आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
बंगला
बंगला baṅgalā m ( H) A summer-house, a pleasure-house, a country-house, a bungalow.
बंगला m A summer-house, a pleasure-house. A Bunglow.
पु. १ उन्हाळ्यांत रहावयाचें घर. २ विलासमंदिर. ३ टुमदार व चारी बाजूंनीं मोकळें असलेलें, एक किंवा दुमजली घर. [हिं.] ॰खातें-न. इमारतखातें. ॰गाडी-स्त्री. अंबारीवजा छप्पर असलेला जुना रथ. -ऐरापुप्र ९.५१५.
पु० घर, महाल.
पु. (नाशिक.) माडीवरील पुढील दिवाण- खाना. -स्मृतिचि १.१०.
पु. (ना.) उत्तर हिंदुस्थानांत होणारी एक विड्याच्या पानांची जात. हीं पानें फार तिखट व उष्ण असतात. [बंगाल ?]
संबंधित शब्द
डा(डां)क
स्त्री. १ टपाल; उतारू नेण्याकरितां घोडे, पळ- णारे मनुष्य ठेवून केलेली व्यवस्था. २ (साम.) टपाल; पोष्ट. ३ डाकचौकी पहा. ॰घर-पु. (हिं.) टपालहपीस. ॰चौकी- स्त्री. डाकेचीं घोडी, माणसें उतरण्याची जागा; टपाल, उतारू नेण्याकरितां घोडे इ॰ बदलण्याची जागा; टप्पा. ॰पाती-स्त्री. १ डाकचौकी; टप्पा. २ एकामागून एक रवानगी; माळ; माळका. (क्रि॰ ठेवणें; राखणें; बसविणें; मोडणें). ३ ठाणें; अड्डा (वाटेवरील चोरांचा). ॰बंगला-पु. प्रवाशांना उतरण्यासाठीं केलेला सरकारी बंगला; (इं.) ट्रॅव्हलर्स बंगलो; मुशाफर बंगला. ॰मार्ग-पु. टपालमार्ग.
घर
बंगला, निवासस्थान, राहते बिऱ्हाड, घरकुल, फ्लॅट, खोली, गाळा, माळा, चाळ, वाडा, निकेतन, मंदिर, गृह, वस्तीचे ठिकाण, घरटा, मकाण, मठी, कुटी, पर्णकुटी, इमारत, इमला, बंगली, हवेली, झोपडी, राहुटी, प्रासाद, सदन, निवास, खोपटें, तंबू , छप्पर, पडवी, गोठा, महाल, मनोरा, आडोशाची जागा. कौलारू छप्पर, टोलेजंग बंगला, भव्य प्रासाद, टुमदार इमला, अलीशान इमारत, छोटीशी मठी, वास्तव्याची जागा, चिरेबंदी वाडा, चंद्रमौळी भाड्याची वीत-टीचभर जागा, केमळी झोंपडी, डोके टेकायला निवारा, हा फ्लॅट म्हणजे कपाटांतील एक कप्पाच आहे! विंचवाचें बिऱ्हाड पाठीवर त्यांपैकींच ! घर कसले ? धर्मशाळा; नुसती मशीद भासते, शवपेटिका वाटते, या नाकपुड्यांएवढ्या खोल्या, एकाकी भयाण घर, तळमजल्यांत एक असूर्यपश्या खोलीत सर्वांचा वावर, बंगल्याचे तोंड गोखलेरोडवर निघालें होते.
बंगलाट-ठ
न. १ खोटा आरोप; कुभांड; आळ. (क्रि॰ घेणें; घालणें; आणणें; उचलणें). २ धाडसाची उलाढाल किंवा मसलत (पैसा मिळविण्याकरितां केलेली). बगलांटी-ट्या, बंगला ठकार-वि. १ (रा.) कुभांडखोर; खोटा आरोप करणारा. २ (गो.) खोटें बोलणारा. ३ साहसाच्या मसलती करणाराशीं संबंध ठेवणारा किंवा त्या स्वतः करणारा. [प्रा.]
चकभूल
स्त्री. आश्चर्य; विस्मय; भ्रांति, संभ्रम; संमोहा- वस्था; अचंबा. 'हें पाहून विद्याधरानें पुत्राची चकभूल जावी म्हणून तेथें एक बंगला होता त्या ठिकाणीं त्यास नेऊन भोजन घातलें.' -बाळ २.११७. -वि. आश्चर्यचकित; विस्मित; विमो- हित; दिङ्मूढ. [सं. चकित + हिं. भूल; चकणें + भुलणें]
चकभूलस्त्री.
आश्चर्य; विस्मय; भ्रांती; संभ्रम; संमोहावस्था; अचंबा : ‘हें पाहून विद्याधरानें पुत्राची चकभूल जावी म्हणून तेथें एक बंगला होता त्याठिकाणीं त्यास नेऊन भोजन घातलें.’ - बाळमित्र २·११७. वि.
चोबी
वि. लाकडी : ‘नबाबाचे खैम व चोबी बंगला जाऊन उभा राहिला.’ − मइसा ७·९८. [फा.]
चोबी
वि. लांकडी. 'नबाबाचे खैम व चोबी बंगला जाऊन उभा राहिला.' -रा ७.९८. [फा.]
डाकबंगला
पु. प्रवाशांना उतरण्यासाठी असलेला सरकारी बंगला.
हुजरा
पु. १ मशीद. 'हिंदूच्या इतर कोणत्याहि मिर- वणुकी हुजर्यावरून जाण्याला आमची मनाई नाहीं.' -के ६.१०.१९३९. २ कबरेवरील मदार; मुसलमानाच्या थडग्या- वर बांधलेली छोटी इमारत. 'काम तर चांगले आहे परंतु कबरेवरील हुजरा आहे. बंगला नाहीं.' -पेद ३९.१०७. ३ मुसुलमानांची ताबूत ठेवण्याची जागा. [अर.]
इमला
(आ) पु० बंगला, महाल, वाडा, इमारत, घर.
काटमाल
पु. १ पडलेल्या इमारतीचें सामान. ‘बंगला पडण्यास आला म्हणूंन त्याचा काटमाल त्यांनीं विकला.’ -लशि आत्म ४२२. [काटणें + माल]
काटमाल
पु. पडलेल्या इमारतीचे सामान : ‘बंगला पडण्यास आला म्हणून त्याचा काटमाल त्यांनी विकला.’ - लशि आत्म ४२२.
खडूळ
वि. गढूळ : ‘खडूळ पान्यामंदी मगरमाशाचा बंगला ।’ - राके ५८२.
खुमाच
पु. चंग कांचन गंजीफांतील चौथा रंग किंवा उत- रत्या बांजवांतील रंगांपैकी पहिला. -स्त्री. १ वस्त्रादिकांची सफाई, सूत, पोत. २ बंगला, घर इ॰ वस्तूंचा सुरेखपणा; तेज; नीटनेटकेपणा; छबदारी; देखणेपणा; घवघवीतपणा; तेज; सौंदर्य (रंग, रंगीत पदार्थांचा). [खुमास]
महाल
पु० मंदिर, बंगला. २ तालुक्याचा विभाग, लहान तालुका.
मूठ
स्त्री. तलवारीच्या मुठीचे पुढें दिल्याप्रमाणें अनेक प्रकार असतात :-१ दिलीशाई, २ औरंगजेबी, ३ सिंधी, ४ हकीमखानी, ५ बंगला. ६ गुजराथ. ७ पुरबिया, ८ भुजी, ९ सिरोही; १० करनशाही ११ कर्नाटकी, १२ शेरदहा , १३ मुल्हेरी, १४ इराणी असली, १५ इराणी नकली, १६ इराणी पोपट घाटी, १७ सुरा घाटी, १८ कुबडी घाटी, १९ इंग्रजी २० प्रकार , २० अब्बासी, व २१ डोंगरपुरी, २२ घोड्याच्या तोंडाची, २३ सिंहाच्या तोंडाची, २४ मेंढ्याच्या तोंडाची, २५ बांसबाडी, २६ नांदोदी, २७ अकीकची, २८ ईशबची, २९ हस्तीदंती, ३० तखाराणा; ३१ वाघाच्या तोंडाची, ३२ कबडी घाटी, ३३ गारदी, ३४ सोजित्रा, ३५ रामपुरी, ३६ उदेपुरी, ३७ महाराष्ट्रीय, ३८ जाफराबादी, ३९ अरबी, ४० फैजाबादी-फैजपूरी.
टुमदार
वि. १. छोटा पण सुंदर; सुरेख; बैठा आणि डौलदार (बंगला, घर). २. शोभिवंत; रम्य; रेखीव; डौलदार; सुबक; मोहक; छानदार. ३. युक्तीप्रयुक्तीने युक्त.
उद्यानबंगला
पु. खेड्यातील घर; बागेतील बंगला.
उन्हाळसावली
स्त्री. १ उन्हाळ्यांत राहण्याकरितां बांध- लेलें घर; उन्हाळी बंगला; बाराद्वारी. २ (थट्टेनें) छप्पर; झोंपडी. ३ उष्णतेपासून बचाव; आसरा.
उन्हाळसावली
स्त्री. १. उन्हाळ्यात राहण्याकरिता बांधलेले घर; उन्हाळी बंगला; बाराद्वारी. २. (थट्टेने) छप्पर; झोपडी. ३. उष्णतेपासून बचाव; आसरा.
सुमुद्र
पु. १ सागर; दर्या; अर्णव; उदकराशि; उदधि; जलधि. २ (ल.) अमर्याद सांठा; विस्तीर्ण, अफाट, अगणित असा समूह, पदार्थ वगैरे (उदा॰ देव, मानवी जीवित, भाषा, शास्त्र, शक्ति, सद्गुण) या कल्पनेवरून भवसमुद्र, गुणसमुद्र असे अनेक सामासिक शब्द बनतात म्ह॰ समुद्रास दुखणें शिंपींत औषध. (वाप्र.) समुद्राखालचा-समुद्रकांठचा; किनार्या- वरील. समुद्राचें अर्ध्य समुद्रास-ज्या वेळीं मिळालेल्या देणगीपैकींच कांहीं परत देतात तेव्हां योजतात. समुद्राचें मीठ डोंगराचे आवळे(मिळणें)-परस्पर विरुद्ध किंवा परस्परां- पासून फार दूरच्या वस्तू एकत्र आल्या असतां म्हणतात. सातासमुद्रां पलीकडे-अतिशय दूर; दुर्गमस्थळीं. साता समुद्रांपलीकडे ठेवणें-अतिशय जतन करणें; दुष्प्राप्य स्थळीं ठेवणें; बहुमोल मानणें. समुद्रांत जाऊन-पडून कोरडा- सुका-१ अमूल्य संधि मिळूनहि ज्यास फायदा झाला नाहीं असा दुदैवी. २ दुष्कर्मांत गढून पुन्हां उजळ माथ्यानें हिंडणारा किंवा नीतीची बढाई मारणारा. समुद्रांत सुई पाहणें, शोधणें- अशक्य किंवा अप्राप्य गोष्टीसाठीं निष्फळ प्रयत्न करणें. सामाशब्द- ॰कफ-पु. समुद्रफेंस; एका माशाचें हाड. समुद्रमाणकी; सिंधुकफ; सुफेन. ॰कमळ-न. एक प्राणि. हा डेसी सारखा असतो. -प्राणिमो १४५. ॰कर्कटी-स्त्री. एक प्राणि -प्राणिमो १३९. ॰कांठ-कांठा किनारा-तीर-पु. समुद्राच्या कांठचा, किनार्याचा प्रदेश. ॰गृह-न. समुद्रकांठीं, किंवा खाडींत वगैरे बांधलेला बंगला; जलंम- दिर; ग्रीष्मगृह. ॰चतुष्टय-न. चार समुद्र; पूर्व, दक्षिण, पश्चिम व उत्तर समुद्र. ॰नारिंग-न. एक प्राणि. -प्राणिमो १३९. ॰पुष्प- न. फुलासारखा एक प्राणि; समुद्रकमळ. -भूवर्णन, काबा मराठे ८३. ॰फळ-ल-न. एक औषधी फळ. याचें झाड समुद्रकिनारीं असून पानें बदामाच्या पानांसारखीं असतात. ॰फेण-फेन-फेस माणकी-पुस्त्री. एक माशाचें हाड, पाठ; एक औषधी पदार्थ. -प्राणिमो ९५. ॰मेखला-स्त्री.पृथ्वी; वसुंधरा; भू (सभोंवती समुद्राचें कडें आहे म्हणून). ॰वलयांकित-वि. समुद्रानें वेढ- लेली (पृथ्वी). 'समुद्रबलयांकित पृथ्वीचें दान । करितां समान नये नामा ।' -तुगा २४९४. ॰शोक-शोफ-शोष-सोक- सोख॰-पु. एक औषधी वेल. [सं. समुद्रशोष] ॰स्नान-न. समुद्राच्या पाण्यानें केलेली आंघोळ. समुद्राची दांडी-स्त्री. समुद्रकिनार्यावर जेथें लाटा फुटतात ती जागा; समुद्रकिनार्या जवळ जो वाळूचा बांध तयार होतो तो. समुद्रिय-वि. समुद्रा- संबंधीं; समुद्रविषयक; समुद्रोद्भव.
उतार
पु. १ पलीकडील तीरास चालत जातां येण्यासारखी पाण्यामधील वाट. 'तो पव्हण्याहूनि पायउतारा ।।' -ज्ञा ५.१६५. २ एखाद्या औषधाची तीव्रता, जोर कमी करण्याकरितां दिलेलें औषध. ३ विषावरील वगैरे औषध, मंत्र, उपाय, इलाज, प्रतिकार. 'जेणें विष पाजिलें दुर्धर । तोचि करूं धांवे उतार ।' -ह १४.१६२. ४ सन्मान, संतोष दाखविण्याच्या वेळीं अंगावरील पोषाख अथवा दागिने बक्षीस देणें. अंगावरील उतरून देणें. ५ कमी होणें; ओसरणें. (नदीचा पूर, रोगाची तीव्रता, दुःख, वैभव, कीर्ति, संपत्ति वगैरे). र्हास; शांति; शमन. ६ जमिनीचा उतरतेपणा; ढाळ; उतरण. ७ चौघड्याच्या अखेरीस वाजविण्याची जलद गति; बाजा. ८ होडीचें, तरीचें भाडें; होडींतून पलीकडे जाण्याचें भाडें; नोर. ९ नक्कल. 'उतार ग्रंथाचा असे लिहिवणें ।।' -दावि २५०. १० उतारा; एका ग्रंथांतील दुसर्या ग्रंथात घेतलेला भाग. 'त्याचि कथेचा आला काहींसा या उतार कवनांत ।' -मोअनुशासन ८.९८. ११ पालट होणें; बदलणें; तीव्रता कमी होणें. 'परंतु जनकोजी शिंदे यांचे बुद्धीस उतार पडेना.' -भाब ९५. [सं. उत् + त, -उत्तार] -वि. १ उतार वय होण्याच्या मार्गास लागलेला; वृद्धत्व आलेला. २ हीण; हिणकस; दुय्यम प्रतीचा; चढ याच्या उलट. ३ नाशाच्या पंथास लागलेला; मोडकळीस आलेला; र्हास होण्याच्या मार्गास लाग- लेला; मंदीचा; तोट्यांत चाललेला. सामाशब्द-उतार खर्च-पत्र-पान-औषध-गोळी-पुडी-मात्रा-मोल-मोली-डाव-वाट-रंग-काळ-चावडी-मंत्र-मार्ग-मसलत-बेत. ॰खालीं असणें-पडणें- अपकर्षास लागणें; निकृष्ट स्थिति प्राप्त होत जाणें; ओहोटी लागणें; उतरती कळा लागणें; मंदी येणें. ॰खालीं चालणें-गति कमी करणें. ॰करी-करू-पु. १ मुशाफर; प्रवासी; पांथस्थ; तात्पुरता मुक्काम करणारा-केलेला. २ द्रव्य वगैरे देऊन नदीपार जाणारा. ॰घाट-पु. नदीवरील पायर्यांचा रस्ता. ॰घात-पु. (गो.) विश्वासघात. [उत्तर + घात] ॰चढ-स्त्री. १ खालीं वर होण्याची क्रिया; कमी अधिक होण्याची क्रिया (आजार, माणूस वगैरेंची); क्षयवृद्धि; उत्कर्षापकर्ष. २ एखाद्या प्रदेशाचा उंचसखलपणा. ३ किंमतीमध्यें कमीजास्तपणा होणें; भावांत बदल. ४ ताप कमीअधिक होणें. ॰चावडी-स्त्री. १ खेड्यांतील पांथस्थ वगैरे जींत उतरतात ती चावडी; डाक- बंगला; धर्मशाळा. २ (ल.) पाहुणे उतरण्याची जागा; अतिथि- घर. ॰चिठी- स्त्री. १ जलमार्गावरून प्रवास करण्याचा परवाना. २ नक्कल; रद्द केलेलें खत-पत्र (पूर्वी वरील श्रीकार खोडून, फाडून खत रद्द करण्याची पद्धत असे). ३ विष वगैरे उतरावें म्हणून बांधलेली- मंतरलेली चिठी, कागद. ४ कोणत्याहि लेखाची नक्कल. ५ (थट्टेनें) बडतर्फीचा हुकूम. ॰जमीन-स्त्री. सखल होत जाणारी जमीन; उतरण. ॰तसरीफ-स्त्री. एखाद्याचा सन्मान करण्याकरितां स्वतःच्या अंगावरून काढून दिलेलीं वस्त्रें. उतार अर्थ ४ पहा. [अर. तसरीफ् = सन्मान; बहुमानाचीं वस्त्रें देणें] ॰तळ-पु. माणसें, गाड्या उत- रण्याची गांवाबाहेरील जागा; अड्डा, गाडीतळ; वाटेंतील मुक्कामाची जागा. ॰तेज-वि. १ ज्याचें तेज कमी झालें आहे असा. २ क्षीण; निस्तेज; निःसत्त्व; निःशक्त. ॰तोंड-न. ज्यापासून घाट उतर- ण्यास सुरुवात होते ती डोंगरांतील जागा; उतरणीचा आरंभ. ॰दिवस-पु. १ आयुष्याचे अखेरचे दिवस; वार्धक्य. २ आप- त्काळ. ॰पातार-बितार-पु. १ सर्वसामान्य प्रवासखर्च. २ तरीचें भाडें; वाहनाचें भाडें; उतार. ३ मार्गावरील कर, जकात वगैरे. ॰पान-न. १ (गंजीफा-पत्त्यांतील खेळांत) खेळलेलें, खेळा- वयाचें पान. २ हिशेब पुढें चालू केलेलें, करावयाचें पान. ॰पेठ- स्त्री. १ ज्या ठिकाणीं निरनिराळ्या ठिकाणचा माल विकावया- करितां येतो व खरेदी केला जातो असें शहर, बंदर, व्यापारी शहर. उतरपेठ पहा. 'आचाराचें मूळ पीठ ।वेदांची उतारपेठ ।' -ज्ञा १७.२७४. २ उतारतळ पहा. ॰पोषाख-पु. १ अंगावरून उत- रून बक्षीस दिलेलीं वस्त्रें. २ अंगावरून काढून टाकलेलीं जुनीं वस्त्रें. उतार अर्थ ४ पहा. [फा. पोशाक् = वस्त्रें] ॰बंद-पु. ज्या काग- दावर कोणत्याहि गोष्टीची नक्कल काढली आहे असा कागद. -वि. १ उतारावर असलेली, उताराची. २ अपकर्षाप्रत जाणारी. [फा. बन्द्] ॰बंदर-न. १ जलमार्गावरील प्रवासी व माल उतरण्याचें ठिकाण. २ जलमार्गांत लागणारें ओरवा करण्याचें-नांगर टाकण्याचे स्थल. बंदर पहा. [फा. बंदर्] ॰बाजी-स्त्री. १ पत्त्याच्या डावां तील दहिल्यापासून खालचे पत्ते. २ अंगावर येणारा, हार येत असलेला खेळ. ३ चौघड्याच्या अखेरीस जलद वाजविण्याची गत; बाजा. उतार अर्थ ७ पहा. ॰बाजू-स्त्री. (पत्यांच्या खेळांत) ज्या बाजूनें प्रथम पान खालीं टाकावयाचें, उतरावयाचें ती बाजू. ॰मणी, मोहरा-पु. विष उतरविणारें रत्न. ॰मान-पु. १ पाणउतारा; अपमान; अप्रतिष्ठा; अवहेलना. २ वृद्धावस्था; आयु- ष्याची उत्तरावस्था. -वि. (व्यापक) अवमानित; अपमानित; मान- खंडना केलेला. ॰माल-पु. होडींतून पलीकडे पाठवावयाचा माल. ॰वय-न. म्हातारपण; वृद्धावस्था. [सं. उत्तरंवयः] ॰वस्त्र-न. १ जीर्णवस्त्र; फाटलेले कपडे. २ दुसर्यानें अंगावरून काढलेलीं किंवा टाकून दिलेलीं वस्त्रें. 'उमदीं तरी ते उतार वस्त्रें । घालूं नये रे अंगा- वर ।' -दावि ४३९. ॰वेळ-स्त्री. दोन प्रहर दिवस टळल्यावरची वेळ; संध्यासमय.
बारा
वि. १२ हीं संख्या. [सं. द्वादश; प्रा. बारह] (वाप्र.) ॰करणें, बाराचें करणें-म्हणणें, बाराचा फाडा वाचणें, बाराचे लेख वाचणें-सफाईनें किंवा धूर्ततेनें पळून जाणें; पोबारा करणें. ॰गोष्टी-कथा सांगणें-करणें-गाणें, बारापंधरा करणें-सांगणें, बाराबत्तिशा लावणें-असंबद्ध बोलणें; खोट्या सबबी सांगणें; कांहीं तरी सांगणें; धरसोडीनें बोलणें; उघवाउडवी करणें; भाकडकथा सांगणें. ॰वाजणें-(ल.) उतरती कळा लागणें; समाप्त होणें; नाश होणें; दिवाळें निघणें. ॰वाजविणें-(ल.) नाश करणें; विध्वंस करणें. ॰वाटा करणें-उधळून लावणें; उध- ळणें. ॰वाटा पळणें-होणें- १ अजिबात नाहींसा होणें. २ चारी दिशांनीं सैरावैरा पळणें; दाणादाण होऊन पळत सुटणें; (सैन्य इ॰) 'फजिलखान बारा वाटा ।' -ऐपो २१ ॰वाटा उधळिला- जाणें-पैसा, संपत्ति, सांठा इ॰ खर्च होणें. ॰वाटा मोकळ्या होणें-मनमानेल तसें वागण्यास पूर्ण मोकळीक असणें. म्ह॰ पळणारास एक वाट; शोधणारास बारा वाटा. ॰गांवचा(पिंपळा- वरचा) मुंज्या-एके ठिकाणीं न राहतां सदां भटकत असणारा. ॰गांवचें(बंदरचें)पाणी प्यालेला-लफंग्या; वस्ताद; चवचाल; बारा बंदराचें पाणी प्यालेला; फार प्रवास केल्यानें चतुर व धूर्त बनलेला. ॰घरचे बारा-भिन्न भिन्न स्थळांचे भिन्न भिन्न प्रकृतीचे एकच जमलेले लोक; परस्परांशीं कोणत्याहि नात्यानें संबंध नाहीं असे लोक. ॰मांडवांचा वर्हाडी-पु. सदोदित अनेक ठिकाणीं अनेक तर्हेचीं कामें असलेला इसम. बारावें वर्ष पालटणें किंवा लागणें-(ल.) बारा वर्षांच्या मुलाप्रमाणें वर्तन करणें. म्ह॰ १ उदीम करतां सोळा बारा; शेती करतां डोईवर भारा. बारनायकी-स्त्री. १ अव्यवस्थित राज्य; बंडाळीः अराजकता. २ शिरजोर लोकांच्या कारभारामुळें कामांत होणारा घोटाळा बार- भाई-स्त्री. (ल.) १ अनेक मतांच्या, स्वभावांच्या लोकांनीं मिळून केलेलें काम; अनेकांच्या हातीं असलेली सत्ता. २ गोंधळ; अव्य- वस्था. बारभाईचा कारखाना-कारभार-खेती-पुस्त्री. १ अव्यवस्थित कारभार किंवा स्थिति. २ लोकप्रतिनिधींचा कारभार (नारायणराव पेशव्यांच्या वधानंतर नाना फडणवीस, सखाराम बापू इ॰ मुत्सद्यांनीं चालविलेला कारभार). 'बाभाईंचा कारभार दिल्लीस आजपर्यंत कोणत्याहि गृहकलहानंतर चालला नाहीं.' -भाऊ ९६. ३ (ल.) गोंधळ; ज्या कामांत किंवा उद्योगांत पुष्कळ मंडळींचें. अंग असतें आणि प्रत्येक जण यजमानासारखे हुकूम सोडीत असतो परंतु त्या हुकुमांची बजावणी मात्र कोणी करीत नाहीं अशा तर्हेचा गोंधळ.म्ह॰ (व.) बारभाईची खेती प्रजा- पती लागला हातीं = घरांत कारभार करणारे पुष्कळ असले व किणीच जबाबदार नसला तर फायदा होत नाहीं. बारभाईची गाडी- स्त्री. उतारूंची व टपालाची घोडागाडी (इंग्रज कुंपिणीच्या पहिल्या अमदानींत ही गाडी मुंबई-पुणें याच्या दरम्यान होती). बार- भाईचें कारस्थान-न अगदीं भावासारखी एकमतानें वागणारी जी मंडळी तिनें केलेलें कारस्थान; श्री. नारायणराव पेशवे मारले गेल्यानंतर राघोबादादांच्या विरुद्ध कारभारी मंडळीनें केलेला कट. बारमास, बारमहां, बारमाही-क्रिवि. वर्षभर; बारा महिने; सतत. -वि. बारामहिन्यांचें. [बारा + सं. मास; फा. माह्] बार- वर्षी(रशी)सोळवर्षी(रशी), बारावर्षे, सोळावर्षे-पुअव. (बारावर्षींचे व सोळा वर्षांचे) अननुभवी तरुणांची सभा; ज्या व्यवहारांत एकहि प्रौढ मनुष्य नाहीं व सर्व एकजात तरुण आहेत अशी मंडळी. सामाशब्द- बारा अक्षरी- १ रेशमाची एक जात. २ बाराखडी. ॰आदित्य-पुअव. (बारा सूर्य) वर्षांतील सूर्याचीं बारा रूपें. ॰कशी-स्त्री. बार(रा) बंडी-दी; बारकशी. [कसा = बंद] ॰कारू-पुअव. बलुतेदार पहा. बाराखडी, बारस्क(ख)डी- स्त्री. व्यंजनापासून १२ स्वरांच्या मिश्रणानें पूर्ण होणार्या अक्षरांची मालिका. [बारा + अक्षरी] ॰गणी-स्त्री. जमीन मोजण्याचें साठ बिघ्यांचें एक माप ॰जन्म-क्रिवि. बारा जन्मांत; कधींहि नाहीं. ॰जिभ्या, बारजिभ्या-वि. अतिशय खोटें बोलणारा; बडबड्या; विसंगत बोलणारा. [बारा + जीभ] ॰ज्योतिर्लिगें-नअव. शंकराचीं प्रसिद्ध १२ लिंगें तीं: १ सोरटी सोमनाथ (काठेवाड २ मल्लि- कार्जुन (मोंगलाई). ३ महाकालेश्वर (उज्जनी). ४ ओंकार अमलेश्वर (ओंकार मांघाता). ५ परळी वैजनाथ (मोंगलाई). ६ भीमाशंकर (पुणें जिल्हा). ७ अवंढ्या नागनाथ (मोंगलाई). ८ काशीविश्वनाथ (काशीस) ९ त्र्यंबकेश्वर (त्र्यंबक-नाशीक). १० केदारेश्वर (हिमालय). ११ घृष्णेश्वर (वेरूळ-मोंगलाई). १२ रामेश्वर (मद्रास इलाखा). ॰तेरा-पु. भाषणांतील असंबद्धता. (क्रि॰ लावणें; सांगणें; बोलणें). ॰द्वारी, दारी-स्त्री. १ बारा दारें असलेला एक प्रकारचा उन्हाळ्यांत राहण्याचा हवाशीर बंगला किंवा १२ पायवाटा असलेली विहीर. २ (ल.) धंदाउद्योगांतील अव्यवस्थितपणा, पसारा. [हिं. बारादारी] ॰पांच-पु. (कु.) कुडाळदेशकर ब्राह्मण राजवटींतील बारा नाईक व पांच देसाई मिळून एकंदर सतरा मानकरी. ॰बंदी, बारबंदी-डी-स्त्री. बारा- बंद असलेला अंगांत घालण्याचा एक कपडा; बारकशी. ॰बलुतीं- तें-नअव. बलुतेदार पहा. ॰बळी-वळी-पु. जन्मापासून बाराव्या दिवसाचा एक विधि; बारसें. 'गरोदरेसि प्रसूति होये । पुत्रजन्में सुखावली ठाये । तेही बाराबळी जैं पाहे । तैं भौगूं लाहे पुत्रसुख ।' अधिकार्याचे वसुलापैकीं बारा हक्क. २ विवाह किंवा मोहतूर इ॰ कांच्या वेळचे पाटलाचे बारा हक्क (विडा, टिळा, शेला, वाटी, गणसवा- शीण इ॰). ३ शेतकरी किंवा महार यांचे लग्न इ॰ बाबतींतील बारा हक्क. ४ बारा बलुतेदारांपैकीं प्रत्येकाचे बारा हक्क. ५ (ल.) लंगड्या सबबी; पाल्हाळिक व मूर्खपणाचें भाषण; गडबडगुंडा. (क्रि॰ सांगणें). ॰बाबू-बापू-भाई(बारभाई)-घरचे बारा- निरनिराळ्या उद्देशांचा व भिन्नभिन्न स्वभावांचा परंतु एका कार्याकरतां एकत्र झालेला लोकसमूह; तसेंच या लोकांचा (घोटाळ्यांचा) कार- भार; अनेकांच्या हातीं असलेली सत्ता. ॰बाविशा-स्त्रीअव. ग्रामाधिकार्यांचे हक्क. 'गांवामध्यें बाराबाविशा रामजी पालटाच्या आहेत.' [बारा + बावीस] ॰बोड्याचा-वि. (कुण.) एक शिवी; जारज. ॰भट-वि. सदोदित आंगतुकी करणारा. ॰भुजां- भुजांबळ-न. (गो.) पुष्कळ शक्ति. [बारा + भुज = हात] ॰महाल- पुअव. राज्यकारभाराच्या सोयीसाठीं केलेलीं सरकारी कामांचीं निरनिराळीं १२ खातीं. हीं पुढील प्रमाणें:-पोतें, कोठी, पागा, दरजी, टंकसाळ, सौदागिरी, इमारत, हवेली, पालखी, थट्टी, चौबिना व शरीमहाल. ॰महिने-पुअव. वर्षाचे महिने:-चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ (आखाड). श्रावण, भाद्रपद (भादवा), आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष(शीर), पौष(पूस), माघ, व फाल्गुन(शिमगा). हीं नावें अनुक्रमें पुढील नक्षत्रांवरून पडलीं आहेत:-चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, आषाढा, श्रवण, भाद्रपदा, आश्विनी, कृत्तिका, मृगशीर्ष, पुष्य, मघा, फाल्गुनी दर पौर्णिमेस या या नक्षत्रीं चंद्र असतो. बारा महिन्यांचीं प्राचीन संस्कृत नावें:-मधु, माधव, शुक्र, शुचि, नभस्, नभस्य, इष, ऊर्ज, सहस, सहस्य, तपस्, तपस्य. -क्रिवि. बाराहि महिनेपर्यंत; सगळ्यां वर्षभर. बारा महिने तेरा काळ-क्रिवि. सदोदित; नेहमीं ॰मावळें-नअव. पुण्या पासून शिरवळपर्यंतचीं सह्याद्रीच्या पूर्व उतरणीवरील १२ खोरीं तीं:-अंदर, नाणें, पवन, घोटण, पौड, मोसें, मुठें, गुंजण, वेळवंड, भोर, शिवतर व हिरडसमावळ. -मुलांचा महाराष्ट्र २०. ॰माशी- वि. वर्षाच्या सगळ्या महिन्यांत येणारें किंवा असणारें (आंबा, फणस, फूल इ॰). ॰माशी खरबूज-न. खरबुजाची एक जात. ॰रांड्या-पु. रंडीबाज मनुष्य. ॰राशी-स्त्रीअव. (ज्यो.) क्रांतिवृत्ताचे बारा विभाग. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धन, मकर, कुंभ व मीन. ॰लग्नेंनअव. (ज्यो.) ज्या वेळीं जी रास क्षितिजावर उदयस्थानीं असते तें त्या वेळचें लग्न. याप्रमाणें १२ लग्नें आहेत. बाराराशी पहा. ॰वफात-पु. रबिउ- लावल महिन्यांतील बारावा दिवस. या दिवशीं महमद पैगंबराची पुण्यतिथि असल्यानें हा दिवस मुसलमान लोक सण म्हणून साजरा करतात. [अर. वफात् = मृत्यु] ॰वा-पु. माणसाच्या मृत्यूच्या बाराव्या दिवशीं करावयाचा श्राद्धादि विधि. -वि. अनुक्रमानें मोजलें असतां ११ च्या पुढील. ॰वा बृहस्पति असणें-(ल.) वैर असणें; उभा दावा असणें (जन्म राशीपासून बाराव्या राशींत गुरु असल्यास तो त्या माणसास फार दुःख देतो त्यावरून). ॰वादी-स्त्री. चपलांची, वाहणांची एक जात, प्रकार. ॰सहस्त्री- पु. बाराहजार फौजेचा सरदार. 'आटोळे सेना-बारा सहस्त्री ।' -मराचिथोरा ५२. ॰सोळा-स्त्रीअव. सूर्याच्या बारा व चंद्राच्या सोळा कळा. 'आटूनियां हेमकळा । आटणी आटल्या बारासोळा ।' -एरुस्व ७.५०. ॰हक्कदार-पुअव. हक्क असलेले खेड्यांतील वंशपरंपरेचे बारा हक्कदार:-देशमुख, देशपांडे, कुळकर्णी, पानसरे, शेट्या इ॰ ॰क्षरी-स्त्री. बाराखडी पहा. 'बाराक्षरि एका सारखी ।' -ऋ ७६. [बारा + अक्षर] बारु-रो-ला-ली, बारोला-ली, बारोळा-वि. बारा पायल्यांचा (मण, खडी, माप). बारोत्तर-वि. एखाद्या संख्येहून अधिक बारा. 'शके बाराशतें बारोत्तरें ।' -ज्ञा १८.१८१०. [बारा + उत्तर] बारोत्रा-पु. १ व्याजाच्या रकमेचा बारावा भाग (या भागाची सूट देतात). २ दरसालदरशेंकडा बारा या दराप्रमाणें व्याज. [बारा + उत्तर]