री. सहजसाध्य, अतिशय सोपी गोष्ट, काम. 'वाघ मारणें तोंडची गोष्ट नव्हे.' तोंड चुकविणें-हातून एखादा अपराध घडला असतां कोणी रागें भरेल या भीतीनें, काम वगैरे टाळण्यासाठीं चुकारतट्टू- पणानें एखाद्यापासून आपलें तोंड लपविणें; दृष्टीस न पडणें; छपून असणें. ॰चे तोंडीं-क्रिवि. प्रत्यक्षाप्रत्यक्ष; तोंडानें; बोला- चालीनें. ॰चे तोंडीं व्यवहार-केवळ तोंडानें बोलून, बोलाचा- लीनें झालेला, होणारा व्यवहार, धंदा. याच्या उलट लेखी व्यव- हार. ॰चें पायचें-न. (कों.) गुरांच्या तोंडास व पायांस होणारा रोग. ॰चे हिशेब-पुअव. कागदांवर आंकडेमोड न करितांमनां- तल्यामनांत कांहीं आडाख्यांच्या; मदतीनें करावयाचे हिशेब. तोंडचें तोंडावरचें पाणी पळणें; उडणें, तोंड कोरडें पडणें-१ (भीतीमुळें) चेहरा फिका पडणें; बावरून,घाबरून जाणें. २ (भीति इ॰ कांमुळें) तोंडांतील ओलावा नाहींसा होणें. तोंड टाकणें-टाकून बोलणें-१ (क्रोधावेशानें) अप शब्दांचा वर्षाव करणें; निर्भर्त्सना करून बोलणें; खरडपट्टी काढणें; अद्वातद्वा बोलणें. 'तूं नोकर-माणसांवर उगीच तोंड टाकलेंस.' २ (घोडा इ॰ जनावरानें) चावण्यासाठीं तोंड पुढें करणें. 'ह्या घोड्याला तोंड टाकण्याची भारी खोड आहे, ती घालविली पाहिजे.' ॰ठेचणारा-फाडणारा-वि. (एखाद्या) उद्धट, बडबड्या माण- सास गप्प बसविण्याची हातोटी ज्यास साधली आहे असा; उद्दामपणानें, गर्वानें बोलणार्‍या व्यक्तीस रोखठोक उत्तर देऊन चूप बसविणारा. [तोंड + ठेचणें] ॰तोडणें-(ना.) एखादी वस्तु मिळ- विण्याकरितां एखाद्याच्या पाठीस लागणें; त्याच्यापुढें तोंड वेंगा- डणें. ॰दाबणें-लांचलुचपत देऊन (एखाद्याचें) तोंड बंद करणें; (एखाद्यास) वश करणें; गप्प करणें. ॰दाबणारा-वि. लांच देऊन (एखाद्या) प्रतिकूल व्यक्तीस वळविणारा; गप्प बसविणारा. [तोंड + दाबणें = बंद करणें] ॰दाबी-स्त्री. (एखाद्यानें) गुप्त बातमी फोडूं नये म्हणून, प्रतिकूल बोलूं नये म्हणून (त्यास) लांच देऊन त्याचें तोंड दाबण्याची, वश करण्याची क्रिया. 'तो गांवकाम- गारांची तोंडदाबी करतो.' -गुजा २१. [तोंड + दाबणें = बंद करणें] ॰दिसणें-एखाद्याची केलेली निर्त्भर्त्सना दुसरी बाजू न कळतां लोकांच्या नजरेस येणें व आपणच वाईट ठरणें (पण ज्याची निर्भर्त्सना केली असेल त्याचें वर्तन सुधारण्याची आशा नसणें ). 'मी तुला रागें भरलों म्हणजे माझें तोंड मात्र दिसेल, पण तूं आपला आहे तसाच राहणार.' ॰देणें- १ पारा वगैरे देऊन तोंडाच्या आंतील त्वचा सुजविण; तोंड आणविणें. 'वैद्य- बोवा म्हणाले कीं त्याला तोंड दिलें आहे.' २ सैन्याच्या अग्रभागीं राहून शत्रूवर हल्ला करणें. ३ (एखाद्याचा) प्रतिपक्षी होऊन राहणें; लढावयाला सिद्ध होणें. ४ (आट्यापाट्यांचा खेळ शेवटची पाटी खेळून परत येणार्‍या गड्याकडे पाटी धरणारानें तोंड फिरविणें. ५ एखाद्या गोष्टीला न भितां तींतून धैर्यानें पार पडण्याची तयारी ठेवणें. ॰धरणें-१ अन्नसेवन करण्याची तोंडाची शक्ति आजार वगैरे कारणांमुळें नाहींशी होणें. 'त्याचें तोंड धरलें आहे, त्याला चमच्याचमच्यानें दुध पाजावें लागतें.' २ (एखा- द्याची) बोलण्याची शक्ति नाहींशी करणें. ३ (एखाद्याला आपल्या) तावडींत, कबजांत आणणें. 'मी त्याचें तोंड धरलें आहे, तो आतां काय करणार !' ॰धुवून येणें-(उप.) एखाद्याची विनंति कधींहि मान्य होणार नाहीं असें म्हणून फेटाळून लावतांना योजण्याचा तिरस्कारदर्शक वाक्प्रचार. ॰निपटणें-(आजार, उपवास इ॰ कारणांमुळें एखाद्याचे) गाल खोल जाणें, चेहरा सुकणें. 'महिनाभर हें मूल तापानें आजारी होतें, त्याचें तोंड पहा कसें निपटलें आहे तें.' ॰पडणें-१ सुरवात होणें. 'लढाईस तोंड पडलें.' २ (गळूं इ॰ कांस) छिद्र पडणें; फुटणें; वाहूं लागणें. ॰पसरणें-वेंगाडणें-१ खिन्नपणाची, केविलवाणी मुद्रा धारण करणें. २ हिनदीनपणानें याचना करणें. ॰पाघळणें-१ न बोला- वयाची गोष्ट कोणाएकापाशीं बोलून टाकणें; बडबडणें. २ (ल.) गुप्त गोष्ट बाहेर फोडणें, फुटूं देणें. ॰पाडणें-एखादें कोडें सोड- विण्यास, वेढा फोडण्यास प्रारंभ करणें; भांडणास सुरवात करणें. ॰पाहणें-१ (एखाद्याच्या) आश्रयाची, मदतीची अपेक्षा करून असणें. 'आम्ही पडलों गरीब, म्हणून आम्हांला सावकाराचीं तोंडें पाहण्याची पाळी वारंवार येते.' २ (एखाद्यानें) स्वतःच्या शक्तीचा, कर्तुत्वाचा अजमास करणें. 'तूं असें करीन म्हणतोस, पण आधीं आपलें तोंड पहा !' ३ बोलणाराचें भाषण नुसतें ऐकणें, पण त्यानें सांगितलेलें करावयास किंवा केलेला बोध अनु- सरावयास प्रवृत्त न होतां स्वस्थ बसून राहणें. 'म्हणती हाणा, मारा, पाडा, घ्या, काय पाहतां तोंडा ।' -मोद्रोण ३.१२५. ॰पाहात-बसणें-काय करावें, कसें करावें या विवंचनेंत असणें. ॰पिटणें-बडबड करणें. 'पश्चिमद्वारींचें कवाड । सदा वार्‍यानें करी खडखड । तैशी न करी बडबड । वृथा तोंड पिटीना ।' -एभा १०.२३१. ॰फिरणें-१ आजारानें, पदार्थाच्या अधिक सेवनानें तोंडाची रुची नाहींशी होणें; तोंड वाईट होणें. २ तोंडांतून शिव्यांचा वर्षाव होऊं लागणें. 'तो रागावला म्हणजे कोणावर त्याचें तोंड फिरेल ह्याचा नेम नाहीं.' ॰फिरविणें-१ तोंडाची चव नाहींशी करणें. २ शिव्यांचा वर्षाव करीत सुटणें. 'तो रागावला म्हणजे तुमच्यावर देखील तोंड फिरवावयाला कचर- णार नाहीं.' ३ वितळत असलेला किंवा तापविला जात अस- लेला धातु इ॰ कानें) रंगामध्यें फरक दाखविणें, रंग पाल- टणें. 'ह्या तांब्यानें अद्याप तोंड फिरविलें नाहीं, आणखी पुष्कळ आंच दिली पाहिजे.' ४ दुसर्‍याकडे पाहणें; विशिष्ट गोष्टी- कडे लक्ष्य न देतां इतर गोष्टींकडे प्रवृत्ति दाखविणें. ५ गतीची दिशा बदलणें; दुसर्‍या दिशेला, माघारें वळणें. ॰फुटणें-१ थंडीमुळें तोंडाची बाह्य त्वचा खरखरीत होणें, भेगलणें. २ (एखाद्याची) फजिती उडणें; पत नाहींशी होणें; नाचक्की होणें; अभिमान गलित होण्याजोगा अपमान, शिक्षा इत्यादि होणें. ॰बंद करणें-१ जीभ आवरणें; जपून बोलणें. २ (एखाद्याला) लांच देऊन गप्प बसविणें, वश करून घेणें. ॰बंदावर राखणें- खाण्याला किंवा बोलण्याला आळा घालणें. 'तूं आपलें तोंड बंदावर राखिलें नाहींस तर अजीर्णानें आजारी पडशील.' ॰बांधणें-लांच देऊन (एखाद्याचे) तोंड बंद करणें; (एखाद्यानें) गुप्त गोष्ट फोडूं नये म्हणून पैसे देऊन त्यास गप्प बसविणें. ॰बाहेर काढणें-१ तोंड दाखविणें; राजरोसपणें समाजांत हिंडणें (बहुधां निषेधार्थी प्रयोग). 'तुरुंगांतून सुटून आल्यावर त्यानें आज दोन वर्षांत एकदांहि तोंड बाहेर काढलें नाहीं.' २ फिरण्यासाठीं, कामकाजासाठीं घराबाहेर पडणें. ॰बिघडणें-तोंड बेचव होणें; तोंडास अरुचि उत्पन्न होणें. विटणें. -॰भर-भरून बोलणें- भीड, संकोच, भीति न धरतां मनमोकळेपणानें भरपूर, अघळपघळ बोलणें; दुसर्‍याचें आणि आपलें समाधान व्हावयाजोगें अघळपघळ बोलणें. ॰भरून साखर घालणें-(एखाद्याचें) तोंड साखरेनें भरणें; (एखाद्याच्या) कामगिरीबद्दल, विजयाबद्दल संतोषादाखल त्याचें तोंड साखरेनें भरणें; (एखाद्याच्या) कामगिरीबद्दल गोड, भरपूर मोबदला देणें. ॰मागणें-(आट्यापाट्यांचा खेळ) लोण घेऊन परत जातांना पाटीवरील गड्यास आपणाकडे तोंड फिर- विण्यास सांगणें. तोंड मागितल्यावर पाटीवरील गडी आपलें तोंड फिरवितो त्यास 'तोंड देणें' म्हणतात. ॰माजणें-१ मिष्टान्न खावयाची चटक लागल्यानें साध्या पदार्थाबद्दल अरुचि उत्पन्न होणें. २ शिव्या देण्याची, फटकळपणानें बोलण्याची खोड लागणें. ॰मातीसारखें-शेणासारखें होणें-(आजारानें) तोंडाची चव नाहींशी होणें; तोंड विटणें, फिरणें; अन्नद्वेष होणें. ॰मिचकणें- दांत, ओंठ खाणें. ॰येणें-१ तोंडाच्या आंतल्या बाजूच्या त्वचेस फोड येऊन ती हुळहुळी होणें व लाळ गळूं लागणें. २ (कर.) लहान मूल बोलूं लागणें. 'आमच्या मुलाला तोंड आलें आहे.' = तो बोलावयास लागला आहे. ॰रंगविणें-१ विडा खाऊन ओंठ तांबडे लाल करून घेणें. २ (ल.) (एखाद्याचें थोबाड) थोबाडींत मारून लाल- भडक करून सोडणें. ॰लागणें-(लढाई, वादविवाद, अंगीकृत कार्य इ॰ कांस) सुरवात होणें. 'तेव्हां युद्धास तोंड लागलें.' -इमं २९०. ॰लावणें-१ (वादविवाद इ॰ कांस) सुरवात करणें. २ प्यावया- साठीं एखादें पेय ओंठाशीं नेणें. ३ ॰वाईट करणें-निराशेची मुद्रा धारण करणें. ॰वाईट होणें-१ तोंडावर निराशेची मुद्रा येणें. २ (ताप इ॰ कांमुळें) तोंडास अरुचि येणें. ॰वांकडें करणें-१ वेडावून दाखविणें. २ नापसंती दर्शविणें. ॰वाजविणें-एकसारखें बोलत सुटणें; निरर्थक बडबड करणें; बकबकणें; वटवट करणें; भांडण करणें. ॰वासणें-१ निराशेनें, दुःखानें तोंड उघडणें व तें बराच वेळ तसेंच ठेवणें. २ याचना करण्यासाठीं तोंड उघडणें, वेंगाडणें. ॰वासून पडणें-शक्तीच्या क्षीणतेमुळें, उत्साह, तेज, वगैरे नष्ट झाल्यामुळें, गतप्राण झाल्यामुळें आ पसरून पडणें. 'तो पडला सिंहनिहमत्तद्विपसाचि तोंड वासून ।' -मोगदा ५.२५. ॰वासून बोलणें-अविचारानें बोलणें. 'ऐसें स्वसख्यांपासीं कां गे वदलीस तोंड वासून ।' -मोउद्योग १३.२०५. ॰विचकणें-दीन मुद्रेनें आणि केविलवाण्या स्वरानें याचना करणें. ॰वेटा(डा)विणें- (काव्य) (एखाद्यास) वेडावून दाखविण्यासाठीं त्याच्यापुढें तोंड वेडेंवाकडें करणें. ॰शेणासारखें पडणें-(लाजिरवाणें कृत्य केल्यानें) तोंड उतरणें; निस्तेज होणें; काळवंडणें. ॰संभाळणें- जपून बोलणें; जीभ आवरणें; भलते सलते शब्द तोंडांतून बाहेर पडूं न देणें; अमर्याद बोलण्यास आळा घालणें. ॰सुटणें- चरांचरां, फडाफडां, अद्वातद्वा बोलूं लागणें. ॰सुरू होणें-बड- बडीला, शिव्यांना सुरवात होणें. ॰सोडणें-१ फडांफडां, अद्वातद्वा बोलूं लागणें; अमर्याद बोलणें. २ आधाशासारखें खात सुटणें; तोंड मोकळें सोडणें. ॰हातीं-हातावर धरणें-तोंडे सोडणें (दोन्ही अर्थीं) पहा. तोंडाचा खट्याळ-फटकळ-फटकाळ-फटकूळ-वाईट-शिनळ-वि. शिवराळ; तोंडाळ; अश्लील बोलणारा. तोंडाचा खबरदार-बहादर-बळकट-वि. बोलण्यांत चतुर, हुषार; बोलण्याची हातोटी ज्याला साधली आहे असा. -तोंडाचा गयाळ, तोंडगयाळ-वि. जिभेचा हलका; चुर- चोंबडा; लुतरा; बडबड्या; ज्याच्या तोंडीं तीळ भिजत नाहीं असा. तोंडाचा गोड-वि. गोड बोलणारा; गोडबोल्या. म्ह॰ तोंडचा गोड हाताचा जड = गोड व अघळपघळ भाषण करणारा पण प्रत्यक्ष कांहींहि मदत, पैसा न देणारा. तोंडाचा जड-वि. रेंगत बोलणारा; फार थोडें बोलणारा; अस्पष्ट भाषण करणारा; तोंडाचा तिखट-वि. खरमरीत, स्पष्ट, झोंबणारें, कठोर भाषण करणारा. तोंडाचा तोफखाना सुटणें-(एखाद्याची) अद्वातद्वा बोल- ण्याची क्रिया सुरू होणें; शिव्यांचा वर्षाव होऊं लागणें. तोंडाचा पट्टा सुटणें-चालणें-अद्वातद्वा बोलणें; शिव्यांचा भडिमार सुरू होणें; तोंडाचा पट्टा सोडणें-(एखाद्यानें) शिव्यांचा भडिमार सुरू करणें; जीभ मोकळी सोडणें; (एखाद्याची) खरडपट्टी आरंभिणें. तोंडाचा पालट-पु. रुचिपालट; तोंडास रुचि येईल असा अन्नांत केलेला फेरबदल; अन्नांतील, खाण्यांतील फरक, बदल. तोंडाचा बोबडा-वि. बोबडें बोलणारा; तोतरा. तोंडाचा मिठा-वि. गोडबोल्या; तोंडाचा गोड पहा. तोंडाचा हलका- वि. चुरचोंबडा; भडभड्या; विचार न करितां बोलणारा; फटकळ. तोंडाचा हुक्का होणें-(व.) तोंड सुकून जाणें. तोंडाची चुंबळ-स्त्री. दुसर्‍यास वेडावून दाखविण्याकरितां चुंबळीसारखी केलेली ओठांची रचना; वांकडें तोंड. तोंडाची वाफ दघडणें- १ मूर्खास उपदेश करतांना, निरर्थक, निरुपयोगी, निष्फळ भाषण करणें. २ ज्यावर विश्वास बसणार नाहीं असें भाषण करणें; मूर्खपणानें बोलणें; वल्गना करणें; बाता मारणें. (या वाक्प्रचारांत दवडणें बद्दल खरचणें गमविणें, फुकट जाणें, घालविणें, काढणें इ॰ क्रियापदेंहि योजतात). तोंडाचें बोळकें होणें-(म्हातारपणामुळें) तोंडां- तील सर्व दांत पडणें. तोंडाचें सुख-न. तोंडसुख पहा. (वरील सर्व वाक्प्रचारांत तोंडाचा या शब्दाऐवजीं तोंडचा हा शब्दहि वापरतात). तोंडांत खाणें, मारून घेणें-१ गालांत चपराक खाणें; मार मिळणें. २ पराभूत होणें; हार जाणें. ३ फजिती झाल्या- नंतर शहाणपणा शिकणें; नुकसान सोसून धडा शिकणें; बोध मिळविणें. तोंडांत जडणें-थोबाडींत, गालांत बसणें (चपराक, थप्पड इ॰). तोंडांत तीळभर न राहणें-अगदीं क्षुद्र अशी गुप्त गोष्टहि पोटांत न ठरणें; कोणतीहि लहानसहान गोष्ट गुप्त ठेवूं न शकणें. तोंडांत तोंड घालणें-१ (ल.) प्रेम, मैत्री इ॰कांच्या भावानें वागणें; मोठ्या प्रेमाचा, मित्रपणाचा आविर्भाव आणून वागणें. २ एकमेकांचें चुंबन घेणें. तोंडांत देणें-(एखाद्याच्या) थोबाडींत मारणें; गालांत चपराक मारणें; तोंडांत बोट घालणें-(ल.) आश्चर्यचकित, थक्क होणें; विस्मय पावणें. तोंडांत भडकावणें-तोंडांत देणें पहा. तोंडांत माती घालणें-खाण्यास अन्न नसणें; अतिशय हाल, कष्ट सोसावे लागणें. तोंडांत माती पडणें-१ (एखाद्याची) उपा समार होणें. २ मरणें. तोंडात शेण घालणें-(एखाद्याची) फजिती करणें; (एखाद्यास) नांवें ठेवणें; खरडपट्टी काढणें. तोंडांत साखर असणें-(गो.) (एखाद्याचें) तोंड, वाणी गोड असणें; गोड बोलत असणें. तोंडांत साखर घालणें-१ तोंड भरून साखर घालणें पहा. २ (उप.) तोंडांत शेण घालणें. 'सावित्री- बाईच्या तोंडांत लोक जेव्हां फारच साखर घालीत, तेव्हां तिनें दोन तीन जुनेरीं एकत्र शिवून जानकीबाईला द्यावी.' -रंगराव. तोंडांत साखर पडणें-(एखाद्याला) आनंदाचा प्रसंग, दिवस येणें. तोंडांतून ब्र काढणें-(तोंडांतून) अधिक-उणें अक्षर काढणें, उच्चारणें. 'आंतल्याआंत चूर होऊन मेलें पाहिजे, तोंडां- तून ब्र काढण्याची सोय नाहीं.' -विकारविलसित. तोंडानें पाप भरणें, तोंडें पाप घेणें-लोकांचीं पातकें उच्चारणें; लोकांचे दोष बोलून दाखविणें; वाईट बोलण्याची हौस यथेच्छ पुरवून घेणें; लोकांचीं पापें उच्चारून जिव्हा विटाळणें. 'कैसीं वो मानुसें । सपाइनि परंवंसें । तोंडे पाप घेती कांइसें । वायां वीण ।' -शिशु २१६. तोंडापुढें-क्रिवि. अगदीं जिव्हाग्रीं; मुखोद्गत. तोंडा- पुरता, तोंडावर गोड-वि. मधुर पण खोटें बोलणारा; दुतोंड्या; वरवर गोड बोलणारा व आंतून कपटी असलेला; उघडपणें प्रिय भाषण करणारा व मनांत निराळेच असणारा. ताडापुरता मांडा-पु. १ भूक भागेल एवढीच पोळी. २ (ल.) जेमतेम गरज भागेल एवढाच जरूर त्या वस्तूचा पुरवठा. तोंडार मारप- (गो.) (एखाद्याच्या) पदरांत चूक बांधणें; वरमण्यासारखें उत्तर देणें. तोंडार ल्हायो उडप-(गो.) फार जलद, अस्ख- लित बोलणें; लाह्या फुटणें. तोंडाला काळोखी आणणें- लावणें-बेअब्रू, नापत करणें. तोंडाला टांकी दिलेली असणें-देवीच्या खोल वणांनीं तोंड भरलेलें असणें; तोंडावर देवीचे वण फार असणें. तोंडाला पाणी सुटणें-(एखादी वस्तु पाहून तिच्यासंबंधीं) मोह उत्पन्न होणें; हांव सुटणें. तोंडाला पानें पुसणें-फसविणें; चकविणें; छकविणें; भोळसाविणें; भोंदणें; तोंडा- वरून हात फिरविणें. 'त्याच्यावर देखरेख करावयाला चार माणसें होतीं, पण त्यानें सर्वांच्या तोंडाला पानें पुसून आपला डाव साधला.' तोंडाला फांटा फुटणें-मूळ मुद्दा सोडून भलतेंच बोलत सुटणें; हवें तसें अमर्याद भाषण करूं लागणें. तोंडावर-क्रिवि. १ समक्ष; डोळ्यांदेखत. २ (ल.) निर्भयपणें; भीड न धरतां. 'मी त्याच्या तोंडावर त्याला लुच्चा म्हणण्यास भिणार नाहीं.' तोंडावर तुकडा टाकणें-(एखाद्यानें) गप्प बसावें, प्रतिकूल बोलूं नये म्हणून त्याला थोडेसें कांहीं देणें. तोंडावर-ला-तोंड देणें-१ (एखाद्यास) विरोध करणें; विरुद्ध बोलणें. २ (एखाद्यास) उद्धटपणानें, अविनयानें, दांडगेपणानें उत्तर देणें; उत्तरास प्रत्युत्तर देणें. तोंडा- वर तोंड पडणें-दोघांची गांठ पडून संभाषण, बोलाचाल होणें. तोंडावर थुंकणें-(एखाद्याची) निर्भर्त्सना, छीःथू करणें; धिक्कार करणें. तोंडावर देणें-तोंडांत देणें पहा. 'काय भीड याची द्या कीं तोंडावरी ।' -दावि ३०२. तोंडावर नक्षत्र पडणें-(एखाद्यानें) तोंडाळपणा करणें; शिवराळ असणें; नेहमीं अपशब्दांनीं तोंड भर- लेलें असणें. 'ह्याजकरिकां तोंडावर नक्षंत्र पडलेल्या पोरास म्या बोलविलें म्हणून हे मला शब्द लावीत नाहींत.' -बाळ २.१४२. तोंडावर पडप-(गो.) थोबाडींत (चपराक) बसणें, पडणें. तोंडावर पदर येणें-१ वैधव्य प्राप्त होणें. 'तिच्या तोंडावर पदर आला म्हणून ती बाहेर पडत नाहीं.' २ लज्जेनें तोंड लपविण्या- जोगी स्थिति होणें. तोंडावर मारणें-(एखाद्याला) पराभूत करणें. तोंडावर सांगणें-बोलणें-(एखाद्याच्या) समक्ष, निर्भीडपणें, बेडरपणें सांगणें, बोलणें. तोंडावरून-तोंडावर हात फिर- विणें-(एखाद्यास) गोड बोलून, फूसलावून, भुलथाप देऊन फस- विणें; भोंदणें; छकविणें. तोंडाशीं तोंड देणें-(हलक्या दर्जाच्या व्यक्तीनें वरिष्ठाशीं) आपला दर्जा विसरून, बरोबरीच्या नात्यानें, अविनयानें बोलणें, व्यवहार करणें. तोंडास काळोखी-स्त्री. मुखसंकोच; ओशाळगत; गोंधळून गेल्याची स्थिति; बेअब्रू; कलंक. तोंडास काळोखी, काजळी लागणें-(एखाद्याची) बेअब्रू, नाचक्की होणें; दुष्कीर्ति होणें; नांवाला कलंक लागणें. तोंडास काळोखी-काजळी लावणें-(एखाद्याचें) नांव कलंकित करणें; बेअब्रू करणें. 'सुनेनें माझ्या तोंडाला काळोखी लावली.' तोंडास कुत्रें बांधलेलें असणें-ताळतंत्र सोडून, अद्वातद्वा, अपशब्द बोलणें; शिव्या देणें. 'त्यानें तर जसें तोंडाला कुत्रेंच बांधलें आहे.' तोंडास खीळ घालणें-निग्रहपूर्वक, हट्टानें मौन धारण करणें. तोंडास तोंड-न. वादविवाद; वाग्युद्ध; हमरी- तुमरी; धसाफसी. -क्रिवि. समक्षासमक्ष; समोरासमोर; प्रत्यक्ष. तोंडास तोंड देणें-१ तोंडाशीं तोंड देणें पहा. २ मार्मिकपणें, खरमरीतपणें उत्तर देणें. तोंडास पाणी सुटणें-(एखाद्या- वस्तूबद्दल, गोष्टीबद्दल) लोभ, मोह उत्पन्न होणें; तोंडाला पाणी सुटणें पहा. 'पोर्तुगीज लोकांची बढती पाहून तिकडच्या दुसर्‍या साहसी लोकांच्या तोंडास पाणी सुटलें.' -बाजी. तोंडास तोंड न दिसणें-(पहांटेस) तोंड न ओळखतां येण्याइतका अंधेर असणें (झुंजमुंजु पहाटेविषयीं वर्णन करितांना हा वाक्प्रचार योजतात). 'अद्याप चांगलें उजाडलें नाहीं, तोंडास तोंड दिसत नाहीं.' तोंडास-तोंडीं बसणें-(श्लोक, शब्द इ॰) स्पष्ट, बिन- चूक, भरभर म्हणण्याइतका पाठ होणें. 'तो श्लोक दहा वेळां पुस्तकांत पाहून म्हण, म्हणजे तो तुझ्या तोंडीं बसेल.' तोंडास येईल तें बोलणें-विचार न करितां, भरमसाटपणानें वाटेल तें बोलणें; अद्वातद्वा, अपशब्द बोलणें. तोंडास-तोंडीं लागणें- १ (एखाद्याच्या) तोंडास तोंड देणें; उलट उत्तरें देणें. २ हुज्जत घालणें; वादविवाद करण्यास तयार होणें. (एखाद्याच्या) तोंडा- समोर-क्रिवि. १ (एखाद्याच्या) समक्ष; समोर; डोळ्यांदेखत. २ अगदीं मुखोद्गत; जिव्हाग्रीं. तोंडापुढें पहा. 'हा श्लोक माझ्या अगदीं तोंडासमोर आहे.' तोंडास हळद लागणें-(एखाद्यास) दोष देणें, नापसंती दर्शविणें अशा अर्थीं हा वाक्प्रचार योजितात. तोंडासारखा-वि. (एखाद्याची) खुशामत, स्तुति इ॰ होईल अशा प्रकारचा; एखाद्याच्या खुशामतीकरितां त्याच्या मतास जुळता. तोंडासारखें बोलणें-(एखाद्याची) स्तुति, खुशामत करण्या- करितां त्याच्याच मताची, म्हणण्याची री ओढणें; त्याचें मन न दुखवेल असें बोलणें. तोंडीं आणणें-देणें-(रोग्यास) लाळ गळण्याचें, तोंड येण्याचें औषध देऊन तोंड आणणें. तोंडीं- काढणें-१ ओकारी देणें; वांती होणें. २ (एखाद्यास त्यानें) केलेले उपकार बोलून दाखवून टोमणा मारणें. तोंडीं खीळ पडणें- तोंड बंद होणें; गप्प बसणें भाग पडणें. 'अवघ्या कोल्यांचें मर्म अंडीं । धरितां तोंडीं खीळ पडे ।' तोंडीं घास येणें-(एखा- द्यास) घांसभर अन्न मिळणें; चरितार्थाचें साधन मिळणें; पोटा पाण्याची व्यवस्था होणें. तोंडीं तीळ न भिजणें-१ (तापानें, संतापून ओरडण्यानें, रडण्यानें) तोंड शुष्क होणें, कोरडें पडणें. २ एखादी गुप्त गोष्ट मनांत न राहणें, बोलून टाकणें; तोंडीं तृण धरणें-(एखाद्यानें) शरण आलों. असें कबूल करणें; शरणागत होणें; हार जाणें (दांतीं तृण धरणें असाहि प्रयोग रूढ आहे). तोंडीं देणें-(एखाद्यास एहाद्या माणसाच्या, कठिण कार्याच्या) सपाट्यांत, तडाख्यांत, जबड्यांत, तावडींत लोटणें, देणें; हाल, दुःख सोसण्यास (एखाद्यास) पुढें करणें. तोंडीं-तोंडास पान- पानें पुसणें-(एखाद्यास) छकविणें; लुबाडणें; भोंदणें; अपेक्षित लाभ होऊं न देणें; स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेऊन दुसर्‍यास तोंड पहावयास लावणें. 'त्यानें आपल्या नळीचें वर्‍हाड केलें आणि सर्वांच्या तोंडीं पान पुसलें.' तोंडीं माती घालणें- (एखाद्यानें) अतिशय दुःखाकुल, शोकाकुल होणें. 'ऊर, माथा बडवून, तोंडीं माती घालूं लागली' -भाव ७५. तोंडीं येऊन बुडणें-नासणें-(एखादी वस्तु, पीक इ॰) अगदीं परिपक्वदशेस, परिणतावस्थेस येऊन, ऐन भरांत येऊन, नाहींशीं होणें, वाईट होणें. तोंडीं येणें-१ (पारा इ॰ औषधानें) तोंड येणें. २ ऐन भरांत, परिपक्व दशेस, पूर्णावस्थेस येणें. तोंडीं-रक्त, रगत लागणें-१ वाघ इ॰ हिंस्त्र पशूला माणसाच्या रक्ताची चटक लागून तो माणसावर टपून बसणें. २ (ल.) लांच-लुचपत खाण्याची चटक लागणें. तोंडीं लागणें-(एखाद्यास एखाद्या वस्तूची, खाद्याची चव प्रथमच कळून त्या वस्तूची त्यास) चटक लागणें; आवड उत्पन्न होणें. 'ह्याच्या तोंडीं भात लागला म्हणून यास भाकर आवडत नाहीं.' तोंडीं लागणें-१ (एखाद्याच्या) तोंडास तोंड देणें; उद्धटपणानें, आपला दर्जा विसरून उलट जबाब देणें. २ हुज्जत घालणें; वादविवादास प्रवृत्त होणें; तोंडास लागणें पहा. 'सुज्ञ आहेत ते दूषकांच्या तोंडीं लागत नसतात.' -नि. ३ (युद्ध, भांडण, इ॰कांच्या) आणीबाणीच्या ठिकाणीं, आघाडीस, अग्रभागीं असणें. तोंडीं लावणें-न. जेवतांना तोंडास रुचि आणणारा भाजी, चटणी इ॰ सारखा मधून मधून खावयाचा चमचमीत पदार्थ. तोंडीं लावणें-१ जेवतांना भाजी, चटणी इ॰ चम- चमीत पदार्थानें रुचिपालट करणें. 'आज तोंडीं लावावयाला भाजीबिजी कांहीं केली नाहीं काय ?' २ विसारादाखल पैसे देणें. तोंडें मागितलेली किंमत-स्त्री. (एखाद्या वस्तूची) दुकान- दारानें सांगितलेली व झिगझिग वगैरे न करितां गिर्‍हाइकानें दिलेली किंमत. तोंडें मानलेला-मानला-वि. (तोंडच्या) शब्दानें, वचनानें मानलेला (बाप, भाऊ, मुलगा इ॰); धर्माचा, पुण्याचा पहा. तोंडें वांकडीं करणें-वेडावून दाखविणें; वेडावणें. लहान तोंडीं मोठा घांस घेणें-१ (एखाद्यानें) आपल्या आवांक्या- बाहेरचें काम हातीं घेणें. २ (वडील, वरिष्ठ माणसांसमोर) न शोभेल असें, मर्यादा सोडून, बेअदबीनें बोलणें; वडील माणसांस शहाणपण शिकविणें. जळो तुझें तोंड-(बायकी भाषेंत) एक शिवी. स्त्रिया रागानें ही शिवी उपयोगांत आणतात. म्ह॰ १ तोंड बांधून (दाबून) बुक्कयांचा मार = एखाद्याचा विनाकारण छळ होऊन त्यास त्याविरुद्ध तक्रार करतां न येणें; एखाद्यास अन्यायानें वाग- वून त्याविरुद्ध त्यानें कागाळी केल्यास त्यास बेगुमानपणें शिक्षा करणें. 'बायकांचा जन्म म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार, म्हण- तात तें अक्षरशः खरें आहे.' -पकोघे २ (गो.) तोंडाच्या बाता घरा बाईल भीक मागता = बाहेर मोठमोठया गप्पा मारतो पण घरीं बायको भीक मागते. सामाशब्द- तोंड उष्ट-न. एखादा-दुसरा घांस खाणें; केवळ अन्न तोंडास लावणें; तोंड खरकटें करणें. [तोंड + उष्टें] ॰ओळख-स्त्री. परस्परांचा विशेष परिचय नसतां, चेहरा पाहू- नच हा अमुक आहे असें समजण्याजोगी ओळख; (एखाद्याची) चेहरेपट्टी लक्षांत राहून तीवरूनच त्याला ओळखतां येणें; नांव वगैरे कांहीं माहीत नसून (एखाद्याचा) केवळ तोंडावळाच ओळ- खीचा असणें. 'एखाद्याला वाटेल कीं बाळासाहेबांशीं त्याची तोंड- ओळखच आहे.' -इंप ३७. ॰कडी-स्त्री. १ आंतील तुळयांचीं तोंडें बाहेर भिंतींतील ज्या तुळईवर ठेवतात, ती सलग तुळई. २ कौलारू छपराचे वासे ज्या सलग तुळईवर टेकतात ती छपराच्या शेवटीं, टोंकास असलेली तुळई. ३ गुरांचें दावें जिला बांधतात ती कडी. ४ (सोनारी धंदा) दागिन्याची शेवटची कडी, नाकें; ज्यांत फांसा इ॰ अडकवितात ती (सरी इ॰ सारख्या दागिन्याची) टोंकाची, तोंडाची कडी; (जव्याच्या) मण्याच्या वगैरे तोंडाशीं ठेवलेली कडी. ५ (जमाखर्चाच्या वहींतील जमा आणि खर्च या दोहोंबाजूंचा मेळ. हा मेळ = = = अशा दुलांगीनें, (दुहेरी रेषेनें) दाखविण्याचा प्रघात आहे. 'वहीची खात्याची-तारखेची-तोंडकडी' असा शब्दप्रयोग करितात. (क्रि॰ मिळणें; जुळणें; येणें; उतरणें; चुकणें; बंद होणें). [तोंड + कडी] ॰कळा-स्त्री. चेहर्‍यावरील तजेला; कांति; तेज; टवटवी. (प्र.) मुखकळा. [तोंड + कळा = तेज] ॰काढप-(गो.) उपदंश झालेल्या रोग्यास एक प्रकारचें औषध देऊन त्याच्या तोंडांतून लाळ वाहवितात तो प्रकार. ह्या औषधानें तोंड बरेंच सुजतें. [तोंड + गो. काढप = काढणें] ॰खुरी- स्त्री. (ना.) गुरांचा एक रोग. ॰खोडी-वि. तोंडाळ; टाकून बोलणारा; तोंड टाकणारा; अशी संवय असलेला. 'परम अधम रुक्मी हा महा तोंडखोडी ।' -सारुह ३.७८. [तोंड + खोड = वाईट संवय] ॰घडण-स्त्री तोंडाची ठेवण; चेहरेपट्टी; तोंडवळां. 'या मुलाची बापासारखी तोंडघडण आहे.' [तोंड + घडण = रचना] ॰घशीं- सीं-क्रिवि. १ जमीनीवर पडून तोंड घासलें जाईल, फुटेल अशा रीतीनें. (क्रि॰ पडणें; पाडणें; देणें). 'तो तोंडघसींच पडे करतां दंतप्रहार बहु रागें ।' -मो. २. (आश्रय तुटल्यानें) गोत्यांत; पेचांत; अडचणींत; फजिती होईल अशा तर्‍हेनें; फशीं (पडणें). [तोंड + घासणें] ॰घशी देणें-दुसरा तोंडघशीं पडे असें करणें. ॰चाट्या-वि. खुशामत करणारा; थुंकी झेलणारा; तोंडासारखें बोलणारा. ॰चाळा-पु. १ तोंड वेडेंवाकडें करून वेडावण्याची क्रिया. २ वात इ॰कांच्या लहरीनें होणारी तोंडाची हालचाल, चाळा. ॰चुकाऊ-वू-व्या, तोंडचुकारू-चुकव्या-वि. (काम इ॰ कांच्या भीतीनें) दृष्टि चुकविणारा; तोंड लपविणारा; नजरेस न पडे असा. [तोंड + चुकविणें] ॰चुकावणी-स्त्री. (एखाद्यापासून) तोंड लपविण्याची, स्वतःस छपविण्याची क्रिया. ॰जबानी-स्त्री. तोंडानें सांगितलेली हकीगत, दिलेली साक्ष, पुरावा. -क्रिवि तोंडी, तोंडानें. [तोंड + फा. झबान्] ॰जाब-पु. तोंडी जबाब. ॰झाडणी-स्त्री. तिरस्कारपूर्ण उद्गारांनीं झिडकारणें; खडका- वणें; खरडपट्टी काढणें. ॰देखणा-ला-वि. आपल्या अंतःकरणांत तसा भाव नसून दुसर्‍याचें मन राखण्याकरितां त्याला रुचेल असा केलेला (व्यवहार, भाषण, गो इ॰); खुशामतीचा; तोंडासारखा; तोंडपुजपणाचा. 'प्राणनाथ, मला हीं तोंडदेखणीं बोलणीं आव- डत नाहींत.' -पारिभौ ३५. [तोंड + देखणें = पाहणें] ॰देखली गोष्ट-स्त्री.दुसर्‍याची मर्जी राखण्याकरितां केलेलें, खुशामतीचें भाषण. ॰निरोप-पु. तोंडी सांगितलेला निरोप. 'कृष्णास ते हळुच तोंडनिरोप सांगे ।' -सारुह ४.९. ॰पट्टा-पु. (बायकी). तोंडाचा तोफखाना; अपशब्दांचा भडिमार; संतापानें, जोराजोरानें बेबंदपणें बोलणें. [तोंड + पट्टा = तलवार] ॰पट्टी-स्त्री. (शिवणकाम) तोंडाला शिवलेला पट्टी. 'योग्य तेवढी तोंडपट्टी कातरावी.' -काप्र. १४. ॰पाटिलकी-स्त्री. १ आपण कांहीं न करतां बसल्या जागे- वरून लुडबुडेपणानें दुसर्‍यांना हुकुमवजा गोष्टी, कामें सांगणें (पाटलाला बसल्या जागेवरून अनेक कामें हुकुम सोडून करून घ्यावीं लागतात त्यावरून). २ (उप.) लुडबुडेपणाची वटवट, बडबड; तोंडाळपणा. 'दुसरें कांहीं न झालें तरी नुसती तोंडपाटिलकी करण्यास कांहीं हरकत नाहीं.' -आगर ३.६१. [तोंड + पाटिलकी = पाटलाचें काम] ॰पाठ-वि. पुस्तकाच्या सहाय्यावांचून केवळ तोंडांनें म्हणतां येण्यासारखा; मुखोद्गत [तोंड + पाट = पठण केलेलें] ॰पालटपुस्त्री. १ (अरुचि घालविण्याकरितां केलेला) अन्नांतील फेरबदल. २ अन्नांत फेरबदल करून अरुचि घालविण्याची क्रिया. [तोंड + पालट = बदल] ॰पिटी-स्त्री. १ (वडील, गुरु इ॰ कांची) आज्ञा न मानतां तिचें औचित्य इ॰ कासंबंधीं केलेली वाटाघाट; (वडिलांशीं, गुरूंशीं) उद्धटपणानें वाद घालणें; उलट उत्तर देणें; प्रश्न इ॰ विचारून अडवणूक करणें. 'गुरूंसी करिती तोंडपिटी ।' -विपू १.५७. २ (दगडोबास शिकविण्याकरितां, विसराळू माणसास पुन्हां पुन्हां बजाविण्याकरितां, थिल्लर जनावरास हांकलण्याकरितां करावी लागणारी) व्यर्थ बडबड, कटकट, वटवट. [तोंड + पिटणें] ॰प्रचिती-प्रचीति-स्त्री. खुशामत करण्याकरितां (एखाद्याच्या) व्यक्तिमाहात्म्यास, भाषणास, अस्तित्वास मान देणें; आदर दाख- विणें. [तोंड + प्रचीति] ॰प्रचीतक्रिवि. १ तोंडासारखें; खुशामतीचें; तोंडापुरतें (भाषण, वर्तन इ॰ करणें) २ माणूस ओळखून, पाहून; माणसामाणसांत तारतम्य ठेवून (बोलणें, चालणें, वागणें). ॰प्रचीत बोलणारा-चालणारा-वागणारा-वि. माणसामाणसांत तारतम्य ठेवून चालणारा, बोलणारा, वागणारा. ॰फटालकी -फटालीस्त्री. तोंडाची निरर्थक बडबड, वटवट, टकळी. [तोंड + ध्व. फटां ! द्वि.] ॰फटाला-ल्या-वि. मूर्खपणानें कांहीं तरी बड बडणारा; बकणारा; वटवट करणारा. [तोंड + ध्व. फटां !] ॰फट्याळ-वि. तोंडाचा फटकळ; शिवराळ; तोंडाळ; बातेफरास; अंगीं कर्तृत्व नसून लंब्या लंब्या बाता झोंकणारा. ॰फट्याळी- स्त्री. शिवराळपणा; तोंडाळपणा; वावदूकता. [तोंडफट्याळ] ॰बडबड्या-बडव्या-वि. निरर्थक वटवट, बडबड करणारा: बकबकणांरा टकळी चालविणारा. ॰बंद -बांधणी-पुस्त्री. गाडीच्या चाकाच्या तुंब्यावरील बाहेरील बाजूचें लोखंडी कडें, पट्टी. आंतील बाजूच्या कड्यास कटबंद असें म्हणतात. [तोंड + बंद = बांधणी] ॰बळ-न. वक्तृत्वशक्ति; वाक्पटुता; वाक्चातुर्य. 'आंगबळ न चांगबळ देरे देवा तोंडबळ.' ॰बळाचा-वि. ज्याला बोलण्याची हातोटी, वक्तृत्कला साधली आहें असा; तोंडबळ अस- लेला; भाषणपटु जबेफरास. ॰बाग-स्त्री. (राजा.) चेहरेपट्टी; चेहर्‍याची ठेवण, घडण; मुखवटा. ॰बांधणी-स्त्री. १ तोंडबंद पहा. २ (ढोरांचा धंदा) कातड्याच्या मोटेच्या सोंडेच्या टोंकाकरितां बाजूला शिवलेला गोट. ॰भडभड्या-वि. तोंडास येईल तें बड- बडत, बकत सुटणारा; बोलण्याची, बडबडण्याची हुक्की, इसळी ज्यास येते असा; भडभडून बोलणारा. ॰भर-वि. तोंडास येईल तेवढा; भरपूर. 'हॅमिल्टन यांनीं खर्चवाढीबद्दल तोंडभर मगणी केली होती.' -केले १.१९८. ॰मार-स्त्री. १ रोग्यावर लाद- लेला खाद्यपेयांचा निर्बंध, पथ्य. २ एखाद्यास बोलण्याकरितां तोंड उघडूं न देणें; भाषणबंदी. ३ (ल.) (एखाद्याच्या) आशा, आकांक्षा फोल ठरविणें; (एखाद्याचा केलेला) आशाभंग; मनोभंग; निराशा. (क्रि॰ करणें). ॰मारा-पु. १ शेतीच्या कामाच्या वेळीं पिकांत वगैरें काम करतांना गुरांच्या तोंडाला जाळी, मुंगसें, मुसकें बांधणें. २ (एखाद्यास केलेली) भाषणबंदी; खाद्यपेयांचा निर्बंध. ३ (प्र.) तोंडमार. तोंडमार अर्थ ३ पहा. ॰मिळवणी- स्त्री, १ जमा आणि खर्च यांचा मेळ; तोंडें मिळविण्यासाठीं मांडलेला जमाखर्च. २ ऋणको व धनको यांच्यांतील हिशेबाची बेबाकी, पूज्य. ३ मेळ. -शर. ॰मिळवणी खातें- (जमाखर्च) कच्चें खातें (याचें देणें येणें सालअखेर पुरें करून खुद्द खात्यांत जिरवितात). ॰लपव्या-वि. तोंड लपविणारा; छपून राहणारा; दडी मारून बसणारा. ॰लाग-पु. शिंगें असलेल्या जनावरांच्या तोंडास होणारा रोग; यांत लाळ गळत असते. ॰वळख-स्त्री (प्र.) तोंडओळख पहा. ॰वळण-वळा-नपु. चेहरा; चर्या; मुद्रा; चेहर्‍याची घडण, ठेवण; रूपरेखा; चेहरामोहरा; चेहरेपट्टी; मुखाकृति; मुखवटा. [तोंड + वळ = रचना] ॰वीख-न. (ल.) तोंडानें ओकलेलें, तोंडां- तून निघालेलें, विषारी, वाईट भाषण, बोलणें. [तोंड + विष] ॰शिनळ, शिंदळ-वि. अचकटविचटक, बीभत्स बोलणारा; केवळ तोंडानें शिनळकी करणारा. ॰शेवळें-न. मुंडावळ. -बदलापूर २७७. [तोंड + शेवळें = शेवाळें] ॰सर-क्रिवि. तुडुंब; तोंडापर्यंत; भरपूर. ॰सरता-वि. अस्खलित, तोंडपाठ न म्हणतां येण्या- सारखा; अडखळत अडखळत म्हणतां येण्यासारखा (श्लोक, ग्रंथ इ॰). -क्रिवि. घसरत घसरत; अडखळत; चुका करीत; कसेंबसें; आठवून आठवून. [तोंड + सरणें] ॰सुख-न. १ एखा- द्यानें केलेल्या अपकाराचें शरीरानें प्रतिकार करण्याचें सामर्थ्य नसल्यामुळें केवळ तोंडानें यथेच्छ शिव्यांचा, अपशब्दांचा भडि- मार करून त्यांत सुख मानणें. २ जिव्हा मोकाट सोडून वाटेल तसें बोलण्यांत मानलेलें सुख; यथेच्छ व अद्वातद्वा केलेलें भाषण; (एखाद्याची काढलेली) खरडपट्टी; बोडंती. (क्रि॰ घेणें). ॰सुख घेणें-(एखाद्याची) खरडपट्टी काढणें, हजेरी घेणें; (एखा- द्यावर) शिव्यांचा, अपशब्दांचा भडिमार करणें. ॰सुटका-स्त्री. १ जिभेचा (बोलण्यांतील) स्वैरपणा; सुळसुळीतपणा; वाक्चा- पल्य; जबेफराशी; (भाषण इ॰ कांतील) जनलज्जेपासूनची मोक- ळीक. २ भाषणस्वातंत्र्य; बोलण्याची मोकळीक. ३ तोंडाळपणा; शिवराळपणा. ४ (पथ्य, अरुची, तोंड येणें इ॰ कांपासून झालेली) तोंडाची सुटका, मोकळीक; तोंड बरें होणें; खाण्यापिण्याला स्वातंत्र्य. [तोंड + सुटणें] ॰हिशेबी-वि. अनेक रकमांचा मनांतल्या- मनांत चटकन्‌ हिशेब करून सांगणारा बुद्धिमान (मनुष्य); शीघ्रगणक. ॰तोंडागळा-वि. (तोंडानें) बोलण्यांत, वक्तृत्वशक्तींत अधिक. 'कीं शेषाहूनि तोंडागळें । बोलकें आथी ।' -ज्ञा ९. ३७०. [तोंड + आगळा = अधिक] ॰तोंडातोंडी-क्रिवि. १ समोरासमोर; २ बोलण्यांत; बोलाचालींत. [तोंड द्वि.] ॰तोंडाळ-वि. १ दुसर्‍या- वर तोंड टाकणारा; शिवराळ; भांडखोर. 'लटिकें आणि तोंडाळ । अतिशयेंसीं ।' -दा २.३.१०. २ बडबड्या; वाचाळ. [तोंड] म्ह॰ हाताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं = शिवराळ माणसा- पेक्षां चोर पुरवतो. ॰तोंडाळणें-उक्रि. बकबक करून गुप्त गोष्ट फोडणें; जीभ पघळणें. [तोंडाळ] ॰तोंडोंतोंड-क्रिवि. तोंडापर्यंत; कंठोकांठ; तुडुंब; तोंडसर.॰तोंडोंळा-पु. तोंडवळा; चेहरेपट्टी. [तोंड + ओळा, वळा प्रत्यय]

दाते शब्दकोश