मराठी बृहद्कोश

तेरा मराठी शब्दकोशांमधील ३,००,८७५ शब्दांचा एकत्रित संग्रह

शब्दार्थ

पार्थिव

पु. राजा. -न. नित्यपूजेसाठीं केलेलें मातीचें शिवलिंग. [सं. पृथा, पृथ्वी] -वि. १ पृथ्वीसंबंधीं; पृथ्वीपासून उत्पन्न झालेला (पदार्थ इ॰). 'तेवीं पार्थिवें पार्थिवासी । सुखदुःखबाधा न घडे त्यासी ।' -एभा २३.७७६. २ मातीचें; मृण्मय. 'आइकें पार्थिव धातु आघवी । आरोगितां कांहीं नुरवी ।' -ज्ञा ६.२३९. 'चुना, क्षार हीं पार्थिव द्रव्यें आहेत.' ३ (ल.) जड; नाश- वंत. 'अहो देहो पार्थिव कीर जाये । ययाची काकुळती कवणा आहे ।' -ज्ञा ११.३६७. ४ भूगोलासंबंधीं; भौगोलिक. [सं.]

दाते शब्दकोश

पार्थिव n An earthen lingam made to use in worship. m A king. a Relating to earth. Terrestrial.

वझे शब्दकोश

पार्थिव pārthiva a S Relating to earth, earthy or earthen. 2 Relating to the globe, terrene or terrestrial.

मोल्सवर्थ शब्दकोश

पार्थिव pārthiva n S An earthen lingam made to use in worship. 2 m A king.

मोल्सवर्थ शब्दकोश

पृथ्वीकार्य, पृथ्वीसंबंधी (ज्ञानेश्वरी अध्याय ११, ओवी ३६७)

ज्ञानेश्वरीमधील कठीण शब्दांचे अर्थ (राज्य मराठी विकास संस्था प्रकाशित)

(सं) पु० राजा. २ न० मातीची प्रतिमा. ३ वि० मातीचें, पृथ्वीसंबंधी.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

संबंधित शब्द

अपार्थिव      

वि.       १. पार्थिव वस्तूंशी संबंधित नसलेला; मानसिक; आध्यात्मिक : ‘रोमच्या सेंट पीटर्सने मला असाच अपार्थिव आनंद दिला आहे.’ – दिअहो ५. २. अमूर्त; निराकार. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

काकुलता, काकुलतो, काकुळत, काकुळती, काकुलपण      

स्त्री.       याचना, कीव, दया इ. पहा : काकळूत : ‘अहो देहो पार्थिव कीर जाये । ययाची काकुळती कवणा आहे ।’ - ज्ञा ११·३६७; ‘आठवण तुम्हीं द्यावी पांडुरंगा । कीव माझी सांगा । काकुलती ।’ - तुगा २२०७. [क. कक्कलाते] (वा.) काकुळतीला येणे, काकुळती करणे - करुणा भाकणे. काकुळती करणे, काकुळतीला येणे - १. अंतःकरणाला पाझर फुटावा अशा रीतीने गयावया करणे. अति दीनवाण्या रीतीने, पदर पसरून, कळवळ्याने मागणे. २. दया येणे, विनवणीने हृदय द्रवणे. काही ठिकाणी विशेषणार्थी ही वापरतात.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

काकुलती-ळत-ळती

स्त्री. याचना, कींव इ॰; काकळूत पहा. 'अहो देहो पार्थिव कीर जाये । ययाची काकुळती कवणा आहे ।' -ज्ञा ११.३६७. 'आठवण तुम्हीं द्यावी पांडुरंगा । कींव माझी सांगा काकुलती ।' -तुगा २२०७. [का. कक्कलाते] ॰स येणें- जाणें-करणें-करुणा भाकणें. 'किती देवा येऊं तुम्हां काकुळती । काय या संचितीं लिहिलें माझ्या ।' कोठें विशेषणार्थींहि योजतात. 'आणिका मी कोण्हा जाऊं काकुळती । कोण कामा येती अंतकाळीं ।'

दाते शब्दकोश

प्रेत

शव, कलेवर, मढें, मुडदा, मृत शरीर, निष्प्राण कुडी, मयताचा देह, ही शरिराची प्राणविहीन खोळ,हें टाकून दिलेलें जीर्ण वस्त्र, हें सोडून दिलेलें घरटें, हा मातीचा अचेतन हंडा, हें चार खांद्यावरलें, ओंकारेश्वराचा हा आवकजावक माल, पार्थिव देह, चैतन्यहीन मांसाचा गोळा, प्राणपखेरू उडून गेलेली काया, देव लोपलेलें देऊळ.

शब्दकौमुदी

संवत्सर

संवत्सर saṃvatsara m (S) A common term for the sixty years composing the Indian cycle, each bearing a peculiar name. These names never occurring but with the indicant word संवत्सर prefixed (e. g. संवत्सरप्रभव) cannot come before the learner as ordinary words bearing signification and demanding to be interpreted: they therefore do not appear in the columns, but are presented together here:--प्रभव, चित्रभानु, हेमलंब, परिधावी, विभव, सुभानु, विलंब, प्रमादी, शुक्ल, तारण, विकारी, आनंद, प्रमोद, पार्थिव, शार्वरी, राक्षस, प्रजापति, अव्यय, प्लव, नल, अंगिर, सर्वजित्, शुभकृत्, पिंगल, श्रीमुख, सर्वधारी, शोभन, कालयुक्त, भाव, विरोधी, क्रोधी, सिद्धार्थ, युव, विकृति, विश्वावसु, रौद्र, धातृ, खर, पराभव, दुर्मति, ईश्वर, नंदन, प्लवंग, दुंदुभि, बहुधान्य, विजय, किलक, रुधिरोद्गारी, प्रमाथी, जय, सौम्य, रक्ताक्ष, विक्रम, मन्मथ, साधारण, क्रोधन, वृष, दुर्मुख, विरोधकृत्, क्षय. 2 A year in general; yet, especially, of the era of Wikramáditya. मनुसंख्यासंवत्सर Years numbered by the (duration of the) Manu; as मनुसंख्यासंवत्सर ॥ राज्य करील माझा पुत्र ॥.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. साठ वर्षांच्या कालचक्रांतील वर्षास संज्ञा. या साठ वर्षांचीं नांवें:-प्रभव, विभव, शुल्क, प्रमोद, प्रजापति, अंगिरा, श्रीमुख, भाव, युवा, धाता, ईश्वर, बहुधान्य, प्रमाथी, विक्रम, वृष, चित्रभानु, सुभानु, तारण, पार्थिव, अव्यय, सर्वजित्, सर्व- धारी, विरोधी, विकृति, खर, नंदन, विजय, जय, मन्मथ, दुर्मुख, हेमलंबी, विलंबी, विकारी, शार्वरी, प्लव, शुभकृत्, शोभन, क्रोधी, विश्वावसु, पराभव, प्लवंग, किलक, सौम्य, साधारण, विरोधकृत्, परिधावी, प्रमादी, आनंद, राक्षस, नल, पिंगल, काळयुक्त, सिद्धार्थी, रौद्र, दुर्मति, दुंदुभि, रुधिरोव्दारी, रक्ताक्षी, क्रोधन, क्षय. २ वर्ष; साल; अब्द; विक्रमाचा शक. [सं.] ॰प्रति- पदा-स्त्री. वर्षप्रतिपदा; चैत्र शुद्ध प्रतिपदा; वर्षारंभाचा दिवस; पाडवा. ॰वृद्धि-स्त्री. वर्षावृद्धि पहा.

दाते शब्दकोश

यम

पु. १ प्राण्याला त्याच्या मरणानंतर पापपुण्याचा निवाडा करून त्याप्रमाणें नरकाला किंवा स्वर्गाला पाठविणारी देवता (ही सामान्यतः पाप्यांनां शिक्षा करणारी देवता असेंच मानण्यांत येतें ); कृतांत; काळ; यमधर्म. २ (ल.) कर्दन- काळ; निर्घृण मनुष्य; भयंकर दिसणारा मनुष्य. [सं.] (वाप्र.) यमाच्या दाढेंत असणें-पडणें-सांपडणें-जाणें-१ मृत्यु- मुखांत असणें-पडणें-सांपडणें. २ (ल.) मोठ्या संकटांत असणें, पडणें, सांपडणें; अतिशय हाल करणाराच्या तावडींत सांपडणें. यमाच्या दाढेंत घालणें-टाकणें-मृत्युमुखांत टाकणें; मोठ्या संकटांत घालणें; अति क्रूर मनुष्याच्या आहारीं टाकला जाणें. सामाशब्द- ॰कुंड-कोड-पु. (गो.) १ नरककुंड; पाप्यांना शासन करण्याकरितां त्यांना कोंडून ठेवण्याचें यमाचें कुंड. २ (ल.) तुरुंग; कैदखाना. [सं. यमकुंड] ॰गंड-पु. मृत्युकाळ; मरणकाळ; गंडांतर; मृत्युयोग. 'त्याच दिनीं यमगंड समजुनी । निमग्न झाला पार्थिव पूजनीं । ' -कीर्तन १.६०. ॰जाच-जाचणी-पुस्त्री. यमानें दिलेली शिक्षा; यमानें भोगावयास लावलेलें दुःख. ॰झाडी- स्त्री. संकट. 'सांपडलासी यमझाडी । ' -नामना १९. ॰तर्पण- न. यमाच्या नांवानें करावयाचें तर्पण. हें यमद्वितीयेला करितात. ॰तुल्य-वि. १ यमासारखा; क्रूर; भयानक; अतिशय भयंकर. २ विरूप; तिरस्कृत; किळसवाणा. ॰दंड-पु. पाप्यांना यमाकडून करण्यांत येणारी शिक्षा. ॰दंष्ट्रा, दाढ-स्त्री. १ यमाचें मुख; काळमुख; मृत्यूमुख. २ आश्विन महिन्याचे शेवटचे आठ व कार्तिक महिन्याचे सर्व दिवस. या अर्थीं अनेकवचनीं उपयोग. या काळांत रोगराई आजार बराच असतो. यावरून रूढ. [सं. यमदंष्ट्रा] ॰दिशा-स्त्री. दक्षिण दिशा; यमाचें वसतिस्थान ज्या दिशेकडे आहे ती दिशा. ॰दूत-पु. १ माणसाचे प्राण हरण करून नेणारा यमाचा नोकर. २ (ल.) निष्ठुर अंतःकरणाचा नोकर, क्रूर शिपाई. ॰द्वितीया-स्त्री. कार्तिक शुद्ध द्वितीया; भाऊबीज. ॰धर्म-पु. यम. ॰नंदन-पु. यमाचा मुलगा; धर्मराजा; युधिष्ठिर. [सं. नंदन = पुत्र; मुलगा] पाश-पु. मनुष्याचे प्राण काढून नेण्या- साठीं यम टाकतो तो पाश; मृत्यूचा फांस. मृत्यूची छाया. 'यमपाश गळ्यांशीं ज्यास लागला त्यास.' -शारदा. ॰पुरी- स्त्री. १ यमाची राजधानी; पापी लोकांना शासन करण्याची जागा; यातनांचें आगर. २ तुरुंग. ३ यमपुरींतील यातना दाखविणारा कळसूत्री बाहुल्यांचा खेळ. [सं. यम + पुरी] ॰यमपुरीं-रा- जाणें-क्रि. मरणें. 'धर्मात्मजार्थ सेनाबिंदु कुरुश्रेष्ठ यमपुरा गेला । ' -मोकर्ण ४.२१. यमपुरीस पाठविणें-१ अतिशय मारणें; बेदम चोप देणें. २ ठार मारणें. यमपुरीची यातना, यम- पुरीचा दंड, यमपुरीचें दुःख-मोठ्या आजाराचें दुःख, घोर शिक्षा; बेदम मार इ॰ ॰बाधा-स्त्री. यमानें दिलेली शिक्षा; यम- दंड; यमयातना; 'न भुले वाट न पडे छंदी । त्यास नव्हे कधीं यमबाधा ।' ॰भट-पु. (विनोदानें) यमाचे दूत. ॰यातना- स्त्री. १ यमाकडून पापीजनास करण्यांत येणारे क्लेश.' विषयाचें सुख येथें बहु लागे गोड । पुढें आहे अवघड यमयातना । ' -नागा. २ विपरीत परिस्थितींतील भयंकर हाल; अतिदुःख; क्लेश. [सं. यम + यातना] ॰रूप-रूपी-स्वरूप-पी-वि. काळरूपी; यमा- सारखा भयंकर, उग्र; मृत्युसारखा. ॰लोक-पु. यमाचें वसती- स्थान ज्या ठिकाणीं मरणोत्तर प्राण्यांना शिक्षा केली जाते तें स्थान. ॰लोकची वाट धरणें-१ मरणोन्मुख होणें. २ मरणें. ॰शिक्षा-स्त्री. यमदंड; यमजाचणी. ॰सदन-न. यमाचें घर; यमलोक; मरणोत्तर शिक्षा भोगण्याचें ठिकाण. [सं. यम + सदन] यमसदनाला पाठविणें-ठार मारणें. यमाचा पाहुणा-पु. (मरणानंतर खात्रीनें यमाच्या घरीं पाहुणा म्हणून जाणारा इसम, नरकांत जाणारा ) महापापी मनुष्य. यमाजीपंत, यमाजीभा- स्कर, यमाजीबाबाजी-पु. यम; मृत्यु. यमाजीपंताचें- यमाचें बो(बु)लावणें-न. १ मृत्यु; मरण २ (ल.) अतिदुष्ट मनु- ष्याचें बोलावणें, अतिकडक मनुष्याकडून किंवा कर्दनकाळाकडून आलेलें बोलावणें; अति नावडणारें परंतु विरोध न करतां न येणारें- न चुकवता येणारें बोलावणें, काम.

दाते शब्दकोश