मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

बाहु

बाहु bāhu m (S) The whole arm. 2 The upper arm. 3 See भुज Sig. V. The sine of the arc &c. 4 A side of a polygon. 5 The base of a right-angled triangle.

मोल्सवर्थ शब्दकोश

१ सबंध हात; भुज. २ वरचा हात; दंड. ३ सरळ- रेषांनीं बनलेल्या आकृतीची बाजू; बहुकोणाची बाजू. ४ काटकोन त्रिकोणाचा पाया. ५ भुज शब्द अर्थ ५ पहा. ६ (नृत्य.) खांद्यापासून मनगटापर्यंतचा भाग. नृत्यामध्यें बाहूच्या योगानें केले जाणारे पुढील दहा अभिनय सांगितले आहेत- १ अधोमुख, २ ऊर्ध्व- संस्थ, ३ तिर्य्क, ४ अंचित, ५ अपविरुद्ध, ६ प्रसारित, ७ स्वस्तिक, ८ उद्वेष्टित, ९ मंडळगति व १० पृष्ठानुसारी. [सं.] ॰ज-पु. क्षत्रिया. 'प्रभु बाहुजकुलमाणि ।' -आय २८. [वै. 'बाहूराजन्यःकृतः ।' -ऋग्वे १०.१०८.] ॰दंडपु. १ वरचा हात; दंड; २ सबंध हात. 'हीरांगदें शोभति बाहुदंडी ।' -सारुह ८.१५२. [सं.] ॰बल- बळ-न. शरीरसामर्थ्य; मनगटांतील ताकद-शक्ति; कपट, मंत्रतंत्र युक्ति इ॰ निरपेक्ष केवळ शारिरीक शक्ति. [सं.] ॰भूषण-न. दंडांत बांधण्याचा अलंकार. [सं.] ॰मूल-न. खाक; काख; बखोटा. [सं.] ॰युद्ध-न. द्वंद्वयुद्ध; मल्लयुद्ध; कुस्ती. [सं.] ॰वट-न. १ हात. -शर. २ दंडावरील दागिना. 'वांकि, बाहुवटें, बाजुबंद, बाळी ।' -आपू १८. ॰वीर्य-न. बाहुबल. [सं.] ॰स्फुरण- न. बाहूनां स्फुरण चढणें; हात शिवशिवणें (युद्धाकरतां इ॰). [सं.] बाहुटा-टी-पु. न. १ बाहुमूला(खाके) पासून कोपरा- पर्यंतचा हात. २ खांद्याच्या सांध्याचा भाग; बखोटा. ३ स्त्रियांचें एक बाहुभूषण; वांकी. बाहुळा-पु. (राजा.) बखोटा; बाव्हळा; बाहू-पु. हात; भुज. (अशुद्ध) बाहूझोंबी-स्त्री. द्वंद्वयुद्ध; कुस्ती. 'तुम्हीं बाहूझोंबी घेतां म्हणोन ।' -ह १९.१४०. बाहू- फुगणें-(एक शौर्याचें लक्षण) हात फुरफुरणें. बाहे-पु. १ बाहु; हात. 'सप्राणें आफळली बाहे ।' -उषा १४.१९. २ (ल.) आधार. 'मोडूनि श्रद्धेची बाहे ।' -ज्ञा १७.४१४.

दाते शब्दकोश

(सं) पु० भुज, दंड.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

उद्वेष्टित(बाहु)

पु. (नृत्य ) बाहूचें मनगट वाटोळें फिरविणें म्हणजे सर्व बाहु फिरला जातो अशी स्थिति.

दाते शब्दकोश

अधोमुख(बाहु)

वि. (नृत्य) नृत्यामध्यें शरीराच्या दोन्ही बाजूस हात स्वाभाविकपणें लोंबत ठेवणें. [सं.]

दाते शब्दकोश

अंचित बाहु, अंचित बाहू      

पु.       (नृत्य) छातीवरील हात थोडा छातीच्या पुढे धरणे. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

बाह, बाहा, बाही, बाहे

स्त्री. बाहु; हात. 'आदिशून्य तरोनि जावें । केउतें बाहीं ।' -ज्ञा १०.१७८. [सं. बाहु]

दाते शब्दकोश

बाजू

स्त्री. १ बाहु; भुज. २ भाग; पैलू (वस्तूचा); कड; कंठ; किनारी; मर्यादा. 'त्रिकोन चौकोन इ॰ कांच्या बाजू.' ३ एखाद्या पदार्थांचा कोणत्याहि एखाद्या विभागाच्या विरुद्ध अस- लेला भाग. ४ (ल.) पक्ष; फळी; कड; तर्फ; चढाओढीच्या सामन्यांतील एक पक्ष. (क्रि॰ राखणें; सांभाळणें). ५ मोठी सत- रंजी; जाजम (पूर्वीं खोलीच्या एका बाजूला पुरेल अशा सतरंजीला म्हणत). ६ मदतनीस; साहाय्यकर्ता; आश्रयदाता; सहाय्यक. 'यशवंतराव बाजू सांग ज्या मर्दाला ।' -ऐपो. ७९.७ (पत्त्यांचा खेळ) खेळांतील रंग; हात; गंजिफांतील एका रंगाचीं १२ पानें; बाजी. ८ गाडीच्या साटीचीं लांबीच्या बाजूला असलेलीं दोन लाकडें. ह्याच्या उलट करोळें = साटींतील रुंदीचीं लाकडें. ९ संकट; अडचण; विघ्न; पेंच. [सं. बाहु; फा. बाजु] ॰मारणें- आपल्या पक्षाची सरशी करणें; स्वीकृत पक्ष यशस्वी करणें. ॰राखणें-अब्रू संभाळणें; नांव राखणें; फजिती किंवा दुर्लौकिक न होऊं देणें. ॰राहणें-अब्रू किंवा नांव राहणें. ॰वर बेतणें- अंगावर येणें-फजिती होण्याची वेळ येणें; पराभव होण्याचा रंग दिसणें. ॰चा देखावा-पु. (इमारत) पार्श्वनिदर्शन. ॰मारणारा-मारून नेणारा-वि. घेतलेला पक्ष यशस्वी करणारा; आपला पक्ष सिद्धीस नेणारा. ॰स-क्रिवि. एकीकडे.

दाते शब्दकोश

(फा) स्त्री० कड, तर्फ, पक्ष. २ बाहु, भुज.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

भुज

पु. १ सगळा बाहु (खांद्यापासून हाताच्या बोटांच्या टोकांपर्यंत). २ भूमितीच्या बहुकोणी आकृतीची एक बाजू. ३ काटकोनत्रिकोणांत कर्ण आणि कोटि यांच्याशिवाय राहिलेली तिसरी बाजू. ४ दोन किंवा चार काटकोनांची भरती; तीन काट- कोनांची पुरवणी. ५ समवृत्ताच्या ध्रुवांतून जाणार्‍या मंडलाच्या धनुष्याची ज्या; ग्रहाचें समवृत्तापासून अंतर. ६ वळण; बांक. ७ राशिचक्रांत नव्वद अंश किंवा त्याहून कमी अंतर. ८ (सामा.) बाजू. [सं.] सामाशब्द- ॰ज्या-स्त्री. धनूची ज्या (इं.) साईन. [सं.] ॰दंड-पु. वरचा, अथवा सगळा बाहु. 'प्रचंड डावा भुजदंड भारी सव्यें करें थापटी कैठभारी ।' -वामन कालियामर्दन ४६. ॰बंध-पु. बाहुभूषण. [सं.] ॰प्रतिभुज-पु. चतुष्कोणांच्या दोन समोरासमोरच्या बाजू. [सं.] ॰बल-ळ-न. १ बाहूचें सामर्थ्य. २ शारीरिक बळ, शक्ति, युक्ती, कुशलता यांच्या उलट. 'भुजबळें त्राहाटून । उर्वीवरी झाडीत ।' ॰भोंवरी- स्त्री. घोड्याच्या खांद्यावरील केसाचा भोंवरा. -वि. खांद्या- वर भोंवरा असलेला (घोडा); खोडिलखांद. ॰वट-वटा-नपु. १ खांद्याचा सांधा. (क्रि॰ उखळणें, हिसकणें, दुखवणें) २ पाटणीच्या दोन कड्यांमध्ये बसवावयाची फळी. [भुज + वत्]

दाते शब्दकोश

अपविद्ध(अंगहार)

पु. (नृत्य) ह्यांत अपविद्ध, व सूचीविद्ध- करणें करून हात उद्वेष्टित करणें; त्रिक फिरविणें, व मग उरोमंडल- हात करून कटिछिन्नकरण करणें; ॰करण-न. (नृत्य) उजवा हात शुकतुंड करून एकदां वाटोळा फिरविणें व मांडीच्या पाठीकडे लावून ठेवणें व डावा हात वक्षःस्थलावर ठेवणें. ॰बाहु-पु. (नृत्य) छाती- वरील बाहु तोंडासमोरून डोक्यापर्यंत नेत असतांची स्थिति. [सं.]

दाते शब्दकोश

आठुवा

पु. भुज; बाहु. 'समट संध्या रागाचे आंग । आठुवाचें जोडें हिरेलग । सर्वांगीं सैभ श्लोकांचें बानलग । देवाचिये मुद्रे आंतुल ।।' -नरुस्व १६५.

दाते शब्दकोश

बाह(हा)ळ

स्त्री. उपरणें, पासोडी इ॰ अंगाभोवतीं गुंडा- ळून डाव्या खांद्यावर त्याचा शेवट घेण्याची पद्धत. (क्रि॰ घेणें; घालणें; टाकणें). (देशावर बाहाळ घेणें-टाकणें याचा अर्थ पांघरणें असा करतात). [सं. बाहु]

दाते शब्दकोश

बाही

बाही f बाहु m The whole arm. The sleeve of a garment.

वझे शब्दकोश

(सं) स्त्री० अस्तनी, अंगरख्याचा हात. २ बाहु.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

बाही bāhī f (बाहु through H) The whole arm (from the shoulder-joint to the wrist). 2 The arm or sleeve of a garment. 3 A jamb or post of a door. बाही देणें To lend the shoulder, lit. fig. बाही धरल्या- ची लाज धरणें To make it a point of honor to espouse the cause of a refugee. बाह्या थापटणें -पिटणें- मारणें To slap the arms in indication of readiness to fight. बाह्या (or बाही) फुरफुरणें or फुरारणें -उसास- णें -उडणें g. of s. To have one's arms (or arm) quivering or itching to fight.

मोल्सवर्थ शब्दकोश

बाहळ or बाहाळ

बाहळ or बाहाळ bāhaḷa or bāhāḷa f (बाहु Arm.) A mode of loosely casting (the धोतर, पासोडी &c.) over the left shoulder and upper arm after a turn round the body. v घाल, टाक, घे. In the Desh वाहळ, with its verb घे or टाक, often occurs as purely synonymous with पांघरणें.

मोल्सवर्थ शब्दकोश

बाहला

पु. दूध काढण्याचे वेळीं गाईचे पाय बांधण्याची दोरी; भाला. (क्रि॰ घालणें; बांधणें; लावणें). 'स्वयें वांसरूं गाय दुहितां । बाहला न लगे सर्वथा ।' -एभा २९.९९७. [बाहु]

दाते शब्दकोश

बाहो

पु. बाहु; हात.

दाते शब्दकोश

बाहुटा

बाहुटा bāhuṭā m (बाहु) The arm from the shoulder to the elbow: also the region of the shoulder-joint. 2 An ornament for the arm (of females).

मोल्सवर्थ शब्दकोश

बाह्या

(महानु.) बाहुबळ; बाहू. 'मोक्षाचा बाह्या गेला ।' -भाए ९१. [सं. बाहु]

दाते शब्दकोश

बाजु(जू)बंद

पु. १ दंडाला बांधण्याचा स्त्रियांचा दागिना. 'बाजूबंद जोडी हातसर ।' -तुगा २९६९. २ (फूलमाळी) दंडाला बांधण्यासाठीं केलेली फुलांची माळ. [सं बाहु = बाजु + बंध]

दाते शब्दकोश

बाऊस

न. खांदा; बाहुमूल; बाहुवटा; बाहुटा. [सं. बाहु]

दाते शब्दकोश

बाव(व्हा)टा

पु. १ निशाण; ध्वज; झेंडा. २ बाहुटा; हाताचा वरील भाग. [सं. बाहु; हिं.] ॰हकारणें (नाविक) आपलें निशाण दाखविणें.

दाते शब्दकोश

बाव्हळ, बाव्ह(व, ह)ळा, बावखंड

पु. हाताचा खांद्या- जवळील भाग. [सं. बाहु]

दाते शब्दकोश

बाव्हळा

बाव्हळा bāvhaḷā m (बाहु) The top of the shoulder or region of the joint.

मोल्सवर्थ शब्दकोश

बावखं(क,ख)ड, वावख-ट, बावकडा

पुन. १ ४ लांकडांपैकीं लांबीचीं दोन लांकडें; गाडीच्या वरल्या बाजूच्या लांकडी बाजवा; कठडा; लोखंडी आंसाच्या वर खालीं लांकडें अस तात त्यांपैकीं वरचें लांकूड. ३ बावकांड पहा. [सं. बाहु + काष्ठ-खंड]

दाते शब्दकोश

भावांस्त्रे

पुअव. धरसोडीचीं व असंबद्ध उत्तरें; खोट्या व पोकळ सबबी; मुद्याला सोडून असलेलें भाषण. (क्रि॰ फोडणें, लावणें, घेणें). [बाहु = फांदी, फांटा?]

दाते शब्दकोश

भुजा

स्त्री. १ (काव्य) सबंध हात; बाहु. भुज पहा. २ (नाट्य) देव. राक्षस यांचीं सोगें घेणाराच्या दंडावर बांधावयाच्या पौराणिक नाटकांतील भूषणांपैकीं एक. या भुजा मातीच्या बनवून त्यांवर कागदाचे थर देऊन मग त्या सोनेरी वर्खाने मढवितात. [सं.] भुजांतर-न. (काव्य) दोन्ही बाहूंमधील भाग; छाती; वक्षःस्थल. 'शिरला भुजांतरीं शर वल्मीकामाजि नागनाय- कसा ।' -मो. ॰दंड-पु. (महानु.) भुजदंड. 'मग आळींगौनि भुजादंडीं । बैसविला तो ।' -भाए ७५. [सं.] भुजोटा-पु. भुजवटा, भुजसंधि पहा.

दाते शब्दकोश

(सं) स्त्री हात, बाहु.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

भूज

स्त्री. १ भुजा; सबंध बाहु. २ (क्षेत्र मापनांत) एक बाजू (शेताची, जागेची). ३ (रसा.) लोहचुंबकाच्या ध्रुवा- मधील आडवी लोखंडी पट्टी. [सं. भुज]

दाते शब्दकोश

दंडक

पु. १ चाल; संवय; प्रघात; पद्धति; संप्रदाय; परि- पाठ; वहिवाट; नियम. 'ऐसा ज्याचा दंडक । अखंड पाहाणें विवेक ।' -दा १९.१०.१३. २ (काव्य) एकसमवृत्त; अक्षरें २७; गण न, न, र, र, र, र, र, र, र, यति शेवटीं. ३ दळण वळण; वाग- णूक. ४ (भयाण आणि ओसाड असा) लांब रस्ता; लांबट जागा. ५ बाहु; हात. 'हा तुझा निववुं दंडक राया । जो समर्थ खळदंड कराया ।' [सं. दंड]

दाते शब्दकोश

दोर्दंड

पु. (काव्य) बाहुदंड; भुजदंड; खांद्यापासून कोपरा- पर्यंतचा हात. [सं. दोस् = बाहु + दंड]

दाते शब्दकोश

ध्वजा

स्त्री. १ निशाण, ध्वज पहा. 'तुका म्हणे सुख घेतलें गोपाळीं । नाचती कांबळीं करुनी ध्वजा ।' -तुगा ३०. २ वर्ष- प्रतिपदेच्या दिवशीं उभारतात ती गुढी. [सं.] ध्वजांगें-क्रिवि. हातांत निशाण धरतांना जो आकार होतो त्या स्थितींत. 'ध्वजांगें उचले बाहु आवेशें लोटिला पुढें ।' -दावि ४७३. [ध्वजा + अंग = अवयव]

दाते शब्दकोश

हात

पु. १ हस्त; बाहु; खांद्यापासून बोटांपर्यंत शरीराचा भाग. कोपरापासून बोटांपर्यंतचा भाग. २ कोपरापासून मधल्याबोटाच्या टोकापर्यंतचें माप. 'हा पंचा साडेचार हात भरला.' ३ उजवी किंवा डावी बाजू, तरफ. 'आमचें घर वाड्याचे उजव्या हातास आहे.' ४ ताबा; आटोका; अधिकार; खातें. 'तुझें काम करणें माझ्या हातीं नाहीं.' (कारक विभक्तींत प्रयोग). ५ स्वतः व्यक्तिगत मनुष्य. 'अपराधावांचून शिवी देणें हें माझ्या हातानें घडणार नाहीं.' ६ स्वामित्व; कबजा; मालकी; ताबा. 'साप्रंत माझ्या हातीं पैसा नाहीं.' ७ हातानें वाजविण्याच्या वाद्यावर मारलेली हाताची थाप. ८ डाव; खेळ (काठी, लाठी, पट्टा इ॰ शस्त्रांचा). 'पट्ट्याचे दोन हात करून दाखव.' ९ कर्तृत्वशक्ति; अंग; हस्तकौशल्य (एखाद्या विषयांतील, कलेंतील). 'त्याचा चित्र काढण्याचा हात चांगला आहे.' १० कुलुपाची किल्ली; चावी. 'कुलवाचा हात इकडे दे बघूं.' ११ सोंगट्या, पत्ते इ॰ खेळांतील डाव, खेळण्याची पाळी, खेळ; खेळणारा गडी. 'अजून आमच्यांतील एक हात खेळवयाचा आहे.' १२ हस्तक; मदतनीस; साहाय्यक; हाताखालचा मनुष्य. १३ ज्यावर दंड, जोर काढावयाचे तो लांकडी, दगडी ठोकळा; हत्ती १४ (रंग देणें, सारवणें इ॰ कामीं) वरून हात फिरविणें; हातानें दिलेला थर, लेप. १५. ठोंसा; तडाखा; हस्तक्रिया (भिन्नभिन्न प्रसंगीं त्या त्या अर्थांनीं) १६ (तेली-घाणा) कातरीस जोडलेला वांकडा लाकडी तुकडा. १७ हात टेकावयासाठी, हातानें धरावयाचा कोणताहि पदार्थाचा भाग. 'खुर्चींचे-रहाटाचे-हात. १८ हाताच्या आका- राची कोणतीहि वस्तु. १९ (सोनेरी) हातांतील दागिना सैल करण्याचें एक हत्यार. २० (नृत्य) दोन हातांनीं मिळून करा- वथाचे अभिनयाचे प्रकार. हे ४० प्रकारचे आहेत. २१ (शिंपी) कापड मोजण्याचें बारा तसूंचें एक माप; गज. २२ पान्हा (नट- बोलट फिरविण्याचा). [सं. हस्त; प्रा. हत्थ; हिं. गु. हाथ; ब. हात; आर्में. जि. हथ, अथ; पॅलेस्टाईनजि. हस्त; पोर्तुंजि. बस्त] म्ह॰ १ हात ओला तर मैत्र भला-नाहींतर पडला अबोला- जोपर्यंत माणूस दुसर्‍यास देत असतो तोंपर्यंत त्याच्याशीं सगळे मित्रत्वानें वागतात. २ हात घशांत घातला तरी कोरडाच = कितीहि मदत केली तरी बेइमान राहणारा. ३ हातपाय रोड्या, पोट लोड्या; हातपाय काड्या, पोट ढेर्‍या = पोटाचा तटतटीतपणा व अवयवांचा रोडकेपणा. ४ हात फिरे तेथें लक्ष्मी फिरें, तोंड फिरे तेथें अवदसा फिरे = उद्योगी माणसाचा हात श्रीमंती आणतो तर नुसत्या बडबड्याच्या हातून कांहींच होत नाहीं उलट दारिद्र्य येतें. ५ आपला हात जगन्नाथ (जगन्नाथपुरीस आपल्या हातानें वाटेल तेवढा प्रसाद घेतां येतो त्यावरून) वाटेल तेवढें व तसें घेणें; प्राचुर्य. ६ हातचें सोडून पळत्याचे पाठीस लागूं नये = जें खात्रीनें आपलें आहे (आपणांस मिळावयाचेंच आहे) तें सोडून जें अनिश्चित आहे तें मिळविण्याच्या नादीं लागूं नये. ७ हातच्या कांकणास आरसा कशाला ? (हातांतील कांकण डोळ्यानें दिसण्या- सारखें आहे, आरसा आणणें वेडेपणा) = जी गोष्ट उघड सिद्ध आहे ती दाखविण्यास पुराव्याची जरूरी नाहीं. ८ हातपाय र्‍हावलें काम करूं वायले = नाइलाज होणें. ९ हातपाय लुलें तोंड चुरचुरां चाले = अशक्त पण तोंडाळ, मुजोर माणूस. १० हातभर लांकूड नऊ हात ढलपी = अतिशयोक्ति करणें. ११ हातांत नाहीं अडका बाजारांत चालला धडका = जवळ कवडीं नाहीं पण डौल बादशहाचा. (वाप्र.) ॰आंखडणें-देण्यासाठीं पुढें केलेली वस्तु एकदम मागें घेणें; देण्याचें प्रमाण कमी करणें, बंद करणें. ॰आटोपणें-मारणें इ॰ हातांनीं करावयाची कोणतीहि क्रिया बंद करणें. ॰आवरणें-१ हात आटपणें. २ कोणत्याहि कृत्यापासून परावृत होणें. 'ऐकेल वचन माझें आवरिल द्वेषिकाळ हात रणीं ।' -मोकर्ण ४६.४४. ॰इचकणें-(व.) हात मोडणें. ॰उगारणें-उचलणें-(एखा- द्यास) मारावयास प्रवृत होणें. ॰उचलणें-१ स्वयंस्फूर्तीनें, आपण होऊन बक्षीस देणें. २ हातीं घेणें (काम, धंदा). ॰ओढविणें- १ घेण्यासाठीं झांप टाकणें. २ विटंबना, करण्यासाठीं तुच्छता दर्शविण्यासाठीं तोंडापुढें हात करणें. ॰ओंवाळणें-तुच्छता दर्शविणें. ॰करणें-१ लाठी मारणें; शस्त्राचा वार करणें. हात टाकणें. 'स्त्रीचे अंगावर हात करूं नये.' २ पट्टा, बोथाटी वगैरेचे डाव करणें; फिरविणें. ३ वादविवाद, युद्ध करणें. ॰कापून-देणें- गुंतणें-लेखी करारकरून स्वतःस बांधून देणें. ॰खंडा असणें- एखादें कार्य (हुन्नर) हमखास पार पाडण्याचें कौशल्य, पटाईत- पणा अंगीं असणें. ॰गहाण ठेवणें-उजवा हात देवास वाहून कोणत्याहि कामीं त्याचा उपयोग करावयाचा नाहीं असा नवस करणें. २ कोणत्याही कामास हात न लावणें. ॰घालणें-१ (एखादें काम) पत्करणें; करावयास घेणें. २ एखादी वस्तु घेणें, धरणें, शोधणें यासाठीं हात पुढें करणें. 'मग विभु वसनासी त्याचिया हात घाली ।' -आनंदतनय. ३ (एखाद्या कामांत, व्यवहांरांत) ढवळाढवळ करणें; आंत पडणें. ॰घेणें-(पत्त्यांचा खेळ) हुकूम मारून अगर भारी पान मारून दस्त करून घेणें. ॰चढणें-प्राप्त होणें. 'अनुताप चढविया हात । क्षणार्धं करी विरक्त ।' -एभा २६.२०. हाताचा आंवळा-मळ, हातचें कांकण-उघडउघड गोष्ट; सत्य. ॰चा मळ-अत्यंत सोपें कृत्य; हात धुण्यासारखें सोपें काम; अंगचा मळ. ॰चालणें-१ हातांत सत्ता, सामर्थ्य, संपत्ति असणें, मिळविणें, मिळणें. १ एखादी गोष्ट करतां येणें. 'कशिद्यावर माझा हात चालत नाहीं.' ॰चाल- विणें-हत्यार चालविणें (संरक्षणार्थ). 'न्यायाच्या अभावीं ज्याला त्याला हात चालवावेसें वाटणें रास्तच होईल.' -टि १. २२. ॰चेपणें-लांचाचे पैसे मुकाट्यानें एखाद्याचे हातांत देणें. ॰चोळणें-फार राग आला असतां तळहात एकमेकांवर घासणें; कुंठितगति होऊन स्वस्थ बसावें लागणें. 'शल्य सुयोधन वाक्यें कोपे चोळी करें करा...।' -मोकर्ण २१.१३. ॰जोडणें-१ नमस्कार, प्रार्थना, विनंति करणें. २ शरण जाणें, येणें. 'अपराध फार केले परि आतां हात जोडिले स्वामी ! ।' -मोआर्याकेका. ३ नको असलेला पदार्थ हात जोडून आर्जवानें दूर सारणें; अव्हे- रणें. 'दानश्री त्याहुनि बहु दुग्धासहि हात जोडितो मीन ।' -मोबृहद्द ८. ॰झाडणें-१ झिडकारणें; नापंसत ठरविणें. २ निराशेनें सोडून देणें. ३ एखादें काम उरकून मोकळें होणें. ॰टाकणें-१ पोहतांना पाण्यावर हात मारणें. २ (एखाद्यावर) प्रहार करणें; मारणें. 'बायकोमाणसाच्या अंगावर हात टाकणें तुम्हाला शोभत नाहीं.' ॰टेकणें-१ काम करण्यास असमर्थ असल्यानें पराभव पावल्याचें कबूल करणें. २ म्हातारपणानें अशक्त होणें. ३ दमणें; थकणें; टेकीस येणें. ॰तोडणें-स्वतःच्या लेखानें आपणांस बांधून घेणें. ॰थावरणें-हात आवरणें; आटो- पणें. '...थावरूनि हातरणीं ।' -मोस्त्री ६.५१. ॰दाखविणें- दावणें-१ हस्तसामुदिक जाणण्यासाठीं जोशापुढें तळहात करणें. २ अहितकारक परिणाम करणें. ३ स्वतःची शक्ति, सामर्थ्य दाख- विणें. 'शक्रादि देव असते तरि त्यांसहि दावितोंचि हात रणीं ।' -मोभीष्म ३.४. ४ नाडीपरीक्षा करण्यासाठीं वैद्यापुढें हात करणें. ५ हातानें एखादी वस्तु दर्शविणें. ६ बडवून काढणें; पारिपत्त्य करणें; सूड घेणें; उट्टें काढणें. म्ह॰ हात दावून अवलक्षण चिंतणें, करणें. ॰दाबणें-लांच देणें. 'त्यानें आपल्यास मदत करावी म्हणून त्याचे हात दाबावे असें एकदां मनांत येतें.' -विवि १०. ९ २१०. ॰देणें-१ मदत करणें; तारणें. 'घडतां अधःपतन मज पुण्यें देतिल न हात परिणामीं ।' -मोआदि १९.३२. २ चोरणें; उचलेगिरी करणें. ३ खाद्यापदार्थावर ताव मारणें. ४ (बायकी, छप्पापाणी) छप्पू घातलेल्या मुलीस इतर मुलीनीं (तिनें उठावें म्हणून) हस्तस्पर्श करणें. ॰धरणें-१ अडविणें; हरकत करणें; स्पर्धा करणें; बरोबरी करणें. २ लांच देणें. ॰धरून जाणें- विवाहित स्त्रीनें एखाद्या परपुरुषाबरोबर पळून जाणें; जाराबरोबर निघून जाणें. ॰धुणें-(ल.) एखाद्या कामांतून आपलें अंग काढून घेणें. ॰धुवून पाठीस लागणें-एखाद्या नाश करण्याविषयीं हट्टानें प्रवृत्त होणें; चिकाटी धरून एखाद्याचा पाठलाग करणें. ॰न बनणें-(व.) विटाळशी होणें; गुंता येणें. ॰नाचविणें-चेष्टा करण्यासाठीं दुसर्‍याचे तोंडापुढें हातवारे करणें. हात ओवाळणें पहा. ॰पडणें-१ एखादें काम अनेकांनीं लागून संपविणें; एखादा खाद्यपदार्थ अनेकांनीं एकसमयवच्छेनेंकरून फन्ना करणें. २ (ना.) जिवंतपणीं भेट नाहीं पण दहनापूर्वी तरीं प्रेताचें दर्शन होणें. ॰पसरणें-भीक मागणें. ॰पाय खोडणें-१ अवयव आंख- डणें; विव्हल होणें. २ एखाद्यास प्रतिबंध, अडचण करणें. ॰पाय गळणें-गाळणें-१ अशक्त होणें; रोडावणें. २ खचून जाणें; नाउमेद होणें; गलितधैर्य होणें. ॰पाय गुंडाळणें-१ अंत- काळच्या वेदनांनीं हातपाय आंखडणें; कियाशक्ति रहित होणें. २ हरकत, अडथळा करणें. ॰पाय चोळणें-१ सूड घेण्याची प्रतिज्ञा करणें; चरफडणें. २ रागानें तरफडणें; शिव्याशाप देणें. ॰पाय झाडणें-१ हातपाय गुंडाळणें अर्थ १ पहा. २ सुटकेसाठीं हातापायांचा उपयोग करणें. ३ धडपड करणें; चरफडणें. ॰पाय ताणणें-सुखानें, निष्काळजीपणानें हातपाय पसरून पडणें. ॰पाय धोडावप-(गो.) आटापिटा करणें. ॰पाय पसरणें- १ हातपाय गुंडाळणें अर्थ १ पहा. २ मर्यादेच्या, आटोक्याच्या बाहेर जाणें; जास्त जास्त व्याप वाढविणें; पसारा वाढविणें. म्ह॰ भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी. ३ काम होत नसल्यास सबबी सांगणें; कामांत आळस करणें (काम करीन असें वचन दिलें असतां). ४ मागणी वाढत जाणें, अधिकाधिक आक्रमण करणें. ॰पाय पाखडणें-अंतकाळच्या वेदनेनें, फार संतापानें हातपाय झाडणें. ॰पाय पांघरून-पोटाळून बसणें-आळशा- सारखें बसणें; जेठा मारून बसणें. ॰पाय फुटणें-१ उधळपट्टी सुरू होणें; संपत्तीला (जाण्यास) पंख फुटणें. 'दौलतीला अलीकडे हातपाय फुटुं लागले आहेत.' ३ लुच्चेगिर्‍या करण्यांत तरबेज होणें. २ थंडीनें हातपायास भेगा पडणें. ॰पाय फोडणें-लावणें- फुटणें-लागणें-१ मूळ गोष्टींत, अंदाजांत भर घालणें; वाढ विणें. २ नटविणें; थटविणें; अलंकृत करणें. ३ मागून वाढविणें (काम, दर, खर्च इ॰). ४ लबाड्या इ॰ नीं सजवून उजळून दाखविणें. ॰पाय मोकळे करणें-फेरफटाका करून हातपाय सैल, हलके करणें; फिरणें; सहल करणें. ॰पाय मोडणें-मोडून येणें-टाकणें-१ तापापूर्वीं अंग मोडून येणें; निरंगळी येणें. २ बलहीन, निःसत्त्व करून टाकणें; हरकत घेणें. ॰पाय सोडणें -अंतकाळच्या वेदनांनीं हातपाय ताणणें, ताठ होणें. ॰पाय हालविणें-उद्योग, परिश्रम, कष्ट इ॰ करणें; स्वस्थ न बसणें. ॰पोचणें-कृतकृत्य होणें (ढुंगणाला हात पोंचणें असा मूळ प्रयोग). ॰फाटणें-रुची वाढणें. 'जेथें जिव्हेचा हातु फाटे ।' -ज्ञा १८.२४९. ॰फिरणें-लक्ष जाणें; व्यवस्थित ठेवण्याची काळजी घेणें; साफसफाई करणें. ॰फेरविणें-१ लहान मुलास प्रेमानें कुरवाळणें. 'प्रेमें मजवरुनि हात फिरवूनी ।' -मोउद्योग १३.१८३. २ पुन्हां उजळणी, उजळा देणें. ॰बसणें-१ एक- सारखें लिहीत, वाचीत इ॰ राहणें. २ अक्षरांचें वळण बसणें; तें पक्कें होणें. ३ एखादें काम उत्तम प्रकारें करतां येणें; मनांत ठसणें; विशिष्ट क्रिया करण्याची सफाई हातास प्राप्त होणें. ॰बांधणें-१ मर्यादा घालणें; स्वैर होऊं न देणें. २ अडथळा आणणें. ॰बोट लावणें-भार लावणें-मदत करणें. ॰भिजणें-१ दक्षणा देणें; (गो.) हात भिजविणें. २ लांच देणें; हात ओले करणें. ॰मारणें-१ बळकाविणें (पैसा इ॰) देणें. २ अधाशीपणानें खाणें; ताव मारणें. ३ एखाद्या वस्तूवर विविध क्रिया करणें. ॰मिठ्ठीला येणें-(माण.) हाताहातीं होईपर्यंत भांडणें. ॰मिळविणें-१ घाव घालणें. 'तस्कारानें जलदीकरून हात मिळविला जाऊन ।' -ऐपो ३९०. २ (कुस्ती) सलामी घेणें. ॰मोडणें-१ असहाय्य, मित्रहीन होणें. २ मिळत असलेली देणगी, बक्षीस नाकारणें. ॰राखणें- कुचराई करणें. ॰राखून खर्च करणें-काटकसरीनें खर्च करणें. ॰लागा ना-(गो.) विटाळशी होणें. ॰लावणें-मदत करणें. ॰वसणें-क्रि. हस्तगत होणें. 'ते ज्ञाननिष्ठा जेथें हातवसे ।' -ज्ञा १८.१२४८; -भाए २४०. ॰वहाणें-१ हत्यार चालविणें. 'परि परमप्रिय अर्जुन त्यावरि याचा न हात वाहेल ।' -मोउद्योग १२.५४. २ प्रवृत्त होणें; कार्य करणें. ॰वळणें-१ सराव, परि- पाठ इ॰ नें हातास सफाई येणें. २ (एखाद्या गोष्टीस, कृत्यास) प्रवृत्त होणें. ॰सैल सोडणें-सढळपणें खर्च करणें. ॰सोडणें-१ पूर्वीप्रमाणें कृपा, लोभ न करणें. २ संगति. ओळख सोडणें. ॰हातांत देणें-लग्न लावणें. 'एखाद्या तरुणीचा हात माझ्या हातांत दे.' -भा ४९. ॰हालवीत येणें-काम न होतां रिकामें परत येणें. हातणें-क्रि. सारवणें. हाताखालीं घालणें-देख. रेखीखालीं, अंमलखालीं, कबज्यांत, ताब्यांत घेणें. हातां चढणें- प्राप्त होणें. 'जरी चिंतामणी हातां चढे ।' -ज्ञा ३.२३; -एभा १०.२८२. हाताचें पायावर लोटणें-आजची अडचण उद्यां- वर ढकलणें; आजचें संकट लांबणीवर टाकणें. हाताचे लाडू होणें-खरजेनें हाताच्या मुठी वळणें, त्या न उघडणें. हाताच्या धारणेनें घेणें-मारणें; बुकलणें. हातांत कंकण बांधणें- एखाद्या गोष्टीची प्रतिज्ञा करणें; चंग बांधणें (यजमानानें यज्ञ करावयाच्या पूर्वी हातांत दीक्षासूत्र बांधण्याच्या चालीवरून). हातांत हात घालणें-१ लांच देणें. २ मैत्रीच्या भावानें वागणें, प्रेम करणें. ३ विवाहसंबंध घडवून आणणें. ४ विवाहित स्त्रीनें परपुरुषाशीं संबंध ठेवणें; निघून जाणें. हातातोंडाशीं गांठ पडणें-१ घास तोंडांत पडणें; खावयास सुरुवात करणें; जेवणा- खेरीज इतरत्र लक्ष न जाणें. २ एखाद्या कार्यास घाईनें आरंभ होणें. ३ बोंब मारणें. हातातोंडास येणें-१ तारुण्यावस्था प्राप्त होणें (लग्न झालेली स्त्री, तरुण मुलगा इ॰). २ फल देण्याच्या स्थितीस येणें. हातापायांचा चौरंग होणें-पेटके वगैरेमुळें हातपाय आंखडणें. हातापायांचे डगळें होणें- पडणें-मोडणें-अशक्तपणानें अंगास कंप सुटणें; अंग शिथिल होणें. हातापायांचे ढीग पडणें-होणें-भीतीनें, आजारानें अशक्त असहाय्य होणें. हातापायांच्या फुंकण्या होणें- अशक्ताता, निर्बलता येणें. हाता(तीं) पायां(यीं) पडणें- १ गयावया करणें; प्रार्थना करणें. २ शरण जाणें; नम्र होणें; दया याचिणें. हाताबोटावर येणें, हातावर येणें-आतां होईल, घटकाभर्‍यानें होईल अशा स्थितीस येणें; हस्तगत कबज्यांत, साध्य होण्याच्या अगदी बेतांत असणें. हाताला चढणें-प्राप्त होणें. 'संसार कशाचा जरि न हाताला चढली ।' -राला ११२. हाताला येईल तें-जें कांहीं हातांत सांपडेल तें; ज्याचेवर हात पडेल तें. हाताल लागणें-गमावलेल्या, फुकट गेलेल्या, नासलेल्या, बिघडलेल्या वस्तूंतून अल्प अंश मिळणें. 'कापडांत पैसें घालूं नका, त्यांतून हाताला कांहीं सुद्धां लागणार नाहीं.' हाताला वंगण लावणें-लांच देणें. -राको १३३७. हाताला हात लावणें-१ पति पुण्याहवाचनादि धर्मसंस्कारास बसला म्हणजे पत्नीनें त्याच्या हातास नुसता हात लावणें (म्हणजे तिलाहि त्याचें फळ मिळतें). २ स्वतः कांहीं न करतां दुसर्‍यानें केलेल्या कामाच्या फळांत वांटेकरी होणें; दुस- र्‍याच्या कार्याला अनुमति देणें. हातावर असणें-पूर्णपणें साध्य असणें. हातावर घेणें-आणणें-काढणें-तारण, गहाण न ठेवतां पैसे उसनें आणणें, काढणें, घेणें. हातावर तुरी देणें-देऊन पळून जाणें-हातावर हात देऊन-मारून पळणें-पळून जाणें-फसविणें; डोळ्यादेखत फसवून पळून जाणें; देखत देखत भुल- विणें. 'सुभद्रा काबीज करण्यासाठीं श्रीकृष्ण परमात्म्याच्या मदतीनें बलिरामाच्या हातावर ज्या तुरी दिल्या... तें पाहून तरी आम्हांस कधीं विषाद झाला आहे काय ?' -आगर. हातावर दिवस काढणें-लोटणें-मोठ्या कष्टानें संसार चालविणें. हातावर धरणें-हातांवर संभाळीत राहावयास लावणें (मुलीनें). 'यानें मला सकाळपासून हातावर धरिलें.' हातावर पाणी पडणें- भोजनोत्तर आंटवणें. 'हातावर पाणी पडलें कीं चालला बाहेर.' हातावर पिळकणें-लांच देणें. हातावर पोट भरणें-संसार करणें-अंगमेहनत, भिक्षा, नौकरी करून उपजीविका करणें. हातावर मिळविणें-मिळवावें व खावें अशा स्थितींत राहणें. हातावर येणें-जवळ येऊन ठेपणें. हातावर येणें-लागणें- दूध देऊं लागणें-थानास वासरूं न लावतां किंवा पान्हवण (सरकी इ॰) पुढें न ठेवतां जनावरानें दूध देणें, पान्हवणें. हातावर शीर घेऊन असणें-कोणतेंहि धाडसाचें कृत्य कर- ण्यास सदां सिद्ध असणें. हातावर हात चोळणें-रागानें तळ- हात एकमेकांवर घासणें; चरफडणें. 'इंद्रें स्वतातघातक पाठीसीं घातला म्हणोनि करें । कर चोळी...' -मोआदि ७.४०. हाता- वर हात मारणें-१ एखादी गोष्ट, सट्टा इ॰ पटला म्हणजे दुस- र्‍याचे हातावर आपला हात मारणें. २ वचन देणें. हातास हात लावणें-(देणार्‍याच्या, घेणार्‍याचे हातास स्पर्श होणें) द्रव्यलाभ होणें. हातास-हातां-हातीं चढणें-प्राप्त होणें. 'तो किल्ला माझ्या हातीं चढला.' 'नवनींत मंथनावांचून । हातां न चढे सहसाहि ।' हातीं धरणें-१ स्वतःच्या देखरेखीखालीं घेणें; एखाद्यास आपल्या आश्रयाखालीं घेणें. २ निरंकुशपणें मोकाट सोडणें (जीभ, तोंड, पोट इ॰ इंद्रियें). हातीं धोंडे घेणें-१ विरुद्ध उठणें. २ वेड्यासारखें करणें. हातींपायीं (अन्न इ॰) डेवणें-धावणें-येणें-रेवणें-जाड्य, सुस्ती येणें; शिव्या देण्यास तयार होणें. हातींपायीं उतरणें-सुटणें-मोकळी होणें-सुखरूपपणें बाळंत होणें हातींपायीं पडणें, लागणें- अतिशय विनवण्या, काकुळत्या करणें. हातीं भोपळा घेणें- देणें-भिक्षा मागणें, मागावयास लावणें. आडव्या हातानें घेणें-१ चोरून; चोरवाटेनें घेणें. २ झिडकारणें; भोसडणें; तुच्छता दाखविणें; कचकावून खडकाविणें; मारणें. आडव्या हातानें घेणें, चारणें-बाजूनें, तोंडांत हात घालून खाऊं घालणें; औषधोपचार करणें (घोडा इ॰स). (देणें-चोरून देणें-मारणें- मागल्या बाजूनें मारणें-ठोकणें). एका हाताचीं बोटें पण सारखीं नाहींत-सारख्या परिस्थितींतील माणसें असलीं तरी त्यांच्यांत थोडाफार फरक असतो. दोहों हाताचे चार हात करणें-होणें-लग्न करणें, होणें या हाताचे त्या हातावर- क्रिवि. ताबडतोब; जेव्हांचे तेव्हांच (दुष्कृत्याची फेड लवकर व खात्रीनें मिळते या अर्थीं). या हाताचें त्या हातास कळूं न देणें-अत्यंत गुप्तपणें करणें. रिकाम्या हातानें-जरूं- रीच्या साधनां-उपकरणां-सामग्रीखेरीज; कांहीं काम न करतां. याचा हात कोण धरीसा आहे ? -याच्या वरचढ, बरो- बरीचा कोण आहे ? याचा हात धरण्याची शक्ति कोणास आहे ? हातांत काय तागडू मिळाला-(व) कोणता फायदा झाला ? हातांत नारळाची आई (नरोटी) देणें-भिक्षा मागावयास लावणें. सामाशब्द- ॰अनार-पु. शोभेच्या दारूचा एक प्रकार. ॰इंद-न. (कों.) खेंकडे पकडण्याचें जाळें. ॰उगावा-पु. १ एखाद्या किचकट, अडचणीच्या कामांतून, धंद्यांतून अंग काढून घेणें. २ सूड; पारिपत्य. (क्रि॰ करणें). ३ कर्जाची उगराणी; घातलेलें भांडवल परत मिळविणें. [हात + उगवणें] ॰उचल-स्त्री. १ पेढींतून स्वतःची रक्कम आतां थोडी मग अशा रीतीनें खर्चण्यास घेणें. २ मूळ भांडवल; मुद्दल. उचल मध्यें पहा. ॰उचला-वि. १ आप- खुषीनें, हात उचलून दिलेला (पदार्थ). २ ज्याचा स्वतः करण्याबद्दल पत्कर घेतला आहे असा (व्यवहार, उद्योग). ॰उसना-ना-वि. थोडा वेळ उसना घेतलेला; लवकर परत करण्याच्या बोलीनें आणलेला (त्यामुळें लेख इ॰ लिहून न घेत दिला-घेतलेला). ॰उसणें-नें-न. थोड्या मुदतींत परत कर- ण्याच्या बोलीनें (लेख करून न देतां) उसनी घेतलेली रक्कम. ॰कडी-स्त्री. हातांतील बेडी. 'मन सिंतरील विवेकासीं । यालागी हात कडिया दोहींसीं ।' -एभा २३.९५१. ॰कर- वत-पुस्त्री. हातानें चालविण्याची लहान करवत. ॰करवती- स्त्री. लहान हात करवत. ॰करीण-स्त्री. अचळाला हात लावतांच (वासरूं न सोडतां किंवा आंबोण न ठेवतां) पान्हा सोडून दूध देणारी गाय; म्हैस. इच्या उलट पान्हावणकरीण. ॰कापें-न. (गो.) लांडी, बिन बाह्यांची बंडी. ॰काम-न. हस्तकौशल्याचें काम (यांत्रिक कामाच्या विरुद्ध); हस्तव्यवसाय. (इं.) हँडफ्रॅक्ट. ॰कैची-कचाटी- स्त्री. आलिंगन; मिठी. ॰खंड-वि. १ मधून मधून कामांत सोडवणूक करणारा; मदतनीस (मूल, मित्र, शेजारी); अडल्या वेळीं आपल्या कामीं उपयोगी पडणारा. २ हात खंडा पहा. [हात + खंड = खळ, विसावा] ॰खंडा-वि. निष्णात, करतलामलकवत् असलेली; म्हणाल त्यावेळीं तयार (विद्या, कला). ॰खर्च-पु. किरकोळ खर्च; वरखर्च. ॰ख(खं)वणी- स्त्री. लहान खवणी. ॰खुंट-खुंटा-पु. (विणकाम) वशारन पसरलेल्या लांबीपाशीं असलेल्या समोरच्या खांबापासून मागा पाशीं बसण्याच्या जागेजवळ उजवीकडे दोरी बांधावयाची खुंटी. ॰खुरपणीचें लोणी-न. हातखुरप्या नारळाचें खोबरें. ॰खुरपा-वि. हातानेंच आंतील खोबरें खरवडून काढण्याजोगा (कोंवळा नारळ). ॰खुरपें-न. १ हातखुरपा नारळ. २ गवत काढण्याचा लहान विळा. ॰खे(खो)रणें-न. कलथा; उलथणें; झारा. (क्रि॰ लावणें-अन्नास, पैक्यास = पैका उकळण्याचा सपाटा). म्ह॰ हातखेरणें असतां हात कां जाळावा. ॰खेवणें-न. १ हातवल्हें. २ मदतनीस; हाताखालचा माणूस. ॰खेव्या-व्या-पु. हातखेवणें अर्थ २ पहा. ॰खोडा-पु. हात अडकविण्याचा सांपळा. 'चंद्रसूर्याचा हातखोडा । काळा कैसेनि घालिजे ।' -भाए ५४९. ॰गाडी-स्त्री. हातानें ढकलून चालविण्याची गाडी. ॰गुंडा-धोंडा-पु. १ हातानें फेकण्या-उचलण्या-जोगा दगड. 'कुश्चीतभावाचे हातगुंडे ।' -ज्ञाप्र २६५. २ असला दगड हातानें जेथवर फेंकला जाईल तितकें अंतर. ॰गुण-पु. (बरेंवाईट करण्याचा योग, गुण) नशीब; हातीं (काम, माणूस) धरणाराचा प्रारब्धयोग. हस्तगुण पहा. ॰घाई-स्त्री. १ हातानें वाजवावयाचें वाद्य जोराजोरानें, आवेशानें वाजविणें. २ (ल.) उतावळेपणा; जोराची हाल चाल. (क्रि॰ हातघाईवर, हातघाईस येणें-मारामारी करणें). ॰चरक-पु. १ हातानें फिरवून रस काढावयाचा चरक. २ हात घाणी. ॰चलाख-वि. चोर; उचल्या. ॰चलाकी-खी-स्त्री. हस्तचापल्य; लपवाछपवी; नजरबंदीचा कारभार (गारुडी, सराफ इ॰ चा). ॰चाळा-पु. १ हाताचा अस्थिरपणा; चुळबुळ; हातानें कांहीं तरी उगीच करीत रहावें अशी लागलेली खोड; हातचेष्टा. (क्रि॰ लागणें). २ अशा प्रकारानें होणारें नुकसान. (क्रि॰ करणें). ३ सदोदित हात गुंतलेला असणें; त्यांत निमग्न असणें (वाढता धंदा, व्यापार, खेळ इ॰ त); देवघेवीचा मोठा उद्योग. ॰चिठी-चिटी-ट्टी-स्त्री. १ अधिकार्‍यानें शिक्का- मोर्तब न करतां आपल्या हातच्या निशाणीनेंच पुरी केलेली चिठी, हुकूम. २ कोणाहातीं पाठविलेली चिठी-चपाटी. ॰चे हातीं- च्या हातीं, हातोहातीं-किवि. लेगच; ताबडतोब; आतांचे आतां; क्षणार्धांत पटकन् (करणें, घडणें). 'ही गडी हाताचे हातीं जाऊन येईल.' 'हाताचे हातीं चोरी-लबाडी-शिंदळकी' इ॰. ॰चोखणें-चुंफणें-न. तान्ह्या मुलास चोखण्यासाठीं हातांत देण्याची वस्तु. ॰जतन-स्त्री. हातानें केलेली मशागत (मालीस इ॰); रोज वक्तशीर घेतलेली काळजी. 'हा घोडा नुसत्या हातजतनानें इतका हुशार आहे.' ॰जुळणी-स्त्री. (ठाकुर) लग्न लागल्यानंतर मुलानें मुलीचे दोन हात धरणें. -बदलापूर १३८. ॰झाड-स्त्री. आपोआप उगवलेलें नसून मुद्दाम लाविलेलें झाड. ॰झाडणी-स्त्री. राग, तिरस्कार इ॰ नें हात झटकणें. ॰झालणा-पु. हातजाळें; हातविंड. ॰झोंबी-स्त्री. परस्परांचे हात धरून केलेली झटापट; हिसकाहसकी; झगडा. ॰तुक-न. १ हातानें वजन करणें. 'नव्हती हाततुके बोल ।' -तुगा ३४२३. २ अटकळ; अजमास. 'मग त्यागु कीजे हात- तुकें ।' -ज्ञा १८.१३१. ॰दाबी-स्त्री. लांच. 'मालकानें हात- दाबी केली म्हणजे माल त्यांना परत देतात.' -गुजा ६७. ॰धरणें-न. (खा.) सोधणें; स्वयंपाकघरांतील भांडीं उतरणें इ॰ चें फडकें. ॰धरणी माप-न. माप भरतांना त्याचे शेवटास डावा हात धरून, मापापेक्षां थोडें जास्त धान्य घेऊन केलेलें माप. बोटधरणी माप पहा. ॰धुणी-स्त्री. १ राजाच्या हात- धुणारास दिलेलें इनाम इ॰. २ स्वयंपाकघरांतील मोरी. ॰धोंडा- पु. १ हातानें उचलण्याजोगा धोंडा. २ धोंडा हातानें फेंकला असतां जेथवर जाईल इतकें अंतर; टप्पा. ॰नळा-पु. हातांत धरून सोडण्याचा, शोभेची दारू भरलेला नळा. ॰नळी-स्त्री. चपटें कौल. ॰निघा-गा-हातजतन पहा. हातजपणूक. ॰नेट- क्रिवि. १ (व.) हाताचा जोर, भार देऊन. २ (व.) हाता- जवळ. ॰पडत-पात-वि. हातीं असलेलें; अगदीं जवळ असणारें; लागेल त्यावेळीं ताबडतोब मिळणारें. ॰पहार-स्त्री. हातभर लांबीची पहार. ॰पा-हातोपा-पु. अंगरखा इ॰ ची बाही. ॰पाटिलकी-स्त्री. १ हातानें ठोकणें; चोपणें, बदडणें. तोंड- पाटिलकीचे उलट. २ बोलण्यापेक्षां प्रत्यक्ष कृति, काम. 'तोंड- पाटिलकी सगळ्यांस येते हातपाटिलकी कठीण.' ३ हस्तचापल्य; उचलेगिरी. ॰पाणी-न. १ लग्नांत रासन्हाणीचे वेळीं वधूच्या सासूनें तिचे हातांवर ओतावयाचें पाणी. (क्रि॰ घालणें). २ लग्नांत मांडव परतण्याचे दिवशीं सासूनें सुनेची बोहोल्यावर ओटी भरून, किंवा मांडवांत न्हातेवेळीं नवर्‍यानें केशरी रंगांत बुडवून तिचे हातांत घालवयाची अंगठी. ३ लग्नांत मुलाच्या हाताखालीं मुलीचा हात ठेवून त्यांवर समंत्रक पाणी घालणें. -बदलापूर २०५. ॰पान-पु. कोंका पडण्यापूर्वींचें केळीचें पान. ॰पान्हा- पु. हातकरीण गाय, म्हैस इ॰ नें सोडलेला पान्हा (वासरूं किंवा अंबोण दाखविल्याशिवाय). हातपान्ह्यास लगाणें, येणें, हातपान्ह्याची गाय इ॰ प्रयोग. ॰पालवी-स्त्री. हात पोंहो- चेल इतक्या उंचीवरील पाला. ॰पावा-वि. (कों.) हाताच्या आटोक्यांतील, हात पोहोंचेल इतक्या उंचीवरील (वेलीचें फूल इ॰ किंवा खोली-विहिरींतील पाणी इ॰). [हात + पावणें] ॰पिटीं-स्त्री. १ झोंबाझोंबी; गुद्दागुद्दी. २ (ल.) हातघाईची मारामारी. 'तंव राउतां जाली हातपीटी ।' -शिशु ९६८. [हात + पिटणें] ॰पेटी-स्त्री. हातानें भाता चालवून वाजवावयाची बाजाची पेटी; हार्मोनियम. २ सरकारी कामाचे कादगपत्र ठेवण्याची पेटी. -स्वभावचित्रें २४. ॰पाळी-स्त्री. चेंडूफळीचा एक प्रकारचा खेळ. -मखेपु ५६. ॰फळ-न. (बे.) मेर ओढण्याचें फळ. ॰फळी, हातोफळी-क्रिवि. हातोहातीं; लवकर. ॰बळ-न. हस्तसामर्थ्य. 'हातबळ ना पायबळ, देरे देवा तोंडबळ.' ॰बांधून डंकी-स्त्री. (कुस्ती) जोडीदारास खालीं आणल्यावर त्यानें आपला एक पाय धरला तर आपण दुसर्‍या पायानें जोडीदाराचे पाठीवरून झोंका घेऊन उडी मारून त्यास चीत करणें. ॰बेडी-स्त्री. कैद्याच्या हातांत अडकवावयाची बेडी; हातकडी. ॰बोनें-न. हातांत घेत- लेलें भक्ष्य. 'बुद्धीचेनि शाकें । हातबोनें निकें ।' -ज्ञा ६.२८२. ॰बोळावन-स्त्री. हातांनीं मार्गाला लावणें. 'जाणो नेदी योग्यता । ग्रहीं हातबोळावन करितां ।' -भाए ३४९. ॰भाता-पु. हातांत घेऊन फुंकावयाचा भाता; लहान भाता. ॰भार-पु. मदत; साहाय्य (विशषतः द्रव्याचें). (क्रि॰ लावणें). ॰भुरकणा- भुरका-वि. हातानें भुरकून खावयाजोगा (पेयपदार्थ). ॰भुर- कणें-भुरकें-वरील प्रकारचा पातळ पदार्थ. ॰भेटी-स्त्री. प्रेमानें हातांत हात घालणें. -एभा २८.५९२. ॰मांडणी-स्त्री. पैसे पावल्याची पोंच म्हणून पैसे नेणार्‍याची खतावणीवर घेतलेली सही. ॰मात-स्त्री. हात टेकणें. ॰मेटी हेटीमेटी-क्रिवि. आळसांत; निरुद्योगीपणानें; हातांवर व गुडघ्यावर टेकून रमतगमत (दिवस इ॰) घालविणें. 'दिवस गेला हातमेटीं चांदण्या खाली कापूस वेटी.' ॰रगाडा-पु. उसाचा हातचरक. ॰रवी-स्त्री. घुसळखांब, मांजरी यांचे विरहित हातानेंट फिरविण्याची लहानरवी. ॰रहाट- पु. हातानें ओढून पाणी काढण्याचा लहान रहाट. ॰रिकामी- स्त्री. विधवा स्त्री. -बजलापूर १७४. ॰रिती-वि. (महानु.) रिकामी विधवा. -स्मृतिस्थळ. ॰रुमाल-पु. १ तोंड वगैरे पुसण्याचा लहान रुमाल. २ नित्योपयोगी कागदपत्रें ठेवण्याच्या दप्तराचा रुमाल; चालता रुमाल; त्यांतील कागदपत्रांचें बंडल. ॰रोखा- पु. दस्तक; चिठी; आज्ञापत्र. 'पाराजीपंत वाघ यांस हातरोखा वरचेवर पाठवून अति आग्रहें अंतरवेदींत घालविलें.' -भाव १०२. ॰लाग-पु. हाताचा टप्पा. ॰लागास-लागीं येणें-असणें- कक्षा, आंवाका, आटोका, अवसान इ॰ त येणें, असणें. ॰लागा- लाग्या-वि. अनुकूल असणारा. 'तुमचे हातलागे लोक असतील.' -वाडबाबा १.६. ॰लावणी-स्त्री. १ वेश्येचा चिरा उतरणें; कौमार्यभंग. (क्रि॰ करणें). २ हाताची पेरणी; लागवण. -वि. हातपेरणीचें. ॰लावा-व्या-वि. हाताळ; चोरटा; चोरी करण्या- साठीं हात फुरफुरत असलेला. ॰वजन-न. १ जिन्नस हातांत घेऊन केलेलें वजन. २ अशाप्रकारें वजन काढण्याची लायकी. ॰वटी- हातोटी-स्त्री. १ हस्तकौशल्य; हस्तचातुर्य. २ (सामा.) कसब; नैपुण्य; चलाखी. 'अहो चंद्रकांतु द्रवता कीर होये । परि ते हात- वटी चंद्री कीं आहे ।' -ज्ञा ९.२९. ३ विशिष्ट पद्धत, रीत, प्रकार. [हिं.] भाषणाची-पोहण्याची-व्यापाराची इ॰ हातोटी. ॰वडा- हातोडा-पु. सोनार, कासार इ॰ चें ठोकण्याचें हत्यार. ॰वडी हातोडी-स्त्री. लहान हातोडी. ॰वणी-न. १ हात धुतलेलें पाणी. २ (कों.) हातरहाटाचें पाणी पन्हाळांतून जेथें पडतें तेथील जमीनीचा उंच केलेला भाग; हातणी. ॰वल्हें-न. हातानेंच वल्हवावयाचें लहान वल्हें. ॰वश-वि. हस्तगत. ॰वशी-स्त्री. हात उगारणें. -शर. ॰वळा, हातोळा-पु. हातवटी पहा. म्ह॰ गातां गळा; शिंपता मळा, लिहितां हातवळा. ॰वारे-पु.अव. हातानीं केलेलें हावभाव; हाताची हालचाल. ॰विंड-न. (राजा.) हाता झालणा पहा. ॰विरजण-न. अजमासानें घातलेलें विरजण ॰विरजा-विरंगुळा-वि. कामांत मदत करण्याच्या लायक, लायकीस झालेला (पुत्र, शिष्य, उमेदवार इ॰) [हात + विरजणें] ॰शिंपणें-न. सोडवणी न देतां शेलणें इ॰ साधनानें भाजी- पाल्यास उडवून द्यावयाचें पाणी; असें पाणी शिंपणें. ॰शेकणें-न. (उसाचा चरक) चुलाण्यांत जाळ घालणारास त्याच्या मेहनती बद्दल द्यावयाचा गूळ. ॰शेवई-स्त्री. हातानें वळलेली शेवई; याचे उलट पाटशेवई. ॰सर-न. बायकांचा हातांतील एक दागिना, गजरा. 'हे पाटल्या हातसरांस ल्याली ।' -सारुह ६.२६. ॰सार- वण-न. खराटा, केरसुणी न घेतां हातानें जमीन इ॰ सारवणें. ॰सुख-न. १ दुसर्‍यास, शत्रूस हातानें मारूंन त्यामुळें अनुभवि- लेलें सुख (क्रि॰ होणें). २ हातानें दिलेला मार. ॰सुटका-स्त्री. १ एखाद्या व्यवहारांतून, धंद्यांतून स्वतः अंग काढून घेणें; मोकळें होणें. २ हातविरजा पहा. ३ हाताचा सढळपणा. ॰सुटी-स्त्री. औदार्य. 'हे हातसुटीक्षीरसागरा । वांचौनि नाहीं ।' -भाए ७६९. ॰सुतकी-स्त्री. पाथरवटाचें दगड फोडण्याचें हत्यार. ॰सूत-न. चातीवर हातानीं काढलेलें सूत. ॰सोकी(के)ल-सोका-वि. हाताच्या संवयीचा; अंगाखांद्यावर घेण्यास संवकलेला. 'केल कुत्रा हातसोंका ।' 'घडो नेदि तीर्थयात्रा.' -तुगा २९५४. ॰सोडवण-नस्त्री. हातसुटका अर्थ १,२ पहा. ॰सोरा-र्‍या सुरा-र्‍या-पु. कुरड्या इ॰ करण्याचा सांचा. ॰हालवणी-स्त्री. प्रवाशांवरील एक जुना कर (त्यांच्या हात हालवण्याच्या क्रियेबद्दल हा कर असे). हातचा-वि. १ हातानें दिलेला; स्वाधीनचा; हातांतला; हातानें निर्मिलेली, मिळविलेली, दिलेली (वस्तु, काम, उत्पादन इ॰). 'शुद्राचे हातचें पाणी स्नानसंध्येस घेऊं नये.' 'रोग्यास औषध देणें मनुष्याच्या हातचें आहे-आयुष्य घालणें नाहीं.' २ (अंकगणित) पूर्णांकाची बेरीज करतांना बेरजेच्या संख्येंतला अंक ज्या स्थानाचा त्या स्थानीं मिळविण्याकरितां उरलेला अंक. (क्रि॰ येणें; रहाणें; ठेवणें). ३ लवकर हातीं येणारें; अवसानांतील. ४ ताब्यांतील; कबजांतील. म्ह॰ 'हातचें सोडून पळत्याचे पाठीस लागूं नये.' ॰चा पाडणें-१ हातां- तील सोडणें. २ एखाद्यास त्याचे ताब्यांतील वस्तू्स मुकविणें. ॰चा-धड-नीट-वि. नीटनेटकें काम करणारा (लेखक, कारागीर). ॰चा फोड-पु. फार प्रिय माणूस. तळहाताचा फोड पहा. ॰चा मळ-पु. सहज घडणारी गोष्ट. 'सरळ, सोपी आणि बालिकाबोध भाषा कशी वापरावी हें म्हणजे माझ्या हाताचा मळ आहे.' -कीच. ॰चा सुटा-वि. सढळ हाताचा. हातवा-पु. १ (बायकी) गौरीपूजनाचे सणांत हळदीकुंकवानें हात भिजवून जमिनीवर छाप मारणें. २ लग्नांत नवर्‍याच्या मिरवणुकीच्या मागें धरावयाचा कणकेचा दिवा. ३ घोड्याचा खरारा, साफ करण्याचा काथ्याचा पंजा. ४ काडवात मनको. ५ (कर्‍हाड) न्हाणवली बसवितांना, मखर बांधावयाचे ठिकाणीं, कुंकू पाण्यांत भिजवून हातानें पांच उलटे पांच सुलटे ठसें उठविणें. हातळ, हाताळ-ळु-वि. चोरण्याची संवय असलेला; चोर; भामटा. हातळणें, हाताळणें-उक्रि. १ हात लावणें; चोळ- वटणें; चिवडणें, २ हाताळ माणसानें वस्तू् चोरणें. हातळी, हाताळी, हाताळें-स्त्रीन. १ घोड्याचा काथ्या इ॰ चा खरारा. २ भात्याची बोटांत, हातांत अडकवावयाची चामड्याची वादीं. ३ (कर.) भाकरी. हाता-पु. हातांत राहील इतका जिन्नस, पसा (फळें, फुलें इ॰ पांच-सहा इ॰ संख्येचा संच एकेक वेळ हातांत घेऊन बाजूस ठेवतात). हाताखालचा-वि. १ मदतनीस; हाता- खालीं काम करणारा. २ उत्तम परिचयाचा; माहितींतील. ३ हातां- तील; कबज्यामधील; स्वाधीन. ४ दुय्यम; कमी दर्जाचा. हाता- खालीं-क्रिवि. १ सत्तेखालीं; दुय्यम प्रतींत. २ स्वाधीन. ३ जातांजातां; हातासरशीं; सहजगत्या. 'मी आपला घोडा विका वयास नेतोंच आहे, मर्जीं असली तर हाताखालीं तुमचाहि घोडा नेईन आणि विकीन.' हाताचा उदार, मोकळा, सढळ- वि. देणगी इ॰ देण्यांत सढळ. हाताचा कुशल-वि. हस्त कौशल्यांत निपुण, प्रवीण. हाताचा जड-बळकट-थंड-वि. १ चिक्कू; कृपण. म्ह॰ हाताचा जढ आणि बोलून गोड. २ मंद (लेखक). हाताचा जलद-वि. काम करण्यांत चलाख हाताचा फटकळ-वि. फटाफट मारणारा; मारकट. हाताचा बाण-पु. वर्चस्व, पगडा, वजन पाडणारें कृत्य, गोष्ट (क्रि॰ गमावणें; दवडणें; सोडणें). हाताजोगता-वि. १ हातांत बसेल; मावेल; धरतां येईल असा. २ हात पोहोचण्याजोगें. हाता- निराळा-वेगळा-वि. १ पूर्ण; पुरा; सिद्ध केलेला; पुन्हां हात लावण्याची जरूरी राहिली नाहीं असें (काम, धंदा इ॰). 'हा दुर्निवह कोश एकदां हातानिराळा झाला म्हणजे दुसरें काम घेतां येईल.' २ -क्रिवि. एकीकडे; बाजूस. 'कामापुरती भांडीं वहिवाटींत ठेवा वरकड हातानिराळीं ठेवा.' हातापद्धति-स्त्री. दलाल माल घेणार्‍याच्या हातावर रुमाल टाकून गुप्तरीतीनें मालाची किंमत माल घेणार्‍याकडून अजमावतो ती पद्धत. हाताची थट्टा-स्त्री. थट्टेंनें मारणें (थापटी इ॰); चापट देणें. (तोंडी थट्टा नव्हे्). हाता(तो)फळी-स्त्री. गुद्दागुद्दी; मारामारी; कुस्ती; हातझोंबी; धक्काबुक्की. 'मजसीं भिडे हातोफळी ।' -ह १९.१४३. -क्रिवि. पटकन्; चट्दिशी; तत्काळ; हातावर हात मारून. [हात + फळी] हातावरचा संसार-हातावरचें पोट-पुन. मजुरी, कामधंदा करून स्वतःचें कसेंतरी पोट भरणें (क्रि॰ करणें; चालविणें) थोड्या पगाराची, कष्टाची नोकरी करून उदरनिर्वाह. हातावीती- क्रिवि. हातोहात पहा. 'सर्वज्ञ हातावीती पुढें जाती ।' -पुच. हातासन-न. हातवटी. 'अन्योपदेशाचेनि हातासनें ।' -ज्ञा ६.११९. हातासरसां-क्रिवि. त्याच हातानें, प्रकारानें; तसेंच; त्याच बरोबर; चालू कामांत आहे तोंच. 'उष्टी काढतो आहेस तों हातासरशीं भांडीं घास मग हात धू.' हातिणें-अक्रि. मारणें. -मनको. हातिवा-स्त्री. काडवात. 'उजळोनि दिव्य तेजा हातिवा ।' -ज्ञा १६.२३. हातुवसीया-विय एक हात अंतरा- वरील. 'हातवसिया कळागंगा पार्वती ।' -धवळे ३१ हातोणी- स्त्री. (व.) खरकटें पाणी; हातवणी. हातोपा-हातपा पहा. हातोपात-ती-क्रिवि. एका हातांतून दुसर्‍या हातांत. वरचेवर; हातोहात. -ज्ञा १८.१५६. हातोरी-क्रि. (ना.) हातानें; साहा- य्यानें. हातोवा-पु. (महानु.) अंजली; ओंजळ. 'हातोवा केवि आटे अंभोनिधि ।' -भाए २१७. हातोसा-पु. मदत; हातभांर. (क्रि॰ देणें), हातोहात-ती-क्रिवि. १ हातचेहातीं; हातोपात. २ चटकन्; भरदिशीं. (क्रि॰ येणें = मारामारी करणें). 'हिंवांळ्याचे दिवसांत दुपार हातोहात भरतें.' हातोळा-हात- वळा पहा. हातोळी-स्त्री. (व.) लग्न. हात्या-पु. १ पाणर- हाटाचा दांडा. २ घोडा घासण्याची पिशवी; खरारा. हाताळी अर्थ १ पहा. ३ मागाच्या फणीची मूठ. ४ काहिलींतील गूळ खरवड- ण्याचें खुरपें. ५ (कर.) मोठी किल्ली.

दाते शब्दकोश

इंद्रबाही

स्त्री. दरवाज्याच्या फळीचे दोन बाजूचे दोन व एक मधील असे उभे तुकडे. [सं. इंद्र + बाहु]

दाते शब्दकोश

इंद्रबाही      

स्त्री.       दरवाज्याच्या फळीचे दोन बाजूचे दोन व मधला एक असे उभे तुकडे. [सं. इंद्र+बाहु]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कार्तवीर्य      

पु.       पुराणप्रसिद्ध सहस्त्रार्जुन. याला परशुरामाने मारले. हरवलेली वस्तू याच्या स्मरणाने सापडते असा भाविक लोकांचा समज आहे व त्यासाठी पुढील श्लोक रूढ आहे - ‘कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहु सहस्त्रवान । यस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते ॥’ [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कार्तवीर्य

पु. पुराणप्रसिद्ध अहस्त्रार्जुन. याला परशुरामानें मारलें. हरवलेली वस्तु याच्या नामस्मरणानें सांपडते असा भाविक लोकांचा समज आहे व त्यासाठीं पुढील श्लोक रूढ आहे- 'कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहु सहस्रवान् । यस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते ।।' [सं.]

दाते शब्दकोश

कंपास      

पु.       १. वर्तुळाकृती काढण्याचे, दोन बाहु असलेले साधन; कुशलकामगार व विद्यार्थी यांच्या वापरातील साधन : ‘कोशकारांनी आपला स्वैरक्रम सोडून मर्यादेने वागण्यास सांगणे म्हणजे नदीच्या ओघांवर व पर्वतांच्या रांगावर रूळ व कंपास चालविणे होय.’ - नि. ४९७. २. होकायंत्र : ‘तसेच कितीएक देशातील लोक ह्या यंत्रास (होकायंत्रास) कंपास असे म्हणतात.’ - मपु ८०. [इं. कंपास]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कंपास

पु. १ सुतार, लोहार, चांभार, वगैरे धंदेवाईक हें हत्यार वापरतात. वर्तुळ आकृति काढण्याचें दोन बाहु असलेलें साधन. 'कोशकारांनीं आपला स्वैरक्रम सोडून मर्यादेनें वागण्यास सांगणें म्हणजे नदीच्या ओघांवर व पर्वतांच्या रांगांवर रूळ व कंपास चालविणें होय.' -नि ४९७. २ होकायंत्र. 'तसेंच किती एक देशांतील लोक ह्या यंत्रास (होकायंत्रास) कंपास असें म्हणतात.' -मराठी ६ वें पुस्तक ८०. (सन १८७५). ॰घालणें-मारणें- कंपासानें आंखणें. [इं. काँपस]

दाते शब्दकोश

प्राप्ति-प्ती

स्त्री. १ मिळकत; लाभ; फायदा; नफा. 'जे साम्यापरौति जगीं । प्राप्ति नाहीं । -ज्ञा ६.४१०. २ प्राप्तपणा; प्राप्तस्थिति; सिद्धी; सफलता. ३ येणें; उद्भवणें; प्राप्त होणें; भोगास येणें (सुख, दुःख इ॰). ४ अष्टमहासिद्धीपैकीं एक; सर्व प्राण्यांच्या इंद्रियाशीं त्या त्या इंद्रियाच्या अधिष्ठात्री देवतांच्या रूपानें संबंध घडणें. 'आणिमा महिमा लघिमास्थिती । या तिन्ही देहसिद्धींची प्राप्ती । प्राप्तिरिंद्रिय जे वंदती ।' -एभा १५.४३. ५ प्राज्ञा; सामर्थ्य; छाती; किंमत; बिशात; प्रतिष्ठा; लाग; पाड. 'मजबरोबर बोलायला त्याची काय प्राप्ति?' 'नाहींतरीं काय प्राप्ती मानवाची । कंदर्प हरावया । -जै २२.३४. [सं. प्राप्ति] ॰कर-वि. प्राप्ती करून देणारा; लाभकारक. 'तंव लवि- न्नला डावा डोळा । बाहु स्फुरती वेळोवेळां । हें तेव चिन्हें गे गोपाळा । प्राप्तीकरें पैं होती ।' -एरुस्व ५.७६. ॰पुरुष-पु. ज्याला भगवत्स्वरूपाचा साक्षात्कार झाला आहे असा साधुपुरुष. ॰वरील कर-पु. कामधंद्यांच्या वर, अगर इतर मार्गानें एखाद्या इसमास अगर संस्थेस जें वार्षिक उत्पन्न येतें त्यावर सरकारकडून विशिष्ट प्रमाणांत घेण्यांत येणारा कर. प्राप्त्यंश-पु. लभ्यांश; फायदा; मिळकत; नफा. [सं. प्राप्ति + अंश]

दाते शब्दकोश

प्रगंड

पु. बाहु; हात; प्रकोष्ठ. प्रगंडास्थि-पु. दंडाचें हाड; भुजास्थि; प्रकोष्ठास्थि. [सं. प्रगंड + अस्थि]

दाते शब्दकोश

रट्टा, रेटा

पु. बाहु; हात. [का. रट्टे = हात]

दाते शब्दकोश

सुलेख

वि. सुंदर; रेखीव; सुरेख 'सौंदर्ये चंद्रासारिखें मुख । कमळा पासौनि डोळे सुलेख । आजान बाहु सुरेख । विशाळ वक्षस्थळ ।' -नरुस्व ३२१. [सं. सुरेखा]

दाते शब्दकोश

तिर्यक्

वि. १ आडवा; तिरपा; वांकडा. २ -क्रिवि. तिरकस; उतरता. [सं.] तिर्यक्कोण-पु. काटकोनाखेरीज सर्व सरळ रेषांचा कोन. तिर्यक्योनि-वि. १ पशूपासून अथवा पशुप्रमाणें जन्मलेला. २ राक्षस; पिशाच्च; देव इ॰ (ज्यांची पंचमहाभूतांपासून उत्पत्ति नाहीं असा). [सं.] ॰बाहु-(नृत्य) नृत्यामध्यें खालून वर व वरून खालीं हात नेत असतां हातांची मधली स्थिति.

दाते शब्दकोश

ठोकणें

सक्रि. १ (दांडकें, काठी, हातोडा इ॰ नीं) मारणें; बदडणें; ठोठावणें; आघात करणें. २ हळूच आघात करणें; थोपटणें. ३ करणें; देणें; पाठविणें. 'तो आजारी पडल्याबरोबर म्या तार ठोकली.' (वाप्र.) अघाडी ठोकणें-पहिला येणें; पहिले स्थान किंवा नंबर पटकावणें. आरोळी ठोकणें-ओरडणें; मोठयानें टाहो फोडणें. अर्जी ठोकणें-विनंति करणें; अर्ज करणें. तंबू ठोकणें-तंबू रोवणें, मारणें, देणें, उभारणें. बाहू-दंड ठोकणें-दंडावर आघात (हातानें) करणें; कुस्तीस तयार होणें. 'किंचिच्छेष कुरुकटक भीमें ठोकूनि बाहु भुलवीलें ।' -मोशल्य ४.५. धाव-धूम ठोकणें- पळत सुटणें. पानें ठोकणें-जेवण्याचीं पानें मांडणें. फिर्याद ठोकणें-तक्रारअर्ज गुदरणें. बोंब ठोकणें-बोंब मारणें; शंख ध्वनी करणें. मूद ठोकणें-ओग्राळ्यांतून भाताच्या मुदा पाडणें. ठोकणें या क्रियापदाचे अर्थ मारणें या क्रियापदाप्रमाणें पुष्कळ आहेत. सामान्यतः ठोकणें; ठोठावणें; फटकारणें; सप्पा उडविणें; घाईनें किंवा ओबडधोबड रीतीनें संपविणें. इ॰ अर्थ होतात. जसें- आम्ही वाटेनें चार भाकरी ठोकल्या आणि सरासरी जेवलों; पुष्कळ कामें जमलीं होतीं तीं मी कशीं तरी ठोकून निघून आलों. ठोकून देणें-सक्रि. गप्प मारणें; बात मारणें; बिन विचारानें सांगणें.

दाते शब्दकोश

वाहुटा

पु. (व.) मुलाची हातांतील वाक. [बाहु]

दाते शब्दकोश

वाव(व्हा)ळा; बावसा

पु. बाहुटा; खांदा. [सं. बाहु]

दाते शब्दकोश

सूत्र

न. १ सूत; धागा, तंतु; दोरा. २ कळसूत्री बाहुलीची दोरी, तार, (यावरून) एकाद्या यंत्रांतील किंवा भानगडीच्या धंद्या-उद्योगांतील मख्खी. चावी, किल्ली, युक्ति, संधान, फिरकी; तसेंच त्या रचनेची युक्ति, पूर्वीं करून ठेवलेली योजना; यंत्राच्या कृतीची पद्धत, रीत उ॰ मनसूत्र म्हणजे मनाचा कल, इच्छा, आवड. ३ नियम, कायदा, तत्त्व; सूचना, शिकवण यांची ठरीव पद्धत, ठाराविक रीत. ४ व्याकरण, तर्क इ॰ शास्त्रां- तील नियम, शास्त्राप्रवर्तक आचार्यांनीं त्या त्या शास्त्रावर लिहि- लेले मूलग्रंथ; त्यांतील सुटीं वाक्यें. ५ (कायदा) हुकुमनामा; निर्णायक मत. ६ जानवें. ७ ओळंबा. ८ वात (कापसादिकांची) ९ (ल.) सरळ ओळ; रांग. 'तैसें दिसें सैन्यसूत्र ।' -एरुस्व ६.५५. १० (ल.) मैत्री; संधान. [सं.] ॰जमणें-गट्टी जमणें. सामाशब्द- ॰क-वि. १ बिनचूक; सरळ; सुतामध्यें; निश्चित; बरोबर. २ सरळ; एका रेषेंत, लंबरेषेंत, समपातळींत असलेली (रस्ता, भिंत, काठी, खांब). ३ बरोबर; नियमित; (त्यावरून) नीटनेटका, छानदार. ॰काठी-स्त्री. मागच्या हात्यास लाविलेली किंवा जोडलेली काठी. ॰जंत-पु. एक प्रकारचा बारीक जंताचा किडा. ॰धार-पु. नाटकाध्यक्ष; नाटकासंबंधी माहिती करून देणारें मुख्य पात्र. २ कळसूत्री बाहुल्यांच्या खेळांत, ज्याच्या हातांत बाहु- ल्यांच्या दोर्‍या असतात तो माणूस. ३ मंडळ, समाज, संघ इ॰ चा मुख्य चालक. ॰धारी-पु. सूत्रधार अर्थ २, ३ पहा. ॰प्राय-क्रिवि. थोडक्यांत; संक्षेपानें. सूत्रात्मा-पु. हिरण्यगर्भ. [सं.] सूत्रा-त्री-वि. सूत्रक पहा. शहाणा; तरबेज; चतुर; चलाख, निष्णात; धूर्त; तीक्ष्ण बुद्धीचा. 'व्यासु सहजें सूत्री बळी ।' -ज्ञा १८.३५. [सं.]

दाते शब्दकोश

काख, कांख

स्त्री. १ खांद्याखालील हात व बरगडी यांमधील खोलगट जागा; बगल; खांक. 'काखेसी मेरू घेऊनि देखा । कैसें नृत्य करील पिपीलिका ।' -रावि १.२२. म्ह॰ 'काखेंत कळसा, गांवास वळसा.' 'काखेंत धाकटें महारवाडा शोधी.' २ तंतू; ताणा; पागोरा (कारण हा देंठाच्या काखेंतून फुटतो म्हणून). (क्रि॰ फुटणें). [सं. कक्षा; प्रा. कक्ख; हिं. कांख; गु. बं. उ. काख; सीगन कख] काखा वर करणें-बगलेंत कांहीं नाहीं हें दाखविण्यासाठीं दोन्ही हात वर करणें; दिवाळखोरी प्रसिद्ध करणें; आपण खंक बनलों असें सांगणें; नंगा बनणें. काखा वाजविणें-आनंद प्रदर्शक चेष्टा करणें; आनंदाचे भरांत दंड बगलेवर मारणें; टिर्‍या पिटणें. काखेंतला काढून बाजारांत मांडणें -स्वकपोलकल्पित गोष्ट खरीच आहे म्हणून भर चारचौघांपुढें मांडणें, सांगणें. काखेस मारणें-१ एखाद्याला आश्रय देणें, आपलासा म्हणणें. २ कांहीं पदार्थ घेऊन पळ काढणें, किंवा एखादी वस्तु उपटून पोबारा करणें. ॰बि(भि)लाई-बिल्ली -स्त्री. काखेंत होणारी एक गाठ; बगलबिल्ली; काखमांजरी पहा. ॰भोंवरा -पु. घोड्याच्या पुढील दोन पायां पैकीं कोणत्याहि एका पायाच्या जांघेंत असणारा केंसाचा भोंवरा; हा अशुभकारक समजतात. ॰मांजरी-स्त्री. काखेंतील गळूं; बग- लेंतील पुटकुळी; बाहु, बरगड्या, खांदे व काखा या ठिकाणीं पित्तप्रकोपामुळें वेदनायुक्त व काळ्या फोडांनीं व्यापलेली अशी होणारी एक गांठ. -योर २.४२५. हिला लोणी लावून तें मांजराकडून चाटविलें म्हणजे ही बरी होते अशी समजूत आहे. ॰वाळ -(कु.) चोळीला काखेंत लावण्याची पट्टी; लाग. ॰सावला वि. (वाटेनें जाणार्‍या किंवा जावयास निघालेल्या प्रवाशाप्रमाणें काखेंत सावलें म्हणजे चिरगूट घेतलेला) आळशी; उदासीन; (चालू कामधंद्याविषयीं) काळजी, आस्था, किंवा संबंध न दाखविणारा. (निष्काळजी चाकर, मुलगा किंवा एखाद्या संस्थेच्या सभासदाला हा शब्द निंदाव्यंजकतेनें लावतात.)

दाते शब्दकोश

मंडल-ळ

न. १ वर्तुळ; वलय; घेर; परिघ; चक्र. २ चंद्र, सूर्य इ॰चें बिंब. 'प/?/मंडळ आणि चंद्रमा । दोनी नव्हती सुवर्मा ।' -ज्ञा १४.४०५. ३ प्रांत; क्षेत्र; वीस किंवा चाळीस योजना- पर्यंतचा आसमंतांतील प्रदेश; भोंवतालचा प्रांत. ४ बारा चक्र- वर्ती राजांनी ज्या प्रांतावर राज्य केलें तो प्रांत, राष्ट्र. ५ (यावरून) प्रांत; देश; राज्य. जसें-कुरुमंडल. ६ समुदाय; समूह; सभा; समाज; टोळी. ७ वर्तुळाकार ठिपके असलेले कोड. ८ देवतेची स्थापना करण्यासाठीं काढलेली एक गूढ वर्तुळाकार आकृति. व्रतोद्यापनप्रसंगीं देवतांची स्थापना करण्यासाठीं विशिष्ट रंगानें रंगविलेलीं सर्वतोभद्र, लिंगतोभद्र इं॰मडळें प्रत्येकीं. ९ एक निरुपद्रवी सर्प. १० देवास नैवद्य दाखवितांना पात्राखालीं पाण्याची (चौकोनी, वर्तुळाकार, त्रिकोणी इ॰) काढलेली आकृति. ११ सैन्याची वर्तुळाकार रचना. १२ चुन्याच्या घाणीची वर्तु- ळाकार चाकोरी. १३ बेचाळीस दिवसांचा काल. 'त्यासि एक मंडळ सांग । पठणें करूनि कार्यसिद्धी ।' -व्यं ९४. १४ (समा- सांत) शरीराचा तो तो भाग. जसें-मस्तक-कुच-कर्ण-मंडल. 'तेआं नाभिमंडळा आगाधा । समवेत ब्रह्में पेलिलें दोंदा ।' -ऋ ९०. १५ (कु.) समुद्राच्या तळाशीं असलेले खडक. १६ राज- मंडल. [सं. मंडल] ॰फिरणे-वर्तुळाकार, गोल फिरणें. मंडळावर धरणें-मंडलाकार, वाटोळें फिरविणें (घोडा इ. स.). ॰गति (बाहु)-पु. (नृत्य.) बाहू वर्तुळाकार फिरविणें. ॰देवतास्त्री. अव. १ एखाद्या व्रताच्या आरंभी सर्वतोभद्र, लिंगतोभद्र इत्यादि मंडलांवर पूजिल्या जाणाऱ्या देवता. २ (ल.) राजाच्या बरोबरचे सरदार, प्रधान. ३ राजसभा; दरबार. ४ कोणत्याहि सरदाराचा, थोरमाणसाचा लवाजमा. ॰वत्-क्रिवि. वर्तुळाप्रमाणें; वाटोळा; चक्राकार. ॰वत-न. अनेक पानें चोयांनीं टोंचून जेवणासाठीं केलेलें जेवणाचें पान; पत्रावळ. [मंडळ + पत्र] ॰स्वस्तिक (करण)-न. (नृत्य) ऐंद्र स्थानांत उभें राहणें व हातांचे स्वस्तिक करणें व आपल्या समोर बसलेल्या मनुष्याला अभिमुख दिसतील असे तळहात वर ठेवणें. मंडली-ळी-स्त्री. १ मनुष्यांचा जमाव, समुदाय, संघ. २ (कायदा) एकमेकांशीं भागी- दारी असणाऱ्या माणसांचा समुदाय, मंडळ (इं.) फर्म. ३ स्पर्श केल्याबरोबर वेटोळें करून बसणारा अनेक पायांचा एक किडा, वाणी. ४(ख्रि.) सार्वत्रिक मंडळी; पिता, पुत्र व पवित्र आत्मा असा जो सनातन एकच देव त्याजवर भाव ठेवून स्वतःस ख्रिस्ती म्हण- विणाऱ्या पृथ्वीवरील सर्व लोकांचा संघ. (इं.) एक्लेशिया. 'आणखी मी तुला सांगतों कीं, तूं पेत्र (खडक) आणि या खडकावर मीं. आपली मंडळी रचीन.' -मत्त १६.१८. ४ (ख्रि.) स्थानिक मंडळी; ईश्वरोपासना, शुद्धाचरण व खिस्ताच्या राज्याचा विस्तार हे हेतू पुढें ठेवून विधिपूर्वक स्थापित झालेला व सार्वजनिक उपा- सनेसाठीं नियमितपणें एकत्र जमत असलेला खिस्ती लोकांचा संघ. (इं.) काँग्रिगेशन. ५ (गहूं, बाजरी, भात इ॰) पिकाच्या पेंढ्यांची वर्तुळाकार गंजी. ६ पति किंवा पत्नी परस्परांविषयीं बोलतांना योजितात. मंडली(ळी) क-पु. १ मंडळ, थवा, पथक इ॰ चा नायक. २ मांडलिक. 'उखरडा धाधाविलें । मंड- ळीकु निघालें ।' -शिशु ५०४. मंडलेश्वर-पु. १ सार्वभौम राजा. २ मांडलिक राजा. [मंडल + ईश्वर]

दाते शब्दकोश

पृष्ट-ष्ठ

न. १ मनुष्यादिकांची पाठ 'कूर्मरूप हो वनमाळी पृष्ठीं धरिली मोदिनी ।' -दशावतारांची भूपाळी पृ. ८. २ मागची बाजू; पाठीमागचा भाग; पिछाडी. ३ कागदाचीं दोन अंगें प्रत्येकीं; पुस्तकाचें पान. ४ पदार्थाची वरची बाजू. ५ (ज्यो. पदार्थ) (गोल इ॰ ची) बाहेरची पातळी. -सूर्य ८. ६ (महत्त्वमापन) जिला फक्त लांबी व रुंदी जाहेत अशी पातळी. (इं.) सर्फेस. ७ (कों.) बसण्याचा लहान पाट. [सं.] सामा शब्द- ॰केंद्र-न. वर्तुळाचा आंस, कणा, ध्रुव. [सं.] ॰केंद्रग- वृत्त-न. एका वर्तुळाच्या ध्रुवांतून जाणारें दुसरें वर्तुळ; गौणवर्तुळ. पृष्ठतोनुपृष्ठ-क्रिवि. १ एका मागून एक; पाठोपाठ; एकाच्या पुढें दुसऱ्याची पाठ येईल अशा तऱ्हेनें (चालत असलेला समाज इ॰ ). २ लागोपाठ; अनुक्रमें. [पृष्ठ + अनु + पृष्ठ] पृष्ठदेश-पु. १ घोडयाचा मध्यभाग आणि कंबरेपासून खुरापर्यंत पश्चिम भाग. -अश्वप १.६४. २ पृष्ठभाग पहा. ॰फल-ळ-न. (महत्त्वमापन) कोण त्याहि घनाकृतीची मर्यादा दाखविणाऱ्या सर्व पृष्ठांच्या क्षेत्र फळांची बेरीज; भरीव पदार्थांच्या वरील भागाचें क्षेत्रफळ. 'परि- घाला व्यासानें गुणिलें असतां गोलाचें पृष्ठफळ निघतें.' -मराठी ६ वें पुस्तक, पृ ३२८. ॰भाग-पु. १ पृष्ठ; पाठ. २ सपाटी; पातळी; सपाटीवरचा भाग. (इं.) सर्फेस. ३ (स्थापत्य) मागली उभारणी. (इं.) बँक् एलेव्हेशन. ॰मात्रा-स्त्री. (के, कै, को, कौ प्रमाणें) अक्षराच्या डोक्यावर न देतां पाठीमागें दिलेली मात्रा. बंगालीप्रमाणें जसें:-सैंधव, कपोत याजबद्दल सधव, क पा त. अशा पृष्ठमात्रा जुन्या कागद पत्रांतून उपयोजीत असत. ॰मैथुन-न. गुदमैथुन; अनैसर्गिक संभोग, बच्चेबाजी. ॰वंश- पु. (शाप.) पाठीचा कणा; मणिस्तंभ. (इं.) स्पाइन, बँकबोन. ॰वंशी-वंशीय-वि. कणा, हाडें इ॰ असलेला (प्राणी). (इं.) व्हेर्टेब्रेट.- प्राणिमो ११. प्राण्यांचे दोन वर्ग आहेत, एकाला पाठीचा कणा असतो तर दुसऱ्याला नसतो. ॰वंशहीन-वि. पाठीचा कणा नसलेला (प्राणिवर्ग). (इं.) इन्व्हर्टेब्रेट. ॰वंशाधर-न. १ शेवटचा कटिमणि; कटिकशेरुका. २ शेवटचा कटिमणि व माकडहाडाच्या वरच्या बाजूचें त्रिकोणाकृति हाड यांमधील प्रदेश. ॰स्वस्तिक-न. (नृत्य.) हात सारखे वेडेवांकडे फेकणें व हात फेकतां फेकतां त्यांचें स्वस्तिक करणें. तसेंच पायांनीं अपक्रांत- आकाशचारी करून अर्धसूचीकरणाप्रमाणें पाठीमागचे बाजूस पायांचे स्वस्तिक करणें. पृष्ठाकृति-स्त्री. (महत्त्वमापन) एक किंवा अनेक रेषांनीं सर्वांगाकडून मर्यादिलेली पातळी. [पृष्ठ + आकृति] पृष्ठांत- पु. पाठीचा खालचा भाग. 'उचलेलें कां नेणिजे । तैसें पृष्ठांत उचलेजे ।' -ज्ञा ६.१९७.[पृष्ठ + अंत] पृष्ठानुसारी(बाहु)- पु. (नृत्य.) बाहू पाठीकडे नेणें.

दाते शब्दकोश

ऊर्ध्व

पु. १ मारण्यापूर्वीं लागलेला श्वास; घरघर. २ एक रोग; श्वास; दमा; छाती भरून येणें. ३ खस्वस्तिक. [सं.] ॰गति-वि. उंच जाणारा, उडणारा. ॰जानु (आकाशीचारी)-(नृत्य.) एक पाय आकुंचित करून गुढघा वक्षस्थळाइतका उंच करणें व दुसरा पाय तसाच ठेवणें. ॰जानु करण-न. (नृत्य) उजवा पाय कुंचित करून गुडघा उंच करणें, डावा हात वक्षस्थळावर व उजवा हात उजव्या पायाप्रमाणें कुंचित करून वर उचलणें. ॰दृष्टि-वि. वर किंवा आकाशाकडे, वरच्या दिशेकडे नजर लावलेला (माणूस); वरडोळ्या; दूर दृष्टीचा; उदात्त हेतूचा; गर्विष्ठ; महत्त्वाकांक्षी; थोर मनाचा. -स्त्री. १ आकाशाकडे असलेली नजर. २ (ल.) कपट; महत्त्वाकांक्षा; अभिमान; उच्च हेतु. ॰देह-पु. मरणोत्तर आत्म्याला प्राप्त होणारा देह. ॰देहिक-न. उत्तरक्रिया. और्ध्वदेहिक पहा. ॰नाडी-स्त्री. वर जाणारी नाडी; सुषुम्ना. इडा पहा. ॰पंथ-पु. (काव्य) वरचा मार्ग; वरची दिशा; स्वर्गास किंवा आकाशांत जाण्याचा रस्ता. 'जों जों वाढे पर्वत । मैनाक नामें अद्भुत । तों ऊर्ध्वपंथ आडवा येत । हनुमंतासी ते काळीं ।।' ॰पातन-न. पाणी अथवा इतर द्रव पदार्थ यांची आंच लावून वाफ करणें व त्या वाफेचें पुन्हां द्रवपदार्थांत रूपांतर करणें, या सर्व क्रियेस उर्ध्वपातन क्रिया म्हणतात. (इं.) डिस्टिलेशन. ह्या क्रियेनें पदार्थाचा अर्क काढणें. ॰पान-न. (सांकेतिक) दारू पिणें अथवा मादक पदार्थ सेवन करणें. ॰पुंड्र-पु. कपाळीं लाविलेला चंदनाचा उभा टिळा; उभें गंध. 'ऊर्ध्वपुंड्र भाळ । कंठीं शोभे माळ । कांपिजे कळिकाळ तया भेणें ।।' -तुगा २२१४. ॰बाहु-पु. सतत वर हात ठेवणार्‍या बैराग्यांचा एक पंथ. ॰मस्तक-न. डोक्यावरची कवटी. ॰मुखी- गोम-स्त्री. (घोड्याच्या अंगावरील) गोमेसारखा केसांच्या अग्रांचा वर वळलेला झुबका. हा अशुभकारक समजतात; याच्या उलट अधो- मुखी गोम. ॰मूळ-वि. वर मुळें असलेला; उलटा १ (ल.) देह; शरीर. २ प्रपंच जगत्. ॰मंडल-न. (नृत्य) दोन्ही हात वर करून वाटोळें फिरणें. ॰रेखा-षा-स्त्री. १ तळहातावरील किंवा तळ- पायावरील वर जाणारी सरळ रेघ. 'ऊर्ध्वरेषा पाया असली म्हणजे राज्य किंवा तीर्थयात्रा.' २ (गणित) लंब रेषा; उभी रेषा. ॰रेतस्क- रेता-पु. हनुमान, भीष्म इ॰ चिराब्रह्मचारी. -वि. नैष्ठिक; आमरण ब्रह्म- चारी; ज्याचा कधींहि वीर्यपात होत नाहीं असा. 'तेथ वसती सन- कादिक । ऊर्ध्वरेते देख महायोगी ।' -एभा २४.२१७. 'तो राघवप्रिय विरक्त । ऊर्वरेतस्क वज्रदेही ।।' 'ऊर्ध्वरेत मुनीश्वरांसी ।' -गुच १३.६९. ॰लोक-पु. १ स्वर्ग; इंद्रलोक. २ स्वर्गांतील अनेक लोक (चंद्रलोक, ब्रह्मलोक इ॰). ॰वात-वायु-ऊर्ध्व अर्थ १ व २ पहा. ॰वाट-स्त्री. स्वर्गाची वाट; ऊर्ध्वपंथ. 'प्राणाशीं दुजा- यींच्या दाउन ऊर्ध्ववाट माघारे फिरती ।' -ऐपो २६९. ॰स्वस्तिक- न. खस्वस्तिक. ॰संस्थ (बाहु)-(नृत्य) पाहणाराच्या मुखा- आड न येतां, लोंबत सोडलेले बाहू वर नेणें.

दाते शब्दकोश