मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

परोक्ष

परोक्ष parōkṣa ad (S पर & अक्षि Eye.) Behind one's back; in the absence of. Used by the ignorant in the sense In the presence of; and अपरोक्ष is created to express In the absence of.

मोल्सवर्थ शब्दकोश

परोक्ष ad Behind one's back.

वझे शब्दकोश

क्रिवि. १ एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या- आड; असमक्ष. २ (चुकीनें) समक्ष. अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात. -वि. अदृश्य; अदृष्ट; न पाहिलेलें. [सं.] ॰ज्ञान-न. न पाहिलेल्या वस्तूंचें ज्ञान. हा शब्द अप्रत्यक्ष विषयदर्शन ह्यासाठींहि योजतात.

दाते शब्दकोश

परोक्ष parōkṣa a S Invisible or unseen.

मोल्सवर्थ शब्दकोश

(सं) क्रि० परभारें, डोळ्याआड.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

संबंधित शब्द

पारखे

वि. परोक्ष; पाठीमागें; मागें; पश्चात्. [सं. परोक्ष]

दाते शब्दकोश

अन्योक्ति

स्त्री. १ आडून बोलणें; अप्रत्यक्ष बोलणें. २ एक अर्थालंकार; अप्रस्तुतप्रशंसा; जेथें अप्रस्तुत गोष्टीच्या वर्णनानें प्रस्तुत गोष्टीची प्रतीति होते तो. १ कार्यावरून कारणाचें, २ कारणा- वरून कार्याचें, ३ सामान्यावरून विशेषाचें व ४ विशेषावरून सामा- न्याचें वर्णन करणें हीं कांहीं अन्योक्तीचीं अंगें आहेत. उ॰ द्वारीं मृगपति हस्तांतून अहो वीरराय जी मुक्ता । ती सेविजेल इतरें सिंहा- वांचून काय जी मुक्ता ।।' -मोरो. 'येथें समस्त बहिरे बसतात लोक । कां भाषणें मधुर तूं करिसी अनेक । हे मूर्ख ज्यांस किमपीहि नसे विवेक । रंगावरूनि तुजला गणितील काक ।।' (हा शब्द श्रीयुत कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनीं रूढ केला. या अलंकाराला मूळ संस्कृता- मध्यें अप्रस्तुतप्रशंसा असें म्हणतात). ३ गुढ अर्थाचें भाषण. 'परोक्ष वाद वेदव्युत्पत्ती । त्यागसुखें गा अन्योक्ती ।सांडवी विषया- सक्ती । ब्रह्यप्राप्ती लागूनी ।' -एभा २१.३५३. [सं. अन्य + वच् = बोलणें]

दाते शब्दकोश

अन्योक्ति, अन्योक्ती      

स्त्री.       १. आडून बोलणे; अप्रत्यक्ष बोलणे. २. एक अर्थालंकार; अप्रस्तुत प्रशंसा. अप्रस्तुत गोष्टीच्या वर्णनाने प्रस्तुत गोष्टीची प्रतीती. (१) कार्यावरून कारणाचे, (२) कारणावरून कार्याचे, (३) सामान्यावरून विशेषाचे व (४) विशेषावरून सामान्याचे वर्णन करणे. ही अन्योक्तीची काही अंगे आहेत. ३. गूढ अर्थाचे भाषण : ‘परोक्ष वाद वेदव्युत्पत्ती । त्यागसुखें गा अन्योक्ती । सांडवी विषयासक्ती । ब्रह्मप्राप्ती लागूनी ॥’ – एभा २१·३५३. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अपरोखीं

क्रिवि. (कु.) अपरोक्ष; पाठीमागें; मागून; डोळ्याआड.[सं. अपरोक्ष = चुकीनें परोक्ष या अर्थी]

दाते शब्दकोश

अपुरकीं

क्रिवि. (गो.) पश्चात्; मागें; (म.) अपरोक्ष; (सं. परोक्ष)

दाते शब्दकोश

अस्वडी      

क्रिवि.       मागे; परोक्ष; सवड नसता; अयोग्य वेळी. (गो.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अस्वडीं

क्रिवि. (गो.) मागें; परोक्ष; सवड नसतां; अयोग्य- वेळीं. [ अ + सवड ]

दाते शब्दकोश

डोळयामागें

क्रि० परभारें, परोक्ष.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

न्यास

पु. १ ठेवणें; स्थापणें; निक्षेप; मुख्यत्वें करावयाच्या गणिताचे आंकडे मांडणें; शस्त्रास्त्रावर दैवी मंत्रांचें अधिष्ठान करणें; मनांत, आठवणींत ठेवणें, सोंपविणे. (ठेव, निश्वस्त वस्तु). २ घर- धन्याला न दाखवितां त्याच्या परोक्ष घरांतील माणसांच्या हवालीं करून हें मालकास द्या असें सांगून दिललें द्रव्य. -मिताक्षरा. ३ जप इत्यादि कर्मोच्या आरंभीं ज्या मंत्राचा जप करावयाचा असेल त्यांतील बीजांचें आपल्या शरीरावयवांच्या ठिकाणीं अधिष्ठान कल्पून त्या त्या शरीरावयवास स्पर्श करणें (धर्मसिंधु-महान्यास, लघुन्यास, षडंगन्यास पहा). ४ मंत्रांनीं देवाच्या मूर्तीच्या अवयवांवर देवत्वाची स्थापना करणें. ५ छाप; ठसा; खूण. 'नखन्यास.' ६ सोडणें; त्यागणें; न स्वीकारणें; त्याग. कर्मन्यास, फलन्यासपहा. [सं. नि + अस्-न्यास] न्यासणें-उक्रि. ठेवणें. 'परीचित्तवृत्ति न्यासावी । आत्मरूपीं ।' -ज्ञा ३.१८६. ॰स्वर- पु. (संगीत) ज्या स्वरावर गीत समाप्त होतें तो.

दाते शब्दकोश

परभारां

क्रि० परस्पर, परोक्ष.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

परभारा-रां-भारीं-भारे-रें

क्रिवि. १ एखाद्या इसमास वगळून. २ ज्याच्याबद्दल आदर, कळकळ दाखविणें योग्य आहे असा विषय, वस्तु किंवा माणूस यांची हेळसांड करून. 'मला न सांगता त्यांस तूं परभारा निरोप देऊं नको.' ३ जी गोष्ट लक्षांत घेणें जरूर आहे त्याकडे दुर्लक्ष करून. ४ परस्पर; बाहेरच्या बाहेर. 'घरीं जाण्याची त्वरा होती म्हणून तुमची भेट न घेतां मी परभारा गेलों.' ५ नेहमींच्या परिपाठाव्यतिरिक्त. ६ अप्रत्यक्ष रीतीनें; अन्य द्वारें . 'तुमच्या शत्रूचें परभारा परिपत्य झालें.' ७ कांहीं प्रयत्न न करतां; सहज. 'प्रतिवर्षीं घरी खंडण्या चालुन येती परभारी ।' -ऐपो ४०६. (समासांत) परभारा-अंमल-खर्च- मिळकत; शिल्लक. ८ (कु.) पाठीमागें; परोक्ष. [सं. पर + बहिः] परभारें-न. (जमाखर्च) वराती दिलेल्या रकमांच्या तपशीलाचें सदर.

दाते शब्दकोश

पश्चात्

क्रिवि. १ नंतर; मागून. २ पाठीमागें; आड; परोक्ष; पश्चिमेकडे. [सं.] ॰स्वतिक-न. क्षितिजाचा पश्चिम बिंदु. [सं.] ॰द्वारगामी-वि. गुदमैथुन करणारा; बच्चेबाज. [सं.]

दाते शब्दकोश

उपश्रुति

स्त्री. १ परोक्ष किंवा भवितव्य गोष्टीविषयीं प्रश्न पाहण्याकरितां रात्रीं हीन वर्गाच्या (चांभार, परीट इ॰) घरा जवळ जाऊन उभें राहिले असतां आंतून साहाजिक निघालेला बरावाईट शब्द; असा शब्द आपल्या गोष्टीवर प्रकाश पाडतो अशी मानण्याची पद्धति; पडताळा. २ आपल्या प्रस्तुत गोष्टीसंबंधीं कोणेक अप्रस्तुत व्यक्तिमुखानें सहज निघणारा बरा-वाईट शब्द आपल्याकडे लावून घेणें. 'मी लग्नाचा विचार करीत बसलों होतों तों मरशीलरे, मरशीलरे अशी तिकडून उपश्रुति झाली; तस्मात् यंदां लग्न करूं नये.' ३ सांगोवांगी, कर्णोपकर्णी आलेली देशांतराची अनिष्ट बातमी (भविष्यकालीन किंवा वर्तमानकालीन वाईट गोष्टीची). ४ जनवार्ता; वदंता; भुमका. [सं. उप + श्रु = ऐकणें]

दाते शब्दकोश

उपश्रुति, उपश्रुती      

स्त्री. १. परोक्ष किंवा भवितव्यातील गोष्टीविषयी प्रश्न पाहण्याकरिता रात्री चांभार, परीट इ. च्या घराजवळ जाऊन उभे राहिले असता आतून साहजिक निघालेला बरावाईट शब्द. असा शब्द आपल्या गोष्टींवर प्रकाश पाडतो अशी मानण्याची पद्धती, पडताळा. २. आपल्या प्रस्तुत गोष्टीसंबंधी एखाद्या अप्रस्तुत व्यक्तीच्या मुखातून सहज निघणारा बरावाईट शब्द आपल्याकडे लावून घेणे. ३. सांगोवांगी, कर्णोपकर्णी आलेली देशांतराची अनिष्ट बातमी (भविष्यकालीन किंवा वर्तमानकालीन वाईट गोष्टीची). ४. जनवार्ता; वंदता; भुमका. [सं. उप + श्रु = ऐकणे]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पट

पुस्त्री. १ बुद्धिबळें किंवा सोंगट्या खेळण्याचें, घरें पाडून तयार केलेलें एक वस्त्र. २ (बडोदें) नांवांचें पत्रक, यादी. रिकार्ड; फेरिस्तपत्रक; विशेष गोष्टींच्या नोंदणीचें लिखाण; नियम किंवा चालीरीती दर्शविणारी यादी किंवा लेख, तक्ता, कोठा. 'नोकर लोकांचे पगार खाजगीच्या पगारपटांतून मिळत असतात.' -चिमा २. ३ (ज्यो.) संक्रातिपट (सूर्य कोणत्या राशीला केव्हां जाणार इ॰ ज्यांत लिहिलें असतें तो ), ग्रहणपट (ग्रहणांविषयीं माहिती असलेला); लग्नपट; मुहूर्तपट इ॰; अनेक कागद एकाखालीं एक चिकटवून ज्यावर नाना प्रकारचीं चित्रें काढलेलीं असतात अशी गुंडाळी. ४ कापड; वस्त्र. 'त्यांत मरेनचि शिरतां काट्यावरि घालितां चिरे पट कीं ।' -मोरविराट ३.४१. ५ जमीनीची अतिशय मोठी वरंघळ; उतरण. ६ पडदा. 'ऐसें वदोनि राघव तीव्र शरांचा क्षणें करूनि पट ।' -मोमंत्ररामायण युद्ध ६८८. ७ (व.) बैल- गाड्यांची शर्यत; शंकरपट. (क्रि॰ खेदणें). ८ पाट; फळी. ९ राजाची गादी; सिंहासन. 'जो दमनशीळ जगजेठी . अकरांचीही नळी निमटी । तो निजसुखाचें साम्राज्यपटीं । बैसे उठाउठीं तत्काळ ।' -एभा १४.१०४. १० गांवचें जमावबंदी किंवा शेत- सारा-यांचें पत्रक. ११ स्थान; ठिकाण. 'लाऊनि बैसवी पटीं । मोक्षश्रियेच्या ।' -ज्ञा ९.४६. -न. दोन, तीन फळ्यांच्या, घडी घालतां येण्यासारख्या झडपाच्या फळ्यांपैंकीं एक फळी, भाग. [सं. पट्ट] ॰कर-न. पटकूर; फटकूर. ॰का-पु. १ वीतभर रुंदीचें व ५।४ हात लांबीचें कमरेस बांधावयाचें कापड. कांचा, कमरपट्टा. २ डोईस बांधावयाचा ८ ते १५ हात लांबाचा फेटा. ॰कुडॉ- पु. (गो.) पापुद्रा. ॰कूर-कुरें-कूळ-न. (निंदार्थी) एकेरी पन्ह्याची घोंगडी किंवा वस्त्र. 'टाकलें पटकूर निजलें बटकूर.' फटकूर पहा. [सं. पट्टकुल] ॰खळणें-सक्रि. (महानु;) आच्छा- दणें; पांघरूण घालणें. धवळे, उत्तरार्ध ६. ॰चीर-न. वस्त्र; पताका; ध्वज. 'टके पटचिरें । तळपती रुचिरें ।' -आसु १३. ॰ल-ळ-न. १ आच्छादन; पडदा; आवरण; आवरणत्वचा. 'प्रथमचि पार्थशरांच्या पटळें तम दाट दाटलें होतें ।' -मोकर्ण १९.३३. २ नेत्रावरील त्वचा. ३ डोळ्यावर रोगानें आलेला दृष्टि- बंधक पडदा, सारा इ॰. ४ (ल.) बुद्धीवर असलेलें आवरण, आच्छादन. जसें-'मोह-माया-अज्ञान-द्वैत-पटल.' 'झाला व्याकुळ दुर्मति आपुलियाचि भ्रमाचिया पटलें ।' -मोसभा ३.३. ५ (सं. समुदाय, राशी, ढीग यावरून) ढग, समूह; राशी; लोट (धूळ, धूर यांचा). ६ फळी. ७ पापुद्रा. पटांतर-वि. परोक्ष; प्रत्यक्ष नव्हे असें. 'आइकिजती पटांतरीं ।' -ज्ञा १६.४२८. पटा- धिकार-पु. पटाचा अधिकार; मूळाच्या कामावरील. देणगीवरील अधिकार, अधिकारपत्र; हक्क किंवा अधिकार धारण करणें किंवा असणें. [पट + अधिकार] पटाधिकारी-वि. हा अधिकार धारण करणारा किंवा असणारा.

दाते शब्दकोश

पाठ

स्त्री. १ कंबरेपासून मानेपर्यंतचा शरीराचा मागचा भाग. २ (ल.) तवा, सहाण, पाट, आरसा इ॰ सारख्या वस्तूच्या मागची, कार्योपयोगी बाजूच्या उलट बाजू. ३ (ल.) मदत; साहाय्य; टेका. (क्रि॰ देणें). 'इंग्रजाचा अन्यायी निघाला पाठ पेशव्याची । म्हणून साहेब लोकांनीं आरंभिली आगळिक दाव्याची ।' -ऐपो ३९७. ४ (ल.) (पृथ्वी, समूद्र इ॰कांचा) पृष्ठभाग; पृष्ठविस्तार; पातळी. ५ साल; बाह्यत्वचा; सालपट. ६ (भरतकाम) टोपी इ॰च्या कपाळपट्टीचा भाग सोडून चांदव्याशीं सभोंवार शिवलेलें कापड. ७ (भरतकाम, शिवणकाम) कंबरे- पासून मानेपर्यंतचा शरीराचा मागचा भाग झांकणारा काप- डाचा तुकडा. ८ मश्रू, किनखाब इ॰कांची दर्शनीय भागाव्यतिरिक्त असलेली दुसरी, मागची, आंतील बाजू. ९ शेळीचें स्त्रीजातीय अपत्य. पिढी या अर्थानें वापरण्यांत येणाऱ्या डोई या शब्दा- प्रमाणें हा शब्द, फक्त बकऱ्याच्या बाबतींत पिढी या अर्थानें वापरतात. ह्या बकरीच्या चार पाटी माझ्या हयातींत झाल्या [सं. पृष्ठ; प्रा. पट्ठ पिठ्ठ, पुट्ठ; हिं. पीठ; गुज. सिं. पुठि; बं. पिट] (वाप्र.) ॰उघडी पडणें-(ल.) पाठाचें भावंड मरणें. ॰उचलणें व्यवसाय सावरणें; गतवैभव परत मिळविणें, मिळणें; गमावलेली शक्ति, तेज इ॰ पुन्हां मिळविणें. याच्या उलट पाठ भुईस लागणें. ॰काढणें-(एखाद्या कामांत) कुचरपणा, अंग चोरपणा करणें. ॰कांपणें-(भिति इ॰कानीं) शरीर थरथर कांपणें. ॰घेणें-१ पाठोपाठ जाणें; पाठलाग करणें; पिच्छा पुरविणें. २ (एखाद्या गोष्टीबद्दल एखाद्यास) सतावणें; गळ घालणें; जेरीस आणणें; राशीस लागणें; खणपटीस बसणें. ३ (एखादें त्रासदायक काम, आजार इ॰ एखाद्याच्या) बोकांडीं बसणें ॰चोरणें-१ (बैल, घोडा इ॰ वाहनास जुंपलेलया जनावरानें) फार ओझें लादलें जाऊं नये म्हणून पाठ आकुंचित करून तें चुकविण्याचा प्रयत्न करणें. २ (एखादें काम करतांना) अग चोरणें; चुकारपणा करणें; पाठ काढणें पहा. ॰झाकणें-(एंखाद्यानें एखाद्याच्या) पाठीवर जन्मास येणें. ॰टाकणें-विश्रांतिसाठीं (जमीन इ॰कावर) अंग आडवे करणें; आडवें पडणें. ॰था(थो)पटणें-(एखाद्यास) उत्तेजनार्थ पाठीवर प्रेमानें थाप मारणें; शाबासकी देणें; वाहवा करणें. 'पाठविला काळानें जाणों थापटुनि पाठ वीर गडी ।' -मोभीष्म ६.४७. 'हनुमंताची पाठी थापटी । प्रेमें संतुष्टी आलिंगी ।' -भाराकिष्किंधा ३.१८. 'लोकग्रणींनीं लोकांची मर्जी संपादण्या- साठीं अथवा त्यांजकडून आपली पाठ थोपटून घेण्यासाठीं त्यांच्या दोषांचें मंडन करणें अत्यंत लज्जास्पद आहे.' -आगरकर. ॰दाखविणें-(युद्ध इ॰कांतून) भीतीनें पळून जाणें; पोबारा करणें. 'त्यांस रडावें मेले असतिल दावूनि जे परा पाठ ।'] -मोशांति ४.३५. [तुल. सिं, पुढि डिअणु = पाठ देणें ॰देणें-१ (युद्धांत शत्रूसमोरून) भीतिनें पळून जाणें; पाठ दाखविणें. 'असुहरखरतरधरगुरुपुत्रा धर्म पाठि दे चुकवी ।' -मोकर्ण ३४.२९. २ मदत, सहाय्य देणें. 'मिथ्यावादाची कुटी आली । तें निवांतचि साहिली । विशेषा दिधली । पाठी जेणें ।' -अमृ ७.१०५. ३ (एखाद्याचा उपदेश, विनंति इ॰कांचा) अव्हेर करणें; आवमानणें; न ऐकणें. 'पितृवचनासी पाठ दिधली ।' -एकनाथ. ४ मुकाट्यानें संकट, विपत्ति इ॰ सहन करणें 'देवोनि पाठ त्याला सर्वहि मी सोशितों मुकाट्यानें ।' -कृ. ना. आठल्ये. 'आल्या प्रसंगाला पाठ दिली पाहिजें.' ॰धरणें-पाठलाग करून पकडणें. ॰निघणें-रिघणें-(स्वतःचें) सरंक्षण व्हावें म्हणून, आश्रयासाठीं एखाद्याच्या मागोमाग जाणें; एखाद्यास शरण जाणें, पाय धरणें. ॰पुरती घेणें-पुरविणें-१ अतिशय आग्रह करणें; गळ घालणें; खणपटीस बसणें. 'मद्वात्सल्यें माझी तूं ही दे म्हणुनि पुरविली पाठ ।' -मोअनुशासन ५.७२. २ (एखाद्या गोष्टीचा, कामाचा) पिच्छा पुरविणें; नेटाचा प्रयत्न चालू ठेवणें. ॰पुरविणें- मदत देणें; साहाय्य, पाठबळ देणें. 'आधींचि देखणी दिठी । वरी सूर्य पुरवी पाठी । तैं न दिसे ऐसी गोठी । केंही आहे ।' -ज्ञा १८.१७३३. ॰पोट सारखें होणें-(उपासमार, आजार इ॰ कानीं) अत्यंत रोड होणें. ॰फोडून निघणें-(एखाद्यानें आपल्या) वडील भावाच्या, बहिणीच्या पाठीमागून जन्मास येणें. ॰भुईस लागणें-(द्रव्य, शक्ति इ॰ बाबतींत एखाद्याची स्थिति) अतिशय खालावणें; असमर्थ होणें; डबघाईस येणें. याच्या उलट पाठ उचलणें. ॰भुईस लावणें-चीत करणें; दडपणें. ॰मऊ करणें-(एखा- द्याच्या) पाठीवर मारणें; बडविणें; पिटणें. 'माझी पाठ मऊ करणें आपणाला नेहमीं हवें असतें.' -गुप्तमंजूष. ॰राखणें-मदत करणें; पाठबळ देणें. 'लोकीं अत्यंत क्षमा करिती । आलियां लोकांचे प्रचिती । मग ते लोक पाठी राखती । नाना प्रकारीं ।' -दा १९.४.२९. ॰वळणें-विवक्षित स्थलाकडे पाठ व्हावयाजोगें फिरणें; पाठमोरें होणें; परत फिरणें. ॰वळणें, पाहणें-मागें वळून पाहणें. ॰सोडणें-१ एखाद्या व्यवसाय, काम इ॰ नेटानें चाल- विण्याचें सोडून देणें. २ एखाद्याच्या गळीं पडण्याचें, खणपटीस बसण्याचें, मागें लागण्याचें सोडून देणें. 'पाठी न सोडिती नको म्हणतांही ।' दावि ३४४. पाठीचे चकदे काढणें-खूप मार देणें; बडविणें. पाठीचे चकदे निघणें-खूप मार बसणें. पाठीचें धिरडें करणें-काढणें-(एखाद्यास) खूप मारून पाठ धिरड्या- सारखी लाल व खरबरीत करणें. 'आई, ही माझी पाठ पहा. हें पाठीचें धिरडें तुझ्या जामदारानें करविलें.' -संभाजी. पाठीचे साल जाणें-१ मार मिळणें. २ (ल. व्यापार इ॰कांत) नुकसान येणें; ठोकर बसणें. ३ लुबाडला, नागविला जाणें. पाठीमागें ठेवणें-(पैसा, माणसें इ॰) मेल्यावर मागें ठेवणें. 'त्या म्हाता- ऱ्यानें पाठीमागें एक पैसाही ठेवला नाहीं.' पाठीमागें देणें- परत देणें. पाठीमागे पडणें-१ (एखादी गोष्ट इ॰) जुनी झाल्यामुळें प्रचारांतून कमी होत जाणें; स्मृतिशेष होणें. २ (एखादी गोष्ट) तीव्रता, महत्व इ॰ बाबतींत कमी होत जाणें. ३ (एखादे काम इ॰) लांबणीवर पडणें; मुदत टळून मागें राहणें. ४ कमी प्रगति होणें; मागें राहणें; मंद गति असणें. पाठीमागें भुंगा लावणें-(एखाद्यास) सतत त्रास देणें; ससे- मिरा लावणें. पाठीमागें लागणें-(एखादी गोष्ट, व्यक्ति इ॰ कांच्या) नादीं लागणें. पाठीमागें सरणें-मागे हटणें; हार खाणें. पाठीवर-क्रिवि. १ (पिच्छा पुरविण्याकरितां, खणपटीस बसण्याकरितां, उत्तेजन देण्याकरितां एखाद्याच्या) मागें; पाठीशीं; मागोमाग (असणें). २ (जन्म इ॰ बाबतींत एखाद्याच्या) नंतर; पाठोपाठ.पाठीवर असणें-१ मालक इ॰कानें देखरेख कर- ण्यास, चाकर इ॰कांची चूक झाली असतां शिक्षा करण्यास आश्रय- भूत, मागें असणें. 'या माणसांच्या पाठीवर कोणी असल्या- शिवाय काम करणार नाहींत.' २ मित्र, बंधु इ॰कांनीं आपत्ति दूर करण्यास (एखाद्याच्या) मागें. पाठीशीं असणें. 'आमच्या पाठीवर ईश्वर आहे.' ३ शत्रूचा नाश, पाठलाग करण्यास मागो- माग असणें. 'चोरांच्या पाठीवर दोनशें स्वार पाठविले आहेत.' ४ संततिक्रमानें कनिष्ठ, सोदरस्थानीं असणें. 'माझ्या पाठीवर पांच भावंडें आहेत.' पाठीवर टाकणें-(एखादें काम) लांबणी- वर टाकणें; दिरंगाईनें करणें. पाठीवर, पाठीला तेल लावून ठेवणें-खरपूस मार खाण्यास तयार होणें, असणें. पाठीला पाय देऊन येणें-(एखाद्याच्या) नंतर, पाठीवर, मागाहून जन्मास येणें (मूल इ॰) (एखाद्याच्या) नंतर अधिकाररूढ होणें (राजा, मंत्री इ॰कानीं). पाठीवरून-अ. नंतर; मागोमाग. पाठी- वरून हात फिरविणें-गोंजारणे; प्रेमानें कुरवाळणें. पाठीवाटे काळीज निघणें-पुरें पारिपत्य होणें, करणें. 'जो कोणी पंतप्रतिनिधीची अखत्यारी सुभेदारी काढूं म्हणेल त्याचें पाठीवाटें काळीज निघेल.' -रा ६.३५७. पाठीशीं-अंगावर; मागें. 'माझ्या पाठीशीं शंभर लचांडें आहेत.' पाठीशीं घेणें-अंगावर घेणें; पतकरणें (काम इ॰). पाठीस काळीज असणें-स्वभावानें धाडसी, साहसी, बेडर असणें. पाठीस पोट लागणें-१ (आजार उपासमार इ॰कानीं) पोट खपाटीस लागणें; रोड होणें. २ उदर- निर्वाहाची जबाबदारी अंगावर असणें; उदरनिर्वाह करण्यास अतिशय श्रम; कष्ट, यातायात पडणें; या अर्थीं पोट पाठीस लागणें असाहि वाक्प्रचार आहे. 'पोट लागलें पाठीशीं । हिंडवितें देशो- देशीं ।' -तुगा ४१९६. पाठीस(ला) लागणें-१ (एखाद्याचा) पिच्छा पुरविणें; पाठलाग करणें. 'पाठीस लागले ते पांडवपांचालभट असें म्हणती ।' -मोशल्य ३.१५. 'तुझ्या पाठीला हा महादेव लागला आहे ना?' -नामना १५. २ खणपटीस बसणें; गळीं पडणें. पाठ घेणें पहा. पाठीसीं-शीं-क्रिवि. (अक्षरशः व लक्षणेनें) (एखाद्याच्या) पाठीमागें. पाठीशीं(सीं) घालणें-१ आश्रय देणें; रक्षण करणें. २ स्वीकारणें. 'रायें पाठिसीं दासी घालितां । तिची सर्वावरी चाले सत्ता ।' -रावि १.४१ (नवनीत पृ. २१४). पाठीशीं घेणें-(एखादें काम इ॰) अंगीकारणें; पत्करणें. पाठीं हटणें-मागें जाणें; मागें पडणें. -देशीभाषा १६. झांकल्या पाठीचा-वि. प्रतिष्ठितपणाचा पांघरुणाखालीं केलेला (गुन्हा, पाप इ॰). उदा॰ विवाहित स्त्रीचें परपुरुषगमन इ॰ झांकल्या पाठीनें-क्रिवि. अब्रूदारपणानें; प्रतिष्ठा न गमवितां. तापल्या पाठीनें-क्रिवि. जोंपर्यंत शरीरांत जोम, ताकद, उत्साह आहे तोंपर्यंत; शरीर शिथिल व दुबळें होण्यापूर्वीं. साधितशब्द- पाठचा-वि. १ (एखाद्याच्या) नंतर, पाठीवर जन्मलेला (भाऊ, बहीण इ॰ भावंड). 'मी तुझ्या पाठची बहीण आहे.' -नामना ११२. २ जीव वांचविण्यासाठीं आश्रयास आलेला. [पाठ] म्ह॰ पोटचा द्यावा पाठचा देऊं नये = प्रसंगविशेषीं पोटच्या मुलालाहि बळी द्यावें परंतु शरण आलेल्यास दगा देऊं नये. पाठला-वि. पाठचा अर्थ १ पहा. पाठीं-क्रिवि. १ एखाद्यावर अवलंबून (अस- लेला मुलाबाळाचा परिवार इ॰) 'माझ्या पाठीं चार पोरें आहेत.' २ मागोमाग; पाठीमागें. 'भीमविजय त्यापाठीं नकुळसहदेव ।' -मोप्रस्थान १.२३. ३ नंतर; मागाहून. 'पाठीं आपण जाइजे । अ-मोल-पणें ।' -शिशु ४७४. 'स्वपद पावलीयापाठीं । जेवीं कां वृत्ति होय उफराटी ।' -एरुस्व १.३१. पाठीकडून-क्रिवि. मागें वळून; तोंड मुरडून. 'दिठी मुखाचिये बरवे । जरी पाठी- कडून फावे । तैं आरिसे धांडोळावे लागती काई ।' -अमृ २.७६. पाठीचा-वि. पाठीवर ओझें वाहून नेणारा (घोडा इ॰). पाठीचा कणा-पु. कंबरेपासून मानेपर्यंतच्या शरीरास ताठपणा देणारा हाडांच्या मणक्यांचा पाठींतील दंड; पृष्ठवंश. पाठीचा कोंका-पु. पोंक; कुबड. पाठीचा तखता-पु. पाठीचा पृष्ठभाग; विस्तृत भाग. पाठीं ना पोटीं-क्रिवि. ज्यास पाठचा भाऊ किंवा पोटीं संतति नाहीं अशा व्यापरहित, बेजबाबदार माणसाच्या स्थितीस उद्देशून वापरावयाचा वाक्प्रचार. पाठीमागचा- मागला-मागील-वि. १ (एखाद्या गोष्टीच्या) नंतर, मागाहून घडलेला; नंतरचा; मागला. २ (वडील भावंडाच्या) पाठीवर, नंतर जन्मास आलेला (भाऊ इ॰ भावंड); पाठचा. पाठी मागून-क्रिवि. १ (एखादा पदार्थ, व्यक्ति इ॰कांच्या) मागच्या बाजूनें; पाठीकडून. 'माझ्या पाठीमागून विस्तव नेऊं नकोस.' २ (एखादी गोष्ट, क्रिया इ॰काच्या) नंतर; पश्चात्. 'बाप मेल्यावर पाठीमागून त्यानें पैसा मिळविला.' ३ (एखाद्याच्या) गैरहजेरींत मागें. 'हा पाठीमागून शिव्या देतो.' [स. पश्चात्; प्रा. पच्छा; पं. पिच्छे; दिं. पीछे, पाछे; गु. पाछुं] पाठीमागें- क्रिवि. १ (एखाद्यावर) अवलंबून; आश्रयाखाली 'त्याच्या पाठीमागें मोठा परिवार आहे.' २ (एखाद्याच्या) पश्चात्, मरणा- नंतर. 'त्यास माझ्या पाठी मागें राज्यावर बसविण्याचा अधि- कार मिळें.' -मसाप २.३. ३ (एखादी क्रिया, गोष्ट इ॰कांच्या) नंतर. ४ गैरहजेरींत; परोक्ष; समक्ष नव्हे अशा रीतीनें. म्ह॰ १ आपली पाठ आपणांस दिसत नाहीं = आपल्या अगदीं सान्नि- ध्यांत घडणाऱ्या पण आपणांस माहीत न पडणाऱ्या गोष्टीस- उद्देशून योजावयाची म्हण. २ पाठीवर मारावें पण पोटावर मारूं नये. = एखाद्यास त्याच्या अपराधाबद्दल देहदंड खुशाल करावा पण त्याच्या निर्वाहाचीं साधनें कमी, नाहींशीं करूं नयेत. सामाशब्द- ॰कांब-स्त्री. बांबूच्या पाठीची, बाहेरील बाजूची काढलेली साल, कांबीट. याच्या उलट पोटकांब = आंतील बाजूची काढलेली कांबीट. [पाठ + कांब] ॰कुळी-कुळीस-कोळी- कोळीस, पाठगुळी-गुळीस, पाठंगुळी, पाठंगुळीस- क्रिवि. (एखाद्याच्या) पाठीवर. (क्रि॰ घेणें; मारणें; आणणें; बसणें). [पाठ] ॰कोरा-वि. एकाच बाजूस लिहिल्यानें दुसऱ्या बाजूस कोरा असलेला (कागद). ॰कोरें-न. एका बाजूस न लिहिलेला कागद. ॰गा-वि. पाठीवर स्वारी, ओझें नेण्यास शिकविलेला (घोडा, बैल). (क्रि॰ करणें; होणें). [पाठ] म्ह॰ शेट शहाणे आणि बैल पाठगे ॰गुली-क्रिवि. (ना) पाठकुळी पहा. ॰जाळ-पु. पाठच्या भावंडाचें मरण इ॰ अनिष्ट गोष्टीचा शोक. [पाठ + जाळ] म्ह॰ पाठजाळ पुरवेल पण पोटजाळ पुरवत नाहीं = पाठच्या भावंडाच्या मृत्यूबद्दलच्या शोकापेक्षां पुत्रशोक अधिक भयंकर असतो. ॰तगड- न. (सोनारी धंदा) (सोनें इ॰ धातूच्या) पत्र्याच्या दागिन्यांतील अथवा, पेटी इ॰ सारख्या दागिन्याच्या मागील, तळचा, दृष्टीस न पडणारा भाग. [पाठ + तगड = तकट, पत्रा] ॰थोपटणी-स्त्री. एखाद्यास उत्तेजन देण्याकरितां त्याची पाठ थोपटण्याची क्रिया; शाबासकी; वाहवा. 'कारण युरोपियन कामदारांच्या ह्या पाठ- थोपटणीनें ते फुशारून जाऊन आपलें दोषार्ह वर्तन पूर्ववत् कायम ठेवतील हें सांगावयास नको.' -टि १.१.४६१. [पाठ + थोपटणें] ॰नळ-पुअव. १ पाठीच्या कण्याच्या दोन्ही बाजूंस असलेले कटि प्रदेशाचे दोन नळाकृति स्नायू. याच्या उलट पोटनळ. २ (ल.) बराच वेळ एकाच स्थितींत बसण्यानें, वातादि विकारानें पोट फुगल्यामुळें पृष्ठवंशाच्या दोन्ही बाजूंच्या कमरेजवळ असलेल्या स्नायूंस आलेला जडपणा, ताठरपणा; त्यानें होणारी पीडा [पाठ + नळ] ॰निघ्या-वि. आश्रयाकरितां, रक्षणाकरितां आलेला; शरण आलेला. [पाठ + निघणें] ॰पलाणें-न. १ (विवाहसमारंभांत रूढ) वरपक्षाकडून वराच्या सासूस चोळखण आणि लुगडें यांच्या अहे- रास विनोदानें दिलेलें नांव. २ पायघड्या संपून विहीणी घरांत शिरतांना वरमातेस वराच्या सासूनें खणलुगड्यांचा करावयाचा अहेर. [पाठ + पलाणें] ॰पुरावा-पु. सहाय्य; मदत; पाठिंबा. [पाठ + पुरविणें] ॰पुराव्या-वि. मदत करणारा; साहाय्य, पाठिंबा देणारा. [पाठ + पुरावा] ॰पोट-न. पणतींत बोळकें उपडें घालून, तें सुतानें बांधून मकरसंक्रांतीच्या दिवशीं स्त्रिया परस्परांस देतात तें वाण. -क्रिवि. दोन्ही बाजूंनी, पृष्ठांवर (लिहिलेला, वाचलेला कागद इ॰). [पाठ + पोट] ॰पोटीं-क्रिवि. समोरासमोर. 'जैसी उदया आणिली गोष्टी । तैसी दाखवा प्रत्यक्षदृष्टी । सूर्य जयद्रथ पाठपोटीं । मिरवा महाराजा ।' -नव १२.८९. [पाठ + पोट] ॰फळी-स्त्री. झाड तोडल्यानंतर त्याचे ओंडे सारखे व चौकोनी करण्यासाठीं त्यांच्या बाहेरील चारी बाजूंनीं काढलेली ओबड- धोबड फळ्यांपैकीं प्रत्येक. [पाठ + फळी] ॰बंद-पु. बैलाला, घोड्याला गाडीला जोडण्याचा बंद, पट्टा. -राको. [पाठ + बंद = पट्टा] ॰बळ-न. इष्टमित्र, भाऊबंद इ॰कांची (एखाद्या कार्यास होणारी) मदत, साहाय्य. [पठ + बळ = शक्ती.] ॰बीळ-बेळ- न. (राजा.) बांबूची बाहेरील बाजूची काढलेली कांबटी, चिपाटी; पाठकांब पहा. [पाठ + बीळ = पाटी इ॰ विणण्याची बांबूची चिपाटी.] ॰मोड-स्त्री. पाठीस कळ येईल अशा तऱ्हेचें (लिहिणें, ओझे वाहणें, खणणें इ॰सारखें) कष्टाचें, परिश्रमाचें काम. [पाठ + मोडणें] ॰मोरा-वि. १ पाठ फिरविलेला; (एखाद्या वस्तूकडे) पाठ करून असलेला. २ (ल.) विमुख; पराङ्मुख; विरुद्ध; उलट झालेला; वक्रदृष्टीनें पाहणार. 'माझें अदृष्ट पाठमोरें देख ।' -ह २९.१७७. 'ईश्वर होता पाठमोरा । नसतींच विघ्नें येतीं घरां ।' -क्रिवि. पाठीकडून; पाठीच्या बाजूनें. [पाठ + मोहरा] ॰राखण- राखणा-राख्या-स्त्रीपु. १ लग्नानंतर नव्यानेंच मुलगी सासरीं जातेवेळीं तिला सोबत म्हणून जाणारें माहेरचें माणूस. २ दिवाळ सणाकरितां जांवई सासुरवाडीस जातेवेळीं त्याच्याबरोबर जाणारें माणूस. ३ साहाय्यकर्ता; मदत करणारा; पाठीराखा; वाली. [पाठ + राखणें] ॰रिगा(घा)वा-पु. (कु.) साहाय्य; पाठबळ. [पाठ + रिघणें] ॰रिघ्या-वि. रक्षणाकरितां आश्रयाची याचना करणारा; शरण गेलेला. [पाठ + रिघणें] ॰लग-पु. (प्रा.) सान्निध्यांत, चिकटून (विद्यादि साधनाकरितां शिष्यानें गुरूजवळ इ॰सारखें) राहणें. 'तूं त्याचा पाठलाग सोडूं नको म्हणजे बरें होईल.' [पाठ + लग] ॰लाग-पु. १ (एखाद्यास पकडण्याकरितां त्याच्या) पाठोपाठ जाणें; पिच्छा पुरविणें; पाठपुरावा. २ तपास; छडा. ॰वटीं-डीं-क्रिवि. (राजा.) (एखादें कार्य आरंभिलें जात असतांना, केलें जात असतांना) पाठपुराव्यास; पाठबळ देण्यास; मागे; पाठीस (असणें). [पाठ] ॰वशास-क्रिवि. पाठीमागें -राको. ॰वळ-न. १ स्वारी वहाण्यासाठीं शिकवून तयार केलेलें जनावर. २ ओझ्याचें जनावर (विशेषतः घोडा). ३ (ल.) कोणतेंहि काम मुकाट्यानें करणारा धट्टाकट्टा किंवा धिम्मा मनुष्य. ४ (ल.) नेहमीं थट्टेचा विषय बनणारा सोशिक मनुष्य. ५ (ल.) गलेलठ्ठ स्त्री. ६ (ल.) रखेली; राख. [पाठ + वळणें] म्ह॰ शेट शाहणा आणि बैल पाठवळ. ॰वळण-न. नवरा मुलगा आपल्या सासूस लुगडें चोळी देतो त्याला विनोदानें म्हणतात. -थोमारो २.३५७. ॰वाड-स्त्री. मदत; पाठपुरावा. [पाठ] ॰शिंगी-गा-ग्या-वि. ज्याचीं शिंगें मागें, पाठीकडे वळलेलीं आहेत असें (जनावर). [पाठ + शिंग] ॰शील-न. (कों.) नारळावरील काथ्याच्या आच्छादनावरील साल, त्वचा; नारळाच्या चोडाची साल. [पाठ + साल] ॰सरीं-क्रिवि. मागच्या बाजूस. पाठाण-न. (को.) १ पाठ; पाठीवर मारतांना किंवा तिच्यावरील फोड इ॰ दुखतांना तिरस्कारानें म्हणतात. 'माझे पाठाणांत कळ आली.' -रोज्यु ९४. २ (राजा.) चोळीचा पाठीचा तुकडा. [पाठ] पाठावळ-ळू-स्त्री. (कों.) घराचें आढें. 'आज घराची पाठावळ बसवावयाची आहे.' [पाठ + वळ प्रत्यय] पाठाळ-न. पाठीवरून ओझें, मनुष्य वाहून नेणारें बैल, घोडा इ॰ जनावर; पाठवळ. 'जो जैसें काम सांगत । तितुकें करी वैष्णव- भक्त । चारा पाणी आणूनि देत । पाठाळे बांधीत निजांगें ।' 'कोस- पर्यंत गिल्चे यांनीं पाठलाग केला, परंतु पाठाळ सक्त शीर (?) होतें म्हणून तशांतून (पार्वतीबाई) निभाऊन गेली.' -भाब १५४. (नवी प्रत). -वि. १ मोठ्या, रुंद पाठीचें (जनावर). २ चांगल्या पाठीचा (घोडा). ३ ओझीं वाहण्याच्या उपयोगाचा (घोडा इ॰ जनावर). [पाठ] पाठीमागून-क्रिवि. नंतर; पश्चात्. पाठुं(ठों)गळीं- क्रिवि. पाठीवर. पाठकुळी पहा. [पाठ] पाठून-क्रिवि. पाठीमागून पहा. पाठेळ-न. ओझ्याचें जनावर; पाठवळ. 'पाठेळ करितां न साहावे वारा । साहेलिया ढोरा गोणी चाले ।' -तुगा २७९३. पाठोपाठ-ठी-ठीं-क्रिवि. १ लागलीच; मागोमाग. २ पाठीमागें; लागोपाठ. 'देव भोळा धांवे भक्तापाठोपाठीं ।' -तुगा १३. [पाठ द्वि.] पाठोवाटा-टीं-ठीं-क्रिवि. १ पाठोपाठ; मागेंमागें; पाठीमागें. 'देखौनि श्रीमूर्ति उघडी । ब्रह्मविद्या डोळे मोडी । मुक्ति धांवे उघडी । पाठोंवाठीं ।' -शिशु ३७२. 'धांवे योषितांचे पाठो- वाटी ।' -एभा ८.१६४. २ वरचेवर; वारंवार; एकामागून एक. 'कां पाठोवाटीं पुटें । भांगारा खारु देणें घटे ।' -ज्ञा १८.१५७. [पाठ द्वि.] पाठोशीं-क्रिवि. पाठीमागें. [पाठ] पाठ्याळ- न. पाठवळ अर्थ १ व २ पहा. [पाठ]

दाते शब्दकोश