मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

बेळा

बेळा bēḷā m A kind of rice.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. (बे.) लांकूड साफ अगर गुळगुळीत करण्याचा लहान रंधा.

दाते शब्दकोश

पु. तांदुळाची एक जात.

दाते शब्दकोश

बेला

बेला bēlā m ( H) A cocoanut hollowed to serve as a vessel. बेल्यांत मडक्या भरणें To make a tumult and fuss; to turn the house out of windows.

मोल्सवर्थ शब्दकोश

बेला m A cocoanut hollowed to serve as a vessel.

वझे शब्दकोश

पु. गोळा. 'उन्हाळ्यांत चिंचेचे बेले करून वाळ- वून ठेवावेत.'

दाते शब्दकोश

पु. नारळ, बेलफळ इ॰ आंतून कोरून तयार केलेलें पात्रं; डहू. [हिं.] बेल्यांत मडक्या भरणें-(ल.) गोंधळ करणें; गडबड करणें; धुमाकूळ घालणें.

दाते शब्दकोश

बेला, बैला, पेला

पु. १ (कों.) ओझें उचलण्यासाठीं एका काठीच्या मध्यावर बसविलेली एक लहान चौकट असलेलें साधन. २ अशा साधनानें एका मनुष्याला पेलेल, वाहून नेतां येईल इतकें ओझें, (विशेषत:) कांटीचा भारा.

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

बैला, बैली

पुस्त्री. १ डोकीवरून ओझें नेतांना तें समतोल राखण्याचें एक लांकडी साधन. एक लांब दांड्याच्या मध्यभागीं एक खुंटी आणि जाळी असते, जाळींत ओझें ठेवतात. हा दांडा हातांत धरतां येतो व त्यामुळें ओझें डोक्यावरून उचलतां येतें व जमिनीवरहि सहज उतरितां येतें. बेला पहा. २ सुताच्या ताण्यास पाजण करतेवेळीं सूत खळ लावणार्‍याच्या छातीइतक्या उंचीवर लांबबर ताणले जाण्यास सुताच्या दोन्ही बाजूस दोन उभ्या कर- तात त्या चौकटी; खळ लावलेलीं ताण्याचीं सुतें ताणलेल्या स्थितींत ठेवण्याचे जे दोन घोडे ते प्रत्येक, हे घोडे दोन काठ्या गुणिले- चिन्हाच्या (x) आकारांत मध्यावर बांधून त्यांच्या वरच्या शेवटास एक आडवी काठी बांधून केलेले असतात. ३ तिफणीची दोरी.

दाते शब्दकोश

बैठा

पु. लांकूड साफ करण्याचा रंधा; बेळा.

दाते शब्दकोश

बेलें

न. बेला; भांडयाप्रमाणे उपयोगी पडणारा, गुडगुडीच्या उपयोगी पडणारा पोखरलेला नारळ; डहू.

दाते शब्दकोश

न. राजे इ॰बडे लोक बाहेर निघाले म्हणजे धर्म कर- ण्याकरतां जो पैसा, पैशाची पिशवी बरोबर घेतात ती. [फा. बेला] ॰बरदार-पु. वरील बेलें (पैसा किंवा त्याची पिशवी) जवळ बाळगणारा मनुष्य. [फा.]

दाते शब्दकोश

बेलें bēlēṃ n ( P) A bag of money or money which Rajas &c. carry in their train to scatter amongst the people. 2 (Or बेला) A cocoanut hollowed to serve as a vessel.

मोल्सवर्थ शब्दकोश

बेलका

बेलका bēlakā m W बेलकें n W (बेला) A cocoanut hollowed to serve as a vessel.

मोल्सवर्थ शब्दकोश

बेलका-कें

पुन. (कु.) हळद, कुंकू इ॰ पदार्थ ठेवण्यास उपयोगी पडणारा पोखरलेला नारळ; बेलें; बेला.

दाते शब्दकोश

दैत्यवेळ

स्त्री. तिनीसांजा. -श्याआ. [सं. दैत्य + बेला]

दाते शब्दकोश

करमल-ळ

न. १ कमरक; करमर; एक आंबट फळें येणारें झाड व त्याचें फळ. लॅ. अ/?/व्हरोआ कॅरमबोला. २ कर- बेला; एक मोठें झाड; याचीं पानें मोठीं व लांबट असतात. लॅ. डिलेनिआ पेंटाजिनिआ.

दाते शब्दकोश