आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
पडसाद
पडसाद paḍasāda m f C Reflected sound, echo.
पडसाद m f Reflected sound, echo.
संबंधित शब्द
प्रतिध्वनि,प्रतिनाद
पु. पडसाद; प्रतिशब्द. प्रतिध्वनित, प्रतिनादित-वि. पडसाद, प्रतिशब्द देणारा, दिलेला; पडसादानें युक्त.
अनुध्वनि
पु. १ मुख्य आवाजानंतरचा आवाज; प्रतिध्वनि; पडसाद. २ वाद्य बंद केल्यानंतर चालू राहणारा नाद-सूर-कंप. [सं. अनु + ध्वनि]
अनुध्वनि, अनुध्वनी
पु. १. मुख्य आवाजानंतरचा आवाज; पडसाद. २. वाद्य बंद केल्यानंतर चालू राहणारा नाद, सूर, कंप. [सं.]
अनुरणन
न. १ प्रतिध्वनि, पडसाद. २ वाद्य वाजविणें बंद झाल्यानंतर त्यांतून कांहीं वेळ घुमणारा, टिकणारा ध्वनि; आवा- जाची धून. ३ सतारीच्या जोडांच्या तारांतून निघणारा ध्वनि किंवा कंपन. ४ (साहित्य.) व्यांगार्थ. [सं. अनु + रण् = नाद करणें.]
अनुरणन
न. १. प्रतिध्वनी; पडसाद. २. वाद्य वाजविणे बंद झाल्यावर त्यातून काही वेळ घुमणारा, टिकणारा ध्वनी; आवाजाची धून. ३. सतारीच्या जोडांच्या तारांतून निघणारा ध्वनी किंवा कंपन. ४. (साहित्य) व्यंग्यार्थ. [सं.]
आटु, आटू
पु. १. लय; आटणी; नाश : ‘तंव शब्दाचा दिवो मावळला । मग तयाहि वरी आटु भविन्नला ।’ − ज्ञा ६·३१४. २. प्रतिशब्द; पडसाद.
आटू
पु. (महानु.) प्रतिशब्द; पडसाद. 'त्रिभुवना आटु भवंडिला' -संत राजी रुस्व १३.
चाहूल
स्त्री. पडसाद; कानोसा; मनुष्याच्या अथवा जनावराच्या हालचालींचा आवाज, चिन्ह; माणसाच्या येण्याची सूचना : ‘जागा रे गोपाळांनो ठायी ठायी जागा । चाहुलीने भागा दूर मजपासूनी ।’ - तुगा २५१. (वा.) चाहूल लागणे - कोणतरी जवळपास आल्याची जाणीव (होणे) : ‘त्याला कशी काय चाहूल लागली आपली?’ - गआचा ५. [सं. चलनवलन]
चाहूल
स्त्री. पडसाद; कानोसा; मनुष्याच्या अथवा जना- वरांच्या हालचालीचा आवाज, चिन्ह; माणसाच्या येण्याची सूचना. 'जागा रे गोपाळांनों ठायीं ठायीं जागा । चाहुलीनें भागा दूर मजपासूनी ।' -तुगा २५१. [चाल + हूल]
खवण
न. १ आकाश. २ पडसाद; प्रतिशब्द. [ख + वाणी]
खवण
न. १. आकाश. २. पडसाद; प्रतिशब्द.
निनाद
पु. १. मोठा नाद, आवाज. २. पडसाद; प्रतिध्वनी. [सं.]
निनाद
पु. १ मोठा नाद, आवाज. 'तैसेचि देखे येरें । निनादें अति नाहिरें ।' -ज्ञा १.१४६. २ पडसाद; प्रतिध्वनि. [सं.]
पडिसाद
पु. पडसाद पहा. 'कां आपुलींचि उत्तरें । पडि- सादां होती प्रत्युत्तरें । तें मिथ्याचि परी साचोकारें । श्रवणीं अक्षरें उमटती ।' -एभा २८.८८.
पडिसादु-पडिया
पु. पडसाद पहा. 'तंव सिंहाचे शब्दें पडिसादु थोरु जाला ।' -पंच ३.२३.
प्रतिशब्द
पु. १ पडसाद; प्रतिध्वनि; प्रतिनाद, 'साद घात- लिया आकाशा । नेदी प्रतिशब्दु जैसा ।' -ज्ञा १७.२७९. २ एका शब्दाला जोड द्यावयासाठीं द्विरुक्ति करून योजिलेला दुसरा तत्सदृश शब्द जसें:-भाकरी-बिकरी' धारणधोरण; दगडबिगड इ॰. उपशब्द पहा. ३ एखाद्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठीं योजि- लेला त्याच अर्थाचा दुसरा शब्द; पर्याय; समनार्थक शद्ब.
साद
पुस्त्री. १ हांक; येण्याविषयीं बोलाविणें. (क्रि॰ घालणें; देणें; हाकणें). 'विपायें वाढे सत्त्व शुद्ध । तेव्हां ज्ञानासी करी साद ।' -ज्ञा १७.६२. २ हाकेला उत्तर; ओ देणें. 'सादु दे कारे पुत्रराया ।' -उषा ६४; -मोअश्व १.२५. ३ प्रतिध्वनि; पडसाद. ४ शब्द; ध्वनि. 'तंव त्या बैलाचा सादु आईकोनि ।' -पंच. ५ (ल.) इच्छा. 'तोचि अभेदु कैसा । हें जाणावया मानसा । साद जाली तरी परियेसा । बोलिजेल ।' -ज्ञा १०.१११. [सं. शब्द; प्रा. सद्द; पं. सद; हिं. गु. साद] ॰घालणें-१ हाक मारणें. -केक १२८. २ (कों.) गागणें. ॰धरणें-पडल्यामुळें किंवा भीतीमुळें रडण्याचा आवाज तोंडातून न निघणें (लहान मुलाचा); श्वास धरणें. ॰परतणें-निराळा आवाज देणें; पिकलेली अवस्था- बदललेल्या आवाजावरून दाखविणें (फळानें, विशेषतः फणसाच्या). -सामाशब्द. ॰परका-ता-वि. १ बदललेल्या आवाजाचा. २ (ल.) पिकलेला. साद परतणें पहा. ॰सादणें-अक्रि. शब्द करणें. 'भणओनि मदनु सादैजें । लेंकरूंपणा लागी ।' -शिशु ३७०. सादविणें, सादाविणें-उक्रि. १ साद घालणें; हांक मारणें. 'वायुदेवातें सादवी । बीजमंत्रें करूनिया ।' -मुआदि २७.१७५; -तुगा ५४. 'करी घेवूनिया सादवी ।' -निगा ११.२ (कर्ना.) ताल धरणें; टिमकी वाजवून साथ करणें. सादु-पु. साद; शब्द. 'तंव त्या बैलाचा सादु आईकौनि साशंकित झाला.' -पंच ३. सादुकारवि. शब्द करणारा. -पंच ३.
शोक
ती शोकसागरांत गर्क झाली, शोकविव्हल, मनांतल्या विस्कटलेल्या विचारांना विंचरीत बसे, आपल्याच दु:खी अंतःकरणाचे पडसाद बाहेर जगांत दिसत, तब्येत लागत नसे, मनाची ही निरगांठ उकलेना, मनच मेलें, जाणीव बधिरली, दुःख उगाळीत बसे, त्याचा चेहरा खाडकन् उतरला, दुःखमिश्रित गांभीर्यांचे जड पटल, जागच्या जागीं खिळल्यासारखा उभा राहिला, अति झालें हंसू आलें, सुतकी चेह-याने, विषण्णता मन झाकळून टाकी, मनांतील आनंदाचें खोबरें झालें, रंजीस आले, बरींच वर्षे तिचें बोलणे-हंसणें इतिहासजमा झालें होतें, अलीकडे दुःख हा मनाचा स्थायीभाव होऊन बसला आहे.
उपध्वनि
पु. प्रतिध्वनि; मुख्य आवाजामागून निघणारा बारीक आवाज; प्रतिशब्द; पडसाद. [सं. उप + ध्वनि]
उपध्वनि, उपध्वनी
पु. प्रतिध्वनी; मुख्य आवाजामागून निघणारा बारीक आवाज; प्रतिशब्द; पडसाद. [सं.]
उठणें
अक्रि. १ उभें राहणें. बसणें त्याच्या उलट. २ (ल.) वर याणें; आकाशांत वर जाणें (धूर, धुरळा). ३ जागें हणें; शुद्धी वर येणें (झोपेंतून, मुर्च्छेतून). ४ बरखास्त होणें, संपणें (सभा, बैठक वगैरे). 'चार वाजले म्हणजे कचेरी उठते !' ५ (सैन्य वगैरे) चालू होणें; बाहेर पडणें; सज्ज होणें; हल्ला करणें. 'भट दशसहस्त्र उठले जे आज्ञाकर सुयोधानाचे हो !' -मोभीष्म ६.६१. ६ उडून जाणें (एखाद्यावरील मन,प्रेम); उद्विग्न होणें; त्रासणें; कंटाळणें. ७ बंड करणें (एखाद्या विरुद्ध); सामना देण्यास तयार होणें. 'दुर्जन ज्याचें अन्न खातो त्याजवरच उठतो.' ८ स्पष्ट दिसणें; उमटणें. (ठसा, रंग, छाप वगैरे). 'उत्तम गुण तत्काळ उठे ।' -दा १९.६.२०. ९ वर येणें; दिसावयास लागणें; बाहेर पडणें; उद्भवणें (पुरळ, सांथ. संकट, बातमी वगैरे). १० दुखावयास लागणें; (डोकें, कपाळ, मस्तक; शीर, त्याचप्रमाणें दाढ, दांत, कान, हात, पाय, या संबंधीही क्वचित उपयोग करतात). 'निघाल्या देवी आणि गोवर । उठलें कपाळ लागला ज्वर ।' -दा ३.२.२६. ११ ताजेंतवानें होणें; फुलणें; टवटवीत होणें; आनंदित होणें; (मनुष्य, प्राणी, वन- स्पती वगैरे); खुलून दिसणें (रंग वगैरे.). १२ आकसानें आळ घेणें; कुभांड रचणें (मनुष्यावर; घराण्यावर वगैरे). १३ खुणा पडणें; उठून दिसावयास लागणें (वण, वळ, चाबकाचा मार, दांताचा चावा). १४ करवणें; उरकणें; पार पडणें (काम वगैरे). 'माझ्याच्यानें पहिल्यासारखें कामही उठत नाहीं.' -विवि ८.८.१५३. १५ वस्ती वगैरे उठून जाणें; ओसाड पडणें. १६ उत्पन्न होणें. 'उठती घन- पटळें । नाना वर्णे ।' -ज्ञा ८.३०. 'शब्द पडसाद उठला । म्हणे कोण रे बोलिला ।' १७ (व.) खर्च होणें; खलास होणें; संपून जाणें. 'इतके तांदूळ आजच्या आज उठतील.' म्ह॰ उठणे- वाल्याचें उठतें कोठीवाल्याचें पोट दुखतें.' १८ पूर येणें. 'जसें महाप्रळयीं जळ । उठलिया भरे ब्रम्ह गोळ ।' -विउ ११.८६. १९ वाढणें. 'चार शिंपणी लागोपाठ सांपडतांच पहिल्यापेक्षां चार बोटें भाजी उठली. ' २० प्रवृत्त होणें (वाईट करण्यास). 'मी इतकें बोलतांच तो जीव ध्यावयास उठला.' २१ क्षोभ होणें (पित्ता- दिकांचा). २२ नवीनच गोष्ट प्रसिद्ध होणें; प्रचारांत येणें. 'बारा- वर्षांचे मागलें देणेंघेणें कोणी देऊं नये, मांगू नये असें हें अलीकडे नवेंच उठलें.' २३ एखाद्यानें लौकिकानुरूप मर्यादा सोडून वर्तन करणें. २४ उभें होणें; तयार होणें (इमारत वगैरे.) 'तैं राजवाडा उठे.' -विक ११.२५ वाटणें; मनांत येणें. 'झोंबी घ्यावी ऐसें उठे ।' -दा २.६.१५. [सं. उत् + स्था; प्रा. उठ्ठ; सिं. उथणु; जिप्सी सीगन उष्टी; जिप्सी फ्रेंच उट्ठी] उठून जाणें-१ परवानगीशिवाय निघून जाणें; पळून जाणें; रागानें चालतें होणें. 'त्याची थट्टा सुरु होतांच तो मंडळींतून उठून गेला.' माणसांतून उठून जाणें-१ रीतभात सोडणें; अनीतीच्या मार्गाला लागणें. २ परपुरुषाबरोबर निघून जाणें (स्त्रियांच्या बाबतींत). 'खरेंच कां रूपमाया सेनापती उठून गेल्या.' -बाय ४.३. उठून दिसणें- स्पष्टपणें नजरेस येणें. नित्य उठून, रोज उठून- क्रिवि. दररोज नेमानें; नित्य; रोजच्यारोज. उठला ठाव देववत नाहीं-उठून जेवावयाचें पानहि मांडतां येत नाहीं (इतक्या निर्बलतेचें द्योतक).
पड
अ. हाताखाली, दुय्यम, दुसऱ्या प्रतीचा, मुख्य वस्तूच्या ऐवजीं घ्यावयाची या अर्थाचा एक प्रत्यय. जसें:- पड-चाकर-शिष्य-लंका-जीभ-कोट-साक्ष इ॰. 'तूं लंका पाहि- लीस तर काय झालें मी पडलंका पाहिली.' [प्रति = दुसरा किंवा सं. पर = पलीकडचा] ॰केश-स-पुअव. डोळ्याच्या पापणीच्या खालीं आंतील बाजूला उगवणारे केंस; डोळ्याचा एक रोग. ॰कोट-पु. किल्ल्याच्या बाहेरचा तट. ॰गादी-स्त्री. गालिचा; लहान गादी. ॰गहाण, गाहाण-न. गहाण ठेवणारानें किंवा सावकारानें आपल्याकडे गहाण ठेवलेले दुसऱ्याकडे गहाण टाकलेले जिन्नस. ॰गहाणदार-पु. पडगहाण ठेवून घेणारा. ॰छाया-स्त्री. १ प्रतिबिंब. २ छाया; साउली. [सं. प्रतिच्छाया] ॰जावई-पु. (व.) जावयाचा भाऊ. ॰जीभ-स्त्री. जिभेच्या मागें असणारी दुसरी लहान जीभ; जिभेच्या मुळाशीं लोंबणारी मांसाची लोळी. [सं. पतज्जिव्हा] ॰थळ-न. (राजा.) पिशाच्चाच्या उपद्रवाचा एका देवानें काहीं निर्णय सांगितला असतां इतर गांवचे देवाला विचारून जो त्याचा पडताळा पहातात तें; किंवा त्या देवानें सांगितल्याप्रमाणें पुजाऱ्याकडून करून घेतलेला लेख; पडताळा. [प्रति + स्थळ] ॰दोरा-पु. गळ्यांतील माळ, हार इ॰कास जोड- लेला व गळ्याभोंवती बांधावयाचा जोड दोरा. ॰नांव-न. टोपण, व्यावहारिक नांव. ॰नाळ-(कों.) (नाविक) मागच्या खांद्यास बाहेरच्या बाजूस जोडलेलीं लांकडें. ॰पापणी-स्त्री. पडकेश पहा. ॰बंद-पु. (गंजिफांचा खेळ) बंदाच्या (राजा, वजीर यांच्या खालील पानाच्या) खालेचें पान. ॰भिंत-स्त्री. मुख्य भिंतीच्या बोहेरची दुसरी भिंत. ॰भोज-भोजन-न. १ वरपक्षाकडून लग्नाचे दुसरे दिवशीं वधूपक्षास दिलेली मेजवानी. २ परत जेवण. [पड = प्रति किंवा परत + भोजन] ॰लंका-स्त्री. एक रावणाची लंका व दुसरी तिच्याहि पलीकडे दूर असलेली लंका. ॰विद्यार्थी- पु. विद्यार्थ्याच्या हाताखालचा दुसरा विद्यार्थी. 'शिवाय त्या शाळेंत पडविद्यर्थी असत ते निराळेच.' -चं १६. ॰शब्द- साद-पु. प्रतिध्वनि; प्रतिशब्द; पडिसाद. 'कां पडसादाचा अवचितां । गजर उठे ।' -दा ६.८.१९. 'शब्द पडसाद ऊठला । म्हणे कोणरे बोलिला ।' -रामदासी स्फुट अभंग २७ नवनीत पृ. १५०) [सं. प्रतिशब्द] ॰शाळा-ळ-शाला-स्त्री. १ घरापासून थोड्याशा अंतरावर बांधलेलें छोटेखानी घर; ओंवरी. २ उतारूंसाठीं देवालयालगत बांधलेली धर्मशाळा. 'मठ मंडपा धर्मशाळा । देवद्वारीं पडशाळा ।' -दा ४.५.२३. ॰सरी-स्त्री. १ उतार असलेल्या जमीनीवरील पाणी वाहून जाण्यासाठीं काढून दिलेला नाला, पाट, जलमार्ग. २ बागाईत जमीन. [पर + सरी] ॰साई-स्त्री. १ छाया; काळोख; झावळेपण. 'आंधार कोंडोनि घरीं । घरा पडसाई न करी ।' -अमृ ७.२१. (जुनी प्रत) २ सावली; पडछाया. 'दीपामागें पडसाई । तैश्या डोळ्यामागें भोंवई ।' -भाराबाल ६.५०. [पड + छाया] ॰सावली-स्त्री. पडछाया; प्रतिबिंब. ॰साळ-स्त्री. १पडशाळा पहा. २ (कु.) पडवी; ओटी. 'तेव्हां ती लवकर घरांतून बाहेर जाऊन पडसाळेंत एक वर्षाच्या वयाची हंसी होती तिला तिनें त्या घरांत आणिलें ।' -मराठी सहावें पुस्तक. पृ. १८. (१८७५) ॰साक्ष-स्त्री. १ पुराव्याला बळकटी देणारा दुसरा पुरावा. २ पडसाक्षी पहा. ॰साक्षी-पु. १ पुराव्याला बळकटी किंवा पुष्टि देणारा साक्षी- दार. २ साक्षादाराचा साक्षी; दुसऱ्याच्या विश्वासूपणाबद्दल शपथपूर्वक खात्री देणारा. ॰सूत्र-दोरा-नपु. मंगळसूत्र, गळसरी इ॰ ओंवून गांठ दिल्यावर जीं त्या दोऱ्याचीं टोकें राहिलीं असतात तीं. ॰स्थळ-न. पडथळ पहा. ॰हात-पु. (गो.) प्रतिहस्त.