तेरा मराठी शब्दकोशांमधील ३,००,८७५ शब्दांचा एकत्रित संग्रह
शब्दार्थ
बद्दल
बद्दल baddala and its compounds and derivatives see under बदल.
बदल पहा.
बद्दल
[अ. बदल् = ऐवजीं] ऐवजी; मुळें; करितां; साठीं. “पाउसाबद्दल हत्ती घोडे उण्टें बहुत मेलीं” (मराचिथोशा ६२). “बदल नन्दादीप व भण्डारा” (राजवाडे १५|१५८).
बद्दल / बदल
(आ) श० ठिकाणीं, करितां, साठीं, ऐवजीं.
संबंधित शब्द
म्हेतर
पु. १ भंगी; झाडूवाला. २ खेडेगांवच्या वंशपरंपरागत वतनदार महाराच्या बद्दल योजावयाचा शब्द. ह्यावरून सर्वसाधा- रणपणें चांभार व महार यांच्या बद्दल योजावयाचा शब्द. तसेंचतसेंच अशा तऱ्हेच्या शब्दांना प्रत्ययवजा जोडून उपयोग. जसे:— हिर- म्हेतर; चांगम्हेतर. ३ गवंडी, सुतार, लोहार, साळी, कोष्टी, तेली तांबोळी, माळी, चांभार यांच्यांतील नायकाबद्दल किंवा मुख्या- बदल मोठेपणानें योजावयाचा शब्द. ४ पाटील, कुळकर्णी, चौघुला इ॰ वतनदार लोकांच्याबद्दल प्रतिष्ठितपणें योजावयाचा शब्द. [सं. मह- त्तर] ॰की-स्त्री. म्हेतराचा उद्योग किंवा कर्तव्य; ग्रामादिसंबंधीं एक वतनदारी. म्हेतराणी, म्हेत्राणी-स्त्री. १ भंगीण किंवा झाडूवाली बाई. २ म्हेतराची स्त्री (वतनदार महार किंवा चांभार याची) चांभार जातीची स्त्री. म्हेतऱ्या-पु. वतनदार महालाबद्दल श्रेष्ठत्वाचा शब्द; कांहीं कारागीर लोकांतील नायकाबद्दल योजाव- याचा शब्द. तसेंच जातींतील मुख्य इसमाबद्दल योजावयाचा शब्द. म्हेतर अर्थ २, ३ पहा. [म्हेतर]
उपकार
पु. १ मदत; साहाय्य; साहित्य. २ कृपा; दया; आभार; मेहेरबानी. ३ हित; कल्याण; फायदा; बरें. म्ह॰ उपकारानें उपकार फेडावा. [सं. उप + कृ; उपकार] ॰ठेवणें-उपकाराची फेड न करणें. ॰बाळगणें-मानणें-न विसरणें-स्मरणें-उपकारा- बद्दल कृतज्ञ असणें. 'तेल आणुनि द्यावें घरा । तुमच्या उपकारा न विसरूं ।' उपकारांनीं बांधणें-दुसर्यास ऋणी करून ठेवणें. उपकारांनीं मारणें-१ अतिशय उपकार करणें; न फिटेसे उपकार करणें. २ उपकार करून एखाद्यास वश करून घेणें; मिंधा करून ठेवणें. ॰स्तुति-स्त्री. (अर्वाचीन) उपकार केल्या- बद्दल आभार मानणें; कृतज्ञता व्यक्त करणें. (इं.) थँक्स गिव्हिंग. ॰स्मृति-स्मरण-स्त्री. न. (अर्वाचीन) उपकाराची जाणीव; उपकार स्मरणें.
ए
क्रि. (द्वितीय-तृतीयपुरुषी एकवचनी) ये, येते, येतो. ये पहा. ‘वैरी सरिसा जीऐ/?/ । तरि निद्रा कैसेनि ऐ/?/ ।।’ –शिशु ४७०. क्रियापदांतील व त्याच्या रूपांतील ये बद्दल ए येतो. उ॰ एओ, एऔनी अशा तर्हेचीं येवो, येवून वगैरेचीं रूपें होतात. ‘अवदशा यां पांडवा । एओ नेदावी ।।’ –शिशु ४९१. ‘वेघें एऔनि वृंदावनां.’ -दाव १६५. [सं. आ + इ; प्रा. ए; म. येणें]
अहंमन्य
वि. गर्विष्ठ; आढ्यताखोर; स्वतः बद्दल वाजवीपेक्षा जास्त अभिमान बाळगणारा. [सं.]
अहंमन्यता
स्त्री. गर्व; आढ्यता; स्वतः बद्दल वाजवीपेक्षा जास्त अभिमान असणे. [सं.]
आइकणें-आइकभट्टी-आइकीव
ऐकणें, ऐकभट्टी, ऐकीव पहा. आइका ऐक पहा. ' ते प्रसिद्ध नागांबिका । प्रसन्न होए आइका ।' -ऋ ४. आइकत- ऐकोत.' तें आइकतु रसिकु आतां ।।' -शिशु ७४३. आइकौनि- ऐकून.' जेआंचे आइकौनि बरवेपणा।' -दाव ४८. आइकीजे- ऐका. 'आइकीजे द्वारका- पुरा नगरी' -उषा ६४७. आइकै- ऐक. 'आणीक आइकै यादव टीळका। ' -उषा ८१३. आइकशी- (रा. कुण) ऐकशील. 'माजें आइकशी ता तूं मुंबयच्या वाटे पडों नुकों.' -मसाप २.४.१११. साधारणपणें जुन्या मराठींत लिहितांना ऐ बद्दल आई किंवा अई येतें.
अक्षम्य
वि. क्षमा करण्यास अपात्र; ज्या बद्दल क्षमा करू नये असा (अपराध, गुन्हा).
अलक्षित
वि. अटकळ किंवा अनुमान न केलेलें. (बद्दल किंवा विषयीं) लक्ष न दिलेलें; न शोधलेलें; न पाहिलेलें; अक- स्मात्. [सं.]
अट
स्त्री. १ अडथळा; अडचण; अटकाव; हरकत; नड. २ चाक पुढें जाऊं नये म्हणून चाकास लाविलेला दगड किंवा घुणा; उटी. ३ (ल.) ठरलेल्या गोष्टीविरुद्ध आचरण घडूं नये म्हणून त्या- बद्दल केलेला करार-शर्त; देण्याघेण्याविषयीं कुळाकडून जो निर्बंध करून घेतात तो. ४ हट्टीपणा; हेका; हट्ट; दुराग्रह. ५ घट्ट बसविलेला सांधा उचकटण्याकरितां तरफेप्रमाणें लावलेला दगड, खिळा, प्रहार वगैरे; जोर. ६ विण्याची किंवा सतारीची घोडी; सतारीच्या दांडी- वरील हस्तिदंती पट्टी-हिच्यावरून तारा खुंटीला अडकविलेल्या असतात. ७ दोरीचा गुंता; गुंतवण; पीळ; अढी. ८ (ल.) मनांतील गांठ; विप- रीत ग्रह. ९ हातमागाच्या परदेशी नांवाच्या खुंटयापुढें बांधलेली, कर- कोचे पाडलेली काठी- हिला विणावयाचे धाग्याचे पुंज निरनिराळे बांधलेले असतात. १० गोट्या खेळतांना हातास व बोटांस जोर येण्यासाठीं आधाराला जमीनीवर टेंकलेला अंगठा; किंवा जेथें असा अंगठा टेंकला जातो ती जागा. [प्रा. का. अड-ड्ड = आडवा, अडथळा.]
अविचारित
वि. ज्या बद्दल मनन, विचार केलेला नाही असे; अविचाराच्या लहरीतले; पूर्णपणे आकलन न झालेले : ‘हे एकलौतें चराचर । अविचारित सुंदर ।’ – ज्ञा १४·११०. [सं.]
अवश्य, अवश्मक
क्रिवि. १. आवश्यक बद्दल उपयोग; जरूर; खचित; खात्रीने; खास; अलबत; निःसंशय; अगत्य; निखालस. २. एखाद्याने सांगितलेल्या गोष्टीच्या अंगीकाराचे द्योतक; संमतिदर्शक होय, बरे या अर्थी अव्यय. [सं.]
अवश्य, अवश्यक
क्रिवि. १ आवश्यक बद्दल चुकीनें उपयोग; जरूर; खचित; खात्रीनें; खास; अलबत; निःसंशय; अगत्य; निखालस. २ कोणेकानें सांगितलेल्या गोष्टीच्या अंगीकाराचें द्योतक, संमतिदर्शक होय, बरें या अर्थीं अव्यय. [सं. अ + वश्]
बा/?/
(संक्षेप) १ बद्दल. 'फुलघाट मिनेगार बा/?/ मल्हारजी होळकर हिरे शहत.' -थोमारो १.१५९. २ बरोबर. ३ ब-मोजिब. ४ बरहुकूम.
बाबे
शअ. करितां; बाबत; साठीं; संबंधानें; बद्दल. 'तुमचे बाबे लक्ष्मण बल्लाळ याणी हुजूर येऊन...' -वाडसमा १.७.
बाबत-द
स्त्री. १ कलम; बाब; मुद्दा; प्रकरण; लक्ष्यांत ठेव- ण्याची गोष्ट. २ खर्चाचा सविस्तर हिशोब; पाल्हाळ; सबबींची, निमित्तांची मालिका. (क्रि॰ सांगणें; लावणें; मांडणें; आणणें) -क्रिवि. मुळें; करितां; बद्दल; विषयीं. 'त्या कर्माबाबत शंभर रुपये दंड बसला.' [फा.] ॰वार, बाबत्वार-क्रिवि. कलमवार; अनु- क्रमानें. ॰वारी-स्त्री. हिशोबांत किंवा नोंदणीपुस्तकांत लिहिली गेलेली कोणतीहि वस्तु, मालमत्ता; कर किंवा जमीनमहसुलाची यादी. ॰बाबती-स्त्री. १ वसुलाची कोणतीहि बाब; एखाद्या विशिष्ट बाबी- वर बसविलेला जादा कर. २ (अव.) देशमुख देशपांडे इ॰ कांचे मुलखावर असणारे हक्क. मराठ्यांची चौथाई. चौथ पहा. [फा.]
बइलका, बईल
बइ व बई यांनीं सुरवात होणार्या शब्दां बद्दल बै पहा.
चौदावे रत्न
१. (चुकीने) चाबूक. (चौदा रत्ने वर्णन करणाऱ्या ‘लक्ष्मीः कौस्तुभ पारिजातक.’ श्लोकातील ‘शंखोऽमृतं चांबुधेः.’ या तिसऱ्या पादाच्या शेवटी ‘चांबुधेः.’ बद्दल चुकीने चाबूक असे वाचल्याने चौदावे रत्न म्हणजे चाबूक असा अर्थ. २. (ल.) खरपूस मार (चौदावे रत्न (अमृत) निघाल्यावर दैत्यांना बसलेल्या मारावरून शिक्षा). ३. भाबड्या माणसाची केलेली खोडी, फसवणूक, (वा.) चौदावे रत्न दाखविणे − चाबकाने मारणे, खरपूस समाचार घेणे. चौदिवाली, चौदिवारी
चढिन्नले
चढले. (काव्यांत चढले बद्दल चढिन्नले असें रूप येतें) -भुवन १.३६.
डाचणें
उक्री. १ डचडचणें; घशाशीं जळजळणें, येणें; पोटांत खुपणें; सलणें(पित्तविकारामुळे, तिखट-मसालेदार पदार्थ खाण्यांत आल्यामुळें). २ (स्वतःचा मूर्खपणा किंवा दुस- र्याचें वर्मी भाषण, पीडा यांच्या आठवणीमुळें) मनांत सलणें; घोळत असणें; बोचणें; शल्य राहणें.(या अर्थीं अकर्तृक प्रयोगहि होतो). ३ (जाचणें बद्दल चुकीनें) त्रास देणें; छळणे; गांजणें. [ध्व. डच; किंवा सं. दंश-दशन; म. डसणें]
दुःख
न. १ दुःसह, अनिष्ट अनुभव; पीडा; क्लेश; यातना; वेदना. 'जी वेदना आपल्याला प्रतिकूल तें दुःख.' -गीर ९६. २ अडचण; त्रास; कष्ट; रोग; त्रासदायक गोष्ट. ३ उपदंश; गरमी. ४ खेद; शोक; पश्चात्ताप. ५ (गो.) अश्रू; आंसु. [सं.] (वाप्र.) ॰घोटणें-दुःख करणें; शोक करणें. 'बोलतां असें दुःख घोटिती ।' -कीर्तन १.२७. ॰पाहून डाग देणें-१ दुःखाचें बीज शोधून तेवढ्याच जागीं इलाज करणें. २ ज्या मानानें अपराध असेल त्याच मानानें शिक्षा करणें. ॰मानणें-(एखाद्या गोष्टी- बद्दल) वाईट वाटणें; विषाद, खेद मानणें; शोक करणें. ॰वेशीस बांधणें-(गांवच्या वेशीला बांधलेली वस्तू सर्वांस दिसते या वरून) (आपलें) दुःख, अडचण सर्वांना कळविणें; आपलें संकट, त्रास; पीडा लोकांमध्यें जाहीर करणें. दुःखाचा वांटा उच- लणें-(एखाद्याच्या) दुःखांत वांटेकरी होणें. दुःखावर डाग- डागण्या देणें, फासण्या घालणें-टाकणें-दैववशात् दुःख पावलेल्या मनुष्यास मर्मभेदक भाषणानें आणखी दुःख देणें; जखमे- वर मीठ घालणें, चोळणें. दुःखाचा प्राणी-पु. ज्याला जन्मभर संकटें व दुःखें सोसावीं लागलीं असा मनुष्य; ज्यावर एकामागून एक दुर्दैवाचे घोले आले असा मनुष्य; जन्मांतहि सुखाचें वारें न मिळालेला मनुष्य. याच्या उलट ऐश्वर्याचा प्राणी. दुःखाचा वांटा-पु. कपाळीं, वांट्यास आलेलें दुःख, भोग; खडतर दुर्भाग्य. (क्रि॰ उचलणें; घेणें; सोसणें; भोगणें). दुःखाचा वांटेली- विभागी-वि. (प्रत्यक्ष, सहानुभूतीनें एखाद्याच्या) दुःखांचा वांटेकरी झालेला; समदुःखी. दुःखें पापें-क्रिवि. अतिशय कष्ट व त्रास सोसून; मोठ्या प्रयासानें. सामाशब्द- ॰कारक-वि. ज्यापासून दुःख होतें असें; दुःखद, दुःखदायक. [दुःख + सं. कारक = करणारें] ॰दाटणी-स्त्री. १ एका मागून एक दुःखें कोस- ळणें; दुःखपरंपरा. २ दुःखाकुलता; दुःखाची वाढ, आधिक्य. [दुःख + दाटणें] ॰दायक-वि. (दुसर्यास) दुःख देण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा. [दुःख + सं. दायक = देणारें] ॰परि- णामी-पर्यवसायी-वि. ज्याचा शेवट दुःखकारक, शोककारक झाला आहे असें (नाटक, गोष्ट इ॰). (इं.) ट्रॅजिक्. याच्या उलट आनंदपर्यवसायी; (इं.) कॉमिक्. 'ही गोष्ट दुःखपरिणामी आहे.' -पाव्ह. प्रस्तावना पृ. १. [दुःख + परिणामी, पर्यवसायी = परिणत होणारें अंत पावणारें] ॰प्रद-वि. दुःखदायक. [दुःख + सं. प्र + दा = देण]
धाड
स्त्री. १ चाल; हल्ला; परचक्र; दरवडा; घाला; एकदम येणारा, पसरणारा, नाश करणारा, हल्ला, संकट (उदा॰ शत्रूचा हल्ला, चोरांचा दरोडा, टोळ, अग्नि यांपासून नाश). (क्रि॰ घालणें; मारणें; पडणें; बसणें). 'तुम्हावरी येत आहे धाडी । -नव २५.१०. 'अग्नीची धाड त्याचे घरावर पडून सर्वस्व जळलें.' 'या गांवावर नुकतीच टोळांची धाड आली होती.' २ परके लोक, पाहुणे, मुलें, भिकारी इ॰ चें टोळकें, जमाव. यांचें एकदम येणें. ३ रोग; आपत्ति; विकार. (क्रि॰ होणें; भरणें; पडणें). 'त्याला येथें येण्यास काय धाड भरली आहे?' ४ त्रासदायक, हट्टी मुलालाहि लावतात. [सं. धाटी; प्रा. धाडी] ॰पडणें-(उगीच अडचणी सांगणार्या बद्दल वापरतात). संकटांत असणें; आपत्ति ओढवणें. 'तुला काय धाड पडली आहे एवढें ओझें उचलावयास.' ॰बडवणें-धाड भरणें. 'काय धाड बडवली आहे त्याला?' -मोटे-अस्पृश्यडायरी पानें. ॰घोडा-पु. १ सुंदर व मोठा पाणीदार घोडा (गरीबास हा बक्षीस दिला असतां त्याच्यावर एक धाडच पडल्यासारखें होतें यावरून). २ आडदांड व लठ्ठंभारती पोरगा; ढमाली, रानवट स्त्री. म्ह॰ धाड पडावी पण चीत पडूं नये = आपणावर टोळधाड इ॰ घाले आले तरी हर- कत नाहीं पण चित्रा नक्षत्राचा पाऊस मात्र पडूं नये (कारण हा पाऊस नव्या पिकाला मारक आहे).
एकाचीएक
वि. एकमत; एकदिल (अनेक व्यक्तींच्या समुहा- बद्दल योजतात).
एकल
वि. १ एकला; एकटा. ‘एथ एकलेआ चालतां । भय नाहीं सर्वथा ।’ –ॠ ७. २ (बैदुलाचा खेळ) एक या अर्थानें. [सं.] ॰काजा, कांजा-खाजी-पु. एक (गोट्या-बैदुलाचा खेळ) एक गोटी दुसरीस मारतांना मोजण्याच्या कामीं एक या संख्ये- बद्दल योजतात. [एकल + खाजा?]
एकमसूदी
वि. थोर; अद्वितीय मुत्सद्दी; धोरणी; ज्या- बद्दल दुमत होणार नाहीं असा सर्वमान्य; अद्वितीय. ‘नानाफडनवीस एक मसूदी तर्क त्यानें काढिला.’ –ऐपो २७६. [एक + मुत्सद्दी, अप; एक + मसुदा]
ग्रह
पु. १ घेणें; स्वीकार; अंगीकार; धरणें. २ चंद्र किंवा सूर्य यांचें ग्रहण (राहूकेतुकडून). ३ सूर्याभोंवतीं फिरणारा गोल (पृथ्वी, बुध, शुक्र, गुरु मंगळ इ॰चा); ज्योतिःशास्त्राप्रमाणें हे (सूर्यासह) नऊ आहेत; (सामा.) केंद्रस्थ, ऊष्ण व देदीप्यमान पदार्थाभोंवतीं फिरणारा, कमी उष्णतेचा परप्रकाश गोल -सूर्य २२; (ग्रहाभोंवतीं फिरणारा तो उपग्रह) ग्रह हा तार्याप्रमाणें दिसतो. पृथ्वीच्या दैनंदिन गतीमुळें हा उगवतो व मावळतो आणि स्वतःच्या गतीनें तार्यांमधून पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो. परप्रकाश असल्यानें याचें तेज स्थिर असतें. -सृष्टि. ४ एक प्रकारचें पिशाच्च, गिरा. 'जैसा ग्रहातें पंचाक्षरी । अनुमानी कां ।' -ज्ञा २.८५ (यापासून ल.) व्याधि,उपाधि, पीडा इ॰; तापदायक माणूस; खनपटीस बसणारा, पाठीस लागणारा इ॰ बद्दल म्हणतात. ५ कल्पना; भावना; मत. ६ चिकाटी. ७ उमज; अधिगम (एखाद्याच्या अर्थाचा); बुद्धि; अर्थग्रहण; अर्थबोध; धारणा; समजूत. ८ मगर; एक मोठा मासा; ग्राह. 'गज सरो- वरीं ग्रहग्रस्त । स्त्रियांपुत्रीं सांडिला जीत ।' -एभा १२.८५. [सं.] सामाशब्द- ॰कुंडली-स्त्री. पंचांगांतील ग्रहांच्या दशा दाखवि- णारी आकृति. ॰गणित-न. ग्रहांच्या गतीविषयींचें गणित. ॰गति-स्त्री. (फल ज्योतिष किंवा ज्योतिःशास्त्र) १ ग्रहांची गति. २ दृष्टि ग्रहांचा विशिष्ट रिणाम. (मुख्यत्वें माणसाचें नशीब पाहतांना) 'गृहस्थ पडले ग्रहगतीत.' ॰चार-पु. सूर्य किंवा इतर ग्रह यांची गति, भ्रमण ॰जप-पु. ग्रह प्रसन्न होण्यासाठीं त्या त्या ग्रहाच्या विशिष्ट मंत्राचा करावयाचा जप. ॰दशा-स्त्री. मनुष्यादिकांस प्राप्त होणारी शुभाशुभ फलसूचक सूर्यादि ग्रहांची दशा, दृष्टि, अवस्था, काल. ॰दान-न. नवग्रहांना प्रसन्न करण्यासाठीं ब्राह्म- णाला द्यावयाचें दान. ॰पीठ-न. ग्रहमख करण्यासाठीं नवग्रह देवता मांडण्याचा पाट, चौरंग. ॰पीडा-बाधा-स्त्री. १ प्रति- कूल ग्रह किंवा ग्रहयोग यापासून उत्पन्न होणारें दुःख, दारिद्र्य, आजारीपण इ॰. २ भूतपिशाच्च बाधा. ॰बल-न. विवक्षित राशीस ग्रहांची अनुकूलता (विवाह, उपनयन, मंगल कृत्य कर- ण्याविषयीं). ॰मख-यज्ञ-पु. ग्रहांना अनुकूल करून घेण्या- साठीं, ग्रहांच्या प्रीत्यर्थ करावयाचा यज्ञ; ग्रहशांति; नवग्रहांना उद्देशून करावयाचा होम; हा होम विवाह, मुंज व इतर शांतीच्या प्रसंगीं करतात. ॰मंडळ-न. ग्रहगोल; सर्व ग्रहांचें चक्र. ॰मैत्री- स्त्री. वधूवरांच्या पत्रिकांचा मेळ. पत्रिका जुळणें, पटणें. राशींचें स्वामी सात असल्यानें, ज्या राशींत नवरी जन्मली आणि ज्या राशींत नवरा जन्मला, त्या दोन्हीं राशींचा स्वामी एक असणें किंवा एकमेकांस अनुकूल असणें. ॰योग-पु. शुभाशुभदायक ग्रहांचा योग, स्थिति. ॰वैर-न. १ ग्रहांचें शत्रुत्व. २ पत्रिका न जमणें. याच्या उलट ग्रहमैत्री. ॰शांति-स्त्री. ग्रहमख. ॰साधन-न. १ (कोष्टक गणित किंवा दुर्बिण इ॰ यंत्रें यांच्या साह्यानें) ग्रहदशेचा निश्चय; ग्रहाचें स्थळ व गति यांचें शोधन; ग्रहांचे वेध घेणें. २ ग्रहाची आराधना. ॰सारणी-स्त्री. अमुक ग्रह अमुक ठिकाणीं आहे याचा निश्चय करण्याचीं गणितें किंवा कोष्टकें; ग्रहसाधनाचें गणित. ग्रहानुकूल्य-न. ग्रहांची प्रसन्नता, ग्रहबल. ग्रहावेज्ञ-ग्रहपीडा. ग्रहेश-पु. सूर्य.
घडणी
स्त्री. एक हिशोबाचा कागद. प्रत्येक महाला- बद्दल अगर एकाकडे अनेक महाल असल्यास त्या सर्वांबद्दल त्याचे नांवचा एकच पण मोकळे वर्खाचा कागद तयार करीत. त्यांत सरंजाम बाब त्याप्रमाणें खर्च लिहून बाकी राहिलेला आकार जामदाराचे नांबें लिहीत असत. तसेंच सनदापत्रें, एक- साली वगैरे पट्टी याशिवाय देवस्थान बर्षासन व खैरात व रोजीनदार व धर्मादाय व इनाम व किरकोळ दफाते व जप्ती मोकळीक व निवाडपत्रें व वतनपत्रें उत्साह खर्च व श्रावणमास दक्षिणा व हरदास बिदागी वगैरे प्रत्येक कलमाबद्दल एकंदर आवर्जे सालवार निराळे तयार करीत असत. याप्रमाणें घडणी हा कागद खतावणी अन्वये मोकळे वर्खाचा हुजूर तयार होत असे. –भारतवर्ष, मराठयांचें दप्तर १२. [घडणें]
घी
(राजा. कु.) घे बद्दल वापरतात. 'माजे दोन सबाद ऐकोन घी' -मसाप २.३६७.
घोर
पु. १ वीणा इ॰ वाद्यांतील खर्ज स्वराची तार. (वाद्यांतील) खर्ज स्वर. २ झोपेंतलें घोरणें; मृत्युसमयीं होणारा घशांतील घरघर असा आवाज. 'हा वेदार्थसागरु । जया निद्रि- ताचा घोरु । तो स्वयें सर्वेंश्वरु । प्रत्यक्ष अनुवादला ।' -ज्ञा १. ७२. 'आपण गाढ झाले निद्रिस्त । चलनवलन सांडूनि स्थित । कंठीं घोर वाजवी ।' -नव १३.१६२. ३ काळजी; धासरा; मानसिक अस्वस्थता; खुणखूण; चिंता. (क्रि॰ करणें; लागणें). 'त्याचा नित्याचा घोर नाहींसा होऊन त्याची स्वभाववृत्ति प्रबळ झाली.' -नि ७०३. 'निरउपाय झाली गोष्ट कंबर बसली घोरानें ।' -ऐपो ४१२. ४ अन्य स्थळीं गेलेल्या माणसा- बद्दल घेतलेली खंत; घोकणी. (क्रि॰ घेणें; कर्माची षष्टी). 'पोरानें आईचा घोर घेतला.' ५ आक्रोश; आकांत; रडारड; कोलाहल. 'तो मरतांच पोराबाळांनीं एकच घोर केला.' ६ आरडाओरड; गलबला; गिल्ला; गलका; गोंगाट; कल्ला. 'हा काय मजुरदारांचा घोर पडला' ७ हल्ला. 'केला मखीं घोर निशाच- रांनीं ।' -आविश्वा २०. 'तेनी धरला सवता घोर' -ऐपो ३५२. ८ मरण्याच्या वेळची घरघर. ९ संकट. 'घोर हा नको । फार कष्टलों ।' 'मानअपमानाचे पडिले । भ्रांतीचे घोरीं ।' -दावि २६०. -वि. अघोर. १ भयंकर; भयप्रद; भयानक; विक्राळ (मुद्रा, आवाज, काम, घडणार्या गोष्टी) 'म्हणऊनि संशयाहूनि थोर । आणिक नाहीं पाप घोर ।' 'नव्हे सार संसार हा घोर आहे ।' -राम ६६. २ गाढ; घनघोर (निद्रा); 'त्यास घोर निद्रा लागली.' ३ निबिड; दाट; घनदाट; गाढ; भयाण (अंधार, अरण्य इ॰). 'मी राजाच्या सदनीं अथवा घोर रानीं शिरेन ।' -खरे, जन्मभूमि. ४ घनघोर; तुंबळ; हातघाईचें; निकराचें (युद्ध लढाई, इ॰). 'कलह उत्पादी अति- घोर ।' -एभा १.२०४. ५ अचाट; अवाढव्य; जगडव्याळ (इमारत). ६ अफाट (भरलेली नदी) [सं. घोर] घोरंदर, घोरांदर-वि. (काव्य.) भयंकर; घोर शब्दांतील विशेषणाचे सर्व अर्थ पहा. 'झोटी धरूनि पाडिती अपार । घोरांदर मांडिलें ।' -एरुस्व ८.४४. 'युद्ध मांडिलें घोरंदर ।' -मुआदि १३.३२. 'युद्ध जाहलें घोरांदर । सकळ राजे पराभविले ।।' -ह २६.५७. [सं. घोरतर] घोरवेळ-स्त्री. (ज्यो.) १ अशुभ, अनिष्ट, भयसूचक वेळ. २ (अनिष्टतेच्या ध्वनितार्थावरून) करकरीत तिन्ही सांजा, टळ- टळीत मध्यान्ह. घोरासुराचें आख्यान-न. (उप.) डाराडूर झोपं; घोर झोपं. 'घालून ठेवलेलें अंथरूण पायानंच उलगडून ही अश्शी घोरासुराच्या अख्यानाला सुरवात.' -फाटक नाट्यछटा २.
हाड
न. १ अस्थि; हाडूक. २ (ल.) मूळ जात; उत्पत्ति. 'त्या मनुष्याचें हाड खरें.' ३ अंगकाठी; शरीररचना; बांधा (जनावर, माणूस इ॰ चा). [सं. हड्ड; हिं. हड्डी] म्ह॰ १ हाड तितकें शेंपूट जाड तोंड जेवण वाढ. २ (गो.) हाडली पड खाल्ली पड-हातावरचें पोट हाडचा-वि. १ मूळचा; जातीचा; वर्णाचा. 'हा हाडाचा ब्राह्मण.' २ स्वभावाचा. 'हाडाचा गरीब आहे.' एका हाडाचा-हाडामासाचा-वि. एकाच जातीचा, कुळाचा. हाडाचा खंबीर-कणखक-कठीण-बळकट-खबरदार-वि. कणखर प्रकृतीचा-शरीराचा-बांध्याचा शरीरानें मजबूत. हाडाचा खरा-चांगला-भला-अस्सल; जातीवंत; टिकाऊ (मनुष्य, वस्तु). 'हा रुपया वरून वाईट दिसतो पण हाडाचा खरा आहे.' हाडांचा चुना-चुरा-चूर- हाडांचीं काडें-हाडांचें पाणी-हाडांचे मणी-हाडांच्या फुंकण्या-करणें-हाणें-शरीर झिजविणें; फार परिश्रम करणें. शरीर खराब होणें; रोडावणें; झिजणें. हाडांला-हाडीं खिळणें-१ सर्व अंगांत मुरणें, शिरणें; दृढमूल होणें (भावना, रोग, गुण, दुर्गुण). हाडाला-हाडीं लागणें-१ (जिव्हारीं लागणें; वर्मीं लागणें. २ त्रासदायकपणें चिकटणें. ३ (मूल, कर्ज, धंदा इ॰ बद्दल). फार काळजी लागणें; अभ्यास-चिंता-शोध इ॰चा विषय होणें. हाडांला-हाडीं-फासण्या घालणें- मारणें-जिव्हारी टोचून बोलणें; एखाद्यास लागेल असें बोलणें. हाडांवर-हाडीं घाव घालणें-१ वर्म मर्मच्छेंद करणें. २ कडक रीतीनें कठोरपणें वागविणें. हाडावर चोट असणें-(वना.) तोशीस लागणें. हाडांशीं लग्न लावणें-म्हातार्याशीं किंवा अत्यंत रोडक्या माणसाशीं मुलीचें लग्न लावणें. हाडीं विसा- वणें-हाडीं शिरणें व तेथें थांबणें (जबर शत्रूचें शत्रुत्व, स्वतःच्या दुष्कृत्याचा पश्चात्ताप, असाध्य रोग). हाडीं शुद्ध-जातीनें, मकानें शुद्ध, चांगला. हाडें उजविणें-भाजणें-शेकणें-कसें /?/ लग्न करणें; लग्न होणें. (अविवाहित, ब्रह्मचारी मृत झाला असतां /?/ प्रेताचा समावर्तन व विवाह संस्कार करून मग दहन करतात. हा /?/संस्कार कसा तरी उरकून घ्यावा लागतो. यावरून ल.) हाडं घुसळणें-१ अतिशय काम करणें. २ सतावणें; गांजणें; जर्जर करणें. हाडें निघणें-पडणें-हाडें दिसणें; फार अशक्त, रोड होणें. हाडें मोडणें-घुसळणें-खिळखिळीं करणें- अतिशय गांजणें; निष्ठुरपणानें छळणें; त्रास देणें. सामाशब्द- ॰कपाळ्या-वि (हाडाच्या कपाळाचा-कपाळावर नशीब लिहिलें असतें म्हणून) दुर्दैंवी; कमनशिबी; कपाळकरंटा. हाडकपाळी- वि. हेकड; शिरजोर; सैरट; बेपर्वा; उपदेश; ताकीद इ॰स न जुमा- नणारा. हाडकी-स्त्री. १ लहान हाड. २ मेलेल्या जनावरांचीं हाडें इ॰ ठेवण्यासाठीं महारांना दिलेली जमी. हडकी पहा. हाडकुरकुटी-स्त्री. हाडीज्वर. हाडकुळा-ळी-ळें-वि. हाडें निघालेला; अशक्त; रोड. हाडकेंकाडकें-नअव. १ शेतीचीं जना- वरें व आउतें. २ झिजलेलें व हाडहाड उरलेलें शरीर (क्रि॰ होणें; रहाणें; उरणें). हाडखाईर-न. हाडवैर. 'म्हणोनि समर्थेंसीं वैरा । जया पडिलें हाडखाईरा ।' -ज्ञा १३.५५०. हाडखाऊ-वि. (तिरस्कारार्थीं) मांसभक्षक (शूद्र-यवनादिक जाती) हाडगळ- वि. रोडका; हाडें वर निघालेला; कृश. [हाड + गळणें] हाडगात- न. शरीरयष्टि, बांधा. 'हा पोटानें दुबळा झाला आहे पण हाड- गात मोठें आहे.' [हाड + गात्र] हाडजर, हाडीं ज्वर-पु. हाडांत मुरलेला ताप. हाडति-हडौति-स्त्री. गळ्याखालच्या अर्धचंद्राकार हाडावरील खळगा. 'मुख मळिण वदन उभा हाड- तिथे घोणे ।' -तुगा १२२. हाडपरब-पु. (व.) पितृपक्ष. हाडपेर-न. अंगकाठी. हाडगात पहा. हाडबोड-पु. (गो.) मासळीचा डोकें इ॰ भाग. हाडभाऊपणा-पु. भाऊबंदकी. 'वडीलकीचे अथवा हाडभाऊपणा सिद्ध करणारे महजर सांपडतात.' -अडिवर्याची महालक्ष्मी ६. हाडमोडी-स्त्री. एक बांडगुळा- सारखी वेल. हिला पानें नसून शेराप्रमाणें कांड्या असतात. हाडवळा-पु. हाडोळा पहा. हाडवैर-न. अत्यंत तीव्र व फार जुनें वैर. हाडशिंगारी-सांधण-स्त्री. एक वेल. हाडसंद- संधी-स्त्री. (बे.) हाडशिंगरी पहा. त्रिधारी कांडवेल. ही ठेचून ३ दिवस मोडलेल्या हाडावर बांधल्यास तें बरें होतें. हाडहाड- हाडोहाड-क्रिवि. प्रत्येक हाडांत. हाडळ-वि. हाडकुळा पहा. हाडांचा पंजर-सांपळा-पु. हाडांचा सांगाडा हाडी जखम- स्त्री जबर दुखापत हाडींज्वर-ताप-पु. हाडज्वर पहा. हाडूक- न. लहान हाड. (गळ्याशीं-दाराशीं) हाडूक बांधणें-१ एखादी बाई ठेवून घेणें, रखेली राखणें. २ त्रासदायक काम अंगा- वर ओढून घेणें. हाडूक दाराशीं-दाराला-रोवणें-लावणें, पुरणें-जातीबहिष्कृत करणें. हाडेंकाडें-नअव. हाडांचा सांपळा; कृश शरीर. (क्रि॰ होणें; रहाणें; उरणें -शरिराचें). हाडोहाड- क्रिवि. हाडहाड पहा. हाडोळा-ळी-पुस्त्री. १ महाराला दिलेली जमीन. हडोळी पहा. २ असल्या जमीनीचें उत्पन्न. हाड्या-पु. १ (खा. व.) कावळा. 'जाय उडून रे हाड्या । नको करूं काव काव ।' -कोलते २ (खा.) गाडी जमीनीवर टेकण्याचें जुंवाखालील लांकूड, खुंटा. -वि. १ हाडकुळा. २ फार हट्टी; हेकड. हाडा रजपूत-पु. फार हेंकट माणूस. (रजपु- तांच्या स्वभावावरून पुढील म्हण आहेच). 'कुवा (विहिर) टळे पण रजपूत ना टळे.' हाड्यावर्ण-व्रण-पु. हड्यावर्ण पहा. हाडांत खोल गेलेला व्रण.
हाय
उद्गा. १ सुखानुभवाचा उद्गार (दुःखाचा प्रतिकार होऊं लागला म्हणजे तोंडांतून निघणारा. २ शरीर, मन यास दुस्सह वेदना झाली असतां निघणारा सुस्कारा, दुःखोद्गार; हां, चूं, कुं कटकटा, इ॰. -स्त्री. (बालभाषा) तिखट, विस्तव, दिवा, तीक्ष्ण शस्त्र, क्षत इ॰. [ध्व.] ॰खाणें-घेणें-१ जिवास लावून घेणें; धास्ती घेणें; घाबरून जाणें. २ (तापाची, खाण्याची) भीति वाटणें, धडकी घेणें. ॰पतकरणें-मोकलणें-पश्चात्ताप करणें; चुकी- बद्दल दुःखोद्गार काढणें. ॰सोडणें-देणें-घालणें-उसासा टाकणें. ॰घालणें-ध्यास घेणें; धोसरा काढणें. हायास येणें- आणणें-जीव मठ्ठ्यास येणें; थकणें; भागणें; अशक्त करणें, दुर्द- शेप्रत आणणें. ॰दोस्त दोस-दुल्ला-धुल्ला, हायदोस- उद्गा. [मुसलमान लोक ताबुताचे पुढें हसन व हुसेन हे त्यांच्या लग्नानंतर लवकरच लढाईंत मरण पावलें, म्हणून हाय ! मित्रा ! नवरदेवा ! असा दुःखोद्गार काढून नाचतात त्यावरून] नाचणें, ओर- डणें; दंगल; धुमाकूळ. (क्रि॰ घालणें; माजणें; उठणें; मांडणें; करणें) [हिं. हाय ! दोस्त ! दुल्हा = नवरा] ॰सा-वि. क्रिवि. हाय ! असा; समाधानाचा, आनंदाचा उद्गार उच्चारावयाच्या स्थितींत अस- लेला; दुःखकारक स्थितींतून सुटका झाल्यामुळें सुखी झालेला. (क्रि॰ होणें). 'त्या दाटीमध्यें माझा जीव अगदीं कासावीस झाला होता, मी अंमळ बाहेर येतांच हायसा झालों.' हायसें वाटणें-आनंद, स्वस्थता वाटणें (दुःखप्रतिकारानंतर). हाय- हूय-दुःखोद्गार. -स्त्री. करुणोद्गार; वेदनांमुळें विवळणी. हाया, हायाहूया-हाय पहा.
होट, होंट
पु. ओठ; ओष्ठ. [सं. ओष्ठ; प्रा. होठ्ठ; हिं. होठ] म्ह॰ १ होटांत एक पोटांत एक = आंत एक बाहेर एक. २ होटाबाहेर तें कोटाबाहेर = षट्कर्णी होणें. ३ होटास जाळ पोटाळ काळ-खादाड आणि तोंडाळ (नोकर, आश्रित इ॰ बद्दल म्हणतात). होटांवर दूध दिसणें-अजून बाल्यदशा असणें. होटाचें वाळणें, जिरणें-बाल्यावस्था ओलांडणें. होटतुट्या-वि. तुटलेल्या ओंठाचा. होटाळ-वि. जाड ओंठाचा; बाबर होट्या. होंटाळी-स्त्री. खरारा करतांना चावूं नये म्हणून घोड्याच्या खालच्या ओंठास बांधलेली दोरी. 'आपल्यास काय परंतु होटाळीवांचून तट्टू न जाय.'
हुरहुर
स्त्री. १ चिंता; चुटपुट; फार काळजी. २ दुःख; शोक (चुकी, आपत्ति, नाश इ॰ बद्दल). ३ पश्चात्ताप; दिल- गिरी; अस्वस्थता. (क्रि॰ वाटणें; लागणें). [हुर] हुरहुरणें- अक्रि. १ दुःख; शोक, वाईट वाटणें; काळजी, अस्वस्थता वाटणें; खेद करणें. २ आसुसणें; तळमळणें.
ईड
अ. (तंजा.) बरोबर; समान; बद्दल; ऐवजीं. 'वरकडास अर्धा मुलुकाचा महसूल ईड करून दिले' -मऐशि १०२.४. [ता. ईडु]
ईड
अ. बरोबर; समान; बद्दल; ऐवजी : ‘वरकडास अर्धा मुलुकाचा महसूल ईड करून दिले.’ − मऐशि १०२·४ [तंजा] [त. ईडु]
इमान
न. १ वचन; एकनिष्ठा; सचोटी; 'नबाबांनीं आपला इमान राखिला.' -पदबा १.८९. २ श्रद्धा; विश्वास. 'त्या पंज्या पासी तुमचा इमान असावा.' -मदरु १.११३. [अर. ईमान् = श्रद्धा] ३ इमानपत्र; इमानाची खूण; शपथपत्र. 'इमान पाठविलें' -९६ कलमी ७. ४ सदसद्विवेकबुद्धि; मनोदेवता; अंतर्याम. ॰इत- बार- पु. एकनिष्ठा; सचोटी; प्रमाणिकपणा. ॰करणें-देणें-वचन देणें; शपथ देणें; शपथेवर सांगणें. 'द्यावी शेजेची बाईल पण इमान देऊं नये.' -इपुस्त्रीपो ४२. ॰क्रिया-स्त्री. इमान राखण्या- बद्दल शपथ घेणें. ॰गुंतणें-शपथेंत अडकणें; शपथ घेऊन चुकणें. इमानास जागणें, इमान धरणें-इमान नष्ट न होऊं देणें; इमान जागृत ठेवणें; सचोटी न सोडणें; पूर्वींचे उपकार स्मरणें. ॰प्रमाण-न. १ प्रामाणिकपणा; विश्वासूपणा; सचोटी.२ करार- मदार; आणभाक; शपथक्रिया. ॰भाक-न. आणभाक; करार; अहदपैमान. -रा १५.२७३.
जागा, जागी, जागे
क्रिवि. ठिकाणी; ऐवजी; बद्दल.
जेवणी
स्त्री. १ धान्य मळणारे मजुर, नोकर यांच्या मजुरी- बद्दल दिलेलें धान्य; शिधा. 'गावात कार्ये प्रयोजन जाहाल्यास नारळ पानविडा जेवणी घ्यावी' -मसाप २.१७११. २ तोंड; मुख; जिवणी. 'जेवणी लहान.' -मराठी ६ वें, पुस्तक पृ. ३०४. (आवृ २) जिवणी पहा. [जेवणें]
जतीमती, जथामथी
स्त्री. १ एकजूट, एकविचार संयोग; एकमत. २ (कायदा) एकाची पूर्णपणें किंवा पुष्कळांची पृथकपणें किंवा सर्वांबद्दल एकाची, किंवा प्रत्येकाची स्वतःबदल आणि सर्वां- बद्दल जबाबदारी; एक जती एक मती पहा.' [सं. युति + मति; जथणें + मथणें]
कागाळी
स्त्री. १ गार्हाणें; तक्रार; ओरड (एखाद्या- बद्दल). २ विरुद्ध सांगणें, कळविणें; चुगली करणें; चहाडी. (क्रि॰ करणें) [काग + आळी?]
कैवाड
नपु. (काव्य) एका पक्षाचें समर्थन, कैवार, अभि- मान. कैवार बद्दल चुकीनें. 'एकाच्या कैवाडें । उगवे बहुतांचें कोडें ।' -तुगा २७४. 'श्रीरामाचेनि कैवाडें । काळिकाळ पळतो पुढें ।' -भारा किष्किंधा १६.३०. [कैवार] कैवाडी-वि. कैवारी.
कांगाव-वा, कांगावखोर
कांघाव-कांघावखोर पहा ' तिनें जो एक रट्टा सुंदरीचे पाठींत दिला त्यानें ती पोर कळव ळली, पण तें लक्षांत न घेतां ती आपल्या डोक्याला लागल्या- बद्दल कांगावा करू लागली. ' -पकोघे.
कोशरा, कोशरे, कोशेरे
न. जाडेभरडे रेशीम. ‘बंदुखानचे बंदा बद्दल कोशरे सुमारे ५००० हजार पाठविणे.’ - पेद ४५·१००. [सं. कोश]
करार
पु. १ ठराव; वचन; बोली; कबुली. 'मन्स्बा करार केला.' -सभासद ३०. 'जमीनच देवास करार करून दिल्ही पाहिजे.' -मसाप २.३९५. २ निश्चय; शाश्वति; ठाम मत. 'तुका म्हणे एका क्षणाचा करार । पाईप अपार सुख भोगी ।' -तुगा ३७३. 'राजश्री नारायणराव घोरपडे यांस पाठवणार म्हणतात, करा- रांत नाहीं.' -ख ११.५६६६. ३ (कायदा) कायद्यानें अंमल- बजावणी करतां येईल अशी कबुलायत. (इं.) काँट्रॅक्ट; 'दोन इसमांमध्यें एकमेकांस वचनें देऊन जेव्हां एखादी गोष्ट ठरते तेव्हां अशा वचनाला संगनमत म्हणतात. व तें संगनमत कायद्यानें अमलांत आणतां येण्यासारखें असेल तर त्यास करार म्हणतात.' -घका ९२. -वि मुक्रर; कायम; निश्चित. [अर. करार्] ॰दाद- पु. ठराव; लेखी वचन; करारमदार. [फा. करार्दाद] ॰नामा- पु. ठरावपत्र; कराराचा कागद; करारलेख. [फा. करार + नामह्] ॰मदार-पु. १ वचन; बोली; कागद लिहून देणें; अनुमति वगैरे- बद्दल व्यापक संज्ञा. [अर. करार + मदार] २ (मदारवर जोर देऊन योजितात) खात्रीचें अभिवचन; आणभाक; बेलभंडारा. ॰वाकई-वाके, वाकै-घडल्याप्रमाणें; बरोबर; अचुकपणें. 'करारवाकई हकीकत.' -रा १८.५१. 'त्यासी माली-मामलतीचा इतका करारवाकै देऊं.' -रा ६.६१२. [फा. करारवाकिई]
करून
शअ. १ कडून; करवीं; मुळें; योगानें (साधन, कारणी भूत, मार्गदर्शक या अर्थीं). 'क्षेमें यावा द्वारकानाथ । याचस्वार्थें करुनियां ।' -ह २५.६०. २ होऊन (स्वतःच्या मर्जींनें, विचा- रानें) बद्दल योजतात. परंतु हा तितका शुद्ध नाहीं. होऊन पहा.
करून शअ.
१. कडून; करवी; मुळे; योगाने (साधन, मार्गदर्शक, कारणीभूत या अर्थी) : ‘क्षेमें यावा द्वारकानाथ । याच स्वार्थे करुनियां ।’ − ह २५·६०. २. होऊन (स्वतःच्या मर्जीने, विचाराने) बद्दल योजतात. परंतु हा तितका शुद्ध नाही. पहा : होऊन करूब
खकाण, खकाणा-ना
नपुस्त्री. १ केर; (पुस्तकांवर- लांकडी सामानावर सांचलेली) धूळ. (क्रि॰ बसणे; येणें; उडणें; उधळणें). २ (तंबाखूची, तपकिरीची, मिरच्यांची) पूड (नाकांत, तोंडांत गेल्यानें त्रास देणारी); (क्रि॰ उधळणें). ३ (खा. माण.) गाळसाळ; केरकचरा; धुरळा (माप करतांना मालांतील धुरळा वजा करतात त्या बद्दल हा शब्द वापरतात). [अर. खाक = धूळ]
खळखळीत
वि. १ खळखळणारा; आवाजदार; खळखळ आवाज काढणारा. २ फडफडीत; कोरडा; ज्यांतील शीतनशीत मोकळें झालें असा (भात); वाळलेली (द्विदल धान्याची शेंग). ३ स्वच्छ; साफ; मळ किंवा घाणीपासून मुक्त (चांगलें धुतलेलें कापड, भांडें, समुद्राच्या पाण्यानें धुतलेला खडक, यांच्या बद्दल योजतात). ४ डुळडुळीत; गळगळीत (कालवण, ताक). [खळखळ]
खंड
पु. १ दंड; चढाई करून आलेल्या शत्रूनें गांवांवर बसविलेली पट्टी; खंडणी. 'खंड काय मला मागतो ।' -ऐपो १४. -पया १२८. २ लढाईंत कैद्र केलेल्या शिपायांबद्दल त्यांच्या सुटकेसाठीं द्यावयाचा पैसा. ३ कामाचा ठराव (ठरवलेली रक्कम); मक्ता; करारानें ठरलेली रक्कम; अमुक कार्यास अमुक द्रव्यादिक असा ठराव. ४ धाण्यारुपानें अगर पैशाच्या रूपानें मालकी हक्का- बद्दल घेतलेला कर, फाळा, सारा. (सरकारीं खोती). 'आमचे जमिनीचा खंड १७५ रु. आहे.' ५ ठराव; निवाडा. 'तुका म्हणे केला । खंड दोघांचा विठ्ठला ।' -तुगा १४२८. [का. कंडणें (कडु धातू पासून) = तह; निकाल; ठराव; कौल] सामाशब्द- ॰कमाविशी-वीस-स्त्री. गांवच्या इनामदाराला दंड करण्याचा व तो वसूल करण्याचा मिळालेला अधिकार. ॰करी-पु. कूळ; खंडानें शेत करणार. ॰काम-न. अमुक द्रव्य व अमुक काम अशा रीतीनें ठरवून घेतलेलें काम; कंत्राटानें घेतलेलें काम; नेमून घेतलेलें काम. ॰खुरई-खंडगुन्हेगारी पहा. ॰खोती-स्त्री. इजारा. ॰गुन्हेगारी-स्त्री. (गुन्हेगारापांसून घेतलेली-ला) दंड; जप्ती; धरपकड वगैरेला सामान्य संज्ञा. 'या राज्यांत उगाच खंडगुन्हेगार्या भराव्या लागतात.' [खंड + फा. गुन्हागारी] ॰चिठ्ठी-स्त्री मक्तेपत्र; भाडे चिठ्ठी. ॰दालदी-स्त्री. साष्टींत पाण्यांत कोवळ्यानें काठ्या रोवण्याच्या हक्कासाठीं दिलेला पैसा. [दालदी = कोळी.] ॰दारू-स्त्री. दारू विकण्याचा मक्ता. ॰फडशी-स्त्री. सरकारच्या वतीनें वसूल केलेला दंड. ॰फुरोई-खंड गुन्हेगारी पहा. ॰बकरी-रें-स्त्रीन. घाटावर चरणीस-विक्रीस आलेल्या शेळ्या मेंढयांच्या कळपांतील एक शेळी-मेंढी सरकारी कर म्हणून घेणें; कळपावरील जकात. ॰भट्टी-स्त्री. भट्टीवरील कर. ॰मक्ता-पु. कंत्राट; हक्क; इजारा; मक्त्यानें दिलेली जमीन. खंड-मक्ता-करार यास व्यापक संज्ञा. ॰शिंदी-स्त्री. ज्यापासून ताडी काढतात त्या ताडीच्या झाडांवरील कर.
लोभ
पु. १ एखाद्या पदार्थाच्या प्राप्तीची उत्कट इच्छा. २ हातचें जाऊं नवे अशी इच्छा. ३ हांव; आधाशीपणा. 'द्रव्याचिया लोभधंदा । करूं नये तो करि धंदा ।' -ज्ञानप्रदीप १३५. ४ चिक्कूपणा. ५ कृपादृष्टि; ममता; मेहेरबानी; प्रीति; प्रेम. 'सदूवर गुरुजींचा फार लोभ होता.' लोभडचें-क्रि. (गो.) लोभ, प्रेम करणें. लोभणें-अक्रि. (काव्य) लोभ करणें, सुटणें; लुब्ध होणें; एखाद्या वस्तूच्या प्राप्तीची इच्छा होणें. लोभणें, लोभवणें, लोभावणें-अक्रि. १ (मनुष्य, पदार्थ इ॰ बद्दल) प्रेम असणें; प्रीति करणें; प्रेमानें खेंचला-ओढला जाणें; 'भू क्लीबा पतिला कधींहि लोभेना ।' -मोशांति ३.६८. २ उत्कट आकांक्षा असणें; एखाद्या वस्तूचें आकृष्ट होणें; प्राप्तीची इच्छा होणें. लोभनीय-वि. लोभ करण्यासारखा; स्पृहणीय; आकर्षक. लोभापर-वि. लोभयुक्त; कृपाळू; ममताळू. 'म्हणोनि त्याज्य जें नोहे । तेथ त्यामागानें न सुवावें । त्याज्यालागीं नोहावें । लोभापरी ।' -ज्ञा १८.१३३. [सं. लोभपर] लोभाविष्ट, लोभाळू, लोभिष्ट, लोभी-वि. १ हावरा; अधाशी; फार लोभ असलेला; एखादी वस्तु मिळण्याबद्दल किंवा आपण- जवळील न जाऊं देण्याबद्दल फाजील इच्छा करणारा. २ चिक्कू; कृपण; कंजूष; पैसा खर्च न करणारा; कवडीचुंबक.
मोबदला, मोबादला, मुबादला
पु. १ एक वस्तु देऊन तीबद्दल दुसरी वस्तु घ्यावी अशा तऱ्हेचा जो व्यापार तो; अदलाबदल. 'त्या आकाराबर्हुकूम दरोबस्त अम्मल-मोबदला घ्यावा' -मराचिथोशा ५३. २ हिशोबांतील एका सदरांतून किंवा खात्यांतून दुसऱ्या सदरांत किंवा खात्यांत घालणें. ३ वसूल. -क्रिवि. एखाद्याच्या ऐवजीं किंवा बद्दल. [अर. मुबादला]
मफसूद
पु. मकसूद बद्दल चुकीचें वाचन; हेतु; हकी- कत; अभिप्राय 'तूं जरूर गळा पडतोस तरी तुझा काय मफ- सूद तो सांगणें.' -रा १५.१०. [अर. मकसूद पहा]
मरात(ती)ब
पुस्त्री. १ (विद्या, पराक्रम इ॰ बद्दल) पदवी; सन्मानार्थ योजावयाचा शब्द. जसें-भट्टाचार्य; समशेरबहाद्दर. 'राजे असा मरातीब मेळविला.' -रा ४.२३. २ दर्जा; बहुमान. 'त्यांचा मरातब दादासाहेबांनीं वाढविला.' -रा १९.९१. ३ -अव. गोष्टी; मजकूर. 'लिहावयाचे मरातब बोलण्यांत येतील त्या प्रमाणें तुम्ही लिहावें.' -रा ५.१५६. [अर. मरातिब्-मर्तबाचें अव.]
मुशारा, मुशाहिरा
पु. १ मासिक वेतन; पगार; २ मजुरी; रोजमुरा ३ वर्षासन. 'हा गांव बद्दल मुशाहिरा, एकूण दोन्ही गांव तुम्हांकडे आहेत.' -वाडसमा ४८. [अर. मुशाहरा] म्ह॰-मुख पाहून मुशारा आणि घोडा पाहून खरारा. मुशार- खोर-पु. नोकर; चाकर; पगार देऊन टेवलेला मनुष्य. मुशारपण-न. मजुरी.
नाना
पु. नाहीं, नाहीं; नकरार्थक शब्द; निषेध. नाकबूली, नाकारणें, परवानगी न देणें इ॰ बद्दल शब्दप्रयोग. (क्रि॰ करणें). [सं. न, न]
नाट
पु. न. १ अडथळा, अपशकुन करणें; हटक; प्रतिकूलता; नड; अडचण. 'आजचा दिवस नाट लागला.' 'मुळींच भेटलासी आतां । नाट लागलें संचिता ।' -तुगा १२८. २ दुर्दैव; अभाग्य; अननुकूलता; एखादी बिघडविणारी, नासणारी, अपकारक, अड- थळा आणणारी, इजा इ॰ करणारी अशी योजना, शक्ति. 'आज काम व्हावयाचें परंतु आज काय नाट लागलें तें समजेना.' -वि. अमंगल; अशुभ; अननुकूल; आडफाट्या; नुकसानकारक (वेळ, मुद्दा इ॰). [सं. नष्ट; प्रा. णट्ठ] ॰भाजणें-जाळणें-अमंगलता, अननुकूलता काढून टाकणें, तिचा नाश करणें. म्हणजेच बोहणी करणें; एखादी गोष्ट हिंमत बांधून छातीनें करणें. ॰बाट-पु. १ कमनशिबाची गोष्ट, अपराध, दोष, काळिमा, डाग, उणीव इ॰ बद्दल व्यापक शब्द. (क्रि॰ असणें; पडणें; भाजणें; जाळणें). २ आढळून आलेला दोष, अपराध; लावलेला बोल, डाग किंवा कळिमा; कलंक. (क्रि॰ आणणें; ठेवणें; येणें; पडणें). [नाट + बाट] नाटलाबाटला-वि. बाट लागलेला; बहिष्कृत; कलंकित. 'पंचां- पुढें येणार्या बखेड्यांत नाटल्याबाटल्यांच्या खटल्यांची संख्या जास्त याचें कारण जातिभेद.' -गांगा ३२.
निपत(ता)ळा
वि. १ अपमान पावलेला; फजीत झालेला. २ दुसर्यापासून पैसा घेतल्यामुळें ओशाळा झालेला. ३ लिप्ताळा- बद्दल चुकीनें उपयोग; गुन्ह्यांत सांपडलेला.
निसबत
स्त्री. १ दिम्मत; हवाला; सत्ता; हुकुमत; देखरेख (मनुष्य, वस्तु, काम इ॰ वर). 'आमचा घोडा त्याचे निसबतीस आहे.' २ संबंध; नातें. -क्रिवि. संबंधानें; संबंधीं; तर्फेंचा; बद्दल. 'गांव-सरकार-देऊळ-निसबत.' 'भिल्लांचें पारिपत्य करावयाची आज्ञा सरसुभा प्रांत खानदेश निसबत नारो कृष्ण यास केली आहे.' -वाडसमा २.१५३. [अर. निस्बत्] निसबतीचा-वि. १ मालकीचा; नात्याचा. २ संबंधाचा; संबंध असलेला. 'त्याचे निसबतीचा जाब करून देऊं हें लिहून दिल्हें सही.' -वाडबाबा २.३९. ॰दार-वि. दिमतदार; ताबा, कबजा, हुकुमत, व्यवस्था ज्याच्या हातीं आहे असा; अधिकारी; कारभारी (मनुष्य). ॰वार- वि. १ मालकीचा; संबंधीं. २ ताब्यांत, कबज्यांत असलेला. -क्रिवि. ज्यांच्या निसबतींत माणसें, वस्तू इ॰ दिलेल्या आहेत अंशाच्या नांवांच्या अनुक्रमानें, यादीप्रमाणें (यादी इ॰). निसबद-स्त्री. दिम्मत; ताबा. निसबत पहा. 'निसबदींत त्याच्या राहसी सदा ।' -दावि ४५६.
नक्र
पु. १ मगर; सुसर.' संकल्पविकल्पांचे मीन । निंदेच्या सुसरी दारुण । ब्रह्मद्वेषाचे नक्र पूर्ण । सागरीं जाण तळपती ।' -एभा २.९९. 'परि पृथ्वी सोडीना जाणों व्रत घेतलेंचि नक्राचें ।' -मोकर्ण ४८.५६. २ घोरपड. -शास्त्रीको. [सं.] ॰नक्राश्रू- पुअव. १ मगराचे अश्रू; मगर आपल्या भक्ष्यास खातांना त्याच्या- बद्दल दुःखानें अश्रु गाळतो असें म्हणतात. त्यावरून. (ल.) खोटे अश्रु गाळणें; वरपांगीं दुःख प्रदर्शित करणें. (क्रि॰ ढाळणें; गाळणें). जुन्या कारागिरांच्या स्थितीबद्दल नक्राश्रु ढाळण्याचा धंदा सोडून देऊन... यांत्रिक कारखानें घालण्याकडे आम्ही लक्ष देत गेलों तरच आमच्या व्यापाराचें पुनरुज्जीवन होणार आहे.' -आगर ३.९९. [नक्र + अश्रु; इं. क्रॉकोडाइल् टियर्स यावरून]
पालटणें
उक्रि. १ दुसऱ्या बाजूस वळविणें; वळणें; फिरणें. २ बदलणें; एक टाकून त्याच्या जागीं दुसरें घेणें, स्वीकारणें; (मार्ग, रीत यांत) फरक करणें; बदलणें (पहारा इ॰). ३ (ल.) बदलणें; फरक करणें; वेगळें भिन्न करणें; फिरणें. 'ऐसा ज्ञानाचिये निजगती । पालटु पडे गा सुमती । डोळ्यांची शोभा रातीं । पालटे जैसी ।' -ज्ञा १८.४९५. 'शतखंड माझी होईल रसना । जरी या वचना पालटेन ।' -तुगा ७५९. ४ (दुखणें) उलटणें; परत येणें. [सं. प्रवर्तन; परिवर्तन; प्रा. पल्लट; गुज. पालटवुं] पालटींव-वि. पालट केलेलें; वळविलेलें; बदललेलें; अदलाबदल केलेलें; फरक केलेलें. [पालटणें] पालटें-क्रिवि. बद्दल; ऐवजीं. 'ज्यांचिया आवडीच्या लोभा । भगवंतू पालटें आला गर्भा । दशा- वतारांची शोभा । जाहली पद्मनाभा ज्यांचेनी ।' -एभा २.२३४.
पणजा
पु. आज्याचा बाप; बापाचा, आईचा आजा. [? पर बद्दल पण + आजा]
परभू
पु, एक बाह्मणेतर हिंदु जात व तींतील व्यक्ति; प्रभु. हे आपणांस चांद्रसेनीय कायस्थ क्षत्रिय म्हणवितात. दुसरा पाठारे म्हणून एक भेद आहे. परभू हा जुना शब्द असून अलीकडे त्या- बद्दल प्रभु असा शब्द रूढ झाला आहे. [सं. प्रभु]
परिचय
पु. १ ओळख; सहवास; घसट; संबंध; माहिती (मनुष्य; धंदा, विषय, ज्ञानक्षेत्र इ॰ विषयीं). २ (प्रत्यय या- बद्दल चुकीनें) अनुभव; अनुभविक ज्ञान; प्रतीति. (क्रि॰ घेणें; पाहणें; येणें; उतरणें). [सं. परि + ची] परिचायक-वि. (व्या.) निर्देश करणारा; दाखविणारा; व्याख्या, विवरण करणारा; परि- चय करून देणारा. [सं.]
परमार्थ
पु. १ ईश्वरसाधनरूप पुरूषार्थ; मोक्ष; सद्गति. २ ब्रह्मज्ञान. 'ऐसी जगीं सुरस कथा । जे जन्मभूमि परमार्था । मुनि सांगे नृपनाथा । जन्मेजया ।' -ज्ञा १.४८. ३ केवल सत्य; सत्यांश. याच्या उलट माया, असत्य. 'कवि वर्णनप्रसंगीं मुखा- पेक्षां चंद्रास केवल तुच्छ करतात परंतु परमार्थ पाहतां मुख तें मुख व चंद्र तो चंद्र.' -क्रिवि. सद्धेतूसाठीं; धर्मार्थ. जसें:-परमार्थ-इनाम- गांव-औषध. म्ह॰ प्रपंचाला धन परमार्थाला वैराग्य. पर- मार्थतः-क्रिवि. सत्यतः; खऱ्या दृष्टीनें; प्रामाणिकपणें (भाषण, वर्तन). ॰दृष्टी-स्त्री-. परमार्थाची आसक्ति इच्छा. -वि. पर- मार्थाची बुद्धि असलेला. ॰प्राप्ति-स्त्री. ब्रह्मप्राप्ति; मोक्ष. ॰बुद्धि- स्त्री. १ कपटादि रहित भावार्थरूप बुद्धि; (व्यापक) सत्य, पावित्र्य, अकृत्रिमता, अहेतुकात इ॰ बद्दल योजतात. २ दैवी प्रेम; शुद्ध, पवित्र भक्ति; आत्म्याचा परमार्थाकडे ओढा. ॰भिक्षा-स्त्री. धर्माकरितां, धार्मिक विचारानें मागितलेली भिक्षा. ॰साधन-न. १ परमार्थ मिळविणें, प्राप्त करून घेणें. २ परमार्थ मिळविण्याचा उपाय; साधन. परमार्थी-वि. १ प्रपंचापेक्षां ईश्वरसाधनरूप मार्गाकडे जास्त लक्ष लावणारा; ब्रह्मप्राप्तीसाठीं झटणारा. २ भावार्थी; कळकळीचा; प्रामाणिक; निष्कपट.
प्रस्ताविणें
अक्रि. पश्चात्ताप होणें (एखाद्या वाईट कृत्या- बद्दल) अत्यंत खेद होणें; पस्तावणें. [पस्तावा]
पुतळी
स्त्री. १ दगड, लांकूड, धातु इ॰ ची स्त्रीच्या आका- राची प्रतिमा, मूर्ति वगैरे. 'नातरी घृताची पुतळी ।' -विउ ५.७०. २ सुमारें चार रुपयें किंमतीचें एक सोन्याचें नाणें. (या नाण्यांची माळ करतात). दागिन्यांत घालतात तो सोन्या-चांदीचा वाटोळा व चपटा तुकडा. 'तूं मज पुतळीचा ठसा आवडसी कसा । मी कलेवर तूं आत्मराज माझा राजसा ।' -होला ११५. ३ तलवारीचें टोंक. ४ घोड्याच्या तळव्यावरचा नाजूक व मऊ शिंगासारखा उंचवटा. ५ दसऱ्याच्या दिवशीं आपटयाच्या पाना- बद्दल म्हणतात. ६ डोळ्यांतील बाहुली. ७ एक माशाचें नांव. ८ सुंदर स्त्री. ९ (विणकाम बे.) कांठातल्या नक्षीचा एक प्रकार. दुहेरी धाग्याचा एकद्वितीयांश इंच आकाराचा चौकडा (चौकडा सिंगल धाग्याचा असतो ). [सं. पुत्तली]
पूर्वपक्ष
पु.(मूळ शको पहा.)पूर्वग्रह; एखाद्या गोष्टी- बद्दल प्रथमदर्शनी झालेलें मत. [सं.]
फौज
स्त्री. सैन्य; पलटण; सैन्याची तुकडी. 'समुद्रतीरा वानरफौज । आजी पातली पाहिजे ।' -मुवन १५.१६२. [अर. फौज्] ॰दार-पु. १ चोरी, शिंदळकी, मारामारी इ॰ गुन्ह्यांची चौकशी करण्याकरतां ठेवलेला संरकारी अधिकारी; पोलिसअधि- कारी. कोंकणांत पोलीसपाटलाला म्हणतात. २ सैन्यावर हुकूम चालविणारा किंवा ज्याच्याजवळ सैन्य आहे असा मनुष्य. ३ महात; महातावरील मुख्य. [फा. फौज्दार] ॰दारी-स्त्री. १ फौजदाराचा अधिकार. २ गुन्ह्याबद्दल खटला. -वि. गैरमुल्की गुन्ह्यासंबंधीं; दिवाणी नव्हे असा; चोरी, मारामारी, शिंदळकी, खून इ॰ गुन्ह्या- संबंधीं (खटला, कोर्ट, कायदा इ॰). (इं.) क्रिमिनल. फौज- दारी कायदा-पु. ज्या कायद्यानें गुन्हेगरांना गुन्हा करण्या- बद्दल शिक्षा सांगण्यांत येते किंवा गुन्हे कोणते हें ठरविण्यांत येतें तो. -घका १६२. (इं.) क्रिमिनल लॉ. फौजदारी फिर्याद; दावा; लोकांच्या हक्कांना बाधक असा गुन्हा केल्याबद्दल भरलेली फिर्याद किंवा केलेला दावा. (इं.) प्रॉसिक्यूशन. ॰दारी विषय-पु. गुन्ह्याची बाब; फौजदारी खटला; दिवाणी नव्हे असा खटला. ॰नशीन, फौजेनशीन-क्रिवि. फौजेनिशी; ससैन्य. 'परंतु राजा- राम तिकडे जाऊन पुन्हां पूर्ववत् फौजनशीन जाले.' -मराचिथोशा ४२. ॰फांटा-पु. सैन्य व त्याबरोबर असणारें, लागणारें साहित्य; फौज, तोफखाना, शिबंदी वगैरे; सैन्य; जमाव. ॰बंद-वि. खडी फौज ज्याजवळ आहे असा; लढाईस सज्ज असें सैन्य ज्याजवळ आहे असा; ससैन्य. ॰बंदी-स्त्री. लढाईकरितां सैन्य घेऊन सिद्धता; तयारी; फौज तयार करून राज्य संरक्षण करणें. [फा.] ॰सरं- जाम-पु. फौजेच्या खर्चासाठीं व किल्ल्याची व्यवस्था राखण्यासाठीं दिलेली नेमणूक. फौजनिर्वाहार्थ दिलेलें उत्पन्न. याच्या उलट जात- सरंजाम. ॰सलतनत-स्त्री. फौज; सैन्य. 'बेजरबी घोडी चालवून हैदरखान यांची फौज सलतनत सर्वत्र बुडवून गारत केली.' -ख ४.१७९८. सलतनत पहा. फौजी-वि. सैन्यविषयक; लष्करी. 'मुलकी आणि फौजी इंग्रज अधिकारी यावेळीं खजिन्याच्या रक्ष- णाच्या बाबतींत मोठ्या काळजींत होते.' -सन १८५७ पृ. ३३५.
रुसु(सू)म
पु. १ देशमुख व देशपांड्याचा जमिनीच्या उत्पन्नांतील भाग. २ हक्क पैका; कर; फी; हक्क म्हणून द्यावयाचें देय; हक्क; शेंकडावळ; दरसाल मिळणारी नक्त नेमणुक. 'रसदेचा ठराब करून घेऊन त्या-ऐवजीं जमीदाराचा ऐवज हक्क रुसुमा- बद्दल... ?' -वाडसभा ४.९२. [अर. रस्म( = चाल, रीत)चें अव) ॰इलाखा-पु. कुळकर्ण्याचा हक्क. 'रुसुम इलाखा नाहींच कीं बा ।' -दावि ३८.
सामदस्तक-दस्तखत-दस्कत, सामादस्तक इ॰
न. धनकोच्या वहीवर ऋणकोनें पैसे पावल्याची-कर्ज घेतल्या- बद्दल करावयाची सही, लेख. [स्व + दस्तक ?] साम (मा) दस्तकी-वि. सामदस्तक असलेली (वही, खातें, लेख, इ॰)
साटल्यामोटल्या
स्त्रीअव. अनेक प्रकारच्या मोटळ्या, गठड्या; कपडे, दागदागीने, गुरेंढोंरें, चीजवस्त इ॰ बद्दल समुच्च- यानें वापरतात. 'तुम्ही निघून जा मी सा॰ अटपून येतो.' [मोटली द्वि.]
सद्वियोग
पु. (चुकीनें) चांगला उपयोग; योग्य विनि- योग. 'उमरावत गीर गोसावी येथें असतां त्याचा सद्वियोग होऊं नये हें चांगलें नाहीं.' -भाब ६९. [सं. सद्व्यय, किंवा सद्विनियोग बद्दल]
शेर
पु. १ पदार्थ तोलावयाचें किंवा मापावयाचें एक प्रमाण, माप. याचें माप पूर्वी निरनिराळ्या भागांत निरनिराळें असे. पुढें दिलेले आंकडे रुपये भाराचे आहेत. बेळगांब-२३.०९. मद्रास-२४.३, मदुरा-२४.९१, मंगळूर-२३.८५, म्हैसूर- २३.८५, पांदिचरी-२३.६२, त्रिचनापल्ली-२३.१७, नगर- ७६.५६, सिंध-७२.४६, माळवा-७३.८९, अजमेर-७४. ९७, पुणें-७६, रत्नागिरी-२९, चिपळूण-३०, वेंगुर्ले-२७।।, मालवण, दापोली, मुंबई-२८, राजापूर-२९, बंगाली-८०, फर्काबाद-११०. लखनौ-९५.८२, मालघा-९५.६६, काशी- १०५. सध्या ८० भारांचा शेर सर्वत्र करण्यांत आला आहे. २ जासूद, शिपाई, बेगारी वगैरेस पोटाकरितां जें धान्य, शिधा देतात तो. ३ रोजचें अन्न; नित्यवृत्ति; उदरनिर्वाहाचें साधन. (क्रि॰ उठणें; उडणें; काढणें; चालणें; तुटणें; मिळणें; लागणें). ४ आलुतेंबलुतें. -गांव १०३. म्ह॰ शेर शिजविला आणि विस्तव विझविला = स्वतःचें थोडेसेंच काम चटकन आटोपून दुसऱ्यास दिरंगाई बद्दल दोष देणाऱ्यास म्हणतात. २ थोडक्यांत कारभार आटोपणाऱ्या घरधनिणीस म्हणतात. शेरास सव्वाशेर = प्रतिपक्षा- पेक्षां वरचढ; चोरावर मोर. ॰पीठ-शिधा-नपु. भत्ता; शिधा; शिपाई, विगारी यास दिलेलें धान्य. शेरका-वि. १ शेरभर धान्य मावेल असा. २ शेरभर वजनांत भरेल असा. ३ शेरबर धान्य, तांदुळाचा भात शिजेल असें. शेरभरकोंडा-पु. एक मुलींचा खेळ. -मखेपु २५८.
संस्थान
न. १ राजाचा गांव; राजवस्तीचा गांव, शहर; लहानसें राज्य; मांडलिक राजांचे राज्य. २ देवता, साधुसंत पंडित वगैरेस नेमून दिलेलें स्थान; देऊळ, मठ वगैरे सारखी ज्यास सराकारांतून उत्पन्न वगैंरे मिळतें अशी जागा; देवाकडे, मठाकडे वगैरे नेमणूक असलेला गांव वगैरे. ३ देवता, साधुसंत यांच्याकरिंता केलेली नेमणूक. [सं. सम् + स्था] संस्थानिक- पु. संस्थानाचा मालक; मांडलिक राजा; ज्याच्या चरितार्था- करितां एखादें गांव वगैरे नेमून दिलें आहे अशी व्यक्ति. संस्था- निक-संस्थानी-वि. १ संस्थानासंबंधी; संस्थानांतील (उद्योग, चाकरी, व्यवसाय). २ राजकिय; राजसंस्थेसंबंधी 'प्रस्तुतच्या अपुर्या इंग्रजी इतिहासांत संस्थानिक वृत्तांखेरीज आमच्या विद्या, कला, स्थितिरीती वगैरे बद्दल एक अक्षरहि नाहीं.' -नि १०५.
स्तव
शअ. साठीं; करितां; कारण; मुळें; बद्दल. [सं.]
तैवज
स्त्री. पानसुपारी. आदरातिथ्य; सत्कार. [अर. तवाझु = सन्मान, आतिथ्य] ॰खर्च-पु. पाहुण्यांना व भेटीस येणार्या मंडळींना पानसुपारी देण्यासाठीं, सत्कारासाठीं केलेला खर्च. 'तैवज खर्च श्रावणमासाचे उत्साहा बद्दल' -वाडसमा ३.१९३.
तांडव
न. (नृत्य) १ शिवनृत्य; शंकर आणि त्याचे गण यांचें नृत्य; अभिनयपूर्वक नृत्य; वीररसप्रधान मर्दानी नृत्य. 'वामांगीचा लास्य विलासु । जो हा जगद्रूप आभासु । तो तांडव- मिसें कळासु । दाविसी तूं ।' -ज्ञा १७.८. 'लास्य आणि तांडव । दोन्ही नृत्यांचे भाव ।' -ह ५.६६. २ (एखाद्या क्षुल्लक गोष्टी- बद्दल) मोहरीचा मेरु, रजाचा गज, राईचा पर्वत करणें; अतिश- योक्ति. ३ थटथयाट; आक्रस्ताळपणा करणें; आदळ आपट करणें. ४ एखाद्या बीजरूप सूत्राचा, गोष्टीचा तिखटमीठ लावून केलेला विस्तार; शब्दपाल्हाळ; अर्थवाद. 'या श्लोकावर ज्ञानेश्वरानें बहुत तांडव केलें आहे.' [सं.] ॰कृष्ण-पु. १ (तांडव नृत्य करताना शरीर वक्र करावें लागतें यावरून) लंगडा बाळकृष्ण. २ (सांकेतिक) महादजी शिंदे; ह्याचा एक पाय पानपतांत जखमी झाल्यामुळें हा कायमचा लंगडा झाला होता म्हणून यास ह्या औपरोधिक नांवानें संबोधीत. 'तांडवकृष्णाकडे पत्रें पाठवावीं.' -ख ३२६४. [सं. तांडव + कृष्ण]
ते
सना. (काव्य) ती हें प्रचारांतील रूप. ती, ही, जी ह्यां- बद्दल काव्यांत ते, हे, जे अशीं रुपें येतात. 'दिक्चक्रीं फिरते सदा गरगरां संभाषणीं येई ते ।' -कमं २.५१.
तमामा
पु. (हमामा बद्दल चुकीनें?) धिंगाणा; धिंगा- मस्ती; धुडगूस. हमामा पहा. 'जो गोकुळांत हरि घालितसे तमामा ।' -देकृष्णस्तोत्र १. [ध्व.]
त्याग
पु. १ सोडणें; टाकून देणें; वर्जणें. २ (वेदांत). कर्मफल सोडून देणें. 'यया कर्मफलत्यागातें । त्यागु म्हणती पैं जाणते । एवं त्याग संन्यास तूतें । परिसविले ।' -ज्ञा १८.१२५. ३ दान; अहेर; बिदागी; संभावना. 'पदोपदीं नाना त्याग ।' -एरुस्व १५.१२८. ४ गोंधळी, भराडी, डौरकरू इ॰ कांना त्यांच्या कामा- बद्दल द्यावयाची बिदागी, मजुरी. [सं.] ॰भोग-पु. उपभोगणें व दुसर्यास देणें, दान करणें [सं. त्याग + भोग = उपभोग] त्यागाभोगापुरता-वि. उपभोग घेण्यास व दुसर्याला देण्यास, दान करण्यास पुरेल इतका (पैसा, संपत्ति, धान्य इ॰). [त्याग- भोग + पुरणें] त्यागणें-सक्रि. १ सोडणें; टाकणें; वर्जणें. २ (काव्य) टाकणें; उत्सर्ग करणें (मल, विष्टा इ॰). 'लांगूल उभारूनि धावि- न्नला वृषभ । त्यागिलें वीरे लेंडचि त्यावेळीं ।' [त्याग] त्यागी- वि. १ संसार व सांसारिक बंधनें ज्यानें टाकिलीं, तोडिलीं आहेत असा (मनुष्य); विरक्त; वैराग्ययुक्त. २ दान देणारा; दान- शूर. ३ सोडलें, त्याग केला आहे ज्यानें असा (मनुष्य). (समासांत) फलत्यागी = फलाचा त्याग केला आहे ज्यानें असा; -कर्मत्यागी-गृहत्यागी-देशत्यागी इ॰. [त्यागणें]
उच्छेद
न.पु. १ समूळ नाश; नायनाट; विध्वसं; खंड. २ त्रासदायक कृत्य (शैथिल्यानें उच्छाद बद्दल). 'उच्छेद तो असे हा गे आरंभला । रोकडें विठ्ठला परचक्र' -तुगा ६४७. [सं.उत् + छीद् = तोडणें] ॰आणणें-मांडणें-त्रास देणें. सामाशब्द-धर्मोच्छेद; वंशोच्छेद; वृत्यच्छेद; वनोच्छेद; कुलोच्छेद; गृहोच्छेद. ॰क-वि. नाहीसें करणारा; नायनाट करणारा; त्रास देणारा; बुडविणारा; निर्दलन करणारा.
उच्छेद
पु.१. समूळ नाश; पूर्ण नाश; नायनाट; विध्वंस; खंड : ‘कुरुवंशाचा उच्छेद होऊ नये म्हणून…’ − युगान्त ३८. २. त्रासदायक कृत्य (शैथिल्याने उच्छाद बद्दल) : ‘उच्छेद तो असे हा गे आरंभला । रोकडें विठ्ठला परचक्र ।’− तुगा ६४७, सामा. शब्द− धर्मोच्छेद, वंशोच्छेद, वृत्त्युच्छेद, वनोच्छेद, कुलोच्छेद, [सं. उत्+छिद्] (वा.) उच्छेद आणणे, उच्छेद मांडणे– त्रास देणे. उच्छेदक
उजू-नमाज़
= प्रार्थना. “याज़बद्दल पांच वख्त उजूनमाज़ करून इलाही नजीक (ईश्वराजवळ) रावसाहेबांचे हक्कामध्यें (= सम्बधीं, बाबतींत) दुवा याद करीत आहों” (राजवाडे १।६३).
उलट
पुस्त्री. परावर्तन; परतणें (चेंडू वगैरे). २ ओहोटी (समुद्राची) ओसर. ३ पुनरुत्थान; फेर उचल; पुनरुज्जीवन (परा- जित शत्रु वगैरेचें). ४ माघार; परत, मागें आणणें; विरुद्ध गति (चाक, त्यावरचा दोर वगैरेची). ५ पुनरागमन; प्रत्यावर्तन; प्रत्यागमन (ताप, साथ, दुष्काळ वगैरेचे). ६ माघार; विन्मुखता; भंग (वचन वगैरेचा). ७ पराङ्मुखता; सोडून जाणें; विमुखता; त्याग (एखादें काम किंवा गोष्टीपासून). (क्रि॰ करणें). ८ ओकारी; वमन; वांती. ९ प्रत्यावर्तन; बद्दल देणें; फेड; परत करणें; (उपकार, अपकार, आदर, सन्मान वगैरेचा). [सं. उद् + लट्; दे. उल्लट्ट] -वि. उफराटें; प्रतिकूल. -क्रिवि. परत; मागें; विरुद्ध दिशेनें; विरुद्ध मार्गानें, रीतीनें. 'त्यानें तिकडून दगड मारितांच मीं इकडून उलट दगड मारिला.' ॰अहेर-एखाद्या कार्यांत मिळालेली देणगी, अहेर (वस्त्र, वगैरे) याबद्दल दुसरा आपला अहेर देणें; परत अहेर. ॰इन्साफ-पु. एखाद्या दिलेल्या निकालाचा विचार करून पुन्हां दिलेला निकाल, निवाडा; दुसरा, फेर निवाडा. ॰उत्तर-न. प्रत्युत्तर; जबाब. २ विरुद्ध भाषण. ॰करार-पु. केलेल्या कराराच्या प्रतिपालनार्थ प्रतिपक्ष्यानें केलेला दुसरा करार; एका कराराच्या विरुद्ध दुसरा करार; ॰कराराचें गहाण-न. बाह्यतः खरेदी केलेली मिळकत तत्त्वतः गहाण समजून किंमत परत दिल्यास मूळ मालकास परत द्यावयाच्या अटीवर केलेला व्यवहार. ॰घेणें-हरकत घेणें; प्रतिकार करणें. ॰गोष्ट-स्त्री. प्रत्युत्तर; फेर जबाब; उद्दामपणानें दिलेलें उत्तर. ॰ढाल-ढाला-स्त्री. १ स्वारी परत फिरविणें; सैन्याचा मोर्चा विरुद्ध दिशेला (कूच करण्यासाठीं) वळविणें. (क्रि॰ देणें) उलटी ढाल पहा. २ स्वपक्ष सोडून प्रति- पक्षास जाऊन मिळणें; वचनभंग करणें शब्द मोडणें; फितूर होणें; बंड करणें. ॰पालट-सुलट-स्त्री. उलटापालट. उलटासुलटा पहा. ॰पुलट-स्त्री. उलथापालथ; फिरवाफिरव; खालींवर, इकडेतिकडे करण्याची क्रिया. ॰बाजी-स्त्री. प्रतिकार; परत फिरविलेला डाव. ॰मजकूर-पु. प्रत्युत्तर; परत जबाब; फेर निरोप; उलट उत्तर. ॰पत्र-न. उत्तरादाखल लिहिलेलें पत्र. ॰भेट-स्त्री. आपल्या भेटीस आलेल्या गृहस्थाच्या घरीं भेटावयास जाणें; भेट परत करणें; परत भेट. ॰मान-पु. आपला ज्यानें सन्मान केला त्याचा आपण उलट सन्मान करणें; उलट मेजवानी, उलट जाबसाल-जबाब वगैरे वाक्प्रचारांत परत फेड असा अर्थ होतो. उलट अहेर पहा. ॰तपा- सणी-स्त्री. १ एखादी गोष्ट पुन्हां शोधून किंवा तपासून पाहणें; विचार करणें; २ साक्षीदारास प्रतिपक्षानें विचारलेले प्रश्न. ॰मनसुबी-स्त्री. दिलेला न्याय किंवा निकाल फिरविणें; उलट इन्साफ पहा. ॰लढाई- स्त्री. फेर हल्ला; पराजित झाल्यावर पुन्हां केलेली उठावणी; पुनरुत्थान (पराभवानंतरचें). ॰वारा-पु. विरुद्ध दिशेकडून येणारा वारा. (क्रि॰ येणें; लागणें). ॰सनद-स्त्री. जुन्या सनदेवरून कायम करून पुन्हां देलेली सनद. ॰हुकूम-पु. १ पुन्हां केलेला पहिलाच हुकूम. २ विरुद्ध हुकूम; पहिला हुकूम रद्द करणारा दुसरा हुकूम; दुसरा हुकूम. ॰हुंडा-पु. वधूपित्यानें वराकडून घ्यावयाचें द्रव्य, शुल्क. 'माझा उलटहुंडा घेण्यासाठीं वडिलांनीं मला मुद्दाम बिन लग्नाची वाढविली.' -सासं २.४१५. [उलट द्वि.]
उपद्वाम
पु, उपव्द्याप; गडबड; खतपट. ‘नबाबाकडील मनुष्य येऊन तह होतो तेव्हां आपण नसतां उपद्वाम करून उपयोग काय?’ –पेद ३.६६. [उपद्व्याप बद्दल चुकीनें]
उर्जी
पु. (क.) शेतीसंबंधीं खर्च; मशागतीचा खर्च. 'जमिनी- बद्दल किती उर्जी आला?' [सं. ऊर्ज्]
उतरणावळ
स्त्री. १ नक्कल करण्याची मजूरी. २ गलबत, होडी, गाडी वगैरेंतून ओझें उतरून दुसरीकडे नेऊन ठेवल्या- बद्दल द्यावयाचें द्रव्य . ३ तरींतून पलीकडे नेण्याबद्दलचें द्रव्य. ४ मुक्काम केल्याबद्दलचें भाडें. ५ झाडावरून फळें अलगत काढण्याबद्दल द्यावयाची मजूरी.
वादळ
न. १ वावटळ; झंझावत; तुफान; वायुक्षोभ. २ (ल.) संकट. [सं. वातुल; दे. वार्दल; प्रा. बद्दल; हिं. बादल]
वांटचा
क्रिवि. ऐवजीं; बद्दल; बदली; जागीं; जागचा. [वांटा + चा]
वांटवा
क्रिवि. बद्दल; ऐवजीं; वांटचा. -शर. [वांटा]
वारि, वारिया
शअ. ऐवजीं; बद्दल. 'तुझीया वारिया मज नाचोंनये ।' -भाए २४२. [वार पहा.]
वतीं, वतींने
क्रिवि. तर्फें; बाजूनें; बद्दल. 'ने ना. दिवाण साहेब यांही श्रीमंतांवती स्वीकार करावा.' -अहेर बहुमान पोषक नियम ६. वतीचा-वि. बाजूचा; पक्षाचा. आमच्यावतीं व तुमच्यावतीं हे शब्द व्यापारी, पेढीवाले यांच्या हिशेबांतून सावकार-कूळ यातर्फें अशा अर्थानें येतात.
बांध
पु. १ बंधारा; धक्का; धरण; ताल (क्रि॰ घालणें). २ शेताची उंच केलेली हद्द, मर्यादा; शेताच्या कांठावरून किंवा बाजूनें असलेली वाट. ३ बंधन; बांधणें; आवळणें. ४ बंद दोरीचा किंवा नाडीचा तुकडा; कोणतेंहि बांधण्याचें साधन; बंधन. ५ (ल.) बेडी; शृंखला. ६ बांदाड. [सं. बध = बांधणें] ॰काम- न. दगड, विटा, चुना, माती इ॰नीं एकत्र बांधलेली भिंत, तट इ॰ ॰ण-न. १ नदीचा थोडासा प्रवाह अथवा ओढा ज्या जमिनी- तून वाहतो व जीस बांध घालून पाणी व त्याबरोबर आलेली मळी जींत आडवून धरतात ती जमीन. विशेषतः भाताचें शेत. २ -नस्त्री. शेतांतील माती पाण्याच्या प्रवाहानें वाहून जाऊं नये म्हणून आडवा घातलेला बांध. ३ पाटाच्या पाण्याकरितां बांध घालणें. (क्रि॰ करणें; घालणें). ४ बांधणें; बंधन; बंद. ५ दागिन्यास तारेच्या कडींत लोंबत्या बांधलेल्या रत्नाचें काम. -जनि परिभाषा १.१०. ६ (कों.) निरण. ॰वरो(रू)ळी-स्त्री. शेताची मर्यादा दाखविणारा प्रत्येक कोनावरील मातीचा ढीग, ओटा. ॰बांधोळी- स्त्री. बांध; बंधारा; धक्का; ताल इ॰ बद्दल व्यापक अर्थाचा शब्द. [बांध + बांधोळी] ॰वाट-स्त्री. १ भाताच्या शेताच्या बांधावरील वाट. २ फरशी केलेला किंवा बांधलेला रस्ता. बांधणावळ-स्त्री. १ (इमारत इ॰) बांधण्याबद्दलची मजूरी. २ बांधणी; बांधण्याची तर्हा, पद्धत. [बांधणें] बांधणी-स्त्री. १ बांधण्याची क्रिया. २ बांधायाची तर्हा, पद्धत (घर, विहीर, पागोटें, गाठोडें इ॰). ३ (कों.) बांधण; बांध; बंधारा; ताल. ४ (ल.) विहित, योग्य किंवा ठराविक मार्ग. ५ शेतांतील कडेचा, मधला मार्ग किंवा पाय- वाट. ६ बांधण्याचें साधन; नाडी; दोरी इ॰ -वि. बांधणासंबंधीं; बांधणांतील पिकासंबंधीं. [बांधणें] बांधा(धे)रा-पु. १ शेताच्या कडेला घातलेला बांध. २ प्रवाहाला अडविण्यासाठीं घातलेला बांध; धरण. ३ बांध घातल्यानें फुगलेलें पाणी; (क्रि॰ घालणें; करणें; होणें). बा(बां)धारी-पु. १ डोंगरावरचा प्रदेश; शिखरांची, किल्ल्यांची रांग. 'रांगणा किल्ला व कोकणबांधारीचे किल्ले...।' -मराविथोरा ४१. २ बंधन; बंधारा. बांधप-न. (राजा.) बांधण्याचें सामान किंवा साधन; घराचें ओंबण इ॰ बांधण्याकरतां लागणारें सुंभ, दोर इ॰ [बांधणें] बांधावळ- स्त्री. १ बनावट; घडण; रचना; बांधणी (घराची इ॰). २ रचना; जुळणी; मांडणी (लेख, ग्रंथ, कविता इ॰ची).
जागा
स्त्रीपु. १ स्थळ; स्थान. २ खाली, रिकामें स्थळ; अवकाश; वाव. ३ हुद्दा; नोकरी; अधिकाराचें ठिकाण; दर्जा 'मुलगी देणें ती चांगली जागा पाहून द्या.' 'फडणविसाची जागा रिकामी आहे.' ४ बदला, ऐवजीं स्थळ ५ स्थळ; पाया; आधार (प्रमाण, पुरावा, समर्थन या साठीं). 'ती आसामी चालत होती तों आमची पांचशें रुपयांची जागा असे.' ६ साधन; कारण; निमित्त; सवड (कृत्यासाठीं). 'धनी उठून जातांच चाकारस खेळावयास जागा झाली.' ७ उभें राहण्याचें ठिकाण; आधार; साधन; युक्ति; बल; सामर्थ्य. 'त्यापाशीं पांचपन्नास रुपयांची जागा आहे.' ८ किल्ला; ठाणें. 'तो जागा सुरुंगानें बुरूज उडवून घेतला.' -चित्र- गुप्त ८७. -मराचिथोरा ४२. [फा. जाय्-गाह्] ॰जागचें जागीं- क्रिवि. १ त्याच स्थळीं; असलेल्या जाग्यावर. 'महामारीनें माणसें जागचेजागीं मरतात.' २ आपण होऊन; दुसर्यानें न सांगतां; मनाचे मनांत. 'कोणी त्याला न बोलतां तो जागचे जागीं रुसला तर रुसो.' 'म्यां तर कांहीं सांगितलें नाहीं तो जागचे जागीं कल्पना काढतो.' जागां-गीं-गें-क्रिवि. ठिकाणीं; -च्या ऐवजीं, बद्दल. 'त्यांना आम्ही वडिलांचे जागीं मानितों.' ॰जुगा-पागा-स्त्री. स्थळ; जागा वगैरे [जागा द्वि.] दोन जागां करणें-होणें-दोन भाग करणें; द्विभागणें. जागा घेणें-रिकामी केलेली जागा स्वीकारणें; बदला येणें. ॰भरणें-नेमणूक करणें, होणें.
खूण
स्त्री. १ चिन्ह, ज्यानें एखादी गोष्ट जाणली जाते किंवा समजली जाते तें लक्षण; ठिपका; निशाणी; व्यंजन; संकेत- चिन्ह. ' हळूच खुणें सांगतसे । ' -नव १२.१८८ २ (विशेषतः) क्षेत्रसीमा चिन्ह; शींव. ३ संकेत; इशारा (डोकें हलविणें, हात- वारे, नेत्रसंकेत इ॰ क्रियेनें दिलेला). सूचना; सांकेतिक सूचना; उल्लेख; पर्यायोक्ति. (गुप्तरूपानें आपला अभिप्राय दुसर्यास सम- जावा म्हणून केलेला) ४ वर्म; मर्म; लक्षण. 'या खुणा तूं कहीं । चुकों नकों ।' -ज्ञा ९.१३४. [सं. क्षुण्ण; का. खून] (वाप्र.) ॰धरणें-ध्यानांत ठेवणें. ॰पाळणें-आज्ञा पाळणें; मनोगता- प्रमाणें वागणें.' नव्हे तयाची खूण पाळिळी । ' -ज्ञा १८.९१४. म्ह॰ दादाची खूण वहिनी जाणें = एखाद्याचें मर्म त्याचा जव- ळच्या माणसास ठाऊक असणें. समशब्द- ॰खाण-स्त्री. खुणा, संकेत, मनोगत, सूचना, चिन्हें यांस व्यापक शब्द. खूण पहा. ॰गांठ-स्त्री. १ (एखाद्या गोष्टीची) आठवण होण्यासाठीं किंवा ती सोडून देण्यासाठीं वस्त्रास किंवा त्याच्या पदरास मारिलेली गाठं. २ (ल.) खात्री. म्ह॰ विश्वास कीं खूणगांठ. ॰मुद्रा-स्त्री. इशारा, चिन्ह, निशाणी, मुद्रा, ठसा, अंक इ॰ मोधम शब्दा- बद्दल आणि व्यापक अर्थानें योजतात. एखादी खूण किंवा सर्व खूणा. खूण पहा.
अंधळा
वि. १ ज्याला दिसत नाहीं असा (मनुष्य, डोळा); अंध पहा. २ (ल.) अज्ञानी; अजाणता; चुकणारा; विवेकशून्य; अविचारी; गोंधळ्या; अव्यवस्थित (व्यवहार), बेकायदेशीर (राज्य). [सं. अंध] ॰म्ह अंधळा सांगे गोष्टी, बहिरा गाढव पिटी; अंधळ्या मनीं आयतवार (सोमवार), बहिरा (किंवा पांगळा) म्हणतो माझी बायको गर्भार. या (परस्पर गैरसमज दाखविणार्या) व अशा पुष्कळ म्हणी आहेत. अंध- ळ्याच्या गाई देव राखतो = ईश्वर गरिबा-दुबळ्याची काळजी घेतो. अंधळ्यानें दळावें कुत्र्यानें पीठ खावें किंवा अंधळें दळतें कुत्रें पीठ खातें = एकानें कष्ट करावे व भलत्यानेंच त्याचा फायदा घ्यावा अशी बेबंदशाही, अंदाधुंदी. 'यास्तव आमचें सर- कारास रयतांच्या वतीनें असें निक्षून सांगणें आहे कीं आंधळें दळतें आणि कुत्रें पीठ खातें असला प्रकार यापुढें चाला- वयाचा नाहीं.' -सासं २.३१६. अंधळ्यापुढें नाच बहिर्या- पुढें गायन = ज्याला ज्याची किंमत नाहीं त्याला ती वस्तु देणगी देणें. (गो.) 'आंधळ्यासरी नाजून आनी भैर्यासरी गावन उपयोग किते?' अंधळ्या बहिर्याची गांठ = प्रत्येक जण दुसर्या- बद्दल गैरसमज करून घेतो अशा दोन माणसांची भेट. २ पर- स्परांना मदत करण्यास असमर्थ अशांची गांठ. अंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन(दैव अनुकूल झालें असतां कधीं कधीं आपल्या इच्छेपेक्षां अधिकहि देतें यावरून) = अपेक्षेपेक्षां अधिक मिळणें. अंधळ्यास अंधळा वाट दाखवितो = एक अज्ञानी दुसर्या अज्ञानी माणसास उपदेश करतो, मार्गदर्शक होतो (म्हणजे दोघेहि फसतात). अंधळा रोजगार आणि मिंधा संसार = अव्यय- स्थितपणामुळें दुसर्याचा पगडा स्वतःवर बसणें. -ळ्याचा रस्ता-वाट-मार्ग-पु. सरळ; रुंद व मोकळा रस्ता; आंधळ्याला अडचणीशिवाय जातां येईल असा हमरस्ता. ॰कारभार- पु. अंदाधुंदीनें चालविलेलें राज्य; बेबंदशाही; अव्यवस्थित काम. ॰डोळा-पु. अंधळा माणूस (विशेषतः एका डोळ्यानें). ॰तिंधळा-तिरळा-वि. (कों.) १ अंडगडी; पोटगडी; पित्त्या, २ (इटीदांडूच्या खेळांतील) दुश्या; दोन्ही बाजूंनीं खेळणारा; रहाट्या. ३ (ल.) दोहीं दगडींवर हात टेकणारा; दुरोखी. ॰नारळ-पु. कोंवळा नारळ; शहाळें; ज्यांत नुसतें पाणीच असल्यामुळें वाजत नाहीं असा. आडसर पहा. -ळ्याची काठी - १ अंधळा, अशक्त, निराश्रित यांचा पुढारी अथवा आश्रयदाता; अंधळ्याला आधारभूत गोष्ट (अंधळ्याला मुख्य आधार त्याच्या काठीचा असतो यावरून). 'या अंधावृद्धाची राहों देतास एक जरि यष्टी । भीमा, मी मानस तरि होऊं देत्यें कशास बहु कष्टी ।' -मोस्त्री ३.४६. २ म्हातार्या आईबापांचा एकुलता एक मुलगा. -ळ्याची माळ-माळका-स्त्री. १ अंधळ्या लोकांची माळ, रांग. २ (ल.) अज्ञानी व मूर्ख लोकांची परंपरा. -ळ्याची मिठी-स्त्री. घट्ट मिठी; चिकटणें. -ळ्यांत काणा राजा-जेथें सर्वच अडाणी असतात तेथें थोडयाशा शहाण्याचें तेज पडतें. -ळ्यासी जन सारेंचि आंधळें-जसें आपण असतों तसेंच जग आपल्याला दिसतें.
म्हातारा
वि. १ वृद्ध; वयोवृद्ध; वयस्क. 'म्हाताऱ्याने केलें नांव.' २ पुनर्वसु नक्षत्राबद्दल शेतकरी लोक म्हणतात. तसेंच पुष्य नक्षत्राला तरणा अशी संज्ञा देतात. ३ एक प्रकारचें गवत. -बदलापूर १६१. [सं. महत्तर] म्हाताऱ्यास पिंपात ठेविलें पाहिजे किंवा पेटींत अगर कंठाळीत घालून नेलें पाहिजे- आपणाला सल्ला देण्यासाठीं आपणाबरोबर नेहमी वयोवृद्ध माणसें असावयास पाहिजेत. म्हातारपणीं ढोवळा मणी-(व.) म्हातारपणीं कशाला शृंगार हवा. म्हाताऱ्याबगर कोणी जायना-(गो.) म्हातारा मनुष्य असल्याशिवाय कहाणीसारख्या ठराविक गोष्टी पार पाडत नाहिंत. म्हाताऱ्याच्या बायकोस तांबटाच्या रोट्या-म्हतारीला धड खाण्यास अन्न व नेस- ण्यास वस्त्र मिळत नाहीं. तिला उरलेंसुरलेंच खावें लागतें. म्हाताऱ्या माणसाचें लोणचें घालून ठेवावें-सदुपदेश पाहिजे असेल तर म्हाताऱ्या माणसाचा सल्ला घ्यावा. म्हातारखंड-न. म्हातारा शब्दाचें तुच्छतेचें रूप; निंदेनें म्हाताऱ्यास म्हणतात. म्हातार चळ-पु. म्हातारपणीं बुद्धीस होणारी विकृति; म्हातारपणीं होणारा बुद्धिभ्रंश; साठी वुद्धि नाठी; पिसें; चाळे; तारे; म्हातारपणीं बुद्धि बावचळणें. म्हातारडा, म्हातारडुक-वि. थेरडा; मूर्ख म्हतारा अशा अर्खीं; तुच्छतादर्शक म्हातारा या अर्थीं (स्त्री. पुरुष या दोहों- बद्दल उपयोग); म्हातारखंड. म्हाताराकोतारा-वि. म्हातारा (द्विरुक्तीनें); वृद्ध आणि वयस्क; म्हातारा आणि अशाचसारखा. म्हातारी-स्त्री. १ वृद्ध स्त्री; आई; जरठ स्त्री. २ बोडकी; केस भादरलेली विधवा स्त्री (तरुण किंवा म्हातारी कशीहि असो इजबद्दल उपहासार्थी योजावयाचा शब्द) ३ कापसाचा हलका पुंजा किंवा हसकें पीस (हवेंत उडणारें) याजबद्दल योजावयाचा शब्द. रुईच्या फळांतील तंतुसमुदाय. (वाप्र) 'मुलें खेळतांना म्हाताऱ्या उडवितात.' -मराठी ६ वें पुस्तक पु. २४३. म्हातारी मेलीसें होणें-(ल.) अतिशय दुःख होणें. म्हातारीनें कोंबडें झांकून ठेवलें म्हणून उजेडावयाचें रहात नाहीं-केंबडा उजेड- ण्याचे अगोदर आरवतो. यावरून कोंबड्याच्या आरवण्याचा आणि उजेडण्याचा कांहीं कार्यकारणभाव आहे असें मात्र नाहीं. उजाडूं नये म्हणून म्हातारीनें कोंबडें झांकून ठेविलें तरी उजाडावयाचें तें उजाडतेंच. सृष्टिक्रमाप्रमाणें गोष्टी होऊं नयेत म्हणून कितीहि प्रयत्न केला तरी त्या गोष्टी थांबावयाचा नाहींत.
चौथ
स्त्री. १ चतुर्थी तिथि. २ (कों.) लोणी वगैरे तोलण्याचें अठ्ठेचाळीस दुदांडी शिवराई पैसेभार वजन. ३ चतुर्थांश. ४ चौथाई; मुसलमानांच्या अमलाखालील प्रांतांतून सरकारी वसुलाच्या एकचतुर्थांश खंडणी मराठे वसूल करीत असत ती. ही खंडणी वसूल केल्यावर मराठे तिची पुढील प्रमाणें वांटणी करीत-चौथाईचा चतुर्थांश राजा स्वतःकरितां ठेवीत असे आणि ह्या हिश्शास राजबाबती असें म्हणत. बाकी राहिलेल्या रकमेपैकीं म्हणजे मोकाशापैकीं सर्व चौथाईच्या साहोत्र्या इतकी (शे. ६ इतकी) रक्कम पंतसचिवास देत असत. बाकी राहिलेला (चौथा- ईचा एकुणसत्तर शंभरांश) हिस्सा ज्याला ऐनमोकासा म्हणत त्याची विशिष्ट अटीवर सरदार-जहागीरदारांत वांटणी होत असे. यांनीं मराठ्यांस लढाईच्या वेळीं सैन्य पुरवावयाचें असे. कांहीं प्रांतांत सगळ्या चौथाईवर शेंकडा तीन इतकी रक्कम वजा घालीत असत. तिला नाडगौडा असें म्हणत. मराठ्यांच्या अमलाखालीं ते प्रांत आल्यावरहि वरीलप्रमाणें चौथाई वसूल करून वर सांगितल्या प्रमाणें तिची वांटणी होत असे. ५ मुसलमानांच्या अमदानींत दाव्यांत, लवादांत यशस्वी झालेल्या व्यक्तीनें प्रतिपक्षाकडून चौथ व्यावी असा नियम असे. दाव्यांतील ऐवजांतील (रकमेंतील) रुप- यास चार आण्याइतकी साधारणतः ही रक्कम असे. ६ कामा- वर भाडोत्री लाविलेल्या नोकरांच्या पगाराच्या रकमेचा चतुर्थांश मुख्य अंमलदारास मिळत असे त्यासही चौथ म्हणत. ७ शिवाय कोर्टांतील बेलीफास प्रोसेस बद्दल दिलेल्या मजुरीचा चतुर्थांश नाझ- रास मिळत असे त्यासहि चौथ म्हणत. -वि. चतकोर (भाकरी). [सं. चतुर्थ; प्रा. चउत्थ] (वाप्र.) चौथीचा चंद्र(चांद)पहाणें- कांहीं तरी आळ, किटाळ येणें; चतुर्थीचा चंद्र पहिला असतां चोरीचा आळ येतो असा समज आहे. 'चौथीचा चांद पाहिलांत याचा हा परिणाम बरें का ?' -नामना ८६. ॰कर कोर-पुस्त्री. (प्र.) चतकोर पहा. ॰भरणी-स्त्री. १ भाद्रपद वद्यांत ज्या दिवशीं भरणी नक्षत्रीं चंद्र असतो असा (तृतीयेचा, चतुर्थीचा, पंचमीचा) दिवस. २ मागील बारामहिन्यांत मेलेल्या माणसांचें या दिवशीं केलेलें श्राद्ध; भरणी श्राद्ध. [चौथ = चतुर्थी + भरणी नक्षत्र]
जात
स्त्री. १ प्रकार; वर्ग; कूळ; वंश. 'याचे गाण्याची जात निराळी, त्याचे निराळी.' २ जन्मस्वभाव, मूळस्वभाव; अंगचा गुण 'तो अट सोडणार नाहीं त्याची जातच अशी.' ३ चातुर्वर्ण्यांतील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या चार किंवा यांच्यां- तील अनेक पोटजाती. जाति पहा. ४ रजःकण; बिंदु; तिळमात्र (नकारार्थी उपयोग). (तुल॰ इं. जॉट). 'त्याचें अंगीं शहाण- पणाची जात नाहीं.' -न. समुदाय; जमाव; समूह; समुच्चय; संघ. 'तैसा विषय जातांचा गरा । वाजों नेदिजे इंद्रियद्वारां ।' -ज्ञा १६.९०. नेहमीं समासांत उपयोग. याचीं उदाहरणें असंख्य आहेत. जसें-वस्त्रजात = सर्व प्रकारचीं वस्त्रें; वस्त्रांतील सर्व- प्रकार, नमुने; वस्त्र या नांवाखालीं येणारे सर्व; याचप्रमाणें धातु- शब्द-गुण-अर्थ-द्रव्य-जात इ॰. [सं. जात] (वाप्र.) जातीवर जाणें-येणें-मूळस्वभावाप्रमाणें करणें; स्वभावांत बदल न करणें (निंदार्थी योजतात). म्ह॰ १ जात कळते पण मत कळत नाहीं. २ (व.) रीत बाटली म्हणून जात थोडीच बाटली. सामाशब्द- ॰करी-पु. जातींतला माणूस, ज्ञातिबांधव. ॰कुळी, कूळ स्त्रीन. जात आणि वंश यांसंबंधीं सर्व माहिती (लग्नाच्यावेळीं ही शोधून काढून हिचा विचार होतो). 'मुलगी सुरूप नव्हे पण जात कुळी चांगली म्हणून करितो.' ॰गंगा-जमात-स्त्री. एकंदर सर्व जात; एकत्र जमलेली सर्व जात (जातींत घेणें, बाहेर टाकणें इ॰ प्रश्नांचा विचार करण्यासाठीं). 'जातगंगेला व लोकगंगेला भ्यालें पाहिजे.' -भाऊ १९. [जात + गंगा; जात अर. + जमाअत] ॰गोत-न. स्वतःची जात आणि स्वतःच्या गोत्रांतील माणसें या- बद्दल समुच्चयार्थी; आपल्या जातीचीं व गोताचीं माणसें. 'त्याला प्रायश्चित दिलें तेथें सर्व जातगोत मिळालें होतें.' ॰चावडी-स्त्री. सरकारी गांवचावडीखेरिज स्वतंत्र एखाद्या जातीनें बांधलेली चावडी, निवाडाकचेरी. 'सार्वजनिक कामासाठीं गांवचावड्याखेरीज स्वतंत्र जातचावड्या बांधल्या.' -गांगा ५५ ॰चौगुला-पु. जातींतल्या, जातपंचायतींतल्या अम्मलदारांतील प्रमुख -गांगा २८. ॰जेवण-न. सर्व जातीला दिलेलें जेवण; जातींतील सर्व माण- सांची पंगत; ज्ञातिभोजन. ॰पंच-पु. जातींतील प्रमुख अधिकारी. 'वडर, कैकाडी, कोल्हाटी, कुंचेवाले वगैरे जातींत ब्राह्मणाला न बोलावतां जातपंच लग्नें लावितात.' -गांगा ११३. ॰पाटील-पु. जातीनें नेमून दिलेला मुख्य अम्मलदार; जातचौगुला पहा. ॰पात-स्त्री. १ जातकुळी, जातगोत पहा. 'त्याची जातपात समजल्यावांचून आम्हीं पंक्तीस घेणार नाहीं.' २ जातगंगा पहा. ३ बहिष्कृत माणसानें जातींत परत यावयाच्यावेळीं जातीला घात- लेलें जेवण; जातजेवण. ॰पूत-स्त्री. जात आणि वंश. 'जातकुळ.' जातगोत पहा. [सं. जाति + पुत्र] जातपूतचा-वि. शुद्ध वंशाचा, बीजाचा, कुलीन. ॰भाई-भाऊ-पु. जातिबांधव; स्वजातीय माणूस. 'आपत्या जातभाईच्या हिताकरितां सरकार त्या सव- डीचा कसा दुरुपयोग करितें...' -टि १.५०२ 'या गांवांत त्याचा कोणी जातभाऊ असता तर उपयोगी पडता.' ॰लग-वि. १ मोठ्या कुळांतील, जातींतील (जनावरें, फळें) 'त्या गाई- पेक्षां-पेरूपेक्षां-ही-हा जातलग आहे.' २ (क.) स्वतःच्या जातीचा; जातीसंबंधाचा. ॰वार-क्रिवि. जातीप्रमाणें निरनिराळे (कर, नोंद, निवडणूक, प्रतिनिधि)
सत्
पु. साधु; पवित्र पुरुष. -न. १ त्रिकालाबाधित अस्ति- रूपी तत्त्व; ब्रह्म. -वि. १ वास्तविक; यथातथ्य; खरें; यथा- स्थित. २ योग्य; रास्त; उत्तम; गुणवान्; खरें; चांगलें; ऋजु; (हा शब्द बहुधा समासांत येतो उदा॰ सत्कर्म, सत्कल्पना, सत्कृत्य, सत्संग, सत्पुरुष, सद्गुण, सद्विद्या, सद्वासना, सत्सेवा, सदाचार, सद्गति, सद्गुरु वगैरे). [सं.] सत्कर्म-न. चांगलें काम; पुण्यकृत्य. सत्कवन, सत्कविता-नस्त्री. चांगलें काव्य; धार्मिक काव्य; पवित्र गीत. सत्कवि-पु. चांगला कवि; संत- कवि; प्रतिभावान कवि. सत्काल-पु. योग्य काल; पुण्यकर्मांत घालविलेला काल. सत्कालक्षेप-पु. पुण्यकृत्यांत वेळ घाल- विणें; सत्कृत्यांत खर्च केलेला वेळ. सत्काव्य-न. चांगलें काव्य; धर्मिक, नीतिपर काव्य; उत्तम प्रतीची कविता. सत्कीर्तन-न. उत्तम पुरुषांचें गुणगान्; सज्जनांची स्तुति. सत्कृति-स्त्री. पुण्यकृत्य; चांगलें काम; योग्य काम; धर्मिक कार्य. सत्क्रिय-वि. चांगल्या कृतीचें; वर्तनाचें. सत्क्रिया- स्त्री. १ चांगलें कर्म; चांगली कृति. 'हे सत्क्रियाचि आच- रावी ।' -ज्ञा २.२६६. २ आदर; सन्मान. सत्ख्याति-स्त्री. ख्याति पहा. सच्चर्चा-स्त्री. धार्मिक बाबीसंबंधीं खल; पुण्यकारक वादविवाद; चांगल्या प्रकारचा वाद, खल. सत्तम- वि. सर्वश्रेष्ठ; सर्वोत्तम; सर्वोत्कृष्ट. 'शबरास म्हणे नृपसत्तम ।' सत्तीर्थ-न. १ विशेष पुण्यदायक क्षेत्र, यात्रेचें ठिकाण; पुण्य- भूमि. २ आदराचें, भाव असलेलें ठिकाण, जागा, व्यक्ति. सत्पथ-पु. चांगला, योग्य, सरळ, पुण्यकारक मार्ग; सन्मार्ग. सत्पात्र-वि. योग्य; लायख; कोणतेंहि दान करण्यास, मान देण्यास, सन्मान करण्यास योग्य (मनुष्य). सत्पात्रीं दान- न. योग्य, पुण्यशील पुरुषास दिलेली देगणी. सत्पाळ-वि. (राजा.) कसदार दुधाची; चांगलें लोणी येणारें दूध देणारी (गाय, म्हैस वगैरे). सत्पुत्र-पु. १ गुणी, कर्तव्यदक्ष मुलगा. २ त्रैवर्णिक स्त्रीपासून झालेला मुलगा. सत्पुरुष-पु. पुण्यवान्, उदार, धार्मिंक मनुष्य; साधु; संत. सत्प्रचीत, प्रचीति- ती-स्त्री. वास्तविक, चांगला अनुभव. सत्प्रिय-वि. १ सत्पुरु- षांस, साधुसंतांस, चांगल्या लोकांस आवडणारा. २ साधुसंता- बद्दल, चांगल्या गोष्टींबद्दल, व्यक्तींबद्दल आवड असणारा. सत्शिष्य-पु. निष्ठावान, श्रद्धावान् शिष्य. सत्शूद्र-पु. १ आपल्या धर्माप्रमाणें योग्य तो आचार पाळणारा शूद्र जातीं- तील मनुष्य. २ गवळी व न्हावी यांचे आचार इतर शूद्रांपेक्षां चांगले असतात म्हणून त्यांस म्हणतात. सत्संग-सत्संगति- पुस्त्री. साधुसंतांशीं, पुण्यवान् पुरुषांशीं, सद्गुणी माणसाशीं सहवास, मैत्री, संबंध वगैरे. 'सत्संगति सत्फळदा सुज्ञासि पचे पचे न येरा हे ।' -मोवन ८.७. 'सत्संगें देव सांपडला ।' -दा १८.८.१३.
माथा-थें
पुन. १ डोक्याचा अग्रभाग; टाळू २ कपाळ. 'अजायुद्ध होतें तेव्हां माथ्यासी माथा आपटतो.' ३ डोकें. ४ घुसळावयाच्या रवीचा माथला;एखाद्या तसल्या वस्तूचें डोकें. ५ शिखर; टेंबा; शेंडा (पर्वत, झाड इ॰ चा). ६ लाक्षणिक अर्थां- करितां डोई पहा. माथां-क्रिवि. (काव्य) डोक्यावर. 'धर्म- प्रसाद माथां आंगी भगवत्प्रसाद दृढ वर्म ।' -मोकर्ण ११.९. [सं. मस्तक; प्रा. माथअ; पं. मथ्था; सिं. मथो; हिं. बं. माथा; गु. माथुं] म्ह॰ १ उरीं केस माथा टक्कल. २ पोटांत जळें माथ्यांत कळे. (वाप्र.) ॰तुकविणें-आनंदाने मस्तक डोलविणें. 'तियांचे भाॐ वाणिता । कवींसी माथा तुकविणें ।' -शिशु ६००. माथां मारणें-एखाद्यावर सोंपविणें; विश्वासणें; हवालणें; लावणें; अंगा- वर टाकणें (काम, धंदा). माथां वाहणें-फुलें इ॰ डोक्यावर सम- र्पण करणें. 'वाटे इषुंनीं माथां धीर गुरु म्हणोनि वाहिला काय? ।' -मोभीष्म ११.१२१. (उजळता)माथा होणें-आलेला अपवाद इ॰ दूर होणें. माथीं बसणें-एखाद्यावर लादलें जाणें. माथ्यांत राख घालणें-वैतागणें. माथ्यार पदर गांड उक्ती-(गो.) वरचा देखावा उत्तम राखणें पण आंत कांहींच अर्थ नसणें. माथ्यावर चढविणें-लडिवाळपणें वाटेल तसें वागूं देणें; डोक्यावर घेणें. माथ्यावरचा पदर टाकणें-उत- रणें-पडणें-वेश्या बनणें (बहुतेक सभ्य स्त्री डोकीवरून पदर घेते यावरून). माथ्या वैयलयान हुवार वचप-(गो.) डोकीवरून पाणी जाणें; गंगेत घोडे न्हाणें; एखाद्या कामाची मेहनतीची शिकस्त होणें याअर्थी. सामाशब्द- माथफळी-स्त्री. गोसावी, बैरागी लोक कुबडीवजा टेकण्यासाठी घेतात त्या साध- नाची वरील आडवी फळी. माथाकूट-स्त्रीन. १ (मूर्खास शिक- विणें, हटवाद्याशीं वाद करणें इ॰) कंटाळा आणणारा, त्रास- दायक व बिनफायदेशीर धंदा, काम. २ एखाद्या गोष्टी बद्दल चीड व शीण आणणारा हट्ट धरून बसणें; एकसारखी बडबड; त्राग्याची मागणी (वाक्यांत काम, छंदा. उद्योग इ॰ शब्दाबरोबर योजतात). ॰फोड-स्त्री. माथेफोड. ॰रोग-पु. गुरांचा एकरोग. -शे ६.४८. ॰शूळ-पु. १ भयंकर डोकेदुखी. २ एक सरळ वाढणारी वनस्पति. माथाटी-स्त्री. माथोटी पहा. माथें-न. शिर; मस्तक. 'संक- टांत तीच म्हणोनी उंच करी माथें ।' -विक ६ [सं. मस्तक] (वाप्र.) ॰करणें-(कु.) (विधवांनी) केशवपन करणें. ॰पिक- वणें-डोकें उठवणें; त्रास देणें. ॰फिरणें-वेडा होणें; अतिशय रागावणें. 'माझें माथें फिरलें.' ॰बोडविणें-हजामत करविणें.' सामाशब्द- ॰माथेकळी-स्त्री. आंगरख्याची एक कळी, भाग. ॰फळी-स्त्री. उंसाच्या चरकांतील नवरानवरीचे माथे जीत बस- विलेले असतात ती आडवी फळी. ॰फिरू-पु. संतापी; अविचारानें भलतेंच कृत्य करणारा; भ्रमिष्ट. ॰फोड-स्त्री. माथाकूट पहा. -वि. कठिण व त्रासदायक; चीड व शीण आणणारें (काम). ॰सूळ-पु. डोकेंदुखी. माथो-पु. (चि.) मस्तक; कपाळ; (सामा.) वरचा भाग. माथोट, माथोटी-नस्त्री. १ बैलाच्या शिंगाच्या मुळाशीं बांधलेली दोरी. २ अशी दोरी जेथें बांधतात तो बैलाच्या डोक्याचा भाग. ही दोरी बैलाला पकडण्याच्या उपयोगी पडते व हिला कासरा लावतात. ३ शिंगाभोवतालचें गोंडे इ॰ ज्यास बांधलेले असतात तें बंधन. ४ डोंगराचा माथा. [माथा + अट] माथ्या-थ्यो-पु. १ रवी इ॰ चा माथा, बोंड. २ (चि.) रवी. माथ्याचा-वि. (गुज.) हेकेखोर; हट्टी.
लांबण
स्त्री. १ बरेंच मोठें अंतर; दूरपणा. 'किल्ला दिसतो खरा पण ही काय लांबण थोडी आहे.' २ सावकाशी; दिरंगाई; दूर टाकण्याचा प्रकार. 'ह्याच महिन्यांत लग्न करून घ्या. उगीच लांबण लावूं नका.' ३ (तुलनेनें पाहतां) जास्त लांबी, अंतर. 'पायवाटेपेक्षां गाडीवाटेकडून लांबण आहे.' ४ विस्तार; पाल्हाळ (भाषणादि व्यवहाराचा). 'काय तें हंशील सांगा, उगीच लांबण लावूं नका, उशीर होतो.' [सं. लंबन] लांबणीवर घालणें- टाकणें-लोटणें-दूर मुदतीवर ढकलणें; उशीरां करण्यासाठीं ठेवणें. लांबणीवर पडणें-दूर मुदतीवर जाणें; पुढें ढकललें जाणें. लांबणें-अक्रि. १ लांब होणें; वाढणें (स्थल किंवा काल या बाबतींत). २ (लांबी, विस्तार व अवधि या बाबतींत). वाढणें (वस्तु, व्यवहार, गोष्ट इ॰). 'काम एकदोन दिवसांत झाले असतें पण सुभेदार गेले, आतां चार महिने लांबलें.' प्रमाणाबाहेर वाढणें. 'प्रथमतः दहा हजारांत घर बांधावें असा बेत धरून आरंभ केला मग जें लांबलें तें पंचवीस हजारांवर गेलें.' ३ भर घातल्यानें प्रमाण वाढणें; अधिक होणें (ताक, दूध इ॰मध्यें पाणी वगैरे घातल्यानें); विस्तार होणें. ४ (बातमी, गुप्तगोष्ट, मसलत इ॰) अनेकांस विदित होणें; जाहीर होणें. ५ (भाषण, ग्रंथ इ॰) कंटाळा येण्याइतकें अधिक मोठें, पाल्हाळीक होणें. [सं. लंबन] लांबता-वि. क्रि वि. १ लौकर न करतां हळू हळू केलेला, करून लांबविलेला (क्रि॰ धरणें) 'दोन गृहस्थ येणार आहेत, कथा जराशी लांबती धरा.' २ लांबलेला; बराच दूर गेलेला; (आकाशांत बराच वर आलेला). 'लांबतिअ/?/ सुरिअ/?/ । केवि लाजिजे नु!' -शिशु ४७०. लांबरा-वि. लांबट. 'मोठाले कुच इंदुवक्र नयनें कर्णावधी लांबरे ।' -कमं २. लांबविणें-क्रि. १ लांब करणें (स्थळ, काळ या बाबतींत); २ (सामा.) लांबीरुंदी वाढविणें. ३ पुढें टाकणें; खेंचणें; ओढणें. ४ (मालकाकडून) काढून नेणें; पळविणें; लुबाडणें. [लांबणें प्रयोजक] लांबवालांबव-स्त्री. १ घाईनें, कसें तरी दूर नेणें, धाडणें (चोरादीच्या भीतीनें द्रव्य, वस्तु इ॰). २ लुबाडणी; पळवापळव. लांबसूनक्रिवि. (कों.) लांबन. -लोक २.४७. लांबी-स्त्री. १ लंबाई; दीर्घता. २ लांब बाजू. ३ अंतर; अवधि; मधली जागा किंवा वेळ; दूरता. ४ एका टोंकापासून दुसऱ्या टोंकापर्यंतचा विस्तार; त्याचें माप.' ५ (गो.) उशीर; दीर्घकाल. 'रुपये पाठविण्यास लांबी जाहल्या- बद्दल राग धरूं नये.' लांबीवर पडणें-लांबणीवर पडणें; विलंब असणें. लांबुनक्रिवि. दुरून; अंतरावरून. लांबोडा, लांबुळा, लांबुडा-वि. वाटोळा, चतुष्कोण इ॰ जे आकार त्यामध्यें लांबी म्हणून जें प्रमाण तत्प्रधान जो आकार तो; लांबट; दीर्घ वर्तुळा- कार; अंडाकृति. 'तोफेच्या गोळ्यासारखा वाटोळा गोळा करूं नको; वरंवट्यासारखा लांबोडा गोळा कर.'
नजर
स्त्री. १ दृष्टि; नदर. 'माझ्या नजरेस जो पडेल त्याची मी आहुती घेई.' -विवि ८.८५५. २ धोरण; उद्देश; पहाणें. 'अवरंगजेबास ठायीं ठेवावें ही नजर शिवाजीची.' -ख ७.३२५९. ३ (ल.) कृपादृष्टि; लक्ष्य; कृपावलोकन; आनुकूल्य. 'विचारास त्या लोकांची नजर पावली नसली तर...अवहेलना न करितां...गुण ते बोलावे.' -मराआ १५. ४ इच्छा; हांव. 'नजर भारी! होनाचें नाणें! लकाराशिवाय बोलीच नाहीं असा प्रकार.' -ख ७.३२५९. ५ वाईट व बाधक दृष्टि; दृष्ट. लोभी, कामी, दृष्टि. 'त्यांची नजर आपली तुझ्यावर.' -मोर ३५. ६ (ल.) तर्क; अवलोकन करण्याची शक्ति. 'त्यांत माझी नजर बराबर चालली नाहीं.' -विवि ८.१. १८. ७ निगा; काळजी. [अर. नझर्; हिं. गु. नजर] ॰करणें-निगा; काळजी. 'संग्रह करावा. याची बरी नजर करावी.' -मराआ १२. ॰टाकणें-(एखाद्या वस्तूकडे) ओझरतें पहाणें. 'याअर्थावरून नजर टाका.' -भक्त मयूर केकावली २. ॰देणें-(एखादी गोष्ट) विचारांत घेणें. ॰धरणें- इच्छा करणें. 'कदाचित् त्याचे वंशजांनीं त्यामागें हरामखोराची नजर धरली तर त्यास त्याच वृत्तीचें बल होणार.' -मराआ २४. ॰न पुरणें-(एखादी गोष्ट) दृष्टीच्या, शक्तीच्याबाहेर कशेबाहेर (विस्तृत, गूढ, मोठी, बहुसंख्याक) असणें. ॰पडणें- (एखाद्याची) दृष्ट लागणें; बाधणें. -विचावि २३०. ॰फांकणें- १ दृष्टि विस्तृत होणें. २ (एखाद्याची) महत्वाकांक्षा, लोभ इ॰ वाढणें. ॰मारणें-(तीच तीच गोष्ट पुनः पुनः केल्यानें तिच्या बद्दलचें) भय, आदर, किळस इ॰ नष्ट होणें; (एखादी गोष्ट) दृष्टीला पूर्ण परिचित होणें. 'या संबंधानें बर्याच लोकांची अजून नजर मेली नाहीं.' -आगर ३.४३. नजरेंत-नजरांत आणणें- ताब्यांत आणणें; डोळ्यांसमोर ठेवणें; लक्ष्यांत घेणें. 'नजरांत आणिला कारभार ।' -दावि ३१. नजरेंत धरणें-पर्वा करणें. 'हम्बीरराव याणीं दिलेलखान नजरेंत धरला नाहीं.' -सभासद ६४. नजरेस पडणें-दिसणें. नजरेस येणें- १ पसंत पडणें. २ माहीत होणें; दृष्टीस पडणें; लक्षांत येणें. (वाप्र.) नजरे(रे)चा खेळ-पु. १ केवळ दृष्टिक्षेपानें, एकदां नजर टाकण्यांनें होणारें काम, गोष्ट; किरकोळ सुलभ काम. २ मुख्यतः दृष्टिनेंच साध्य अस- लेलें काम, विषय. उदा॰ चित्रकला, तिरंदाजी, लेखन. ३ दृष्टीचें अद्भुत, विलक्षण, आश्चर्यकारक कृत्य, काम. जसें:-अतिशय सूक्ष्म अक्षरें, चित्रें काढणें; बारीक शिवणें; घड्याळाचीं सूक्ष्म यंत्रें बसविणें इ॰ ४ चांगली बळकट दृष्टि, पराकाष्ठेची तारतम्यदृष्टि लागणारी गोष्ट. दृष्टीचा खेळ व नजरेचा खेळ हे शब्द एकमेकां- बद्दल पर्याय म्हणून योजतात व तसें करणें इष्ट आहे. कांहीं मात्र वर दिलेल्या अर्थांप्रमाणें उपयोगांत आणितात. दृष्टीचा खेळ पहा. नजरेचीबाधा-दृष्ट. 'आज रामूला नजरेची बाधा झाली.' नजर(रे)चें पाप-न. प्रत्यक्ष (एखादी वाईट गोष्ट) पहाण्यानें होणारें पाप; पाह्ण्याचें पाप. (एखादी विशिष्ट गोष्ट नजरेआड घडल्यास खपते पण समोर घडल्यास खपत नसते अशा वेळीं उपयोग). नजरेनें-क्रिवि. समक्ष; प्रत्यक्ष. 'त्यासही येथील विचार नजरेनें दाखवून जो विचार सांगणें...' -पेद ३.१८३. नजरेनें पाषाण उलणें-फार वाईट नजर असणें. दृष्टि या शब्दांतील इतर वाक्प्रचार पहा. सामाशब्द- ॰अंदाजा-पु. नजरेनें पाहणी करून (पीक इ॰ कांचा) केलेला अंदाज; (सामा.) डोळ्यांनी पाहून एखाद्या वस्तूचें मान, परिणाम ठरविणें; अशा रीतीनें ठरविलेला अंदाज, अटकळ. 'नजर-अंदाज-पाहणी-मोजणी-मोजदाद- अजमास-पडीत-वहीत-पीक-बार-किंमत-वजन.' [नजर + अंदाज] ॰एनायत-स्त्री. कृपादृष्टि, 'नजर एनायत फर्माऊन.' -रा १६. १३८. ॰कैद-स्त्री. साधी अटक. [नजर + कैद] ॰गहाण-गाहण- गहाण ठेवलेली मिळकत सावकाराच्या ताब्यांत न राहतां ऋणकोजवळच राहते असला गहाणाचा एक प्रकार; ह्या प्रकारांत ऋणकोनें मी जातीनें कर्ज फेडीन न फेडल्यास सावकारानें माझी विवक्षित मिळकत विकून तिच्या किंमतींतून आपलें कर्ज सव्याज फेडून घ्यावें असें लिहून द्यावें लागतें.' -घका ३०. याच्या उलट अमलगहाण, ताबेगहाण. [नजर + गहाण] ॰गुजार-स्त्री. परीक्षा; पारख. 'आपण रजियांनीं नजरगुजर करून एक एक माणूस पाहून ठेवावें.' -सभासद २१. -वि. डोळ्याखालून घातलेलें; गेलेलें; पारखलेलें; दृष्टिगोचर झालेलं. 'तसेंच तटसरनोबत. जे ठेवणें ते बरे मर्दान कबिलेदार विश्वासु असे पाहून नजरगुजार करून ठेवीत जावे.' -मराआ २८. [नजर + फा. गुझार = गुझाश्तनचे अज्ञार्थी रूप] ॰गुजारत-गुजारा-स्त्रीपु. नजरानजर; दृष्टादृष्ट; भेट. 'त्याची व आमची नजरगुजारत होईल तेव्हां काय बोलणें तें बोलूं' [नजर + गुजारत, गुजारा] ॰चूक-स्त्री. दुर्लक्षामुळें, नकळत, घडलेली झालेली चूक, दोष; दृष्टिदोष. [नजर + चूक] ॰चोर-पु. धूर्तपणानें, कावेबाजपणानें नजर चुकविणारा; दृष्टीस पडण्याचें टाळणारा. [नजर + चोर] ॰दौलत-स्त्री. लक्ष्मीची कृपादृष्टि. -राव्यको ८.६७. [नजर + दौलत] ॰पापी-वि. वाईट, पापी, दृष्ट नजरेचा. ॰पारख-स्त्री. १ पाहतांक्षणींच, बाह्यस्वरूपावरून (एखाद्या गोष्टीची, व्यक्तीची) केलेली परीक्षा, अनुमान. २ पाहतांक्षणीं, बाह्यस्वरूपावरून अनुमान, तर्क करण्याची शक्ति, चातुर्य. [नजर + पारख = परीक्षा] ॰पाहणी-स्त्री. केवळ नजरेनें पीक, जमीन, धान्याची रास इ॰ कांचा केलेला अजमास, अटकळ. [नजर + पाहणीं] ॰बंद-पु. १ नजरबंदी करणारा; गारुडी. २ (कों.) नजरबंदी पहा. -क्रिवि. साध्या अटकेंत; ज्याच्या हालचालीवर सक्त नजर आहे अशा स्थितींत. 'बादशहानें नजरबंद केलें.' -मराचिथोशा ३. [फा. नझर्बंद] ॰बंदी-स्त्री. १ दृष्टीला भुरळ पाडणें; जादुगिरी; हात- चलाखी. 'ही जादुची नजरबंदी कुणि कुठें कशी केली ?' -वाग्वै- जयंति, गुलाबी कोडें २ नजरकैद; साधी अटक. [फा. नझर्बंदी] ॰बाग-पु. १ घर, राजवाडा इ॰ कांसमोर शोभेकरितां केलेला सहज दृष्टीस पडावयाजोगा बाग. 'पांच कैदी नव्या वाड्यांतील नजर- बागेंत आणून त्यास समक्ष रूळ ढोराप्रमाणें त्यांचेकडून ओढवले.' -विक्षिप्त २.१०१. २ गच्चीवर, खिडकीपुढें फुलझाडांच्या कुंड्या वगैरे ठेवून केलेली बागेसारखी टुमदार रचना. ॰बाज-वि. १ सूक्ष्म नजरेनें परीक्षा, निरीक्षण करण्यांत कुशल. २ हेर; टेहळणी करणारा. -ऐटी १.४४. 'शहरांत नजरबाज लोक ठेवून...' -मरिउनि २.२००. ३ डोळे मोडणारा, मारणारा; नेत्रसंकेत करणारा. [नझर्बाझ] ॰बुलंद-स्त्री. कृपादृष्टि. 'गारिबांवर नजरबुलंद झाल्यानें आपलेंच गांव आहे.' -पदमव १७. ॰भूल-स्त्री. पाहण्यांत झालेली चूक; डोळ्यांना पडलेली भुरळ; नचरचूक. [नजर + भूल = चूक, मोह] ॰मासला-पु. नुसत्या नजरपहाणीनें मिळालेला मासला, नमुना. नजरअंदाजा या शब्दाबद्दल योजितात. ॰मुबा रक-रकी-स्त्री.शुभदृष्टि; कृपादृष्टि. [नजर + अर. मुबारक् = शुभ, मंगळ] ॰मोजणी-स्त्री. मोजण्याच्या कोणत्याहि साधनाचा उपयोग न करतां केवळ नजरेनें केलेली मोजणी. 'नजरमोजणी करावयाचा शिस्ता आहे' -मसाप २.२. १४१. [नजर + मोजणी] ॰मोजबा-पु. चौकशी; पाहणी. -वाडसभा २.२. ३५. ॰हुजूर, नजरेहुजूर- क्रिवि. प्रत्यक्ष (राजाच्या, हुजुराच्या) समक्ष, दुष्टीखालीं; समोर. [नजर + हुजूर] नजरानजर-स्त्री. परस्परांनीं एकमेकांस पाहणें; दृष्टादृष्ट; भेट. [नजर द्वि.]
ज्ञान
न. १ बुद्धि; विषयाचें आकलन करण्याचें सामर्थ्य २ मनोव्यापाराचा विषय, शास्त्र ३ बातमी; महिती. ४ विषय ग्रहणाचा बुद्धीवर झालेला संस्कार; मनावरचा ठसा, समजूत. ५ ब्रह्मज्ञान; सृष्टींत अनेकप्रकारचे जे अनेक विनाशी पदार्थ आहेत त्या सर्वांत एकच अविनाशी परमेश्वर भरून राहिला आहे असें जाणणें; ब्रह्मात्मैकज्ञान. -गीर ७१३. अध्यात्मविद्या. [सं. ज्ञा = जाणणें] ॰कमळ-न. १ एक रांगोळी काढण्याचा प्रकार. २ (योग) शरीराच्या ठिकाणीं कल्पिलेल्या आठ कमळांपैकीं प्रत्येक. ॰कळा-स्त्री. बुद्धिवैभव; बुद्धिप्रभाव. 'कौशल्य ज्ञानकळा परम ।' २ शहाणपणाचा प्रकाश; बुद्धीची, जाणिवेची भूमिका; जाणण्याची कला. 'आंगीं ज्ञानकळा आली म्हणजे दुराचार घडत नाहीं.' ३ जाणतीकळा पहा. ॰कळेपार-वि. मनुष्याच्या बुद्धीच्या आटो- क्याच्या बाहेर; बुद्धीला अगम्य. ॰कांड-न. त्रिकांड वेदांतील आत्मज्ञानाचें प्रतिपादन केलेला भाग; आरण्यकें व उपनिषदें (यांत यज्ञयागादि कर्म गौण व ब्रह्मज्ञानच काय तें श्रेष्ठ असतें). -गीर २८७. याच्या उलट कर्मकांड. ॰कोश-पु. १ ज्ञानाचा संग्रह, सांठा. २ विविध विषयांची माहिती ज्यांत दिली असते असा कोश; (इं.) एन्सायक्लोपीडिया. ३ मराठींतील असा ग्रंथ. ॰गुरु-पु. १ ज्ञान देणारा, शिकविणारा शिक्षक. २ महावाक्यो- पदेशेंकरून ब्रह्म प्रत्ययास आणून देणारा, मोक्षगुरु. ॰धन-वि. परिपूर्ण ज्ञानस्वरूप असलेला; ज्ञानानें पूर्णपणें भरलेला. 'महाराज राज सद्गुरु ज्ञानघना ।' ॰चक्षु-दृष्टी-प. बाह्येंद्रियांच्या विषया- पलीकडील आत्मस्वरूप जाणण्याचें ज्ञान, बुद्धि, मनःचक्षु. -वि. एतद्विशिष्ट (मनुष्य). ॰जनक-वि. ज्ञान उत्पन्न करणारें. ॰दाता-पु. ज्ञानगुरु. -वि. ज्ञान दान करणारा. ॰दिवा-दीप- पु. बुद्धिरूपी दिवा. 'अंतरिचा ज्ञानदिवा मालवूं नकोरे ।' ॰निष्ठा-स्त्री. ज्ञानोत्तर सर्व कर्मे सोडून देऊन ज्ञानांतच गढून जाण्याची सिद्धावस्थेंतील स्थिति. -गीर ४१२. ॰परंपरा-स्त्री. १ एकामागून एक येणाऱ्या विचारांमुळें, माहितीमुळें झालेलें ज्ञान. २ वाढतें ज्ञान. ॰मठ-मठी-पुस्त्री. १ अध्यात्म ज्ञानाचा अथवा ध्यानयोगाचा अभ्यास करण्यासाठीं बांधलेला आश्रम; एकांतस्थान. २ (ल.) तुरुंग; कारागृह. ज्ञानमठांत बसणें- १ सांसारिक बंधनांतून पराङ्मुख होऊन आध्यात्मिक चिंतनांत काळ घालविणें. २ स्वतःच्या शहाणपणाबद्दल घमेंड, गर्व बाळगणें, ॰मार्ग-पु. ईश्वर प्राप्तीचा वेदांचा शास्त्रोक्त रास्त, मार्ग; अव्य- क्तोपासनेची साधनावस्थेंतील स्थिति दाखविणारी रीत. -गीर ४१२. ॰मार्गी-वि. ज्ञानमार्गाचा अवलंब करणारा; ब्रह्मज्ञानाच्या मागें असणारा. ॰माला(ळ-ळा)-स्त्री. १ स्वाध्यायास प्रारंभ करतांना शिष्या्च्या, पुत्राच्या गळ्यांत गुरूकडून किंवा पित्या- कडून घातली जाणारी माळ. २ ही माळ घालण्याचा संस्कार. ३ (ल) जगाचें ज्ञान; व्यवहारज्ञान. ॰यज्ञ-पु. ज्ञानप्राप्ति; परमे- श्वर स्वरूपाचें ज्ञान करून घेऊन त्या ज्ञानाला अनुरूप अशा आचर- णानें परमेश्वराची प्राप्ति करून घ्यावयाचा मार्ग, साधन. -गीर ६८०. ॰रत्नाची मांदुस-स्त्री. ज्ञानी, शहाणा माणूस, या- बद्दल गौरवानें म्हणतात. [ज्ञान + मांदूस = पेटीं] ॰लक्षण-न. १ ज्ञानसाधनाचें चिन्ह; खूण. २ बुद्धिलक्षण. ॰वल्ली-स्त्री. (थट्टेनें) भांग. ॰वाद-पु. १ (तत्त्वज्ञान) ज्ञानानेंच मोक्ष प्राप्ती होते, मुक्ति मिळते हें तत्त्व; व त्या तत्त्वाचें समर्थन. २ (इं.) ग्नॉस्टिसिझम्. ॰वान्-वि. १ शाहाणा; ज्ञानी. २ अध्यात्मज्ञान असणारा; ब्रह्मज्ञानी. ॰वायु-पु एक वातरोग. हा झाला असतां माणूस गहन विषयावर विद्वत्तापूर्ण बडबड करीत सुटतो. ॰विग्रह-पु. ज्ञानरूपी शरीर असलेली (देवता). ॰विज्ञान-न. १ आध्या- त्मिक ज्ञान आणि आधिभौतिक किंवा शास्त्रीय ज्ञान. २ अध्य- यनापासून मिळालेलें ज्ञान आणि अनुभवजन्य किंवा प्रत्यक्ष ज्ञान. ३ वाङ्मय आणि शास्त्र. ॰शक्ति-स्त्री. १ ज्ञानेंद्रिय पंचक. २ बुद्धिसामर्थ्य. ॰सूर्य, ज्ञानार्क-पु ज्ञानरूपी सूर्य. 'ज्ञानसूर्य उगवला देहामाजी । ॰स्पृश्-वि. ज्ञानाला स्पर्श झालेलें; जाण- लेलें; समजलेलें. ज्ञानांजन-न. ज्ञानरूपी अंजन, काजळ; ज्ञानो- पदेश. 'नयनीं लेईलें ज्ञानांजन.' ज्ञानाभ्यास-पु. अध्यात्म- ज्ञानाचें चिंतन; ब्रह्मज्ञानाचा अभ्यास, चिंतनमनन ज्ञानाभ्यासी- वि. सदोदित ब्रह्मचिंतन करणारा. याच्या उलट कर्मसंगी. ज्ञानार्थ- पु ज्ञानरूप, ज्ञानाचा विषय. 'हे असो आतां वाजटा । तो ज्ञानार्थ करूनि गोमटा ।' -ज्ञा १४.२६. [ज्ञान + अर्थ] ज्ञानाज्ञान-न. पारलौकिक ज्ञान व (अन्यथा) ऐहिक विषयांचें ज्ञान. -ज्ञा १५. ५०३. [ज्ञान + अज्ञान] ज्ञानी-ज्ञानिया-वि. १ ज्ञाता; शाहणा, जाणणारा; विद्वान; सुज्ञ. २ आध्यात्मिक, पारमार्थिक ज्ञान असणाराच ब्रह्मज्ञानी. 'तिज अथार्थी जाणिजे । ज्ञानिया चौथा ।' -ज्ञा ७.१०९; एभा ११.२४९. [सं. ज्ञानिन्] ज्ञानेंद्रिय-न. ज्यांच्याद्वारें वस्तूंचें ज्ञान होतें अशीं त्वचा, नेत्र, जिव्हा, कान, नाक हीं पांच इंद्रियें प्रत्येकीं याच्या उलट कर्मेद्रिय. या पांचांच्या समूहास ज्ञानेंद्रियपंचक म्हणतात. [सं.] ज्ञानोपदेश-पु. अध्यात्मज्ञान; आत्मज्ञान याचा उपदेश, बोध. (क्रि॰ करणें; देणें). [सं.] ज्ञानोपासना-स्त्री. उपासनेचा तिसरा प्रकार. वेद व शास्त्रें यांच्यापापासून ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न, मार्ग, (कर्मोपासना व आत्मोपासना हे उपासनेचे पहिले दोन प्रकार आहेत). [सं.]
शेत
न. १ धान्य वगैरे लावण्याची जागा; क्षेत्र; लागवड केलेली जमीन. २ पीक; उगवलेलें, पिकलेलें उभें धान्य. ३ शेत- काम; कृषिकर्म; धान्य पिकविण्याचें काम; शेती. ४ नवरात्रांत किंवा चैत्रांत रहू करतात तो; भांड्यांत रुजत घातलेलें धान्य व त्याचे अंकुर. ५ (ल.) उपजीविकेचें साधन; धंदा; व्यवसाय. पोटाची तजवीज. [सं. क्षेत्र; प्रा. छेत्त] शेत उतरणें-कणसें चांगलीं बाहेर पडून भरणें; कणसें, चांगलीं येणें. शेत घरांत ठेवणें-असणें-करणें-खंडानें न देतां शेताची मशागत स्वतः करणें. शेत तोडणें-कोंवळ्या भातात्या रोपावर रोग पडणें- कृषि २३६. शेत सोसणें-भात रोप्याचे केसर पांढरे पडणें; शेत सुकणें, वाळणें; एक रोग. [सं. शुष्] (भरल्या) शेतांतून काढणें-ढकलणें-उठविणें-लाभ होण्याच्या ऐनवेळीं काढून लावणें; हातातोंडाशीं आलेला घास काढून घेणें. ॰आडगरा- पु. वि. नाचणीची एकजात. ॰एरंड-पु. एरंडीचें झाड; सुरती एरंडीचें झाड; सुरती एरंड; मळा एरंडा दुसरा मोगली एरंड, वईएरंड. ॰करी-पु. १ शेतीवर निर्वाह करणारा; शेताची मेहनत करणारा; कृषीवल. २ शेताचा मालक, धनी. ३ शेती; खंडकरी; शेतावर काम करणाराच कर्दा; कूळ. ॰कापशीस्त्री. शेतांत पेरा- वयाचें, उगवणारें कापशीचें झाड. ॰काम-न. शेतीचें काम, धंदा. ॰कामी-काम्या-वि. शेतावर काम करणारा; शेतकीच्या कामीं येणारा, उपयोगी पडणारा; कृषीवल. ॰खप्या-पु. १ केवळ शेतकाम ज्याला माहीत आहे, इतर कांहीं विद्या नाहीं असा मनुष्य; अडाणी, गांवठी मनुष्य; गांवढा. २ शेतकाम करणारा परंतु ज्याचा वास्तविक धंदा शेतकीचा नव्हे, असा ब्राह्मण वगैरे मनुष्य. ॰खेतन. जमीनजुमला; शेती; वत- नवाडी. ॰गणा-पु. शेतजमीनीचा समुदायच लागवडीची जमीन. ॰गहूं-पु. गव्हाची एक जात; पाणी न देतां शेताच्या ओली- वर येणारा गहूं. ॰गी-स्त्री. शेतकाम; कृषिकर्म; जमीनीची मशा- गत, लागवड वगैरे. 'वेठीचे उपाद्रवामुळें रयत परागंदा होत्ये, शेतगी होत नांहीं.' -वाडसमा ३.२२४. ॰घर-न. शेतांतील घर; शेतकामासाठीं शेतांत बांधलेली झोपडी वगैरे. ॰जमीन-स्त्री. लाग- वडीखालील. जमीन. ॰पेढी-स्त्री. शेतकऱ्यास कर्ज देणारी सहकारी पतपेढी. ॰पोत-न. १ सामान्यतः शेती; शेतीखालील जमीन; शेतीवाडी; जमीनजुमला. २ शेतीचीं कामें; कृषिकर्म. [शेत द्वि.] ॰बाडी-स्त्री. शेतभात; शेतीवाडी. ॰भात-शेतीभाती-नस्त्री. शेती; शेतजमीन; शेतीवाडी; सामान्यतः शेतीची जमीन व लाग- वडीचीं कामें यांस व्यापक संज्ञा. ॰मळा-पु. शेती, बागायत वगैरे; जिराईत व बागाईत शेती यांस सामान्य व्यापक संज्ञा. ॰माल-पु. शेतींत पिकणारा माल. ॰वड, शेताड-स्त्री. १ लागवडीची जमीन गांवासभोंवतीची. ॰वड-वडा-१ पु. एक फुलझाड; दुधाणी, कुंभा पहा. २ एक झुडुप. ॰वस्ती-स्त्री. १ (हंगामांत) शेतावरील वास्तव्य, राहणें. २ शेतकरी लोकांची वस्ती, गांव, खेडें; गांवढें गांव. ॰वळी-स्त्री. चांभार लोकांत मामानें बाशिंग बांधल्यावर वर शेजारच्या घरीं जातो हा विधि. ॰वाडी-स्त्री. शेती, लागवडीखालील जमीन, कुरणें, बागायत, आवार, वाडगें वगैरे शेतीसंबंधीं जमीनीस व्यापक शब्द. ॰वार- पत्रक-वारी-नस्त्री. गांवासंबंधीं कुळकर्णी किंवा तलाठी यानें ठेवावयाचें सर्व जमीनीचें शेतांच्या अनुक्रमानें नोंदणीपत्रक, तक्ता. ॰वाळूक-न. शेतांत होणारें एक काकडीसारखें वेलाचें फळ; चिबूड. ॰सनदी-वि. लष्करी अथवा इतर सरकारी कामा- बद्दल पूर्वी सनदेसह शेत मिळत असे, तसें शेत धारण करून नोकरी करणारा. ॰सनदी शिपाई-पु. लष्करी नोकरीबद्दल शेताची सनद मिळालेली सैनिक. 'जेथें किल्ले आहेत तेथें किल्लेदार शेत- सनदी शिपाई ठेवीत.' -नि १०६१. ॰सरी-स्त्री. शेती, पिकें वगैरेस सामान्य व्यापक संज्ञा. 'शेतसरी पिकली.' ॰सारा-पु. जमीनीवरील कर; शेतीवरील कर, महसूल. ॰हेत-न. जमीन- जुमला; शेतवाडी. शेतकी-स्त्री. १ शेतकाम; शेतकऱ्याचा धंदा, व्यवसाय. २ पीक; उभें पीक; शेत. शेताड-डी-शेतवड पहा. शेती-क-स्त्री. १ शेतकी; शेतजमीन. २ शेतलागवडीसंबंधीं कामें. शेती-पु. शेताचा मालक, धनी. -स्त्री. शेतजमीन; शेतकी. शेती पाऊस-पु. पिकांना योग्य असा पाऊस. शेती- भाती-स्त्री. शेतवाडी, जमीन पहा. २ शेतीचीं कामें.
विषय
पु. १ इंद्रियें किंवा मन यांस गोचर वस्तु; ज्ञानाच्या कोणत्याहि साधनानें माहीत होणारी गोष्ट. (याअर्थीं सामासांत) विषयभोग, विषयत्याग, विषयासक्ति, विषयाभिरुचि, विषय- सेवा-सेवन-प्रीति-तिरस्कार-संबंध-कथन-निंदा-ज्ञान-सुख- दुःख. २ एखाद्या क्रियेचा कर्ता अथवा कार्य; एखादा विकार अथवा भावनेशीं संबद्ध गोष्ट; (कर्ता, करण, शक्ति अथवा कार्याचा) प्रदेश, टप्पा, आटोका, स्थान वगैरे. उदा॰ कामाचा विषय स्त्री; मोहाचा विषय पुत्र; लोभाचा विषय वित्त; रोगाचा विषय शरीर; तसेंच क्रोध, हर्ष, दंड इत्यादींचा विषय. (याअर्थीं सामासांत) विवाद-व्याख्या-गायन-लेखन-गमन-विचार-धर्म-ज्ञाति- हास्य-काम-संकल्प-विधि-निषेध-विषय. 'निजस्मृतिस जाहलीं विषयी तीं तव श्रीपदें' -केका ८. ३ कार्य; कर्तव्य; कार्यक्षेत्र; अधिकार; व्यवसाय; योग्य धंदा, काम. उदा॰ बोलणें हा वागिं- द्रियाचा विषय; मामलत करणें हा भिक्षुकाचा विषय नव्हें; रफू करणें हा दाभणाचा विषय नव्हे. ४ उद्देश; हेतु; ध्येय; मनां- तील गोष्ट. 'तुम्ही जो हा उद्योग करीत आहां याचा विषय कोण?' ५ मुद्दा; प्रकरण; बाब; संबंध. 'शब्द साधनारूप विषय ज्यांत असतो त्याला व्याकरण म्हणावें.' ६ द्रव्य; ऐवज; माल. 'त्यास साऱ्या वर्षांत शंभर रुपयांचा विषय पोंचतो.' ७ महत्व; पर्वा; दरकार. 'स्वामीचा आशीर्वाद असतां इतरांचा विषय मांनीत नाहीं.' -रा ३.३२४. ८ कामेच्छा. 'जैसे थोर विषय सुभगे अंगी । अंगसानें ।' -ज्ञा १६.२५३. 'रुचे विषय ज्या मिळे अमृत ते न मद्या पिती ।' -केका ४३. [सं.] ॰द्वार-न. इंद्रिय. 'बहु हीं दुस्तर विषयद्वारें ।' -तुगा १८७४. ॰नियामक समिति-स्त्री. सभेपुढें मांडावयाचे विषय ठरविणारी, निश्चित कर- णारी, निवडणारी मंडळी. ॰पंचक-न. पांच इंद्रियांचे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पांच विषय. 'शब्दस्परुषरूपरसगंध । ऐसें हें विषय पंचक ।' -दा १७.८.१४. ॰बद्ध-वि. इंद्रिय विषय लोलुप; कामी; भोगी; आसक्त. (याचअर्थीं सामासांत) विषय- तत्पर-लंपट-लीन-लुब्ध-वश-दास-आसक्त-आधीन-आविष्ट- अंध. ॰भोगोडा-पु. विषयाचा उपभोग. 'विषयभोगोडा करा- वया ।' -दावि ४१. ॰वासना-स्त्री. भोगेच्छा; इंद्रियसुखेच्छा; ऐहिक वस्तूंच्या उपभोगाची इच्छा. 'विषयवासना नावडो' ॰विरक्त-वि. ऐहिक भोगांस विटलेला; भोगांचा त्याग केलेला. ॰व्यापार-पु. व्यवहार; धंदा; ऐहिक व्यवसाय; सुखसाधनांचें संपादन. 'विषयव्यापारीं सदा सादर । आपपर नावडे त्या ।' ॰सुख-न. इंद्रियजन्यसुख; रतिसुख; सृष्टींतील निरनिराळ्या भोगांपासून निरनिराळ्या इंद्रियांस मिळणारा आनंद. विषया- चरण-न. इंद्रियभोग; विषयोपभोग. 'पतंगा दीपीं आलिंगन । तेथ त्यासी अचुक मरण । तेंवी विषयाचरण । आत्माघाता ।' -ज्ञा ३.२०१. विषयानंद-पु. भोगसुख; निरनिराळ्या पदार्थांच्या उपभोगापासून मिळणारें सुख. विषयोपभोग-पु. भोग्य वस्तूंचें सेवन; इंद्रियांस सुख देणाऱ्या वस्तूंचें सेवन. विषयी-वि. १ विषयासक्त; भोगसुखास लालचावलेला; कामी; गोडघाश्या. 'जरी विषयीं विषयों सांडिजेल ।' -ज्ञा ५.१२५. २ इंद्रियांस अगोचर वस्तूंचें अस्तित्व न मानणारा. ३ ज्या गोष्टीचें एखादी वस्तु कार्य अथवा कर्ता असतो ती (गोष्ट). विषयीकरण-न. इंद्रियांकडून स्वविषयाचें ग्रहण; इंद्रियाकडून त्या विषयाचें ज्ञान होणें. विषयीं- शअ. संबंधी; संबंधानें; बद्दल; धरून; अनुसरून; अनुलक्षून. पूर्वीं षष्ठ्यंत नामापुढें लावीत हल्लीं सामान्यरूप करून जोडतात. उदा॰ घराचेविषयीं, युद्धाचेविषयीं = घराविषयीं, युद्धाविषयीं. [विषय- सप्तमी] विषी, विषीं-शअ. विषयीं पहा. 'अगा आत्मजेच्या विषी । जिवु जैसा निरभिलाषी ।' -ज्ञा १२.१३२. विषो-पु. विषय पहा. 'अमाइक तंव नव्हसी । कवणा ही विषो ।' -अमृ २.३६.
चौदा
स्त्री. चौदा विद्या. 'चौदाजणींची ठेव । नचले स्वरूप वर्णावया ।' -ह ३.३ -वि. १४ संख्या; दहा आणि चार. [सं. चतुर्दश; प्रा. चउद्दाह; हिं. चौदह; बं. चौद्द; उ. गु. चौद; प. चौदा] सामाशब्द- ॰इंद्र-पु. ब्रह्मदेवाच्या एका दिवसाच्या कालांत जसे पृथ्वीवर एकामागून एक असे चौदा मनु राज्य करून जातात त्याचप्रमाणें स्वर्गांत एकामागून एक चौदा इंद्र त्या कालांत राज्य करून जातात. म्ह॰ चौदा इंद्र झाले तरी इंद्राणी एकच (सभोंवतीं अनेक फेरफार होत असतांना देखील जी एकच व्यक्ति, वस्तु, संस्था, विधि, चाल इ॰ टिकून राहते तिचें वर्णन करतांना या म्हणीचा उपयोग करतात). गोत्रें-नअव. (कोंकणस्थ ब्राह्मणांचीं) अत्रि, कपि, काश्यप, कौंडिण्य, कौशिक, गार्ग्य, जामदग्न्य, नित्युंदन, बाभ्रव्य, भारद्वाज, वत्स, वसिष्ठ, विष्णुवृद्ध व शांडिल्य. चौकड्या-वि. चौदा चौकड्यांचें राज्य असणारा. 'चौदा चौकडिया लंकापति । त्याची कोण झाली गति ।' -तुगा ॰चौकड्यांचें राज्य-न. कृत, त्रेता. द्वापार व कलि हीं चार युगें मिळून एक चौकडी होते. अशा चौदा चौकड्या होईपर्यंत केलेलें राज्य; अतिशय दीर्घकाल केलेलें राज्य; रावणाचें राज्य. 'सर्व देवांना बंदींत टाकणारा व चौदा चौकड्या राज्य करणारा रावण स्वतःच्या प्रतापासंबंधाच्या... ...चुकीच्या कल्पनेला बळी पडला.' -कीचकवध. ॰तंतुवाद्यें-वीणा, बीन, रुद्रवीणा, एकतारी, सारंगी, सतार, सारमंडळ, तुंबरी (तंबुरी), सरोद, कोंका, रखब, मदनमंडळ, ताउस व तुणतुणें. ॰ताल-ळ-वि. चौदा मजले उंच; फार उंच; गगनभेदी. [चौदा + ताल] ॰नारू- पु. चौदा अलुते-अलुतेदार पहा. [चौदा + नारू = अलुतेदार] ॰ब्रह्में-नअव. शब्द, मीतिकाक्षर, खं, सर्व, चैतन्य, सत्ता, साक्ष, सगुण, निर्गुण, वाच्य, अनुभव, आनंद, तदाकार व अनु(नि)र्वाच्य ब्रह्म. -दा ७.३.५ ते ९. ॰भवनें, भुवनें-नअव. चौदा लोक, सप्तवर्ग आणि सप्तपाताळ मिळून चौदा लोक. भूः, भुवर्, स्वर्, महर्, जन, तप, सत्य हे सात लोक आणि अतल, वितल, सुतल, महातल, रसातल, तलातल व पाताल हे सात पाताल लोक मिळून चौदा लोक. ॰मनु-सात सातांचे दोन वर्ग. (१) स्वायं- भुव, स्वारोचिष, औत्तमी, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत. (२) सावर्णि मनुः-सावर्णि, दक्ष, ब्रह्म, धर्म, रुद्र, देव व इंद्रसावर्णि. ॰रत्नें-नअव. देव आणि दानव यांनीं समुद्रमंथन करून चौदा मूल्यवान वस्तू काढिल्या त्याः लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्र, कामधेनु, ऐरावत, रंभा (आदिअप्सरा). उच्चैःश्रवा नामक सप्तमुखी घोडा, कालकूट विष, धनुष्य (शार्ङ), पांचजन्य शंख, अमृत. ॰लोक-पुअव. चौदा भवनें पहा. 'तेतिस कोटि देव सकळ । चौदा लोक सुवर्णाचळ । वेष्टित राहिले ।' -दा ४.१०.१४. ॰विद्या-स्त्रीअव. ऋक्, यजुस्, साम, अथर्व हे चार वेद व शिक्षा, छंद, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष, कल्प हीं सहा वेदांगें व न्याय, मीमांसा, पुराणें, धर्मशास्त्र मिळून चौदा विद्या. 'चौदा विद्या ज्यांचे हाती ।' -भूपाळी गणपतिची पृ. ३. चौदावें रत्न-न. १ (चुकीनें) चाबूक. २ (ल.) खरपूस मार (चौदा रत्नें वर्णन करणार्या 'लक्ष्मीः कौस्तुभ पारिजातक.' श्लोकांतील 'शंखोऽमृतं चांबुधेः' या तिसर्या पादाच्या शेवटीं 'चांबुधेः' बद्दल चुकीनें चाबूक असें वाचल्यानें चादावें रत्न म्हणजे चाबूक असा अर्थ; किंवा चौदावें रत्न (अमृत) निघाल्यावर दैत्यांना बसलेल्या मारावरून शिक्षा.) 'आम्ही इतके धीट आहों कीं चवदावें रत्न आमच्या दृष्टीस पडलें कीं पुरे, आम्ही आपले पाय लावून पळत सुटलोंच.' -आगरकर. २ भाबडया माणसाची केलेली खोडी, फसवणूक. चौदावेंरत्न दाखविणें-चाबकानें मारणें, खरपूस समाचार घेणें.
हा(हां)क
स्त्री. १ आरोळी; नावांचा मोठ्यानें उच्चार; बोलावणें. (क्रि॰ मारणें). २ मोठ्यानें ओरडणें; बोंब, आरडा करणें. 'सभेमाजिं रायापुढें हाक गेली ।' -राक १.४. ३ दुलौंकिक; सार्वजनिक चर्चा; हाकाटी. ४ आरोळी ऐकूं जाईल इतकें अंतर. 'वाटेवर हाक हाकेवर चौक्या होत्या.' ५ विकाणारानें आपल्या मालाची पुकारलेली किंमत. (यावरून) त्यानें जबर किंमत मागणें. 'पेठेंत तांदळाची हाक दाहा रुपये फरा असी आहे.' 'जिन्नस पुष्कळ येतांच वाण्याची हाक कमती झाली.' ६ (ल.) उपदेश. 'बा ! हाणिली सुरभिला जेंवि तुज्या तेंवि लात हांकेला ।' -मोशल्य १.१०. ७ बडबड; आरडाओरड. तुमच्या होणार काय हाकानीं ।' -मोउद्योग ८.७९. [हिं. प्रा. हक्का] ॰देणें-१ हाक मारणें. २ ओ देणें, बोलावल्याबरोबर येतों म्हणून धांवून येणें. ३ उपयोगी पडावयास किंवा गरज भागविण्यास तयार होणें. ॰फोडणें- मोठ्यानें दुःखोद्गार काढणें; मोठ्यानें हांक मारणें; टाहो फोडणें. -मोआदि २. ॰मारणें-१ बोलावणें, हाका मारणें. २ कार्य करणें, पाड लावणें. 'मद्गति हे अन्याचें येथें मारील काय हाक बळ ।' -मोवन ६.३. हाका मारणें-१ ओरड करीत बसणें; चरफडत राहणें, केलेल्या चुकीबद्दल दुःख भोगीत बसणें, दुसर्याचे नांवाचा बभ्रा करणें, मोठ्यानें तक्रारी करीत सुटणें. 'कां न तुम्हींहि परिसा मारित आलों अशाचि हाका मी ।' -मोउद्योग ११.५१. २ काम अपुरें पडून राहणें; प्रगति खुंटणें, बेत, कार्य इ॰ फिसकटणें. हाक ना बोंब-१ बिनबोभाट; तक्रार, नाखुषी इ॰ न दर्शविणें. २ केलेली ओरड, तक्रार एखाद्याचे कानीं जावयाची मुष्कील, अशक्यता. हाक बोंब- म-स्त्री. आरडाओरडा; हाकाटी; गलबला. हाकटणें-उक्रि. १ मोठ्यानें बोलावणें, एकानें किंवा अनेकांनीं एकास किंवा अने- कांस, जोराजोरानें हांक मारणें. -वामनराधा ५३. २ डांगोरा पिटणें; बोभाट करणें. हाकणें-उकि. १ पशूंना लवकर जाणे इ॰ करितां शब्द, काठी इ॰ नीं नेटानें चालविणें; त्यांना काढून लावणें, पिटाळणें, पुढें ढकलणें. २ संसारादि खटलें कसेंहि करून चालविणें, रेटणें. ३ अतिशयोक्ति दिसायाजोगी किंमत, बातमी, गप्प सांगणें, झोकणें. हाकलणें-सक्रि. हाकणें पहा. हकारणी, हाकारणी-स्त्री. (जहाज इ॰) चालू करण्याची क्रिया. हाकरणें, हाकारणें-क्रि. गलबत, नाव इ॰ चालू करणें, त्यांस गति देणें. २ गलबत चालू करण्याकरिंता त्याचें शीड वार्यावर पसरणें. ३ बैलांचा तांडा, प्रवासी यांना प्रवास करण्यास सांगणें. ४ एखाद्या कामगिरीवर जासूद, नोकर पिटाळणें, दवडणें. ५ घोडा इ॰ कांस जलद चालण्याबद्दल इशारा देणें, दौड करावयास लावणें. हाकविणें-उक्रि. (प्रा.) हाकणें १ अर्थ पहा. हाकहूल- स्त्री. आरडाओरडा; हांकाटी, दंगा. [हिं.] हाका-पु. (बडोदें) शिकारीचें जनावर दडलेल्या ठिकाणाहून हुसकविण्यासाठीं केलेली ओरड; हाकारा. (क्रि॰ करणें). 'हाका सुरू जाहला वाघ निघून गेला ।' -गापो २३. हाका करणार्यास हांक्या किंवा हांकेवाला म्हणतात. -गापो २३. हाकाक, हाकाहाक- स्त्री. १ हाकहूल पहा. २ तक्रार; ओरड. 'कोणा ग्रंथका- राची लेखणी भाषेच्या कोतेपणामुळें थांबली अशी हाकाक अजून कोणाच्या कानीं नाहीं.' -नि २०१. हाकाटा-टी- पुस्त्री. १ अनेक हाकांचा; आरोळ्यांचा आवाज; गलबला; गोंधळ. २ एखाद्याचे विरुद्ध ओरड; बोभाट; तक्रार. ३ हवी असलेल्या वस्तूसाठीं जोराची मागणी. ४ ओरड; दंगा; गोंधळ; कल्ला. ५ कुप्रसिद्धि; डांगोरा. हाकट्याचा-वि. विद्वत्ता, धन इ॰ असण्या- बद्दल प्रसिद्ध; नांव, कीर्ति झालेला; अस्कर्याचा. हाकारणी, हाकारणें-हकारणी-णें पहा. हाकारणें-सक्रि. १ ओरडून हांक मारणें; बोलावणें. २ शीड उभारून गलबत चालू करणें; शीड उभारणें; हकारणें. ३ चालू करणें; गती देणें. म्ह॰ आषाढी आणि सण हाकारी. हाकारा-पु. १ हाकाटा पहा. बोला- वणें. 'नवखंडीचिया राया हाकारा केला ।' -संतराजीरूख १३. ५. २. दवंडी. ३ दरारा. ४ (नगरी) बोभाट. हाकालणें- उक्रि. हकालणें पहा. हाकाहाक-की-स्त्री. १ अनेक हाकांचा मिळून झालेला आवाज, यानें त्याला, त्यानें याला या- प्रमाणें हांक मारणें; यामुळें झालेला गोंधळ. २ सर्वसामान्य सर्वत्र ओरड; हाकाटी;उदा॰ पावसाची-पिकाची-पाण्याची-हांकाटी; जुलमाविरूद्ध ओरड; उदा॰ कोतवालची-मामलेदाराची-हांकाटी. ३ बाजारांतील जिन्नसांची चढीची किंमत इ॰; किंवा जिन्नस संप- ल्यानें होणारी हांका मारण्याची अवस्था; दुर्मिक्ष.
वृद्ध
वि. १ वयातीत; म्हातारा; जरठ. 'वृद्ध तपस्वी पितृ पद सेवन सर्वस्व पुंडरीक मुनी ।' -भंक्तमयूरकेका १२. २ पूर्ण वाढ झालेला; योग्य विकास पावलेला. ३ मोठा (गुणादिकानीं); (शहानपण, ज्ञान इ॰ त) प्रगति झालेला. (समासांत) विद्या- वृद्ध; वयोवृद्ध; तपोवृद्ध; ज्ञानवृद्ध. ४ श्रेष्ठ. 'तरी अवघाचि गुणीं वृद्धी । जे महर्षीमाजि प्रबुद्ध । काश्यपादि प्रसिद्ध । सप्तऋषी ।' -ज्ञा १०.९२. ५ वृद्धि पावलेला; जमून, सांठून वाढलेला; पूंजीभूत. [सं.] ॰कपि-पु. १ जख्ख, फार म्हातारा. २ (ल.) चांगला अनुभवी; मुरलेला. 'पंचवीस वर्षें काम केलेले वृद्धकपी कौन्सिलर सांगतात.' -टि २.१४६. ३ (विशेषतः अनादरानें) वृद्ध गृहस्थ. 'तुझ्या ओळखीच्या गृहस्थाकडे गेलों आणखी ते एखादें जर कां वृद्धकपी असेल तर आपल्या हिंडण्या फिंडण्याला विनाकारण अडथळा यायचा.' -पिंगला. [सं.] ॰काक-पु. (म्हातारा कावळा) टणक, निरोगी वृद्ध गृहस्थास योजतात. काटक म्हातारा. ॰गंगाधर चूर्ण-न. एक प्रकारचें औषधी चूर्ण (संग्रहणी, अतिसार यांवर देतात) -योर १.४४८. ॰पतंग- पु. मावळणारा सूर्य 'तया गीती तेणें उणिव क्षण ये वृद्ध पतंगा ।' -वामन, विराट ८.१२. [सं. पत(तं)ग = सूर्य] ॰परंपरा-स्त्री. १ मागच्या वृद्धवृद्ध माणसांकडून चालत अलेली वहिवाट, चाल. २ (ल.) प्रमाणभूत, पूज्य आचार, वर्तन. ॰प्रमदा न्याय-जरठ- तरुणी दांपत्य न्याय, (प्रमदा = अतिशय मदनावेग असलेली स्त्री तिच्यापुढें वृद्ध पुरुष न टिकून त्याची फजिती होते यावरून). 'हे अवहेलना करणारे मात्र कल्पनेचे जड ठरून वृद्धप्रमदा न्यायानें उपहास्य होतात.' -नि ७९. ॰संघ-पु. वयोवृद्ध मंड- ळीची सभा; वडील माणसांचा संघ [सं.] वृद्धाचार-पु. वृद्ध- परंपरेनें चालत आलेली, पूर्वापार वहिवाट, रिवाज; पूर्वजांची, वडील माणसांची अतएव आदरणीय रीत. 'परमामृते भरूनि वाटी । देवकी लावी सुनेच्या वोटीं । पुसे वृद्धाचार गोष्टी । सुने घालीसी पोटीं निजमाये ।' -एरुस्व १८.३८. -एभा १३.१५४. वृद्धा- चारीचे देव-पुअव. जुने देव; कुलदेवता. 'वृद्धाचारीचे पूजिले देव ।' -दावि ३३. [वृद्ध + आचार] वृद्धापकाळ-पु. म्हातारपण; म्हातारपणाचा काळ; वार्धक्य. 'कठिण काळीं वृद्धापकाळीं । सर्व- काळीं अंतकाळी । नामस्मरण असावें.' -दा ४.३.१४. वृद्धाप्य पहा. वृद्धाप्य-न. म्हातारपण. 'मजही वृद्धाप्य आलें । लेंकीं वेगळें घातलें ।' -दा ३.५.३३. -ज्ञा/?/ ७.८६. [वृद्ध + आप्-आप्य?] वृद्धावस्था-स्त्री. म्हातारपण. [वृद्ध + अवस्था] वृद्धि-स्त्री. १ वाढ; विस्तार; प्रमाणाधिक्य; वाढलेली अवस्था (आकार, वय, संपत्ति, दर्जा इ॰ ची). 'रिगे मन्वंतर मनूपुढें । वंशावरी वंशांचे मांडे । जैसी इक्षुवृद्धी कांडेनकांडें । जिंके जेवीं ।' -ज्ञा १५.१२८. २ व्याज; वाढ; (उसाना दिलेला पैसा, धान्य इ॰ ची) वाढी. ३ सोयरे; घरांत कोणी प्रसूत झालें असतां येणारें अशुचित्व. ४ चंद्र व सूर्य यांच्या कलांची वाढ; चढती दशा. ५ सूर्योंदयापूर्वीं सुरू होऊन दुसऱ्या सूर्योदयानंतर संपणारा चांद्रदिवस किंवा तिथि. नक्षत्र, योग यांचें आधिक्य. ६ अंडवृद्धि. ७ (व्या.) अ, इ (ई), उ (ऊ), ऋ यांच्या बद्दल अनुक्रमें आ, ऐ, औ व आर हे वर्ण येणें. ८ -पु. ज्योतिषशास्त्रांतील सत्तावीस योगांपैकीं अकरावा योग. ॰जीविका-स्त्री. व्याजावर किंवा सावकारीच्या धंद्यावर उपजीविका; सावकारी. ॰प्रमाण-न. (गणित, भूमिति श्रेढी) वाढीचें प्रमाण. [सं.] ॰श्राद्ध-न. नांदीश्राद्ध. ॰सूतक- न. सोयेर. सूतक पहा. वृद्धिंगत-वि. वाढीस लागलेलें; प्रगति होत असलेलें; वाढणारें; वृद्धि पावत चाललेलें. वृद्ध्याजीव-पु. सावकारी करणारा; पैसे व्याजानें लावून, वाढीदिढी करून उपजी- विका करणारा माणूस.
म्हैस
स्त्री. १ महिषी; रेड्याची मादी; म्हसरू; म्हस. २ एक प्रकारचा सहा पायांचा माशीपेक्षां मोठ्या आकाराचा व वरचा पृष्ठभाग कठीण असलेला किडा. ३ केळफुलावरील निबर, काळसर रंगाची पारी. पांढऱ्या रंगाच्या पारीस गाय म्हणतात. म्ह॰-मेल्या म्हशीला दहाशेर दूध किंवा बहु दूध. [सं. महिष प्रा. महिस] पाण्यांत म्हैस न बाहेर मोल-म्हैस डबक्यांत बुडून राहिली असतां तिची किंमत ठरविणें. म्हशीवर पाऊस पडणें-बेकिफायतीचे प्रयत्नाबद्दल किंवा निरर्थक झालेल्या हित- कारक गोष्टीबद्दल योजावयाचा शब्द. म्हशीचा प्राणनाथ-पु. रेडा. -वि. (ल.) सुस्त; मस्त. 'तो काय नुसता म्हशीचा प्राणनाथ आहे.' म्हशीनें पाय दिलेलें नाक-न. नकटें किंवा बसकें नाक. म्हैस आटणें-दूध द्यावयाचें बंद होणें; दूध न निघणें. 'गेल्या महिन्यापासून म्हैस आटली आहे.' म्हैस पावल्या- वि. (व.) म्हशीसारखा जड प्रकृतीचा. म्हैस पाहणें-(व.) म्हशीचें दूध काढणें. म्हैस पिळणें-धार काढणें. 'मी म्हैस पिळून येतों.' म्हैस हात पारखते-(व.) म्हैस धार काढ- णाऱ्याचा हात ओळखते. म्हशीचीं शिंगें म्हशीला जड होत नाहींत-मुलें अधिक असली तरी तीं आईंबापाला जड नसतात. म्हशा-पु. १ (व.) रेडा; हल्या; जड, दांडग्या व कुरूप रेड्याबद्दल किंवा इतर पशूबद्दल तुच्छतेनें योजावयाचा शब्द. २-वि. (ल.) रेड्यासारखा धष्ट पुष्ट मतिमंद; म्हशीसारखा जड प्रकृतीचा. ३ सुस्त; दांडगा आणि घाणेरडा अशा इसमाबद्दल योजावयाचा तुच्छतादर्शक शब्द; मूर्ख अरचट मनुष्य. 'कीं म्हशीचें गण्या नाम ।' -नव १८.१७२. [म्हैस] म्हशागुग्गुळ-गुगुळ- पु. १ एक प्रकारचा गुग्गुल. २ (म्हशा किंवा म्हैस) धिप्पाड गलेलठ्ठ व ठोंब्या इसमाबद्दल निर्भत्सनापूर्वक योजावयाचा शब्द. [म्हशा, म्हैस; मशी आणि गुग्गुल] म्हशाबोळ-पु. एक प्रका- रचा बोळ; एक औषधी वनस्पती; एका झाडाच्या चिकापासून हा होतो. याचा रंग काळा असतो. हें औषध गुरांचे पोटदुखीवर चालतें. म्हशासुर-पु. देवीनें मारलेला एक दैत्य; म्हसोबा. [सं. महिषासुर] म्हशी केळें, म्हशेळी, म्हशळें, म्हस- केळें-न. एक जातीचीं मोठीं व जाड केळीं. म्हशीचा खटारा म्हशीचें खोड-म्हशीचें डोबड-पुन. म्हशीबद्दल उपहासानें म्हणतात. म्हशीचें मेळवण-न. (विनोदानें) अव्यवस्थित जेवण; पात्रावर खाद्यपदार्थांची अव्यस्थित रेलचेल. म्हस-स्त्री. (व.) म्हैस; महिषी; म्हसरू; म्हसरूड; म्हसर ह्या शब्दाकरितां म्हैसरूं इ॰ शब्द पहा. [म्हैस] म्हसकी-म्हसक्या-वि. म्हैस राखणारा, चारणारा. म्हसडी, म्हसडें-वि. म्हशीचें कातडें; महिषचर्म. [म्हैस-म्हस-म्हसडी] म्हसर-ढोर; लांब व सापट (म्हशीच्या पाठी प्रमाणें) ह्या अर्थीं नामाशीं सामाजिक शब्दांत म्हैस किंवा म्हस शब्दाचें तुच्छतादर्शक रूप; कंटाळवाणें व न संपणारे लांबलचक. जसे-म्हसरमाळ, म्हसर मैदान, म्हसररान. कधीं कधीं म्हसरभुई व म्हसरजमीन, म्हसरशेत, म्हसरवाट, म्हस- ररस्ता, म्हसर मजल, म्हसरकोस, म्हसरल्ला इ. [एकवचन म्हसरू] म्हसरे-म्हैस टोणगे. म्हसड्या-वि. (व.) म्हशीसारखा जड प्रकृतीचा. म्हसासूर, म्हसोबा-पु. एका असुराचें किंवा दैत्याचें नांव यास देवीनें मारलें. कांहीं हलक्या जातीचे लोक ह्याची पूजा करितात; एक पिशाच्च. [महिष] म्हसोबाला नाहीं बायको व सटवाईला नाहीं दादला. म्हसोबा कोपविणें, पेचविणें- कृष्णानदी तटाकास अक्कलखोप गांवीं म्हसोबा आहे त्याला आपल्या शत्रूचा सूड घेण्याकरितां नारळ फोडणें; देव घालणें म्हैशा-पु. अंगानें मोठा व कुरूप अशा रेड्याबद्दल किंवा इतर नर जातीच्या पशूबद्दल रागानें किंवा उपहासपूर्वक योजावयाचा शब्द. -वि. ज्याचें शरीर पुष्ट असून जो आळशी आहे त्यास निंदेनें म्हणावयाचा शब्द. [म्हैस] म्हैसभादऱ्या-वि. आपल्या कामांचा निपुन नसलेल्या न्हाव्याबद्दल उपहासानें योजावयाचा शब्द; वाईटपणें खाडाखोड करून लिहिणाऱ्या लेखकाबद्दल योज- तात. म्हैसमंगळ-वि. मठ्ठ. म्हैसमाळ-पु. प्रवासामध्यें लवकर न संपणारा मोठा माळ किंवा ओसाड व नापीक जमीन. म्हसर पहा. म्हैसरट, म्हैसरूड, म्हैसर-न. म्हैस किंवा म्हैसा याज- बद्दल तुच्छतादर्शक बनलेली रूपें. म्हैसरूं-न. म्हैस शब्दाचे नर किंवा मादी वगैरे भेद लक्षात न घेतां लाडिकपणानें योजावयाचा शब्द. म्हैसवा-पु. (महानु.)एक प्रकारचा पाषाण. 'कीं आव्हाटी म्हैसवा थर । नव्हतां दुष्टी गोचरु ।' -ऋ ४८. म्हैसवल-स्त्री. एक झुडुप. म्हैसा-पु. टोणगा; रेडा (हा शब्द मराठींत विशेष रुळलेला नाहीं.) रांड-भांड म्हैसा बिघडे तो होय कैसा? (हिदी म्हण) 'नको देऊं म्हैसा ।' -प्रला. म्हैसासुर-पु. एक पिशाच्च; क्षुद्रदेवता. 'म्हैसासुर मलिकार्जुन ।' -दावि ६३. [महिषासुर] म्हैसिक-वि. म्हशीचा. म्हैसोबा-म्हसोबा. 'मुंज्या झोटिंग करणी । म्हैसोबाची'
राखण
स्त्रीन. (कों.) १ राखणें; ठेवणें; रक्षण करणें. २ रक्षक म्हणुन ठेवलेला मनुष्य; रखावाली. 'राखण वायसें राह- वेना ।' -एभा १३.४७४. ३ रक्षकाचें, रखवालदाराचें वेतन. ४ पिशाचादि उपद्रवापासून आपलें रक्षण व्हावें म्हणुन ग्रामदेवतेस प्रतिमासीं किंवा प्रतिवर्षी अर्पण केलेला नारळ; बळी. ५ भुतें, उंदीर, टोळ इ॰ कांच्या उपद्रवापासून मनुष्यें, प्राणी, शेतें इ॰ कांना मंत्र, तंत्र, मानता इ॰ उपायांनीं मुक्त करून सुरक्षित ठेवण्याची क्रिया; भूतादिकांचा बंदोबस्त करणें. (क्रि॰ लावणें; करणें; लागणें). ६ (क्व.) पूर्ण अभाव होऊं नये म्हणून घरांत राखून ठेवलेलें अल्प- स्वल्प धान्यादि खाद्य पदार्थाचें परिमाण; घर म्हणून ठेवलेला पदार्थ. 'सगळे दाणे खर्चूं नका, घरांत राखण म्हणून दोन पायली तरी राखून ठेवा.' ७ (माळवाप्रांत) अतिशय कुरूपतेमुळें व अक्राळविक्राळपणामुळें घराचें व त्यांतील स्त्रियांचें चेटकापासून रक्षण करण्यास समर्थ म्हणून मानलेली स्त्री. -न. ब्राह्मणांत प्रसूती- नंतर तिसर्या दिवशीं, सुईण बाळंतिणीच्या खोलींतील एक कोनाडा सारवून, रांगोळी काढून, त्यांत वर गंधाचीं बोटें ओढलेलें व आंत पैसा, सुपारी टाकलेलें जें मडकें ठेवते तें; किंवा बाळं- तिणीच्या दहा दिवसांत तिच्या जेवणाच्या वेळीं तिच्या खोलींत, निखारा व त्यावर थोडा भात टाकून ठेवलेलें मडकें. याच मड- क्यांत प्रत्येक जेवणाच्या वेळीं असा निखारा व भात टाकतात. [सं. रक्षण] (वाप्र.) ॰लागणें-उपद्रव न होईल असा बंदो- बस्त करणें. 'या खिस्तीचे एकदां रुपये भरले म्हणजे चार महि- न्यांची राखण लागली.' सामाशब्द- ॰करी-दार, राखणा, राखणाई(इ)त, राखणार-पु. १ रखावालदार; पहारेकरी. २ गुराखी. 'जरी राखणाइत सहपरीवारी ।' -विउ ९.७६. 'माली- काच मी तो राखणार ।' -दावि ४५९. म्ह॰ राखण्यानें गुरें टाकलीं म्हणून धनी टाकील काय ? राखणावळ-स्त्री. १ गुरा- ख्याची मजुरी, वेतन. २ राखणें; रक्षण करणें; काळजी घेणें. [राखणें] राखणी-स्त्री. राखणे; संभाळणें; ठेवणें; बाळगणें इ॰ [राखणें] राखणें-सक्ति. १ रक्षणें; रक्षण करणें; रखवाली करणें; खबरदारी घेणें; अपकारापासून वांचविण्याकरितां आपल्या ताब्यांत घेणें. 'काढूनि राखे प्राणु ।' -ज्ञा १६.१४३. २ ठेवणें; उरविणें; पुढच्या काळाकरितां किंवा कांहों उद्देशानें ठेवून देणें. 'त्या रानां- तील गवत यंदा राखलें आहे.' ३ खर्चल्याशिवाय ठेवणें (सामर्थ्य, जोर). 'जोर-हात राखला.' 'टोला-घाव-मार-राखला.' ४ चोरून ठेवणें; पोटांत किंवा मनांत ठेवणें. 'तुझ्या मनांत असेल तें सारें बोल. कांहीं राखूं नको.' ५ एखाद्या पदार्थावर ओघानें एखादी क्रिया करणें प्राप्त झालें असतां ती न करितां, तो पदार्थ तसाच ठेवणें; आहे त्या स्थितींत राहूं देणें. 'कोनाडयाची जागा तेवढी राख आणि अवघी भिंत सारीव.' ६ करणें; ठेवणें; एखादा पदार्थ स्थित्यंतर न पावूं देतां ठेवणें; बनविणें व कायम करणें. 'ही भिंत फार रुंद राखली म्हणून जागा अडली.' 'हा अंगरखा त्वां आंखूड राखलास म्हणून शोभत नाहीं.' ७ स्त्रीनें पुरुषास किंवा पुरु- षानें स्त्रीस उपभोगार्थ बाळगणें; ठेवणें. ८ ठेंवणें; धरणें; पाळणें; हेळसांड, अवज्ञा न करणें; एका बाजूस पडूं न देणें. ९ व्यवस्थित, योग्य स्थितींत ठेवणें. १० पालन करणें; न ढळणें (वचन; आज्ञा; प्रतिज्ञा). [सं. रक्षण; रक्ष्; प्रा. रक्ख; पं. रक्खण; सिं. रखणु; हिं. रखना, राखना; गुज. राखवुं; बं. राखिवा; फ्रेजि. रख; पोर्तुजि. अरखना = रक्षक] म्ह॰ राखील त्याचें घर, खणेल त्याचें शेत. राख- णेकरी-पु. राखणदार; राखणकरी पहा. राखण्या-पु. (राजा.) गुरें राखणारा; गुराखी. राखले-स्त्री. हुंडी विकत घेणाराची स्थिति, पेशा, अधिकार, पत दर्शक योजाक्याचा शब्द. 'त्या हूंडीमध्यें माझी राखले घातली होती.' [राखणें (गुजराथींतून आलेला शब्द)] राखवळ-स्त्री. (प्र.) राखणावळ; राखण्या- बद्दल मजूरी, वेतन.
वज्र
पुन. १ इंद्राचें आयुध; (सामा.) अमोघ शस्त्र. २ हिरा. 'माणिक मोती प्रवाळ । पाचि वैडूर्य वज्र नीळ ।' -दा ८. ६.३४.३ वीज; विद्युत्. ४ वज्रतुंड पहा. -पु. १ सत्तावीस योगां- पैकीं पंधरावा. २ जाज्वल्य, दहशत बसविणारा माणूस (योद्धा, शास्त्री). हा शब्द पहिल्या पदीं येऊन पुष्कळ समास होतात कांहींचे अर्थ पुढें दिले आहेत. ॰आंगठी-स्त्री. त्रिकोनाकृति कोंदणांत हिरा व तीन कोनांवर तीन रत्नें बसविलेली अशी आंगठी. -देहु ४९. ॰कपाट-न. वज्राचें, हिऱ्याचें कवाड, दार. 'मुक्तिचे वज्रकपाट । कामीनि हे ।' -भाए ७५६. कवच-न. वज्राचें, वज्रासारखें अभेद्य चिलखत. 'जैसें वज्रकवच लेइजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे ।' -ज्ञा २.१३२; -एभा १५.७. ॰कीट-पु. खवल्या मांजर. ॰कीटकी-स्त्री. (महानु.) एक रोग-जंतु. 'कव्हणा एका अंताचीए सवडी वज्रकीटकी लागली असे ।' -दृष्टांत- पाठ २. ॰कृत-वि. घट्ट; घट्ट बसेल असें केलेलें. ॰गर्भ-स्त्री. एक प्रकारची भिकबाळी. (बं.) गिमडा. -देहु ४५. ॰गांठ-स्त्री. पक्की, न सुटणारी गांठ. 'कर्माच्या वज्रगांटीं । कळासे तो ।' -ज्ञा १८.३९२. ॰घात-पु. १ वज्राचा प्रहार, तडाखा. २ (ल.) मोठा आपत्ति; नुकसान; संकट. ॰चुडेदानचुडेदान पहा. -ह ११.१३७. ॰चूडेमंडित-वि. १ हिऱ्याच्या कंकणांनीं विभूषित, शोभायमान असलेले (हात); 'वजचूडेमंडित हस्त । अवतार मुद्रा दाही झळकत ।' -ह २७.८०. २ पत्रांतून सुवासिनी स्त्रियांस लिहावयाचा मायना. अक्षय टिकणारे चुडे हातांत असणारी; (ल.) अखंड सौभाग्यवती. ॰जिव्ह-वि. खोंचदार, कडक भाषा वापरणारा. ॰जिव्हा-स्त्री. खोंचदार, कडक भाषण. ॰टीक-टीका- स्त्री. स्त्रियांचा गळ्यांतील एक दागिना. ॰तडक-पु. वीज. -ख्रिपु. ॰तुंड-पु. वज्राचा एक जातीचा दगड. स्फटिक, चंद्रकांत आणि अभ्रक या पदार्थांच्या कणांच्या अनियमित मिश्रणानें हा झालेला असतो. (इं.) ग्रॅनाईट. ॰देह-पु. वजाप्रमाणें अभेद्य, बळकट शरीर; रोगरहित, ताकदवान शरीर. ॰देही-वि. असें शरीर अस- लेला; फार बलाढ्य. ॰द्रोह-पु. दीर्घकालचा व फार तीव्र असा द्वेष. ॰द्रोही-वि. हाडवैरी. ॰धर-पु. इंद्र. ॰धार-वि. तीक्ष्ण धार असलेलें; तिखट (शस्त्र). नाद-निर्घोष-पु. विजेचा कड- कडाट. ॰पंजर-पु. (वज्राचा पिंजरा) दुर्भेद्य किल्ला, आश्रयस्थान; निर्भय आसरा. 'तरि शरणांगतां वज्रपंजर । तेहिं कां म्हणवावें ।' -भाए ६१४. -तुगा ७०६. ॰पथ्य-न. फार अवघड, कठिण पथ्य. ॰परीक्षा-स्त्री. १ हिऱ्यांची परीक्षा. २ (ल.) कठिण कसोटी; फार अवघड तपासणी. ॰पाणि-पु. इंद्र. 'कृपा भाकिता जाहला वज्रपाणी ।' ॰पात-पु. १ वज्रायुधाचा प्रहार. २ वीज कोसळणें; पडणें. ॰पाणी-वि. मोठा पातकी. -एभा २७.४९४. ॰प्रयोग- पु. १ फार अवघड प्रयोग, उपाय. २ मांत्रिक जादूगाराचा विशिष्ट मंत्रप्रयोग. ॰प्रहार-पु. वज्रपात पहा. ॰प्रायवि. १ वज्रासा- रखा कठीण (पदार्थ). २ वज्रासारखा अमोघ आघात असणारा (बाण, मुष्टि इ॰). ३ अतिशय वजनदार, खंडण करण्यास अव- घड (मुद्दा). ४ झोंबणारें; मर्मभेदी; हृदयांत सलेल असें (भाषण, इ॰). ॰बटू-पु. एक झाड. -न. त्याचें फळ. बजरबटू पहा. ॰बाण-वि. वज्रासारखे घातक बाण असलेला. ॰बुद्धि-स्त्री. १ खंबीर मन. २ उत्कृष्ट ग्रहणशक्ति. विशेषणासारखाहि उपयोग. ॰मणि-पु. हिरा. ॰मय-वि. १ वज्राचा, हिऱ्याचा केलेला. २ अतिशय कठीण. ॰महाग-वि. अतिशय महाग. ॰महागाई- स्त्री. अतिशयित, भरमसाट महागाई. ॰महाग्या-वि. अतिशय महाग विकणारा. ॰माला-स्त्री. हिऱ्याची माळ. ॰मिठी-स्त्री. फार घट्ट मिठी. 'मग तोंडा कां वज्रमिठी पाडिजे ।' -ज्ञा ७. १५२. ॰मुष्टि-पु. मल्लाचें एक आयुध. हें मुठीला लावतात. -स्त्रीपु. लोखंडासारखी, कठीण मूठ. २ (बडोदें) एक खेळ. -खाला ८०. ३ लुतीचा कांदा. सरण पहां. -वि. १ लोखंडासारखी मारक मूठ असलेली. 'मी वज्रमुष्टि... ।' -स्वयंवर. २ वज्रमुष्टि हत्यारानें लढणारा, हत्यार वापरणारा. ॰मूठ-स्त्री. वज्रमुष्टि पहा. ॰मूली- मूळ-स्त्री, एक झुडूप; रानउडीद. ॰योग-पु. वज्रासन; हट- योग. 'एक वज्रयोग क्रमें । सर्वाहार संयमें ।' -ज्ञा ४.१४७. ॰लेप-पु. १ चुन्यामध्यें कात, गूळ इ॰ सरंजाम घातल्यामुळें दृढता आलेला चुना. २ अशा चुन्याचा दगड इ॰ वर करतात तो लेप. ३ (ल.) अक्षयता; अविनाशता; चिरंतनपणा (वचन, निश्चय, संस्था इ॰ चा). याअर्थी विशेषणासारखा उपयोग; पक्कें; काययचें; स्थिर; अभंग. 'महापापां प्रायश्चित्तविधान । वज्रलेप पूर्ण गुरुवाक्यावज्ञा ।' -भाराबाल ११.२७९. ४ (महानु.) दृढता आणणारा पदार्थ. 'ना तो संशृतीसि ताठ । वज्रलेप ।' -ऋ ११. ॰लेप होणें-पक्कें, कायम होणें. 'आमच्या आजे सासुबाई एकदां कोणाचें नांव घ्यावयाचें नाहीं असें म्हणाल्या कीं मग तें वज्रलेप झालेंच समजावें !' -पकोघे. ॰वाट-स्त्री. (महानु.) वज्राचें वेष्टण. 'काळ लोहें डवरिलें । वज्रवाटीं बांधिलें ।' -शिशु. [सं. वज्र + वृत्त; प्रा. वट्ट] ॰वाणी-स्त्री. कठोर, झोंबणारें भाषण. -वि. असें भाषण करणारा. ॰वीर्य-न. वानराचें वीर्य (शुक्र). हें इतकें उष्ण असतें म्हणतात कीं त्यामुळें दगडहि उलतात. -वि. १ अमोघ, पराक्रमी वीर्याचा (माणूस-ज्याचीं मुलें फार सशक्त आहेत अशा- बद्दल. हें विशेषण योजतात). २ उत्साही; पराक्रमी; निश्चयी; सहनशील; ताकदवान इ॰. ॰शरीर-न. वज्रदेह पहा. ॰शरीरी- वि. वज्रदेही. ॰शलाका-स्त्री. घरावर वीज पडूं नये म्हणून लावतात ती तार. ॰शील-(व.) वरिष्ठ; वरचढ. 'सगळ्या कार- कुनांत तो वज्रशील होऊन बसला.' ॰संकल्प-पु. न फिरणारा निश्चय; दृढनिश्चय. ॰संकल्प-पी-वि. फार दृढनिश्चयी. ॰सांखळ-ळी-स्त्री. अभेद्य, अखंड्य कोटिक्रम. 'तार्किकां- चिया वज्रसांखळा ।' -शिशु २५. ॰हस्त-वि. वज्राप्रमाणें कठीण हाताचा. ॰हस्तेंक्रिवि. फार जोरानें. 'तों मुकुंदरायें काय केलें । वेताचे छडीस पडताळिलें । मारिते जाहले वज्रहस्तें ।' -संवि २०.११६. ॰हृदय-यी-वि. १ कठोर अंतःकरणाचा; अति निर्दय. २ अति निग्रही; निधड्या छातीचा. ॰क्षार-पु. एक औषधी क्षार. मीठ, सेंधेलोण, पादेलोण, टाकणखार, बागडखार, जवखार, सज्जीखार, या खारांचें विशिष्ट कृतीचें केलेलें औषध. वज्रांगी-स्त्री. चिलखत; कवच. 'वज्रांगी लेइला तैशी प्रलयमेघांची ।' -शिशु १००१. -ज्ञा ६.४७५. [वज्र + अंग] वज्राग्नि-पु. १ मूलबंधापासून उत्पन्न होणारी उष्णता; वज्रासनरूप अग्नि. -ज्ञा १२.५०. २ विद्युल्लताग्नि; विजेचा अग्नि. 'वज्राग्नी- चिया जाळीं । करूनि सप्तधातूंची होळी ।' -ज्ञा ११.३७७. [वज्र + अग्नि] वज्राघात-पु. १ वीज पडणें. 'शिरिं वज्राघातचि गमला ।' -संग्रामगीतें १२. २ (ल.) भयंकर संकट, आपत्ति. [वज्र + आघात] वज्राधिकार-पु. अनेक पिढ्या एका कुटुं- बांत असलेला अधिकार. [वज्र + अधिकार] वज्रानल-पु. वीज; विजेचा लोळ. [वज्र + अनल] वज्रांबट-वि. अतिशय आंबट. [वज्र + आंबट] वज्राभ्यास-पु. गुणाकाराचा एका प्रकार; वज्र- वध. [वज्र + अभ्यास] वज्रावळ, वज्राळें-स्त्री. न. एका वेलीच्या बियांची, मण्यांची केलेली माळ. मुलाला दृष्ट लागूं नये म्हणून ही त्याच्या गळ्यांत बांधतात. [वज्र + आवळी] वज्रासन-न. १ (योग.) एक आसन. मुसलमान नमाज पढावयास बसतात त्याप्रमाणें बसून हात जोडणें. -संयोग ३२०. -एभा ६. १२७. २ मूळबंध; आधारबंध. -ज्ञा ८.४९. ३ स्थिर, दृढ- आसन (जसें घोड्यावर). ४ (ल.) दृढपणें धारण करणें (अधिकार, सत्ता). [वज्र + आसन] वज्रास्त्र-न. इंद्राचें आयुध; वज्र; विद्युतास्त्र. [वज्र + अस्त्र] वज्राहत-वि. वज्राचा प्रहार ज्यावर झाला आहे असा. [वज्र + आहत] वज्रिका-वि. (संगीत) दहाव्या श्रुतीचें नांव. वज्री-स्त्री. पाय घांसण्यास उपयोगी असा कठीण, खरखरीत दगड, वीट, धातूचा पदार्थ इ॰ -पु. इंद्र. वज्रेश्वरी, वज्राबाई-योगिनी-स्त्री. एक देवता. वज्रोप- चार-पु. कडक उपचार, उपाय. [वज्र + उपचार]
गां(गा)व
पुन. १ वस्तीचें ठिकाण; ग्राम; मौजा; खेडें. २ (व्यापक) नगर; शहर. ३ गांवातील वस्ती; समाज. 'यंदा दंग्यामुळें कितीक गांव पळून गेलें.' ४ आश्रय. ५ (दोन गांवांमधील अंतरावरून) चार कोस; योजन; चार ते नऊ मैल अंतर. 'मारीचातें प्रभू शत गांवें पुंखसमीरें उडवी' -मोरा १.१९९. हा शब्द कोंकण आणि देशांत पुल्लिंगी व सामान्य- पणें नपुंसकलिंगी योजतात. समासांत-गांव-कुलकर्णी-चांभार- न्हावी-भट इ॰ याप्रमाणें बारा बलुत्यांच्या नांवापूर्वीं गांव हा शब्द लागून सामासिक शब्द होतात व त्या शब्दावरून त्या त्या बलुतेदाराच्या एक वर्षाच्या कामगिरीवरील हक्काचा बोध होतो. [सं. ग्राम; प्रा. गाम; हिं. गु. गाम; सिं. गांउ; फ्रेंजि. गांव; पोर्तुजि. गाऊ] (वाप्र.) (त्या)गांवचा नसणें-दुसर्यावर लोटणें; टाळणें (काम); (त्या) कामाशीं आपला कांहीं अर्था- अर्थी संबंध नाहीं असें दर्शविणें. ॰मारणें-लुटणें; खंडणी बसविणें. 'दौड करून गांव मारूं लागलें' -पया १८८. गांवानांवाची हरकी देणें-सांगणें-(तूं कोठून आलास, तुझें नांव काय आहे सांग इ॰) ज्याच्या अंगात भूतसंचार झाला आहे अशा मनु- ष्यास (भुतास, किंवा झाडास) विचारतात. यावरून पाहुण्यास आपण कोठून आलांत इ॰ नम्रपणें विचारणें. ॰गांवाला जाणें- १ जवळ नसणें. २ (ल.) निरुपयोगी असणें. जसें-'माझे हात कांहीं गांवाला गेले नाहींत' (जवळच आहेत, वेळ आली तर तुला रट्टा मारतील). गांवीं नसणें-पूर्ण अभाव असणें; अज्ञानी असणें; दरकार नसणें; खिजगणतींत नसणें. सामाशब्द- ॰आखरी-क्रिवी. (व.) गांवालगत-शेवटीं-लागून. गांवई- स्त्री. सरकारी जुलुमामुळें आपलें गांव सोडून दुसर्या गांवीं केलेली वस्ती; सरकारी हुकुमाची अमान्यता; सरकारी अटींना प्रति- रोध (सार्यांत सूट, तहकुबी इ॰ मिळविण्यासाठीं गांवचे सर्व लोक हा उपाय अंमलांत आणतात). ॰कंटक-वि.गांवाची पीडा; गांवाला त्रास देणारा. [सं. ग्राम + कंटक] ॰कबुलात-स्त्री. १ (कों.) वहिवाटदार खोतानें गांवांतील जमिनीचा सारा भर- ण्याबाबत दिलेली कबुली. २ गांवांतील गांवकर्यांनीं वहीत किंवा पडीत जमीन कोणती ठेवावी याबद्दल केलेला निश्चय, ठराव. ॰कर पु. १ गांवांतील वृत्तिवंत. -कोंकणी इतिहाससाहित्य लेख ४००. २ (राजा.) गांवच्या शूद्रांतील देवस्कीच्या मानपाना- संबंधातील एक अधिकारी. ३ भूतबाधा नाहींशी करणारा, देवस्की करणारा माणूस; धाडी. -झांमू १०२. ४ गांवचे लोक; रहिवासी; गांवांत घरदार शेताभात असणारा. 'गांवकर म्हणती हो पेटली आग ।' -दावि ३५०. ५ (कु. कों.) पाटील; खोत; पुढारी. ६ (रत्नागिरी) कुणबीवाड्याचा व्यवस्थापक; कुणबी. ॰करी-पु. १ एखाद्या गांवांत ज्याचें घरदार आहें तो त्या गांवचा रहिवासी; गांवांत राहणारा. 'त्या गांवचे सर्व गांवकरी आज देवळाजवळ मिळाले होते.' २ शेतकरी. गांवकी-स्त्री. १ गांवाच्या संबंधीचा हरयेक अधिकार (अमंगल इ॰); गांवचा कारभार. २ गांवसभा; तींत झालेले ठराव. ३ गांवचा विचार; गांवकरी व पुढारी यांनी एकत्र जमून केलेला विचारविनिमय. ४ वतनदारांचा गांवासंबंधाचा परस्पर संबंध व त्यांचा समाईक अंतर्बाह्य व्यवहार. -गांगा १६७ [सं. ग्रामिक] गांवकुटाळ- वि. गांवकुचाळ; गांवांतील निंदक; टवाळ; लोकांची निंदा करणारा. ॰कुठार-वि. १ गांवांतील लोकांवर संकट आणणारा (चहाडी, वाईट कर्म इ॰ करून); गांवभेद्या; कुर्हाडीचा दांडा. २ गांवांतील सामान्य लोक. 'दिल्लींतील वाणी, बकाल, बायका देखील गांवकुठार (हे) लश्करच्या लोकांस मारूं लागलें. ' -भाब १६०. ॰कुंप-कुसूं-कोस-नपु. १ गावाच्या भोंवतालचा तट. २ (ल.) वस्त्राचा (रंगीत) कांठ (धोतरजोडा, शेला इ॰ चा रेशमी, कलाबतूचा). ॰कुळकर्णी-पु. गांवचा वतनदार पिढीजात हिशेबनीस; याच्या उलट देशकुळकर्णी (जिल्हा, प्रांत, यांचा कुळकरणी).॰खर न. गांवाची सीमा, हद्द; सीमाप्रदेश; परिकर. [गांव + आखर] ॰खर्च-पु (जमीनमहसुली) गांवचा (धार्मिक समारंभ, करमणूक इ॰चा) (खर्च; पंडित, गोसावी, फकीर इ॰ स द्रव्य, शिधासामुग्री इ॰ देतात त्याचा खर्च. ॰खातें-न. १ (पोलीस; कुळकर्णी वगैरे गांवकामगार लोक. २ गांवचा हिशेब. ॰खिडकी-स्त्री. गांवकुसवाची दिंडी; हिच्या उलट गांव- वेस (दरवाजा). ॰खुरीस-क्रिवि. गावानजीक; जवळपास. ॰गन्ना-क्रिवि. दर गांवास; प्रत्येक गांवाकडून-गणिक-पासून. 'गांवगन्ना चार रुपये करून द्यावे.' 'गावगन्ना ताकीद करून सर्व लोक बोलावून आणा.' ॰गरॉ-वि. (गो.) गावठी. ॰गाडा- पु. गांवांतील सर्व प्रकारचें (तंटे, प्रकरणें, बाबी इ॰) कामकाज; गांवचा कारभार; गांवकी. (क्रि॰ हांकणें; चालविणें; संभाळणें). ॰गाय-स्त्री. आळशी व गप्पिष्ट स्त्री; नगरभवानी. ॰गांवढें- न. गांवें; खेडीं (व्यापक अर्थीं). ॰गिरी-वि. गांवांत उत्पन्न झालेलें, तयार केलेलें; गांवराणी; गांवठी; याच्या उलट घाटी; तरवटी; बंदरी इ॰. ॰गुंड-गुंडा-पु. १ गांवचा म्होरक्या. २ विद्वानांस आपल्या हुशारीनें (वास्तविक विद्या नसतां) कुंठित करणारा गांवढळ. ३ जादुगारांची मात्रा चालूं न देणारा पंचा- क्षरी; गारुड्यास त्याच्याच विद्येनें जिंकणारा. 'जेवी गारुडी- याचें चेटक उदंड । क्षणें निवारीत गांवगुंड ।' -जै २४.९. ४ गांवांत रिकाम्या उठाठेवी करणारा; त्रासदायक माणूस; मवाली; सोकाजी; फुकट फौजदार; ढंगबाजव्यक्ति; खेळ्या. ॰गुंडकी- स्त्री. १ गांवगुंडाचा कारभार; गांवकी. २ (ल.) फसवेगिरी; लबाडी. ॰गुंडांचा खेळ-पु. पंचाक्षरी किंवा जादूगार यांच्याशीं गांवगुंडांचा चढाओढीचा सामना; मुठीचा खेळ. ॰गोहन-पु. (व.) सबंध गांवांतील गाई एकत्र असलेला कळप. ॰गौर-स्त्री. सबंध गांवांत भटकणारी स्त्री. गांवभवानी. 'पोरीबाळीसुद्धां हिणवून पुरेसें करतील कीं, या गांवगौरीला हें भिकेचें वाण कुणी वाहिलें म्हणुन?' -पुण्यप्रभाव ॰घेणी-स्त्री. दरवडा; हल्ला. 'समुद्राचें पाणी सातवा दिसीं करील गांवघेणी ।' -भाए ६९. ॰चलण-णी, गांव चलनी-वि. गांवांत चालणारें (नाणें). ॰चा डोळा-पु. गांवचा वेसकर, महार, जागल्या. ॰चा लोक-पु. गांवांतील कोणी तरी; कोणास ठाऊक नसलेला; परका; अनोळखी. ॰चावडी-स्त्री. गांवांतील सरकारी कामकाजाची जागा; चौकी. ॰जाण्या-वि. गांवदेवतेस वाहिलेलें (मूल). ॰जेवण- जेवणावळ-भोजन-स्त्रीन. १ गांवांतील सर्व जातींना घात- लेलें जेवण. २ गांवांतील स्वजातीस दिलेली मेजवानी. म्ह॰ हें गांव- जेवण नव्हे कीं घेतला थाळातांब्या चालला जेवायला (महत्त्वाच्या गोष्टीची थट्टा करणारास उपरोधिकपणें म्हणतात). ॰जोशी- पु. गांवांतील वृत्तिवंत जोसपण करणारा. ॰झाडा-पु. गावां- तील (शेत इ॰) जमीनींचा कुळकर्ण्यानें तयार केलेला वर्णनपर तक्ता; कुलकर्णीदप्तर. ॰झोंड-पु. १ सर्व गांवापासून कर्ज काढून नागविणारा. २ गांवांतील खट्याळ, खाष्ट माणूस; गांवास त्रास देणारा माणूस. ॰ठण-ठण-न. स्त्री. गांवांतील वस्तीची जागा (अस्तित्वांत असलेली किंवा उजाड झालेली); आईपांढर. [सं. ग्राम + स्थान = म. गांव + ठाण] गांवठा-पु. १ गांवचा एक वतनदान. म्ह॰ गांवचा गांवठा गांवीं बळी. २ खेडवळ; गांवढळ गांवठी-ठू-वि. १ गांवचें; स्थानिक. गावगिरी अर्थ १ पहा. 'बाजारी तुपापेक्षां गांवठी तूप नामी.' २ गांवढळ; खेडवळ. ३ (विशेषतः गांवठू) रानटी; खेडवळ (माणूस, चालरीत). ॰गांवठी- वकील-पु. देशी भाषेंत वकिलीची परीक्षा दिलेला माणूस. इंग्रजी न जाणणारा किंवा वकिलीची मोठी परीक्षा न दिलेला साधा मुखत्त्यार वकील. गांवडुकर-पु. डुक्कराची एक जात; गांवांतच राहणारें डुक्कर; याच्या उलट रानडुक्कर. गांवडें-ढें-पु. अनाडीपण; अडाणीपणा. गांवढ(ढा)ळ-गांवढ्या-वि. १ खेड- वळ; मूर्ख; रानवट; अडाणी, 'खंती करिती कर्माची । ते गावंढे गा ।' -ज्ञा ३.१४५. २ खेड्यांत राहणारा; शेतकरी. ॰ढळकर-पु. (गो.) गांवढळ; खेडवळ; शूद्र. गांवढें-न. लहान खेडें, गांव; शेतकर्यांची वाडी; शेतवाडी; 'मला माझें गावर्डेच बरें.' -इसाप- नीति (छत्रे) [सं. ग्रामटिक प्रा. गामड] गांवढेकर-वि. खेडवळ; गांवढ्या. 'तेथें कोणी गांवढेकर कुणबी बसला होता.' -नि १४९. गांवढेकरी-पु. खेड्यांत राहणारा माणूस; गांवकरी. गांवढें गांव-पुन. वाडी; पाडा; खेडें; निवळ शेतकरी राहतात तें गांव. म्ह॰-गांवढे गांवांत गाढवी सवाशीण (गाढवी बद्दल गांवठी असा पाठभेद) = लहान गांवांत क्षुद्र माणसासहि महत्त्व येतें. ॰थळ-न. गांवठण पहा. [सं. ग्राम + स्थल] ॰था-वि. गांवढळ. -शर. ॰दर-री-स्त्री. गांवांच्या लगतची जागा. 'आतांशीं वाघ रात्रीचा गांवदरीस येत असतो.' ॰देवता-देवी-स्त्री. गांवची संरक्षक देवता; ग्रामदेवता. [सं. ग्राम + देवता] ॰धणें-न. गांवचीं गुरें. -शर. [गांव + धन?] गांवधें-न. १ वाडी; खेडें; गांवढें पहा. २ दुसर्या खेड्यांतील कामकाज. 'मला गांवधें उपस्थित झालें.' गांवधोंड-स्त्री. १ गांवावर बसविलेली जबरदस्त खंडणी. २ (सामा.) गांवावर आलेलें संकठ, अरिष्ट. [गांव + धोंडा] ॰निसबत इनाम-न. निरनिराळ्या प्रासंगिक खर्चाकरितां किंवा सरकारी खर्चाकरितां काढिलेल्या सार्वजनिक कर्जाच्या फेडीकरितां गांवकर्यांनीं गहाण ठेवलेली जमीन. ॰निसबत मिरास-स्त्री. जिचा मालकीहक्क सर्व गांवकर्यांकडे मिळून आहे अशी जमीन. ॰नेमणूक-स्त्री. गांवखर्चाकरितां तोडून दिलेला पैका. ॰पडीत-न. गांवांतील बिन लागवडीची, पडीत जमीन. ॰पण-(गो.) ग्रामसभा; गांवकी. 'गांवपण मांडलिया वायसें ।' -सिसं ८.१५७. ॰पाणोठा-था-पु. गांवची नदी- तळ्यावरील पाणी भरण्याची जागा. ॰पाहणी-स्त्री. गांवांतील पीक किंवा शेतजमीन यांची पाटलानें केलेली पाहणी, मोजणी; (सामा.) गांवाची सर्वदृष्टीनें पाहणी. ॰बंदी-वि. गांवांत वस्ती करून असलेला (फिरस्ता नव्हे). ॰बैल-पु. (पोळ्याच्या दिवशींचा) पाटलाचा बैल; हा सर्व बैलांच्या पुढें असतो; हा पाट- लाचा एक मान आहे. ॰महार-पु. (बिगारी इ॰च्या) गांवच्या चाकरीवर असलेला वतनदार महार. ॰मामा-पु. गांवांतील शहाणा माणूस; गांवकर्यांवर चरितार्थ चालविणारा व सर्वांशीं मिळूनमिस- ळून असणारा माणूस (उपहासात्मक). ॰मावशी-स्त्री. गांवां- तील कुंटीण; (सामा.) वयस्क व स्वैरिणी स्त्री. ॰मुकादम-पुअव. गांवचे सारे श्रेष्ठ वतनदार. -गांगा ४५. ॰मुकादमी-स्त्री. वतनी ग्रामव्यवस्था. ॰मुनसफ-पु. शेतकर्यांचे १० रु. च्या आंतील दावे चालविण्यासाठीं, शेतकी कायद्याप्रमाणें नेमलेला बिनपगारी मुनसफ. -गांगा ७२. ॰मेव्हणी-स्त्री. गांवांतील वेश्या. ॰म्हसन- न. गांवांतील स्मशान. ॰रस-न. गांवांतील घाणेरडें पाणी; लेंडी नाला; लेंडे ओहोळ. 'हां गा गावरसें भरलें । पाणी पाठीं पाय देत आलें ।' -ज्ञा १६.२५. ॰रान-न. १ गांव व त्याच्या आस- पासचा प्रदेश, जमीन. २ गांवची व आसपासची लोकसंख्या. ॰रान-नी-राणी-वि. स्थानिक; गांवठी; घरगुती; रानवट (भाजी, पदार्थ इ॰); याच्या उलट शहरी, पेठी. ॰वर्दळ- स्त्री. गायरानाखेरीज गांवच्या दिमतीस असलेली इतर जमीन. ॰वसाहत-वसात-स्त्री. १ गांवची वसलेली स्थिति, वसती. २ गांवचा वसलेला भाग. ३ गांवची लोकसंख्या. ॰वहीत-न. गांवची लागवडीखालची जमीन. ॰वेस-स्त्री. गांवाच्या तटाचा मोठा दरवाजा. ॰वेसकर-पु. गांवाच्या वेशीवर पहारा करणारा पाळीचा महार; याच्याकडे गांवाचें निकडीचें काम कर- ण्याचें असतें. ॰शाई-स्त्री. खडबडीत चपटें मोतीं, ॰शीव- स्त्रीन. गांव किंवा गांवें (यांना सामान्य संज्ञा); नांवगांव वगैरे माहिती. 'त्याची गांवशीव मला ठाऊक नाहीं.' ॰सई-स्त्री. १ गांवच्या भुताखेतांना दरसाल द्यावयाची ओंवाळणी, बळी (नारळ, कोंबडें इ॰). २ एकूणएक गांववस्ती; गांवकरी; अखिल ग्रामस्थ. ३ भगत सांगेल ते सात किंवा नऊ दिवस गावां- तील यच्चावत् माणसांनीं बाहेर जाऊन राहणें. -बदलापूर ३२०. ॰समाराधना-स्त्री. गांवजेवण पहा. ॰सवाशीण-सवाष्ण- स्त्री. १ (गोंधळ, मोहतूर इ॰ प्रसंगीं) पाटील किंवा चौगुला याच्या बायकोस म्हणतात. २ (ल.) गांवची वेश्या. गांवळी- क्रिवि. गांवोगांव; सर्व गावांतून. 'जेवी निळहारयांची नासे निळी । तो मिथ्यामात उठवी वायकोळी । ते देशीं विस्तारें गांवळी । सांचा सारिखी ।' -ज्ञाप्र ६२७. गांवाची खरवड- स्त्री. गांवास त्रास देणारा, द्वाड माणूस. गांवा-देशानें ओंवा- ळलेला-वि. द्वाड, वाईट म्हणून गांवानें दूर केलेला; कुप्रसिद्ध; गांवाची खरूज (ओवाळणें पहा). गांवांबाहेरचा, गांवा भायला-वि. महार; परवारी. (कु.) गांवाभायला. गावार- न. गांवजेवण गांवीक-वि. (राजा.) सार्वजनिक; गांवचें (शेत, पाणी, खर्च, पट्टी, कधा). गावुंडगो-वि. (गो.) गांवांत राहणारा.
कान
पु. १ श्रोत्र; कर्णेद्रिय; श्रवणेंद्रिय; शरीराच्या ज्या अवयवामुळें आपणास ऐकूं येतें तो अवयव. २ (ल.) कढई, मोदकपात्र किंवा या सारख्या भांडयाच्या कड्या; सामान्यतः कानाच्या आका- राची वस्तु. ३ दागिने घालण्यासाठीं कानाला पाडलेलें भोंक. 'माझा भिकबाळीचा कान बुजला आहे.' ४ बंदुकीचा काना किंवा रंजक; दारू पेटविण्याचें छिद्र; बत्ती लावावयाची जागा. [सं. कर्ण] (वाप्र.) ॰उघडणें-केलेल्या मूर्खपणाचीं कृत्यें समजणें (स्वतःची व दुसर्याचीं); डोळे उघडणें; एखादी गोष्ट स्पष्ट करून दाखविणें; समजूत पटविणें; ॰उघडून सांगणें- बजावून सांगणें; स्पष्ट सूचना देणें. ॰उपटणें, धरणें, पिळणें, पिरगळणें-शिक्षा करण्यासाठीं कान धरून पिळविटणें, ओढणें; शिस्त लावणें. 'त्याला जिंकून जिवंत पकडून त्याचे कान उपटल्या- शिवाय आम्ही राहणार नाहीं.' -बाय २.२. ॰कापणें-कापून हातावर देणें- वरचढ करणें; कडी करणें; वर ताण करणें; मात करणें; फसविणें. 'दुकानदारानें माझा चांगला कान कापला' ॰किटणें-एखादी गोष्ट पुन्हां पुन्हां ऐकविण्यामुळे वीट, कंटाळा येणें. ॰खडा-डी लावणें-सूचना देणें; मनावर ठसेल असें सांगणें. ॰खडी लावून घेणें-स्वतःला शिक्षा लावून घेऊन चुकी सुधारणें. ॰झाडणें- १ स्पष्ट नाकारणें; ऐकून न घेणें; कानावर येऊं न देणें; निषेध करणें. 'स्वर्गा जाणें हें सांडी । भवविषयीं कान झाडी ।' -ज्ञा १३.६१७. २ उपदेश झिडकारणें, न मानणें. ॰टवकारून, पसरून, ऐकणें-लक्ष देणें; पूर्ण लक्ष देऊन ऐकणें. 'भाषण करणार म्हटल्याबरोबर त्यांनीं कान टवकारून पहावें.' के ३१.५.३०. ॰टोचणें-१ कानाला भोंक पाडणें. २ (ल.) फूस देणें; चिथावणें; चढविणें. ३ कानउघाडणी करणें; झाडणें; ताशेरा झाडणें; खरडपट्टी काढणें. (सोनारानें) कान टोचणें-तिर्हाइतानें कानउघाडणी करणें. ॰देणें-लक्ष देणें. 'श्रीरामराजा देतेस कान ।' -दावि ७८०. ॰धरणें-शासन करणें. ॰धरून-पिळून घेणें-वादाची वस्तु बळजबरीनें कब- ज्यांत, ताब्यांत घेणें. ॰निवणें-थंड होणें-बरें वाटणें; आव- डती किंवा जिच्याबद्दल उत्कंठा लागलेली अशी गोष्ट ऐकून संतोष होणें ॰पसरून ऐकणें-पूर्ण लक्ष देऊन ऐकणें (पण कृति न करणें). ॰पाडणें-१ धैर्य सुटणें; निराश होणें. २ आपल्या तांठ्याला आळा बसलासें वाटणें; गरीब बनणें; माघार घेणें. ३ ऐकूं येत नाहीं असें सोंग करणें; काणा डोळा करणें. 'कान पाडुनि बसे धरणीसी ।' -किंगवि २.२०. 'मी ह्याविषयीं कान पाड- णार नाही.' -बाळ २.१५. ॰पिळून घेणें-स्वतःचा मूर्खपणा कळून आल्यामुळें व त्याचे दुष्परिणाम भोगल्यानंतर पुन्हां तसें न वागण्याबद्दल दृढ निश्चय करणें. ॰पूर ओस करून बसणें- बहिर्याचें सोंग घेणें; ऐकूं येत नाहीं असें भासविणें. ॰पूर ओस पडणें-बहिरा होणें. ॰फुंकणें-१ कानांत मंत्र सांगणें; उपदेश देणें. २ चुगली करणें; मनांत भरविणें; चाहाडी, लावालावी करणें. ॰फुटणें-बहिरा होणें (पूर्ण, अर्धवट). ॰भरणें- भारणें-चहाड्या करणें; कानांत सांगणें; चिथविणें. -॰येणें- ऐकण्याची शक्ति येणें. ॰लांबणें-१ वयानें जसेजसें मोठें होते जाईल तसतशी अक्कल कमी होत जाणें (लहान मुलाविषयीं). २ (गाढवाचे कान लांब असतात यावरून) गाढव होणें. ॰होणें- लक्ष देणे; सावध होणें; सावधपणानें वागणें. कानाआड- मागें-वरून- ऊ न जाणें-उपदेश, शिक्षा, ताकीद वगैरेचा एखाद्यावर उपयोग न होणें. -चा चावा घेणें-खोट्या नाट्या गोष्टी सांगून दुसर्याचें मन कलुषित करणें. -चे कानवले होणें-कान वाकडें, (कानोल्याप्रमाणें) पिळवटलेले होणें. -चे किडे झाडणें-१ परनिंदा श्रवणदोषापासून मुक्त करणें; किल्मिष घालविणें; मनांतील गैरसमज, अढी दूर करणें. २ (कानांत किड्यांचा प्रवेश झाला आहे अशा समजुतीनें) बरोबर समजूत पाडणें; हितवाद सांगणें; चांगली खरडपट्टी काढणें. -त खुंट्या मारणें-१ बहिरें होणें. २ पूर्वींचा एक शिक्षेचा प्रकार, 'कानीं खुंट्या आदळिती । अपानीं मेखा मारिती ।' -दा ३.७.७३. -त जपणें-कानांत पुटपुटणें; गुप्त रीतीनें बोलणें, सुचविणें; कानमंत्र देणें; चहाडी करणें. -त तुळशी घालणें-घालून बसणें-१ ऐकूं येत नाहीं असें भासविणें, सोंग करणें. २ माया- पाश झुगारून दिल्याचा आविर्भाव आणणें; उपरति झाल्याचें दाख- विणें; विरक्तीचें सोंग आणणें. -त तेल घालून निजणें-अति- शय दुर्लक्ष करणें; पूर्णपणें उदासीन असणें. -त भरणें-चुगल्या करणें; एखाद्याचें वाईट करण्याविषयीं भरी भरणें. -त भेंड घालणें-(व.) बहिरेपणाचें सोंग घेणें; न ऐंकणे -त वारें भरणें-उच्छृंखल होणें; एखद्या गोष्टीचा पूर्ण विचार न करतां हुरळून जाणें. 'ही गरीब गाय कानांत वारें भरल्यामुळें उधळली आणि सैरवैरा धांवून अखेर चिखलांत रुतली' -सु ६१. (या) कानानें ऐकणें-त्या कानानें-सोडणें-मनांत मुळींच न ठेवणें, राखणें. -पाठीमागें टाकणें-दुर्लक्ष करणें 'फुकटच्या उपदेशा- प्रमाणें त्यांच्या निरोप कानापाठीमागें टाकणार नसाल तर सांगतों' -सु १०५. -बाहेर-वेगळा करणें-दुर्लक्ष करणें; उदासीन राहणें. -मध्यें-त- मंत्र सांगणे, फुकणें-चिथविणें; चेताविणें. -मागें टाकणें १ उपदेश शिकवण, सूचना इ॰ कडे लक्ष न देणें. २ दुर्लक्ष करणें. 'शत्रूचा समाचार अगोदर घेतला पाहिजे. घरचीं भांडणें तूर्त कानामागें टाकलीं पाहिजेत.' -बाजीराव. -ला खडा लावणें-मूर्खपणाचें किंवा दुष्टपणाचें काम पुन्हां न करण्या- विषयीं निश्चय करणें (कानाच्या पाळीच्या मागें खडा लावून दाबण्याचा पूर्वीं शिक्षेचा एक प्रकार होता). -वर (उजव्या डाव्या) पडणें-निजणें-लेटणें एका कुशीकर (डाव्या-उजव्या) निजणें. -वर मान ठेवणें-आळशीपणानें किंवा निष्काळजीपणानें बसणें. -वर येणें-ऐकणें; श्रुत होणें; 'येणार पुढें पुष्कळ आलें आतांचि काय काना तें ।' -भोभीष्म ७.६. -वर हात ठेवणें-त बोटें घालणें,कान-झांकणें-१ एखादी गोष्ट मुळींच माहीत नाहीं अगर तींत आपला बिलकुल संबंध नाहीं असें दाखविणें; नाकारणें; नाकबूल जाणें. २ एखादी मनाविरुद्ध गोष्ट ऐकवत नाहीं म्हणून कानांत बोटें घालणें. 'तो हा वधिला केलें कर्म अमित साधु घातसें मोठें । खोटें हें म्हणतिल शिव शिव कर्णी घालतील बुध बोटें. ।' -मोस्त्री ४.३६. -वरून जाणें १ कान चाटून जाणें; २ (ल.) थोडासा तोटा होणें. ३ ऐकलेलें असणें. -शीं कान लावणें-गुप्त रीतीनें मिळून मसलत, खलबत करणें. -शीं लागणें, कानीं लागणें-कानांत सांगणे; हळूच बोलणें; गुप्त रीतीनें सुचविणें -स कोन न कळूं-न लागूं देणें-अतिशय गुप्तपणा राखणें. 'आणि झाल्यावर सुद्धां कानास कोन लागूं नये ही तर खबर- दारी घेतलीच पाहिजे.' -सु १०.८. -स दट्टे-दडे बसणें- बहिरा होणें. कानीं कपाळीं रडणें-ओरडणें-सदोदित, नेहमीं बुद्धिवाद करीत असणें; नेहमीं, पुन्हां पुन्हा सांगणें. -नीं कोचीं बसणें-लागणें-(चोरून ऐकण्यासाठीं) कानाकोपर्यांत, अड- चणींत बसणें, कानोसा घेणें. -नीं मनीं नसणें-एखाद्याची कल्पना नसणें; कधींच न ऐकलेलें, मनांत नसलेलें ऐकणें. -नीं सात बाळ्या असणें-(लहान मुलांच्या भाषेंत) (ऐकावयाचेंच नाहीं असा निश्चय दाखवावयाचा असतां) ह्या कानाचें ह्या कानास कळूं न देणें; अतिशय गुप्तपणा ठेवणें. म्ह॰ (व.) १ कानाची कोन झाली नाहीं = कुणालाहि कळलें नाहीं. २ कानामागून आलें महालिंग (तिखट) झालें; = मागून आलेला किंवा वयानें लहान असा माणूस जेव्हां वरचढ होतो तेव्हां योजतात. ३ मुढ्या कानाची पण अभिमानाची = अंगांत दोष असून अभिमानयुक्त. ४ (गो.) कान मान हालवप = एखादी गोष्ट करण्यासाठीं उत्सुकता दाखविणें. ५ (गो.) कान फुंक म्हळ्यार व्हान फुंकता = एक सांगि- तल्यावर दुसरेंच करणें. ६ (गो.) कानाचा पोळा आनी पोटाची चिरी वोढता तितली वाढता = संवयीनें संवय वाढते. ७ कान आणि डोळे यांच्यांत चार बोटांचें अंतर = पाहिलेलें व ऐकिलेलें यांत केव्हां केव्हां अंतर असतें, ऐकलेलें तितकें विश्वसनीय नसतें, पुढें खोटें ठरण्याचा संभव असतो. ८ कानामागून आलें शिंगट ते झालें अति तिखट-(कानाच्या नंतर शिंगें उद्भवतात म्हणून) एखादा उपटसुंभ मागून येऊन एकाएकीं मोठ्या पदाला चढला व पहिल्या लोकांना शिकवूं लागला-त्रास देऊं लागला तर त्यास म्हणतात. यावरून कानामागून येणें व तिखट होणें. सामाशब्द-॰आढा-पु. (बैल- गाडी) गाडी उतरणीवर असतां किंवा बैल बेफाम असला तर तो ताब्यांत रहावा म्हणून कासर्यानें बैलाच्या कानाला टाकलेला वेढा. ॰कडी-स्त्री. (लोखंडी काम) कानाच्या आकाराचा पत्रा कापून त्याला जें एक लांबट तोंड ठेवतात तें वळवून त्यांत बसविलेली कडी. अशा दोन बाजूस दोन कड्या असतात. ॰कवडा-पु. कान- खवडा पहा. ॰कळाशी-सी-स्त्री. (घोडा, बैल इ॰ च्या) कानाची व डोक्याची ठेवण, आकार. 'अस्सल जरदी घोडी भिवरथडी वर बसली चांदणी । कानकळाशीं फेरफटक्यामध्यें कोणी तरी दिली आंदणी ।' -पला ४.२१. ॰कात्रा-पु. (गो.) पाण्या- वर तरंगणारा एक लहान मासा. -मसाप ३.३.१५७ -वि. कान कापलेला; कानफाट्या. ॰कारी-स्त्री. (विणकाम) ताणा ताणून धर- णारी एक धनुकली. ॰किरळी-कीड-कुरकुटी-कुरटी-स्त्री. (कों.) कानास होणार एक रोग; कानाची कीड. ॰कुडें-न. कानां- तील कुडें; एक अलंकार. [कर्ण + कुंडल; कण्णकुड्डळ-कानकुडें.] ॰कुलाय-स्त्री. (गो.) कान झाकेपर्यंतचा डोक्यावर घालण्याचा निमुळता टोप. [सं. कर्ण + कुलाया = घर, झांकण] ॰कूण-स्त्री. १ गुणगुण; बाजारगप्प. २ कुजबूज; कुरकूर. ३ तक्रार; कां कूं; अनिश्चित वर्तन. [कान + कुणकुण] ॰कूस-अनिश्चितता; कां कूं; चालढकल; कानकूण अर्थ ३ पहा. [कान + ध्व. कुस्] ॰केस-पुअव. (नुकत्याच विधवा झालेल्या स्त्रीचें) केशवपन करणें व अलंकार काढून घेणें. (क्रि॰ करणें.) ॰कोंडा-वि. १ (आश्रयदाता, उपकारकर्ता, ज्याला आपलीं अंडींपिल्लीं, दोष माहीत आहेत अशा माणसासमोर) लज्जित; मुग्ध; खजिल; कुंठित; ओशाळा; भय- चकित झालेला; मिंधा. 'गुरुज्ञानाचें अंजन नसतां कानकोंडा प्रपंच फोल ।' -अमृत १९. 'ईश्वरी कानकोंडा जाला । कुटुंब- काबाडी ।' -दा ३.४.४७. 'मी कानकोंडा जाहलों दुर्मती ।' -भावि ५५.१०६. २ ऐकूं येत नाहीं असें ढोंग करणारा. -पु. दुर्लक्ष; ऐकूं येत नसल्याचें सोंग. 'तुजविषयीं कानकोंडा करुं काय मी आतां ।' -दावि ८२. [कान + कोंडणें] ॰कोंडा-पु. कानां- तील भुसकट, मळ. ॰कोंडीं-गाडा, कानागाडा-स्त्रीपु. बहिरे- पणाचें सोंग घेणें; दुर्लक्ष करणें; कां कूं करणें; अळंटळं करणें; ऐकण्या न ऐकण्याबद्दल अनिश्चितता. (क्रि॰ करणें). [कान + कोंडा] ॰कोंडा-डी-वाटणें-शरमिंधें होणें, वाटणें. ॰कोंडें-वि. लाजिरवाणें. कानकोंडा-डी पहा. 'ऐसी परस्त्रीची संगत । घडतां जनांत कानकोंडें । -महिकथा २८.१००. -न. १ दुर्लक्ष; 'केली नाही चिंता नामीं कानकोंडें । अंती कोण्या तोंडें जात असे ।' -रामदास (नवनीत पृ. १५२.) २ भिडस्तपणा. 'कानकोंडें साहो नये ।' -दा १४.१.६. ॰कोपरा-पु. वेडावांकडा भाग; कान किंवा कोपरा; पुडें आलेला भाग (शेत, घन पदार्थ इ॰ चा) चतुरस्त्र, वर्तुल इ॰. आकारविरहित जे क्षेत्रादिकांचे अंश असतात तो. ॰कोरणी-णें-कानांतील मळ काढण्याची, पुढें वाटी असलेली धातूची लहानशी काडी; कानमळ काढण्याचें हत्यार. ॰खडी-स्त्री. सूचना; ताकीद. 'मी त्यास कानखडी लावली.' ॰खवडा-पु. वास- रांच्या कानाला होणारा एक रोग; तो नाहींसा होण्यासाठीं वास- राच्या कानांत एक कथलाची बाळी घालतात. ॰खीळ-स्त्री. १ (बैल- गाडी) चाक पडूं नये किंवा जागेवरून मागेंपुढें सरकूं नये म्हणून आंसास घातलेली कडी, कुणी. २ (औत) जेथें दोन शिवळा जोखडास असतात त्यांतील बाहेरील शिवळ. ॰खोरणें-(ना.) कानकोरणी-णें पहा. ॰गच्ची-स्त्री. १ पट्टा अगर वस्त्र यांनीं कान झांकणें, बांधणें. (क्रि॰ करणें; बांधणें). २ खोट्या, अनिष्ट गोष्टी ऐकूं नये म्हणून कानावर हात ठेवणें; आपल्या कानीं सातबाळ्या करणें. (क्रि॰ करणें). [कान + गच्च] ॰गोष्ट- स्त्री. कानांत सांगितलेली गोष्ट; रहस्य; कर्णमैथुन. ॰घसणी- स्त्री. १ कानगोष्ट पहा. २ कुजबूज; आळ. 'जाणोनि कान घसणी हरि चालियेला' -अकक. कृष्ण कौतुक ५४. ॰घुशी-घुसणी-स्त्री. (गोट्यांचा खेळ) हाताच्या बोटांनीं आपला कान धरून त्याच हाताच्या कोपरानें गोटी उडविण्याचा प्रकार. ॰घोण-स्त्री. गोम नांवाचा सरपटणारा किडा; घोण; कर्णजूलिका; कर्णकोटी. हा कानांत शिरतो ॰चा कोन-पु. क्रिवि. कानाच्या कोपर्यांत; अगदीं जवळ; कोठेंहि; किंचित् (ऐकूं न येणें, परिस्फुटता न करणें). 'म्या त्याची लबाडी कानाच्याकोनाला कळूं दिली नाहीं.' 'कानाचाकोन समजला नाहीं.' ॰चिट्-पु. खेळांतील समाईक गडी; राहाट्या. ॰चिपी-स्त्री. १ कानाचा वरचा भाग पिरगळणें; कानपिचकी. (शाळेंतील पंतोजीच्या शिक्षेचा अथवा मुलांच्या खेळांतील शिक्षेचा एक प्रकार). (क्रि॰ घेणें). २ खेळांत लबाडी केल्याबद्दल शिक्षा म्हणून स्वतःचा कान पिरगळून घेणें. (क्रि॰ घालणें.) ॰चिंबळी-(कों.) कानचिपी पहा. (क्रि॰ घेणें. ॰चोर-वि. (गो.) ऐकून न ऐकलेसें करणारा. ॰टाळ- ठाळ-ळी-ळें-ठळ्या-ठाळ्या-टाळीं-ळें-(अव.) (बसणें क्रियापदास जोडून) बधिर होणें; दडे बसणें; कानाचे पडदे बंद होणें. ऐकूं न येणें (थंडी, वारा, मोठा आवाज इ. मुळें). -गलि ३.१७ २ (उघडणें क्रियापदाला जोडून) बहिरेपणा जाणें; ऐकूं येऊं लागणें. ३ समजण्याला, शिकविण्याला योग्य होणें; डोळे उघ- डणें; ताळ्यावर येणें. ४ ताळ्यावर आणणें. [कर्ण + स्थळ] ॰टोपी-पु. कान, कपाळ झांकणारी टोपी; माकडटोपी; कान- पट्टीची टोपी. ॰पट-स्त्री. (व.) कानशील; कानाजवळील गाल व कपाळ यांमधील भाग. ॰पट्टी-स्त्री. १ कानगच्ची अर्थ १ पहा. कान झांकतील अशा तर्हेनें डोक्याला गुंडाळणें. २ कान- पट; कान-शील. 'भाल्याची जखम कानपट्टीस लागली.' -भाब ५७. ॰पिसा-वि. (कों.) कानाचा हलका; भोळ- सर; खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवणारा. ॰पिळा-ळ्या-पु. (लग्नांत) नवर्यामुलीचा भाऊ. नवरीच्या हातांत लाजाहोमाच्या वेळेस लाह्या घालतो व नवरामुलगा त्याचा कान पिळतो, त्या- बद्दल त्याला नवर्यामुलाकडून कानपिळ्याचें अगर कानपिळणीचें पागोटें मिळतें तो मान. ॰फट-ड-स्त्रीन. कानशील; गालफड; कानाच्या पुढील गालाचा प्रदेश (विशेषतः थोबाडींत मारतांना ह्या शब्दाचा उपयोग करतात. जसें-मी तुझें कानफड सुजवीन, फोडीन; कानफडांत मारीन. [सं. कर्ण + फलक] ॰फटा-फाटा- टी-ट्या-डी-पु. नाथपंथ व त्या पंथांतील गोसावी. ह्यांचीं परं- परा आदिनाथापासून आहे. यांच्यांत प्रख्यात असे नऊ नाथ होऊन गेले. हे शैवमतानुयायी आहेत. हे कानाच्या पाळीस मोठें भोंक पाडून त्यांत काचेच्या किंवा लाकडाच्या गोल चकत्या घाल- तात. ह्यांच्या गळ्यांत शिंगी, पुंगी असते. हे किनरीबर गोपीचंद राजाचीं गाणीं म्हणतात. 'व्याघ्रांबर गजचर्मांबर परिधान शुद्ध कानफटा । ' -प्रला ५. [कान + फाट] कानफटा (इ.) नांव पडणें-क्रि. दुर्लौकिक होणें; नांव बद्दू होणें. कानफाट्यांच्या वर्त- नाबद्दल लोक सांशक असतात त्यावरून लोकांत एकदां शंका उत्पन्न झाली कीं ती जात नाहीं. उदा॰ म्ह॰ एकदां कानफाट्या नांव पडलें म्हणजे जन्मभर तें तसेंच राहतें, त्यावरून एकदां दुष्कृत्य केलें म्हणजे त्याचा कलंक जन्मभर राहतो. ॰फुटी-स्त्री. १ एक औषधी वेल. २ (हेट.) कडधान्यांतील एका गवताचें बीं. ॰फुशी- स्त्री. कानगोष्ट; कानांत पुटपुटणें; कुज बूज. ॰फोडी-स्त्री. अजगंधा वनस्पति; तिळवळ. ॰भेरा-भायरा-वि. बहिरट. ॰मंत्र- मंत्री-पुस्त्री. कानांत सांगितलेली गोष्ट; गुप्त मसलत. ॰वडा-वि. १ एका कुशीवर, बाजूवर निजलेला; आडवा झालेला. (क्रि॰ निजणें; पडणें; होणें). 'ना येणेसीं मुख वांकडें । करूनि ठाकाल कान- वडे ।' -ज्ञा १८.१६९३. 'परि ते कानवडि परांमुख निजेली होती ।' -पंच ३.१५. 'कोणी कानवडे निजती -दा १८. ९.७. २ पराङ्मुख. 'दुर दुर जासी निघुन बघुन लगबगुन होसि कां कानवडा ।' -प्रला १६२. -पु. दाराचें झांकण, वस्त्राचा आडपडदा. -शर ॰वडें-क्रिवि. कानवडा पहा. एका कुशीवर, बाजूवर. 'तिएं धारेचेनि दडवादडें । नावेकु मुखचंद्र कानवडें ।' -शिशु ७१२. 'नये अळसे मोडूं अंग । कथे कानवडे ढुंग ।' -तुगा २४१३. ॰वसा-पु. कानोसा; दूरचा शब्द कान देऊन एकाग्रतेनें ऐकण्याची कृति. (क्रि॰ घेणें; लावणें; लावणें) ॰वळ-पु. कानामागें होणारा एक रोग. ॰वळा-वि. कानवडा पहा. (क्रि॰ असणें; निजणें; पडणें). -पु. (पशूच्या) डाव्या कानाखालीं दिलेल्या डागाची रेघ. ॰वळे-पुअव. गालावर आलेले कानाच्या बाह्य अंगावरील केंस. कानवा-व्ह-ळा-पु. कानोसा. (क्रि॰ घेणें; लावणें). ॰विळें-न. (कु.) कानांतील मळ ॰वेणी, कानशीलवेणी-स्त्री. लहान मुलांच्या कानावरील केसांची घातलेली वेणी. ॰वेरी-क्रिवि. कानापर्यंत; कानाविरी. 'जे अनर्थाचे कानवेरी ।' -ज्ञा ९.१८२. ॰शिरा-स्त्रीअव. कानाजवळच्या शिरा. 'कानशिरा दुखतात, धमकतात, उठल्या.' ॰शील-सल-सूल, कानाड-न. १ कानाच्या जवळचा, गाल व कपाळ यांमधील भाग 'कानसुलां भाली । आंगें कूट जालीं ।' -शिशु ९७०. 'घोर जाहली हातफळी । हाणिताती कानसुली । एकमेकां ।' -कथा ५.१७.१४१. 'याच कानसुलीं मारीतसे हाका ।' -तुगा १८०५. २ गालफड; चेहर्याची एक बाजू; कानठाड; कानफट. [कर्णशिरस्] ॰सर-पु. बैलाच्या कान व शिंगाभोंवतीं बांधावयाची रंगीत सुती दोरी. ॰साक्षी-पु. ऐकींव माहिती सांगणारा साक्षीदार. काना-नें आरंभ होणारे सामा- शब्द-कानाकोचा-वि. कानाला कटु, कर्कश, वाईट लागणारें; कर्णकटू (भाषण, इ॰) 'आणि कां कानेंकोचें बोले ।' -तुगा २७३५. ॰कोचा-कोपरा-१ उंचवटे व भेगा. पृष्ठभागीं विष- मता (जागा, वस्तू इ॰ ची). २ (ल.) एकूण एक भाग. 'मी घराचा कानाकोपरा शोधला.' [कान + कोपरा, कोचा] ३ पुढें मागें झालेला, भाग; उंचसखल भाग; गट्टू व खड्डा. कानाकोपर्याचें भाषण- न. गुपचुपीचें भाषण; कुजबूज; गुप्तपणाचें बोलणें; खाजगी, घरगुती बोलणें. -चा आदळ-वि. ज्याच्या पोटांत कोणतीहि गोष्ट राहात नाही असा; बहकणारा; बडबड करणारा. -चा जड- वि. १ अर्धवट बहिरा; बहिरट. २ (ल.) ज्याला सांगून लवकर समजत नाहीं असा. -चा टप्पा-पु. हांकेचे अंतर. -चा तिखट-वि. तीक्ष्ण श्रवणेंद्रियाचा. -चा पडदा-पु. ध्वनीचा आघात होऊन नाद उत्पन्न होणारें कानांतील तंबूर; ध्वनिलहरी ज्यावर आदळल्यामुळें कंप उत्पन्न होऊन ऐकूं येतें तो पातळ पापुदरा. -वर लेखणी ठेवणारा, बाळगणारा-वि. हुषार; वाकबगार कारकून, लेखक यास म्हणतात. -चा हलका-खरी खोटी गोष्ट सांगितली असतां तीवर सहज विश्वास ठेवणारा; चहाडखोराचें खरें मानणारा.
तोंड
न. १ ज्यानें खातां वं बोलतां येतें तो शरीराचा अव- यव; मुख; वदन; तुंड. २ चेहरा; हनुवटीपासून डोक्यापर्यंत मस्तकाचा दर्शनी भाग. ३ (सामा.) (एखाद्या वस्तूचा) दर्शनी भाग; पुढचा-अग्रभाग; समोरील अंग. 'या ओझ्याच्या तोंडीं मात्र चांगल्या चांगल्या पेंढ्या घातल्या आहेत.' ४ (फोड, गळूं इ॰ कांचा) छिद्र पडावयाजोगा, छिद्रासारखा भाग; व्रणाचें मुख. यांतूनच पुढें पू, लस इ॰ वाहतात. ५ (कुपी, तपेली, लोटी इ॰ कांचें) पदार्थ आंत घालावयाचें भोंक; द्वार; मार्ग; मुख. ६ (एखाद्या विषयांत, शास्त्रांत, गांवांत, देशांत, घरांत) शिरकाव होण्याचा मार्ग; प्रवेशद्वार. 'ह्या घराचें तोंड उत्तरेस आहे.' ७ (ल.) गुरुकिल्ली. उदा॰ 'एखाद्या प्रांताचें, देशाचें किल्ला हें तोंड होय.' 'व्याकरण भाषेचें तोंड होय.' ८ (वारा इ॰कांची) दिशा; बाजू. ९ धैर्य; दम; उमेद; एखादें कार्य करण्याविषयींची न्यायतः योग्यता. १० एखाद्या पदार्थाचें ग्रहण किंवा त्या पदार्थाचा एखाद्या कर्याकडे विनियोग इ॰ कांचा आरंभ त्या पदार्थाच्या ज्या भागाकडून करि- तात तो भाग. 'भाकरीस जिकडून म्हटलें तिकडून तोंड आहे.' ११ (युद्ध, वादविवाद इ॰कांसारख्या गोष्टींची) प्रारंभदशा. 'वादास आतां कुठें तोंड लागलें.' १२ (सोनारी धंदा) हातोड्याच्या सगळ्यांत खालच्या बाजूस अडिश्रीच्या बुडासारखा जो भाग असतो तो. यानें ठोकलेला जिन्नस सारखा करून घेतात. १३ (सोनारी धंदा) कांबीस गोल आकार देतांनां तिचीं टोंकें जेथें जुळतात तो भाग. १४ (बुद्धिबळें) डाव सुरू करण्याचा प्रकार; मोहरा. 'वजीराच्या प्याद्याचें तोंड.' [सं. तुंड; प्रा. तोंड] (वाप्र.) ॰आटोपणें, सांभाळणें, आवरणें-जपून बोलणें; बोलण्याला आळा घालणें; अमर्याद भाषण, अभक्ष्यभक्षण यांपासून निवृत्त होणें. ॰आणणें- (आट्यापाट्यांचा खेळ) शेवटची पाटी खेळून जाऊन पुन्हां एक एक खेळत येणें; पाणी आणणें; लोण आणणें. ॰आंबट करणें- (एखाद्यानें) असंतुष्ट, निराशायुक्त मुद्रा धारण करणें. तोंड आहे कीं तोबरा-खादाड किंवा बडबड्या माणसास उद्देशून वापरावयाचा, 'किती खातोस' 'किती बोलतोस' या अर्थाचा वाक्प्रचार. ॰उतरणें-(निराशा, आजार इ॰ कांनीं) चेहरा म्लान होणें, सुकणें, फिका पडणें, निस्तेज होणें. ॰उष्टें करणें-(अन्नाचा) एखादा-दुसरा घांस, एक दोन घांस खाणें; जेवणाचें नुसतें नांव करणें. ॰करणें-बडबड, वटवट, बकबक करणें; उद्धटपणानें, निर्लज्ज- पणानें बोलणें. ॰करून बोलणें-निर्लज्जपणें, आपला (लहान) दर्जा सोडून बोलणें. ॰काळें करणें-(उप.) एखादा ठपका, तोहमत अंगावर आल्यामुळें निघून, पळून, निसटून जाणें; हातावर तुरी देणें; दृष्टीस न पडणें (केव्हां केव्हां तोंड हा शब्द वगळला तरी चालतो. जसें:-त्यांनीं काळें केलें). ॰गोड करणें-१ (एखाद्याला) लांच देणें; खूष करणें. २ मेजवानी देणें; गोड खावयास घालणें. ॰गोरेंमोरें करणें-(कोणी रागें भरल्यामुळें, मनास वाईट वाटल्यामुळें) निराशेची, लाजलेपणाची मुद्रा धारण करणें. ॰घालणें-(दोघे बोलत असतां तिसर्यानें) संबंध नसतां मध्येंच बोलणें. ॰घेऊन येणें-एखाद्यानें एखाद्यावर सोंपविलेलें काम न करतां त्यानें तसेंच परत येणें. 'असें सर्वांनीं न करावें. जो मामलेदार असें करून तोंड घेऊन येईल त्याचें मुखावलोकन न करितां फिरोन सेवा न सांगतां त्यास घरींच बसवावें.' -मराआ २९. ॰घेणें-१ बोंबलत सुटणें; ताशेरा झाडणें; बोंबलपट्टी करणें. २ तोंडांतून लाल गळावी म्हणून पारा इ॰ तोंड आणणारीं औषधें घेणें. तोंड देणें पहा. 'मी वैद्याकडून तोंड घेतलें आहें.' तोंडचा-वि. १ विरुद्ध, उलट दिशेचा; समोरून येणारा (वारा, ऊन, भरती इ॰). २ ज्याची कर्तबगारी केवळ तोंडांतच, बोल- ण्यांतच आहे, क्रियेंत दिसून येत नाहीं असा. 'तोंडचा शिपाई- कारकून-सुग्रण-खबरदार.' ३ तोंडानें सांगितलेला, निवेदन केलेला; तोंडीं केलेला (व्यवहार, हिशेब, पुरावा इ॰). याच्या उलट लेखी. तोंडचा, तोंडींचा घास काढणें-हिरून घेणें-१ (एखा- द्याची) अगदीं आटोक्यांत आलेली वस्तु, पदरीं पडावयास आलेला लाभ हिसकावून घेणें. २ (एखाद्याच्या) अन्नावर पाणी पाडणें; अन्नांत माती कालविणें; पोटावर पाय देणें. तोंडचा-तोंडींचा घांस देणें-(ल.) (एखाद्यास) अतिशय प्रेमानें, ममतेनें वाग- विणें; प्रसंगविशेषीं आपण उपाशी राहून दुसर्यास खावयास देणें. तोंडचा गोड आणि हातचा जड-बोलण्यांत गोड व अघळ- पघळ, पण प्रत्यक्ष पैशाची मदत करण्यांत पूज्य. तोंडचा चतुर- वि. बोलण्यांत पटाईत; वाक्पटु. तोंडचा जार-पु. नुकत्याच जन्मलेल्या मुलाच्या तोंडांतील फेंस; चिकटा; ओंठावरचा जार; जन्मप्रसंगींचा तोंडावरचा पातळ पापुद्रा (विशेषतः तुझ्या, त्याच्या तोंडाचा जार वाळला नाहीं. = तूं, तो अजून केवळ बालक आहेस.' अशा वाक्यांत उपयोग). तोंडचा नीट-वि. १ बोलून भला, चांगला; बोलकाचालका; सौजन्ययुक्त. २ युक्तायुक्त विचार करून बोलणारा. ३ हजरजबाबी; अस्खलित बोलणारा. तोंडचा फटकळ-वि. शिवराळ; उघडतोंड्या; अश्लील, शिवराळ भाषण करणारा. तोंडचा रागीट-वि. जहाल; तिखट; कडक भाषण करणारा. तोंडचा शिनळ-वि. १ इष्कबाज, फंदी म्हणून नांव मिळविण्याची इच्छा करणारा; स्त्रियांची खोटी खुषमस्करी करणारा; स्त्रियांच्या कृपेची खोटीच फुशारकी मारणारा. २ निरर्गल व अश्लील भाषण करणारा; शिवराळ. तोंड(डा)ची गोष्ट-स्त्री. सहजसाध्य, अतिशय सोपी गोष्ट, काम. 'वाघ मारणें तोंडची गोष्ट नव्हे.' तोंड चुकविणें-हातून एखादा अपराध घडला असतां कोणी रागें भरेल या भीतीनें, काम वगैरे टाळण्यासाठीं चुकारतट्टू- पणानें एखाद्यापासून आपलें तोंड लपविणें; दृष्टीस न पडणें; छपून असणें. ॰चे तोंडीं-क्रिवि. प्रत्यक्षाप्रत्यक्ष; तोंडानें; बोला- चालीनें. ॰चे तोंडीं व्यवहार-केवळ तोंडानें बोलून, बोलाचा- लीनें झालेला, होणारा व्यवहार, धंदा. याच्या उलट लेखी व्यव- हार. ॰चें पायचें-न. (कों.) गुरांच्या तोंडास व पायांस होणारा रोग. ॰चे हिशेब-पुअव. कागदांवर आंकडेमोड न करितांमनां- तल्यामनांत कांहीं आडाख्यांच्या; मदतीनें करावयाचे हिशेब. तोंडचें तोंडावरचें पाणी पळणें; उडणें, तोंड कोरडें पडणें-१ (भीतीमुळें) चेहरा फिका पडणें; बावरून,घाबरून जाणें. २ (भीति इ॰ कांमुळें) तोंडांतील ओलावा नाहींसा होणें. तोंड टाकणें-टाकून बोलणें-१ (क्रोधावेशानें) अप शब्दांचा वर्षाव करणें; निर्भर्त्सना करून बोलणें; खरडपट्टी काढणें; अद्वातद्वा बोलणें. 'तूं नोकर-माणसांवर उगीच तोंड टाकलेंस.' २ (घोडा इ॰ जनावरानें) चावण्यासाठीं तोंड पुढें करणें. 'ह्या घोड्याला तोंड टाकण्याची भारी खोड आहे, ती घालविली पाहिजे.' ॰ठेचणारा-फाडणारा-वि. (एखाद्या) उद्धट, बडबड्या माण- सास गप्प बसविण्याची हातोटी ज्यास साधली आहे असा; उद्दामपणानें, गर्वानें बोलणार्या व्यक्तीस रोखठोक उत्तर देऊन चूप बसविणारा. [तोंड + ठेचणें] ॰तोडणें-(ना.) एखादी वस्तु मिळ- विण्याकरितां एखाद्याच्या पाठीस लागणें; त्याच्यापुढें तोंड वेंगा- डणें. ॰दाबणें-लांचलुचपत देऊन (एखाद्याचें) तोंड बंद करणें; (एखाद्यास) वश करणें; गप्प करणें. ॰दाबणारा-वि. लांच देऊन (एखाद्या) प्रतिकूल व्यक्तीस वळविणारा; गप्प बसविणारा. [तोंड + दाबणें = बंद करणें] ॰दाबी-स्त्री. (एखाद्यानें) गुप्त बातमी फोडूं नये म्हणून, प्रतिकूल बोलूं नये म्हणून (त्यास) लांच देऊन त्याचें तोंड दाबण्याची, वश करण्याची क्रिया. 'तो गांवकाम- गारांची तोंडदाबी करतो.' -गुजा २१. [तोंड + दाबणें = बंद करणें] ॰दिसणें-एखाद्याची केलेली निर्त्भर्त्सना दुसरी बाजू न कळतां लोकांच्या नजरेस येणें व आपणच वाईट ठरणें (पण ज्याची निर्भर्त्सना केली असेल त्याचें वर्तन सुधारण्याची आशा नसणें ). 'मी तुला रागें भरलों म्हणजे माझें तोंड मात्र दिसेल, पण तूं आपला आहे तसाच राहणार.' ॰देणें- १ पारा वगैरे देऊन तोंडाच्या आंतील त्वचा सुजविण; तोंड आणविणें. 'वैद्य- बोवा म्हणाले कीं त्याला तोंड दिलें आहे.' २ सैन्याच्या अग्रभागीं राहून शत्रूवर हल्ला करणें. ३ (एखाद्याचा) प्रतिपक्षी होऊन राहणें; लढावयाला सिद्ध होणें. ४ (आट्यापाट्यांचा खेळ शेवटची पाटी खेळून परत येणार्या गड्याकडे पाटी धरणारानें तोंड फिरविणें. ५ एखाद्या गोष्टीला न भितां तींतून धैर्यानें पार पडण्याची तयारी ठेवणें. ॰धरणें-१ अन्नसेवन करण्याची तोंडाची शक्ति आजार वगैरे कारणांमुळें नाहींशी होणें. 'त्याचें तोंड धरलें आहे, त्याला चमच्याचमच्यानें दुध पाजावें लागतें.' २ (एखा- द्याची) बोलण्याची शक्ति नाहींशी करणें. ३ (एखाद्याला आपल्या) तावडींत, कबजांत आणणें. 'मी त्याचें तोंड धरलें आहे, तो आतां काय करणार !' ॰धुवून येणें-(उप.) एखाद्याची विनंति कधींहि मान्य होणार नाहीं असें म्हणून फेटाळून लावतांना योजण्याचा तिरस्कारदर्शक वाक्प्रचार. ॰निपटणें-(आजार, उपवास इ॰ कारणांमुळें एखाद्याचे) गाल खोल जाणें, चेहरा सुकणें. 'महिनाभर हें मूल तापानें आजारी होतें, त्याचें तोंड पहा कसें निपटलें आहे तें.' ॰पडणें-१ सुरवात होणें. 'लढाईस तोंड पडलें.' २ (गळूं इ॰ कांस) छिद्र पडणें; फुटणें; वाहूं लागणें. ॰पसरणें-वेंगाडणें-१ खिन्नपणाची, केविलवाणी मुद्रा धारण करणें. २ हिनदीनपणानें याचना करणें. ॰पाघळणें-१ न बोला- वयाची गोष्ट कोणाएकापाशीं बोलून टाकणें; बडबडणें. २ (ल.) गुप्त गोष्ट बाहेर फोडणें, फुटूं देणें. ॰पाडणें-एखादें कोडें सोड- विण्यास, वेढा फोडण्यास प्रारंभ करणें; भांडणास सुरवात करणें. ॰पाहणें-१ (एखाद्याच्या) आश्रयाची, मदतीची अपेक्षा करून असणें. 'आम्ही पडलों गरीब, म्हणून आम्हांला सावकाराचीं तोंडें पाहण्याची पाळी वारंवार येते.' २ (एखाद्यानें) स्वतःच्या शक्तीचा, कर्तुत्वाचा अजमास करणें. 'तूं असें करीन म्हणतोस, पण आधीं आपलें तोंड पहा !' ३ बोलणाराचें भाषण नुसतें ऐकणें, पण त्यानें सांगितलेलें करावयास किंवा केलेला बोध अनु- सरावयास प्रवृत्त न होतां स्वस्थ बसून राहणें. 'म्हणती हाणा, मारा, पाडा, घ्या, काय पाहतां तोंडा ।' -मोद्रोण ३.१२५. ॰पाहात-बसणें-काय करावें, कसें करावें या विवंचनेंत असणें. ॰पिटणें-बडबड करणें. 'पश्चिमद्वारींचें कवाड । सदा वार्यानें करी खडखड । तैशी न करी बडबड । वृथा तोंड पिटीना ।' -एभा १०.२३१. ॰फिरणें-१ आजारानें, पदार्थाच्या अधिक सेवनानें तोंडाची रुची नाहींशी होणें; तोंड वाईट होणें. २ तोंडांतून शिव्यांचा वर्षाव होऊं लागणें. 'तो रागावला म्हणजे कोणावर त्याचें तोंड फिरेल ह्याचा नेम नाहीं.' ॰फिरविणें-१ तोंडाची चव नाहींशी करणें. २ शिव्यांचा वर्षाव करीत सुटणें. 'तो रागावला म्हणजे तुमच्यावर देखील तोंड फिरवावयाला कचर- णार नाहीं.' ३ वितळत असलेला किंवा तापविला जात अस- लेला धातु इ॰ कानें) रंगामध्यें फरक दाखविणें, रंग पाल- टणें. 'ह्या तांब्यानें अद्याप तोंड फिरविलें नाहीं, आणखी पुष्कळ आंच दिली पाहिजे.' ४ दुसर्याकडे पाहणें; विशिष्ट गोष्टी- कडे लक्ष्य न देतां इतर गोष्टींकडे प्रवृत्ति दाखविणें. ५ गतीची दिशा बदलणें; दुसर्या दिशेला, माघारें वळणें. ॰फुटणें-१ थंडीमुळें तोंडाची बाह्य त्वचा खरखरीत होणें, भेगलणें. २ (एखाद्याची) फजिती उडणें; पत नाहींशी होणें; नाचक्की होणें; अभिमान गलित होण्याजोगा अपमान, शिक्षा इत्यादि होणें. ॰बंद करणें-१ जीभ आवरणें; जपून बोलणें. २ (एखाद्याला) लांच देऊन गप्प बसविणें, वश करून घेणें. ॰बंदावर राखणें- खाण्याला किंवा बोलण्याला आळा घालणें. 'तूं आपलें तोंड बंदावर राखिलें नाहींस तर अजीर्णानें आजारी पडशील.' ॰बांधणें-लांच देऊन (एखाद्याचे) तोंड बंद करणें; (एखाद्यानें) गुप्त गोष्ट फोडूं नये म्हणून पैसे देऊन त्यास गप्प बसविणें. ॰बाहेर काढणें-१ तोंड दाखविणें; राजरोसपणें समाजांत हिंडणें (बहुधां निषेधार्थी प्रयोग). 'तुरुंगांतून सुटून आल्यावर त्यानें आज दोन वर्षांत एकदांहि तोंड बाहेर काढलें नाहीं.' २ फिरण्यासाठीं, कामकाजासाठीं घराबाहेर पडणें. ॰बिघडणें-तोंड बेचव होणें; तोंडास अरुचि उत्पन्न होणें. विटणें. -॰भर-भरून बोलणें- भीड, संकोच, भीति न धरतां मनमोकळेपणानें भरपूर, अघळपघळ बोलणें; दुसर्याचें आणि आपलें समाधान व्हावयाजोगें अघळपघळ बोलणें. ॰भरून साखर घालणें-(एखाद्याचें) तोंड साखरेनें भरणें; (एखाद्याच्या) कामगिरीबद्दल, विजयाबद्दल संतोषादाखल त्याचें तोंड साखरेनें भरणें; (एखाद्याच्या) कामगिरीबद्दल गोड, भरपूर मोबदला देणें. ॰मागणें-(आट्यापाट्यांचा खेळ) लोण घेऊन परत जातांना पाटीवरील गड्यास आपणाकडे तोंड फिर- विण्यास सांगणें. तोंड मागितल्यावर पाटीवरील गडी आपलें तोंड फिरवितो त्यास 'तोंड देणें' म्हणतात. ॰माजणें-१ मिष्टान्न खावयाची चटक लागल्यानें साध्या पदार्थाबद्दल अरुचि उत्पन्न होणें. २ शिव्या देण्याची, फटकळपणानें बोलण्याची खोड लागणें. ॰मातीसारखें-शेणासारखें होणें-(आजारानें) तोंडाची चव नाहींशी होणें; तोंड विटणें, फिरणें; अन्नद्वेष होणें. ॰मिचकणें- दांत, ओंठ खाणें. ॰येणें-१ तोंडाच्या आंतल्या बाजूच्या त्वचेस फोड येऊन ती हुळहुळी होणें व लाळ गळूं लागणें. २ (कर.) लहान मूल बोलूं लागणें. 'आमच्या मुलाला तोंड आलें आहे.' = तो बोलावयास लागला आहे. ॰रंगविणें-१ विडा खाऊन ओंठ तांबडे लाल करून घेणें. २ (ल.) (एखाद्याचें थोबाड) थोबाडींत मारून लाल- भडक करून सोडणें. ॰लागणें-(लढाई, वादविवाद, अंगीकृत कार्य इ॰ कांस) सुरवात होणें. 'तेव्हां युद्धास तोंड लागलें.' -इमं २९०. ॰लावणें-१ (वादविवाद इ॰ कांस) सुरवात करणें. २ प्यावया- साठीं एखादें पेय ओंठाशीं नेणें. ३ ॰वाईट करणें-निराशेची मुद्रा धारण करणें. ॰वाईट होणें-१ तोंडावर निराशेची मुद्रा येणें. २ (ताप इ॰ कांमुळें) तोंडास अरुचि येणें. ॰वांकडें करणें-१ वेडावून दाखविणें. २ नापसंती दर्शविणें. ॰वाजविणें-एकसारखें बोलत सुटणें; निरर्थक बडबड करणें; बकबकणें; वटवट करणें; भांडण करणें. ॰वासणें-१ निराशेनें, दुःखानें तोंड उघडणें व तें बराच वेळ तसेंच ठेवणें. २ याचना करण्यासाठीं तोंड उघडणें, वेंगाडणें. ॰वासून पडणें-शक्तीच्या क्षीणतेमुळें, उत्साह, तेज, वगैरे नष्ट झाल्यामुळें, गतप्राण झाल्यामुळें आ पसरून पडणें. 'तो पडला सिंहनिहमत्तद्विपसाचि तोंड वासून ।' -मोगदा ५.२५. ॰वासून बोलणें-अविचारानें बोलणें. 'ऐसें स्वसख्यांपासीं कां गे वदलीस तोंड वासून ।' -मोउद्योग १३.२०५. ॰विचकणें-दीन मुद्रेनें आणि केविलवाण्या स्वरानें याचना करणें. ॰वेटा(डा)विणें- (काव्य) (एखाद्यास) वेडावून दाखविण्यासाठीं त्याच्यापुढें तोंड वेडेंवाकडें करणें. ॰शेणासारखें पडणें-(लाजिरवाणें कृत्य केल्यानें) तोंड उतरणें; निस्तेज होणें; काळवंडणें. ॰संभाळणें- जपून बोलणें; जीभ आवरणें; भलते सलते शब्द तोंडांतून बाहेर पडूं न देणें; अमर्याद बोलण्यास आळा घालणें. ॰सुटणें- चरांचरां, फडाफडां, अद्वातद्वा बोलूं लागणें. ॰सुरू होणें-बड- बडीला, शिव्यांना सुरवात होणें. ॰सोडणें-१ फडांफडां, अद्वातद्वा बोलूं लागणें; अमर्याद बोलणें. २ आधाशासारखें खात सुटणें; तोंड मोकळें सोडणें. ॰हातीं-हातावर धरणें-तोंडे सोडणें (दोन्ही अर्थीं) पहा. तोंडाचा खट्याळ-फटकळ-फटकाळ-फटकूळ-वाईट-शिनळ-वि. शिवराळ; तोंडाळ; अश्लील बोलणारा. तोंडाचा खबरदार-बहादर-बळकट-वि. बोलण्यांत चतुर, हुषार; बोलण्याची हातोटी ज्याला साधली आहे असा. -तोंडाचा गयाळ, तोंडगयाळ-वि. जिभेचा हलका; चुर- चोंबडा; लुतरा; बडबड्या; ज्याच्या तोंडीं तीळ भिजत नाहीं असा. तोंडाचा गोड-वि. गोड बोलणारा; गोडबोल्या. म्ह॰ तोंडचा गोड हाताचा जड = गोड व अघळपघळ भाषण करणारा पण प्रत्यक्ष कांहींहि मदत, पैसा न देणारा. तोंडाचा जड-वि. रेंगत बोलणारा; फार थोडें बोलणारा; अस्पष्ट भाषण करणारा; तोंडाचा तिखट-वि. खरमरीत, स्पष्ट, झोंबणारें, कठोर भाषण करणारा. तोंडाचा तोफखाना सुटणें-(एखाद्याची) अद्वातद्वा बोल- ण्याची क्रिया सुरू होणें; शिव्यांचा वर्षाव होऊं लागणें. तोंडाचा पट्टा सुटणें-चालणें-अद्वातद्वा बोलणें; शिव्यांचा भडिमार सुरू होणें; तोंडाचा पट्टा सोडणें-(एखाद्यानें) शिव्यांचा भडिमार सुरू करणें; जीभ मोकळी सोडणें; (एखाद्याची) खरडपट्टी आरंभिणें. तोंडाचा पालट-पु. रुचिपालट; तोंडास रुचि येईल असा अन्नांत केलेला फेरबदल; अन्नांतील, खाण्यांतील फरक, बदल. तोंडाचा बोबडा-वि. बोबडें बोलणारा; तोतरा. तोंडाचा मिठा-वि. गोडबोल्या; तोंडाचा गोड पहा. तोंडाचा हलका- वि. चुरचोंबडा; भडभड्या; विचार न करितां बोलणारा; फटकळ. तोंडाचा हुक्का होणें-(व.) तोंड सुकून जाणें. तोंडाची चुंबळ-स्त्री. दुसर्यास वेडावून दाखविण्याकरितां चुंबळीसारखी केलेली ओठांची रचना; वांकडें तोंड. तोंडाची वाफ दघडणें- १ मूर्खास उपदेश करतांना, निरर्थक, निरुपयोगी, निष्फळ भाषण करणें. २ ज्यावर विश्वास बसणार नाहीं असें भाषण करणें; मूर्खपणानें बोलणें; वल्गना करणें; बाता मारणें. (या वाक्प्रचारांत दवडणें बद्दल खरचणें गमविणें, फुकट जाणें, घालविणें, काढणें इ॰ क्रियापदेंहि योजतात). तोंडाचें बोळकें होणें-(म्हातारपणामुळें) तोंडां- तील सर्व दांत पडणें. तोंडाचें सुख-न. तोंडसुख पहा. (वरील सर्व वाक्प्रचारांत तोंडाचा या शब्दाऐवजीं तोंडचा हा शब्दहि वापरतात). तोंडांत खाणें, मारून घेणें-१ गालांत चपराक खाणें; मार मिळणें. २ पराभूत होणें; हार जाणें. ३ फजिती झाल्या- नंतर शहाणपणा शिकणें; नुकसान सोसून धडा शिकणें; बोध मिळविणें. तोंडांत जडणें-थोबाडींत, गालांत बसणें (चपराक, थप्पड इ॰). तोंडांत तीळभर न राहणें-अगदीं क्षुद्र अशी गुप्त गोष्टहि पोटांत न ठरणें; कोणतीहि लहानसहान गोष्ट गुप्त ठेवूं न शकणें. तोंडांत तोंड घालणें-१ (ल.) प्रेम, मैत्री इ॰कांच्या भावानें वागणें; मोठ्या प्रेमाचा, मित्रपणाचा आविर्भाव आणून वागणें. २ एकमेकांचें चुंबन घेणें. तोंडांत देणें-(एखाद्याच्या) थोबाडींत मारणें; गालांत चपराक मारणें; तोंडांत बोट घालणें-(ल.) आश्चर्यचकित, थक्क होणें; विस्मय पावणें. तोंडांत भडकावणें-तोंडांत देणें पहा. तोंडांत माती घालणें-खाण्यास अन्न नसणें; अतिशय हाल, कष्ट सोसावे लागणें. तोंडांत माती पडणें-१ (एखाद्याची) उपा समार होणें. २ मरणें. तोंडात शेण घालणें-(एखाद्याची) फजिती करणें; (एखाद्यास) नांवें ठेवणें; खरडपट्टी काढणें. तोंडांत साखर असणें-(गो.) (एखाद्याचें) तोंड, वाणी गोड असणें; गोड बोलत असणें. तोंडांत साखर घालणें-१ तोंड भरून साखर घालणें पहा. २ (उप.) तोंडांत शेण घालणें. 'सावित्री- बाईच्या तोंडांत लोक जेव्हां फारच साखर घालीत, तेव्हां तिनें दोन तीन जुनेरीं एकत्र शिवून जानकीबाईला द्यावी.' -रंगराव. तोंडांत साखर पडणें-(एखाद्याला) आनंदाचा प्रसंग, दिवस येणें. तोंडांतून ब्र काढणें-(तोंडांतून) अधिक-उणें अक्षर काढणें, उच्चारणें. 'आंतल्याआंत चूर होऊन मेलें पाहिजे, तोंडां- तून ब्र काढण्याची सोय नाहीं.' -विकारविलसित. तोंडानें पाप भरणें, तोंडें पाप घेणें-लोकांचीं पातकें उच्चारणें; लोकांचे दोष बोलून दाखविणें; वाईट बोलण्याची हौस यथेच्छ पुरवून घेणें; लोकांचीं पापें उच्चारून जिव्हा विटाळणें. 'कैसीं वो मानुसें । सपाइनि परंवंसें । तोंडे पाप घेती कांइसें । वायां वीण ।' -शिशु २१६. तोंडापुढें-क्रिवि. अगदीं जिव्हाग्रीं; मुखोद्गत. तोंडा- पुरता, तोंडावर गोड-वि. मधुर पण खोटें बोलणारा; दुतोंड्या; वरवर गोड बोलणारा व आंतून कपटी असलेला; उघडपणें प्रिय भाषण करणारा व मनांत निराळेच असणारा. ताडापुरता मांडा-पु. १ भूक भागेल एवढीच पोळी. २ (ल.) जेमतेम गरज भागेल एवढाच जरूर त्या वस्तूचा पुरवठा. तोंडार मारप- (गो.) (एखाद्याच्या) पदरांत चूक बांधणें; वरमण्यासारखें उत्तर देणें. तोंडार ल्हायो उडप-(गो.) फार जलद, अस्ख- लित बोलणें; लाह्या फुटणें. तोंडाला काळोखी आणणें- लावणें-बेअब्रू, नापत करणें. तोंडाला टांकी दिलेली असणें-देवीच्या खोल वणांनीं तोंड भरलेलें असणें; तोंडावर देवीचे वण फार असणें. तोंडाला पाणी सुटणें-(एखादी वस्तु पाहून तिच्यासंबंधीं) मोह उत्पन्न होणें; हांव सुटणें. तोंडाला पानें पुसणें-फसविणें; चकविणें; छकविणें; भोळसाविणें; भोंदणें; तोंडा- वरून हात फिरविणें. 'त्याच्यावर देखरेख करावयाला चार माणसें होतीं, पण त्यानें सर्वांच्या तोंडाला पानें पुसून आपला डाव साधला.' तोंडाला फांटा फुटणें-मूळ मुद्दा सोडून भलतेंच बोलत सुटणें; हवें तसें अमर्याद भाषण करूं लागणें. तोंडावर-क्रिवि. १ समक्ष; डोळ्यांदेखत. २ (ल.) निर्भयपणें; भीड न धरतां. 'मी त्याच्या तोंडावर त्याला लुच्चा म्हणण्यास भिणार नाहीं.' तोंडावर तुकडा टाकणें-(एखाद्यानें) गप्प बसावें, प्रतिकूल बोलूं नये म्हणून त्याला थोडेसें कांहीं देणें. तोंडावर-ला-तोंड देणें-१ (एखाद्यास) विरोध करणें; विरुद्ध बोलणें. २ (एखाद्यास) उद्धटपणानें, अविनयानें, दांडगेपणानें उत्तर देणें; उत्तरास प्रत्युत्तर देणें. तोंडा- वर तोंड पडणें-दोघांची गांठ पडून संभाषण, बोलाचाल होणें. तोंडावर थुंकणें-(एखाद्याची) निर्भर्त्सना, छीःथू करणें; धिक्कार करणें. तोंडावर देणें-तोंडांत देणें पहा. 'काय भीड याची द्या कीं तोंडावरी ।' -दावि ३०२. तोंडावर नक्षत्र पडणें-(एखाद्यानें) तोंडाळपणा करणें; शिवराळ असणें; नेहमीं अपशब्दांनीं तोंड भर- लेलें असणें. 'ह्याजकरिकां तोंडावर नक्षंत्र पडलेल्या पोरास म्या बोलविलें म्हणून हे मला शब्द लावीत नाहींत.' -बाळ २.१४२. तोंडावर पडप-(गो.) थोबाडींत (चपराक) बसणें, पडणें. तोंडावर पदर येणें-१ वैधव्य प्राप्त होणें. 'तिच्या तोंडावर पदर आला म्हणून ती बाहेर पडत नाहीं.' २ लज्जेनें तोंड लपविण्या- जोगी स्थिति होणें. तोंडावर मारणें-(एखाद्याला) पराभूत करणें. तोंडावर सांगणें-बोलणें-(एखाद्याच्या) समक्ष, निर्भीडपणें, बेडरपणें सांगणें, बोलणें. तोंडावरून-तोंडावर हात फिर- विणें-(एखाद्यास) गोड बोलून, फूसलावून, भुलथाप देऊन फस- विणें; भोंदणें; छकविणें. तोंडाशीं तोंड देणें-(हलक्या दर्जाच्या व्यक्तीनें वरिष्ठाशीं) आपला दर्जा विसरून, बरोबरीच्या नात्यानें, अविनयानें बोलणें, व्यवहार करणें. तोंडास काळोखी-स्त्री. मुखसंकोच; ओशाळगत; गोंधळून गेल्याची स्थिति; बेअब्रू; कलंक. तोंडास काळोखी, काजळी लागणें-(एखाद्याची) बेअब्रू, नाचक्की होणें; दुष्कीर्ति होणें; नांवाला कलंक लागणें. तोंडास काळोखी-काजळी लावणें-(एखाद्याचें) नांव कलंकित करणें; बेअब्रू करणें. 'सुनेनें माझ्या तोंडाला काळोखी लावली.' तोंडास कुत्रें बांधलेलें असणें-ताळतंत्र सोडून, अद्वातद्वा, अपशब्द बोलणें; शिव्या देणें. 'त्यानें तर जसें तोंडाला कुत्रेंच बांधलें आहे.' तोंडास खीळ घालणें-निग्रहपूर्वक, हट्टानें मौन धारण करणें. तोंडास तोंड-न. वादविवाद; वाग्युद्ध; हमरी- तुमरी; धसाफसी. -क्रिवि. समक्षासमक्ष; समोरासमोर; प्रत्यक्ष. तोंडास तोंड देणें-१ तोंडाशीं तोंड देणें पहा. २ मार्मिकपणें, खरमरीतपणें उत्तर देणें. तोंडास पाणी सुटणें-(एखाद्या- वस्तूबद्दल, गोष्टीबद्दल) लोभ, मोह उत्पन्न होणें; तोंडाला पाणी सुटणें पहा. 'पोर्तुगीज लोकांची बढती पाहून तिकडच्या दुसर्या साहसी लोकांच्या तोंडास पाणी सुटलें.' -बाजी. तोंडास तोंड न दिसणें-(पहांटेस) तोंड न ओळखतां येण्याइतका अंधेर असणें (झुंजमुंजु पहाटेविषयीं वर्णन करितांना हा वाक्प्रचार योजतात). 'अद्याप चांगलें उजाडलें नाहीं, तोंडास तोंड दिसत नाहीं.' तोंडास-तोंडीं बसणें-(श्लोक, शब्द इ॰) स्पष्ट, बिन- चूक, भरभर म्हणण्याइतका पाठ होणें. 'तो श्लोक दहा वेळां पुस्तकांत पाहून म्हण, म्हणजे तो तुझ्या तोंडीं बसेल.' तोंडास येईल तें बोलणें-विचार न करितां, भरमसाटपणानें वाटेल तें बोलणें; अद्वातद्वा, अपशब्द बोलणें. तोंडास-तोंडीं लागणें- १ (एखाद्याच्या) तोंडास तोंड देणें; उलट उत्तरें देणें. २ हुज्जत घालणें; वादविवाद करण्यास तयार होणें. (एखाद्याच्या) तोंडा- समोर-क्रिवि. १ (एखाद्याच्या) समक्ष; समोर; डोळ्यांदेखत. २ अगदीं मुखोद्गत; जिव्हाग्रीं. तोंडापुढें पहा. 'हा श्लोक माझ्या अगदीं तोंडासमोर आहे.' तोंडास हळद लागणें-(एखाद्यास) दोष देणें, नापसंती दर्शविणें अशा अर्थीं हा वाक्प्रचार योजितात. तोंडासारखा-वि. (एखाद्याची) खुशामत, स्तुति इ॰ होईल अशा प्रकारचा; एखाद्याच्या खुशामतीकरितां त्याच्या मतास जुळता. तोंडासारखें बोलणें-(एखाद्याची) स्तुति, खुशामत करण्या- करितां त्याच्याच मताची, म्हणण्याची री ओढणें; त्याचें मन न दुखवेल असें बोलणें. तोंडीं आणणें-देणें-(रोग्यास) लाळ गळण्याचें, तोंड येण्याचें औषध देऊन तोंड आणणें. तोंडीं- काढणें-१ ओकारी देणें; वांती होणें. २ (एखाद्यास त्यानें) केलेले उपकार बोलून दाखवून टोमणा मारणें. तोंडीं खीळ पडणें- तोंड बंद होणें; गप्प बसणें भाग पडणें. 'अवघ्या कोल्यांचें मर्म अंडीं । धरितां तोंडीं खीळ पडे ।' तोंडीं घास येणें-(एखा- द्यास) घांसभर अन्न मिळणें; चरितार्थाचें साधन मिळणें; पोटा पाण्याची व्यवस्था होणें. तोंडीं तीळ न भिजणें-१ (तापानें, संतापून ओरडण्यानें, रडण्यानें) तोंड शुष्क होणें, कोरडें पडणें. २ एखादी गुप्त गोष्ट मनांत न राहणें, बोलून टाकणें; तोंडीं तृण धरणें-(एखाद्यानें) शरण आलों. असें कबूल करणें; शरणागत होणें; हार जाणें (दांतीं तृण धरणें असाहि प्रयोग रूढ आहे). तोंडीं देणें-(एखाद्यास एहाद्या माणसाच्या, कठिण कार्याच्या) सपाट्यांत, तडाख्यांत, जबड्यांत, तावडींत लोटणें, देणें; हाल, दुःख सोसण्यास (एखाद्यास) पुढें करणें. तोंडीं-तोंडास पान- पानें पुसणें-(एखाद्यास) छकविणें; लुबाडणें; भोंदणें; अपेक्षित लाभ होऊं न देणें; स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेऊन दुसर्यास तोंड पहावयास लावणें. 'त्यानें आपल्या नळीचें वर्हाड केलें आणि सर्वांच्या तोंडीं पान पुसलें.' तोंडीं माती घालणें- (एखाद्यानें) अतिशय दुःखाकुल, शोकाकुल होणें. 'ऊर, माथा बडवून, तोंडीं माती घालूं लागली' -भाव ७५. तोंडीं येऊन बुडणें-नासणें-(एखादी वस्तु, पीक इ॰) अगदीं परिपक्वदशेस, परिणतावस्थेस येऊन, ऐन भरांत येऊन, नाहींशीं होणें, वाईट होणें. तोंडीं येणें-१ (पारा इ॰ औषधानें) तोंड येणें. २ ऐन भरांत, परिपक्व दशेस, पूर्णावस्थेस येणें. तोंडीं-रक्त, रगत लागणें-१ वाघ इ॰ हिंस्त्र पशूला माणसाच्या रक्ताची चटक लागून तो माणसावर टपून बसणें. २ (ल.) लांच-लुचपत खाण्याची चटक लागणें. तोंडीं लागणें-(एखाद्यास एखाद्या वस्तूची, खाद्याची चव प्रथमच कळून त्या वस्तूची त्यास) चटक लागणें; आवड उत्पन्न होणें. 'ह्याच्या तोंडीं भात लागला म्हणून यास भाकर आवडत नाहीं.' तोंडीं लागणें-१ (एखाद्याच्या) तोंडास तोंड देणें; उद्धटपणानें, आपला दर्जा विसरून उलट जबाब देणें. २ हुज्जत घालणें; वादविवादास प्रवृत्त होणें; तोंडास लागणें पहा. 'सुज्ञ आहेत ते दूषकांच्या तोंडीं लागत नसतात.' -नि. ३ (युद्ध, भांडण, इ॰कांच्या) आणीबाणीच्या ठिकाणीं, आघाडीस, अग्रभागीं असणें. तोंडीं लावणें-न. जेवतांना तोंडास रुचि आणणारा भाजी, चटणी इ॰ सारखा मधून मधून खावयाचा चमचमीत पदार्थ. तोंडीं लावणें-१ जेवतांना भाजी, चटणी इ॰ चम- चमीत पदार्थानें रुचिपालट करणें. 'आज तोंडीं लावावयाला भाजीबिजी कांहीं केली नाहीं काय ?' २ विसारादाखल पैसे देणें. तोंडें मागितलेली किंमत-स्त्री. (एखाद्या वस्तूची) दुकान- दारानें सांगितलेली व झिगझिग वगैरे न करितां गिर्हाइकानें दिलेली किंमत. तोंडें मानलेला-मानला-वि. (तोंडच्या) शब्दानें, वचनानें मानलेला (बाप, भाऊ, मुलगा इ॰); धर्माचा, पुण्याचा पहा. तोंडें वांकडीं करणें-वेडावून दाखविणें; वेडावणें. लहान तोंडीं मोठा घांस घेणें-१ (एखाद्यानें) आपल्या आवांक्या- बाहेरचें काम हातीं घेणें. २ (वडील, वरिष्ठ माणसांसमोर) न शोभेल असें, मर्यादा सोडून, बेअदबीनें बोलणें; वडील माणसांस शहाणपण शिकविणें. जळो तुझें तोंड-(बायकी भाषेंत) एक शिवी. स्त्रिया रागानें ही शिवी उपयोगांत आणतात. म्ह॰ १ तोंड बांधून (दाबून) बुक्कयांचा मार = एखाद्याचा विनाकारण छळ होऊन त्यास त्याविरुद्ध तक्रार करतां न येणें; एखाद्यास अन्यायानें वाग- वून त्याविरुद्ध त्यानें कागाळी केल्यास त्यास बेगुमानपणें शिक्षा करणें. 'बायकांचा जन्म म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार, म्हण- तात तें अक्षरशः खरें आहे.' -पकोघे २ (गो.) तोंडाच्या बाता घरा बाईल भीक मागता = बाहेर मोठमोठया गप्पा मारतो पण घरीं बायको भीक मागते. सामाशब्द- तोंड उष्ट-न. एखादा-दुसरा घांस खाणें; केवळ अन्न तोंडास लावणें; तोंड खरकटें करणें. [तोंड + उष्टें] ॰ओळख-स्त्री. परस्परांचा विशेष परिचय नसतां, चेहरा पाहू- नच हा अमुक आहे असें समजण्याजोगी ओळख; (एखाद्याची) चेहरेपट्टी लक्षांत राहून तीवरूनच त्याला ओळखतां येणें; नांव वगैरे कांहीं माहीत नसून (एखाद्याचा) केवळ तोंडावळाच ओळ- खीचा असणें. 'एखाद्याला वाटेल कीं बाळासाहेबांशीं त्याची तोंड- ओळखच आहे.' -इंप ३७. ॰कडी-स्त्री. १ आंतील तुळयांचीं तोंडें बाहेर भिंतींतील ज्या तुळईवर ठेवतात, ती सलग तुळई. २ कौलारू छपराचे वासे ज्या सलग तुळईवर टेकतात ती छपराच्या शेवटीं, टोंकास असलेली तुळई. ३ गुरांचें दावें जिला बांधतात ती कडी. ४ (सोनारी धंदा) दागिन्याची शेवटची कडी, नाकें; ज्यांत फांसा इ॰ अडकवितात ती (सरी इ॰ सारख्या दागिन्याची) टोंकाची, तोंडाची कडी; (जव्याच्या) मण्याच्या वगैरे तोंडाशीं ठेवलेली कडी. ५ (जमाखर्चाच्या वहींतील जमा आणि खर्च या दोहोंबाजूंचा मेळ. हा मेळ = = = अशा दुलांगीनें, (दुहेरी रेषेनें) दाखविण्याचा प्रघात आहे. 'वहीची खात्याची-तारखेची-तोंडकडी' असा शब्दप्रयोग करितात. (क्रि॰ मिळणें; जुळणें; येणें; उतरणें; चुकणें; बंद होणें). [तोंड + कडी] ॰कळा-स्त्री. चेहर्यावरील तजेला; कांति; तेज; टवटवी. (प्र.) मुखकळा. [तोंड + कळा = तेज] ॰काढप-(गो.) उपदंश झालेल्या रोग्यास एक प्रकारचें औषध देऊन त्याच्या तोंडांतून लाळ वाहवितात तो प्रकार. ह्या औषधानें तोंड बरेंच सुजतें. [तोंड + गो. काढप = काढणें] ॰खुरी- स्त्री. (ना.) गुरांचा एक रोग. ॰खोडी-वि. तोंडाळ; टाकून बोलणारा; तोंड टाकणारा; अशी संवय असलेला. 'परम अधम रुक्मी हा महा तोंडखोडी ।' -सारुह ३.७८. [तोंड + खोड = वाईट संवय] ॰घडण-स्त्री तोंडाची ठेवण; चेहरेपट्टी; तोंडवळां. 'या मुलाची बापासारखी तोंडघडण आहे.' [तोंड + घडण = रचना] ॰घशीं- सीं-क्रिवि. १ जमीनीवर पडून तोंड घासलें जाईल, फुटेल अशा रीतीनें. (क्रि॰ पडणें; पाडणें; देणें). 'तो तोंडघसींच पडे करतां दंतप्रहार बहु रागें ।' -मो. २. (आश्रय तुटल्यानें) गोत्यांत; पेचांत; अडचणींत; फजिती होईल अशा तर्हेनें; फशीं (पडणें). [तोंड + घासणें] ॰घशी देणें-दुसरा तोंडघशीं पडे असें करणें. ॰चाट्या-वि. खुशामत करणारा; थुंकी झेलणारा; तोंडासारखें बोलणारा. ॰चाळा-पु. १ तोंड वेडेंवाकडें करून वेडावण्याची क्रिया. २ वात इ॰कांच्या लहरीनें होणारी तोंडाची हालचाल, चाळा. ॰चुकाऊ-वू-व्या, तोंडचुकारू-चुकव्या-वि. (काम इ॰ कांच्या भीतीनें) दृष्टि चुकविणारा; तोंड लपविणारा; नजरेस न पडे असा. [तोंड + चुकविणें] ॰चुकावणी-स्त्री. (एखाद्यापासून) तोंड लपविण्याची, स्वतःस छपविण्याची क्रिया. ॰जबानी-स्त्री. तोंडानें सांगितलेली हकीगत, दिलेली साक्ष, पुरावा. -क्रिवि तोंडी, तोंडानें. [तोंड + फा. झबान्] ॰जाब-पु. तोंडी जबाब. ॰झाडणी-स्त्री. तिरस्कारपूर्ण उद्गारांनीं झिडकारणें; खडका- वणें; खरडपट्टी काढणें. ॰देखणा-ला-वि. आपल्या अंतःकरणांत तसा भाव नसून दुसर्याचें मन राखण्याकरितां त्याला रुचेल असा केलेला (व्यवहार, भाषण, गो इ॰); खुशामतीचा; तोंडासारखा; तोंडपुजपणाचा. 'प्राणनाथ, मला हीं तोंडदेखणीं बोलणीं आव- डत नाहींत.' -पारिभौ ३५. [तोंड + देखणें = पाहणें] ॰देखली गोष्ट-स्त्री.दुसर्याची मर्जी राखण्याकरितां केलेलें, खुशामतीचें भाषण. ॰निरोप-पु. तोंडी सांगितलेला निरोप. 'कृष्णास ते हळुच तोंडनिरोप सांगे ।' -सारुह ४.९. ॰पट्टा-पु. (बायकी). तोंडाचा तोफखाना; अपशब्दांचा भडिमार; संतापानें, जोराजोरानें बेबंदपणें बोलणें. [तोंड + पट्टा = तलवार] ॰पट्टी-स्त्री. (शिवणकाम) तोंडाला शिवलेला पट्टी. 'योग्य तेवढी तोंडपट्टी कातरावी.' -काप्र. १४. ॰पाटिलकी-स्त्री. १ आपण कांहीं न करतां बसल्या जागे- वरून लुडबुडेपणानें दुसर्यांना हुकुमवजा गोष्टी, कामें सांगणें (पाटलाला बसल्या जागेवरून अनेक कामें हुकुम सोडून करून घ्यावीं लागतात त्यावरून). २ (उप.) लुडबुडेपणाची वटवट, बडबड; तोंडाळपणा. 'दुसरें कांहीं न झालें तरी नुसती तोंडपाटिलकी करण्यास कांहीं हरकत नाहीं.' -आगर ३.६१. [तोंड + पाटिलकी = पाटलाचें काम] ॰पाठ-वि. पुस्तकाच्या सहाय्यावांचून केवळ तोंडांनें म्हणतां येण्यासारखा; मुखोद्गत [तोंड + पाट = पठण केलेलें] ॰पालटपुस्त्री. १ (अरुचि घालविण्याकरितां केलेला) अन्नांतील फेरबदल. २ अन्नांत फेरबदल करून अरुचि घालविण्याची क्रिया. [तोंड + पालट = बदल] ॰पिटी-स्त्री. १ (वडील, गुरु इ॰ कांची) आज्ञा न मानतां तिचें औचित्य इ॰ कासंबंधीं केलेली वाटाघाट; (वडिलांशीं, गुरूंशीं) उद्धटपणानें वाद घालणें; उलट उत्तर देणें; प्रश्न इ॰ विचारून अडवणूक करणें. 'गुरूंसी करिती तोंडपिटी ।' -विपू १.५७. २ (दगडोबास शिकविण्याकरितां, विसराळू माणसास पुन्हां पुन्हां बजाविण्याकरितां, थिल्लर जनावरास हांकलण्याकरितां करावी लागणारी) व्यर्थ बडबड, कटकट, वटवट. [तोंड + पिटणें] ॰प्रचिती-प्रचीति-स्त्री. खुशामत करण्याकरितां (एखाद्याच्या) व्यक्तिमाहात्म्यास, भाषणास, अस्तित्वास मान देणें; आदर दाख- विणें. [तोंड + प्रचीति] ॰प्रचीतक्रिवि. १ तोंडासारखें; खुशामतीचें; तोंडापुरतें (भाषण, वर्तन इ॰ करणें) २ माणूस ओळखून, पाहून; माणसामाणसांत तारतम्य ठेवून (बोलणें, चालणें, वागणें). ॰प्रचीत बोलणारा-चालणारा-वागणारा-वि. माणसामाणसांत तारतम्य ठेवून चालणारा, बोलणारा, वागणारा. ॰फटालकी -फटालीस्त्री. तोंडाची निरर्थक बडबड, वटवट, टकळी. [तोंड + ध्व. फटां ! द्वि.] ॰फटाला-ल्या-वि. मूर्खपणानें कांहीं तरी बड बडणारा; बकणारा; वटवट करणारा. [तोंड + ध्व. फटां !] ॰फट्याळ-वि. तोंडाचा फटकळ; शिवराळ; तोंडाळ; बातेफरास; अंगीं कर्तृत्व नसून लंब्या लंब्या बाता झोंकणारा. ॰फट्याळी- स्त्री. शिवराळपणा; तोंडाळपणा; वावदूकता. [तोंडफट्याळ] ॰बडबड्या-बडव्या-वि. निरर्थक वटवट, बडबड करणारा: बकबकणांरा टकळी चालविणारा. ॰बंद -बांधणी-पुस्त्री. गाडीच्या चाकाच्या तुंब्यावरील बाहेरील बाजूचें लोखंडी कडें, पट्टी. आंतील बाजूच्या कड्यास कटबंद असें म्हणतात. [तोंड + बंद = बांधणी] ॰बळ-न. वक्तृत्वशक्ति; वाक्पटुता; वाक्चातुर्य. 'आंगबळ न चांगबळ देरे देवा तोंडबळ.' ॰बळाचा-वि. ज्याला बोलण्याची हातोटी, वक्तृत्कला साधली आहें असा; तोंडबळ अस- लेला; भाषणपटु जबेफरास. ॰बाग-स्त्री. (राजा.) चेहरेपट्टी; चेहर्याची ठेवण, घडण; मुखवटा. ॰बांधणी-स्त्री. १ तोंडबंद पहा. २ (ढोरांचा धंदा) कातड्याच्या मोटेच्या सोंडेच्या टोंकाकरितां बाजूला शिवलेला गोट. ॰भडभड्या-वि. तोंडास येईल तें बड- बडत, बकत सुटणारा; बोलण्याची, बडबडण्याची हुक्की, इसळी ज्यास येते असा; भडभडून बोलणारा. ॰भर-वि. तोंडास येईल तेवढा; भरपूर. 'हॅमिल्टन यांनीं खर्चवाढीबद्दल तोंडभर मगणी केली होती.' -केले १.१९८. ॰मार-स्त्री. १ रोग्यावर लाद- लेला खाद्यपेयांचा निर्बंध, पथ्य. २ एखाद्यास बोलण्याकरितां तोंड उघडूं न देणें; भाषणबंदी. ३ (ल.) (एखाद्याच्या) आशा, आकांक्षा फोल ठरविणें; (एखाद्याचा केलेला) आशाभंग; मनोभंग; निराशा. (क्रि॰ करणें). ॰मारा-पु. १ शेतीच्या कामाच्या वेळीं पिकांत वगैरें काम करतांना गुरांच्या तोंडाला जाळी, मुंगसें, मुसकें बांधणें. २ (एखाद्यास केलेली) भाषणबंदी; खाद्यपेयांचा निर्बंध. ३ (प्र.) तोंडमार. तोंडमार अर्थ ३ पहा. ॰मिळवणी- स्त्री, १ जमा आणि खर्च यांचा मेळ; तोंडें मिळविण्यासाठीं मांडलेला जमाखर्च. २ ऋणको व धनको यांच्यांतील हिशेबाची बेबाकी, पूज्य. ३ मेळ. -शर. ॰मिळवणी खातें- (जमाखर्च) कच्चें खातें (याचें देणें येणें सालअखेर पुरें करून खुद्द खात्यांत जिरवितात). ॰लपव्या-वि. तोंड लपविणारा; छपून राहणारा; दडी मारून बसणारा. ॰लाग-पु. शिंगें असलेल्या जनावरांच्या तोंडास होणारा रोग; यांत लाळ गळत असते. ॰वळख-स्त्री (प्र.) तोंडओळख पहा. ॰वळण-वळा-नपु. चेहरा; चर्या; मुद्रा; चेहर्याची घडण, ठेवण; रूपरेखा; चेहरामोहरा; चेहरेपट्टी; मुखाकृति; मुखवटा. [तोंड + वळ = रचना] ॰वीख-न. (ल.) तोंडानें ओकलेलें, तोंडां- तून निघालेलें, विषारी, वाईट भाषण, बोलणें. [तोंड + विष] ॰शिनळ, शिंदळ-वि. अचकटविचटक, बीभत्स बोलणारा; केवळ तोंडानें शिनळकी करणारा. ॰शेवळें-न. मुंडावळ. -बदलापूर २७७. [तोंड + शेवळें = शेवाळें] ॰सर-क्रिवि. तुडुंब; तोंडापर्यंत; भरपूर. ॰सरता-वि. अस्खलित, तोंडपाठ न म्हणतां येण्या- सारखा; अडखळत अडखळत म्हणतां येण्यासारखा (श्लोक, ग्रंथ इ॰). -क्रिवि. घसरत घसरत; अडखळत; चुका करीत; कसेंबसें; आठवून आठवून. [तोंड + सरणें] ॰सुख-न. १ एखा- द्यानें केलेल्या अपकाराचें शरीरानें प्रतिकार करण्याचें सामर्थ्य नसल्यामुळें केवळ तोंडानें यथेच्छ शिव्यांचा, अपशब्दांचा भडि- मार करून त्यांत सुख मानणें. २ जिव्हा मोकाट सोडून वाटेल तसें बोलण्यांत मानलेलें सुख; यथेच्छ व अद्वातद्वा केलेलें भाषण; (एखाद्याची काढलेली) खरडपट्टी; बोडंती. (क्रि॰ घेणें). ॰सुख घेणें-(एखाद्याची) खरडपट्टी काढणें, हजेरी घेणें; (एखा- द्यावर) शिव्यांचा, अपशब्दांचा भडिमार करणें. ॰सुटका-स्त्री. १ जिभेचा (बोलण्यांतील) स्वैरपणा; सुळसुळीतपणा; वाक्चा- पल्य; जबेफराशी; (भाषण इ॰ कांतील) जनलज्जेपासूनची मोक- ळीक. २ भाषणस्वातंत्र्य; बोलण्याची मोकळीक. ३ तोंडाळपणा; शिवराळपणा. ४ (पथ्य, अरुची, तोंड येणें इ॰ कांपासून झालेली) तोंडाची सुटका, मोकळीक; तोंड बरें होणें; खाण्यापिण्याला स्वातंत्र्य. [तोंड + सुटणें] ॰हिशेबी-वि. अनेक रकमांचा मनांतल्या- मनांत चटकन् हिशेब करून सांगणारा बुद्धिमान (मनुष्य); शीघ्रगणक. ॰तोंडागळा-वि. (तोंडानें) बोलण्यांत, वक्तृत्वशक्तींत अधिक. 'कीं शेषाहूनि तोंडागळें । बोलकें आथी ।' -ज्ञा ९. ३७०. [तोंड + आगळा = अधिक] ॰तोंडातोंडी-क्रिवि. १ समोरासमोर; २ बोलण्यांत; बोलाचालींत. [तोंड द्वि.] ॰तोंडाळ-वि. १ दुसर्या- वर तोंड टाकणारा; शिवराळ; भांडखोर. 'लटिकें आणि तोंडाळ । अतिशयेंसीं ।' -दा २.३.१०. २ बडबड्या; वाचाळ. [तोंड] म्ह॰ हाताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं = शिवराळ माणसा- पेक्षां चोर पुरवतो. ॰तोंडाळणें-उक्रि. बकबक करून गुप्त गोष्ट फोडणें; जीभ पघळणें. [तोंडाळ] ॰तोंडोंतोंड-क्रिवि. तोंडापर्यंत; कंठोकांठ; तुडुंब; तोंडसर.॰तोंडोंळा-पु. तोंडवळा; चेहरेपट्टी. [तोंड + ओळा, वळा प्रत्यय]
हात
पु. १ हस्त; बाहु; खांद्यापासून बोटांपर्यंत शरीराचा भाग. कोपरापासून बोटांपर्यंतचा भाग. २ कोपरापासून मधल्याबोटाच्या टोकापर्यंतचें माप. 'हा पंचा साडेचार हात भरला.' ३ उजवी किंवा डावी बाजू, तरफ. 'आमचें घर वाड्याचे उजव्या हातास आहे.' ४ ताबा; आटोका; अधिकार; खातें. 'तुझें काम करणें माझ्या हातीं नाहीं.' (कारक विभक्तींत प्रयोग). ५ स्वतः व्यक्तिगत मनुष्य. 'अपराधावांचून शिवी देणें हें माझ्या हातानें घडणार नाहीं.' ६ स्वामित्व; कबजा; मालकी; ताबा. 'साप्रंत माझ्या हातीं पैसा नाहीं.' ७ हातानें वाजविण्याच्या वाद्यावर मारलेली हाताची थाप. ८ डाव; खेळ (काठी, लाठी, पट्टा इ॰ शस्त्रांचा). 'पट्ट्याचे दोन हात करून दाखव.' ९ कर्तृत्वशक्ति; अंग; हस्तकौशल्य (एखाद्या विषयांतील, कलेंतील). 'त्याचा चित्र काढण्याचा हात चांगला आहे.' १० कुलुपाची किल्ली; चावी. 'कुलवाचा हात इकडे दे बघूं.' ११ सोंगट्या, पत्ते इ॰ खेळांतील डाव, खेळण्याची पाळी, खेळ; खेळणारा गडी. 'अजून आमच्यांतील एक हात खेळवयाचा आहे.' १२ हस्तक; मदतनीस; साहाय्यक; हाताखालचा मनुष्य. १३ ज्यावर दंड, जोर काढावयाचे तो लांकडी, दगडी ठोकळा; हत्ती १४ (रंग देणें, सारवणें इ॰ कामीं) वरून हात फिरविणें; हातानें दिलेला थर, लेप. १५. ठोंसा; तडाखा; हस्तक्रिया (भिन्नभिन्न प्रसंगीं त्या त्या अर्थांनीं) १६ (तेली-घाणा) कातरीस जोडलेला वांकडा लाकडी तुकडा. १७ हात टेकावयासाठी, हातानें धरावयाचा कोणताहि पदार्थाचा भाग. 'खुर्चींचे-रहाटाचे-हात. १८ हाताच्या आका- राची कोणतीहि वस्तु. १९ (सोनेरी) हातांतील दागिना सैल करण्याचें एक हत्यार. २० (नृत्य) दोन हातांनीं मिळून करा- वथाचे अभिनयाचे प्रकार. हे ४० प्रकारचे आहेत. २१ (शिंपी) कापड मोजण्याचें बारा तसूंचें एक माप; गज. २२ पान्हा (नट- बोलट फिरविण्याचा). [सं. हस्त; प्रा. हत्थ; हिं. गु. हाथ; ब. हात; आर्में. जि. हथ, अथ; पॅलेस्टाईनजि. हस्त; पोर्तुंजि. बस्त] म्ह॰ १ हात ओला तर मैत्र भला-नाहींतर पडला अबोला- जोपर्यंत माणूस दुसर्यास देत असतो तोंपर्यंत त्याच्याशीं सगळे मित्रत्वानें वागतात. २ हात घशांत घातला तरी कोरडाच = कितीहि मदत केली तरी बेइमान राहणारा. ३ हातपाय रोड्या, पोट लोड्या; हातपाय काड्या, पोट ढेर्या = पोटाचा तटतटीतपणा व अवयवांचा रोडकेपणा. ४ हात फिरे तेथें लक्ष्मी फिरें, तोंड फिरे तेथें अवदसा फिरे = उद्योगी माणसाचा हात श्रीमंती आणतो तर नुसत्या बडबड्याच्या हातून कांहींच होत नाहीं उलट दारिद्र्य येतें. ५ आपला हात जगन्नाथ (जगन्नाथपुरीस आपल्या हातानें वाटेल तेवढा प्रसाद घेतां येतो त्यावरून) वाटेल तेवढें व तसें घेणें; प्राचुर्य. ६ हातचें सोडून पळत्याचे पाठीस लागूं नये = जें खात्रीनें आपलें आहे (आपणांस मिळावयाचेंच आहे) तें सोडून जें अनिश्चित आहे तें मिळविण्याच्या नादीं लागूं नये. ७ हातच्या कांकणास आरसा कशाला ? (हातांतील कांकण डोळ्यानें दिसण्या- सारखें आहे, आरसा आणणें वेडेपणा) = जी गोष्ट उघड सिद्ध आहे ती दाखविण्यास पुराव्याची जरूरी नाहीं. ८ हातपाय र्हावलें काम करूं वायले = नाइलाज होणें. ९ हातपाय लुलें तोंड चुरचुरां चाले = अशक्त पण तोंडाळ, मुजोर माणूस. १० हातभर लांकूड नऊ हात ढलपी = अतिशयोक्ति करणें. ११ हातांत नाहीं अडका बाजारांत चालला धडका = जवळ कवडीं नाहीं पण डौल बादशहाचा. (वाप्र.) ॰आंखडणें-देण्यासाठीं पुढें केलेली वस्तु एकदम मागें घेणें; देण्याचें प्रमाण कमी करणें, बंद करणें. ॰आटोपणें-मारणें इ॰ हातांनीं करावयाची कोणतीहि क्रिया बंद करणें. ॰आवरणें-१ हात आटपणें. २ कोणत्याहि कृत्यापासून परावृत होणें. 'ऐकेल वचन माझें आवरिल द्वेषिकाळ हात रणीं ।' -मोकर्ण ४६.४४. ॰इचकणें-(व.) हात मोडणें. ॰उगारणें-उचलणें-(एखा- द्यास) मारावयास प्रवृत होणें. ॰उचलणें-१ स्वयंस्फूर्तीनें, आपण होऊन बक्षीस देणें. २ हातीं घेणें (काम, धंदा). ॰ओढविणें- १ घेण्यासाठीं झांप टाकणें. २ विटंबना, करण्यासाठीं तुच्छता दर्शविण्यासाठीं तोंडापुढें हात करणें. ॰ओंवाळणें-तुच्छता दर्शविणें. ॰करणें-१ लाठी मारणें; शस्त्राचा वार करणें. हात टाकणें. 'स्त्रीचे अंगावर हात करूं नये.' २ पट्टा, बोथाटी वगैरेचे डाव करणें; फिरविणें. ३ वादविवाद, युद्ध करणें. ॰कापून-देणें- गुंतणें-लेखी करारकरून स्वतःस बांधून देणें. ॰खंडा असणें- एखादें कार्य (हुन्नर) हमखास पार पाडण्याचें कौशल्य, पटाईत- पणा अंगीं असणें. ॰गहाण ठेवणें-उजवा हात देवास वाहून कोणत्याहि कामीं त्याचा उपयोग करावयाचा नाहीं असा नवस करणें. २ कोणत्याही कामास हात न लावणें. ॰घालणें-१ (एखादें काम) पत्करणें; करावयास घेणें. २ एखादी वस्तु घेणें, धरणें, शोधणें यासाठीं हात पुढें करणें. 'मग विभु वसनासी त्याचिया हात घाली ।' -आनंदतनय. ३ (एखाद्या कामांत, व्यवहांरांत) ढवळाढवळ करणें; आंत पडणें. ॰घेणें-(पत्त्यांचा खेळ) हुकूम मारून अगर भारी पान मारून दस्त करून घेणें. ॰चढणें-प्राप्त होणें. 'अनुताप चढविया हात । क्षणार्धं करी विरक्त ।' -एभा २६.२०. हाताचा आंवळा-मळ, हातचें कांकण-उघडउघड गोष्ट; सत्य. ॰चा मळ-अत्यंत सोपें कृत्य; हात धुण्यासारखें सोपें काम; अंगचा मळ. ॰चालणें-१ हातांत सत्ता, सामर्थ्य, संपत्ति असणें, मिळविणें, मिळणें. १ एखादी गोष्ट करतां येणें. 'कशिद्यावर माझा हात चालत नाहीं.' ॰चाल- विणें-हत्यार चालविणें (संरक्षणार्थ). 'न्यायाच्या अभावीं ज्याला त्याला हात चालवावेसें वाटणें रास्तच होईल.' -टि १. २२. ॰चेपणें-लांचाचे पैसे मुकाट्यानें एखाद्याचे हातांत देणें. ॰चोळणें-फार राग आला असतां तळहात एकमेकांवर घासणें; कुंठितगति होऊन स्वस्थ बसावें लागणें. 'शल्य सुयोधन वाक्यें कोपे चोळी करें करा...।' -मोकर्ण २१.१३. ॰जोडणें-१ नमस्कार, प्रार्थना, विनंति करणें. २ शरण जाणें, येणें. 'अपराध फार केले परि आतां हात जोडिले स्वामी ! ।' -मोआर्याकेका. ३ नको असलेला पदार्थ हात जोडून आर्जवानें दूर सारणें; अव्हे- रणें. 'दानश्री त्याहुनि बहु दुग्धासहि हात जोडितो मीन ।' -मोबृहद्द ८. ॰झाडणें-१ झिडकारणें; नापंसत ठरविणें. २ निराशेनें सोडून देणें. ३ एखादें काम उरकून मोकळें होणें. ॰टाकणें-१ पोहतांना पाण्यावर हात मारणें. २ (एखाद्यावर) प्रहार करणें; मारणें. 'बायकोमाणसाच्या अंगावर हात टाकणें तुम्हाला शोभत नाहीं.' ॰टेकणें-१ काम करण्यास असमर्थ असल्यानें पराभव पावल्याचें कबूल करणें. २ म्हातारपणानें अशक्त होणें. ३ दमणें; थकणें; टेकीस येणें. ॰तोडणें-स्वतःच्या लेखानें आपणांस बांधून घेणें. ॰थावरणें-हात आवरणें; आटो- पणें. '...थावरूनि हातरणीं ।' -मोस्त्री ६.५१. ॰दाखविणें- दावणें-१ हस्तसामुदिक जाणण्यासाठीं जोशापुढें तळहात करणें. २ अहितकारक परिणाम करणें. ३ स्वतःची शक्ति, सामर्थ्य दाख- विणें. 'शक्रादि देव असते तरि त्यांसहि दावितोंचि हात रणीं ।' -मोभीष्म ३.४. ४ नाडीपरीक्षा करण्यासाठीं वैद्यापुढें हात करणें. ५ हातानें एखादी वस्तु दर्शविणें. ६ बडवून काढणें; पारिपत्त्य करणें; सूड घेणें; उट्टें काढणें. म्ह॰ हात दावून अवलक्षण चिंतणें, करणें. ॰दाबणें-लांच देणें. 'त्यानें आपल्यास मदत करावी म्हणून त्याचे हात दाबावे असें एकदां मनांत येतें.' -विवि १०. ९ २१०. ॰देणें-१ मदत करणें; तारणें. 'घडतां अधःपतन मज पुण्यें देतिल न हात परिणामीं ।' -मोआदि १९.३२. २ चोरणें; उचलेगिरी करणें. ३ खाद्यापदार्थावर ताव मारणें. ४ (बायकी, छप्पापाणी) छप्पू घातलेल्या मुलीस इतर मुलीनीं (तिनें उठावें म्हणून) हस्तस्पर्श करणें. ॰धरणें-१ अडविणें; हरकत करणें; स्पर्धा करणें; बरोबरी करणें. २ लांच देणें. ॰धरून जाणें- विवाहित स्त्रीनें एखाद्या परपुरुषाबरोबर पळून जाणें; जाराबरोबर निघून जाणें. ॰धुणें-(ल.) एखाद्या कामांतून आपलें अंग काढून घेणें. ॰धुवून पाठीस लागणें-एखाद्या नाश करण्याविषयीं हट्टानें प्रवृत्त होणें; चिकाटी धरून एखाद्याचा पाठलाग करणें. ॰न बनणें-(व.) विटाळशी होणें; गुंता येणें. ॰नाचविणें-चेष्टा करण्यासाठीं दुसर्याचे तोंडापुढें हातवारे करणें. हात ओवाळणें पहा. ॰पडणें-१ एखादें काम अनेकांनीं लागून संपविणें; एखादा खाद्यपदार्थ अनेकांनीं एकसमयवच्छेनेंकरून फन्ना करणें. २ (ना.) जिवंतपणीं भेट नाहीं पण दहनापूर्वी तरीं प्रेताचें दर्शन होणें. ॰पसरणें-भीक मागणें. ॰पाय खोडणें-१ अवयव आंख- डणें; विव्हल होणें. २ एखाद्यास प्रतिबंध, अडचण करणें. ॰पाय गळणें-गाळणें-१ अशक्त होणें; रोडावणें. २ खचून जाणें; नाउमेद होणें; गलितधैर्य होणें. ॰पाय गुंडाळणें-१ अंत- काळच्या वेदनांनीं हातपाय आंखडणें; कियाशक्ति रहित होणें. २ हरकत, अडथळा करणें. ॰पाय चोळणें-१ सूड घेण्याची प्रतिज्ञा करणें; चरफडणें. २ रागानें तरफडणें; शिव्याशाप देणें. ॰पाय झाडणें-१ हातपाय गुंडाळणें अर्थ १ पहा. २ सुटकेसाठीं हातापायांचा उपयोग करणें. ३ धडपड करणें; चरफडणें. ॰पाय ताणणें-सुखानें, निष्काळजीपणानें हातपाय पसरून पडणें. ॰पाय धोडावप-(गो.) आटापिटा करणें. ॰पाय पसरणें- १ हातपाय गुंडाळणें अर्थ १ पहा. २ मर्यादेच्या, आटोक्याच्या बाहेर जाणें; जास्त जास्त व्याप वाढविणें; पसारा वाढविणें. म्ह॰ भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी. ३ काम होत नसल्यास सबबी सांगणें; कामांत आळस करणें (काम करीन असें वचन दिलें असतां). ४ मागणी वाढत जाणें, अधिकाधिक आक्रमण करणें. ॰पाय पाखडणें-अंतकाळच्या वेदनेनें, फार संतापानें हातपाय झाडणें. ॰पाय पांघरून-पोटाळून बसणें-आळशा- सारखें बसणें; जेठा मारून बसणें. ॰पाय फुटणें-१ उधळपट्टी सुरू होणें; संपत्तीला (जाण्यास) पंख फुटणें. 'दौलतीला अलीकडे हातपाय फुटुं लागले आहेत.' ३ लुच्चेगिर्या करण्यांत तरबेज होणें. २ थंडीनें हातपायास भेगा पडणें. ॰पाय फोडणें-लावणें- फुटणें-लागणें-१ मूळ गोष्टींत, अंदाजांत भर घालणें; वाढ विणें. २ नटविणें; थटविणें; अलंकृत करणें. ३ मागून वाढविणें (काम, दर, खर्च इ॰). ४ लबाड्या इ॰ नीं सजवून उजळून दाखविणें. ॰पाय मोकळे करणें-फेरफटाका करून हातपाय सैल, हलके करणें; फिरणें; सहल करणें. ॰पाय मोडणें-मोडून येणें-टाकणें-१ तापापूर्वीं अंग मोडून येणें; निरंगळी येणें. २ बलहीन, निःसत्त्व करून टाकणें; हरकत घेणें. ॰पाय सोडणें -अंतकाळच्या वेदनांनीं हातपाय ताणणें, ताठ होणें. ॰पाय हालविणें-उद्योग, परिश्रम, कष्ट इ॰ करणें; स्वस्थ न बसणें. ॰पोचणें-कृतकृत्य होणें (ढुंगणाला हात पोंचणें असा मूळ प्रयोग). ॰फाटणें-रुची वाढणें. 'जेथें जिव्हेचा हातु फाटे ।' -ज्ञा १८.२४९. ॰फिरणें-लक्ष जाणें; व्यवस्थित ठेवण्याची काळजी घेणें; साफसफाई करणें. ॰फेरविणें-१ लहान मुलास प्रेमानें कुरवाळणें. 'प्रेमें मजवरुनि हात फिरवूनी ।' -मोउद्योग १३.१८३. २ पुन्हां उजळणी, उजळा देणें. ॰बसणें-१ एक- सारखें लिहीत, वाचीत इ॰ राहणें. २ अक्षरांचें वळण बसणें; तें पक्कें होणें. ३ एखादें काम उत्तम प्रकारें करतां येणें; मनांत ठसणें; विशिष्ट क्रिया करण्याची सफाई हातास प्राप्त होणें. ॰बांधणें-१ मर्यादा घालणें; स्वैर होऊं न देणें. २ अडथळा आणणें. ॰बोट लावणें-भार लावणें-मदत करणें. ॰भिजणें-१ दक्षणा देणें; (गो.) हात भिजविणें. २ लांच देणें; हात ओले करणें. ॰मारणें-१ बळकाविणें (पैसा इ॰) देणें. २ अधाशीपणानें खाणें; ताव मारणें. ३ एखाद्या वस्तूवर विविध क्रिया करणें. ॰मिठ्ठीला येणें-(माण.) हाताहातीं होईपर्यंत भांडणें. ॰मिळविणें-१ घाव घालणें. 'तस्कारानें जलदीकरून हात मिळविला जाऊन ।' -ऐपो ३९०. २ (कुस्ती) सलामी घेणें. ॰मोडणें-१ असहाय्य, मित्रहीन होणें. २ मिळत असलेली देणगी, बक्षीस नाकारणें. ॰राखणें- कुचराई करणें. ॰राखून खर्च करणें-काटकसरीनें खर्च करणें. ॰लागा ना-(गो.) विटाळशी होणें. ॰लावणें-मदत करणें. ॰वसणें-क्रि. हस्तगत होणें. 'ते ज्ञाननिष्ठा जेथें हातवसे ।' -ज्ञा १८.१२४८; -भाए २४०. ॰वहाणें-१ हत्यार चालविणें. 'परि परमप्रिय अर्जुन त्यावरि याचा न हात वाहेल ।' -मोउद्योग १२.५४. २ प्रवृत्त होणें; कार्य करणें. ॰वळणें-१ सराव, परि- पाठ इ॰ नें हातास सफाई येणें. २ (एखाद्या गोष्टीस, कृत्यास) प्रवृत्त होणें. ॰सैल सोडणें-सढळपणें खर्च करणें. ॰सोडणें-१ पूर्वीप्रमाणें कृपा, लोभ न करणें. २ संगति. ओळख सोडणें. ॰हातांत देणें-लग्न लावणें. 'एखाद्या तरुणीचा हात माझ्या हातांत दे.' -भा ४९. ॰हालवीत येणें-काम न होतां रिकामें परत येणें. हातणें-क्रि. सारवणें. हाताखालीं घालणें-देख. रेखीखालीं, अंमलखालीं, कबज्यांत, ताब्यांत घेणें. हातां चढणें- प्राप्त होणें. 'जरी चिंतामणी हातां चढे ।' -ज्ञा ३.२३; -एभा १०.२८२. हाताचें पायावर लोटणें-आजची अडचण उद्यां- वर ढकलणें; आजचें संकट लांबणीवर टाकणें. हाताचे लाडू होणें-खरजेनें हाताच्या मुठी वळणें, त्या न उघडणें. हाताच्या धारणेनें घेणें-मारणें; बुकलणें. हातांत कंकण बांधणें- एखाद्या गोष्टीची प्रतिज्ञा करणें; चंग बांधणें (यजमानानें यज्ञ करावयाच्या पूर्वी हातांत दीक्षासूत्र बांधण्याच्या चालीवरून). हातांत हात घालणें-१ लांच देणें. २ मैत्रीच्या भावानें वागणें, प्रेम करणें. ३ विवाहसंबंध घडवून आणणें. ४ विवाहित स्त्रीनें परपुरुषाशीं संबंध ठेवणें; निघून जाणें. हातातोंडाशीं गांठ पडणें-१ घास तोंडांत पडणें; खावयास सुरुवात करणें; जेवणा- खेरीज इतरत्र लक्ष न जाणें. २ एखाद्या कार्यास घाईनें आरंभ होणें. ३ बोंब मारणें. हातातोंडास येणें-१ तारुण्यावस्था प्राप्त होणें (लग्न झालेली स्त्री, तरुण मुलगा इ॰). २ फल देण्याच्या स्थितीस येणें. हातापायांचा चौरंग होणें-पेटके वगैरेमुळें हातपाय आंखडणें. हातापायांचे डगळें होणें- पडणें-मोडणें-अशक्तपणानें अंगास कंप सुटणें; अंग शिथिल होणें. हातापायांचे ढीग पडणें-होणें-भीतीनें, आजारानें अशक्त असहाय्य होणें. हातापायांच्या फुंकण्या होणें- अशक्ताता, निर्बलता येणें. हाता(तीं) पायां(यीं) पडणें- १ गयावया करणें; प्रार्थना करणें. २ शरण जाणें; नम्र होणें; दया याचिणें. हाताबोटावर येणें, हातावर येणें-आतां होईल, घटकाभर्यानें होईल अशा स्थितीस येणें; हस्तगत कबज्यांत, साध्य होण्याच्या अगदी बेतांत असणें. हाताला चढणें-प्राप्त होणें. 'संसार कशाचा जरि न हाताला चढली ।' -राला ११२. हाताला येईल तें-जें कांहीं हातांत सांपडेल तें; ज्याचेवर हात पडेल तें. हाताल लागणें-गमावलेल्या, फुकट गेलेल्या, नासलेल्या, बिघडलेल्या वस्तूंतून अल्प अंश मिळणें. 'कापडांत पैसें घालूं नका, त्यांतून हाताला कांहीं सुद्धां लागणार नाहीं.' हाताला वंगण लावणें-लांच देणें. -राको १३३७. हाताला हात लावणें-१ पति पुण्याहवाचनादि धर्मसंस्कारास बसला म्हणजे पत्नीनें त्याच्या हातास नुसता हात लावणें (म्हणजे तिलाहि त्याचें फळ मिळतें). २ स्वतः कांहीं न करतां दुसर्यानें केलेल्या कामाच्या फळांत वांटेकरी होणें; दुस- र्याच्या कार्याला अनुमति देणें. हातावर असणें-पूर्णपणें साध्य असणें. हातावर घेणें-आणणें-काढणें-तारण, गहाण न ठेवतां पैसे उसनें आणणें, काढणें, घेणें. हातावर तुरी देणें-देऊन पळून जाणें-हातावर हात देऊन-मारून पळणें-पळून जाणें-फसविणें; डोळ्यादेखत फसवून पळून जाणें; देखत देखत भुल- विणें. 'सुभद्रा काबीज करण्यासाठीं श्रीकृष्ण परमात्म्याच्या मदतीनें बलिरामाच्या हातावर ज्या तुरी दिल्या... तें पाहून तरी आम्हांस कधीं विषाद झाला आहे काय ?' -आगर. हातावर दिवस काढणें-लोटणें-मोठ्या कष्टानें संसार चालविणें. हातावर धरणें-हातांवर संभाळीत राहावयास लावणें (मुलीनें). 'यानें मला सकाळपासून हातावर धरिलें.' हातावर पाणी पडणें- भोजनोत्तर आंटवणें. 'हातावर पाणी पडलें कीं चालला बाहेर.' हातावर पिळकणें-लांच देणें. हातावर पोट भरणें-संसार करणें-अंगमेहनत, भिक्षा, नौकरी करून उपजीविका करणें. हातावर मिळविणें-मिळवावें व खावें अशा स्थितींत राहणें. हातावर येणें-जवळ येऊन ठेपणें. हातावर येणें-लागणें- दूध देऊं लागणें-थानास वासरूं न लावतां किंवा पान्हवण (सरकी इ॰) पुढें न ठेवतां जनावरानें दूध देणें, पान्हवणें. हातावर शीर घेऊन असणें-कोणतेंहि धाडसाचें कृत्य कर- ण्यास सदां सिद्ध असणें. हातावर हात चोळणें-रागानें तळ- हात एकमेकांवर घासणें; चरफडणें. 'इंद्रें स्वतातघातक पाठीसीं घातला म्हणोनि करें । कर चोळी...' -मोआदि ७.४०. हाता- वर हात मारणें-१ एखादी गोष्ट, सट्टा इ॰ पटला म्हणजे दुस- र्याचे हातावर आपला हात मारणें. २ वचन देणें. हातास हात लावणें-(देणार्याच्या, घेणार्याचे हातास स्पर्श होणें) द्रव्यलाभ होणें. हातास-हातां-हातीं चढणें-प्राप्त होणें. 'तो किल्ला माझ्या हातीं चढला.' 'नवनींत मंथनावांचून । हातां न चढे सहसाहि ।' हातीं धरणें-१ स्वतःच्या देखरेखीखालीं घेणें; एखाद्यास आपल्या आश्रयाखालीं घेणें. २ निरंकुशपणें मोकाट सोडणें (जीभ, तोंड, पोट इ॰ इंद्रियें). हातीं धोंडे घेणें-१ विरुद्ध उठणें. २ वेड्यासारखें करणें. हातींपायीं (अन्न इ॰) डेवणें-धावणें-येणें-रेवणें-जाड्य, सुस्ती येणें; शिव्या देण्यास तयार होणें. हातींपायीं उतरणें-सुटणें-मोकळी होणें-सुखरूपपणें बाळंत होणें हातींपायीं पडणें, लागणें- अतिशय विनवण्या, काकुळत्या करणें. हातीं भोपळा घेणें- देणें-भिक्षा मागणें, मागावयास लावणें. आडव्या हातानें घेणें-१ चोरून; चोरवाटेनें घेणें. २ झिडकारणें; भोसडणें; तुच्छता दाखविणें; कचकावून खडकाविणें; मारणें. आडव्या हातानें घेणें, चारणें-बाजूनें, तोंडांत हात घालून खाऊं घालणें; औषधोपचार करणें (घोडा इ॰स). (देणें-चोरून देणें-मारणें- मागल्या बाजूनें मारणें-ठोकणें). एका हाताचीं बोटें पण सारखीं नाहींत-सारख्या परिस्थितींतील माणसें असलीं तरी त्यांच्यांत थोडाफार फरक असतो. दोहों हाताचे चार हात करणें-होणें-लग्न करणें, होणें या हाताचे त्या हातावर- क्रिवि. ताबडतोब; जेव्हांचे तेव्हांच (दुष्कृत्याची फेड लवकर व खात्रीनें मिळते या अर्थीं). या हाताचें त्या हातास कळूं न देणें-अत्यंत गुप्तपणें करणें. रिकाम्या हातानें-जरूं- रीच्या साधनां-उपकरणां-सामग्रीखेरीज; कांहीं काम न करतां. याचा हात कोण धरीसा आहे ? -याच्या वरचढ, बरो- बरीचा कोण आहे ? याचा हात धरण्याची शक्ति कोणास आहे ? हातांत काय तागडू मिळाला-(व) कोणता फायदा झाला ? हातांत नारळाची आई (नरोटी) देणें-भिक्षा मागावयास लावणें. सामाशब्द- ॰अनार-पु. शोभेच्या दारूचा एक प्रकार. ॰इंद-न. (कों.) खेंकडे पकडण्याचें जाळें. ॰उगावा-पु. १ एखाद्या किचकट, अडचणीच्या कामांतून, धंद्यांतून अंग काढून घेणें. २ सूड; पारिपत्य. (क्रि॰ करणें). ३ कर्जाची उगराणी; घातलेलें भांडवल परत मिळविणें. [हात + उगवणें] ॰उचल-स्त्री. १ पेढींतून स्वतःची रक्कम आतां थोडी मग अशा रीतीनें खर्चण्यास घेणें. २ मूळ भांडवल; मुद्दल. उचल मध्यें पहा. ॰उचला-वि. १ आप- खुषीनें, हात उचलून दिलेला (पदार्थ). २ ज्याचा स्वतः करण्याबद्दल पत्कर घेतला आहे असा (व्यवहार, उद्योग). ॰उसना-ना-वि. थोडा वेळ उसना घेतलेला; लवकर परत करण्याच्या बोलीनें आणलेला (त्यामुळें लेख इ॰ लिहून न घेत दिला-घेतलेला). ॰उसणें-नें-न. थोड्या मुदतींत परत कर- ण्याच्या बोलीनें (लेख करून न देतां) उसनी घेतलेली रक्कम. ॰कडी-स्त्री. हातांतील बेडी. 'मन सिंतरील विवेकासीं । यालागी हात कडिया दोहींसीं ।' -एभा २३.९५१. ॰कर- वत-पुस्त्री. हातानें चालविण्याची लहान करवत. ॰करवती- स्त्री. लहान हात करवत. ॰करीण-स्त्री. अचळाला हात लावतांच (वासरूं न सोडतां किंवा आंबोण न ठेवतां) पान्हा सोडून दूध देणारी गाय; म्हैस. इच्या उलट पान्हावणकरीण. ॰कापें-न. (गो.) लांडी, बिन बाह्यांची बंडी. ॰काम-न. हस्तकौशल्याचें काम (यांत्रिक कामाच्या विरुद्ध); हस्तव्यवसाय. (इं.) हँडफ्रॅक्ट. ॰कैची-कचाटी- स्त्री. आलिंगन; मिठी. ॰खंड-वि. १ मधून मधून कामांत सोडवणूक करणारा; मदतनीस (मूल, मित्र, शेजारी); अडल्या वेळीं आपल्या कामीं उपयोगी पडणारा. २ हात खंडा पहा. [हात + खंड = खळ, विसावा] ॰खंडा-वि. निष्णात, करतलामलकवत् असलेली; म्हणाल त्यावेळीं तयार (विद्या, कला). ॰खर्च-पु. किरकोळ खर्च; वरखर्च. ॰ख(खं)वणी- स्त्री. लहान खवणी. ॰खुंट-खुंटा-पु. (विणकाम) वशारन पसरलेल्या लांबीपाशीं असलेल्या समोरच्या खांबापासून मागा पाशीं बसण्याच्या जागेजवळ उजवीकडे दोरी बांधावयाची खुंटी. ॰खुरपणीचें लोणी-न. हातखुरप्या नारळाचें खोबरें. ॰खुरपा-वि. हातानेंच आंतील खोबरें खरवडून काढण्याजोगा (कोंवळा नारळ). ॰खुरपें-न. १ हातखुरपा नारळ. २ गवत काढण्याचा लहान विळा. ॰खे(खो)रणें-न. कलथा; उलथणें; झारा. (क्रि॰ लावणें-अन्नास, पैक्यास = पैका उकळण्याचा सपाटा). म्ह॰ हातखेरणें असतां हात कां जाळावा. ॰खेवणें-न. १ हातवल्हें. २ मदतनीस; हाताखालचा माणूस. ॰खेव्या-व्या-पु. हातखेवणें अर्थ २ पहा. ॰खोडा-पु. हात अडकविण्याचा सांपळा. 'चंद्रसूर्याचा हातखोडा । काळा कैसेनि घालिजे ।' -भाए ५४९. ॰गाडी-स्त्री. हातानें ढकलून चालविण्याची गाडी. ॰गुंडा-धोंडा-पु. १ हातानें फेकण्या-उचलण्या-जोगा दगड. 'कुश्चीतभावाचे हातगुंडे ।' -ज्ञाप्र २६५. २ असला दगड हातानें जेथवर फेंकला जाईल तितकें अंतर. ॰गुण-पु. (बरेंवाईट करण्याचा योग, गुण) नशीब; हातीं (काम, माणूस) धरणाराचा प्रारब्धयोग. हस्तगुण पहा. ॰घाई-स्त्री. १ हातानें वाजवावयाचें वाद्य जोराजोरानें, आवेशानें वाजविणें. २ (ल.) उतावळेपणा; जोराची हाल चाल. (क्रि॰ हातघाईवर, हातघाईस येणें-मारामारी करणें). ॰चरक-पु. १ हातानें फिरवून रस काढावयाचा चरक. २ हात घाणी. ॰चलाख-वि. चोर; उचल्या. ॰चलाकी-खी-स्त्री. हस्तचापल्य; लपवाछपवी; नजरबंदीचा कारभार (गारुडी, सराफ इ॰ चा). ॰चाळा-पु. १ हाताचा अस्थिरपणा; चुळबुळ; हातानें कांहीं तरी उगीच करीत रहावें अशी लागलेली खोड; हातचेष्टा. (क्रि॰ लागणें). २ अशा प्रकारानें होणारें नुकसान. (क्रि॰ करणें). ३ सदोदित हात गुंतलेला असणें; त्यांत निमग्न असणें (वाढता धंदा, व्यापार, खेळ इ॰ त); देवघेवीचा मोठा उद्योग. ॰चिठी-चिटी-ट्टी-स्त्री. १ अधिकार्यानें शिक्का- मोर्तब न करतां आपल्या हातच्या निशाणीनेंच पुरी केलेली चिठी, हुकूम. २ कोणाहातीं पाठविलेली चिठी-चपाटी. ॰चे हातीं- च्या हातीं, हातोहातीं-किवि. लेगच; ताबडतोब; आतांचे आतां; क्षणार्धांत पटकन् (करणें, घडणें). 'ही गडी हाताचे हातीं जाऊन येईल.' 'हाताचे हातीं चोरी-लबाडी-शिंदळकी' इ॰. ॰चोखणें-चुंफणें-न. तान्ह्या मुलास चोखण्यासाठीं हातांत देण्याची वस्तु. ॰जतन-स्त्री. हातानें केलेली मशागत (मालीस इ॰); रोज वक्तशीर घेतलेली काळजी. 'हा घोडा नुसत्या हातजतनानें इतका हुशार आहे.' ॰जुळणी-स्त्री. (ठाकुर) लग्न लागल्यानंतर मुलानें मुलीचे दोन हात धरणें. -बदलापूर १३८. ॰झाड-स्त्री. आपोआप उगवलेलें नसून मुद्दाम लाविलेलें झाड. ॰झाडणी-स्त्री. राग, तिरस्कार इ॰ नें हात झटकणें. ॰झालणा-पु. हातजाळें; हातविंड. ॰झोंबी-स्त्री. परस्परांचे हात धरून केलेली झटापट; हिसकाहसकी; झगडा. ॰तुक-न. १ हातानें वजन करणें. 'नव्हती हाततुके बोल ।' -तुगा ३४२३. २ अटकळ; अजमास. 'मग त्यागु कीजे हात- तुकें ।' -ज्ञा १८.१३१. ॰दाबी-स्त्री. लांच. 'मालकानें हात- दाबी केली म्हणजे माल त्यांना परत देतात.' -गुजा ६७. ॰धरणें-न. (खा.) सोधणें; स्वयंपाकघरांतील भांडीं उतरणें इ॰ चें फडकें. ॰धरणी माप-न. माप भरतांना त्याचे शेवटास डावा हात धरून, मापापेक्षां थोडें जास्त धान्य घेऊन केलेलें माप. बोटधरणी माप पहा. ॰धुणी-स्त्री. १ राजाच्या हात- धुणारास दिलेलें इनाम इ॰. २ स्वयंपाकघरांतील मोरी. ॰धोंडा- पु. १ हातानें उचलण्याजोगा धोंडा. २ धोंडा हातानें फेंकला असतां जेथवर जाईल इतकें अंतर; टप्पा. ॰नळा-पु. हातांत धरून सोडण्याचा, शोभेची दारू भरलेला नळा. ॰नळी-स्त्री. चपटें कौल. ॰निघा-गा-हातजतन पहा. हातजपणूक. ॰नेट- क्रिवि. १ (व.) हाताचा जोर, भार देऊन. २ (व.) हाता- जवळ. ॰पडत-पात-वि. हातीं असलेलें; अगदीं जवळ असणारें; लागेल त्यावेळीं ताबडतोब मिळणारें. ॰पहार-स्त्री. हातभर लांबीची पहार. ॰पा-हातोपा-पु. अंगरखा इ॰ ची बाही. ॰पाटिलकी-स्त्री. १ हातानें ठोकणें; चोपणें, बदडणें. तोंड- पाटिलकीचे उलट. २ बोलण्यापेक्षां प्रत्यक्ष कृति, काम. 'तोंड- पाटिलकी सगळ्यांस येते हातपाटिलकी कठीण.' ३ हस्तचापल्य; उचलेगिरी. ॰पाणी-न. १ लग्नांत रासन्हाणीचे वेळीं वधूच्या सासूनें तिचे हातांवर ओतावयाचें पाणी. (क्रि॰ घालणें). २ लग्नांत मांडव परतण्याचे दिवशीं सासूनें सुनेची बोहोल्यावर ओटी भरून, किंवा मांडवांत न्हातेवेळीं नवर्यानें केशरी रंगांत बुडवून तिचे हातांत घालवयाची अंगठी. ३ लग्नांत मुलाच्या हाताखालीं मुलीचा हात ठेवून त्यांवर समंत्रक पाणी घालणें. -बदलापूर २०५. ॰पान-पु. कोंका पडण्यापूर्वींचें केळीचें पान. ॰पान्हा- पु. हातकरीण गाय, म्हैस इ॰ नें सोडलेला पान्हा (वासरूं किंवा अंबोण दाखविल्याशिवाय). हातपान्ह्यास लगाणें, येणें, हातपान्ह्याची गाय इ॰ प्रयोग. ॰पालवी-स्त्री. हात पोंहो- चेल इतक्या उंचीवरील पाला. ॰पावा-वि. (कों.) हाताच्या आटोक्यांतील, हात पोहोंचेल इतक्या उंचीवरील (वेलीचें फूल इ॰ किंवा खोली-विहिरींतील पाणी इ॰). [हात + पावणें] ॰पिटीं-स्त्री. १ झोंबाझोंबी; गुद्दागुद्दी. २ (ल.) हातघाईची मारामारी. 'तंव राउतां जाली हातपीटी ।' -शिशु ९६८. [हात + पिटणें] ॰पेटी-स्त्री. हातानें भाता चालवून वाजवावयाची बाजाची पेटी; हार्मोनियम. २ सरकारी कामाचे कादगपत्र ठेवण्याची पेटी. -स्वभावचित्रें २४. ॰पाळी-स्त्री. चेंडूफळीचा एक प्रकारचा खेळ. -मखेपु ५६. ॰फळ-न. (बे.) मेर ओढण्याचें फळ. ॰फळी, हातोफळी-क्रिवि. हातोहातीं; लवकर. ॰बळ-न. हस्तसामर्थ्य. 'हातबळ ना पायबळ, देरे देवा तोंडबळ.' ॰बांधून डंकी-स्त्री. (कुस्ती) जोडीदारास खालीं आणल्यावर त्यानें आपला एक पाय धरला तर आपण दुसर्या पायानें जोडीदाराचे पाठीवरून झोंका घेऊन उडी मारून त्यास चीत करणें. ॰बेडी-स्त्री. कैद्याच्या हातांत अडकवावयाची बेडी; हातकडी. ॰बोनें-न. हातांत घेत- लेलें भक्ष्य. 'बुद्धीचेनि शाकें । हातबोनें निकें ।' -ज्ञा ६.२८२. ॰बोळावन-स्त्री. हातांनीं मार्गाला लावणें. 'जाणो नेदी योग्यता । ग्रहीं हातबोळावन करितां ।' -भाए ३४९. ॰भाता-पु. हातांत घेऊन फुंकावयाचा भाता; लहान भाता. ॰भार-पु. मदत; साहाय्य (विशषतः द्रव्याचें). (क्रि॰ लावणें). ॰भुरकणा- भुरका-वि. हातानें भुरकून खावयाजोगा (पेयपदार्थ). ॰भुर- कणें-भुरकें-वरील प्रकारचा पातळ पदार्थ. ॰भेटी-स्त्री. प्रेमानें हातांत हात घालणें. -एभा २८.५९२. ॰मांडणी-स्त्री. पैसे पावल्याची पोंच म्हणून पैसे नेणार्याची खतावणीवर घेतलेली सही. ॰मात-स्त्री. हात टेकणें. ॰मेटी हेटीमेटी-क्रिवि. आळसांत; निरुद्योगीपणानें; हातांवर व गुडघ्यावर टेकून रमतगमत (दिवस इ॰) घालविणें. 'दिवस गेला हातमेटीं चांदण्या खाली कापूस वेटी.' ॰रगाडा-पु. उसाचा हातचरक. ॰रवी-स्त्री. घुसळखांब, मांजरी यांचे विरहित हातानेंट फिरविण्याची लहानरवी. ॰रहाट- पु. हातानें ओढून पाणी काढण्याचा लहान रहाट. ॰रिकामी- स्त्री. विधवा स्त्री. -बजलापूर १७४. ॰रिती-वि. (महानु.) रिकामी विधवा. -स्मृतिस्थळ. ॰रुमाल-पु. १ तोंड वगैरे पुसण्याचा लहान रुमाल. २ नित्योपयोगी कागदपत्रें ठेवण्याच्या दप्तराचा रुमाल; चालता रुमाल; त्यांतील कागदपत्रांचें बंडल. ॰रोखा- पु. दस्तक; चिठी; आज्ञापत्र. 'पाराजीपंत वाघ यांस हातरोखा वरचेवर पाठवून अति आग्रहें अंतरवेदींत घालविलें.' -भाव १०२. ॰लाग-पु. हाताचा टप्पा. ॰लागास-लागीं येणें-असणें- कक्षा, आंवाका, आटोका, अवसान इ॰ त येणें, असणें. ॰लागा- लाग्या-वि. अनुकूल असणारा. 'तुमचे हातलागे लोक असतील.' -वाडबाबा १.६. ॰लावणी-स्त्री. १ वेश्येचा चिरा उतरणें; कौमार्यभंग. (क्रि॰ करणें). २ हाताची पेरणी; लागवण. -वि. हातपेरणीचें. ॰लावा-व्या-वि. हाताळ; चोरटा; चोरी करण्या- साठीं हात फुरफुरत असलेला. ॰वजन-न. १ जिन्नस हातांत घेऊन केलेलें वजन. २ अशाप्रकारें वजन काढण्याची लायकी. ॰वटी- हातोटी-स्त्री. १ हस्तकौशल्य; हस्तचातुर्य. २ (सामा.) कसब; नैपुण्य; चलाखी. 'अहो चंद्रकांतु द्रवता कीर होये । परि ते हात- वटी चंद्री कीं आहे ।' -ज्ञा ९.२९. ३ विशिष्ट पद्धत, रीत, प्रकार. [हिं.] भाषणाची-पोहण्याची-व्यापाराची इ॰ हातोटी. ॰वडा- हातोडा-पु. सोनार, कासार इ॰ चें ठोकण्याचें हत्यार. ॰वडी हातोडी-स्त्री. लहान हातोडी. ॰वणी-न. १ हात धुतलेलें पाणी. २ (कों.) हातरहाटाचें पाणी पन्हाळांतून जेथें पडतें तेथील जमीनीचा उंच केलेला भाग; हातणी. ॰वल्हें-न. हातानेंच वल्हवावयाचें लहान वल्हें. ॰वश-वि. हस्तगत. ॰वशी-स्त्री. हात उगारणें. -शर. ॰वळा, हातोळा-पु. हातवटी पहा. म्ह॰ गातां गळा; शिंपता मळा, लिहितां हातवळा. ॰वारे-पु.अव. हातानीं केलेलें हावभाव; हाताची हालचाल. ॰विंड-न. (राजा.) हाता झालणा पहा. ॰विरजण-न. अजमासानें घातलेलें विरजण ॰विरजा-विरंगुळा-वि. कामांत मदत करण्याच्या लायक, लायकीस झालेला (पुत्र, शिष्य, उमेदवार इ॰) [हात + विरजणें] ॰शिंपणें-न. सोडवणी न देतां शेलणें इ॰ साधनानें भाजी- पाल्यास उडवून द्यावयाचें पाणी; असें पाणी शिंपणें. ॰शेकणें-न. (उसाचा चरक) चुलाण्यांत जाळ घालणारास त्याच्या मेहनती बद्दल द्यावयाचा गूळ. ॰शेवई-स्त्री. हातानें वळलेली शेवई; याचे उलट पाटशेवई. ॰सर-न. बायकांचा हातांतील एक दागिना, गजरा. 'हे पाटल्या हातसरांस ल्याली ।' -सारुह ६.२६. ॰सार- वण-न. खराटा, केरसुणी न घेतां हातानें जमीन इ॰ सारवणें. ॰सुख-न. १ दुसर्यास, शत्रूस हातानें मारूंन त्यामुळें अनुभवि- लेलें सुख (क्रि॰ होणें). २ हातानें दिलेला मार. ॰सुटका-स्त्री. १ एखाद्या व्यवहारांतून, धंद्यांतून स्वतः अंग काढून घेणें; मोकळें होणें. २ हातविरजा पहा. ३ हाताचा सढळपणा. ॰सुटी-स्त्री. औदार्य. 'हे हातसुटीक्षीरसागरा । वांचौनि नाहीं ।' -भाए ७६९. ॰सुतकी-स्त्री. पाथरवटाचें दगड फोडण्याचें हत्यार. ॰सूत-न. चातीवर हातानीं काढलेलें सूत. ॰सोकी(के)ल-सोका-वि. हाताच्या संवयीचा; अंगाखांद्यावर घेण्यास संवकलेला. 'केल कुत्रा हातसोंका ।' 'घडो नेदि तीर्थयात्रा.' -तुगा २९५४. ॰सोडवण-नस्त्री. हातसुटका अर्थ १,२ पहा. ॰सोरा-र्या सुरा-र्या-पु. कुरड्या इ॰ करण्याचा सांचा. ॰हालवणी-स्त्री. प्रवाशांवरील एक जुना कर (त्यांच्या हात हालवण्याच्या क्रियेबद्दल हा कर असे). हातचा-वि. १ हातानें दिलेला; स्वाधीनचा; हातांतला; हातानें निर्मिलेली, मिळविलेली, दिलेली (वस्तु, काम, उत्पादन इ॰). 'शुद्राचे हातचें पाणी स्नानसंध्येस घेऊं नये.' 'रोग्यास औषध देणें मनुष्याच्या हातचें आहे-आयुष्य घालणें नाहीं.' २ (अंकगणित) पूर्णांकाची बेरीज करतांना बेरजेच्या संख्येंतला अंक ज्या स्थानाचा त्या स्थानीं मिळविण्याकरितां उरलेला अंक. (क्रि॰ येणें; रहाणें; ठेवणें). ३ लवकर हातीं येणारें; अवसानांतील. ४ ताब्यांतील; कबजांतील. म्ह॰ 'हातचें सोडून पळत्याचे पाठीस लागूं नये.' ॰चा पाडणें-१ हातां- तील सोडणें. २ एखाद्यास त्याचे ताब्यांतील वस्तू्स मुकविणें. ॰चा-धड-नीट-वि. नीटनेटकें काम करणारा (लेखक, कारागीर). ॰चा फोड-पु. फार प्रिय माणूस. तळहाताचा फोड पहा. ॰चा मळ-पु. सहज घडणारी गोष्ट. 'सरळ, सोपी आणि बालिकाबोध भाषा कशी वापरावी हें म्हणजे माझ्या हाताचा मळ आहे.' -कीच. ॰चा सुटा-वि. सढळ हाताचा. हातवा-पु. १ (बायकी) गौरीपूजनाचे सणांत हळदीकुंकवानें हात भिजवून जमिनीवर छाप मारणें. २ लग्नांत नवर्याच्या मिरवणुकीच्या मागें धरावयाचा कणकेचा दिवा. ३ घोड्याचा खरारा, साफ करण्याचा काथ्याचा पंजा. ४ काडवात मनको. ५ (कर्हाड) न्हाणवली बसवितांना, मखर बांधावयाचे ठिकाणीं, कुंकू पाण्यांत भिजवून हातानें पांच उलटे पांच सुलटे ठसें उठविणें. हातळ, हाताळ-ळु-वि. चोरण्याची संवय असलेला; चोर; भामटा. हातळणें, हाताळणें-उक्रि. १ हात लावणें; चोळ- वटणें; चिवडणें, २ हाताळ माणसानें वस्तू् चोरणें. हातळी, हाताळी, हाताळें-स्त्रीन. १ घोड्याचा काथ्या इ॰ चा खरारा. २ भात्याची बोटांत, हातांत अडकवावयाची चामड्याची वादीं. ३ (कर.) भाकरी. हाता-पु. हातांत राहील इतका जिन्नस, पसा (फळें, फुलें इ॰ पांच-सहा इ॰ संख्येचा संच एकेक वेळ हातांत घेऊन बाजूस ठेवतात). हाताखालचा-वि. १ मदतनीस; हाता- खालीं काम करणारा. २ उत्तम परिचयाचा; माहितींतील. ३ हातां- तील; कबज्यामधील; स्वाधीन. ४ दुय्यम; कमी दर्जाचा. हाता- खालीं-क्रिवि. १ सत्तेखालीं; दुय्यम प्रतींत. २ स्वाधीन. ३ जातांजातां; हातासरशीं; सहजगत्या. 'मी आपला घोडा विका वयास नेतोंच आहे, मर्जीं असली तर हाताखालीं तुमचाहि घोडा नेईन आणि विकीन.' हाताचा उदार, मोकळा, सढळ- वि. देणगी इ॰ देण्यांत सढळ. हाताचा कुशल-वि. हस्त कौशल्यांत निपुण, प्रवीण. हाताचा जड-बळकट-थंड-वि. १ चिक्कू; कृपण. म्ह॰ हाताचा जढ आणि बोलून गोड. २ मंद (लेखक). हाताचा जलद-वि. काम करण्यांत चलाख हाताचा फटकळ-वि. फटाफट मारणारा; मारकट. हाताचा बाण-पु. वर्चस्व, पगडा, वजन पाडणारें कृत्य, गोष्ट (क्रि॰ गमावणें; दवडणें; सोडणें). हाताजोगता-वि. १ हातांत बसेल; मावेल; धरतां येईल असा. २ हात पोहोचण्याजोगें. हाता- निराळा-वेगळा-वि. १ पूर्ण; पुरा; सिद्ध केलेला; पुन्हां हात लावण्याची जरूरी राहिली नाहीं असें (काम, धंदा इ॰). 'हा दुर्निवह कोश एकदां हातानिराळा झाला म्हणजे दुसरें काम घेतां येईल.' २ -क्रिवि. एकीकडे; बाजूस. 'कामापुरती भांडीं वहिवाटींत ठेवा वरकड हातानिराळीं ठेवा.' हातापद्धति-स्त्री. दलाल माल घेणार्याच्या हातावर रुमाल टाकून गुप्तरीतीनें मालाची किंमत माल घेणार्याकडून अजमावतो ती पद्धत. हाताची थट्टा-स्त्री. थट्टेंनें मारणें (थापटी इ॰); चापट देणें. (तोंडी थट्टा नव्हे्). हाता(तो)फळी-स्त्री. गुद्दागुद्दी; मारामारी; कुस्ती; हातझोंबी; धक्काबुक्की. 'मजसीं भिडे हातोफळी ।' -ह १९.१४३. -क्रिवि. पटकन्; चट्दिशी; तत्काळ; हातावर हात मारून. [हात + फळी] हातावरचा संसार-हातावरचें पोट-पुन. मजुरी, कामधंदा करून स्वतःचें कसेंतरी पोट भरणें (क्रि॰ करणें; चालविणें) थोड्या पगाराची, कष्टाची नोकरी करून उदरनिर्वाह. हातावीती- क्रिवि. हातोहात पहा. 'सर्वज्ञ हातावीती पुढें जाती ।' -पुच. हातासन-न. हातवटी. 'अन्योपदेशाचेनि हातासनें ।' -ज्ञा ६.११९. हातासरसां-क्रिवि. त्याच हातानें, प्रकारानें; तसेंच; त्याच बरोबर; चालू कामांत आहे तोंच. 'उष्टी काढतो आहेस तों हातासरशीं भांडीं घास मग हात धू.' हातिणें-अक्रि. मारणें. -मनको. हातिवा-स्त्री. काडवात. 'उजळोनि दिव्य तेजा हातिवा ।' -ज्ञा १६.२३. हातुवसीया-विय एक हात अंतरा- वरील. 'हातवसिया कळागंगा पार्वती ।' -धवळे ३१ हातोणी- स्त्री. (व.) खरकटें पाणी; हातवणी. हातोपा-हातपा पहा. हातोपात-ती-क्रिवि. एका हातांतून दुसर्या हातांत. वरचेवर; हातोहात. -ज्ञा १८.१५६. हातोरी-क्रि. (ना.) हातानें; साहा- य्यानें. हातोवा-पु. (महानु.) अंजली; ओंजळ. 'हातोवा केवि आटे अंभोनिधि ।' -भाए २१७. हातोसा-पु. मदत; हातभांर. (क्रि॰ देणें), हातोहात-ती-क्रिवि. १ हातचेहातीं; हातोपात. २ चटकन्; भरदिशीं. (क्रि॰ येणें = मारामारी करणें). 'हिंवांळ्याचे दिवसांत दुपार हातोहात भरतें.' हातोळा-हात- वळा पहा. हातोळी-स्त्री. (व.) लग्न. हात्या-पु. १ पाणर- हाटाचा दांडा. २ घोडा घासण्याची पिशवी; खरारा. हाताळी अर्थ १ पहा. ३ मागाच्या फणीची मूठ. ४ काहिलींतील गूळ खरवड- ण्याचें खुरपें. ५ (कर.) मोठी किल्ली.