मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

पूर्व-नियोजित

पूर्वकल्पित, आधीं ठरवून, प्रथम आंखल्याप्रमाणे, आगाऊ केलेल्या ब्लू-प्रिंटप्रमाणें, कट करून नंतर, जमवाजमव करून, जाणूनबुजून, आयत्या वेळीं सुचलेले नव्हे, बेत करून, आधींपासूनच्याच कल्पना पुढे साकारल्या, ठराव करून, वचन-बद्ध होऊन, मांडामांड- रचना-जुळण केल्यावर, याची प्राथमिक आंकडे-मोड झाल्यावरच हें घडलें आहे, निश्चित केल्याप्रमाणे, दिसलें भासलें व केलें असें नसून पाहिले निरखलें-ठरविलें व पार पाडलें, याचे टाइम-टेबल प्रारंभालाच ठरलें होतें ! जसा संकल्प सोडला होता तसे, सल्लामसलत करून मग हल्ला ! कॅलेंडरवर काट मारलेल्या दिवशीं, डायरींत टिपल्याप्रमाणें, याच्यासाठीं आधीं सभा भरल्या होत्या, विचारांची देवाण घेवाण झाली होती, याचे तिथि-वार-नक्षत्र ज्योतिष्याकडून आधीच आणले होते, पद्धतशीरपणें यादी केल्याप्रमाणें.

शब्दकौमुदी