मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

संबंधित शब्द

खात्री वाटणे

असे प्रत्ययाला येईल-दिसून पडेल, पाहण्यात येतात, सत्यता पडूं लागेल, आतां ही शिक्कामोर्तब झालेली गोष्ट आहे, मोती खोटें आहे; मला विचार ! याबद्दल दुमत होणे शक्य नाहीं, बालंबाल खात्री, मनाशी खूणगांठ बांधून ठेव, ही वार्ता मेंदूच्या कप्प्यांत नीट घडी करून बसविली, चक्षुर्वे सत्यं, हातच्या कांकणाला आरसा कशाला ? या गोष्टी मनोमन सर्वांना ठाऊक आहेत, त्यांनी पुरतें ओखळले असेल, मनाची पक्की धारणा झाली.

शब्दकौमुदी

पूर्ण

अख्खें, एकूण, सर्वच्या सर्व, आमूलाग्र, अजीबात, साफ साफ, पार, सपशेल, बिलकूल, अजी, निखालस, मुळापासून, सर्वस्वीं, पुरेपूर, तळापासून, अंतर्बाह्य, चौफेर, एकूण एक, तमाम, निःशेष, आमूल, समूळ, चट सारा, झाडून सारा, समग्र, नखशिखान्त, आपाद- मस्तक, अपवादरहित, साकल्याने, शेंड्याबुडख्यासकट, अविभंजित, अन्रुटित, अभंग, भाग न पाडतां, अखंड, फाळणी न करतां, न फोडतां, सलग, अथपासून इतिपर्यंत, या कडेपासून त्या कडेपर्यंत, सुष्ट दुष्ट सर्व, सर्व, अगदी नाहीं, मुळींच नव्हे, शंभर हिश्श्यांनीं, रुपयाचे सोळा आणे, परिपूर्ण, झाडून सर्वंकष, सर्वतोमुखी, बालंबाल, सगळें, निरपवादरीत्या, अ पासून ज्ञ पर्यंत, कांहीं वगळावगळ न करतां, शंभर टक्के, पायाच्या नखा- पासून डोक्याच्या शेंडीपर्यंत.

शब्दकौमुदी