आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
पोटार्थी
पोटार्थी a A bolly-god.
पोटार्थी pōṭārthī (पोट & अर्थी) Careful of the belly, a belly-god. 2 That serves solely for his daily food, receiving no wages.
पोटार्थी
भोजनवादी, जेथें भरे डेरा तोच गांव बरा, नोकरी हेंच प्राप्तव्य, भाडोत्री सेवक, दिल्या भाकरीचे, ज्याचें खावें मीठ त्याची चाकरी करावी नीट, पोटोबा तोच त्याचा विठोबा, दुपारची वेळ भागविणे हेंच यांचें उद्दिष्ट-
संबंधित शब्द
स्वार्थी
स्वार्थांध, मतलबी, मतलबसिंधु, स्वार्थशास्त्री, स्वार्थ साधू, स्वार्थ-परायण, संधि-साधू, पोटार्थी, स्वहितदक्ष, पोटभरू, स्वहितनिष्ठ, स्वार्थ-लोलुप, आत्महितदक्ष, आत्मकेंद्रित, पंक्तिपठाण, आप्पलपोट्या, उपट्या, आपमतलबी, आत्मकामी, आपले घर भरणारा, स्वार्थाने लडबडलेला, आपल्या पोळीवर तूप ओढील, आपले घोडें पुढे दामटील, दुस-याला नाडून स्वतः नटणारा, कापल्या बोटावर पाणी टाकणार नाहीं, आधीं पोटोबा मग विठोबा, उडत्या पांखरांचीं पिसें मोजणारा, स्वत:ची तुंबडी भरतो, आम्ही खावें आम्ही प्यावे जमाखर्च तुमचे नांवें, तुम्ही आम्ही भाऊ भाऊ तुमचें आमचें आम्हीच खाऊ, तुमचे पोहे आमचा कोंडा फुंकून फुंकून खाऊं, मी खाईन खोबरें तूं करवंटी कुरतड.
उदरंभर, उदरंभरी
वि. १. भोजन भाऊ; पोटभरू; पोटार्थी; खादाड : ‘पीतां मरंद उदरंभर बंभराचे ।’ -नल ३८. २. स्वार्थसाधू; आपमतलबी : ‘बरेच प्रोफेसर…उदरंभरी लोक आहेत.’ -लोटिकेले २·५१४. ३. पोट भरण्याखेरीज काही न करणारा; स्वतःच्या निर्वाहाखेरीज अन्यत्र न पाहणारा (देश-समाज-सेवा इ. इतर काही न करणाऱ्याला म्हणतात).
उदर
न. १ पोट; कोठा; जठर. 'उकार उदर विशाल ।' -ज्ञा १.१९. २ पोटफुगी; विकारानें फुगलेलें पोट; पोटांतील एक रोग. उ॰ जलोदर; वातोदर; सर्पोदर, वगैरे. ३ (कृषी.) (पाण्याचें अजीर्ण) कांदे, बटाटे इत्यादि भूमिगत पिकास पाणी फार झालें तर सूज येते व तो भाग कुजतो त्यास म्हणतात. -कृषि. १८४. ४ गर्भाशय; कूस; कुक्षि. 'अगा वसुदेवाचिये तपप्राप्तीं । श्रीकृष्ण देवकीउदरा येती ।' -एरुस्व १.१०. 'धन्य धन्य ते कौसल्या सती । उदरासि । आला त्रैलोक्यपति ।' -संवि १८.५. [ सं. उदर; सिं जलंधरु] -राची खांच स्त्री. पोट. 'आपुली खांच उदराची.' -संग्रामगीतें १३३. -रीं येणें (एखादा ग्रह जन्मराशीस येणें); यथेच्छ खाण्या- पिण्यास, उपभोग घेण्यास मिळण्याजोगी दशा येणें (निंदाबोधक). उदरीं शनी, शनैश्वर येणें-(ज्यो.) शनी जन्मराशीस येणें. म्हणजे चांगली दशा प्राप्त होणें; ऐश्वर्य मिळणें. ॰तलधमनी स्त्री. (शारीर.) पोटाजवळची धमनी. ॰तलपाद (प्राणि.) गोगल- गाय इत्यादि पोटानें सरपटणारे प्राणी. [इं. गॅस्टरोपोडा; ग्री. गॅस्टर = पोट; तुल॰ सं. जठर]. ॰दरी स्त्री. पोट; पोटाची खांच. ॰निर्वाह-पूर्ति-पोषण-प्रवृत्ति-वृत्ति-पुस्त्रीन. १ चरि- तार्थ; उपजीविका; पोषण; उदरंभरण; क्षुधाशांति. 'भिक्षा मागुनी क्षेत्राभीतरीं । उदरनिर्वाह करितसे ।।' -नव १३.६०. 'उदर प्रवृत्ति- करणें । मोळ्या आणून विकीतसे ।।' -संवि २१.१४. २ उपजी- विकेचें, चिरितार्थाचें साधन; जीवन; पोटापाण्याची सोय. ३ पोट भरणें; केवळ जगणें; जीव जगविणें; पोट चालविणें (सामा. निंदा- व्यंजक). ॰पिशाच्च पु. अतिशय खादाड; अधाशी; खाबू. उदरंभर-री वि. १ पोटभरू; पोटार्थी; खादाड. 'पीतां मरंद उदरंभर बंभराचें ।' -नल ३८. 'गोसावी लोक ईश्वरप्राप्तीचे नुसतें सोंग आणतात, पण उदरंभर मात्र असतात.' २ स्वार्थसाधु; आपमतलबी. 'बरेच प्रोफेसर... उदरंभरी लोक आहेत' -टि २. ५१४. ३ पोट भरण्याखेरीज कांहीं न करणारा; स्वतःच्या निर्वाहखेरीज अन्यत्र न पहणारा (देश-समाजसेवा इ॰ इतर कांहीं न करणा र्यास म्हणतात). ॰भरण-न. अन्न खाणें; जेवणें; भोजन, उदर- निर्वाह पहा. 'उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ।'
पोट
पु. १ अन्नाशय, उरापासून बस्तीपर्यंतचा, ज्यामध्यें अन्नोदकादि किंवा गर्भ राहतो तो शरीराचा भाग; बरगडीच्या खालचा व कंबरेच्या वरचा भाग; उदर. २ कोठा; अन्नपचनाचें स्थान; जठर. ३ (ल.) गर्भ; गर्भाशय. 'तुझें ओझें नऊ महिने मी पोटांत वाहिलें हों?' ४ (ल.) गर्भारपण. उदा॰ पोट येयें. ५ (ल.) कोणत्याहि वस्तुचा फुगीर भाग. कोणत्याहि गोष्टीचा पुढें आलेला भाग. उदा॰ घटाचा, पापण्यांचा इ॰; उदा॰ गडव्याचें, घागरीचें पोट. ६ वस्तूचा पोकळ भाग; पोकळी; दरा; खळगी; खांच. ७खोलवा; सांठवा; कव; कवळ; खातें; समावेश करण्याचा गुण, शक्ति; मुख्य किंवा आंतील बाजू; मुख्य कृत्याच्या अंगभूत इतर कृत्यें. नदीच्या पात्राचा मध्य. 'वरप्रस्थान, वाक्दान इ॰ हीं सर्व विवाहाच्या पोटचीं कर्में.' ८(ल.) मन; हृदय; बुद्धीचें, विकाराचें स्थान. 'ज्याच्या पोटीं खर विष, मुखीं आज्य हैय्यंगवीन ।' -वि. वा. भिडे. [सं. पुष्ठ; पुट. दे. पोट्टं; प्रा. पोट्ट; का. होट्टे; तुल॰ हिं. गु.पेट] (वाप्र.) ॰करणें-(जनावर) गाभण राहणें; लठ्ठ बनणें. ॰करणें-फुगणें-येणें-वाढविणें- व्यभिचारानें गर्भार होणें. ॰गळ्याशीं लागणें-फार जेवल्यानें पोट आकंठ भरणें. पोट(टा)चें दुःख काढणें-सोसणें- भुकेची वेदना सोसणें. पोटचें पाडणें-कृत्रिम उपायांनीं गर्भ- पात करणें; पोट पाडणें. ॰जाणें-ढांळणें-ढाळ, रेच, जुलाब होणें. 'हंगलें नाहीं पोट गेलें.' ॰जाळणें-१ (निंदार्थी, वैतागानें) पोट भरणें. 'समर्थाची लाळ घोटूं नकों तर काय करूं. हें पोट जाळावयाचें आहें ना?' २ दुसर्याचें नुकसान करून आपला फायदा करून घेणें. ह्या वेळीं मला बढती मिळा- वयाची, पण त्या शंकररावानें आपलें पोट जाळलें ना !' ॰जिरणें-गर्भ शमन होणें; वाढूं लागलेला गर्भ पोटांत जिरणें. 'त्या स्त्रीचें पोट जिरलें.' ॰जिरविणें-झाडणें-पाडणें-मारणें सांडणें-(औषध घेऊन) गर्भपात करणें. ॰तडीस लागणें-पोट गळयाशीं लागणें पहा. ॰दुखणें-(ल.) (दुसर्याचें चागलें पाहून) मत्सर वाटणें; असह्य होणें; वाईट वाटणें. 'खरचणाराचें खरचतें आणि कोठवळ्याचें पोट दुखतें.' ॰धरणें-जुलाब बंद होणें. ॰धरूधरून हंसणें-अतिशय हंसणें. ॰नकटें आहे-पोट लाजबीज कांहीं जाणत नाहीं (भूक लागली असतां, वात्सल्यप्रेमानें कळवळा आला असतां). ॰पाठीस लागणें-पोटाला मिळविण्या- साठीं उद्योग करावा लागणें. 'पोट लागलें पाठीशीं । हिंडवीतें देशो- देशीं ।' -तुगा ४१९६. ॰पाठीस लागणें-पातळास, रसा- तळास जाणें, पोटाची पत्रावळ होणें-खावयास न मिळाल्या- मुळें पोट खपाटी जाणें, पोटास खळगी पडणें; पोट-पाठ एक होणें. ॰पिकणें-१ प्रसूत होणें; मूल होणें. 'त्या मुलीचें एकदाचें पोट पिकलें.' २ गर्भार असणें. ॰फुगणें-१ अजीर्णादिकांमुळें पोटांत वायु सांठून पोट मोठें होणें. २ (ल.) एखादी गुप्त बातमी कोणाला तरी सांगण्याला संधि न मिळाल्याकारणानें अस्वस्थता वाटणें. ३ गरोदर होणें. ॰फुटणें-खरोखरी पोट फुटल्याप्रमाणें पोटाला वेदना होणें. 'हंसतां हंसतां आमचीं पोटें फुटलीं.' ॰फोडणें-गुप्त बातमी फोडणें, उघडकीस आणणें. ॰बांधणें-उपासमार करणें; पोटाला चिमटा घेणें. ॰बांधून चाकरी करणें-पैसा जम- विणें-जेवणें-खाणें-खरचणें-पोटास न खातां नोकरी करणें, पैसे जमविणें इ॰ ॰बाहेर पडणें-जेवणाचा खर्च परभारां भागणें. 'त्या व्यापारांत पोट बाहेर पडून दहा रुपये मिळतात.' ॰बाहेर पाडणें-गुप्त गोष्ट चारचौघांत उघडकीस आणणें, फोडणें. ॰बुडणें- चरितार्थाचें साधन नाहींसें होणें. 'यंदा पाऊस चांगला पडला नाहीं, माझें पोट बुडालें.' ॰भर अन्न, अंगभर वस्त्र मिळणें- माणसाच्या निर्वाहाला आवश्यक अशा वस्तू मिळणें. ॰भरणें- १ इच्छा तृप्त होणें; पोटाची गरज भागणें; भरपूर जेवणें. 'माझें पोट भरलें, आतां जिलब्याचा आग्रह करूं नका.' २ चरितार्थ चालविणें. 'माझ्या सामर्थ्यें भरिल आजि पोटातें ।' -मोआदि २६.१४. ॰मोठें करणें-(ल.) दया दाखविणें; कृपाळू होणें. ॰सरणें-सुटणें-१ रेच होणें. ॰सुटणें-१ वातानें दोंद वाढणें; खायला, प्यायला यथेच्छ मिळत असल्यानें दोंद येणें. २ (ल.) उदरनिर्वाहाचा खर्च बाहेर पडणें, अंगावर न पडणें. पोटाखालीं जाणें-येणें-ओढ्या होऊन जाणें; विधवेनें पाट लावला असतां पहिल्या नवर्यापासून झालेल्या मुलांनीं तिजबरोबर जाणें. पोटाचा कपोता वळणें-अतिशय रोड, कृश होणें. पोटाचा चाकर, पाईक-पोटाकरितां मजुरी करणारा. पोटाचा डमामा, नगारा होणें-पोटांत वायु धरल्यामुळें पोट फुगणें. पोटाच्यापाठीस लागणें-चरितार्थाचीं साधनें मिळविण्याकडे सर्व वेळ, शक्ति खर्चणें. पोटाचें पाणी होणें-जोराची हगवण लागणें. पोटांत आग पेटणें-अतिशय भूक लागणें. पोटांत कालवणें-पोटांत ढवळणें, पोटांत गडबड होणें. पोटांत कावळे ओरडूं- कोकावूं-तोडूं-टोचूं लागणें, पोटांत कोंबडीं चरूं लागणें-अतिशय भूक लागणें; भुकेनें जीव व्याकूळ होणें. पोटांत खडबडणें-भूक लागणें. पोटांत गोळा उभा राहणें-संकट येणें; भीति वाटणें; पोटांत धस्स होणें. पोटांत घालणें-घेणें, पोटीं घालणें-(अपराध, चूक) क्षमा करणें. 'पोटीं घालावा त्वां, जोडा, माझ्या नसेचि अपराधा ।' -मो. पोटांत जावप- (गो.) पोटांत दुखणें. पोटांत ठेवणें-गुप्त ठेवणें; कोणाला कळूं न देणें. पोटांत-स डोकें घालणें-आश्रय, कृपा संपादणें. पोटांत तडस भरणें-पोटास कळ लागणें (फार खाल्यामुळें). पोटांत तोडणें-(ल.) दयेनें पोटांत कळवळणें; दुःख होणें. 'तुझें गरिबीचें बोलणें ऐकलें म्हणजे पोटांत कसें तडातड तोडतें.' -नामना ११२. पोटांत धाक पडणें-भीति उत्पन्न होणें. 'माझ्या पोटांत धाक पडला आहे.' -मृ ६९. पोटांत धोंडा उभा राहणें-अतिशय भीति वाटणें. 'तिला पहातांच माझ्या पोटांत एवढा थोरला धोंडा उभा राहिला.' -पण लक्षांत कोण घेतो. पोटांत पाय शिरणें-खचून जाणें; भ्रांत होणें; भांबावणें. 'त्याच्या मरणाची खबर ऐकिल्यापासून याचे पायच जणों पोटांत शिरले आहेत.' पोटांत पोट-मुख्याच्या पोटांत असलेला, गौण (मनुष्य, वस्तु). पोटांत पोट करणें-आपल्या उपजीविकेमधून दुसर्याचें पोट भरणें. पोटांत पोट चालणें-एकाच्या अन्नांत, निर्वाहांत दुसर्याचा समावेश होणें. पोटांत ब्रह्मराक्षस असणें-उठणें- खा खा सुटणें. पोटांत भडभडणें-दुःखानें ऊर भरणें. 'अंध म्हणे या पुत्रव्यसनें पोटांत फार भडभडतें ।' -मोशल्य ४.४९. पोटांत शिरणें-निघणें-१ (दुसर्याची) मर्जी संपादन करणें. २ दुसर्याच्या गुप्त गोष्टी काढून घेणें. पोटांत शूळ उठणें- सलणें-(ल.) मत्सर, हेवा वाटणें; दुसर्याचें बरें पाहून वाईट वाटणें. पोटांतील पाणी न हालविणें-एखादी गोष्ट गुप्त ठेवणें. पोटांतून उगळणें-कळवळा येणें-मायेचा पाझर फुटणें. पोटा येणें-पोटीं जन्म घेणें. पोटा येऊनियां चांग । उत्तमांग पावला ।' -एरुस्व १.७२. पोटाला कुंकू लावणें-(व.) गर्भारणींच भावी संततीचा वरवधूंचा वाङ्निश्चय करणें. पोटाला गांठी देणें-चिक्कूपणानें, दारिद्र्यामुळें पोटाला पुरेसें न खाणें. पोटाला पाटा बांधणें-पोटाला चिमटा घेणें; भुकेच्या वेदना बंद करण्यासाठीं धोतरानें पोट बांधणें. पोटावर उठणें-मारणें- येणें, पोटाआड येणें, पोटावर पाय देणें-मारणें, दुस- र्याचें उदरनिर्वाहाचें साधन काढून घेणें; प्राप्ति कमी करणें. पोटावारी नोकरी करणें, राहणें-फक्त जेवण घेऊन नोकरी करणें. पोटा(ट)शीं धरणें-१ प्रेम, ममता करणें. २ मदत करणें; पोषण, सांभाळ करणें. ३ (झाडांसंबंधीं तंट्यांत) झाडास कवटाळून देवाची शपथ घेणें, वाहणें इ॰ पोटा(ट-टि-टे)शीं राहणें- असणें-गर्भार असणें, राहणें. पोटास अन्न ढोंगास वस्त्र मिळणें-निर्वाहाचें अगदीं किमान साधन मिळणें; निर्वाहाच्या अगदीं आवश्यक वस्तू मिळणें. पोटास तडस लागणें-फार जेवल्यामुळें अस्वस्थता वाटणें. पोटास बिब्बे घालणें-चिमटे घेणें-पोटाला न खातां राहणें; उपास काढणें. पोटास येणें- उदरीं येणें; जन्मणें; मूल होणें. 'केला पहा, कसा हा येउनि पोटास घात लोकांनीं ।' -मोउद्योग ४.७९. पोटीं-पोटांत-(आल्याच्या- गेल्याच्या-दिल्याच्या-केल्याच्या) तर्फें, आनुषंगिक. पोटीं उत- रणें-जिरणें. पोटीं खोसणें-(ना.) कनवटीला बांधणें; कडोस्त्रीला लावणें. पोटीं घालणें-अपराध क्षमा, माफ करणें. 'अपराध कोटि पोटीं घालाया मुकुट पाय ते करितों ।' -मोस्त्री ६.६३. पोटीं जन्मणें-(आई-बापापासून) जन्म पावणें; उदरीं येणें. पोटीं धरणें-आवड धरणें; स्वीकारणें. 'पुण्य मार्ग पोटीं धरीं ।' -दा ५.८.२४. पोटीं-पोटांत पडणें-१ भक्षस्थानीं पडणें. २ शरीरांत खिळणें. (रोग, गोवर, देवी, ताप, खरूज इ॰). ३ स्वतःच बळकाविणें (पैका, द्रव्य). ४ जेवणांत खर्च होणें. ५ पोटांत मुरणें, नाहींसें होणें (औषध); (दूध) पोटांत तसेंच राहणें (रेच करणें). पोटीं वागविणें-एखाद्याला सतत आपल्याबरोबर वागवून त्याची काळजी वाहणें. 'हें पांगुळें वागवितोसि पोटीं ।' -सारुह १.८. पोट्यां चालणें-(गो.) मुलानें, पोट सरपटत चालणें. थंडा पोटानें-मित्रभावानें; सलोख्यानें; चिरडीशिवाय; अकसाशिवाय; रागा-क्षोभा-शिवाय. भरल्या पोटीं-पोटानें-जेवणानंतर लागलींच (काम करणें, चालणें इ॰). रिकाम्या पोटीं-पोटानें- जेवल्याशिवाय. म्ह॰ पोटचा(चें) द्यावा पण पाठचा देऊं नये = प्रत्यक्ष आपलें मूलहि सोडावें, पण आश्रयास आलेल्या माणसास सोडूं नये. साधितशब्द-पोटचा-वि. १ औरस; स्वतःचा; स्वजात; एखा- द्याच्या पोटीं जन्मलेलें (मूल). 'पोटचें द्यावें पण पाठचें देऊं नये.' २ पासून जन्मलेला, झालेला. 'हा कोणाच्या पोटचा?' ३ अंतर्भूत, समाविष्ट असलेलें. 'साष्टीच्या पोटचे साठ गांव आहेत.' पोटचा गोळा-लोळा-पु. स्वतःचें पोटचें मूल; पोर; नऊ महिने पोटांत बाळगलेलें मूल. 'विचार पडला कसा पोटचा गोळा तोडावा.' -विक ४०. पोटचें ज्ञान-न. १ नैसर्गिक, उपजत, स्वाभाविक ज्ञान; न शिकतां, संपादितां अंगीं असलेलें ज्ञान. २ अंगची हुशारी, शहाणपण. ३ स्वतःची बुद्धी, अक्कल, समज इ॰ पोटाचा अदळ- वि. शौच्याला लागली असतां क्षणभरसुद्धां धीर धरवत नाहीं असा. (ल.) ढिल्या संवईचा. पोटाचा पाईक-पायक-पु. पोटाचा चाकर; पोटपाईक पहा. सामाशब्द- ॰उक(का)ल-स्त्रीपु. मन मोकळें करणें. (क्रि॰ करणें). ॰कटार-री-स्त्री. १ पोटांत कट्यार, सुरा खुपसून घेऊन आत्महत्त्या करणें; आत्महत्त्या. (क्रि॰ करून घेणें). २ कट्यारीनें दुसर्यास भोसकणें. (क्रि॰ करणें) ॰करपी- स्त्री. (बायकी) एक शिवी; पोटजाळी. [पोट + करपणें] ॰करीण- स्त्री. व्यभिचारानें गरोदर झालेली स्त्री. ॰कली-कुली-कूळ- स्त्रीन. १ (निंदार्थी) लहान पोट. २ पोटकुळी पहा. ॰कांब-स्त्री. बांबूची आंतल्या बाजूची चिरटी, कामटी. याच्या उलट पाठकांब. ॰किडा-पु. १ (झाड, फळ इ॰ च्या) आंत राहणारा किडा. २ (ल.) गुप्त गोष्टी, गुह्यें जाणणारा मनुष्य. ॰कुळी-स्त्री. पोटाची बाजू; कनवटी; कडोस्त्री; ज्यावर धोतर, लुगडें आवळलें जातें तो भाग (तेथें कांहीं खोवण्याच्या संबंधानें उपयोग). 'त्याची पोट- कुळी म्यां चांचपून पाहिली.' -क्रिवि. प्रमाणेंहि उपयोग होतो. ॰कूळ-न. (निंदार्थीं) पोट. ॰कूळ-न. दुसर्याकरितां जामीन राहणारा मनुष्य; संगतीचा, परिवारांतील माणूस. ॰खण-स्त्री. (कु.) अधाशीपणा. ॰खर्च-पु. खाण्यापिण्याचा, जेवणाचा खर्च; पोटगी खर्च. ॰खर्ची-स्त्री. प्रवास इ॰ प्रसंगीं खाण्यापिण्यासाठीं घेतलेले पैसे. ॰खराब-वि. मध्यें (खडक, वाळवंट, घळ, पायवाट इ॰ मुळें) खराब असलेली, लागवड न होण्याजोगी (जागा, जमीन). ॰खराबा-पु. (कों.) वहित जमीनीच्या पोटीं ओसाड, खराब असलेली जमीन. ॰खीळ-खिळा-स्त्रीपु. १ शिवाळेची आंतील खीळ, याच्या उलटबोळ खीळ. २ आंतील, मधली खीळ, खुंटी. ॰गडी-पु. १ (सोंगट्यांचा खेळ) खेळणाराच्या हाताखालचा व त्यास मदत करणारा गडी; आंगगडी; पित्तू. २ (ल.) मदतनीस; रिकामी झालेली जागा भरून काढणारा गडी. ॰गळ-स्त्री. (राजा.) खाजणाच्या बांधाच्या आंत पाणी सांचणारा चर. ॰गुजारा- पु. नुसती गुजराण; निव्वळ उपजीविका, निर्वाह; क्षुद्रवृत्ति. ॰गुमास्ता-पु. मुख्य गुमास्त्याचा मदतनीस. (इं.) सब्एजंट. ॰घडी-स्त्री. गर्भार आहे असें दिसावें म्हणून वांझोट्या स्त्रीनें पोटावर बांधलेली घडी. ॰घर-न. (सोंगट्यांचा खेळ) पटाच्या बाजूवरील घरांच्या तीन ओळींपैकीं मधल्या ओळींतील शेवटचें (खालचें) घर. ॰चक-पु. मोठ्या शेताच्या अंतर्भूत असलेलें पण दुसर्याच्या मालकीचें लहान शेत, जमीनीचा विभाग; शेताचा पोटविभाग. ॰जामीन, पोटचा जामीन-पु. जामीनाच्या पोटांतला जामीन; खाजगी जामीन; आंतील जामीनदार; परत जामीन. ॰जाळ-पु. आईची माया; मातृवात्सल्य; पोटच्या पुत्रा- दिकांचा नाश झाल्यामुळें होणारा शोक. [पोट + जाळ] म्ह॰ पाठजाळ पुरवेल पोटजाळ पुरवत नाहीं. ॰जाळू-वि. (ल.) चहाड- खोर; पोटासाठीं हलकें काम करणारा. 'पोटजाळू माणसांच्या हातून महाराजांचा हेतु सिद्धीस जाईल.' -विक्षिप्त ३.१०७. ॰जीभ- स्त्री. पडजीभ; आंतील बाजूची, घशांतील जीभ. ॰झांकणी-णें- स्त्रीन. (बायकी) १ लग्नांत सुनमुखाच्यावेळीं वराच्या आईकडून वधूच्या आईला लुगडें देण्यांत येतें तें. २ तो विधि. टाळा-पु. (ढोराचा धंदा) दोन अधोडीमधील तुकडा. ॰तिडीक-स्त्री. १ पोटांतील कळ; पोट दुखण्याची वेदना. २ (ल.) कळकळ; आस्था. ॰दुखणें-न. अजीर्ण वगैरे कारणानें पोटांत वेदना होणें; पोटशूळ; मुरडा. ॰दुखा-दुखी-पुस्त्री. १ (कों.) पोटशूळाची व्यथा; नेहमींचें पोट दुखणें. २ (ल.) दुसर्याचें बरें पाहून झालेलें दुःख; हेवा; मत्सर. ३ गरज; मागणी; हांव. 'वैद्याची-दलालाची-कार- कुनाची-लांचेची-मिळकतीची-पोटदुखी.' ॰नरपु. मोत्याच्या आंतल्या पडद्याच्याहि आंत जो नर असतो तो. ॰नळ-नअव. पोटांतील नळाचे वर जाणारे आणि खालीं जाणारे भाग; नळाचा आजार, दुखणें. याच्या उलट पाठनळ. ॰पडीत-न. लागवड केलेल्या जमीनीमधला पडीत तुकडा. ॰पाईक-पायक-वि. पोटार्थी; उपजीविकेकरितां काम, नोकरी करणारा; काम करण्याची जरूर असलेला (मनुष्य). ॰पाणी-न. पोटाची तजवीज, व्यवस्था. ॰पु(पू)जा-स्त्री. १ खाणेपिणें; भोजन. (क्रि॰ करणें). २ (ल.) लांच देणें. ॰पोशा-सा-वि. पोटार्थी; पोटभरू; खादाड. 'न करितां आळसी पोटपोसा ।' -दावि ४३७. ॰फुगी-स्त्री. १ व्यभिचार करून गरोदर होणारी, झालेली स्त्री. २ पोट फुगणें; दब्ब होणें; पोटांत गुबारा धरणें. ३ नेहमींचें पोट फुगणें; पोट फुगण्याचा रोग. ४ दुसर्याचें चांगलें झालेलें पाहून वाईट वाटणें; हेवा; मत्सर. ५ आकस; खुनस; चुरस. ॰फू(फु)ग-स्त्री. कांहीं गुप्त गोष्ट फोडण्याची उत्कंठा (त्यामुळें पोट फुगणें). [पोट + फुगणें] पोटफुगी झाडणें-गुप्त गोष्ट फोडणें. ॰फोड-स्त्री. १ मन मोकळें करणें. २ गुप्त गोष्ट फोडणें, प्रसिद्ध करणें. ३ एखादें कोडें उकलणें. [पोट + फोडणें] ॰फोडें-वि. एकदां व्यायलेलें (जनावर). [पोट + फोडणें] ॰बंदा-वि. पोटार्थी; फक्त पोटाकरितां काम, चाकरी करणारा. ॰बांधणें-णी-नस्त्री. पोटास बांधण्याचें वस्त्र (विशेषतः बाळंतीण स्त्रियांकरितां, मुलांकरितां). ॰बाबू-पु. १ पोटपोशा; पोटभरू; खादूनंदन; पुखानंद. २ पोटाला मिळालें म्हणजे बाकीच्या गोष्टींविषयीं बेफिकीर असणारा. [पोट + बाबू] ॰बूड-स्त्री. १ निर्वाहाच्या साधनांचा नाश; वृत्तिनाश. २ वाजवी- किंवा अपेक्षित रकमेपेक्षां कमी रक्कम उत्पन्न येणें; नुकसानी. 'अशा बोलीचा व्यापार आम्ही करणार नाहीं, ह्यांत आमची पोट- बूड आहे.' ॰बेरीज-स्त्री. हिशेबाच्या पोटांतील संख्यांची बेरीज. ॰भर-स्त्री. उदरपूरण; तृप्तिस्थिति. -क्रिवि. पोट भरेपर्यंत; (क्षुधेची) तृप्ति होईपर्यंत; (ल.) गरजेची, इच्छेची तृप्ति होईपर्यंत. ॰भरणा-भरती-स्त्री. (राजा. कु.) (अन्नादिकांनीं झालेली) पोटाची भरती; पोट भरणें; क्षुधेची तृप्ति. 'गुरांची पोट-भरती पावसांत होते.' ॰भगई-स्त्री. (ना.) पोट भरेपर्यंत खाणें. ॰भरावा-पु. उदरनिर्वाह. 'पोट भराव्या कारणें । नाना विद्या अभ्यास करणें ।' -दा ६.१. २० ॰भरू-वि. ज्यापासून पुष्टि मुळींच नाहीं पण नुसतें प्राणधारणेंपुरतें पोट भरणारें किंवा रुचकर नसून भरपूर पोट भरणारें (अन्न). ॰भरू-भर्या-वि. पोटबाबू पहा. ॰भाडेचिठ्ठी-स्त्री. पोटभाडेकर्याकडून घेतलेली भाडेकर्यानें खंडचिठ्ठी, भाडेचिठ्ठी (घर इ॰ची). ॰मंडळ-न. मूळ मंडळाची शाखा; मदतनीस मंडळ; पुरवणीमंडळ. 'संयुक्त राज्यघटनेचें एक पोटमंडळ नेमण्यांत आलें.' -के २.१२. ३०. ॰मांडणी-मांडा- वणस्त्री. पोटसर; लग आणि कांबेरे. घराचीं पाखीं न दबावीं म्हणून प्रायः त्यांच्या मध्यजागीं खांबावर लगा घालून उभें केलेलें काम. ॰मारा-पु. उपासमार; पोटाला चिमटा घेणें; पोटाची आबाळ. ॰म्हातारा-वि. पोटाच्या, अन्नाच्या आबाळीमुळें म्हातार्यासारखा, अशक्त झालेला. ॰रकम-स्त्री. पोटांतील बाब; पोटांतील सदर, कलम. ॰वहीत-वि. मध्यें मध्यें लागवड केलेली (जमीन). याच्या उलट सबंधवहीत. ॰वाइ(ई)क-वि. पोटभरू पहा. ॰वांटा-पु. पोट वाटणी; मुख्य वांट्यांतील केलेला वाटा. ॰वांटेकरी-पु. पोटवाटणीचा मालक; दुय्यम वांटेकरी. ॰वाढवी- वाढी-स्त्री. व्यभिचारानें गर्भार झालेली स्त्री. [पोट + वाढविणें] ॰शूळ-सूळ-पु. पोटदुखी; मुरडा. ॰सर-पु. पोटमांडणी पहा. ॰सरकत-स्त्री. पोटभागीदारी; पोटवांटा. ॰सरकती-वि. पोट- भागीदार; पोट वाटेकरी. ॰सरू-स्त्री. पोटजाळी; एक शिवी. 'रांड मुलखाची पोटसरू ।' -राला ४६. [पोट + सारणें (दुसर्यापूढें)] ॰हिस्सा-पु. पोटवांटा. पोटांतून-क्रिवि. मनापासून; खरो- खरी. 'मला हा बेत कांहीं पोटांतून आवडला नव्हता.' पोटा- पाण्याचा बंदोबस्त-पु. निर्वाहाची केलेली व्यवस्था, तजवीज. पोटार्थीं-पु. पगार न घेतां नुसत्या जेवणावारी राहणारा नोकर. पोटबाबू पहा. [पोट + अर्थी] पोटावर्त-पु. घोड्याच्या पोटावरील भोंवरा. हें अशुभ लक्षण होय. -वि. असें चिन्ह असलेला (घोडा). [पोट + आवर्त] पोटाळ-वि. मोठ्या पोटाचा; ढेरपोट्या; दोंदील (माणूस). पोटाची आग-स्त्री. भूक. 'एखादीनें पोटाच्या आगीमुळें असें केलें तर असो मेलें ?' -फाल्गुनराव. पोट्या-वि. १ पोटभरू पहा. २ पोटचा (मुलगा). ३ (व.) पाटाच्या स्त्रीचा पूर्वघरचा, पाटकरणीबरोबर येणारा मुलगा. 'एक पोट्या मुलगा आईबरोबर आला.