मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

बहीर

बहीर bahīra a (बधिर S) Dead, numb, callous.

मोल्सवर्थ शब्दकोश

बहीर a Dead, numb, callous.

वझे शब्दकोश

स्त्री. अघाडीचें सैन्य; बिनी. [हिं.]

दाते शब्दकोश

(पु.) हिंदी अर्थ : सैनिक छावनी में रहनेवाले सामान्य लोग, (स्त्रियाँ मजदूर आदि). मराठी अर्थ : सैनिक छावणीत राहणारे (सॅपर्स, मायनर्स).

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

बहिर

(सं) वि० बधिर, बहिरा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

बहिरा, बहीर

वि. १ फुटका (कान). २ ज्याला मुळींच ऐकूं येत नाहीं किंवा कमी येतें असा. ३ वेदनाक्षम; सुन्न; संवेदनारहित (अवयव). [सं. बधिर] म्ह॰ (व.) बहिर्‍याकानीं कुयर्‍या, अडक्यावायती मोहर्‍या = बहिर्‍याला ऐकूं येत नाहीं. तेव्हां त्यास उद्देशून म्हणतात. ॰पिसा-वि. बहिरा व वेडा; पिसाट. बहिरंभट-वि बहिरा.

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

आलाहिदा      

वि.       अलग : नबाबांनी बहीर बुणगे कुली आलहिदे करून राये सोनगड सातकोस आहे तेथें पाठविले.’ − पेद ३०·१५८. [अर.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आस्थान

न. स्थान; स्थल; सभास्थान; पीठ. 'कां बहिर- यांच्या आस्थानीं । कवण गीतातें मानी ।' -ज्ञा ४.२३. [सं.]

दाते शब्दकोश

बहीरबुनगें

न. बुणगे वगैरे किरकोळ लोक: सैन्या- बरोबरचे फालतू लोक. 'मुकामाचे झेंडे उभे करून बहीरबुनगे उतरवून फौजा चहूकडे मिसली वरच उभे आहेत.' -पेद १. १३. [बहीर + बुनगे व तत्सम लोक]

दाते शब्दकोश