मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

बोहणी or नी

बोहणी or नी bōhaṇī or nī f (भवानी, because ascribed to her auspices, through H) The first sale of goods occurring after the dawning of the day. It is usually for ready money; and the luck of the day is viewed as determined by it. Ex. शेर तांदूळ सारुके सजगणी ॥ इतकीच रोख जाली बो0 ॥. बोहणीचे प्रहरीं or पाहरीं At the hour of बोहणी; in the early morning.

मोल्सवर्थ शब्दकोश

खरतड बोहणी      

लाभदायक बोहणी. (ना.) खरतर      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

बोहणी

स्त्री० भवानी, विक्रीचा आरंभ.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

संबंधित शब्द

बोहणी-नी, भवानी

स्त्री. १ दुकानदारानें सकाळीं दुकान उघडल्यावर होणारी पहिली विक्री. ही बहुधा रोखीची करतात, व तिच्यावरून लाभ-हानि समजते. 'शेर तांदूळ सारुके सजगणी । इतकीच रोख जाली बोहणी ।' २ (ल.) आरंभ; सुरवात. 'बोह- णियेसीचि येवढें । भारी जेथ ।' -ज्ञा १८.७८४. ३ लाभ. 'पावे सद्गति बोहणीसचि तया ज्ञानामृतें बोहणी ।' -मृगीचरित्र १. [सं. भवानी का. बोणी] ॰चे प्रहरीं-पाहरीं-पारीं-बोहणीचे वेळीं; सकळीं.

दाते शब्दकोश

खरतड

वि. १ खडतर पहा. २ स्पष्ट; निर्भीड. ॰बोहणी- स्त्री. (ना.) लाभदायक बोहणी.

दाते शब्दकोश

भोवनी

स्त्री. १ आरंभ; सुरुवात बोहणी पहा. २ चिन्ह; शकुन. 'लाभ अथवा हानी । थोड्यामध्येंचि भोवनी ।' -तुगा ३३५३. [भवानी]

दाते शब्दकोश

भवानी

भवानी bhavānī f (S) The goddess Párvatí in her pacific form. Pr. सवा रुपयाची भ0 सोळा रुपयांचा गोंधळ. 2 See बोहणी.

मोल्सवर्थ शब्दकोश

स्त्री. १ सौम्य रूप धारण केलेली पार्वती देवी 'देउनि विजय-वर असा झाली अन्तर्हिता भवानी ती ।' -मोभीष्म १.५०. २ बोहणी पहा. [सं.] म्ह॰ सवा रुपयाची भवानी व सोळा रुपयांचा गोंधळ. ॰कवडी-स्त्री. सामान्य कवडी. दही- कवडी, सगुणी कवडी व भवानी कवडी अशा कवडीच्या तीन जाती आहेत.

दाते शब्दकोश

नाट

पु. न. १ अडथळा, अपशकुन करणें; हटक; प्रतिकूलता; नड; अडचण. 'आजचा दिवस नाट लागला.' 'मुळींच भेटलासी आतां । नाट लागलें संचिता ।' -तुगा १२८. २ दुर्दैव; अभाग्य; अननुकूलता; एखादी बिघडविणारी, नासणारी, अपकारक, अड- थळा आणणारी, इजा इ॰ करणारी अशी योजना, शक्ति. 'आज काम व्हावयाचें परंतु आज काय नाट लागलें तें समजेना.' -वि. अमंगल; अशुभ; अननुकूल; आडफाट्या; नुकसानकारक (वेळ, मुद्दा इ॰). [सं. नष्ट; प्रा. णट्ठ] ॰भाजणें-जाळणें-अमंगलता, अननुकूलता काढून टाकणें, तिचा नाश करणें. म्हणजेच बोहणी करणें; एखादी गोष्ट हिंमत बांधून छातीनें करणें. ॰बाट-पु. १ कमनशिबाची गोष्ट, अपराध, दोष, काळिमा, डाग, उणीव इ॰ बद्दल व्यापक शब्द. (क्रि॰ असणें; पडणें; भाजणें; जाळणें). २ आढळून आलेला दोष, अपराध; लावलेला बोल, डाग किंवा कळिमा; कलंक. (क्रि॰ आणणें; ठेवणें; येणें; पडणें). [नाट + बाट] नाटलाबाटला-वि. बाट लागलेला; बहिष्कृत; कलंकित. 'पंचां- पुढें येणार्‍या बखेड्यांत नाटल्याबाटल्यांच्या खटल्यांची संख्या जास्त याचें कारण जातिभेद.' -गांगा ३२.

दाते शब्दकोश

नाट n A play with cowries; the cowries (usually five); the cross-lines drawn; the board on which the game is played. Evil fortune; unpropitiousness or unluckiness. नाट भाजणें or जाळणें (To burn the ill-luck.) To destroy or remove inauspiciousness or unpropitiousness; i. e. to make बोहणी or the first morning sale at all costs; or to do any thing daringly and desperately.

वझे शब्दकोश

नाट nāṭa n A play with cowries: also the cowries (usually five): also the cross-lines drawn: also the board on which the game is played. 2 Evil fortune; unpropitiousness or unluckiness; some marring, blasting, mischievous power (conceived as the author of a hinderance or an injury). v लाग, लाव. Ex. आज कार्य व्हायाचें परंतु आज काय नाट लागलें तें समजेना. नाट भाजणें or जाळणें (To burn the ill-luck.) To destroy or remove inauspiciousness or unpropitiousness: i. e. to make बोहणी or the first morningsale at all costs; or to do anything daringly and desperately.

मोल्सवर्थ शब्दकोश

ठाकठोक

क्रिवि. १ हातोड्यानें ठोकलें असतां निघणार्‍या आवाजाप्रमाणें आवाज होऊन. २ -वि. रोख; प्रत्यक्ष; तत्काळ. 'ठाकठोक माझी प्राप्ति । पंगिस्त न होती आणिकांचे ।' -एभा १२.४० [ठोक] म्ह॰ ठाकठोक बोहणी रोख.

दाते शब्दकोश

ठाकठोक ṭhākaṭhōka ad Imit. of the sound of reiterated strokes of a hammer &c. Pr. ठा0 बोहणी रोख.

मोल्सवर्थ शब्दकोश