मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

पाश्चिमात्य

वि. (पौर्वात्य शब्दाप्रमाणेंच हा चुकीचा प्रयोग आहे) पश्चिमेकडील; यूरोपीय; पाश्चात्त्य. 'पण अशीं शब्दरत्नें व काव्यरत्नें ज्यास यथेच्छ हवीं असतील त्यानें पाश्चि- मात्य लोकांचें भाषण, लिहिणें यांकडे अमळ लक्ष पुरवावें म्हणजे झालें.' -नि ११५. -टि २.५६०.;३.१६. [सं. पश्चिम- पाश्चिम]

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

मोमुर

पु. गरम राख; फुपाटा. मुंबर पहा. 'चटणीसाठीं वांगीं उकडण्याऐवजीं आपल्या चालीप्रमाणें मोमुरांत भाजून काढलीं असतां तीं विशेष रुचिकर लागतील.' -पाश्चिमात्य पाकशास्त्र ५७९.

दाते शब्दकोश

पाश्चात्त्य

वि. पश्चिम खंडांतील; युरोपांतील (लोक; देश; वस्तु इ॰) यूरोपियन, अमेरिकन इ॰ प्राच्येतर. -पया ४९. (इं.) वेस्टर्न याला प्रतिशब्द म्हणून फार रूढ आहे. पाश्चिमात्य पहा. [सं. पश्चात्]

दाते शब्दकोश