मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

संबंधित शब्द

पसाय

पु. प्रसाद; कृपा; मेहेरबानी. 'आता तेणेंचि पसायें तुम्हां संतांचे मी पाये ।' -ज्ञा १५.२८. 'असो हें सांगतां कथा रंभु । तेणें परितोषोनि प्रभु । पसाय दे परमलाभू । म्हणे मुनी विश्वनाथु ।' -ज्ञा ६०. ॰दान-न. प्रसाद; वर. 'तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ।' -ज्ञा १८.१७९३. [सं. प्रसाद; प्रा. पसाय]

दाते शब्दकोश

सनाथ

वि. ज्यास प्रभु, मालक, आश्रय, संरक्षक, मित्र आहे असा; धन्य. 'मज वोळगे पसायदान । दीजो जी सनाथु होईन ।' -ज्ञा १६.४७३. [सं. स + नाथ] सनाथा-स्त्री. सुवासिनी स्त्री; सौभाग्यवती, पति जीवंत असलेली स्त्री.

दाते शब्दकोश