आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
बेचिराख or ग
बेचिराख or ग bēcirākha or ga a ( P Lampless.) Desolate, untenanted, uninhabited.
बे-चिराख; बे-चिराग
[फा. बी-चिराघ्] दीपहीन; ओसाड; उध्वस्त. “पेण्डारी जयपूरवाल्याचे प्रान्तांत कज़ाकी करून मुलूख बे-चिराग करितात” (दिमरा २|१५६).
संबंधित शब्द
आफ्तर
वि. उजाड; बेचिराख; नष्ट. [अर. अबतर]
आफ्तर
वि. उजाड; बेचिराख; नष्ट. [अर. अबतर]
देश
पु. १. प्रांत; प्रदेश; भाषाभेदाने भिन्न झालेला प्रांत. २. जागा; स्थान. ३. योग्य स्थान; सभोवतीची परिस्थिती, भूमी. ४. सह्याद्री, बालाघाट, कर्नाटक व गोदावरी नदी यांमधील प्रदेश. ५. (ज्यो.) औरस चौरस १०० योजनांनी व्याप्त भूभाग. ६. परिसीमायुक्त भूमिभाग. उदा.देश (महाराष्ट्र, कर्नाटक इ.); प्रांत (पुणे, वार्इप्रांत इ.). [सं.] (वा.) देश घेणे, आपला देश घेणे – आपल्या स्वतःच्या कामात लक्ष घालणे. देशाचा पाटा वरंवटा होणे – बेचिराख, ओसाड होणे, करणे. देशी जाणे – स्वदेशी जाणे.
दग्धभू
स्त्री. घरफुंकी. (इं.) स्कॉर्च्ड अर्थ. दग्धभूचें धोरण-शत्रूस संकटांत घालण्याकरितां स्वतःचा देश जाळून पोळून बेचिराख करणें. 'दग्धभूचें दुधारी शस्त्र वापरूं नका.' -दैका १४.३.१९४२.
दिवा
पु. १. दीप; तेल व वात यांच्या साहाय्याने प्रकाश देणारे साधन. वीज, धूर यांच्या साहाय्याने प्रकाश देणारे साधन. २. पहा : दिवली १. ३. लग्नविधीत लावायचा कणकेचा केलेला दिवा. ४. वैशाख महिन्यातील अश्विनी इ. पाच नक्षत्रांनी युक्त असे दिवस (दिवे-पंचक). ५. पहा : दिवसे. ६. (ल.) मूर्ख; अज्ञानी. ७. (ल.) सूर्य. [सं. दीप] (वा.) दिवा न लागणे - बेचिराख, उजाड होणे (प्रांत, गाव). दिवालावणे - (उप.) वाईट कृत्यांनी प्रसिद्धीला येणे; अपकीर्ती होणे. दिवा सरसा करणे - वात पुढे करणे, तिचा कोळी झाडणे. दिवे ओवाळणे - (उप.) कुचकिमतीचा, क्षुद्र लेखणे; तिरस्कार दाखविणे. दिव्याने दिवस काढणे,
गैरआबादी
वि. उजाड; बेचिराख.
नाबूद
क्रिवि. १ नष्ट झालेला; बेचिराख झालेला; बुडालेला; बेपत्ता झालेला; नाहींसा झालेला; नष्टप्राय. (क्रि॰ जाणें; बुडणें; होणें; मरणें इ॰). 'रयत शाबूद तर त्यांत आमचें कल्याण ती नाबूद झाल्यास आमची हक्कदारी आम्ही कोठें पहावी?' -भा जुऐगो २५. 'नजीबखानास नाबूद करावें हे मसलत त्यांनीं केली.' -मदबा १.६९. २ पूर्णपणें; साफ. 'गांवीं टोळ येऊन शेतें नाबूद खाऊन नासाडी जाहली.' -सासंइ, जुले ९४. ३ (क्व.) अपूर्व; न भूतो न भविष्यति. [फा. न + बुद् किंवा नाबरद् = नसलेला]
नाबूद
क्रिवि. १. नष्ट, बेचिराख, नाहीसा, बेपत्ता झालेला; बुडालेला : ‘नजीबखानास नाबूद करावें हे मसलत त्यांनी केली.’ – मदबा १·६९. २. पूर्णपणे; साफ : ‘गांवीं टोळ येऊन शेतें नाबूद खाऊन नासाडी जाहली.’ — सासंइ, जुलै ९४. ३. (क्व.) अपूर्व; न भूतो न भविष्यति. [फा. न+बूद, नाबरद्]
नावनट
वि. क्रिवि. पूर्णपणे नष्ट, बेचिराख झालेला; थांग, पत्ता, माग, खूण, अवशेष नसलेला.
नि(नी)ज
स्त्री. झोंप. 'तदुक्तिस जन प्रभो जरि निजेमधें चावळे ।' -केका ७३. [सं. निद्रा] निजगळ-वि. (ना.) झोंपाळू. निजतीक्रिया-स्त्री. प्रेत निजल्या स्थितींत पुरणें. -बदलापूर १७२. निजणें-अक्रि. १ झोंप घेणें; झोंपणें. 'टपकण निज. महार- पोर रात्र शिळी करतील.' (लहान मुलाला लवकर निजविण्या- साठीं म्हणतात). २ आडवें होणें; कलणें; लोळणें. ३ आजारी पडणें; हांतरुणाला खिळणें. ४ (ल.) मरणें. ५ नाश पावणें; बुडणें; नाहींसा होणें. (धंद्यांतील भांडवल, धंदा, व्यापार इ॰). ६ भर- भराटीस न येणें (दैव); मंद चालणें (कामधंदा); नाहींसा होणें (हुकमत, अधिकार); बेचिराख, उजाड होणें (घर, गांव). ७ संभोग करणें. निजलेला मेल्यासारखा-मृतवत निजलेला व मेलेला सारखाच. निजल्या जागीं विकणें-कारवाईनें आपलें काम साधणें; बोटावर नाचविणें. निजून उठणें, उठत असणें(पहांटेस, लवकर)-प्रातःकाळीं झोंपेंतून उठणें किंवा उठ- ण्याची संवय असणें. सावकाश निजणें-शांतपणानें झोंप घेणें; बेफिकीरपणें झोंपणें. निजविणें-सक्रि. झोंपविणें; दुसर्याला झोंपू देणें आडवें पसरविणें; निजावयास लावणें. निजसुरा-वि. अर्धवट झोंपलेला अर्धवट जागा; असावध. 'जेणें देहात्मवादी निजसुरा ।' -यथादी १.३८२. निजानीज-स्त्री. सामान्यपणें निजणें; सर्वत्रांचें निजणें; शांतता; सामसूम. निजायाबसायाजोगी-वि. (बायकी) घरकाम करण्यास योग्य झालेली, वयांत आलेली (स्त्री). निजाळू-वि. झोंपाळू; फार, नेहमीं झोंप घेणारा. निजेला-वि. निजलेला; झोंपलेला (माणूस). 'निजेल्यामधें पुछ्य तें लोळताहे ।' -राक १.३३. 'त्यांतील एक कलहंस तटीं निजेला ।' -र ९.
निजणे
अक्रि. १. झोप घेणे; झोपणे. २. आडवे होणे; कलणे; लोळणे. ३. आजारी पडणे; अंथरुणाला खिळणे. ४. (ल.) मरणे. ५. नाश पावणे; बुडणे; नाहीसा होणे (धंद्यातील भांडवल, धंदा, व्यापार इ.). ६. भरभराटीला न येणे (दैव); मंद चालणे (कामधंदा); नाहीसा होणे (हुकमत, अधिकार); बेचिराख, उजाड होणे (घर, गाव). ७. संभोग करणे. [सं. निद्रा] (वा.) निजल्या जागी विकणे–कारवाईने आपले काम साधणे.
शून्य
न. १ अभाव; साहित्य; नास्तित्व; रिक्तता; पोकळी. २ संख्येचा अभाव दाखविणारें चिन्ह; पूज्य. ३ अनुस्वार, विसर्ग दर्शक चिन्ह. ४ आकाश; अवकाश; पोकळी. ५ (वेदांत) निराकार ब्रह्म. 'आपुलिया साटोवाटीं । शून्य घेती उठाउठी ।' -ज्ञा १२. ५८. -वि. अभावात्मक; रिक्त; रिकामें; खाली; विरहित. (समा- सांत) द्रव्य-ज्ञान-युक्ति-अर्थ-जल-शक्ति-वृक्ष-पुष्प-पर्ण-शून्य. २ नग्न; उघड; निर्वस्त्र; पात्रादि विरहित; वस्तुविरहित; पोकळ; उघडेबोडकें. ३ उजाड; निर्जन; सुनें; बेचिराख. (समासांत) शून्य- मंदिर-गृह-प्रांत-स्थल. 'धावोनि ये उटज केवळ शून्य पाहे ।' मोरामायण १.४२५. ४ बधिर; चेतनारहित; संज्ञाविरहित. 'तो आपल्या शोकावेगानें इतका शून्यचित्त झाला होता...'-मोयचा- बाजार. (वाप्र.) शून्यस्थानीं पडणें-निष्फळ, निरर्थक होणें; वाऱ्यावर जाणें. 'परि जेवणार ते रोगिष्ट. तरि ते सुगरिणीचे कष्ट । शून्यस्थानीं पडियेलें ।' [सं. शुन् = जाणें] सामाशब्द ॰ख्याति- स्त्री. ख्याति पहा. ॰दृष्टि-स्त्री. १ निर्विकार, चेतनारहित दृष्टि. 'तिच्याकडे तो शून्यदृष्टीनें पहात बसला.' -मायेचा बाजार. २ (नृत्य) एक अभिनय. डोळ्यांतील बुबुळें स्तब्ध व एका रेषेत ठेवणें, पापण्या निश्चळ दाखविणें. हा चिन्तादर्शक आहे. ॰देह-वि. बधिर, चेतनारहित अंग झालेला. विशिष्ट रोगानें पीडिलेला. ॰परि- कर्माष्टक-न. (गणित) शून्यासंबंधीं बेरीज, वजाबाकी, गुणा- कारादि आठ क्रिया. परिकर्माष्टक पहा. ॰मंदिर-न. मूर्ति विरहित देऊळ; मशीद 'श्री शाळिग्रामशिळा यवनाचे शून्य मंदिरीं पडली ।' -स्फुटआर्या. ॰मस्तक-की-वि. ज्याचे तीन किंवा चार पाय पांढरे असून डोक्यावर (किंवा कानाजवळ) भोंवरा वगैरे कोण- तेंहि चिन्हे नसतें असा (घोडा). -अश्वप १.९७. ॰लब्धी-स्त्री. १ भाज्यापेक्षां भाजक मोठा असल्यास भागाकार शून्य येतो ती. २ (अर्वाचीन) अत्यंत सूक्ष्म संख्यांचें गणित. 'शून्यलब्धी पर्यंत माराकूट करून मजल मारा.' -नि १०३०. ॰लिंग-न. निराकार परमात्म्याचें, ब्रह्माचें, चिन्ह खूण. 'जे शून्यलिंगाची पिंडी । जे परमात्मयाची करंडी ।' -ज्ञा ६.२७३. ॰वाद- पु. जग हें केवळ अभावात्मक आहे, म्हणजे कांहीं नाहीं म्हणजेच ब्रह्म असें मत. ॰वादी-पु. शून्य वादाचा पुरस्कर्ता. ॰वेला-वेळ-स्त्री. (ज्योति) मध्यान्ह, मध्यरात्र, व संध्या- काळ या वेळांस संज्ञा. कारण यावेळीं केलेलीं कृत्यें निष्फळ होतात. ॰शेज-सेज-स्त्री. माया. ॰सिद्धान्त-पु. पदार्थ- मात्र नाशिवंत म्हणून नाहींतच व ब्रह्महि असतें तर प्रत्ययास येतें, ज्या अर्थीं प्रत्ययास येत नाहीं व जें नाहीं तेंच ब्रह्म हा सिद्धान्त. शून्यवाद पहा. ॰हृदय-वि. १ संज्ञा, जाणीव नाहींशी झालेला २ निष्ठुर; क्रूर; (मृदु) भावना नाहींशा झालेला; अन्तःकरण नसलेला. ३ मन, इच्छा, वासना नष्ट झालेला; वासनांच्या पलीकडे गेलेला; अतींद्रिय. शून्याकार- वि. १ अभावरूप; ओसाड; निर्जन; उध्वस्त; शून्यरूप. २ स्थलकालादि मर्यादा नसलेलाच निराकार; सर्वव्यापी, (प्रस- रणशीलतेनें); सर्वनाशी (आवरणशीलतेनें) (ब्रह्म). शून्या- कृति-वि. अक्रिय; नाकर्ता. 'लॉर्ड लान्सडौनसारखे शून्याकृति व्हाइसरॉय आले कीं... निरर्गल यजमान आमचे डोक्यावर बस- तात.' -टिले १.१.२८६. शून्यतुल्य-वि. निरुपयोगी; निर्माल्य- वत्' शून्यालय-न. मशीद-(कर्वेयांचे) आत्मवृत्त १४.
ताराज
पु. मारलूट; जाळपोळ. -वि. उध्वस्त; ओसाड; बेचिराख. 'मुलूख राहिला, तोही ताराज करून मोगल अन्नास महाग होत ऐसैच केलें जाईल.' -इमं २००. [फा. ताराज्] ताराजी-स्त्री. १ मारलूट; जाळपोळ; नाश; विध्वंस. 'त्या संस्थानची ताराजी केली.' -चित्रगुप्त ८. २ खराबी. 'रुद्रवरम् येथें जमियत पोहोंचून ताराजी मांडिली.' -रा ५.१२२. [फा. ताराज्]
तलफ
वि. उद्ध्वस्त; बेचिराख; ओसाड : ‘मुऱ्हारी जगदेवराव सुभा येऊन पुणे जाळून लुटून तलफ केलें.’ – इमं ५६. [अर.तलफ्]
तलफ
वि. उध्वस्त; बेचिराख; ओसाड. 'मुर्हारी जग- देवराव सुभा येऊन पुणें जाळून लुटून तलफ केलें.' -इमं ५६. -पेदसमा २१६. [अर. तलफ्]
देश
पु. १ प्रांत; प्रदेश; भाषाभेदानें भिन्न झालेला प्रांत. 'देशा- सारखा वेष.' २ जागा; स्थान. 'वृक्षाचे मूळदेशीं सेचन केलें म्हणजे अग्रदेशींहि टवटवी येते.' ३ योग्य स्थान; सभोवतीची परिस्थिति, भूमि. 'देश काल पाहून काम करावें.' ४ सह्याद्री, बालाघाट, कर्नाटक व गोदावरी नदी यांमधील देश. ५ (ज्योतिष) औरस चौरस १०० योजनें यांनीं व्याप्त असा भूभाग. ६ परिसीमायुक्त भूमिभाग. जसें:- देश (महाराष्ट्र, कर्नाटक देश इ॰); प्रांत (पुणें, वाई प्रांत इ॰). या- खेरीज सुभा, परगणा, तालुका, जिल्हा, महाल, कसबा, पेटा, पुठा, मौजा, संमत, तरफ, टप्पा, मजरा, मुजरी इ॰ आणखीहि भूमिभाग आहेत. यांची माहिती त्या त्या शब्दाखालीं पाहणें. [सं. दिश् = दाखविणें. तुल॰ झें. दिश्; ग्री. देइक्नुमि; लॅ. दिकेरे; गॉं. तैहन; प्रा. ज. झीग्ऑन; लिथु. झेन्क्लास = खूण; आर्मे. लेशी; लेशवाव (गांव)] (वाप्र.) ॰घेणें, आपला देश घेणें-आपल्या स्वतःच्या कामांत लक्ष घालणें. देशाचा पाटा वरवंटा होणें- बेचिराख, ओसाड करणें. देशीं जाणें-स्वदेशास जाणें. (सामा- शब्द) ॰कार-पु. एक राग. या रागांत षड्ज, तीव्र ऋषभ, तीव्र गांधार, पंचम, तीव्र धैवत हे स्वर लागतात. जाति औडुव-औडुव. वादी धैवत. संवादी गांधार. गानसमय दिवसाचा पहिला प्रहर. -वि. (गो.) देशावरचा. ॰कारण-न. देशभक्ति; राजकारण. ॰कालवस्तुपरिच्छेदरहित-वि. काळ, स्थळ इ॰ वस्तूनें अनिश्चयात्मक अथवा अनिर्ववनीय म्हणजे सर्वव्यापी, शाश्वत, अशरीर असें ब्रह्म, आत्मा, ईश्वर इ॰ ॰कुळकरण-न. देशकुळ- कर्ण्याचें काम. ॰कुळकरणी-पु. देशपांड्या; महालांतील प्रत्येक गांवच्या कुळकर्ण्यावरील मुख्य वतनदार कुलकर्णी. याचें काम कुळ- कर्ण्याचा व खोतांचा हिशेब तपासण्याचें असतें. ॰चौगुला-पु. देशमुखाच्या हाताखालील अधिकारी. ॰ठक-वि. अट्टल सोदा; महाठक. ॰त्याग-पु. १ देशांतर. २ हद्दपारी. ॰द्रोह-पु. स्वदेशाचा विश्वासघात. ॰द्रोही-वि. देशद्रोह करणारा. ॰धडी-धडीस- क्रिवि. देशोदेशीं भीक मागत फिरण्याची स्थिति. 'नाना हव्या- सांची जोडी । तृष्णा करी देशधडी ।' -तुगा ३५५. ॰धर्म-पु. १ देशाचा धर्म. २ स्थानिक आचारविचार, चालरीत. ॰पांड्या- डे-पु. देशकुळकर्णी पहा. ॰परिच्छेद रहित-वि. (ब्रह्माचें विशेषण) देश, काळ इ॰ मर्यादेच्या बाहेरचा. ॰भक्त-वि. देशाची सेवा करणारा. ॰भाषा-स्त्री. देशाची भाषा. बोलण्याची, लोकभाषा. ॰भाषाज्ञान-न. अनेक भाषांचें ज्ञान. ॰भ्रमण- न. निरनिराळ्या देशांत फिरणें; मुशाफरी; पर्यटण; प्रवास. ॰मर्यादा-स्त्री. १ देशांतील आचारविचार; संप्रदाय; नियम; पद्धति. २ देशाची सीमा. ॰मूख-पु. १ परगण्याचा वतनदार अधिकारी. हा परगण्यांतील सर्व पाटलांवरील मुख्य असतो. २ (विनोदानें) सोनाराचें कांकता नामक हत्यार. ३ (ल.) हुलगा. (कारण यास देशांत फार चाहतात). ४ वतल (ओतल) मधून पाणी काढण्याचें मडकें. ५ (विनोदानें) पिकदाणीसारखा उपयोग करण्याचें मडकें. ६ (व.) लग्नांत आणलेलें मडकें. ॰मुखी-स्त्री. १ देशमुखाचें काम किंवा अधिकार. २ महालांतील नक्त जमा- बंदीवर शेंकडा सात आणि धान्यावर शेंकडा तीन असा कर. ॰मुखीण-स्त्री. १ देशमुखाची बायको. २ (व.) वाकळ; गोधडी. ॰लेखक-पु. देशकुळकरणी पहा. ॰वटा-पु. हद्दपारी; देशत्याग. 'मोक्ष तो पाहातसे वास । रिद्धिसिद्धि देशवटा त्रास ।' -तुगा ७२७. ॰वर-वर(ऊर)करी-देशावर-वरकरी पहा. ॰वही-स्त्री. लोकांच्या नांवांची यादी, चोपडी. 'काळाची देश- वही । वाचितां माझे नांव नाहीं.' -भाए १५१. ॰वळू-वि. देशी; खेडवळ. ॰व्यवहार-पु. देशधर्म पहा. ॰साया, शाया-वि. माळवी; सोरठी. 'आणिके देशशाया सांगडी । कोसी कनकवर्णी ।' -दाव २८१. ॰सेविका-वि. १ देशाची सेवा करणारी (स्त्री.). २ स्वयंसेविका. ॰स्थ-वि. १ ब्राह्मणांतील एक पोटजात. २ देशांत राहणारा. ॰स्थी-वि. देशस्थासंबंधीं (व्यवहार इ॰). देशाउर- देशावर पहा. 'तो देशाउरें निघाला ।' -पंच १.३९. देशाचार-पु. देशधर्म पहा; शास्त्रप्रमाण नसतांहि एखादे देशामध्यें शिष्टपरंपरेने चालत असलेला आचार. देशाटन-न. देशभ्रमण पहा. 'केल्यानें देशाटन पंडितमैत्री सभेंत संचार' देशांतर-न. १ परदेश; दुसरा देश; (धर्मसंबंधीं बाबींत) साठ योजनें दूर असणारा अथवा नदी-पर्वतानें तुटक झालेला असा देश. हा परका समजला जातो. २ याम्योत्तरवृत्तापासून पूर्वेकडील अथवा पश्चिमेकडील अंतर. देशांतरीं जाणें, देशांतर करणें-प्रवास करणें देशाधडी- धडीस-देशधडी पहा. देशाभिमान-पु. देशाचा अभिमान; स्वराष्ट्राविषयीं तळमळ, प्रेम, जिव्हाळा. 'खरा देशाभिमान म्हणजे आपल्या देशांतील लोकांचीं निकृष्टावस्थेचीं कारणें शोधून तन्निवार- णार्थ उद्योग करणें. -टिसू १०७. देशावर-पु. १ देशोदेशीं भीक मागत फिरणें.' २ -न. अशा रीतीनें मिळविलेली भिक्षा. ३ पर- देश; परदेशी व्यापाराचा, पेठेचा गांव. ४ परदेशी, आयात माल. ५ परदेशाच्या व्यापारी, किंमतीसंबंधीं बातम्या. देशावरास-देशा- वरीं जाणें-१ देशपर्यटन करणें. २ देशोदेशीं भिक्षा मागत फिरणें. देशावरकरी-कर-पु. देशोदेशीं भिक्षाटण करणारा माणूस. देशाळू-वि. (व.) देशावरचा; मोठया शहरांतील. देशिक-पु. १ प्रवासी; मुशाफर; परदेशांत फिरणारा. २ आत्मज्ञानोपदेशक सद्गुरु. ३ समूह; थवा. 'ऐसां कव्हणी नाहीं अभिचरिकू । जो होमीं कोंकिळांचां देशिकू ।' -शिशु ८४३. देशी-वि. १ घाटावरील देशासंबंधीं. २ (समासांत) त्या त्या देशासंबंधीं. जसें:- पुणेदेशी; एतद्देशी इ॰ २ मराठी भाषा; देशांतील भाषा. 'देशियेचेनि नागर पणें ।' -ज्ञा १०.४२. ११.३ देशीकार-वि. मराठी भाषेच्या आकाराचें; मराठी भाषेमध्यें रचलेलें बनविलेलें. 'केलें ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणें । -ज्ञा १०.१८०५. [देशी + आकार] देशी- ताल-ताल पहा. देशीय-वि. देशी अर्थ १२ पहा. देशी- संगीत-न. निरनिराळ्या देशांतील लोकांच्या अभिरुचीप्रमाणें प्रचलित असलेलें संगीत. गान पहा. देशोधडी-धडीस-देस- धडी, धडीस-क्रिवि. देशधडी पहा.
गैर
अ. निराळेपणा, भिन्नपणा दाखविणारा परंतु सामा- न्यतः अभाव किंवा अन्यथाभावदर्शक अरबी अव्ययशब्द किंवा प्रत्यय. याचा मनसोक्त (विशेषतः हिंदुस्थानी शब्दांबरोबर) उपयोग करितात. या शब्दाचें पुढील कांहीं अर्थ होतात- १ इतर; अन्य. 'गैर पथकें येऊन मोर्चेबंदी केली आहे.' -रा १२.१२५. २ अयोग्य; अन्यायाचा. 'हें तुम्हीं गैर केलें' -मदरु १.१०६. ३ (नामाच्या किंवा विशेषणाच्या प्रारंभीं जोडल्यास) अवास्त- विक, उलट; विपरीत. ४ विना; वांचून. 'गैर अन्याय मला गांजतो.' 'गैर अपराध दंड घेऊं नये.' [अर. घैर = निराळा, व्यतिरिक्त] (वाप्र.) ॰अदबी-स्त्री. असभ्यता; अपमान; अनादर. 'गैर अदबी बोलला सबब पातशाहा यास राग येऊन डोळे काढिले.' -मदरु २.७०. ॰अदा-वि. रद्द; न पटलेलें. 'शिंदे कडील वरात आली तर मग गैरअदाही व्हावयाची नाहीं.' -ख १०. ५२.७९. ॰अब्रू स्त्री. अप्रतिष्ठा. 'गैर-अब्रू फारशी न करणें.' -वाडबाबा २.७५. ॰अमली-वि. परस्वाधीन; दुसर्याचें. 'चार लक्षाचे भरतीस अमली महालांपैकीं बेरीज कमी आल्यास गैर- अमली महाल आहेत त्यांपैकीं भरतीस कमाल आकाराचे बेर- जेचा महाल लावून देणें.' -रा १०.३२१. ॰आबादी-वि. ओसाड; उजाड; बेचिराख. ॰आरामी-स्त्री. अवस्थता. 'हज्र- तांचे शरिरास दोन दिवस गैरआरामी] आहे.' -दिमरा २.३२. ॰इतबार-पु अविश्वास. 'तमाम फौजेस गैरइतबार जाहला.' -भाब ८०. ॰इमान-न. इमान नसणें; द्रोह; अनिष्ठा. 'आमचें गैरइमान असतें तरी आम्हीं आजपर्यंत येथें तुम्हापाशीं न ठरतों.' -भाब १११. ॰कबजी-वि. परस्वाधीन; गैरअमली पहा. 'सरं- जाम गैरकबजी, कांहीं सुटला त्यांत वस्ती नाहीं.' -ख २.९४२. ॰कायदा-वि. बेकायदेशीर; असनदशीरे. (इं.) इल्लीगल. ॰कायदा मंडळी-स्त्री. (कायदा) गुन्ह्याचें कृत्य करण्याच्या इराद्यानें पांच किंवा पांचाहून अधिक एकत्र जमलेले इसम. (इं.) अन्लॉफुल असेंब्ली. ॰किफायत-स्त्री. तोटा; नुकसान. 'किफायत, गैरकिफायत समयासमयास चित्तांत आणून किफा- यतीचीं कामें करीत आलां, पुढें त्याचप्रमाणें करावीं' -रा १. ३४६. ॰कौली-वि. परवाना किंवा अभयपत्र न दिलेलें; बिगर परवाना. -मराआ. ॰खर्च-पु. १ जादा, किरकोळ खर्चं. २ गैर- वाजवी, अयोग्य खर्च. ॰खुशी-षी-वि. नाकबूल; नाखूष; रुष्ट. 'खुषी किंवा गैरखुषी असा हा कौल बायकांशी ।' -पला १०४. ॰चलन-नी-वि. १ चालू नसलेलें (नाणें). २ (ल.) अव्यव- स्थित; बेशिस्त; अशिष्ट (वर्तन). ॰चलन-स्त्री. १ चलनाचा अभाव; चलन नसणें. २ (क्व.) गैर वर्तन; बदचाल. ॰चाकर- वि. बडतर्फ; माजूल. 'जखमी जाहले त्यांस गैरचाकर करून जागिरा तगीर करविल्या.' -जोरा ७५. ॰जप्त-वि. गैरअ- मल; गैरकबजी; परस्वाधीन. 'गैरजप्त देश साधावें.' -चित्रगुप्त ११०. ॰जबाब-पु. उद्धटपणाचें, अनादराचें उत्तर. ॰दस्त- स्ती-वि. सरकारसार्याची सूट असलेली (जमीन). ॰नफा- फायदा-पु. तोटा; नुकसान. 'येणेंकडून तुमचा गैरनफा जाहला.' -जोरा १४. 'अत्यंत वोढ केल्यास पाटीलबावांचा गैर फायदा आहे.' -जोरा ४७. ॰प्रकारचा-वि. १ इतर; भिन्न; दुसरा. २ चमत्कारिक; हास्यापद; तर्हेवाईक; विलक्षण. ॰बर्दार-वि. बहार नसलेला; फळहीन. 'पोकळी गैर-बर्दार, शेंडे वाळलेल्या आहेत.' -रा ११.७९. ॰मजुरा-क्रिवि. (हिशेब) मजुरा (वजा) टाकल्याशिवाय; वजावाट न करितां. [गैर + मजुरा-मुजरा] ॰मंजूर-वि. नामंजूर; रद्द. 'अप्टणांनीं जापले जागा वाजवी असतां गैरमंजूर करून एकपक्षी तह केला.' -रा १२.१२२. ॰मर्जी-स्त्री. अवकृपा; रुष्टता; इतराजी; नाराजी. ॰मसलत- मनसुबा-स्त्रीपु. मूर्खपणाचा, वेडगळपणाचा बेत, कट, योजना. ॰महसर्दार-वि. अप्रतिष्ठित. -रा ८.४३. [अर. मआसिर = थोरवी] ॰महसूल-पु. जुलमी करांपासून किंवा अन्याय्य मार्गानें काढलेला वसूल; योग्य सरकारसार्याविरहीत वसूल. 'विजा- पुराहून एक हवालदार गैरमहसूल पैदागिरी कबुल करून आला.' -इऐ ५.१००. ॰माकूल-मूर्ख; अडाणी; गैर; वाईट. 'कार्बारास खलेल करणें हें गैरमाकूल गोस्टी आहे.' -रा १८.३३. -क्रिवि. मूर्खपणें. 'लोक गैरमाकूल आम्हांस न कळत वर्तले तरी त्याची बद्लामी आपणावरी न ठेववी.' -रा ८.१०. ॰मान्य-वि. अमान्य; असमंत. ॰मार्ग-पु. गैरशिस्त आचार, रीत; दुराचरण. ॰माहीत-वि. १ अपरिचित; अनोळखी. २ अजाण; नेणता. 'साठे आहेत ते गैरमाहीत.' -ख ७.३५५१. ॰माहीतगार- वि. अज्ञानी; अडाणी. ॰मिराशी-वि. वंशपरंपरा मालकी नस- लेला. 'मातकदीम मिरासी खरी जाहली. काणव मजकूर गैर- मिरासी मुतालीक ऐसे जाहले.' -इऐ ५.१०२. ॰मेहनत- स्त्री. निरुद्योग. 'परंतु मेहनत, गैर-मेहनत सर्व एक ईश्वरी क्षोभानें वायां गेल्या.' -ऐ ५. ॰मेहेरबानी-स्त्री. अवकृपा; इतराजी. 'सांगितल्यावरून मनांत गैर मेहेरबानी न धरावी.' -रा ८. १०. ॰मोसम-हंगाम-पु. अवेळ. 'गैर मोसमांत (पौष वद्य १२ स) आंबे आले यावरून कौतुक वाटलें.' -रा २२.५. ॰रजावंद-वि. नाराज; नाकबूल. 'तो क्रियेस गैररजावंद जाहला.' -वाडशाछ १३२. [फा.] ॰रहा-रीत-स्त्री. बद- चाल; अयोग्य रीत; वाईट आचरण. -वि. बदचालीचा-सलु- काचा. 'भुजंगराव याची वर्तणूक गैररहा दिसते.' -ख ११. ५७७६. ॰राजी-वि. असंतुष्ट; नाराज. 'पाटसकर गैर-राजी जाले.' -रा ६.२६. ॰राबता-वि. १ बंदी; मनाई; खंड (मार्ग, मिळणें, येणें-जाणें, वहिवाट, चाल यांमध्यें). 'नाना फडणीस लष्करांतून आल्यापासून गैरराबता बहुत करूं लागले. कोणाचीच गांठ पडत नाहीं.' -ख ८.४१५१. २ वहिवाट, चाल यामध्यें अनभ्यास; अपरिचय; अवापर; वळण नसणें. ॰रास्त-वि. गैर- वाजवी; असत्य; खोटा. ॰रुजू-वि. १ गैरहजर. २ मंजूर किंवा दाखल किंवा मान्य न केलेले (हिशेब). ॰लायक वि. अयोग्य; नालायक; अनुचित. ॰वळण-न १ गैरराबता. 'त्या मार्गास सध्यां गैरवळण जाहे.' २ एकीकडे असणें; आडवळण; दळण- वळण नसणें. 'हा गांव गैरवळणांत पडला.' ३ गबाळ, वाईट लिखाण. ४ सरावांत नसणें; सवंय नसणें; निरुपयोग. ॰वाका- पु. खोटी किंवा बनावट गोष्ट; गैरसमजूत; लबाडी. 'ऐसा गैर- वाका सांगितला.' -रा ८.५२. -वि. वेडावांकडा -शर [फा. घैर्-वाकिअ] ॰वाजवी-वाजिवी-वि अयोग्य; अनुचित; फाजील; अन्याय्य. 'त्याचा अभिमान गैर-वाजवी याणीं नच- धरावा.' -रा १२.७९. [फा. घैर् + वाजिवी] ॰वाजवी दाब- पु. (कायदा) अयोग्य वजन. (इं.) अनड्यू इन्फ्लुअन्स. ॰वास्तविक-वि. खोटा; असत्य; वस्तुस्थितीस सोडून. ॰विलग-क्रिवि. आडबाजूस; आडवळणी. -वि. (विलगसाठीं चुकीनें योजलेला) न मिळणारा; न जुळणारा. ॰विल्हईस- विल्हेस-विल्हे- क्रिवि. आपल्या (योग्य) ठिकाणाच्या विरुद्ध जागी; भलतीकडे. ॰विल्हेस लागणें-पडणें-१ दुसरीकडे किंवा चुकीच्या ठिकाणी लागण; क्रमवार नसणें. २ योग्य ठिकाणाहून गहाळणें; गमावणें. ३ गोंधळ होणें, अव्यवस्थित असणें, ॰शर्ती- स्त्री. माफीजमीन म्हणून ठरविल्यानंतर जिला इतर दुसर्या कोणत्याही अटी पाळावयाच्या नसतात अशी जमीन. ॰शिस्त- वि. बेशिस्त; अव्यवस्थित; विना रीतभात; नियमबाह्य; असभ्य; फाजील (माणूस, वर्तन, भाषण). -स्त्री. बेशिस्तपणा; अव्यवस्थितपणा; अयोग्यपणा. अनियमितपणा. ॰शेरा- शरा-वि. धर्मशास्त्रविरहीत. 'काजीपासून गैरशेरा अमल होऊन आला.' -वाडसनदा १५- [अर.घैर् + शरअ = धर्मशास्त्र] ॰संधी- स्त्री. अवेळ; गैरमोसम; अवकाळ. ॰सनदी-वि. १ बेसनदशीर; बेकायदेशीर; सनदेनें अधिकृत नसलेलें. २ जादा मंजुरीशिवाय. 'गैर-सनदी खर्च करावयाची सरकारची आज्ञा नाहीं.' -ख ५. २३५३. ॰समजाविशी-स्त्री. (कायदा) गैरसमजूत; (इं.) मिस्रिप्रेझेंटेंशन. ॰समजूत-स्त्री. उलट, चुकीची समजूत; चूक. ॰सल्ला-सलाह-गैरमसलत पहा. 'हे कंपणी इंग्रजबहादूर यांचे सलाहानें अगर गैर सलाहानें ...' -रा २२.१२५. ॰साल-वि. अनिश्चित वेळेचा; वर्ष नमूद नसलेला. 'गुणनवरे यांनी कागद एक काढिला, तो बहुतां दिवसांचा, गैर-साल ।' -रा ६.८९. ॰सावध-वि. १ बेसावध; गाफील. २ बेशुद्ध; मूर्छित. ॰साळ- वि. १ खोटसाळ; सरकारी टांकसाळींतून न पाडलेलें. इतर ठिकाणाचें म्हणजे हिणकस, कमी किंमतीचें (नाणें). 'गैरसाळ तामगिरी । कोणी नवी मुद्रा करी ।' -दा १०.८.१४. (त्यावरून) खोटा; बनावट; लबाडीचा. २ (ल.) बेशिस्त; अनभ्यासी; गांवढळ; अडाणी; (माणूस); अयोग्य; अनुचित (वर्तन). ३ अशिष्ट; अडाणी; हलका; राकट; बेडौल; गावठी इ॰ ॰सोई-य-स्त्री. अडचण; त्रास; हाल; अप्रशस्तता. ॰सोईचा-वि. अडचणीचा; सोईचा, सुखकर नसलेला. ॰हंगाम-पु. गैरमोसम पहा. 'त्यास गैरहंगाम, हल्ली खरबुजीं तयार मिळालीं ते आठ सेवसी पाठ- विलि असेत.' -रा ३.३१२. ॰ह(हा)जीर-वि. मोजदादीच्या वेळीं समक्ष नसलेला; अविद्यमान; अनुपस्थित. [फा.] ॰हिसा (शे)बी-स्त्री. अन्याय; अव्यस्थितपणा. -क्रिवि. अन्यायानें. 'आपले जागिरींत नाहक गैरहिसाबी पादशाह खलल करवि- ताती ।' -इमं ६७. ॰हुकुमा-वि. अनधिकृत; संमति, आज्ञा नसलेले; नामंजूर. ॰हुर्मत-स्त्री. अप्रतिष्ठा; बेअब्रू.
नांव
न. १ नाम अर्थ १, २ पहा. 'नांव तुजें नावचि या संसारांभोधिला तरायासी ।' -भक्तमयूरकेका ४०. २ (ल.) कीर्ति; ख्याती; लौकिक; पत; अब्रू; चांगलें नाम. 'सकल म्हणती नांव राखिले । वडिलांचे ।' -दा ३.४.१४. ३ दुर्लौकिक; डाग; कलंक; बदनामी; दुष्कीर्ति; नापत; (क्रि॰ ठेवणें). ४ भांड्यावर नांव घाल- ण्याचें कासारी हत्यार. -बदलापूर ९६. ५ नवरा बायकोनें उखाणा घालून घ्यावयाचें परस्परांचें नांव (क्रि॰ घेणें). [सं. नाम; हिं. नाओं; जुनें हिं. नाऊं; पं. सिं. नाउं; फ्रेंजि. नव; इं. नेम] (वाप्र.) ॰करणें-कीर्ति गाजविणें. ॰काढणें-नांव गाजविणें; प्रसिद्धीस येणें. ॰काढणें-कुरापत काढणें; कळ लावणें. ॰खारणें- उक्रि. (कों.) नांव घेऊन निर्देश करणें; नांवाचा उल्लेख करणें; नांव घेणें. ॰गांव विचारणें-माहिती विचारणें; सामान्य विचारपूस करणें. ॰जळो-भाजो-नांवास हळद लागो-तळतळाट किंवा शाप देण्याचा वाक्प्रचार. ॰ठेवणें व फोडणें-(बायकी) खेळांत एखाद्या वेळीं दोन मुलींस एकदम शिवल्याचा प्रसंग येतो तेव्हां डाव कोणी घ्यावा ह्याविषयीं तंटा होतो त्यावेळीं त्या दोन्ही मुली एकमेकांच्या संमतीनें नांवें बदलून ठेवतात, मग त्यांतील एखाद्या मुलीस आपलीं नांवें सांगून तीं त्यांतील कुठलें नांव मागेल तें तिला देऊन उरलेल्या नांवाच्या मुलीनें डाव घ्यावयाचा असतो. ॰ठेवणें-१ दोष देणें; व्यंग काढणें. म्ह॰ नांव ठेवी लोकाला शेंबूड आपल्या नाकाला = दुसर्याला ज्या दोषाबद्दल नांवें ठेवावयाचीं तोच स्वतांत असणें. २ जन्मलेल्या मुलाचें नामकरण करणें; ॰डहाळ होणें-(ना.) बदनामी होणें. ॰डाहार करणें-(व.) नांव बद्दू करणें. ॰डालणें-(परदेशी तेली) प्रेताच्या सारवलेल्या जागेवर केळीचें पान ठेवून त्यावर प्रत्येक मनुष्यानें मयताचें नांव घेऊन कालवलेल्या भाताचा घांस ठेवणें. -बदलापूर २६७. ॰धुळींत, मातींत, पाण्यांत इ॰ जाणें, मिळणें, पडणें-नांवावर पाणी घालणें पहा. ॰नको-तिटकारा, चिळस, द्वेष दाखविणारा शब्द. ॰न घेणें-अलिप्त राहणें; अंगांस संसर्ग न लागू देणें; दूर राहणें; नांव न काढणें. ॰नाहीं-नसणें-(विद्या, पैसा इ॰कांचा) पूर्णपणें अभाव असणें; नांव, निशाण, खूण कांहीं नसणें. बदलणें-नामोशी पत्करणें (प्रतिज्ञेच्या वेळीं योजतात). 'अमूक झालें तर नांव बदलून टाकीन.' ॰मिळविणें-वाद- विवाद, लढाई इ॰ मध्यें कीर्ति मिळविणें. ॰सांगणें-लावणें- घालणें-देणें-किंमत, शर्ती ठरविणें. ॰सांगणी-वाङ्निश्चयः कुणब्यांतील वधुवरांचीं व त्यांच्या मात्यापित्यांचीं नांवें जातीच्या सभेमध्यें जाहीर करून लग्न ठरविण्याचा समारंभ. ॰सोडणें- टाकणें-त्याग करणें; संबंध सोडणें; इच्छा न करणें. नांवाचा- १ खरा. 'मी तें काम करीन तरच नांवाचा.' २ नामधारी; केवळ नांवापुरता. 'मी जॉन्सनचा नांवाचा मात्र गुरु होतों, खरोखर पहातां तो माझ्याहून वरचढ होता.' -नि ३ चांगलें नांव लौकिक असलेला. नांवाची बोंब पडणें-वाईट गोष्टीला कारणीभूत होणें किंवा एखाद्या तक्रारीचा विषय होऊन बसणें. नांवानें घागर फोडणें-संबंध तोडणें; मेला असें समजणें. 'तियेचेनि नांवें फोडावी घागरी । नाहीं ते संसारी बहिणी म्हणे ।' -ब ४७० नांवानें पाणी तावणें, तापविणें-एखाद्याचा द्वेष करणें, किंवा मरण चिंतणें. नांवानें पूज्य असणें-पूर्ण अभाव असणें. 'विद्येच्या नांवानें जरी आवळ्या एवढें (पूज्य) म्हणतां येणार नांहीं तरी मासला तोच ।' -मधलीस्थिति. नांवानें बोंब मारणें, शंख करणें, खडे फोडणें-एखाद्या विरुद्ध बोभाटा, ओरड करणें. नांवानें भंडार उधळणें-स्तुति करणें. नांवानें शंख-पूर्ण अभाव असणें. नांवानें हांका मारीत बसणें-दुसर्यानें नुक- सान केलें अशी विनाकारण ओरड करीत सुटणें. नांवावर-१ नांवासाठीं-करितां-मुळें-खातर. २ (जमाखर्च) खात्यावर; नांवें. नांवावर गोवर्या फोडणें-घालणें-रचणें-एखाद्याचें वाईट करणें-चिंतणें; शाप देणें (गोवर्या प्रेतास जाळण्यास लागतात). नांवावर पाणी घालणें-कीर्तीवर पाणी सोडणें; चांगलें नांव, लौकिक बुडविणें. नांवावर विकणें-स्वतःच्या नुस्त्या किंवा दुसर्या-मोठ्याच्या नांवाचा फायदा घेणें, त्यावर नांव, प्रसिद्धि मिळविणें; खपणें. नांवास चढणें-कीर्तिमान होणें; लौकिक वाढणें. नांवास देखील नाहीं-शपथेस किंवा नांव घेण्यास देखील नाहीं. याच्या अगोदर 'ज्याचें नांव' हे शब्द जोडतात म्हणजे त्याचा अर्थ अगदीं मुळींच नाहीं असा होतो. 'यंदा पाऊस ज्यानें नांव पडला नाहीं.' ज्याचें नांव तें-(नांव घेण्यास अयोग्य अथवा अमंगल म्हणून ज्याचें नांव घेतलें नाहीं तो अथवा तें) जें पाहिजे असतें अथवा ज्याची आशा केलेली असते तें कधीं न देणार्या, करणार्या मनुष्य-वस्तू इ॰ संबंधीं योजतात. सामाशब्द- ॰कर-री-वि. १ कीर्तिमान; प्रसिद्ध; नावलौकि- काचा. 'वडिल नांवकर मल्हार ऐका गर्दी झाली त्यावरती ।' -ऐपो ३५८. २ दुसर्याचें नांव धारण करणारा; एकाच नांवाचा दुसरा नामधारी. ॰कुल-वि. (ना.) सगळा; एकूण एक. ॰ग्रहण-न. नांव घेणें; उल्लेख करणें; नामनिर्देश (क्रि॰ करणें; घेणें; काढणें). ॰ग्रहण टाकणें-सोडणें-नांव टाकणें पहा. ॰ग्रहण ठाऊक नसणें-नांवा गांवाची कांहींहि माहिती नसणें. ॰धारक-वि. नामधारक अर्थ २ पहा. ॰नट-वि. क्रिवि. पूर्णपणें नष्ट झालेला; बेचिराख झालेला; थांग, पत्ता, माग, खुण, अवशेष नसलेला. 'त्याची गाय गुराख्यानें नांवनट केली.' [नांव + नष्ट] ॰नांगर-पु. पेरणीच्या वेळीं प्रथम नांगर धरण्याचा व निवाड- पत्रांत निशाण्या करतांना प्रथम नांगराची निशाणी करण्याचा पाटील अथवा देशमूख यांचा मान. ॰नांव-वि. (ना.) नावकुल पहा. सबंध सगळा. ॰निशाण-न. सर्व वृत्तांत (कुल, नांव, गांव इ॰). ॰निशाण ठाऊक असणें-कुलशील परंपरा ठाऊक असणें. ॰निशी-स्त्री. १ नांवांची यादी. २ तींत दाखल केलेलें नांव. 'माझी नांवनिशी काढ' [नांव + फा. नविशी] ॰निशीवार- क्रिवि. नांवा बरहुकूम; नांवनिशींतील नांवांच्या अनुक्रमानें. (क्रि॰ घेणें; मागणें). ॰नेम-१ (फलज्यो.) नांवावरून राशी, गण, नक्षत्र इ॰कांची माहिती काढणें. २ अशी काढलेली माहिती. ॰बुडव्या-वि. स्वतःचा लौकिक, पत, किंमत घालविणारा (मनुष्य वस्तु). ॰र(रा)स-स्त्री. १ (फलज्यो.) जन्मकालीन नक्षत्राव- रून नांव ठेवणें किंवा व्यावहारिक नांवावरून नक्षत्रनाम काढणें. 'मग बोलाविले ज्योतिषी । भूमी पाहिली चौरासी । तव दक्षा- चिया नावरासी । घातचंद्र ।' -कथा ३.१०.९९. २ अशा तर्हेनें काढलेलें नांव, कुंडली इ॰ (क्रि॰ काढणें). ३ जन्मनक्षत्रावरून पहावयाचें वधूवरांचें राशी घटित; नांवावरून लग्न जमविणें. (क्रि॰ काढणें; पाहणें; ठरविणें). ॰राशीस येणें, उतरणें, जमणें- मिळणें-नांवांवरून वधूवरांचा घटित विचार केला असतां अनुकूलता येणें, कुंडलींवरून लग्न जमणे. [नांव + राशि] ॰रूपन. १ कीर्ति; अब्रू; पत. नांव अर्थ २ पहा. 'त्यानें त्या लढाईमध्यें नांवरूप मिळविलें.' 'माझें लपो असतेपण । नांवरूपाशीं पडो खंडन ।' २ सार्थक; योग्यस्थानीं विनियोग. 'विद्वानास पुस्तक दिलें असतां त्याचें नांवरूप होतें.' ३ नांव आणि आकार; व्यक्तित्व; स्वतंत्र, वेगळें अस्तित्व. 'जैसें समुद्रास मिळतां गंगेचें आप । तात्काळ निरसे नांवरूप ।' नांवलौकिक-पु. प्रसिद्धिः मोठेपणा; कीर्ति; ख्याति. ॰वार-क्रिवि. नांवाबरहुकूम; नांवनिशीवार पहा. ॰सकी-स्त्री. (कु) लौकिक; कीर्ति; प्रसिद्धि. ॰सता-वि. (कु.) प्रसिद्ध; नांवाजलेला; कीर्तीचा (चांगल्या व वाईट अशा दोन्ही अर्थीं योजतात). नांवानिराळा-वि. अलिप्त; अलग (वाईट नांवापासून); स्वतंत्र; विरहित. 'हा सर्व करून नांवानिराळा.' नांवारूपास आणणें-येणें-प्रसिद्धीस-मान्यतेस आणणें- येणें. नांवें-(जमाखर्च) खर्चाची बाजू; नांवानें; खर्चीं; खर्चाकडे. नांवावर पहा.