मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

पारंपरिक

पारंपरिक pāramparika a S Successional, consecutive, continuous, traditional.

मोल्सवर्थ शब्दकोश

वि. परंपरागतचा; क्रमानें येणारा. [परंपरा]

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

अभिजाततावाद      

पु.       (सास.) १. साहित्यातील पारंपरिक मूल्यांचे पालन करावे असे प्रतिपादणारा संप्रदाय. २. साहित्याविष्कारातील भावनिक संयम व नियमबद्धता यांचा पुरस्कार करणारा, अद्‌भुतरम्यता वादाच्या विरोधी वाद. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अनैतिक ( वाङ्मय )

औचित्यभंग केला आहे, वांकड्या वळणाचें, पारंपरिक सारीं मूल्यें उधळून लावलीं, जगाच्या प्रतिष्ठेचे संकेत मोडले आहेत, समाजाला घातुक, आजच्या वाङ्मयांत शिवण्यापेक्षां उसवणेंच फार चाललें आहे.

शब्दकौमुदी

अनुकुंचनी      

स्त्री.       (वन.) लांबीमध्ये होणाऱ्या पारंपरिक वृद्धीमुळे द्विपार्श्व अवयवांमध्ये निर्माण होणारी स्वयंचलित वक्रता. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

असांकेतिक      

वि.       पारंपरिक चिन्हानुसार किंवा लक्षणानुसार नसलेले.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)