आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
बखल
बखल bakhala n C An old, broken, or bruised metal vessel. 2 A chip flying off; as मडक्याचें ब0-नार- ळाचें ब0-डोकीचें ब0-उडालें.
बखल n An old metal vessel. A chip flying off.
न. (कों.) १ फुटकें, पोंचटलेलें धातूचें भांडें. २ कपची; ढलपी; तुकडा. 'नारळाचें-डोकीचें-बखल उडालें.' [भक्कल]
स्त्री. १ खोलगट जागा. २ तळ; बूड. ३ पोकळी. [सखल ?]
बखळ
बखळ bakhaḷa a Open and clear--space. 2 Plentiful, copious, exuberant (in number or in quantity), many or much.
बखळ bakhaḷa f Open or clear space (in a village or on ground); space not built upon or cultivated; any void spot. 2 fig. An extensive and desert tract: also unoccupied space around or in a house. 3 (Commonly भकाळी or भकाटी) The depression in, or the depressed state of, the flanks and belly from fasting. v पड, बस. 4 Applied also to a sinking or hollow in a roof, floor &c. v पाड, पड.
बखळ a Open and clear. Plentiful, exuberent.
बखळ f Open or clear space (in a village or on ground); space not built upon. An extensive and desert tract. The depression in the flanks and belly from fasting.
स्त्री० रिकामी जागा, इमारतीशिवाय जागा. २ वि० पुष्कळ.
संबंधित शब्द
आंगण
(सं) न० अंगण, मैदान, परसू. २ बखळ.
बाड
(व.) (कापूस वठण्याचें जिनिंग मशीन येण्यापूर्वीं अशा जागीं पूर्वीं हतरीवर कापूस वठीत असत परंतु हल्ली गुरें बांध- तात यावरून) बखळ; आवार; मोकळी जागा; गोठा; कापसाचें आखें दाबण्याची जागा. -स्त्री. (गो.) स्थावर संपत्ति.
बख(ख्ख)ळ
स्त्री. १ उघडी, मोकळी जागा, अंगण. २ घरें इ॰ न बांधलेली किंवा लागवड न केलेली जागा. ३ पडून राहिलेली किंवा पडीक जागा; पडक्या घराची मोकळी जागा. ४ (ल.) विस्तीर्ण व वैराण प्रदेश; ओसाड जागा. ५ घरांतील, त्या भोंवतालची रिकामी जागा. ६ (विरू. भकाळी, भकाटी) उपासा- मुळें पोटाला पडलेली खळी, खळगा. (क्रि॰ पडणें; बसणें). ७ छपर, भुई इ॰वरील पोकळ, खोलगट जागा. (क्रि॰ पाडणें; पडणें). [का. बक्कल = मोरी, गटार] -वि. १ खुली स्वच्छ (जागा). २ पुष्कळ; विपुल; मुबलक (संख्येनें, परिमाणानें). 'त्या विहिरीला बखळ पाणी आहे.' [भक्कळ]
बखला
बखला bakhalā m A detached crust; a scaling or peeling off.
बखया
स्त्री. रिकामी जागा; न व्यापलेली जागा (खेड्यां- तील, घराभोंवतालची इ॰). [बखळ]
भका(क)ळणें
क्रि. १ (राजा.) (उपवासानें) पोट आंत जाणें, खोल जाणें. २ बखल पोटाचा असणें (मनुष्य). [भकाळी]
खपाट, खपाटा, खपाटी, खपारी
न. पु. स्त्री. १. रिकामे पोट. २. खबदड; पोकळ भाग; खळगा; भोक; भेग; बळद; बीळ. (वा.) खपाटा बसणे, खपाटी बसणे, खपारी बसणे, खपाटे बसणे, खपाट बसणे, खपाट्या बसणे - उपास इ. मुळे पोटाला खळगा पडणे, पोट बखळ होणे. खपाट वळणे, खपाटा वळणे, खपाटी वळणे, खपारी वळणे - पोट खाली जाणे : ‘कोणाचीं अन्नाविणें खपाटें वळलीं आहेत.’ - निबंध ५१०. खपाट जाणे, खपाटा जाणे, खपाटी जाणे, खपारी जाणे - रिकामे होणे; सपाट होणे : ‘कारण त्यांच्या दुकानातील बहुतेक सारी पोती अन् डबे खपाटी गेले होते.’ - बाविबु.
खपाट-टा-टी, खपारी
नपु. १ रिकामें पोट. 'कोणाचीं अन्नाविणें खपाटें वळलीं आहेत,' -नि ५१०. 'पोटास खपाटा बसला-झाला.' २ खबदड; पोकळ भाग; खळगा; भोंक; भेग; बळद; बीळ. खपाटें-न. अव. (चि.) गालफडें; कानशिलें इ॰. खपाटें, खपाट्या बसणें-न. उपास इ॰ पासून पोटाला खळगा पडणें, पोट बखळ होणें. [सं. कपाट]
रीठ
न. (ना. व.) १ बखळ; पडक्या घराची जागा; पूर्वी वस्ती असलेली परंतु सध्यां नसून ओसाड पडलेली जागा. २ ओसाड व मोडकळीस आलेलें घर, घराचें भग्नावशेष. (वाप्र.) रिठावर दिवा लागणार नाहीं-नि:संतान होऊन घर पडून त्याचें रीठ होईल व तेथें कोणीहि घर बांधणार नाहीं.
सतसय
सतसय satasaya ad C (सततसोई) In a regular and continuous line or row; directly and uninterruptedly along. Ex. ह्या वेशीपासून त्या वेशीपावेतों स0 घरें लागत गेलीं आहेत मध्यें एकही बखळ पडली नाहीं.