मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

संबंधित शब्द

बाजी

(स्त्री.) [फा. बाझी] खेळ; क्रीडा; डाव; सरशी. “एकवेळ बाजी विस्कटली म्हणून पराक्रमी पुरुष स्वस्थ बसत नाहीत” (खरे ११|६१००) अङ्गावर बाजी येणें = हरणें.-वर बाजी देणें = हरविणें.

फारसी-मराठी शब्दकोश

बाजी

स्त्री. १ पत्ते, गंजिफा, सोंगट्या यांचा खेळ, क्रीडा; २ (ल.) सरशी; बाणा; बाजू; डाव. 'एकवेळ बाजी विस्कटली म्हणून पराक्रमी पुरुष स्वस्थ बसत नाहींत.' -ख ११.६१००. ३ (पत्त्यांचा खेळ) रंग; बाजू. ४ हात किंवा वाटलेले पत्ते; जिंकलेला डाव. ५ खेळाचि समाप्ति. ६ (ल.) मसलत. 'यासाठीं अवघ्यांनीं साहित्य पुरवून बाजी सेवटास न्यावी.' -पेद ५.२४. ७ (ल.) बाणा. ८ घोड्याची एक चाल. (क्रि॰ धरणें; चालणें; येणें; जाणें; उभारणें). ९ (ल.) सवय; व्यसन अशा अर्थीं शब्दाला जोडून उपयोग. उदा॰ दारू-सट्टे-बाजी इ॰ [फा. बाझी] ॰अंगावर येणें-देणें-हरणें; हरविणें. ॰कार-वि. कर्ता; उत्पा- दक. 'सर्वांचे सम्मते या करण्याचे बाजीकर रघुनाथ बिडवई.' -रा ७.३९. [फा.]

दाते शब्दकोश

स्त्री. तलवारीचें द्वंद्व युद्ध. 'तलवारीचें युद्ध महाराष्ट्रांत फार प्रिय असें वर्णन फिरस्त्यानें केलें आहे. यास यकंगबाजी म्हणतात.' -व्याज्ञा १.३८. [एकांग + बाजी]

दाते शब्दकोश

ऐट-टा-टी, ऐटबाज, ऐटबाजी

अयट-टा-टी अयट. बाज -बाजी पहा. [हिं,ऐठ = अक्कड]

दाते शब्दकोश

अणसूट

अनसूट पहा. 'अणसूट निर्मल चार बाजी ।' -वेसी- स्व. ८. १०९.

दाते शब्दकोश

अणसूट      

पहा : अनसूट : ‘अणसूट निर्मल चार बाजी ।’ – वेसीस्व ८·१०९. अणी, अणि      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अप्तर

[फा. अब्तर्] दोषयुक्त बिघडलेलें. : “तितका बयान श्रीमन्तांस लिहिला असता तर बाजी अप्तर होती" (राजवाडे ५।१६६). “श्रेष्ट स्थलचे नृपास पैत्य भ्रमाचा उपद्रव फार जाहला होता; सबब पांच महिने काम अप्तर जाहलें" (राजवाडे १०।२८०).

फारसी-मराठी शब्दकोश

अप्तर      

वि.       १. बिघडलेले; दोषयुक्त; नासलेले : ‘तितका बयान श्रीमंतास लिहिला असतां बाजी अप्तर होती.’ – मइसा. ५·११६ २. उनाड; उजाड.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अप्तर

वि. १ बिघडलेलें; दोषयुक्त; नासलेलें. 'तितका बयान श्रीमंतास लिहिला असतां बाजी अप्तर होती.' -रा. ५.११६. २ उनाड; उजाड. [अर. अब्तर]

दाते शब्दकोश

आतशबाजी      

स्त्री.       १. अग्निक्रिडा; शोभेचे दारूकाम; दारूची लंका : ‘रात्रीं नाच रोशनी आतशबाजी जाली ।’ − मइसा ७·१४५. २. (ल.) चैन; करमणूक. [फा. आतिश्+बाजी]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

बाजीग(गा)र

पु. गारुडी; जादूगार. -वि. उलटणारा. 'माष्टीन बाजीगार होऊन...' -ख ३५७०. [फा. बाझीगर्] बाजी(जे)गरी-गारी-गिरी-स्त्री. १ गारुडीविद्या; चेटूक; मंत्र- तंत्र; नजरबंदी; हातचलाखी; इंद्रजाल. 'माया मिथ्या बाजीगरी । दिसे साचाचिये परी ।' -दा ६.८.२४. २ पत्ते, सोंगटया खेळणें; द्यूत; जुगार. -वि. १ रिकामा; कुचकमी; निकस; वाईट (वस्तू, पदार्थ). २ (ल.) निरर्थक; पोकळ; मूर्खपणाचें (भाषण, वागणूक, उद्योग); वरकरणी; ढोंगी; बेजबाबदार (माणूस). [फा. बाझीगरी]

दाते शब्दकोश

बाजीकार

वि. कारस्थानी; घालमेल करणारा; मुत्सद्दी. 'नबाबा जवळ बाजीकार प्रस्तुत मोरोपंत आहेत.'-पेद २८.२८. [बाजी पहा]

दाते शब्दकोश

बाजू

स्त्री. १ बाहु; भुज. २ भाग; पैलू (वस्तूचा); कड; कंठ; किनारी; मर्यादा. 'त्रिकोन चौकोन इ॰ कांच्या बाजू.' ३ एखाद्या पदार्थांचा कोणत्याहि एखाद्या विभागाच्या विरुद्ध अस- लेला भाग. ४ (ल.) पक्ष; फळी; कड; तर्फ; चढाओढीच्या सामन्यांतील एक पक्ष. (क्रि॰ राखणें; सांभाळणें). ५ मोठी सत- रंजी; जाजम (पूर्वीं खोलीच्या एका बाजूला पुरेल अशा सतरंजीला म्हणत). ६ मदतनीस; साहाय्यकर्ता; आश्रयदाता; सहाय्यक. 'यशवंतराव बाजू सांग ज्या मर्दाला ।' -ऐपो. ७९.७ (पत्त्यांचा खेळ) खेळांतील रंग; हात; गंजिफांतील एका रंगाचीं १२ पानें; बाजी. ८ गाडीच्या साटीचीं लांबीच्या बाजूला असलेलीं दोन लाकडें. ह्याच्या उलट करोळें = साटींतील रुंदीचीं लाकडें. ९ संकट; अडचण; विघ्न; पेंच. [सं. बाहु; फा. बाजु] ॰मारणें- आपल्या पक्षाची सरशी करणें; स्वीकृत पक्ष यशस्वी करणें. ॰राखणें-अब्रू संभाळणें; नांव राखणें; फजिती किंवा दुर्लौकिक न होऊं देणें. ॰राहणें-अब्रू किंवा नांव राहणें. ॰वर बेतणें- अंगावर येणें-फजिती होण्याची वेळ येणें; पराभव होण्याचा रंग दिसणें. ॰चा देखावा-पु. (इमारत) पार्श्वनिदर्शन. ॰मारणारा-मारून नेणारा-वि. घेतलेला पक्ष यशस्वी करणारा; आपला पक्ष सिद्धीस नेणारा. ॰स-क्रिवि. एकीकडे.

दाते शब्दकोश

बाजू bājū f ( P) A side. 2 Any part of a body opposed to any other part. 3 Verge, border, margin. 4 fig. Party, faction, interest; a part or side. v राख, संभाळ. 5 A carpet. Applied originally to one long enough to cover the side of a room, but now used more generally. 6 A patron, aider, helper. 7 (Or बाजी) A suit: also a hand. 8 A common term for the two side-poles of a साठा or bed of a गाडा: opp. to the करोळें or transverse piece. 9 A strait or perplexity.

मोल्सवर्थ शब्दकोश

बलबल, बलबलपुरी

स्त्री. १ दंगलीचें, धुमाकुळीचें ठिकाण; बाजार. २ अव्यवस्था; अंधेरनगरी; गोंधळ; अंदाधुंदी; नियम इ॰कांकडे दुर्लक्ष; वेशिस्ती. (क्रि॰ मांडणें; होणें; करणें). 'राजेलोक ऐषआरामी झाले म्हणजे...सगळी बलबलपुरी होऊन जाते.' -बाजी. [बलबल + पुरी = शहर] म्ह॰ बलबलपुरी आणि टमटम राज्य.

दाते शब्दकोश

भुतावळ-वळें

स्त्रीन. दारूकामाचा एकदम पेट; आताष- बाजी.

दाते शब्दकोश

चैन

स्त्री. १ आराम; सुख; विश्राम; विसावा; स्वस्थता; मजा; आनंद. २ ऐषआरामाचा, सुखविलासाचा जिन्नस, गोष्ट; (अर्थशास्त्र) खोटया गरजा भागविण्यासाठीं ज्यांच्या उत्पादनास अतिशय मेहनत पडली आहे अशा गोष्टींसाठीं केलेला खर्च. -ज्ञाको च २०२. 'चैन ही व्यक्तीला घातक व समाजाला मारक आहे.' -ज्ञाकोच २०२. [हिं. चैन = आराम; सं. शयन] ॰मारणें- मजा करणें; सुख भोगणें. ॰बाज, चैनीबाज-वि. सुखाभिलाषी; गुलहौशी; विलासी; ऐषआरामी; रंगेल. [चैन + बाज प्रत्यय] ॰बाजी, चैनीबाजी-स्त्री. चैन करणें; मजा मारणें; विलास; सुखासीनता; ऐषआरामानें वागणें. [म. चैनबाज] ॰गडी, चैनी गडी पु. मजा मारणारा, चैन करणारा मनुष्य. [चैन + गडी] -नी-वि. चैन करणारा; मजा मारणारा. [चैन]

दाते शब्दकोश

चाल

स्त्री. जाणें; गमन करणें; मार्ग आक्रमण करणें; प्रवास करणें. 'आज मला दहा कोसांची चाल पडली.' २ रीत; वहि- वाट;पध्दत;रिवाज;परिपाठ;प्रघात. 'या बेटांतील जुन्या लोकांच्या चालीप्रमाणें त्याचा पोषाख होता.' -पाव्ह ३. 'त्या देशी स्त्रिया कासोटा घालीत नाहींत, अशी चाल आहे.' ३ चालण्याचा नोक; पाऊल टाकण्याची, चालण्याची ढब, ऐट. ४ घोड्याचा कदम; किंवा गति; याच्या कांही तर्‍हा पुढीलप्रमाणें आहेत-कुकर; कोंकर; खुदकी; चवड; तुरुक; तुर्की; दुडकी; धांवरी; चौक; टाकण; बाजी; भरधांव; हुदरूक; सात्रक; रहिवाळ; डुलत; साधी; हुडूक; हुद्रुक; तुरतुर इ॰ ५ चलन; फैलाव; प्रसार. 'मुंबईंत सुरती रुप- याची चाल आहे.' ६ काम भागविणें; गुजराण करणें; ऐवजी, बदली योजणे. 'सोंवळे दुसरें कांही नाही म्हणून धाबळीवर चाल करतों.' ७ सत्ता; वर्चस्व; वजन; अधिकार; चलती. 'दरबरांत त्याची चाल होती तेथपर्यंत त्यचें वांकडें कोणाच्या नेंहिं झालें नाहीं.' ८ वागणूक; आचार; वर्तणूक; वर्तन. 'यावरून तो उमेदवार सम्य चालीचा आहें हें मी ताडिलें.' ९ प्रकार; जाति तर्‍हा (काव्यांतील छंदविषयक); गाण्यांतील तान, स्वर, गति. १० हल्ला करणें किंवा अंगावर तुटून पडलें; चढाई.(क्रि॰ करणें). ११ दुरर्‍या भिंतीचा जोड मिळण्याकरितां ठेवलेला भिंतीच्या शेवटचा बाहेर आलेला भाग; आणखी जोड करतां यावी म्हणून छपराची खंडें पडलेली कड. १२ ऊंसाचा रस गाळण्याच्या चरकाच्या नरमादीमध्यें जी मळसूत्रांसारखी खोबण व पुढें काढ- लेला भाग असतो ती. १३ बुद्धिबळाच्या खेंळांत मोहर्‍यानें केलेली खेळी किंवा हल्ला. [सं.चल् = चालणें] (वाप्र.) चाल करणें-तुटून पडणें; हल्ला करणें; चढाई करणें. चालीवर घेणें- भागविणें; गुजारा करणें; निर्वाह करणें; चालवून घेणें; करविणें. चालीस लागणें-मार्गास लागणें; चालु होणें; सुरवात करणें; (धंदा, कृत्य यांस). चालीस लावणें-चलावयास लावणें; चालु करणें; सुरवात करून देणें.

दाते शब्दकोश

दगल

स्त्री. फसविण्याची युक्ति; लबाडी; लुच्चेगिरी; विश्वास घात; निमकहरामी; कपट. [अर. दघल्] ॰फसल-स्त्री. मुद्दाम, जाणूनबजून केलेली लुच्चेगिरी; कपट; दगाफटका. [दगल द्वि.] ॰बाज, दगाबाज-वि. लुच्चा; कपटी; विश्वासघातकी; निमक- हराम; फसव्या. ॰बाजी, दगाबाजी-स्त्री. कपट; ठकबाजी; सोदेगिरी; हिकमतगिरी; विश्वासघात; अप्रामाणिक अथवा कप- टाचीं कृत्यें.

दाते शब्दकोश

धडाका

पु. १ (बंदूक, तोफ, दारूकाम यांचा)आवाज; स्फोट; धडधडाट;(सामा) मोठा कडाक्याचाआवाज;।कडकडाट. २ (सामा.) आवेश, झपाटा व गडबड यांनीं युक्त असें कोणतेंही दृश्य. जसें: -काम इ॰ करण्याचा सपाटा, तडाखा, चपळाई, झपाटा; वादळ ई॰ कांचाजोर, क्षोभ, तडाखा; (सांथ, रोग इ॰ कांनीं मांडलेला)सपाटा; सप्पा; धुमाकूळ; जोराचा वउपद्रव; (लढाई इ॰ कांतील) धूमश्र्चक्री; खणका; दणदणाट; धुमधडाका; कल्लोळ.(क्रि॰ मांडणें; मारणें). इतर उदाहरणांकरितां तडाका शब्द सर्वसाधा- खेरीज करून पहा. तडाका-खा व धडाका हे दोन शब्द सर्वसाधा- रण अर्थी व अनेक रूढ अर्थी एकमेकाशीं जुळतात हें खरें असलें तरी त्या उभयातांत एक सूक्ष्म फरक आहे तो असा कीं तडाका शब्दांत जोर, आवेश यांचा वाढता प्रकर्ष ध्वनित होत असतो तर धडाका शब्दांत मोठया आवाजानें सहित असा जोर, आवेश, सपाटा इ॰ अर्थ अभिप्रेत असतो. [हिं. धडक ] -केबाज फुल- बाजी -स्त्री.(शोभेचें दारूकाम)इंग्रजी फुलबजीचा एक प्रकार.

दाते शब्दकोश

गौण

न. १ न्यून; अभाव; तुटवडा; कमीपणा. २ अपूर्णत्व; हीनता; तफावत. -वि. १ कमी प्रतीचा; हलक्या प्रतीचा; कमी महत्त्वाचा; अप्रधान. २ आनुकल्पिक; गौणभूत; बदला. ३ मुख्य नव्हें तें; दुय्यम. 'मूळबंधाचें लक्षण । वज्रासन गौण । नाम यासी ।।' -ज्ञा ६.१९९. [सं.] ॰मानणें-कमी लेखणे. 'तें तीर्थ घालतां वदनीं । ब्रह्मरस गौणमानी ।' ॰कल्प-पु. १ अमुख्य, अप्रधान हेतु किंवा उद्धेश. २ दुय्यम ध्येय; विकल्प; अनुकल्प; बदला; प्रतिनिधि. ॰पक्ष-१ कमजोर, खालच्या दर्जाचा, अमुख्य,अप्रधान पक्ष, बाजू (वाद, गोष्टी, प्रमेय यांचा). २ गौणकल्प ३ (सामा.) हलका पक्ष, बाजी. ॰मुख- न्याय-पु. तारतम्याचा नियम (मुख्यामुख्य, मौलिक व अलं कारिक, प्रधान अप्रधान यांतील) मुख्य पक्ष संभवत असतां गौण अंगिकारूं नये या अर्थी वापरतात. गौणीवृत्ति-स्त्री. शब्दाची स्वाभिधेय गुणसंबंधामुळें अर्थांतराच्या ठायीं असलेली प्रवृत्ति. [सं.]

दाते शब्दकोश

गौणपक्ष      

पु.       १. कमजोर, खालच्या दर्जाचा, अप्रधान पक्ष, बाजू (वाद, गोष्टी, प्रमेय यांचा). २. गौण कल्प. ३. (सामा.) हलका पक्ष, बाजी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गमजा, गम्जा

पु. १ तोरा; ऐट; मिजास अक्कड; गर्व; ताठ. 'सज्ञानीं सत्करुणेवांचुनि मतिचें न चालती गमजे ।' -मोविराट ६.१२०. २ थाटमाट; शृगारिक नेत्रकटाक्ष; नखरे. बाजी; मुरका; चोचला; तिरप्या दृष्टीनें पाहणें; हावभाव; नटणें; फुगणें (छानछुकीचें); कामविकाराचें कृत्रिम प्रदर्शन. 'तेहि ठाके ठुमके बहुतांपरि । गमजा उत्तम तियेचा ।' -स्वादि २.३.१७. ३ दिमाख; दंडगेपणा; चावटपणा; धटाई; अमर्यादा (बाय- कोची नवर्‍याशीं, मुलाची बापाशीं, चाकराची धन्याशीं इ॰); बहुधा अनेकवचनी प्रयोग. ४ (सामा.) चोचले; चाळें; चेष्टा. [फा. घम्झा = कटाक्ष; विभ्रम] ॰करणें- १ दिमाख दाखविणें; गर्व करणें. २ (माण.) मजेंत असणें. ३ उच्छृंखलपणानें वागणें; चाळें करणें. 'गमजा करितां मनिं उमजाना, हें सुख न पुढें पडले वजा ।' -राल ८५. ॰चालणें-अमर्याद वर्तन खपणें, करणें, ॰न चालणें-न चालू देणें-चाळ्यांना अवसर न देणें, नियं- त्रण असणें.

दाते शब्दकोश

घडेबाजी

स्त्री १ मडक्यांत फटाके वगैरे भरून त्यांना बत्ती देणें; आतषबाजी; दारूकाम. '...झाडें नानाप्रकारचीं व घडेबाजी...दारू सुटावयाची. -ख ४५८७. (क्रि॰ उडविणें; करणें, लावणें). २ (ल.) एकदम होणारा वाद्यांचा गजर; कड- कडाट. [घडा + बाजी. हिं.]

दाते शब्दकोश

हिम्मत

(स्त्री.) [अ. हिम्मत्] महत्वाकाङ्क्षा; निश्चय; धैर्य; उत्साह; उमेद. “ज्याशी नित्य नूतन सम्पादीन ही हिम्मत त्यानें हुजुरात सजावी” (मराआ १३). “प्रस्तुत तोहमास्प कुलीनें बाजी जिङ्किली आहे; परन्तु अवध्या हिदूंनीं हिम्मत बान्धिल्यास व आमच्या फौज़ा मातबर गेल्यास हिन्दूंचीच बातशाही होईल ऐसा प्रसङ्ग दिसतो” (पारसनीस-ब्रच ११८).

फारसी-मराठी शब्दकोश

हरणें

हरणें haraṇēṃ v i To lose; to fail (in a battle or fight, a game or play, an argument, a suit): also to fail, miss, miscarry, fall abortive or unavailing;--as wisdom, ingenuity, ability, an effort, attempt, expedient. In the first clause of this sense the verb, although intransitive, may sometimes seem to take an object; but the word which it assumes into construction marks, not the object of its action, but rather the occasion, instance, bearing, or respect. Ex. मी वाद हरलों, खेळ -बाजी -रुपया -पण &c. हरलों.

मोल्सवर्थ शब्दकोश

हस्तपगदस्त

हस्तपगदस्त hastapagadasta or -दस्ती a (A formation with हस्त Hand, पग A square of the chessboard, and P Hand.) An epithet of that mode of playing chess of which it is the law, or of that law of which it is the principle, both that the piece once touched shall be played, and that in the square into which it is put, it shall remain; touch and go. Used with खेळ, बाजी, and similar nouns. 2 as ad After the mode or according to the law above detailed--playing at chess. Used with खेळणें and similar verbs.

मोल्सवर्थ शब्दकोश

इश्क, इशक

पु. १ प्रणय; शृंगार; विलास. 'आम्ही तर दर्दी, इश्काचे भुकेले प्राणी' -प्रला'. २ नाद; कल; आवड; शोक; ओढा. 'श्रीमंत राजेश्री बाजीरावसाहेब व चिमाजीआप्पा यांसी घोड्या- वर बसवयाचा इशक बहुत आहे.' -ख ९.४८३३. [अर. इश्क = प्रेम] ॰पेंच-न. एक पुष्पविशेष; शोभिवंत लता. 'इश्कपेंच गुल्छबू सदोदित भर शेवती सांवरी' -प्रला १५४. ॰बाज-वि.चैनी; विलासी; स्त्रीलंपट. [अर.इश्क + फा.बाझ्] ॰बाजी-स्त्री. प्रेमलीला; प्राणयविलास; आशकवाजी.-चित्रगुप्त १६४.२ रांडबाजी; बाहेरची नाद.३ चैन. [अर.इश्क + फा बाझी] ॰बाजी लावणी स्त्री. शृंगारपर लावणी; पद.

दाते शब्दकोश

कंपेश

पु. १ कंबेश; फरक; कमी अधिक प्रमाण. 'बाजी- राव कबूल होतांच त्याशीं पूर्ववत् प्रमाणें कांहीं एक कंपेश न करितां दोस्ती सरकारनें कायम ठेविली. - इनाम १४०. -स्त्री. कंबेशी. न्यूनाधिक्य; घोंटाळा; गोंधळ. -वि. १ कमीअधिक, थोडें जास्त किंवा थोडें कमी; जवळजवळ. 'कंपेश चाळीस हजार फौज' -ख ७.३२८८. २ तंतोतंत. 'सला झाल्याप्रमाणें वर्तणूक कंपेश न केल्यास पारिपत्य होईल.' -ख ५.२६०७. [फा. कम् + बेश्]

दाते शब्दकोश

कोंडी करणें

कोंडणें; वेष्टणे; घेरणें. ‘पहिल्या बाजी- रावानें भोपाळवर कोंडी करून निजामाच्या घोड्यांना पळसाचा पाला खाण्याची पाळी आणली.’ –के १९.३.१९४०

दाते शब्दकोश

कोसळणे      

उक्रि.       १. एकदम पडणे; तुटून, मोडून पडणे; ढासळणे; विस्कळणे (भिंत, विहीर, रास इ.) : ‘बाजी एकदम जागच्या जागींच कोसळला.’ - स्वप ८८. २. पडून तुकडे होणे (यंत्र इ.) ३. (ल.) वेगाने खाली येणे, पडणे (पाऊस). ४. आधार सुटून, वियुक्त होऊन, सपाटून भरभर खाली पडणे. (वाऱ्याने फळे, फुले). ५. फिसकटणे; प्रतिकूल होणे; निष्फळ होणे (बेत, मसलत). [क. कोसरु = आधार सुटणे]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कोसळणें

अक्रि. १ एकदम पडणें; तुटून, मोडून पडणें; ढांसळून पडणें; ढांसळणें; विस्कळणें (भिंत, विहिर, रास इ॰). 'बाजी एकदम जागच्या जागींच कोसळला.' -स्वप ८८. २ पडून तुकडे होणें (यंत्र इ॰). ३ (ल.) जोरानें वेगानें खालीं येणें, पडणें, (पाऊस). ४ आधार सुटून, वियुक्त होऊन, सपा- टून भरभर खालीं पडणें (वार्‍यानें फळें, फुलें). ५ फिसकटणें; प्रतिकूल होणें; निष्फळ होणें (बेत, मसलत). ६ केव्हां केव्हां वरील अर्थीं सकर्मक क्रियापदासारखा उपयोग करतात. [का. कोसरु = आधार सुटणें, सोडणें]

दाते शब्दकोश

करवडी      

पु.       जकात अधिकारी : ‘नायबसेख अहमद करवडी व तहवल बालाजी बाजी परगणे मजकूर हूजूर…’ - पुनसंवृखं २.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खामी

(स्त्री.) [फा. खामी] कमीपणा; नुक्सान; खराब; अप्तर. “अतःपर पादशाहीस खामी आली” (चित्रगुप्त ३४). “आज पन्धस सोळा वर्षे खुदावन्त त्याची खामी करवितात तरी मोडत नाहींत” (मराचिथोशा ७६). “या वेळेस न राहिले तरी साऱ्याच मन्सब्यास खामी बसेल” (खरे ६।२९६६). “अमृतरावसाहेब यांचा विचार लोभी! शभ्भर रुपये दिले असतां सर्कारदौलतीमध्यें लाख रुपयांची खामी जाली असतां चिन्ता नाहीं; हे समज तेथें आहेत” (खरे १०।५६०६). “सवाई सिङ्गाची बाजी खामी जाहली” (जोरा ८५)

फारसी-मराठी शब्दकोश

खासनिशी      

स्त्री.       खाजगी कारभाऱ्याचे काम : ‘बाजी मुरार यांचे नातू हे खासनिशी करून... राहिले.’ -मराचिसं १.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

लठ

स्त्री. १ (व.) लाठी; काठी; सोटा. २ कापड मोजण्याचा गज. ३ मूर्ख किंवा अशिक्षित मनुष्य. [हिं.] ॰बाजी- स्त्री. झोडपट्टी; चोपणें; चोप. लठाईत-वि. (व.) १ लाठी बाळ- गणारा. २ धश्चोट. लठुंगा-बि. भक्कम; राकट; मजबूत; बळकट; अटस.

दाते शब्दकोश

पेश

[फा. पेश्] पुढें; उन्नत; वज़न्दार; यशस्वी. (स्त्री.) वग; वजन. “इराणीस पेश होऊ न देता...अगदीं नेस्तनाबूद करावा” (पाब ६). “जुगुल्किशोर पठाणापाशीं पेश आहे” (राजवाडे १|१११). “घाटगे याणीं आपली कन्या शिन्दे यांस दिली, त्याजमुळें बहुत पेश आहेत” (खरे १०।५३६१). “मग यांचेपुढें कोठून बाजी पेश होईल?” (राजवाडे ३६।३३१). “राजाजी यांची पेश नबाबाजवळ विशेष आहे” (राजवाडे ५|२४).

फारसी-मराठी शब्दकोश

फांकडा

वि. १ फक्कड; चलाख; पाणीदार; तडफदार. २ हुशार; कुशल; निष्णात.३ऐटबाज;अक्कडबाज.' फांकडा शिपाई बाजी ।' -विक १०. ४ सुंदर; गुलजार; मारू; फक्कड. फांकडू असेंहि रूप आढळतें. [फक्कड; हिं. फांकडा]

दाते शब्दकोश

फारिद

वि. फारिक पहा. १ मुक्त; मोकळा. २ कर्ज इ. वारलेला; ॠणमुक्त. 'राजश्री बाजी विठ्ठल यास ही त्याच्या गुजारतीचे कर्जवाम फारिद करावे.' -पदे १९.१११. फारिग पहा.

दाते शब्दकोश

सेनापती

स्त्री. सेनापतिपद; सैन्याधिकार. 'रामाजी दगडोनें त्याचा दोरा आणिला आहे जे श्रीमंत राजेश्री बाजी- राऊजी दस्तगिरी करून महाराजस भेटऊन सेनापती देवि तील तर उठोन येईल.' -पेद १०.७३. [सं. सेना + पति + फा. ई]

दाते शब्दकोश

शेर

पु. १ वाघ. -राव्य ३.२२. २ सिंह. ३-वि. जबरदस्त; धृष्ट; धीट; शूर; पराक्रमी; धाडशी; अंमल, सत्ता गाजविणारा. 'परंतु ऐशा बखेडियांनीं दुश्मन शेर होतात.' -रा १२.८३. 'मागती गिलचे शेर झाले.' -भाब १०८. -राव्य ८.६०. [फा. हिं. शेर = सिंह] ॰खोर-वि. उन्मत्त. 'तऱ्हेवाईक शेर खोर... लोक हुजरातींत एकंदर ठेवूंच नयेत.' -मराआ १४. ॰पणा-पु. सामर्थ्य; जबरदस्ती; जोरावरी. -रा ८.४. ॰बाजी- बाजू-स्त्री. सरशी; वर्चस्व. 'हे आपले ठायीं आपली बहुत शेरबाजी मानतात.' -जोरा ११५.

दाते शब्दकोश

शराब

पुस्त्री. (पिण्याची) दारू; मद्य. [अर. शराब्] ॰खाना-पु. दारू पिण्याचें स्थान; सुरागार. ॰पाणी-न दारू- बाजी; अंमल; निशा. 'नाचरंग आणि शराबपाणी याचीच त्याला विशेष आवड होती.' -स्वप ७३. शराबी-वि. मद्यपी; दारू- बाज. [फा.]

दाते शब्दकोश

सराई(इ)त

वि. निष्णात; पटाईत; कुशल; सुग्रण; पटु; तरबेज; दक्ष; सराव असलेला; अभ्यस्त; अनुभवी. 'सराइत होता बाजी ज्याचा मारा संभाळिला ।' -ऐपो ७०. 'मी आहे सराईत सख्यारे बाळपणाची । पुरवावी हौस मनाची ।' -पला २८. [सराव]

दाते शब्दकोश

ताडबाजी

स्त्री. अनुमानधपका; तर्क; अनुमान; कल्पनेनें ताडणें [फा. [(ताडणें + बाजी)]

दाते शब्दकोश

ताले      

पु.अव.       दैव; प्रारब्धयोग; नशीब : ‘रावसाहेबांचे ताले बुलंद म्हणोनच ते बाजी सर केली.’ – मइसा १·५२. हा शब्द दैव, प्रारब्ध, नशीब किंवा अशा अर्थाच्या कोणत्याही शब्दासाठी उपयोगात आणतात. उदा. दैवाचे ताले. [अर. तालिअ]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ताले

(पु. अनेक व.) [अ. तालिअ) दैव; ग्रह. “रावसाहेबांचे ताळे बुलन्द (= उच्च) म्हणोनच ते बाजी सर केली” (राजवाडे १|५२). त्यांचें थोरपण व दुरन्देशी बहुत व तालेही मोठे” (ऐटि ३|१५). “दौलतराव बाबा यांचे ताले विचित्र आहेत” (खरे १२|६८१७).

फारसी-मराठी शब्दकोश

ताले

पुअव. दैवी; प्रारब्धयोग; नशीब. 'रावसाहेबांचें ताले बुलंद ( = उच्च) म्हणोनच ते बाजी सर केली.' -रा १.५२. 'दौलतरावबाबा यांचें तालें विचित्र आहेत.' -ख १२. ६८१७. ह शब्द, दैव, नशीब, प्रारब्ध किंवा अशा अर्थाचा कोणताहि शब्द यासहसुद्धां उपयोगांत आणतात. जसें-दैवाचें तालें. 'संपत्ति मिळणें हे दैवाचें तालें आहेत.' [अर. तालिअ] म्ह॰ 'असे त्याचें दैवाचें तालें कीं कुत्र्यावर नौबत चाले.' तालेवंत-वि. सुदैवी; भाग्यवान; श्रीमान लक्ष्मीवंत. [ताले] ॰वार- वि. दैव- वान; ऐश्वर्यसंपन्न; वैभवशाली; श्रीमत 'राजा जनक तालेवार मांडी सीतास्वयंवर.' -तारामंडळ अंक ३. प्रवेश ३. तालवर (-वि.) पहा. [फा. तालिअवर्] ॰वारी-स्त्री. भाग्य; सुदैवी; श्रीमंती; संपन्न स्थिति; उत्कर्ष; भरभराटीची स्थिति. [फा. तालिअवरी]

दाते शब्दकोश

उद्‌घाट      

पु.       उपक्रम; सुरुवात : ‘यंदा सारेच गोष्टीचा उद्‌घाट चिरंजीव बाजी राऊ उत्तरप्रांती गेले असता करावयाचा नव्हता.’ -पेद ३३·३२७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उणाके, उणाखे      

न.       हलके वस्त्र : ‘बाजी नारायण पुरंदरे यांना उणाखीं मिळाली होतीं’ -भात्रै १०·३·१२७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उणाक-ख

वि. हलक्या प्रतीचें; कमी किंमतीचें; (हलकें, विटणारें वस्त्र. माल वगैरे). 'त्याप्रमाणें उणाख आणि मध्यम शालजोड्या पाहून पाठवून देणें' -पेद १८.७२. -न. हलकें वस्त्र. 'बाजी नारायण पुरंदरे यांना उणाखीं मिळालीं होतीं.' -भात्रै १०.३.१२७. [उणा + आंख]

दाते शब्दकोश

वाजी

वि. खराब; बिघडलेलें. 'कापड वाजी न होतां सुरक्षित गोविंदगडास येईल तें केलें पाहिज़े.' -रा. ३.३०३. [अर. बाजी]

दाते शब्दकोश

विनोद (चांगला)

वाचीत असतां तोंडाची सुरकुती मोडेल असे लिखाण, खमंग चुरचुरीत खुसखुशीत विनोद, विनोदाची रम्य आतष- बाजी, लेखाला नरम विनोदाची झालर लावली आहे, दिलखेचक रोचक थट्टा, विनोदाची पखरण, कडू चेह-यांना विनोदाची बाळगोळी दिली आहे, हास्य-रसाची मेजवानी, मूर्तिमंत गंभीरतेला हंसविणारा विनोद, कोटीबाजपणा व विनोद याचा चमचमीत मसाला दाटून भरला आहे, मधाळ रसाळ व खट्याळ लेख, येथून तेथून श्लेषयुक्त व मार्मिक विनोदयुक्त, हास्यकारक घटनांनी ओथंबलेली कथा, विनोदाची झेप व पल्ला मोठा, यांची थट्टा हें दु:ख झाकणारें वस्त्र आहे, जीवनांतील झोंबणारी विसंगति उघड करतात.

शब्दकौमुदी

वस्ताद

पु. १ विद्या-कलादिकांमध्यें निष्णात, पटाईत, वाकबगार. २ शिक्षक; गुरूजी; अध्यापक (विशेषतः गायन, व्यायाम, नृत्य या कलांचा). 'वस्ताद गंगु हैबती तेथील रहिवाशी ।' -प्रला १९४. ३ दमनकर्ता; तोडीस तोड असणारा माणूस; शेराला सवाशेर. ४ कावेबाज, धूर्त मनुष्य. [अर. उस्ताद्] ॰गिरी-स्त्री. वस्तादाचें, गुरूचें काम, धंदा. २ चातुर्य; कौशल्य. ३ धूर्तता; कावे- बाजी; लबाडी. वस्तादी-वि. वस्तादापासून मिळालेली (गाय नादि विद्या). -स्त्री. १ प्रावीण्य; ममज्ञता. 'पीळ पेच अर्ध अक्षरांत वस्तादीचे ।' -प्रला ६२. २ धूर्तता; कावेबाजपणा. [फा. उस्तादी]

दाते शब्दकोश

व्यसनी

चंगीभंगी, रंगेल, छंदीफंदी, व्यसनांत डुबलेला ओंगळ संवयींचा, बाटलीबाज, दारूंतला किडा, सर्व नाद असलेला, ब-याव बाजी आहेत, सर्व त-हेनें चिखलांत बरबटलेला.

शब्दकौमुदी

घडा

पु. १ घागर; घट; मडकें. 'अवतरली गाडग्यां घडां । पृथ्वी अनोळख जाली मूढां ।' -ज्ञा १८.५४३. २ ताडाच्या पोंगीला (ताडी काढण्यकरितां) लावावयाचें गाडगें. ३ जम; घडी. -शर. [सं. घट; प्रा. हिं. पं. घडा; गु. सिं. घडो] (वाप्र.) घडा फोडणें-संकेत, खरें तत्व बाहेर सांगणें; ग्पुत गोष्ट प्रकट करणें. (एखाद्याचा) घडा भरणें-अपराधांची परमावधि होऊन शिक्षेस पात्र होणें.' त्याचा घडा भरला म्हणजे त्याला शासन होईलच होईल.' (आयुष्याचा) घडा भरणें- १ अंतकाळ जवळ येणें; आयुष्य संपणें. २ (ल.) अधिकाराची मुदत संपण्याच्या बेतांत येणें. (पापाचा) घडा भरणें-(पापपुण्यें सांठविण्यासाठीं घडें असतात या कल्पनेवरून) दुष्कृत्यांचा कळस होऊन त्यांचे फळ भोगण्याची वेळ येणें. (कच्या) घड्यानें पाणी भरणें-वाहणें-१ निष्फळ काबाडकष्ट करणें; निरर्थक उद्योग, मेहनत करणें. २ अतिशय हाल काढणें; कष्ट करणें. सामाशब्द-॰बाजी-स्त्री. दारू उडविण्याचा प्रकार; मडक्यांत फाटके, चिचुंद्र्या इ॰ ठांसून त्यांचा घडाका करणें; (प्र घडें- बाजी पहा.

दाते शब्दकोश

खास

क्रिवि. १ खचित; निखालस; खात्रीनें; निश्चयपूर्वक. २ बरोबर; तंतोतंत. ३ खुद्द; स्वतः; जातीनें. -वि. १ राजा किंवा राज्यासंबंधीं; सरकारी. २ स्वतःचें; खाजगी; जातीचें. (समासांत) खासपथक; खासपागा. ३ शुद्ध; अस्सल; खरा; चांगला. ४ विशेष; विशिष्ट. ५ निवडक; थोरथोर; उच्च. सामान्य सामासिक शब्द राजकीय अथवा सरकारी या अर्थाचे व कांहीं स्वतःचे किंवा जातीचे या अर्थाचे खासकोठी-खास-खजाना-सरंजाम-जाम- दार-हुजुरात-जामीन-इनाम-नेमणूक इ॰. [अर. खास्स्] विशेष सामाशब्द. ॰आमदानी-स्त्री. नियमित पीक, उत्पन्न. याच्या विरुद्ध शिवाई आमदानी = जादा पीक. ऐन अमदानी हा शब्दहि कधींकधीं या अर्थानें योजतात. ॰खबर-स्त्री. १ खात्री- लायक बातमी. २ सरकारी बातमी. ॰खेल-वि. सेनाखास- खेल; सेनापति. 'एक सेनापती जन्मला । खासखेल सयन ।' ऐपो ७९. ॰गत, खाजगत-वि. १ स्वतःचा; आपला; जातीचा; खाजगी. 'आमचा खासगत वाडा पुण्यास आहे.' २ मालक स्वतः जमाखर्च लिहीत असल्यास हा शब्द तो आपल्या नांवामागें लावतो. -क्रिवि. जातीनें; खुद्द. 'मी खासगत त्यांसच रुपये दिले.' ॰गत राजश्री-(जमाखर्च) मालकाच्या नांवा- मागें लावतात. ॰गाडी-स्त्री. राजाची किंवा स्वतःसाठीं मुद्दाम काढलेली (स्पेशल) आगगाडी. 'खाशांच्या स्वार्‍या खासगाडीनें अगर मोटारीनें जाण्याच्या असल्यास...' -डुकराची शिकार (बडोदें) २. ॰जमीन-स्त्री. १ जमीनदार खुद्द करीत असलेली जमीन. २ जिचा वसूल प्रत्यक्ष सरकार वसूल करतें अशी जमीन. ॰नीस, खासनवीस-पु. खानगी कारभारी; सरकारी हिशेबनीस; (इं.) प्रायव्हेट सेक्रेटरी. ॰निशी-स्त्री. त्याचें काम. 'बाजी मुरार यांचे नातू हे खासनिशी करून...राहिले,' -मराचिसं १. ॰पंगत स्त्री. ज्या पंक्तींत यजमान जेवावयास बसतो ती पंगत; राजाची अथवा सरदारांची पंगत; थोरथोर लोकांची पंगत. २ उच्च जात; शिष्ट वर्ग. ३ निवडक मंडळी. ॰पथ(त)क-न. एखाद्याचे स्वतःचें, खासगी घोडेस्वारांचें पथक; ज्याच्या निशाणाखालीं हे घोडेस्वार चाकरी करितात आणि ज्याच्या खर्चानें ते ठेविले असतात त्याचें पथक; खाशांचें पथक. ॰पथ(त)की-वि. खासपथकासंबंधीं- (स्वार, शिपाई, घोडा). ॰पागा-स्त्री. राजानें अथवा राज्यक- र्त्यानें स्वतः ठेवलेली आणि त्याच्या हुकमांतील घोडेस्वारांची टोळी; घोडदळ. ॰पाग्या-पु.१ खासपागेवरचा अधिकारी. २ खासपागेंतील घोडा किंवा स्वार ॰बंदी-स्त्री. खेड्यांतील कांहीं घराण्यांत वाटेल तशी वांटून दिलेली जमीन व प्रत्येकीचा कांहीं ठोकळमानानें ठरविलेला सारा. ॰बरदार-बार्दार-बालदार- पु. राजा, सरदार किंवा मोठा माणूस यांची बंदूक वगैरे नेणारा सेवक. 'हिंमत बहादुर खासे बालदार' -ऐपो ३३३. ॰बातमी, वर्तमान-स्त्रीन. सरकारी खबर. ॰बारगीर-पु. राजा किंवा सरदार यांचा शरीरसंरक्षक स्वार. ॰बाल-स्त्री. वाळू चिकणमाती यांच्या मिश्रणानें बनलेली जमीन. ही खतावल्यास चांगलें पीक देते. ॰बिघा-पु. खासबंदी गांवांतील कुळांच्या जमिनीचा धारा ठरविण्याचें माप; मोजणीमाप. ॰महाल-पु. १ खाजगी महाल. २ विवाहित पत्न्यांचा महाल; राणीवसा. याच्या उलट खुर्द महाल (रखेल्यांचा महाल). ॰स्वारी-स्त्री. राजा किंवा सरदार यांचा लवाजमा, मिरवणूक; जिलीब; त्याचप्रमाणें स्वतः राजा, अथवा सरदार. खाशी स्वारी पहा.

दाते शब्दकोश

रंग

पु. १ केवळ चक्षुरिंद्रियानां जाणतां येतो असा पदार्थांच्या ठिकाणीं जो पांढरेपणा, तांबडेपणा इ॰ वर्ण तो; एखद्या वस्तूवर प्रकाश पडला असतां ती वस्तु ज्या रंगाची असेल त्या रंगाच्या किरणाशिवाय इतर किरण शोषले जाऊन त्या रंगाचे किरणच फक्त बाहेर टाकते. त्यास रंग म्हणतात. -ज्ञाको (र) २. २ रंगाची पूड; पदार्थाला तांबडा, काळा इ॰ कोणताहि वर्ण देण्याचें द्रव्य; रंगविण्याचें द्रव्य. ३ (ल.) तेज; तेजस्विता, चकाकी; भपका; गायन, कीर्तन, तमाशा, भाषण, इ॰ चा लोकांचीं अंतःकरणें रमण्याजोगा पडणारा शोभाविशेष; मजा; शोभा; आनंद. 'आजचे गाण्यास रंग चांगला आला. ' ४ देखणेपणा; उत्कृष्टता; चांगली स्थिति (मनुष्य, वृक्ष, बाग, शेत इ॰ पदार्थांची किंवा संसार, व्यवहार इ॰ ची). 'नुकता संसार रंगास आला तों बायको मेली. ' ५ देखावा; आकार; ढब; डौल; घाट; अंदाज; चिन्ह; परिस्थिति; प्रसंग; संधी. (क्रि॰ दिसणें). 'आज गरमी होती तेव्हां पाऊस पडेलसा रंग दिसतो.' 'उन्हाचा-वाऱ्याचा-आभाळाचा-दिव- साचा-काळाचा-धारणेचा-भावाचा-पिकाचा-चाकरीचा-रंग. ' 'तूं शालजोडी मागशील तर पहा, मागण्याचा रंग आहे. ' ६ सोंगट्यांचे चार भिन्न प्रकार; गंजिफांचे निरनिराळे दहा प्रकार; पत्त्यांच्या चार बाजू प्रत्येकीं. ७ गंमत; मजा; तमाशा; खेळ. 'भंगकरी रंग, अफू करी चाळा, तंबाखू बापडा भोळा. ' ८ रंगण; क्रीडास्थान (नाट्य, नृत्य इ॰ चें); हौदा; आखाडा; रंगभूमी; सभागृह; सभामंडप. 'असें बोलून इकडे तिकडे फिरते आणि रंगांतून पडद्यांत निघून जाते.' -क्रमं २; -मोआदि २६.२१. ९ नवरा; पति (समासांत स्त्रीच्या नांवापुढें योजतात). 'सीतारंग.' १० विचार; बेत. 'जाणत्याचे जाणावे प्रसंग । जाणत्याचे घ्यावे रंग ' -दा १८.२.१२. ११ तऱ्हा; ढोंग. 'बहु शिकला रंग चाळे । खरें खोटें इचे वेळे. -तुगा १३५९. १२ गाणें, बजावणें, नृत्य इत्यादि करमणुकीचा प्रकार. 'आजि कुमारिकेच्या महा- लासी । रंग होतो दिवसनिशीं । ' -शनि २४६. १३ थाटमाट. ' रंग स्वर्गीचा उतरे । ' -दावि ५०४. १४. महत्त्व ' या कारणें कांहीं रंग । राखोन जावें ' -दा १७.७.२१. १५ विवाह, शिमगा इ॰ प्रसंगीं एकमेकांच्या अंगावर केशर इ॰ चें रंगीत पाणी टाकतात तें किंवा तें टाकण्याचा समारंभ. १६ प्रेक्षकांचा किंवा श्रोत्यांचा समुदाय. १७ चुना; सफेती; उजळा. (क्रि॰ देणें). [सं. रञ्ज्-रंग देणें; फा. रङ्ग; हिं. रंग] (वाप्र.) ॰उडणें- १ मूळचा रंग जाणें, फिका होणें; तेज कमी होणें. ॰करणें- मजा मारणें; मौज करणें. ॰खेळणें-विवाहादि प्रसंगीं एकमेकांच्या अंगावर रंग उडविणें. ॰चढणें-अंमल, निशा, मद, धुंदी येणें. ॰दिसणें-एखादी गोष्ट होईलशी वाटणें, आकारास येणें; संभव असणें. 'तरी यापुढें जें एकंदर अवस्थांतर होण्याचा रंग दिसत आहे.' -नि. ॰भरणें-१ भरास येणें; जोमांत येणें; मजा येणें. 'भलत्या प्रसंगीं भलत्या तालाची चीज सुरू केलीत तर रंग भरेल कां ? ' -नाकु ३.४६. २ रंग आणणें. 'रंग भरिती अद्भूत । ' -सप्र १०.८८. ३ तडजोड करणें. -पया १४०. ॰मारणें-- बाजी मारून नेणें. 'रहस्य राखून रंग मारला । ' -ऐपो २५३. ॰राखणें, रंगाची मोट बांधणें-विजयानें, वैभवानें हुरळून न जातां सभ्य आणि सौम्य वर्तन कायम ठेवणें; आपल्या प्रति पक्ष्यांवर वादांत किंवा कांहीं कामांत आपण सरशी मिळविली असतां आपण दिलदारीनें त्याच्याशीं वागणें; त्या सरशीच्या जोरावर त्याच्याशीं कठोरपणा न करणें; त्याला न हिणविणें; अधिक पेंचांत ढकलण्याचा प्रयत्न न करणें. ' त्यानें मी चुकलों असें कबूल केलें तें बस झालें, आतां काय रंगाच्या मोटा बांधा- वयाच्या आहेत ? ' ॰शिंपणें-होळीचे अगर लग्नाचे वेळी रंगाचें पाणी उडविणें, फेकणें; रंग खेळणें. रंगाचा भंग करणें-आनं- दाचा बिरस करणें. रंगांत येणें-तल्लीन होणें; रंगून जाणें. चढणें- शोभा प्राप्त होणें; खुलून दिसणें; पूर्णतेस येणें; विकास पावणें; भरास येणें. रंगास-रंगारूपास आणणें-येणें-चढणें-१ फलद्रूप होणें-करणें; वैभवशाली, सुखावह करणें; आरंभिलेलें कार्य अनुकूल संस्कारादिकांनीं चांगल्या स्थितीला आणणें, येणें. 'माझ्या ग्रंथाचा मी नुसता कच्चा खरडा तयार केला आहे. तो रंगारूपास आणावयास वर्ष दीड वर्ष तरी लागेल. ' २ (तिरस्का- रार्थी) एखाद्या तऱ्हेस, आकृतीस, विशिष्ट अवस्थेस पोंचणें, पोचविणें. ' हा आतां राम म्हणावयाचे रंगास आला. ' सामा- शब्द- ॰आखाडा-पु. कुस्ती खेळण्याची जागा. 'धनुर्याग आरंभिला । मल्लें रंगआखाडा केला । ' -कथा ४.६.३७. ॰काम- न. १ रंग देण्याचें, रंगाचें काम. २ (रंगारी धंदा) धाग्यावर रंग चढवून तो पक्का बसविण्याची क्रिया; (इं.) डाइंग. ॰डाव- बाजी-पुस्त्री. गंजिफा, पत्ते खेळण्याचा एक प्रकार. ॰डी, रंगडी ढंगडी-धंगडी-स्त्री. १ ढंग; चाळा. २ फसगंमत; फसवेगिरी; खोडी; लबाडी; डावपेंच इ॰ (अनेक वचनी उपयोग). [रंग + ढंग] ॰ढंग-नपु. १ युक्ति; कारवाई; फंद; चाळा; लटपट; कावा. (क्रि॰ करणें; मांडणें; चालविणें). २ रागरंग; स्वरूप; एकंदर देखावा. ३ नाचरंग वगैरे; स्वच्छंदी आचरण. रंगणावळ-स्त्री. रंगविण्याबद्दलची मजुरी; रंगविण्याचा खर्च. [रंगणें] ॰दार-वि. १ मनोहर रंग असणारा (पदार्थ, फूल, वस्त्र इ॰) २ रंगेल गमत्या; विनोदी विषयी; चैनी; (माणूस) ३ रंगीत; रंगविलेले; रंगीबेरंगी. ॰देवता-स्त्री. गाणेंबजावणें, कथा पुराण, प्रवचन, व्याख्यान इ॰ कांस जिच्या प्रसादानें रंग येतो, यश मिळतें अशीं एक कल्पित देवता; खेळांत रमणीयता आणणारी देवता. २ खेळांची अधिष्टात्री देवता. [सं.] ॰द्रव्यें-नअव. (रसा.) जीं द्रव्यें सूर्यकिरणांचा कांहीं विशिष्ट भागच फक्त आरपार जाऊं देतात अथवा परावृत्त करतात व बाकीचा भाग नष्ट करून टाकतात तीं द्रव्यें. -ज्ञाको (र) ३. २ रंगविण्याच्या कामीं लागणाऱ्या वस्तू, पदार्थ. ॰नाथ- पु. कृष्ण; श्रीकृष्णाची बालमूर्ति. [सं.] ॰पंचमी-स्त्री. फाल्गुन वद्य पंचमी. या दिवशीं एकमेकांवर रंग उडवितात. ॰पट-पु. रंग- ण्याची खोली; पात्र रंगून तयार होण्याकरितां केलेली जागा; (इं.) ड्रेसरूम, ग्रीनरूम. [सं.] ॰बहार-पु. १ मौज. कमालीचा आनंद; सुख; आनंदाची लूट (क्रि॰ करणें मांडणें; होणें) ' रंगबहार एकांतीं लुटा । घर सुंदर कर पोपटा । ' -प्रला १४०. २ भव्य, आनंददायक दृष्य; थाटमाट. ३ नानाप्रकारच्या करमणुकी, खेळ, कसरती किंवा त्या जेथें चालतात तें ठिकाण. ४ मुबलकता; पीक इ॰ ची आनंदप्रद रेलचेल. 'पिकांचा-धान्याचा-आंब्यांचा-लाड- वांचा-जेवणांचा-रंगबहार. [रंग + बहार] ॰बाजी-स्त्री. पत्त्यांनीं खेळण्याचा एक प्रकार; पत्त्यांतील एक खेळ; रंगडाव. ॰भंग- पु. विरस; आनंदाचा नाश; मध्येंच एकदम येऊन खेळ थांबविणें, बंद करणें; खेळांतील आनंद, गोडी न वाटेल असें करणें. ॰भूमि-स्त्री. १ नाटकगृह; प्रयोग किंवा नाटक करून दाख- विण्याची जागा; सभागृह; सभामंडप. २ मर्दानी खेळांचें मैदान; रणांगण. [सं.] ॰मंडप-पु. कुस्त्या वगैरे खेळण्यासाठीं घातलेला मांडव. [सं.] ॰मंडपी-स्त्री. खेळाची अथवा करमणुकीची जागा. [सं.] ॰महाल-पु. विलासमंदिर; दिवाणखाना; आरसे व तजबिरी लावून सुखोपभोग घेण्यासाठीं केलेलें घरांतील दालन; श्रीमंत लोकांची आरशांनीं, रंगीबेरंगी चित्रांनीं सुशोभित केलेली विलास करण्याची खोली; (विशेषतः) निजण्याची खोली. [फा.] ॰माळ-स्त्री. लग्न वगैरे समारंभाच्या मिरवणुकीपुढची नक्षत्रमाळा; रंगीबेरंगी कागदांचीं अथवा बेगडांचीं फुलें कातरून दोऱ्यांत ओवून काठीला बांधून लग्नकार्यांत धरण्याच्या माळा. [सं. रंग + माला] ॰माळा-स्त्री. १ रांगोळीचीं चित्रें; रांगोळी. 'प्रवर्तोनि गृहकामीं रंगमाळा घालुं पाहती ।' -भूपाळी घनश्यमाची २०. २ सिंहासन अथवा मूर्तीचें देवालय याचे भोवतीं तिन्ही बाजूंनीं बसविलेल्या लाकडी अगर धातूच्या सोंगट्या अथवा निरनिराळ्या आकृतीचीं चिन्हें. ३ नक्षत्रपुंज; तारे. ४ नक्षत्रमाळा; (सामा.) रंगमाळ ॰मूर्तिं-स्त्री. ज्याच्यामुळें समारंभास विशेष शोभा येते असा मनुष्य अथवा मूर्ति; कृष्णाचें बालस्वरूपी लांकडी अथवा धातूचें छायाचित्र; श्रीकृष्णाची मूर्ति. [सं.] ॰मोड-स्त्री. रंगभंग; ऐन भरांत खेळ आला असतां विरस होणें; हिरमोड; उत्साहभंग; आनं- दाचा नाश; खेळाचा चुथडा. ॰रस-पु. आनंद; हर्ष. 'हस्ती सेवकांसुद्धां सकळही लाल रंगसी । ' -हो २०३. ॰राग-पु. राग- रंग पहा. ॰रूप-न. आकार, रंग, वर्ण, चर्या, देखावा इ॰ (फळ, व्यापार, व्यक्ति, इ॰चा); बाह्यस्वरूप. [सं.] ॰रूपास आणणें- चांगल्या स्थितीस आणणें; निरोगी करणें; ऊर्जित दशेस आणणें. ॰रूपास येणें-चढणें-चांगल्या स्थितीस किंवा पूर्णतेस येणें. पोहोचणें. ॰रेज-पु. रंगारी. [फा. रंग्रेझ] ॰रेजी-स्त्री. रंग देणें; रंगविणें; सफेती. [फा.] ॰रोगण-न. १ तेलिया रंग. २ सामान्यतः रंग देणें; साफसूफ करणें वगैरे क्रिया. [रंग-इ-रौघन्] ॰लाल-वि. चैनी (मनुष्य). [रंग] ॰लूट-स्त्री गंजिफांचे खेळां- तील एक शब्द; गंजीफांचे डावांत सर्वांचीं पानें एक रंगाचीच पडलीं असतां तो हुकूम फुकट जातो आणि पानें सर्वांनीं लुटून घ्यावीं असा एक प्रकार आहे ती. ॰लेला ऊंस-पु. गाभ्यांत लाल पड- लेला ऊंस. ॰वट-स्त्री. खेळण्याची जागा; क्रीडांगण; रंगण. 'द्राखे घोंस लांबटी । रंगवटामाजी मिरवती । ' -ख्रिपु १.८.२३. ॰वणी-न. रंगाचें पाणी. [रंग + पाणी] ॰वल्ली-स्त्री. रांगोळीचें चित्र; रांगोळी पहा. [सं.] ॰शाला, रंगांगण-स्त्रीन. नाटकगृह; खेळाचें मैदान; तालीम; नर्तनशाला; जेथें नाटकांतील पात्रें रंग- वितात ती जागा. [सं.] ॰शिला, रंगशिळ-स्त्री. १ दगडी पाटा. २ देवाच्या मूर्तीपुढील मोठी शिळा; पंढरपूरच्या विठोबाच्या पुढील मोठी शिळा (यावर भक्त नाचतात). 'नाचा रंगशिळेवरी । भेट देईगा मुरारी । रामचंद्रहो । ' -भज ८२. [सं.] ॰सभा-स्त्री. १ खेळ अथवा करमणूक यासाठीं असलेली जागा. २ खेळाडू अगर विनोदी मंडळी. (क्रि॰ जमणें; भरणें; मांडणें; चालणें; उठण; मोडणें). ॰सही-स्त्री. तिफांशी खेळांत पक्क्या रंगाच्या चारी सोंगट्या पटाच्या चारी बाजू हिंडून आपल्या पटाच्या डाव्या बाजूकडील घरांच्या ओळींत येऊन बसणें. ॰स्थल-न. रंगण; रंग- भूमि पहा. ' विचक्षणा पडद्यांतून रंगस्थलांत येते. ' -कमं २. रंगाई-स्त्री. (हिं.) रंगणावळ; रंग देण्याची मजूरी, किंमत. 'रंगाऱ्याला कपडे रंगविण्याबद्दल रंगाई द्यावी लागते. ' -विक्षिप्त १.१२. [फा. रंगाई] रंगांगण-न. कुस्त्या, खेळ इ॰ करून दाख- विण्यास योग्य स्थळ; रंगशाला पहा. रंगाचळ-न. (महानु.) रंगाचा भर; आनंद; उत्साह; भर. 'निरुपनांचा रंगाचळी । त्यागाचें आढाळ चाळी । ' -भाए २३७. [रंग + अचल] रंगाची (रंगीत) तालीम-स्त्री. रंगभूमीवर नाटक होण्यापूर्वीं खाजगी रीतीनें सालंकृत प्रयोग करून पाहणें. [इं.] रंगाथिणें-क्रि. रंगविणें; रंगविशिष्ट करणें. 'यया भूतांचेनि संगें । जीवें घेतलीं अनेक सोंगें । विपरीत वासना संगे । रंगाथिला ।' -सिसं ३५.२२२. रंगामेज-पु. १ चितारी २ ढोंगी; दांभिक इसम. [फा. रंगामेझ] रंगामेजी-स्त्री. १ आरसे, चित्रे; इ॰ नीं सुशोभित करणें; दिवाणखाना इ॰ स्थलास नानाप्रकारचे रंगांनीं, चित्रें, वेलबुट्टी काढून शोभेसाठीं चितारण्याचा केलेला संस्कार. 'भीमनाथ केदार राममंदीर रंगामेजींचें ।' -प्रला ७८. २ (ल.) दांभिकता; कृत्रिमता; कुटिलता. रंगारी-पु. कपडे रंग- विणारा; वस्त्रें रंगवून उपजीविका करणाऱ्यांची एक जात. [सं. रंज्; फा.] रंगारीहिरडा-पु. एक प्रकारचें हिरड्याचें झाड व त्याचें फळ (पिवळसर रंगाचें). यालाच जंगली किंवा चांभारी हिरडा म्हणतात. सुरवारी हिरडा हा दुसऱ्या जातीचा आहे. रंगालय-न. नाट्यशाला. [सं.] रंगालां-न. (राजा.) चामडें ताणून घोटण्याचें साधन (हें सुताराच्या पटाशीसारखें पण बोथट धारेचें असतें). [रंगाळें] रंगिन-न. चांदीवर सोन्याचा पत्रा चढवून तयार केलेलें जरतार. रंगिला-वि. रंगेल; ख्यालीखुशा- लीचा; चैनी; विषयी; खेळाडू. [हिं.] रंगी-स्त्री. (बे.) जुगार; जुवा; पत्त्यांतील खेळाचा एक प्रकार. रंगी, रंगीन, रंगील-वि. १ रंगीत; रंगविलेलें. 'तुम्ही रंगीन फेटा पाठविला तो पावला. ' -रा ३२.८९. २. रंगेल पहा. [रंग; महानु] रंगीढंगी-वि. रंगेल; चंगीभंगी; व्यसनी. 'मुलगा रंगीढंगी असूनहि केवळ पैसा पाहून पांचmohsinहजार हुंडयासह त्याच्या ताब्यांत देऊन चाकली.'-हाकांध १८२. रंगीत-वि. रंगी; रंगविलेलें; रंग असलेले; रंग लाविलेला कुसुंबा, हिंगूळ इ. रंगानीं रंगविलेला (पदार्थ, पस्त्र, काष्ठ इ.). रंगीबेरंगी-वि. अनेक रंगाचा. रंगीला-वि. रंगीन; रंगेल; गुलहौशी. रंगेरी-स्त्री. (गंजीफांचा खेळ) अखेरीस म्हणजे सर्व खेळाच्या शेवटीं खेळणाराची अखेरी दोघानीहि मापली, तिघांचेंहि पान एकाच रंगाचें निघालें तर त्यास रंगेरी म्हणतात. रंगेल-ला-ली-वि. १ आनंदी; विनोदि; खेळाडू; खेळकर; चैनी; विषयी; विलासी; ललितकलाप्रिय; गाणें, तमाशा, इ. विषयांचा उपभोग, मस्करी, या विषयावर ज्याची अधिक रुचि असा आनंदी; रसिक; इष्कबाज. रंगविणें-क्रि. १ रंग लावणें, देणें; रंगानें वस्त्रादिक विशिष्ट करणें; शोभिवंन करणें. २ (ल.) तोंडांत देणें; भडकाविणे; मारणें. 'त्याचें तोंडांत दोन रंगविल्या म्हणजे कबूल होईल.' (तोंड) रंगविणें-१ विडा खाणें. २ (ल.) थोबाडांत मारणें. [रंग; रंजू = रंग देणें]

दाते शब्दकोश

पंच

वि. पांच; ५ संख्या. [सं.] ॰उपप्राण-पुअव. पांच वायु:-नाग = शिंक येणारा वायु, कूर्म = जांभई येणारा, कृकल = ढेंकर येणारा, देवदत्त = उचकी येणारा व धनंजय = सर्व शरीरांत राहून तें पुष्ट करणारा व मनुष्य मेल्यावर त्यांचे प्रेत फुगविणारा वायु. 'नाग कूर्म कृकल देवदत्त । पांचवा धनंजय जाण तेथ ।' -एभा १३.३२०. ॰कन्या-स्त्रीअ. पांच सुविख्यात पतिव्रता स्त्रिया; अहल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी. ॰कर्में-नअव. शरीराचीं मुख्य पांच कामें-ओकणें, रक्तस्त्राव होणें, मलोत्सर्ग, मूत्रोत्सर्ग, नाक शिंकरणें इ॰. किंवा गतीचे पुढील पांच प्रकार:-उत्क्षेपण (वर करणें), अपक्षेपण (खालीं करणें), आकुंचन (आखडणें), प्रसारण (पसरणें) व गमन (जाणें). ॰कर्मेंद्रियें-हात, पाय, वाणी, शिश्न व गुद. कर्मेंद्रिय पहा. ॰कल्याण-णी-वि. १ गुडघ्यापर्यंत पांढरे पाय व तोंडावर पांढरा पट्टा असलेला (घोडा) हा शुभ असतो. -अश्वप १.९०. 'पंच कल्याणी घोडा अबलख ।' ३ (उप.) सर्व अवयव विकृत असलेला (माणूस). ३ (उप.) भाड्याचें तट्टू, घोडा (याला दोन्ही टाचांनीं, दोन्हीं मुठींनीं व दांडक्यानें मारून किंवा तोंडानें चक् चक् करून चालवावें लागतें म्हणून). ४ (उप.) ज्याच्या नाकाला निरंतर शेंबूड असून तो वारंवार मणगटांनीं काढून टिरीस पुसत असणारा असा (पोर). ॰काजय-स्त्री. (गो.) पंचखाद्य पहा. ॰कृष्ण-पुअव. (१) महानुभाव संप्रदायांतील ५ कृष्ण-कृष्णचक्रवर्ती, मातापूर येथील दत्त, ऋद्धिपूरचा गुंडम राउळ, द्वारावतीचा व प्रतिष्ठानचा चांग- देव राउळ. -चक्रधर सि. सूत्रें पृष्ठ २१. (२) हंस, दत्त, कृष्ण, प्रशांत व चक्रधर. -ज्ञाको (म) ७७. ॰केणें-न. मसाल्यांतील मिरी, मोहरी, जिरें, हिंग, दगडफूल इ॰ पदार्थ. ॰केण्याचें दुकान-न. छोटेसें किराण्याचें दुकान. ॰केदार-पुअव. केदार, ममद, तुंग, रुद्र, गोपेश्वर. ॰कोटी-स्त्री. उत्तर हिंदुस्थानांतील शंकराचें तीर्थक्षेत्र. ॰कोण-पु. पांच कोनांची एक आकृति. -वि. पांच कोनांची. ॰कोश-ष-पुअव. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय अशीं देहाचीं पांच आवरणें. या कोशांचा त्रिदेहाशीं पुढीलप्रमाणें समन्वय करतात-अन्नमयाचा स्थूलदेहाशीं, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, यांचा सूक्ष्म किंवा लिंगदेहाशीं व आनंदमयाचा कारणदेहाशीं. ॰क्रोशी-स्त्री. १ चार, पांच कोसांच्या आंतील गांवें; एखाद्या क्षेत्राच्या भोंवतालची पांचकोस जमीन. 'पुरलें देशासी भरलें शीगेसी । अवघी पंचक्रोशी दुम- दुमीत ।' -तुगा २६१०. ३ (ल.) या गांवांतील जोशाची वृत्ति. ४ पंचक्रोशी यात्रा पहा. ॰क्रोशी यात्रा-स्त्री. क्षेत्राची विशे- षतः काशी क्षेत्राच्या भोंवतालच्या पांच कोसांतील देवस्थानांना प्रदक्षिणा, तार्थाची यात्रा. ॰खंडें-नअव. आशिया, यूरोप, अमे- रिका, अफ्रिका, ओशियानिया. ॰खाज-जें-खाद्य-नपुन. १ ख या अक्षरानें प्रारंभ होणारे खाण्यायोग्य असे पांच पदार्थ (खारीक, खोबरें, खसखस (किंवा खवा) खिसमिस व खडी साखर). -एभा १.०.४९२. 'पूर्ण मोदक पंचखाजा । तूं वऱ्हाडी आधीं ।' -वेसीस्व ३. २ (गो.) नारळाचा खव, गूळ. चण्याची डाळ इ॰ पांच जिन्नसांचा देवाला दाखवावयाचा नैवेद्य. ३ (कों.) तांदूळ किंवा गहू, काजळ, कुंकू, उडदाची डाळ व खोबरें यांचा भूतपिशाचांना द्यावयाचा बळी; या पांच वाणजिनसा. ॰गंगा- -स्त्री १ महाबळेश्वरांतील एक तीर्थ. येथें कृष्णा, वेणा, कोयना, गायत्री (सरस्वती) व सावित्री यांचा उगम आहे. २ काशी क्षेत्रां- तील एक तीर्थ. 'गंगा भारति सूर्यसूनु किरणा बा धूतपापा तसे । पांची एकवटोनि तीर्थ निपजे ते पंच-गंगा असें ।' -नरहरी, गंगा- रत्नमाला १५७ (नवनीत पृ. ४३३). ३ पंचधारा पहा. (क्रि॰ वाहणें). ॰गति-स्त्री. घोड्याच्या पांच चाली-भरपल्ला किंवा चैवड चाल; तुरकी किंवा गाम चाल, दुडकी, बाजी, आणि चौक चाल. यांचीं संस्कृत नावें अनुक्रमें:-आस्कंदित, धौरितक, रेचित, वल्गित, प्लुत. ॰गव्य-न. गाईपासून निघालेले, काढलेले पांच पदार्थ दूध, दहीं, तूप, गोमूत्र, शेण यांचें मिश्रण (याचा धार्मिक शुद्धिकार्याकडे उपयोग करतात). ॰गोदानें-नअव. पापधेनु, उत्क्रांतिधेनु, वैतरणी, ऋणधेनु, कामधेनु. हीं पंचगोदानें और्ध्वदेहिक कर्मांत करतात. ॰गौड-पु. ब्राह्मणांतील पांच पोट जाती-(अ) गौड, कनोज (कान्यकुब्ज), मैथिल, मिश्र व गुर्जर; किंवा सारस्वत, कान्य- कुब्ज, गौड, उत्कल आणि मैथिल. ॰ग्रंथ-पुअव. यजुर्वेदाचे पांच ग्रंथ-संहिता, ब्राह्मण,आरण्यक, पदें आणि क्रम. ॰ग्रही- स्त्री. एका राशींत पांच ग्रहांची युति. [पंच + ग्रह] ॰तत्त्वें-नअव. पंचमहाभूतें पहा. ॰तन्मात्रा-स्त्रीअव. पंचमहाभूतांचीं मूलतत्त्वें, गंध रस, रूप, स्पर्श, शब्द हे गुण. 'प्रकृति पुरुष महत्तत्त्व । पंच, तन्मात्रा सूक्ष्मभाव ।' -एभा १९.१६८ ॰तीर्थ-नअव. हरिद्वार किंवा त्र्यंबकेश्वर येथील गंगाद्वार, कुशावर्त, बिल्वक, नीलपर्वत आणि कनखल हीं पांच तीर्थें. ॰दंती-वि. पांच दांत असलेला (घोडा), सप्तदंती व अशुभलक्षण पहा. ॰दाळी-स्त्रीअव. तूर, हर- भरा, मूग, उडीद व वाटाणा या पांच धान्यांच्या डाळी. ॰देवी- स्त्रीअव. दुर्गा, पार्वती, सावित्री, सरस्वती व राधिका. ॰द्रविड- पुअव. ब्राह्मणांतील पांच पोटजाती-तैलंग, द्राविड, महाराष्ट्रीय, कर- नाटकी व गुर्जर. ॰द्वयी-स्त्री. १ दक्षिणा द्यावयाच्या रकमेचे (ती कमी करणें झाल्यास) पांच भाग करून त्यांतील दोन किंवा तीन ठेवून बाकीचे वाटणें. २ अशा रीतीनें शेत, काम, रक्कम, वस्तु इ॰ची वांटणी करणें. ॰धान्यें-नअव. हवन करण्यास योग्य अशीं पांच धान्यें-गहूं, जव, तांदूळ, तीळ व मूग. महादेवाला याची लाखोली वाहतात. ॰धान्याचा काढा-पु. हा धने, वाळा, सुंठ, नागर- मोथा व दालचिनी यांचा करतात. ॰धार-स्त्री. १ जेवतांना तूप पडलें न पडलें इतकें कमी वाढणें; तुपाच्या भांड्यांत पांच बोटें बुडवून अन्नावर शिंपडणें. २ झाडास पाणी घालण्याची पांच धारांची झारी. 'जगजीवनाचिया आवडी । पंचधार करी वरी पडी ।' -ऋ ७३. ॰धारा-स्त्री. (विनोदानें) तिखट पदार्थ खाल्ला असता किंवा नाकांत गेला असतां दोन डोळे, दोन नाक- पुड्या व तोंड यांतून वाहणाऱ्या पाण्याच्या पांच धारा. ॰धारें -न. देवावर अभिषेक करावयाचें पांच भोंकांचें पात्र. [पांच + धारा] ॰नख-नखी-वि. १ पांच नखें असलेला (मनुष्य, माकड, वाघ). २ ज्यांचें मांस खाण्यास योग्य मानिलें आहे असे पांच नखें असणारे सायाळ, घोरपड, गेंडा, कांसव, ससा इ॰ प्राणी. 'पंचपंच नखा भक्ष्याः ।' -भट्टिकाव्य ६.१३१. ३ छातीवर, खुरावर पांच उभ्या रेषा असणारा (घोडा). हें अशुभलक्षण होय. -अश्वप १.९५. ४ ज्याच्या चार पायांपैकीं कोणत्याहि एका पायाला फाटा फुटल्या- सारखी आकृति असते असा (घोडा). -अश्वप १.९८. ॰नवटे- पुअव. (राजा. कु.) संसारादिकांचा अनेकांनी मिळून अनेक प्रका- रचा केलेला नाश; (एखाद्या संस्थेंत, मंडळांत झालेली) फाटा- फूट; बिघाड. (क्रि॰ करणें). २ गोंधळ; घालमेल; अडचण. [पंच + नव] ॰पक्वान्नें-नअव. १ लाडू, पुरणपोळी इ॰ पांच उंची मिष्टान्नें. २ भारी, उंची खाद्यपदार्थ, जेवण. ॰पंचउषःकाल- पु. सूर्योदयापूर्वीं पांच घटिकांचा काळ; अगदीं पहाट. 'पंच पंच- उषःकालीं रविचक्र निघोआलें ।' -होला १७ ॰पदी-स्त्री. देवापुढें नित्य नियमाने पांच पदें, अभंग भक्तगण म्हणतात ती. 'पंचपदी राम कलिसंकीर्तन ।' -सप्र २१.३६. ॰पर्व-वि. कोणत्याहि एका पायास फरगड्याची आकृति असणारा (घोडा). -अश्वप १.१०२. १०२. ॰पल्लव-पुअव. आंबा, पिंपळ, पिंपरी, वड व उंबर या किंवा इतर पांच वृक्षाचे डहाळे (किंवा पानें). स्मार्त याज्ञिकांत हे कलशामध्यें घालतात. 'पंचपल्लव घालोनि आंत । आणि अशोकें केलें वेष्टित । नरनारी मिळाल्या समस्त । लग्नसोहळिया कारणें ।' -जै ५६.१४. ॰पाखंड-न. जैन, बौद्ध, चार्वक इ॰ पांच मुख्य प्रकारचीं अवैदिक मतें, संप्रदाय. ॰पाखंडी-वि. वरील पाखंड मतांपैकीं कोणत्याहि मताचा अनुयायी. ॰पात्र-पात्री-नस्त्री. पाणी पिण्याचें किंवा इतर उपयोगाचें नळ्याच्या आकाराचें मोठें भांडें. ॰पाळें-न. लांकडाचें, किंवा धातूचें पांच वाट्या अथवा खण असलेलें पात्र. हळद, कुंकु, इ॰ पूजासाहित्य ठेवण्याच्या उपयोगी; किंवा फोडणीचें सामान ठेवण्याच्या उपयोगी पात्र. (गो.) पंचफळें. ॰पुरुषार्थ-पु. धर्म, अर्थ, काम, मोक्ष (सलोकता, समीपता, सरूपता सायुज्यता) व परमप्रेमरूपा-परानुरक्ति- पराभक्ति हें पांच पुरुषार्थ. 'जैसा ज्यासी भावार्थ । तैसा पुरवी मनोरथ । पढिये पंचपुरुषार्थ । तो हरि नांदत वैकुंठी ।' एभा २४.२७०. ॰प्रमाणें-नअव. शब्दप्रमाण, आप्तवाक्यप्रमाण, अनुमानप्रमाण. उपमानप्रमाण व प्रत्यक्षप्रमाण. ॰प्रयाग-पुअव. नंदप्रयाग, स्कंदप्रयाग, रुद्रप्रयाग, देवेंद्रप्रयाग व कणप्रयाग हे पांच प्रयाग. ॰प्रलय-पु. निद्राप्रलय, मरणप्रलय, ब्रह्म्याचा निद्राप्रलय, ब्रह्म्याचा मरणप्रलय, व विवेकप्रलय. ॰प्रवर-पुअव. ब्राह्मणांत कांहीं पंचप्रवरी ब्राह्मण आहेत त्याचे पांच प्रवर असे-भार्गव, च्यावन, आप्नवान, और्व व जामदग्न्य. प्रवर पहा. ॰प्राण- पु. १ प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. हे पांच प्राण प्राण्याच्या आयुष्यास कारणीभूत आहेत. यांचीं स्थानें आणि कार्यें भिन्न भिन्न आहेत. (क्रि.॰ ओढणें; आकर्षणें; सोडणें; टाकणें लागणें). 'देह त्यागुन पंचप्राणीं । गमन केलें तात्कळीं ।' -मुआदि २८.२४. २ (ल.) अतिशय आवडती, प्रियकर वस्तु. 'तो पंचप्राण धन्याचा ।' -संग्रामगीतें ११९. (एखाद्यावर) पंच- प्राण ओवाळणें-पंचप्राणांची आरती करणें-दुसऱ्या- करितां सर्वस्व, प्राणहि देणें; सर्व भावें करून आरती ओवाळणें; खरी, उत्कटभक्ति किंवा प्रेम दाखविणें. 'पंच प्राणांची आरती । मुक्तीबाई ओवाळती ।' ॰प्राणाहु(व)ती-स्त्री. पांच प्राणांना द्याव- याच्या लहान लहान आहुती किंवा घास या त्रेवर्णिकांनीं भोज- नाच्या आरंभीं द्यावयाच्या असतात. पांच आहुती घेणें म्हणजे घासभर, थोडेंसें खाणें. (क्रि॰ घेणें). [पंच + प्राण + आहुती] ॰बदरी- स्त्रीअव. योग, राज. आदि, वृद्ध, ध्यान. या सर्व बदरी बदरी नारा- यणाच्याच रस्त्यावर आहेत. ॰बाण-पु. (काव्य) मदन; कामदेव. मदनाच्या पाच बाणांसाठीं बाण शब्द पहा. ॰बेऊळी-स्त्री. पांच नांग्यांची इंगळी. -मनको. ॰बेळी-स्त्री. बोंबिल, कुटें इ॰ विक्री- करितां एकत्र मिसळलेले लहान मासे. ॰भद्र-वि. सर्व शरीर पिवळें असून पाय आणि तोंड मात्र श्वेतवर्ण असणारा (घोडा). अश्वप १. २१. ॰भूतातीत-वि. १ पंचभूतांपासून अलिप्त, सुटलेला (मुक्त मनुष्य, लिंगदेह). २ निरवयव; निराकार (ईश्वर). ॰भू(भौ)तिक-वि. पांच तत्त्वांनीं युक्त; जड; मूर्त; सगुण. ॰भूतें-नअव. पंचमहाभूतें पहा. भे(मे)ळ-पुस्त्री. पंचमिसळ पहा. अनेक पदार्थांचें मिश्रण -वि. पांच प्रकार एकत्र केलेलें. 'मोहोरा पंचमेळ बरहुकूम पत्र पुरंदर.' -वाडसमा ३.८३. ॰मघा-स्त्रीअव. १ मघा नक्षत्रांत सूर्य आल्या- नंतरचे पांच दिवस. २ मघापासून पुढचीं पांच सूर्यसंक्रमणाचीं नक्षत्रें. ॰महाकाव्यें-नअव. रघुवंश, कुमारसंभव, माघ, किरात, नैषध हीं पांच मोठीं संस्कृत काव्यें. ॰महातत्त्वांचीं देवस्थानें- १ पृथ्वी = कांचीवरम् (कांची स्टेशन). आप-जंबुकेश्वर (श्रीरंगम् स्टेशनपासून १२ मैल). तेज = अरुणाचल (एम्. एस्. एम्. रेलवेच्या मलय स्टेशन नजीक). वायु = कालहस्ती (वरील रेलवेच्या रेणीगुंठा स्टेशनपासून गुडुर रस्त्यावर). आकाश-चिदांबरम् (चेंगलपट रस्त्यावर). ॰महापातकें-नअव. ब्रह्महत्या, मद्यपान, सुवर्णचौर्य, मात्रागमन किंवा गुरुस्त्रीसंभोग व वरील चार महापात- क्यांची संगत. ॰महापातकी-वि. वरील महापातकें करणारा. ॰महाभूतें-नअव. पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश हीं पांच. गंध, रस, रूप, स्पर्श व शब्द हीं यांचीं अनुक्रमें सूक्ष्मरूपें होत. यांना पंचसूक्ष्मभूतें असें म्हणतात. पंचमहाभूतांचीं हीं मूलकारणें आहेत. ह्यावरून जगदुत्पत्तिविषयक ग्रंथांतून पंचभूत व पंचतन्मात्रा अशा संज्ञा ज्या येतात त्यांचा अर्थ पंचमहा(सूक्ष्म)भूतें असाच होय तन्मात्र पहा. ॰महायज्ञ, पंचयज्ञ-पुअव. ब्रह्मयज्ञ (वेदाध्ययन), पितृयज्ञ (तर्पण), देवज्ञ (होम, वैश्वदेव), भूतयज्ञ (बलि), मनुष्ययज्ञ (अतिथिसंतर्पण). भोजनाच्यापूर्वी ब्राह्मणानें नित्य करावयाचे हे पांच यज्ञ आहि्नकांपैकीं होत. ॰महासरोवरें- नअव. बिंदुसरोवर (सिद्धपूर-मातृगया), नारायणसरोवर (कच्छ- प्रांतीं मांडवी), मानस सरोवर (हिमालयामध्यें उत्तरेस), पुष्कर (अजमीर), पंपासरोवर (एम्. एम्. एस् रेलवेच्या होसपेट स्टेशननजीक). ॰महासागर-पुअव. उत्तर, दक्षिण, हिंदी, पॅसिफिक व अटलांटिक महासागर. ॰माता-स्त्रीव. स्वमाता, सासू, थोरली भावजय, गुरुपत्नी व राजपत्नी. ॰मिसळ-मेळ- पुस्त्री. १ पांच डाळींचें केलेलें कालवण, आमटी. २ पांचसहा प्रकारच्या डाळी किंवा धान्यें यांचें मिश्रण. ३ (ल.) एका जातीच्या पोटभेदांतील झालेल्या मिश्रविवाहाची संतति, कुटुंब, जात; कोण- त्याहि वेगवेगळ्या जातीच्या संकरापासून झालेली जात; संकर- जात. ४ भिन्न भिन्न पांच जातींतील लोकांचा समाज. ५ (ल.) निरनिराळ्या जातींचा एकत्र जुळलेला समाज. -वि. मिश्र; भेस- ळीचें. 'हे तांदूळ पंचमिसळ आहेत.' ॰मुख-पु. १ शंकर. 'चतुर्मुख पंचमुख । वेगें षण्मुख पातला ।' -एभा ६.२५. २ सिंह ॰मुखी-वि. १ उरावर भोंवरा असून त्यांत पांच डोळे असणारा (घोडा). -मसाप २.५५. २ पांच तोंडांचा (मारुती, महादेव, रुद्राक्ष). ॰मुद्रा-स्त्रीअव. (योग) भूचरी, खेचरी, चांचरी, अगोचरी आणि अलक्ष अशा पांच मुद्रा आहेत. 'योगी स्थिर करूनियां तेथें मन । शनै शनै साधिती पवन । पंचमुद्रांचें अतर्क्य विंदान । तें अभ्यासयोगें साधिती ।' -स्वादि ९.३.६२. ॰रंगी-वि. १ पांच रंगांचें (रेशीम, नाडा इ॰). २ धोतरा, अफू, इ॰ पांच कैफी पदार्थ घालून तयार केलेला (घोटा). ॰रत्नीगीता-स्त्री. भगवद्गीता, विष्णुसहस्त्रनाम, भीष्मस्तवराज, अनुस्मृति व गजेंद्र- मोक्ष हे पांच अध्यात्म ग्रंथ. ॰रत्नें-नअव. सोनें, हिरा, नीळ, पाच व मोतीं किंवा सोनें, रुपें, पोवळें, मोतीं, राजावर्त (हिऱ्याची निकृष्ट जात). ॰रसी-वि. १ पांच (किंवा जास्त) धातूंच्या रसापासून तयार केलेली (वस्तु). २ तोफांचा एक प्रकार. 'पंचरशी आणि बिडी लोखंडी ।' -ऐपो २२५. ॰राशिक- राशि-पुस्त्री. (गणित) बहुराशिक; दोन त्रैराशिकें एकत्र करून तीं थोडक्यांत सोडविण्याचा प्रकार; संयुक्त प्रमाणांतील चार पदांपैकीं संयुक्त गुणोत्तरांतील दोन पदें आणि साध्या गुणोत्तरांतील एक पद हीं दिलीं असतां साध्या गुणोत्तरांतील दुसरें पद काढण्याची रीत. ॰रुखी-रुढ-वि. साधारण; सामान्य; रायवळ; अनेक प्रकारचें; जंगली (लांकूड-सागवान, खैर, शिसवी इ॰ इमारतीस लागणाऱ्या पांच प्रकारच्या लांकडाशिवाय). ॰लवणें-नअव. मीठ, बांगडखार, सैंधव, बिडलोण व संचळ. ॰लवी-वि. (गो.) पंचरसी पहा. ॰लोह-न. तांबें, पितळ, जस्त, शिसें व लोखंड यांचें मिश्रण. ॰वकार-पुअव. व नें आरंभ होणारे व प्रत्येकास लागणारे पांच शब्द शब्द म्हणजे विद्या, वपु, वाचा, वस्त्र आणि विभव. 'विद्यया वपुषा वाचा वस्त्रेण विभवेन वा । वकारैः पंच- भिर्हीनो नरो नाप्नोति गौरवम् ।' ॰वक्त्र-वदन-पु. महादेव. 'भक्तोत्सल पंचवदन । सुंदर अति अधररदन ।' -देप २००. याच्या पांच तोंडांचीं नावें:-सद्योजात, तत्पुरुष, अघोर, वामदेव आणि ईशान. ॰वर्ज्यनामें-नअव. आत्मनाम, गुरुनाम, कृपणनाम, ज्येष्ठापत्यनाम व पत्निनाम. या पांच नामांचा उच्चार करूं नयें. ॰विध-वि. पांच प्रकारचें. ॰विशी-स्त्री. १ पंचवीस वर्षांचें वय. २ पंचवीस वस्तूंचा समूह. पहिल्या पंचवीशींतलें पोरगें-तरणाबांड. ॰विषय-पुअव. (कर्ण, त्वचा, चक्षु, रसना, घ्राण या) पांच ज्ञानेंद्रियांचे अनुक्रमें पांच विषय:-शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध. पंचवीस-२५ संख्या; वीस आणि पांच. ॰विसावा-वि. सांख्य मताप्रमाणें मूल-प्रकृत्यादि जीं चोवीस तत्त्वें आहेत त्यांपलीकडील पंचविसावा (आत्मा). 'तूं परम दैवत तिहीं देंवा । तूं पुरुष जी पंचवीसावा । दिव्य तूं प्रकृति- भावा- । पैलीकडील ।' -ज्ञा १०.१५०. ॰शर-पु. पंचबाण पहा. ॰सार-न. तूप, मध, तापविलेलें दूध, पिंपळी व खडीसाखर हे पदार्थ एकत्र घुसळून तयार केलेलें सार. हें विषमज्वर, हृद्रोग, श्वास, कास व क्षय यांचा नाश करतें. -योर १.३५३. ॰सूत्र-सूत्री-वि. १ पांच दोऱ्यांचें, धान्यांचें, रेषांचें. २ सारख्या लांबीच्या पांच सुतांमध्यें केलेलें, बसविलेलें (शाळुंकेसह बनविलेलें शिवलिंग). 'पंचसूत्री दिव्य लिंग करी । मणिमय शिवसह गौरी ।' ॰सूना-स्त्रीअव. कांडण, दळण, चूल पेटविणें, पाणी भरणें, सारवणें यापासून जीवहिंसादि घडणारे दोष. 'पंचसूना किल्बिषें म्हणूनि । एथें वाखाणिती ।' -यथादी ३.२३. ॰सूक्तें-नअव. ऋग्वेद संहितेंतील पुरुषसूक्त,देवासूक्त, सूर्यसूक्त (सौर), पर्जन्यसूक्त व श्रीसूक्त हीं पांच सूक्तें. ॰सूक्ष्मभूतें-नअव. पंचमहाभूतें पहा. ॰स्कंध-पुअव. सौगतांच्या अथवा बौद्धांच्या दर्शनाला अनुसरून मानवी ज्ञानाचे पांच भाग. म्हणजे रूप, वेदना, विज्ञान, संज्ञा व संस्कार. या शब्दांचे विषयप्रपंच, ज्ञानप्रपंच, आलयविज्ञान संतान, नामप्रपंच आणि वासनाप्रपंच ह्या अनुक्रमें पांच शब्दांनीं स्पष्टी- करण केलें आहे. ॰स्नानें-नअव. पांच स्नानें-प्रातः-संगव- माध्यान्ह-अपराण्ह-सायंस्नान. ॰हत्यारी-वि. १ ढाल, तरवार, तीरकमान, बंदूक, भाला किंवा पेशकबज या पांच हत्यारांनीं युक्त. २ चार पाय व तोंड यांचा शस्त्राप्रमाणें उपयोग करणारें (जनावर-सिंह, वाघ इ॰). ३ (ल.) हुशार; योग्य; समर्थ; संपन्न; सिद्ध असा (मनुष्य). ४ (व्यंग्यार्थी) शेंदाड शिपाई; तिसमारखान. ॰हत्त्या-स्त्रीअव. ब्रह्महत्त्या, भ्रूणहत्त्या, बालहत्त्या, गोहत्त्या व स्त्रीहत्त्या. पंचाग्नि-ग्नी-पुअव. १ चारी दिशांना चार पेटविलेले व डोक्यावरील तप्त असा सूर्य मिळून पांच अग्नी. 'पंचाग्नी गोरांजनें । जें प्राप्त नव्हे ।' -दा ५.६.२९. २ शरीरांतील पांच अग्नी. ३ -वि. पांच श्रौताग्नि; धारण करणारा गृहस्थाश्रमी ब्राह्मण. हे पांच अग्नी-दक्षिणाग्नि; गार्हपत्य, आहवनीय, सभ्य व आवसथ्य हे होत. -ग्नि साधन-न. चारी दिशांनां चार कुंडें पेटवून दिवसभर उन्हांत बसणें. हा तपश्चर्येचा एक प्रकार आहे. याला पंचाग्निसेवन, धूम्रपान असेंहि म्हणतात. 'चोहींकडे ज्वलन पेटवुनी दुपारीं । माथ्यावरी तपतसे जंव सूर्य भारी । बैसोनियां मुनि सुतीक्ष्ण म्हणोनि हा कीं । पंचाग्निसाधन करी अबले विलोकी ।' पंचादुयी- दिवी-दुवी-देवी-स्त्री. पंचद्वयी पहा. [अप.] पंचादेवी-स्त्री. शेताच्या उत्पन्नाचे ५ वांटे करून ज्याचे बैल असतील त्याला ३ व दुसऱ्याला (मालकाला) २ वांटे देण्याची रीत. पंचानन-पु. १ शंकर. २ (सामा.) पांच तोंडांची किंवा बाजूंची वस्तु. ३ सिंह. पंचामृत-न. १ दूध, दहीं, तूप, मध आणि साखर या पांचांचें मिश्रण. यानीं देवाच्या मूर्तीला स्नान घालतात. 'पय दधि आणि घृत । मधु शर्करा गुड संयुक्त । मूर्ति न्हाणोनि पंचामृतें । अभिषेक करिती मग तेव्हां ।' २ शेंगदाणे, मिरच्या, चिंच, गूळ, खोबऱ्याचे तुकडे इ॰ पदार्थ एकत्र शिजवून त्यास तेलाची फोडणी देऊन केलेला पदार्थ. ३ एक पक्वान्न; मिष्टान्न. [सं.] म्ह॰ १ जेवावयास पंचामृत आंचवावयास खारें पाणी. २ पंचामृत खाई त्यास देव देई. ॰मृत सोडणें-(बायकी) चातुर्मासांतील पहिल्या महिन्यांत दूध, दुसऱ्यांत दहीं, तिसऱ्यांत तूप, चौथ्यांत मध व पाचव्यांत (अधिकांत) साखर किंवा पांचवा (अधिक) नस- ल्यास चौथ्यांतच मध व साखर यांनीं युक्त असे पदार्थ न खाणें. ॰मृतानें-पंचामृतें न्हाणणें-पंचामृताच्या पदार्थानीं देवास स्नान घालणें. पंचायतन-न. १ शिव, विष्णु, सूर्य, गणपति व देवी या पांच देवता व त्यांचा समुदाय. या पांच देवतांपैकी प्रत्येक देव- तेस प्राधान्य देऊन शिव, विष्णु, गणपति इ॰ चीं पांच पंचायतनें मानण्याचीहि पद्धत आहे. (गो.) पंचिष्ट २ (ल.) एकचित्त असलेले पांच जण. ३ पंचमहाभूतांचें स्थान; शरीर. 'तें अधिदैव जाणावें । पंचायतनीचें ।' -ज्ञा ८.३६. पंचारती, पंचारत- स्त्री. १ तबकांत पांच दिवे ठेवून आरती ओवाळणें. २ आरती करितां लावलेले पांच दिवे. ३ असे दिवे ठेवण्याचें पात्र. पंचाक्षरी-वि. पंचाक्षरीमंत्र म्हणणारा व अंगांतील भूतपिशाच्च काढणारा; देव- ऋषी. 'पंचाक्षरी काढिती समंध ।' ॰क्षरीकर्म-न. पंचाक्षरीमंत्र म्हणून अंगांतील भूत काढणें. ॰क्षरीमंत्र-पु. १ भूतपिशाच्च काढ्ढन टाकण्याचा पांच अक्षरांचा मंत्र. २ ॐ नमःशिवाय हा मंत्र. पंचास्त्र-न. पंचकोण. -वि. पंचकोणी. [सं.] पंचाळ-स्त्री. (विणकाम) १ पांच पंचांकरितां लावलेला ताणा. २ एक शिवी. -वि. १ फार तोंडाळ, बडबड करणारी (स्त्री). पंचीकरण-न. १ पांच महाभूतांपैकीं प्रत्येकाचा कमीजास्त भाग घेऊन त्या सर्वांच्या मिश्रणानें नवा पदार्थ तयार होणें. -गीर १८१. २ आका- शादि पंचभूतें, त्यांचे देहादिकांच्या उत्पत्तीसाठीं ईश्वरशक्तीनें झालेलें परस्पर संमिश्रण. तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ. हा देह किंवा विश्व हें पंचमहाभूतात्मक कसें आहे याचें विवरण करणारा ग्रंथ. पंचीकृत- वि. पांच मूलतत्वें एकत्र झालेली (स्थिती). पंचेचाळ- चाळीस-ताळ-ताळीस-वि. चाळीसामध्यें पांच मिळवून झालेली संख्या; ४५. पंचेंद्रिय-नअव. पांच इंद्रियें. डोळे, कान, नाक, जिव्हा व त्वचा. यांचीं कामें अनुक्रमें-पहाणें, ऐकणें, वास घेणें, चव घेणें व स्पर्श करणें. पंचोतरा-पु. १ दरमहा दरशेकडा पांच टक्के व्याजाचा दर. २ शेंकडा पांच प्रमाणें द्यावयाचा कर. ३ सरकारसारा वसूल करतांना पांच टक्के अधिक वसूल करण्याचा हक्क. ४ सरकाराकरितां शंभर बिघे किंवा एकर जमीन लागवडी- खालीं आणली असतां पाटलाला पांच बिघे किंवा एकर सारा- माफीनें द्यावयाची जमीन. पंचोतरा, पंचोतरी-पुस्त्री. गव- ताच्या शंभर पेंढ्या किंवा आंबे विकत देतांना पांच अधिक देणें. पंचोपचार-पुअव. गंध, पुष्प, धूप, दीप व नैवेद्य या वस्तू व त्या देवाला समर्पण करणें. पंचोपप्राण-पुअव. नाग, कूर्म, कृकल, देवदत्त व धनंजय हे पांच उपप्राण. कूर्म अर्थ ३ पहा. पंचो- पाख्यानी-वि. १ (पांच प्रकरणांचे पंचोपाख्यान नांवाचा विष्णु- शर्म्याचा नीतिपर एक ग्रंथ आहे त्यावरून) अनेक कथा, संदर्भ, उदाहरण, दृष्टांत इ॰ नीं परिपूर्ण. २ कल्पित; विलक्षण; अद्भुत. ३ अभद्र; शिवराळ (स्त्रिया संबंधीं योजितात). पंच्याऐशी- पंच्याशी-वि. ८५ संख्या. पंच्याण्णव-वि. ९५ संख्या. पंच्याहत्तर-वि. ७५ संख्या.

दाते शब्दकोश

जीव      

पु.        १. प्राण : जीवित. २. प्राण असणारा जिवंत प्राणी. ३. लहान कीटक; प्राणी (चिलट, घुंगरडे, पिसू, किडा इ.). ४. तेज; वीर्य; जोम; धमक; पाणी; शक्ती, धैर्य; कार्यक्षमता; सत्त्व; सार (माणूस, घोडा, बैल इत्यादींचे). ५. अंतरात्मा; सचेतन आत्मा. पहा : जीवात्मा [सं.] (वा.) जीव अधांत्री उडणे - संकटात पडणे; भांबावून जाणे; घाबरून जाणे. जीव अर्धा करणे - मनुष्याला अतिशय त्रास देणे. सर्व शक्ती खर्च करणे (श्रम, व्यर्थ शिकवण इ.). जीव अर्धा होणे - भिणे; त्रासले जाणे; गर्भगळित होणे; श्रमणे; दमणे; अर्धमेले होणे. जीव अडकणे, जीव टांगणे, जीव टांगला असणे - आवडत्या वस्तूच्या प्राप्तीसाठी घाबरे होणे, काळजी लागणे. जीव आटणे - १. मरेमरेतो काम करणे. २. अतिशय थकून जाणे (मेहनत, काळजी इ.नी). जीव आंबणे - त्रासून जाणे; कंटाळणे. जीव उडणे - १. प्रेम नाहीसे होणे; विटणे. २. भीतिग्रस्त होणे. जीव कयंगटीस येणे - १. मेटाकुटीस येणे. २. मुरगळून पडणे. (कर.) जीव कालविणे - गलबलणे; अतिशय क्षोभ होणे; घाबरणे; गडबडणे. जीव की प्राण करणे - अतिशय प्रेम करणे. जीव कोड्यात पडणे - बुचकळ्यात पडणे; काही न सुचणे : ‘हे ऐकून भागाचा जीव कोड्यांत पडला.’ - ऊन १७. जीव कोरडा होणे, जीव कोरडा पडणे - घसा वाळणे; थकणे; अतिशय दमणे; (आजार, श्रम, भूक यांनी). जीव कोंडाळणे - गुदमरणे (ना.). जीव खरडून बोलणे, जीव सुकणे, जीव रडणे - आकांत करणे; ओक्साबोक्सी रडणे. जीव खाऊन - सर्व शक्ती एकवटून किंवा मनापासून; जोरजोरात : ‘ताशा वाजंत्रीवाले सकाळपासून दाराशी येऊन दोन पायांवर बसले होते आणि जीव खाऊन वाजवीत होते.’ - भुज १२२. जीव खाऊन काम करणे - मनापासून काम करणे; कसून काम करणे. जीव खाणे, जीव घेणे, जिवास खाणे - एखाद्याच्या जिवास त्रास देणे; झुरविणे. जीव खाली पडणे - उत्कट इच्छा पूर्ण होणे; साध्य गाठणे; मनाजोगे होणे. जीव गंगाजळ होणे - धन्य होणे; कृतार्थ होणे : ‘मळवट भरून त्येंच्यासंगं गेली असती. जीव गंगाजळ झाला असता माझा.’ - खळाळ ७४. जीव गोळा होणे - १. अधीर होणे. २. मरणोन्मुख होणे. अतिशय घाबरणे : ‘जों जों देखे देव काखेंत बोळा । तों तों त्याचा होतसे जीव गोळा ।’ - आसुच २६. जीव घेऊन पळणे - जीव वाचविण्यासाठी पळून जाणे. जीव जाळणे, जीव मारणे - निग्रह करणे; दमन करणे (कामेच्छा, पाप वासना, मनोविकार यांचे). जीव टाकणे - १. प्राण सोडणे. २. निराश होणे; चित स्वस्थ नसणे. ३. फार उत्कंठा लागणे; अतिशय हट्ट, छंद घेणे. ४. खूप प्रेम करणे; लुब्ध होणे : ‘त्यासाठी मी जीव टाकतो.’ - अआबांदे ११. जीव टाकून पळणे - अतिशय त्वरेने, घाईने, एकदम पळणे; भिऊन पोबारा करणे. जीव टांगणीस लागणे - १. एखाद्या वस्तूवर प्रीती बसणे. २. चिंताग्रस्त होणे. जीव टांगणे - काळजीत असणे : ‘लवकर ये रे बाबा - माझा जीव टांगलेला आहे.’ - एल्गार १२८. जीव टांगून ठेवणे - तिष्ठत ठेवणे; काळजीत ठेवणे : ‘चार वर्षं बिचारीचा जीव टांगून ठेवलात.’ - ऑक्टोपस ६१. जीव ठिकाणी नसणे - अस्वस्थ असणे; चैन न पडणे. जीव डहळणे, जीव मळकणे - (ना.) मळमळणे. जीव तुटणे - १. अतिशय थकणे. २. तळमळ लागणे. एखाद्याचा ध्यास लागणे; एखाद्याबद्दल अतिशय काळजी वाटणे. जीव तोडणे - दुःखाने सचिंत होणे. जीव तोडून करणे - अतिशय मेहनतीने करणे. (काम, धंदा). जीव थारी असणे - स्वस्थपणा असणे. जीव थारी नसणे - अस्वस्थ असणे; चैन न पडणे. जीव थोडा थोडा होणे - (ग्लानी, देणे इत्यादी कारणांनी) अतिशय चिंताग्रस्त होणे; काळजी लागणे; भीती वाटणे; फार दुःख होणे; धैर्य खचणे. जीव देणे - १. आत्महत्या करणे. २. सगळे लक्ष घालणे; लक्ष देऊन करणे; पुष्कळ प्रयत्न करणे. जीव धडधड करणे - काळजी, भीती वाटणे. जीव धरणे - नवीन शक्ती मिळविणे; रंगारूपास येणे; बरे व्हावयास लागणे. जगणे, वाढीस लागणे (झाड वगैरे). जीव धरून - १. धैर्य धरून; उत्सुकतेने; उत्साहाने (कृत्य करणे.) २. जिवंत राहून; अस्तित्व टिकवून (कसा तरी याला जोडून योजना.). जीव धागधूग करणे - घाबरणे; वरखाली होणे : ‘निकालाचा दिवस जो जो जवळ येऊ लागला तो तो माझा जीव धागधूग करू लागला.’ - पलको ४९१. जीव धुकुडपुकुड करणे - घाबरणे. (ना.) जीव नाकास येणे - नाकी नव येणे; नाकी नळ येणे; दमछाक होणे. जीव पछाडणे - मोठ्या कळकळीने, लाचारीने नम्र होणे. जीव पडणे - एखाद्या गोष्टीत मनापासून शिरणे; गोडी लागणे; तत्पर होणे. जीव पाखडणे - १. अतिशय मेहनत करणे; प्रयत्न करणे. २. जळफळणे; तडफडणे. जीव पोळणे - १. दुःख होणे. २. चट्टा बसणे; धडा मिळणे. जीव प्यारा असणे - जिवाविषयी अति प्रीती दाखविणे. जीव फुटणे - अतिशय उत्सुक होणे : ‘तुझे भेटीसाठी निशिदिवस माझा जिव फुटे ।’ - सारुह ६·१५८. जीव बसणे - (एखाद्यावर) मन बसणे; प्रेम करणे. जीव भांड्यात पडणे - जीव स्वस्थ होणे. जीव मट्ट्यास येणे - दमणे, अगदी थकून जाणे. जीव मुठीत धरणे - १. काळजीपूर्वक स्वतःचे संरक्षण करणे (धोक्यामुळे). जीव मोठा करणे - १. जोराचा प्रयत्न करणे; धैर्य धरणे. २. उदार होणे (खर्च करण्यात); मन मोठे करणे. जीव रखमेस येणे - कंटाळा येणे; त्रासणे. (कु.) जीव राखणे - जिवाचे रक्षण करणे; आळसाने काम करणे. जीव लावणे - प्रेम करणे; माया लावणे. जीव वर धरणे, जीव वरता धरणे - अतिशय उत्सुक होणे; उत्कंठा लागणे. जीव वारा पिणे - उदास भासणे; भयाण वाटणे. जीव सुकणे - अशक्त, व्याकूळ होणे. जीव सुचिंत नसणे - काळजीत असणे. जीव सोडणे - १. मरणे. २. जीव धोक्यात घालणे; स्वतःच्या जिवाची आहुती देणे. ३. अतिशय इच्छा दर्शविणे. ४. आजारी माणसावरून कोंबडे ओवाळून टाकणे (याने आजाऱ्याचा रोग कोंबड्यावर जाऊन ते मरते अशी समजूत). जिवाचं काय पांढ्‌ढ (कांळ-पांढरं) करणे - जिवाचे बरेवाईट करणे : ‘कोन्या आडशइरीवर जावं आन्‌ आपल्या जिवाचं काई काय पांढ्‌ढ करून टाकावं.’ - शिळान ७८. जिवाचा कान करणे - लक्षपूर्वक कान देऊन ऐकणे : ‘वयातीत वृद्धही त्यांचे बोलणे ऐकण्यासाठी जिवाचा कान करीत असत.’ - लोसंक्षि १२१. जिवाचा घात करणे - १. आटोकाट प्रयत्न करणे; जिवापाड मेहनत करणे. २. अतिशय छळणे; गांजणे (जीव जाईपर्यंत). जिवाचा घोट घेणे - जिवाचा घात करणे; मरेपर्यंत छळणे. जिवाचा धडा करणे - साहसाचा प्रयत्न करण्यास तयार होणे. जिवाचा निधडा करणे - जिवावर उदार होणे : ‘तेव्हा त्याणें जिवाचा निधडा करून शिपाइगिरी म्हणावी तैशी केली.’ - ऐको ४४५. जिवाचा लोळ करणे - १. फार श्रम करणे; जिवाला त्रास देणे. २. फार मेहनत घेणे. जिवाची कोयकोय करणे - (कुत्र्यासारखे भुंकावयास लावणे म्हणजे) अतिशय छळणे. जिवाची ग्वाही देणे, जिवाची पाखी देणे - खात्रीपूर्वक सांगणे. जिवाची घालमेल होणे - जीव अस्वस्थ होणे : ‘तुझ्या जिवाची आता जी घालमेल चालली होती’ - असा ८१. जिवाची बाजी - जिवाची पर्वा न करता : ‘येसाजींनी जिवाच्या बाजीनं वाटा रोखल्या.’ - श्रीयो २४७. जिवाची मुंबई करणे - चैन करणे : ‘मोटारी उडवून जिवाची तात्पुरती मुंबई करतात.’ - शेले ३८. जिवाची राळवण करणे - अतिशय काम करणे (राळ्याच्या काडीसारखे होणे); त्रास घेणे. जिवाची हुल्लड करणे - मोठा नेटाचा प्रयत्न करणे. जिवाची होड करणे - प्राण पणास लावणे; एखादे कार्य सर्व सामर्थ्यानुसार करणे : ‘जिवाची होड करून चालविलेल्या त्या स्वातंत्र्यसंगराने.’ - मसासंअभा ४४६. जिवाचे चार - चार करणे - थेर करणे; नाचणे; चैन, विलास करणे. जिवाचे रान करणे - अतिशय कष्ट सोसणे. जिवाच्या आकांताने - गर्भगळित होऊन; अतिशय घाबरून; सर्व शक्तीनिशी : ‘ते जिवाच्या आकांताने बाहेर पडले.’ - माचू ३७३. जिवाच्या गाठी बांधणे - मनात नीट ठसवून किंवा बिंबवून घेणे. जिवात जीव आहे तोपर्यंत - मरण येईपर्यंत; जन्मभर; सदासर्वदा. जिवात जीव घालणे - १. उत्तेजन देणे; सांत्वन करणे; धैर्य देणे. २. आपले व दुसऱ्याचे मन एक करणे; आपले विचार दुसऱ्यास नीट समजावणे. जिवात जीव नसणे - धीर नसणे - अस्वस्थ्य होणे : ‘घरी येईपर्यंत तिच्या जिवात जीव नव्हता.’ - रथचक्र १७३. जिवात जीव येणे - गेलेली शक्ती, धैर्य पुन्हा येणे; धीर येणे. जिवानिशी - जिवासकट. जिवानिशी जाणे - मरणे (जुलमाने, अकाली). जिवाला करवत लागणे - अतिशय चिंता लागणे. जिवाला काही तरी करून घेणे - आत्महत्या करणे; जीव देणे. जिवाला खाणे - मनाला लागून राहणे; झुरणे; झिजणे. तडफडणे. जिवाला चरका लावून जाणे - बेचैन करणे : ‘हे पद जिवाला चरका लावून जात असे.’ - मास्मृग्रं १४२. जिवावर आंगेजणी करणे - जिवावर उदार होऊन कार्यभाग अंगीकारणे : ‘लढाई होईलसी दिसती ते बहूत हे थोडे परंतु हे जिवावर आंगेजणी करितील श्री यश कोन्हास देईल पहावे.’ - ऐको ४४५. जिवावर उठणे - दुसऱ्याच्या जिवाची काळजी न करणे; त्याचा जीव घ्यायला याला तयार होणे. जिवावर उड्या मारणे - दुसऱ्याच्या पैशावर, मदतीवर चैन बढाई मारणे. जिवावरची होड - प्राणावर बेतलेले संकट; प्राणाची पैज; प्राणपणाला लावणे. जिवावर द्वारका करणे - एखाद्याच्या आधारावर, आश्रयावर चैन करणे; महत्कृत्य करणे; मोठा उपकार करणे : ‘तुमच्या जिवावर एवढी द्वारका केले घरदार दोमजली ।’ - पला ८५. (दुसऱ्याच्या) जिवावर (आपले) पोट भरणे - दुसऱ्यावर अवलंबून आपला उदरनिर्वाह चालविणे. जिवावर येणे, जिवावर बेतणे, जिवाशी गाठ पडणे - १. जीव धोक्यात पडणे; मोठे संकट ओढवणे. २. दुष्कर वाटणे. ३. चिडणे. जिवावरचे आधण उतरणे - कठीण प्रसंगांतून बचावणे, निभावणे. ९८. जिवाशी धरणे, जिवाशी बांधणे, जिवी धरणे, जिवी बांधणे - अतिशय प्रीती करणे; बहुमोल वाटणे : ‘काय इणें न धरावें अधनत्वें भूप - जन - वरा जीवीं ।’ - मोवन १३·१८ जिवाशी बेतणे - प्राण जाण्याची वेळ येणे : ‘जिवाशी बेतल्यावर तरी शुद्धींत याल असं वाटलं होतं.’ - एल्गार ११२. जिवास जहानगिरी करणे, जिवास जहानगिरी होणे - जिवावर मोठे संकट येणे, आणणे; संकटाचा प्रसंग ओढवणे. जिवास जीव देणे - प्रिय माणसासाठी आपला जीव देणे. अतिशय सख्य करणे. जिवास पाणी घालणे - जिवावर उदार होणे : ‘अवघे लोक पळाले, ऐसा प्रसंग लोकांचा या भरोसियावर रहावे तरी आपल्या जीवास पाणी घालोन रहावे लागते.’ - ऐको ४४५. जिवास मुकणे - मरणे; मृत्यू पावणे. जिवी लागणे - १. आवडीचा असणे; प्रिय वाटणे. २. मर्मभेद होणे; जिवाला लागणे. जिवे धुस जाणे - धस्स होणे; जिवात धडकी भरणे : ‘तुमते एतां देखिलें । तेंची माझां जीवे घुस गेले ।’ - शिव १२५. जीवे प्राणे उभे राहणे - जिवावर उदार होणे : ‘हें जीवें प्राणें उभे राहिलें तेव्हां त्याणीं अमल दिल्हा व तह केला.’ - ऐको ४४७. जिवे मारणे - जीव जाईपर्यंत मारणे. जिवे वाचणे - एखादे संकट टळून जिवंत राहणे; जीव जाण्याचा प्रसंग असता जीव न जाता बचावणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तोंड

न. १ ज्यानें खातां वं बोलतां येतें तो शरीराचा अव- यव; मुख; वदन; तुंड. २ चेहरा; हनुवटीपासून डोक्यापर्यंत मस्तकाचा दर्शनी भाग. ३ (सामा.) (एखाद्या वस्तूचा) दर्शनी भाग; पुढचा-अग्रभाग; समोरील अंग. 'या ओझ्याच्या तोंडीं मात्र चांगल्या चांगल्या पेंढ्या घातल्या आहेत.' ४ (फोड, गळूं इ॰ कांचा) छिद्र पडावयाजोगा, छिद्रासारखा भाग; व्रणाचें मुख. यांतूनच पुढें पू, लस इ॰ वाहतात. ५ (कुपी, तपेली, लोटी इ॰ कांचें) पदार्थ आंत घालावयाचें भोंक; द्वार; मार्ग; मुख. ६ (एखाद्या विषयांत, शास्त्रांत, गांवांत, देशांत, घरांत) शिरकाव होण्याचा मार्ग; प्रवेशद्वार. 'ह्या घराचें तोंड उत्तरेस आहे.' ७ (ल.) गुरुकिल्ली. उदा॰ 'एखाद्या प्रांताचें, देशाचें किल्ला हें तोंड होय.' 'व्याकरण भाषेचें तोंड होय.' ८ (वारा इ॰कांची) दिशा; बाजू. ९ धैर्य; दम; उमेद; एखादें कार्य करण्याविषयींची न्यायतः योग्यता. १० एखाद्या पदार्थाचें ग्रहण किंवा त्या पदार्थाचा एखाद्या कर्याकडे विनियोग इ॰ कांचा आरंभ त्या पदार्थाच्या ज्या भागाकडून करि- तात तो भाग. 'भाकरीस जिकडून म्हटलें तिकडून तोंड आहे.' ११ (युद्ध, वादविवाद इ॰कांसारख्या गोष्टींची) प्रारंभदशा. 'वादास आतां कुठें तोंड लागलें.' १२ (सोनारी धंदा) हातोड्याच्या सगळ्यांत खालच्या बाजूस अडिश्रीच्या बुडासारखा जो भाग असतो तो. यानें ठोकलेला जिन्नस सारखा करून घेतात. १३ (सोनारी धंदा) कांबीस गोल आकार देतांनां तिचीं टोंकें जेथें जुळतात तो भाग. १४ (बुद्धिबळें) डाव सुरू करण्याचा प्रकार; मोहरा. 'वजीराच्या प्याद्याचें तोंड.' [सं. तुंड; प्रा. तोंड] (वाप्र.) ॰आटोपणें, सांभाळणें, आवरणें-जपून बोलणें; बोलण्याला आळा घालणें; अमर्याद भाषण, अभक्ष्यभक्षण यांपासून निवृत्त होणें. ॰आणणें- (आट्यापाट्यांचा खेळ) शेवटची पाटी खेळून जाऊन पुन्हां एक एक खेळत येणें; पाणी आणणें; लोण आणणें. ॰आंबट करणें- (एखाद्यानें) असंतुष्ट, निराशायुक्त मुद्रा धारण करणें. तोंड आहे कीं तोबरा-खादाड किंवा बडबड्या माणसास उद्देशून वापरावयाचा, 'किती खातोस' 'किती बोलतोस' या अर्थाचा वाक्प्रचार. ॰उतरणें-(निराशा, आजार इ॰ कांनीं) चेहरा म्लान होणें, सुकणें, फिका पडणें, निस्तेज होणें. ॰उष्टें करणें-(अन्नाचा) एखादा-दुसरा घांस, एक दोन घांस खाणें; जेवणाचें नुसतें नांव करणें. ॰करणें-बडबड, वटवट, बकबक करणें; उद्धटपणानें, निर्लज्ज- पणानें बोलणें. ॰करून बोलणें-निर्लज्जपणें, आपला (लहान) दर्जा सोडून बोलणें. ॰काळें करणें-(उप.) एखादा ठपका, तोहमत अंगावर आल्यामुळें निघून, पळून, निसटून जाणें; हातावर तुरी देणें; दृष्टीस न पडणें (केव्हां केव्हां तोंड हा शब्द वगळला तरी चालतो. जसें:-त्यांनीं काळें केलें). ॰गोड करणें-१ (एखाद्याला) लांच देणें; खूष करणें. २ मेजवानी देणें; गोड खावयास घालणें. ॰गोरेंमोरें करणें-(कोणी रागें भरल्यामुळें, मनास वाईट वाटल्यामुळें) निराशेची, लाजलेपणाची मुद्रा धारण करणें. ॰घालणें-(दोघे बोलत असतां तिसर्‍यानें) संबंध नसतां मध्येंच बोलणें. ॰घेऊन येणें-एखाद्यानें एखाद्यावर सोंपविलेलें काम न करतां त्यानें तसेंच परत येणें. 'असें सर्वांनीं न करावें. जो मामलेदार असें करून तोंड घेऊन येईल त्याचें मुखावलोकन न करितां फिरोन सेवा न सांगतां त्यास घरींच बसवावें.' -मराआ २९. ॰घेणें-१ बोंबलत सुटणें; ताशेरा झाडणें; बोंबलपट्टी करणें. २ तोंडांतून लाल गळावी म्हणून पारा इ॰ तोंड आणणारीं औषधें घेणें. तोंड देणें पहा. 'मी वैद्याकडून तोंड घेतलें आहें.' तोंडचा-वि. १ विरुद्ध, उलट दिशेचा; समोरून येणारा (वारा, ऊन, भरती इ॰). २ ज्याची कर्तबगारी केवळ तोंडांतच, बोल- ण्यांतच आहे, क्रियेंत दिसून येत नाहीं असा. 'तोंडचा शिपाई- कारकून-सुग्रण-खबरदार.' ३ तोंडानें सांगितलेला, निवेदन केलेला; तोंडीं केलेला (व्यवहार, हिशेब, पुरावा इ॰). याच्या उलट लेखी. तोंडचा, तोंडींचा घास काढणें-हिरून घेणें-१ (एखा- द्याची) अगदीं आटोक्यांत आलेली वस्तु, पदरीं पडावयास आलेला लाभ हिसकावून घेणें. २ (एखाद्याच्या) अन्नावर पाणी पाडणें; अन्नांत माती कालविणें; पोटावर पाय देणें. तोंडचा-तोंडींचा घांस देणें-(ल.) (एखाद्यास) अतिशय प्रेमानें, ममतेनें वाग- विणें; प्रसंगविशेषीं आपण उपाशी राहून दुसर्‍यास खावयास देणें. तोंडचा गोड आणि हातचा जड-बोलण्यांत गोड व अघळ- पघळ, पण प्रत्यक्ष पैशाची मदत करण्यांत पूज्य. तोंडचा चतुर- वि. बोलण्यांत पटाईत; वाक्पटु. तोंडचा जार-पु. नुकत्याच जन्मलेल्या मुलाच्या तोंडांतील फेंस; चिकटा; ओंठावरचा जार; जन्मप्रसंगींचा तोंडावरचा पातळ पापुद्रा (विशेषतः तुझ्या, त्याच्या तोंडाचा जार वाळला नाहीं. = तूं, तो अजून केवळ बालक आहेस.' अशा वाक्यांत उपयोग). तोंडचा नीट-वि. १ बोलून भला, चांगला; बोलकाचालका; सौजन्ययुक्त. २ युक्तायुक्त विचार करून बोलणारा. ३ हजरजबाबी; अस्खलित बोलणारा. तोंडचा फटकळ-वि. शिवराळ; उघडतोंड्या; अश्लील, शिवराळ भाषण करणारा. तोंडचा रागीट-वि. जहाल; तिखट; कडक भाषण करणारा. तोंडचा शिनळ-वि. १ इष्कबाज, फंदी म्हणून नांव मिळविण्याची इच्छा करणारा; स्त्रियांची खोटी खुषमस्करी करणारा; स्त्रियांच्या कृपेची खोटीच फुशारकी मारणारा. २ निरर्गल व अश्लील भाषण करणारा; शिवराळ. तोंड(डा)ची गोष्ट-स्त्री. सहजसाध्य, अतिशय सोपी गोष्ट, काम. 'वाघ मारणें तोंडची गोष्ट नव्हे.' तोंड चुकविणें-हातून एखादा अपराध घडला असतां कोणी रागें भरेल या भीतीनें, काम वगैरे टाळण्यासाठीं चुकारतट्टू- पणानें एखाद्यापासून आपलें तोंड लपविणें; दृष्टीस न पडणें; छपून असणें. ॰चे तोंडीं-क्रिवि. प्रत्यक्षाप्रत्यक्ष; तोंडानें; बोला- चालीनें. ॰चे तोंडीं व्यवहार-केवळ तोंडानें बोलून, बोलाचा- लीनें झालेला, होणारा व्यवहार, धंदा. याच्या उलट लेखी व्यव- हार. ॰चें पायचें-न. (कों.) गुरांच्या तोंडास व पायांस होणारा रोग. ॰चे हिशेब-पुअव. कागदांवर आंकडेमोड न करितांमनां- तल्यामनांत कांहीं आडाख्यांच्या; मदतीनें करावयाचे हिशेब. तोंडचें तोंडावरचें पाणी पळणें; उडणें, तोंड कोरडें पडणें-१ (भीतीमुळें) चेहरा फिका पडणें; बावरून,घाबरून जाणें. २ (भीति इ॰ कांमुळें) तोंडांतील ओलावा नाहींसा होणें. तोंड टाकणें-टाकून बोलणें-१ (क्रोधावेशानें) अप शब्दांचा वर्षाव करणें; निर्भर्त्सना करून बोलणें; खरडपट्टी काढणें; अद्वातद्वा बोलणें. 'तूं नोकर-माणसांवर उगीच तोंड टाकलेंस.' २ (घोडा इ॰ जनावरानें) चावण्यासाठीं तोंड पुढें करणें. 'ह्या घोड्याला तोंड टाकण्याची भारी खोड आहे, ती घालविली पाहिजे.' ॰ठेचणारा-फाडणारा-वि. (एखाद्या) उद्धट, बडबड्या माण- सास गप्प बसविण्याची हातोटी ज्यास साधली आहे असा; उद्दामपणानें, गर्वानें बोलणार्‍या व्यक्तीस रोखठोक उत्तर देऊन चूप बसविणारा. [तोंड + ठेचणें] ॰तोडणें-(ना.) एखादी वस्तु मिळ- विण्याकरितां एखाद्याच्या पाठीस लागणें; त्याच्यापुढें तोंड वेंगा- डणें. ॰दाबणें-लांचलुचपत देऊन (एखाद्याचें) तोंड बंद करणें; (एखाद्यास) वश करणें; गप्प करणें. ॰दाबणारा-वि. लांच देऊन (एखाद्या) प्रतिकूल व्यक्तीस वळविणारा; गप्प बसविणारा. [तोंड + दाबणें = बंद करणें] ॰दाबी-स्त्री. (एखाद्यानें) गुप्त बातमी फोडूं नये म्हणून, प्रतिकूल बोलूं नये म्हणून (त्यास) लांच देऊन त्याचें तोंड दाबण्याची, वश करण्याची क्रिया. 'तो गांवकाम- गारांची तोंडदाबी करतो.' -गुजा २१. [तोंड + दाबणें = बंद करणें] ॰दिसणें-एखाद्याची केलेली निर्त्भर्त्सना दुसरी बाजू न कळतां लोकांच्या नजरेस येणें व आपणच वाईट ठरणें (पण ज्याची निर्भर्त्सना केली असेल त्याचें वर्तन सुधारण्याची आशा नसणें ). 'मी तुला रागें भरलों म्हणजे माझें तोंड मात्र दिसेल, पण तूं आपला आहे तसाच राहणार.' ॰देणें- १ पारा वगैरे देऊन तोंडाच्या आंतील त्वचा सुजविण; तोंड आणविणें. 'वैद्य- बोवा म्हणाले कीं त्याला तोंड दिलें आहे.' २ सैन्याच्या अग्रभागीं राहून शत्रूवर हल्ला करणें. ३ (एखाद्याचा) प्रतिपक्षी होऊन राहणें; लढावयाला सिद्ध होणें. ४ (आट्यापाट्यांचा खेळ शेवटची पाटी खेळून परत येणार्‍या गड्याकडे पाटी धरणारानें तोंड फिरविणें. ५ एखाद्या गोष्टीला न भितां तींतून धैर्यानें पार पडण्याची तयारी ठेवणें. ॰धरणें-१ अन्नसेवन करण्याची तोंडाची शक्ति आजार वगैरे कारणांमुळें नाहींशी होणें. 'त्याचें तोंड धरलें आहे, त्याला चमच्याचमच्यानें दुध पाजावें लागतें.' २ (एखा- द्याची) बोलण्याची शक्ति नाहींशी करणें. ३ (एखाद्याला आपल्या) तावडींत, कबजांत आणणें. 'मी त्याचें तोंड धरलें आहे, तो आतां काय करणार !' ॰धुवून येणें-(उप.) एखाद्याची विनंति कधींहि मान्य होणार नाहीं असें म्हणून फेटाळून लावतांना योजण्याचा तिरस्कारदर्शक वाक्प्रचार. ॰निपटणें-(आजार, उपवास इ॰ कारणांमुळें एखाद्याचे) गाल खोल जाणें, चेहरा सुकणें. 'महिनाभर हें मूल तापानें आजारी होतें, त्याचें तोंड पहा कसें निपटलें आहे तें.' ॰पडणें-१ सुरवात होणें. 'लढाईस तोंड पडलें.' २ (गळूं इ॰ कांस) छिद्र पडणें; फुटणें; वाहूं लागणें. ॰पसरणें-वेंगाडणें-१ खिन्नपणाची, केविलवाणी मुद्रा धारण करणें. २ हिनदीनपणानें याचना करणें. ॰पाघळणें-१ न बोला- वयाची गोष्ट कोणाएकापाशीं बोलून टाकणें; बडबडणें. २ (ल.) गुप्त गोष्ट बाहेर फोडणें, फुटूं देणें. ॰पाडणें-एखादें कोडें सोड- विण्यास, वेढा फोडण्यास प्रारंभ करणें; भांडणास सुरवात करणें. ॰पाहणें-१ (एखाद्याच्या) आश्रयाची, मदतीची अपेक्षा करून असणें. 'आम्ही पडलों गरीब, म्हणून आम्हांला सावकाराचीं तोंडें पाहण्याची पाळी वारंवार येते.' २ (एखाद्यानें) स्वतःच्या शक्तीचा, कर्तुत्वाचा अजमास करणें. 'तूं असें करीन म्हणतोस, पण आधीं आपलें तोंड पहा !' ३ बोलणाराचें भाषण नुसतें ऐकणें, पण त्यानें सांगितलेलें करावयास किंवा केलेला बोध अनु- सरावयास प्रवृत्त न होतां स्वस्थ बसून राहणें. 'म्हणती हाणा, मारा, पाडा, घ्या, काय पाहतां तोंडा ।' -मोद्रोण ३.१२५. ॰पाहात-बसणें-काय करावें, कसें करावें या विवंचनेंत असणें. ॰पिटणें-बडबड करणें. 'पश्चिमद्वारींचें कवाड । सदा वार्‍यानें करी खडखड । तैशी न करी बडबड । वृथा तोंड पिटीना ।' -एभा १०.२३१. ॰फिरणें-१ आजारानें, पदार्थाच्या अधिक सेवनानें तोंडाची रुची नाहींशी होणें; तोंड वाईट होणें. २ तोंडांतून शिव्यांचा वर्षाव होऊं लागणें. 'तो रागावला म्हणजे कोणावर त्याचें तोंड फिरेल ह्याचा नेम नाहीं.' ॰फिरविणें-१ तोंडाची चव नाहींशी करणें. २ शिव्यांचा वर्षाव करीत सुटणें. 'तो रागावला म्हणजे तुमच्यावर देखील तोंड फिरवावयाला कचर- णार नाहीं.' ३ वितळत असलेला किंवा तापविला जात अस- लेला धातु इ॰ कानें) रंगामध्यें फरक दाखविणें, रंग पाल- टणें. 'ह्या तांब्यानें अद्याप तोंड फिरविलें नाहीं, आणखी पुष्कळ आंच दिली पाहिजे.' ४ दुसर्‍याकडे पाहणें; विशिष्ट गोष्टी- कडे लक्ष्य न देतां इतर गोष्टींकडे प्रवृत्ति दाखविणें. ५ गतीची दिशा बदलणें; दुसर्‍या दिशेला, माघारें वळणें. ॰फुटणें-१ थंडीमुळें तोंडाची बाह्य त्वचा खरखरीत होणें, भेगलणें. २ (एखाद्याची) फजिती उडणें; पत नाहींशी होणें; नाचक्की होणें; अभिमान गलित होण्याजोगा अपमान, शिक्षा इत्यादि होणें. ॰बंद करणें-१ जीभ आवरणें; जपून बोलणें. २ (एखाद्याला) लांच देऊन गप्प बसविणें, वश करून घेणें. ॰बंदावर राखणें- खाण्याला किंवा बोलण्याला आळा घालणें. 'तूं आपलें तोंड बंदावर राखिलें नाहींस तर अजीर्णानें आजारी पडशील.' ॰बांधणें-लांच देऊन (एखाद्याचे) तोंड बंद करणें; (एखाद्यानें) गुप्त गोष्ट फोडूं नये म्हणून पैसे देऊन त्यास गप्प बसविणें. ॰बाहेर काढणें-१ तोंड दाखविणें; राजरोसपणें समाजांत हिंडणें (बहुधां निषेधार्थी प्रयोग). 'तुरुंगांतून सुटून आल्यावर त्यानें आज दोन वर्षांत एकदांहि तोंड बाहेर काढलें नाहीं.' २ फिरण्यासाठीं, कामकाजासाठीं घराबाहेर पडणें. ॰बिघडणें-तोंड बेचव होणें; तोंडास अरुचि उत्पन्न होणें. विटणें. -॰भर-भरून बोलणें- भीड, संकोच, भीति न धरतां मनमोकळेपणानें भरपूर, अघळपघळ बोलणें; दुसर्‍याचें आणि आपलें समाधान व्हावयाजोगें अघळपघळ बोलणें. ॰भरून साखर घालणें-(एखाद्याचें) तोंड साखरेनें भरणें; (एखाद्याच्या) कामगिरीबद्दल, विजयाबद्दल संतोषादाखल त्याचें तोंड साखरेनें भरणें; (एखाद्याच्या) कामगिरीबद्दल गोड, भरपूर मोबदला देणें. ॰मागणें-(आट्यापाट्यांचा खेळ) लोण घेऊन परत जातांना पाटीवरील गड्यास आपणाकडे तोंड फिर- विण्यास सांगणें. तोंड मागितल्यावर पाटीवरील गडी आपलें तोंड फिरवितो त्यास 'तोंड देणें' म्हणतात. ॰माजणें-१ मिष्टान्न खावयाची चटक लागल्यानें साध्या पदार्थाबद्दल अरुचि उत्पन्न होणें. २ शिव्या देण्याची, फटकळपणानें बोलण्याची खोड लागणें. ॰मातीसारखें-शेणासारखें होणें-(आजारानें) तोंडाची चव नाहींशी होणें; तोंड विटणें, फिरणें; अन्नद्वेष होणें. ॰मिचकणें- दांत, ओंठ खाणें. ॰येणें-१ तोंडाच्या आंतल्या बाजूच्या त्वचेस फोड येऊन ती हुळहुळी होणें व लाळ गळूं लागणें. २ (कर.) लहान मूल बोलूं लागणें. 'आमच्या मुलाला तोंड आलें आहे.' = तो बोलावयास लागला आहे. ॰रंगविणें-१ विडा खाऊन ओंठ तांबडे लाल करून घेणें. २ (ल.) (एखाद्याचें थोबाड) थोबाडींत मारून लाल- भडक करून सोडणें. ॰लागणें-(लढाई, वादविवाद, अंगीकृत कार्य इ॰ कांस) सुरवात होणें. 'तेव्हां युद्धास तोंड लागलें.' -इमं २९०. ॰लावणें-१ (वादविवाद इ॰ कांस) सुरवात करणें. २ प्यावया- साठीं एखादें पेय ओंठाशीं नेणें. ३ ॰वाईट करणें-निराशेची मुद्रा धारण करणें. ॰वाईट होणें-१ तोंडावर निराशेची मुद्रा येणें. २ (ताप इ॰ कांमुळें) तोंडास अरुचि येणें. ॰वांकडें करणें-१ वेडावून दाखविणें. २ नापसंती दर्शविणें. ॰वाजविणें-एकसारखें बोलत सुटणें; निरर्थक बडबड करणें; बकबकणें; वटवट करणें; भांडण करणें. ॰वासणें-१ निराशेनें, दुःखानें तोंड उघडणें व तें बराच वेळ तसेंच ठेवणें. २ याचना करण्यासाठीं तोंड उघडणें, वेंगाडणें. ॰वासून पडणें-शक्तीच्या क्षीणतेमुळें, उत्साह, तेज, वगैरे नष्ट झाल्यामुळें, गतप्राण झाल्यामुळें आ पसरून पडणें. 'तो पडला सिंहनिहमत्तद्विपसाचि तोंड वासून ।' -मोगदा ५.२५. ॰वासून बोलणें-अविचारानें बोलणें. 'ऐसें स्वसख्यांपासीं कां गे वदलीस तोंड वासून ।' -मोउद्योग १३.२०५. ॰विचकणें-दीन मुद्रेनें आणि केविलवाण्या स्वरानें याचना करणें. ॰वेटा(डा)विणें- (काव्य) (एखाद्यास) वेडावून दाखविण्यासाठीं त्याच्यापुढें तोंड वेडेंवाकडें करणें. ॰शेणासारखें पडणें-(लाजिरवाणें कृत्य केल्यानें) तोंड उतरणें; निस्तेज होणें; काळवंडणें. ॰संभाळणें- जपून बोलणें; जीभ आवरणें; भलते सलते शब्द तोंडांतून बाहेर पडूं न देणें; अमर्याद बोलण्यास आळा घालणें. ॰सुटणें- चरांचरां, फडाफडां, अद्वातद्वा बोलूं लागणें. ॰सुरू होणें-बड- बडीला, शिव्यांना सुरवात होणें. ॰सोडणें-१ फडांफडां, अद्वातद्वा बोलूं लागणें; अमर्याद बोलणें. २ आधाशासारखें खात सुटणें; तोंड मोकळें सोडणें. ॰हातीं-हातावर धरणें-तोंडे सोडणें (दोन्ही अर्थीं) पहा. तोंडाचा खट्याळ-फटकळ-फटकाळ-फटकूळ-वाईट-शिनळ-वि. शिवराळ; तोंडाळ; अश्लील बोलणारा. तोंडाचा खबरदार-बहादर-बळकट-वि. बोलण्यांत चतुर, हुषार; बोलण्याची हातोटी ज्याला साधली आहे असा. -तोंडाचा गयाळ, तोंडगयाळ-वि. जिभेचा हलका; चुर- चोंबडा; लुतरा; बडबड्या; ज्याच्या तोंडीं तीळ भिजत नाहीं असा. तोंडाचा गोड-वि. गोड बोलणारा; गोडबोल्या. म्ह॰ तोंडचा गोड हाताचा जड = गोड व अघळपघळ भाषण करणारा पण प्रत्यक्ष कांहींहि मदत, पैसा न देणारा. तोंडाचा जड-वि. रेंगत बोलणारा; फार थोडें बोलणारा; अस्पष्ट भाषण करणारा; तोंडाचा तिखट-वि. खरमरीत, स्पष्ट, झोंबणारें, कठोर भाषण करणारा. तोंडाचा तोफखाना सुटणें-(एखाद्याची) अद्वातद्वा बोल- ण्याची क्रिया सुरू होणें; शिव्यांचा वर्षाव होऊं लागणें. तोंडाचा पट्टा सुटणें-चालणें-अद्वातद्वा बोलणें; शिव्यांचा भडिमार सुरू होणें; तोंडाचा पट्टा सोडणें-(एखाद्यानें) शिव्यांचा भडिमार सुरू करणें; जीभ मोकळी सोडणें; (एखाद्याची) खरडपट्टी आरंभिणें. तोंडाचा पालट-पु. रुचिपालट; तोंडास रुचि येईल असा अन्नांत केलेला फेरबदल; अन्नांतील, खाण्यांतील फरक, बदल. तोंडाचा बोबडा-वि. बोबडें बोलणारा; तोतरा. तोंडाचा मिठा-वि. गोडबोल्या; तोंडाचा गोड पहा. तोंडाचा हलका- वि. चुरचोंबडा; भडभड्या; विचार न करितां बोलणारा; फटकळ. तोंडाचा हुक्का होणें-(व.) तोंड सुकून जाणें. तोंडाची चुंबळ-स्त्री. दुसर्‍यास वेडावून दाखविण्याकरितां चुंबळीसारखी केलेली ओठांची रचना; वांकडें तोंड. तोंडाची वाफ दघडणें- १ मूर्खास उपदेश करतांना, निरर्थक, निरुपयोगी, निष्फळ भाषण करणें. २ ज्यावर विश्वास बसणार नाहीं असें भाषण करणें; मूर्खपणानें बोलणें; वल्गना करणें; बाता मारणें. (या वाक्प्रचारांत दवडणें बद्दल खरचणें गमविणें, फुकट जाणें, घालविणें, काढणें इ॰ क्रियापदेंहि योजतात). तोंडाचें बोळकें होणें-(म्हातारपणामुळें) तोंडां- तील सर्व दांत पडणें. तोंडाचें सुख-न. तोंडसुख पहा. (वरील सर्व वाक्प्रचारांत तोंडाचा या शब्दाऐवजीं तोंडचा हा शब्दहि वापरतात). तोंडांत खाणें, मारून घेणें-१ गालांत चपराक खाणें; मार मिळणें. २ पराभूत होणें; हार जाणें. ३ फजिती झाल्या- नंतर शहाणपणा शिकणें; नुकसान सोसून धडा शिकणें; बोध मिळविणें. तोंडांत जडणें-थोबाडींत, गालांत बसणें (चपराक, थप्पड इ॰). तोंडांत तीळभर न राहणें-अगदीं क्षुद्र अशी गुप्त गोष्टहि पोटांत न ठरणें; कोणतीहि लहानसहान गोष्ट गुप्त ठेवूं न शकणें. तोंडांत तोंड घालणें-१ (ल.) प्रेम, मैत्री इ॰कांच्या भावानें वागणें; मोठ्या प्रेमाचा, मित्रपणाचा आविर्भाव आणून वागणें. २ एकमेकांचें चुंबन घेणें. तोंडांत देणें-(एखाद्याच्या) थोबाडींत मारणें; गालांत चपराक मारणें; तोंडांत बोट घालणें-(ल.) आश्चर्यचकित, थक्क होणें; विस्मय पावणें. तोंडांत भडकावणें-तोंडांत देणें पहा. तोंडांत माती घालणें-खाण्यास अन्न नसणें; अतिशय हाल, कष्ट सोसावे लागणें. तोंडांत माती पडणें-१ (एखाद्याची) उपा समार होणें. २ मरणें. तोंडात शेण घालणें-(एखाद्याची) फजिती करणें; (एखाद्यास) नांवें ठेवणें; खरडपट्टी काढणें. तोंडांत साखर असणें-(गो.) (एखाद्याचें) तोंड, वाणी गोड असणें; गोड बोलत असणें. तोंडांत साखर घालणें-१ तोंड भरून साखर घालणें पहा. २ (उप.) तोंडांत शेण घालणें. 'सावित्री- बाईच्या तोंडांत लोक जेव्हां फारच साखर घालीत, तेव्हां तिनें दोन तीन जुनेरीं एकत्र शिवून जानकीबाईला द्यावी.' -रंगराव. तोंडांत साखर पडणें-(एखाद्याला) आनंदाचा प्रसंग, दिवस येणें. तोंडांतून ब्र काढणें-(तोंडांतून) अधिक-उणें अक्षर काढणें, उच्चारणें. 'आंतल्याआंत चूर होऊन मेलें पाहिजे, तोंडां- तून ब्र काढण्याची सोय नाहीं.' -विकारविलसित. तोंडानें पाप भरणें, तोंडें पाप घेणें-लोकांचीं पातकें उच्चारणें; लोकांचे दोष बोलून दाखविणें; वाईट बोलण्याची हौस यथेच्छ पुरवून घेणें; लोकांचीं पापें उच्चारून जिव्हा विटाळणें. 'कैसीं वो मानुसें । सपाइनि परंवंसें । तोंडे पाप घेती कांइसें । वायां वीण ।' -शिशु २१६. तोंडापुढें-क्रिवि. अगदीं जिव्हाग्रीं; मुखोद्गत. तोंडा- पुरता, तोंडावर गोड-वि. मधुर पण खोटें बोलणारा; दुतोंड्या; वरवर गोड बोलणारा व आंतून कपटी असलेला; उघडपणें प्रिय भाषण करणारा व मनांत निराळेच असणारा. ताडापुरता मांडा-पु. १ भूक भागेल एवढीच पोळी. २ (ल.) जेमतेम गरज भागेल एवढाच जरूर त्या वस्तूचा पुरवठा. तोंडार मारप- (गो.) (एखाद्याच्या) पदरांत चूक बांधणें; वरमण्यासारखें उत्तर देणें. तोंडार ल्हायो उडप-(गो.) फार जलद, अस्ख- लित बोलणें; लाह्या फुटणें. तोंडाला काळोखी आणणें- लावणें-बेअब्रू, नापत करणें. तोंडाला टांकी दिलेली असणें-देवीच्या खोल वणांनीं तोंड भरलेलें असणें; तोंडावर देवीचे वण फार असणें. तोंडाला पाणी सुटणें-(एखादी वस्तु पाहून तिच्यासंबंधीं) मोह उत्पन्न होणें; हांव सुटणें. तोंडाला पानें पुसणें-फसविणें; चकविणें; छकविणें; भोळसाविणें; भोंदणें; तोंडा- वरून हात फिरविणें. 'त्याच्यावर देखरेख करावयाला चार माणसें होतीं, पण त्यानें सर्वांच्या तोंडाला पानें पुसून आपला डाव साधला.' तोंडाला फांटा फुटणें-मूळ मुद्दा सोडून भलतेंच बोलत सुटणें; हवें तसें अमर्याद भाषण करूं लागणें. तोंडावर-क्रिवि. १ समक्ष; डोळ्यांदेखत. २ (ल.) निर्भयपणें; भीड न धरतां. 'मी त्याच्या तोंडावर त्याला लुच्चा म्हणण्यास भिणार नाहीं.' तोंडावर तुकडा टाकणें-(एखाद्यानें) गप्प बसावें, प्रतिकूल बोलूं नये म्हणून त्याला थोडेसें कांहीं देणें. तोंडावर-ला-तोंड देणें-१ (एखाद्यास) विरोध करणें; विरुद्ध बोलणें. २ (एखाद्यास) उद्धटपणानें, अविनयानें, दांडगेपणानें उत्तर देणें; उत्तरास प्रत्युत्तर देणें. तोंडा- वर तोंड पडणें-दोघांची गांठ पडून संभाषण, बोलाचाल होणें. तोंडावर थुंकणें-(एखाद्याची) निर्भर्त्सना, छीःथू करणें; धिक्कार करणें. तोंडावर देणें-तोंडांत देणें पहा. 'काय भीड याची द्या कीं तोंडावरी ।' -दावि ३०२. तोंडावर नक्षत्र पडणें-(एखाद्यानें) तोंडाळपणा करणें; शिवराळ असणें; नेहमीं अपशब्दांनीं तोंड भर- लेलें असणें. 'ह्याजकरिकां तोंडावर नक्षंत्र पडलेल्या पोरास म्या बोलविलें म्हणून हे मला शब्द लावीत नाहींत.' -बाळ २.१४२. तोंडावर पडप-(गो.) थोबाडींत (चपराक) बसणें, पडणें. तोंडावर पदर येणें-१ वैधव्य प्राप्त होणें. 'तिच्या तोंडावर पदर आला म्हणून ती बाहेर पडत नाहीं.' २ लज्जेनें तोंड लपविण्या- जोगी स्थिति होणें. तोंडावर मारणें-(एखाद्याला) पराभूत करणें. तोंडावर सांगणें-बोलणें-(एखाद्याच्या) समक्ष, निर्भीडपणें, बेडरपणें सांगणें, बोलणें. तोंडावरून-तोंडावर हात फिर- विणें-(एखाद्यास) गोड बोलून, फूसलावून, भुलथाप देऊन फस- विणें; भोंदणें; छकविणें. तोंडाशीं तोंड देणें-(हलक्या दर्जाच्या व्यक्तीनें वरिष्ठाशीं) आपला दर्जा विसरून, बरोबरीच्या नात्यानें, अविनयानें बोलणें, व्यवहार करणें. तोंडास काळोखी-स्त्री. मुखसंकोच; ओशाळगत; गोंधळून गेल्याची स्थिति; बेअब्रू; कलंक. तोंडास काळोखी, काजळी लागणें-(एखाद्याची) बेअब्रू, नाचक्की होणें; दुष्कीर्ति होणें; नांवाला कलंक लागणें. तोंडास काळोखी-काजळी लावणें-(एखाद्याचें) नांव कलंकित करणें; बेअब्रू करणें. 'सुनेनें माझ्या तोंडाला काळोखी लावली.' तोंडास कुत्रें बांधलेलें असणें-ताळतंत्र सोडून, अद्वातद्वा, अपशब्द बोलणें; शिव्या देणें. 'त्यानें तर जसें तोंडाला कुत्रेंच बांधलें आहे.' तोंडास खीळ घालणें-निग्रहपूर्वक, हट्टानें मौन धारण करणें. तोंडास तोंड-न. वादविवाद; वाग्युद्ध; हमरी- तुमरी; धसाफसी. -क्रिवि. समक्षासमक्ष; समोरासमोर; प्रत्यक्ष. तोंडास तोंड देणें-१ तोंडाशीं तोंड देणें पहा. २ मार्मिकपणें, खरमरीतपणें उत्तर देणें. तोंडास पाणी सुटणें-(एखाद्या- वस्तूबद्दल, गोष्टीबद्दल) लोभ, मोह उत्पन्न होणें; तोंडाला पाणी सुटणें पहा. 'पोर्तुगीज लोकांची बढती पाहून तिकडच्या दुसर्‍या साहसी लोकांच्या तोंडास पाणी सुटलें.' -बाजी. तोंडास तोंड न दिसणें-(पहांटेस) तोंड न ओळखतां येण्याइतका अंधेर असणें (झुंजमुंजु पहाटेविषयीं वर्णन करितांना हा वाक्प्रचार योजतात). 'अद्याप चांगलें उजाडलें नाहीं, तोंडास तोंड दिसत नाहीं.' तोंडास-तोंडीं बसणें-(श्लोक, शब्द इ॰) स्पष्ट, बिन- चूक, भरभर म्हणण्याइतका पाठ होणें. 'तो श्लोक दहा वेळां पुस्तकांत पाहून म्हण, म्हणजे तो तुझ्या तोंडीं बसेल.' तोंडास येईल तें बोलणें-विचार न करितां, भरमसाटपणानें वाटेल तें बोलणें; अद्वातद्वा, अपशब्द बोलणें. तोंडास-तोंडीं लागणें- १ (एखाद्याच्या) तोंडास तोंड देणें; उलट उत्तरें देणें. २ हुज्जत घालणें; वादविवाद करण्यास तयार होणें. (एखाद्याच्या) तोंडा- समोर-क्रिवि. १ (एखाद्याच्या) समक्ष; समोर; डोळ्यांदेखत. २ अगदीं मुखोद्गत; जिव्हाग्रीं. तोंडापुढें पहा. 'हा श्लोक माझ्या अगदीं तोंडासमोर आहे.' तोंडास हळद लागणें-(एखाद्यास) दोष देणें, नापसंती दर्शविणें अशा अर्थीं हा वाक्प्रचार योजितात. तोंडासारखा-वि. (एखाद्याची) खुशामत, स्तुति इ॰ होईल अशा प्रकारचा; एखाद्याच्या खुशामतीकरितां त्याच्या मतास जुळता. तोंडासारखें बोलणें-(एखाद्याची) स्तुति, खुशामत करण्या- करितां त्याच्याच मताची, म्हणण्याची री ओढणें; त्याचें मन न दुखवेल असें बोलणें. तोंडीं आणणें-देणें-(रोग्यास) लाळ गळण्याचें, तोंड येण्याचें औषध देऊन तोंड आणणें. तोंडीं- काढणें-१ ओकारी देणें; वांती होणें. २ (एखाद्यास त्यानें) केलेले उपकार बोलून दाखवून टोमणा मारणें. तोंडीं खीळ पडणें- तोंड बंद होणें; गप्प बसणें भाग पडणें. 'अवघ्या कोल्यांचें मर्म अंडीं । धरितां तोंडीं खीळ पडे ।' तोंडीं घास येणें-(एखा- द्यास) घांसभर अन्न मिळणें; चरितार्थाचें साधन मिळणें; पोटा पाण्याची व्यवस्था होणें. तोंडीं तीळ न भिजणें-१ (तापानें, संतापून ओरडण्यानें, रडण्यानें) तोंड शुष्क होणें, कोरडें पडणें. २ एखादी गुप्त गोष्ट मनांत न राहणें, बोलून टाकणें; तोंडीं तृण धरणें-(एखाद्यानें) शरण आलों. असें कबूल करणें; शरणागत होणें; हार जाणें (दांतीं तृण धरणें असाहि प्रयोग रूढ आहे). तोंडीं देणें-(एखाद्यास एहाद्या माणसाच्या, कठिण कार्याच्या) सपाट्यांत, तडाख्यांत, जबड्यांत, तावडींत लोटणें, देणें; हाल, दुःख सोसण्यास (एखाद्यास) पुढें करणें. तोंडीं-तोंडास पान- पानें पुसणें-(एखाद्यास) छकविणें; लुबाडणें; भोंदणें; अपेक्षित लाभ होऊं न देणें; स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेऊन दुसर्‍यास तोंड पहावयास लावणें. 'त्यानें आपल्या नळीचें वर्‍हाड केलें आणि सर्वांच्या तोंडीं पान पुसलें.' तोंडीं माती घालणें- (एखाद्यानें) अतिशय दुःखाकुल, शोकाकुल होणें. 'ऊर, माथा बडवून, तोंडीं माती घालूं लागली' -भाव ७५. तोंडीं येऊन बुडणें-नासणें-(एखादी वस्तु, पीक इ॰) अगदीं परिपक्वदशेस, परिणतावस्थेस येऊन, ऐन भरांत येऊन, नाहींशीं होणें, वाईट होणें. तोंडीं येणें-१ (पारा इ॰ औषधानें) तोंड येणें. २ ऐन भरांत, परिपक्व दशेस, पूर्णावस्थेस येणें. तोंडीं-रक्त, रगत लागणें-१ वाघ इ॰ हिंस्त्र पशूला माणसाच्या रक्ताची चटक लागून तो माणसावर टपून बसणें. २ (ल.) लांच-लुचपत खाण्याची चटक लागणें. तोंडीं लागणें-(एखाद्यास एखाद्या वस्तूची, खाद्याची चव प्रथमच कळून त्या वस्तूची त्यास) चटक लागणें; आवड उत्पन्न होणें. 'ह्याच्या तोंडीं भात लागला म्हणून यास भाकर आवडत नाहीं.' तोंडीं लागणें-१ (एखाद्याच्या) तोंडास तोंड देणें; उद्धटपणानें, आपला दर्जा विसरून उलट जबाब देणें. २ हुज्जत घालणें; वादविवादास प्रवृत्त होणें; तोंडास लागणें पहा. 'सुज्ञ आहेत ते दूषकांच्या तोंडीं लागत नसतात.' -नि. ३ (युद्ध, भांडण, इ॰कांच्या) आणीबाणीच्या ठिकाणीं, आघाडीस, अग्रभागीं असणें. तोंडीं लावणें-न. जेवतांना तोंडास रुचि आणणारा भाजी, चटणी इ॰ सारखा मधून मधून खावयाचा चमचमीत पदार्थ. तोंडीं लावणें-१ जेवतांना भाजी, चटणी इ॰ चम- चमीत पदार्थानें रुचिपालट करणें. 'आज तोंडीं लावावयाला भाजीबिजी कांहीं केली नाहीं काय ?' २ विसारादाखल पैसे देणें. तोंडें मागितलेली किंमत-स्त्री. (एखाद्या वस्तूची) दुकान- दारानें सांगितलेली व झिगझिग वगैरे न करितां गिर्‍हाइकानें दिलेली किंमत. तोंडें मानलेला-मानला-वि. (तोंडच्या) शब्दानें, वचनानें मानलेला (बाप, भाऊ, मुलगा इ॰); धर्माचा, पुण्याचा पहा. तोंडें वांकडीं करणें-वेडावून दाखविणें; वेडावणें. लहान तोंडीं मोठा घांस घेणें-१ (एखाद्यानें) आपल्या आवांक्या- बाहेरचें काम हातीं घेणें. २ (वडील, वरिष्ठ माणसांसमोर) न शोभेल असें, मर्यादा सोडून, बेअदबीनें बोलणें; वडील माणसांस शहाणपण शिकविणें. जळो तुझें तोंड-(बायकी भाषेंत) एक शिवी. स्त्रिया रागानें ही शिवी उपयोगांत आणतात. म्ह॰ १ तोंड बांधून (दाबून) बुक्कयांचा मार = एखाद्याचा विनाकारण छळ होऊन त्यास त्याविरुद्ध तक्रार करतां न येणें; एखाद्यास अन्यायानें वाग- वून त्याविरुद्ध त्यानें कागाळी केल्यास त्यास बेगुमानपणें शिक्षा करणें. 'बायकांचा जन्म म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार, म्हण- तात तें अक्षरशः खरें आहे.' -पकोघे २ (गो.) तोंडाच्या बाता घरा बाईल भीक मागता = बाहेर मोठमोठया गप्पा मारतो पण घरीं बायको भीक मागते. सामाशब्द- तोंड उष्ट-न. एखादा-दुसरा घांस खाणें; केवळ अन्न तोंडास लावणें; तोंड खरकटें करणें. [तोंड + उष्टें] ॰ओळख-स्त्री. परस्परांचा विशेष परिचय नसतां, चेहरा पाहू- नच हा अमुक आहे असें समजण्याजोगी ओळख; (एखाद्याची) चेहरेपट्टी लक्षांत राहून तीवरूनच त्याला ओळखतां येणें; नांव वगैरे कांहीं माहीत नसून (एखाद्याचा) केवळ तोंडावळाच ओळ- खीचा असणें. 'एखाद्याला वाटेल कीं बाळासाहेबांशीं त्याची तोंड- ओळखच आहे.' -इंप ३७. ॰कडी-स्त्री. १ आंतील तुळयांचीं तोंडें बाहेर भिंतींतील ज्या तुळईवर ठेवतात, ती सलग तुळई. २ कौलारू छपराचे वासे ज्या सलग तुळईवर टेकतात ती छपराच्या शेवटीं, टोंकास असलेली तुळई. ३ गुरांचें दावें जिला बांधतात ती कडी. ४ (सोनारी धंदा) दागिन्याची शेवटची कडी, नाकें; ज्यांत फांसा इ॰ अडकवितात ती (सरी इ॰ सारख्या दागिन्याची) टोंकाची, तोंडाची कडी; (जव्याच्या) मण्याच्या वगैरे तोंडाशीं ठेवलेली कडी. ५ (जमाखर्चाच्या वहींतील जमा आणि खर्च या दोहोंबाजूंचा मेळ. हा मेळ = = = अशा दुलांगीनें, (दुहेरी रेषेनें) दाखविण्याचा प्रघात आहे. 'वहीची खात्याची-तारखेची-तोंडकडी' असा शब्दप्रयोग करितात. (क्रि॰ मिळणें; जुळणें; येणें; उतरणें; चुकणें; बंद होणें). [तोंड + कडी] ॰कळा-स्त्री. चेहर्‍यावरील तजेला; कांति; तेज; टवटवी. (प्र.) मुखकळा. [तोंड + कळा = तेज] ॰काढप-(गो.) उपदंश झालेल्या रोग्यास एक प्रकारचें औषध देऊन त्याच्या तोंडांतून लाळ वाहवितात तो प्रकार. ह्या औषधानें तोंड बरेंच सुजतें. [तोंड + गो. काढप = काढणें] ॰खुरी- स्त्री. (ना.) गुरांचा एक रोग. ॰खोडी-वि. तोंडाळ; टाकून बोलणारा; तोंड टाकणारा; अशी संवय असलेला. 'परम अधम रुक्मी हा महा तोंडखोडी ।' -सारुह ३.७८. [तोंड + खोड = वाईट संवय] ॰घडण-स्त्री तोंडाची ठेवण; चेहरेपट्टी; तोंडवळां. 'या मुलाची बापासारखी तोंडघडण आहे.' [तोंड + घडण = रचना] ॰घशीं- सीं-क्रिवि. १ जमीनीवर पडून तोंड घासलें जाईल, फुटेल अशा रीतीनें. (क्रि॰ पडणें; पाडणें; देणें). 'तो तोंडघसींच पडे करतां दंतप्रहार बहु रागें ।' -मो. २. (आश्रय तुटल्यानें) गोत्यांत; पेचांत; अडचणींत; फजिती होईल अशा तर्‍हेनें; फशीं (पडणें). [तोंड + घासणें] ॰घशी देणें-दुसरा तोंडघशीं पडे असें करणें. ॰चाट्या-वि. खुशामत करणारा; थुंकी झेलणारा; तोंडासारखें बोलणारा. ॰चाळा-पु. १ तोंड वेडेंवाकडें करून वेडावण्याची क्रिया. २ वात इ॰कांच्या लहरीनें होणारी तोंडाची हालचाल, चाळा. ॰चुकाऊ-वू-व्या, तोंडचुकारू-चुकव्या-वि. (काम इ॰ कांच्या भीतीनें) दृष्टि चुकविणारा; तोंड लपविणारा; नजरेस न पडे असा. [तोंड + चुकविणें] ॰चुकावणी-स्त्री. (एखाद्यापासून) तोंड लपविण्याची, स्वतःस छपविण्याची क्रिया. ॰जबानी-स्त्री. तोंडानें सांगितलेली हकीगत, दिलेली साक्ष, पुरावा. -क्रिवि तोंडी, तोंडानें. [तोंड + फा. झबान्] ॰जाब-पु. तोंडी जबाब. ॰झाडणी-स्त्री. तिरस्कारपूर्ण उद्गारांनीं झिडकारणें; खडका- वणें; खरडपट्टी काढणें. ॰देखणा-ला-वि. आपल्या अंतःकरणांत तसा भाव नसून दुसर्‍याचें मन राखण्याकरितां त्याला रुचेल असा केलेला (व्यवहार, भाषण, गो इ॰); खुशामतीचा; तोंडासारखा; तोंडपुजपणाचा. 'प्राणनाथ, मला हीं तोंडदेखणीं बोलणीं आव- डत नाहींत.' -पारिभौ ३५. [तोंड + देखणें = पाहणें] ॰देखली गोष्ट-स्त्री.दुसर्‍याची मर्जी राखण्याकरितां केलेलें, खुशामतीचें भाषण. ॰निरोप-पु. तोंडी सांगितलेला निरोप. 'कृष्णास ते हळुच तोंडनिरोप सांगे ।' -सारुह ४.९. ॰पट्टा-पु. (बायकी). तोंडाचा तोफखाना; अपशब्दांचा भडिमार; संतापानें, जोराजोरानें बेबंदपणें बोलणें. [तोंड + पट्टा = तलवार] ॰पट्टी-स्त्री. (शिवणकाम) तोंडाला शिवलेला पट्टी. 'योग्य तेवढी तोंडपट्टी कातरावी.' -काप्र. १४. ॰पाटिलकी-स्त्री. १ आपण कांहीं न करतां बसल्या जागे- वरून लुडबुडेपणानें दुसर्‍यांना हुकुमवजा गोष्टी, कामें सांगणें (पाटलाला बसल्या जागेवरून अनेक कामें हुकुम सोडून करून घ्यावीं लागतात त्यावरून). २ (उप.) लुडबुडेपणाची वटवट, बडबड; तोंडाळपणा. 'दुसरें कांहीं न झालें तरी नुसती तोंडपाटिलकी करण्यास कांहीं हरकत नाहीं.' -आगर ३.६१. [तोंड + पाटिलकी = पाटलाचें काम] ॰पाठ-वि. पुस्तकाच्या सहाय्यावांचून केवळ तोंडांनें म्हणतां येण्यासारखा; मुखोद्गत [तोंड + पाट = पठण केलेलें] ॰पालटपुस्त्री. १ (अरुचि घालविण्याकरितां केलेला) अन्नांतील फेरबदल. २ अन्नांत फेरबदल करून अरुचि घालविण्याची क्रिया. [तोंड + पालट = बदल] ॰पिटी-स्त्री. १ (वडील, गुरु इ॰ कांची) आज्ञा न मानतां तिचें औचित्य इ॰ कासंबंधीं केलेली वाटाघाट; (वडिलांशीं, गुरूंशीं) उद्धटपणानें वाद घालणें; उलट उत्तर देणें; प्रश्न इ॰ विचारून अडवणूक करणें. 'गुरूंसी करिती तोंडपिटी ।' -विपू १.५७. २ (दगडोबास शिकविण्याकरितां, विसराळू माणसास पुन्हां पुन्हां बजाविण्याकरितां, थिल्लर जनावरास हांकलण्याकरितां करावी लागणारी) व्यर्थ बडबड, कटकट, वटवट. [तोंड + पिटणें] ॰प्रचिती-प्रचीति-स्त्री. खुशामत करण्याकरितां (एखाद्याच्या) व्यक्तिमाहात्म्यास, भाषणास, अस्तित्वास मान देणें; आदर दाख- विणें. [तोंड + प्रचीति] ॰प्रचीतक्रिवि. १ तोंडासारखें; खुशामतीचें; तोंडापुरतें (भाषण, वर्तन इ॰ करणें) २ माणूस ओळखून, पाहून; माणसामाणसांत तारतम्य ठेवून (बोलणें, चालणें, वागणें). ॰प्रचीत बोलणारा-चालणारा-वागणारा-वि. माणसामाणसांत तारतम्य ठेवून चालणारा, बोलणारा, वागणारा. ॰फटालकी -फटालीस्त्री. तोंडाची निरर्थक बडबड, वटवट, टकळी. [तोंड + ध्व. फटां ! द्वि.] ॰फटाला-ल्या-वि. मूर्खपणानें कांहीं तरी बड बडणारा; बकणारा; वटवट करणारा. [तोंड + ध्व. फटां !] ॰फट्याळ-वि. तोंडाचा फटकळ; शिवराळ; तोंडाळ; बातेफरास; अंगीं कर्तृत्व नसून लंब्या लंब्या बाता झोंकणारा. ॰फट्याळी- स्त्री. शिवराळपणा; तोंडाळपणा; वावदूकता. [तोंडफट्याळ] ॰बडबड्या-बडव्या-वि. निरर्थक वटवट, बडबड करणारा: बकबकणांरा टकळी चालविणारा. ॰बंद -बांधणी-पुस्त्री. गाडीच्या चाकाच्या तुंब्यावरील बाहेरील बाजूचें लोखंडी कडें, पट्टी. आंतील बाजूच्या कड्यास कटबंद असें म्हणतात. [तोंड + बंद = बांधणी] ॰बळ-न. वक्तृत्वशक्ति; वाक्पटुता; वाक्चातुर्य. 'आंगबळ न चांगबळ देरे देवा तोंडबळ.' ॰बळाचा-वि. ज्याला बोलण्याची हातोटी, वक्तृत्कला साधली आहें असा; तोंडबळ अस- लेला; भाषणपटु जबेफरास. ॰बाग-स्त्री. (राजा.) चेहरेपट्टी; चेहर्‍याची ठेवण, घडण; मुखवटा. ॰बांधणी-स्त्री. १ तोंडबंद पहा. २ (ढोरांचा धंदा) कातड्याच्या मोटेच्या सोंडेच्या टोंकाकरितां बाजूला शिवलेला गोट. ॰भडभड्या-वि. तोंडास येईल तें बड- बडत, बकत सुटणारा; बोलण्याची, बडबडण्याची हुक्की, इसळी ज्यास येते असा; भडभडून बोलणारा. ॰भर-वि. तोंडास येईल तेवढा; भरपूर. 'हॅमिल्टन यांनीं खर्चवाढीबद्दल तोंडभर मगणी केली होती.' -केले १.१९८. ॰मार-स्त्री. १ रोग्यावर लाद- लेला खाद्यपेयांचा निर्बंध, पथ्य. २ एखाद्यास बोलण्याकरितां तोंड उघडूं न देणें; भाषणबंदी. ३ (ल.) (एखाद्याच्या) आशा, आकांक्षा फोल ठरविणें; (एखाद्याचा केलेला) आशाभंग; मनोभंग; निराशा. (क्रि॰ करणें). ॰मारा-पु. १ शेतीच्या कामाच्या वेळीं पिकांत वगैरें काम करतांना गुरांच्या तोंडाला जाळी, मुंगसें, मुसकें बांधणें. २ (एखाद्यास केलेली) भाषणबंदी; खाद्यपेयांचा निर्बंध. ३ (प्र.) तोंडमार. तोंडमार अर्थ ३ पहा. ॰मिळवणी- स्त्री, १ जमा आणि खर्च यांचा मेळ; तोंडें मिळविण्यासाठीं मांडलेला जमाखर्च. २ ऋणको व धनको यांच्यांतील हिशेबाची बेबाकी, पूज्य. ३ मेळ. -शर. ॰मिळवणी खातें- (जमाखर्च) कच्चें खातें (याचें देणें येणें सालअखेर पुरें करून खुद्द खात्यांत जिरवितात). ॰लपव्या-वि. तोंड लपविणारा; छपून राहणारा; दडी मारून बसणारा. ॰लाग-पु. शिंगें असलेल्या जनावरांच्या तोंडास होणारा रोग; यांत लाळ गळत असते. ॰वळख-स्त्री (प्र.) तोंडओळख पहा. ॰वळण-वळा-नपु. चेहरा; चर्या; मुद्रा; चेहर्‍याची घडण, ठेवण; रूपरेखा; चेहरामोहरा; चेहरेपट्टी; मुखाकृति; मुखवटा. [तोंड + वळ = रचना] ॰वीख-न. (ल.) तोंडानें ओकलेलें, तोंडां- तून निघालेलें, विषारी, वाईट भाषण, बोलणें. [तोंड + विष] ॰शिनळ, शिंदळ-वि. अचकटविचटक, बीभत्स बोलणारा; केवळ तोंडानें शिनळकी करणारा. ॰शेवळें-न. मुंडावळ. -बदलापूर २७७. [तोंड + शेवळें = शेवाळें] ॰सर-क्रिवि. तुडुंब; तोंडापर्यंत; भरपूर. ॰सरता-वि. अस्खलित, तोंडपाठ न म्हणतां येण्या- सारखा; अडखळत अडखळत म्हणतां येण्यासारखा (श्लोक, ग्रंथ इ॰). -क्रिवि. घसरत घसरत; अडखळत; चुका करीत; कसेंबसें; आठवून आठवून. [तोंड + सरणें] ॰सुख-न. १ एखा- द्यानें केलेल्या अपकाराचें शरीरानें प्रतिकार करण्याचें सामर्थ्य नसल्यामुळें केवळ तोंडानें यथेच्छ शिव्यांचा, अपशब्दांचा भडि- मार करून त्यांत सुख मानणें. २ जिव्हा मोकाट सोडून वाटेल तसें बोलण्यांत मानलेलें सुख; यथेच्छ व अद्वातद्वा केलेलें भाषण; (एखाद्याची काढलेली) खरडपट्टी; बोडंती. (क्रि॰ घेणें). ॰सुख घेणें-(एखाद्याची) खरडपट्टी काढणें, हजेरी घेणें; (एखा- द्यावर) शिव्यांचा, अपशब्दांचा भडिमार करणें. ॰सुटका-स्त्री. १ जिभेचा (बोलण्यांतील) स्वैरपणा; सुळसुळीतपणा; वाक्चा- पल्य; जबेफराशी; (भाषण इ॰ कांतील) जनलज्जेपासूनची मोक- ळीक. २ भाषणस्वातंत्र्य; बोलण्याची मोकळीक. ३ तोंडाळपणा; शिवराळपणा. ४ (पथ्य, अरुची, तोंड येणें इ॰ कांपासून झालेली) तोंडाची सुटका, मोकळीक; तोंड बरें होणें; खाण्यापिण्याला स्वातंत्र्य. [तोंड + सुटणें] ॰हिशेबी-वि. अनेक रकमांचा मनांतल्या- मनांत चटकन्‌ हिशेब करून सांगणारा बुद्धिमान (मनुष्य); शीघ्रगणक. ॰तोंडागळा-वि. (तोंडानें) बोलण्यांत, वक्तृत्वशक्तींत अधिक. 'कीं शेषाहूनि तोंडागळें । बोलकें आथी ।' -ज्ञा ९. ३७०. [तोंड + आगळा = अधिक] ॰तोंडातोंडी-क्रिवि. १ समोरासमोर; २ बोलण्यांत; बोलाचालींत. [तोंड द्वि.] ॰तोंडाळ-वि. १ दुसर्‍या- वर तोंड टाकणारा; शिवराळ; भांडखोर. 'लटिकें आणि तोंडाळ । अतिशयेंसीं ।' -दा २.३.१०. २ बडबड्या; वाचाळ. [तोंड] म्ह॰ हाताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं = शिवराळ माणसा- पेक्षां चोर पुरवतो. ॰तोंडाळणें-उक्रि. बकबक करून गुप्त गोष्ट फोडणें; जीभ पघळणें. [तोंडाळ] ॰तोंडोंतोंड-क्रिवि. तोंडापर्यंत; कंठोकांठ; तुडुंब; तोंडसर.॰तोंडोंळा-पु. तोंडवळा; चेहरेपट्टी. [तोंड + ओळा, वळा प्रत्यय]

दाते शब्दकोश

शब्दार्थ

बाजी

बाजी f A game at cards or सोंगट्या.

वझे शब्दकोश

बाजी bājī f ( P) A game at cards, at Songṭyá &c. 2 A suit, the cards of a suit. 3 A hand, the cards dealed. 4 At plays with Songṭyá. The won game, the game. 5 also बाजीचाल f A sort of curvet (of the horse). Ex. बाजीवर धरणें-चालणें-येणें-जाणें.

मोल्सवर्थ शब्दकोश

खेळ. २ पु० जुव्वा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

(फा) स्त्री० खेळ, कर्मणूक.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

पु. १ एक नांव. २ (कु.) धनगरास मारावयाची हांक.

दाते शब्दकोश

थट्टा, थट्टामस्करी, थट्टेखोर, थट्टेबाज, थट्टे- बाजी

ठठ्ठा पहा. थट्टेवाईक-वि. विनोदी (भाषण करणारा, भाषण).

दाते शब्दकोश