तेरा मराठी शब्दकोशांमधील ३,००,८७५ शब्दांचा एकत्रित संग्रह
शब्दार्थ
बद
वि. वाईट; नीच (विशेषतः समासांत उपयोग). [सं. वध; फा. बद्; इं. बॅड] सामाशब्द- ॰मल-अम्म(म)ल-अमली- पुस्त्री. १ दुष्कर्म; व्यभिचार; अविवाहित स्त्रीशीं गमन. 'सन्तु जाधवीण, तिनें बद-अमल केला.' -ख ८.४२१३. २ हराम खोरी. 'बद-अमली करून बसल्यास रुपये श्रीमन्तांचे सुटतात असें नाहीं.' -ख ७.३७५५. ३ गैरवर्तणूक; जेबंदशाही. 'मुलकांत बद-अमली जाली आहे.' -दिमरा १.२२४. [फा.] ॰अहदी- कौली-स्त्री. १ वचनभंग; शब्दाप्रमाणें वर्तन न करणें. 'टिपू बहादूर यांनीं बद-अहदी केल्यास तिन्हीं सर्कारांनीं एक होऊन त्याची तम्बी करावी.' -रा ७.२. २ गैर-सलूक; अमैत्री. [फा.] ॰कर्म-ख्याली-नस्त्री. बद अम्मल; व्यभिचार [फा] ॰ख्याल- ली-वि. बदफैल; व्यभिचारी. ॰गोई-स्त्री. अपभाषण; निंदा. 'लाइणी-बद-गोई केली.' -रा २०.२२०. [फा.] ॰दिली- स्त्री. १ भ्याडपणा. २ वहीमखोरी. ॰दील-वि. १ भ्याड. २ संशयी; वहीमखोर. -हिंब २६१. [फा.] ॰दुवा-स्त्री. बेदुवा; शाप. 'बद-दुवा दिल्ही कीं या दोघांचा खाणा खराब.' -मदरु १.११८. [फा] ॰नकशा-क्षा-क्ष-नाम-नामी-पुनस्त्री. पाण- उतारा; मानखण्डना; दुर्लौंकिक; अप्रतिष्ठा; बेअब्रू. 'लोकांत बद- नक्ष होय तें न कीजे.' -रा ८.२१३. [फा.] ॰नजर-स्त्री. १ वाईट दृष्टि कुवासना. 'दर्यामध्यें टोपीकरांची बद-नजर.' -वाडमा १.३४०. २. वैर. -ख ७.३५६६. ३ बेभरंवसा; बेविश्वास. [फा.] ॰नाम-वि. बेअब्रू असलेली, झालेला; मान- खण्डित; कुप्रसिद्ध., 'पुढें ऐसी बद-रहा वर्तणूक करून बद-नाम न होणें.' -रा १५.३८१. [फा.] ॰नियत-नेत-नेक-स्त्रीपु. सवामिद्रोह; हरामखोरी. 'महाराजांचे पायाशीं सेनापतीनें बद- नेत धरिला.' -मराचिथोशा ४९. [फा.] ॰नियती-वि. स्वामि- -जोरा ९. ॰फैल-पु. १ कुकर्म; दुर्वर्तन; दुर्व्यसन. २ स्वामि- द्रोह. 'नाहींतर बदफैल करून फन्द कराल तर जावली मारून तुम्हांस कैद करून ठेऊं.' -ऐस्फुले १.२४. ३ -वि. कुकर्मी; रंडीबाज. [अर. फिअल् = कर्म] ॰फैलीस्त्री. १ बदफैलाचें कर्म; (मुख्यत्वें) रंडीबाजी; सोदेगिरी. २ गैरवर्तन. ३ -वि. कुकर्मी; व्यभिचारी; पापाचरण करणारा. ॰बोई-बोय-स्त्री. १ घाण; दुर्गंध. २ (ल.) बेअब्रू; अपमान; दुर्लौकिक. [फा. बदबू] ॰मस्त- वि. १ गर्वानें मत्त झालेला; धुंद; उन्मत्त. २ बंडखोर. 'गलीम बहुत बदमस्त जोरावर जाहला.' -पाब १२. [फा.] ॰मस्ती- स्त्री. १ उद्धटपणा; ताठा; अभिमान; मगरूरी; अरेरावी. २ बंड- खोरी; बंड. [फा.] ॰मामला-ली-पुस्त्री. १ कहराचें व दंडेलीचें वर्तन; दांडगाई (मुख्यत्वें पैशाच्या मागणीचा प्रतिकार करणारांचें). २ अन्याय. 'साष्टीचें ठाणें इंग्रजानें बदमामली करून घेतलें.' -वाडसमा २.१९. ३ हरामखोरी; बेइमानी. ४ गोंधळ; अव्य- वस्था. ५ भित्रेपणा. -वि. १ लुच्चा; हरामखोर. 'इंग्रज फार बद-मामली आहेत.' -रा १२.६. [फा.] ॰मास-श-ष-वि. १ वाईट रीतीनें उपजीविका करणारा. २ (ल.) दुराचरणी; गुंड; पुंड. [फा. मआष = उपजीविका] ॰माशगिरी-स्त्री. गुंडगिरी; पुंडपणा. ॰रंग-पु. १ नष्ट, भग्न झालेला मान, ऐश्वर्य, थाटमाट. २ ऐश्वर्य इ॰ च्या भंगानें झालेला अपमान; मानखंडना; उपहास. ३ बेरंग. ॰रस्ता-रहा-राह-पु. वाईट किंवा गैर चाल, वर्तन; अन्याय. 'हे बदरहाची कैफियत.' -ख ७.३५७०. [फा.] बदराई-राह-हा-ही-वि. १ बदकर्मानें वागणारा; कुमार्गी. 'बदराईच्या पाडी दाढा । लागे तुकयाचा हुंदाडा ।' -तुगा २८२४. २ -क्रिवि. कुमार्गानें. 'कोणी बद-राह वर्ततील तर तुम्हां लोकांनीं बुद्धिवाद सांगावा.' -रा ८.१२६. [फा.] ॰लाभ-नाम- नामी, बदलौकिक-वकर-वकरी-वक्र-वक्री-नपुस्त्री. १ दुर्लौकिक; बेअब्रू; अपकींर्ति; बदनामी. २ अयोग्य आरोप; दोष; ठपका; दुर्निमित्त. (क्रि॰ घालणें; ठेवणें; आणणें; येणें). -वि. कलंकित; दुर्लौकिक झालेला. 'आम्हास बदलाम करूं नये. ' -ख १०.५६२९. 'नबाब बुद्धिवन्त होत्साता हे बुद्धि वृद्धापकाळीं करून बद-वक्र करून घेतला.' -ब्रप ४५. [फा.] ॰वख्त-वि. दुर्दैवी. [फा.] ॰सलूक-पुस्त्री. गैर वर्तणूक; अन्याय. [फा.] ॰सल्ला- स्त्री. वाईट मसलत. ॰सल्लागार-पु. वाईट मसलत देणारा. [फा.] ॰सुरत-वि. अवलक्षणी मुद्रेचा; कुरूप. [फा.] ॰सूर- वि. वाईट स्वराचा, आवाजाचा; बेसूर (गाणें, वाद्य). [फा.] ॰हवई-स्त्री. १ खोटी बातमी; हवेंतील गप्प. -वि. विशेष खोटी; अगदींच वार्यावरची. 'अशा बदहवई आवया उठवितील त्यांत जीव नाहीं.' -ख १.१९३. [फा.] ॰हवा-स्त्री. दुर्दिन; वाईट हवा. [फा.]
बद bada a ( P) Bad. Only in comp., but this abundantly, and whether with elegance or propriety or in gross violation of both. Examples follow.
बद bada ad (Commonly बद्द) Fully, to the full &c.
बद bada m ( H) A venereal bubo. 2 The hole or ring at marbles.
न. (व.) भुकटी; पीठ. 'राळेचें बद विकत मिळतें.'
बद m A venereal bubo. ad Fully. a Bad. Only in comp.
पुन. १ गर्मीमुळें होणारें गळूं किंवा उठाणूं. २ (गोट्यांचा खेळ) गोटी टाकण्यासाठीं केलेली लहानशी खाच; गल. ३ (व.) ठेंगणी, सखल जागा. ४ -स्त्री. (विटीदांडू) पांचव्या दांडूचें अंतर किंवा तोला. (क्रि॰ मारणें). [हिं. बद]
(फा) वि० वाईट. २ रोगविशेष.
(वि.) हिंदी अर्थ : बुरा, खराव. मराठी अर्थ : वाट.
हिंदी अर्थ : बुरा मराठी अर्थ : वाट उदाहरण : बदचलन, बदमाश
क्रिवि. पुरतेपणीं; पुरा होईतों; कांठोकांठ इ॰ [बद्द ध्व.]
न० उपदंशविकारविशेष.
बद
[फा. बद्] वाईट.
बद सूरत
(वि.) हिंदी अर्थ : बद शक्ल. मराठी अर्थ : कुरूप.
बड
पु. चव काढण्याकरितां सारख्या आकाराच्या मोत्याचें वेगवेगळें वजन करण्याची क्रिया.
बद अमाल
(वि.) हिंदी अर्थ : बदचलन. मराठी अर्थ : दुराचारी.
बद अमली
(स्त्री.) हिंदी व मराठी अर्थ : कुप्रबंध, अराजकता.
बद अवलादीचा
वि. जारज; संकरज. [फा.]
बद बू
(स्त्री.) हिंदी अर्थ : खराब बू. मराठी अर्थ : दुर्गंध, वाअीट वास.
बद(द्द)ल
पुस्त्री. १ पालट; फेर; फरक; अंतर. (क्रि॰ करणें). २ मनाचा पालट, फेर. (क्रि॰ घेणें). ३ आपल्या वचनापासून फिरणें; माघार; उलट. (क्रि॰ खाणें). -वि. उलट; भलतें. 'इक- डून ऐवज पावला असतां बदल गोष्ट सांगितल्यास ऐवज माघारा घ्यावा.' -ख ११.५६६०. -शअ. १ करितां; बदला; विनिमयानें. २ जगीं; ऐवजी. 'पागोट्याबदल हा शेला देतो.' ३ कारणें; साठीं. 'अध्ययनाबदल त्या गावांत राहणें प्राप्त आहे.' ४ मुळें. 'पावसाबद्दल हत्ती, घोडे, उंटें बहुत मेलीं.' -मराचिथोशा ६२. [अर. बदल्] ॰देणें-सक्रि. मोबदला देणें; खर्चाकरितां देणें. 'बदल बदलाचें लग्न-न. साटेंलोटें; दोन घराण्यांनीं परस्परांच्या घरीं मुली देणें व त्यांच्या करणें. ॰खातर-शअ. साठीं; कारणें; मुळें. ॰मुशारा-पु. रोख ऐनजिनसी, जमिनीच्या रूपानें सरकारी नोकरांस दिलेला पगार, वेतन, मुशारा बदलणें-सक्रि १ पाल टणें; फेरफार करणें. २ फिरविणें; परतणें; वेगळें बनविणें. ३ एक सोडून दुसरें घेणें.बदलूनबदलून, अदलुन बदलून-क्रिवि. आलटून पालटून.बदलणें-अक्रि. १ (सामान्यतः व ल.) बदल होणें. २ उलटणें; बंड करणें. ३ नाकबूल जाणें. ४ परत फिरणें (प्रतिज्ञेपासून, कृत्यापासून). बदलून-उलटून-फिरून पडणें- अंगावर येणें; प्रतिकूल होणें. बदला-पु. १ बदलून घेण्याकरितां परत केलेलें नाणें. २ सूड; फेड; उट्टें; प्रतिक्रिया. (क्रि॰ घेणें). ३ मुशारा; वेतन. ४ एकाच्या ऐवजीं दुसरें घेणें. ५ रोख्याची किंमत वाढेल या अपेक्षेनें 'बैल' नें तो खरेदी केला असतां पटावटीच्या वेळीं व्यवहार पुढें ढकलण्यासाठीं द्याव्या लागणार्या व्याजाचा दर. -वा. गो. काळेकृत व्यापारी उलाढाली. -शअ. करितां; जागीं; कारणें. बदलाबदल-ली-स्त्री. विनिमय; अदलाबदल; उलटापालट बदला मुबादला-पु. चलन, पैसे बदलणें; सराफी.बदलाई- स्त्री. उलटापालट. ॰करणें-बदलाईस येणें- १ माघार घेणें; परत फिरणें (कामापासून). २ प्रतिकूल होणें; नाकबूल करणें (हक्क इ ॰). बदली-पुस्त्री. १ बदलणें; फिरवणूक; पालट (संत्रीपाहारा, संरक्षक, सैन्याची टोळी इ॰ चा). २ तात्पुरती सुटका करण्यासाठीं दिलेला मनुष्य, टोळी. ३ बदल्या; एकाबद्दल दुसरा दिलेला मनुष्य. ४ दुसर्या स्थळीं नेमणूक. ५ मोबदला; विनियम [हिं.]
बद दुआ
(स्त्री.) हिंदी अर्थ : बुरी दुआ. मराठी अर्थ : शाप.
(बद) दुआ लगना
हिंदी अर्थ : शाप पडना मराठी अर्थ : शाप लागणें.
बद दयानत
(वि.) हिंदी अर्थ : खराब नीयतवाला. मराठी अर्थ : वाअीट अिच्छा असणारा.
बद ज़ेब
(वि.) हिंदी अर्थ : भद्दा. मराठी अर्थ : कुरूप.
बद गो
(वि.) हिंदी अर्थ : बुरी बातें कहनेवाला, चुगलखोर. मराठी अर्थ : बरें वाअीट बोलणारा, चाहड्या सांगणारा.
बद हज़मी
(स्त्री.) हिंदी अर्थ : हज़म न होना. मराठी अर्थ : अपचन.
बद(त)का
पु. १ मुष्टिप्रहार; ठोसा; गुद्दा. २ (लोणी, शेण, चिखल इ॰) मृदु पदार्थाचा लहान गोळा. [ध्व.]
बद(त)खल
न. दबलेली, खोलगट, अथवा सखल जागा, तळ, पात्र; लवण. 'तें गांव बदखलांत आहे.' -स्त्री. फतकल; ऐसपैस घातलेली मांडी. -वि. १ खोलगट (जमीन). २ ठेंगू (माणूस, जनावर). ३ थबकल; बसकट (ताट, इमारत इ॰).
बद खू
(वि.) हिंदी अर्थ : खराब आदत वाला. मराठी अर्थ : वाअीट संवयीचा.
बद ख्वाह
(वि.) हिंदी अर्थ : बुरा या अशुभ चाहनेवाला. मराठी अर्थ : वाअीट अिच्छा असणारा, वाळगणारा.
बद लगाम
(वि.) हिंदी अर्थ : जो लगामका संकेत या जोर न माने, जो बोलते समय भले बुरेका खयाल न रखे. मराठी अर्थ : ज्याचें बोलतांना बऱ्या वाअीट गोष्टीकडे लक्ष नसतें असा.
बद मिजाज़
(वि.) हिंदी अर्थ : दुष्ट स्वभाववाला. मराठी अर्थ : वाअीट स्वभावाचा.
बद मस्त
(वि.) हिंदी अर्थ : नशेमें चूर, मत्त. मराठी अर्थ : निशांत गुंग.
बद मुआमिला
(वि.) हिंदी व मराठी अर्थ : जिसका व्यवहार ठीक न हो बेअिमान.
बद परहेज़
(वि.) हिंदी व मराठी अर्थ : असंयमी.
बद फ़ेल
(पु.) हिंदी अर्थ : बुरा काम, कुकर्मी. मराठी अर्थ : कुकर्म, कुकर्मी.
बद फ़ेली
(स्त्री.) हिंदी अर्थ : बुरा काम करनेवाला. मराठी अर्थ : वाअीट आचरणाचा.
बद राह
(वि.) हिंदी व मराठी अर्थ : कुमार्गी, कुमार्ग.
बद तर
(वि.) हिंदी अर्थ : ज्यादा खराब. मराठी अर्थ : फारच वाअीट.
बद्द / बद
(सं) वि० भरलेला, पूर्ण. २ नवाजणारा, वाईट, बोद.
जुब्द(बद)तुल्-आमासील(एकान्)वल्
थोरांत व समवयस्कांत श्रेष्ठ. 'जुबदतुल अमासील बल एकरान दत्ताजी देशमुख.' -रा २०.२१४. [अर. झुब्द = सार, नवनीत; फा.]
झु(झुं)बड
स्त्री. १ दाटी; गर्दी; झिंबड; खेचाखेच; भोंवतीं गोळा होणें. 'तसेंच त्याच्याही पलीकडे नैऋत्येकडे उडालेली अशीच झुंबडही सहज दिसेल.' -पार्ल ४५. (क्रि॰ घालणें; पडणें). २ झिंबड पहा. [तुल॰ अर. झुमरा = गर्दी; दाटी]
संबंधित शब्द
जल्प-जल्पना
पुस्त्री बडबड; वल्गना; बरळणें; मूर्ख- पणाच्या गप्पा; बढाईचें, प्रौढीचें भाषण 'मातला हस्ती क्षोभला सर्पु । भ्रष्टला ब्राम्हण पेटला द्वीपु । १६.१६९ जल्पक-वि. बड- बड्या; निंदक 'आतित्याई जल्पक । -दा २.३.२६. जल्पणे- अक्रि. १ प्रौढी सांगणें: गर्व वाहणें २ बडबडणें पोकळ बढाया मारणें -सक्रि बोलणें उच्चार करणें. 'सदा परनिंदा जल्पती । सीतासती तेथें कैची । [सं जल्प् = बडबडणें] ॰वाद-पु बड- बड; जल्पना 'अहं ममतेचिया जल्पवादीं । -ज्ञा ७ ०६
वाचा
स्त्री. १ वाक्; वाणी; वागिंद्रिय. २ भाषण; बोलणें; शब्द; वचन; बोल. 'वदलासि न तूं कधींहि अशी वाचा ।' -मोकर्ण ५.३७. ३ आकाशवाणी; अशरीरिणी वाक्. ४ अव- सरणी. [सं. वच् = बोलणें] वाचा उकठणें-पालटणें-परतणें- फिरणें-मुरडणें-बोलणें खुंटणें; बोलणें खोटें पडणें; मागें घेण्याची पाळी येणें; गप्प बसावें लागणें. वाचा नरकांत घालविणें-खोटें बोलणें; वचन मागें घेणें. वाचा फुटणें-बोल- ण्याची शक्ति येणें. वाचा बसणें-बोलण्याची शक्ति नाहींशीं होणें; वाणी खुंटणें; बोबडी वळणें. वाचा विटाळणें-१ खोटें बोलणें; वचन न पाळणें. २ व्यर्थ भीड घालणें; निरर्थक शब्द वेंचणें, खर्च करणें. ॰ट-ल-ळ-वि. बडबड्या; बोलका; बोल- घेवडा; वटवट करणारा. 'वाचाट हा चाट वदोन राहे ।' -सारुह ८.१५. (वाप्र.) ॰दत्त-वि. १ वाग्दत्त; वाणीनें दिलेलें; वाङ्- निश्चित. २ वचनानें दिलेलें; कबूल केलेलें. ॰बरळ-वि. बड- बड्या; बरळणारा. 'गुरूतें वाचाबरळ ।' -विपू २.६. ॰रंभण- न. परिस्फुटता; स्पष्टपणें वाचेनें निदर्शन; बोलण्यांत रूढी. 'राष्ट्रीय शिक्षणाच्या कल्पनेला वाचारंभण किंवा नामधेय अजून मिळालें नव्हतें ।' -टिळकचरित्र १. ॰विदळ-वि. (बो.) वाचाट; वात्रट; अद्वातद्वा बोलणारा. वाचांश-पु. १ (चुकीनें वाच्यांश). शब्द; चकार शब्द; उच्चार (क्रि॰ काढणें; करणें). २ उल्लेख; बोलणें; चर्चा. (क्रि॰ काढणें; निघणें). ३ परिस्फोट; लावालावी. (क्रि॰ करणें). ४ वचन; करार. (क्रि॰ करणें). वाचाशक्ति- स्त्री. १ वक्तृत्त्व; व्याख्यानसामर्थ्य; बोलण्याचें चातुर्य. २ (रूढ) वाचण्यांतील कौशल्य; स्पष्टपणा; वाचनशक्ति. ३ वाचाळपणा. 'तुम्ही अमळसें तोंड आपटून धरीत जा. भारी वाचाशक्ति करूं नका.' -शास्त्रीको. ॰सिद्धि-स्त्री. बोललेलें खरें होण्याचें सामर्थ्य; अमोघवाणी. वाचाळ-वाचाट पहा. 'तुका म्हणे वाचा वाचां- ळतें ।' -तुगा ७०. वाचाळता-स्त्री. बडबड. 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ।' -राम १६५. वाचाळ पंचविशी- स्त्री. बडबड. (क्रि॰ लावणें). 'तिची वाचाळ पंचविशी आतां सारखी चालू झाली ।' -गणपतराव. ॰पंचांग-न. चऱ्हाट; बड- बड; वटवट. ॰वाणा-णी-वि. बोलका; बडबड्या. -क्रिवि. चावटपणें; वाचाटपणें. वाचाळी-स्त्री. बडबड. 'एक म्हणती साडी वाचाळी ।' -दा ८.१०.१९; -ज्ञा १८.१७०९. वाचिक- न. वृत्त; बातमी; हकीकत; वर्तमान. -वि. वाणीसंबंधीं; बोलण्यानें, शब्दानें घडलेलें. ॰कर्म-१ वाणीनें केलेलें काम. (विशेषतः पातक, खोटें, कडू बोलणें वगैरे). ॰प्रतिकार-पु. तोंडानें केलेला विरोध; शाब्दिक विरोध. 'त्यांचा वाचिक प्रतिकारहि आम्हाला करवत नाहीं ।' -केले २.५०३.
बृहस्पति
पु. १ देवांचा गुरु. 'विस्मित जाहला बृहस्पती । आश्चर्य मानिती सुरवर ।'-एरुस्व ३.७. २ नवग्रहांपैकीं पांचवा ग्रह. ३ (ल.) उत्तम वक्ता; विद्वान् ४ (ल.) मूर्ख. 'हे बृह- स्पती अशा एकेक विपरीत गोष्टी करणारे आहेत कीं अनुमान करतां येत नाहीं. '-विक्षिप्त १.५२.. [सं.] ॰वार, बृहस्पतवार- पु. गुरुवार. बोलून बृहस्पति-वि. मूर्खपणाची व बाष्कळ बड- बड करणारा.
काज
न. १ (काव्य) काम; धंदा; कृत्य.;तरी आलेंती कव्हणें कांजे ।' -शिशु ११८. 'आमुचिया काजाचेनि पाडें ।' -ज्ञा १.११२. ' आता काज न ये हातां । ' -उषा २८. ९. ' तें (नारायणस्त्र) हि प्रतिहत केले करितो हीं सिद्ध कृष्ण तो काजें ।' -मोकर्ण १.२१. ' होड घाली अवघड । काजेविण करी बड- बड ।' -दा २. १. ४९. ' भक्तजनाचिया काजा । जेवीं करिती अवर्णपूजा । ' -एरुस्व ६.५४. २कारण; उपयोग; प्रयोजन. 'त्या वेडियाच्या गोठी । काय काज ।' -विपू १.३४. ' ऐसा काजेंवीण आंतुडला ।' -ज्ञा ६.७९. ' शिरीं आहे रामराज । औषधाचे कोण काज ।' ३ (ल.) हेतु; मनोरथ. ' त्र्यंबक हा तीर्थराज । पुरवी अंतरीचे काज ।' -भूपाळी ११. [सं. कार्य-कज्ज- काज; सिं. काजु; गु.हिं. पं. काज] ॰काम-कारभार -पु (प्र.) कामकाज-कारभार पहा.
ज़मीन आसमान अेक करना
हिंदी अर्थ : बहुत बड़े बड़े अपाय करना मराठी अर्थ : फार प्रयत्न करणें, आकाश पाताळ अेक करणें.
ज़मीन आसमानके कुलावें मिलाना
हिंदी अर्थ : बहुत बड़ी बड़ी बातें सोंचना | बहुत प्रयत्न करना मराठी अर्थ : आटापीटा करणें, प्रयत्नांची पराकाष्ठा करणें.
क
१ मराठी वर्णमालेंतील १७ वा वर्ण आणि पहिलें व्यंजन. अक्षरविकास-याच्या पांच अवस्था असून पहिली अशोक- कालीन तर शेवटची ११ व्या शतकांतील. पहिली अवस्था थेट क्रूसासारखी असून पुढें आडवी-उभी रेघ बांकदार होऊं लागली. २ पुष्कळ संस्कृत नामांना तीं दुसर्या शब्दांशीं संयुक्त होतांना (समासांत) हा शब्दातिशय प्रत्यय लागतो, जसें:-आत्म- आत्मक. 'हें जग पंचभूतात्मक आहे'; 'अलंकार सुवर्णात्मक आहेत. स्तुत्यात्मक; निंदात्मक (परिपूर्ण याअर्थीं); मूल-मूलक; ज्यापासून उत्पन्न होतें तो या अर्थीं. 'पुण्य मूलक सुख' (ज्या- अर्थीं) 'स्त्रीमूलक कलह' इ॰; पूर्व-पूर्वक पुरस्सर; अनुसरून; मुद्दाम उ॰ बुद्धिपूर्वक; आदरपूर्वक; शपथपूर्वक (भाषण इ॰). लहान वय, सारखेपणा, प्रेम इ॰ दर्शविण्याकरितां कधीं कधीं शब्दाच्या शेवटीं हें अक्षर जोडतात. त्यामुळें अर्थ फारसा बद- लत नाहीं. उ॰ बालक; पुत्रक; दंडक इ॰; ब्रहुव्रीहि समासापुढें प्रायः याचा प्रयोग होतो. उ॰ देवदत्त आहे नाम ज्याचें तो देवदत्त नामक. 'जीवत्पितृक पुरुष', 'देवमातृक देश'; 'आनंदविषयक वाक्य.' ३ ब्रह्मदेव; दक्षप्रजापति; कश्यप; वायु; सूर्य; यम; विष्णु; अग्नि इ॰ देवता. ४ मन; अंतःकरण; आत्मा. ५ पक्षिविशेष; पक्षी; पक्ष्यांचा राजा. ६ पाणी; पिण्याचा पातळ पदार्थ.
आज्ञा
स्त्री. १ हुकूम; आदेश; ताकीद. सामाशब्द-राजाज्ञा; शास्त्राज्ञा; वेदाज्ञा इ॰ २ वेद, शास्त्र इत्यादिकांस म्हणतात. -मनको. ३ होय, बरें, इच्छेप्रमाणें करतों या अर्थीं. वरिष्ठांनी आज्ञा केली असतां सेवकजन 'आज्ञा' या शब्दानें उत्तर देतात; ४ तंत्रशास्त्रां- तील षट्चक्रापैकीं एक. योगशास्त्रांतील एक भुकुटीस्थ चक्र. 'आधा- रादि भेदुनि । आज्ञावरी ।।' -ज्ञा १८.१०३८. ॰वंदणें-नमस्का- रणें-पाळणें-आज्ञा शिरसामान्य करणें. 'आज्ञा वंदोनि निघाला तेव्हां' 'तयातें वोळखावया हेचि संज्ञा । जे जगें नमस्कारिजे आज्ञा ।।' -ज्ञा १०.३११. ॰देणें-१ कामावरून दूर करणें; बड- तर्फ करणें. २ निरोप देणें. ॰मागणें (जाण्यास)-परवानगी घेणें; निरोप घेणें. ॰दशक-न. (ख्रिस्ती) दशाज्ञा; परमेश्वरानें मोशाला सीनापर्वतावर ज्या दोन दगडी पाट्या दिल्या होत्या त्यांवरील लेखाचें नांव. पहिल्या चार आज्ञांमध्यें मनुष्याचीं देवाशीं आणि बाकीच्या आज्ञांत मनुष्याचीं मनुष्यांशीं कर्तव्यें सांगितलीं आहेत) -अनु ४.१३;१०.४. 'आणि पाट्यांवर त्यानें (मोश्यानें) कराराचीं वचनें म्हणजे दहा आज्ञा लिहून काढिल्या' -निर्ग ३४.२८.
अनसूट
वि. १ चव न घेतलेलें; उष्टें न केलेलें; न वापरलेलें; स्पर्श न केलेलें; जसेंच्या तसें असणारें. (दुभतें, पाणी, वगैरे). 'म्हणे दधि दूध जें सांचलें । अनसूट घरी येथूनी ।' -ह ७.२८. २ खर्च न करावयाचें; न वापरण्याजोगें; आधीं उष्टें न करण्याचें. 'माता म्हणे आजि मित्रवार । दुग्ध अनसूट असे समग्र ।' -ह ९.१९३. ३ (ल.) वाटणीचा भाग ज्यास मिळाला नाहीं असा. ४ वैषयिक अनुभव न घेतलेला; ब्रह्मचारी (पुरुष किंवा स्त्री). 'उरों नेदी कोठें अनसूट । परद्वारी हा क्रियाभ्रष्ट ।' -ह १६.१६. 'आजवर नीट अनसुट गहुन । कसें मन मोहुन । घडोघडीं केला विषय पलंगावर संशय सोडुन ।' प्रला ७२.१७९. ५ बिन बड- वलेला (बैल); खच्ची न केलेला (घोडा); (ल.) वीर्यवान् 'अनसुट निर्मळ च्यारि वाजी ।' -सीस्व ८.१०९. [सं. अनुच्छिष्ट]
अंची
स्त्री. १ डाक, टपाल; पेणें (टपालाचा घोडा बद- लण्याची जागा व मुक्काम). 'सरकारांतून पत्रें आंचीवर जीं जीं आलीं तीं तीं नबाब बहादूर यांस श्रवण करून पत्राचे भाव सम- जाऊन, उत्तरे निरोत्तरें आलीं. त्या अन्वयें आंचीवर लिहित गेलों.' -राज १०.१९७. -ख ३६४०. २ हरकारा. [सं. अंचि (अंचगतौ). ते. अंचे, अंचिय = टपाल; घोडा बदलण्याची जागा; जासूद. का. अंचे = टपालरस्ता.] ॰वाला-पु. टपाल खात्याचा अधिकारी. (का.) अंचेदार.
आफ़तका परकाला
हिंदी अर्थ : कुशल । किसी कामको बड़ी तेज़ी से करनेवाला मराठी अर्थ : कोणतेंहि काम तडफेनें करणारा.
अरंबळणें
अक्रि. विप्र. आरंबळणें. १ झोपेंत बरळणें, बड- बडणें; कुंथणें. २ झोंपेनें घेरलेला असणें; पेंगणें. ३ ओरडणें; भ्रमांत बहकणें; आक्रोश करणें; हंबरडा फोडणें. ४ निष्कारण किंवा व्यर्थ बडबड करणें. [सं. आ + रु किंवा आ + रंभ् + ओरडणें, शब्द करणें]
बाद
बाद bāda ad ( A) Deducted or cast out (from a number, list, collection). v घाल, कर, पड. Ex. माझें नांव पटास होतें तें बाद पडलें. बाद करणें To make null and void. 2 To dismiss (a suit or a case); to strike off the file.
बाड
बाड bāḍa f ( H) Edge (of a weapon or tool). To express the original giving of the edge, the verb is दे or चिर; to express a subsequentwhetting of the edge, it is लाव. 2 fig. f n An enclosing line (of milkbush, thorns &c. or of tentwalls) around a tent. v चिर. Applied by some in the sense of Fence in general. v घाल. 3 fig. f n m Stimulating or sharpening (to some evil deed) by deceptive assurances or suggestions: also such incentives. v दे. 3 n The frame (i. e. two slips of wood) of a scabbard. 4 esp. in pl, as बाडा, Gossip or idle chatter. v मार, झोक, हाक, हाण, फेंक, सांग.
बाड bāḍa n A book into which are collected the general heads or the common points of a science; a compendium, an epitome, a common-place-book, an adversaria.
बाद्या
पु. (ना.) बैदूल खेळण्यासाठीं जमिनींत केलेली खांच; गल. [बद = खड्डा]
बडा
बडा baḍā a ( H) Great, big, large. The word is little used. H Pr. बडा घर पोकळ वासा Said of a person or thing whose real merit or worth does not equal the pretensions or appearance.
वि. १ मोठा; थोर. २ जंगी. म्ह॰ १ बडा घर पोकळ- वांसा. २ बडे बापके बेटे = बापच्या मोठेपणावर डौल मिरविणारा मनुष्य. 'विलायतेंतून आणलेल्या गव्हर्नरांमध्यें बडेबापके बेटे आणि कपाळकरंटे पुष्कळ आहेत.' -केले १.१८१. [सं. वृद्ध; प्रा. वढ्ढो, बड; हिं. बडा] बडीस्वारी-स्त्री. (ल.) ढेंकूण. -राको.
बदाफळ
बदाफळ badāphaḷa n (As a soft fruit falls with a बद! or squelch.) A term for a huge, bloated, or fleshy person.
न. (मऊ झालेलें फळ पडतांना बद आवाज होतो त्यावरून ल.) जंगी, फोपशा, थलथलीत मनुष्य. [ध्व.]
बदबद-बदां
क्रिवि. सरबरीत पदार्थ (दहीं, आंबरस, पू इ॰) ओततांना किंवा बाहेर पडतांना, ढिला अथवा फुटका मृदंग वाज- वितांना, बदका मारतांना, पोकळ जमिनीवरून चालतांना होणार्या आवाजाप्रमाणें आवाज होऊन; धपांधप; (क्रि॰ वाजणें; करणें; पडणें; मारणें). बदबदणें-अक्रि. १ बदबद आवाज होणें (फुटक्या नगा- र्याचा इ॰). २ पू इ॰ पिकणें (उठाणूं, गांठ इ॰तील). ३ पडशा- मुळें जड, भरलेलें, कोंदलेलें होणें (डोकें, नाक इ॰). [ध्व.] बद बदीत-वि. बदबद आवाज करणारा (फुटलेला मृदंग, भांडें इ॰).
बडबीज
बडबीज baḍabīja n A seed of a species of lotus, the same with मकाणा. (Seed of the tree बड or Ficus Indicus which is small, whilst the tree is large and widespreading.) A term for a numerous offspring, for any overgrown establishment or business, or for any very complicate and troublesome affair. 2 Applied to an indecent fellow that abuses his own sisters and female relatives. 3 unc Applied to certain grains of exuberant produce.
न. १ कमळाच्या एका जातीचें बीं; मकाणा. २ (लहान बीजामधून विस्तृत होणार्या वटवृक्षावरून ल.) मोठा विस्तार; अतिविस्तृत स्वरूपाचा धंदा अथवा अतिशय गुंतागुंतीचें व त्रासदायक काम. ३ अतिशय उत्पन्नाचीं कांहीं विशिष्ट धान्यें. ४ आया-बहिणींना शिव्या देणारा निर्लज्ज मनुष्य. [बड + बीज]
बद्दू
वि. १ बेअब्रूचा; दुर्लौंकिकाचा; वाईट. २ दुर्गंधीचा; बेचंव; खराब झालेला. ३ डाग लागलेला; कलंकित. 'त्याचें नांव बद्दू झालें किंवा केलें.' [फा. बद = वाईट]
बद-दुवा
(स्त्री.) बेटुवा; शाप. “बद दुवा दिल्ही कीं या दोघांचा खाना खराब” (मदरु १|११८).
बदी
स्त्री. १ आळ; आरोप. २ कपट. 'त्याच्या मनांत बदी नाहीं.' -चिमा ३६.[फा. बद = वाईट]
बदर (रा) हा
क्रिवि. गैरमार्गानें; कुमार्गी; भलतीच. 'पुण्यातील वगैरे कितेकानी फितूर करून बदराहा वर्तणूक करू लागले.' -पेद २०.२२४. [फा. बद + राह]
बे अदब
(वि.) हिंदी अर्थ : जो बड़ोंका सम्मान न करे. मराठी अर्थ : असभ्य.
बोद
वि० बद, छन्दिशीं न वाजणारा.
भपका ( खोटा )
घरांत उष्टी बाहेर गोष्टी, बड़ें घर पोकळ वासा, दिसायला भपका, खोटा डामडौल, बेगडी सौंदर्य, छानछोकी, नुसता झक्कीपणा, दिखाऊपणा, नखरेलपणा
चाळाकुचाळा
पु. उपद्व्याप; भानगड; खोडी; गड- बड; बंडखोरी. 'कोठेंहि असतील तेथें लटकी राजकारणें करावीं, चाळाकुचाळा करावा चार लोक फोडावे.' -पेद २०.१०४. [चाळा + कु + चाळ]
देबाकबदिया
पु. घोड्याचा रोग (काळजाजवळ मोठाले फोड होतात). -अश्वप २.३३०. [बद]
दिलका बादशाह
हिंदी अर्थ : बड़ा अुदार मराठी अर्थ : मोठा अुदार, मनाचा मोठा.
डिंडिम-मा
१ एक वाद्य; डंका; नगारा. २ (ल.) गड- बड; गलबला; संभ्रम. 'तये खेंवीं आटे डिंडिमा । सांसारिक हे ।' -ज्ञा १६.४४३. [सं. डिंडिम]
द-नेक
(स्त्री.) [फा. बद्=वाईट; नेक्=चाङ्गलें] हरामखोरी. “स्वामीसी त्यानें बदनेक केली त्याचें फल ईश्वरें दिलें” (खरे १०|५२३०). “मी बद-नेक बाळासाहेबांपाशीं केलीच नाहीं” (खरे १०|५२३७).
धावय
पु. १ सापाची एक जात. रंग भुरकट, नऊ दहा फूट लांब हा शेपटी तोंडांत धरून गाडीच्या चाकाप्रमाणें चालतो. -बद- लापूर ३४९. 'हें जाणौनि जैसा प्रौढी । जो दृष्टीसवेंचि विष फेडी । तो धावेया हरिगारुडी । पातला कां ।' -राज्ञा २.७२.
ढगढग
स्त्री. उघड रीतीनें निंदा, बेअब्रू; धिंडवडा; बद- नामी. (क्रि॰ करणें). (व.) फजिती (एखाद्यास दिवाळ्या, लबाड, लुच्चा इ॰). दूषणें देऊन त्याच्या नावाचा केलेला बोभाटा. 'तिच्या जिवाची ढगढग झाली.'
धोतरा
पु. एक फुलझाड व त्यांचें फूल. बीं. हें विषारी असतें. [सं. धत्तूर] ॰घालणें-देणें-(स्त्रीस) धोतर्याचें बीं, विष देणें) भ्रमिष्ट होण्यासाठीं. वेड लागण्यासाठीं. या वेडांतील बड- बडणें भविष्यसूचक असतें अशी समजत आहे). ॰येणें-होणें- धोतर्याचे विषामुळें बडबडणें, भ्रमिष्ट होणें. धोतरेल-न. धोतर्या- पासून काढलेलें तेल. [धोतरा + तेल]
धुर्या
वि. १ धुरेकरी पहा. २ चिखल्यापासून सुमारें पांच फुटांवर भोंक पाडून एक फूट लांबीचें लांकूड बसवितात तें. -बद- लापूर २८७. धुर्यावर ठेवणें-बसविणें-(ना.) जाणून बुजून दुर्लक्ष करणें उपेक्षा करणें. [सं. धूर्-रा]
एळकोट, एळकोटभेर
पु. १ (खंडोबाचे भक्त देवापुढची तळी उचलतांना किंवा भिक्षा मागतांना एळकोट किंवा एळकोट- मल्हार असें ओरडतात, त्यावरून) एक जुटीनें प्रयत्न; निकराचा प्रयत्न. 'आधीं होता वाघ्या । दैवयोगें झाला पाग्या । त्याचा एळ- कोट राहीना मूळस्वभाव जाईना.' २ (निंदाव्यंजक) गोंधळ; गड- बड; अव्यवस्था. 'दहा घरचीं दहा माणसें आलीं तेव्हां त्यांनीं सार्याच कामाचा एळकोट करून टाकला.' [का. एळु ( = सात) + कोट ( = कोट संख्या किंवा तट. खंडोबाचें सैन्य सात कोटी असेल किंवा त्याच्या किल्ल्याचे सात तट असतील.]
गन्दुम नुमा जौ फ़रोश
हिंदी अर्थ : पहले गेहूँ दिखलाकर फिर अुसके बदले में जौ तोलने वाला । बहुत बड़ा धूर्त मराठी अर्थ : धोकेबाज, दिसतो तसा नसणारा.
गोरबंद
पु. घोडा, उंठ यांच्या खोगिराचा पुडील बंद. [गोर = मान + बद]
गुं(गु)ता
पु. १ अटकाव; अडथळा; खोटी; प्रतिबंध. २ (ल.) अडचण; हरकत; नड. 'ह्यामधिं कांहीं गुंता नाहीं ।' -ऐपो ३२. ३ शेंडी-वेणींतील गुंतवळ; विंचरतांना बाहेर निघा- लेले केंस. ४ (ल.) सुतक. ५ गुंतागुंती (केस, दोरा इ॰ची). ६ (भात, सावा, हरीक वगैरेचें) मळणीनंतरचें तृण, गवत, कचरा. ७ (ना.) ब्याद; लचांड. ८ लढा; तंटा. ॰गुंत-गुत, गुता- मूत-स्त्री. १ गुंता; गुंताड. २ गळफाटा; घोंटाळा; गोंधळ; घोळ. गुंताड; गुताड-नस्त्रीपु. १ गुंता; गुंतलेली स्थिति (विशेषतः केसांची). २ गुंतवळ. ३ गुंता अर्थ ६ पहा. ४ शिवर्यावरून आयंडा काढला व बुंध्याची दोरी सोडून शेंड्याला बांधून तो हालवल्यावर खालीं पडतात त्या भाताच्या बारींक पाती -बद- लापूर २९१. ५ गुंतागुंत; घोंटाळा; गोंधळ. गुंतारुंता, गुता- रुता-पु. १ अडथळा; अटकाव; अडचण (क्रि॰ घालणें; पाडणें). २ अडथळा केलेली स्थिति. (क्रि॰ करणें; होणें). [गुतणें + रुतणें] गुंतापणें-क्रि. (बे.) गुंतणें. गुंतापा, गुंतोळा-पु. (बे.) गुंताड-डा (सूत, केस, इ॰ चा) पहा.
हाणणें
उक्रि. १ काठी इ॰ नें ताडण करणें; मारणें; ठाकणें. २ छाटणें; काटणें; कापणें. ३ ठार मारणें. ४ (व.) हांकणें; हाकून लावणें. [सं. हन् = मारणें] हाणून पाडणें-१ जमीनदोस्त करणें. २ (ल.) बिघडविणें; निष्फल करणें; मोडून काढणें. हाणता-वि. ठोकणारा; धोपटणारा; बडविणारा; छाटणारा, कापणारा; ठार मारणारा. म्ह॰ हाणत्यांच्या मागें पळत्यांच्या पुढें = अत्यंत भेकड माणसास उद्देशून म्हणतात. हाण(णा) मार, हाणामारो, हाणाहाण-णी-स्त्री. एकमेकांनीं एकमे- कांस मारणें; आवेशानें ठोकणें; मारामारी. [हाणणें + मारणें] हाणविणें-उक्रि. (हाणणेंबद्दल चुकीनें) मारणें; मारविणें; बड- विणें; ठोकणें. हाणी-स्त्री. हानि; तोटा. [सं. हानि]
हातिमकी क़ब्रपर लात मारना
हिंदी अर्थ : बहुत बड़ी अुदारताका या अुपकारका काम करना मराठी अर्थ : (व्यंग) मोठा अपकार करणें (अुपहासात्मक).
हफ़्त अिमाम
(पु.) हिंदी अर्थ : मुसलमानोंके सात बड़े अिमाम. मराठी अर्थ : मुसलमानांचे सात धर्मगुरु.
इंद्राणी
स्त्री. १ इंद्राची स्त्री; शची. म्ह॰ इंद्र फिरतो (बद- लतो) पण इंद्राणी फिरत नाहीं. = इंद्रपदावर कोणीहि आला तरी त्याची बायको इंद्राणी ही एकच, यावरून. २ निर्गुडी. ३ इंद्र- वल्लरी किंवा कडु कवंडळी (इंद्रवारुणी). ४ वेलदोड्यांचें झुडुप. [सं.]
जार
पु. १ परस्त्रीशीं संबंध करणारा; उपपति; धगंड. २ प्रियकर; दोस्त; यार (स्त्रीचा). ३ जारकर्म; व्यभिचार. 'ज्यांस न कळतां घडला जार । तिहीं रासमंडळीं खेळला याद- वेंद्र । -ह १८.१०. [सं. जार] ॰कर्म-न. व्यभिचार; बद- फैलीपणा; विवाहित पुरुषानें अगर स्त्रीनें अन्य स्त्रीशीं अगर पुरुषाशीं केलेला संग; परशय्या; परद्वार; व्यभिचार. (कायदा) जिचा नवरा जिवंत असल्याचें माहीत आहे अशा स्त्रीशीं तिच्या नवर्याच्या संमतीवाचून केलेला संभोग. ॰कर्मी--वि. जारकर्म करणारा; व्यभिचारीः बदफैली. जारज-वि. अनौरस; जारकर्मा- पासून झालेली (संतति). जारिणी-रीण-स्त्री. व्यभिचारिणी; जारकर्मी स्त्री. 'की वरपंगी जेवीं जारीण । यावी भ्रतार सेवा करून ।' जारीवधू-स्त्री. जारकर्मी स्त्री. 'जारीवधू न्यायज-नेम हारी ।' -मुरामा बाल ८४.
का-कांठ
पु. १ कडा; बाजू; मर्यादा; टोंक; किनारी (ताट, पागोटें, मडकें इ. च्या भोंवतालचा भाग); कोर (भांडीं वगैरेंची); कंगोरा. २ किनारा (समुद्राचा); जवळची भूमि; थड-डी (समुद्र, नदी यांची). ३ पदर; किनारी (वस्त्राची वेलबुट्टीची किंवा साधी). [सं. कंठ = गळा, काष्ठा = सीमा] ॰कोणा मोजणें-सूक्ष्मपणें परीक्षणें, बारकाईनें तपासणें. -ठावर बसणें (पखवाजाच्या कांठावर थाप मारली म्हणजे बद आवाज होतो त्यावरून) सोडणें, कमी होणें, (धंदा, गोष्ट), नासणें (काम) अकर्तृक योजतात. 'याच्या कांठावर बसली (चोपकाडी किंवा एकादें अव्याहृत् स्त्रीलिंगी नाम) -ठावर मारणें-बिघ- डणें, नासणें, मारणें. -ठावर येणें-जीवावर येणें. ॰किनारा -पु. बाजूची पट्टी-कडा-कांठ. [काठ + किनारा] ॰कोपरा-पु. बाजू, कड, कोपरा, कोन. 'सारें शेत पिकलें (गेलें) नाहीं कांठ- कोपरा पिकला (गेला). ॰दोरा-पु. कापडाच्या गांठीस-काठाला घातलेला जाड दोरा, पदराला घातलेली दोर्याची शिवण. ॰(ठा) परा-प्रा-फरा पु. १ (कों.) फुटलेल्या मातीच्या मडक्याचा वरचा भाग; अर्धा भाग; गळा; कांठ. 'काणा कुंटा व्याधिव्याप्त । चिंता कांठफरा गळां वहात । तोही शुनीमागें धांवत । कामासक्त अविचारी ।' -एभा १३.२०६. 'जें कां काठफरा उलले । देखसी ज्याचें बुड गेलें । तें न पाहिजे हालविलें । असो संचरलें निज- आळां ।' -एरुस्व १८.४५. ५ बोडकें गलबत (शीड, काठी वगैरे कांहीं नसलेलें). गलबताचा सांगाडा; खटारा. ॰फुटका-वि. ज्याचा कांठ मोडला आहे असा. ॰मोडका-मोडा-कांठफुटका पहा. ॰मोरा-१ कांठप्रा पहा. 'जेवीं नीचाचा कांठमोरा । गळां अडकल्या मांजरा । ते रिघोनि शुचीचिया घरा । नाना रसपात्रां विटाळी ।' -एभा २६.२०६. 'कांठमोरा त्याचे निडळी रुतला ।' -पंच ४.४. 'हातां न ये ज्या घरचा गोरस । तरी ताडन करी त्यांचिया मुलांस । त्यांच्या गळां कांठमोरे हृषीकेश । घालोनियां हिंडवी ।' -ह ७.१४६. २ पोळी, भाकरीचा कडेचा तुकडा. (क्रि॰ घेणें; तोडणें). कांठमोरा गळ्यांत अडकणें-येणें-एकाद्या धंद्यांतील, कामांतील लभ्यांश हातीं न लागतां व्यर्थ शीण पडणें (ज्याला मडक्यांतील वस्तु खावयास मिळाली नाहीं पण मड- क्याचा कांठ गळ्यांत अडकला त्या कुत्र्याप्रमाणें). ॰रें-न. कापडाची किनारी, धार. 'धोतराची कांठरी लोंबू लागली.' ॰वा-पु. (ना.) कांठ; किनारा; थडी. ॰सर-तुडुंब; कांठोकाठ; ओतप्रोत.
कची
वि. चीर पडलेला; बद आवाजाचा (रुपया इ॰); व्यंग असलेला. [ध्व. कच] ॰ढेली-चा-वि. बद्द; ठोका पडलेला; छाप पुसलेला. (रुपया इ॰)
कचकचीत
वि. १ टणक; अपक्व; कच्चा हिरवा; (भात). २ बद वाजणारें; फुटक्या आवाजाचें (मडकें इ॰). ३ मोठा आणि ठळक; स्पष्ट दिसणारा (दागिना, अलंकार). ४ जींत कचकच लागते अशी; रेवाळ (भाकरी वगैरे); रेताड; भरड. ५ (गो) पुष्कळ; विपुल. -क्रिवि. १ रोख वाजवून; खणखणा (दिलेला दाम, पैका). 'या दागिन्याबद्दल कचकचीत शंभर रुपये दिले आहेत.' २ पुरेपूर; सपाटून (मौज करणें, उपभोग घेणें). केवळ जोर दर्शविण्याकरितांहि हा शब्द योजतात. [कचकच]
कदम्बोसी
(स्त्री.) पादचुम्बन. “व निरोप प्याद्यास दिधला जर बड़ी फज़र साहेबके कदम्बोसी करनेकूं हुजूडखडे होऊं” (मब ६७).
कदर्
(स्त्री.) हिंदी अर्थ : बड़ाअी, मान. मराठी अर्थ : किंमत, पारख.
(किसी के) हवाले करना
हिंदी अर्थ : सौंपना स्वाधीन करणें. बड़े बुतके हवाले करना, मृत्युके हाथ सौंप देना मराठी अर्थ : मृत्यूच्या स्वाधीन करणें, यमराजाच्या दरवारांत धाडणें.
(किसी की) शान में
हिंदी अर्थ : किसी बड़ेके गौरवार्थ मराठी अर्थ : गुण गौरवार्थ .
कळवी
स्त्री. मुख्य सरकारी खजिन्यांतून खोटें किंवा बद नाणें म्हणून परगण्याच्या खजिन्यांत परत आलेली रक्कम, पैसा; खोटें नाणें.
कोंबणें
उक्रि. १ ठासून भरणें; गच्च भरणें; ठासणें. २ बद- डणें; कुबलणें.
कथली
स्त्री. एक तृणधान्य. कथली खरूज-१ स्त्री. जींतून पू वहात आहे अशी-ओली असलेली खरूज. २ (ल.) अति द्वाड, खोडकर मनुष्य. ३ काळजास जाऊन झोंबणारें दुःख, पीडा; त्रासदायक गोष्ट. कथली व्याध-धी-पीडा-स्त्री. १ वहात असलेली गर्मी, उपदंश, बद; २ (ल.) खोडकर, त्रासदायक मन्युष्य; मरी, प्लेग, वाखा वगैरे आजार; सांथ; व्याधि; पीडा.
कथली व्याध, कथली व्याधी, कथली पीडा
१. वाहत असलेली गर्मी, उपदंश, बद. २. (ल.) खोडकर, त्रासदायक मनुष्य; मरी, प्लेग, वाखा वगैरे आजार; साथ; व्याधी; पीडा. कथले
कुंद
वि. चोंदलेलें; बुजलेला (नळ, गुडगुडीची नळी इ॰) कोंदट; थांबलेली; थबकलेली; स्थिर झालेली (हवा, वारा); (त्या- वरून) चोंदल्यामुळें बद किंवा बेसूर वाजणारा (वाद्य, गळा, स्वर, हवा). [कोंडणें.]
कुंद
वि. १. चोंदलेले; बुजलेले (नळ, गुडगुडीची नळी इ.); कोंदट; थांबलेली; थबकलेली; स्थिर झालेली (हवा, वारा); (त्यावरून) चोंदल्यामुळे बद किंवा बेसूर वाजणारा (वाद्य, गळा, स्वर, हवा.). २. हवालदिल; हताश. [फा. कुंद]
कुट्याल-ट्येल
न. (कों. कु.) यथेच्छ चोपणें; बड- वणें. (क्रि॰ काढणें; निघणें.) [कुटणें + तेल]
खळ
(सं) पु० नीच मनुष्य, दुष्ट. २ बद. ३ चिकटविण्याकरितां किंवा पांजणाकरितां चिंचोके किंवा पीठ यांचा केलेला पदार्थ.
खळ्याचा
वि. खळ्यावर मळलेला; याच्या उलट बड- व्याचा = बडविलेला. [खळें]
खुदखुद
स्त्री. १ (घोड्याची) रगं; चमक; खुमखुम; पाणी २ उचंबळणें; ऊत; तृष्णा; आग; हांव; सोस (स्पर्धा, महत्त्वाकांक्षा, अभिमान यांची). ३ हुरहुर; अस्वस्थता. -स्त्रीपु (येणारा-जाणारांची पुष्कळवेळ चाललेली व त्रासदायक) गड- बड; गजबज; (लहान मुलांचा) हट्ट; टकळी; वेवताळणी. [ध्व. खदखद?]
(मेंढकी को) ज़ुकाम होना
हिंदी अर्थ : किसी छोटे मनुष्यका बड़ा काम करना मराठी अर्थ : वामन मूर्तीस दिलेले सहाय्य.
नेकबद
स्त्री. नेकीबदी पहा. बरावाईट प्रकारः अस्मानी सुलतानी; हरामी; फितुरी. 'तुम्ही धाकटे नेकबद झाली तर काय करावे या करितां यांच्या नावे सनद आणली.' -पेद २८.९८. [फा. नेक + बद]
नियाज़ हासिल करना
हिंदी अर्थ : किसी बड़ेकी सेवा में अुपस्थित होना मराठी अर्थ : मोठ्या माणसाचें दर्शन घडणें.
नक्कार खाने में तूती की आवाज कौन सुनता है
हिंदी अर्थ : बड़े आदमियों के सामने छोटोंकी बात कोअी नहीं सुनता मराठी अर्थ : नगाऱ्यापुढें टिमकीचं काय !
प्रलाप
पु. असंबद्ध, निरर्थक बडबड (झोप, शोक, मद, इ॰ तील); व्यर्थ भाषण. 'हा प्रलाप स्त्रीजातीनें करावा.' -भाब ७४. [सं.] प्रलापणें-अक्रि. (काव्य) विसंगतपणें बोलणें, बड- बडणें; बकणें. [प्रलाप]
फ़ज़ीलतकी पगड़ी बांधना
हिंदी अर्थ : बड़प्पन संपादित करना मराठी अर्थ : मोठेपणा मिळविणें.
शाह राह
(पु.) हिंदी अर्थ : बड़ी सड़क. मराठी अर्थ : राजमार्ग.
(सब्ज़) बाग़ दिखलाना
हिंदी अर्थ : बड़ी आशाओं दिलाना मराठी अर्थ : आशा लावणें.
सई
स्त्री. (कर.) खेळतांना बैदूल, गोटी टाकण्यासाठीं केलेला खळगा; गल; बद. सईभरणें-(कर.) गलींत गोटी टाकणें.
सनद
(स्त्री.) हिंदी अर्थ : बड़ा तकिया, प्रमाणपत्र. मराठी अर्थ : मोठा तक्क्या, प्रमाणपत्र.
सन्नाअ
(पु.) हिंदी अर्थ : बहुत बड़ा कारीगर. मराठी अर्थ : मोठा कारागीर, कलावंत.
स्वस्ति
उद्गा. बरें; चांगलें; कल्याण; उत्कर्ष; क्षेम, आशी- र्वादाचा एक प्रकार. 'रामायण स्वस्ति रावणास स्वस्ति' = दोन्ही पक्षांस खूष ठेवणें, दोन डगरीवर हात ठेवणें, [सं.] ॰वाचन- न. व्रत; शांती इ॰ मंगलकार्याच्या आरंभी करण्याचा एक विधि; पुण्याहवाचन. ॰क्षेम-अ. स्वस्ति पहा. -न. त्रास, गड- बड इ॰ कांहीं न होतां कुशल किंवा यशास्थित असणें. सुस्थिति; चांगली स्थिति. स्वस्त्ययन-न. लग्नामुंजींतील एक धार्मिक समारंभ, स्वस्तिवाचन; पुण्याहवाचन.
टाळकें
न. १ (निंदार्थीं) डोकें; मस्तक; बोडकें; टकलें. २ (कु.) टाळक्यां. [सं. तालकम्] ॰शेकणें-१ मारणें; बड- विणें. २ (ल.) तोटा येणें.
टापर
न. (ना.) मोठें लांकडी घुंगरू. -वि. (ना.) बड- बड्या (मनुष्य). [ध्व.]
टवरकी, टवरचाळ-चाळा
स्त्रीपु. उनाडटप्पूपणा; बद- फैली; भटकेपणा; टवाळकी. टवरी-वि. भटक्या; उनाड; विषयी; बदफैली; उनाडटप्पू.
थोप
थोप thōpa f State of being stopped and brought up (as of a boat): the dashing against (of water): also any erection to receive and break this dash, a breakwater. 2 Stopping, a stop, a rest: also a place to stop or rest. Ex. ह्या डोंगरांत चढतांना तीन थोपी घ्याव्या लागतात. 3 A dam across a stream, or a rock &c. within it; any cause of stoppage. 4 fig. A terminus or term; an end or a limit assigned. v राख, संभाळ, टाळ, टळ. Ex. त्याच्या शंभर रुपयांची थोप म्यां संभाळली. 5 Standing fast; hold ing on; maintaining one's ground. v राख, ठेव, धर, संभाळ g. of o.; also बुडव or बड in the sense of Ruining or of being ruined. Ex. तुम्ही कचेरींत बोलून माझी थोप or आबरूची थोप संभाळा: also keeping one's place or preserving one's credit. Ex. तुझ्या शेरभर तुपानें माझ्या प्रयोजनाची or जेवणाची थोप संभाळली; एवढ्या रुपयांनीं माझी थोप धरली.
वाय
पु. (समासांत) वायु; वारा. [सं. वायु] ॰कर-खर- खोर-वि. (गो.) वातुळ; वायुप्रकोप करणारें. ॰गमन-न. आंत- ड्यांत वायूमुळें निघणारी कळ; वायगोळा. ॰कळा-स्त्री. अव. संधिवाताच्या वेदना. ॰कुंभा-पु. एक औषधी वनस्पति. -प्रसूति- कृत्यादर्श ६. ॰कळणें-चळणें-अक्रि. १ चळणें; भ्रमिष्ट होणें; बेफाम होणें; वेडें होणें. २ स्वैर, स्वच्छंदी वर्तणूक करणें; चंगी- भंगी होणें; अनिर्बंध, मोकाट वागणूक करणें. ॰गोळा-पु. आत- ड्यांत वायु धरल्यामुळें येणारी कळ, होणारा रोग. 'पोटसुळीं निरंतर वायगोळा ।' -दा ३.२.२६. ॰चळ-कळ-पु. वातभ्रम; वायु झाल्यामुळें होणारा उन्माद बुद्धिभ्रंश; वेड. -वि. वेडा; भ्रमिष्ट; बडबड्या. ॰चाळ-ळा-पु. वेड; भ्रम; बडबड. 'अन्याय तो त्याचा नव्हे वायचाळ ।' -तुगा ३०७८. 'जनीं व्यर्थ संसार हा वायचाळा ।' -स्तोत्रमाला, रामदास करुणाष्टक ७. -वि. बड- बड्या; वेडा. ॰जाळ-न. उन्हाळ्यांत उष्णवातानें हातापायांस भेगा पडणें. ॰दमन-न. (गो.) एक वातरोग; वायूचा गोळा छातींत बसणें.
वजनदारपणा
जड बूड, प्रस्थ, बड़े धेंड आहे, म्हणतील तसच होईल, शब्दाला मान आहे, चार लोक हातांत आहेत, शब्द खालीं पडणार नाहीं, महंमदाला टेकडीकडे जावे लागेल, दबदबा, दबाव, शिसवी लांकूड आहे, लोक मानतात, शिशाचें बूड यांचें.
वखवख
स्त्री. १ खा खा सुटणें; क्षुधातिशय; तृप्ति न होणारी भूक. २ (ल.) अतृप्य लालसा; अभिलाषातिशय; तृष्णा; लोभ. ३ (भिकारी, मुलें, तगादेदार इ॰ कडून) छळणूक; त्रास; जाच. ४ पोटांत तुटणें (भूक, पित्त यांमुळें). ५ खंगणें (काळ- जीनें). ६ तगादा; दपटशा (कामाचा). ७ वरील प्रकारची स्थिति- ८ (व्यापक) उपहास; दुर्लौकिक; छळ. ९ उपहासाची, बद लौकिकाची स्थिति. (क्रि॰ करणें; होणें). [ध्व. तुल॰ सं. वष्- वख] वखवखणें-अक्रि. वखवखीनें विशिष्ट होणें. वखवख्या- वि. १ वखवखणें; अतिशय भुकेला. २ हांवरा; लोभी. ३ त्रास देणारा; छळणारा; उपहास, बदलौकिक करणारा.
वळ
(सं) स्त्री० ओळ, रांग. २ गांठ, बद. ३ मारल्याची खूण.
वतवत
स्त्री. १ रिकामें भटकणें, फिरणें. 'त्वां दिवसभर वतवत केलीस आतां जेवायला तांतडलास.' २ वटवट; बडबड; बक- बक. ३ बदलणें [ध्व.] वतवत-तां-क्रिवि. १ वटवट लावून; बडबडून. २ बरळून; भ्रमिष्टपणें. (क्रि॰ करणें; बोलणें). ३ वच- वच पहा. (क्रि॰ खाणें; जेवणें). ४ रिकामपणें; रमतगमत. (क्रि॰ फिरणें; करणें). वतवतणें-अक्रि. १ वटवट करणें; बड- बडणें. 'तें नाही तरीं किती । वतवतु ।' -अमृ ७.८४. २ तण- तणणें; क्रोधावेशांत चडफडणें.
व्यक्ति
स्त्री. १ सत्य, प्रत्यक्ष गोष्ट; वस्तु; विशेष (मनु- ष्याचा, पदार्थाचा). २ स्पष्टपणा; उघडपणा; प्रगटता. -ज्ञा १७. ३७०; -एभा २८.८८. ३ आकार; स्थिति. -ज्ञा २.१५०. ४ स्पष्ट उच्चार. -ज्ञा १७४०४. 'हें पोर नुगतें बोलूं लागलें, अजून वर्णाची व्यक्ति होत नाहीं.' ५ असाधारण, अलौकिक पुरुष. कोणताहि मनुष्य; असामी; इसम. ६ (ल.) अट्टल लबाड, बद- माष माणूस. ७ आविष्करण; दिग्दर्शन. ८ अचा लोप झाल्याची अक्षरापुढीलऽखूण. [सं.] ॰दर्शन-न. (लेखनकला) लोखकानें जें कांहीं लिहिलें असेल त्यावरून बिवक्षित व्यक्तीचें प्रत्यक्ष दर्शन झाल्यासारखें वाटणें किंवा लेखकाच्या वर्णनानें वर्ण्य व्यक्ति वाचकांपुढें मूर्तिमंत उभी राहणें. -प्रतिभा साधन. ॰वाचक- वि. १ वैयक्तिक; व्यक्तीसंबंधीं. २ (व्या.) एखादें उदाहरण दाखविणारें, सिद्ध (नाम). याच्या उलट जातिवाचक. ॰वैचित्र्य-वैशिष्ट्य-न. एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणीं असणारा विशेष गुण. 'एखादा कलावान् व्यक्तिवैचित्र्यानें नवीन सुंधारणा-कसब दाखवूं लागला तर लोक त्याला मागें खेंचतात.' ॰स्वातंत्र्य-न. व्यक्तीला निर्वेध वागण्याची मोकळीक. 'व्यक्तिस्वांतत्र्यानें धर्मबंधनें तुटत चाललीं आहेत.' -केले १.१६७. ॰स्वातंत्र्यवादपु. (तत्त्व.) व्यक्तीला स्वातंत्र्य देण्याबद्दलचें मत. (इम.) इन्डिव्हिज्युअ/?/लिझम्. व्यक्तीकरण- न. १ स्पष्टीकरण; विवरण; फोड. करण ७ पहा. २ चित्रकलेंतील अंग; साधनक्रिया. (इं.) आर्ट आँफ एक्झेक्युशन.
भाकर-री
स्त्री. १ जोंधळा, बाजरी इ॰ च्या पिठाचा चपटा आणि वाटोळा (जाड-पोळीसारखा) भाजून केलेला खाद्य पदार्थ. 'वीरांची उत्पत्ति, वीरांचें संगोपन व वीरांचें तेजोवर्धन स्वकष्टाच्या भाकरी करीत असतात.' -सत्वपरीक्षा ७७. देशावर भाकर (अनेक वचन भाकरी) व कोंकणांत भाकरी (अनेक वचन भाकर्या) अशीं रूपें रूढ आहेत. भाकर शब्द थोडा अशिष्ट मानतात. २ पाण्या- वर उडविण्याचा चपटा दगड आणि हा खेळ. [सं. भक्ष्याहार] म्ह॰ भाकरीस तोंड नाहीं भांडणास मूळ नाहीं. ॰पायानें खाणें-मोडणें-मूर्ख, वेडगळ असणें. भाकरीला भूक लागली-जेवण वाट पाहात आहे. सामाशब्द- ॰काला-पु. भाकरी व इतर खाद्य पदार्थ यांचा कुसकरा; दूधभाकरी. 'मुख- प्रक्षालन करी । अंगिकारी भाकरकाला ।' -घन श्यामाची भूपाळी. ॰खाऊ-वि. (निंदार्थी) भाकरी हें ज्याचें खाणें आहे असा (शेतकरी, कुणबी इ॰). याच्या उलट भात खाऊ म्हणजे पांढर- पेशा. [भाकर + खाणें] ॰तुकडा-पु. (क्षुद्रतादर्शक संज्ञा) १ भाकरी. २ अन्न; जेवण. ॰बडव्या-वि. (तिरस्कारार्थीं) दुसर्याच्या घरीं आचारीपणा करून उपजीविका करणारा; स्वयंपाकी. [भाकर + बड- विणें] ॰मोड्या-वि. १ भाकरखाऊ पहा. २ तुकडमोड्या. भाक- रीचा खेळ-पु. पाण्याच्या पृष्ठभागाला तीन चार वेळां स्पर्श करून पुढें जाईल अशाप्रकारें खापर्या किंवा चपटे दगड पाण्यावर फेकण्याचा मुलांचा खेळ. भाकरीचा पिंड-पु. मुख्यत्वें भाकरी- वर पोसला गेलेला, भाकरी मानवणारा मनुष्य; भाकरखाऊ. भाकरीची चाकरी-स्त्री. पोट भरण्याकरितां करावी लागणारी नोकरी. 'कल्पनांचा सुखसंचार संपला आणि एकलकोंडा भविष्य- काळ व भाकरीची चाकरी डोळे फाडून दटावूं लागली.' -तीन- आणेमाला १०. भाकरीचें झाड-न. एक प्रकारचेंझाड. हें दक्षिण पॅसिफिक महासागराच्या बेटांतून होतें; यापासून भाकरी करतात. भाकर्या-वि. दुसर्याच्या घरीं तुकडे मोडणारा; उपट- सुंभ. भाकर्या भाजणें-मुलींचा खेळ. -मखेपु ३४६. लष्क- रच्या भाकर्या भाजणें-नसत्या उठाठेवी करणें. (पूर्वी ज्या ठिकाणीं लष्करी तळ पडे त्या ठिकाणच्या लोकांना भाकर्या भाज- ण्यास लावीत). भाकर्या निवडुंग-पुन. फड्यानिवडुंग पहा.
रान
न. १ जंगल; वन; विशेषत: जंगलांतील खुजा, ठेंगण्या झाडाझुडपांचा समुदाय. २ तळवट; माळ; रुक्ष प्रदेश; नापीक व निर्जन प्रदेश. ३ मनुष्यास उपभोग्य असा भाजी-पाला इ॰ कांहून भिन्न असें तण, गवत, उपद्रवी-निरुपयोगी वनस्पती इ॰ 'भाजीचे वाफ्यांत कोठें कोठें रान रुजलें आहे तें उपटून टाक.' ४ शेतांत उगवणारें गवत; तन. ५ शेत. ६ झाडी; राई; बन; वृक्षवाटिका. 'बंदर किनार्यास सारें नारळींचें रान.' ७ देश; प्रदेश; भाग. 'मारवाडदेश म्हणजे उंटाचें रान.' 'त्या रानचे मनुष्यास हें रान मानत नाहीं.' ८ विदेश; परका मुलुख. 'परस्परें या रानांतील उमराव व रजवाडे यांस पत्रें देऊन तुमची कुमक करवितों.' -भाव १३. ९ (ल.) फार मोठी वाढलेली हजामत. प्रदेश ह्या सामान्य अर्थी रान शब्दा- पूर्वीं विशेषणात्मक शब्द जोडल्यानें त्याचा विशेष अर्थ होतो; उदा॰ डोंगररान; खडकरान; धोंडेरान किंवा गोटेरान; वनजररान गवतरान; माळरान इ॰ तसेंच काळें रान, पांढरें रान, चिक्कणरान काळया-पांढर्या-चिक्कण मातीचा प्रदेश. नवें रान = पूर्वीं जंगल किंवा माळ असून नुकतीच लागवडीस आणलेली जमीन [सं. अरण्य; प्रा. रण्ण] म्ह॰ (गो.) रान झालें लागीं घरां जाली पैस = म्हातारपण प्राप्त होणें, मरण जवळ येणें या अर्थीं. (वाप्र.) ॰उठणें-लोक खवळणें; क्रुद्ध होणें. 'म्युनिसिपल इमारतीवर संयुक्त निशाण लावण्याचा ठराव हुजूरपक्षानें फेटाळला त्यामुळें शहरांतील रान उठलें होतें.' -के २२.७.३०. ॰उठविणें- जागाविणें-पारधीकरितां धडधड आवाज करून सावजांना जागें करणें. झाडींतून पारध, सावज बाहेर हुसकणें. 'रान उठविल्या- शिवाय, जागविल्याशिवाय शिकार कशी सापडेल ?' ॰काढणें- १ जंगल-जमीन लागवडीस आणणें. २ झाडें झोडपून व ओर- डून ओडडून शिकार उठवणें. ३ रानाचा, जंगलाचा शोप लावणें. ॰खवळणें-१ एखाद्यावर खवळणें; उठणें (रान, श्वापदें). २ अतिशय क्षुब्ध होणें, (राग, भूक, लोभ, काम इ॰ कानीं). 'लवकर जेवायला वाढा, आज इकडे रान फार खवळलें आहे.' ॰घेणें-१ रानांत पळून जाणें (गुरांनीं). २ (ल.) वेढंग मार्गाचा स्वीकार करणें; बारगळणें. ३ रानांत शिरणें पहा. ॰बदलणें- सोडणें-पारखें होणें-(ल.) आपलें मन किंवा उद्देश बद- लणें; एखाद्यासंबंधीचा आपला विचार फिरविणें; आपला पूर्वींचा मुद्दा सोडून देणें. ॰भारणें-१ सर्व प्रदेशावर जादू पसरणें; मंत्र टाकणें. 'तमाम गारोडी रान भारतो तसा प्रकार त्यानें केला.' -भाव २४. २ (ल.) यथास्थित पैसे चारणें. ॰मानणें-त्या देशाची हवा इ॰ प्रकृतीस मानवणें, पसंत पडणें. 'कोंकणच्या माणसास हें रान मानवत नाहीं.' ॰हांकणें- (शिकार उठविण्याकरितां) झाडें झोडपणें व आरडाओरड करणें. रानांत, आडरानांत पडणें-एकटें सापडणें; उदास होणें. रानांत शिरणें-(ल.) (संभाषणप्रसंगीं) सरळ मार्ग सोडून अयोग्य गोष्ठी सांगत बसणें; विषयांतर करणें; बहकणें. रानीं रिघणें-अरण्य सोविणें. 'ब्रह्म- सुकाळु लाघला ते ही । जे रानीं रिगाले ।' -ऋ १६. रिकाम्या रानीं-क्रिवि. बेफायदेशीर; व्यर्थ; निरर्थक; फुकट; (बोलणें, चालणें). 'आतां एथें काम नाहीं काज नाहीं. रिकाम्यारानीं कशाला बसावें, रहावें, फिरावें इ॰.' रान या शब्दापुढें पक्षी, पशु व वनस्पति यांचीं नांवें जोडून रानटी किंवा व माणसाळलेला, न लागवड केलेला या अर्थीं बरेच समास होतात. जसें.-रानडुक्कर; रान- मांजर; रानकेळ; रानउडीद; रानतूर; रानपडवळ; रानमटकी; रान- मसूर; रानमाठ; रानमूग इ॰. तसेंच रावआंबा-केळी-कोंबडा-जेवण. या व यासारख्या दुसर्या अनेक सामासिक शब्दांत /?/ ह्याचा रानांत राहणारा किंवा होणारा असा अर्थ होतो; कांहीं विशिष्ट सामाशब्द- ॰आंबा-पु. वृक्षविशेष. ॰आलें-न. रानांत होणारें आलें. ॰आळू-न. तेरें अळूं. हें पर्जन्यकाळीं उगवतें; याचा रंग पाढरा, हें फार थंड आहे याची भाजी चागली होते. ॰कट- वि. खेडवळ; गांवढळ; वनांतील (मनुष्य, पशु). [रान] ॰कंद-पु. एक कंद. ॰करी-पु. रान्या; गवत, ताकूडफाटा इ॰ आणण्याकरितां रानांतच फिरणारा माणूस. ॰काढ्या-वि. शिकार कर- ण्यासाठीं रान काढण्याकरिता लावलेला (मनुष्य); पारध्याकरितां सावज कचाटयांत आणणारा. ॰कांदळ-न. एक वन्य वृक्ष. ॰कापशी-स्त्री. रानांतील कापशीचें झाड; देवकापशी, देवपळ्ही- हून भिन्न व पिळ्हेशीं जुळणारी. हिचें बीं लहान व वाटोळें असून देवकापशीचें मोठें व लांबट असतें. ॰कापूस-पु. रानकापशीचा कापूस. ॰कोवळा-पु. कावळ्याच्या जातींतील जंगली पक्षी. ॰केळ-ळी-स्त्री. केळीची जंगली जात. हिच्या पानावर जेवतात. कांदा उकडून किंवा वाळवून त्याचें पीठ करून खातात; कवदर व ही एकच. कवदर पहा. ॰कौबडा-डी-डें-पुस्त्रीन. जंगली कोंबडा. ॰खरडा-पु. जंगलखरडा पहा. ॰गट-वि. १ खेडवळ; गांवढळ. २ वन्य; लागवडीशिवाय उगवणारा. [रान] ॰गांजा-ज्या-पु. एक औषधी मूळ; सालवण. याचीं पानें बेलाप्रमाणें त्रिदळ असून यास निरनिराळया रंगाचीं फुलें येतात. याचें मूळ सर्व प्रकारचे तापा- वर गुणकारी आहे. ॰गाय-स्त्री. तार्तरी देशांतील गाय; वनगाय. ॰गोवरी-स्त्री. जंगलांत सांपडणारें इतस्तत: पडलेलें शेण, शेणी. याच्या उलट शेण थापटून लावलेली गोवरी. ॰घेवडा-पु. एक वेल. ॰घोळ-स्त्री. घोळ नामक भाजीचा एक प्रकार. हिचें पान रंगानें तांबूस चरबट असतें. ॰चा राजा-पु. भील किंवा कात- करी. ॰चिमणी-स्त्री. १ चिमणीसारखा एक लहान पक्षी. २ जांभळीं व पांढरीं फुलें येणारें एक झाड. ॰जाई-स्त्री. उंच वाढ- णारें वेलासारखें झुडुप. ॰जेवण-न. वनभोजन; रानात किंवा झाडाखालीं केलेलें जेवण. रानट, रानक(ग ट-वि. १ रानांत राहणारा; रानटी; अज्ञानी. 'होतां तापत्रयार्त त्वरित भववनीं रक्षितां रानटाचा ।' -केका १२२. २ आडगांवीं राहणारा; शहर, कचेरी, गरबार इ॰ ठिकाणीं न जाणारा; अडाणी (मनुष्य). ३ जींत भात, गहूं इ॰न येतां गवत फार उगवतें अशी जमीन. ॰टाकळी-स्त्री. टाकळीची एक जात. रानटी-ठी-वि. १ रानासंबंधीं; आपो- आप उगवणारा. २ गांवढळ; खेडवळ; रीतभात नसलेला. [रान] ॰टोणगा-पु. जंगली टोणगा; रेडा. ॰टोळ-पु. टोळाची एक जात. ॰डुक(क्क)र-पुन. भुइमूग, ऊंस, भात इ॰ पिकांचा फन्ना उडविणारें रानटी जनावर. ॰तरवड-पु. तरवडाची एक जात. ॰तीळ-पु. काळा तीळ पहा. ॰तुळस-स्त्री. एक वनस्पति; वैज- यंती, ही तुळशीसारखीच असते. पानें मात्र मोठीं असतात. हिला मंजिर्या येतात. बीं काळें, किंचित् तांबूस व खसखशीएवढें असून पाण्यांत घातलें असतां फुगतें. हें तुकुमराई (सबजाचें बीं) प्रमाणें असतें. यासहि तुकुमराई म्हणतात. ॰र-स्त्री. एक लहान पिवळ्या फुलांचें झुडुप. ॰तेरडा-पु. तेरड्याची एक जंगली जात. ॰दांडगा- वि. आडदांड; रानटी; धिप्पाड; राक्षसी काम करणारा. ॰दांडगे- पुअव. सर्व तर्हेचीं शस्त्रें घेऊन शत्रूचा किंवा लुटारू घाडीचा प्रति- कार करण्याकरितां जाणारा शेतकरी किंवा खेड्यांतील लोकांचा समुदाय. ॰निंबू-न. राननिंबोणीचें फळ. निंबोणी-निंबूण- स्त्री. एक मोठें कोटेरी झाड. ॰निवडुंग-पुन. जंगली निवडुंग. ॰पासरा-पु. दुकानदारीची झिंबड. ॰पाळ-वि. नापीक; भुकिस्त; बरड; माळवजा (भातजमीन). ॰पिंपळ-पु. पारोसा पिंपळ; एक झाड. ॰बाजरी-स्त्री. गवतासारखी वनस्पति. ॰भरी-क्रिवि. रानोमाळ. 'रानभरी झाले साधारण ।' -एभा २३.३१६. ॰भरी- भरू-वि. १ भयभीत; घाबरलेला; पलायमान; परागंदा (पशु, मनुष्य). 'महा वारण जे उन्मत्त । दैत्यें सोडिले तयावरते । तमास प्रल्हाद सिंह दिसत । मग ते होत रानभरी ।' २ (ल.) चैनीकरितां इतस्तत: भटकण्याच्या हेतूनें ज्यानें आपली बायका- पोरें सोडली आहेत असा. [रान + भरणें] ॰भरू होणें-१ रस्ता चुकणें; आडरस्त्यास जाणें. २ गोंधळणें; घाबरणें; घाबरें होणें. ॰भाजी-स्त्री. १ लागवडीशिवाय उगविणारी भाजी. २ वनांत होणारी खाद्य वनस्पति. ॰मटकी-स्त्री. रानांत होणारी मटकी, मठ. ॰मसूर-स्त्री. एक जंगली झाड; हीं झाडें महाबळेश्वराकडे पुष्कळ होतात; ह्यांचें बीं मसुरासारखें असतें. ॰माजर-पुन. जंगली मांजर; मोठा व धाकटा असे याचे दोन मेद आहेत. ॰माणुस- न. १ एक प्रकारचा वानर. २ (ल.) रानटी; खेडवळ माणूस. ॰मूग-पु. रानात होणर्या मुगाची जात. ॰मोगरा-पु. अरुंद पानाची जाई. ॰म्हैस-स्त्री. जंगली म्हैस. ॰रावताण-णी- नस्त्री. रावताण पहा. ॰वट-स्त्री. मोठ्या रस्त्यापासून फुटलेली रानास जावयाची वाट 'पुढच्या आंब्याजवळ वाट उजवी फुटली आहे ती रानवट आहे.' -वि. १ जंगली; लागवड न केलेली व साफ न केलेली (जमीन). २ खेडवळ; गांवढळ; रानटी (मनुष्य). ३ वन्य आपोआप उगवणारा (वृक्ष, वन- स्पती). ॰वत-न. (राजा.) वन्य वृक्षांचें पान; ज्यांचीं पानें सामान्यत: भोजनाकरितां, पुड्याकरितां उपयोगी पडत नाहींत अशा झाडाचें पान. [रान + पत्र] ॰वन-न. (व्यापक) रान; जंगली प्रदेश; रानांच फिरणें, वन्य पदार्थांवर उपजीविका करणें किंवा निर्वाहाकरितां वन्य पदार्थ शोधणें. (क्रि॰ करणें; पाहणें; फिरणें; हिंडणें). 'रानवन मला व्हाव्याचें-किंवा भी करीत असतों.' [रान + वन] रानवा-पु. लागवडीस न आणलेली पडीत जमीन; जंगल; रान. 'गांवाला रानवा असल्यावांचून तृणकाष्ठाची सोय होत नाहीं.' रानवाट-स्त्री. जंगली व रानवट प्रदेशाकडे जाणारी वाट. ॰वाळूक-न. (थट्टेनें, ल.) दगड. ॰वाळूक चारणें-(ल.) दगड मारणें. ॰शकट्ट-पु. एका जातीचें श्वापद. 'रानशकट्ट आणी रीसें ।' -दा ३.७.९. ॰शेकट-पु. रानशेवगा पहा. ॰शेण-शेणी-गवरी-स्त्री. १ रानांत पडलेलें गाई-म्हशीचें वाळलेलें शेण, याच्या उलट वळशेण. २ जेव्हां एखाद्या मनुष्याचें ज्ञान, समज, सामर्थ्य किंवा संपत्ति यासंबंधीं पूर्णपणें निषेध दाख वाववाचा असतो तेव्हां उपमानाप्रमाणें योजलेल्या (शेण, गोवर्या, माती, धूळ, दगड, धोंडा, राख इ॰) शब्दापैकीं हा एक शब्द आहे. उदा॰ त्याला रानशेणीचें पीठ समजतें ? = त्याला काय समजतें ? ॰शेर-पु. एक वनस्पति; हुरा. ॰शेवगा-पु. एक झाड. सामा- न्यत: रानेशर. ॰सठ(ट)वी-स्त्री. सठवीचें रूप धारण करणार्या देवीचें किंवा दुर्गेंचें नांव. 'उच्छिष्टचांडाळी रानसटवी जखणी ।' -ह १३.६८. ॰सावज-न. रानांतील जंगली पशु. 'कीं रानींचें रानसावज उन्मत्त ।' -नव २२.१३१. ॰सिवार-न. शिवारां- तील जंगल. 'गांवचें रानसिवार खोताची सत्ता आहे.' -मसाप २.५९. ॰सोडवण-स्त्री. रान तोडून साफ केल्याबद्दलची जकात. -अस्पृ ३८. ॰सो(व)र-सोरु-पु. रानटुक्कर. 'रानसोवर बळकट ।' -कालिका २२.१९.[रान सूकर-सूअर-वर] ॰हळद- दी-स्त्री. एक वनस्पति. ॰हुरा-पु. सामान्यत: रानशेर. राना- वळी-स्त्री. एक लहान फुलझाड. हिचा औषधांत उपयोग करतात. रानी-परज-स्त्री. सुरतपासून नवापूरपर्यंत राहणारे रानटी लोक. रानोमाळ-क्रिवि. १ रानांत आणि माळांत. २ तजावजा; अव्यवस्थित; अस्ताव्यस्त रीतीन; पांगून. 'तैसे ब्राह्मण रानो- माळ । भयें करूनि फळतात ।' ३ (ल.) पसरल्यासारखें; इकडे तिकडे अस्ताव्यस्त फेकल्यासारखें. 'वार्यानें पोथीचीं पत्रें रानो- माळ झाली.' [रान + माळ] रानोरान-क्रिवि. रानांतून आणि वनांतून; दरीखोर्यांतून; सर्व देशभर. 'माझी गाय चुकली म्हणून मी रानोरान फिरलों' [रान द्वि.] रान्या-वि. रानावनां तील; खेडवळ; गांवढळ; रानकरी; रानट. [रान]
शुद्ध
न. ब्रह्म; चैतन्य. 'शुद्धीं अहंकार अळुमाळ । उठतां शुद्वासि करीं शबळ ।' -एभा १३.४३२. -धावि. १ निर्मल; पापरहित; दोषरहित; पवित्र; स्वच्छ; निष्पाप. २ शोधित; संस्कारादिकानीं पवित्र, निर्मल केलेला; पावन केलेला. ३ निर्दोष; बिनचूक; चोख; बरोबर; अव्यंग. (व्यक्ति, लेखन, भाषण, वर्तन, क्रिया वगैरे). ४ एकाकी; साधा; विशेषणरहित. 'कांदा भक्षूं नये असा एक निषेध केला असला म्हणजे शुद्धाचा निषेध सर्व जातीवर जाईल'. ५ केवळ; फक्त; नुसता; निवळ. 'त्याची फ्रान्सच्या रणांगणावर शद्ध लांडगेतोड चालली होती' -अस्पृ २. ६ शुक्ल; पांढरें; चांदण्याचा (पक्ष). ७ चांगला; शुभ; (कुयो- गादि) दोषरहित; पवित्र (दिवस, तिथि). ७ योग्य; न्याय्य; बरोबर; संमत; 'कीं नृपशुद्ध युद्ध हा करितो ।' -मोकर्ण १३. १७. याअर्थी अनेक समासांत हा शब्द येतो. उदा॰ आकारशुद्ध, आचारशद्ध ९ अव्यंगच निरोगी; सुदृढ; धडधाकट. १० साक्षात्; मूर्तीमंत. 'सुमनें तीच्या रतीच जी शुद्ध ।' -क्रमं २. [सं. शुध् = स्च्छ करणें] ॰अपूर्णांक-पु. (गणित) साधा अपू- र्णांक. ॰कल्याण-पु. एक राग. या रांगात षड्ज, तीव्र ऋषभ. तीव्र गांधार, तीव्र मध्यम, पंचम, तीव्र धैवत व तीव्र निषाद हे स्वर लागतात आरोहांत मध्यम, निषाद वर्ज्य, अव- रोह संपूर्ण. जाति औडुव-संपूर्ण. गानसमय रात्रीचा पहिला प्रहर. याचे भेद-कामोदकल्याण, जयकल्याण, भूपाळी कल्याण, यमन कल्याण, श्याम कल्याण, सवानी कल्याण, हमीर कल्याण, हेमक कल्याण इ॰ ॰जाति-स्त्री. (संगीत) शुद्ध स्वरांवरून तयार झालेली जाति. या सात आहेत-षाड्जी, आर्षभी, गांधारी, मध्यमा, पंचमी, धैवती व नैषादी. ॰तान-स्त्री. (संगीत) स्पतस्वरांच्या क्रमांत बदल न करतां घेतली जाणारी तान. ॰पक्ष- पु. शुक्लपक्ष; चांदण्याचा पंधरवडा. ॰प्रीति-स्त्री. निर्व्याज प्रेम; अहेतुक प्रेम. याहून भिन्न भयप्रीति, काम्यप्रीति इत्यादि. ॰भोजन-न. निरामिष, निर्मांस भोजन. ॰मति-वि. सरळ मनाचा; आंतबाहेर नसलेला; निष्कपट. ॰मल्लार-पु. (संगीत) एक राग. या रागांत षड्ज, तीव्र ऋषभ, कोमल मध्यम, पंचम, तीव्र धैवत हे स्वर लागतात. जाति औडुव औडुव. वादी मध्यम, संवादी षड्ज, गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर. याचे प्रकार पुढें दिल्याप्रमाणें आहेत-गौडमल्लार, नटमल्लर, मीरामल्लार, रामदासीमल्लार, मियामल्लार, मेघमल्लार, सूरदासीमल्लार, चर्ज्यू- मल्लार, देसमल्लार, रूपमंजरीमल्लार वगैरे. ॰मार्ग-पु. सनातनधर्म; परंपरागत धर्म; परंपरागत मार्ग; पवित्र, सत्य, ऋजु मार्ग. 'विरक्तें शुद्ध मार्ग सांगावा ।' -दा २.९.३७. ॰मुखी-वि. पांढऱ्या कपा- ळाचा; गंध न लावलेला. ॰राग-पु. (संगीत) जो राग आपल्या नियमबद्ध स्वरांनीं रंजक होतो तो. ॰लेखन-न. व्याकरण नियमां- नुसार जें लिहिलेलें असतें, लिहावयाचें असतें तें. ॰वृत्ति-स्त्री. १ योग्य, अधिकारानुरूप व्यवसाय, धंदा; ब्राह्मणाचाधंदा-भिक्षाटन. २ निष्कपट, निष्पाप, सरळ स्वभाव, वर्तन. -वि. निष्कपट; सरळ; निष्पाप. ॰शब्दयोगी अव्यय-न. (व्या.) ज्या शब्दयोगी अव्ययांस शब्दांस जोडल्याशिवाय स्वतःचा अर्थ नसतो व जीं जोडतांना शब्दांचें सामान्यरूप होत नाहीं तीं. उदा॰ च, हि. ॰शैव ब्राह्मण-पु. गुरव. -केसरी १ । ९ । ३६. ॰सत्त्व-पु. रजोगुण अथवा तमोगुण यांच्या प्रभावानें मिश्र न झालेला सत्त्व- गुण. 'आपुले आर्तींचें अंजन । शुद्ध सत्त्वाचें पत्र जाण ।' -एरुस्व ३.१. ॰समाचार-पु. १ कुशलवृत्त; सुवार्ता; खुशा- लीची बातमी. २ शुद्धि; भान; मन ठिकाणावर असणें. ॰सामंत- पु. (संगीत) एक राग. या रागांत षड्ज, कोमलऋषभ, कोमल गांधार, कोमल मध्यम, पंचम, कोमल धैवत हेस्वर लागतात. आरोहांत गांधार, निषाद वर्ज्य, अवरोहांत निषाद वर्ज्य. जाति औडवषाडव. वादी षड्ज, संवादी मध्यम. गानसमय दिवसाचा पहिला प्रहर. ॰सारंग-पु. (संगीत) एक राग. यांत षड्ज, तीव्र ऋषभ, कोमल मध्यम. तीव्र मध्यम, पंचम, तीव्र धैवत, कोमल निषाद हे स्वर लागतात. जाति षाडव षाडव. वादी ऋषभ, संवादी पंचम. गानसमय माध्यान्ह. या रागाचे प्रकार:-बड- हंल, मियारंग, लंकादहन, बिंद्राबनी, मधुमाद. सावंतसारंग इत्यादि ॰स्फटिक-पु. १ (शब्दशः) निवळ, स्वच्छ, पांढरा स्फटिक. २ (ल.) निरक्षर, निष्कांचन, अक्षरशत्रु, ढ, कफल्लख इसमास म्हणतात; तसेंच वस्त्रहीन, अर्थहीन, सर्वस्वीं नागवलेला अशा गृह- स्थासहि म्हणतात. ॰स्वर-पु. (संगीत) जुन्या मताप्रमाणें बावीस श्रुतींपैकीं ४,७,९,१३,१७,२०,२२, या श्रुतींस ठेवलेलीं नावें. नव्यां मताप्रमाणें १,५,८, १०, १४, १८, २१ या श्रुतींची नांवें. दोन्ही पद्धतींत सा, रे, ग, म, प, ध, नि हींच नांवें आहेत. ॰स्वरूप-न. ब्रह्म. ॰ज्ञान-न. ब्रह्मज्ञान; अपरोक्ष- ज्ञान. शुद्धद्वैती-पु. एक संप्रदाय. मायाविरहित म्हणजे शुद्ध जीव व परब्रह्म हीं एकच आहेत असें मत. -गीर १७.
गैर
अ. निराळेपणा, भिन्नपणा दाखविणारा परंतु सामा- न्यतः अभाव किंवा अन्यथाभावदर्शक अरबी अव्ययशब्द किंवा प्रत्यय. याचा मनसोक्त (विशेषतः हिंदुस्थानी शब्दांबरोबर) उपयोग करितात. या शब्दाचें पुढील कांहीं अर्थ होतात- १ इतर; अन्य. 'गैर पथकें येऊन मोर्चेबंदी केली आहे.' -रा १२.१२५. २ अयोग्य; अन्यायाचा. 'हें तुम्हीं गैर केलें' -मदरु १.१०६. ३ (नामाच्या किंवा विशेषणाच्या प्रारंभीं जोडल्यास) अवास्त- विक, उलट; विपरीत. ४ विना; वांचून. 'गैर अन्याय मला गांजतो.' 'गैर अपराध दंड घेऊं नये.' [अर. घैर = निराळा, व्यतिरिक्त] (वाप्र.) ॰अदबी-स्त्री. असभ्यता; अपमान; अनादर. 'गैर अदबी बोलला सबब पातशाहा यास राग येऊन डोळे काढिले.' -मदरु २.७०. ॰अदा-वि. रद्द; न पटलेलें. 'शिंदे कडील वरात आली तर मग गैरअदाही व्हावयाची नाहीं.' -ख १०. ५२.७९. ॰अब्रू स्त्री. अप्रतिष्ठा. 'गैर-अब्रू फारशी न करणें.' -वाडबाबा २.७५. ॰अमली-वि. परस्वाधीन; दुसर्याचें. 'चार लक्षाचे भरतीस अमली महालांपैकीं बेरीज कमी आल्यास गैर- अमली महाल आहेत त्यांपैकीं भरतीस कमाल आकाराचे बेर- जेचा महाल लावून देणें.' -रा १०.३२१. ॰आबादी-वि. ओसाड; उजाड; बेचिराख. ॰आरामी-स्त्री. अवस्थता. 'हज्र- तांचे शरिरास दोन दिवस गैरआरामी] आहे.' -दिमरा २.३२. ॰इतबार-पु अविश्वास. 'तमाम फौजेस गैरइतबार जाहला.' -भाब ८०. ॰इमान-न. इमान नसणें; द्रोह; अनिष्ठा. 'आमचें गैरइमान असतें तरी आम्हीं आजपर्यंत येथें तुम्हापाशीं न ठरतों.' -भाब १११. ॰कबजी-वि. परस्वाधीन; गैरअमली पहा. 'सरं- जाम गैरकबजी, कांहीं सुटला त्यांत वस्ती नाहीं.' -ख २.९४२. ॰कायदा-वि. बेकायदेशीर; असनदशीरे. (इं.) इल्लीगल. ॰कायदा मंडळी-स्त्री. (कायदा) गुन्ह्याचें कृत्य करण्याच्या इराद्यानें पांच किंवा पांचाहून अधिक एकत्र जमलेले इसम. (इं.) अन्लॉफुल असेंब्ली. ॰किफायत-स्त्री. तोटा; नुकसान. 'किफायत, गैरकिफायत समयासमयास चित्तांत आणून किफा- यतीचीं कामें करीत आलां, पुढें त्याचप्रमाणें करावीं' -रा १. ३४६. ॰कौली-वि. परवाना किंवा अभयपत्र न दिलेलें; बिगर परवाना. -मराआ. ॰खर्च-पु. १ जादा, किरकोळ खर्चं. २ गैर- वाजवी, अयोग्य खर्च. ॰खुशी-षी-वि. नाकबूल; नाखूष; रुष्ट. 'खुषी किंवा गैरखुषी असा हा कौल बायकांशी ।' -पला १०४. ॰चलन-नी-वि. १ चालू नसलेलें (नाणें). २ (ल.) अव्यव- स्थित; बेशिस्त; अशिष्ट (वर्तन). ॰चलन-स्त्री. १ चलनाचा अभाव; चलन नसणें. २ (क्व.) गैर वर्तन; बदचाल. ॰चाकर- वि. बडतर्फ; माजूल. 'जखमी जाहले त्यांस गैरचाकर करून जागिरा तगीर करविल्या.' -जोरा ७५. ॰जप्त-वि. गैरअ- मल; गैरकबजी; परस्वाधीन. 'गैरजप्त देश साधावें.' -चित्रगुप्त ११०. ॰जबाब-पु. उद्धटपणाचें, अनादराचें उत्तर. ॰दस्त- स्ती-वि. सरकारसार्याची सूट असलेली (जमीन). ॰नफा- फायदा-पु. तोटा; नुकसान. 'येणेंकडून तुमचा गैरनफा जाहला.' -जोरा १४. 'अत्यंत वोढ केल्यास पाटीलबावांचा गैर फायदा आहे.' -जोरा ४७. ॰प्रकारचा-वि. १ इतर; भिन्न; दुसरा. २ चमत्कारिक; हास्यापद; तर्हेवाईक; विलक्षण. ॰बर्दार-वि. बहार नसलेला; फळहीन. 'पोकळी गैर-बर्दार, शेंडे वाळलेल्या आहेत.' -रा ११.७९. ॰मजुरा-क्रिवि. (हिशेब) मजुरा (वजा) टाकल्याशिवाय; वजावाट न करितां. [गैर + मजुरा-मुजरा] ॰मंजूर-वि. नामंजूर; रद्द. 'अप्टणांनीं जापले जागा वाजवी असतां गैरमंजूर करून एकपक्षी तह केला.' -रा १२.१२२. ॰मर्जी-स्त्री. अवकृपा; रुष्टता; इतराजी; नाराजी. ॰मसलत- मनसुबा-स्त्रीपु. मूर्खपणाचा, वेडगळपणाचा बेत, कट, योजना. ॰महसर्दार-वि. अप्रतिष्ठित. -रा ८.४३. [अर. मआसिर = थोरवी] ॰महसूल-पु. जुलमी करांपासून किंवा अन्याय्य मार्गानें काढलेला वसूल; योग्य सरकारसार्याविरहीत वसूल. 'विजा- पुराहून एक हवालदार गैरमहसूल पैदागिरी कबुल करून आला.' -इऐ ५.१००. ॰माकूल-मूर्ख; अडाणी; गैर; वाईट. 'कार्बारास खलेल करणें हें गैरमाकूल गोस्टी आहे.' -रा १८.३३. -क्रिवि. मूर्खपणें. 'लोक गैरमाकूल आम्हांस न कळत वर्तले तरी त्याची बद्लामी आपणावरी न ठेववी.' -रा ८.१०. ॰मान्य-वि. अमान्य; असमंत. ॰मार्ग-पु. गैरशिस्त आचार, रीत; दुराचरण. ॰माहीत-वि. १ अपरिचित; अनोळखी. २ अजाण; नेणता. 'साठे आहेत ते गैरमाहीत.' -ख ७.३५५१. ॰माहीतगार- वि. अज्ञानी; अडाणी. ॰मिराशी-वि. वंशपरंपरा मालकी नस- लेला. 'मातकदीम मिरासी खरी जाहली. काणव मजकूर गैर- मिरासी मुतालीक ऐसे जाहले.' -इऐ ५.१०२. ॰मेहनत- स्त्री. निरुद्योग. 'परंतु मेहनत, गैर-मेहनत सर्व एक ईश्वरी क्षोभानें वायां गेल्या.' -ऐ ५. ॰मेहेरबानी-स्त्री. अवकृपा; इतराजी. 'सांगितल्यावरून मनांत गैर मेहेरबानी न धरावी.' -रा ८. १०. ॰मोसम-हंगाम-पु. अवेळ. 'गैर मोसमांत (पौष वद्य १२ स) आंबे आले यावरून कौतुक वाटलें.' -रा २२.५. ॰रजावंद-वि. नाराज; नाकबूल. 'तो क्रियेस गैररजावंद जाहला.' -वाडशाछ १३२. [फा.] ॰रहा-रीत-स्त्री. बद- चाल; अयोग्य रीत; वाईट आचरण. -वि. बदचालीचा-सलु- काचा. 'भुजंगराव याची वर्तणूक गैररहा दिसते.' -ख ११. ५७७६. ॰राजी-वि. असंतुष्ट; नाराज. 'पाटसकर गैर-राजी जाले.' -रा ६.२६. ॰राबता-वि. १ बंदी; मनाई; खंड (मार्ग, मिळणें, येणें-जाणें, वहिवाट, चाल यांमध्यें). 'नाना फडणीस लष्करांतून आल्यापासून गैरराबता बहुत करूं लागले. कोणाचीच गांठ पडत नाहीं.' -ख ८.४१५१. २ वहिवाट, चाल यामध्यें अनभ्यास; अपरिचय; अवापर; वळण नसणें. ॰रास्त-वि. गैर- वाजवी; असत्य; खोटा. ॰रुजू-वि. १ गैरहजर. २ मंजूर किंवा दाखल किंवा मान्य न केलेले (हिशेब). ॰लायक वि. अयोग्य; नालायक; अनुचित. ॰वळण-न १ गैरराबता. 'त्या मार्गास सध्यां गैरवळण जाहे.' २ एकीकडे असणें; आडवळण; दळण- वळण नसणें. 'हा गांव गैरवळणांत पडला.' ३ गबाळ, वाईट लिखाण. ४ सरावांत नसणें; सवंय नसणें; निरुपयोग. ॰वाका- पु. खोटी किंवा बनावट गोष्ट; गैरसमजूत; लबाडी. 'ऐसा गैर- वाका सांगितला.' -रा ८.५२. -वि. वेडावांकडा -शर [फा. घैर्-वाकिअ] ॰वाजवी-वाजिवी-वि अयोग्य; अनुचित; फाजील; अन्याय्य. 'त्याचा अभिमान गैर-वाजवी याणीं नच- धरावा.' -रा १२.७९. [फा. घैर् + वाजिवी] ॰वाजवी दाब- पु. (कायदा) अयोग्य वजन. (इं.) अनड्यू इन्फ्लुअन्स. ॰वास्तविक-वि. खोटा; असत्य; वस्तुस्थितीस सोडून. ॰विलग-क्रिवि. आडबाजूस; आडवळणी. -वि. (विलगसाठीं चुकीनें योजलेला) न मिळणारा; न जुळणारा. ॰विल्हईस- विल्हेस-विल्हे- क्रिवि. आपल्या (योग्य) ठिकाणाच्या विरुद्ध जागी; भलतीकडे. ॰विल्हेस लागणें-पडणें-१ दुसरीकडे किंवा चुकीच्या ठिकाणी लागण; क्रमवार नसणें. २ योग्य ठिकाणाहून गहाळणें; गमावणें. ३ गोंधळ होणें, अव्यवस्थित असणें, ॰शर्ती- स्त्री. माफीजमीन म्हणून ठरविल्यानंतर जिला इतर दुसर्या कोणत्याही अटी पाळावयाच्या नसतात अशी जमीन. ॰शिस्त- वि. बेशिस्त; अव्यवस्थित; विना रीतभात; नियमबाह्य; असभ्य; फाजील (माणूस, वर्तन, भाषण). -स्त्री. बेशिस्तपणा; अव्यवस्थितपणा; अयोग्यपणा. अनियमितपणा. ॰शेरा- शरा-वि. धर्मशास्त्रविरहीत. 'काजीपासून गैरशेरा अमल होऊन आला.' -वाडसनदा १५- [अर.घैर् + शरअ = धर्मशास्त्र] ॰संधी- स्त्री. अवेळ; गैरमोसम; अवकाळ. ॰सनदी-वि. १ बेसनदशीर; बेकायदेशीर; सनदेनें अधिकृत नसलेलें. २ जादा मंजुरीशिवाय. 'गैर-सनदी खर्च करावयाची सरकारची आज्ञा नाहीं.' -ख ५. २३५३. ॰समजाविशी-स्त्री. (कायदा) गैरसमजूत; (इं.) मिस्रिप्रेझेंटेंशन. ॰समजूत-स्त्री. उलट, चुकीची समजूत; चूक. ॰सल्ला-सलाह-गैरमसलत पहा. 'हे कंपणी इंग्रजबहादूर यांचे सलाहानें अगर गैर सलाहानें ...' -रा २२.१२५. ॰साल-वि. अनिश्चित वेळेचा; वर्ष नमूद नसलेला. 'गुणनवरे यांनी कागद एक काढिला, तो बहुतां दिवसांचा, गैर-साल ।' -रा ६.८९. ॰सावध-वि. १ बेसावध; गाफील. २ बेशुद्ध; मूर्छित. ॰साळ- वि. १ खोटसाळ; सरकारी टांकसाळींतून न पाडलेलें. इतर ठिकाणाचें म्हणजे हिणकस, कमी किंमतीचें (नाणें). 'गैरसाळ तामगिरी । कोणी नवी मुद्रा करी ।' -दा १०.८.१४. (त्यावरून) खोटा; बनावट; लबाडीचा. २ (ल.) बेशिस्त; अनभ्यासी; गांवढळ; अडाणी; (माणूस); अयोग्य; अनुचित (वर्तन). ३ अशिष्ट; अडाणी; हलका; राकट; बेडौल; गावठी इ॰ ॰सोई-य-स्त्री. अडचण; त्रास; हाल; अप्रशस्तता. ॰सोईचा-वि. अडचणीचा; सोईचा, सुखकर नसलेला. ॰हंगाम-पु. गैरमोसम पहा. 'त्यास गैरहंगाम, हल्ली खरबुजीं तयार मिळालीं ते आठ सेवसी पाठ- विलि असेत.' -रा ३.३१२. ॰ह(हा)जीर-वि. मोजदादीच्या वेळीं समक्ष नसलेला; अविद्यमान; अनुपस्थित. [फा.] ॰हिसा (शे)बी-स्त्री. अन्याय; अव्यस्थितपणा. -क्रिवि. अन्यायानें. 'आपले जागिरींत नाहक गैरहिसाबी पादशाह खलल करवि- ताती ।' -इमं ६७. ॰हुकुमा-वि. अनधिकृत; संमति, आज्ञा नसलेले; नामंजूर. ॰हुर्मत-स्त्री. अप्रतिष्ठा; बेअब्रू.
काळा
पु. १ (सांकेतिक) बिब्बा; भिलावा. २ (काव्य) श्रीकृष्ण; विठोबा. 'अपयशाचें खापर......त्या काळ्याच्या ढाळक्यावर फुटलें' -नामना १३. ३ काळसर्प. 'जागविला पुच्छीं त्वां देवुनि पद बहु सपूर्वफट काळा ।' -मोउद्योग १२. २१. --वि. १ कृष्णवर्ण; श्याम; काजळाच्या रंगासारखा; तशा रंगानें युक्त असलेला. २ कपटी. 'कृष्ण बाहेर काळा तसाच आंतहि काळा आहे.' -परिभौ २५. [सं. काल; फ्रें. जि. काळो, काळार्दी = जिप्सी माणूस; पो. जि. काळी; फा. कारा; सिं काला; का. करि] काळपूर्वपद असलेले रंग, वर्ण या अर्थांचें सामासिकशब्द- काळजिभ्या-वि. १ शिवराळ तोंडाचा; अनिष्ट बोलणारा; निमदळ; शिव्याशाप देणारा; अचकट विचकट बोलणारा. २ ज्याचें वाईट भाषण खरें होतें असा. ॰टिक्या- वि. १ काळे ठिपके असलेला (घोडा इ॰) घोड्याच्या ७२ अशुभ चिन्हांपैकी हें एक आहे. -मसाप २.५६. ॰तोंड्या- वि. १ दुर्दैवी; अपशकुनी; दुष्ट. २ लज्जित झालेला; गांगरलेला; खजिल. 'स्नेह कैसा सांडिला ध्रुवा आजी । काळतोंडा जाहलों जगामाजीं ।' -चिंतामणिकवी ध्रुवाख्यान. ३ (व.) ओठावर काळे केंस असलेलें(जनावर). ॰ळंदरा-ळुंद्रा-(शिवी) काळ्या उंदरासारखा काळा कुळकुळीत. ॰दांत्या वि. १ काळे दांत अस- लेला (कर्मविपाकावरून असला माणूस पूर्वजन्मीं मांग होता अशी समजूत आहे.) २ (ल.) अशुभकारक; अनिष्टदर्शक; अपशकुनी (माणूस). ३ (ल.) शिव्याशाप देणारा; शिवराळ; निंदक. ॰ळंबन-ळमन-स्त्रीन. अंधारलेली, सर्द हवा; पाऊस, थंडी यांनीं युक्त वांबाळी हवा. [कादंबिनी] ॰बुंडी-बोंडी जोंधळा- पु. जोंधळ्याची एक जात; याचें बोंड काळें असतें. ॰मांजर- पुन. कांडेचोर; ऊद. ॰मुखी-वि. १ काळ्या तोंडाचा; तोंडावर काळे केंस असलेला (घोडा), हा अशुभकारक समजतात. २ सामा- न्यतः काळ्या तोंडाचा. ३ (काव्य) दुष्ट; भयंकर; राक्षसी. 'नागविले प्रतापी थोर थोर । दशवक्त्र काळमुख ।' ॰मुखी गुंज- स्त्री. काळा ठिपका असलेली गुंज. ॰मुख्या-वि. दुर्दैवी; अभागी; अधम; नीच. ॰लोह-न. पोलाद; कालायस. 'काळलोहें डंव- चिलें । वज्रवाटीं बांधिलें ।' -शिशु ५०९. ॰वख-खा-खें-पुन. १ काळोख; अंधार (कांहीं ठिकाणीं चुकीनें काळवसें असा शब्द वापरलेला आहे). 'महामोहाचा काळवखा ।' -भाए १०२. 'कां काळ राहे काळवखा । तो आपणा ना आणिकां ।' -अमृ ४.३६. 'निद्रेचे शोधिले । काळवखें ।' -ज्ञा १२.४९. 'अविद्येचे काळवसे । समूळ गेले तेधवां ।' -भवि ९.१९६. २ काळेपणा; डाग. ॰वट-वि. १ काळसर. २ काळा; काळी (जमीन). [काळा + वत्] ॰वटणें-वंडणें-अक्रि. १ काळें पडणें; मलिन होणें; (ऊन वगैरे लागल्यामुळें शरीर इ॰) अपराध, भय यानीं चेहरा काळा ठिक्कर पडणें; काळानिळा पडणें; हिरवा निळा होणें. २ शेत पीक यांचा फिकटपणा जाऊन टवटवीत होणें; निसवण्याच्या स्थितीस येणें. ३ (काव्य) काळा पडणें. 'ग्रहणीं काळवंडे वासरमणि ।' 'चंद्रबिंब विटाळलें । गुरुद्रोहें काळ- वंडलें ।' -कथा १.२.१५०. ॰वटी-वण-स्त्री. काळिमा; डाग; कलंक; दोष. ॰वंडी-स्त्री. (कों.) कळवटणें, काळवंडणें पहा. ॰वत्री-वथरी-स्त्री. सह्याद्रींतील दख्खनमधील अग्निगर्भ काळा खडक; हा ज्वालामुखीच्या रसाच्या थरांतील उष्णता विसर्जन पावून झाला आहे. -सृष्टि ३८. ॰वदन-वि. काळमुखी (घोडा) पहा. -अश्वप ९४. ॰विद्रें-काळुंद्रा पहा. काळवें-(राजा. कुण.) संध्याकाळची काळोखी. ॰सर-वि. कळवट; किंचित् काळ्या रंगाचा. ॰सरणें-अक्रि. काळवटणें; काळवंडणें पहा. ॰सावळा-वि. काळासावळा; साधारण काळा. (रंग). काळा-नें आरंभ होणारे शब्द (वाप्र.) काळ्याचे पांढरे होणें-एखाद्याचे काळे केस पांढरे होणें; म्हातारपण येणें. पांढर्याचे काळे होणें-म्हातारपणांत तरुणपणाचे चाळे करणें; सचोटी सोडून देणें. काळ्या डोईचें मनुष्य-न. (जेव्हां इतर जिवांपेक्षां (प्राण्यांपेक्षां) माणसाची अद्भुत शक्ति वर्णाव- याची असते अशावेळीं हा शब्द माणसास लावतात). काळ्या दगडावरची रेघ-(वाप्र.) टिकाऊ; अक्षय्य; अबाधित अशी गोष्ट; उक्ति; न बदलणारी गोष्ट. 'ही आपली माझी काळ्या दगडावरची रेघ.' -तोबं १७९. सामाशब्द- ॰अबलख-वि. पांढर्या अंगावर काळे ठिपके असणारा (घोडा). ॰अभ्रक- पु. काळ्या रंगाचा अभ्रक. ॰आजार-पु. हा भयंकर रोग आसाम व मद्रास इलाख्याच्या एक भागांत होतो. यानें यकृत व प्लीहा फार वाढतात आणि रोज ताप येतो. ॰उन्हाळा-पु. १ अत्यंत कडकडीत उन्हाळा; यामुळें सर्व सृष्ट पदार्थ रखरखीत भासतात. २ कठिण, आणीबाणीची, टंचाईची वेळ; आयुष्याच्या भर- भराटीच्या साधनांचा अभाव. 'तूं काळ्या उन्हाळ्यांत मजजवळ पैका मागतोस काय?' ३ चैत्र व वैशाख हे दोन महिने. ॰उंबर- पु. उंबरे झाडाची एक जात. ॰कभिन्न-कभीन-वि. अत्यंत काळा; लोखंडासारखा काळा. [सं. काल + का. कब्बिण्ण = लोखंड] ॰किट्ट-कीट-कुट्ट-कुळकुळीत-मिचकूट- वि. अतिशय काळा. (किट्ठ, कुट्ठ वगैरे शब्द जोर दाखवितात). लोखंडासारखा किंवा शाईसारखा काळा. काळा जहर पहा. 'हा अमावास्येचा । काळाकुट्ट अंधार' -चंद्रग्र २. ॰कटवा-पु. काळा तीळ. ॰करजत-करंद-वि. काळाकभिन्न. ॰करंद- फत्तर-पु. काळा दगड. 'कृष्णवेणीचें पाणी काळाकरंद फत्तरांतून उसळ्या मारीत' -खेया २९. ॰कुडा-पु. कुड्याच्या झाडांतील एक जात. दुसरा तांबडा कुडा. [सं. कुटज; बं. कुटराज; हिं. कुडा, कौरेया; गु.कडी] ॰कुमाईत-वि. काळ्या रंगांत तेल्या रंगाची झांक असलेला (घोडा.) ॰क्रूम-पु. (चांभारी) विशिष्ट पद्धतीनें कमावलेलें काळें कातडें. ॰खापर-वि. खापरासारखा काळा. ॰गरु-पु. काळ्या रंगाचा अगरु, धूप. 'तत्काळ काळागरु धूप दावी ।' -सारुह ८.७९. ॰गवर-पु. एक शक्तिवर्धक वनस्पति. ॰गहिरा-वि. काळा कुट्ट. ॰गुगळी-पु. गुगळासारखा काळा मासा. ॰गुरा-पु. एक लहान झाड. ॰गोरा वि. १ काळा व गोरा. २ खराखोटा; शुद्धाशुद्ध. ॰चांफा-पु. चाफ्यांतील एक भेद. ॰चित्रक-पु. चित्रक (एक औषधी) झाडाची एक जात. काळचो-पु. (गो.) नीच मनुष्य. -ळांजनी-वि. एकरंगी असून डाव्या खाकेच्या जवळ किंवा छातीवर काळा ठिपका असलेला (घोडा) यामुळें धन्याला मृत्यु येतो अशी समजूत आहे. अश्वप ९६. ॰जहर-ठिक्कर-ढोण-वि. काळाकभिन्न. ॰डगलेवाला- पु. पोलीसचा शिपाई. ॰तित्तर-तीतर पु. रंगीबेरंगी तितर पक्षी. ॰तीळ-पु. कारळा तीळ पहा. ॰दगड-पु. काळवत्री- वथरी पहा. ॰दाणा-पु. एक वेल; हिचें कांडें व शाखा यांवर बारीक कुसें असून पानें कपाशीसारखीं असतात. फुलें फिकट, निळ्या रंगाची घंटेच्या आकाराचीं, व मोठीं असतात. फळ नरम असून आंत तीन पुडें व त्यांत काळें बीं असतें. याचा औषधाकडे उपयोग करतात. -वगु ७.१. [सं. कृष्णबीज, नीलपुष्पी] ॰धोतरा-पु. काळसर-जांभळट धोतर्याचें झाड. ॰निळा-वि. काळासांवळा (रंग, चेहरा). ॰फत्तर पु. १ काळवथरी दगड. २ (ल.) अत्यंत मूर्ख; अडाणी माणूस. ॰बगळा-पु. काळ्या पाठीचा बगळा. ॰बाळा-बाहाळा-वि. फिकट काळे किंवा काळे व पांढरे पट्टे अंगावर असलेला (पशु.) ॰बेंदरा-बेंद्रा- वि. काळा व हेंगाडा; विद्रूप. 'मी चांगट फांकडी रूपानें तूं काळा बेंदरा' -पला ५. [काल + हेंदर]? ॰बेरा-वि. काळाबेंदरा (अंगाचा वर्ण, स्वरूप, कपडालत्ता वगैरे). ॰बोळ-पु. बाळंत- बोळ; एका झाडाचा वाळलेला चीक. हा मुलांच्या पोटदुखीवर उपयोगी आहे. ॰भिल्ल-भील-मांग-वीख-वि. काळाकभिन्न. ॰भोपळा पु. भोपळ्याची एक जात; तांबडा भोपळा; गंगाफळ. ॰माजा-पु. मायफळ; माजूफळ. ॰मासी-पु. पित्तपापडा. ॰मुरूम-पु. काळ्या रंगाचा मुरूम. ॰शेंगळ पु. काळ्या रंगाचा एक मासा. ॰सावळा-वि. केवळ काळाहि नाहीं व केवळ गोराहि नाहीं असा (रंग, रंगाचा); साधारण काळा. [सं. काल + श्यामल] ॰सावा-पु. साव्याची काळी जात. ॰सुरमा-पु. डोळ्यांत घालावयाचें एक अंजन; (ब्लॅक सल्फेट ऑफ अँटिमनी). काळें उडीद-पुअव. माष; एक द्विदल धान्य. ॰केस-पुअव. (ल.) तारुण्य व त्यांतील खुमखुमीचा काळ; याच्या उलट पांढरे-करडे केश. ॰तीळ पुअव. काळ्या रंगाचे तीळ, श्राद्धपक्ष, श्रावणी वगैरे कार्यांत उपयोगी पडणारे तीळ. काळेला-रा- वि. काळसर वर्णाचा. काळ्या पाठीचें खोबरें-न. ज्या खोब- र्याची पाठ काळी असतें तें, ही खोबर्याची एक जात आहे. काळीनें आरंभ होणारे शब्द. काळी-वि. १ रंगानें काळी (स्त्री, मादी वगैरे). स्त्री. -स्त्री. म्हैस (कारण ती रंगानें काळी असते) ज्याचे घरीं काळी त्याची सदा दिवाळी ।' म्ह॰ (व.) काळीकाळीउंदर तिचा सैपाक सुंदर-काळ्या स्त्रीस चढविण्या- साठीं म्हणतात. सामाशब्द- ॰काठी-स्त्री. एक औषधी झुडूप. ॰कांब-१ काळ्याकुट्ट ढगांची रांग. (क्रि॰ येणें; जमणें; उठणें; विरणें; फाकणें). २ (ल.) काळ्या रंगाच्या कुण- ब्यांची (जेवण वगैरेस बसलेली) पंगत. ॰खजुरी-खजूर-खारीक-स्त्री.एक औषधोपयोगी रानखारीक. ही कडू, अग्नि- दीपक व ज्वरनाशक आहे. ॰गुळी-स्त्री. काळा रंग तयार कर- ण्याच्या कामीं उपयोगांत येणारी नीळ. ॰घेटूळ-टोळी-स्त्री. घेडूळचीच एक काळी जात. ॰चंद्रकळा-स्त्री. काळें लुगडें; याचें उभार व आडवण सर्व काळें व किनार कोणत्याहि तर्हेची असतें. ॰जिरी-स्त्री. कडू कारळी. ॰तुळस-स्त्री. काळ्या पानांची व मंजिर्यांची तुळस; कृष्णतुळस. ॰तेरी-स्त्री. काळ्या रंगाचें अळूं; हें मुळव्याध नाशक, अग्निदीपक, व शौचास साफ करणारें आहे. -योर १.४७. ॰धार-वि. दृश्य क्षितिज; समुद्रांत पहात असतां ज्यापुढें दृष्टी पोंहचत नाहीं तो मर्यादाप्रदेश. -शास्त्रीको. 'त्याची हद्द काळेधारेशीं लागलेली आहे.' -बाळ २.११८. ॰पानवेल-स्त्री. काळ्या रंगाच्या विड्यांच्या पानांची वेल; हिचें पान स्वादिष्ट परंतु तिखट असतें. ॰प्रजा-स्त्री. १ सामान्यपणें मजूरवर्ग. २ बडोदें संस्थानांतील भिल्लासारखी एक जात; (गु.) काली परज. ॰भिंत-स्त्री. उत्तरदिशेस जेथपर्यंत मनुष्याचें गमन होतें तेथील सीमाप्रांत. -शास्त्री. ॰भोपळी-स्त्री. काळ्या भोपळ्याचा वेल. ॰माशी वि. १ मोठी, काळ्या रंगाची, व्रण, क्षत, मेलेलें जना- वर यांवर बसणारी माशी. २ एका जातीचें गवत. ॰मिरची-स्त्री. १ (हिं.) काळ्या मिरच्या येणारी मिरचीची एक विशिष्ट जात. २ काळीं मिरें. ॰मुष्ठी-स्त्री. जारणमारणांतील मूठ (मार- ण्याची). 'काळामुष्ठीची बाधा होतां ।' -नव ६.१५२. ॰मुसळी- स्त्री. एक औषधी वनस्पति व मुळी; मुसळीची काळी जात. ॰रात्र-शिळी रात्र -स्त्री. १ भयंकर रात्र; भयाण रात्र. 'ही काळीरात्र चालली आहे मी खोटें बोललों तर पाहून घेईल.' [काळ + रात्र] २ हा शब्द क्रियाविशेषणासारखा सप्तम्यंत करूनहि योज- तात. जसें:-काळ्याशिळ्या रात्रीं. जास्त माहितीसाठीं बंद खालील भरल्या बंदाखालीं बसणें पहा.३ अमावस्या, मध्यरात्र, अशुभ भाषण, भूतपिशाच्चाचें आगमन (असत्य भाषण व शपथ यांखे रीज) वगैरेसंबंधानेंहि सामान्य रात्रीस हा शब्द लावितात; अरिष्टसूचक रात्र. ॰वसू-स्त्री. एक औषधी वनस्पति; हिचा दुसरा प्रकार पांढरी वसू. ॰वेल-स्त्री. गुरांच्या रोगावर उपयोगी पडणारी एक वेल. ॰साळ-स्त्री. काळ्या रंगाची साळ किंवा भात. काळेंनें आरंभ होणारे शब्द - काळें-न. १ डाग; कलंक; काळिमा; अपकीर्ति. [काळा] (वाप्र.) काळें करणें-तोंड काळें करणें; तोंड लपवून जाणें; दृष्टिआड होणें, फरारी होणें (दोष, अपराध वगैरेमुळें). 'जा कर काळें ।' -कमं २. ॰तोंड घेऊन जाणें-पळून जाणें; पोबारा करणें. 'काळें तोंड घेऊनि । गेला नेणो कोणीकडे ।' सामाशब्द- ॰अळू-न. काळी तेरी पहा. ॰अक्षर-न. कागदावर लिहिलेलें मनोगत, अक्षरें, लेख, पत्र इ॰; यच्चयावत् अक्षरमात्र-शास्त्रीको. 'हा पंडित काळ्या अक्षरांचा अर्थ करील.' ॰कमळ-न. हें हिमालय पर्वतावर बर्फांत उत्पन्न होतें. याला एक हजार पाकळ्या असून त्यांचा घेर एक हातभर असतो -तीप्र ४१. ॰कृत्य-न. कृष्ण कारस्थान; अन्याय. ॰खापर-न. अतिशय काळा माणूस. अपकीर्ति, बद- नाम झालेला, पराभव झालेला, आजारानें कृश, अशक्त झालेला माणूस. ॰गवत-न. एक प्रकारचें गवत. ॰जिरूं-जिरें-न. १ कडू कारळें. २ शहाजिरें [हिं. काली जिरी, सं. कालाजीरक] ॰ढवळें-न. १ संशय; शंका; अनिष्ट कल्पना; अंदेशा. २ काळें बेरें पहा. ॰तेरें-न. काळी तेरी, काळें अळूं पहा. ॰तोंड-पु. स्वतः पासून पुढील पांचवा वंशज (आपल्या पणतूचा मुलगा). -वि. लाजिरवाणीं कृत्यें केल्यानें कलंकित झालेलें तोंड. 'तुझें काळें तोंड दृष्टीआड कर.' ॰थर-वि. काळ्या रंगाचा थर; कार दगड किंवा काळवथरी धोंडा ॰द्राक्ष-न. एक प्रकारच्या काळा मनुका. ॰पाणी-न. १ महासागर. २ अकालीं किंवा अतिशय पडलेल्या पावसाच्या पाण्याचा दोष घालविण्यासाठीं बागेस दिलेलें विहिरीचें पाणी. ३ (ल.) हद्दपारीची शिक्षा व ती भोगाव- यांचें ठिकाण (ही शिक्षा झालेल्या इसमास हिंदुस्तानाबाहेर अंद- मानांत ठेवतात). 'अखेरीस जाल काळ्या पाण्यावर चांगले' -भा १०४. ॰पान-न. काळ्या पानवेलीचें विड्याचें पान. ॰बुबुळ-न. डोळ्याचा काळा भाग (बाहुली व कनीनिका). ॰बेरें-भेरें-ळें-न. १ अनिष्ट संशय; वाईट आकांक्षा; अनिष्ट कल्पना; कुशंका; कपट. (क्रि॰ येणें.) 'हें काळेंबेरें तुझ्या मनांत कोठून आलें?' -गीर ६१२. २ लुच्चेगिरी; डावपेंच; कारस्थान; गिळंकृत करणें; दडपादडपी. ॰भिवरी-स्त्री. काळवथरी पहा. ॰मांजर-नपु. कांडेचोर; ऊद. ॰मिरें-न. काळ्या रंगाचें मिरें. 'मिरूं पहा. ॰मीठ-न. १ पादेलोण. २ खार्या माती- पासून उत्पन्न केलेलें मीठ. -रें-न. कडू कारळें.
तोंड
न. १ ज्यानें खातां वं बोलतां येतें तो शरीराचा अव- यव; मुख; वदन; तुंड. २ चेहरा; हनुवटीपासून डोक्यापर्यंत मस्तकाचा दर्शनी भाग. ३ (सामा.) (एखाद्या वस्तूचा) दर्शनी भाग; पुढचा-अग्रभाग; समोरील अंग. 'या ओझ्याच्या तोंडीं मात्र चांगल्या चांगल्या पेंढ्या घातल्या आहेत.' ४ (फोड, गळूं इ॰ कांचा) छिद्र पडावयाजोगा, छिद्रासारखा भाग; व्रणाचें मुख. यांतूनच पुढें पू, लस इ॰ वाहतात. ५ (कुपी, तपेली, लोटी इ॰ कांचें) पदार्थ आंत घालावयाचें भोंक; द्वार; मार्ग; मुख. ६ (एखाद्या विषयांत, शास्त्रांत, गांवांत, देशांत, घरांत) शिरकाव होण्याचा मार्ग; प्रवेशद्वार. 'ह्या घराचें तोंड उत्तरेस आहे.' ७ (ल.) गुरुकिल्ली. उदा॰ 'एखाद्या प्रांताचें, देशाचें किल्ला हें तोंड होय.' 'व्याकरण भाषेचें तोंड होय.' ८ (वारा इ॰कांची) दिशा; बाजू. ९ धैर्य; दम; उमेद; एखादें कार्य करण्याविषयींची न्यायतः योग्यता. १० एखाद्या पदार्थाचें ग्रहण किंवा त्या पदार्थाचा एखाद्या कर्याकडे विनियोग इ॰ कांचा आरंभ त्या पदार्थाच्या ज्या भागाकडून करि- तात तो भाग. 'भाकरीस जिकडून म्हटलें तिकडून तोंड आहे.' ११ (युद्ध, वादविवाद इ॰कांसारख्या गोष्टींची) प्रारंभदशा. 'वादास आतां कुठें तोंड लागलें.' १२ (सोनारी धंदा) हातोड्याच्या सगळ्यांत खालच्या बाजूस अडिश्रीच्या बुडासारखा जो भाग असतो तो. यानें ठोकलेला जिन्नस सारखा करून घेतात. १३ (सोनारी धंदा) कांबीस गोल आकार देतांनां तिचीं टोंकें जेथें जुळतात तो भाग. १४ (बुद्धिबळें) डाव सुरू करण्याचा प्रकार; मोहरा. 'वजीराच्या प्याद्याचें तोंड.' [सं. तुंड; प्रा. तोंड] (वाप्र.) ॰आटोपणें, सांभाळणें, आवरणें-जपून बोलणें; बोलण्याला आळा घालणें; अमर्याद भाषण, अभक्ष्यभक्षण यांपासून निवृत्त होणें. ॰आणणें- (आट्यापाट्यांचा खेळ) शेवटची पाटी खेळून जाऊन पुन्हां एक एक खेळत येणें; पाणी आणणें; लोण आणणें. ॰आंबट करणें- (एखाद्यानें) असंतुष्ट, निराशायुक्त मुद्रा धारण करणें. तोंड आहे कीं तोबरा-खादाड किंवा बडबड्या माणसास उद्देशून वापरावयाचा, 'किती खातोस' 'किती बोलतोस' या अर्थाचा वाक्प्रचार. ॰उतरणें-(निराशा, आजार इ॰ कांनीं) चेहरा म्लान होणें, सुकणें, फिका पडणें, निस्तेज होणें. ॰उष्टें करणें-(अन्नाचा) एखादा-दुसरा घांस, एक दोन घांस खाणें; जेवणाचें नुसतें नांव करणें. ॰करणें-बडबड, वटवट, बकबक करणें; उद्धटपणानें, निर्लज्ज- पणानें बोलणें. ॰करून बोलणें-निर्लज्जपणें, आपला (लहान) दर्जा सोडून बोलणें. ॰काळें करणें-(उप.) एखादा ठपका, तोहमत अंगावर आल्यामुळें निघून, पळून, निसटून जाणें; हातावर तुरी देणें; दृष्टीस न पडणें (केव्हां केव्हां तोंड हा शब्द वगळला तरी चालतो. जसें:-त्यांनीं काळें केलें). ॰गोड करणें-१ (एखाद्याला) लांच देणें; खूष करणें. २ मेजवानी देणें; गोड खावयास घालणें. ॰गोरेंमोरें करणें-(कोणी रागें भरल्यामुळें, मनास वाईट वाटल्यामुळें) निराशेची, लाजलेपणाची मुद्रा धारण करणें. ॰घालणें-(दोघे बोलत असतां तिसर्यानें) संबंध नसतां मध्येंच बोलणें. ॰घेऊन येणें-एखाद्यानें एखाद्यावर सोंपविलेलें काम न करतां त्यानें तसेंच परत येणें. 'असें सर्वांनीं न करावें. जो मामलेदार असें करून तोंड घेऊन येईल त्याचें मुखावलोकन न करितां फिरोन सेवा न सांगतां त्यास घरींच बसवावें.' -मराआ २९. ॰घेणें-१ बोंबलत सुटणें; ताशेरा झाडणें; बोंबलपट्टी करणें. २ तोंडांतून लाल गळावी म्हणून पारा इ॰ तोंड आणणारीं औषधें घेणें. तोंड देणें पहा. 'मी वैद्याकडून तोंड घेतलें आहें.' तोंडचा-वि. १ विरुद्ध, उलट दिशेचा; समोरून येणारा (वारा, ऊन, भरती इ॰). २ ज्याची कर्तबगारी केवळ तोंडांतच, बोल- ण्यांतच आहे, क्रियेंत दिसून येत नाहीं असा. 'तोंडचा शिपाई- कारकून-सुग्रण-खबरदार.' ३ तोंडानें सांगितलेला, निवेदन केलेला; तोंडीं केलेला (व्यवहार, हिशेब, पुरावा इ॰). याच्या उलट लेखी. तोंडचा, तोंडींचा घास काढणें-हिरून घेणें-१ (एखा- द्याची) अगदीं आटोक्यांत आलेली वस्तु, पदरीं पडावयास आलेला लाभ हिसकावून घेणें. २ (एखाद्याच्या) अन्नावर पाणी पाडणें; अन्नांत माती कालविणें; पोटावर पाय देणें. तोंडचा-तोंडींचा घांस देणें-(ल.) (एखाद्यास) अतिशय प्रेमानें, ममतेनें वाग- विणें; प्रसंगविशेषीं आपण उपाशी राहून दुसर्यास खावयास देणें. तोंडचा गोड आणि हातचा जड-बोलण्यांत गोड व अघळ- पघळ, पण प्रत्यक्ष पैशाची मदत करण्यांत पूज्य. तोंडचा चतुर- वि. बोलण्यांत पटाईत; वाक्पटु. तोंडचा जार-पु. नुकत्याच जन्मलेल्या मुलाच्या तोंडांतील फेंस; चिकटा; ओंठावरचा जार; जन्मप्रसंगींचा तोंडावरचा पातळ पापुद्रा (विशेषतः तुझ्या, त्याच्या तोंडाचा जार वाळला नाहीं. = तूं, तो अजून केवळ बालक आहेस.' अशा वाक्यांत उपयोग). तोंडचा नीट-वि. १ बोलून भला, चांगला; बोलकाचालका; सौजन्ययुक्त. २ युक्तायुक्त विचार करून बोलणारा. ३ हजरजबाबी; अस्खलित बोलणारा. तोंडचा फटकळ-वि. शिवराळ; उघडतोंड्या; अश्लील, शिवराळ भाषण करणारा. तोंडचा रागीट-वि. जहाल; तिखट; कडक भाषण करणारा. तोंडचा शिनळ-वि. १ इष्कबाज, फंदी म्हणून नांव मिळविण्याची इच्छा करणारा; स्त्रियांची खोटी खुषमस्करी करणारा; स्त्रियांच्या कृपेची खोटीच फुशारकी मारणारा. २ निरर्गल व अश्लील भाषण करणारा; शिवराळ. तोंड(डा)ची गोष्ट-स्त्री. सहजसाध्य, अतिशय सोपी गोष्ट, काम. 'वाघ मारणें तोंडची गोष्ट नव्हे.' तोंड चुकविणें-हातून एखादा अपराध घडला असतां कोणी रागें भरेल या भीतीनें, काम वगैरे टाळण्यासाठीं चुकारतट्टू- पणानें एखाद्यापासून आपलें तोंड लपविणें; दृष्टीस न पडणें; छपून असणें. ॰चे तोंडीं-क्रिवि. प्रत्यक्षाप्रत्यक्ष; तोंडानें; बोला- चालीनें. ॰चे तोंडीं व्यवहार-केवळ तोंडानें बोलून, बोलाचा- लीनें झालेला, होणारा व्यवहार, धंदा. याच्या उलट लेखी व्यव- हार. ॰चें पायचें-न. (कों.) गुरांच्या तोंडास व पायांस होणारा रोग. ॰चे हिशेब-पुअव. कागदांवर आंकडेमोड न करितांमनां- तल्यामनांत कांहीं आडाख्यांच्या; मदतीनें करावयाचे हिशेब. तोंडचें तोंडावरचें पाणी पळणें; उडणें, तोंड कोरडें पडणें-१ (भीतीमुळें) चेहरा फिका पडणें; बावरून,घाबरून जाणें. २ (भीति इ॰ कांमुळें) तोंडांतील ओलावा नाहींसा होणें. तोंड टाकणें-टाकून बोलणें-१ (क्रोधावेशानें) अप शब्दांचा वर्षाव करणें; निर्भर्त्सना करून बोलणें; खरडपट्टी काढणें; अद्वातद्वा बोलणें. 'तूं नोकर-माणसांवर उगीच तोंड टाकलेंस.' २ (घोडा इ॰ जनावरानें) चावण्यासाठीं तोंड पुढें करणें. 'ह्या घोड्याला तोंड टाकण्याची भारी खोड आहे, ती घालविली पाहिजे.' ॰ठेचणारा-फाडणारा-वि. (एखाद्या) उद्धट, बडबड्या माण- सास गप्प बसविण्याची हातोटी ज्यास साधली आहे असा; उद्दामपणानें, गर्वानें बोलणार्या व्यक्तीस रोखठोक उत्तर देऊन चूप बसविणारा. [तोंड + ठेचणें] ॰तोडणें-(ना.) एखादी वस्तु मिळ- विण्याकरितां एखाद्याच्या पाठीस लागणें; त्याच्यापुढें तोंड वेंगा- डणें. ॰दाबणें-लांचलुचपत देऊन (एखाद्याचें) तोंड बंद करणें; (एखाद्यास) वश करणें; गप्प करणें. ॰दाबणारा-वि. लांच देऊन (एखाद्या) प्रतिकूल व्यक्तीस वळविणारा; गप्प बसविणारा. [तोंड + दाबणें = बंद करणें] ॰दाबी-स्त्री. (एखाद्यानें) गुप्त बातमी फोडूं नये म्हणून, प्रतिकूल बोलूं नये म्हणून (त्यास) लांच देऊन त्याचें तोंड दाबण्याची, वश करण्याची क्रिया. 'तो गांवकाम- गारांची तोंडदाबी करतो.' -गुजा २१. [तोंड + दाबणें = बंद करणें] ॰दिसणें-एखाद्याची केलेली निर्त्भर्त्सना दुसरी बाजू न कळतां लोकांच्या नजरेस येणें व आपणच वाईट ठरणें (पण ज्याची निर्भर्त्सना केली असेल त्याचें वर्तन सुधारण्याची आशा नसणें ). 'मी तुला रागें भरलों म्हणजे माझें तोंड मात्र दिसेल, पण तूं आपला आहे तसाच राहणार.' ॰देणें- १ पारा वगैरे देऊन तोंडाच्या आंतील त्वचा सुजविण; तोंड आणविणें. 'वैद्य- बोवा म्हणाले कीं त्याला तोंड दिलें आहे.' २ सैन्याच्या अग्रभागीं राहून शत्रूवर हल्ला करणें. ३ (एखाद्याचा) प्रतिपक्षी होऊन राहणें; लढावयाला सिद्ध होणें. ४ (आट्यापाट्यांचा खेळ शेवटची पाटी खेळून परत येणार्या गड्याकडे पाटी धरणारानें तोंड फिरविणें. ५ एखाद्या गोष्टीला न भितां तींतून धैर्यानें पार पडण्याची तयारी ठेवणें. ॰धरणें-१ अन्नसेवन करण्याची तोंडाची शक्ति आजार वगैरे कारणांमुळें नाहींशी होणें. 'त्याचें तोंड धरलें आहे, त्याला चमच्याचमच्यानें दुध पाजावें लागतें.' २ (एखा- द्याची) बोलण्याची शक्ति नाहींशी करणें. ३ (एखाद्याला आपल्या) तावडींत, कबजांत आणणें. 'मी त्याचें तोंड धरलें आहे, तो आतां काय करणार !' ॰धुवून येणें-(उप.) एखाद्याची विनंति कधींहि मान्य होणार नाहीं असें म्हणून फेटाळून लावतांना योजण्याचा तिरस्कारदर्शक वाक्प्रचार. ॰निपटणें-(आजार, उपवास इ॰ कारणांमुळें एखाद्याचे) गाल खोल जाणें, चेहरा सुकणें. 'महिनाभर हें मूल तापानें आजारी होतें, त्याचें तोंड पहा कसें निपटलें आहे तें.' ॰पडणें-१ सुरवात होणें. 'लढाईस तोंड पडलें.' २ (गळूं इ॰ कांस) छिद्र पडणें; फुटणें; वाहूं लागणें. ॰पसरणें-वेंगाडणें-१ खिन्नपणाची, केविलवाणी मुद्रा धारण करणें. २ हिनदीनपणानें याचना करणें. ॰पाघळणें-१ न बोला- वयाची गोष्ट कोणाएकापाशीं बोलून टाकणें; बडबडणें. २ (ल.) गुप्त गोष्ट बाहेर फोडणें, फुटूं देणें. ॰पाडणें-एखादें कोडें सोड- विण्यास, वेढा फोडण्यास प्रारंभ करणें; भांडणास सुरवात करणें. ॰पाहणें-१ (एखाद्याच्या) आश्रयाची, मदतीची अपेक्षा करून असणें. 'आम्ही पडलों गरीब, म्हणून आम्हांला सावकाराचीं तोंडें पाहण्याची पाळी वारंवार येते.' २ (एखाद्यानें) स्वतःच्या शक्तीचा, कर्तुत्वाचा अजमास करणें. 'तूं असें करीन म्हणतोस, पण आधीं आपलें तोंड पहा !' ३ बोलणाराचें भाषण नुसतें ऐकणें, पण त्यानें सांगितलेलें करावयास किंवा केलेला बोध अनु- सरावयास प्रवृत्त न होतां स्वस्थ बसून राहणें. 'म्हणती हाणा, मारा, पाडा, घ्या, काय पाहतां तोंडा ।' -मोद्रोण ३.१२५. ॰पाहात-बसणें-काय करावें, कसें करावें या विवंचनेंत असणें. ॰पिटणें-बडबड करणें. 'पश्चिमद्वारींचें कवाड । सदा वार्यानें करी खडखड । तैशी न करी बडबड । वृथा तोंड पिटीना ।' -एभा १०.२३१. ॰फिरणें-१ आजारानें, पदार्थाच्या अधिक सेवनानें तोंडाची रुची नाहींशी होणें; तोंड वाईट होणें. २ तोंडांतून शिव्यांचा वर्षाव होऊं लागणें. 'तो रागावला म्हणजे कोणावर त्याचें तोंड फिरेल ह्याचा नेम नाहीं.' ॰फिरविणें-१ तोंडाची चव नाहींशी करणें. २ शिव्यांचा वर्षाव करीत सुटणें. 'तो रागावला म्हणजे तुमच्यावर देखील तोंड फिरवावयाला कचर- णार नाहीं.' ३ वितळत असलेला किंवा तापविला जात अस- लेला धातु इ॰ कानें) रंगामध्यें फरक दाखविणें, रंग पाल- टणें. 'ह्या तांब्यानें अद्याप तोंड फिरविलें नाहीं, आणखी पुष्कळ आंच दिली पाहिजे.' ४ दुसर्याकडे पाहणें; विशिष्ट गोष्टी- कडे लक्ष्य न देतां इतर गोष्टींकडे प्रवृत्ति दाखविणें. ५ गतीची दिशा बदलणें; दुसर्या दिशेला, माघारें वळणें. ॰फुटणें-१ थंडीमुळें तोंडाची बाह्य त्वचा खरखरीत होणें, भेगलणें. २ (एखाद्याची) फजिती उडणें; पत नाहींशी होणें; नाचक्की होणें; अभिमान गलित होण्याजोगा अपमान, शिक्षा इत्यादि होणें. ॰बंद करणें-१ जीभ आवरणें; जपून बोलणें. २ (एखाद्याला) लांच देऊन गप्प बसविणें, वश करून घेणें. ॰बंदावर राखणें- खाण्याला किंवा बोलण्याला आळा घालणें. 'तूं आपलें तोंड बंदावर राखिलें नाहींस तर अजीर्णानें आजारी पडशील.' ॰बांधणें-लांच देऊन (एखाद्याचे) तोंड बंद करणें; (एखाद्यानें) गुप्त गोष्ट फोडूं नये म्हणून पैसे देऊन त्यास गप्प बसविणें. ॰बाहेर काढणें-१ तोंड दाखविणें; राजरोसपणें समाजांत हिंडणें (बहुधां निषेधार्थी प्रयोग). 'तुरुंगांतून सुटून आल्यावर त्यानें आज दोन वर्षांत एकदांहि तोंड बाहेर काढलें नाहीं.' २ फिरण्यासाठीं, कामकाजासाठीं घराबाहेर पडणें. ॰बिघडणें-तोंड बेचव होणें; तोंडास अरुचि उत्पन्न होणें. विटणें. -॰भर-भरून बोलणें- भीड, संकोच, भीति न धरतां मनमोकळेपणानें भरपूर, अघळपघळ बोलणें; दुसर्याचें आणि आपलें समाधान व्हावयाजोगें अघळपघळ बोलणें. ॰भरून साखर घालणें-(एखाद्याचें) तोंड साखरेनें भरणें; (एखाद्याच्या) कामगिरीबद्दल, विजयाबद्दल संतोषादाखल त्याचें तोंड साखरेनें भरणें; (एखाद्याच्या) कामगिरीबद्दल गोड, भरपूर मोबदला देणें. ॰मागणें-(आट्यापाट्यांचा खेळ) लोण घेऊन परत जातांना पाटीवरील गड्यास आपणाकडे तोंड फिर- विण्यास सांगणें. तोंड मागितल्यावर पाटीवरील गडी आपलें तोंड फिरवितो त्यास 'तोंड देणें' म्हणतात. ॰माजणें-१ मिष्टान्न खावयाची चटक लागल्यानें साध्या पदार्थाबद्दल अरुचि उत्पन्न होणें. २ शिव्या देण्याची, फटकळपणानें बोलण्याची खोड लागणें. ॰मातीसारखें-शेणासारखें होणें-(आजारानें) तोंडाची चव नाहींशी होणें; तोंड विटणें, फिरणें; अन्नद्वेष होणें. ॰मिचकणें- दांत, ओंठ खाणें. ॰येणें-१ तोंडाच्या आंतल्या बाजूच्या त्वचेस फोड येऊन ती हुळहुळी होणें व लाळ गळूं लागणें. २ (कर.) लहान मूल बोलूं लागणें. 'आमच्या मुलाला तोंड आलें आहे.' = तो बोलावयास लागला आहे. ॰रंगविणें-१ विडा खाऊन ओंठ तांबडे लाल करून घेणें. २ (ल.) (एखाद्याचें थोबाड) थोबाडींत मारून लाल- भडक करून सोडणें. ॰लागणें-(लढाई, वादविवाद, अंगीकृत कार्य इ॰ कांस) सुरवात होणें. 'तेव्हां युद्धास तोंड लागलें.' -इमं २९०. ॰लावणें-१ (वादविवाद इ॰ कांस) सुरवात करणें. २ प्यावया- साठीं एखादें पेय ओंठाशीं नेणें. ३ ॰वाईट करणें-निराशेची मुद्रा धारण करणें. ॰वाईट होणें-१ तोंडावर निराशेची मुद्रा येणें. २ (ताप इ॰ कांमुळें) तोंडास अरुचि येणें. ॰वांकडें करणें-१ वेडावून दाखविणें. २ नापसंती दर्शविणें. ॰वाजविणें-एकसारखें बोलत सुटणें; निरर्थक बडबड करणें; बकबकणें; वटवट करणें; भांडण करणें. ॰वासणें-१ निराशेनें, दुःखानें तोंड उघडणें व तें बराच वेळ तसेंच ठेवणें. २ याचना करण्यासाठीं तोंड उघडणें, वेंगाडणें. ॰वासून पडणें-शक्तीच्या क्षीणतेमुळें, उत्साह, तेज, वगैरे नष्ट झाल्यामुळें, गतप्राण झाल्यामुळें आ पसरून पडणें. 'तो पडला सिंहनिहमत्तद्विपसाचि तोंड वासून ।' -मोगदा ५.२५. ॰वासून बोलणें-अविचारानें बोलणें. 'ऐसें स्वसख्यांपासीं कां गे वदलीस तोंड वासून ।' -मोउद्योग १३.२०५. ॰विचकणें-दीन मुद्रेनें आणि केविलवाण्या स्वरानें याचना करणें. ॰वेटा(डा)विणें- (काव्य) (एखाद्यास) वेडावून दाखविण्यासाठीं त्याच्यापुढें तोंड वेडेंवाकडें करणें. ॰शेणासारखें पडणें-(लाजिरवाणें कृत्य केल्यानें) तोंड उतरणें; निस्तेज होणें; काळवंडणें. ॰संभाळणें- जपून बोलणें; जीभ आवरणें; भलते सलते शब्द तोंडांतून बाहेर पडूं न देणें; अमर्याद बोलण्यास आळा घालणें. ॰सुटणें- चरांचरां, फडाफडां, अद्वातद्वा बोलूं लागणें. ॰सुरू होणें-बड- बडीला, शिव्यांना सुरवात होणें. ॰सोडणें-१ फडांफडां, अद्वातद्वा बोलूं लागणें; अमर्याद बोलणें. २ आधाशासारखें खात सुटणें; तोंड मोकळें सोडणें. ॰हातीं-हातावर धरणें-तोंडे सोडणें (दोन्ही अर्थीं) पहा. तोंडाचा खट्याळ-फटकळ-फटकाळ-फटकूळ-वाईट-शिनळ-वि. शिवराळ; तोंडाळ; अश्लील बोलणारा. तोंडाचा खबरदार-बहादर-बळकट-वि. बोलण्यांत चतुर, हुषार; बोलण्याची हातोटी ज्याला साधली आहे असा. -तोंडाचा गयाळ, तोंडगयाळ-वि. जिभेचा हलका; चुर- चोंबडा; लुतरा; बडबड्या; ज्याच्या तोंडीं तीळ भिजत नाहीं असा. तोंडाचा गोड-वि. गोड बोलणारा; गोडबोल्या. म्ह॰ तोंडचा गोड हाताचा जड = गोड व अघळपघळ भाषण करणारा पण प्रत्यक्ष कांहींहि मदत, पैसा न देणारा. तोंडाचा जड-वि. रेंगत बोलणारा; फार थोडें बोलणारा; अस्पष्ट भाषण करणारा; तोंडाचा तिखट-वि. खरमरीत, स्पष्ट, झोंबणारें, कठोर भाषण करणारा. तोंडाचा तोफखाना सुटणें-(एखाद्याची) अद्वातद्वा बोल- ण्याची क्रिया सुरू होणें; शिव्यांचा वर्षाव होऊं लागणें. तोंडाचा पट्टा सुटणें-चालणें-अद्वातद्वा बोलणें; शिव्यांचा भडिमार सुरू होणें; तोंडाचा पट्टा सोडणें-(एखाद्यानें) शिव्यांचा भडिमार सुरू करणें; जीभ मोकळी सोडणें; (एखाद्याची) खरडपट्टी आरंभिणें. तोंडाचा पालट-पु. रुचिपालट; तोंडास रुचि येईल असा अन्नांत केलेला फेरबदल; अन्नांतील, खाण्यांतील फरक, बदल. तोंडाचा बोबडा-वि. बोबडें बोलणारा; तोतरा. तोंडाचा मिठा-वि. गोडबोल्या; तोंडाचा गोड पहा. तोंडाचा हलका- वि. चुरचोंबडा; भडभड्या; विचार न करितां बोलणारा; फटकळ. तोंडाचा हुक्का होणें-(व.) तोंड सुकून जाणें. तोंडाची चुंबळ-स्त्री. दुसर्यास वेडावून दाखविण्याकरितां चुंबळीसारखी केलेली ओठांची रचना; वांकडें तोंड. तोंडाची वाफ दघडणें- १ मूर्खास उपदेश करतांना, निरर्थक, निरुपयोगी, निष्फळ भाषण करणें. २ ज्यावर विश्वास बसणार नाहीं असें भाषण करणें; मूर्खपणानें बोलणें; वल्गना करणें; बाता मारणें. (या वाक्प्रचारांत दवडणें बद्दल खरचणें गमविणें, फुकट जाणें, घालविणें, काढणें इ॰ क्रियापदेंहि योजतात). तोंडाचें बोळकें होणें-(म्हातारपणामुळें) तोंडां- तील सर्व दांत पडणें. तोंडाचें सुख-न. तोंडसुख पहा. (वरील सर्व वाक्प्रचारांत तोंडाचा या शब्दाऐवजीं तोंडचा हा शब्दहि वापरतात). तोंडांत खाणें, मारून घेणें-१ गालांत चपराक खाणें; मार मिळणें. २ पराभूत होणें; हार जाणें. ३ फजिती झाल्या- नंतर शहाणपणा शिकणें; नुकसान सोसून धडा शिकणें; बोध मिळविणें. तोंडांत जडणें-थोबाडींत, गालांत बसणें (चपराक, थप्पड इ॰). तोंडांत तीळभर न राहणें-अगदीं क्षुद्र अशी गुप्त गोष्टहि पोटांत न ठरणें; कोणतीहि लहानसहान गोष्ट गुप्त ठेवूं न शकणें. तोंडांत तोंड घालणें-१ (ल.) प्रेम, मैत्री इ॰कांच्या भावानें वागणें; मोठ्या प्रेमाचा, मित्रपणाचा आविर्भाव आणून वागणें. २ एकमेकांचें चुंबन घेणें. तोंडांत देणें-(एखाद्याच्या) थोबाडींत मारणें; गालांत चपराक मारणें; तोंडांत बोट घालणें-(ल.) आश्चर्यचकित, थक्क होणें; विस्मय पावणें. तोंडांत भडकावणें-तोंडांत देणें पहा. तोंडांत माती घालणें-खाण्यास अन्न नसणें; अतिशय हाल, कष्ट सोसावे लागणें. तोंडांत माती पडणें-१ (एखाद्याची) उपा समार होणें. २ मरणें. तोंडात शेण घालणें-(एखाद्याची) फजिती करणें; (एखाद्यास) नांवें ठेवणें; खरडपट्टी काढणें. तोंडांत साखर असणें-(गो.) (एखाद्याचें) तोंड, वाणी गोड असणें; गोड बोलत असणें. तोंडांत साखर घालणें-१ तोंड भरून साखर घालणें पहा. २ (उप.) तोंडांत शेण घालणें. 'सावित्री- बाईच्या तोंडांत लोक जेव्हां फारच साखर घालीत, तेव्हां तिनें दोन तीन जुनेरीं एकत्र शिवून जानकीबाईला द्यावी.' -रंगराव. तोंडांत साखर पडणें-(एखाद्याला) आनंदाचा प्रसंग, दिवस येणें. तोंडांतून ब्र काढणें-(तोंडांतून) अधिक-उणें अक्षर काढणें, उच्चारणें. 'आंतल्याआंत चूर होऊन मेलें पाहिजे, तोंडां- तून ब्र काढण्याची सोय नाहीं.' -विकारविलसित. तोंडानें पाप भरणें, तोंडें पाप घेणें-लोकांचीं पातकें उच्चारणें; लोकांचे दोष बोलून दाखविणें; वाईट बोलण्याची हौस यथेच्छ पुरवून घेणें; लोकांचीं पापें उच्चारून जिव्हा विटाळणें. 'कैसीं वो मानुसें । सपाइनि परंवंसें । तोंडे पाप घेती कांइसें । वायां वीण ।' -शिशु २१६. तोंडापुढें-क्रिवि. अगदीं जिव्हाग्रीं; मुखोद्गत. तोंडा- पुरता, तोंडावर गोड-वि. मधुर पण खोटें बोलणारा; दुतोंड्या; वरवर गोड बोलणारा व आंतून कपटी असलेला; उघडपणें प्रिय भाषण करणारा व मनांत निराळेच असणारा. ताडापुरता मांडा-पु. १ भूक भागेल एवढीच पोळी. २ (ल.) जेमतेम गरज भागेल एवढाच जरूर त्या वस्तूचा पुरवठा. तोंडार मारप- (गो.) (एखाद्याच्या) पदरांत चूक बांधणें; वरमण्यासारखें उत्तर देणें. तोंडार ल्हायो उडप-(गो.) फार जलद, अस्ख- लित बोलणें; लाह्या फुटणें. तोंडाला काळोखी आणणें- लावणें-बेअब्रू, नापत करणें. तोंडाला टांकी दिलेली असणें-देवीच्या खोल वणांनीं तोंड भरलेलें असणें; तोंडावर देवीचे वण फार असणें. तोंडाला पाणी सुटणें-(एखादी वस्तु पाहून तिच्यासंबंधीं) मोह उत्पन्न होणें; हांव सुटणें. तोंडाला पानें पुसणें-फसविणें; चकविणें; छकविणें; भोळसाविणें; भोंदणें; तोंडा- वरून हात फिरविणें. 'त्याच्यावर देखरेख करावयाला चार माणसें होतीं, पण त्यानें सर्वांच्या तोंडाला पानें पुसून आपला डाव साधला.' तोंडाला फांटा फुटणें-मूळ मुद्दा सोडून भलतेंच बोलत सुटणें; हवें तसें अमर्याद भाषण करूं लागणें. तोंडावर-क्रिवि. १ समक्ष; डोळ्यांदेखत. २ (ल.) निर्भयपणें; भीड न धरतां. 'मी त्याच्या तोंडावर त्याला लुच्चा म्हणण्यास भिणार नाहीं.' तोंडावर तुकडा टाकणें-(एखाद्यानें) गप्प बसावें, प्रतिकूल बोलूं नये म्हणून त्याला थोडेसें कांहीं देणें. तोंडावर-ला-तोंड देणें-१ (एखाद्यास) विरोध करणें; विरुद्ध बोलणें. २ (एखाद्यास) उद्धटपणानें, अविनयानें, दांडगेपणानें उत्तर देणें; उत्तरास प्रत्युत्तर देणें. तोंडा- वर तोंड पडणें-दोघांची गांठ पडून संभाषण, बोलाचाल होणें. तोंडावर थुंकणें-(एखाद्याची) निर्भर्त्सना, छीःथू करणें; धिक्कार करणें. तोंडावर देणें-तोंडांत देणें पहा. 'काय भीड याची द्या कीं तोंडावरी ।' -दावि ३०२. तोंडावर नक्षत्र पडणें-(एखाद्यानें) तोंडाळपणा करणें; शिवराळ असणें; नेहमीं अपशब्दांनीं तोंड भर- लेलें असणें. 'ह्याजकरिकां तोंडावर नक्षंत्र पडलेल्या पोरास म्या बोलविलें म्हणून हे मला शब्द लावीत नाहींत.' -बाळ २.१४२. तोंडावर पडप-(गो.) थोबाडींत (चपराक) बसणें, पडणें. तोंडावर पदर येणें-१ वैधव्य प्राप्त होणें. 'तिच्या तोंडावर पदर आला म्हणून ती बाहेर पडत नाहीं.' २ लज्जेनें तोंड लपविण्या- जोगी स्थिति होणें. तोंडावर मारणें-(एखाद्याला) पराभूत करणें. तोंडावर सांगणें-बोलणें-(एखाद्याच्या) समक्ष, निर्भीडपणें, बेडरपणें सांगणें, बोलणें. तोंडावरून-तोंडावर हात फिर- विणें-(एखाद्यास) गोड बोलून, फूसलावून, भुलथाप देऊन फस- विणें; भोंदणें; छकविणें. तोंडाशीं तोंड देणें-(हलक्या दर्जाच्या व्यक्तीनें वरिष्ठाशीं) आपला दर्जा विसरून, बरोबरीच्या नात्यानें, अविनयानें बोलणें, व्यवहार करणें. तोंडास काळोखी-स्त्री. मुखसंकोच; ओशाळगत; गोंधळून गेल्याची स्थिति; बेअब्रू; कलंक. तोंडास काळोखी, काजळी लागणें-(एखाद्याची) बेअब्रू, नाचक्की होणें; दुष्कीर्ति होणें; नांवाला कलंक लागणें. तोंडास काळोखी-काजळी लावणें-(एखाद्याचें) नांव कलंकित करणें; बेअब्रू करणें. 'सुनेनें माझ्या तोंडाला काळोखी लावली.' तोंडास कुत्रें बांधलेलें असणें-ताळतंत्र सोडून, अद्वातद्वा, अपशब्द बोलणें; शिव्या देणें. 'त्यानें तर जसें तोंडाला कुत्रेंच बांधलें आहे.' तोंडास खीळ घालणें-निग्रहपूर्वक, हट्टानें मौन धारण करणें. तोंडास तोंड-न. वादविवाद; वाग्युद्ध; हमरी- तुमरी; धसाफसी. -क्रिवि. समक्षासमक्ष; समोरासमोर; प्रत्यक्ष. तोंडास तोंड देणें-१ तोंडाशीं तोंड देणें पहा. २ मार्मिकपणें, खरमरीतपणें उत्तर देणें. तोंडास पाणी सुटणें-(एखाद्या- वस्तूबद्दल, गोष्टीबद्दल) लोभ, मोह उत्पन्न होणें; तोंडाला पाणी सुटणें पहा. 'पोर्तुगीज लोकांची बढती पाहून तिकडच्या दुसर्या साहसी लोकांच्या तोंडास पाणी सुटलें.' -बाजी. तोंडास तोंड न दिसणें-(पहांटेस) तोंड न ओळखतां येण्याइतका अंधेर असणें (झुंजमुंजु पहाटेविषयीं वर्णन करितांना हा वाक्प्रचार योजतात). 'अद्याप चांगलें उजाडलें नाहीं, तोंडास तोंड दिसत नाहीं.' तोंडास-तोंडीं बसणें-(श्लोक, शब्द इ॰) स्पष्ट, बिन- चूक, भरभर म्हणण्याइतका पाठ होणें. 'तो श्लोक दहा वेळां पुस्तकांत पाहून म्हण, म्हणजे तो तुझ्या तोंडीं बसेल.' तोंडास येईल तें बोलणें-विचार न करितां, भरमसाटपणानें वाटेल तें बोलणें; अद्वातद्वा, अपशब्द बोलणें. तोंडास-तोंडीं लागणें- १ (एखाद्याच्या) तोंडास तोंड देणें; उलट उत्तरें देणें. २ हुज्जत घालणें; वादविवाद करण्यास तयार होणें. (एखाद्याच्या) तोंडा- समोर-क्रिवि. १ (एखाद्याच्या) समक्ष; समोर; डोळ्यांदेखत. २ अगदीं मुखोद्गत; जिव्हाग्रीं. तोंडापुढें पहा. 'हा श्लोक माझ्या अगदीं तोंडासमोर आहे.' तोंडास हळद लागणें-(एखाद्यास) दोष देणें, नापसंती दर्शविणें अशा अर्थीं हा वाक्प्रचार योजितात. तोंडासारखा-वि. (एखाद्याची) खुशामत, स्तुति इ॰ होईल अशा प्रकारचा; एखाद्याच्या खुशामतीकरितां त्याच्या मतास जुळता. तोंडासारखें बोलणें-(एखाद्याची) स्तुति, खुशामत करण्या- करितां त्याच्याच मताची, म्हणण्याची री ओढणें; त्याचें मन न दुखवेल असें बोलणें. तोंडीं आणणें-देणें-(रोग्यास) लाळ गळण्याचें, तोंड येण्याचें औषध देऊन तोंड आणणें. तोंडीं- काढणें-१ ओकारी देणें; वांती होणें. २ (एखाद्यास त्यानें) केलेले उपकार बोलून दाखवून टोमणा मारणें. तोंडीं खीळ पडणें- तोंड बंद होणें; गप्प बसणें भाग पडणें. 'अवघ्या कोल्यांचें मर्म अंडीं । धरितां तोंडीं खीळ पडे ।' तोंडीं घास येणें-(एखा- द्यास) घांसभर अन्न मिळणें; चरितार्थाचें साधन मिळणें; पोटा पाण्याची व्यवस्था होणें. तोंडीं तीळ न भिजणें-१ (तापानें, संतापून ओरडण्यानें, रडण्यानें) तोंड शुष्क होणें, कोरडें पडणें. २ एखादी गुप्त गोष्ट मनांत न राहणें, बोलून टाकणें; तोंडीं तृण धरणें-(एखाद्यानें) शरण आलों. असें कबूल करणें; शरणागत होणें; हार जाणें (दांतीं तृण धरणें असाहि प्रयोग रूढ आहे). तोंडीं देणें-(एखाद्यास एहाद्या माणसाच्या, कठिण कार्याच्या) सपाट्यांत, तडाख्यांत, जबड्यांत, तावडींत लोटणें, देणें; हाल, दुःख सोसण्यास (एखाद्यास) पुढें करणें. तोंडीं-तोंडास पान- पानें पुसणें-(एखाद्यास) छकविणें; लुबाडणें; भोंदणें; अपेक्षित लाभ होऊं न देणें; स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेऊन दुसर्यास तोंड पहावयास लावणें. 'त्यानें आपल्या नळीचें वर्हाड केलें आणि सर्वांच्या तोंडीं पान पुसलें.' तोंडीं माती घालणें- (एखाद्यानें) अतिशय दुःखाकुल, शोकाकुल होणें. 'ऊर, माथा बडवून, तोंडीं माती घालूं लागली' -भाव ७५. तोंडीं येऊन बुडणें-नासणें-(एखादी वस्तु, पीक इ॰) अगदीं परिपक्वदशेस, परिणतावस्थेस येऊन, ऐन भरांत येऊन, नाहींशीं होणें, वाईट होणें. तोंडीं येणें-१ (पारा इ॰ औषधानें) तोंड येणें. २ ऐन भरांत, परिपक्व दशेस, पूर्णावस्थेस येणें. तोंडीं-रक्त, रगत लागणें-१ वाघ इ॰ हिंस्त्र पशूला माणसाच्या रक्ताची चटक लागून तो माणसावर टपून बसणें. २ (ल.) लांच-लुचपत खाण्याची चटक लागणें. तोंडीं लागणें-(एखाद्यास एखाद्या वस्तूची, खाद्याची चव प्रथमच कळून त्या वस्तूची त्यास) चटक लागणें; आवड उत्पन्न होणें. 'ह्याच्या तोंडीं भात लागला म्हणून यास भाकर आवडत नाहीं.' तोंडीं लागणें-१ (एखाद्याच्या) तोंडास तोंड देणें; उद्धटपणानें, आपला दर्जा विसरून उलट जबाब देणें. २ हुज्जत घालणें; वादविवादास प्रवृत्त होणें; तोंडास लागणें पहा. 'सुज्ञ आहेत ते दूषकांच्या तोंडीं लागत नसतात.' -नि. ३ (युद्ध, भांडण, इ॰कांच्या) आणीबाणीच्या ठिकाणीं, आघाडीस, अग्रभागीं असणें. तोंडीं लावणें-न. जेवतांना तोंडास रुचि आणणारा भाजी, चटणी इ॰ सारखा मधून मधून खावयाचा चमचमीत पदार्थ. तोंडीं लावणें-१ जेवतांना भाजी, चटणी इ॰ चम- चमीत पदार्थानें रुचिपालट करणें. 'आज तोंडीं लावावयाला भाजीबिजी कांहीं केली नाहीं काय ?' २ विसारादाखल पैसे देणें. तोंडें मागितलेली किंमत-स्त्री. (एखाद्या वस्तूची) दुकान- दारानें सांगितलेली व झिगझिग वगैरे न करितां गिर्हाइकानें दिलेली किंमत. तोंडें मानलेला-मानला-वि. (तोंडच्या) शब्दानें, वचनानें मानलेला (बाप, भाऊ, मुलगा इ॰); धर्माचा, पुण्याचा पहा. तोंडें वांकडीं करणें-वेडावून दाखविणें; वेडावणें. लहान तोंडीं मोठा घांस घेणें-१ (एखाद्यानें) आपल्या आवांक्या- बाहेरचें काम हातीं घेणें. २ (वडील, वरिष्ठ माणसांसमोर) न शोभेल असें, मर्यादा सोडून, बेअदबीनें बोलणें; वडील माणसांस शहाणपण शिकविणें. जळो तुझें तोंड-(बायकी भाषेंत) एक शिवी. स्त्रिया रागानें ही शिवी उपयोगांत आणतात. म्ह॰ १ तोंड बांधून (दाबून) बुक्कयांचा मार = एखाद्याचा विनाकारण छळ होऊन त्यास त्याविरुद्ध तक्रार करतां न येणें; एखाद्यास अन्यायानें वाग- वून त्याविरुद्ध त्यानें कागाळी केल्यास त्यास बेगुमानपणें शिक्षा करणें. 'बायकांचा जन्म म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार, म्हण- तात तें अक्षरशः खरें आहे.' -पकोघे २ (गो.) तोंडाच्या बाता घरा बाईल भीक मागता = बाहेर मोठमोठया गप्पा मारतो पण घरीं बायको भीक मागते. सामाशब्द- तोंड उष्ट-न. एखादा-दुसरा घांस खाणें; केवळ अन्न तोंडास लावणें; तोंड खरकटें करणें. [तोंड + उष्टें] ॰ओळख-स्त्री. परस्परांचा विशेष परिचय नसतां, चेहरा पाहू- नच हा अमुक आहे असें समजण्याजोगी ओळख; (एखाद्याची) चेहरेपट्टी लक्षांत राहून तीवरूनच त्याला ओळखतां येणें; नांव वगैरे कांहीं माहीत नसून (एखाद्याचा) केवळ तोंडावळाच ओळ- खीचा असणें. 'एखाद्याला वाटेल कीं बाळासाहेबांशीं त्याची तोंड- ओळखच आहे.' -इंप ३७. ॰कडी-स्त्री. १ आंतील तुळयांचीं तोंडें बाहेर भिंतींतील ज्या तुळईवर ठेवतात, ती सलग तुळई. २ कौलारू छपराचे वासे ज्या सलग तुळईवर टेकतात ती छपराच्या शेवटीं, टोंकास असलेली तुळई. ३ गुरांचें दावें जिला बांधतात ती कडी. ४ (सोनारी धंदा) दागिन्याची शेवटची कडी, नाकें; ज्यांत फांसा इ॰ अडकवितात ती (सरी इ॰ सारख्या दागिन्याची) टोंकाची, तोंडाची कडी; (जव्याच्या) मण्याच्या वगैरे तोंडाशीं ठेवलेली कडी. ५ (जमाखर्चाच्या वहींतील जमा आणि खर्च या दोहोंबाजूंचा मेळ. हा मेळ = = = अशा दुलांगीनें, (दुहेरी रेषेनें) दाखविण्याचा प्रघात आहे. 'वहीची खात्याची-तारखेची-तोंडकडी' असा शब्दप्रयोग करितात. (क्रि॰ मिळणें; जुळणें; येणें; उतरणें; चुकणें; बंद होणें). [तोंड + कडी] ॰कळा-स्त्री. चेहर्यावरील तजेला; कांति; तेज; टवटवी. (प्र.) मुखकळा. [तोंड + कळा = तेज] ॰काढप-(गो.) उपदंश झालेल्या रोग्यास एक प्रकारचें औषध देऊन त्याच्या तोंडांतून लाळ वाहवितात तो प्रकार. ह्या औषधानें तोंड बरेंच सुजतें. [तोंड + गो. काढप = काढणें] ॰खुरी- स्त्री. (ना.) गुरांचा एक रोग. ॰खोडी-वि. तोंडाळ; टाकून बोलणारा; तोंड टाकणारा; अशी संवय असलेला. 'परम अधम रुक्मी हा महा तोंडखोडी ।' -सारुह ३.७८. [तोंड + खोड = वाईट संवय] ॰घडण-स्त्री तोंडाची ठेवण; चेहरेपट्टी; तोंडवळां. 'या मुलाची बापासारखी तोंडघडण आहे.' [तोंड + घडण = रचना] ॰घशीं- सीं-क्रिवि. १ जमीनीवर पडून तोंड घासलें जाईल, फुटेल अशा रीतीनें. (क्रि॰ पडणें; पाडणें; देणें). 'तो तोंडघसींच पडे करतां दंतप्रहार बहु रागें ।' -मो. २. (आश्रय तुटल्यानें) गोत्यांत; पेचांत; अडचणींत; फजिती होईल अशा तर्हेनें; फशीं (पडणें). [तोंड + घासणें] ॰घशी देणें-दुसरा तोंडघशीं पडे असें करणें. ॰चाट्या-वि. खुशामत करणारा; थुंकी झेलणारा; तोंडासारखें बोलणारा. ॰चाळा-पु. १ तोंड वेडेंवाकडें करून वेडावण्याची क्रिया. २ वात इ॰कांच्या लहरीनें होणारी तोंडाची हालचाल, चाळा. ॰चुकाऊ-वू-व्या, तोंडचुकारू-चुकव्या-वि. (काम इ॰ कांच्या भीतीनें) दृष्टि चुकविणारा; तोंड लपविणारा; नजरेस न पडे असा. [तोंड + चुकविणें] ॰चुकावणी-स्त्री. (एखाद्यापासून) तोंड लपविण्याची, स्वतःस छपविण्याची क्रिया. ॰जबानी-स्त्री. तोंडानें सांगितलेली हकीगत, दिलेली साक्ष, पुरावा. -क्रिवि तोंडी, तोंडानें. [तोंड + फा. झबान्] ॰जाब-पु. तोंडी जबाब. ॰झाडणी-स्त्री. तिरस्कारपूर्ण उद्गारांनीं झिडकारणें; खडका- वणें; खरडपट्टी काढणें. ॰देखणा-ला-वि. आपल्या अंतःकरणांत तसा भाव नसून दुसर्याचें मन राखण्याकरितां त्याला रुचेल असा केलेला (व्यवहार, भाषण, गो इ॰); खुशामतीचा; तोंडासारखा; तोंडपुजपणाचा. 'प्राणनाथ, मला हीं तोंडदेखणीं बोलणीं आव- डत नाहींत.' -पारिभौ ३५. [तोंड + देखणें = पाहणें] ॰देखली गोष्ट-स्त्री.दुसर्याची मर्जी राखण्याकरितां केलेलें, खुशामतीचें भाषण. ॰निरोप-पु. तोंडी सांगितलेला निरोप. 'कृष्णास ते हळुच तोंडनिरोप सांगे ।' -सारुह ४.९. ॰पट्टा-पु. (बायकी). तोंडाचा तोफखाना; अपशब्दांचा भडिमार; संतापानें, जोराजोरानें बेबंदपणें बोलणें. [तोंड + पट्टा = तलवार] ॰पट्टी-स्त्री. (शिवणकाम) तोंडाला शिवलेला पट्टी. 'योग्य तेवढी तोंडपट्टी कातरावी.' -काप्र. १४. ॰पाटिलकी-स्त्री. १ आपण कांहीं न करतां बसल्या जागे- वरून लुडबुडेपणानें दुसर्यांना हुकुमवजा गोष्टी, कामें सांगणें (पाटलाला बसल्या जागेवरून अनेक कामें हुकुम सोडून करून घ्यावीं लागतात त्यावरून). २ (उप.) लुडबुडेपणाची वटवट, बडबड; तोंडाळपणा. 'दुसरें कांहीं न झालें तरी नुसती तोंडपाटिलकी करण्यास कांहीं हरकत नाहीं.' -आगर ३.६१. [तोंड + पाटिलकी = पाटलाचें काम] ॰पाठ-वि. पुस्तकाच्या सहाय्यावांचून केवळ तोंडांनें म्हणतां येण्यासारखा; मुखोद्गत [तोंड + पाट = पठण केलेलें] ॰पालटपुस्त्री. १ (अरुचि घालविण्याकरितां केलेला) अन्नांतील फेरबदल. २ अन्नांत फेरबदल करून अरुचि घालविण्याची क्रिया. [तोंड + पालट = बदल] ॰पिटी-स्त्री. १ (वडील, गुरु इ॰ कांची) आज्ञा न मानतां तिचें औचित्य इ॰ कासंबंधीं केलेली वाटाघाट; (वडिलांशीं, गुरूंशीं) उद्धटपणानें वाद घालणें; उलट उत्तर देणें; प्रश्न इ॰ विचारून अडवणूक करणें. 'गुरूंसी करिती तोंडपिटी ।' -विपू १.५७. २ (दगडोबास शिकविण्याकरितां, विसराळू माणसास पुन्हां पुन्हां बजाविण्याकरितां, थिल्लर जनावरास हांकलण्याकरितां करावी लागणारी) व्यर्थ बडबड, कटकट, वटवट. [तोंड + पिटणें] ॰प्रचिती-प्रचीति-स्त्री. खुशामत करण्याकरितां (एखाद्याच्या) व्यक्तिमाहात्म्यास, भाषणास, अस्तित्वास मान देणें; आदर दाख- विणें. [तोंड + प्रचीति] ॰प्रचीतक्रिवि. १ तोंडासारखें; खुशामतीचें; तोंडापुरतें (भाषण, वर्तन इ॰ करणें) २ माणूस ओळखून, पाहून; माणसामाणसांत तारतम्य ठेवून (बोलणें, चालणें, वागणें). ॰प्रचीत बोलणारा-चालणारा-वागणारा-वि. माणसामाणसांत तारतम्य ठेवून चालणारा, बोलणारा, वागणारा. ॰फटालकी -फटालीस्त्री. तोंडाची निरर्थक बडबड, वटवट, टकळी. [तोंड + ध्व. फटां ! द्वि.] ॰फटाला-ल्या-वि. मूर्खपणानें कांहीं तरी बड बडणारा; बकणारा; वटवट करणारा. [तोंड + ध्व. फटां !] ॰फट्याळ-वि. तोंडाचा फटकळ; शिवराळ; तोंडाळ; बातेफरास; अंगीं कर्तृत्व नसून लंब्या लंब्या बाता झोंकणारा. ॰फट्याळी- स्त्री. शिवराळपणा; तोंडाळपणा; वावदूकता. [तोंडफट्याळ] ॰बडबड्या-बडव्या-वि. निरर्थक वटवट, बडबड करणारा: बकबकणांरा टकळी चालविणारा. ॰बंद -बांधणी-पुस्त्री. गाडीच्या चाकाच्या तुंब्यावरील बाहेरील बाजूचें लोखंडी कडें, पट्टी. आंतील बाजूच्या कड्यास कटबंद असें म्हणतात. [तोंड + बंद = बांधणी] ॰बळ-न. वक्तृत्वशक्ति; वाक्पटुता; वाक्चातुर्य. 'आंगबळ न चांगबळ देरे देवा तोंडबळ.' ॰बळाचा-वि. ज्याला बोलण्याची हातोटी, वक्तृत्कला साधली आहें असा; तोंडबळ अस- लेला; भाषणपटु जबेफरास. ॰बाग-स्त्री. (राजा.) चेहरेपट्टी; चेहर्याची ठेवण, घडण; मुखवटा. ॰बांधणी-स्त्री. १ तोंडबंद पहा. २ (ढोरांचा धंदा) कातड्याच्या मोटेच्या सोंडेच्या टोंकाकरितां बाजूला शिवलेला गोट. ॰भडभड्या-वि. तोंडास येईल तें बड- बडत, बकत सुटणारा; बोलण्याची, बडबडण्याची हुक्की, इसळी ज्यास येते असा; भडभडून बोलणारा. ॰भर-वि. तोंडास येईल तेवढा; भरपूर. 'हॅमिल्टन यांनीं खर्चवाढीबद्दल तोंडभर मगणी केली होती.' -केले १.१९८. ॰मार-स्त्री. १ रोग्यावर लाद- लेला खाद्यपेयांचा निर्बंध, पथ्य. २ एखाद्यास बोलण्याकरितां तोंड उघडूं न देणें; भाषणबंदी. ३ (ल.) (एखाद्याच्या) आशा, आकांक्षा फोल ठरविणें; (एखाद्याचा केलेला) आशाभंग; मनोभंग; निराशा. (क्रि॰ करणें). ॰मारा-पु. १ शेतीच्या कामाच्या वेळीं पिकांत वगैरें काम करतांना गुरांच्या तोंडाला जाळी, मुंगसें, मुसकें बांधणें. २ (एखाद्यास केलेली) भाषणबंदी; खाद्यपेयांचा निर्बंध. ३ (प्र.) तोंडमार. तोंडमार अर्थ ३ पहा. ॰मिळवणी- स्त्री, १ जमा आणि खर्च यांचा मेळ; तोंडें मिळविण्यासाठीं मांडलेला जमाखर्च. २ ऋणको व धनको यांच्यांतील हिशेबाची बेबाकी, पूज्य. ३ मेळ. -शर. ॰मिळवणी खातें- (जमाखर्च) कच्चें खातें (याचें देणें येणें सालअखेर पुरें करून खुद्द खात्यांत जिरवितात). ॰लपव्या-वि. तोंड लपविणारा; छपून राहणारा; दडी मारून बसणारा. ॰लाग-पु. शिंगें असलेल्या जनावरांच्या तोंडास होणारा रोग; यांत लाळ गळत असते. ॰वळख-स्त्री (प्र.) तोंडओळख पहा. ॰वळण-वळा-नपु. चेहरा; चर्या; मुद्रा; चेहर्याची घडण, ठेवण; रूपरेखा; चेहरामोहरा; चेहरेपट्टी; मुखाकृति; मुखवटा. [तोंड + वळ = रचना] ॰वीख-न. (ल.) तोंडानें ओकलेलें, तोंडां- तून निघालेलें, विषारी, वाईट भाषण, बोलणें. [तोंड + विष] ॰शिनळ, शिंदळ-वि. अचकटविचटक, बीभत्स बोलणारा; केवळ तोंडानें शिनळकी करणारा. ॰शेवळें-न. मुंडावळ. -बदलापूर २७७. [तोंड + शेवळें = शेवाळें] ॰सर-क्रिवि. तुडुंब; तोंडापर्यंत; भरपूर. ॰सरता-वि. अस्खलित, तोंडपाठ न म्हणतां येण्या- सारखा; अडखळत अडखळत म्हणतां येण्यासारखा (श्लोक, ग्रंथ इ॰). -क्रिवि. घसरत घसरत; अडखळत; चुका करीत; कसेंबसें; आठवून आठवून. [तोंड + सरणें] ॰सुख-न. १ एखा- द्यानें केलेल्या अपकाराचें शरीरानें प्रतिकार करण्याचें सामर्थ्य नसल्यामुळें केवळ तोंडानें यथेच्छ शिव्यांचा, अपशब्दांचा भडि- मार करून त्यांत सुख मानणें. २ जिव्हा मोकाट सोडून वाटेल तसें बोलण्यांत मानलेलें सुख; यथेच्छ व अद्वातद्वा केलेलें भाषण; (एखाद्याची काढलेली) खरडपट्टी; बोडंती. (क्रि॰ घेणें). ॰सुख घेणें-(एखाद्याची) खरडपट्टी काढणें, हजेरी घेणें; (एखा- द्यावर) शिव्यांचा, अपशब्दांचा भडिमार करणें. ॰सुटका-स्त्री. १ जिभेचा (बोलण्यांतील) स्वैरपणा; सुळसुळीतपणा; वाक्चा- पल्य; जबेफराशी; (भाषण इ॰ कांतील) जनलज्जेपासूनची मोक- ळीक. २ भाषणस्वातंत्र्य; बोलण्याची मोकळीक. ३ तोंडाळपणा; शिवराळपणा. ४ (पथ्य, अरुची, तोंड येणें इ॰ कांपासून झालेली) तोंडाची सुटका, मोकळीक; तोंड बरें होणें; खाण्यापिण्याला स्वातंत्र्य. [तोंड + सुटणें] ॰हिशेबी-वि. अनेक रकमांचा मनांतल्या- मनांत चटकन् हिशेब करून सांगणारा बुद्धिमान (मनुष्य); शीघ्रगणक. ॰तोंडागळा-वि. (तोंडानें) बोलण्यांत, वक्तृत्वशक्तींत अधिक. 'कीं शेषाहूनि तोंडागळें । बोलकें आथी ।' -ज्ञा ९. ३७०. [तोंड + आगळा = अधिक] ॰तोंडातोंडी-क्रिवि. १ समोरासमोर; २ बोलण्यांत; बोलाचालींत. [तोंड द्वि.] ॰तोंडाळ-वि. १ दुसर्या- वर तोंड टाकणारा; शिवराळ; भांडखोर. 'लटिकें आणि तोंडाळ । अतिशयेंसीं ।' -दा २.३.१०. २ बडबड्या; वाचाळ. [तोंड] म्ह॰ हाताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं = शिवराळ माणसा- पेक्षां चोर पुरवतो. ॰तोंडाळणें-उक्रि. बकबक करून गुप्त गोष्ट फोडणें; जीभ पघळणें. [तोंडाळ] ॰तोंडोंतोंड-क्रिवि. तोंडापर्यंत; कंठोकांठ; तुडुंब; तोंडसर.॰तोंडोंळा-पु. तोंडवळा; चेहरेपट्टी. [तोंड + ओळा, वळा प्रत्यय]