आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
पायली
स्त्री. १ धान्य मोजण्याचें चार शेराचें (पक्का किंवा कच्चा) एक माप. बारा किंवा सोळा पायल्यांचा एक मण होतो. खानदेशांत अठ्ठेचाळीस शेरांची एक पायली होते. [पाय = एक चतुर्थांश; पाव] डोळा पहा. (वाप्र.) ॰भरणें-१ (स्वतःच्या गरजा, आयुष्य, भरभराटीची स्थिति इ॰चें) माप भरून घेणें; स्वार्थ साधणें; कम करून घेणें. २ एखाद्याला उतरती कळा लागणें. घडा, पायरी भरणें पहा. ॰चा पसा करणें-होणें-परद्रव्याचा गुप्तपणें अपहार करणें; कमी करून सांगणें; कमी करणें; होणें. ॰चे पंधरा-अतिविपुल; पु्ष्कळ; फार स्वस्त; ज्यास फारशी किंमत, महत्त्व नाहीं असें; क्षुद्र: 'छप्पन्न. तुझ्यासारखे पायलीचे पंधरा आहेत.' गोव्याकडे 'पायलेड पन्नास' = पायलीचे पन्नास असा प्रचार आहे. आपली पायली भरणें-स्वतःपुरतें पाहणें; स्वार्थ. आपलपोटेपणा करणें. म्ह॰ आण पायली करूं दे वायली.
पायली pāyalī f A measure of four sher (पक्का or कच्चा). Pr. आण पा0 करूं दे वायली Go to, let us eat and enjoy ourselves. 2 C The socket of a millstone. 3 In Khándesh the पायली is forty-eight sher. See under डोळा. आपली पा0 भरणें To regard self; to fill one's own measure. पा0 भरणें g.of s. To have one's measure (i. e. the measure of one's iniquities, the period of one's life or of one's prosperous circumstances &c.) filled. पा0 चा पसा करणें-होणें To make--or to become--a handful out of four sher. Used where crimping, cabbaging, or illicit appropriation is charged or suspected. Also, generally, to reduce, or to be reduced, exceedingly. पा0 चे पंधरा (Fifteen to a páylí.) A term for a light, insignificant fellow.
पायली f A measure of four shers. आपली पा?B भरणें To regard self. पा भरणें To have one's measure, where crimping, cabbaging, or illicit, appropriation is charged or suspected. Also, generally, to reduce, or to be reduced, exceedingly. पा?B चे पंधरा Light, insignificant fellows.
स्त्री. जात्याच्या वरच्या तळीला धान्य घालण्या- साठीं असलेलें भोंक.
स्त्री० दोन अधोल्या, प्रमाणविशेष.
स्त्री. १ (ना.) कंदिलाची कांच. २ कागदाच्या कंदिलांत फिरणारी पायलीच्या आकाराची रचना.
पायळी
पायळी pāyaḷī f A grass-sickle.
स्त्री. गवत कापावयाचें खुरपें.
संबंधित शब्द
डोळा
डोळा ḍōḷā m An eye. 2 fig. Sight, vision, attention, regard &c. 3 A little hole;--as burnt in a cloth, burst through a vessel &c. 4 The eye of the peacock's fan. 5 The eye (of a coconnut, cashewnut, a sugarcane, potato &c.) 6 The eye of the leg, i. e. the anklebone. 7 The cavity on the side of the knee; observable on stretching the leg. 8 A source in general of knowledge or information; viz. a Shástra or scientific treatise, a scout or emissary, the Mahár of a village &c. 9 A scale of a fish; a square of a custard apple, pine apple &c. 10 (In Khándesh.) A measure of capacity, of sixteen sher or ⅓ of a पायली. (The पायली there is forty-eight sher. As three डोळे make one पाय- ली, so twelve डोळे or four पायली make one माप, and sixty मापें make एकसाठ. One fourth of a पायली or twelve sher is चौथा or चोथा) 11 The dint or little cavity in the flint of the potter's wheel. चार डोळे होणें g. of s. & o. reciprocally. To have an interview, to meet. डोळा ओळखणें g. of o. To be acquainted with the whims, ways, and will of, or with the mind of. डोळा काणा असावा मुलूक काणा असूं नये Let there be Eye-blindness, but let there not be Civil darkness and disorder. डोळा घालणें To wink; to intimate by the eye: also to cast the eye at; to glance at. डोळा चुकाविणें or मारणें g. of o. To elude the observation of. डोळा जाणणें-समजणें-ताडणें To discern the mind of. डोळा न फुटे काडी न मोडे ह्या रीतीनें करणें To execute or perform with great care and skill. डोळां प्राण ठेवणें See डोळ्यांत प्राण ठेवणें. Ex. माझी माता शोकें करून ॥ डोळां प्राण ठेवील की ॥. डोळाभर झोप A good bit of sleep; and, neg. con., not a wink of sleep. डोळे उमारणें or गुरकाविणें To browbeat; to scowl; to glare at fiercely. डोळे उघडणें To open the eyes (to one's duty or interest). डोळा उघडत नाहीं Said of a disdainful or proud man: also of rain which pours unceasingly. डोळे उरफाटणें-फिरणें-चढणें g. of s.To become blind: (as on an accession of wealth &c.) Lit. To start out or turn up or in. डोळेखाणें g. of s. To nod from drowsiness. डोळेगांवचीं कवाडें लागलीं (I, he &c.) am blind. डोळे चढणें g. of s. To look fiery--the eyes: (from intoxication, watchfulness, pride.) डोळे चढवून बोलणें To speak sharply and angrily. डोळे जळणें g. of s. To burn with envy; to be pained at the sight of. डोळे झांकणें or ढांपणें To be remiss, heedless, careless. 2 To connive at or to overlook. 3 To close the eyes in death. डोळे टळटळीत भरणें g. of s. To have one's eyes glistening with tears. डोळे ताठणें g. of s. To become haughty or disdainful. डोळे तांबारणें (To make the eyes red upon.) To glare at fiercely. डोळे निवणें or थंड होणें g. of s. To experience the gratification of seeing a much desired person or thing; to obtain the desire of one's eyes. डोळे निवळणें g. of s. To get one's eyes clean and bright again after ophthalmia &c. 2 fig. To recover clear mental vision (after any infatuation). डोळे पठारास जाणें g. of s. To have sunken eyes (eyes gone down into the back) from fasting or disease or in death. डोळे पांढरे करणें g. of o. To beat unmercifully. 2 g. of s. To be on the point of death. डोळे पाताळांत जाणें g. of s. To have one's eyes sink in. डोळे पापी The eyes spoken of as (ever) lascivious or wanton. डोळे पाहून वागणें or चालणें g. of o. To conduct one's self with obsequious conformity to the will of. डोळे पिंजारणें or फिंदारणें or फाडणें To look fiercely; to glare at angrily. डोळे पुसणें (To wipe or rub the eyes.) To cry, blubber, pipe. 2 g. of o. To comfort or console; to wipe the tears of. डोळे पोंढळणें g. of s. To get sinking or hollowness of eyes. डोळे फाटणें g. of s. To have one's expectations enlarged. डोळे फाडणें To set the eyes and glare (as in death). डोळे फिरणें g. of s. To be dizzy or to have swimming in the eyes. 2 fig. To become disdainful or supercilious. 3 To turn up the eyes (in dying). 4 To change the mind (as from an agreement); to fight shy. डोळे फिरविणें To turn up the eyes; to be dying: also to glare at angrily; or to begin to look at with estrangement or disfavor. डोळे फुटणें g. of s. To become blind or impaired in vision. 2 To be pained at the sight (of another's prosperity or success). डोळे बांधणें To fascinate the eyes (as by spells and charms). 2 To blindfold, hoodwink, befool, bamboozle. डोळेभर or भरून पाहणें To feast the eyes upon; to fill the sight with. डोळे मुरढणें To cast the eyes askance; to look aside. डोळे मोडणें To wink at or leer at; to ogle or shoot glances. Ex. डोळे मोडून वांकुल्या दावी ॥ घुलकावीत मान पैं ॥. 2 To turn up the eyes fastidiously or superciliously डोळे येणें in. con. To obtain sight--a blind person. डोळे येणें or डोळे विणें g. ofs. To get ophthalmia. डोळे लवणें g. ofs. To have a twitching in the eyes. A favorable indication. डोळे होणें in. con. To become acquainted with or aware of (any business or study, the wiles of another &c.) डोळ्यांचा अंधार करणें To err against light. डोळ्यांची खोगरें or डोळ्यांच्या खांचा or डोळ्यां- ची भिंत होणें g. of s. To become or be stone blind. डोळ्यांच्या वाती करणें To strain the eyes. डोळ्यांचें पारणें फिटणें or होणें To see at length an object or an accomplishment anxiously longed after; to have the desire of one's eyes gratified. डोळ्यांत कुरूप or कुरुंद असणें g. of s. To be envious about: also to have hatred or a grudge against. डोळ्यांत खुपणें or सलणें To pain the eyes--another's merit, wealth &c. डोळ्यांत जहर उतरणें To be pained at the sight of (another's fortune &c.) डोळ्यांत तेल घालून जपणें To watch intently; to be very vigilant. डोळ्यांत तेल घालून पाहणें To inspect narrowly; to pore over; to pry or peer into. डोळ्यांत धूळ or माती घालणें To throw dust into the eyes of; to blind. डोळ्यांत पाणी नसणें g. of s. To have no reverence for or sense of shame at: or -असणें To have shame, modesty &c. डोळ्यांत प्राण ठेवणें To be ready to die after seeing. See below. डोळ्यांत प्राण येणें or उरणें To be in the last lingerings of life; to be tarrying only to see (some greatly desired object). डोळ्यांत बोट घातलें असतां तरीं दिसत नाहीं Used in expression of the sense of gross darkness. डोळ्यांत भरणें To fill or satisfy the sight. डोळ्यांत माती पडणें g. of s. To envy. डोळ्यांत मावणें or समावणें g. of o. To be swallowed up or confounded by the scowl or fierce glare of. Gen. neg. con. Ex. तू आप- ला ऐस मी कांहीं तुझ्या डोळ्यांत मावणार नाहीं. डोळ्यांत वात घालून बसणें To sit up watching. डोळ्यांत शरम नसणें To be brazenfaced. डोळ्यांत हराम उतरणें To be evil in the eyes of. डोळ्यांनीं उजेडणें To watch throughout the night. डोळ्यांनीं मारणें To strike with amorous glances; to ogle. डोळ्यांनीं (रात्र or दिवस) काढणें or उगविणें, To spend (the night or the day) in wakefulness. डोळ्यांवर कातडें ओढणें To connive or wink at. 2 To act blindly and rashly; to resist conviction &c. डोळ्यांवर धूर येणें g.of s. or धुरानें डोळे भरणें To be blinded (by riches, honors &c.) डोळ्यांवर पडळ येणें g. of s. To become proud-blind. डोळ्यांवर येणें g. of o. To be an eyesore unto. 2 g. of s. To get blinded (as by wealth or fame). डोळ्याशीं डोळा मिळविणें To look at audaciously or pertly. डोळ्याशीं डोळा लागणें To close in sleep--eyes. डोळ्यांस टिपें येणें To have tears come into the eyes. डोळ्यांस पाटा बांधणें (To bind a slab over the eyes.) To close the eyes; to hoodwink; to blind. दोहों डोळ्यांची मुरवत राखणें To be afraid to look in the face of. रुप्याचे डोळे होणें in con. To have silvery eyes; i. e. to be blind, or to be dying. वांकड्या डोळ्यानें पाहणें To look sideways, i. e. with timorous yet earnest desire. दुसऱ्याच्या डोळ्यांत बोट टपकन शिरतें or जातें expresses great censoriousness or the easiness of c. दोन डोळे शेजारीं भेट नाहीं संसारीं Applied to a friend in the neighborhood but seldom seen. फुटका डोळा काजळानें साजरा Applied to a deformity or a defect tricked out or varnished over.
पु. १ रंग, रूप वगैरे जाणण्याचें इंद्रिय; नेत्र; दृष्टि; नयन; नेत्रेंद्रियाचें स्थान. २ दृष्टि; नजर; लक्ष; कटाक्ष. ३ लहान भोंक; छिद्र (कापड, भांडें इ॰ चें). ४ मोराच्या पिसार्यावरील डोळयाच्या आकाराचें वर्तुळ; नेत्रसदृशचिन्ह; चंद्र; चंद्रक. ५ अंकुर, मोड फुटण्याची, येण्याची जागा (बटाटा, ऊंस, नारळ इ॰स). ६ पायाच्या घोट्याचें हाड; घोटा. ७ गुडघ्याच्या वाटीजवळ दोन खळगे असतात ते प्रत्येक. ८ माहिती सांगणारा; ज्ञान देणारा (माणूस, विद्या इ॰); बातमीचा, ज्ञानाचा उगम (शास्त्र, कागदपत्र, हेर, गांवचा महार इ॰). 'धर्माधर्म ज्ञान समजण्याचा डोळा धर्मशास्त्र.' 'पांढरीचे डोळे महार.' ९ माशाच्या पाठीवरील खवला; सीताफळ, रामफळ, अननस इ॰ फळावरील खवला, नेत्रकार आकृति. १० (खा.) १६ शेराचें माप; परिमाण. एकतृतीयांश पायली (४८ शेरांची). १२ डोळे = एक माप व ६० मापें = एक साठ). ११ कुंभाराच्या चाकांतील एक खांच. १२ (सोनारी) जिन्नसाच्या इतर अंगापेक्षां तोंडाशीं किंचित वाटोळा व डगळ असणारा भाग. १३ दुर्बिणीचें आपल्याकडे असलेलें भिंग. १४ जात्याचें तोंड. १५ मोटेस बांधावयाचें लाकण. १६ (विटीदांडू, कर). आर डाव; वकट, लेंड इ॰ मधील डोळ्यावरून विटी मारण्याचा डाव. (क्रि॰ मारणें). [देप्रा. डोल] (वाप्र.) डोळा उघडत नाहीं-एखाद्या, गर्विष्ठ मगरूर माणसाबद्दल किंवा पाऊस एकसारखा पडत अस- ल्यास म्हणतात. डोळा ओळखणें-दुसर्याच्या मनाचा कल समजणें, आशय, अभिप्राय ताडणें. डोळा काणा असावा मुलूक काणा असूं नये-दृष्टीला अंधत्व असलें तरी चालेल परंतु अव्यवस्था असूं नये. डोळा घालणें-मारणें-१ डोळा मिचकावून खूण करणें. २ आपलें प्रेम व्यक्त करण्यासाठीं एखाद्या (बाई) कडे पाहून डोळे मिचकावणें. डोळा चुकविणें-दृष्टीस न पडणें; भेट घेण्याचें टाळणें; नजरेला नजर भिडूं न देणें. डोळा ठेवणें-एखाद्या वस्तूच्या प्राप्तीची इच्छा करणें. डोळा जाणणें- समजणें-ताडणें-मनांतील गोष्ट जाणणें. डोळा देणें-बारीक नजर ठेवणें. 'गृध्रासम डोळा दिधला.' -संग्रामगीतें ४१. डोळा न फुटे काडी न मोडे या रीतीनें करणें-अगदीं लक्षपूर्वक, कौशल्यानें काम करणें. डोळा पाहणें-डोळे वटारून पाहणें. डोळा प्राण ठेवणें-डोळ्यांत प्राण ठेवणें पहा. 'माझी माता शोकें करून । डोळां प्राण ठेवील कीं ।' डोळा बांधणें-दुसर्या झाडाच्या फांदीला सालीमध्यें खांच करून निराळ्या झाडाचा डोळा कापून बसविणें. डोळाभर झोंप-चांगली झोंप. डोळे उगा- रणें-गुरकावणें-डोळे वटारणें. डोळे उघडणें-आपलें कर्तव्य, हिताहित वगैरेकडे लक्ष वेधणें; सावध होणें. अनुभवानें; चट्टा बसल्यानें; नुकसान झाल्यानें शहाणें होणें. 'आतां तरी याचे डोळे उघडले असले म्हणजे पुष्कळच चांगलें झालें म्हणा- यचें.' -उषःकाल. डोळे उरफाटणें-फिरणें-चढणें- (श्रीमंतीमुळें) मदांध होणें. डोळे (मोठे, केवढे)करणें-डोळे वटारणें; रागावून पाहणें. 'मी नुसतें त्याचें नांव घेतलें मात्र तों बाईसाहेबांनीं केवढे डोळे केले तें तूं पाहिलेंस ना?' -फाल्गुनराव. डोळे खाणें-पेंगणें; डुलकी घेणें. डोळेगांवचीं कवाडें लागणें-(मी, तो इ॰) अंध होणें. डोळे चढणें- (दारूनें, जाग्रणानें, उन्हानें, रागानें) डोळे उग्र दिसणें. डोळे चढवून बोलणें-रागानें बोलणें. डोळे जळणें-द्वेषामुळें बरें न पाहवणें; जळफळणें. डोळे जाणें-अंधत्व येणें. डोळे झांकणें-ढापणें-१ मरणें. २ दुर्लक्ष, हयगय करणें; कानाडोळा करणें; डोळझांक करणें. ३ डोळे मिटणें; प्राण सोडणें. डोळे टळ- टळीत भरणे-अश्रूंनीं डोळे भरून येणें. डोळे तळावणें- खुडकणें-डोळे लाल होणें, उष्णतेनें बिघडणें. डोळे ताठणें- अरेराव, मगरूर बनणें, होणें. डोळे ताणून पहाणें, डोळे फांकणें-तीक्ष्ण नजरेनें पाहणें. डोळे तांबडेपिवळे करणें- रागानें लाल होणें; उग्र नजरेनें, डोळे फाडून पाहणें. डोळे निवणें, निवविणें-थंड होणें-एखादी ईप्सित, प्रिय वस्तु पाहून समा- धान पावणें; कृतकृत्य होणें. 'कृष्णा म्हणे निवविले डोळे त्वां बा यदूत्तमा माजे ।' -मोऐषिक ३.३१. डोळे निवळणें-१ डोळे येऊन बरे होणें; डोळे फिरून पूर्ववत् स्वच्छ होणें. २ (ल.) (वेडानंतर) पूर्ववत् ताळ्यावर, शुद्धीवर येणें. डोळे पठारास, पाताळांत जाणें-आजार, अशक्तता इ॰ मुळें डोळे खोल जाणें. डोळे पांढरे करणें-१ (डोळे पांढरे होईतोंपर्यंत) अत्यंत क्रूरपणाची शिक्षा देणें. २ मृत्युपंथास लागणें. डोळे पापी-डोळ्यांना नेहमीं विलासी, विषयी, कामुक असें मानण्यांत येतें; प्रथम पाप करतात ते डोळेच. डोळे पाहून वागणें-चालणें-एखाद्याच्या मनाचा कल पाहून वागणें; तब्येत ओळखणें. डोळे पिंजारणें- फिंदारणें-फाडणें-(रागानें) डोळे वटारणें; क्रूर मुद्रा करणें; डोळे पुसणें-१ रडावयास लागणें; वाईट वाटणें. २ सांत्वन करणें. डोळे पोंढळणें-डोळे खोल जाणें. डोळे फाटणें-१ आशा जास्त जास्त वाढणें; महत्त्वाकांक्षी बनणें. २ आश्चर्यचकित होणें. डोळे फाडणें-१ रागावणें; डोळे वटारून पाहणें. २ अंतकाळीं डोळे निश्चळ उघडे ठेवणें; डोळे थिजणें. डोळे फिरणें- १ घेरी, चक्कर येणें. २ (ल.) मगरूर, उन्मत्त होणें. ३ (मरण- समयीं) डोळे फिरवूं लागणें. ४ (करारासंबंधीं) बेत फिरणें; मत बदलणें; माघार घेणें. डोळे फिरविणें-(रागानें) डोळे वटारणें; चेहरा उग्र करणें; अवकृपेनें पाहणें. डोळे फुटणें-१ अंध होणें; डोळे जाणें. २ दुसर्याचा उत्कर्ष पाहून मत्सरग्रस्त होणें. डोळे फोडून वाचणें-लक्षपूर्वक वाचणें. डोळे बांधणें-१ भारणें; नजरबंदी करणें (जादूटोणा इ॰नीं). २ डोळ्यांत माती फेंकणें; फस- विणें. डोळेभर-डोळ्यांभर पाहणें, डोळे भरून पाहणें- तृप्ति होईपर्यंत एखादी वस्तु पाहणें. डोळे मिटणें-मरणें; डोळे झांकणें. 'आदिमाये, माझ्या डोळ्यांनीं हें पाहण्यापूर्वीं माझे डोळे कां मिटलें नाहींत.' -बाय ५.२. डोळे मुरडणें-१ वांकडी नजर करून, संशयित नजरेनें पाहणें. २ काण्या डोळ्यानें पाहणें; एके बाजूस पाहणें. 'डोळे मुरडुनि सहज बघे ती ।' -शाकुंतल अंक २. डोळे मोडणें-मारणें-१ डोळे मिचकावणें; डोळ्यानें खुणा करणें. 'डोळे मोडून वांकुल्या दावी । घुलकावित मान पै ।' २ ऐटीनें, चोखंदळपणानें डोळे उचलणें, वर करणें; नखर्यानें पाहाणें. डोळे येणें-अंधत्व जाऊन दृष्टि प्राप्त होणें. डोळे येणें-विणें- डोळयांस रोग येणें. डोळे लवणें-डोळयाच्या पापणीचें स्फुरण होणें (शुभाशुभसूचक). पुरुषांचा उजवा व बायकांचा डावा डोळा लवणें हें शुभसूचक लक्षण समजतात. डोळे लाल करणें-वटा रणें-१ रागावणें. २ एखाद्यावर उलटणें. डोळे होणें-माहिती होणें-सावध होणें (कामधंदा, अभ्यास इ॰ संबंधीं). डोळ्या आड-नजरे पलीकडे, पाठीमागें डोळ्यांचा अंधार करणें- उजेडांत चुकणें; धडधडीत चूक करणें. डोळ्यांचीं खोगरें- डोळ्यांच्या खांचा-डोळ्यांची भिंत होणें-कांहीं एक दिसे- नासें होणें; दृष्टि जाणें. डोळ्यांचें पारणें फिटणें-होणें-उत्कं- ठेनें अपेक्षिलेली वस्तु पहावयास मिळणें; फार दिवस इच्छिलेली गोष्ट घडून येणें. डोळ्यांच्या वाती करणें-डोळे ताणणें; डोळ्यांनीं जास्त काम करणें. डोळ्यांत कुरूप-कुरुंद असणें- असूया वाटणें; एखाद्याविषयीं मत्सरग्रस्त असणें. डोळ्यांत- खुपणें-सलणें-१ डोळ्यांस वेदना होणें. २ (ल.) मत्सरग्रस्त होणें; द्वेषबुद्धियुक्त, कलुषित मन असणें (दुसर्याचे गुण, धन इ॰ पाहून) डोळ्यांत गंगाजमना येणें-डोळे भरून येणें- रडूं येणें. डोळ्यांत जहर उतरणें-दुसर्याचें वैभव इ॰ पाहून हेवा वाटणें; डोळ्यांत सलणें, खुपणें. डोळ्यांत तेल घालून जपणें-अतिशय काळजीनें जपणें; लक्ष देणें; काळजी घेणें. डोळ्यांत तेल घालून पाहणें-सूक्ष्म नजरेनें पाहणें; पाळत ठेवणें; बारीक चौकशी करणें. डोळ्यांत धूळ, माती घालणें- फेकणें-फसविणें; नजरबंद करणें. डोळ्यांत पाणी असणें- लाज वाटणें; विनय, मर्यादा असणें. डोळ्यांत पाणी नसणें-लाज न वाटणें; आदर न वाटणें; निर्लज्ज बनणें. डोळ्यांत प्राण ठेवणें-एखादी गोष्ट पाहिल्यावर मग मरावयास तयार असणें; मरणापूर्वीं एखाद्या गोष्टीची इच्छा धरणें. डोळ्यांत प्राण येणें-उरणें-१ मरणाच्या द्वारीं असणें. २ इच्छित वस्तु (माणूस इ॰) पाहण्या-मिळण्याकरतांच केवळ फक्त प्राण गुंतलेले असणें. डोळ्यांत बोट घातलें तरी दिसत नाहीं-अतिशय, निबिड काळोख पडला असतां म्हणतात. डोळ्यांत भरणें-१ दृष्टीला आनंद, संतोष देणें. २ पटणें; मान्य होणें. डोळ्यांत माती पडणें-मत्सर वाटणें; द्वेष करणें. डोळ्यांत मावणें- समावणें-(डोळ्यांनीं खाल्ला जाणें) रागाने पाहण्यानें घाबरून जाणें. (नकारार्थीं वाक्यांत उपयोग करतात). 'तूं किती डोळे ताण- लेस तरी मी कांहीं तुझ्या डोळ्यांत मावणार नाहीं.' डोळ्यांत वात घालून बसणें-ताटकळत, वाट पहात मार्गप्रतीक्षा करणें. डोळ्यांत शरम नसणें-निर्लज्ज बनणें. डोळ्यांत हराम उतरणें-एखाद्याच्या दृष्टीनें वाईट असणें. डोळ्यांतील काजळ चोरणें-पाहतां पाहतां चोरी करणें. डोळ्यांतून उतरविणें-अपमान करणें. डोळ्यांतून पाणी काढणें-रडणें; अश्रु गाळणें. 'असें वारंवार डोळ्यांतून पाणी काढीत राहूं नये.' -रत्न ४.४. डोळ्यांनीं उजेडणें-सारी रात्र जागून काढणें. डोळ्यांनी मारणें-प्रेमकटाक्षांनीं प्रहार करणें; प्रेमकटाक्ष टाकणें. डोळ्यांनीं रात्र-दिवस काढणें-एकसारखें जागत बसून रात्र- दिवस घालविणें. डोळ्यानें भुई दिसेनाशी होणें-उन्मत्त होणें (संपत्ति इ॰नीं). डोळ्यांपुढें काजवे चमकणें-भोंवळ येण्याची भावना होणें; घेरी येणें. डोळ्याला पाणी येणें-अश्रूंनीं डोळे भरणें; वाईट वाटणें. 'आलें डोळ्याला बहु वर्षाकालीं जसें नदा पाणी ।' -मोशल्य ३०.२०. डोळ्यांवर कातडें ओढणें-१ एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणें. २ बेदरकारपणें, बेफामपणें वागणें. डोळ्या- वर धूर येणें-धुरानें डोळे भरणें-(अधिकार, संपत्ति इ॰नें) ताठणें; फुगून जाणें. डोळ्यांवर पडळ-मांद येणें-चढणें- गर्वानें अंध होणें; गर्वानें कोणास न जुमानणें. डोळ्यांवर येणें-१ डोळ्यांत सलणें. २ (कीर्ति, पैका यांनीं) पूर्णपणें फुगून जाणें; धुंद होणें. डोळ्याशीं डोळा मिळविणें-भिडविणें- (एकमेकांकडे पाहणें) नजरेशीं नजर भिडविणें; उद्धटपणानें टक लावून पाहणें. डोळ्याशीं डोळा लागणें-झोंप येणें, झोपेनें डोळे मिटणें. डोळ्यांस टिपें येणें-डोळ्यांत अश्रू येणें. डोळ्यांस पाटा(पट्टा)बांधणेंडोळें मिटणें; कानाडोळा करणें; न पाहिल्यासारखें करणें. डोळ्यांस पाणी लावणें- अनुकूल करून घेणें; संतोषविणें. 'आतांशा उगेच बाबाच्या डोळ्यांस पाणी लावण्यासाठीं इकडे येते.' -रत्न ३.३.डाव्या डोळ्यानें-१ तिरस्कारानें. 'डाव्या डोळ्यानें तुमच्याकडे पाह्याचेसुद्धां नाहींत.' -झांमू ६१. २ चोरून, वांकड्या नजरेनें. दोहों डोळ्यांची मुरवत राखणें-एखाद्याकडे पहावयास, नजर भिडवावयास भिणें, कचरणें. दुसर्याच्या डोळ्यांत बोट टपकन जातें-शिरतें-दुसर्याचे दोष चट्कन् कळतात. दोषैकदृष्टीबद्दल वापरतात. रुप्याचे डोळे होणें-डोळे पांढरे होणें; मरणोन्मुख होणें. वांकड्या डोळ्यानें पाहणें- कानाडोळा करून पाहणें. भीतभीत पण उत्कट इच्छेनें पाहणें. म्ह॰ १ दोन डोळे शेजारीं भेट नाहीं संसारी = शेजारीं राहत असूनहि क्वचितच भेटत असलेल्या मित्रांसंबंधीं योजतात. २ डोळ्यांत केर व कानांत फुंकर = रोग एक व उपाय भलताच! ३ फुटका डोळा काजळानें साजरा = व्यंग झांकण्याचा प्रयत्न. सामाशब्द- डोळुला-पु. (लडिवाळपणें) डोळा. 'वाटुली पाहतां सिणले डोळुले । दाविसी पाउले कैं वो डोळा ।' -तुगा ८२९. डोळे उजेडी-क्रिवि. १ दिवसा उजेडी; अंधार पडण्याचे पूर्वीं; उजेड आहे तों. 'डोळेउजेडीं घरीं ये. ' २ स्पष्टपणें; उघड; तोंडावर; आड पडदा न ठेवतां. 'तुझे मनांत काय तें डोळेउजेडी सांग.' [डोळा + उजेड] डोळे झांक-की-स्त्री. मुद्दाम दुर्लक्ष; कानाडोळा; हयगत; उपेक्षां. [डोळे + झांकणें] डोळे झांकणी, डोळे झांकण्याचा खेळ-स्त्रीपु. एक खेळ. डोळे झांकणें- झांपणी-ढाळणें-ढांपणें-बांधणें-नस्त्री. बैलाच्या डोळ्या- वरची झांकणी; ढापणी. डोळे फुटका-वि. दृष्टि गेलेला; आंधळा. डोळेफोड-स्त्री. १ बारीक पाहणी, चौकशी; तीक्ष्ण नजर. २ डोळे त्रासले जावयाजोगी किचकट कामामध्यें मेहनत. -वि. १ डोळ्यांस त्रास देणारें (कलाकुसरीचें, बारीक काम). २ डोळ्यास हिडिस दिसणारी; ओंगळ (वस्तु). ३ डोळ्यांत भरणारी पण निरुप- योगी सुंदर पण टाकाऊ. 'ही गाय डोळेफोड मात्र दिसत्ये पण दूध तादृश नाहीं.' [डोळा + फोडणें] डोळे भेट-स्त्री. १ शेव- टची भेट (मुलाची व मरणोन्मुख आईबापांची भेट); नुसतें एकदां शेवटचें डोळ्यांनी पाहणें. २ ओझरती, उभ्या उभ्या भेट; घाईची भेट. ३ नजरानजर; दृष्टीस पडणें. 'डोळेभेट तरी दुरून देत जा नको करूं हयगय ।' -होला १५१. डोळे मिचका-क्या-वि. डोळेपिचक्या; डोळे मिचकावणारा. डोळेमोडे-स्त्री. नेत्रसंकेत; डोळे मिचकाविणें. डोळेमोडणी-वि. डोळे मोडणारी (मूढ होऊन); डोळे फिरविणारी. 'चौघी डोळेमोडण्या ।लाजोनियां तटस्थ ।' -ह ३.५. डोळेलासु-वि. डोळ्यांत अंजन घालणारा; वठणीवर आणणारा. 'साभिमानिआ देवां डोळेलासु ।' -शिशु १५६. [डोळा + लासणें = डाग देणें] डोळ्याचा त्रास- दाब-पु. डोळ्यानें भीति घालणें; दाबणें; भेदक नजर. डोळ्याचा पडदा-पु. डोळ्यावरचें आवरण; नेत्रदोष. डोळ्याचा मद-पु. डोळ्याची लाली, लालबुंदपणा (मद्यपान, क्रोध, गर्व इ॰मुळें). डोळ्याची खूण-स्त्री. नेत्रकटाक्ष, संकेत. 'तुमच्यापैकीं कोणी तरी बाईनें डोळ्याची खूण करून त्याला तेथून बाहेर काढला असेल.' -बाय २.१. डोळ्याची जीभ-स्त्री. पापण्यांच्या आंतील बाजूस अस्तराप्रमाणें असणारी त्वचा. डोळ्यांतलें काजळ चोरणारा-नेणारा-पु. वस्ताद; अट्टल चोर. -वि. अतिशय कुशल; हुशार; धूर्त. डोळ्यादेखत-तां, डोळ्यापुढें-क्रिवि. १ डोळ्यांसमोर; प्रत्यक्ष. 'माझ्या डोळ्यांदेखत तो निसटला.' २ प्रत्यक्ष; स्वतः पाहिल्यापैकीं; स्वतःच्या आयुष्यांतील, अनुभवां- तील; जिवंतपणीं. 'म्हातारीचें डोळ्यादेखत पोराचें लग्न होतें म्हणजे बरें.' डोळ्यांभर-क्रिवि. डोळे भरून; अवलोकनानें नेत्र तृप्त करून (पाहणें); दृष्टि संतुष्ट करून. डोळ्यांमागें-पर- भारें-क्रिवि. पाठीमागें; गैर हजेरींत; अप्रत्यक्ष.
माप
न. १ प्रमाणानें मोजून निश्चित करण्याचें साधन; (वजन, सांठा, लांबी, वेळ इ॰) मोजण्याची, गणण्याची क्रिया. (क्रि॰ करणें; चालवणें; घेणें; मांडणें; लावणें.) 'आज भाताचें माप चालले आहें.' २ गणना; गणनेनें निश्चित करणें. 'आंब्याचें माप झालें म्हणजे खुरद्याचें माप घे.' ३ (सामा) मापण्यानें निश्चित केलेलें मान, करिमाण. 'दहा खंडी माप भरलें; (सामा.) माप- ण्याचें साधन. (वजन, सांठा, लांबी इ॰चें) उदा॰ वजनी माप, कैली माप, धान्य माप, कापडाचें माप. इ॰, मापण्याचें कोणतेंहि साधन. ४ मापलेला, परिमित भाग. 'त्या खाचरांत चार मापें आहेत.' ५ (खा.) बारा डोळे किंवा चार पायली. डोळा अर्थ १० पहा. [सं. मा = मोजणें] ॰देणें-घेणें-मापून देणें, घेणें. ॰कुतऱ्यानें नेणें-एखादी गोष्ट गतगोष्टींपैकीं एक होणें; एखाद्या गोष्टीची गतगोष्टींत गणना होणें. (पदरी) ॰घालणें-एखादी गोष्ट अमान्य करणारास ती अनेक प्रमाणांनी खरी करून पटवून देणें. ॰लागणें-मापी लागणें-कमी कमी होणें. 'मापीं लागलें शरीर ।' -दा ३.९.१. (आपल्या) मापानें मोजणें-आपल्या स्वतःच्या (प्रमाण असलेल्या) मापानें मोजणें. माप आणि महापाप-खोटें माप घालणें महापाप होय. सामाशब्द- ॰पट्टी- ऐनजिनसी सारा घेतांना धान्य मापण्याबाबत शेतकऱ्यावर बस- विलेला कर. ॰वरताळा-वर्ताळा-पु. १ धान्याच्या साऱ्याच्या खंडीमागें सरकारनें हक्कानें मागितलेला वरकतावळा. २ (कों.) कुळांकडून धान्य घेतांना माप घेण्यासाठीं हक्क म्हणून ठरीव खंडा- पेक्षा एकचौसष्टांश किंवा एकअष्टमांश जास्त घेतलेला माल, रकम. मापटें-न. साठप्याचें माप; अर्धा शेर, एक अषटमांश पायली; निठवें. म्ह॰ (व.) आपलं तें मापटं दुसऱ्याचं तें दीड पायली. मापणें- सक्रि. (वजन, साठपा, लांबी, वेळ यांच्या) मापानें निश्चित करणें; मोजणें; तोल करणें; मेंज घेणें. [सं. मा; झें. मा; ग्री. मेजिओ; लॅ॰ मेतिओर] मापन-न. मापणें; मोजणें; माप घेणें. मापड्या, मापारी, मापेली-वि. १ (सरकारी कोठ्या, बाजार माल यांतील) सरकारी धान्य मापणारा. २ (सामा.) मापणारा. 'आयुष्य मोजायाला बैसला मापारी । तूं कांरे व्यापारीं संसाराच्या ।' मापारकी-स्त्री. मापाऱ्याचा धंदा. मापारी- स्त्री. धान्य इ॰ मोजण्याचें फरा नावाचें एक मांप. मापी-वि. १ साठप्याच्या मापानें निश्चित केलेला. २ मापानें मोजण्यासारखें; साठप्याचें; वजनीच्या उलट. माप दाखविणाऱ्या शब्दांच्या पूर्वी हा शब्द जोडून येतो. जसें मापी खंडी-मण-शेर. मापीव, मापित-वि. मापलेला. ह्याच्या उळट तोलीव, मोजीव.
माप māpa n (मापन S) Determining by a measure (whether of weight, capacity, length, or time), measuring. v कर, चालव, घे, मांड, लाव. 2 unc Determining by numbering. Ex. आंब्याचें माप झालें म्हणजे खुरद्याचें माप घे. 3 The amount or quantity determined by measurement, the measure. Ex. दाहा खंडी माप भरलें; वीस हात कापड भरलें. 4 A measuring instrument or means, a measure (of weight, capacity, length &c.); as वजनी माप, कैली माप, धान्यमाप, कापडाचें माप &c.; any means of measuring. 5 A portion measured off. Ex. त्या खांचरांत चार मापें आहेत. 6 In Khándesh माप is a measure of twelve डोळे or four पायली. See under डोळा. आपल्या मापानें मोजणें To measure by one's own bushel (standard). तें माप कुतऱ्यानें नेलें That matter is amongst the by-gones, Fuit Ilium. माप आणि महापाप A (false) measure is an abomination. Deut. xxv. 13--15.
आडशेरी
स्त्री. अंदाजे अडीच किलोचे माप किंवा वजन अर्धीं पायली : ‘शेतकरी याला चार पेंड्या कडबा देतो आणि आडशेरी पायली जोंधळेही देतो.’ − विश ७०.
अडशेरी
स्त्री. १. अडीच शेरांचे माप–वजन; (पूर्वी पाच शेरांची पायली असे) या पायलीचा अर्धा भाग. २. अधोली; अर्धी पायली. ३. नोकरास दररोज किंवा महिन्याच्या महिन्याला दिले जाणारे धान्य; मासिक वेतन; मजूरी. (एका दिवसाचा २॥ शेर वजनाचा शिधा, भत्ता यावरून).
बारोली
बारोली bārōlī f (बारा & पायली) A maund consisting of twelve पायली.
डोळा
पु. सोळा शेराचे माप, परिमाण; एक तृतीयांश पायली (४८ शेर = एक पायली). १२ डोळे = एक माप व ६० मापे = एक साठ. (खा.)
कुडव
पु. १ (कु. गो.) सामान्यतः आठ शेर अथवा दोन पायलींचे माप. देशावर आठ पायली धान्याचें माप; कोंक- णांत राजापुराकडे चार पायली; २ एक प्रस्थाचा एकचतुर्थांश; एक पक्का पावशेर. -अश्वप १.१३०; पातळ औषधें मापण्याकरितां मातीचें, कळकाचें, लाकडाचें किंवा लोखंडाचें, विस्तारानें व उंचीनें चार अंगळांचें भांडें. -योर १.३८. 'तो निजबोधाचें कुडवाकारीं । भरील वखारी श्रवणाच्या ।' -एभा ३.८७३. [सं.] ॰भरणें- (कु.) माप भरणें, पूर्ण होणें; मरण ओढवणें. म्ह॰ मेल्या म्हशीस कुडवभर दूध.
कुडव kuḍava m (S) A corn-measure of two पायली, in the Konkan̤, of eight. Pr. मेल्या म्हशीस कु0 दूध.
कुडव m A corn-measure of two पायली.
कुडव, कुडवा
पु. १. सामान्यतः आठ शेर अथवा दोन पायलीचे माप. देशावर आठ पायली धान्याचे माप; राजापुराकडे चार पायली. २. एक प्रस्थाचा एक चतुर्थांश; एक पक्का पावशेर; पातळ औषधे मापण्याकरता मातीचे, कळकाचे, लाकडाचे किंवा लोखंडाचे, विस्ताराने व उंचीने चार अंगळांचे भांडे : ‘तो निजबोधाचें कुडवाकारीं । भरील वखारी श्रवणाच्या ।’ - एभा ३·८७२. [सं.] (वा.) कुडव, कुडवा भरणे - १. माप भरणे, २. पूर्ण होणे; ३. मरण ओढवणे. (कु.)
अडमाप
न. १ वाजवी, सरळ, खऱ्या मापापेक्षां कमी अगर जास्त असलेलें असें अधलेंमधलें माप (सव्वातीन शेरी किंवा साडे- तीन शेरी पायली हें अडमाप). २ दिडकें माप? ३ (ल.) खोटें माप. -वि. प्रमाणशीर-बद्ध नसलेला; अडबंक. [सं. अर्ध किंवा का. अड्ड = आडवेंतिडवें + मापन]. अडमापानें मोजणें-बेसुमार, गैरशिस्त अंदाज बांधणें, अपेक्षा करणें; फाजील आशा धरणें.
अडनाट-ड
वि. अडनीड; अडनेड; अडनीट; नीट किंवा बरोबर, हिशेबाच्या दृष्टीनें पूर्ण, नसलेला-दहा, वीस, शंभर इ॰ ठोकळ संख्येचा-परिणामाचा नसलेला, अधल्यामधल्याच संख्येचा-गैर- सोयीचा. 'एक रुपयाचे होईल तें भात ने किंवा मणभर ने, अडनीड अकरा पायली नेऊ नको.' -क्रिवि. सोईस्कर नाहीं, अशावेळीं; अनिश्चितपणें; धड इकडे नाहीं, धड तिकडे नाहीं अशा तऱ्हेनें. 'आंत तरी बैस नाहींतर बाहेर तरी बैस, मध्येंच अडनीड बसूं नकोस.' [सं. अर्ध + नीतः का. नेट्टगेः ता. निट्टुः म. नीट]
अडशेरी
अडशेरी f A weight of 2½ शेर; a ½ पायली
अडशेरी, अडिश्री
स्त्री. १ अडीच शेरांचें माप-वजन; (पूर्वी पांच शेरांची पायली असे त्याचा अर्धा. २ (हल्लीं) अधोली; अर्धीपा- यली. ३ नोकरांस दररोज किंवा महिन्याच्या महिन्याला दिलें जाणारें धान्य; मासिक वेतन; मजूरी (एका दिवसाचा २।। शेर वजनाचा शिधा, भत्ता यावरून). [अडीच + शेर सं. अर्धतृतीय; अडीच]
अधोली
अधोली f A half पायली.
आलवाकालव करणे
क्रि. कालवणे : ‘पसा दोन पसे हरभऱ्याची डाळ तुरीच्या अर्ध्या−पाऊण पायली डाळींत आलवाकालव केली.’ − बाविबु ३३७.
अनर्थ
अनर्थ anartha m (S अ & अर्थ) Any exceeding, overwhelming calamity, e.g. an inundation, an epidemic, a hostile irruption: also the disorder, tumult, or distress occasioned by it. 2 Excess, extravagance, vehemence, boundlessness. It is used with the uttermost freedom, and of all actions, appearances, qualities, things, of which the speaker would express the immoderateness, exorbitance, or superlativeness. Ex. ह्या पोरानें रडण्याचा अ0 मांडिला or रडून अ0 केला This child is bellowing with might and main; देवळ बांधावयाचा ह्यानें अं0 मांडिला He is straining every nerve and employing every means to build the temple; राजानें अ0 माजेवला The Raja has set on foot a grievous oppression. आमचें कुटुंब समग्र ॥ कुंभकर्णे ग्रासिलें ठार ॥ अ0 मांडिला ॥ यंदा सस्ताईचा अ0 झाला पंधरा पायली तांदूळ रुपयास मिळतात; पावसानें अ0 केला; त्यानें एका दिवसांत पांचशें श्र्लोक लिहून अ0 केला. 3 Also used adj & adv in the above sense. Ex. हा अ0 बोलतो; त्याची अ0 बुद्धि. 4 Want or privation of meaning, nonsense. Ex. श्र्लोकाचा अर्थ सोडून अ0 केला. N. B. This last sense is the radical or literal sense, but it is uncommon. The intelligent student will recognise in it the source of the other senses, and will call to mind the similar use of the English word Nonsense. 5 Unsubstantialness, unsatisfactoriness, hollowness, inanity. Ex. जडा अनर्थांत समान साचा॥ जो अर्थ तो मी प्रिय माणसाचा॥ In the midst of dreary vanity, the true and unvarying substance or good--am I, the beloved of man. (An utterance ascribed to Deity.) Oh! si sic omnia.
आठवा
पु. १ अठवें पहा. २ (गो.) अर्धीपड (माप); आठवो; पायलीच्या आठव्या भागाएवढें माप. 'ती पायली आनी तॉ आठवॉ मात्सॉ ताका आठवा व्हरून दी.'
अठवा
अठवा aṭhavā m or अठवें n A measure of capacity, half a शेर or ⅛ of a पायली.
अठवा m वें n Half a शेर or ⅛ of a पायली.
बारुला, बारुली, बारोला, बारोली or बारूला
बारुला, बारुली, बारोला, बारोली or बारूला bārulā, bārulī, bārōlā, bārōlī or bārūlā or ली, more frequently बारोळा a (बारा) That contains or consists of twelve पायली--a maund. The word is used before मण, खंडी, or माप.
भरा
भरा bharā m A corn measure,--one hundred and sixty पायली As used in Málwán táluká, it is stated at ten maunds.
भरडण
भरडण bharaḍaṇa n (भरडणें) Grain &c. taken to be coarsely ground. 2 Grinding coarsely. Ex. दोन पायली भरडणाचें भरडण करायाचें आहे.
भरडणें
सक्रि. १ जाड दळणें. २ (ल.) सरासरी व ओबड धोबड रीतीनें करणें; भरकटणें. भरडण-न. १ भरडण्यास घेतलेलें धान्य. २ जाड कणीदार दळण. 'दोन पायली भरडणाचें भरडण करावयाचें आहे.' भरडणी-स्त्री. जाड दळण इ॰ भरडा-पु. १ कळणा; भरडलेले तांदूळ व उडीद, इतर डाळी यांचें मिश्रण. २ भरडलेली डाळ, धान्य. भरडी-वि. भरडलेली (डाळ, धान्य, औषधी मसाले, चुना); भरड्याची केलेली (थुली, भाकरी, पोळी, औषधी). भरडींव-वि. भरडलेलें (धान्य, डाळ).
भरणें
भरणें bharaṇēṃ v i (भरण S) To fill out; to become fleshy or pulpous--the body, fruits, grains: also to fill--an ear of corn. 2 To rise to and equal; to amount (to some number or quantity assumed as a standard). Ex. तांदूळ चार पायली भरले; नारळ शंभर भरले; खंडीभर धान्य आणलें तें ह्या मापानें बराबर भरलें. 3 To become complete or full--a term or time; as वर्ष भरलें, आयुष्य भरलें, मुद्दत भरली. 4 To become heavy and torpid;--used of knees or legs from fatigue or sitting. 5 To fill up--a well or pit with rubbish: also, or भरून येणें, to form in granulations and fill--a healing wound or sore. 6 To enter and lodge--a thorn into and in the flesh. 7 To gather, come together, fill;--used of a market. Ex. बाजार चांगला भरला म्हणजे मी येईन. Also to gather, meet, form, to fill or be held--a market or bazar. Ex. तो मोठा गांव आहे तेथें बाजार भरतो. भरून येणें To rise up bodily or in mass;--used of a boiling liquor.
सक्रि. १ पूर्ण करणें. २ बुझविणें; भरून काढणें (खळगा, रिकामी जागा, व्यंग). ३ आंत, वर, घालणें, ठेवणें (भरीत, भर- ताड, पूरणद्रव्य); ठांसणें (बार). ४ आंत ओतणें (रस, भुकटी, धान्य, वाळू इ॰). 'सिंधू कवण भरी ।' -ज्ञा १३.५६. ५ सर्वत्र माखणें, लिप्त करणें (तेल तूप, चिखल, धूळ, काजल इ॰ -सामा- न्यतः अपवित्र, घाणेरड्या वस्तूनीं). ६ पूर्ण करणें (कच्चे आकार, आराखडे, रकाने, घरें, तक्ते, कोष्टकें इ॰). ७ भरणा करणें (देणें असलेले पैसे इ॰ चा). ८ खूट, तोटा पूर्ण करणें; हानिनिष्कृति करणें. ९ घालणें, लेणें (मुख्यत्वें दागिना). 'बांगड्या भरल्या, गोट भरले.' १० पुरा करणें (नियतकाल, वायदा). 'चार दिवस कमी आहेत ते भर मग चाकरी सोड.' ११ (सुतारी) (खा.) तयार करणें (बाज, खुर्ची इ॰). 'रामभाऊ माझी बाज भरून द्या.' १२ मारणें; भोसकणें. 'पळतां तदुरीं शर शीघ्र भरी ।' -मोरा हर- रमणीय रामायण २०. [सं. भृ] भरणें-अक्रि. १ अंगानें जाड, भरदार, दळदार होणें (शरीर, फळें, दाणे); भरून जाणें (कणीस). २ बरोबर असणें; तंतोतंत होणें (ठराविक संख्या, परिमाण यांच्या इतकें). 'तांदूळ चार पायली भरले.' ३ पूर्ण, पुरा होणें (मुदत, काल). 'वर्ष, आयुष्य भरलें.' ४ जड आणि बधिर होणें (श्रमानें, बसण्यानें-गुडघे, पाय इ॰) ५ भरून निघणें (विहीर, खांच); भरून येणें; मठारणें व भरून जाणें (बरी होत जाणारी जखम, क्षत). ६ रुपून बसणें; शिरणें; घुसणें (कांटा, बाण इ॰). 'गुरुसि त्यजुनि, व्यूहीं भीम, त्रिपुरीं जसा हरशर भरे ।' -मोभीष्म ७.७. ७ संचरणें. 'दोघे पत्री पाशीं गुंतुनि भरले उडोनि गग- नींच ।' -मोउद्योग ५.५५. ८ भरती येणें. 'कां चंद्राचेनि पूर्ण- पणें । सिधूं भरती ।' -ज्ञा १३.१३८. ९ जमणें; एकत्र होणें, मिळणें, केला जाणें (बाजार). 'बाजार चांगला भरला.' 'तो मोठा गांव आहे तेथें बाजार भरतो.' [सं. भृ, भरण] भरून येणें-अक्रि. वर येणें (उकळणारें द्रव द्रव्य). भरणें-उक्रि. १ पात्रांत समाविष्ट करणें. २ गच्च करणें. ३ रंग देणें (चित्र, कोष्टक इ॰ कांस). भरणें. भरत-न. भरीत पहिल्या तीन अर्थी पहा. भरताचें भांडें-न. विशिष्ट मापाचें, परिमाणाचें भांडें. [भरीत + भांडें] भरतक-न. १ पूरण; पुरें करणें (संख्या, परिमाण). २ भरगत; बारदान; भरताड. ३ सामान लादणें; भरणें (गलबत, गाडी इ॰ कांत). भरताड-स्त्री. १ सामानानें लादलेला तांडा (गलबतें, गाड्या, पशू इ॰ कांचा). २ वरीलप्रमाणें लादलेली, भरलेली स्थिति ३ (कों.) पाणरहाटाचे भरून वर येणारे लोटे. याच्या उलट 'रिताड.' भरती-स्त्री. १ समुद्राच्या पाण्याचा चढ. हा विशेषतः चंद्राच्या आकर्षणानें प्रत्यहीं दोनदां (सुमारें १२ तास १५ मिनिटें इतक्या अवकाशानें) होतो. ओहटी, सुकती यांच्या उलट. २ चढाई. 'गिलचांची झाली भरती ।' -संग्रामगीतें ६९. ३ पूरण; भरण; लादणी. ४ पूर्ण झाल्याची, लादल्याची स्थिति. (गलबत, गाडी). ५ नोंदणीं. (सैन्य, मजूर इ॰) ६ (ल.) भरभराट; वृद्धि. भरती सुकती-स्त्री. (कों.) भरती व ओहोटी; चढउतार. भरतीचा-वि. १ पूर्ण करण्यास, भर- ण्यास लावलेला, पाहिजे असलेला. २ फक्त परिमाण, संख्या पूर्ण करण्याच्या, खळगा, जागा भरून काढण्याच्या लायक (वस्तु). भरतूक-न. १ भरीत; बारदान; भरताड. २ ओझें वाहून नेण्या- बद्दलचें भाडें. भर(रि)तें-न. १ पुरतेपणा; पूर्णता; पूर्ति (गुन्हा, पाप, अन्याय यांची); पराकाष्ठा (ताप, अव्यवस्था, इ॰ कांची); सीमा (शीण, आजार, दुःख इ॰ कांची); सहनशक्तीपर्यंतची मर्यादा; दाहाची पूर्ण संवेदना (शैत्याची-मुख्यत्वें ज्वरापूर्वीं होणारी); उमाळा; भरती (शोक, दुःख, आनंद इ॰ ची). (क्रि॰ येणें). भर अर्थ १ पहा. 'आलें भरतें एवढें । तें काढूनि पुढती ।' -ज्ञा १८.२८९. २ समुद्राच्या पाण्याचा चढ. ३ वृद्धि. 'इतरांच्या जाळाया भरतें सुकृताधनातमा येतें ।' -मोमंभा ३.१४. ॰येणें- जोर येणें; समृद्धि प्राप्त होणें. भरला भरला-वि. १ चांगला भरलेला; समृद्ध; भरभरणारा (संपत्ति, संतति, मित्र, कीर्ति इ॰ कानीं); परिपूर्ण (प्रजेनें राज्य, उत्पन्नानें शेत, देश व सामान, भांडीं यानीं घर). भरला भारला-वि. पतदार; अब्रूदार; लायकीचा; वजनदार (व्यापारी, मनुष्य); भरभरीचा (व्यापार, काम). [भरणें + भार] म्ह॰ भरल्या गाड्यास सूप जड नाहीं !' भरलीसरली-सवरलेली-वि. (बायकी) बाळंतपणाचे दिवस नजीक आलेली; गर्भवती. भरलें कुंकूं-न. (बायकी) पूर्ण सौभाग्य. 'माझें काय वाईट होत आहे? भरल्या कुंकवानें मी देवाघरीं जात आहें.' भरलें घर-न. पुष्कळ माणसें असून भर- भराटींत असलेलें इष्टमित्रांनीं व्यापलेलें असें कुटुंब. 'मग म्हणतांचि म्हणे भरलें घर ।' -राक २.३८. भरलें धरणें-क्रि. गडप करणें; देवाला कौल लाविला असतां त्यानें उजवी, डावी न देणें. 'देवानें भरलें धरलें.' भरलें शेत-न. भरपूर पिकलेलें शेत. भरल्या ओटीनें- क्रिवि. (बायकी) मुलांबांळांसह सुखरूप. 'भरल्या ओटीनें बाळंतीण सासरीं जाऊं दे.' भरल्या घोसानें-बंदांत- मरणें-तरणाताठा मरणें. भरल्या पायांचा-वि. चिखलानें इ॰ मळलेले पाय असलेला; बाहेरून आल्यावर पाय न धुतलेला. भरल्या पायीं-क्रिवि. बाहेरून चालून आल्यावर पाय न धुतां. भरल्या पोटीं-क्रिवि. पोट भरलेलें असतां. भरलेल्या आंगाची-वि. (कों.) गरोदर. भरान येणें-अक्रि. १ (कु.) दुःखाचे अश्रु येणें; हृदय भरून येणें. २ कफानें छाती भरणें. 'त्यंकां खूप भरान इलां.' भरवड-स्त्री. १ (कु.) ओसाड जमिनींत भर घालून तयार केलेली जमीन. २ खारवट जमिनीपैकीं टणक जमिनींत रोहपेरा करतेवेळीं ती जमीन पावसाच्या पाण्यानें तुडुंब भरून काढणें. भरवण-न. १ एके वेळीं दिव्याच्या टवळयांत, तळणाच्या कढईंत घातलेलें तेलाचें परिमाण; एके वेळीं तळलेल्या, शिजविलेल्या पदार्थाचें परिणाम; एके वेळीं जमलेल्या काजळाचें परिमाण इ॰. २ भूत काढण्याकरितां भुतानें झपाटलेल्या माणसा- वरून ओवाळलेलें द्रव्य (कोंबडें, नारळ इ॰). भराई-स्त्री. १ भरण्याची किंमत. २ भरणें. भराभर-स्त्री. घाईचें भरणें. भराव- पु. १ भरण; पूरण (खांच बुजविण्याची). २ भरल्याची स्थिति भरावण-वळ-स्त्री. (कों.) जमीन भाजण्याकरितां तिजवर गवत. काट्या, छाट आणि शेण इ॰ पसरणें. भराविणें-सक्रि. १ शेणानें, घाणीनें चोपडणें, माखणें (हात, पाय, वस्त्र). २ भर विणें पहा. भरीचा-वि. १ विवक्षित माप पूर्ण भरेल इतका. २ निम्मेंशिम्में पात्र भरलें असतां तें पूर्ण भरेल इतका नवीन घाला- वयाचा (पदार्थ). भरी(रि)त, भर्त-न. १ लादल्याची, भर- ल्याची स्थिति. २ भरलेला, भरावयाचा माल (पोतें इ॰ त); ओझें; बोजा. 'हें सामान दोहों बैलांचें भरीत आहे.' ३ लादणी; ओझें; भरताड. ४ चिघळणार्या जखमा, गांठी यांची पूयमय व नासलेली स्थिति. ५ वांगें वगैरे भाजून दहीं घालून केलेली कोशि बीर. (वांगीं इ॰ ची). ॰पत्र-न. गलबतावरील भरताची (बार- दानाची) यादी. भरून देणें-सक्रि. खुटीची, तोट्याची निष्कृति करणें. भरून पावणें-सक्रि. पूर्णत्वानें पावणें; पुरी करून मिळणें (मागणी इ॰).
भुंडा
भुंडा bhuṇḍā a Bare, naked, void, wanting the usual ornament, appendage, or accompaniment. 2 Of which the horns are crumpled or turned back and down--a horned beast. 3 That lacks horns. 4 Bare, mere, wanting the customary overplus or excess; as भुंडा रुपया, भुंडा शेर -पायली -मण &c., भुंडे शंभर, भुंडे हजार &c.
चोबा or भा
चोबा or भा cōbā or bhā m A measure of capacity, the fourth of a maund of sixteen पायली.
चोबा-भा
चोबा-भा m A measure of capacity, the पायली.
चोथवा
चोथवा cōthavā m also चोथा & चौथा m In Khándesh. A measure of capacity, the fourth of a चोभा or one पायली.
चोथवा, चो(चौ)था
पु. (खा.) एक माप; चोभ्याचा चतुर्थांश किंवा एक पायली. 'भसक चोथवा करून त्यावर शिक्का सरकारी ।' पला ७०. [सं. चतुर्थ; प्रा. चउत्थ; म. चवथा]
चोथवा, चोथा, चौथा
पु. एक माप; चोभ्याचा चतुर्थांश किंवा एक पायली : ‘भसक चोथवा करून त्यावर शिक्का सरकारी ।’ − पला ७०. [क.; सं. चतुर्थ]
गोणी
स्त्री. एक परिमाण. गुळाचे ६ रवे; ३२ पायली धान्य. [गोण]
गोणी
स्त्री. वजनमापाचे एक परिमाण. गुळाचे सहा रवे; बत्तीस पायली धान्य.
घबाड
न. १ एक शुभ मुहूर्त; सूर्यनक्षत्रापासून चंद्र- नक्षत्रापर्यंत मोजून येणार्या संख्येला तीन या संख्येनें गुणून गुणाकारांत चालू तिथि मिळवून आलेल्या संख्येला सातानीं भागून बाकी तीन उरल्यास त्या दिवशीं हा योग येतो असें समजतात. २ (सामा.) शुभ वेळ, मुहूर्त; सुयोग. 'त्याला जेव्हां अक- स्मात एवढें द्रव्य मिळालें त्याजवरून असें दिसतें कीं जातेसमयीं त्यास घबाड साधलें होतें.' ३ (ल.) आकस्मिक लाभ; अना- यासें झालेली मोठी द्रव्यप्राप्ति; लाट. (क्रि॰ मिळलें; साधणें). 'गाण विहंगमें गेला । घबाड अवचित पावला ।' -दावि २७४. 'मी एक पैशाचें घबाढ पाहतों आहें.' -मोर १२. ॰चूक- स्त्री. मोठी चूक; घोडचूक. ॰दैव-न. सुदैव; मोठें भाग्य. ॰माप-न. १ बाजारांत चालणार्या शिरस्त्याच्या मापापेक्षां, वजनापेक्षां मोठें माप, वजन. 'हे दहा पायली गहूं आहेत, परंतु त्या घबाड मापानें मोजले असतां आठ पायल्या भरतील.' २ मोठा आहार असणार्या माणसाचें पोट; कधीं तृप्त न होणारा कोठा. 'चार माणसांचें अन्न या तुझ्या घबाड मापास पाहिजे.' ॰मुहूर्त-पु. घबाड अर्थ १ पहा. ॰वशिला-पु. दांडगा वशिला; कार्य साधण्याकरितां मोठ्या माणसाकडून घातलेली गळ; ॰षष्ठी-स्त्री. ज्या षष्ठीला घबाड मुहूर्त येतो ती षष्ठी. [घबाड + षष्ठी]
होन
होन hōna m (हंस S through H The figure of a swan or goose having originally been impressed.) A gold coin, a pagoda. Some varieties of this coin are शिवराई होन, पादशाही होन, सणगिरी होन, अच्युतराई होन, रामराई होन, देवराई होन, जडमाळ होन, धारवडी होन, कावरी होन, शैल्यघाटी होन, पामनायकी होन, अदवानी होन, ताडपत्री होन, निशाणी होन, उकिरी होन, सापे होन, एकेरी होन. होनापायली होणें (A पायली being of the price of a होन) To be exorbitantly dear.
पु. सोन्याचें साधारण ३।। रु. किंमतीचें एक नाणें. याचे कांहीं प्रकार-शिवराई, पादशाही, सणगीरी, अच्युतराई, रामराई, देवराई, जडमाळ, धारवाडी, कावेरी, पामनायकी, आदवानी, ताडपत्री, निशाणी, उकिरी, सापे, एकेरी इ॰ [का. होन = सोनें, सोन्याचें नाणें] होना पायली होणें-फार महाग होणें. ॰माळ-स्त्री. होनांची केलेली गळ्यांत घाल- ण्याची माळ.
जिबरोहोकना
पु. १. चांदीची चापट पायली. २. जीभ घासण्याची पट्टी. (झाडी)
कैली
वि. मापी आकार; खंडी, पायली, शेर इ. धान्ये वगैरे मोजण्याच्या प्रमाणदर्शक शब्दामागे हा शब्द लावतात : ‘तांदूळ कैली कोठीमापें पाच मण’ - मइसा १५•२२४. [फा. कैल् = माप]
कैली
वि. मापी आकार; खंडी, पायली, शेर इ॰ धान्य वगैरे मोजण्याच्या प्रमाणदर्शक शब्दांमागें हा शब्द लावतात. याच्या उलट वजनी. 'तांदूळू कैली कोठीमापें पांच मण.' -रा १५. २२४. [अर. कैल् = माप; का. कैलो = हातानें] ॰माप-न. मापानें मोजून घ्यावयाचें परिमाण. याच्या उलट वजनी माप.
कैली कोठी
वजनी मापाने मोजलेले; खंडी पायली, शेर इ. धान्ये मोजण्याचा परिमाणदर्शक शब्द. कैली माप, कैली मापी
कोळें
न. १ बैलाचें वशिंड; कोलखंड. २ गवताचा लंबवर्तु- ळाकर (अंडाकृति) मुडा किंवा पुडा. यांत भात किंवा भाताचें बियाणें ठेवतात. गवताची पुरचुंडी (पावटे इ॰ ठेवण्याची). -शे ७.२८. [कोहळें] ॰भर-वि. कोळ्यांत राहतील इतके. 'कोळें- भर पावटे सुमारें दीड पायली होतात.'
कुडाळ
पु. एक प्रांत. हा कोंकणांत सावंतवाडी संस्थानांतील एक तालुका आहे. ॰देश-(प्राचीन रचना) उत्तरेस देवगड तालुका, दक्षिणेस गोंव्यांतील पंचमहाल, पूर्वेस सह्याद्री, पश्चिमेस अरबी समुद्र. हा प्रांत. -आद्यगौडब्राह्मण, वर्ष २, अंक ३-४. पृ. ३०. -चा संत-पु. कुडाल कोटांत जोगण प्रभु पडला तो; त्या स्थळास ब्राह्मण असेंहि म्हणतात. ॰देशकर ब्राह्मण-पु. या प्रांतांतील आद्यगौड ब्राह्मण. ॰माप-या देशांतील विशिष्ट माप, कोकणांतील सर्वसामान्य मापापेक्षां हें निराळें आहे. चार शेर = एक पायली, दोन पायल्या = एक कुडव, वीस कुडव = एक खंडी, चार खंडी = एक भरा.
मण
पु० ( वजनी ) चाळीस शेर, (मापी) बारा किंवा सोळा पायली. (देश भेदानें ह्याचें प्रमाण भिन्न आढळतें.) २ मणाचें ओझें, वजन.
निठवें
निठवें niṭhavēṃ n A measure of capacity, a half-sher or ⅛ of a पायली.
पल्ला
पु. १ तीस पायली किंवा १२० शेरांचें माप. २ (पातळ पदार्थ, तेल, सुपारी इ॰ वाणजिन्नस मोजण्याचें) १२० शेरांचें अडीच मणांचें पक्कें वजन. ३ पल्लाभर धान्यांचें पोतें, थैला अगर गोणी. [वैस. पल्यं = धान्याची गोणी; प्रा. पल्ल]
पु० तीस पायली, एकशेंवीस शेर. २ पल्ल्याचें ओझें. ३ अंतर, अवकाश.
पल्ला m A measure of capacity of thirty पायली or 120 शेर. A measure of weight of 120 शेर (for oil, betelnuts, groceries). Length, extent; as हा पल्ला लांब आहे. Used of rooms, places, and articles. A distance, a space. A period, a term. Fig. Reach, range, capacity. A line, cord. पल्ला करणें-बांधणें To get patronage or support. पल्लयावर असणें To be ever closed at one's back (whether to befriend or to injure). A distance, a space &c.
प्रस्थ-स्त
न. १ लग्न, मुंज इ॰ प्रसंगीं दिलेलें ब्राह्मणभोजन. २ (कोणी थोर मनुष्य प्रवासास जाण्यास निघतांना किंवा लग्न- कार्याच्या वेळीं होणारी) गडबड; गोंधळ; घाई. ३ विद्या, संपत्ति, वक्तृत्व इ॰ गोष्टीमुळें असामान्य असा माणूस. ४ (ल.) ढोंग; स्तोम. ५ (ल.) धेंड; प्रकरण. ६ खटलें; घरदार; जमीनजुम्ला. 'प्रपंचप्रस्तीं जाऊं नये ।' -दा १४.१. ५२. ७ आसन; स्थान. 'माझें प्रस्थ खरोखरच डळमळायला लागून मी भांबावून गेलों.' -नाकु ३.३. ८ धान्य मोजण्याचें एक माप; (६४ तोळ्यांचा) एक शेर; कोठें १ पायली तर कोठें १ अधोली. 'गजरथ हय एक एक । गोसहस्त्र द्याव्या पृथक । रत्नें प्रस्थभार एक एक कनक । ऐसी दक्षिणा प्रारंभीं ।' -जै १९१. [सं.] ॰करून ठेवणें- माजविणें-वाढविणें-दुसर्यावर छाप बसेल असा भपका करणें; नसतें महत्त्व माजविणें; अतोनात तारीफ करणें.
राखण
स्त्रीन. (कों.) १ राखणें; ठेवणें; रक्षण करणें. २ रक्षक म्हणुन ठेवलेला मनुष्य; रखावाली. 'राखण वायसें राह- वेना ।' -एभा १३.४७४. ३ रक्षकाचें, रखवालदाराचें वेतन. ४ पिशाचादि उपद्रवापासून आपलें रक्षण व्हावें म्हणुन ग्रामदेवतेस प्रतिमासीं किंवा प्रतिवर्षी अर्पण केलेला नारळ; बळी. ५ भुतें, उंदीर, टोळ इ॰ कांच्या उपद्रवापासून मनुष्यें, प्राणी, शेतें इ॰ कांना मंत्र, तंत्र, मानता इ॰ उपायांनीं मुक्त करून सुरक्षित ठेवण्याची क्रिया; भूतादिकांचा बंदोबस्त करणें. (क्रि॰ लावणें; करणें; लागणें). ६ (क्व.) पूर्ण अभाव होऊं नये म्हणून घरांत राखून ठेवलेलें अल्प- स्वल्प धान्यादि खाद्य पदार्थाचें परिमाण; घर म्हणून ठेवलेला पदार्थ. 'सगळे दाणे खर्चूं नका, घरांत राखण म्हणून दोन पायली तरी राखून ठेवा.' ७ (माळवाप्रांत) अतिशय कुरूपतेमुळें व अक्राळविक्राळपणामुळें घराचें व त्यांतील स्त्रियांचें चेटकापासून रक्षण करण्यास समर्थ म्हणून मानलेली स्त्री. -न. ब्राह्मणांत प्रसूती- नंतर तिसर्या दिवशीं, सुईण बाळंतिणीच्या खोलींतील एक कोनाडा सारवून, रांगोळी काढून, त्यांत वर गंधाचीं बोटें ओढलेलें व आंत पैसा, सुपारी टाकलेलें जें मडकें ठेवते तें; किंवा बाळं- तिणीच्या दहा दिवसांत तिच्या जेवणाच्या वेळीं तिच्या खोलींत, निखारा व त्यावर थोडा भात टाकून ठेवलेलें मडकें. याच मड- क्यांत प्रत्येक जेवणाच्या वेळीं असा निखारा व भात टाकतात. [सं. रक्षण] (वाप्र.) ॰लागणें-उपद्रव न होईल असा बंदो- बस्त करणें. 'या खिस्तीचे एकदां रुपये भरले म्हणजे चार महि- न्यांची राखण लागली.' सामाशब्द- ॰करी-दार, राखणा, राखणाई(इ)त, राखणार-पु. १ रखावालदार; पहारेकरी. २ गुराखी. 'जरी राखणाइत सहपरीवारी ।' -विउ ९.७६. 'माली- काच मी तो राखणार ।' -दावि ४५९. म्ह॰ राखण्यानें गुरें टाकलीं म्हणून धनी टाकील काय ? राखणावळ-स्त्री. १ गुरा- ख्याची मजुरी, वेतन. २ राखणें; रक्षण करणें; काळजी घेणें. [राखणें] राखणी-स्त्री. राखणे; संभाळणें; ठेवणें; बाळगणें इ॰ [राखणें] राखणें-सक्ति. १ रक्षणें; रक्षण करणें; रखवाली करणें; खबरदारी घेणें; अपकारापासून वांचविण्याकरितां आपल्या ताब्यांत घेणें. 'काढूनि राखे प्राणु ।' -ज्ञा १६.१४३. २ ठेवणें; उरविणें; पुढच्या काळाकरितां किंवा कांहों उद्देशानें ठेवून देणें. 'त्या रानां- तील गवत यंदा राखलें आहे.' ३ खर्चल्याशिवाय ठेवणें (सामर्थ्य, जोर). 'जोर-हात राखला.' 'टोला-घाव-मार-राखला.' ४ चोरून ठेवणें; पोटांत किंवा मनांत ठेवणें. 'तुझ्या मनांत असेल तें सारें बोल. कांहीं राखूं नको.' ५ एखाद्या पदार्थावर ओघानें एखादी क्रिया करणें प्राप्त झालें असतां ती न करितां, तो पदार्थ तसाच ठेवणें; आहे त्या स्थितींत राहूं देणें. 'कोनाडयाची जागा तेवढी राख आणि अवघी भिंत सारीव.' ६ करणें; ठेवणें; एखादा पदार्थ स्थित्यंतर न पावूं देतां ठेवणें; बनविणें व कायम करणें. 'ही भिंत फार रुंद राखली म्हणून जागा अडली.' 'हा अंगरखा त्वां आंखूड राखलास म्हणून शोभत नाहीं.' ७ स्त्रीनें पुरुषास किंवा पुरु- षानें स्त्रीस उपभोगार्थ बाळगणें; ठेवणें. ८ ठेंवणें; धरणें; पाळणें; हेळसांड, अवज्ञा न करणें; एका बाजूस पडूं न देणें. ९ व्यवस्थित, योग्य स्थितींत ठेवणें. १० पालन करणें; न ढळणें (वचन; आज्ञा; प्रतिज्ञा). [सं. रक्षण; रक्ष्; प्रा. रक्ख; पं. रक्खण; सिं. रखणु; हिं. रखना, राखना; गुज. राखवुं; बं. राखिवा; फ्रेजि. रख; पोर्तुजि. अरखना = रक्षक] म्ह॰ राखील त्याचें घर, खणेल त्याचें शेत. राख- णेकरी-पु. राखणदार; राखणकरी पहा. राखण्या-पु. (राजा.) गुरें राखणारा; गुराखी. राखले-स्त्री. हुंडी विकत घेणाराची स्थिति, पेशा, अधिकार, पत दर्शक योजाक्याचा शब्द. 'त्या हूंडीमध्यें माझी राखले घातली होती.' [राखणें (गुजराथींतून आलेला शब्द)] राखवळ-स्त्री. (प्र.) राखणावळ; राखण्या- बद्दल मजूरी, वेतन.
रुमाली पांटी
रुमाली पांटी rumālī pāṇṭī f A kind of bamboo basket, capable of holding two or three पायली of corn.
सोट
पु. १ लांब, सरळ व जाड लांकूड (तुळई, कडी, खांब इ॰ साठीं); उंच; सरळ झाड; उंच केळीचा कोका. २ उंच मनोरा; उभट जिना, दादर; पर्वताची सरळ सोंड; सरळ रस्ता. ३ सुमारें २० पायली धान्य भरलेलें व तोंड शिवलेलें पोतें. ४ (ल.) आडदांड; धश्चोट; राकट माणूस; फटिंग; मूलबाळ किंवा परिवारविरहित पुरुष किंवा स्त्री. ५ (ल.) उंच व धिप्पाट माणूस. [सं. शौंड ? हिं. सोंटा] ॰गा-गें- पु.न. दांडकें; सोटा; दंडुका; बडगा. ॰बहिरी-भैरव-पु. गलेलठ्ठ व आडदांड माणूस; फटिंग; सडेसोट पुरुष. ॰वाव-पु. फोंक (झाडाचा इ॰). ॰शिंग-पु. सडेसोट; अविवाहित पुरुष. ॰ळणें, सोटाळणें-अक्रि. गाय, म्हैस यांच्या जननें- द्रियातून शेंबडाचे लोळीसारखा स्त्राव होणें. सो(सों)टा- पु. १ लांबट लाकूड (खांब, शिडाची काठी यांच्या उपयोगी). सोटगा, सोट पहा. २ गाय; म्हैस इ॰ च्या योनींतून शेंबडाचे लोळीसारखा गळणारा स्त्राव. (क्रि॰ गळणें, गाळणें). सोटा- दुपट्टा-पु. प्रवासांतील वस्त्रपात्र, काठी दांडकें इ॰ थोडेसें जरूरीचें सामान. सोटे पान्हवण-न. सोटा इ॰ मारून गाय इ॰ पशु पान्हण्याची क्रिया; त्यासाठीं सोडग्याचा काढलेला आवाज. सोटे दरबार-सोटा बाळगणारा मनुष्य. सोटे- पीर-बारगीर-भैरव-सुंभ-सुलतान-सोट बहिरी पहा; सडाफटिंग; सडेसोट. सोटे बरदार-पु. भालदार; चोपदार. सोटेबाजी-शाई-स्त्री. काठ्यांची मारामारी; दंडुकेशाई. -वि. आडदांड; आडदांडपणें हल्ला करणारा.
टका
पु. १ एक नाणें. याची किंमत वेगवेगळी आहे. (अ) सोळा शिवराई पैसे; (आ) चार पैसे; एक आणा. (इ) (गुज- रथेंत) तीन पैसे. (ई) (उत्तर हिंदुस्तान) दोन पैसे. (उ) चार- पांच आणे किंमतीचें नाणें. -भात्रै १२.१. (ऊ) (सामा.) एक रुपया. (हें प्रत्यक्ष नांणे नसावें. वरील किंमतीचा वाचक शब्द असेल.) 'शेंकडा ६ टक्के.' २ पैका; धन; द्रव्य. ३ कर. (समासांत) घरटका-लग्नटका-तोरणटका. ४ १२० चौरस बिघे जमिनीचें एक माप. [सं. टंक = नाणें. हिं. टका] टके करणें-१ पैसा जवळ करणें. एखादी वस्तु विकून तिचे पैसे करणें. २ फायदा, नफा मिळविणें. ३ वर्चस्व मिळविणें, वरचढ होणें. टके शेर-अतिशय स्वस्त; पैशास पायली; मातीमोल. २ कवडी किंमतीचा; क्षुद्र; महत्त्व नसणारा. 'हे पूर्वी भालेराव होते. ऐलीकडे टके शेर झाले.' ३ चांगलें किंवा वाईट एकाच मापाचें, एकाच योग्यतेचें; समानमूल्य. 'टका शेर आटा टका शेर खाजा.' म्ह॰ टक्या कोठें रे जातोस सखा तोडावयास. द्रव्यामुळें मैत्री मोडते याअर्थी.
टका ṭakā m ( H) An aggregate of sixteen शिवराई- pice: also an aggregate of four pice, an án̤á: also, as in parts of Gujarát, an aggregate of three pice. 2 Money. Pr. टक्या कोठेंरे जातोस सखा तोडायास. Used, however, esp. in comp. as घरटका, लग्नटका, तोरणटका House money or tax, marriage-tax &c. Used also for a rupee; as शेकडा पांच टके. 3 A land measure consisting of 120 square Bighá. टके करणें g. of o. To make money of, lit. fig.; to turn to account; to have the superiority or advantage over. टके शेर Exceedingly cheap. The phrase agrees with पैशास पायली, मातीचें मोल &c.: also of little value or low estimation; as हे पूर्वीं भालेराव होते ऐलीकडे टके शेर झाले: also all of one price, good or bad; as Pr. टके शेर आटा टके शेर खाजा.
टके शेर
१. अतिशय स्वस्त; पैशास पायली; मातीमोल. २. कवडी किमतीचा; क्षुद्र; महत्त्व नसणारा. ३. चांगले किंवा वाईट एकाच मापाचे, एकाच योग्यतेचे; समानमूल्य. टकोचा
भीक
स्त्री. १ भिक्षा; दानधर्म. २ अभाव; कमताई; उणीव; वैगुण्य. 'सर्व गोष्टीची भीक आहे.' [सं. भिक्षा; प्रा. भिक्खा] म्ह॰ १ भिकेची हंडी शिंक्यास चढत नाहीं. २ भीक नको पण कुत्रा आवर. (वाप्र.) भीक असून द(दा)रिद्र(द्र्य)कां- भिक्षेकर्याचा धंदा पतकरल्यावर मग अडचण कां सोसावी? ॰काढणें-क्रि. अडचण सोसणें; दारिद्र्य अनुभविणें. ॰घालणें- क्रि. १ (ल.) वचकून असणें. 'तो माझ्यावर आपला अंमल चालवूं पाहतो, पण मी कोठें त्याला भीक घालायाला बसलों आहें !' ३ मोजणें; मानणें; जुमानणें. 'बायकांच्या धमका- वणीला कां तुम्ही भीक घालणार?' २ मागितलेली वस्तु देणें; एखाद्याची विनंती मान्य करणें (हा प्रयोग नेहमीं नकारार्थीं असतो). 'मीं त्याला परोपरीनें विनविलें, पण त्यानें माझ्या शब्दाला भीक घातली नाहीं.' ॰न घालणेंक्रि. अतिशय तुच्छ लेखणें. ॰लागणें-क्रि. १ फार मागणी असणें; अतिशय चणचणीचा असणें. २ भिकेस मिळणें; कमताई असणें. भिकेचा डोहळा- पु. दारिद्र्य आणणारी हलकट, नीच, भिकार खोड, कृत्य, इच्छा. (क्रि॰ लागणें, आठवणें, होणें) भिकेचे डोहाळे होणें-क्रि. दारिद्र्यादि दुर्दशा येण्यापूर्वीं तदनुरूप पूर्वींच्या संपन्न स्थितीत विरुद्ध अशा वासना होणें (ज्या प्रकारची संतति व्हावयाची असते त्या प्रकारचे डोहाळे-वासना गर्भारपणीं बायकांना होतात यावरून). भिकेवर लक्ष्य ठेवेणें-भीक मागण्याचा प्रसंग येईल अशा रीतीनें वर्तन करणें. आळशी, उधळा इ॰ बनणें. भिकेवर श्राद्धन. १ भिक्षेवर केलेलें श्राद्ध; भिकार, चुटपुटीत श्राद्ध. २ (ल) दिलेल्या, उसन्या घेतलेल्या, तुटपुंज्या सामग्रीवर भिकार- पणानें चालविलेला धंदा, काम. (क्रि॰ करणें, होणें). सामाशब्द- ॰दुःख-न. भीक मागण्याची दुःखकारक स्थिति. ॰पायली- स्त्री. गांवकर्यांकडून महारास दिलें जाणारें धान्य. ॰बरी-स्त्री. भिक्षा; धर्म. (क्रि॰ मागणें). [भीक द्वि.] भी(भि)क बाळी- स्त्री. पुरुषांचा उजव्या कानांत घालावयाचा मोत्याचा दागिना. पुर्वी ही भिक्षा मागून मिळविलेल्या सोन्याची अथवा त्या पैशांचें सोनें घेऊन त्याची करीत. ॰मागता-माग्या-वि. भिक्षा मागणारा; भिकारी. म्ह॰ भीक मागत्या दहा घरें. भिकणें-न. १ भिक्षा मागून मिळालेली एखादी वस्तु; भिक्षा. (क्रि॰ मागणें). २ जोशी, भक्त, उपाध्याय इ॰ कांस दिलेलें बक्षीस, इनाम. ३ धर्मादाय. ४ धर्मादाय म्हणून सरकाराकडून घेण्यांत येणारा कर. ५ बलुतेंअलुतें; बलुतेदार इ॰ स धान्य देणें. ६ जकातीच्या उत्पन्नांतील पतकीस दिलेला हक्क. ७ भिकारीपणा; दारिद्र्य. (क्रि॰ लागणें).