मराठी बृहद्कोश

नऊ मराठी शब्दकोशांमधील २,६२,७३६ शब्दांचा एकत्रित संग्रह

शब्दार्थ

पुजा करणें or घालणें

पुजा करणें or घालणें pujā karaṇē or ṅghālaṇēṃ g. of o. To pommel or to rate soundly. पुजा बांधणें To decorate an idol with flowers &c. Ex. पुजा बांधिली माणिकामोतीं ह्यांची ॥.

मोल्सवर्थ शब्दकोश

पुजा

स्त्री. १ (प्र. पूजा) देव, मोठी विभूति इ॰ चा आदर- सत्कार, अर्चा; मानसन्मान; उपासना; भक्ति. २ पूजेचें साहित्य व पूजा करतांना करावयाचे विधि. ३ भूतबाधा झाली असतां शूद्र लोक करितात तो संस्कार. [सं. पूजा] (वाप्र.) ॰करणें-घालणें-१ (ल.) बडविणें; चोप देणें; मारणें; पिटणें. २ भोसडणें; खरडपटी काढणें. ॰बांधणें-देवाच्या मूर्तीस, पुष्पादिकांनीं सजविणें; देवाला शृंगार घालणें. 'जोड करितां खुरपुटीं । तोडौनि अरिशिरें गोमटीं । जैसीं रेवांता धुर्जेठी । पुजा बांधितुसें ।' -शिशु १००९. 'पूजा बांधिली माणिकामोती ह्यांची ।' म्ह॰ चांभाराच्या देवाला खेटराची पुजा. समाशब्द- ॰पत्री-स्त्री. १ फुलें, पत्री वगैरे पूजेचें साहित्य. २ (ल.) बडविणें; मारणें; खुदळणें. (क्रि. करणें).

दाते शब्दकोश

पुजा pujā f (पूजा S) Worship; homage of superiors or adoration of the gods. 2 The vessels and articles used, or the several acts and points observed, in idol-worship. Pr. चांभाराचे देवाला खेट- राची पुजा. 3 Certain ceremonies by Shúdras on occasions of demoniac possession. N. B. Pronounced Pudzá.

मोल्सवर्थ शब्दकोश

संबंधित शब्द

पुंजा

पुंजा f Worship. पुजा करणें or घालणें To pommel or to rate soundly. पुजा बांधणें To decorate an idol with flowers &c.

वझे शब्दकोश

स्त्री. (कों. खा. अशिष्ट) पुजा पहा.

दाते शब्दकोश

आगमिक      

वि.       आगम जाणणारा, वेदशास्त्र जाणणारा : ‘तो आगमिक, पुजा करू निका जाणे.’ − लीच १•१९

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अपराजिता

स्त्री १ (विजयादशमीस जिची पुजा करतात ती) दुर्गा देवी. २ जमिनीवर पसरणारी एक वेली; दुर्वा; शेफालिका, जयंती, विष्णुक्रांता, शमी वगैरे वनस्पति. ३ ईशान्य दिशा. ४ एक अक्षरगण,समवृत. यांत प्रत्येक पदांत १४ अक्षरें असतात. उ॰ 'धन- यश मिळण्य त्यजूं निज तत्त्व मी? । स्वहृदयमणि तो न कांहीं मला कमी।।' -छंर ३३.[सं.]

दाते शब्दकोश

भगत

पु. १ भजक; अनुयायी; उपासक. 'भगत परि राउळें । कीं सेविजताए ।' -ऋ ८१. २ देवऋषी; देवभक्त्या; देवस्की करणारा; ज्याच्या अंगांत येतें तो. ३ (व.) निमग्न. [सं. भक्त] ॰की-स्त्री. भगताचे विधि, मंत्र इ॰ कर्म. ॰राज- पु. (प्रेमानें, वात्सल्यानें) भक्त. ॰वाडा-पु. देवाच्या पुजा- र्‍याची राहण्याची जागा.

दाते शब्दकोश

जाड

न. १ घन; ठोकळा; २ आडपडदा. 'हळू हळू त्यांचें पुण्य जालें वाड । वारलें हें जाड तिमिराचें ।' -तुगा ४०. -वि. १ स्थूल; जाडगा (तक्ता, फळी) २ जाडेंभरडें; खरखरीत (कापड). ३ दाट; फार पातळ नसणारा (प्रवाही पदार्थ). ४ धट्टेकट्टे; कण- खर (शरीर). ५ जड; मोठें (ओझें) ६ भारदस्त; प्रौढ; थोर; कठिण. 'प्रबंध कविता जाड वचनें ।' -दा ११.६.८. ७ मोठी; भव्य; प्रचंड. 'पुजा देखतां जाड जीवीं गळालों ।' -रामदास (करुणा- कष्ट). ८ लठ्ठ; दांडगा; स्थूल (माणूस, शरीर). ९ घट्ट; जाडा पहा. [सं. जड] जाडगा, जाडगेला वि. जाड; लठ्ठ; धष्टपुष्ट; गब- दुल (मनुष्य, प्राणी). 'लेले किंवा काणे यांच्यासारखा अमंळ जाडगेला असा मासा त्यांस गावतो.' -नि १०६९ ॰सर-वि. किंचित् जाड ॰सुती-वि. जाड्याभरड्या सुताचें, विणीचें (कापड). ॰जाडा, जाडगा-वि. १ जाड पहा २ मोठा विद्वान; प्रतिभा- संपन्न; भारदस्त (पंडित, कविता, कल्पना,कोटी, लेख इ॰) ३ भरींव; अर्थपूर्ण, गहन. जाडाधोंगडा-भरडा-वि. १ ओबड- धोबड; खरबरीत (वस्त्र); भरड दळलेलें; भरडलेलें भरभरीत(पीठ). जाडी-स्त्री. १ जाडपणा; घनता. २ स्थूलता लठ्ठपणा. ३ दाटपणा; जाड पहा. ४ धुरीच्या पुढील चाव्हरीच्या बैलांचें जूं; शिवाळ. जाडें(डी) प्रकरण-न. असामान्य माणूस; वजनदार, विद्वान, श्रीमंत माणूस; धेंड. 'वरील दोघांहूनहि जाडी प्रकरण जे वरील महाविख्यात स्वामी त्यांच्याविषयीं कांहीं लिहून हा भाग आट- पतों. -नि ३३९. ॰बार-मोठा फटका. 'जाडे बारहि लाविती धडधडां त्यांचा उठें तो ध्वनी ।' केक १४१. जाडेला-वि. १ जाडा; लठ्ठ. २ जाडसर; जाडा पहा. [सं. जड]

दाते शब्दकोश

जाड      

वि.       १. स्थूल; जाडगा (फळी). २. जाडेभरडे; खरखरीत (कापड). ३. दाट; फार पातळ नसणारा (प्रवाही पदार्थ). ४. धट्टेकट्टे; कणखर (शरीर). ५. जड; मोठे (ओझे). ६. भारदस्त; प्रौढ; घोर; कठीण : ‘प्रबंध कविता जाड वचनें ।’ – दास ११·६·८. ७. मोठी; भव्य; प्रचंड : ‘पुजा देखतां जाड जीवीं गळालो ।’ – रामदास करुणा. ८. लठ्ठ; दांडगा; स्थूल (माणूस, शरीर). ९. घट्ट. पहा : जाडा. [सं. जड]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जिवती

स्त्री. मूल जन्मल्यानंतर सहावीच्या दिवशीं पुजा- वयाची एक देवता; सटवी. 'रक्षी गुरुसेवा हे सच्छिष्यशिशूसि गालवा जिवती ।' -मोउद्योग ८.८८. २ तीची एक लहान प्रतिमा करून मुलाच्या गळ्यांत बाधितात ती.' ३ श्रावणमहिन्यांत मुलास दीर्घायुष्य मिळावें म्हणून माता दर शुक्रवारीं पूजन कर- तात ती देवता [सं. जीवंतिका]

दाते शब्दकोश

खेंटर or खेटर

खेंटर or खेटर khēṇṭara or khēṭara n A term of reviling for a shoe or sandal. 2 A term of disdain or contempt for any person or thing. Pr. चाम्हाराचे देवाला खेटराची पुजा Pr. आपल्या खेटरावर माया ती दुसऱ्याच्या पोरा- वर नाहीं Man has a greater regard for an old shoe of his own than for the child of another. वडिलांचीं खेटरें घेऊन पळळणारा (One that would snatch away and run off with the slipper with which his father might be chastising him.) A term for an undutiful and incorrigible child. खें0 तुटो or जळो I dont care a straw, Ruat cœlum.

मोल्सवर्थ शब्दकोश

मूर्ति

स्त्री. या शब्दाखालीं पुढील सामासिक शब्द अधिक देतां येतील.मूर्तिपूजा-सगुणरूपधारी परमेश्वराची पुजा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा-मूर्तीची स्थापना, अर्चा. मूर्तिपूजक-मूर्तीची पूजा करणारे, सगुनोपासक.मूर्तिभंग- मूर्ती फोडणें.

दाते शब्दकोश

नीज

नीज nīja n f (निज S) One's own affairs. Pr. निजे वांचून पुजा नाहीं No one cares about the concerns of another.

मोल्सवर्थ शब्दकोश

नस्त्री. १ स्वतःचें काम. २ आत्मस्वरूप. 'छंदे आपु- लिया नाचत । नीज घेऊनी फिरत गा ।' -तुगा ३४८. [सं. निज]म्ह॰निजे वांचून पुजा नाहीं = दुसर्‍याच्या कामाची कोणी काळजी घेत नाहीं.

दाते शब्दकोश

निज

निज nija a (S) Own, proper, peculiar. 2 Used as s n f One's own affairs. v सांग, बोल &c. Pr. निजेवांचून पुजा नाहीं No one serves or honors another disinterestedly. Numerous compounds occur, esp. in poetry. The useful ones follow in order.

मोल्सवर्थ शब्दकोश

वि. स्वतःचें; स्वकीय; आत्मीय; आपलें; (अत्यंत-शर) -नस्त्री. स्वतःचीं कामें (क्रि॰ सांगणें; बोलणें). म्ह॰ निजेवाचून पुजा नाहीं = फुकट कोणी कोणाच्या उपयोगीं पडत नाहीं. [सं.] ॰कार्य-न. १ आपलें स्वतःचें काम. २ ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान मिळविणें. ॰खूण-स्त्री. विशिष्ट खूण, चिन्ह, लक्षण. ॰गूज-न. स्वताचें, खाजगी-गुप्त काम, गोष्ट. ॰जन-स्वकीयजन अथवा भक्त. आप्त; सोयरेधायरे. -ज्ञा १८.१. ॰जनजित-वि. भक्ता- धीन. ॰जनरक्षक-वि. आपल्या लोकांचें, भक्तांचें रक्षण करणारा (ईश्वर). ॰जनाखिलमंगल-वि. भक्तांचें संपूर्ण कल्याण करणारा; भक्तांचें मंगळ करणारा. 'जय जय देव निर्मळ । निज- जनाखिल मंगल । जन्मजरा जलद जाल प्रभंजन ।' -ज्ञा १८.१. ॰ठेवा-पु. १ स्वतःची पुंजी, मुख्यत्वें स्वतःच्या पाप पुण्यास लाव- तात. २ ब्रह्मज्ञान. 'ऐसें म्हणाल तरी निजठेवा । सद्गरूवीण नाहीं ।' -दा ५.१. १९. ॰ढाळ-पु. स्वभाविक गति. ॰तेज-न. स्वकीय तेज; स्वस्वरूप. ॰त्व-न. निजरूप. ॰धाम-न. (काव्य.) स्वतःचें घर, निवासस्थान; आत्मस्वरूप; निजतेज. 'कृष्णदास जयराम । जे शांतक्षमेचें निजधाम ।' ॰धामास जाणें-मरणें; दिवंगत होणें. ॰निवाडा-पु. आत्मस्वरूपाचा निश्चय. निजस्वरूप भाव. -एभा २.१३६. ॰बोध-पु. आत्मज्ञान. 'जेथें भेटे निर्गुण निजबोध विष्णु स्वरूप.' ॰मूर्ति-रूप-वि. स्वस्वरूप; स्वतःसिद्ध. ॰रूप-न. १ स्वतःचें खरें स्वरूप. 'निजरूप इला मी दाऊं कां ।' -सौभद्र अंक ५. २ स्वस्वरूप; चिन्मयकला; शिवात्मा. ॰लोट- पु. (काव्य.) प्रत्यक्ष लाट, जलकल्लोळ. 'जो विवेक रत्नाचा किरिट । जो सद्गुण गंगेचा निजलोट ।' ॰वर्म-न. स्वतःचे (गूढ) दोष; रहस्य; गुप्त गोष्ट. ॰वस्तु-नस्त्री. ब्रह्म. ॰वृत्ति- स्त्री. स्वधर्म. 'तैसी निजवृत्ति जेथ सांडे । तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे । आइका प्रजाहो हें फुडें । विरंचि म्हणे ।' -ज्ञा ३.१११. ॰साधन-न. १ आत्म्याचें ज्ञान मिळविणें. २ स्वतःचें हित पाहणें, स्वहिताकडे नजर देणें. (क्रि॰ पाहणें). ॰सार-पु. मुख्य उद्देश; तात्पर्य. 'एर्‍हवीं या लक्षणांचिया निजसारा । मी अपाडे कीर अपुरा ।' -ज्ञा ६.१४०. ॰सुकृत-पु. आपलीं स्वतःचीं कृत्यें (पूर्व जन्मांतील किंवा ह्या जन्मांतील). ॰सुख-न. १ ब्रह्मसुख. २ स्वतःचें सुख. ॰स्वरूप-न. निजरूप पहा. ॰ज्ञानी- पु. आत्मज्ञानी. निजांगें-क्रिवि. (काव्य) स्वतः; जातीनें. 'निजांगें वधोनि दशकंधर ।' -स्तोत्रमाला महिपति-पांडुरंगस्तोत्र. निजाचो-वि. (गो.) स्वतःचा; मूळचा; नैसर्गिक. ॰निजाचो श्रीमंत-वि. गर्भश्रीमंत. निजानंद, निजानंदभरित-वि. स्वतःमध्यें आनंद पावणारा (ब्रह्म).

दाते शब्दकोश

पुजारा or री

पुजारा or री pujārā or rī m (पुजा) The officiating Bráhman or other person of a temple.

मोल्सवर्थ शब्दकोश

पूजा

स्त्री. १ पूजन; अर्चा; उपास्य दैवताची आराधना. पूजेचे पंचोपचार व षोडशोपचार असे प्रकार आहेत. २ पूजना- साठीं गंध, फुलें इ॰ रूप आणलेली सामग्री. ३ सत्कार; सन्मान; आदर ठेवणें; भक्ति. ४ (ल.) द्रव्यरूप सत्कार; पैसा. 'पै कळांतर गांठीं बांधिजे । मग पुढिलांचें काज कीजे । पूजा घेऊनि रसु दीजे । पीडितांसी ।' -ज्ञा १७.२८७. ५ (ल.) अपमान; खरडपट्टी. 'नागोपंताची पूजा होऊन ते घरीं गेले.' -विक्षिप्त १.३२. ६ लांचलुचपत. -ख ३७००. पुजा पहा. [सं.] (वाप्र.) ॰करणें- घालणें-मारणें; बडविणें; खुदळणें; भोसडपट्टी काढणें; फार रागें भरणें. 'बायकोनें खेटरानें नवऱ्याची, पूजा केली-घातली अशीं उदाहरणें पहायला सांपडतात.' ॰बांधणें-फुलें इ॰नीं मूर्ति सज विणें; मूर्तीला शृंगारणें. सामाशब्द- ॰अर्चा-स्त्री. १ पूजा व तिच्या अंगभूत इतर कृत्यें; पूजन. २ (ल.) शिव्या; अपमान; खरडपट्टी. 'सासरे मंडळींची पूजाअर्चा चालूच आहे.' -विक्षिप्त १.६५. ॰आरती-आर्ती-स्त्री. १ पूजाअर्चा पहा. २ (ल.) अपमान; खरडपट्टी. 'लोंढयांची पूजाआर्ती महाराजांनीं केल्यामुळें ते छाव- णींत जाऊन राहिलें.' -विक्षिप्त १.३३. ॰उर्जा-स्त्री. पूजाअर्चा. 'हे वृंदावनाची पूजाउर्जा चालवतील येविषयीं ताकीदपत्रें...' -शाछ ३६. ॰द्रव्य-न. पूजेस लागणारा किंवा अवश्य असलेला जिन्नस (फूल, गंध, पाणी इं॰ ). [सं. पूजा + द्रव्य] ॰पत्री-स्त्री. १ (फुलें, पत्री, बेलाचीं पानें इ॰ ) पूजेचें साहित्य; देवपूजा. २ (खा.) पूजा करणें. -भात्रै ७.१ ते ४. [पूजा + पत्री] ॰पाती- स्त्री. (ना.) पूजाअर्चा; पूजा वगैरे. [पूजा + पाती (सं. पत्री)] ॰पात्र-न. पूजेचें साहित्य ठेवण्याचें एक विशिष्ट प्रकारचें भांडें. [सं. पूजा + पात्र] ॰पुरस्कार-पु. पूजा व तदनुषंगिक इतर कर्में. ॰बंध-पु. बांधलेली पूजा. 'मुगुटावरी स्तबक । ठायीं ठायीं पूजा- बंध अनेक ।' -ज्ञा ११.२२०. पूजोपचार-पुअव. देवाची पूजा करण्याचीं सर्व उपकरणें, कर्में, तंत्रें इ॰. षोडशोपचार पहा.

दाते शब्दकोश

पूजणें

पूजणें pūjaṇēṃ & पूजा See पुजणें & पुजा.

मोल्सवर्थ शब्दकोश