मराठी बृहद्कोश

सहा मराठी शब्दकोशांतील २,१८,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

पंचिका

पंचिका pañcikā f (S) A common name for the sections of the ब्राह्मणभाग of each वेद.

मोल्सवर्थ शब्दकोश

स्त्री. पांचांचा ससुदाय. ऋग्वेदाच्या ऐतरेय ब्राह्म- णाच्या आठ भागांपैकीं प्रत्येकास संज्ञा. या प्रत्येक पंचिकेंत पांच अध्याय असतात. [सं.]

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

पांची

स्त्री. ए/?/तरेय ब्राह्मणाच्या चाळीस अध्यायांच्या प्रत्येकी पांच याप्रमाणें पाडलेल्या आठ गटांपैकी प्रत्येक पंचिका; पंचिका पहा. 'कित्येक तेथें पढताति पांच्या । कित्येक माळा धरिती जपांच्या ।' -सारुह ६.४६. [सं. पंचक]

दाते शब्दकोश

आभ

न. (कों.) १ आकाश; आभाळ. २ ढग; अभ्र; आभाळ येणें. ३ प्रतिबिंब -आगमसार पंचिका १.२.३४. (हंको) [सं. अभ्र]

दाते शब्दकोश

ऐतरेय

पु. एक वैदिक ॠषि; इतरा नांवाच्या स्त्रीचा मुलगा. ॰आरण्यक-न. ॠग्वेदाच्या शाकल शाखेचें आरण्यक. याचे पांच भाग असून यांत कांहीं अध्यात्म व बराचसा हौत्रविषय आहे. ॰उपनिषद्-न. ऐतरेय आरण्यकाच्या दुसर्‍या भागांतील काहीं भाग. यांत अध्यात्मविषयाचें विवेचन आहे. ॰ब्राह्यण-न. ॠग्वेदाचा ब्राह्मण ग्रंथ. याचे ४० अध्याय असून पांच पांच अध्यायाचांची एक अशा आठ पंचिका आहेत. यज्ञांत होता नामक ॠत्विजानें करावयाच्या हौत्रकर्माविषयींचें विवेचन यांत आलें आहे. या ग्रंथाचें कर्तृत्व ऐतरेय ॠषीकडे आहे.

दाते शब्दकोश

पची

पु. (कु.) पांच किंवा सात दगड किंवा गोट्यांचा लहान मुलांचा एक खेळ. [सं. पंचिका]

दाते शब्दकोश

पंची

स्त्री. विस्तृत भाषण. [सं. पंचिका]

दाते शब्दकोश

उपाधि

पुस्त्री. १ शुद्धस्वरूप पदार्थावर अन्यरूपता भासवि- ण्यास कारणीभूत असणारें पदार्थांतर. उ॰ रंग द्रव्यानें पाण्यास रंगीत स्वरूप येतें, येथे रंगद्रव्य हा उपाधि होय. 'आकारविशेषरूप उपाधि झाला म्हणजे सुवर्ण अंलकारादि व्यपदेश पावतें.' २ कोणेका पदार्थापासून विलक्षण कार्य उत्पन्न होण्यास प्रयोजक असें कांही एक; (सामा.) कारण, उत्पादक, प्रवर्तक, परिणामकारक, कार्य- कारक गोष्ट. उ॰ अग्नीपासून धूर होतो त्यास आर्द्रेंधनसंयोग उपाधि होय. ३ प्रसंग; कारण; निमित्त; प्रयोजन. ४ विशेष गुण- धर्म; गुणविशेष. ५ पदवी; टोपण नांव; अन्वर्थक नांव; विशेषण (आवडीनें किंवा उपहासानें दिलेलें). ६ (वेदांत) जग; माया; बाह्यपाश; संग. 'करिती नावडतेयां त्याग । उपाधींचे ।' -ज्ञा १७. ३६२. ७ प्रपंच; संसार. 'जीवु तैसा उपाधि । आवडे लोकां ।' -ज्ञा ४.२१. ८ विकार; विचार. -आगमसार पंचिका १.२.५०. ९ त्रास; अडथळा; उपसर्ग; अडचण; आपत्ति; संकट; भानगड; लचांड; लिगाड. 'रायाच्या मनीं नव्हतें, पडूं नये उपाधीला ।' -ऐपो ४१०. 'राजकीय बाबतींत अशा उपाधी म्हणजे लोकांचा असं- तोष, आग्रह...ह्याच होत.' -टि ३.२५९. १० (रामदासी) चळ- वळ; खटपट. 'उपाधीसी विस्तारावें । उपाधींत न सांपडावें ।' -दा ११.५.९. 'सांकडीमधें वर्तों जाणे । उपाधीमधें मिळों जाणे ।।' -दा ११.६.१३. [सं.] ॰निरास पु. उपाधि नाहींशी करणें.

दाते शब्दकोश