आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
पावक
पु. १ (पावन करणारा) अग्नि. 'ना तरी पवनु मेघासी बिहे । कीं अमृतासि मरण आहे । पाहे पां इंधनचि गिळोनि जाये । पावकातें ।' -ज्ञा २.१४. २ एका रागाचें नांव. 'कल्याण गोटी श्रीराग । मुरलींत आळवी श्रीरंग । वसंत पावक पद्मसु- रंग । नीलांवर राग वाजवित ।' -ह १०.११७. -दावि १३८. [सं.]
पावक pāvaka m S (The purifier.) Fire.
पावक m Fire.
संबंधित शब्द
दाहक
पु. (काव्य.) अग्नि; विस्तव; पावक. -वि. १ जाळणारा; दहन करणारा. २ (रसा.) जाळणारा; (इं.) कॉस्टिक्. [सं.] ॰पालाश-पु. एक तीव्र अल्कली; (इं.) कॉस्टिक पोट्याश्. ह्याच्या पांढर्या कांड्या असतात. हा हाताला बुळबुळीत लागतो. [दाहक + (रसा.) पालाश = (इं.) पोट्याश्] ॰सिंधु-पु. (रसा.) सिंधुचा (सोड्याचा) दाहकरणारा एक संयोग. (इं.) कॉस्टिक सोडा. [दाहक + (रसा.) सिंधु]
धुंधुकणे
अक्रि. १. ओकणे : ‘क्रोधे पावक धुंधके नयना’ - गरा ७९. २. धुराने वेष्टित होणे.
धुंधुकणें
अक्रि. (महानु.) धुरानें वेष्टित होणें, भड- कणें. 'क्रोधे पावक धुंधुके नयन तें:' -गस्तो ८४.
मेणचट
टेस्टलेस् ओडरलेस् वायूसारखा, निर्गुंण निराकार स्वभाव, नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: असा कशानेहि न चिडणार न संतापणारा, गुळगुळीत, पिळपिळीत, मिळमिळीत, गिळगिळीत, पुळपुळीत, पिशपिशीत, मिशमिशीत, विशविशीत कवकवीत, थुलथुलीत, ढिला, निकम्मा, लोचट, पांचट, बेचव, बेरंग, पेद्रू पापड, अळणीं, गुळमट, पायांत पोतेरें होऊन राहील, शेळीसारखें शेळपट जीवन जगतो, हें कानेकोपरे नसलेलें आकारहीन रंगरूपहीन अस्तित्व.
नीलांबरी
स्त्री. (संगीत) एक राग. यांत षड्ज, तीव्र ॠषभ, कोमल गांधार, कोमल मध्यम, पंचम, तीव्र धैवत, कोमल निषाद हे स्वर लागतात. आरोहांत धैवत वर्ज्य. जाति षाडव-संपूर्ण. वादी पंचम, संवादी षड्ज. गानसमय दिवसाचा तिसरा प्रहर. 'कल्याण गोडी श्रीराग । मुरलींत आळवी श्रीरंग । वसंत पावक पद्मसुरंग । निलांबर राग वाजवित ।' -ह १०.१७७.
पावन
वि. १ पवित्र; शुद्ध; निर्मल. 'परब्रह्ममूर्ती श्रीकृष्ण । सादरें करितां अवलोकन । तेणें दृष्टी होय पावन । डोळ्यां संपूर्ण सुखावबोधू ।' -एभा ५.५०६. २ निर्दोष; निष्पाप. 'आम्ही स्वधर्मनिष्ठापावन ।' -एभा २३.२४३. ३ पवित्र करणारा; शुद्ध करणारा; पावक. 'मी खरा पतित तूं खरा पावन ।' -नवनीत १५५. [सं.] ॰पण-न. १ पवित्रपणा; शुद्ध करण्याचें सामर्थ्य. 'याचे पावनपण सोडवाजी तुम्ही । पतितपावन आम्ही आहों खरें ।' तुगा १२१८. २ सार्थकता. 'चरणाचें पावनपण या नांव जाण उद्धवा ।' -एभा ११.१२११.
वसंत
पु. १ एक ऋतु; चैत्र आणि वैशाख या दोन मासांचा किंवा मीन आणि मेष या दोन संक्रांतींचा काळ. 'हा वसंत म्हणजे सृष्टिसतीची करमणूक नुसती ।' -टिक. २ या ऋतूची अधिष्ठात्री देवता. 'सुखकर वसंत सरसावला, किं कोकिळा करि गायनाला ।' ३ (संगीत) एक राग. यांत षड्ज, कोमल ऋषभ, तीव्र गांधार, कोमल मध्यम, तीव्र मध्यम, पंचम, कोमल धैवत, तीव्र निषाद हे स्वर लागतात; जाति संपूर्ण-संपूर्ण. वादी तार षड्ज, संवादी पंचम. गानसमय रात्रीचा तिसरा प्रहर व वसंत ऋतूंत सार्वकालिक. याचे आणखी दोन प्रकार आहेत. एकांत आरोहांत पंचम वर्ज्य ठेवतात व दुसऱ्यांत पंचम वर्ज्य करून कोमल धैवताच्या जागीं तीव्र धैवत घेतात. 'वसंत पावक पद्म सुरंग । नीलांबर राग वाजवित । -ह १०.११७. ४ आर्यवैद्यकांतील एक औषध; सुवर्ण मालिनीवसंत. [सं.] ॰खेळणें-रंग खेळणें. 'जें सिंहासनीं राजत्व जोडे । तें वसंत खेळतां न मोडे ।' -एभा १३.७०१. ॰ऋतु- पु. वसंत अर्थ १ पहा. ॰कुमार-कुसुमाकर-पु. एक औषधी रसायन. अनेक भस्में, फुलें, चंदन इ॰ पासून हा तयार होतो. सर्व रोगांचा यानें नाश होतो. -योर १.५९६. ॰तिलका-स्त्री. एक वृत्त. याच्या प्रत्येक चरणांत १४ अक्षरें असतात व त, भ, ज, ज, ग, ग असे गण असतात. उदा॰ 'जो मानसीं विहरतो विहरो परी तो ।' ॰पंचमी-स्त्री. माघ शुद्ध ५. ॰पूजा-स्त्री. वसंत- ऋतूंत वसंतमाधवाप्रीत्यर्थ समारंभपूर्वक जी ब्राह्मणांची पूजा करतात ती; मंत्रजागर. ॰माधव-पु. वसंताची अधिष्ठात्री देवता; विष्णु. ॰मुखारी-पु. (संगीत) एक राग. या रागांत षड्ज, कोमल ऋषभ, तीव्र गांधार, कोमल मध्यम, पंचम, कोमल धैवत, कोमल निषाद हे स्वर लागतात. जाति संपूर्ण-संपूर्ण. वादी धैवत संवादी ऋषभ. गानसमय प्रातःकाळ. वसंताचें बोलणें-न. नुसतें गोड, मिठास भाषण; भारून टाकणारें, फुसलावीचें वचन. 'त्यांचें बोलणें म्हणजे वसंताचें बोलणें, मधुर किती म्हणून सांगू?' वसंतारंभपात-पु. उत्तरायणपात पहा. वसंती-वि. वसंता (ऋतु-रागा) संबंधी.
पद्म
न. १ कमळ; नीलकमल. २ एकावर बारा पूज्यें अस- णारी एक संख्या; दहा हजार लाख; शतकोटी. ३ नागाच्या फणीवर दहाचा आंकडा. ४ घोड्याचें एक शुभ लक्षण. [सं.] ॰काष्ठ-न. एक औषधी लांकूड. हें थंड व शक्तिवर्धक आहे. याचा वृक्ष हिमालयांत होतो. ॰कोश(हस्त)-पु. (नृत्य) हात उताणा करून अंगठ्यासह सर्व बोटें विरळ ठेवून तळहाताच्या बाजूला वांकडीं करणें. ॰ज-भव-योनी-पु. ब्रह्मदेव. 'स्वाधीन हें पद्मभवें फुकाचें ।' -वामन, स्फुटश्लोक (नवनीत पृ. १३३.) ॰दल-न. कमळाची पाकळी. 'इंद्रादिक निजविभूती । त्यातें देखोनि श्रीपती । स्वनेत्र पद्मदलाकृति । ते सहजस्थितीं झांकिले ।' -एभा ३१.३९. ॰जनंदिनी-स्त्री. सरस्वती. ॰नाभ-पु. ज्याच्या नाभीपासून कमळ निघालें आहे असा विष्णु. 'पद्मनाभ तिष्ठे त्याजवळ । सप्रेम कळवळ देखोनी ।' ॰नाल-न. कमळाचा देंठ, तंतु. ॰योग-पु. विशाखा नक्षत्रीं सूर्य असतां ज्या तिथीला कृत्तिका हें चंद्रनक्षत्र येतें तो योग. याचें महत्त्व पुष्करतीर्थीं फार आहे. -धर्मसिंधु. ॰राग- पु. लाल; माणिक. 'पाची हीरक पद्मराग लसणें गोमेद मुक्ताफळें ।' -सारुह ३.४२. ॰रेखा-स्त्री. तळहातावरील द्रव्यसूचक रेषा. ॰संध-पु. घोड्याच्या खांद्यावरचा किंवा पुठ्यावरचा भोंवरा. हें घोड्याचें शुभलक्षण आहे. ॰सुरंग-पु. एका रागाचें नांव. 'वसंत पावक पद्मसुरंग । नीलांबर राग वाजवित ।' -ह १०.११७. ॰हस्त- हस्ती-वि. १ दैववान; यशस्वी; हाताला यश असणारा; हाताचा यशस्वी (वैद्य, पंडित). 'धन्वंतरी परोपकारी । पद्महस्ती ।' -दा २.८.८. २ ज्याच्या हातावर पद्मचिन्ह आहे असा. हें एक हस्त- सामुद्रिकांतील शुभलक्षण आहे. पद्माकर-पु. १ ज्यांत कमळें उत्पन्न होतात असें सरोवर. 'आणि जालेनि फुलें फळें । शाखिया जैसी मोकळे । का उदार परिमळें । पद्माकरु ।' -ज्ञा १८.८६८. २ कमळांचा समुदाय. ३ विष्णूचें नांव. (प्र.) पद्मकर. पद्मासन- पु. ब्रह्मदेव. -न. (योग) उजवा पाय डावे मांडीवर व डावा पाय उजवे मांडीवर व उजवे गुडघ्यावर उजवा, डावे गुडघ्यावर डावा हात ताठ ठेवून, मान व पाठ सरळ ताठ करून बसणें. बौद्धासन (बुद्धाचें ध्यान असेंच असतें). पद्मा-स्त्री. लक्ष्मी. पद्मिनी, पद्मीण-स्त्री. १ स्त्रियांचा पद्मिनी, हस्तिनी, चित्रिणी, शंखिनी या चार प्रकारापैकीं पहिल्या प्रकारची स्त्री. (ल.) अति उत्कृष्ठ, सुंदर स्त्री. २ कमळीण; पद्म. [सं.] म्ह॰ नपुंसकाच्या हातीं पद्मीण. पद्मिणी मित्र-पु. सूर्य.