मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

बहिरा, बहीर

वि. १ फुटका (कान). २ ज्याला मुळींच ऐकूं येत नाहीं किंवा कमी येतें असा. ३ वेदनाक्षम; सुन्न; संवेदनारहित (अवयव). [सं. बधिर] म्ह॰ (व.) बहिर्‍याकानीं कुयर्‍या, अडक्यावायती मोहर्‍या = बहिर्‍याला ऐकूं येत नाहीं. तेव्हां त्यास उद्देशून म्हणतात. ॰पिसा-वि. बहिरा व वेडा; पिसाट. बहिरंभट-वि बहिरा.

दाते शब्दकोश

बहिरा

बहिरा a Deaf. Numb, void of feeling.

वझे शब्दकोश

बहिरा bahirā a (बधिर S) Deaf--the ear; and attrib. the person. 2 Dead, callous, numb, void of feeling.

मोल्सवर्थ शब्दकोश

बहिरा पिसा

बहिरा पिसा a Deaf and crazy.

वझे शब्दकोश

बहिरा पिसा bahirā pisā a Deaf and crazy; deaf and idiotic.

मोल्सवर्थ शब्दकोश

संबंधित शब्द

अंधळा

अंधळा andhaḷā a (अंध S) Blind--a person or an eye. 2 fig. Ignorant or erring: confused, disorderly, wild--as proceedings: blind, undiscerning, undistinguishing--a government &c. अं0 सांगे गोष्टी बहिरा गाढव पिटी; अंधळ्याच्या मनीं आयतवार बहिरा म्हणतो माझी बायको गर्व्हार and many others expressive of mutual misapprehension. अंधळ्याच्या गायी देव राखितो Providence takes care of fools and blind. अंधळ्यानें दळावें कुत्र्यानें पीठ खावें or अंधळें दळतें कुत्रें पीठ खातें Expresses wild anarchy or misrule. अंधळ्यापुढें नाच बहिऱ्यापुढें गायन Said of the bestowing of gifts or granting of favors where they are not valued. अंधळ्याबहिऱ्याची गांठ Used of an intercourse or a meeting where each party mistakes the other. अंधळ्यास अं0 वाट दाखवितो The blind lead the blind. अंधळ्यास आमंत्रणें दोघे येतात If you invite a blind man, you must expect also his leader.

मोल्सवर्थ शब्दकोश

वि. १ ज्याला दिसत नाहीं असा (मनुष्य, डोळा); अंध पहा. २ (ल.) अज्ञानी; अजाणता; चुकणारा; विवेकशून्य; अविचारी; गोंधळ्या; अव्यवस्थित (व्यवहार), बेकायदेशीर (राज्य). [सं. अंध] ॰म्ह अंधळा सांगे गोष्टी, बहिरा गाढव पिटी; अंधळ्या मनीं आयतवार (सोमवार), बहिरा (किंवा पांगळा) म्हणतो माझी बायको गर्भार. या (परस्पर गैरसमज दाखविणार्‍या) व अशा पुष्कळ म्हणी आहेत. अंध- ळ्याच्या गाई देव राखतो = ईश्वर गरिबा-दुबळ्याची काळजी घेतो. अंधळ्यानें दळावें कुत्र्यानें पीठ खावें किंवा अंधळें दळतें कुत्रें पीठ खातें = एकानें कष्ट करावे व भलत्यानेंच त्याचा फायदा घ्यावा अशी बेबंदशाही, अंदाधुंदी. 'यास्तव आमचें सर- कारास रयतांच्या वतीनें असें निक्षून सांगणें आहे कीं आंधळें दळतें आणि कुत्रें पीठ खातें असला प्रकार यापुढें चाला- वयाचा नाहीं.' -सासं २.३१६. अंधळ्यापुढें नाच बहिर्‍या- पुढें गायन = ज्याला ज्याची किंमत नाहीं त्याला ती वस्तु देणगी देणें. (गो.) 'आंधळ्यासरी नाजून आनी भैर्‍यासरी गावन उपयोग किते?' अंधळ्या बहिर्‍याची गांठ = प्रत्येक जण दुसर्‍या- बद्दल गैरसमज करून घेतो अशा दोन माणसांची भेट. २ पर- स्परांना मदत करण्यास असमर्थ अशांची गांठ. अंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन(दैव अनुकूल झालें असतां कधीं कधीं आपल्या इच्छेपेक्षां अधिकहि देतें यावरून) = अपेक्षेपेक्षां अधिक मिळणें. अंधळ्यास अंधळा वाट दाखवितो = एक अज्ञानी दुसर्‍या अज्ञानी माणसास उपदेश करतो, मार्गदर्शक होतो (म्हणजे दोघेहि फसतात). अंधळा रोजगार आणि मिंधा संसार = अव्यय- स्थितपणामुळें दुसर्‍याचा पगडा स्वतःवर बसणें. -ळ्याचा रस्ता-वाट-मार्ग-पु. सरळ; रुंद व मोकळा रस्ता; आंधळ्याला अडचणीशिवाय जातां येईल असा हमरस्ता. ॰कारभार- पु. अंदाधुंदीनें चालविलेलें राज्य; बेबंदशाही; अव्यवस्थित काम. ॰डोळा-पु. अंधळा माणूस (विशेषतः एका डोळ्यानें). ॰तिंधळा-तिरळा-वि. (कों.) १ अंडगडी; पोटगडी; पित्त्या, २ (इटीदांडूच्या खेळांतील) दुश्या; दोन्ही बाजूंनीं खेळणारा; रहाट्या. ३ (ल.) दोहीं दगडींवर हात टेकणारा; दुरोखी. ॰नारळ-पु. कोंवळा नारळ; शहाळें; ज्यांत नुसतें पाणीच असल्यामुळें वाजत नाहीं असा. आडसर पहा. -ळ्याची काठी - १ अंधळा, अशक्त, निराश्रित यांचा पुढारी अथवा आश्रयदाता; अंधळ्याला आधारभूत गोष्ट (अंधळ्याला मुख्य आधार त्याच्या काठीचा असतो यावरून). 'या अंधावृद्धाची राहों देतास एक जरि यष्टी । भीमा, मी मानस तरि होऊं देत्यें कशास बहु कष्टी ।' -मोस्त्री ३.४६. २ म्हातार्‍या आईबापांचा एकुलता एक मुलगा. -ळ्याची माळ-माळका-स्त्री. १ अंधळ्या लोकांची माळ, रांग. २ (ल.) अज्ञानी व मूर्ख लोकांची परंपरा. -ळ्याची मिठी-स्त्री. घट्ट मिठी; चिकटणें. -ळ्यांत काणा राजा-जेथें सर्वच अडाणी असतात तेथें थोडयाशा शहाण्याचें तेज पडतें. -ळ्यासी जन सारेंचि आंधळें-जसें आपण असतों तसेंच जग आपल्याला दिसतें.

दाते शब्दकोश

बहिरोबा

पु. १ भैरव देव. २ (ल.) बहिरा मनुष्य. [सं. भैरव] ॰ची सेवा असणें-अक्रि. बहिरा असणें.

दाते शब्दकोश

भेरा

वि. १ (राजा.) बहिरा; बधिर कानाचा. २ बधिर; सुना; निर्जीव; संवेदनाशून्य. [बधिर] भेरकट-वि. किंचित बहिरा; बहिरट. भैरवाची सेवा असणें-बहिरा असणें.

दाते शब्दकोश

भेरा bhērā a R (Commonly बहिरा) Deaf. 2 Dead, callous, insensible.

मोल्सवर्थ शब्दकोश

किंवडा, किंवडू, किंवड्या      

पु.        बहिरा. (तंजा.)[क. किवी = कान, किवड = बहिरा]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

किंवडा-डू, किवढ्या

पु. (तंजा.) बहिरा. [का. किवी = कान, किव्ड = बहिरा]

दाते शब्दकोश

किवडा, किवडू, किवढ्या      

वि.        बहिरा.–(तंजा.) [का. किवी = कान, कीव्ह = बहिरा]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कान      

पु.       १. श्रोत्र; कर्णेंद्रिय; श्रवणेंद्रिय; शरीराच्या ज्या अवयवामुळे आपल्याला ध्वनीचे ज्ञान होते, ऐकू येते तो अवयव : ‘सर्वांगी निघाले कान ।’ - ज्ञा १४·६१. २. (ल.) कढई; मोदकपात्र किंवा यासारख्या भांड्याच्या कड्या; सामान्यतः कानाच्या आकाराची वस्तू. ३. दागिने घालण्यासाठी कानाला पाडलेले भोक. ४. बंदुकीचा काना किंवा रंजक; दारू पेटवण्याचे छिद्र; बत्ती लावायची जागा. [सं. कर्ण] (वा.) कान उघडणे - केलेल्या मूर्खपणाची कृत्ये (स्वतःची व दुसऱ्याची) समजणे; डोळे उघडणे; एखादी गोष्ट स्पष्ट करून सांगणे; समजूत पटवणे. कान उघडून सांगणे - बजावून सांगणे; स्पष्ट सूचना देणे. कान उपटणे, कान धरणे, कान पिरगाळणे - शिक्षा करण्यासाठी कान धरून पिळवटणे; ओढणे; शिस्त लावणे : ‘त्याला जिवंत पकडून त्याचे कान उपटल्याशिवाय आम्ही राहणार नाही.’ - बाय २·२. कान काढणे - आगाऊपणा करणे. कान कापणे, कान कापून हातावर देणे - वरचढ करणे, कडी करणे; मात करणे; वर ताण करणे; फसवणे. कान किटणे - एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा ऐकण्यामुळे वीट, कंटाळा येणे. कान चावणे - खोट्यानाट्या गोष्टी सांगून दुसऱ्याचे मन कलुषित करणे. कान झाकणे, कान झाकून घेणे - दुर्लक्ष करणे; मुळीच न ऐकणे. कान झाडणे - १. स्पष्ट नाकारणे; ऐकून न घेणे; कानावर येऊ न देणे; निषेध करणे : ‘स्वर्गा जाणें हें सांडी । भवविषयीं कान झाडी ।’ - ज्ञा १३·६१८. कान टवकारून ऐकणे - लक्ष देणे; पूर्ण लक्ष देऊन, उत्सुकतेने ऐकणे : ‘भाषण करणार म्हटल्याबरोबर त्यांनी कान टवकारून पहावे.’ - के २१·५·३०. कान टोचणे - १.कानाला भोक पाडणे. २. झाडणे; ताशेरा ओढणे; खरडपट्टी काढणे; योग्य व्यक्तीने कानउघाडणी करणे. ३. (ल.) फूस देणे; चिथावणे; चढवणे कान धरली शेळी - पूर्ण आधीन किंवा स्वाधीन : ‘आम्ही कान धरली शेळी आहो, हुकमी आहो.’ - ऐकोपुर. कान देणे - लक्ष देणे. कान धरणे - शासन, शिक्षा करणे. कान धरून घेणे, कान पिळून घेणे - वादाची वस्तू बळजबरीने ताब्यात घेणे. कान निवणे, कान थंड होणे - ज्या गोष्टीबद्दल फार उत्सुकता लागली आहे ती ऐकून बरे वाटणे, आनंद होणे. कान पसरून ऐकणे - पूर्ण लक्ष देऊन ऐकणे (पण कृती न करणे.) कान पाडणे - १. धैर्य सुटणे; निराश होणे. २. आपल्या ताब्याला आळा बसलासे वाटणे; गरीब बनणे; माघार घेणे. ३. ऐकू येत नाही असे सोंग करणे; कानाडोळा करणे; दुर्लक्ष करणे : ‘कान पाडुनि बसे धरणीसी ।’ - किंगवि २·२०. कान पिळून घेणे - स्वतःच्या मूर्खपणाचे दुष्परिणाम भोगल्यानंतर पुन्हा तसे न वागण्याबद्दल दृढ निश्चय करणे. कानपूर ओस करून बसणे - बहिऱ्याचे सोंग घेणे; ऐकू येत नाही असे भासवणे. कान फुटणे - १. (पूर्ण किंवा अर्धवट) बहिरा होणे. २. अतिशहाणपणा दाखवणे. कान फुंकणे - १. कानात मंत्र सांगणे; उपदेश देणे. २. (ल.) चुगली करणे; कानात भरवणे; चहाडी, लावालावी करणे. कान भरणे, कान भारणे - चहाड्या करणे; कानात सांगणे; चिथवणे. ३. (वर्तमान) कान भ्रष्ट होणे - बाहेर फुटणे; वाच्चता होणे. कान लांबणे - १. (लहान मुलासंदर्भात बोलताना) वयाने जसजसे मोठे होत जाईल तसतशी अक्कल कमी होत जाणे. २. गाढव होणे. (गाढवाचे कान लांब असतात त्यावरून.) काना टाळी पडणे - ऐकू न येणे; कानात दडे बसणे. कानाआड जाणे, कानामागे जाणे, काना वरून जाणे - उपदेश, शिक्षा, ताकीद वगैरेचा एखाद्यावर परिणाम न होणे. कान चावणे - खोट्यानाट्या गोष्टी सांगून दुसऱ्याचे मन कलुषित करणे. कानाचे कानवले होणे - कान वाकडे (कानोल्याप्रमाणे) पिळवटलेले होणे. कानाखाली वाजवणे; कानाखाली लगावणे - कानफडात मारणे. कानाचे किडे झाडणे - १. परनिंदा श्रवणदोषापासून मुक्त करणे; किल्मिष घालवणे; मनातील गैरसमज, अढी दूर करणे. २. (कानात किड्यांचा प्रवेश झाला आहे अशा समजुतीने) बरोबर समजूत पाडणे; हितवाद सांगणे; चांगली खरडपट्टी काढणे. कानात खुंट्या मारणे - १. बहिरे होणे. २. पूर्वीचा शिक्षेचा प्रकार : ‘कानीं खुंट्या आदळिती । अपानीमेखा मारिती ।’ - दास २·७·७३. कानात जपणे - १. कानात पुटपुटणे; गुप्त रीतीने बोलणे, सुचवणे; कानमंत्र देणे; चहाडी करणे. २. कानात जपून ठेवणे. कानात तुळशी घालणे, कानात तुळशी घालून बसणे - १. ऐकू येत नाही असे भासवणे; सोंग करणे. २. मायापाश झुगारून दिल्याचा आविर्भाव आणणे; उपरती झाल्याचे दाखवणे; विरक्तीचे सोंग आणणे. कानात तेल घालून निजणे - अतिशय दुर्लक्ष करणे; पूर्णपणे उदासीन असणे. कानात भरणे - चुगल्या करणे, एखाद्याचे वाईट करण्याविषयी भरी भरणे. कानात भेंड घालणे - बहिरेपणाचे सोंग घेणे; न ऐकणे. (व.) कानात मंत्र सांगणे, कानमंत्र देणे - चिथवणे; चेतवणे. कानात रस ओतणे - मंत्रोपदेश करणे. कानात वारे भरणे - उच्छृंखल होणे; एखाद्या गोष्टीचा पूर्ण विचार न करता हुरळून जाणे : ‘ही गरीब गाय कानात वारे भरल्यामुळे उथळली आणि सैरावैर धावून अखेर चिखलात रुतली.’ - सुदे ६१. या कानाने ऐकणे त्या कानाने सोडणे, कानाने ऐकणे त्या कानाने सोडणे - मनात मुळीच न ठेवणे, राखणे. कानामागे टाकणे, कानापाठी टाकणे - दुर्लक्ष करणे : ‘फुकटच्या उपदेशाप्रमाणे त्यांचा निरोप कानापाठीमागे टाकणार नसाल तर सांगतो.’ - सुदे १०५. कानाबाहेर करणे, कानावेगळा करणे - दुर्लक्ष करणे; उदासीन राहणे. कानाला खडा लावणे, कानाला खडा लावून घेणे - मूर्खपणाचे किंवा दुष्टपणाचे काम पुन्हा न करण्याविषयी निश्चय करणे (कानाच्या पाळीच्या मागे खडा लावून दाबण्याचा पूर्वी शिक्षेचा एक प्रकार होता.). कानावर पडणे - सहजपणे ऐकणे; विनासायास ऐकायला मिळणे. कानावर मान ठेवणे - आळशीपणाने किंवा निष्काळजीपणाने बसणे. कानावर येणे - ऐकणे; श्रुत होणे : ‘येणार पुढे पुष्कळ आले आतांचि काय काना तें ।’ - मोभीष्म ७·६. कानावर हात ठेवणे, कानात बोटे घालणे, कान झाकणे - १. एखादी गोष्ट मुळीच माहीत नाही अगर त्या गोष्टीत आपला बिलकुल संबंध नाही असे दाखवणे; नाकारणे; नाकबूल करणे. २. एखादी मनाविरुद्ध गोष्ट ऐकवत नाही म्हणून कानात बोटे घालणे : ‘तो हा वधिला केले कर्म अमित साधु घातसे मोठें । खोटें हे म्हणतिल शिव शिव कर्णी घालतील बुध बोटे ।’ - मोस्त्री ४·२६. कानावरून जाणे - १. कान चाटून जाणे. २. (ल.) थोडासा तोटा होणे. ३. ऐकलेले असणे. कानावेगळे टाकणे - कानाआड करणे, कानाडोळा करणे; दुर्लक्ष करणे : ‘पण येथे सांगावे तर कारभारी कानावेगळी टाकतात.’ - पुणे अख भावं २·१६३. कानाशी कान लावणे - गुप्त रीतीने मिळून मसलत, खलबत करणे. कानाशी लागणे, कानी लागणे - कानात सांगणे; हळूच बोलणे; गुप्त रीतीने सुचवणे. कानास कोन न कळू देणे, कानास न लागू देणे - अतिशय गुप्तपणा राखणे : ‘आणि झाल्यावर सुद्धा कानास कोन लागू नये ही तर खबरदारी घेतलीच पाहिजे.’ - सुदे १०·८. कानास खडा लावणे - कान उघाडणी करणे; वावदंड करणे. कानास बट्टे बसणे, कानास दडे बसणे - बहिरा होणे. कानी कपाळी रडणे, कानी कपाळी ओरडणे - सदोदित, नेहमी, बुद्धिवाद करत असणे; नेहमी, पुन्हा पुन्हा सांगणे. कानी कोची बसणे, कानी कोची लागणे - (चोरून ऐकण्यासाठी) कानाकोपऱ्यात, अडचणीत बसणे, कानोसा घेणे. कानी मनी नसणे - एखाद्याची कल्पना नसणे; कधीच न ऐकलेले, मनात नसलेले ऐकणे. कानी सात बाळ्या असणे - (लहान मुलांच्या भाषेत ऐकायचेच नाही असा निश्चय दाखवायचा असताना) या कानाचा त्या कानाला कळून देणे; अतिशय गुप्तपणा ठेवणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अंतरायामवात

अंतरायामवात antarāyāmavāta m S A form of धनुर्वात or Tetanus. The muscles of the fore part are affected, and the patient is bowed forward. Contrad. from बहिरा- यामवात.

मोल्सवर्थ शब्दकोश

अपांग

वि. १ अवयवांत किंवा इंद्रियांत व्यंग, खोडी अस- लेला; विकलांग उ॰. आंधळा, बहिरा, लंगडा. [सं. अप + अंग] २ (कों.) स्वतंत्र.

दाते शब्दकोश

बैराट

वि. बहिरा; बहिरट. 'नणद ते बैराट कानीं असें ।' -अकक २ विठ्ठल रसमंजरी ३०. [बहिरट]

दाते शब्दकोश

बधिर

(सं) वि० बहिरा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

वि. १ बहिरा. २ स्पर्शानभिज्ञ; संवेदनशून्य; सुन्न; जड. [सं. बधिर; प्रा. बहीरो]

दाते शब्दकोश

बेरकट

वि. बहिरट; कमी ऐकूं येत असलेला. [बहिरा]

दाते शब्दकोश

बेरकट bērakaṭa a (बहिरा) Deafish.

मोल्सवर्थ शब्दकोश

बहिर

(सं) वि० बधिर, बहिरा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

बहिरावणें

बहिरावणें bahirāvaṇēṃ v i (बहिरा) To become deaf. 2 To become numb, callous, insensible, dead.

मोल्सवर्थ शब्दकोश

बहिरावणें, बहिरणें

अक्रि. १ बधिर होणें. 'दिशाचक्र बहिरैले । घाई निशानाचां ।' -शिशु ५८५. २ वेदनारहित, सुन्न होणें. [बहिरा]

दाते शब्दकोश

बहिरट

वि. बहिरा. [सं. बधिर अल्पार्थे]

दाते शब्दकोश

बहिरट bahiraṭa a (बहिरा) Rather deaf, deafish. 2 Contemptuously or angrily. Deaf. 3 Numb.

मोल्सवर्थ शब्दकोश

भैरी

पु. बहिरा माणूस. ॰वे(व्य)था-स्त्री. त्वचेचें स्पर्श- ज्ञान नाहीसें होणारा रोग; बधिरता.

दाते शब्दकोश

भैरोबा

पु. १ भैरव. २ बहिरा मनुष्य; बहिरोबा.

दाते शब्दकोश

भैरोबा bhairōbā m A familiar appellation of the god भैरव. 2 Applied (from the likeness of the sound of the word to that of बहिरा) to a deaf man.

मोल्सवर्थ शब्दकोश

भेदरणें

भेदरणें bhēdaraṇēṃ v i P (बधिर or बहिरा) To be numb (as from confined posture)--a limb.

मोल्सवर्थ शब्दकोश

भॅड्डॉ

वि. (गो.) बहिरा. [सं. बधिर]

दाते शब्दकोश

भर्‍यौचें

उक्रि. (गो.) बहिरे होणें. [बहिरा]

दाते शब्दकोश

कानाचा जड      

१.       अर्धवट बहिरा; बहिरट. २. (ल.) ज्याला सांगून लवकर समजत नाही असा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कानागाडा

पु. बहिरा असल्याचें सोंग; टंगळ मंगळ; दुर्लक्ष; ऐकलें न ऐकलेसें करण्याची क्रिया. (क्रि॰ करणें.) [कान + गाडणें]

दाते शब्दकोश

कानागाडा      

पु.       बहिरा असल्याचे सोंग; टंगळमंगळ; दुर्लक्ष; ऐकले न ऐकलेसे करणे : ‘तेव्हां राजानें आज्ञा केली की आपली फौज जमा करा. ऐकून कानागाडा केला.’ - होकै १५.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कानभेरा, कानभायरा      

वि.       बहिरट; बहिरा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कानडा

पु. बहिरा; कानवडा पहा. 'कानडा सखा ना वेडा नेत रोकडा किं पैलतिरा ।' -देप २८.

दाते शब्दकोश

कानडा      

पु.       बहिरा. पहा : कानवडा : ‘कानडा सखा ना येडा नेत रोकडा किं पैलेतिरा ।’ - देप १८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कॅपॉ

वि. (गो.) बहिरा.

दाते शब्दकोश

सैरा

वि. (व.) नीट; चांगलें; सरळ. 'सैरा घरीं जा.' म्ह॰ एक कान सैरा, एक कान बहिरा.

दाते शब्दकोश

सम-संयोग

दुधांत साखर, रत्नाला सुवर्णाचे कोंदण, आधीं सोन्याचे त्यांत जडावाचें, सुवर्णाला सुगंध, जणूं राम -लक्ष्मणांची जोडी, चंदनी काठीला चांदीची मूठ, किंमती सुरीला शिसवी मूठ, तलम साडीला जरीचा कांठ, सौंदर्याच्या जोडीला बुद्धि, पैशाबरोवर औदार्य, मर्दांचे पोवाडे मर्दांनीं गावेत, चांभाराच्या देवाला खेटराची पूजा, त्या हिडिंबेला हा खवीस भेटला, लाठी लाठीस भेटीस भेट, आंधळ्याला बहिरा भेटला, मणिकांचन न्याय.

शब्दकौमुदी

कान

पु. १ श्रोत्र; कर्णेद्रिय; श्रवणेंद्रिय; शरीराच्या ज्या अवयवामुळें आपणास ऐकूं येतें तो अवयव. २ (ल.) कढई, मोदकपात्र किंवा या सारख्या भांडयाच्या कड्या; सामान्यतः कानाच्या आका- राची वस्तु. ३ दागिने घालण्यासाठीं कानाला पाडलेलें भोंक. 'माझा भिकबाळीचा कान बुजला आहे.' ४ बंदुकीचा काना किंवा रंजक; दारू पेटविण्याचें छिद्र; बत्ती लावावयाची जागा. [सं. कर्ण] (वाप्र.) ॰उघडणें-केलेल्या मूर्खपणाचीं कृत्यें समजणें (स्वतःची व दुसर्‍याचीं); डोळे उघडणें; एखादी गोष्ट स्पष्ट करून दाखविणें; समजूत पटविणें; ॰उघडून सांगणें- बजावून सांगणें; स्पष्ट सूचना देणें. ॰उपटणें, धरणें, पिळणें, पिरगळणें-शिक्षा करण्यासाठीं कान धरून पिळविटणें, ओढणें; शिस्त लावणें. 'त्याला जिंकून जिवंत पकडून त्याचे कान उपटल्या- शिवाय आम्ही राहणार नाहीं.' -बाय २.२. ॰कापणें-कापून हातावर देणें- वरचढ करणें; कडी करणें; वर ताण करणें; मात करणें; फसविणें. 'दुकानदारानें माझा चांगला कान कापला' ॰किटणें-एखादी गोष्ट पुन्हां पुन्हां ऐकविण्यामुळे वीट, कंटाळा येणें. ॰खडा-डी लावणें-सूचना देणें; मनावर ठसेल असें सांगणें. ॰खडी लावून घेणें-स्वतःला शिक्षा लावून घेऊन चुकी सुधारणें. ॰झाडणें- १ स्पष्ट नाकारणें; ऐकून न घेणें; कानावर येऊं न देणें; निषेध करणें. 'स्वर्गा जाणें हें सांडी । भवविषयीं कान झाडी ।' -ज्ञा १३.६१७. २ उपदेश झिडकारणें, न मानणें. ॰टवकारून, पसरून, ऐकणें-लक्ष देणें; पूर्ण लक्ष देऊन ऐकणें. 'भाषण करणार म्हटल्याबरोबर त्यांनीं कान टवकारून पहावें.' के ३१.५.३०. ॰टोचणें-१ कानाला भोंक पाडणें. २ (ल.) फूस देणें; चिथावणें; चढविणें. ३ कानउघाडणी करणें; झाडणें; ताशेरा झाडणें; खरडपट्टी काढणें. (सोनारानें) कान टोचणें-तिर्‍हाइतानें कानउघाडणी करणें. ॰देणें-लक्ष देणें. 'श्रीरामराजा देतेस कान ।' -दावि ७८०. ॰धरणें-शासन करणें. ॰धरून-पिळून घेणें-वादाची वस्तु बळजबरीनें कब- ज्यांत, ताब्यांत घेणें. ॰निवणें-थंड होणें-बरें वाटणें; आव- डती किंवा जिच्याबद्दल उत्कंठा लागलेली अशी गोष्ट ऐकून संतोष होणें ॰पसरून ऐकणें-पूर्ण लक्ष देऊन ऐकणें (पण कृति न करणें). ॰पाडणें-१ धैर्य सुटणें; निराश होणें. २ आपल्या तांठ्याला आळा बसलासें वाटणें; गरीब बनणें; माघार घेणें. ३ ऐकूं येत नाहीं असें सोंग करणें; काणा डोळा करणें. 'कान पाडुनि बसे धरणीसी ।' -किंगवि २.२०. 'मी ह्याविषयीं कान पाड- णार नाही.' -बाळ २.१५. ॰पिळून घेणें-स्वतःचा मूर्खपणा कळून आल्यामुळें व त्याचे दुष्परिणाम भोगल्यानंतर पुन्हां तसें न वागण्याबद्दल दृढ निश्चय करणें. ॰पूर ओस करून बसणें- बहिर्‍याचें सोंग घेणें; ऐकूं येत नाहीं असें भासविणें. ॰पूर ओस पडणें-बहिरा होणें. ॰फुंकणें-१ कानांत मंत्र सांगणें; उपदेश देणें. २ चुगली करणें; मनांत भरविणें; चाहाडी, लावालावी करणें. ॰फुटणें-बहिरा होणें (पूर्ण, अर्धवट). ॰भरणें- भारणें-चहाड्या करणें; कानांत सांगणें; चिथविणें. -॰येणें- ऐकण्याची शक्ति येणें. ॰लांबणें-१ वयानें जसेजसें मोठें होते जाईल तसतशी अक्कल कमी होत जाणें (लहान मुलाविषयीं). २ (गाढवाचे कान लांब असतात यावरून) गाढव होणें. ॰होणें- लक्ष देणे; सावध होणें; सावधपणानें वागणें. कानाआड- मागें-वरून- ऊ न जाणें-उपदेश, शिक्षा, ताकीद वगैरेचा एखाद्यावर उपयोग न होणें. -चा चावा घेणें-खोट्या नाट्या गोष्टी सांगून दुसर्‍याचें मन कलुषित करणें. -चे कानवले होणें-कान वाकडें, (कानोल्याप्रमाणें) पिळवटलेले होणें. -चे किडे झाडणें-१ परनिंदा श्रवणदोषापासून मुक्त करणें; किल्मिष घालविणें; मनांतील गैरसमज, अढी दूर करणें. २ (कानांत किड्यांचा प्रवेश झाला आहे अशा समजुतीनें) बरोबर समजूत पाडणें; हितवाद सांगणें; चांगली खरडपट्टी काढणें. -त खुंट्या मारणें-१ बहिरें होणें. २ पूर्वींचा एक शिक्षेचा प्रकार, 'कानीं खुंट्या आदळिती । अपानीं मेखा मारिती ।' -दा ३.७.७३. -त जपणें-कानांत पुटपुटणें; गुप्त रीतीनें बोलणें, सुचविणें; कानमंत्र देणें; चहाडी करणें. -त तुळशी घालणें-घालून बसणें-१ ऐकूं येत नाहीं असें भासविणें, सोंग करणें. २ माया- पाश झुगारून दिल्याचा आविर्भाव आणणें; उपरति झाल्याचें दाख- विणें; विरक्तीचें सोंग आणणें. -त तेल घालून निजणें-अति- शय दुर्लक्ष करणें; पूर्णपणें उदासीन असणें. -त भरणें-चुगल्या करणें; एखाद्याचें वाईट करण्याविषयीं भरी भरणें. -त भेंड घालणें-(व.) बहिरेपणाचें सोंग घेणें; न ऐंकणे -त वारें भरणें-उच्छृंखल होणें; एखद्या गोष्टीचा पूर्ण विचार न करतां हुरळून जाणें. 'ही गरीब गाय कानांत वारें भरल्यामुळें उधळली आणि सैरवैरा धांवून अखेर चिखलांत रुतली' -सु ६१. (या) कानानें ऐकणें-त्या कानानें-सोडणें-मनांत मुळींच न ठेवणें, राखणें. -पाठीमागें टाकणें-दुर्लक्ष करणें 'फुकटच्या उपदेशा- प्रमाणें त्यांच्या निरोप कानापाठीमागें टाकणार नसाल तर सांगतों' -सु १०५. -बाहेर-वेगळा करणें-दुर्लक्ष करणें; उदासीन राहणें. -मध्यें-त- मंत्र सांगणे, फुकणें-चिथविणें; चेताविणें. -मागें टाकणें १ उपदेश शिकवण, सूचना इ॰ कडे लक्ष न देणें. २ दुर्लक्ष करणें. 'शत्रूचा समाचार अगोदर घेतला पाहिजे. घरचीं भांडणें तूर्त कानामागें टाकलीं पाहिजेत.' -बाजीराव. -ला खडा लावणें-मूर्खपणाचें किंवा दुष्टपणाचें काम पुन्हां न करण्या- विषयीं निश्चय करणें (कानाच्या पाळीच्या मागें खडा लावून दाबण्याचा पूर्वीं शिक्षेचा एक प्रकार होता). -वर (उजव्या डाव्या) पडणें-निजणें-लेटणें एका कुशीकर (डाव्या-उजव्या) निजणें. -वर मान ठेवणें-आळशीपणानें किंवा निष्काळजीपणानें बसणें. -वर येणें-ऐकणें; श्रुत होणें; 'येणार पुढें पुष्कळ आलें आतांचि काय काना तें ।' -भोभीष्म ७.६. -वर हात ठेवणें-त बोटें घालणें,कान-झांकणें-१ एखादी गोष्ट मुळींच माहीत नाहीं अगर तींत आपला बिलकुल संबंध नाहीं असें दाखविणें; नाकारणें; नाकबूल जाणें. २ एखादी मनाविरुद्ध गोष्ट ऐकवत नाहीं म्हणून कानांत बोटें घालणें. 'तो हा वधिला केलें कर्म अमित साधु घातसें मोठें । खोटें हें म्हणतिल शिव शिव कर्णी घालतील बुध बोटें. ।' -मोस्त्री ४.३६. -वरून जाणें १ कान चाटून जाणें; २ (ल.) थोडासा तोटा होणें. ३ ऐकलेलें असणें. -शीं कान लावणें-गुप्त रीतीनें मिळून मसलत, खलबत करणें. -शीं लागणें, कानीं लागणें-कानांत सांगणे; हळूच बोलणें; गुप्त रीतीनें सुचविणें -स कोन न कळूं-न लागूं देणें-अतिशय गुप्तपणा राखणें. 'आणि झाल्यावर सुद्धां कानास कोन लागूं नये ही तर खबर- दारी घेतलीच पाहिजे.' -सु १०.८. -स दट्टे-दडे बसणें- बहिरा होणें. कानीं कपाळीं रडणें-ओरडणें-सदोदित, नेहमीं बुद्धिवाद करीत असणें; नेहमीं, पुन्हां पुन्हा सांगणें. -नीं कोचीं बसणें-लागणें-(चोरून ऐकण्यासाठीं) कानाकोपर्‍यांत, अड- चणींत बसणें, कानोसा घेणें. -नीं मनीं नसणें-एखाद्याची कल्पना नसणें; कधींच न ऐकलेलें, मनांत नसलेलें ऐकणें. -नीं सात बाळ्या असणें-(लहान मुलांच्या भाषेंत) (ऐकावयाचेंच नाहीं असा निश्चय दाखवावयाचा असतां) ह्या कानाचें ह्या कानास कळूं न देणें; अतिशय गुप्तपणा ठेवणें. म्ह॰ (व.) १ कानाची कोन झाली नाहीं = कुणालाहि कळलें नाहीं. २ कानामागून आलें महालिंग (तिखट) झालें; = मागून आलेला किंवा वयानें लहान असा माणूस जेव्हां वरचढ होतो तेव्हां योजतात. ३ मुढ्या कानाची पण अभिमानाची = अंगांत दोष असून अभिमानयुक्त. ४ (गो.) कान मान हालवप = एखादी गोष्ट करण्यासाठीं उत्सुकता दाखविणें. ५ (गो.) कान फुंक म्हळ्यार व्हान फुंकता = एक सांगि- तल्यावर दुसरेंच करणें. ६ (गो.) कानाचा पोळा आनी पोटाची चिरी वोढता तितली वाढता = संवयीनें संवय वाढते. ७ कान आणि डोळे यांच्यांत चार बोटांचें अंतर = पाहिलेलें व ऐकिलेलें यांत केव्हां केव्हां अंतर असतें, ऐकलेलें तितकें विश्वसनीय नसतें, पुढें खोटें ठरण्याचा संभव असतो. ८ कानामागून आलें शिंगट ते झालें अति तिखट-(कानाच्या नंतर शिंगें उद्भवतात म्हणून) एखादा उपटसुंभ मागून येऊन एकाएकीं मोठ्या पदाला चढला व पहिल्या लोकांना शिकवूं लागला-त्रास देऊं लागला तर त्यास म्हणतात. यावरून कानामागून येणें व तिखट होणें. सामाशब्द-॰आढा-पु. (बैल- गाडी) गाडी उतरणीवर असतां किंवा बैल बेफाम असला तर तो ताब्यांत रहावा म्हणून कासर्‍यानें बैलाच्या कानाला टाकलेला वेढा. ॰कडी-स्त्री. (लोखंडी काम) कानाच्या आकाराचा पत्रा कापून त्याला जें एक लांबट तोंड ठेवतात तें वळवून त्यांत बसविलेली कडी. अशा दोन बाजूस दोन कड्या असतात. ॰कवडा-पु. कान- खवडा पहा. ॰कळाशी-सी-स्त्री. (घोडा, बैल इ॰ च्या) कानाची व डोक्याची ठेवण, आकार. 'अस्सल जरदी घोडी भिवरथडी वर बसली चांदणी । कानकळाशीं फेरफटक्यामध्यें कोणी तरी दिली आंदणी ।' -पला ४.२१. ॰कात्रा-पु. (गो.) पाण्या- वर तरंगणारा एक लहान मासा. -मसाप ३.३.१५७ -वि. कान कापलेला; कानफाट्या. ॰कारी-स्त्री. (विणकाम) ताणा ताणून धर- णारी एक धनुकली. ॰किरळी-कीड-कुरकुटी-कुरटी-स्त्री. (कों.) कानास होणार एक रोग; कानाची कीड. ॰कुडें-न. कानां- तील कुडें; एक अलंकार. [कर्ण + कुंडल; कण्णकुड्डळ-कानकुडें.] ॰कुलाय-स्त्री. (गो.) कान झाकेपर्यंतचा डोक्यावर घालण्याचा निमुळता टोप. [सं. कर्ण + कुलाया = घर, झांकण] ॰कूण-स्त्री. १ गुणगुण; बाजारगप्प. २ कुजबूज; कुरकूर. ३ तक्रार; कां कूं; अनिश्चित वर्तन. [कान + कुणकुण] ॰कूस-अनिश्चितता; कां कूं; चालढकल; कानकूण अर्थ ३ पहा. [कान + ध्व. कुस्] ॰केस-पुअव. (नुकत्याच विधवा झालेल्या स्त्रीचें) केशवपन करणें व अलंकार काढून घेणें. (क्रि॰ करणें.) ॰कोंडा-वि. १ (आश्रयदाता, उपकारकर्ता, ज्याला आपलीं अंडींपिल्लीं, दोष माहीत आहेत अशा माणसासमोर) लज्जित; मुग्ध; खजिल; कुंठित; ओशाळा; भय- चकित झालेला; मिंधा. 'गुरुज्ञानाचें अंजन नसतां कानकोंडा प्रपंच फोल ।' -अमृत १९. 'ईश्वरी कानकोंडा जाला । कुटुंब- काबाडी ।' -दा ३.४.४७. 'मी कानकोंडा जाहलों दुर्मती ।' -भावि ५५.१०६. २ ऐकूं येत नाहीं असें ढोंग करणारा. -पु. दुर्लक्ष; ऐकूं येत नसल्याचें सोंग. 'तुजविषयीं कानकोंडा करुं काय मी आतां ।' -दावि ८२. [कान + कोंडणें] ॰कोंडा-पु. कानां- तील भुसकट, मळ. ॰कोंडीं-गाडा, कानागाडा-स्त्रीपु. बहिरे- पणाचें सोंग घेणें; दुर्लक्ष करणें; कां कूं करणें; अळंटळं करणें; ऐकण्या न ऐकण्याबद्दल अनिश्चितता. (क्रि॰ करणें). [कान + कोंडा] ॰कोंडा-डी-वाटणें-शरमिंधें होणें, वाटणें. ॰कोंडें-वि. लाजिरवाणें. कानकोंडा-डी पहा. 'ऐसी परस्त्रीची संगत । घडतां जनांत कानकोंडें । -महिकथा २८.१००. -न. १ दुर्लक्ष; 'केली नाही चिंता नामीं कानकोंडें । अंती कोण्या तोंडें जात असे ।' -रामदास (नवनीत पृ. १५२.) २ भिडस्तपणा. 'कानकोंडें साहो नये ।' -दा १४.१.६. ॰कोपरा-पु. वेडावांकडा भाग; कान किंवा कोपरा; पुडें आलेला भाग (शेत, घन पदार्थ इ॰ चा) चतुरस्त्र, वर्तुल इ॰. आकारविरहित जे क्षेत्रादिकांचे अंश असतात तो. ॰कोरणी-णें-कानांतील मळ काढण्याची, पुढें वाटी असलेली धातूची लहानशी काडी; कानमळ काढण्याचें हत्यार. ॰खडी-स्त्री. सूचना; ताकीद. 'मी त्यास कानखडी लावली.' ॰खवडा-पु. वास- रांच्या कानाला होणारा एक रोग; तो नाहींसा होण्यासाठीं वास- राच्या कानांत एक कथलाची बाळी घालतात. ॰खीळ-स्त्री. १ (बैल- गाडी) चाक पडूं नये किंवा जागेवरून मागेंपुढें सरकूं नये म्हणून आंसास घातलेली कडी, कुणी. २ (औत) जेथें दोन शिवळा जोखडास असतात त्यांतील बाहेरील शिवळ. ॰खोरणें-(ना.) कानकोरणी-णें पहा. ॰गच्ची-स्त्री. १ पट्टा अगर वस्त्र यांनीं कान झांकणें, बांधणें. (क्रि॰ करणें; बांधणें). २ खोट्या, अनिष्ट गोष्टी ऐकूं नये म्हणून कानावर हात ठेवणें; आपल्या कानीं सातबाळ्या करणें. (क्रि॰ करणें). [कान + गच्च] ॰गोष्ट- स्त्री. कानांत सांगितलेली गोष्ट; रहस्य; कर्णमैथुन. ॰घसणी- स्त्री. १ कानगोष्ट पहा. २ कुजबूज; आळ. 'जाणोनि कान घसणी हरि चालियेला' -अकक. कृष्ण कौतुक ५४. ॰घुशी-घुसणी-स्त्री. (गोट्यांचा खेळ) हाताच्या बोटांनीं आपला कान धरून त्याच हाताच्या कोपरानें गोटी उडविण्याचा प्रकार. ॰घोण-स्त्री. गोम नांवाचा सरपटणारा किडा; घोण; कर्णजूलिका; कर्णकोटी. हा कानांत शिरतो ॰चा कोन-पु. क्रिवि. कानाच्या कोपर्‍यांत; अगदीं जवळ; कोठेंहि; किंचित् (ऐकूं न येणें, परिस्फुटता न करणें). 'म्या त्याची लबाडी कानाच्याकोनाला कळूं दिली नाहीं.' 'कानाचाकोन समजला नाहीं.' ॰चिट्-पु. खेळांतील समाईक गडी; राहाट्या. ॰चिपी-स्त्री. १ कानाचा वरचा भाग पिरगळणें; कानपिचकी. (शाळेंतील पंतोजीच्या शिक्षेचा अथवा मुलांच्या खेळांतील शिक्षेचा एक प्रकार). (क्रि॰ घेणें). २ खेळांत लबाडी केल्याबद्दल शिक्षा म्हणून स्वतःचा कान पिरगळून घेणें. (क्रि॰ घालणें.) ॰चिंबळी-(कों.) कानचिपी पहा. (क्रि॰ घेणें. ॰चोर-वि. (गो.) ऐकून न ऐकलेसें करणारा. ॰टाळ- ठाळ-ळी-ळें-ठळ्या-ठाळ्या-टाळीं-ळें-(अव.) (बसणें क्रियापदास जोडून) बधिर होणें; दडे बसणें; कानाचे पडदे बंद होणें. ऐकूं न येणें (थंडी, वारा, मोठा आवाज इ. मुळें). -गलि ३.१७ २ (उघडणें क्रियापदाला जोडून) बहिरेपणा जाणें; ऐकूं येऊं लागणें. ३ समजण्याला, शिकविण्याला योग्य होणें; डोळे उघ- डणें; ताळ्यावर येणें. ४ ताळ्यावर आणणें. [कर्ण + स्थळ] ॰टोपी-पु. कान, कपाळ झांकणारी टोपी; माकडटोपी; कान- पट्टीची टोपी. ॰पट-स्त्री. (व.) कानशील; कानाजवळील गाल व कपाळ यांमधील भाग. ॰पट्टी-स्त्री. १ कानगच्ची अर्थ १ पहा. कान झांकतील अशा तर्‍हेनें डोक्याला गुंडाळणें. २ कान- पट; कान-शील. 'भाल्याची जखम कानपट्टीस लागली.' -भाब ५७. ॰पिसा-वि. (कों.) कानाचा हलका; भोळ- सर; खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवणारा. ॰पिळा-ळ्या-पु. (लग्नांत) नवर्‍यामुलीचा भाऊ. नवरीच्या हातांत लाजाहोमाच्या वेळेस लाह्या घालतो व नवरामुलगा त्याचा कान पिळतो, त्या- बद्दल त्याला नवर्‍यामुलाकडून कानपिळ्याचें अगर कानपिळणीचें पागोटें मिळतें तो मान. ॰फट-ड-स्त्रीन. कानशील; गालफड; कानाच्या पुढील गालाचा प्रदेश (विशेषतः थोबाडींत मारतांना ह्या शब्दाचा उपयोग करतात. जसें-मी तुझें कानफड सुजवीन, फोडीन; कानफडांत मारीन. [सं. कर्ण + फलक] ॰फटा-फाटा- टी-ट्या-डी-पु. नाथपंथ व त्या पंथांतील गोसावी. ह्यांचीं परं- परा आदिनाथापासून आहे. यांच्यांत प्रख्यात असे नऊ नाथ होऊन गेले. हे शैवमतानुयायी आहेत. हे कानाच्या पाळीस मोठें भोंक पाडून त्यांत काचेच्या किंवा लाकडाच्या गोल चकत्या घाल- तात. ह्यांच्या गळ्यांत शिंगी, पुंगी असते. हे किनरीबर गोपीचंद राजाचीं गाणीं म्हणतात. 'व्याघ्रांबर गजचर्मांबर परिधान शुद्ध कानफटा । ' -प्रला ५. [कान + फाट] कानफटा (इ.) नांव पडणें-क्रि. दुर्लौकिक होणें; नांव बद्दू होणें. कानफाट्यांच्या वर्त- नाबद्दल लोक सांशक असतात त्यावरून लोकांत एकदां शंका उत्पन्न झाली कीं ती जात नाहीं. उदा॰ म्ह॰ एकदां कानफाट्या नांव पडलें म्हणजे जन्मभर तें तसेंच राहतें, त्यावरून एकदां दुष्कृत्य केलें म्हणजे त्याचा कलंक जन्मभर राहतो. ॰फुटी-स्त्री. १ एक औषधी वेल. २ (हेट.) कडधान्यांतील एका गवताचें बीं. ॰फुशी- स्त्री. कानगोष्ट; कानांत पुटपुटणें; कुज बूज. ॰फोडी-स्त्री. अजगंधा वनस्पति; तिळवळ. ॰भेरा-भायरा-वि. बहिरट. ॰मंत्र- मंत्री-पुस्त्री. कानांत सांगितलेली गोष्ट; गुप्त मसलत. ॰वडा-वि. १ एका कुशीवर, बाजूवर निजलेला; आडवा झालेला. (क्रि॰ निजणें; पडणें; होणें). 'ना येणेसीं मुख वांकडें । करूनि ठाकाल कान- वडे ।' -ज्ञा १८.१६९३. 'परि ते कानवडि परांमुख निजेली होती ।' -पंच ३.१५. 'कोणी कानवडे निजती -दा १८. ९.७. २ पराङ्मुख. 'दुर दुर जासी निघुन बघुन लगबगुन होसि कां कानवडा ।' -प्रला १६२. -पु. दाराचें झांकण, वस्त्राचा आडपडदा. -शर ॰वडें-क्रिवि. कानवडा पहा. एका कुशीवर, बाजूवर. 'तिएं धारेचेनि दडवादडें । नावेकु मुखचंद्र कानवडें ।' -शिशु ७१२. 'नये अळसे मोडूं अंग । कथे कानवडे ढुंग ।' -तुगा २४१३. ॰वसा-पु. कानोसा; दूरचा शब्द कान देऊन एकाग्रतेनें ऐकण्याची कृति. (क्रि॰ घेणें; लावणें; लावणें) ॰वळ-पु. कानामागें होणारा एक रोग. ॰वळा-वि. कानवडा पहा. (क्रि॰ असणें; निजणें; पडणें). -पु. (पशूच्या) डाव्या कानाखालीं दिलेल्या डागाची रेघ. ॰वळे-पुअव. गालावर आलेले कानाच्या बाह्य अंगावरील केंस. कानवा-व्ह-ळा-पु. कानोसा. (क्रि॰ घेणें; लावणें). ॰विळें-न. (कु.) कानांतील मळ ॰वेणी, कानशीलवेणी-स्त्री. लहान मुलांच्या कानावरील केसांची घातलेली वेणी. ॰वेरी-क्रिवि. कानापर्यंत; कानाविरी. 'जे अनर्थाचे कानवेरी ।' -ज्ञा ९.१८२. ॰शिरा-स्त्रीअव. कानाजवळच्या शिरा. 'कानशिरा दुखतात, धमकतात, उठल्या.' ॰शील-सल-सूल, कानाड-न. १ कानाच्या जवळचा, गाल व कपाळ यांमधील भाग 'कानसुलां भाली । आंगें कूट जालीं ।' -शिशु ९७०. 'घोर जाहली हातफळी । हाणिताती कानसुली । एकमेकां ।' -कथा ५.१७.१४१. 'याच कानसुलीं मारीतसे हाका ।' -तुगा १८०५. २ गालफड; चेहर्‍याची एक बाजू; कानठाड; कानफट. [कर्णशिरस्] ॰सर-पु. बैलाच्या कान व शिंगाभोंवतीं बांधावयाची रंगीत सुती दोरी. ॰साक्षी-पु. ऐकींव माहिती सांगणारा साक्षीदार. काना-नें आरंभ होणारे सामा- शब्द-कानाकोचा-वि. कानाला कटु, कर्कश, वाईट लागणारें; कर्णकटू (भाषण, इ॰) 'आणि कां कानेंकोचें बोले ।' -तुगा २७३५. ॰कोचा-कोपरा-१ उंचवटे व भेगा. पृष्ठभागीं विष- मता (जागा, वस्तू इ॰ ची). २ (ल.) एकूण एक भाग. 'मी घराचा कानाकोपरा शोधला.' [कान + कोपरा, कोचा] ३ पुढें मागें झालेला, भाग; उंचसखल भाग; गट्टू व खड्डा. कानाकोपर्‍याचें भाषण- न. गुपचुपीचें भाषण; कुजबूज; गुप्तपणाचें बोलणें; खाजगी, घरगुती बोलणें. -चा आदळ-वि. ज्याच्या पोटांत कोणतीहि गोष्ट राहात नाही असा; बहकणारा; बडबड करणारा. -चा जड- वि. १ अर्धवट बहिरा; बहिरट. २ (ल.) ज्याला सांगून लवकर समजत नाहीं असा. -चा टप्पा-पु. हांकेचे अंतर. -चा तिखट-वि. तीक्ष्ण श्रवणेंद्रियाचा. -चा पडदा-पु. ध्वनीचा आघात होऊन नाद उत्पन्न होणारें कानांतील तंबूर; ध्वनिलहरी ज्यावर आदळल्यामुळें कंप उत्पन्न होऊन ऐकूं येतें तो पातळ पापुदरा. -वर लेखणी ठेवणारा, बाळगणारा-वि. हुषार; वाकबगार कारकून, लेखक यास म्हणतात. -चा हलका-खरी खोटी गोष्ट सांगितली असतां तीवर सहज विश्वास ठेवणारा; चहाडखोराचें खरें मानणारा.

दाते शब्दकोश